Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

ज्ञान प्राप्त होण्यातील टप्पे

१. ‘ईश्‍वराकडून ज्ञान प्र्राप्त होणे
२. ईश्‍वरी ज्ञान जिवाने मानवी भाषेत समजून घेणे 
३. ज्ञान शब्दबद्ध करणे
    ही प्रक्रिया काही सेकंदांची असते.’ 
- श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२९.९.२०१५)

कोटी कोटी प्रणाम !

प.प. श्रीधरस्वामी यांची आज जयंती

कोटी कोटी प्रणाम !

सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांचा आज वाढदिवस

सनातनचे २६ वे संत पू. सदाशिव (भाऊ) परब यांचा आज वाढदिवस

हिदु युवकांनो, देश आणि धर्म यांसाठी समर्पित व्हा !

भाग्यनगर येथील भाजपचे आमदार राजासिंह ठाकूर यांचे आवाहन !
कोल्हापूर येथील हिंदु धर्मजागृती सभेला ४ सहस्र ५०० हून अधिक हिंदूंची उपस्थिती
ज्यांना हिंदु धर्माचे कार्य करायचे आहे, त्यांनी हिंदु जनजागृती
समितीला जोडून घेऊन कार्य केले पाहिजे ! - श्री. राजासिंह ठाकूर
श्री. राजासिंह ठाकूर
   कोल्हापूर - ‘लव्ह जिहाद’सारखी अनेक संकटे आज आपल्यासमोर आहेत. राज्यकर्ते मतपेढीच्या राजकारणात मग्न असल्याने ‘भारतमाता की जय’ म्हणण्यास नकार देणार्‍यांना प्रत्युत्तर दिले जात नाही. बांगलादेशातील हिंदूंना वेचून वेचून मारले जात आहे, तर भारतात ख्रिस्ती आणि इस्लामी हे हिंदूंना संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा वेळी हिंदवी स्वराज्य स्थापन करतांना छत्रपती शिवाजी महाराज यांची जी भावना होती, ती आपल्याला जागृत करावी लागेल. तरी हिंदु युवकांनो, देश आणि धर्म यांसाठी तन, मन, धन समर्पण करण्याची सिद्धता ठेवा, असे जाज्वल्य आवाहन भाग्यनगर (हैद्राबाद) येथील श्रीराम युवा सेनेचे संस्थापक अध्यक्ष आणि भाजपचे आमदार श्री. राजासिंह ठाकूर यांनी केले. रविवार, ११ डिसेंबर या दिवशी कोल्हापूर येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित केलेल्या हिंदु धर्मजागृती सभेत बोलत होते. हिंदूंमध्ये राष्ट्रकार्यासाठी उत्साह निर्माण करणारी ही सभा पद्माराजे गर्ल्स हायस्कूलच्या पटांगणात पार पडली. या सभेत सनातन संस्थेच्या प्रसारसेविका सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, सोलापूर जिल्हा रणरागिणी शाखेच्या संघटक सौ. अलका व्हनमारे आणि हिंदु जनजागृती समितीचे पश्‍चिम महाराष्ट्र समन्वयक श्री. मनोज खाडये यांनीही मार्गदर्शन केले.

चेन्नईमध्ये ‘वरदा’ चक्रीवादळात २ ठार !

    चेन्नई - ताशी १२० किलोमीटरच्या वेगाने ‘वरदा’ चक्रीवादळ चेन्नईच्या किनार्‍यावर धडकले आहे. सोसाट्याच्या वार्‍याने किनारपट्टीवरील अनेक वृक्ष उन्मळून पडले आहेत. १२ डिसेंबरला दुपारपर्यंत चक्रीवादळात २ जण ठार झाल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. चेन्नईत ठिकठिकाणी वाहतूक ठप्प झाली आहे. ७ सहस्र लोकांना सुरक्षित ठिकाणी हालवण्यात आले आहे. खबरदारी म्हणून चेन्नई विमानतळावरील वाहतूक थांबवण्यात आली. त्याचप्रमाणे चक्रीवादळाचा कुठलाही धोका निर्माण होऊ नये, यासाठी येथील अणूऊर्जा प्रकल्पात आवश्यक खबरदारी घेण्यात आली आहे. मच्छीमारांनाही चेतावणी देण्यात आली आहे. साहाय्यतेसाठी सैन्याच्या ७ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
१. चेन्नई आणि त्याच्या आसपासच्या परिसरात ११ डिसेंबरच्या रात्रीपासून पाऊस पडत होता. चेन्नईतील स्थानिकांना घरीच रहाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. आवश्यकता असेल, तरच लोकांनी घराबाहेर पडावे, असे सांगण्यात आले आहे.
२. १२ डिसेंबरला चेन्नई, कांचीपुरम् आणि तिरुवलून यांसह किनारी भागातील सर्व शाळा-महाविद्यालये यांना सुट्टी देण्यात आली होती, तसेच अण्णा विश्‍वविद्यालयाने १२ डिसेंबरला होणारी परीक्षा पुढे ढकलली आहे.
३. बंगालच्या खाडीतून उठलेले ‘वरदा’ या हंगामातील तिसरे चक्रीवादळ आहे.

ऑगस्टा वेस्टलॅण्ड घोटाळ्याच्या प्रकरणी डॉ. मनमोहन सिंह यांची चौकशी होण्याची शक्यता !

     नवी देहली - ऑगस्टा वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर खरेदी घोटाळ्याच्या प्रकरणी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांची केंद्रीय अन्वेषण विभागाकडून चौकशी करण्यात येण्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त डॉ. मनमोहन सिंह यांचे मुख्य सचिव राहिलेले टी.के.ए. नायर, केंद्रीय अन्वेषण विभागाचे माजी संचालक रंजीत सिन्हा आणि माजी राष्ट्र्रीय सुरक्षा सल्लागार एम्.के. नारायणन् यांचीही चौकशी होण्याची शक्यता आहे. या प्रकरणात माजी वायूदल प्रमुख एस्.पी. त्यागी यांना अटक करण्यात आली आहे. त्यांनी न्यायालयात सांगितले होते की, या प्रकरणातील निर्णयाची माहिती पंतप्रधान कार्यालयाला होती. (काँग्रेस सत्ताच्युत होऊन अडीच वर्षे लोटली असतांना आतापर्यंत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांची कोळसा खाण वाटप, २-जी, ऑगस्टा वेस्टलॅण्ड आदी त्यांच्या कार्यकाळात झालेल्या घोटाळ्यांसाठी चौकशी का करण्यात आली नाही ? या घोटाळ्यांमुळेच जनतेने काँग्रेला सत्तेतून हाकललेे, हे आताच्या सरकारला ठाऊक नाही का ? - संपादक)

इसिसमध्ये भरती झालेला मुंब्य्रातील तबरेज हा लिबिया सरकारच्या कह्यात !

     ठाणे - मुंब्य्रातील कौसा भागात रहाणारा तबरेज तांबे (वय २८ वर्षे) हा इसिसमध्ये भरती झाल्याची माहिती स्वतः त्याच्या भावाने दिल्यानंतर तबरेजला लिबिया सरकारने अटक केल्याची माहिती समोर आली आहे. तबरेज हा काही दिवसांपूर्वी ‘नोकरीसाठी जातो’, असे सांगून इजिप्तला गेला होता. तो भ्रमणभाष आणि सोशल मीडिया यांच्या माध्यमातून कुटुंबियांच्या संपर्कात होता.


घाटकोपर येथे आदिनाथ संप्रदायाच्या वतीने आज दत्त जयंती सोहळा

     मुंबई, १२ डिसेंबर (वार्ता.) - आदिनाथ संप्रदायप्रणीत सद्गुरु प.पू. गोपाळ रामचंद्र बसणकर महाराज (समर्थ हिराजीनाथ महाराज यांचे अनुग्रही) यांच्या मार्गदर्शनानुसार प्रतिवर्षाप्रमाणे मार्गशीर्ष पौर्णिमा म्हणजे १३ डिसेंबर या दिवशी दत्त जयंती सोहळा आयोजित करण्यात आला आहे. घाटकोपर (पश्‍चिम) येथील लालबहाद्दूर शास्त्री मार्गावरील प्रेसिडेन्शीयल टॉवरच्या ‘बी’ विंगमधील दत्त मंदिरात हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात नित्यपूजा, श्री दत्तयाग हवन, श्री सत्यनारायणाची महापूजा, दत्तजन्म आणि दर्शन, भजन अन् महाप्रसाद अशा प्रकारे कार्यक्रमाचे स्वरूप आहे. या कार्यक्रमाला श्री. शामजी हिराजी गोगरी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. 
     सर्व अनुग्रहित साधक आणि मित्रमंडळी यांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आदिनाथ संप्रदाय घाटकोपर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

नथुराम गोडसेंचा दहशतवादी असा उल्लेख करणार्‍या आव्हाड यांचे तोंड काळे करू ! - अजयसिंह सेंगर

     नवी मुंबई - ११ डिसेंबर या दिवशी ठाणे येथे ‘हु किल्ड गांधी’ या चर्चासत्रात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या भाषणात ‘नथुराम गोडसे दहशतवादी होता’, असे उद्गार काढले. त्यावर प्रेक्षकांमध्ये बसलेले ‘महाराणा प्रताप बटालियन’चे अध्यक्ष श्री. अजयसिंह सेंगर यांनी ‘नथुराम गोडसे देशभक्त होते’, असे ओरडून सांगितले. त्या वेळी सभागृहात गोंधळ निर्माण झाला. या वेळी पोलिसांनी सेंगर यांना सभागृहाबाहेर नेऊन कह्यात घेतले. महात्मा गांधींचे पणतु श्री. तुषार गांधी या वेळी चर्चासत्रात उपस्थित होते.
     याविषयी काढलेल्या प्रसिद्धीपत्रकामध्ये श्री. सेंगर यांनी नमूद केले आहे की, या देशात नथुराम गोडसे, भगतसिंह यांसारख्या महान क्रांतिकारकांचा अपमान सहन केला जाणार नाही. या देशात आव्हाड सारख्या व्यक्ति नथुरामजी सारख्या देशभक्तास दहशतवादी म्हणतात, त्या आव्हाड यांचे तोंड काळे केल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही., असे श्री. सेंगर यांनी सांगितले.

फलक प्रसिद्धीकरता

शाळेत योगाभ्यासाला विरोध करणारे धर्मनिरपेक्षवादी आता गप्प का ?
     पनवेल येथील ‘दिल्ली पब्लिक स्कूल’च्या नर्सरी ते इयत्ता ८ वीपर्यंतच्या प्रवेशासाठी लावण्यात आलेल्या विज्ञापनामध्ये एका छोट्या मुलीला ‘नन’च्या वेशात दाखवण्यात आले आहे. यामुळे धर्मांतराचा अंतस्थ प्रयत्न उघड झाल्याची चर्चा आहे.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Panvel (Maharashtra)ke Delhi Public School ne admissionke vigyapan me ek ladkiko nun ke vesh me dikhaya.
Yog ki shiksha ka virodh karnewale ab chup kyu ?

जागो ! : पनवेल (महाराष्ट्र)के दिल्ली पब्लिक स्कूलने एडमिशन के विज्ञापनमें एक लडकीको ननके वेषमें दिखाया ।
योग की शिक्षा का विरोध करनेवालें अब चुप क्यूं ?

साक्षात् श्री दत्तात्रेयांच्या अस्तित्वाची अनुभूती देणारी जागृत तीर्थक्षेत्रे

१. माहूर : ता. किनवट, जि. नांदेड, महाराष्ट्र.
२. गिरनार : जुनागडजवळ, सौराष्ट्र. याला १०,००० पायर्‍या आहेत.
३. कारंजा : श्री नृसिंह सरस्वतींचे जन्मस्थान. लाड-कारंजे हे याचे दुसरे नाव होय. काशीचे ब्रह्मानंद सरस्वती यांनी या स्थानी प्रथम दत्तमंदिर उभारले.
४. औदुंबर : श्री नृसिंह सरस्वतींनी येथे चातुर्मास-निवास केला. हे स्थान महाराष्ट्रातील भिलवडी स्थानकापासून १० कि.मी. अंतरावर कृष्णाकाठी आहे.

श्री दत्तगुरूंच्या जागृत तीर्थक्षेत्रांचे ‘याचि देही, याचि डोळा’ दर्शन !

ब्रह्मा, विष्णु आणि महेश्‍वर सामोरे बसले । मला हे दत्तगुरु दिसले ।’
     हे प्रसिद्ध भजन ऐकले की, आपल्यासमोर भगवान दत्तात्रेयांची सुकोमल मनोहर मूर्ती उभी रहाते. महाराष्ट्रात माहूर, कारंजा, माणगाव, गाणगापूर, औदुंबर, नृसिंहवाडी अशी श्री दत्तगुरूंची देहावतारी दत्तपिठे आहेत. यांतील काही तीर्थक्षेत्रांच्या दर्शनाचा लाभ आपण घेऊया.
कोल्हापूर येथील श्री दत्त भिक्षालिंग देवस्थान : श्री दत्तगुरु महालक्ष्मीकडे भिक्षा मागून येथे येतात

वनस्पतीशास्त्रातील तज्ञ आणि अभ्यासू, तसेच या विषयाचे शिक्षण घेणारे विद्यार्थी यांना वैज्ञानिक दृष्टीने संशोधन करण्याची विनंती !

     ‘योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी सांगितल्याप्रमाणे रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमात दत्तमालामंत्राचे पठण करतांना आश्रम परिसरात नैसर्गिक पालट घडले आहेत.
१. आश्रमात दत्तमालामंत्राचे पठण चालू केल्यानंतर औदुंबराची रोपे उगवण्यामागील वैज्ञानिक कारण काय ?
२. अधिक संख्येने औदुंबराचीच रोपे उगवण्याचे कारण काय ? या ठिकाणी इतर रोपे का आली नाहीत ?
३. पठण चालू झाल्यावर ध्यानमंदिराच्या शेजारी यज्ञकुंडाच्या परिसरात औदुंबराची अनेक रोपे आपोआप उगवली. आश्रमात अन्य ठिकाणी ही रोपे का उगवली नाहीत ? ध्यानमंदिराच्या शेजारी यज्ञकुंडाच्या परिसरात, वातावरणात किंवा मातीत कोणता पालट झाल्यामुळे ही रोपे उगवली ?
४. ‘औदुंबराच्या या रोपांचे कोणत्या वैज्ञानिक उपकरणांद्वारे संशोधन करावे ?’, या संदर्भात वैज्ञानिक दृष्टीने संशोधन करणार्‍यांचे साहाय्य लाभल्यास आम्ही कृतज्ञ असू.’
व्यवस्थापक, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. 
(ई-मेल : savv.research@gmail.com)

दत्त जयंती उत्सव भावपूर्ण होण्यासाठी हे करा !

१. स्त्रियांनी नऊवारी साडी अन् पुरुषांनी सदरा-धोतर/पायजमा अशी सात्त्विक वस्त्रे परिधान करून उत्सवात सहभागी व्हावे.
२. विद्यार्थ्यांसाठी ‘श्रीदत्तात्रेयकवच’ पठण ठेवावे, त्यांच्याकडून दत्ताचा नामजप करवून घ्यावा.
३. उत्सवाच्या ठिकाणी कर्णकर्कश संगीत लावणे, विद्युत रोषणाईचा झगमगाट यांसारख्या रज-तम निर्माण करणार्‍या कृती करू नयेत.
४. दत्त जयंतीच्या मिरवणुकीत टाळ, मृदुंग अशी सात्त्विक वाद्ये वापरावीत.

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ।’ या नामजपाचा भावार्थ

‘     श्री’ म्हणजे लक्ष्मी आणि ती ज्याच्या पायाशी आहे तो ‘श्रीपाद’. ‘श्रीपाद वल्लभ’ म्हणजे लक्ष्मी त्याच्या पायाशी असून तो लक्ष्मीचा स्वामी आहे, असा (श्रीविष्णु).
     ‘सर्व रूपांच्या समुच्चयातून निर्माण झालेला, दत्ताचे गुणगान आणि महती वर्णन करणारा, आवाहनात्मक मंत्र म्हणजे ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ।’ दोन वेळा होणारा निर्गुणरूपी दिगंबराचा उच्चार हा निर्गुणातून उत्पन्न होणारी आणि द्वैत दर्शवणारी ‘श्रीपाद’ आणि ‘वल्लभ’ ही दोन रूपे प्रकट करून परत एकत्वात म्हणजेच दिगंबररूपी अद्वैतात जातो.’ - एक विद्वान (सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ या ‘एक विद्वान’ या नावाने भाष्य करतात. ७.६.२००५)

श्री नृसिंह सरस्वती यांच्या मनोहर पादुका असलेले श्री क्षेत्र नृसिंहवाडी

     श्रीक्षेत्र नृसिंहवाडी, कृष्णा-पंचगंगा या नद्यांच्या संगम-तिरावर वसलेलं नयनरम्य तीर्थस्थळ ! दत्तप्रभूंचे दुसरे अवतार श्री नृसिंह सरस्वती स्वामींनी या ठिकाणी तब्बल १२ वर्षे तपश्‍चर्या केली. त्यांच्या वास्तव्यामुळेच या क्षेत्राला नृसिंहवाडी असे नाव पडले. तपःसाधना झाल्यावर श्री नृसिंह सरस्वती स्वामींनी या ठिकाणी औदुंबर वृक्षातळी मनोहर पादुकांची स्थापना केली. सांगली जिल्ह्यातील औदुंबर येथे त्यांच्या विमल पादुका आहेत, तर कर्नाटक राज्यातील गाणगापूरला त्यांच्या निर्गुण पादुका आहेत.

संकलकांची थोडक्यात ओळख

     डॉ. अजय गणपतराव जोशी हे १६ वर्षे पुणे येथील बीएआयएफ् या संस्थेत कार्यकारी अधिकारी होते, तसेच त्यांनी पुणे येथील ‘व्हेंट्री बायोलॉजिकल्स्’ येथे १६ वर्षे उत्पादन व्यवस्थापक (प्रॉडक्ट मॅनेजर) म्हणून काम केले आहे.
     या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. - संपादक
वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषीमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत.

दत्तगुरूंचा नामजप करत असतांना ‘पूर्वज दत्तगुरु आणि प.पू. डॉक्टर यांच्या चरणी कृतज्ञताभावाने नतमस्तक होऊन गुरुचरणी गेल्यावर मुक्त होत आहेत’, असे दिसणे

      ‘२२.९.२०१६ या दिवशी मी दत्तगुरूंचा नामजप करत असतांना ‘माझ्या समोर दत्तगुरु विराजमान आहेत आणि मी त्यांच्या चरणांशी बसून नामजप करत आहे’, असा भाव ठेवला होता. त्या वेळी मला दिसले, ‘माझे असंख्य पूर्वज दत्तचरणी नतमस्तक होत आहेत आणि त्याच क्षणी त्यांना मुक्ती मिळून ते अदृश्य होत आहेत.’ मी दत्तगुरूंना विचारले, ‘यांना केवळ मी करत असलेल्या नामजपामुळे मुक्ती मिळू शकत नाही. मग हे कसे होत आहे ?’ त्या वेळी दत्तगुरु म्हणाले, ‘तुझ्यामागे कोण आहे, ते बघ.’ मी मागे वळून पाहिल्यावर मला प.पू. डॉक्टर दिसले. त्यांचा आशीर्वादरूपी हात माझ्या डोक्यावर होता आणि त्यांच्या हातांतून पिवळ्या रंगाचे चैतन्य माझ्या सहस्रारचक्रात जात होते. तेव्हा माझ्या लक्षात आले, ‘गुरुमाऊलीच्या कृपेने दत्तगुरु पूर्वजांना मुक्त करत आहेत.’
   पूर्वजांना गुरुदेवांप्रती कृतज्ञता वाटून ते कृतज्ञताभावाने दत्तगुरु आणि गुरुमाऊलीलाही वंदन करत होते. पूर्वज गुरुचरणी गेल्यावर मुक्त होतांना दिसले. या वेळी मला माझे आजी-आजोबा यांचे तोंडवळे स्पष्टपणे दिसले. मला हे दृश्य २० मिनिटे दिसत होते.

अतृप्त पूर्वजांमुळे होणार्‍या त्रासांवर उपाय म्हणून दत्ताचा नामजप करणे

     सध्याच्या काळी बहुतांश जण साधना करत नसल्याने मृत्यूनंतर त्यांच्या अनेक इच्छा-आकांक्षा अतृप्त रहातात. त्यामुळे अशा व्यक्तींचे लिंगदेह भुवलोकात अडकतात. भुवलोकातून सुटण्यासाठी भूतलावर असलेल्या आपल्या कुटुंबियांनी आपल्यासाठी काहीतरी करावे, यासाठी ते त्यांना त्रास देतात; मात्र सध्याच्या काळी पूर्वीप्रमाणे कोणी श्राद्ध-पक्ष इत्यादी, तसेच साधनाही करत नसल्याने बहुतेक सर्वांनाच अशा पूर्वजांच्या अतृप्त लिंगदेहांमुळे आध्यात्मिक त्रास होतो. अतृप्त पूर्वजांमुळे त्रास होण्याची शक्यता आहे किंवा त्रास होत आहे, हे उन्नतच सांगू शकतात. तसे सांगणारे उन्नत न भेटल्यास पुढे दिलेल्यापैकी काही प्रकारचे त्रास अतृप्त पूर्वजांमुळे होतात असे समजावे - विवाह न होणे, पती-पत्नीचे न पटणे, गर्भधारणा न होणे, गर्भपात होणे, मूल अपुर्‍या दिवसांचे जन्मणे, मतीमंद किंवा विकलांग अपत्य होणे, अपत्य बालपणातच मृत्यूमुखी पडणे इत्यादी; व्यसन, दारिद्र्य, शारीरिक व्याधी अशीही लक्षणे असू शकतात. यासाठी ‘'श्री गुरुदेव दत्त'’ हा नामजप करावा. (संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘दत्त’)

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी सांगितल्याप्रमाणे दत्तमालामंत्राचे पठण केल्यावर रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील ध्यानमंदिराजवळील परिसरात औदुंबराची रोपे उगवणे

सनातन आश्रमातील एक बुद्धीअगम्य घटना
औदुंबराच्या रोपांवर आलेले सुरवंट
१. गोव्यातील सनातनच्या 
आश्रमात होत असलेल्या 
दत्तमालामंत्राच्या पठणाविषयी माहिती
    ‘सनातन संस्थेवरील संकट दूर होण्यासाठी महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथील थोर संत योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी सांगितल्याप्रमाणे सप्टेंबर २०१५ मध्ये गोव्यातील सनातनच्या आश्रमातील ध्यानमंदिरात दत्तमालामंत्राचे पठण चालू केले. पठणास आरंभ झाल्यापासून काही मास (महिने) सकाळी, दुपारी आणि सायंकाळी अशी एका दिवसात पठणाची ३ सत्रे करण्यात येत. ऑगस्ट २०१६ पासून आजपर्यंत (१५.११.२०१६ पर्यंत) प्रतिदिन २१ साधक एका सत्रात १२ वेळा करण्यात येत आहे.

अतृप्त लिंगदेहाविषयी साधिकेला जाणवलेली आणि शिकायला मिळालेली सूत्रे

     ‘माझ्या बहिणीचा मुलगा याचा वर्ष २०१६ मध्ये ‘ब्लड कॅन्सर’ने मृत्यू झाला. त्या वेळी त्याच्या १० वीच्या परीक्षेचा तिसरा पेपर चालू होता. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या लिंगदेहाविषयी जाणवलेली आणि शिकायला मिळालेली सूत्रे येथे देत आहे.
१. लिंगदेहाविषयी जाणवलेली सूत्रे
१ अ. मुलाचा सूक्ष्म-देह त्याच्या मृतदेहाजवळ घुटमळत असल्याचे जाणवणे : त्याचा मृतदेह त्याच्या गावी धाकवली येथे होता. तेव्हा त्याच्या प्रेताजवळ त्याचा सूक्ष्म-देह घुटमळत असल्याचे जाणवले. मृत्यूसमयी त्याच्या मनात परीक्षा देणे, गुण मिळवणे, पुढे शिकणे, या तीव्र इच्छा होत्या. तेव्हा त्याच्या लिंगदेहाला ‘आपण शरिरापासून वेगळे झालो आहोत. इतर सर्व का रडतात ?’, हेे कळत नसल्याने तो गोंधळलेल्या स्थितीत असल्याचे जाणवले.

श्री. अशोक रेणके यांना सनातन संस्थेत येण्यापूर्वी, संस्थेत आल्यानंतर आणि प.पू. डॉक्टरांची भेट झाल्यावर आलेल्या अनुभूती

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...
परात्पर गुरु
डॉ. जयंत आठवले
१. एका संप्रदायातील महाराजांना शिष्य करून घेण्यास आणि दीक्षा देण्यास सांगितल्यावर त्यांनी ‘योग्य वेळ येताच गुरु भेटतील’, असे सांगणे अन् कालांतराने सनातन संस्थेशी जोडल्यानंतर त्याविषयी उलगडा होणे : ‘प.पू. डॉक्टरांच्या कृपेने मी वर्ष १९९७ मध्ये सनातन संस्थेशी जोडले गेलो, हे माझे परम भाग्य आहे. जगात अध्यात्म शिकवणार्‍या अनेक संस्था आहेत; परंतु सनातन संस्थेसारखी संस्था विरळच ! सनातन संस्थेशी जोडण्यापूर्वी मी वेगवेगळ्या संप्रदायांप्रमाणे साधना करत होतो. वर्ष १९९६ मध्ये बार्शी (जिल्हा सोलापूर) येथे श्रावण मासानिमित्त प्रत्येक दिवशी एका संप्रदायाच्या महाराजांच्या प्रवचनाला मी जात असे. त्या वेळी मला वाटले, ‘हे अध्यात्मातील
श्री. अशोक रेणके
एक अधिकारी संत आहेत. आपण यांना भेटून पुढील मार्गदर्शन घेऊया आणि साधना चालू ठेवूया.’ त्यानंतर मी एके दिवशी त्या महाराजांना म्हणालो, ‘‘महाराज, मला तुमचा शिष्य करून घ्या. मला दीक्षा द्या.’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘तुम्हाला थोडे दिवस वाट पहावी लागेल. योग्य वेळ येताच तुम्हाला तुमचे गुरु भेटतील. तोपर्यंत तुम्ही नामजप करत रहा.’’ कालांतराने मी सनातन संस्थेशी जोडल्यानंतर मला अध्यात्माचे धडे मिळाले. ‘साधना म्हणजे काय ? ती आपण आपल्या जीवनात कसे आत्मसात करू शकतो ? गुरु करायचे असतात का ? जीवनात गुरु कसे येतात ?’ इत्यादी सर्व शिकायला मिळाले. तेव्हा माझ्या लक्षात आले, ‘मी महाराजांना ‘दीक्षा द्या, शिष्य करून घ्या’ इत्यादी जे म्हणालो, ते स्वतः ठरवायचे नसते. स्वतःहून कुणाला गुरु करायचे नसते. आपल्या जीवनात गुरु स्वत:च येतात.’

दत्तजयंती

     एक सांप्रदायिक जन्मोत्सव. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रांत साजरा होत असतो.
इतिहास
     ‘पूर्वीच्या काळी भूतलावर स्थूल आणि सूक्ष्म रूपांत अनिष्ट शक्ती मोठ्या प्रमाणावर वाढल्या होत्या. त्यांना दैत्य म्हटले जात असे. देवगणांनी अनिष्ट शक्तींच्या निर्मूलनासाठी केलेले प्रयत्न अयशस्वी झाले. तेव्हा ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रूपांत दत्त देवतेला अवतार घ्यावा लागला. त्यानंतर दैत्य नष्ट झाले. तो दिवस ‘दत्तजयंती’ म्हणून साजरा करतात.’
महत्त्व
     दत्तजयंतीला दत्ततत्त्व हे पृथ्वीतलावर नेहमीच्या तुलनेत १,००० पटींनी कार्यरत असते. या दिवशी दत्ताची मनोभावे नामजपादी उपासना केल्यास दत्ततत्त्वाचा लाभ मिळण्यास साहाय्य होते.

सनातन-निर्मित दत्ताचे सात्त्विक ‘चित्र’

     प्रत्येक देवता हे एक विशिष्ट तत्त्व आहे. देवतेचे द्विमितीय रूप (चित्र) वा त्रिमितीय रूप (मूर्ती) हे जितके त्या देवतेच्या मूळ रूपाशी जुळणारे असेल, तितके त्यात त्या देवतेचे तत्त्व अधिक आकृष्ट होते. देवतेचे तत्त्व रूपामध्ये जितके अधिक असते, तितका पूजकामध्ये भक्तीभाव लवकर जागृत होण्यास साहाय्य होते. अशा रूपातून देवतेची स्पंदने अधिक प्रक्षेपित होत असल्याने वातावरणही सात्त्विक बनते.

दत्ताच्या नामजपामुळे होणारे लाभ

१. ‘दत्ताच्या नामजपामुळे पूर्वजांना गती मिळाल्याने घरातील वातावरण आनंदी रहाण्यास साहाय्य होते.
२. दत्ताच्या नामजपामुळे जिवाला शिवाचीही शक्ती मिळते.’
- श्री. भरत मिरजे २.११.२००५, रात्री ८.३०

दत्ततत्त्व आकृष्ट आणि प्रक्षेपित करणार्‍या रांगोळ्या

११ ठिपके ११ ओळी

६ ठिपके ६ ओळी

(संदर्भ : सनातनचा लघुग्रंथ ‘देवतांची तत्त्वे आकृष्ट व प्रक्षेपित करणार्‍या रांगोळ्या’)

दत्तमाला मंत्रपठण करतांना 'दत्तमाला मंत्र लिहिलेल्या कागदावरच दत्तगुरु उभे आहेत', असा भाव ठेवल्यावर दत्तगुरु स्पष्टपणे दिसू लागून त्यांच्या जटेतील केसांवर पसरलेल्या जांभळ्या रंगातून 'जांभळे ॐ' इतरत्र जात असल्याचे दिसणे

     ‘२२.१.२०१६ या दिवशी मी एका संतांनी सांगितल्यानुसार रामनाथी आश्रमात सामूहिक दत्तमाला मंत्रपठण करण्यासाठी सकाळी ९.४० वाजता बसले होते. मी '‘दत्तमाला मंत्र लिहिलेल्या कागदावरच दत्तगुरु उभे आहेत'’, असा भाव ठेवून पठण चालू केले. काही वेळाने मला पठण करतांना आनंद वाटू लागून ‘'मी दत्तगुरुंनाच त्यांची स्तुती ऐकवत आहे'’, असे जाणवू लागले. मला कागदावर दत्तगुरु स्पष्टपणे दिसू लागले.

दत्ताचा नामजप करतांना आलेल्या अनुभूती

१. श्रीमती जेनी, अमेरिका 
१ अ. स्वप्नात साधू नामजप करत असल्याचे दिसणे : ‘सत्संगाच्या दिवशी पहाटे ५ ते ६ या कालावधीत पडलेल्या स्वप्नात मला ख्रिस्ती धर्मोपदेशक नामजप करत असल्याचे दिसले. त्यानंतर मी झोपेतून उठले आणि ‘ईश्‍वराने मला शक्ती दिली आहे’, असे वाटून आनंद जाणवला. (मला बर्‍याच वेळा स्वप्नात लांब झगे घातलेले ख्रिस्ती धर्मोपदेशक जप करत असतांना दिसतात.)
१ आ. दत्ताच्या नामजपात वाढ केल्यानंतर साप आणि कुत्री यांची स्वप्ने पडणे : मी ‘फोटोशॉप’ची सेवा करण्यास आरंभ केल्यानंतर आणि ‘श्री गुरुदेव दत्त’ हा नामजप वाढवल्यानंतर मध्यरात्री साप आणि कुत्री यांची स्वप्ने पडतात. मी झोपेतून जागी होते आणि पुन्हा झोपते. झोपेतून उठल्यावरही साप चावल्याची संवेदना जाणवते.

दैनिक सनातन प्रभातमधील सूचनेप्रमाणे पितृपक्षात ‘ॐ ॐ श्री गुरुदेव दत्त ॐ ॐ ।’ हा नामजप केल्यावर आलेल्या अनुभूती

आधुनिक वैद्या
(डॉ.) सौ. नंदिनी सामंत
१. ‘ॐ ॐ श्री गुरुदेव दत्त ॐ ॐ ।’ हा नामजप एका लयीत होणे आणि पुष्कळ आनंद जाणवणे : ‘२७.९.२०१६ या दिवशी सकाळी १० ते १२ या वेळेत मी उपायांना बसल्यावर ‘ॐ ॐ श्री गुरुदेव दत्त ॐ ॐ ।’ हा नामजप म्हणण्यास प्रारंभ केला. जप चालू करताच तो एका लयीत होऊ लागला. काहीच क्षणांत मला जपातून पुष्कळ आनंद जाणवू लागला. 
२. पितरांप्रती धर्मकर्तव्य बजावत असल्यामुळे जपातून आनंद जाणवत असल्याचे देवाने सूक्ष्मातून सांगणे, अवतीभोवती पूर्वजांचे अस्तित्व जाणवू लागणे आणि जप त्यांच्या दिशेने जात असल्याचे जाणवणे : ‘ॐ ॐ श्री गुरुदेव दत्त ॐ ॐ ।’ या जपातून आनंद का जाणवतो ?’, असे देवाला विचारल्यावर देव सूक्ष्मातून म्हणाला, ‘पितरांप्रती धर्मकर्तव्य बजावत असल्यामुळे तुला आनंद जाणवत आहे.’ या आनंदाचे आलंबन केल्यावर जपातील एकाग्रता आणखी वाढली. जप जसा होत गेला, तसे मला माझ्या अवतीभोवती माझ्या अनेक जन्मांतील पूर्वजांचे अस्तित्व जाणवू लागले. त्या वेळी मला भीती न वाटता आणि जपातील एकाग्रता भंग न पावता उलट त्यांच्याविषयी कृतज्ञता अन् कणव जाणवत होती. जप त्यांच्या दिशेने जात असल्याचे मला जाणवले.

दत्तगुरूंचा नित्यक्रम

१. निवास : मेरुशिखर
२. प्रातःस्नान : वाराणसी (गंगातीर)
३. आचमन : कुरुक्षेत्र
४. चंदनाची उटी लावणे : प्रयाग 
५. प्रातःसंध्या : केदार
६. विभूतीग्रहण : केदार
७. ध्यान : गंधर्वपत्तन
८. दुपारची भिक्षा : कोल्हापूर
९. दुपारचे जेवण : पांचाळेश्‍वर, जिल्हा बीड, मराठवाडा येथे गोदावरीच्या पात्रात.
१०. तांबूलभक्षण : राक्षसभुवन, बीड, महाराष्ट्र.
११. विश्राम : रैवत पर्वत
१२. सायंसंध्या : पश्‍चिम सागर
१३. पुराणश्रवण : नरनारायणाश्रम (पाठभेद - प्रवचन आणि कीर्तन ऐकणे : नैमिषारण्य, बिहार)
१४. निद्रा : माहूरगड (पाठभेद - सह्य पर्वत, जिल्हा नांदेड)
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘दत्त’)

दत्तात्रेयाची उपासना कशी करावी ?

     प्रत्येक देवतेचे विशिष्ट उपासनाशास्त्र आहे. याचा अर्थ असा की, प्रत्येक देवतेच्या उपासनेच्या अंतर्गत प्रत्येक कृती विशिष्ट प्रकारे करण्यामागे शास्त्र आहे. अशा कृतीमुळेच त्या देवतेच्या तत्त्वाचा अधिकाधिक लाभ होण्यास साहाय्य होते. दत्ताच्या उपासनेच्या अंतर्गत नेहमीच्या काही कृती नेमक्या कशा कराव्यात, याविषयीची माहिती पुढील सारणीत दिली आहे. 
- श्री गुरुतत्त्व (सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ ‘श्री गुरुतत्त्व’ या नावाने भाष्य करतात. (२१.११.२००४)

श्री दत्तगुरूंच्या वास्तव्याने पुनीत झालेली महाराष्ट्र आणि कर्नाटक येथील तीर्थक्षेत्रे

कुरवपूर (रायचूर, कर्नाटक) येथील पवित्र कृष्णानदीचा काठ.
श्री दत्तगुरूंचा आद्य अवतार श्रीपाद श्रीवल्लभ हे याच स्थानाहून गुप्त झाले.
दत्तप्रभूंचे दुसरे अवतार श्री नृसिंह सरस्वती यांच्या श्री क्षेत्र नृसिंहवाडी (शिरोळ, कोल्हापूर) येथील मनोहर दत्तपादुका

सनातन-निर्मित ‘दत्ताची सात्त्विक नामजप-पट्टी’

     
     सात्त्विक अक्षरांमध्ये चैतन्य असते. सात्त्विक अक्षरे आणि त्यांच्या भोवतालची देवतेच्या तत्त्वाला अनुरूप अशी चौकट यांनी युक्त असलेल्या त्या त्या देवतेच्या नामजप-पट्ट्या सनातन बनवते. त्यांच्यात संबंधित देवतेचे तत्त्व सरासरी १० टक्के आले आहे. संबंधित देवतेचे तत्त्व अधिक आकृष्ट आणि प्रक्षेपित करू शकतील, असा प्रयत्न त्या बनवतांना केला जातो. दत्तासहित विविध देवतांच्या ८० हून अधिक नामजप-पट्ट्या सनातनने बनवल्या आहेत. 

रामनाथी आश्रमात उगवलेले औदुंबराचे रोपटे पहातांना मनात आलेले विचार

‘     सनातनच्या रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरात प्रतिदिन दत्तमंत्रमाला स्तोत्राचे पठण केले जाते. एकदा पठण झाल्यानंतर ध्यानमंदिराशेजारी असलेल्या यज्ञकुंडाच्या परिसरात उगवलेले औदुंबराचे रोपटे पहातांना मनात पुढील विचार आले. 
१. भगवान दत्तात्रेयांनी आपल्या हाकेला प्रतिसाद दिला आहे आणि ते ‘'काळजी करू नका. मी तुमच्या समवेतच आहे’', असे औदुंबराच्या रोपट्याच्या माध्यमातून सांगत आहेत.

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी सांगितल्याप्रमाणे दत्तमालामंत्राचे पठण केल्यावर रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील ध्यानमंदिराजवळील परिसरात औदुंबराची रोपे उगवणे

योगतज्ञ दादाजी वैशंपायन
     योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांच्या आज्ञेनुसार रामनाथी येथील सनातन आश्रमातील ध्यानमंदिरात दोन मासांपूर्वी (महिन्यांपूर्वी) दत्तमाला मंत्रजपाचे पठण चालू झाले. त्या दिवसापासून आश्रमात दिवसेंदिवस दत्ततत्त्व वाढत असल्याची प्रचीती साधकांना येत आहे आणि आश्रम परिसरात एक वैशिष्ट्यपूर्ण नैसर्गिक पालट झाला आहे. पठण चालू झाल्यावर ध्यानमंदिराच्या शेजारील यज्ञकुंडाच्या परिसरात औदुंबराची २०२ रोपे आपोआप उगवली आहेत.
योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांच्या कृपेमुळे अनुभवायला मिळालेल्या चैतन्यरूपी आशीर्वादाविषयी सनातनच्या सर्व साधकांच्या वतीने त्यांच्या चरणी अनंत कोटी कृतज्ञता !

दत्तगुरूंची काळानुसार आवश्यक उपासना !

१. दत्ताच्या उपासनेविषयी धर्मशिक्षण देणे
      बहुतांश हिंदूंना आपल्या देवता, आचार, संस्कार, सण आदींविषयी आदर आणि श्रद्धा असते; परंतु त्यांच्या उपासनेमागील धर्मशास्त्र ठाऊक नसते. शास्त्र समजून घेऊन धर्माचरण योग्यरित्या केल्यास अधिक फलप्राप्ती मिळते. त्यामुळे दत्ताच्या उपासनेत अंतर्भूत असलेल्या विविध कृती करण्याच्या योग्य पद्धती आणि त्यांचे शास्त्र यांविषयी समाजाला धर्मशिक्षण देण्याचा यथाशक्ती प्रयत्न करणे, ही दत्तभक्तांसाठी काळानुसार आवश्यक अशी श्रेष्ठ स्तराची समष्टी साधना आहे. 
२. दत्त मंदिरात पावित्र्य राखावे !
अ. दत्ताच्या किंवा अन्य मंदिरात दर्शनासाठी झुंबड करू नये. ओळीने अन् शांतपणे दर्शन घ्यावे. शांतपणे भावपूर्ण दर्शन घेतल्यानेच दर्शनाचा खरा लाभ होतो.
आ. देवळात किंवा गाभार्‍यात गोंगाट करू नये. गोंगाट केल्यामुळे देवळातील सात्त्विकता घटते, तसेच तेथे दर्शन घेणार्‍या, नामजप करणार्‍या किंवा ध्यानाला बसलेल्या भाविकांनाही त्याचा त्रास होतो.

दत्ताच्या नामाने अतृप्त पूर्वजांच्या त्रासांपासून रक्षण कसे होते ?

१. संरक्षक-कवच निर्माण होणे 
     दत्ताच्या नामजपातून निर्माण होणार्‍या शक्तीने नामजप करणार्‍याच्या भोवती संरक्षक-कवच निर्माण होते.
२. अतृप्त पूर्वजांना गती मिळणे 
    बहुतेक जण साधना करत नसल्यामुळे ते मायेत सर्वाधिक गुरफटलेले असतात. यामुळे मृत्यूनंतर अशांचा लिंगदेह अतृप्त रहातो. असे अतृप्त लिंगदेह मर्त्यलोकात अडकतात. (मर्त्यलोक हा भूलोक आणि भुवलोक यांच्या मध्ये आहे.) दत्ताच्या नामजपामुळे मर्त्यलोकात अडकलेल्या अतृप्त पूर्वजांना गती मिळतेे. त्यामुळे पुढे ते त्यांच्या कर्मानुसार पुढच्या पुढच्या लोकात गेल्याने साहजिकच त्यांच्यापासून व्यक्तीला होणार्‍या त्रासाचे प्रमाण घटते.

श्री दत्तगुरूंनी केलेल्या २४ गुणगुरुंचा भावार्थ !

     श्रीमद् भागवताच्या अकराव्या स्कंधात यदु आणि अवधूत यांचा संवाद आहे. आपण कोणते गुरु केले आणि त्यांपासून काय बोध घेतला’, हे यात अवधूत सांगतो. अवधूत म्हणतो, ‘‘जगातील प्रत्येक गोष्टच गुरु आहे; कारण प्रत्येक गोष्टीपासून काही ना काही शिकता येते. वाईट गोष्टींपासून कोणते दुर्गुण सोडायचे आणि चांगल्या गोष्टींपासून कोणते सद्गुण घ्यायचे, हे शिकायला मिळते. 
     वानगीदाखल पुढे दिलेल्या २४ गुरूंपासून थोडे थोडे ज्ञान घेऊन मी त्याचा समुद्र बनवला आणि त्यात स्वतः स्नान करून सर्व पापांचे क्षालन केले.’’ 

१. पृथ्वी : पृथ्वीप्रमाणे सहनशील आणि द्वंद्वसहिष्णू असावे. मूल आईच्या मांडीवर असते, तिला लाथा मारते, अंगावर मल-मूत्र टाकते, तरी ती न चिडता, न रागावता दूध पाजते. लोक भूमीवर मल-मूत्र टाकतात, तिला नांगरतात, जाळतात, तरी लोकांनी पेरलेल्या दाण्यांच्या कितीतरी पट दाणे ती त्यांना देते. माणसानेही परपीडा सहन करावी. कोणी अपमान केला, अपशब्द बोलले किंवा लुबाडले, तरी न रागावता ते सर्व सहन करून, त्यास क्षमा करून साहाय्यच करावे. 

एका संतांच्या मनात ज्ञानप्राप्तीविषयी विकल्प येणे, त्यांनी विचारलेल्या प्रश्‍नाला सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून मिळालेले ज्ञान वाचून त्यांना आश्‍चर्य वाटणे

१. एका संतांच्या मनात गाडगीळकाकूंची परीक्षा घेण्याचा विचार येणे आणि त्यांनी ‘ज्ञान कसे मिळवता ?’ हे पहायचे असल्याचे सांगणे : ‘पूर्वीच्या सुखसागरमध्ये एक संत आले होते. त्या वेळी त्यांच्या मनात गाडगीळकाकूंची परीक्षा घेण्याचा विचार आला. त्यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना विचारले, ‘‘तुमच्याकडे देवाकडून ज्ञान मिळवणार्‍या साधिका आहेत. मला त्या कसे ज्ञान मिळवतात ?, हे बघायचे आहे.’’ तेव्हा परात्पर गुरु डॉ. आठवले काकू भ्रमणसंगणकावर सेवा करत होत्या तिथे आले आणि त्यांनी सांगितले, ‘‘हे संत आलेले आहेत आणि त्यांना ‘तुम्ही ज्ञान कसे मिळवता ?’ हे पहायचे आहे. त्यांना तुम्हाला प्रश्‍न विचारायचा आहे.’’

पुणे येथील श्री. अनिल गोविंद बोकील यांनी सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांना वाढदिवसानिमित्त केलेला नमस्कार आणि आग्रहपूर्वक मागितलेले आशीर्वाद !

श्री. अनिल बोकील

पूज्य सद्गुरुमाई, 
आदेश !!! (म्हणजे अभेदभावाने प्रमाण !) 
     आज आपला वाढदिवस ! मायेतल्याच शब्दांनी आपल्याला शुभेच्छा द्यायच्या आहेत. थोड्या आगळ्या वेगळ्या पद्धतीनं ! संवाद-रूपानं ! आवडतील ? आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने सर्वच संतांना या शुभेच्छा आहेत आणि हे ‘शुभेच्छा देणे’ नव्हे, तर ‘आशीर्वाद मागणे’ आहे ! द्याच ! 
     सर्वच संत गुरुदेव आहेत. गुरुदेव म्हणजे चैतन्याचे स्वामीच ! शून्यभावात असणारे ! शून्यभाव कसला ? स्थुलातला शून्यभाव म्हणजे अनासक्ती (वैराग्य) आणि सूक्ष्मातला शून्यभाव म्हणजे मायेचा शून्यभाव ! शून्यभाव कसलाही असो ! तो मायेचा कि अस्तित्वाचा ? अस्तित्व हीसुद्धा मायाच नव्हे काय ? 

वैराग्यस्वरूप, क्षमाशील आणि भक्तवत्सल असणारे दत्तात्रेय !

१. दत्तात्रेयांमध्ये ज्ञान, वात्सल्य आणि वैराग्य यांचा सुरेख संगम असणे : ‘भगवान दत्तात्रेय म्हणजे ‘'ब्रह्मा, विष्णु आणि महेश’' या त्रिमूर्तींचे रूप. ब्रह्मदेव ज्ञानस्वरूप, श्रीविष्णु वात्सल्यस्वरूप आणि शिव वैराग्यस्वरूप आहे. अशा त्रिमूर्तींचे एकत्रित रूप असणार्‍या दत्तात्रेयांमध्ये ज्ञान, वात्सल्य आणि वैराग्य यांचा सुरेख संगम झालेला आहे. 
२. वैराग्य आणि संन्यस्थ : भगवान दत्तात्रेयांमध्ये वैराग्य असल्यामुळे ते संन्यस्त जीवन व्यतीत करतात. त्यांचा निवास मेरुशिखरावर असतो. संध्या आणि अन्य दिनक्रम ते इतर ठिकाणी पूर्ण करतात. त्यांच्यामध्ये वैराग्य वृत्ती प्रबळ असल्याने त्यांना कोणत्याही स्थानाचे मोहबंधन नाही. त्यामुळे ते ‘'स्वेच्छाविहारी'’ आहेत. ते जीवनमुक्त असल्यामुळे संपूर्ण ब्रह्मांडात मुक्तपणे विचरण करतात. दत्तात्रेय आपल्या भक्तांवर प्रसन्न होऊन त्यांना वैराग्याचा आशीर्वाद देतात. जगात सर्व काही मिळू शकेल; परंतु देवदुर्लभ असे वैराग्य केवळ श्रीगुरुकृपेनेच मिळते. 

साधकांना सूचना

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
प्रारंभ - मार्गशीर्ष शुक्ल पक्ष चतुर्दशी (१३.१२.२०१६) सकाळी ९.१७ वाजता- 
समाप्ती - मार्गशीर्ष कृष्ण पक्ष प्रतिपदा (१४.१२.२०१६) पहाटे ५.३६ वाजता
आज पौर्णिमा आहे.

पुणे येथील संत प.पू. आबा उपाध्ये आणि त्यांच्या पत्नी पू. सौ. मंगला उपाध्ये यांनी सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या वाढदिवसानिमित्त दिलेले आशीर्वाद !


प.पू. आबा उपाध्ये आणि पू. (सौ.) मंगला उपाध्ये
योगायोग शुभयोग !
 ॥ श्री ॥
     आपले गुरु सद्गुरु सदानंद महाराज बसवकल्याण (कर्नाटक) यांच्या वाणीमध्ये ते म्हणाले होते, ‘‘कुठलाही योग हा परमेश्‍वराने नियतीमध्ये ठरवून ठेवलेला असतो आणि तो यावा लागतो.’’ तसाच योग माझ्यासमोर दोन दिवसांपूर्वी येऊन उभा राहिला. तो म्हणजे ‘शुभयोग !’ दोन दिवसांपूर्वी मी सद्गुरु (सौ.) अंजलीताई गाडगीळ यांना भ्रमणभाष केला होता. (सद्गुरु अंजलीताईंना मी उगीच त्रास देत नाही; कारण त्यांच्यामागे असलेली भरपूर कामे त्यांना पार पाडायची असतात.) संध्याकाळी त्यांचा भ्रमणभाष आला. ‘‘आबा नमस्कार !’’ तेच गोड शब्द आणि भरलेली प्रेमाची आर्तता ! ‘‘मला आशीर्वाद द्या !’’ 

सद्गुरुपदावर आरूढ झालेल्या सौ. अंजली गाडगीळ यांच्याविषयी त्यांचे पती पू. डॉ. मुकुल गाडगीळकाका यांनी काढलेले गौरवोद्गार !


सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ आणि (पू.) डॉ. मुकुल गाडगीळ 
१. अस्तित्वाने कार्य होणे आणि 
सनातन धर्म राज्यासाठी देवतांचा आशीर्वाद मिळवणे  ‘
     सद्गुरु (सौ.) अंजली यांच्याविषयी सांगायचे म्हणजे त्यांच्या अस्तित्वाने कार्य होत आहे. त्यांना महर्षि दैवी प्रवास करायला सांगतात. सनातन धर्म राज्यासाठी त्यांच्याद्वारे देवतांचा आशीर्वाद मिळवून घेतात. त्यांच्यामुळे सनातन संस्थेला सर्व आशीर्वाद मिळतात आणि आपले कार्य आणखीन सुलभ होते. असे त्यांच्या अस्तित्वाने आपोआपच कार्य होत आहे; म्हणून महर्षींनी त्यांना निवडले. ‘त्यांची तेवढी योग्यता आहे’, असे मला वाटते. 
२. पुष्कळ उन्हाळा आणि अतिशय 
अल्प तापमान दोन्ही स्थितीमध्ये राहूनही 
चैतन्यामुळे पालट न होणे अन् तेज वाढत असल्याचे लक्षात येणे 
     आतापर्यंत त्यांनी पुष्कळ प्रवास केला. तमिळनाडूमध्ये पुष्कळ उन्हाळा असतो. तिथे जवळजवळ दीड वर्ष त्या फिरल्या. त्यानंतर उत्तर भारतात गेल्या. लेह-लडाख, सिमला, कुलु-मनाली यांसारख्या ठिकाणी त्या गेल्या. तिथे अतिशय अल्प, म्हणजे कधी शून्याखालीही तापमान असते. अशा दोन्ही प्रतिकूल स्थितीमध्ये राहूनही त्यांच्यावर काही परिणाम झाला नाही. त्यांच्यातून प्रकट होणारे चैतन्य अल्प झाले नाही किंवा त्यांचा तोंडवळा काळवंडला, असे काही झाले नाही. त्यांच्यातील तेज आणखीन वाढत गेले आहे. यातून लक्षात येते, ‘त्यांच्यातील चैतन्यामुळे सगळे होत आहे.’ 
३. कौतुक करूनही अहं न वाढणे आणि ‘
आपल्यामुळे काही होत आहे’, अशी जाणीव 
नसून गुरुकृपेने सर्व होत असल्याची जाणीव असणे 
     त्यांचा अहं अल्प आहे. महर्षि त्यांचे एवढे कौतुक करतात. ते सारखे म्हणतात, ‘तू आमची कार्तिकपुत्री आहेस. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी तुला आमच्याकडे पाठवले आहे. तुझ्याकडून एकही चूक होत नाही.’ सातत्याने एवढे कौतुक करूनही त्यांच्यामध्ये अहं वाढलेला नाही. एवढे कौतुक होऊनही त्यांना ‘आपण काही विशेष करत आहोत’, असे वाटत नाही. त्यांच्याकडून सगळे सहजतेने होत आहे. ‘आपल्यामुळे काही होत आहे किंवा आपण काही करत आहोत’, याची त्यांना जाणीव नसते. ‘सगळे काही गुरुकृपेने होत आहे’, असे त्यांना वाटते. 
४. शारीरिक त्रास होत असतांना १० घंटे प्रवास 
करून मंदिरात जाऊन दर्शन घेणे आणि महर्षींनी 
कठीण परीक्षा घेऊनही मनःस्थिती विचलीत न होणे 
     खडतर, म्हणजे कधी कधी १० घंटे प्रवास करणे, तिकडे गेल्यावर काही कि.मी. चालत जाऊन मंदिरात दर्शन घेणे, असे त्या करतात. त्या वेळी शारीरिक त्रासही होत असतात. असे सगळे करूनही त्या आनंदावस्थेत असतात. महर्षीही त्यांची कठीण परीक्षा घेतात, तरीही त्यांची मनःस्थिती विचलीत होत नाही. आहे त्या स्थितीत त्या सतत भावावस्थेत असतात. स्वतः आनंदावस्थेत असतात आणि इतरांनाही आनंद देतात. ही त्यांची आनंदावस्था प्रकर्षाने जाणवते. ‘त्या आधीपासून आनंदी असायच्या. आता त्यात अजून वाढ झाली आहे’, असे वाटते. 
५. सद्गुरु (सौ.) बिंदाताई धर्माची स्थिती आणि 
सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ धर्माचे अधिष्ठान सांभाळत असल्याचे वाटणे 
     असे वाटते की, सद्गुरु बिंदाताई इथले क्षेत्र म्हणजे धर्माची स्थिती आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ या धर्माचे अधिष्ठान सांभाळत आहेत. त्या ब्राह्मतेज आणि सद्गुरु (सौ.) बिंदाताई क्षात्रतेज सांभाळत आहेत. नाण्याच्या दोन बाजू पूर्ण होतात; म्हणून ‘सनातन धर्म राज्य’ आणण्याचे कार्य परिपूर्ण होत आहे.’ 
- (पू.) डॉ. मुकुल गाडगीळ

श्री दत्तात्रेयांचे प्रमुख अवतार आणि त्यांच्याविषयीचे विवेचन

     श्रीपाद श्रीवल्लभ हा दत्ताचा पहिला अवतार. यांनी पंधराव्या शतकात महाराष्ट्रात दत्तोपासना चालू केली. श्री नृसिंह सरस्वती हा दुसरा अवतार. श्री गुरुचरित्रात श्रीपाद श्रीवल्लभ आणि श्री नृसिंह सरस्वती या दोन्ही अवतारांचे विवेचन केले आहे. 
काही प्रमुख संत : एकनाथ, माणिकप्रभु, अक्कलकोटचे स्वामी समर्थ, वासुदेवानंद सरस्वती, पंतमहाराज बाळेकुंद्रीकर इत्यादी. (बाळेकुंद्री हे गाव बेळगावच्या जवळ आहे.)
अवतार : ऐतिहासिक काळात श्रीपाद श्रीवल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, माणिकप्रभु हे तीन आणि चौथे श्री स्वामी समर्थ महाराज अवतार होत. हे चार पूर्ण अवतार आणि अंशात्मक अवतार तर कितीतरी आहेत. यात श्री वासुदेवानंद सरस्वती (टेंबेस्वामी) यांचा समावेश आहे. 
    लोकांचा त्रास चुकवण्यासाठी श्री नृसिंह सरस्वती आपल्या शिष्यांना सांगून कर्दलीवनात गेले. तेथे तपश्‍चर्या करत असतांना त्यांच्या अंगावर मुंग्यांनी वारूळ केले आणि त्यांचे पूर्ण अंग झाकून गेले. कित्येक वर्षांनी एक लाकूडतोड्या त्या वनात लाकडे तोडत असतांना त्याच्या कुर्‍हाडीचा निसटता वार त्या वारुळावर बसला. कुर्‍हाडीच्या पात्याला रक्त लागलेले पाहून तो घाबरला आणि त्याने वारूळ उकरले.

साधकांना सूचना

सनातनच्या संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नका !
     ‘सनातनच्या संतांचा वाढदिवस असलेल्या दिवशी त्यांच्या संदर्भात साधकांनी दैनिक सनातन प्रभातमध्ये गुणवैशिष्ट्ये लिहून दिलेली असतात. त्यामुळे सर्वत्रच्या साधकांचे त्या संतांना भ्रमणभाष येतात. संतांना दिवसभर अनेक साधकांशी भ्रमणभाषवर बोलावे लागत असल्याने त्यांच्या सेवेतील अमूल्य वेळ वाया जातो. सध्या आपत्काळाला आरंभ झाल्यामुळे एकेक क्षण महत्त्वाचा आहे. स्थुलापेक्षा सूक्ष्म श्रेष्ठ असल्याने साधकांनी संतांना भ्रमणभाष न करता त्यांना मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.’ - (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘     साधना म्हणजे दुसरे तिसरे काही नसून प्रत्येक माणसाचे प्रेम संपादन करणे आणि भगवंताच्या प्रेमासाठी अधीर होणे. प्रेमच आपल्याला मिळवायचे आहे आणि आपल्याला काय पाहिजे ? साधना म्हणजे नुसती प्रेमाचीच देवाण-घेवाण आहे.’ - सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ

सप्तर्षि जीवनाडीत सांगितल्याप्रमाणे राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी सतत दिव्य प्रवास करणार्‍या सनातनच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ !

वाचा प्रतिदिन नवीन सदर 
महर्षींची शिकवण आणि कार्य !  ‘
     सनातनच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ मागील ४ वर्षांपासून भारतभरातील विविध राज्यांत दौर्‍यावर जात आहेत. हिंदु राष्ट्राची (सनातन धर्म राज्याची) शीघ्रतेने स्थापना व्हावी, राष्ट्राचे सर्व नैसर्गिक आपत्तींपासून आणि परकीय आक्रमणांपासून रक्षण होण्यासाठी देवतांचा आशीर्वाद मिळावा, धर्माचे तसेच साधकांचे रक्षण व्हावे, यासाठी सप्तर्षि जीवनाडीत सांगितलेल्या क्षेत्री जाण्याचे त्यांचे नियोजन असते. आतापर्यंत त्यांनी २४ राज्यांतील विविध तीर्थक्षेत्रे, देवस्थाने, संतांचे आश्रम आणि संशोधन केंद्रे इत्यादींना भेटी देऊन तेथील वैशिष्ट्यपूर्ण दगड, माती, तीर्थ आदींचा संग्रह केला आहे. त्याचप्रमाणे तेथील आध्यात्मिक वैशिष्ट्ये चित्रीत केली आहेत. अशा प्रकारे त्यांनी नोव्हेंबर २०१६ पर्यंत ३ लक्ष ५६ सहस्र कि.मी. एवढा प्रवास करून भावी पिढीसाठी भारतातील अलौकिक समृद्ध ठेवा संग्रहित केला आहे. या दैवी प्रवासाची सर्वांना माहिती व्हावी, तसेच महर्षि सांगत असलेल्या दैवी प्रवासाचे महत्त्व लक्षात यावे, यासाठी आजपासून प्रतिदिन हे सदर चालू करत आहोत.’ 
१०.१२.२०१६ 
     तिरुवण्णामलईला जाणे : ‘१०.१२.२०१६ या दिवशी आम्ही दुपारी सवा तीन वाजता तमिळनाडूमधील ईरोड येथून निघून तमिळनाडूतील तिरुवण्णामलई येथे जात आहोत. तो चारचाकी गाडीने ५ घंट्यांचा प्रवास आहे. तिरुवण्णामलई येथे अण्णामलई पर्वत हे शिवाचे तेजतत्त्वाचे स्थान आहे. तेथे १२ डिसेंबर या दिवशी पौर्णिमेनिमित्त ‘कार्तिक दीपम्’ हा उत्सव आहे. (तमिळ पंचांगानुसार हा कार्तिक मास आहे.) या उत्सवासाठी लाखो भाविक तेथे येतात. ‘पुढील आपत्काळात साधकांचे रक्षण आणि धर्मकार्य निर्विघ्न होण्यासाठी शिवाला प्रार्थना करणे’ हा या दैवी दौर्‍याचा उद्देश आहे.’ - (सद्गुरु) सौ. अंजली गाडगीळ, ईरोड, तमिळनाडू. (क्रमश:)

सनातनचा आधारस्तंभ सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ !

     सनातनच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांचा मार्गशीर्ष शुक्ल पक्ष चतुर्दशी (१३.१२.२०१६) या दिवशी वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांच्याविषयीचे लिखाण प्रसिद्ध करत आहोत
सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांना सनातन परिवाराकडून कृतज्ञतापूर्वक नमस्कार ! 

     गेल्या १५ वर्षांत सनातन संस्थेच्या २९६ ग्रंथांच्या ६६ लक्षांहून अधिक प्रती अनेक भारतीय भाषांतच नव्हे, तर जर्मन आणि स्पॅनिश या भाषांतही प्रकाशित झाल्या आहेत. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे अध्यात्मातील अनेक सूत्रांच्या संदर्भात ‘का आणि कसे’, यांची उत्तरे सनातनच्या ग्रंथांत दिलेली आहेत. उत्तरांचे श्रेय पूर्वीच्या सौ. अंजली गाडगीळ, म्हणजे आताच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांना आहे. त्यांना मिळणार्‍या ज्ञानामुळे माझी स्वतःची अध्यात्मशास्त्रावर पूर्ण श्रद्धा बसली. सद्गुरु (सौ.) गाडगीळ यांचे महत्त्व म्हणजे एवढे अपूर्व ज्ञान मिळत असूनही त्यांच्यात अजिबात अहं नाही. त्यामुळेच वर्ष २००० मध्ये सनातनमध्ये आल्यापासून केवळ १६ वर्षांत त्यांनी सद्गुरुपदापर्यंत वाटचाल केली. सद्गुरु (सौ.) गाडगीळ साधिका आणि गुरु या दोन्ही अवस्थांत होत्या, तेव्हाही त्यांचे बोलणे, चालणे, वागणे अत्यंत आदर्श होते. त्यांच्या सहवासाचा लाभ घेऊन अनेक साधकांनी प्रगती केली आहे. 

सौ. शोभा कौलकर यांना वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून नमस्कार !

सौ. शोभा कौलकर
     रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात सेवा करणार्‍या सौ. शोभा कौलकर यांचा आज मार्गशीर्ष पौर्णिमेला वाढदिवस आहे. त्यांच्याविषयीचे लिखाण लवकरच प्रसिद्ध करत आहोत.
॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज 
सनातनचे श्रद्धास्थान
मायेचे आकर्षण
सततच्या दिव्याकडे कोणाचे लक्ष नसते. लुकलुकणार्‍या दिव्याकडे लक्ष जाते.
भावार्थ : सततचा दिवा म्हणजे आत्मज्योत (ब्रह्म). ही स्थिर असते. लुकलुकणारा दिवा म्हणजे माया. तिच्याकडे सर्वांचे लक्ष चटकन वेधले जाते.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन ‘संत भक्तराज महाराज यांची शिकवण.’)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
     ‘कुठे पृथ्वीवर राज्य करण्याचे ध्येय असणारे काही पंथ, तर कुठे ‘प्रत्येकाला ईश्‍वरप्राप्ती व्हावी’, हे ध्येय असणारा महान हिंदु धर्म !’- (परात्पर गुरु) डॉ. आठवले


योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

चुकांकडे कसे पहावे ?
इतरांच्या चुका दाखवणे सोपे असते; पण ‘इतरजन सुधारावेत’, 
असे खरोखरच वाटत असेल, तर नुसत्या चुका न दाखवता त्या कशा सुधारायच्या, तेही सांगावे ! 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

अबू आझमींचा लोकशाहीद्रोह !

संपादकीय
     भारतात देशद्रोही आणि हिंदुद्वेष्टे डॉ. झाकीर नाईक यांना अजूनही मानाचे स्थान आहे, असेच म्हणण्याची वेळ लोकांवर आली आहे. कारवाईच्या भीतीने ते भारतातून पसार झाले आहेत; पण त्यांच्या चाहत्यांची संख्या भारतात उदंड आहे. यांत बहुतांश राजकीय पक्षातील धर्मांध नेत्यांचाही समावेश आहे. काही उघड पाठिंबा देतात, तर काही छुपा. त्यांना उघड पाठिंबा देणार्‍यांमध्ये समाजवादी पक्षाचे महाराष्ट्रातील आमदार अबू आझमी यांचा क्रमांक वरचा आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn