Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कोटी कोटी प्रणाम !

ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर
महाराज यांची आज पुण्यतिथी

... अन्यथा शिवसेना पद्धतीने सनबर्न बंद पाडू ! - शिवसैनिकांचा निर्धार

सनबर्नविरोधी बैठकीत उपस्थित शिवसैनिक
     पुणे, २१ डिसेंबर (वार्ता.) - धर्म आणि संस्कृती यांच्या रक्षणासाठी शिवसेना नेहमी कटिबद्ध आहे. सनबर्न फेस्टिव्हल भारतीय युवकांना व्यसनाधीन बनवणारा आहे. हा फेस्टिव्हल आम्ही कदापि होऊ देणार नाही. हा फेस्टिव्हल होत असेल, तर शिवसेना पद्धतीने हा कार्यक्रम बंद पाडू, अशी खणखणीत चेतावणी शिवसैनिकांनी दिली आहे. सनबर्न फेस्टिव्हलच्या विरोधात २० डिसेंबर या दिवशी लोणीकंद येथील शिवसेनेच्या कार्यालयात शिवसेना कार्यकारिणीच्या पदाधिकार्‍यांची जिल्हास्तरीय बैठक पार पडली. त्या वेळी हा निर्धार व्यक्त करण्यात आला. हा फेस्टिव्हल महाराष्ट्रातच नाही, तर भारतात अन्यत्र कुठेही होऊ देणार नाही, अशी चेतावणी शिवसेनेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष श्री. संदीप अप्पा भोंडवे यांनी दिली. या प्रसंगी ७३ शिवसैनिक, तसेच हिंदु जनजागृती समितीचे श्री. दीपक आगवणे, श्री. पराग गोखले उपस्थित होते.

जाज्वल्य इतिहासाचे स्मरण करून धर्मसेवेसाठी कार्यरत व्हा ! - प्रशांत जाधव, श्रीशिवप्रतिष्ठान

निगडी (तालुका सातारा) 
येथे हिंदु धर्मजागृती सभा 
श्री. प्रशांत जाधव
       सातारा, २१ डिसेंबर (वार्ता.) - हिंदूंनी आपल्या जाज्वल्य इतिहासाचे स्मरण करावे. श्रीशिवप्रतिष्ठानने चालू केलेल्या उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे. त्यातून प्रेरणा घेऊन धर्मसेवेसाठी कार्यरत व्हावे, असे प्रतिपादन श्रीशिवप्रतिष्ठानचे श्री. प्रशांत जाधव यांनी केले. ते निगडी येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर येथे २० डिसेंबरला आयोजित केलेल्या हिंदु धर्मजागृती सभेत बोलत होते. या वेळी व्यासपिठावर हिंदु जनजागृती समितीच्या सौ. विद्या कदम आणि सनातन संस्थेचे श्री. राहुल कोल्हापुरे हेही उपस्थित होते.
       श्री. प्रशांत जाधव यांचा सत्कार श्री. विजय भालके, सौ. विद्या कदम यांचा सत्कार सौ. सीमा पवार आणिे श्री. राहुल कोल्हापुरे यांचा सत्कार श्री. शंकर पवार यांच्या हस्ते करण्यात आला. समितीचे श्री. हणमंत कदम यांनी समितीच्या कार्याचा आढावा सांगितला. सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन कु. प्रियांका साळुंखे यांनी केले. सभेला १०० हून अधिक धर्माभिमानी उपस्थित होते.

संभाजी ब्रिगेडच्या चेतावणीनंतरही सांगलीत हे राम नथुरामचा प्रयोग कोल्हापूरप्रमाणेच हाऊसफुल !

श्री. शरद पोंक्षे (डावीकडून दुसरे) यांच्याशी
चर्चा करतांना पू. संभाजीराव भिडेगुरुजी

          सांगली, २१ डिसेंबर (वार्ता.) - सांगली येथे होणारा हे राम नथुरामचा प्रयोग उधळू अशी चेतावणी संभाजी ब्रिगेडने दिली होती. प्रत्यक्षात मंगळवारी रात्री भावे नाट्यमंदिर येथे संभाजी ब्रिगेडचा एकही कार्यकर्ता फिरकला नाही. त्यामुळे संभाजी ब्रिगेडचा बार फुसका निघाला. सांगलीतील नाटकाचा प्रयोगही प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादामुळे कोल्हापूरप्रमाणेच हाऊसफुल झाला. या नाटकासाठी ब्राह्मण सभा, श्रीशिवप्रतिष्ठान, तसेच अन्य हिंदुत्वनिष्ठ पक्ष, संघटना यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोणाताही अनुचित प्रकार होऊ नये यांसाठी भावे नाट्यमंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. २१ डिसेंबर या दिवशी सातारा येथे होणारा प्रयोगही यशस्वी होणारच असा निर्धार हिंदुत्वनिष्ठांनी व्यक्त केला आहे.

इसिसने बर्लिन येथील आक्रमणाचे दायित्व स्वीकारले !

        बर्लिन - जर्मनीची राजधानी बर्लिनमध्ये १९ डिसेंबरच्या रात्री नाताळसाठी सजलेल्या बाजारपेठेमध्ये ट्रक घुसवून घडवून आणलेल्या आतंकवादी आक्रमणाचे दायित्व इसिसने घेतले आहे. इसिसशी संबंधित अमाक न्यूज एजन्सीने यासंबंधी वृत्त दिले आहे. या आक्रमणात १२ जण ठार झाले, तर ४८ जण घायाळ झाले. पोलिसांनी कारवाई करत एका पाकिस्तानी नागरिकाला अटक केली होती; पण त्याच्या विरोधात काहीच पुरावे नसल्याने नंतर त्याची सुटका करण्यात आली. जेथे आक्रमण करण्यात आले तो प्रसिद्ध कैसर विल्हेम मेमोरियल चर्चजवळील ख्रिसमस बाजार पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहे.

(म्हणे) भ्रष्टाचार थांबल्यास आपोआप काळ्या पैशाला आळा बसेल !

सर्वाधिक काळ सत्ता भोगून भ्रष्टाचारचा उच्चांक 
केलेल्या काँग्रेसचे पी. चिदंबरम् यांची मुक्ताफळे !
        मुंबई, २१ डिसेंबर - शंभर प्रतिशत काळा पैसा रोखीच्या स्वरूपात नसतो, तर तो स्थावर मालमत्ता, दागिने, भूमी आणि महागड्या वस्तूंच्या स्वरूपात गुंतवला जातो. रोखीत मिळवलेला पैसाही खेळता असतो. त्याचेही रूपांतर व्हाइट मनीमध्ये केले जाते. त्यामुळे केवळ नोटाबंदीने काळ्या पैशाला आळा घालता येणे अशक्य आहे. भ्रष्टाचार थांबल्यास आपोआप काळ्या पैशाला आळा बसेल, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम् यांनी केले. मुंबई विद्यापिठाच्या अर्थशास्त्र विभागाच्या वतने आयोजित २५ वर्षांतील आर्थिक विकास आणि आव्हाने या विषयावर ते बोलत होते. (चिदंबरम् यांनी अर्थमंत्री असतांना भ्रष्टाचार रोखण्यासाठी काही प्रयत्न तर केले नाहीतच उलट ते त्याचे मुकसंमतीदार राहिले, त्याचे काय ? - संपादक)
        या वेळी पी. चिदंबरम् म्हणाले, काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी नोटाबंदी केल्याचे सांगितले जाते. देशातील एकूण पैशांपैकी केवळ ६ प्रतिशत पैसे काळ्या पैशाच्या स्वरूपात असतांना तडकाफडकी नोटाबंदी केल्यामुळेच सध्या गोंधळ चालू आहे. त्यामुळे नोटबंदीमुळे काळ्या पैशाला आळा बसण्याचा दावा खोटा ठरला आहे.

जळगाव येथे हिंदु धर्मजागृती सभा

वार आणि दिनांक : रविवार, २५ डिसेंबर २०१६
वेळ : सायंकाळी ५.३०
स्थळ : शिवतीर्थ, जी.एस्.मैदान, न्यायालय चौक, जळगाव
हिंदूंनो, या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित रहा ! 

बँक खात्यामध्ये ५ सहस्र रुपयांपेक्षा अधिक रक्कम भरण्यावरील निर्बंध मागे !

नोटाबंदीनंतर नवनवीन नियम करून आणि
ते मागे घेऊन जागतिक विक्रम करू पहाणारे केंद्र सरकार !
     नवी देहली - बँकेत पैसे जमा करण्यावर यापूर्वी घोषित करण्यात आलेले निर्बंध रिझर्व्ह बँकेने मागे घेतले आहेत. १७ डिसेंबरला सरकारने राजपत्रित सूचना जारी करून जुन्या ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या नोटा असलेल्या ५ सहस्र रुपयांंपेक्षा अधिक रक्कम ३० डिसेंबपर्यंत एकदाच बँकेत भरता येणार, असा आदेश दिला होता. तसेच ही रक्कम यापूर्वी का भरता येऊ शकली नाही, याचे स्पष्टीकरणही खातेधारकांकडून मागवले होते. या आदेशावर मोठ्या प्रमाणावर टीका चालू झाल्यावर रिझर्व्ह बँकेने २१ डिसेंबरला नवी सूचना जारी करून हे दोन्ही आदेश मागे घेतले आहेत. त्यामुळे आता केवायसी(know your customer) (म्हणजे आधार कार्ड, पॅन कार्ड आदी पुरावे देऊन स्वतःची ओळख बँकेला पटवून देणे) कागदपत्रांची पूर्तता केलेल्या ग्राहकांना बँक खात्यात ३० डिसेंबरपर्यंत जुन्या नोटांच्या स्वरूपात ५ सहस्र रुपयांंपेक्षा अधिक रक्कम जमा करता येईल. तसेच ही रक्कम जमा करतांना त्यांना बँक अधिकार्‍यांना कोणतेही स्पष्टीकरण द्यावे लागणार नाही.

नोटाबंदीनंतर निर्माण झालेल्या समस्या सोडवण्यास सरकार असक्षम ! - चंद्राबाबू नायडू

     नवी देहली - नोटाबंदीच्या निर्णयाने मला आनंद झाला होता; मात्र ४० दिवसांनंतरही लोकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या या अडचणी सुटतील, अशी शक्यता वाटत नाही, कारण समस्या सोडवणारे सक्षम नाहीत. त्यामुळे या समस्येवर कोणताही उपाय दिसत नाही, अशी टीका नोटाबंदीचे समर्थन करणारे आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केली आहे. या संदर्भात तात्काळ उपाययोजना न केल्यास लोकांना अनेक दिवसांपर्यंत त्रासाला सामोरे जावे लागू शकते, असेही नायडू यांनी म्हटले आहे. ते तेलगू देसमच्या लोकप्रतिनिधींना मार्गदर्शन करत होते. नोटाबंदीमुळे निर्माण झालेल्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या १३ सदस्यांच्या समितीमध्ये नायडू यांचा समावेश आहे. नोटाबंदीमुळे अनेक गुंतागुंतीच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. मी प्रतिदिन २ घंटे या समस्या सोडवण्यासाठी देतो; मात्र तरीही यामुळे निर्माण झालेल्या समस्यांमधून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग सापडत नाही, असेही नायडू यांनी म्हटले आहे.

तमिळनाडूच्या मुख्य सचिवांच्या निवासस्थानावर आयकर विभागाचा छापा !

देशभरातील प्रत्येक प्रशासकीय अधिकार्‍याने
त्याच्या संपत्तीची माहिती जनतेसमोर उघड केली पाहिजे !
     चेन्नई - तमिळनाडूचे मुख्य सचिव राममोहन राव यांच्या चेन्नईतील निवासस्थानी आणि इतर ७ ठिकाणी आयकर विभागाने २१ डिसेंबरच्या पहाटे छापे मारले. राव यांचे निकटवर्तीय आणि नातेवाईक यांच्या निवासस्थानांवरही छापे मारण्यात आले आहेत. राममोहन राव यांचे अण्णा द्रमुक पक्षाचे नेते आणि उद्योगपती शेखर रेड्डी यांच्याशी जवळचे संबंध आहेत. मागील मासात रेड्डी आणि त्यांचे २ सहकारी यांचे कार्यालय अन् निवासस्थान येथे छापे मारण्यात आले होते, तेव्हा १०० किलो सोने, ९६ कोटी रुपयांच्या जुन्या नोटा आणि ३४ कोटी रुपयांच्या नव्या नोटा सापडल्या होत्या.

करीना सैफ अली खान यांनी त्यांचा मुलाचे नाव तैमूर ठेवल्यामुळे त्यांच्यावर टीकेचा भडीमार

हिंदुबहुल देशात तैमूरसारख्या क्रूरकर्म्यांचे उदात्तीकरण होते, हे संतापजनक !
     मुंबई - भारतीय अभिनेत्री करीना कपूर-खान आणि त्यांचे पती अभिनेते सैफ अली खान यांनी त्यांच्या मुलाचे नाव तैमूर ठेवले आहे. त्यामुळे सामाजिक संकेतस्थळांवरून त्यांच्यावर टीकेचा भडीमार होत आहे. क्रूर आणि लक्षावधी हिंदूंचा वंशसंहार करणार्‍या तैमूर लंग याच्याशी नामसाधर्म्य असल्यामुळे तैमूर हे नाव ठेवल्याविषयी भारतीय आणि विदेशी अचंबित झाले आहेत.
     पाकिस्तानी वंशाचे लेखक तारेक फतेह यांनी त्यांच्या ट्विटर खात्यावर लिहिले आहे की, एक तर तुम्ही अज्ञानी आहात, नाही तर घमेंडखोर. मुलाचे नाव तैमूर ठेवून तुम्ही असे केले आहे की, तो भारतियांचे नरसंहार करणारा म्हणून ओळखला जावा.

कर्मचार्‍यांचे वेतन बँक खात्यात जमा करणे बंधनकारक ! - केंद्र सरकारचा वटहुकूम

     नवी देहली - १० पेक्षा अधिक कर्मचारी असलेल्या कुठल्याही आस्थापनाला त्यांच्या कर्मचार्‍यांचे वेतन आता रोखीने देता येणार नाही. कर्मचार्‍यांचे वेतन धनादेशाद्वारे किंवा थेट बँकेतील त्याच्या खात्यात जमा करणेे आस्थापनांना बंधनकारक असणार आहे, असा निर्णय केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. नुकत्याच पार पडलेल्या संसद अधिवेशनात १९३६ च्या वेतन कायद्यातील सुधारणेविषयीचे विधेयक लोकसभेत मांडण्यात आले होते. पुढील अधिवेशनात हे विधेयक संमत होण्याची शक्यता आहे; मात्र त्यासाठी २ महिने वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळे सरकारने वटहुकूम लागू करून तात्काळ ही सुधारणा लागू केली आहे.

धुळे येथील समर्थ वाग्देवता मंदिरात सापडले छत्रपती शिवाजी महाराजांचे अप्रकाशित पत्र !

        पुणे, २१ डिसेंबर - शिवचरित्राचे अभ्यासक डॉ. केदार फाळके यांना धुळे येथील समर्थ वाग्देवता मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज यांची कामकाजाची पद्धत, राजकीय आणि प्रशासकीय धोरण अधोरेखित करणारे अप्रकाशित पत्र मिळाले आहे.
        शिवछत्रपतींच्या कार्यावर डॉ. फाळके यांनी विद्यावाचस्पती (पी.एच्डी.) पदवी मिळवली आहे. काही दिवसांपूर्वी ते धुळ्यामधील दफ्तरखान्यातील पत्रे अभ्यासासाठी चाळत होते. त्या वेळी त्यांच्या हाती महाराजांचे अस्सल मुद्रा उमटवलेले हे पत्र हाती लागले. साताराचे सुभेदार अबाजी मोरदेव यांना महाराजांनी राज्याभिषेकापूर्वी हे पत्र पाठवले आहे. या पत्रामध्ये पाटीलकी वतनासंबंधात कान्होजी खराडे आणि काळभर यांच्यातील वादावर दिलेला निवाडा आहे. हे पत्र स्वराज्यातील प्रशासनात २७ जुलै १६७३ मध्ये प्रविष्ट झाले. स्वराज्यात प्रविष्ट झालेल्या प्रदेशाची प्रशासकीय व्यवस्था लावण्यासंबंधी छत्रपती शिवाजी महाराज यांची दक्षता या पत्रातून दिसून येत असल्याचे डॉ. फाळके यांनी सांगितले.

मध्यप्रदेशमध्ये भाजप नेत्याच्या घरावर आयकर विभागाचा छापा !

  • बहुतेक राजकारण्यांकडे कोट्यवधी रुपयांचा काळा पैसा आहे, असे जनतेला वाटते. त्यामुळे एखाद-दुसर्‍या राजकारण्यावर धाड टाकून काही साध्य होणार नाही !
  • लोकशाही व्यवस्थेत राजकारण्यांकडील काळा पैसा बाहेर येणे अशक्य असल्याने तो काढण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !
     भोपाळ - मध्यप्रदेशमधील भाजप नेते सुशील वासवानी यांच्या घरावर आणि कार्यालयावर आयकर विभागाने छापा घातला. वासवानी यांनी बँक खात्यात बेहिशोबी रक्कम जमा केल्याचा संशय आहे. वासवानी यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. यापूर्वी बंगालमध्ये नवीन नोटा बाळगणार्‍या भाजपच्या मनीष शर्मा या नेत्याला ३३ लाख रुपयांच्या नवीन नोटा बाळगल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आली होती. त्याच्याकडून ३३ लाख रुपयांच्या नवीन नोटा जप्त करण्यात आल्या होत्या.

कार्यालयीन वेळेत प्रार्थना करण्यासाठी सर्वधर्मियांनाच विशेष सुट्टी ! - हरिश रावत

हिंदूंच्या विरोधानंतर उत्तराखंड सरकारचा सारवासारव करण्याचा प्रयत्न !
     डेहराडून - सरकारी कर्मचार्‍यांना शुक्रवारी कामाच्या वेळी नमाज पठणासाठी ९० मिनिटांचे मध्यांतर घेण्याच्या निर्णयावर वाद निर्माण झाल्यानंतर उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरिश रावत यांनी सर्वधर्मियांना प्रार्थना करण्यासाठी छोट्या मध्यांतराची संकल्पना मांडली आहे. जर उत्सवाच्या काळात तुम्हाला तुमच्या देवतेची आराधना करायची असेल, तर तुम्हाला वेळ मिळेल. यासाठी तुम्हाला आधी अर्ज करावा लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

विदेशी गायींमुळे ओझोनच्या थराला छिद्रे पडतात ! - गुजरातमधील संशोधकांचा निष्कर्ष

भारतीय गायींचे महत्त्व आतातरी केंद्र सरकारच्या लक्षात
येऊन देशात गोहत्याबंदीसह गोमांस निर्यातीवर बंदी घालणार का ?
     कर्णावती - परदेशी गायींमुळे ओझोनच्या थरावर परिणाम होत असल्याचा निष्कर्ष जामनगर येथील गुजरात आयुर्वेद विद्यापिठाच्या संशोधकाने काढला आहे. परदेशी गायींमुळे ओझोनच्या थराला पडलेले छिद्र वाढत चालले आहे. त्याच वेळी भारतीय गायी जागतिक तापमान वाढीला उत्तरदायी नाहीत, असे या संशोधकाने म्हटले आहे.

हिंदु जनजागृती समितीचा मला अभिमान आहे ! - राहुल यादव, सातारा जिल्हा कार्याध्यक्ष, हिंदु एकता

कार्वे, तालुका कराड 
येथे हिंदु धर्मजागृती सभा 
       कराड, २१ डिसेंबर (वार्ता.) - मुलांना इंग्रजी यायला हवे, असा आजच्या पालकांचा अट्टाहास असतो. एकवेळ शुभंकरोती आले नाही, तरी चालेल; पण जॉनी जॉनी आलेच पाहिजे, असे त्यांचे विचार आहेत. त्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पुस्तकातून काढून टाकण्यात आला आहे. आज धर्मांतरासाठी पैसे दिले जातात. पाकिस्तान आपल्याला कधीही संपवू शकत नाही; पण आपलीच माणसे आपल्याला संपवतील. मला हिंदु जनजागृती समितीचा अभिमान आहे. आज देशात हिंदु जनजागृती समितीप्रमाणे कार्य करणारी संघटना नाही, असे प्रखर मार्गदर्शन हिंदु एकताचे सातार्‍याचे जिल्हा कार्याध्यक्ष श्री. राहुल यादव यांनी केले. ते कार्वे, तालुका कराड येथे हिंदु जनजागृती समिती आयोजित हिंदु धर्मजागृती सभेमध्ये बोलत होते.

काँग्रेसची चहावाल्याकडे २ लक्ष रुपयांची उधारी

सर्वसामान्यांची लक्षावधींची उधारी 
ठेवणारे लोकप्रतिनिधी काँग्रेसमध्ये असल्यानेच 
काँग्रेसची अखेर जवळ आली आहे !
        मुंबई, २१ डिसेंबर - आझाद मैदानाजवळ मुंबई विभागीय काँग्रेस समितीच्या कार्यालयात येथील इंदर जोशी नामक चहावाल्याची मागील चार मासांपासून २ लक्ष रुपयांची उधारी बाकी आहे. उधारीचे पैसे मिळत नसल्याने अखेर त्याने काँग्रेस कार्यालयात उधारीवर चहा देणे बंद केले आहे. काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरूपम यांनी चहाची उधारी असल्याचे मान्य केले असून पक्षातील एका नेत्याच्या हलगर्जीपणामुळे ही उधारी झाली आहे, असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तो चांगला चहा बनवतो. त्याचे पैसे त्याला मिळायलाच हवेत. चार मासांपासून त्याला पैसे दिले गेले नाहीत. आम्ही लवकरच त्याचे सर्व पैसे देऊ. (काँग्रेसी राजकारण्यांची जनतेची फसगत करणारी भाषा ! - संपादक)

हातावर मेंदी काढल्यामुळे इंग्रजी शाळेतून विद्यार्थिनीला वर्गाबाहेर काढले

       मुंबई, २१ डिसेंबर - हातावर मेंदी काढून शाळेच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे इयत्ता २ री मध्ये शिकणार्‍या कु. सारा गुप्ते (वय ७ वर्षे) या विद्यार्थिनीला वर्गातून बाहेर काढण्यात आले. दादर येथील सानेगुरुजी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत १९ डिसेंबर या दिवशी हा प्रकार घडला. या वेळी शाळेकडून कु. सारा हिच्या पालकांना तातडीने शाळेत बोलावून घेण्यात आले. शाळेच्या नियमानुसार हातावरील मेंदी जाईपर्यंत शाळेत प्रवेश दिला जाणार नाही, असे शाळेकडून कु. सारा हिच्या पालकांना सांगण्यात आले. (संस्कृतीचे हनन करणार्‍या इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये पाल्यांना प्रवेश देण्याचा अट्टाहास पालक सोडतील तो सुदिन ! - संपादक) त्यानंतर पालकांनी केलेल्या विनवणीवरून एका दिवसाच्या तडजोडीवर कु. सारा हिला वर्गात प्रवेश देण्यात आला.

राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व बसगाड्यांमध्ये आता वाय-फाय सुविधा

वाय-फाय सुविधा देण्यासमवेत बसगाड्यांची 
स्वच्छता, प्रवाशांना आदराची वागणूक आदी 
प्राथमिक सुधारणा केल्यास जनतेला आवडेल !
        मुंबई, २१ डिसेंबर - राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व गाड्यांमध्ये वाय-फाय सुविधा देण्याचा निर्णय राज्य परिवहन महामंडळाकडून घेण्यात आला आहे. यासाठी एका खाजगी आस्थापनासमवेत महामंडळाचा करार झाला असून जानेवारी २०१७ पासून ही सुविधा देण्यास प्रारंभ होणार आहे. वर्षभरात महामंडळाच्या सर्वच्या सर्व १८ सहस्र बसगाड्यांमध्ये ही सुविधा कार्यरत होणार आहे. यासाठी राज्य परिवहन महामंडळ वर्षाला १ कोटी रुपये खर्च करणार आहे. पुणे जिल्ह्यातील शिवाजीनगर आणि स्वारगेट येथे राज्य परिवहन महामंडळाच्या गाड्यांमध्ये या सुविधेची प्रायोगिक तत्त्वावर यशस्वी चाचपणी घेण्यात आली आहे.

राम मंदिर रेल्वेस्थानकाचे २२ डिसेंबरला लोकार्पण !

         मुंबई, २१ डिसेंबर - जोगेश्‍वरी आणि गोरेगाव या रेल्वेस्थानकांच्या दरम्यान नव्याने बांधण्यात आलेल्या राम मंदिर रेल्वे स्थानकाचे २२ डिसेंबरला रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांच्या हस्ते लोकार्पण केले जाणार आहे. या नवीन रेल्वेस्थानकाचा ओशिवरा परिसरात रहाणार्‍या सहस्रो नागरिकांना लाभ होणार आहे. दोन मासांपूर्वीच सिद्ध झालेल्या या रेल्वेस्थानकाच्या राम मंदिर या नावाला आयत्या वेळी अनुज्ञप्ती मिळाल्यामुळे यापूर्वी आयोजित करण्यात आलेला लोकार्पण सोहळा रहित करण्यात आला होता. यादरम्यान पश्‍चिम रेल्वे प्रशासनाने तिकीट, उद्घोेषणा आणि वेळापत्रक यांमध्ये आवश्यक ते पालट करण्याचे काम पूर्ण केले असून राम मंदिर रेल्वे स्थानक प्रवाशांच्या सेवेसाठी सिद्ध झाले आहे.

भारतीय तटरक्षक दलाकडून २६ पाकिस्तानी नागरिकांना अटक !

    कच्छ (गुजरात) - तटरक्षक दलाने भारतीय सीमेमध्ये २६ मैल आत शिरलेल्या २६ पाकिस्तानी नागरिकांना अटक केली आहे. (पाकचे नागरिक २६ मैल आत शिरेपर्यंत सुरक्षा यंत्रणा काय करत होत्या ? - संपादक) पुढील चौकशीसाठी त्यांना जखाऊ येथे नेण्यात आले आहे. या नागरिकांची चौकशी चालू असून प्राथमिक चौकशीत ते मच्छीमार असल्याचे आढळले आहे. ते लाकडी नौकेऐवजी रबराच्या नौकेचा वापर करत होते; मात्र मोठ्या संख्येने त्यांनी भारतीय सीमेमध्ये प्रवेश करणे ही सामान्य घटना नाही, असे तटरक्षक दलाच्या अधिकार्‍याकडून सांगण्यात आले.

इक्वेडोरमधील भूकंपामध्ये दोघांचा मृत्यू !

     क्विटो - दक्षिण अमेरिका खंडाच्या पश्‍चिमेकडे असलेल्या इक्वेडोरमध्ये झालेल्या ५.७ तीव्रतेच्या भूकंपात २ जणांचा मृत्यू, तर १५ जण घायाळ झाले. या भूकंपामुळे १० इमारती कोसळल्या, तर ६५ इमारतींना किरकोळ हानी झाली.
महर्षींनी प्रलयकालाविषयी सतर्क करणे
     १९.३.२०१६ या दिवशी झालेल्या ‘नाडीवाचन क्रमांक ६७’मध्ये महर्षि म्हणतात, ‘‘हे पूर्ण वर्ष प्रलयकालाचे आणि आपत्तीजनक असणारे आहे.’’ (दक्षिण अमेरिका खंडाच्या पश्‍चिमेकडे असणार्‍या इक्वेडोरमध्ये रिश्टर स्केलवरील ५.७ तीव्रतेचा भूकंप. या घटनेवरून प्रलयकालाविषयी महर्षींनी केलेले भाष्य किती तंतोतंत आहे, हे लक्षात येते ! - संपादक)

अमेरिकेच्या सिलिकॉन व्हॅलीमध्ये मुसलमान शरणार्थींची नोंदणी ठेवण्यास अ‍ॅमेझॉन आणि मायक्रोसॉफ्ट कर्मचार्‍यांचा विरोध !

   कॅलिफोर्निया - अमेरिकेच्या सिलिकॉन व्हॅलीमध्ये अ‍ॅमेझॉन आणि मायक्रोसॉफ्ट या आस्थापनांच्या कर्मचार्‍यांनी त्यांच्या इतर सहकार्‍यांसह मुसलमान शरणार्थींची नोंदणी ठेवण्यास विरोध दर्शवला आहे. अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदी निवड झालेले डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्व मुसलमान शरणार्थींची नोंद ठेवण्याची योजना बनवली आहे. राष्ट्राध्यक्षांच्या या योजनेला साहाय्य न करण्याचा निर्धार या कर्मचार्‍यांनी केला आहे. शरणार्थी मुसलमानांची वेगळी नोंद ठेवल्याने त्यांच्यामध्ये भेदभावाची भावना निर्माण होऊ शकते, असा या कर्मचार्‍यांचा दावा आहे. तंत्रज्ञान आस्थापनांच्या कर्मचार्‍यांनी राबवलेल्या स्वाक्षरी मोहिमेमध्ये अ‍ॅमेझॉन, मायक्रोसॉफ्ट यांसह गुगल, अ‍ॅपल, आयबीएम्, ओरॅकल इत्यादी आस्थापने सहभागी झाली आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणूक प्रचाराच्या वेळी मुसलमान शरणार्थींची त्यांच्या मायदेशी रवानगी करण्यात येणार असल्याचे घोषित केले होते.

मुंबई, ठाणे, पालघर येथे राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी नागरिकांकडून पोलीस अन् प्रशासकीय अधिकारी यांना निवेदन

हिंदु जनजागृती समितीची ३१ डिसेंबरला होणार्‍या अपप्रकारांच्या विरोधात प्रबोधन मोहीम
     मुंबई, २१ डिसेंबर (वार्ता.) - देशभरात सध्या पाश्‍चात्त्य प्रथांच्या वाढत्या अंधानुकरणामुळे नववर्ष गुढीपाडव्याच्या ऐवजी ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री साजरे करण्याची कुप्रथा मोठ्या प्रमाणात वाढीस लागली आहे. या वेळी मद्यपान, अंमली पदार्थांचे सेवन, महिलांवरील अत्याचार आदी अपप्रकारांचे प्रमाण वाढले आहे. या कुप्रथांमुळे युवापिढीचे नैतिकदृष्ट्या हनन होत आहे. नववर्ष स्वागताच्या नावाखाली होणारे हे अपप्रकार रोखावेत, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मुंबई, ठाणे, पालघर, पनवेल आदी ठिकाणी पोलीस आणि प्रशासन यांना निवेदन देण्यात आले. हे निवेदन देतांना राष्ट्रप्रेमी आणि धर्म प्रेमी नागरिकांसह श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, सनातन संस्था, शौर्य प्रतिष्ठान आदी संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

अकोला येथे ३१ डिसेंबरला होणारे अपप्रकार थांबवण्यासाठी उपजिल्हाधिकार्‍यांना निवेदन !

         नवीन वर्षोत्सवाच्या नावाखाली ३१ डिसेंबरला प्रेक्षणीय स्थळे, किल्ले आदी सार्वजनिक ठिकाणी होणारे अपप्रकार थांबवण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने अकोला उपजिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. या वेळी समितीचे श्री. अजय खोत, श्री. अविनाश मोरे आणि श्री. अजिंक्य खुरसुडे उपस्थित होते.

शिवाजी पार्कवर नाताळ साजरा करण्यासाठी उच्च न्यायालयाने नाकारलेली अनुमती सर्वोच्च न्यायालयाने दिली !

न्यायालयांच्या अशा निर्णयांविषयी 
नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला नाही तर नवल !
        मुंबई, २१ डिसेंबर - ३१ डिसेंबरनिमित्त नवीन वर्ष साजरे करण्यासाठी २ दिवस शिवाजी पार्कवर खेळ आणि करमणुकीच्या कार्यक्रमाला अनुमती मिळावी, यासाठी शिवाजी जिमखान्याच्या वतीने उच्च न्यायालयात अर्ज करण्यात आला होता. शिवाजी पार्क शांतता क्षेत्रात येत असल्याने उच्च न्यायालयाने या कार्यक्रमाला अनुमती नाकारली होती. अशा कार्यक्रमांमुळेे ध्वनीप्रदूषणाविषयीचे नियम धाब्यावर बसवले जातात, तसेच कार्यक्रमांमुळे मोठ्या प्रमाणात कचरा जमा होतो, कधी रथयात्रा, दुर्गापूजा, गणेशोत्सव, नवीन वर्ष आणखी बर्‍याच कार्यक्रमांसाठी अनुमती येते. आता दांडियासाठी अनुमती मागितली जाईल. मध्य मुंबईत हीच एक मोकळी जागा राहिल्याने ऊठसूट कुणीही या मैदानावर अनुमती मागतात. शिवाजी पार्क म्हणजे डम्पिंग ग्राऊंड होत आहे, असा शेरा याविषयी उच्च न्यायालयाच्या खंडपिठाने मारला. उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात शिवाजी जिमखान्याने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. यावर सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय रहित ठरवून या कार्यक्रमाला अनुमती दिली आहे. तसेच या कार्यक्रमासाठी व्यासपीठ उभारण्यालाही सर्वोच्च न्यायालयाने अनुमती दिली आहे.

स्टंटबाजी करणारा युवक दुचाकी पेटल्याने जागीच ठार !

        मुंबई, २१ डिसेंबर - वांद्र येथे दुचाकीवरून स्टंटबाजी करत असतांना सहकार्‍याच्या दुचाकीला धडक लागून दुचाकीस्वार अभिजीत गुरव याच्या गाडीने पेट घेतल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याचे अन्य २ सहकारी गंभीररित्या घायाळ झाले आहेत. पोलिसांकडून वारंवार समज देऊनही तरुणांकडून दुचाकींचे स्टंट करण्याचे प्रकार वारंवार घडतात. (चित्रपटांतील दृश्यांचे अनुकरण करून जीव धोक्यात घालण्यापेक्षा तोच वेळ राष्ट्र-धर्म कार्यार्थ सत्कारणी लावायला हवा. असे युवक देशाला कधीतरी महासत्ता बनवू शकतील का ? - संपादक)

संपूर्ण पाकिस्तान नष्ट होईल आणि मुळासकट आतंकवाद संपेल, असे सर्जिकल स्ट्राईक पंतप्रधानांनी करावेत ! - श्री. सुनील घनवट, महाराष्ट्र राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

Add caption
जळगाव येथील हिंदु धर्मजागृती सभेच्या प्रचारार्थ नांद्रा बुद्रुक येथे प्रचारसभा !
      नांद्रा बुद्रुक (जळगाव), २१ डिसेंबर (वार्ता.) - ज्याप्रमाणे वर्ष १९८९ मध्ये काश्मीरमध्ये काश्मिरी हिंदूंना आतंकवादामुळे विस्थापित व्हावे लागले, तशी परिस्थिती आपल्याकडेही निर्माण होत आहे, याची आपण जाणीव ठेवायला हवी. न्यायालयाच्या आदेशानुसार ठिकठिकाणी मंदिरे पाडली जात आहेत; पण अनधिकृत मशिदी आणि चर्च यांविषयी बोटचेपे धोरण आखले जाते. यासाठी हिंदूंनी सतर्क असले पाहिजे. मोदींनी केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचे आम्हाला कौतुकच आहे; पण त्यांनी संपूर्ण पाकिस्तानच नष्ट होईल आणि मुळासकट आतंकवाद संपेल, असे सर्जिकल स्ट्राईक करावेत, असे मार्गदर्शन येथे आयोजित केलेल्या हिंदु धर्मजागृती सभेच्या प्रचारसभेत हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी केले. रणरागिणी शाखेच्या कु. रागेश्री देशपांडे यांनी लव्ह जिहाद, धर्माचरण, पाश्‍चात्यांचे अंधानुकरण या विषयांवर मार्गदर्शन केले.

हिंदु राष्ट्र सेनेच्या महिला कार्यकर्त्यांचे दारूबंदीसाठी आंदोलन

दारूबंदीसाठी आंदोलन करतांना महिला
      पुणे, २१ डिसेंबर - ‘दारूबंदी’च्या अभियानांतर्गत हिंदु राष्ट्र सेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी अलीकडेच राज्य शुल्क उत्पादन विभागाच्या समोर आंदोलन केले. ‘दारूबंदी झालीच पाहिजे’ अशा आशयाचे फलक कार्यकर्त्यांनी हातात धरले होते. हिंदु राष्ट्र सेनेच्या महिला आघाडीच्या सौ. तृप्ती काळे आणि श्री. वैजनाथ भगत यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नावाची पाटी काढली; पण भारतियांच्या मनातून त्यांचे नाव काढू शकणार नाही ! - मुख्यमंत्री

      पुणे, २१ डिसेंबर - इतिहासकार आणि काँग्रेस सरकार यांनी निश्‍चितपणे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर अन्याय केला. काँग्रेसच्या शासन काळात स्वातंत्र्यवीर सावरकर यांची अंदमान कारागृहातील पाटीही काढून टाकली; परंतु त्यामुळे त्यांचे अतुलनीय शौर्य पुसले जाणार नाही. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नावाची पाटी काढली; पण भारतियांच्या मनातून त्यांचे नाव काढू शकणार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. (असे आहे, तर मुख्यमंत्र्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्यासाठी केंद्राकडे शिफारस करावी, ही सावरकरप्रेमींची अपेक्षा ! - संपादक) येथील कर्वे रस्त्यावरील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाचे नूतनीकरण आणि सभागृह यांचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते १९ डिसेंबर या दिवशी झाले. त्या वेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी क्रांतीकारकांची पिढी घडवली. त्यांनी जातीभेद निर्मूलनाचे कार्य ते स्वतः परमोच्च स्तरावर असतांना केवळ भाषणातून न करता प्रत्यक्ष कृतीतून केले. ते प्रत्येक गोष्टीचे विज्ञाननिष्ठेने मूल्यमापन करत. प्रा.(सौ.) मेधा कुलकर्णी म्हणाल्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जाज्वल्य विचार पुढे नेण्यासाठी स्मारकाची निर्मिती करण्यात येईल.


रेल्वेचा विकास झाला, तरच देशाचा विकास ! - सुरेश प्रभु

     मुंबई - मुंबईत येत्या काही काळात रेल्वेच्या पायाभूत सुविधांच्या विकासाचे काम हाती घेण्यात येणार आहे. रेल्वेचा विकास झाला, तरच देशाचाही विकास होईल, असे प्रतिपादन केंद्रीय रेल्वेमंत्री श्री. सुरेश प्रभू यांनी केले. येथे एका कार्यक्रमासाठी आले असतांना ते बोलत होते. (स्वातंत्र्यानंतर बहुतांश शासनकर्त्यांनी रेल्वेच्या विकासाकडे दुर्लक्ष केले. त्याचाच हा परिणाम होय ! - संपादक)

रेल्वे स्थानकांवर अकबराची चित्रे लावण्याचा निर्णय रहित करावा ! - हिंदु धर्माभिमानी

वाराणसी येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन करतांना धर्माभिमानी हिंदू
वाराणसी येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन
      वाराणसी - बांगलादेशमध्ये अल्पसंख्यांक हिंदूंवर होणार्‍या अत्याचाराचे सूत्र संयुक्त राष्ट्रांमध्ये उपस्थित करावे आणि हिंदूंवर अत्याचार करणारा क्रूर मोगल शासक अकबर याची चित्रे रेल्वे स्थानकांवर लावण्याचा निर्णय रहित करावा, यांसाठी १८ डिसेंबर या दिवशी येथील शास्त्रीघाट, वरुणापूल येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. यासंदर्भातील मागणीचे निवेदन रेल्वे मंत्रालयाला देण्यासाठी स्थानिक जिल्हाधिकार्‍यांकडे सादर करण्यात आले. या वेळी ‘इंडिया विथ विझडम्’, हिंदु युवा वाहिनी, हिंदु युवा शक्ती, सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे कार्यकर्ते आणि हिंदु धर्माभिमानी यांनी आंदोलनात सहभाग घेतला.

दत्तजयंतीनिमित्त ‘संतकृपा प्रतिष्ठान’च्या वतीने बडोदा येथे ग्रंथप्रदर्शन

ग्रंथप्रदर्शनाचा लाभ घेतांना जिज्ञासू
      बडोदा (गुजरात) - दत्तजयंतीच्या निमित्ताने ‘संतकृपा प्रतिष्ठान’च्या वतीने येथील कुबेरेश्‍वर दत्त मंदिरात ग्रंथप्रदर्शन आणि धर्मशिक्षण देणार्‍या फ्लेक्स फलकांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. या प्रदर्शनात श्री दत्तगुरूंशी संबंधित आध्यात्मिक माहिती देणारे ग्रंथ, लघुग्रंथ, छायाचित्र, नामपट्टी आणि सात्त्विक उत्पादने हे साहित्य ठेवण्यात आले होते. या प्रदर्शनाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 
क्षणचित्रे
  • या ग्रंथप्रदर्शनाच्या ठिकाणी पाश्‍चात्त्य पद्धतीनुसार नववर्ष ३१ डिसेंबरच्या रात्री साजरे करण्याच्या विरोधात स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली.
  • एका ख्रिस्ती जिज्ञासूनेही या पत्रकावर स्वाक्षरी केली. त्यांनी नाथपंथाची दीक्षा घेतली असून त्यानुसार ते साधना करतात. 
  • या वेळी ‘हिंदूंनी ३१ डिसेंबर नव्हे, तर गुढीपाडव्याला नववर्ष साजरे करावे’, याविषयी प्रबोधन करण्यात आले.

भाग्यनगरमध्ये मोगल शासनकाळातील १ लाख ५५ सहस्र कागदपत्रे मिळाली !

मोगल आक्रमणकर्त्यांच्या दरबारातील मंडळी ही हुजरेगिरी करणारी असल्याने ती नेहमीच त्यांची प्रशंसा करणारे लेखन करायची ! त्यामुळे या कागदपत्रांची सत्यता पडताळणे आवश्यक !
      भाग्यनगर - मोगल प्रशासकीय व्यवस्थेविषयी १ लाख ५५ सहस्र कागदपत्रे मिळाली आहेत. शाहजहान आणि आैंरंगजेब यांच्या शासनकाळातील ही कागदपत्रे फारसी भाषेत लिहण्यात आली असून सध्या तेलंगणच्या ‘अर्काइव्स अ‍ॅण्ड रिसर्च इंस्ट्यिट्यूट’ च्या कह्यात आहेत. या कागदपत्रांमध्ये मोगलांची प्रशासकीय व्यवस्था, पदे आणि स्थिती, जागीरदारी पद्धती, महसूल यांच्याविषयी माहिती अंतर्भूत आहे.

हिंदू तेजा जाग रे !

Jago !
Videshi gay se watavaran ki ozone parat me
chhed padate hai. - Gujrat ke vaigyanik
- kya Ab sarkar deshi gayka mahatva samzegi ?
जागो !
विदेशी गाय से वातावरण की ओजोन परत में छेद पडते हैं । - गुजरात के वैज्ञानिक
- क्या अब सरकार देशी गाय का महत्त्व समझेगी ?

फलक प्रसिद्धीकरता

देशात विदेशी नाही, तर देशी गायींच्या पालनाला प्रोत्साहन द्या !
     विदेशी गायी मिथेन गॅस सोडतात. त्याच्या परिणामामुळे वातावरणातील ओझोनच्या थराला छिद्रे पडतात. त्याच वेळी भारतीय गायी जागतिक तापमान वाढीला उत्तरदायी नाहीत, असा निष्कर्ष जामनगर येथील गुजरात आयुर्वेद विद्यापिठाच्या संशोधकांनी काढला आहे.

तमिळनाडूमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ५० सहस्र स्वयंसेवक !

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यात पुढाकार घेणे आवश्यक ! 
     चेन्नई - तमिळनाडूमध्ये वर्ष १९४० पासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य चालू आहे. या कार्याला वर्ष २००० पासून मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. सध्या तमिळनाडूमध्ये संघाच्या १ सहस्र ५०० दैनंदिन शाखा कार्यरत आहेत. त्यात अनुमाने ५० सहस्र स्वयंसेवक सहभागी होतात. प्रारंभी द्रविडी संस्कृतीचे वर्चस्व असलेल्या या राज्यात हिंदीला विरोध असल्यामुळे संघाला मोठ्या प्रमाणात विरोधाला समोरे जावे लागले होते. या विरोधानंतरही गेल्या १६ वर्षांत तमिळनाडूमध्ये संघाचे कार्य वाढत असल्याची माहिती संघाचे प्रांत सहप्रचार प्रमुख नरसिंम्हन यांनी दिली.

देहली येथे दत्तजयंतीनिमित्त ग्रंथप्रदर्शन

ग्रंथप्रदर्शनाचा लाभ घेतांना जिज्ञासू
      देहली - दत्तजयंतीच्या निमित्ताने सनातन भारतीय संस्कृती संस्थेच्या वतीने येथील जनकपुरीच्या दत्तविनायक मंदिरात ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले होते. या प्रदर्शनामध्ये अध्यात्म, राष्ट्र आणि धर्म या विषयांवरील ग्रंथांचा समावेश होता. या प्रदर्शनाला जिज्ञासूंचा चांगला प्रतिसाद मिळाला.
क्षणचित्र
  • प्रदर्शनस्थळी धर्मशिक्षण देणारे फ्लेक्स लावण्यात आले होते.

मुंबईमध्ये एअर इंडियाच्या इमारतीला आग

        मुंबई, २१ डिसेंबर - २० डिसेंबरला सकाळी पावणेसातच्या दरम्यान नरिमन पॉईंट येथील एअर इंडियाच्या इमारतीच्या २२ व्या मजल्याला आग लागली. अद्याप आगीचे कारण कळू शकलेले नाही. यामध्ये कोणतीही जिवीत हानी झालेली नाही.

भिवंडी-पारोळ रस्त्यावरील अनधिकृत बांधकामाला सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे अभय (?)

     भिवंडी - पारोळ रस्त्यावर मोक्याच्या ठिकाणी दुतर्फा वाढते अतिक्रमण होत असूनही भिवंडी येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे अधिकारी या अनधिकृत बांधकामाकडे अक्षम्य दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. यामुळे येथील भूमफियांचे चांगलेच फावले आहेे. (अनधिकृत बांधकामाकडे दुर्लक्ष करणार्‍या उत्तरदायी अधिकार्‍यांवर कारवाई होणे आवश्यक आहे. - संपादक) रस्त्याच्या दुतर्फा भंगाराची दुकाने आहेत, तसेच अनधिकृत गाळ्यांची बांधकामे करण्यात आली आहेत. या अनधिकृत बांधकामालगत विद्युत जनित्र आणि उच्चदाबाची विद्युत वाहिनी आहे. असे असतांनही बांधकाम विभागाचे अधिकारी शांत आहेत. (स्थानिक जागरूक नागरिकांनी संघटितपणे राष्ट्रकर्तव्य म्हणून याविरोधात आवाज उठवला पाहिजे ! - संपादक)

घणसोली (नवी मुंबई) येथील अनधिकृत इमारतींवर महापालिकेची धडक कारवाई

      नवी मुंबई, २१ डिसेंबर (वार्ता.) - नवी मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांच्या विरोधात महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमण विभागाकडून धडक कारवाई करण्यात येत आहे. येथील सिद्धार्थनगर येथे चालू असलेल्या पाच मजली इमारतीच्या बांधकामाविषयी नोटीस देऊनही त्याला काहीच प्रतिसाद न दिल्याने २० डिसेंबरला ही इमारत पाडण्यात आली. यासह जवळच असलेली दोन अनधिकृत बांधकामेही पाडून टाकण्यात आली.

पश्‍चिम उपनगरीय रेल्वेमार्गावर विनातिकीट प्रवाशांकडून ८ कोटी ७८ लक्ष रुपयांचा दंड जमा

हिंदु राष्ट्रात नियमांचे पालन करणारे नीतीमान नागरिकच असतील !
    मुंबई, २१ डिसेंबर पश्‍चिम उपनगरीय रेल्वेमार्गावर विनातिकीट प्रवास करणार्‍या प्रवाशांवर नोव्हेंबर मासात केलेल्या कारवाईत पश्‍चिम रेल्वेने ८ कोटी ७८ लक्ष रुपयांचा दंड गोळा केला आहे. नोव्हेंबरमध्ये एकूण १ लक्ष ९८ सहस्र प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. नोव्हेंबर २०१५च्या तुलनेत अशा प्रवाशांच्या प्रमाणात या वर्षी २९.२० टक्क्यांनी वाढ झाली आहे. आपले आरक्षित तिकीट दुसर्‍यांना वापरासाठी देणार्‍या ७३ जणांवरसुद्धा कारवाई करण्यात आली. १ सहस्र १०५ भिकारी आणि अनधिकृत फेरीवाले यांना रेल्वे परिसरातून बाहेर हाकलण्यात आले. (रेल्वे परिसर बकाल करणार्‍या अशांना केवळ हाकलण्यापेक्षा ते पुन्हा तेथे येऊ नयेत, यासाठी रेल्वे प्रशासनाने ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे. - संपादक) त्यांपैकी ११८ जणांना अटक करण्यात आली आहे. तिकिटांचे आरक्षण करून देणार्‍या दलालांची पडताळणी करून रेल्वे अधिनियमांच्या अंतर्गत २१६ जणांवर गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे ‘प्रवाशांनी विनातिकीट प्रवास करू नये’, असे आवाहन पश्‍चिम रेल्वे प्रशासनाने केले आहे.

अंबाजोगाई येथे दत्तजयंतीनिमित्त झालेल्या कीर्तनात गुढीपाडव्याला नववर्ष साजरे करण्याविषयी ह.भ.प. अच्युत महाराज जोशी यांच्याकडून प्रबोधन

     अंबाजोगाई (जिल्हा बीड) - दत्तजयंतीनिमित्त येथील हौसिंग सोसायटी दत्तमंदिरामध्ये १३ डिसेंबरला ह.भ.प. अच्युत महाराज जोशी यांच्या काल्याच्या कीर्तनात त्यांनी १ जानेवारीऐवजी गुढीपाडव्याला नववर्ष साजरे करायला हवे, असे मार्गदर्शन केले. ‘गुढीपाडव्याला नैसर्गिक, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक वारसा आहे’, असेही ते म्हणाले. या वेळी त्यांनी भगवंत अवतार का घेतो, धर्मसंस्थापना म्हणजे याविषयी मार्गदर्शन केले, तसेच ‘भगवंताच्या व्यापक स्वरूपालाच नारायण म्हणतात. हाच नारायण कधी श्रीकृष्णाच्या रूपात, कधी दत्तरूपात दर्शन देतो. हे नारायण म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून यालाच ‘अनंत’ म्हणतात’, असेही
त्यांनी सांगितले. कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी दत्तचरित्र आणि श्रीकृष्णचरित्र यांच्या श्रेष्ठत्वाची महतीही वर्णिली.
     गुढीपाडव्याविषयी सांगतांना त्यांनी पाश्‍चात्त्य संस्कृतीचा आपल्यावर असलेला पगडा आणि ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री नवीन वर्ष साजरे करून संस्कृतीचा होणारा र्‍हासही विशद केला. ६०० भक्तांनी त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेतला.

रशियाकडून पाक-चीन कॉरिडोरला समर्थन

भारताच्या परराष्ट्रनीतीचे अपयश !
      नवी देहली - चीन आणि पाकिस्तान यांच्यातील आर्थिक महामार्गाला रशियाने समर्थन दिले आहे. तसेच युरोप आणि आशिया खंडांतील व्यापार्‍यांसाठी त्याला युरोपशी जोडण्याचेही सुतोवाच केले आहे. या महामार्गाला भारताचा विरोध आहे. तरीही रशियाने याला समर्थन देणे ही भारतासाठी चिंतेची गोष्ट आहे.

धारावी येथे आगीत ४०० हून अधिक झोपड्या जळून खाक

     मुंबई (वार्ता.) - येथे १८ डिसेंबरच्या पहाटे ४.३० वाजता धारावी सायन-कुर्ला मार्ग येथील प्रेमनगर झोपडपट्टीला आग लागली. या आगीमध्ये ४०० हून अधिक झोपड्या जळून खाक झाल्या. आगीत तिघेजण घायाळ झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. ६ घंट्यांच्या अथक प्रयत्नांनंतर अग्नीशमनदलाला ही आग विझवण्यात यश आले.

वर्धा येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

     वर्धा - येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रीय हिंदू आंदोलन घेण्यात आले. या आंदोलनात बांगलादेशातील अल्पसंख्य हिंदूंवर होणारे अत्याचार, मंदिरांची तोडफोड आणि मूर्तीभंजन या विषयांमध्ये तातडीने लक्ष घालून हिंदूंच्या मानवाधिकाराचे संरक्षण आणि ठोस कृती व्हावी, तसेच हिंदूंवर केल्या जाणार्‍या अत्याचारांविषयी संयुक्त राष्ट्रसंघात सूत्र उपस्थित करावे, अशी मागणी हिंदुत्वनिष्ठांनी केली. बांगलादेशातील अल्पसंख्य हिंदूंची सद्यस्थिती, हिंदूंवर आणि त्यांच्या घरांवर धर्मांधांकडून होणारी आक्रमणे यांविषयीची उदाहरणेही या वेळी समितीच्या सौ. रत्ना हस्ती यांनी सांगितले.
क्षणचित्र - रस्त्यावरून येणारे जाणारे अनेक जण थांबून आंदोलनातील विषय ऐकत होते.

यवतमाळ येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

आंदोलनात उपस्थित धर्माभिमानी
     यवतमाळ, २१ नोव्हेंबर (वार्ता.) - येथील हिंदु जनजागृती समिती आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने श्री दत्त चौक येथे १७ नोव्हेंबरला दुपारी ४ ते सायं. ६ या वेळेत राष्ट्रीय हिंदू आंदोलन झाले.
     या वेळी रेल्वे स्थानकांवर क्रूरकर्मा अकबराची चित्रे रंगवण्यास विरोध करणे, बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षिततेचे सूत्र संयुक्त राष्ट्रसंघात मांडणे आणि इस्लामिक बँकिंगचा धर्मांध प्रस्ताव देणार्‍या रिझर्व्ह बँकेच्या अधिकार्‍याची चौकशी करून त्यावर आवश्यक ती कारवाई करावी, या विषयांवर आंदोलन करण्यात आले.

प.पू. पांडे महाराज यांच्या दिव्य सत्संगातून मिळालेल्या चैतन्यामुळे व्यष्टी आणि समष्टी साधना करण्यासाठी प्रेरणा मिळणे

प.पू. पांडे महाराज
श्री. शिवाजी वटकर
    माझ्या भाग्याने मला देवद आश्रमात प.पू. पांडे महाराज यांचा सत्संग मिळत आहे. त्याचा शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावर लाभ होत आहे. त्यांच्या आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मला शिकायला मिळालेली सूत्रे येथे देत आहे.
१. प.पू. पांडे महाराजांना पहाटे
५.३० वाजता उत्साहात चालतांना पाहून

पहाटे उठून चालण्याची सवय लागणे आणि त्यामुळे शारीरिक दृष्टीने लाभ होणे
      मागील ९ मास (महिने) पहाटे ५.३० वाजता प.पू. पांडे महाराज यांच्यासमवेत चालण्याची मला संधी मिळत आहे. मला हृदयविकाराचा त्रास असल्यामुळे प्रतिदिन सकाळी चालण्याच्या व्यायामाची आवश्यकता आहेे. यापूर्वी माझ्याकडून सकाळी नित्यनेमाने चालणे होत नसे.

सिमेंट-रेतीद्वारे नव्हे, तर धर्माचरण आणि साधना यांद्वारे विचारांचा पाया पक्का केल्यास देशाचा खरा विकास होईल आणि देश टिकून राहील !

     ‘देशात मोठमोठे टॉवर, मॉल, रस्ते, पूल, हॉटेल्स उभे होणे, जनतेने चांगले कपडे परिधान करणे, चांगले खाणे-पिणे करणे आणि त्यांचे उच्च राहणीमान असणे, म्हणजे विकास, अशी शासनकर्त्यांची विकासाची संकल्पना असते ! मात्र हा विकास मर्यादित आणि तात्पुरता आहे. राष्ट्र-धर्म प्रेम, समाजहित, त्याग, इतरांचा विचार आणि नि:स्वार्थी वृत्ती यांचा जनतेमध्ये विकास करणे, हा धर्माला अभिप्रेत असा विकास असतो आणि हा विकास अमर्याद आणि कायमचा असतो.’

भारतात राज्य कुणाचे ?

     ‘जम्मू-काश्मीरमधील त्राल भागातल्या एका रस्त्याला फुटीरतावादी हुरियत कॉन्फरन्सच्या नेत्यांकडून आतंकवादी बुरहान वानी याचे नाव देण्यात आले आहे.’

१४ वर्षांनंतर जागे झालेले सरकार !

     ‘राज्यात प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाच्या निर्मितीस पायबंद घालण्याच्या दृष्टीने त्याचे उत्पादक, विक्रेते आणि वितरक यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश १४ जून २०१४ या दिवशी एका परिपत्रकाद्वारे दिले आहेत. तसेच प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाच्या निर्मितीस बंदी आणण्याचा प्रस्ताव केंद्रीय गृहमंत्रालयाकडे पाठवला आहे, असे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत लेखी उत्तरात सांगितले.
     गेली १४ वर्षे हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था प्लास्टिकचे राष्ट्रध्वज न वापरण्याच्या संदर्भात अभियान राबवत आहे. त्यामुळे अनेक शासकीय कार्यालयांतून या संदर्भात आदेश काढण्यात आले आहेत.

न्यायालयाच्या आदेशाचे पालन न करणार्‍या पोलीस अधिकार्‍यांवर कारवाई करावी, अशी मागणी करा !

     ‘मशिदींवरील अनधिकृत भोंगे हटवण्याच्या संदर्भात हिंदु धर्माभिमान्यांनी १० डिसेंबर २०१६ या दिवशी वाकड (पुणे) पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीधर जाधव आणि पेठ (मंंचर) येथे मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील गोडसे यांना निवेदने दिली. या वेळी त्यांनी अनधिकृत भोंग्यांच्या विरोधात कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले.’

‘सनबर्न फेस्टिव्हल’ - भारतीय संस्कृतीवर विकृत परिणाम घडवणारे आक्रमण !

   
गेली ९ वर्षे गोव्यासह देशातील विविध शहरांमध्ये आयोजित करण्यात येणारा ‘सनबर्न’ हा पाश्‍चात्त्य संगीताचा फेस्टिव्हल यंदा पुणे शहराजवळ केसनंद येथे २८ ते ३१ डिसेंबर २०१६ या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. या संगीत महोत्सवामध्ये ‘डीजे’ वाद्याच्या कर्णकर्कश आवाजात गायन-नृत्यासह, मद्यपान, अमली पदार्थांचे सेवन यामधून युवक आणि युवती उन्मत्त होतात. यामधून अश्‍लील चाळे, ‘नार्कोटिक ड्रग्ज’चा मुक्तहस्ते वापर आदी अपप्रकारांना चालना मिळून कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात येते. या संगीत महोत्सवामध्ये हिंदु संस्कृतीपासून दुरावरलेले समाजातील उच्चभ्रू लोक (Uprooted Hindus) सहभागी होत असले, तरी या कार्यक्रमाच्या आजूबाजूचे नागरी जीवन आणि ‘सोशल मिडिया’मधून देशाची सबंध युवा पिढी या भोगवादाला बळी पडल्याचे निर्दशनास येते. या कार्यक्रमातून संस्कृतीवर होणार्‍या आक्रमणातून समाजमनावर अनेक दूरगामी परिणाम होऊन भोगवादी मूल्यांना चालना मिळते. महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाने पर्यटनवाढीच्या नावाखाली हा फेेस्टिव्हल पुण्यात आणण्यास हिरवा कंदील दाखवला असला, तरी पुण्याचे सांस्कृतिक वातावरण लक्षात घेता ‘सनबर्न’सारखे फेेस्टिव्हल पुण्याच्या सुसंस्कृतपणाला गालबोट लावणारे ठरणार आहे.
सनबर्नमध्ये देवतेचे विडंबन

सनबर्नमध्ये राष्ट्रध्वजाची विटंबना 

समाजाला संयम शिकवायचा कि भोगवाद शिकवायचा, ते सरकारला ठरवावे लागेल ! - समर्थभक्त पू. सुनील चिंचोलकर

पू. सुनील चिंचोलकर
   गांधीजींनी ज्या रामराज्याचे स्वप्न पाहिले होते, तेच हे रामराज्य आहे का ? व्यसनाधीनतेच्या विरुद्ध गांधीजी होते. मग व्यसनाधीनतेला प्रोत्साहन देणारे कार्यक्रम ठेवणार का ? नंतर मणिभाई देसाई यांना ‘मॅगेसेस’ पुरस्कार मिळाला होता. त्यांनी गायींविषयी प्रयोग करून पाहिला होता. त्यांनी ५० देशी गायींचे २ गोठे १० मैलांच्या अंतरावर केले होते. एका गोठ्यात दूध काढण्याच्या आधी सकाळी ते पॉप गाणे लावायचे आणि दुसरीकडे कृष्णाची बासरी लावायचे. ज्या गोठ्यात पॉपगीत वाजायचे, त्या गायी अल्प दूध द्यायच्या, तर ज्या गोठ्यात बासरी वाजायची, त्या गायी जास्त दूध द्यायच्या. त्यानंतर त्यांनी एका मासानंतर उलट प्रयोग केला. त्या वेळी ज्या गोठ्यात बासरी लावायचे, तेथे ते पॉप गीत लावले. त्या गायींनी अल्प दूध दिले, तर ज्या ठिकाणी पॉप गीत लावले जायचे, तेथे बासरी लावल्यावर त्या गायींनी जास्त दूध दिले. त्यातून भारतीय संगीताची बरोबरी जगातील कोणतेही संगीत करू शकत नाही. 
   आमच्याकडे संत मीराबाई नृत्य करत होत्या. दक्षिणेकडे अनेक मंदिरांमध्ये नृत्य सेवा करण्यात येते. ती भगवंताची सेवा म्हणून नृत्य केले जाते. याचा अर्थ आम्हाला नृत्य किंवा रसिकता मान्य नाही, असे नाही. भारतातील अनेक सिनेअभिनेत्रींनी नृत्य केले आणि आम्ही ते स्वीकारले.

जळगाव येथे आज हिंदु धर्मजागृती सभेच्या प्रचारानिमित्त विराट वाहन फेरी

दिनांक - २२ डिसेंबर २०१६
वेळ - सकाळी १० वा.
प्रारंभ - नेहरू चौक, बिग बाझार येथून

हिंदूंना धर्मशिक्षित करण्यासाठी विविध उपक्रमांच्या माध्यमातून जनजागृती हिंदु जनजागृती समितीचे केरळ येथील नोव्हेंबर मासाच्या तिसर्‍या आणि चौथ्या सप्ताहातील प्रसारकार्य

१. एका धर्माभिमान्यांच्या कुलदेवतेच्या मंदिरात ‘अय्यप्पन विळक्कं’
कार्यक्रमात ‘हिंदु धर्माची सद्यस्थिती’ या विषयावर प्रवचनाचे आयोजन
   ‘२४.११.२०१६ या दिवशी त्रिश्शूर जिल्ह्यातील कोडुंगल्लूर येथे एक धर्माभिमानी श्री. चंद्रमोहन यांच्या कुलदेवतेच्या मंदिरात ‘अय्यप्पन विळक्कं’ कार्यक्रमात समितीच्या कु. अदिती सुखटणकर यांनी ‘हिंदु धर्माची सद्यस्थिती आणि त्यावर उपाय’ याविषयी श्रोत्यांना अवगत केले. त्यांनी सांगितले, ‘‘धर्माचरण हाच सध्याची समाजाची स्थिती सुधारण्याचा एकमेव उपाय आहे.’’ नंतर त्यांनी देवळात दर्शन कसे घ्यायचे ?, कुलदेवतेच्या नामजपाचे महत्त्व, नामजप करण्याची पद्धत आणि नमस्कार करण्याची योग्य पद्धत, यांविषयी माहिती सांगितली. या वेळी १०० भाविक उपस्थित होते.
२. पेरिंजणम् येथे एका मंदिरात ‘स्कंद यागम्’च्या
निमित्ताने लावलेल्या ग्रंथ प्रदर्शनात धर्माभिमान्याचा सहभाग
पेरिंजणम् येथे एका मंदिरात ‘स्कंद यागम्’च्या निमित्ताने ग्रंथ प्रदर्शन लावण्यात आले. मंदिरात धर्मशिक्षण देणारे फ्लेक्स फलकही लावले होते. एर्नाकुलम् जिल्ह्यातील एक धर्माभिमानी रिक्शा व्यवसाय बंद ठेवून सेवेसाठी आले होते.
३. एर्नाकुलम् जिल्ह्यातील काक्कनाड येथे गेल्या सप्ताहापासून नवीन धर्मशिक्षणवर्ग चालू झाला आहे.’ 
- कु. प्रणिता आणि कु. अदिती सुखटणकर, केरळ

आज वाढदिवस

श्री. प्रताप कपाडिया
     ६३ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले श्री. प्रताप कपाडिया (वय ६८ वर्षे) यांचा मार्गशीर्ष कृष्ण पक्ष नवमी, कलियुग वर्ष ५११८ (२२ डिसेंबर २०१६) ला वाढदिवस आहे. त्यांची गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.
श्री. प्रताप कपाडिया यांना वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून नमस्कार !

‘सनबर्न’ला विरोध !

सनबर्नसारख्या कार्यक्रमांवर शासनाने तात्काळ बंदी आणावी ! - ह.भ.प भानुदास तुपे महाराज, हडपसर 
   सनबर्न फेस्टिव्हलसारख्या कार्यक्रमांच्या माध्यमातून तरुण पिढी व्यसनाधीन होत आहे. तरुण पिढीला व्यसनाधीनतेचा विळख्यातून वाचवण्यासाठी शासनाने तात्काळ या कार्यक्रमांवर बंदी आणावी. या कार्यक्रमाच्या विरोधात सर्व कीर्तनकारांच्या माध्यमातून जनजागृती करू.
हिंदु संस्कृती नष्ट करणार्‍या कार्यक्रमांना विरोधच ! - ह.भ.प. तांबे महाराज, थेऊर 
   हिंदु धर्म आणि संस्कृती नष्ट करणार्‍या कार्यक्रमांना आमचा तीव्र विरोध असून समाजातील सर्व स्तरातील लोकांनी सनबर्न फेस्टिव्हलचा तीव्र निषेध करून त्याला विरोध करायला हवा. शासनानेही याची दाखल घेऊन हा कार्यक्रम रहित करावा.

नाताळ साजरा करणे, ही हिंदूंची अतिसहिष्णुताच !

डिसेंबरमध्ये नाताळ हा ख्रिस्त्यांचा सण येतो. सध्या हिंदूदेखील हा सण साजरा करण्यात गुरफटले आहेत. नाताळच्या निमित्ताने हिंदूंची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट होत असून हे एकप्रकारे धर्मांतरच आहे. हिंदूंना धर्मशास्त्राचे पालन करणे मागासलेपणाचे वाटते, तर सांता क्लॉसच्या भाकड कथा ऐकणे आणि त्या अनुसरणे पुढारलेपणाचे वाटते, हे दुर्दैवी नव्हे का ?
पुरोगामी आणि राजकीय नेते यांचा ढोंगीपणा 
   ‘हिंदूंच्या त्या अंधश्रद्धा आणि अन्य पंथियांच्या त्या श्रद्धा’ अशी सध्या मानसिकता आहे. एरव्ही देवळात देवाला फुले, दूध अर्पण करण्यास प्रतिबंध करणारे पुरो(अधो)गामी ठिकठिकाणी भेटतील. नाताळच्या नावाने खाद्यपदार्थ, सजावट यांवर होणार्‍या अनाठायी खर्चाविषयी मात्र ते मूग गिळून गप्प असतात. हिंदूंच्या प्रत्येक परंपरेला वैज्ञानिक आणि धर्मशास्त्रीय आधार असूनही त्याचा अभ्यास करण्यासाठी नीरस असणारे पुरो(अधो)गामी ‘सांता क्लॉस’सारख्या तर्कहीन संकल्पनांना विरोध करायला पुढे सरसावत नाहीत. 
   गेल्या वर्षी सरकारने नाताळनिमित्त २ लाख ख्रिस्त्यांना कपडे वाटले. हा सण जर सर्वांचाच आहे, तर हिंदूंना यात सहभागी का केले नाही ? हिंदूंच्या सणांच्या दिवशी असा उपक्रम राबवल्याचे कधी ऐकिवात नाही. यातून राजकीय नेत्यांचा सर्वधर्मसमभावाविषयीचा ढोंगीपणाच समोर येतो. 

हिंंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या दृष्टीने ब्राह्मतेजाचे (आध्यात्मिक बळाचे) महत्त्व

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या संदर्भातील परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे विचारधन !


‘वर्ष २०२३ पासून ‘हिंदु राष्ट्र’ येईल’, हे आजवर अनेक संतांनी वेळोवेळी सांगितले आहे. या पार्श्‍वभूमीवर हिंदु राष्ट्र स्थापनेविषयी अनेकांंच्या मनात उत्सुकता असते. यासाठीच ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची दिशा’ या विषयावरील वैशिष्ट्यपूर्ण सदर !
१. ब्राह्मतेज म्हणजे काय ?
‘ब्राह्मतेज म्हणजे साधना केल्यामुळे निर्माण होणारे आध्यात्मिक बळ ! 
२. ब्राह्मतेजाची आवश्यकता
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे शिवधनुष्य धर्माचरणी हिंदूंना उचलायचे आहे. ‘शिवधनुष्य’ या शब्दाचा उपयोग यासाठी केला की, केवळ बाहूबळाने शिवधनुष्य उचलणे शक्य नसते. त्यासाठी दैवी पाठबळही लागते. केवळ शारीरिक, मानसिक किंवा बौद्धिक स्तरावर कार्य करून हिंदु राष्ट्राची स्थापना होणार नाही, तर आध्यात्मिक स्तरावरही प्रयत्न करावे लागतील. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी क्षात्रतेजासह ब्राह्मतेजही (आध्यात्मिक बळही) आवश्यक आहे.
३. ब्राह्मतेजाद्वारे कार्य कसे होते ?
अणूबॉम्बपेक्षा परमाणूबॉम्ब अधिक प्रभावशाली असतो; कारण तो अणूबॉम्बपेक्षा अधिक सूक्ष्म असतो. म्हणजे स्थूल गोष्टींपेक्षा सूक्ष्म अधिक सामर्थ्यवान आहे. विविध स्तरांवर कार्य कसे होते, हे लक्षात घेतले की, ब्राह्मतेजाचे सामर्थ्य लक्षात येईल.

कुठे काही सहस्र लोक ठार झाल्यावर जिहादी अतिरेकी संघटनांचा तीव्र निषेध करणारी अमेरिका आणि कुठे अतिरेक्यांच्या आक्रमणात लक्षावधी भारतीय ठार झाल्यावरही शांत असणारे संवेदनाशून्य भारतीय शासन !

   ‘अमेरिकेच्या जागतिक व्यापार संघटनेच्या ११० मजली इमारतीवर (‘वर्ल्ड ट्रेड सेंटर’वर) जिहादी अतिरेकी संघटनांनी विमानांची टक्कर मारून त्या उद्ध्वस्त केल्या. त्यांत २० सहस्र लोक ठार झाले. त्यांनी अमेरिकेच्या संरक्षण विभागाच्या ‘पेंटॅगॉन’ या प्रचंड कार्यालयावरही हल्ला केला.
     या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. - संपादक

६९ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या सौ. अश्‍विनी अतुल पवार यांनी दिलेले अमूल्य दृष्टीकोन !

सौ. अश्‍विनी पवार
श्री. संदेश नाणोसकर
     गुरुदेवांच्या कृपेमुळे देवद (पनवेल) येथील सनातन आश्रमातील साधकांना कधी सत्संगाच्या, तर कधी सेवेच्या माध्यमातून वा प्रत्यक्ष सहवासातून सौ. अश्‍विनीताईचा (सौ. अश्‍विनी पवार यांचा) सत्संग मिळतो. देवाने या सत्संगात ताईच्या माध्यमातून दिलेले साधनेचे दृष्टीकोन सर्वांसाठीच आदर्श आहेत.
७. साधनेच्या दृष्टीने 
अ. अध्यात्मातील प्रवासात १०० पैकी ४० पावले चालायची राहिली, तर देव ती पूर्ण होण्यासाठी काय करता येईल, ते बघत असतो; पण आपण ६० पावले झाली, हे पहात असतो.

सप्तर्षि जीवनाडीत सांगितल्याप्रमाणे सनातनच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांचा अहर्निश प्रवास !

महर्षींची शिकवण आणि कार्य !
सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ
सनातनच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ मागील ४ वर्षांपासून भारतभरातील विविध राज्यांत दौर्‍यावर जात आहेत. हिंदु राष्ट्राची (सनातन धर्म राज्याची) शीघ्रतेने स्थापना व्हावी, राष्ट्र, धर्म, तसेच साधक यांचे रक्षण व्हावे आणि देवतांचा आशीर्वाद मिळावा, यासाठी सप्तर्षि जीवनाडीत सांगितलेल्या क्षेत्री जाण्याचे त्यांचे नियोजन असते. आतापर्यंत त्यांनी २४ राज्यांतील प्रवास करून तेथील वैशिष्ट्यपूर्ण दगड, माती, तीर्थ आदींचा संग्रह केला आहे. त्यांनी नोव्हेंबर २०१६ पर्यंत ३ लक्ष ५६ सहस्र कि.मी. एवढा प्रवास करून भावी पिढीसाठी भारतातील अलौकिक समृद्ध ठेवा संग्रहित केला आहे. या दैवी प्रवासाची सर्वांना माहिती व्हावी, यासाठी हे सदर प्रसिद्ध करत आहोत.

काळानुसार योग्य नामजप योग्य प्रमाणात करा !

पू. संदीप आळशी
     सध्या प.पू. डॉक्टरांनी साधकांना ७० टक्के वेळ महर्षींनी सांगितलेला जप आणि ३० टक्के वेळ अन्य जप करण्यास सांगितले आहे. काही साधकांनी प.पू. डॉक्टरांची ही चौकट नीट वाचलेली नाही; त्यामुळे ते त्याप्रमाणे करत नाहीत. काही साधक या चौकटीत सांगितल्याप्रमाणे न करता स्वतःला कोणता जप आवडतो किंवा स्वतःचा कोणता जप चांगला होतो, यानुसार तो करतात. काही साधक महर्षींनी सांगितलेला जप आणि अन्य जप हे प.पू. डॉक्टरांनी सांगितलेल्या प्रमाणात करत नाहीत. योग्य नामजप योग्य प्रमाणात करण्याचे महत्त्व पुढीलप्रमाणे आहे.

कु. सुुप्रिया नवरंगे यांच्या वाढदिवसाला कु. दीपाली पवार यांनी शुभेच्छापत्र देऊन दिलेला कृष्णानंद !

कु. सुप्रिया नवरंगे यांना दिलेले शुभेच्छापत्र
कु. सुप्रिया नवरंगे
लखोट्यावर असलेले लिखाण
      सुप्रिया, वाढदिवसाच्या निमित्ताने तुला माझ्याकडून पुष्कळ आशीर्वाद आणि पुढच्या वाढदिवसापर्यंत तुझ्या जलद आध्यात्मिक उन्नतीसाठी चांगले प्रयत्न होऊ देत, यासाठीही तुला आशीर्वाद ! - तुझा कृष्ण
कृष्णासमवेत जाण्यासाठी आतुरलेली आमची लाडकी ताई कु. सुप्रिया नवरंगे !
कृष्णाचे कु. सुप्रियाला आश्‍वासन
कृष्ण : सुप्रिया मागच्या वर्षीच्या वाढदिवसाला तुला शाश्‍वती दिली होती की, तुला गरुड वाहनात माझ्यासमवेत घेऊन जाणार आहे म्हणून !

शरणागत भाव आणि वर्तनातील पालट यांविषयी ६७ टक्के आध्यात्मिक स्तर असलेले अधिवक्ता सुधाकर चपळगावकर यांच्या लक्षात आलेली सूत्रे

अधिवक्ता सुधाकर
चपळगावकर
१. संचित, प्रारब्ध, क्रियमाण, पुनर्जन्म, मुक्ती, मोक्ष ही भारतीय
सनातन तत्त्वज्ञानाची 
मूलतत्त्वे असणे अन् आपल्या बुद्धीनुसार धर्माचे
पालन केल्यास मुक्तीसाठी ते पुरेसे असल्याची समजूत असणे
      परमेश्‍वराचे अस्तित्व मानावे कि मानू नये ?, हा प्रत्येकाच्या विचारशक्तीचा प्रश्‍न आहे. मृत्यूनंतर काय ? या विषयावर गेल्या अनेक वर्षांपासून तत्त्ववेत्त्यांनी आपापल्या परीने त्यांचे विचार मांडले आहेत. संचित, प्रारब्ध, क्रियमाण, पुनर्जन्म, मुक्ती, मोक्ष ही भारतीय सनातन तत्त्वज्ञानाची मूलतत्त्वे आहेत, असे मी मानतो. मनुष्यजन्मात या सर्व गोष्टींचा गांभीर्याने विचार करणारा स्वतःला मुक्तीमार्गाकडे नेण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करत असतो.

देवापर्यंत पोचण्यासाठी गाडीला लोंबकळून जाण्याचा विचार करत असतांना गरुड वाहनात बसण्याची संधी दिल्याने कु. सुप्रिया नवरंगे यांच्या वतीने साधिकेने व्यक्त केलेली कृतज्ञता !

कु. दीपाली पवार
      रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात सेवा करणार्‍या कु. सुप्रिया नवरंगे यांच्या मार्गशीर्ष कृष्ण पक्ष सप्तमी (२० डिसेंबर २०१६) या दिवशी वाढदिवस झाला, त्या निमित्त कु. दीपाली पवार यांनी केलेले लिखाण देत आहोत.
प.पू. डॉक्टरांच्या चरणी,
शिरसाष्टांग नमस्कार.
१. सुप्रियाच्या सहवासात तिचे प्रयत्न, तळमळ आणि भाव
जवळून पहायला मिळाल्यानेे तिच्या वतीने प.पू. डॉक्टरांना पत्र लिहावेसे वाटणे
      प.पू. डॉक्टर, हा नमस्कार माझ्या वतीने केला नाही, तर आपल्या कु. सुप्रिया नवरंगेताईच्या वतीने केला आहे. आज सुप्रियाताईचा वाढदिवस आहे. आज मला वाटले, सुप्रियाच्या वतीने तुम्हाला पत्र लिहावे; कारण आम्ही दोघी तुमच्या खोलीत (प.पू. डॉक्टर पूर्वी रहात असलेल्या खोलीत) एकत्र रहातो. त्यामुळे तिच्या सहवासात तिचे प्रयत्न, तळमळ आणि भाव हे जवळून पहायला अन् अनुभवायला मिळाले.

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...

कु. वैष्णवी वेसणेकर
अनेक जन्मांची ही पुण्याई, आज फळास आली ।
     मूळची कोल्हापूरची आणि सध्या रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमात रहाणारी बालसाधिका कु. वैष्णवी वेसणेकर (वय १६ वर्षेे) हिच्याविषयी मे २०१४ मध्ये दैनिक सनातन प्रभातमध्ये लिखाण वाचल्यावर श्रीकृष्णाने एका साधिकेला पुढील कविता सुचवली.
चिमुकल्या या जिवावर आज गुरुकृपा झाली ॥
अनेक जन्मांची ही पुण्याई आज फळास आली ॥ धृ. ॥
गुुरुसेवेचा ध्यास लागला । मायेचा पिंजरा तोडला ॥
गुरुसावली मिळाली तिला । गुरुसेवेत जीव हा गुंतला ॥ १ ॥

जन्म झाला आमुचा केवळ तुझ्या सेवेसाठी ।

सौ. विद्या शानभाग
हे सद्गुरुराया, जन्म झाला आमुचा केवळ तुझ्या सेवेसाठी ।
कृपा प्राप्त करण्या दिली संधी मोठी ॥ १ ॥
पावलोपावली करता तुम्ही मार्गदर्शन ।
दिले जीवन्मुक्त होण्यासाठी साधनेचे अमूल्य धन ॥ २ ॥

बोधचित्र

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
दुसरा आणि स्वतः
    दुसर्‍याला उमजू न देणे, स्वतःचे स्वतःला न उमजणे, स्वतःचे दुसर्‍याला उमजू न देणे, ही अवस्था आल्यास तो जीव ईश्‍वराच्या अगदी निकट आला आहे, असे समजावे.
भावार्थ : ‘दुसर्‍याला उमजू न देणे’ म्हणजे आपल्यातील शक्ती दुसर्‍याला समजणार नाही, असे वागणे. ‘स्वतःचे स्वतःला न उमजणे’ म्हणजे अद्वैतात गेल्यावर स्वतःचे स्वतःला उमजण्यासारखे काही उरत नाही; कारण तो स्वतःला विसरूनच गेलेला असतो. ‘स्वतःचे दुसर्‍याला उमजू न देणे’ म्हणजे ‘आपण स्वतः ब्रह्मस्थितीत आहोत’, हे प्रकृतीतील दुसर्‍याला उमजून येत नाही. ही ईश्‍वराची, ब्रह्माची लक्षणे असल्याने तशा स्थितीत जो असेल, तो साहजिकच ईश्‍वराच्या निकट आलेला असतो.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन ‘संत भक्तराज महाराज यांची शिकवण.’)


परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
    स्वसुखासाठी दुसर्‍यांना दुःख देऊन धनाचा संग्रह करणे, हे पाप आहे; पण भविष्यकाळ लक्षात घेऊन सन्मार्गाने आणि आवश्यक तेवढा धनसंचय करून ठेवणे, याला दूरदर्शीपणा म्हणतात. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

सत्याची कास कधीही सोडू नये ! 
परमेश्‍वराची साथ नित्य रहावी, ही इच्छा असेल, तर
कधीही सत्याची कास सोडू नये. सतत सत्याचे अधिष्ठान ठेवावे ! 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

समान नागरी कायद्याची आवश्यकता !

तमिळनाडूतील मद्रास उच्च न्यायालयाने नुकतेच एका याचिकेवरील सुनावणीद्वारे राज्यातील शरीया न्यायालय बंद करण्याचा आदेश दिला आणि पुन्हा एकदा समान नागरी कायद्याचा विषय समोर आला. मुळात हा विषय विविध संघटनांद्वारे सतत समोर येत असतो; मात्र त्यातही न्यायालयाकडून याची आवश्यकता समोर आणणारे निकाल जेव्हा दिले जातात तेव्हा त्यावर पुन्हा चर्चा होणे आवश्यक ठरते. न्यायालयापुढे अशा प्रकारे धर्माच्या आधारे असणार्‍या नियमांमुळे आणि प्रथांमुळे निकाल देण्यास अडचणीचे ठरत आहे. न्यायाधीश निकाल देतांना राज्यघटनेचा विचार करतात; मात्र या प्रथा राज्यघटनेच्या वर आहेत, असे सांगत त्याला विरोध केला जातो. यामुळे न्यायालयाला नेहमीच डोकेदुखी ठरते. याचा विचार करून न्यायालयानेच समान नागरी कायद्याची मागणी नेहमीच केली आहे. राजीव गांधी पंतप्रधान असतांना शहाबानो खटल्याच्या वेळीच ही समस्या अधिक प्रकर्षाने निदर्शनास आली होती. या वेळी काँग्रेस सरकारला समान नागरी कायला लागू करण्याची मोठी संधी होती; मात्र तिने मुसलमानांच्या मतांसाठी शेपूट घालत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय संसदेत घटना दुरुस्ती करत फिरवला. न्यायालयाने शहाबानो हिला तलाक देणार्‍या नवर्‍याकडून पोटगी मिळवून देणारा निर्णय दिला होता.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn