Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

दैनिक सनातन प्रभातचे नूतन संकेतस्थळ : www.SanatanPrabhat.Org

दैनिक सनातन प्रभातचे नूतन संकेतस्थळ : www.SanatanPrabhat.Org

     भगवान श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या कृपाशीर्वादाने २५ डिसेंबर २०१६ या दिवशी दैनिक सनातन प्रभातच्या नूतन संकेतस्थळाचा शुभारंभ झाला. त्यामुळे आता या ब्लॉगएेवजी सदर संकेतस्थळावर आपल्याला हिंदु्त्व, राष्ट्र-धर्म, अध्यात्म, साधना इत्यादी विषयांवरील दैनिकाचा मजकूर वाचावयास मिळेल. आम्हाला सदैव सहकार्य करणार्या सर्व वाचक, विज्ञापनदाते अाणि हितचिंतक यांचे आम्ही आभारी आहोत.

(लिंक : www.SanatanPrabhat.Org)

कोटी कोटी प्रणाम !

सनातनचे १३ वे संत पू. महादेव नकातेकाका यांचा आज वाढदिवस

कोटी कोटी प्रणाम !

स्वामी स्वरूपानंद (पावस) यांची आज जयंती

मशिदींवरील अनधिकृत भोंग्यावर कारवाई नाही ! - सरकारचे उच्च न्यायालयात शपथपत्र

अनधिकृत भोंग्यांवर कारवाई न होणे, हे सरकारला लज्जास्पद आहे ! ही स्थिती पालटण्यासाठी
हिंदु राष्ट्रच हवे ! अनधिकृत भोंग्यांवर कारवाई न करणार्‍या उत्तदायींवर शासनाने कठोर कारवाई केली पाहीजे.
     मुंबई - नवरात्र, गणेशोत्सव आदी उत्सव ठराविक कालावधीकरिता असतात; मात्र मशिदींवरील भोंगे वर्षाचे १२ महिने सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या आदेशांचे प्रतिदिन उल्लंघन करतात, तरीही त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली गेलेली नाही, अशी माहिती सरकारने मुंबई उच्च न्यायालयास सादर केलेल्या शपथपत्रात २३ डिसेंबरला दिली. ख्रिसमस आणि ३१ डिसेंबर या दिवशी होणार्‍या कार्यक्रमांच्या आवाजाची पातळी तपासण्यासाठी उपलब्ध डेसीबल मीटर्स वापरले जातील. आवाजाच्या पातळीचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई करू, असेही सरकारच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांच्या विरोधातील संतोष पाचलग यांची याचिका आणि या संदर्भातील तीन अवमान याचिका यांची एकत्रित सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात झाली. याप्रसंगी शासनाच्या वतीने त्यांच्या अधिवक्त्यांनी म्हणणे मांडले.

राम मंदिर बांधा आणि त्याचे श्रेय घ्या ! - उद्धव ठाकरे

     मुंबई - स्थानकाच्या नावाचे श्रेय कसले घेता ? अयोध्येत राममंदिर बांधा आणि त्याचे श्रेय घ्या. त्याला मी हिंमत म्हणेन, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला उद्देशून सांगितले. मुंबईतील पश्‍चिम रेल्वेवरील राम मंदिर रेल्वेस्थानकाचे उद्घाटन २२ डिसेंबरला झाले. त्या पार्श्‍वभूमीवर श्री. ठाकरे यांनी हे विधान केले.

संस्कृत भाषेचे आध्यात्मिक स्तरावरील महत्त्व आधुनिक वैज्ञानिक संशोधनाद्वारे सिद्ध करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी लिहिलेला शोधनिबंध सादर !

शोधनिबंध सादर करतांना सौ. क्षिप्रा जुवेकर
देहलीतील जेएन्यू विश्‍वविद्यालयातील आंतरराष्ट्रीय वेद परिषदेत महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचा सहभाग
      नवी देहली - येथील जवाहरलाल नेहरू विश्‍वविद्यालयामध्ये (जेएन्यूमध्ये) १५ ते १८ डिसेंबर या कालावधीत वेद अ‍ॅज ग्लोबल हेरिटेज : सायंटिफिक पर्सपेक्टीव्ह (वेद एक वैश्‍विक वारसा : वैज्ञानिक दृष्टीकोन) या विषयावरील आंतरराष्ट्रीय वेद परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यात ८५ शोधनिबंध सादर करण्यात आले. ७ विदेशी संशोधकांसह, वैज्ञानिक आणि विद्वान यांनी यात सहभाग घेतला. महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचा सटल इफेक्ट ऑफ संस्कृत टेक्स्ट अ‍ॅण्ड स्क्रिप्ट कम्पेर्ड टू अदर लँग्वेजेस (संस्कृत भाषा आणि (देवनागरी) लिपी यांचा अन्य भाषांच्या तुलनेत सूक्ष्मस्तरावर होणारा परिणाम) हा शोधनिबंध सौ. क्षिप्रा जुवेकर यांनी उपस्थितांसमोर मांडला. या वेळी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे श्री. प्रणव मणेरीकर हेही उपस्थित होते.

जागतिक प्रसारमाध्यमांकडून भारतातील नोटाबंदीनंतरच्या परिस्थितीवर टीका !

 • पाश्‍चात्त्यांचा भारतद्वेष पुन्हा एकदा उघड !
 • भारत शासनाने कुठलाही राष्ट्रहिताशी निगडित कठोर निर्णय घेतल्यावर पाश्‍चात्त्य प्रसारमाध्यमांच्या पोटात का दुखते ? ‘भारतात भ्रष्टाचार बोकाळला आहे’, असे सांगून थयथयाट करणार्‍या या प्रसारमाध्यांना भारताने भ्रष्टाचाराच्या विरोधात पावले उचलल्यावर हा निर्णय रूचत नाही, हे लक्षात घ्या ! भारत शासनाने महासत्ता होण्याच्या दृष्टीने प्रवास करतांना त्यात अडसर असणार्‍या पाश्‍चात्त्य प्रसारमाध्यमांनाही वठणीवर आणण्यासाठी कृती करावी, ही अपेक्षा ! 
नवी देहली - न्यूयॉर्क टाइम्स, बीबीसी, अल जझीरा अशा प्रसिद्ध जागतिक प्रसारमाध्यमांनी भारत शासनाने घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे देशात अभूतपूर्व गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्याचे म्हटले आहे. (एवढ्या मोठ्या प्रमाणात निर्णय घेतल्यावर गोंधळ उडणे सहाजिकच आहे. हा गोंधळ व्हेनेझुएलाएवढा तीव्र नव्हता. असे असतांनाही या गोंधळाचा पाश्‍चात्त्य प्रसारमाध्यमांकडून बाऊ का केला जात आहे ? - संपादक) नोटा पालटून घेण्यासाठी लोक बँकांमध्ये मोठ्या प्रमाणावर रांगा लावत आहेत, असे न्यूयॉर्क टाइम्सने म्हटले आहे. तर नोटाबंदीमुळे सर्वसामान्य आणि गोरगरीब नागरिक यांचे कसे हाल होत आहेत, याचा आढावा बीबीसीने घेतला आहे. गरीब आणि मध्यमवर्ग यांना यामुळे फटका बसत आहे; तसेच काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी घेण्यात आलेल्या निर्णयामुळे निर्माण झालेल्या गोंधळाविषयीही बीबीसीने वृत्त प्रसारित केले आहे. (हे वृत्त प्रसारित करतांना लोकांनी ‘आम्हाला त्रास होत असला, तरी आम्ही नरेंद्र मोदी यांच्या निर्णयाचे समर्थन करतो’, अशा आशयाच्या प्रतिक्रिया का नाही छापल्या ? एकांगी वृत्ते प्रसारित करणार्‍या पाश्‍चात्त्य प्रसारमाध्यमांचा भारतद्वेष यातून दिसून येतो ! - संपादक)

पाकमध्ये मुलांसह नाच केल्यामुळे ५ मुलींची अमानुष हत्या !

 • ६ वर्षांपूर्वीची घटना आली समोर
 • ‘भारतात असहिष्णुता आहे’, असे वाटणार्‍या धर्मनिरपेक्षतावाद्यांनी 
  असहिष्णुता काय असते, हे पाकमधून शिकावे !
   इस्लामाबाद -
पाकमध्ये कोहिस्तान जिल्ह्यातील बाजीगा, सारीन जान, बेगम जान, अमिना आणि शाहीन या ५ मुली नारंगी रंगाचा स्कार्फ घालून मुलांसह नाच करतांनाची एक ध्वनीचित्रफीत प्रसारित झाली होती. ही ध्वनीचित्रफीत पाहिल्यानंतर गावातील कुळ पंचायतीने मुलांसह नृत्य करणे पाप असल्याचे सांगत मुलींना ठार करण्याचा आदेश त्यांच्या कुटुंबियांना दिले. पंचायतीच्या आदेशाप्रमाणे कुटुंबियांनी मुलींच्या अंगावर गरम पाणी आणि गरम कोळसे टाकून त्यांची निर्घृण पद्धतीने हत्या केली. या ध्वनीचित्रफितीमध्ये पाचही मुली मुलांसह नृत्य करतांना, हसतांना, गाण्यावर टाळ्या वाजवतांना दिसत होत्या. ही ६ वर्षांपूर्वीची घटना अलीकडेच समोर आली आहे.

मुसलमान विद्यार्थिनींना स्कार्फ देण्याचा मुंबई महानगरपालिकेचा निर्णय हिंदूंच्या कराच्या पैशांतून अल्पसंख्यांकांना सुविधा देणारे प्रशासन !

अल्पसंख्यांकांचे लाड पुरवणे थांबवले जाण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !
      मुंबई, २४ डिसेंबर - मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी २७ प्रकारच्या शैक्षणिक वस्तू विनामूल्य पुरवल्या जातात. या वर्षीपासून उर्दू शाळेतील इयत्ता ६ वी ते १० वीच्या विद्यार्थिनींना डोक्याला बांधण्यासाठी स्कार्फ देण्याचा निर्णय पालिका प्रशासनाच्या वतीने घेतला जाणार आहे. (स्कार्फ ही शैक्षणिक वस्तू आहे, हा जावईशोध महापालिकेने केव्हा लावला ? - संपादक) मुंबईमध्ये उर्दू माध्यमाच्या एकूण ३०० शाळा आहेत. त्यात अनुमाने एक लक्ष विद्यार्थी शिक्षण घेतात. मुसलमान पंथानुसार ठराविक वयानंतर डोक्यावर स्कार्फ किंवा हिजाब बांधणे बंधनकारक असते. त्यामुळे महापालिकेने मुसलमान मुलींना स्कार्फ पुरवावा, अशी मागणी करण्यात आली होती. (आज स्कार्फ देणारे उद्या नमाज पढण्यासाठी शाळेची जागाही देतील. महापालिका प्रशासन तीही पुरवणार आहे का ? - संपादक) या मागणीचा विचार करून प्रशासनाने या प्रकरणी लक्ष घालावे, असे निर्देश स्थायी समितीचे अध्यक्ष यशोधर फणसे यांनी दिले आहेत.

सनातन संस्थेची अपकीर्ती केल्याच्या प्रकरणी दैनिक बंगलोर मिररच्या विरोधात सनातनचा हानीभरपाईचा दिवाणी दावा न्यायालयात दाखल !

     फोंडा (गोवा), २४ डिसेंबर (वार्ता.) - सनातन संस्थेचा समाजात असलेला नावलौकिक माहिती असतांना तिची मानहानी करण्याच्या हेतूने कर्नाटक राज्यातील बंगलोर येथून प्रसिद्ध होणारे इंग्रजी दैनिक बंगलोर मिररचे संपादक बी. महेश यांनी कॉल देम सनातनीक वर्सेस या मथळ्याखाली सनातन संस्थेच्या विरोधात खोडसाळ आणि मानहानीकारक लेख दैनिक बंगलोर मिररच्या ३१ ऑगस्ट २०१६ या दिवशीच्या अंकात प्रसिद्ध केला आहे. यामुळे संस्थेची अपरिमित हानी झाली; म्हणून सनातन संस्थेचे व्यवस्थापकीय विश्‍वस्त श्री. वीरेंद्र मराठे यांनी हिंदु विधीज्ञ परिषदेच्या अधिवक्त्या कु. दीपा तिवाडी, अधिवक्ता गजानन नाईक आणि सनातन संस्थेचे मानद कायदेविषयक सल्लागार अधिवक्ता श्री. रामदास केसरकर यांच्यामार्फत दैनिक बंगलोर मिररचे संपादक बी. महेश, मालक बेनेट कोलोमन अ‍ॅण्ड कंपनी लि., मुद्रक आणि प्रकाशक आर्.जे. प्रकाशन् यांच्या विरोधात फोंडा, गोवा येथील दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) यांच्या न्यायालयात मानहानी भरपाईपोटी १० कोटी रुपयांच्या मागणीचा दिवाणी दावा दाखल केला आहे.

नागालॅण्डचे राज्यपाल पद्मनाभ आचार्य यांची सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांनी घेतली सदिच्छा भेट !

मध्यभागी राज्यपाल श्री. पद्मनाभ आचार्य, त्यांच्या डावीकडे
श्री. भरत प्रभू आणि श्री. प्रभाकर पडियार आणि उजवीकडे श्री. रमानंद गौडा आणि श्री. अनंत कामत
नागालॅण्डमध्ये प्रसारकार्य करण्यासाठी राज्यपालांकडून आमंत्रण !
      मंगळुरू - सनातन संस्थेचे कर्नाटक राज्यसेवक श्री. रमानंद गौडा, हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रभाकर पडियार, श्री. भरत प्रभू, तसेच धर्माभिमानी श्री. अनंत कामत यांनी नागालॅण्डचे राज्यपाल श्री. पद्मनाभ आचार्य यांची येथे २३ डिसेंबरला सदिच्छा भेट घेतली. श्री. आचार्य यांच्या पत्नी कन्नड साप्ताहिक सनातन प्रभातच्या नियमित वाचक आहेत. श्री. आचार्य यांना संस्था आणि समिती यांच्याकडून हिंदुत्वाच्या रक्षणासाठी करत असलेल्या अथक प्रयत्नांची आणि कार्याची माहिती देण्यात आली. राज्यपाल श्री. आचार्य यांनी या कार्याचे कौतुक केले. तसेच नागालॅण्ड येथे संस्था आणि समिती यांनी येऊन कार्य करावे, असे आमंत्रणही त्यांनी दिले. या वेळी सनातनचा धर्मशिक्षण फलक हा ग्रंथ श्री. आचार्य यांना भेट देण्यात आला.

पर्थ येथे मुसलमान महिलेला दारूच्या बाटलीने मारहाण, तिचा हिजाबही फाडला !

युरोप आणि अमेरिका यांनंतर आता ऑस्टे्रलियातही मुसलमानांच्या विरोधात जनक्षोभ !
   मेलबर्न (ऑस्टे्रलिया) - पर्थ येथे एका इसमाने मुसलमान महिलेला दारूच्या बाटलीने मारहाण केली, तसेच तिचा हिजाब (डोके झाकण्यासाठी वापरायचे कापड) काढून फेकल्याची घटना घडली. या महिलेने ‘डब्ल्यू ए टुडे’ या वृत्तपत्राशी बोलतांना सांगितले की, ती येथील सुपरमार्केटमध्ये फिरत होती. त्यावेळी एका इसमाने तिला ‘मेरी क्रिसमस’ म्हटले. यावर तिने मागे वळून ‘हॅप्पी हॉलिडे’ म्हटले. यावरून त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर त्याने दारूची बाटली उचलली आणि महिलेच्या खांदे आणि मानेवर मारली. या झटापटीत तिचा हिजाब निघाल्यावर त्याने तोही फाडून फेकून दिला.

लंडनमध्ये भर बाजारातमुसलमान महिलेला तिच्या हिजाबला धरून ओढले !

युरोपमध्ये मुसलमानांच्या विरोधात लोकांचा रोष
   लंडन - पूर्व लंडनच्या चिंगफोर्ड येथे भर बाजारात दोन अल्पवयीन मुलांनी एका ब्रिटीश महिलेला खाली पाडले आणि तिच्या हिजाबला (डोके झाकण्यासाठी वापरायचे कापड) धरून ओढले. (जगभर मुसलमानांच्या विरोधात लोकांचा उद्रेक वाढत आहे. यामागील कारणे शोधण्याची बुद्धी मुसलमानप्रेमींना होईल का ? - संपादक) पोलिसांनी सांगितले की, दोन्ही श्‍वेतवर्णीय संशयितांचे वय अनुमाने १७ ते १९ आहे. त्यांनी काळे कपडे घातले होते. अजूनपर्यंत कोणालाही अटक करण्यात आली नाही.

हिंदू जनजागृती समितीच्या वतीने चेरत्तला (केरळ) येथील कडविल श्री महालक्ष्मी मंदिरात धर्माचरण या विषयावर प्रबोधनात्मक प्रवचन !

   चेरत्तला (केरळ) - येथील कडविल श्री महालक्ष्मी मंदिरात १५ ते २५ डिसेंबर या कालावधीत कनकधारा महायज्ञ आणि दशलक्षार्चन करण्यात येत आहे. त्या निमित्ताने २० डिसेंबरला हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांना तिथे प्रवचन देण्यास संधी मिळाली. समितीच्या वतीने कु. अदिती सुखटणकर यांनी ‘धर्माचरण या विषयावर प्रवचन केले. ‘आज प्रत्येक व्यक्ती, समाज अन् हिंदु धर्म यांची स्थिती खूप वाईट आहे. याचे कारण अधर्माचरण आहे आणि ते दूर करून धर्मावर आलेली ग्लानी दूर करायला धर्माचरणच आवश्यक आहे’, असे कु. अदिती सुखटणकर यांनी सांगितले. धर्माचरणाच्या काही सोप्या पद्धती, जसे शास्त्रानुसार देवळात दर्शन करणे, कुंकू लावण्याची पद्धत, काळानुसार कुलदेवतेचे आणि दत्त यांच्या नामजपाचे महत्त्व याविषयीही सांगण्यात आले. या प्रवचनाचा लाभ २५० भाविकांनी घेतला.

भाजप कार्यकर्त्याला मारहाण केल्याप्रकरणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यावर अदखलपात्र गुन्हा प्रविष्ट

असे लोकप्रतिनिधी कायद्याचे राज्य कधीतरी देऊ शकतील का ?
     सातारा,२४ डिसेंबर (वार्ता.) - भाजपचे जिल्हा परिषद सदस्य श्री. दीपक पवार यांच्या कार्यकर्त्याला भणंग येथे मारहाण करून धमकी दिल्याप्रकरणी सातारा-जावली मतदारसंघाचे विद्यमान आमदार श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह तीन जणांवर मेढा पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे. भणंग येथे पाण्याच्या टाकीजवळ रस्त्याच्या उद्घाटनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आले होते. तेव्हा गणेश जगताप यांनी माजी सभापती सुहास गिरीगोसावी यांच्याजवळ जाऊन या रस्त्याचे काम दीपक पवार यांच्या समाज कल्याण फंडातून संमत केले आहे, असे पत्र दाखवले आणि तुम्ही कसे काय उद्घाटन करू शकता ? असा प्रश्‍न विचारला. यावर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी चिडून जाऊन जगताप यांच्या हातातील पत्र फाडून टाकले आणि जगताप यांच्या कानशिलात लगावली. त्याच वेळी तेथीलच दोन कार्यकर्त्यांनी जगताप यांना मारहाण केली. जगताप तेथून पळून गेले. नंतर त्यांनी याविषयी मेढा पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली.

जळगावमधील विविध समाज संघटनांच्या प्रमुखांनी केला हिंदु राष्ट्र स्थापनेचा निर्धार !

बैठकीत डावीकडून १. पू. नंदकुमार जाधव २. श्री. सुनील घनवट आणि सर्व समाजाचे प्रमुख प्रतिनिधी
हिंदूंवर होणार्‍या आघातांच्या विरोधात कृतीशील होणार !
      जळगाव, २४ डिसेंबर (वार्ता.) - येथील विविध समाज संघटनांच्या प्रमुखांनी हिंदु राष्ट्र स्थापनेचा निर्धार येथे आयोजित केलेल्या बैठकीत व्यक्त केला. तसेच हिंदु समाजावर होणार्‍या आघातांच्या विरोधात कृतीशील होण्याचा मानसही बोलून दाखवला. जळगावातील विविध समाज संघटनांच्या प्रमुखांची एकत्रित बैठक २३ डिसेंबर या दिवशी येथे होणार्‍या जाहीर हिंदु धर्मजागृती सभेच्या निमित्ताने उत्साहात पार पडली. या बैठकीला शहरातील मराठा, कुंभार, बेलदार, भावसार, जैन, नाभिक, सुतार, परीट, राजपूत आदी समाजांचे तसेच समाज संघटनांचे प्रमुख उपस्थित होते.

आज जळगाव येथील हिंदु धर्मजागृती सभेत प्रखर हिंदुत्वाची तोफ धडाडणार !

 • जळगावच्या विराट हिंदु धर्मजागृती सभेचा प्रसार अंतिम टप्प्यात !
 • सभा संपन्न होणार्‍या शिवतीर्थ मैदानावर सभेच्या सिद्धतेस वेग
     जळगाव, २४ डिसेंबर (वार्ता.) - जळगावच्या शिवतीर्थ मैदानावर २५ डिसेंबर या दिवशी प्रचंड उत्साहात संपन्न होणार्‍या जाहीर हिंदु धर्मजागृती सभेचा प्रसार अंतिम टप्प्यात पोचला आहे. त्यामुळे जिल्ह्यांत सर्वत्र सभेविषयी औत्सुक्य निर्माण झाले आहे. या धर्मसभेत प्रमुख वक्त्यांच्या जाज्ज्वल्य अशा मार्गदर्शनाची तोफ धडाडणार आहे. त्यामुळे जळगाववासियांना हिंदु राष्ट्र स्थापनेची पुढील दिशाच मिळणार आहे.

संस्कृती भ्रष्ट करणारा अन् युवा पिढीला नासवणारा सनबर्न फेस्टिव्हल रहित करा ! - रणरागिनी

मारुती चौक येथे आंदोलन करतांना रणरागिणी शाखेच्या महिला
रणरागिणी शाखेची आंदोलनाद्वारे नारीशक्तीची चेतावणी सनबर्न फेस्टिव्हल रहित करा !
      सांगली, २४ डिसेंबर (वार्ता.) - अमली पदार्थांचा गैरवापर आणि अनैतिक कृत्ये यांमुळे कुप्रसिद्ध ठरलेला सनबर्न फेस्टिव्हल गोव्यातून सांस्कृतिक आणि शैक्षणिक राजधानी असणार्‍या पुण्यात हालवण्यात आला आहे. हा फेस्टिव्हल संस्कृती भ्रष्ट करणारा अन् युवा पिढीला नासवणारा असल्याने २८ ते ३१ डिसेंबर २०१६ या काळात पुणे येथे होणारा सनबर्न फेस्टिव्हल रहित करावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीप्रणित रणरागिणी शाखेच्या सौ. मधुरा तोफखाने यांनी केली.

‘गोमांस पौष्टिक भोजन आहे’, असे कुठे लिहिले आहे ? - पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालय

गोमांस खाण्याचे समर्थन करणार्‍या गोमांसप्रेमींना न्यायालयाने कठोर शिक्षा द्यावी, अशी हिंदूंची अपेक्षा !
   चंदीगड - ‘गोमांस पौष्टिक भोजन आहे’, असे कुठे लिहिले आहे ?, असा प्रश्‍न पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने एका याचिकाकर्त्याला विचारला. मागील वर्षी हरियाणा सरकारने ‘गायीचे संरक्षण आणि विकास अधिनियम सन २०१५’ हा कायदा लागू केला होता. या निर्णयाच्या विरोधात देहली येथील सी.आर्. जया सुकिन यांनी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती. 

नाशिकमध्ये नववर्षारंभ गुढीपाडव्याला साजरा करण्याचे आवाहन करणारी जनप्रबोधन फेरी !

    नाशिक, २४ डिसेंबर (वार्ता.) - आपली संस्कृती जोपासणे आणि तिचे रक्षण करणे, हे प्रत्येकाचे जन्मजात कर्तव्य आहे. ते प्रत्येक हिंदूने पार पाडावे, तसेच हिंदु नववर्षारंभ हा ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री नव्हे, तर गुढीपाडव्याला म्हणजेच चैत्र शुद्ध प्रतिपदेला पहाटे साजरा करावा, असे आवाहन करणारी एक जनप्रबोधन फेरी येथील सिडको भागात २४ डिसेंबर या दिवशी आयोजित करण्यात आली होती.

निवृत्त सैनिकाकडून स्थूल असणार्‍या पोलिसांच्या विरोधात याचिका प्रविष्ट !

जे एका माजी सैनिकाला कळते, ते प्रशासनाला का कळत नाही ?
 त्यासाठी न्यायालयाचा वेळ का घ्यावा लागतो ?
   कोलकाता - एका निवृत्त सैनिकाने स्थूल असणार्‍या पोलिसांच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे. यात त्यांनी ‘प्रमाणाच्या बाहेर स्थूल असणारे पोलीस कर्मचारी निरोगी नसतात आणि सेवेवर असतांना ते झोपा काढतात’, असा आरोप केला आहे. ‘अशा स्थितीत त्यांच्यावर विसंबून आम्ही आरामात झोपू कसे शकतो ?’, असा प्रश्‍नही विचारला आहे. 
   ही याचिका येथील निमलष्करी दलाचे निवृत्त सैनिक कमल डे यांनी प्रविष्ट केली आहे. या याचिकेला त्यांनी कोलकाता येथील पोट सुटलेल्या १८ पोलिसांची छायाचित्रेही जोडली आहेत.

पालखी आणि झेंड्याच्या भव्य मिरवणुकीने श्रीसेवागिरी महाराज यात्रेस प्रारंभ

     सातारा, २४ डिसेंबर (वार्ता.) - प.पू. सेवागिरी महाराज यांच्या ६९ व्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित वार्षिक यात्रेचा प्रारंभ पालखी आणि झेंड्याच्या भव्य मिरवणुकीने झाला. २३ डिसेंबर २०१६ ते २ जानेवारी २०१७ या कालावधीत होण्यार्‍या यात्रेस महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश, ओरीसा आणि गुजरात या राज्यांतून भाविक मोठ्या प्रमाणात येेण्यास प्रारंभ झाला आहे. शासकीय विद्यानिकेतन आणि पुसेगाव-पंढरपूर रस्त्याच्या दुतर्फा यात्रेसाठी भाविक जमत आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा उल्लेख प्रत्येक ठिकाणी आदराने व्हायलाच हवा ! - पू. संभाजीराव भिडेगुरुजी

     कोल्हापूर, २४ डिसेंबर (वार्ता.) - कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापिठाचे छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ, असे नामकरण होण्याच्या संदर्भात हिंदु जनजागृती समितीने उपस्थित केलेले सूत्र योग्यच आहे. केवळ विद्यापीठच नव्हे, तर प्रत्येकच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा उल्लेख आदराने व्हायला हवा, असे मत श्रीशिवप्रतिष्ठानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी व्यक्त केले. हिंदु जनजागृती समितीचे पश्‍चिम महाराष्ट्र समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी २३ डिसेंबर या दिवशी पू. भिडेगुरुजी यांची भेट घेऊन त्यांना समितीच्या वतीने शिवाजी विद्यापिठाच्या संदर्भात समिती करत असलेल्या आंदोलनाची माहिती दिली. त्या वेळी पू. गुरुजींनी हे मत व्यक्त केले. यानंतर धारकर्‍यांना झालेल्या मार्गदर्शनात पू. गुरुजींनी दोन वेळा हा विषय त्यांच्या मार्गदर्शनात मांडला.

हिंदु रुग्णांच्या असाहाय्यतेचा लाभ उठवून त्यांचे धर्मांतर करणार्‍या ‘बिलिव्हर्स’च्या प्रचारकांवर तातडीने कारवाई करा !

 • हिंदुत्वनिष्ठ संघटनांची गोव्यातील अझिलो रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांकडे मागणी
 • शासकीय कार्यालयांमध्ये हिंदु कर्मचारी बहुसंख्य असूनही श्री सत्यनारायण पूजेसारख्या धार्मिक कृती केल्यास आवई उठवणारे रुग्णालयांत सर्रास होणार्‍या अशा अवैध धर्मांतराच्या प्रकाराविषयी काही का बोलत नाहीत ?
आझिलो रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. गीता काकोडकर यांना निवेदन देताना हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी
म्हापसा, २४ डिसेंबर - येथील अझिलो रुग्णालयात हिंदु रुग्णांच्या असाहाय्यतेचा लाभ उठवून त्यांचे धर्मांतर करणार्‍या ‘बिलिव्हर्स’च्या प्रचारकांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. गीता काकोडकर यांच्याकडे केली. त्यानंतर ‘रुग्णालयातील या घटनांची चौकशी करण्याची, तसेच अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी संबंधितांवर लक्ष ठेवावे’, असा आदेश वैद्यकीय अधीक्षक डॉ. गीता काकोडकर यांनी रुग्णालयाच्या प्रमुख व्यवस्थापकाला दिला. या वेळी शिवसेना, स्वराज्य, संस्कृती रक्षा समिती, रणरागिणी, हिंदु जनजागृती समिती आणि गोमंतक मंदिर अन् धार्मिक संस्था महासंघ या संघटनांचे प्रतिनिधी आणि हिंदु धर्माभिमानी यांची उपस्थिती होती. सर्वश्री जयेश थळी, सिद्धार्थ मांद्रेकर, नीलेश केणी, सिद्धेश केणी, एकनाथ म्हापसेकर, सुरेश वेर्लेकर, किशोर राव, अंकित साळगावकर, निखिल, सौ. अंजली नायक, सौ. विशाखा म्हांबरे, सौ. शुभदा केणी, सौ. शोभा मेनन आदींचा या वेळी सहभाग होता. हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी उपरोल्लेखित मागणी करणारे एक निवेदनही वैद्यकीय अधीक्षक डॉ. गीता काकोडकर यांच्याकडे सुपुर्द केले.

पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांचे आज पुणे येथे व्याख्यान !

     श्रीशिवप्रतिष्ठानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांचे आज (२५ डिसेंबर या दिवशी) शिवाजीनगर येथील मॉडर्न हायस्कूल येथे शिवचरित्र आणि गडदुर्ग या विषयावर सायंकाळी ६ वाजता व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. पू. भिडेगुरुजी यांचे व्याख्यान म्हणजे हिंदु राष्ट्र स्थापनेच्या दृष्टीने युवकांना कृतीशील करणारा स्रोतच आहे. अधिकाधिक धर्माभिमानी युवकांनी कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

डीजेसारख्या संगीतप्रकारावर सरकारने बंदी घालावी ! - मुंबई उच्च न्यायालयाचे मत

प्रत्येक गोष्ट न्यायालयाला का सांगावी लागते ? सरकारच्या हे का लक्षात
येत नाही ? डीजेप्रमाणेच सनबर्नसारख्या संस्कृतीहीन कार्यक्रमांवरही सरकारने बंदी घातली पाहिजे !
     मुंबई - डीजेसारख्या संगीत प्रकारांना आळा घालण्याची आवश्यकता आहे. तसेच डीजेसाठी लागणारी वाद्ये आणि अन्य साहित्य यांचे उत्पादन अन् विक्री यांवर राज्य सरकारने बंदी घालण्याची आवश्यकता आहे. डीजेसारख्या घातक संगीत प्रकारांवर बंदी घालण्यासाठी कायदा करण्याच्या पर्यायांचा विचार झाला पाहिजे, असे स्पष्ट मत मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे.

‘कॅशलेस’ (रोखरहित) व्यवहाराला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारची त्रिस्तरीय ‘लकी ड्रॉ’ योजना

   नवी देहली - ‘कॅशलेस’ (रोकडरहित) व्यवहाराला प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान नरेंदी मोदी यांनी त्रिस्तरीय ‘लकी ड्रॉ’ (भाग्यवान सोडत) योजनेची नुकतीच घोषणा केली आहे. ८ नोव्हेंबर ते आजपर्यंत देशातील ज्या नागरिकांनी डेबिट, क्रेडिट कार्ड, मोबाइल वॉलेट यांच्या माध्यमातून व्यवहार केले आहेत, त्यांना या योजनेच्या अंतर्गत कोट्यवधी रूपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत.
१. या योजनेची पहिली भाग्यवान सोडत २५ डिसेंबरला काढण्यात येणार आहे. आतापर्यंत ‘कॅशलेस’ व्यवहार केलेल्या ग्राहकांमधून १५ सहस्र लोकांना निवडण्यात येईल आणि त्यांच्या बँक खात्यांमध्ये प्रत्येकी एक सहस्र रूपये जमा केले जातील.

छत्रपती शिवाजी महाराजांसारखे बहुआयामी व्यक्तीमत्व जगाच्या इतिहासात होणे असंभव ! - पंतप्रधान नरेंद्र मोदी

सिंधुदुर्ग किल्ल्याच्या धर्तीवर सिंधुसागरात (अरबी समुद्र) साकारण्यात येणार्‍या भव्य शिवस्मारकाचे भूमीपूजन !
      मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज पराक्रमी तर होतेच शिवाय ते उत्तम प्रशासकही होते. संघर्षमय काळात त्यांनी हिंदुस्थानच्या इतिहासात प्रशासनाचा नवीन अध्याय लिहिला. महाराजांचे मावळ्यांचे संघटन करण्याचे कौशल्य, पाणीव्यवस्था आणि सामुद्रिक सामर्थ्य सर्वच प्रेरणादायी आहे. विदेशींनी आपल्या शासनावर आक्रमण करू नये यासाठी महाराजांनी स्वत: मुद्रा सिद्ध केली. छत्रपती शिवाजी महाराजांसारखे बहुआयामी व्यक्तीमत्व जगाच्या इतिहासात होणे असंभव आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. २४ डिसेंबरला अरबी समुद्रात उभारण्यात येणार्‍या भव्य शिवस्मारकाचे भूमिपूजन पार पडले.

न्यायालयासमोर प्रकरण आले नसते, तर सरकारने काही केले नसते ! ही आहे सरकारची कार्यक्षमता !

    चेन्नईमधील अन्ना सलाईमध्ये मशिदीच्या आवारात मक्का मस्जिद परिषदेकडून शरिया न्यायालय स्थापन करण्यात आले होते. या न्यायालयात वैवाहिक प्रकरणांपासून ते समन्स बजावणे, घटस्फोटाचा निर्णय संमत करणे, असे निर्णय घेतले जात होते. अब्दुल रेहमान या अनिवासी भारतियाला शरिया न्यायालयाने पत्नीशी बळजोरीने घटस्फोट घ्यायला भाग पाडले होते. या विरोधात रेहमान यांनी मद्रास उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेवर निकाल देतांना न्यायालयाने शरिया न्यायालय बंद करण्याचा आदेश दिला.  

मतांसाठी स्वत: ख्रिस्तीधार्जिणे असल्याचे दाखवण्यासाठी आटापिटा करणारे आपचे वाल्मीकि नायक !

    मी कधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात नव्हतो. संघात जाण्याचा विचारसुद्धा केला नाही. संघ ही अत्यंत जातीयवादी संघटना आहे. माझे कुटुंब जातीयवादी नाही. मी करंजाळे येथील एका ख्रिस्ती कुटुंबाच्या घरात जन्मलो आणि वाढलो. माझी बहीण कॉन्व्हेंट शाळेत शिकली. ती शाळेतून यायची, तेव्हा तिच्या ओठावर नेहमी बायबलमधील पवित्र (?) वचने असायची. मी गोमांस खाणारा माणूस आहे. आमच्या घराजवळ असलेला एक बारमालक अतिशय चविष्ट गोमांस बनवायचा. सध्या रहात असलेल्या घराच्या समोर असलेल्या कपेलच्या समोर आम्ही फेस्ताच्या वेळी मेणबत्ती लावतो. यावरून आम्ही जातीयवादी संघात होतो, असे तुम्हाला वाटते का ? - वाल्मीकि नायक, आम आदमी पक्ष, गोवा

मंदिर, शिक्षण ही क्षेत्रे धर्माच्या नियंत्रणातील आहेत; पण आज या क्षेत्रांवर राज्यकर्त्यांनी नियंत्रण मिळवले आहे. ही अराजकतेची पराकाष्ठा आहे. - शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती, पुरी मठ


देशात दलाल २५ टक्के दलाली घेऊन काळे पैसे पांढरे करून देत आहेत. यात बँक अधिकारी आणि कर्मचारी यांचा समावेश आहे. यामुळे नोटाबंदीनंतर आयकर कायद्यात केलेल्या सुधारणांचा विशेष परिणाम होणार नाही. - खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी, भाजप


मोगल प्रशासकीय व्यवस्थेविषयी स्वातंत्र्यानंतर ७० वर्षांनी कागदपत्रे मिळणे, हे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय सरकारांना लज्जास्पद !

     भाग्यनगर येथे मोगल प्रशासकीय व्यवस्थेविषयी १ लाख ५५ सहस्र कागदपत्रे मिळाली आहेत. शाहजहान आणि औरंगजेब यांच्या शासनकाळातील ही कागदपत्रे फारसी भाषेत लिहण्यात आली असून सध्या तेलंगणच्या अर्काइव्स अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूटच्या कह्यात आहेत.

इयत्ता ७ वी आणि १० वीच्या पुस्तकांतील चुकीचा भाग

    एन्.सी.ई.आर्.टी.च्या इयत्ता ७ वीच्या आमचा भूतकाळ - २ या इतिहासाच्या पुस्तकातील १५४ पानांंपैकी अधिकाधिक पाने भारतावर आक्रमण करणार्‍या क्रूर आणि आक्रमणकारी मोगल बादशहांची माहिती देण्यासाठी खर्ची घातली आहेत; पण ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगलांशी लढून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, त्यांचा इतिहास केवळ ६ ओळींमध्ये दिला गेला आहे. या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांना नगण्य स्थान देऊन अपमान केला गेला आहे. यात छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्रही छापलेले नाही.

सरकारच्या विधानसभेतील आश्‍वासनावरही विश्‍वास ठेवता येत नाही !

    पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या अंतर्गत येणार्‍या ३ सहस्र ६७ मंदिरांतील घोटाळ्याच्या संदर्भात ८ एप्रिल २०१५ या दिवशी विधानसभेत लक्षवेधी मांडण्यात आली होती. यावर चर्चा करतांना मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी ६ मासांत सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले होते, प्रत्यक्षात दोषींवर कोणती कारवाई केली त्याचा अहवाल विशेष अन्वेषण पथकाने (एस्आयटीने) अद्यापही सादर केलेला नाही. - आमदार श्री. राजेश क्षीरसागर, शिवसेना 
   क्रांतीकारकांनी देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी सर्वस्वाचा त्याग केला. स्वातंत्र्यापासून आजपर्यंतची स्थिती पाहिल्यास, त्यांच्या स्वप्नातील भारत हाच आहे का ? - शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती, पुरी मठ

फलक प्रसिद्धीकरता

हिंदूंच्या मंदिरांना अवैध ठरवून पाडणार्‍या सरकारची हीच का धर्मनिरपेक्षता ?
      मशिदींवरील भोंगे वर्षाचे १२ महिने सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या आदेशांचे प्रतिदिन उल्लंघन करतात; तरीही त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली गेलेली नाही, अशी माहिती सरकारने मुंबई उच्च न्यायालयास सादर केलेल्या शपथपत्रात २३ डिसेंबरला दिली.


भावी महायुद्धकाळात डॉक्टर, वैद्य, औषधे आदी उपलब्ध नसतांना, तसेच नेहमीसाठीही उपयुक्त !

सनातनच्या ‘भावी आपत्काळातील संजीवनी’ या ग्रंथमालिकेतील नूतन ग्रंथ !
विकार-निर्मूलनासाठी रिकाम्या खोक्यांचे उपाय
 • भाग १ - महत्त्व आणि उपायपद्धतीमागील शास्त्र
 • भाग २ - खोक्यांचे उपाय कसे करावेत ?
      संत-महात्मे, ज्योतिषी आदींच्या सांगण्यानुसार आगामी काळ हा भीषण आपत्काळ असून या काळात समाजाला अनेक आपत्तींना तोंड द्यावे लागणार आहे. आपत्काळात स्वतःसह कुटुंबियांच्याही आरोग्याचे रक्षण करणे, हे मोठे आव्हानच असते. आपत्काळात दळणवळण तुटल्यामुळे रुग्णाला रुग्णालयात नेणे, डॉक्टर वा वैद्य यांच्याशी संपर्क साधणे आणि पेठेत (बाजारात) औषधे मिळणेही कठीण होते. आपत्काळात ओढवणार्‍या विकारांना तोंड देेण्याच्या पूर्वसिद्धतेचा एक भाग म्हणून सनातन संस्था ‘भावी आपत्काळातील संजीवनी’ ही ग्रंथमालिका सिद्ध (तयार) करत आहे. २४.१२.२०१६ या दिनांकापर्यंत या मालिकेतील १३ ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. या मालिकेतील ‘विकार-निर्मूलनासाठी रिकाम्या खोक्यांचे उपाय (२ भाग)’ या ग्रंथाचा परिचय २ लेखांद्वारे (पूर्वार्ध आणि उत्तरार्ध यांद्वारे) करून देत आहोत. सविस्तर विवेचन ग्रंथात केले आहे. या ग्रंथाचे दोन्ही भाग वाचकांनी अवश्य संग्रही ठेवावेत. पूर्वार्ध
आध्यात्मिक उपायांच्या नवनवीन पद्धतींचे जनक : परात्पर गुरु डॉ. आठवले !
आध्यात्मिक उपायांच्या नवनवीन पद्धतींचे विवेचन करणारे
जगाच्या पाठीवरील एकमेव परात्पर गुरु डॉ. आठवले !
     व्यक्तीला होणार्‍या शारीरिक आणि मानसिक त्रासांचे कारण बहुतेक वेळा आध्यात्मिक असते. त्यातील प्रमुख कारण म्हणजे वाईट शक्तींचा त्रास. हे त्रास दूर होण्यासाठी आजवर परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आध्यात्मिक उपायांच्या अनेक नवनवीन पद्धतींचे विवेचन केले आहे, उदा. देवतांचा एक-आड-एक नामजप, प्राणशक्ती (चेतना) वहन संस्थेतील अडथळ्यांमुळे होणार्‍या विकारांवरील उपाय. या उपायपद्धतींचा सनातनच्या शेकडो साधकांना लाभ होत असल्याने या पद्धती प्रमाणभूत शास्त्रेच झाली आहेत. यांतीलच एक पद्धत म्हणजे, ‘रिकाम्या खोक्यांचे उपाय’ ! परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी स्वतः खोक्यांच्या उपायांच्या संदर्भात विविध प्रयोग केले आणि अनुभव घेतला. सनातनच्या शेकडो साधकांनीही या उपायांचे प्रयोग केले आणि त्यांना लाभ झाला. या उपायपद्धतीचे साधकांना झालेले लाभ लक्षात आल्याने आता ग्रंथाच्या माध्यमातून सर्वांसमोर ही उपायपद्धत प्रस्तुत करत आहोत.
विदेशातील लोकही लाभ घेत असलेली उपायपद्धत
      ‘स्पिरीच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन’ या संस्थेच्या ‘www.ssrf.org’ या संकेतस्थळावर ‘बॉक्स थेरपी (रिकाम्या खोक्यांचे उपाय)’ याविषयीचे विवेचन ठेवण्यात आले आहे. या संकेतस्थळाच्या माध्यमातून अनेक विदेशी लोकांनीही या उपायपद्धतीचा लाभ करून घेतला आहे. एका वाचकाची यासंदर्भातील पुढील प्रतिक्रिया बोलकी आहे.
      ‘मी खोक्यांचे उपाय केल्यावर माझ्या पाठीतून काहीतरी बाहेर पडल्याचे मला जाणवले. त्यानंतर माझ्या डोक्यातील ट्यूमर काढलेल्या स्थानी खोका ठेवल्यावर मला कानाजवळ वेदना झाल्या आणि अंग शहारले. दुसर्‍या दिवशी मात्र मला नवजीवन मिळाल्याप्रमाणे वाटले. यामुळे खोक्यांचे उपाय मला नाविन्यपूर्ण वाटतात.’ - श्री. सेबॅस्टियन अलझान्ड्रो ऑर्टिझ (‘www.ssrf.org’च्या ‘स्पॅनिश फेसबूक’वरील अभिप्राय)
     परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी मानवी जीवन त्रासमुक्त आणि आनंदी बनवणारी ‘रिकाम्या खोक्यांचे उपाय’ ही अत्यंत सोपी पद्धत शोधून अखिल मानवजातीवर उपकार केले आहेत. हे उपकार कधीही फेडता येणार नाहीत, असे आहेत. त्यांनी मानवजातीवर केलेल्या या उपकारांसाठी आम्ही त्यांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञ आहोत !
- (पू.) श्री. संदीप आळशी, सनातनच्या ग्रंथांचे संकलक
मनोगत 
     रिकाम्या खोक्यात पोकळी असते. पोकळीत आकाशतत्त्व असते. आकाशतत्त्वामुळे आध्यात्मिक उपाय होतात. आध्यात्मिक उपायासाठी खोके वापरल्याने व्यक्तीचा देह, मन आणि बुद्धी यांवरील त्रासदायक शक्तीचे आवरण, तसेच व्यक्तीमधील त्रासदायक शक्ती खोक्यातील पोकळीत खेचली जाऊन नष्ट केली जाते. या योगे विकारांमागील मूळ कारणच नष्ट केले जात असल्याने विकारही लवकर नष्ट होण्यास साहाय्य होते.
     खोक्यांचे उपाय, ही अत्यंत सोपी आणि बंधनविरहित उपायपद्धत आहे. ग्रंथाच्या पहिल्या भागात खोक्यांचे शास्त्रीय महत्त्व सांगण्यासह खोक्यांचे उपाय करण्याची शरिरातील विविध स्थाने, खोका कसा बनवावा आदींविषयी विवेचन केले आहे. ग्रंथाच्या दुसर्‍या भागात विकारांनुसार विशिष्ट मापांचे खोके वापरणे; खोक्यांचे उपाय करण्याच्या विविध पद्धती; दैनंदिन कामकाज, अभ्यास इत्यादी करतांनाही खोक्यांचे उपाय करणे आदींविषयी मार्गदर्शन केले आहे. आजकाल अनेकांना रात्री शांत झोप लागत नाही. शांत झोप लागण्यासाठी साहाय्यक ठरणारे खोक्यांचे उपाय कसे करावेत, याचेही विवेचन या भागात केले आहे. खोक्यांचे उपाय करतांना नामजप आणि मुद्रा किंवा न्यासही केला, तर उपायांची फलनिष्पत्ती वाढते. यासाठी ग्रंथाच्या या दुसर्‍या भागात तेही सांगितले आहेत.
     ‘खोक्याचे उपाय करून जास्तीतजास्त रुग्ण लवकरात लवकर विकारमुक्त होवोत’, ही श्री गुरुचरणी आणि विश्‍वपालक श्री नारायणाच्या चरणी प्रार्थना !
१. रिकाम्या खोक्याविषयी सर्वसाधारण विवेचन
१ अ. खोका कोणत्या मापाचा असावा ?
१ अ १. खोक्याच्या मापाविषयीचा दृष्टीकोन

अ. मानवी शरीर हे पृथ्वी, आप, तेज, वायु आणि आकाश या पंचतत्त्वांनी (पंचमहाभूतांनी) बनलेले आहे. या पंचतत्त्वांचे शरिरातील संतुलन बिघडल्यास शरिरात विकार निर्माण होतात. विकार पंचतत्त्वांपैकी कोणत्या तत्त्वाशी संबंधित आहे, त्या तत्त्वाशी संबंधित असलेल्या मापाचा खोका वापरणे, हे त्या विकाराच्या निर्मूलनासाठी १०० टक्के लाभदायक ठरते, तर सर्व पंचतत्त्वे समाविष्ट असणारा, म्हणजे सर्वसाधारणपणे कोणत्याही उद्देशासाठी वापरायचा खोका हा त्या विकाराच्या निर्मूलनासाठी ७० टक्के लाभदायक ठरतो. त्या त्या विशिष्ट पंचतत्त्वाशी संबंधित असलेले खोक्याचे विशिष्ट माप कोणते, याविषयी ग्रंथात सांगितले आहे. या लेखात केवळ सर्वसाधारणपणे कोणत्याही उद्देशासाठी वापरायच्या खोक्याचे माप सांगितले आहे.
    एखाद्याला विविध विकारांनुसार विविध मापांचे खोके बनवणे शक्य नसेल, तर त्याने सर्वसाधारणपणे कोणत्याही उद्देशासाठी वापरायचा खोका उपयोगात आणला तरी चालू शकेल.
१ अ २. सर्वसाधारणपणे कोणत्याही उद्देशासाठी वापरायच्या खोक्याचे माप
१ अ २ अ. खोक्याची लांबी, रुंदी अन् खोली (उंची) यांचे एकमेकांशी प्रमाण (गुणोत्तर) - १० : ७ : ६
१ अ २ आ. खोक्याचे सर्वसाधारण माप : २५ सें.मी. लांब × १७.५ सें.मी. रुंद × १५ सें.मी. खोल (उंच) 
सर्वसाधारण मापाचा खोका
    वरील मापात १० टक्के अल्प-अधिक असलेला तयार (रेडीमेड) खोकाही चालू शकतो.
(खोका बनवण्याविषयीचे सचित्र विवेचन ग्रंथात केले आहे.)
१ अ ३. मोठा खोका आणि लहान खोका यांची उपयुक्तता
अ. मोठा खोका : सभोवताली खोके ठेवून उपाय करणे, झोपतांना अंथरुणाभोवती खोके ठेवणे आदींसाठी मोठे (सर्वसाधारण मापाचे किंवा त्यापेक्षा मोठ्या मापाचे) खोके वापरावेत.
आ. लहान खोका : प्रवास करतांना खोक्यांचे उपाय करणे, खोक्यांचे शिरस्त्राण (हेल्मेट) बनवणे आदींसाठी लहान खोके वापरावेत.
१ अ ४. ‘खोका कोणत्या मापाचा आहे’ यापेक्षा ‘खोका वापरण्यामागील भाव’ महत्त्वाचा ! : खोका कोणत्याही मापाचा असला, तरी खोक्याचे उपाय करतांना भाव ठेवला, तर कोणत्याही मापाच्या खोक्याद्वारे उपाय होतात. असे असले, तरी भाव ठेवून योग्य मापाचा खोका उपायांसाठी वापरला, तर उपायांची फलनिष्पत्ती निश्‍चितच अधिक मिळते.
१ आ. खोका शक्यतो पांढर्‍या रंगाचा असावा !
१ इ. खोक्याच्या पोकळीला अधिक महत्त्व असून ‘खोका कशापासून बनवला आहे’, याला गौण महत्त्व असणे : आपत्काळात एखाद्या वेळी खोका वापरणे शक्य नसल्यास घरातील बालदी, पातेले, डबा यांसारख्या वस्तूंचाही उपायांसाठी उपयोग करू शकतो.
२. खोक्यांचे उपाय करण्याची शरिरातील स्थाने 
 २ अ. प्राधान्याने शरिरातील कुंडलिनीचक्रांच्या स्थानी खोक्यांचे उपाय करावेत
२ अ १. कुंडलिनीचक्रांच्या स्थानी खोक्यांचे उपाय करण्यामागील शास्त्र : ब्रह्मांडातील प्राणशक्ती (चेतना) मनुष्याच्या शरिरातील कुंडलिनीचक्रांमध्ये ग्रहण केली जाते आणि त्या त्या चक्राद्वारे ती शरिरातील त्या त्या इंद्रियापर्यंत पोचवली जाते. इंद्रियामध्ये प्राणशक्तीच्या वहनात (चेतनेच्या प्रवाहात) अडथळा निर्माण झाला की, विकार निर्माण होतात. यासाठी वाईट शक्ती प्रामुख्याने कुंडलिनीचक्रांवर आक्रमण करून तेथे त्रासदायक (काळी) शक्ती साठवून ठेवतात. यावर उपाय म्हणून कुंडलिनीचक्रांच्या ठिकाणी खोक्यांचे उपाय करणे महत्त्वाचे ठरते.
(कुंडलिनीचक्रांच्या स्थानांव्यतिरिक्त विकारग्रस्त अवयवांच्या स्थानीही खोक्यांचे उपाय करता येतात.)
२ अ २. विकारांनुसार कोणत्या कुंडलिनीचक्रांच्या स्थानी खोक्यांचे उपाय करावेत ?
 
 
टीप १ - मूलाधारचक्राच्या ठिकाणी न्यास करण्यास सांगितलेले नाही; कारण या चक्राच्या ठिकाणी न्यास करणे कठीण असते.
टीप २ - सहस्रारचक्र : हे कुंडलिनीच्या षट्चक्रांमध्ये गणले न जाता स्वतंत्र चक्र म्हणून गणले जाते. ब्रह्मांडातील प्राणशक्ती या चक्रामधूनच शरिरात प्रवेश करते. या चक्राला ‘ब्रह्मद्वार’ असेही म्हणतात. सर्वसाधारण व्यक्तीमध्ये सहस्रारचक्र बंद असते. साधनेत प्रगती झाल्यानंतर ते उघडते. त्यामुळे अन्य व्यक्तींच्या तुलनेत साधनेत प्रगती झालेल्याने सहस्रारचक्राच्या ठिकाणी न्यास केल्यास त्याला अधिक लाभ होतो.
(सविस्तर विवेचनासाठी वाचा : सनातनचा ग्रंथ ‘विकार-निर्मूलनासाठी रिकाम्या खोक्यांचे उपाय (२ भाग)’)
टीप : वाचकांनी प्रस्तुत ‘पूर्वार्ध’ संदर्भासाठी जपून ठेवावा.
वैज्ञानिकांना साहाय्यासाठी विनंती !
     अध्यात्म विश्‍वविद्यालयाने आध्यात्मिक उपायासाठी खोके वापरल्याने व्यक्ती आणि वातावरण यांवर काय परिणाम होतो इत्यादी विषयांसंदर्भात ‘पी.आय.पी.’ आणि ‘यू.टी.एस्.’ या वैज्ञानिक उपकरणांच्या माध्यमातून संशोधन केले आहे. यासंदर्भात अधिक संशोधन करण्यासाठी वैज्ञानिक आणि यासंदर्भात शिक्षण घेणार्‍या विद्यार्थी यांनी साहाय्य करावे, ही विनंती ! 
 
सनातनची ग्रंथसंपदा ‘ऑनलाईन’ खरेदी करा !
विशिष्ट मूल्याच्या खरेदीवर विनामूल्य घरपोच सेवा !
     सनातनच्या विक्रीकेंद्रांवर आणि वितरकांकडे उपलब्ध असलेले ग्रंथ आता SanatanShop.com वरही उपलब्ध !
स्थानिक वितरकाचा संपर्क : ९३२२३१५३१७

संस्कृतीविरोधी ‘सनबर्न फेस्टिव्हल’ला विरोध करण्यासाठी पुणे येथील धर्माभिमानी एकवटले !

श्री. पराग गोखले
     केसनंद (जि. पुणे) येथे भारतीय संस्कृतीविरोधी ‘सनबर्न फेस्टिव्हल’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या विरोधात जनजागृती करण्यासाठी केसनंद-वाघोली पंचक्रोशीत ग्रामस्थांच्या भेटी घेत असतांना हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले यांना जाणवलेली सूत्रे येथे देत आहोत.
१. ग्रामस्थांनी ‘सनबर्न फेस्टिव्हल’ला विरोध करू नये,
यासाठी धूर्त आयोजकांनी ग्रामस्थांना प्रलोभने दाखवणे !
     ‘सनबर्न फेस्टिव्हल’च्या विरोधात ग्रामस्थांच्या भेटी घेऊन त्यांना जागृत करणे, जागृतीपर बैठकांचे आयोजन करणे अशा सेवा करण्यास आरंभ झाला. त्या वेळी ‘सनबर्न’च्या आयोजकांकडून अथवा त्यांच्या वरिष्ठ पातळीवरून ग्रामस्थांचा विरोध मोडून काढण्यासाठी त्यांना प्रलोभने दाखवली गेली. स्थानिक स्तरावर विरोध होऊ नये, यासाठी गावातील मंदिरांना कोट्यवधी रुपयांची देणगी देण्याचे आश्‍वासन देणे, गावात डांबरी रस्ता बांधून देणे अथवा अन्य सोयीसुविधा निर्माण करण्याचे आश्‍वासन देणे, या माध्यमातून प्रयत्न केले जात होते.

काळवंडलेला ‘सनबर्न फेस्टिव्हल !’

प्रा. (कु.) शलाका सहस्रबुद्धे
    ‘प्रखर उन्हामुळे (सूर्याच्या अतीनील किरणांमुळे) त्वचा काळवंडली जाण्याला इंग्रजी भाषेत ‘सनबर्न’ म्हटले जाते. शब्दाच्या अर्थाशी साधर्म्य असणारा आणि अमली पदार्थांच्या माध्यमातून युवा पिढीला सांस्कृतिक अन् नैतिकदृष्ट्या काळवंडणारा ‘सनबर्न फेस्टिव्हल’ २८ ते ३१ डिसेंबर २०१६ या कालावधीत फुरसुंगी (जि. पुणे) येथे आयोजित करण्यात आला आहे. व्यसनाधीनतेला प्रोत्साहन देणार्‍या या कार्यक्रमाला संस्कृतीप्रेमी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात विरोध होत असून ‘देशाची सांस्कृतिक राजधानी असणार्‍या पुण्यामध्ये असले कार्यक्रम नकोच’, अशी मागणी जोर धरत आहे.

असा झाला जळगाव हिंदु धर्मजागृती सभेचा प्रसार !

खाजगी शिकवण्यांमध्ये सभेची माहिती देतांना
हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रशांत जुवेकर
पथनाट्यानंतर सभेचे निमंत्रण देतांना श्री. प्रशांत जुवेकर
     २५ डिसेंबर या दिवशी जळगाव परिसरात होणार्‍या ५६ व्या हिंदु धर्मजागृती सभेच्या निमित्ताने केलेल्या प्रसारकार्यातील काही ठळक सूत्रांचा आढावा येथे देत आहोत.
१. छोट्या हिंदु धर्मजागृती सभांद्वारे प्रचार !
     मोठ्या हिंदु धर्मजागृती सभेच्या प्रचारार्थ ३ गावांमध्ये छोट्या हिंदु धर्मजागृती सभांचे आयोजन गावातील स्थानिक धर्माभिमान्यांनी केले होते. या धर्मजागृती सभांच्या ठिकाणीही गावातील युवकांनी उत्स्फूर्तपणे वाहनफेर्‍या आणि पदफेर्‍या काढल्या होत्या. प्रसार आणि लागणारी अन्य व्यवस्थाही स्थानिक धर्माभिमान्यांनी केली.
      शहरामध्ये विविध भागांत सभांचे आयोजन अनेक धर्माभिमानी स्वतःहून करत, तसेच त्याविषयी हिंदु जनजागृती समितीच्या समन्वयकांना ‘व्हॉट्स अ‍ॅप’ या सामाजिक संकेतस्थळाच्या माध्यमातून कळवत.

हिंदु जनजागृती समितीसाठी हिंदु राष्ट्र स्थापनेचे ध्येय हेच सर्वश्रेष्ठ आहे ! - श्री. गोपाल दास, ज्येष्ठ नेते, विश्‍व हिंदु परिषद, आसाम

   ‘हिंदु जनजागृती समितीचे ध्येय आणि विचार स्पष्ट आहेत. माझ्या संपूर्ण जीवनात मी अशी संघटना पाहिली नाही. समिती जात, भाषा किंवा प्रांत यांमध्ये कधीच भेद करत नाही. त्यामुळे समितीसाठी हिंदु राष्ट्र स्थापनेचे ध्येय हेच सर्वश्रेष्ठ आहे. त्यांचा उद्देश नक्कीच यशस्वी होईल.’

कुंडलीत सांगितल्याप्रमाणे प.पू. डॉ. आठवले यांनी सांगणे

   ‘प.पू. डॉ. आठवले यांनी सांगितले की, ‘मी जीवनमुक्त झालो आहे.’ मी जीवनमुक्त होणार’, असे माझ्या कुंडलीतच लिहिले आहे. माझी कुंडली वर्ष १९२९ मध्ये माझ्या काकांनी बनवली होती. गोवा कुठे आणि माझे गाव कुठे, तरी प.पू. डॉ. आठवले यांनी ही भविष्यवाणी केली.’ - माजी खासदार श्री. वैकुंठलाल शर्मा उपाख्य प्रेमसिंह शेर, देहली राजकारण्यांना लुटण्यासाठी मंदिरेही उपलब्ध ! मंदिराचे व्यवस्थापन सरकार पहाणार, हे आंधळ्याने वाहतुकीचे नियंत्रण करण्यासारखे आहे किंवा १० वी उत्तीर्ण न झालेल्याने महाविद्यालयाचे दायित्त्व घेणे होय ! - (परात्पर गुरु) डॉ. जयंत आठवले

   ‘मध्यप्रदेशमध्ये शासकीय किंवा अर्पणात मिळालेल्या भूमीवर बांधण्यात आलेल्या सार्वजनिक मंदिरांचे व्यवस्थापन राज्य सरकार पहाणार आहे. याविषयीच्या कायद्याचे प्रारूप सिद्ध झाले आहे. हे प्रारूप विधानसभेच्या आगामी अंदाजपत्रकाच्या सत्रात पटलावर ठेवण्यात येणार आहे. राज्यात अशी २५ सहस्र मंदिरे असल्याचा अंदाज आहे. यातील २१ सहस्र मंदिरांची सूची सिद्ध झाली आहे.’

हिंदू तेजा जाग रे !

Jago !
Masjidoke andhikrut bhopuoke virodhme koi karvai nahi- Maharashtra Sarkarki nyayalayko jankari - Mandiropar sadaiv karvai karnewali sarkar ab hatbal kyu
जागो !
मस्जिदों के अनधिकृत भोपुआें के विरोध में कोई कारवाई नहीं - महाराष्ट्र सरकार की न्यायालय को जानकारी - मंदिरों पर सदैव कारवाई करनेवाली सरकार अब हतबल क्यूं ?

स्वामी श्रद्धानंद यांच्याविषयी लिखाण प्रसिद्ध करणारे दैनिक सनातन प्रभात आणि सनातन संस्था यांचे मन:पूर्वक अभिनंदन !

   २३ डिसेंबर २०१६ या दिवशी दैनिक सनातन प्रभातमध्ये हिंदु नेते स्वामी श्रद्धानंद यांच्या ९० व्या स्मृतीदिनानिमित्त ‘हिंदुद्वेष्ट्यांनी हत्या केलेले पहिले हिंदु नेते स्वामी श्रद्धानंद !’ हा लेख पृष्ठ क्र. ५ वर प्रसिद्ध करण्यात आला होता. त्याविषयी पंढरपूर येथील ह. भ. प. रामकृष्ण वीर महाराज यांनी काढलेले कौतुकास्पद उद्गार...
    ‘स्वामी श्रद्धानंदांच्या विषयी अतिशय सुरेख आणि समर्पक माहिती प्रसिद्ध केलीत. त्यासाठी दैनिक सनातन प्रभात आणि सनातन संस्थेचे मन:पूर्वक अभिनंदन ! स्वामी श्रद्धानंदांच्या विषयी प्रसिद्ध झालेली ही माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवण्यासाठी मी स्वत: कीर्तन, प्रवचन, तसेच वारकरी पाईक संघ यांच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे.’

वाईट शक्तींनी केलेल्या आक्रमणामुळे सुकलेल्या पारिजातकाच्या वृक्षावर ‘शिवकवच’ पठणाचा होणारा आध्यात्मिक स्तरावरील परिणाम अभ्यासण्यासाठी ‘यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने केलेली वैज्ञानिक चाचणी !

‘यू.टी.एस्.’ उपकरण
१. प्रस्तावना आणि उद्देश
     सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमाच्या परिसरात असलेला पारिजातक वृक्ष ऐन पावसाळ्यात पूर्णपणे सुकून गेला. सप्तर्षि जीवनाडीपट्टीतून मागदर्शन करणार्‍या महर्षींनी यामागील कारण स्पष्ट करतांना सांगितले, ‘वाईट शक्तींनी केलेल्या आक्रमणामुळे हा वृक्ष सुकून गेला आहे.’ सप्तर्षींनी यावर उपाय म्हणून पारिजातकाची नारळाने दृष्ट काढण्यास सांगितले. त्यानंतर ४ दिवसांनी त्यांनी पुढील उपायही सांगितला - ‘झाडापुढे दिवा आणि उदबत्ती लावावी. झाडाच्या रक्षणासाठी प्रार्थना करावी. त्यानंतर झाडाच्या मुळाशी मध, गव्हाचे पिठ आणि गुलाबपाणी घालावे. झाडाला नैवेद्य दाखवावा. त्यानंतर झाडाला उदबत्ती आणि दिवा यांनी ओवाळावे.’ त्याप्रमाणे हे दोन्ही उपाय केले.
वाईट शक्तींनी केलेल्या आक्रमणामुळे
सुकलेले पारिजातकाचे झाड
     भृगुसंहितावाचक डॉ. विशाल शर्मा यांच्या माध्यमातून मार्गदर्शन करणार्‍या भृगुमहर्षींनीही पारिजातकासाठी उपाय सांगितला. ते म्हणाले, ‘पाण्यात सुवर्णाचा एक तुकडा घालून ते पाणी अर्धे होईपर्यंत उकळू द्यावे. अशा प्रकारे सिद्ध केलेले सुवर्णजल प्रत्येक रविवारी सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी पारिजातकाला घालावे.’ महर्षींनी सांगितल्याप्रमाणे सद्गुरु बिंदाताई यांनी १३.११.२०१६ पासून प्रत्येक रविवारी सुवर्णजल पारिजातकाला घालण्यास आरंभ केला.’ तसेच पुणे येथील मंत्रोपचारतज्ञ डॉ. मोहन फडके यांनी पारिजातक वृक्षाची स्थिती सुधारण्यासाठी आध्यात्मिक उपाय म्हणून वृक्षाजवळ शिवकवचाचे पठण करण्यास सांगितले. या आध्यात्मिक उपायांपैकी शिवकवचाच्या पठणामुळे पारिजातक वृक्षावर झालेला परिणाम वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यासण्यासाठी २९.८.२०१६ या दिवशी सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमाच्या परिसरात ‘यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर)’ या उपकरणाच्या साहाय्याने चाचणी घेण्यात आली. या चाचणीची निरीक्षणे आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे.

मडगाव, गोवा येथील रवींद्र भवन येथे पुरो(अधो)गाम्यांची अभिव्यक्ती दक्षिणायन परिषद १८ ते २० नोव्हेंबर या कालावधीत पार पडली. या परिषदेत विविध वक्त्यांनी व्यक्त केलेले हिंदुद्वेष्टे, तसेच राष्ट्रघातकी विचार

जम्मू येथील पुरो(अधो)गामी खलीद हुसेन यांची देशद्रोही उपाययोजना
(म्हणे) काश्मीरमधील पाकिस्तानचा हिस्सा पाकिस्तानला देऊन टाकणे हाच काश्मीर समस्येवरील उपाय !
      काश्मीर प्रश्‍न सोडवण्यासाठी काश्मीरमधील पाकिस्तानचा हिस्सा पाकिस्तानला देऊन टाकला पाहिजे. पाकिस्तान आणि भारत यांच्यामध्ये वहाणारी नदी ही सीमा मानून नदीच्या दुसर्‍या बाजूचा भाग पाकिस्तानला, तर नदीच्या उर्वरित बाजूचा भाग भारताने घ्यावा. ग्लेशियरच्या (हिमकड्यांच्या) प्रदेशात ज्या ठिकाणी जेथे गवतही उगवत नाही, तेथे पहार्‍यांसाठी भारताने सैनिक नेमले असून हे हास्यास्पद आहे.

रामनाथी आश्रम आहे तीर्थक्षेत्र !

१. ‘गोवा येथील एका पुण्यभूमीवर रामनाथी आश्रमाची निर्मिती झाली आहे.
२. रामनाथी आश्रमात परात्पर गुरु डॉ. आठवले वास्तव्यास आहेत.
३. अशा ठिकाणी देवतांचे वास्तव्य असते.
४. या ठिकाणी साधक निष्काम भक्ती आणि सेवा करतात.
५. येथे ईश्‍वरी ज्ञानाचे आदान-प्रदान होते.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे जीवनचरित्र आणि अवतारी कार्य यांचे दर्शन घडवणारी सौ. उमा रविचंद्रन यांनी रेखाटलेली भावचित्रे

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...

सौ. उमा रविचंद्रन्
    ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या चेन्नई येथील सौ. उमा रविचंद्रन् यांनी रेखाटलेल्या चित्रांच्या माध्यमातून परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे जीवनचरित्र आणि अवतारी कार्य यांचे दर्शन घडते. त्यांनी त्या चित्रांचे विवरणही केले आहे. ते पुढीलप्रमाणे आहे.
१. श्री जयंत यांचा जन्म
     ‘६.५.१९४२ या दिवशी श्री जयंत यांचा जन्म झाला. सर्व देवता, ऋषि आणि त्रिमूर्ती त्यांना आशीर्वाद देत आहेत, किंबहुना ते या दैवी बालकाचे आशीर्वाद घेण्यासाठी जमलेे आहेत. भूदेवीला मुक्त करण्यासाठी ते अवतरले असल्याने ती आनंदी झाली आहे. या दैवी बालकाच्या स्मितहास्याने वातावरणात आनंद आणि चैतन्य यांची उधळण होत आहेे, तसेच साधू, संत अन् देवता यांचे हृदय पूर्ण धन्यतेने भरून गेले आहे. त्याच्या नाजूक पावलांच्या प्रत्येक लाथेने कानठळ्या बसवणार्‍या गडगडाटाचा आवाज वातावरणातील सूक्ष्म वाईट शक्तींच्या कानावर पडताच त्यांचा अंत जवळ आल्याची पूर्वसूचना मिळाल्याने ते भीतीने थरथरत आहेत.
- सौ. उमा रविचंद्रन्, चेन्नई (२४.४.२०१६)

चक्रीवादळाने निर्माण झालेल्या आपत्काळातून हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची आवश्यकता अधोरेखित होणे

      ‘चेन्नई किनारपट्टीवर २० वर्षांनंतर ‘वरदा’ हे मोठे चक्रीवादळ आले. या वादळामुळे वीजपुरवठा खंडित होणे, वृक्ष उन्मळून पडून रस्त्यावरील वाहतूक ठप्प होणे इत्यादी अनेक प्रकारच्या अडचणी आल्या. साध्या अडचणीच्या काळातही सामान्यपणे समोरच्या व्यक्तीला काही साहाय्य हवे असल्यास आपण ते लगेच करतो. असे करणे हे आपण ‘मनुष्य’ असल्याचे लक्षण आहे; परंतु चक्रीवादळाने निर्माण झालेल्या या आपत्काळात मानवतेला काळिमा फासणार्‍या अनेक घटना घडल्या. चक्रीवादळाने निर्माण झालेला आपत्काळ आणि त्याची तीव्रता अन् हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची आवश्यकता याबद्दलची माहिती पुढे दिली आहे.

दिनांक २५.९.२०१६ - महर्षींनी केरळ राज्यातील पालक्काड येथे झालेल्या सुदर्शन यागात विविध देवतांची यंत्रे भारित करून रामनाथी आश्रमात रक्षणासाठी पाठवण्यास सांगणे, यासाठी महर्षींनी साधकांना केरळमधील एका प्रसिद्ध नंबुद्री घराण्याकडे प्रश्‍नज्योतिषम्साठी पाठवणे आणि याचा वृत्तांत !

केरळ येथील श्री. नंदन प्रसिद्ध नंबुद्री
     ‘सध्या सनातनवर बंदीचे मोठेच संकट आलेले आहे. दूरचित्रवाणीवरूनही सनातनच्या विरोधात अनेक चर्चासत्रे घेतली जात आहेत, तसेच साधकांना दाभोलकर हत्ये प्रकरणी नाहक अटक करून कारागृहातही डांबले जात आहे. न्यायालयात अत्यंत रटाळ पद्धतीने चालणार्‍या आणि भ्रष्ट अधिकार्‍यांच्या अन् राजकारण्यांच्या दडपशाहीमुळे निरपराध लोकांवरच शासन करणार्‍या यंत्रणेलाच धडा शिकवायची वेळ आता आली आहे. यासाठी आता आम्हाला देवाची भक्तीच वाढवायला हवी. देवाची उपासना वाढवणे, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन देवालयात प्रार्थना करणे, यज्ञयाग करणे, यांसारखे उपाय महर्षि आम्हाला सांगत आहेत.

केवळ महर्षींच्या कृपेने भ्रमणभाषद्वारे चेन्नईत संपर्क होणे आणि ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे साधकांवर लक्ष आहे’, हा साधकांना आश्‍वस्त करणारा निरोप देता येणे

सद्गुरु (सौ). बिंदा सिंगबाळ
     ‘१२.१२.२०१६ या दिवशी चेन्नई येथे झालेल्या चक्रीवादळाने आपत्काळ निर्माण झाला होता. त्याच कालावधीत रामनाथी आश्रमात ‘कार्तिक दीपम्’च्या निमित्ताने विधी चालू असल्याने सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी चेन्नई येथील साधकांची विचारपूस करण्यासाठी आणि ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे साधकांवर लक्ष आहे’, हा साधकांना आश्‍वस्त करणारा निरोप देण्यासाठी कु. प्रियांका जोशी यांना चेन्नई येथील साधिका सौ. उमा रवीचंद्रन (उमाक्का) यांना संपर्क करण्यास सांगितले. महर्षींच्याच कृपेने त्यांचा संपर्क झाला. त्या वेळी बोलतांना उमाक्का म्हणाल्या, ‘‘चेन्नईत माहितीजाल (इंटरनेट), भ्रमणभाष इत्यादी सर्व संपर्कयंत्रणा वादळामुळे ठप्प झाल्या आहेत. मी बराच वेळ साधकांना संपर्क करण्याचा प्रयत्न करत होते; पण संपर्क होत नव्हता. केवळ तुझाच भ्रमणभाष लागला.’’ निरोप ऐकून उमाक्कांचा भाव जागृत होऊन त्यांना संत, परात्पर गुरु डॉ. आठवले आणि महर्षि यांच्याबद्दल पुष्कळ कृतज्ञता वाटली.

चेन्नईतील साधकांनी संत सांगत असलेला आपत्काळ प्रत्यक्ष अनुभवणे आणि केवळ साधनेमुळे आपत्काळात स्थिर राहू शकत असल्याची अनुभूती घेणे

श्री. श्रीराम लुकतुके
     ‘१२.१२.२०१६ या दिवशी ताशी १२० किलोमीटर वेगाने वहाणारे ‘वरदा’ हे चक्रीवादळ चेन्नई किनारपट्टीवर धडकले. या आपत्काळात चेन्नई येथील साधकांनी देवाची कृपा अनुभवली. संत आणि महर्षि यांच्या सांगण्यानुसार पुढील काळात अशा प्रकारच्या अनेक संकटांना सामोरे जावे लागणार आहे. ‘तीव्र साधना करून देवाच्या साहाय्याने कोणत्याही आपत्काळात तरून पुढे जाता येवो’, ही भगवान श्रीकृष्ण, परात्पर गुरु डॉ. आठवले आणि महर्षि यांच्या चरणी अनन्यभावे प्रार्थना !
१. संतांच्या सांगण्यानुसार आपत्काळात प्रसंग घडणे 
   चक्रीवादळाने निर्माण झालेल्या या आपत्काळात सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ सत्संगामध्ये सांगत असलेल्या वाक्यांची आठवण होत होती. सद्गुरु ताई सांगायच्या, ‘‘पुढे एवढा आपत्काळ येणार आहे की, त्या वेळी सत्संग मिळेल, सेवा करता येईल, अशी स्थिती नसेल.’’ प्रत्यक्षातही आम्ही अगदी तशीच स्थिती अनुभवली. वादळामुळे संपर्कयंत्रणा ठप्प झाली होती. इंटरनेट नसल्याने सत्संग मिळत नव्हता, तर संपर्क करण्यातही अडचणी येत होत्या.

सप्तर्षि जीवनाडीत सांगितल्याप्रमाणे सनातनच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांचा अहर्निश प्रवास !

    ‘सनातनच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ मागील ४ वर्षांपासून भारतभरातील विविध राज्यांत दौर्‍यावर जात आहेत. हिंदु राष्ट्राची (सनातन धर्म राज्याची) शीघ्रतेने स्थापना व्हावी, राष्ट्र, धर्म, तसेच साधक यांचे रक्षण व्हावे आणि देवतांचा आशीर्वाद मिळावा, यासाठी सप्तर्षि जीवनाडीत सांगितलेल्या क्षेत्री जाण्याचे त्यांचे नियोजन असते. आतापर्यंत त्यांनी २४ राज्यांतील प्रवास करून तेथील वैशिष्ट्यपूर्ण दगड, माती, तीर्थ आदींचा संग्रह केला आहे. त्यांनी नोव्हेंबर २०१६ पर्यंत ३ लक्ष ५६ सहस्र कि.मी. एवढा प्रवास करून भावी पिढीसाठी भारतातील अलौकिक समृद्ध ठेवा संग्रहित केला आहे. या दैवी प्रवासाची सर्वांना माहिती व्हावी, यासाठी हे सदर प्रसिद्ध करत आहोत.’

सनातन संस्थेवर येणार्‍या संकटांच्यासंदर्भात महर्षींनी सांगितलेले उपाय

शेषशायी विष्णूचे चित्र असलेले धनुष्य
सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ
१. दिनांक ३०.६.२०१६ - महर्षींनी तमिळनाडूतील
नामक्कल जिल्ह्यातील कोळ्ळीमलई पर्वतावर असलेल्या
श्री अरप्पाळीश्‍वर मंदिराचे दर्शन घेण्यास सांगणे
     ‘१८.६.२०१६ या दिवशी महर्षींनी तमिळनाडूतील चेन्नई येथे झालेल्या ८५ व्या नाडीवाचनात सांगितल्याप्रमाणे आम्ही ३०.६.२०१६ या दिवशी श्री अरप्पाळीश्‍वर देवाची पूजा, तसेच त्या मंदिरातच असलेल्या देवी नाथम्माळ (अरप्पाळनायकी) हिला ‘ललितासहस्रनाम मंत्रपठणात कुंकूमार्चन केले. सनातनवरील संकटे दूर व्हावीत आणि हिंदु राष्ट्राच्या (सनातन धर्म राज्याच्या) स्थापनेतील अडथळे दूर व्हावेत यांसाठी या पूजा करण्यात आल्या.’ - (पू.) सौ. अंजली गाडगीळ, त्रिची, तमिळनाडू. (१.७.२०१६)

आजचा वाढदिवस

चि. योगेश्‍वर जरळी
     ५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला चिपळूण (जिल्हा रत्नागिरी) येथील चि. योगेश्‍वर आेंकार जरळी (वय ४ वर्षे) याचा २५.१२.२०१६ या दिवशी वाढदिवस आहे.
चि. योगेश्‍वर यास वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून आशीर्वाद
चि. योगेश्‍वरची गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.

आध्यात्मिक सोपी कोडी - भाग २

     आध्यात्मिक सोपी कोडी (उत्तरांसह) या सदरात चांगले जाणवणे आणि त्रास जाणवणे यांत बराच भेद असलेली कोडी दिली आहेत. येथे चांगले जाणवणे आणि त्रासदायक जाणवणे यांची तुलना न करता चांगले जाणवणे आणि थोडेसे अधिक चांगले जाणवणे, तसेच त्रासदायक जाणवणे आणि थोडेसे अधिक त्रासदायक जाणवणे, यांची तुलना करण्याचे प्रयोग दिले आहेत. त्यांची उत्तरे योग्य यायला लागली की, जीवनातील प्रत्येक गोष्टीतच अधिक चांगले काय, ते वापरण्याकडे कल राहील, उदा. काळ्या रंगाऐवजी पिवळ्या अथवा निळ्या रंगाचे कपडे स्वतःसाठी वापरणे जास्त चांगले, हे कळेल. त्यामुळे जीवन आनंदी होण्यास साहाय्य होईल.

साधकांना सूचना

सनातनच्या संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नका !
      सनातनच्या संतांचा वाढदिवस असलेल्या दिवशी त्यांच्या संदर्भात साधकांनी दैनिक सनातन प्रभातमध्ये गुणवैशिष्ट्ये लिहून दिलेली असतात. त्यामुळे सर्वत्रच्या साधकांचे त्या संतांना भ्रमणभाष येतात. संतांना दिवसभर अनेक साधकांशी भ्रमणभाषवर बोलावे लागत असल्याने त्यांच्या सेवेतील अमूल्य वेळ वाया जातो. सध्या आपत्काळाला आरंभ झाल्यामुळे एकेक क्षण महत्त्वाचा आहे. स्थुलापेक्षा सूक्ष्म श्रेष्ठ असल्याने साधकांनी संतांना भ्रमणभाष न करता त्यांना मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

व्हॉट्स अ‍ॅप आणि तत्सम प्रणाली हाताळण्यात साधनेतील अमूल्य वेळ वाया घालवणारे साधक !

सध्या अनेक साधकांच्या भ्रमणभाष संचावर व्हॉट्स अ‍ॅप असल्याचे लक्षात आले आहे. या संदर्भात साधकांकडून साधनेच्या अनुषंगाने होणार्‍या अक्षम्य चुका पुढे देत आहोत.
१. स्वतःच्या मनाने साधकांचे गट बनवणे
     प्रसार अथवा आश्रम यांतील बरेच साधक व्हॉट्स अ‍ॅपवर गट (ग्रुप) बनवतात. त्यामध्ये आपले सहसाधक, परिचित साधक यांना समाविष्ट (अ‍ॅड) करतात. गट बनवण्यापूर्वी असे करणे योग्य आहे का ?, असे जिल्हासेवकांना विचारून घेत नाहीत.
     आश्रम आणि प्रसार यांतील ज्या साधकांनी आतापर्यंत असे गट सिद्ध केले आहेत, त्यांनी ते यापुढे चालू ठेवण्याविषयी जिल्हासेवकांना विचारून घ्यावे.

जळगाव येथे जाहीर हिंदु धर्मजागृती सभा

स्थळ : शिवतीर्थ, जी.एस्. मैदान, न्यायालय चौक, जळगाव.
रविवार, २५ डिसेंबर २०१६, सायं ५.३०
सभेमध्ये मार्गदर्शन करणारे वक्ते
 • पू. नंदकुमार जाधव
 • पू. (कु.) स्वाती खाडये
 • श्री. सुनील घनवट आणि
 • आमदार श्री. राजासिंह ठाकूर
देश बदलतो आहे आणि धर्माभिमानी हिंदूंची वाटचाल हिंदु राष्ट्राकडे
होत आहे, हे अनुभवण्यासाठी हिंदु धर्मजागृती सभेत मोठ्या संख्येने सहभागी व्हा !

साधकांना अत्यंत महत्त्वाची सूचना

      तांत्रिक अडचणींमुळे सनातन संस्थेच्या अंतर्गत चालू असलेले एअरटेल आणि बीएस्एन्एल् यांचे भ्रमणभाष गट
३१ डिसेंबर २०१६ या दिवशी बंद होत आहेत. जे साधक एअरटेल आणि बीएस्एन्एल् यांच्या गट योजनेचे स्वत:हून ग्राहक बनले होते, त्यांनी ३१ डिसेंबरपर्यंत स्वत:चे भ्रमणभाष क्रमांक बंद करावेत. या क्रमांकावर व्हॉट्स अ‍ॅपची सुविधा असल्यास ती बंद करून अन्य क्रमांकावर चालू करण्याची व्यवस्था करावी.

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

मानवी जीवन 
   परमेश्‍वराने देणगी दिलेल्या देहाचा उपयोग नेहमी सत्कर्मासाठी करावा. ‘इतरांच्या त्रासाला आपला देह कारणीभूत होणार नाही’, याची नेहमी काळजी घ्यावी. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

॥ हरि ॐ तत्सत् ॥

सतत वर्तमानकाळात रहाणे
     आम्ही कर्मधर्माला मानत नाही. कर्म मागे, तर धर्म आमच्या पुढे असतो. आम्ही दोन्हीच्या मध्ये असतो.
भावार्थ : कर्म मागे म्हणजे भूतकाळातील असल्याने केलेल्या कर्माचा विचार करीत नाही. धर्म आमच्या पुढे असतो म्हणजे भविष्यकाळातील योग्य आचरण. आम्ही दोन्हीच्या मध्ये असतो म्हणजे सतत वर्तमानकाळात असतो.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)
संत भक्तराज सनातनचे श्रद्धास्थान
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
जगातील एकमेव धर्म आहे हिंदु धर्म !
      उत्पत्ती, स्थिती आणि लय या सिद्धांतानुसार विविध संप्रदायांची स्थापना होते आणि काही काळानंतर त्यांचा लय होतो, म्हणजे त्यांचे अस्तित्व टिकत नाही. याउलट सनातन हिंदु धर्माला उत्पत्ती नसल्यामुळे, म्हणजे तो अनादि असल्यामुळे तो अनंत काळपर्यंत रहातो. हे हिंदु धर्माचे वैशिष्ट्य आहे. जगात दुसरा धर्मच नसल्यामुळे सर्वधर्मसमभाव हा शब्द किती अयोग्य आहे, हेही यावरून लक्षात येते. - (परात्पर गुरु) डॉ. आठवलेबोधचित्र


हिंदु संस्कृतीचा विसर ?

सनबर्न संगीत फेस्टिव्हल, हा सध्या चर्चेचा विषय आहे. पुणे शहरात त्याच्या कार्यक्रमाचे आयोजन झाले असून संस्कृतीनिष्ठ हिंदु संघटना त्याला प्रखर विरोध करत आहेत. हिंदु संस्कृतीच्या वातावरणात हा कार्यक्रम होणे अशोभनीय आहे. हा कार्यक्रम म्हणजे पाश्‍चात्त्य संस्कृतीचे अतीक्रमण, असेच समीकरण आहे. महाराष्ट्र राज्यात संस्कृतीप्रेमी आणि धर्मप्रेमी राजवट आहे. तरीही हा कार्यक्रम तेथे होऊ पहात आहे. गोवा राज्यातील जनतेने त्याला विरोध केल्यामुळे या राज्यातून त्याला पळ काढावा लागला. पंतप्रधानांचे विकासाचे सूत्र आपण जेव्हा पहातो, तेव्हा संस्कृतीप्रेम हा घटक डोळ्यांसमोर येतो. जनतेचा सर्वांगीण विकास म्हणजे देशाचा विकास आणि जनतेचा विकास तिच्या भावनांशी जोडला गेला आहे. असे असतांना देखिल जनतेला शासनाकडून योग्य प्रतिसाद न मिळणे, हा दैवदुर्विलास आहे. राज्याचे पर्यटन राज्यमंत्री म्हणतात, ‘‘सनबर्न संगीत फेस्टिव्हलमुळे पर्यटनाला चालना मिळून सरकारचा महसूल वाढेल. काळाप्रमाणे लोकांच्या विचारसरणीत आणि सांस्कृतिक विचारांमध्ये पालट होत आहेत. पुण्यातील तरुणाईची आवड लक्षात घेऊन या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.’’ आमदार माधुरी मिसाळ म्हणतात, ‘‘महिलांनी कसे कपडे घालायचे हा त्यांचा वैयक्तिक प्रश्‍न आहे. हिंदुत्वनिष्ठांनी काही संस्कृतीचा ठेका घेतलेला नाही.’’

काळ्या पैशाचा भस्मासुर !

निवडणूक आयोगाने देशातील २५५ राजकीय पक्षांची नावे अधिकृत पक्षांच्या सूचीतून वगळली आहेत. या कारवाईनंतर या पक्षांना कोणत्याच निवडणुकीत भाग घेता येणार नाही. निवडणूक लढवता येणार नाही, मग हे पक्ष स्थापनच कशासाठी झाले होते ? देशातील भ्रष्टाचार निपटून काढण्यासाठी पंतप्रधानांनी पाऊल उचलले आणि देशातील विविध भ्रष्टाचारी क्षेत्रे उघड झाली. त्याचाच एक भाग म्हणून राजकीय पक्ष स्थापनेत होणारा भ्रष्टाचार उघड करण्यात आला. राजकीय पक्षांना देण्यात येणारी आर्थिक देणगी करमुक्त असते. या तरतुदीचा लाभ उठवण्यासाठीच असे काही नाममात्र राजकीय पक्ष स्थापन झाले. करचुकवे, काळा पैसा जमवणारे, राजकारणी, उद्योगपती यांच्याकडून मिळणार्‍या उत्तेजनातून हे राजकीय पक्ष उदयास आले. देशद्रोही कृत्ये करणार्‍यांकडूनच असे केले जाते. याच विचारधारेतून मागे मागे आपण पाहिले, तर त्याला चुकीचे राजकीय धोरण उत्तरदायी असल्याचे लक्षात येते. असे नाममात्र दर्जाचे राजकीय पक्ष स्थापन करण्याची तरतूद असणारे कायदे निर्माण का केले गेले ?
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn