Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कोटी कोटी प्रणाम !

गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांची आज पुण्यतिथी

तोंडी तलाक पद्धत घटनाबाह्य ! - अलाहाबाद उच्च न्यायालय

     नवी देहली - मुसलमान समाजात प्रचलित असलेली तोंडी तलाकची पद्धत घटनाबाह्य आहे. ही प्रथा मुसलमान महिलांच्या अधिकारांचे उल्लंघन करणारी आहे, असा निर्णय अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला आहे. ‘कोणतेही वैयक्तिक कायदेमंडळ हे घटनेपेक्षा मोठे नाही’, अशा शब्दांत ‘मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डा’लाही न्यायालयाने फटकारले आहे. तोंडी तलाकचे समर्थन करणार्‍या ‘ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डा’ने मात्र अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे.
     तीन वेळा तोंडी तलाक म्हणण्याच्या पद्धतीला काही मुसलमान महिला आणि संघटना यांनी सर्वोच्च न्यायालयासह विविध उच्च न्यायालयांमध्ये आव्हान दिले आहे. केंद्र सरकारनेही प्रतिज्ञापत्राद्वारे या पद्धतीला आणि बहुपत्नीत्वाला न्यायालयात विरोध दर्शवला आहे. याच संदर्भातील एका याचिकेवर ८ डिसेंबरला अलाहाबाद उच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्या वेळी खंडपिठाने तोंडी तलाक घटनाबाह्य असल्याचे स्पष्ट केले. अशा तलाक पद्धतीला कुराणातही आक्षेप घेण्यात आल्याचे खंडपिठाने या वेळी निदर्शनास आणले.
शहाबानोसारखे व्हायला नको ! - उद्धव ठाकरे
    अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा सन्मान करावा.

नोटाबंदी हा यज्ञ ! - पंतप्रधान मोदी

नोटाबंदी हा यज्ञ असेल तर यज्ञात सर्वसामान्यांची नव्हे, तर
काळा पैसेवाल्यांची आहुती पडावी, अशीच जनतेची अपेक्षा आहे !
     नवी देहली - केंद्र सरकारचा नोटाबंदीचा निर्णय हा भ्रष्टाचार, आतंकवाद आणि काळा पैसाधारक यांच्या विरोधातील यज्ञ आहे. याचा देशातील ग्रामीण जनतेला आणि मजुरांना लाभच होईल, असा विश्‍वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. नोटाबंदीच्या या यज्ञाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य करणार्‍या देशवासियांना मी सलाम करतो, असे मोदी यांनी ट्विट करून म्हटले आहे. नोटाबंदीला एक मास पूर्ण होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर विरोधकांनी ८ डिसेंबरला ‘काळा दिवस’ पाळला. या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करून नोटाबंदीच्या निर्णयाचे समर्थन केले. ‘नव्या तंत्रज्ञानाच्या वापरात आघाडीवर असलेल्या भारताला नोटाबंदी ही ‘कॅशलेस’ अर्थव्यवस्थेकडे नेण्यासाठी मिळालेली ऐतिहासिक संधी आहे’, असेही त्यांनी नमूद केले.

नोटाबंदीमुळे उद्योग आणि रोजगार क्षेत्रावर दुष्परिणाम होण्याची शक्यता ! - असोचेम

नोटाबंदीच्या निर्णयाचा सामान्य जनतेला फटका बसू नये, यासाठी 
शासनकर्त्यांनी सुनियोजन करून त्याची कार्यवाही करणे आवश्यक !
     नवी देहली - नोटाबंदीच्या निर्णयाला एक मास पूर्ण झाला आहे. यावर देशातील उद्योगक्षेत्राचे प्रतिनिधित्व करणार्‍या ‘असोचेम’ (द असोसिएटेड चेंबर ऑफ कॉमर्स ऑफ इंडिया) संघटनेचे अध्यक्ष सुनील कनोरिया यांनी ‘या निर्णयामुळे भारतीय उद्योगक्षेत्राला काही प्रमाणात फटका बसेल, तसेच यामुळे देशातील अनेकांना रोजगार गमवावा लागणार आहे’, असे म्हटले आहे. नोटाबंदीला एक मास झाल्यानंतरही देशातील अनेक ठिकाणी बँकांच्या शाखांपुढे, एटीएम्पुढे रोकड घेण्यासाठी नागरिकांना रांगा लावाव्या लागत आहेत. त्यातही प्रत्येकाला हवी असलेली रक्कम मिळेल, याची काहीच शाश्‍वती नाही. त्यातच सहकारी बँकांमधील रोकड उपलब्धतेची स्थिती गंभीर आहे, असेही ते म्हणाले.

१० डिसेंबरनंतर रेल्वेमध्ये ५०० रुपयांच्या जुन्या नोटा चालणार नाहीत !

     नवी देहली - १० डिसेंबरनंतर रेल्वे, मेट्रो आणि सरकारी बस येथे ५०० रुपयांच्या जुन्या नोटा स्वीकारल्या जाणार नाहीत. दूधविक्रीची दुकाने आणि अन्य १४ ठिकाणी अजूनही ५०० रुपयांच्या जुन्या नोटा स्वीकारल्या जाणार आहेत.

भुजबळ यांना ‘बॉम्बे हॉस्पिटल’ येथून जे.जे.मध्ये हालवले

     मुंबई - महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना ‘बॉम्बे हॉस्पिटल’तून जे.जे. रुग्णालयात हालवण्यात आले आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे गेले १ मास भुजबळांवर बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार चालू होते. काही दिवसांपूर्वी ते रुग्णालयाच्या लॉबीमध्ये फिरत असल्याची तक्रार ईडीकडे करण्यात आली होती. (भुजबळ यांना काय आजार आहे आणि त्यांना रुग्णालयात का प्रविष्ट करण्यात आले, हे जनतेला समजायला हवे ! - संपादक)

बडोद्यात धर्मांधांनी वरातीवर दगडफेक केल्याने हिंसाचार !

मोहल्ल्यातच हिंसाचार आणि दंगली का होतात,
याचे उत्तर निधर्मीवादी अन् पुरोगामी देतील का ?
  • ५ पोलीस घायाळ
  • पोलिसांच्या वाहनावर गावठी बॉम्ब फेकले !
      बडोदा - ७ डिसेंबरला मध्यरात्री येथील जुन्या शहरात मुसलमानबहुल फतेहपुरा मोहल्ल्यातून एका विवाहाची वरात जात असतांना त्यावर धर्मांधांनी दगडफेक केली. या वेळी झालेल्या हिंसाचारात एक चारचाकी आणि दुचाकी जाळण्यात आली, तर पोलिसांच्या वाहनावर गावठी बॉम्ब फेकण्यात आले. पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. या हिंसाचारात ५ पोलीस घायाळ झाले. पोलिसांनी प्रथम दोन्ही गटांना समजावण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांच्या वाहनावर गावठी बॉम्ब फेकल्यावर पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्यावर जमावाने दगडफेक चालू केली.

काश्मीरमध्ये आतंकवाद्यांचा बँकेवर दरोडा !

काश्मीरमध्ये राज्य सरकारचे कि आतंकवाद्यांचे ?
     पुलवामा - दक्षिण काश्मीरमधील पुलवामामध्ये ४-५ आतंकवाद्यांनी जम्मू अ‍ॅण्ड काश्मीर बँकेच्या शाखेत घुसून १० लाख रुपये लुटले. बडगाम जिल्ह्यातील याच बँकेच्या शाखेतही दरोड्याचा प्रयत्न झाला; मात्र हा प्रयत्न अयशस्वी ठरला. नोव्हेंबर महिन्यात बडगामच्या याच शाखेत १२ लाख रुपयांची चोरी झाली होती. याप्रकरणी पोलिसांनी लष्कर-ए-तोयबाशी संबंधित आतंकवाद्यांना अटक केली होती. बँक लुटल्याने आतंकवाद्यांना आणि त्यांच्या कारवायांना नोटाबंदीमुळे आळा बसला आहे का, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

पाकमध्ये अहमदियांनी स्वत:ला मुसलमान समजल्यास कारावासाची शिक्षा !

जातीव्यवस्थेच्या नावावर हिंदु धर्माला लक्ष्य करणारे 
 पुरोगामी मुसलमानांच्या या कट्टरतावादावर का बोलत नाहीत ?
     
     इस्लामाबाद - पाकमध्ये अहमदियांना स्वत:ला मुसलमान समजण्याचा अधिकार नाही. कोणी अहमदिया स्वत:ला मुसलमान समजत असल्यास कायद्यानुसार त्याला कारावासही होऊ शकतो. याला अहमदिया असलेले पाकचे पहिले नोबेल पारितोषिक प्राप्त शास्त्रज्ञ प्रा. अब्दुससलामही अपवाद नव्हते. पाकमध्ये त्यांच्याकडेही तब्बल ३० वर्षे दुर्लक्ष करण्यात आले. 

काश्मीरमध्ये ३ आतंकवादी ठार !

आतंकवादग्रस्त भारत !
     श्रीनगर - काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील अरवानी भागात सैन्य आणि आतंकवादी यांत झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तोयबाचे ३ आतंकवादी ठार झाले आहेत. ठार करण्यात आलेल्या तिघांपैकी एक आतंकवादी हा जुनैद मट्टू असल्याची माहिती सुरक्षा दलाने दिली.
डेहराडून येथे पाकच्या क्रिकेट खेळाडूंचे समर्थन करणार्‍या काश्मिरी मुसलमान विद्यार्थ्यांचा हिंदु संघटनांकडून विरोध !

पाकचे समर्थन करणार्‍यांना केवळ हिंदुत्वनिष्ठ संघटनाच विरोध करतात !
कम्युनिस्ट, पुरोगामी, निधर्मीवादी आणि अन्य धर्मियांच्या संघटना कधी
अशा देशद्रोह्यांचा विरोध करण्यासाठी पुढे येत नाहीत, हे लक्षात घ्या !
     डेहराडून (उत्तराखंड) - येथील कुआंवाला स्थित एक पॅरामेडिकल महाविद्यालयात शिकणार्‍या काश्मिरी मुसलमान विद्यार्थ्यांनी सामाजिक माध्यमांतून पाकच्या क्रिकेटपटूंचे समर्थन केल्याचा येथील हिंदुत्वनिष्ठ संघटनाच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला. त्यांनी महाविद्यालयात जाऊन केलेल्या या विरोधामुळे दोन्ही गटांमध्ये दगडफेक झाली. यामुळे पोलिसांनी त्यांन पांगवण्यासाठी सौम्य लाठीमार केला. पोलिसांनी या प्रकरणी ३ काश्मिरी विद्यार्थ्यांना कह्यात घेतले. या दगडफेकीत २ जण घायाळ झाले. हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी पाकचे समर्थन करणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये आतंकवादाच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ !

केंद्र सरकार आणि राज्यातील पीडीपी-भाजप सरकार यांच्या 
 निष्क्रीयतेचा परिणाम ! काँग्रेस सरकारच्या काळापेक्षाही जर 
काश्मीरची  परिस्थिती अधिक बिघडत असेल, तर त्याचे दायित्व सरकारचेच आहे ! 
     नवी देहली - जम्मू-काश्मीरमध्ये आतंकवादी घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. आतंकवाद्यांनी सुरक्षारक्षकांवर केलेल्या आक्रमणांमध्येही वाढ झाली आहे. गेल्या ४ वर्षांत ही वाढ झाली आहे, अशी माहिती गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी लोकसभेत विचारण्यात आलेल्या प्रश्‍नावर दिली. (नुसती मार खाण्याची आकडेवारी देणारे मंत्री काय कामाचे ? या घटना कशा रोखणार, हे का सांगत नाहीत ? - संपादक) बुरहान वानीच्या मृत्यूनंतर काश्मीरमध्ये चालू झालेल्या हिंसाचारानंतरच अशा घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. 

केरळ उच्च न्यायालयाकडून पद्मनाभस्वामी मंदिरात चुडीदार घालून प्रवेश करण्यावर बंदी कायम !

     कोच्ची (केरळ) - केरळच्या पद्मनाभस्वामी मंदिरात महिलांना चुडीदार आणि पायजमा परिधान करून प्रवेश करण्यास मंदिर समितीकडून घालण्यात आलेली बंदी केरळ उच्च न्यायलयाने कायम ठेवली आहे. मंदिराच्या प्रथा-परंपरा पहाता मंदिर समितीने घेतलेला हा निर्णय योग्यच असल्याचे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. काही दिवसांपूर्वी ही परंपरा मोडीत काढत महिला भाविकांना मंदिर प्रवेशासाठी पोशाखात सवलत देण्यात आली होती. त्यामुळे महिला सलवार कमीज आणि चुडीदार परिधान करून पूजापाठ करू शकत होत्या. मंदिराचे कार्यकारी अधिकारी के.एन्. सतीश यांनी हा निर्णय घेतला होता. या निर्णयावर मंदिराच्या प्रमुखांनी आक्षेप घेतला होता. (मंदिराचे सरकारीकरण झाल्यावर असे धर्मद्रोही निर्णय घेतले जातात, हे हिंदूंनी लक्षात घ्यावे आणि मंदिर सरकारीकरणाला विरोध करावा ! - संपादक) त्यानंतर केरळ उच्च न्यायालयात एक जनहित याचिका प्रविष्ट करण्यात आली होती. या याचिकेवर हा निकाल देण्यात आला.

भारताचा विरोध असतांनाही पाकिस्तान सिंधू नदीवर धरण बांधणार !

भारताला न जुमानणारा मुजोर पाक ! 
     नवी देहली - पंतप्रधान नवाज शरीफ यांनी दिमीर-भाशा या सिंधू नदीवरील धरणाच्या निधीला मान्यता दिली असून पुढील वर्षी या धरणाच्या बांधकामाला प्रारंभ करण्याची सूचनाही यांनी जल-विद्युत विभागाच्या सचिवांना दिली आहे, असे पाकिस्तान रेडिओच्या वृत्तात म्हटले आहे. पाककडून उभारण्यात येणार्‍या या धरणावर भारताने तीव्र आक्षेप घेतला आहे. (पाकमध्ये जाणार्‍या नद्यांवर धरणे बांधून भारत पाकला धडा शिकवणार आहे का ? - संपादक) 
     भारताचा दावा असलेल्या पाकव्याप्त काश्मीरमधील गिलगिट-बाल्टिस्थान भागातील परिसरात पाकिस्तान हे धरण बांधणार आहे. या धरणासाठी १४ बिलियन अमेरिकी डॉलर्स (अनुमाने ९३ सहस्र ८०० कोटी) इतका व्यय (खर्च) अपेक्षित आहे. पाकिस्तानने भारताकडून ‘ना हरकत’ मिळवली नसल्यामुळे २ वर्षांपूर्वी जागतिक बँकेने आणि मागील वर्षी एशियन डेव्हलपमेंट बँकेने या धरणासाठी निधी देण्यास नकार दिला होता.

चेन्नईमध्ये सराफाच्या घरावर प्राप्तीकर विभागाच्या छाप्यात ९० कोटी रुपये आणि १०० किलो सोने जप्त !

अशा भ्रष्टाचार्‍यांच्या विरोधात तात्काळ खटला चालवून
त्यांना कठोरातील कठोर शिक्षा द्यायला हवी !
     चेन्नई - ८ डिसेंबरला येथे ८ ठिकाणी एकाच वेळी छापा मारून प्राप्तीकर विभागाने पैसे पालटून देण्याचे एक मोठे जाळे उघडकीस आणले. प्राप्तीकर विभागाच्या अधिकार्‍यांनी येथे एका सराफाच्या घरातून १०० किलो सोने आणि ९० कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. यात ७० कोटी रुपयांच्या नव्या नोटा आहेत.

अमेरिकेत भगवान कृष्णाला बाहुल्याच्या रूपात दाखवून विडंबन !

जगात हिंदूंचे परिणामकारक संघटन नसल्याचा परिणाम !
     नेवाडा (अमेरिका) - लॉस एंजेलिस येथील ‘ला लुझ द जिझस’ या कलादालनात आयोजित केलेल्या ‘प्लास्टिक रिलिजन’ या प्रदर्शनात मारियानेला पेरेली आणि पूल पावलोनी या अर्जेन्टिनाच्या कलाकारांनी हिंदूंचे आराध्य दैवत भगवान कृष्णाला ‘केन’ नावाने प्रचलित असलेल्या बाहुल्याच्या रूपात प्रदर्शित केले आहे. याचा तेथील हिंदूंनी तीव्र निषेध केला आहे. अमेरिकेतील हिंदूंचे धार्मिक नेते श्री. राजन झेद यांनी ‘भगवान कृष्णाच्या रूपातील बाहुलीला प्रदर्शनातून तात्काळ काढून टाकावे’, अशी मागणी केली आहे. (परदेशातील हिंदूंचे धार्मिक नेते देवतांच्या अनादराचा निषेध तरी करतात, तर भारतात मात्र स्वतःला हिंदूंचे नेते म्हणवणारे आणि त्यांच्या संघटना याविषयी निष्क्रीयच असतात ! - संपादक)      नॉर्थ अमेरिकेतील ‘मॅट्टल’ या नामांकित आस्थापनाचा ‘केन’ हा ट्रेडमार्क आहे. वर्ष १९८६ मध्ये स्थापन झालेले ‘ला लुझ द जिझस’ हे कलादालन लॉस एंजेलिसमधील सर्वांत महत्त्वाचे कलादालन म्हणून प्रसिद्ध आहे. बिली शायर आणि मॅट कानडी हे त्या कलादालनाचे मालक अन् संचालक आहेत. वर्ष १९६१ मध्ये मॅट्टल आस्थापनाने ‘बार्बी’ बाहुलीचा काल्पनिक प्रियकर म्हणून ‘केन’ हा बाहुला बाजारात आणल्याचे म्हटले जाते.

हिंदु नेत्यांच्या हत्यांची केंद्रीय अन्वेषण विभागाकडून चौकशी करण्याची मागणी

हिंदु जनजागृती समितीकडून एर्नाकुलम् (केरळ) येथील जिल्हाधिकार्‍यांना निवेदन सादर
     एर्नाकुलम् (केरळ) - केरळमधील हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या नेत्यांच्या हत्यांच्या प्रकरणांची केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (सीबीआयकडून) अन्वेषण करण्याची मागणी करणारे एक निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने एर्नाकुलम् जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री. नंदकुमार कैमल आणि कु. रश्मी परमेश्‍वरन् यांनी हे निवेदन जिल्हाधिकारी महंमद सरिफुल्ला यांना दिले.
     ‘या हत्या प्रकरणातील आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, तसेच राज्यातील हिंदुत्वनिष्ठ नेत्यांना सुरक्षा पुरवण्यात यावी’, अशी मागणी या निवेदनामध्ये करण्यात आली आहे.
     याविषयी योग्य कारवाई करण्याचे आश्‍वासन जिल्हाधिकार्‍यांनी हिंदु जनजागृती समितीच्या प्रतिनिधींना दिले.

 

शिवचरित्र अभ्यासणे ही काळाची आवश्यकता ! - श्री. विशाल मोहिते, अधिवक्ता, मुंबई उच्च न्यायालय

‘रौद्रशंभो मंडळा’च्या वतीने शिवप्रताप दिनानिमित्त महाआरतीचे आयोजन 
     नवी मुंबई, ८ डिसेंबर (वार्ता.) - छत्रपती शिवाजी महाराजांनी भवानीमातेच्या आशीर्वादाने धर्मकार्य करून विजय मिळवला. आपणही निर्भयपणे धर्मकार्य केले पाहिजे. शिवाजी महाराजांच्या चरित्रातून आपण आपल्यापेक्षा सामर्थ्यवान, जीवघेण्या संकटांपुढे डगमगून न जाता त्यांचा धैर्याने आणि बुद्धीने सामना करायला शिकले पाहिजे. शिवचरित्र अभ्यासणे ही काळाची आवश्यकता आहे, असे मत मुंबई उच्च न्यायालयाचे अधिवक्ता श्री. विशाल मोहिते यांनी व्यक्त केले. येथे ‘रौद्रशंभो मंडळा’च्या वतीने शिवप्रताप दिनानिमित्त महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. 
     या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतींना उजाळा देणारे पोवाडे, गीते आणि महाराजांची आरती म्हणण्यात आली. मंडळाच्या वतीने शिवप्रताप दिन साजरा करण्याचे हे ३ रे वर्ष आहे. या वेळी मंडळाचे ५५ कार्यकर्ते उपस्थित होते.

‘छत्रपती शिवाजी टर्मिनस’चे नाव आता ‘छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस’ !

     मुंबई - सीएस्टी अर्थात ‘छत्रपती शिवाजी टर्मिनस’ आणि ‘छत्रपती शिवाजी विमानतळ’ या दोन्हींची नावे पालटली जाणार आहेत. यापुढे या दोघांचा उल्लेख ‘छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस’ आणि ‘छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ’, असा होईल. आधीच्या ‘छत्रपती शिवाजी टर्मिनस’ या नावात ‘महाराज’ या शब्दाचा उल्लेख नव्हता. (वास्तविक नामांतर करतांनाच अशा क्षुल्लक चुका कशा होतात ? - संपादक) त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. या नामकरणाला राज्यशासनाच्या कॅबिनेट मंत्रीमंडळाने संमती दिली आहे.

नालासोपारा येथे हिंदु धर्मजागृती सभा !

वार आणि दिनांक : रविवार, ११ डिसेंबर २०१६
वेळ : सायंकाळी ५.३० वाजता
स्थळ : विद्या वारिधी विद्यालय, वालई पाडा मार्ग, संतोषभुवन, नालासोपारा (पू.)
संपर्क क्रमांक : ९५५२४०२९९९, ९९२०२०८९५८
हिंदूंनो, मोठ्या संख्येने सहभागी व्हा !

अँजेला मर्केल जर्मनीमध्ये बुरख्यावर बंदी आणण्याच्या प्रयत्नात !

मुसलमान शरणार्थींचे समर्थक असणार्‍या मर्केल यांनी
असा प्रयत्न करणे, हे भारत सरकारलाही शिकण्यासारखे !
     बर्लिन - जर्मनीच्या चान्सलर अँजेला मर्केल जर्मनीमध्ये बुरख्यावर बंदी आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. वर्ष २०१५ मध्ये जर्मनीमध्ये मोठ्या प्रमाणात मुसलमान शरणार्थी आले होते; मात्र पुन्हा असे होणार नाही. ‘जर्मनीमध्ये नवीन आलेल्यांनी येथील लोकांमध्ये मिसळायला हवे. त्यासाठी त्यांनी बुरखा घालू नये, अशी जर्मनीची अपेक्षा आहे’, असे त्यांनी म्हटले आहे.
     मर्केल या चान्सलरपदासाठी चौथ्यांदा उभ्या रहाणार आहेत. त्यांनी यापूर्वी ‘मुसलमान शरणार्थी देशासाठी संकट आहेत’, अशी जनतेकडून होत असलेली टीका फेटाळून लावली आहे.

नोटांमध्ये जनावरांची चरबी असल्याने मंदिरात ५ पाऊंडच्या नोटा अर्पण करण्यावर ब्रिटनमध्ये बंदी !

धर्मशास्त्रानुसार धर्माचरणासाठी जागृत असणार्‍या
 ब्रिटनमधीलहिंदूंकडून भारतातील हिंदू काही बोध घेतील का ? 
     लंडन - नोटानिर्मितीमध्ये जनावरांच्या चरबीचा वापर करण्यात येत असल्याचे समोर आल्यानंतर ब्रिटनमधील काही मंदिरांनी ५ पाऊंडच्या नोटा अर्पण करण्यावर बंदी घातली आहे. ‘नॅशनल काऊंसिल ऑफ हिंदू टेंपल्स’ या हिंदूंच्या मंदिरांच्या संस्थेनेही ‘नवीन नोटा या देवाण-घेवाण करण्याचे सोपे माध्यम बनण्याऐवजी त्रासाचे कारण झाले आहे. आम्ही अशा नोटांना स्पर्श करू इच्छित नाही’, असे म्हटले आहे. 
     ‘हिंदू फोरम ऑफ ब्रिटेन’ या संघटनेने नोटा हटवण्याची मागणी केलेल्या एका सार्वजनिक याचिकेवर आतापर्यंत १ लाख ३० सहस्र स्वाक्षर्‍या झाल्या आहेत. दीड लाख स्वाक्षर्‍या पूर्ण झाल्यानंतर ‘बँक ऑफ इंग्लंड’कडे ते देण्यात येणार आहे. लोकांकडून वापरल्या जाणार्‍या चलनामध्ये पशूंच्या चरबीचा वापर केला जाऊ नये, असे या याचिकेत म्हटले आहे.

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, मुंबई विभागाच्या वतीने उत्साहपूर्ण वातावरणात शिवप्रताप दिन साजरा !

मर्दानी खेळ, अफझलखान वधाचे पथनाट्य आणि व्याख्याने यांतून जागवले धर्मतेज !

 कोपरखैरणे 

लोअर परळ
     मुंबई, ८ डिसेंबर (वार्ता.) - ‘अफझलखान वध’ हा महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावा असा प्रसंग आहे. आतंकवाद कसा संपवावा, हे या प्रसंगातून शिवरायांनी प्रत्यक्ष कृतीतून जगाला दाखवले; मात्र अल्पसंख्याकांच्या धार्मिक भावना जपण्यासाठी राज्यातील यापूर्वीच्या पुरोगामी सरकारने या ऐतिहासिक प्रसंगाला विद्यार्थ्यांच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातून हद्दपार केले. येणार्‍या पिढीला कदाचित या प्रसंगाची माहितीही नसेल. शिवाजी महाराजांच्या या पराक्रमाची आठवण सदैव रहावी, यासाठी गेल्या ४ वर्षांपासून ‘श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’ या संघटनेकडून मार्गशीर्ष शुक्ल पक्ष सप्तमीला शिवप्रतापदिन साजरा केला जातो. यावर्षीही मुंबईतील लोअर परळ, दहिसर आणि नवी मुंबईतील कोपरखैरणे या ठिकाणी शिवप्रताप दिनानिमित्त मर्दानी खेळ, व्याख्याने आणि अफझलखान वधाचे पथनाट्य सादर करण्यात आले. 

येत्या निवडणुकीनंतर महापालिकेचा कारभार कागदरहित करण्याचा विचार !

नगरसेवकांच्या उदासीनतेमुळे ७ वर्षांपासून प्रस्ताव प्रलंबित !
     मुंबई - पुढील वर्षी होणार्‍या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर महापालिकेचा कारभार कागदरहित करण्याचा विचार महापालिका प्रशासन करत आहे.
१. सद्यस्थितीत महापालिकेच्या महासभेच्या आणि विविध समित्यांच्या कार्यक्रम पत्रिका नगरसेवकांना घरपोच पाठवल्या जातात. या कार्यक्रम पत्रिका ई-मेलने पाठवून छपाई, कागद आणि वितरण यांसाठी होणारा व्यय टाळता येणे शक्य होणार आहे.
२. वर्ष २००९ मध्ये महापालिका प्रशासनाने एक कोटी रुपये व्यय करून सर्व नगरसेवकांना भ्रमणसंगणक उपलब्ध करून दिले होते. त्यासंदर्भातील प्रशिक्षणवर्गाचेही आयोजन करण्यात आले होते; मात्र या वर्गाला निम्म्याहून अल्प नगरसेवकांनी उपस्थिती दर्शवली होती. (भ्रमणसंगणक विकत घेण्यापूर्वी त्याच्या वापराविषयी महापालिकेने अभ्यास न केल्यामुळे जनतेच्या घामाचा पैसा वाया गेला, असेच म्हणावे लागेल ! - संपादक)
३. तेव्हापासून कार्यक्रम पत्रिका ई-मेलने पाठवण्याचा महापालिकेचा प्रस्ताव प्रलंबित आहे.

राज्यातील सर्व न्यायालयांमध्ये मार्च २०१७ पर्यंत व्हिडिओ कॉन्फरसिंग यंत्रणा स्थापन करावी ! - मुंबई उच्च न्यायालय

     मुंबई - राज्यातील सर्व न्यायालयांमध्ये येत्या मार्चपर्यंत व्हिडीओ कॉन्फरसिंग यंत्रणा स्थापन करावी, असा आदेश ५ डिसेंबर या दिवशी उच्च न्यायालयाने राज्य शासनाला दिला. न्यायमूर्ती व्ही.एम्. कानडे आणि न्यायमूर्ती नूतन सरदेसाई यांच्या खंडपिठापुढे एका सुनावणीच्या कालावधीत हा आदेश देण्यात आला.
१. राज्यात एकूण २ सहस्र २०० न्यायालये असून त्यांपैकी २४८ न्यायालयांमध्ये तांत्रिक अडचणींमुळे व्हिडीओ कॉन्फरसिंग यंत्रणा बसवता आली नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणण्यात आले.
२. कारागृहातील बंदीवानांना व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून न्यायालयापुढे उपस्थित केले जात असल्याची माहिती शासकीय अधिवक्ता एस्.आर्. नारगोळकर यांनी दिली. ही सुविधा नसलेल्या न्यायालयांमध्ये मुंबईसह यवतमाळ, वर्धा यांचा समावेश आहे.
३. महाराष्ट्र न्यायिक अकादमीने केलेल्या अभ्यासातून खटले रेंगाळण्याच्या प्रमाणामागे पोलीस ताफ्याअभावी आरोपीला न्यायालयात उपस्थित केले जात नसल्याचेही कारण आहे.

राष्ट्र आणि विश्‍व यांचे कल्याण होण्यासाठी सनातन धर्म अन् संस्कृती यांनुसार आचरण आणि समर्पणाची भावना असेल, तेव्हाच राष्ट्राचा उत्कर्ष होऊन विश्‍वाचेही कल्याण होईल !

गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांचे अमूल्य विचारधन !
गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांच्या आज
 असलेल्या पुण्यतिथीच्या निमित्ताने...
१. धर्मज्वलंत भारत देशात धर्मनिरपेक्षतेनेे गोंधळ माजवणे, हे दुर्भाग्य ! : ‘या बेधुंद अशा धर्मनिरपेक्षतेनेे धिंगाणा घातला आहे. पावलोपावली सुरूंग पेरला आहे. त्यामुळे सनातन धर्माची प्रतिष्ठा असलेल्या या भारतखंडात दुर्भाग्याने आज कोणत्याही चांगल्या उपक्रमास जिवाभावाची माणसे मिळत नाहीत. या भारताचे दुर्दैव असे की, सैन्यदलातही हव्या त्या क्षमतेची माणसे आज नाहीत. लक्षावधी वर्षांपासून विश्‍वाची प्रतिष्ठा असलेल्या धर्मज्वलंत भारत देशात असे का घडावे ?
२. सनातन हिंदु संस्कृतीच्या चिरंतन तत्त्वांच्या आधाराविना समृद्ध जीवन जगणे अशक्य : आजचे गोंधळलेले, भांबावलेले आणि दिशाहीन जगही चिरंतन तत्त्वांचा आधार घेऊनच त्याला अनुसरणारी शास्त्रशुद्ध अशी आखणी प्रतिपादन करणार्‍या सनातन विचारसरणीच्या शोधात आहे. त्यांना या सनातन हिंदु संस्कृतीच्या चिरंतन तत्त्वांच्या आधाराविना समृद्ध जीवन जगताच यायचे नाही.
३. श्रुति, स्मृति, पुराणादी शास्त्र यांत चिरंतन मूल्ये सांगितलेली असणे : जगातले सगळेच विचारवंत आणि चिरंतन तत्त्वे मूल्यांचा पाठपुरावा करायला सांगतात. चिरंतन मूल्यांचा ध्यासच घ्यायचा असेल, तर आमची श्रुति, स्मृति, पुराणादी शास्त्रे, आमच्या परंपरा, आमच्या निष्ठा यांचा मूलभूत विचार आणि त्याला अनुरूप अशा शक्तीनुसार अनुष्ठान हे आवश्यक आहे.

महत्त्वपूर्ण कारणास्तव रात्री उशिरापर्यंत सेवेत असणार्‍या पोलिसांना विनामूल्य टॅक्सीसुविधा !

     मुंबई - महत्त्वाच्या दिवशी संरक्षणासाठी तैनात केलेल्या, रात्री उशिरापर्यंत सेवेत असणार्‍या पोलिसांना विनामूल्य टॅक्सीसेवा देण्याचा निर्णय टॅक्सीचालकांनी घेतला आहे. ‘भगवान टॅक्सी महासंघा’च्या अध्यक्षांनी ही माहिती दिली. पोलिसांची संख्या अधिक असल्याने प्रत्येकाला घरी पोचवणे पोलीस विभागाला शक्य होत नाही. त्यामुळे पोलिसांची गैरसोय होते. पोलिसांना होणार्‍या त्रासासंदर्भात त्यांच्या पत्नी गेल्या काही दिवसांपासून आझाद मैदानावर आंदोलन करत होत्या.


(म्हणे) इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन बंद पडल्याने १२५ मुसलमान विद्यार्थ्यांची हानी !

देशद्रोही डॉ. झाकीर नाईक यांच्याविषयी आमदार अबू आझमी यांना पुळका !
     नागपूर, ८ डिसेंबर (वार्ता.) - विधानसभेत औचित्याचे सूत्र मांडतांना अबू आझमी यांनी डॉ. झाकीर नाईक यांच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन या शैक्षणिक संस्थेवर कारवाई केल्याने १२५ मुसलमान विद्यार्थ्यांची शैक्षणिक हानी झाल्याचे सूत्र उपस्थित केले; मात्र डॉ. नाईक यांच्या संस्थेवर केंद्र शासनाने केलेली कारवाई योग्यच आहे, असे सूत्र भाजपच्या काही आमदारांनी मांडून अबू आझमी यांचे सूत्र खोडून काढले.

समित्या स्थापन करून उपयोग नाही, उदासीनता सोडून मंत्र्यांनी लक्ष दिल्यास प्रश्‍न सुटेल !

कुपोषणाच्या प्रश्‍नाविषयी न्यायालयाने राज्यशासनाला फटकारले !
सर्वाधिक सत्ता भोगूनही काँग्रेसने न सोडवलेला कुपोषणाचा
प्रश्‍न सोडून युती शासनाने जनतेला चांगले दिवस दाखवावेत !
     मुंबई - मेळघाटासह राज्यातील आदिवासी भागांतील कुषोषण बळी रोखण्यासाठी केवळ समित्या नियुक्त करून उपयोग नाही. या गंभीर समस्येविषयीची उदासीनता सोडून आदिवासी कल्याण मंत्र्यांनी जातीने लक्ष घातले, तरच हा प्रश्‍न मार्गी लागू शकेल, असा सल्ला मुंबई उच्च न्यायालयाने ५ डिसेंबर या दिवशी दिला आहे. न्यायमूर्ती व्ही.एम्. कानडे आणि न्यायमूर्ती नूतन सरदेसाई यांच्या खंडपिठापुढे ही सुनावणी झाली. मेळघाट, पालघर या भागांत कुपोषणामुळे झालेल्या मृत्यूंविषयी विविध जनहित याचिका न्यायालयात करण्यात आल्या आहेत. या याचिकांवर न्यायालयाने आतापर्यंत बरेच आदेश दिले आहेत; मात्र बळी आटोक्यात आणण्यात शासनाला यश आलेले नाही. त्यामुळे मंत्र्यांनीच या प्रश्‍नाकडे अधिक लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
      न्यायालयाने या प्रश्‍नाविषयी नेमलेल्या समितीच्या वर्षभरात ८ बैठका झाल्या; मात्र त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही. त्यामुळे आता आम्ही आणखी समिती नेमण्याविषयी आदेश देऊ इच्छित नाही. त्यापेक्षा या प्रश्‍नाशी संबंधित खात्याच्या प्रधान सचिवांनी परस्परांशी समन्वय करावा आणि योजना कार्यान्वित कराव्यात.

(म्हणे) मुसलमानांना आरक्षण मिळण्यासाठी संघर्ष करू ! - अबू आझमी, आमदार, समाजवादी पक्ष

किती हिंदु लोकप्रतिनिधी हिंदूंसाठी अशा प्रकारे तळमळीने बोलतात ? 
      नागपूर, ८ डिसेंबर (वार्ता.) - आज समाजात आणि सरकारमध्ये मराठा आरक्षणाची चर्चा केली जात असून मुसलमानांना आरक्षण मिळण्याविषयी कोणीही चर्चा करत नाही. मुसलमानांना शिक्षणामध्ये दिलेले ५ टक्के आरक्षण राज्य सरकारने रहित केले आहे. ते आरक्षण सर्वोच्च न्यायालय आणि कायदा विभाग यांनी मान्य केलेले असतांनाही ते सरकारने नाकारले आहे. सरकारने मराठ्यांना आरक्षण देण्यासमवेत मुसलमानांना हक्काचे आरक्षण दिले पाहिजे. त्यासाठी मुसलमान गांधीजींनी सांगितलेल्या मार्गाने आंदोलन करतील, तसेच वेळप्रसंगी आरक्षण मिळण्यासाठी संघर्ष करतील, असे वक्तव्य समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी केले. (आतापर्यंत सत्तेत आलेल्या बहुतांश शासनकर्त्यांनी मुसलमानांवर सुविधांची खैरात केली. असे असतांनाही मुसलमानांचे राज्यकर्ते आरक्षणाची मागणी करतात, हे संतापजनक ! - संपादक) विधानसभेच्या पायरीवर आझमी हे महाराष्ट्रात मुसलमानांना आरक्षण मिळावे, यासाठी ८ डिसेंबर या दिवशी आंदोलन करत होते.
     महाराष्ट्रात उच्च न्यायालयाने दिलेले मुसलमानांचे आरक्षण पुन्हा मिळावे, यासाठी एम्आयएम्चे आमदार इम्तियाज जलील आणि वारीस पठाण यांनीही ८ डिसेंबर या दिवशी विधानसभेच्या पायरीवर वेगळे आंदोलन केले.

मराठा आरक्षण विषयावर विधान परिषदेत चर्चा चालू !

विधान परिषद
     नागपूर, ८ डिसेंबर (वार्ता.) - मराठा आरक्षण विषयावर नियम २६० अन्वये विधान परिषदेत चर्चा चालू करण्याची अनुमती सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी दिली. त्यानुसार चर्चा झाल्यावर राज्य सरकारच्या वतीने त्यावर उत्तर देण्यात येणार आहे.
मराठा आरक्षण आणि स्वामीनाथन आयोगाच्या मागण्या मान्य करा ! 
- विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे
      राज्यामध्ये मराठा समाजाचे लक्षावधी संख्येने आरक्षण मिळण्यासाठी मूक मोर्चे निघत आहेत. त्याला सरकारकडून उत्तर दिले जात नाही. सरकारच्या विरोधात मराठा समाजात असंतोष आहे. राज्य शासन मराठा, धनगर, लिंगायत आणि मुसलमान या समाजांना आरक्षण देण्यासाठी कोणतेही प्रयत्न करत नाही. कारण संघ कार्यालयातून आरक्षणाला विरोध केला जात आहे. १४ डिसेंबरला विधानभवनावर मोर्चा येणार असल्याने सरकारने उच्च न्यायालयात ५ डिसेंबर या दिवशी उच्च न्यायालयात २ सहस्र ७०० पानांचे प्रतिज्ञापत्र प्रविष्ट केले. सरकार समाजात फूट पाडत असून समाजातील इतर घटकही आरक्षण आणि अन्य गोष्टींसाठी मोर्चे काढत आहेत. मराठा आणि अन्य समाजाला न्याय न दिल्यास सरकारविरोधात आगडोंब उसळेल. तसे होणे अपेक्षित नसेल, तर सरकारने मराठा आरक्षण देण्यासमवेत स्वामीनाथन आयोगाच्या मागण्या मान्य कराव्यात.

पुणे मेट्रोला राज्य मंत्रिमंडळाची संमती !

      नागपूर, ८ डिसेंबर (वार्ता.) - केंद्र सरकारने ७ डिसेंबर या दिवशी पुणे मेट्रो प्रकल्पाला संमती दिली. त्यानंतर राज्य सरकारने ८ डिसेंबर या दिवशी सकाळी घेतलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुणे मेट्रोला राज्य मंत्रिमंडळाची संमती दिल्याची माहिती पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी पत्रकारांंना दिली. या वेळी बापट म्हणाले की, गेली १० वर्षे प्रलंबित असलेला पुणे मेट्रोचा प्रश्‍न सुटला असून पुढची कार्यवाही महाराष्ट्र मेट्रो कॉर्पोरेशन करणार आहे. हा प्रकल्प ३२ किलोमीटरचा असून त्याला १२ सहस्र ५०० कोटी रुपये व्यय येणार आहेत. येत्या ४ वर्षार्ंत हा प्रकल्प कार्यान्वित होणार आहे. त्यामुळे पुणेकरांची वाहतूकसमस्या काही प्रमाणात सुटेल. 
    या प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्राधानांनी करायचे कि पवारांनी याविषयी निर्माण झालेल्या श्रेयवादाच्या प्रकरणाच्या पार्श्‍वभूमीवर या प्रकल्पाच्या भूमीपूजनाचा प्रश्‍न हा सर्व पक्षांशी बोलून आणि एकत्रित करून सोडवू, असे बापट यांनी सांगितले.

तिल्लोरी (जिल्हा नाशिक) येथील आश्रमशाळेतील विद्यार्थिनींवरील लैंगिक अत्याचाराची फेरचौकशी करण्यात येईल ! - विष्णु सवरा, आदिवासी विकासमंत्री

विधानसभा
      नागपूर, ८ डिसेंबर (वार्ता.) - तिल्लोरी ( जिल्हा नाशिक) येथील आदिवासी मुलींसाठी असलेल्या निवासी आश्रमशाळेत व्यवस्थापनाचा मनमानी कारभार आणि विद्यार्थिनींवर केलेल्या लैगिंक अत्याचार यांची फेरचौकशी करण्यात येईल, असे आश्‍वासन आदिवासी विकास मंत्री विष्णु सवरा यांनी ८ डिसेंबर या दिवशी विधानसभेत प्रश्‍नोत्तरात दिले. 
१. आश्रमशाळेतील दोन दोषी अधिकार्‍यांची चौकशी करून त्यांना सामंजस्याने काम करण्याची समज दिली आहे, असे सवरा यांनी सांगितले; मात्र त्यांच्यावरील कारवाईविषयी माहिती न दिल्याने दिल्याने सदस्य संतप्त झाले. 
२. आश्रमशाळेतील संंबंधित अधिकार्‍यांनी अत्याचार केल्याची माहिती विद्यार्थिनींनी ग्रामसभेत दिली होती. संबंधितांवर कारवाई होण्यासाठी मुलींच्या पालकांनी ४ दिवस उपोषणही केले होेते. त्यामुळे दोषी अधिकार्‍यांवर कोणती कारवाई करणार आणि असे प्रकार न घडण्यासाठी शासन कोणत्या उपाययोजना करणार आहे, असा प्रश्‍न सदस्यांनी विचारला; मात्र समाधानकारक उत्तरे न दिल्यामुळे सदस्यांनी विष्णु सवरा यांना धारेवर धरले.

देशासमोरील संकटे आणि स्त्रियांवरील वाढते अत्याचार यांना प्रतिबंध करण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना अपरिहार्य ! - सौ. पल्लवी लांजेकर

गवाणे, लांजा (रत्नागिरी) येथे हिंदूसंघटन मेळावा !
डावीकडून श्री. संजय जोशी
दीपप्रज्वलन करतांना सौ. पल्लवी लांजेकर
     लांजा (रत्नागिरी) - आज हिंदूंसमोर इसिस, जिहादी आतंकवाद, लॅण्ड जिहाद, लव्ह जिहाद अशी अनेक संकटे आवासून उभी आहेत. आज राष्ट्र टिकले, तर समाज टिकेल आणि समाज टिकला, तर आपण टिकू शकतो. देशासमोरील ही संकटे आणि स्त्रियांवरील वाढते अत्याचार याला प्रतिबंध करायचा असेल, तर हिंदु राष्ट्राची स्थापना अपरिहार्य आहे, असे प्रतिपादन सनातन संस्थेच्या जिल्हासेविका सौ. पल्लवी लांजेकर यांनी केले. तालुक्यातील गवाणे येथील श्री सिद्धेश्‍वर मंदिरात झालेल्या हिंदूसंघटन मेळाव्यात त्या बोलत होत्या. या मेळाव्याचे सूत्रसंचालन डॉ. समीर घोरपडे यांनी केले. या मेळाव्याला १२५ धर्मप्रेमींची उपस्थिती होती. 
     सौ. लांजेकर म्हणाल्या, मी एकटा काय करणार?, असे म्हणून गप्प बसू नका ! असे अनेक एकटे एकत्र आले, तर राष्ट्रोद्धाराला वेळ लागणार नाही.

नोटाबंदीच्या काळात मृत्यू पावलेल्या लोकांना हुतात्म्यांचा दर्जा द्या !

     नागपूर - नोटाबंदीच्या वेळी मृत्यू झालेल्यांना हुतात्म्यांचा दर्जा द्या आणि त्यांच्या कुटुंबियांना १० लक्ष रुपयांचे साहाय्य करण्याची भूमिका शिवसेनेचे आमदार श्री. सुनील प्रभू यांनी विधानसभेत मांडली. तसेच ३० डिसेंबरपर्यंत पथकर न आकारण्याची मागणीही त्यांनी केली. नोटाबंदीवर शिवसेनेची भूमिका स्पष्ट करतांना शिवसेनेचे आमदार श्री. सुनील प्रभु आणि श्री. प्रताप सरनाईक म्हणाले की, पंतप्रधानांच्या निर्णयाचे स्वागत आहे; मात्र अंमलबजावणीतील त्रुटी दूर करावी. नोटबंदीनंतर शेतकर्‍यांना होत असलेल्या त्रासाविषयी शिवसेनेचे आमदार मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांना साहाय्य करण्याविषयीचे निवेदन देणार आहेत.

पाळधी (जळगाव) येथे हिंदु मुलीची छेड काढणार्‍या धर्मांधाला हिंदूंकडून चोप !

धर्मरक्षणासाठी तत्पर हिंदूंचे अभिनंदन !
     जळगाव - पाळधी तालुका धरणगाव येथील बसस्थानकात हिंदु मुलीची छेड काढणार्‍या धर्मांधाला हिंदु धर्माभिमान्यांनी चोप दिला आणि पोलीस ठाण्यात नेले; मात्र पोलिसांनी त्याला केवळ समज देऊन सोडले. (अशाने वासनांध धर्मांधांना मोकळीक मिळते, हे पोलिसांच्या लक्षात कसे येत नाही ? - संपादक)

पोलीस उपनिरीक्षकांना लाच घेतांना अटक

     भुसावळ - शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक रामा वसतकर यांना लाच घेतांना अटक करण्यात आली. पोलीस ठाण्यात आलेल्या एका वादग्रस्त प्रकरणाचा गुन्हा प्रविष्ट होऊ नये आणि हे प्रकरण परस्पर मिटवले जावे, यासाठी एक सहस्र रुपयांची लाच घेतांना त्यांना जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. (लाचखोरी नसानसात मुरलेले पोलीस खाते ! - संपादक) एका व्यक्तीने घरात बांधलेल्या पायर्‍यांच्या संदर्भात तक्रार केल्याने २ नातेवाइकांचा वाद मिटवण्यासाठी त्यांनी लाच मागितली होती.

विधीमंडळातील आमदारांमध्ये जागृती करण्यासाठी ‘लठ्ठपणा जागृती अभियान’

     नागपूर - लठ्ठपणा न्यून करणे आणि त्यामुळे होणार्‍या १०१ आजारांवर काळजी घेणे आणि त्यावरील उपचार याविषयी जागृती करण्यासाठी हिवाळी अधिवेशनाचे औचित्य साधून विधीमंडळामध्ये वैद्यकीय शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आमदारांसाठी ‘लठ्ठपणा जागृती अभियान’ ७ डिसेंबर या दिवशी राबवण्यात आले.
     याविषयी माहिती देतांना वैद्यकीय शिक्षणमंत्री श्री. गिरीश महाजन यांनी सांगितले की, राज्यात ८ कोटी ५० लक्ष नागरिक लठ्ठपणाच्या विकाराने त्रस्त आहेत. त्यामुळे राज्यभर हे अभियान चालू असून ते २१ नोव्हेंबर ते २९ डिसेंबर या कालावधीत प्रत्येक जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत घेण्यात येत आहे. हाच उपक्रम विधीमंडळातील सर्व आमदारांसाठी येथे राबवला जात आहे. या अभियानात लठ्ठपणा आणि त्यामुळे झालेले आजार यांचे निदान करून त्यावर उपचारही करण्यात येत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनीही स्वतः २८ किलो वजन न्यून करून प्रयत्न केला आहे.
राज्याचे महाअधिवक्ता पद रिक्त असल्याप्रकरणी शासनाने उत्तर सादर करावे ! - सभापतींचे आदेश

विधान परिषद
      नागपूर, ८ डिसेंबर (वार्ता.) - राज्याचे महाअधिवक्ता पद हे गेले ८ मास रिक्त असून अशी कृती घटनाबाह्य असल्याची सूचना काँग्रसचे आमदार संजय दत्त यांनी विधान परिषदेत सादर केली. त्यावर नियम २८९ अन्वये चर्चा घ्यावी, असेही त्यांनी प्रविष्ट केलेल्या प्रस्तावात म्हटले होते. त्यावर सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी चर्चेचा प्रस्ताव तात्पुरता फेटाळून लावत महाअधिवक्ता पद रिक्त असल्याप्रकरणी शासनाला उत्तर सादर करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले. (इतके महत्त्वाचे पद रिक्त असणे, हे राज्य सरकारला लज्जास्पद नव्हे का ? या प्रकरणी सरकार कोणता निर्णय घेणार आहे ? - संपादक)

स्वाईप मशीन नसल्याने ग्राहकांना देयक देण्यातील अडचणी वाढल्या !

     नागपूर, ८ डिसेंबर (वार्ता.) - हिवाळी अधिवेशनाकरता राज्यभरातून विविध पक्षांचे नेते, कार्यकर्ते, पोलीस कर्मचारी, विविध शासकीय विभागांचे अधिकारी नागपूर विधीमंडळ परिसरात आहेत. विधानभवन परिसरातील विविध उपाहारगृहांमध्ये डेबिट आणि क्रेडिट कार्डने देयक देण्याकरिता स्वाईप मशीनची व्यवस्थाच नसल्याने त्यांचा मनस्ताप वाढला आहे. सुटे पैसेे घेण्याकरिता अनेकांना अनेक ठिकाणी पायपीट करावी लागत असल्याचे चित्र आहे. 
     नोटाबंदीच्या निर्णयानंतर काळा पैसा रोखण्यासाठी कॅशलेस व्यवहार करण्याचे आवाहन केंद्र सरकारकडून करण्यात येत आहे. सुट्या पैशांच्या तुटवड्यामुळे राज्यभरातून विधानभवन परिसरात आलेल्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. नोटबंदीला एक मास झाला असतांना चलनाचा तुटवडा मात्र कायम आहे. काळा पैसा रोखण्याकरिता मोदी शासनाच्या निर्णयाचे स्वागत होत असले तरी सर्वसामान्यांना मात्र याचा प्रचंड त्रास होत आहे. शासनाने नियोजन केले नसल्यामुळे जनता त्रस्त झाली आहे. त्यामुळे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेकांनी नागरिकांना डेबिट क्रेडिट कार्डने वा ऑनलाईन पैसे देण्याचेे आवाहन केले आहे.

मराठवाड्यासाठी आरक्षित असलेले पाणी मांजरी धरणात सोडण्यासाठी भाजपच्या आमदारांचे आंदोलन

     नागपूर, ८ डिसेंबर (वार्ता.) - कृष्णा खोरे पाणीवाटप लवादाच्या आदेशानुसार उजनी धरणातील मराठवाड्यासाठी आरक्षित असलेल्या २१ अब्ज घनफूट (टीएम्सी) पाण्यापैकी ५ अब्ज घनफूट पाणी मांजरी धरणात सोडण्यासाठी भाजपच्या आमदारांनी विधानसभेच्या पायरीवर आंदोलन केले. (सत्तेत्त स्वतःच्या पक्षाचे शासन असतांना असे आंदोलन करावे लागणे, हे लज्जास्पद नव्हे का ? - संपादक) या आंदोलनामध्ये भाजपचे आमदार सौ. संगीता ठोंबरे, तानाजी मुटकुले, नारायण कुचे, आशिष शेलार आणि सौ. मंदा म्हात्रे यांनी सहभाग घेतला.-

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Dehradun me Pakistani khiladiyo ka samarthan karnewale Kashmiri vidyarthiyoka keval Hindutvanishtho ne kiya virodh. - Secularwadi is ghatnapar chup kyu ?
जागो ! : देहरादून में पाकिस्तानी खिलाडियों का समर्थन करनेवाले कश्मीरी विद्यार्थियों का केवल हिन्दुत्वनिष्ठों ने किया विरोध । - सेकुलरवादी इस घटना पर चुप क्यों ?फलक प्रसिद्धीकरता

पाकचे समर्थन करणार्‍यांचा सेक्युलरवादी विरोध का करत नाहीत ?
     डेहराडून येथील एका महाविद्यालयात शिकणार्‍या काश्मिरी धर्मांध विद्यार्थ्यांनी ‘सोशल मीडिया’द्वारे पाकच्या क्रिकेटपटूंचे समर्थन केले. यास येथील हिंदुत्वनिष्ठ संघटनाच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला. त्यानंतर महाविद्यालयात दोन्ही गटांमध्ये दगडफेक झाली.

अमली पदार्थाची तस्करी करण्यासाठी आलेल्या दोन धर्मांधांना रे रोड येथून अटक !

     मुंबई - अमली पदार्थाची तस्करी करण्यासाठी आलेल्या दोन धर्मांधांना भायखळा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून १ लक्ष ७ सहस्र किंमतीचे १ किलो ७० ग्राम चरस जप्त करण्यात आले. रे रोड परिसरातील बॅरिस्टर नाथ पै मार्गावर अमली पदार्थ घेऊन काही जण येणार असल्याची माहिती भायखळा पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी या परिसरात सापळा रचला, तेव्हा तिघे जण संशयितरित्या वावरत असल्याचे पोलिसांना आढळले. पोलिसांनी त्यांना हटकले असता, त्यांपैकी एक जण पळून गेला. (पोलिसांमधील सतर्कतेच्या अभावामुळे गुन्हेगार त्यांच्या हातावर तुरी देऊन पळून जातात, हे लज्जास्पद ! संपादक)
      मोहम्मद बाबू नुराल्ला खान आणि मोहम्मद जावेद सर्व्हर शेख या दोघांना पोलिसांनी अटक केली असून अधिक तपास चालू आहे. (अल्पसंख्यांक गुन्हेगारीत मात्र अव्वल ! संपादक)

समीर गायकवाड यांच्यावरील आरोप निश्‍चितीची पुढील सुनावणी १९ डिसेंबरला !

कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरण ! 
     कोल्हापूर, ८ डिसेंबर (वार्ता.) - सनातन संस्थेचे साधक श्री. समीर गायकवाड यांच्यावर कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणात आरोप निश्‍चित करण्याच्या विषयीची पुढील सुनावणी १९ डिसेंबरला होईल. येथील जिल्हा न्यायाधीश एल्.डी. बिले यांच्यासमोर कॉ. गोविंद पानसरे खून प्रकरणाची सुनावणी चालू आहे. श्री. समीर गायकवाड यांच्या वतीने अधिवक्ता समीर पटवर्धन हे उपस्थित होते. आरोप निश्‍चिती प्रकरणात अद्याप उच्च न्यायालयात स्थगिती असून तेथील सुनावणी १५ डिसेंबर या दिवशी होण्याची शक्यता आहे.

वडाळा-कासारवडवली मेट्रो प्रकल्पाच्या भूमीपूजनाला उद्धव ठाकरे यांना निमंत्रित करा ! - प्रताप सरनाईक

      नागपूर, ८ डिसेंबर (वार्ता.) - २४ डिसेंबर या दिवशी पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रो प्रकल्पाबरोबरच वडाळा-कासारवडवली मेट्रो प्रकल्पाचे भूमीपूजन करणार असल्याची माहिती मिळाली आहे. ठाणे मेट्रो प्रकल्पाचे यश हे एकट्याचे नसून सामूहिक आहे. त्यामुळे वडाळा-कासारवडवली मेट्रो प्रकल्पाचे भूमीपूजन करत असतांना शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करून त्यांना योग्य तो मानसन्मान देण्यात यावा, अशी विनंती शिवसेनेचे आमदार श्री. प्रताप सरनाईक यांनी ८ डिसेंबर या दिवशी विधानसभेत औचित्याचे सूत्र मांडतांना केली. विशेष म्हणजे त्यांनी चक्क औचित्याच्या सूत्राद्वारे ही मागणी केल्याने आमदारांनी आश्‍चर्य व्यक्त केले आहे.

जळगाव जिल्ह्यात सिमीच्या ४९ कार्यकत्यांची चौकशी !

जिहादी आतंकवादी संघटनेवर बंदी घालूनही ती कार्यरत रहाते, हे सुरक्षायंत्रणांचे अपयश 
नव्हे का ? सिमीच्या कार्यकर्त्यांची केवळ चौकशी नको, त्यांच्यावर कठोर कारवाई करा ! 
      जळगाव - जिल्ह्यात १ डिसेंबरपासून आतंकवादविरोधी पथक आणि गुप्तचर यंत्रणा यांच्या पथकाकडून भारत सरकारने बंदी घातलेल्या सिमी या आतंकवादी संघटनेच्या ४९ कार्यकर्त्यांसह काही पदाधिकार्‍यांची चौकशी करण्यात आली आहे. तसेच या संघटनेच्या बंदीनंतर दुसर्‍या धर्मांध संघटनांमध्ये प्रवेश केलेल्या तीन संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचीही चौकशी करण्यात आली आहे. पूर्वी जळगाव जिल्हा सिमीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात असे. जिल्हा न्यायालयात मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी आसीफ खान आणि शहरातील तांबापुरा भागातील परवेज खान यांच्यावरील खटल्याचे कामकाज जलद गतीने चालू आहे. (एरवी सनातनच्या निष्पाप साधकांची चौकशी झाल्यावर वृत्तपत्रांचे स्तंभ भरणारी प्रसारमाध्यमे जिहादी संघटनांची चौकशी झाल्यावर मात्र कानावर हात ठेवतात, हा दुटप्पीपणाच नव्हे का ? - संपादक)

जागतिक अपंग दिनानिमित्त प्रकाश अधिक दिवस १० डिसेंबरला साजरा करणार !

वेद वासुदेव प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम !
      अकोला, ८ डिसेंबर - ३ डिसेंबर २०१६ या दिवशी झालेल्या जागतिक अपंग दिनाचे औचित्त्य साधून वेद वासुदेव प्रतिष्ठानच्या वतीने अकोला येथील सावरकर सभागृहात १० डिसेंबरला प्रकाश अधिक दिवस साजरा करण्यात येणार आहे. 
१. कार्यक्रमाचे उद्घाटन सकाळी ९.३० वाजता होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून अकोला जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मा. श्री. श्री.जी. श्रीकांत, जिल्हा विधी प्राधिकरण, अकोला येथील सदस्यसचिव मा. श्री. पी.एम. बाडगी आणि अकोल्याचे प्रथितशय उद्योजक श्री. दीपकजी भारतीया यांची उपस्थिती रहाणार आहे. 
२. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पुण्याच्या वेद वासुदेव प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. अजितदादा तुकदेव भूषवणार आहेत.

हिंदु राष्ट्र : मूलभूत विचार

वाचा नवीन सदर
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसंदर्भातील परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे मार्गदर्शन !
     वर्ष २०२३ पासून हिंदु राष्ट्र येईल, हे आजवर अनेक संतांनी वेळोवेळी सांगितले आहे. तथापि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेविषयी कोणत्याही आशादायी घटना स्थुलातून घडत नसतांना असे सांगणे, ही काहींना अतिशयोक्ती वाटेल; पण संतांमध्ये काळाच्या पडद्याआड पहाण्याचे सामर्थ्य असते. म्हणूनच अशा द्रष्ट्या संतांच्या मार्गदर्शनाखाली आपण त्या दिशेने प्रयत्न करणे, हीच आपली साधना आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेविषयी अनेकांंच्या मनात उत्सुकता आहे. या विषयीची सविस्तर माहिती हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची दिशा या नियमित सदरात आपल्याला मिळेल. आगामी काळात हिंदु समाजाला भारतभूमीत रामराज्याची अनुभूती देणारे हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी खारीचा नव्हे, तर श्री हनुमंताचा वाटा उचलण्याची प्रेरणा यातून मिळावी, अशी ईश्‍वरचरणी प्रार्थना !

भारताच्या मुक्त ज्ञान समाज निर्मितीसाठी भारतवाणी योजना !

मानव संसाधन विकास मंत्रालयाचा उपक्रम 
विविध भारतीय भाषा आणि क्षेत्रे यांची माहिती एकाच संकेतस्थळावर मिळणार !
      देहली - भारताच्या मुक्त ज्ञान समाज निर्मितीसाठी मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या अखत्यारित असलेल्या भारतीय भाषा संस्थेकडून भारतवाणी योजना आखण्यात आली आहे. या योजनेनुसार समस्त भारतीय भाषांमधील ज्ञान एका संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेमध्ये १२१ भाषांना समाविष्ट करण्यात आले आहे. या माध्यमातून देशातील जवळपास सर्व भाषा आणि समुदाय यांच्याशी संपर्क साधण्याची सरकारची योजना आहे. या संकेतस्थळासाठी खाजगी संस्थांकडून माहिती मागवण्यात आली आहे. 
१. भारतवाणी संकेतस्थळाचा लाभ विविध सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक पार्श्‍वभूमी असलेल्या आणि सर्व वयोगटातील लोकांना घेता येणार आहे. 
२. प्रारंभी विषय तज्ञांकडून रचलेले आणि प्रतिष्ठित संस्था यांच्याकडून प्रकाशित करण्यात आलेले साहित्य या संकेतस्थळावर ठेवण्यात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसवर बंदी का नको ?

      मुंबईतील चेंबूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या कार्यक्रमात त्यांच्याच पक्षाचे माजी खासदार आणि माजी मुंबई प्रदेशाध्यक्ष संजय दीना पाटील यांनी त्यांच्या ८ हून अधिक कार्यकर्त्यांसमवेत जाऊन गोळीबार केला. तसेच या वेळी काही जणांना शस्त्राद्वारे मारहाणही केली. त्यामध्ये काही जण घायाळ झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात प्रविष्ट करण्यात आले होते. या संदर्भात मलिक यांनी म्हटले की, या प्रकरणी आपण पोलीस तक्रार प्रविष्ट करणार असून पाटील यांनीच माझ्यावर जीवघेणे आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. पाटील यांनी म्हटले की, आपण काही केले नसून उलट मला आणि माझ्या कार्यकर्त्यांनाच मारहाण करण्यात आली आहे. आपण आपल्या स्वरक्षणार्थ बंदूक चालवली. त्यामुळे आपणही मलिक यांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार प्रविष्ट करणार. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी ४ जणांना अटक केली असून आणखी ५ जण फरार आहेत. हे प्रकरण झाल्यानंतर मलिक आणि पाटील यांच्यामध्ये अंतर्गत वाद असल्याची चर्चा चालू होती.

सरकारने नोटाबंदीसह आता अन्य समस्या सोडवण्यासाठीही कृती करावी !

     नोटाबंदीच्या क्रांतीकारी निर्णयानंतर पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी २२.११.२०१६ या दिवशी भाजपच्या संसदीय मंडळाच्या झालेल्या बैठकीत व्यवस्था सुधारण्यासाठीची ही शेवटची कारवाई नाही, असे स्पष्ट केले. गोरगरिबांच्या कल्याणासाठी समर्पित झालेले मोदी सरकार प्रसंगी याहून कठोर निर्णयही घेऊ शकतात. यावरून नव्या वर्षात नव्या भारताची निर्मिती करण्याचा मोदी यांचा संकल्प आहे, असेे जाणवते. आता मोदी सरकारचा पुढील क्रांतीकारी निर्णय कोणता असेल, हे माहीत नाही; पण सरकार भविष्यात पुढील काही सूत्रांवर सकारात्मक विचार करील का ?,
१. बांगलादेश, पाकिस्तान, अफगाणिस्तान, म्यानमार, सुदान इत्यादी देशांतून कोट्यवधींच्या संख्येने भारतात घुसलेल्या घुसखोरांपासून देशाला केव्हा मुक्ती मिळेल ? कारण यामुळेच भारताच्या अर्थव्यवस्थेवर पुष्कळ मोठा आघात होत आहे. विविध अपराध आणि आतंकवादी कटांमध्ये त्यांचा सहभाग आढळतो.
२. काश्मीरमधील विघटनवादी आणि तेथील जनतेसाठी केंद्रशासन वर्षानुवर्षे जो विशेष आर्थिक निधी देत आहे, त्यामुळे देशाला कोणता लाभ होत आहे का ?

जप आणि तप यांपेक्षाही कर्तव्यधर्मपालनाचे फळ श्रेष्ठ !

१. गंगास्नानापेक्षा स्वकर्तव्याला श्रेष्ठ समजणारे संत रोहिदास !
     संत रोहिदास हे चांभारकाम करत होते. ते आपले काम भगवंताची पूजा समजून मनःपूर्वक आणि प्रामाणिकपणे करत होते. त्यांनी एकदा एका साधूला सोमवती अमावस्येच्या दिवशी समवेत गंगास्नान करण्याचे आश्‍वासन दिले होते. तो दिवस जवळ आला होता. साधू रोहिदासांकडे गेले आणि त्यांनी त्यांना गंगास्नानाची आठवण करून दिली. तेव्हा रोहिदास हे लोकांची पादत्राणे करण्यात गुंतले होते आणि ती पादत्राणे त्यांना नियोजित वेळेत द्यायची होती. त्यामुळे गंगास्नानाला येण्यासाठीची आपली असमर्थता व्यक्त करून ते म्हणाले, हे महात्मा ! तुम्ही मला क्षमा करा. माझ्या भाग्यात गंगास्नानाचा योग नाही. तुम्ही हा एक पैसा घेऊन जा आणि तो गंगामातेला अर्पण करा.

बलात्काराची तक्रार : काही महिलांचे पैसे मिळवण्याचे नवीन साधन ?

पीडित बलात्कारित महिलांसाठी राबवण्यात येणार्‍या मनोधैर्य योजनेचा गैरवापर !
      सिंधुदुर्ग, ८ डिसेंबर - बलात्काराची तक्रार देऊन राज्य सरकारच्या मनोधैर्य योजनेचा लाभ घेणार्‍या आणि नंतर न्यायालयात तक्रार मागे घेणार्‍या महिलांकडून या योजनेतंर्गत देण्यात आलेली एक लाख रुपयांची रक्कम वसूल करण्याची प्रक्रिया शासन पातळीवर चालू झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अशा ८ महिलांकडून अशी वसुली केली जाणार आहे. या घटनेवरून उघडकीस येणारी बलात्कारांची प्रकरणे खरी किती आणि खोटी किती, असा प्रश्‍न निर्माण होत आहे.
     सिंधुदुर्ग जिल्हा महिला आणि बालविकास विभागाकडे मनोधैर्य योजनेतून दाखल झालेल्या ७३ प्रकरणांपैकी १३ बलात्कार प्रकरणे संशयास्पद आहेत. या १३ प्रकरणांपैकी ८ प्रकरणांतील महिलांनी बलात्कार करणार्‍याला वाचवण्यासाठी न्यायालयात फितुरी केली. त्यांना मनोधैर्य योजनेतून प्रत्येकी एक लाख रुपये शासनाकडून साहाय्य म्हणून देण्यात आल्याचे उघड झाल्यानंतर पैसे वसूल करण्याची ही प्रक्रिया चालू झाली आहे.

धर्मनिरपेक्ष कोण ?

१. जो केवळ मदरसे, दर्गा आणि मशिदींच्या मुल्ला-मौलवींना वेतन देईल.
२. जो देशाच्या सुरक्षा यंत्रणांवर लांच्छन लावील आणि जिहाद्यांची पाठ थोपटेल.
३. जो मुसलमानांना आरक्षण देईल.
४. जो बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोर आणि जिहादी यांना शिधापत्रिका, नागरिकत्व आणि चालक अनुज्ञप्ती देईल; पण पाकिस्तानातील कट्टरवाद्यांच्या भीतीने भारतात आश्रय घेऊ इच्छिणार्‍या पाकिस्तानातील हिंदूंना त्यांनी पाकिस्तानातच रहावे, यासाठी अडून बसेल.
- डॉ. हरपाल सिंह
     हिंदु धर्मातील संस्कृती जपण्याचे कार्य सनातन संस्था करत आहे. तिच्या पाठीशी सर्वांनी उभे रहावे. गोवर्धन पर्वत हिंदूंचा आहे आणि त्या पर्वताला प्रत्येकाने काठी लावण्याची आवश्यकता आहे ! - पू. मोहनबुवा रामदासी, सज्जनगड

प.पू. डॉक्टरांच्या संदर्भात साधिका कु. नंदा सदानंद नाईक यांना आलेल्या अनुभूती

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...
परात्पर गुरु
डॉ. जयंत आठवले
१. इतरांचे बोलणे ऐकू न येणे; मात्र प.पू. डॉक्टर 
आणि काही चांगले साधक बोलतांना ते ऐकू येणे 
     मी डिसेंबर १९९९ पासून आश्रमात सेवा करते. मी काही कारणाने प्रसारातून आश्रमात आले होते. तेव्हा माझे बाबा (पू. बाबा नाईक) आश्रमात होते. प.पू. डॉक्टरांंच्या कृपेमुळे मला आश्रमात रहायला मिळाले. त्या वेळी मला ऐकू येत नसे आणि त्यामुळे काही जण काय बोलतात ते कळत नसे. त्या वेळी प.पू. डॉक्टर जेवायला आल्यावर मी त्यांच्याशी बोलायचे. तेव्हा ते जे काही बोलायचे, ते मला ऐकू यायचे. काही चांगले साधक बोलतांनाही ऐकू यायचे; पण इतर साधकांचे बोलणे मला ऐकू यायचे नाही. तेव्हा मला पुष्कळ मानसिक त्रासही
व्हायचा. तेव्हा प.पू. डॉक्टरांशी बोलल्यावर माझे मन हलके व्हायचे. त्या वेळी ते अशी गोष्ट सांगायचे की, मला हसू यायचे. जवळजवळ २ वर्षे मला होणारा तीव्र त्रास त्यांचे बोलणे आणि अस्तित्व यांमुळे जास्त जाणवायचा नाही.

देवद आश्रमातील साधकांचे भाग्य थोर, लाभले प.पू. पांडे महाराज ।

प.पू. पांडे महाराज 
गुरूंप्रती (टीप १) असे अपार श्रद्धा, व्यक्त करती त्यांच्याप्रती पदोपदी कृतज्ञता ।
ज्यांनी सोपवले मला साक्षात् अवतार स्वरूप भगवंताच्या (परात्पर गुरु डॉक्टर) हाती ।
सांगती कधी आठवणी गुरुंविषयी
होतसे आपली भावजागृती ॥ १ ॥

प.पू. बाबा करत असती २४ घंटे गुणगान ।
परात्पर गुरु डॉक्टरांचेविना नाही रमत त्यांचे मन ।
प्रत्येक क्षणी हृदयी त्यांच्या असतात परात्पर गुरु डॉक्टरांचे चरण ॥ २ ॥

सनातनच्या साधकांवर उत्कट प्रेम करून त्यांना भरभरून आशीर्वाद देणारे प.पू. आबा उपाध्ये !

प.पू. आबा उपाध्ये
     जून २०१६ मध्ये पुणे येथील संत प.पू. नरसिंह उपाख्य आबा उपाध्ये यांनी सनातनच्या रामनाथी आश्रमाला भेट दिली. ६.६.२०१६ या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले अन् त्यांच्यात भावस्पर्शी संवाद झाला. त्या वेळी प.पू. आबा यांनी काढलेले गमतीशीर उद्गार पुढीलप्रमाणे आहेत.
परात्पर गुरु डॉ. आठवले : किती प्रेम करता साधकांवर !
प.पू. आबा : त्याला काही लिमिट (मर्यादा) नाही. प्रेमाचा फ्लो आहे. त्याला फुलस्टॉप नसतो ना ! तुमच्याकडील सगळी मंडळी म्हणतात, आम्हाला काही नको, केवळ आशीर्वाद पाहिजेत ! 
परात्पर गुरु डॉ. आठवले : हो. आम्हाला तेच पाहिजे. 
प.पू. आबा : पैसे आपण मिळवू शकतो; पण आशीर्वाद संपले ना, तर पुन्हा तपश्‍चर्या करायला लागते. 
परात्पर गुरु डॉ. आठवले : म्हणून तुम्ही आशीर्वाद देत नाही का ?
(उपस्थित सर्व साधक हसले.) 
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

प.पू. पांडे महाराजांनी उपायांच्या वेळी नामजपाकडे लक्ष नसल्याची जाणीव करून दिल्यावर व्यक्त केलेली कृतज्ञता !

कु. लक्ष्मी घोलप
     २६.९.२०१६ या दिवशी मी प.पू. पांडे महाराज यांच्या खोलीबाहेर ठेवलेल्या सुखासनावर (सोफ्यावर) नामजप करत बसले होते. तेव्हा प.पू. पांडे महाराजांच्या खोलीच्या बाजूला एका भिंतीवर श्रीकृष्ण आणि त्याच्या हातावर मी बसले आहेे, असे मला दिसले. त्या वेळी माझे नामजपाकडे लक्ष नव्हते. त्या वेळी मला प.पू. पांडे महाराजांचा आवाज ऐकू आला, लक्ष्मी, नामजपाकडे लक्ष दे. नंतर मी देवाला पुन्हा एकदा प्रार्थना केली, हे भगवंता, तू माझ्यासाठी किती करतोस रे ! मी तुझ्यापासून दूर जाते, तरी तू पुनः पुन्हा माझ्याजवळ दिसतोस आणि माझे लक्ष नामजपावर राहू दे, याची मला जाणीव करून देतोस. तेव्हा मला पुढील ओळी सुचल्या.
नाथा किती करता हो माझ्यासाठी ।
मी आहे मुलगी तुमची, स्वीकारली तुम्ही मला ॥
अनंत कोटी कोटी कृतज्ञता ॥
- कु. लक्ष्मी घोलप, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (वय ९ वर्षे) (२६.९.२०१६)-

प्रत्येक सेवा म्हणजे प.पू. गुरुदेवांची मानसपूजाच आहे, असे उत्तर देवाने सूक्ष्मातून देणे आणि तसेच मार्गदर्शन प.पू. पांडे महाराज यांनी स्थुलातून करणे

हे गुरुदेवा, 
आपल्या चरणी साष्टांग नमस्कार. 
१. नामजप करतांना प.पू. गुरुदेवांची मानस-पाद्यपूजा कशा प्रकारे करावी ? असा प्रश्‍न पडणेे आणि देवाने प्रत्येक सेवा ही प.पू. गुरुदेवांची मानसपूजा आहे, असा विचार सुचवणे : गुरुदेवा, मला चार घंटे नामजप करायला सांगितले आहेत. मी अगोदर ध्यानमंदिरात जाऊन नंंतर प.पू. भक्तराज महाराज यांच्या गाडीभोवती प्रदक्षिणा घालतेेे. प.पू. गुरुदेवांची मानस-पाद्यपूजा आणि नामजप करतांना एकदा मनात विचार आला, आपण प्रतिदिन गुरुदेवांची मानस पाद्यपूजा पंचामृताने करतो; परंतु आज कशी पाद्यपूजा करावी ? आणि देवाने विचार दिला, भगवंताच्या अनेक प्रकारच्या सेवा असून प्रत्येक सेवा ही एक प्रकारे प.पू. गुरुदेवांची केलेली मानसपूजाच आहे.

प.पू. पांडेबाबा तुम्हीच सर्वकाही !

       देवद (पनवेल) येथील सनातन आश्रमातील एका साधकाला प.पू. परशराम पांडे महाराज यांच्या नावातील प्रत्येक अक्षरासंबंधी पुढील गूढार्थ सुचला. त्याने तो मार्गशीर्ष शुक्ल पक्ष प्रतिपदा (३०.११.२०१६) या दिवशी प.पू. महाराजांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या चरणी कृतज्ञतापूर्वक अर्पण केला. 
प. - परमपिता तुम्हीच आहात बाबा ।
पू. - पूर्णब्रह्मही तुम्हीच आहात बाबा ।
- परमात्मास्वरूपही तुम्हीच आहात बाबा ।
- रक्षण होते आम्हा साधकांचे आणि देवद आश्रमाचे आपल्या अस्तित्वाने बाबा ।
- शुद्धी होते देवद आश्रमाची तुम्ही जेव्हा आश्रम परिसरात फिरता बाबा ।

तळमळ आणि कृतज्ञता भाव असणार्‍या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सांगली येथील सौ. विद्या जाखोटिया !

सौ. विद्या जाखोटिया
१. पायाच्या दुखण्यामुळे सेवेसाठी घराबाहेर 
पडू शकत नसल्याने परिस्थिती स्वीकारून स्वभावदोष प्रक्रिया 
आणि भावजागृतीचे प्रयत्न ध्येय ठेऊन करण्यास प्रारंभ करणे 
    सौ. विद्या जाखोटियाभाभी चिपळूण येथे आयुर्वेदिक उपचारांसाठी गेल्या होत्या. उपचारानंतर त्यांच्यामधे बराच पालट जाणवत होता. त्यांची प्रकृती बरी नसल्यामुळे त्या सेवा करू शकत नसत. त्यापूर्वी त्यांच्याकडे वेगवेगळ्या सेवा होत्या. पायाचे दुखणे उद्भवल्यामुळे सेवेसाठी घराबाहेरही पडू शकत नाही, हे त्यांनी पूर्णपणे स्वीकारले होते. या परिस्थितीत काय करू शकतो, याचे चिंतन करून त्यांनी स्वभावदोष प्रक्रिया आणि भावजागृतीचे प्रयत्न ध्येय ठेवून करण्यास प्रारंभ केला.

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या शिबिराच्या निमित्ताने साधना करण्याचे आणि श्रीगुरूंचे आज्ञापालन करण्याचे लक्षात आलेले महत्त्व !

श्री. अभय वर्तक
      २५ ते २७ नोव्हेंबर २०१६ या कालावधीत रामनाथी आश्रमात वक्ता प्रशिक्षण शिबीर झाले. या शिबिरात लिबिया, सिरीया, कझाकीस्तान, इस्रायल, इंग्लंड आदी देशांचा उल्लेख होत होता. ही नावे ऐकल्यावर माझे मन अस्वस्थ होत असे. याउलट शिबिरातील मधल्या विश्रांतीच्या सत्रात केवळ एकदा श्रीकृष्ण, प.पू. भक्तराज महाराज किंवा परात्पर गुरु डॉ. आठवले यांपैकी कोणतेही नाव घेतल्यावर मन स्थिर होत असे. यावरून देवाने त्यांचेे स्मरण करण्याचे महत्त्व लक्षात आणून दिले आणि पुढील तुलनात्मक सारणी सुचवली.

नवरात्रीच्या कालावधीत रामनाथी आश्रमात असतांना आलेल्या अनुभूती

सौ. मीरा माने
१. यज्ञकुंडाभोवती देवीच्या अस्त्रांची रांगोळी 
काढतांना त्यातून सुटलेला प्रत्येक बाण स्वतःतील दोषांना 
लागून दोष नष्ट होत असल्याचे जाणवणे आणि मन सकारात्मक होणे 
     नवरात्रीच्या दिवसांत रामनाथी आश्रमात नवचंडी याग करण्यात येणार होता. त्या वेळी मला यज्ञकुंडाभोवती देवीच्या अस्त्रांची रांगोळी काढण्याची संधी मिळाली होती. तेव्हा यज्ञकुंडाच्या तीन बाजूंनी रांगोळी काढत असतांना मला फार चांगले वाटत होते. रांगोळीत रंग भरतांना आतून आपोआप प्रार्थना झाली, हे देवी, तू या बाणांनी असुरांचा नाश केलास, तसेच हे बाण माझ्यातील अनेक जन्मांचे दोष आणि अहं यांना लागून ते मुळासकट नष्ट होऊदे. अशी प्रार्थना झाल्यावर प्रत्येक बाण त्या त्या दोषावर लागत आहे आणि देवी त्यांना नष्ट करण्याची शक्ती देत आहे, असे जाणवत होते. त्या वेळी मनात दोषांमुळे आलेली नकारात्मता अल्प होऊन मन सकारात्मक झाले.

परिस्थिती स्वीकारणे यापेक्षा परिस्थिती चांगलीच आहे, असा संस्कार स्वतःवर करा !

पू. संदीप आळशी
     आजारपण, कौटुंबिक अडचणी, आर्थिक विवंचना, आध्यात्मिक त्रास इत्यादींमुळे त्रस्त झालेले साधक परिस्थिती स्वीकारणे, ही साधना आहे, असा दृष्टीकोन स्वतःला देत असतात. हा दृष्टीकोन योग्यच आहे; पण तरीही यामध्ये एकप्रकारची उदासीनतेची भावना अंतर्मनात वास करून राहू शकते. यासाठी या दृष्टीकोनाच्याही पुढे जाऊन परिस्थिती चांगलीच आहे, असा संस्कार आपण पुढीलप्रमाणे स्वतःवर करू शकतो.
१. देवाने आपल्याला कीडामुंगीप्रमाणे नव्हे, तर मनुष्याचा जन्म दिला आहे; म्हणून आपण साधना करण्याचा विचार तरी करू शकतो.
२. देवाने आपल्याला लुळ्या-पांगळ्याप्रमाणे नव्हे, तर त्यातल्यात्यात धडधाकट देह दिला आहे; म्हणून आपण साधनेचे प्रयत्न तरी करू शकतो.

नामस्मरण भावपूर्ण होण्यासाठी प्रयत्न केल्यावर श्रीमती मेघना वाघमारे यांना आलेल्या अनुभूती !

श्रीमती मेघना वाघमारे
     भावजागृतीसाठी मनापासून प्रयत्न केले, तर भावजागृती किती लवकर होऊ शकते, याचे आदर्श उदाहरण श्रीमती मेघना वाघमारे यांनी सर्वांसमोर ठेवले आहे. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले 
१. सत्संगात प्रतिदिन भावपूर्ण नामस्मरण करण्यास सांगितल्यावर 
प्रतिदिन अल्प काळच भावपूर्ण नामस्मरण होत आहे, असे लक्षात येणे
     १६.११.२०१६ या दिवशी मला संतांच्या सत्संगात उपस्थित रहाण्याची संधी मिळाली. सत्संगात एका साधकाच्या मनातील शंकांचे निरसन करतांना संतांनी प्रतिदिन नियमित आणि भावपूर्ण नामस्मरण झालेच पाहिजे. नामाचे महत्त्व लक्षात घेऊन ते केलेच पाहिजे, असे सांगितले. त्या रात्री या सूत्रावर विचार करतांना मी नकळत स्वतःच्या आत डोकावून पाहिले. तेव्हा माझ्या मनात मी प्रतिदिन नामजप करते; परंतु माझे नामस्मरण भावपूर्ण होते का ? किती काळ भावपूर्ण नामस्मरण होते ?, असे प्रश्‍न निर्माण झाले. माझ्याकडून भावपूर्ण नामस्मरण अल्प काळच होत आहे, असे मला वाटले. नंतर गुरुदेवा, तुम्हाला अपेक्षित असे नामस्मरण तुम्हीच माझ्याकडून करवून घ्यावे, अशी प्रार्थना झाली.

स्वतःच्या हृदयात राममंदिर उभारल्यावरच त्या आत्मबलाने राममंदिराची निर्मिती आणि त्याचे रक्षण होऊ शकणे

     देऊळ निर्माण केल्यास ते सांभाळण्याचे सामर्थ्य हवे. झेंडा किंवा दंड हे त्यांच्या शक्तीचे प्रतीक असते; मात्र त्यात चैतन्यशक्ती आणून ते सांभाळण्याची शक्ती पाहिजे. राममंदिर बांधण्याच्या घोषणा करून राममंदिर उभारले जात नाही. प्रथम स्वतःच्या हृदयात राममंदिर उभारले पाहिजे. त्या आत्मबलाने राममंदिराची निर्मिती होऊ शकेल आणि त्याच्या बळावर त्याचे रक्षण होऊ शकेल. धर्मो रक्षति रक्षितः । (मनुस्मृति, अध्याय ८, श्‍लोक १५) म्हणजेच धर्माचे रक्षण आपण केले, तर धर्म, म्हणजेच ईश्‍वर आपले रक्षण करील, तसेच हे आहे. 
- प.पू. परशराम पांडे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२८.२.२०१६)

कु. योगिनी आफळे (वय १४ वर्षे) यांनी प.पू. पांडे महाराज यांना दिलेले कृतज्ञतापत्र

स्वतःला पालटण्याची तळमळ आणि देशाभिमान असलेला ५४ टक्के आध्यात्मिक पातळी आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला संभाजीनगर येथील कु. अवधूत गोविंद जोशी (वय ९ वर्षे) !

उच्चलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र 
(सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. अवधूत जोशी एक दैवी बालक आहे !
कु. अवधूत जोशी
पालकांनो, हे लक्षात घ्या ! 
     तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल. 
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले 
    यासमवेतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर यूट्यूबच्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.

‘प्रथमोपचार प्रशिक्षण (भाग ३)’ या ग्रंथात खालील सुधारणा करून घ्याव्यात !

साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती
     सनातनने प्रकाशित केलेल्या ‘प्रथमोपचार प्रशिक्षण (भाग ३)’ या ग्रंथात पुढीलप्रमाणे सुधारणा (दुरुस्त्या) आहेत. साधक आणि वाचक यांनी याआधी खरेदी केलेल्या त्यांच्याकडील ग्रंथात या सुधारणा करून घ्याव्यात.
१. ग्रंथाच्या आवृत्त्या (मराठी भाषा)
अ. आवृत्ती पहिली :
१९ जुलै २०१६
आ. आवृत्ती पहिली, पहिले पुनर्मुद्रण : २६ ऑक्टोबर २०१६
२. करावयाच्या सुधारणा अ. पुढील पृृष्ठांवरील ‘गुडघ्यांवर’ हा शब्द खोडून तेथे ‘उकिडवे’ असे करावे.
अ १. पृष्ठ क्र. ९१ : वरून बारावी आणि अठरावी ओळ
अ २. पृष्ठ क्र. ९२ : वरून चौथी ओळ
अ ३. पृष्ठ क्र. ९६ : शेवटून दुसरी ओळ
अ ४. पृष्ठ क्र. ९७ : शेवटून तिसरी आणि पाचवी ओळ
आ. पृष्ठ क्र. १०० वरील उपसूत्र क्र. ‘इ’ येथे ‘आकृती २०’ या शब्दांच्या ठिकाणी ‘आकृती २० अ’ असे करावे.


बोधचित्र

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराजसनातनचे श्रद्धास्थान
आश्रमाविषयीचा दृष्टीकोन
आश्रम माझा नाही; पण मी आश्रमाचा आहे.
भावार्थ : ‘आश्रम माझा नाही’ म्हणजे आश्रमावर माझे स्वामित्व (मालकी) किंवा अधिकार (हक्क) नाही; कारण तो गुरूंचा आहे. ‘मी आश्रमाचा आहे’ म्हणजे मी गुरूंच्या आश्रमाचा असल्याने आश्रमाची, आश्रमात आलेल्यांची काळजी घेणार व सेवा करणार. या दृष्टीकोनामुळेच आश्रमातील कामे करूनही आश्रमाविषयी प्रेम निर्माण होत नाही, तर प्रीती निर्माण होते.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन ‘संत भक्तराज महाराज यांची शिकवण.’)


परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार


परात्पर गुरु डॉ. आठवले
     ‘वैज्ञानिक देवाचा शोध घेण्याऐवजी देवाने बनवलेल्या विश्‍वाचा पिढ्यान्पिढ्या शोध घेत बसतात. याउलट अध्यात्मात साधक देवाचा शोध घेतात. देव सापडल्यावर त्यांना विश्‍वाचे कोडे उलगडते !’ - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

चुकांकडे कसे पहावे ? 
कालक्रमणा करतांना मनुष्याकडून चुका घडतातच; पण प्रत्येक 
चुकीपासून आपण काहीतरी शिकलो, तरच पुढील आयुष्य यशस्वी होते. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn