Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

संसदेत हिंदु राष्ट्राचा ठराव आणा !

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भाजपला हाक !
      मुंबई - कधी नव्हे तो हिंदू एकवटला आणि काँग्रेस, गांधी घराणे, जवाहरलाल नेहरू यांचे पाप भाजपच्या पदरात टाकले. एकहाती सत्ता दिली. तुम्हाला मुफ्ती महंमद चालतो, मेहबुबा मुफ्ती चालते; मात्र शिवसेनेचे कडवट हिंदुत्व चालत नाही. हे कसले तुमचे हिंदुत्व ? देेशाला हिंदु राष्ट्र बनवण्याचा ठराव संसदेत आणा, शिवसेनेचे सर्व खासदार त्याला पाठिंबा देतील, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांनी भाजपला केले. शिवसेना नेते, खासदार तथा दैनिक ‘सामना’चे कार्यकारी संपादक श्री. संजय राऊत यांचे प्रत्येक गुरुवारी दैनिक ‘सामना’मध्ये ‘सच्चाई’ सदर प्रसिद्ध होते. या सदराच्या पुस्तकाच्या दोन खंडांचे प्रकाशन श्री. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. या वेळी श्री. उद्धव ठाकरे बोलत होते. हा सोहळा १७ डिसेंबर या दिवशी माटुंगा येथील रुईया कॉलेजच्या सभागृहात पार पडला. या वेळी भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी, पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने, ‘राजा’ प्रकाशनचे श्री. ज्ञानेश्‍वर मुळे आणि शिवसेनेचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
या वेळी श्री. उद्धव ठाकरे म्हणाले की,
१. उत्तर प्रदेशातील निवडणुका जिंकाल किंवा हराल; पण ‘एवढ्या दिवसांत राममंदिर बांधतो’, असे घोषित करा. उत्तर प्रदेशात शिवसेना तुम्हाला पाठिंबा देईल.
२. नोटाबंदीनंतर ४० दिवस होत आले, तरी जनतेचे हाल चालूच आहेत.

धुलागड (बंगाल) येथे धर्मांधांचे हिंदूंवर आक्रमण !

* गावठी बॉम्बचा सर्रास वापर * हिंदूंच्या ६० घरांना आग लावून लुटले 
* ६० हिंदू परिवारांचे पलायन * पोलीस निष्क्रीय मंदिरावर बॉम्बफेक
     हावडा (बंगाल) - बंगालमधील हावडा जिल्ह्यातील धुलवाडाजवळील बानिजोपोला या गावात १३ डिसेंबरला महंमद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्तच्या मिरवणुकीच्या वेळी धर्मांधांनी हिंदूंवर आक्रमण करून त्यांच्या ६० घरांना आग लावली. तसेच त्यांच्या घरातील मौल्यवान वस्तूंची लुटमार केली. आक्रमण करतांना धर्मांधांनी मोठ्या प्रमाणात गावठी बॉम्बचा वापर केला. त्यांनी पोलिसांनाही घटनास्थळी पोचू दिले नाही. ५ घंटे धर्मांधांकडून येथे लुटमार करून हैदोस घालण्यात येत होता. येथील एका मंदिरातही गावठी बॉम्ब फोडण्यात येऊन त्याची तोडफोड करण्यात आली. या घटनेनंतर येथील ६० हिंदू परिवारांनी पलायन केले आहे. आक्रमणाची मालिका ३ दिवस चालू होती. सध्या येथे कलम १४४ लावण्यात आले आहे. तसेच मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलिसांनी आतापर्यंत कोणालाही अटक केलेली नाही. आक्रमण करणार्‍यांपैकी काही जण येथील दोन मदरशांमधील होते, तसेच काही जण जमाते इस्लामी संघटनेचे होते, असे म्हटले जात आहे. येथील सीसीटीव्ही फुटेजमधून पोलिसांनी आक्रमणकर्त्यांना ओळखून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे. या आक्रमणाविषयी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. पीडित हिंदूंना हानीभरपाई देण्याची मागणी केली जात आहे.
धर्मांधांच्या उलट्या बोंबा !
(म्हणे) ‘हिंदूंनी मिरवणुकीवर आक्रमण केले !’
      एका वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याने सांगितले की, मुसलमानांनी म्हटले आहे की, हिंदूंनी त्यांच्या मिरवणुकीवर नियोजनपूर्वक आक्रमण केले

एन्सीईआर्टी’च्या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास न छापल्यास महाराष्ट्रात उद्रेक होईल !

शिवसेनेच्या आमदारांचा आदर्श सर्वत्रच्या लोकप्रतिनिधींनी घेतल्यास पाठ्यपुस्तकात
भारताचा गौरवशाली आणि सत्य इतिहास समाविष्ट होण्यास वेळ लागणार नाही !
शिवसेनेचे आमदार भरतशेठ गोगावले यांची चेतावणी
‘एन्सीईआर्टी’च्या विरोधात घोषणा देऊन निदर्शने करतांना शिवसेनेचे आमदार
     नागपूर - राष्ट्रीय शिक्षण संशोधन तथा प्रशिक्षण संस्था अर्थात् ‘एन्सीईआर्टी’च्या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास न छापणार्‍या अपकारभाराची शासनाने गंभीर नोंद घ्यावी. गोवा राज्यात ‘एन्सीईआर्टी’च्या पुस्तकातील मोगलांच्या इतिहासाची माहिती काढून टाकण्यात आली आहे. याच धर्तीवर महाराष्ट्रातील सातवीच्या पुस्तकातील ‘एन्सीईआर्टी’ने छापलेल्या मोगलांच्या इतिहासाची माहिती त्वरित काढून तेथे छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली आणि सत्य दैदिप्यमान इतिहास छापावा अन्यथा याचा महाराष्ट्रात उद्रेक होईल, अशी चेतावणी शिवसेनेचे आमदार श्री. भरतशेठ गोगावले यांनी येथे विधानभवनाच्या आवारात निदर्शने करतांना दिली. 
     ‘एन्सीईआर्टी’च्या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज यांचा खरा इतिहास आणि त्यांचे चित्र छापण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी शिवसेनेच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर निदर्शने केली.

पुण्यात ‘सनबर्न फेस्टिव्हल’च्या विरोधात सामाजिक आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा !

हिंदु संस्कृतीवरील आघातांच्या विरोधात संघटित होणार्‍या हिंदूंचे अभिनंदन !
     पुणे - २८ ते ३१ डिसेंबर या कालावधीत केसनंद (वाघोली, जिल्हा पुणे) येथे ‘सनबर्न फेस्टिव्हल’ आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाची पार्श्‍वभूमी पहाता यंदाच्या वर्षी पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला सर्वच स्तरांतून वाढता विरोध होतांना दिसून येत आहे. ‘सनबर्न फेस्टिव्हल’च्या माध्यमातून व्यसनाधीनतेला चालना मिळत असून हा कार्यक्रम म्हणजे सांस्कृतिक राजधानी म्हणवणार्‍या पुणे शहराला कलंकच आहे. त्यामुळेच स्थानिक नागरिकांपासून विविध हिंदुत्वनिष्ठ आणि सामाजिक संघटना या महोत्सवाच्या विरोधात कृतीशील होत आहेत. हिंदु संस्कृती भ्रष्ट करणारा आणि भारतीय युवकांना पाश्‍चात्त्य संगीताच्या नावाखाली व्यसनाधीनतेकडे नेऊ पहाणारा हा महोत्सव रहित व्हावा, या मागणीसाठी १७ डिसेंबर या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य धडक मोर्चा काढण्यात आला. 
     ह.भ.प. मंचक महाराज कराळे (परभणीकर) यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून श्री कसबा गणपति मंदिरापासून मोर्च्याला प्रारंभ झाला. या वेळी ‘सनबर्न’ कार्यक्रमाच्या विरोधात उत्स्फूर्त घोषणा देण्यात आल्या,

काश्मीरमध्ये आतंकवाद्यांच्या गोळीबारात ३ सैनिक हुतात्मा !

पाकचे १० तुकडे करण्याची भाषा करणारे गृहमंत्री राजनाथ सिंह काय
करत आहेत ? आतंकवाद्यांच्या आक्रमणात वारंवार सैनिक हुतात्मा 
होऊ देणारा जगातील एकमेव देश भारत !
     श्रीनगर - जम्मू-काश्मीरमधील पंपोर शहरातील कादलाबाद येथे श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्गावर आतंकवाद्यांनी सैनिकांवर केलेल्या गोळीबारात ३ सैनिक हुतात्मा झाले आहेत. आतंकवाद्यांच्या गोळीबाराला सैन्याने प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला; मात्र घटनास्थळी सर्वसामान्य नागरिक असल्यामुळे सैन्याला थेट कारवाई करता आली नाही. त्याचा अपलाभ घेऊन आतंकवादी पळून गेले. यानंतर सैन्याने येथील परिसरात शोधमोहीम चालू केली आहे.

‘सनबर्न फेस्टिव्हल’ची माहिती घेऊन पुढील कारवाई केली जाईल ! - मुुख्यमंत्री

     नागपूर (वार्ता.) - सनबर्न महोत्सवाविषयी माहिती घेऊन पुढील कारवाई केली जाईल, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १७ डिसेंबर या दिवशी अधिवेशनाच्या समारोपप्रसंगी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले. ‘पुणे येथे ‘सनबर्न फेस्टिव्हल’च्या कार्यक्रमात अश्‍लीलता आहे, तसेच तेथे अमली पदार्थांचे सेवन केेले जाते त्यामुळे या महोत्सवावर बंदी घालणार का ?’, असा प्रश्‍न सनातन प्रभातच्या वार्ताहराने विचारल्यावर त्यांनी वरील उत्तर दिले.
     शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नकार दिला असून ‘शेतकरी सक्षम झाल्यावरच शासन कर्जमाफी देईल’, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. हिवाळी अधिवेशनात भरीव कामकाज झाले असून सर्वाधिक २७ विधेयके सादर झाली. त्यांपैकी दोन्ही सभागृहांत २३ विधेयके संमत झाली आहेत, असे मुख्यमंत्री या वेळी म्हणाले.
महाराष्ट्रातही ‘वैद्यकीय आस्थापना कायदा २०१०’ हा कायदा लागू केला जाईल !
     ‘कर्नाटक राज्याप्रमाणे ‘वैद्यकीय आस्थापना कायदा २०१०’ हा कायदा महाराष्ट्रात लागू नसल्याने महाराष्ट्रातील रुग्णालयांकडून रुग्णांची लुबाडणूक केली जात आहे.

सनातनच्या निरपराध साधकांवरील हा अन्याय लक्षात ठेवा !

     कोणताही गुन्हा केला नसतांना श्री. समीर गायकवाड यांना मागील १ वर्ष ८३ दिवसांपासून, तर डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना ६ मास ८ दिवसांंपासून कारागृहात डांबण्यात आले आहे. 
    केवळ हिंदुत्वाची मानहानी करण्यासाठी सनातनच्या निरपराध साधकांना कारागृहात डांबणार्‍यांना हिंदु राष्ट्रात दामदुप्पटीने शिक्षा देण्यात येईल !

(म्हणे) ‘वेद म्हणजे ज्ञानाचे भांडार म्हणणारे वेडे !’ - रावसाहेब कसबे

मडगाव, गोवा येथील रवींद्र भवन येथे पुरो(अधो)गाम्यांची अभिव्यक्ती
दक्षिणायन परिषद १८ ते २० नोव्हेंबर या कालावधीत पार पडली. या परिषदेत
विविध वक्त्यांनी व्यक्त केलेले हिंदुद्वेष्टे, तसेच राष्ट्रघातकी विचार 
     ‘वेदांमध्ये काहीच तत्त्वज्ञान नाही. वेद म्हणजे ज्ञानाचे भांडार म्हणणारे वेडे आहेत. वेदांचे मी भाषांतर केलेले आहे. उपनिषद हा एक चांगला ग्रंथ आहे. जेव्हा नामदेवांनी भक्ती आंदोलन चालू केले, तेव्हा नामदेव वरचढ होणार म्हणून ज्ञानेश्‍वराला पुढे करण्यात आले. यालाच ‘जातीव्यवस्था’ म्हणतात. या वेळी रामदासांनी प्रतिक्रांती केली.’

कन्नड दैनिक ‘वार्ताभारती’च्या विरोधात सनातन संस्थेचा हानीभरपाईचा दिवाणी दावा न्यायालयात दाखल !

सनातन संस्थेची अपकीर्ती केल्याचे प्रकरण
     फोंडा (गोवा) - सनातन संस्थेची अपकीर्ती करण्याच्या हेतूने ‘वार्ताभारती’ या कन्नड दैनिकाने २८ ऑक्टोबर २०१६ या दिवशीच्या अंकात ‘सनातन संस्थेवर बंदी आणण्यात अडचण काय ?’ या मथळ्याखाली मानहानीकारक संपादकीय लेख प्रसिद्ध करून संस्थेची अपकीर्ती केली. याप्रकरणी संस्थेचे व्यवस्थापकीय विश्‍वस्त श्री. वीरेंद्र मराठे यांनी या दैनिकाचे संपादक, मालक, प्रकाशक आणि मुद्रक यांच्या विरोधात १० कोटी रुपये मानहानी भरपाईच्या मागणीचा दिवाणी दावा फोंडा, गोवा येथील दिवाणी न्यायालयात दाखल केला आहे.
     सनातन संस्थेचा राष्ट्र आणि धर्म या क्षेत्रांतील कार्याचा नावलौकिक माहिती असतांना मानहानी करण्याच्या हेतूने कर्नाटक राज्यातील मंगळुरू येथून प्रसिद्ध होणार्‍या कन्नड दैनिक ‘वार्ताभारती’चे संपादक, मुद्रक आणि प्रकाशक ए.एस्. पुथिगे यांनी ‘सनातन संस्थेवर बंदी आणण्यात अडचण काय ?’ 
     या मथळ्याखाली संस्थेच्या विरोधात मानहानीकारक संपादकीय लेख दैनिक ‘वार्ताभारती’ च्या २८ ऑक्टोबर २०१६ च्या दिवशीच्या अंकात पृष्ठ ६ वर प्रसिद्ध केला आहे. त्यामुळे संस्थेची अपरिमित हानी झाली आहे

केंद्रामध्ये तुमच्या पक्षाची सत्ता आहे, तर तुम्ही थेट त्याच्याकडे दाद का मागत नाही ? - सर्वोच्च न्यायालयाने भाजपच्या प्रवक्त्याला फटकारले

न्यायालयाचे फटकारे 
* वारंवार याचिका प्रविष्ट करण्यासाठी पक्ष तुम्हाला पैसे देतो का ?
* भाजपने तुमच्यावर केवळ हेच दायित्व सोपवले आहे का ?
      नवी देहली - सर्वोच्च न्यायालयात सातत्याने याचिका प्रविष्ट करणारे देहलीतील भाजपचे प्रवक्ता अश्‍विनी उपाध्याय यांना न्यायालयाने फटकारल्याची घटना समोर आली आहे. उपाध्याय यांनी प्रविष्ट केलेल्या एका याचिकेवरील सुनावणीच्या वेळी न्यायालयाने त्यांना फटकारतांना म्हटले की, आम्ही तुम्हाला प्रतिदिन याचिका प्रविष्ट करतांना पहात असतो. तुम्ही एक ‘व्यावसायिक याचिकाकर्ते’ व्हायला पाहिजे. केंद्रामध्ये तुमच्या पक्षाची सत्ता आहे. जर तुम्हाला काही समस्या असेल, तर तुम्ही सरळ त्याच्याकडे का दाद मागत नाही ? राजकीय लाभासाठी कार्यकर्त्यांकडून न्यायालयाचा वापर व्हावा, अशी आमची इच्छा नाही. पक्ष तुम्हाला न्यायालयात राजकीयदृष्ट्या सक्रीय रहावे, यासाठीच पैसा पुरवतो का ? भाजपने तुमच्यावर केवळ हेच दायित्व सोपवले आहे का ? न्यायालयात पक्षाचा प्रचार करण्यासाठीच भाजप तुम्हाला पैसा पुरवत आहे का ?’, असे प्रश्‍नही न्यायालयाने विचारले. याबरोबर न्यायालयाने उपाध्याय यांची याचिका फेटाळून लावली. 
     गेल्या महिन्यात देहली उच्च न्यायालयाने प्रविष्ट करण्यात आलेल्यांपैकी अनेक याचिका विनाकारण करण्यात आल्याचा निष्कर्ष काढला होता. ८० टक्के याचिका या समोरच्या व्यक्तीला ब्लॅकमेल करण्यासाठी केल्या जात असल्याचाही निष्कर्ष उच्च न्यायालयाच्या खंडपिठाने काढला होता.

ख्रिस्ती सेवाभावी संस्थांवर कारवाई करणार्‍या प्रामाणिक अधिकार्‍याचे अमेरिकेच्या दबावाखाली स्थानांतर !

काँग्रेसच्या काळात सेवेच्या नावाखाली हिंदूंचे धर्मांतर करणार्‍या 
ख्रिस्त्यांच्या संस्थांवर कारवाई होत नव्हती, ती आताच्या सरकारमधील अधिकारी 
करत असतांना त्या अधिकार्‍यांवर कारवाई करणारे सरकार काँग्रेसची आठवण करून देते !
     नवी देहली - गृह मंत्रालयात कार्यरत असलेले अतिरिक्त सचिव श्री. बिपीन मलिक यांनी धर्मांतराच्या आरोपांचे सावट असलेल्या ख्रिस्ती सेवाभावी संस्थांवर कडक कारवाई केल्याने केंद्र सरकारने अमेरिकेच्या दबावाखाली त्यांचे गृह मंत्रालयातून स्थानांतर केले. श्री. मलिक यांनीच डॉ. झाकीर नाईक आणि त्यांच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनवर बंदी आणण्याची पाऊले उचलली होती. वरवर बालकल्याणासाठी कार्यरत असलेल्या अमेरिकेतील ‘कम्पॅशन इंटरनॅशनल’ या सेवाभावी संस्थेविरुद्ध भारतीय गुप्तचर खात्याचा प्रतिकूल अहवाल आल्याने श्री. मलिक यांनी सरकारच्या धोरणानुसार या संस्थेला अनुमती घेतल्याविना विदेशी देणग्या स्वीकारण्यास बंदी केली होती. या संस्थेचे अमेरिकेच्या शासनात उच्च स्तरावर चांगले संबंध असल्यामुळे अमेरिकेने भारत शासनास २ वेळा ‘कम्पॅशन इंटरनॅशनल’विरुद्ध केलेल्या कारवाईसंबंधी विचारणा केली होती.

आज नाशिक आणि गोवंडी (मुंबई) येथे हिंदु धर्मजागृती सभा !

स्थळ : स्वामी मुक्तानंद शाळेचे आतील मैदान, गंगा दरवाजा, येवला, जिल्हा नाशिक
वेळ : सायंकाळी ७ 
संपर्क क्रमांक : ९४०४९ ५६४८१
स्थळ : गणेश मैदान सभागृह, श्री स्वयंभू हनुमान मंदिराजवळ, देवनार कॉलनी, गोवंडी (प.)
वेळ : सायंकाळी ६ 
संपर्क क्रमांक : ९९२०२ ०८९५८

सौदी अरेबियात दीडशे भारतियांचे मृतदेह वर्षभरापासून तेथील शवागृहात पडून !

सौदी अरेबियातील भारतीय दूतावासाचे भारतियांना साहाय्य 
होत नसेल, तर त्याच्यावर जनतेचे पैसे कशाला उधळायचे ?
भारतीय दूतावासाकडून अल्प प्रतिसाद !
      भाग्यनगर - नोकरीच्या निमित्ताने सौदी अरेबियात गेलेल्या दीडशे भारतियांचे मृतदेह वर्षभरापासून सौदीच्या शवागृहात पडून आहेत. हे मृतदेह कह्यात घेण्यासाठी त्यांचे नातेवाईक प्रचंड धडपड करत आहेत. भारतीय दूतावासाकडून मात्र त्यांना फारसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. हे मृत्यू आजारपण, अपघात आणि आत्महत्या यांमुळे झाले आहे. त्यात बहुतांश तेलंगण आणि आंध्रप्रदेश या राज्यांतील लोकांचा समावेश असल्याचे सांगण्यात येते.
     भाग्यनगर (हैद्राबाद), करीमनगर, वारंगळ, महबूबनगर, निझामाबाद आदी भागांतून मोठ्या प्रमाणावर लोक आखाती देशात नोकरीसाठी जातात. केवळ सौदी अरबमध्ये आंध्र आणि तेलंगण या राज्यांमधील १० लाख लोक काम करत आहेत.

तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून महिलेला निर्वस्त्र करून मारहाण !

महिलांचे नेतृत्व करणार्‍या तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते एका महिलेला निर्वस्त्र करून मारहाण 
करत असतील, तर पक्षाची महिलांच्या संदर्भातील धोरणे काय असतील, याचा विचारही न केलेला बरा ! 
     कोलकाता - ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बंगालच्या बर्दवान जिल्ह्याच्या नेपाकुली झापानतला भागात एका महिलेला निर्वस्त्र करून अमानुष केली. 
       तृणमूल काँग्रेसचे स्थानिक नेते ब्रजगोपाल घोष त्यांच्या २० समर्थकांसह त्यांच्या घरी सभा घेत होते. अनुमती नसतांना ही सभा घेण्यास घरमालकाच्या मुलाने विरोध केला. त्यामुळे त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर संतप्त झालेल्या ब्रजगोपाल आणि त्यांचे समर्थक यांनी युवकाला मारहाण करणे चालू केले. त्यामुळे या लोकांनी मुलाला सोडण्याची मागणी करणार्‍या त्याच्या आईला निर्वस्त्र करून मारहाण केली. स्थानिक लोकांनी पीडितेला मारहाणीपासून वाचवले. त्यानंतर तिला कलना महकमा रुग्णालयात भरती करण्यात आले. याप्रकरणी पीडितेच्या कुटुंबाने पोलिसांकडे तक्रार केली आहे; मात्र अद्याप कोणावरही कारवाई करण्यात आली नाही.

पाक एका आतंकवाद्याला १ कोटी रुपये देतो !

आतंकवाद्यांच्या आक्रमणात नाहक हुतात्मा होणार्‍या भारतीय 
सैनिकांच्या कुटुंबियांना सरकार साहाय्य म्हणून तरी इतकी रक्कम देते का ?
     मुझफ्फराबाद - भारत-पाकमधील नियंत्रण रेषा ओलांडण्यासाठी आणि आत्मघातकी आक्रमणे घडवून आणण्यासाठी पाक एका आतंकवाद्याला १ कोटी रुपये देतो, अशी माहिती पाकव्याप्त काश्मीरमधील ‘जम्मू-काश्मीर अमन फोरम’चे नेते रईस इन्कलाबी यांनी दिली आहे.
     इन्कलाबी म्हणाले, ‘‘आतंकवाद्यांना भारताच्या विरोधात उभे करण्याचे काम पाकिस्तान करतो. पाकच्या या कारवाया दोन्ही देशांतील तणावाचे मुख्य कारण आहे. आमचा याला विरोध आहे. तुम्हाला गोळीबाराची आणि युद्धाची एवढी खुमखुमी असेल, तर सैन्याला सैन्याशी भिडवा.’’ 
     ‘पाकमध्ये ज्या आतंकवादी संघटनांवर बंदी आहे, त्यांना पाकव्याप्त काश्मीरमध्ये रान मोकळे करून देण्यात आले आहे. येथून भारतविरोधी कारवाया करण्याची त्यांना मुभा आहे. हे दुटप्पी धोरण का ?,’ असा प्रश्‍नही इन्कलाबी यांनी केला आहे.

फरिदाबाद येथे गीता जयंती महोत्सवात सनातनच्या साधिका सौ. संदीपकौर मुंजाल यांचा सत्कार

डावीकडून मूलचंद शर्मा,
आयुक्त सौ. सोनल गोयल, सौ. संदीपकौर
मुंजाल यांचा सत्कार करतांना कृष्णपल गुर्जर
     फरिदाबाद - गीता जयंती महोत्सवाच्या दुसर्‍या दिवशी जिल्हा प्रशासनाकडून हुड्डा संमेलनकेंद्रात एका संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सनातन संस्थेच्या सौ. संदीपकौर मुंजाल यांनी, ‘श्रीमद्भगवद्गीता आणि स्वभावदोष निर्मूलन याविषयी माहिती दिली. त्यांनी स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेमुळे ‘योगः कर्मसु कौशलम् ।’चे ध्येय आणि समाज अन् राष्ट्र यांचे उत्थानही कसे साध्य होऊ शकते, यांविषयी माहिती दिली. या प्रसंगी कार्यक्रमाच्या शेवटी नगरपालिका आयुक्त सोनल गोयल यांनी सनातनच्या सौ. संदीपकौर मुंजाल यांचा शाल देऊन, तर सामाजिक न्याय राज्यमंत्री कृष्णपल गुर्जर यांनी स्मृतीचिन्ह भेट देऊन सत्कार केला. या वेळी वल्लभगडचे आमदार मूलचंद शर्मा, फरिदाबाचे उपायुक्त चंद्रशेखर आणि अन्य प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. 
क्षणचित्र 
     गीता जयंती या कार्यक्रमानंतर आयुक्त सोनल गोयल यांनी सनातन संस्थेच्या ग्रंथ प्रदर्शनाला भेट दिली.

राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाची चिनी मांजावर बंदी !

चीनच्या एकेका वस्तूंवर बंदी घालण्यापेक्षा राष्ट्राला हानीकारक सर्वच 
चिनी वस्तूंवर एकदाच बंदी का घालत नाही ? त्यामुळे देशाची हानी तरी टळेल !
     नवी देहली - काचेची पूड लावलेल्या चिनी मांजावर बंदी घालण्याचा निर्णय राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने दिला आहे. ही बंदी काचेची पूड असलेल्या नायलॉन, चिनी आणि सुती अशा सर्व प्रकारच्या मांजांवर लागू असेल, असेही न्यायाधिकरणाचे अध्यक्ष स्वतंत्र कुमार यांच्या खंडपिठाने स्पष्ट केले आहे. याबरोबरच या मांजाच्या परिणामांविषयी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाला अहवाल सादर करण्याचा आदेशही न्यायाधिकरणाने ‘मांजा असोसिएशन ऑफ इंडिया’ला दिला आहे.

बांगलादेशातील अल्पसंख्य हिंदूंवरील अत्याचार थांबवा ! - हिंदु धर्माभिमानी

बेंगळुरू (कर्नाटक) येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन
राष्ट्रीय हिंदू आंदोलन करतांना हिंदु धर्माभिमानी
     बेंगळुरू - बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणार्‍या अत्याचाराच्या निषेधार्थ हिंदु जनजागृती समितीच्या वतीने बेंगळुरू शहरातील टाऊन हॉल येथे ११ डिसेंबर या दिवशी राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला हिंदु जनजागृती समितीचे श्री. जयंत, श्रीराम सेनेचे श्री. प्रितेश, सनातन संस्थेच्या सौ. गायत्री राव, हिंदुत्वनिष्ठ श्री. व्यंकटस्वामी रेड्डी यांनी आंदोलनाला संबोधित केले. या वेळी त्यांनी ‘बांगलादेशी हिंदूंच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी भारत सरकारने बांगलादेशी सरकारवर दबाव आणला पाहिजे. अन्यथा येत्या ३० वर्षांत बांगलादेशात एकही हिंदु शिल्लक रहाणार नाही’, असे प्रतिपादन केले. या वेळी विविध संघटनांचे अनेक हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.

स्पेनची राजधानी माद्रीदमध्ये गंगा आरती लोकप्रिय !

विदेशी लोकांना भारतीय संस्कृतीचे महत्त्व कळते, तेवढे भारतियांना कळते का ? 
     माद्रीद (स्पेन) - गंगा आरती केवळ भारतातच लोकप्रिय आहे, असे नाही तर युरोपमधील शहरांमध्येही तेवढीच लोकप्रिय आहे. स्पॅनिश लोकही याला अपवाद नाहीत. वाराणसीच्या गंगा घाटावर सायंकाळच्या वेळी ज्याप्रमाणे आरतीचा नित्यक्रम असतो, त्याचप्रकारे स्पेनची राजधानी माद्रीद येथील बनारस हॉटेलमध्येही प्रतिदिन ही आरती केली जाते. त्यासाठी त्यांनी विशेष तलाव बनवून घेतला आहे.
     माद्रीद येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ असलेल्या बनारस नावाने हॉटेल आहे. संपूर्ण शहरात शाकाहारी भोजन मिळण्याचे हे एकमेव स्थान आहे. या ठिकाणी सायंकाळी आरती झाल्यावरच भोजन वाढले जाते. येथे भारतातील विविध राज्यांतील अनेक पदार्थ उपलब्ध आहेत. भारतीय पर्यटकांसाठी स्पेन विशेष महत्त्व ठेवून आहे. येथील सरकारही भारतीय पर्यटकांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यांच्या मते स्पॅनीश लोकांना भारतीय संस्कृतीचे वेड आहे.अमेरिकेत हिजाब परिधान केलेल्या महिला पोलिसाला ‘इसिस’ असे संबोधले !

अमेरिकेतील आतंकवादी आक्रमणानंतर तेथे मुसलमानांच्या 
विरोधात वातावरण निर्माण होत असून अशा घटना त्याचेच द्योतक आहे ! 
उदारमतवादी आणि सुधारणावादी समाजातही मुसलमानविरोधी वातावरण का 
निर्माण होत आहे, याचे उत्तर भारतातील धर्मनिरपेक्षतावाल्यांनी शोधणे आवश्यक ! 
     न्यूयॉर्क - हिजाब परिधान केलेल्या एल्म एल्सोकेरी नामक मुसलमान पोलीस महिलेला ३० वर्षांच्या एका श्‍वेतवर्णीय व्यक्तीने ‘‘इसिस’, मी तुझा गळा कापीन, तुझ्या देशात परत जा’’, असे म्हटले. त्यानंतर तिच्या १६ वर्षांच्या मुलाला मारहाणही केली. त्यानंतर ती व्यक्ती तेथून पळून गेली. पोलीस त्या व्यक्तीचा शोध घेत आहेत. वर्ष २०१४ मध्ये एल्सोकेरी यांना आग लागलेल्या एका इमारतीत घुसून एका वयस्कर व्यक्तीचा आणि लहान मुलीचा जीव वाचवल्यासाठी पदक मिळाले होते.

जर्मनीमध्ये मुसलमान शरणार्थींचा ख्रिस्ती धर्मात प्रवेश !

शरणार्थींवर ओढवलेल्या परिस्थितीचा धर्मांतरासाठी अपलाभ करून घेणारे ख्रिस्ती !
     बर्लिन - जर्मनीत काही मुसलमान शरणार्थींनी नुकतेच ख्रिस्ती धर्मात धर्मांतर करण्यात आले. ख्रिस्ती धर्मगुरु मथाईस लिंक यांनी त्यांना ‘बाप्तिस्मा’ (ख्रिस्ती धर्माची दीक्षा) दिला. अद्याप बरेच शरणार्थी ख्रिस्ती धर्मात प्रवेश करण्याच्या सिद्धतेत आहेत. इराणमधील एक शरणार्थी मॅटीन राईट यांनी ‘बाप्तिस्मा’ झाल्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त करतांना ‘मी आनंदी आहे’ असे सांगितले. जर्मनीमध्ये बर्‍याच मुसलमान शरणार्थींना सध्या ख्रिस्ती धर्माकडे ओढले जात आहे. वर्ष २०१५ मध्ये सुमारे ९ लक्ष शरणार्थींनी जर्मनीमध्ये आश्रय घेतला होता. २०१५ मध्ये सुमारे ९ लक्ष शरणार्थींनी जर्मनीमध्ये आश्रय घेतला आहे. हे शरणार्थी इराण, अफगाणिस्तान, सिरिया इत्यादी देशांमधून आले आहेत. या शरणार्थींना जर्मनीतील समाजाशी एकरूप होऊन रहायचे आहे, असे चर्चच्या नेत्यांनी सांगितले.

हेरिटेज धोरणाच्या माध्यमातून पर्यटनस्थळांचा विकास करणार ! - पर्यटनमंत्री जयकुमार रावल

     नागपूर (वार्ता.) - हेरिटेज धोरण निश्‍चित करून त्या माध्यमातून राज्यातील पर्यटनस्थळांचा सर्वांगीण विकास करण्यात येईल, अशी माहिती पर्यटनमंत्री श्री. जयकुमार रावल यांनी १६ डिसेंबर या दिवशी विधानसभेत दिली. सामानगड (ता. गडहिंग्लज, जिल्हा कोल्हापूर) या पर्यटनस्थळाच्या विकासाविषयीचा प्रश्‍न सदस्य श्रीमती संध्यादेवी देसाई-कुपेकर यांनी विचारला होता.

मोहरममधील हिंसक प्रकारांना प्रतिबंध घालणारे परिपत्रक संपूर्ण राज्यात लागू करणार का ?

मुंबई उच्च न्यायालयाचा राज्य शासनाला प्रश्‍न
हिंदूंच्या धार्मिक प्रथांविरोधात गळा काढणारे पुरोगामी याविषयी गप्प का ?
      मुंबई, १७ डिसेंबर - डिसेंबर २०१४ मध्ये मुंबई पोलिसांनी एक परिपत्रक काढून प्रत्येक पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकाने मोहरमपूर्वी मोहल्ला कमिटीची बैठक घेऊन मोहरमच्या मिरवणुकांमध्ये मुलांना सहभागी न करणे, धारदार शस्त्रांचा वापर टाळणे, तसेच मिरवणुकीचे चित्रीकरण करण्याविषयी मार्गदर्शन करणे याविषयी निर्देश दिले होते. हे परिपत्रक संपूर्ण राज्यभरात लागू करणार का ? असा प्रश्‍न मुंबई उच्च न्यायालयाने १५ डिसेंबर या दिवशी उपस्थित केला. याविषयी राज्य शासनाने भूमिका स्पष्ट करावी, असा आदेशही न्यायालयाने दिला आहे. मोहरमच्या मिरवणुकांमध्ये लहान मुलेही सहभागी होतात आणि तीही स्वत: शरीराला धारदार शस्त्र वा अन्य मार्गाने इजा करून घेतात. त्यामुळे मिरवणुकांमध्ये मुलांच्या सहभागावर बंदी घालण्याची मागणी जनहित याचिकेद्वारे करण्यात आली होती. न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांच्यापुढे या प्रकरणी सुनावणी झाली.

राज्याला ‘गुन्हेगारी राज्य’ ठरवण्याचे पाप करू नका !

कायदा सुव्यवस्थेच्या प्रस्तावावर मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे उत्तर !
विधान परिषद 
     नागपूर, १७ डिसेंबर (वार्ता.) - गुन्हेगारीची वर्गवारी लोकसंख्येच्या प्रमाणात ठरते. ही वर्गवारी लक्षात घेता दिल्ली, केरळ, आसाम, हरियाणा, तेलंगणा आणि तामिळनाडू आदी राज्यांत महाराष्ट्रापेक्षा जास्त गुन्हे प्रविष्ट आहेत. त्यामुळे राज्याला ‘गुन्हेगारी राज्य’ ठरवण्याचे पाप करू नका, असे प्रतिपादन मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी केले. (असे असले तरी गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन होण्यासाठीचे प्रयत्न राज्य शासनाकडून अधिक गांभिर्याने व्हायला हवेत, हे कोणीही नाकारणार नाही ! - संपादक) अधिवेशनाच्या अंतिम आठवड्याच्या प्रस्तावांतर्गत विरोधी पक्षांनी गृह खात्याच्या प्रकरणी चर्चा उपस्थित केली होती. त्या चर्चेला ते उत्तर देत होते. या वेळी विरोधकांना आश्‍वासन देतांना ते म्हणाले की, राज्यात सुरक्षेविषयीचे सर्वंकष धोरण आणि दृष्टीकोन सिद्ध करण्याविषयी राज्य सरकार विचार करेल. 

केरळमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्याच्या हत्येप्रकरणी संघाचे १३ कार्यकर्ते दोषी !

केरळ किंवा एकूणच दक्षिण भारतात हिंदु नेत्यांच्या हत्या केल्या जात आहेत; मात्र या हत्यांच्या प्रकरणी कोणाला अटक होत नाही आणि झाली, तर त्यांना शिक्षाही लवकर होत नाही ! कम्युनिस्टांनी संघाच्या अनेक कार्यकर्त्यांच्या हत्या केल्याचा आरोप आहे; मात्र त्यांनाही शिक्षा होत नाही ! 
      थिरूवनंतपुरम् - येथील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते विष्णु यांच्या हत्येच्या प्रकरणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या १३ कार्यकर्त्यांना थिरुवनंतपुरम्मधील स्थानिक न्यायालयाने दोषी ठरवले आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश टीके उन्नीमोल यावर शिक्षा सुनावणार आहेत. १ एप्रिल २००८ मध्ये ही हत्या करण्यात आली होती. 
      थिरूवनंतपुरममधील कैथामुक्कु येथील विष्णु यांच्या घरातच तलवार आणि अन्य धारदार शस्त्रांनी त्यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी १६ जणांवर गुन्हा प्रविष्ट करण्यात आला होता. यातील एकाचा मृत्यू झाला, तर दुसर्‍याला निर्दोेष ठरवण्यात आले, तर तिसरा फरार आहे.

‘सनबर्न फेस्टिव्हल’ रहित होण्यासाठी पुणे येथे न्यायालयात दावे प्रविष्ट !

     पुणे - अमली पदार्थ, मद्य यांचा मुक्त वापर असलेल्या ‘सनबर्न’ या संगीत महोत्सवाला नागरिकांचा विरोध वाढत असून आता हा महोत्सव कायद्याच्या कचाट्यातही सापडला आहे. हा महोत्सव रहित होण्यासाठी येथील शिवाजीनगर न्यायालयात दिवाणी आणि फौजदारी दावे दाखल झाले आहेत. १७ डिसेंबर या दिवशी झालेल्या पहिल्या सुनावणीच्या वेळी खटल्यासाठी १९ डिसेंबरची पुढची तारीख देण्यात आली. माहिती सेवा समितीचे श्री. चंद्रकांत वारघडे आणि श्री. गणेश म्हस्के यांनी अधिवक्ता वाजीद खान यांच्या माध्यमातून हे खटले प्रविष्ट केले आहेत. यामध्ये महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळ, ‘सनबर्न फेस्टिवल’चे मुख्य कार्यकारी अधिकारी करण सिंग आणि जिल्हाधिकारी यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. 
वादीच्या वतीने करण्यात आलेल्या निवेदनांत म्हटले आहे की, 
१. ‘सनबर्न फेस्टिव्हल’मध्ये तिरंग्याचा अवमान करण्यात आल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या होत्या. 
२. वर्ष २०१३ मध्ये गोव्यातील वागोतोर किनार्‍यावर अमली पदार्थविरोधी पथकाने टाकलेल्या धाडीमध्ये अमली पदार्थांचा दलाल सौरभ अगरवाल याला चरससहित अटक करण्यात आली होती.

कोल्हापूर येथील ‘शिवाजी विद्यापिठा’चे नामकरण ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ करा ! - शिक्षणमंत्र्यांना निवेदन

श्री. विनोद तावडे यांना निवेदन देतांना
आमदार श्री. राजेश क्षीरसागर (उजवीकडे)
नागपूर, १७ डिसेंबर (वार्ता.) - मुंबईतील पश्‍चिम उपनगरीय रेल्वे मार्गावरील ‘एलफिन्सटन’ रेल्वे स्थानकाचे ‘प्रभादेवी’ असे नामकरण होणार आहे, तसेच ‘छत्रपती शिवाजी टर्मिनस’ (CST) रेल्वेस्थानकाच्या नावात ‘महाराज’ हे आदरार्थी संबोधन समाविष्ट करून ते ‘छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस’ (CSMT), तसेच ‘छत्रपती शिवाजी आंतररष्ट्रीय विमानतळ’ आता ‘छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असे केले जाणार आहे. त्याचप्रमाणे राज्य शासनाने कोल्हापूर येथील ‘शिवाजी विद्यापिठा’चे नामांतर ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’, असे करावे, अशा मागणीचे निवेदन शिवसेनेचे आमदार श्री. राजेश क्षीरसागर यांनी १७ डिसेंबर या दिवशी शिक्षणमंत्री श्री. विनोद तावडे यांना दिले. 
या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, कोल्हापूर येथील विद्यापिठाचे नाव ‘शिवाजी विद्यापीठ’ असे असून त्यात छत्रपतींचा उल्लेख काहीसा एकेरी आणि आदरार्थी संबोधन नसलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य आणि पराक्रम यांचे स्मरण आदराने करणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यांचा उल्लेख योग्य उपाधी आणि संबोधन यांसह ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ होणे अत्यावश्यक आहे.


कोल्हापूर येथील विद्यापिठाचे नामकरण ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ करा ! - हिंदु जनजागृती समितीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

     कोल्हापूर येथील ‘शिवाजी विद्यापिठा’चे नामांतर ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ करावे, या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांना सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक आणि हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्राचे प्रवक्ता श्री. अरविंद पानसरे यांनी दिले. या निवेदनात मागणी करतांना म्हटले आहे की, काँग्रेसच्या कार्यकाळात १८ नोव्हेंबर १९६२ ला स्थापन झालेल्या विद्यापिठाच्या नावात ५४ वर्षांनंतरही छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख होणे हे तमाम शिवप्रेमींसाठी वेदनादायी आहे. त्यामुळे ‘शिवाजी विद्यापिठा’चे ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’, असे नामांतर करण्यासाठी आपण उचित कार्यवाही त्वरित करावी.

अनैतिक वर्तन करण्याविषयी विचारणा करणार्‍या अरबिंदो आश्रमाची देखरेख करणार्‍या कुटुंबाला पोलिसांकडून मारहाण !

जनतेचे रक्षक नव्हे, तर गुंडांप्रमाणे वर्तन करणारे पोलीस !
     नागपूर - अरबिंदो आश्रमात मद्यपान करण्यास बंदी केल्याच्या कारणावरून ‘मॉरिस टी पॉईंट’च्या सुरक्षेसाठी नेमलेल्या पोलिसांनी आश्रमाची देखरेख करणार्‍या मुरेकर कुटुंबाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. अधिवेशनाच्या काळात पोलिसांनी या आश्रमाच्या परिसरात मद्यपान केले, तसेच कचरा केला होता, यासंबंधी देखरेख करणार्‍या कुटुंबाने त्यांना जाब विचारला होता. (‘मारहाण करणारे असे व्यसनी पोलीस जनतेचे रक्षक नव्हे, भक्षकच आहेत. शासनाने अशा पोलिसांना तात्काळ निलंबित करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी जनतेची अपेक्षा आहे !’ - संपादक)

धुळे जिल्ह्यातील भुईकोट किल्ला नामशेष होण्याच्या मार्गावर !

राज्यात पुरातत्व विभाग सक्षमपणे कार्यरत नसल्याचे उदाहरण ! 
छत्रपती शिवाजी महाराजांचा दुर्गरूपी अनमोल ठेवा जपण्यासाठी शासन काही करेल का ?
     धुळे, १७ डिसेंबर - येथील शिरपूर तालुक्यातील थाळनेर गावातील भुईकोट किल्ल्याची स्थिती बिकट झाली असून ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेला हा किल्ला नामशेष होण्याच्या मार्गावर आला आहे. 
 • किल्ल्यामध्ये संरक्षण तटबंदी, पुरातन विहिरी, कारंजी, हौद आणि धान्य साठवणीचे रांजण असे अवशेष पहायला मिळतात. 
 • थाळनेर गावातील काही नागरिकांनी हा किल्ला अक्षरशः पोखरून काढला आहे. अनेक लोकांनी किल्ल्यातील मोठमोठे दगड, माती आणि विटा हे बांधकामासाठी घेऊन जात आहेत. त्यामुळे या किल्ल्याचे हनन मोठ्या प्रमाणावर होत आहे. किल्ल्याचे बुरूज ढासळले असून भींतीही पडल्या आहेत.
 • इतिहासतज्ञ डॉ. टी.टी. महाजन यांनी सांगितले की, भुईकोट किल्ल्याची बांधणी शासनाने केली पाहिजे, तरच त्याला पुनर्वैभव प्राप्त होईल.


नाशिक जिल्ह्यातील गडकोट संवर्धनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘किल्ले वाचवा !’ आंदोलन शिवकार्य गडकोट मोहिमेचा उपक्रम

गडकोट संवर्धनासाठी निवेदन द्यावे लागणे, हे लज्जास्पद नव्हे का ? 
गडकोटांच्या संवर्धनासाठी ‘हिंदु राष्ट्र’ (सनातन धर्म राज्य) आवश्यक !
     नाशिक, १७ डिसेंबर - राज्यासह जिल्ह्यामध्ये अनेक पुरातन किल्ले असून ते पडक्या स्थितीत आहेत. शासनाच्या दुर्लक्षामुळे त्या गडकोट किल्ल्यांची अतोनात हानी होत आहे. या गडकोटांचे संवर्धन करण्यासाठी तातडीने यंत्रणा नेमून त्यासाठी आवश्यक तो निधी देण्यात यावा. तसेच हा ऐतिहासिक ठेवा पुरातत्व पद्धतीने जतन करण्यात यावा, या आणि अन्य मागण्यांसाठी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवकार्य गडकोट मोहिमेच्या वतीने १६ डिसेंबरला आंदोलन करण्यात आले. 
या आंदोलनानंतर देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गडकोटांवर व्यसनी लोकांचा वावर वाढला असून अनुचित प्रकार वाढले आहेत. यामुळे इतिहासाचे विद्रुपीकरण होत आहे. सरकारने राज्यातील १० दुर्गांसाठी निधीची तरतूद करूनही कोणतेही कामकाज झालेले नाही. त्यामुळे दुर्ग संवर्धनाचे काम वेगाने हाती घ्यावे. 
क्षणचित्र - आंदोलनाच्या वेळी ‘जेव्हा गड बोलू लागला’ हे एकपात्री नाटक सादर करून त्यात किल्ल्यांची व्यथा मांडण्यात आली. त्यानंतर दुर्गगीत सादर करण्यात आले.

फलक प्रसिद्धीकरता

बंगालचे काश्मीर होण्यापासून वाचवण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे !
     बंगालमधील हावडा जिल्ह्यातील धुलवाडाजवळील बानिजोपोला या गावात १३ डिसेंबरला महमंद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्तच्या मिरवणुकीच्या वेळी धर्मांधांनी हिंदूंवर आक्रमण करून त्यांच्या ६० घरांना आग लावली. या घटनेनंतर येथील ६० हिंदू परिवारांनी पलायन केले आहे.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! 
Bangal me Havara ke Banijopola gav me dharmandhone Hinduo ke 60 ghar jalaye aur lutpat ki. - Sarkar Bangal ke Hinduon ka ant kab tak dekhegi ?
जागो !
बंगाल में हावडा के बानिजोपोला गांव में धर्मांधो ने हिन्दुआें के ६० घर जलाए और लूटपाट की. - सरकार बंगाल के हिन्दुआें का अंत कब तब देखेगी ?

दत्तजयंतीनिमित्त ठाणे जिल्ह्यात लावलेल्या ग्रंथप्रदर्शनाला लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि मान्यवर यांच्या भेटी

शिवसेनेचे नगरसेवक श्री. उमेश पाटील ग्रंथ पहातांना
प्रदर्शन पहातांना शिवसेनेचे खासदार श्री. राजन विचारे (डावीकडे)
ठाणे - येथे दत्तजयंतीनिमित्त ३३ ठिकाणी सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले. त्यांपैकी काही ठिकाणच्या प्रदर्शनांना विविध मंत्री आणि प्रशासकीय अधिकारी यांनी भेटी दिल्या. 

 • ठाणे, नौपाडा येथील विठ्ठल सायंन्ना दत्त मंदिरातील ग्रंथ प्रदर्शनाला शिवसेनेचे खासदार श्री. राजन विचारे, तसेच कौपिनेश्‍वर मंदिर ट्रस्टचे सर्वेसर्वा श्री. मा.य. गोखले यांनी भेट दिली. 
 • कळवा येथील व्हाईट हाऊसमध्ये लावलेल्या ग्रंथ प्रदर्शनाला भाजपचे माजी उपमहापौर श्री. अशोक भोईर आणि खारेगावचे नगरसेवक श्री. उमेश पाटील यांनी भेट दिली. त्यांनी सनातनचे कार्य चांगले असल्याचे सांगून प्रशंसाही केली. 
 • माजी विरोधी पक्ष नेते श्री. प्रकाश बर्डे यांनीही नेहमीप्रमाणे ग्रंथप्रदर्शन लावण्यास सहकार्य केले. 
 • श्री. कळवा येथील ग्रंथ प्रदर्शनाला शिवसेनेच्या नगरसेविका सौ. अनिता गौरी यांनी भेट दिली.
 • डोंबिवली येथे एका ठिकाणी धर्मशिक्षणवर्गातील धर्माभिमानी महिलांनी स्वत:हून ग्रंथ प्रदर्शन लावले. गळ्यात ‘क्रॉस’ घालून आलेल्या एका हिंदूचे महिलांनी प्रबोधन करून त्याला सनातननिर्मित पदकाचे महत्त्व सांगितले. त्यानंतर त्याने ‘क्रॉस’ काढून पदक विकत घेऊन गळ्यात घातले. 
 • कल्याण येथे वाचक सौ. सोनाली भारांबे यांनी त्याच्या कार्यालयात दत्तजयंतीचे महत्त्व सांगितले. त्यांचे पती श्री. भारांबे यांनीही त्यांच्या कार्यालयातील ग्रंथालयासाठी ग्रंथांची मागणी केली. 
 • अंबरनाथ येथे ग्रंथप्रदर्शनाच्या ठिकाणी धर्मशिक्षणवर्गातील महिला उपस्थित होत्या. सेवेतून मिळणार्‍या आनंदाने त्या लवकर न निघता शेवटपर्यंत थांबल्या.

जळगाव जिल्हा बार काऊन्सिल असोसिएशनचे अध्यक्ष आणि अधिवक्ता यांना धर्मजागृती सभेचे निमंत्रण !

डावीकडून श्री. प्रशांत जुवेकर, निमंत्रण 
स्वीकारतांना अधिवक्ता श्री. लक्ष्मण वाणी, अधिवक्ता 
श्री. गोविंद तिवारी, त्यांचे सहकारी, अधिवक्ता श्री. निरंजन चौधरी
जळगाव - येथील जळगाव जिल्हा बार काऊन्सिल असोसिएशनचे अध्यक्ष आणि अधिवक्ता श्री. लक्ष्मण वाणी यांना येथे २५ डिसेंबर या दिवशी होणार्‍या हिंदु धर्मजागृती सभेचे निमंत्रण देण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रशांत जुवेकर, श्री. विजय पाटील आणि हिंदुत्ववादी अधिवक्ता श्री. निरंजन चौधरी उपस्थित होते. अधिवक्ता श्री. लक्ष्मण वाणी म्हणाले, ‘‘आम्ही सर्व अधिवक्त्यांना सभेला येण्याचे आवाहन करू.’’ श्री. प्रशांत जुवेकर यांनी काऊन्सिलच्या अधिवक्त्यांना सभेविषयी माहिती दिली. जळगाव जिल्ह्याचे माजी पोलीस निरीक्षक श्री. रमेश सुशील आणि तालुका अध्यक्ष आबासाहेब पाटील यांनाही निमंत्रण देण्यात आले.

जळगाव येथे हिंदु धर्मजागृती सभेच्या निमंत्रण बैठकांना ग्रामीण भागात उदंड प्रतिसाद!

जळगाव, १७ डिसेंबर (वार्ता.)- येथे २५ डिसेंबर या दिवशी होणार असलेल्या हिंदु धर्मजागृती सभेनिमित्त आयोजित केल्या जाणार्‍या निमंत्रण बैठकांना तालुका आणि ग्रामीण स्तरावर चांगला प्रतिसाद मिळत आहे.
 • भुसावळ, यावल, धरणगाव, पारोळा, एरंडोल, जामनेर, पाचोरा यांसह जळगाव तालुक्यातील ३२ गावांमध्ये सभेचा प्रसार करण्यात आला. 
 • आतापर्यंत ग्रामीण भागात ५६ हून अधिक बैठकांमध्ये ४ सहस्रांहून अधिक धर्माभिमानी हिंदूंपर्यंत सभेचा विषय पोचवण्यात आला आहे.
 • ग्रामीण भागातील एस्.टी. बस, प्रवासी रिक्शा आणि अन्य वाहनांवर सभेच्या निमंत्रणाचे पोस्टर, भित्तीपत्रके लावण्यात आली आहेत. ग्रामीण भागातील बस स्थानक, ग्रामपंचायत कार्यालये आणि इतर गावातील मुख्य चौकांमध्ये बॅनर लावले आहे. 
 • हरिनाम कीर्तन सप्ताहात सभेचा विषय सांगितल्यावर कीर्तनकार किंवा प्रवचनकार २० ते २५ मिनिटे धर्मसभेच्या प्रचाराविषयी मार्गदर्शन करून सभेला उपस्थित रहाण्याविषयी श्रोत्यांना आवाहन करत आहेत.


औषधी वनस्पतींची लागवड करा !

 • भावी महायुद्धकाळात डॉक्टर, औषधे आदी उपलब्ध नसतांना अन् नेहमीसाठीही उपयुक्त सनातनचा ग्रंथ !
 • भावी आपत्काळातील संजीवनी
 • सनातनची ग्रंथमालिका
१. काळाची पावले ओळखून
जनकल्याणासाठी ग्रंथाची निर्मिती !
        ‘पूर, भूकंप यांसारख्या नैसर्गिक आपत्तींनंतर मोठ्या प्रमाणात रोगराई पसरते. जनजीवन आणि दळणवळण सुविधा विस्कळीत झाल्याने तयार औषधांचा पुरवठा होऊ शकत नाही. कधी सीमेवर युद्धाची ठिणगी पडल्यास शासनाकडे उपलब्ध औषधे सैन्याला पुरवायची कि जनतेला, हा प्रश्‍न येतो आणि साहजिकच सर्व सुविधा सैन्याकडे वळवल्या जातात. अलीकडेच नेपाळमध्ये झालेल्या मोठ्या भूकंपामध्ये १० सहस्रांहून अधिक लोक मरण पावले. तेथेही औषधांचा प्रचंड तुटवडा भासत होता. अशा वेळी शासकीय यंत्रणांवर अवलंबून न रहाता औषधांच्या बाबतीत स्वयंपूर्ण व्हावे, यासाठी प्रत्येकाने आतापासूनच निदान स्वतःपुरत्या तरी काही औषधी वनस्पती लावायला हव्यात. या वनस्पती कशा लावाव्यात याची इत्थंभूत माहिती प्रस्तुत ग्रंथात दिली आहे. हा ग्रंथ म्हणजे काळाची पाऊले ओळखून जनकल्याणासाठी केलेला एक यज्ञच म्हणावा लागेल. 

घराघरात खेळला जाणारा ‘सापशिडी’ हा खेळ संत ज्ञानदेवांच्या काळात ‘मोक्षपट’ या नावाने ओळखला जात असणे

१. ‘सापशिडी’ हा खेळ संत ज्ञानदेवांच्या काळात ‘मोक्षपट’ या 
नावाने ओळखला जात असल्याचे संशोधनातून समोर येणे
     ‘घराघरात खेळला जाणारा ‘सापशिडी’ हा खेळ साक्षात् ज्ञानेश्‍वर माऊलींनीही खेळला असावा’, असे दाखले मिळाले आहेत. ज्ञानदेवांच्या काळात हा खेळ ‘मोक्षपट’ या नावाने ओळखला जात असल्याचे संशोधनातून समोर आले आहे. डेन्मार्क येथील प्राध्यापक जेकॉब यांच्या संशोधनातून हा ‘मोक्षपट’ उलगडला आहे.
२. भारतभरातून अनेक सापशिड्यांचे पट मिळवनूही त्यामध्ये ज्ञानदेवांचा 
उल्लेख कुठेच नसणे आणि संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक आणि संशोधक वा.ल. 
मंजुळ यांनी डेक्कन महाविद्यालयामध्ये संदर्भ असल्याचे सांगणे अन् ‘मोक्षपटा’चा उलगडा होणे
    ‘ट्रॅडिशन’ या संकल्पनेच्या अंतर्गत ‘संत ज्ञानेश्‍वरांच्या काळात खेळले जाणारे खेळ’, असा विषय संशोधनासाठी घेतला. त्यासाठी त्यांनी त्या काळी ‘कोणते खेळ खेळले जात असावेत’, यावर संशोधन सुरू केले. सापशिडीचा खेळ त्याही काळात खेळला जात होता, अशी माहिती त्यांना मिळाल्यानंतर त्यांनी भारतभरातून अनेक सापशिड्यांचे पट मिळवले; पण त्यामध्ये ज्ञानदेवांचा उल्लेख कुठेच नव्हता. ज्ञानदेवांची अनेक चरित्रे वाचल्यानंतर त्यांना कुठेही तशा प्रकारचे संदर्भ सापडले नाहीत. त्यांनी या संदर्भात संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक आणि संशोधक वा.ल. मंजुळ यांच्याकडे विचारणा केली असता मंजुळ यांनी डेक्कन महाविद्यालयामध्ये तशा प्रकारचा संदर्भ असल्याचे सांगितले आणि ‘मोक्षपटा’चा उलगडा झाला. जेकॉब यांना डेक्कन महाविद्यालयामध्ये श्री. रा.चिं. ढेरे यांच्या हस्तलिखित संग्रहातून दोन ‘मोक्षपट’ मिळाले आहेत.

सनातनची ग्रंथसंपदा ऑनलाईन खरेदी करा !

सनातनच्या विक्रीकेंद्रांवर आणि 
वितरकांकडे उपलब्ध असलेले ग्रंथ आता 
SanatanShop.com वरही उपलब्ध !
विशिष्ट मूल्याच्या खरेदीवर विनामूल्य घरपोच सेवा !
स्थानिक वितरकाचा संपर्क :
९३२२३१५३१७

औषधी वनस्पतींची लागवड करा !

 • २०० हून अधिक औषधी वनस्पतींविषयी माहिती !
 • दैनंदिन जीवनात आढळणार्‍या १०० हून अधिक विकारांवर उपचार !
 • ४८ रंगीत छायाचित्रांद्वारे औषधी वनस्पतींचा सुयोग्य परिचय !
 • लागवडीसाठी औषधी वनस्पतींचे बियाणे, रोपे इत्यादी कोठे मिळतात, याची माहिती !
 • केवळ शेतकर्‍यांनाच नव्हे, तर शहरातील लोकांनाही उपयुक्त अशी बहुमूल्य माहिती !
घरी अंगणी भूखंडी । लावा औषधी वनस्पती ।
मानवांचे जीणे आपत्काळी । सुकर त्या करतील ॥
येत्या पावसाळ्यात औषधी वनस्पतींची लागवड करा !

राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्याच्या संदर्भात केलेली ही दिरंगाईच आहे !

     ‘राज्यात प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाच्या निर्मितीस पायबंद घालण्याच्या दृष्टीने त्याचे उत्पादक, विक्रेते आणि वितरक यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश १४ जून २०१४ या दिवशी एका परिपत्रकाद्वारे दिले आहेत. तसेच प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाच्या निर्मितीस बंदी आणण्याचा प्रस्ताव केंद्रीय गृहमंत्रालयाकडे पाठवला आहे, असे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत लेखी उत्तरात सांगितले.
    गेली १४ वर्षे हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था प्लास्टिकचे राष्ट्रध्वज न वापरण्याच्या संदर्भात अभियान राबवत आहे. त्यामुळे अनेक शासकीय कार्यालयांतून या संदर्भात आदेश काढण्यात आले आहेत.

जे इटलीच्या न्यायालयाला कळते, ते भारत सरकारला का कळत नाही ? का कळूनही आपले हात धुवून घेतात ?

     ‘ऑगस्टा वेस्टलॅण्ड घोटाळ्याच्या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने माजी वायूदल प्रमुख एस्.पी. त्यागी, अधिवक्ता गौतम खेतान आणि संजीव त्यागी यांना अटक केली. इटलीतील मिलानच्या न्यायालयाने फिनमेकॅनिका आणि ऑगस्टा वेस्टलॅण्ड यांनी भारतीय अधिकार्‍यांना मध्यस्थांच्या माध्यमातून कंत्राट मिळवण्यासाठी दलाली दिली होती, याचा उल्लेख केला होता.’

सर्वोच्च न्यायालयाला वाटते, तसे सरकारला का वाटत नाही ?

     ‘प्रत्येक आठवड्याला २४ सहस्र रुपये बँकेतून काढण्याची सीमा घातली असतांना लोकांना ही रक्कम का मिळत नाही ? याचे नेमके कारण काय आहे, असा प्रश्‍न सर्वोच्च न्यायालयाने नोटाबंदीविषयीच्या याचिकेवर ९ डिसेंबर २०१६ या दिवशी झालेल्या सुनावणीच्या वेळी केंद्र सरकारला विचारले.’
    आज भारतात ‘सेक्युलरवादा’च्या नावे अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन आणि हिंदूंवर अन्याय केला जात आहे ! - श्री. हेमंत मणेरीकर, समन्वयक, हिंदु जनजागृती समिती, सिंधुदुर्ग.
हिंदू जागृत झाले, तर अटकेपार झेंडा फडकवतात, हा इतिहास आहे ! - सौ. आनंदी वानखडे, सनातन संस्था
      आपल्या ऋषिमुनींनी मानवजातीच्या कल्याणासाठी इतके शोध लावले; पण त्यावर ‘पेटंट’ घेऊन कधी स्वतःचा अधिकार प्रस्थापित केला नाही.’ - श्री. आनंद जाखोटिया, हिंदु जनजागृती समिती

केवळ विकासामुळे विजय मिळत नाही, हे लक्षात घ्या !

     ‘वाजपेयी यांच्या काळात ‘इंडिया शायनिंग’ची घोषणा देण्यात येऊनही पक्ष पराभूत झाला. नरसिंह राव यांनी आर्थिक सुधारणेद्वारे देशाचा विकासदर वाढवूनही त्यांचा पराभव झाला. राजीव गांधी यांनी औद्योगिक क्षेत्रात प्रगती घडवून आणल्यानंतरही त्यांचा पराभव झाला. मोरारजी देसाई यांनीही आर्थिक सुधारणा केल्या, तरीही त्यांचा पराभव झाला. म्हणजेच विकासामुळे विजय मिळत नाही, हे लक्षात घ्यायला हवे.’ - खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी, भाजप

प्रथम मी हिंदु आहे !’ असे सांगून पदत्यागाचीही सिद्धता असणारे राजासिंह ठाकूर हे अभिमान वाटावा, असे हिंदु लोकप्रतिनिधी !

     ‘मला एका हिंदु धर्मजागृती सभेला येण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्नही झाला. ‘तुम्ही एक आमदार आहात’, असे सांगून इतर अनेक गोष्टी सांगण्यात आल्या; मात्र ‘ही सभा माझ्यासाठी प्राधान्य असून मी त्यासाठी जाणारच !’, असे मी ठामपणे सांगितले. प्रथमत: मी हिंदु आहे, नंतर लोकप्रतिनिधी आहे. प्रसंगी मला लोकप्रतिनिधीपद सोडावे लागले, तरी हरकत नाही; मात्र मी हिंदु धर्मासाठी कार्य करतच रहाणार !’ - आमदार राजासिंह ठाकूर, भाजप, भाग्यनगर

पाकिस्तान भेकड नाही, उलट भारतीय राज्यकर्तेच स्वातंत्र्यापासून आतापर्यंत भेकडपणे वागत आले आहेत !

       ‘भारताला युद्धात पराजित करणे कठीण आहे, हे पाकला समजले आहे. कारगिल युद्धाच्या वेळीही पाकला पराजित व्हावे लागले होते, तरीही पाक भेकडाप्रमाणे आक्रमणे करत आहे. पाकशी हृदयापासून नाते जोडण्याचा आमचा प्रयत्न होता. त्याच वेळी आमची भावना पाकने समजून घ्यायला हवी होती; पण त्यांना ते समजले नाही. त्यानंतरही शिष्टाचार बाजूला ठेवत मोदी लाहोरला आले; पण पाकच्या नापाक कारवाया चालूच राहिल्या.’ - केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह

हे स्वातंत्र्यानंतर ७० वर्षांनी जाहीर करणारी न्यायप्रणाली !

     ‘मुसलमान समाजात प्रचलित असलेली तोंडी तलाकची पद्धत घटनाबाह्य आहे. ही पद्धत मुसलमान महिलांच्या अधिकारांचे उल्लंघन करणारी आहे.’ - अलाहाबाद उच्च न्यायालय

आता हिंदूंचे संघटन करणे आवश्यक !

      ‘वर्ष २०१४ च्या निवडणुकीत मुसलमानांचे लांगूलचालन आणि हिंदूंच्या मतांमध्ये विभाजन असे राजकारण झाले होते. आता मात्र हिंदूंना संघटित करण्याची आवश्यकता आहे. वर्ष २०१४ च्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला हिंदूंची ३१ टक्के मते मिळाली होती. त्याच विचारानुसार पक्ष चालला, तर पुढे ही टक्केवारी ४० होऊ शकते. हिंदुत्वाचा विचार म्हणजे अन्य धर्मियांचा द्वेष करणे, असा नसून हिंदूंमधील वाईट गोष्टी दूर करून त्यांना संघटित करणे असा आहे.’ - खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी, भाजप

इस्लामी देशांत तोंडी तलाकवर बंदी !

    ‘जॉर्डन, सुदान, मोरक्को, ट्युनिशिया, इराण, बांगलादेश आणि इंडोनेशिया या इस्लामी देशांमध्ये ३ वेळा ‘तलाक’ म्हणण्याच्या पद्धतीवर बंदी आहे.’

(म्हणे) ‘हिंदूंना त्यांच्या धर्मपरंपरा पालटायला सांगितल्या, तर कसे वाटेल ?

चैतन्यदायी हिंदु धर्मपरंपरा आणि अन्याय्य तलाक यांची तुलना करणारे खासदार अबू आझमी !
     ‘न्यायालयाच्या निर्णयावर समाजवादी पक्षाचे खासदार अबू आझमी तलाकचे समर्थन करतांना म्हणाले, ‘‘समजा हिंदूंना सांगितले की, त्यांना मृत्यूनंतर जाळायचे नाही किंवा त्यांच्या अन्य धर्मपरंपरांचे पालन करायचे नाही, तर त्यांना कसे वाटेल ? तसेच तलाकच्या संदर्भात आहे.’’ हिंदूंना जर विचारले की, देशातील संविधान मोठे कि धर्माचे संविधान मोठे, तर त्यांचे जे उत्तर असेल, तेच माझे आहे.’

भारतीय संस्कृतीविषयी खोटा आणि अवमानकारक इतिहास शिकवणार्‍या ‘एन्.सी.ई.आर्.टी.’च्या पुस्तकातील चुका

इयत्ता १२ वीच्या ‘भारतीय इतिहासातील मूलभूत संकल्पना’ खोटा 
इतिहास शिकवणार्‍या राष्ट्रद्रोही आणि धर्मद्रोही यांच्यावर कठोर कारवाई करा !
     इयत्ता १२ वीच्या ‘भारतीय इतिहासातील मूलभूत संकल्पना’ (थीम्स अ‍ॅाफ इंडियन हिस्ट्री) या पुस्तकातील पृष्ठ क्रमांक ५८ वरील परिच्छेदात म्हटले आहे की, ‘या साहित्यातील ब्राह्मण लेखक असा दावा करत आहेत की, त्यांचा दृष्टीकोन पूर्ण विश्‍वातील सर्वांना मान्य आहे, त्यांची आज्ञा सर्वत्र मानली जावी, असा त्यांचा आग्रह असायचा.’ (अभ्यासक्रमात जातीवाचक उल्लेख करून समाजात फूट पाडणारी ‘एन्.सी.ई.आर्. टी.’ ! जात्यंध काँग्रेसी राज्यकर्त्यांनी स्वातंत्र्यानंतर समाज एकसंघ राखण्याऐवजी अशा प्रकारे फूट पाडण्याचीच कारस्थाने अधिक केली. प्रत्यक्षात ब्राह्मण लेखकांनी अजूनपर्यंत असा दावा कधीच केलेला नाही.) प.पू. कालीदास देशपांडे आणि त्यांच्या पत्नी यांना नवीन ठिकाणी प्रसार करतांना झालेला विरोध अन् त्यांनी गुरुकृपेने त्यावर केलेली मात !

प.पू. कालीदास देशपांडे
१. नवीन ठिकाणी प्रसाराला गेल्यावर आधी 
बुद्धीप्रामाण्यवाद्यांच्या विरोधाला तोंड द्यावे लागणे 
         ‘नास्तिक आणि बुद्धीप्रामाण्यवादी यांच्यासाठी काळ सोकावला आहे. दुसरा काही चांगले करत असेल, तर त्याचे पाय कसे ओढायचे, त्याला खाली कसे पाडायचे, त्याला अनंत प्रश्‍न विचारून भंडावून कसे सोडायचे, यातच ते धन्यता मानतात. आरंभीच्या काळात नवीन ठिकाणी प्रसारासाठी गेल्यावर प्रथम यांना तोंड देणे भागच होते. एका मोठ्या हिंदुत्वनिष्ठ संघटनेचे काही कार्यकर्ते म्हणतात, ‘आम्ही धर्माला मानत नाही’; पण घरोघरी ते सणवार, कुळाचार, तीर्थयात्रा अशा सर्व कृती करतात; मात्र बोलतांना ‘ईश्‍वर वगैरे काही नाही, थोतांड आहे’, असे म्हणतात.
२. विरोधकांनी त्रास 
देण्यासाठी लढवलेल्या क्लृप्त्या
२ अ. सनातनचे कार्यक्रम होऊ न देण्यासाठी प्रयत्न करणे : आम्ही गावातच येऊ नये; म्हणून खोटी कारणे सांगितली जायची. ज्यांच्याकडे आम्ही मुक्कामाला जात होतो, त्यांच्याविषयी ‘तो गावाला गेलाय’, ‘घराला कुलूप आहे’, ‘आज कुणी येणार नाही’, असा निरोप ठेवला जायचा. हे नित्याचेच झाले होते. प्रवचनासाठी जागा निश्‍चित केली की, रात्रीच व्यवस्थापकाला भेटून, त्याला कैचीत पकडून, म्हणजे तो कर्जदार असेल, शेतसारा किंवा कर भरायचा असेल, त्याचे मूल शाळेत असेल, तर अशा नाजूक सूत्रावर बोट ठेवून प्रवचनाची जागा ऐनवेळी मिळू दिली जायची नाही. प्रवचन, सत्संग आणि बैठका घेण्यासाठी निश्‍चित केलेल्या ठिकाणी त्यांचे कार्यक्रम ठरवले जायचे. त्या ठिकाणची स्वच्छता, सिद्धता वगैरे सर्व आधी आम्हाला करू दिले जायचे आणि ऐनवेळी वरच्यांची चिठ्ठी आणून कार्यक्रम रहित करायला लावून आमचा वेळ वाया घालवला जायचा.

बगलामुखी-ब्रह्मास्त्र याग’ आणि ‘महागणपति होम’ या विधींच्या वेळी देवतांना समर्पित केलेल्या श्रीफळाची (नारळाची) आध्यात्मिक स्तरावरील वैशिष्ट्ये अभ्यासण्यासाठी ‘यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने केलेली वैज्ञानिक चाचणी !

१. वैज्ञानिक चाचणी करण्याचा उद्देश
     हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतील सर्व अडथळे दूर व्हावेत आणि साधकांवरील संकटांचे निवारण व्हावे, यांसाठी भृगु महर्षींच्या आज्ञेने सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात ४ आणि ५.११.२०१६ या दिवशी बगलामुखी-ब्रह्मास्त्र याग करण्यात आला. तसेच सप्तर्षि जीवनाडीपट्टीतून महर्षींनी मार्गदर्शन केल्याप्रमाणे ६.११.२०१६ या दिवशी प.पू. डॉक्टरांच्या ‘उत्तराषाढा’ या जन्मनक्षत्रावर विशेष महागणपति होम आणि ब्रह्मास्त्र याग करण्यात आला. ब्रह्मास्त्र यागाच्या वेळी श्री बगलामुखी देवी, श्री काळभैरव आणि नवग्रह देवता यांचे पूजन करण्यात आले. या पूजाविधीत देवतांना श्रीफळ (नारळ) समर्पित करण्यात आले. ‘पूजाविधीत श्रीफळ समर्पित केल्याने आध्यात्मिकदृष्ट्या काय लाभ होतो ?’, हे वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यासण्याच्या उद्देशाने ‘यू.टी.एस्.’ या उपकरणाद्वारे ७.११.२०१६ या दिवशी ही चाचणी घेण्यात आली.

सनातनच्या देवद, पनवेल येथील आश्रमात पोलिसांच्या चौकशीला सामोरे जातांना साधिकेने अनुभवलेले स्थूल आणि सूक्ष्म स्तरावरील प्रक्रिया !

     सनातनच्या देवद, पनवेल येथील आश्रमात नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येच्या प्रकरणात साधकांना नाहक पोलिसांच्या चौकशीला सामोरे जावे लागले. तेव्हा पोलिसांचे ओरडून आणि अधिकारवाणीने बोलणे, तेच तेच प्रश्‍न विचारून साधकांना गोंधळात टाकणे आणि साधकांचा मानसिक छळ करणे, या अग्निदिव्याला साधक श्रीकृष्ण आणि श्रीगुरु यांच्या कृपेने कसे सामोरे गेले, याविषयी साधिकेला आलेले अनुभव आणि तिला शिकायला मिळाली सूत्रे येथे दिली आहेत. 
      हिंदु राष्ट्राची स्थापना होईपर्यंत अनेक राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी यांना पोलिसांच्या चौकशांना आणि छळांना सामोरे जावे लागेल. त्या वेळी ‘आपले मन स्थिर कसे ठेवायचे आणि भगवंताचे साहाय्य कसे मिळवायचे’, याची माहिती या लेखावरून होईल. यासाठी हा लेख संग्रही ठेवा आणि त्याचा अभ्यास करा.’
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

सिंगापूरच्या प्रसारदौर्‍याच्या वेळी सौ. श्‍वेता क्लार्क यांनी अनुभवलेले प.पू. गुरुदेवांच्या संकल्पाचे फलित आणि अनुभवलेला त्यांच्या चैतन्याचा वर्षाव !

सौ. श्‍वेता क्लार्क
     ‘सिंगापूरचा हा माझा चौथा प्रसारदौरा होता. या पूर्वीचा प्रसारदौर्‍याचा कालावधी केवळ दोन आठवड्यांचा असायचा. या वेळी या दौर्‍याचे नियोजन करतांना साधकांनी मला तिथे १ मासासाठी जाण्यास सुचवले. त्यामुळे आम्ही मिळालेल्या अल्प कालावधीत २ आठवड्यांचे प्रसाराचे नियोजन करून उरलेले २ आठवडे प्रवचने आणि प्रसंगानुसार इतर कार्यक्रम करण्यासाठी राखून ठेवले.
१. ‘दोन आठवड्यांत प्रसारकार्य कसे होईल ?’ याची काळजी वाटत असतांना ‘
प.पू. गुरुदेवांचा संकल्प कसा कार्य करतो, याची अनुभूती घ्या’, असे 
सांगून पू. सिरियाकदादा आणि एक संत यांनी आश्‍वस्त करणे 
     ‘शेवटच्या दोन आठवड्यांचे प्रसारकार्य कसे होईल ?’ याविषयी माझ्या मनात थोडी भीती होती. माझ्या मनात पुढील विचार येत होते, ‘इथे मला फारसे कोणी ओळखत नाही. नवीन कार्यक्रम आयोजित करता आले नाही आणि नवीन संपर्क झाले नाही, तर मी काय करू ? देवाला अपेक्षित असे मी पूर्ण करू शकेन का ?’ तेव्हा एक संत आणि पू. सिरियाकदादा यांनी मला पुढीलप्रमाणे सांगून आश्‍वस्त केले, ‘‘प.पू. गुरुदेव सर्व काळजी घेणार आहेत. त्यांचा संकल्प कसा कार्य करतो, ते तुम्ही पहा आणि त्याची अनुभूती घ्या.’’ मी प.पू. गुरुदेवांना संपूर्णपणे शरण जाऊन प्रार्थना केली, ‘आता तुम्हीच सर्व काळजी घ्या.’ प्रत्यक्षात मला या दौर्‍याच्या वेळी पुष्कळ अनुभूती आल्या. ‘प.पू. गुरुदेवांचे चैतन्य कसे कार्यरत होते आणि त्यांचे अस्तित्व पदोपदी माझ्यासमवेत कसे होते ?’, हे अनुभवल्यानंतर मी मंत्रमुग्ध झाले.

आध्यात्मिक सोपी कोडी - भाग १

    बर्‍याच नियतकालिकांत ‘शब्दकोडी’ असतात. ती बौद्धिक स्तरावरची असतात. ही शब्दकोडी देण्यामागे ‘बुद्धीला चालना मिळणे आणि ज्ञानात भर पडणे’, हा व्यावहारिक दृष्टीकोन असतो. ‘प्रहेलिका’ (कोडी सोडवणे) ही ६४ कलांमधील एक कला आहे. ईश्‍वराचे अस्तित्व जाणून घेऊन त्याच्याशी एकरूप होणे, हा ईश्‍वराने निर्माण केलेल्या या विविध कलांचा मुख्य उद्देश आहे. 
    जीवन हे देवाने निर्माण केलेले एक कोडे आहे; परंतु ‘ते कशा प्रकारे सोडवायचे ?’, हे त्या त्या व्यक्तीवर अवलंबून असते. आपण ज्या वेळी जीवनात येणार्‍या अडचणी, सुख-दुःख यांच्या उत्तरांचा शोध घेऊ लागतो, त्या वेळी लक्षात येते की, या सर्वांचे उत्तर एकच आहे आणि ते म्हणजे साधना ! साधना केल्यावरच कोणत्याही अडचणीमागील कोडे सहज सोडवता येते. ‘प्रहेलिका’ या कलेच्या माध्यमातून हे शिकायला मिळते. 
    येथे एक मानसिक स्तरावरचे कोडे दिले आहे. सनातन प्रभात आध्यात्मिक नियतकालिक असल्यामुळे लेखमालिकेत आध्यात्मिक स्तरावरील कोडी दिली आहेत. त्यावरून मानसिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक स्तरांवरील कोडी म्हणजे काय, हे लक्षात येईल. सनातन प्रभात दैनिकात प्रत्येक रविवारी आणि साप्ताहिक, पाक्षिक आणि मासिक ‘सनातन प्रभात’ यांत प्रत्येक अंकात कोडी देण्यात येत आहेत. 
१. मानसिक स्तरावरील कोडे - प.पू. भक्तराज महाराज 
यांची आकार लहान होत गेलेली छायाचित्रे 
१ अ. प्रयोग : प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्रांवरून नजर मोठ्या छायाचित्राकडून लहान छायाचित्राकडे सावकाश फिरवत प्रत्येक छायाचित्राकडे पाहिल्यावर काय जाणवते, त्याचा अभ्यास करा. असे १ - २ मिनिटे करा. 

नित्य पठण करता न येण्याच्या कारणानुसार पापाचे प्रमाण (टक्के) आणि प्रायश्‍चित्त

- (सद्गुरु) सौ. अंजली गाडगीळ, चेन्नई, तमिळनाडू. (५.८.२०१६, सकाळी ९.१४)

स्वामीनारायण संस्थे’चे साधक श्री. धनाजी लक्ष्मण कमळकर यांना देवद (पनवेल) येथील सनातन आश्रमात गेल्यावर जाणवलेली सूत्रे

     ‘मी ‘स्वामीनारायण संस्थे’च्या सत्संगात जातो. मी देशप्रेम आणि धर्मप्रेम यांना प्रेरणा देणार्‍या सनातन संस्थेच्या देवद (पनवेल) येथील सनातन आश्रमात सेवा करण्याच्या उद्देशाने गेलो होतो. तेथे ४ दिवस सेवा केल्यावर मला जाणवलेली सूत्रे पुढे देत आहे.
१. सनातनच्या आश्रमात प्रथम पाऊल ठेवताच ‘
सत्ययुगातच आलो आहे’, अशी दिव्य अनुभूती येणे
     मी देवद (पनवेल) येथील सनातन आश्रमात प्रथम पाय ठेवला. तेव्हा मला एक दिव्य अनुभूती आली. मी ‘सत्ययुगातच आलो आहे’, असे मला वाटले. मी तेथे प्रतिदिन ध्यानमंदिरात जाऊन इष्टदेवतेचे ध्यान करतांना पुष्कळ चांगले वाटायचे.

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर राज्यकर्त्यांनी धर्मनिरपेक्षतेचे ढोंग करून हिंदूंना शाळा-महाविद्यालयांतून धर्मशिक्षण न दिल्याचा दुष्परिणाम दर्शवणारे एक उदाहरण !

एका साधिकेच्या आईला जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त होण्याचे 
महत्त्व ठाऊक नसणे आणि ‘स्वतःच्या मुलीने ६१ टक्के आध्यात्मिक पातळी 
गाठल्याने तिला पुनर्जन्म नाही’, हे कळल्यावर अज्ञानामुळे साधिकेच्या आईची चिडचिड होणे 
     ‘  २६.२.२०१६ या दिवशी माझी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित झाली. त्यामुळे ‘आता मला पुढचा जन्म नाही’, ही आनंदाची वार्ता मी माझ्या आईला सांगितली. तेव्हा तिला राग आला (तिच्या माहितीनुसार परत जन्म मिळाल्याविना जीवनाचे सार्थक होत नाही. त्यामुळे माझ्या आईला ‘मुलीला पुढचा जन्म असायला हवा’, असे म्हणायचे होते.) आणि ती चिडचिड करून माझ्याशी भांडू लागली. त्याच रात्री एका साधिकेने मला भ्रमणभाषद्वारे संपर्क केला. तेव्हा मी तिला माझ्या आईशी बोलण्यास सांगितले. त्या वेळी रागाने आई तिला म्हणाली, ‘‘तुमची भाषा आम्हाला कळत नाही.’’ - एक साधिका
    (वर्ष २०२३ पासून येणार्‍या हिंदु राष्ट्रात प्रत्येक व्यक्तीला बालपणापासूनच ‘ईश्‍वरप्राप्तीच्या दृष्टीने मनुष्यजन्माचे महत्त्व, साधना कशी करावी आणि साधना केल्याने होणारे लाभ’ हे शिकवण्यात येईल. त्यामुळे हिंदु राष्ट्रातील आबालवृद्ध असे सर्वच जण निरंतर आनंदी होतील ! त्या दृष्टीने आतापासूनच सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती हिंदूंना धर्मशिक्षण देत आहेत. - संपादक)आजचा वाढदिवस

    लोभस, सहनशील आणि सात्त्विक गोष्टींची आवड असलेला ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेला महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला नागपूर येथील चि. अभिराम आशिष क्षीरसागर याचा मार्गशीर्ष कृष्ण पंचमी म्हणजे १८.१२.२०१६ या दिवशी तिथीनुसार पहिला वाढदिवस आहे.
चि. अभिराम याला वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून आशीर्वाद !
    चि. अभिरामची आई सौ. नेहा आशिष क्षीरसागर आणि आत्या कु. अंजली क्षीरसागर यांना त्याची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाविषयी अनुभवण्यास मिळालेली सूत्रे

    २ ऑगस्ट २०१६ ते ५ ऑगस्ट २०१६ या कालावधीत प.पू. गुरुदेवांच्या आश्रमदर्शनाची संधी उपलब्ध झाली, त्या वेळी लक्षात आलेली सूत्रे येथे देत आहे.
१. रामनाथी आश्रमाचे वर्णन शब्दांत करणे अवघड आहे. गुरुमाऊलीने येथे आनंदाचा सागरच ठेवला आहे. या आनंदरूपी सागरात एकदा जरी स्नान केले, तरी अनंत जन्मांची शुद्धी केल्याचे प्रत्येक क्षणी अनुभवयास मिळाले.
२. आश्रम म्हणजे अनंत गुणांचा समूह आहे.

जन्मतः हृदयविकाराचा त्रास असणे, दोन वेळा ओपन हार्ट सर्जरी होणेे; परंतु सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधनेला प्रारंभ केल्यापासून कोणताही त्रास न होणे

    मला जन्मतः हृदयविकाराचा आजार (VSD) आहे. त्यामुळे मला जन्मापासून वयाच्या २१ व्या वर्षापर्यंत पेनीड्युअर १२ लाख पॉवरचे इंजेक्शन २१ दिवसांनी एकदा घ्यावे लागायचे. १९९० या वर्षी माझी दोनदा ओपन हार्ट सर्जरी झाली आहे. त्यानंतरही प्रकृतीमध्ये चढ-उतार असायचाच. मी नोव्हेंबर १९९८ मध्ये सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधनेला प्रारंभ केला. तेव्हापासून आतापर्यंत मला कुठल्याही प्रकारचा हृदयाच्या आजाराचा त्रास झाला नाही किंवा त्यासाठी गेल्या १८ वर्षांत कोणतेही औषध घ्यावे लागले नाही.
    प.पू. गुरुदेवांच्या कृपेने माझ्याकडून नियमित १२ - १३ घंटे सेवा होत गेली. त्याविषयी अनेकांनी आश्‍चर्य व्यक्त केले. केवळ परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याच कृपेने हे सर्व शक्य आहे. याची प्रचीती अनेकदा विविध प्रसंगातून अनुभवण्यास मिळाली आहे.
- श्री. गौरीशंकर कालशेट्टी, अकोला (१०.८.२०१६)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अध्यात्मप्रसाराच्या कार्याला बळ देण्यासाठी महर्षि अनेक उपाय योजत असणे

१. दिनांक १४.६.२०१६ - नादाच्या रूपात प्रत्यक्ष दृष्टांत देऊन देवीने प.पू. डॉक्टरांच्या अमृत महोत्सवाच्या वेळी त्यांच्या डोक्यावर धरण्यासाठी मी तुला हे माझे छत्र दिले आहे, असे सांगणे आणि प.पू. डॉक्टरांच्या डोक्यावर प्रत्यक्ष देवतांनाही छत्र धरावेसे वाटणे अन् यातूनच प.पू. डॉक्टरांचे अवतारत्व लक्षात येणे
    देवळाच्या महंतबाईंनी आम्हाला देवीच्या अंगावरील वस्त्र प्रसाद म्हणून दिले. तसेच एक छोटेसे चांदीचे छत्रही दिले आणि हे छत्र देवीचा प्रसाद म्हणून आमच्या गाडीत लावण्यास सांगितले. परत जातांना देवीचे पुन्हा दर्शन घ्यावे म्हणून मी जेव्हा देवळात गेले, त्या वेळी मला प्रत्यक्ष देवी माझ्याशी बोलत असल्याचे जाणवले. ती म्हणाली, प.पू. डॉक्टरांच्या अमृत महोत्सवाच्या वेळी त्यांच्या डोक्यावर धरण्यासाठी मी तुला हे माझे छत्र दिले आहे. (खरंच, अमृत महोत्सवाच्या वेळी प.पू. डॉक्टरांच्या डोक्यावर जे मोठे लाल छत्र धरले होते, त्याच्या आत मध्यभागी आम्ही हे छोटे देवीचे छत्र अडकवले होते. - सौ. गाडगीळ) प.पू. डॉक्टरांच्या डोक्यावर प्रत्यक्ष देवतांनाही छत्र धरावेसे वाटणे, यातूनच प.पू. डॉक्टरांचे अवतारत्व लक्षात येते.

सप्तर्षि जीवनाडीत सांगितल्याप्रमाणे सनातनच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांचा अहर्निश प्रवास !

महर्षींची शिकवण आणि कार्य !
     सनातनच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ मागील ४ वर्षांपासून भारतभरातील विविध राज्यांत दौर्‍यावर जात आहेत. हिंदु राष्ट्राची (सनातन धर्म राज्याची) शीघ्रतेने स्थापना व्हावी, राष्ट्र, धर्म, तसेच साधक यांचे रक्षण व्हावे आणि देवतांचा आशीर्वाद मिळावा, यासाठी सप्तर्षि जीवनाडीत सांगितलेल्या क्षेत्री जाण्याचे त्यांचे नियोजन असते. आतापर्यंत त्यांनी २४ राज्यांतील प्रवास करून तेथील वैशिष्ट्यपूर्ण दगड, माती, तीर्थ आदींचा संग्रह केला आहे.  त्यांनी नोव्हेंबर २०१६ पर्यंत ३ लक्ष ५६ सहस्र कि.मी. एवढा प्रवास करून भावी पिढीसाठी भारतातील अलौकिक समृद्ध ठेवा संग्रहित केला आहे. या दैवी प्रवासाची सर्वांना माहिती व्हावी, यासाठी हे सदर प्रसिद्ध करत आहोत.
१४.१२.२०१६ - तिरुवण्णामलई, तमिळनाडू
सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ
१. महर्षींनी संरक्षक उपाय सांगणे
१ अ. कलशांवरील नारळ सनातनच्या रामनाथी आश्रमात विविध ठिकाणी प्रवेशद्वारावर बांधायला सांगणे : काल पूजन केलेल्या ८ कलशांवरील नारळ महर्षींनी सनातनच्या रामनाथी आश्रमात लवकरात लवकर पाठवायला सांगितले. महर्षि म्हणाले, नारळ पिवळ्या कापडात बांधून तो रामनाथी आश्रमाचे मुख्य प्रवेशद्वार, तसेच परात्पर गुरु डॉ. आठवले, सद्गुरु (सौ.) बिंदाताई आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या खोलीचे प्रवेशद्वार यांवर मध्यभागी बांधावा. आणखी उरलेले ४ नारळ रामनाथी आश्रमात त्रास असणार्‍या ठिकाणी प्रवेशद्वारावर बांधावेत. बांधलेला नारळ वजनाने हलका झाल्यावर तो कापडासहित पाण्यात विसर्जित करावा.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे जीवनचरित्र आणि अवतारी कार्य यांचे दर्शन घडवणारी ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. उमा रविचंद्रन यांनी रेखाटलेली भावचित्रे

सौ. उमा रविचंद्रन्
    चेन्नई येथील सौ. उमा रविचंद्रन् यांनी रेखाटलेल्या चित्रांच्या माध्यमातून परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे जीवनचरित्र आणि अवतारी कार्य यांचे दर्शन घडते. त्यांनी त्या चित्रांचे विवरणही केले आहे. ते पुढीलप्रमाणे आहे.
चतुर्भुज विष्णूने गर्भवास पत्करणे
     चतुर्भुज श्री महाविष्णूने सौ. नलिनीदेवी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मातोश्री) यांच्या गर्भात तिसर्‍या मासात (महिन्यात) दिव्य ज्योतीच्या रूपात प्रवेश केला आणि श्री जयंत अवताराने त्याच्या दैवी कृपेला आरंभ केला. - सौ. उमा रविचंद्रन्, चेन्नई (२४.४.२०१६)

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...

सौ. नंदिनी साळोखे
गुरुमाऊलीच साधकांना घेऊन जाणार मोक्षासी ।
गुरुमाऊलीच्या नामाने
कंठ दाटूनी येई ।
गुरुमाऊलीच्या स्मरणाने
देहाचे भान विसरूनी जाई ॥ १ ॥
गुरुमाऊली समवेतचा आनंद
प्रत्येक क्षणी अनुभवता यावा ।
गुरुमाऊलीच्या स्मरणात
हा जन्मही अपुरा पडावा ॥ २ ॥

सर्वत्रच्या साधकांना सेवेची सुवर्णसंधी !

धर्मरथांवर चालक-साधकांची तातडीने आवश्यकता !
    सनातनचे ग्रंथ म्हणजे समाजाला धर्मशिक्षण देणारे ज्ञानाचे अनमोल भांडारच ! मानवजातीसाठी ज्ञानामृत असलेल्या या ग्रंथांद्वारे समाजाला आचारधर्म, साधना, आदी नानाविध विषयांसंदर्भात दिशादर्शन केले जाते. या ग्रंथांना सर्वत्र मोठ्या प्रमाणावर मागणी येत आहे.
    समाजापर्यंत शीघ्रतेेने पोहोचण्यासाठी सनातन संस्थेच्या वतीने ठिकठिकाणी धर्मरथाद्वारे ग्रंथप्रदर्शने लावली जात आहेत. या सेवेसाठी धर्मरथावर चालक-साधकांची आवश्यकता आहे. सेवेसाठी इच्छुक असलेल्या साधकांकडे लहान धर्मरथासाठी लाईट मोटर व्हेहिकल (LMV), दुसर्‍या लहान धर्मरथासाठी लाईट ट्रान्स्पोर्ट व्हेहिकल आणि तीन मोठ्या धर्मरथांसाठी हेव्ही ट्रान्स्पोर्ट व्हेहिकल असे परवाने असणे आवश्यक आहे.

बोधचित्र

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
मी कोणाचा नाही. माझा कुणी नाही. 
ज्याचा त्याचा तोच मी; म्हणून मी सर्वांचा आहे.
भावार्थ : मी सर्वस्व गुरुचरणांवर वाहिल्यानंतर मी दुसर्‍या कुणाचा होऊच शकत नाही. गुरूंना अर्पण झाल्यानंतर माझा कुणी असायला मी शिल्लक राहिलोच कुठे ? परंतु सर्वांचा खरा ‘मी’ एकच आणि सर्वव्यापी असल्यामुळे आता मी सर्वांचा आहे. 
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण)


परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
     ‘गुन्हा सिद्ध झाल्यावर न्यायाधीश गुन्हेगाराला शिक्षा ठोठावतात. तेव्हा गुन्हेगाराची खोटी बाजू लढवल्याबद्दल, त्याचे साथीदार झाल्याबद्दल त्याच्या अधिवक्त्यांना शिक्षा केली जात नाही. हिंदु राष्ट्रात अशा अधिवक्त्यांची वकिलीची सनद रद्द करून त्यांना आजन्म कारागृहात साधना करण्याची कडक शिक्षा केली जाईल.’ - (परात्पर गुरु) डॉ. आठवले 
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. 
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे 


योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

कुणाचेही वाईट चिंतू नये !
वाईट बोलणे हे केव्हाही अयोग्यच; पण कुणाचेही वाईट चिंतणे 
आणि त्याच्या र्‍हासाची इच्छा करणे, हे अधिक अयोग्य ! 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

अयोध्येतील राममंदिर !

संपादकीय
     अयोध्या येथे राममंदिराची उभारणी करा, अशी मागणी शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी लोकसभेत केली. राममंदिराच्या सूत्रावर महाराष्ट्र राज्यातून किंवा राष्ट्रीय पातळीवर शिवसेनेचाच आवाज ऐकू येत असतो. केंद्रसरकामध्ये शिवसेना सहभागी आहे, तरीही या पक्षाला सरकारकडे एका महत्त्वाच्या सूत्रावर मागणी करावी लागते. लोकराज्य व्यवस्थेतील हा शिष्टाचार आहे, असे मानले जाते. सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांचे राष्ट्रीय सूत्रावर एकमत व्हावे, असा एक समज असल्याने जनताभिमुख अशा सूत्रांविषयी तळमळ असली, तरी व्यवस्था कशी अडचणीची ठरते, हे येथे लक्षात येते.

देशभक्ती आणि विकल्प !

संपादकीय
     नोटाबंदीच्या निणर्र्यात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. ‘देशाच्या आर्थिक धोरणाचा तो भाग आहे’, असे न्यायालयाने निकालात म्हटले आहे. नोटाबंदीचा सरकारचा उद्देश नीट लक्षात न घेता प्रविष्ट केलेली ही याचिका असावी. शासनाचा उद्देश सर्वसामान्य जनतेला भावल्याने ती शासनाच्या बाजूने उभी राहिली. संसदेत विरोधी पक्ष नोटाबंदीच्या विरोधात गोंधळ घालत होते, त्याच वेळी त्यांना निवडून देणारी जनता, ‘आम्ही शासनाबरोबर आहोत, आम्हाला थोडा त्रास सहन करावा लागला, तरी शासनाचा हा निर्णय योग्यच आहे’, असे म्हणत होती.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn