Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कोटी कोटी प्रणाम !

ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर
महाराज यांची आज पुण्यतिथी

स्वामी श्रद्धानंद स्मृतीदिन (दिनांकानुसार)

स्वामी श्रद्धानंद
स्मृतीदिन (दिनांकानुसार)

जळगाव येथे हिंदु धर्मजागृती सभा

वार आणि दिनांक : रविवार, २५ डिसेंबर २०१६
वेळ : सायंकाळी ५.३०
स्थळ : शिवतीर्थ, जी.एस्. मैदान, न्यायालय चौक, जळगाव
हिंदूंनो, या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित रहा !

तमिळनाडूचे धर्मदाय खाते रहित करण्याची मद्रास उच्च न्यायालयाची चेतावणी !

मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम !
     चेन्नई - तमिळनाडू सरकारचे हिंदु मंदिरांच्या नियंत्रणाविषयीचे धर्मादाय खाते रहित करण्याची चेतावणी मद्रास उच्च न्यायालयाने नुकतीच दिली आहे. सरकारचे धर्मादाय खाते प्राचीन मंदिरांच्या दुरुस्तीच्या नावाखाली मंदिरांची अपरिमित हानी करत आहे, असा आरोप एका भक्ताने मद्रास उच्च न्यायालयात प्रविष्ट केलेल्या जनहित याचिकेत केला आहे. त्यावरील सुनावणीच्या वेळी न्यायालयाने वरील चेतावणी दिली.
     उच्च न्यायालयाने धर्मादाय खात्याच्या आयुक्तांना न्यायालयात उपस्थित रहाण्याचा आदेश दिला होता. युनेस्कोच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील मंदिरांच्या डागडुजीचे काम हाती घेण्याच्या उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन न केल्याविषयी आयुक्तांना या वेळी धारेवर धरण्यात आले.

(म्हणे) ‘शिवस्मारकासाठी नद्यांचे पाणी आणणे, हा वैदिकीकरण करण्याचा प्रयत्न !’

कधी नव्हे एवढी हिंदु ऐक्याची 
आवश्यकता असतांना जातीद्वेषी सूत्रांची 
खुसपटे काढणारे हिंदुद्वेषी पुरुषोत्तम खेडेकर !
         मुंबई, २२ डिसेंबर - अरबी समुद्रात बांधण्यात येणार्‍या शिवस्मारकासाठी नद्यांचे पाणी आणण्यात येणार आहे. जिवंतपणी महाराजांना वैदिक अधिकार नाकारणार्‍यांचा हा वैदिकीकरण करण्याचा प्रयत्न आहे, असे मत मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी व्यक्त केले आहे. अरबी समुद्रात उभारण्यात येणार्‍या भव्य शिवस्मारकाचे उद्घाटन २४ डिसेंबरला होणार आहे.
त्यांनी म्हटले आहे -
१. अरबी समुद्रात अश्‍वारूढ पुतळा उभारण्यापेक्षा सिंहासनाधिष्ठित पुतळ्याची देखभाल करणे सोपे असल्याने तो उभारण्यात यावा. घोड्यावरचे शिल्प केवळ युद्धजन्य अवस्था प्रदर्शित करते. ही शिल्पे स्फूर्तीदायक असतात, परंतु समृद्धी, शांतता, लोकशासन आणि लोककल्याणकारी महाराज हा संदेश प्रदर्शित होतोच असे नाही. महाराज सर्व मानवांप्रती पालक आणि विश्‍ववंदनीय होते. यासाठी महाराजांचे शिल्प महाभव्य; परंतु सिंहासनाधिष्ठित असे प्रसन्न मुद्रेतील आणि प्रेरणादायी असावे. (महाराजांनी महाआक्रमक मुगलांशी घनघोर लढाया करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली; म्हणून ते सिंहासनावर बसू शकले आणि लोककल्याणकारी राजा होऊ शकले. त्यामुळेच शांतता आणि समृद्धी प्रस्थापित झाली. हिंदूंमध्ये फूट पाडण्यासाठी खंडणी घेत असल्याचा आरोप असणार्‍या हिंदुद्वेषी खेडेकरांना नेमका ‘मुगलांशी युद्ध करणारे छत्रपती’ हा इतिहास पुढे आणून द्यायचा नाही, हेच त्यांच्या वरील मागणीवरून सुस्पष्ट होते. ‘मुगलांचा पराजय कराणारा हिंदु राजा’ ही छत्रपतींची ओळख खेडेकरांना पुसायची आहे; परंतु तीच योग्य असल्याने लढवय्या स्थितीतील पुतळाच उभारला जाणे योग्य आहे. - संपादक)

परीक्षेत नक्कल करण्यास प्रतिबंध करणार्‍या हिंदु प्राध्यापकाला धर्मांध विद्यार्थ्याकडून मारहाण

प्राध्यापकावर भर वर्गात हात 
उगारणार्‍या धर्मांधाचा उद्दामपणा जाणा !
         सातारा - येथील लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयात कला शाखेच्या तृतीय वर्षाच्या परीक्षेत नक्कल (कॉपी) करतांना प्रतिबंध करणार्‍या हिंदु प्राध्यापकाला धर्मांध सैफ शेख या विद्यार्थ्याने वर्गातच मारहाण केली. याप्रकरणी पोलिसांनी त्याला कह्यात घेतले आहे. (पोलिसांनी धर्मांध विद्यार्थ्याला कठोर शासन करावे ! - संपादक)
१. सैफ शेख नक्कल करत असल्याचे लक्षात येताच हिंदु प्राध्यापकाने ती नक्कल स्वतःकडे घेऊन त्याला वर्गाबाहेर जाण्यास सांगितले. त्याने तसे करण्यास नकार देऊन प्राध्यापकांना मारहाण केली. तसेच ‘वर्गाबाहेर बघून घेतो, हात-पाय काढतो’, अशी धमकीही दिली. (हिंदूंनो, किती काळ धर्मांधांच्या अशा धमक्या ऐकणार आहात ? सुरक्षित जीवन जगण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करा ! - संपादक)
२. प्राध्यापकांनी सैफ शेखच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा प्रविष्ट केला. तसेच ‘संबंधित विद्यार्थ्याला कठोर शिक्षा करावी’, अशी मागणी ही सर्व प्राध्यापकांनी केली. (केवळ मागणी नको, तर शासन होईपर्यंत पोलिसांचा पाठपुरावा घ्या ! - संपादक)

सनबर्न फेस्टिव्हलला शासनाने अनुमती नाकारावी ! - शरद पोंक्षे, प्रखर हिंदुत्वनिष्ठ अभिनेते

श्री. शरद पोंक्षे (उजवीकडे) यांना निवेदन देतांना श्री. अजय केळकर
     सांगली, २२ डिसेंबर (वार्ता.) - सनबर्न फेस्टिव्हल गतवर्षीपर्यंत गोवा येथे होत होता; मात्र या फेस्टिव्हलमध्ये मोठ्या प्रमाणात अपप्रकार होत असल्याचे लक्षात आल्यावर गोवा शासनाने त्याला अनुमती नाकारली. मुळात ज्या प्रकाराचा भारतीय संस्कृतीशी संबंध नाही, असे प्रकार महाराष्ट्रात घेण्याची आवश्यकता काय ? हा प्रकार महाराष्ट्राच्या संस्कृतीला धक्का लावणारा आहे. त्यामुळे भारतीय संस्कृती हनन करणार्‍या सनबर्न फेस्टिव्हलला शासनाने अनुमती नाकारावी, अशी मी शासनाकडे मागणी करतो.

शबरीमला यात्रेवरून परतणार्‍या संघ कार्यकर्त्याच्या मुलावर धर्मांधांचे आक्रमण !

केरळमधील कम्युनिस्टांच्या राज्यांत हिंदु यात्रेकरूंवर धर्मांधांकडून आक्रमण होते आणि
देशातील एकही पुरो(अधो)गामी अन् निधर्मी त्याविरोधात बोलत नाही, हे लक्षात घ्या ! धर्मांधांच्या अशा आक्रमणांंमुळे देशात असहिष्णुता वाढली आहे, हे हिंदूंनी आणि त्यांच्या संघटनांनी सांगायला हवे !
     पेरुंपडप्पू (मलप्पुरम्) - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते आयरूर थोट्टाथील वेलयुधन यांचे पुत्र श्री. मिथुन (वय २३ वर्षे) हे शबरीमला यात्रेवरून घरी परततांना त्यांच्यावर ३ धर्मांधांनी आक्रमण केले. त्यांनी श्री. मिथुन यांना अमानुष मारहाण केली. (केरळमध्ये हिंदु यात्रेकरूंवर आक्रमण व्हायला ते भारतात आहेत कि पाकिस्तानात ? - संपादक) श्री. मिथुन त्यांच्या मित्रांसह तीर्थम् कलावेदी बसस्थानकावर बसची वाट पहात थांबला होते. त्या वेळी ३ धर्मांध तेथे आले आणि चौकशी करण्याचे निमित्त करून श्री. मिथुन यांच्यावर तलवारीने डोक्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. मिथुन यांनी हे वार हातावर घेतल्याने त्यांचा हात छाटला गेला.

अमेरिकेत धर्मांधांच्या प्रवेशावर बंदी घालण्याचा माझा विचार योग्य ठरला !

युरोप आणि तुर्कस्थान मधील जिहादी आतंकवादी आक्रमणांवर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान !
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना जे कळते, ते भारतीय शासनकर्त्यांना इतकीवर्षे का कळले नाही ?
      वॉशिंग्टन - बर्लिन येथील आक्रमण आणि तुर्कस्थानमधील रशियाच्या राजदूतांची हत्या या घटना भयावह आहेत. या आतंकवादी घटनांनी अमेरिकेत धर्मांधांना प्रवेश करण्यापासून रोखण्याच्या माझ्या विचारांना १०० टक्के योग्य ठरवले आहे, असे प्रतिपादन अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फ्लोरिडा येथे एका कार्यक्रमात केले. (गेल्या ३ दशकांत जिहादी आतंकवाद्यांच्या आक्रमणामुळे ग्रस्त असणार्‍या भारतातील एकातरी पंतप्रधानाने किंवा मंत्र्याने डोनाल्ड ट्रम्पसारखे मतप्रदर्शन केले आहे का ? - संपादक)

जळगाव येथे हिंदु धर्मजागृती सभेनिमित्तच्या भव्य वाहनफेरीतून दर्शवली गेली हिंदु राष्ट्राकडे घोडदौड !

७०० हून अधिक वाहनांसह १ सहस्र ५०० हून अधिक हिंदूंचा उत्स्फूर्त सहभाग !
      जळगाव, २२ डिसेंबर (वार्ता.) - हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् अशा गगन भेदून टाकणार्‍या घोषणा अन् भगवे ध्वज यांमुळे भगवी झालेली जळगावनगरी, तसेच २५ डिसेंबरला होणार्‍या हिंदु धर्मजागृती सभेनिमित्त काढलेल्या ऐतिहासिक भव्य वाहनफेरीने जळगावनगरीचे वातावरण दुमदुमून गेले. या वाहनफेरीमध्ये ७०० हून अधिक दुचाकी, तीनचाकी, चारचाकी वाहने आणि १ सहस्र ५०० हून अधिक धर्माभिमान्यांनी सहभागी होऊन हिंदु धर्मजागृती सभा यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त केला.

छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक हे जगातील पर्यटक येतील असे जागतिक केंद्र होईल ! - चंद्रकांत पाटील, महसूलमंत्री

      मुंबई, २२ डिसेंबर (वार्ता.) - छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक मुंबईमध्ये व्हावे, अशी सर्वांची इच्छा होती. यापूर्वीच्या शासनाने अनेकवेळा स्मारक उभारण्याच्या घोषणा केल्या; मात्र स्मारकाचे काम आवश्यक अनुमती मिळण्यामध्ये अडकले. भाजपने निवडणुकीपूर्वी घोषणा केली होती की, आम्ही छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद घेऊन सत्तेत जात आहोत. त्यामुळे आम्ही हे स्मारक पूर्ण करणार. जगातील पर्यटक येतील आणि जागतिक केंद्र होईल, अशा प्रकारचे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक होईल, असे प्रतिपादन महसूलमंत्री श्री. चंद्रकांत पाटील यांनी केले. अरबी समुद्रात होणार्‍या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचा भूमीपूजन सोहळा २४ डिसेंबर या दिवशी माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी २२ डिसेंबर या दिवशी सह्याद्री अतिथीगृहात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी शिक्षणमंत्री श्री. विनोद तावडे आणि छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष श्री. विनायक मेटे उपस्थित होते.

भारतीय प्रसारमाध्यमे राष्ट्रवाद आणि देशद्रोह यात फसलेली आहेत ! - पत्रकार अर्णव गोस्वामी

     जयपूर - मी राष्ट्रवादी असल्याचा मला अभिमान आहे. तुम्हाला कोणी भारताचा समर्थक म्हणाले, तर त्यात लाज कसली ? भारतीय प्रसारमाध्यमे राष्ट्रवाद आणि देशद्रोह यात फसलेली आहेत. भारतीय प्रसारमाध्यमांत देशद्रोह्यांना स्थान नाही. मी माझ्या देशासाठी पक्षपाती आहे. त्यामुळे भारत-पाकिस्तान सूत्रावर मी तटस्थ होऊ शकत नाही, असे प्रतिपादन पत्रकार आणि निवेदक अर्णव गोस्वामी यांनी येथे केले. ते दैनिक भास्करने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. गोस्वामी यांनी नुकतेच टाइम्स नाऊ या वृत्तवाहिनीचे त्यागपत्र दिले आहे आणि ते स्वतःची वृत्तवाहिनी चालू करत आहेत.

कर्णावती येथील अ‍ॅक्सिस बँकेवरील धाडीतून ८९ कोटी रुपये जप्त !

अशा बँकांच्या सर्व शाखांना टाळे ठोकून गुन्हेगार अधिकार्‍यांवर तात्काळ खटला चालवून त्यांना कठोर शिक्षा करा !
      कर्णावती - येथील अ‍ॅक्सिस बँकेवर आयकर विभागाने मारलेल्या टाकलेल्या धाडीत १९ बनावट खात्यांमध्ये ८९ कोटी रुपये जमा करण्यात आले असल्याचे आढळले आहे. या शाखेतील काही ग्राहक हे सोन्याचे ठोक व्यापारी होते. त्यावरून आयकर विभागाला शंका होती. या बँकेतील ४ अधिकारीही आयकर विभागाच्या रडारवर होते. याआधी नवी देहली, नोएडा आणि कोलकाता येथील अ‍ॅक्सिस बँकांवर धाडी टाकण्यात आल्या होत्या. येथून कोट्यवधी रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे, तर अनेक खाती सील करण्यात आली आहेत. आतापर्यंत किमान २५ अधिकार्‍यांवर कारवाई करण्यात आली.

तमिळनाडूच्या मुख्य सचिवांकडून ३० लाखांची रोकड आणि ५ किलो सोने जप्त

भ्रष्ट शासकीय अधिकार्‍याबरोबर आता भ्रष्ट मंत्र्यांवरही कारवाई व्हावी !
      चेन्नई - तमिळनाडूचे मुख्य सचिव पी. राम मोहन राव यांच्या निवासस्थानावरील छाप्यातून आयकर विभागाने ३० लाख रुपयांची रोकड आणि ५ किलो सोने जप्त केले आहे. या व्यतिरिक्त ४० महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत. राव यांच्या मुलाने त्याच्याकडे अघोषित ५ कोटी रुपये असल्याची स्वीकृती दिल्याचेही वृत्त आहे.
भाजपच्या नेत्यांवर कारवाई का नाही ? - ममता बॅनर्जी
     राव यांच्यावर कारवाई केल्यानंतर बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर टीका केली. त्या म्हणाल्या की, भाजपला खरा भ्रष्टाचार न्यून करण्याविषयी कळवळा असेल, तर भाजप नेत्यांवर कारवाई का होत नाही ?

ऑस्ट्रेलिया आणि इंडोनेशिया या देशांत भूकंपाचे धक्के !

      मेलबर्न - ऑस्ट्रेलियाचा उत्तरेतील भाग आणि इंडोनेशिया यांच्या काही भागांत २१ डिसेंबरला रिश्टर स्केलवरील ६.५ तीव्रतेचे भूकंपाचे धक्के बसले. यात जीवित हानी झाल्याचे वृत्त नाही. तसेच त्सुनामीची चेतावणी देण्यात आलेली नाही. भूकंपाचा केंद्रबिंदू समुद्रात १५८ किलोमीटर खोल होता.
महर्षींनी प्रलयकालाविषयी सतर्क करणे
     १९.३.२०१६ या दिवशी झालेल्या नाडीवाचन क्रमांक ६७मध्ये महर्षि म्हणतात, हे पूर्ण वर्ष प्रलयकालाचे आणि आपत्तीजनक असणारे आहे. (ऑस्ट्रेलियाचे उत्तरेतील भाग आणि इंडोनेशिया यांच्या काही भागांत २१ डिसेंबरला रिश्टर स्केलवर ६.५ तीव्रतेचे भूकंपाचे धक्के बसले. या घटनेवरून प्रलयकालाविषयी महर्षींनी केलेले भाष्य किती तंतोतंत आहे, हे लक्षात येते ! - संपादक)

मेक्सिकोमधील फटाका बाजारात भीषण आगीमध्ये २६ जणांचा मृत्यू !

फटाक्यांवर केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात बंदी घातली पाहिजे !
      मेक्सिको सिटी - येथून ३२ कि.मी. अंतरावर असणार्‍या सेन पल्बिटो या सर्वात मोठ्या फटाका बाजारात झालेल्या स्फोटात २६ जणांचा मृत्यू झाला, तर ७० हून अधिक लोक घायाळ झाले आहेत. येथे मोकळ्या मैदानात हा बाजार भरवला जातो. नाताळ आणि नववर्ष साजरा करण्यासाठी लोकांची फटाके घेण्यासाठी गर्दी झालेली असतांनाच ही दुर्घटना घडली. आगीवर नियंत्रण आणण्यासाठी अग्नीशमन दलाला ३ घंटे लागले. आग इतकी भीषण होती की, जवळ असणारी घरे आणि गाड्याही जळून खाक झाल्या आहेत. सेन पल्बिटो बाजारात याआधीही २००५ आणि २००६ मध्ये अशीच भीषण आग लागली होती.

हिंदु धर्मजागृती सभेचे निमंत्रण जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांपर्यंत पोचवणार ! - भाजपच्या लोकप्रतिनिधींचे आश्‍वासन

खासदार श्री. ए.टी. नाना पाटील
धर्मजागृती सभेची स्मरणिका पहातांना (१)

डावीकडून श्री. सुनील घनवट भाजपचे
जिल्हाध्यक्ष श्री. उदय वाघ (२) यांना निमंत्रण देतांना

         जळगाव, २२ डिसेंबर (वार्ता.) - हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथे २५ डिसेंबर या दिवशी आयोजित केलेल्या हिंदु धर्मजागृती सभेचे निमंत्रण भाजपच्या जिल्हा बैठकीत २१ डिसेंबर या दिवशी देण्यात आले. या वेळी खासदार श्री. ए.टी. नाना पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष श्री. उदय वाघ यांना सभेचे निमंत्रण देण्यात आले. त्या वेळी त्यांनी सांगितले, ‘‘आम्ही या हिंदु धर्मजागृती सभेला आवर्जून उपस्थित राहू आणि जिल्ह्यातील आमच्या सर्व कार्यकर्त्यांना घेऊन येऊ.’’

मराठी शाळांचे प्रश्‍न मराठी साहित्य संमेलनात मांडा !

  • अशी मागणी करावी लागणे हेच मायमराठीसाठी लज्जास्पद आहे !
  • शिक्षक परिषदेचे अनिल बोरनारे यांची अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाकडे मागणी
        मुंबई, २२ डिसेंबर - इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या आकर्षणामुळे अनेक पालक त्यांच्या पाल्यांना मातृभाषेतून शिक्षण देणार्‍या शाळांऐवजी इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये घालत आहेत. त्यामुळे राज्यातील मराठी शाळा वाचवण्याविषयीचा ठराव डोंबिवली येथे होणार्‍या ९० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मांडावा, अशी मागणी शिक्षक परिषदेचे श्री. अनिल बोरनारे यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाकडे केली आहे.

केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते ‘राम मंदिर’ रेल्वेस्थानकाचे उद्घाटन

       मुंबई, २२ डिसेंबर (वार्ता.) - नाव देण्यावरून बहुचर्चेत असलेल्या जोगेश्‍वरी-गोरेगाव रेल्वेमार्गावर बांधण्यात आलेल्या नवीन रेल्वेस्थानकाचे २२ डिसेंबर या दिवशी केंद्रीय रेल्वेमंत्री श्री. सुरेश प्रभू यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये नवीन रेल्वेस्थानकाचे नामकरण ‘राम मंदिर रेल्वेस्थानक’, असे अधिकृतरित्या घोषित करण्यात आले. या वेळी व्यासपिठावर खासदार श्री. गजानन कीर्तीकर, परिवहनमंत्री श्री. दिवाकर रावते, आमदार विद्या ठाकूर, राज्यमंत्री रवींद्र वायकर, वीर सेनेचे अध्यक्ष श्री. निरंजन पाल उपस्थित होते. उद्घाटनाच्या कार्यक्रमापूर्वी येथील श्रीराम मंदिर ते नवीन रेल्वेस्थानकापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक सहभागी झाले होते.

प्रत्येक ९६ मिनिटाला एका भारतियाचा दारूच्या अतिसेवनामुळे मृत्यू होतो !

  • हिंदु राष्ट्रात प्रत्येक जण धर्माचरण करणारे आणि साधना करणारे असल्याने त्यांना साधनेतून मिळणार्‍या आनंदामुळे कोणतेही व्यसन लागण्याची शक्यताच नसणार ! 
  • लोकांना व्यवसायापासून दूर नेण्याऐवजी त्यांना दारू पुरवणारी सरकारे लोकशाही निरर्थक ठरवतात ! 
   नवी देहली - भारतात प्रत्येक दिवशी १५ जण दारूच्या अतिसेवनामुळे मृत्यूमुखी पडत आहेत. म्हणजेच प्रत्येक ९६ मिनिटाला एका भारतियाचा दारूच्या अति सेवनामुळे मृत्यू होत आहे, अशी माहिती ‘नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो’च्या आकडेवारीतून पुढे आली आहे. 

पंजाबमध्ये बनावट नोटा जप्त !

       अमृतसर - येथे महताब सिंह आणि निर्मल कौर या दोन जणांकडून १ लाख २० सहस्र रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. यातील बहुतांश नोटा या २ सहस्र रुपयांच्या आहेत. या नोटा पाकिस्तानात छापण्यात आल्याचा संशय व्यक्त होत आहे.

‘व्हॉट्स अ‍ॅप’वर हिंदु देवता आणि संत यांच्याविषयी विडंबनात्मक लिखाण करणार्‍याच्या विरोधात हिंदुत्वनिष्ठांकडून तक्रार

पोलीस उपनिरीक्षक श्री. रामभाऊ खराटे
(मध्यभागी) यांना तक्रार देतांना हिंदुत्वनिष्ठ

        अमरावती - येथील व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप वर हिंदु देवता आणि संत यांच्याविषयी विडंबनात्मक लिखाण करणारा जसवीन लोनारे याच्यावर दंडात्मक कार्यवाही करण्यात यावी, यासाठी हिंदुत्वनिष्ठांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा प्रविष्ट केला असून ‘योग्य ती कारवाई केली जाईल’, असेही सांगण्यात आले आहे. (हिंदूंनो, पोलिसांच्या आश्‍वासनावर अवलंबून न रहाता दोषीवर कारवाई होईपर्यंत त्यांचा पाठपुरावा घ्या ! - संपादक)
        या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. नीलेश टवलारे, श्री. तुषार वानखडे, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. महेश लडके आणि कार्यकर्ते, तसेच हिंदुत्वनिष्ठ श्री. वैभव चोरे आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.

राष्ट्रगीताचा अवमान केल्याप्रकरणी मल्याळम् लेखक कमल सी चावरा यांना अटक !

भारतीय नागरिकांकडून सातत्याने होत असलेला राष्ट्रगीताचा अवमान,
म्हणजे सर्वपक्षीय राज्यकर्त्यांनी जनतेत राष्ट्रप्रेम निर्माण न केल्याचे द्योतक आहे !
      कोची (केरळ) - राष्ट्रगीताचा अवमान केल्याच्या आरोपाखाली प्रसिद्ध मल्याळम् लेखक आणि रंगमंच साहाय्यक कमल सी चावरा उपाख्य कमलसी प्राण यांना कोळीकोड पोलिसांनी अटक केली आहे. चावरा यांच्यावर कलम १२४ (अ) अन्वये राष्ट्र्रद्रोहाचा गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे, अशी माहिती कोळीकोड (उत्तर) साहाय्यक पोलीस आयुक्त पृथ्वीराज यांनी दिली.

डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांच्या संदर्भातील पुढील सुनावणी ३ जानेवारीला !

कॉ. गोविंद पानसरे खून प्रकरण
         कोल्हापूर, २२ डिसेंबर (वार्ता.) - कॉ. गोविंद पानसरे खून प्रकरणात पोलिसांनी सनातन संस्थेचे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना अटक केली होती. या प्रकरणी त्यांच्यावर आता नियमित न्यायालयात सुनावणी चालणार आहे. ही सुनावणी ज्यांच्याकडे होणार आहे, ते न्यायाधीश उपलब्ध नसल्याने २२ डिसेंबर या दिवशीची सुनावणी जिल्हा न्यायाधीश श्री. एस्.आर्. साळुंखे यांच्याकडे झाली. त्यांनी पुढील सुनावणी ३ जानेवारी २०१७ या दिवशी होईल, असे सांगितले. डॉ. तावडे यांच्या वतीने अधिवक्ता समीर पटवर्धन यांनी कामकाज पाहिले.
         डॉ. तावडे हे सध्या पुणे येथील कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. गतवेळेस त्यांना प्रत्यक्ष उपस्थित न करता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित करण्यात आले होते. २२ डिसेंबर या दिवशी झालेल्या सुनावणीच्या काळात अधिवक्ता समीर पटवर्धन यांनी डॉ. तावडे यांना पुढील वेळेस प्रत्यक्ष उपस्थित करण्याची मागणी न्यायाधिशांकडे केली.

पंढरपूरमधील अनधिकृत मटण दुकानांच्या विरोधातील छावाच्या आंदोलनाला वारकर्‍यांसह अनेकांचा पाठिंबा !

        पंढरपूर - ही आध्यात्मिक नगरी असून येथे वारकरी संप्रदायाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. वारकरी हे गळ्यात तुळशीची माळा परिधान करून मांसाहाराचा संपूर्पपणे परित्याग करणारे असतात. असे असतांना शहराच्या विविध भागांत रस्त्यावरच अनधिकृतरित्या दर्शनीय भागात मटणविक्री केली जाते. वारकर्‍यांच्या भावना दुखावतील असे कृत्य घडू नये, ही छावाची भूमिका आहे. त्यांच्या या भूमिकेला समस्त वारकरी फडकरी दिंडी समाज (संघटना), ह.भ.प. श्री संत बद्रीनाथ महाराज (संत तनपुरे महाराज चारोधाम मंडप ट्रस्ट), विश्‍व वारकरी सेना, विश्‍व संत पालखी सोहळा, वारकरी सांप्रदाय पाईक संघ, शिवसंग्राम संघटना आदींसह अनेकांनी पाठिंबा दिला आहे. शहरातील अनेक भागांत अनधिकृतरित्या उघडपणे चालणारी मटणविक्रीची दुकाने बंद करावीत, अशी एकमुखाने मागणी आता जोर धरत आहे.

नववर्ष ३१ डिसेंबरला नाही, तर गुढीपाडव्याला साजरे करा ! - सौ. शोभा कामत, सनातन संस्था

बैंदूर (कर्नाटक) येथे हिंदु धर्मजागृती सभा 
डावीकडून कु. रेवती मोगेर, सौ. शोभा कामत आणि दीपप्रज्वलन करतांना श्री. विजयकुमार
   बैंदूर (कर्नाटक) - सुखाचे मूळ धर्माचरणात आहे. इतर धर्मियांना त्यांच्या धर्माचे पालन करण्याची लाज वाटत नाही; मात्र हिंदू कपाळावर टिळा लावण्यासही लाजतात. आपण पाश्‍चात्य संस्कृतीचा अवलंब न करता हिंदु संस्कृतीचे पालन केले पाहिजे. त्यामुळे नववर्ष ३१ डिसेंबरला साजरे न करता गुढीपाडव्याला साजरे करूया, असे आवाहन सनातन संस्थेच्या सौ. शोभा कामत यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १८ डिसेंबर या दिवशी येथील श्री सीतारामचंद्र कल्याण मंदिरामध्ये हिंदु धर्मजागृती सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत कामत बोलत होत्या. या सभेला हिंदु जनजागृती समितीचे श्री. विजयकुमार आणि रणरागिणी शाखेच्या 
कु. रेवती मोगेर यांनीही संबोधित केले. 

नोटाबंदीमुळे महिलांची तस्करी सध्या बंद !

  • नोटाबंदीमुळे अनेक अपव्यवहारांना फटका बसल्याचे दिसत 
    असतांना या नोटाबंदीला विरोध करणारे कुणाची पाठराखण करत आहेत ?
  • महिलांच्या तस्करीचा व्यवसाय २० लाख कोटी रुपयांच्या घरात !
   नवी देहली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबरला ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या होत्या. याचा मोठा परिणाम महिलांची तस्करी करण्याच्या घटनांवरही झाला आहे. महिलांच्या तस्करीचा व्यवसाय २० लाख कोटी रुपयांच्या घरात असल्याचा अंदाज आहे. हा सगळा व्यवसाय काळ्या पैशावर चालतो. त्यामुळे या उद्योगाला नोटाबंदीचा फटका बसला असून महिलांची तस्करी सध्या बंद झाली आहे, अशी माहिती सामाजिक कार्यकर्त्यांनी दिली आहे. 
१. मुख्यत: गौहत्ती, झारखंड, चेन्नई, बेंगळुरू आणि भाग्यनगर (हैद्राबाद) येथून महिलांची तस्करी केली जाते; परंतु मागील एक महिन्यापासून एकाही मुलीची किंवा महिलेची तस्करी झालेली नाही. यात सर्व व्यवहार हे रोखीने होत असतात. दलालांच्या हातात ठेवण्यासाठी रोख रक्कम नसल्याने हा व्यवसाय पूर्णपणे बंद पडला आहे. जो पैसा जवळ आहे त्याला रद्दीची किंमत आहे, असे बचपन बचाओ आंदोलन संघटनेचे सामाजिक कार्यकर्ते राकेश सेनगेर यांनी सांगितले आहे. 

‘इस्लामिक स्टेट’च्या हस्तकाने पोलिसांना फसवण्यासाठी केले धर्मांतर !

   भाग्यनगर - सहकार्‍यांना अटक झाल्यानंतर अन्वेषण यंत्रणांना मूर्ख बनवण्यासाठी ख्रिस्ती धर्मात प्रवेश केलेल्या अबिद खान या ‘इस्लामिक स्टेट’च्या हस्तकाला नुकतीच हिमाचल प्रदेशच्या कुल्लू येथे अटक करण्यात आली. अबिद खान याच्या ५ सहकार्‍यांना हैदराबाद येथे, तर ३ सहकार्‍यांना बेंगळुरू येथे अटक करण्यात आली होती. त्यानंतर अबिद खान याने बेंगळुरू येथे ख्रिस्ती धर्म स्वीकारून पॉल असे नाव धारण केले होते, अशी माहिती राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या अधिकार्‍यांनी दिली. 

इंद्राणी मुखर्जीकडून भगवद्गीतेतील श्‍लोकांचा इंग्रजीत अनुवाद !

   मुंबई, २२ डिसेंबर - शीना बोरा हत्याकांडाच्या प्रकरणी कारागृहात असलेली मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी हिने भगवद्गीतेतील ७०० श्‍लोकांचा संस्कृतमधून इंग्रजीत अनुवाद केला आहे. त्याच्या प्रकाशनासाठी न्यायालयाकडे अनुमती मागितली आहे. (भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे आचरण केले असते, तर आज ही वेळ आली नसती ! - संपादक) या ग्रंथाच्या विक्रीतून आलेले अर्धे उत्पन्न इस्कॉनला दान करण्याचा, तर उर्वरित रक्कम भायखळा कारागृहातील परितक्त्यांना देणार असल्याचे तिने सांगितले आहे.

सोलापूरसह विविध ठिकाणी ३१ डिसेंबरला होणारे अपप्रकार रोखण्याविषयी पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी यांना निवेदन !

सोलापूर येथील उपजिल्हाधिकारी श्री. अजित रेळेकर यांना निवेदन
देतांना माजी नगरसेवक श्री. बापू ढगे (डावीकडून चौथे) आणि समितीचे कार्यकर्ते
      सोलापूर, २२ डिसेंबर (वार्ता.) - ३१ डिसेंबरला नववर्षोत्सवाच्या नावाखाली होणारे अपप्रकार रोखण्यासाठी पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी यांनी योग्य ती काळजी घ्यावी, अशा आशयाचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सोलापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी देण्यात आले.

मुंबई विमानतळावर अटक केलेल्या धर्मांधाकडून १८ लक्ष रुपये मूल्याचे सोने हस्तगत !

अल्पसंख्य धर्मांध गुन्हेगारीत बहुसंख्य !
        मुंबई, २२ डिसेंबर - रियाध येथून आलेला धर्मांध मोहमद शहानझर याच्याकडून अनुमाने १८ लक्ष रुपये मूल्याच्या सोन्याच्या विटा मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर पोलिसांनी हस्तगत करून त्याला अटक केली. त्याच्याकडे भारतीय पारपत्रही आढळले आहे. सीमा शुल्क विभागाच्या हवाई गुप्तचर विभागाने ही कारवाई केली. त्याने एका दिव्याच्या विजेरीमध्ये सोन्याच्या विटा लपवल्या होत्या. प्रत्येक विटेचे वजन ६९६ ग्रॅम असून त्यांचे एकूण मूल्य अनुमाने १८ लक्ष ७ सहस्र रुपये आहे.

केरळच्या कम्युनिस्टांची सरकारकडून कर्नाटकातील पर्यटक वाहनांची करवाढीद्वारे लूट !

मोठ्या हिंदुत्वनिष्ठ संघटना याविषयी काही करतील का ?
शबरीमला यात्रेकरूंना भुर्दंड ! 
   थिरुवनंतपुरम् - केरळ राज्यात मे २०१६ पासून साम्यवाद्यांचे सरकार आल्यानंतर कर्नाटक राज्यातून केरळमध्ये प्रवेश करणार्‍या अखिल भारतीय परवानाधारक पर्यटक वाहनांना भरमसाठ कर लावण्यात येत आहे. कर्नाटक राज्यातून केरळमध्ये प्रवेश करणार्‍या इनोव्हा गाडीला 
   २५ सहस्र रुपये भरावे लागतात, तर टेम्पो ट्रॅव्हलरला १ लक्ष रुपये भरावे लागतात. त्यामुळे शबरीमला यात्रेकरूंना मोठा भुर्दंड बसत आहे. बरेच यात्रेकरू कर्नाटक-केरळ सीमेवर अडकून पडले आहेत, तर खूप पैसे भरावे लागत असल्याने काहींनी पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे ठरवले आहे. (हिंदू यात्रेकरूंची सतावणूक करणारे केरळच्या कम्युनिस्टांचे हिंदुद्रोही सरकार ! - संपादक) 

२०० राजकीय पक्षांना पक्षांच्या सूचीतून वगळले !

   नवी देहली - निवडणूक आयोगाने २०० राजकीय पक्षांची नावे सूचीतून वगळली आहेत. आयोगाला पक्षांची नोंदणी रहित करण्याचा अधिकार नसल्याने त्याने या पक्षांना पक्षांच्या सूचीतून वगळले आहे. आता त्यांना निवडणूक लढवता येणार नाही. या संदर्भात लवकरच केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाला पत्र लिहून माहिती देण्यात येणार आहे. तसेच त्यांच्यावर कारवाई होण्यासाठी त्यांच्याविषयीची विस्तृत माहितीही देण्यात येणार आहे. या माहितीद्वारे बोर्ड त्यांची अर्थविषयक चौकशी करू शकतो. निवडणूक आयोगाच्या मते या पक्षांची स्थापना निवडणूक लढवण्यासाठी नव्हे, तर काळा पैसा पांढरा करण्यासाठीच करण्यात आली होती. या पक्षांनी २००५ पासून एकदाही निवडणूक लढवलेली नाही. आणखीन काही पक्षांची नावे वगळण्यात येणार आहेत, असे सूत्रांकडून सांगण्यात आले आहेत. जळगाव येथील हिंदु धर्मजागृती सभेचे मान्यवरांना निमंत्रण

डावीकडून श्री. सुनील घनवट हे चोपडा येथील शिवसेना आमदार
श्री. चंद्रकांत सोनावणे आणि पाचोरा भडगाव मतदारसंघातील
आमदार श्री. किशोरअप्पा पाटील यांना निमंत्रण देतांना

डावीकडून श्री. सुनील घनवट, श्री. प्रशांत जुवेकर हे सहकार
 राज्यमंत्री श्री. गुलाबराव पाटील यांना सभेचे निमंत्रण देतांना 

शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख श्री. रवींद्र मिर्लेकर (डावीकडे) यांना
 निमंत्रण देतांना श्री. प्रशांत जुवेकर, श्री. सुनील घनवट आणि
 श्री. दत्तात्रेय वाघुळदे (शिवसैनिकांना धर्मसभेचे
निमंत्रण देणार असल्याचे श्री. मिर्लेकर यांनी सांगितले.)
(श्री. पाटील यांनी सभेला उपस्थित रहाणार असल्याचे सांगितले.)

ठाणे येथील लाचखोर पोलीस हवालदाराला अटक

असे लाचखोर पोलीस 
सामान्य जनतेला काय न्याय देणार ?
         ठाणे, २२ डिसेंबर (वार्ता.) - लॉटरीच्या धंद्यावर कोणतीही कारवाई न करण्यासाठी १५ सहस्र रुपयांची लाच घेणारा वागळे ईस्टेट पोलीस ठाण्याचा हवालदार जीवन नाईक याला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. नाईक याने तक्रारदाराकडे ३० सहस्र रुपयांची मागणी केली होती. या प्रकरणी तक्रारदाराने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार लाच घेतांना अटकेची कारवाई करण्यात आली.

पाश्‍चात्यांच्या अंधानुकरणात वहावत जाणार्‍या देशाच्या भावी पिढीला वाचवा !

हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेचे जनतेला आवाहन 
‘सनबर्न फेस्टिव्हल’ला गोव्यातील जनतेप्रमाणे कायमचे हद्दपार करा ! 
हिंदु जनजागृती समितीप्रणीत रणरागिणी शाखेच्या वतीने सावंतवाडी येथे करण्यात आलेले आंदोलन
   सावंतवाडी, २२ डिसेंबर (वार्ता.) - सध्या पाश्‍चात्त्यांच्या वाढत्या अंधानुकरणामुळे नववर्ष गुढीपाडव्याला नव्हे, तर ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री १२ वाजता साजरे केले जात आहे. या रात्री मद्यपान, अमली पदार्थांचे सेवन करणे, भरधाव वेगाने वाहने चालवणे, मोठ्या आवाजात फटाके फोडणे, बीभत्स गाण्यांच्या तालावर अश्‍लील अंगविक्षेप करत नाचणे, आदी कृत्ये सर्रास होत आहेत. नैतिकदृष्ट्या उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असलेल्या युवा पिढीला अशा वेळी छत्रपती शिवरायांच्या जीवनाचा आदर्श घेण्यास सांगायला हवे; मात्र आपले दुर्दैव असे की, छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात हिंदवी स्वराज्याचे स्मारक असलेले गड-कोट आज मौजमजा, मेजवान्या (पार्ट्या) यांसाठी उपयोगात आणले जात आहेत. त्यामुळे गडकोटांचे पावित्र्यही धोक्यात आले आहे. ‘रेव्हपार्टी’, ‘हुक्कापार्टी’ आदींमधील युवकांचा सहभाग याची गंभीरता दर्शवतो; मात्र पाश्‍चात्य विकृतीला प्रोत्साहन देणारे आणि भारतीय युवा पिढीला अमली पदार्थांच्या गर्तेत ढकलून नासवणारे ‘सनबर्न फेस्टिव्हल’ गोव्यातील जनतेप्रमाणे कायमचे हद्दपार करून सांस्कृतिक अस्मिता जपा, असे आवाहन हिंदु जनजागृती समिती प्रणित रणरागिणी शाखेच्या वतीने २१ डिसेंबर या दिवशी गांधी चौक, सावंतवाडी येथे करण्यात आलेल्या धरणे आंदोलनाच्या वेळी करण्यात आले.

३१ डिसेंबरला होणारे अपप्रकार थांबवण्यासाठी अमरावती येथील पोलीस आयुक्तांना निवेदन !

      अमरावती - ख्रिस्ती नववर्षोत्सवानिमित्त ३१ डिसेंबरच्या रात्री होणारे अपप्रकार थांबवावेत, यासाठी येथील पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले. या वेळी समितीचे श्री. नीलेश टवलारे, सौ. स्मिता ठाकरे, श्री. श्याम सांगूनवेढे, श्री. योगेश भागवतकर, श्री. संजय चौधरी आणि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
     पोलीस आयुक्तांनी समितीच्या कार्यकर्त्यांना सांगितले की, आम्ही या वेळी विनाअनुमती कोणतेही कार्यक्रम चालू देणार नाही. तुम्हाला कोठेही अपप्रकार होतांना आढळल्यास तुम्ही आम्हाला सांगा. अन्य वेळीही हिंदुत्वनिष्ठांना चुकीचे काही जाणवल्यास ते आम्हाला सांगू शकतात.

५ वर्षीय बालिकेचा विनयभंग केल्याप्रकरणी अल्पवयीन धर्मांधाला अटक !

   डहाणू - येथील एका इमारतीच्या व्हरांड्यात खेळणार्‍या ५ वर्षीय बालिकेचा विनयभंग केल्याप्रकरणी १६ वर्षीय आतिफ शेख याला डहाणू पोलिसांनी कह्यात घेतले आहे. त्याच्यावर ‘पोस्को’ कायद्याच्या अंतर्गत गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. (संख्येने अल्पसंख्य गुन्हेगारीत बहुसंख्यांक ! - संपादक)

मायातापाने पोळलेला जीव गुरूंच्या सान्निध्यात आल्यावर त्याला कृपेची छाया मिळून मनःशांती लाभते

     ‘तप्त उन्हात पोळलेला मनुष्य वृक्षाच्या छायेखाली आल्यावर शांत होतो. त्याप्रमाणे मायातापाने पोळलेला जीव जेव्हा गुरूंच्या सान्निध्यात येतो, त्या वेळी त्याला कृपेची छाया मिळून मनःशांती लाभते.’ - श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा (२१.७.२०१६)

स्वामी श्रद्धानंद स्थापित गुरुकुल : राष्ट्रभक्त निर्मितीचे केंद्र !

     ‘स्वामी दयानंद सरस्वती यांची ओजस्वी वाणी, तेजस्वी रूप आणि तत्त्वज्ञान यांमुळे ते प्रभावित झालेे. स्वामी दयानंदांच्या उपदेशामुळे अनेक दुर्व्यसनांनी ग्रस्त मुन्शीराम यांच्या जीवनात आमुलाग्र पालट घडला आणि ते राष्ट्रपुरुष बनले. स्वामी श्रद्धानंदांनी दयानंद सरस्वती यांच्या शिक्षणविषयक दृष्टीकोनांना साकार करण्याचे व्रत घेतले. त्यांनी गुरुकुल शिक्षण पद्धतीच्या माध्यमातून नवीन पिढी घडवण्यासाठी आदर्श गुुरुकुलाची स्थापना केली. त्यासाठी त्यांनी लाहोर, रावळपिंडी, जालंधर, अंबाला, सहारनपूर, हरिद्वार, रूडकी, देहली आणि ग्वाल्हेर येथे भ्रमण करून दान गोळा केले.

स्वामी श्रद्धानंदांची हत्या करणार्‍या अब्दुल रशीदचा उल्लेख भाई अब्दुल रशीद, असा करणारे आणि त्याची फाशीची शिक्षा रद्द होण्यासाठी धडपडणारे गांधी !

     ‘स्वामी श्रद्धानंदांची हत्या करणार्‍या अब्दुल रशीदचा उल्लेख ‘भाई अब्दुल रशीद’, असा गांधीजी करत असत. त्या भाई अब्दुल रशीदला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आल्यानंतर ‘भाई अब्दुलला क्षमा व्हावी, यासाठी स्वामी श्रद्धानंदांच्या मुलानेच अर्ज करावा’, अशी सूचना गांधींजींनी ‘यंग इंडिया’तून दिली.’ - श्री. माधव बिवलकर (संदर्भ : ‘स्वातंत्र्यवीर’, फेब्रुवारी-मार्च २०१०)

सनातनच्या सात्त्विक उत्पादनांना समाजातून अभूतपूर्व प्रतिसाद

नोव्हेंबर २०१६ मधील सनातन संस्थेचे पुणे जिल्ह्यातील प्रसारकार्य

१. सनातनच्या उत्पादनांचे वितरण करणारे पुणे जिल्ह्यातील धर्माभिमानी व्यावसायिक !
सद्गुरु (कु.) स्वाती खाडये
१ अ. चांगल्या व्यावसायिकांशी संपर्क करून देण्याची सिद्धता दर्शवणारे श्री. दीपक डुबाले ! : ‘सिंहगड रस्ता येथील पतंजली उत्पादनांचे मुख्य वितरक श्री. दीपक डुबाले यांनी राष्ट्र-धर्माच्या कार्यात सहभाग म्हणून काही दुकानदारांचे संपर्क क्रमांक दिले. त्यांच्याकडे ४०० दुकानदारांची सूची आहे. त्यांच्यापैकी चांगल्या व्यावसायिकांशी संपर्क करून देण्यासाठी त्यांनी सिद्धता दर्शवली.
१ आ. प्रथम भेटीतच नेलेली सर्व उत्पादने विकत घेऊन त्यांचे वितरण करणारे श्री. सुरके : ‘उत्पादनांचे वितरण व्यावसायिक स्तरावर कसे होईल’, यासाठी प्रयत्न करत असतांना दुकानदार श्री. सुरके यांना संपर्क केल्यावर ते प्रथम भेटीतच मला म्हणाले, ‘‘मला सनातनचे कार्य ठाऊक आहे.’’ नेलेली सर्व उत्पादने त्यांनी रोख रक्कम देऊन घेतली. सध्या त्यांनी व्यवसाय पालटला असून दुकान बंद करेपर्यंत ते संस्थेची उत्पादने वितरण करत होते.

आश्रमशाळांमधील गैरकारभार !

बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव तालुक्यातील पाळा येथे अनुदानित आदिवासी आश्रमशाळेत अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार उघड झाल्यावर प्रशासनाला जाग आली. त्यानंतर राज्यातील सर्वच अनुदानित आश्रमशाळांची तपासणी मोहीम हाती घेण्यात आली. वास्तविक राज्यातील आश्रमशाळांमधील अपप्रकारांची गंभीर नोंद घेत उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले होते. ‘आश्रमशाळा चालू करण्यामागील उद्देश आणि समाजातील वंचित घटक शिकून सिद्ध होईल, या उद्देशाला हरताळ फासला जात आहे’, अशा शब्दांत राज्यशासनाची कानउघडणी केली होती. यानंतरही जागे न झाल्याने पाळासारखी घटना घडली. या शाळेची मान्यता रहित करण्यासारखा वरवरचा उपाय प्रशासनाने केला आहे.

हिंदुद्वेष्ट्यांनी हत्या केलेले पहिले हिंदु नेेते स्वामी श्रद्धानंद !

      दिशादर्शक नेता ठार झाल्यास हिंदु समुदाय दिशाहीन होतो, हे मानसशास्त्र ओळखून हिंदुद्वेष्ट्यांकडून पद्धतशीरपणे हिंदु नेत्यांना वेचून ठार मारले जात आहे. गेल्या काही वर्षांत एकट्या केरळमध्ये संघपरिवारातील १२५ जणांच्या हत्या करण्यात आल्या. ओडिशा राज्यात वर्ष २००८ मध्ये स्वामी लक्ष्मणानंद यांची हत्या केली गेली. हिंदुद्वेष्ट्यांच्या या खुनी परंपरेचे पहिले बळी स्वामी श्रद्धानंद होते. २३ डिसेंबर १९२६ या दिवशी अब्दुल रशीद नावाच्या धर्मांध मुसलमानाने त्यांची हत्या केली. आज त्यांचा ९० वा स्मृतीदिन आहे. त्यानिमित्ताने...

हिंंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या दृष्टीने ब्राह्मतेजाचे (आध्यात्मिक बळाचे) महत्त्व

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या संदर्भातील परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे विचारधन !
     ‘वर्ष २०२३ पासून ‘हिंदु राष्ट्र’ येईल’, हे आजवर अनेक संतांनी वेळोवेळी सांगितले आहे. या पार्श्‍वभूमीवर हिंदु राष्ट्र स्थापनेविषयी अनेकांंच्या मनात उत्सुकता असते. यासाठीच ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची दिशा’ या विषयावरील वैशिष्ट्यपूर्ण सदर !
३. ब्राह्मतेजाद्वारे कार्य कसे होते ?
३ ए. संकल्पाचे कार्य म्हणजे ब्राह्मतेजाद्वारे होणारे कार्य ! : संकल्पाने कार्य सिद्ध होण्यासाठी आध्यात्मिक पातळी न्यूनतम ७० टक्के तरी असावी लागते. संकल्प कार्य कसे करतो, हे पुढील उदाहरणावरून लक्षात येईल.
     मनुष्यमात्राच्या मनाची शक्ती १०० एकक (युनिट) आहे, असे समजा. प्रत्येकाच्या मनात दिवसभर काही ना काही विचार येतच असतात. त्यासाठी काहीतरी शक्ती व्यय (खर्च) होत असते. एखाद्याच्या मनात असे दिवसात १०० विचार आले, तर त्याची त्या दिवसाची बरीच शक्ती संपून जाईल; परंतु त्याच्या मनात विचारच आला नाही, मन निर्विचार असले आणि अशा वेळी ‘अमुक एक गोष्ट घडो’, अशा प्रकारचा एक विचार त्याच्या मनात आला, तर त्या एका विचारामागे सगळी १०० एकक शक्ती असते; म्हणून तो विचार (संकल्प) सिद्ध होतो, यालाच ‘ब्राह्मतेज’ म्हणतात.

कायद्याची बंधने असूनही सर्रास भू्रणहत्या होणारा एकमेव देश भारत !

‘भारतीय दंड विधानातील अधिनियमाप्रमाणे पुढील कारणांसाठीच गर्भजलपरीक्षा करण्याची अनुमती आहे -
१. अनुवंशिक विकार 
२. चयापचयाचे विकार
३. गुणसूत्रीय असमानता 
४. जन्मतः व्यंग
५. रक्ताच्या संबंधीचे रोग 
६. लैंगिक रोग 
असे असूनही कायदा उल्लंघून सर्वत्र गर्भजलपरीक्षा आणि मुलीचा गर्भ असल्याचे लक्षात आल्यास भ्रूणहत्या होत असल्याचे लक्षात येते.’ (पाक्षिक आर्यनीती, २५.२.२०१५)

फलक प्रसिद्धीकरता

देशात हिंदूंच्या विरोधात वाढलेल्या असहिष्णुतेची आणखी एक घटना !
      राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ता आयरूर थोट्टाथील वेलयुधन यांचे पुत्र श्री. मिथुन (वय २३ वर्षे) हे शबरीमला यात्रेवरून घरी परततांना त्यांच्यावर ३ धर्मांधांनी आक्रमण केले. श्री. मिथुन यांना झालेल्या अमानुष मारहाणीत ते गंभीर घायाळ झाले.

हिंदू तेजा जाग रे !

Jago !
Keralme Sabarimala yatrase lautte samay RSS karykartake putrapar dharmandhoka talvarse akraman - Hinduoke prati badhti hui Asahishnutaki ye ek aur ghatna
जागो !
केरल में सबरीमला यात्रा से लौटते समय आरएसएस कार्यकर्ता के पुत्र पर धर्मांधों का तलवार से आक्रमण.
- हिन्दुआें के प्रति बढती हुई असहिष्णुता की यह एक और घटना !

राजसत्ता हाताशी असतांना सलोखा निर्माण करता न आलेली ख्रिस्ती धर्मसंस्था म्हणे, जगात शांती आणणार !

    ‘ख्रिस्ती धर्मसंस्थेने ‘धर्म समीक्षण सभा’ (इन्क्विझिशन) लादून गोवा राज्यातील संस्कृतीच देशोधडीला लावली. राजसत्ता मिळून स्थैर्य लाभल्यानंतरही ख्रिस्ती धर्मसंस्थेला येथे सलोखा निर्माण करता आला नाही. या धर्मसंस्थेच्या चर्चमधून येथील समाजजीवन, स्थानिक परंपरा आणि सहस्रो वर्षार्ंपासून चालत आलेली संस्कृती, यांचा अनादर केला गेला. गोमंतकीय राष्ट्रवादाचे जनक म्हणून ओळख असणार्‍या त्रिस्ताव ब्रागांझ कुन्हा यांनी तर गोवा राज्याचे पाश्‍चात्त्यीकरण चर्चने चालू केल्याचा ठपका ठेवला आहे.’

उपजतच देवाप्रती श्रद्धा आणि भाव असणार्‍या फोंडा, गोवा येथील सनातनच्या ६२ व्या संत पू. सुमन नाईक यांचा जीवनपट !

पू. सुमन नाईक
१. पू. सुमनमावशींचे लहानपण
१ अ. लहानपण हसत-खेळत आणि लाडात जाणे : ‘पू. सुमनमावशी त्यांच्या आई-वडिलांच्या पुष्कळ लाडक्या होत्या. त्यांचे लहानपण आई-वडिलांसमवेत हसत-खेळत गेले. लहानपणी त्या त्यांच्या मामांकडे १४ वर्षे राहिल्या. मामांच्या कुटुंबात भावंडांसह ४० जण रहात असत. 
१ आ. सर्व भावंडांमध्ये स्वतःला सर्वांत अधिक चिंचा मिळण्यासाठी झाडाखाली दगड ठेवून ‘तो दगड म्हणजे गणपती आहे आणि तोच अधिक चिंचा मिळवून देईल’, असा भाव ठेवणे : त्यांच्या वाड्यामधे एक मोठे चिंचेचे झाड होते. पू. मावशी सर्व भावंडांसह चिंचा आणायला जायच्या. अधिक चिंचा मिळाव्यात; म्हणून पू. मावशींनी झाडाखाली एक दगड ठेवला आणि भाव असा ठेवला की, तो गणपति आहे. हाच मला सर्वांत अधिक चिंचा मिळवून देईल. त्या तेव्हाही गणपतीशी सहजपणे बोलायच्या. त्यामुळे त्यांनाच सर्वांत अधिक चिंचा मिळायच्या. सर्व भावंडे विचारायची, ‘‘तुलाच अधिक चिंचा कशा काय मिळतात ?’’ तेव्हाही पू. मावशींमधे ‘सर्वकाही देवच देतो’, असा भाव आणि श्रद्धा होती.

३१ डिसेंबरच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखा ! - शिराळा आणि पलूस येथे निवेदन

(उजवीकडे) आमदार श्री. शिवाजीराव नाईक यांना दैनिक सनातन प्रभात भेट देतांना हिंदुत्वनिष्ठ

(डावीकडे) शिराळा पोलीस निरीक्षक श्री. प्रताप पोमण यांना यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ
   सांगली - ३१ डिसेंबरच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखावेत यांसाठी शिराळा येथे पोलीस निरीक्षक श्री. प्रताप पोमण यांना आणि तहसीलदार श्री. दिपक शिंदे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी हिंदु धर्माभिमानी श्री. शशांक चव्हाण आणि श्री. अशोक मस्कर, हिंदु जनजागृती समितीचे श्री. संतोष कुंभार, तसेच सनातन संस्थेचे श्री. रामाराम मोरे उपस्थित होते.

सप्तर्षि जीवनाडीत सांगितल्याप्रमाणे सनातनच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांचा अहर्निश प्रवास !

सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ
महर्षींची शिकवण आणि कार्य !
     ‘सनातनच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ मागील ४ वर्षांपासून भारतभरातील विविध राज्यांत दौर्‍यावर जात आहेत. हिंदु राष्ट्राची (सनातन धर्म राज्याची) शीघ्रतेने स्थापना व्हावी, राष्ट्र, धर्म, तसेच साधक यांचे रक्षण व्हावे आणि देवतांचा आशीर्वाद मिळावा, यासाठी सप्तर्षि जीवनाडीत सांगितलेल्या क्षेत्री जाण्याचे त्यांचे नियोजन असते. आतापर्यंत त्यांनी २४ राज्यांतील प्रवास करून तेथील वैशिष्ट्यपूर्ण दगड, माती, तीर्थ आदींचा संग्रह केला आहे. त्यांनी नोव्हेंबर २०१६ पर्यंत ३ लक्ष ५६ सहस्र कि.मी. एवढा प्रवास करून भावी पिढीसाठी भारतातील अलौकिक समृद्ध ठेवा संग्रहित केला आहे. या दैवी प्रवासाची सर्वांना माहिती व्हावी, यासाठी हे सदर प्रसिद्ध करत आहोत.’

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवानिमित्त झालेले नाडीवाचन ऐकतांना चिपळूण, जिल्हा रत्नागिरी येथील साधकांना आलेल्या अनुभूती

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...
परात्पर गुरु
डॉ. जयंत आठवले
१. नाडीवाचन ऐकत असतांना तहान-भूक आणि त्रास यांचा विसर पडून 
आनंद वाटणे अन् गुरुदेवांवरची श्रद्धा वाढून सर्वकाही देवावरच सोपवणे
    त्या दिवशी सकाळी उठल्यानंतर स्वत:विषयीच्या विचारांनी निराशा आली होती. नाडीवाचन ऐकायला मिळालेे, यासाठी कृतज्ञता व्यक्त झाली. डोळ्यांतून सतत भावाश्रू वहात होते. वाचन चालू असतांना सतत प्रार्थना आणि कृतज्ञता व्यक्त होत होती. नाडीवाचनातील गुरुदेवांविषयीची सूत्रेे ऐकून त्यांच्यावरची श्रद्धा वाढली आणि सर्वकाही देवावरच सोपवले. सत्संग ऐकतांना तहान-भूक आणि त्रास यांचा विसर पडून आनंद वाटत होता. गुरुदेवांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञ !’- कु. सिमंतिनी शेटे, पोफळी, तालुका चिपळूण.

ईश्‍वरप्राप्तीचा राजमार्ग - शरणागती !

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त...
१. शरणागतीचे महत्त्व
      ‘माणसाचा अहंकार आणि कर्तेपणाचा अभिमान हे त्याच्या आनंदाच्या आड येतात. तो अडथळा दूर करण्याचे सामर्थ्य माणसाच्या अंगी नाही; म्हणून ‘ईश्‍वराला शरण जाणे’ हा एकच अनुभवसिद्ध उपाय आहे. शरणागतीमध्ये जीव ईश्‍वरचरणी लीन होतो. शरणागत माणसाला ईश्‍वर त्याच्या दोषांसह स्वीकारतो.
२. शरणागती कशी साध्य करता येते ?
     ज्ञान, धर्म किंवा अन्य मोठे साधन काहीही नको; पण श्रद्धा असल्यास शरणागतीचे दार उघडते. जो सर्वप्रकारे हतबल होतो आणि कोणत्याही निमित्ताने ईश्‍वरचरणी लीन होतोे, त्याला शरणागती पटकन साधते. ईश्‍वरामध्येे स्वतःचे कर्तेपण बुडवणे, हे शरणागतीचे मर्म आहे.

आधुनिक वैद्या (सौ.) नंदिनी सामंत यांना वाढदिवसानिमित्त कु. दीपाली पवार यांनी दिलेल्या शुभेच्छापत्रातील लिखाण !

डॉ.(सौ.) नंदिनी सामंत
कु. दीपाली पवार
१. शुभेच्छापत्राचा लखोटा 
गुरुपौर्णिमेनिमित्त हार्दिक शुभेच्छा ! : ईश्‍वराचे पृथ्वीवरील चालते-बोलते रूप म्हणजे श्री गुरु ! वाघाच्या जबड्यात सापडलेले श्‍वापद ज्याप्रमाणे सुटत नाही, त्याप्रमाणे ज्याच्यावर श्रीगुरूंनी कृपा केली, तो मोक्षाला जाईपर्यंत गुरु त्याला केव्हाही सोडून देत नाहीत. गुरु आपल्या डोळ्यांतून, शब्दांतून किंवा स्पर्शाने कृपेचा ओघ भक्ताकडे वळवतात. गुरूंच्या कृपेचा पूर्ण लाभ व्हावा, यासाठी शिष्यालाही सतत प्रयत्न (साधना) करावे लागतात.

रामनाथी आश्रमात यज्ञस्वरूपी स्वयंपाकघराच्या पुनर्रचनेची सेवा करतांना श्री. सुदिश पुथलत यांनी अनुभवलेला एक अविस्मरणीय आनंदसोहळा !

श्री. सुदिश पुथलत
      ‘देवद आश्रमात सेवा करत असतांना मला रामनाथी आश्रमात स्वयंपाकघराच्या पुनर्रचनेच्या सेवेला यायची संधी मिळाली. या सेवेच्या संदर्भात मला फारसे काही ठाऊक नाही आणि तेवढा अनुभवसुद्धा नाही. ‘ही सेवा मी कशी काय करणार ?’, अशी चिंता मला वाटली नाही; कारण ‘प.पू. गुरुदेव हे सगळे करवून घेतील’, अशी श्रद्धा होती. ही सेवा करतांना मला शिकायला मिळालेली सूत्रे आणि अनुभव लिहिण्याचा प्रयत्न करत आहे.
१. स्वयंपाकघरात बांधकाम तोडलेले असूनही सेवेला 
गेल्यावर आध्यात्मिक उपाय होत असल्याचे जाणवणे
    आरंभी मी स्वयंपाकघरात सेवेला आलो. त्या वेळी आतील सर्व बांधकाम तोडलेले होते, तरीही त्या दिवसापासून स्वयंपाकघरात गेल्यावर माझ्यावर आध्यात्मिक उपाय होत असल्याचे जाणवले. हे मला सतत जाणवत होते; कारण प.पू. गुरुदेवांचा संकल्प पूर्णपणे कार्यरत होता. दुसरे कारण म्हणजे शौर्यादीदींनी तळमळीने आणि भावपूर्णरित्या सिद्ध केलेला स्वयंपाकघराचा आराखडा (Drawing) बघूनच चैतन्य जाणवत होते.

सहजावस्थेत राहून सतत सेवारत असणारे सनातनचे संत पू. संदीप आळशी यांच्याकडून कु. गौरी मुद्गल हिला शिकायला मिळालेली सूत्रे

पू. संदीप आळशी
१. वेळेचे महत्त्व असणे
     ‘प.पू. संदीपदादांना तुळशीच्या पानांचा रस करून देण्याची सेवा माझ्याकडे आहे. मी प्रथमच पू. संदीपदादांना तुळशीचा रस करून दिल्यावर ते म्हणाले, ‘‘चांगला केला आहेस. रस करायला किती वेळ लागला ?’’ मी त्यांना ‘‘रस करायला ३० मिनिटे लागली’’, असे सांगितल्यावर त्यांनी विचारले, ‘‘खलबत्त्यात रस करायला इतका वेळ लागतो, तर आपण तो मिक्सरमध्ये करू शकतो का ?’’ तेव्हा माझ्या लक्षात आले की, पू. दादांना वेळेचे गांभीर्य फार आहे. ‘प्रत्येक क्षणाचा परिपूर्ण लाभ कसा करून घेता येईल ? याचा ते नेहमी विचार करतात. ते वेळेचे महत्त्व जाणतात.

सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या नावाचा देवाने सुचवलेला भावार्थ !

     दैनिक सनातन प्रभातच्या श्री दत्तजयंती विशेषांकातील सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्याविषयी लिखाण वाचून त्यांच्या नावाविषयी देवाने सुचवलेले विचार गुरुमाऊली आणि सद्गुरु (सौ.) अंजलीताई यांच्या चरणी अर्पण करते.
स - सद्गुणी, सतत सेवारत आणि सहजावस्थेत असणार्‍या
द् - दहाही दिशांना अध्यात्माचा प्रसार करणार्‍या
गु - गुरुमाऊलीच्या अनुसंधानात असणार्‍या
रु - रात्रंदिवस गुरुसेवेचा ध्यास असणार्‍या
अं - अहंकार नसणार्‍या आणि अखंड सेवारत असणार्‍या
ज - जातील तेथे सर्वांची मने जिंकणार्‍या
ली - लहान होऊन सर्वांवर निरागस आणि निरपेक्ष प्रेम करणार्‍या
गा - गोड वाणी असणार्‍या
ड - महर्षींच्या लाडक्या
गी - गुरुमहिमेची आणि अध्यात्माची गीता गाणार्‍या
ळ - सर्वांना गुरुमाऊलीचा लळा लावून गुरुमहती सर्वदूर पसरवणार्‍या, तसेच स्वत: कृती करून सर्वांसाठी आदर्श असणार्‍या
सद्गुरु (सौ.) अंजलीताईंना सर्व साधकांकडून कोटी कोटी नमस्कार !
- सौ. सविता मनोहर शेणवी, कराड, जिल्हा सातारा (१३.१२.२०१६)

सनातनच्या साधकांना नाहक भोगावा लागणारा तुरुंगवास आणि संस्थेची होणारी मानहानी यावर भृगु महर्षि यांचे साधकांना आश्‍वस्त करणारे बोल !

सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ
    ‘श्री. समीर गायकवाड आणि डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांच्यावरील आरोप निश्‍चिती करण्यात धर्मविरोधी शक्तींकडून अडथळे आणले जात आहेत. त्यामुळे या दोन्ही साधकांना नाहक तुरुंगवास सोसावा लागत आहे, तसेच संस्थेचीही नाहक मानहानी आणि साधकांची चौकशी होत आहे. यावर भृगु महर्षि यांनी भृगु नाडीवाचक डॉ. विशाल शर्मा यांच्या माध्यमातून आश्‍वस्त केले की, कायदेविषयक कारवाईत सनातनचा जय होईल.’ - (सद्गुरु) सौ. बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.१२.२०१६)

देवपूजेची आवड आणि सेवेची तळमळ असणारी ५५ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून जन्माला आलेली संभाजीनगर येथील कु. देवश्री महेश देशपांडे (वय १४ वर्षे) !

उच्चलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र
(सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. देवश्री देशपांडे एक आहे !
(कु. देवश्री हिची वर्ष २०११ मध्ये ५१ टक्के आध्यात्मिक पातळी होती. आता ५५ टक्के आहे.)
१. पूजेची आवड असणे आणि स्वतःहून प्रतिदिन नियमितपणे पूजा करणे
कु. देवश्री देशपांडे
     ‘कु. देवश्रीला देवाची पूजा करायला पुष्कळ आवडते. सकाळची शाळा असूनही ती प्रतिदिन शाळेत जाण्यापूर्वी फुले तोडून आणते आणि सर्व सिद्धता (तयारी) स्वतः करून पूजा करते. एकदा फुले नसल्यामुळे मी पूजा केली नाही. हे देवश्रीला कळल्यावर ती मला म्हणाली, ‘‘बाबा, पूजा करणे म्हणजे काय केवळ देवांना फुले वाहणे आहे का ?’’ देवश्री तिन्हीसांजेच्या वेळीही न चुकता देवाजवळ दिवा लावते.’ - श्री. महेश देशपांडे (देवश्रीचे वडील)
२. नामजप करण्याची आवड असणे
    ‘देवश्रीला नामजप करायला पुष्कळ आवडते. ती घरी नियमितपणे नामजप करते. शाळेतील रिकाम्या वेळेेत ती नामजप करते.

‘व्हॉट्सअ‍ॅप’ आणि तत्सम प्रणाली हाताळण्यात साधनेतील अमूल्य वेळ वाया घालवणारे साधक !

     ‘सध्या अनेक साधकांच्या भ्रमणभाष संचावर ‘व्हॉट्सअ‍ॅप’ असल्याचे लक्षात आले आहे. या संदर्भात साधकांकडून साधनेच्या अनुषंगाने होणार्‍या अक्षम्य चुका पुढे देत आहोत.
१. स्वतःच्या मनाने साधकांचे गट बनवणे
     प्रसार अथवा आश्रम यांतील बरेच साधक ‘व्हॉट्सअ‍ॅप’वर गट (ग्रुप) बनवतात. त्यामध्ये आपले सहसाधक, परिचित साधक यांना समाविष्ट (अ‍ॅड) करतात. गट बनवण्यापूर्वी ‘असे करणे योग्य आहे का ?’, असे जिल्हासेवकांना विचारून घेत नाहीत.
     आश्रम आणि प्रसार यांतील ज्या साधकांनी आतापर्यंत असे गट सिद्ध केले आहेत, त्यांनी ते यापुढे चालू ठेवण्याविषयी जिल्हासेवकांना विचारून घ्यावे.

साधकांना महत्त्वाची सूचना

५०० आणि १ सहस्र रुपयांच्या जुन्या नोटा ३१ डिसेंबरपूर्वी
अधिकोषांत जमा करा आणि अशा जुन्या नोटा स्वीकारू नका !
      नोटाबंदीनंतर ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या जुन्या नोटा वापरता येणार नाहीत. साधकांनी त्यांच्याकडे अशा नोटा राहिल्या आहेत का, हे पुन्हा एकदा तपासून ३१ डिसेंबरपूर्वी त्या अधिकोषांत जमा कराव्यात. तसेच या नोटा चलनात आता वापरता येणार नसल्याने साधकांनी यापुढे अशा नोटा स्वीकारू नयेत. यापुढे साधकांनी अर्पण, नियतकालिकांची वर्गणी किंवा वसुली स्वीकारतांना धनादेश, डिमांड ड्राफ्ट या स्वरूपात किंवा चलनामध्ये सध्या वापरात असलेल्या १००, ५०, २०, १० रुपयांच्या नोटा, तसेच चलनात आलेल्या नवीन ५०० आणि २००० रुपयांच्या नोटा स्वीकाराव्यात.

बोधचित्र

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज सनातनचे श्रद्धास्थान
आश्रमाविषयीचा दृष्टीकोन
आश्रम माझा नाही; पण मी आश्रमाचा आहे.
     भावार्थ : आश्रम माझा नाही म्हणजे आश्रमावर माझे स्वामित्व (मालकी) किंवा अधिकार (हक्क) नाही; कारण तो गुरूंचा आहे. मी आश्रमाचा आहे म्हणजे मी गुरूंच्या आश्रमाचा असल्याने आश्रमाची, आश्रमात आलेल्यांची काळजी घेणार आणि सेवा करणार. या दृष्टीकोनामुळेच आश्रमातील कामे करूनही आश्रमाविषयी प्रेम निर्माण होत नाही, तर प्रीती निर्माण होते.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

कुठलेही कर्म मनःपूर्वक करणे हितकारक !
कर्म करतांना ते छोटे आहे का मोठेे, हे पहाणे महत्त्वाचे नसून प्राप्त कर्म मनःपूर्वक करणे हितकारक आहे. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
ब्राह्मणांची कावीळ झालेले गांधीवादी !
      गांधी वधानंतर ब्राह्मणांची घरे जाळणे, ब्राह्मणहत्या करणे इत्यादी प्रकार तथाकथित जात्यंध गांधीप्रेमींनी केले. आता आतंकवादी शेकडो हिंदूंना ठार करत असतांना त्यासंदर्भात गांधीप्रेमी एक शब्दही बोलत नाहीत. तसेच ब्राह्मणहत्या करतांना त्यांना अटकेपार झेंडा फडकवणारे पेशवे आठवत नाहीत. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

... हाच खरा शिवछत्रपतींचा आशीर्वाद ठरेल !

२४ डिसेंबर या दिवशी महाराष्ट्र शासनाच्या एका महत्त्वाकांक्षी उपक्रमाच्या प्रारंभासाठी पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी मुंबईत येत आहेत. छत्रपतींचा आशीर्वाद भाजपच्या समवेत, अशी घोषणा देत सत्ता मिळवलेले भाजप समुद्रात छत्रपतींचे भव्य स्मारक उभारण्यातील पहिले पाऊल टाकत आहे. गेल्या १५ दिवसांपासून राज्याचे माहिती खाते याची माहिती प्रसिद्धी करण्याच्या मागे लागले असून नामांकित दैनिकात अर्धे-अर्धे पान विज्ञापन देण्यात येत असून सर्वत्र फलक लावण्यात येत आहेत. जे छत्रपती शिवाजी महाराज आज केवळ महाराष्ट्र नव्हे, भारत नव्हे, तर जगासाठी सर्वच गोष्टींत आदर्श आहेत त्यांची प्रेरणा त्यातून मिळावी, या मुख्य उद्देशाने हा खटाटोप चालू आहे; मात्र समुद्रात स्मारक उभारून मूळ उद्देश साध्य होणार आहे का, याचा विचार होताना दिसत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलांचा स्पर्श जिथे झाला, ते गडकोट हे खरे मुख्य प्रेरणास्रोत असून स्मारक तिथे होणे अपेक्षित आहे. समुद्रातील स्मारकासाठी शासन कोट्यवधी रुपये नव्हे, तर अब्जावधी रुपये व्यय करणार आहे. याउलट छत्रपतींनी जिथे पराक्रम गाजवला ते किल्ले आज भग्नावस्थेत आहेत ! हा विरोधाभास नव्हे का ?

‘कॅशलेस’च्या दिशेने राजकीय पक्षांचा प्रवास कधी ?

पंतप्रधान श्री. मोदी यांच्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर गेल्या काही दिवसांपासून आयकर विभाग, ईडी, केंद्रीय अन्वेषण यंत्रणा अशा विविध खात्यांनी टाकलेल्या धाडींमधून मोठ्या प्रमाणात काळे धन सापडत आहे. भारतातील सध्याची निवडणूक प्रक्रिया पाहिल्यास काळा पैसा ज्यांच्याकडे असण्याची दाट शक्यता आहे तो विभाग म्हणजे विविध राजकीय पक्ष होय ! निवडणुकीत जवळपास प्रत्येक पक्ष कोट्यवधी नव्हे, तर अब्जावधी रुपये व्यय करतो. किंबहुना काळा पैसा पांढर्‍या पैशात रूपांतरित होण्यासाठी निवडणुका हे एक महत्त्वाचे माध्यमही असते. हा निधी उद्योगपती, तसेच विविध माध्यमांकडून देणग्यांच्या रूपात राजकीय पक्षांना मिळतो. सध्याच्या व्यवस्थेत या राजकीय पक्षांना २० सहस्र रुपयांपेक्षा अल्प मिळणारा निधी हा कुठून मिळाला, हे न सांगण्याची सवलत आहे. आज सामान्य लोकांना जर अधिकोषांत काही ठराविक मर्यादेपेक्षा अधिक पैसे भरायचे असतील, तर त्यांना ते कसे उपलब्ध झाले याचा हिशोब द्यावा लागतो, तर राजकीय पक्षांना तो का द्यावा लागू नये ? राजकीय पक्षांसाठी पक्षासाठी निधी घेतांना तो अधिकोषांमार्फतच स्वीकारण्यात यावा, असा नियम का नाही ? 
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn