Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

भाजप सरकारने विकासाबरोबर हिंदुत्वाकडेही लक्ष द्यावे ! - डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी, खासदार, भाजप

केवळ डॉ. स्वामीच असे बोलण्याचे धाडस दाखवतात !
नवी देहली - केवळ विकासाच्या गोष्टी केल्या जात आहेत. आर्थिक विकास अपरिहार्य आहे; मात्र ते पुरेसे नाही. देशातून भ्रष्टाचार समाप्त करणे आणि हिंदुत्व यांकडे भाजपने लक्ष द्यायला हवे, असे प्रतिपादन भाजपचे खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी येथे केले. 
   डॉ. स्वामी पुढे म्हणाले की, वाजपेयी यांच्या काळात इंडिया शायनिंगचा नारा देण्यात येऊनही पक्ष पराभूत झाला. नरसिंह राव यांनी आर्थिक सुधारणेद्वारे देशाचा विकासदर वाढवूनही त्यांचा पराभव झाला. राजीव गांधी यांनी औद्योगिक क्षेत्रात प्रगती घडवून आणल्यानंतरही त्यांचा पराभव झाला. मोरारजी देसाई यांनीही आर्थिक सुधारणा केल्या, तरीही त्यांचा पराभव झाला. म्हणजेच विकासामुळे विजय मिळत नाही, हे लक्षात घ्यायला हवे. वर्ष २०१४ च्या निवडणुकीत मुसलमानांचे लांगूलचालन आणि हिंदूंच्या मतांमध्ये विभाजन असे राजकारण झाले होते. आता मात्र हिंदूंना संघटित करण्याची आवश्यकता आहे.

महामार्गांवर मद्याची दुकाने नकोत ! - सर्वोच्च न्यायालय

  • मद्यविक्रीतून महसूल मिळवण्यासाठी त्यावर बंदी न घालणारी आतापर्यंतची सरकारे लोकशाही निरर्थक ठरवतात !
  • हे न्यायालयाला का सांगावे लागते ? सरकारला आतापर्यंत का कळले नाही कि मद्यप्राशन करून महामार्गावर गाडी चालवण्यास सरकारचा पाठिंबा आहे ?
   नवी देहली - राष्ट्रीय महामार्ग असो कि राज्य महामार्ग कुठेही मद्याची दुकाने नसावीत. जरी या महामार्गांचा भाग शहराच्या मधून जात असला, तरी त्यांना अनुमती दिली जाऊ नये, तसेच त्यांच्यापर्यंत पोचणे सोपे नसावे, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाने एका याचिकेवर सुनावणी करतांना केले आहे. महामार्गांवर मद्याची दुकाने नसावीत, यासाठी ही याचिका प्रविष्ट करण्यात आली आहे. या याचिकेत महामार्गावर होणारे अपघात मद्यप्राशनाने होतात आणि त्यात मोठ्या प्रमाणात जीवितहानी होते, असे म्हटले आहे. 

अमेरिकेतील विनोदी कार्यक्रमात नोटाबंदी आणि राष्ट्रगीत यांची खिल्ली !

अमेरिकी जनमानसामध्ये भारतद्वेष ठासून भरला 
असल्यामुळेच भारताच्या राष्ट्रहिताशी निगडित निर्णयांविषयी
तेथील दूरचित्रवाहिनीवरील कार्यक्रमात खिल्ली उडवली जाते ! 
     वॉशिंग्टन - अमेरिकेत १ डिसेंबर या दिवशी प्रसारित करण्यात आलेल्या ‘द डेली शो विथ ट्रिवोर नोआ’ या विनोदी कार्यक्रमात भारतातील नोटाबंदी आणि चित्रपटगृहांत चित्रपटाच्या प्रारंभी राष्ट्रगीत दाखवण्याच्या न्यायालयाच्या निर्णयाची खिल्ली उडवण्यात आली. 
     भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर या दिवशी ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या नोटा चलनातून बाद ठरवल्या. यावर विनोद करतांना कार्यक्रमाचा सूत्रसंचालक ट्रिवोर नोआ याने ‘असे प्रथमच घडत आहे की, लोक दुसर्‍यांना पैसे देत आहेत; पण पैसे न घेता लोक ‘ते तुम्हालाच राहू द्या’, असे म्हणत आहेत’, असे सांगत नोटाबंदीची खिल्ली उडवली. यावेळी कायक्रमातील पडद्यावर देहलीच्या ‘एटीएम्’ समोर लोकांनी लावलेल्या रांगांची दृष्ये दाखवण्यात आली. 

फारूख अब्दुल्ला यांच्यावर देशद्रोहाचा खटला प्रविष्ट करा ! - काश्मिरी पंडितांच्या संघटनांची मागणी

अशी मागणी का करावी लागते ? सरकारला हे का कळत नाही कि सरकारला तसे करावेसे वाटत नाही ?
   जम्मू - फारूख अब्दुल्ला यांनी केलेल्या राष्ट्रविरोधी वक्तव्यांवरून काश्मिरी पंडितांच्या संघटनांनी जम्मू येथे निदर्शन केले. फारूख अब्दुल्ला यांच्या विरोधात देशद्रोहाचा खटला दाखल करावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली. अब्दुल्ला यांनी हुर्रीयत कॉन्फरन्सच्या स्वतंत्र काश्मीरच्या मागणीचे समर्थने केले; म्हणून आम्ही देशद्रोहाचा खटला प्रविष्ट करण्याची मागणी करत आहोत, असे ऑल पार्टीज माइग्रंट्स कोऑर्डिनेशन कमिटी (एपीएम्सीसी)चे राष्ट्रीय प्रवक्ता किंग भारती यांनी म्हटले आहे.
   हजरतबलमध्ये शेख अब्दुल्ला यांच्या १११ व्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करतांना स्वतंत्र काश्मीरच्या मागणीचे मी समर्थन करतो. आम्ही तुमच्यासमवेत आहोत, असे फारूख अब्दुल्ला यांनी म्हटले होते. 

कोलकाता येथे भाजपचे नेते मनीष शर्मा आणि ६ कोळसा माफिया यांना अटक !

बेहिशोबी ३३ लाख रुपये आणि ७ बंदुका जप्त सत्तेत नसतांना पक्षाचा एक नेता इतका बेहिशोबी पैसा बाळगतो, तर पक्षाच्या नेत्यांकडे किती बेहिशोबी पैसा असेल, याची कल्पना न केलेली बरी ! अशा राजकारण्यांची त्यांच्या नातेवाइकांच्या संपत्तीसह सर्व संपत्ती जप्त केली पाहिजे !

   कोलकाता - भाजपचे नेते मनीष शर्मा यांना कोलकाता पोलिसांच्या विशेष कृती पथकाने राणीगंज येथून अटक केली आहे. त्यांच्याकडून ३३ लाख रुपयांच्या नोटा, ७ बंदुका आणि ८९ गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत. शर्मा यांच्यासह ६ कोळसा माफियांनाही पोलिसांनी अटक केली आहे. मनीष शर्मा यांच्याकडून जप्त केलेल्या ३३ लाख रुपयांमधील सर्व नोटा २ सहस्र रुपयांच्या आहेत. काही दिवसांपूर्वी तमिळनाडूतही भाजपच्या नेत्याला बेहिशोबी नोटांसहित अटक करण्यात आली होती.

म्यानमारमधील रोहिंग्या मुसलमानांवरील अत्याचारांविषयी संयुक्त राष्ट्राचे माजी प्रमुख कोफी अन्नान यांच्याकडून चौकशी चालू !

म्यानमारमधील मुसलमानांवरील अत्याचाराची चौकशी 
करणारा संयुक्त राष्ट्र पाकिस्तान आणि बांगलादेश येथील हिंदूंवर होत 
असलेल्या अत्याचाराच्या विरोधात साधा निषेधही नोंदवत नाही, हे लक्षात घ्या ! 
     बँकॉक (थायलंड) - संयुक्त राष्ट्राचे माजी प्रमुख कोफी अन्नान यांनी म्यानमारच्या सैन्याकडून अल्पसंख्यांक रोहिंग्या मुसलमानांवर होत असलेल्या अत्याचारांच्या आरोपांची चौकशी चालू केली आहे. 
     म्यानमारमध्ये फार पूर्वीपासून रोहिंग्या आणि बौद्ध यांच्यात धार्मिक संघर्षाची स्थिती चालू आहे. वर्ष २०१२ मध्ये येथे मोठ्या प्रमाणात धार्मिक हिंसाचार झाला होता. यात शेकडो लोक ठार झाले होते आणि १ लक्ष ४० सहस्र बेघर झाले होते. प्रसारमाध्यमांतील वृत्तानुसार म्यानमार सैन्याने केलेल्या अत्याचारामुळे तेथील अनेक गावे उद्ध्वस्त झाली आहेत. मलेशियाच्या परराष्ट्र मंत्रालयानेही म्यानमारमध्ये होत असलेल्या रोहिंग्या मुसलमानांचा वंशसंहार त्वरित बंद करण्याची मागणी केली आहे. म्यानमारच्या नेत्या आंग सान सू ची यांनी मात्र सिंगापूर वृत्तवाहिनी ‘न्यूजएशिया नेटवर्क’ ला सांगितले की, रोहिंग्या मुसलमानांविषयीची वृत्ते ओढून ताणून प्रस्तुत करण्यात येत आहेत.

भारतात सनी लिओन सर्वाधिक ‘सर्च’ केलेले व्यक्तिमत्त्व !

यावरून भारतीय जनतेची नीतीमत्ता किती खालावली आहे,
हे लक्षात येते. यासाठी समाजाला धर्मशिक्षण देण्याचे महत्त्व अधोरेखित होते ! 
     नवी देहली - भारतात चित्रपट अभिनेत्री सनी लियोन सलग पाचव्या वर्षीही संकेतस्थळावर सर्वाधिक ‘सर्च’ करण्यात येत असलेले व्यक्तिमत्त्व असल्याचे ‘याहू इंडिया’च्या सर्वेक्षणातून पुढे आले आहे. प्रत्येक वर्षी ‘याहू इंडिया’ संकेतस्थळ वर्षभर ‘सर्च’ केलेल्या भारतीय चिन्हे, कार्यक्रम आणि कथा (स्टोरी) यांच्या आधारावर ही यादी घोषित करते. पुरुष सेलिब्रिटीमध्ये अभिनेते सलमान खान यांना सर्वाधिक सर्च करण्यात येते. त्यानंतर कपिल शर्मा, अमिताभ बच्चन, शाहरुख खान आणि आमिर खान या अभिनेत्यांची नावे आहेत.

अंनिसवर कारवाई करण्यासाठी विधी आणि न्याय विभागाच्या राज्यमंत्र्यांकडे शिफारस करणार ! - गिरीश महाजन, जलसंपदामंत्री

   
जलसंपदामंत्री श्री. गिरीश महाजन (उजवीकडे) यांना
सनातन पंचांग भेट देतांना श्री. अरविंद पानसरे
   नागपूर, ७ डिसेंबर (वार्ता.) - अंनिसच्या आर्थिक घोटाळ्याच्या संबंधाने त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी विधी आणि न्याय विभागाच्या राज्यमंत्र्यांकडे शिफारस करू, असे आश्‍वासन जलसंपदामंत्री तथा भाजपचे नेते श्री. गिरीश महाजन यांनी दिले. हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र प्रवक्ता श्री. अरविंद पानसरे यांनी श्री. महाजन यांची भेट घेतली. या प्रसंगी त्यांना वरील विषयावर निवेदन देण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.
  अंनिसकडून देशविदेशांतून कोट्यवधी रुपये जमा करून मोठा आर्थिक घोटाळा करण्यात आला आहे. या संस्थेने शासनाचे लाखो रुपयांचे अंशदान (कर) बुडवले आहे. विदेशातून घेतलेले पैसे वार्षिक हिशोब पत्रकात दाखवण्यात आलेले नाहीत. देणगी पावत्यांवर क्रमांक नाहीत, असे अनेक अपप्रकार आणि कायदाद्रोही कृत्ये अंनिस न्यासाने केलेली आहेत. तसेच निरीक्षक आणि अधीक्षक, सार्वजनिक विश्‍वस्त न्यास कार्यालय, सातारा या विभागाने सदर न्यासावर प्रशासन नेमून विशेष लेखापरीक्षण करण्याची शिफारस केली आहे; मात्र साहाय्यक धर्मादाय आयुक्त, सातारा विभाग हा अहवाल तसाच प्रलंबित ठेवून दोषींना पाठीशी घालत आहेत. 
त्यामुळे त्या अहवालावर तातडीने कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने जलसंपदामंत्री श्री. गिरीश महाजन यांच्याकडे या वेळी केली. या वेळी श्री. पानसरे यांनी श्री. महाजन यांना सनातन पंचांग २०१७ भेट दिले.

(म्हणे) ‘भारताने सीमावाद आणखी किचकट करू नये !’ - चीन

भारत सीमावाद किचकट करत नसून चीन त्यावर दावा करत असल्याने 
तो किचकट होत आहे ! त्यामुळे चीनने तो करत असलेला दावा सोडून द्यावा ! 
     बीजिंग - तिबेटचे १७ वे आध्यात्मिक गुरु करमापा ओग्येन त्रिनली दोरजे यांनी नुकतीच अरुणाचल प्रदेशला भेट दिली होती. हा भाग दक्षिण तिबेटचा असल्याचा दावा चीन पूर्वीपासून करत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता लू कांग यांनी म्हटले आहे की, भारत-चीन सीमेवरील पूर्व भागाविषयी चीनची भूमिका स्पष्ट आहे. त्यामुळे भारत निश्‍चित स्वरूपात असे कोणते पाऊल उचलणार नाही ज्यामुळे सीमावाद आणखी किचकट होईल. सीमा भागात शांतता अखंडित रहावी, तसेच द्विपक्षी संबंध दृढ व्हावेत, यांसाठी प्रयत्न करणे, हे उभय राष्ट्रांसाठी हितावह असल्याचे कांग म्हणाले.

हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर पंताजीकाका बोकील अधिवक्ता पुरस्काराने सन्मानित !

छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज श्रीमंत शिवाजीराजे भोसले यांची उपस्थिती
अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांना पंताजीकाका बोकील अधिवक्ता
पुरस्कार देतांना श्रीमंत शिवाजीराजे भोसले महाराज
(डावीकडून तिसरे) आणि अन्य मान्यवर
   सातारा, ७ डिसेंबर (वार्ता.) - वाई (जिल्हा सातारा) येथील प्रतापगड उत्सव समितीच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे शिवप्रतापदिन अर्थात् अफझलखानवधाचा आनंदोत्सव श्री महागणपति घाटावर आयोजित करण्यात आला होता. या नेत्रदीपक सोहळ्यात श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज अदालत वाडा येथील निवासी श्रीमंत शिवाजीराजे भोसले महाराज यांच्या शुभहस्ते हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांना पंताजीकाका बोकील अधिवक्ता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि स्मृतीचिन्ह, असे पुरस्काराचे स्वरूप होते.
या वेळी प्रतापगड उत्सव समितीच्या निमंत्रक श्रीमती विजयाताई भोसले, उपाध्यक्ष श्री. विनायक सणस, सचिव श्री. यशवंत लेले, श्री. सुहास पानसे, बजरंग दलाचे श्री. रविकुमार कोठाळे, पुणे येथील हिंदु स्वाभिमान प्रतिष्ठानचे अधिवक्ता देवदास शिंदे, शिवसेनेचे शहराध्यक्ष अधिवक्ता शिरीष दिवाकर, वाईच्या प्रथम नगराध्यक्ष 
डॉ. (सौ.) प्रतिभा शिंदे आणि त्यांचे सहकारी नगरसेवक आदी मान्यवर उपस्थित होते. 

ट्रम्प यांना हिंदु धर्म आणि भारतीय लोक अतिशय आवडतात !

भारतीय वंशाचे अमेरिकी उद्योगपती शलभ कुमार यांची माहिती 
     नवी देहली - अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प आणि त्यांचे प्रशासन दक्षिण आशियात शांती आणि समृद्धी यांसाठी प्रयत्न करेल, असा आशावाद भारतीय वंशाचे अमेरिकी उद्योगपती शलभ कुमार यांनी व्यक्त केला आहे. निवडणुकीच्या १५ दिवसांपूर्वी हिंदू-अमेरिकी नागरिकांच्या एका कार्यक्रमात ट्रम्प यांना बोलावण्यात कुमार यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. कुमार अमेरिकेतील रिपब्लिकन हिंदु आघाडीचे अध्यक्ष आहेत. नव्या सरकारच्या सत्ताग्रहण समारोहासाठी नेमलेल्या समितीत शलभ कुमार यांचा समावेश आहे. कुमार म्हणाले, ‘‘ट्रम्प यांनी अमेरिका आणि भारत जवळचे मित्र असतील, असे म्हटले आहे. ट्रम्प यांना हिंदु धर्म आणि भारतीय लोक अतिशय आवडतात.’’ ट्रम्प यांच्या निवडणुकीसाठी आलेल्या देणगीत सर्वाधिक देणगीदारांच्या सूचीत कुमार यांचा पहिल्या १० लोकांमध्ये समावेश होता.

बुरहान वानी आणि हाफिज सईद यांची भारतद्वेषी ध्वनीफीत उघड !

     देहली - जम्मू काश्मीरमध्ये भारतीय सैनिकांनी ठार मारलेला हिजबुलचा कमांडर बुरहान वानी आणि पाकिस्तानमधील जिहादी आतंकवादी हाफिज सईद यांच्यात झालेल्या संवादाची ध्वनीफीत एका वृत्तवाहिनीने प्रसारीत केली आहे. काश्मीरमध्ये आतंकवादी कारवायांसाठी बुरहान वानी हा हाफिज सईदकडून पैसे, शस्त्रास्त्रे आणि मार्गदर्शन घेत असल्याचे या ध्वनीफितीतून समोर येत आहे. यात आतंकवादी वानी भारतीय सैनिकांना शत्रू संबोधत असल्याचे दिसून आले आहे. (यातून वानी हा जिहादी आतंकवादी असल्याचेच पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. वानीच्या मृत्यूनंतर नरकाश्रू ढाळणार्‍यांना ही चपराकच आहे. अशा भारतद्वेष्ट्यांना भारताने चोख प्रत्युत्तर देणे आवश्यक आहे ! - संपादक)

रेल्वेच्या १२ सहस्र तिकीट खिडक्या ‘कॅशलेस’ करण्यात येणार !

भारताची कॅशलेस अर्थव्यवस्थेकडे वाटचाल ! 
     नवी देहली - ‘कॅशलेस’ (रोखविरहित) अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देण्यासाठी येत्या ६ मासांत रेल्वेचे १२ सहस्र तिकिट खिडक्या ‘कॅशलेस’ करण्यात येणार आहेत. त्यामुळे रोख रक्कमेद्वारे कोणतेही तिकीट मिळणार नाही. त्यासाठी रेल्वे प्रवाशांना डेबिट किंवा क्रेडिट कार्डचा वापर करावा लागणार आहे. रेल्वे विभागाने यासाठी ‘आयसीआयसीआय’सह अन्य बँकांशी करार केले आहेत. या बँकांना तिकीट खिडक्यांसाठी १५ सहस्र ‘पीओएस्’ यंत्रे उपलब्ध करून देण्यास सांगण्यात आले आहे. प्राधान्याने सर्व शहरी भागात यंत्रे उपलब्ध करण्यात येणार आहे. रेल्वेच्या या कॅशलेस व्यवस्थेमुळे रेल्वे कर्मचार्‍यांना मोठ्या रोख रकमेपासून दिलासा मिळणार आहे, तसेच त्यांची चिल्लर पैशांची अडचण दूर होणार आहे. 

‘इंटरनेट’शिवाय ‘मोबाइल बँकिंग’ सेवा चालू करण्याचा सरकारचा निर्णय !

देशातील अर्धी अधिक जनता एकवेळ उपाशी रहात असतांना 
त्यांचे जगणे सुसह्य करण्याऐवजी देशाला ‘डिजिटल’ करायला निघालेले सरकार ! 
     नवी देहली - सरकारने ८ नोव्हेंबरला ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या चलनावर बंदी आणली. आता भारतीय अर्थव्यवस्थेला ‘कॅशलेस’ च्या (रोकडविरहित) दिशेने घेऊन जाण्याचा भारत सरकारचा प्रयत्न चालू आहे. ‘कॅशलेस’ व्यवहारामध्ये भ्रमणभाषला विशेष महत्त्व असणार आहे. हे लक्षात घेऊन ‘इंटरनेट’ जोडणी शिवाय (कनेक्शनशिवाय) साधारण मोबाइलवरून ‘मोबाइल बँकिंग’ करता येईल, असे स्वस्त तंत्रज्ञान विकसित करावे, अशी सूचना केंद्र सरकारने दूरसंचार आस्थापनांना केली आहे. या अनुषंगाने अनेक वर्षे दुर्लक्ष केल्यानंतर ‘अनस्ट्रक्चर्ड सप्लीमेंट्री सर्व्हिस डेटा’ (युएस्एस्डी) चालू करण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न चालू आहेेत. केंद्रीय ऊर्जामंत्री पियूष गोयल यांच्या उपस्थितीत बँकिंग, दूरसंचार आणि पेमेंट्स इंडस्ट्रीज यांच्या प्रतिनिधींची बैठक नुकतीच झाली. या बैठकीत ‘युएस्एस्डी’ला चालना देण्याचा निर्णय झाला. ‘युएस्एस्डी’च्या साहाय्याने खातेदाराला त्याच्या खात्यातील रकमेची माहिती घेता येईल, तसेच लहान रक्कम दुसर्‍याच्या खात्यामध्ये जमा करता येईल.

सरन्यायाधीशपदी न्या. केहर यांची नियुक्ती !

   नवी देहली - सध्याचे सरन्यायाधीश टी.एस्. ठाकूर निवृत्त झाल्यानंतर सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती जगदीशसिंह केहर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ४ जानेवारी २०१७ या दिवशी राष्ट्रपदी प्रणव मुखर्जी हे केहर यांना सरन्यायाधीशपदाची शपथ देणार आहेत. ४ ऑगस्ट २०१७ पर्यंत ते या पदावर असतील.

सिरियाला जाण्याच्या विचारात होते सिमीचे आतंकवादी !

भोपाळ येथे चकमकीत ठार झालेल्या सिमीच्या आतंकवाद्यांचे प्रकरण 

सिमीचे आतंकवादी चकमकीत ठार झाल्यानंतर 
गळा काढणार्‍या कथित मानवतावाद्यांना काय म्हणायचे आहे ? 
आतंकवादग्रस्त भारत ! 
     भोपाळ - भोपाळ मध्यवर्ती कारागृहातून पलायन करतांना चकमकीत मारल्या गेलेल्या सिमीच्या आतंकवाद्यांचे इसिसमध्ये सहभागी होण्याचे नियोजन होते, अशी माहिती गुप्तचर यंत्रणेच्या अन्वेषणात समोर आली आहे. हे आतंकवादी कारागृहातून पळून जात असतांना पोलिसांनी त्यांना काही घंट्याच्या आतच चकमकीत ठार मारले होते. 
     इसिसमध्ये सहभागी होण्यासाठी सिरियाला जाण्याविषयी या आतंकवाद्यांनी कारागृहातील इतर कैद्यांशीही चर्चा केली होती. या कारागृह पलायनचा मुख्य सूत्रधार अबू फैजल होता. अटक होण्याच्या पूर्वी तो पाकिस्तानला जाण्याच्या विचारात होता. त्याने उत्तरप्रदेशातही त्याचे जाळे निर्माण केले होते. या जाळ्याच्या माध्यमातून बनावट पासपोर्ट सिद्ध करून त्यांचा नेपाळ मार्गे सिरिया गाठण्याचा बेत होता.

काळा पैसा पांढरा केल्याच्या आरोपाखाली ‘अ‍ॅक्सिस’ बँकेच्या २ व्यवस्थापकांना अटक!

देशातील प्रमुख बँकांमधील अधिकारीच 
काळा पैसा पांढरा करण्यात गुंतले असतील, तर 
सरकारची भ्रष्टाचाराच्या विरोधातील मोहीम यशस्वी होईल का ? 
     नवी देहली - काळा पैसा सोन्याच्या रूपात पालटून दिल्याच्या आरोपाखाली ‘अ‍ॅक्सिस’ बँकेच्या शोभित सिन्हा आणि विनीत गुप्ता या दोन व्यवस्थापकांना सक्तवसूली संचालनलयाने (ईडी) अटक केली आहे. राजीव सिंह नावाच्या व्यक्तीच्या सांगण्यावरून काळा पैसा पांढरा केल्याचे या दोघांनी मान्य केले आहे. याप्रकरणी गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. 
१. ‘ईडी’ने दिलेल्या माहितीनुसार राजीव सिंह हा कर सल्लागार आहे. कर सल्लागाराच्या व्यवसायाआड तो हवाला रॅकेट चालवत असून त्याने ५ आस्थापनांची नोंदणी केलेली आहे. 

आदर्श पिढीसाठी माता-पिता आणि गुरु यांनी मुलांवर योग्य संस्कार करणे आवश्यक ! - अधिवक्ता सुब्रह्मण्य

होळेहोन्नूर (कर्नाटक) येथे हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन 
दीपप्रज्वलन करतांना डावीकडून सौ. कावेरी रायकर,
सौ. सुकन्या आचार्य, अधिवक्ता सुब्रह्मण्य आणि श्री. विजय रेवणकर

     होळेहोन्नूर (कर्नाटक) - आता गावागावांत, राष्ट्रीय स्तरावर भ्रष्टाचार अधिक वाढला आहे. त्याला केवळ माता-पिता आणि गुरु हे तीन लोकच पालटू शकतात. या तिघांनी योग्य संस्कार केले, तर देशात आदर्श पिढी निर्माण होऊ शकते, असे प्रदिपादन अधिवक्ता सुब्रह्मण्य यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ४ डिसेंबरला येथील सत्यधर्म कल्याण मंदिरामध्ये हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला समितीचे श्री. विजय रेवणकर, रणरागिणी शाखेच्या सौ. कावेरी रायकर आणि सनातन संस्थेच्या सौ. सुकन्या आचार्य यांनी संबोधित केले. हिंदूंनी मोठ्या संख्येने हिंदु धर्मजागृती सभेत सहभागी व्हावे ! - संभाजीराव भोकरे, शिवसेना

कोल्हापूर येथे पत्रकार परिषद 
डावीकडून श्री. मधुकर नाझरे, डॉ. (सौ.) शिल्पा कोठावळे, श्री. मनोज खाडये, 
डॉ. मानसिंग शिंदे, बोलतांना श्री. संभाजीराव भोकरे, श्री. शिवाजीराव ससे
कोल्हापूर, ७ डिसेंबर (वार्ता.) - हिंदूंचे संघटन होण्याच्या दृष्टीने ही सभा अत्यंत महत्त्वाची आहे. या सभेच्या प्रचारात शिवसैनिक सर्वत्र सहभागी आहेत. या सभेत सहभागी होणे, हे धर्मकर्तव्यच असल्याने हिंदूंनी मोठ्या संख्येने ११ डिसेंबर या दिवशी होणार्‍या हिंदु धर्मजागृती सभेत सहभागी व्हावे, असे आवाहन शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजीराव भोकरे यांनी केले. ते धर्मजागृती सभेच्या निमित्ताने राजर्षी शाहू स्मारक येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. या वेळी शिवसेनेचे मुरुगुड येथील विभागप्रमुख श्री. मारुती पुरीबुवा, हिंदु एकता आंदोलनाचे श्री. शिवाजीराव ससे, श्री संप्रदायाचे शहरप्रमुख श्री. एम्.के. यादव, श्रीशिवप्रतिष्ठानचे सर्वश्री शरद माळी, आशिष लोखंडे, हिंदु जनजागृती समितीचे पश्‍चिम महाराष्ट्र समन्वयक श्री. मनोज खाडये, रणरागिणी शाखेच्या डॉ. (सौ.) शिल्पा कोठावळे, सनातन संस्थेचे डॉ. मानसिंग शिंदे उपस्थित होते. 

धर्मांधाकडून घरात घुसून विवाहित हिंदु महिलेचा विनयभंग !

हिंदूंच्या लेकी-सुना आता घरातही सुरक्षित नाहीत;
म्हणजे अस्मानी सुलतानी आली, असे समजायचे का ?
       जळगाव - शहरातील पिंप्राळा परिसरातील शाहरुख रहेमान शहा या धर्मांध युवकाने एकतर्फी प्रेमातून एका हिंदु विवाहित महिलेचा विनयभंग केल्याने त्याच्याविरुद्ध रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. (हिंदूंच्या घरात घुसून विवाहित महिलांची छेड काढण्यापर्यंत धर्मांधांची मजल जाते, हे हिंदूंसाठी लज्जास्पद आहे. हिंदूंनो, धर्मांधांना तुमच्या लेकी-सुनांकडे वाकड्या दृष्टीने पहाण्याचे धैर्य होणार नाही, असे संघटन करा ! - संपादक) या धर्मांधाला अटक करण्यात आली आहे.
       यापूर्वीही या धर्मांधाने अनेक वेळा या पीडितेला छळण्याचा प्रयत्न केला होता; पण भीतीपोटी महिलेने विरोध केला नव्हता. एकतर्फी प्रेमातून विवाहित महिलेशी अश्‍लील वर्तन करणार्‍या या धर्मांधानेे ‘मला पीडितेला भेटू दिले नाही, तर मी आत्महत्या करीन’, अशी धमकी दिली आहे. (‘चोर तो चोर वर शिरजोर’ या वृत्तीचे धर्मांध ! - संपादक)

खाजगी ई-वॉलेटला शासनाचा महावॉलेटचा पर्याय !

      नागपूर, ७ डिसेंबर (वार्ता.) - नोटाबंदीच्या निर्णयानंतर देशभरात आर्थिक व्यवहार सुरळीत ठेवण्यासाठी पेटीएम या खाजगी ई-वालेटने साथ दिली; मात्र आता महाराष्ट्र शासनाने कॅशलेस (नोटाविरहीत) व्यवहारांसाठी पावले उचलण्यास प्रारंभ केला आहे, कारण पेटीएमला पर्याय म्हणून सरकारी महावॉलेट नावाचे ई-वॉलेट आणणार असल्याचे सांगण्यात येत आहे. अद्याप देशात अशा प्रकारचे शासकीय ई-वॉलेट कोणत्याही शासनाने आणलेले नाही. त्यामुळे महावॉलेट हे देशातील पहिलेच सरकारी ई-वॉलेट ठरणार आहे. महावॉलेटमध्ये पैसे पूर्णतः सुरक्षित असतील. डेबिट कार्ड, क्रेडीट कार्ड, आधारकार्ड यांसारख्या कार्डच्या माध्यमातून पैसे देता येईल. नोटाबंदीमुळे एटीएम्बाहेर रांगा लागल्या आहेत. त्यामुळे बहुतेक जण आता नोटाविरहीत व्यवहार करत आहेत. शासनाकडूनही नोटाविरहीत व्यवहारांसाठी प्रोत्साहन दिले जात आहे. त्यामुळे महावॉलेटसारखे ई-वॉलेट महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.

आदर्श व्यक्तीमत्त्व आणि जीवनात यशस्वी होण्यासाठी स्वभावदोष घालवून स्वतःत ईश्‍वरी गुण आणणे आवश्यक ! - संजय जोशी

पेंडखळे (ता. राजापूर) येथे स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्ग प्रशिक्षकनिर्मिती कार्यशाळा
लाठीकाठीची प्रात्यक्षिके करतांना प्रशिक्षणार्थी
    राजापूर (रत्नागिरी) - छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, स्वातंत्र्यवीर सावरकर यांसारखे राष्ट्रपुरुष आणि क्रांतीकारक यांची नावे इतिहासात अजरामर झाली; कारण त्यांच्यात अन्यायाविरोधात चीड, प्रखर राष्ट्रभक्ती आणि धर्मप्रेम, नेतृत्व करणे, नियोजन कौशल्य, साहस, दुर्दम्य इच्छाशक्ती, साधनेचे बळ असे अनेक गुण होते. म्हणूनच तेे आपले खरे आदर्श होऊ शकतात. चित्रपट कलाकार किंवा क्रिकेटपटू हे आपले आदर्श होऊ शकत नाहीत. जीवनात यशस्वी व्हायचे असेल, तर आपल्याला जास्तीतजास्त ईश्‍वरी गुण स्वतःत आणावे लागतील आणि दोष घालवावे लागतील, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक श्री. संजय जोशी यांनी केले. तालुक्यातील पेंडखळे येथील निनावेवाडीतील श्री ब्राह्मणदेव मंदिर येथे पार पडलेल्या स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्ग प्रशिक्षकनिर्मिती कार्यशाळेत ते बोलत होते.

महाराष्ट्रात १ कोटीहून अधिक बनावट शिधापत्रिका !

बनावट शिधापत्रिका देऊन देशाच्या सुरक्षेशी खेळणारे 
दोषी अधिकारी आणि कर्मचारी यांना कारागृहात डांबा !
      नागपूर, ७ डिसेंबर (वार्ता.) - राज्यात एक कोटीहून अधिक शिधापत्रिका बनावट आहेत, असे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत प्रश्‍नोत्तरात सांगितले. (यामध्ये किती बांगलादेशी घुसखोर किंवा जिहादी असतील, याचा विचारही न केलेला बरा ! - संपादक) बनावट शिधापत्रिकांचा आकडा दीड कोटीपर्यंत जाण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली. आधारपत्रिकेसोबत शिधापत्रिका जोडल्यामुळे बनावट शिधापत्रिकांची माहिती समोर आली आहे. बनावट शिधापत्रिकांमुळे धान्य मोठ्या प्रमाणात काळ्या बाजारात जात आहे. त्यामुळे पुढील तीन मासांत सर्व शिधापत्रिका दुकानांवर ‘पॉस मशिन’ बसवण्यात येईल. तसेच ‘बायोमेट्रीक’ पद्धतीने धान्य वितरीत केले जाईल. ही पद्धत चालू केल्यानंतर बनावट शिधापत्रिकाधारकांना धान्य द्यावे लागणार नाही. स्वस्त धान्य दुकानदारांचे शुल्कही (कमिशन) वाढवण्यात येणार आहे. कोल्हापूर खंडपीठ होण्यासाठी सर्वपक्षीय आमदारांचे आंदोलन

कोल्हापुरात उच्च न्यायालयाचे खंडपीठ होण्याच्या
मागणीसाठी सर्वपक्षीय आमदारांनी विधानभवनाच्या केलेले आंदोलन
     नागपूर, ७ डिसेंबर (वार्ता.) - मुंबई उच्च न्यायालयाचे ‘सर्किट बेंच’ कोल्हापूर येथे व्हावे, या प्रमुख मागणीसाठी ७ डिसेंबरला विधाभवनाच्या दारात काँग्रेसचे आमदार सतेज उपाख्य बंटी पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय आमदारांनी निदर्शने केली. ‘सामान्य जनतेला न्याय द्या. कोल्हापुरात उच्च न्यायालयाचे खंडपीठ चालू करा’, अशी माहिती लिहिलेले फलक आमदारांनी हाती घेतले होते. या वेळी ‘कोल्हापूरला उच्च न्यायालयाचे खंडपीठ झालेच पाहिजे’, अशी घोषणा आमदारांनी दिली. सांगली जिल्ह्यातील विटा येथील शिवसेनेचे आमदार सर्वश्री अनिल बाबर, काँग्रेसचे नेते डॉ. पतंगराव कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांसह सर्वपक्षातील काही आमदार उपस्थित होते. 

एप्रिल २०१७ पासून ज्येष्ठ नागरिकांना रेल्वेतील सवलतींसाठी ओळखपत्रासह आधार कार्ड जोडणे अनिवार्य !

      मुंबई, ७ डिसेंबर - ज्येष्ठ नागरिकांना रेल्वेच्या सुविधेत सवलत मिळण्यासाठी यापुढे ओळखपत्रासह आधार कार्ड जोडणे अनिवार्य करण्यात येणार आहे. एप्रिल २०१७ पासून रेल्वे मंत्रालयाकडून ही अनिवार्यता लागू करण्यात येईल. तोपर्यंत ओळखपत्रासमवेत आधारकार्ड दाखवायचे कि नाही, हे नागरिक ठरवू शकतात. हा नियम केवळ आरक्षित तिकीटांसाठीच लागू करण्यात आला आहे.

चिंचवड येथे ९ डिसेंबरपासून श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सव !

     चिंचवड, ७ डिसेंबर (वार्ता.) - चिंचवड देवस्थानच्या वतीने श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ९ डिसेंबरला सायंकाळी ५ वाजता संजीवन समाधी महोत्सवाचे उद्घाटन सत्र होईल. महोत्सवाचे यंदाचे ४५५ वे वर्ष असून त्यानिमित्त ९ ते १९ डिसेंबर या कालावधीत कीर्तन, प्रवचन, सुगम संगीत, अभंगवाणी आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच दासबोध पारायण, सामूहिक सूर्यनमस्कार आदी कार्यक्रमही होणार आहेत. १८ डिसेंबर या दिवशी विद्या वाचस्पती प्रा. स्वानंदशास्त्री पुंड यांना श्री मोरया गोसावी जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. हा पुरस्कार राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे (एन्.सी.एल्.) ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ शुक्ल यांच्या हस्ते देण्यात येणार असून प्रमुख पाहुणे म्हणून पुण्याचे पालकमंत्री श्री. गिरीश बापट हे उपस्थित असतील. अधिकाधिक भाविकांनी या महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

जळगाव महापालिका अधीक्षकांचे मद्य प्राशन करून आल्याने निलंबन !

    जळगाव - महानगरपालिकेचे आस्थापना विभागाचे प्रभारी अधीक्षक संजय सोनवणे हे कार्यालयीन कामासाठी संभाजीनगर येथील खंडपिठात अधिवक्त्यांंना भेटण्यासाठी गेले असता मद्याच्या नशेत आढळून आल्याने त्यांना निलंबित करण्याचे आदेश महानगरपालिका आयुक्तांनी दिले आहेत. यापूर्वीही ते कार्यालयीन वेळेत त्यांनी मद्य प्राशन केल्याचे आढळले असल्याने त्यांना ताकीद देण्यात आली होती.

फलक प्रसिद्धीकरता

राष्ट्राच्या प्रगतीसाठी विकास, तर राष्ट्र जगण्यासाठी हिंदुत्व आवश्यक !
     देशात केवळ विकासाच्या गोष्टी केल्या जात आहेत. आर्थिक विकास अपरिहार्य आहे; मात्र ते पुरेसे नाही. देशातून भ्रष्टाचार समाप्त करणे आणि हिंदुत्व यांकडे भाजपने लक्ष द्यायला हवे, असे प्रतिपादन भाजपचे खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी केले.

हिंदू तेजा जाग रे !

Jago !
 BJP sarkar vikas ke sath Hindutva ki our bhi dhyan de ! 
- Dr. Subramanian Swamy, Sansad, BJP 
- Rashtra ke liye Hindutva avashyak yaha sarkar kab janegi ?
जागो !
भाजप सरकार विकास के साथ हिन्दुत्व की ओर भी ध्यान दे ! 
- डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी, सांसद, भाजपा । 
- राष्ट्र के लिए हिन्दुत्व आवश्यक है, यह सरकार कब जानेगी ?

नोटाबंदीनंतर भविष्यातील सर्व व्यवहार रोकडविरहित होणार ! - मुख्यमंत्री

विधानसभा आणि विधान परिषद येथे मुख्यमंत्र्यांचे सडेतोड उत्तर !

       नागपूर, ७ डिसेंबर (वार्ता.) - नोटाबंदीनंतर भविष्यातील सर्व व्यवहार रोकडविरहित अथवा कॅशलेस होत असतांना शासकीय खातेसुद्धा लवकरच ही पद्धत अवलंबणार आहे. सामाजिक बांधकाम विभाग असो वा इतर कुठलाही विभाग असो, जेव्हा कंत्राट दिले जाईल, तेव्हा त्याचे व्यवहार हे सर्व ‘ऑनलाईन’ होतील. इतकेच नव्हे, तर त्यांनादेखील पुढील व्यवहार ऑनलाईन करूनच मजुरांची देयके चुकती करावी लागतील. अर्थसंकल्पही गोपनीय ठेवला जातो. तसे नोटाबंदीचे निर्णय उघडपणे घ्यायचे नसतात. नोटाबंदीसाठी २ वर्षांपासून सिद्धता चालू होती, अशी माहिती मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी ७ डिसेंबरला विधानसभेत दिली. 
      विधानसभा विरोधकांनी उपस्थित केलेल्या स्थगन प्रस्तावावर चर्चा केल्यानंतर यावर ते विधानसभेत बोलत होते. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी हे अर्थतज्ज्ञ नसले, तरी ते भूमीवर काम करणारे नेते आहेत, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी श्री. मोदी यांनी घेतलेल्या निर्णयाचे समर्थन केले. देशातील काळा पैसा बाहेर आला पाहिजे, अशी सभागृहातील प्रत्येक व्यक्तीची अपेक्षा आहे. भ्रष्टाचार अल्प झाला पाहिजे; मात्र त्याची जननी ‘काळा पैसा’ आहे, असेही ते म्हणाले.
      मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस म्हणाले...
१. ‘आम्ही नोटबंदी करणार आहे. तुम्ही कामाला लागावे’, असे सांगून होत नाही. ८५ टक्के चलन पालटत आहोत, तरीही लोकांनी निर्णय मान्य केला. 
२. लोक मागे उभे राहिले, याचा अर्थ त्रास झाला तरी चालेल; मात्र काळा पैसा बाहेर आला पाहिजे, ही जनतेची भूमिका आहे. श्री. मोदी यांनी २३ कोटी जनधन खाती उघडली. पहिली दोन वर्षे सिद्धता केली. डिजिटल इंडियाची सिद्धता केली. ‘कॅशलेस बँकिंग’ मात्र पहिल्याच दिवशी सांगितले होते.
३. २०११-१२ वर्षात चलनात शंभरच्या १५ लक्ष, पाचशेच्या ४२ लक्ष नोटा, तर एक सहस्रच्या २२ लक्ष खोट्या नोटा होत्या. फोर्ब्स, वॉशिंग्टन पोस्ट, वर्ल्ड बँकेकडूनही पंतप्रधान मोदी यांच्या निर्णयाचे कौतुक करून त्यांनी पाठिंबा दिला आहे. 
४. या देशात काळ्या पैशाच्या विरोधात इतक्या ताकदीने पहिल्यांदा कायदा सिद्ध झाला. त्यासाठी धैर्य लागते. नोटाबंदीनंतर तिसर्‍या दिवशी बाजार समित्यांमध्ये ‘कॅशलेस व्यवहार’ चालू झाले. एकही तक्रार नाही. रब्बी पिकांच्या पेरण्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत १०९ टक्क्यांनी वाढ झाली.
५. खाजगी रुग्णालयांना धनादेश घेण्याची विनंती केली. धनादेश नाकारला (बाऊन्स), तर आम्ही १० सहस्र रुपयांचा निधी देऊन नेहमीपेक्षा अधिक पैसे ग्रामीण भागात पाठवले.
६. एक दिवसाआड बैठक घेतली. राज्यात अधिकाधिक पैसे येण्यासाठी प्रयत्न केले. ‘महावॉलेट’ सिद्ध करणार आहे; मात्र देशातील लहानसहान लोकांचीही अडचण सहन करण्याची सिद्धता आहे. पुणे येथे नोटाबंदीच्या समर्थनार्थ मोर्चा निघाला. सहकारी अधिकोषामध्ये व्यवहार नाही म्हणून अडचणी वाढल्या आहेत. हे व्यवहार चालू झाले पाहिजेत, अशी आमची भूमिका आहे. 
७. नोटाबंदीनंतर काश्मीरमध्ये दगडफेक झाली नाही. गेल्या मासात सर्वात अधिक नक्षलवाद्यांनी समर्पण केले आहे. इतर राज्यातील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेतलेला नाही. 
     शेतकर्‍यांची जी हानी झाली त्याची निश्‍चिती करून सरकार त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील, असे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी विधान परिषदेत दिले.

‘हिंदु राष्ट्र’: मूलभूत विचार

वाचा नवीन सदर
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसंदर्भातील परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे मार्गदर्शन !
     ‘वर्ष २०२३ पासून ‘हिंदु राष्ट्र’ येईल’, हे आजवर अनेक संतांनी वेळोवेळी सांगितले आहे. तथापि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेविषयी कोणत्याही आशादायी घटना स्थुलातून घडत नसतांना असे सांगणे, ही काहींना अतिशयोक्ती वाटेल; पण संतांमध्ये काळाच्या पडद्याआड पहाण्याचे सामर्थ्य असते. म्हणूनच अशा द्रष्ट्या संतांच्या मार्गदर्शनाखाली आपण त्या दिशेने प्रयत्न करणे, हीच आपली साधना आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेविषयी अनेकांंच्या मनात उत्सुकता आहे. यासाठी ६ डिसेंबर २०१६ या दिवसापासून ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची दिशा’ या नियमित सदरास आरंभ करत आहोत. आगामी काळात हिंदु समाजाला भारतभूमीत रामराज्याची अनुभूती देणारे ‘हिंदु राष्ट्र’ स्थापन करण्यासाठी खारीचा नव्हे, तर श्री हनुमंताचा वाटा उचलण्याची प्रेरणा यातून मिळावी, अशी ईश्‍वरचरणी प्रार्थना !

फारुख अब्दुल्लांचे देशद्रोही फुत्कार !

       जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी पुन्हा एकदा फुटीरतावाद्यांची तळी उचलत स्वतंत्र काश्मीरच्या मागणीचे समर्थन केले आहे. त्यांनी नुकतेच ‘पाकव्याप्त काश्मीर ही भारताच्या बापाची जागा नाही’, असे देशद्रोही विधान केले. याही आधी त्यांनी वेळोवेळी देशद्रोही वक्तव्ये केली आहेत. तरीही त्यांच्यावर केंद्रातील आजपर्यंतच्या एकाही सरकारकडून कारवाई झालेली नाही. त्याविषयी ऊहापोह करणारा हा लेख.
१. अब्दुल्लांच्या वादग्रस्त
आणि देशद्रोही वक्तव्यांची मालिका !
      ‘कुठले ना कुठले वक्तव्य करून प्रसिद्धीच्या झोतात रहाण्याची जी शैली दिग्विजय सिंह, मणिशंकर अय्यर आदींनी अवगत करून घेतली आहे, त्या मालिकेतील आणखी एक नाव म्हणजे फारुख अब्दुल्ला !

मध्यप्रदेश राज्याचा प्रसारकार्याचा आढावा

१. नोव्हेंबर मासात सनातन संस्थेच्या वतीने इंदूर 
(मध्यप्रदेश) येथे लावलेल्या ग्रंथप्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद 
     ‘इंदूर येथे ६ ते ९ नोव्हेंबर या कालावधीत ‘मुक्त संवाद’ संस्थेच्या वतीने मध्यप्रदेश मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनात सनातनच्या विविध विषयांवरील ग्रंथांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. त्याचा अनेकांनी लाभ घेतला. अनेकांनी हे ग्रंथ अन्य ग्रंथांपेक्षा वेगळे आहेत, अशा शब्दांत ग्रंथांचे कौतुक केले. हे ग्रंथ प्रदर्शन लावण्यासाठी मुक्त संवाद या संस्थेचे सदस्य श्री. मोहन रेडगांवकर यांचे सहकार्य लाभले.

निधर्मी लोकशाहीतील नीतीहीन लोकप्रतिनिधी !

      लोकांनी, लोकांसाठी आणि लोकांचे असलेले ‘भारत’ हे स्वतंत्र लोकशाही राष्ट्र ! वरपांगी अतिशय आदर्श वाटणारी ही लोकशाही आज स्वातंत्र्याच्या ६९ वर्षांनंतरही लोकांच्या समस्या सोडवू शकलेली नाही, हे प्रतिदिन वर्तमानपत्रांमध्ये येणार्‍या घडामोडींवरून लक्षात येतच आहे. सध्याच्या लोकशाहीत सर्वसाधारणपणे प्रसिद्धी मिळवून मतपेढी वाढवण्याकडेच लोकप्रतिनिधींचा कल असतो. लोकप्रतिनिधींनी लोकप्रिय असले पाहिजे; परंतु त्यासाठी त्यांनी किमान काही नीतीमूल्यांचा अवलंब करायला हवा.

कर्जांचे व्याजदर कायम रहाणार ! - रिझर्व्ह बँक

मुंबई - ७ डिसेंबरला रिझर्व्ह बँकेकडून द्वैमासिक पतधोरण घोषित करण्यात आले. यात रेपो दरात कोणताही पालट करण्यात आलेला नाही. रेपो दर ६.२५ टक्क्यांंवर कायम ठेवण्यात आला आहे. यामुळे गृहकर्जासह इतर कर्जांवरील व्याजदरात कोणताही पालट होण्याची शक्यता नाही. रेपो दरात कोणताही पालट न झाल्यामुळे रिव्हर्स रेपो दरही ५.७५ टक्के इतकाच रहाणार आहे. चालू आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत किरकोळ महागाईचा दर ५ टक्के इतका राहण्याची शक्यता रिझर्व्ह बँकेने वर्तविली आहे.

‘भारतरत्न’ पुरस्कारासाठी स्वत:च स्वत:ची निवड करून घेणारे नेहरू आणि इंदिरा गांधी !

       ‘भारतरत्न’ हा देशाचा सर्वोच्च सन्मान आहे. या अलंकाराने त्या व्यक्तींना सन्मानित केले जाते ज्यांनी देशाच्या एखाद्या क्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण कार्य केले असेल, आपापल्या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करून आपल्या देशाचा मान वाढवला असेल आणि आपल्या देशाला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळवून दिली असेल. भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. कला, साहित्य, विज्ञान, राजनीतीज्ञ, विचारवंत, वैज्ञानिक, उद्योगपती, लेखक आणि समाजसेवक यांना अद्वितीय सेवांसाठी हा पुरस्कार सरकारकडून दिला जातो. याचा आरंभ भारताचे तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांनी २ फेब्रुवारी १९५४ या दिवशी केला. या पुरस्कारांतर्गत एक सन्मानपत्र आणि मानचिन्ह दिले जाते. या पुरस्कारांतर्गत कोणत्याही प्रकारची रोख रक्कम दिली जात नाही. आजपर्यंत देश-विदेशातील एकूण ४५ महान व्यक्तींना ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यातील केवळ ६ व्यक्ती आता जीवंत आहेत; परंतु आम्हा देशवासियांना विचार करायला हवा की, भारत सरकारच्या सर्वोच्च पदावर आरूढ मागील २ पंतप्रधानांनी स्वतःलाच ‘भारतरत्न’ दिले होते. ते दोघे म्हणजे भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि त्यानंतर त्यांची राजकीय वारस, त्यांची कन्या इंदिरा गांधी ! त्यांनी जिवंतपणी स्वत:च स्वत:ची ‘भारतरत्न’ पुरस्कारासाठी निवड करून घेतली आणि हा पुरस्कार स्वतःला बहाल करून घेतला.’
- श्री. दिलेर सिंह बग्गा (संदर्भ : ‘मासिक राष्ट्रबोध’, जून २०१६)शेतकर्‍यांना हरितक्रांतीच्या चक्रव्यूहात फसवले गेले आहे !

‘झिरो बजेट’ शेतीचे प्रणेते कृषीऋषी पद्मश्री सुभाष पाळेकर यांचे परखड मत
      कणकवली - रासायनिक आणि सेंद्रिय शेतीच्या प्रयोगातून सरकार आणि कृषी विद्यापिठे यांनी शेतकर्‍यांची फसवणूक केली. विद्यापिठे तर रासायनिक शेतीचे प्रयोग करण्यास सांगून शेतकर्‍यांना लुटत आहेत. अशा प्रयोगामुळे सावकारी पद्धतीची यंत्रणा विकसित केली गेली आहे. हे नवीन चक्रव्यूह निर्माण केले गेले असून त्याचे गोंडस नाव ‘हरितक्रांती’ आहे. आपल्याकडे हरितक्रांती कधी झाली नाही आणि होणारही नाही. त्यामुळे विद्यापिठांनी शेतकर्‍यांची फसवणूक थांबवावी आणि शेतकर्‍यांनीही स्वतःच्या प्रगतीसाठी ‘झिरो बजेट नैसर्गिक शेती’कडे वळावे, असे आवाहन ‘झिरो बजेट’ शेतीचे प्रणेते कृषीऋषी पद्मश्री सुभाष पाळेकर यांनी केले. पद्मश्री पाळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवली येथे पाच दिवसीय झिरो बजेट नैसर्गिक शेती प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

दोन वेळा सभागृह स्थगितीनंतर विधान परिषदेत नोटाबंदीवर चर्चा चालू !

विधान परिषद
     नागपूर, ७ डिसेंबर (वार्ता.) - विधान परिषदेचे कामकाज चालू झाल्यावर नोटाबंदीच्या परिणामांची चर्चा चालू होण्यासाठी विरोधी पक्षाने आक्रमक भूमिका घेतल्याने सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी प्रथम २५ मिनिटांसाठी आणि नंतर ४५ मिनिटांसाठी आणि सायंकाळी परत १० मिनिटांसाठी सभेचे कामकाज स्थगित केले. (सभा स्थगित करणे म्हणजे, कोट्यवधी रुपयांचा चुराडा करणेच होय. - संपादक) दोन वेळा सभागृह स्थगितीनंतर सभापतींनी नियम १७ अन्वये नोटाबंदीच्या परिणामांवर चर्चा करण्यास अनुमती दिली आणि त्यावर चर्चा चालू झाली. 
१. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी नोटबंदीवरील चर्चेसाठी आग्रही भूमिका मांडली. सभागृहाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, प्रश्‍नोत्तराचा तास महत्त्वाचा असून त्यावर चर्चा होणे आवश्यक आहे. त्यातून जनतेच्या प्रश्‍नांना न्याय मिळेल. त्यावर सभापती नाईक-निंबाळकर यांनी चर्चा करायची कि नाही, याविषयी निर्णय घेण्यासाठी सभा स्थगित करण्याचा निर्णय घेतला असता विरोधी पक्षातील सदस्यांनी सभापतींच्या समोरील मोकळ्या जागेत जाऊन घोषणाबाजी केली.
२. एकूण १ घंटा १० मिनिटांच्या स्थगितीनंतर अखेर सभापतींनी नोटाबंदीच्या परिणामांवर चर्चा करण्यास सदस्यांना अनुमती दिली.

काही वर्षांची वैशिष्ट्ये

१. सोळाव्या वर्षात पदार्पण करणार्‍यांनो, हे लक्षात घ्या ! 
सोळावं वरीस धोक्याचं ।
२. पंचविसाव्या वर्षात पदार्पण करणार्‍यांनो, हे लक्षात घ्या !
गद्धे पंचविशी 
३. साठाव्या वर्षात पदार्पण करणार्‍यांसाठी काही म्हणी 
अ. साठी बुद्धी नाठी ।
आ. आली साठी, दुखणी पाठी ।
इ. आली साठी, कुठल्या आता गोष्टी । 

धर्मनिरपेक्ष कोण ?

१. ‘जो अशी घोषणा करील की, भारताच्या साधनसंपत्तीवर पहिला अधिकार मुसलमानांचा आहे.
२. जो केवळ मुसलमान मुलींना दहावी उत्तीर्ण झाल्यावर ३० सहस्र रूपये देईल.
३. जो २५ लक्ष शिष्यवृत्त्या केवळ मुसलमान विद्यार्थ्यांना देईल.
४. जो हिंदु विद्यार्थ्यांना १५ ते १८ प्रतिशत व्याजदराने, तर मुसलमान विद्यार्थ्यांना २ ते ४ प्रतिशत व्याजदराने शैक्षणिक ऋण देईल.
५. जो गोध्रा रेल्वे स्थानकावर ५९ यात्रेकरूंचे झालेले क्रूर हत्याकांड विसरून जाईल.
६. जो इस्लामी जिहाद्यांना सोडून देईल आणि निर्दोष हिंदूंना आतंकवादाच्या नावाखाली कारागृहात टाकील.’
- डॉ. हरपाल सिंह

महंमद पैगंबर यांच्या जयंतीच्या एक दिवस आधीही लोकसभेला सुटी !

  • सर्वपक्षीय नेत्यांनी कधी हिंदूंच्या देवतांच्या जयंतीसाठी अशी सुटी देण्याची मागणी लोकसभेत केली होती का ? एका धर्मियांच्या लांगूलचालनासाठी प्रयत्न करणारे हिंदु नेते धर्मद्रोहीच होत !
  • सर्वपक्षीय नेत्यांच्या मागणीचा परिणाम ! 
      नवी देहली - १३ डीसेंबरला असणार्‍या ‘ईद-ए-मिलाद-उन-नबी’च्या दिवशी म्हणजेच महंमद पैगंबर जयंतीला लोकसभेला सुटी आहे. या पार्श्‍वभूमीवर १२ डीसेंबरलाही सुटी देण्यात यावी, जेणेकरून हा महोत्सव साजरा करण्यासाठी वेळ मिळू शकेल. तसेच दक्षिण भारतातील काही राज्यांमध्ये ही जयंती सोमवारीच साजरी करण्यात येणार आहे, अशी मागणी तृणमूल काँग्रेस, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि अन्य राजकीय पक्ष यांच्या नेत्यांनी केली. त्याला काँग्रेसनेही समर्थन दिले. ही मागणी प्रथम लोकसभेत करण्यात आल्यावर लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या कार्यालयात बैठक झाली. त्यानंतर या मागणीला अनुमती देण्यात आली. त्यामुळे लोकसभेला १० ते १३ डीसेंबर, असे सलग ४ दिवस सुटी असणार आहे. दोन्ही पूल एकाच वेळी बंद करू नयेत, हेही सरकारला कळत नाही का ?

    पणजी, गोवा येथील मांडवी नदीवर जुना आणि नवीन असे दोन्ही पूल १० आणि ११ डिसेंबर या दिवशी सकाळी ६.३० ते ८.३० या कालावधीत बंद असणार आहेत. हे पूल, तसेच पुलावरील रस्ता आणि पदपथ यांची तपासणी करण्यासाठी या पुलांवरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.

बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी हिंदूंना साधना, अध्यात्म यांपासून दूर नेल्याने हिंदूंची स्थिती पाश्‍चात्त्यांप्रमाणे झाली आहे आणि ते मनोरुग्ण होत आहेत !

     भारतात १० ते २० कोटी भारतीय विविध मानसिक आजारांना सामोरे जात असतांना याकडे कमालीचे दुर्लक्ष होते आहे, असे लक्षात आले आहे. - खासदार श्री. गजानन कीर्तीकर, शिवसेना

विनाशाकडे जाऊ नाही, गेलोच आहोत ! उशिरा जागे झालेले भाजपचे खासदार !

     भारतात शिक्षणाची परंपरा वेदकाळापासून चालू आहे; मात्र आपण परंपरा विसरत चाललो आहोत. भारताच्या शिक्षण परंपरेकडे दुर्लक्ष केले, तर आपण विनाशाकडे जाऊ. - डॉ. करण सिंह, राज्यसभेतील भाजपचे खासदार अन् शिक्षणतज्ञ

हे गोवा पोलीस आणि भाजप सरकार यांना लज्जास्पद ! गुंडांचा बंदोबस्त करू न शकणारे आतंकवाद्यांचा बंदोबस्त करू शकतील का ?

     गोव्याच्या चिंबल भागात रस्त्याच्या बाजूला ठेवण्यात आलेल्या २२ वाहनांची अज्ञात समाजकंटकांकडून तोडफोड करण्यात आली. या भागात गुंडाराज चालू आहे आणि पोलीस अशा प्रकारांकडे दुर्लक्ष करत आहेत, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

स्वातंत्र्याच्या ७० वर्षांत भ्रष्टाचार होण्यास सर्व राजकीय पक्ष कारणीभूत आहेत. त्यांच्या नेत्यांना प्रथम कारागृहात टाका, तरच २१ व्या शतकाचे आश्‍वासन कृतीत येईल !

    साधनेशिवाय म्हणजे, सात्त्विक झाल्याशिवाय भ्रष्टाचार रोखू असे म्हणणे, म्हणजे जनतेला खोटे आश्‍वासन देणे ! हिंदु राष्ट्रात स्थापनेनंतर पहिल्याच दिवसापासून भ्रष्टाचार नसेल !
     लोकांनी मोठ्या प्रमाणात कॅशलेस व्यवहारांना प्राधान्य द्यावे. त्यामुळे आपल्याला कॅशलेस अर्थव्यवस्थेचा पाया रचता येईल. मोठ्या प्रमाणात रोख रक्कम उपलब्ध असल्यास काळा पैसा आणि भ्रष्टाचार वाढतो. २१ व्या शतकातील भारतात भ्रष्टाचाराला कोणतेही स्थान नाही. - पंतप्रधान नरेंद्र मोदी
     ‘भारत अधर्मामुळे होत असलेल्या अधःपतनामुळे अखेरचे श्‍वास घेत आहे. त्यात नवचेतना येण्यासाठी हिंदु राष्ट्ररूपी संजीवनीची आवश्यकता आहे.’ 
- श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.११.२०१६)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांना त्रास होऊ नये; म्हणून केवळ आनंदात असतांनाच त्यांचे स्मरण करण्याचे ठरवणार्‍या ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. उमा रविचंद्रन् !

सौ. उमा रविचंद्रन्
     ‘सप्तर्षींनी नाडीवाचनात म्हटले, ‘साधकांना त्रास झाल्यास किंवा कोणतीही समस्या उद्भवल्यास ते परम गुरुजींना हाक मारतात आणि परम गुरुजी त्यांच्या लाडक्या साधकांचे रक्षण करण्यासाठी सूक्ष्मातील सर्व भार आपल्यावर घेतात.’ पुढे सप्तर्षींनी विचारले, ‘त्यांच्या खांद्यांना भार सहन करतांना किती वेदना होत आहेत, याची तुम्ही कल्पना करू शकता का ?’ ही सप्तर्षींची दिव्य वाणी ऐकल्यानंतर मला अतिशय वाईट वाटले. त्या वेळी मला संत गोपाळकृष्ण भारती यांनी शिवावर रचून गायिलेल्या प्रसिद्ध तमिळ गीताची आठवण झाली.
१. देवाला भक्तांमुळे अनेक त्रास सहन करावे लागत 
असल्याने परमेश्‍वराविषयीच्या अपार प्रेमामुळे कवीला मातृवात्सल्यभाव जाणवणे
     या तमिळ गीताचा भावार्थ पुढीलप्रमाणे आहे - ‘हे शिवा, आमच्यासारख्या भक्तगणांमुळे तुला अनेक त्रास सहन करावे लागतात. सदैव तुझी काळजी घेण्यासाठी तुझे आईवडील असते, तर तुला एवढा त्रास सहन करावा लागला असता का ?’ याचा भावार्थ म्हणजे, परमेश्‍वराला जन्म-मृत्यू नसल्याने आई-वडील नाहीत.

६९ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले श्री. अनंत आठवले आणि त्यांच्या धर्मपत्नी सौ. सुनीती यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे

श्री. अनंत आठवले आणि सौ. सुनीती आठवले
१. ती. भाऊकाका 
(श्री. अनंत बाळाजी आठवले) 
१ अ. एकाग्रता 
    ‘ती. भाऊकाका पुष्कळ एकाग्रतेने आणि मन लावून सेवा करतात. त्यांच्या समवेत सेवेला बसल्यावर त्यांच्यामुळे मनाची एकाग्रता साधली जात असल्याने आपल्याला विषयाचे सहजतेने आकलन होते.
१ आ. सतत शिकण्याच्या स्थितीत रहाणे
१. एक दिवस भाऊकाकांचा भ्रमणभाष कंपन स्थितीत ठेवल्याने नंतर त्यांना तो पूर्वस्थितीत आणता येत नव्हता. मी त्यांना तसे करून दिल्यावर त्यांनी ‘कसे केले ?’ हे विचारून पुन्हा भ्रमणभाषवर त्याप्रमाणे करून दाखवायला सांगितले आणि ‘‘पुढे असे झाले, तर मला करता येईल’’, असे ते म्हणाले.

देवाच्या ओढीमुळे स्वभावदोष आणि अहं यांवर मात करून स्वतःत पालट घडवणे शक्य असल्याचे उदाहरण म्हणजे रामनाथी आश्रमातील साधक श्री. राकेश पाध्ये !

श्री. राकेश पाध्ये
१. आश्रमजीवनाचा अनुभव नसल्याने प्रारंभी 
श्री. राकेश आणि कुटुंबीय यांचा संघर्ष होणे आणि स्वतःचा 
संघर्ष होत असतांनाही त्यांनी पत्नीला साधनेविषयी योग्य दृष्टीकोन देणे
     ‘श्री. राकेशदादा (श्री. राकेश पाध्ये) साधारण दीड ते दोन वर्षांपूर्वी आश्रमात पूर्णवेळ साधना करण्यासाठी आले. त्या वेळी त्यांना आश्रमातील सर्व कार्यपद्धती माहिती नसल्याने आणि आश्रमजीवनाचा अनुभव नसल्याने प्रारंभी त्यांचा थोडा संघर्ष होत असे. त्यांचा मुलगा चि. वल्लभ आणि पत्नी सौ. पूर्वा यांनाही आश्रमजीवन, आश्रमातील कार्यपद्धती ठाऊक नसल्याने थोडे कठीण जायचे. त्यामुळे राकेशदादांना ‘हे सर्व कसे हाताळायचे ?’, असा थोडा ताण असायचा. त्या वेळी त्यांनाही इतरांकडून काही प्रमाणात अपेक्षा असायच्या. या परिस्थितीत ते स्वतः नवीन असूनही ते पूर्वाताईला ‘आपण प्रत्येक ठिकाणी साधना म्हणून कसे पहायला हवे ?’, ते सांगायचे. ताईला साधनेचा फारसा भाग ठाऊक नसल्याने तिचाही थोडा संघर्ष व्हायचा.

गुरुदेव माझे थोर, काय सांगू त्यांचे उपकार ।

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...
परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले
गुरुदेव माझे थोर, काय सांगू त्यांचे उपकार ।
जीवनाच्या वाटेवर, किती असतो त्यांचा आधार ॥ १ ॥

गुरु माझे दयेचा सागर, दिला त्यांनी जीवनाला आधार ।
परात्पर गुरु तुम्ही, श्रीकृष्णाचे अवतार ॥ २ ॥

त्रास साधकांचे, घेता स्वतःवर ।
शीतल छाया तुमची, आम्हा हवी जीवनभर ॥ ३ ॥

सौ. रेखा जाखोटिया
जरी प्रसन्न झाला देव, मी मागेन गुरुदेव ।
गुरुदेवांचे उपकार, न फिटे त्यांचे ऋण ॥ ४ ॥

या प्रगतीच्या वाटेवर, दूर करूनी स्वभावदोष-अहंकारास ।
साधना करू विहंगम, मिळेल गुरूंचा सदैव आशीर्वाद ॥ ५ ॥

- सौ. रेखा नटवरलाल जाखोटिया, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१२.११.२०१४)

‘भावसत्संग’ या शब्दातील प्रत्येक अक्षराचा उमगलेला अर्थ !

सौ. मीना खळतकर
भा - सर्वांना भावावस्थेत ठेवणारा ।
व - वातावरणात चैतन्य निर्माण करणारा ।
स - सखोल ज्ञान आणि सतत आनंदावस्था देणारा सत्संग ।
त - सर्वांना भावानंदात तल्लीन करणारा ।
सं - सर्वांना संघटित करून ईश्‍वरी राज्याच्या स्थापनेच्या कार्यात सहभागी करवून घेणारा ।
ग - गर्व नाहीसा करून श्रीविष्णूच्या सान्निध्याची अनुभूती देणारा ।
भावसत्संग म्हणजे अद्वितीय सत्संग !
- सौ. मीना खळतकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२५.११.२०१६)

राष्ट्र-धर्मासाठी आध्यात्मिक स्तरावरही कार्य करणे अत्यावश्यक !

पू. संदीप आळशी
      ‘राष्ट्र म्हणजे ‘फळ’ असे समजले, तर त्या फळाचे आवरण म्हणजे समाज आणि गाभा म्हणजे संत होत. गाभाच नसला, तर फळाला काय अर्थ आहे ? राष्ट्राची धारणा संतांमुळे होत असते. संत राष्ट्र-धर्मासाठी आध्यात्मिक स्तरावर कार्य करतात. आपणही राष्ट्र-धर्मासाठी शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक स्तरांवर कार्य करण्याच्या जोडीला आध्यात्मिक स्तरावरही कार्य करणे अत्यावश्यक आहे.’ - (पू.) श्री. संदीप आळशी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

कु. ऐश्‍वर्या जोशी (वय १३ वर्षे) हिला वाढदिवसानिमित्त तिची आई सौ. भाग्यश्री योगेश जोशी यांनी पाठवलेले शुभेच्छापत्र

कु. ऐश्‍वर्या जोशी
सनातन परिवाराकडून कु. ऐश्‍वर्या जोशी हिला जन्मदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा !!!

ठेवूनी मनात गुरुदेवांचे चरण । सदा पाय ठेव तू भूमीवर ॥

श्री. योगेश जोशी
      ‘६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली आणि महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली माझी मुलगी चि. ऐश्‍वर्या जोशी (वय १३ वर्षे) हिची आध्यात्मिक पातळी घोषित झाल्यामुळे तिचा अहं वाढून साधनेत घसरण होऊ नये, यासाठी देवाने मला खालील कविता सुचवली. 
नको होऊ उन्मत्त ।
घोषित झाल्याने
आध्यात्मिक पातळी ॥
पातळीचे सर्वकाही ।
आहे गुरूंच्या हातात ॥ १ ॥

साधिकेला नामजप करतांना स्वतः वृंदावनात श्रीकृष्णासमवेत असल्यासंबंधी एक दृश्य दिसणे

कु. सोनम फणसेकर
१. दुपारी डोळे मिटून नामजप करतांना ‘वृंदावनात 
बसलेल्या श्रीकृष्णाच्या जवळ स्वतः लहान मुलीच्या 
रूपात आहे आणि श्रीकृष्ण १० वर्षांच्या एका तेजस्वी अन् सात्त्विक मुलाला 
जवळ घेऊन त्याच्या अंगावरून प्रेमाने हात फिरवत आहे’, असे दृश्य दिसणे
    ‘मी प्रतिदिन दुपारी नामजप करायला बसते. एकदा डोळे मिटून नामजप करतांना मला एक दृश्य दिसले, ‘वृंदावनात श्रीकृष्ण बसला होता. त्याने सोन्याची आभूषणे आणि सोनेरी रंगाची वस्त्रे परिधान केली होती. मी श्रीकृष्णाच्या जवळ लहान मुलीच्या रूपात (उमाक्कांच्या चित्रातील लहान मुलीप्रमाणे) होते. तिथे साधारण १० वर्षांचा एक मुलगा आला. त्याने पांढरा-शुभ्र सदरा आणि पायजमा घातला होता. तो अतिशय तेजस्वी आणि सात्त्विक दिसत होता. तो आल्यावर श्रीकृष्ण उभा राहिला. नंतर कृष्णाने त्या मुलाच्या डोक्यावरून आणि पाठीवरून प्रेमाने हात फिरवून त्याला जवळ घेतले. मी त्या मुलाभोवती गोल फिरून ‘हा कोण आहे ? किती तेजस्वी आहे ?’, असा विचार करत त्याचे निरीक्षण केले.

डॉ. (सौ.) नंदिनी सामंत यांना भावप्रयोग करतांना ‘सर्व साधक देवगणांच्या रूपात दिसणे आणि साधकांविषयी मनात प्रतिक्रिया येण्यापूर्वीच त्या विरून जाणे’ याविषयी आलेली वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

डॉ. (सौ.) नंदिनी सामंत
१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीत 
मानस जाण्याचा भावप्रयोग करतांना ‘ते खोलीच्या 
रूपातील क्षीरसागरात विष्णुरूपात शेषावर पहुडले असून 
स्वतःसह सर्व साधक त्यांच्याभोवती देवगणांच्या 
रूपात नमस्काराच्या मुद्रेत उभे आहोत’, असे जाणवणे 
     ‘१३.११.२०१६ या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमातील दैनंदिन भावसत्संगामध्ये आम्हाला भावप्रयोगाच्या अंतर्गत सांगितले, ‘‘मानसरित्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीत जाऊन त्यांचे दर्शन घेऊन या.’’ त्यानुसार मी डोळे मिटले आणि मानसरित्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीत गेले. तेव्हा मला जाणवले, ‘खोलीच्या जागी क्षीरसागर आहे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले क्षीरसागरात विष्णुरूपात शेषावर पहुडले आहेत. सर्व साधक त्यांच्याभोवती देवगणांच्या रूपात नमस्काराच्या मुद्रेत उभे आहेत. तेव्हा त्या सर्व देवगणांचे श्रीविष्णूशी संपूर्ण अनुसंधान चालू आहे आणि त्या देवगणांत मीही आहे.’

आनंदी आणि कुटुंबियांना साधना करण्यासाठी पाठिंबा देणारे ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे मिरज येथील श्री. रमेश वांडरे !

श्री. रमेश वांडरे
      ‘माझे धाकटे दीर श्री. रमेश वांडरे यांची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाली’, हे ऐकून आम्हा सर्वांना फार आनंद झाला. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दिवाळीच्या पाडव्याच्या दिवशी आम्हा वांडरे कुटुंबियांना अनमोल भेट दिली. त्यासाठी गुरुचरणी अनंत कोटी कृतज्ञ आहे. 
१. आनंदी आणि मनमोकळा स्वभाव 
     माझे लग्न झाले, तेव्हा ते ७ - ८ वर्षांचे होते. त्यांचा स्वभाव गोड आणि मनमोकळा आहे. ते सतत आनंदी असतात. मला ते माझ्या लहान भावाप्रमाणे आहेत. सर्व भावंडांमध्ये त्यांच्या मनमोकळ्या स्वभावामुळे त्यांच्याशी माझी गट्टी जमत असे. त्या वेळीही त्यांच्याशी बोलण्यातून आनंद मिळत असे.

लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांचीच आईप्रमाणे काळजी घेणार्‍या ६९ टक्के आध्यात्मिक पातळीच्या देवद (पनवेल) आश्रमातील साधिका सौ. अश्‍विनी पवार !

सौ. अश्‍विनी पवार
       ‘माझ्या कटीपासून खाली दोन्ही पायांमध्ये शक्ती नाही आणि त्या ठिकाणी मला नेहमी पुष्कळ वेदना जाणवतात. १४.११.२०१६ या दिवशी त्रिपुरारि पौर्णिमा झाल्यानंतर पुढे २ - ३ दिवस मला तीव्र वेदनांचा त्रास होत होता आणि कोणतेही अन्न खावेसे वाटत नव्हते. मी भोजनकक्षात सौ. अश्‍विनी पवार (अश्‍विनीताई) हिला त्रासाविषयी सांगतांना मला रडायला आले. तेव्हा अश्‍विनीताईने मला पहाताक्षणीच जाणले, ‘मला दृष्ट लागली आहे.’ लगेच तिने तत्परतेने माझी दृष्ट काढण्याचे नियोजन केले आणि गोवा येथील सनातन आश्रमात विचारून मला आध्यात्मिक उपायही करायला सांगितले. त्यानुसार एका साधकाने माझी दृष्ट काढली आणि मी आकाशदेवाचा नामजप करत स्वतःच्या शरिरावरील काळ्या शक्तीचे आवरण काढले. तेव्हा माझ्या वेदना थोड्या न्यून झाल्या. काही वेळाने अश्‍विनीताईने ‘माझा त्रास न्यून झाला किंवा नाही’, याविषयी आढावाही घेतला. ज्याप्रमाणे मूल रडायला लागले की, आईला ‘त्याला काय आवश्यक आहे’, ते अचूक लक्षात येते आणि उपाययोजना करते; त्याचप्रमाणे नेहमीच अश्‍विनीताई साधकांना त्रास झाल्यावर कळवळते आणि तत्परतेने उपाय शोधते. त्यामुळे साधकांना तिचा पुष्कळ आधार वाटतो.’ - सौ. रेखा नटवरलाल जाखोटिया (वय ५७ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२०.११.२०१६)

सहनशील, तसेच देवाची आणि सेवा करण्याची आवड असणारी ६२ टक्के आध्यात्मिक पातळीची महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली पुणे येथील चि. आरुषी अमित सेलूकर (वय ४ वर्षे) !

उच्चलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन 
धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. आरुषी अमित सेलूकर एक दैवी बालक आहे !
चि. आरुषी सेलूकर
      (‘गेल्या वर्षी पुणे येथील चि. आरुषीची पातळी ६१ टक्के होती.’ - संकलक)
पालकांनो, हे लक्षात घ्या ! 
     ‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ - (परात्पर गुरु) डॉ. आठवले 
     यासमवेतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.

१०.१२.२०१६ ते १०.५.२०१७ या कालावधीत सर्वांनी करावयाचे नामजपादी उपाय

     महर्षींनी जीवनाडीपट्टीत सांगितलेल्या उपायांच्या जोडीला पुढील उपायही करावेत. उपायांच्या एकूण कालावधीतील ३० टक्के वेळ पुढे दिलेल्या उपायांना द्यावा आणि ७० टक्के वेळ महर्षींनी सांगितलेला ॐ निसर्गदेवो भव । ॐ वेदम् प्रमाणम् । हरि ॐ जयमे जयम् । जय गुरुदेव । हा जप करण्यासाठी द्यावा.

१. सर्वांनी करावयाचे उपाय 
 

१ अ. विविध चक्रांवर लावावयाची देवतांची चित्रे : देवतेचे चित्र शरिराला स्पर्श करून बाहेरच्या दिशेने मुख करून (निर्गुण) ठेवायचे कि आतल्या दिशेने मुख करून (सगुण) ठेवायचे, हे येथे दिले आहे. संबंधित देवतेची नामपट्टी वापरायची असल्यास तिच्या अक्षरांच्या संदर्भात तसेच करता येईल. अनाहतचक्राच्या खालील चक्रांसाठी नामपट्टीचा उपयोग करावा. 

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
  कुठे विश्‍वचि माझे घर, असा भाव असलेले संत, तर कुठे बांगलादेशातीलच नव्हे, तर भारतातील हिंदूही आपले न वाटणारे स्वातंत्र्यापासून आतापर्यंतचे शासनकर्ते !
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

बोधचित्र


॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
जीवात्मा आणि शिवात्मा म्हणजे काय ?
बाबा : मी कशासाठी जन्माला आलो आहे आणि मला काय करायचे आहे, याचे ज्ञान जिवाला झाले, तर त्या आत्म्याला जीवात्मा म्हणतात. कोणीतरी माझ्याकडून कार्य करवून घेत आहे, याचे ज्ञान झाले की, त्या आत्म्याला शिवात्मा म्हणतात. शिवात्मा शोधणे, म्हणजे खरे ज्ञान. शिवात्मा कार्यकारणभावापुरता जन्माला येतो, तर जीव प्रारब्धभोगामुळे जन्माला येतो.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. 
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

प.पू. पांडे महाराज यांचे अनमोल विचारधन

प.पू. पांडे महाराज
१. ‘सत्ता आली की, बुद्धी भ्रष्ट होते !
२. सत्ता राबवणे आणि राज्यकारभार चालू परिस्थितीनुसार केवळ चालू ठेवणे यात भेद आहे. सत्ता राबवण्यात खरे सामर्थ्य आहे.
३. आजकाल दुष्ट वृत्तीचा सत्कार, त्याचे लांगूलचालन आणि त्याला बढावा देणे’, असे सर्व उलटे चालू आहे.
४. पाकिस्तानची जनता जरा काही थोडेसे झाले की, त्याचा अपलाभ उठवते आणि आपल्यावर आक्रमण करते. त्याला लगेच तोडीस तोड उत्तर न दिल्याने त्यांचे वर्चस्व वाढले आहे.
५. दुष्टांच्या विरुद्ध लढणारा खरा वीर आहे. असलेल्या परिस्थितीला सामोरे जाण्याची हिंमत पाहिजे. तोंड देण्याची हिंमत नसल्याने आजचे नेते असे वागतात.
६. आजचे नेते सत्य सांगायला घाबरतात. यांच्याएवढा दुबळेपणा कुणाचाच नाही.’
- प.पू. परशराम पांडे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२४.८.२०१६)

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

खरा हितचिंतक !
‘अहो रूपम् अहो ध्वनिः ।’ म्हणजे ‘(गाढवाने उंटाला म्हणावे) वा ! काय रूप आहे 
आणि (उंटाने गाढवाला म्हणावे) वा ! काय आवाज आहे’, असे म्हणणारा कधीही मित्र नसतो. 
तुम्हाला तुमच्यातील दोष सांगणाराच तुमचा खरा मित्र आणि खरा हितचिंतक असतो.
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

पाकच्या अधिकार्‍याची मुजोरी !

संपादकीय
      पाकची मुजोरी केवळ सीमेवरच आहे असे नाही, तर ती सर्वच ठिकाणी दिसून येते. पंजाबमध्ये नुकत्याच पार पडलेल्या ‘हार्ट ऑफ एशिया’ या परिषदेच्या निमित्ताने पाकचे परराष्ट्र विषयक सल्लागार सरताज अझीज यांच्या वर्तनातून हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. अझीज यांनी अमृतसरच्या सुवर्ण मंदिराला भेट दिल्यानंतर तेथेच परस्पर पत्रकार परिषद घ्यायचा घाट घातला होता. पत्रकार परिषदेत त्यांनी पाकच्या विखारी विचारांचीच री ओढली असती, यात शंका नाही. भारताने तो घाट उधळून लावला.

सुब्रह्मण्यम् स्वामींचा लाखमोलाचा सल्ला !

संपादकीय
      निवडणुकीपूर्वी दिलेली आश्‍वासने निवडणुकीनंतर न पाळणे, हे जणू सर्वच राजकीय पक्षांनी जनतेला दिलेले एक अघोषित आश्‍वासनच असते ! विद्यमान राजकीय परिस्थितीत तरी त्यास कोणीही अपवाद नाही. अनेक ठिकाणी तर आपण मत दिलेला उमेदवार सध्या नेमक्या कोणत्या पक्षात आहे, याविषयी बिचारे मतदारच अनभिज्ञ असतात ! तत्त्वनिष्ठता वगैरे शब्द आता अडगळीतले झाले आहेत. लोकशाही व्यवस्थेत राजकीय क्षेत्रात तत्त्वनिष्ठता कधीच रूजली नाही. अशात तत्त्वमूल्यांचे किमान भान असणार्‍यांचा अपवाद निश्‍चितच आहे. भाजपचे नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी हे त्यातीलच एक म्हणावे लागतील. स्वातंत्र्यानंतर ‘निधर्मी’ भारताच्या आजवरच्या इतिहासाचे अवलोकन करता येथील राजकारण हे नेहमी धर्माभोवतीच फिरलेले आढळते. स्वातंत्र्यानंतर ‘निधर्मी’ काँग्रेसने देशावर सर्वाधिक काळ राज्य केले.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn