Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

आज गीता जयंती
मंदिरांना अवैध म्हणून पाडण्याची शासकीय मोहीम तातडीने बंद करावी ! - भाजप आणि शिवसेना आमदारांची विधीमंडळात मागणी

भाजप आमदारांकडून लक्षवेधी सूचना विधानसभेत प्रधान सचिवांकडे
प्रविष्ट, तर शिवसेना आमदारांकडून विधान परिषदेत सभापतींकडे प्रविष्ट !
श्री. श्रीकांत पिसोळकर
      नागपूर - राज्यभर, तसेच नवी मुंबई आणि अकोला शहरात गेल्या १ वर्षापासून अतिक्रमणाच्या नावाखाली मंदिरे पाडण्याचा सपाटा महानगरपालिकेने लावला आहे. शासनाकडून मंदिरे पाडण्यापूर्वी संबंधित मंदिरांना कोणत्याही प्रकारची नोटीस वा पूर्वसूचना दिली जात नाही. मंदिरे पाडण्यामुळे नागरिकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत. मंदिरांना उद्ध्वस्त करण्याची ही शासकीय मोहीम तातडीने बंद व्हावी, यासाठी भाजपच्या आमदारांनी ८ डिसेंबर या दिवशी लक्षवेधी सूचना विधानसभेमध्ये राज्याच्या प्रधान सचिवांकडे दिली आहे. तर या संदर्भातील औचित्याचा मुद्दा अकोला-वाशिम येथील शिवसेनेचे आमदार श्री. गोपीकिशन बाजोरीया यांनी ९ डिसेंबर या दिवशी विधान परिषदेत मांडला आणि सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी ते सूत्र प्रविष्ट करून घेतले.
     गोवर्धन शर्मा, डॉ. संजय कुटे, आकाश फुंडकर आणि सौ. मंदा म्हात्रे या भाजप आमदारांनी नियम १०५ अन्वये विधानसभेत प्रविष्ट केलेल्या सूचनेत म्हटले आहे की, राज्याची ओळख ही संत राज्य म्हणून आहे. महाराष्ट्रात हिंदु धर्मियांचे वेगवेगळे पंथ आणि संप्रदाय आहेत. त्याचाच परिणाम म्हणून राज्यात धार्मिक आणि सात्त्विक वातावरण आहे.

खोटा इतिहास शिकवणार्‍या एन्.सी.ई.आर्.टी.च्या अभ्यासक्रमात पालट करण्याची मागणी !

केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री श्री. प्रकाश जावडेकर यांना सनातन संस्थेकडून निवेदन
     नवी देहली - भारतीय संस्कृतीविषयी खोटा आणि अवमानकारक इतिहास शिकवणार्‍या एन्.सी.ई.आर्.टी.च्या ७ वी, १० वी आणि १२ वी इयत्तांच्या अभ्यासक्रमात पालट करण्याच्या मागणीचे निवेदन केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री श्री. प्रकाश जावडेकर यांना सनातन संस्थेकडून देण्यात आले. सनातनचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांनी या अभ्यासक्रमातील चुका श्री. जावडेकर यांच्या लक्षात आणून देऊन त्याविषयी त्वरित निर्णय घेण्याची विनंती केली. यावर भाष्य करतांना श्री. जावडेकर म्हणाले, हा विषय आमच्या विचाराधीन आहे. आम्ही लवकरच यावर निर्णय घेऊ. या वेळी सनातन पंचांग २०१७ त्यांना भेट देण्यात आले.
इयत्ता १२ वीच्या पुस्तकातील चुका
१. इयत्ता १२ वीच्या भारतीय इतिहासातील मूलभूत संकल्पना (थीम्स अ‍ॅाफ इंडियन हिस्ट्री) या पुस्तकातील पृष्ठ क्रमांक ५८ वरील परिच्छेदात म्हटले आहे की, या साहित्यातील ब्राह्मण लेखक असा दावा करत आहेत की, त्यांचा दृष्टीकोन पूर्ण विश्‍वातील सर्वांना मान्य आहे, त्यांची आज्ञा सर्वत्र मानली जावी, असा त्यांचा आग्रह असायचा. (अभ्यासक्रमात जातीवाचक उल्लेख करून समाजात फूट पाडणारी एन्.सी.ई.आर्.टी. ! जात्यंध काँग्रेसी राज्यकर्त्यांनी स्वातंत्र्यानंतर समाज एकसंघ राखण्याऐवजी अशा प्रकारे फूट पाडण्याचीच कारस्थाने अधिक केली.

प्लास्टिकच्या नोटा येणार !

     नवी देहली - केंद्र सरकारने प्लास्टिकच्या नोटा छापण्याचा निर्णय घेतला आहे. याविषयीची माहिती संसदेत देण्यात आली.

लोकांना बँकेतून पैसे का मिळत नाहीत ? - सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला प्रश्‍न

     नवी देहली - प्रत्येक आठवड्याला २४ सहस्र रुपये बँकेतून काढण्याची सीमा घातली असतांना लोकांना ही रक्कम का मिळत नाही ? याचे नेमके कारण काय आहे, असे प्रश्‍न सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला विचारले आहेत. नोटाबंदीविषयीच्या याचिकेवर ९ डिसेंबरला झालेल्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाने हे प्रश्‍न विचारले. यावर पुढील सुनावणी १४ डिसेंबरला होणार आहे.
     मुख्य न्यायाधीश टी.एस्. ठाकुर यांच्या अध्यक्षतेखालील ३ न्यायाधिशांच्या खंडपिठाने महाअधिवक्ता मुकुल रोहतगी यांना विचारले की, जिल्हा सहकारी बँकांना काही अटी घालून जुन्या नोटांचा स्वीकार करण्याची अनुमती दिली जाऊ शकते का ? तसेच बँकांतून न्यूनतम रक्कम काढण्याची मर्यादा ठरवू शकतो का ? या प्रश्‍नांवर प्रारूप बनवण्याचा आदेश या वेळी न्यायालयाने दिला.

नोटाबंदीचा निर्णय फसल्यास संपूर्ण दायित्व माझे ! - पंतप्रधान मोदी

कोणत्याही निर्णयाचा लाभ अथवा हानी याचे दायित्व तो निर्णय कोणी घेतला
त्याच्याकडेच जाते, तसेच एखादा निर्णय न घेतल्याने होणार्‍या लाभ-हानीचेही
दायित्व तो न घेणार्‍याकडेच जाते. त्यामुळे समान नागरी कायदा, राममंदिर,
कलम ३७० आदींविषयीही निर्णय घेतला गेला पाहिजे !
     नवी देहली - मी सर्व संशोधन केले आहे. नोटाबंदीचा निर्णय फसल्यास त्याचे सर्व दायित्व माझ्यावर असेल, असे प्रतिपादन पंतप्रधान मोदी यांनी केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत म्हटले होते, अशी माहिती या बैठकीत सहभागी झालेल्या ३ मंत्र्यांनी दिली आहे. गोपनीय पद्धतीने मोदी यांनी नोटाबंदीच्या निर्णयाची सिद्धता केली होती, असे रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

जयपूरमध्ये चित्रप्रदर्शनात लावण्यात आलेली अश्‍लील चित्रे लाल सेनेने फाडली !

तृप्ती देसाई यांच्यासारख्या प्रसिद्धीलोलुप आंदोलने करणार्‍या
तथाकथित महिला नेत्या आणि त्यांच्या संघटना महिलांची अश्‍लील
चित्रे लावण्याला कधी विरोध करत नाहीत, हे लक्षात घ्या !
     जयपूर - येथील कला प्रदर्शनामध्ये अर्धनग्न चित्रांचे प्रदर्शन भरवल्यामुळे लाल सेना नावाच्या संघटनेच्या सदस्यांनी या चित्रप्रदर्शनामध्ये असलेली चित्रे फाडली, असे वृत्त इंडिया टुडे वृत्तसंकेतस्थळाने दिले आहे.
     या घटनेची चौकशी करतांना आंदोलनाच्या वेळची चित्रफीत पोलिसांना मिळाली आहे. या चित्रफीतीनुसार लाल सेनेच्या अध्यक्षा हेमलता शर्मा या आयोजकांना विरोध करत आहेत, असे दिसून आले आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली अश्‍लील चित्रांचे प्रदर्शन का भरवता ?, असा प्रश्‍न त्यांनी आयोजकांना विचारला. (अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली हिंदूंच्या देवतांचाही अवमान केला जातो; मात्र सरकार अशा अभिव्यक्तींवर बंदी घालण्यासाठी काहीही प्रयत्न करत नाही; म्हणून लोक कायदा हातात घेतात, हे रोखण्यासाठी सरकारने प्रयत्न करायला हवेेत ! - संपादक)

ऑगस्टा वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर खरेदी घोटाळ्याच्या प्रकरणी माजी वायूदल प्रमुख एस्.पी. त्यागी यांना अटक !

भ्रष्ट राजकारण्यांमुळे भ्रष्टाचाराची लागण झालेले भारतीय सैन्यदलाचे अधिकारी !
अशा प्रकरणांत राजकारण्यांचा हात नसणार, असे म्हणता
येणार नाही. त्यामुळे त्या दिशेनेही अन्वेषण व्हायला हवे !
     नवी देहली - ऑगस्टा वेस्टलॅण्ड घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने माजी वायूदल प्रमुख एस्.पी. त्यागी, अधिवक्ता गौतम खेतान आणि संजीव त्यागी यांना अटक करण्यात आली आहे. इटलीच्या फिनमेकॅनिका या आस्थापनाच्या ऑगस्टा वेस्टलॅण्डकडून भारताने अतीमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी ३ सहस्र ६०० कोटी रुपयांचे हेलिकॉप्टर खरेदी केले होते. या व्यवहारात दलाली देण्यात आल्याचे समोर आले होते. इटलीतील मिलानच्या न्यायालयाने फिनमेकॅनिका आणि ऑगस्टा वेस्टलँडने भारतीय अधिकार्‍यांना मध्यस्थांच्या माध्यमातून कंत्राट मिळवण्यासाठी दलाली दिली होती, याचा उल्लेख केला होता. त्या निकालात त्यागी यांचे नाव घेण्यात आले होते.

(म्हणे) आम्ही भारतासमवेत नेहमीच शत्रुत्व घेऊन जगू शकत नाही !

पाकचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांचा साळसूदपणा !
पाकला जर खरंच असे वाटत असेल, तर त्याने प्रथम पाकमधील आतंकवाद्यांचा
निःपात करावा आणि प्रतिदिन सीमेवरील गोळीबार अन् घुसखोरी थांबवावी. 
एवढे जरी त्याने प्रत्यक्षात करून दाखवले, तरी शत्रुत्व संपण्यास प्रारंभ होईल !
     नवी देहली - आम्ही नेहमीच भारतासमवेत शत्रुत्व पत्करून राहू शकत नाही. ७० वर्षे आम्ही वाया घालवली आहेत. आता वेळ आली आहे की, दोन्ही शेजार्‍यांनी ठरवले पाहिजे की, आम्हाला याच परिस्थितीत रहायचे कि नवीन प्रारंभ करायचा, असे विधान भारतातील पाकचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी केले आहे. एका चर्चेच्या वेळी त्यांनी हे विधान केले. चर्चेसाठी पाक सिद्ध आहे; मात्र भारताकडून यावर सहकार्य मिळतांना दिसत नाही, असा कांगावाही त्यांनी या वेळी केला. (पाकने अनेकदा भारतावर आक्रमण करूनही भारत सरकारने सातत्याने मुसलमानांच्या लांगूलचालनापोटी का होईना पाकशी चर्चा केली आहे. तरीही पाक असा कांगावा करत आहे, यावरून त्याचा हेतू लक्षात येतो ! - संपादक)      बासित पुढे म्हणाले की, दोन्ही देशांनी आपापसांतील मतभेद दूर केले पाहिजेत, ज्यामुळे दोन्ही देशांमध्ये सहकार्य वाढीस लागून कोणत्याही अडचणींविना पुढे जाता येईल.

नालासोपारा येथे हिंदु धर्मजागृती सभा !

वार आणि दिनांक : रविवार, ११ डिसेंबर २०१६
वेळ : सायंकाळी ५.३० वाजता
स्थळ : विद्या वारिधी विद्यालय, वालई पाडा मार्ग, संतोषभुवन, नालासोपारा (पू.)
संपर्क क्रमांक : ९५५२४०२९९९, ९९२०२०८९५८
हिंदूंनो, मोठ्या संख्येने सहभागी व्हा !

(म्हणे) लोकसभेत मी नोटाबंदीवर बोललो, तर भूकंप येईल ! - राहुल गांधी

काँग्रेसच्या सत्ताकाळात झालेल्या घोटाळ्यांवर राहुल गांधी
कधी बोलले नाहीत, तेव्हा त्यांना कोणी रोखले होते ?
     नवी देहली - सरकार नोटाबंदीवरील चर्चेपासून पळत आहे. त्याने मला संसदेत बोलण्याची संधी दिली, तर काय भूकंप येतो, ते तुम्हाला दिसेल, असे विधान काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केले. (राहुल गांधी यांचे बोलणे काँग्रेसमधील लोकही गांभीर्याने घेत नाहीत, तेथे लोकसभेत त्यांना कोण विचारणार ? - संपादक) राहुल गांधी पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निर्णय हा भारताच्या इतिहासातील सर्वांत मोठा घोटाळा आहे. त्यावर मला लोकसभेत बोलायचे आहे. मी तिथे सर्वकाही सांगीन. महिन्याभरापासून आम्ही नोटाबंदीवर चर्चेसाठी प्रयत्न करत आहोत. हा विषय मार्गी लागावा, असा आमचा प्रयत्न आहे. (धादांत खोटे बोलणारे राहुल गांधी ! विरोधक गोंधळ घालून संसदेचे कामकाज बंद पाडत असतांना राहुल गांधी यांच्या आम्ही नोटाबंदीवर चर्चेसाठी प्रयत्न करत आहोत, या विधानावर कोण विश्‍वास ठेवणार ? - संपादक)
काँग्रेसच्या सत्ताकाळात झालेल्या लाखो शेतकर्‍यांच्या
आत्महत्या राहुल गांधी विसरले का ? - भाजप
     नोटाबंदीमुळे लोकांचा मृत्यू होत असल्याचे राहुल गांधी म्हणत आहेत; पण काँग्रेसच्या सत्ताकाळात लाखो शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत

तंबाखूमिश्रित पदार्थांवर बंदी घालण्याचे सरकारचे राज्यांना आदेश !

केवळ बंदी घालण्याचा आदेश देतांनाच या
बंदीची कार्यवाही होते का, हेही सरकारने पहावे !
     मुंबई - देशातील काळा पैसा बाहेर काढण्यासाठी नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर आता केंद्र सरकारने तंबाखूमिश्रित पदार्थांचे उच्चाटन करण्याचा निर्णय घेतला आहे. नुकतेच केंद्र सरकारने तंबाखूमिश्रित पदार्थांचे उत्पादन आणि विक्री यांच्यावर त्वरित बंदी घालण्याचा आदेश केंद्राच्या आरोग्य खात्याने राज्यांना दिला आहे. एवढेच नव्हे, तर यात मावा आणि खर्र्‍याचाही समावेश केला आहे.
     महाराष्ट्रात यापूर्वीच काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकाच्या काळात गुटख्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे व्यापार्‍यांनी पान मसाला आणि तंबाखू असे वेगवेगळे उत्पादन बाजारात आणले. आता केंद्र सरकारच्या तंबाखूमिश्रित पदार्थांच्या बंदीमुळे पानमसालासारख्या उत्पादनांच्या विक्रीवरही बंधने येणार आहेत.

डॉ. झाकीर नाईक यांचे समर्थन केल्याप्रकरणी अबू आझमी यांच्यावर देशद्रोेहाचा गुन्हा प्रविष्ट करा !

  • अबू आझमी यांच्यासारख्या धर्मांधांना प्रस्थापित व्यवस्थेचे भय न राहिल्यामुळेच लोकशाहीचे मंदिर म्हणून ओळखल्या जाणार्‍या विधानसभेच्या सभागृहात ते आतंकवादाला खतपाणी घालणारे डॉ. झाकीर नाईक यांचे उघड समर्थन करण्यास धजावतात ! त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, अशी जनतेची अपेक्षा आहे !
  • आमदार अनिल गोटे यांची मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे आणि औचित्याच्या सूत्राद्वारे मागणी
        नागपूर, ९ डिसेंबर (विशेष प्रतिनिधी) - इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन या संस्थेचे अध्यक्ष डॉ. झाकीर नाईक यांनी आतंकवाद्यांना आश्रय देण्याविषयी वक्तव्य केले होते. समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी औचित्याच्या सूत्राद्वारे इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनविषयीचे सूत्र विधानसभेत मांडून सभागृहाच्या विशेषाधिकाराचा अपलाभ घेतला आहे. अशाप्रकारे अबू आझमी यांनी डॉ. झाकीर नाईक यांचे उघड समर्थन केले असून त्यांनी प्रसिद्धीमाध्यमांसमोर याविषयी बेताल वक्तव्ये केली आहेत. त्यामुळे या दोन्ही गोष्टींची नोंद घेऊन आझमी यांच्या विरोधात देशद्रोहाच्या आरोपाखाली गुन्हा प्रविष्ट करण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी भाजपचे आमदार श्री. अनिल गोटे यांनी एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्री श्री. देेवेंद्र फडणवीस यांच्याकडे ९ डिसेंबरला केली आहे. विशेष म्हणजे श्री. अनिल गोटे यांनी विधानसभेत खास औचित्याचे सूत्र मांडून अबू आझमी यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. (विधानसभेतील २८९ आमदारांपैकी केवळ भाजपचे आमदार श्री. अनिल गोटे यांनी तीन टप्प्यात शासनाकडे अबू आझमी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केल्याविषयी त्यांचे अभिनंदन ! श्री. अनिल गोटे यांनी मांडलेले सूत्र देशहिताचे असल्याने त्यांना इतर आमदारांनी पाठिंबा देऊन देशहिताच्या विरोधात काम करणार्‍या लोकप्रतिनिधींच्या विरोधात मुख्यमंत्र्यांकडे तक्रारी प्रविष्ट कराव्यात, एवढीच भाजप आणि शिवसेना यांच्या आमदारांकडून अपेक्षा आहे. - संपादक)

देशाची म्लेंच्छबाधा दूर करण्यासाठी शिवचरित्र अभ्यासा ! - पू. संभाजीराव भिडेगुरुजी

पू. भिडेगुरुजी यांना सनातन प्रभातचा
विशेषांक भेट देतांना श्री. दीपक आगवणे (डावीकडे)

        पिरंगुट (जिल्हा पुणे), ९ डिसेंबर (वार्ता.) - ज्याप्रमाणे भूतबाधा होते, अन्नातून विषबाधा होते, तशी या देशाला म्लेंच्छबाधा झाली आहे. ही बाधा नष्ट करायची असेल, तर प्रत्येक तरुणाने प्रखर धर्माभिमान आणि देशाभिमान चित्तात ठेवायला पाहिजे. त्यासाठी शिवचरित्राचा अभ्यास करून संघटित आणि कृतीशील समाज निर्माण केला पाहिजे, असे आवाहन श्रीशिवप्रतिष्ठानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी केले. पिरंगुट ग्रामस्थांच्या वतीने शिवचरित्रपारायण उद्यापन सोहळ्यानिमित्त ४ डिसेंबर या दिवशी त्यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी २ सहस्राहून अधिक धर्माभिमानी उपस्थित होते.

हिंदु धर्मजागृती सभेच्या माध्यमातून हिंदु राष्ट्राकडे वाटचाल ! - शरद माळी, श्रीशिवप्रतिष्ठान

  • हिंदु धर्मजागृती सभेच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या वाहनफेरीत ११५ हून अधिक दुचाकींचा उत्स्फूर्त सहभाग ! 
  • कोल्हापूर येथे ११ डिसेंबरला हिंदु धर्मजागृती सभा ! 

वाहनफेरीत सहभागी सहभागी झालेले हिंदुत्वनिष्ठ

        कोल्हापूर, ९ डिसेंबर (वार्ता.) - कोल्हापूर जिल्हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आहे. आजूबाजूच्या अनेक गडकोटांवर छत्रपती शिवाजी महाराज यांचे वास्तव्य होते. या शिवरायांच्या भूमीत काही संघटना जाणीवपूर्वक हिंदु धर्म, देश, देवता यांच्यावर टीका करत आहेत; मात्र यापुढील काळात ही टीका सहन केली जाणार नाही. ही सभा म्हणजे हिंदुत्वाची डरकाळी आहे. या सभेच्या माध्यमातून हिंदु राष्ट्र येणारच आहे, असे ठाम प्रतिपादन श्रीशिवप्रतिष्ठानचे श्री. शरद माळी यांनी केले. ते ११ डिसेंबर या दिवशी होत असलेल्या हिंदु धर्मजागृती सभेच्या प्रचाराच्या निमित्ताने आयोजित केलेल्या फेरीच्या समारोप्रसंगी बोलत होते.

नवी देहलीत शिवसेना आता सामाजिक कार्य करणार !

     नवी देहली - ६ डिसेंबरला येथील जंतरमंतरवर शिवसेनेच्या सर्व पदाधिकार्‍यांनी आणि शिवसैनिकांनी अयोध्येतील बाबरी ढाचा पाडल्याचा ‘शौर्य दिवस’ उत्साहात साजरा केला. शिवसेनेचे देहली राज्य प्रमुख श्री. नीरज सेठी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारकडे अयोध्येत राम मंदिर जलद गतीने उभारण्यासाठी येथे शक्ती मोर्चा काढला. या वेळी श्री सेठी यांनी घोषणा केली की, नवी देहलीमध्ये कोणत्याही गरीब परिवाराच्या घरामध्ये कोणाचे निधन झाले, तर शिवसेना त्यांच्या अंत्यविधीचा सर्व खर्च करील.डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांच्या संदर्भातील पुढील सुनावणी २२ डिसेंबरला !

कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरण !
     कोल्हापूर - कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेले सनातन संस्थेचे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांचा खटला ९ डिसेंबर या दिवशी जिल्हा आणि सत्र न्यायाधीश यांच्याकडे वर्ग करण्यात आला. ही सुनावणी आता जिल्हा न्यायाधीश एल्.डी. बिले यांच्यासमोर होईल. आज डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना प्रत्यक्ष उपस्थित न करता व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित करण्यात आले. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता २२ डिसेंबर या दिवशी होईल.

१४ सहस्र मुलांनी इंग्रजी शाळा सोडून मराठी शाळेत प्रवेश घेतला ! - शिक्षणमंत्री विनोद तावडे

मराठी माध्यमांच्या शाळांचा दर्जा चांगला राखण्यासाठी 
शासनाकडून अधिकाधिक प्रयत्न व्हावेत, ही अपेक्षा !
       नागपूर, ९ डिसेंबर (वार्ता.) - इंग्रजी माध्यमांच्या शाळांतून जिल्हा परिषदेच्या मराठी माध्यमाच्या शाळांकडे मुलांचा ओढा वाढत आहे. राज्यातील १४ सहस्र मुलांनी इंग्रजी शाळा सोडून जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांमध्ये प्रवेश घेतला आहे. या चांगल्या कार्याविषयी प्रयत्न करणार्‍या शिक्षकांचे कौतुक केले पाहिजे, असे सांगून शिक्षणमंत्री श्री. विनोद तावडे यांनी संबंधित शिक्षकांचे विधानसभेत अभिनंदन केले. विधानसभेत श्री. तावडे यांनी ही माहिती दिल्यानंतर इतर सर्व आमदारांनी बाके वाजवून शिक्षकांचे अभिनंदन केले. ते म्हणाले की, चांगल्या दर्जाचे शिक्षण आणि स्पोकन इंग्लीशवर भर दिल्याने जिल्हा परिषदेच्या शाळेत मुले येण्याचा ओढा वाढला आहे. या वेळी सभागृहात संबंधित जिल्हा परिषदेतील शाळांमधील शिक्षक उपस्थित होते. (चांगल्या दर्जाचे शिक्षण देेणे आणि ते टिकवून ठेवणे हे शिक्षकांचे दायित्व असून याकडे शासनाने कायम लक्ष ठेवले पाहिजे. - संपादक)

लोकल थांबवून मेल-एक्स्प्रेस सोडल्याने टिटवाळ्यात संतप्त प्रवाशांचा रेलरोको !

     टिटवाळा - मुंबईकडे जाणारी लोकल थांबवून मेल-एक्स्प्रेस गाड्या अगोदर सोडल्याने संतप्त प्रवाशांनी टिटवाळा रेल्वे स्थानकात रेल्वे रोको आंदोलन चालू केल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. कल्याण-कसारा आणि कसारा-कल्याण या दोन्ही अप-डाऊन मार्गावरील वाहतूक पूर्ण ठप्प झाली. प्रवाशांनी २ घंटे हे आंदोलन केले. कोणताही तांत्रिक बिघाड झालेला नसून प्रवाशांनी सहकार्य करावे आणि आंदोलन मागे घेऊन रेल्वे वाहतूक चालू करावी, असे आवाहन मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी केले आहे.

उच्च न्यायालयातील सुनावणीसाठी केंद्रीय अन्वेषण यंत्रणेला जिल्हा सत्र न्यायालयाकडून एक संधी

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी २३ डिसेंबरला
     पुणे - डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणातील संशयित आरोपी सनातनचे डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांच्यावरील आरोप निश्‍चितीची सुनावणी घेण्यात यावी, यासाठी येथील जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश पी.वाय. लाडेकर यांनी १६ आणि २८ नोव्हेंबर या दिवशी केंद्रीय अन्वेषण यंत्रणेला आदेश दिला होता. अन्वेषण यंत्रणेने त्या आदेशाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे. त्यामुळे जिल्हा सत्र न्यायालयाने केंद्रीय अन्वेषण यंत्रणेला उच्च न्यायालयातील सुनावणीसाठी एक संधी दिली आहे. या कारणाने या प्रकरणाची पुढील सुनावणी २३ डिसेंबर या दिवशी होणार आहे.
    उपरोक्त प्रकरणाची सुनावणी ९ डिसेंबर या दिवशी झाली. त्या वेळी यंत्रणेचे शासकीय अधिवक्ता मनोज चालाडे, यंत्रणेचे अधिकारी एस.आर. सिंग आणि डॉ. तावडे यांचे अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर हे उपस्थित होते. या सुनावणीच्या वेळी डॉ. तावडे यांना उपस्थित करण्यात आले होते.

स्त्रियांनी गार्गी, जिजाऊ, अहिल्या, लक्ष्मीबाई यांचा आदर्श ठेवावा !- सौ. नयना भगत, रणरागिणी शाखा

मार्गदर्शन करतांना सौ. नयना भगत
    सानपाडा - पूर्वी आक्रमकांच्या काळात देव, देश, धर्म यांवरील श्रद्धा, अभिमान आणि स्वतःच्या अंगीभूत गुणांनी स्त्रियांनी समाजाला आधार देऊन इतिहासात स्थान मिळवले. आजच्या स्त्रिया मात्र आपला दैदिप्यमान इतिहास विसरून मुलांना पाश्‍चात्य शिक्षण, कपडे, जीवनशैली यांविषयी प्रोत्साहन देतांना आढळतात. स्त्रियांनी गार्गी, जिजाऊ, अहिल्या, लक्ष्मीबाई यांचा आदर्श ठेवावा, असे आवाहन रणरागिणी शाखेच्या सौ. नयना भगत यांनी केले. येथील सेक्टर ८ येथे स्वामी समर्थ केंद्रात महिलांवरील अत्याचारांच्या विरोधात स्वसंरक्षण आणि धर्मशिक्षण ही काळाची आवश्यकता या विषयावर त्या महिलांना मार्गदर्शन करत होत्या. या व्याख्यानाचा लाभ २५ महिलांनी घेतला.
     या वेळी सौ. नयना भगत म्हणाल्या, स्त्रियांवरील अत्याचारांची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आतंकवाद, लव्ह जिहाद यांत हिंदु स्त्रियांना लक्ष्य केले जात आहे.

कोल्हापूर येथे होणार्‍या धर्मजागृती सभेसाठी उपस्थित राहून धर्मकर्तव्य बजावा ! - सचिन पवार, श्रीशिवप्रतिष्ठान

पत्रकार परिषदेत उपस्थित डावीकडून सौ. स्मिता
माईणकर, सौ. गौरी खिलारे आणि श्री. सचिन पवार

       सांगली, ९ डिसेंबर (वार्ता.) - हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित हिंदु धर्मजागृती सभा या हिंदूंमध्ये नवचैतन्य निर्माण करतात. या सभेला श्रीशिवप्रतिष्ठानचा पाठिंबा आहे. तरी सांगली येथील हिंदूंनीही ११ डिसेंबर या दिवशी कोल्हापूर येथे होणार्‍या धर्मसभेसाठी उपस्थित राहून धर्मकर्तव्य बजावावे, असे आवाहन श्रीशिवप्रतिष्ठानचे विभागप्रमुख श्री. सचिन पवार यांनी केले. ते येथे कोल्हापूर येथे होत असलेल्या हिंदु धर्मजागृती सभेच्या पार्श्‍वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. ही पत्रकार परिषद ९ डिसेंबर या दिवशी हरिदास भवन येथे घेण्यात आली. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या सौ. गौरी खिलारे, तसेच सनातन संस्थेच्या सौ. स्मिता माईणकर उपस्थित होत्या.

हिंदु जनजागृती समितीचे उपक्रम चांगलेच ! - कराड पोलीस

शहर पोलीस निरीक्षक श्री. गुंजवटे यांना निवेदन
देतांना हिंदुत्वनिष्ठ आणि समितीचे कार्यकर्ते
     कराड, ९ डिसेंबर (वार्ता.) - शहर पोलीस निरीक्षक श्री. जोतिराम गुंजवटे यांनी ‘३१ डिसेंबरच्या अपप्रकारांच्या विरोधात योग्य ती पावले उचलू’, असे आश्‍वासन हिंदुत्वनिष्ठांना दिले, तर कराड तालुका ग्रामीणचे पोलीस निरीक्षक श्री. भोसले म्हणाले, ‘‘आम्ही शक्य ती उपाययोजना करू आणि असले अपप्रकार रोखू; परंतु जर तुम्हाला कोठे असे प्रकार दिसले, तर माझ्या भ्रमणध्वनीवर कळवा, आम्ही लगेच तेथे कारवाई करू. तुमचे
पोलीस ठाणे अमलदार लक्ष्मण जगधने
यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ
उपक्रम चांगलेच आहेत !’’
     ख्रिस्ती नववर्षाच्या निमित्ताने ३१ डिसेंबरच्या रात्री मद्यपान केल्यामुळे होणारे अपप्रकार रोखण्याविषयीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीसह अन्य हिंदुत्वनिष्ठांनी दिले. त्या वेळी कराड पोलिसांनी हिंदुत्वनिष्ठांच्या उपक्रमाचे कौतुक करून वरील उद्गार काढले.
     या वेळी हिंदु एकता आंदोलन सातारा जिल्हा उपाध्यक्ष श्री. रूपेश मुळे, कराड भाजप युवा मोर्च्याचे उपाध्यक्ष श्री. गणेश कापसे, सनातन संस्थेचे श्री. लक्ष्मण पवार, श्री. पालेकर, हिंदु जनजागृती समितीचे श्री. मदन सावंत आणि श्री. अणिल कडणे उपस्थित होते.

पिंपरी स्मशानभूमीच्या देखभालीकडे दुर्लक्ष

     पिंपरी - येथील स्मशानभूमीत घाणीचे साम्राज्य पसरले असून तेथे नियमितपणे जुगार खेळला जातो, तसेच मद्याच्या मेजवान्याही होतात. त्या ठिकाणी सुरक्षारक्षकही उपलब्ध नाही. टोळक्यांकडून गरीब मुलांना मारणे, धमकावणे अशा घटनाही घडतात. या संदर्भात संबंधित कंत्राटदाराची चौकशी करून त्याला काळ्या सूचीत टाकण्यात येईल, असे स्थायी समितीचे अध्यक्ष हिराचंद आसवानी यांनी सांगितले.

दोन्ही प्रकरणांतील दोषींवर कारवाईची शिफारस करणारे पत्र संबंधित मंत्र्यांना पाठवतो ! - महसूल राज्यमंत्री श्री. संजय राठोड

शाहूवाडी (कोल्हापूर) जमीन घोटाळा आणि श्री तुळजाभवानी देवस्थान दानपेटी घोटाळा प्रकरण
     नागपूर - पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अंतर्गत येणार्‍या कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी देवस्थानाची शाहूवाडी येथील १ सहस्र एकर शेतजमीन लाटण्याचा प्रकार समोर आला आहे. यामध्ये देवस्थान समितीच्या सदस्यांच्या खोट्या स्वाक्षर्‍या आणि शिक्के मारून जमीन वळवण्याचा प्रयत्न झाल्याचे राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडीच्या) चौकशीत उघड झाले आहे. त्या चौकशीत होणारा राजकीय हस्तक्षेप पूर्णपणे रोखणे, तसेच त्या प्रकरणी सादर झालेल्या अहवालावर शासनाकडून कोणती कार्यवाही करण्यात आली आणि दोषींवर लवकरात लवकर आरोपपत्र प्रविष्ट करावे. त्याचसमावेत श्री तुळजाभवानी देवस्थानमधील दानपेटी घोटाळ्याचा राज्य अन्वेषण विभागाचा (सीआयडी) चौकशी अहवाल त्वरित उघड करून सर्व दोषी व्यक्तींवर कठोर करावी, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र प्रवक्ता श्री. अरविंद पानसरे यांनी महसूल राज्यमंत्री श्री. संजय राठोड यांना दिले.

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक २०१६ हे विधेयक एकमताने विधानसभेत संमत !

विधानसभा...
     नागपूर - महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक २०१६ हे विधेयक ८ डिसेंबर या दिवशी विधानसभेत एकमताने समंत करण्यात आले. उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री श्री. विनोद तावडे यांनी हे विधेयक विधानसभेत मांडले. या विधेयकामुळे राज्याच्या उच्च शिक्षणाला अधिक गती मिळणार आहे आणि संपूर्ण देशात महाराष्ट्र अग्रेसर राज्य म्हणून ओळख निर्माण करेल, असा विश्‍वास श्री. विनोद तावडे यांनी या वेळी व्यक्त केला. राज्य शासनाने डॉ. अनिल काकोडकर समिती, डॉ. अरुण निगवेकर समिती आणि डॉ. राम ताकवले समिती अशा तीन समित्या उच्चशिक्षण विषयक शिफारसी करण्याकरिता २०१०-२०११ मध्ये नियुक्त केल्या होत्या.
     या तीनही समित्यांनी परस्परपूरक काम केले असून उचित शिफारसी केल्या आहेत, असे या वेळी सांगण्यात आले.
प्रस्तावित सार्वजनिक विद्यापीठ कायद्याची ठळक वैशिष्ट्ये !
१. विद्यार्थीकेंद्रीत रचना आणि त्यांचा निर्णय प्रक्रियेतील सहभाग
२. महाविद्यालयीन विद्यार्थी निवडणुका पुन्हा चालू होणार
३. पसंतीवर आधारित श्रेयांक पद्धती लागू होणार
४. परिणामकारक तक्रार निवारण व्यवस्था

दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी आरोप फेटाळले !

काँग्रेसच्या उमेदवाराचे आवेदन बाद करण्यासाठी अधिकार्‍यावर दबाव आणल्याचे प्रकरण !
     मुंबई, ९ डिसेंबर (वार्ता.) - गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज नगरपरिषद निवडणुकीत निवडणूक अधिकार्‍यांवर दबाव टाकल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांना नोटीस पाठवून खुलासा मागवला होता. जानकर यांनी आयोगाला १२ पानी खुलासा पाठवला असून त्यात त्यांनी आपण निर्दोष असल्याचे म्हटले आहे. 
     देसाईगंज नगरपरिषद निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढणार्‍या उमेदवाराने अपक्ष म्हणूनही आवेदन प्रविष्ट केले होते. काँग्रेसकडून प्रविष्ट केलेले आवेदन बाद करून त्या संबंधित उमेदवारास अपक्ष निवडणूक लढवण्याची अनुमती द्यावी आणि कपबशी हे निवडणूक चिन्ह द्यावे, असा दबाव जानकर यांनी निवडणूक अधिकार्‍यांवर टाकला असल्याची तक्रार काँग्रेसने आयोगाकडे केली होती. या संदर्भातील ‘व्हिडिओ’ही वृत्तवाहिन्यांवर दाखवला गेला होता. याची नोंद घेऊन निवडणूक आयोगाने जानकर यांच्याकडून खुलासा मागवला होता.

लोकलगाड्यांतील अवैध विज्ञापनांमध्ये ८० टक्क्यांनी घट !

      मुंबई, ९ डिसेंबर - लोकलगाड्यांतील डब्यांमध्ये अवैध भित्तीपत्रके लावणार्‍यांचे प्रमाण गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी ८० टक्क्यांनी घटले असल्याची माहिती रेल्वे पोलीस दलाच्या अधिकार्‍यांनी दिली आहे. 
     अल्प श्रमात अधिक लोकांपर्यंत आपल्या आस्थापनाची, व्यवसायाची प्रसिद्धी करण्यासाठी काही जण रात्री लोकलगाड्या उभ्या असतांना गुपचूपपणे गाड्यांच्या डब्यात विनाअनुमती विज्ञापने चिकटवतात. यांमध्ये घरखरेदी, कर्जपुरवठा, नोकरीची संधी, भोंदू बाबा यांच्या विज्ञापनांचा प्रामुख्याने समावेश असतो. लोकलगाडीच्या डब्यांमध्ये ठिकठिकाणी चिकटवलेल्या या विज्ञापनांमुळे डबे विद्रुप दिसतात. (राष्ट्रीय संपत्तीचे विद्रुपीकरण करणारे राष्ट्रदोहीच ! संपादक) तसेच यांमुळे नागरिक फसवले जाण्याचीही मोठी शक्यता असते.

नवी मुंबई येथे अमली पदार्थ विकणार्‍या धर्मांध महिलेला अटक !

      नवी मुंबई, ९ डिसेंबर - येथील नेरुळ परिसरात अमली पदार्थ विकणार्‍या धर्मांध महिलेला अटक करण्यात आली. अझीथा बेगम अब्दुल मुथलिफ असे या महिलेचे नाव असून अमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केली. तिच्याजवळून ३० लाख रुपयांची एक किलो ‘एम्डी मेफेड्रोन पावडर’ जप्त करण्यात आली आहे. या महिलेच्या विरोधात ‘एन्डीपीएस्’ या कायद्यानुसार गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. (गुन्हेगारीत धर्मांध महिलाही अग्रेसर ! संपादक)

माजी कृषिमंत्री शशिकांतभाऊ सुतार यांच्या हस्ते समितीचे श्री. कृष्णाजी पाटील यांचा सत्कार

कोथरूड (जिल्हा पुणे) येथे शिवसैनिकांच्या मेळाव्यात हिंदु जनजागृती समितीचा गौरव !
सत्कार स्वीकारतांना समितीचे
श्री. कृष्णाजी पाटील (उजवीकडे)
      पुणे, ९ डिसेंबर (वार्ता.) - येथील शिवसमर्थ सभागृहात नुकतेच प्रभाग क्र. ११ मधील शिवसैनिकांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला शिवसेनचे माजी कृषिमंत्री श्री. शशिकांत भाऊ सुतार, शिवसेनेचे पुणे शहर संघटक सर्वश्री श्याम देशपांडे, कार्यक्रमाचे आयोजक जयदीप पडवळ, कोथरूड विभाग शिवसेना प्रमुख राजेश पळसकर, शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते अनंतराव भिलारे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. हिंदु जनजागृती समितीच्या स्थानिक कार्यकर्त्यांनाही या मेळाव्याचे आमंत्रण देण्यात आले होते. या कार्यक्रमात श्री. शशिकांतभाऊ सुतार यांच्या हस्ते हिंदु जनजागृती समितीचे श्री. कृष्णाजी पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

ठाणे येथे नैतिकमूल्यांवर प्रवचन

विषय समजून घेतांना विद्यार्थी
   ठाणे - सनातन संस्था ठाणेच्या वतीने उथळसर, शाळा क्रमांक ४१ (हिंदी माध्यम), तसेच भालेराव क्लासेस मध्ये नैतिकमूल्यांचे प्रवचन घेण्यात आले होते. त्यासमवेत अभ्यास कसा करावा? अभ्यासात एकाग्रता कशी साधावी? या संदर्भातील मार्गदर्शन सनातन संस्थेच्या सौ. प्रतिभा जैसवाल यांनी विद्यार्थ्यांना केले. या मार्गदर्शनाचा लाभ ११० विद्यार्थ्यांनी घेतला.

नवी मुंबई येथे बांधकाम व्यवसाय विषयक प्रदर्शनात सनातनचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन

     नवी मुंबई - येथील बांधकाम व्यवसाय विषयक (प्रॉपर्टी) प्रदर्शनात सनातन संस्थेचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन आणि वितरण कक्ष लावण्यात आला आहे. ९ ते १२ डिसेंबर या कालावधीत सिडको मैदान, वाशी येथे हे प्रदर्शन सकाळी १० ते सायं. ७ या वेळेत आहे. सनातनच्या प्रदर्शन आणि वितरण कक्षाचा क्रमांक एच् २३ असून आयोजकांकडून विनामूल्य जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

शौर्य दिनानिमित्त पंढरपुरात (जिल्हा सोलापूर) हिंदुत्ववाद्यांनी केली महाआरती !

महाआरती करतांना हिंदुत्ववादी
     पंढरपूर (जिल्हा सोलापूर), ९ डिसेंबर (वार्ता.) - ६ डिसेंबर या दिवशी छत्रपती शिवरायांनी अफजलखानाचा कोथळा काढून दहशतवाद कसा संपवायचा असतो, याचा आदर्श घालून दिला; तसेच याच दिवशी बाबरीचे पतनही करण्यात आले होते. हा दिवस पंढरपूर येथील हिंदुत्ववाद्यांनी श्रीकृष्ण मंदिराजवळ सायंकाळी ७ वाजता महाआरती करून शौर्य दिन म्हणून साजरा केला. या वेळी विश्‍व हिंदु परिषदेचे अध्यक्ष रविंद्र साळे सर, हिंदु महासभेचे शहराध्यक्ष बाळासाहेब डिंगरे, विवेक बेणारे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शशिशेखर पाटील, हिंदुस्थान शिवभक्त प्रतिष्ठानचे प्रतापसिंह साळुंके, पेशवा युवा मंचचे श्री. देशपांडे, सनातन संस्थेचे मोहन लोखंडे, दुर्गा वाहिनीच्या सौ. भाग्यश्री लिहिणे, आणि अन्य महिला, वारकरी पाईक संघाचे प्रवक्ते ह.भ.प. वीर महाराज या वेळी उपस्थित होते.

तुळजाभवानी देवस्थानामधील घोटाळ्यांविषयी कराड आणि वाई येथे निवेदने !

वाई
    ‘श्री तुळजाभवानी देवस्थाना’तील दानपेटी घोटाळ्याचा सी.आय.डी. चौकशी अहवाल त्वरित उघड करून सर्व दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई व्हावी याची मागणी करणारे निवेदन कराड येथे सहकार परिषदेचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) भाजपचे श्री. शेखर चरेगावकर यांना देतांना हिंदु जनजागृती समितीचे श्री. मदन सावंत, श्री. अनिल कडणे, तसेच सनातनचे श्री. लक्ष्मण पवार आणि श्री. सुरेंद्र भस्मे उपस्थित होते.

कोल्हापूर जिल्ह्यातील ३ तालुक्यांत ३१ मार्चपर्यंत नवीन विद्युत् खांब बसवणार ! - ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे

      नागपूर, ९ डिसेंबर (वार्ता.) - कोल्हापूूर जिल्ह्यातील चंदगड, आजरा आणि गडहिंग्लज या तीन तालुक्यांतील गावांमधील डी.पी. आणि नवीन विद्युत् खांब बसवण्यासाठी १ कोटी ६० लक्ष रुपयांची तरतूद केली आहे. या तीन तालुक्यांत ३१ मार्चपर्यंत नवीन विद्युत् खांब बसवण्यात येतील, अशी माहिती ऊर्जामंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी ८ डिसेंबर या दिवशी विधानसभेतील प्रश्‍नोत्तरात दिली. चंदगड (जिल्हा कोल्हापूर) येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार श्रीमती संध्यादेवी कुपेकर यांनी हा प्रश्‍न विचारला होता. 
    श्री. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, चंदगड तालुक्यातील मौजे तुड्ये येथील बंद असलेले विद्युत् केंद्र (सबस्टेशन) चालू करण्याची मागणी करण्यात आली आहे. ३३ के.व्ही. तुडीये या वाहिनीवरील ३३ केव्ही ‘डिस्क इन्सुलेटर’ वारंवार निकामी होत आहे. स्थानिक ठेकेदाराकडून टप्प्याटप्याने ५०० ‘डिस्क इन्सुलेटर’ पालटूनही सदर वाहिनी कार्यान्वित न झाल्यामुळे संपूर्ण वाहिनीचे ‘डिस्क इन्सुलेटर’ पालटण्यात येणार आहेत. गडहिंग्लज विभागीय कार्यालयाच्या वतीने या कामाच्या निविदा प्रक्रियेचे काम प्रगतीपथावर आहे. लवकरच कामाला प्रारंभ करण्यात येईल.

वाळूमाफियाने हप्त्याविषयी उघडपणे प्रश्‍न केलेल्या तहसील कार्यालयातील भ्रष्ट अधिकार्‍याच्या चौकशीचे आदेश !

      जळगाव - एका वाळूमाफियाने २९ नोव्हेंबर या दिवशी ‘मी नियमित हफ्ते देऊनही माझे डंपर का पकडतात ?’, अशी मोठ्याने विचारणा तहसील कार्यालयातील अधिकार्‍यांना केली होती. तहसील कार्यालयातील या भ्रष्टाचारी अधिकार्‍यांच्या चौकशीचे जिल्हाधिकार्‍यांनी आदेश काढले आहेत.
    वरील अचनाक घडलेल्या प्रसंगामुळे वाळूमाफिया आणि अधिकारी यांचे आर्थिक संबंध उघड झाले होते. यानंतर भाजपचे शहर उपाध्यक्ष यांनी हफ्ते घेणार्‍या अधिकार्‍यांची चौकशी करून त्यांना निलंबित करण्यात यावे, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांना दिले होते. जळगावचे नायब तहसीलदार डी.एस्.भालेराव हे तर जळगाव तालुक्यातील एका वाळू ठेक्यात भागीदार असल्याचे वाळूमाफियांकडून उघडपणे सांगितले जात आहे. तहसीलदारांच्या भ्रष्टाचाराविषयी अनेक तक्रारी आल्या आहेत, असे समजते. (अनेक तक्रारी आल्या होत्या, तर पूर्वीच्या त्यांच्यावर कारवाई का झाली नाही ? - संपादक)फलक प्रसिद्धीकरता

अश्‍लीलतेचा पुरस्कार करणार्‍यांच्या विरोधात सरकार हतबल का ?
     जयपूर येथील कला प्रदर्शनात अर्धनग्न चित्रांचे प्रदर्शन भरवल्यामुळे लाल सेना आणि राष्ट्रीय हिंदु एकता मंचच्या कार्यकर्त्यांनी सदर चित्रे फाडली. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली अश्‍लील चित्रांचे प्रदर्शन का भरवता ?, असा प्रश्‍न त्यांनी आयोजकांना विचारला.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Jaipurki ek pradarshanime rakhe ardh nagna chitroko Lal senake karyakartaone phad diya. - Ashleelta ka puraskar karnewalopar sarkar karvai kyu nahi karti
जागो ! : जयपुर की एक प्रदर्शनी में रखे अर्धनग्न चित्रों को लालसेना के कार्यकर्ताआें ने फाड दिया । - अश्‍लीलता का पुरस्कार करनेवालों पर सरकार कार्यवाही क्यों नहीं करती ?

‘पेटीएम्’च्या माध्यमातून ३० सहस्र रुपयांहून अधिक रुपयांची चोरी

‘कॅशलेस’ व्यवहाराला प्रोत्साहन देतांना अशा घटना रोखण्यासाठी उपाययोजना काढणार का ?
     नालासोपारा (ठाणे), ९ डिसेंबर - येथे ‘पेटीएम्’च्या माध्यमातून ३० सहस्र रुपयांहून अधिक रुपयांची चोरी करण्यात आली. येथील तुळीज भागात रहाणार्‍या राजकुमार सोनी यांच्या खाते क्रमांकाची चोरी करून अज्ञाताने ‘पेटीएम्’ खाते उघडले. या खात्यातून एकाच दिवसात अनुक्रमे ५ सहस्र, १६ सहस्र ९९९, १० सहस्र ४३४ एवढी रक्कम काढण्यात आली. ( नीतीमान जनता मिळण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे ! - संपादक) सोनी यांच्या मुलाने खात्याचे व्यवहार थांबवले. अन्यथा याहून अधिक रक्कम चोरीला गेली असती.मुंबई महापालिकेत कचरा वाहतुकीत ९०० कोटी रुपयांचा घोटाळा

मनसेचे संदीप देशपांडे यांचा आरोप
     मुंबई, ९ डिसेंबर (वार्ता.) - मुंबई महापालिकेत कचरा वाहतुकीत ९०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप मनसेचे संदीप देशपांडे यांनी केला आहे. मनसेच्या नगरसेविका सुजाता पाठक यांनी माहितीच्या अधिकाराखाली मिळवलेल्या माहितीतून हे निष्पन्न झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. या वेळी त्यांनी घोटाळ्यांची कागदपत्रे सादर केली. 
    महापालिका आयुक्तांकडे या संदर्भात तक्रार करूनही कारवाई करण्यास चालढकलपणा होत असल्याने स्थायी समितीच्या अध्यक्षांनी याची सखोल चौकशी करून त्याचा अहवाल सादर करावा, असे सूत्र देशपांडे यांंनी स्थायी समितीच्या बैठकीत उपस्थित केले. ते पुढे म्हणाले की,
१. घाटकोपर, भांडुप आणि बोरिवली या वॉर्डमधून देवनार ‘डम्पिंग ग्राऊण्ड’मध्ये कचरा नेतांना कंत्राटदाराने हा घोटाळा केला आहे. एकच वाहन एकाच वेळेला दोन ठिकाणी गेल्याचे कंत्राटदाराने नमूद केले आहे.
२. नाल्यांच्या स्वच्छतेच्या कामात घोटाळा करणार्‍या आस्थापनालाच हे काम देण्यात आले आहे. त्या कामात ज्या पद्धतीने घोटाळा करण्यात आला, त्याच पद्धतीने यातही घोटाळा करण्यात आला आहे. (महानगरपालिकेने यापूर्वीही रस्त्यांच्या कामाचे कंत्राट घोटाळेबाज कंत्राटदारांना दिले होते. ही पालिकेतील अधिकार्‍यांची भ्रष्टाचार संपवण्याची उदासिनता आहे कि कंत्राटदारांसह घोटाळ्यात सहभाग आहे ? - संपादक)

नागपूर येथील प्रादेशिक मनोरुग्णालयातील २१ मनोरुग्णांच्या मृत्यू प्रकरणांची पुन्हा चौकशी करून दोषींवर कारवाई करणार ! - आरोग्यमंत्री दीपक सावंत

      नागपूर, ९ डिसेंबर (वार्ता.) - येथील प्रादेशिक मनोरुग्णालयात ७ मासांत २१ मनोरुग्णांचा मृत्यू झाल्याचे नुकतेच निदर्शनास आले आहे. या मृत्यू प्रकरणाची चौकशी करून दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्‍वासन आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी ८ डिसेंबर या दिवशी विधानसभेत लक्षवेधीवर दिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. मिलिंद माने आणि अन्य यांनी ही लक्षवेधी मांडली होती.

हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता !

वाचा नवीन सदर
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसंदर्भातील परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे विचारधन !
     ‘वर्ष २०२३ पासून ‘हिंदु राष्ट्र’ येईल’, हे आजवर अनेक संतांनी वेळोवेळी सांगितले आहे. तथापि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेविषयी कोणत्याही आशादायी घटना स्थुलातून घडत नसतांना असे सांगणे, ही काहींना अतिशयोक्ती वाटेल; पण संतांमध्ये काळाच्या पडद्याआड पहाण्याचे सामर्थ्य असते. म्हणूनच अशा द्रष्ट्या संतांच्या मार्गदर्शनाखाली आपण त्या दिशेने प्रयत्न करणे, हीच आपली साधना आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेविषयी अनेकांंच्या मनात उत्सुकता आहे. या विषयीची सविस्तर माहिती ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची दिशा’ या नियमित सदरात आपल्याला मिळेल. आगामी काळात हिंदु समाजाला भारतभूमीत रामराज्याची अनुभूती देणारे ‘हिंदु राष्ट्र’ स्थापन करण्यासाठी खारीचा नव्हे, तर श्री हनुमंताचा वाटा उचलण्याची प्रेरणा यातून मिळावी, अशी ईश्‍वरचरणी प्रार्थना !

भगवद्गीता आणि महाभारत यांचे धडे आपल्या शिक्षणक्रमात हवेच ! - निवृत्त न्यायमूर्ती दवे

१. श्रीमद्भगवद्गीता आणि महाभारत हे मुलांना बालवयापासून शालेय जीवनात शिकवले पाहिजे ! 
     ‘२.८.२०१४ या दिवशी कर्णावती (अहमदाबाद) येथे सर्वोच्च न्यायालयाचे तत्कालीन न्यायमूर्ती ए.आर्. दवे म्हणाले, ‘श्रीमद्भगवद्गीता आणि महाभारत हे मुलांना बालवयापासून शालेय जीवनात शिकवले पाहिजे.’ खरे म्हणजे त्यांच्या या वक्तव्यावर भारतात गदारोळ उठण्याचे काहीच कारण नव्हते; कारण महाभारत हे भारताचे आणि श्रीमद्भगवद्गीतासुद्धा भारताचीच ! तिचे धडे भारतात द्यायचे नाहीत, तर मग काय ते केनियात द्यायचे ? युक्रेनमध्ये द्यायचे कि ब्राझिलमध्ये द्यायचे ? 
२. नेहरूनिर्मित विकृत परंपरा देशाच्या भूमीतून कायमची 
हद्दपार होईल, तो दिवस सुवर्णाक्षरांनी नोंदवला पाहिजे ! 
     हिंदु समाजाच्या भावविश्‍वातील कुठलाही विषय आला की, त्याच्यावर तुटून पडायचे, ही आपली भारतातील निधर्मी परंपरा झाली आहे. ही विकृत, निधर्मी परंपरा नेहरूंनी या देशात निर्माण केली. ज्या दिवशी ही नेहरूनिर्मित विकृत परंपरा या देशाच्या भूमीतून कायमची हद्दपार होईल, तो दिवस सुवर्णाक्षरांनी नोंदवला पाहिजे. आपण सर्वांनी जसे ठरवून सत्तांतर केले, तसेच हे पवित्र कार्य आपल्याला सर्वांना मिळूनच करायचे आहे.

वैचारिक अपराधांची परिसीमा गाठणारे श्रीपाल सबनीस !

     सध्याच्या पुरोगामी वर्तुळातील काही वाचाळवीरांपैकी श्रीपाल सबनीस हे एक होत. प्रसिद्धीची हौस भागवण्यासाठी स्वत:चे फुटकळ विचार समाजात पसरवून अपसमज निर्माण करण्यात सबनीस यांचा अव्वल क्रमांक येईल ! साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होण्यापूर्वी सबनीस यांना कोणी ओळखतही नव्हते. अध्यक्षपद गाठल्यावर त्यांनी त्यांचा वैचारिक आतंकवाद चालू केला. प्रत्येक भाषणातून मोदींवर टीका करणे हा साहित्यिक (?) म्हणवणार्‍या सबनीस यांचा छंदच झाला आहे.

कोमलला मैत्रिणींकडून नवीन वर्षाच्या शुभेच्छा मिळाल्यावर ‘आपण हिंदु असल्याने गुढीपाडव्याला नवीन वर्ष साजरे करूया’, असे सांगणे

कु. कोमल दळवी
‘माझी मुलगी कु. कोमल दळवी ही बी. फार्मसीला शिकत आहे. ३१ डिसेंबर २०१४ ला रात्री ११ वाजता कोमलला दूरध्वनीवर ‘नवीन वर्षाच्या शुभेच्छा !’ असा लघुसंदेश सर्व मित्र-मैत्रिणींनी पाठवला होता. या लघुसंदेशला उत्तर; म्हणून तिने ‘हिंदू आहे, हिंदूच रहाणार ! आम्ही गुढीपाडवा या दिवशी शुभेच्छा देणार !’ असा लघुसंदेश सर्व मित्र-मैत्रिणींना पाठवला. थोड्या वेळाने कु. कोमलने हे सर्व मला सांगितले आणि मला प.पू. गुरुदेव यांच्याविषयी पुष्कळ कृतज्ञता वाटू लागली. हे केवळ प.पू. गुरुदेवच करू शकतात. 
      ३१ डिसेंबर या दिवशी कोमलच्या मैत्रिणींनी तिला दूरभाष केला, ‘आज आपण पार्टी करूया !’ तेव्हा कोमलने तिच्या मैत्रिणींना ठामपणे उत्तर दिले, ‘‘मी एक दिवसासाठी धर्मांतर करणार नाही. मी हिंदू आहे आणि हिंदूच रहाणार. एका दिवसासाठी मी पाप करणार नाही.’’ कोमलने तिच्या मैत्रिणींनाही समजून सांगण्याचा प्रयत्न केला, ‘‘तुम्हीसुद्धा जाऊ नका. हे योग्य नाही.

रणजित सावरकर यांच्या पुढाकाराने ‘धसई’ होणार नोटबंदी नंतरचे भारतातील पहिले चलनविरहित गाव !

श्री. रणजित सावरकर
       मुंबई - नोटाबंदीनंतर निर्माण झालेली गोंधळाची परिस्थिती दूर करण्याच्या दृष्टीने रोखमुक्त व्यवहाराच्या दिशेने केंद्र सरकारने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू रणजित सावरकर यांनी ठाणे जिल्ह्यातील मुरबाडच्या आदिवासी विभागातील धसई गावात व्यवहार चलनविरहित (कॅशलेस) करण्याच्या दिशेने वाटचाल केली आहे. अशाप्रकारे नोटबंदी नंतर चलनविरहित होणारे धसई हे भारतातील पहिलेच गाव ठरणार आहे. (गाव चलनविरहित करण्यासाठी प्रयत्न करणारे श्री. रणजित सावरकर यांचे अभिनंदन ! त्यांचा आदर्श प्रत्येक नागरिकाने घेतला पाहिजे ! - संपादक)

कारण आणि निवारण

१. ‘युद्ध किंवा दंगल यांमध्ये मातृशक्तीवर सर्वाधिक अत्याचार होतात. त्यामुळे त्यांनी स्वसंरक्षणासाठी सिद्ध राहिले पाहिजे.
२. तुम्ही आताच जागे झाला नाहीत, तर येणार्‍या भविष्यकाळातील गृहयुद्धात कुत्र्याच्या मरणाने मराल, जसे भारताच्या फाळणीच्या वेळी झाले होते.’
- श्री. आर. के. शर्मा (वय ८७ वर्षे), डिफेन्स कॉलनी, देहली.

दिव्य अध्यात्मज्ञान देणार्‍या श्रीमद्भगवद्गीतेचा परिचय करून देणारा सनातनचा ग्रंथ !

गीताज्ञानदर्शन

      ‘श्रीमद्भगवद्गीता’ म्हणजे हिंदु धर्म आणि नीतीशास्त्र यांविषयीचा मूलभूत ग्रंथ आणि ‘महाभारता’चा मुकुटमणी ! हिंदूंच्या या महान धर्मग्रंथाच्या प्रत्येक अध्यायातील तत्त्वज्ञान, साधना आणि तिचे फळ प्रस्तूत ग्रंथात सांगितले आहे. आवश्यक तेथे विषय स्पष्ट करणारे सुगम विवेचनही केले आहे. यामुळे सर्वसाधारणपणे कठीण वाटणारी गीता समजून घेणे सामान्य माणसालाही सोपे झाले आहे ! 
संपर्क : ९३२२३१५३१७
सनातनची ग्रंथसंपदा आता SanatanShop.com वर खरेदीसाठी उपलब्ध !
     ‘देशातील नितीशकुमार, ममता बॅनर्जी, अखिलेश यादव ही आणि अशी धर्मनिरपेक्ष म्हणवणारी मंडळी पाकिस्तानी कलाकारांना भारतात बोलावतील; परंतु तस्लीमा नसरीन, वहिदा रहेमान यांना मात्र बोलावणार नाहीत.’
- तुफेल अहमद, ज्येष्ठ पत्रकार आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अभ्यासक

दैनिक सनातन प्रभातचा रंगीत दत्तजयंती विशेषांक

प्रसिद्धी दिनांक : १३ डिसेंबर २०१६
पृष्ठ संख्या : १२, मूल्य : ५ रुपये
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी १२ डिसेंबर
या दिवशी दुपारी ३ पर्यंत इआरपी प्रणालीत भरावी !

६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. संगीता घोंगाणे यांनी दिवाळीच्या कालावधीत स्वभावदोष आणि अहं निर्मूलन यांसाठी गुणरूपी १० देवदूतांना घेऊन करावयाच्या प्रयत्नांविषयी केलेले मार्गदर्शन

सौ. संगीता घोंघाणे
     ‘२२.१०.२०१६ या दिवशी ठाणे आणि मुंबई या जिल्ह्यांचा जिल्हा स्तरावरचा सत्संग दादर येथील सेवाकेंद्रात होता. त्या वेळी दिवाळीमध्ये साधनेसाठी करावयाच्या प्रयत्नांच्या संदर्भात ‘पुढील आठवड्याचे सर्वांचे नियोजन काय आहे ?’, असे सौ. घोंगाणेकाकूंनी (सौ. संगीता घोंगाणे यांनी) विचारल्यावर सर्व साधिकांच्या तोंडवळ्यावर ताण दिसला. त्या वेळी ‘दिवाळीची सिद्धता करायची आहे. फराळ आणि घराची स्वच्छता करायची आहे. सेवाही पुष्कळ आहेत; पण घरातील कामांना प्राधान्य द्यावे लागेल. पाहुण्यांचे आदरातिथ्य करावे लागेल. या सर्वांमधून व्यष्टी आणि समष्टी साधना यांचा मेळ कसा राखायचा ? पुढील ८ ते १० दिवसांमध्ये घरातील कृती करण्यात वेळ जाईल. मग आवरण वाढेल. ते घालवण्यासाठी परत काही दिवस वेळ जाईल. चुका होतील. त्यांचा ताण येईल’, असे सर्व विचार मनात येत होते. त्या वेळी सौ. घोंघाणेकाकूंच्या माध्यमातून गुरुदेवांनीच ‘खरी दिवाळी कशी साजरी करायची आणि दिवाळीचा खरा आनंद कसा घ्यायचा ?’, ते शिकवले. त्यांनी सांगितलेली सूत्रे पुढे देत आहे.’
- सौ. वेदिका पालन, डोंबिवली.

सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांच्यातील गुणमोती !

सद्गुरु
(कु.) अनुराधा वाडेकर
      ‘सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर (सद्गुरु अनुताई) देवद (पनवेल) येथील सनातन आश्रमात ३ - ४ दिवस आल्या होत्या. तेव्हा त्या व्यस्त दिनक्रमातही स्वयंपाकघरात येत असत. त्या प्रसंगी त्यांच्यातील पुढील गुणमोतींचा लाभ करून घेता आला.
१. प्रीतीचे मूर्तीमंत रूप 
      सद्गुरु अनुताई साधकांशी बोलत असतांना जणू ‘फुलांचा वर्षाव होत आहे’, असे वाटते. त्यांच्या लयबद्ध बोलण्याने मन मंत्रमुग्ध व्हायला लागते. त्यांचा सहवास हवाहवासा वाटतो. त्यांच्या दृष्टीतील सौंदर्य तर अवर्णनीय असते. त्या ‘आश्रमात येणार आहेत’, असे कळल्यावर उत्साह हृदयात मावत नाही. एकदा मी माझ्याकडून झालेली चूक त्यांना सांगितली. त्यांच्याशी बोलल्यावर माझी नकारात्मकता दूर होऊन उत्साह वाढला. सद्गुरु अनुताईंच्या साधकांविषयीच्या प्रेमाचे शब्दांत वर्णन करता येणार नाही.
     उच्च स्वर्गलोकातून जन्माला आलेला आणि ५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा चि. चरणदास रमानंद गौडा (वय ३ वर्षे), कर्नाटक याचा आज मार्गशीर्ष शुक्ल पक्ष एकादशी, १०.१२.२०१६ या दिवशी वाढदिवस आहे. त्याची गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.
चि. चरणदास रमानंद गौडा याला वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून शुभाशीर्वाद !

श्रीमद्भगवद्गीतेविषयी पाश्‍चात्त्य विद्वानांचे विचार

आज असलेल्या गीता जयंतीनिमित्त...
१. गीतेशी तुलना केल्यावर विश्‍वाचे संपूर्ण आधुनिक ज्ञान मला तुच्छ वाटते !
     ‘प्राचीन युगातील सर्व रमणीय वस्तूंमध्ये भगवद्गीतेपेक्षा श्रेष्ठ कोणतीही वस्तू नाही. गीतेत असे उत्तम आणि सर्वव्यापक ज्ञान आहे की, तिच्या रचनाकार देवास असंख्य वर्षे झाली, तरीही असा दुसरा एकसुद्धा ग्रंथ लिहिला गेला नाही. गीतेशी तुलना केल्यावर जगाचे संपूर्ण आधुनिक ज्ञान मला तुच्छ वाटते. मी नेहमी प्रातःकाळी माझ्या हृदय आणि बुद्धी यांना गीतारूपी पवित्र जलाने स्नान घालतो.’ - तत्त्ववेत्ता थोरो, अमेरिका
२. भारताचा राष्ट्रीय धर्मग्रंथ होण्याच्या पात्रतेसाठी ज्या ज्या 
विशेष गुणांची आवश्यकता आहे, ते सर्व गुण श्रीमद्भगवद्गीतेेत मिळतात !
     ‘श्रीमद्भगवद्गीता भारताच्या विविध मतांना जुळवणारा रज्जू, तसेच राष्ट्रीय जीवनाची अमूल्य संपत्ती आहे. भारताचा राष्ट्रीय धर्मग्रंथ होण्याच्या पात्रतेसाठी ज्या ज्या विशेष गुणांची आवश्यकता आहे, ते सर्व गुण श्रीमद्भगवद्गीतेेत मिळतात. यात केवळ उपयुक्त गोष्टीच आहेत, असे नाही तर हा भावी विश्‍वधर्माचा सर्वोपरी धर्मग्रंथ आहे. भारताच्या उज्ज्वल इतिहासाचे हे महादान मानवजातीच्या भावी उत्कर्षाचे निर्माते आहे.’ - एफ्.टी. ब्रूक्स

स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रियेतून साधकांना वैराग्याकडे नेणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

श्री. राम होनप
     ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया राबवण्यास शिकवली. त्यात साधक विविध प्रसंगांत मनात येणार्‍या अपेक्षांचे विचार न्यून करण्यासाठी सारणी लिखाण करतात आणि स्वयंसूचनांची सत्रे करतात. असे काही काळ प्रयत्न केल्यावर साधकांमधील अपेक्षांचे प्रमाणही न्यून होऊ लागते. 
     अपेक्षाविरहित कर्म म्हणजे वैराग्य. वैराग्याच्या या व्याख्येनुसार पाहिले, तर साधकांमधील अपेक्षांचे प्रमाण हळूहळू न्यून होणे, म्हणजे असे साधक वैराग्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे लक्षण आहे. पूर्वी कठोर तपश्‍चर्या करून ऋषींना वैराग्य प्राप्त होत असे. आता परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रियेतून सहज अन् सुलभ पद्धतीने अपेक्षा न्यून करण्याची पद्धत साधकांना शिकवली आहे. ही पद्धत अभिनव आणि अलौकिक आहे !’ 
- श्री. राम होनप, सनातन आश्रम रामनाथी, गोवा. (२०.९.२०१६)

श्री. नंदकुमार कैमल यांना आलेल्या अनुभूती

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...
परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले
श्री. नंदकुमार कैमल
१. ‘५.१०.२०१६ या दिवशी पहाटे ३.४५ वाजता उठल्यापासून मला आतून पुष्कळ उत्साह वाटत होता आणि दिवसभर मन सकारात्मक होते. 
२. आज दिवसभर मनाने रामनाथी आश्रमात असल्यासारखा भाव जाणवत होता.
३. काही कारण नसतांना रात्री ९ वाजता प.पू. डॉक्टरांची आठवण येऊन भावजागृती व्हायला लागली. आज दिवसभरात देवाने १०.३० घंटे सेवा आणि ४ घंटे नामजपादी उपाय करून घेतल्यामुळे कृतज्ञता वाटू लागली. 
४. बर्‍याच दिवसांनी काही प्रयत्न न करता रात्री ईश्‍वरप्राप्तीचे विचार पुष्कळ वाढले. याचे कारण कळले नाही; पण ‘प.पू. डॉक्टर जे काही घडवतात, ते आपल्या भल्यासाठी असते’, असा विचार मनात आला.
        ‘प.पू. डॉक्टरांनी माझे मन सतत त्यांच्या चरणी ठेवावे’, हीच श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना.’
- श्री. नंदकुमार कैमल, केरळ (१८.१०.२०१६)

देवद आश्रमात प्रवेश करताच विसरून जातो जगाचे भान ।

कु. उदय पाटील
देवद आश्रमातील वातावरण 
आहे खूपच छान ।
साधकांचा मंजूळ आवाज ऐकून 
तृप्त होतात कान ॥ १ ॥

संतांची वाणी ऐकून पक्षीही 
डोलवतात मान ।
सात्त्विक वातावरण 
आकर्षित करून घेते ध्यान ॥ २ ॥

देवद आश्रमातील ध्यानमंदिरात बसून नामजप करतांना आलेल्या अनुभूती

कु. मनीषा शिंदे
१. ‘मी रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमातील प.पू. गुरुदेवांच्या खोलीत सूक्ष्मातून गेले. तेथे मला श्रीकृष्णाचे विराट रूप जाणवले. 
२. मला तेथून संपूर्ण ब्रह्मांडात चैतन्याचे प्रक्षेपण होत असल्याचे सूक्ष्मातून दिसले. 
३. नंतर त्या चैतन्याचा ओघ प्रथम संतांकडे आणि संतांकडून शरणागतभाव असणार्‍या साधकांकडे जातांना सूक्ष्मातून दिसला.’ 
- कु. मनीषा शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१२.८.२०१६)

गंभीर आजारपणात महर्षींनी सांगितलेले उपाय आणि संतांनी केलेले उपाय वाचून कु. दीपाली मतकर हिने त्या सर्वांप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता !

कु. दीपाली मतकर
     ‘रामनाथी आश्रमात आल्यावर मी आजारी असतांना संतांनी माझ्यासाठी काय उपाय केले आणि महर्षींनी कोणते उपाय करायला सांगितले, याविषयीच्या धारिका मला वाचायला मिळाल्या. त्या धारिका वाचत असतांना त्या उपायांचा परिणाम माझ्यावर होत होता. महर्षी आणि सर्व संत यांनी सूक्ष्मातून केलेले उपाय यांमुळे माझे प्राण वाचल्याचे लक्षात आले आणि मन कृतज्ञतेने भरून आले.
१. पू. गाडगीळकाकांनी सूक्ष्मातून केलेल्या उपायांमुळे 
त्रास उणावून ‘काय चालू आहे’, ते लक्षात येऊ लागणे 
     ‘दैनिक सनातन प्रभातमध्ये छापून आलेल्या लेखाप्रमाणे पू. गाडगीळकाकांनी २४.१०.२०१६ या दिवशी रात्री ९.४५ ते २.३० या वेळी सहस्रारचक्र आणि आज्ञाचक्रावर न्यास करून सूक्ष्मातून उपाय केले.

समष्टी सेवा करणारी सून आणि मुलगा यांना सेवेचा वेळ घरगुती गोष्टींसाठी द्यावा लागू नये, यासाठी कधीही बाहेरगावी न जाता सेवाभावाने घरी राहून साधना करणारी एक आदर्श साधक-गृहिणी !

    ‘बाहेर जाऊन सेवा करता येत नाही; म्हणून खंत वाटणार्‍या सर्वांसमोर या साधक-गृहिणीने एक आदर्श ठेवला आहे.’ - (परात्पर गुरु) डॉ. आठवले 
     ‘घरातील काही वैयक्तिक अडचणींमुळे मी गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून घरी राहून सेवा करते. घरची कामे आणि सेवा यांमुळे मी केवळ अत्यावश्यक कारणांसाठीच बाहेरगावी जाते. माझा मुलगा आणि सून हेही पूर्णवेळ सेवा करतात. त्यामुळे आमचे काही नातेवाईक आणि परिचित यांना वाटते, ‘मलाच कुठे बाहेरगावी जायला आवडत नाही. मला बाहेर पडण्याचा कंटाळा आहे. मी घरातील मायेत पुष्कळ अडकले आहे. त्यामुळे मला घर सोडवत नाही.’ त्यामुळे ते सर्व जण मला नेहमी त्यांच्या घरी रहाण्यास बोलावतात. काही जण म्हणतात, ‘‘चार दिवस तू आमच्याकडे ये. घरातील सर्व सून सांभाळेल.’’

जीवनाच्या खडतर वाटचालीत देवावरील अतूट श्रद्धेच्या बळावर स्थिर रहाणार्‍या ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती सुलभा मालखरेआजी (वय ७५ वर्षे) !

श्रीमती सुलभा मालखरे
    ‘देवद आश्रमाजवळील सनातन संकुलात रहाणार्‍या श्रीमती सुलभा मालखरेआजींचा १०.१२.२०१६ या दिवशी वाढदिवस आहे. त्यानिमित्त सहसाधिकांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये देत आहोत. 
श्रीमती सुलभा मालखरेआजींना वाढदिवसानिमित्त 
सनातन परिवाराच्या वतीने नमस्कार !
     तत्त्वनिष्ठता ज्यांच्या उरी तोच जगाला उद्धरी ।
     अशी आमची माय माऊली क्षणभरी उभा देव त्यांच्या दारी ।
वरील ओळी ज्यांना लागू होतात, अशा आमच्या धीरोदात्त श्रीमती सुलभा मालखरेआजी !

१०.१२.२०१६ ते १०.५.२०१७ या कालावधीत सर्वांनी करावयाचे नामजपादी उपाय : महर्षींनी जीवनाडीपट्टीत सांगितलेल्या उपायांच्या जोडीला पुढील उपायही करावेत.

१. विविध चक्रांवर देवतांची चित्रे लावणे
     देवतेचे चित्र शरिराला स्पर्श करून बाहेरच्या दिशेने मुख करून (निर्गुण) ठेवायचे कि आतल्या दिशेने मुख करून (सगुण) ठेवायचे, हे येथे दिले आहे. संबंधित देवतेची नामपट्टी वापरायची असल्यास तिच्या अक्षरांच्या संदर्भात तसेच करता येईल. अनाहतचक्राच्या खालील चक्रांसाठी नामपट्टीचा उपयोग करावा.
टीप १ - पुढे म्हणजे शरिराचा पुढचा भाग (चक्राशी संबंधित भाग)
टीप २ - पाठी म्हणजे शरिराचा पाठचा भाग (चक्राशी संबंधित भाग)
२. जप
     सध्या आपत्काळाची तीव्रता वाढत आहे. कालमाहात्म्यानुसार सर्वसाधारणपणे सध्या साधकांना होणार्‍या त्रासांपैकी ७० टक्के त्रास समष्टी स्तरावरील, तर ३० टक्के त्रास व्यष्टी स्तरावरील आहे.

चुका सुधारण्यासाठी गुरुकृपायोगानुसार साधनेचे प्रयत्न कसे करावेत, याविषयी देवाने सुचवलेली सूत्रे

श्री. विक्रम डोंगरे
१. सहसाधकांनी चुका सांगितल्यावर मनाचा संघर्ष होणे 
      ‘२८.८.२०१६ या दिवशी सहसाधकांनी मला माझ्याकडून सेवेत होणार्‍या चुकांची जाणीव करून दिली. आरंभी माझ्या मनाचा संघर्ष झाला. माझ्या मनात नकारात्मक विचार येऊन ‘परिस्थितीला दोष देणे, ‘स्वतः प्रयत्न करत आहेच’, असा विचार येणे आणि सहसाधकांमधील दोष पहाणे’, असा भाग झाला. त्याच वेळी दुसर्‍या बाजूला ‘आपल्याला अंतर्मुख व्हायचे आहे आणि त्यासाठी सकारात्मक रहायला हवे’, असे विचारही मनात येत होते. तेव्हा मी माझ्या आध्यात्मिक मित्राशी बोललो. त्यांनी काही आध्यात्मिक दृष्टीकोन देऊन प्रोत्साहन दिले.

कुशाग्र बुद्धीमत्तेची देणगी लाभलेली, पारितोषिकांची रक्कम आणि खाऊचे पैसे स्वत:हून अर्पण करणारी ५५ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली सांगलीतील कु. प्रणिता प्रशांत जोशी (वय १४ वर्षे) !

उच्चलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र 
(सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. प्रणिता जोशी ही एक आहे !
कु. प्रणिता जोशी
     (कु. प्रणिताची वर्ष २०११ मध्ये ५१ टक्के आध्यात्मिक पातळी होती. - संकलक)
पालकांनो, हे लक्षात घ्या ! 
     ‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ - (परात्पर गुरु) डॉ. आठवले 
     यासमवेतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.

बोधचित्र

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज सनातनचे श्रद्धास्थान
गुरूंकडे काय मागावे ?
माझ्याकडे सुख मागू नका, दुःख सहन करण्याचे बळ मागा.
     भावार्थ : सुख हे प्रकृतीतील असल्याने अशाश्‍वत असते, म्हणून गुरूंकडे मागू नये. तसेच हेही लक्षात ठेवले पाहिजे की, शाश्‍वत आनंद मिळवून देणे, हेच गुरूंचे खरे कार्य असते. प्रारब्धामुळे दुःख भोगावे लागणार असल्यास, त्या दुःखदायक प्रसंगांमुळे होणारे दुःख सहन करण्याची शक्ती मात्र गुरु निश्‍चित (नक्कीच) देतात; म्हणून ती मागायला आडकाठी (हरकत) नाही
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)
परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

(परात्पर गुरु) डॉ. आठवले
     जनता राष्ट्र-धर्म प्रेमी असेल, तरच लोकशाहीला अर्थ असतो, म्हणजे जनता राष्ट्र-धर्म प्रेमी उमेदवारांना निवडते, स्वार्थी आणि धर्मांध उमेदवारांना निवडत नाही. भारताची स्थिती तशी नसल्याने स्वातंत्र्यापासून आतापर्यंत सर्वच क्षेत्रांत भारताची परमावधीची अधोगती झाली आहे. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

गीतेवर बंदी येऊ नये; म्हणून हिंदु राष्ट्राची स्थापना करा !

      ‘तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्‍चयः ।’ (श्रीमद्भगवद्गीता, अध्याय २, श्‍लोक ३७), म्हणजे ‘हे कुंतीपुत्र अर्जुना, तू युद्धाचा निश्‍चय करून उभा रहा.’ या ओळीवरून उद्या ‘गीता दहशतवाद पसरवते’, असे म्हणून सरकारने तिच्यावर बंदी घातल्यास आश्‍चर्य वाटायला नको. इतर धर्मांत याहून भयानक अनेक वाक्ये असूनही ‘त्या संदर्भात सरकार काही करणार नाही’, याचीही खात्री बाळगा. गीतेवर बंदी येऊ नये; म्हणून हिंदु राष्ट्राची स्थापना अनिवार्य आहे.’ 
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

असत्याचा विजय तात्पुरताच !
सत्य हे स्वयंप्रकाशी असते. ‘कलियुगात असत्याचा विजय होतो’, 
असे वाटले, तरी नित्य हे लक्षात ठेवावे की, हा विजय तात्पुरता असतो !
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

विरोधकांचा पोरकटपणा !

संपादकीय 
     ‘संसदेचे कामकाज सुरळीतपणे चालवण्यासाठी तुम्हाला लोकांनी निवडून दिले आहे. नियतीने आपल्यावर सोपवलेले दायित्व योग्य प्रकारे पार पाडा’, असा खरमरीत सल्ला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सर्वच खासदारांना दिला आहे. नोटाबंदीच्या सूत्रावरून प्रतिदिन गोंधळात स्थगित होणार्‍या संसदीय कामकाजासंदर्भात राष्ट्रपती मुखर्जी यांनी चिंतायुक्त स्वरात नाराजी व्यक्त केली. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात यंदा ८ डिसेंबरपर्यंत लोकसभेत १४ टक्के, तर राज्यसभेत २0 टक्के इतके अत्यल्प कामकाज झाले आहे. लालकृष्ण अडवाणी यांनीही संसदीय कार्यमंत्री अनंतकुमार यांना खडसवले आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn