Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

सनबर्नची पार्श्‍वभूमी पडताळून कारवाई करू ! - गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांचे आश्‍वासन

श्री. दीपक केसरकर (उजवीकडे) यांना निवेदन देतांना श्री. अरविंद पानसरे
    नागपूर - मागील वर्षी गोवा येथे झालेल्या सनबर्न फेस्टिव्हलमध्ये अमली पदार्थविरोधी पथकाला त्या ठिकाणी शेकडो जण सार्वजनिकरित्या हुक्का आणि चिलीम पीत असतांना, तसेच अनेक जण तात्पुरत्या स्वरूपात बांधण्यात आलेल्या प्रसाधनगृहांत अमली पदार्थांचे सेवन करत असतांना पहायला मिळाले. सहस्रो जणांकडून नो स्मोकिंग झोनमध्ये धूम्रपान करण्यात येत होते. त्या वेळी पोलिसांनीही मोठ्या प्रमाणात दंड वसुली केली होती. सनबर्न फेस्टिव्हलच्या आयोजकांनी हा ड्रग्ज-फ्री इव्हेंट आहे, असे कितीही सांगितले, तरी या ठिकाणी अमली पदार्थांच्या सेवनाचा मुक्त संचार असतो, हा आतापर्यंतचा पोलीस आणि अंमली पदार्थविरोधी पथक यांचा अनुभव आहे.

पुणे येथे ‘लेफ्ट-राईट-लेफ्ट’ नाटकाच्या वेळी डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांकडून गोंधळ घालण्याचा प्रयत्न

नाटकातून शहरी भागातील 
वाढत्या नक्षलवादावर प्रकाश !
       पुणे, २० डिसेंबर - शहरी भागात वाढत जाणार्‍या नक्षलवादावर प्रकाश टाकणारे ‘लेफ्ट-राईट-लेफ्ट’ हे नाटक रंगभूमीवर आले आहे. हे नाटक ‘आर्ट ऑफ नेशन’ आणि अभाविप यांच्या वतीने ‘जागर कलामंच’ यांनी प्रस्तूत केले आहे. या नाटकातून नक्षलवादाविषयीची कटू सत्ये मांडण्यात आल्याने साम्यवादी (कम्युनिस्ट), तसेच डाव्या विचारधारेच्या लोकांना ते जिव्हारी लागत असल्याचे चित्र दिसत आहे. (डाव्या विचारसरणीच्या वाढत्या नक्षलवादाविषयीचे वास्तव नाटकाद्वारे मांडणार्‍या अभाविपचे अभिनंदन ! - संपादक) ८ डिसेंबर या दिवशी नाटकाच्या पहिल्याच प्रयोगाच्या वेळी डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठात अभाविपच्या कार्यकर्त्यांना विरोध केला आणि त्या विद्यार्थ्यांनी गोंधळ घालून नाटक बंद पाडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. (डाव्यांचा सत्य मांडणार्‍यांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न ! डाव्या विचारसरणींच्या विद्यार्थ्यांकडून केला जाणारा विरोध हा एकप्रकारे त्यांची कुकृत्ये उघड करतोे. - संपादक) नाटकाच्या प्रयोगानंतर प्रश्‍नोत्तरासाठी वेळ दिलेला असूनही डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांनी हमरातुमरीवर येऊन गोंधळ घातला. (अशा प्रकारे गोंधळ घालून विरोध करणार्‍या डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी कारवाई करणे अपेक्षित आहे. - संपादक)

त्रिपुरा विधानसभेत तृणमूल काँग्रेसच्या आमदाराने अध्यक्षांचा राजदंड पळवला !

लोकशाहीला निरर्थक \
ठरवणारे लोकप्रतिनिधी !
        अगरतळा - २० डिसेंबरला त्रिपुरा विधानसभेत तृणमूल काँग्रेसचे आमदार आणि माजी विरोधी पक्षनेते सुदीप रॉय बर्मन यांनी विधानसभा अध्यक्षांचा राजदंड घेऊन सदनाबाहेर पळ काढला. त्रिपुरा विधानसभेत असा प्रकार घडण्याची ही पाचवी वेळ आहे.
        त्रिपुराचे वन आणि ग्रामीण विकासमंत्री नरेश जमातिया यांच्यावर ‘सेक्स स्कॅण्डल’शी संबंध असल्याचा आरोप झाला होता. यावर आमदार सुदीप बर्मन यांनी चर्चेची मागणी केली होती; परंतु विधानसभा अध्यक्षांनी चर्चा करण्यास नकार दिल्याने सुदीप बर्मन त्याचा विरोध करत होते.

‘एन्आयए’ने वर्ष २००६ मधील मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचे अन्वेषण पूर्वग्रहदूषितपणे केल्याचा ‘एटीएस्’चा आरोप

       मुंबई, २० डिसेंबर - राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्आयए) वर्ष २००६ मधील मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास हा केंद्रीय अन्वेषण यंत्रणा (सीबीआय) आणि आतंकवादविरोधी पथक (एटीएस्) यांनी केलेले अन्वेषण व्यर्थ्य ठरवण्यासाठी पूर्वग्रह बाळगून कोण आहे, असा आरोप एटीएस्ने केला आहे. ‘एन्आयए’ने मात्र १९ डिसेंबरला उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून हा आरोप फेटाळला आहे. या प्रकरणी आरोपी असलेल्या सिमी या आतंकवादी संघटनेच्या ८ जणांची विशेष न्यायालयाने एप्रिल २०१६ मध्ये मुक्तता केली होती.
१. ‘एटीएस्’ने केलेल्या आरोपांमध्ये म्हटले आहे की, मुसलमान मशिदीत बॉम्बस्फोट करू शकत नाही, हा निष्कर्ष आधारहीन आहे. विशेष न्यायालयाने रेकॉर्डवरील पुराव्यांविरुद्ध आदेश दिला असून हा बेकायदेशीर आहे.
२. हा आरोप फेटाळतांना ‘एन्आयए’ने म्हटले आहे की, संपूर्ण अन्वेषण करूनच हा निष्कर्ष काढला आहे. त्यामुळे ‘एटीएस्’च्या आरोपांत तथ्य नाही.
       एन्आयएने न्यायाधीश रणजीत मोरे आणि न्यायाधीश शालिनी फणसाळकर-जोशी यांच्या खंडपिठापुढे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात हे म्हटले आहे.

बर्लिनमध्ये ट्रकच्या धडकेने १२ जण ठार !

आतंकवादी आक्रमण असण्याची शक्यता
      बर्लिन - जर्मनीची राजधानी असलेल्या बर्लिन शहरात एका ख्रिसमस बाजारामध्ये भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने अनेक जणांना उडवले. यामध्ये १२ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर ५० पेक्षा अधिक जण घायाळ झाले आहेत. हा अपघात नसून मुद्दाम केलेली घटना असावी. म्हणजेच हे आतंकवादी आक्रमण असावे, अशी शक्यता पोलिसांना वाटत आहे.

इस्लामी आतंकवादी ख्रिस्त्यांना लक्ष्य करत आहेत ! - डोनाल्ड ट्रम्प

  • डोनाल्ड ट्रम्प थेट बोलतात आणि निवडणुकीत निवडूनही येतात; मात्र भारतातील राजकारणी असे बोलू शकत नाहीत; कारण त्यांना निवडणुकीत निवडून यायचे असते !
  • गेल्या ३ दशकांत भारतातील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे सोडले, तर एकाही राजकारण्याने ‘इस्लामी आतंकवादी हिंदूंना लक्ष्य करतात’, असे एकदाही म्हटलेले नाही, हे लक्षात घ्या !
       वॉशिंग्टन - इसिस आणि अन्य इस्लामी आतंकवादी त्यांच्या जागतिक जिहादाच्या अंतर्गत ख्रिस्ती, त्यांचे अनेक समुदाय आणि श्रद्धास्थाने येथे सातत्याने आक्रमणे करत आहेत. या आतंकवाद्यांचा आणि त्यांच्या जागतिक नेटवर्कचा पृथ्वीवरूनच नाश केला पाहिजे. आपण स्वातंत्र्यप्रेमी हे अभियान पूर्ण करण्यासाठी साहाय्य कराल, असे आवाहन अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे. तुर्कस्थानमध्ये रशियाच्या राजदुताची करण्यात आलेली हत्या आणि जर्मनीमध्ये ख्रिसमस बाजारामध्ये झालेले आक्रमण याविषयावर ते बोलत होते. रशियाच्या राजदुताच्या हत्येसाठी त्यांनी इस्लामी आतंकवाद्यांनाच उत्तरदायी ठरवले.

कोल्हापुरातील हे राम नथुराम नाटकाचा प्रयोग प्रचंड उत्साहात यशस्वी !

हिंदुत्वनिष्ठांच्या कणखर भूमिकेचा परिणाम केशवराव नाट्यगृहास पोलीस छावणीचे स्वरूप !
आंदोलन करणारे ४० हून अधिक कार्यकर्ते पोलिसांच्या कह्यात !
    
नाटक पार पडल्यावर श्री. शरद पोंक्षे (१) यांच्याशी चर्चा
करतांना शिवसेनेचे श्री. संजय पवार (२) आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ
     कोल्हापूर, २० डिसेंबर (वार्ता.) - हिंदुत्वनिष्ठ श्री. शरद पोंक्षे दिग्दर्शित हे राम नथुरामच्या प्रयोगाला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, संभाजी ब्रिगेड, स्वाभिमान संघटना, नौजवान सभा यांसह विविध पुरो(अधो)गामी संघटनांनी विरोध केला. नाटक होऊ न देण्यासाठी महापालिकेच्या आयुक्तांवर दबाव आणला, नाटक उधळून लावण्याची चेतावणी दिली; मात्र इतके सगळे होऊनही शिवसेना आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी घेतलेल्या कणखर भूमिकेमुळे १९ डिसेंबर या दिवशी केशवराव भोसले नाट्यगृहात नाट्यरसिकांच्या उपस्थितीत प्रचंड उत्साहात नाटकाचा प्रयोग यशस्वी झाला. एकूण परिस्थिती पहाता नाट्यगृहाला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. नाटक चालू होण्यापूर्वी निदर्शने करणार्‍या विविध पुरोगामी संघटना आणि पक्ष यांच्या ४० हून अधिक कार्यकर्त्यांना पोलिसांनी कह्यात घेऊन सोडून दिले.
१. १९ डिसेंबरला नाटक आहे, असे समजल्यापासून नाटकाला विरोध चालू झाला. १७ डिसेंबर या दिवशी विविध पुरोगामी संघटनांकडून महापालिका आणि पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले.

सनबर्न रहित न केल्यास तीव्र आंदोलन करू ! - गजानन चिंचवडे, शिवसेना

हिंदु संस्कृतीवरील आघातांच्या विरोधात संघटित होणार्‍या हिंदुत्वनिष्ठांचे अभिनंदन !
पिंपरी येथे सनबर्नच्या विरोधात राष्ट्रीय हिंदू आंदोलन
     पिंपरी, २० डिसेंबर (वार्ता.) - हिंदु संस्कृतीचे दर्शन घडवणार्‍या पुणे शहरात सनबर्न फेस्टिव्हलसारख्या कार्यक्रमांचे आयोजन होत आहे. पुण्याची संस्कृती बिघडवणारा कार्यक्रम होऊ देणार नाही. शासनाने सनबर्न फेस्टिव्हल रहित केला नाही, तर केसनंद गावात आणि अन्य ठिकाणीही आम्ही तीव्र आंदोलन करू. भविष्यातही संस्कृतीला विघातक असे कोणतेही कार्यक्रम होत असतील, तर तेही होऊ देणार नाही, असे प्रतिपादन पिंपरी-चिंचवड महानगरपालिका शिक्षण मंडळाचे सदस्य आणि शिवसेनेचे श्री. गजानन चिंचवडे यांनी केले.

हिंदु राष्ट्र स्थापनेची प्रतिज्ञा घेण्यास सहस्रोंच्या संख्येने शिवतीर्थावर उपस्थित रहा ! - हिंदु जनजागृती समितीचे पत्रकार परिषदेद्वारे आवाहन

जळगाव येथे २५ डिसेंबर या 
दिवशी हिंदु धर्मजागृती सभा ! 

डावीकडून श्री. प्रशांत जुवेकर, शिवसेनेचे श्री. मोहन तिवारी, श्री. राजकुमार
गवळी, श्री. सुनील घनवट, पू. नंदकुमार जाधव आणि कु. रागेश्री देशपांडे

         जळगाव - धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली आज या देशात बहुसंख्य असलेल्या हिंदु समाजावर अनेक बंधने लादली जात आहेत. आज भारतात धर्मनिरपेक्षता म्हणजे ‘केवळ हिंदूंसाठी कायदे आणि अन्य धर्मियांना फायदे’ अशी स्थिती झाली आहे. हिंदूंच्या धार्मिक भावनांना प्रशासन किंमत देत नाही. हिंदूंच्या समस्यांवर एकच उपाय म्हणजे हिंदूंचे प्रभावी संघटन. त्यासाठीच जळगाव येथे रविवार, २५ डिसेंबर २०१६ या दिवशी हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी दिली. हिंदु धर्मजागृती सभेनिमित्त येथील पद्मालय विश्रामगृहात समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी सनातन संस्थेचे पू. नंदकुमार जाधव, बारा बलुतेदार समाजाचे महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख श्री. राजकुमार गवळी, शिवसेनेचे श्री. मोहन तिवारी, हिंदु जनजागृती समिती रणरागिणी शाखेच्या कु. रागेश्री देशपांडे आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रशांत जुवेकर उपस्थित होते.

पाकमध्येही ५ सहस्र रुपयांची नोट बंद करण्याचा निर्णय !

     इस्लामाबाद - भारताने नोटाबंदी केल्यानंतर पाकनेही ५ सहस्र रुपयांची नोट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ही नोट बंदी ३ ते ५ वर्षांत टप्प्याटप्प्याने लागू केली जाईल, असे वृत्त डॉन या वृत्तपत्राने दिले आहे.

भाजप राष्ट्रभक्त पक्ष असल्याने त्याला मुसलमान मतदान करत नाहीत ! - भाजपचे खासदार प्रवेश वर्मा यांचा दावा

     बागपत (उत्तरप्रदेश) - मुसलमानांनी भाजपला कधी मतदान केलेले नाही आणि ते करणारही नाहीत. भाजप हा राष्ट्रभक्त पक्ष असल्याने मुसलमान मतदान करत नाहीत, असे विधान भाजपचे खासदार प्रवेश वर्मा यांनी येथे आयोजित एका कार्यक्रमात केले. राममंदिर निश्‍चितच बनणार असून त्यापासून कोणी कोणाला रोखू शकत नाही, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. प्रवेश वर्मा यांनी या विधानाच्या प्रकरणी क्षमा मागावी, अशी मागणी बहुजन समाज पक्ष आणि समाजवादी पक्ष यांनी केली आहे.

अल्ला हू अकबर म्हणत रशियाच्या राजदूतांची तुर्कस्थानमध्ये हत्या !

    अंकारा (तुर्कस्थान) - तुर्कस्थानच्या मेवलूत मेर्त एडीन्टास या नावाच्या पोलीस अधिकार्‍याने अल्ला हू अकबर ओरडत रशियाचे तुर्कस्थानमधील राजदूत आंद्रे कार्लोव्ह यांची एका कार्यक्रमात हत्या केली. कार्लोव्ह अंकारा येथील एका चित्रप्रदर्शनात भाषण करत असतांना एडीन्टास याने त्यांच्यावर ८ गोळ्या झाडल्या. मेवलूतलाही पोलिसांनी तात्काळ गोळ्या घालत ठार केले. मेवलूत पोलिसांच्या दंगलविरोधी पथकात काम करत होता. कोर्लोव्ह यांनी भाषणाला प्रारंभ करताच मेवलूतने सिरीयातील अलेप्पो शहराविषयी घोषणा द्यायला प्रारंभ केला.

(म्हणे) ‘सांगलीतील ‘हे राम नथुराम’चा प्रयोग उधळू !’

  • अहिंसेची भाषा करणार्‍या संभाजी ब्रिगेडची धमकी
  • प्रयोग कोल्हापूरप्रमाणे यशस्वी होणारच ! - हिंदुत्ववादी संघटना
        सांगली, २० डिसेंबर (वार्ता.) - कोल्हापूरप्रमाणे सांगली येथेही ‘हे राम नथुराम’ला विरोध करू आणि प्रयोग उधळून लावू, अशी चेतावणी संभाजी ब्रिगेडने दिली आहे. ‘कोल्हापुरात ज्याप्रमाणे प्रयोग यशस्वी झाला, तसाच तो सांगलीतही होईल’, अशी उलट चेतावणी सांगलीतील हिंदुत्ववादी संघटनांनीही दिली आहे. सांगलीत २० डिसेंबर या दिवशी रात्री ९.३० वाजता भावे नाट्यमंदिर येथे ‘हे राम नथुराम’चा प्रयोग होत आहे. सांगलीतील प्रयोगाची तिकिटे सायंकाळी ५ पर्यंत जवळपास संपली होती आणि प्रयोग ‘हाऊसफुल’ होणार अशीच अटकळ राष्ट्रप्रेमी संघटनांनी व्यक्त केली आहे.

हिमाचल प्रदेशमधून इसिसच्या हस्तकाला अटक !

इसिसच्या हस्तकांनी पोखरलेला भारत !
   कुलू (हिमाचल प्रदेश) - कुलू जिल्ह्यातील बंजार भागात पोलिसांनी १७ डिसेंबरला इसिसच्या हमीद खान या हस्तकाला अटक केली आहे. खान ५-६ मासांपासून कुलू जिल्ह्यातील २ ठिकाणी राहून रेकी (अवलोकन करून माहिती गोळा करणे) करत होता. त्याच्याजवळून १ भ्रमणभाष आणि १ भ्रमणसंगणक (लॅपटॉप) जप्त करण्यात आला आहे. हमीद खान बेंगळुरूचा रहिवासी आहे. खान श्रीलंकेला जाऊन आलेला आहे. तो इंडोनेशियाला जाण्याच्या सिद्धतेत होता. तेथून तो सिरियात जाणार होता. काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून देहलीत अटक करण्यात आलेल्या इसिसच्या दोघा आतंकवाद्यांंच्या चौकशीत त्यांचा एक साथीदार कुलूमध्ये रहात असल्याची माहिती मिळाली होती.

भीलवाडा येथे धार्मिक मिरवणुकीवर दगडफेक, ३ घायाळ

हिंदूंच्या धार्मिक मिरवणुकींवर सातत्याने आक्रमणे होण्यासाठी हा पाक आहे का ?
    भीलवाडा (राजस्थान) - गायत्री नगरमध्ये काढण्यात आलेल्या हिंदूंच्या धार्मिक मिरवणुकीवर समाजकंटकांकडून दगडफेक करण्यात आली. त्यानंतर संतप्त कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेल्या प्रत्युत्तरात एक दुकान, घर आणि चारचाकी वाहन पेटवण्यात आले. परस्थिती नियंत्रित करण्यासाठी आलेल्या पोलिसांवरही जमावाने दगडफेक केली. या दगडफेकीत ३ जण घायाळ झाले आहेत. पोलिसांनी काही दंगलखोरांना अटक केली आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून गावात तणावाचे वातावरण कायम आहे.

बांगलादेशमध्ये धर्मांधांकडून १९ वर्षीय हिंदु विद्यार्थ्याची खंडणी न दिल्याने हत्या !

बांगलादेश असो कि पाकिस्तान तेथील हिंदूंच्या रक्षणासाठी
भारत सरकार आणि मोठ्या हिंदुत्वनिष्ठ संघटना काहीही करत नाहीत, हे तेथील हिंदूंचे दुर्दैव !
    ढाका - बांगलादेशमधील सतखिरा जिल्ह्यातील मोहादेबनगर येथील १९ वर्षीय विद्यार्थी गौतम सरकार याची ५ धर्मांधांनी १० लाख रुपयांच्या खंडणीसाठी हत्या केली.
    गौतम हा सिमांत आदर्श महाविद्यालयात राज्यशास्त्राच्या शेवटच्या वर्षात शिकत होता. धर्मांधांनी गौतम यांच्या भ्रमणभाषवरून त्याच्या वडिलांकडे १० लाख रुपयांची खंडणी मागितली होती. गौतम त्यांचा एकुलता एक मुलगा होता. सरकार खंडणीच्या रकमेची पूर्तता करू न शकल्याने धर्मांधांनी गौतम याची हत्या केली. त्याचा मृतदेह एका तलावाच्या ठिकाणी आढळला. या प्रकरणी पोलिसांनी नझमल हसन, सहादत मोरल, मोनिरूल साना, साजू शेख आणि महंमद शाओन या धर्मांधांना अटक केली आहे. बांगलादेश मायनॉरिटी वॉचचे अध्यक्ष डॉ. रवींद्र घोष यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.

भाग्यनगरमध्ये जुन्या नोटांद्वारे विकत घेतले गेले २ सहस्र ७०० कोटी रुपयांचे सोने !

   भाग्यनगर (हैद्राबाद) - नोटाबंदीच्या घोषणेनंतर ८ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत येथे जुन्या नोटांचा वापर करून २ सहस्र ७०० कोटी रुपयांच्या सोन्याच्या बिस्किटांची खरेदी झाली आहे. या व्यवहारानंतर संबंधित खरेदीदार फरार आहेत, अशी माहिती अंमलबजावणी संचालनालयाच्या चौकशीतून समोर आली आहे. या कालावधीत येथे ८ सहस्र किलो सोने आयात करण्यात आले. तसेच १ ते १० डिसेंबरमध्ये १ सहस्र ५०० किलो सोने पुन्हा आयात करण्यात आले. मोठ्या प्रमाणात काळा पैसा साठवून असलेल्या लोकांनी हे सोने खरेदी केले आहे. सराफ व्यापार्‍यांनी जुन्या नोटा घेऊन सोने विकले का, याची चौकशी करण्यात येत आहे.

राजधानीत प्रतिदिन ६ बलात्कार होतात !

मुख्यमंत्री केजरीवाल यांना देहलीत बलात्काराच्या संख्येत होणारी वाढ दिसत नाही का ?
    देहली - देहली देशाची राजधानी आहे; मात्र याच राजधानीत प्रतिदिन ६ बलात्कार होतात, अशी माहिती देहली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी दिली आहे.
   मानसोपचारतज्ञ आणि समाजसेविका रंजना कुमार यांच्या मते ज्या निर्भया घटनेने संपूर्ण देशाला हादरवून टाकले होते, त्यानंतरही परिस्थिती सुधारली नाही. अजूनही निर्भयाचे पालक न्यायाची वाट पहात आहेत. लहान मुलींवरील बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. जे लोक मुलींकडे केवळ उपभोग आणि शारीरिक आवश्यकता पूर्ण करण्याची वस्तू म्हणून पहातात, त्यांच्यात भीती निर्माण करण्याची आवश्यकता आहे. न्यायव्यवस्थेत कठोर शिक्षेची तरतूद केली, तरच हे शक्य आहे.

गुजरात आणि नाशिक येथे संतप्त नागरिकांनी बँकांना टाळे ठोकले !

जनतेला नोटा उपलब्ध करून दिल्या नाहीत, तर देशात हिंसाचार
होईल, असे सर्वोच्च न्यायालयानेच म्हटले आहे, त्याचेच या घटना दर्शक होत !
      नवी देहली - गुजरातच्या अमरेली जिल्ह्यातील समधालिया गावात पैसे न मिळाल्यामुळे स्टेट बँक ऑफ इंडिया आणि देना बँक यांच्या खातेदारांनी बँकांना टाळे ठोकले. रविवार, १८ डिसेंबरला बँका बंद होत्या, त्यामुळे सोमवारी १९ डिसेंबरला पैसे काढण्यासाठी बँकेसमोर मोठी रांग लागली होती; परंतु रोख रक्कम नसल्याने बँकेने या सर्वांना पैसे देण्यास समर्थ नाही, असे म्हटल्याने संतप्त लोकांनी बँकेच्या खिडक्या आणि दरवाजे यांची तोडफोड केली.

विश्‍वासघातकी बँक अधिकार्‍यांना जन्मठेप द्या ! - योगऋषी रामदेवबाबा

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या प्रमाणेच योगऋषी रामदेवबाबा यांनी
प्रतिक्रिया दिली आहे. सर्वत्रच्या हिंदुत्वनिष्ठांनी अशीच प्रतिक्रया व्यक्त करणे हिंदूंना अपेक्षित आहे !
     नवी देहली - देशाचा विश्‍वासघात करणार्‍या बँक अधिकार्‍यांना जन्मठेपेची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी योगऋषी रामदेवबाबा यांनी केली आहे. नोटाबंदीच्या निर्णयानंतर अनेक ठिकाणी कोट्यवधी रुपयांच्या बेहिशोबी नवीन नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. यामध्ये काही बँकांचे अधिकारी सहभागी असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे योगऋषी रामदेवबाबा यांनी वरील मागणी केली आहे.

‘सीबीआय’सारखी यंत्रणा सारासार विचार न करता तपास करते, हे धक्कादायक !

‘सीबीआय’च्या तपासाविषयी उच्च न्यायालयाचे मत
       मुंबई, २० डिसेंबर - २०१४ मध्ये अ‍ॅग्नेलो वालद्रिस (वय २५ वर्षे) या युवकाच्या वडाळा लोहमार्ग पोलीस ठाण्यात झालेल्या मृत्यूविषयी ‘सीबीआय’ने आरोप असलेल्या १० पोलिसांवरील हत्या, अनैसर्गिक संबंध, अपहरण, खोटे पुरावे सादर करणे आदी गंभीर गुन्हे हटवून किरकोळ गुन्हे नोंदवले. या प्रकरणी सकृत पुरावे असतांना सीबीआयने गंभीर गुन्ह्यांच्या दिशेने तपास केला नाही, असा ताशेरा ओढून ‘सीबीआय’सारखी तपासयंत्रणा सारासार विचार न करता तपास करते, हे पाहून धक्का बसला’, असे मत व्यक्त केले. उच्च न्यायालयाने व्यक्त केलेल्या मतामुळे ‘सीबीआय’सारख्या महत्त्वाच्या तपासयंत्रणेच्या तपासकार्याबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. १९ डिसेंबर या दिवशी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रणजित मारे आणि न्यायमूर्ती ए.एम्. बदर यांच्या खंडपिठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली.
       पोलिसांकडून तपास पुढे जात नसल्याचे लक्षात आल्यावर अ‍ॅग्नेलो याच्या वडिलांनी या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करावा, यासाठी उच्च न्यायालयात याचिका केली होती. या प्रकरणात सकृतदर्शनी पोलिसांविरुद्ध अनैसर्गिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचा आणि हत्या केल्याचा गुन्हा सिद्ध होत आहे, अशी भूमिका उच्च न्यायालयाने मांडली आहे. याविषयी ‘२ मासांत अन्वेषण करून पुरवणी दोषारोपपत्र दाखल करा’, असा निर्देश उच्च न्यायालयाने दिला आहे.

मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांची निधी संपवण्याच्या मुदतीत ८ दिवसांची वाढ करण्याची मागणी !

       मुंबई - नगरसेवकांना दिला जाणारा निधी संपवण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने दिलेली मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी नगरसेवकांनी सभागृहात केली. राज्य निवडणूक आयोगाच्या बंधनानुसार मुंबई महानगरपालिकेचा कार्यकाल ७ मार्च या दिवशी संपत असल्याने ७ डिसेंबरपासून नगरसेवक निधी वापरण्यास बंदी घालण्याचे परिपत्रक पालिका आयुक्तांनी काढले आहे. या मर्यादेमुळे कामे रखडली असून नगरसेवकांची कोंडी करण्याचा हा डाव आहे. ही अघोषित आचारसंहिताच आहे, असे नगरसेवकांनी म्हटले आहे. महानगरपालिकेतील संगणकीय बिघाडामुळे विकासकामांचे आदेश निघू शकले नाहीत.
       मुंबई महानगरपालिकेत ६० लाख रुपये नगरसेवक निधी दिला जातो. अनेक नगरसेवकांचा निधी शेष आहे. प्रभाग समितीमध्ये संमत झालेल्या कामांना तरी अनुमती द्या, अशी मागणी समाजवादी पक्षाचे नगरसेवक याकूब मेनन यांनी केली. या सूत्राला सर्वपक्षीय नगरसेवकांनी पाठिंबा दिला. २६ ऑक्टोबरला गटनेत्यांच्या बैठकीत या परिपत्रकाविषयी सांगण्यात आले; मात्र नगरसेवकांपर्यंत हे परिपत्रक पोचले नसल्याचे नगरसेवकांनी सांगितले. सभागृहनेत्या तृष्णा विश्‍वासराव यांनी ही मुदत ८ दिवसांनी वाढवून द्यावी, अशी मागणी केली असून प्रशासनाने या संदर्भात निवडणूक आयोगाला पत्र पाठवून पाठपुरावा घ्यावा, तसेच २२ डिसेंबरला याविषयी सविस्तर माहिती सादर करावी, असे निर्देश महापौर स्नेहल आंबेकर यांनी दिले आहेत.

कणकवली (सिंधुदुर्ग) येथे जनकल्याण महायागास भावपूर्ण वातावरणात प्रारंभ

कलशयात्रेचा दीपप्रज्वलन करून प्रारंभ करतांना साधू,
संत, महंत यांच्यासह पालकमंत्री दीपक केसरकर आणि अन्य
साधू, संत, महंत, महामंडलेश्‍वर यांच्या वंदनीय उपस्थितीमुळे
कुंभमेळ्याचे स्वरूप कणकवली शहरातून निघाली भव्य कलशयात्रा
      कणकवली - देशातील तिसर्‍या आणि महाराष्ट्र राज्यातील पहिल्या जनकल्याण महायाग अर्थात श्री लक्ष्मीनारायण महायागाचा प्रारंभ देशभरातून आगमन झालेले साधू, संत, महंत, महामंडलेश्‍वर यांच्या वंदनीय उपस्थितीत १९ डिसेंबरला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथील श्री मुडेश्‍वर मैदानात झाला. संतांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून परमहंस भालचंद्र महाराज मठ ते श्री मुडेश्‍वर मैदानापर्यंत काढण्यात आलेल्या भव्य कलशयात्रेमुळे संपूर्ण वातावरण चैतन्यमय झाले होते.

जुन्या नोटा पालटून दिल्याच्या आरोपाखाली रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या दोन वरिष्ठ अधिकार्‍यांना अटक !

  • अशा भ्रष्टाचारी अधिकार्‍यांचा इतिहास तपासून त्यांना कठोर शिक्षा करा !
  • केंद्रीय अन्वेषण विभागाची कारवाई
   नवी देहली - केंद्रीय अन्वेषण विभागाने (‘सीबीआय’ने) रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या रोकड विभागातील वरिष्ठ विशेष साहाय्यक सदानंद नायक आणि विशेष साहाय्यक ए. के. केविन यांना भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार बेंंगळुरू येथे अटक केली.
   या अधिकार्‍यांवर १ कोटी ९९ लाख रुपयांच्या ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या जुन्या नोटा अवैधपणे पालटून दिल्याचा आरोप आहे. या दोघांना सीबीआयच्या विशेष न्यायालयाने ४ दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे. यापूर्वीही नोटा पालटून दिल्याप्रकरणी रिझर्व बँकेचे वरिष्ठ विशेष साहाय्यक के. मायकल यांना सीबीआयने अटक केली होती.

गेल्या ६ वर्षांत देशातील पोलीस कोठडीमध्ये ६०० कच्च्या कैद्यांचा मृत्यू !

पोलीस कोठडीत कैद्यांचा मृत्यू का होतो, ही गोष्ट जगजाहीर आहे;
पण त्यावर कधी पोलिसांना शिक्षा होत नाही !
ही स्थिती हिंदु राष्ट्राची (सनातन धर्म राज्याची) अपरिहार्यता दर्शवते !
    नवी देहली - देशात पोलिसांच्या कह्यात असलेल्या कच्च्या कैद्यांच्या मृत्यूमध्ये लक्षणीय वाढ होत आहे, असे ह्युमन राइट्स वॉचने म्हटले आहे. सरासरी प्रत्येक वर्षाला किमान १०० कच्च्या कैद्यांचे मृत्यू पोलीस कोठडीत होतात. वर्ष २००९ ते २०१५ या काळात एकूण ६०० मृत्यू झाल्याचे मानवाधिकार संघटनेने म्हटले आहे. न्यायदंडाधिकार्‍यांसमोर उपस्थित करण्यापूर्वीच काही कच्च्या कैद्यांचा मृत्यू होतो; मात्र त्यांची नोंद आत्महत्या किंवा आजारपणामुळे झाली, अशी केली जाते. वरील संख्या पहाता भारत सरकारने लवकरच कठोर पावले उचलावीत, अशी विनंती मानवी अधिकार संघटनेने केली आहे.

राष्ट्र आणि धर्म रक्षणाच्या संदर्भातील प्रश्‍नांविषयी अकोला येथे उपजिल्हाधिकार्‍यांना निवेदन

      अकोला - केंद्र शासनाने बांगलादेशातील अल्पसंख्य हिंदूंच्या सुरक्षिततेचे सूत्र संयुक्त राष्ट्र संघात मांडावे. तसेच रेल्वे स्थानकांवर क्रूरकर्मा अकबराची चित्रे रंगवल्यास हिंदूंमध्ये जनक्षोभ उसळेल, याची जाणीव ठेवावी, या विषयांच्या अनुषंगाने येथील उपजिल्हाधिकार्‍यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले. या वेळी समितीचे श्री. अजय खोत, अविनाश मोरे, सौ. मोरे, कु. निधी बैस, तसेच धर्माभिमानीही उपस्थित होते.

सिलेंडरचे अतिरिक्त पैसे मागणार्‍या वितरकाला पुणे येथील सनातनच्या साधिका सौ. प्रीती जोशी यांनी रोखले !

चिंचवड, २० डिसेंबर (वार्ता.) - सिलेंडर घरपोच देण्याचे अतिरिक्त पैसे मागणार्‍या व्यक्तीला (सिलेंडर देणार्‍या डिलिव्हरी बॉयला) येथील सनातनच्या साधिका सौ. प्रीती जोशी यांनी वरिष्ठांकडे तक्रार नोंदवून धडा शिकवला.

मंत्र आणि मंदिरे हे आजार बरे करणारे ऊर्जास्रोत आहेत ! - पू. (डॉ.) रघुनाथ शुक्ल

        पुणे, २० डिसेंबर (वार्ता.) - संस्कृती ही भारतियांचा वेद असून संस्कृतीतून अध्यात्म कळते. ज्योतिष हे विज्ञान आहे. मंत्र आणि मंदिरे हे आजार बरे करणारे ऊर्जास्रोत आहेत, असे मार्गदर्शनपर प्रतिपादन पू. (डॉ.) रघुनाथ शुक्ल यांनी केले. (तथाकथित बुद्धिप्रामाण्यवाद्यांना चपराक ! - संपादक) ‘भारतीय संस्कृती आणि विज्ञान’ या विषयावर येथील गोपाळ हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय यांच्या वतीने ५ ते ८ डिसेंबर या कालावधीत बहुश्रुत व्याख्यानमालेचे आयोजन केले होते. त्यामध्ये पहिल्या दिवशी ‘अध्यात्म आणि विज्ञान’ या विषयावर ते मार्गदर्शन करत होते.
        पू. (डॉ.) रघुनाथ शुक्ल म्हणाले, ‘‘आपल्याला अध्यात्माचे ज्ञान व्हायला पाहिजे. जेथे पिंड आणि ब्रह्मांड यांचे नाते जुळते, तो आत्मज्ञानी होतो. विद्यार्थ्यांनी विद्यार्थीदशेतच आयुष्यात काय करायचे आहे, ते ठरवून त्याचे चिंतन केले पाहिजे. पुस्तकी ज्ञानापेक्षा व्यवहारात घडणार्‍या गोेष्टींचा अभ्यास करायला पाहिजे. चांगले काम केल्याचे फळ चांगलेच मिळते आणि ते सर्व देणारा देवच आहे, असा भाव ठेवायला हवा.’’

बलात्कार करणार्‍या युवक काँग्रेसच्या पदाधिकार्‍याला अटक

वासनांध पदाधिकारी असलेला काँग्रेस पक्ष समाजहित काय साधणार ?
     मुंबई, २० डिसेंबर - लग्नाचे आमिष दाखवून ३० वर्षांच्या तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी दक्षिण मुंबई युथ काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष मंदार पवार (वय ४० वर्षे) याच्या विरोधात ताडदेव पोलीस ठाण्यात गुन्हा प्रविष्ट झाला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. मंदार याच्याकडून फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित युवतीने पोलिसांत तक्रार देण्याचा प्रयत्न केला; मात्र रात्री ८ वाजेपर्यंत तिची तक्रार घेतली गेली नाही. दबावामुळे पोलीस तक्रार लिहून घेण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप तिने केला. (अशा कर्तव्यचुकार पोलिसांवर कारवाई करावी, हीच महिलांची अपेक्षा ! - संपादक) तेथून तिला ताडदेव पोलीस ठाण्यात पाठवण्यात आले. ताडदेव पोलीस ठाण्यात तिची तक्रार नोंदवण्यात आली.

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास महाराष्ट्र आणि भारत यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे ! - शिवशाहीर श्री. बाबासाहेब पुरंदरे

श्री. बाबासाहेब पुरंदरे यांची मुलाखत घेतांना श्री. कौस्तुभ कस्तुरे
      ठाणे, २० डिसेंबर (वार्ता.)- आज दूरचित्रवाहिनींचा दुरुपयोग केला जात आहे; पण त्यांचा उपयोग स्वराज्याच्या स्थापनेसाठी का केला जात नाही ? आज देशात अनेक समस्या आहेत. त्या मला माझ्या वाटल्या पाहिजेत. समस्या दूर करणे, हे माझे कर्तव्य आहे, याची जाणीव आपल्याला हवी. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास महाराष्ट्रासाठी आणि आपल्या देशासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, असे मार्गदर्शन शिवशाहीर श्री. बाबासाहेब पुरंदरे यांनी केले. ते वेदांत खुला रंगमंच, दोस्ती विहारजवळ, वर्तकनगर येथे अश्‍वमेध प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या प्रकट जाहीर मुलाखतीच्या वेळी केले. तरुण पिढीला शिवचरित्र कळावे, यासाठी अश्‍वमेध प्रतिष्ठान आणि भारतीय युवा मोर्चाचे अध्यक्ष श्री. मयुरेश जोशी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. श्री. बाबासाहेब पुरंदरे यांची मुलाखत श्री. कौस्तुभ कस्तुरे यांनी घेतली. कार्यक्रमाचा आरंभ छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरतीने करण्यात आली.

हिंदूंनी नेभळटपणा झटकून सिंहगर्जना करून धर्मद्रोह्यांच्या छातीत धडकी भरवावी ! - कु. मृणाल जोशी

डावीकडून श्रीमती वैशाली कातकाडे, कु. मृणाल जोशी, श्री. शशिधर जोशी
      येवला (नाशिक) २० डिसेंबर (वार्ता.) - संपूर्ण भारतामध्ये हिंदुत्वनिष्ठांच्या वेचून वेचून हत्या होत आहेत, अनेकांना अपकीर्त करून त्यांचे कार्य बंद पाडले जात आहे. सनातन संस्थेचे कार्य बंद पाडण्यासाठी षड्यंत्र रचले जात आहे; मात्र यातून सत्य बाहेर येऊन सनातन संंस्था आपले निर्दोषत्व सिद्ध करील. धर्मद्रोही, नास्तिकवादी, पुरोगामी, धर्मांध यांनी हि्ंदुविरोधी उच्छाद मांडला आहे; मात्र त्यांनी लक्षात घ्यावे की, आमच्या देवता आम्हाला दुष्प्रवृत्तींविरुद्ध लढण्याची शक्ती देणार्‍या आहेत. हिंदूंनी नेभळटपणा झटकून सिंहगर्जना करून धर्मद्रोह्यांच्या छातीत धडकी भरवावी, असे प्रतिपादन सनातन संस्थेच्या कु. मृणाल जोशी यांनी केले.
१८ डिसेंबर या दिवशी स्वामी मुक्तानंद शाळा मैदान, येवला या ठिकाणी हिंदु जनजागृती समिती आयोजित हिंदु धर्मजागृती सभेत त्या बोलत होत्या. या वेळी त्यांच्यासमवेत व्यासपिठावर हिंदु जनजागृती समितीचे श्री. शशिधर जोशी, रणरागिणी शाखेच्या श्रीमती वैशाली कातकाडे उपस्थित होत्या. या सभेला येवला आणि पंचक्रोशीतील २०० हून अधिक धर्माभिमान्यांनी कडाक्याच्या थंडीतही उपस्थिती लावली. या वेळी स्वसंरक्षणाची काही प्रात्यक्षिकेही दाखवण्यात आली.

नोटांचा तुटवडा दूर करा किंवा उत्तरप्रदेशच्या निवडणुकांचा दिनांक पुढे ढकला ! - संघ आणि भाजप कार्यकर्त्यांची पक्षाकडे मागणी

   लक्ष्मणपुरी - नोटाबंदीनंतरच्या चलन तुटवड्यामुळे जनतेला होत असलेल्या त्रासाचा उत्तरप्रदेशच्या विधानसभेच्या आगामी निवडणुकीत पक्षाला फटका बसू शकतो. यामुळे एकतर चलन तुटवडा दूर करा किंवा निवडणुकांचा दिनांक पुढे ढकला, अशी मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप यांच्या कार्यकर्त्यांनी पक्षाला केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. तसेच विश्‍व हिंदु परिषद, अभाविप आणि अन्य संघटना यांनीही याविषयी पक्षाकडे अहवाल पाठवला आहे. नोटाबंदीमुळे जनता प्रथम आनंदी होती; मात्र नंतरच्या चलन तुटवड्याने ती त्रस्त झाली आहे. त्याचा परिणाम निवडणुकीत भोगावा लागण्याची चिन्हे दिसत असल्याने ही मागणी करण्यात येत आहे.

जळगाव येथे ८८ गायी आणि बैल यांची कोंबून वाहतूक करणारा ट्रक पकडला

गुदमरून ७ गायींचा मृत्यू शासन गोवंशहत्या बंदी कायद्याची कठोर कार्यवाही कधी करणार ?
     जळगाव - येथे एका ट्रकमधून ८८ गायी आणि बैल यांची कोंबून वाहतूक करण्यात येत होती. पोलिसांनी ट्रक पकडल्यावर ८१ गायी आणि बैल यांची सुटका केली; मात्र गुदमरल्यामुळे ७ गायींचा मृत्यू झाला. (गोवंशियांच्या रक्षणासाठी सर्वत्रच्या गोप्रेमींनी संघटित होण्याविना पर्याय नाही ! - संपादक) काही गोवंशियांची स्थिती खालावली आहे. हा ट्रक भुसावळहून मालेगाव येथे जात होता. पोलिसांनी गोवंशियांना कुसुंबा येथील अहिंसा तीर्थ, रतनलाल सी. बाफना गोसेवा अनुसंधान केंद्रात पाठवले.

मलनि:स्सारण प्रकल्पाच्या सल्लागारांसाठी मुंबई महापालिकेचा १८० कोटी रुपयांचा व्यय !

     मुंबई - मुंबई महानगरपालिकेने मलनि:स्सारण प्रकल्पाच्या सल्ल्यासाठी १८० कोटी रुपये व्यय केले आहेत. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी महापालिकेच्या मलनि:सारण प्रकल्प कार्यालयाकडे मागितलेल्या माहितीतून हे समोर आले आहे. पालिकेकडे उच्च दर्जाचे अधिकारी असतांना सल्लागारांच्या नेमणुकीवर केलेला व्यय अनावश्यक असल्याचे श्री. अनिल गलगली यांनी म्हटले आहे. (उधळपट्टी करणारे नको, तर जनतेच्या पैशांचा सुविनियोग करणारे प्रशासन हवे ! - संपादक)

पाकमध्येही ५ सहस्र रुपयांची नोट बंद करण्याचा निर्णय !

हिंदु संस्कृतीवरील आघातांच्या विरोधात संघटित होणार्‍या हिंदुत्वनिष्ठांचे अभिनंदन ! 
पिंपरी येथे सनबर्नच्या विरोधात राष्ट्रीय हिंदू आंदोलन
     पिंपरी, २० डिसेंबर (वार्ता.) - हिंदु संस्कृतीचे दर्शन घडवणार्‍या पुणे शहरात सनबर्न फेस्टिव्हलसारख्या कार्यक्रमांचे आयोजन होत आहे. पुण्याची संस्कृती बिघडवणारा कार्यक्रम होऊ देणार नाही. शासनाने सनबर्न फेस्टिव्हल रहित केला नाही, तर केसनंद गावात आणि अन्य ठिकाणीही आम्ही तीव्र आंदोलन करू. भविष्यातही संस्कृतीला विघातक असे कोणतेही कार्यक्रम होत असतील, तर तेही होऊ देणार नाही, असे प्रतिपादन पिंपरी-चिंचवड महानगरपालिका शिक्षण मंडळाचे सदस्य आणि शिवसेनेचे श्री. गजानन चिंचवडे यांनी केले.

घरात नोटा बाळगणे हा गुन्हा आहे का ? - कर्नाटक उच्च न्यायालय

      बेंगळुरू - घरात नोटा बाळगणे हा गुन्हा आहे का, असा प्रश्‍न कर्नाटक उच्च न्यायालयाने केंद्रीय अन्वेषण यंत्रणेला (सीबीआयला) विचारला आहे. यावर सीबीआयने, स्वतःकडे नोटा बाळगणे हा गुन्हा नाही असे उत्तर न्यायालयाला दिले आहे.
     कर्नाटकमधील कंत्राटदार इब्राहिम शेरीफ यांच्या घरावर आयकर विभागाने १ डिसेंबरला धाड टाकली होती. शेरीफच्या घरातून ४ कोटी ८० लाख रुपये जप्त करण्यात आले होते. यामध्ये सर्व नवीन नोटांचा समावेश होता. या प्रकरणी शेरीफ यांनी अटक टाळण्यासाठी कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती.

जैन उद्योग समूहाच्या कर्मचार्‍यांपर्यंत सभेचा विषय पोचवणार ! - अशोकभाऊ जैन, अध्यक्ष

डावीकडून सौ. किरण वाघुळदे, श्री. दत्तात्रय वाघुळदे,
श्री. सुनील घनवट आणि जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष श्री. अशोकभाऊ जैन
      जळगाव, २० डिसेंबर (वार्ता.) - हिंदु धर्मजागृती सभेनिमित्त येथील जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष श्री. अशोकभाऊ जैन यांना निमंत्रण देण्यात आले. या वेळी त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ‘आम्ही आमच्या सर्व कर्मचार्‍यांपर्यंत धर्मसभेचा विषय पोचवून त्यांना उपस्थित रहाण्याचे आवाहन करू’, असे सांगितले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे राज्य संघटक श्री. सुनील घनवट, तसेच सनातन संस्थेचे श्री. दत्तात्रेय वाघुळदे, सौ. किरण वाघुळदे उपस्थित होत्या.

जळगाव येथे पथनाट्याच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधनाद्वारे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना हिंदु धर्मजागृती सभेचे निमंत्रण !


      जळगाव, २० डिसेंबर (वार्ता.) - हिंदु धर्मजागृती सभेनिमित्त विविध उपक्रमांद्वारे, तसेच पथनाट्य, सामाजिक संकेतस्थळे, होर्डिंग, भित्तीपत्रके, स्टिकर यांद्वारे विविध आस्थापने, संस्था, महाविद्यालये, संघटना आणि घरोघरी प्रसार करण्यात येत आहे. सामाजिक संकेतस्थळांच्या माध्यमातून सभेच्या प्रचारासंदर्भातील समितीच्या जळगाव फेसबूक पेजची एकूण रीच संख्या एका सप्ताहात ३ लाखांहून अधिक झालेली आहे. तसेच व्हॉट्स अ‍ॅपद्वारे सभेचा विषय ६५ सहस्रांहून अधिक लोकांपर्यंत पोचला आहे.

३१ डिसेंबरला होणारे अपप्रकार थांबवण्यासाठी जळगाव येथे उपजिल्हाधिकार्‍यांना निवेदन !

उपजिल्हाधिकार्‍यांना (डावीकडे) निवेदन देतांना कार्यकर्ते
     जळगाव, २० डिसेंबर (वार्ता.) - येथील ३१ डिसेंबर या दिवशी नववर्षोत्सवाच्या नावाखाली प्रेक्षणीय स्थळे, किल्ले आदी सार्वजनिक ठिकाणी होणारे गैरप्रकार थांबवण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जळगाव येथील उपजिल्हाधिकारी (निवासी) श्री. राहुल मुंडके यांना निवेदन देण्यात आले. श्री. राहुल मुंडके यांनी ‘तुमचे कार्य कौतुकास्पद आहे आणि सनदशीर मार्गाने होणार्‍या या कार्याला आमचा नेहमीच पाठिंबा असेल’, असे त्यांनी सांगितले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री सचिन वैद्य, प्रफुल्ल टोंगे, तुषार काकड आणि प्रीतम पाटील उपस्थित होते.


जळगाव येथील हिंदु धर्मजागृती सभेचा प्रसार करणार्‍या प्रभावी चित्रफीती !

‘देश बदल रहा है ।...’
‘एक विद्यार्थी...वडिलांसमवेत तो शालोपयोगी साहित्याच्या दुकानात जातो... दुकानदार त्याला हिंदी चित्रपटातील अभिनेते सलमान खान, आमीर खान यांची छायाचित्रे मुखपृष्ठावर असलेल्या वह्या दाखवतो; परंतु त्या पाहून त्याचे समाधान होत नाही. तितक्यात त्याचे लक्ष जाते ते छत्रपती शिवाजी महाराज यांचे चित्र असलेल्या वहीवर ! ती वही हातात मिळताच विद्यार्थ्याच्या तोंडवळ्यावरून राष्ट्राभिमान ओसंडून वाहू लागतो...’ हिंदूंनो, ही पुस्तकातील गोष्ट नसून वरील प्रसंग एका चित्रफीतीच्या माध्यमातून साकारण्यात आला आहे... ! हेच आहे बदलणार्‍या....हिंदुत्वाकडे आकर्षित होणार्‍या भारताचे एक छोटेसे उदाहरण !...

अमेरिकेत प्रथमच भारतीय वंशाची महिला महापौरपदी निर्वाचित !

   वॉशिंग्टन - अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्याच्या क्यूपर्टीनो शहराच्या महापौरपदी प्रथमच भारतीय वंशाच्या अमेरिकी महिला म्हणून सविता वैद्यनाथन् निर्वाचित झाल्या आहेत. ‘अ‍ॅपल’च्या मुख्यालयामुळे क्यूपर्टीनो हे शहर जगभर ओळखले जाते. या शहराच्या नूतन महापौर म्हणून त्यांनी नुकतीच शपथ घेतली. त्यांनी यापूर्वी माध्यमिक शाळेत गणिताच्या शिक्षिकेची नोकरी केली आहे, तसेच व्यावसायिक बँकेत अधिकारी म्हणूनही काम पाहिले आहे.

हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेशात वेगाने वृद्धींगत होत असलेले धर्मकार्य

श्री. योगेश व्हनमारे
हिंदु जनजागृती समितीच्या मध्यप्रदेश येथील धर्मप्रसाराच्या
कार्याचा ८ ते २७ नोव्हेंबर २०१६ या कालावधीमधील आढावा
१. हस्तशिल्प मेळ्यात ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन
     ‘११ ते २१.११.२०१६ या कालावधीत उज्जैन येथील ‘कालिदास अ‍ॅकडमी’च्या पटांगणात जिल्हा पंचायत समितीच्या वतीने आयोजित हस्तशिल्प मेळ्यात सनातन संस्थेचे विविध विषयांवरील ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले.
२. मध्यप्रदेश शासन आणि ‘प्रज्ञाप्रवाह’ या संस्थेच्या
वतीने आयोजित केलेल्या कार्यशाळेत समितीच्या कार्यकर्त्यांचा सहभाग
    भोपाळ येथे १२ ते १४.११.२०१६ या कालावधीत मध्यप्रदेश शासन आणि ‘प्रज्ञाप्रवाह’ या संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या ‘लोकमंथन’ या तीन दिवसीय कार्यशाळेत समितीच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. या कार्यशाळेत राष्ट्राशी निगडित विविध समस्यांविषयी तज्ञांनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत सहभागी झालेल्या मान्यवरांच्या भेटी घेऊन त्यांना समितीच्या कार्याची माहिती देण्यात आली.
३. ‘धर्मरक्षक संघटने’चे अध्यक्ष श्री. विनोद यादव यांच्या
पुढाकाराने समितीच्या एका कार्यक्रमाचे आयोजन
    भोपाळ येथील वाजपेयीनगर येथे ‘धर्मरक्षक संघटने’च्या वतीने समितीच्या एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. आयोजनासाठी संघटनेचे अध्यक्ष श्री. विनोद यादव यांनी पुढाकार घेतला. यात प्रत्येक १५ दिवसांनी धर्मशिक्षणवर्ग घेण्याचे ठरवले.
४. उज्जैन येथे समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे यांचे मार्गदर्शन
अ. उज्जैन येथील श्री. भूपेंद्र गुलाटी आणि श्री. संजीव पांचाळ यांनी इंदिरानगर येथे समितीच्या एका कार्यक्रमाचे आयोजन केले. या कार्यक्रमात समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तत्पूर्वी येथील ‘पुरुषोत्तम सागर’ या ऐतिहासिक तलावाच्या काठी सामूहिक आरती करण्यात आली.

लोकशाहीच्या नावाने पोरखेळ करणारे लोकप्रतिनिधी !

   गोवा फॉरवर्ड या पक्षाचे चिन्ह नारळ असल्याने या पक्षात प्रवेश केलेले फातोर्डा (गोवा) मतदारसंघाचे अपक्ष आमदार विजय सरदेसाई यांनी नुकतेच रस्ता रुंदीकरणात आड येणार्‍या नारळाच्या ४० झाडांचे मोठा खर्च करून पुनर्रोपण केले. नारळाची झाडे मोठी असल्याने काही दिवसांनी मेली. यावर राजकारण करत काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी मेलेल्या झाडांना फुले वाहून श्रद्धांजली अर्पण केली आणि आमदार सरदेसाई यांचा निषेध केला. प्रसिद्धीसाठी राजकारणी किती हास्यास्पद कृती करतात, हेच यावरून दिसून येते.
- कु. ऋतुजा शिंदे, गोवा

पाश्‍चात्त्यांनो, भारतियांमध्ये हीनगंड पोसण्याचा प्रयत्न करणे, म्हणजे ‘वाळूच्या दोरीने आकाश बांधण्यासारखे व्यर्थ आहे’, हे लक्षात घ्या !

१. हिंदु धर्म आणि शास्त्र यांनी वैभव अन् संकटे यांच्या
काळातही भारताची समाजव्यवस्था सुसंघटित ठेवणे 
   ‘शक, हूण आणि यवन या इस्लामी सत्तांच्या आक्रमणामुळे भारतात सहस्रो (हजारो) वर्षे समाज अन् धर्म यांच्या अस्तित्वावर प्रचंड संकट कोसळले होते; पण आमचा समाज इतका शास्त्रीय आणि धर्मनिष्ठ होता की, त्या समाजावर राजसत्तेला नियंत्रण ठेवता आले नाही. तेव्हा आमची समाजव्यवस्था ही अविघटित, अच्छेद्य आणि अभंग राहिली.
वैभव आणि संकटे यांच्या काळातही भारताची समाजव्यवस्था सुसंघटित ठेवण्याची केवढी बहुमोल कामगिरी आमचा धर्म अन् शास्त्र यांनी केली आहे !
२. पाश्‍चात्त्यांनी बुद्धीभ्रंश केल्याने हिंदूंना स्वतःचा धर्म,
संस्कृती आणि समाजरचना हीन वाटू लागणे
   अठराव्या शतकात ‘गोरे पाय’ या पुण्यभूमीला लागले. गोर्‍या राज्यकर्त्यांनी आमची समाजव्यवस्था उद्ध्वस्त करण्यासाठी हेतूपूर्वक कसोशीचे प्रयत्न केले. सर्व बाजूंनी त्यांनी आमची समाजरचना मोडण्यासाठी आक्रमणे केली. आर्थिक, सामाजिक, धार्मिक, राजकीय अशा सर्वच क्षेत्रांत आमच्यामध्ये न्यूनगंड पसरवला. पाश्‍चात्त्यांनी आमचा इतका ‘ब्रेन वॉश’ केला की, त्यामुळे आमचा बुद्धीभ्रंश होऊन आमचा धर्म आणि समाजरचना संपूर्णपणे आज पाश्‍चात्त्य असल्याचे वाटू लागले अन् आमची संस्कृती हीन वाटू लागली.

फलक प्रसिद्धीकरता

सरकार लांगूलचालनाऐवजी जिहाद्यांना तात्काळ फाशी देणार का ?
     भाग्यनगर (हैद्राबाद) येथे २१ फेब्रुवारी २०१३ या दिवशी झालेल्या बॉम्बस्फोटाच्या प्रकरणी इंडियन मुजाहिदीनचा जिहादी आतंकवादी यासीन भटकळ आणि त्याच्या ४ सहकार्‍यांना राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : NIAke nyayalayne Hyderabad bamvisphotke doshi Yasin Bhatkal aur anya 4 jihadiyoko faasi ki saja sunai. - Kya sarkar is nirnaypar shighra karyavahi karegi ?
जागो ! : एनआइए के न्यायालय ने हैदराबाद बमविस्फोट के दोषी यासिन भटकल और अन्य ४ जिहादियों को फांसी की सजा सुनाई । - क्या सरकार इस निर्णय पर शीघ्र कार्यवाही करेगी ?

हिंदु राष्ट्र स्थापनेतील साधनेचे महत्त्व

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या संदर्भातील परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे विचारधन !
   ‘वर्ष २०२३ पासून ‘हिंदु राष्ट्र’ येईल’, हे आजवर अनेक संतांनी वेळोवेळी सांगितले आहे. या पार्श्‍वभूमीवर हिंदु राष्ट्र स्थापनेविषयी अनेकांंच्या मनात उत्सुकता असते. यासाठीच ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची दिशा’ या विषयावरील वैशिष्ट्यपूर्ण सदर !
६. हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनाही
साधना करण्यास प्रवृत्त करणे आवश्यक !
    ‘हिंदु राष्ट्र स्थापन झाले पाहिजे’, अशी इच्छा बाळगणारे अनेक हिंदुत्वनिष्ठ आहेत. यांपैकी किती हिंदुत्वनिष्ठांना ‘हिंदु राष्ट्र स्थापन होईल’, याविषयी निश्‍चिती आहे ? याउलट सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे साधक अन् कार्यकर्ते यांना ‘हिंदु राष्ट्र स्थापन होईल’, याची निश्‍चिती आरंभीपासून वाटत आहे. याचे कारण म्हणजे त्यांची ईश्‍वर आणि गुरु यांच्यावरील श्रद्धा ! त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून ते हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी सातत्याने आणि टप्प्याटप्प्याने आत्मविश्‍वासासह प्रयत्न करत आहेत.
   विशेष म्हणजे हे करत असतांना ते कुठेही तणावग्रस्त नाहीत, तर दिवसेंदिवस त्यांच्यातील आनंद वाढत आहे. हे त्यांनी केलेल्या साधनेमुळे त्यांच्यात निर्माण झालेल्या ब्राह्मतेजाचे प्रतीक आहे. आपल्या संघटनेतील कार्यकर्त्यांनाही साधना करण्यास प्रवृत्त करा. त्यासाठी संघटनेच्या स्तरावर तुम्ही पुढील प्रयत्न करू शकता. 

जळगाव येथे हिंदु धर्मजागृती सभा

वार आणि दिनांक :  रविवार, २५ डिसेंबर २०१६
वेळ :  सायंकाळी ५.३०
स्थळ : शिवतीर्थ, जी.एस्. मैदान, न्यायालय चौक, जळगाव
हिंदूंनो, या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित रहा !

अधिकार्‍यांच्या भ्रष्टाचाराचा भस्मासुर !

   समृद्धी महामार्गावरील भूमी ‘लॅण्ड पुलिंग’ अंतर्गत संपादित केल्या जाणार असून भूमींच्या बदल्यात भूमी दिल्या जाणार आहेत. त्यामुळे सनदी अधिकार्‍यांनी भूमी खरेदी केल्या असतील, तर त्यांनी पैसा कोठून आणला, याची चौकशी केली जाईल, असे आश्‍वासन मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत नुकतेच दिले. माजी मंत्री जयंत पाटील यांनी राज्यातील सनदी अधिकार्‍यांनी साडेतीनशे एकर भूमी खरेदी केल्याची माहिती त्यांच्या नावांच्या सूचीसह मुख्यमंत्र्यांना दिली.
   वास्तविक राज्यातील सर्व खात्यांतील वरिष्ठ आणि कनिष्ठ अधिकारी यांच्या वेतनापेक्षा त्यांची संपत्ती, मालमत्ता, फ्लॅट, दागिने किती आहेत, त्यांनी कुठे भूमी खरेदी केल्या आहेत, त्यांच्या संपत्तीत अचानक केवढी वाढ झाली आहे, अधिकार्‍यांनी नातेवाइकांच्या नावावर किती संपत्ती जमा केली आहे, याची नोंदणीसहित माहिती सर्वच मंत्र्यांना मिळू शकते. मुळात लोकप्रतिनिधींचा वरदहस्त असल्याशिवाय एवढी मोठी संपत्ती जमा करण्याचे धाडस कोणताही अधिकारी करणार नाही. त्यामुळे अशा प्रकरणातील संपूर्ण भ्रष्टाचार निपटून टाकायचा असेल, तर प्रथम भ्रष्ट लोकप्रतिनिधींची बेहिशेबी संपत्ती जप्त करून त्यांना कारावासाची शिक्षा दिली पाहिजे. त्यानंतर दोेषी अधिकार्‍यांवर तशी कारवाई करायला पाहिजे.

हिंदूंनो, ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यात आपण ‘श्रीरामाच्या वानरसेनेतील वानरांप्रमाणे सहभागी होत आहोत’, हा भाव ठेवा !

    ‘असा भाव ठेवला, तर रामराज्याची, म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना होण्यासह आपलाही उद्धार होईल; नाहीतर हिंदु राष्ट्राची स्थापना झाली, तरी आपला अहंभाव जागृत असल्यास आपला उद्धार होणार नाही !’

धर्मवृक्षाची व्यापकता !

   ‘शाखा-उपशाखांनी विस्तारलेल्या या धर्मवृक्षाचा विस्तार भाषांतरकारांनी दर्शवलेल्या अर्थापेक्षा किती विस्तृत आणि प्रचंड आहे’, हे जगासमोर स्पष्टपणे यायला हवे. हीच आमची भूमिका !’
- गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (संदर्भ : मासिक ‘घनगर्जित’, ऑगस्ट २०१६)

६९ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या सौ. अश्‍विनी अतुल पवार यांनी दिलेले अमूल्य दृष्टीकोन !

सौ. अश्‍विनी पवार
    ‘गुरुदेवांच्या कृपेमुळे देवद (पनवेल) येथील सनातन आश्रमातील साधकांना कधी सत्संगाच्या, तर कधी सेवेच्या माध्यमातून वा प्रत्यक्ष सहवासातून सौ. अश्‍विनीताईचा (सौ. अश्‍विनी पवार यांचा) सत्संग मिळतो. देवाने या सत्संगात ताईच्या माध्यमातून दिलेले साधनेचे दृष्टीकोन सर्वांसाठीच आदर्श आहेत.
४. चुका झाल्यावर सत्संग होत असतांना
अ. ‘चुकांविषयी सत्संग होणे’, ही ईश्‍वरी प्रक्रिया आहे. तिच्याकडे सकारात्मकतेने पाहिले पाहिजे.
आ. मला घडवण्याची प्रक्रिया ईश्‍वरी असून देवच ती घडवत आहे.
इ. सत्संगात गुरुतत्त्व सांगत असते, त्या वेळी सर्व देवाच्या नियोजनाप्रमाणे घडत असते.
ई. देव आपल्याला कशाही पद्धतीने घडवील. चूक नसतांनाही तसे दाखवून घडवील.

प.पू. गुरुमाऊलींना केलेले आत्मनिवेदन !

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...
गुरुमाऊली, तुमच्या कोमल चरणी मी अनंत कोटी कृतज्ञ आहे !
साधना करण्यासाठी देवाने मला जन्म दिला ।
गुरुमाऊली, तुम्ही मला साधक आई-बाबा दिले ।
आणि त्यांंच्या माध्यमातून प्रेमाने सांभाळले ।
लहानपणापासून साधकांच्या सत्संगात ठेवले ।
कसलीच उणीव भासू न देता मला सांभाळले ।

गणेश यागाच्या कालावधीत आलेल्या अनुभूती

     ‘४ ते ६.१०.२०१६ या कालावधीत सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात गणेश याग झाला. त्या वेळी मला पुढील अनुभूती आल्या.
१. यज्ञस्थळी ‘प्रत्यक्ष श्री गणेश उपस्थित आहे’, असे वाटणे
    ‘यज्ञस्थळी बसल्यावर ‘माझ्याभोवती संरक्षक कवच निर्माण होत आहे’, असे जाणवत होते. ‘प्रत्यक्ष श्री गणेश तेथे उपस्थित आहे’, असे वाटून माझी भावजागृती होत होती. यज्ञस्थळी नामजप करतांना मला पुष्कळ शांत वाटत होते आणि आनंद मिळत होता.

प.पू. गुरुदेवांशी मानस संवाद साधून वाढदिवसाच्या दिवशी कसे प्रयत्न करायला हवेत, याचे मार्गदर्शन घेणारी कु. योगिनी आफळे (वय १५ वर्षे) !

     ‘७.१२.२०१६ या दिवशी मी देवद आश्रमातील ध्यानमंदिरात बसून भावजागृतीचा प्रयोग करत होते. त्या वेळी प.पू. गुरुदेवांशी मनातून झालेला संवाद पुढे देत आहे.
१. प.पू. गुरुदेवांनी साधिकेला ‘स्वतःचा वाढदिवस आहे’,
असे न समजता ‘कृष्णाचा वाढदिवस आहे’, असा भाव ठेवण्यास सांगणे
मी : गुरुमाऊली, २१ डिसेंबरला माझा वाढदिवस आहे. त्या दिवशी मी कसा भाव ठेवायला हवा ? आणि कोणते ध्येय ठेवायला हवे ?
प.पू. गुरुदेव : ‘तुझा वाढदिवस आहे’, असे न समजता ‘कृष्णाचा वाढदिवस आहे’, असा भाव ठेव.
मी : कृतज्ञता गुरुमाऊली !

लहानपणापासूनच आश्रमजीवनाची ओढ असलेली ५५ टक्के आध्यात्मिक पातळीची आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेेली कु. योगिनी वैभव आफळे (वय १५ वर्षे) !

उच्चलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे
हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. योगिनी ही एक आहे !
(‘वर्ष २०१० मध्ये योगिनीची आध्यात्मिक पातळी ५२ टक्के होती.’ - संकलक)
     रामनाथी आश्रमात रहाणारी कु. योगिनी वैभव आफळे हिचा मार्गशीर्ष कृष्ण पक्ष अष्टमी (२१.१२.२०१६) या दिवशी वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आई-वडिलांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये पुढे देत आहोत.
कु. योगिनी आफळे
कु. योगिनी वैभव आफळे हिला वाढदिवसानिमित्त
सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
    हे भगवंता, श्रीविष्णुस्वरूप गुरुराया, तुम्हीच घडवलेले या बालिकेतील (कु. योगिनीतील) आमूलाग्र पालट तुमच्या चरणी स्थुलातून कृतज्ञतापूर्वक अर्पण करत आहोत. तिच्यावर संस्कार करणे अथवा तिला काही शिकवणे, हे आमच्या हातात नाही. तिच्या जीवनात जे काही घडत आहे, ते तुमच्याच कृपाशीर्वादाने. तिच्यातील स्वभावदोष आणि अहं नष्ट होऊन तिला तुमच्या चरणी विलीन होण्यासाठी तुम्हीच सामर्थ्य द्या. आज तिच्या पंधराव्या वाढदिवसानिमित्त तुम्ही आम्हावर केलेल्या कृपेचा वर्षाव शब्दांत व्यक्त करण्याचा हा अल्पसा प्रयत्न !

संतमाता सौ. प्राजक्ता जोशी यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

१. सतत हसतमुख
     ‘प्राजक्ताताईंना काही मासांपासून तीव्र अर्धशिशी, हातापायांत गाठी येऊन ते कडक होणे, सर्दी-ताप इत्यादी अनेक आजार होत आहेत. असे असूनही त्या सतत आनंदी दिसतात. तशा स्थितीतही त्या पू. सौरभदादांच्या दिवसातून २ - ३ वेळा बालदीभर गोधड्या धुणे, वाळत घालणे, तेवढ्या कपड्यांच्या घड्या घालणे, त्यांना जेवण भरवणे, औषधे देणे, खोलीची स्वच्छता इत्यादी सर्व कामे करून ज्योतिषाच्या संदर्भातील सेवाही करत असतात. त्यांची ही अफाट कार्यक्षमता पाहून मी एकदा त्यांना विचारले, ‘‘तुम्हाला एवढ्या वेदना होत असूनही तुम्ही आनंदी कशा रहाता आणि सगळ्या सेवा कशा पूर्ण करता ?’’, तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘मला कधी रडता येतच नाही आणि कितीही आजारी असले, तरी मला झोपून रहाणे जमत नाही.’’

सतत आनंदी आणि शारीरिक त्रासांवर मात करून भावपूर्णरित्या संतसेवा करणार्‍या सनातनच्या ज्योतिष फलित विशारद सौ. प्राजक्ता जोशी !

सौ. प्राजक्ता जोशी
     ‘सनातनचे संत पू. सौरभ जोशी यांच्या मातोश्री सौ. प्राजक्ता जोशी यांचा मार्गशीर्ष कृष्ण पक्ष अष्टमी, म्हणजेच २१.१२.२०१६ या दिवशी वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने रामनाथी आश्रमातील साधकांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये देत आहोत.
सौ. प्राजक्ता जोशी यांना सनातन
परिवाराच्या वतीने वाढदिवसानिमित्त नमस्कार !
१. कु. स्नेहल स्वामी
      ‘नोव्हेंबर २०१६ मध्ये मी सौ. प्राजक्ता जोशीकाकू यांच्याकडे गेले होते. त्या वेळी त्यांची पुढील वैशिष्ट्ये लक्षात आली.
१ अ. काकू सतत सकारात्मक आणि हसतमुख असतात.
१ आ. प्रेमळ : त्या साधकांशी मनमोकळेपणाने बोलतात. त्या प्रत्येक साधकाला आपलेसे करून घेतात. त्या मला पुष्कळ प्रेमाने आणि स्वतःच्या मुलीप्रमाणे समजून घेतात.

सप्तर्षि जीवनाडीत सांगितल्याप्रमाणे सनातनच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांचा अहर्निश प्रवास !

सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ
महर्षींची शिकवण आणि कार्य !
    ‘सनातनच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ मागील ४ वर्षांपासून भारतभरातील विविध राज्यांत दौर्‍यावर जात आहेत. हिंदु राष्ट्राची (सनातन धर्म राज्याची) शीघ्रतेने स्थापना व्हावी, राष्ट्र, धर्म, तसेच साधक यांचे रक्षण व्हावे आणि देवतांचा आशीर्वाद मिळावा, यासाठी सप्तर्षि जीवनाडीत सांगितलेल्या क्षेत्री जाण्याचे त्यांचे नियोजन असते. आतापर्यंत त्यांनी २४ राज्यांतील प्रवास करून तेथील वैशिष्ट्यपूर्ण दगड, माती, तीर्थ आदींचा संग्रह केला आहे. त्यांनी नोव्हेंबर २०१६ पर्यंत ३ लक्ष ५६ सहस्र कि.मी. एवढा प्रवास करून भावी पिढीसाठी भारतातील अलौकिक समृद्ध ठेवा संग्रहित केला आहे. या दैवी प्रवासाची सर्वांना माहिती व्हावी, यासाठी हे सदर प्रसिद्ध करत आहोत.’

पूर्णवेळ साधक झाल्यानंतर मनातील संघर्ष जाणून घेऊन साधकाला प्रेम देऊन आश्रमजीवनात रुळण्यास साहाय्य करणारे पू. भाऊकाका (सदाशिव) परब !

पू. भाऊकाका
(सदाशिव) परब
श्री. विलास महाडिक
१. आश्रमात पूर्णवेळ साधनेला आरंभ केल्यानंतर कल्पनेने घरातील अडचणींचे डोंगर उभे करून मायेच्या ओढीने स्वतःला मागे खेचणे
     ‘मी जानेवारी २०१६ मध्ये पूर्णवेळ साधना करण्याच्या निश्‍चयाने देवद आश्रमात सेवेत रुजू झालो. प्रतिदिन ८ ते १० घंटे सेवा होत होती; परंतु मन रमत नव्हते. केवळ कार्य होत होते. मी माझ्या कल्पनेने घरातील अडचणींचे डोंगर उभे करून मायेच्या ओढीने स्वतःला मागे खेचत होतो. आश्रमातील वातावरण एवढे सुंदर असूनही, सर्व सुखसोयी मिळत असूनही आणि सर्व साधकांकडून प्रेम मिळत असूनही ‘येथे मन का रमत नाही ?’, याचे मला आश्‍चर्य वाटायचे आणि दुःखही व्हायचे. कर्मधर्मसंयोगाने किंवा माझ्या पूर्वसुकृतामुळे म्हणा मला पू. भाऊ परब यांच्यासमवेत सेवा मिळाली.

बालवयातच सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता असणारा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला ५३ टक्के आध्यात्मिक पातळीचा जयपूर, राजस्थान येथील कु. देव नोगिया (वय ८ वर्षे) !

उच्चलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे
हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी !
या पिढीतील कु. देव नोगिया एक दैवी बालक आहे !
१. कु. देवच्या जन्मापूर्वीपासून त्याचे आई-वडील साधनारत असणे
  
कु. देव नोगिया
‘कु. देव नोगिया हे आमचे दुसरे पुत्ररत्न. याचा जन्म ३.५.२००८ या दिवशी झाला. आमच्या घरात मी आणि माझी आई (कु. देवची आजी) आम्ही दोघे जण वर्ष २००५ पासून साधना करतो. कु. देवच्या जन्मापूर्वीपासून त्याची आई सौ. सुनिता याही नामजप करतात.
२. देवच्या जन्माच्या संदर्भात त्याच्या आजीला मिळालेली पूर्वसूचना
   श्रीकृष्णाच्या मंदिरात बसलेली असतांना पाठीवर आणि नंतर मांडीवर एक बालक येऊन बसल्याचा भास होणे आणि नंतर सून गरोदर असल्याचे समजणे : देवच्या आगमनाची पूर्वसूचना त्याच्या आजीला पूर्वीच मिळाली होती. एकदा माझी आई श्रीकृष्णाच्या मंदिरात बसली होती. तेव्हा कुणीतरी लहान बालक तिच्या पाठीवर बसल्याचा तिला भास झाला. काही वेळाने ते लहान बालक तिच्या मांडीवर येऊन बसले. त्या वेळी तिला श्रीकृष्णाच्या बालक रूपातील अनुभूती आली. तिला आश्‍चर्य वाटले. आमच्या घरात हे लहान मूल कुठून येणार ?; कारण तिला वाटत होते, ‘आम्हा उभयतांना केवळ एकच मूल हवे आहे.’ त्या वेळी कामाच्या निमित्ताने मी जयपूरच्या बाहेर रहात होतो. माझी धर्मपत्नी सौ. सुनिताही माझ्यासमवेतच होती. घरी गेल्यावर तिने माझ्या आईला गर्भधारणेविषयी सांगितले. त्या वेळी आईला ईश्‍वराने दिलेली पूर्वसूचना सत्य झाल्याची प्रचीती आली. चि. देवच्या नामकरणासाठी आलेल्या ब्राह्मणाने हा बालक अतिशय भाग्यवान असल्याचे सांगितले.

सर्वत्रच्या साधकांना सेवेची सुवर्णसंधी !

धर्मरथांवर चालक-साधकांची तातडीने आवश्यकता !
     सनातनचे ग्रंथ म्हणजे समाजाला धर्मशिक्षण देणारे ज्ञानाचे अनमोल भांडारच ! मानवजातीसाठी ज्ञानामृत असलेल्या या ग्रंथांद्वारे समाजाला आचारधर्म, साधना, आदी नानाविध विषयांसंदर्भात दिशादर्शन केले जाते. या ग्रंथांना सर्वत्र मोठ्या प्रमाणावर मागणी येत आहे.
     समाजापर्यंत शीघ्रतेेने पोहोचण्यासाठी सनातन संस्थेच्या वतीने ठिकठिकाणी धर्मरथाद्वारे ग्रंथप्रदर्शने लावली जात आहेत. या सेवेसाठी धर्मरथावर चालक-साधकांची आवश्यकता आहे. सेवेसाठी इच्छुक असलेल्या साधकांकडे लहान धर्मरथासाठी लाईट मोटर व्हेहिकल (LMV), दुसर्‍या लहान धर्मरथासाठी लाईट ट्रान्स्पोर्ट व्हेहिकल आणि तीन मोठ्या धर्मरथांसाठी हेव्ही ट्रान्स्पोर्ट व्हेहिकल असे परवाने असणे आवश्यक आहे.
     जे साधक वरील सेवांमध्ये काही कालावधीसाठी किंवा पूर्णवेळ सहभागी होऊ शकतात, त्यांनी जिल्हासेवकांच्या माध्यमातून श्री. माधव गाडगीळ यांच्याशी ०८४५१००६००८ या क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा.
     ज्यांना धर्मरथ (ट्रक) चालवता येत नाही; मात्र शिकण्याची इच्छा आहे त्यांना धर्मरथ चालवण्यास शिकवण्यात येईल.

बोधचित्र

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज सनातनचे श्रद्धास्थान 
     हे असे आहे का ? ते तसे आहे का ? हे असेही नाही, तसेही नाही. ते कशात नाही ? मग ते असेही आहे आणि तसेही आहे.
     भावार्थ : हे असे आहे का ? मधील हे मायेविषयी आहे. ते तसे आहे का ? मधील ते ब्रह्मासंबंधी आहे. हे असेही नाही, तसेही नाही, म्हणजे म्हटले तर ही म्हणजे माया, असेही नाही म्हणजे दिसते तशी नसून ब्रह्म आहे आणि तशीही नाही म्हणजे ब्रह्म म्हटले तर ब्रह्मस्वरूपातही नाही. ते कशात नाही ? म्हणजे ब्रह्म सर्वत्र आहे, मायेतही आहे. मग ते असेही आहे आणि तसेही आहे म्हणजे माया व ब्रह्म दोन्ही एकच आहेत.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
बुद्धीप्रामाण्यवादी, सर्वधर्मसमभावी, साम्यवादी हेच देशाचे आणि धर्माचे खरे शत्रू !
      बुद्धीप्रामाण्यवाद्यांमुळे हिंदूंची देवावरची श्रद्धा नष्ट झाली. सर्वधर्मसमभाववाद्यांमुळे हिंदूंना हिंदु धर्माची अद्वितीयता कळली नाही आणि साम्यवाद्यांमुळे हिंदू देवाला मानेनासे झाले. यांमुळे देवाची कृपा न झाल्याने हिंदू आणि भारत यांची स्थिती दयनीय झाली आहे. यावर एकच उपाय आहे आणि तो म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

परमेश्‍वरावर श्रद्धा ठेवा !
    एखादी सुसंधी हातातून निसटली, तर परमेश्‍वरावर श्रद्धा ठेवून याची निश्‍चिती बाळगा की, याहीपेक्षा चांगली संधी मला मिळणार आहे.
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

धर्मसूर्य तळपू दे !

   २८ ते ३१ डिसेंबर या कालावधीत पुणे शहरानजीकच्या केसनंद या गावात होणार्‍या ‘सनबर्न फेस्टिव्हल’ला हिंदु जनजागृती समितीसह हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि स्थानिक शिवसेना यांनी अत्यंत प्रखर विरोध चालू केला असून आता हे आंदोलन एक टप्प्यावर येऊन ठेपले आहे. येथील ग्रामस्थांच्या या विरोधातील भावनाही तीव्र होत आहेत. अमली पदार्थांचा यथेच्छ अंमल चालणार्‍या, तसेच हिंदु देवता, धर्म, संस्कृती, गानपरंपरा या सर्वांवर आघात करणार्‍या या पाश्‍चात्त्य संगीत महोत्सवास महाराष्ट्रातील अन्य हिंदुत्वनिष्ठांकडूनही आता विरोध होत आहे.
विरोध का ?
   गेली ८ वर्षे हा महोत्सव परदेशी पर्यटकांसाठी प्रसिद्ध असणार्‍या गोव्यात होत होता. गोव्यात या कार्यक्रमात महिलांवर अत्याचार करण्यास उत्तेजन देऊ शकणार्‍या ‘केटामेन’ या (‘रेप ड्रग’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या) ड्रग्जच्या ४५० बाटल्या मिळाल्या होत्या. एवढ्या एका उदाहारणावरून या ‘महोत्सव’ म्हणवल्या जाणार्‍या कार्यक्रमाच्या दुष्परिणामांचे गांभीर्य लक्षात घेतले पाहिजे. वर्ष २०१३ मध्ये गोव्यात ‘अमली पदार्थविरोधी पथका’ला या कार्यक्रमात शेकडोजण सार्वजनिकरित्या हुक्का आणि चिलीम पित असतांना आणि अनेकजण तात्पुरत्या स्वरूपात बांधण्यात आलेल्या प्रसाधनगृहात अमली पदार्थांचे सेवन करत असतांना पहायला मिळाले. नेहा बहुगुणा हिचा मृत्यू या कार्यक्रमातील अमली पदार्थांच्या अतिसेवनाने झाला. अमली पदार्थांचा दलाल सौरभ अगरवाल याला चरससहित अटक करण्यात आली होती. गोवा शासनाचा ३ कोटी रुपयांचा महसूल या कार्यक्रमाच्या आयोजकांनी बुडवला. या पार्श्‍वभूमीकडे पुण्यात या कार्यक्रमाला अनुमती देतांना अधिकार्‍यांनी सोयिस्करपणे दुर्लक्ष केले आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn