Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

...अन्यथा हिंदुत्वनिष्ठ संघटना सनबर्न फेस्टिव्हल बंद पाडतील !

श्री. शिवाजीराव आढळराव पाटील यांची हिंदुत्वनिष्ठांनी
भेट घेतली त्या वेळी त्यांना निवेदन सादर करतांना हिंदुत्वनिष्ठ
शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची खणखणीत चेतावणी
केसनंद (जिल्हा पुणे) येथे होणार्‍या सनबर्न या पाश्‍चात्त्य संगीत महोत्सवाला होणार्‍या विरोधाची धार तीव्र !
     पुणे, १९ डिसेंबर (वार्ता.) - मादक पदार्थांच्या सेवनाला प्रोत्साहन देणार्‍या आणि सामाजिक स्वास्थ्य बिघडवणार्‍या सनबर्न फेस्टिव्हलला अनुमती देण्यात येऊ नये अन्यथा हिंदुत्वनिष्ठ संघटना सनबर्न फेस्टिव्हल बंद पाडतील, अशी खणखणीत चेतावणी शिवसेनेचे खासदार श्री. शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली आहे. खासदार श्री. पाटील यांनी तसे पत्रही जिल्हाधिकारी सौरभ राव आणि पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. जय जाधव यांना दिले आहे. १८ डिसेंबर या दिवशी सनबर्न फेस्टिव्हलच्या विरोधात हिंदुत्वनिष्ठांनी श्री. पाटील यांची भेट घेतली असता त्यांनी याची नोंद घेत तत्परतेने पोलीस आणि प्रशासन यांच्याशी पत्रव्यवहार केला.

देवनार क्षेपणभूमीवर कचरा वाहून नेणार्‍या वाहनांवर लक्ष ठेवण्यासाठी डिजिटल यंत्रणेची उभारणी

      मुंबई, १९ डिसेंबर - देवनार क्षेपणभूमीवर कचरा वाहून नेणार्‍या वाहनांवर लक्ष ठेवण्यासाठी डिजिटल यंत्रणा उभारण्यात आली आहे. यात प्रत्येक वाहनाचे वजन, वाहनाच्या क्रमांकाच्या पाटीचे छायाचित्र, येण्या-जाण्याच्या वेळा टिपण्यात येत असून या नोंदींनुसारच कंत्राटदारांना देयके देण्यात येणार आहेत. कचरा वाहून नेण्याच्या कामात कंत्राटदारांना फसवणूक, तसेच घोटाळे करता येऊ नये, यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. संकेतस्थळाद्वारे ही माहिती जनतेसाठी उपलब्ध होणार आहे.

व्हेनेझुएलामधील नोटाबंदीचा निर्णय स्थगित !

      काराकस (व्हेनेझुएला) - भारताप्रमाणेच व्हेनेझुएलामध्ये १०० बोलीवरच्या नोटा बंद करण्याचा सरकारने निर्णय घेतला होता; मात्र त्याला लोकांकडून विरोध झाल्यामुळे तो निर्णय ७ दिवसांतच स्थगित करण्यात आला आहे. लोकांना नोटा पालटण्यासाठी १० दिवसांचा कालावधी सरकारने दिला होता. सरकारने म्हटले की, आर्थिक समस्यांमुळे नोटाबंदीचा निर्णय २ जानेवारी २०१७ पर्यंत स्थगित करण्यात येत आहे. १०० बोलीवर नोटांऐवजी ५०० आणि २० सहस्र बोलीवरच्या नोटा सरकारकडून आणण्यात आल्या होत्या; मात्र ५०० बोलीवरच्या नोटा पोचवण्यात सरकारला समस्या आल्याने हा निर्णय स्थगित करण्यात आला.

पापुआ न्यू गिनीमध्ये ८.० रिश्टर स्केलचा भूकंप !

     पापुआ न्यू गिनी - ऑस्ट्रेलियाच्या उत्तरेला प्रशांत महासागरात बेटांचा देश असलेल्या पापुआ न्यू गिनी येथे १७ डिसेंबरला रिश्टर स्केलवर ८.० तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपामुळे हानी झाल्याची माहिती मिळालेली नाही. या भूकंपानंतर त्सुनामीची चेतावणी देण्यात आली होती; मात्र ती आली नाही.
महर्षींनी प्रलयकालाविषयी सतर्क करणे
      १९.३.२०१६ या दिवशी झालेल्या नाडीवाचन क्रमांक ६७मध्ये महर्षि म्हणतात, हे पूर्ण वर्ष प्रलयकालाचे आणि आपत्तीजनक असणारे आहे. (ऑस्ट्रेलियाच्या उत्तरेला प्रशांत महासागरात बेटांचा देश असलेल्या पापुआ न्यू गिनी येथे १७ डिसेंबरला रिश्टर स्केलवर ८.० तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला. या घटनेवरून प्रलयकालाविषयी महर्षींनी केलेले भाष्य किती तंतोतंत आहे, हे लक्षात येते ! - संपादक)

यासीन भटकळ आणि अन्य ४ आतंकवाद्यांना फाशीची शिक्षा !

आता सरकारने मागील काँग्रेस सरकारप्रमाणे या आतंकवाद्यांना न पोसता
तात्काळ या शिक्षेची कार्यवाही करावी आणि त्यांचे मृतदेह नातेवाइकांना न देता दफन करावेत !
     भाग्यनगर - येथील दिलसुखनगर भागात २१ फेब्रुवारी २०१३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाच्या प्रकरणी इंडियन मुजाहिदीनचा जिहादी आतंकवादी यासीन भटकळ आणि त्याचे सहकारी असादुल्ला अख्तर, एजाज शेख, तहसीन अख्तर आणि झिया उर रहमान उर्फ वकास यांना राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या (एन्आयएच्या) न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. यातील एजाज शेख हा महाराष्ट्रातील रहिवासी आहे, तर झिया उर रहमान हा पाकिस्तानचा आहे. तसेच अन्य एक आरोपी रियाज भटकळ फरार असून तो पाकिस्तानात आहे. इंडियन मुजाहिदीन या बंदी घालण्यात आलेल्या संघटनेच्या सदस्यांना आतंकवादाच्या प्रकरणात दोषी ठरवून शिक्षा करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

शुक्रवारच्या नमाजासाठी मुसलमान सरकारी कर्मचार्‍यांना दुपारी ९० मिनिटांची सुटी !

उत्तराखंडच्या काँग्रेस सरकारचा मुसलमानांच्या लांगूलचालनासाठीचा निर्णय !
धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली मुसलमानांचे लांगूलचालन
करण्याचा इतिहास असणार्‍या काँग्रेसकडून याहून वेगळे काय घडणार !
     डेहराडून (उत्तराखंड) - उत्तराखंडमधील काँग्रेस सरकारने विधानसभा निवडणुकांपूर्वीच मुसलमान सरकारी कर्मचार्‍यांना शुक्रवारच्या नमाजासाठी दुपारी १२.३० ते २ वाजेपर्यंत म्हणजे ९० मिनिटांची सुटी देण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री हरीश रावत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. काँग्रेस सरकारच्या या निर्णयावर भाजपचे प्रवक्ता नलिन कोहली यांनी टीका करतांना म्हटले आहे की, ही अत्यंत दुःखाची गोष्ट आहे की, धर्माच्या आधारावर निर्णय घेण्यात आला. भारत धर्मनिरपेक्ष देश आहे. यामुळे सर्वच गोष्टी धर्माच्या आधारे केल्या जाऊ शकतात. मतांसाठीच हा निर्णय घेण्यात आला आहे.

पुणे येथे होणारे सन बर्न रहित करा !

कोल्हापूर येथे रणरागिणींची 
थाळीनादाद्वारे चेतावणी ! 

आंदोलनात बोलतांना सनातन संस्थेच्या डॉ. (सौ.) शिल्पा कोठावळे

         कोल्हापूर, १९ डिसेंबर (वार्ता.) - हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेच्या वतीने येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे १९ डिसेंबर या दिवशी ऐन तळपत्या उन्हात दुपारी १२ वाजता घेण्यात आलेल्या आंदोलनात ८० हून अधिक रणरागिणींनी थाळीनाद करत पुणे येथे होणारे सन बर्न रहित करा, अशी जोरदार मागणी केली.
हिंदु धर्मासाठी कृती करण्याची तीव्र तळमळ
असलेल्या श्री संप्रदायाच्या सौ. तिलोत्तमा नाईक !
         सौ. नाईक या आंदोलनासाठी कोल्हापूर शहरापासून १२ किलोमीटर अंतरावर शिरोली येथून आल्या होत्या. सौ. नाईक यांची प्रकृती बरी नव्हती. असे असतांना भर उन्हात हिंदु धर्म आणि हिंदु जनजागृती समिती यांच्यावर असलेल्या प्रेमापोटी त्या आंदोलनासाठी उपस्थित राहिल्या. सौ. नाईक या आंदोलनासाठी शेवटपर्यंत उपस्थित होत्या, एवढेच नव्हे, तर त्या निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित होत्या.

भारतीय संस्कृतीविरोधी सनबर्न फेस्टिव्हल गावात होऊ देणार नाही !

केसनंद येथील ग्रामस्थांचा निर्धार ! 

सनबर्नच्या विरोधात पार पडलेल्या बैठकीतील ग्रामस्थ

       पुणे, १९ डिसेंबर (वार्ता.) - पोलिसांची, तसेच शासकीय आणि प्रशासकीय अनुमती नसतांना सनबर्न फेस्टिव्हलच्या आयोजकांनी २८ ते ३१ डिसेंबर या कालावधीत केसनंद येथे होणार्‍या सनबर्न फेस्टिव्हलची जय्यत सिद्धता चालू केली आहे. या फेस्टिव्हलसाठी बिनदिक्कतपणे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात येत असून डोंगराचे सपाटीकरण चालू आहे. अनेक शेतकरीही बाधित झाले आहेत. याशिवाय भारतीय संस्कृतीशी नाळ तोडून तरुणांना व्यसनाधीन बनवण्याच्या संदर्भातही हा फेस्टिव्हल कुप्रसिद्ध आहे. त्यामुळेच भारतीय संस्कृतीविरोधी सनबर्न फेस्टिव्हल गावात कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका केसनंद ग्रामस्थांनी घेतली आहे.

सातारा येथेही सनबर्न फेस्टिव्हलच्या विरोधात हिंदुत्वनिष्ठ संघटना एकवटल्या !

सनबर्न फेस्टिवल रहित करावा यासाठी
आंदोलन करतांना हिंदुत्वनिष्ठ महिला कार्यकर्त्या

         सातारा, १९ डिसेंबर (वार्ता.) - गेली काही वर्षे गोवा येथे होणारे सनबर्न फेस्टिव्हल यंदाच्या वर्षी २८ ते ३१ डिसेंबर २०१६ या काळात पुण्यामध्ये आयोजित करण्यात येणार आहे. तरुण पिढीला व्यसनाधीन करणारा हा कार्यक्रम त्वरित रहित करावा, यासाठी हिंदु जनजागृती समितीप्रणित रणरागिणी शाखा आणि अन्य समविचारी हिंदुत्वनिष्ठ संंघटनांच्या वतीने गोलबाग, राजवाडा येथे तीव्र आंदोलन करण्यात आले. आंदोलक रणरागिणींनी सनबर्न फेस्टिव्हलच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. आंदोलनात भारतीय जनता पक्ष, दुर्गावाहिनी, हिंदु जनजागृती समितीप्रणित रणरागिणी शाखा, शिवसेना, सनातन संस्था यांसह विविध सामाजिक संघटनांच्या महिला-युवती मोठ्या संख्येने सहभागी झाल्या.
अवैध उत्खनन करून तेथील शेतकर्‍यांना धमक्या
देऊन आयोजित केलेला सनबर्न फेस्टिव्हल तात्काळ
रहित करावा ! - सौ. रूपा महाडिक, रणरागिणी शाखा
         हा फेस्टिव्हल जेथे होत आहे, तेथे आयोजकांकडून स्थानिक शेतकर्‍यांची भूमी विनाअनुमती वापरणे, अवैध उत्खनन करणे, या संदर्भात तक्रार करणार्‍यांना स्थानिकांना धमक्या देणे, असे गंभीर प्रकारही होत आहेत. त्यामुळे तरुण पिढीला व्यसनाधीन करणारा हा कार्यक्रम त्वरीत रहित करावा, अशी मागणी या वेळी रणरागिणी शाखेच्या सौ. रूपा महाडिक यांनी केली.

५ सहस्र रुपयांहून अधिक रकमेच्या जुन्या नोटा एकदाच भरता येणार !

नोटाबंदीनंतर नवनवीन नियम बनवण्याचा जागतिक विक्रम करणारे केंद्र सरकार !
      नवी देहली - केंद्र सरकारने आता बँकेत ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या नोटा जमा करण्याची मर्यादा निश्‍चित केली आहे. सरकारच्या नव्या आदेशानुसार आता ३० डिसेंबर २०१६ पर्यंत एका खात्यात जुन्या नोटांच्या स्वरूपातील ५ सहस्र रुपयांहून अधिक रक्कम केवळ एकदाच जमा करता येणार आहे. त्याहून अधिक पैसे भरायचे झाल्यास त्यासंदर्भातील माहिती द्यावी लागेल. बँक खात्यांचा वापर करून काळापैसा पांढरा करण्यावर आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्याचे सांगण्यात आले आहे. जुन्या नोटा बँकेत जमा करण्याची मुदत संपण्यासाठी आता ११ दिवस उरले आहेत. या १२ दिवसांत वेगवेगळ्या मार्गाने मोठ्या प्रमाणावर काळा पैसा बँकेत जमा केला जाण्याची शक्यता आहे. याला चाप बसावा म्हणून सरकारने नवे निर्बंध घातले आहेत. ५ सहस्र रुपयांंपेक्षा अल्प रकमेच्या जुन्या नोटा जमा करण्यावर कोणतीही मर्यादा नाही, असे अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

एस्आयटीचा चौकशी अहवाल सादर करून दोषींवर कठोर कारवाई करावी ! - शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांची मागणी

श्री. राजेश क्षीरसागर
पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती घोटाळ्याचे प्रकरण
श्री. श्रीकांत पिसोळकर
      नागपूर - पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या अंतर्गत येणार्‍या ३ सहस्र ६७ मंदिरांतील घोटाळ्याच्या संदर्भात गेल्या वर्षी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडण्यात आली होती. त्या वेेळी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी ८ एप्रिल २०१५ या दिवशी या विधानसभेत लक्षवेधीवर चर्चा करतांना ६ मासांत सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले होते, प्रत्यक्षात दोषींवर कोणती कारवाई केली त्याचा अहवाल विशेष अन्वेषण पथकाने (एस्आयटीने) अद्यापही सादर केलेला नाही.

हे राम नथुराम हे नाटक होणारच ! - शरद पोंक्षे आणि शिवसेना यांची ठाम भूमिका

        कोल्हापूर, १९ डिसेंबर - हे राम नथुराम या नाटकाचे आतापर्यंत ७०० प्रयोग झाले आहेत. आजपर्यंत या नाटकाला कोठेही विरोधी झालेला नाही. हे नाटक सेन्सॉरसंमत असून मला माझी भूमिका मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यामुळे हे राम नथुराम हे नाटक होणारच अशी ठाम भूमिका या नाटकातील नथुराम गोडसे यांची प्रमुख भूमिका करणारे अभिनेते श्री. शरद पोंक्षे यांनी घेतली. राजवाडा पोलीस ठाण्यात पोलीस, पुरोगामी, शिवसैनिक आणि हिंदुत्वनिष्ठ यांची संयुक्त बैठक आयोजित केली होती. त्या वेळी श्री. पोंक्षे यांनी त्यांची भूमिका मांडली. या वेळी शिवसेना, तसेच सर्वच हिंदुत्वनिष्ठ यांनी ते श्री. पोंक्षे यांच्या भूमिकेशी सहमती दर्शवत नाटकाच्या पूर्णपणे बाजूने असल्याचे सांगितले.
        १९ डिसेंबर या दिवशी केशवराव भोसले नाट्यगृहात रात्री ९ वाजता हे राम नथुराम या नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे. याला विरोध दर्शवत संभाजी ब्रिगेड आणि पुरोगामी संघटना यांनी हे नाटक होऊ देणार नसल्याची भूमिका घेतली आहे. पोलिसांकडे चर्चा करतांना पुरोगामी संघटनांचे कार्यकर्ते म्हणाले, या नाटकाद्वारे तुम्ही नथुरामचे उदात्तीकरण करत आहात. आम्ही नाटक उधळून लावू, पोलिसांनीही नाटक सेन्सॉर संमत असल्याने ते होणारच, अशी भूमिका घेतली आहे.

तमिळनाडूतील मशिदीमध्ये चालू असलेले शरीया न्यायालय बंद करण्याचा मद्रास उच्च न्यायालयाचा आदेश !

या देशात जोपर्यंत समान नागरी कायदा लागू होत नाही,
तोपर्यंत न्यायालयांना अशा प्रकारे आदेश द्यावे लागणार आहेत !
     चेन्नई - चेन्नईमधील अन्ना सलाईमध्ये मशिदीच्या आवारात मक्का मस्जिद परिषदेकडून शरीया न्यायालय स्थापन करण्यात आले होते. या न्यायालयात वैवाहिक प्रकरणांपासून ते समन्स बजावणे, घटस्फोटाचा निर्णय संमत करणे, असे निर्णय घेतले जात होते. याविरोधात अब्दुल रेहमान या अनिवासी भारतियाने मद्रास उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. रेहमान यांना शरीया न्यायालयाने पत्नीशी बळजोरीने घटस्फोट घ्यायला भाग पाडले होते.

विधानसभेत आमदारांनी मांडलेल्या औचित्याच्या सूत्रावर उत्तर न देणार्‍या संबंधित अधिकार्‍यांवर कारवाई होणार !

    नागपूर, १९ नोव्हेंबर (वार्ता.) - विधानसभेत सर्वपक्षीय आमदार विविध विषयांवर औचित्याचे सूत्र मांडतात; मात्र हे सूत्र मांडल्यानंतर विधिमंडळ अधिनियमाप्रमाणे विविध खात्यांतील सचिव आणि संबंधित अधिकारी यांना १ मासात उत्तर देणे आवश्यक असते. असे असतांना औचित्याच्या सूत्राकडे अधिकार्‍यांकडून दुर्लक्ष केले जाते. परिणामी आमदारांनी त्यांच्या विषयांची उत्तरे मिळत नाहीत. त्यामुळे या विषयाची गंभीर नोंद घेऊन औचित्याच्या सूत्रावर उत्तर न देणारे मंत्र्यांचे सचिव आणि संबंधित अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी १७ डिसेंबर या दिवशी विधानसभेत सर्वपक्षीय आमदारांनी एकमताने केली.

चौकशी करून कारवाई करण्याचे पर्यावरण राज्यमंत्री पोटे-पाटील यांचे आदेश !

श्री. प्रवीण पोटे-पाटील (उजवीकडे) यांना निवेदन देतांना
श्री. अभय वर्तक आणि श्री. श्रीकांत पिसोळकर
मुळेगांव तांडा (जिल्हा सोलापूर) येथील अवैध पशूवधगृहाचे प्रकरण
      नागपूर, १९ डिसेंबर (वार्ता.) - सोलापूर जिल्ह्यातील मुळेगांव तांडा या गावामध्ये गेली १० वर्षे शासनाचे अनेक नियम आणि कायदे धाब्यावर बसवून अन् शासनाची फसवणूक करून अवैधपणे चालू असलेल्या मे. सोनअंकुर एक्सपोर्ट्स प्रा.लि. या पशूवधगृहाची चौकशी करून कारवाई करा, असे आदेश पर्यावरण राज्यमंत्री श्री. प्रवीण पोटे-पाटील यांनी १६ डिसेंबर या दिवशी दिले.

सीपीएम् कार्यकर्त्याच्या हत्येच्या प्रकरणी संघाच्या ११ कार्यकर्त्यांना जन्मठेप !

      थिरूवनंतपुरम् - मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्याच्या हत्येच्या प्रकरणी रा.स्व. संघाच्या ११ कार्यकर्त्यांना येथील न्यायालयाने दोन जन्मठेपांची शिक्षा ठोठावली. १ एप्रिल २००८ मध्ये विष्णु नावाच्या कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली होती.

लोकनियुक्त नगराध्यक्षांना सर्वसाधारण सभा बोलवण्यासह नामनिर्देशित सदस्य नियुक्ती करण्याचा अधिकार ! - डॉ. रणजीत पाटील

      नागपूर, १९ डिसेंबर (वार्ता.) - थेट जनतेतून निवडून आलेल्या नगराध्यक्षांना नगरपरिषदेची पहिली सर्वसाधारण सभा बोलवण्याचा, नामनिर्देशित सदस्य नियुक्त करण्याचा आणि उपनगराध्यक्षाच्या निवडणुकीसाठी पिठासीन अधिकारी म्हणून काम पहाण्याचा अधिकार प्रदान करण्यात आला आहे. त्यासाठी महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ मध्ये सुधारणा करण्यात येणार आहे, अशी माहिती नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी १६ डिसेंबर या दिवशी निवेदनाद्वारे विधानसभेत दिली. डॉ. पाटील म्हणाले की, नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकीत १६१ नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांना काही अधिकार प्रदान करण्याचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यानुसार वरील निर्णय घेतले आहेत.

नाट्यगृहाची मोडतोड होईल या भीतीने महापालिका आयुक्तांनी शरद पोंक्षे आणि निर्माते धुरत यांना हमी म्हणून ५ लक्ष रुपये भरण्यास भाग पाडले !

         कोल्हापूर - कोल्हापूर महापालिकेतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी, तसेच नितेश राणे प्रणीत स्वाभिमानी संघटना यांनी श्री. शरद पोंक्षे यांच्या नाटकास विरोध करत महापालिका आयुक्तांकडे या नाटकास अनुमती देण्यात येऊ नये, अशी भूमिका घेत महापालिका आयुक्तांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी नाट्यगृहाची मोडतोड झाल्यास नाट्यगृहाची हानी होईल म्हणून शरद पोंक्षे आणि निर्माते धुरत यांना हमी म्हणून १० लक्ष रुपये भरण्यास सांगितले. यावर तडजोड होऊन पोंक्षे यांनी ५ लक्ष रुपयांचा धनादेश महापालिकेला सुपुर्द केला.
         केशवराव भोसले नाट्यगृह महापालिकेच्या मालकीचे असून या नाट्यगृहाचा विमा नसल्याविषयी नागरिकांनी आश्‍चर्य व्यक्त करून श्री. पोंक्षे यांच्यावर हा अन्याय का, असा प्रश्‍न उपस्थित केला आहे.

दोषारोप अंतिम करण्याच्या संदर्भात पुढील सुनावणी ३ जानेवारी या दिवशी

कॉ. गोविंद पानसरे खून प्रकरण !
        कोल्हापूर, १९ डिसेंबर (वार्ता.) - कॉ. गोविंद पानसरे खून प्रकरणात अटकेत असलेले सनातन संस्थेचे साधक श्री. समीर गायकवाड यांच्यावर दोषारोप अंतिम करण्याच्या संदर्भात सध्या सुनावणी चालू आहे. नियमित सुनावणी ज्यांच्याकडे आहे, ते न्यायाधीश उपलब्ध नसल्याने १९ डिसेंबर या दिवशीची सुनावणी न्यायाधीश श्री. एस.आर्. साळुंखे यांच्याकडे झाली. त्यांनी पुढील सुनावणी ३ जानेवारी २०१७ या दिवशी होईल, असे सांगितले. या वेळी अधिवक्ता समीर पटवर्धन यांनी २२ डिसेंबरला डॉ. वीरेंद्र तावडे यांची सुनावणी असून त्यांना प्रत्यक्ष न्यायालयात उपस्थित करण्यात यावे, अशी विनंती न्यायालयास केली.

जळगाव येथे हिंदु जनजागृती समितीकडून अधिवक्त्यांची बैठक

      जळगाव - हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित हिंदु धर्मजागृती सभेनिमित्त शहरातील अधिवक्त्यांची बैठक जळगावातील आचार्य कॉम्प्लेक्स येथे १९ डिसेंबर या दिवशी घेण्यात आली. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट म्हणाले की, राष्ट्र उभारणीच्या कार्यात अधिवक्त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. समाज विघातक गोष्टी थांबवून समाज बळकट होण्यासाठी अधिवक्त्यांनी पुढाकार घ्यायला हवा. हिंदु विधीज्ञ परिषदेद्वारे अनेक धर्माभिमानी अधिवक्ते राष्ट्र आणि धर्मजागृतीच्या या कार्यात सक्रीयपणे सहभागी आहेत. त्यांनी पश्‍चिम महाराष्ट्र मंदिरातील घोटाळा, तुळजापूर, पंढरपूर येथील मंदिरातील भ्रष्टाचार उघडकीस आणून धर्मकार्यात सहभाग घेतला आहे. याचप्रमाणे जिल्ह्यातील अधिवक्त्यांनीही अशाप्रकारे सहभागी होऊन आपले धर्मकर्तव्य बजावावे, असे आवाहन केल्यानंतर उपस्थित अधिवक्त्यांनी उर्त्स्फूतपणे आम्ही या कार्यात सर्वतोपरी सहकार्य करू, असे सांगितले. त्यानंतर एरंडोल, धरणगाव, जळगाव येथील बार काउन्सिलमध्ये काश्मिरी हिंदूंचे सन्मानपूर्वक पुनर्वसन करावे, हा ठराव संमत करण्यात येईल आणि प्रतिमास एकदा एक बैठक राष्ट्र आणि धर्मकार्यासाठी घेणार यावर शिक्कामोर्तब झाले. या बैठकीला जिल्हा बार काउन्सिलचे सचिव श्री. गोविंद तिवारी, तसेच धर्माभिमानी अधिवक्ते श्री. योगेश पाटील, श्री. संजयसिंग पाटील, श्री. भाटिया, श्री. कैलास परदेशी यांच्यासह अन्य अधिवक्ते उपस्थित होते.

आमदारांना २ लक्ष वेतनावर प्राप्तीकर आकारण्यात येणार !

मुख्य सचिवांप्रमाणे भत्ते मिळणार नाहीत !
     नागपूर, १९ डिसेंबर (वार्ता.) - महाराष्ट्रातील आमदारांना मुख्य सचिवांइतके वेतन आणि इतर भत्ते देण्याविषयी गेल्या अधिवेशनातील निर्णयावर टीका झाल्यानंतर आता त्यांना इतर भत्ते दिले जाणार नाहीत. तसेच त्यांच्या वेतनावर प्राप्तीकर आकारण्यात येणार आहे. राज्य मंत्रीमंडळाच्या १५ डिसेंबर या दिवशी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. (राज्यावर साडेतीन लक्ष कोटी रुपयांचा कर्जाचा बोजा असतांना आमदारांना २ लक्ष रुपये इतके वेतन आवश्यक आहे का ? याचा शासनाने गांभीर्याने विचार करावा. - संपादक)

कल्याण येथे कर चुकवणार्‍या सुप्रसिद्ध थारवानी बांधकाम व्यावसायिकाच्या इमारतीवर जप्ती !

करबुडव्या बांधकाम व्यावसायिकाकडून ही रक्कम त्वरित वसूल करण्यात यावी !
      कल्याण - थकित करांच्या वसुलीसाठी कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्तांनी सुप्रसिद्ध थारवानी बांधकाम व्यावसायिकाच्या बारावे येथील इमारतीवर जप्तीची कारवाई केली. १५ लाख ३१ सहस्र रुपये आणि ६१ लाख ८९ सहस्र रुपयांची थकबाकी असल्याचे महानगरपालिकेने सांगितले आहे. सूूचना देऊनही कर भरणा न झाल्याने संबंधित इमारतीतील २२ सदनिका सील करण्यात आल्या.

आता ७/१२ चा उतारा यंत्राद्वारे २० रुपयांत मिळणार

     मुंबई, १९ डिसेंबर - ७/१२ चा उतारा मिळण्यासाठी आता तलाठी कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या फेटरी या गावात ७/१२ चा उतारा देणारी व्हेंडिंग मशीन बसवण्यात आली आहे. या यंत्रामध्ये २० रुपये टाकून स्वत:च्या शेतजमिनीचा तपशील भरला की, सातबाराचा उतारा थेट हातात येतो.
    ठाणे / नेरूळ - आज सर्वधर्मसमभाव स्वीकारल्याने आपला कोण आणि परका कोण, हे हिंदूंना समजत नाही. मुंगूस ज्याप्रमाणे शत्रूला ओळखतो, ती मुंगूस वृत्ती हिंदूंमध्ये नाही. आज लव्ह जिहाद, जाळपोळ, बलात्कार, दंगली या माध्यमातून धर्मांध स्वत:चा धर्म वाढवत आहेत. या देशाला जर हिंदुस्थान म्हणून जगात रहायचे असेल, तर छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांविना गत्यंतर नाही, असे मार्गदर्शन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे पू. संभाजी भिडे गुरुजी यांनी केले.

काळा पैसा पांढरा केल्याच्या संशयातून झवेरी बाजारातील सराफ दुकानांवर ईडीकडून धाडी !

     मुंबई, १९ डिसेंबर - काळा पैसा पांढरा करत असल्याच्या संशयावरून झवेरी बाजारातील काही सराफ दुकानांवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडीने) १६ डिसेंबरला रात्री धाडी टाक्ल्या. या ठिकाणी ७० कोटी रुपयांचे काळे धन पांढरे करण्यात आल्याची माहिती ईडीला प्राप्त झाली होती. यामध्ये खोटे ट्रान्झक्शन दाखवून जमा केलेली १ कोटी रुपयांहून अधिक रक्कम ईडीने गोठवली आहे. ही रक्कम कोणत्या बँकेतून, तसेच कोणत्या एजन्टकडून ट्रान्सफर करण्यात आली आहे, याचा तपास चालू आहे.

कल्याण येथे १७ लाखांच्या नवीन नोटांसह २ जणांना पोलिसांनी पकडले

     कल्याण - नवीन नोटा पालटून देण्यासाठी आलेल्या २ जणांना कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून १७ लाख रुपयांच्या २ सहस्र नोटा आणि ५००च्या २७ सहस्र रुपयांच्या नोटांसह २१ लाख २२ सहस्र रुपये जप्त करण्यात आले आहेत. कल्याण पश्‍चिमेतील संदीप हॉटेल परिसरात २ जण जुन्या नोटा पालटून देण्यासाठी येणार असल्याची माहिती खडकपाडा पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे संदीप हॉटेल परिसरात सापळा रचून पोलिसांनी २ संशयितांना कह्यात घेतले. त्या दोघांकडे असणार्‍या ऍक्टिव्हा गाड्यांची झडती घेतली असता मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम आढळून आली.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी अधिवक्त्यांविषयी लिहिलेल्या तेजस्वी विचारावर एका अधिवक्त्यांनी व्हॉट्स अ‍ॅपवरून केलेली टीका आणि त्याचे हिंदुत्वनिष्ठांनी केलेले समर्पक खंडण

अधिवक्त्यांच्या टीकेचे समर्पक भाषेत खंडण 
करणार्‍या हिंदुत्वनिष्ठांचे अभिनंदन ! असे हिंदुत्वनिष्ठच 
हिंदु राष्ट्र चालवतील, यात शंका नाही ! - संपादक
         १८.१२.२०१६ या दिवशीच्या दैनिकात पृष्ठ १ वर परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार ही चौकट वाचून एका शहरातील एका अधिवक्त्यांनी व्हॉट्स अ‍ॅपच्या एका गटात पोस्ट टाकून या चौकटीतील लिखाणाविषयी टीका केली आहे. या टीकेचे त्याच गटातील हिंदुत्वनिष्ठांनी समर्पक उत्तरे देऊन खंडणही केले आहे.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे १८.१२.२०१६ या 
दिवशीच्या दैनिकात प्रसिद्ध झालेले तेजस्वी विचार
         गुन्हा सिद्ध झाल्यावर न्यायाधीश गुन्हेगाराला शिक्षा ठोठावतात. तेव्हा गुन्हेगाराची खोटी बाजू लढवल्याबद्दल, त्याचे साथीदार झाल्याबद्दल त्याच्या अधिवक्त्यांना शिक्षा केली जात नाही. हिंदु राष्ट्रात अशा अधिवक्त्यांची वकिलीची सनद रद्द करून त्यांना आजन्म कारागृहात साधना करण्याची कडक शिक्षा केली जाईल ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील अतिरेक्यांच्या आक्रमणाचे खरे स्वरूप ओळखा !

    ‘अमेरिकेत ११.९.२००१ या दिवशी वॉशिंग्टनमधील न्यूयॉर्क शहरात वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील अतिरेकी आक्रमणात सहस्रशः माणसे मेली. हे काय केवळ राजकीय संकट आहे ? हे तर धार्मिक आणि सांस्कृतिक संकट आहे. अतिरेक्यांच्या इस्लामवादाची ही भीषण आणीबाणी आहे. राजकीय संकट कदाचित् अमेरिका दूर करू शकेल; परंतु अतिरेक्यांच्या इस्लामवादाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक संकटांचा प्रतिकार अमेरिका करू शकेल का ? हिंदुस्थान यापासून काही बोध घेईल का ?’ - गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (घनगर्जित, सप्टेंबर २००५)

हिंदु राष्ट्र स्थापनेतील साधनेचे महत्त्व

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या संदर्भातील परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे विचारधन !
 
‘वर्ष २०२३ पासून ‘हिंदु राष्ट्र’ येईल’, हे आजवर अनेक संतांनी वेळोवेळी सांगितले आहे. या पार्श्‍वभूमीवर हिंदु राष्ट्र स्थापनेविषयी अनेकांंच्या मनात उत्सुकता असते. यासाठीच ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची दिशा’ या विषयावरील वैशिष्ट्यपूर्ण सदर !
५. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या दृष्टीने साधनेची आवश्यकता
५ उ. हिंदूसंघटनात अडथळा ठरणारा अहंकार दूर करण्यासाठी साधना उपयुक्त ! : ‘हिंदुत्वनिष्ठांमधील अहंकार हा हिंदूऐक्यातील प्रमुख अडथळा असतो. साधना केल्यामुळे अहंकार न्यून (कमी) होतो, नम्रता वाढते आणि इतरांशी जुळवून घेणे सोपे जाते. थोडक्यात, साधनेमुळे ईश्‍वरी गुण वाढतात. हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि सनातन संस्थेचे साधक प्रतिदिन साधना करत असल्याने ते इतरांशी पटकन जुळवून घेतात.’ (२३.४.२०१२)
५ ऊ. साधना केल्याने प्रतिकूल परिस्थितीतही आनंदी रहाता येणे : ‘साधना केल्याने आत्मबळ जागृत होत असल्याने व्यक्तीला तणावरहित आणि आनंदी जीवन जगता येते. साधनेमुळे ईश्‍वराचे साहाय्य मिळत असल्याने प्रतिकूल काळातही निराशा येत नाही. साधनेमुळे कर्मफळाची अपेक्षा न ठेवता कार्य करता येते आणि दु:ख न होता कर्मातून आनंद मिळतो. फळाची अपेक्षा न करता कार्य केल्यास तो निष्काम कर्मयोग होतो. यामुळे आध्यात्मिक प्रगतीही होते.

हिंदूंवरील आघात आणि साधना इत्यादींविषयी केलेल्या जनजागृतीला उत्स्फूर्त प्रतिसाद

ओडिशा राज्याचे नोव्हेंबर २०१६ मधील प्रसारकार्य 
१. प्रवचने
१ अ. कटक येथे एस्.एस्.आर.एफ्.च्या (‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊन्डेशन’ या आध्यात्मिक संस्थेच्या) जिज्ञासूंसाठी ‘अध्यात्मशास्त्रातील संशोधन आणि साधनेचे मूलभूत सिद्धांत’ या विषयावर प्रवचन : ‘९.११.२०१६ या दिवशी कटक येथील एस्.एस्.आर.एफ्.च्या जिज्ञासू श्रीमती हेमप्रभा भुईयान यांच्या घरी प्रवचनाचे आयोजन करण्यात आले. प्रवचनाला बुद्ध संप्रदायानुसार साधना करणार्‍या चार हिंदु महिला आणि श्रीमती हेमप्रभा यांच्या घरातील दोघीजणी उपस्थित होत्या. त्या वेळी संस्थेने केलेले अध्यात्मशास्त्रातील संशोधन आणि साधनेचे मूलभूत सिद्धांत यांची माहिती देण्यात आली. बुद्ध संप्रदायानुसार साधना करत असूनही त्यांनी ही माहिती समजून घेण्याची जिज्ञासा दाखवली. त्या महिला म्हणाल्या, ‘‘अशी शास्त्रीय माहिती देण्यासाठी तुम्ही अवश्य या. आम्ही वेळ काढून उपस्थित राहू.’’
     सत्संग झाल्यानंतर श्रीमती हेमप्रभा आणि त्यांची मुलगी कु. मधुश्री यांनी रामनाथी आश्रम आणि साधना यांविषयी माहिती जाणून घेण्यात विशेष रूची दाखवली. त्या दोघीही रामनाथी आश्रमात ५ दिवस झालेल्या कार्यशाळेत उपस्थित होत्या. त्या दोघीही रामनाथी आश्रम आणि कार्यशाळेत मिळालेली माहिती यांच्यामुळे प्रभावित झाल्या. त्या म्हणाल्या, ‘‘डिसेंबर २०१६ पासून घरी सत्संगाचे आयोजन नियमितपणे करूया.’’

फलक प्रसिद्धीकरता

अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन करणारी धर्मनिरपेक्षतावादी काँग्रेस !
      उत्तराखंडमधील काँग्रेस सरकारने विधानसभा निवडणुकांपूर्वीच मुसलमान सरकारी कर्मचार्‍यांना शुक्रवारच्या नमाजासाठी दुपारी १२.३० ते २ वाजेपर्यंत म्हणजे ९० मिनिटांची सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री हरिश रावत यांच्या अध्यक्षतेखाली हा निर्णय झाला.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Uttarakhandki Congress sarkarne Musalman Sarkari
karmachariyo ko Shukravar ki Namaz hetu dedh ghanteki chutti di.
Secular Congress ka satya swarup jane
जागो ! : उत्तराखंड की कांग्रेस सरकार ने मुसलमान सरकारी
कर्मचारियों को शुक्रवार की नमाज हेतु डेढ घंटे की छुट्टी दी ।
सेक्यूलर कांग्रेस का सत्य स्वरूप जाने ।

अधिकोषांतील दायित्वशून्य कर्मचारी !

विविध मूल्यांच्या नोटांचा पुरवठा तातडीने पूर्ववत करून शासकीय अधिकोषांची (बँकांची) धोक्यात आलेली प्रतिमा सावरावी, असे आवाहन ‘भारतीय राष्ट्रीय अधिकोष कर्मचारी महासंघा’ने रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरला केले आहे. शासकीय आणि खाजगी अधिकोषांतील काही कर्मचार्‍यांच्या लबाडीमुळे कोट्यवधी रुपयांच्या नव्या नोटा नको त्यांच्या हाती लागल्या आहेत. यामुळे अधिकोषांची प्रतिमा मलीन झाली आहे. अधिकोष कर्मचार्‍यांनी अधिकोषांची विश्‍वासार्हता जपणे किती आवश्यक आहे, हे ज्ञात असूनही भ्रष्टाचार आणि काळ्याचे पांढरे करणार्‍यांना सहकार्य करून प्रामाणिक मार्गावर चालणार्‍या जनतेची खिल्ली उडवली आहे. अधिकोषांची प्रतिमा मलीन करायची कि स्वच्छ ठेवायची, हे कर्मचार्‍यांच्या हाती असते; पण जुन्याच्या बदल्यात नव्या नोटा पालटून देण्यासाठी घेण्यात येत असलेल्या कमिशनच्या काही प्रतिशत रकमेसाठी नीतीमत्ता गहाण ठेवल्याने त्यापुढे अधिकोषांच्या प्रतिमेचे कोणाला काय मूल्य ? अधिकोषांची प्रतिमा खर्‍या अर्थाने कशामुळे डागाळत आहे, हे ठाऊक असूनही त्यावर सोयीस्कर मौन पाळले गेले आहे. म्हणजे कर्तव्यचुकार कर्मचार्‍यांनी जे केले आहे ते या महासंघास मान्य आहे, असे समजायचे का ?

आश्रमातील सात्त्विकता आणि चैतन्य यांमुळे देहाची शुद्धी होत असल्याची अनुभूती घेणारे रोमानिया येथील श्री. द्रगोस बार्बलता !

    महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या शिबिरात सहभागी झालेल्या
शिबिरार्थींचा साधनाप्रवास आणि त्यांना आलेल्या अनुभूती 
श्री. द्रगोस बार्बलता
श्री. द्रगोस बार्बलता हे रोमानिया येथून आले आहेत. गेल्या ८ वर्षांपासून ते साधना करत आहेत. त्यांनी विविध माध्यमांतून साधना केली आहे. त्यांना ‘मानसिक तणावाच्या माध्यमातून स्वतःला आध्यात्मिक त्रास आहे’, असे वाटते. काही काळापूर्वी त्यांनी स्वतःचे घर विकले, चाकरी सोडली आणि ते पर्वतांच्या ठिकाणी वास्तव्यास गेले. तेथे राहून त्यांना खरा साधनामार्ग शोधायचा होता आणि ‘पुढे काय करायचे आहे’, याचे ध्येय निश्‍चित करायचे होते. त्याच उद्देशाने ते या कार्यशाळेसाठी उपस्थित राहिले. त्यांना आलेली अनुभूती येथे देत आहोत.

स्वभावदोष आणि अहंनिर्मूलन प्रक्रिया राबवून ईश्‍वराशी एकरूप होण्यासाठी तळमळीने प्रयत्न करणारे ऑस्ट्रेलिया येथील श्री. सिमॉन !

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या शिबिरात सहभागी झालेल्या
शिबिरार्थींचा साधनाप्रवास आणि त्यांना आलेल्या अनुभूती 
श्री. सिमॉन
श्री. सिमॉन हे ऑस्ट्रेलिया येथील असून गेले ६ मास (महिने) ते एस्.एस्.आर्.एफ्.च्या मार्गदर्शनानुसार साधना करत आहेत. ते ‘लेव्हल २’ सत्संगाला उपस्थित रहातात. श्री. सिमॉन स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया राबवत असून त्यासाठी ते तळमळीने प्रयत्न करतात. त्यांच्याकडे एस्.एस्.आर्.एफ्.ची ऑनलाइन ‘एस.इ.ओ’ सेवा आहे. काही काळापूर्वी त्यांनी ‘साधनेसाठी अधिक वेळ मिळावा’, यासाठी त्यांनी पूर्णवेळ असलेली चाकरी सोडली आहे. सध्या ते अर्धवेळ चाकरी करतात. या कार्यशाळेत ते उत्साहाने सहभागी असून येथे उपस्थित रहायला मिळाल्यामुळे त्यांना कृतज्ञता वाटत आहे. त्यांचा साधनाप्रवास आणि कार्यशाळेच्या कालावधीत त्यांना आलेल्या अनुभूती येथे देत आहोत.
१. साधनाप्रवास
१ अ. ईश्‍वर (जीझस) हा सूडभावनेने वागणारा असून ‘आपल्या हातून काही चुका घडल्या, तर तो शिक्षा करतो’, असे शिकवण्यात येणे आणि माहितीजालावर (इंटरनेट) अध्यात्मशास्त्राविषयी माहितीचे वाचन केल्यामुळे ‘ईश्‍वर म्हणजे प्रीती आहे’, हे समजल्यावर आश्‍चर्य वाटणे : ‘ईश्‍वर (जीझस) हा सूडभावनेने वागणारा असून ‘आपल्या हातून काही चुका घडल्या, तर तो शिक्षा करतो’, असे मला शिकवण्यात आले होते. वयाच्या १७ व्या वर्षी मला ‘मेक्सिकन भारतीय आणि सूक्ष्मातील संकल्पना’ याविषयी एक ग्रंथ मिळाला. तो वाचल्याने माझी जिज्ञासा जागृत झाली आणि मी प्राणायामाचे ज्ञान मिळवून देहाच्या बाहेर रहाण्याच्या अनुभूती घेतल्या. त्यानंतर मी चाकरी करायला आरंभ केला; पण वय होऊ लागले तसतसे मला पूर्वीच्या अनुभूती आठवू लागल्याने मी माहितीजालावर (इंटरनेटवर) अध्यात्मशास्त्राविषयी माहिती मिळवण्यास आरंभ केला. या वाचनामुळे ‘ईश्‍वर म्हणजे प्रीती’, हे समजल्याने मला आश्‍चर्य वाटले.

साधनेत योग्य मार्ग मिळण्यासाठी देवाला प्रार्थना करणार्‍या आणि शिकण्याच्या स्थितीत असणार्‍या मुंबई येथील कु. नीती कौशिक !

कु. नीती कौशिक
महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या शिबिरात सहभागी झालेल्या शिबिरार्थींचा साधनाप्रवास आणि त्यांना आलेल्या अनुभूती
‘कु. नीती कौशिक या मुंबई येथील असून त्यांना त्या पूर्वी करत असलेल्या साधनेने व्यवस्थित साधना होत नसल्याचे जाणवले. माहितीजालाच्या माध्यमातून त्या ‘एस्.एस्,आर्.एफ्.’च्या संपर्कात आल्या आणि संस्थेच्या ‘लेव्हल २’ सत्संगालाही उपस्थित राहू लागल्या. त्यानंतर त्या सेवा करू लागल्या आणि स्वभावदोष अन् अहं निर्मूलन प्रक्रियाही राबवू लागल्या. आध्यात्मिक त्रास आणि स्वतःमधील दोष अन् अहं न्यून कसे करायचे, हे शिकण्यासाठी त्या या कार्यशाळेला उपस्थित राहिल्या आहेत. त्यांच्या पूर्वीच्या साधनाप्रवासाविषयी आणि त्यांना योग्य साधनेने आलेल्या अनुभूती येथे देत आहोत.

प.पू. भक्तराज महाराज यांच्याविषयी उत्कट भाव असणार्‍या आणि त्यांना आत्मनिवेदन करणार्‍या मलेशियातील कु. जीम टीओ !

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या शिबिरात सहभागी
झालेल्या शिबिरार्थींचा साधनाप्रवास आणि त्यांना आलेल्या अनुभूती 
कु. जीम व्ही टीओ, क्वालालांपूर, मलेशिया येथील रहिवासी आहे. ख्रिस्ताब्द २०१३ मध्ये ती एस्.एस्.आर्.एफ्.च्या संपर्कात आली. त्या वेळी तिच्या मनात अनेक प्रश्‍न होते. हिंदु मैत्रिणीला ती त्याविषयी विचारत असे. त्यांची उत्तरे देणे हिंदु मैत्रिणीला अशक्य असल्याने मैत्रिणीच्या यजमानांनी तिला एस्.एस्.आर्.एफ्.ची लिंक दिली आणि सांगितले, ‘‘तुझ्या सर्व प्रश्‍नांची उत्तरे इथे मिळतील.’’ ख्रिस्ताब्द २०१५ मध्ये जीमने एस्.एस्.आर.एफ्.च्या मार्गदर्शनानुसार साधना करण्यास आरंभ केला. या काळात तिची व्याख्यान घेण्यासाठी आलेल्या सौ. श्‍वेता क्लार्क यांच्याशी ओळख झाली. तिच्या ईश्‍वराप्रती असलेल्या भावामुळे तिच्या शरिरावर आणि तिच्या घरातही दैवी कण दिसू लागले. बौद्ध धर्माची पार्श्‍वभूमी असल्याने जीमचे कुटुंबीय देवाला मानत नाही; परंतु तिला साधना करायची होती. साधना वाढवून आध्यात्मिक उन्नती करण्याच्या तळमळीपोटी ती कार्यशाळेला उपस्थित राहिली. प्रश्‍नांची उत्तरे शोधण्याची जिज्ञासा तिला स्वस्थ बसू देत नाही. कार्यशाळेला आल्यापासून तिचा प.पू. भक्तराज महाराजांप्रती (प.पू. बाबांप्रती) उत्कट भाव जागृत झाला आहे आणि तिला ते आपल्या वडिलांप्रमाणे वाटतात. ती प.पू. बाबांना आत्मनिवेदन करते. तिच्यामधे बालकभाव आहे. तिला आलेल्या काही अनुभूती तिच्याच शब्दांत पुढे देत आहे.

हिंदु धर्माचा सखोल अभ्यास करण्याची तळमळ असणार्‍या आणि नामजप करून त्याचा लाभ अनुभवणार्‍या बेंगळुरू येथील शिल्पा माधुरी जी !

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या शिबिरात सहभागी झालेल्या
शिबिरार्थींचा साधनाप्रवास आणि त्यांना आलेल्या अनुभूती
सौ. शिल्पा माधुरी जी
   १० ते १४ डिसेंबर २०१६ या कालावधीत सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेला उपस्थित असलेल्यांना आलेले अनुभव आणि अनुभूती पुढे देत आहोत.
१. साधनाप्रवास
१ अ. आरंभीची साधना - ध्यानधारणा आणि ग्रंथवाचन : ‘सौ. शिल्पा माधुरी जी. यांनी वयाच्या १५व्या वर्षी साधनेला प्रारंभ केला. सुरुवातीला त्या त्यांच्या वडिलांकडून मिळालेले ओशो यांचे ग्रंथ वाचत होत्या. त्यांच्या एका मैत्रिणीचे कुटुंब ध्यानधारणा करत असे, म्हणून त्यांनीही ध्यानसाधना करण्यास प्रारंभ केला. पुढे आध्यात्मिक साहित्याबद्दल जिज्ञासा वाढल्याने त्या अनेक ग्रंथ वाचू लागल्या; मात्र आळस आणि मायेत गुरफटल्यामुळे त्यांची साधना व्यवस्थित होत नव्हती. जिज्ञासेपोटी त्या परग्रहांवरील जिवांबद्दल संशोधन करत होत्या.

६९ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या सौ. अश्‍विनी अतुल पवार यांनी दिलेले अमूल्य दृष्टीकोन !

सौ. अश्‍विनी पवार
     गुरुदेवांच्या कृपेमुळे देवद (पनवेल) येथील सनातन आश्रमातील साधकांना कधी सत्संगाच्या, तर कधी सेवेच्या माध्यमातून वा प्रत्यक्ष सहवासातून सौ. अश्‍विनीताईचा (सौ. अश्‍विनी पवार यांचा) सत्संग मिळतो. देवाने या सत्संगात ताईच्या माध्यमातून दिलेले साधनेचे दृष्टीकोन सर्वांसाठीच आदर्श आहेत.
२. सेवेच्या संदर्भात
अ. एखादी सेवा मिळणे, ही आपल्यावर झालेली गुरूंची कृपा असते. बाहेर सेवा मिळण्यासाठी धडपडावे लागते.
आ. देव सेवा देतो आणि ती करण्यासाठी क्षमताही देतो. देव आपली श्रद्धा किती आहे, ते बघतो. माघार न घेता सतत शिकत रहायला हवे.
इ. पाट्याटाकूपणा असेल, तर सेवा पुष्कळ मोठी वाटते.
ई. सेवा करतांना अयोग्य विचार केल्यास सेवेत चूक होते.

प.पू. डॉक्टर जे सांगतात त्यातील केवळ शब्दार्थ लक्षात न घेता त्यामागील उद्देश समजून घेणे महत्त्वाचे असते, हे लक्षात येणे

श्री. राम होनप
    प.पू. डॉक्टरांनी ३ मासांपूर्वी मला सांगितले, ज्ञान मिळवल्याने प्रगती होत नाही. त्यामुळे ज्ञान न घेता समष्टी सेवा करावी. आपण त्रेतायुगात असतो, तर ज्ञान घेणे योग्य ठरले असते. आता कलियुग आहे. त्यानंतर मी नियमित सेवा करू लागलो. तीन मासांनी प.पू. डॉक्टरांनी मला सांगितले, संगीत आणि विविध विषयांवर ज्ञान घ्यावे. त्या वेळी मनात प.पू. डॉक्टरांनी आधी वेगळे सांगितले आणि आता असे का सांगितले ?, असा विचार येऊ शकतो. त्यावर देवाने प.पू. डॉक्टरांनी पूर्वी काळाची प्रतिकूलता अधिक असल्याने ज्ञान न घेण्यास सांगितले. आता काळ अनुकूल असल्याने ज्ञान घेऊ शकतो, असे सांगितलेे, असे सुचवले. या प्रसंगावरून प.पू. डॉक्टर जे सांगतात त्यातील केवळ शब्दार्थ लक्षात न घेता त्यामागील उद्देश समजून घेणे महत्त्वाचे असते, हे लक्षात आले.
- श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२१.७.२०१६) 

प्रत्यक्ष साधनेत नसतांनाही साधकांसाठी गुरुतत्त्व कसे कार्य करते ? यासंदर्भात जाणवलेली सूत्रे

श्री. व्यंकटेश अय्यंगार
    वर्ष १९९० मध्ये सनातन संस्थेची (सनातन भारतीय संस्कृती संस्था) स्थापना झाली. त्या वेळी मला संस्थेविषयी काही ठाऊक नव्हते. तरीही गुरुतत्त्व कसे योग्य मार्गदर्शन करते, हे दर्शवणारा एक प्रसंग आठवला.
१. चोरून नक्कल करणे (कॉपी) या दुष्कृत्याविरुद्ध
ठोस पावले उचलल्याने प्रशासकाने त्यागपत्र देण्यास सांगणे
    मी कर्नाटक राज्याच्या एका महाविद्यालयामध्ये अध्यापक (लेक्चरर) या पदावर सेवारत होतो. ती खाजगी प्रशासक संस्था (प्रायव्हेट मॅनेजमेंट इन्स्टिट्यूशन) होती. परीक्षेमध्ये विद्यार्थी चोरून नक्कल (कॉपी) करत असतांना त्यांच्या या दुष्कृत्याविरुद्ध मी ठोस पावले उचलली. त्यामुळे मुख्य प्रशासकाने मला त्यागपत्र (राजीनामा) देण्यास सांगितले. माझ्या इतर सहकार्‍यांचा मला पाठिंबा न मिळाल्यामुळे मी त्यागपत्र दिले.       

प्रत्येक साधकाच्या जीवनातील परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासमवेतचे आनंदाचे तुषार !

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...
सौ. रेखा जाखोटिया
    या विश्‍वात परात्पर गुरु डॉ. आठवले ही एकच गोष्ट अशी आहे, जी साधकांच्या जीवनात आनंदाचा वर्षाव करते. साधक कितीही दु:खात असो, निराशेने घेरलेला असो अथवा नकारात्मक विचारांनी घेरलेला असो, परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा विषय निघाला किंवा त्यांची आठवण आली, म्हणजे त्यांचा तोंडवळा, त्यांचे चरण, त्यांचे हसणे, बोलणे या गोष्टी डोळ्यांसमोर एखाद्या चित्रपटाप्रमाणे येऊ लागतात आणि साधक स्वतःचे सुख-दुःख विसरून आनंदी होतो. माझ्या जीवनातील प.पू. डॉक्टरांसमवेतचे काही दुर्मिळ प्रसंग आजही मला जसेच्या तसे आठवतात.
साधनेला आरंभ केल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांची पहिली भेट !
१. साधनेला आरंभ केल्यावर नातेवाइकांना पत्राद्वारे सनातनच्या सत्संगात जाण्यास
सांगणे आणि हे समजल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी बोलावून कौतुक करणे
    मी साधनेला आरंभ केल्यावर काही दिवसांतच कु. शशिकला आचार्य यांच्या घरी परात्पर गुरु डॉ. आठवले यांची भेट झाली. आम्ही सर्व साधक बाहेर अंगणात बसलो होतो. परात्पर गुरु डॉ. आठवले आणि काही साधक आतल्या खोलीत बोलत होते. बोलता बोलता ते भोजनही करत होते. अचानक माझे भाग्य उजळले आणि डॉ. (सौ.) नंदिनी सामंत यांनी बाहेर येऊन मला गुरुदेव बोलावत असल्याचे सांगितले.

घर सोडण्याची कारणे आणि त्यांचा होणारा परिणाम

- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

श्रीकृष्णाशी बोलणारा आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रती भाव असणारा ५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा अन् उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला यवतमाळ येथील चि. रुद्र चंद्रशेखर गोबाडे (वय ५ वर्षे) !

चि. रुद्र गोबाडे
    चि. रुद्र चंद्रशेखर गोबाडे याचा मार्गशीर्ष कृष्ण पक्ष सप्तमी (२०.१२.२०१६) या दिवशी वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या आजीला त्याची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये, तसेच दोष देत आहोत.
चि. रुद्र चंद्रशेखर गोबाडे याला
सनातन परिवाराकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा !
१. गुणवैशिष्ट्ये
१ अ. रामाचा पाळणा, भजने इत्यादी ऐकत झोपी जाणे आणि हातांची मुद्रा केलेली असणे : रुद्रला प.पू. भक्तराज महाराज यांची भजने ऐकायला आवडते. तो ८ दिवसांचा असतांना त्याच्या जवळ सतत रामाचा पाळणा, भजने आणि सद्गुरु (श्री.) राजेंद्र शिंदे यांनी केलेले मार्गदर्शन लावलेले असायचे. तो ते ऐकत कधी झोपायचा, हे कळायचे नाही. तो सतत हाताच्या बोटांची मुद्रा करायचा.
१ आ. समंजस : मी नामजप करत असतांना रुद्रला एखादी वस्तू (उदा. दूध) हवी असल्यास तो मला म्हणतो, आजी, तुझा नामजप झाला की, मला दूध दे.

एकाग्र, अष्टावधानी आणि देवाप्रती भाव असणारी ६४ टक्के आध्यात्मिक पातळीची महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली संभाजीनगर येथील चि. देवश्री गोविंद जोशी (वय २ वर्षे) !

उच्चलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके
म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी !

या पिढीतील चि. देवश्री जोशी आणि चि. रुद्र गोबाडे ही दोन दैवी बालके आहेत !
    (चि. देवश्री हिची वर्ष २०१४ मध्ये ६१ टक्के आध्यात्मिक पातळी होती. आता ६४ टक्के आहे.)
    चि. देवश्री गोविंद जोशी हिचा मार्गशीर्ष कृष्ण पक्ष सप्तमी (२०.१२.२०१६) या दिवशी वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आई आणि आजी यांना तिची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये देत आहोत.
चि. देवश्री गोविंद जोशी हिला वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून आशीर्वाद !
चि. देवश्री जोशी
पालकांनो, हे लक्षात घ्या !
    तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले    
१. एकाग्रता आणि एकपाठी असणे
    चि. देवश्रीला एकदा सांगितलेली गोष्ट लक्षात रहाते आणि त्याप्रमाणे ती लगेच कृतीही करते. तिला आतापर्यंत २ वेळाच बालसंस्कारवर्गाला नेले होते. त्या वेळी तिथे पाहिलेली ध्यानमुद्रा आणि श्री गुरुदेव दत्त हा नामजप तिच्या लक्षात राहिला. आता केव्हाही बालसंस्कारवर्गाचे नाव उच्चारले की, ती मुद्रा करते आणि श्री गुरुदेव दत्त हा नामजप म्हणून दाखवते.

आपत्काळात ईश्‍वरच साधकांचे रक्षण करणार आहे, हे सूचित करणारी साधिकेला आलेली अनुभूती !

कु. मनीषा माहुर
१. स्वप्नात आश्रम नष्ट होत असून
३ देव साधकांच्या रक्षणासाठी आल्याचे दिसणे
    १.९.२०१५ या दिवशी सकाळी ९.३० ते ११ या कालावधीत मला एक स्वप्न पडले. त्यामध्ये मला पुढील दृश्य दिसले - आम्ही रहात असलेला आश्रम नष्ट होत आहे आणि तेथे केवळ अर्धे छप्पर आणि भूमी राहिली आहे. तो आश्रम एवढा पडला आहे की, त्यामधून आकाश दिसत आहे. आम्ही जेथे होतो, तेथे अगदी समोरच सूर्योदय झाला आहे आणि तेथून ३ देव साधकांच्या रक्षणासाठी आले आहेत. त्या देवांचा आकार लहान आहे आणि त्यांनी साधकांच्या रक्षणासाठी चारही बाजूंनी संरक्षक कवच निर्माण केले आहे. हा फारच मोठा आपत्काळ चालू आहे आणि तरीही साधकांचे मात्र रक्षण होत आहे.

सप्तर्षि जीवनाडीत सांगितल्याप्रमाणे सनातनच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांचा अहर्निश प्रवास !

महर्षींची शिकवण आणि कार्य !
     सनातनच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ मागील ४ वर्षांपासून भारतभरातील विविध राज्यांत दौर्‍यावर जात आहेत. हिंदु राष्ट्राची (सनातन धर्म राज्याची) शीघ्रतेने स्थापना व्हावी, राष्ट्र, धर्म, तसेच साधक यांचे रक्षण व्हावे आणि देवतांचा आशीर्वाद मिळावा, यासाठी सप्तर्षि जीवनाडीत सांगितलेल्या क्षेत्री जाण्याचे त्यांचे नियोजन असते. आतापर्यंत त्यांनी २४ राज्यांतील प्रवास करून तेथील वैशिष्ट्यपूर्ण दगड, माती, तीर्थ आदींचा संग्रह केला आहे.  त्यांनी नोव्हेंबर २०१६ पर्यंत ३ लक्ष ५६ सहस्र कि.मी. एवढा प्रवास करून भावी पिढीसाठी भारतातील अलौकिक समृद्ध ठेवा संग्रहित केला आहे. या दैवी प्रवासाची सर्वांना माहिती व्हावी, यासाठी हे सदर प्रसिद्ध करत आहोत.

एका संतांनी देहत्याग केल्यानंतर महर्षींनी त्यांना दिलेली आध्यात्मिक शक्ती प.पू. डॉक्टरांना देणे

१. एका संतांनी देहत्याग केल्यानंतर महर्षींनी त्यांना दिलेली
आध्यात्मिक शक्ती प.पू. डॉक्टरांकडे पाठवण्यास आरंभ केल्याने
प.पू. डॉक्टरांना चक्कर आल्यासारखे वाटत आहे, असे महर्षींनी सांगणे
सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ
    काही दिवसांपूर्वी एका संतांनी देहत्याग केला. त्यांच्या देहत्यागानंतर महर्षींनी त्यांना दिलेली आध्यात्मिक शक्ती प.पू. डॉक्टरांकडे पाठवण्यास आरंभ केला; कारण याच संतांकडे पूर्वी एकदा महर्षींनी नाडीवाचन केले होते. त्या वेळी महर्षींनी त्यांना आध्यात्मिक शक्ती दिली होती. आता या आध्यात्मिक शक्तीची आवश्यकता अधिकतर प.पू. डॉक्टरांना आहे; कारण प.पू. डॉक्टरांच्या कार्यात या शक्तीचा सहभाग आहे. या शक्तीमुळे जशी त्या संतांना प्रसिद्धी मिळाली, तशीच आता प.पू. डॉक्टरांनाही प्रसिद्धी मिळेल; म्हणून आता आम्ही ही शक्ती अधिक योग्य माणसाकडेच पाठवत आहोत, असे महर्षि म्हणाले.

बोधचित्र

संत भक्तराज सनातनचे श्रद्धास्थान
॥ हरि ॐ तत्सत् ॥
संतांकडून मिळवायच्या गोष्टी देण्यासाठी आमच्याकडे काहीच नाही. ज्याला घ्यायचे असेल, तो आमच्याकडून सर्वकाही घेऊ शकतो.
भावार्थ : देण्यासाठी आमच्याकडे काही नाही मधील काही शब्द व्यावहारिक गोष्टींच्या संदर्भात आहे. सर्वकाही घेऊ शकतो मधील सर्वकाही अध्यात्माच्या संदर्भातील आहे.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
     अहंभाव असलेले लेखापरीक्षक आणि अहंभावशून्य भगवंत लेखापरीक्षक काही व्यक्तींचे लेखा परीक्षण करतात आणि त्याचा त्यांना अहंभाव असतो. याउलट भगवंत अनंत कोटी ब्रह्मांडांतील प्रत्येक जिवाचा क्षणाक्षणाचा हिशोब (अकाऊंट) ठेवतो, तरी तो अहंशून्य आहे ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

स्नेही निर्धन असला तरी चालेल पण सदाचारी असावा !
धनवान स्नेही दुराचारी असेल, तर तो कधीही तुमचा विश्‍वासघात करू शकतो; पण तुमचा स्नेही सदाचारी असेल, तर तो कितीही निर्धन असला, तरी नित्य तुम्हाला साथच देतो.
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥

या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

व्हेनेझुएलामधील नोटाबंदी !

   व्हेनेझुएला हा दक्षिण अमेरिका खंडातील तेलसंपन्न देश. या देशाचे ९५ टक्के अर्थकारण हे तेलाच्या निर्यातीवर अवलंबून आहे. मागील काही काळात जागतिक बाजारपेठेत तेलाच्या किमती उतरल्या. एवढ्या की, या देशात वर्ष २०१४ मध्ये तेलाची किंमत प्रति बॅरल १०० डॉलर होती, ती नंतर ५० डॉलर एवढी घसरली. या वर्षाच्या शेवटी ती २६ डॉलर प्रति बॅरल होती. यावर्षी तेलनिमिर्तीतही घट झाली. व्हेनेझुएलाच्या अर्थकारणाला याचा मोठा फटका बसला. तेथील महागाईचा दर ५०० टक्क्यांपर्यंत पोचला. अमेरिकेच्या डॉलरच्या तुलनेत व्हेनेझुएलाचे चलन बोलिवरचे अवमूल्यन झाले. याहीपेक्षा तेथील मोठी समस्या म्हणजे तेथे नोट माफियांचा सुळसुळाट वाढला. व्हेनेझुएलाच्या चलनी नोटांची तस्करी करून ते शेजारी राष्ट्र कोलंबियामध्ये नेण्याचे उद्योग या नोट माफियांकडून चालतात. तेथील तस्कर या नोटांचा वापर करून व्हेनेझुएलात जीवनावश्यक वस्तूंची मोठ्या प्रमाणात खरेदी करून ते कोलंबियात विकतात. त्यामुळे हे नोट माफिया मालामाल होतात. या सर्व कारणांमुळे व्हेनेझुएलात भूकमारी वाढत आहे. या सर्व समस्या हाताबाहेर जात असतांना या देशाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांनी अर्थकारणाला उभारी येण्यासाठी काही कठोर पावले उचलत १०० बोलिवरच्या नोटा चलनातून काढून टाकण्याचा निर्णय घेतला. नोट माफियांना ताळ्यावर आणण्याचे त्यांचे लक्ष्य होते. यासाठी त्यांनी व्हेनेझुएला आणि कोलंबिया देशांची सीमारेषा बंद केली.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn