Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कोटी कोटी प्रणाम !मध्यप्रदेश येथील श्री अनंतानंद साईश यांचा महानिर्वाणोत्सव  
 ---------------------------------
मोरया गोसावी पुण्यतिथी

मध्यप्रदेशात सार्वजनिक मंदिराच्या व्यवस्थापनासाठी लवकरच नवीन कायदा !

मशिदी आणि चर्च यांच्या संदर्भात असा कायदा करण्याचे धाडस सरकार कधी दाखवणार ?
 • २५ सहस्र सार्वजनिक मंदिरांचे व्यवस्थापन सरकार पहाणार ! (राज्यकारभार योग्यप्रकारे करू न करणारे सरकार राज्यभरातील एवढ्या मोठ्या संख्येने असलेल्या मंदिरांचे व्यवस्थापन कसे पहाणार ? - संपादक)
 • वैदिक कर्मकांड जाणणारे पुजारीच मंदिरात पूजा करणार !
      भोपाळ - मध्यप्रदेशमध्ये शासकीय किंवा अर्पणात मिळालेल्या भूमीवर बांधण्यात आलेल्या सार्वजनिक मंदिरांचे व्यवस्थापन राज्य सरकार पहाणार आहे. याविषयीच्या कायद्याचे प्रारूप सिद्ध झाले आहे. हे प्रारूप विधानसभेच्या आगामी अंदाजपत्रकाच्या सत्रात पटलावर ठेवण्यात येणार आहे. राज्यात अशी २५ सहस्र मंदिरे असल्याचा अंदाज आहे. यातील २१ सहस्र मंदिरांची सूची सिद्ध झाली आहे. संस्कृती विभागाचे प्रमुख सचिव मनोज श्रीवास्तव यांनी याला दुजोरा दिला आहे.
१. या कायद्यानुसार मंदिराचे सध्याचे व्यवस्थापन आणि व्यवस्था यांच्यात कोणतेही पालट करण्यात येणार नाहीत.
२. मंदिराच्या संचालनासाठी प्रत्येक मंदिराची स्वतंत्र समिती असणार आहे. या समितीचे संचालन जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, उपविभागीय दंडाधिकारी, तहसीलदार आणि नायब तहसीलदार सांभाळणार आहेत.

पाककडून भारतीय चित्रपटांवरील बंदी हटवण्यात येणार !

      कराची - पाकिस्तानी फिल्म एक्सिबिटर्स आणि चित्रपटगृहांचे मालक यांनी भारतीय चित्रपटांच्या प्रदर्शनावर घातलेली बंदी उठवणार आहेत. उरी येथील आक्रमणानंतर पाकने ही बंदी घातली आहे. भारतीय चित्रपटांवर बंदी घातल्याने येथील व्यावसायिकांना तोटा होत आहे.

रांचीमध्ये विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार केल्यानंतर तिची हत्या करून मृतदेह जाळला !

     रांची - येथील आरटीसी इन्स्टिट्यूटमधील अभियांत्रिकीच्या १९ वर्षीय विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करून तिच्याच घरी तिचा मृतदेह जाळून टाकण्याची घटना समोर आली. (अशा नराधमांना न्यायालयाने फाशीचीच शिक्षा द्यायला हवी ! - संपादक)

अधिग्रहित मंदिरे आणि अंनिसचे आर्थिक घोटाळे यांविषयी कारवाई करू !

विधी आणि न्याय मंत्री डॉ. रणजीत पाटील यांचे आश्‍वासन
श्री. श्रीकांत पिसोळकर 
डावीकडून श्री. बाळासाहेब मुरकुटे, डॉ. रणजीत पाटील,
श्री. श्रीकांत पिसोळकर आणि श्री. अभय वर्तक
      नागपूर - अधिग्रहित मंदिर, अंनिसचे आर्थिक घोटाळे, तसेच सोलापूर जिल्ह्यातील अवैध पशूवधगृह हे विषय मला चांगल्या पद्धतीने माहिती असून मी यात लक्ष घालून योग्य कारवाई करतो, असे आश्‍वासन गृह विभागाचे विधी आणि न्याय राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी दिले. वरील विषयांंच्या संदर्भातील मागण्यांचे निवेदन सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांनी डॉ. पाटील यांना दिले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी भाजपचे आमदार श्री. बाळासाहेब मुरकुटे, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र प्रवक्ता श्री. अरविंद पानसरे आणि समितीचे विदर्भ समन्वयक श्री. श्रीकांत पिसोळकर हेही उपस्थित होते.
     सुयोग्य व्यवस्थापन देण्याच्या नावाखाली श्री तुळजाभवानी, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती आणि पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या अंतर्गत येणारी मंदिरे सरकारने अधिग्रहित केली आहेत. अशा शासननियंत्रित देवस्थानांत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार, सहस्रो एकर जमिनींचे घोटाळे, दान केलेल्या गायींचे मृत्यू अन् त्यांची कसायांना विक्री आदी अनेक अपप्रकार हिंदु जनजागृती समिती, हिंदु विधीज्ञ परिषद आणि अन्य भक्त यांनी वेळोवेळी पुराव्यानिशी उघड केले.
     परिणामी पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती आणि तुळजापूर देवस्थान समिती यांच्या घोटाळ्यांची राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून चौकशी चालू झाली; मात्र जाणीवपूर्वक वर्षानुवर्षे या चौकशा लांबवल्या जात आहेत.

जम्मू-काश्मीरमध्ये या वर्षात ८७ सैनिक हुतात्मा !

‘पाकने पोरखेळ थांबवला नाही, तर त्याचे १० तुकडे करू’, म्हणणारे 
गृहमंत्री राजनाथ सिंह यांना हुतात्मा सैनिक दिसत नाहीत का ?
     नवी देहली - जम्मू-कश्मीरमध्ये या वर्षात आतापर्यंत आतंकवाद्यांच्या आक्रमणात ८७ सैनिक हुतात्मा झाले आहेत. यात ८१ सैनिक, तर ६ अधिकारी यांचा समावेश आहे.
१. काश्मिरात २००८ नंतर २०१६ मध्ये हुतात्मा झालेल्या सैनिकांच्या संख्येत वाढ झाली आहे. सप्टेंबर महिन्यात उरी येथील सैन्याच्या तळावर झालेल्या आतंकवादी आक्रमणात १९ सैनिक हुतात्मा झाले होते.
२. २००८ मध्ये ९० सैनिक हुतात्मा झाले होते. २००९ मध्ये ७८, २०१० मध्ये ६७, २०११ मध्ये ३० सैनिक हुतात्मा झाले. २०१२ मध्ये सुरक्षा दलाचे १७ सैनिक हुतात्मा झाले. २०१३ मध्ये ६२, २०१४ मध्ये ५१ आणि २०१५ मध्ये ४१ सैनिक हुतात्मा झाले. (२००८ ते २०१४ पर्यंत काँग्रेसचे सरकार होते आणि तेव्हाही आतंकवाद्यांच्या आक्रमणात सैनिक हुतात्मा होत होते आणि आता काँग्रेसचे सरकार नसतांनाही सैनिक तसेच हुतात्मा होत आहेत, ही स्थिती कोणतेही सरकार आले, तरी पालटत नसल्याने हिंदु राष्ट्राच्या स्थापनेला पर्याय नाही, हेच दर्शवते ! - संपादक)

राजकीय पक्षांना २ सहस्रांहून अधिक रुपयांच्या देणगीचे स्रोत दाखवणे बंधनकारक करा ! - निवडणूक आयोगाची मागणी

काळ्या पैशावर रोख लावण्यासाठी नोटाबंदी करणार्‍या
केंद्र सरकारने ही मागणी लगेच पूर्ण करायला हवी !
     नवी देहली - निवडणुकीत काळ्या पैशाचा वापर थांबावा, यासाठी निवडणूक आयोगाने कायद्यांमध्ये पालट करण्याची सरकारकडे मागणी केली आहे. आयोगाच्या मते राजकीय पक्षांना २ सहस्र रुपयांहून अधिक रुपयांच्या देगणीचे स्रोत दाखवणे बंधनकारक केले पाहिजे. सध्या २० सहस्र रुपयांपर्यंत देणगी घेण्याला स्रोत सांगणे बंधनकारक नाही.
     त्याचप्रमाणे केवळ त्यांनाच देणगीच्या करामध्ये सवलत मिळावी जे राजकीय पक्ष निवडणूक लढवतात आणि विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला आहे.

राजकीय पक्षांना जुन्या नोटांमध्ये देणग्या घेता येणार नाहीत ! - अरुण जेटली

     नवी देहली - ३० डिसेंबरपर्यंत राजकीय पक्ष बँकांमध्ये ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या जुन्या नोटांमधील देणगीचे रोख पैसे जमा करू शकतात; मात्र त्या जुन्या नोटा देणगीच्या स्वरूपात त्यांना स्वीकारता येणार नाही; कारण त्या बाद करण्यात आल्या आहेत, असे स्पष्टीकरण अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिले आहे. तसेच जमा करण्यात आलेल्या नोटांच्या उत्पन्नाचे स्रोत सांगणे अपरिहार्य आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
     राजकीय पक्षांच्या खात्यात जमा होणार्‍या ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या जुन्या नोटांवर कोणताही कर लागणार नाही. राजकीय पक्षांना पहिल्यापासूनच आयकर कायद्यातून सूट आहे. एकीकडे सर्वसामान्य नागरिकांच्या खात्यात किती रक्कम जमा होते, त्यावर सरकार आणि आयकर विभागाचे लक्ष आहे. अतिरिक्त रक्कम जमा करणार्‍यांना मोठा दंड आणि कर लावण्यात येत आहे. मात्र राजकीय पक्षांच्या खात्यावरील रकमेविषयी विचारणाही होणार नाही, यावर आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. (देशातील राजकीय पक्षांना मिळणार्‍या देणग्या बहुदा रोकडच्या स्वरूपात दिल्या जातात; मात्र आयकर खात्याने कधी राजकीय पक्षांवर या संदर्भात धाडी टाकल्याचे ऐकिवात नाही.

‘वैद्यकीय आस्थापना कायदा २०१०’ पुढच्या अधिवेशनामध्ये लागू करू ! - आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत

 श्री. श्रीकांत पिसोळकर 
(उजवीकडे) आरोग्यमंत्री डॉ. दीपक
सावंत यांना निवेदन देतांना श्री. अभय वर्तक
      नागपूर - केंद्रशासनाने रुग्णांचे हित लक्षात घेऊन ‘वैद्यकीय आस्थापना कायदा २०१०’ (क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट अ‍ॅक्ट २०१०) हा संमत करून कार्यवाहीसाठी देशातील प्रत्येक राज्य सरकारला तसे अधिकार दिले आहेत. केंद्रशासनाने हा कायदा संमत करूनही यापूर्वीच्या राज्य सरकारच्या उदासीनतेमुळे तो राज्यात लागू होऊ शकलेला नाही. महाराष्ट्रासारखे स्वतःला पुरोगामी आणि पुढारलेले राज्य मात्र याविषयी फारच अनुत्सुक आहे. वैद्यकीय क्षेत्रात सहस्रो कोटींची उलाढाल होत असतांना त्यावर राज्यशासनाचे सक्षम नियंत्रण येण्यासाठी हा कायदा होणे अत्यंत आवश्यक आहे, अशा आशयाचे निवेदन सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांनी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांना दिले. त्यावर डॉ. सावंत यांनी ‘वैद्यकीय आस्थापना कायदा २०१०’ हा कायदा पुढच्या अधिवेशनामध्ये आम्ही राज्यामध्ये लागू करू’, असे आश्‍वासन दिले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र प्रवक्ता श्री. अरविंद पानसरे आणि समितीचे विदर्भ समन्वयक श्री. श्रीकांत पिसोळकर हेही उपस्थित होते.
निवेदनात कायद्याविषयी नूमद केलेली वैशिष्ट्ये
१. अनेक प्रथितयश आधुनिक वैद्य, पत्रकार, आमदार आणि सर्वसामान्य नागरिक असे अनेक जण हा कायदा व्हावा, म्हणून प्रयत्नशील आहेत.

वारकरी आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्या दणक्याने लोकमतची क्षमायाचना !

 • वारकर्‍यांनो, याचप्रकारे हिंदु धर्मावर होणार्‍या प्रत्येक आघाताचा सनदशीर मार्गाने निषेध करून तो परतवून लावा !
 • संत तुकाराम महाराज यांच्या संदर्भातील अयोग्य लिखाण प्रसिद्ध केल्याचे प्रकरण !
         सांगली - दैनिक लोकमत या वृत्तपत्राने १७ डिसेंबर या दिवशी संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाच्या शैलीचा वापर करून ३१ डिसेंबर साजरा करण्याच्या संदर्भातील अत्यंत आक्षेपार्ह असे लिखाण प्रसिद्ध केले होते. संतशिरोमणी जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या संदर्भात अशा प्रकारे आक्षेपार्ह लिखाण प्रसारित होताच, महाराष्ट्रात वारकर्‍यांसह तमाम भाविक समाजात संतापाची लाट पसरली. वारकर्‍यांच्या अनेक फेसबुक, व्हॉटस् अ‍ॅप गटात याचा निषेध चालू झाला. यात अनेकांनी दूरभाष करून दैनिक लोकमतच्या कार्यालयात निषेध नोंदवला. अनेकांनी लोकमतच्या बहिष्काराचेही आवाहन केले. अखेर दैनिक लोकमतने नमते घेत रविवार, १८ डिसेंबरच्या अंकात या संदर्भात लेखी खुलासा करून जाहीर क्षमायाचना केली. संतप्त प्रतिक्रिया ज्या भागात उमटल्या त्यात विशेषकरून आळंदी, भोसरी, देहू, चाकण, पंढरपूर यांसह वारकर्‍यांची संख्या अधिक असणार्‍या जिल्ह्यातून प्रतिक्रिया होत्या. सांगली जिल्ह्यात श्रीसंत सेवा वारकरी सांस्कृतिक प्रतिष्ठान, सांगलीवाडी यांनीही याचा निषेध केला.

हज यात्रेसाठी ८२६ कोटी रुपये देणारे आणि हिंदूंच्या तोंडाला पाने पुसणारे देशातील निधर्मी शासन ! - सौ. विद्या कदम, हिंदु जनजागृती समिती

डबेवाडी (जिल्हा 
सातारा) येथे हिंदु धर्मजागृती सभा 

मार्गदर्शन करतांना सौ. विद्या कदम

       सातारा, १८ डिसेंबर (वार्ता.) - सध्या हिंदूंना धर्मपरंपरांच्या रक्षणासाठी लढा द्यावा लागत आहे. शबरीमला मंदिर असो किंवा शनिशिंगणापूर मंदिर असो, तेथील मंदिरातील प्राचीन धर्मपरंपरा निधर्मी राज्यकर्ते मोडीत काढत आहेत. देशातील निधर्मी शासन हज यात्रेसाठी ८२६ कोटी रुपये देते; मात्र हिंदूंच्या तोंडाला पाने पुसते, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीच्या सौ. विद्या कदम यांनी केले. डबेवाडी (जिल्हा सातारा) येथील श्रीपद्मावती माता मंदिरामध्ये आयोजित करण्यात आलेल्या जाहीर हिंदु धर्मजागृती सभेत त्या बोलत होत्या. या वेळी व्यासपिठावर श्री. राहुल कोल्हापुरे उपस्थित होते.
       श्रीकृष्णाच्या प्रतिमेचे पूजन करून धर्मसभेला प्रारंभ झाला. मान्यवरांच्या हस्ते वक्त्यांचे सत्कार करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन कु. प्रियांका साळुंखे यांनी केले. समितीच्या कार्याची ओळख श्री. वैभव क्षीरसागर यांनी करून दिली. डबेवाडी आणि पंचक्रोशीतील १०० हून अधिक धर्माभिमानी हिंदूंनी सभेचा लाभ घेतला.

बिपीन रावत नवे सैन्यप्रमुख, तर बी.एस्. धनाओ वायूदलप्रमुख !

       नवी देहली - लेफ्टनंट जनरल बिपीन रावत यांची सैन्यदल प्रमुखपदी, तर वायूदल प्रमुखपदी बी.एस्. धनाओ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान सैन्यदलप्रमुख दलबीरसिंह सुहाग आणि वायूसेनाप्रमुख अरूप राहा हे ३१ डिसेंबरला सेवानिवृत्त होत आहेत. याचबरोबर गुप्तचर विभागाच्या प्रमुखपदी राजीव जैन यांची, तर अनिल धसमाना यांची रॉच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली होती.
       लेफ्टनंट जनरल बिपीन रावत यांची सैन्यदल प्रमुखपदी नियुक्ती केल्यावरून काँग्रेसने टीका केली आहे. रावत यांच्या क्षमतेवर आम्हाला अजिबात शंका नाही; मात्र त्यांना बढती देतांना इतर तीन वरिष्ठ अधिकार्‍यांना दृष्टीआड का केले गेले, याचा खुलासा सरकारने करायला हवा, असे काँग्रेसचे प्रवक्ते मनीष तिवारी यांनी म्हटले आहे. (हाच प्रश्‍न राहुल गांधी यांच्या संदर्भात काँग्रेसी नेत्यांना विचारला गेला, तर त्याचे उत्तर मिळेल का ? - संपादक)

पॅरोलवरून फरार झालेल्या साजिद पठाणला पकडण्यासाठी काय पावले उचलली ? - उच्च न्यायालय

पल्लवी पुरकायस्थ हत्या प्रकरण
       मुंबई - व्यवसायाने वकील असलेल्या पल्लवी पुरकायस्थच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आलेल्या साजिद मुगल पठाणला कह्यात (ताब्यात) घेण्यासाठी काय पावले उचलण्यात आली, अशी विचारणा करत उच्च न्यायालयाने राज्य सरकारला २१ डिसेंबरपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले. गेल्या वर्षी साजिद पठाणला विशेष न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. फेब्रुवारी २०१६ मध्ये नाशिक कारागृह प्रशासनाने त्याची पॅरोलवर सुटका केली. कारागृह प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, पठाण जम्मू-काश्मीरचा रहिवासी असल्याने त्याने आतापर्यंत देशाची सीमा पार केली असावी. (या घटनेवरून कारागृहांच्या कार्यप्रणालीवर प्रश्‍न निर्माण होतोे. - संपादक)

आखूड आणि बिनबाह्याचे कपडे परिधान करून येणार्‍यास प्रवेशबंदी !

मुंबईतील झेव्हिअर्स 
महाविद्यालयाची अभिनंदनीय कृती !
        मुंबई, १८ डिसेंबर - मुंबईतील झेव्हिअर्स महाविद्यालय प्रशासनाने आखूड आणि बिनबाह्यांचे कपडे परिधान करून महाविद्यालयात प्रवेश करण्यावर बंदी घातली आहे. याविषयीची पूर्वसूचना यापूर्वीच महाविद्यालयाने सूचना फलकावर लावून विद्यार्थ्यांना सूचित केले होते. आता या नियमांच्या अंमलबजावणीस प्रारंभ करण्यात आला आहे. या नियमांचे पालन न करणार्‍या विद्यार्थ्यांना सुरक्षा रक्षकांकरवी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारातूनच परत पाठवले जात आहे. महाविद्यालयात जीन्सचे कपडे घालून येण्याची अनुमती देण्यात आली असली, तरी फॅशन (नवरुढी) म्हणून फाटलेल्या आणि आखूड जीन्सचे कपडे घालून येण्याची अनुमती महाविद्यालय प्रशासनाने दिलेली नाही. (रुग्णालय, प्रयोगशाळा, कारखाने आदी सर्वच ठिकाणी त्या त्या क्षेत्राच्या अनुषंगाने पोषाख परिधान करण्यासाठी नियम असतात. त्याचप्रमाणे विद्या ग्रहण करण्यासाठी जाणार्‍या विद्यार्थ्यांसाठीही महाविद्यालयात वेशभूषेचे संकेत असणे अपरिहार्य आहे. - संपादक)

पाणी मागण्याच्या निमित्ताने घरात शिरून धर्मांधाचा बलात्कार करण्याचा प्रयत्न !

हिंंदूंनो, धर्मांधांना पाणीही 
द्यायचे का, याचा विचार करा !
        ठाणे, १८ डिसेंबर - पाणी मागण्याच्या निमित्ताने घरात घुसून भरदिवसा एका २८ वर्षीय महिलेला ठार मारण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न करणार्‍या धर्मांधाचा पोलीस शोध घेत आहेत. या प्रकरणी संबंधित महिलेने कोपरी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे. कोपरीतील गांधीनगर येथील के.एल्. कॉलनीत रहाणारा मोहम्मद आशू दिलशान कुरेशी याने महिला एकटी असल्याची खात्री करून पिण्यासाठी पाणी मागण्याच्या निमित्ताने घरात प्रवेश केला आणि महिलेचा गळा आवळून तिला ठार करण्याचे भय दाखवून बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. (संकटाला सामोरे जाण्याची वेळ केव्हाही येऊ शकते यासाठी प्रत्येक स्त्रीने स्वसंरक्षण प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे ! संपादक)

राज्यातील कोणत्याही विषयाच्या शिक्षकाला बेरोजगार होऊ देणार नाही ! - शिक्षणमंत्री विनोद तावडे

        नागपूर, १८ डिसेंबर (वार्ता.) - राज्याच्या शिक्षणामध्ये पालट करण्याचा प्रयत्न हा मुलांमध्ये गुणांची जोपासणे आणि शिक्षणाची गुणवत्तता वाढवणे यांसाठी आहे. शाळांमध्ये इंग्रजी आणि गणित हे विषय पर्यायी ठेवण्याचा विचार असून त्यावर अंतिम निर्णय घेतलेला नाही. हा निर्णय घेतांना राज्यातील कोणत्याही विषयाच्या शिक्षकाला बेरोजगार होऊ देणार नाही, असे आश्‍वासन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधान परिषदेत दिले. लोकभारती पक्षाचे आमदार कपिल पाटील यांनी शिक्षण खात्याविषयी अल्पकालीन चर्चेचा प्रस्ताव दिला होता. त्यावर उत्तर देतांना ते बोलत होते.
        तावडे पुढे म्हणाले की, राज्यातील शिक्षकांचा दर्जा वाढवून त्यांचा सन्मान होईल, असे कार्य शिक्षण खात्यातून केले जाईल. तसेच कोणत्याही शिक्षकांवर या शासनाच्या काळात अन्याय होणार नाही.

कोलंबियाला भूकंपाचा धक्का !

      बोगोटा (कोलंबिया) - १६ डिसेंबरच्या रात्री कोलंबियाला ४.५ तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला. भूकंपाचा केंद्रबिंदू भूगर्भात २४ कि.मी. खोल होता. भूकंपाची कंपने नैवा आणि बुगोट या शहरातही जाणवली.
महर्षींनी प्रलयकालाविषयी सतर्क करणे
     १९.३.२०१६ या दिवशी झालेल्या नाडीवाचन क्रमांक ६७मध्ये महर्षि म्हणतात, हे पूर्ण वर्ष प्रलयकालाचे आणि आपत्तीजनक असणारे आहे. (१६ डिसेंबरला रात्री कोलंबियाला ४.५ तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला. या घटनेवरून प्रलयकालाविषयी महर्षींनी केलेले भाष्य किती तंतोतंत आहे, हे लक्षात येते ! - संपादक)

धर्मांध मालकाने केलेल्या आम्ल आक्रमणात हिंदु कर्मचार्‍याचा मृत्यू !

हिंदूंनो, आणखी किती काळ धर्मांधांच्या 
आक्रमणांना तुम्ही बळी पडणार आहात ? 
त्यांच्यावर वचक राहील असे संघटन करा !
        मुंबई, १८ डिसेंबर - कारखान्यातील किरकोळ वादाचा राग मनात धरून धर्मांध मालक रफिक मोराब याने तेथील कर्मचारी आणि त्याचे कुटुंबीय यांच्यावर नोव्हेंबर २०१६ मध्ये केलेल्या आम्ल आक्रमणात गंभीररित्या घायाळ झालेले चंदन सिंग या कर्मचार्‍याचा उपचाराच्या वेळी नुकताच मृत्यू झाला. मागील मासात रफिक आणि चंदन सिंग यांच्यात वाद झाला. त्याचा डूख धरून रफिकने रात्री झोपलेले चंदन सिंग, त्याची पत्नी आणि चार वर्षांचा मुलगा यांच्यावर खिडकीतून आम्ल फेकले. त्यात यामध्ये चंदन सिंग ७० टक्के भाजले. या प्रकरणी आरोपी रफिक मोराब आणि त्याला साहाय्य करणार्‍या एका महिलेस पोलिसांनी अटक केली आहे.

अवैध बांधकामांवर कारवाई करतांना पोलीस उपनिरीक्षकास चार धर्मांधांकडून मारहाण !

आणखी किती दिवस पोलीस 
धर्मांधांचा मार खात रहाणार ?
        मुंबई, १८ डिसेंबर - वांद्रे पूर्व येथील अवैध बांधकामावर कारवाई करतांना बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस उपनिरीक्षकाला चार धर्मांधांनी बेदम मारहाण केल्याची घटना १५ डिसेंबरला घडली आहे. वांद्रे-कुर्ला संकुल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एम्.एम्.आर्.डी.ए.च्या जागेवर मोठ्या प्रमाणात अवैध बांधकामे करण्यात आली होती. या ठिकाणी अनधिकृत व्यवसाय चालू असल्याची माहितीही पोलिसांना मिळाली होती. एम्.एम्.आर्.डी.ए.ने येथील अतिक्रमणे हटवण्याचा अनेकदा प्रयत्न केला होता; मात्र स्थानिकांच्या गुंडगिरीमुळे त्यांना प्रत्येक वेळी माघारी फिरावे लागले होते. गुरुवारी पोलीस संरक्षणात अतिक्रमणे हटवण्याची कारवाई करण्यास आरंभ करताच एकाच कुटुंबातील चार धर्मांधांनी पोलीस उपनिरीक्षक वाव्हळ यांच्यावर बांबू आणि लाथा-बुक्क्यांनी आक्रमण केले. अन्य पोलीस कर्मचारी साहाय्यासाठी येण्यापूर्वीच वाव्हळ गंभीररित्या घायाळ झाले. (धर्मांधांना पोलीस प्रशासनाचे भय वाटत नाही, म्हणूनच पोलिसांना जागोजागी त्यांच्याकडून मार खाण्याची नामुष्की येते. ही स्थिती सुधारण्यासाठी राज्याचे गृहखाते काही ठोस उपाययोजना करणार आहे का ? संपादक) मारहाण करून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी नासीर मणियार, जाकीर मणियार, रुक्साना मणियार आणि अबिदा मणियार यांच्या विरोधात गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्यात आली आहे.

ईस्ट खानदेश एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षांवर चौकशीच्या आधारे कारवाई करणार ! - विनोद तावडे

संस्थाचालकांकडून शिक्षकांना दिल्या 
जाणार्‍या त्रासावर उपाय म्हणून 
शासन सर्वंकष धोरण सिद्ध करणार का ?
        नागपूर, १८ डिसेंबर (वार्ता.) - जळगाव येथील ईस्ट खानदेश एज्युकेशन सोसायटीद्वारा संचालित रावसाहेब रूपचंद विद्यालयाच्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेतील अनेक शिक्षक अन् शिक्षकेतर कर्मचारी यांनी संस्थेच्या अध्यक्षांकडून त्रास देण्यात येत असल्याची तक्रार केली आहे. या तक्रारीच्या अनुषंगाने प्राथमिक चौकशी करण्यात आली असून त्यामध्ये तथ्य असल्याचे आढळून आले आहे. त्यानुरूप त्या अध्यक्षांची चौकशी करण्यात येत आहे. त्याच्या आधारे सोसायटीच्या अध्यक्षांवर कारवाई करण्यात येईल, असे आश्‍वासन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले. विधान परिषदेमध्ये भाजप आमदार स्मिता वाघ यांनी ईस्ट खानदेश एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षांकडून शिक्षकांना दिल्या जाणार्‍या त्रासाविषयी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावर उत्तर देतांना तावडे यांनी वरील आश्‍वासन दिले.

३१ डिसेंबरच्या निमित्ताने अपप्रकार रोखण्यासाठी योग्य ते प्रयत्न करू ! - ईश्‍वरपूर तहसीलदार

तहसीलदारांना (डावीकडे) निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ
ईश्‍वरपूर - ३१ डिसेंबरच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखण्यासाठी प्रशासनाने योग्य ती पाऊले उचलवीत, या मागणीसाठी ईश्‍वरपूर येथे हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने तहसीलदार श्रीमती सविता लष्करे यांना निवेदन देण्यात आले. यावर तहसीलदारांनी सकारात्मक प्रतिसाद देत अपप्रकार रोखण्यासाठी योग्य ते प्रयत्न करू, असे सांगितले. तहसीलदारांनी समितीच्या कार्यकर्त्यांचे संपर्क क्रमांक घेत आवश्यकता लागल्यास दूरभाष करू, असेही सांगितले. या वेळी हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री स्वप्नील माळी, प्रशांत पाटील, तसेच हिंदु जनजागृती समिती यांचे कार्यकर्ते आणि सनातन संस्थेचे साधक उपस्थित होते.अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांंचे मानधन ऑनलाईन पद्धतीने देणार ! - महिला आणि बाल विकास मंत्री पंकजा मुंडे

विधान सभेतील प्रश्‍नोत्तरे...
     नागपूर - राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना त्यांचे मानधन देण्यास विलंब होऊ नये, यासाठी त्यांचे आधारकार्ड लिंक करून ऑनलाईन पद्धतीने त्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्यात येईल. मूर्तिजापूर (जिल्हा अकोला) येथील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे मानधन देण्यास विलंब करणार्‍या लिपिकास निलंबित करण्यात आले आहे. अधिक चौकशीत तो दोषी आढळल्यास त्यास बडतर्फ करू, अशी माहिती महिला आणि बाल विकास मंत्री सौ. पंकजा मुंडे यांनी १६ डिसेंबर या दिवशी विधानसभेत दिली. हा प्रश्‍न सदस्य श्री. गोवर्धन शर्मा यांनी विचारला होता.

नागपूर येथील स्मृती मंदिरास भेट देण्यासाठी ७ आमदारांसाठी २ बसगाड्यांची सोय !

      नागपूर - भाजपचे आमदार आणि मंत्री यांनी रेशीमबाग स्मृती मंदिरास भेट दिली. त्यासाठी केवळ ७ आमदारांसाठी चक्क दोन ग्रीन बसगाड्यांची व्यवस्था महापालिमका अधिकार्‍यांनी केली होती. बहुतांश आमदार चारचाकी वाहनाने स्मृती मंदिरात गेले. परतीच्या प्रवासात केवळ एक आमदार या बसमध्ये उपस्थित होता. बस रिकामी जात असल्याचे पाहून मग दोन माजी आमदार आणि त्यांच्या समवेतचे कार्यकर्ते त्यात बसले. एक बस रिकामीच गेली.

मुंबई येथे ६ मार्चला अर्थसंकल्पीय अधिवेशन !

हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजले !
        नागपूर, १८ डिसेंबर (वार्ता.) - ५ डिसेंबरपासून चालू झालेल्या हिवाळी अधिवेशनाचे १७ डिसेंबर या दिवशी सूप वाजले. आता पुढील अर्थसंकल्पीय अधिवेशन म्हणजे उन्हाळी अधिवेशन ६ मार्च २०१७ या दिवशी मुंबई येथे होईल, अशी घोषणा विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी विधानसभेत केली. चालू सत्रातील कामकाजाचा आढावा घेतांना श्री. बागडे यांनी एकूण १० दिवसांत विधानसभेत ६६ घंटे ४० मिनिटे म्हणजे प्रतीदिन सरासरी ६ घंटे ४० मिनिटे कामकाज झाले. ३ घंटे १० मिनिटे वेळा वाया गेला. विधानसभेत मांडलेली २३ विधेयके मान्य करण्यात आली, तर ४४१ तारांकित प्रश्‍न, ८२ लक्षवेधी, अर्धा घंटा चर्चा उपस्थित करण्यात आल्या आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

कल्याण-डोंबिवली महापालिकेतील भ्रष्ट अधिकार्‍यांना बडतर्फ करण्याची विधानसभेत मागणी

      कल्याण - कल्याण-डोंबिवली महापालिकेतील लाचखोर अधिकार्‍यांचे सूत्र नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात उपस्थित करून भ्रष्टाचारी अधिकार्‍यांना बडतर्फ करण्याची मागणी कल्याण पूर्व येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जगन्नाथ (आप्पा) शिंदे यांनी केली होती. गेल्या महिन्याभराच्या कालावधीत कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या ३ अधिकार्‍यांना लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले आहे. गेल्या दोन दशकांत आजपर्यंत २६ जण लाच घेतांना पकडले आहे, तर त्यातील एका अधिकार्‍यांना दोन वेळा पकडण्यात आले आहे.
      या संदर्भात विचारणा करणारे पत्र शासनाने कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाला पाठवले आहे. या पत्रामुळे महापालिकेच्या अधिकार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे.

आतंकवाद्यांवर कारवाई न करण्यावरून पाक न्यायालयाच्या आयोगाने पाक सरकारला फटकारले !

     इस्लामाबाद - क्वेटा येथे झालेल्या आत्मघाती आक्रमणात ७४ जण ठार झाले होते. त्याच्या चौकशीसाठी पाकच्या सर्वोच्च न्यायालयाने आयोगाची स्थापना केली होती. या आयोगाने बंदी घालण्यात आलेल्या आतंकवादी संघटनांच्या आतंकवाद्यांवर कारवाई न करण्यावरून पाक सरकारला फटकारले आहे. आतंकवादविरोधी कायद्यांतर्गत लवकरात लवकर आतंकवादी संघटनांवर बंदी घातली गेली पाहिजे. केवळ कागदावर नोंद न करता प्रत्यक्षात कृती करावी, अशा शब्दांत आयोगाने पाक सरकारला फटकारले आहे. 
     पाकिस्तानात शांतता नांदावी, असे वाटत असेल आणि सुसंवाद वाढवायचा असेल, तर कायदा आणि राज्यघटनेची पुनर्स्थापना करण्याची आवश्यकता आहे, असे आयोगाने त्याच्या अहवालात म्हटले आहे. परदेशात रहाणार्‍यांमध्ये सर्वाधिक भारतीय नागरिक !

    वॉशिंग्टन - १ कोटी ५६ लाख भारतीय नागरिक परदेशात रहात आहेत, अशी माहिती प्यू रिसर्चच्या अहवालातून समोर आली आहे. या अहवालानुसार अन्य देशांमध्ये स्थलांतर करणार्‍या नागरिकांच्या सूचीत भारत प्रथम क्रमांकावर आहे. 
 • आंतरराष्ट्रीय प्रवासी दिनाच्या निमित्ताने आकडेवारी घोषित करण्यात आली आहे. जागतिक लोकसंख्येच्या ३.३ टक्के लोक आंतरराष्ट्रीय स्थलांतरित आहेत. जगातील हे लोक एकाच देशात राहिले असते, तर तो जगातील ५ वा सर्वांत मोठा देश असला असता. या देशात २४.४ कोटी नागरिक असले असते.
 • वर्ष २०१५ पर्यंतच्या आकडेवारीनुसार ३५ लाख भारतीय नागरिक संयुक्त अरब अमिरातमध्ये रहातात. वर्ष १९९० नंतर यात मोठी वाढ झाली.
 • इतर देशांच्या तुलनेत अमेरिकेत सर्वाधिक म्हणजे ४ कोटी ६६ लाख स्थलांतरित नागरिक रहातात.३१ डिसेंबरला होणारे अपप्रकार रोखण्यासाठी रायगड जिल्ह्यात पोलीस आणि प्रशासन यांना निवेदन !

      रायगड - ३१ डिसेंबरला होणारे अपप्रकार रोखण्यासाठी पोलीस आणि प्रशासन यांनी योग्य ती काळजी घ्यावी, अशा आशयाचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी देण्यात आले.
पेण येथील तहसीलदार श्रीमती वंदना मकु
(डावीकडे) यांना निवेदन देतांना कार्यकर्त्या

पनवेल
     येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सुनील बाजारे आणि नायब तहसीलदार सौ. कल्याणी कदम यांना निवेदन देण्यात आले. या वेळी समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
महाड
     येथे पोलीस ठाणे आणि तहसीलदार, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. धनाजी गुरव यांनाही निवेदन देण्यात आले. या वेळी समितीच्या कार्यकर्त्यांसमवेत महाड येथील शिवसेनेचे कार्यकर्ते श्री. अजय मांगडे हेही उपस्थित होते.
पेण
     येथेही तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. कळंबोली येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. पोपेरे आणि के.एल्.ई महाविद्यालयाचे प्राचार्य यांना निवेदन दिले.

आज रणरागिणी शाखेच्या वतीने कोल्हापूर येथे आंदोलन !

        कोल्हापूर - ३१ डिसेंबरच्या निमित्ताने होणार्‍या अपप्रकारांना विरोध करा आणि पुणे येथे होणारा सनबर्न फेस्टिव्हल रहित करा, या मागण्यांसाठी जनप्रबोधन करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेने कोल्हापूर येथे एका आंदोलनाचे आयोजन केले आहे. तरी संस्कृतीरक्षणाच्या या मोहिमेत युवती, महिला यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन रणरागिणी शाखेच्या वतीने करण्यात येत आहे.
स्थळ : छत्रपती शिवाजी महाराज चौक, कोल्हापूर
वेळ : दुपारी १२

सरकारच्या निर्णयाच्या विरोधात जनता रस्त्यावर उतरली !

 • भारतात ५०० आणि १ सहस्र रुपये मूल्यांंच्या नोटा बंद करण्यात आल्या; पण १२५ कोटी लोकसंख्येच्या या देशात जनतेने राष्ट्राच्या भल्यासाठी सरकारचा निर्णय स्वीकारला. व्हेनेझुएलाच्या उदारहरणावरून भारतीय जनतेची परिपक्वता लक्षात येते !
 • व्हेनेझुएलामध्ये नोटाबंदी !
 • लूटमार आणि जाळपोळ, अनेकांना अटक 
      व्हेनेझुएला - भारताच्या नोटाबंदीनंतर व्हेनेझुएलाच्या सरकारनेही देशातील सर्वाधिक चलनात असणार्‍या १०० बोलिवरच्या नोटा बंद करून त्याऐवजी नाणे आणण्याचा निर्णय घेतला. सरकारचा हा निर्णय लोकांच्या गळी न उतरल्याने त्यांनी या निर्णयाला मोठ्या प्रमाणावर विरोध चालू केला. व्हेनेझुएलाच्या लोकांनी रस्त्यावर उतरून लूटमार आणि जाळपोळ केली. हैदोस घालणार्‍या लोकांना नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, तसेच अनेकांना अटक केली आहे. 
 • मागील आठवड्यातच देशातील सर्वाधिक मोठ्या चलनातील नाणी पालटण्याचा निर्णय घेण्यात येईल, अशी व्हेनेझुएला सरकारने घोषणा केली होती. 
 • काळा पैसा आणि नोट माफिया यांना नियंत्रित करण्यासाठी चलन पालटण्याचा निर्णय घेतल्याचे सरकारने म्हटले आहे.
 • सरकारच्या या निर्णयानंतर लोकांना आता क्रेडिट कार्ड आणि ‘बँक ट्रान्सफर’ च्या माध्यमातून खरेदी करावी लागत आहे. त्यामुळे किरकोळ खरेदीसाठी लोकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. 
 • आता १०० बोलिवर नोटेची किंमत केवळ २ अमेरिकी सेंट एवढी झाली आहे. 
 • जुन्या नोटा पालटण्यासाठी लोकांनी बँकांच्या बाहेर रांगा लावल्या आहेत.

केरळमध्ये राष्ट्र्रगीताचा अवमान करणार्‍या ११ जणांना अटक !

देशात प्रत्येकाला विद्यार्थीदशेतच खरा इतिहास शिकवला असता, 
तर जनतेत राष्ट्रप्रेम निर्माण होऊन त्यांनी राष्ट्रगीताचा सन्मान ठेवला असता ! 
थिरुवनंतपुरम् (केरळ) - राष्ट्र्रगीत चालू झाल्यानंतर त्याच्या सन्मानार्थ उभे न रहाता बसून रहाणार्‍या ११ जणांना अटक करण्यात आली. यात २ महिलांचाही समावेश आहे. अटकेनंतर या सर्वांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. ‘इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ केरळ’च्या वेळी अरेबिक चित्रपट ‘क्लॅश’चा ‘निशा गांधी ऑडिटोरिअम्’मध्ये खेळ आयोजित करण्यात आला होता. या वेळी राष्ट्रगीत चालू झाल्यानंतर ६ जण त्यांच्या जागेवरच बसून असल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्यांमधील काही जणांनी ते उशिरा पोचल्याने जागा शोधण्यात व्यस्त असल्याचे कारण दिले.

मीरा-भाईंदर महापालिकेतील घरांच्या महाघोटाळ्यातील संबंधितांवर कारवाई व्हावी ! - नीतेश राणे

विधानसभा लक्षवेधी...
     नागपूर - मीरा-भाईंदर महापालिकेत गरिबांना युएल्सी अंतर्गत घरे बांधण्याच्या असलेल्या भूमींच्या धोरणाला हरताळ फासत त्यासाठी असलेल्या भूमी २८ खाजगी बांधकाम व्यावसायिकांनी खोटी ओसी देऊन विकल्या, असा आरोप आमदार नीतेश राणे यांनी केला. विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून सर्वांत मोठा शासकीय भूमीचा घोटाळा समोर आणण्याचा प्रयत्न केला असल्याचेही ते म्हणाले. या घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार आणि बनावट कागदपत्रे आणि भूमीची ओसी देणारे नगररचनाकार दिलीप घेवारे यांना त्वरित बडतर्फ करावे आणि संबंधित विकासकांना काळ्या सूचीत टाकून त्यांच्यावर एम्आर्टीपी अंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी नीतेश राणे यांनी केली.
    या प्रश्‍नावर नगरविकास राज्य मंत्री डॉ. रणजीत पाटील म्हणाले, घेवारे यांचे नाव समोर आल्यास त्यांची चौकशी केली जाईल. जर अपप्रकार समोर आला, तर त्यांना बडतर्फही केले जाईल. शिवसेनेचे प्रताप सरनाईक यांनी या मोठ्या घोटाळ्याचे हे एक हिमनगाचे टोक असून मीरा-भाईंदर येथे बनावट कागदपत्रे सिद्ध करून मोठ्या प्रमाणात व्यवहार केला जात आहे, असे सांगितले.

मुंबईमध्ये वाहतूक हवालदाराला समर खान या मुसलमानाकडून मारहाण

     मुंबई - चित्रपट निर्माते फिरोझ नडियादवाला यांचा धर्मांध अंगरक्षक समर खान याने क्षुल्लक कारणावरून वाहतूक पोलीस हवालदार बाबू पाटील यांना गंभीर मारहाण केली. याप्रकरणी त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहेे; मात्र समर खान फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. मारहाणीत पाटील यांची मान आणि पाय यांना दुखापत झाली. (अल्पसंख्यांक धर्मांध गुन्हेगारीत मात्र सर्वांत पुढे ! - संपादक)
     फिरोझ नडियादवाला यांनी त्यांची गाडी डबल पार्किंगमध्ये लावल्याने वाहतूक पोलीस हवालदार बाबू पाटील यांनी गाडी काढण्यास सांगितले. त्याचा राग आल्याने समर खान याने मारहाण केली.

माहिती-तंत्रज्ञानाच्या शिक्षणासाठी मान्यता न घेणार्‍या शाळा आणि महाविद्यालये यांना राज्य शिक्षण मंडळाकडून नोटीस !

      मुंबई - विद्यार्थ्यांना माहिती आणि तंत्रज्ञान या विषयाचे शिक्षण देण्यासाठी मान्यता न घेतल्याने मुंबई विभागीय मंडळातील ७० हून अधिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालये यांना राज्य शिक्षण मंडळाने नोटीस पाठवली आहे.
     राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने काही वर्षांपूर्वी १२ वीच्या विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञान (आयटी) हा विषय अनिवार्य करण्यात आला होता. त्यासाठी शिक्षण मंडळाची मान्यता घेणे आवश्यक होते; मात्र मुंबईतील काही शाळा आणि महाविद्यालये यांनी केवळ एका तुकडीची अनुमती घेऊन विद्यार्थ्यांच्या ४ ते ५ तुकड्या चालू केल्या. या शिक्षण संस्थांना गेल्या वर्षी मंडळाने नोटीस पाठवूनही त्यांनी यात सुधारणा केली नाही. त्यामुळे ३१ डिसेंबरपर्यंत त्यांना शेवटची संधी देण्यात आली आहे, अशी माहिती राज्य शिक्षण मंडळाचे मुंबई विभागाचे सचिव एस्. चांदेकर यांनी दिली.

योगऋषी रामदेवबाबा यांच्या पतंजली आस्थापनाला ११ लाख रुपयांचा दंड !

दिशाभूल करणार्‍या विज्ञापनाचे प्रकरण
     हरिद्वार - योगऋषी रामदेवबाबा यांच्या पतंजली आयुर्वेद लिमिटेड आस्थापनाला चुकीच्या आणि अपसमज पसरवणार्‍या विज्ञापनासाठी ११ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. दुसर्‍याचे उत्पादन स्वत:च्या नावावर खपवल्याचा पतंजलीवर आरोप आहे. ‘मिसब्रँडिंग’च्या एकूण ५ प्रकारांत पतंजली दोषी ठरल्याने हरिद्वारच्या न्यायालयाने पतंजलीच्या ५ उत्पादनांना हा दंड ठोठावला आहे. हा दंड एका महिन्याच्या आत भरायचा आहे. भविष्यात या उत्पादनांच्या बाबतीत सुधारणा झाली नाही, तर योग्य ती कारवाई करण्याचे आदेशही न्यायालयाने अन्नसुरक्षा विभागाला दिले आहेत. १६ ऑगस्ट २०१२ या दिवशी पतंजलीचे मध, मीठ, तिळाचे तेल, जॅम आणि बेसन या उत्पादनांचे नमुने तपासणीसाठी पाठवले असता सदोष आढळले होते. नमुन्यांची तपासणी उत्तराखंडच्या रुद्रपूर येथील अन्न आणि औषध चाचणी प्रयोगशाळेत झाली होती.
    अन्न सुरक्षा आणि मानके कायदा, २००६ च्या कलम ५२ (ब्रँडिंगविषयी दिशाभूल), कलम ५३ (दिशाभूल करणारे विज्ञापन) आणि अन्न सुरक्षा आणि दर्जा (पॅकेजिंग आणि लेबलिंग नियंत्रण कायदा, २०११) कायद्याच्या २३.१(५) या कलमांखाली पतंजलीला हा दंड ठोठावण्यात आला आहे. गायीला राष्ट्रमातेचा दर्जा मिळावा, यासाठी संत गोपाल मणि महाराज यांची ‘गो प्रतिष्ठा’ यात्रा !

संत गोपाल मणि महाराज यांचे 
आशीर्वाद घेतांना श्री. योगेश व्हनमारे
     उज्जैन - केंद्र सरकारने गायीला राष्ट्रमातेचा दर्जा द्यावा आणि देशात गोमंत्रालयाची निर्मिती करावी, याकरता उत्तराखंडचे संत गोपाल ‘मणि’ महाराज यांनी ९ मे पासून देशभरात ‘गो प्रतिष्ठा’ यात्रा चालू केली आहे. ही यात्रा १६ डिसेंबरला उज्जैन येथे आली असता चिमनगंज मंडी पटांगणात झालेल्या मार्गदर्शनात त्यांनी लोकांना गोरक्षणासाठी आवाहन केले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. योगेश व्हनमारे यांनी राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यासाठी महाराजांचे आशीर्वाद घेतले. आतापर्यंत या यात्रेने ७ राज्यांतून भ्रमण केले असून ती ८ वे राज्य मध्यप्रदेशमध्ये फिरत आहे. 
देशभरातील ६७६ जिल्ह्यांतून गोमातेचा प्रचार केल्यावर १८ फेब्रुवारी २०१८ या दिवशी देहलीमध्ये या यात्रेचा समारोप होणार आहे. त्यानिमित्ताने देशातील १ कोटी लोकांच्या समर्थनासह गोकुंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी केंद्र सरकारला गोरक्षणाशी संबंधित मागण्यांचे निवेदन देण्यात येणार आहे.

४ बँकांनी अडीच वर्षांत १२ सहस्र ३५७ कोटी रुपये देशाबाहेर पाठवले !

 • ‘ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स’, ‘आयसीआयसीआय बँक’, ‘बँक ऑफ बडोदा’ आणि ‘इंडसइंड बँक’ यांच्या विरोधात गुन्हे प्रविष्ट 
 • देशातील भ्रष्टाचार संपवण्यासाठी केवळ नोटाबंदीच नाही, तर संपूर्ण व्यवस्थाच पालटणे आवश्यक आहे ! यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करा !
      नवी देहली - जानेवारी २०१४ ते जून २०१६ या अडीच वर्षांत चार बँकांनी मिळून १२ सहस्र ३५७ कोटी रुपये देशाबाहेर पाठवले असल्याचे अंमलबजावणी संचालनालयाला आढळून आले आहे. ही रक्कम केवळ चार बँकामधील ५ प्रकरणांमधीलच आहे. वास्तवात याहून अधिक रक्कम बाहेर पाठवली गेली असण्याची शक्यता आहे. हे पैसे कोणाचे आहेत आणि कुठे पाठवण्यात आले आहेत, याविषयी अद्याप कळू शकले नाही.
 • टाइम्स ऑफ इंडियानुसार याप्रकरणी ‘ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स’च्या विरोधात २ गुन्हे, तर ‘आयसीआयसीआय बँक’, ’बँक ऑफ बडोदा’ आणि ’इंडसइंड बँक’ यांच्या विरोधात प्रत्येकी एक गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. 
 • हे सर्व गुन्हे ‘प्रिव्हेंशन ऑफ मनी लॉन्ड्रिंग अ‍ॅक्ट २००२’ अंतर्गत प्रविष्ट करण्यात आले आहेत. यांतील ‘ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स’ आणि ‘बँक ऑफ बडोदा’ या राष्ट्रीयकृत बँका आहेत. 
 • अन्वेषणामध्ये काही बँक अधिकार्‍यांचे संगनमत असल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले असल्याचे संचालनालयाने म्हटले आहे.
 • यापूर्वी ५०० बँकांच्या शाखांवर लक्ष असल्याचे गुप्तचर खात्याने म्हटले होते.

भाग्यनगर येथे अश्‍लील आणि ‘इसिस’च्या चित्रफिती पहाणार्‍या ६५ अल्पवयीन मुलांना अटक !

अश्‍लील आणि आतंकवाद्यांच्या हिंसक चित्रफिती पहाणार्‍या विद्यार्थ्यांमधून उद्या आतंकवादी निपजल्यास आश्‍चर्य नाही ! त्यांचा सामना सरकार कसा करणार ?
     भाग्यनगर (हैद्राबाद) - अश्‍लील चित्रपट आणि ‘इसिस’ या जिहादी आतंकवादी संघटनेच्या हिंसक चित्रफिती पहाणार्‍या ६५ अल्पवयीन मुलांना पोलिसांनी अटक केली. या मुलांचे समुपदेशन करण्यात येत आहे. त्यांतील बहुतांश मुलांचे वय ११ वर्षांच्या जवळपास आहे. या समुपदेशनाच्या वेळी त्यांच्या पालकांनाही बोलावण्यात आले होते. 
      प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार या सर्व मुलांना याच आठवड्यात भाग्यनगरच्या विविध सायबर कॅफेत अश्‍लील चित्रफट पहातांना पकडण्यात आले होते. अल्पवयीन मुले सायबर कॅफेत अधिक काळ घालवतात, अशी मुलांच्या पालकांकडून पोलिसांकडे तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी या मुलांवर लक्ष ठेवले होते. या पालकांच्या मते सर्व मुले संकेतस्थळावर गृहपाठ करण्याच्या निमित्ताने घरातून बाहेर पडत होती. याकरता १०० सायबर कॅफेंचा तपास करण्यात आला. दोषी कॅफेंच्या विरोधातही विविध गुन्हे प्रविष्ट करण्यात आले आहेत.

मुंबई महापालिकेच्या कारभारात पारदर्शकता नाही - मुख्यमंत्री

     मुंबई महापालिकेत विविध घोटाळे उजेडात आले आहेत. महापालिकेच्या कारभारात पारदर्शकता नाही. त्यामुळे महापालिकेच्या कारभारावर अधिक नियंत्रण आणण्याची आणि पारदर्शी कारभार ठेवण्याची आवश्यकता आहे, असे मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले.
     तसेच नगराध्यक्षांप्रमाणे लवकरच राज्यातील ड वर्ग महापालिकांच्या महापौरांचीही निवड थेट जनतेतून करण्याचे संकेतही मुख्यमंत्री फडणवीस यांनी अधिवेशनाच्या समारोपाच्या प्रसंगी झालेल्या पत्रकार परिषदेत दिले.

फलक प्रसिद्धीकरता

धर्मनिरपेक्ष भारतात मशिदी-चर्चचे व्यवस्थापनही सरकार कह्यात का घेत नाही ?
     मध्यप्रदेशमध्ये सार्वजनिक मंदिरांचे व्यवस्थापन राज्य सरकार पहाणार आहे. याविषयीच्या कायद्याचे प्रारूप सिद्ध झाले आहे. राज्यात अशी २५ सहस्र मंदिरे असल्याचा अंदाज आहे. यातील २१ सहस्र मंदिरांची सूची सिद्ध झाली आहे.

हिंदू तेजा जाग रे !

Jago !
     Madhya Pradesh Sarkar 25,000 mandiro ko apne adhikar me legi. - Dharmanirpeksha Bharat me masjido aur churcho ke liye bhi yah niyam lagu ho !
जागो !
मध्यप्रदेश सरकार २५,००० मंदिरों को अपने अधिकार में लेगी । - धर्मनिरपेक्ष भारत में मस्जिदों और चर्चों के लिए भी यह नियम लागू हो !

वायूदलात दाढीविना कपाळावर टिळा लावण्यासही प्रतिबंध !


वायूदल सर्वधर्मसमभावी आहे, हे दाखवण्याचा हा प्रयत्न आहे. टिळा लावल्यामुळे संबंधित व्यक्तीला आध्यात्मिक स्तरावर लाभ होऊन त्याला चैतन्य मिळते. दाढी वाढवल्यामुळे असे होते का ? हिंदु राष्ट्रातील राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी हिंदु सैनिकांना धर्माचरणाची पूर्ण मुभा देण्यात येईल. 
     नवी देहली - भारतीय वायूदलाच्या सेवेत असतांना केवळ दाढीच नाही, तर कपाळावर टिळा लावणे, विभूती लावणे, हातावर कोणत्याही प्रकारचा धागा बांधणे आणि कानात कुंडल घालणे आदी गोष्टींवरही नियमानुसार प्रतिबंध घालण्यात आल्याचे नुकतेच समोर आले आहे. सेवेत असतांना दाढी ठेवण्याची अनुमती मिळावी, याकरता मकतुम हुसेन यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केलेल्या याचिकेच्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाने या नियमांचा संदर्भ दिला. अर्थात ही याचिका न्यायालयाने फेटाळून लावली होती. 
      धार्मिक ओळख टाळण्यासाठी केवळ मुसलमानांनाच नाही, तर हिंदू आणि शीख यांनाही दाढी ठेवता येत नाही. भारतीय वायूदलातील धोरणाचे फेब्रुवारी २००३ मध्ये नूतनीकरण करण्यात आले होते. या धोरणानुसार १ जानेवारी २००२ च्या पूर्वी नोकरीवर रुजू होतांना ज्यांनी दाढी ठेवली होती, त्यांना पुढेही दाढी ठेवण्याची अनुमती देण्यात आली आहे. सैन्याच्या एका वरिष्ठ कायदेविषयक अधिकार्‍याने सांगितल्यानुसार रमझानच्या मासात मुसलमान दाढी ठेवू शकतात; मात्र ईदनंतर त्यांना दाढी काढणे बंधनकारक आहे. ज्या शिखांनी नोकरीवर रुजू होतांना दाढी ठेवली होती, त्यांना सेवेत दाढी ठेवण्याची अनुमती आहे.

धार्मिक आधारावर मुसलमान सैनिकास दाढी ठेवू देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार !

     नवी देहली - धार्मिक आधारावर दाढी वाढवल्याने मकतुम हुसेन या सैनिकाला भारतीय वायूदलातून निलंबित करण्यात आले होते. या निलंबनाच्या विरोधात त्यांनी सर्वोच्च न्यायालयात प्रविष्ट केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. ‘वायूदलाचे कर्मचारी सेवेत असेपर्यंत दाढी वाढवू शकत नाहीत’, असे न्यायालयाने म्हटले आहे. यापूर्वी कर्नाटक उच्च न्यायालयानेही असाच निर्णय हुसेन यांच्या संदर्भात दिला होता. 
     वर्ष २००१ मध्ये मकतुम हुसेन यांनी त्यांच्या कमांडिंग ऑफिसरकडे दाढी वाढवण्याची अनुमती मागितली होती. यासाठी मकतुम यांनी धार्मिक कारण दिले होते. कमांडिंग ऑफिसरने प्रथम मकतुम यांना दाढी वाढवण्याची अनुमती दिली होती; मात्र त्यानंतर दाढी वाढवण्याची अनुमती केवळ शिखानांच असल्याने ही अनुमती रहित करण्यात आली. हा सर्व भेदभावाचा प्रकार असल्याची मकतुम हुसेन यांची भावना होती. त्यामुळेच मकतुम यांनी कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती.

ममल्लपूरम्, तमिळनाडू येथील ऐतिहासिक गुहा मंदिराचे रक्षण करा ! - सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी


ममल्लपूरम् येथील ऐतिहासिक गुहांपैकी एक गुहा
अशी मागणी का करावी लागते ? पुरातत्व विभागाच्या हे लक्षात येत नाही का ? हिंदूंच्या ऐतिहासिक वारशांचे जतन करू न शकणारे पुरातत्व खाते हवे कशाला ? हा विभाग विसर्जित करून संबंधितांना कारागृहात टाका !
      चेन्नई - ममल्लपूरम् येथील पल्लवकालीन गुहा मंदिरातील प्राचीन मूर्तींची तोडफोड करण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. प्राचीन मूर्तींची तोडफोड करणे हा गुन्हा आहे. या घटना थांबल्या पाहिजेत. तसेच या प्राचीन शिल्पाकृतींना संरक्षण पुरवले पाहिजे, अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी एका निवेदनाच्या द्वारे केली आहे. ममल्लपूरम् येथील शिल्पकला जगप्रसिद्ध आहेत. येथे किनारा मंदिर, ५ रथ, अर्जुन तप, कृष्ण मंडप, वराह मंडप इत्यादी ३२ प्राचीन शिल्पाकृती आहेत. ममल्लपूरम्ची प्राचीन वास्तू पुरातत्व खात्याच्या अधिकाराखाली येते. गेल्या काही वर्षांपासून या वास्तूची योग्य काळजी घेतली जात नाही. त्यामुळे काही समाजकंटकांकडून येथील मूर्तींची तोडफोड करण्याचे प्रकार चालू आहेत. गेल्या वर्षी ३ मूर्तींची विटंबना करण्यात आली होती. हल्लीच काही समाजकंटकांनी वराह मंडपातील भूमीदेवीची बोटे आणि नाक तोडले होते. (वारंवार अशा घटना घडत असतांना झोपलेले पुरातत्व खाते ! मुसलमान अथवा ख्रिस्ती यांच्या वास्तूंविषयी असे झाले असते, तर पुरातत्व खाते गप्प बसले असते का ? - संपादक)
      तमिळनाडू शासनाचे अधिकृत शिल्पकार श्री. व्ही. हरिदास यांनी सांगितले की, ७ व्या शतकात तेथे पल्लवांचे राज्य होते. ममल्लपूरम् हे त्यांचे बंदर होते, तर कांचीपूरम् ही त्यांची राजधानी होती. राजा महेंद्रवर्मन आणि त्यांचे पुत्र राजा नरसिंहवर्मन यांनी
      या गुहा मंदिराची उभारणी केली होती. हे मंदिर म्हणजे एक अमूल्य ठेवा आहे. पुरातत्व खात्याने त्याची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या संदर्भातील परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे विचारधन !

हिंदु राष्ट्र स्थापनेतील साधनेचे महत्त्व
     ‘वर्ष २०२३ पासून ‘हिंदु राष्ट्र’ येईल’, हे आजवर अनेक संतांनी वेळोवेळी सांगितले आहे. या पार्श्‍वभूमीवर हिंदु राष्ट्र स्थापनेविषयी अनेकांंच्या मनात उत्सुकता असते. यासाठीच ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची दिशा’ या विषयावरील वैशिष्ट्यपूर्ण सदर !
५. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या दृष्टीने साधनेची आवश्यकता 
५ अ. धर्मसंस्थापनेचे कार्य यशस्वी होण्यासाठी शारीरिक आणि मानसिक सिद्धतेसह साधनेचे बळ असणे आवश्यक ! : ‘साधनेचे बळ आणि समर्थ रामदासस्वामींचे मार्गदर्शन असल्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यात यशस्वी झाले. स्वातंत्र्यपूर्व काळात बहुतेक क्रांतीविरांमध्ये प्रखर राष्ट्राभिमान असूनही साधनेचे बळ नसल्यामुळे त्यांची क्रांती यशस्वी न होता त्यांना नाहक प्राण गमवावे लागले होते.

सतीसावित्रीचा उपहास आणि मद्यपानाचेे महिलांवर होणारे दुष्परिणाम !

      ‘श्रुती’, ही भारतातील अभियांत्रिकी महाविद्यालयातील एक विद्यार्थिनी ! ‘बार’ विकृती (मद्यपान) अवलंबावी यासाठी पुरोगामी आणि आधुनिक म्हणवणार्‍यांनी तिच्यावर आणलेल्या दबावाविषयी ती माझ्याशी बोलली. मुले-मुली असलेला त्यांच्या महविद्यालयातील एक गट देहलीतील नाईट क्लबमध्ये गेला. या गटातील बहुतेक विद्यार्थी मद्यपान करत होते; परंतु श्रुती त्यापासून अलिप्त होती. त्यांनी तिला ‘सतीसावित्री’ असे हिणवले. 
     ‘हे लोक तुम्हाला त्यांच्यापासून अलिप्त ठेवतात’, असे तिने तिच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटवर म्हटले आहे. तुम्ही कितीही प्रयत्न केले, तरी तुम्ही त्यांच्यात मिसळून जाऊ शकत नाही. याला मी सावित्रीचा उपहास (‘Savitri shaming) म्हणते आणि हे वाळीत टाकण्यासारखेच आहे.

प्लास्टिक नोटा चरबीविरहित असाव्या, ही अपेक्षा !

      सध्या केंद्रशासनाने काळा पैसा आणि खोट्या नोटा बाहेर काढण्यासाठी जुन्या नोटांवर बंदी घातली आहे. तसेच शासन देशामध्ये ‘कॅशलेस’ व्यवहार वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. याचसमवेत खोट्या नोटा बंद होण्यासाठी प्लास्टिक नोटा छापता येतील का, याचा प्रस्तावही केंद्र सरकारच्या विचाराधीन आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रस्ताव भारतीय रिझर्व्ह बँकेच्या विचाराधीन आहे. गेल्या काँग्रेस सरकारने वर्ष २०१४ मध्ये प्लास्टिक नोटांविषयीची माहिती संसदेत दिली होती. त्यानुसार देशातील म्हैसुरू, जयपूर, कांची, सिमला आणि भुवनेश्‍वर या शहरांमध्ये प्लास्टिक नोटा प्रायोगिक तत्त्वावर वापरण्याचा विचारही झाला होता; परंतु पुढे प्रत्यक्ष कार्यवाही झाली नाही.

राष्ट्र अन् धर्म यांवर विविध स्तरांवर होत असलेल्या आघातांच्या विरोधात हिंदुत्वनिष्ठांचा कृतीशील आविष्कार !

गोवा राज्याचे नोव्हेंबर २०१६ मधील हिंदु जनजागृती समितीचे प्रसारकार्य 
१. ‘चलो कश्मीर की ओर’ अभियान 
१ अ. उत्तर गोव्यात कृतीप्रवण झालेल्या हिंदूंनी ‘बिलिव्हर्स’च्या प्रार्थनासभांच्या विरोधात संघटितपणे कार्य करण्याचे ठरवणे : ‘म्हापसा येथे झालेल्या ‘एक भारत अभियान - कश्मीर की ओर’ या सभेनंतर कृतीप्रवण झालेल्या हिंदूंनी संघटितपणे कार्य करण्याचे ठरवले आहे. या दृष्टीने म्हापसा येथे चौथी बैठक झाली.
१ आ. तीन ग्रामसभांत काश्मीरमधील विस्थापित हिंदूंच्या पुनर्वसनासंबंधी ठराव पारित ! : पोंबुर्फा, वन-म्हवलिंगे-कुडिचरे आणि पिळगाव या ग्रामपंचायतींमध्ये ‘एक भारत अभियान - कश्मीर की ओर’ याविषयी सांगितल्यानंतर ग्रामसभांत विस्थापित हिंदूंच्या पुनर्वसनासंबंधी ठराव पारित करून घेण्यात आला. त्याचप्रमाणे पेडणे तालुक्यातील सरपंंचांनी ठराव घेणार असल्याचे सांगितले.
     या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. - संपादक

ज्ञानप्राप्तीवर परिणाम करणारे घटक

श्री. राम होनप
१. ‘ज्ञानप्राप्तीच्या वेळी ज्ञान प्राप्त करणार्‍या जिवाची एकरूपता संबंधित विषयाशी जितकी अधिक असते, तेवढे परिपूर्ण ज्ञान प्राप्त होते. 
२. ज्ञानातील अचूकता ही ज्ञान ग्रहण करण्याची क्षमता आणि जिवाची शुद्धता या घटकांवर अवलंबून असते.’ 
- श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२९.९.२०१५)
     ‘केवळ संख्येवरून अल्पसंख्यांक आणि बहुसंख्यांक अशी वर्गवारी करता येणार नाही. ख्रिस्ती, शीख, जैन हेही देशात अल्पसंख्य आहेत; परंतु त्यांना अल्पसंख्यांकाच्या दृष्टीने पाहिले जात नाही.’ - तुफेल अहमद, ज्येष्ठ पत्रकार आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अभ्यासक

सामाजिक आणि आर्थिक स्थिती भीषण असतांना संरक्षणावर अब्जावधी रुपये व्यय करणारा भारतद्वेष्टा पाक !

     ‘आज पाकमध्ये जन्माला येणारे बाळ हे त्याच्या शिरावर दोन कोटी डॉलरचे ऋण घेऊन जन्माला येते. पाकसारख्या भुकेल्या देशात १८ तास भारनियमन असते. प्रतिवर्षी पडणारा दुष्काळ आणि पूर यांमुळे तेथील सामान्य नागरिक त्रस्त झाला आहे.’

मधुरा भक्तीद्वारे अखंड ईश्‍वराच्या अनुसंधान राहून सगुणातून निर्गुणाकडे वाटचाल करणार्‍या कु. दीपाली पवार !

कु. दीपाली पवार
       साधना करणे म्हणजे सतत ईश्‍वराच्या अनुसंधानात रहाणे. नवविधा भक्तीद्वारे भक्त त्याच्या प्रकृतीप्रमाणे ईश्‍वराच्या अनुसंधानात रहाण्याचा प्रयत्न करतो. कु. दीपाली पवार यांचा ‘परात्पर गुरु म्हणजे श्रीकृष्ण’, असा भाव आहे. त्यांच्या जीवनातील सर्व घडामोडी पत्राद्वारे परात्पर गुरु डॉक्टरांना सांगणे, ‘तेच श्रीकृष्ण कसे आहेत’, हे त्यांना विविध उदाहरणांतून पटवून देणे, त्यांच्याशी सूक्ष्मातून झालेल्या संवादाची चित्रे रेखाटून त्यांना देणे आणि त्यांना सखा मानून प्रत्येक वैशिष्ट्यपूर्ण प्रसंगात शुभेच्छापत्रे देणे, अशा प्रकारे त्या ईश्‍वराच्या अनुसंधान राहिल्या. पुढे त्यांना काही विषयांवर ईश्‍वराकडून ज्ञानही मिळाले. हे सर्व करतांना त्यांच्यामध्ये निरपेक्षता होती.

महर्षींच्या कृपेमुळे प्रवासात एके ठिकाणी प्रत्यक्ष प.पू. अनंतानंद साईश यांचे मानवी रूपात दर्शन होणे आणि त्या वेळी ‘जीवन कृतार्थ झाले’, असे वाटणे

प.पू. अनंतानंद साईश यांच्या महानिर्वाणोत्सवाच्या निमित्ताने...
     ‘आम्ही महर्षींच्या आज्ञेप्रमाणे म्हैसुरूहून होसूरकडे जायला निघालो. वाटेत इंधन भरण्यासाठी एका पेट्रोलपंपावर थांबलो. त्या वेळी गाडीजवळ एक व्यक्ती आली. या व्यक्तीने मला चंदनाचे दोन करंडे विकत दिले आणि ‘यात पूजेसाठी हळद-कुंकू ठेवा’, असे सांगितले आणि आणखी एक डबी देऊन ‘ही तुम्हाला बांगड्या, कानातले ठेवायला घ्या’, असे ते म्हणाले. ती व्यक्ती गरीब दिसल्याने तिला साहाय्य म्हणून मी ते करंडे विकत घेतले. त्यानंतर त्यांनी उदबत्तीची तीन घरेही आम्हाला दिली. त्यानंतर माझ्या हळूहळू लक्षात यायला लागले, ‘ही व्यक्ती सामान्य नाही. हिंचा पोशाख अगदी अनंतानंद साईशांसारखा आहे. या व्यक्तीच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनंतानंद साईशच आम्हाला आशीर्वाद देण्यास आले आहेत.’ अनंतानंद साईश म्हणजे प.पू. डॉक्टरांच्या गुरूंचे (प.पू. भक्तराज महाराज यांचे) गुरु.

ध्यास असो तुझ्या चरणांचा मम हृदयी ।

 परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले 
                                 परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले 
                              यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...
      ‘वैशाख कृष्ण पक्ष सप्तमी (२९.५.२०१६) या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा अमृत महोत्सव रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमात साजरा करण्यात आला. त्या दिवशी मी देवद (पनवेल) येथील सनातन आश्रमात होते. त्यामुळे ‘अमृत महोत्सवाला मी रामनाथी आश्रमात असायला हवे होेते’, असा विचार माझ्या मनात येऊन रुखरुख लागली. त्या सायंकाळी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी मानस संवाद साधल्यावर मला पुढील काव्यपंक्ती सुचवल्या.
सौ. सारिका आय्या
प.पू. गुरुमाऊली, 
त्रिगुणात्मक साकार मूर्ती तूच ।
चराचरांत व्यापणारी चैतन्यमूर्ती तूच ।
हरिहर श्रीकृष्ण मुरलीधर तूच ॥ १ ॥

जीवन उद्धरण्या जीव तळमळे ।
शरण आले तुझ्या दारी ।
कृपेची भीक घाल पदरी ॥ २ ॥

सप्तर्षि जीवनाडीपट्टीद्वारे महर्षींनी ‘चि.सौ.कां. सायली गाडगीळ आणि चि. सिद्धेश करंदीकर यांच्या विवाह सोहळ्याला देवता, ऋषीमुनी आणि संत उपस्थित असतील’, या केलेल्या भविष्यवाणीनुसार आलेल्या अनुभूती

१. एका साधिकेला स्वप्नदृष्टांतामध्ये विवाह 
सोहळ्याला श्री अनंतानंद साईश उपस्थित असल्याचे दिसणे 
     ‘२५.४.२०१६ या दिवशी पहाटे ५.४५ वाजता मला जाग आली. नंतर मी परत झोपल्यावर मला स्वप्नात दिसले, ‘चि.सौ.कां. सायली गाडगीळ आणि चि. सिद्धेश करंदीकर यांचा विवाह चालू आहे. त्या प्रसंगी प.पू. भक्तराज महाराज यांचे गुरु श्री अनंतानंद साईश हे सगुण रूपात सभागृहात फिरत आहेत आणि काही साधक त्यांची सेवा करत आहेत. तेव्हा त्यांचे रूप सनातनच्या ग्रंथावर छापलेल्या चित्राप्रमाणे (डोक्याला साईबाबांप्रमाणे भगवा रूमाल बांधलेला, भगवी कफनी परिधान केलेली आणि पांढरी दाढी असे) दिसत होते. ते पूर्ण सोहळ्याला उपस्थित असून त्यांना अतिशय महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहेे. आजपर्यंत मला कधीही श्री अनंतानंद साईश यांचे स्वप्नात दर्शन झालेले नाही किंवा त्यांच्या संदर्भात मला कोणती अनुभूतीही आली नाही; परंतु वरील स्वप्नदृष्टांतामध्ये त्यांचे दर्शन झाल्यावर मला अतिशय कृतज्ञता वाटत होती.’
- सौ. नंदिनी चितळे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२५.४.२०१६)

सप्तर्षि जीवनाडीत सांगितल्याप्रमाणे सनातनच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांचा अहर्निश प्रवास !

      महर्षींची शिकवण आणि कार्य !
    ‘सनातनच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ मागील ४ वर्षांपासून भारतभरातील विविध राज्यांत दौर्‍यावर जात आहेत. हिंदु राष्ट्राची (सनातन धर्म राज्याची) शीघ्रतेने स्थापना व्हावी, राष्ट्र, धर्म, तसेच साधक यांचे रक्षण व्हावे आणि देवतांचा आशीर्वाद मिळावा, यासाठी सप्तर्षि जीवनाडीत सांगितलेल्या क्षेत्री जाण्याचे त्यांचे नियोजन असते. आतापर्यंत त्यांनी २४ राज्यांतील प्रवास करून तेथील वैशिष्ट्यपूर्ण दगड, माती, तीर्थ आदींचा संग्रह केला आहे. त्यांनी नोव्हेंबर २०१६ पर्यंत ३ लक्ष ५६ सहस्र कि.मी. एवढा प्रवास करून भावी पिढीसाठी भारतातील अलौकिक समृद्ध ठेवा संग्रहित केला आहे. या दैवी प्रवासाची सर्वांना माहिती व्हावी, यासाठी हे सदर प्रसिद्ध करत आहोत.’

६९ टक्के आध्यात्मिक स्तर असलेल्या सौ. अश्‍विनी अतुल पवार यांनी दिलेले अमूल्य दृष्टीकोन !

सौ. अश्‍विनी पवार
       ‘गुरुदेवांच्या कृपेमुळे देवद (पनवेल) येथील सनातन आश्रमातील साधकांना कधी सत्संगाच्या, तर कधी सेवेच्या माध्यमातून वा प्रत्यक्ष सहवासातून सौ. अश्‍विनीताईचा (सौ. अश्‍विनी पवार यांचा) सत्संग मिळतो. देवाने या सत्संगात ताईच्या माध्यमातून दिलेले साधनेचे दृष्टीकोन सर्वांसाठीच आदर्श आहेत. ‘भगवंताने ते समष्टीसाठी लिहून देण्याची बुद्धी दिली’, यासाठी त्याच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो. ‘ते कृतीत आणण्यासाठी देवाने आमच्याकडून प्रयत्न करून घ्यावेत’, ही श्रीगुरुचरणी प्रार्थना !

सनातनच्या ग्रंथांचे मुद्रण आणि पुनर्मुद्रण करतांना येणार्‍या अडचणींवर आध्यात्मिक उपाय करताच ती सेवा निर्विघ्नपणे पूर्ण होणे, याविषयी श्री. संतोष गावडे यांना आलेल्या अनुभूती

श्री. संतोष गावडे
१. मुद्रणातील त्रुटी आणि बारकावे कळल्यावर मनात नकारात्मक विचार येणे आणि त्याविषयी एका संतांशी बोलल्यावर त्यांनी देवाचे साहाय्य घेण्यास सांगणे : ‘ग्रंथांचे मुद्रण (छपाई) कोल्हापूर येथील मुद्रणालयात (प्रेसमध्ये) चालू झाल्यावर ग्रंथांच्या आतील पाने एका रंगात मुद्रित होत (छापली जात) नव्हती. त्यानंतर चार रंगांमध्ये मुखपृष्ठाच्या मुद्रणाला आरंभ झाला. त्या वेळी त्या सेवेसंबंधी बारकावे मला ठाऊक नव्हते. त्यामुळे मुद्रण झाल्यावर त्यातील त्रुटी किंवा बारकावे रामनाथी येथील साधक मला सांगत होते; परंतु त्याविषयी प्रत्यक्ष मुद्रणालयात आमच्या काही लक्षात येत नव्हते. त्यामुळे माझ्या मनात सतत ‘मला ही सेवा जमणार नाही, मला काही येत नाही’, अशा प्रकारचे नकारात्मक विचार येत होते; म्हणून त्याविषयी मी एका संतांशी बोललो. तेव्हा त्यांनी मला ‘सेवा करतांना देवाचे साहाय्य घ्या’, असे सांगितले.

प.पू. गुरुदेवांना स्थुलातून भेटण्यापेक्षा मानस भावाच्या स्तरावर भेटल्यामुळे सर्वाधिक आनंदाची अनुभूती येणे, याविषयी रामनाथी आश्रमातील कु. सोनम फणसेकर यांना आलेली अनुभूती

कु. सोनम फणसेकर
१. प.पू. गुरुदेवांना स्थुलातून भेटण्याची आणि त्यांच्याशी बोलण्याची तीव्र इच्छा होणे अन् प.पू. गुरुदेवांशी मनातून संवाद साधण्यास आरंभ केल्यावर त्यांना प्रत्यक्ष भेटल्याचा आनंद मिळणे : ‘साधारणतः दीड - दोन मासांपासून (महिन्यांपासून) मला प.पू. गुरुदेवांची पुष्कळ आठवण येत होती. त्यांना स्थुलातून भेटण्याची आणि त्यांच्याशी बोलण्याची तीव्र इच्छा व्हायची; पण मला प.पू. गुरुदेव दिसत नसल्यामुळे मन पुष्कळ अस्वस्थ व्हायचे. त्यांच्या आठवणीने मला पुष्कळ रडू यायचे. तेव्हा मला वाटू लागले, ‘निश्‍चितच ते माझ्यावर रागावले असतील; म्हणूनच एवढे दिवस झाले, तरी त्यांचे मला दर्शन होत नाही.’

अखंड भारत मोर्चाचे संस्थापक आणि माजी खासदार श्री. वैकुंठलाल शर्मा उपाख्य प्रेमसिंह शेर (वय ८७ वर्षे) यांनी गाठली ६३ टक्के आध्यात्मिक पातळी !

श्री. संदीप आहुजा, पू. डॉ. चारुदत्त पिंगळे,
श्री. वैकुंठलाल शर्मा आणि दीपक सिंह
      देहली - अखंड भारत मोर्चाचे संस्थापक, तसेच देहलीचे माजी खासदार श्री. वैकुंठलाल शर्मा उपाख्य प्रेमसिंह शेर यांचा १७ डिसेंबरला ८८ वा वाढदिवस साजरा करण्यात आला. तसेच अखंड भारत मोर्चाचा १८ वा स्थापना दिवसही साजरा करण्यात आला. येथील लक्ष्मीनगरमधील हनुमान मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात हा वाढदिवस साजरा करतांना त्यांची आध्यात्मिक पातळी ६३ टक्के झाल्याचे घोषित करण्यात आले. या वेळी उपस्थित असणारे हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी त्यांची पातळी घोषित केली. पू. डॉ. पिंगळे यांनी त्यांचा शाल, श्रीफळ आणि भगवान श्रीकृष्णाची प्रतिमा देऊन त्यांचा सत्कार केला. या वेळी प्रेमसिंह शेर यांचे हितचिंतक, तसेच अखंड भारत मोर्चाचे सर्वश्री संदीप आहुजा, दीपक सिंह, भारतभूषण, भारत बत्रा, प्रवेश आणि अन्य पदाधिकारी, तसेच सनातनच्या साधिका सौ. क्षिप्रा जुवेकर उपस्थित होत्या.

लोभस, सहनशील आणि सात्त्विक गोष्टींची आवड असलेला ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला नागपूर येथील चि. अभिराम आशिष क्षीरसागर (वय १ वर्ष) !

उच्चलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन
धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. अभिराम क्षीरसागर एक दैवी बालक आहे !
चि. अभिराम क्षीरसागर
     ‘मार्गशीर्ष कृष्ण पक्ष पंचमी म्हणजे १८.१२.२०१६ या दिवशी नागपूर येथील चि. अभिराम आशिष क्षीरसागर याचा तिथीनुसार पहिला वाढदिवस झाला. त्यानिमित्त त्याची आई सौ. नेहा आशिष क्षीरसागर आणि आत्या कु. अंजली क्षीरसागर यांना त्याची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत. 
पालकांनो, हे लक्षात घ्या ! 
     ‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ - (परात्पर गुरु) डॉ. आठवले 
     यासमवेतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.

बोधचित्र

॥ हरि ॐ तत्सत् ॥

जीवात्मा आणि शिवात्मा म्हणजे काय ?
बाबा : मी कशासाठी जन्माला आलो आहे आणि मला काय करायचे आहे, याचे ज्ञान जिवाला झाले, तर त्या आत्म्याला जीवात्मा म्हणतात. कोणीतरी माझ्याकडून कार्य करवून घेत आहे, याचे ज्ञान झाले की, त्या आत्म्याला शिवात्मा म्हणतात. शिवात्मा शोधणे, म्हणजे खरे ज्ञान. शिवात्मा कार्यकारणभावापुरता जन्माला येतो, तर जीव प्रारब्धभोगामुळे जन्माला येतो.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)
संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

अहंभाव असलेले आधुनिक वैद्य (डॉक्टर) आणि अहंभावशून्य भगवंत !
     ‘आधुनिक वैद्य (डॉक्टर) रुग्णांना लहान-मोठ्या आजारांतून वाचवतात आणि त्याचा त्यांना अहंभाव असतो. याउलट भगवंत साधकांना भवरोगापासून, म्हणजे जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त करतो, तरी तो अहंशून्य असतो !’ - (परात्पर गुरु) डॉ. आठवले


॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

ईश्‍वर सर्वत्र आहे !
जी गोष्ट उघडपणे करणे अयोग्य वाटते, ती लपून करण्याचा प्रयत्न 
करणेही अयोग्यच; कारण एखादी अहितकारक गोष्टच उघडपणे करायची टाळली जाते. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

बंगालमधील हिंदू !

संपादकीय
      बंगालमधील हावडा जिल्ह्यात महंमद पैगंबर जयंती साजरी झाली. धुलागडजवळील बानिजोपोला या गावात मिरवणुकीच्या वेळी धर्मांधांनी हिंदूंवर आक्रमण करून त्यांच्या ६० घरांना आग लावली. ५ घंटे येथे लूटमार करून हैदोस घालण्यात येत होता. आक्रमणाची मालिका ३ दिवस चालू होती. याचे दूरगामी परिणाम तेथील हिंदूंच्या जीवनमानावर झाले आहेत. गेली काही वर्षे बंगालमधील वातावरण चिघळले आहे. धर्मांधांची बहुसंख्या आणि कट्टरता यांमुळे भारतात अनेक छोटे पाकिस्तान निर्माण झाले आहेत. बंगाल हा त्यापैकी सर्वाधिक भीषण परिस्थिती असलेला भाग आहे. राजरोसपणे होणारी धर्मांधांची आक्रमणे हिंदूंना जगणे नको करतात. सण कुणाचेही असोत, हिंदूंची दुर्गापूजा असो वा मुसलमानांची ईद असो, दंगल, दगडफेक, हिंदूंवरील आक्रमणे ठरलेलीच असतात. यामध्ये मदरसे, मशिदी यांमधून हिंदूंवर होणारी सशस्त्र आक्रमणेही लक्षणीय असतात. फटाक्यांप्रमाणे होणारा गावठी बॉम्बचा वापर, जाळपोळ, हिंदूंना धमकावणे, यांतून बंगालमधील जंगलराजच दिसून येते.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn