Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

देवस्थानांच्या भ्रष्ट शासकीय समित्या त्वरित विसर्जित करा ! - हिंदुत्वनिष्ठांची मागणी

नागपूर विधान भवनाजवळ निदर्शने; ‘अंधश्रद्धा 
निर्मूलन समिती’वर प्रशासक नेमण्याची मागणी ! 

आंदोलनात बोलतांना शिवसेनेचे आमदार
श्री. प्रकाश अबिटकर. डावीकडे श्री. अभय वर्तक

मंदिरांच्या देवस्थान समितीमध्ये भ्रष्टाचार करणार्‍यांना 
शिक्षा होईपर्यंत संघटितपणे काम करूया ! - शिवसेनेचे आमदार प्रकाश अबिटकर
        नागपूर, १३ डिसेंबर (वार्ता.) - शासनाने श्री महालक्ष्मी मंदिर, श्री तुळजाभवानी मंदिर, पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर यांसह इतर देवळांतील अपकारभाराचे नैतिक दायित्व स्वीकारून सर्व भ्रष्ट शासकीय देवस्थान समित्या तात्काळ विसर्जित (बरखास्त) कराव्यात, लक्षावधी रुपयांचे घोटाळे करणार्‍या अंधश्रद्धा निर्मूलन समितीवर प्रशासक नियुक्त करण्यात यावा, या प्रमुख मागण्यांसाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी १३ डिसेंबर या दिवशी दुपारी १ वाजता नागपूर विधान भवनाजवळ निदर्शने आणि घोषणाबाजी केली. शिवसेनेचे राधानगरी (जिल्हा कोल्हापूर) येथील आमदार श्री. प्रकाश अबिटकर यांनी या आंदोलनात उत्स्फूर्तपणे भाग घेतला. ‘पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समिती आणि तुळजापूर मंदिरात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करणार्‍यांवर कठोर शिक्षा होईपर्यंत आपण संघटितपणे काम करूया’, असे आवाहन श्री. अबिटकर यांनी केले. या वेळी सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक उपस्थित होते.

बुरहान वानीच्या आतंकवादी भावाला चकमकीत ठार केल्याच्या प्रकरणी हानी भरपाई देणार !

  • काँग्रेसच्या काळातही जे झाले नाही, ते आता होत आहे ! असे सरकार राज्यात सत्तेवर असेल, तर राज्यातील आतंकवाद कधीतरी नष्ट होईल का ? उद्या आक्रमण करणार्‍या आतंकवाद्यांना सरकारने पुरस्कार दिल्यास आश्‍चर्य वाटू नये !
  • जम्मू-काश्मीरच्या पीडीपी-भाजप सरकारचा आतंकवादप्रेमी निर्णय !
      नवी देहली - जम्मू-काश्मीरमध्ये १३ एप्रिल २०१५ या दिवशी सैन्याबरोबर झालेल्या चकमकीत खालिद वानी हा ठार झाला होता. खालिद हा ठार झालेला आतंकवादी बुरहान वानी याचा भाऊ होता. आता खालिदच्या कुटुंबियांना राज्यातील पीडीपी-भाजप आघाडी सरकारने हानी भरपाई देण्याची घोषणा केली आहे. वानी कुटुंबियांकडून खालिद आणि सैन्य यांच्यातील चकमक बनावट असल्याचा दावा पूर्वीपासून केला जात आहे. (काश्मीरमधील एखाद्या आतंकवाद्याला चकमकीत सैन्य अथवा पोलिसांनी ठार केले, तर तेथील देशद्रोही लोक ती चकमक खोटी होती आणि मरणारा आतंकवादी निरपराध होता, असेच म्हणत आली आहे ! - संपादक) अशा प्रकारचे साहाय्य आतंकवाद्यांच्या आक्रमणात किंवा चकमकीत हुतात्मा झालेल्या सैनिकांना आणि मृत्यू पावलेल्या नागरिकांना दिली जाते; मात्र नियमांचे उल्लंघन करून वानीच्या कुटुंबियांना ही हानी भरपाई दिली जाणार आहे.

मलकापूर येथे धर्मांधांनी देशविरोधी आणि जातीय तेढ निर्माण होणार्‍या घोषणा दिल्याने जातीय दंगल : १५ दुकाने आणि २ वाहने पेटवली !

धर्मांधांनी जाळलेले दुकान

  • हिंदुबहुल देशात धर्मांधांकडून हिंदूंवर वारंवार आक्रमणे व्हायला हा पाक आहे का ? हिंदूंनो, धर्मांधांकडून होणारी आक्रमणे थांबण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करा !
  • मलकापूर (जिल्हा बुलढाणा) येथील घटना !
  • दगडफेकीत भाजपचे आमदार चैत्रसुख संचेती यांसह ३५ जण घायाळ !
  • ८ वाहनांची तोडफोड : शहरात १४४ कलमासह संचारबंदी लागू !
         मलकापूर, १३ डिसेंबर - येथे १२ डिसेंबर या दिवशी महंमद पैगंबर जयंतीनिमित्त काढलेल्या मिरवणुकीच्या वेळी साळीपुरा भागात दुुचाकीस्वार धर्मांध तरुणांच्या जमावाने देशविरोधी आणि जातीय तेढ निर्माण होईल, अशा चिथवणीखोर घोषणाबाजी करत फेरी काढली. त्यांना काही जणांनी अटकाव करताच धर्मांधांनी हिंदूंच्या घरांवर आणि हिंदूंवर दगडफेक केली. त्यामुळे संतप्त झालेल्या हिंदूंनी धर्मांधांवर दगडफेक केली. दोन्ही गट समोरासमोर येऊन दगडफेक करण्यात आल्याने शहरात जातीय दंगल उसळली. धर्मांधांनी जाळपोळ आणि तोडफोड केली. धर्मांधांनी १५ दुकानांसह ऑटो आणि मालवाहू बोलेरो वाहन पेटवून दिले, तसेच ८ ते १० दुचाकी आणि ६ चारचाकी वाहनांची तोडफोड केली. (वारंवार दंगल घडवणे, दंगलीत हिंदूंच्या घरांवर आणि हिंदूंवर दगडफेक करून त्यांच्या मालमत्तेची हानी करणे, महिलांचा विनयभंग करणे, असे प्रकार नित्याचेच झाले असल्याने या धर्मांधांना अद्दल घडवण्यासाठी संघटित व्हा ! - संपादक)

यासिन भटकळ आणि इंडियन मुजाहिदीनचे ४ आतंकवादी दोषी !

  • या आतंकवाद्यांना न्यायालयाने फाशीचीच शिक्षा द्यावी आणि त्याची तात्काळ कार्यवाही व्हावी, अशीच जनतेची मागणी आहे !  
  • भाग्यनगरमधील बॉम्बस्फोटाचे प्रकरण
        नवी देहली - राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या (एन्आयएच्या) न्यायालयाने २१ फेब्रुवारी २०१३ मध्ये भाग्यनगर येथील दिलखुशनगरमधील २ बॉम्बस्फोटांच्या प्रकरणात यासिन भटकळ आणि इंडियन मुजाहिदीनच्या ४ आतंकवाद्यांना दोषी ठरवले आहे. १९ डिसेंबरला न्यायालय त्यांना शिक्षा घोषित करणार आहे. इंडियन मुजाहिदीनच्या आतंकवाद्यांना दोषी ठरवण्यात आल्याचा हा पहिलाच न्यायालयीन निकाल आहे. या स्फोटांमध्ये १८ जणांचा मृत्यू झाला होता, तर १३१ जण घायाळ झाले होते. या कटाचा मुख्य सूत्रधार रियाझ भटकळ अद्यापही फरार आहे.

गोव्यात भाजप-मगो युती होणे हे जनता आणि पक्ष दोहोंच्या हिताचे ! - मनोहर पर्रीकर

मगो पक्षाच्या ढवळीकर बंधूंना गोवा 
राज्य मंत्रीमंडळातून वगळल्याचे प्रकरण
        पणजी, १३ डिसेंबर (वार्ता.) - मुख्यमंत्र्यांनी जरी मगोच्या नेत्यांना मंत्रीमंडळातून काढून टाकले असले, तरी भाजप आणि मगो पक्षांची पक्षस्तरावरची युती तुटलेली नाही. येत्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि मगो यांची युती होणे, हे जनता अन् पक्ष दोहोंच्या हिताचे आहे. मगो पक्षाने प्रस्ताव मांडल्यास येत्या निवडणुकीत भाजप आणि मगो पक्षांच्या युतीसंदर्भात चर्चा करता येईल. युतीचा मार्ग भाजपने बंद केलेला नाही, असे भाजपचे गोव्यातील वरिष्ठ नेते आणि केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी पणजी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
        गोवा विधानसभेची निवडणूक काही महिन्यांवर ठेपली आहे. प्रचारालाही वेग आला आहे. ११ डिसेंबर या दिवशी सायंकाळी फोंडा, गोवा येथे झालेल्या प्रचारसभेत सध्या सत्तेत सहभागी असलेल्या मगो पक्षाने सहकारी पक्ष असलेल्या भाजपवर टीका करत ‘मुख्यमंत्र्यांनी राज्याला १० वर्षे मागे नेले आहे. मुख्यमंत्र्यांना पदावरून हटवल्यासच पुढील निवडणुकीच्या वेळी युतीचा विचार करू’, असे विधान केले होते. त्यानंतरच मुख्यमंत्र्यांनी १२ डिसेंबरला रात्री उशिरा मगोच्या दोन्ही नेत्यांना मंत्रीमंडळातून वगळले. श्री. सुदिन ढवळीकर यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम आणि वाहतूक अन् नदी परिवहन खात्यांचे दायित्व होते, तर श्री. दीपक ढवळीकर यांच्याकडे कारखाने आणि बाष्पक मंत्रालय होते.

‘वरदा’ चक्रीवादळात १० जण ठार !

        चेन्नई - १२ डिसेंबरला ताशी १२० कि.मी. वार्‍याच्या वेगाने ‘वरदा’ चक्रीवादळ चेन्नई आणि उत्तर तमिळनाडू किनारपट्टीवरील जिल्ह्यांत धडकले. यात १० जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण घायाळ झाले. गेल्या ५० वर्षांत चेन्नई शहरात आलेले हे सर्वांत वेगवान चक्रीवादळ आहे. तिरुवल्लूवर आणि कांचीपुरम् या भागांना चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका बसला. किनारपट्टीवरील लोकांना वेळीच सुरक्षित ठिकाणी पोचवण्यात आले. तरीदेखील या चक्रीवादळामुळे लक्षावधी लोकांना फटका बसला आहे. ‘१३ डिसेंबरला ते कर्नाटकात पोचेल आणि गोव्यात संपुष्टात येईल’, अशी चेतावणी हवामान विभागाने दिली होती.

खाद्यपदार्थांसाठी वृत्तपत्रांचा वापर बंद करण्याविषयी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचे दिशा-निर्देश काढण्याचे आदेश !

खाद्यपदार्थांसाठी वृत्तपत्रांचा वापर टाळावा, 
यासाठी वृत्तपत्रांनीच प्रबोधन करणे आवश्यक आहे !
     नवी देहली - खाद्यपदार्थार्ंच्या वस्तू बांधण्यासाठी वृत्तपत्रांचा वापर होत असल्याविषयी केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा यांनी चिंता व्यक्त केली आहे. वृत्तपत्रांच्या कागदावरील शाई आरोग्यासाठी हानीकारक असल्यामुळे लोकांच्या स्वास्थ्यासाठी ते धोकादायक ठरू शकते, हे लक्षात घेऊन नड्डा यांनी भारतीय खाद्य संरक्षण आणि मानक प्राधिकरणाला या संदर्भात आवश्यक दिशा-निर्देश काढण्याचे आदेश दिले आहेत.

विद्यार्थ्यांचा तणाव दूर करण्यासाठी जयपूरच्या जिल्हाधिकार्‍यांनी ‘कोलावरी डी’च्या नावाने पुस्तिका काढली !

विद्यार्थ्यांचा तणाव दूर करण्यासाठी वर्तमान शिक्षणपद्धती कारणीभूत आहे. 
ती न पालटता वरवरचे मानसिक स्तरावरील उपाय करून काय साध्य होणार ?
     जयपूर (राजस्थान) - शिकवणी वर्गातील विद्यार्थ्यांचा तणाव दूर करण्यासाठी काही वर्षांपूर्वी लोकप्रिय झालेले ‘कोलावरी डी’ या गाण्याच्या नावाने येथील जिल्हाधिकारी रवी कुमार सुरपूर यांनी छोट्या पुस्तिका काढल्या आहेत. या पुस्तिकांच्या माध्यमातून कोटा येथील एका शिकवणी वर्गातील विद्यार्थ्यांचा तणाव दूर करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. केवळ २० पृष्ठांच्या या पुस्तिकांमध्ये विद्यार्थ्यांशी त्यांच्याच भाषेत संवाद साधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या पुस्तिकेत चित्रपटांतील प्रसिद्ध संवाद, मोठे तत्त्वचिंतक यांचे विचार आणि काही दृष्टीकोन दिले आहेत. (हिंदु राष्ट्रात विद्यार्थ्यांचा संपूर्ण व्यक्तीमत्त्व विकास होईल, अशा प्रकारचे शिक्षण देण्यात येईल. तसेच त्यांच्यात आत्मबळ निर्माण होण्यासाठी त्यांना साधना आणि धर्माचरण शिकवण्यात येईल. त्यामुळे ते जीवनातील कोणत्याही समस्येला धैर्याने सामोरे जाण्यास सिद्ध होतील ! - संपादक)

मेरठमधील मदरशात मुलाला साखळीने बांधून ठेवल्याची घटना उघड !

मदरशांत मुलांवर शारीरिक आणि लैंगिक अत्याचार होतात, 
त्यांना जिहादचे शिक्षण दिले जाते, हे सातत्याने समोर येऊनही अशा 
मदरशांना सरकार अनुदान देते, ही घटना लोकशाहीला निरर्थक ठरवते ! 
     मेरठ (उत्तरप्रदेश) - उत्तरप्रदेशच्या मुझफ्फरनगर शहराजवळ असलेल्या फुलाट येथील मदरशात एका १० वर्षाच्या मुलाला साखळीने बांधून ठेवण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. पायाला बांधलेल्या साखळ्यांमधून सुटका करून घेऊन या मुलाने मदरशातून पलायन केले. तेथून पळून जात असतांना तो एका तलावात पडला. गावकर्‍यांनी त्याला तलावातून बाहेर काढून त्याचा जीव वाचवला. या मुलाची गावकर्‍यांनी एक चित्रफीत बनवली असून ती सामाजिक माध्यमांवर (‘सोशल मीडिया’वर) प्रसारित केली आहे. 
     या मुलाला त्याचे कुटुंबीय मदरशामध्ये घेऊन आले होते. त्याने शिकावे यासाठी मुलाला ते मदरशामध्ये सोडून निघून गेले. हा मुलगा पळून जाऊ नये, म्हणून मदरशाच्या प्राचार्याने त्याच्या पायात साखळी बांधून त्याला कैद करून ठेवल्याचा आरोप करण्यात येत आहे. पोलिसांनी मात्र त्याला साखळीने बांधून ठेवल्याचा आरोप फेटाळला आहे. फुलाट गावच्या सरपंचांनी मात्र मुलाला साखळीने बांधून ठेवल्याच्या घटनेला दुजोरा दिला आहे. मदरशाच्या व्यवस्थापकांकडून या घटनेविषयी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही.नोटा पालटून देतांना रिझर्व्ह बँकेच्या अधिकार्‍याला अटक !

अशांची सर्व संपत्ती जप्त करून जलदगती 
न्यायालयात खटला चालवून कठोर शिक्षा करा !
        बेंगळुरू (कर्नाटक) - केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआयच्या) अधिकार्‍यांनी रिझर्व्ह बँकेच्या अधिकार्‍याला नोटा पालटून देताना रंगेहात अटक केली आहे. के. मायकल असे अधिकार्‍याचे नाव आहे. मायकल यांच्याकडून १६ लाख रुपयांच्या नव्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडून महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या म्हैसुरू शाखेतून नोटा पालटून देत असतांना त्यांना पकडण्यात आले. त्यांच्यासमवेत असणार्‍या अन्य तिघांनाही अटक करण्यात आली आहे.

धर्मांधाचा बनावट नोटा अधिकोषात भरण्याचा प्रयत्न

अल्पसंख्यांक धर्मांध गुन्हेगारीत बहुसंख्याक ! 
     ठाणे - महिंद्रा कोटक बँकेत १ सहस्रांच्या बनावट चलनी नोटा खर्‍या असल्याचे भासवून अधिकोषात भरणा करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपी सलीम शेख (१८) याच्यावर राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे.

रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या हातातील तुटलेली तलवार पालटली !

   मुंबई, १३ डिसेंबर (वार्ता.) - हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर मेघडंबरीत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या हातातील तुटलेली तलवार ११ डिसेंबर या दिवशी सकाळी ७ वाजता पालटून नवीन तलवार बसवण्यात आली. १० डिसेंबर या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या हातातील ही तलवार तुटल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे शिवभक्तांमध्ये संतापाची प्रचंड मोठी लाट उसळली होती. एकीकडे सहस्रों कोटी रुपये खर्चून अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभारण्याची घोषणाबाजी राज्य शासन करत असतानाच हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर छत्रपती शिवरायांची तलवारही सुरक्षित नसल्याची खंत अनेकांनी व्यक्त केली. धर्माभिमानी श्री. सतीश घारगे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासाठी नवी तलवार अति जलद वेगाने सिद्ध केली. 

अखंड हिंदु राष्ट्राची स्थापना होईपर्यंत शांत बसणार नाही ! - श्री. राजासिंह ठाकूर, आमदार, भाजप

कल्याण (जिल्हा ठाणे) येथे सळसळत्या भगव्या वातावरणात 
‘हिंदु महामण्डलम्, कल्याणच्या वतीने आयोजित धर्मजागरण सभा !
हिंदु धर्मजागृती सभा विशेष ‘जय श्रीराम’च्या घोषणांनी दुमदुमला आसमंत !
श्री. राजासिंह ठाकूर
     कल्याण, १३ डिसेंबर, (वार्ता.) - १ सहस्र ४०० वर्षांपूर्वी जगात इस्लाम धर्म अस्तित्वात नव्हता. २००० वर्षांपूर्वी ख्रिस्ती धर्म अस्तित्वात नव्हता. त्यापूर्वी केवळ सनातन वैदिक हिंदु धर्मच होता. भारत हे हिंदूंचे स्थान आहे. अखंड हिंदु राष्ट्राची स्थापना होईपर्यंत शांत बसणार नाही, असे प्रतिपादन गोशमहल, तेलंगण येथील भाजपचे आमदार तथा श्रीराम युवा सेनेचे अध्यक्ष आणि प्रखर हिंदुत्वनिष्ठ श्री. राजासिंह ठाकूर यांनी केले. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी आरमाराचा (नौदलाचा) आरंभ कल्याणनगरीतून केला. हा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या कल्याणनगरीत लाल चौकी येथील नमस्कार मंडळाच्या पटांगणात ‘हिंदु महामण्डलम्’च्या वतीने धर्मजागरण सभा पार पडली. या वेळी ते बोलत होते. या वेळी व्यासपिठावर जैन मुनी पू. निलेशचंद्र विजयजी, ‘इंडिया अगेन्स्ट इस्लामिक स्टेट’चे राष्ट्रीय अध्यक्ष पारस राजपूत, बहेन दुर्गा डिफेन्सच्या संस्थापिका सौ. मंजुश्री वरादी, विश्‍व हिंदु सेवेचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि भारत शासनाच्या महिला अन् बालकल्याण मंत्रालयाचे सदस्य श्री. रविंद्र द्विवेदी उपस्थित होते. हिंदु धर्म आणि संस्कृती अबाधित राखण्याच्या संकल्पाने सभेचा आरंभ करण्यात आला. या सभेला १ सहस्र ५०० धर्माभिमान्यांची उपस्थिती होती.

अतींद्रिय विज्ञानाच्या क्षेत्रातील कार्यासाठी डॉ. मेहरा श्रीखंडे यांचा भारतीय पत्रकार संघाच्या वतीने पुरस्कार देऊन सन्मान

मुंबई, १४ डिसेंबर (वार्ता.) - मानवतेच्या कल्याणासाठी अतींद्रिय विज्ञानाचा अभ्यास आवश्यक असल्याच्या प्रबंधासाठी आणि या विषयावर सातत्याने केलेल्या कार्यासाठी भारतीय पत्रकार संघाच्या वतीने डॉ. मेहरा श्रीखंडे यांचा विशेष पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. हा पुरस्कार येथील केंद्रीय श्रमिक शिक्षण भवनामध्ये केंद्रीय श्रमिक शिक्षण मंडळाचे विभागीय संचालक श्री. प्रदीप मून यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या वेळी संघटनेचे अध्यक्ष श्री. अण्णासाहेब देसाई उपस्थित होते. मेहरा श्रीखंडे यांचे ‘पॅरानॉर्मल एक्सपिरियन्सेस’ या विषयावरील पुस्तक देशभर लोकप्रिय झाले आहे. त्याचा मराठी अनुवाददेखील प्रकाशित झाला असून नुकतेच ई-बुक स्वरूपातदेखील ते उपलब्ध करण्यात आले आहे. या वेळी डॉ. श्रीखंडे यांनी ‘भारतातदेखील अभ्यासकांनी पुढे येऊन या विषयावर अधिक व्यापकतेने अभ्यास केला पाहिजे’, अशी अपेक्षा व्यक्त केली.

‘सनबर्न फेस्टिव्हल’ पुण्यातून हद्दपार करणारच !

पुणे येथील आंदोलनात रणरागिणींची चेतावणी ! 
आंदोलन करतांना धर्माभिमानी हिंदू
     पुणे, १३ डिसेंबर (वार्ता.) - विद्येचे माहेरघर आणि सांस्कृतिक शहर म्हणून ओळखल्या जाणार्‍या पुणे शहरात केसनंद येथे २८ ते ३१ डिसेंबर या कालावधीत ‘सनबर्न फेस्टिव्हल’ होऊ घातला आहे. पाश्‍चात्य संगीताच्या नावाखाली युवा पिढीला व्यसनाधिनतेकडे नेणारा महोत्सव पुण्यातून हद्दपार करणारच, अशी खणखणीत चेतावणी हिंदु जनजागृती समितीप्रणित रणरागिणी शाखेच्या वतीने घेण्यात आलेल्या आंदोलनात देण्यात आली. १२ डिसेंबर या दिवशी मंडई येथील लोकमान्य टिळक पुतळा येथे करण्यात आलेल्या या आंदोलनाला १७५ हून अधिक धर्माभिमानी महिला उपस्थित होत्या.

विरोधकांनी केलेल्या गोंधळातच विधानसभेचे कामकाज पूर्ण करून सभागृह दिवसभरासाठी स्थगित

३ वेळा सभागृहाचे कामकाज स्थगित आणि १ वेळा सभात्याग 
सातत्याने सभागृहाचे कामकाज स्थगित होणे, ही जनतेच्या पैशाशी केलेली प्रतारणाच ! 

विधानसभा
     नागपूर, १३ डिसेंबर (वार्ता.) - विधानसभेचे कामकाज चालू होताच विरोधी पक्षाने दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली. ही मागणी करतांना विरोधी पक्षाने गोंधळ घालून घोषणा देत सभात्याग केला. कामकाज चालू झाल्यावर दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांच्या राजीनाम्यावरून विरोधकांनी गोंधळ घातल्याने ३ वेळा म्हणजेच, एकूण ४५ मिनिटांसाठी सभागृहाचे कामकाज स्थगित करण्यात आले. असे असतांनाही सभापती हरिभाऊ बागडे आणि सत्ताधारी पक्ष यांनी सभेचे कामकाज पुकारले अन् दिवसभराचे कामकाज पूर्ण केले. त्यानंतर सभागृह दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले. 

रायगडावरील पवित्रतेची विटंबना करणार्‍या राष्ट्रवादीच्या धर्मांध नगरसेवकासह जळगावच्या तिघांची शिवरायांच्या पुतळ्यासमोर नाक घासून क्षमायाचना !

महाराष्ट्रातील किल्ले हे छत्रपती शिवाजी महाराज यांनी 
हिंदवी स्वराज्याची स्थापनेची साक्ष आहेत. ऐतिहासिक स्थळाची 
विटंबना करणारे असे मद्यपी लोकप्रतिनिधी लोकशाहीला कलंक आहेत ! 
     जळगाव - रायगडावर मद्यप्राशन केल्यामुळे शिवभक्तांकडून चोप मिळालेल्या शरीफ पिंजारी या राष्ट्रवादीच्या नगरसेवकासह त्यांच्या २ समर्थकांना जळगावात स्वराज्य निर्माण सेना आणि शिवप्रतिष्ठान या संघटनांनी १२ डिसेंबरला दुपारी शिवरायांच्या पुतळ्यासमोर उभे करून नाक घासून दिलगिरी व्यक्त करायला लावली. तसेच ‘भविष्यात असा घृणास्पद प्रकार होणार नाही’, असे सांगितले. या तिघांनी केलेली क्षमायाचना किल्ले रायगड समितीला पाठवण्यात येणार आहे.

विविध संघटनेचे कार्यकर्ते आणि हिंदुत्वनिष्ठ यांचा जळगाव येथील हिंदु धर्मजागृती सभेच्या प्रचारात उत्स्फूर्त सहभाग !

जळगाव येथील हिंदु धर्मजागृती 
सभेला विविध प्रभागांतील हिंदुत्ववाद्यांचा 
मशाल फेरीने सभास्थळी येण्याचा मानस ! 

     जळगाव, १३ डिसेंबर (वार्ता.) - जळगाव येथे २५ डिसेंबर या दिवशी होणार्‍या हिंदु धर्मजागृती सभेच्या निमित्ताने शहरातील विविध प्रभागांत, भागवत सप्ताहाच्या ठिकाणी, विविध समाजाच्या बैठकांच्या ठिकाणी हिंदु धर्मजागृती सभेचा उद्देश सांगून निमंत्रण देण्यात येत आहे. शहरातील विविध प्रभागांतील हिंदुत्वनिष्ठ सभास्थळी ढोल-ताशांच्या गजरात, हातात भगवे ध्वज घेऊन, मशाल फेरीद्वारे पोचण्याचे नियोजन करत आहेत. हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांसोबतच शहरातील गणेशोत्सव मंडळांचे सदस्य, हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते, धर्माभिमानी हिंदु धर्मजागृती सभेच्या प्रचारात उत्स्फूर्त सहभाग घेत आहेत. आतापर्यंत जळगाव जिल्ह्यात सुमारे १ लक्ष हिंदूंपर्यंत धर्मजागृती सभेचा विषय पोचला आहे, असे हिंदु जनजागृती समितीच्या समन्वयकांनी सांगितले आहे.

जानकर यांचा राजीनामा मागण्याच्या गोंधळामुळे विधान परिषदेचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित

विधान परिषद 
दिवसभरासाठी कामकाज सातत्याने स्थगित होणे, हा 
जनतेवर अन्यायच म्हणावा लागेल ! अशाने कोणते जनहित आणि देशहित 
 साधले जात आहे ?  ही परिस्थिती ‘हिंदु राष्ट्र’ (सनातन धर्म राज्य) अपरिहार्य करते ! 
     नागपूर, १३ डिसेंबर (वार्ता.) - विधान परिषदेचे कामकाज चालू होताच विरोधी पक्षांनी दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांच्या राजीनाम्याची मागणी स्थगन प्रस्तावाद्वारे केली. या प्रकरणी विरोधी पक्षांनी सातत्याने गोंधळ आणि घोषणाबाजी यांमुळे विधान परिषदेचे कामकाज ३ वेळा एकूण १ घंट्यासाठी स्थगित केले. त्यानंतरही चालू झालेल्या सभागृहात सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी स्थगन प्रस्तावावरील चर्चा फेटाळून लावली. त्यामुळे विरोधी पक्षांनी गोंधळ घातला. एकूण गोंधळाचा वातावरण पाहून सभापतींनी सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित केले.

रत्नागिरी जिल्ह्यातील नोव्हेंबर २०१६ मधील हिंदु जनजागृती समितीच्या प्रसारकार्यात धर्माभिमान्यांचा सहभाग !

श्री. संजय जोशी
१. प्रांतीय हिंदू अधिवेशनामुळे जिल्ह्यातील 
राष्ट्रीय हिंदू आंदोलन आणि धर्मशिक्षणवर्ग यांत वृद्धी !
     रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचे प्रांतीय हिंदू अधिवेशन २० नोव्हेंबर २०१६ या दिवशी चिपळूण येथील स्वामी मंगल हॉल, बहादूरशेख नाका येथे पार पडले. या अधिवेशनाचे उद्घाटन महाराष्ट्र वारकरी प्रबोधन सेवा मंडळाचे कोकण प्रांत उपाध्यक्ष ह.भ.प. अभय महाराज सहस्रबुद्धे यांच्या हस्ते झाले. या अधिवेशनाला महाराष्ट्र वारकरी प्रबोधन सेवा मंडळ, महाराष्ट्र वारकरी महामंडळ, श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, श्री संप्रदाय, शिवसेना, श्री योग वेदांत सेवा समिती, फुरुस ग्रामदेवता देवस्थान आदींचे मुख्य प्रतिनिधी, तसेच वाचक, हिंदुत्वनिष्ठ, हितचिंतक असे ५४ जण उपस्थित होते. या वेळी रत्नागिरी जिल्ह्यात प्रत्येक महिन्याला प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी राष्ट्रीय हिंदू आंदोलन घेण्याचे ठरले. जिल्ह्यात ६ ठिकाणी हिंदूसंघटन मेळावे आणि ६ ठिकाणी धर्मशिक्षणवर्ग चालू होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे धर्मप्रेमींनी सांगितले. ६ धर्माभिमान्यांनी धर्मप्रसारासाठी नियमित वेळ देणार असल्याचे उत्स्फूर्तपणे सांगितले.

हिंदु राष्ट्र’ हाच विश्‍वासाठी आशेचा किरण ! - श्री. ईश्‍वरप्रसाद खंडेलवाल, राष्ट्रीय अध्यक्ष, लष्कर-ए-हिंद

४ सहस्र ४३४ हिंदूंनी अनुभवली ऑनलाईन सभा !
नालासोपारा (जिल्हा पालघर) येथे हिंदु धर्मजागृती सभेच्या माध्यमातून हिंदूंमध्ये जागृती !
श्री. ईश्‍वरप्रसाद खंडेलवाल
     नालासोपारा (जिल्हा पालघर), १३ डिसेंबर (वार्ता.) - आज ‘इसिस’च्या माध्यमातून इस्लामी आतंकवादाचा संपूर्ण जगाला धोका आहे. ‘हिंदु राष्ट्र’ हाच विश्‍वासाठी आशेचा किरण आहे. सहस्रो वर्षांचा इतिहास सांगतो की, हिंदू हा सामर्थ्यशाली असतांनाही त्याने कधीही कोणावर स्वत:हून आक्रमण केले नाही; कारण विस्तारवाद हा हिंदूंचा स्वभाव नसून साधना करून ईश्‍वरप्राप्ती करणे हा हिंदूंचा स्वभावधर्म आहे. आज मात्र हिंदूंच्या या मूलभूत अधिकारावरच संकट आले आहे. आज ‘लिव्ह इन् रिलेशनशिप’, समलैंगिकता, हिंदूंच्या सणांच्या विरोधातील याचिका यांवर त्वरित निकाल देण्यात येतात; मात्र हिंदु संत आणि हिंदुत्वनिष्ठ यांवरील खटले वर्षानुवर्षे प्रलंबित ठेवले जातात. हे सर्व रोखण्यासाठी ‘हिंदु राष्ट्र’ निर्माण करणे हेच आपले ध्येय असले पाहिजे आणि हिंदूंनी त्यासाठी संघटित होणे ही काळाची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन लष्कर-ए-हिंदचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. ईश्‍वरप्रसाद खंडेलवाल यांनी केले. नालासोपारा (जिल्हा पालघर) येथील हिंदु धर्मजागृती सभेत ते बोलत होते.

म्हणे) ‘मराठीला गोव्याच्या अधिकृत भाषेचा दर्जा देता येणार नाही !’ - मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांची स्पष्टोक्ती

गोवा राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अधिकृत भाषेच्या 
संवेदनशील सूत्राला हात घालून राज्याचे मुख्यमंत्री काय साध्य करू पहात आहेत ? 
     पणजी - प्रत्येक राज्याची केवळ एकच अधिकृत भाषा असू शकते आणि तो दर्जा कोकणी भाषेला अगोदरच देण्यात आला आहे. एका राज्याच्या २ अधिकृत भाषा नसतात, हे सत्य आपण स्वीकारले पाहिजे. गोव्याच्या संस्कृतीत कोकणी भाषेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे कोकणी भाषेला अधिकृत भाषेचा दर्जा देण्यात आला आहे; मात्र राज्यात मराठी भाषेलाही तितकेच महत्त्व देण्यात येते. त्यामुळे अधिकृत भाषेच्या सूत्रावरून लोकांनी विनाकारण वाद निर्माण करू नयेत, असे गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी स्पष्ट केले. ते पणजी येथील एका कार्यक्रमात बोलत होते. 

फलक प्रसिद्धीकरता

जम्मू-काश्मीर सरकारचा आतंकवादप्रेमी निर्णय !
   जम्मू-काश्मीरमध्ये सैन्यासमवेत झालेल्या चकमकीत ठार झालेला बुरहान वानी याचा मोठा भाऊ खालिद वानी याच्या कुटुंबियांना राज्यातील पीडीपी-भाजप आघाडी सरकारने नियमांचे उल्लंघन करत हानी भरपाई देण्याची संतापजनक घोषणा केली आहे.

हिंदूंनो, हिंदु राष्ट्राचे महत्त्व जाणा ! - पू. नंदकुमार जाधव

नांद्रा (जळगाव) येथे ४०० हून अधिक धर्माभिमान्यांच्या उपस्थितीत पार पडली ग्रामसभा !
दिपप्रज्वलन करताना पू. नंदकुमार जाधव
आणि बाजूला कु. रागेश्री देशपांडे 
     जळगाव, १३ डिसेंबर (वार्ता.) - आजच्या लोकशाही व्यवस्थेत बहुमत असूनसद्धा हिंदुहिताचे निर्णय शासन घेत नाही. संसदेतील ३० टक्के उमेदवार हे गुन्हेगारी पार्श्‍वभूमीचे आहेत. त्यांच्याकडून आपण चांगल्या कार्याची अपेक्षा तरी करू शकतो का ? यावरून लोकशाहीची निरर्थकता सिद्ध होते. या सर्वांवर एकच उपाय आहे, तो म्हणजे धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे संत पू. नंदकुमार जाधव यांनी केले. २५ डिसेंबर या दिवशी जळगाव येथे हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. गावातील ग्रामस्थांना याची माहिती व्हावी, यासाठी गावातील युवकांनी उत्स्फूर्तपणे ग्रामसभेचे आयोजन केले होते. त्या वेळी पू. जाधवकाका बोलत होते. या सभेला ४०० हून अधिक धर्माभिमानी उपस्थित होते.
     या सभेचा आरंभ शंखनादाने होऊन सनातन संस्थेचे प्रसारसेवक पू. नंदकुमार जाधव यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीप्रणित रणरागिणी शाखेच्या कु. रागेश्री देशपांडे उपस्थित होत्या. सभेचे सूत्रसंचालन कु. तेजस्वीनी तांबट यांनी केले.

आत्मोद्धार आणि धर्मसंस्थापना करण्यासाठी श्री भगवद्गीतेचा नियमित अभ्यास करावा ! - प्रभु नरसिंहा लीलादासजी, इस्कॉन

उपस्थितांना मार्गदर्शन
करतांना प्रभू नरसिंहा लीलादासजी
   कोपरखैरणे (नवी मुंबई), १३ डिसेंबर (वार्ता.) - आजचा तरुण पाश्‍चात्त्य संस्कृतीच्या प्रभावामुळे व्यसन, मांसाहार आणि वासना यांच्या आहारी जाऊन दिशाहीन झाला आहे. अशा दिशाहीन तरुणांना भगवद्गीता जीवनाचा योग्य मार्ग दाखवू शकते. आत्मोद्धार आणि धर्मसंस्थापना करण्यासाठी श्री भगवद्गीतेचा नियमित अभ्यास करावा, असे मार्गदर्शन इस्कॉनचे प्रभु नरसिंहा लीलादासजी यांनी गीता जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात केले. ‘नवी मुंबई हिंदू ब्रेन्स’ यांच्या वतीने कोपरखैरणे, सेक्टर १९ मधील ग्रामदेवता श्री रांजनदेवी मंदिराच्या प्रांगणात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या आरंभी प्रेरणामंत्र आणि गीतेच्या ‘पुरुषोत्तमयोग’ हा १५ व्या अध्यायाचे गायन करण्यात आले. सूत्रसंचालक श्री. मंगेश म्हात्रे यांनी गीता जयंती साजरी करण्यामागील हेतू सांगितला. कार्यक्रमाच्या शेवटी ध्येयमंत्र म्हणण्यात आला. या वेळी ‘नवी मुंबई हिंदू ब्रेन्स’चे ४५ कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमस्थळी इस्कॉनच्या वतीने श्री भगवद्गीतेचे आणि सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथांचे प्रदर्शन लावण्यात आले होते.

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या संदर्भातील परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे विचारधन !

‘      वर्ष २०२३ पासून ‘हिंदु राष्ट्र’ येईल’, हे आजवर अनेक संतांनी वेळोवेळी सांगितले आहे. तथापि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेविषयी कोणत्याही आशादायी घटना स्थुलातून घडत नसतांना असे सांगणे, ही काहींना अतिशयोक्ती वाटेल; पण संतांमध्ये काळाच्या पडद्याआड पहाण्याचे सामर्थ्य असते; म्हणूनच अशा द्रष्ट्या संतांच्या मार्गदर्शनाखाली आपण त्या दिशेने प्रयत्न करणे, हीच आपली साधना आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेविषयी अनेकांंच्या मनात उत्सुकता आहे. या विषयीची सविस्तर माहिती ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची दिशा’ या नियमित सदरात आपल्याला मिळेल. आगामी काळात हिंदु समाजाला भारतभूमीत रामराज्याची अनुभूती देणारे ‘हिंदु राष्ट्र’ स्थापन करण्यासाठी खारीचा नव्हे, तर श्री हनुमंताचा वाटा उचलण्याची प्रेरणा यातून मिळावी, अशी ईश्‍वरचरणी प्रार्थना !

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Jihadi atanki Khalid Waniki muthbhedke paschat uske parivarko Jammu Kashmir sarkarne di hani bharpai. - Bharatiyo, aap is deshdrohi nirnayka virodh kare !
जागो ! : जिहादी आतंकी खालिद वानी की मुठभेड के पश्‍चात उसके परिवार को जम्मू-कश्मीर सरकार ने दी हानि भरपाई ! - भारतीयो, आप इस देशद्रोही निर्णय का विरोध करें !

अधिवेशनाच्या उत्तरार्धात तरी जनतेला न्याय मिळणार का ? - श्री. भूषण कुलकर्णी, नागपूर

महाराष्ट्र विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन, नागपूर
श्री. भूषण कुलकर्णी
     ‘राज्य विधीमंडळाचे अधिवेशन ५ डिसेंबर या दिवसापासून चालू झाले. नेहमीप्रमाणे अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्षाच्या नेत्यांनी राज्य सरकारच्या कारभारावर टीका करत मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर बहिष्कार घातला. त्यावर मुख्यमंत्र्यांनीही प्रतिक्रिया व्यक्त करत अधिवेशन यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त केला. या वेळच्या अधिवेशनाचा कालावधी हा कामकाजासाठी केवळ १० दिवसांचा आहे. 
१. दिवंगतांना श्रद्धांजली वाहून कामकाज चालू ठेवणे, ही खरी श्रद्धांजली !
     अधिवेशनात पहिल्या ५ दिवसांपैकी २ दिवस हे नोटाबंदीवरील चर्चेसाठी विरोधकांनी मागणी लावून धरणे, शोकप्रस्ताव आणि तमिळनाडूच्या मुख्यमंत्री दिवंगत जयललिता यांना श्रद्धांजली वाहून सभेचे कामकाज स्थगित करणे यांमध्ये गेले. शोकप्रस्ताव झाल्यानंतरही सभेचे कामकाम चालू रहायला हवे. तसे होणे हे दिवंगत झालेल्या व्यक्तीला ही खरी श्रद्धांजली ठरेल. जनतेचे गंभीर प्रश्‍न सोडवण्यासाठी मंत्री, आमदार, विरोधक आणि अधिकारी हे अधिवेशनाच्या निमित्ताने एकत्र आलेले असतात. अशा वेळी एवढ्या सर्वांचा वेळ आणि पैसा वाया जाणे, हे राज्याला परवडणारे नाही. त्यानंतर प्रत्यक्षात ३ दिवस विधान परिषदेचे कामकाज चालले. त्यातही नोटाबंदीवर चर्चा आणि त्यावर राज्य सरकारचे उत्तर, मराठा समाजाला आरक्षण देण्याविषयीची चर्चा आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त कृतज्ञतापर विशेष सभेचे आयोजन, या सर्व विषयांवर २ दिवस चर्चा झाली. त्यामुळे प्रत्यक्षात बघायला गेले, तर जनतेसाठी म्हणून कामकाजातील एकच दिवस मिळाला.

युद्धनौकांचे अपघात आणखी किती दिवस ?

     ६ डिसेंबर या दिवशी ३ सहस्र ८०० टन वजनाची ‘आय.एन्.एस्. बेतवा’ ही विशाल युद्धनौका दुरुस्तीनंतर समुद्रात उतरवली जात असतांना तांत्रिक कारणामुळे उलटली. जहाजावर उपस्थित नौदलाच्या सैनिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले असले, तरी २ नौदल सैनिकांना त्यांचेे प्राण गमवावे लागले. शांततेच्या काळात युद्धनौकांचे अपघात होणे, ही गोष्ट देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर आहे. एका बड्या नेत्यांच्या अंत्यसंस्कारापुढे प्रसिद्धी माध्यमांच्या दृष्टीने या घटनेला इतके महत्त्व नसावे. त्यांच्या मते २ परिच्छेद वृत्त लोकांच्या माहितीसाठी देणे एवढेच या घटनेचे महत्त्व ! असे असले तरी प्रसिद्धीमाध्यमे, शासन आणि सुजाण नागरिक यांनी युद्धनौकेच्या होणार्‍या अपघातांकडे दुर्लक्ष केलेले देशाला नक्कीच परवडणारे नाही.
      ‘हिंदु धर्म टिकवण्यासाठी आज हिंदूंना प्रतिदिन लढावे लागणार आहे. हिंदूंना आज कोणीही वाली नसल्याने हिंदूंवर ही स्थिती आज ओढवली आहे. हिंदूंनी आज त्यांचा इतिहास शिकून त्यातून बोध घेऊन कृतीप्रवण होणे आवश्यक आहे !’
- श्री. निरंजन चोडणकर

४० वर्षांपासून संस्कृतमध्ये वकिली करणारे देशातील एकमेव अधिवक्ता : आचार्य पंडित श्यामजी उपाध्याय !

       अधिवक्ता उपाध्याय यांच्यासारखे धर्मनिष्ठ अधिवक्ते हे हिंदूंसाठी आदर्श होत. जे हिंदु धर्माचरण करण्यास कचरतात, लाजतात अथवा त्यास अव्यवहार्य म्हणतात, त्यांनी उपाध्याय यांच्याकडून धर्माचरणाची तीव्र तळमळ, प्रबळ इच्छाशक्ती आणि धर्माभिमान शिकायला हवा.
     वाराणसी - येथील अधिवक्ता आचार्य पंडित श्यामजी उपाध्याय यांचे देववाणी संस्कृतप्रती असलेले समर्पण कौतुकास्पद आहे. ते गेल्या ४० वर्षांपासून संस्कृतमध्येच वकिली करत आहेत. मागील ४० वर्षांत संस्कृतमध्ये वकिली करतांना त्यांच्या बाजूचे निकाल आणि आदेशही न्यायाधिशांनी संस्कृत किंवा हिंदीतच दिले आहेत.
१. आचार्य श्यामजी उपाध्याय संस्कृत अधिवक्ता म्हणून प्रसिद्ध आहेत. ते वर्ष १९७८ मध्ये अधिवक्ता बनले. तेव्हापासून त्यांनी संस्कृतमध्येच कामकाज केले आहे.
२. ते सर्व न्यायालयीन कामकाज जसे शपथपत्र, विनंतीपत्र, दावा, वकिलनामा आणि प्रतिवादही संस्कृतमध्येच करत आले आहेत.

देशाच्या रक्षणासाठी असा विचार तरी कोणी करील का ?

चीनची भिंत : ‘१५०० मैल, म्हणजे पृथ्वीच्या परिघाच्या बाराव्या हिश्श्याइतकी जागा व्यापणारी, मानवाने बांधलेली अशी ही सर्वांत मोठी वास्तू होय. या भिंतीत २४,००० दरवाजे आणि मिनार आहेत. भिंतीची सरासरी उंची २५ फूट असून पायथ्याशी तिची रुंदी २० ते ३० फूट इतकी आहे. या भिंतीवरून एकाच वेळी एका रेषेत अनेक घोडेस्वार आपले घोडे दौडवू शकतात. इ.स.पूर्व तिसर्‍या शतकात चीनचा राजा शिने व्हांग टी याने बांधकामास प्रारंभ केलेल्या या भिंतीचे काम पुढे १७०० वर्षांपर्यंत चालू राहिले आणि त्याला शेवटचा हात मिंग राजघराण्याकडून (इ.स. १३६८ - १६४४ मध्ये) दिला गेला.’ (श्री गजानन आशिष, जानेवारी २००२) सर्वांना सुख देणारे ‘हिंदु राष्ट्र’ हे एक दैवी राष्ट्र आहे.’ - आद्यसरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार

तरुण वयातच व्यायाम, प्राणायाम, स्वसंरक्षण आणि प्रथमोपचार प्रशिक्षण घ्या !

पू. भाऊ परब यांचा वाढदिवस मार्गशीर्ष पौर्णिमेला झाला. त्यानिमित्ताने त्यांनी साधकांना 
केलेले मार्गदर्शन आणि त्यांच्याकडून साधकाला शिकायला मिळालेली सुत्रे येथे पाहूया. 
पू. सदाशिव (भाऊ) परब
     ‘बर्‍याच जणांना उतार वयात विशिष्ट व्याधीने ग्रासलेले असते. मग आधुनिक वैद्यांकडून त्यांना औषधांच्या जोडीला विविध योगासने आणि नियमितपणे गतीने चालण्याचा समुपदेश दिला जातो. अशा प्रकारे केला जाणारा व्यायाम व्याधीत सुधार होण्यासाठी आणि व्याधी न बळावण्यासाठी केला जातो; मात्र हाच व्यायाम बालपणापासून किंवा तरुण वयापासून केल्यास व्याधी टळू शकतात किंवा पुढे जाऊन त्यांचे स्वरूप सौम्य होऊ शकते. 
१. सूर्यनमस्कार, योगासने आणि प्राणायाम यांच्या जोडीला 
प्रतिदिन ३० मिनिटे सकाळी किंवा संध्याकाळी जलद चाला !
     सूर्यनमस्कार, योगासने आणि प्राणायाम यांच्या जोडीला प्रतिदिन ३० मिनिटे सकाळी किंवा संध्याकाळी जलद चालण्याचा सराव केल्यास शरीर प्रकृती धडधाकट रहाते. मेंदू कार्यक्षम राहून निर्णयक्षमता वाढते आणि रोगप्रतिकारक क्षमता वाढते. दिवसभर शरिरात उत्साह आणि चेतना निर्माण होऊन सेवा किंवा कार्य परिपूर्ण होते. अशक्तपणा जाणवत नाही. काम अजून उत्साहाने करावेसे वाटते. अशा प्रकारे नियमित व्यायाम करत राहिल्याने व्यक्ती निरोगी राहून दीर्घायु होते. ‘देशाचा नागरीक सुदृढ, तर देश सुदृढ !’ हे सार्थ करण्यासाठी प्रत्येकाने व्यायाम केला पाहिजे.

पू. (सौ.) सखदेवआजींची सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ आणि पू. डॉ. मुकुल गाडगीळ यांच्यावर असलेली विशेष प्रीती !


पू. (सौ.) सखदेवआजी
‘     संतांची एकमेकांवर प्रीती असतेच, तरीही पू. (सौ.) सखदेवआजींची सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ आणि पू. डॉ. मुकुल गाडगीळ यांच्यावर विशेष प्रीती होती, हे काही उदाहरणांतून लक्षात आले.
१. ५ वर्षांपूर्वी सौ. गाडगीळ यांच्याशी बोलल्यानंतर ‘त्या 
बोललेले शब्द मी कदाचित् विसरीन; पण त्यांच्या बोलण्यातील 
नाद माझ्या कायम लक्षात राहील’, असे पू. आजींनी सांगणे 
      ५ वर्षांपूर्वी पू. आजी डायलिसिससाठी घरी असतांना त्यांचे भ्रमणभाषवर सौ. गाडगीळ यांच्याशी बोलणे व्हायचे. ते बोलून झाल्यावर पू. आजी म्हणाल्या, ‘‘यांचा आवाज ऐकतच रहावासा वाटतो. त्या बोललेले शब्द कदाचित् मी विसरेन; पण बोलण्यातील नाद माझ्या कायम लक्षात राहील.

सनातनचे पू. भाऊकाका (सदाशिव) परब यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे

१. चैतन्य आणि संतांचे अस्तित्व यांमुळे दिवसभरात 
१० ते ११ घंटे सेवा करून सर्व साधकांची मने दिवसभर उल्हासित असणे
     ‘आम्ही ११.२.२०१६ या दिवशी देवद येथील सनातन आश्रमाचे दर्शन घेतले. नंतर आम्ही सकाळी ११.३० वाजता आश्रमातील जेथे सनातनची ग्रंथसंपदा आहे तेथे पोचलो. येथे प.पू. भक्तराज महाराज, प.पू. गुरुमाऊली आणि भगवान श्रीकृष्ण यांचे अस्तित्व सतत जाणवते. या ठिकाणी सनातनची सर्व ग्रंथसंपदा, तसेच पू. भाऊकाका (पू. सदाशिव परब), पू. नकातेकाका आणि पू. होनपकाका ही गुरुमाऊलींची रूपे दिवसभर कार्यरत असतात. सर्व साधक दिवसभरात १० ते ११ घंटे सेवारत असूनही कुणाच्याही मनावर कोणताही ताण जाणवत नाही, उलट सर्व साधकांची मने दिवसभर उल्हासित असतात.

तुम्हीच अवघे कर्ता-करविता !

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...
परात्पर गुरु
डॉ. जयंत आठवले 
श्रीमती मेघना वाघमारे
     ९.१२.२०१६ या दिवशी सकाळच्या वेळी दैनिक सनातन प्रभातमध्ये ‘नामस्मरण भावपूर्ण होण्यासाठी प्रयत्न केल्यावर श्रीमती मेघना वाघमारे यांना आलेल्या अनुभूती’ आणि त्यासमवेत परात्पर गुरुदेवांची प्रसिद्ध झालेली चौकट वाचली. सकाळपासून भेटलेल्या साधकांनी माझे कौतुक केले. तेव्हा वाटले, ‘यात माझे कसले कौतुक ! हे तर सारे प.पू. गुरुदेवांचे आहे. त्यांच्या कृपेनेच हे सारे घडत आहे अन् होत आहे.’ मी प्रत्येक वेळी साधकांनी केलेले कौतुक प.पू. गुरुदेवांना मनोमन अर्पण करत होते. त्यानंतर नामस्मरणाला बसले असतांना प.पू. गुरुदेवांच्या कृपेने स्फुरलेल्या पद्यपंक्ती त्यांच्याच चरणी अर्पण करत आहे.

सप्तर्षि जीवनाडीत सांगितल्याप्रमाणे राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी सनातनच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांचा अहर्निष प्रवास !

वाचा प्रतिदिन नवीन सदर
महर्षींची शिकवण आणि कार्य !
       ‘सनातनच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ मागील ४ वर्षांपासून भारतभरातील विविध राज्यांत दौर्‍यावर जात आहेत. हिंदु राष्ट्राची (सनातन धर्म राज्याची) शीघ्रतेने स्थापना व्हावी, राष्ट्राचे सर्व नैसर्गिक आपत्तींपासून आणि परकीय आक्रमणांपासून रक्षण होण्यासाठी देवतांचा आशीर्वाद मिळावा, धर्माचे तसेच साधकांचे रक्षण व्हावे, यासाठी सप्तर्षि जीवनाडीत सांगितलेल्या क्षेत्री जाण्याचे त्यांचे नियोजन असते. आतापर्यंत त्यांनी २४ राज्यांतील विविध तीर्थक्षेत्रे, देवस्थाने, संतांचे आश्रम आणि संशोधन केंद्रे इत्यादींना भेटी देऊन तेथील वैशिष्ट्यपूर्ण दगड, माती, तीर्थ आदींचा संग्रह केला आहे. त्याचप्रमाणे तेथील आध्यात्मिक वैशिष्ट्ये चित्रीत केली आहेत. अशा प्रकारे त्यांनी नोव्हेंबर २०१६ पर्यंत ३ लक्ष ५६ सहस्र कि.मी. एवढा प्रवास करून भावी पिढीसाठी भारतातील अलौकिक समृद्ध ठेवा संग्रहित केला आहे. या दैवी प्रवासाची सर्वांना माहिती व्हावी, तसेच महर्षि सांगत असलेल्या दैवी प्रवासाचे महत्त्व लक्षात यावे, यासाठी प्रतिदिन हे सदर प्रसिद्ध करत आहोत.’

सौ. शोभा कौलकर यांच्या वाढदिवसानिमित्त कु. दीपाली पवार यांनी दिलेल्या शुभेच्छापत्रातील लिखाण !

सौ. शोभा कौलकर यांचा वाढदिवस काल झाला. त्यानिमित्ताने
कु. दीपाली पवार यांनी त्यांना शुभेच्छापत्र दिले. त्यांतील लिखाण येथे देत आहोत.
सौ. शोभा कौलकर
     ‘सौ. शोभाकाकू शरणागत भावाने करत असलेली प्रार्थना ऐकून कृष्ण त्यांच्यासमोर प्रगट होतो. त्या वेळी त्यांच्यात झालेले संभाषण पुढे देत आहे. 
१. श्रीकृष्णाला मार्गदर्शन आणि साहाय्य
करण्यासाठी प्रार्थना करणार्‍या सौ. शोभाकाकू ! 
     सौ. शोभा : हे श्रीकृष्णा, मला तुला अपेक्षित अशी साधना आणि प्रगती करायची आहे; पण माझ्याकडून तुला अपेक्षित असे प्रयत्न होत नाहीत. ‘मी स्वतःला पालटण्यासाठी नेमके काय प्रयत्न करायचे ?’, तेच कळत नाही. त्यामुळे मला ताण आणि दडपण येते. कृष्णा, सांग ना मी काय करू ते ? कशी पालटू मी स्वतःला, सांग ना ! कृष्णा, मला तुझे मार्गदर्शन आणि साहाय्य हवे आहे. तुझे साहाय्य आणि मार्गदर्शन यांविना मी पालटू शकेन, असे मला वाटत नाही; म्हणून कृष्णा, माझ्यावर कृपा कर. मला साहाय्य कर. मी तुझ्या चरणी संपूर्णपणे शरण आले आहे.

उत्तम नियोजनासहित सहजतेने सेवा करणारे आणि आनंदी श्री. अमोल बधाले !

श्री. अमोल बधाले
‘     श्री. अमोल बधाले हे ग्रंथांची सेवा चालते तेथे सेवा करतात. गेल्या काही दिवसांपासून ते पुढाकार घेऊन सेवा करत आहेत. सहसाधकांना त्यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये आणि जाणवत असलेला पालट पुढीलप्रमाणे आहेत. 
१. गुणवैशिष्ट्ये 
१ अ. इतरांना समजून घेणे
    साधकांना येणार्‍या अडचणी ते समजून घेऊन बोलतात. काही वेळा साधक काहीही न बोलता त्यांच्या अडचणी ते समजून घेतात आणि त्यानुसार ते त्यांना साहाय्य करतात.
१ आ. सतत हसतमुख आणि वर्तमानकाळात राहणे
    परिस्थिती कशीही असो किंवा ते आजारी असो. ते परिस्थितीचा आनंदाने स्वीकार करून वर्तमानकाळात असतात.

उच्छिष्ट गणपति यज्ञाच्या कालावधीत साधिकेला सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती

१. प.पू. रामभाऊस्वामी यांच्या सत्कार सोहळ्याच्या वेळी आलेल्या अनुभूती 
१ अ. खोलीत प्रवेश केल्यावर वातावरण प्रसन्न वाटणे आणि हा पालट सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यामुळेच झाल्याचे जाणवणे : ‘जानेवारी २०१६ मध्ये झालेल्या उच्छिष्ट गणपति यज्ञ करण्यासाठी प.पू. रामभाऊस्वामी रामनाथी आश्रमात आले होते. त्यांच्या सत्कार सोहळ्याच्या वेळी खोलीत प्रवेश केल्यावर तेथील वातावरण प्रसन्न वाटत होते. त्या वेळी वातावरणात सहजता आणि मोकळेपणाही वाटत होता. वातावरणातील ‘हा पालट सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यामुळेच झाला आहे’, असे मला जाणवले.
१ आ. सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या चरणांतून नारिंगी रंगाचे किरण वातावरणात पसरतांना दिसणे आणि त्यांच्या जागी प.पू. डॉक्टरच बसल्याचे जाणवणे : या सत्कार सोहळ्याच्या वेळी सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ आसंदीवर आसनस्थ झाल्या होत्या. त्या वेळी त्यांच्या चरणांतून नारिंगी रंगाचे किरण वातावरणात पसरतांना दिसले. त्यांच्याभोवती नारिंगी रंगाचे वलय निर्माण झालेले दिसले. त्याच वेळी प.पू. रामभाऊस्वामी यांच्या आसंदीवर नारंगी रंगाचा गोळा दिसला. नंतर त्यांच्या चरणांजवळ श्रीरामाच्या सिंहासनाचा जिथे पाठ टेकतो, तसा आकार दिसला आणि त्या ठिकाणी प.पू. डॉक्टरांचे चरण दिसले. काही वेळाने ‘त्यांच्याऐवजी प.पू. डॉक्टरच तेथे बसले आहेत’, असे दिसले.

सदगुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांना ईश्‍वरी ज्ञानातून स्वतःच्या साधनेविषयी मिळालेली माहिती

श्री. दिवाकर आगावणे
१. सदगुरु (सौ.) गाडगीळकाकू विश्रांती 
घेत असतांना ध्यानावस्थेत असल्याप्रमाणे बोलणे
     ‘सदगुरु (सौ.) गाडगीळकाकूंना ईश्‍वरी ज्ञान मिळते, हे सर्वांना ज्ञातच आहे. ९.१२.२०१६ या दिवशी रात्री १२.३५ वाजता सदगुरु काकू विश्रांती घेत होत्या. त्यांना विश्रांतीला जाऊन अर्धा घंटा झाला होता. अकस्मात् त्या माझ्याशी हळूहळू आणि थांबत थांबत बोलू लागल्या. मला असे वाटले, ‘त्या ध्यानावस्थेतच बोलत आहेत आणि जणू त्या प्रत्यक्ष ती स्थिती अनुभवत आहेत.’ 
२. सदगुरु (सौ.) गाडगीळकाकू यांनी विश्रांती घेत 
असतांना त्यांना स्वतःच्या साधनेविषयी जाणवलेली सूत्रे 
२ अ. सदगुरु गाडगीळकाकू यांना त्या कैलास पर्वतावर उभ्या राहून तपस्या करत असल्याचे आणि शिवाकडून त्यांना प्रकाशाच्या रूपात आशीर्वाद मिळत असल्याचे जाणवणे : त्या म्हणाल्या, ‘‘मी डोळे बंद करते, तेव्हा पुष्कळ वेळा ‘मी कैलास पर्वतावर उभी राहून तपस्या करत आहे’, असे मला जाणवते. कैलासावर शिव बसलेला आहे. तेथून तो मला आशीर्वाद देत आहे. शिवाकडून मला प्रकाशाच्या रूपात आशीर्वाद मिळत आहे’, असे मला जाणवते.

योगेश्‍वरी’ (गाडी) चा दैवी प्रवास

दैवी प्रवासाच्या वेळी त्या प्रवासासाठीच्या 
‘योगेश्‍वरी’ या चारचाकी गाडीचे रक्षण प्रत्यक्ष 
श्रीविष्णु, हनुमान आणि गरुड करत असणे 
    सद्गुरु (सौ.) गाडगीळकाकू प्रवासासाठी उपयोग करत असलेल्या वाहनाला महर्षींनी ‘योगेश्‍वरी’ हे नाव दिले आहे. ‘योगेश्‍वरी’ या दैवी वाहनाचे हनुमान समोरून, गरुडदेव मागच्या बाजूने, तर प्रत्यक्ष श्रीविष्णु वाहनाच्या ‘इंंजिन’चे रक्षण करत आहेत. 
- सौ. उमा रविचंद्रन, चेन्नई, तमिळनाडू. (१५.६.२०१६)
   (दैवी प्रवासासाठी ‘योगेश्‍वरी’ या चारचाकी वाहनाचा उपयोग आरंभ करण्यापूर्वी त्या वाहनाचे शास्त्रोक्त पूजन करण्यात आले. धर्मशास्त्राप्रमाणे हे पूजन करतांना वाहनाच्या पुढच्या भागात हनुमान, त्याच्या थोडे मागे ‘इंजिन’ असलेल्या ठिकाणी श्रीविष्णु आणि मागच्या बाजूला गरुडदेवता यांना आवाहन करून त्यांची स्थापना करतात. ते केल्यामुळे साधकांना त्या देवता वाहनासमवेत प्रत्यक्ष असल्याची अनुभूती येते. - संकलक)
     सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळकाकूंचा एकेक शब्द म्हणजे ज्ञानामृत असते. आपल्याला ते ऐकत रहावेसे वाटते. आपण ‘अष्टपैलू व्यक्तीमत्त्व’ ऐकलेले असते. सद्गुरु काकूंचे व्यक्तीमत्त्व किती पैलूंचे आहे, ते लक्षात येत नाही ना ?’ - सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ

स्वीकारण्याची वृत्ती आणि श्रीकृष्ण अन् संत यांप्रती भाव असलेला उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला ५५ टक्के आध्यात्मिक पातळीचा ठाणे येथील कु. मल्हार अरविंद कौसडीकर (वय ९ वर्षे) !

उच्चलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन
धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. मल्हार कौसडीकर एक दैवी बालक आहे !
कु. मल्हार कौसडीकर
पालकांनो, हे लक्षात घ्या ! 
     ‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ - (परात्पर गुरु) डॉ. आठवले 
     यासमवेतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.
१. देवाची आवड असणे
    ‘मल्हार नियमितपणे शुभंकरोती, रामरक्षा आणि मारुतीस्तोत्र म्हणतो. तो सतत प्रार्थना करतो आणि कधी देवासमोर बसून नामजपही करतो.

सनातनची सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथ यांचे प्रदर्शन !

     दत्त जयंतीच्या निमित्ताने श्री क्षेत्रनृसिंहवाडी (जिल्हा कोल्हापूर) येथे विठठलमंदिरासमोर, तसेच श्री क्षेत्रऔदुंबर (जिल्हा सांगली) येथील मंदिराबाहेर १४ डिसेंबरपर्यंत सनातनची सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथप्रदर्शन यांचे आयोजन करण्यात आले आहे.

साधकांना सूचना !

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
काल पौर्णिमा झाली.

साधकांना सूचना !

बालसंस्कारविषयक फलक उपलब्ध ! 
   सनातन संस्थेच्या वतीने बालकांवर सुसंस्कार करणारे पुढील आकारातील फ्लेक्स फलक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. (सोबत त्याचे नमुन्यासाठीचे आर्टवर्क दिले आहे.)
१. आकार २.२५ फूट × ३.५ फूट 
अ. वाढदिवस तिथीनुसार करा ! 
आ. मुलांनो, प्रतिदिन देवाला प्रार्थना करा ! 
इ. अभ्यास चांगला होण्यासाठी हे करा ! 
२. आकार १.५ फूट × २ फूट 
अ. शास्त्रानुसार कृती करा ! 
आ. हिंदु संस्कृतीचे पालन करा !
इ. हिंदु संस्कृतीचा अभिमान जोपासा ! 
   या फलकांचा उपयोग प्राथमिक आणि माध्यमिक शाळा, बालसंस्कारवर्ग, शिकवणीवर्ग, लहान मुलांची सहलीची ठिकाणे आणि अन्य ठिकाणी करू शकतो. तरी साधकांनी या फलकांसाठी प्रायोजक मिळवून ते अधिकाधिक ठिकाणी लावण्याचे प्रयत्न करावेत, जेणेकरून भावी पिढी घडवण्यासाठी त्याचा लाभ होईल.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
‘        शालेय शिक्षणात जीवनात सर्वात उपयुक्त असा विषय, म्हणजे साधना शिकवत नाहीत, तर इतर सर्व विषय शिकवतात. त्यामुळे समाजात सर्वत्र दुराचार पसरला आहे. याउलट हिंदु राष्ट्रात धर्मशिक्षण असल्यामुळे एकही गुन्हेगार नसेल !’ 
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

बोधचित्र

॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. 
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
ईश्‍वरालाच जिंकणे 
विषयांपेक्षा विषयांच्या निर्मात्यालाच का जिंकू नये ? 
भावार्थ : एकेक विषय जिंकत जायचे म्हटले तर वासना, आवडी-निवडी, स्वभावातील दोष, असे लाखो विषय जिंकायला, म्हणजे त्यांच्यावर नियंत्रण मिळवायला लाखो जन्म लागतील. त्यापेक्षा त्या सर्वांच्या निर्मात्यालाच भक्तीने या जन्मात जिंकले, तर त्या सर्वांवर या जन्मातच नियंत्रण मिळविता येईल; म्हणूनच म्हटले आहे, ‘एक साधै सब साधै । सब साधै सब जाय ॥ म्हणजे एका नामाला, भगवंताला (नाम आणि भगवंत एकच आहेत.) साध्य केले म्हणजे सर्वच साध्य होते. सर्व साध्य करायला गेलो, तर काहीच साध्य होत नाही. 
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.’)

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

सदाचाराचे महत्त्व ! 
मानवाचे रूप अल्प काळाचे असते. रूपाला महत्त्व नसते, 
तर व्यक्तीचे आचार-विचार आणि वर्तन यांनाच खरे महत्त्व असते. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

काळ्याचे पांढरे !

संपादकीय
     नोटाबंदी घोषित करून एक मास उलटून गेला आहे. पंतप्रधान मोदी यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगतांना देशवासियांकडे ५० दिवसांचा कालावधी मागितला आहे. या कालावधीची ते परत परत जनतेला जाणीव करून देत आहेत; कारण जनता नोटाबंदीनंतरच्या चलन तुटवड्याचा अजूनही सामना करत आहेत. त्यात तिला मनस्ताप होत आहे. या कालावधीत काही जणांचा मृत्यूही झाला, तर काहींनी आत्महत्याही केल्या आहेत. अशा वेळी जनतेला आणखी काही काळ कळ सोसण्यासाठी मोदी आवाहन करत आहेत. ५० दिवसांनंतर जनतेला आता भोगाव्या लागणारे त्रास समाप्त होतील, असे आश्‍वासन ते देत आहेत.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn