Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

नागपूर येथे पोलिसांच्या अस्वच्छ टँकरमधून पोलीस आणि आंदोलनकर्ते यांना पाणीपुरवठा !

पोलीस आणि महापालिका प्रशासन यांचा ढिसाळ कारभार !
     नागपूर, १५ डिसेंबर (वार्ता.) - येथे हिवाळी अधिवेशन चालू झाल्यानंतर राज्यातील विविध संघटनांच्या वतीने त्यांच्या न्याय हक्क मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येते. शासनाने विविध संघटनांना विधानभवनाजवळील यशवंत मैदानात मंडप घालून आंदोलन करण्यास अनुमती दिली आहे. तेथे विविध संघटनांच्या वतीने अधिवेशन चालू झाल्यापासून आंदोलन चालू आहे. या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या मैदानात चंद्रपूर पोलीस मुख्यालयातील पोलिसांचा पाण्याचा एक टँकर ठेवण्यात आला आहे. खरेतर पोलिसांच्यासाठी हा पाण्याचा टँकर ठेवण्यात आला आहे.

कोटी कोटी प्रणाम !


प.पू. भुरानंदबाबा निर्वाणोत्सव, मध्यप्रदेश
पू. (श्रीमती) कला प्रभुदेसाई यांचा आज वाढदिवस 

मणीपूरमध्ये आतंकवाद्यांच्या आक्रमणात ४ पोलीस हुतात्मा, तर ४ घायाळ !

पाकपुरस्कृत आतंकवाद नष्ट करण्याचे धाडस नाही, तर किमान ईशान्य
भारतातील आतंकवाद तरी केंद्र सरकारने नष्ट करून दाखवावा अन्यथा
काँग्रेसच्या काळात जे झाले नाही, ते आताही होत नाही, असेच जनतेला वाटेल !
     इंफाळ - १५ डिसेंबरला मणीपूरच्या चंदेल जिल्ह्यात लोकचाओ येथे आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणात
४ पोलीस हुतात्मा झाले, तर ४ जण घायाळ झाले आहेत. मणीपूर पोलिसांचे पथक भारत-म्यानमार सीमेजवळ मोरेह येथून तेंगनुपाल जिल्ह्यात येत होते. त्याच वेळी लोकचाओ येथे दबा धरून बसलेल्या एन्एस्सीआयच्या आतंकवाद्यांनी पोलिसांच्या पथकावर अंदाधुंद गोळीबार केला. तसेच स्फोटही घडवून आणला. दुसर्‍या एका घटनेत याच जिल्ह्यातील बोंगयांग परिसरातही आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणात एक पोलीस गंभीर घायाळ झाला. यापूर्वी ऑक्टोबरमध्ये मुख्यमंत्री ओकाराम इबोबी आतंकवाद्यांनी केलेल्या गोळीबारात बचावले होते.

जम्मू-काश्मीरमध्ये आतंकवाद्यांनी बँकेतून ११ लाख रुपये पळवले !

एकीकडेे आतंकवादी बँका लुटत आहेत, तर दुसरीकडे भ्रष्ट बँक अधिकारी अवैधपणे
काळा पैसा पांढरा करून देत आहेत. त्यांनी चालवलेली ही बँकेची लूटच आहे !
     जम्मू - १५ डिसेंबरला जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात आतंकवाद्यांनी एका बँकेवर दरोडा घालून ११ लाख रुपयांंची रोकड पळवून नेली. नोटाबंदीच्या निर्णयानंतर आतंकवाद्यांनी बँक लुटण्याची ही तिसरी घटना आहे. नोटाबंदीनंतर आतंकवाद्यांजवळ असलेल्या ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या जुन्या नोटा बाद झाल्याने त्यांच्या कारवायांना काही प्रमाणात आळा बसला. त्यामुळे कारवायांसाठी लागणारे पैसे गोळा करण्यासाठी आतंकवादी बँका लुटत आहेत.

दिल्ली पब्लिक स्कूलची चौकशी करून कारवाई करण्याचे शिक्षणमंत्र्यांचे आदेश !

हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्याकडून शिक्षणमंत्र्यांना निवेदन सादर
विज्ञापनाच्या माध्यमातून धर्मांतरास प्रोत्साहन देण्याचा शाळेचा प्रयत्न
डावीकडून शिक्षणमंत्री श्री. विनोद तावडे यांना निवेदन देताना
श्री.अभय वर्तक, मध्यभागी भाजपचे आमदार श्री.नरेंद्र पवार
     नागपूर - नेरुळ, पनवेल येथील प्रसिद्ध दिल्ली पब्लिक स्कूलने विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी लावलेल्या विज्ञापनामध्ये एका लहान मुलीला मदर तेरेसा यांच्यासारख्या दिसणार्‍या ख्रिस्ती पंथीय ननच्या वेशात दाखवले आहे. त्यावर अशी शाळा जेथे इतरांविषयी दया कशी निर्माण करावी, हेे शिकवले जात नाही, तर ती तुमच्यात निर्माण करते, या अर्थाचे इंग्रजी भाषेत वाक्य लिहून धर्मांतरास प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने दिल्ली पब्लिक स्कूलच्या व्यवस्थापनाने विज्ञापन त्वरित मागे घेऊन त्या विज्ञापनाविषयी शिक्षण संस्थेने माफी मागावी, तसेच अशा प्रकारचे विज्ञापन प्रसिद्ध करून धर्मांतराला चालना देणार्‍या शाळांची नोंदणी रहित करावी आणि अन्य ख्रिस्ती शाळांचीही त्या अनुषंगाने तपासणी करावी, अशी मागणी करणारे निवेदन राज्याचे शिक्षणमंत्री श्री. विनोद तावडे यांना १५ डिसेंबर या दिवशी दिले. त्यावर श्री. तावडे यांनी दिल्ली पब्लिक स्कूलची चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले.

अंबरनाथ (जिल्हा ठाणे) येथे ईदच्या मिरवणुकीत पोलीस बंदोबस्तात धर्मांधांकडून पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देऊन धिंगाणा !

धर्मांधांकडून उघडपणे राष्ट्रद्रोही कृत्ये होत असतांना त्यावर कोणतीही
कारवाई न करणारे अकार्यक्षम पोलीस हवेच कशाला ? अशा पोलिसांना
निलंबित करा ! हिंदु राष्ट्रात सक्षम पोलीस यंत्रणा असेल !
  • महिलांची छेड काढण्याचे प्रकार 
  •  वाहनांवरून हुल्लडबाजी करून भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न
     अंबरनाथ - ईदनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत सहभागी झालेल्या २५० पैकी १५० दुचाकीस्वार धर्मांधांनी मिरवणुकीतून बाहेर पडून शहरातील प्रत्येक चौकात जाऊन पाकिस्तान जिंदाबाद आणि इस्लाम जिंदाबादच्या घोषणा दिल्या अन् शहरभर हुल्लडबाजी केली, त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात भीतीचे आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले. भवानी चौकात धर्मांधांनी रस्त्यावरून जाणार्‍या महिलांची छेड काढण्याचा प्रयत्न केला. (या ठिकाणी आझाद मैदान मोर्च्याप्रमाणे महिला आणि पोलीस यांच्यावर अत्याचार होण्याच्या घटना घडल्या असत्या, तर त्याला कोण उत्तरदायी झाले असते ? त्यामुळे धर्मांधांच्या मिरवणुकांना अनुमती द्यायची का, याचा पुनर्विचार व्हायला हवा ! - संपादक)      रात्री १० वाजता भवानी चौकात काही धर्मांध हुल्लडबाजी करत अब लग रहा है ना पाकिस्तान ? असे नागरिकांना विचारून दहशत पसरवत होते. (गेली अनेक वर्षे प्रत्येक शहरात मुसलमानबहुल परिसर निर्माण होऊ दिल्याचाच हा परिणाम आहे !- संपादक)      विशेष म्हणजे पोलीस बंदोबस्तात हा प्रकार चालू होता. पोलिसांसमोर हे सर्व प्रकार होत असूनही या प्रकरणी अद्याप कोणावरही गुन्हा प्रविष्ट झालेला नाही.

जगातील १० शक्तीशाली व्यक्तींमध्ये पंतप्रधान मोदी यांचा समावेश !

पंतप्रधानांनी आता त्यांची शक्ती पाकच्या विरोधात दाखवून द्यावी, अशीच जनतेची इच्छा !
    न्यूयॉर्क - फोर्ब्स मासिकाने नुकतेच प्रकाशित केलेल्या जगातील प्रमुख १० शक्तीशाली व्यक्तींमध्ये पंतप्रधान ९ व्या स्थानी आहेत. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी सलग चौथ्यांदा प्रथम स्थान अबाधित ठेवले आहे. अमेरिकेचे नवनिर्वाचित डोनाल्ड ट्रम्प दुसर्‍या स्थानी आहेत. चौथ्या स्थानी चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग आहेत. पोप फ्रांसिस ५ व्या स्थानी आहेत.

मराठवाड्यातील बनावट मदरशांद्वारे अनुदान लाटणार्‍यांवर कठोर कारवाई करा ! - आमदार डॉ. राहुल पाटील, शिवसेना

डॉ. राहुल पाटील
अवैध कृत्यांच्या विरोधात आवाज उठवणारे
आमदार डॉ. राहुल पाटील यांचे अभिनंदन !
     नागपूर - मुसलमान मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी मदरशांमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि शिक्षक यांसाठी राज्यशासनाने झाकीर हुसैन मदरसा अनुदान ही योजना चालू केली. ही योजना चालू करताच मुसलमान समाजातील अनेकांनी कागदावरच मदरसा दाखवून कोट्यवधी रुपयांचे अनुदान लाटण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. त्यानंतर संभाजीनगरचे जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडेय यांनी जिल्ह्यातील २२५ मदरशांची झडती घेतली. या वेळी बहुतांश ठिकाणी मदरसे अस्तित्वातच नसल्याचे आढळून आले. अनेक मदरशांमध्ये सोयी-सुविधांचा अभाव होता, तर विद्यार्थ्यांची संख्या कागदोपत्री दाखवून अनुदान उचलत असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. अशा आशयाची वृत्ते अनेक वृत्तपत्रांतून ठळकपणे प्रसिद्ध झाली. त्यामुळे मराठवाड्यातील बीड, जालना, धाराशिव, परभणी, लातूर, नांदेड आणि हिंगोली शहरांसह ग्रामीण भागातील बनावट मदरशांची चौकशी करून शासनाचे लक्षावधी रुपयांचे अनुदान लाटणार्‍यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेचे परभणी येथील आमदार डॉ. राहुल पाटील यांनी १५ डिसेंबर या दिवशी विधानसभेत औचित्याचे सूत्र मांडतांना केली.
     डॉ. राहुल पाटील म्हणाले की, ३ वर्षांपासून मदरशांना अनुदान दिले जात असून प्रत्येकी २ ते ४ लक्ष ५० सहस्र रुपयांपर्यंत अनुदानाचे वाटप करण्यात येते.

राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवरील दारूची दुकाने बंद करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश !

केवळ दारूची दुकाने बंद करून दारू पिणे बंद होणार नाही, यासाठी
दारूविक्रीच बंद करून त्याची कठोेरपणे अंमलबजावणी करा ! तसेच
जनतेला दारूचे व्यसन लागू नये म्हणून तिला साधना शिकवा !
     नवी देहली - देशभरातील राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवर असणारी दारूची दुकाने १ एप्रिलपर्यंत हटवण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे; मात्र जोपर्यंत दारूविक्रीचा परवाना आहे, तोपर्यंत दुकान चालू ठेवण्याची अनुमती दुकान मालकांना देण्यात आली आहे. ३१ मार्चनंतर परवान्यांचे नूतनीकरण केले जाणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
     दारूची दुकाने राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांपासून किमान ५०० मीटर अंतरावर असली पाहिजेत, असे न्यायालयाने सांगितले आहे. तसेच दारूचे फलक आणि विज्ञापने हटवण्याचे आदेशही दिले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे दायित्व मुख्य सचिव आणि राज्य पोलीस प्रमुख यांना देण्यात आली आहे.

(म्हणे) जगात अन्य धर्मियांच्या तुलनेत हिंदूंचे शिक्षण अल्प ! - प्यू रिसर्च सेंटरचा अहवाल

प्यू रिसर्चचा अहवाल वस्तूनिष्ठ आहे का, याचा शोध हिंदूंनी घेतला पाहिजे !
     वॉशिंग्टन - जगातील अन्य धर्मियांच्या तुलनेत हिंदूंच्या शिक्षणाचे प्रमाण अत्यंत अल्प आहे, असे प्यू रिसर्च सेंटर या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे. विशेष म्हणजे थोड्या प्रमाणात मुसलमान हिंदूंच्या पुढे आहेत, असेही यात म्हटले आहे. प्यू रीसर्च सेंटरनेे रिलीजन अ‍ॅण्ड एज्यूकेशन अराऊंड द वर्ल्ड अ‍ॅट लार्ज या शीर्षकाखाली हा १६० पानांचा अहवाल बनवला आहे.
१. संस्थेने २५ वर्षांवरील तरुणांचे सर्वेक्षण केले. त्यात इतर कोणत्याही धर्मियांच्या तुलनेत हिंदूंचे शिक्षणाचे प्रमाण अत्यल्प असून ज्यू शिक्षणात पुढे असल्याचे दिसून आले आहे.
२. ४१ टक्के हिंदूंकडे कोणतेही औपचारिक शिक्षण नाही. दहांमध्ये केवळ एकाकडे माध्यमिक स्तरापेक्षा अधिक शिक्षण आहे. त्यातल्या त्यात हिंदू पुरुषांपेक्षा महिलांचे शिक्षणाचे प्रमाण समाधानकारक आहे.
३. मुसलमान महिलांचे शैक्षणिक प्रमाण ४.९ टक्के आहे, तर पुरुषांचे प्रमाण ६.४ टक्के एवढे आहे. हिंदु महिलांचे शिक्षणाचे प्रमाण ४.२ टक्के असून पुरुषांचे प्रमाण ६.९ टक्के एवढे आहे.
४. भारतात हिंदूचे शिक्षणाचे प्रमाण ५.५ टक्के आहे, तर नेपाळमध्ये ३.९ आणि बांगलादेशमध्ये ४.६ टक्के एवढे प्रमाण आहे. अमेरिकेत हिंदूंच्या शिक्षणाचे प्रमाण १५.७ टक्के आणि युरोपात हेच प्रमाण १३.९ टक्के एवढे आहे.

मलकापूर येथील दंगलप्रकरणी एम्आयएम्च्या धर्मांध नगरसेवकासह २ सहस्र जणांवर गुन्हे प्रविष्ट, केवळ ८३ जण अटकेत

अशा एम्आयएम्वर जनतेने बंदीची मागणी केल्यास चुकीचे काय ?
     बुलढाणा - मलकापूर (जिल्हा बुलढाणा) येथे झालेल्या दंगलीच्या प्रकरणी पोलिसांनी एम्आयएम्चा नगरसेवक शहेजाद खान यांच्यासह २ सहस्र जणांवर विविध आरोपांखाली मलकापूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हे प्रविष्ट केले आहेत. (यावरून धर्मांधांची वाढती मुजोरी लक्षात येईल. ही स्थिती पालटण्यासाठी हिंदूंनी संघटित होऊन हिंदु राष्ट्राची (सनातन धर्म राज्याची) स्थापना करणे आवश्यक आहे ! - संपादक) या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ८३ जणांना अटक केली आहे. त्या आरोपींना १४ डिसेंबर या दिवशी न्यायालयात उपस्थित करण्यात आले होते. न्यायालयाने त्यातील २० जणांना १७ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी, ४९ जणांना न्यायालयीन कोठडी, तर १४ जणांना बालसुधारगृहात पाठवले आहे. उर्वरित पसार झालेल्या आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. (या प्रकरणातील सर्व आरोपींचा शोध घेऊन सर्वांवर कठोर कारवाई होण्यासाठी पोलीस प्रशासनाने प्रयत्न करणे आवश्यक आहे ! - संपादक)      महंमद पैगंबर जयंतीच्या दिवशी, म्हणेजच १२ डिसेंबर या दिवशी काही धर्मांधांनी पोलिसांच्या अनुमतीविना वाहनफेरी काढली होती. त्या वेळी धर्मांधांनी देशविरोधी घोषणाही दिल्या होत्या. त्यानंतर झालेल्या दंगलीमध्ये शेकडो धर्मांधांनी दगडफेक आणि जाळपोळ करत धुडगूस घातला होता. मलकापूर गावातील संचारबंदी तूर्तास स्थगित केली असून गावात तणावाची स्थिती आहे आणि पोलिसांनी बंदोबस्त मात्र कायम ठेवला आहे.

काश्मीरसंदर्भात नरमाईचे घातक धोरण सोडून द्यावे ! - पनून कश्मीरची पंतप्रधानांकडे मागणी

     जम्मू - भारत सरकारने काश्मीरविषयी घेतलेले नरमाईचे धोरण बराच काळ टिकून असले, तरी पालटत्या परिस्थितीनुसार ते आता घातक ठरत आहे. पंतप्रधानांनी याची नोंद घ्यावी, अशी पनून कश्मीरची मागणी आहे, असे वक्तव्य पनून कश्मीरचे राज्य संयोजक डॉ. अग्नीशेखर आणि अध्यक्ष डॉ. अजय च्रोंगू यांनी पत्रकारांना संबोधित करतांना केले. विस्थापित काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन करून त्यांच्यासाठी स्वतंत्र केंद्रशासित प्रदेशाची मागणीही या वेळी करण्यात आली. या वेळी पनून कश्मीरचे सरचिटणीस कुलदीप रैना आणि राज्य संघटक संजय मोझा हेही उपस्थित होते.

फरिदाबाद नगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचार्‍यांना कर्मयोग विषयावर सनातन संस्थेचे मार्गदर्शन

     फरिदाबाद (हरियाणा) - गीता जयंतीच्या निमित्ताने येथील नगरपालिकेच्या सभागृहामध्ये पालिकेच्या स्वच्छता कर्मचार्‍यांसाठी कर्मयोग या विषयावर एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी वक्त्यांनी उपस्थितांना संबोधित करतांना भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेत सांगितलेल्या कर्मयोगाच्या सिद्धांताचा आपल्या जीवनात असलेला संबंध स्पष्ट केला. सनातन संस्थेच्या सौ. संदीप कौर यांनी धर्माचे महत्त्व आणि त्याचे आपल्या जीवनात असलेले महत्त्वाचे स्थान यांविषयी माहिती दिली. यासमवेतच प्रत्येक कृती करतांना नामजप करणे का आवश्यक आहे, याविषयीही सांगितले.
     या कार्यक्रमाला फरिदाबाचे उपायुक्त चंद्रशेखर, नगरपालिकेच्या आयुक्त सौ. सोनल गोयल, पालिकेचे उपायुक्त महावीर प्रसाद, ब्रह्मकुमारीच्या पूनमदीदी आणि उषादीदी, तर सनातन संस्थेच्या साधिका सौ. संदीप कौर आदी उपस्थित होत्या.

सनातनच्या हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्याला निश्‍चित यश मिळणार ! - श्रीश्रीश्री सिद्धलिंगेश्‍वर महास्वामी, करुणेश्‍वर मठ, कर्नाटक

शिवपाडी (कर्नाटक) येथे प्रांतीय हिंदू अधिवेशनाचा समारोप
फर्स्ट एड ट्रेनिंग (प्रथमोपचार प्रशिक्षण) या इंग्रजी भाषेतील सनातनच्या 
ग्रंथांच्या तीन भागांचे प्रकाशन करतांना डावीकडून श्रीश्रीश्री सिद्धलिंगेश्‍वर 
महास्वामी, श्रीश्रीश्री मुक्तानंदस्वामी, सनातनचे सद्गुरु सत्यवान कदम, 
श्री. प्रमोद मुतालिक आणि श्री. गुरुप्रसाद
    शिवपाडी (कर्नाटक) - हिंदु राष्ट्र पुन्हा बलिष्ठ करण्यासाठी सनातन संस्था प्रामाणिक कार्य करत आहे. हे राष्ट्र हिंदु राष्ट्र बनवण्यासाठी कटिबद्ध झालेली हिंदु जनजागृती समितीसुद्धा तिच्या कार्यात यशस्वी होत आहे. या देशात सहस्रो संघटना असून प्रत्येक संघटना पर्याय म्हणून राजकीय पक्ष वाढवून, अधिकार मिळवून नंतर स्वार्थासाठी कृती करत आहेत. दुसरीकडे मात्र सनातन संस्था हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी कोणत्याही पक्षावर अवलंबून न रहाता केवळ भगवंताचे अधिष्ठान ठेवून मार्गक्रमण करत आहे; म्हणूनच यश प्राप्त होणार आहे, असे प्रतिपादन कर्नाटकच्या आंदोल येथील करुणेश्‍वर मठाचे श्रीश्रीश्री सिद्धलिंगेश्‍वर महास्वामी यांनी केलेे. शिवपाडी येथे समितीने आयोजित केलेल्या २ दिवसीय प्रांतीय हिंदू अधिवेशनाच्या सांगता समारंभात ते मार्गदर्शन करत होते.

अविवाहित महिलांनाही गर्भपात करण्याची कायदेशीर मान्यता मिळण्याची शक्यता !

     अविवाहित महिला गर्भवती का रहातात, याचा विचार करून त्यावर उपाययोजना करण्याऐवजी असे वरवरचे हास्यास्पद उपाय काढणारे सरकार जनतेत कधीतरी नैतिकता निर्माण करील का ? अशा घटना स्वातंत्र्याच्या ६८ वर्षांत समाजाला धर्माचरणाद्वारे साधना करण्यास न लावणार्‍या शासनकर्त्यांमुळेच घडत आहेत. त्यात पालट करण्यासाठी आता धर्माचरणी लोकांचे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) स्थापन करण्याला पर्याय नाही ! 
     नवी देहली - केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने विवाहित आणि अविवाहित अशा सर्व महिलांसाठी अनियोजित गर्भधारणा किंवा अयशस्वी गर्भनिरोधक या कारणांमुळे राहिलेला गर्भ काढून टाकण्यासाठी गर्भपात कायदेशीर करण्याची शिफारस केली आहे. सध्या हा कायदा केवळ विवाहित महिलांसाठी आहे. मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी (एम्टीपी) कायद्यात वरील शिफारशीसह आणखी अनेक सुधारणा सुचवण्यात आल्या आहेत. संसदेचे अधिवेशन संपल्यानंतर होणार्‍या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे. 
     सध्या अस्तित्वात असलेल्या कायद्यात गर्भपाताचे कारण सांगण्यासाठी डॉक्टर आवश्यक असतो. महिलेची शारीरिक आणि मानसिक स्थिती जर बाळाला जन्म देण्यायोग्य नसेल किंवा महिलेच्या जिवाचा प्रश्‍न असेल, तर डॉक्टर गर्भपात करू शकतात; पण सध्याची समाजातील अविवाहित महिलांचे लैंगिक वास्तव जाणून त्या पार्श्‍वभूमीवर कायदेशीर गर्भपात प्रक्रिया अधिक व्यापक करण्यासाठी सरकारने या शिफारशी केल्या आहेत.

एम्आयएम् चे कमर खान यांच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट !

जाहीर सभेतून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचे प्रकरण 
     ठाणे, १५ डिसेंबर - जाहीर सभेत हिंदूंच्या विरोधात वक्तव्य करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी एम्.आय.एम्.चे (मजलिस-ए-इत्तेहादुल-उल-मुस्लिमीन) स्थानिक नेते कमर खान यांना ठाणे नगर पोलिसांनी चौकशीकरिता कह्यात घेतले आहे. मागील मासात खान यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून एम्.आय.एम्.मध्ये प्रवेश केला. एम.आय.एम्.मध्ये प्रवेश करताच त्यांनी सभांतून हिंदु धर्माच्या विरोधात उघडपणे बोलायला प्रारंभ केला. (यावरून एम्.आय.एम्. पक्ष हिंदुविरोधी आहे, हे स्पष्ट होते. अशा पक्षाच्या हातात सत्ता आल्यास हिंदू सुरक्षित रहातील का ? संपादक) मागील मासात अशाच एका सभेत हिंदु धर्माच्या विरोधात बोलल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका पदाधिकार्‍याने कमर खान यांच्या विरोधात धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार ठाणे नगर पोलीस ठाण्यात प्रविष्ट केली. या प्रकरणी ठाणे नगर पोलिसांनी कमर खान यांना त्यांच्या मुंब्रा येथील घरातून चौकशीसाठी कह्यात घेतले; मात्र अद्याप त्यांना अटक केली नसल्याचे पोलीस उपायुक्त त्रिमुखे यांनी सांगितले. (तक्रार प्रविष्ट केल्यांतर एक मासाने गुन्हेगाराला कह्यात घेणारे पोलीस अटकेची कारवाई करण्यासाठी आणखी किती दिवस घेणार ? अन्य पंथियांच्या धार्मिक भावना दुखावल्यास पोलीस असाच वेळकाढूपणा करतात का?- संपादक )

सनातन संस्थेला माझा सदैव पाठिंबा ! - स्वामी श्री इंद्रदेवेश्‍वरानंद सरस्वती

स्वामी श्री इंद्रदेवेश्‍वरानंद सरस्वती
(उजवीकडे) यांची भेट घेतांना समितीचे कार्यकर्ते
     हडसपर, १५ डिसेंबर (वार्ता.) - सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे कार्य चांगले आहे. या कार्याला माझे सदैव आशीर्वाद आहेत. सनातन संस्थेला माझा नेहमी पाठिंबा आहे, असे आशीर्वचन युगप्रवर्तक क्रांतीकारी राष्ट्रीय संत यज्ञपिठाधीश्‍वर धर्मसम्राट विद्यावाचस्पती महामंडलेश्‍वर श्री श्री १००८ महंत स्वामी श्री इंद्रदेवेश्‍वरानंद सरस्वती महाराज (मथुरा निवासी) यांनी दिले. श्रीमद्भागवत कथेच्या निमित्ताने ते हडपसर येथे आले असता सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती या संघटनांच्या कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेतली. त्या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी सर्वश्री प्रशांत पाटील, साईराज पवळे आणि कु. कार्तिकी पवळे यांनी महाराजांना संस्था आणि समिती यांच्या कार्याची माहिती सांगितली, तसेच व्यसनाधीनतेला प्रोत्साहन देणार्‍या आणि यंदाच्या वर्षी पुण्यात होणार असलेल्या सनबर्न या पाश्‍चात्त्य संगीत महोत्सवाविषयी समितीने छेडलेल्या आंदोलनाविषयीही अवगत केले. या वेळी त्यांनी अशा विकृतीविरोधात चीड व्यक्त करून अयोग्य कृतींच्या विरोधात समाजप्रबोधन करतच असल्याचे सांगितले.

पुणे आणि लातूर येथील नगरपालिकांमधील निवडणुकीत भाजपचे वर्चस्व

     मुंबई, १५ डिसेंबर - पुणे आणि लातूर या जिल्ह्यांत झालेल्या नगरपालिकांच्या निवडणुकीत भाजपने सरशी केली आहे. या दोन्ही जिल्ह्यांतील १४ नगरपालिकांपैकी ५ ठिकाणी भाजपचे नगराध्यक्ष निवडून आले आहेत. उर्वरित ठिकाणी काँग्रेस ३, राष्ट्रवादी काँग्रेस २, तर एका ठिकाणी शिवसेनेचा आणि अन्य ३ नगराध्यक्ष निवडून आले आहेत. या सर्व नगरपालिकांमध्ये असलेल्या ३२४ नगरसेवकांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसचे १०७, भाजपचे ८१, काँग्रेसचे ३१, शिवसेनेचे २३ असे नगरसेवक निवडून आले. येथे ३९ पैकी राष्ट्रवादी काँग्रेसचे ३५ नगरसेवक निवडून आले. 

दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून विधान परिषद ३० मिनिटांसाठी स्थगित

     नागपूर, १५ डिसेंबर (वार्ता.) - दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप केल्याप्रकरणी विरोधी पक्षांनी राजीनाम्याच्या मागणीवरून केलेली घोषणाबाजी आणि गोंधळ यामुळे विधान परिषदेचे कामकाज ३० मिनिटांसाठी स्थगित करण्यात आले. दुपारी चालू झालेल्या चर्चासत्राच्या वेळी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मंत्री महादेव जानकर यांच्या राजीनाम्यावरून चर्चा करण्यासाठी स्थगन प्रस्ताव आणला. सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी हा प्रस्ताव नाकारला. त्यामुळे विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभापतींच्या समोरील जागेत जाऊन घोषणाबाजी करत गोंधळ केला. हा गोंधळ चालू असतांनाच सभापतींनी तारांकित प्रश्‍नांची अधिक माहिती पटलावर ठेवले, काही वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवले, तसेच अन्य अहवाल सभेमध्ये ठेवले आणि ते संमत करून घेऊन कामकाज स्थगित केले.

रा.स्व. संघाच्या कार्यकर्त्यार्ंच्या हत्यांची चौकशी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा करणार !

     बेंगळुरू - येथे १६ ऑक्टोबर या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते आर्. रुद्रेश यांची काही धर्मांधांनी हत्या केली होती. या प्रकरणी ५ धर्मांधांना पोलिसांनी अटक केली होती. या हत्येची चौकशी आता राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा (एन्.आय.ए.) करणार आहे. रुद्रेश यांच्या हत्येव्यतिरिक्त २२ सप्टेंबर या दिवशी तमिळनाडूतील कोइम्बतूर येथे हिंदू मुन्नानी संघटनेचे पदाधिकारी सी. शशिकुमार आणि १३ मार्च या दिवशी कर्नाटकातील मैसुरू येथे बजरंग दलाचे कार्यकर्ते के. राजू यांच्या हत्येचीही चौकशी एन्.आय.ए. करणार आहे. 

डीजेला अनुमती; मात्र वातावरण शुद्ध करणार्‍या सुरांवर बंधने !

मध्यरात्रीनंतर नागरिकांना मनःस्ताप देत पार पडलेल्या
पैगंबर मिरवणुकीविषयी सुप्रसिद्ध गायक श्री. राहुल देशपांडे यांची भावना
    पुणे, १५ डिसेंबर - सूर हे कलाकारांचे दैवत आहे. आम्ही सुरांची पूजा मांडतांना सरकार आम्हाला आडवे येते. शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांच्या वेळी पोलिसांना सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आठवतो; मग रात्री-अपरात्री होणार्‍या डिस्कोचा दणदणाट कसा दिसत नाही ? ध्वनीक्षेपकांच्या भिंतींना अनुमती असते; मात्र ज्या सुरांनी पंचक्रोशीतील वातावरणाची शुद्धी होते, त्यांना मात्र नियम लावले जातात. आम्ही नियमांचे पालन करतो; म्हणूनच सॉफ्ट टार्गेट होतो, अशी भावना सुप्रसिद्ध गायक श्री. राहुल देशपांडे यांनी व्यक्त केली.

पुणे येथील प्रमुख पुलांची माहिती महानगरपालिकेने तीन मासांत शासनाला सादर करावी ! - मुख्यमंत्री

विधानसभा प्रश्‍नोत्तरे...
    नागपूर, १५ डिसेंबर (वार्ता.) - पुणे शहरातील प्रमुख पुलांची मुदत संपली अथवा कसे याची माहिती येत्या ३ मासांत राज्य शासनाला कळवण्याचे निर्देश पुणे महानगरपालिकेला देण्यात येत आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी १३ डिसेंबर या दिवशी विधानसभेत प्रश्‍नोत्तरात दिली. पुणे शहरातील प्रमुख १८ पुलांच्या झालेल्या दुरवस्थेविषयी सदस्य प्रा. सौ. मेधा कुलकर्णी यांनी प्रश्‍न उपस्थित केला होता. त्या वेळी मुख्यमंत्री बोलत होते.

पाक कलाकारांच्या चित्रपटाला राज ठाकरे यांच्याकडून हिरवा कंदील

पाक आक्रमणात हुतात्मा सैनिकांच्या बलीदानाची जाण ठेवून
आता जनतेनेच पाक कलाकार असलेल्या चित्रपटांवर बहिष्कार घालून राष्ट्रप्रेम दाखवावे !
     मुंबई - पाक अभिनेत्री माहिरा खान असलेल्या अभिनेता शाहरूख खान याचा रईस हा चित्रपट २५ जानेवारी २०१७ या दिवशी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाला विरोध होऊ नये, यासाठी शाहरूख खान याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची कृष्णकुंज या त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर राज ठाकरे यांनी रईस या चित्रपटाच्या प्रदर्शनाला हिरवा कंदिल दिला आहे.

पुण्यात सनबर्नच्या विरोधात वातावरण तापले !

   
आमदार बाबुराव पाचुर्णे (मध्यभागी) यांना निवेदन देतांना संस्कृतीप्रेमी

श्री. भरत (आबा) कुंभारकर (डावीकडे) यांना निवेदन देतांना कार्यकर्ते
ह.भ.प. मंचक महाराज कराळे (डावीकडे) यांना निवेदन देतांना संस्कृतीप्रेमी

पुणे, १५ डिसेंबर (वार्ता.) - आशिया खंडातील सर्वांत मोठ्या संगीत महोत्सवांपैकी एक समजला जाणारा सनबर्न संगीत महोत्सव यंदाच्या वर्षी पुणे-नगर रस्त्यावरील केसनंद येथे होणार असल्याचे घोषित करण्यात आले आहे. असे असले, तरी अमली पदार्थांचे सेवन, अश्‍लीलता, तसेच हिडीस नाच यांमुळे कुख्यात झालेल्या या महोत्सवाला स्थानिक पातळीवर तीव्र विरोध होतांना दिसून येत आहे. हिंदु जनजागृती समितीप्रणित रणरागिणी शाखेच्या वतीने शहराच्या सुसंस्कृतपणाला गालबोट लावणार्‍या या महोत्सवाच्या विरोधात आंदोलन छेडण्यात आले असून या आंदोलनाची धार दिवसेंदिवस वाढत चालली आहे. वाघोली परिसरातील ग्रामस्थ, तसेच शहरातील अनेक संस्कृतीप्रेमी संघटना आणि नागरिक या महोत्सवाच्या विरोधात उभे ठाकले आहेत. युवाजागृती आणि संस्कृतीरक्षण अभियानाच्या अंतर्गत सनबर्नला हद्दपार करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने महिला संघटना, लोकप्रतिनिधी, पोलीस-प्रशासन यांना निवेदने देण्यात येत आहेत, तर अनेक ठिकाणी जागृतीपर बैठकांचे आयोजन करण्यात येत आहे.

शिवसेनेचे आमदार तुकाराम काते विधानभवनात आले अनवाणी चालत !

नागरिकांना पाणी मिळत नसल्याच्या निषेधार्थ केली कृती !
      नागपूर, १५ डिसेंबर (वार्ता.) - मुंबई येथील अणूशक्तीनगर परिसरात मुंबई महानगरपालिकेकडून नागरिकांना व्यवस्थित पाणीपुरवठा होत नसल्याच्या निषेधार्थ विधानभवनाच्या आवारात मुंबई येथील अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. तुकाराम काते १४ डिसेंबर या दिवशी विधानभवनाच्या आवारात चक्क चप्पल न घालताच आल. (पाणीपुरवठा करण्यासाठी लोकप्रतिनिधींना असे आंदोलन करावे लागत असेल, तर सामान्य लोकांचे काय होत असेल, याचा विचारही न केलेला बरा ! लोकप्रतिनिधींच्या मागण्यांना केराची टोपली दाखवणारे प्रशासन जनहितकारी योजना काय राबवणार ? शासनाने संबंधितांना घरी बसवून त्यांच्यावर कठोर कारवाई करणे अपेक्षित आहे ! - संपादक)

सोलापूर येथील हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांची नोटीस !

हिंदु धर्मजागृती सभेत वक्त्यांनी शौर्यदिन साजरा करण्याचे आवाहन केल्याचे निमित्त !
  • आज शौर्यदिन साजरा करण्याचे आवाहन केले म्हणून नोटीस बजावून हिंदुत्वनिष्ठांना छळणारे पोलीस भविष्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जागवणार्‍या प्रत्येक कार्यक्रमावर बंदी आणतील, हे लक्षात घ्या ! 
  • हिंदुत्वनिष्ठांना नोटीस बजावणारे पोलीस उघड सभांतून हिंदूंना संपवण्याची भाषा करणारे धर्मांध नेते आणि मुल्ला-मौलवी यांना नोटीस बजावण्याचे धारिष्ट्य दाखवतात का ?
     सोलापूर, १५ डिसेंबर (वार्ता.) - येथे ४ डिसेंबर या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानात हिंदु धर्मजागृती सभा पार पडली. या सभेत हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी ६ डिसेंबर हा शौर्यदिन म्हणून साजरा करा, या हिंदूंना केलेल्या आवाहनाचे निमित्त करून येथील पोलिसांनी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांना नोटीस बजावली, तसेच या आवाहनामुळे काही अनुचित प्रकार घडल्यास यास संपूर्णपणे आपणास उत्तरदायी धरून कारवाई केली जाईल, असे म्हटले.

राज्यातील सहकारी पतसंस्था आणि बँका यांतील १ सहस्र ४५० संचालकांकडून २०० कोटी रुपये वसूल करणार ! - सहकारमंत्री सुभाष देशमुख

राज्यातील सहकारी संस्थांमधील अपहार प्रकरणी
 १ सहस्र ६९ व्यक्तींकडून १ सहस्र ६७० कोटी रुपये वसूल करणार ! 
     नागपूर, १५ डिसेंबर (वार्ता.) - ३० नोव्हेंबरअखेर राज्यातील विविध नागरी सहकारी पतसंस्था आणि बँका यांमध्ये लक्षावधी रुपयांचा अपहार करणार्‍या संस्थेतील १ सहस्र ६९ व्यक्तींवर १६७०.९० कोटी रुपयांचे दायित्व निश्‍चित करण्यात आले आहे. या सर्वांकडून संस्था आणि बँक यांमधील अपहाराची रक्कम वसूल करण्यात येईल. यापैकी राज्यातील सहकारी पतसंस्था आणि बँका यांतील १ सहस्र ४५० संचालकांकडून २०० कोटी रुपये वसूल करणार आहोत, अशी माहिती सहकार मंत्री श्री. सुभाष देशमुख यांनी विधानसभेत प्रश्‍नोत्तरात दिली. राज्यातील सहकारी संस्था आणि बँका यांमध्ये अपहार करून कोट्यवधी रुपयांचा निधी लाटणारे उत्तरदायी दोषी संचालक, व्यवस्थापक आणि कर्मचारी यांची मालमत्ता जप्त करून तो पैसा ठेवीदारांना परत करावा, अशी एकमुखी मागणी सदस्यांनी केली. या प्रश्‍नोत्तरातील प्रश्‍नाच्या चर्चेत भाग घेतला. (गेल्या अनेक वर्षांपासून सहकारी बँका आणि पतसंस्था यांच्यात कोट्यवधी रुपयांचा अपहार करून स्वतःची तिजोरी भरणारे लोकप्रतिनिधी, बँकांचे संचालक, कर्मचारी आणि इतर शासकीय कर्मचारी यांच्या संपत्तीचा लिलाव करून तो पैसा ठेवीदारांना परत केला पाहिजे आणि दोषी संचालक आणि कर्मचारी यांना आजन्म कारावासाची शिक्षा करणे अपेक्षित आहे ! - संपादक) 
     श्री. सुभाष देशमुख म्हणाले की, ३० नोव्हेंबर २०१६ अखेर राज्यातील ७३ नागरी सहकारी बँका आणि १४७ नागरी सहकारी पतसंस्थांचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. या संस्था आणि बँका यांमधील संचालक, व्यवस्थापक आणि कर्मचारी यांना रक्कम वसुलीच्या नोटिसा पाठवून देण्यात आल्या आहेत.

मुंबई महापालिका मुख्यालयातील ‘नेट’ सुविधेचा अपवापर करणार्‍या पालिका कर्मचार्‍यांवर कारवाई करणार !

तंत्रज्ञानाचा यथायोग्य वापर करण्यासाठीही नीतीमान 
 प्रजेची आवश्यकता असते. अशी प्रजा केवळ हिंदु राष्ट्रात असेल ! 
पालिका प्रशासनाकडून सामाजिक प्रसारमाध्यामांच्या संकेतस्थळांच्या वापरावर निर्बंध ! 
     मुंबई, १५ डिसेंबर - मुंबई महापालिकेचा कारभार सुरळीत पार पाडावा यासाठी पालिका मुख्यालयात करण्यात आलेल्या ‘नेट’ आणि ‘वाय-फाय’ जोडणीचा पालिका कर्मचार्‍यांकडून मोठ्या प्रमाणात अपवापर करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. या सुविधांचा वापर पालिका कर्मचारी कामाच्या वेळेत फेसबुक, व्हॉट्स अप, ट्विटर यांसारखी सामाजिक प्रसारमाध्यमांची संकेतस्थळे पाहण्यासाठी, संकेतस्थळांवरून गाणी, चित्रपट संचित करण्यासाठी करत असल्याचे निदर्शनास आले आहेेे. कामाच्या वेळेत भ्रमणभाषवरून सामाजिक प्रसारमाध्यमांची संकेतस्थळे पहाणार्‍या कर्मचार्‍यांवरही यापुढे कारवाई करण्यात येणार आहे. (जनतेच्या समस्या निकाली काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रलंबित असतांना कामाच्या वेळेचा आतापर्यंत अशा प्रकारे अपवापर केलेल्या कर्मचार्‍यांवरही कारवाई व्हायला हवी. - संपादक) या सर्वांचा अतिरिक्त भार पालिकेच्या ‘सर्व्हर’वर येत असल्याने त्याची काम करण्याची गती अत्यंत मंदावून कामकाज ठप्प पडण्याची वेळ आली. या सर्वांवर उपाय म्हणून ९ डिसेंबरपासून पालिका मुख्यालयातील संगणकांवर सामाजिक प्रसारमाध्यमे तसेच चित्रपट, गाणी संचित करण्याची सुविधा असणार्‍या सर्व संकेतस्थळांच्या वापरावर बंदी आणली आहे. ‘वाय-फाय’ जोडणीचे संकेतांकही पालटण्यात आले आहेत.

गड आणि किल्ले यांचे दायित्व शिवभक्तांच्या हाती सोपवावे ! - श्री. नरेंद्र सुर्वे, प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती

तुर्भे (नवी मुंबई) येथे आमच्या कृतीत हवेत शिवाजी महाराज या विषयावर व्याख्यान ! 
    नवी मुंबई, १५ डिसेंबर (वार्ता.) - रायगडावरील मेघडंबरीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या हातातील तलवार तोडण्यात आली. शिवभक्तांनी काही तरुणांना रायगडावर मद्यपान करतांना पकडले. या सर्व घटनांमुळे रायगड किल्ल्याची सुरक्षितता धोक्यात आली आहे. सरकार आणि पुरातत्व विभाग संरक्षण करू शकत नसेल, तर गड आणि किल्ले यांचे दायित्व शिवभक्तांच्या हाती सोपवावे, असे विचार हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ता श्री. नरेंद्र सुर्वे यांनी व्यक्त केले.

पुण्यात पैगंबर जयंती मिरवणुकीत ध्वनीविषयक नियम धाब्यावर

कायदाद्रोही धर्मांध !
    पुणे, १५ डिसेंबर - सर्वोच्च न्यायालयाने मिरवणुकांमध्ये ५५ डेसिबलपेक्षा अधिक आवाजात वाद्य वाजवण्यास, तसेच रात्री १० नंतर वाद्य वाजवण्यास बंदी घातली आहे. पैगंबर जयंतीनिमित्त वाद्य वाजवण्याची अनुमती रात्री १२ पर्यंत वाढवण्यात आली होती; मात्र अनेक मंडळांनी रात्री १२ नंतरही डीजेचा दणदणाट चालूच ठेवला होता. रास्ता पेठ, गंज पेठ, नाना पेठ, कोंढवा आदी भागांतून डीजसहित मिरवणुका काढण्यात आल्या. पोलिसांनी ध्वनीपातळीची नोंद ठेवली असून मंडळांकडून नियमांचे उल्लंघन झाले असेल, तर सर्वोच्च न्यायालयाच्य आदेशानुसार नोटिसा बजावून खटले भरले जातील, असे पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी सांगितले. (अशा धर्मांधांवर पोलिसांनी वेळीच कठोर कारवाई केली पाहिजे. हिंदूंवर लाठी आणि मुसलमानांची हांजी हांजी अशीच सवय राज्यकर्त्यांपासून पोलिसांना लागल्याने समाजातील काही घटक शेफारले गेले आहेत. असे होऊ नये म्हणून पोलिसांनी निष्पक्षपातीपणे दोषींवर कठोर कारवाई केली पाहिजे. - संपादक)

आश्रम शाळांतील शिक्षकांचे वेतन वेळेवर न केल्यास संबंधित अधिकार्‍याला तात्काळ निलंबित केले जाईल ! - सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे

      नागपूर, १५ डिसेंबर (वार्ता.) - ज्या आश्रम शाळांतील शिक्षकांचे वेतन वेळेवर केले जाणार नाही, त्या संबंधित अधिकार्‍याला तात्काळ निलंबित केले जाईल, असा निर्णय सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी विधान परिषदेत दिला. काँग्रेसचे आमदार दत्तात्रय सावंत यांनी परिषदेमध्ये मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर उत्तर देतांना त्यांनी वरील निर्णय जाहीर केला. या वेळी आमदार श्रीकांत देशपांडे यांनी सोलापूर जिल्ह्यातील आश्रम शाळांतील शिक्षकांना निधी उपलब्ध असूनही वेतन न दिल्याचे सांगितले. त्यावर सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी संबंधित अधिकार्‍यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले. (सभापतींना शासनाला असे निर्देश का द्यावे लागतात ? - संपादक) या प्रकरणी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी सांगितले की, सोलापूर जिल्ह्यातील आश्रम शाळांतील शिक्षकांना वेळेवर वेतन न देणार्‍या सहाय्यक आयुक्त यांची चौकशी करून एका मासात त्याविषयी अहवाल करण्यात येईल.

महिलांवरील अत्याचार आणि त्याच्या दोषसिद्धीची माहिती विधान परिषदेत मांडण्याचे सभापतींचे निर्देश

      नागपूर, १५ डिसेंबर (वार्ता.) - वर्ष २०१६ मध्ये किती महिलांवर अत्याचार झाले ? त्यांतील किती प्रकरणे जलदगती न्यायालयात प्रविष्ट झाली आणि त्यातील दोषसिद्धी प्रमाण सांगून किती जणांना शिक्षा झाली, याची माहिती विधान परिषदेमध्ये मांडण्याचे निर्देश सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांना दिले. काँग्रेसचे आमदार नारायण राणे यांनी राज्यात महिलांवर वाढणार्‍या अत्याचाराच्या घटनांच्या अनुषंगाने लक्षवेधी सूचना मांडली. त्यावर केसरकर यांनी महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण न्यून होण्यासाठी केले जाणारे प्रयत्न, त्यावर केलेल्या उपाययोजना, वाढत असलेले दोषसिद्धीचे प्रमाण याविषयीची माहिती सभागृहात दिली. या माहितीतून अनेक प्रश्‍न उपस्थित झाल्याने सभापतींनी शासनाला वरील निर्देश दिले.

अजित पवार आणि संदीप बाजोरिया यांना उच्च न्यायालयाची नोटीस !

     भ्रष्टाचार्‍यांवर कारवाई होण्यासाठी लोक न्यायालयात याचिका प्रविष्ट करतात ! याचा अर्थ त्यांच्यावर प्रशासन किंवा शासनकर्ते काही कारवाई करतील, अशी लोकांना आशा राहिलेली नाही ! न्यायालयाला जर भ्रष्टाचाराच्या याचिकांवर निवाडा देण्यात वेळ घालवाया लागत असेल, तर इतर प्रचलित व्यवस्था हव्यात कशाला ?
     नागपूर, १५ डिसेंबर (वार्ता.) - अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुकास्थित रायगड नदी सिंचन प्रकल्प आणि दर्यापूर तालुकास्थित वाघाडी सिंचन प्रकल्पात झालेल्या आर्थिक अपव्यवहारास माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि बाजोरिया कन्स्ट्रक्शन आस्थापनाचे संचालक संदीप बाजोरिया हे सामील आहेत, असा आरोप उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात प्रविष्ट केलेल्या नवीन दोन जनहित याचिकांमध्ये करण्यात आला आहे. कंत्राटदार श्री. अतुल जगताप यांनी या याचिका प्रविष्ट केल्या आहेत. न्यायमूर्ती श्री. भूषण धर्माधिकारी आणि इंदिरा जैन यांनी १३ डिसेंबर या दिवशी या प्रकरणी सुनावणी केल्यानंतर अजित पवार आणि संदीप बाजोरिया यांसह अन्य प्रतिवादींना नोटीस बजावून १९ डिसेंबरपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.

राज्यातील इंग्रजी शाळांमधील आदिवासी मुलांच्या समस्यांविषयी फेरचौकशी करणार ! - आदिवासी विकास मंत्री विष्णु सवरा

विधानसभा प्रश्‍नोत्तरे... 
     नागपूर, १५ डिसेंबर (वार्ता.) - राज्यातील इंग्रजी शाळांमध्ये आदिवासी मुलांना अस्पृश्यतेची वागणूक देण्यात येत आहे. त्याचसमवेत आदिवासी विद्यार्थ्यांना निवास आणि खाण्यापिण्याची व्यवस्था केली जात नाही. त्यामुळे आदिवासी मुलांना अस्पृश्यतेची वागणूक देणार्‍या आणि त्यांची व्यवस्थित देखभाल न करणार्‍या संंबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सदस्या श्रीमती मनीषा चौधरी, सदस्य अधिवक्ता आशिष शेलार, विरोधी पक्षनेता राधाकृष्ण विखे-पाटील आदी सदस्यांनी विधानसभेत केली. राज्यातील इंग्रजी शाळांमधील मुलांना अस्पृश्यतेची वागणूक देण्यात येत नाही. विद्यार्थ्यांची आरोग्याची व्यवस्थित काळजी घेण्यात येते. सदस्यांनी केलेल्या विविध मागण्यांचा विचार करून या सर्व प्रकरणांची पुन्हा फेरचौकशी करण्यात येईल, अशी माहिती आदिवासी विकास मंत्री विष्णु सवरा यांनी १५ डिसेंबर या दिवशी विधानसभेत प्रश्‍नोत्तरात दिली. मात्र या उत्तराने समाधान न झाल्याने विरोधी सदस्यांनी सवरा यांना धारेवर धरले, तसेच विधानसभा अध्यक्षांच्या मोकळ्या जागेत जाऊन गोंधळ घातला आणि शासनाच्या विरोधात घोषणा दिल्या.

खोटी साक्ष दिल्याचे उघड झाल्यास बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांना शिक्षा करू ! - सर्वोच्च न्यायालय

     नवी देहली - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआयचे) अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याचे न्यायमित्रांनी (अ‍ॅमायकस क्युरी) सर्वोच्च न्यायालयापुढे सांगितले. तसेच अनुराग ठाकूर यांच्यावर न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी खटला चालवावा, अशी मागणी देखील केली. त्यामुळे अनुराग ठाकूर यांनी खोटी साक्ष दिल्याचे निष्पन्न झाल्यास त्यांना कारावास भोगावा लागेल, असे सांगत न्यायालयाने ठाकूर यांना फटकारले.

सनदी अधिकारी चंद्रकांत गुडेवार यांच्यावरील हक्कभंग प्रस्ताव विधानसभेत एकमताने संमत !

     नागपूर, १५ डिसेंबर (वार्ता.) - विधानसभेत तत्कालीन राज्यमंत्री सुनील देशमुख यांच्या अवमानप्रकरणी अमरावतीचे तत्कालीन आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्यावर प्रविष्ट केलेला हक्कभंग प्रस्ताव हक्कभंग समितीने १५ डिसेंबर या दिवशी एकमताने तो मान्य केला. सुनील देशमुख यांनी श्री. गुडेवार यांच्या विरोधात विधानसभेत हक्कभंग प्रस्ताव मांडला होता. याचा अहवाल आज सभागृहाने स्वीकारला. हा प्रस्ताव प्रविष्ट केल्यानंतर हक्कभंग समितीने त्यांना महत्त्वाच्या पदांवर नेमणूक न देण्याचा निर्णय घेतला आहे. गुडेवारा सध्या पुणे येथे ग्रामीण विकास उपायुक्त म्हणून कार्यरत आहेत. 

विवाहितेवर बलात्कार करून अश्‍लील चित्रफीत बनवणार्‍या दोघांवर गुन्हा

      इचलकरंजी - आर्थिक असहाय्यतेचा लाभ घेत विवाहितेची अश्‍लील चित्रफीत सिद्ध केल्याच्या कारणावरून मुबारक बशीर पकाली आणि फिरोज दस्तगीर नदाफ या दोघांवर बलात्कार आणि अन्य कलमांन्वये गुन्हा प्रविष्ट झाला आहे. या प्रकरणात संतप्त जमावाने पकाली याचे घर, दुकान आणि यंत्रमाग कारखाना यांवर दगडफेक केली. या घटनेनंतर परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी मुबारकला अटक करून त्याला १७ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. याविषयी अधिक माहिती अशी की, मुबारक हा कार्डभिशी चालवतो, तसेच त्याचा बांगड्यांचाही व्यवसाय आहे. भिशीच्या माध्यमातून चार मासांपूर्वी त्याचा एका विवाहितेशी संपर्क झाला. मुबारक याने त्या महिलेला ऑक्टोबर मासांत ५० सहस्र रुपये देतो, असे कारण सांगून जयसिंगपूर येथे एका उपहारगृहात घेऊन तिच्यावर बलात्कार केला. येथे मुबारक याने संबंधित महिलेची चित्रफीतही बनवली. या प्रकरणात त्याचा मित्र फिरोज याने त्याला साहाय्य केले.

एटीएम्मधून निघाली चक्क २ सहस्र रुपयांची बनावट नोट !

     नागपूर, १५ डिसेंबर (वार्ता.) - ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर सर्व सामान्य नागरिक त्रस्त असतांनाच येथील वर्धा मार्गावरील बुटीबोरी गावात आयसीआयसीआय अधिकोषाच्या एटीएम्मधून चक्क २ सहस्र रुपयांची बनावट नोट निघाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या एटीएम्मध्ये श्री. सुभाष ठाकरे यांनी पैसे काढले होते. श्री. सुभाष ठाकरे यांनी ही नोट मद्याच्या दुकानात नेली असता त्या दुकानाच्या मालकाने ही नोट बनावट असल्याचे सांगितले. २ डीडी ३९१५०२ असा २ सहस्रांच्या बनावट नोटेचा क्रमांक असून त्यानंतर श्री. सुभाष ठाकरे यांनी या घटनेची माहिती बुटीबोरी पोलिसांना दिली. बुटीबोरी पोलिसांनी बनावट नोट कह्यात घेऊन चौकशी केली असता ही नोट झेरॉक्स कॉपी असल्याचे निदर्शनात आले. पोलिसांनी घटनेची नोंद घेऊन अधिकोषाला याची माहिती दिली आहे. सीसीटीव्ही फुटेजेस पोलिसांनी कह्यात घेतले आहेत. बुटीबोरीचे पोलीस निरीक्षक एच्.जी चांदेवार हे पुढील अन्वेषण करत आहेत.

मुंबई महापालिकेकडून विकास निधीतील केवळ २० प्रतिशत निधी खर्च : आचारसंहितेमुळे निधी परत जाण्याची शक्यता

      मुंबई, १५ डिसेंबर (वार्ता.) - अर्थसंकल्पामध्ये विकासकामांसाठी चालू वर्ष २०१६-१७ या वर्षासाठी तरतूद करण्यात आलेल्या १२ सहस्र ९६३ कोटी रुपये निधीपैकी केवळ २० प्रतिशत इतकाच निधी महापालिकेकडून खर्च करण्यात आल्याची बाब उघडकीस आली आहे. फेब्रुवारी मासात होणार्‍या महापालिकेची आचारसंहिता जानेवारी मासात लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे चालू आर्थिक वर्षातील खर्च न झालेला ८० प्रतिशत निधी परत जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

फलक प्रसिद्धीकरता

वरवरच्या उपायांपेक्षा दारूबंदीच सर्वथा श्रेयस्कर !
      देशभरातील राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवर असणारी दारूची दुकाने १ एप्रिलपर्यंत हटवण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. दारूची दुकाने महामार्गांपासून किमान ५०० मीटर अंतरावर असली पाहिजेत, असेही न्यायालयाने सांगितले आहे.

हिंदू तेजा जाग रे !

Jago !
Deshbhar ke Rashtriya aur Rajyastariya mahamargo se
madya ki dukane hatane ka Supreme Courtka adesh.
- Kya Madya par purna pratibandh adhik upyukt nahi ?
जागो !
देशभर के राष्ट्रीय और राज्यस्तरीय महामार्गों से मद्य की दुकानें हटाने का
सुप्रीम कोर्ट का आदेश - क्या मद्य पर पूर्ण प्रतिबंध अधिक उपयुक्त नहीं ?

हिंदू तेजा जाग रे !


Jago ! : Deshbhar ke Rashtriya aur Rajyastariya mahamargo se madya ki dukane hatane ka Supreme Courtka adesh. - Kya Madya par purna pratibandh adhik upyukt nahi ?

जागो ! : देशभर के राष्ट्रीय और राज्यस्तरीय महामार्गों से मद्य की दुकानें हटाने का सुप्रीम कोर्ट का आदेश - क्या मद्य पर पूर्ण प्रतिबंध अधिक उपयुक्त नहीं ?

दत्तजयंतीनिमित्त नवी मुंबई, मुंबई, पालघर येथे सनातनने उभारलेल्या ग्रंथ प्रदर्शनाचा सहस्रावधी जिज्ञासूंनी लाभ घेतला

दैनिक सनातन प्रभातविषयी
जाणून घेतांना श्री. मनोहर जोशी
  • शिवसेनेचे नेते मनोहर जोशी आणि माजी नगरसेवक अधिवक्ता जगदीश सावंत यांची ग्रंथप्रदर्शनाला भेट
  • वाय-फाय सुविधेद्वारे ६७ जिज्ञासूंनी केले सनातन पंचांग डाऊनलोड
      मुंबई - दत्तजयंतीनिमित्त १३ डिसेंबर या दिवशी सनातन संस्थेच्या वतीने मुंबई, नवी मुंबई येथे ५० ठिकाणी ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले होते. या ग्रंथप्रदर्शनाला सहस्रावधी जिज्ञासूंनी भेट देऊन सनातनचे ग्रंथ खरेदी केले. वरळी सुंदरनगर येथील ग्रंथकक्षावर शिवसेनेचे नेते आणि माजी मुख्यमंत्री श्री. मनोहर जोशी यांनी भेट दिली. सनातन संस्थेच्या वतीने त्यांना दैनिक सनातन प्रभात चा दत्तजयंती विशेषांक, तर मंदिर समितीच्या वतीनेही सनातनचा दत्त हा ग्रंथ भेट देण्यात आला. यासह वरळी बी.डी.डी. चाळ येथील ग्रंथप्रदर्शनाला शिवसेनेचे माजी नगरसेवक अधिवक्ता जगदीश सावंत यांनी भेट दिली. त्यांनी सनातनचा लघुग्रंथ घेऊन १५ सनातन पंचांगांची मागणी केली. या वेळी अधिवक्ता जगदीश सावंत यांनी ग्रंथप्रदर्शनाच्या ठिकाणी उपस्थितांना उद्देशून हे देवाचे भक्त आहेत आणि मी यांचा (सनातन) चा भक्त आहे, असे सनातनविषयी कौतुकोद्गार काढले.

खलीदप्रमाणे आता इशरतच्या कुटुंबालासुद्धा साहाय्य देणार का ? - उद्धव ठाकरे

     मुंबई, १५ डिसेंबर - ज्याप्रमाणे खालीद याला सामान्य नागरिक ठरवून आर्थिक साहाय्याची घोषणा दिली, त्याच न्यायाने गुजरात पोलिसांच्या चकमकीत मारल्या गेलेल्या इशरत जहां किंवा सोहराबुद्दिन यालाही सामान्य नागरिक म्हणून साहाय्य देणार का ?, असा प्रश्‍न शिवसेनाप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांनी दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून विचारला आहे. 
     यात पुढे म्हटले आहे की, हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर बुरहान वानी लष्कराच्या चकमकीत ठार झाल्यावर जम्मू-काश्मीरमध्ये ३ मास अस्थिरता निर्माण झाली होती. याच बुरहान वानी याचा भाऊ खालीद वानी १३ एप्रिल २०१५ या दिवशी सुरक्षा जवानांच्या गोळीबारात ठार झाला. सुरक्षारक्षकांनी केलेल्या गोळबारात किंवा आतंकवादी आक्रमणात खालीद याच्या मृत्यूमुखी पडलेल्या १०६ कुटुंबियांना जम्मू-काश्मीरमधील भाजप-पीपीडी शासनाकडून प्रत्येक कुटुंबाला ४ लक्ष रुपये इतके आर्थिक साहाय्य देण्यात आले. त्यामध्ये आतंकवादी बुरहानचा भाऊ खालीद याच्या कुटुंबालाही आर्थिक साहाय्य देण्यात आले. अतिरेकी खालीद वानी याच्या मृत्यूनंतर आर्थिक साहाय्य म्हणजे कश्मीरमध्ये लढणार्‍या जवानांचे मनोबल खच्चीकरण करण्याचाच प्रकार आहे. 

सनदी अधिकारी चंद्रकांत गुडेवार यांनी लगेचच केली स्वेच्छानिवृत्तीची घोषणा !

     नागपूर, १५ डिसेंबर (वार्ता.) - सनदी अधिकारी श्री. चंद्रकांत गुडेवार यांच्या विरोधात प्रविष्ट केलेला हक्कभंग प्रस्ताव विधानसभेत हक्कभंग समितीने एकमताने तो मान्य केला. यानंतर ‘हक्कभंग समितीने सुनावलेली शिक्षा आपल्याला मान्य आहे; मात्र यापुढे शासकीय नोकरीत कार्यरत रहाण्याची आपली इच्छा नाही. त्यामुळे १५ डिसेंबर या दिवशी सोलापूरहून पुणे येथे परत आल्यानंतर लगेचच आपण स्वेच्छा निवृत्तीसाठी आवेदन देणार आहोत’, असे श्री. चंद्रकांत गुडेवार यांनी घोषित केले. 

गुन्हा रहित करण्याच्या मागणीसाठी दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांची नागपूर खंडपिठात याचिका

     नागपूर, १५ डिसेंबर - गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज नगरपालिका निवडणुकीत एका अधिकार्‍यावर दबाव आणल्याप्रकरणी राज्याचे दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांच्यावर निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पोलिसांनी गुन्हा प्रविष्ट केला आहे. आपल्यावरील हा गुन्हा रहित करण्यात यावा, या मागणीची याचिका जानकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात १५ डिसेंबर या दिवशी प्रविष्ट केली आहे. या याचिकेवर १६ डिसेंबर या दिवशी सुनावणी होणार आहे.

तेलवाहिनीला भोक पाडून १५ सहस्र लिटर डिझेलची चोरी

     मुंबई, १५ डिसेंबर - हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (एचपीसीएलच्या) पाइपलाइनमधून डिझेल चोरी करणार्‍या तेलचोरांच्या टोळीला पोलिसांनी गजाआड केले आहे. या चोरांनी जवळपास १५ हजार लीटर डिझेलची चोरी केल्याचे उघड झाले आहे.
     या चोरांनी मानखुर्द येथील एचपीसीएलच्या तेलवाहिनीजवळ आरोपींनी एक जागा भाड्याने घेतली होती. तेथे चार मीटर खोल आणि सहा मीटर लांब बोगदा खोदून त्यांनी तेलवाहिनीला भोक पाडले होते. त्यातून हे आरोपी डिझेल चोरी करत होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी पोलिसांनी प्रदीप राजभर, बाबू शेख आणि मोहम्मद यांना पोलिसांनी अटक केली आहे. तर या टोळीचा म्होरक्या सरवर शेख फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या संदर्भातील परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे विचारधन !

हिंदु राष्ट्र स्थापनेतील धर्माचरणी हिंदूंचे महत्त्व
     वर्ष २०२३ पासून हिंदु राष्ट्र येईल, हे आजवर अनेक संतांनी वेळोवेळी सांगितले आहे. या पार्श्‍वभूमीवर हिंदु राष्ट्र स्थापनेविषयी अनेकांंच्या मनात उत्सुकता असते. यासाठीच हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची दिशा या विषयावरील वैशिष्ट्यपूर्ण सदर !
१. हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी सध्याचे 
बहुतांश धर्मनिरपेक्ष राजकारणी अपात्र का आहेत ?
अ. धर्मनिरपेक्ष राजकारणी हे स्वतः धर्मच मानत नसल्याने ते हिंदु राष्ट्र ही संकल्पनाच मान्य करणार नाहीत. त्यांच्या दृष्टीने अल्पसंख्य आधारित राजकारण प्रथम असून धर्म नंतर आहे, तर हिंदु राष्ट्र हे सनातन धर्मातील आदर्श संकल्पनेवर आधारित असल्याने ते अपात्र ठरतात.

दीपक ढवळीकर आणि सुदिन ढवळीकर यांनी गोव्याच्या राजकारणात केलेल्या सर्जिकल स्ट्राइकचे स्वागत !

गोव्यात मगो पक्षाच्या दोन्ही नेत्यांना मंत्रीमंडळातून 
वगळल्याच्या प्रकरणी दैनिक सामनाचा अग्रलेख !
   दैनिक सामनाने गोवा राज्यात घडणार्‍या राजकीय घडामोडींविषयी सूचक भाष्य करणारा अग्रलेख १४ डिसेंबर या दिवशी प्रसिद्ध केला आहे. शिवसेना गोवा सुरक्षा मंचसह युती करून यंदाच्या विधानसभा निवडणुकीत उतरली आहे. या पार्श्‍वभूमीवर या अग्रलेखातील सूत्रांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. आमच्या वाचकांसाठी त्यातील निवडक सूत्रे प्रसिद्ध करत आहोत.

काळे पैसेवाल्यांकडून देशांतर्गत लुटमार !

     पैसा बड्या असामींचा, मी केवळ प्यादा, असे केंद्र सरकारच्या उत्पन्न प्रकटीकरण योजनेच्या अंतर्गत १३ सहस्र ८६० कोटी रुपयांची रक्कम घोषित करणारे बांधकाम व्यावसायिक महेश शहा यांचे म्हणणे आहे. मोजक्याच आयकर अधिकार्‍यांच्या चमूसमोर नावे सांगण्याची त्याने तयारी दर्शवली आहे. दुसर्‍या प्रकरणात मुंबईतील एका कुटुंबाने घोषित केलेल्या दोन लाख कोटी रुपयांच्या बेहिशोबी उत्पन्नाचे विवरणपत्र संशयास्पद ठरवून प्राप्तीकर विभागाने ते फेटाळल्याने काळ्या पैशाचे हे बेनामी घबाड आहे तरी कोणाचे, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

केंद्र सरकारकडून महिन्याभरात केवळ ५ लाख कोटी रुपयांच्या नव्या नोटा चलनात !

     नवी देहली - नोटाबंदीच्या निर्णयाला १ मासाहून अधिक कालावधी पूर्ण झाला आहे. या कालावधीत साडेपंधरा लाख कोटी रुपये मूल्याच्या नोटा चलनातून बाद झाल्या; मात्र या बदल्यात आतापर्यंत केवळ ५ लाख कोटी रुपयांच्या नव्या नोटा चलनात आल्या आहेत. त्यामुळे अजूनही चलन संकटाची तीव्रता कायम आहे. ३० डिसेंबरपर्यंत म्हणजे येत्या १८ दिवसांमध्ये सरकारला दोन तृतीयांश नव्या नोटा बाजारात आणाव्या लागणार आहेत. दुसरीकडे काही अर्थतज्ञांच्या मते सरकार लोकांना कॅशलेस म्हणजे चलनविरहित व्यवहाराकडे जाण्यासाठी प्रयत्नरत असल्याने अधिक नोटांची छपाई करण्यात येईल, याची शक्यता नाही. त्यामुळे भविष्यातही चलनाचा तुटवडा कायम असणार आहे.

चहाचे गंभीर दुष्परिणाम !

१५ डिसेंबर या दिवशी झालेल्या जागतिक चहादिनानिमित्त...
१. कर्करोग आणि हृदयरोग रोखणारे अ‍ॅन्टी-ऑक्सिडन्ट नामक पदार्थ केवळ कोर्‍या चहात आहे. दूध साखर घालून उकळलेला चहा आयुर्वेद शास्त्रानुसार अग्नीमांद्य घडवणारा (भूक अल्प करण्यास कारणीभूत असणारा) असतो. 
    दिवसाला ७ ते ३० कप इतक्या प्रमाणात अती उकळलेला चहा पिणारे पचनशक्ती बिघडून आम्लपित्त, अल्सर, सांधेदुखी, अंगदुखी आणि मलावरोध या विकारांना बळी पडतात. 
२. भारतियांमध्ये चहात साखर घालण्याचे प्रमाण जगात सर्वाधिक आहे. त्यामुळे बैठा व्यवसाय करणार्‍या व्यक्ती मधुमेह, कोलेस्टेरॉल, हृदयविकार आणि स्थौल्य अशा विकारांकडे ओढल्या जात आहेत. 
३. दूध-साखरविरहित चहा जरी पुष्कळ प्रमाणात प्यायला, तरी त्याच्या तुरट चवीच्या अतिरिक्त प्रमाणामुळे मलावष्टंभ, तहान, पक्षाघातासारखे वातविकार आणि शुक्राणूंची संख्या अल्प होणे, असे विकार बळावतात.
४. दूध, साखर आणि चहाची भुकटी एकत्र करून उकळलेला चहा कफ-पित्त वाढवणारा अन् उष्ण गुणाचा आहे.

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

सकारात्मकतेतील शक्ती !
घडणार्‍या गोष्टींकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहिले की, आपल्या आयुष्यात 
घडणार्‍या प्रत्येक गोष्टीत आपले हितच आहे, याची जाणीव होते. नेहमी सकारात्मक बोलणारी 
व्यक्ती सर्वांना हवीहवीशी वाटते. नैराश्यपूर्ण विचारांची व्यक्ती समाजातील लोकांना नकोशी वाटते. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

क्रांतीकार्यासमवेत सतत मृत्यूची गाठ असते !

स्वातंत्र्यवीर सावरकर
    स्वराज्याचे, स्वातंत्र्याचे कार्य करणे, हा माझा धर्म आहे. त्या धर्म धारणेचा अट्टाहास करत मी रणात घुसलो, (लढाईत अवतरलो) तो मृत्यूशीच गाठ घालून !
    लग्नात वधू-वरांची गाठ मारली जाते, तशी क्रांतीकार्यासमवेत सतत मृत्यूची गाठ असते. सहधर्मचारिणी सारखी, सावली सारखी आणि सख्या सारखी ! 
- स्वातंत्र्यवीर सावरकर (संदर्भ : मासिक स्वातंत्र्यवीर, मे २००४)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केल्यानिमित्त काढलेल्या विशेषांकातील प.पू. डॉक्टरांच्या छायाचित्राच्या संदर्भात आलेली अनुभूती

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...
परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले
१. आदल्या रात्री विशेषांक वाचल्यावर निर्गुणाची 
(विशेषांकाची) सगुणातून पूजा करूया, असे ठरवणे 
     परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त काढलेला विशेषांक २८.५.२०१६ च्या रात्रीच घरी आला होता. मी त्या रात्रीच तो अंक पूर्ण वाचला. अंक पाहून मनात विचार आला, आज केवळ प.पू. डॉक्टरांच्या कृपेनेच निर्गुण तत्त्वाची सगुणातून अनुभूती घेण्याची संधी आली आहे. त्यानंतर मी देवाने दिलेल्या निर्गुणाची (विशेषांकाची) सगुणातून उद्या पूजा करूया, असे ठरवले.

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या महामृत्यूयोगाच्या निवारणार्थ रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात मृत्यूंजय याग संपन्न !

यज्ञस्थळी देवतांना ओवाळतांना 
सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि बाजूला 
सनातन साधक पुरोहित पाठशाळेचे पुरोहित
    रामनाथी, गोवा - गेल्या काही दिवसांपासून परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्यावरील महामृत्यूयोगाचे संकट टळून त्यांना दीर्घायुष्य लाभावे, यासाठी महर्षींनी जीवनाडीच्या माध्यमातून केलेल्या मार्गदर्शनानुसार रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात मृत्यूंजय याग करण्यात आला.
क्षणचित्रे 
१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावरील संकट दोन पक्षांनी स्वतःवर घेणे : १०.१२.२०१६ या दिवशी यज्ञाची पूर्वसिद्धता चालू असतांना आश्रम परिसरात असलेल्या पारिजातकाच्या झाडाजवळ दोन पक्षी पडतांना दिसले. त्यातील एक पक्षी मृतावस्थेत होता आणि एक घायाळ अवस्थेत होता. तो काही वेळाने उडून गेला. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावरील संकट पशूपक्षी स्वतःवर घेतात, असे सप्तर्षि जीवनाडीच्या माध्यमातून महर्षींनी सांगितले आहे. त्याचीच ही साक्ष होती.

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या शिबिरात सहभागी झालेल्या शिबिरार्थींचा साधनाप्रवास आणि त्यांना आलेल्या अनुभूती

कोलंबिया येथील श्री. जर्मन मोरेनो यांच्या साधनेचा प्रवास 
आणि त्यांना रामनाथी आश्रमातील वास्तव्यात आलेल्या अनुभूती

      १० ते १४ डिसेंबर २०१६ या कालावधीत सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेला उपस्थित असलेल्यांना आलेले अनुभव आणि अनुभूती पुढे देत आहोत.
१. साधनाप्रवास
१ अ. लहानपणापासून अध्यात्म आणि आध्यात्मिक उपाय यांविषयी जिज्ञासा असणे अन् कोणी मार्गदर्शक नसल्याने ग्रंथात दिल्यानुसार प्रयत्न करणे : १५ व्या वर्षापासूनच श्री. जर्मन यांना चक्र, उपाय, इत्यादीची जिज्ञासा होती. ते ध्यान लावण्याचा प्रयत्न करायचे. त्यांना कुणी मार्गदर्शक नव्हता. ते ग्रंथांत दिलेल्या माहितीनुसार प्रयत्न करत असत. त्यांच्या ध्यान लावण्यात नियमितपणा नव्हता. ते कॅथलिक असल्याने चर्चमध्ये जात असत; परंतु श्रद्धेने नाही.

सप्तर्षि जीवनाडीत सांगितल्याप्रमाणे सनातनच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांचा अहर्निश प्रवास !

महर्षींची शिकवण आणि कार्य !
      सनातनच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ मागील ४ वर्षांपासून भारतभरातील विविध राज्यांत दौर्‍यावर जात आहेत. हिंदु राष्ट्राची (सनातन धर्म राज्याची) शीघ्रतेने स्थापना व्हावी, राष्ट्र, धर्म, तसेच साधक यांचे रक्षण व्हावे आणि देवतांचा आशीर्वाद मिळावा, यासाठी सप्तर्षि जीवनाडीत सांगितलेल्या क्षेत्री जाण्याचे त्यांचे नियोजन असते. आतापर्यंत त्यांनी २४ राज्यांतील प्रवास करून तेथील वैशिष्ट्यपूर्ण दगड, माती, तीर्थ आदींचा संग्रह केला आहे. त्यांनी नोव्हेंबर २०१६ पर्यंत ३ लक्ष ५६ सहस्र कि.मी. एवढा प्रवास करून भावी पिढीसाठी भारतातील अलौकिक समृद्ध ठेवा संग्रहित केला आहे. या दैवी प्रवासाची सर्वांना माहिती व्हावी, यासाठी हे सदर प्रसिद्ध करत आहोत.

रामनाथी आश्रमाभोवती दिसणार्‍या गरुडासम पक्ष्यांच्या आकारापेक्षा २ मोठे गरुड दिसणे आणि त्यांच्याकडे पाहिल्यावर मनाला पुष्कळ शांत अन् आनंदी वाटणे

     २८.११.२०१६ (सोमवती अमावास्या) या दिवशी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास हनुमान मंदिराकडील डोंगरावरून २ मोठे गरुड पक्षी रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमाकडे उडत आले आणि सनातन कलामंदिराकडून आश्रमाभोवती १ प्रदक्षिणा घालून पुढे निघून गेले. त्या वेळी मी आश्रमातील आगाशीत (गच्चीत) होतो. सर्वसाधारणत: आश्रमाभोवती वावरणार्‍या गरुडासम पक्ष्यांच्या आकारापेक्षा ते मोठे होते. त्यांच्याकडे पाहिल्यावर माझ्या मनाला पुष्कळ शांत आणि आनंदी वाटले. 
- एक साधक, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२८.११.२०१६, सायं. ६.३५ वा.)

दरिद्री आणि गरीब यांतील भेद

प.पू. पांडे महाराज यांचे अनमोल विचारधन
प.पू. पांडे महाराज
१. दरिद्री 
    गरीब आणि दरिद्री यात भेद आहे. दरिद्री म्हणजे असाहाय्य, कमनशिबी, तीव्र प्रारब्ध असलेला, संकटांनी ग्रस्त असलेला, खायला-प्यायला नसलेला, हलाखीची परिस्थिती असलेला. त्या परिस्थितीत तो काहीच करू शकत नाही. ना स्वतःचे भले करू शकत, ना दुसर्‍याचे. 
२. गरीब 
     गरीब हा गुण आहे. गरीब खाऊन पिऊन सुखी, कुणाच्या अध्यात नाही, मध्यात नाही, कुणाला त्रास न देणारा. गाय गरीब आहे, असे आपण म्हणतो. ती आपणहून कुणाला त्रास देत नाही. हिंदु धर्मसुद्धा कुणावर विनाकारण आक्रमण करत नाही. 
     सत्तेपायी आंधळा झालेला मूर्ख मनुष्य मायेच्या प्रभावाखाली आल्यामुळे अहंकारी होतो. हा एक प्रकारचा मद असतो. मनुष्य उन्मत्त होतो, तेव्हा स्वतःचा नाश करून घेतो. 
- प.पू. परशराम पांडे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२५.८.२०१६)


पू. नेनेआजी यांच्या लक्षात आलेली त्यांची कन्या श्रीमती सुधा देशमुख यांची गुणवैशिष्ट्ये आणि त्यांनी त्यांच्याप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता !

सनातनच्या ३६ व्या संत पू. नेनेआजी यांच्या कन्या श्रीमती सुधा 
(अनुपमा) देशमुख यांचा आज १६.१२.२०१६ या दिवशी दिनांकानुसार 
वाढदिवस आहे. त्यानिमित्त श्रीमती सुधा देशमुख यांना सनातन परिवाराचा नमस्कार !
     देवद आश्रमात वास्तव्यास असणार्‍या सनातनच्या ३६ व्या संत पू. नेनेआजी यांच्या श्रीमती सुधा (अनुपमा) देशमुख या कन्या आहेत. १९.११.२०१६ या दिवशी पू. नेनेआजी यांच्या वाढदिवसाच्या दिवशी दैनिक सनातन प्रभातमध्ये त्यांच्या आठवणी प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यात त्यांची कन्या श्रीमती सुधा (अनुपमा) देशमुख यांचा उल्लेख आला नव्हता. हे सुधा यांनी वाचल्यावर त्यांनी पू. नेनेआजींना त्याची आठवण करून दिली. तेव्हा पू. आजींना पुष्कळ वाईट वाटले. त्या म्हणाल्या, सुधाने माझ्यावर केलेल्या अनंत उपकारांविषयी मला विस्मरण कसे झाले ? माझ्या हातून अशी कशी चूक झाली ? असे म्हणतांना त्यांना पुष्कळ खंत वाटत होती. तिच्याविषयी कशी कृतज्ञता व्यक्त करायची ?, या विवंचनेतच त्यांनी मला बोलावले आणि याविषयी सांगितले. त्या म्हणाल्या, मला सुधाविषयी कृतज्ञता व्यक्त करायची आहे. तिने मला सांभाळले आहे. मला कसे काय तिच्याविषयीच्या स्मृतींचे विस्मरण झाले, मला कळलेच नाही. माझ्या हातून मोठी चूक झाली आहे. आपण तिच्याविषयी कृतज्ञता म्हणून लिहूया. पू. आजींनी सांगितलेल्या त्यांच्याविषयीच्या काही आठवणी येथे दिल्या आहेत. - सौ. आनंदी पांगुळ (२९.११.२०१६)

सनातनच्या संत पू. शालिनी नेनेआजींचा सत्संग म्हणजे प.पू. डॉक्टरांकडून मिळालेली विजयादशमीची अमूल्य भेट !

पू. शालिनी नेनेआजी
      वर्ष २०१६ च्या विजयादशमीच्या दिवशी मला देवद आश्रमात सनातनच्या ३६ व्या संत पू. शालिनी नेनेआजींची सेवा करण्याची संधी मिळाली. पू. नेनेआजींच्या सेवेला जातांनाच मी गुरुदेवांना तुम्हाला अपेक्षित अशी सेवा होऊ दे, अशी प्रार्थना केली होती. पू. आजी भूतकाळातील आठवणींना उजाळा देत प.पू. डॉक्टरांविषयी बोलत होत्या. त्यांनी पुढील सूत्रे सांगितली.
१. प.पू. डॉक्टरांविषयी
१ अ. प.पू. डॉक्टर आणि त्यांचे ४ भाऊ म्हणजे पाच पांडवच ! : प.पू. डॉक्टर आमचे नातेवाईक आहेत. आम्ही दोघे पती-पत्नी पूर्वी त्यांच्या घरी जात होतो. तेव्हा त्यांचे लहान घर (१० फूट लांब आणि १० फूट रूंद अशा दोन खोल्या) होते. प.पू. डॉक्टर आणि त्यांचे ४ भाऊ म्हणजे पाच पांडवच आहेत. प.पू. डॉक्टरांच्या आईला आम्ही वहिनी म्हणायचो.

सिंगापूर येथील श्रीमती सँडी योंग स्वी फोंग यांच्या साधनेचा प्रवास आणि त्यांना रामनाथी आश्रमातील वास्तव्यात आलेल्या अनुभूती

श्रीमती सँडी
योंग स्वी फोंग
१. साधनाप्रवास
१ अ. विविध माध्यमांतून साधना करतांना आयुष्यात रिक्तपणा जाणवणे, स्वभावदोष आणि निर्मूलनासाठी कोणाकडूनही मार्गदर्शन न मिळणे आणि एस्.एस्.आर्.एफ्.च्या संपर्कात आल्यावर त्यासाठी प्रायोगिक स्तरावर उपाय सापडणे : सँडी योंग स्वी फोंग या सिंगापूरच्या आहेत. त्यांनी ख्रिस्ती पंथाचा अभ्यास केला असून त्या ध्यानधारणा करतात. त्यांनी प्राणिक हिलिंग या आध्यात्मिक उपायपद्धतीनुसार इतरांवर उपायही केले आहेत. असे असले, तरी त्या नेहमी खर्‍या अध्यात्माच्या शोधात होत्या. त्या वेगवेगळ्या माध्यमांतून साधना करत असल्या, तरी त्यांना त्यांच्या आयुष्यात एक रिक्तपणा वाटत असे. स्वतःमध्ये पुष्कळ स्वभावदोष असल्याची त्यांना जाणीव झाली. बौद्ध पंथानुसार साधना करतांना त्यांना स्वतःतील अहं न्यून करणे आवश्यक आहे, हे समजले; परंतु स्वभावदोष आणि अहं निर्मूलन कसे करायचे, याविषयी प्रायोगिक स्तरावर त्यांना कोणाकडूनही मार्गदर्शन मिळाले नाही. साधना करताकरता अहं वाढत असल्याची त्यांना जाणीव होऊ लागली. याविषयी साहाय्य मिळण्यासाठी त्या भक्तीभावाने प्रार्थना करू लागल्या. त्या नास्तिक होत्या; मात्र ईश्‍वराला समजून घेण्यासाठी त्या ईश्‍वराकडे साहाय्य मागू लागल्या. माहितीजालावर शोध घेतांना त्या एस्.एस्.आर्.एफ्.च्या संपर्कात आल्या. त्यांना स्वभावदोष आणि अहं निर्मूलन कसे करायचे, याविषयी प्रायोगिक स्तरावर उपाय सापडला.

देव आणि भक्त यांचा लपंडाव !

श्री. राम होनप
      भक्त वर्षानुवर्षे देवाला शोधत असतो आणि देव मायेच्या पाठी लपून बसलेला असतो. एक दिवस भक्त देवाला शोधतो. त्या वेळी दोघे समोरासमोर येतात. या वेळी भक्ताला देव भेटल्याचा आनंद होतो आणि भक्ताने पकडल्याचा देवाला आनंद मिळतो. देव आणि भक्त यांचा हा लपंडाव युगानयुगे चालू आहे. 
- श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२९.९.२०१५)

राहीन सदैव मी तुझी ऋणी ।

माझ्या जीवनाची सांगाती कन्या माझी सुधा गोजरी ।
कशी होऊ गं उतराई, तुझे उपकार अनंत माझ्यावरी ॥ १ ॥

सतत सोबती असतात, त्यांच्या स्मृती नसतात ना गं ।
जो दूर असतो, त्याच्या विरहाच्या स्मृती रहातात ना गं ॥ २ ॥

तू माझ्या हृदयात आहेस, माझ्यापासून वेगळी नाहीस गं ।
हेच तुझ्या स्मृतींचे वैशिष्ट्य आहे ना गं ॥ ३ ॥

साधकांना सूचना

सनातनच्या संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नका !
    सनातनच्या संतांचा वाढदिवस असलेल्या दिवशी त्यांच्या संदर्भात साधकांनी दैनिक सनातन प्रभातमध्ये गुणवैशिष्ट्ये लिहून दिलेली असतात. त्यामुळे सर्वत्रच्या साधकांचे त्या संतांना भ्रमणभाष येतात. संतांना दिवसभर अनेक साधकांशी भ्रमणभाषवर बोलावे लागत असल्याने त्यांच्या सेवेतील अमूल्य वेळ वाया जातो. सध्या आपत्काळाला आरंभ झाल्यामुळे एकेक क्षण महत्त्वाचा आहे. स्थुलापेक्षा सूक्ष्म श्रेष्ठ असल्याने साधकांनी संतांना भ्रमणभाष न करता त्यांना मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

बोधचित्र

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज सनातनचे श्रद्धास्थान
     कितीही कल्पनातीत आनंदलहरी असल्या, तरी त्यांची शीतलताच त्यांचा दाब उसळेल.
भावार्थ : आनंदलहरी कल्पनातीत आहेत; कारण साधारण व्यक्तीला आध्यात्मिक आनंदाची, आत्मानंदाची अनुभूती नसतेच, केवळ व्यावहारिक सुखाची असते. त्यांची शीतलताच त्यांचा दाब उसळेल म्हणजे आनंदाची अनुभूती घ्यावी, अशी प्रत्येक जिवाला नैसर्गिक ओढ असतेच, म्हणून आनंद मिळावा हा विचार कधी ना कधी उफाळून येतोच.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

     वैद्यकीय, अर्थ, न्याय इत्यादी सर्वच क्षेत्रांत सर्व जण तज्ञांचे ऐकतात; पण त्याहून सूक्ष्म असणार्‍या अध्यात्माच्या क्षेत्रात मात्र बुद्धीप्रामाण्यवादी हिंदू स्वतःला अधिक शहाणे समजतात !
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

राहुलचे पुरावे !

संपादकीय
    लहान मुलाने, अनुभवी नसणार्‍याने किंवा अभ्यास नसणार्‍याने एखादे संवेदनशील अथवा वादग्रस्त विधान केले, तर त्याला कोणीही गांभीर्याने घेत नाही. तसाच प्रकार काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याविषयी आहे. राहुल गांधी यांचे व्यक्तीमत्त्व वरील तीनही श्रेणीत बसणारे आहे, असे कोणी म्हटल्यास चुकीचे ठरू शकत नाही. घराणेशाहीमुळे काँग्रेसला पर्याय नसल्याने राहुल गांधी यांचे नेतृत्व मिळाले आहे. राहुल गांधी यांचे राजकीय क्षेत्रातील कर्तृत्व शून्य आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn