दुसरी मोगलाई
भाजपशासित मध्यप्रदेशात हिंदूंच्या श्रद्धास्थानावर आघात !
हिंदूंनो, राज्यकर्त्यांना या हिंदुद्रोहाविषयी सनदशीर मार्गाने खडसावून विचारा !
- श्री वाग्देवीच्या पालखी यात्रेवर भाजप शासनाची बंदी !
- वसंत पंचमीच्या दिवशी श्री वाग्देवीच्या पालखी यात्रेसाठी धर्माभिमान्यांचे आमरण उपोषण !
- पालखी यात्रेचे समर्थन करणार्या ५० उपोषणकर्त्या भाविकांना भाजप शासनाकडून अटक !
गोमाता, श्रीराम आणि हिंदुत्व यांची आठवण केवळ निवडणूक काळातच ठेवणारा भाजप !
ही केवळ आश्वासने नकोत, तर प्रत्यक्ष कृती करून त्यांची कार्यवाही व्हावी, अशी जनतेची अपेक्षा आहे !
भाजपची आतापर्यंतची श्रीराम मंदिराच्या उभारणीच्या संदर्भातील धरसोड वृत्ती, कर्नाटकात शेकडोंनी मंदिरे पाडण्याचा गझनीच्या महंमदालाही लाजवणारा धर्मद्रोह आणि धारमध्ये श्री वाग्देवीची मूर्ती कह्यात ठेवण्याचा अश्लाघ्य प्रकार यांमुळे या जाहीरनाम्यावर हिंदूंनी विश्वास कसा ठेवायचा हे भाजप सांगेल का ? - संपादक
कर्नाटक राज्यात शेकडो मंदिरे पाडणार्या भाजपचे उत्तरप्रदेशातील जनतेला आश्वासन !
राममंदिर बांधण्याचे आश्वासन देऊन भाजप यापूर्वी उत्तरप्रदेशसह दिल्लीत सत्तेवर आला होता;मात्र मंदिराच्या निर्माणाकडे दुर्लक्ष करून भाजपने मुसलमानांचे लांगूलचालन चालू केले आणि त्याचा परिणाम म्हणून त्याला केंद्रातील सत्ता गमवावी लागली. त्यातून शहाणपण शिकण्याचा प्रयत्न भाजपने केला नाही. आता परत उत्तरप्रदेशातील निवडणुकीत राममंदिराचे आश्वासन देऊन भाजप हिंदूंना मूर्ख बनवू शकत नाही ! - संपादक
जनतेला त्याग शिकवणारे नव्हे, तर मद्य आणि मांस यांचे आमिष दाखवून भ्रष्टाचाराचे बाळकडू पाजणारे काँग्रेसचे उमेदवार !
धाराशिव, २७ जानेवारी - धाराशिव जिल्ह्यातील लासोना येथे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार व्यंकट गुंड यांनी प्रजासत्ताकदिनाच्या आदल्या दिवशी ग्रामस्थांना तेथील संत ज्ञानेश्वर शाळेमध्ये दारू आणि मटण यांची मेजवानी दिल्याचे एका वृत्तवाहिनीने उघड केले.
त्या निमित्ताने त्यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम !
‘पाकचा ध्वज फडकावून फॅसिस्टवादी संघपरिवार शांतीचा भंग करू पहात आहे, असा आरोप करत ‘पॉप्युलर फ्रट ऑफ इंडिया’च्या सुळ्या (कर्नाटक) विभागाकडून खिस्ताब्द २०१२ च्या जानेवारी मासात निषेधमोर्चा काढण्यात आला. या वेळी ‘ऑल इंडिया इमाम काऊन्सिल’चे सदस्य हाफिल निजामुद्दीन बाखवी याने या वेळी संघाचे नेते कल्लड्क प्रभाकर भट् देशद्रोही असल्याचा आरोप केला.’
न्यायव्यवस्थेला घरचा अहेर !
नागपूर - न्यायालयीन व्यवस्थेत ९० टक्के भ्रष्टाचार हा अधिवक्त्यांच्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभागाने होतो. हा भ्रष्टाचार निपटून काढण्यासाठी अधिवक्त्यांनीच पुढाकार घेतला पाहिजे, असा सल्ला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आर्.एम्. लोढा यांनी अधिवक्त्यांना दिला. ज्यांना गोंधळच घालायचा त्यांनी या क्षेत्रात न आलेलेच बरे, असे परखड मतही त्यांनी व्यक्त केले. हे वृत्त दैनिक ‘पुण्यनगरी’ने प्रसिद्ध केले आहे.
मुंबई, २७ जानेवारी (वार्ता.) - सार्वजनिक ठिकाणी बांधलेल्या अनधिकृत प्रार्थनास्थळांवर कारवाई करण्याचा विषय सर्वोच्च न्यायालयानेही गांभीर्याने घेतला आहे. त्यासाठी सर्व राज्यांना प्रतिवादी बनवण्यात आले आहे. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचाच आदेश आहे. असे असतांना मुंबईत असलेल्या अनधिकृत प्रार्थनास्थळांवर कारवाई करण्याविषयी दिरंगाई का केली जात आहे ?
पुण्यातील एस्.टी. बसचे प्रकरण
(अंध)श्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. दाभोलकर यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?
पुणे, २७ जानेवारी (वार्ता.) - मला स्वप्न पडले होते. या स्वप्नामध्ये लोक मरतात. कोणीतरी माझ्यावर करणी केली आहे. माझ्या कानामध्ये गूं गूं, असे होत आहे. आणि मला काही माहीत नाही, अशी उत्तरे २५ जानेवारीला सकाळी पुण्याच्या रस्त्यावर राज्य महामंडाळाच्या बसखाली ३६ जणांचा चिरडणार्या संतोष माने याने चौकशीत दिली आहेत. गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकार्यांना चौकशीच्या वेळी माने प्रारंभी शांत होता; परंतु नंतर वरील प्रकारची विचित्र उत्तरे द्यायला लागला, असे चौकशी करणार्या अधिकार्यांनी सांगितले. हे वृत्त ‘डीएन्ए’ या वृत्तपत्रात हे वृत्त प्रसिद्ध झाले आहे.
राजकीय नेत्यांनो, या जनमत चाचणीवरून तरी तुम्ही अंतर्मुख व्हाल का ?
मुंबई, २७ जानेवारी (वार्ता.) - प्रजासत्ताक दिनी गेट वे ऑफ इंडियाजवळ ‘मुंबई का हिरो कौन ?’ या विषयावर जनतेची मते जाणून घेण्यासाठी सायंकाळी ५ ते ८ या वेळेत ‘इंडिया अगेंन्स्ट करप्शन’ या संस्थेच्या वतीने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी आलेल्या नागरिकांना त्यांना आदर्श नेता कोण, यासाठी ६ पर्याय दिले होते. यामध्ये ज्येष्ठ समाजसेवक श्री. अण्णा हजारे यांनाच जनतेकडून सर्वाधिक पसंती देण्यात आली.
काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते यांची राष्ट्रध्वजाप्रतीची उदासीनता !
मुंबई, २७ जानेवारी (वार्ता.) - भारताच्या ६३ व्या प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने सर्वत्र उत्साहाने ध्वजवंदनाचे कार्यक्रम होत असातांना नरिमन पॉर्इंट येथील राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रदेश कार्यालय ‘गांधी भवन’ येथे पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते यांचा शुकशुकाट असल्याने अखेर तेथील सुरक्षारक्षकालाच ध्वजारोहण करणे भाग पडले. या धक्कादायक घटनेमुळे १२५ वर्षांहून अधिक वय झालेल्या राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या उदासीनतेची चर्चा बाकी मंत्रालय परिसरात उद्विग्नतेने चालू असल्याचे निदर्शनास आले.
धर्माभिमानी हिंदूंकडून शासनाचा निषेध
निधर्मी काँग्रेस शासनाचा हिंदूंच्या जखमांवर मीठ चोळण्याचा प्रकार !
डॉ. जुझे परेरा यांनी काढलेल्या हिंदूंच्या धर्मभावना दुखवणार्या चित्रांपैकी एक चित्र
 |
| या चित्रात पाच नग्न गोपिकांची कामजागृती भगवान श्रीकृष्ण करत आहे, असे दाखवले आहे. |
पणजी, २७ जानेवारी (वार्ता.) - मूळ गोव्यातील, पण सध्या अमेरिकेत वास्तव्यास असलेले प्राध्यापक, लेखक तथा चित्रकार डॉ. जुझे परेरा यांना साहित्य आणि शिक्षण या क्षेत्रांतील कार्याबद्दल पद्मभूषण हा नागरी पुरस्कार देण्याचे भारत शासनाकडून घोषित करण्यात आले आहे. काही महिन्यांपूर्वी भगवान कृष्ण, शिव आदी देवतांची अश्लील आणि नग्न चित्रे काढून त्याचे प्रदर्शन डॉ. जुझे परेरा यांनी मांडले होते.
अजित पवार यांच्या विरोधात याचिका दाखल
मुंबई, २७ जानेवारी (वार्ता.) - राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ऑक्टोबर २००९ मधील विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरतांना निवडणूक आयोगाकडे खोटी माहिती सादर केल्याप्रकरणी त्यांचे केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागामार्फत अन्वेषण करण्यात यावे, अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.
नीतीमत्ताहीन राजकीय पक्षांच्या हातात असलेले भारतीय लोकराज्य !
सध्या महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात प्रचाराने वेग धरला असून त्यानिमित्ताने कार्यकर्त्यांत उत्साह टिकून रहावा म्हणून ओल्या पार्ट्यांचे पेव फुटले आहेत. कार्यकर्त्यांना मटण आणि दारू मोठ्या प्रमाणात पुरवली जात आहे. उत्पादन शुल्क अधिकार्यांच्या माहितीनुसार जिल्हा परिषद निवडणुकांत सुमारे ५५० लाख लिटरहून अधिक देशी-विदेशी मद्य राज्यातील विविध पक्षांतील कार्यकर्ते रिचवतील.
मुंबई, २७ जानेवारी (वार्ता.) - मुंबई उच्च न्यायालयात आलेल्या पोलीस अधिकार्यांचा न्यायालयात बसल्यावरही सतत भ्रमणध्वनी वाजत असतो, ही गोष्ट आता नेहमीची झाली आहे. त्यांना जर त्यांची महत्त्वाची कामे करायची असतील, तर त्यांनी न्यायालयाच्या बाहेर जाऊन करावीत, इथे भ्रमणध्वनीवर बोलू नये. न्यायालयात वर्तन कसे करावे, याविषयी पोलिसांमध्ये घोर अज्ञान आहे, अशा कडक शब्दांत न्यायमूर्ती अजय खानविलकर यांनी भिवंडी येथील साहाय्यक पोलीस आयुक्त ए.व्ही. पाटील यांना आज खडसावले.
ओस्लो, २७ जानेवारी - नॉर्वे शासनाने भारतीय दांपत्याच्या दोन लहान मुलांना त्यांना परत करण्याविषयीचा भारताचे परराष्ट्र मंत्री एस्.एम्. कृष्णा यांचा प्रस्ताव स्वीकारला आहे. आता अनुरूप आणि सागरिका भट्टाचार्य या दांपत्याला नॉर्वेच्या न्यायालयात त्यांच्या तीन वर्षांचा मुलगा अभिज्ञान आणि १ वर्षाची मुलगी ऐश्वर्या यांची देखभाल कोण करणार, हे सांगावे लागेल.
नवी मुंबई, २७ जानेवारी – प्रत्येकाला आई, बहीण, पत्नी हवी असते मग मुलगी का नको, असा प्रश्न करीत स्त्री-भू्रण हत्या रोखणे आवश्यक असल्याचे मत भाजपचे ठाणे जिल्हा अध्यक्ष सुरेश हावरे यांनी तुर्भेगाव येथे केले. श्री विठाई प्रबोधन सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित गुणगौरव आणि हळदी-कुंकू कार्यक्रमात हावरे बोलत होते.
मुंबई, २७ जानेवारी (वार्ता.) - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत असलेले कार्यकर्ते धडाडीने कार्यरत आहेत. त्यांनी आजवर काहीच वाईट केलेले नाही. पक्षासाठी त्यांनी बरेच सोसले आहे. त्यामुळे सर्वच आपले आहेत. यातील अनेकांना उमेदवारी मिळणार नसली, तरी आपणाला पक्षात बंडखोरीची चिंता नाही, असे ठाम प्रतिपादन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांशी वार्तालाप करतांना रवींद्र नाट्यमंदिरातील मेळाव्यात केले.
टीप : खालील फलकप्रसिद्धीचा मजकूर स्थानिक परिस्थितीनुसार तारतम्याने फलकावर लिहावा.
हिंदूंनो, निधर्मी राज्यकर्त्यांच्या राज्यात तुमची श्रद्धास्थाने धोक्यात आहेत, हे सत्य जाणा !
मध्यप्रदेशातील धार येथील श्री वाग्देवी सरस्वतीची मूर्ती भाजप शासनाने धार येथील पोलीस ठाण्यात कैदेत ठेवली आहे. शासनाने वसंत पंचमीच्या दिवशी निघणार्या वाग्देवीच्या पालखी मिरवणुकीवरही बंदी घातली आहे !
जोगेश्वरी -
श्री सिद्धीविनायक मंदिर, अंबिकानगर, जोगेश्वरी (पू.) येथे ‘गुरुकृपा
प्रतिष्ठान’च्या वतीने मंदिर स्वच्छता उपक्रम राबवण्यात आला. यामध्ये
प्रतिष्ठानचे ८ साधक सहभागी झाले होते. मंदिरात येणारे भाविक या उपक्रमाची
माहिती जाणून घेत होते.
जयपूर, राजस्थान - अजमेर येथे ऋषी उद्यान गुरुकुलात रहाणारे आचार्य दिनेश शास्त्री यांनी सनातन संस्थेच्या वतीने आयोजित प्रदर्शनात ‘लव्ह जिहाद’ हा ग्रंथ विकत घेतला होता. ग्रंथात असलेली माहिती वाचून ‘हा विषय सगळ्यांपर्यंत पोहोचायला हवा’, असे त्यांना वाटले.
ओडिशा, झारखंड - सनातन भारतीय संस्कृती संस्थेच्या वतीने ओडिशाच्या भुवनेश्वर शहरातील `एक्झीबिशन मैदान' आणि पुरीच्या ‘गुंडेचा मंदिर’ परिसरातील पुस्तक मेळाव्यात तसेच झारखंड येथील ‘बोकारो स्वदेशी मेळाव्या’त भव्य ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
 |
| श्रीमती कला प्रभुदेसाईआजी |
१. प्रतिमास प.पू. डॉक्टरांकडून खाऊ मिळू लागल्यावर त्याची आसक्ती न्यून होणे : ‘एक वर्षापूर्वी (अनुमाने डिसेंबर २०१० मध्ये) पू. राजेंद्रदादा गोव्याला जाण्यापूर्वी आमच्या घरी आले होते. त्यांनी मला विचारले, ‘`तुम्हाला प.पू. डॉक्टरांना काही निरोप द्यायचा आहे का ?’' तेव्हा मी त्यांना म्हणाले, `‘बरेच दिवसांत प.पू. डॉक्टरांकडून प्रसाद मिळाला नाही.'’
एका सनदी अधिकारी सौ. लीना जैन
यांनी देशातील विदारक स्थितीविषयी मांडलेली सूत्रे आमच्या वाचकांसाठी येथे
देत आहोत. लोकशाहीतील प्रत्येक क्षेत्रच कसे अकार्यक्षम, भ्रष्ट आणि
जनताद्रोही आहे, हेच त्यांच्या पुढे दिलेल्या सूत्रांतून स्पष्ट होते.
माघ शु. पंचमी, कलियुग वर्ष ५११३ (२८.१.२०१२) या दिवशी प.पू. भक्तराज महाराजांचा प्रगटदिन आहे. त्यानिमित्त मला पुढील काव्य सुचले.
तेजोमय सोनकिरणांपरी । अमर प्रकाशित साज ।।
भक्तउद्धारार्थ अवतरले । प.पू. भक्तराज महाराज ।। १ ।।
१. ‘१९.७.२०११ या दिवशी आमचा साप्ताहिक सत्संग होता. सत्संगात प.पू. भक्तराज महाराजांचे (प.पू. बाबांचे) जागृत झालेले नवीन छायाचित्र ठेवले होते. त्या वेळी सर्वच साधकांना मन निर्विचार होणे, प्रार्थना भावपूर्ण होणे, स्वतःच्या अस्तित्वाचा विसर पडणे, अशा विविध अनुभूती आल्या.
१. ‘पूर्वी प.पू. बाबा म्हणायचे, ‘‘केवळ डॉक्टर (डॉ. आठवले) बोलतील.’’ (इतर साधकांनी मार्गदर्शन करू नये.)
२. पूर्वी प.पू. बाबा म्हणायचे ‘नाम घ्या.’ १०.३.१९९३ या दिवशी दुपारी ३ ते ४ च्या या कालावधीत इस्लामपूर येथे गोव्यातील साधकांना सांगितले, ‘‘भारतभर (नामाचा) प्रचार करा.’’
 |
| प.पू. भक्तराज महाराज, सनातन संस्थेचे प्रेरणास्थान |
१. ‘तुझ्यासारख्या ‘वेड्याला’ (पागल माणसाला) ‘वेडेच’ (पागलच) समजू शकतील. हे ‘वेडे’ (पागल) काय समजू शकणार’, असे सूक्ष्मातून प.पू. भक्तराज महाराजांनी सांगणे : ‘एकदा ‘प.पू. डॉक्टरांविषयी कोणाशीतरी बोलावे’, अशी तीव्र इच्छा माझ्या मनात निर्माण झाली; परंतु मला जे बोलायचे आहे, ते समजू शकणारी एकही व्यक्ती मला भेटत नव्हती.
वर्ष १५२६ मध्ये बाबराने दिल्लीतील सत्ता कह्यात घेतली आणि त्यानंतर सार्या हिंदुस्थानभर मोगलांची सत्ता पसरली. स्वतःच्या वडिलांना किंवा भावांना ठार मारूनच सत्ता हस्तगत करणारे मोगल बादशहा क्रूर असतांना त्यांचे उदात्तीकरण करणारे ‘सन्स ऑफ बाबर’ (बाबराचे पुत्रपौत्र किंवा वंशज) हे नाटक रंगभूमीवर आले आहे.
 |
| अमरावती येथील प्रबोधनफेरी |
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विविध ठिकाणी राबवलेल्या ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा’ चळवळीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. चौकाचौकात समितीच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर पडलेले राष्ट्रध्वज सन्मानाने जमा केले. काही ठिकाणी विद्यार्थी, तर काही ठिकाणी जनतेनेही या कार्यात सहकार्य केले. समितीच्या या चळवळीचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले.
 |
| कु. आहान आशिष वैद्य |
‘कु. आहान आशिष वैद्य (वय ८ वर्षे) हा ठाणे येथे रहातो. तो इयत्ता दुसरीत शिकत आहे. त्याच्या वागण्या-बोलण्यातून अन्य बालकांपेक्षा त्याचे असलेले वेगळेपण आमच्या लक्षात आले. त्याच्या घरचे कोणीही सनातनचे साधक नाहीत, तरीही ‘सनातन’विषयी त्याच्या मनात पुष्कळ आदर आणि प्रेम आपोआप निर्माण झाले आहे.
देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा देशाची एकूण विद्युतनिर्मिती क्षमता १३०० ते १४०० मेगावॅट इतकी होती. आजमितीला ही आकडेवारी १ लक्ष ३० सहस्र ते १ लक्ष ४० सहस्र मेगावॅट म्हणजे जवळपास १०० पटीने वाढली आहे. याच काळात देशाचा औद्योगिक विकासही मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे विजेची मागणी ही नेहमीचीच बाब होऊन बसली आहे.
देशात वेगवेगळ्या राज्यांत होणार असलेल्या विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या अनुषंगाने ‘कल्याणकारी राज्य’ या संकल्पनेवर उमेदवारांच्या सभा आणि सर्वसामान्य जनतेमधील चर्चा रंगत आहेत. चांगल्या राज्यव्यवस्थेचे धोरण म्हटले म्हणजे समाजातील सर्व गटांतील जनता सुखी आणि समाधानी राहील, अशा प्रकारे लक्ष पुरवण्याचे काम त्या धोरणाच्या अंतर्गत करावे लागते.