Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

सर्वसमावेशक आर्थिक धोरण स्वीकारल्याने इस्लामी बँकेची आवश्यकता उरली नाही ! - केंद्र सरकार

हिंदूंच्या तीव्र विरोधाच्या परिणामामुळे केंद्र सरकारने इस्लामी बँकेची योजना गुंडाळली !
      नवी देहली - रिझर्व्ह बँकेने केंद्रशासनास सादर केलेला इस्लामी बँकेचा प्रस्ताव बासनात गुंडाळून ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती अर्थ मंत्रालयाचे राज्यमंत्री संतोषकुमार गंगवार यांनी लोकसभेत एका प्रश्‍नाला लिखित उत्तर देतांना पटलावर ठेवली. व्याजरहित आर्थिक व्यवस्था असलेली आणि कुराणावर आधारित असलेली इस्लामी बँकेची योजना रिझर्व्ह बँकेने केंद्रशासनास सादर करताच हिंदू आणि आर्थिक क्षेत्रांतील तज्ञांनी या योजनेला तीव्र विरोध केला होता. अनेक इस्लामी राष्ट्रांतही इस्लामी बँकेची योजना कार्यान्वित नसतांना ती धर्मनिरपेक्ष अशा भारतातच का लागू करण्यात येणार आहे, याचे कोडे हिंदूंना पडले होते. तसेच अशा एक एक योजनेसह एका दिवशी भारतात शरीया कायदाही लागू होईल, अशी रास्त भीती व्यक्त करण्यात येत होती. त्यामुळेच ही योजना गुंडाळून ठेवण्यात आल्याचे म्हटले जात आहे.
      राज्यमंत्री संतोषकुमार गंगवार म्हणाले की, शासनाने जनधन योजना आणि सुरक्षा विमा योजना असे सर्वसमावेशक आर्थिक धोरण स्वीकारल्याने देशात आता इस्लामी बँकेची आवश्यकता उरली नाही, असे शासनाचे मत झाले आहे. (या दोन्ही योजना केव्हाच प्रारंभ झाल्या आहेत. रिझर्व्ह बँकेने त्यानंतर इस्लामी बँकेची योजना केंद्रशासनास सादर केली. म्हणजेच ही योजना हिंदूंच्या विरोधामुळे रहित करण्याची नामुष्की सरकारवर आली, हे मान्य न करता केंद्राला लंगडी कारणे देणे भाग पडले आहे. यात सरकारचा दूरदर्शीपणाचा अभाव स्पष्ट होतो. - संपादक)

डॉ. दाभोलकर हत्येचे अन्वेषण सीबीआयकडे, तर कॉ. पानसरे हत्येचे प्रकरण न्यायप्रविष्ट !

मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती
      नागपूर - डॉ. दाभोलकर हत्येच्या प्रकरणी गुन्हा नोंदवलेला असून त्याचे अन्वेेषण केंद्रीय अन्वेषण यंत्रणेकडे (सीबीआयकडे) वर्ग केले आहे. कॉ. पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणातील २ आरोपींवर गुन्हा प्रविष्ट केला असून त्यांच्यावर दोषारोपपत्र प्रविष्ट करण्यात आले आहे. पानसरे हत्या प्रकरणी गुन्हा न्यायप्रविष्ट असून त्यातील काही फरार आरोपींचे पुढील अन्वेषण चालू आहे, असे लेखी उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. विधान परिषदेचे आमदार संजय दत्त आणि रामहरी रूपनवर यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्‍नावर मुख्यमंत्र्यांनी हे लेखी उत्तर दिले आहे. या प्रकरणी हत्येचे अन्वेषण पूर्ण झाले आहे का ? त्यात काय आढळून आले ? त्यावर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे आणि तपासाची सद्यस्थिती काय आहे ? असे लेखी प्रश्‍न विचारण्यात आले होते.
     १४ डिसेंबर या दिवशी विधान परिषदेमध्ये सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी प्रश्‍नोत्तराचा तास पुकारताच विरोधकांनी स्थगन प्रस्तावाद्वारे मराठा आरक्षणावर चर्चा करण्याची मागणी केली.

गंगावती (कर्नाटक) येथे रस्त्यावर ध्वज लावण्यास विरोध केल्याने धर्मांधांनी हिंदूंची मालमत्ता जाळली !

पोलिसांचा धर्मांधांवर कारवाई करण्यास नकार !
पाकिस्तान आणि बांगलादेश प्रमाणे काँग्रेसच्या राज्यातील असुरक्षित हिंदू ! 
या घटनेविषयी एकही निधर्मी, पुरोगामी आणि लेखक धर्मांधांना असहिष्णु
म्हणणार नाही कि त्यांच्या विरोधात पुरस्कार परत करणार नाही !
     गंगावती (कर्नाटक) - ईदच्या दिवशी धर्मांधांना शहराच्या रस्त्यांवर ध्वज लावण्यास विरोध केल्याने धर्मांधांनी चिडून हिंदूंच्या दुकानांना आणि घरांना आग लावल्याची घटना या शहरात १२ डिसेंबरला घडली. शहरातील धर्मांध ईदच्या दिवशी रस्त्यावर ध्वज लावत होते. अशी काही प्रथा नसल्याने त्याच वेळी हनुमानाचा उत्सव साजरा करत असलेल्या हिंदूंनी आक्षेप घेतला. तसेच हनुमान आणि अयप्पा देवतांच्या भाविकांनी शांतपणे पोलीस ठाण्यात जाऊन या प्रकाराला आळा घालावा, अशी पोलिसांना विनंती केली; मात्र पोलिसांनी धर्मांधांवर काहीही कारवाई न करता उलट पोलीस ठाण्याच्या बाहेर जमलेल्या हिंदूंवर लाठीमार केला. (अशा पोलिसांची नावे आणि बक्कल क्रमांक सनातन प्रभातला कळवा ! - संपादक) त्यात अनेक हिंदू घायाळ झाले. तिकडे मोकळे रान मिळाल्याने धर्मांधांनी शहरात हैदोस घातला. तुफान दगडफेक केली आणि अनेक ठिकाणी आग लावली. त्यात अनेक दुकाने आणि वाहने भस्मसात झाली. (कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजणारे धर्मांध अन् ती रोखण्यासाठी काहीही न करणारे निष्क्रीय पोलीस ! - संपादक)      कोप्पाला येथील खासदार श्री. कराडी संगम्मा यांनी या घटनेचा निषेध केला असून उत्तरदायी पोलीस अधिकारी बिरादार यांच्याविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी केली.

(म्हणे) पंतप्रधान मोदी यांच्या भ्रष्टाचाराचे माझ्याकडे पुरावे !

राहुल गांधी यांचा हास्यास्पद दावा !
पुरावे आहेत, तर ते लोकांसमोर उघड का करत नाहीत ? बोफोर्स, कोळसा
खाण वाटप, २-जी, राष्ट्रकुल, आदर्श आदी काँग्रेसच्या काळात झालेल्या
भ्रष्टाचाराचे पुरावे राहुल गांधी कधी सादर करणार आहेत, हेही त्यांनी सांगावे !
      नवी देहली - माझ्याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची तपशीलवार माहिती आहे. मला हे सगळे लोकसभेत मांडायचे आहे; मात्र मला सभागृहात बोलू दिले जात नाही, असा दावा काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. ते येथे एका पत्रकार परिषदेत बोलत होते. (लोकसभेत बोलू दिले जात नाही, तर हे पुरावे जनतेसमोर जाऊन का उघड करत नाहीत ? त्यासाठी त्यांना कोणी रोखले आहे ? मात्र अशी विधाने करून राहुल गांधी पुन्हा एकदा स्वतःचे हसे करून घेत आहेत ! - संपादक)      राहुल गांधी पुढे म्हणाले की, गेल्या महिनाभरापासून सर्व विरोधी पक्षांना लोकसभेत कामकाज व्हावे, असे वाटते; मात्र पंतप्रधान मोदी आणि सरकारला ते नको आहे. (चोराच्या उलट्या बोंबा ! काँग्रेससहित विरोधी पक्षांकडून घालण्यात येणार्‍या गदारोळामुळेच संसदेचे कामकाज होत नाही ! - संपादक) लोकसभेत मला बोलू दिल्यास आपले बिंग फुटेल, अशी भीती मोदी यांना वाटते. त्यामुळेच मला घाबरून मोदी नोटाबंदीवरील चर्चेपासून दूर पळत आहेत. सरकारने आम्हाला सभागृहात बोलू द्यावे.

जयललिता यांच्यावर दुसर्‍यांदा अंत्यसंस्कार करतांना बाहुलीवर अग्नीसंस्कार !

     म्हैसुरू/चेन्नई - तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या पार्थिवावर द्रविडी परंपरेने अंंत्यसंंस्कार (दफनविधी) करण्यात आले होते. यावर जयललिता यांंच्या नातेवाइकांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे जयललिता यांंना मोक्ष मिळावा, यासाठी त्यांच्या नातेवाइकांनी पुन्हा एकदा हिंदु परंपरेप्रमाणे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. श्रीरंगपटना येथे कावेरी नदीच्या काठावर १३ डिसेंबरला हा विधी करण्यात आला. जयललिता यांच्या पार्थिवाऐवजी चितेवर एक बाहुली ठेवण्यात आली होती. जयललिता यांचा सावत्र भाऊ वरदराजू याने चितेला अग्नी दिला.
     जयललिता यांचा सावत्र भाऊ एन्.जे. वासुदेवन् यांनी सांगितले की, आम्ही अय्यंगार ब्राह्मण आहोत. मोक्ष मिळण्यासाठी जयललिता यांच्यावर श्री रामानुजाचार्य श्रीवैष्णव परंपरेने पुन्हा अंत्यसंस्कार केले. जयललिता यांच्या आत्म्याला शांती मिळावी, यासाठी त्यांच्यावर हिंदु परंपरेने अंत्यसंस्कार करणे आवश्यक होते, असे पुरोहित रघुनाथ अय्यंगार यांनी सांगितले.

अनैतिक शारीरिक संबंधाच्या चित्रफीतीमुळे कर्नाटकच्या उत्पादनशुल्क मंत्र्यांचे त्यागपत्र !

     बेंगळुरू - कर्नाटकचे ७१ वर्षीय उत्पादनशुल्कमंत्री एच्.वाय. मेती यांनी त्यांच्या पदाचे त्यागपत्र दिले आहे. मेती यांची शारीरिक संबंधाची एक कथित चित्रफीत उघड झाली. त्यामुळे त्यांनी त्यागपत्र दिले आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी १२ डिसेंबरला सांगितले होते की, जर अशी चित्रफीत खरोखर अस्तित्वात असेल, तर मेती यांना त्यागपत्र द्यावे लागेल. स्वत:चा लाभ करून घेण्यासाठी एका महिलेने मेती यांच्याशी शारीरिक संबंध ठेवले होते, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. अद्याप या चित्रफितीची सत्यता उघड झालेली नाही.

नोटाबंदीनंतरच्या कारवाईत आतापर्यंत १९ जणांना अटक आणि २० कोटींहून अधिक रोकड जप्त !

     नवी देहली / मुंबई - नोटाबंदीनंतर आतापर्यंत काळा पैसा गैरमार्गाने पांढरा करून घेण्याची ११ प्रकरणे उघडकीस आली आहेत. यासाठी २०० हून अधिक ठिकाणी शोधमोहीम घेण्यात आली. अटक केलेल्यांमध्ये १६ बँक अधिकारी आणि ३ व्यापारी आहेत. त्यांच्याकडून २० कोटींहून अधिक रोकड जप्त करण्यात आली. पुढील काही दिवसांत आणखी काही लोकांना अटक होऊ शकते, असे म्हटले जात आहे.
देहली, गोवा आणि कर्नाटक येथे बेहिशोबी पैसा जप्त !
     देहली येथील एका हॉटेलमध्ये आयकर विभागाच्या अधिकार्‍यांनी छापा मारून ३ कोटी २५ लाख रुपयांच्या बेहिशोबी जुन्या नोटा जप्त केल्या. तसेच बेंगळुरूमध्ये २ कोटी २५ लाख रुपयांची बेहिशोबी रोकड जप्त करण्यात आली. कर्नाटकमध्ये १३ डिसेंबरला ९३ लाख रुपये जप्त करण्यात आले होते. तसेच गोव्यातील पणजीमध्ये ६८ लाख रुपये जप्त करण्यात आले.

सोपोरमध्ये एक आतंकवादी ठार !

     सोपोर - जम्मू-काश्मीरच्या सोपोर येथील बोमाईमध्ये भारतीय सैन्याने एका आतंकवाद्याला ठार केले.

क्रांतीकारकांच्या स्वप्नातील भारत हाच आहे का ? - पुरी पीठाचे शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती

     उज्जैन, १४ डिसेंबर (वार्ता.) - क्रांतीकारकांनी देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी सर्वस्वाचा त्याग केला. स्वातंत्र्यापासून आजपर्यंतची स्थिती पाहिल्यास, त्यांच्या स्वप्नातील भारत हाच आहे का ? क्रांतीकारकांच्या स्वप्नातील भारताचा प्रत्येकाने विचार केल्यास देशात परिवर्तनाची दिशा स्पष्ट होईल, असे प्रतिपादन पुरी पिठाचे शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती यांनी केले. ते १२ डिसेंबरला येथील हरसिद्धी मंदिराच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात जिज्ञासूंनी विचारलेल्या प्रश्‍नांना उत्तर देतांना बोलत होते. या वेळी स्वामी निर्विकल्पानंद महाराज आणि उज्जैनचे महंत पू. शेखरानंदजी महाराज उपस्थित होते.

रेल्वे स्थानकांवर क्रूर मोगल बादशाह अकबराचे चित्र लावण्यात येऊ नये ! - हिंदुत्वनिष्ठांची एकमुखी मागणी

देहलीच्या जंतरमंतरवर राष्ट्रीय हिंदू आंदोलन !
राष्ट्रीय हिंदू आंदोलनात सहभागी झालेले
विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे धर्माभिमानी हिंदू
      देहली - रेल्वे स्थानकांवर क्रूर मोगल बादशाह अकबराचे चित्र लावण्यात येऊ नये, बांगलादेशातील अल्पसंख्यांक हिंदूंच्या सुरक्षेचे सूत्र संयुक्त राष्ट्रसंघामध्ये उपस्थित करावे आणि भारतीय रिझर्व बँकेने केंद्र सरकारकडे पाठवलेला ‘इस्लामिक बँकींग’चा प्रस्ताव सरकारने स्वीकारू नये, यांसाठी देहली येथील जंतरमंतरवर राष्ट्रीय हिंदू आंदोलन घेण्यात आले. या आंदोलनात शिवसेना, अखंड भारत मोर्चा, बजरंग दल, वैदिक उपासना पीठ, वेद भारती संस्कार शाळा, हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या कार्यकर्त्यांसह विविध हिंदुनिष्ठ धर्माभिमान्यांनी सहभाग घेतला.

काँग्रेसच्या २० मंत्र्यांकडून हिंदु जनजागृती समितीला सकारात्मक प्रतिसाद !

  • कर्नाटक सरकारच्या अंधश्रद्धाविरोधी विधेयकाच्या विरोधात हिंदु जनजागृती समितीकडून यशस्वी मोहीम !
  • हिंदु नेत्यांच्या वारंवार होणार्‍या हत्यांच्या विरोधात कर्नाटक विधानसभेत सूत्र उपस्थित
कॅप्टन गणेश कर्णिक (सर्वांत उजवीकडे) यांना
निवेदन देतांना डावीकडून डॉ. अंजेश कणगलेकर,
सर्वश्री काशिनाथ शेट्टी, अशोक भोज आणि मोहन गौडा
     बेळगाव - २२ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर या कालावधीत कर्नाटक विधानसभेचे अधिवेशन बेळगाव येथे घेण्यात आले. या वेळी विधानसभेत अंधश्रद्धाविरोधी विधेयक मांडण्याची सरकारची योजना होती. याविषयीची माहिती मिळताच हिंदु जनजागृती समितीच्या सदस्यांनी काँग्रेसच्या २० मंत्र्यांची भेट घेऊन त्यांना अंधश्रद्धाविरोधी विधेयकाच्या विरोधातील भूमिका पटवून देण्याचा प्रयत्न केला. हिंदु जनजागृती समितीचे समन्वयक श्री. मोहन गौडा यांनी मंत्र्यांना विधेयकातील त्रुटींची माहिती दिली. सर्व मंत्र्यांनी समितीची भूमिका ऐकून घेऊन त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला. काही मंत्र्यांनी ते या विधेयकाच्या विरोधात असल्याचे सांगितले, तर अन्य काही मंत्री हे विधेयक विधानसभेत न मांडण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे म्हणाले.

वाराणसी येथे हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता आणि अन्य धर्माभिमान्यांकडून प्रशासकीय अधिकार्‍यांना निवेदन !

ख्रिस्ती नववर्षाच्या नावाखाली ३१ डिसेंबरला होत 
असलेल्या गैरप्रकारांच्या विरोधात हिंदुत्वनिष्ठांची मोहीम
वाराणसी येथील पोलीस अधीक्षक (ग्रामीण)
आशीष तिवारी यांना निवेदन देतांना धर्माभिमानी हिंदू
     वाराणसी - ३१ डिसेंबरला नववर्ष साजरा करण्याच्या नावावर लोकांकडून हिंदु संस्कृतीचे होणारे हनन; सार्वजनिक आणि प्रेक्षणीय स्थळे तसेच तीर्थक्षेत्रे या ठिकाणी करण्यात येत असलेल्या अयोग्य कृती यांना प्रतिबंध करण्यात यावा, यासाठी येथील हिंदु धर्माभिमान्यांनी आयुक्त ओमप्रकाश चौबे, अप्पर जिल्हा दंडाधिकारी जे.एम्. सिंह आणि पोलीस अधीक्षक (ग्रामीण) आशीष तिवारी यांना निवेदन दिले. या सर्व प्रशासकीय अधिकार्‍यांनी शिष्टमंडळाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या वेळी हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता कमलेशचंद्र त्रिपाठी, अधिवक्ता संजीवन यादव, अधिवक्ता अरुण कुमार मौर्या, अधिवक्ता धर्मेंद्र सिंह, अधिवक्ता रोहनलाल भारद्वाज, अधिवक्ता रवी श्रीवास्तव, अधिवक्ता अवीन राय, अधिवक्ता जैकी शुक्ल, अधिवक्ता विनोद पाण्डेय; तसेच शीवपूर, वाराणसी येथील धर्माभिमानी श्री. राकेश गुप्ता आणि श्री. पवन गुप्ता अन् सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
क्षणचित्रे : ‘युपी न्युज’ आणि ‘के टिव्ही’ या वृत्तवाहिनींच्या प्रतिनिधींनी हिंदु जनजागृती समिती आणि अधिवक्ता कमलेशचंद्र त्रिपाठी यांच्याशी संवाद साधला (बाईट घेतली).

हिंदु जनजागृती समितीचे हिंदु राष्ट्र स्थापनेचे ध्येय सर्वश्रेष्ठ आहे ! - श्री. गोपाल दास, ज्येष्ठ नेते, विहिंप

डावीकडून सर्वश्री तुषार कांती दास,
चित्तरंजन सुराल, गोपाल दास,
डॉ. हरिचरण दास आणि बोलतांना श्री. सुमंत देवनाथ
      बिलासीपाडा (आसाम), १४ डिसेंबर (वार्ता.) - हिंदु जनजागृती समितीचे ध्येय आणि विचार स्पष्ट आहेत. माझ्या संपूर्ण जीवनात मी अशी संघटना पाहिली नाही. समिती जात, भाषा किंवा प्रांत यांमध्ये कधीच भेद करत नाही. त्यामुळे समितीसाठी हिंदु राष्ट्र स्थापनेचे ध्येय हेच सर्वश्रेष्ठ आहे. त्यांचा उद्देश नक्कीच यशस्वी होईल, असे आशीर्वादपर उद्गार विश्‍व हिंदु परिषदेचे ज्येष्ठ नेते श्री. गोपाल दास यांनी येथे काढले.
      आसामच्या बिलासीपाडा येथे अमर क्लब सभागृहात हिंदु जनजागृती समिती आणि स्थानिक हिंदु युवक यांनी एकत्र येऊन ‘हिंदूसंघटन संमेलन’ कार्यक्रमाचे आयोजन केेले होते. त्या वेळी ते बोलत होते.

शेवगाव (जिल्हा नगर) येथे दत्त जन्मोत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा

फुलांनी सजवलेल्या श्री दत्ताच्या पाळण्यासमवेत भक्तगण
श्री दत्ताची मनोहारी मूर्ती
     शेवगाव (जिल्हा नगर) - योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शेवगाव (जिल्हा नगर) येथील वैशंपायन नगरमधील श्री दत्त देवस्थानात दत्त जन्मोत्सवाचा सोहळा मंगलमय वातावरणात संपन्न झाला. थंडीतही भाविक-भक्तांची उपस्थिती लक्षणीय होती. सलग तीन दिवस भक्तीमय वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमामुळे वैशंपायन नगरमधील मातीतून जणू काही सुगंध दरवळत होता, असे भक्तांना जाणवले.
     गुरुदत्त सामाजिक संस्था संचलित श्री दत्त देवस्थानात श्री दत्त जयंतीनिमित्त श्री गुरुचरित्र या प्रासादिक ग्रंथाचे पारायण, श्री दत्त याग, ५१ लक्ष्मी-नारायण जोडप्यांकरवी सत्यदत्त, सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते.
     श्री दत्त जयंतीच्या निमित्ताने भल्या सकाळी श्री दत्तात्रेयांच्या संगमरवरी मूर्तीला पंचसूक्त पवमान अभिषेक दत्त भक्त आणि साधक समूहाच्या हस्ते घालण्यात आला.

देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात शिवगिरी महाराज यांच्या पादुका आणि दत्तपालखी यांचे चैतन्यमय वातावरणात आगमन !

पादुकांचे पूजन करतांना श्री. बलभीम येळेगांवकर
     देवद (पनवेल) - येथील सनातनच्या आश्रमात १३ डिसेंबरला दत्तजयंतीनिमित्त शिवगिरी महाराज यांच्या पादुकांचे आणि दत्तपालखीचे आगमन झाले. पारंपरिक वेशभूषेतील भाविकांच्या दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या गजराने वातावरण चैतन्यमय झाले होते. शिवगिरी महाराज यांच्या पादुका आणि दत्तगुरूंचे चित्र यांचे सनातनचे ६६ टक्के आध्यात्मिक पातळीचे साधक श्री. बलभीम येळेगांवकर यांनी पूजन केले, तर धर्मध्वज आणि धर्मदंड यांचे पूजन ६७ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. माधव गाडगीळ यांनी केले. या वेळी शिवगिरी संप्रदायाचे पू. दादा खोत आणि सनातनचे प.पू. परशराम पांडे महाराज यांची वंदनीय उपस्थिती होती. आश्रमातील प्रवेशद्वाराजवळ पालखीच्या स्वागतासाठी रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. या वेळी भाविकांना प्रसाद वाटण्यात आला. पू. दादा खोत यांच्या निवासस्थानी प्रथम दत्तगुरूंचा जन्मोत्सव साजरा झाला. त्यानंतर पालखीचे सनातनच्या आश्रमात आगमन झाले.
क्षणचित्र : पालखी येण्यापूर्वी आणि पालखी आश्रमातून निघतांना शंखनाद करण्यात आला.

२५ डिसेंबर या दिवशी जळगाव येथे होणार्‍या हिंदु जनजागृती समितीच्या हिंदु धर्मजागृती सभेला शिवसेना आणि भाजप यांच्या लोकप्रतिनिधींचा पाठिंबा !

     जळगाव येथे शिवतीर्थ पटांगणात २५ डिसेंबर या दिवशी विशाल धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्या निमित्ताने विविध लोकप्रतिनिधींना भेटून हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सभेचे निमंत्रण देण्यात येत आहे.
डावीकडून हिंदु जनजागृती समितीच्या सौ. अनिता पोळ, सनातनचे श्री. दत्तात्रेय वाघुळदे यांच्याकडून निमंत्रण स्वीकारतांना जळगाव शहराचे महापौर श्री. नितीन लढ्ढा आणि सनातनचे श्री. रवींद्र हेम्बाडे 

मोरया गोसावी यांच्या संजीवन समाधी महोत्सवास प्रारंभ

     चिंचवड - श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी यांच्या ४५५ व्या संजीवन समाधी महोत्सवास उत्साहास प्रारंभ झाला. ९ डिसेंबर या दिवशी सायंकाळी महोत्सवाचे उद्घाटनसत्र पार पडले. राज्य लोकलेखा समितीचे अध्यक्ष अधिवक्ता सचिन पटवर्धन, आळंदी येथील मारुति महाराज कुर्‍हेकर यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन झाले. या वेळी आळंदी देवस्थानाचे विश्‍वस्त डॉ. अभय टिळक, चिंचवड येथील मोरया गोसावी देवस्थानचे विश्‍वस्त श्री. मंदार महाराज देव, श्री. विश्‍वनाथ देव, नगरसेवक मोरेश्‍वर भोंडवे, अधिवक्ता संदीप चिंचवडे, नगरसेविका सौ. अश्‍विनी चिंचवडे आदी मान्यवर उपस्थित होते. संस्थानच्या वतीने १९ डिसेंबरपर्यंत विविध भक्तीमय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

अनुशासनाचा विसर पडल्याने प्रशासन लादण्याची वेळ ! - डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य

     पुणे - सध्या योगमार्गाने शरीर सोडणार्‍यांपेक्षा रोगमार्गाने शरीर सोडणार्‍यांचे प्रमाण अधिक आहे. मानव व्यसनाधीन झाल्याने त्याचा जन्म आणि मृत्यू रुग्णालयांमध्ये होत आहे. योगमार्गाने शरीर सुटण्यासाठी व्यक्तीने अनुशासन अंगीकारणे आवश्यक आहे. सध्याच्या धावपळीच्या जगात मानवाला प्रशासनाची नाही, तर अनुशासनाची आवश्यकता आहे. मानवाला अनुशासनाचा विसर पडल्याने त्याच्यावर प्रशासन लादण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन काशी विश्‍वेश्‍वराचे महास्वामी डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य यांनी केले. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर न्यासाच्या वतीने गुरुमहात्म्य पुरस्काराचे वितरण डॉ. शिवाचार्य यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी पद्मविभूषण डॉ.एच्.के. संचेती, ज्येष्ठ विधिज्ञ एस्.के. जैन, न्यासाचे अध्यक्ष अशोक गोडसे, दत्तमंदिर न्यासाचे अध्यक्ष अधिवक्ता एन्.डी. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या वेळी धार्मिक आणि आध्यात्मिक क्षेत्रातील योगदानाविषयी फुलगांवच्या श्रुतीसागर आश्रमाचे स्वामी स्वरूपानंद सरस्वती, सामाजिक क्षेत्रातील योगदानाविषयी डॉ. अनिल अवचट, ज्ञानदान क्षेत्रातील योगदानाविषयी डॉ. सुधाकर आव्हाड यांना गुरुमाहात्म्य पुरस्कार प्रदान करण्यात आला.

भ्रष्ट कारभार दिसल्यास नगरपालिका बरखास्त करणार ! - मुख्यमंत्री

मुख्यमंत्र्यांना अशी चेतावणी द्यावी लागणे, ही लोकशाहीची निरर्थकताच !
     नागपूर - नगरपालिका निवडणुकीत जिंकून आल्यानंतर त्याचा आनंद अवश्य साजरा करा; मात्र नगरपालिकेत भ्रष्टाचार अथवा चुकीची कामे केली, तर तेथील नगराध्यक्ष आणि नगरसेवक यांच्यावर कारवाई होईल, अशी चेतावणी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ज्या नगरपालिकेत भ्रष्ट कारभार दिसेल, ती बरखास्त केली जाईल. भाजप तिथल्या भ्रष्ट नेतृत्वासोबत संबंध ठेवणार नाही, असेही ते म्हणाले. (देशाला स्वातंत्र्य मिळून ६९ वर्षे झाली, तरी अजूनही भ्रष्ट कारभार करू नका, हे लोकप्रतिनिधींना सांगावे लागते, यांसारखी लज्जास्पद गोष्ट कोणती असेल ? - संपादक)      येथे ९ डिसेंबर या दिवशी नगरपालिका आणि नगर पंचायत निवडणुकीत जिंकून आलेल्या नगरसेवक अन् नगराध्यक्षांच्या सत्कार समारंभात बोलत होते. श्री. फडणवीस म्हणाले की, जनतेने जुन्यांना हटवून भाजपच्या हातात मोठ्या विश्‍वासाने सत्ता दिली आहे. तोे विश्‍वास कायम ठेवा. हा श्री. नरेंद्र मोदी यांचा पक्ष असून इथे अपकारभार खपवून घेतला जाणार नाही.

पिंपरी-चिंचवड शहर भोंगेमुक्त करणारच ! - हिंदुत्वनिष्ठांचा निर्धार

अनधिकृत कृत्यांच्या विरोधात संघटित 
होऊन आवाज उठवणार्‍या हिंदुत्वनिष्ठांचे अभिनंदन ! 
१. वाकड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक
श्रीधर जाधव (डावीकडे) यांना निवेदन देतांना धर्माभिमानी
 

२. मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक
सुनील गोडसे (उजवीकडून तिसरे) यांना निवेदन देतांना धर्माभिमानी
     पिंपरी-चिंचवड, १४ डिसेंबर (वार्ता.) - मशिदींवरील अनधिकृत भोंगे हटवण्याच्या संदर्भात उच्च न्यायालयाने अनेक वेळा आदेश देऊनही पोलीस आणि प्रशासन यांच्याकडून त्याचे पालन केले जात नाही. तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे अनधिकृत मंदिरे पाडण्यासाठी उतावीळ असलेले प्रशासन अनधिकृत भोंग्यांकडे मात्र सोयीस्कररित्या डोळेझाक करते. त्यामुळेच अनधिकृत भोंग्यांच्या प्रश्‍नावर आवाज उठवण्यासाठी शहरातील हिंदुत्वनिष्ठ संघटना एकत्रित झाल्या असून 'पिंपरी-चिंचवड शहर भोंगेमुक्त करणारच', असा निर्धार हिंदुत्वनिष्ठांनी व्यक्त केला आहे. 

विधानसभेचे कामकाज ३ वेळा स्थगित !

पशुसंवर्धन आणि दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी ! 
अशा स्थगितीमुळे जनतेच्या होणार्‍या हानीस
उत्तरदायी कोण ? वारंवार होणारी कामकाजाची स्थगिती
ही 'हिंदु राष्ट्रा'ची (सनातन धर्म राज्य) अपरिहार्यता दर्शवते !
 
     नागपूर, १४ डिसेंबर (वार्ता.) - पशुसंवर्धन आणि दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी निवडणूक अधिकार्‍यांवर दबाव टाकून काँग्रेस उमेदवाराचे आवेदन रहित करण्यास सांगितल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा प्रविष्ट झाला आहे. त्यामुळे शासनाने त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई करावी, या प्रमुख मागणीसाठी विरोधकांनी सभागृहात गोंधळ घातला. सतत तीन वेळा विधानसभेचे अध्यक्ष श्री. हरिभाऊ बागडे यांच्या समोरील मोकळ्या हौदात जाऊन विरोधी सदस्यांनी घोषणा देऊन ही मागणी रेटून धरली. त्यामुळे श्री. बागडे यांनी तीन वेळा २० ते ३० मिनिटांसाठी विधानसभेचे कामकाज स्थगित केले. (विधानसभेचे कामकाज वारंवार स्थगित करून लक्षावधी रुपयांची हानी करणार्‍या विरोधी पक्षातील आमदारांकडून झालेली हानीभरपाई वसूल करणारे राज्यकर्ते हवेत ! - संपादक) 

मुंबई येथील ‘प्राचीन भारतीय ज्ञान पद्धत’ परिसंवादात ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’चा सहभाग !

आध्यात्मिक संशोधनाचा
शोधनिबंध सादर करतांना श्री. रमेश शिंदे
      मुंबई - ‘भारतीय प्रोद्योगिकी संस्थाना’च्या (आयआयटीच्या) विद्यार्थ्यांनी भांडूप येथे आयोेेजित केलेल्या ७ दिवसांच्या ‘प्राचीन भारतीय ज्ञान पद्धत’ (Ancient Indian Knowledge Systems) परिसंवादात वेद, वेदांगे, दर्शन, उपवेद आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले, तसेच हिंदु संस्कृतीविषयीचे शोधार्थींचे वैेज्ञानिक संशोधन प्रस्तूत करण्यात आले. या परिसंवादात विविध उच्चशिक्षण देणार्‍या विश्‍वविद्यालयांचे विद्यार्थी, शोधार्थी, प्राध्यापक, तसेच हिंदु विद्या क्षेत्रात कार्यरत गुरुकुलांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालयाचे राज्यपालांच्या हस्ते लोकार्पण

     मुंबई - मुंबई महापालिकेचे विलेपार्ले येथील डॉ. रुस्तम नरसी कूपर महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय आणि जोगेश्‍वरी येथील बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालय यांच्याशी संलग्न हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालयाचे नामकरण आणि लोकार्पण राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते ११ डिसेंबर या दिवशी करण्यात आले. या वेळी शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे, महापौर सौ. स्नेहल आंबेकर, पर्यावरणमंत्री श्री. रामदास कदम यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते. या वेळी मनोगत व्यक्त करतांना राज्यपाल सी. विद्यासागर राव म्हणाले, परिचारिकांना नर्स म्हणण्याऐवजी वैद्यकीय साहाय्यक, असे संबोधण्यात यावे आणि गर्भवती महिलांना प्रसूतीसाठी त्यांच्या आवडीचे रुग्णालय निवडण्याचा अधिकार मिळावा. या दोन गोष्टींसाठी शासनाने पाठपुरावा करावा.

नकल (कॉपी) करतांना पकडणार्‍या शिक्षकाला विद्यार्थ्याकडून मारहाण !

     संभाजीनगर - परीक्षा चालू असतांना नकल करतांना पकडणार्‍या केंद्रप्रमुखांना विद्यार्थ्याने मारहाण केल्याची घटना संभाजीनगरमधील सांगवी येथील एका महाविद्यालयात घडली. अभियांत्रिकी शाखेच्या प्रथम वर्षात शिकणार्‍या गिरीश चौधरी या विद्यार्थ्याला केंद्रप्रमुख डॉ. सुनीत पिंपळे यांनी परीक्षेच्या वेळी नकल करतांना पकडल्याचा राग मनात धरून गिरीश याने अन्य चार मित्रांच्या साहाय्याने पिंपळे यांची गाडी अडवून त्यांना मारहाण केली. या मारहाणीत पिंपळे यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी हर्सूल(संभाजीनगर) पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. (कुठे गुरुदक्षिणा म्हणून स्वत:च्या उजव्या हाताचा अंगठा कापून देणारा एकलव्य आणि कुठे अपराध करण्यापासून रोखणार्‍या शिक्षकाला मारहाण करणारे विद्यार्थी ! समाजाची नीतीमत्ता ढासळल्यानेच शिक्षकांना मारहाण करण्याचे धाडस विद्यार्थी करत आहेत. ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्र अपरिहार्य आहे ! संपादक)

मराठा आरक्षणावरून विरोधकांनी केलेल्या गोंधळामुळे विधान परिषदेचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित

४ वेळा सभागृह स्थगित 
     नागपूर, १४ डिसेंबर (वार्ता.) - येथे झालेल्या मराठा समाजाच्या मूक मोर्च्याचे तीव्र पडसाद १४ डिसेंबर या दिवशीच्या विधान परिषदेच्या कामकाजात दिसून आले. सभागृहाचे कामकाज मराठा आरक्षणाच्या चर्चेवरून ४ वेळा एकूण १ घंटा १० मिनिटांसाठी स्थगित झाले. त्यानंतर चालू झालेल्या कामकाजामध्ये विरोधकांनी घोषणा देत गोंधळ करण्याचा प्रयत्न केला. अशाच परिस्थितीत सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी सभेचे कामकाज केले आणि सभा दिवसभरासाठी स्थगित केली. 

पत्रकार संरक्षण कायद्याचा मसुदा येत्या अधिवेशनात मांडू ! - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नवीन कायदा करण्यासमवेत आहे त्या कायद्यांची 
प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठीची उपाययोजना आवश्यक !  
     नागपूर, १४ डिसेंबर (वार्ता.) - पत्रकार हा लोकशाहीचा ४ था आधारस्तंभ असून त्यांच्यासाठी सरकार सकारात्मक आहे. पत्रकारांवरील आक्रमणे रोखण्यासाठी कायदा केला पाहिजे, ही शासनाची मानसिकता आहे. या कायद्यासंबंधी पत्रकार संघटनांच्याही सूचना घेतल्या असून कायद्याचा मसुदा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये संमतीसाठी ठेवू, तसेच त्यानंतर तो मसुदा येत्या मार्च अधिवेशनातही मांडू, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. काँग्रेसचे आमदार संजय दत्त यांनी पत्रकारांवर होणार्‍या आक्रमणांच्या अनुषंगाने विधान परिषदेत लक्षवेधी सूचना मांडली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी वरील उत्तर दिले. या वेळी मुख्यमंत्र्यांनी असेही सांगितले की, सरकार प्रामाणिक पत्रकारांच्या पाठीशी असून त्यांना सवलतीत घरे मिळण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेमध्येही प्रयत्न करण्यात येईल. त्याचसमवेत पत्रकारांसाठी निवृत्ती योजना देण्याचाही शासन सकारात्मक विचार करत आहे.

डोंबिवली येथे होणार्‍या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ समीक्षक डॉ. अक्षयकुमार काळे यांची निवड

     नागपूर - डोंबिवली येथे होणार्‍या ९० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ समीक्षक डॉ. अक्षयकुमार काळे यांची निवड झाली आहे. अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत त्यांना ६९२ मते मिळाली आहेत. या निवडणुकीत काळे यांच्यासह प्रसिद्ध गीतकार आणि कवी प्रवीण दवणे, मदन कुलकर्णी आणि जयप्रकाश घुमटकर हे उमेदवारही उभे होते. या वेळी झालेल्या मतदानात काळे यांना ६९२ मते, तर दवणे यांना १४२ मते मिळाली.

रिलायन्स जिओला पुणे महानगरपालिकेकडून २० कोटी रुपयांचा दंड

     पुणे - खोदाई करतांना महानगरपालिकेला इंटरनेट सुविधा पुरवण्याच्या करारातील अटींचा भंग केल्याने रिलायन्स जिओला पुणे महानगरपालिका आयुक्तांनी २० कोटी रुपये जमा करण्याचा आदेश दिला आहे. महानगरपालिकेच्या पथ विभागाने रिलायन्सला शहरात खोदाई करण्यास गेल्या वर्षी अनुमती दिली होती. त्या वेळी महानगरपालिकेच्या सर्व कार्यालयांना इंटरनेट सुविधा पुरवण्याचे बंधन रिलायन्सवर घालण्यात आले होते; मात्र रिलायन्सकडून दोन एम्बीपीएस् ऐवजी केवळ डोंगलवर सुविधा देण्यात आली. करारातील अटी आणि शर्तींचा भंग झाल्याने रक्कम जमा केल्यानंतरच खोदाईला अनुमती मिळणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

याने राष्ट्र आणि धर्म यांच्या संदर्भात जागृती होण्यासाठी साहाय्य होणार आहे का ? सरकार जनतेचे पैसे उगाच का उधळते ?

     गोवा राज्य १०० टक्के तंत्रज्ञानयुक्त करण्याच्या योजनेच्या अंतर्गत गोवा शासनाने ५.१२.२०१६ या दिवशी युवा संवाद योजनेचा पणजी आणि मडगाव येथे शुभारंभ केला. या योजनेच्या अंतर्गत १६ ते ३० वर्षे वयोगटातील युवक-युवतींना ई-वॉलेट सुविधा, दरमहा मोफत १०० मिनिटे टॉक टाइम आणि ३ जीबी इंटरनेट डेटा मिळणार आहे. यासाठी व्होडाफोन कंपनी प्रति व्यक्ती १२४.९० रुपये शासनाकडून आकारणार आहे.

जोपर्यंत जनता सात्त्विक होत नाही, तोपर्यंत नोटा पालटण्यासारख्या वरवरच्या उपायांचा काही परिणाम होणार नाही, हे सरकारला कळत कसे नाही ?

     ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या नोटा रहित झाल्यानंतर ३.१२.२०१६ पर्यंत अधिकोषांमध्ये ९ लाख ८५ सहस्र कोटी रुपये जमा झाले आहेत. ही सर्व रक्कम ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या नोटांच्या स्वरूपात आहे. जुन्या नोटा जमा करण्याची मुदत ३०.१२.२०१६ पर्यंत आहे, तोपर्यंत उर्वरित साडेचार लाख कोटी रुपये जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे काळा पैसा फिरवण्याच्या अनेक वाटा तातडीने रोखल्या नाहीत, तर बराचसा काळा पैसा हुशारीने पांढरा केला जाण्याची शक्यता आहे, अशी भीती केंद्रीय अर्थमंत्रालयातील अधिकारी व्यक्त करत आहेत. वैद्यकीय क्षेत्र, शिक्षण क्षेत्र, सोन्याचा मोठा व्यापार, भूमी खरेदी-विक्रीचे व्यवहार, बांधकाम उद्योग यांच्या व्यवहारांवर नियंत्रण मिळवले नाही, तर काळा पैसा शोधून काढण्याची मोहीम यशस्वी होणार नाही, असेही तज्ञांचे म्हणणे आहे.

नवी मुंबई महापालिकेची मेल आणि 'अ‍ॅप'वरून तक्रारींचे निवारण करणारी यंत्रणा कार्यान्वित !

     नवी मुंबई, १४ डिसेंबर - नवी मुंबई महापालिकेमध्ये आता ई-मेल आणि 'अ‍ॅप'वरून नागरिकांना तक्रार करता येणार आहे. तक्रारींचे निवारण संबंधित अधिकार्‍यांच्या पातळीवर केले जाईल. तक्रारींची दाखल त्वरित घेतली गेली नाही, तर ती तक्रार वरिष्ठ अधिकार्‍यांकडे आपोआप वर्ग होणार आहे. वरिष्ठ अधिकार्‍यांकडेही तक्रार पडून राहिल्यास ती थेट आयुक्तांकडे जाईल. या प्रक्रियेत कुणा अधिकार्‍याकडून तक्रारीची योग्य दखल घेतली गेली नाही, तर दोषी अधिकार्‍यांवर आयुक्तांकडून कारवाई केली जाणार आहे. महापालिकेच्या संकेतस्थळ आणि भ्रमणध्वनी अ‍ॅपवर ही सुविधा उपलब्ध आहे. या सुविधेमुळे आता एकदा कळ दाबून परवाने, तसेच जन्मनोंद या सेवा उपलब्ध होणार आहेत.

राज्यात साडेसहा वर्षांत २०९ पोलिसांची आत्महत्या

जनतेचे रक्षण करणारे पोलीस मनाने सक्षम असणे आवश्यक आहे. 
मनोबल वाढण्यासाठी साधना शिकवणारी शिक्षणप्रणाली देणारे हिंदु राष्ट्रच हवे ! 
     मुंबई, १४ डिसेंबर (वार्ता.) - मागील साडेसहा वर्षांमध्ये राज्यातील २०९ पोलिसांनी आत्महत्या केली आहे. आत्महत्या करणार्‍यांमध्ये ३९ पोलीस अधिकार्‍यांचा समावेश आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर गृहविभागाने पोलीस कर्तव्यावर असतांना त्यांनी केलेल्या आत्महत्यांचा अहवाल केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून प्राप्त केला आहे. यामध्ये ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे. पोलिसांच्या आत्महत्यांमागे कामाचा अतिरक्त ताण, वरिष्ठ आणि सहकारी यांच्याकडून होणारी पिळवणूक, कौटुंबिक कलह ही कारणे पुढे आली आहेत. पोलिसांच्या प्रलंबित समस्या आणि कामाचा ताण दूर करण्याची ग्वाही राज्यकर्ते आणि वरिष्ठ अधिकारी यांच्याकडून वारंवार दिली जात असली, तरी प्रत्यक्षात त्यांच्यातील स्वस्थता आणि मानसिक ताण वाढत चालल्याने त्यांच्या आत्महत्येच्या वाढत्या प्रकारामुळे स्पष्ट झाले आहे.

'वरदा' चक्रीवादळामुळे एअरटेल आणि वोडाफोन यांच्या इंटरनेट गतीवर परिणाम !

     चेन्नई - 'वरदा' चक्रीवादळाचा इंटरनेट सेवेवरही परिणाम झाला आहे. एअरटेलने त्यांच्या ग्राहकांना यासंबंधी संदेश पाठवत पुढील काही दिवस इंटरनेट गतीवर परिणाम होईल, असे सांगितले आहे. एअरटेलने यासंबंधी पत्रक प्रसिद्धीसाठी दिले आहे. यात म्हटले आहे की, 'वरदा'मुळे समुद्राखालील केबल्सची हानी झाली आहे. आमचे अभियंते समस्या सोडवण्यासाठी आणि सेवा पुन्हा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

विधानसभेतील आमदारांचा गोंधळ पाहून अमेरिकी वाणिज्यदूत अवाक् झाले !

  • विधानसभेत गोंधळ घालून परदेशातील वाणिज्य दुतासमोर देशाची अपकीर्ती करणारे सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी लोकशाहीसाठी लज्जास्पद ! 
  • स्वातंत्र्याच्या ६९ वर्षांनंतर विधीमंडळात गोंधळ घालणारे लोकप्रतिनिधी लोकशाहीची निरर्थकताच स्पष्ट करतात !

     नागपूर, १४ डिसेंबर (वार्ता.) - विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशनाचे कामकाज पहाण्यासाठी अमेरिकेचे मुंबईतील वाणिज्यदूत क्रिस्टोफर ग्रॉसमन हे १३ डिसेंबर या दिवशी विधान भवनात आले होते. वरिष्ठ अधिकार्‍यांकडून स्वागत स्वीकारल्यानंतर ते कामकाजाची पाहणी करण्यासाठी विधानसभेच्या प्रेक्षक दालनात येऊन बसले; मात्र त्या वेळी दुग्धविकासमंत्री महादेव जानकर याच्या त्यागपत्राच्या मागणीवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी सभागृहात गोंधळ घातला होता. आमदारांकडून कामकाजात वारंवार व्यत्यय आणून शासनाच्या विरोधात घोषणाबाजीही केली जात होती. त्यामुळे नेमके काय चालले आहे, हे क्रिस्टोफर यांना समजत नव्हते. सोबतच्या अधिकार्‍यांकडून ते माहिती मिळविण्याचा प्रयत्न करत होते. आमदारांनी गोंधळ घातल्याची माहिती त्यांना समजल्यावर गोंधळामुळे ते अचंबित झाल्याचे त्यांच्या चेहर्‍यावरून जाणवत होते, कारण अशा कामकाजाचा अनुभव त्यांना अमेरिकेच्या विधिमंडळात आलेला नव्हता !

हिंदूंची दु:स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना हाच एकमेव उपाय ! - सौ. मधुरा तोफखाने, हिंदु जनजागृती समिती

दीपप्रज्वलन करतांना डावीकडून
सौ. गौरी खिलारे आणि सौ. मधुरा तोफखाने
कौलगे (जिल्हा सांगली) येथील हिंदु धर्मजागृती सभेसाठी ३०० हून अधिक हिंदूंची उपस्थिती
     कौलगे (जिल्हा सांगली), १४ डिसेंबर (वार्ता.) - आज हिदूंच्या मंदिरांचा पैसा अन्य धर्मियांना देण्यात येत आहे. हिंदूच्या सणांच्या वेळी कायद्याचा बडगा दाखवणारे शासन अन्य धर्मियांवर तशी कारवाई करत नाहीत. आज हिंदूंची जी दु:स्थिती झाली आहे, ती दूर करण्यासाठी हिंदु राष्ट्राची निर्मिती करणे हाच उपाय आहे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीच्या सौ. मधुरा तोफखाने यांनी केले. येथील श्री हनुमान मंदिरासमोर पार पडलेल्या हिंदु धर्मजागृती सभेत त्या बोलत होत्या. या सभेत रणरागिणी शाखेच्या सौ. गौरी खिलारे यांनीही मार्गदर्शन केले. या सभेसाठी ३०० हून अधिक हिंदु धर्माभिमानी उपस्थित होते.
     या वेळी सौ. गौरी खिलारे म्हणाल्या, ‘‘शौर्याने ओतप्रत भरलेला इतिहास असतांना तो आपल्याला शिकवला जात नाही. त्याचाच परिणाम म्हणून इसिस आणि आतंकवाद यांचे संकट आपल्यासमोर आहे. संकटांना सामोरे जाण्यासाठी शौर्यजागरण करण्याची आवश्यकता आहे.’’

फलक प्रसिद्धीकरता

राहुल गांधी बोफोर्स आदी प्रकरणांतील पुरावे का सादर करत नाहीत ?
     माझ्याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची तपशीलवार माहिती आहे. मला हे सगळे लोकसभेत मांडायचे आहे; मात्र मला सभागृहात बोलू दिले जात नाही, असा दावा काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत केला.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! -Mere paas Pradhanmantri Narendra Modi ke bhrashtachar ki jaankari hai - Rahul Gandhi
Bofors, 2G scam adipar Gandhi pehle kyon nahi bolte ?

जागो ! -  मेरे पास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के भ्रष्टाचार की जानकारी है ! - राहुल गांधी
बोफोर्स, २ जी स्कैम आदि पर गांधी पहले क्यों नहीं बोलते ?

नागपूर येथे मराठा-कुणबी समाजाचा भव्य मूक मोर्चा !

     नागपूर - मराठा समाजाला आरक्षण द्यावे, नगरमधील कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशी द्यावी आणि अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात पालट करावे, या प्रमुख मागण्यांसाठी मराठा-कुणबी समाजाच्या वतीने १४ डिसेंबर या दिवशी शहरातून शिस्तबद्धपणाने भव्य मूक मोर्चा काढण्यात आला. 
     विशेष म्हणजे एकीकडे मूक मोर्चा निघाला असतांना दुसरीकडे विधान परिषदेत मराठा आरक्षणावरील चर्चा चालू होती. सत्ताधारी पक्षांसोबत विरोधकांनी मोर्च्यात सहभाग घेतला. यावरून त्यांत श्रेयासाठी लढाई चालू असल्याचे चित्र दिसून आले. 

वरदा वादळामुळे गोव्यात पुढील काही दिवस पाऊस पडण्याची शक्यता

     पणजी, १४ डिसेंबर (वार्तां.) - अरबी समुद्रात निर्माण झालेल्या वरदा चक्रीवादळामुळे गोव्यातील वातावरणात पालट झाला. १४ डिसेंबर या दिवशी गोव्यात दमट वातावरण होते. काही ठिकाणी पाऊस पडला. पुढील काही दिवस राज्यात तुरळक पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तमिळनाडूमध्ये आलेल्या या वादळामुळे आतापर्यंत १८ जणांचा मृत्यू होऊन कोट्यवधी रुपयांची हानी झाली आहे.

पाककडून मोबाईल अ‍ॅपमधून हेरगिरी !

डावपेचात भारतापेक्षा हुशार असणार पाक !
 ४ अ‍ॅप डिलीट करण्याचे सरकारचे आवाहन ! 
     नवी देहली - 'टॉप गन' (गेम अ‍ॅप), 'एम्पीजंक '(म्यूजिक अ‍ॅप), 'व्हिडिजंक' (व्हिडिओ अ‍ॅप) आणि 'टॉकिंग फ्रॉग' (एंटरटेन्मेंट अ‍ॅप) हे ४ अ‍ॅप भ्रमणभाषमध्ये असतील, तर ते त्वरित डिलीट करा, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्रालयाने केले आहे. या अ‍ॅपद्वारे पाकिस्तान व्हायरस पाठवून गोपनीय माहिती मिळवून हेरगिरी करत आहे, असे समोर आले आहे. देशातील सर्व सुरक्षा यंत्रणा आणि राज्यांच्या गुप्तचर यंत्रणा यांना पत्र लिहून काही ठराविक मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड न करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

बीडमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीवरून २ बस फोडल्या

कायदा-सुव्यवस्थेचा धाक संपल्याचे लक्षण ! 
     बीड, १४ डिसेंबर - मराठा समाजाला आरक्षण मिळावे आणि त्या मागणीची शासनाने गंभीर नोंद घ्यावी, या कारणाने येथील संतप्त जमावाने दगडफेक करून राज्य परिवहन महामंडळाच्या २ बस फोडल्या. ही घटना १४ डिसेंबर या दिवशी येथील मादळमोहीत आणि गेवराई येथे दुपारच्या कालावधीत घडली आहे. बसची तोडफोड करणार्‍या एकूण १९ मराठा तणांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावर गुन्हा प्रविष्ट केला आहे.

ऑस्ट्रेलियात १०० डॉलरच्या नोटेवर बंदी !

     मेलबर्न - भारताने ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या नोटांवर बंदी घातल्यानंतर व्हेनेझुएला देशानेही नोटाबंदीचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता ऑस्ट्रेलियानेही असा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियाने १०० डॉलरची नोट बंद करण्याचे घोषित केले आहे. काळ्या धनावर कारवाई होण्याच्याच उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियामध्ये ५० आणि १०० डॉलरच्या नोटांचे एकूण चलनात ९२ टक्के प्रमाण आहे.

राष्ट्ररक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांप्रमाणे सिद्ध व्हा ! - कु. प्रतीक्षा कोरगावकर, महाराष्ट्र राज्य संघटक, रणरागिणी

डावीकडून सौ. कल्पना देशपांडे, दीपप्रज्वलन करतांना
ह.भ.प. छत्रगुण महाराज आणि कु. प्रतीक्षा कोरगावकर
धर्मासाठी सर्वस्व अर्पण करण्याचा डायगव्हाणवासियांचा (संभाजीनगर) निर्धार !
    डायगव्हाण (संभाजीनगर) - धर्महानीसमवेत सामाजिक दुष्प्रवृत्तींना रोखणे ही काळाची आवश्यकता झाली आहे. त्यासाठीच आता आपण संघटित होऊन भ्रष्टाचारासारख्या इतरही सर्व सामाजिक दुष्प्रवृतींना रोखण्यासाठी कटीबद्ध झाले पाहिजे. हिंदुत्वनिष्ठ संघटनांची अपकीर्ती, हिंदुत्वनिष्ठ नेत्यांच्या हत्या, गोहत्या, धर्मांतर यांसारखे हिंदु धर्मावरील आघात रोखण्यासाठी आता हिंदु राष्ट्र स्थापण्याविना दुसरा पर्याय नाही. यासाठीच आता हिंदूंनी राष्ट्ररक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांप्रमाणे सिद्ध व्हायला हवे, असे प्रतिपादन रणारागिणी शाखेच्या महाराष्ट्र राज्य संघटक कु. प्रतीक्षा कोरगावकर यांनी केले. कु. प्रतीक्षा कोरगावकर यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत ‘डायगव्हाण गावातील प्रत्येक युवक हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी आता कटीबद्ध होईल’, असा निर्धार येथील युवकांनी डायगव्हाण येथे ११ डिसेंबर या दिवशी पार पडलेल्या हिंदु धर्मजागृती सभेनंतर केला.

लोकप्रतिनिधींना मद्यबंदीपेक्षा कोट्यवधी रुपयांचा महसूल हवा !

    सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यामुळे आता देशातील राष्ट्रीय महामार्गांवरील मद्याच्या दुकानांना टाळे लावण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने केंद्राच्या धोरणाला पाठिंबा देत देशभरातील मुख्य मार्गांवरील मद्याची दुकाने हटवण्याचे आदेश कधीही देऊ शकतो, असे म्हटले आहे. प्रतीवर्षी देशात १.४२ लक्ष लोक रस्ते अपघातात जीव गमावतात. अनेकांचे मृत्यू मद्य पिऊन गाडी चालवल्याने होत आहेत, असा दावा ‘अराईव्ह सेफ’ या संस्थेने केला आहे.

एर्नाकुलम्, केरळ येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्‍या पाद्य्राला जन्मठेपेची शिक्षा !

हिंदूंच्या साधूसंतांवर कथित आरोप लावून त्यांची यथेच्छ निंदानालस्ती करणार्‍या निधर्मी प्रसारमाध्यमांना वासनांध ख्रिस्ती पाद्य्रांनी केलेले लैंगिक अत्याचार दिसत नाहीत कि ते मुद्दामहून त्याकडे दुर्लक्ष करतात ?
     कोची (केरळ) - १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर सातत्याने बलात्कार केल्याप्रकरणी एर्नाकुलम्च्या स्थानिक न्यायालयाने थ्रिशूर येथील कॅथॉलिक पाद्री फादर एडविन पिगारेज यांना २ वेळा जन्मठेप आणि २ लाख रुपये दंड शिक्षा सुनावली. पिगारेज यांची शिक्षा येथेच संपत नाही, त्यांना ‘पॉक्सो’ कायद्याच्या अंतर्गत ३ वर्षे सश्रम कारावास आणि ५ सहस्र रुपयांच्या दंडाची शिक्षाही ठोठावण्यात आली आहे. या दोन्ही शिक्षा त्यांना एकाच वेळी भोगायच्या आहेत. याप्रकरणी सुनावणी करतांना न्यायालयाने सांगितले की, आरोपी एक पाद्री आहे. त्यांचे जीवन सामान्य लोकांच्या दृष्टीने आदर्श असले पाहिजे. याऊलट पिगारेज यांनी त्यांच्या पदाचा अपवापर केला आहे. पिगारेज यांनी त्यांच्या घरात जे घृणास्पद कृत्य केले त्यामुळे पीडिताच नव्हे, तर ज्या समाजाने त्यांच्यावर विश्‍वास ठेवला, त्या समाजाचाही त्यांनी विश्‍वासघात केला आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे.

संस्कृत कार्यक्रमाच्या प्रसारासाठी संस्कारहीन उपक्रम राबवणारी दूरदर्शन वृत्तवाहिनी !

श्री. धैवत वाघमारे
      ‘डीडी न्यूज’ या वृत्तवाहिनीने संस्कृत वार्तापत्राच्या प्रसारासाठी एका स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेअंतर्गत दर्शकांना ‘परदेस’ या चित्रपटातील ‘दो दिल मिल रहे हैं ।’ गीताचा संस्कृतमध्ये अनुवाद करून १९.१२.२०१६ पर्यंत इ-मेल पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यातून संस्कृत भाषेला मृत घोषित करून देशावर इंग्रजी थोपणार्‍या राजकारण्यांचे अनुकरणच दूरदर्शन करत आहे. भारतियांना संस्कृत भाषा शिकवून सुसंस्कृत करण्याऐवजी चित्रपटगीतांचा संस्कृतमध्ये अनुवाद करण्यासारखे संस्कारहीन उपक्रम राबवणारी भारताची अधिकृत वाहिनी आणि देशाला प्रगतीपथावर नेण्याची भाषा करणारे राजकारणी यातून नेमका कोणता विकास साधू इच्छितात ? ही परिस्थिती हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची अपरिहार्यता स्पष्ट करते !’ - श्री. धैवत विलास वाघमारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.१२.२०१६)

इंडियन मुजाहिद्दीनपेक्षा मुसलमान युवकांना आकर्षित करण्याचा ‘इसिस’चा वेग अधिक ! - आतंकवादविरोधी पथक

आतंकवादविरोधी पथक यांना रोखण्यासाठी काय करणार कि त्यांचे ‘प्रबोधन’ करून सोडून देणार ?
      मुंबई, १४ डिसेंबर (वार्ता.) - ‘इसिस’कडून इंटरनेटचा प्रभावी वापर करून मुसलमान युवकांना आतंकवादी कारवायांकडे पद्धतशीरपणे आकर्षित करण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणात चालू आहे. इंटरनेटवरील संकेतस्थळ बंद केले तरी दुसर्‍या संकेतस्थळाची निर्मिती केली गेली आहे. ‘स्टुडन्ट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया’ (सिमी) किंवा इंडियन मुजाहिद्दीन या आतंकवादी संघटनांना मुसलमान युवकांना आकर्षित करण्यासाठी ९ - १० मास इतका कालावधी लागत होता; मात्र इस्लामिक स्टेट ऑफ इराक आणि सीरिया म्हणजेच ‘इसिस’ला मुसलमान युवकाला आकर्षित करण्यासाठी केवळ ४० दिवसांचा कालावधी लागत आहे, अशी माहिती राज्याच्या आतंकवादीविरोधी विभागाकडून चालू असलेल्या अन्वेषणात उघड झाले आहे.

राज्योत्सव कसा साजरा करायचा, हेही आता जनतेला शिकवायला हवे !

    ‘१ नोव्हेंबर या दिवशी कर्नाटक राज्योत्सवाच्या मिरवणुकीतील ‘डीजे’ चे आवाज, हिडीस नाच, अर्वाच्य गाणी सकाळी ११ ते रात्री ११ पर्यंत बेळगावात सर्वत्र ऐकू येत होते.’ - एक साधिका
    ‘आज पापस्तानादि शत्रू पक्षांनी हिंदुस्थानात घुसवलेल्या पंचस्तंभीय घातपाती आणि भ्रष्टाचारी देशद्रोह्यांच्या प्लेगला नष्ट करण्यासाठी, तसेच पवित्र सिंधु नदीला मुक्त करण्यासाठी अखंड बलसंपन्न हिंदुस्थान निर्मिण्याकरता कृतीशील राहूया !’ - प्रज्वलंत, (२२.६.२००२)

साधकांना आपलेसे करून त्यांच्यासमोर परिपूर्ण सेवेचा आदर्श ठेवणारे सनातनचे २६ वे संत पू. सदाशिव (भाऊ) परब !

 पू. सदाशिव (भाऊ) परब
     देवद आश्रमात पू. भाऊकाकांसारखी संतरत्ने, म्हणजे अनेक गुणांचा समुच्चय असणारी खाण आहे. त्यांच्या समवेत सेवा करणार्‍या साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये देत आहोत.
१. शिस्त 
     ‘पू. भाऊकाकांचे संपूर्ण दिवसाचे नियोजन ठरलेले असते. ते नियमित पहाटे लवकर उठून अर्धा घंटा चालून नंतर अर्धा घंटा योगासने करतात. त्यांच्या या नियोजनात कधीही खंड पडत नाही. त्यांच्या प्रत्येक कृतीत सातत्य असते. प.पू. पांडे महाराजांनी सांगितलेली प्रार्थनेची वेळ ते कधीही विसरत नाहीत. प्रार्थना करायच्या वेळेच्या आधी अर्धा मिनीट येऊन ते उभे रहातात.’
- कु. शशिकला आचार्य, कु. श्‍वेता पट्टणशेट्टी, कु. नलिनी राऊत आणि सौ. राधा साळोखे

विविध आध्यात्मिक गुणांनी युक्त असलेल्या आणि ‘ज्यांच्याकडून सर्वांनीच शिकावे’, असा चैतन्याचा स्रोत असलेल्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ !

सद्गुरु
(सौ.) अंजली गाडगीळ
१. सहजता 
    ‘सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ या सगळ्यांना शिकण्याचा एक स्रोत आहेत. त्यांच्या वागण्या-बोलण्यात सहजता आहे. त्या स्वतःच्या व्यक्तीमत्त्वाचे वेगळे अस्तित्व जपत नाहीत. त्या सहजतेने सगळ्यांमध्ये मिसळून जातात. 
२. प्रत्येक कृतीचे अध्यात्मीकरण करून 
स्वतःच्या आचरणातून इतरांना शिकवणे 
    सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ प्रत्येक कृतीचे अध्यात्मीकरण करून सर्व कृती सहजतेने करतात. त्यांनी पूर्णवेळ साधनेला आरंभ केला, तेव्हापासून त्यांचा हा गुण पहायला आणि शिकायला मिळाला. प्रत्येक गोष्टीचे अध्यात्मीकरण
सौ. रंजना गडेकर
करण्यास शिकणार्‍या आणि इतरांनाही ते आत्मसात करण्यास शिकवणार्‍या त्याच आहेत. या कृतींचे पैलू आपल्या आचरणातून इतरांना शिकवणे, हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. त्या वेळी अनेक संतांनी त्यांना ज्या ज्या सेवा सांगितल्या, त्या त्यांनी शिकून घेतल्या होत्या. आरंभी त्यांनी आश्रमात शूद्र वर्णाची सेवाही केली आहे. 
३. चतुर, सतर्क, संवेदनशील आणि तत्पर 
    त्या चतुरही आहेत. त्या एकाच कार्यपद्धतीत कार्यरत न रहाता प्रत्येक गोष्टीत तन्मयता ठेवतात. त्या कार्य करतांना मनाच्या स्तरावर पुष्कळ सतर्क आणि संवेदनशील असून तत्पर असतात. सर्वकाही करूनही त्या वर्तमानात असतात. त्यांच्यासह सेवा करतांना सर्वांनाच आनंद मिळतो. त्या आपुलकीने सर्वांची काळजी घेतात. त्या प.पू. डॉक्टरांच्या सात्त्विकतेचा लाभ करवून घेण्यासाठी प्रयत्नशील असतात. त्यांना अपेक्षित असे त्यांचे आचरण असते.

शाश्‍वत सत्य शेष रहाते आणि शाश्‍वताला धरून गेल्यावरच जीवनाची नौका पार होऊ शकते !

प.पू. पांडे महाराज यांचे अनमोल विचारधन 
प.पू. परशराम पांडे महाराज
       ‘सत्यमेव जयति ।’, म्हणजे ‘सत्याचा विजय होतो.’ सत्यासमोर सर्वकाही खोटे आहे; कारण सत्य शाश्‍वत आहे. आपण काय करतो, तर असत्याला सत्य समजून चालतो. असत्याला सत्य समजूनच आपले आतापर्यंतचे जीवन व्यतित झाले आहे. निखळ सत्य न कळल्यामुळे आपले सहस्रो (हजारो) जन्म झाले. वयोमान आणि कालपरिस्थितीला अनुसरून प्रत्येकाचे जे गट बनतात, त्याला सत्य समजून प्रत्येक जीव जीवन कंठतो. 
१. जसे लहानपणी खेळणी, खेळ वा मित्रमंडळी हेच सत्य समजून चालतो. त्या वेळेचे वागणे ‘बरोबरच आहे’, असे समजून तो वागतो. 
२. मोठे झाल्यावर नोकरीच्या निमित्ताने जे काही मित्रमंडळ वा काम चालते, तेच वातावरण सत्य समजून वागतो. असे जीवन होता होता संपून जाते.

सप्तर्षि जीवनाडीत सांगितल्याप्रमाणे सनातनच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांचा अहर्निष प्रवास !

    महर्षींची शिकवण आणि कार्य !
    ‘सनातनच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ मागील ४ वर्षांपासून भारतभरातील विविध राज्यांत दौर्‍यावर जात आहेत. हिंदु राष्ट्राची (सनातन धर्म राज्याची) शीघ्रतेने स्थापना व्हावी, राष्ट्र, धर्म, तसेच साधक यांचे रक्षण व्हावे आणि देवतांचा आशीर्वाद मिळावा, यासाठी सप्तर्षि जीवनाडीत सांगितलेल्या क्षेत्री जाण्याचे त्यांचे नियोजन असते. आतापर्यंत त्यांनी २४ राज्यांतील प्रवास करून तेथील वैशिष्ट्यपूर्ण दगड, माती, तीर्थ आदींचा संग्रह केला आहे. त्यांनी नोव्हेंबर २०१६ पर्यंत ३ लक्ष ५६ सहस्र कि.मी. एवढा प्रवास करून भावी पिढीसाठी भारतातील अलौकिक समृद्ध ठेवा संग्रहित केला आहे. या दैवी प्रवासाची सर्वांना माहिती व्हावी, यासाठी हे सदर प्रसिद्ध करत आहोत.’

सौ. शोभा कौलकर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे जावई श्री. अजित तावडे यांनी लिहिलेले काव्य

सौ. शोभा कौलकर
व्यष्टीसह समष्टी साधना करून । 
जा तू गुरुचरणांसी सत्वर ॥
‘न ऋण जन्मदात्रीचे फिटे’ ।
सांगून गेले प्रभु श्रीराम ।
सनातनच्या या मातेचे ।
आम्हावर ऋण असे अमाप ॥ १ ॥

साधनेत स्वतःस झोकूनी देऊनी ।
पतीसह कन्येस साधनारत करूनी ।
पुत्रास अर्पिले राष्ट्र-धर्म कार्या ।
श्रीगुरूंवर दृढ श्रद्धा ठेवूनी ॥ २ ॥

जामसंडे, देवगड (सिंधुदुर्ग) येथील सनातनचे साधक श्री. शेखर इचलकरंजीकर यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

श्री. इचलकरंजीकर यांना परात्पर
गुरु डॉ. आठवले यांची प्रतिमा देऊन
सत्कार करतांना श्री. हेमंत मणेरीकर (डावीकडे)
      ‘श्री. शेखर इचलकरंजीकर यांनी घरी केवळ ते आणि त्यांची पत्नी रहात असतांना पत्नीला घरी साहाय्य करून आणि उतारवयात साधना करून ६१ टक्के पातळी गाठून सर्व साधकांपुढे विशेषतः वयोवृद्ध साधकांपुढे एक आदर्श ठेवला आहे. ‘त्यांची प्रगती उत्तरोत्तर अशीच जलद गतीने होवो’, अशी भगवान श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना !’ - (परात्पर गुरु) डॉ. आठवले 
     देवगड - जामसंडे, देवगड येथील सनातनचे साधक श्री. शेखर इचलकरंजीकर (वय ७१ वर्षे) यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे त्यांच्या येथील निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमात सनातनच्या सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी भ्रमणभाषद्वारे १३ डिसेंबर या दिवशी घोषित केले. त्यानंतर ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले हिंदु जनजागृती समितीचे श्री. हेमंत मणेरीकर यांनी श्री. इचलकरंजीकर यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांची प्रतिमा देऊन सत्कार केला.

कु. राजश्री सखदेव यांना रामनाथी आश्रमासंदर्भात आलेल्या अनुभूती

१. रामनाथी आश्रम व्यापक झाल्याचे जाणवणे 
     ‘१२.११ ते ५.१२.२०१६ या कालावधीत मी आश्रमातून घरी गेले होते. वर्ष २०११ नंतर मी पहिल्यांदाच आश्रमाबाहेर गेले होते. आश्रमात आल्यानंतर ध्यानमंदिर, भोजनकक्ष आणि ग्रंथ कक्ष आकाराने मोठे झाल्याचे जाणवले. त्यानंतर मी आश्रमाच्या ज्या ज्या भागात जाईन, तो प्रत्येकच भाग पहिल्यापेक्षा व्यापक झाल्याचे जाणवले.
२. ध्यानमंदिरातील सनातन-निर्मित देवतांच्या चित्रांमधील देवता अधांतरी असल्याचे दिसणे 
      १२.१२.२०१६ या दिवशी मी स्तोत्रपठणासाठी ध्यानमंदिरात देवतांच्या अगदी समोरच बसले होते. त्यामुळे सर्व देवतांची चित्रे अगदी जवळून पहायला मिळाली. ती पहात असतांना लक्षात आले, ‘सनातन-निर्मित देवतांची सर्वच चित्रे अधांतरी दिसत आहेत. त्यातल्या त्यात हनुमानाचे चित्र अधांतरी असल्याचे अगदी स्पष्ट दिसते. काही चित्रांत देवतांनी त्यांचे चरण कशावर तरी ठेवलेले आहेत, उदा. श्रीरामाच्या चित्रात त्याचे चरण चौरंगावर आहेत. तरी श्रीराम अधांतरी बसल्याचे दिसतो.’ - कु. राजश्री सखदेव, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.१२.२०१६)

श्री. अमोल बधाले यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त व्यक्त केलेली कृतज्ञता !

      ‘माझ्या वाढदिवसानिमित्त १४ डिसेंबरला दैनिक सनातन प्रभातमध्ये साधकांनी त्यांना माझ्यासंदर्भात जाणवलेली गुणवैशिष्ट्ये लिहून दिली आहेत. हे वाचल्यावर ‘माझा अहं वाढायला नको’, असे वाटले. ज्या साधकांनी माझी गुणवैशिष्ट्ये लिहून दिली आहेत, त्यांच्यातील प्रेमभाव, शिकण्याची वृत्ती आणि निरीक्षणक्षमता हे गुण शिकायला मिळाले. हे गुण माझ्यात नाहीत. त्यामुळे ते निर्माण करण्यासाठी मला प्रयत्न करायचे आहेत. ज्यांनी ही गुणवैशिष्ट्ये लिहून दिली, ते साधक माझ्यापेक्षा किती श्रेष्ठ आणि पुढच्या टप्प्याचे आहेत, हे माझ्या लक्षात आले. त्यांच्यासारखे मला पुष्कळ प्रयत्न करायचे आहेत. ज्या साधकांनी माझ्यासंदर्भातील गुणवैशिष्ट्ये लिहून दिली, त्यांच्याबद्दल कृतज्ञता आणि गुरुचरणी वाढदिवसानिमित्त साष्टांग नमस्कार !’ - अमोल बधाले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.१२.२०१६)

उतारवयातही चिकाटीने प्रयत्न करून स्वतःत पालट केेलेले श्री. शेखर इचलकरंजीकर !

१. ‘त्यांच्यात स्वतःत पालट करण्याची तळमळ वाढली आहे. 
२. त्यांची खाण्याची आवड-निवड अल्प झाली आहे.’ - सौ. मीनाक्षी इचलकरंजीकर (पत्नी)
३. तत्परता
    ‘पूर्वीच्या तुलनेत बाबांची कृतीशीलता, सतर्कता आणि तत्परता वाढली आहे. बाबा ‘कोणतेही काम किंवा सेवा अल्प वेळेत कशी होईल’, असा विचार करून तत्परतेने कृती करतात.’ - सौ. भाग्यश्री देशमाने, (मुलगी) कराड, सातारा.
४. काटकसरी
    ‘ते पूर्वी वैयक्तिक लिखाणासाठी नव्या कोर्‍या वह्या वापरत असत. आता ते जुन्या आणि पाठकोर्‍या वह्या वापरतात.’ - सौ. मीनाक्षी इचलकरंजीकर

प्रेमळ, मनमिळाऊ आणि धार्मिक ग्रंथ वाचण्याची आवड असलेली ५१ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली वॉशिंग्टन येथील कु. पूर्वी अरविंद (वय ९ वर्षे) !

उच्चलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र 
(सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. पूर्वी अरविंद एक दैवी बालक आहे !
कु. पूर्वी अरविंद
     अमेरिकेतील वॉशिंग्टन येथे रहाणारी कु. पूर्वी अरविंद हिचा मार्गशीर्ष कृष्ण पक्ष द्वितीया (१५.१२.२०१६) या दिवशी वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आईला तिची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये देत आहोत.
पालकांनो, हे लक्षात घ्या ! 
     ‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ - (परात्पर गुरु) डॉ. आठवले 
     यासमवेतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.
कु. पूर्वी अरविंद हिला वाढदिवसानिमित्त 
सनातन परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा !

सनातनचे ग्रंथ आणि लघुग्रंथ यांची अद्ययावत सूची प्रसारासाठी उपलब्ध !

साधकांना सूचना !
     सनातन संस्थेच्या वतीने प्रकाशित केलेले सर्व ग्रंथ आणि लघुग्रंथ यांच्या ए ४ आकारातील अद्ययावत सूची प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या सूची दोन प्रकारांत उपलब्ध आहेत.
१. प्रकार १ : ही सूची केवळ मराठी भाषेतील ग्रंथांची आहे. यामध्ये ग्रंथांच्या नावापुढे केवळ पृष्ठसंख्या आणि मूल्य दिले आहे.
२ प्रकार २ : ही सूची मराठीसह अन्य सर्व भाषांतील ग्रंथांची आहे. या सूचीमध्ये ग्रंथ कोणकोणत्या भाषेत उपलब्ध आहे, हे देण्यात आले आहे.
     या दोन्ही सूची नेहमीच्या संगणकीय ठिकाणावर उपलब्ध करण्यात आल्या आहेत. साधकांनी ग्रंथप्रदर्शने, वाचनालये आदी सुयोग्य ठिकाणी आवश्यकतेनुसार योग्य प्रकारची सूची अधिकाधिक उपयोगात आणावी आणि धर्मशिक्षण देणारे ग्रंथ समाजात पोेचवण्यासाठी प्रयत्न करावेत.

साधकांना सूचना

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
दोन दिवसांपूर्वी पौर्णिमा झाली.

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
देवाकडे ऐहिक सुख मागू नये
     मुलाने विष मागितले, तरी आई आणि डॉक्टर त्याला विष देत नाहीत. तसेच देवही ऐहिक सुख देत नाही; कारण त्याला ठाऊक असते की, हे त्याला पेलवणार नाही. म्हणून देवाकडे भीक (ऐहिक सुख) मागण्यात अर्थ नाही.
भावार्थ :
देव, म्हणजे गुरु, हे देवापासून दूर नेणारे ऐहिक सुख देत नाहीत. देवापासून दूर जाणे हे साधकाच्या दृष्टीने मरणच होय; म्हणून ऐहिक सुख हे विषासमान मानले आहे
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण)

-
परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
     हिंदूंना संशोधन करण्याची आवश्यकता नसते; कारण सुख नाही, तर आनंदप्राप्तीसाठीचे, म्हणजेच मोक्षप्राप्तीपर्यंतचे सर्व हिंदु धर्मात सांगितलेले आहे. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

-


गुरु आत्मज्योतीचे दर्शन ।

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...
परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले
गुरु आत्मज्योतीचे दर्शन ।
गुरु करिती स्वयंप्रकाशी ।
गुरु काढिती माया-मोहातून ।
काय करावे या गुरूंचे वर्णन ॥ १ ॥

मोक्षाप्रती नेण्याकरता त्रास सोसून । 
इच्छा ज्याची-त्याची स्वतः समजून ।
काट्या-कुट्यांच्या मार्गातून ।
बाळा लागले का म्हणून ।
आता नको मागे राहू हात सोडून ।
अशा गुरूंचे काय करू वर्णन ॥ २ ॥
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. 
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

समर्पित व्हा ! 
इतरांना प्रकाश देण्यासाठी ज्योत सतत तेवत रहाते. तोच आदर्श 
समोर ठेवावा आणि गरजू लोकांसाठी आपले जीवन समर्पित करावे !
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

काश्मीरमधील आतंकवाद !

संपादकीय
     जम्मू-काश्मीर राज्यात वर्ष २०१५ च्या एप्रिल मासात आतंकवादी खालिद वानी सैन्याबरोबरच्या चकमकीत ठार झाला. राज्यात चालू असलेला हिंसाचार ज्या बुरहान वानी नावाच्या आतंकवाद्याच्या मृत्यूनंतर चालू झाला, तो बुरहान वानी खालिद वानी याचा भाऊ असल्याचे सांगण्यात येते. खालिद वानी याच्या कुटुंबियांना राज्यातील पीडीपी-भाजप आघाडीचे सरकार आता हानीभरपाई देणार आहे. अशा प्रकारचे साहाय्य आतंकवाद्यांच्या आक्रमणात किंवा चकमकीत हुतात्मा झालेल्या सैनिकांना आणि मृत्यू पावलेल्या नागरिकांना दिले जाते. असे असतांना जम्मू-काश्मीरच्या सरकारने या नियमाचे उल्लंघन का केले, ते त्यांनाच ठाऊक ! अर्थात् चाणाक्ष जनतेच्या कल्पनाशक्तीला आव्हान देण्याचे धाडस कोणी करील, असे वाटत नाही. त्यामुळे सत्ता सांभाळायचे जम्मू-काश्मीर सरकारचे धोरणच येथे अधोरेखित होते,
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn