Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कॅशलेस व्यवहारात मंत्री आणि अधिकारी यांच्यापेक्षा दारूडे बरे ! - चंद्राबाबू नायडू यांचा घरचा अहेर

मंत्री आणि अधिकारी यांना रोख व्यवहार करण्यातच अधिक रस का आहे, याचा
शोध नायडू यांनी घेतला पाहिजे, तरच त्यांना वस्तूस्थिती लवकर लक्षात येईल !
     मंत्री आणि अधिकारीच चलनविरहित व्यवहार करण्यास टाळत असतील, तर वीज, इंटरनेट आदी सुविधांंचा अभाव असणार्‍या ग्रामीण भागांतील जनता त्यांचा वापर कसा करणार ?
     अमरावती (आंध्रप्रदेश) -
नोटाबंदीनंतर देशात सर्वत्र चलनविरहित (कॅशलेस) व्यवहार करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. अशा वेळी आंध्रप्रदेशातील मंत्री आणि प्रशासकीय अधिकारी त्याचा वापर करतांना दिसत नाहीत, असे स्वतः राज्याचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी त्यांना एका बैठकीत विचारल्यावर सांगितल्याचे समोर आले आहे. या वेळी संतप्त नायडू यांनी तुमच्यापेक्षा दारूडे बरे, अशा शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त केली. या बैठकीला अनुमाने २०० अधिकारी आणि मंत्री उपस्थित होते.
     नायडू म्हणाले की, जेव्हापासून नोटाबंदी चालू झाली, सर्वप्रथम राज्यातील दारूची दुकाने आणि दारू पिणार्‍या व्यक्ती या कॅशलेस व्यवहार करू लागल्या. दारूच्या दुकानावर कार्ड स्वाईप करून व्यवहार होतो. जर एखाद्या मद्यपीने रात्री दारू प्यायली नाही, तर तो अस्वस्थ होतो. त्यामुळे त्यांनी ही पद्धत तुमच्यापेक्षा लवकर अवलंबली.

काँग्रेससाठी देशापेक्षा त्यांचा पक्ष महत्त्वाचा ! - पंतप्रधान नरेंद्र मोदी

     नवी देहली - आधी विरोधक २ जी आणि कोळसा घोटाळ्यांतील भ्रष्टाचाराचा विरोध करण्यासाठी सरकारच्या विरोधात एकत्र यायचे; मात्र आता विरोधक भ्रष्टाचार रोखण्यासाठी सरकारने घेतलेल्या निर्णयाविरोधात एकत्र येत आहेत, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांवर केली. ते भाजपच्या संसदीय बैठकीत खासदारांना संबोधित करत होते. काँग्रेससाठी देशापेक्षा त्यांचा पक्ष महत्त्वाचा आहे; मात्र भाजपसाठी देशहित महत्त्वाचे आहे, असेही मोदी यांनी म्हटले. मोदी यांनी एका पुस्तकातील संदर्भाचा हवाला देत म्हटले की, १९७१ मध्ये नोटाबंदीची आवश्यकता होती. तसा प्रस्ताव तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या समोर मांडण्यात आल्यावर त्यांनी तो फेटाळला होता. काँग्रेसला पुढे निवडणुका लढवायच्या आहेत, असे सांगत त्यांनी हा प्रस्ताव फेटाळला. त्यामुळे आज देशाच्या अर्थव्यवस्थेची स्थिती वाईट झाली आहे.

अन्वेषणातील दिरंगाईमुळे उच्च न्यायालयाने सीबीआयला पुन्हा फटकारले !

डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे यांच्या हत्यांचे प्रकरण
स्कॉटलंड यार्डकडून अन्वेषण अहवालास दिरंगाई होत असल्याने फॉरेन्सिक
तपासण्या देहलीतील प्रयोगशाळेत करण्याची सीबीआयची इच्छा !
     डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे हत्यांच्या अन्वेषणाच्या संदर्भातील याचिका १६ डिसेंबर या दिवशी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती कोलाबावाला यांच्या खंडपिठासमोर सुनावणीसाठी आली होती. या सुनावणीच्या वेळी अतिरिक्त सॉलिसीटर जनरल श्री. अनिल सिंह यांनी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआयच्या) वतीने आपले म्हणणे मांडतांना स्कॉटलंड यार्डकडून अन्वेषण अहवाल मिळण्यास दिरंगाई होत असल्याने आम्ही सदर फोरेन्सिक तपासण्या देहली येथील फोरेन्सिक लॅबकडून करून घेऊ इच्छितो, असे सांगितले. त्या वेळी न्यायालयाने सीबीआयला पुन्हा फटकारत सांगितले, अशामुळे अन्वेषण लांबत आहे. उद्या तुमच्यावर मुद्दाम तपास लांबवला, असे आरोप होतील. स्कॉटलंड यार्डला पाठवण्याचा निर्णय तुमचा होता. आता तुम्ही निर्णय पालटत असाल, तर त्याला आमची ना नाही; परंतु दिरंगाई टाळली पाहिजे.
कॉ. पानसरे हत्येच्या प्रकरणी सीबीआय आणि विशेष अन्वेषण पथक
यांच्यात समन्वय दिसत नाही ! - उच्च न्यायालयाकडून असमाधान व्यक्त
     कॉ. पानसरे हत्या प्रकरणात शासनाची बाजू मांडतांना ज्येष्ठ अधिवक्ता श्री. मुंदरगी यांनी आम्ही दुसर्‍या आरोपीच्या विरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल केले असून काही बाबतीत तपास अजून चालू आहे,

मुळेगांव तांडा (जिल्हा सोलापूर) येथील अवैध पशूवधगृहाची चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश ! - पर्यावरणमंत्री श्री. रामदास कदम

सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. विजयकुमार देशमुख(उजवीकडे) यांना निवेदन सादर
करताना (डावीकडून) श्री अरविंद पानसरे, श्री श्रीकांत पिसोळकर आणि श्री अभय वर्तक
हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्याकडून निवेदन सादर
श्री. रामदास कदम
     नागपूर - मुळेगांव तांडा (जिल्हा सोलापूर) येथील मे. सोनअंकुर एक्सपोटर्स प्रा. लि. हे अवैध पशूवधगृह तातडीने बंद करावे आणि या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित शासकीय अधिकारी अन् पशूवधगृहाचे मालक यांच्यावर फौजदारी गुन्हे प्रविष्ट करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशा आशयाच्या मागणीचे निवेदन शिवसेनेचे नेते तथा राज्याचे पर्यावरणमंत्री श्री. रामदास कदम यांना सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांनी दिले. त्यावर श्री. कदम यांनी या अवैध पशूवधगृहाची चौकशी करून कारवाई करू, असे आश्‍वासन दिले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र प्रवक्ता श्री. अरविंद पानसरे आणि समितीचे विदर्भ समन्वयक श्री. श्रीकांत पिसोळकर हेही उपस्थित होते.
     हे निवेदन सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. विजयकुमार देशमुख यांनाही देण्यात आले.

अयोध्येत राममंदिराची उभारणी करा ! - शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांची लोकसभेत मागणी

     नवी देहली - हिंदूंचे श्रद्धास्थान असलेले भगवान श्री रामचंद्रांचे अयोध्येत मंदिर व्हावे, अशी कोट्यवधी हिंदूंची मागणी आहे, अशी आग्रही मागणी शिवसेनेचे उपनेते खासदार चंद्रकांत खैरे यांनी लोकसभेत नियम ३७७ नुसार १५ डिसेंबर या दिवशी केली. ६ डिसेंबरला भगवा संकल्प दिन, शौर्य दिन देशभरात साजरा केला गेला, तेव्हा सरकार राममंदिर उभारण्यासाठी पावले उचलील, अशी आशा होती; परंतु या संदर्भात सरकारने २ वर्षांत काहीच केलेे नसल्याचा खेद आहे, असे श्री. खैरे यांनी लोकसभेत मांडलेल्या सूचनेत म्हटले आहे.
     श्री. खैरे यांनी सूचनेत पुढे म्हटले की, लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपने घोषणापत्राच्या माध्यमातून अयोध्येत राममंदिर उभारणार, असे आश्‍वासन दिले होते. आता पूर्ण बहुमताने सरकार निवडून आले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही जनतेच्या धार्मिक भावनांचा आदर राखून राममंदिराची उभारणी जलदगतीने चालू व्हावी, यासाठी पावले उचलायला हवीत. राममंदिराच्या संदर्भातील प्रलंबित न्यायालयीन प्रक्रिया जलदगतीने पूर्ण व्हावी यासाठी उच्चस्तरीय न्यायालयाचे खंडपीठ स्थापन करून राममंदिराच्या संदर्भातील वादावरील सुनावणी ६० दिवसांच्या काळात पूर्ण होईल

नोटाबंदीच्या निर्णयात हस्तक्षेप करणार नाही ! - सर्वोच्च न्यायालय

     नवी देहली - केंद्र सरकारने घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यात सर्वोच्च न्यायालयाने १६ डिसेंबरला झालेल्या सुनावणीच्या वेळी नकार दिला आहे. हा निर्णय आर्थिक धोरणाचा भाग आहे, असे सांगत न्यायालयाने अंतरिम आदेशात मध्यस्थी करण्यास नकार दिला. तसेच देशभरातील उच्च न्यायालयांमध्ये नोटाबंदीच्या संदर्भातील याचिकांवरील सुनावणींना स्थगिती देत केवळ सर्वोच्च न्यायालय याप्रकरणी सुनावणी करील, असे स्पष्ट केले. त्याबरोबर ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या जुन्या नोटांचा रुग्णालय, रेल्वे तिकीट आणि सरकारी कार्यालय यांमधील वापराची मर्यादा वाढवण्याची मागणीही सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. तसेच बँक खात्यातून आठवड्याला केवळ २४ सहस्र रुपये काढण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याचा सल्ला केंद्र सरकारला देण्यात आला आहे. केवायसी (ओळख स्पष्ट करणारी कागदपत्रे) पूर्ततेनंतरच सहकारी बँकाना जुन्या नोटा स्वीकारता येणार, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
काही लोकांकडेच लाखो रुपयांच्या नवीन नोटा कशा सापडतात ?
सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला प्रश्‍न
सर्वसामान्य जनतेला पडणारा प्रश्‍नच सर्वोच्च न्यायालयाने विचारला आहे. असा प्रश्‍न
सरकारमधील एकाही मंत्र्याला पडत नाही का कि त्याकडे ते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत ?
     लोकांना अजूनही प्रत्येक आठवड्याला २४ सहस्र रुपये काढता येत नाहीत; मग काही लोकांकडेच लाखो रुपयांच्या नवीन नोटा कशा काय सापडतात ?, असा प्रश्‍न सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला विचारला आहे.

९ नोव्हेंबरनंतर २ लाख रुपयांहून अधिक रक्कम खात्यात जमा करणार्‍यांना पॅन कार्डविना पैसे काढता येणार नाही ! - रिझर्व्ह बँकेची अधिसूचना

नोटाबंदीनंतर प्रतिदिन नवनवीन नियम काढून
जागतिक विक्रम करू पहाणारे केंद्र सरकार !
     नवी देहली - पॅन कार्ड नसलेल्या ज्या बँक खात्यामध्ये ५ लाख रुपयांंहून अधिक रक्कम जमा आहे आणि ९ नोव्हेंबरनंतर या खात्यात २ लाख रुपयांंहून अधिक रक्कम जमा करण्यात आली असेल, तर अशा खात्यांमधून पैसे काढण्यावर प्रतिबंध घालण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला आहे. अशा खात्यांना पॅन कार्ड क्रमांक दिल्याविना किंवा अर्ज क्रमांक ६० (ज्यांच्याकडे पॅन क्रमांक नाही त्यांनी हा अर्ज भरायचा असतो.) भरल्याविना पैसे मिळणार नाहीत, असे रिझर्व्ह बँकेने अधिसूचनेत म्हटले आहे. वार्षिक एक लाख रुपये जमा करण्याची मर्यादा असलेल्या जनधनसारख्या खात्यातूनही महिन्याला १० सहस्र रुपये काढण्याची मर्यादा कायम ठेवण्यात आली आहे.

संसदेच्या संपूर्ण अधिवेशनातएकही दिवस कामकाज न झाल्याने २२३ कोटी रुपयांची हानी !

जनतेचा हा पैसा गोंधळ घालणार्‍या लोकप्रतिनिधींची
सर्व संपत्ती जप्त करून वसूल करण्यात यावा !
      नवी देहली - संसदेच्या हिवाळी अधिवेशनातील संपूर्ण २१ दिवसांपैकी एकही दिवस नोटाबंदीमुळे कामकाज न होता अधिवेशन १६ डिसेंबरला समाप्त झाले. या कालावधीत केवळ राज्यसभेत दिव्यांग कायदाच संमत होऊ शकला. या व्यतिरिक्त एकही विधेयक संमत होऊ शकले नाही. २०१० पासून झालेल्या संसदेच्या सगळ्या अधिवेशनांपैकी हे अधिवेशन सर्वांत अल्प कामकाज झालेले अधिवेशन ठरले आहे. संसदेच्या कामकाजावर प्रतिदिन जवळपास ११ कोटी १७ लाख रुपये खर्च होतात. २१ दिवसांत जवळपास २२३ कोटी रुपयांची हानी झाली आहे.

जगात केवळ भारत ही धर्मभूमी आहे ! - श्री. शिवाचार्य महास्वामी, कर्नाटक

कुडूर (कर्नाटक) येथे हिंदु धर्मजागृती सभा 
डावीकडून कु. भव्या गौडा, सौ. शीला नारायण,
दीपप्रज्वलन करतांना श्री. शिवाचार्य
महास्वामी आणि श्री. शशीधर आचार
     कुडूर (कर्नाटक) - जगात केवळ भारत ही धर्मभूमी आहे. या देशातील प्रत्येकाच्या रक्तात हिंदुत्व आहे. जोपर्यंत आपण राष्ट्र, धर्म आणि भाषा यांविषयी जागृत होत नाही, तोपर्यंत त्यांवरील आक्रमण चालूच राहील, असे उद्गार कर्नाटकच्या शिवगंगा क्षेत्र, मगडी येथील वीरसिंहासन संस्थान मठाचे श्री. शिवाचार्य महास्वामी यांनी काढले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कुडूर, मगडी येथील श्री कन्निका परमेश्‍वरी मंदिराच्या मंडपात आयोजित केलेल्या हिंदु धर्मजागृती सभेत महास्वामी बोलत होते. या वेळी व्यासपिठावर सनातन संस्थेच्या सौ. शीला नारायण, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शशीधर आचार आणि हिंदु जनजागृती समितीप्रणीत रणरागिणी शाखेच्या कु. भव्या गौडा उपस्थित होत्या.

उज्जैन येथील कार्तिक मेळ्यात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून जनजागृती !

ग्रंथ प्रदर्शनाचा लाभ घेतांना जिज्ञासू
     उज्जैन (मध्यप्रदेश), १६ डिसेंबर (वार्ता.) - येथे उज्जैन नगरपालिकेच्या वतीने प्रतिवर्षी होणार्‍या सुप्रसिद्ध कार्तिक मेळ्यात ८ ते ११ डिसेंबर या कालावधीत सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या यांच्या वतीने प्रदर्शनाद्वारे जनजागृती करण्यात आली. याकरता मेळ्यात एक कक्ष उभारून त्यात आचारधर्म, राष्ट्र-धर्म, धर्मशिक्षण, हिंदु राष्ट्र आदी विषयांवर ‘फ्लेक्स’ फलकांचे प्रदर्शन लावण्यात आले. तसेच संस्थेने प्रकाशित केलेले विविध विषयांवरील ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे विक्रीकेंद्रही या ठिकाणी उभारण्यात आले होते. या प्रदर्शनाला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हे प्रदर्शन लावण्यासाठी नगरपालिकेच्या महापौर सौ. मीना जोनवाल, सभापती श्री. सोनू गेहलोत, आयुक्त श्री. सुबोध जैन आणि श्री. धीरज श्रीवास्तव यांनी सहकार्य केले.

‘नवा बंगाल’ या नावाचा वेगळा स्वतंत्र देश स्थापन करावा ! - अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प यांच्याकडे निखील बंग नागरिक संघाची मागणी

असाहाय्य बांगलादेशी हिंदूंच्या अधिकारांच्या संरक्षणार्थ 
त्यांच्यासाठी स्वतंत्र राष्ट्राच्या निर्मितीसाठी त्यांचा नैसर्गिक मित्र असलेल्या 
भारताने तत्परतेने पाऊल उचलणे अपेक्षित आहे. सातासमुद्रापलीकडे असलेल्या 
अमेरिकेसमोर त्यांना हात पसरावे लागणे, हे भारतासाठी लज्जास्पदच नव्हे का ?
बांगलादेशातील हिंदू आणि अन्य अल्पसंख्यांक यांची स्वतंत्र देशाची मागणी !
     कोलकाता - बांगलादेशातील धर्मांधांच्या अत्याचारांना कंटाळून भारतात शरण घेतलेले ४ कोटी हिंदू आणि बांगलादेशात अद्यापही जीव मुठीत धरून अत्यंत अमानवीय अवस्थेत तग धरून असलेले २ कोटी हिंदू आणि इतर अल्पसंख्यांक यांच्यासाठी ‘नवा बंगाल’ या नावाचा वेगळा स्वतंत्र देश स्थापन करावा, अशी मागणी येथील निखील बंग नागरिक संघाचे महासचिव श्री. सुभाष चक्रवर्ती यांनी अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प यांना एक पत्र लिहून केली आहे. यात त्यांनी वर्ष १९४७ पासून बांगलादेशातील हिंदू आणि अल्पसंख्यांक यांची होत असलेली परवड कथन केली आहे.

भारतात कोणतेही मोबाईल बँकिंग अ‍ॅप सुरक्षित नाही !

  • ‘मोबाईल चिप’ बनवणारे जगातील प्रमुख आस्थापन ‘क्वालकॉम’चे मत
  • ‘ऑनलाईन पेमेंट्स’च्या सुरक्षेच्या संदर्भात प्रश्‍नचिन्ह !
नवी देहली - काळ्या पैशावर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकार रोखीने व्यवहार करण्याऐवजी ‘कॅशलेस’ (रोखरहित) व्यवहार आणि ‘ई-बॅकिंग’ यांना प्रोत्साहन देत आहे; मात्र ‘देशातील कोणतेही ‘मोबाईल बँकिंग अ‍ॅप’ सुरक्षित नाही’, असे ‘मोबाईल चिप’ बनवणारे जगातील प्रमुख आस्थापन ‘क्वालकॉम’चे म्हणणे आहे. त्यामुळे ‘ऑनलाईन पेमेंट्स’च्या सुरक्षेच्या संदर्भात प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.
१. ‘क्वालकॉम’चे वरिष्ठ अधिकारी एस्.वाय. चौधरी यांनी सांगितले की, भारतात कोणतेही सर्वसाधारण वॉलेट ‘मोबाईल बँकिंग अ‍ॅप्लीकेशन हार्डवेअर लेव्हल सेक्युरिटी’ या संरक्षणात्मक प्रणालीचा वापर करत नाही. या प्रणालीमुळे ‘ऑनलाईन’ व्यवहार अधिक सुरक्षित ठेवता येऊ शकतात.

कर्नाटकातील तुमाकुरू येथे ३५ लाख रुपये लुटल्याप्रकरणी ५ पोलीस कर्मचार्‍यांसह ७ जणांना अटक !

कुंपणच शेत खात असेल, तर जनतेचे रक्षण करणार कोण ?
    बेंगळुरू (कर्नाटक) - नोटाबंदी करण्यात आल्यानंतर कर्नाटकमध्ये एका व्यापार्‍याला ३५ लाख रुपयांना लुटल्याप्रकरणी ५ पोलीस कर्मचार्‍यांसह ७ जणांना अटक करण्यात आली आहे. यात पोलीस उपनिरीक्षक एन्.सी. मल्लिकार्जुन यांच्यासह २ खबर्‍यांचा समावेश आहे. पोलिसांनी आरोपींकडून १६ लाख रुपये कह्यात घेतले आहेत. यापूर्वीही एका अधिवक्त्याचे ८ लाख रुपये लुटल्याप्रकरणी ४ डिसेंबरला दोन पोलीस शिपायांना निलंबित करण्यात आले होते. तुमाकुरू जिल्ह्यात मोबाईलचे विक्रेते गंगाधर उपाख्य गंगाधरप्पा यांनी तक्रार दाखल केल्याप्रमाणे त्यांनी जुन्या नोटा पालटून नवीन नोटा घेण्यासाठी ३५ लाख रुपये त्यांच्या मित्राकडे ठेवले होते. एका वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी सांगितले की, या पैशांविषयी पोलिसांच्या खबर्‍या जफर याने पोलीस उपनिरीक्षक मल्लिकार्जुन यांना माहिती दिली होती. या माहितीच्या आधारे आरोपींनी कट रचून ही रक्कम लुटली.

सौदीमध्ये सार्वजनिक ठिकाणी हिजाबविना छायाचित्र काढल्याप्रकणी मुसलमान तरुणीला अटक !

महिला उपभोगाची वस्तू असल्याची इस्लामची शिकवण
असल्यामुळेच सौदी अरबमध्ये असे फतवे निघतात ! या पार्श्‍वभूमीचा
 भारत सरकारने शरीयत कायदा रहित करून मुसलमान महिलांना त्यांचे न्यायहक्क देणे आवश्यक !
    रियाध (सौदी अरब) - एका मुसलमान तरुणीने सार्वजनिक ठिकाणी हिजाबविना छायाचित्र काढून ते ‘ट्विटर’वर ठेवले. त्यामुळे सौदी अरबमधील कायद्याचे उल्लंंघन झाल्याप्रकरणी त्या तरुणीला पोलिसांनी अटक केली आहे.
   रियाधमधील पोलीस अधिकारी फवाज अल्-मैमन यांच्यानुसार मलाक-अल-शेहरी या तरुणीने काही दिवसांपूर्वी रियाधमधील प्रसिद्ध रियाध कॅफेसमोर हिजाबविना स्वत:चे छायाचित्र काढले होते. त्यानंतर हे छायाचित्र तिने ‘ट्विटर’वर ठेवले. सौदीमध्ये महिलांना पर-पुरुषाशी उघडपणे बोलणे आणि सार्वजनिक ठिकाणी हिजाबविना स्वत:चे छायाचित्र काढण्यास बंदी आहे. त्यामुळे सदर तरुणीवर कारवाई करण्यात आली.

विवाहात ख्रिस्ती वधूने साडीऐवजी गाऊन घातल्यास विवाह लावण्यास चर्चचा नकार !

धूर्त ख्रिस्ती ! आता अशिक्षित, भोळ्या; पण निष्पाप हिंदु समाजाला
फसवण्यासाठी चर्च जाणीवपूर्वक धर्मांतरित हिंदूंच्या विवाहाच्या 
प्रसंगी हिंदु वेशभूषेचा आग्रह धरतात, हे लक्षात घ्या !
    कोची - केरळ राज्यात ख्रिस्ती धर्मीय वधू विवाहाच्या वेळी पांढरी साडी नेसते. नंतर आधुनिकतेच्या नावाखाली साडीऐवजी गाऊन परिधान करण्याची पद्धत निघाली होती; मात्र चर्चच्या धार्मिक अधिकार्‍यांनी ‘गाऊन परिधान करण्याला तीव्र विरोध करून भारतीय वातावरणात आणि संस्कृतीत साडीलाच महत्त्व आहे’, असे सांगून गाऊन परिधान करून आलेल्या वधूंचे विवाह लावण्यास नकार दिल्याच्या घटना घडल्या आहेत.

सनातन संस्थेचे फ्लेक्स फलक आणि ग्रंथ-उत्पादन यांच्या प्रदर्शनाचा सहस्रो जिज्ञासूंनी घेतला लाभ !

बांगर (देवास, मध्यप्रदेश) येथे दत्तजयंती महोत्सव उत्साहात साजरा !
सनातनच्या फ्लेक्स फलक
प्रदर्शनाचा लाभ घेतांना जिज्ञासू
    देवास (मध्यप्रदेश), १६ डिसेंबर (वार्ता.) - दत्तजयंतीच्या निमित्ताने बांगर येथील श्री दत्त पादुका मंदिरात जन्मोत्सव साजरा केला गेला. या वेळी मध्यप्रदेश आणि आणि महाराष्ट्र राज्यांतील सहस्रो भक्तांनी दत्तात्रेयांचे दर्शन घेतले. दत्तजयंतीनिमित्त मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. पहाटे ५ वाजता काकड आरती आणि त्यानंतर गुरुचरित्राचे पारायण करण्यात आले. सायंकाळी ५.३५ वाजता दत्तगुरूंचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. दत्तजन्मानंतर आरती, पाळणागीत म्हणून नंतर प्रसाद वितरण करण्यात आले. सायंकाळी झालेल्या महाआरतीलाही भक्तांची मोठी गर्दी होती. रात्री कवीसंमेलनही पार पडले. या कवीसंमेलनात कवींनी राष्ट्र आणि धर्म यांविषयी वीररस उत्पन्न करणार्‍या कविता म्हणून उपस्थितांमध्ये राष्ट्र आणि धर्म प्रेमाची भावना जागृत केली.

यानम (पुडुचेरी) बेटावर बौद्ध भिक्खूचा पुतळा वाहून आल्याचा आढळला !

      यानम (पुडुचेरी) - बौद्ध भिक्खूचा एक मोठा पुतळा सावित्रीनगर येथील बेटावर वाहून आलेला सापडला. माती अथवा प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनवण्यात आलेला हा पुतळा योग्याच्या रूपात असून त्याच्या हातात एक भिक्षापात्र आहे. मंदिरासमान रचनेत बद्ध असलेला हा पुतळा एका बांबूच्या तराफ्यावर घट्ट बांधलेल्या अवस्थेत होता.
    ही बातमी समजताच सावित्रीनगर आणि भैरवपालेम् येथील शेकडो लोकांनी हा पुतळा पहाण्यासाठी गर्दी केली. यानम येथील ‘सीआयजी’ शिव गणेश म्हणाले, ‘‘हा पुतळा काही महिन्यांपूर्वी समुद्रातील पाण्यात सोडला असावा; कारण त्याच्यावर गोगलगाई तसेच शिंपलेही चिकटलेले दिसतात. दीड दशकापूर्वी अशाच स्थितीतील एक पुतळा करायकल किनार्‍यावर सापडला होता. कदाचित् श्रीलंका किंवा म्यानमार येथील लोकांच्या पारंपरिक विधीनुसार असे पुतळे बंगालच्या उपसागरात विसर्जित केले जात असल्याची शक्यता नाकारता येत नाही. या प्रकरणाची पोलीस चौकशी करत आहेत.’’

(म्हणे) ‘देशात आणीबाणी आणणार्‍या मोदी आणि अमित शहा यांचा शिरच्छेद केल्यास योग्य बक्षीस दिले जाईल !’

उत्तरप्रदेश राज्यात समाजवादी पक्षाची सत्ता असतांना हिंदूंवर होणारे अत्याचार, त्यांना करावे 
लागलेले पलायन, सातत्याने होणार्‍या दंगली आदींसाठी तरुणदेव यादव कोणाला शिक्षा देणार आहेत ?
समाजवादी पक्षाचे नेते तरुणदेव यादव यांची घोषणा
     नवी देहली - नोटाबंदीच्या निर्णयामुळे सामान्य माणूस होरपळत आहे, मजुरांना त्यांचे वेतन मिळत नाही. तुम्ही तुमच्या आजोबांच्या वयाच्या व्यक्तीला घंटोन्घंटे बँकेच्या रांगेत उभे राहिलेले पाहिले, तर तुम्हीदेखील मोदी यांना शाप द्याल. ही एकप्रकारची आणीबाणी नाही का ?, हे सरकार सत्तेवरून गेलेच पाहिजे. त्यामुळे जो कोणी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा शिरच्छेद करेल, त्याला मी योग्य बक्षीस देईन, अशी घोषणा समाजवादी पक्षाच्या बागपत येथील युवक संघटनेचे माजी अध्यक्ष तरुणदेव यादव यांनी केली आहे. याविषयी समाजवादी पक्षाने यादव यांच्या विधानाशी सहमत नसल्याचे स्पष्ट केले आहे आणि त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.

हिंदु देवतांच्या नावाने बियरचे उत्पादन करणार्‍या स्पेनच्या आस्थापनाकडून क्षमायाचना !

परदेशातील हिंदू आणि त्यांचे नेते देवतांच्या विडंबनाचा विरोध करतात अन् त्यांना 
यश मिळते; मात्र भारतात हिंदूंचे नेते देवतांच्या विडंबनाच्या विरोधात निष्क्रीय रहातात ! 
हिंदूंनी केलेल्या निषेधाची फलश्रुती !
     नेवाडा (अमेरिका) - स्पेनमधील इबिझा बेटावरील ‘इबोसिम ब्रेहाऊस मायक्रोब्रेव्हरी’ या बियरचे उत्पादन करणार्‍या आस्थापनाने हिंदु देवतांच्या नावाने बियर काढून तिची विक्री चालवली होती. शिव, काली, श्री गणेश, हनुमान या हिंदु देवतांची चित्रे आणि नावे यांसह बियरची निर्मिती करणार्‍या या आस्थापनाचा हिंदूंनी निषेध केला होता. ‘हिंदूंच्या धार्मिक भावनांचा अनादर करण्याचा आमचा उद्देश नव्हता. हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या असतील, तर आम्ही क्षमायाचना करतो’, असे या आस्थापनाने अमेरिकेतील हिंदु नेते श्री. राजन झेद यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

बांगलादेशी हिंदूंची व्हाईट हाऊससमोर निदर्शने !

    भारत सरकार आणि मोठ्या हिंदुत्वनिष्ठ संघटना निष्क्रीय असल्याने भारतातील विशेषतः काश्मीर, उत्तरप्रदेशातील कैराना, आसाम, बंगाल, केरळ येथील पीडित हिंदूंनीही व्हाईट हाऊसच्या समोर निदर्शने करून त्यांच्या रक्षणासाठी साहाय्य करण्याची मागणी करावी, असेच हिंदूंना वाटेल ! 
    वॉशिंग्टन - बांगलादेशमधील अल्पसंख्यांक हिंदूंवरील अत्याचार थांबवून त्यांना संरक्षण देण्यात यावे, यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी साहाय्य करावे, या मागणीसाठी बांगलादेशी हिंदूंनी त्यांचे निवासस्थान असणार्‍या व्हाईट हाऊससमोर शांततामय निदर्शने केली. अशाच प्रकारची निदर्शने नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्रम्प टॉवर समोर नुकतीच करण्यात आली होती.

पाकच्या कारागृहांमध्ये ५१६ भारतीय मासेमार आणि ५७ नागरिक अटकेत !

केवळ माहिती न देता भारतीय नागरिकांच्या सुटकेसाठी
काय करणार आहात, हेही सरकारने सांगावे !
परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची माहिती
    नवी देहली - पाकच्या कारागृहांमध्ये ५१६ भारतीय मासेमार आणि ५७ भारतीय नागरिक अटकेत आहेत, अशी माहिती परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी लोकसभेतील एका लिखित उत्तरात दिली आहे. या उत्तरात स्वराज यांनी सांगितले की,
१. उपलब्ध माहितीनुसार सध्या पाकच्या कारागृहांमध्ये ५७ भारतीय कैदी आहेत. या ५७ पैकी ३ कैद्यांच्या उपस्थितीविषयी पाककडून औपचारिक दुजोरा अद्याप मिळाला नाही.
२. वर्ष २०१३, २०१४ आणि २०१५ च्या कालावधीत पाक कारागृहातील ३ भारतीय कैदी आणि ८ भारतीय मासेमार यांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत वर्ष २०१६ मध्ये १ भारतीय कैदी आणि
२ भारतीय मासेमार यांचा मृत्यू झाला आहे.
३. पाकच्या कारागृहांमध्ये अटकेत असलले सर्व भारतीय कैदी आणि मासेमार यांचे संरक्षण करणे आणि काळजी घेणे हे पाकचे दायित्व असल्याची जाणीव अनेकवेळा भारत सरकारने पाक सरकारला करून दिली आहे.

फिरोजाबाद येथे धर्मांध अधिवक्त्याकडून गायत्री मंत्राविषयी अश्‍लील मजकूर व्हॉट्स अ‍ॅपवर प्रसारित !

  • जिल्हा न्यायालयातील हिंदुत्वनिष्ठ अधिवक्त्यांकडून आरोपीच्या विरोधात तक्रार प्रविष्ट !
  • धर्मांध उच्चशिक्षित असले, तरी त्यांची मूळ हिंदुविरोधी वृत्ती जात नाही, हे लक्षात घ्या !
    फिरोजाबाद (उत्तरप्रदेश) - येथील एका धर्मांध अधिवक्त्याने गायत्री मंत्राला अश्‍लील संबोधून मंत्राचा चुकीच्या पद्धतीने उच्चारण असलेला मजकूर सामाजिक संकेतस्थळांवर प्रसारित केला. धार्मिक भावना भडकवणारा हा मजकूर भ्रमणभाषवर दिसताच जिल्हा न्यायालयातील हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ते संतप्त झाले. त्यांनी अश्‍लील मजकूर टाकणारे अधिवक्ता महंमद यामीन यांच्या विरोधात घोषणा दिल्या, तसेच त्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली. अधिवक्त्यांनी अश्‍लील मजकूर प्रसारित करणारे यामीन यांचा शोध घेतला; मात्र ते फरार झाले होते.

इंडोनेशियात भूकंपामुळे ८४ सहस्र लोक बेघर !

  • भारतात पुढे अशाच आपत्कालाच्या घटना घडल्यावर अशी स्थिती येऊ शकते, त्या वेळी सरकार आणि प्रशासन साहाय्य करील, याची निश्‍चिती नाही. हे लक्षात घेऊन हिंदूंनी आतापासून साधनेला प्रारंभ करावा. त्यामुळे अशा काळात देव त्यांचे रक्षण करू शकेल !
    जकार्ता - काही दिवसांपूर्वी इंडोनेशियाला बसलेल्या ६.५ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यामुळे ८४ सहस्र लोक बेघर झाले आहेत. या भूकंपात १०० लोकांचा बळी गेला आहे. अनेक लोक घायाळ असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत. हिंदी महासागरात वर्ष २००४ मध्ये आलेल्या सुनामीनंतर या भागातील ही सर्वांत मोठी नैसर्गिक आपत्ती ठरली आहे. या भूकंपात अनेक इमारती, औद्योगिक आस्थापनांच्या इमारती, मशिदी पडल्या आहेत.

३१ डिसेंबरपर्यत हस्तलिखित सातबारा पुन्हा चालू करणार ! - चंद्रकांत पाटील

३१ मार्चपर्यंत ‘फायबर कनेक्टीव्हिटी’ने राज्यातील ग्रामपंचायती जोडणार !
    नागपूर, १६ डिसेंबर (वार्ता.) - ‘ऑनलाईन सातबारा’ प्रक्रियेत जोपर्यर्ंत सर्व त्रुटी पूर्णपणे दुरुस्त होत नाहीत, तोपर्यर्ंत सातबारा लिखित स्वरूपात देण्यात येईल. ३१ मार्चपर्यंत ‘फायबर कनेक्टीव्हिटी’ने राज्यातील ग्रामपंचायती जोडण्यात येईल, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत १५ डिसेंबर या दिवशी दिली. विरोधी पक्षनेत्यांनी विचारलेल्या लक्षवेधी प्रश्‍नावर ते बोलत होते.

संस्कृती भ्रष्ट करणारा आणि तरुण पिढीला व्यसनाधीन बनवणारा सनबर्न फेस्टिव्हल रहित करा !


डावीकडून श्री. चंद्रकांत वारघडे, अधिवक्ता श्री. मोहनराव डोंगरे,
सर्वश्री पराग गोखले, चैतन्य तागडे आणि आनंद दवे
हिंदु जनजागृती समितीची पत्रकार परिषदेद्वारे मागणी
     पुणे, १६ डिसेंबर (वार्ता.)- अमली पदार्थांचा अपवापर आणि अनैतिक कृत्ये यांमुळे कुप्रसिद्ध ठरलेला आणि गोव्यातून हाकलण्यात आलेला सनबर्न फेस्टिव्हल सांस्कृतिक आणि शैक्षणिक राजधानी असलेल्या पुण्यात होत आहे. गोवा शासनाने या फेस्टिव्हलच्या आयोजकांना ३ कोटी रुपयांचा थकवलेला कर भरण्याचा आदेश दिला आहे. असा हा फेस्टिव्हल पुण्यात झाल्यावर आयोजक महाराष्ट्र शासनाचा कर जमा करतील का, याची निश्‍चिती न करताच शासकीय अधिकार्‍यांनी या फेस्टिव्हलला अनुमती दिली आहे.

२ सहस्र रुपयांची नोट ५ वर्षांत बंद होईल ! - संघाचे नेते एस्. गुरुमूर्ती यांचा दावा

   नवी देहली - २ सहस्र रुपयांची नवीन नोट पुढच्या ५ वर्षांत बंद होईल. नोटाबंदीमुळे रकमेचा तुटवडा भरून काढण्यासाठी सरकारने ही नोट छापण्याचा निर्णय घेतला; परंतु पुढील ५ वर्षांत ती बंद केली जाईल. भविष्यात ५०० रुपयांची नोटच सर्वात मोठे चलन असेल, असा दावा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अर्थविषयक विचारवंत एस्. गुरुमूर्ती यांनी केला आहे.
   एस्. गुरुमूर्ती पुढे म्हणाले की, नोटाबंदीमुळे बाजारात नोटांचा मोठा तुटवडा निर्माण होईल, हे आधीच ओळखून सरकारने २ सहस्र रुपयांच्या नोटा छापल्या आणि त्या चलनात आणल्या. प्रचंड गोपनियतेत अल्प कालावधीत नोटबंदीचा सरकारने अचानक निर्णय घोषित केला. त्यामुळे यात अचडणी रहाणे स्वाभाविक आहे. इतक्या अल्पावधीत ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या नोटा छापणे शक्य नव्हते. त्यामुळे २ सहस्रची नोट चलनात आणणे सरकारला भाग पडले.

बेंगळुरू येथे दीडशे रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी ८ वर्षांनंतर निकाल !

  • मुख्याध्यापकाच्या विरोधात माजी विद्यार्थ्याच्या तक्रार खटल्यावर सरकारचे १५ लाख रुपये खर्च !
  • एका लहान प्रकरणात एवढी वर्षे न्यायदानासाठी लागत असतील, तर न्यायालयात प्रलंबित असलेल्या कोट्यवधी प्रकरणांमध्ये न्यायदानासाठी किती वर्षे लागतील ? हिंदु राष्ट्रात जनतेला त्वरित न्याय दिला जाईल !
बेंगळुरू (कर्नाटक) - येथील एका शाळेतील मुख्याध्यापकाने विद्यार्थ्याकडून दीडशे रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी अनुमाने ८ वर्षे खटला चालला. या खटल्याच्या सुनावणीवर पोलिसांकडून सरकारी तिजोरीतील १५ लाख रुपये खर्च करण्यात आले. नुकतीच या प्रकरणात न्यायालयाने मुख्याध्यापकांची निर्दोष सुटका केली आहे.

संसद बंद पाडणार्‍या खासदारांचे वेतन आणि भत्ते रोखले पाहिजे !

काशी सुमेरु पीठाधिश्‍वर जगद्गुरु शंकराचार्य स्वामी नरेंद्र सरस्वती यांचे विधान
  ठाणे - ‘संसद बंद पाडणार्‍या खासदारांचे वेतन आणि भत्ते रोखले पाहिजे, असे विधान काशी सुमेरु पीठाधिश्‍वर जगद्गुरु शंकराचार्य स्वामी नरेंद्र सरस्वती यांनी केले. येथील सिद्धेश्‍वर मंदिरात ४५ दिवसांचा यज्ञ चालू आहे. या ठिकाणी भाविकांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. संसदेच्या कामकाजात अडथळा आणण्यात येत असल्याविषयी चिंता व्यक्त करतांना ते म्हणाले, ‘‘खासदारांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी कोणी थांबवले आहे ? अशा खासदारांना सभागृहाच्या बाहेर काढण्यासाठी मार्शलांचे साहाय्य का घेण्यात येत नाही ?’’

चोपडा (जिल्हा जळगाव) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नामदिंडी

  
   चोपडा -
दत्तजयंतीनिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रतीवर्षीप्रमाणे नामदिंडी काढण्यात आली. शहरातील छत्रपती शिवाजी चौकात सकाळी ८.३० वाजता नगरसेवक जीवन चौधरी यांनी सपत्नीक नगराध्यक्ष मनीषा चौधरी यांसह प्रभू दत्त भगवानच्या छायाचित्राचे पूजन आणि माल्यार्पण केले, तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले.

नागपूर येथे ३१ डिसेंबरला होणारे अपप्रकार थांबवण्यासाठी उपजिल्हाधिकार्‍यांना निवेदन

   
उपजिल्हाधिकार्‍यांना निवेदन देतांना कार्यकर्ता
नागपूर -
नववर्षोत्सवाच्या नावाखाली ३१ डिसेंबर या दिवशी प्रेक्षणीय स्थळे, किल्ले आदी सार्वजनिक ठिकाणी होणारे अपप्रकार थांबवण्याविषयी येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उपजिल्हाधिकारी श्री. राव यांना निवेदन देण्यात आले. या वेळी समितीचे श्री. अभिजीत पोलके आणि श्री. अतुल आर्वेन्ला उपस्थित होते.

पनवेल-वसई-विरार कॉरिडोरमध्ये ११ नवीन रेल्वेस्थानकांचा समावेश

     मुंबई - मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून पनवेल-वसई-विरार कॉरिडोर बांधण्यात येणार आहे. यामध्ये ११ नवीन स्थानकांचा समावेश आहे. अंतिम मंजुरीसाठी हा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या अंतर्गत नवी डोंबिवली स्थानकही उदयास येणार आहे. या प्रकल्पाच्या अंतर्गत २ नवीन रेल्वेमार्ग टाकण्यात येणार आहेत. त्यामुळे लोकलचा प्रवास सुकर होणार आहे. ७० किलोमीटर असलेल्या या प्रकल्पासाठी ९ सहस्र कोटी रुपये इतका खर्च येणार आहे. येत्या ५ वर्षांत या प्रकल्पाचे काम पूर्ण होणार आहे.

नागपूर येथे २३ डिसेंबरपासून धार्मिक आणि ऐतिहासिक विराट धर्मसंस्कृती महाकुंभाचे आयोजन

  • वर्ष २०२५ पर्यंत भारताला जगद्गुरु बनवण्याचा उद्देश !
  • विविध संप्रदायांच्या देशातील १ सहस्र ११८ संतांचा सहभाग !
      नागपूर, १६ डिसेंबर (वार्ता.) - येथील रेशीमबाग मैदानावर २३ ते २५ डिसेंबर या कालावधीत धार्मिक आणि ऐतिहासिक विराट धर्मसंस्कृती महाकुंभ आयोजित करण्यात आला आहे. हा विराट ऐतिहासिक महाकुंभ सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल. विराट धर्मसंस्कृती महाकुंभ या राष्ट्रीय सोहळ्यात भारतमातेच्या सेवेसाठी सर्वच धर्म संप्रदायांचे देशभरातील १ सहस्र ११८ संत सहभागी होणार आहेत. वैदिक आणि सांप्रदायिक असे दोन प्रकारचे संत देशभरातून एकाच वेळी एकत्र येत आहेत, हेच या महाकुंभाचे वैशिष्ट्य होय.

मुख्यमंत्र्यांच्या सचिवासह भ्रष्ट सनदी अधिकार्‍यांवर निलंबनाची कारवाई करा ! - शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांचा आरोप

भूमी लाटण्याच्या प्रकरणाच्या विरोधात विधानभवनाच्या पायर्‍यांवर शिवसेनेचे आंदोलन !
     नागपूर, १६ डिसेंबर (वार्ता.) - मुंबई-नागपूर समृद्धी या मुख्य मार्गावर राज्यातील मोठ्या अधिकार्‍यांनी ठाणे आणि परिसरात मोठ्या प्रमाणात गरीब शेतकर्‍यांच्या भूमी खरेदी केल्या आहेत. या भूमी लाटणार्‍या भ्रष्ट सनदी अधिकार्‍यांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेचे आमदार श्री. प्रताप सरनाईक यांनी १६ डिसेंबर या दिवशी केली. या मागणीसाठी शिवसेनेच्या आमदारांनी याच सूत्रावर सभागृहाच्या पायर्‍यांवर आंदोलन केलेे. या अधिकार्‍यांच्या भूमी खरेदीचा सातबारा उतारा श्री. सरनाईक यांनी १५ डिसेंबर या दिवशी विधानसभेतील सभागृहात दाखवला होता.

मुंबईतील एलफिन्सटन होणार आता प्रभादेवी !

      नागपूर, १६ डिसेंबर (वार्ता.) - मुंबई येथील एलफिन्सटन रेल्वे स्थानकाचे नाव पालटून प्रभादेवी करण्याच्या प्रस्तावाला १६ डिसेंबर या दिवशी विधानसभेत एकमताने मान्यता देण्यात आली. हा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे मुंबईच्या छत्रपती शिवाजी टर्मिनसचे नाव पालटून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस करण्याच्या प्रस्तावालाही विधानसभेत सदस्यांनी एकमताने संमती दिली. १६ डिसेंबरला सकाळी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या दोन्ही प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. ही सर्व माहिती मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.

‘सनातन संस्था ठाणे’ न्यासाच्या वतीने बेलवडे, पेण येथील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप

विद्यार्थ्यांना खाऊ देतांना कार्यकर्ते
      पेण - ‘सनातन संस्था ठाणे’ न्यासाच्या वतीने बेलवडे येथील आदिवासी पाड्यावरील शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. उपक्रमाचा लाभ ९० विद्यार्थ्यांनी घेतला. या वेळी उपस्थित रा.जि.प. शाळा भोरकस या शाळेतील शिक्षक श्री. प्रफुल्ल सुखचैन यांनी ‘सनातन संस्था सामाजिक कार्य करण्यासह समाजाला धर्मशिक्षण देते आणि अयोग्य गोष्टींचे खंडण करून धर्मजागृती करते, हे कार्य कौतुकास्पद आहे.आपले कार्य असेच पुढे वाढत जावो’, असे सांगितले.

अकोला शहरात सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन

     अकोला - येथील श्रीनाथ दत्तमंदिरासमोर सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शन आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले. अनेकांनी प्रदर्शनाचा लाभ घेतला. प्रदर्शनस्थळी सनातन पंचांग २०१७ हे अँड्रॉईड अ‍ॅपवर डाऊनलोड करण्यात येत होते. या सेवेचा लाभ ६० नागरिकांनी घेतला.

जळगाव शहरातील विविध हिंदु समाजाच्या प्रमुखांचा हिंदु धर्मजागृती सभेला जाहीर पाठिंबा !

बारा बलुतेदार समाजाचे श्री. चंद्रकांत सोनवणे (उजवीकडे) यांना निमंत्रण देतांना कार्यकर्ते
चांभार समाजाचे अध्यक्ष श्री. चंद्रशेखर कापडे (डावीकडे) यांना निमंत्रण देतांना कार्यकर्ते
      जळगाव - येथे २५ डिसेंबर या दिवशी होणार्‍या हिंदु धर्मजागृती सभेचे निमंत्रण बारा बलुतेदार, नाभिक समाज महासंघ, चांभार समाज, क्षत्रिय मराठा समाज, आदर्श मराठा समाज यांना देण्यात आले. नाभिक महासंघाचे संपर्क प्रमुख श्री. राजकुमार गवळी यांनी स्वत: सभेच्या पहिल्या बैठकीपासून सक्रीय सहभाग घेत शहरातील सर्व समाजाच्या प्रमुखांना भेटण्याचे नियोजन केले.

(म्हणे) राज्यातील कायदा सुव्यवस्थेविषयी सरकार गंभीर नाही !

स्वतःच्या पक्षाच्या सत्ताकाळात कायदा सुव्यवस्थेची लक्तरे
निघालेेली असतांना त्याविषयी ब्रही न काढणारे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे वक्तव्य !
     नागपूर, १६ डिसेंबर (वार्ता.) - राज्यातील गुन्हेगारीची वाढती संख्या पहाता राज्य सरकारने जनतेचा अंत पाहू नये. अन्यथा जनता सत्तेचा माज उतरवेल. एकूणच राज्यातील कायदा सुव्यवस्थेविषयी सरकार गंभीर नाही, असे प्रतिपादन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले. परिषदेमध्ये अंतिम आठवडा प्रस्तावातील गृह खात्यावर आयोजित केलेल्या चर्चेचा प्रस्ताव सादर झाला. यामध्ये अन्य सदस्यांनीही कायदा सुव्यवस्थेच्या चर्चेत सहभाग घेतला. या चर्चेला अंतिम उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस १७ डिसेंबर या दिवशी देणार आहेत.

भाजपचे आमदार चैनसुख संचेती यांच्याकडून वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय !

मलकापूर (जिल्हा बुलढाणा) येथील दंगलीचे प्रकरण !
     नागपूर, १६ डिसेंबर (वार्ता.) - बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे १२ डिसेंबर या दिवशी झालेल्या दंगलीच्या पार्श्‍वभूमीवर भाजपचे आमदार श्री. चैनसुख संचेती यांनी १६ डिसेंबरला त्यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आणि मलकापूर येथील नागरिकांनाही त्यांचा वाढदिवस साजरा करू नये, तसेच त्या निमित्ताने कोणीही जाहिरात, फलक लावू नये आणि कोणतेही कार्यक्रम ठेवू नयेत, असे आवाहन केलेे. (दंगलीच्या पार्श्‍वभूमीवर वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेणारे भाजपचे आमदार श्री. चैनसुख संचेती यांचे अभिनंदन ! - संपादक)
वर्तमानपत्रातून केलेल्या आवाहनात श्री. संचेती यांनी म्हटले आहे की,

कोल्हापूर येथील मोर्च्यात पाकचा ध्वज घेऊन सहभागी असणार्‍यांवर कारवाई करा ! - शिवसेना

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ निदर्शने करतांना शिवसैनिक
     कोल्हापूर, १६ डिसेंबर (वार्ता.) - १४ डिसेंबर या दिवशी कोल्हापुरात काढण्यात आलेल्या मोर्च्यात सहभागी असलेली एक व्यक्ती पाकिस्तानी ध्वज घेऊन फिरत होती. यामुळे शहरात कायदा आणि सुव्यवस्था यांचा भंग होऊ शकतो, तरी अशा समाजकंटकावर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी शिवसेनाप्रमुख श्री. संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ निदर्शने करण्यात आली.

देहलीमध्ये २० वर्षांच्या तरुणीवर चारचाकी गाडीमध्ये बलात्कार !

गाडीवर लावण्यात आला होता गृहमंत्रालयाचा स्टीकर !
बलात्कार्‍यांना कठोर शिक्षा मिळत नसल्याचा परिणाम ! काँग्रेसच्या काळात
देहलीत बलात्कार होत होते, ते आताच्या सरकारच्या काळातही होत आहेत; मग पालटले काय ?
      नवी देहली - देहलीत एका २० वर्षांच्या तरुणीवर चारचाकी गाडीमध्ये बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी बलात्कार्‍याला अटक केली आहे. विशेष म्हणजे या गाडीवर गृहमंत्रालयाचा स्टीकर लावलेला आढळून आला आहे.
      पीडित तरुणी नोएडा येथील रहिवासी आहे. १४ डिसेंबरला ती नोकरीच्या शोधात देहलीला आली होती. रात्री नऊच्या सुमारास घरी परतण्यासाठी ती एम्स् रुग्णालयाजवळ बसची वाट पहात उभी होती.

मुंबईत प्रवासी वाहतूक चालकांसाठी शिवसेनेचा ‘अन्नदाता वाहन’ उपक्रम कार्यान्वित

    मुंबई, १६ डिसेंबर - दिवसभर प्रवासी वाहतूक करणारे रिक्शा, टॅक्सी आणि अन्य वाहतूक चालकांना अल्पदरात चांगल्या दर्जाचे जेवण आणि अल्पोहार मिळावा, यासाठी शिवसेनेच्या वतीने ‘अन्नदाता वाहन’ हा उपक्रम कार्यान्वित करण्यात आला आहे. युवा सेनेचे प्रमुख श्री. आदित्य ठाकरे यांच्या हस्ते १४ डिसेंबरला या उपक्रमाचे उद्घाटन झाले. महाराष्ट्र शिव वाहतूक सेनेच्या वतीने हा उपक्रम चालवण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या अंतर्गत वाहतूकदारांना योग्य दरात दिवसभर अल्पोहार आणि भोजन पुरवण्यात येणार आहे.

क्षमतेपेक्षा अधिक संख्येने विद्यार्थी नेणार्‍या रिक्शांवर कारवाई करणार ! - परिवहनमंत्री श्री. दिवाकर रावते

      नागपूर, १६ डिसेंबर (वार्ता.) - वैध क्षमतेपेक्षा अधिक संख्येने विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्‍या रिक्शा आणि रिक्शामध्ये अवैधरित्या फळी लावून अधिक विद्यार्थी नेणार्‍या रिक्शा यांवर तात्काळ कारवाई करण्यात येईल, अशी माहिती परिवहनमंत्री श्री. दिवाकर रावते यांनी विधान परिषदेत दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल भोसले यांनी परिषदेच्या प्रश्‍नोत्तराच्या तासामध्ये पुणे शहरातील विद्यार्थ्यांच्या वाहतूक करणार्‍या बसगाड्यांच्या पडताळणीवरून विचारलेल्या प्रश्‍नावरील चर्चेत श्री. रावते यांनी ही माहिती दिली.

तुळजापूर येथे सुदर्शन वाहिनीचे संपादक सुरेश चव्हाणके यांचा हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सत्कार !

सुदर्शन वाहिनीचे संपादक श्री. सुरेश चव्हाणके आणि त्यांच्या
पत्नी सौ. माया यांचा सत्कार करतांना हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते
     तुळजापूर (जिल्हा धाराशिव), १६ डिसेंबर (वार्ता.) सुदर्शन वाहिनीचे संपादक सुरेश चव्हाणके आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. माया श्री भवानीदेवीच्या दर्शनासाठी तुळजापुरात आले होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेऊन श्री भवानीदेवीची प्रतिमा देऊन त्यांचा सत्कार केला. या वेळी समितीच्या वतीने सर्वश्री विलास पुजारी, सुरेश नाईकवाडी, संदीप बगडी आणि अमित कदम उपस्थित होते.

पंतप्रधानांविषयीच्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे विधान परिषदेचे कामकाज अल्पकाळ स्थगित

     नागपूर, १६ डिसेंबर (वार्ता.) - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर नोटाबंदीच्या प्रकरणी काँग्रेसचे भाई जगताप यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्यातील गोंधळामुळे विधान परिषदेचे कामकाज १० मिनिटांसाठी स्थगित करावे लागले. ही सूत्रे मांडतांना जगताप यांनी नोटाबंदीच्या प्रकरणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पैसे खाल्ले आहेत आणि भ्रष्टाचार केला आहे, असे वक्तव्य काँग्रेसचे राहुल गांधी यांनी केले आहे, असे म्हटले. त्यावर सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी त्यावर आक्षेप घेतला. त्यावर विरोधी पक्षाच्या सदस्यांनीही घोषणा देत गोंधळ केला. या गोंधळाच्या वेळी सभापतींनी स्थगन प्रस्ताव फेटाळल्याचे जाहीर करत सभेचे कामकाज स्थगित केले. (गोंधळ घालून सभेचे कामकाज रोखणे, हे लोकप्रतिनिधींना अशोभनीय ! - संपादक)
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या संदर्भातील परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे विचारधन !

हिंदु राष्ट्र स्थापनेतील साधनेचे महत्त्व
‘      वर्ष २०२३ पासून ‘हिंदु राष्ट्र’ येईल’, हे आजवर अनेक संतांनी वेळोवेळी सांगितले आहे. या पार्श्‍वभूमीवर हिंदु राष्ट्र स्थापनेविषयी अनेकांंच्या मनात उत्सुकता असते. यासाठीच ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची दिशा’ या विषयावरील वैशिष्ट्यपूर्ण सदर !
३. साधना म्हणजे काय ?
     ‘हिंदु धर्म असे सांगतो की, मनुष्यजन्माची सार्थकता ईश्‍वरप्राप्तीतच आहे. ईश्‍वरप्राप्तीसाठी प्रतिदिन करावयाच्या प्रयत्नांना ‘साधना’ असे म्हणतात. काही जण वैयक्तिक साधना म्हणून पूजा-अर्चा, नामजप, ध्यानधारणा, योगासने, यज्ञयाग, तीर्थक्षेत्री जाणे इत्यादी धार्मिक कृती करत असतात. गुरुप्राप्ती झालेले काही जण त्यांच्या सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली समष्टी साधना म्हणून सनातन धर्माचा प्रसार, समाजसाहाय्य, राष्ट्रजागृती आणि धर्मरक्षण आदी कृती करत असतात. काही जण भारतमातेला देवता मानून तिच्या कार्यासाठी समर्पित झालेले असतात, म्हणजेच कर्मयोगानुसार साधना करत असतात.’ (३.५.२०१४)

जिल्हा अधिकोषांच्या (बँकांच्या) समस्येवर उपाययोजना नसणे, हे अपयश नव्हे का ?

      राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची जिल्हा मध्यवर्ती सहकारी अधिकोषांमध्ये (बँकांमध्ये) नोटा पालटण्यास अनुमती द्यावी, यासाठी नुकतीच भेट घेतली. त्यासाठी जेटली यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचेही त्यांनी सांगितले. पंतप्रधान मोदी यांनी देशातील काळा पैसा बाहेर काढण्यासाठी ८ नोव्हेंबर या दिवशी ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या जुन्या नोटांवर बंदी आणून नवीन नोटा चलनात आणण्याचे घोषित केले. त्यानंतर देशातील सर्वच क्षेत्रांतील अधिकोषांना जुन्या नोटा पालटून नवीन नोटा देण्याची अनुमती दिली होती. ९ ते ११ नोव्हेंबर या कालावधीत राज्यातील जिल्हा मध्यवर्ती अधिकोषांमध्ये अंदाजे ३०० कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या जुन्या नोटा जमा झाल्या. त्यानंतर ११ नोव्हेंबर या दिवशी जिल्हा मध्यवर्ती अधिकोष आणि पतसंस्था यांना जुन्या नोटा पालटण्यास भारतीय रिझर्व्ह बँकेने बंदी घातली. त्यानंतर आतापर्यंत तरी जुन्या नोटा पालटण्याची बंदी आहे तशीच आहे. या प्रक्रियेमुळे जिल्हा अधिकोषांकडे असलेला जुन्या नोटांच्या रूपातील पैसा हा त्या अधिकोषांमध्येच आहे. त्यांच्याकडे असलेल्या नोटाही अद्यापपर्यंत पालटण्यात आलेल्या नाहीत. यामुळे जिल्हा अधिकोषांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेचे पैसे काढणे आणि भरणे यांचे व्यवहार अन् अर्थव्यवस्था काही प्रमाणात ठप्प आहे.

सनातन संस्था साधकांना मिळत असलेले ईश्‍वरी ज्ञान तत्परतेने समाजापर्यंत पोचवत असल्याने ईश्‍वराने ज्ञान देण्यासाठी सनातनच्या साधकांची निवड करणे

श्री. राम होनप
‘     सनातन संस्थेच्या काही साधकांना ईश्‍वराकडून ज्ञान प्राप्त होते. ईश्‍वराने सनातनच्या साधकांना ज्ञान देण्याची अनेक कारणे आहेत. त्यांपैकी एक कारण याप्रमाणे आहे. साधकांना मिळत असलेले ज्ञान सनातन स्वतःजवळ न ठेवता तत्परतेने दैनिक सनातन प्रभात आणि सनातनचे ग्रंथ इत्यादी माध्यमांतून समाजापर्यंत पोचवते. त्यामुळे देवालाही वाटते, ‘मी देत असलेल्या ज्ञानाचा सनातन योग्य उपयोग करत आहे. त्यामुळे देवालाही साधकांना आणखी ज्ञान द्यावेसे वाटते.’ - श्री. राम होनप, सनातन आश्रम रामनाथी, गोवा. (२०.९.२०१६)


केरळच्या ख्रिस्ती शाळेत मुलांना हिंदुविरोधी शिकवण देत असल्याचा पालकांचा आरोप !

ख्रिस्ती शाळांमध्ये आपल्या मुलांना हिंदुविरोधी शिकवण देऊन
त्यांचे वैचारिक धर्मांतर तर करण्यात येत नाही ना, याविषयी हिंदूंनी जागरूक राहिले पाहिजे !
    एर्नाकुलम् (केरळ) - परावूरमध्ये एका ख्रिस्ती शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये हिंदुविरोधी भावना निर्माण करून ख्रिस्ती धर्माविषयी आकर्षण निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे पालकांमध्ये संताप व्यक्त झाला असून त्यांनी शाळा हिंदुविरोधी कार्यक्रम राबत असल्याचा आरोप केला. त्यानंतर शाळेच्या शिक्षिकेने व्यवस्थापनाच्या वतीने क्षमा मागितली आहे.

जे आई-वडील संस्कारहीन मुलांना समाज आणि देश यांच्या डोक्यावर मारतात, ते निश्‍चितच पुष्कळ मोठा गुन्हा करतात !

     ‘संस्कारहीन व्यक्ती शिक्षित समाजात हंसाच्या थव्यामध्ये बगळ्याप्रमाणे असते.’ जे आई-वडील संस्कारहीन मुलांना समाज आणि देश यांच्या डोक्यावर मारतात, ते निश्‍चितच पुष्कळ मोठा गुन्हा करतात. ज्या ठिकाणी ज्ञान, शिक्षण, माणुसकी आणि संपन्नता असते, त्या ठिकाणी स्वर्ग असतो. याच्या उलट जेथे अज्ञान, राक्षसीपणा आणि संकटे असतात, तेथे नरक असतो. संस्कारक्षम व्यक्ती स्वर्ग निर्माण करतात, तर संस्कारहीन व्यक्ती नरक निर्माण करतात.’ - गीता स्वाध्याय (जानेवारी २०११)

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Sansad ke pure satra me 1 bhi din kamkaj n hone se 223 karod ki hani hui.
Janta ka yah paisa vyartha gawanewale sansadose vasul karo !
जागो ! : संसद के पूरे शीत सत्र में १ भी दिन कामकाज न होने से २२३ करोड रुपयों की हानि हुई.
जनता का यह पैसा व्यर्थ गंवानेवाले सांसदों से वसूल करो !

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचा देह आणि चक्र यांवर विराजमान असणार्‍या देवतांचे सूक्ष्मातून झालेले दर्शन अन् त्यांचे कार्य !

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...
परात्पर गुरु
डॉ. जयंत आठवले
      ‘गुरुमाऊली, एक दिवस सकाळी नामजप करायला बसले होते. तेव्हा सूक्ष्मातून तुमच्याकडे लक्ष गेले. त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टरही नामजप करतांना दिसले. माझे परात्पर गुरूंच्या देहाकडे लक्ष गेल्यावर ‘काही देवता परात्पर गुरु डॉक्टरांना अध्यात्मप्रसाराच्या कार्यासाठी पुढीलप्रमाणे साहाय्य करत आहेत, तर काही देहात आणि काही चक्रांवर विराजमान आहेत’, असे दिसले. 
१. सहस्रारचक्रावर ब्रह्मदेव 
     देवता हिंदु राष्ट्राची निर्मिती करण्यासाठी गुरुदेवांना साहाय्य करत आहे.
२. आज्ञाचक्रावर श्री गणेश 
     येणार्‍या काळासाठी सर्व ग्रंथांचे संकलन करण्यासाठी बुद्धी देणे

रामनाथी आश्रमातील सुकून गेलेली अश्‍वत्थ आणि तुळस यांची रोपे अन् पारिजातकाचा वृक्ष यांना महर्षि भृगु यांच्या आदेशानुसार सुवर्णसिद्ध जल घालणे, याचे सूक्ष्म-परीक्षण

कु. मधुरा भोसले
      ‘रविवार, १३.११.२०१६ या दिवशी दुपारी ४ वाजता भृगुसंहितेचे वाचक डॉ. विशाल शर्मा यांच्या माध्यमातून महर्षि भृगु यांच्या आदेशानुसार सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी सनातनच्या रामनाथी आश्रमात वाळलेली अश्‍वत्थ आणि तुळस यांची रोपे अन् वाळलेला पारिजातकाचा वृक्ष यांना सुवर्ण घालून तापवून नंतर थंड केलेले पाणी (सुवर्णसिद्ध जल) घातले. या कृतीचे सूक्ष्म-स्तरावरील परिणाम सूक्ष्म-परीक्षणाद्वारे विशद करत आहे.
१. रविवारच्या दिवशी दुर्बळ आणि क्षीण 
झालेल्या वृक्षांना सुवर्णाचा अंश असणारे जल वाहणे
सुवर्ण हा धातू रवि, म्हणजे सूर्य याच्याशी संबंधित आहे. अन्य दिवसांच्या तुलनेत रविवारी सोन्यामध्ये असणारे दैवी तेज हे शतपटींनी अधिक प्रमाणात प्रगट होऊन कार्यरत असते.

आत्मानुसंधानाची प्रक्रिया

प.पू. पांडे महाराज यांचे अनमोल विचारधन
प.पू. पांडे महाराज 
१. ‘आत्मानुसंधानाच्या वेळी आतून सांगणारा आत्माच असतो. 
२. आपले सांगणे हे आत्मानुसंधान झाले पाहिजे. असे आत्मानुसंधान असलेले सांगणे समोरच्या व्यक्तीच्या आत्मानुसंधानाशी संमिलीत होऊन त्याच्यातील आत्मा जेव्हा जागृत करील, तेव्हा त्याला आपल्याप्रमाणे वाटायला लागेल. येथपर्यंत प्रक्रिया होऊन कार्य झाल्यास ‘ते कार्य झाले’, असे समजावे अन्यथा नाही. म्हणजे आपले सांगणे हे ‘मी सांगतो’ यापेक्षा ‘आत्म्याद्वारे सांगणे’ असे होणे अपेक्षित आहे.
३. प.पू. डॉक्टरांंचे चैतन्य स्वतःतील चैतन्याशी अनुग्रहीत होऊन त्यातून स्फुरणारे विचार समोरच्या व्यक्तीला क्रियाशील करतील. त्यामुळे त्याच्यातील संवेदना जागृत होऊन त्या व्यक्तीची धारणा पालटेल. तेव्हा धर्मप्रसाराचे कार्य योग्य पद्धतीने परिणामकारक होत राहील. 
     हे जग चैतन्यमय आहे आणि येथील प्रत्येक कर्म चैतन्याद्वारेच होत असते, हे यावरून दिसून येते.’ 
- प.पू. परशराम पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२७.४.२०१५)

सप्तर्षि जीवनाडीत सांगितल्याप्रमाणे सनातनच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांचा अहर्निश प्रवास !

महर्षींची शिकवण आणि कार्य !
‘     सनातनच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ मागील ४ वर्षांपासून भारतभरातील विविध राज्यांत दौर्‍यावर जात आहेत. हिंदु राष्ट्राची (सनातन धर्म राज्याची) शीघ्रतेने स्थापना व्हावी, राष्ट्र, धर्म, तसेच साधक यांचे रक्षण व्हावे आणि देवतांचा आशीर्वाद मिळावा, यासाठी सप्तर्षि जीवनाडीत सांगितलेल्या क्षेत्री जाण्याचे त्यांचे नियोजन असते. आतापर्यंत त्यांनी २४ राज्यांतील प्रवास करून तेथील वैशिष्ट्यपूर्ण दगड, माती, तीर्थ आदींचा संग्रह केला आहे. त्यांनी नोव्हेंबर २०१६ पर्यंत ३ लक्ष ५६ सहस्र कि.मी. एवढा प्रवास करून भावी पिढीसाठी भारतातील अलौकिक समृद्ध ठेवा संग्रहित केला आहे. या दैवी प्रवासाची सर्वांना माहिती व्हावी, यासाठी हे सदर प्रसिद्ध करत आहोत.’

कुटुंबियांची पित्याप्रमाणे काळजी घेणारे आणि ‘ते आनंदी रहावेत’, यासाठी प्रयत्न करणारे श्री. अमोल बधाले !

श्री. अमोल बधाले
     रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात सेवा करणारे श्री. अमोल बधाले यांच्याविषयी त्यांच्या आई श्रीमती संध्या बधाले यांनी लिहिलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.
१. गुणवैशिष्ट्ये
१ अ. समाधानी वृत्ती : ‘मी घरी असतांना त्याला ‘त्याच्या वाढदिवसासाठी काय आणू’, असे विचारल्यावर तो म्हणाला, ‘‘आता मला पुष्कळ सेवा आहे. आठवले की, मी सांगेन.’’ त्याने शेवटपर्यंत ‘काय पाहिजे’, हे सांगितले नाही. त्याचा ‘देवाने इथे सर्व दिले आहे’, असा विचार असून तो नेहमी समाधानी असतो. 
१ आ. सकारात्मक दृष्टीकोन देणे : आमच्या घराच्या कट्ट्यावर तुळशीची आणि कोरफडीची कुंडी होती. एकदा त्या अचानक कट्ट्यावरून खाली पडल्या. तुळशीची कुंडी फुटल्याने माझ्या मनात ‘हा त्रासाचा भाग असावा’, असा विचार आला. नंतर घरावर माकड येऊन बसले. मी हे दोन्ही प्रसंग अमोलला सांगितले. तेव्हा तो म्हणाला, ‘‘आपण कुठेही असलो, तरी देव आपले रक्षण करतो.’’

लाभली आम्हा आध्यात्मिक आई थोर ।

सौ. अश्‍विनी पवार
सतत असते सेवारत । 
झोप नाही रात्रंदिवस ॥
ध्यास घेतला समष्टीचा । 
नेण्या पुढे साधनेत 
सर्व साधकांस ॥ १ ॥

रामनाथीस असे एक समष्टी राधा ।
असे दुसरी ती देवद आश्रमात ॥
दिसे आपल्याला मूर्ती लहान ।
परंतु सेवेत असे तिची कीर्ती महान ॥ २ ॥

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या शिबिरासाठी रामनाथी आश्रमात आलेल्या सिंगापूर येथील श्रीमती मुदिता यांचा साधनाप्रवास आणि त्यांना आलेल्या अनुभूती

१. अभ्यास आवडेनासा झाल्यावर ‘तो 
आध्यात्मिक त्रास आहे’, असे वाटणे आणि त्रासातून 
बाहेर पडण्यासाठी मार्ग शोधतांना बौद्ध तत्त्वज्ञानाशी ओळख होणे 
     ‘माझ्या १२ ते १६ वर्षे या वयात मला अभ्यास आवडेनासा झाला आणि ‘हा त्रास आहे’, असे मला वाटू लागले. या त्रासातून बाहेर पडण्यासाठी मी मार्ग शोधत होते. वयाच्या २० व्या वर्षी बौद्ध तत्त्वज्ञानाशी माझी ओळख झाली आणि ‘त्रासातून बाहेर पडण्याचा तो मार्ग आहे’, हे मला समजले. बुद्धांनी जे काही शिकवले आहे, ते देवळांमध्ये दिसून न आल्याने त्याचा मी शोध घेण्यास आरंभ केला.

रामनाथी आश्रमातील साधिका कु. प्रतीक्षा हडकर यांना श्री अन्नपूर्णामातेने खीर भरवण्यासंबंधी आलेली अनुभूती

कु. प्रतीक्षा हडकर
      आध्यात्मिक त्रासांमुळे ग्लानी येतांना ‘श्री अन्नपूर्णामाता खीर भरवत आहे आणि ती साधकांनाही खीर वाढत आहे, तरी खिरीचे भांडे पूर्ण भरलेलेच आहे’, असे सूक्ष्मातून दिसणे : ‘३०.१०.२०१६ या दिवशी मला दिवसभरात मध्ये-मध्ये त्रासांमुळे ग्लानी येत होती. प्रतिदिन मी दुपारी १२ ते १२.३० या वेळेत जेवते; पण मला ग्लानी अधिक येत असल्याने ‘मी जेवले नाही’, याची जाणीव नव्हती. मी ग्लानीत असतांना ‘श्री अन्नपूर्णामाता तिच्या हातातील पळीने साधकांना खीर वाढत आहे’, असे दृश्य सूक्ष्मातून दिसले. त्याच क्षणी मला कुणाचा तरी स्पर्श झाला. तसेच तीन वेळा माझ्या डोक्यावरून कुणीतरी हात फिरवला आणि त्या वेळी मला आवाज ऐकू आला, ‘बाळा, उठतेस ना !’ त्यानंतर काही वेळाने अन्नपूर्णामाता मला खीर भरवत असल्याचे सूक्ष्मातून दिसले आणि खीर खातांना ‘माझ्या आत सुगंध जात आहे’, असे मला जाणवले. देवी एका बाजूला मला भरवत होती आणि दुसरीकडे साधकांना वाढत होती; पण भांड्यातील खीर अल्प न होता ते भांडे पूर्ण भरलेले दिसत होते.

व्यष्टी आणि समष्टी साधनेविषयी योग्य दृष्टीकोन ठेवून साधनेचा समन्वय साधावा !

श्री. यशवंत कणगलेकर
१. दैनिक सनातन प्रभातमध्ये वारंवार प्रसिद्ध होणारे दृष्टीकोन
     ‘व्यष्टी आणि समष्टी साधनेविषयी दैनिक सनातन प्रभातमध्ये वारंवार दृष्टीकोन प्रसिद्ध होतात. त्यापैकी काही सूत्रे पुढीलप्रमाणे आहेत. 
अ. काळानुसार व्यष्टी साधनेचे ३० टक्के, तर समष्टी साधनेचे ७० टक्के महत्त्व आहे.
आ. व्यष्टी आणि समष्टी साधना एकमेकांना पूरक आहेत. 
इ. व्यष्टी चांगली नसेल, तर समष्टी साधना नीट होत नाही, उलट हानीच होते.
ई. समष्टी साधना करतांना व्यष्टीकडे लक्ष नसेल, तर साधकाची साधना न होता कार्य होते.
     वरील सूत्रे वाचून अनेक साधकांना संभ्रम निर्माण झाल्याचे माझ्या लक्षात आले; म्हणून व्यष्टी आणि समष्टी म्हणजे नेमके काय अन् ती एकमेकांना कशी पूरक आहे, हे समजून घेणे आवश्यक आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

(परात्पर गुरु) डॉ. आठवले
     स्वसुखासाठी दुसर्‍यांना दुःख देऊन धनाचा संग्रह करणे, हे पाप आहे; पण भविष्यकाळ लक्षात घेऊन त्यासाठी आपली उचित अशी तयारी योग्य प्रकारे करून ठेवणे याला दूरदर्शीपणा म्हणतात. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. 
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

बोधचित्र


योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

ज्ञानाचा वापर सुयोग्य करायला हवा 
नुसते ज्ञान संपादन केले, तर त्याचा उपयोग होईलच, असे नाही. त्याचा सुयोग्य 
वापर करण्याचा चाणाक्षपणा आणि हुशारी नसेल, तर ते ज्ञान म्हणजे इंजिनविना असलेली गाडी ! 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

असाही भ्रष्टाचार !

संपादकीय 
      झाकीर हुसेन मदरसा अनुदान’ ही योजना महाराष्ट्र राज्यशासनाने चालू केली आहे. मुसलमान रहिवाशांच्या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ही योजना राज्यशासनाने चालू केली आहे खरी, परंतु हा लाभ संबंधित मुलांपर्यंत जात आहे, असे खात्रीपूर्वक म्हणण्याची सोय नाही. असे अनेक नतद्रष्ट समाजात वावरत आहेत की, ते भ्रष्ट आणि खोट्या कर्मात व्यग्र असतात. अशांपैकी काही जणांनी मदरसा शाळा केवळ कागदोपत्री दाखवून लाखो रुपयांचे शासकीय अनुदान लाटले असल्याचे उघड झाले आहे.

जागतिक शक्तीशाली व्यक्ती !

संपादकीय
      अमेरिकेतील ‘फोर्ब्स’ मासिकाने जगातील पहिल्या १० शक्तीशाली व्यक्तींची सूची सिद्ध केली आहे. एरव्ही अमेरिकी आस्थापनांना जागतिक घडामोडीत लक्ष घालण्याचा आणि शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, समाज, रस्ते, सुविधा, वगैरे संबंधांत अहवाल सिद्ध करून तो प्रसिद्ध करण्याचा एक छंद जडलेला असतो, ही गोष्ट मान्यच करावी लागेल. फोर्ब्स या आस्थापनाचे शक्तीशाली व्यक्तींची सूची सिद्ध करण्याचे काम, हा त्यापैकीच एक कार्यक्रम आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn