Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

(म्हणे) पाकने पोरखेळ चालू ठेवला, तर त्याचे १० तुकडे होतील ! - राजनाथ सिंह

पाक प्रतिदिन भारतीय सैनिकांना ठार करत असतांना त्याकडे पोरखेळ
समजून कडक कारवाई न करणारे सरकार देशाचे रक्षण कसे करणार ?
     पाकने अजून काय करायचे बाकी ठेवले आहे की, ज्यानंतर भारत पाकचे १० तुकडे करील, हे सरकारने एकदाचे घोषित करावे, म्हणजे जनता पुन:पुन्हा पाकला धडा शिकवण्याविषयी विचारणा करणार नाही !      जम्मू - भारताला युद्धात पराजित करणे कठीण आहे, हे पाकला समजले आहे. कारगील युद्धाच्या वेळीही पाकला पराजित व्हावे लागले होते. तरीही पाक भेकडाप्रमाणे आक्रमणे करत आहे. पाकचेे आतापर्यंत केवळ दोनच तुकडे पडले आहेत. त्याचा पोरखेळ असाच चालू राहिला, तर त्याचे १० तुकडे होतील, अशी चेतावणी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी येथे दिली. हुतात्मादिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सिंह बोलत होते.
राजनाथ सिंह यांनी केलेली विधाने १. धर्माच्या नावावर भारतियांमध्ये फूट पाडण्याचे स्वप्न पाक पहात आहे; पण त्याचे हे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. (भारतात धर्माच्या नावावर एकी नाही, हे राजनाथ सिंह यांना ठाऊक नाही का ? भारतातील धर्मांध अल्पसंख्यांक आतंकवाद्यांना साहाय्य करतात, हे काश्मीरसह देशभरामध्ये वारंवार घडत आहे, हे देशातील जनता जाणते ! - संपादक) २. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या शपथविधी सोहळ्याला पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना बोलावले होते. पाकशी हृदयापासून नाते जोडण्याचा आमचा प्रयत्न होता. त्याच वेळी आमची भावना पाकने समजून घ्यायला हवी होती; पण त्यांना ते समजले नाही.

कोल्हापूर येथील हिंदु धर्मजागृती सभेला उत्साही प्रतिसाद !

डावीकडून सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, सौ. अलका व्हनमारे, दीपप्रज्वलन 
करतांना आमदार श्री. राजासिंह ठाकुर आणि श्री. मनोज खाडये
     कोल्हापूर - कोल्हापूर येथील पद्माराजे गर्ल्स हायस्कूलच्या मैदानावर ११ डिसेंबर या दिवशी झालेली सभा अलोट उत्साहात पार पडली. सभेच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. या सभेत भाग्यनगर येथील श्रीराम युवा सेनेचे अध्यक्ष आणि भाजपचे आमदार श्री. राजासिंह ठाकुर, सनातन संस्थेच्या प्रसारसेविका सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, हिंदु जनजागृती समितीचे पश्‍चिम महाराष्ट्र समन्वयक श्री. मनोज खाडये, तसेच सोलापूर येथील रणरागिणी शाखेच्या सौ. अलका व्हनमारे यांचे जाज्वल्य मार्गदर्शन झाले.

ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळ्यात तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या सहभागाची शक्यता !

केंद्र सरकारने याची चौकशी करून सत्य बाहेर आणावे !
     नवी देहली - वर्ष २००५ मध्ये ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदीसाठीच्या अटींमध्ये पालट करण्याच्या निर्णयात पंतप्रधान कार्यालयाचाही सहभाग होता, अशी माहिती या खरेदी घोटाळ्याच्या प्रकरणी अटक करण्यात आलेले माजी वायूदल प्रमुख एस्.पी. त्यागी यांनी न्यायालयात दिली आहे. त्यांच्या अधिवक्त्यांच्या माध्यमातून त्यांनी ही माहिती न्यायालयाला दिली आहे. यामुळे तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचाही या घोटाळ्यात सहभाग आहे का, यावर संशय निर्माण झाला आहे. १० डिसेंबरला त्यागी यांना न्यायालयात उपस्थित करण्यात आले होते.

(म्हणे) इसिसमध्ये सहभागी व्हा !

इसिसमध्ये गेलेल्या धर्मांध युवकाचा पालकांना सल्ला
मुसलमान युवकांचे प्रबोधन केल्यावर ते पालटतील, अशी
भाबडी आशा ठेवणार्‍या सरकारला याविषयी काय म्हणायचे आहे ?
     मुंबई - इसिसमध्ये सहभागी व्हा. येथील जगणे एकदम सुरक्षित आणि आरामदायी आहे, असा सल्ला इसिसमध्ये सहभागी होण्यासाठी गेलेेल्या मुंब्यातील २८ वर्षीय तबरेझ महंमद तांबे या मुसलमान युवकाने त्याचे पालक आणि मित्र यांना पाठवला आहे, अशी माहिती आतंकवादविरोधी पथकातील एका अधिकार्‍याने एका वृत्तसंस्थेला दिली. तबरेझ याच्याशी त्याच्या भावाने संपर्क साधून तू चुकीच्या ठिकाणी गेला आहेस, तात्काळ घरी परत ये, असे सांगितल्यावर त्याने वरील निरोप पाठवला. तबरेझ याने कार्गो व्यवस्थापन आणि परिवहन या विषयात पदव्युत्तर पदवी मिळवली आहे. (यातून गरिबीमुळे नव्हे, तर कट्टर धर्मांधतेमुळे मुसलमान आतंकवादाकडे वळतात, हे स्पष्ट होते ! - संपादक)

केंद्रशासनाकडून ५०० बँकांमध्ये स्टिंग ऑपरेशन !

राजकारण्यांप्रमाणे भ्रष्टाचाराची लागण झालेले बँक कर्मचारी !
जनतेला त्रास होत असतांना स्वतःचे उखळ पांढरे करून घेणार्‍यांची
सर्व संपत्ती जप्त करून त्यांना कठोरातील कठोर शिक्षा केली पाहिजे !
नोटाबंदीचा अपलाभ घेणार्‍या बँक कर्मचार्‍यांवर कारवाई होणार !
      नवी देहली - नोटाबंदीच्या निर्णयानंतर अनेक बँकांमधील व्यवस्थापक आणि कर्मचारी यांनी अवैधरित्या नोटा पालटून दिल्या. या सगळ्यांचे स्टिंग ऑपरेशन करण्यात आले आहे. त्याच्या ४०० सीडी (ध्वनीचित्र-चकत्या) अर्थ मंत्रालयाकडे जमा झाल्या आहेत. बँकांमध्ये काही मोजक्या लोकांची मोठी रक्कम पोलीस, दलाल आणि बँक कर्मचारी कशाप्रकारे पालटून देतात, याची सर्व माहिती या ४०० सीडींमध्ये आहे. मोठ्या शहरांबरोबरच काही लहान शहरांमधील बँकांमध्येही स्टिंग ऑपरेशन करण्यात आले आहे.
     काही दिवसांपूर्वी अ‍ॅक्सिस बँकेच्या २ व्यवस्थापकांना ४० कोटी रुपयांच्या घोटाळ्याच्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. अ‍ॅक्सिस बँकेकडून १९ कर्मचार्‍यांवर कारवाई करण्यात आली आहे. कोलकात्यात कॅनरा बँकेच्या उपव्यवस्थापकावर, तर राजस्थानातील अलवरमध्ये को-ऑपरेटिव्ह बँकेच्या व्यवस्थापकावर कारवाई करण्यात आली आहे. पंजाबमधील भटिंडातील ओबीसी बँकेचे व्यवस्थापक आणि रोखपाल यांच्यावर कारवाई झाली आहे. बेंगळुरूमध्ये सेंट्रल बँकेच्या व्यवस्थापकाला, तर भाग्यनगरमध्ये सिंडिकेट बँकेच्या २ कर्मचार्‍यांना अटक करण्यात आली आहे.
     नोटाबंदीच्या निर्णयानंतर देशभरातील बँकांमध्ये गेल्या मासात २०० कोटी रुपयांचे अपहार झाले आहेत. यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे.

देशभरातून मोठ्या प्रमाणात नव्या नोटांसहित बेहिशोबी रोकड जप्त !

     चेन्नई - आयकर विभागाच्या अधिकार्‍यांनी गेल्या दोन दिवसांत देशभरातील विविध ठिकाणांवरून बेहिशोबी पैसे जप्त केले आहेत. यात नव्या नोटांचाही समावेश आहे.
१. चेन्नईमध्ये नव्या नोटा असलेली २४ कोटी रुपयांची रक्कम १० डिसेंबरला जप्त करण्यात आली. वेल्लोरमधील एका चारचाकीमधून २ सहस्र रुपयांच्या नव्या नोटा असलेली रक्कम जप्त करण्यात आली.
२. कर्नाटकमधील चल्लाकेरे येथे एका न्हाणीघरातून नव्या नोटा असलेली ५ कोटी ७० लाख रुपयांची रोख रक्कम, ३२ किलो सोन्याची बिस्किटे आणि दागिने, ९० लाख रुपयांच्या जुन्या नोटा जप्त केल्या आहेत.
३. भाग्यनगरजवळील कोथूर येथून ८२ लाख रुपये जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. यामध्ये ७१ लाख रुपयांच्या नव्या २ सहस्र रुपयांच्या आणि ११ लाख रुपयांच्या १०० रुपयांच्या नोटा आहेत. कमिशन घेऊन नोटाबदलीचा व्यवहार करणार्‍या दोघांवरही कारवाई करण्यात आली आहे.
४. भाग्यनगरमधील अन्य एका घटनेत टपाल कार्यालयाचे वरिष्ठ अधीक्षक के. सुधीर बाबू यांच्यावर ६५ लाख रुपयांचे कमिशन घेण्यात आल्यामुळे कारवाई करण्यात आली. ३ कोटी ७५ लाख रुपयांच्या नोटा पालटून देण्यासाठी हे कमिशन घेण्यात आले होते.
५. देहलीच्या ग्रेटर कैलाश १ परिसरात अधिवक्ता रोहित टंडन यांच्या कार्यालयावर टाकण्यात आलेल्या धाडीत १३ कोटी ५६ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.

उयो (नायजेरिया) येथे चर्चचे छत कोसळून ६० हून अधिक लोकांचा मृत्यू !

शेवटी जिझस ख्रिस्तही नायजेरियातील भाविकांना
वाचवू शकला नाही, असे कुणाला वाटल्यास चूक ते काय ?
     उयो (नायजेरिया) - येथील रेनर्स बायबल चर्चमध्ये दीक्षा समारंभ चालू असतांना चर्चचे छत कोसळून झालेल्या अपघातात ६० हून अधिक लोक मृत्यूमुखी पडल्याचे वृत्त आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीवरून मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या १६० असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
     चर्चमध्ये बिशपने आयोजित केलेल्या समारंभात भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती. या चर्चचे बांधकाम चालू होते. त्याचे सिमेंट आणि लोखंडी सळ्या असलेले छत अचानक कोसळून ते भाविकांच्या अंगावर पडले; मात्र त्यातून अक्वा इबॉन प्रांताचे राज्यपाल उडोम इम्यॅनुअल आश्‍चर्यकारकरित्या बचावले. शहरातील शवागारात शव ठेवण्यास जागा उरलेली नाही. राष्ट्राध्यक्ष मुहम्मदू बहारी यांनी घटनेविषयी खेद व्यक्त केला आहे.

विरार (मुंबई) येथील जय हिंदुत्व आणि युवा सेना यांच्या धर्माभिमानी युवकांनी थांबवला देवतांचा अवमान !

विरारमध्ये ठिकठिकाणी उघड्यावर ठेवलेल्या देवतांच्या प्रतिमा
आणि मूर्ती एकत्रित करून त्यांचे समुद्रात विसर्जन केले !
हिंदु जनजागृती समितीच्या धर्मशिक्षणवर्गाचा परिणाम !
देवतांचा अवमान होऊ नये, यासाठी जागृत असलेल्या धर्माभिमानी 
युवकांचा आदर्श सर्वत्रच्या हिंदूंनी बांधवांनी घ्यावा !
     देवतांची चित्रे रस्त्यावर कुठेही ठेवल्याने त्यांच्या होणार्‍या अनादराचे आणि विटंबनेचे पाप चित्रे ठेवणार्‍याला लागते. अशा प्रकारे देवतांचा अवमान होऊ नये, यासाठी जीर्ण झालेली देवतांची चित्रे किंवा मूर्ती प्रार्थना करून जलाशयात विसर्जित कराव्यात अथवा अग्नीत समर्पित करावीत, असे शास्त्र सांगते.
     विरार (मुंबई)  - अनेक हिंदू घरामध्ये नको असलेली देवतांची चित्रे शहरातील पारा, कठडा अशा ठिकाणी आणून ठेवतात. त्या ठिकाणी घाणीमध्ये देवतांची छायाचित्रे आणि मूर्ती अस्ताव्यस्त पडलेल्या आढळतात; मात्र त्याविषयी हिंदूंना काहीच वाटत नाही. रस्त्यावर, घाणीच्या ठिकाणी अशा प्रकारे अस्ताव्यस्त ठेवलेल्या देवतांच्या चित्रांमुळे देवतांचा अवमान होत असल्याचे येथील जय हिंदुत्व आणि युवा सेना यांच्या धर्माभिमानी युवकांच्या लक्षात आले. या युवकांनी शौर्यदिनाचे औचित्य साधून ६ डिसेंबर या दिवशी शहरात ठिकठिकाणी पडलेली देवतांची चित्रे एकत्रित करून समुद्रात विसर्जित केली. श्री. शिव यादव यांसह १४ धर्माभिमानी युवकांनी यामध्ये सहभाग घेतला.

सर्वश्रेष्ठ हिंदु धर्माची आज दुःस्थिती झाली आहे ! - कैलासगिरीजी महाराज, गिरीमठ

सावखेडा येथील हिंदु धर्मजागृती 
सभेत ४०० हिंदुत्वनिष्ठांची उपस्थिती ! 

डावीकडून पराग गोखले, दीपप्रज्वलन करतांना
कैलासगिरी महाराज, कैलास कुर्‍हाडे, प्रतीक्षा कोरगावकर

       सावखेडा (संभाजीनगर) - मुसलमान मुलीचे नखही आपल्याला दिसत नाही; मात्र हिंदु मुलीचे कपडेही योग्य नसतात. आपल्या प्राचीन, सर्वश्रेष्ठ आणि महान अशा हिंदु धर्माची आज ही दुःस्थिती झाली आहे, असे प्रतिपादन गिरीमठ येतील कैलासगिरीजी महाराज यांनी केले. ते संभाजीनगर मधील गंगापूर तालुक्यातील सावखेडा गावातील हिंदु धर्मजागृती सभेत बोलत होते. ४ डिसेंबर या दिवशी झालेल्या हिंदु धर्मजागृती सभेला ४०० हून अधिक धर्माभिमानी हिंदू उपस्थित होते. महाराजांनी आशीर्वादपर भाषणात हिंदु धर्माचे महत्त्व विषद केले.

किल्ले रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची तलवार तुटलेल्या स्थितीत !

पुरातत्व खात्याचा संतापजनक आणि हलगर्जी कारभार ! ऐतिहासिक
स्मारकांचे जतन करू न शकणारे पुरातत्व खाते विसर्जित करा !
     पोलादपूर - किल्ले रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची तलवार १० डिसेंबर या दिवशी तुटलेल्या स्थितीत आढळून आली आहे. या प्रकरणाची पोलिसांच्या एका पथकाने पाहणी केल्यावर महाड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे. त्या पाहणीनुसार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावरील तलवारीची म्यान तुटलेल्या स्थितीत आढळली आहे. (रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुरेसे संरक्षण नसल्याने विभागाच्या कारभाराविषयीच प्रश्‍नचिन्ह निर्माण होते ! - संपादक)
शिवप्रेमीमुळे चोरी उघड !
     किल्ले रायगडावर होळीचा माळ येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंहासनाधिष्ठित, तर दरबार सभागृहातील मेघडंबरीमध्ये बैठक असलेला पुतळा आहे. १० डिसेंबर या दिवशी एक शिवप्रेमी सकाळी ९ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या मेघडंबरीतील पुतळ्याची पूजा करण्यास गेला होता. त्या वेळी त्याला पुतळ्याच्या मांडीवर असलेली तलवार मोडलेल्या स्थितीत दिसून आली.

शिवपाडी (कर्नाटक) येथे प्रांतीय हिंदु अधिवेशनात संत आणि हिंदुत्वनिष्ठ यांचा सहभाग

डावीकडून श्री. काशिनाथ प्रभु, श्री श्री श्री विनायकनाद स्वामी,
श्री श्री श्री विश्‍वप्रसन्न तीर्थ, सद्गुरु सत्यवान कदम आणि श्री. गुरुप्रसाद

       उडुपी (कर्नाटक), ११ डिसेंबर - हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शिवपाडी, मणिपाल येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रांतीय हिंदु अधिवेशनाचे उद्घाटन रविवार, ११ डिसेंबर या दिवशी पेजावर स्वामीजी श्री श्री श्री विश्‍वप्रसन्न तीर्थ यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या उद्घाटन सोहळ्याला बेळुर रामकृष्ण आश्रमाचे श्री श्री श्री विनायकनाद स्वामीजी, सनातनचे सद्गुरु सत्यवान कदम, हिंदु जनजागृती समितीचे कर्नाटक राज्य प्रवक्ता श्री. गुरुप्रसाद आणि सनातन संस्थेचे श्री. काशीनाथ प्रभु व्यासपिठावर उपस्थित होते. या प्रांतीय हिंदु अधिवेशनात उडुपी, दक्षिण कन्नड आणि उत्तर कन्नड येथील हिंदुत्वनिष्ठ सहभागी झाले आहेत.
       या २ दिवसांच्या अधिवेशनात गोहत्या, धर्मांतर, लव्ह जिहाद, हिंदु नेत्यांच्या हत्या, मंदिरांचे सरकारीकरण, हिंदु देवतांचे विडंबन, अंधश्रद्धा निर्मूलन कायदा इत्यादी विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे, असे श्री. गुरुप्रसाद यांनी या वेळी सांगितले. अधिवक्त्यांचे सत्र उद्या होणार आहे.

बेंगळुरू येथे ६० देशांतील सहस्रावधी लोकांनी हिंदु धर्म स्वीकारला !

विदेशातील चर्च ओस पडणे आणि तेथील सहस्रावधी ख्रिस्तींनी हिंदू होणे, यातून हिंदु 
धर्माचे आध्यात्मिक महत्त्व लक्षात येते ! भारतातील भोंदू पुरोगाम्यांना हे लक्षात येईल तो सुदिन ! 
     बेंगळुरू - येथील स्वामी नित्यानंद मठामध्ये नुकत्याच पार पडलेल्या एका धार्मिक विधीच्या वेळी जगभरातील ६० देशांतील सहस्रावधी लोकांनी हिंदु धर्म स्वीकारला. विविध धार्मिक विधी, जीवनपद्धती आणि पूजा-अर्चा करून विदेशी नागरिकांना हिंदु नावे देण्यात आली. 
       एखाद्याला हिंदु व्हायचे असल्यास पारंपरिक शैवपंथीय मठांमध्ये लाखो वर्षांपासून समय दीक्षा, विशेष दीक्षा, निर्वाण दीक्षा आणि आचार्य अभिषेक या ४ दीक्षांचा अवलंब केला जातो. गेल्या १० वर्षांत बेंगळुरू येथील स्वामी नित्यानंद मठामध्ये १० लक्षांपेक्षा अधिक विदेशी नागरिकांनी हिंदु धर्मात अधिकृतरित्या प्रवेश केला आहे.

दिल्ली पब्लिक स्कूलच्या विज्ञापनात विद्यार्थिनीला ‘नन’च्या वेशात दाखवून हिंदु विद्यार्थ्यांच्या धर्मांतराचा प्रयत्न !

  • हिंदूंनो, तुमच्या पाल्यांना अशा शाळांत घालून ‘ख्रिस्ती’ बनवायचे आहे का, ते ठरवा !
  • शाळेत योगाभ्यासाला विरोध करणारे धर्मनिरपेक्षवादी याविषयी गप्प रहातात, हे लक्षात घ्या !
विज्ञापनामध्ये एका छोट्या मुलीला
‘नन’च्या वेशात दाखवणारा फलक
     पनवेल - येथील ‘दिल्ली पब्लिक स्कूल’च्या नर्सरी ते इयत्ता ८ वीपर्यंतच्या प्रवेशासाठी लावण्यात आलेल्या विज्ञापनामध्ये एका छोट्या मुलीला ‘नन’च्या वेशात दाखवण्यात आले आहे. यामुळे हिंदुद्वेषी ख्रिस्त्यांचा धर्मांतराचा अंतस्थ प्रयत्न उघड झाला आहे. (शिक्षणसंस्थेच्या विज्ञापनात विद्यार्थ्याला आधुनिक वैद्य, अभियंता किंवा अधिवक्ता झालेले दाखवण्यात येते. या विज्ञापनातून मात्र ‘या शाळेत शिक्षण घेऊन ‘नन’ बना !’, असेच सुचवायचे आहे. ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या शाळांमध्ये हिंदु विद्यार्थ्यांचे कसे ख्रिस्तीकरण केले जाते, याचा या चालता-बोलता पुरावा आहे ! शासनकर्ते याची नोंद घेतील का ? - संपादक)

भ्रष्ट कारभार दिसल्यास नगरपालिका बरखास्त करणार ! - मुख्यमंत्री

मुख्यमंत्र्यांना अशी चेतावणी द्यावी 
लागणे ही लोकशाहीची निरर्थकताच !
        नागपूर, ११ डिसेंबर (वार्ता.) - नगरपालिका निवडणुकीत जिंकून आल्यानंतर त्याचा आनंद अवश्य साजरा करा; मात्र नगरपालिकेत भ्रष्टाचार अथवा चुकीची कामे केली, तर तेथील नगराध्यक्ष आणि नगरसेवक यांच्यावर कारवाई होईल, अशी चेतावणी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ज्या नगरपालिकेत भ्रष्ट कारभार दिसेल, ती बरखास्त केली जाईल. भाजप तिथल्या भ्रष्ट नेतृत्वासोबत संबंध ठेवणार नाही, असेही ते म्हणाले. (देशाला स्वातंत्र्य मिळून ६९ वर्षे झाली, तरी अजूनही भ्रष्ट कारभार करू नका, हे लोकप्रतिनिधींना सांगावे लागते, यांसारखी लज्जास्पद गोष्ट कोणती असेल ? - संपादक)
        येथे ९ डिसेंबर या दिवशी नगरपालिका आणि नगर पंचायत निवडणुकीत जिंकून आलेल्या नगरसेवक अन् नगराध्यक्षांच्या सत्कार समारंभात बोलत होते. श्री. फडणवीस म्हणाले की, जनतेने जुन्यांना हटवून भाजपच्या हातात मोठ्या विश्‍वासाने सत्ता दिली आहे. तोे विश्‍वास कायम ठेवा. हा श्री. नरेंद्र मोदी यांचा पक्ष असून इथे अपकारभार खपवून घेतला जाणार नाही.

पाश्‍चात्त्य संस्कृतीचा फोलपणा कळण्यासाठी धर्मशिक्षण घ्या ! - आनंद जाखोटिया, हिंदु जनजागृती समिती

     उज्जैन (मध्यप्रदेश), ११ डिसेंबर (वार्ता.) - इंग्रजांनी भारताची सर्वश्रेष्ठ गुरुकुलव्यवस्था नष्ट करून निर्माण केलेल्या शिक्षणव्यवस्थेने भारतियांमध्ये स्वतःच्याच संस्कृतीविषयी तिरस्काराची भावना निर्माण केली. त्यामुळे जे जे विदेशी, ते ते येथील युवकांना प्रतिष्ठेचे वाटू लागले. आज भारतीय युवक पाश्‍चात्त्य संस्कृतीच्या मृगजळामागे धावत असतांना, विदेशी लोक मात्र शांतीच्या शोधात भारताकडे येत आहेत. पाश्‍चात्त्य संस्कृतीचा फोलपणा समजण्यासाठी युवकांनी धर्मशिक्षण घ्यायला हवे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. आनंद जाखोटिया यांनी केले. येथील प्रा. राहुल अंजाना यांनी त्यांच्या घरी ६ डिसेंबर या दिवशी आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.

नालासोपारा (जि. पालघर) येथे क्षात्रतेज जागवणारी हिंदु धर्मजागृती सभा !

दीपप्रज्वलन करतांना डावीकडून सनातनच्या संत सद्गुरु (कु.) अनुराधा
वाडेकर, सनातन संस्थेच्या प्रवक्त्या सौ. नयना भगत, हिंदु जनजागृती समितीचे
श्री. सुमित सागवेकर, लष्कर-ए-हिंदचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता श्री. ईश्‍वरप्रसाद खंडेलवाल

विवाह झालेली व्यक्ती ही अविवाहितांपेक्षा अधिक निरोगी असते ! - संशोधनाचा निष्कर्ष

     मुंबई - विवाह झालेली व्यक्ती ही अविवाहितांपेक्षा अधिक निरोगी रहात असून आजारांपासून चार हात लांबच असते, असे एका संशोधनातून समोर आले आहे. 
१. या संशोधनानुसार अधिकाधिक अविवाहित मंडळी ही मधुमेह, उच्च रक्तदाब, पचनसंस्थेशी संबंधित आजार, स्थूलपणा अशा अनेक तक्रारींनी ग्रासलेले आढळले. तेच विवाह झालेल्या व्यक्तींचे आजार अक्षरशः नाहीच्या बरोबरीस निघाले. 
२. संशोधन करणारे योकोहामा सिटी विश्‍वविद्यालयातील अध्यापक योशिनोबु कोंडो यांच्या मते, विवाहितांमध्ये वजन वाढण्याचा धोका ५० टक्क्यांहून अल्प असतो, तसेच पचनाशी निगडित आजारही ५८ टक्के दूर लांब असतात.

अमली पदार्थाची तस्करी करणारा धर्मांध अटकेत !

अल्पसंख्यांक धर्मांध गुन्हेगारीत मात्र बहुसंख्यांक !
    अहमदाबाद (कर्णावती) - देहलीहून चरस विकण्यासाठी आलेल्या सय्यद अलीमुद्दीन या ६० वर्षांच्या धर्मांधाला अमली पदार्थविरोधी पथकाने साबरमती रेल्वेस्थानकावर अटक केली. त्याच्याकडून अनुमाने १५ ते २० लक्ष रुपये किमतीचे ३ किलो चरस जप्त करण्यात आले. नोटाबंदीमुळे चरस विकले गेले नसल्याचे त्याने पोलीस चौकशीच्या वेळी सांगितले. मादक पदार्थ तस्करी प्रतिबंधक कायद्याच्या अंतर्गत धर्मांधावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

हेरगिरी केल्याप्रकरणी सौदी अरेबियामध्ये १५ गुप्तहेरांना मृत्यूदंड !

सौदी अरेबियासारखी कठोर शिक्षा भारताने गुप्तहेरांना दिली असती, 
तर भारतात पाकच्या गुप्तहेरांची बजबजपुरी माजली नसती !
      रियाध - इराणसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी सौदी अरेबियाच्या न्यायालयाने १५ गुप्तहेरांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. इतर १५ जणांना ६ महिने ते २५ वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. हेरगिरीसाठी गुप्तहेरांचा ३२ जणांचा एक गट कार्यरत होता. त्यांतील दोघांची सुटका करण्यात आली आहे. अल् अरेबियाने दिलेल्या माहितीनुसार आरोपींपैकी ३० जण सौदी अरेबियाचे नागरीक आहेत, तर ईराण आणि अफगाणिस्तान येथील प्रत्येकी एक नागरीक आहे. त्यांना वर्ष २०१३मध्ये अटक करण्यात आली होती.मंदिरे तोडून हिंदूंच्या भावनांचा अनादर केल्यास जनआंदोलनाला सामोरे जावे लागेल !

हिवाळी अधिवेशनात भाजपच्या आमदार 
सौ. मंदा म्हात्रे यांची प्रशासनाला चेतावणी !
       नवी मुंबई, ११ डिसेंबर (वार्ता.) - श्रद्धास्थाने असलेली मंदिरे तोडून शासनाने हिंदूंच्या धार्मिक भावनांचा अनादर करू नये. अन्यथा प्रशासनाला जनआंदोलनाला सामोरे जावे लागेल, अशी चेतावणी भाजपच्या आमदार सौ. मंदा म्हात्रे यांनी प्रशासनाला दिली. नवी मुंबई येथील हिंदूंची मंदिरे अनधिकृत ठरवून पाडण्यात येत असल्याचे सूत्र आमदार सौ. मंदा म्हात्रे यांनी औचित्याच्या सूत्रांमध्ये उपस्थित केले. नवी मुंबई महापालिका आणि सिडको प्रशासन यांच्याकडून येथील मंदिरे अनधिकृत ठरवून पाडण्यात येत आहेत. याविषयी काही दिवसांपूर्वी नवी मुंबई मंदिर समितीच्या वतीने आमदार सौ. म्हात्रे यांची भेट घेऊन त्यांना याविषयी निवेदन देण्यात आले होते. यावर आमदार सौ. म्हात्रे यांनी अधिवेशनात आवाज उठवण्याचे आश्‍वासन नवी मुंबई मंदिर समितीच्या कार्यकर्त्यांना दिले होते. 

देशात शिक्षण घेऊन मातृभूमीच्या सेवेसाठी कार्यरत रहाणे, ही स्वा. सावरकर यांना आदरांजली ठरेल ! - डॉ. संजय देशमुख, कुलगुरु, मुंबई विद्यापीठ

स्वा. सावरकर यांच्या जीवनावर आधारित 
जगातील ७ व्या आणि देशातील १ ल्या 
‘थ्रीडी मॅपिंग लाईट-साऊंड शो’चे उद्घाटन !
        मुंबई, ११ डिसेंबर (वार्ता.) - कुटुंबाला आपणाकडून अपेक्षा असतेच; मात्र त्याच्या पलीकडे जाऊन देशाला काय देऊ शकतो, याचा विचार केला तर देश मोठा होईल. देशात शिक्षण घेऊन मातृभूमीच्या सेवेसाठी इथेच कार्यरत रहाणे, ही स्वातंत्र्यवीर सावरकर यांना आदरांजली ठरेल, असे प्रतिपादन मुंबई विद्यापिठाचे कुलगुरु डॉ. संजय देशमुख यांनी केले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावरील हिंदी भाषेतील ‘थ्रीडी मॅपिंग लाईट-साऊंड शो’चा उद्घाटन सोहळा डॉ. संजय देशमुख यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक येथे १० डिसेंबर या दिवशी पार पडला. या वेळी त्यांनी हे विचार व्यक्त कले. या वेळी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक समितीचे अध्यक्ष श्री. अरुण जोशी, कार्याध्यक्ष श्री. रणजित सावरकर, माजी खासदार श्री. भारतकुमार राऊत, कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, कार्यवाह श्री. राजेंद्र वराडकर आदी मान्यवर उपस्थित होते.
        या वेळी डॉ. संजय देशमुख म्हणाले, ‘‘देहाकडून देवाकडे जातांना मधेे देश लागतो. ‘देशाचे आपण काहीतरी देणे लागतो’, ही भावना स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी प्रत्येक भारतियाच्या मनात तेवत ठेवली आहे. प्रत्येक क्षेत्रात जगात नेतृत्व करू शकेल, अशी माणसे आपल्याकडे आहेत. ही भावना सदैव प्रेरित व्हावी; यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित ‘थ्री डी मॅपिंग लाईट साऊंड शो’सारखे अत्याधुनिक प्रयोग अंदमान आणि अन्यत्र दाखवणे आवश्यक आहे.’’

कोल्हापूर येथे पाणी प्रश्‍नावरून नगरसेवक आणि अधिकारी यांच्यात वादावादी !

नगरसेवकांनी आयुक्तांच्या दालनाला कुलूप ठोकले !
     कोल्हापूर - महानगरपालिकेत महानगरपालिका अधिकारी आणि नगरसेवक यांच्यामध्ये पाण्याच्या प्रश्‍नावरून वादावादी झाली. त्यानंतर संतप्त झालेल्या महानगरपालिकेच्या नगरसेवकांनी थेट आयुक्तांच्या दालनालाच कुलूप ठोकले. ही घटना ९ डिसेंबरला घडली आहे. नगरसेवकांनी आयुक्तांच्या दालनात जाऊन गोंधळही घातला. त्यामुळे महानगरपालिकेच्या परिसरात काही काळासाठी मोठा गोंधळ निर्माण झाला होता.
     शहरातील पाणीपुरवठा आणि पाणी गळतीचा प्रश्‍न दिंवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे; मात्र महानगरपालिकेचे अधिकारी या प्रश्‍नाकडे गांभीर्याने पहायला सिद्ध नाही. त्यामुळे आज संतापलेल्या नगरसेवकांनी वरील कृत्य केले. त्यानंतर आयुक्त पी. शिवशंकर हे पोलिसांना घेऊन कार्यालयात दाखल झाले. त्यामुळे उपस्थित असणारे नगरसेवक पोलिसांना घेऊन का आलात ? असा जाब विचारत त्यांना धारेवर धरले. या वेळी आयुक्तांसमवेत सुरक्षा देण्यासाठी आलेल्या पोलीस अधिकारी आणि नगरसेवक यांच्यात बाचाबाची झाली. त्यामुळे गोंधळाच्या वातावरण आणखी भर पडली.


हुपरी ग्रामपंचायत सरपंच, सदस्य आणि ग्रामविकास अधिकारी यांच्याकडून ५७ लक्ष ८३ सहस्र रुपयांचा निधी वसूल करणार ! - राज्यमंत्री भुसे

      नागपूर - कोल्हापूूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील हुपरी ग्रामपंचायतमध्ये १९९९-२००० ते २०११-२०१२ या कालावधीतील लेखापरीक्षणानुसार १ कोटी ६६ लक्ष ६ सहस्र ३०५ रुपयांचा निधी आक्षेपार्ह आढळून आला आहे. त्यापैकी संबंधित सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य आणि कर्मचारी यांच्याकडून १ कोटी ८ लक्ष २३ सहस्र १२ रुपये इतका निधी वसूल केला आहे. उर्वरित ५७ लक्ष ८३ सहस्र २९३ रुपये इतका निधी वसूल करण्यात येईल. त्यासाठी तत्कालीन ९ सरपंच, ७६ ग्रामपंचायत सदस्य आणि १९ ग्रामविकास अधिकारी यांना ऑक्टोबर २०१६ मध्ये नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. भविष्यात असे प्रकार न होण्यासाठी प्रशासनाकडून काळजी घेतली जाईल, अशी माहिती ग्रामविकास राज्यमंत्री श्री. दादाजी भुसे यांनी ९ डिसेंबर या दिवशी विधानसभेत प्रश्‍नोत्तरात दिली.
     इचलकरंजी येथील आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांनी हा प्रश्‍न उपस्थित केला होता. या वेळी इतर आमदारांनी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि कर्मचारी यांच्यावर गुन्हे प्रविष्ट करून त्यांच्या मालमत्तेवर बोजा आणण्याची मागणी केली; मात्र ही मागणी श्री. दादाजी भुसे यांनी फेटाळून लावली.

निवडणूक अधिकार्‍याला धमकावल्याप्रकरणी पशुसंवर्धन आणि दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांच्यावर गुन्हा प्रविष्ट

निवडणूक अधिकार्‍याला धमकावणारे लोकप्रतिनिधी 
सामान्य जनतेशी कसे वागत असतील !
        नागपूर, ११ डिसेंबर - गडचिरोलीतील वडसा-देसाईगंज नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या कालावधीत एका उमेदवाराला मनाप्रमाणे निवडणूक चिन्ह मिळावे, यासाठी पशुसंवर्धन आणि दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी निवडणूक अधिकार्‍याला धमकावले होते. या प्रकरणी जानकर यांच्यावर निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार १० डिसेंबर या दिवशी रात्री वडसा पोलीस ठाण्यात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. याचसमवेत आयोगाने निवडणुकीतील प्रभाग क्रमांक ९ ची निवडणूक ही रहित केली आहे. उपरोक्त प्रकरणावर निवडणूक आयोगाने जानकर यांच्यावर नोटीस बजावून उत्तर मागवले होते. त्यानंतर जानकर यांनी पाठवलेल्या उत्तराची आयोगाने पडताळणी करून वरील कारवाई केली आहे.

घाटकोपर येथील मौलाना चाळीत गरिबांच्या खात्यातून काळा पैसा पांढरा करण्याचा प्रकार उघड

यावरून लक्षात येईल की, भ्रष्टाचाराच्या समूळ 
उच्चाटनासाठी नोटाबंदीसारखे तात्पुरते उपाय पुरेसेे 
नाहीत, तर त्यासाठी नीतीमान समाजाची निर्मिती 
आवश्यक आहे आणि ती केवळ धर्मशिक्षणानेच होऊ शकते !
        मुंबई, ११ डिसेंबर - घाटकोपर येथील मौलाना चाळीत गरिबांना कमिशन देऊन काळा पैसा पांढरा करणारे दलाल मोठ्या प्रमाणात कार्यरत झाले आहेत. प्राप्तीकर विभागाने या ठिकाणी घातलेल्या धाडीमध्ये ३० लक्ष रुपयांहून अधिक रकमेच्या २ सहस्र रुपयांच्या नोटा आढळून आल्या. या चाळीशेजारील ‘युनिटी अपार्टमेंट्स’मध्ये नव्यानेच आलेल्या रहिवाशांनी गरीब चाळधारकांंच्या खात्यांमध्ये १५ प्रतिशत मोबदल्याच्या बदल्यात स्वत:चे काळे पैसे भरले आहेत, अशी माहिती आयकर विभागाला प्राप्त झाली होती. या प्रकारामागे दलालांचे मोठे जाळे असण्याची शक्यता आहे. काळे पैसेवाले त्यांचे पैसे दलालांना आणून देतात. हे दलाल गरिबांना गाठून मोबदल्याचे प्रलोभन दाखवून त्यांच्या खात्यात पैसे टाकतात. (काही पैशांच्या प्रलोभनाला बळी पडून काळे धन साठवणार्‍यांना साहाय्य करणार्‍यांनासुद्धा कठोर शासन केले पाहिजे आणि दलालांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा नोंदवला गेला पाहिजे ! संपादक) संपादक)

(म्हणे) ‘सत्ता आल्यास मुंबईचा विकास कसा करतो, हे युतीने पहावे !’

भ्रष्टाचाराची परमावधी गाठलेल्या 
राष्ट्रवादी काँगे्रसचे सचिन अहिर !
       मुंबई, ११ डिसेंबर (वार्ता.) - मुंबई महापालिकेत मागील २० वर्षांपासून शिवसेना-भाजप युतीची सत्ता आहे. ही महापालिका सध्या विविध प्रकारच्या घोटाळ्यांनी गाजत आहे. याउलट पुणे, पिंपरी-चिंचवड, बारामती महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे; मात्र तेथे कधी भ्रष्टाचार झाल्याचे उदाहरण सापडत नाही. तेथे केवळ विकासाचीच कामे होताच. (मग सर्वाधिक सत्ता भोगलेल्या आघाडीच्या सत्ताकाळात महाराष्ट्रात झालेल्या भ्रष्टाचाराचे काय ? - संपादक) या वेळी मुंबई महापालिकेत आपल्याला परिवर्तन घडवून आणायचे आहे. त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यात येईल. राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आल्यास आम्ही मुंबईचा विकास कसा करतो, हे युतीने पहावे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी केले. कांजूरमार्ग येथील परांजपे उद्यानाच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते.

कोक्राझार (आसाम) येथील चकमकीत २ आतंकवादी ठार !

       कोक्राझार (आसाम) - भुतान सीमेला लागून असणार्‍या आसामच्या कोक्राझार जिल्ह्यातील घनदाट जंगलामध्ये पोलीस आणि सुरक्षा दल यांच्यासमवेत झालेल्या चकमकीमध्ये २ आतंकवादी ठार झाले. हे दोन्ही आतंकवादी ‘एन्डीएफ्बी’ (साँगबिजीत) या गटाचे असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या चकमकीमध्ये ठार झालेल्या आंतकवाद्यांकडून एके ५६ रायफल, २१ जिवंत काडतुसे, पिस्तूल आणि ६ सहस्र रुपयांची रोकड, सायकली आणि शिधावाटप पत्रही जप्त करण्यात आले आहे.
       राज्य पोलीस आणि आसाम रायफलच्या सैनिक यांनी मिझोराम अन् म्यानमार यांच्या सीमेवर ८ आतंकवाद्यांना पकडले असून या आतंकवाद्यांच्या कह्यातून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.

पुणे जिल्ह्यातील ब्रिटीशकालीन ३१ पुलांपैकी २६ पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट चालू ! - सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील

विधान परिषद
     नागपूर - पुणे जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील रस्त्यांवर ३१ ब्रिटीशकालीन पूल असून त्यातील २६ पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट चालू आहे. उर्वरित ५ पुलांचे ऑडीट पूर्ण केले आहे. सद्यस्थितीत पुलांच्या अत्यावश्यक दुरुस्तींची कामे हाती घेण्यात आल्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत एका लेखी उत्तरात दिले आहे. काँग्रेसचे आमदार अनंत गाडगीळ यांनी पुणे जिल्ह्यातील नद्यांवर बांधलेल्या ब्रिटीशकालीन पुलांविषयी तारांकित प्रश्‍न विचारला होता. मावळ तालुक्यातील टाकवे येथील पूल कमकुवत झाल्याने तो जड वाहतुकीस बंद केला आहे, अशी माहिती या वेळी देण्यात आली. (हा पूल वाहतुकीस पूर्णपणे बंद करून त्याची तातडीने दुरुस्ती करावी. - संपादक)

शिवसेनेचे माजी आमदार डॉ. रमेश प्रभु यांचे निधन

       मुंबई, ११ डिसेंबर - शिवसेनेचे माजी आमदार आणि माजी महापौर डॉ. रमेश प्रभु (वय ७६) यांचे ११ डिसेंबर या दिवशी सकाळी ६.२० वाजता विलेपार्ले (पूर्व) हनुमान रोड येथील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. १९८७ ला ते मुंबईचे महापौर झाले. १९८७ आणि १९९० मध्ये सलन दोन वेळा ते आमदार म्हणून निवडून आले. १९९५ ला न्यायलयाने हिंदुत्वावर निवडणूक लढवून आमदार झाल्यावरून त्यांना ६ वर्षे मतदान आणि निवडणूक लढवण्यास बंदी घातली होती.

कांदा उत्पादक शेतकर्‍यांना केंद्र सरकारकडून अनुदान मिळावे, याविषयीची लक्षवेधी सूचना सभापतींनी राखून ठेवली !

विधीमंडळाच्या कामात अडथळा आणणारे 
लोकप्रतिनिधी हे लोकशाहीची निरर्थकताच स्पष्ट करतात !
     नागपूर, ११ डिसेंबर (वार्ता.) - विधान परिषदेमध्ये ९ डिसेंबर या दिवशी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी कांदा उत्पादक शेतकर्‍यांना अनुदान मिळावे, यांसाठी लक्षवेधी सूचना मांडली. त्यावर पणनमंत्री सदाभाऊ खोत यांनी उत्तर दिले की, जानेवारी अखेरपर्यंत शेतकर्‍यांना कांद्याचे अनुदान देण्यात येईल. 
    मुंडे यांनी यावर सांगितले की, शेतकर्‍यांना देण्यात येणारे अनुदान मिळण्यासाठी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्र्यांना आणि केंद्र सरकारने राज्य सरकारला १२ वेळा पत्राद्वारे आठवण करूनही राज्य सरकारने तसा प्रस्ताव पाठवलेला नाही. त्यावर सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी प्रस्ताव पाठवल्याचे सांगितले; परंतु विरोधी पक्षाच्या सदस्यांना हे उत्तर न पटल्याने गोंधळ वाढल्याने सभापतींनी वरील निर्णय घोषित केला. यानंतर सभा २० मिनिटे स्थगित करूनही घोषणाबाजी झाली. नागपूर येथील ‘मिहान सेझ’ प्रकल्पामध्ये पतंजली समूहाला २५ लक्ष प्रतिहेक्टर दराने भूमी दिली. यामध्येही सरकारने भ्रष्टाचार केला असून पारदर्शी कारभार केला नाही, तसेच या प्रकरणी सरकारचे कोट्यवधी रुपयांची हानी झाले आहे, अशी विविध सूत्रे विरोधी पक्षांनी लक्षवेधी सूचनेद्वारे मांडली. या प्रकरणी सत्ताधारी पक्षाकडून दिलेल्या उत्तराने विरोधकांचे समाधान होत नाही, हे पाहून सभापतींनी ही लक्षवेधी राखून ठेवली.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी केंद्रशासनाकडे पाठपुरावा चालू ! - विनोद तावडे

अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी तातडीने पावले उचलणार का ?
     नागपूर - मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी केंद्रशासनाकडे वर्ष २०१३ मध्ये प्रस्ताव पाठवला होता. त्यानंतर हे प्रकरण विविध न्यायप्रविष्ट प्रकरणांमुळे प्रलंबित असल्याचे केंद्रशासनाने कळवले होते. मद्रास उच्च न्यायालयाने दिलेल्या एका निकालानुरूप तातडीने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी केंद्रशासनाकडे पाठपुरावा चालू असल्याची माहिती मराठी भाषामंत्री विनोद तावडे यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयवंत जाधव यांनी विधान परिषदेत अभिजात भाषेच्या दर्जाविषयी तारांकित प्रश्‍न विचारला होता. त्यावर तावडे यांनी वरील लेखी उत्तर दिले आहे.

युवकांनी शिवचरित्र हृदयात कायम धगधगत ठेवावे ! - सु.ग. शेवडेगुरुजी

     कुडाळ (जिल्हा सातारा) - छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवलेले अतुलनीय शौर्य आणि त्याग यामुळे शिवप्रतापदिन येणार्‍या प्रत्येक पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल. युवकांनी शिवचरित्र आत्मसात करून कायम हृदयात धगधगत ठेवावे, असे मार्गदर्शन भारताचार्य सु.ग. शेवडेगुरुजी यांनी केले. ते कुडाळ (जिल्हा सातारा) येथे ६ डिसेंबरला आयोजित केलेल्या शिवप्रतापदिनाच्या कार्यक्रमात बोलत होते.
     या वेळी श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी श्री. संदीप जायगुडे यांनी गडकोट मोहिमेविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या आरंभी नगरप्रदक्षिणा करण्यात आली. शेवट प्रेरणामंत्र आणि ध्येयमंत्र म्हणून करण्यात आला. या वेळी शेकडो धारकरी उपस्थित होते. कार्यक्रमास मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त होता.

सोलापूर येथे झालेल्या हिंदु धर्मजागृती सभेनंतरच्या ठिकठिकाणच्या बैठकांना उत्स्फूर्त प्रतिसाद !

धर्मसभांंसह अनेक उपक्रमांचे नियोजन, धर्माभिमान्यांचा कृतीशील सहभाग !
     सोलापूर - येथे ४ डिसेंबर या दिवशी झालेल्या हिंदु धर्मजागृती सभेनंतर ठिकठिकाणी आढावा बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकांना धर्माभिमान्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आतापर्यंत खानापूर, नान्नज, विडी घरकूल, शेळगी, बक्षिहिप्परगा, दहिटने आणि हत्तूर या सात ठिकाणी बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. खानापूर येथे ६०, तर हत्तूर येथे २० धर्माभिमानी उपस्थित होते.
     या सर्व बैठकांच्या माध्यमातून पुष्कळ धर्माभिमानी कृतीशील झाले असून अनेक उपक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये खानापूर येथे धर्मजागृती सभा घेण्याचे निश्‍चित झाले. सर्व ठिकाणी धर्मशिक्षणवर्ग घेण्याचे ठरले. ३१ डिसेंबरमुक्त सोलापूर करण्यासाठी ठिकठिकाणी फलकप्रसिद्धी करून हस्तपत्रके, भित्तीपत्रके लावण्याचे; तसेच स्वाक्षरी मोहीम राबवून प्रशासनाला निवेदन देण्याचे निश्‍चित झाले. सर्व धर्माभिमान्यांनी राष्ट्रीय हिंदु आंदोलनात सहभागी होणार, तर काही जणांनी दैनिक सनातन प्रभातचे वर्गणीदार होणार असल्याचे सांगितले. हत्तूर येथे ३१ डिसेंबरची पत्रके छापण्यासाठी धर्माभिमान्यांनी वर्गणी गोळा करून रक्कम गोळा केली.

सोलापुरात कत्तलीसाठी आणलेले १७ गोवंशीय जप्त; धर्मांधावर गुन्हा प्रविष्ट

      सोलापूर - येथील चांदनी चौक फॉरेस्ट परिसरातील मनपा बीफ मार्केटच्या पत्र्याच्या छताखाली कत्तलीसाठी अवैधरित्या आणलेले १७ गोवंशीय पोलिसांनी जप्त करून रजाक अब्दुल कादर कुरेशी या धर्मांधाला अटक केली. त्याने १७ जनावरे त्यांच्या जीविताला धोका होईल, अशा पद्धतीने दोरीने बांधून ठेवली होेती. ही जनावरे कत्तलीसाठी आणल्याचेही त्याने सांगितले. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा प्रविष्ट केला आहे.

वीजदेयक न भरल्याने जिजाऊंच्या समाधीस्थळाची वीजजोडणी दुसर्‍यांदा तोडली !

ऐतिहासिक वारशांविषयी उदासीन असलेल्या वनविभागाचा भोंगळ कारभार !
     महाड - छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड येथील जिजामातांची समाधीची वीजजोडणी तोडण्यात आली आहे. वनविभागाने गेले चार मास विजेचे देयक न भरल्यामुळे महावितरणच्या अधिकार्‍यांनी येथील वीजजोडणी दुसर्‍यांदा तोडली आहे. 
   राजमाता जिजाऊंच्या समाधीकडे शासनाचे होणारे सततचे दुर्लक्ष, तसेच शिवपर्यटकांना सोयी-सुविधा पुरवण्यात शासनाला येणारे अपयश या पार्श्‍वभूमीवर पाचाड ग्रामस्थांनी पत्रकार परिषद घेतली. या वेळी ग्रामस्थ म्हणाले, ‘‘या परिसरात रात्री संपूर्ण काळोखाचे साम्राज्य पसरत आहे. परिसराच्या उद्यानातील झाडे उन्हामुळे करपून गेली आहेत. शासनाला या समाधीची देखभाल करणे परवडत नसेल, तर या समाधीची देखभाल करण्याचे दायित्व पाचाड ग्रामस्थ स्वीकारण्यास सिद्ध आहेत. येथील धर्मशाळेच्या देखभाल दुरुस्तीकडेही सार्वजनिक बांधकाम विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. या समस्यांवर आठ दिवसांत तोडगा काढला गेला नाही, तर पाचाड ग्रामस्थ रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडतील.’’

फलटण (जिल्हा सातारा) येथे पोलिसांचे ३१ डिसेंबरच्या अपप्रकारांच्या विरोधात कारवाई करण्याचे आश्‍वासन !

३१ डिसेंबरच्या दिवशी आणि रात्री होणारे अपप्रकार 
रोखण्याच्या संदर्भात महाराष्ट्रात विविध ठिकाणी निवेदने !
     फलटण (जिल्हा सातारा) - ३१ डिसेंबर या दिवशी ख्रिस्ती वर्ष साजरे करतांना होणारे अपप्रकार रोखा, या आशयाचे निवेदन फलटण (जिल्हा सातारा) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रशासनास दिले. हे निवेदन तहसीलदारांच्या वतीने नायब तहसीलदार श्री. नंदकुमार भोईटे यांनी, तर फलटण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. प्रकाश धस यांनी स्वीकारले.
     या वेळी तहसीलदार श्री. नंदकुमार भोईटे म्हणाले, ‘‘असे प्रकार कोठे घडतात, अशी ठिकाणे निवेदनात नमूद करा; म्हणजे त्याप्रमाणे आम्हाला कारवाई करणे सोपे पडेल.’’ (सर्वांनीच याकडे सतर्कतेने पाहिल्यास हे अपप्रकार सर्वांच्याच लक्षात येऊ शकतात ! - संपादक) त्यानंतर समितीच्या कार्यकर्त्यांनी हे अपप्रकार होणारी ठिकाणे सांगितली; तसेच पोलीस निरीक्षक श्री. धस यांनीही ‘असे प्रकार कोठे कोठे घडतात’, असे विचारले आणि अशा ठिकाणांची नावे स्वतः लिहून घेतली; तसेच ‘‘असे प्रकार घडत असतील, तर आम्हाला दूरध्वनी वरून कळवा; परंतु तुम्ही स्वतः काही ही कारवाई करू नका’’, असे सांगितले. (पोलिसांनी अशा अपप्रकरांच्या विरोधात स्वतःहून कारवाई करणे अपेक्षित आहे. - संपादक)

फलक प्रसिद्धीकरता

गृहमंत्र्यांनी पाकच्या होणार्‍या तुकड्यांची नाही, तर सैनिकांच्या मृत्यूची चिंता करावी ?
     पाक भेकडाप्रमाणे आक्रमणे करत आहे. पाकचेे आतापर्यंत केवळ दोनच तुकडे पडले आहेत. त्यांचा पोरखेळ असाच चालू राहिला, तर त्याचे १० तुकडे होतील, अशी चेतावणी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी जम्मू येथील एका कार्यक्रमाच्या प्रसंगी दिली.

हिंदू तेजा जाग रे !

Jago !
Yadi Pak apni harkato se baaz nahi aya, to uske 10 tukde ho jayenge - Rajnath Singh
Jihadi Pak ke aur kya harkat karnepar Bharat uspar karvai karega ?

जागो !
यदि पाक अपनी हरकतों से बाज नहीं आया, तो उसके १० टुकडे हो जाएंगे ! - राजनाथ सिंह
जिहादी पाक के और क्या हरकत करने पर भारत उस पर कारवाई करेगा ?

महाराष्ट्रातील पाळणाघरे ‘सीसीटीव्ही’ लावून अद्ययावत करणार ! - गृह राज्यमंत्री

     नागपूर - महिला आणि बालविकास कल्याण यांच्या वतीने पाळणाघरांसाठी एक सर्वंकष योजना आखण्याचे काम चालू आहे. तसेच राज्यातील खाजगी आणि शासकीय पाळणाघरे, शिशूगृहे या ठिकाणीही ‘सीसीटीव्ही’ लावून यंत्रणा अद्ययावत करण्यात येईल, अशी माहिती गृह राज्यमंत्री रणजित पाटील यांनी दिली. खारघर (नवी मुंबई) येथील पाळणाघरातील बाळाला अफसाना शेख या आयाने अमानुष मारहाण केल्याच्या प्रकरणी भाजपचे आमदार सुजितसिंह ठाकुर यांनी परिषदेत वरील प्रकरणाची लक्षवेधी सूचना मांडली होती. त्या वेळी ते बोलत होते.

अनेक आमदारांना मधुमेह आणि रक्तदाब असल्याचे निदान !

     नागपूर, ११ डिसेंबर (वार्ता.) - लोकांचे जीवनमान आणि आरोग्याविषयी विधीमंडळात आवाज उठवणार्‍या अनेक आमदारांना रक्तदाब आणि मधुमेह या रोगाने ग्रासले आहे. ७ डिसेंबर या दिवशी विधीमंडळ परिसरात झालेल्या ‘लठ्ठपणा जागृती अभियान’ या शिबिरात ३६ आमदारांसह ५ मंत्र्यांपैकी २५ टक्क्यांहून अधिकांमध्ये उच्च रक्तदाब आणि मधुमेह असल्याचे आढळले.

शाहिस्तेखानावरचे आक्रमण हा सर्जिकल स्ट्राईक ! - विनायक पाटणकर

     पुणे, ११ डिसेंबर (वार्ता.) - छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानावर केलेले आक्रमण हा ‘सर्जिकल स्ट्राईक’च आहे. शिवरायांनी गडकिल्ले कह्यात घेऊन प्रदेशावर नियंत्रण प्रस्थापित केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेकरिता प्रदेश नियंत्रणाची नीती वापरली, असे प्रतिपादन लेफ्टनंट जनरल विनायक पाटणकर यांनी केले. प्रतापगड उत्सव समितीच्या वतीने शनिवारवाडा येथे ६ डिसेंबर या दिवशी शिवप्रतापदिन साजरा करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते.

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसंदर्भातील परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे विचारधन !

        ‘वर्ष २०२३ पासून ‘हिंदु राष्ट्र’ येईल’, हे आजवर अनेक संतांनी वेळोवेळी सांगितले आहे. तथापि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेविषयी कोणत्याही आशादायी घटना स्थुलातून घडत नसतांना असे सांगणे, ही काहींना अतिशयोक्ती वाटेल; पण संतांमध्ये काळाच्या पडद्याआड पहाण्याचे सामर्थ्य असते. म्हणूनच अशा द्रष्ट्या संतांच्या मार्गदर्शनाखाली आपण त्या दिशेने प्रयत्न करणे, हीच आपली साधना आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेविषयी अनेकांंच्या मनात उत्सुकता आहे. या विषयीची सविस्तर माहिती ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची दिशा’ या नियमित सदरात आपल्याला मिळेल. आगामी काळात हिंदु समाजाला भारतभूमीत रामराज्याची अनुभूती देणारे ‘हिंदु राष्ट्र’ स्थापन करण्यासाठी खारीचा नव्हे, तर श्री हनुमंताचा वाटा उचलण्याची प्रेरणा यातून मिळावी, अशी ईश्‍वरचरणी प्रार्थना !

प.पू. पांडे महाराज यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या दृष्टीने केलेले अमूल्य मार्गदर्शन

प.पू. पांडे महाराज
१. हिंदु राष्ट्र स्थापनेमागील आध्यात्मिक दृष्टीकोन 
      ‘आज आपण हिंदु राष्ट्रासाठी अखंडपणे झटत आहोत; मात्र आपण हिंदु राष्ट्राचा विचार पुष्कळ स्थूलपणे, म्हणजे केवळ मुसलमान, ख्रिस्ती, निधर्मी आदींकडून होणार्‍या आक्रमणांच्याच संदर्भात करत असून हिंदु राष्ट्राची वास्तविकता आपल्या लक्षातच आलेली नाही. ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी आपल्याला हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यास का सांगितले आहे ?’, याचा सर्व कार्यकर्त्यांनी सूक्ष्मपणे विचार करायला हवा. मनुष्यातील चैतन्याच्या आधारेच ‘तो जिवंत किंवा मृत आहे’, हे ठरवले जाते. ज्याच्या शरिरातील चैतन्य नष्ट झाले आहे, तो मृत मानला जातो, तसेच विश्‍वही चैतन्याच्या आधारेच चालते. प्राणी, वृक्ष या सर्वांत ते चैतन्य आहे; म्हणून सृष्टी जिवंत आहे. आज संपूर्ण विश्‍वाला चैतन्य पुरवणारा भारत हा एकमात्र चैतन्याचा स्रोत आहे.

वक्त्याचे बोलणे आत्मविश्‍वासपूर्वक असण्याचे महत्त्व

       ‘संवादातून सुसंवाद साधण्याच्या हातोटीवर पुष्कळ लोकांनी जीवनात यश मिळवले आहे. अनेकांना विषयाचे भरपूर ज्ञान असूनही इतरांवर तेवढा प्रभाव पाडता येत नाही. उलट अधिक ज्ञान नसूनही काही लोक उत्तम प्रभाव पाडू शकतात. याला कारण म्हणजे ‘संभाषणचातुर्य’. जो आपले विचार प्रभावीपणे मांडू शकतो, तोच लोकांची हृदये जिंकू शकतो. आत्मविश्‍वासपूर्वक केलेले छोटेसे संभाषणसुद्धा प्रभावी होऊ शकते. आपले प्रेमळ, सौम्य आणि कारुण्यपूर्ण शब्द आत्मविश्‍वासात वृद्धी करण्यास साहाय्य करतात. इतरांशी संभाषण करतांना आपल्या प्रत्येक शब्दातून आपला आत्मविश्‍वास प्रकट झाला पाहिजे, तरच आपण इतरांवर प्रभाव पाडून यश प्राप्त करू शकतो. थोडेच लोक मेंदूची भाषा समजू शकतात; पण हृदयापासून येणारी भाषा मात्र प्रत्येक व्यक्ती समजू शकते.’ 
- स्वामी विवेकानंद (संदर्भ : मासिक, ‘स्व’-रूपवर्धिनी कार्यवृत्त, २५.१.२०१३) राहुल गांधी यांचे भूकंपविषयक नवे संशोधन !

श्री. भाऊ तोरसेकर
      राहुल गांधी यांनी आता देशातील विरोधी पक्षांचे नेतृत्व हाती घेतले असून, त्यासाठीच विरोधी पक्षांना शुभेच्छा देण्याची वेळ आलेली आहे, कारण राहुल यांनी गेल्या चार वर्षांत काँग्रेससारख्या शतायुषी पक्षाची लिलया धूळधाण उडवून दाखवली आहे. साहजिकच त्यांच्याच हाती आपल्या तमाम विरोधकांचे नेतृत्व जावे, अशीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अपेक्षा असली, तर नवल नाही. नोटाबंदीनंतर त्या दिशेने राजकारण वळते आहे. गेल्या तीन आठवड्यांत संसदेचे कामकाज ठप्प करून दाखवण्यात राहुल यशस्वी झाले असून, राष्ट्रपती प्रणव मुखर्जीही त्यामुळे विचलीत झाले आहेत.

जिओ’च्या मागे लागून देवाने दिलेल्या अमूल्य वेळेचा अपव्यय करू नका !

     ‘आज अनेक जणांना आपल्याकडे ‘जिओ’ ही सुविधा हवी’, असे वाटते. ‘जिओ’ ही सुविधा येथून पुढे ३-४ मासांंसाठी (महिन्यांसाठी) विनामूल्य असल्यामुळे या अंतर्गत ‘इंटरनेट’चा वापर, भ्रमणभाषवरील बोलणे आणि लघुसंदेश पाठवणे, यांमध्ये लोक वेळ व्यर्थ दवडत असल्याचे दिसून येत आहे. 
      मानवाच्या जीवनात वेळ ही सर्वांत अमूल्य गोष्ट आहे. देवाने मनुष्यजन्म हा साधना करून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून सुटका करून घेण्यासाठी दिला आहे. आपले आयुष्य मर्यादित आहे आणि त्यातील एकेक मिनिटाचे मोल जाणून वेळेचा सदुपयोग करणे, हे मानवाच्या हातात आहे. देवाच्या कृपेने आपल्याला सेवेसाठी आवश्यक त्या सुविधा मिळत आहेत. प्रसारात असणार्‍या साधकांना या सुविधेचा मोठ्या प्रमाणात लाभ होतो, हे खरे आहे; पण अन्य साधकांनी ‘विनामूल्य आहे; म्हणून अधिक वेळ बोलूया’, असा विचार करून स्वत:चा अमूल्य वेळ व्यर्थ घालवू नये.

शिक्षणपद्धतीत परिवर्तन अत्यावश्यक !

      ‘पूर्वी कधीतरी अन्याय झाला’, असे इंग्रज साहेबाने ठरवले आणि त्याच्या आधारे आपण शिक्षकांच्या राखीव नोकर्‍या चालू केल्या. मराठ्यांनी सेनेत भरती न होता इतर उद्योग चालू केले. थोडक्यात राष्ट्रीय एकात्मतेच्या जागी आपल्या शासनाने राष्ट्रीय विषमता वाढवण्याचा उद्योग चालू केला. ही विषमता प्रच्छन्नपणे अविरत चालू आहे. त्याचा परिणाम आज आपण अनुभवत आहोत. आपल्या शिक्षणव्यवस्थेत अशी विषमता प्रामुख्याने टाळण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला जात होता. आजच्या व्यवस्थेत ते शक्य नाही. राजकीय पुढारी, शासकीय अधिकारी, त्यांच्याशी संबंधित असलेला अधिकारीवर्ग (उदा. पोलीस) आणि शिक्षणसम्राट अन् त्यांचे आश्रित, अशा लोकांची एक जबरदस्त टोळी गावोगाव निर्माण झाली आहे. त्यामुळे ही शिक्षणव्यवस्था पालटणे आता शक्य नाही. बी.एड्. आणि एम्.एड्. किंवा प्रौढ किंवा प्राथमिक शिक्षण यांच्या संशोधनाप्रमाणे निर्माण केलेल्या नियमांचा आजच्या व्यावहारिक शिक्षणव्यवस्थेशी सूतराम संबंध नाही, हे सत्य सर्वांना माहीत आहे. तरीही शिक्षणपद्धतीत परिवर्तन करण्यास कोणी सिद्ध नाही.’ - दादूमिया (धर्मभास्कर, ऑगस्ट २००९)

आजचा वाढदिवस

श्री. शेखर इचलकरंजीकर
     मार्गशीर्ष शुक्ल पक्ष त्रयोदशी (१२.११.२०१६) या दिवशी देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग येथील श्री. शेखर इचलकरंजीकर यांचा ७१ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्यात जाणवलेले पालट लवकरच प्रसिद्ध करत आहोत.
श्री. शेखर इचलकरंजीकर यांना 
सनातन परिवाराच्या वतीने वाढदिवसानिमित्त नमस्कार !
परात्पर गुरु डॉ. आठवले यांना ज्ञानग्रहण केलेली धारिका आवडल्यावर त्यांनी दिलेल्या खाऊविषयी साधकाने केलेले आत्मनिवेदन !

     ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दिलेला खाऊ खातांना मी देवाला सांगतो, ‘प्रभु, मला मिळालेले ज्ञान तुझेच आहे. त्यामुळे या खाऊचा मानकरी तूच आहेस, याचा स्वीकार कर ! - श्री. राम होनप, सनातन आश्रम रामनाथी, गोवा.
संकटकाळी ‘जिओ’ नव्हे, तर देवच साहाय्याला धावून येईल, हे लक्षात घ्या !’ - श्री. गणेश कामत, मंगळुरु (४.१२.२०१६)
     वर्ष २०१४ मध्ये वृत्तवाहिन्यांनी रालोआला बहुमत मिळेल, असे कुठेच दाखवले नव्हते. प्रत्यक्षात निवडणुकीचे निकाल मात्र वृत्तवाहिन्यांच्या अंदाजाच्या उलटे लागले. यावरूनच मोदीविरोधी माध्यमकर्मींच्या पत्रकारितेच्या अभ्यासाचा प्रत्यय देशाला आला !’ - तुफेल अहमद, ज्येष्ठ पत्रकार आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अभ्यासक

दैनिक सनातन प्रभातचा रंगीत दत्तजयंती विशेषांक

प्रसिद्धी दिनांक : १३ डिसेंबर २०१६
पृष्ठ संख्या : १२, मूल्य : ५ रुपये
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी १२ डिसेंबर
या दिवशी दुपारी ३ पर्यंत इआरपी प्रणालीत भरावी !

सनातन संस्थेचे पहिले संतरत्न सद्गुरु विमल फडकेआजी यांना घडवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कृतज्ञतापूर्वक अर्पिलेली शब्दसुमने !

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...
परात्पर गुरु
डॉ. जयंत आठवले
     दयासागर, कृपासिंधू, चैतन्यदायिनी अशी गुरूंची नानाविध वैशिष्ट्ये आहेत. याच वैशिष्ट्यांच्या जोडीला शिष्याचे बोट धरून त्याला अध्यात्ममार्गावरून नेऊन मोक्षाची प्राप्ती करून देणारीही एकमेव गुरुमाऊली असते. भवसागराच्या बंधनातून मुक्त करणार्‍या गुरूंचे ऋण फेडणे कोणत्याही शिष्याला अशक्यप्राय आहे. केवळ त्यांनी दिलेले निरपेक्ष प्रेम, तसेच प्रत्येक प्रसंगातून घडवले असल्याचे अनमोल क्षण आठवून त्यासाठी कृतज्ञता व्यक्त करणे हेच त्याच्या हातात असते. सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपाछत्राखाली राहून त्यांना अनुभवण्याची संधीही अनेक जिवांना लाभली. प्रत्येक वेळी त्यांच्यातील भगवंताच्या रूपाचेच दर्शन झाले. सनातनच्या पहिल्या संतरत्न झालेल्या सद्गुरु विमल फडकेआजी यांना प.पू. डॉक्टरांचा लाभलेला सहवास, त्या माध्यमातून साक्षात् ईश्‍वराच्या गुणांचे झालेले दर्शन, साधक, तसेच संत यांविषयी त्यांना असणारी प्रीती, आजी संत झाल्यावर आणि अंथरुणाला खिळून असतांना त्यांना केलेले चैतन्यदायी साहाय्य हे सर्वच आठवून मन कृतज्ञतेने भरून येते. सद्गुरु आजींच्या माध्यमातून त्यांनी आम्हा सर्वांवर आतापर्यंत केलेल्या कृपेसाठी पुढील प्रसंग त्यांच्याच चरणी कृतज्ञतापूर्वक अर्पण !

भावजागृतीचे प्रयत्न करत असतांना आलेली अनुभूती आणि त्यातून मिळालेला आनंद !

डॉ. (सौ.) नंदिनी सामंत
१. पूर्वी भावजागृतीसाठी प्रयत्न करावे लागणे आणि 
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या दर्शनाने आपोआप भावजागृती होणे 
     ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनानुसार गेली १ - २ वर्षे भावजागृतीसाठी विविध प्रयत्न चालू होते. त्या प्रयत्नांमुळे कधी भावजागृती व्हायची, तर कधी व्हायची नाही. झाली तरी प्रत्यक्ष प्रयत्न करत असतांनाच ती टिकायची. काही वेळा आपोआपही भावजागृती व्हायची, उदा. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे दर्शन झाल्यावर किंवा एखाद्या यज्ञाच्या वेळी इत्यादी. 
२. सध्या विशेष प्रयत्न न करताही आपोआप भावजागृती होणे 
     गेल्या १ - २ मासांपासून प्रयत्न न करताही किंवा विशेष परिस्थिती नसतांनाही, अगदी सहजस्थितीत ‘आधी भावजागृती झाली अन् नंतर त्याची जाणीव झाली’, असे हळूहळू होऊ लागले आहे. भावजागृती कधी व्यक्त स्वरूपात (अष्टसात्त्विक भाव) असते, तर कधी अव्यक्त स्वरूपात. भावजागृतीचे निमित्त वेगवेगळे असते, उदा. सेवा करत असतांना अचानक आतून तीव्रतेने जाणीव होते, ‘ही सेवा मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळेच मिळाली आहे. तेच माझ्याकडून ती करवून घेत आहेत.’ ही कृपेची जाणीव एवढी उत्कट असते की, आपोआप भावजागृती होते आणि काही काळ टिकून रहाते. या जाणिवेमुळे थकवा असला किंवा कंटाळा आलेला असला, सेवा क्लिष्ट असली, तरीही सेवा चालू ठेवता येते किंवा सेवेत वारंवार झालेले पालट सहजतेने स्वीकारता येतात आणि मन सकारात्मक रहाते.

सप्तर्षि जीवनाडीत सांगितल्याप्रमाणे राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी सतत दिव्य प्रवास करणार्‍या सनातनच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ !

महर्षींची शिकवण आणि कार्य !
सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ
सनातनच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ मागील ४ वर्षांपासून भारतभरातील विविध राज्यांत दौर्‍यावर जात आहेत. हिंदु राष्ट्राची (सनातन धर्म राज्याची) शीघ्रतेने स्थापना व्हावी, राष्ट्राचे सर्व नैसर्गिक आपत्तींपासून आणि परकीय आक्रमणांपासून रक्षण होण्यासाठी देवतांचा आशीर्वाद मिळावा, धर्माचे तसेच साधकांचे रक्षण व्हावे, यासाठी सप्तर्षि जीवनाडीत सांगितलेल्या क्षेत्री जाण्याचे त्यांचे नियोजन असते. आतापर्यंत त्यांनी २४ राज्यांतील विविध तीर्थक्षेत्रे, देवस्थाने, संतांचे आश्रम आणि संशोधन केंद्रे इत्यादींना भेटी देऊन तेथील वैशिष्ट्यपूर्ण दगड, माती, तीर्थ आदींचा संग्रह केला आहे. त्याचप्रमाणे तेथील आध्यात्मिक वैशिष्ट्ये चित्रीत केली आहेत. अशा प्रकारे त्यांनी नोव्हेंबर २०१६ पर्यंत ३ लक्ष ५६ सहस्र कि.मी. एवढा प्रवास करून भावी पिढीसाठी भारतातील अलौकिक समृद्ध ठेवा संग्रहित केला आहे. या दैवी प्रवासाची सर्वांना माहिती व्हावी, तसेच महर्षि सांगत असलेल्या दैवी प्रवासाचे महत्त्व लक्षात यावे, यासाठी प्रतिदिन हे सदर चालू करत आहोत.’

परिपूर्ण सेवेचा ध्यास असणार्‍या आणि तरुणांना लाजवेल, अशी कार्यक्षमता असणार्‍या रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील सौ. क्षमा राणे (वय ६७ वर्षे) !

सौ. क्षमा राणे 
     रामनाथी गोवा येथील सनातनच्या आश्रमात सेवा करणार्‍या सौ. क्षमा राणे यांचा मार्गशीर्ष शुक्ल पक्ष त्रयोदशी १२.१२.२०१६ या दिवशी ६७ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांचे पती आणि रामनाथी आश्रमातील साधक यांच्या लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि जाणवलेले पालट येथे देत आहोत. 
सौ. क्षमा राणे यांना वाढदिवसानिमित्त 
सनातन परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा ! 
१. गुणवैशिष्ट्ये 
१ अ. श्री. शशिकांत राणे (सौ. क्षमा राणे यांचे पती
१ अ १. वेळ वाया जाऊ न देणे : ‘सौ. क्षमा आवश्यक तेवढीच विश्रांती घेते आणि उर्वरित वेळ नेमून दिलेली सेवा, टापटीपपणा, स्वच्छता आणि खोलीची निगा राखणे यांसाठी वापरते. हा तिचा नित्यक्रम असतो.

देवा, साधनेची नाव तूच ने पैलतिरी ।

    ‘१९.१०.२०१६ या दिवशीच्या भावसत्संगानंतर कर्तेपणाची व्याप्ती काढतांना मला माझ्यातील कर्तेपणासंबंधी ६० सूत्रे लक्षात आली. त्यानंतर ‘कर्तेपणा दूर करणे माझ्यासाठी अशक्य आहे’, असे वाटून मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी शरण गेले. त्या वेळी मला खालील कविता सुचली. 
देवा, तू माय, तूच हो बाप ।
तूच माझा हो सखा ॥
सतत ऐकतोस, सहज बोलतोस ।
येतोस सतत धावून ॥ १ ॥

आहे स्वभावदोष नि अहं यांचे ओझे ।
कसे येऊ तुझ्याकडे गतीने ॥
कर्तेपणाने बांधले गेले माझे पाय ।
स्वभावदोषांचा असे अंधार ॥ २ ॥

आध्यात्मिक उपायांची आठवण करून देणारा, सांगितलेले लगेच कृतीत आणणारा आणि आनंदी असणारा ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेला महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला रत्नागिरी येथील चि. चैतन्य मच्छिंद्र खेराडे (वय २ वर्षे) !

उच्चलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र
(सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. चैतन्य खेराडे एक दैवी बालक आहे !
चि. चैतन्य खेराडे
     रत्नागिरी येथील दैवी बालक चि. चैतन्य मच्छिंद्र खेराडे याचा ११ डिसेंबर २०१६ (मार्गशीर्ष शुक्ल पक्ष द्वादशी) या दिवशी वाढदिवस झाला. त्यानिमित्त त्याचे आई, बाबा आणि अन्य साधकांनी लिहून दिलेली त्याची गुणवैशिष्ट्ये प्रसिद्ध करत आहोत.
पालकांनो, हे लक्षात घ्या ! 
      ‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले 
     यासमवेतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.

साधकांना सूचना

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
प्रारंभ - मार्गशीर्ष शुक्ल पक्ष चतुर्दशी (१३.१२.२०१६) सकाळी ९.१७ वाजता
समाप्ती - मार्गशीर्ष कृष्ण पक्ष प्रतिपदा (१४.१२.२०१६) पहाटे ५.३६ वाजता
उद्या पौर्णिमा आहे.

बोधचित्र

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
गुरूंकडे काय मागावे ?
माझ्याकडे सुख मागू नका, दुःख सहन करण्याचे बळ मागा.
भावार्थ : सुख हे प्रकृतीतील असल्याने अशाश्‍वत असते, म्हणून गुरूंकडे मागू नये. तसेच हेही लक्षात ठेवले पाहिजे की, शाश्‍वत आनंद मिळवून देणे, हेच गुरूंचे खरे कार्य असते. प्रारब्धामुळे दुःख भोगावे लागणार असल्यास, त्या दुःखदायक प्रसंगांमुळे होणारे दुःख सहन करण्याची शक्ती मात्र गुरु निश्‍चित (नक्कीच) देतात; म्हणून ती मागायला आडकाठी (हरकत) नाही
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
गुरूंकडे काय मागावे ?
माझ्याकडे सुख मागू नका, दुःख सहन करण्याचे बळ मागा.
भावार्थ : सुख हे प्रकृतीतील असल्याने अशाश्‍वत असते, म्हणून गुरूंकडे मागू नये. तसेच हेही लक्षात ठेवले पाहिजे की, शाश्‍वत आनंद मिळवून देणे, हेच गुरूंचे खरे कार्य असते. प्रारब्धामुळे दुःख भोगावे लागणार असल्यास, त्या दुःखदायक प्रसंगांमुळे होणारे दुःख सहन करण्याची शक्ती मात्र गुरु निश्‍चित (नक्कीच) देतात; म्हणून ती मागायला आडकाठी (हरकत) नाही
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
     क्षयरोग्याला क्षयाचे जंतू मारण्यासाठीचे औषध न देता केवळ खोकल्यासाठीचे औषध देणे जसा वरवरचा हास्यास्पद उपाय आहे, तसा जनतेला साधनेने सात्त्विक न बनवता केवळ नोटा बदलणे वरवरचा उपाय आहे. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. 
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

सकारात्मक रहा !
जगात यशाचीच पूजा केली जाते. ‘मी यशस्वी होणारच’, 
असे म्हणणारी आणि सकारात्मक वागणारी व्यक्तीच सर्वांना हवीहवीशी वाटते. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

बँकांमधील विश्‍वासघातकी कोण ?

संपादकीय
     नोटाबंदीचा मोदी सरकारचा धाडसी, राष्ट्रहितकारी निर्णय यशस्वी करण्याचे सर्वांत मोठे दायित्व आहे ते बँकांचे आणि प्राप्तीकर खात्याचे. नोटा बंदीनंतर जी गोंधळाची परिस्थिती उद्भवणार होती, त्याला नियंत्रणात ठेवण्याचे यश बँकांचे सुयोग्य आणि कौशल्यपूर्ण नियोजन यांवर ठरणार होते. काही ठिकाणी पोलिसांनी एटीएम्समोरील गर्दी हटवण्यासाठी केलेला लाठीमार, मोठ्या रांगामध्ये नागरिकांचे झालेले मृत्यू अशा घटना घडल्या असल्या, तरी बँक कर्मचार्‍यांनी रात्रंदिवस सेवा पुरवून नागरिकांना दिलासा दिला होता. बँक कर्मचार्‍यांच्या या सेवावृत्तीचे पंतप्रधान मोदी यांनीही कौतुक केले आणि त्यांचे आभार मानले. हे सर्व आतापर्यंत ठीक होते. गेल्या काही दिवसांत मात्र वेगळ्याच बातम्या ऐकायला मिळत आहेत. नोटाबंदीच्या निर्णयानंतर देशभरातील बँकांमध्ये गेल्या महिन्याभरात तब्बल २०० कोटी रुपयांचा अपहार झाल्याचे वृत्त आहे. अनेक बँकांमधील व्यवस्थापक आणि कर्मचारी यांनी कोट्यवधींच्या नोटा गैरमार्गाने पालटून दिल्या. या सगळ्यांचे ‘स्टिंग ऑपरेशन’ करण्यात आले असून बँकांमध्ये काही मोजक्या लोकांची मोठी रक्कम पोलीस, दलाल आणि बँक कर्मचारी कशा प्रकारे पालटून देतात, याची सर्व माहिती असलेल्या ४०० सीडी अर्थ मंत्रालयाकडे सोपवण्यात आल्या आहेत, असेही समजते.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn