Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना वेळोवेळी केलेले मार्गदर्शन

१. साधकांनी विचारलेले प्रश्‍न आणि त्यांनी दिलेली उत्तरे 
१ अ. त्रास असलेल्या व्यक्तीने स्वतः आध्यात्मिक उपाय करणे अधिक योग्य, ते शक्य नसल्यास घरच्यांनी तिच्यासाठी सांगितलेले उपाय करावेत !
प्रश्‍न : मुलीला त्रास आहे. त्यामुळे तिला आश्रमात राहू नये, असे वाटते. तिला ‘नोकरी करावी’, असे वाटते. ती आध्यात्मिक उपायही करत नाही.
उत्तर : मुलीला ३० प्रतिशत आध्यात्मिक त्रास असल्यामुळे तिच्या मनात असे विचार येतात. त्रास असणारी व्यक्ती स्वतः नामजप किंवा उपाय करू शकत नसेल, तर घरच्यांनी सतत उदबत्ती लावणे, भ्रमणभाष संचावर भजने किंवा नामजप लावणे हे उपाय करावेत. अन्य आध्यात्मिक उपायही करावेत. असे अप्रत्यक्ष उपाय केल्यामुळेही तिचा त्रास न्यून होण्यास साहाय्य होईल. त्रास होत असलेल्या व्यक्तीने प्रत्यक्ष उपाय केल्यास तिला अधिक लाभ होतो.

कोटी कोटी प्रणाम !

सांदीपनीऋषि यांची आज जयंती

तेलंगण सरकार रोहिंग्या मुसलमानांच्या निर्वासित मुलांना मुख्य प्रवाहात आणणार !

म्यानमारमधील मुसलमानांविषयी पुळका आलेल्या तेलंगण सरकारने
कधी विस्थापित काश्मिरी हिंदु मुलांचा विचार केला आहे का ?
    भाग्यनगर - तेलंगणातील रोहिंग्या मुसलमानांच्या निर्वासित मुलांना इतरांशी बोलता यावे यासाठी त्यांच्यापैकी बर्‍याच मुलांना अवगत असलेल्या हिंदी आणि उर्दू भाषांचा उपयोग करून सर्वत्र प्रचलीत असलेली इंग्रजी भाषा त्यांना शिकवण्यात येणार आहे. असे करून त्यांना लवकरच मुख्य प्रवाहातील सरकारी शाळांमध्ये सामावून घेण्यात येईल. त्यासाठी तेलंगणाचे शिक्षण खाते आणि एन्सीईआर्टी यांनी संयुक्तपणे आखलेला अभ्यासक्रम हल्लीच घोषित करण्यात आला आहे. हा अभ्यासक्रम १० मासांमध्ये पूर्ण करण्याच्या हेतूने ३ स्तरावर बनवला गेला आहे, असे समजतेे. (विदेशातून शरणार्थी म्हणून आलेल्या रोहिंग्या मुसलमान मुलांची काळजी घेण्याऐवजी भारतातील हिंदु मुलांची काळजी घेतल्यास देशातील साक्षरतेचे प्रमाण वाढण्यास साहाय्य होईल, हे राज्य सरकारला कळत नाही का ? हिंदूंनी कररूपाने दिलेल्या पैशांचा वापर धर्मांधांची मतपेढी सिद्ध करण्यासाठी वापरून देशाचे अकल्याण करणार्‍या राज्यकर्त्यांना जनतेनेच घरी बसवावे ! - संपादक) या प्रकल्पांतर्गत सेव्ह द चिल्ड्रन आणि संयुक्त राष्ट्राच्या उच्च आयुक्तांच्या विद्यमाने निर्वासितांसाठी चालू करण्यात आलेल्या शाळेत ही मुले हा अभ्यासक्रम शिकतील. सेव्ह द चिल्ड्रनच्या प्रशांती बथीना म्हणाल्या की, रोहिंग्या मुसलमानांच्या मुलींनाही घराबाहेर यायला साहाय्य होईल. या मुलींचे पालक विशेषकरून पाल्यांची सुरक्षितता आणि सुरक्षा यांविषयी जागरूक आहेत

शरीयतमध्ये पालट करता येईल का ?, या न्यायालयाच्या प्रश्‍नाला नरेंद्र मोदी यांनी हो म्हणावे ! - शिवसेना

     मुंबई - तोंडी तलाक घटनाबाह्य आणि निर्घृण असल्याची भूमिका घेऊन अलाहाबाद उच्च न्यायालयाने समान नागरी कायद्याचा मार्गच उघडा करून दिला आहे. म्हणूनच शरीयतमध्ये पालट करता येईल काय ? या न्यायालयाच्या प्रश्‍नाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुणाचाही सल्ला न घेता होय म्हणावे. अलाहाबाद उच्च न्यायालयाची भूमिका हा निकाल नाही. ते त्याचे निरीक्षण आहे; पण हीच देशाची भावना आहे आणि मुसलमान महिलांच्या वेदनेचा स्फोट आहे. देशाची भावना समजून होय म्हणा. तो निर्णयही नोटाबंदीइतकाच देशभक्तीचा आणि क्रांतीकारक ठरेल, अशी सामनाच्या अग्रलेखातून श्री. उद्धव ठाकरे यांनी शरीयत कायद्याविरोधात परखड भूमिका मांडली आहे. यात पुढे म्हटले आहे की, पंतप्रधानांच्या होयनंतर जे मुल्लामौल्लवी हैदोस घालायला रस्त्यावर उतरतील, ते देशद्रोही आणि जे घरात बसून रहातील ते देशभक्त हे आताच घोषित केले, तर अधिक बरे होईल.
यात पुढे म्हटले आहे - १. नोटाबंदीस विरोध करणार्‍यांना ज्याप्रमाणे देशद्रोही ठरवण्यात आले, तसे मुस्लिम पर्सनल लॉच्या नावाखाली महिलांचा छळ करणार्‍यांना देशद्रोही ठरवून त्यांना शिक्षा ठोठवायला हवी.
२. तलाक या केवळ ३ शब्दांनी एका स्त्रीचे आयुष्य क्षणात उकिरड्यावर येत असेल, तर ही प्रथा धार्मिक नसून अघोरी आहे.
३. मुसलमान महिलांच्या यातनांविषयी आवाज उठवणे म्हणजे इस्लाम खतरे में असे ज्यांना वाटते, ते देशद्रोही आहेत; पण यावर एकही नोटाबंदी समर्थक उघडपणे बोलायला सिद्ध नाही.

भाग्यनगर येथील प्रखर हिंदुत्वनिष्ठ राजासिंह ठाकुर यांची तोफ आज करवीरनगरीत धडाडणार !

आज कोल्हापूर येथे जाहीर हिंदु धर्मजागृती सभा !
     कोल्हापूर - कोल्हापूर येथील हिंदु धर्मजागृती सभेसाठी कोल्हापूर जिल्ह्यासह पश्‍चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात प्रसार करण्यात आला आहे. कोपरा सभा, वैयक्तिक संपर्क, कट्टा बैठका आणि सामाजिक संकेतस्थळाच्या माध्यमातून लक्षावधी लोकांपर्यंत सभेचा विषय पोचवण्यात आला आहे. याला सर्व समाज घटकांतून उत्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
     ९ डिसेंबर या दिवशी शहरात झालेल्या वाहनफेरीमुळे करवीर नगरीत भगवा उत्साह संचारला आहे. पद्माराजे गर्ल्स हायस्कूल येथे ११ डिसेंबर या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता होत असलेल्या सभेची सिद्धता आता अंतिम चरणात पोेचली आहे.

सप्तर्षि जीवनाडीत सांगितल्याप्रमाणे राष्ट्र आणिधर्म यांच्या रक्षणासाठी सतत दिव्य प्रवास करणार्‍यासनातनच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ !

वाचा आजपासून प्रतिदिन नवीन सदर 
सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ
महर्षींची शिकवण आणि कार्य !
     सनातनच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ मागील ४ वर्षांपासून भारतभरातील विविध राज्यांत दौर्‍यावर जात आहेत. हिंदु राष्ट्राची (सनातन धर्म राज्याची) शीघ्रतेने स्थापना व्हावी, राष्ट्राचे सर्व नैसर्गिक आपत्तींपासून आणि परकीय आक्रमणांपासून रक्षण होण्यासाठी देवतांचा आशीर्वाद मिळावा, धर्माचे तसेच साधकांचे रक्षण व्हावे, यासाठी सप्तर्षि जीवनाडीत सांगितलेल्या क्षेत्री जाण्याचे त्यांचे नियोजन असते. आतापर्यंत त्यांनी २४ राज्यांतील विविध तीर्थक्षेत्रे, देवस्थाने, संतांचे आश्रम आणि संशोधन केंद्रे इत्यादींना भेटी देऊन तेथील वैशिष्ट्यपूर्ण दगड, माती, तीर्थ आदींचा संग्रह केला आहे. त्याचप्रमाणे तेथील आध्यात्मिक वैशिष्ट्ये चित्रीत केली आहेत. अशा प्रकारे त्यांनी नोव्हेंबर २०१६ पर्यंत ३ लक्ष ५६ सहस्र कि.मी. एवढा प्रवास करून भावी पिढीसाठी भारतातील अलौकिक समृद्ध ठेवा संग्रहित केला आहे. या दैवी प्रवासाची सर्वांना माहिती व्हावी, तसेच महर्षि सांगत असलेल्या दैवी प्रवासाचे महत्त्व लक्षात यावे, यासाठी आजपासून प्रतिदिन हे सदर चालू करत आहोत.
२.१२.२०१६
साधकांना कालसर्पयोगाचा त्रास होऊ नये, यासाठी महर्षींनी सांगितलेला उपाय :

(म्हणे) हिंदु राष्ट्र देशासाठी घातक ! - स्वाती जोशी, पुरो(अधो)गामी

मडगाव, गोवा येथील रवींद्र भवन येथे पुरो(अधो)गाम्यांची अभिव्यक्ती
दक्षिणायन परिषद १८ ते २० नोव्हेंबर या कालावधीत पार पडली. या परिषदेत
विविध वक्त्यांनी व्यक्त केलेले हिंदुद्वेष्टे, तसेच राष्ट्रघातकी विचार
     राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने वर्ष १९२० पासून हिंदु राष्ट्राचा विचार मांडला आहे. हिंदु राष्ट्र देशासाठी घातक आहे आणि बुद्धीजीवींसाठी हे एक आव्हान आहे. वीर सावरकर यांनीही हिंदु राष्ट्राची संकल्पना मांडतांना हिंदु राष्ट्रात इतर धर्मियांना रहाण्याचा अधिकार नसल्याचे म्हटले होते. गोळवलकर गुरुजी यांचीही विचारसरणी एकांगी आहे आणि या ठिकाणी दुसर्‍या विचारसरणीला स्थान नाही, सध्या विविध विद्यापिठांमध्ये होत असलेल्या घडामोडी पुरो(अधो)गाम्यांना आशेचा किरण वाटत आहे. कन्हैया कुमार यांनी सामाजिक न्यायासाठी उभारलेली लढाई हे याचे एक उदाहरण आहे. (राष्ट्रद्रोहाचा आरोप असलेला देशके तुकडे होंगे म्हणणारा कन्हैया आशेचा किरण वाटणार्‍या पुरोगाम्यांची विचारसरणी आणखी काय वेगळी असणार ? - संपादक)

सॉलोमन बेटाला ७.७ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का !

     नवी देहली - ९ डिसेंबरला पहाटे दक्षिण अमेरिका खंडाजवळ असणार्‍या सॉलोमन बेटाच्या किनारपट्टीला ७.७ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपामुळे सुनामीचा धोका निर्माण झाला आहे. यात जीवित आणि वित्त हानी झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. सॉलोमन, वानुआतु, पापुआ न्यू गिनी, नोरू, न्यू सेलेडोनिया, तुवालू आणि कोसरी या बेटांच्या किनारपट्टीला सुनामीचा धोका असल्याचे म्हटले गेले आहे. सॉलोमन बेट हा पापुआ न्यू गिनीच्या पूर्वेस मेलानेसिया येथे सुमारे १ सहस्र बेटांनी बनलेला देश आहे. सुमारे २८ सहस्र ४०० चौरस किलोमीटर परिसरात विस्तारलेल्या या देशाची राजधानी गुवाडलकॅनाल बेटावरील होनिआरा ही आहे.
चीनच्या शिनच्यांगमध्ये भूकंप !
     चीनच्या शिनच्यांग वेवुर या प्रांतातील हूतूबी काउंटी येथे ८ डिसेंबरला दुपारी सवा वाजता ६.२ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
महर्षींनी प्रलयकालाविषयी सतर्क करणे
     १९.३.२०१६ या दिवशी झालेल्या नाडीवाचन क्रमांक ६७मध्ये महर्षि म्हणतात, हे पूर्ण वर्ष प्रलयकालाचे आणि आपत्तीजनक असणारे आहे.

नालासोपारा येथे आज हिंदु धर्मजागृती सभा !

वेळ : सायंकाळी ५.३० वाजता
स्थळ : विद्या वारिधी विद्यालय, वालई पाडा मार्ग, संतोषभुवन, नालासोपारा (पू.)
संपर्क क्रमांक : ९५५२४०२९९९, ९९२०२०८९५८
हिंदूंनो, मोठ्या संख्येने सहभागी व्हा !

सनातनच्या निरपराध साधकांवरील हा अन्याय लक्षात ठेवा !

     कोणताही गुन्हा केला नसतांना श्री. समीर गायकवाड यांना मागील १ वर्ष ७६ दिवसांपासून, तर डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना ६ महिने १ दिवसांंपासून कारागृहात डांबण्यात आले आहे.
केवळ हिंदुत्वाची मानहानी करण्यासाठी सनातनच्या निरपराध साधकांना
कारागृहात डांबणार्‍यांना हिंदु राष्ट्रात दामदुप्पटीने शिक्षा देण्यात येईल !


२००० रुपयांच्या नवीन नोटेकडे पहाण्याचा प्रयोग

पुढील २००० रुपयांच्या नवीन नोटेकडे २ मिनिटे पहा आणि मनाला 
काय जाणवते ?, ते अनुभवा अन् नंतरच पुढील भाग वाचा. 
नोटेची पुढची बाजू 
 
नोटेची मागची बाजू

प्लास्टिकच्या राष्ट्रध्वज निर्मितीस बंदी आणण्याचा प्रस्ताव केंद्रीय गृहमंत्रालयाकडे पाठवला ! - मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस

प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांची निर्मिती करणार्‍या देशभरातील उत्पादकांवर बंदी घालायला हवी !
गेली १४ वर्षे हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था प्लास्टिकचे 
राष्ट्रध्वज न वापरण्याच्या संदर्भात अभियान राबवत आहे. त्यामुळे अनेक
शासकीय कार्यालयातून या संदर्भातील आदेश काढण्यात आला आहे.
     नागपूर - राज्यात प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाच्या निर्मितीस पायबंद घालण्याच्या दृष्टीने त्याचे उत्पादक, विक्रेते आणि वितरक यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश १४ जून २०१४ या दिवशी एका परिपत्रकाद्वारे दिले आहेत. तसेच प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाच्या निर्मितीस बंदी आणण्याचा प्रस्ताव केंद्रीय गृहमंत्रालयाकडे पाठवला आहे, असे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी एका लेखी उत्तरात म्हटले आहे. काँग्रेसचे आमदार जनार्दन चांदूरकर यांनी याविषयी विधान परिषदेत तारांकित प्रश्‍न विचारला होता. श्री. फडणवीस यांनी प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाची विटंबना रोखण्यासाठीच्या उपाययोजनांविषयी उत्तर दिले आहे की, त्या राष्ट्रध्वजाचा वापर थांबवण्यासाठी जिल्हा आणि तालुका या दोन्ही स्तरावर समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. इतस्ततः पडलेले राष्ट्रध्वज गोळा करून त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी ग्रामपंचायत ते महानगरपालिका या सर्व स्तरांवर उचित यंत्रणा निर्माण करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत.


कर्नाटकमध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या वृद्ध माजी सैनिकाला पोलिसाची मारहाण : पोलीस निलंबित

देशाचे रक्षण करणार्‍या सैनिकांशीही कसे वागायचे हे माहीत
नसणारे पोलीस सर्वसामान्यांशी कसे वागत असतील ?
     बागलकोट (कर्नाटक) - नोटाबंदीमुळे बँकांमध्ये होत असलेल्या गर्दीचा फटका येथील एका माजी सैनिकाला नुकताच बसला. बँकेत पैसे काढण्यासाठी गेलेल्या वृद्ध माजी सैनिकाला पोलिसाने मारहाण केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या मारहाणीचे चित्रीकरण झाले आहे.
     नोटाबंदीच्या निर्णयाला ८ डिसेंबर या दिवशी एक मास पूर्ण झाला. असे असतांना अजूनही पैसे काढण्यासाठी बँकांच्या बाहेर लोकांच्या रांगा लागल्या आहेत. कर्नाटकमधील बागलकोटमध्येही बँकेच्या बाहेर गर्दी झाली होती. या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस ठेवण्यात आले आहेत. बँकेच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या गर्दीला मागे रेटतांना संतप्त पोलिसाने लोकांना मारण्यास चालू केले. त्यात त्याने एका वृद्ध माजी सैनिकाच्याही श्रीमुखात मारली. एवढेच नाही, तर त्याने त्या वृद्धाला रेटत मागे नेले. याचे चित्रीकरण झाल्यामुळे ही माहिती लगेच सगळीकडे पसरली. त्यामुळे पोलीस प्रशासनावर दबाव वाढला आणि शेवटी मारहाण करणार्‍या पोलिसाला निलंबित करण्यात आले.

अ‍ॅक्सिस बँकेत ४४ बनावट खात्यांत १०० कोटी रुपये जमा !

देशातील अशा किती बँकांमध्ये असा प्रकार झाला असेल, याची कल्पना करत येत नाही ! सरकारने अशा घटना घडू शकतील याचा विचार करून त्यावर प्रतिबंध लावण्यासाठी उपयायोजना केली होती का ? 
     नवी देहली - नोटाबंदीनंतर काळा पैसा पांढरा करण्यासाठी अनेकांनी बनावट नावाने बँक खाते काढल्याचे देहलीतील अ‍ॅक्सिस बँकेच्या शाखेत आयकर विभागाच्या अधिकार्‍यांनी घातलेल्या छाप्यातून उघड झाले आहे. या बँकेत ८ नोव्हेंबरपासून चलनातून बाद झालेल्या जुन्या नोटांमध्ये ४४ बनावट खात्यात १०० कोटी जमा झाल्याचे समोर आले आहे. मागच्या महिन्यात देहलीतील काश्मीरा गेट येथील अ‍ॅक्सिस बँकेच्या शाखेतून नव्या चलनातील साडेतीन कोटी रुपयांच्या नोटांसह दोघांना अटक केली होती.

मुंब्रा (ठाणे) येथून आणखी एक तरुण इसिसमध्ये !

     ठाणे - मुंब्रा येथून आणखी एक तरुण नोकरीच्या बहाण्याने इजिप्तमार्गे लिबियाला जाऊन इसिसमध्ये सहभागी झाल्याचे उघड झाले आहे. इजिप्तला त्याचे ब्रेन वॉशिंग झाल्याची माहिती आहे. या तरुणाच्या भावानेच तक्रार केल्यानंतर या प्रकरणी गुन्हा प्रविष्ट होऊन तपास यंत्रणेने त्याचा शोध चालू केला आहे. तबरेज नूर मोहम्मद तांबे (२८) असे या युवकाचे नाव असून तो मूळचा दापोली (जि. रत्नागिरी) येथील रहिवासी आहे. वर्षभरापूर्वी इजिप्तला जाण्याअगोदर तो मुंब्रा येथे काही दिवस राहिला होता.

पाश्‍चात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण करणारा 'सनबर्न' महोत्सव रहित करा ! - हिंदु जनजागृती समिती

भाजप आमदार श्री. महेश लांडगे (डावीकडून दुसरे) 
यांना निवेदन देतांना समितीचे कार्यकर्ते
     आळंदी (जिल्हा पुणे), १० डिसेंबर (वार्ता.) - पॉप संगीताच्या नावाखाली युवा पिढीला व्यसनाधिनतेकडे नेणारा 'सनबर्न' संगीत महोत्सव २८ ते ३१ डिसेंबर या काळात पुणे परिसरात होणार आहे. पुणे-नगर महामार्गावरील केसनंद या गावी होणारा हा महोत्सव भारतीय संस्कृतीला गालबोट लावणारा आहे. हा महोत्सव रहित करण्यात यावा, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले.

ओबीसींना धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार ! - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्‍वासन

पाश्‍चात्त्य देशात आरक्षण नसल्याने त्या देशांनी मोठी प्रगती 
केली आहे. त्या देशांमध्ये गुणवत्ता, दर्जा याला प्राधान्य देण्यात येते. 
याउलट भारतात आरक्षण लागू केल्यामुळे देशाची अपरिमित हानी झाली 
असून देशाची अधोगती झाली आहे. यासाठी देशातून आरक्षण हद्दपार केले पाहिजे. 
हिंदु राष्ट्रात कोणालाही आरक्षण दिले जाणार नाही. गुणवत्तेलाच प्राधान देण्यात येईल !
मराठा समाजाने काढलेल्या शिस्तबद्ध मोर्च्याचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक !
     नागपूर, १० डिसेंबर (वार्ता.) - सकल मराठा समाजाच्या वतीने राज्यातील विविध जिल्ह्यात, देशात इतकेच काय विदेशातही मूक मोर्चे काढण्यात आले. या मोर्च्यात लक्षावधींच्या संख्येने लोक सहभागी होते. त्यांच्यात एक प्रकारची शिस्त होती. हे मोर्चे मूक असले, तरी त्याचा आवाज मोठा होता. या मोर्च्यांमुळे शासन हालले. मराठा समाजाला आरक्षण देण्यास शासन कटिबद्ध असून ओबीसींना धक्का न लावता हे आरक्षण देण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री श्री. देेवेंद्र फडणवीस यांनी केले. मराठा आरक्षणावरील चर्चेला उत्तर देतांना मराठा समाजाने काढलेल्या मूक मोर्च्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी ९ डिसेंबरला विधानसभेत कौतुक केले.

जिल्हा अधिकोषांवरील निर्बंध उठवण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्र्यांची भेट घेतली

     नागपूर - राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी अधिकोषांवर चलनबंदीच्या निर्णयानंतर घातलेले निर्बंध उठवण्याच्या मागणीसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय नेत्यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची नवी देहली येथे भेट घेतली.

हिंदु धर्मजागृती सभेच्या निमंत्रण बैठकांना जळगाव जिल्ह्यात अभूतपूर्व प्रतिसाद !

     जळगाव - सामाजिक दुष्प्रवृत्तींविरुद्ध संघटितपणे अन् वैध मार्गाने कृती करणे, भारतात समान नागरी कायदा, धर्मांतर बंदी कायदा लागू करण्यात यावा, गोवंश हत्याबंदी कायद्याची कठोर कार्यवाही करावी आणि भारतात हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी यासाठी हिंदु जनजागृती समितीने २५ डिसेंबर या दिवशी शिवतीर्थ मैदान येथे सायंकाळी ५.३० वाजता हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन केले आहे.
     या सभेसाठी जळगाव जिल्ह्यात निमंत्रण बैठकांना उत्स्फूर्त प्रतीसाद मिळत असून ठिकठिकाणचे धर्माभिमानी, संघटना, संप्रदाय, सार्वजनिक गणेशोत्सव तसेच दुर्गोत्सव मंडळे हे स्वत: सहभागी होऊन इतर जवळच्या गावांतही बैठकांचे आयोजन करीत आहे.
     पारोळा, धरणगाव, एरंडोल, भुसावळ, चोपडा आणि जळगाव या तालुक्यांतील अनेक गावांमध्ये आतापर्यंत झालेल्या बैठकांना धर्माभिमानी हिंदूंचा भरघोस पाठिंबा मिळत आहे. तसेच वॉट्स अ‍ॅप, फेसबूक आणि ट्विटर या सामाजिक संकेतस्थळांच्या माध्यमांतूनही जिल्हाभरात हिंदु धर्मजागृती सभेचा विषय पोचवण्यात येत आहे.

३० गावांतील कुटुंबांकडे असलेल्या देवस्थानच्या भूमीचा कर शासनाने वसूल करावा ! - आमदार मेधा कुलकर्णी

     नागपूर, १० डिसेंबर (वार्ता.) - राज्यात कोल्हापूर जिल्ह्यांसह इतर ठिकाणी देवस्थानाच्या भूमी असून करवीरपिठाच्या भूमी त्या त्या परिसरातील ३० गावांत असलेल्या काही कुटुंबांकडून बलपूर्वक घेण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. भूमीचे ७/१२ देवस्थानच्या नावावर असतांना अशाप्रकारे भूमीच्या कराच्या माध्यमातून देवस्थानला मिळणारा निधी बुडवणार्‍या त्या परिसरातील व्यक्तींविरुद्ध आणि महसूल विभागातील संबंधित दोषी कर्मचारी यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भाजपच्या आमदार प्रा. सौ. मेधा कुलर्णी यांनी ९ डिसेंबरला विधानसभेत औचित्याचे सूत्र मांडतांना केली. 

केंद्र शासनाकडून मदरशांमधील गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी ४७८ लक्ष रुपयांहून अधिक रक्कम अनुदान म्हणून वितरीत

हे अनुदान गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठीच व्यय झाले कशावरून ? राज्यशासन याची पडताळणी करणार का ? 
     नागपूर, १० डिसेंबर (वार्ता.) - केंद्र शासनाकडून गेल्या ७ वर्षांत म्हणजेच, वर्ष २००९ ते २०१६ या कालावधीत मदरसांमधून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी ४७८.७१ लक्ष रुपये इतके अनुदान वितरीत करण्यात आले आहे, अशी माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी लेखी उत्तरात दिली आहे. (शेतकर्‍यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी हिंदूंच्या मंदिरांचा निधी मागणारे मदरसांसाठी देण्यात येणारा निधी मागणार का ? - संपादक) विधान परिषदेतील काँग्रेसचे आमदार शरद रणपिसे यांनी राज्यातील १४३ मदरशांना आधुनिकीकरणासाठी केंद्रशासनाच्या वतीने 'डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजने'अंतर्गत निधीच्या वितरणाविषयी तारांकित प्रश्‍न विचारला होता. त्यावर तावडे यांनी वरील उत्तर दिले आहे. ही योजना १०० टक्के केंद्र पुरस्कृत असून ती अल्पसंख्यांक विकास विभागाकडून राबवली जात असल्याचेही त्या उत्तरात म्हटले आहे.

महाराष्ट्रात आता शाळा होणार ‘वाय-फाय’ युक्त !

शाळांचे आधुनिकीकरण करणे आवश्यक आहेच; मात्र त्याबरोबरच मुलांना 
धर्मशिक्षण देणे अपरिहार्य आहे. अन्यथा या आधुनिक तंत्रज्ञानाचा अपवापर होण्याची 
शक्यताच अधिक ! याची नोंद घेऊन महाराष्ट्र शासन सर्व शाळांमध्ये धर्मशिक्षण चालू करणार का ?
     मुंबई, १० डिसेंबर - ई-शैक्षणिक साहित्याचा वापर करून विद्यार्थ्यांना अधिकाधिक प्रगत शिक्षण देता यावे, यासाठी केंद्रशासनाच्या ‘डिजिटल इंडिया’ या उपक्रमाच्या अंतर्गत राज्यातील सर्व शाळांमध्ये लवकरच ‘वाय-फाय’ सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे शिक्षकांनी सिद्ध केलेले २ सहस्र ३०६ शैक्षणिक ‘अ‍ॅप्स’, ५ सहस्रांहून अधिक शैक्षणिक ध्वनीचित्रफिती, शैक्षणिक ब्लॉग आणि संकेतस्थळे यांचा वापर करून विद्यार्थ्यांना शिकवणे शिक्षकांना सुलभ जाणार आहे. या ई-साहित्याचा अधिकाधिक शिक्षकांनी वापर करावा असे आवाहन शिक्षण विभागाच्या उपसचिव डॉ. सुवर्णा खरात यांनी केले आहे. पाठ्यपुस्तकातील धडे शिकवतांना हे ई-साहित्य कसे वापरावे, कसे शोधावे याविषयीची माहिती शालेय शिक्षण विभागाने ‘एकस्टेप’ या संस्थेच्या साहाय्याने http://community.ekstep.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे.

(म्हणे) ‘डॉ. झाकीर नाईक हे देशाविरुद्ध कोणतेच काम करत नाहीत !

‘पडलो तरी पाय वर’ ही म्हण सार्थ ठरवत देशद्रोह्यांची तळी उचलून 
धरणारे अबू आझमी यांची मुक्ताफळे अबू आझमी यांना कायद्याचे भय 
न राहिल्यामुळेच ते उघडपणे आतंकवादाला खतपाणी घालणारे डॉ. झाकीर 
नाईक यांचे समर्थन करण्यास धजावतात ! त्यांच्यावर आताच कारवाई केली 
नाही, तर भविष्यात त्यांनी बगदादीचे समर्थन केले, तर आश्‍चर्य वाटायला नको !
      नागपूर, १० डिसेंबर (वार्ता.) - डॉ. झाकीर नाईक यांच्याविरुध्द कोणताच आरोप सिद्ध झालेला नाही. ते धार्मिक प्रवचन देतात, त्यांच्या संस्थेवर केलेली बंदी चुकीची आहे, अशी दर्पोक्ती समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी ९ डिसेंबरला केली. (डॉ. झाकीर नाईक हे आतंकवाद्यांना साहाय्य करतात, त्यांच्या भाषणामुळे मुसलमान मुले आतंकवादी होतात, हे आंतरराष्ट्रीय स्तरावर सिद्ध झाले आहे. त्या पोलीस यंत्रणांपेक्षा अबू आझमी हुशार आहेत का ? - संपादक)

भिवंडी येथील अवैध पशूवधगृहासंबंधी उत्तरदायी अधिकार्‍यांवरील कारवाईसाठी प्रयत्न करतो ! - पर्यावरण राज्यमंत्री श्री. प्रवीण पोटे-पाटील

श्री. प्रवीण पोटे-पाटील (उजवीकडे) यांना 
सनातन पंचांग भेट देतांना श्री. श्रीकांत पिसोळकर
      नागपूर - भिवंडी येथील महानगरपालिकेच्या इदगाह पशूवधगृहाला ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा’ची अनुमती नसतांना तो अवैधपणे चालू करण्यात आला होता. या विरोधात ‘राष्ट्रीय हरित लवाद, पुणे’ या न्यायप्राधिकरणाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या स्थानिक अधिकार्‍याला निलंबित करून सदर पशूवधगृह बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. ते अवैध पशूवधगृह चालवून जनतेच्या आरोग्याशी खेळणार्‍या भिवंडी महानगरपालिकेचे अधिकारी आणि पशूवधगृहाकडे दुर्लक्ष करणारे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उत्तरदायी स्थानिक अधिकारी यांच्यावर गुन्हे प्रविष्ट करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करणारे निवेदन हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र प्रवक्ता श्री. अरविंद पानसरे यांनी पर्यावरण राज्यमंत्री आणि भाजपचे नेते श्री. प्रवीण पोटे-पाटील यांना दिले. त्यावर श्री. पोटे-पाटील यांनी ‘या प्रकरणी लक्ष घालून संबंधित सर्व अधिकार्‍यांवर कारवाई करण्यासाठी प्रयत्न करतो’, असे आश्‍वासन दिले. या वेळी श्री. पोटे-पाटील यांना ‘सनातन पंचांग २०१७’ भेट म्हणून देण्यात आले. या प्रसंगी समितीचे श्री. श्रीकांत पिसोळकर हेही उपस्थित होते.

द्रुतगती मार्गाच्या क्षमतावाढ प्रकल्पामुळे पथकर वसुली वर्ष २०३५ पर्यंत करण्याचा विचार ! - सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे

सर्वसामान्यांना पथकर वसुलीतून सूट मिळण्यासाठी 
राज्यशासनाने प्रयत्न करून जनहित साधावे, ही अपेक्षा !
      नागपूर, १० डिसेंबर (वार्ता.) - आतापर्यंत मुंबई-पुणे द्रुतगती मार्गासाठी जो व्यय झाला आहे. तो पथकरातून वसूल करणे अपेक्षित असून तो ८ ऑगस्ट २०१९ पर्यंत अपेक्षित आहे. द्रुतगती मार्गाच्या प्रस्तावित क्षमतावाढ प्रकल्पामुळे संभाव्य किंमत सुमारे ३ सहस्र २१५ कोटी रुपये असल्याने पथकर वसुली वर्ष २०३५ पर्यंत करण्याचा विचार शासनाकडे प्रस्तावाधीन असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत एका लेखी उत्तरात दिली आहे. काँग्रेसचे आमदार संजय दत्त आणि अन्य आमदारांनी द्रुतगती मार्गावरील पथकर वसुलीला मुदतवाढ दिल्याविषयी तारांकित प्रश्‍न उपस्थित केला होता.

तहसील कार्यालयातील भ्रष्ट अधिकार्‍याच्या चौकशीचे आदेश !

     जळगाव - एका वाळूमाफियाने २९ नोव्हेंबर या दिवशी मी नियमित हफ्ते देऊनही माझे डंपर का पकडतात ?, अशी मोठ्याने विचारणा तहसील कार्यालयातील अधिकार्‍यांना केली होती. तहसील कार्यालयातील या भ्रष्टाचारी अधिकार्‍यांच्या चौकशीचे जिल्हाधिकार्‍यांनी आदेश काढले आहेत. वरील अचनाक घडलेल्या प्रसंगामुळे वाळूमाफिया आणि अधिकारी यांचे आर्थिक संबंध उघड झाले होते. यानंतर भाजपचे शहर उपाध्यक्ष यांनी हफ्ते घेणार्‍या अधिकार्‍यांची चौकशी करून त्यांना निलंबित करण्यात यावे, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांना दिले होते. जळगावचे नायब तहसीलदार डी.एस्.भालेराव हे तर जळगाव तालुक्यातील एका वाळू ठेक्यात भागीदार असल्याचे वाळूमाफियांकडून उघडपणे सांगितले जात आहे. तहसीलदारांच्या भ्रष्टाचाराविषयी अनेक तक्रारी आल्या आहेत, असे समजते. (अनेक तक्रारी आल्या होत्या, तर पूर्वीच त्यांच्यावर कारवाई का झाली नाही ? - संपादक)

३१ डिसेंबरच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखा ! - ईश्‍वरपूर पोलीस ठाण्यात निवेदन

     ईश्‍वरपूर (जिल्हा सांगली) - ३१ डिसेंबरच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखा या मागणीसाठी ईश्‍वरपूर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक श्री. प्रताप मानकर यांना निवेदन देण्यात आले. या वेळी श्रीशिवप्रतिष्ठानचे श्री. गजानन पाटील, हिंदु धर्माभिमानी सर्वश्री पृथ्वीराज पाटील, प्रशांत पाटील यांसह हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्थेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

कुर्ला येथील इंग्रजी शाळेच्या शिक्षिकेचा बुरखा घालून शिकवण्यास विरोध केल्याचे सांगून राजीनामा

किती हिंदु महिलांमध्ये असा धर्माभिमान आहे आणि त्या धर्मपालनासाठी नोकरीचा त्याग करण्यास सिद्ध आहेत ? 
     कुर्ला (मुंबई) - नवीन मुख्याध्यापिका आल्यानंतर वर्गात बुरखा घालण्यास बंदी केल्याने कुर्ला येथील विवेक इंग्रजी शाळेच्या सबिना खान या शिक्षिकेने त्यागपत्र दिले आहे. मात्र 'आमची शाळा मुसलमानबहुल भागात असल्याने विद्यार्थिनी, तसेच अन्य शिक्षिका बुरखा घालून येतात, त्यांना बुरखा घालण्यास कधीही विरोध केलेला नाही', असे शाळा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

उत्पन्नाच्या दाखल्यावर खोट्या स्वाक्षर्‍या करणारा धर्मांध नसीर खान याला शिवसेना महिला पदाधिकार्‍यांनी चोपले !

     जळगाव - धर्मांध नसीर खान हा तहसील कार्यालयात ५० रुपये लाच घेऊन अशिक्षित महिलांच्या उत्पन्नाच्या दाखल्यावर कुटुंबप्रमुख म्हणून बनावट स्वाक्षरी करत होता. शिवसेना महिला पदाधिकारी सौ. शोभा चौधरी, मनीषा पाटील, सुनीता भालेराव यांनी या धर्मांधाला घेराव घालून चोप दिला आणि तहसीलदारांकडे नेले. तहसीलदार जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीला गेले होते. या वेळी धर्मांधाने क्षमा मागितल्याने त्याला समज देऊन सोडून देण्यात आले. (सोडून दिलेला धर्मांध परत अशाच प्रकारचा गुन्हा करणार नाही कशावरून ? - संपादक)

सेंद्रीय खत प्रकल्पाविषयी उदासीन असलेले मॉल्स आणि उपाहारगृहे यांच्यावर कारवाईचे आदेश !

महापालिकेचे नियम न पाळणारे स्वार्थी उद्योजक समाज आणि राष्ट्र यांसाठी काय करणार ?
     मुंबई, १० डिसेंबर - मुंबईतील कचर्‍याचा प्रश्‍न काही प्रमाणात सुटावा म्हणून मुंबई महानगरपालिकेने मोठी उपाहारगृहे, मॉल्स, गृहनिर्माण मंडळ यांना त्यांच्या मालकीच्या परिसरात सेंद्रीय खत प्रकल्प कार्यान्वित करणे सक्तीचे केले आहे; मात्र या संदर्भातील अंमलबजावणीमध्ये कमालीची उदासीनता असल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे. ज्या ठिकाणी हे प्रकल्प अद्याप कार्यान्वित केलेले नाहीत त्यांना महापालिकेने सक्त ताकीद दिली आहे. यापुढे सेंद्रीय खत प्रकल्पाची उभारणी न करणारे मॉल्स, मोठी उपाहारगृहे आणि गृहनिर्माण मंडळे यांची सूची बनवून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी साहाय्यक आयुक्तांना दिले आहेत.ठाणे तालुक्यातील शासनाचा कर चुकवणार्‍या १ सहस्र ५२६ भ्रमणध्वनींसाठी वापरण्यात येणार्‍या मनोर्‍यांवर कारवाई होणार

प्रामाणिकपणे कर भरणारी प्रजा हिंदु राष्ट्रातच असेल !
      ठाणे, १० डिसेंबर (वार्ता.) - गेल्या अनेक वर्षांपासून ठाणे तालुक्यातील इमारतींच्या गच्चीवर असणार्‍या भ्रमणध्वनी मनोर्‍यांच्या (मोबाईल टॉवर) आस्थापनांनी अकृषिक कर न भरल्यामुळे इमारतींच्या पदाधिकार्‍यांना ठाणे तहसीलदारांच्या वतीने नोव्हेंबर महिन्यात नोटिसा बजावण्यात आल्या होत्या; परंतु त्यांनी ७ डिसेंबरपर्यंत कर न भरल्यामुळे ८ डिसेंबरपासून कारवाईस आरंभ झाला आहे. ठाणे तालुक्यातील एकूण १ सहस्र ५२६ भ्रमणध्वनींसाठी वापरण्यात येणार्‍या मनोर्‍यांवर कारवाई करण्यात येणार आहे. या कारवाईमुळे शासनाच्या तिजोरीत २ कोटींहून अधिक महसूल जमा होणार आहे.

सेवेत रुजू न होणार्‍या आधुनिक वैद्यांवर दोन मासांत कारवाई करण्याचे आरोग्यमंत्र्यांचे आश्‍वासन

        नागपूर, १० डिसेंबर (वार्ता.) - आरोग्यमंत्री डॉ. दीपक सांवत यांनी ९ डिसेंबरला विधानसभेत सांगितले की, राज्यातील वैद्यकीय आणि आरोग्य सेवेतील रिक्त पदे भरण्याची कार्यवाही चालू आहे. दीर्घ रजेवर गेलेले राज्यभरात अशा प्रकारचे ४९७ आधुनिक वैद्य आहेत. त्यांपैकी ९९ आधुनिक वैद्यांवर कारवाई करण्यात आली आहे. येत्या २ मासांत उर्वरित आधुनिक वैद्यांवर कारवाई करण्यात येईल.
     या संदर्भात आमदार श्रीमती ज्योती कलानी प्रश्‍न उपस्थित करतांना म्हणाल्या होत्या की, सध्या उल्हासनगर येथील शासकीय प्रसूतीगहात स्त्रीरोगतज्ञांची पदे रिक्त असल्याने गरोदर स्त्रियांना वैद्यकीय सेवेपासून वंचित रहावे लागत आहे. शासनाने कोट्यवधी रुपये खर्चून या रुग्णालयांतील खाटांची क्षमता ५० वरून १०० खाटांपर्यंत वाढवली आहे; मात्र तेथील महिला आधुनिक वैद्य ३ वर्षांपासून अनुपस्थित असल्याने गरोदर स्त्रियांची गैरसोय होत आहे. अशीच अवस्था राज्यातील शासकीय रुग्णालयांची असून शासन याविषयी कोणती कार्यवाही करणार ? (आधुनिक वैद्यांअभावी रुग्णांचे हाल होत आहेत. एखादा आधुनिक वैद्य दीर्घकाळ रजेवर गेल्यानंतर केवळ नोटीस पाठवून हा प्रश्‍न सुटणारा नाही. त्यासाठी नवीन आधुनिक वैद्यांची तात्काळ नियुक्ती करण्यासाठी शासन काही प्रयत्न करणार आहे कि नाही ? - संपादक)

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या स्टॉलची डाव्या संघटनेच्या सांस्कृतिक समूहाकडून तोडफोड

ही आहे डाव्यांच्या सांस्कृतिक समूहाची चालू असलेली विकृती !
आता असहिष्णु कोण आहे, हे जनतेनेच सांगावे !
      मुंबई - येथे डाव्या संघटनेच्या सांस्कृतिक समूहाकडून ६ डिसेंबर या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महानिर्वाणदिनानिमित्त ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, मुंबई’च्या वतीने लावण्यात आलेल्या स्टॉलची तोडफोड करण्यात आली. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, कोकण प्रांताच्या विद्यापिठ कार्यप्रमुखांनी ही माहिती दिली. ते पुढे म्हणाले, ‘‘स्टॉलवर बुद्ध आणि कार्ल मार्क्स तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर उवाच या पुस्तकांच्या प्रती विनामूल्य वितरणासाठी अन् विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या. या पुस्तकांतील काही मजकुरावर आक्षेप असल्याचे कारण देऊन त्यांनी स्टॉलची नासधूस केली, तसेच कार्यकर्त्यांना धक्काबुक्की केली. या वेळी त्यांनी बाबासाहेबांचे चित्र असलेला फ्लेक्स फलक फाडण्याचा प्रयत्न केला. पुस्तकाविषयी काही तक्रार असल्यास कायदेशीर तक्रार करा, असे सांगूनही त्यांनी तोडफोड करणे चालूच ठेवले.’’मुंबई येथील ‘सेंट झेवियर्स महाविद्यालयात फाटलेली जीन्स (रिप्ड) घालण्यास बंदी !

सेंट झेवियर्स महाविद्यालयाचा स्तुत्य निर्णय ! महाविद्यालये ही विद्येची केंद्रे आहेत ! 
त्यामुळे तेथे ज्ञानार्जनासाठी येणार्‍या मुलांचा पेहरावही त्यास साजेसाच हवा !
     मुंबई - येथील ‘सेंट झेवियर्स महाविद्यालयात फाटलेली जीन्स (रिप्ड) घालण्यास बंदी घालण्यात आली आहे. प्राध्यापकांनी केलेल्या तक्रारीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भात महाविद्यालयाच्या प्राचार्या म्हणाल्या, ‘‘गरिबांकडे पर्याय नसल्याने ते फाटलेले कपडे वापरतात. फाटलेली जीन्स वापरणे हे गरिबांची खिल्ली उडवण्यासारखे आहे. ही जीन्स नको त्या ठिकाणी फाटलेली असल्याने वर्गात जातांना अवघडल्यासारखे होते. यापूर्वीही महाविद्यालयात अस्तर नसलेला टॉप आणि तोकडे कपडे घालून येण्यास बंदी घालण्यात आली होती.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Telangana sarkar Myanmar se visthapit Musalmanoke bacchoko mukhya dharaki shiksha dilane hetu prayasrat. - Lakho Kashmiri Hinduoki vyathapar vah chup kyu
जागो ! : तेलंगाना सरकार म्यांमार से विस्थापित मुसलमानों के बच्चों को मुख्य धारा की शिक्षा दिलाने हेतु प्रयासरत. - लाखों कश्मीरी हिन्दुआें की व्यथा पर वह चुप क्यों ?

हिंदूंच्या कररूपातील पैशांद्वारे लांगूलचालनाचे हीन राजकारण चालूच !

फलक प्रसिद्धीकरता
     तेलंगणातील रोहिंग्या मुसलमानांच्या निर्वासित मुलांना इतरांशी बोलता यावे; म्हणून सर्वत्र प्रचलीत असलेली इंग्रजी भाषा शिकवून त्यांना लवकरच मुख्य प्रवाहातील सरकारी शाळांमध्ये सामावून घेण्यात येईल. यासाठी सरकारने अभ्यासक्रमही घोषित केला आहे.

राज्यातील शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करून त्यांना मुख्य प्रवाहात आणणार ! - शिक्षणमंत्री विनोद तावडे

     नागपूर, १० डिसेंबर (वार्ता.) - महिला बालकल्याण समितीच्या वतीने राज्यातील शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करून त्यांना मुख्य प्रवाहात आणू. तसेच ज्या सामाजिक संस्थांनी शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण केले आहे, त्यांच्याकडूनही त्या मुलांविषयीचा तपशील मागवला आहे. त्याद्वारे त्या मुलांचा शोध घेऊन त्यांना शाळेत आणले जाईल, असे प्रतिपादन राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले आहे.

धर्माभिमान्यांच्या बैठकीत वाद घालणार्‍या हिंदुद्रोही संघटनेच्या २ कार्यकर्त्यांची शिवसेनेचे डॉ. अनिल पाटील यांनी केली कानउघाडणी !

हिंदुद्रोही संघटनेच्या कार्यकर्त्यांना परखडपणे सुनावणारे डॉ. पाटील यांचे अभिनंदन ! असे हिंदुत्वनिष्ठ हीच हिंदु धर्माची शक्ती !
     कोल्हापूर - शहरात ११ डिसेंबर या दिवशी होणार्‍या हिंदु धर्मजागृती सभेच्या निमित्ताने एके ठिकाणी आयोजित केलेल्या धर्माभिमान्यांच्या बैठकीनंतर एका धर्मद्रोही संघटनेच्या २ कार्यकर्त्यांनी "तुम्ही मुसलमानांच्या विरोधात का बोलता", असे म्हणून सनातन संस्थेच्या साधकाशी वाद घातला. या वेळी शिवसेनेचे करवीर उपतालुका प्रमुख डॉ. अनिल पाटील यांनी त्या दोन कार्यकर्त्यांची कानउघाडणी करून त्यांना खडेबोल सुनावल्यानंतर ते दोन्ही कार्यकर्ते निघून गेले. (हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या मुशीत सिद्ध झालेले शिवसैनिक धर्महानी रोखण्यासाठी नेहमीच तत्पर असतात, याचे हे उदाहरण होय ! - संपादक) 

बार्शी (जिल्हा सोलापूर) येथे आज जिल्हा ग्रंंथालय संघाचे अधिवेशन !

     बार्शी (जिल्हा सोलापूर), १० डिसेंबर (वार्ता.) - सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघ आणि बार्शी तालुका ग्रंथालय संघ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा ग्रंथालय संघाचे अधिवेशन आणि पुरस्कार वितरण सोहळा बार्शी येथील संत तुकाराम सभागृह, शिवाजी महाविद्यालय येथे रविवार, ११ डिसेंबर यादिवशी सकाळी १० वाजता होणार असल्याची माहिती सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष ग्रंंथमित्र गुलाबराव पाटील यांनी दिली. 

मुंबई प्रवेशद्वार आणि द्रुतगती मार्ग येथील पथकर नाक्यांवर इंधन उपकर चालू ठेवणार ! - सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे

सर्वसामान्य नागरिकांना अजून किती दिवस पथकराच्या झळा सोसाव्या लागणार ? 
     नागपूर, १० डिसेंबर (वार्ता.) - पथकरातील तूट भरून काढण्यासाठी मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आणि मुंबई शहराच्या प्रवेशदारावरील ५ पथकर नाके येथे इंधन उपकर चालू ठेवणे आवश्यक असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयवंत जाधव यांनी विधान परिषदेत मुंबईतील पथकराविषयी विचारलेल्या तारांकित प्रश्‍नावर शिंदे यांनी वरील लेखी उत्तर दिले आहे. 

भाजपचे आमदार पास्कल धनारे यांनी खंडणी म्हणून मद्याच्या बाटल्या मागितल्याचा आरोप

भाजप या आरोपाची नोंद घेऊन सत्य समोर आणेल का ?
     पालघर, १० डिसेंबर - येथील डहाणू मतदारसंघातील भाजपचे आमदार पास्कल धनारे यांनी तलासरी नगरपंचायतीच्या निवडणुकीपूर्वी मतदारांना वाटण्यासाठी व्हिस्की आणि बिअर यांचे प्रत्येकी ५० खोके खंडणी म्हणून मागितल्याचा आरोप राज्य उत्पादन शुल्क विभागाने पोलीस निरीक्षक जयवंत पाटील यांनी केला आहे. या संदर्भात केलेल्या तक्रारीमध्ये आमदार धनारे यांनी मागणी पूर्ण न केल्यास मंत्र्यांकडे तक्रार करण्याची धमकी दिल्याचे म्हटले आहे. शासकीय सेवकाला धमकावणे आणि खंडणी मागणे, ही गोष्ट गंभीर असून शासकीय कामकाजात अडथळा आणणारी आहे, असे पाटील यांनी तक्रारीत म्हटले आहे.

महाराष्ट्राच्या महाअधिवक्ता पदाची नियुक्ती डिसेंबरअखेरपर्यंत करणार ! - सभागृह नेते चंद्रकांत पाटील

विधान परिषद
      नागपूर, १० डिसेंबर (वार्ता.) - राज्याच्या महाअधिवक्ता पदावर सध्या प्रभारी महाअधिवक्ता पदाची नियुक्ति राज्यपालांनी केली आहे. त्यामुळे त्या पदाची नियुक्ति डिसेंबर अखेरपर्यंत करण्यात येईल, अशी माहिती विधान परिषदेचे सभागृह नेते चंद्रकांत पाटील यांनी दिली. नियम २८९ अन्वये ८ डिसेंबर या दिवशी काँग्रेसच्या आमदाराने ‘राज्याचे महाअधिवक्ता पद गेली ८ मास रिक्त आहे’, याविषयी चर्चेचा प्रस्ताव ठेवला होता. सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी तो प्रस्ताव फेटाळून शासनाला निवेदन करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पाटील यांनी वरील निवेदन सादर केले.

कुठे चलनी नोटांवर हिंदु शुभचिन्हे छापणारे अन्य देश, तर कुठे नोटांवर तामसिक आकृत्या छापणारा भारत !

इंडोनेशिया मुद्रेवर समृद्धीचे
प्रतीक असणारे श्री गणपतीचे चित्र
१. तामसिक नोटा चलनात 
आणून सर्वत्र तमोगुण पसरवणारे सरकार !
     ‘८.११.२०१६ या दिवशी भारत शासन आणि रिझर्व्ह बँक यांनी चलनातील ५०० आणि १००० रुपयांच्या सध्याच्या नोटांची वैधता रहित केली. भारतीय रिझर्व्ह बँकेने ९.११.२०१६ या दिवशी प्रसिद्ध केलेल्या विज्ञापनात म्हटले आहे, ‘भारतीय चलनी नोटांचे नकलीकरण रोखणे, रोख रकमा साठवून ठेवण्यावर प्रतिबंध आणणे आणि आतंकवादी कारवायांसाठी पैशांचा होत असलेला पुरवठा बंद करणे, यांसाठी सदर पाऊल आवश्यक आहे.’ सरकारने घेतलेला हा एक चांगला निर्णय आहे. तो कृतीत आणतांना सात्त्विक नोटांचा वापर करून समाजात सात्त्विकतेचा प्रसार करण्याची संधी होती; पण २ सहस्र रुपयांची नवीन नोट तामसिक आहे. त्यामुळे ती वापरणार्‍यांना सात्त्विक स्पंदनांचा लाभ मिळू शकत नाही.

राज्यकर्त्यांनो, जनतेला धर्मराज्य हवे आहे, हे लक्षात ठेवा !

सौ. शालिनी मराठे
    ‘धर्मनिष्ठ प्रजेलाच धर्मराज्य प्राप्त होते. तेव्हा प्रजेनेच आता स्वतःला पालटायला हवे. प्रजेच्या योग्यतेप्रमाणे तिला तिचा नेता किंवा राजा मिळतो, हे सूत्र लक्षात घेता जनतेने आता धर्मनिष्ठ व्हायची वेळ आली आहे. त्यासाठी आपण धर्मराज्य आणि निधर्मी राज्य यांची परंपरा आणि दोन्हीतील भेद पाहूया.
१. धर्मराज्य
१ अ. धर्मराज्याची परंपरा असलेला रघुवंश : कवी कुलगुरु कालीदास यांनी ‘रघुवंश’ नावाच्या त्यांच्या महाकाव्यात रघूच्या घराण्याचे वर्णन केले आहे. याच वंशात प्रभू श्रीराम जन्मले. त्यांचे राज्य ‘रामराज्य’ म्हणून सर्वच युगात ‘आदर्श राज्य’ ठरले. त्रेतायुगातील रघुवंशातील राजे धर्मराज्यासाठी प्रसिद्ध आहेत. यांतील रघु, दिलीप आणि राम, हे ३ राजे उदाहरण म्हणून घेऊ आणि त्यांच्या जीवनातील काही प्रसंग पाहू.

हिंदूंनो, कृपा करून ‘सर्व धर्म सारखे’, असे म्हणू नका ! - मारिया वर्थ

मारिया वर्थ
     ख्रिस्ती धर्माच्या अतिशय कर्मठ, दुराग्रही आणि घुसमटून टाकणार्‍या वातावरणात वाढलेल्या मारीया वर्थ यांनी काही निरीक्षणे केलेली आहेत. मारिया वर्थ ख्रिस्ती धर्मात जन्मल्या आणि वाढल्या असल्या, तरी त्या हिंदु धर्मातील स्वातंत्र्य आणि मोकळेपणा या गोष्टींच्या नेहमीच प्रशंसक राहिल्या आहेत. हिंदु धर्म हा एक परिपूर्ण आयुष्य जगण्यासाठी सर्वोत्कृष्ट पर्याय असतांना काही हिंदू आपल्या हिंदु असण्याची जवळ जवळ लाज वाटल्यासारखे वागतात. ही गोष्ट मारिया वर्थ यांच्यासाठी नेहमीच कोड्यात टाकणारी राहिली आहे. मारिया वर्थ यांची हिंदूंविषयीची निरीक्षणे काय आहेत, ते येथे पाहूया.

गोहत्या आणि धर्मांतराला विरोध करणार्‍या स्वामी लक्ष्मणानंद सरस्वती यांची ख्रिस्त्यांनी नक्षलवाद्यांकडून केलेली हत्या आणि पोलिसांनी केलेले दुर्लक्ष !

अधिवक्ता
नागेश ताकभाते
१. स्वामी लक्ष्मणानंद यांनी हिंदु धर्माचे महत्त्व सांगून 
लोकांना धर्माचरण करण्यास प्रवृत्त करणे आणि आमीष 
दाखवून धर्मांतर करणार्‍या पाताळयंत्री ख्रिस्ती धर्मगुरु 
अन् नक्षलवादी यांचे खरे रूप समाजासमोर आणणे 
     ‘श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी, म्हणजे २३.८.२००८ या दिवशी जालेशपेटा (ओडीशा) येथील ७२ वर्षीय वेदांत केसरी स्वामी लक्ष्मणानंद सरस्वती, अमृतानंदजीबाबा, माता भक्तीमाई, किशोरीबाबा आणि रक्षक पुरंजन घंटा यांची दिवसाढवळ्या त्यांच्या आश्रमात घुसून निर्दय हत्या करण्यात आली. स्वामी लक्ष्मणानंद यांनी ओडीशा राज्यात अनेकविध कार्य आरंभले होते, उदा. धर्मांतरित झालेल्यांसाठी शुद्धीकरण मोहिमा, गोहत्या रोखणे, राष्ट्रप्रेम जागृत करणे. त्यांनी हिंदु धर्माचे महत्त्व सांगून लोकांना धर्माचरण करण्यास प्रवृत्त केले. स्वामीजींनी त्यांचे पूर्ण आयुष्य आदिवासी लोकांच्या सेवेत समर्पित केले होते. विशेष म्हणजे ते आदिवासी लोकांना खोटे आमीष दाखवून धर्मांतर करणारे पाताळयंत्री ख्रिस्ती धर्मगुरु आणि नक्षलवादी यांचे खरे रूप समाजासमोर आणत होते.

जिथे मोदी सुरक्षित नाहीत,तेथे जनता सुरक्षित असेल का ?

     ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह २२ अतीमहनीय व्यक्तींच्या हत्येचा कट रचल्याच्या प्रकरणी अन्वेषण यंत्रणांनी अल कायदाशी संबंधित ४ आतंकवाद्यांना अटक केली आहे. त्यांना चेन्नई आणि मदुराई येथून अटक करण्यात आली आहे.’

तेलंगणचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या घरातील स्नानगृहही आता ‘बुलेटप्रूफ !’

     ‘झेड प्लस सुरक्षा, पूर्ण सुरक्षित कार आणि एखाद्या तटबंदी किल्ल्यासारखे १ लाख स्क्वेअर फूटमधील घर. एवढी सुरक्षा असतांना तेलंगणचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी आता त्यांच्या घरातील स्नानगृहही ‘बुलेटप्रूफ’ करून घेतले आहे. राव यांच्या नव्या घरात तयार करण्यात आलेले हे ‘बुलेटप्रूफ बाथरूम’ सध्या चर्चेचा विषय बनला आहे.’

संयुक्त राष्ट्रांना पाकिस्तान, बांगलादेश आणि काश्मीर येथील हिंदूंचा झालेला वंशसंहार दिसला नाही; कारण भारताच्या आतापर्यंतच्या शासनकर्त्यांनी याला प्रसिद्धी दिली नाही; म्हणून यासाठी तेच याला उत्तरदायी आहेत !

    ‘म्यानमारमधून रोहिंग्या मुसलमानांचा वंशसंहार करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तेथे रोहिंग्या मुसलमानांशी मोठ्या प्रमाणात भेदभाव आणि दुर्व्यवहार केला जात आहे. त्यांच्या महिलांवर सामूहिक बलात्कार करण्याबरोबर हिंसाचार आणि हत्या यांतही वाढ झाली आहे, असा आरोप संयुक्त राष्ट्रांकडून करण्यात आला आहे.’

हिंदु आहोत, हे सांगायची लाज वाटणारे हिंदू !

          जगातील प्रत्येक सहावा माणूस हिंदु आहे; पण हिंदू प्रामुख्याने ज्या देशात रहातात, त्या हिंदुस्थानात स्वतःला हिंदु म्हणवणे, हे नैतिकदृष्ट्या कमीपणाचे मानले जाते !
(‘लोकजागर’, सांगली)

काळा पैसा पांढरा करणार्‍या बँक कर्मचार्‍यांपासून सावध राहा !

       एका परिचित व्यापारी मित्राने त्याच्या नेहमीच्या बँकेत आदल्या दिवशी गोळा झालेली विक्रीची ५० सहस्र रुपयांची रक्कम स्वत:च्या खात्यात भरली. त्याने हे पैसे नवीन चलनातील २ सहस्र रुपयांच्या १५ नोटा आणि १०० रुपयाच्या २०० नोटा अशा स्वरूपात जमा केली. काही वेळाने त्यांच्या भ्रमणभाषवर बँकेकडून लघुसंदेश (एस्.एम्.एस्.) आला की, त्यांच्या खात्यात जुन्या चलनी नोटांत एकंदर २ भागांत ६ सहस्र आणि ४३ सहस्र, असे ५० सहस्र रुपये जमा झाले आहेत. आश्‍चर्यचकित झालेल्या त्या व्यापार्‍याने बँकेशी संपर्क साधला असता त्यांच्या खात्यात जमा झालेली रक्कम ही जुन्या चलनी नोटांत जमा करण्यात आली आहे, असे सांगण्यात आले. 

निष्काम कर्मयोगाचा संस्कार रुजवणारे पुणे येथील गीता धर्म मंडळ

गीता जयंतीच्या निमित्ताने
     धर्मसंस्थापक भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला भगवद्गीता सांगितली तो दिवस म्हणजे गीता जयंती. १० डिसेंबर या दिवशी गीता जयंती साजरी करण्यात आली. लोकमान्य टिळकांकडून प्रेरणा घेऊन गीतेत सांगितलेले निष्काम कर्मयोगाचे तत्त्वज्ञान जनमानसात रुजवण्यासाठी लोकमान्यांचे नातू पत्रकारमहर्षी श्री. ग.वि. केतकर आणि प्रज्ञाचक्षू श्री. सदाशिवशास्त्री भिडे यांनी २३ जुलै १९२४ या दिवशी पुण्यातील भिडे वाड्यातील सदाशिवशास्त्री यांच्या घरी गीता धर्म मंडळाची स्थापना केली. गेली ९२ वर्षे अव्याहतपणे गीता धर्म मंडळाचे गीतेतील तत्त्वज्ञानाचा प्रचार करण्याचे कार्य चालू आहे. 

(म्हणे) ‘बुरहान वानी याला ठार करण्याऐवजी अटक करायला हवी होती !’ - प्रा. आर्.डी. शर्मा, कुलगुरु, जम्मू विद्यापीठ

     ‘हिजबूल मुजाहिदीनचा कमांडर बुरहान वानी याला चकमकीत ठार मारण्याऐवजी अटक करायला हवी होती, असे मत जम्मू विद्यापिठाचे कुलगुरु प्रा. आर्.डी. शर्मा यांनी मांडले आहे. बुरहान वानी याच्या मृत्यूमुळे राज्यातील विद्यार्थ्यांची हानी झाली, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली आहे. ‘काश्मीरमधील जनता आतंकवाद्यांचे समर्थन का करते, हे मलादेखील समजत नाही’, असेही त्यांनी स्पष्ट केले.’

काश्मीरमध्ये फुटीरतावाद्यांनी एका रस्त्याला दिले आतंकवादी बुरहान वानी याचे नाव !

     ‘जम्मू-कश्मीरमधील त्राल भागातल्या एका रस्त्याला फुटीरतावादी हुरियत कॉन्फरन्सच्या नेत्यांकडून आतंकवादी बुरहान वानी याचे नाव देण्यात आले आहे. हुरियतचे नेते इम्तियाज अहमद रेशी यांनी याला दुजोरा दिला आहे. ‘नामकरण केलेला रस्ता त्रालला अवंतीपोरशी जोडतो’, असे रेशी यांनी सांगितले. बुरहान वानी याला ठार केल्यापासून काश्मीरमध्ये हिंसाचार आणि अशांतता चालू होती.’

देशातून प्रतिवर्षी ४० कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त होतात !

     ‘देशामध्ये प्रतिवर्षी साधारणत: ४० कोटी रुपये मूल्याच्या ८-९ लाख बनावट नोटा पकडल्या जातात. दुसरीकडे प्रतिवर्षी देशामध्ये सुमारे ७० कोटी रुपये किमतीच्या बनावट नोटा घुसवल्या जातात, अशी माहिती अर्थमंत्री अरुण जेटली यांनी काही दिवसांपूर्वी लोकसभेत दिली.’

दैनिक सनातन प्रभातचा रंगीत दत्तजयंती विशेषांक

प्रसिद्धी दिनांक : १३ डिसेंबर २०१६
पृष्ठ संख्या : १२, मूल्य : ५ रुपये
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी १२ डिसेंबर
या दिवशी दुपारी ३ पर्यंत इआरपी प्रणालीत भरावी !

सूक्ष्मातील कळण्याच्या संदर्भातील विविध घटक

१. आध्यात्मिक पातळीनुसार सूक्ष्मातील 
उत्तरे योग्य असण्याचे आणि उत्तरांवर 
होणार्‍या वाईट शक्तींच्या परिणामाचे प्रमाण
२. सूक्ष्मातील उत्तरे प्राप्त 
करण्यासाठी आवश्यक असणारे घटक
अ. व्यक्तीची आध्यात्मिक पातळी
आ. सूक्ष्मातील स्पंदने ग्रहण करण्याची पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांची क्षमता
इ. सूक्ष्मातील स्पंदनांचे विश्‍लेषण करून त्यामागे असणार्‍या कार्यकारणभावाविषयी ज्ञान प्राप्त करण्यासाठी बुद्धीची सात्त्विकता 

साधकांनी देवाला आणि संतांना प्रतिदिन करावयाच्या प्रार्थना

साधकांनी पुढील प्रार्थना प्रतिदिन सकाळी, तसेच मंदिर, मठ येथे गेल्यावर,
संतांच्या दर्शनाला गेल्यावर एकदा करावी आणि एरव्हीही करावी.
१. देवा, माझ्यावर झालेल्या अनिष्ट शक्तींच्या हल्ल्यांचा परिणाम समूळ नष्ट होऊ दे. माझ्या देहातील सर्व रोगांचा नाश होऊन मला उत्तम आरोग्य लाभू दे. (एखाद्याला अनिष्ट शक्तींचा त्रास आणि एखादा रोग नसल्यास त्याने पुढील प्रार्थना करावी - मला अनिष्ट शक्तींचा त्रास होऊ देऊ नकोस आणि माझे आरोग्य चांगले राहू दे.)
२. साधकांचे त्रास दूर होऊ देत.
३. माझी आणि साधकांची आध्यात्मिक उन्नती होऊ दे.
४. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या कार्यांतील अडथळे दूर होऊन हिंदु राष्ट्राची स्थापना होऊ दे.
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

२ सहस्र रुपयांच्या नवीन नोटेची एस्.एस्.आर्.एफ्.च्या संत पू. (सौ.) योया वाले यांना जाणवलेली सूक्ष्मातील वैशिष्ट्ये

मायावी शक्ती 
१. मायावी शक्तीच्या चक्राकार लहरी नोटेत निर्माण होऊन त्या वातावरणात प्रक्षेपित होणे : त्यामुळे नवीन नोट चांगली असल्याचे लोकांना भासत असून तिच्याविषयी त्यांच्या मनात संभ्रमही आहे.
त्रासदायक शक्ती
२. त्रासदायक शक्तीच्या लहरी ठिणग्यांच्या स्वरूपात प्रक्षेपित होणे : त्यामुळे नोट हाताळणार्‍या व्यक्तींना प्रचंड दाब जाणवण्याची शक्यता आहे.
२ अ. त्रासदायक शक्तीचे कण नोटेतून कार्यरत स्वरूपात वातावरणात प्रक्षेपित होणे 

चलनातील २ सहस्र रुपये मूल्याच्या नवीन नोटेतून प्रक्षेपित होणारी स्पंदने अभ्यासण्यासाठी ‘यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने केलेली वैज्ञानिक चाचणी !

१. प्रस्तावना आणि उद्देश
     ‘८.११.२०१६ या दिवशी भारत शासन आणि रिझर्व्ह बँक यांनी चलनातील ५०० आणि १ सहस्र रुपये मूल्याच्या सध्याच्या नोटांची वैधता रहित केली. रिझर्व्ह बँकेने २ सहस्र रुपये मूल्याच्या बँकेच्या नवीन नोटा चलनात आणल्या आहेत. या दृष्टीने या ‘नवीन नोटेतून प्रक्षेपित होणारी स्पंदने लाभदायक आहेत का ?’, हे वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यासण्यासाठी २६.११.२०१६ या दिवशी गोवा येथील सनातन आश्रमात ‘यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर)’ या उपकरणाच्या साहाय्याने चाचणी घेण्यात आली. या चाचणीची निरीक्षणे आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे.

‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाउंडेशन’च्या प्रसारकार्याचा सप्टेंबर २०१६ मधील आढावा

पू. मिलुटीन पांक्रात्स
४ ई. वाचकांना आलेली अनुभूती आणि 
त्यांनी दिलेले वैशिष्ट्यपूर्ण अभिप्राय
४ ई १. ‘एस्.एस्.आर्.एफ्.फेसबूक’(इंग्रजी) वरील जिज्ञासूला आलेली अनुभूती - ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप केल्याने शारीरिक आणि मानसिक पालट जाणवणे : ‘मी ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करायला आरंभ केला आहे. काल मी आपल्या संकेतस्थळावरून हा नामजप ‘डाऊनलोड’ करून तो लावून त्याच्यासमवेत नामजप केला. हा जप अत्यंत प्रभावी असून त्यामुळे माझ्यात शारीरिक आणि मानसिक पालट जाणवत आहेत. हा जप विनामूल्य उपलब्ध करून दिल्याविषयी आपले मनःपूर्वक आभार !’ श्रीमती क्रिस्टीन वूड, अमेरिका

परात्पर गुरु डॉ. आठवले संकलित करत असलेल्या ग्रंथांच्या निर्मिती-कार्यात सहभागी व्हा !

१. परात्पर गुरु डॉ. आठवले संकलित करत असलेल्या 
अध्यात्म या विषयावरील ग्रंथांच्या निर्मितीचे कार्य
 लवकरात लवकर करण्याची आवश्यकता !
     सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले संकलित करत असलेल्या धर्म, अध्यात्म, साधना, ईश्‍वरप्राप्तीसाठी कला, आध्यात्मिक संशोधन यांसारख्या विविधांगी विषयांवरील मराठी भाषेतील सुमारे ४५०० ग्रंथ लवकरात लवकर अंतिम करणे आणि त्यांचे विविध भाषांत भाषांतर करणे भावी काळाच्या दृष्टीकोनातून अत्यावश्यक झाले आहे. याची कारणे पुढे दिली आहेत.
१ अ. दूरचित्रवाहिन्यांसाठी धर्मशिक्षणाचे कार्यक्रम सिद्ध करणे : विविध दूरचित्रवाहिन्यांसाठी या ग्रंथांतील ज्ञानावर आधारित धर्मशिक्षणाचे कार्यक्रम सिद्ध करता येणार आहेत.
१ आ. आगामी भीषण काळापूर्वी करावयाची सिद्धता ः तिसर्‍या महायुद्धाला काही वर्षांतच आरंभ होणार असल्यामुळे या ग्रंथांच्या संगणकीय धारिका लवकरात लवकर सिद्ध करायच्या आहेत.
१ इ. अखिल मानवजातीला पुढील सहस्रो वर्षे मार्गदर्शक ठरणे : हे ग्रंथ अखिल मानवजातीला पुढील सहस्रो वर्षे मार्गदर्शक ठरणार आहेत. या संदर्भातील ग्रंथांची वैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
१. कलियुगात पुढील शेकडो वर्षे आधुनिक विज्ञानाची भाषा प्रचलित रहाणार आहे. यासाठी हे ग्रंथ तुलनात्मक सारणी, टक्केवारी अशा वैज्ञानिक परिभाषेत लिहिले आहेत.
२. सध्याच्या काळात शब्दप्रमाण फारच थोडे लोक मानतात आणि बहुसंख्य त्यांना बुद्धीच्या स्तरावर का आणि कसे ? यांची उत्तरे मिळाली, तरच एखादे सूत्र मान्य करतात, उदा. गणपतीला जास्वंदीचे फूल का वाहायचे ?, यामागील अध्यात्मशास्त्र बुद्धीच्या स्तरावर सांगितल्यास त्यांना पटते.

सनातन आश्रमांच्या नूतनीकरणाकरता पुढील साहित्याच्या खरेदीसाठी धनरूपात साहाय्य करा !

सर्वत्रचे वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांना नम्र विनंती ! 
     ‘सनातनचे आश्रम म्हणजे हिंदु धर्माच्या पुनर्प्रतिष्ठेसाठी अविरत झटणार्‍या साधकांची आध्यात्मिक शाळाच ! आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करण्यास आणि राष्ट्र-धर्माच्या कार्याला हातभार लावण्यासाठी इच्छुक साधक अन् धर्माभिमानी यांची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. रामनाथी आणि देवद येथील आश्रम, तसेच मंगळुरू (कर्नाटक) अन् कुडाळ येथील सेवाकेंद्रे यांचे नूतनीकरण (renovation) करणे चालू आहे. त्यासाठी पुढील साहित्याची तातडीने आवश्यकता आहे. 

सर्वशक्तीमान आणि सर्वसमर्थ असल्याने ईश्‍वरच खरा दयाळू, अहिंसावादी आणि कृपाळू असणे

प.पू. पांडे महाराज
प.पू. पांडे महाराज यांचे अनमोल विचारधन 
     ‘ईश्‍वरच खरा दयाळू आणि क्षमाशील आहे. माणसाने पुष्कळ पापे आणि कुकर्मे केली, तरी ईश्‍वर त्याला पुनःपुन्हा जन्म देऊन मोक्षप्राप्तीची संधी देतो. तो सर्वशक्तीमान आणि सर्वसमर्थ असल्याने दयावान, अहिंसावादी आणि कृपाळू आहे.’ - प.पू. परशराम पांडे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२८.२.२०१६) 

धर्मरथांवर चालक-साधकांची तातडीने आवश्यकता !

सर्वत्रच्या साधकांना सेवेची सुवर्णसंधी !  
     सनातनचे ग्रंथ म्हणजे समाजाला धर्मशिक्षण देणारे ज्ञानाचे अनमोल भांडारच ! मानवजातीसाठी ज्ञानामृत असलेल्या या ग्रंथांद्वारे समाजाला आचारधर्म, साधना, आदी नानाविध विषयांसंदर्भात दिशादर्शन केले जाते. या ग्रंथांना सर्वत्र मोठ्या प्रमाणावर मागणी येत आहे. 

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिलेल्या मान्यवरांचे अभिप्राय !

१. आश्रमात प्रत्येक ठिकाणी दैवी अनुभूती येऊन सात्त्विकता जाणवली ! 
 ‘आश्रमातील प्रत्येक ठिकाणाचे निरीक्षण केल्यानंतर आलेले अनुभव अत्यंत विलक्षण होते. प्रत्येक ठिकाणी दैवी अनुभूती येत असून प्रत्येक ठिकाणी सात्त्विकता जाणवत होती.’ - श्री. मोतीराम अनंता गोंधळी, अध्यक्ष, ‘हिंदु राष्ट्र जनजागरण समिती’, ठाणे, महाराष्ट्र. (२४.६.२०१६)

५०० आणि १ सहस्र रुपयांच्या जुन्या नोटा ३० डिसेंबरपर्यंत अधिकोषांत जमा करा आणि अशा जुन्या नोटा स्वीकारू नका !

साधकांना महत्त्वाची सूचना
     नोटाबंदीमुळे ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या जुन्या नोटा वापरता येणार नाहीत. साधकांनी त्यांच्याकडे अशा नोटा राहिल्या आहेत का, हे पुन्हा एकदा तपासून ३० डिसेंबरपर्यंत त्या अधिकोषांत जमा कराव्यात. तसेच या नोटा चलनात आता वापरता येणार नसल्याने साधकांनी यापुढे अशा नोटा स्वीकारू नयेत. यापुढे साधकांनी अर्पण, नियतकालिकांची वर्गणी किंवा वसुली स्वीकारतांना धनादेश, डिमांड ड्राफ्ट या स्वरूपात किंवा चलनामध्ये सध्या वापरात असलेल्या १००, ५०, २०, १० रुपयांच्या नोटा, तसेच चलनात आलेल्या नवीन ५०० आणि २००० रुपयांच्या नोटा स्वीकाराव्यात.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील स्वयंपाकघरात सेवा करण्याची संधी !

     सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमातील स्वयंपाकघरात सेवा करण्यासाठी शारीरिक क्षमता असलेल्या पूर्णवेळ साधकांची आवश्यकता आहे. ही सेवा करण्याची आवड असलेल्या किंवा शिकून ती करण्याची सिद्धता असलेल्या साधकांनी जिल्हासेवकांमार्फत सौ. भक्ती खंडेपारकर यांना ९४०४९५६०७४ या क्रमांकावर संपर्क साधावा.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे जीवनचरित्र आणि अवतारी कार्य यांचे दर्शन घडवणारी ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. उमा रविचंद्रन यांनी रेखाटलेली भावचित्रे

सौ. उमा रविचंद्रन्
चेन्नई येथील सौ. उमा रविचंद्रन् यांनी रेखाटलेल्या चित्रांच्या माध्यमातून परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे जीवनचरित्र आणि अवतारी कार्य यांचे दर्शन घडते. त्यांनी त्या चित्रांचे विवरणही केले आहे. ते पुढीलप्रमाणे आहे. 
१. श्री. अनंत आठवले यांचा जन्म (वर्ष १९३५)
 ‘श्री. अनंत आठवले यांच्या रूपात दुसर्‍या मोठ्या भावाचा जन्म होत असतांना श्री महाविष्णु ‘वैकुंठ’ या त्याच्या अनंत काळासाठी असलेल्या निवासात बसून पहात आहे. ‘आता माझी वेळ आली आहे. कालांतराने तुलाही दैवी कार्याच्या पूर्ततेसाठी पृथ्वीवर जन्म घ्यावा लागणार आहे’, असे श्रीविष्णु त्याची पत्नी महालक्ष्मी हिला सांगत आहेत. - सौ. उमा रविचंद्रन्, चेन्नई (२४.४.२०१६)

अमृत महोत्सवाच्या प्रसंगी सिंहासनाधिष्ठित परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्राविषयी कु. योगिनी आफळे हिला आलेल्या अनुभूती

कु. योगिनी आफळे

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले 
यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त... 
वैशाख कृष्ण पक्ष सप्तमी (२९.५.२०१६) या दिवशी सप्तर्षि जीवनाडीपट्टीचे वाचक पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या मार्गदर्शनाखाली परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा अमृत महोत्सव रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमात साजरा करण्यात आला. त्या वेळी डोक्याला भगवा फेटा आणि गळ्यामध्ये तुळशीचा हार घालून सिंहासनाधिष्ठित झालेले परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे रूप नयनमनोहर दिसत होते. ते छायाचित्र प्रतिदिन स्वतःजवळ ठेवल्यावर रामनाथी आश्रमातील साधिका कु. योगिनी आफळे हिला येत असलेल्या अनुभूती पुढे देत आहोत. 

भावी आपत्काळात अन् नेहमीसाठीही उपयुक्त ठरणारी सनातनची ग्रंथमालिका : भावी आपत्काळातील संजीवनी !

भावी महायुद्धकाळात डॉक्टर, औषधे आदी उपलब्ध
नसतांना अन् नेहमीसाठीही उपयुक्त सनातनचा ग्रंथ ! 
       संत-महात्मे, ज्योतिषी आदींच्या सांगण्यानुसार आगामी काळ हा भीषण आपत्काळ असून या काळात समाजाला अनेक आपत्तींना तोंड द्यावे लागणार आहे. आपत्काळात दळणवळण तुटल्यामुळे रुग्णाला रुग्णालयात नेणे, डॉक्टर वा वैद्य यांच्याशी संपर्क साधणे आणि पेठेत (बाजारात) औषधे मिळणेही कठीण होते. आपत्काळात ओढवणार्‍या विकारांना (आजारांना) तोंड देेण्याच्या पूर्वसिद्धतेचा एक भाग म्हणून सनातन ‘भावी आपत्काळातील संजीवनी’ ही ग्रंथमालिका सिद्ध (तयार) करत आहे. या मालिकेतील १२ ग्रंथ आतापर्यंत प्रकाशित झाले आहेत. या ग्रंथांचा अभ्यास आतापासूनच केला, तर प्रत्यक्ष आपत्काळात विकारांना सामोरे जाण्यासाठी लागणारा आत्मविश्‍वास निर्माण होण्यास साहाय्य होईल. यासाठी हे सर्व ग्रंथ वाचकांनी अवश्य संग्रही ठेवावेत !
प्राणशक्ती (चेतना) वहन संस्थेतील
अडथळ्यांमुळे होणार्‍या विकारांवरील उपाय
       शरिरातील प्राणशक्ती (चेतना) वहन संस्थेत अडथळे निर्माण झाल्यास विकार निर्माण होतात. ते अडथळे स्वतः शोधून दूर करण्याचे नाविन्यपूर्ण उपाय या ग्रंथात सांगितले आहेत. या माहितीच्या आधारे स्वतःच स्वतःवर उपाय करा आणि रोगमुक्त व्हा !
संपर्क : ९३२२३१५३१७
सनातनची ग्रंथसंपदा आता 
SanatanShop.com वर उपलब्ध !

१०.१२.२०१६ ते १०.५.२०१७ या कालावधीत सर्वांनी करावयाचे नामजपादी उपाय : महर्षींनी जीवनाडीपट्टीत सांगितलेल्या उपायांच्या जोडीला पुढील उपायही करावेत.

१. विविध चक्रांवर देवतांची चित्रे लावणे 
     ‘देवतेचे चित्र शरिराला स्पर्श करून बाहेरच्या दिशेने मुख करून (निर्गुण) ठेवायचे कि आतल्या दिशेने मुख करून (सगुण) ठेवायचे, हे येथे दिले आहे. संबंधित देवतेची नामपट्टी वापरायची असल्यास तिच्या अक्षरांच्या संदर्भात तसेच करता येईल. अनाहतचक्राच्या खालील चक्रांसाठी नामपट्टीचा उपयोग करावा. 

टीप १ - ‘पुढे’ म्हणजे शरिराचा पुढचा भाग (चक्राशी संबंधित भाग) 
टीप २ - ‘पाठी’ म्हणजे शरिराचा पाठचा भाग (चक्राशी संबंधित भाग)

भावी सुनेबद्दल भावी सासूने व्यक्त केलेला विचार

     ‘एका मुला-मुलीचा विवाह ठरवण्यासंदर्भात दोघांचे आई-वडील एकमेकांशी बोलत होते. बोलतांना मुलीची आई म्हणाली, ‘‘आमच्या मुलीची काळजी घ्या.’’ त्यावर मुलाची आई, म्हणजे बेळगावच्या सौ. आशा कागवाड म्हणाल्या, ‘‘लग्न होईपर्यंत ती तुमची मुलगी आहे. लग्न झाल्यानंतर ती आमची मुलगी होईल !’’ 
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

बोधचित्र


॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज सनातनचे श्रद्धास्थान
मी कोणाचा नाही. माझा कुणी नाही. ज्याचा
त्याचा तोच मी; म्हणून मी सर्वांचा आहे.
     भावार्थ : मी सर्वस्व गुरुचरणांवर वाहिल्यानंतर मी दुसर्‍या कुणाचा होऊच शकत नाही. गुरूंना अर्पण झाल्यानंतर माझा कुणी असायला मी शिल्लक राहिलोच कुठे ? परंतु सर्वांचा खरा मी एकच आणि सर्वव्यापी असल्यामुळे आता मी सर्वांचा आहे.
(संदर्भ ः सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण)
परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
राष्ट्र-धर्मासाठी आध्यात्मिक स्तरावरही कार्य करणे अत्यावश्यक !
     शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक स्तरांवर राष्ट्र-धर्मासाठी कार्य करून काही साध्य होत नाही, हे गेल्या ७० वर्षांत अनेकदा सिद्ध झाले आहे. आता त्यांच्या जोडीला आध्यात्मिक स्तरावरही कार्य करणे अत्यावश्यक आहे, हे सर्वांनी लक्षात घेणे आवश्यक आहे. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले


योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

सन्मार्गावरून चालण्याचे महत्त्व ! 
सत्प्रवृत्ती अंगी बाणवणे आणि तशी इच्छा होणे हे चांगलेच; पण 
चित्तवृत्ती संपूर्णपणे सन्मार्गाला लागणे, हा मनुष्य जीवनातील सुवर्णक्षण होय ! 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

क्रूर आणि आदर्श प्रथा !

संपादकीय
     ‘तोंडी तलाक घटनाबाह्य आणि मुसलमान महिलांवर अन्याय करणारी क्रूर प्रथा आहे’, असा महत्त्वपूर्ण निकाल अलाहाबाद उच्च न्यायालयाने गुरुवार, ८ डिसेंबरला दिला. साहजिकच या निर्णयावर अबू आझमी, मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड यांसारख्या धर्मांधांची नाराजी असणारच ! हे धर्मांध काही दिवसांपासून तोंडी तलाकची मखलाशी करतांना ‘भारतात पुरुषप्रधान संस्कृती आहे’, असेही सांगत होते. म्हणजे यांना भारतातील बहुसंख्य हिंदूंची जी संस्कृती आहे, ती पुरुषप्रधान आहे, असे सांगायचे होते आणि त्याचा लाभ उठवायचा होता. या देशातील पुरो(अधो)गामी, तथाकथित स्त्रीस्वातंत्र्यवाले जे बरळतात तेच हे बरळत होते. यांना हिंदु संस्कृतीचे महत्त्व कधीच लक्षात आले नाही. त्यामुळे हिंदु संस्कृतीतील आदर्श प्रथा आणि अन्य क्रूर प्रथा यांतील भेद समजून घेणे आवश्यक आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn