Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

संस्कृतीविरोधी ‘सनबर्न’ला भाजप सरकारचा पाठिंबा !

  • जनता संस्कृतीहीन बनेल, असे कार्यक्रम ठेवणे भाजप सरकारकडून अपेक्षित नाही ! अशा कार्यक्रमांतून महसूल मिळाल्याने भौतिक विकास होईल; पण जनतेची अधोगती होईल. संस्कृतीचे रक्षण केल्यास ईश्‍वर विकासासाठी महसूल अल्प पडू देणार नाही, असा विश्‍वास का नाही ? 
सनबर्न फेस्टिव्हलमुळे पर्यटनाला चालना मिळून 
सरकारचा महसूल वाढेल ! - पर्यटन राज्यमंत्री जयकुमार रावल
         पुणे, २३ डिसेंबर (वार्ता.) - सनबर्न संगीत फेस्टिव्हलमुळे पर्यटनाला चालना मिळून सरकारचा महसूल वाढेल. पुण्यातील तरुणाईची आवड लक्षात घेऊन हा कार्यक्रम आयोजित केला जात आहे. काळाप्रमाणे लोकांच्या विचारसरणीत आणि सांस्कृतिक विचारांमध्ये पालट होत आहेत, असे सांगत पर्यटन राज्यमंत्री जयकुमार रावल यांनी संस्कृती भ्रष्ट करणार्‍या आणि अमली पदार्थांच्या माध्यमातून व्यसनाधीनेतला चालना देणार्‍या सनबर्न संगीत फेस्टिव्हलला पाठिंबा घोषित केला. (राज्याच्या सांस्कृतिक राजधानीत भारतीय संस्कृतीचे अधःपतन करणारे कार्यक्रम होणे दुर्दैवी ! पर्यटन आणि महसूल यांमध्ये वाढ होण्यासाठी संस्कृतीहीन कार्यक्रमांचा आधार का घ्यावा लागतो ? - संपादक)

डॉ. तावडे यांच्यावरील आरोप निश्‍चितीची सुनावणी पुढे ढकलण्याचा सीबीआयचा अर्ज न्यायालयाने पुन्हा फेटाळला !

पुढील सुनावणी 
३ जानेवारी २०१७ ला होणार
       पुणे, २३ डिसेंबर - डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणातील संशयित आरोपी असलेले सनातनचे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांच्यावरील आरोप निश्‍चितीची सुनावणी १ मास पुढे ढकलावी; कारण आरोपनिश्‍चिती करण्यासंबंधी जिल्हा न्यायालयाच्या आदेशावर स्थगिती मिळवण्यासाठी उच्च न्यायालयात केलेली याचिका प्रलंबित आहे, असा विनंती अर्ज केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने (सीबीआयने) जिल्हा सत्र न्यायालयात सादर केला. अपर सत्र न्यायाधीश एम्. नासीर यांनी हा अर्ज फेटाळून लावत आरोप निश्‍चितीची पुढील सुनावणी ३ जानेवारी २०१७ या दिवशी ठेवली आहे. (यावरूनच अन्वेषण यंत्रणेचा चालढकलपणाच दिसून येतो ! संपादक) यापूर्वीही अन्वेषण यंत्रणेने ‘आरोप निश्‍चितीची सुनावणी पुढे ढकलावी’, असे अर्ज १६ आणि २८ नोव्हेंबर, तसेच ९ डिसेंबर २०१६ या दिवशीही केले होते. प्रत्येक वेळी न्यायालयाने ते अर्ज फेटाळून लावत यंत्रणेला संधी दिली होती. या वेळी डॉ. तावडे यांचे अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर आणि अन्वेषण यंत्रणेचे अधिवक्ता मनोज चालाडे हे उपस्थित होते. सुनावणीला डॉ. तावडे यांना उपस्थित करण्यात आले नव्हते.

‘सनातन पंचांग २०१७’च्या कन्नड भाषेतील अ‍ॅण्ड्रॉईड आवृत्तीचे प्रकाशन !

सनातन पंचांग २०१७च्या कन्नड
भाषेतील अ‍ॅण्ड्रॉईड आवृत्तीचे प्रकाशन करतांना
श्रीश्रीश्री (डॉ.) महर्षी आनंद गुरुजी आणि श्री. मोहन गौडा

        बेंगळुरू - येथे २३ डिसेंबर या दिवशी श्रीश्रीश्री (डॉ.) महर्षी आनंद गुरुजी यांच्या शुभहस्ते सनातन पंचांग २०१७ च्या कन्नड भाषेतील अ‍ॅण्ड्रॉईड आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे समन्वयक श्री मोहन गौडा, श्री. नवीन, सौ. ललिता तिम्मप्पय्य आणि श्री. तिम्मप्पय्य हे उपस्थित होते.

गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी ६९ ट्रक पेटवले !

   गडचिरोली - २३ डिसेंबरला दुपारी १२ वाजता गणवेशधारी नक्षलवाद्यांनी लोह खनिजाची वाहतूक करणारे ६९ ट्रक पेटवले. जिल्ह्यातील सुरजागड पहाडावर गेल्या तीन मासांपासून लोह खनिज उत्खननाचे काम चालू होते. मुंबईतील ‘लायड अ‍ॅण्ड मेटल’ या आस्थापनाला सरकारने २००७ मध्ये लीज दिली होती. या प्रकल्पाला नक्षलवाद्यांनी तीव्र विरोध केला होता. काही वर्षांपूर्वी याच पहाडीजवळ नक्षलवाद्यांनी या आस्थापनाच्या २ कर्मचार्‍यांची हत्या केली होती. त्यानंतर २०१६ मध्ये भाजप सरकारने हा प्रकल्प पुन्हा चालू करण्याचा निर्णय घेऊन चार मासांपूर्वी येथे उत्खनन चालू केले होते.

नोटाबंदीद्वारे सरकारने सामान्यांच्या संपत्तीवरच डल्ला मारला ! - स्टिव्ह फोर्ब्स

   नवी देहली - नोटाबंदीचा निर्णय घेतांना सक्षम पर्यायी व्यवस्था निर्माण न करता केंद्र सरकारने एक प्रकारे लोकांच्या संपत्तीवरच डल्ला मारला आहे. एखाद्या देशातील लोकांनी निवडून दिलेल्या सरकारने अशा प्रकारचा निर्णय घेणे माझ्यासाठी धक्कादायकच होते, अशी टीका ‘फोर्ब्स’ या प्रसिद्ध मासिकाचे मुख्य संपादक स्टिव्ह फोर्ब्स यांनी केली आहे. ‘फोर्ब्स’मध्ये लिहिलेल्या लेखात त्यांनी या निर्णयाचा आणि त्याच्या परिणामांचा सांगोपांग आढावा घेतला आहे.
   या लेखात स्टिव्ह फोर्ब्स यांनी म्हटले की, केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे भारतीय नागरिकांचे भविष्य सध्या पणाला लागले आहे. सर्वसामान्य लोकांना नाहक नोटाबंदीचा त्रास सहन करावा लागतो आहे. यामुळे विदेशी गुंतवणुकीवरही भविष्यात परिणाम होऊ शकतो. भारताच्या नोटाबंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी बघून जगातील इतर देशांनाही धडाच मिळाला आहे. भारताला जगातील महासत्ता होण्याची महत्त्वाकांक्षा आहे; पण त्या दिशेने प्रवास करतांना भारताने प्राप्तिकर आणि व्यावसायिक कर यांचे दर न्यून केले पाहिजेत. त्याचप्रमाणे संपूर्ण कररचनेमध्ये आमूलाग्र पालट घडवून आणले पाहिजेत.

बडोदा येथे मद्य मेजवानीवरील धाडीतून आयपीएल्चे माजी प्रमुख चिरायू अमीन यांच्यासह २०० जणांना अटक !

गुजरातमध्ये मद्यबंदी असतांनाही मोठ्या लोकांकडून अशा मेजवानीचे आयोजन करण्याचे धाडस होते, याचाच अर्थ अशा मेजवान्या नियमित होत असणार आणि त्यांना स्थानिक पोलिसांचे समर्थन असणार ! 
   बडोदा - येथे अवैधरित्या चालू असलेल्या एका दारूच्या मेजवानीवर गुजरात पोलिसांनी टाकलेल्या धाडीत २०० हून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये अनेक नामवंत उद्योजक आणि महिला यांसह इंडियन प्रीमियर लीगचे माजी प्रमुख चिरायू अमीन यांचाही समावेश असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. एका फार्महाऊसवर ही मेजवानी चालू होती. गुजरातमध्ये दारूबंदी आहे.

सायबेरिया (रशिया) येथे उणे ६२ डिग्री सेल्सियस तापमान !

महर्षींनी प्रलयकालाविषयी सतर्क करणे
   १९.३.२०१६ या दिवशी झालेल्या ‘नाडीवाचन क्रमांक ६७’मध्ये महर्षि म्हणतात, ‘‘हे पूर्ण वर्ष प्रलयकालाचे आणि आपत्तीजनक असणारे आहे.’’ (रशियातील सायबेरियात येथील तापमान उणे ६२ डिग्री सेल्सियसपर्यंत खाली घसरले आहे. या घटनेवरून प्रलयकालाविषयी महर्षींनी केलेले भाष्य किती तंतोतंत आहे, हे लक्षात येते ! - संपादक)
   मॉस्को - रशियातील सायबेरियात येथील तापमान उणे ६२ डिग्री सेल्सियसपर्यंत खाली घसरले आहे. तसेच या संपूर्ण प्रदेशात तापमान उणे ४० ते उणे ६२ डिग्री सेल्सियसपर्यंत आहे. मागील ८३ वर्षांतील हे सर्वांत न्यून तापमान ठरले आहे. ६ फेब्रुवारी १९३३ मध्ये उणे ६७.२ डिग्री नोंदवले होते. केस, भुवया आणि दाढी यांवरही बर्फ जमत आहे. सर्वांत अधिक थंडी काउंटी मानसी भागात नोंदवली गेली आहे. थंडीमुळे इलेक्ट्रॉनिक वस्तू बंद पडल्या आहेत. या थंडीमुळे जंगली प्राणी, हरणे आणि घोडे सुद्धा रहिवासी इमारतींमध्ये शिरू लागली आहेत.

लिबियाच्या प्रवासी विमानाचे अपहरण

   वालेटा - लिबियाच्या प्रवासी विमानाचे अपहरण करण्यात आले आहे. हे विमान माल्टा विमानतळावर उतरवण्यात आले आहे. एअरबस ए ३२० विमानात एकूण ११८ प्रवासी आहेत. विमानात २ अपहरणकर्ते असून त्यांनी विमान उडवून देण्याची धमकी दिली आहे.अमेरिकेत एका मुसलमान महिलेला ‘आतंकवादी’ संबोधून तिच्यावर गरम कॉफी फेकली !

अमेरिकेच्या नागरिकांमध्ये मुसलमानांच्या विरोधात वाढता द्वेष !
न्यूयॉर्क - अमेरिकेमध्ये एका मुसलमान महिलेला ‘आतंकवादी’ संबोधून तिच्यावर गरम कॉफी फेकल्याप्रकरणी अमेरिकेच्या एका नागरिकाला पोलिसांनी अटक केली आहे. मॅनहॅटन येथील एका कॉफी शॉपमध्ये ही घटना घडली असून नाथन ग्रे नावाच्या ३४ वर्षीय सदर व्यक्तीने तेथे उपस्थित मुसलमान महिलेला ‘आतंकवादी’ संबोधत ‘मी मुसलमानांचा द्वेष करतो’, असे म्हटले.

झारखंडमध्ये नक्षलवाद्यांच्या ४० बँक खात्यांमध्ये ५५ कोटी रुपये जमा !

एका राज्यात नक्षलवाद्यांची एवढी खाती, तर देशभरात किती असतील, याचा विचारही न केलेला बरा !
अंमलबजावणी संचलनालयाकडून सर्व खात्यांना टाळे !
    रांची (झारखंड) - नोटाबंदीचा फटका सर्वसामान्य नागरिकांसह नक्षलवाद्यांनाही बसला आहे. झारखंडमध्ये प्रशासनाकडून नक्षलवाद्यांच्या ४० बँक खात्यांना टाळे ठोकण्यात आले आहे. त्यामुळे या खात्यांमधून रक्कम काढणे आणि पैसे जमा करणे यांवर बंधन आले आहे. या ४० खात्यांमध्ये अनुमाने ५५ कोटी रुपये जमा आहेत. यांतील १५ खाते कुप्रसिद्ध नक्षलवाद्यांचे असून त्यांना पकडून देणार्‍यांना पोलिसांकडून ‘बक्षिस’ घोषित करण्यात आले आहे. 

मुसलमानांच्या मोर्च्यात पंतप्रधानांच्या विरोधात घोषणा !

धार्मिक कायद्यातील हस्तक्षेपाच्या विरोधात मुसलमान संघटित होऊन
विरोध करतात, तर किती हिंदू आणि त्यांचे लोकप्रतिनिधी, संघटना,
 पक्ष मंदिरांच्या सरकारीकरणासह अन्य धार्मिक हस्तक्षेपांना विरोध करतात ?
बुढाना (उत्तरप्रदेश) येथे शरीयत कायद्यातील हस्तक्षेपाला विरोध
   मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) - उत्तरप्रदेशच्या बुढाना येथे नुकतेच भारतीय किसान मजदूर मंचाच्या नेतृत्वाखाली मुसलमानांनी तीन वेळा तलक म्हणण्याच्या सूत्रावरून आंदोलन केले. यात सहस्रावधी मुसलमान सहभागी झाले होते. या वेळी काढण्यात आलेल्या मोर्च्यामध्ये ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी मुर्दाबाद’च्या घोषणा देण्यात आल्या. तहसीलदार कार्यालयावर मोर्चा पोचल्यावर राष्ट्रपतींच्या नावाने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. मोर्च्याच्या वेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शरीयत कायद्यातील कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप मुसलमान सहन करणार नाहीत. भाजप सरकार षड्यंत्र करून सर्वोच्च न्यायालयाची दिशाभूल करत यात हस्तक्षेप करत आहे. या हस्तक्षेपाला विरोध केला जाईल, अशी चेतावणी या वेळी देण्यात आली.

मुसलमानांचे आरक्षण ४ वरून १२ टक्के करा !

  • आरक्षण म्हणजे लायकी नसणार्‍यांना संधी देणे ! अशा आरक्षणामुळेच भारताची दिवसेंदिवस अधोगती होत आहे ! ही अधोगती रोखण्यासाठी लोकशाही नव्हे, तर हिंदु राष्ट्रच हवे !
  • आधी ४ टक्के आरक्षण मिळवणारे आता १२ टक्क्यांची मागणी करत आहेत, पुढे त्यातही वाढ करण्याची मागणी होणार नाही, याची निश्‍चिती कोण देणार ?
  • तेलंगणच्या अल्पसंख्यांक आयोगाची मागणी
       भाग्यनगर - तेलंगण राज्याच्या अल्पसंख्यांक आयोगाने राज्याच्या मागसवर्गीय आयोगाकडे मुसलमानांना १२ टक्के आरक्षण देण्याची मागणी केली आहे. सध्या मुसलमानांना शैक्षणिक संस्था आणि सरकारी नोकर्‍या यांत ४ टक्के आरक्षण दिले जाते. याविषयी अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष आबिद रसूल खान म्हणाले की, जर सरकार मुसलमानांसाठी १२ टक्के आरक्षणाला संमती देते, तर सध्याच्या ४ टक्के आरक्षणात वाढ करण्याचा आदेश काढावा लागेल.
       या आदेशाला एखाद्याने न्यायालयात आव्हान दिले, तर सध्याचे ४ टक्के आरक्षणही धोक्यात येऊ शकते. त्यामुळे या आरक्षणाचे संरक्षण होणेही आवश्यक आहे, म्हणूनच आम्ही ४ अधिक ८ अशा आरक्षणाची मागणी केली आहे. या दोघांना मिळून १२ टक्के होते. (चतुर आबिद रसूल खान ! अशी हुशारी स्वतःच्या धर्मियांसाठीच न दाखवता देशासाठीही त्यांनी दाखवावी ! - संपादक)

श्रीशिवप्रतिष्ठानच्या धारकर्‍यांनी ख्रिसमसच्या नावाखाली होणारा धर्मप्रसार रोखला !

श्रीशिवप्रतिष्ठानच्या धारकर्‍यांची अभिनंदनीय कृती ! 
   सांगली, २३ डिसेंबर (वार्ता.) - येथील राममंदिर चौकात २२ डिसेंबरच्या रात्री ७.३० वाजता काही ख्रिस्ती ख्रिसमसच्या नावाखाली बायबलचे वाटप करणे, पदपथावरच येशूचे महत्त्व सांगणे, तसेच अन्य प्रकारच्या कृतींद्वारे ख्रिस्ती धर्माचा प्रसार करत होते. ही गोष्ट श्रीशिवप्रतिष्ठानचे धारकरी श्री. नितीन चौगुले आणि त्यांचे धारकरी यांना समजली. त्यांनी तेथे जाऊन या सर्वांना खडसवले. अनुमती पत्राची तपासणी केली असता त्यांच्याकडे केवळ धार्मिक कार्यक्रम करण्याची अनुमतीच होती; मात्र तरीही ते रस्त्यावर ध्वनीक्षेपक लावून धर्मप्रसार करत होते. यामुळे संतप्त झालेल्या धारकर्‍यांनी या सर्वांना कार्यक्रम बंद करण्यास भाग पाडले. 
१. ख्रिस्ती येणार्‍या-जाणार्‍या लोकांना विनामूल्य बायबलचे वाटप करत होते. यातून एकप्रकारे हिंदूंना ख्रिस्ती धर्म कसा चांगला आहे, हे सांगण्याचा प्रयत्न चालू होता. 
२. काही जण सांताक्लॉजचा वेश करून प्रबोधनाच्या नावाखाली पत्रके वाटप करण्याचे काम करत होते. 

यापुढे भारतियांसाठी हाँगकाँगची ‘विजा’मुक्त प्रवेश सुविधा बंद !

धूर्त चीनची भारतावर कुरघोडी ! चीनच्या दबावाखाली हाँगकाँगचा भारतविरोधी निर्णय ?
     नवी देहली - हाँगकाँगने भारतियांसाठी असलेली ‘विजा’मुक्त प्रवेश सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यापुढे हाँगकाँगला जाणार्‍या भारतियांसाठी आगमन पूर्व नोंदणी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक असणार आहे. यासंदर्भात नुकतीच हाँगकाँगच्या इमिग्रेशन विभागाने त्यांच्या संकेतस्थळावर घोषणा केली आहे. हाँगकाँगने घेतलेला हा निर्णय व्यवसाय, व्यापार आणि पर्यटनासाठी जाणार्‍या भारतियांसाठी अडचणीचा ठरणारा आहे. ही व्यवस्था २३ जानेवारी २०१७ पासून लागू करण्यात येणार आहे.

आसाममध्ये पाक क्रिकेटपटूचे नाव असलेली पाकिस्तानी जर्सी घातल्यामुळे युवकाला कारावास !

सीमेवर पाककडून भारतीय सैन्यांच्या हत्या होत असतांना
 पाकच्या क्रिकेटपटूंचे उदात्तीकरण करणार्‍यांना पाकमध्ये पाठवणे आवश्यक !
   गौहत्ती (आसाम) - येथे रिपन चौधरी नावाच्या एका युवकाने पाक क्रिकेटपटू शाहिद अफ्रिदी याचे नाव असलेली पाकिस्तानी जर्सी घातल्यामुळे त्याला आसाम पोलिसांनी भारतीय दंडविधानाच्या १२० (ब) आणि २९४ या कलमांखाली अटक केली आहे. 
   आसाममधील हैलालकंदी येथे जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धा चालू होती. या स्पर्धेत रिपन चौधरी याने शाहिद अफ्रिदीच्या नावाची जर्सी घातली. यावर आक्षेप घेत भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्याने त्याच्या विरोधात तक्रार प्रविष्ट केली होती. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. सध्या त्याला कारागृहात पाठवण्यात आले आहे. अशाच प्रकारची घटना मागील वर्षी पाकमध्ये घडली होती. भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीच्या एका चाहत्याने त्याच्या घरावर भारताचा तिरंगा लावला होता. त्यामुळे त्याला १० वर्षांची शिक्षा झाली होती. कालांतराने ५० सहस्र रुपयांच्या जातमुचलक्यावर त्याला जामीन देण्यात आला.

३१ डिसेंबरला होणारे अपप्रकार रोखण्यासाठी गुजरात, तेलंगण आणि केरळ या राज्यांमध्ये हिंदु जनजागृती समितीकडून आंदोलन अन् निवेदन सादर !

इंदूर येथे आंदोलनात सहभागी धर्माभिमानी आणि बोलतांना श्री. नेल्ला तुकाराम

गुजरातमध्ये आंदोलन करतांना धर्मप्रेमी
मुंबई - ३१ डिसेंबरच्या रात्री ख्रिस्ती नववर्षाच्या नावाखाली होणारे अपप्रकार रोखण्याची मागणी हिंदु जनजागृती समितीने तेलंगण राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आंदोलन आणि निवेदन यांद्वारे केली आहे. या आंदोलनांमध्ये हिंदुत्वनिष्ठ संघटना सहभागी झाल्या होत्या. तसेच गुजरातची राजधानी असलेल्या कर्णावती येथील मणीनगर परिसरात १८ डिसेंबरला राष्ट्रीय हिंदू आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. केरळमधील एर्नाकुलम् येथे समितीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन सादर केले. या सर्वच ठिकाणी मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला.

विनाशिरस्त्राण दुचाकी चालवणार्‍या पोलिसांवर मोटार वाहन नियमानुसार दंडात्मक कारवाईचे आदेश

असे आदेश देण्याची वेळ का येते, 
याचा पोलिसांनी विचार करावा !
        ठाणे - काही पोलीस अधिकारी, कर्मचारी, बीट मार्शल कर्मचारी हे शासकीय, तसेच खाजगी दुचाकी चालवतांना शिरस्त्राण (हेल्मेट) परिधान करत नाहीत. नागरिक विनाशिरस्त्राण दुचाकी चालवणार्‍या अशा पोलिसांची छायाचित्रे काढून सामाजिक संकेतस्थळांवर अपलोड करतात आणि त्याद्वारे कारवाईमध्ये दुजाभाव करण्याविषयीच्या तक्रारी करतात. वाहनचालकांना शिस्त लावण्यापूर्वी पोलिसांनी स्वत:ला शिस्त लावणे आवश्यक आहे. विनाशिरस्त्राण दुचाकी चालवणार्‍या पोलिसांवर मोटार वाहन नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल. तसेच मोटार वाहन नियमांची माहिती ठाऊक असतांनाही त्यांचे जाणून-बुजून उल्लंघन करणार्‍यांवर शिस्तभंगाचीही कारवाई करण्यात येईल, असे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत.

देहलीतील कोटक महिंद्रा बँकेवरील धाडीत ७० कोटी रुपये जप्त !

   नवी देहली - आयकर विभागाने अ‍ॅक्सिसपाठोपाठ नवी देहलीतील कोटक महिंद्रा बँकेवर २३ डिसेंबरला धाड टाकली. या वेळी बँकेतील २ खात्यांतून ७० कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. येथील कस्तुरबा गांधी शाखेत बनावट खाती असल्याचा संशय आल्याने ही कारवाई करण्यात आली. ही खाती रमेश चांद आणि राजकुमार या २ व्यक्तींच्या नावे आहेत. त्यांनी हा पैसा काळ्याचा पांढरा केल्याचा संशय आहे; मात्र या खातेधारकांनी केवायसी (know your customer) (म्हणजे आधार कार्ड, पॅन कार्ड आदी पुरावे देऊन स्वतःची ओळख बँकेला पटवून देणे) प्रक्रिया पूर्ण केल्याचा दावा बँकेने केला आहे.

पुढील शंभर वर्षांत मुंबईचा ४० टक्के भाग पाण्याखाली येण्याची शक्यता !

  • शोधनिबंधाद्वारे शास्त्रज्ञांनी मुंबईकरांना करून दिली भविष्यातील संकटाची जाणीव !
  • संत आणि ऋषिमुनी यांनी जे सहस्रो वर्षांपूर्वी सांगितले आहे, ते शास्त्रज्ञ आता संशोधन करून सिद्ध करत आहेत. यावरून अध्यात्म हे विज्ञानापेक्षा कसे श्रेष्ठ आहे, हे लक्षात येते !
मुंबई, २३ डिसेंबर - वातावरणात सातत्याने होणार्‍या पालटामुळे जगभरातील समुद्रांच्या पातळीत वाढ होत आहे. समुद्रपातळी वाढण्याचे प्रमाण याच गतीने चालू राहिल्यास पुढील १०० वर्षांत ४० टक्के मुंबई पाण्याखाली बुडण्याची शक्यता एका संशोधनाद्वारे व्यक्त करण्यात आली आहे. मुंबईवर येणारे हे संकट २६ जुलैच्या संकटापेक्षा कितीतरी पटींने मोठे असेल. ही माहिती इंडियन मेट्रोलॉजिकल सोसायटीच्या वतीने भुवनेश्‍वरमध्ये झालेल्या ‘ट्रॉपमेट’ या राष्ट्रीय चर्चासत्रात एका शोधनिबंधावर झालेल्या चर्चेत देण्यात आली. ‘हवामानामधील पालटाचे मुंबईवर होणारे परिणाम’ या विषयावर हा शोधनिबंध होता. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफीचे शास्त्रज्ञ आर्. मणी मुरली यांनी रियास एम्.जे., रेशमा के.एन्. आणि संतोष कुमार यांच्या साहाय्याने हा शोधनिबंध सिद्ध केला आहे.

नाशिक येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

   नाशिक (वार्ता.) - हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धर्माभिमान्यांनी राष्ट्रीय हिंदू आंदोलन केले. बांगलादेशमधील हिंदू आणि हिंदूंच्या मंदिरांवर होणार्‍या आक्रमणांविषयी शासनाने तातडीने योग्य ती कारवाई करावी, तसेच हिंदूंवर आक्रमणे करणारा, स्त्रियांची अब्रू लुटणारा, हिंदूंची मंदिरे फोडणारा क्रूरकर्मा अकबर याचे उदात्तीकरण थांबवून त्याची रेल्वे स्थानकांवर काढण्यात येणारी चित्रे त्वरित पालटावीत, या मागण्या आंदोलनात करण्यात आल्या. या वेळी शासनाच्या चुकीच्या धोरणाविरुद्ध घोषणाही देण्यात आल्या. आंदोलनानंतर वरील मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकारी श्री. खेडेकर यांना देण्यात आले.  

नाशिकमध्ये दीड कोटीच्या बनावट नोटा जप्त केल्याच्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याला अटक !

   नाशिक - येथे २२ डिसेंबरला दीड कोटीच्या बनावट नोटा जप्त करून नाशिक पोलिसांनी ११ जणांना अटक केली. त्यामध्ये राष्ट्रवादीचा युवक अध्यक्ष छबू नागरे आणि रामराव पाटील यांचा समावेश आहे. या आरोपींकडून दीड कोटीच्या बनावट नोटा आणि १ लाख ८० सहस्र रुपयांची रोकड जप्त केली असून त्यात दोन सहस्रच्या नव्या नोटांचाही समावेश आहे.

सातारा येथे पुरोगामी संघटनांचा विरोध झुगारत ‘हे राम नथुराम’ नाटकाचा प्रयोग यशस्वी !

पुरोगाम्यांनी नाटकाला विरोध करणे, ही गांधीवादाची हत्याच !
   सातारा, २३ डिसेंबर (वार्ता.) - हिंदुत्वनिष्ठ विचारांचे अभिनेते श्री. शरद पोंक्षे यांचे ‘हे राम नथुराम’ हे नाटक पुरोगामी संघटनांच्या विरोधानंतरही पुष्कळ गर्दीत पार पडले. शाहू कलामंदिर येथे २१ डिसेंबरला रात्री ९ वाजता प्रयोगाचे सादरीकरण होत असतांना पुरोगामी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी नाटक बंद पाडण्यासाठी घोषणाबाजी केली. (विरोध प्रकट करण्यासाठी असंवैधानिक मार्गाचा अवलंब करणारे पुरोगामी महाराष्ट्राला कलंकच ! - संपादक) पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत आंदोलनकर्त्यांना कह्यात घेतल्याने नाटकाचा प्रयोग यशस्वीरित्या पार पडला.
   नाटकाला विरोध करून पुरोगामी नेहमीप्रमाणे प्रसिद्धीसाठी ‘स्टंटबाजी’ करत असल्याची प्रतिक्रिया उपस्थितांनी व्यक्त केली. बलात्काराच्या आरोपातून पुराव्याअभावी मुक्त झालेले ‘उपरा’कार लक्ष्मण माने, अधिवक्त्या वर्षा देशपांडे, अधिवक्त्या शैला जाधव, माया पवार, कैलास जाधव, संदीप कांबळे, रूपा मुळे, स्वाती कांबळे, राकेश कुलकर्णी यांनी बेकायदेशीर घोषणाबाजी केल्याने पोलिसांनी त्यांना कह्यात घेतले. या नाटकाला सातारकरांनी मोठा प्रतिसाद दिला.

मुंबईत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकानिमित्त भव्य शोभायात्रा !

   मुंबई - छत्रपती शिवाजी महाराजांच्या जागतिक कीर्तीच्या स्मारकानिमित्त राज्यातील सर्व जिल्ह्यांमधून आलेल्या नद्यांचे जल आणि मातीचे कलश यांची चेंबूर येथून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत चंद्रकांत पाटील, विनोद तावडे, आशिष शेलार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांसह भाजपच्या नेत्यांनी सहभाग घेतला. या भव्य शोभायात्रेतील सर्व कलश मुख्यमंत्र्यांकडे सोपवले गेले. शिवस्मारकाच्या भूमीपूजनासाठी आणि शिवकालीन वातावरणनिर्मिती करण्यासाठी सरकारने नितीन देसाई यांच्याकडून मेघडंबरी किल्ल्यांचा देखावा साकारला होता. 

मुंबईत इमारतीवरून उडी मारून पोलिसाची आत्महत्या

वारंवार होणार्‍या पोलिसांच्या आत्महत्या रोखण्यासाठी त्यांना साधना शिकवणेच अपरिहार्य आहे !
मुंबई, २३ डिसेंबर - अंधेरी येथे २२ डिसेंबर या दिवशी सकाळी ७ वाजता पोलीस श्रीनिवास कुंभारे (वय ४३ वर्षे) यांनी त्यांच्या राहत्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. कुंभारे यांनी आजाराला कंटाळून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

घोडबंदर रोड, ठाणे येथून युरेनियमसदृश पदार्थांचा साठा कह्यात !

       ठाणे - पोलिसांनी एका कारवाईच्या वेळी युरेनियम सदृश्य पदार्थांचा साठा कह्यात घेतला आहे. या कारवाईत जप्त करण्यात आलेल्या पदार्थाची किंमत अनुमाने २४ कोटी रुपये आहे. या पदार्थांमध्ये युरेनियमचे प्रमाण ८७.७० टक्के युरोमनियम असल्याचे प्रयोगशाळेतून सांगण्यात आले. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपस्थित आहेत.

केसनंद येथे अवैध उत्खनन करणार्‍या ठेकेदाराच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट !

       पुणे - केसनंद गावात सनबर्न संगीत फेस्टिव्हल ज्या ठिकाणी होणार आहे, त्या ठिकाणी अवैध उत्खनन करणार्‍या एका ठेकेदाराच्या विरोधात वन विभागाने २० डिसेंबर या दिवशी गुन्हा प्रविष्ट केला आहे. त्या ठिकाणाहून २ पोक्लेन यंत्रे जप्त करण्यात आली असून पुढील कायदेशीर प्रक्रिया चालू करण्यात आली आहे.

गोवंडी, मुंबई येथे अल्पवयीन मुलीला पळवून नेणार्‍या धर्मांधाच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट !

  • धर्मांधांच्या तावडीतून आपल्या मुलींचे रक्षण करण्यासाठी त्यांना स्वसंरक्षण प्रशिक्षण द्या !
  • १ मास होऊनही मुलीचा शोध लागला नाही
   मुंबई, २३ डिसेंबर (वार्ता.) - गोवंडी येथील झाकीर हुसैन नगर परिसरात रहाणार्‍या अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेणार्‍या अश्रफ खान या धर्मांधाच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली होती. सकाळी ९.३० वाजता बाहेर गेलेली मुलगी सायंकाळ होऊनही परत न आल्याने वडिलांनी तक्रार नोंदवली; मात्र १ मास उलटूनही तिचा शोध लागत नसल्याने पोलिसांनी काहीच प्रयत्न केला नसल्याची चर्चा होत आहे. (पोलिसांना याविषयी काय म्हणायचे आहे ? - संपादक)

जळगाव येथे होणार्‍या ५६ व्या विराट हिंदु धर्मजागृती सभेचा उत्साह शिगेला !

जळगाव, २३ डिसेंबर (वार्ता.) - येथे २५ डिसेंबर या दिवशी होणार्‍या विराट हिंदु धर्मजागृती सभेचा स्थानिक हिंदुत्वनिष्ठ संघटना, धर्माभिमानी आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांच्याकडून जोमाने प्रसार केला जात आहे. त्यामुळे जनमानसामध्ये धर्मजागृती सभेविषयीचा उत्साह शिगेला पोचला आहे. याचा परिणाम म्हणजे ठिकठिकाणी विविध मंडळांचे कार्यकर्ते, हिंदुत्वनिष्ठ, धर्माभिमानी, सांप्रदायिक आणि विविध युवकांचे गट सभेला उपस्थित रहाण्याचे नियोजन करत आहेत. 
तन-मन-धन झोकून देऊन धर्माभिमानी करत आहेत सभेच्या प्रसाराची धर्मसेवा
   जळगाव शहर आणि ग्रामीण भागात कोपरा सभा, समूह बैठका, घरोघरी निमंत्रण, रिक्शाद्वारे उद्घोषणा, सामाजिक संकेतस्थळे (व्हॉट्स अ‍ॅप, फेसबूक, ट्विटर) आणि अन्य संकेतस्थळे यांच्या माध्यमातून या सभेचा प्रसार चालू आहे. काही धर्माभिमानी भ्रमणभाषवरूनही अनेकांना संपर्क करून धर्मसभेचे निमंत्रण देत आहेत. या सर्वांमुळे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये सभेविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.

नववर्ष १ जानेवारीला नव्हे, तर गुढीपाडव्याला साजरे करा ! - हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीची संस्कृती रक्षण मोहीम !
विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी आणि धर्माभिमानी यांचा मोहिमेत उत्स्फूर्त सहभाग !

पुणे, २३ डिसेंबर (वार्ता.) - ख्रिस्ती नववर्ष स्वागताच्या नावाखाली ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री होणारे समाज आणि संस्कृतीविघातक प्रकार रोखण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने संस्कृतीरक्षण मोहीम राबवण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून या वर्षीही समितीच्या वतीने पुणे, तसेच पिंपरी-चिंचवड परिसरातील शाळा आणि महाविद्यालये यांंमधील विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्यासाठी, तसेच ३१ डिसेंबरच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखण्यासाठी प्राचार्य आणि मुख्याध्यापक यांना, तसेच पोलीस-प्रशासन विभागातील अधिकार्‍यांना निवेदने देण्यात आली. विद्यार्थ्यांचे व्याख्यानांच्या माध्यमातून प्रबोधनही करण्यात आले. या मोहिमेला शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी अन् शिक्षक यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. अनेक शिक्षकांनी समितीच्या या उपक्रमाचे कौतुक केले.

भिवंडी येथे २५ डिसेंबरला हिंदु धर्मजागृती सभा

स्थळ : बाळाजी मंदिर सभागृह, पद्मा नगर, भिवंडी
वेळ : सायंकाळी ५.३० संपर्क : ९९८७०२७३२७

जळगाव येथे जाहीर हिंदु धर्मजागृती सभा

‘देश बदलतो आहे आणि धर्माभिमानी हिंदूंची 
वाटचाल हिंदु राष्ट्राकडे होत आहे’, हे अनुभवण्यासाठी 
हिंदु धर्मजागृती सभेत मोठ्या संख्येने सहभागी व्हा !
स्थळ : शिवतीर्थ, जी.एस्. मैदान, न्यायालय चौक, जळगाव.
रविवार, २५ डिसेंबर २०१६, सायं ५.३०

देवद (पनवेल) येथील सनातन आश्रमातील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे साधक नारायण (नंदू) मुळ्ये यांचे अपघाती निधन

नारायण मुळ्ये
          ‘पनवेल सनातन संस्था’ न्यासाचे व्यवस्थापकीय विश्‍वस्त आणि ‘सनातन संस्था रायगड’ न्यासाचे विश्‍वस्त नारायण (नंदू) मुळ्ये (वय ५९ वर्षे) यांचे २२ डिसेंबरच्या रात्री अपघाती निधन झाले. मृत्यूसमयी त्यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली होती. त्यांच्यावर २३ डिसेंबरला दुपारी १ वाजता पनवेलमधील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
          मुळ्ये हे वर्ष १९९३ पासून सनातनच्या मार्गदर्शनाखाली साधना करत होते, तर वर्ष २००१ पासून देवद येथील आश्रमात पूर्णवेळ सेवा करत होते. त्यांच्या पश्‍चात पनवेल येथे नियमितपणे दैनिक वितरण आणि प्रसारसेवा करणार्‍या त्यांच्या पत्नी अनुराधा मुळ्ये, मुलगा श्री. मयुरेश, सून सौ. वेदिका, नातू चि. अथर्व, मुलगी सौ. प्रज्ञा जोशी, जावई श्री. पुष्कराज जोशी, नात चि. दिव्या जोशी असा परिवार आहे. रत्नागिरी येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. अण्णा टिकेकर यांचे नारायण मुळ्ये हे जावई होते. सनातन परिवार मुळ्ये, जोशी आणि टिकेकर कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.

संसद ठप्प होण्यातले दोषी !

१. संसदेचे कामकाज ठप्प झाल्यामुळे त्या दिवसांचे वेतन न घेणारे ओडीशाचे
आदर्श खासदार जयपांडा आणि त्याविषयी टीका करणारे काही स्वार्थी विरोधक !
भाऊ तोरसेकर
     जयपांडा नावाचे ओडीशाचे एक खासदार आहेत. गेल्या तीन-चार निवडणुका त्यांनी केंद्रापारा या मतरादसंघातून जिंकल्या आहेत. अतिशय शांत स्वभावाचे हे खासदार अनेकदा तुम्ही विविध वाहिन्यांवरील चर्चेत सहभागी होतांना बघितलेले असेल. आपल्या संयमी स्वभावासाठी ते प्रसिद्ध आहेत आणि नेमक्या विषयावर मोजक्या शब्दांत मतप्रदर्शन करणारे, अशी त्यांची ओळख आहे. जयपांडा कधी लोकसभा अधिवेशनात गोंधळ घालतांना वा आवेशपूर्ण भाषण करतांना दिसणार नाहीत. त्यांनी आता नवे वादळ निर्माण केले आहे. आपल्या सोशल मीडियाच्या खात्यावर त्यांनी आपल्यापुरती एक घोषणा करून टाकली आहे.

धर्माचरण आणि धर्मकार्य करण्यासाठी उद्युक्त झालेले पुणे येथील धर्माभिमानी

नोव्हेंबर २०१६ मधील सनातन संस्थेचे पुणे जिल्ह्यातील प्रसारकार्य
     काल आपण नोव्हेंबर २०१६ या मासातील सनातन संस्थेचे पुणे जिल्ह्यातील प्रसारकार्य या लेखाचा पहिला भाग पाहिला. उर्वरित भाग आज पाहू.
३. साप्ताहिक आणि दैनिक सनातन प्रभातच्या वाचकांचा प्रतिसाद
३ अ. दैनिक सनातन प्रभातविषयी आदर असणारे श्री. रामकृष्ण जोशी ! : श्री. रामकृष्ण जोशी यांना दैनिक सनातन प्रभातविषयी आदर आहे. ते म्हणाले, ‘‘मी प्रतिदिन माहितीजालावर (इंटरनेटवर) दैनिक वाचतो; पण प्रत्येक मासाच्या वर्गणीतून आमचा सहभाग होतो. अन्य कुठेही पैसे देण्यापेक्षा सनातन संस्थेच्या कार्यासाठी व्यय झालेले अधिक चांगले आहे.’’

हिंंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या दृष्टीने ब्राह्मतेजाचे (आध्यात्मिक बळाचे) महत्त्व

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या संदर्भातील
परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे विचारधन !
     ‘वर्ष २०२३ पासून ‘हिंदु राष्ट्र’ येईल’, हे आजवर अनेक संतांनी वेळोवेळी सांगितले आहे. या पार्श्‍वभूमीवर हिंदु राष्ट्र स्थापनेविषयी अनेकांंच्या मनात उत्सुकता असते. यासाठीच ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची दिशा’ या विषयावरील वैशिष्ट्यपूर्ण सदर !
४. ब्राह्मतेजाचे महत्त्व
अ. ‘ब्राह्मतेजात क्षात्रतेज असतेच; म्हणूनच ऋषी राजाला शाप देऊ शकत.’ (९.५.२०१२)
आ. ‘संतांमध्ये ब्राह्मतेज असल्याने त्यांच्या कार्यक्रमाला लाखो लोक स्वेच्छेने आणि श्रद्धेने येतात. राजकीय सभांप्रमाणे त्यांना पैसे देऊन किंवा वाहनसुविधा देऊन बोलवावे लागत नाही.
इ. एकाही राजकीय पक्षाचा विदेशात प्रचार होत नाही; पण आध्यात्मिक संस्थांचा होतो; कारण आध्यात्मिक संस्थांकडे धर्माचे व्यापकत्व आणि आध्यात्मिक तेज, म्हणजेच ब्राह्मतेज असते.’ (२३.४.२०१२)

मान्यता रहित झालेल्या पक्षांचे दुर्व्यवहार !

केंद्रीय निवडणूक आयोगाने २०० हून अधिक राजकीय पक्षांना पक्षांच्या सूचीतून अवैध ठरवलेे असून देणग्यांच्या माध्यमातून काळा पैसा पांढरा करण्याचे काम हे पक्ष करीत असल्याचे आयोगाच्या निदर्शनास आले आहे. कोणाचाही वचक नसल्याने अपप्रकार करणारे कसे मोकाट आणि निवांत असतात, याचे हे ज्वलंत उदाहरण आहे. कष्ट न करता लबाडी करून झटपट उत्पन्न मिळवण्याचे उद्योग करणारी लबाडांची टोळीच या प्रकारे कार्यरत आहे. वर्ष २००५ पासून निवडणूक न लढवता आजपर्यंत काळा पैसा पांढरे करण्याव्यतिरिक्त कोणत्या अनधिकृत उलाढाली त्या पक्षांनी केल्या आहेत, याचा शोध घेतला पाहिजे. यांना अवैध ठरवण्यासाठी डिसेंबर २०१६ पर्यंत वाट पहावी लागणे आयोगाच्या कारभारातील त्रुटींवर बोट ठेवते. त्यामुळे या काळात किती पैसा काळ्याचा पांढरा करण्यात आला, याचा संपूर्ण तपशील मिळेल, असे म्हणणे धाडसाचे ठरेल. यावरून एक सूत्र लक्षात येते की, एखाद्या चुकीच्या गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यास त्या माध्यमातून अपप्रकार करण्याच्या घटनांना उधाण तर येतेच; शिवाय त्यात अपप्रकारांच्या नवनवीन संकल्पनांचा समावेशही होत रहातो.
नवीन राजकीय पक्षांना मान्यता देण्याची प्रक्रिया कडक करावी लागणार आहे, याची नोंद अनुभवावरून निवडणूक आयोगाने घ्यायला हवी. आयोगाने आतापर्यंत देशभरात १ सहस्र ७८० राजकीय पक्षांना मान्यता दिली आहे. त्यांतील अनेक पक्षांचे अस्तित्वही नाही. काही संशयित सामाजिक संस्थांवर मागील चालू मासात बंदीचा बडगा उगारण्यात आला अथवा त्यांना विदेशातून मिळणार्‍या निधीवर बंदी लादण्यात आली. त्यामध्ये वादग्रस्त इस्लामी धर्मप्रचारक झाकीर नाईक यांची इस्लामिक रिसर्च फाउंडेशन, धर्मद्रोही तिस्ता सेटलवाड यांच्या संस्थेचा आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांचा मुख्यत्वेकरून समावेश आहे. अवैध ठरवण्यात आलेले राजकीय पक्ष आणि या सामाजिक संस्था यांचा हेतू आर्थिक लाभाशी निगडित असल्याने राष्ट्राची फसवणूक करणार्‍या संबंधितांना कारागृहात केव्हा टाकण्यात येणार, याची जनता वाट पहात आहे.
मान्यता दिलेल्या पक्षांच्या आर्थिक व्यवहारांवर लक्ष ठेवत त्यांच्या कृती आक्षेपार्ह वाटल्यास त्वरेने त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी सक्षम यंत्रणा उभारणेही अत्यावश्यक आहे. आजमितीस सहस्रोंच्या संख्येत असलेली पक्षसंख्या पहाता त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी उभारण्यात येणार्‍या यंत्रणेत राजकीय हस्तक्षेप होणार नाही, याची दक्षता प्रामुख्याने घ्यावी लागणार आहे. तमिळनाडू राज्याच्या प्रधान सचिवांच्या निवासस्थानावर आयकर विभागाने जसा छापा टाकला, त्याप्रमाणे राजकीय पक्षांवर छापा टाकण्यासाठी त्या यंत्रणेचे हात मोकळे असायला हवे. पैसा हा कोणत्याही पक्षाच्या चलनासाठी लागतोच. त्यामुळे त्याच्या आगमनाच्या मुख्य स्रोताकडे बारीक लक्ष हवेच. मान्यता काढण्यात आलेले पक्ष वर्षानुवर्षे जरी निष्क्रीय असले, तरी आयोगाने यापुढे सक्रीय रहायला हवे. निवडणुका न लढवता वेगळ्याच कामासाठी सक्रियता पणाला लावणार्‍या त्या राजकीय पक्षांवर कठोर कारवाई करावी, तरच खर्‍या अर्थाने ‘स्वच्छ भारत’ मोहिमेस बळ येईल.
- श्री. जयेश राणे, भांडुप, मुंबई.

श्री सद्गुरु स्वामी सदानंद सत्संग परिवारातील श्री. राजाभाऊ उपाध्ये (प.पू. आबा) यांच्या जीवनप्रवासातील काही अनुभव

श्री. राजाभाऊ उपाध्ये
(प.पू. आबा)
१. श्री. राजाभाऊ उपाध्ये हे आनंद संप्रदायाचे अनुयायी असून ‘या संप्रदायाचे
मूळ पुरुष श्री सदानंंद महाराज यांच्याशी आपले जन्मजन्मांतरीचे
शिष्यत्वाचे नाते आहे’, अशी त्यांची श्रद्धा असणे
   ‘श्री. राजाभाऊ उपाध्ये (प.पू. आबा) हे आनंद संप्रदायाचे यात्री आहेत. अतिप्राचीन काळापासून असलेल्या चार संप्रदायांपैकी, म्हणजे चैतन्य, स्वरूप, नाथ आणि आनंद संप्रदायांतील ‘आनंद’ या संप्रदायाचे ते अनुयायी आहेत. प.पू. आबांची ‘या संप्रदायाचे मूळ पुरुष श्री सदानंंद महाराज हे आपले गुरु असून त्यांच्याशी आपले जन्मजन्मांतरीचे शिष्यत्वाचे नाते आहे’, अशी श्रद्धा आहे. सद्गुरूंच्या भेटीसाठी प.पू. आबांनी पुष्कळ शोध घेण्याचा प्रयत्न केला. १९७७ सालापासून अनेक वेळा हरिद्वार आणि अन्य तीर्थक्षेत्रे फिरून झाली; परंतु ‘ते तुला यथावकाश आपोआप कळेल’, असे उत्तर त्यांना सद्गुरूंकडून मिळत असे. श्री सद्गुरु सदानंद स्वामी मठ संस्थान, बसवकल्याण, जिल्हा बिदर, कर्नाटक या गुरुदेवांच्या स्थानाचे प्रत्यक्ष दर्शन घेण्याचा त्यांना योग आला. 

सेवाभावी आणि गुरूंवर दृढ श्रद्धा असलेलेे नंदू मुळ्येकाका !

         नंदू मुळ्ये (मुळ्येेकाका) आणि आम्ही (मी आणि श्री. पाध्येकाका) एकाच वेळी साधनेत आलो. मी आणि श्री. पाध्येकाका प्रथम गुरुपौर्णिमेच्या प्रसाराला गेलो, ते मुळ्येकाकांच्याच घरी. वर्ष १९९६ मध्ये सांगलीला असलेल्या गुरुपौर्णिमेनिमित्त अर्पण घेण्यासाठी आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो. त्यानंतर ते सत्संगात येऊ लागले. आम्ही प्रथम सत्संगात गेलो, ते त्यांच्यासह. म्हणजे साधनेचा श्रीगणेशा त्यांच्यासमवेतच गिरवला.
         आमचे आणि मुळ्येकाकांचे घर जवळजवळ होते. त्यामुळे आमचे संबंध घरच्यासारखे होते. काही वर्षांनी श्री. पाध्येकाका अध्यात्मप्रसारासाठी बाहेरगावी गेल्याने पनवेलमधील सत्संग घेणे, नवीन सत्संग चालू करणे, ग्रंथांचे स्टॉललावणे, प्रवचन घेणे अशा प्रत्येक सेवेत मुळ्येकाका आणि मी समवेत असायचो. त्यांच्या निधनाचे वृत्त ऐकून आम्हाला दोघांनाही धक्का बसला.

राष्ट्रद्रोह्यांचे विचार असे असतात - आम्ही धर्मनिरपेक्षच काय, देशनिरपेक्षही आहोत !

श्री. अनंत आठवले
प्रस्तुत लेखातील विचार श्री. अनंत आठवले यांचे स्वतःचे नसून त्यांनी आजच्या तथाकथित धर्मनिरपेक्षतावाद्यांची विचारधारा समर्पक शब्दांत मांडली आहे. या माध्यमातून धर्मनिरपेक्षतेच्या बुरख्याआड असलेले तथाकथित साम्यवाद्यांचे समाजविघातक, राष्ट्रद्रोही आणि पर्यायाने हिंदुद्रोही स्वरूप वाचकांच्या लक्षात येईल. - संपादक
   ‘काय वेडे लोक आहेत ! म्हणे पाकिस्तानशी क्रिकेट खेळायचे नाही !! आता तुम्हीच सांगा, राजनीतीचा आणि क्रिकेटचा काय संबंध ? पण नाही, ह्यांचा पोटशूळ उठतो. पुन्हा म्हणतात, ‘पाकिस्तानी कलाकारांना चित्रपटात घेऊ नका !’ आता काय म्हणावे ? कलेला देशाच्या सीमा असतात का ? आणि हो, पाकिस्तानी कलाकार किती अप्रतिम अभिनय करतात ! आपल्याकडे अभिनय येणारे कलाकार आहेतच कुठे ? पण नाही, हे लोक काव काव करणार ! 

भू्रणहत्या म्हणजे एका व्यक्तीची हत्या !

   ‘गर्भ हा कायद्याच्या दृष्टीने एक व्यक्ती आहे. त्यामुळे गर्भाची हत्या करणे म्हणजे एका व्यक्तीची हत्या करण्याप्रमाणे आहे. भू्रणहत्या करणार्‍यांना भारतीय दंड संहितेनुसार फाशीची शिक्षा द्यायला हवी.’ (पाक्षिक आर्यनीती, २५.२.२०१५)

परात्पर गुरु डॉक्टरांनी आध्यात्मिक उन्नतीचे टप्पे सांगितल्यावर त्याचे श्रेय त्यांनाच देऊन कु. दीपाली पवार यांनी व्यक्त केलेली कृतज्ञता !

कु. दीपाली पवार
साधकांना मार्गदर्शक ठरणारी कु. दीपाली पवार यांची साधनेतील वाटचाल
     साधना करणे म्हणजे सतत ईश्‍वराच्या अनुसंधानात रहाणे. नवविधा भक्तीद्वारे भक्त त्याच्या प्रकृतीप्रमाणे ईश्‍वराच्या अनुसंधानात रहाण्याचा प्रयत्न करतो. कु. दीपाली पवार यांचा ‘परात्पर गुरु म्हणजे श्रीकृष्ण’, असा भाव आहे. त्यांच्या जीवनातील सर्व घडामोडी पत्राद्वारे परात्पर गुरु डॉक्टरांना सांगणे, ‘तेच श्रीकृष्ण कसे आहेत’, हे त्यांना विविध उदाहरणांतून पटवून देणे, त्यांच्याशी सूक्ष्मातून झालेल्या संवादाची चित्रे रेखाटून त्यांना देणे आणि त्यांना सखा मानून प्रत्येक वैशिष्ट्यपूर्ण प्रसंगात शुभेच्छापत्रे देणे, अशा प्रकारे त्या ईश्‍वराच्या अनुसंधान राहिल्या.

याचसाठी केला होता अट्टाहास । शेवटचा दिस गोड व्हावा ॥ या संतवचनाप्रमाणे जीवनाचे सार्थक करणारे देवद आश्रमातील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. नारायण (नंदू) मुळ्येकाका !

१. सौ. संगीता 
लोटलीकर, रायगड जिल्हासेवक
१ अ. दैनिक वितरणाची सेवा अविरतपणे करणे
१. मुळ्येकाका आश्रमात पूर्ण वेळ असले, तरी त्यांचा प्रसारसेवेत मोठा वाटा होता. दैनिक सनातन प्रभात चालू झाल्यापासून; म्हणजे वर्ष २००० पासून २२.१२.२०१६ पर्यंत त्यांनी दैनिक वितरणाची सेवा अविरतपणे केली.
२. उन्हाळा असो किंवा पावसाळा, नियमित वेळेत दैनिक वितरण करून त्यांनी प.पू. गुरुदेवांना अपेक्षित अशी सेवा केली. देवद आश्रमातील सेवा पूर्ण करून ते रात्री १२ ते १२.३० वाजेपर्यंत घरी जात; परंतु त्यांनी दैनिक वितरण करण्यासाठी कधीच तक्रार केली नाही.
१ आ. सर्वांना हवेहवेसे वाटणारे व्यक्तीमत्त्व : काकांचेे व्यक्तीमत्त्व सर्वांना हवेहवेसे वाटणारे होते. ते कधीच अनावश्यक बोलत नसत. आवश्यक आणि समर्पक बोलण्याने ते सर्वांना आपलेसे करून घेत. अखंड सेवारत असून ते प्रत्येक सेवा मनापासून करत. प्रत्येक प्रसंग शांतपणे हाताळण्याची त्यांची हातोटी होती. त्यांच्या तोंडवळ्यावर कधीच ताण दिसत नसे. त्यांची प.पू. गुरुदेवांवर अपार श्रद्धा असल्याने शेवटच्या श्‍वासापर्यंत ते अखंड सेवारत राहिले आणि श्रीगुरूंची कृपा संपादन करून त्यांनी जीवनाचे सार्थक केले.

सर्वांवर निरपेक्ष प्रेम करणार्‍या आणि नामस्मरणात मग्न असणार्‍या (कै.) श्रीमती चंद्रकलावतीदेवी ! (वय ८१ वर्षे)

   १४.९.२०१६ या दिवशी नोएडा येथील साधिका श्रीमती राजरानी माहुर यांच्या आई श्रीमती चंद्रकलावतीदेवी यांचे निधन झाले. त्यांच्या कुटुंबात पती, ४ पुत्र आणि २ मुली आहेत. श्रीमती राजरानी माहुर यांना जाणवलेली आईची गुणवैशिष्ट्ये आणि आईच्या मृत्यूनंतर त्यांना आलेल्या अनुभूती देत आहोत.
१. नामजप करण्यातील सातत्य
   ‘अनुमाने ४० वर्षांपूर्वी एक संत माझ्या आजोबांना नामजप आणि त्याचे महत्त्व सांगत असतांना आईने ते सर्व ऐकले होते. तेव्हापासून आई नित्यनियमाने, कोणालाही न सांगता नामजप करत होती. यातून आईचे सातत्य आणि ईश्‍वरावरील श्रद्धा हे गुण लक्षात येतात.
२. परिस्थितीचा स्वीकार करणे 
  आईच्या जीवनात अनेक वेळा आर्थिक अडचणी आल्या. ती आयुष्यभर शेतात राबली. तिला कुटुंबातही फारसे महत्त्व दिले गेले नाही. तिला ४ मुले असूनही एकाच मुलाने तिला सांभाळले. त्या वेळी आईने ‘अन्य मुलांनीही मला सांभाळायला हवे’, असा विचार केला नाही. 

६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. शालिनी मराठे यांना स्थुलाकडून सूक्ष्माकडे आणि द्वैताकडून अद्वैताकडे होत असलेल्या प्रवासाविषयी आलेल्या अनुभूती

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...

सौ. शालिनी मराठे
१. परात्पर गुरु डॉ. आठवले ‘माझ्यात अडकू नका, तर कृष्णाकडे जा’
असे सांगत असूनही साधकांना त्यांच्या सगुण भेटीची ओढ वाटणे 
    ‘परात्पर गुरु डॉ. आठवले (प.पू. गुरुदेव) रुग्णाईत असल्यामुळे ते सतत खोलीत असतात. त्यांना फार थकवा असल्यामुळे भिंतीला धरून चालावे लागते. वैद्यांच्या सांगण्याप्रमाणे ते प्रतिदिन ३० ते ३५ वेळा औषध घेत असतात. एवढे असूनही ‘त्यांच्याकडे पाहिल्यावर ते रुग्णाईत आहेत’, असे वाटतच नाही. ते एवढे तेजःपुंज आणि आनंदी दिसतात की, सर्व जीव त्यांच्याकडे आकर्षिले जातात. साधकांना त्यांच्या सान्निध्यात निर्विचार स्थिती, आनंद जाणवणे, तसेच अन्य विविध अनुभूती येतात; मात्र प.पू. गुरुदेव कुणालाच त्यांच्या स्थूल देहात अडकू देत नाहीत. ते सर्वांना ‘माझ्यात अडकू नका, तर कृष्णाकडे जा’ असेच सांगत असतात. असे असले, तरी साधकांना प.पू. गुरुदेवांच्या सगुण भेटीची ओढ असतेच ना ? 

देवद आश्रमातील नंदू मुळ्ये यांच्या निधनानंतर जाणवलेली सूत्रे

        २३.१२.२०१६ या दिवशी सकाळी श्री. नंदू मुळ्येकाका यांचे निधन झाल्याचे कळाले. मुळ्येकाकांनी गेल्याच आठवड्यात मला खाऊ पाठवला होता. पुष्कळ दिवस त्यांच्याशी बोलणेही झाले नसल्याने त्यांना भ्रमणभाष करून त्यांच्याशी बोलूया, असे ठरवले होते. काही ना काही कारणामुळे माझे बोलणे राहून जायचे. नेहमी इतरांच्या साहाय्यासाठी तत्पर असलेले आणि घरातील वडीलधार्‍या व्यक्तीप्रमाणे साधकांची काळजी घेणारे मुळ्येकाका आता नाहीत, हे कळल्यावर वाईट वाटले.
१. सूक्ष्मातून मुळ्येकाकांना पाहिल्यावर ते नेहमीप्रमाणे स्थिर असल्याचे दिसले.
२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी त्यांच्याभोवती सूक्ष्मातून कवच करून वाईट शक्तींपासून त्यांचे रक्षण केल्याचे दिसले.

सेवेची फलनिष्पती वाढण्यासाठी साधकांनी लक्षात घ्यायची सूत्रे !

सौ. कमलिनी कुंडले
     देवद आश्रमाची आध्यात्मिक स्थिती सुधारण्यासाठी आम्हा स्वतःला सुधारण्याचे आध्यात्मिक स्तरावरचे प्रयत्न होत नाहीत; परंतु निदान कार्य तरी परिपूर्ण, सहज, सोपे आणि अनुशासनबद्ध होण्यासाठी बुद्धीच्या स्तरावर प्रयत्न व्हावेत, यासाठी काही सूत्रे सुचली. आपल्याला सेवेची फलनिष्पत्ती वाढवायची असेल, तर आपल्या वेळेचे परिपूर्ण नियोजन केले पाहिजे. त्यासाठी प्रत्येक साधकाला काही महत्त्वाच्या सवयी अंगी बाणवाव्या लागतील. त्यातील काही महत्त्वपूर्ण सवयींचा येथे विचार केला आहे.
१. कार्यालये आणि आस्थापने यांची कामकाजाची पद्धत
१ अ. कर्मचारी अन् अधिकारी यांच्या कार्यालयात उपस्थित रहाण्याच्या ठराविक वेळा 
      व्यवहारात अधिकारी आणि कर्मचारी कार्यालयात त्यांच्या ठरलेल्या वेळेतच पोेचतात. अनेक कार्यालयांचे काम सकाळी ९.३० किंवा १० वाजता चालू होते. कार्यालयातील अधिकारीवर्ग किंवा मालक अनुमाने ११ ते १२ वाजेपर्यंत पोचतात. अधिकारी किंवा मालक यांच्या भेटीगाठी, बैठका ते कार्यालयात किंवा दुकानांत आल्यावर लगेचच चालू होतात. त्यामुळे त्यांच्या कामाची पूर्वसिद्धता करण्यासाठी अन्य कर्मचार्‍यांनी घंटाभर तरी आधी कार्यालयात उपस्थित असले पाहिजे, असा दंडक असतो.

सप्तर्षि जीवनाडीत सांगितल्याप्रमाणे सनातनच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांचा अहर्निश प्रवास !

महर्षींची शिकवण आणि कार्य !
सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ
     सनातनच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ मागील ४ वर्षांपासून भारतभरातील विविध राज्यांत दौर्‍यावर जात आहेत. हिंदु राष्ट्राची (सनातन धर्म राज्याची) शीघ्रतेने स्थापना व्हावी, राष्ट्र, धर्म, तसेच साधक यांचे रक्षण व्हावे आणि देवतांचा आशीर्वाद मिळावा, यासाठी सप्तर्षि जीवनाडीत सांगितलेल्या क्षेत्री जाण्याचे त्यांचे नियोजन असते. आतापर्यंत त्यांनी २४ राज्यांतील प्रवास करून तेथील वैशिष्ट्यपूर्ण दगड, माती, तीर्थ आदींचा संग्रह केला आहे.  त्यांनी नोव्हेंबर २०१६ पर्यंत ३ लक्ष ५६ सहस्र कि.मी. एवढा प्रवास करून भावी पिढीसाठी भारतातील अलौकिक समृद्ध ठेवा संग्रहित केला आहे. या दैवी प्रवासाची सर्वांना माहिती व्हावी, यासाठी हे सदर प्रसिद्ध करत आहोत.

सत्सेवेची तळमळ आणि प्रेमभाव या गुणांच्या बळावर ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झालेल्या कै. ठगूबाई भगवान वाघ !

कै. ठगूबाई वाघ
‘माझ्या सासूबाई कै. ठगूबाई भगवान वाघ यांचे ३१.८.२००९ या दिवशी निधन झाले. त्यांची माझ्या लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहे.
१. सत्सेवेची तळमळ 
१ अ. पतीचा विरोध असतांनाही सेवा करणे : सासूबाईंना सेवेची पुष्कळ आवड होती. त्या अध्यात्मप्रसार आणि गुरुपौर्णिमेचे अर्पण आणण्याची सेवा करायला बाहेर जायच्या. त्यांना साधना करण्यास सासर्‍यांचा पुष्कळ विरोध होता. ते त्यांना साधना किंवा सेवा करू देत नसत; तरीही त्या सेवेला वेळ द्यायच्या. 
१ आ. मुलाला पूर्णवेळ सेवा करण्यास पाठिंबा देणे : माझे यजमान पूर्णवेळ सेवा करायचे. ते देवासाठी सेवा करतात; म्हणून सासूबाईंना ते फार आवडायचे. सासर्‍यांचा सेवा करण्यास विरोध असूनही सासूबाई माझ्या यजमानांना सेवा करायला पाठिंबा देत असत.
२. संघभावना आणि जवळीकता 
सण वा उत्सव असेल, त्या वेळी त्या सर्व सुनांना एकत्र बोलावत असत. ‘सर्वांनी एकत्र येऊन पंचपक्वानांचा स्वयंपाक करायचा आणि एकत्र जेवण करून सण साजरा करायचा’, असा त्यांचा प्रघात होता. त्यामुळे सर्व नातेवाइकांची एकमेकांशी जवळीक रहायची. नातेवाईक कसेही वागले किंवा त्यांना काहीही बोलले, तरी त्या कधीच रागाने किंवा द्वेषाने बोलल्या नाहीत. 

व्यष्टी साधनेत अहं-निर्मूलन न झाल्यास साधक त्याच टप्प्याला रहाणे आणि समष्टीत साधना करतांना अन्य साधकासमवेत मिसळल्याने आणि मनाविरुद्ध घडणार्‍या विविध प्रसंगांतून साधकाचा अहं आपोआप न्यून होण्यास साहाय्य होणे

श्री. राम होनप
‘व्यष्टी साधना करणार्‍या साधकांत काही गुण असतात. साधनेची तीव्रता आणि त्यानुरूप येणार्‍या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती यांचा त्याला अहं निर्माण होऊ शकतो. अहं-निर्मूलन न झाल्यास साधक आयुष्यभर त्याच टप्प्याला राहू शकतो. समष्टी साधनेत अन्य साधकांत मिसळल्यानेे अहं वाढत नाही आणि वाढल्यास समष्टीत मनाविरुद्ध घडणार्‍या विविध प्रसंगांतून तो आपोआप न्यून होण्यास साहाय्य होते. त्याची काही उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत.
   एखाद्या आधुनिक वैद्याने पूर्णवेळ साधना करण्याचे ठरवले आणि त्याच्या मनात आले की, ‘मी मोठा त्याग करून आश्रमात आलो आहे’, तर आश्रमात आल्यावर त्याच्या लक्षात येते की, ‘आश्रमात अनेक तज्ञ आधुनिक वैद्य अनेक वर्षांपासून पूर्णवेळ साधना करत आहेत.’ एखाद्या साधिकेला चांगले गायन येत असल्यास तिची कालांतराने अन्य सुंदर गाणार्‍या आणि त्यातील पुष्कळ ज्ञान असलेल्या साधिकांची ओळख होते.

प.पू. पांडे महाराज यांचे अनमोल विचारधन !

काहीतरी मूल्य असणारी व्यक्तीच दुसर्‍याचे मूल्य जाणू शकणे
    जेव्हा आपण दुसर्‍याचा सन्मान करतो, तेव्हा स्वतःच सन्मानित होत असतो. दुसर्‍याला मूल्य दिल्याने स्वतःचे मूल्य वाढवतो. ज्याला काहीतरी मूल्य आहे, तोच दुसर्‍याचे मूल्य जाणू शकतो.
- प.पू. परशराम पांडे, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

गणहोमाची सेवा पुष्कळ भावपूर्ण आणि परिपूर्ण करणार्‍या पुरोहित-साधकांवर प्रसन्न होऊन महर्षींनी १०० राजसूय यज्ञांचे फळ देणे

सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ
    १२.९.२०१६ या दिवशी सप्तर्षि जीवनाडीच्या माध्यमातून मार्गदर्शन करणार्‍या महर्षींनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे जन्मनक्षत्र असलेल्या उत्तराषाढा या नक्षत्रावर गणहोम करण्यास सांगितले. या दिवशी केलेला यज्ञ पुष्कळ भावपूर्ण आणि परिपूर्ण झाला. यज्ञाची सेवा करणार्‍या सनातन साधक-पुरोहित पाठशाळेतील पुरोहितांनी ही सेवा पुष्कळ भावपूर्ण रीतीने केली. पुरोहित-साधकांच्या या सेवेवर प्रसन्न होऊन महर्षींनी सांगितले, ब्रह्मांडाचे कार्य सोडून त्रिदेव, म्हणजे ब्रह्मा, विष्णु आणि महेश हा यज्ञ पहात होते. त्रिदेवांच्या बरोबर त्रिदेवीही; म्हणजे सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वती हा यज्ञ पहात होत्या. हा यज्ञ इतका भावपूर्ण आणि परिपूर्ण झाला आहे की, तुम्हाला १०० राजसूय यज्ञांचे फळ देऊ.
     केवळ महर्षि आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने यज्ञाची सेवा भावपूर्ण आणि परिपूर्ण झाली. या सेवेचे महर्षींनी केलेले कौतुकही त्यांच्याच चरणी अर्पण.
- (सद्गुरु) सौ. बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.१२.२०१६) 

आश्रम आणि सेवाकेंद्र यांसाठी लागणारे साहित्य अर्पण केल्यानंतर त्याविषयी विचारणा करणे, हे साधकांच्या साधनेच्या दृष्टीने चुकीचे !

पू. डॉ. चारुदत्त पिंगळे
    काही साधक आश्रम आणि सेवाकेंद्र यांसाठी लागणारे साहित्य अर्पण म्हणून देतात. या संदर्भात काही साधक पुढीलप्रमाणे विचारणा करतात - अर्पण म्हणून दिलेले साहित्य प्रत्यक्षात उपयोगात आणले जाते कि नाही ? किंवा त्यांनी एखाद्या विशिष्ट सेवाकेंद्र किंवा आश्रम यासाठी अर्पण दिले असेल, तर त्या साहित्याचा तेथेच उपयोग केला जातो कि अन्य कुठल्या आश्रमात केला जातोे ?
     अर्पण केलेल्या साहित्याविषयी साधकांनी पुढील गोष्ट लक्षात घ्यावी. सनातनचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांचे एक प्रसिद्ध सुवचन आहे, एकदा काही अर्पण केले, तर त्यानंतर त्याविषयी आपल्या मनात कोणताही विचार येता कामा नये. त्यामुळे साधकांनीही आपण अर्पण केलेल्या साहित्याचे पुढे काय झाले ?, याचा विचार करणे किंवा त्यासंबंधी विचारणा करणे, हे साधनेच्या दृष्टीने चुकीचे आहे.

साधकांना अत्यंत महत्त्वाची सूचना

       तांत्रिक अडचणींमुळे सनातन संस्थेच्या अंतर्गत चालू असलेले एअरटेल आणि बीएस्एन्एल् यांचे भ्रमणभाष गट ३१ डिसेंबर २०१६ या दिवशी बंद होत आहेत. जे साधक एअरटेल आणि बीएस्एन्एल् यांच्या गट योजनेचे स्वत:हून ग्राहक बनले होते, त्यांनी ३१ डिसेंबरपर्यंत स्वत:चे भ्रमणभाष क्रमांक बंद करावेत. या क्रमांकावर व्हॉट्स अ‍ॅपची सुविधा असल्यास ती बंद करून अन्य क्रमांकावर चालू करण्याची व्यवस्था करावी.

फलक प्रसिद्धीकरता

आरक्षणसंस्कृती ही 
देशाला घातक असल्याचे जाणा !
        तेलंगण राज्याच्या अल्पसंख्यांक आयोगाने राज्याच्या मागसवर्गीय आयोगाकडे मुसलमानांना १२ टक्के आरक्षण देण्याची मागणी केली आहे. सध्या मुसलमानांना शैक्षणिक संस्था आणि सरकारी नोकर्‍या यांत ४ टक्के आरक्षण दिले जाते.

हिंदू तेजा जाग रे !

Jago !
       Telangana Rajyake alpasankhyak ayogki mang, Musalmanoka arakshan 4 se 12 pratishat kiya jaye. 
Arakshanse Deshki hani-hi-hani hai, yah hum kab samjhenge
जागो !
       तेलंगाना राज्य के अल्पसंख्यक आयोग की मांग, मुसलमानों का आरक्षण ४ से १२ प्रतिशत किया जाए ! 
आरक्षण से देश की हानि-ही-हानि है, यह हम कब समझेंगे ?

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
कुठे बालवाडीप्रमाणे असलेले आणि संशोधन 
करणारे पाश्‍चात्त्यांचे विज्ञान, तर कुठे लाखो 
वर्षांपूर्वीच परिपूर्णता गाठलेले हिंदु धर्मातील विज्ञान !
        ‘येथे दिलेल्या खगोलशास्त्रातील एका उदाहरणावरून हे सूत्र लक्षात येईल. आकाशातील ग्रहांबद्दल विज्ञान जो शोध घेते, तो केवळ भौतिक दृष्टीने आहे. याउलट हिंदु धर्मातील विज्ञान ग्रहांच्या भौतिक माहितीसोबत ‘ग्रहांचा परिणाम काय होतो ? कधी होतो ? आणि दुष्परिणाम होणार असले, तर त्यावर उपाय काय ?’, असे सर्व सांगते. आधुनिक विज्ञानाच्या सर्वच शाखांच्या संदर्भात असेच आहे.’ - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

बोधचित्र

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
मी कोणावर प्रेम करीत नाही. 
प्रेम मला खेचते. मी प्रेमात 
फसेन म्हणून मी प्रेमात अडकलो.
भावार्थ : मी प्रेम कोणावर करीत नाही, यातील प्रेम शब्द हा व्यावहारिक, मायेतील प्रेमासंबंधी आहे. प्रेम मला खेचते, यातील प्रेम म्हणजे प्रीती, पारमार्थिक प्रेम. नामधारकाचे प्रेम मला खेचते, म्हणजे मला त्याच्याविषयी ओढ वाटते.
       मी प्रेमात फसेन, यातील प्रेम हा शब्द व्यावहारिक प्रेमासंबंधी आहे. म्हणून मी प्रेमात अडकलो, यातील प्रेमात हा शब्द प्रीती म्हणजे पारमार्थिक प्रेम या अर्थाने वापरला आहे. थोडक्यात व्यावहारिक प्रेमात फसू नये, म्हणून मी पारमार्थिक प्रेमात अडकलो आहे.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

मानवी जीवन 
मानवी जन्म पूर्वपुण्याईनेच प्राप्त होतो; म्हणून जीवनात सुविचाराची साथ ठेवून जन्माचे सार्थक करावे. 

ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

हिंदु राष्ट्र आणि कृतीप्रवणता !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित जळगाव येथील हिंदु धर्मजागृती सभेच्या निमित्ताने वाहनफेरी काढण्यात आली. जवळपास ७०० वाहने आणि १ सहस्र ५०० धर्मनिष्ठ सहभागी झालेले असल्याने फेरीला भव्यपणा आला होता. या देखण्या वाहनफेरीत हातात भगवे ध्वज घेतलेले आणि ‘हर हर महादेव’, ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो’, ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्’ या घोषणा देणारे युवक सामील असल्यामुळे ‘ही तर हिंदु राष्ट्राच्या स्थापनेकडे वाटचाल करणारी हिंदुत्वनिष्ठांची फेरी आहे’, असे विचार रहिवाशांच्या मनात डोकावून गेले. तरुण पिढीचे योगदान या कार्यासाठी मिळणे अत्यंत आवश्यक आहे, याचे कारण असे की, आजची ही तरुण पिढी भावी हिंदु राष्ट्राची जोपासना करणार आहे. वाहनफेरीच्या वेळी दिल्या जाणार्‍या घोषणा शौर्याच्या विचारांनी छाती फुगण्यास साहाय्य करत होत्या. छत्रपती शिवरायांच्या तेजस्वी कार्यकालाची आठवण करून देणार्‍या त्या घोषणांना पादचारी लोक प्रतिसाद देत होते आणि ‘आम्हाला या फेरीचा अभिमान वाटतो’, असे सांगत होते.

पोलिसांची कानउघाडणी !

गोवा राज्याचे पोलीस महासंचालक मुक्तेश चंदर यांनी पोलिसांना सूचना देतांना म्हटले आहे की, वाईट कृत्यांत सापडल्यास कडक कारवाई केली जाईल. पोलिसांना अशी सूचना द्यावी लागली, यावरून पोलीस त्यांच्या कर्तव्याला योग्य प्रकारे जागत नसल्याचे सिद्ध होते. अर्थात् नियमाला अपवाद असतो; म्हणून सर्वच पोलिसांना या पद्धतीने दोष देणे अयोग्य ठरेल. स्वतःच्या कर्तव्याला जागणारे कतर्र्र्र्र्र्र्व्यदक्ष असे जसे काही पोलीस आहेत, तसेच स्वतःच्या पदाचा अपलाभ उठवत वैयक्तिक स्वार्थ साधणारे पोलीसही आहेत. जेवढे काही बेकायदा उद्योग आहेत, त्यांच्याशी अर्थलाभासाठी काही पोलिसांचे संबंध असतात. अशा काळ्या उद्योगांची मोठीच सूची असून तिच्याविषयी सविस्तर लिहायचे म्हणजे वेळेचा अपव्यय ठरेल. शिवाय या सर्व गोष्टी वाचकांना परिचित आहेतच. तात्पर्य असे की, पोलीस दलात शिरलेली ही वृत्ती समाजाला घातक आणि अन्यायकारी ठरत असल्याने त्यांच्या महासंचालकांना अशी चेतावणी द्यावी लागली. भ्रष्टाचार, स्वार्थ, उपभोग अशा दुष्प्रवृत्तींमुळे पोलीस पदावरील व्यक्ती टीकाकारांचे लक्ष्य बनतात. मुंबई शहरातील मरीन ड्राईव्ह आणि पवई परिसरातील बलात्काराची प्रकरणे, गोव्यातील दूधकेंद्रावरील दूध चोरीचे प्रकरण, भारत-पाक सीमेवरील अमलीपदार्थ तस्करी प्रकरण अशा काही ठळक गोष्टी आहेत, ज्याकडे पाहिले असता अपप्रवृत्तींकडे पोलीस व्यक्ती आकर्षित झालेली दिसते.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn