Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

फारुख अब्दुल्ला यांचे हुरियत कॉन्फरन्सच्या स्वतंत्र काश्मीरच्या मागणीला समर्थन !

फारुख अब्दुल्ला एकापाठोपाठ एक देशद्रोही विधाने करत आहेत
आणि केंद्र सरकार याविषयी गप्प आहे ! अशामुळे काश्मीरची समस्या
सुटण्याऐवजी अधिक स्फोटक होत जाईल, हे सरकारला कधी कळणार ?
        नवी देहली - मी हुरियत कॉन्फरन्सच्या विरोधात नाही. काश्मिरी जनतेच्या अधिकारासाठी मी स्वातंत्र्याचे समर्थन करतो, असे विधान जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी केले आहे. आपण जोपर्यंत एकत्रित येणार नाही, तोपर्यंत स्वतंत्र होऊ शकत नाही. मी नॅशनल कॉन्फरन्सच्या कार्यकर्त्यांना या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करतो, असेही त्यांनी या वेळी म्हटले. शेख अब्दुल्ला यांच्या १११ व्या जयंतीनिमित्त हजरतबल येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.
फारुख अब्दुल्ला यांनी केलेली विधाने
१. ही आग आता कधी विझणार नाही. ते (केंद्र सरकार) तुम्हाला काहीच देणार नाहीत. तुम्हाला तुमच्या अधिकारासाठी हा संघर्ष चालूच ठेवावा लागेल. आम्ही या आंदोलनासाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घातले आहे.

बांगलादेशातील हिंदु कुटुंबावर धर्मांधांचे आक्रमण !

       बांगलादेशातून हिंदूंचा पूर्ण वंशसंहार झाला, तरी भारत सरकार आणि मोठ्या हिंदुत्वनिष्ठ संघटना काही करणार नसल्याचे ओळखून हिंदूंनी लवकरात लवकर हिंदु राष्ट्राची (सनातन धर्म राज्याची) स्थापना करून जगभरातील हिंदूंचे रक्षण करावे !
       ढाका - सध्या बांगलादेशात हिंदु कुटुंबावर आक्रमण करून त्यांची भूमी हडपण्याचे कारस्थान चालू आहे. येथे मिलिमा बेगम या महिलेने दिवंगत सुभाषचंद्र डे यांच्या घरात बराच काळ वास्तव्य करणार्‍या सौ. पारुल हलदार यांच्या घरात भाडोत्री धर्मांधांना पाठवून त्यांच्या घरातील वस्तूंची मोडतोड करून त्यांना घराबाहेर काढण्याचा प्रयत्न केला.
       बांगलादेश मायनॉरिटी वॉच या तेथील अल्पसंख्यांकांसाठी काम करणार्‍या संघटनेचे प्रमुख श्री. रवींद्र घोष यांनी फकीरहाट पोलीस ठाण्यातील अधिकारी महंमद फझलूर रेहमान यांना संपर्क केला असता उपनिरीक्षक स्वपनकुमार सरकार यांना सदर प्रकरणाची चौकशी करण्याचा आदेश दिल्याचे त्यांनी सांगितले. श्री. रवींद्र घोष यांनी स्वपनकुमार सरकार यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी सदर प्रकरण घडल्याचे मान्य केले आणि सौ. पारुल यांनी अद्याप कोणतीही तक्रार केली नसल्याची माहिती दिली.

जयललिता यांच्या पार्थिवाला हिंदु धर्मशास्त्रानुसार अग्नी न देता त्यांचे दफन करण्यामागील हास्यास्पद आणि धर्मविरोधी कारणे !

       चेन्नई - इंडियन एक्सप्रेस या इंग्रजी वृत्तपत्राने तमिळनाडूमधील एका वरिष्ठ सरकारी सचिवांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार जयललिता या आमच्यासाठी (हिंदु) अय्यंगार नव्हत्या. त्या जात अथवा धर्म याच्या पलीकडे होत्या. (धर्मशिक्षणाच्या अभावी असे हास्यास्पद विधान करणारे सचिव ! जयललिता या जात आणि धर्म याच्या पलीकडे होत्या म्हणून पुरले असेल, तर पार्थिव पुरणे हे कुठलीच जात किंवा धर्म यांच्याशी निगडित नाही का ? पार्थिवावर अग्नीसंस्कार करणे हा सर्वांत चांगला अंत्यविधी आहे; म्हणून तरी जयललिता यांच्या पार्थिवावर अग्नीसंस्कार करायचा होता ! - संपादक) याआधी पेरियार, अण्णा दुराई आणि एम्जीआर् यांसारख्या नेत्यांना आम्ही पुरले होते. त्यांच्या स्मारकाच्या माध्यमातून जनतेच्या ते स्मृतीस राहिले आहेत. (अग्नीसंस्कार केल्यानंतरही त्या ठिकाणी स्मारक उभारता येते. - संपादक)
       एका राजकीय विश्‍लेषकाच्या मते, जयललिता या सश्रद्ध महिला होत्या. त्यामुळे लोकांमध्ये त्यांच्यावर अग्नीसंस्कार होईल, अशी साहजिक अपेक्षा होती; परंतु त्यांना अग्नी देण्यासाठी त्यांचे नातेवाईक उपस्थित असणे अपेक्षित आहे. त्यांची भाची दीपा जयकुमार हीच आता जीवित असल्याने तिलाच अग्नी देण्याचा अधिकार आहे; परंतु राजकीय लाभासाठी जयललिता यांच्या निकटवर्ती असलेल्या शशिकला यांना दीपा यांना अंत्यसंस्काराच्या जवळपासही फिरकू द्यायचे नव्हते. (नेत्याच्या अंत्यसंस्काराचाही राजकीय लाभासाठी वापर करणारे स्वार्थी आणि निर्लज्ज राजकारणी ! - संपादक)

जयललिता यांच्या पार्थिवावर चेन्नईमध्ये अंत्यसंस्कार !

दहन न करता
पार्थिव पुरण्यात आले !
        चेन्नई - ६ डिसेंबरला तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता (वय ६८ वर्षे) यांच्या पार्थिवावर सायंकाळी ६ वाजता लाखो लोकांच्या उपस्थितीत येथील मरीना समुद्रकिनार्‍यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. जयललिता यांच्या पार्थिवाचे हिंदु परंपरेनुसार दहन न करता ते येथे पुरण्यात आले. जयललिता यांचे राजकीय मार्गदर्शक आणि माजी मुख्यमंत्री एम्.जी रामचंद्रन् यांच्या स्मारकाशेजारीच जयललिता यांचे पार्थिव पुरण्यात आले. (हिंदु परंपरेचे पालन न करता आणि धर्मशास्त्राच्या विरुद्ध अंत्यसंस्कार केल्यामुळे जिवाला पुढची गती प्राप्त होण्यात अडथळा निर्माण होतो, हे हिंदूंनी लक्षात घ्यायला हवे ! - संपादक) प्रकृती खालावल्यामुळे जयललिता यांचे ५ डिसेंबरच्या रात्री साडेअकरा वाजता दीर्घ आजारामुळे निधन झाले. अनुमाने अडीच मास (महिने) त्या अपोलो रुग्णालयात उपचार घेत होत्या. जयललिता यांच्या निधनानंतर अपोलो रुग्णालयासह संपूर्ण राज्यात प्रचंड बंदोबस्त वाढवण्यात आला होता. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीयमंत्री व्यंकय्या नायडू, कर्नाटक, केरळ आदी ७ राज्यांचे मुख्यमंत्री, तसेच अन्य मंत्री आणि मान्यवर आले होते. राष्ट्रपती प्रणव मुखर्जीही येण्यासाठी निघाले असता त्यांच्या विमानात अचानक तांत्रिक समस्या निर्माण झाल्याने ते दुसर्‍या विमानाने येथे दाखल झाले.

देहली येथे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने केंद्रीय अवजड उद्योगमंत्री श्री. अनंत गीते यांची भेट

डावीकडून श्री. कार्तिक साळुंके, श्री. अभय वर्तक 
आणि केंद्रीय अवजड उद्योगमंत्री श्री. अनंत गीते

       देहली - सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने केंद्रीय अवजड उद्योगमंत्री आणि शिवसेनेचे श्री. अनंत गीते यांची भेट घेण्यात आली. या वेळी त्यांना राष्ट्र आणि धर्म यांच्या संदर्भातील समस्यांविषयी अवगत करण्यात आले. यावर त्यांनी शिवसेनेचे खासदार हे विषय संसदेत नक्की मांडतील, असे आश्‍वासन दिले. या प्रसंगी त्यांना सनातन पंचांग २०१७ भेट देण्यात आले. या वेळी सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक आणि हिंदु जनजागृती समितीचे देहली समन्वयक श्री. कार्तिक साळुंके उपस्थित होते.

अंनिसवर कारवाई करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवतो ! - श्री. प्रकाश मेहता, गृहनिर्माणमंत्री, भाजप

गृहनिर्माणमंत्री श्री. प्रकाश मेहता
यांना निवेदन देतांना श्री. अरविंद पानसरे

वस्त्रोद्योगमंत्री श्री. अर्जुन खोतकर (उजवीकडे)
यांना निवेदन देतांना श्री. अरविंद पानसरे

        नागपूर, ६ डिसेंबर (वार्ता.) - अंनिसने केलेल्या आर्थिक घोटाळ्यांच्या संदर्भात तिच्यावर कारवाई करावी आणि श्री तुळजापूर देवस्थान समितीमध्ये होत असलेल्या भ्रष्टाचारप्रकरणाची चौकशी लवकर पूर्ण व्हावी, या दोन्ही मागण्यांसाठी मी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवतो, असे प्रतिपादन राज्याचे गृहनिर्माणमंत्री आणि भाजपचे श्री. प्रकाश मेहता यांनी केले. हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र प्रवक्ता श्री. अरविंद पानसरे यांनी त्यांची भेट घेतली. त्या वेळी त्यांना देण्यात आलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने ते बोलत होते. 

अखंड भारताची निर्मिती होणारच ! - शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती

      कोल्हापूर - सत्ययुगापासून कलियुगापर्यंत अनेक वेळा अशी परिस्थिती होती की परिस्थिती पालटणे शक्य नाही, असे सर्वांना वाटत होते, दुर्जन प्रबळ होते; मात्र प्रत्येक वेळी सज्जन शक्तींनी त्यांच्यावर मात केली. रामायणकाळात रावणाचा पराभव झाला, द्वापरयुगात दुर्योधनाचा पराभव झाला. अगदी अलीकडच्या काळातही चाणक्यने चंद्रगुप्ताच्या साहाय्याने नंदाचा पराभव केला, छत्रपती शिवाजी महाराज-रामदास स्वामी यांचेही उदाहरण आपल्यासमोर आहे. त्याचप्रकारे पूर्वी भारत अखंड होता आणि सध्या तो नसला, तरी अखंड भारताची निर्मिती ही होणारच आहे, असे मार्गदर्शन पूर्वाम्नाय श्रीगोवर्धनमठ - पुरीपीठाधीश्‍वर श्रीमज्जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती महाराज यांनी केले. 

सिंधमधील धर्मांतरविरोधी कायद्याला आतंकवादी हाफिज सईद विरोध करणार !

आतंकवाद्यांना धर्म असतो ! त्यामुळेच हाफिज सईद हिंदूंचे 
धर्मांतर रोखणार्‍या कायद्याला विरोध करत आहे, हे लक्षात घ्या !
       कराची - पाकमधील आतंकवादी संघटना जमात-उद-दावाचा प्रमुख हाफिज सईद याने सिंध प्रांतामध्ये अल्पसंख्यांकांचे बलपूर्वक होणारे धर्मांतर रोखण्यासाठी बनवण्यात आलेल्या कायद्याला देशव्यापी विरोध करण्याचे घोषित केले आहे. हा कायदा इस्लामविरोधी आणि घटनेच्या विरोधात आहे. भारताने नेहमीच सिंधमध्ये रहाणार्‍या हिंदूंचा पाकच्या विरोधात वापर केला आहे; परंतु तो यशस्वी होऊ शकला नाही, असेही तो म्हणाला.
       या कायद्यामुळे धर्मांतर करण्यासाठी बळजोरी करणार्‍यांना ५ वर्षांची आणि त्यांना साहाय्य करणार्‍यांना ३ वर्षांची शिक्षा होणार आहे. साउथ एशिया पार्टनरशिप-पाकिस्तान (सैप-पीके) नावाच्या संघटनेनुसार पाकमध्ये प्रतीवर्षी १ सहस्र मुलींचे धर्मांतर केले जाते आणि यात सर्वाधिक हिंदु मुली असतात. (भारतात घरवापसी वरून ऊर बडवणारे पाकमधील हिंदूंच्या होणार्‍या धर्मांतराविषयी मात्र मौन बाळगतात ! - संपादक)

देहलीचे शिवसेना राज्यप्रमुख श्री. नीरज सेठी यांना पाकमधून धमकी !

पाकिस्तानातून भारतातील धर्माभिमानी हिंदूंना धमक्या येतात; पण अशा 
धमक्या भारतातून पाकिस्तानातील जिहादी मुसलमानांना कधी देण्यात आली आहे का ?
श्री. नीरज सेठी
      देहली - येथील शिवसेना राज्यप्रमुख श्री. नीरज सेठी यांना अज्ञातांनी पाकमधून दूरभाषद्वारे जिवे मारण्याची धमकी दिली. या धमकीच्या विरोधात नारायण विहार आणि पार्लमेंट स्ट्रीट पोलीस ठाण्यांमध्ये तक्रार करण्यात आली आहे. धमकी देणार्‍याने सेठी यांना ‘‘जास्त हिंदुत्वाचे कार्य करत आहेस, मुसलमानांना विरोध करत आहेस, तुला बघून घेऊ’’, अशी धमकी दिली. यावर श्री. सेठी यांनी खंबीरपणे त्यांना, ‘‘तुम्हाला काय करायचे ते करून घ्या, मी हिंदुत्व सोडणार नाही आणि तुम्ही दूरभाषवर काय घाबरवण्याचा प्रयत्न करता, धाडस असेल, तर समोर येऊन विरोध करा’’, अशा शब्दांत प्रत्युत्तर दिले. त्यांना २३ आणि २९ नोव्हेंबर या दोन दिवस धमक्या देण्यात आल्या.

हिंदु धर्मप्रसार आणि धर्मरक्षण करणार्‍या धर्माभिमान्यांचा सोलापूर धर्मजागृती सभेत सत्कार

ह.भ.प. इंगळे महाराज यांच्याकडून सत्कार स्वीकारतांना श्री. सिद्राम चरकुपल्ली 

ह.भ.प. इंगळे महाराज यांच्याकडून सत्कार स्वीकारतांना श्री. प्रशांत सलगरे      सोलापूर - हिंदुत्वनिष्ठांच्या बैठकांचे आयोजन करणारे धर्माभिमानी श्री. सिद्राम चरकुपल्ली यांनी धर्मसभेच्या सेवेमध्येही हिरीरीने सहभाग घेतला. त्यानिमित्त त्यांचा सत्कार ह.भ.प. इंगळे महाराज यांनी केला. श्री. प्रशांत सलगरे हे पायाने अधू असूनही त्यांनी सभेच्या प्रसारात उत्स्फूर्त सहभाग घेतला, तसेच गावकर्‍यांनाही ते सभेला घेऊन आले होते. श्री. सलगरे यांचा सत्कार ह.भ.प. इंगळे महाराज यांच्या हस्ते करण्यात आला. 
विशेष - फेसबूकच्या माध्यमातूनही सोलापूर येथील हिंदु धर्मजागृती सभेचे प्रक्षेपण करण्यात आले. ११ सहस्रांहून अधिक लोकांनी याचा लाभ घेतला. 
धर्मसभेला उपस्थित मान्यवर : विद्यार्थी सेनेचे लहू गायकवाड, कवठळे येथील सरपंच सुरेश नरोटे, मनसे विद्यार्थी सेनेचे अमर कुलकर्णी, शिंगडगांवचे सरपंच श्री. मल्लीकार्जुन पनशेट्टी, माढा भाजप तालुकाध्यक्ष योगेश पाटील

सनातन संस्थेसाठी माझे नेहमीच आशीर्वाद !

शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती यांना ग्रंथ भेट देतांना श्री. आनंद पाटील

       कोल्हापूर - पूर्वाम्नाय श्रीगोवर्धनमठ - पुरीपीठाधीश्‍वर श्रीमज्जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती महाराज हे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने येथे आले आहेत.
       ६ डिसेंबर या दिवशी सकाळी अधिवक्ता रवि शिराळकर यांच्या घरी सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांनी त्यांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले, तसेच त्यांना ११ डिसेंबर या दिवशी असलेल्या हिंदु धर्मजागृती सभेचे निमंत्रण दिले. या वेळी शंकराचार्यांना अध्यात्म विश्‍वविद्यालय (इंग्रजी आवृत्ती) आणि राष्ट्र और धर्म चिंतन (हिंदी आवृत्ती) हे दोन ग्रंथ भेट देण्यात आले. शंकराचार्यांनी तात्काळ हे दोन ग्रंथ चाळले आणि सनातन संस्थेसाठी माझे नेहमीच आशीर्वाद आहेत, असे सांगितले. या वेळी सनातन संस्थेच्या सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, सौ. वसुधा दिवाण, श्री. आनंद पाटील, हिंदु जनजागृती समितीचे श्री. मधुकर नाझरे उपस्थित होते.

रायचूर येथील अखिल भारतीय कन्नड साहित्य संमेलनात सनातनचे ग्रंथ आणि साहित्य याला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

ग्रंथ प्रदर्शनाला भेट देतांना जिज्ञासू
      रायचूर (कर्नाटक) - येथे २ ते ४ डिसेंबरच्या कालावधीत ८२ वे अखिल भारतीय कन्नड साहित्य संमेलन पार पडले. या संमेलनामध्ये सनातन संस्था आणि श्री सिद्धेश्‍वर धर्मजागृती संस्था यांच्या संयुक्त वतीने ग्रंथ आणि सनातनचे सात्त्विक साहित्य यांचे प्रदर्शन लावण्यात आले. या प्रदर्शनाला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कर्नाटकातील उडुपी येथे ख्रिस्त्यांचा हिंदूंप्रमाणे धार्मिक यात्रा काढून भोळ्याभाबड्या हिंदूंची दिशाभूल करण्याचा प्रयत्न !

       उडुपी (कर्नाटक) - कॅथलिक ख्रिस्ती समुदायाच्या राष्ट्रीय युवकांच्या संमेलनाची पूर्वसिद्धता म्हणून येथे ‘पवित्र क्रॉस’ यात्रेला आरंभ झाला आहे. कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यातील कार्कळ सीमेवरील मियारू येथून याला प्रारंभ झाला. बेळतंंगडी धर्मक्षेत्राच्या व्याप्तीत येणार्‍या धर्मकेंद्रांमध्ये २० दिवस यात्रा केल्यानंतर उडुपी धर्मक्षेत्रातील भारतीय कॅथलिक युवा संचालनाचे पदाधिकारी बेळतंगडीला परत येऊन ‘पवित्र क्रॉस’चा स्वीकार करून कार्कळ तालुक्यातील मियारी येथे असलेल्या संत डोमिनिकर चर्च येथे आणला. ११ डिसेंबरपर्यंत उडुपी कार्यक्षेत्राच्या अंतर्गत येणार्‍या विविध ख्रिस्ती धर्मकेंद्रांमध्ये ही ‘पवित्र क्रॉस’ यात्रा होणार आहे. ११ डिसेंबरला ख्रिस्त्यांच्या धर्मक्षेत्रांचे मोठे चर्च असलेल्या मिलाग्रिस कॅथेड्रलमध्ये उडुपीचे धर्माध्यक्ष जेराल्ड आयझॅक लोबो यांच्या नेतृत्वाखाली मिरवणूक, बलीपूजा, क्रॉॅसची आराधना आणि मोठ्या प्रमाणात समारोप समारंभ होणार आहे. त्यानंतर हा ‘पवित्र क्रॉस’ मंगळुरू धर्मक्षेत्राला हस्तांतरीत करण्यात येणार आहे. (युरोपमध्ये मोठ्या प्रमाणात ख्रिस्ती त्यांच्या धर्माचा त्याग करू लागले आहेत. तेथील चर्च ओस पडत आहेत. अनेक चर्चच्या वास्तू विकण्यात आल्या आहेत. दुसरीकडे भारतात मात्र बाटलेल्या ख्रिस्त्यांकडून या सत्यतेकडे दुर्लक्ष करत हिंदु संस्कृतीनुसार धार्मिक कृती करून भोळ्याभाबड्या हिंदूंची दिशाभूल करून त्यांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न होत आहे. हा खोटेपणा समजण्यासाठी हिंदूंना धर्मशिक्षण देऊन त्यांच्यात जागृती निर्माण केली पाहिजे ! - संपादक)

ट्रम्प यांना हिंदु धर्म आणि भारतीय लोक अतिशय आवडतात !

भारतीय वंशाचे अमेरिकी उद्योगपती शलभ कुमार यांची माहिती 
     नवी देहली - अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प आणि त्यांचे प्रशासन दक्षिण आशियात शांती आणि समृद्धी यांसाठी प्रयत्न करेल, असा आशावाद भारतीय वंशाचे अमेरिकी उद्योगपती शलभ कुमार यांनी व्यक्त केला आहे. निवडणुकीच्या १५ दिवसांपूर्वी हिंदू-अमेरिकी नागरिकांच्या एका कार्यक्रमात ट्रम्प यांना बोलावण्यात कुमार यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. कुमार अमेरिकेतील रिपब्लिकन हिंदु आघाडीचे अध्यक्ष आहेत. नव्या सरकारच्या सत्ताग्रहण समारोहासाठी नेमलेल्या समितीत शलभ कुमार यांचा समावेश आहे. कुमार म्हणाले, ‘‘ट्रम्प यांनी अमेरिका आणि भारत जवळचे मित्र असतील, असे म्हटले आहे. ट्रम्प यांना हिंदु धर्म आणि भारतीय लोक अतिशय आवडतात.’’ ट्रम्प यांच्या निवडणुकीसाठी आलेल्या देणगीत सर्वाधिक देणगीदारांच्या सूचीत कुमार यांचा पहिल्या १० लोकांमध्ये समावेश होता.

युरोपमधील स्लोव्हाकियामध्ये इस्लामला धर्म म्हणून मान्यता नाही !

     ब्रॅटीस्लाव्हा (स्लोव्हाकिया) - स्लोव्हाकिया हा युरोपियन युनियनचा सदस्य देश आहे. युरोपियन युनियनमधील इतर देशांना सिरीया आणि इतर युद्धपीडित देशांतील किती शरणार्थी मुसलमानांना आश्रय द्यायचा याविषयीचा कोटा आखून देण्यात आला आहे. तसाच कोटा स्लोव्हाकिया देशालाही देण्यात आला होता. स्थलांतरितांसाठी असणार्‍या कोट्याकडे दुर्लक्ष करून मोठ्या प्रमाणात स्थलांतर करणार्‍या लोकांना राज्यात सामवून घेण्यास कडाडून विरोध केला जात आहे. त्यासाठी इस्लामला ‘धर्म’ म्हणून मान्यता देण्यात आलेली नाही. पंतप्रधान रॉबर्ट फिको यांनी इस्लाम धर्माला स्लोव्हाकियामध्ये स्थान नसल्याचे विधान सतत केले आहे. 
     पूर्वीच्या जनगणनेनुसार केवळ २ सहस्र अनुयायी असलेेल्या आणि मान्यताप्राप्त मशीद नसलेल्या इस्लाम धर्माला स्लोव्हाकियात बस्तान बसवायला अतिशय कठीण जाणार आहे. इस्लामिक फाऊंडेशननुसार सध्या स्लोव्हाकियात ५ सहस्र मुसलमान आहेत.अमेरिकेच्या बाहेर काम घेऊन जाणार्‍या आस्थापनांना किंमत चुकवावी लागेल ! - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प

     वॉशिंग्टन (अमेरिका) - अमेरिकेच्या बाहेर काम घेऊन जाणार्‍या आस्थापनांंना त्याची किंमत चुकवावी लागेल, अशी चेतावणी अमेरिकेचे नविनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प यांनी नुकतीच दिली आहे.
    ‘कॅरिअर’ या आस्थापनेने इंडियानापोलीस राज्यातील कारखाना बंद करून मॅक्सिको येथे हालवण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे १ सहस्र १०० लोकांच्या नोकर्‍यांना धोका निर्माण झाला होता; परंतु या राज्याकडून ‘कॅरिअर’ला कर सवलत देण्यात आली. त्यानंतर हा कारखाना हालवण्याचा निर्णय मागे घेतला होता. या पार्श्‍वभूमीवर ट्रम्प यांनी वरील चेतावणी दिली होती.
     ट्रम्प म्हणाले, ‘‘आमचे सरकार ‘कॉर्पोरेट कर’ न्यून करेल. त्यामुळे अनेक आस्थापनेही अमेरिकेतच रहाण्याचा विचार करतील; मात्र जी आस्थापने त्यांचे काम बाहेर घेऊन जातील, त्यांना आयातीवरील सीमा कराच्या माध्यमातून किंमत चुकवावी लागेल.’’ कॅरिअरच्या संदर्भात त्यांनी दूरचित्रवाहिनीवर वृत्त पाहिले. या माहितीमुळे त्यांना निवडणुकीत दिलेल्या आश्‍वासनांची आठवण झाली. आम्ही ‘कॅरिअर’ला जाऊ देऊ शकत नाही, असे ते म्हणाले. निवडणूक प्रचाराच्या वेळी ट्रम्प यांनी दुसर्‍या देशांकडून काम करवून घेणार्‍या अमेरिकेच्या आस्थापनांवर टीका केली होती. त्यांच्या या मताला लोकांचे मोठे समर्थन मिळाले होते.

मुंबईत जर राम मंदिर स्थानक नाही, तर मज्जीद रेल्वेस्थानकही नाही !

गोरेगाव ते जोगेश्‍वरी रेल्वेमार्गातील नवीन 
रेल्वेस्थानकाला विरोध दर्शवणार्‍या अबू आझमी आणि 
नवाब मलिक यांना वीर सेनेचे अध्यक्ष निरंजन पाल यांची चेतावणी ! 
       मुंबई - राम मंदिर हा नागरिकांच्या श्रद्धेचा विषय आहे. आम्ही अबू आझमी आणि नवाब मलिक यांना विनंती करतो की, कृपा करून आपण राम मंदिर नावाचे राजकारण करू नये. जर आपण राम मंदिर रेल्वेस्थानकाला विरोध दर्शवला किंवा आंदोलन केले, तर वीर सेना सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या साहाय्याने सनदशीर मार्गाने मज्जीद रेल्वेस्थानकाला विरोध करेल. मुंबईमध्ये जर राम मंदिर रेल्वेस्थानक नाही, तर मज्जीद रेल्वेस्थानक नाही, अशी चेतावणी वीर सेनेचे अध्यक्ष श्री. निरंजन पाल यांनी दिली आहे. गोरेगाव ते जोगेश्‍वरी रेल्वेमार्गातील नवीन रेल्वेस्थानकाला राम मंदिर, हे नाव देण्यात यावे, यासाठी २२ ऑक्टोबर २०१५ पासून अध्यक्ष श्री. निरंजन पाल यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन चालू करण्यात आले आहे. अखेर या नवीन रेल्वेस्थानकाला राम मंदिर, असे नाव देण्यास राज्य शासनाने संमती दर्शवली असून त्याविषयीचे अधिकृत पत्र २५ नोव्हेंबर २०१६ या दिवशी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहे; मात्र समाजवादी पक्षाचे अबू आझमी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता नवाब मलिक यांनी राम मंदिर नावाला विरोध दर्शवला आहे. या पार्श्‍वभूमीवर वीर सेनेचे अध्यक्ष श्री. निरंजन पाल यांनी वरील चेतावणी दिली. 

जळगाव येथील रुग्णालयात आधुनिक वैद्यांची तातडीने नेमणूक करावी !

हे सांगावे का लागते ? रुग्णालय 
प्रशासनाला स्वतःहून का कळत नाही ?
शिवसेना जिल्हाप्रमुखांचे 
जिल्हा शल्यचिकित्सकांना निवेदन
        जळगाव - येथील मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात आधुनिक वैद्यांच्या अभावी रुग्णांचे पुष्कळ हाल होत आहेत. याची गांभीर्याने नोंद घ्यावी. आधुनिक वैद्य नसल्याने उपचारांअभावी रुग्ण दगावण्याची शक्यताही अधिक असल्याने तातडीने वैद्यांची नेमणूक करण्यात यावी, असे निवेदन येथील शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भामरे यांना घेराव निवेदन दिले. या वेळी शिवसेना जिल्हा संघटक ह.भ.प जळकेकर महाराज, तसेच शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. 

नोटाबंदीच्या विषयात विरोधकांची पळपुटी भूमिका ! - आमदार आशिष शेलार

      नागपूर, ६ डिसेंबर (वार्ता.) - नोटाबंदीविषयी राज्य शासनाने केलेल्या उपाययोजना अधिक होत्या. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या देशहिताच्या निर्णयाचे जनतेने स्वागतच केले आहे; मात्र नियमात बसत नसतांनाही विरोधी पक्षाने याविषयी विधानसभेत चर्चा उपस्थित केली. शासन याविषयी सविस्तर चर्चा करायला आणि उत्तर द्यायला सिद्ध होते, त्यानिमित्ताने जनतेच्या अडचणी शासनासमोर मांडण्याची संधी होती; मात्र विरोधकांना राजकारण करण्यातच रस होता; म्हणून त्यांनी पळपुटी भूमिका घेतली, असा आरोप मुंबई भाजपचे अध्यक्ष आणि आमदार श्री. आशिष शेलार यांनी ५ डिसेंबर या दिवशी केला. विधानभवनाच्या आवारात माध्यमांच्या प्रतिनिधींशी ते बोलत होते. 

अंधश्रद्धा निर्मूलन समितीवर प्रशासक नेमा !

हिंदु जनजागृती समितीची 
आमदारांकडे निवेदनाद्वारे मागणी 

आमदार श्री. बालाजी केणीकर (डावीकडे) यांना निवेदन देतांना

आमदार श्री. संजय केळकर (उजवीकडे) यांना निवेदन देतांना

        ठाणे, ६ डिसेंबर (वार्ता.) - शासनाची फसवणूक करून आर्थिक घोटाळे करणार्‍या अंधश्रद्धा निर्मूलन समिती, महाराष्ट्र (सातारा)वर प्रशासक नेमण्याविषयी ठाणे येथील आमदार श्री. संजय केळकर आणि अंबरनाथ येथील आमदार श्री. बालाजी केणीकर यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले. या वेळी समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते. 

अपप्रकार रोखण्यासाठी उपाययोजना करण्यासंदर्भात आदेश देऊ ! - राजेंद्र मुठे, उपजिल्हाधिकारी

ख्रिस्ती नववर्षाच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखण्यासाठी पोलीस-प्रशासन यांना निवेदने ! 
उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे (डावीकडून तिसरे)
यांना निवेदन देतांना धर्माभिमानी
     पुणे, ६ डिसेंबर (वार्ता.) - ख्रिस्ती नववर्षाच्या निमित्ताने ३१ डिसेंबरच्या रात्री होणारे अपप्रकार थांबवण्याविषयी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे यांना ३० नोव्हेंबर या दिवशी निवेदन देण्यात आले. निवेदनाची नोंद घेत ‘अपप्रकार रोखण्यासाठी, तसेच कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी योग्य ती उपाययोजना राबवण्याचे आदेश देऊ’ असे आश्‍वासन मुठे यांनी दिले. या वेळी अखिल राजस्थानी समाज संघाचे महासचिव सर्वश्री मोहनसिंह राजपुरोहित, योग वेदांत सेवा समितीचे सुधाकर संगनवार, धर्माभिमानी अशोक केडगे आणि हिंदु जनजागृती समितीचे दीपक आगवणे उपस्थित होते.

अंनिसवरील आरोपांच्या संदर्भात विधानसभेच्या आगामी अधिवेशनात आवाज उठवणार !

शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांचे हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाला आश्‍वासन
आमदार वैभव नाईक (उजवीकडे)
यांना निवेदन देतांना धर्मप्रेमी
      कणकवली - अंधश्रद्धा निर्मूलन समितीवरील गंभीर आरोपांविषयी विधानसभेच्या आगामी अधिवेशनात आवाज उठवणार असून हे निवेदन पुढील कार्यवाहीसाठी मुख्यमंत्र्यांकडेही पाठवणार आहे, असे आश्‍वासन शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाला दिले. हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाने आमदार नाईक यांची कणकवली येथे भेट घेऊन यासंदर्भात निवेदन दिले. या वेळी श्री. संजय पावसकर, श्री. सचिन तेजसिंहन्, हिंदु जनजागृती समितीचे श्री. दिनेश जंगम, श्री. अवधूत सावंत, श्री. श्रीधर मुसळे आणि सनातन संस्थेचे श्री. जयवंत सामंत उपस्थित होते.

खोट्या धाडी घालून बेहिशोबी पैसा हडपणारे पोलीस, हवालदार आणि दलाल यांना अटक !

कायदा-सुव्यवस्थेचा धाक संपल्याचेच लक्षण !
नवी मुंबई, ६ डिसेंबर - बेहिशोबी काळा पैसा बाळगणार्‍या व्यक्तीचे पैसे पांढरे करून देण्याची बतावणी करून त्याला लुटणारे साहाय्यक पोलीस निरीक्षक, हवालदार आणि दलाल यांना खांदेश्‍वर पोलिसांनी अटक केली आहे. (अशा गुन्हेगार पोलिसांविषयी शासनाला काय म्हणायचे आहे ? - संपादक)

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या लिपिकाला साडेतीन सहस्र रुपयांची लाच घेतांना पकडले

अशा लाचखोरांची सर्व संपत्ती शासनाधीन करून त्यांना आजन्म तुरुंगात ठेवणे आवश्यक !
     कल्याण, ६ डिसेंबर (वार्ता.) - कल्याण-डोंबिवली महापालिकेतील लाचखोरीची प्रकरणे उघड होणे चालूच असून पालिकेच्या आणखी एका कर्मचार्‍याला साडेतीन सहस्र रुपयाांंची लाच घेतांना ठाणे जिल्ह्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. महिन्याभराच्या कालावधीतील लाचखोरीची ही ३ री घटना असून त्यामुळे कल्याण-डोंबिवली महापालिकेत बोकाळलेला भ्रष्टाचार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. जेजोराम वायले असे या लिपिकाचे नाव असून बांधकामाची कर पावती देण्यासाठी त्याने ही लाच मागितली होती.

राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनात ९ सहस्र ४८९ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर

     नागपूर, ६ डिसेंबर (वार्ता.) - राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे ५ डिसेंबरला ९ सहस्र ४८९ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडल्या गेल्या. त्यातील सर्वाधिक म्हणजे १७१५.८५ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्सव्यवसाय या विभागांच्या आहेत. त्यानंतर नगरविकास विभाग, उद्योग, ऊर्जा, कामगार विभाग आणि गृह विभाग यांच्या आहेत. 
     राज्य सरकारने या वर्षी मुंबईमध्ये झालेल्या पावसाळी अधिवेशनात मांडलेल्या आणि आता मांडलेल्या पुरवण्या मागण्या यांचा एकत्रित विचार करता एकूण पुरवणी मागण्या २२ सहस्र ५२१ कोटी रुपयांच्या आहेत. राज्याचे एकूण आर्थिक राज्यसंकल्प (बजेट) ७४ सहस्र ४७२ कोटी रुपयांचे असून सरकारने यावर्षीच्या आर्थिक राज्यसंकल्पाविना ३१ टक्के जास्तीच्या पुरवणी मागण्या मांडल्या आहेत. नैसर्गिक संकटामुळे सरकारला या पुरवणी मागण्या मांडाव्या लागल्याचे स्पष्टीकरण अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहे.

‘हिंदु राष्ट्र’ : मूलभूत विचार

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसंदर्भातील परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे मार्गदर्शन !
वाचा नवीन सदर
१. व्याख्या आणि समानार्थी शब्द 
१ अ. हिंदु राष्ट्र म्हणजे विश्‍वकल्याणार्थ कार्यरत सत्त्वगुणी लोकांचे राष्ट्र ! : ‘मेरुतंत्र’ या धर्मग्रंथात ‘हीनं दूषयति इति हिन्दुः ।’ म्हणजे ‘हीन किंवा कनिष्ठ अशा रज आणि तम गुणांचा ‘दूषयति’ म्हणजेच नाश करणारा, तो हिंदु’, अशी ‘हिंदु’ शब्दाची व्युत्पत्ती दिली आहे. जो रज-तमात्मक हीन गुण आणि त्यामुळे घडणारी कायिक, वाचिक आणि मानसिक स्तरांवरील हीन कर्मे यांचा तिरस्कार करतो; म्हणजेच सात्त्विक आचरण करतो, तो ‘हिंदु’ असतो. अशी सत्त्वगुणी व्यक्ती ‘मी आणि माझे’ असा संकुचित विचार त्यागून विश्‍वाच्या कल्याणाचा विचार करते. इतिहासात याची अनेक उदाहरणे आहेत.

हिंदु महिलांनी धर्मशिक्षण घेण्याची आवश्यकता ! - सौ. नेहा मेहता

कार्यक्रमासाठी उपस्थित महिला
      शिरवळ (ता. खंडाळा, जिल्हा सातारा), ६ डिसेंबर (वार्ता.) - सध्या आधुनिकतेच्या नावाखाली धर्माचरण विसरल्याने हिंदु संस्कृती लोप पावत आहे. पाश्‍चात्त्यांचे अंधानुकरण आणि स्वैराचार यांमुळे महिला अत्याचारांना बळी पडत आहेत. धर्मशिक्षणाच्या अभावामुळे ‘लव्ह जिहाद’चे संकटही उभे आहे; म्हणूनच हिंदु महिलांनीही धर्मशिक्षण घेऊन धर्माचरण केले पाहिजे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समिती प्रणित रणरागिणी शाखेच्या सौ. नेहा मेहता यांनी केले. १ डिसेंबर या दिवशी महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या वेळी रणरागिणी शाखेच्या सौ. छाया पवार आणि ४० हून अधिक महिला उपस्थित होत्या. मार्गदर्शनानंतर उपस्थित महिलांनी शिरवळ आणि विंग या गावांमध्ये धर्मशिक्षण वर्ग चालू करण्याची मागणी केली.

गडांवरील बेवारस तोफा संरक्षित होणार !

पुणे, ६ डिसेंबर - गडांवरील बेवारस तोफा संरक्षित करण्याची अधिकृत प्रक्रिया चालू करण्याचे आदेश राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी दिले आहेत. तसेच राज्यातील गडकोटांच्या नियमित स्वच्छतेसाठी राज्यातील सर्व विद्यापिठांच्या ‘एन्सीसी’ अभ्यासक्रमात ‘स्वच्छता अभियान’ या विषयाचा समावेश होण्याची शक्यता आहे. सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे आणि राज्याच्या दुर्ग संवर्धन समितीचे अध्यक्ष यांच्यामध्ये झालेल्या बैठकीच्या वेळी हा निर्णय घेण्यात आला. राज्य संरक्षित ४९ गडांवर २८० तोफांची शासनाकडे नोंद आहे. गडसंवर्धन आणि ऐतिहासिक वस्तूंचे जतन यांकडे आतापर्यंत अक्षम्य दुर्लक्ष झाल्याने मधल्या काळात तोफांची चोरी होण्याच्या घटनाही घडल्या होत्या. (गडकिल्ले हा आपला ऐतिहासिक आणि प्रेरणादायी ठेवा आहे. याचे होत असलेले विद्रूपीकरण थांबून गडकिल्ल्यांचे जतन आणि संवर्धन व्हावे आणि गडकोट स्फूर्तीकेंद्रे बनावित, ही अपेक्षा ! - संपादक)

गोवंश : मानवी जीवनाची एकमेव संजीवनी !

धर्मांध, हिंदुद्वेष्टे, नि(अ)धर्मी, पुरो(अधो)गामी, तथाकथित व्यक्तीस्वातंत्र्यवाले 
आदी उत्तरप्रदेश येथील गो-कथाकार महंमद फैज खान यांच्याकडून काही बोध घेतील का ?
    ‘गायींचे महत्त्व लोकांपर्यंत पोेचवणे आणि गोवंशाचे रक्षण करणे, याकरता उत्तरप्रदेश येथील महंमद फैज खान हे गो-कथा मोहीम राबवतात. ते गो-कथा सांगण्यासाठी विजयपूर येथे आले असता त्यांनी स्थानिक ‘दैनिक संयुक्त कर्नाटक’ या वृतपत्राच्या प्रतिनिधीशी विशेष संवाद साधला. तो त्या दैनिकाने प्रसिद्ध केला आहे. या संवादामधील काही भाग आमच्या वाचकांसाठी येथे प्रसिद्ध करत आहोत.’

पालकांनो, तुमच्या पाल्याला समजून घ्या !

     ‘प्रत्येक मातापित्याच्या आपल्या मुलांकडून बर्‍याच अपेक्षा असतात आणि ते साहजिकही आहे; पण त्याच वेळेला आपल्या मुलांच्या क्षमतेविषयी आपण अवास्तव अपेक्षा तर ठेवत नाही ना, याचाही विचार करावा लागतो. या मर्यादांचे योग्य ते भान ठेवले नाही, तर मातापित्यांच्या आकांक्षा या मुलांना न पेलणारे ओझे बनते. प्रस्तूत लेखात विद्यार्थ्यांच्या मानसिक समस्यांविषयी आणि त्यावर पालकांनी करावयाची उपाययोजना यांविषयी ऊहापोह केला आहे.

धान्यसाठवणुकीची सक्षम व्यवस्था हवी !

       भारत हा कृषिप्रधान देश असूनही देशात उपासमारी आणि कुपोषण यांना अनेक लोकांना तोंड द्यावे लागते. यामागे देशाची असलेली अवाढव्य लोकसंख्या हे कारण असले, तरी धान्याची होणारी नासाडी हेही प्रमुख कारण आहे. एका आकडेवारीनुसार बिहार राज्याला वर्षभर पुरेल एवढ्या अन्नाची नासाडी देशात वर्षभरात होते. पुरेशा साठवणूक क्षमतेचा अभाव हे त्यामागचे एक कारण होते. पुरेशी साठवणूक करण्याची व्यवस्था नसल्याने देशातील १६ ते १७ टक्के धान्य वाया जाते. वर्ष २००९-१० मध्ये राज्यात ५.८९ लक्ष मेट्रिक टन क्षमतेची १ सहस्र १७ गोदामे होती. त्यांपैकी ०.५८ लक्ष मेट्रिक टन क्षमतेची १४४ गोदामे वापरासाठी अयोग्य होती. त्यावर उपाय म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय गोदाम योजना चालू केली. शेतकर्‍याने पिकवलेल्या अन्नधान्याची योग्य प्रकारे साठवणूक व्हावी आणि त्यातून शेतीमालाला योग्य बाजारभाव मिळावा आणि शेतकरी सक्षम व्हावे, हा या योजनेचा उद्देश होता. या योजनेअंतर्गत शासनाच्या वतीने जिल्ह्यांमध्ये भव्य गोदामे, तसेच शीतगृहे उभारली जात आहेत. असे असले तरी जोपर्यंत सक्षम वितरणव्यवस्था निर्माण होणार नाही, तोपर्यंत गोदामांचा विशेष लाभ होणार नाही.

नालासोपारा (ठाणे) येथील हिंदु धर्मजागृती सभेच्या प्रचाराला प्रारंभ !

सभेच्या प्रचारापूर्वी देवतांचा आशीर्वाद घेतांना धर्माभिमानी
     ठाणे, ६ डिसेंबर (वार्ता.) - नालासोपारा (पूर्व) येथे ११ डिसेंबर या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेच्या प्रचाराला प्रारंभ करण्यापूर्वी वालईपाडा येथील तुळजापूर मंदिरात नारळ वाढवून देवतांचा आशीर्वाद घेण्यात आला. या वेळी धर्माभिमानी सर्वश्री संतोष पांडे, गुलाब विश्‍वकर्मा, हिंदू गोवंश रक्षा समितीचे श्री. दीप्तेश पाटील आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रसाद काळे उपस्थित होते.

‘संजय गांधी नॅशनल पार्क’च्या सीमेपासून १०० मीटर ते ४ किमी अंतरापर्यंतचा भाग ‘इकोसेन्सेटिव्ह झोन’ म्हणून घोषित !

मुंबई, ६ डिसेंबर - ‘संजय गांधी नॅशनल पार्क’च्या सीमेपासून यापुढे केवळ १०० मीटर ते ४ किमी अंतरापर्यंतचाच भाग ‘इकोसेन्सेटिव्ह झोन’ म्हणून घोषित करण्यात आला आहे. ५ डिसेंबरला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने ही घोषणा केली. यापूर्वी वर्ष २०१५ मध्ये राष्ट्रीय हरित लवादाने पार्कच्या सीमेपासून १० किमीपर्यंतचा परिसर ‘इकोसेन्सेटिव्ह झोन’ म्हणून घोषित केला होता. त्यामुळे खाणकाम तसेच कोणत्याही औद्योगिक आणि व्यावसायिक कारणांसाठी या क्षेत्राचा उपयोग करण्यास अनुमती दिली जात नव्हती. त्याचप्रमाणे या क्षेत्रात रहिवासी प्रकल्प उभारण्यापूर्वी राष्ट्रीय हरित लवादाकडून अनुमतीचे प्रमाणपत्र मिळवणे आवश्यक होते.

हे राजकारण्यांमुळे झाले आहे. त्यांनी ते दुरुस्त करावे. संतांना यासाठी आवाहन का ?

       आज संपूर्ण देश जातींमध्ये विभागला गेला आहे. आजही देशात काही समाजघटकांना मंदिरात जाण्यापासून थांबवण्यात येते, तसेच त्यांना सामूहिक अन्नदानापासून लांब ठेवण्यात येते. त्यामुळे हिंदूंच्या या पतनाकडे संत समाजाने लक्ष देणे आवश्यक आहे. 
- माजी केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह 

राष्ट्रगीत आणि एम्आयएम् !

      ‘संपूर्ण देशभरातील सर्व चित्रपटगृहांमध्ये चित्रपट चालू होण्यापूर्वी भारताचे राष्ट्रगीत लावण्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने ३० नोव्हेंबरला दिला आहे आणि त्या संदर्भातील संक्षिप्त नियमावलीही घोषित केली आहे. या वेळी पडद्यावर राष्ट्रध्वजाचे चित्र लावण्यात येईल आणि या कालावधीत प्रत्येकाने उभे राहून राष्ट्रगीताचा मान राखणे बंधनकारक आहे. ‘राष्ट्रगीताच्या वेळी उभे रहा’, असे देशभक्तांची परंपरा असणार्‍या भारतियांना आज न्यायालयाने तसे आदेश देण्याची वेळ का आली ? हे लज्जास्पद असले, तरी न्यायालयाने ते केल्यामुळे आता देशद्रोही प्रवृत्तीवर वचक रहाण्यास काही प्रमाणात साहाय्य होणार आहे.

तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनावर शोक प्रस्ताव सादर करून विधानसभा आणि विधान परिषदेचे दिवसभराचे कामकाज स्थगित !

      नागपूर, ६ डिसेंबर (वार्ता.) - तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांचे ५ डिसेंबरला निधन झाल्याने केंद्र शासनाने ६ डिसेंबरला राष्ट्रीय दुखवटा घोषित केला. या पार्श्‍वभूमीवर ६ डिसेंबर या दिवशी विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहांत जयललिता यांना आदरांजली वाहण्यात आली. शोक प्रस्तावानंतर दोन्ही सभागृहांचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले. (दिवसभरासाठी कामकाज स्थगित करण्यापेक्षा कामकाम चालू ठेवून राज्याच्या हिताचे निर्णय घेतले असते, तर ती खरी श्रद्धांजली ठरली असती ! - संपादक)
      विधानसभेमध्ये मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी जयललिता यांचे निधन झाल्याचा शोकप्रस्ताव सभागृहात मांडला. त्यानंतर विरोधी पक्षातील काँग्रेसचे नेते डॉ. पतंगराव कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, शिवसेनेचे एकनाथ शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे आदींनी शोक प्रस्तावावर आपले विचार व्यक्त केले. बागडे यांनी दुखवटा पाळण्यासाठी दिवसभर विधानसभेचे कामकाज स्थगित केले. विधान परिषदेत सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शोकप्रस्ताव सादर केला. त्यावर विरोधी पक्षनेते आणि सत्ताधारी पक्षातील काही सदस्यांनी जयललिता यांच्याविषयीचे विचार मांडून आदरांजली वाहिली.

राज्यातील आतंकवादविरोधी पथकातील अधिकार्‍यांना उर्दू, अरबी आणि बांगला भाषांचे धडे !

देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक आणि  महत्त्वपूर्ण निर्णय
घेण्यास विलंब का लागला, हेही पोलीस महासंचालकांनी स्पष्ट करावे !
     मुंबई, ६ डिसेंबर - महाराष्ट्र पोलिसांकडून आतंकवादविरोधी पथकातील अधिकार्‍यांना उर्दू, अरबी आणि बांगला या भाषांचे शिक्षण देणार्‍या कार्यशाळा चालू करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी एका वृत्तपत्राच्या प्रतिनिधीशी बोलतांना दिली.

मुंबईत ४७ वातानुकूलित लोकल रेल्वेसाठी केंद्रीय मंत्रीमंडळाची मान्यता !

मुंबई, ६ डिसेंबर - मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एम्आर्व्हीसी) ४७ नव्या वातानुकूलित लोकल आणण्याची योजना आखली आहे. केंद्रीय मंत्रीमंडळाने संमती दिलेल्या मुंबई अर्बन ट्रान्स्पोर्ट प्रोजेक्ट (एम्यूटीपी) ३ या योजनेत ५६४ नवीन डबे, म्हणजेच १२ डब्यांच्या ४७ गाड्या येणार आहेत. या गाड्या वातानुकूलित असाव्यात, असा मुंबई रेल्वे विकास महामंडळाचा आग्रह आहे. मध्य आणि पश्‍चिम रेल्वेवर वातानुकूलित लोकलची चाचणी चालू झाल्यानंतर त्या चाचणीच्या निष्कर्षांवरून याविषयी निर्णय घेतला जाणार आहे.


राजकारण असे चालते; म्हणून सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती राजकारणात नाहीत, तर धर्मकारणासाठी सेवा करतात !

      तात्त्विक मतभेदांवरून भाजप शासनाच्या विरोधात राजकीय मोर्चा उभारलेले प्रा. सुभाष वेलिंगकर यांना राजकीय षड्यंत्राद्वारे अटक करण्याचे कारस्थान सत्ताधारी रचत आहेत, असा आरोप गोवा सुरक्षा मंच आणि भारतीय भाषा सुरक्षा मंच यांनी केला आहे. 

हिंदुस्थानात हिंदूंच्या नेत्यांना ठार करण्याचे आतंकवाद्यांचे ध्येय !

      अखिल भारतीय हिंदू महासभेचे अध्यक्ष स्वामी चक्रपाणी यांची हत्या करण्याची कुख्यात गुंड छोटा शकीलकडून सुपारी घेणार्‍या २ गुंडांकडून उत्तरप्रदेशातील बिसरख येथील पोलिसांनी चोरीच्या ७ दुचाकी जप्त केल्या. तसेच २ चाकूही जप्त करण्यात आले. सुपारीच्या प्रकरणात ते जामिनावर सुटले होते. 

हिंदुस्थानला जन्मभूमी मानणारे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पत्रकार तारक फतेह !

      तारक फतेह पाकिस्तानात जन्मलेले कॅनडा निवासी आंतरराष्ट्रीय ख्यातनाम पत्रकार आहेत, तसेच अनेक पुस्तकांचे लेखक आहेत. ते स्वत:ला हिंदु वंशपरंपरेतील मानतात. एवढेच नव्हे, तर गर्वाने म्हणतात की, ते मूळत: भारतीय आहेत. फतेह म्हणतात, ‘‘हिंदुस्थान माझी पायाभूत जन्मभूमी आहे, तोच माझा देश आहे. माझी पाकिस्तानी ओळख विसरण्यास अथवा परत करण्यास कोणती पद्धत असेल, तर ती परत करण्यास मी तयार आहे. मी माझ्या मातेला कसे विसरू शकतो ? आम्ही तर दाराशुकोहचे संतान आहोत. आम्ही त्या पंजाबची मुले आहोत, जेथील अत्यंत मोठ्या नेत्याची एका मोठ्या व्यक्तीने हत्या केली, त्याचे नाव होते औरंगजेब ! हिंदुस्थानच्या मुसलमानांंना एक पर्याय आहे, ते दाराशुकोहचे अनुयायी आहेत कि औरंगजेबचे ?’’
- श्री. तारक फतेह (साप्ताहिक ‘वीरवाणी’, वर्ष ३७, अंक ८, ५ जुलै २०१३)

स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विधिमंडळावर मोर्चा


      नागपूर, ६ डिसेंबर - स्वतंत्र विदर्भ राज्य आणि शेतकर्‍यांचे प्रश्‍न या मागण्यांसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या नेतृत्वाखाली एक मोर्चा ५ डिसेंबर या दिवशी विधिमंडळावर काढण्यात आला होता. या मोर्चामध्ये विविध घोषणा देत शेतकरी, महिला आणि युवक सहभागी झाले होते. मोर्चाचे नेतृत्व समितीचे मुख्य संयोजक राम नेवले आणि विदर्भ राज्य आंदोलन समितीचे प्रमुख अधिवक्ता वामनराव चटप यांनी केले. उपरोक्त मागण्यांसाठी विदर्भातील दर्यापूर, गडचिरोली, गोंदिया, बुलढाणा आणि यवतमाळ या ५ जिल्ह्यांतून ‘विदर्भ दिंडी यात्रा’ काढण्यात आली होती. तिचा समारोप या मोर्च्याच्या निमित्ताने येथील यशवंत स्टेडियम येथे झाला.

अर्थक्रांती नव्हे, तर अर्थसाक्षरतेकडचा प्रवास ! - अर्थतज्ञ डॉ. अभय टिळक

      पुणे, ६ डिसेंबर (वार्ता.) - नोटाबंदीचा एकंदरीत निर्णय चांगला असला, तरी त्याचे अकल्पनीय परिणाम सर्वांना सोसावे लागतील. हा निर्णय म्हणजे अर्थक्रांती नसून अर्थसाक्षरतेकडे जाण्याचा प्रवास आहे, असे प्रतिपादन अर्थशास्त्राचे अभ्यासक डॉ. अभय टिळक यांनी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या वतीने आयोजित ‘ऑन डिफरंट नोट’ या विषयावरील व्याख्यानात केले.

इतकी वर्षे प्रशासन झोपले होते का ? उत्तरदायींना कारागृहात टाका !

       देशद्रोही डॉ. झाकीर नाईक यांची मुंबईतील माझगाव येथील अनधिकृत शाळा ही सरकारच्या अनुमतीविना तसेच कोणत्याही बोर्डाशी संलग्न नसतांना चालवण्यात येत होती. 
     ‘कोट्यधीश व्यक्ती त्याला हवा तसा पैशांचा व्यय करतो; पण भगवंत सर्वशक्तीमान असूनही पृथ्वीवर आवश्यक तेवढे पाणी, प्रकाश, वारा उपलब्ध करून देतो, तसेच भगवंताने मनुष्याच्या शरिराची रचना करतांना त्याला जीवन जगण्यासाठी आवश्यक दोन हात, दोन पाय, दोन डोळे इत्यादींची निर्मिती केली आहे. भगवंतही विशिष्ट नियमानुसार कार्य करत असतो, तर मनुष्याला भगवंताने घालून दिलेले नियम, म्हणजे धर्मपालन करण्यात का अडचण यावी ?’ 
- श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.(१.९.२०१६)

महादेव जानकर यांच्या विरोधात काँग्रेसची राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार !

निवडणूक आयोगाने बजावली नोटीस !
नागपूर, ६ डिसेंबर (वार्ता.) - गडचिरोली जिल्ह्यातल्या वडसा नगरपालिका निवडणूक अधिकार्‍याला धमकावल्याप्रकरणी पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांच्या विरोधात तात्काळ आचारसंहिता भंगाचा गुन्हा प्रविष्ट करून कारवाई करावी, अशी मागणी प्रदेश काँग्रेसच्या एका शिष्टमंडळाने ५ डिसेंबरला राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे. याविषयी काही वृत्तवाहिन्यांवर वृत्त प्रसारित झाले होते, तसेच काँग्रेसकडून तक्रारसुद्धा प्राप्त झाली आहे. याविषयी निवडणूक आयोगाने जानकर यांना नोटीस बजावली असून नोटीस मिळाल्यापासून २४ घंट्यांच्या आत खुलासा करावा, अन्यथा योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असेही नोटीसमध्ये म्हटले आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अवतारी कार्याची ओळख महर्षि, संत आणि नाडीवाचक यांनी जगाला करून देणे अन् सर्व समष्टी ठायी प.पू. डॉक्टरांचे तत्त्वच कार्यरत असल्याचे अनुभवणे

पू. डॉ. चारुदत्त पिंगळे
परात्पर गुरु श्री श्रीजयंत बाळाजी आठवले, 
हेच श्रीहरि विष्णूचे कलियुगातील बुद्ध 
अवतार, म्हणजे समष्टीची बुद्धी शुद्ध करणारा !
     ‘परात्पर गुरु डॉ. आठवले हे श्रीहरि विष्णूचे कलियुगातील बुद्ध अवतार आहेत. बुद्ध अवतार म्हणजे समष्टीची बुद्धी शुद्ध करणारा अर्थात् गुरुभक्तीद्वारे साधना (गुरुकृपायोगाद्वारे) करून ज्ञानाच्या आधारावर समाजाला धर्म आणि राष्ट्र यांप्रती जागृत अन् क्रियाशील करणारा ज्ञानशक्तीरूपी अवतार !’ - पू. डॉ. चारुदत्त पिंगळे, उत्तरभारत प्रसारसेवक

लोकांचा त्रास न्यून न झाल्यास केंद्रशासन उत्तरदायी !

नोटाबंदीविषयी रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरपुढे शिवसेनेच्या खासदारांनी मांडली भूमिका
मुंबई, ६ डिसेंबर - नोटाबंदीच्या संदर्भात जनतेला होणार्‍या त्रासाविषयी आम्हाला आवाज उठवण्याचा अधिकार आहे. ५० दिवसांनंतरही लोकांचा त्रास न्यून न झाल्यास याला केंद्रशासन उत्तरदायी राहील, अशी भूमिका शिवसेनेच्या खासदारांनी रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गर्व्हनर आर्. गांधी यांच्या समोर मांडली. ५ डिसेंबरला शिवसेनेच्या खासदारांनी गांधी यांची भेट घेऊन नोटाबंदीच्या निर्णयामुळे जनतेला होणार्‍या त्रासाविषयी त्यांना अवगत केले. या वेळी निवेदन देऊन जनतेच्या त्रासाविषयी खासदारांनी संताप व्यक्त केला. या वेळी शिवसेनेचे खासदार सर्वश्री अनिल देसाई, गजानन कीर्तीकर, अरविंद सावंत उपस्थित होते. गांधी यांनी ‘लवकरच हा त्रास संपणार असून येत्या २ आठवड्यांत आवश्यक तेवढे सुट्टे पैसे उपलब्ध होतील’, असे आश्‍वासन शिवसेनेच्या खासदारांना दिले.

साधकांना आईचे प्रेम देऊन त्यांची साधना होण्यासाठी सतत प्रयत्न करणार्‍या आणि नेहमी देहभान हरपून भावपूर्ण सेवा करणार्‍या ६४ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. सोनल जोशी !

कु. सोनल जोशी
१. प्रत्येक वस्तू स्वच्छ, व्यवस्थित आणि नीटनेटकी ठेवणे
     ‘कु. सोनल जोशी (ताई) शांत आणि स्थिर असते. तिची प्रत्येक वस्तू स्वच्छ आणि नीटनेटकी असते. ताई कपड्यांच्या घड्याही व्यवस्थित घालते. त्यामुळे तिचे कपडे इस्त्री केल्यासारखे वाटतात आणि अधिक काळ टिकतात. 
२. सहसाधकांना आईप्रमाणे आधार वाटणे
    सहसाधकांना सोनलताई आईसमान वाटते. त्यामुळे सर्व साधिका तिला विचारून आणि दाखवूनच नवीन कपडे, दागिने वा वस्तू खरेदी करतात. कधी प्रदर्शन आणि विक्रीच्या ठिकाणी तिला काही पोशाख पाहिल्यावर वाटले की, हा पोशाख या साधिकेला चांगला दिसेल, तर ती लगेच त्या साधिकेसाठी त्याविषयी सांगते. तेव्हा ‘तिच्या म्हणण्याप्रमाणे व्हायला पाहिजे’, असा तिचा आग्रह नसतो.

साधना करतांना काळाच्या संदर्भात मनात येणारे योग्य आणि अयोग्य विचार

श्री. राम होनप
अयोग्य विचार
      ‘काळ प्रतिकूल आहे. त्यामुळे माझी साधना होत नाही.
योग्य विचार
    काळ हा महाकाळाच्या; म्हणजेच भगवान शिवाच्या हातात आहे. श्रद्धेच्या जोरावर प्रतिकूल काळातही साधना करता येते, तसेच प्रतिकूल काळात केलेल्या साधनेचे फळ अनुकूल काळाच्या तुलनेत अधिक असते.’
- श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.(१७.११.२०१६)

प.पू. गुरुदेवांना भेटण्याची ओढ लागणे आणि त्यांना सूक्ष्मातून भेटण्याचा प्रयत्न केल्यावर भावजागृती होणे

     ‘मला ‘रामनाथी आश्रमात सेवेला जायचे आहे’, असे समजल्यापासून माझी प.पू. गुरुदेवांना भेटण्याची ओढ वाढू लागली. ‘प.पू. गुरुदेवांना भेटायचे आहे’, असे विचार मनात येऊ लागले. मला रामनाथी आश्रमात येऊन २ दिवस झाल्यानंतर मनात ‘प.पू. गुरुदेवांना प्रत्यक्ष (स्थूल देहाने) भेटण्यापेक्षा त्यांना सूक्ष्मातून भेटूया’, असे विचार येऊ लागले. मी प.पू. गुरुदेवांना सूक्ष्मातून भेटण्याचा प्रयत्न केल्यावर माझी भावजागृती होऊ लागली.’ - श्री. किशोर हरिभाऊ दिवेकर, पेण, रायगड. (१५.६.२०१६) सनातन के रंग में रंगू । ऐसा दो वरदान ॥

श्रीकृष्ण नाम से नयन मैं खोलू । श्रीकृष्ण नाम सुनूं दिन-रात ।
श्रीकृष्ण नाम से कर्म करूं तो ।
अकर्म से होवे संसार की हर बात ॥ १ ॥

श्रीकृष्ण प्रेम से तर गई मीरा । जहर को अमृत बनाय ॥ 
श्रीकृष्ण नाम तो हमें प्यारा लगे । जो संतों की याद दिलाए ॥ २ ॥

पाप बढा धरती के ऊपर । हो रहा अत्याचार ।
आपातकाल के संकट से प्यारे । श्रीकृष्ण ही करेंगे बेडा पार ॥ ३ ॥

बार-बार श्रीकृष्ण चरण धरूं । वंदन करूं त्रिवार ।
सनातन के रंग में रंगू । ऐसा दो वरदान ॥ ४ ॥
- सौ. अलकनंदा मदनलाल लाहोटी, संभाजीनगर (२२.३.२०११)

प.पू. डॉक्टरांवर निस्सीम श्रद्धा असणारी ६२ टक्के आध्यात्मिक पातळीची आणि महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली कु. मृदुला विजय झोडे (वय ५ वर्षे) !

उच्चलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र 
(सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. मृदुला विजय झोडे एक दैवी बालक आहे !
कु. मृदुला झोडे
     (कु. मृदुला हिची वर्ष २०१४ मध्ये ६१ टक्के आध्यात्मिक पातळी होती. आता ६२ टक्के आहे.) 
पालकांनो, हे लक्षात घ्या ! 
     ‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ - (परात्पर गुरु) डॉ. आठवले 
     यासमवेतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.

चारचाकी गाडीचे दार अकस्मात् उघडून महामार्गावर पडून झालेल्या अपघाताच्या वेळी सुखरूपता अनुभवतांना आणि त्यानंतरही सौ. स्नेहल गांधी यांनी घेतलेली गुरुकृपेची अनुभूती

श्री. संतोष गांधी
     ‘१५.९.२०१६ च्या रात्री मी चारचाकी गाडीतून जात असतांना अचानक गाडीचे उजव्या बाजूचे दार उघडले आणि मी रस्त्यावर (महामार्गावर) पडले. क्षणभर मला काय झाले, ते कळलेच नाही. ‘देवा, मी गाडीतून पडले’, एवढेच माझ्याकडून म्हटले गेले. मी उठण्याचा प्रयत्न केला; परंतु मला सगळीकडेच लागले असल्याने उठता येत नव्हते. त्याही स्थितीत मी ‘महामार्गावर मागून पुढून गाडी येत नाही ना’, हे पाहिले आणि माझ्याकडून देवाप्रती कृतज्ञता व्यक्त झाली. तोपर्यंत गाडीतील साधक उतरून माझ्या साहाय्याला आले होते. साधकांनी मला उठवून गाडीत बसवले आणि रुग्णालयात नेऊन माझ्यावर उपचार चालू झाले. या वेळी देवाने वेळोवेळी केलेले साहाय्य आणि देवाच्या कृपेनेच या प्रसंगातून कशी बाहेर पडले, याविषयी आलेल्या अनुभूती येथे देत आहे. 

प.पू. डॉक्टरांच्या अमृत महोत्सवाच्या दिवशी सांगितलेला नामजप करतांना मानसभावाने आश्रमात गेल्यावर आलेल्या अनुभूती

परात्पर गुरु 
डॉ. जयंत आठवले
परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त... 
१. नामजप करतांना मानसभावानेे आश्रमात 
गेल्यावर प.पू. डॉक्टरांच्या खोलीकडे जातांना 
त्यांच्या खोलीतून प्रकाश दिसून तो खोलीत 
जाण्यास प्रतिबंध करत असल्याचे दिसणे,
प्रकाशाला  साष्टांग नमस्कार घातल्यावर प्रकाशाचे 
रूपांतर प.पू. डॉक्टरांमध्ये होऊन त्यांनी आशीर्वाद देणे 
     ‘अमृत महोत्सवाच्या दिवशी महर्षींनी सांगितल्यामुळे ‘श्री श्रीजयंत बाळाजी आठवले... जय गुरुदेव ।’, असा जप करायचा होता. त्या वेळी माझी मासिक पाळी चालू होती. जपाला आरंभ करताच मन, बुद्धी आणि चित्त एकाग्र झाले. मी मनाने गोव्यातील रामनाथी येथील आश्रमात गेले. आश्रमाच्या प्रवेशद्वाराबाहेर गुरुदेवांची गाडी उभी होती. मी तिला प्रदक्षिणा घातल्या. नंतर मी आश्रमात प्रवेश केला. जिना चढून वर जात असतांना जिन्याच्या पायर्‍यांवर दोन्ही बाजूंनी ॐ उमटले होतेे. मी गुरुदेवांच्या खोलीच्या दिशेने जाणार्‍या मार्गाने गेले. मी गुरुदेवांच्या खोलीजवळ गेल्यावर खोलीतून ज्योतीप्रमाणे लख्ख पांढरा प्रकाश आला. मी पुढे जाण्याचा प्रयत्न केला; पण तो प्रकाश मला पुढे जाऊ देत नव्हता. माझा आणि त्या प्रकाशाचा संघर्ष होत होता. मी पुढे गेले, तरी त्या प्रकाशामुळे माझे डोळे उघडत नव्हते. तेव्हा मी विचार केला की, मी मागच्या बाजूने खोलीत जावे. 

हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांना सूचना

प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने 
प्रबोधनासाठी प्रसारसाहित्य उपलब्ध !
       प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने प्रबोधन करण्यासाठी ए-५ आकारातील पाठपोट नवीन हस्तपत्रक बनवले आहे. ते नेहमीच्या संगणकीय ठिकाणावर उपलब्ध करण्यात आले असून सामाजिक जागृतीसाठी या पत्रकाचा वापर करता येईल. तसेच या पत्रकासाठी प्रायोजक मिळवून त्याचा शाळा, महाविद्यालये, सार्वजनिक वाचनालये, रहिवासी संकुल आणि अन्य सुयोग्य ठिकाणी प्रबोधनासाठी वापर करावा, असे समितीच्या वतीने कळवण्यात आले आहे.

फलक प्रसिद्धीकरता

काश्मीरची समस्या स्फोटक 
करणार्‍यांना कारागृहात डांबा !
     मी (फुटीरतावादी) हुरियत कॉन्फरन्सच्या विरोधात नाही. काश्मिरी जनतेच्या अधिकारासाठी मी स्वातंत्र्याचे समर्थन करतो. आम्ही जिहादची लढाई लढली आहे, असे देशद्रोही विधान जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी केले.

हिंदू तेजा जाग रे !

Jago !
      Kashmiriyoke adhikarhetu unki swatantrataka samarthan karta hu-Farooq Abdulla 
Kya sarkar sainikoke balidanka samman karte hue Abdullapar karvai karegi ?
जागो !
      कश्मीरियों के अधिकार हेतु उनकी स्वतंत्रता का समर्थन करता हूं - फारूक अब्दुल्ला 
क्या सरकार सैनिकों के बलिदान का सम्मान करते हुए अब्दुल्ला पर कार्यवाही करेगी ?

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
       विज्ञानाने विविध यंत्रे शोधून मानवाचा वेळ वाचेल असे केले; पण त्या वेळेचा सदुपयोग कसा करायचा, हे न शिकवल्याने मानव पराकोटीच्या अधोगतीला गेला आहे. 
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले
 प.पू. पांडे महाराज
इच्छायुक्त कर्म नको, तर निष्काम भावाने कर्म करा ! 
     ‘कर्म करतांना ‘त्यात यश मिळवायचेच आहे’, या जिद्दीने केले पाहिजे; परंतु त्यात इच्छा नको. इच्छायुक्त केलेले कर्म आणि निष्काम कर्म यांत भेद दिसतो. निष्काम कर्म करतांना ठेवलेल्या जिद्दीने निराशा येत नाही; पण तेच कर्म इच्छायुक्त होऊन जिद्दीने केले आणि त्या कार्यात यश आले नाही, तर उद्विग्नता येते.’ 
- प.पू. परशराम पांडे महाराज (४.९.२०१६)

॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥ 
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥ 

या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. 

- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

बोधचित्र


॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
देवाकडे ऐहिक सुख मागू नये 
       मुलाने विष मागितले, तरी आई आणि डॉक्टर त्याला विष देत नाहीत. तसेच देवही ऐहिक सुख देत नाही; कारण त्याला ठाऊक असते की, हे त्याला पेलवणार नाही. म्हणून देवाकडे भीक (ऐहिक सुख) मागण्यात अर्थ नाही.
भावार्थ : देव, म्हणजे गुरु, हे देवापासून दूर नेणारे ऐहिक सुख देत नाहीत. देवापासून दूर जाणे हे साधकाच्या दृष्टीने मरणच होय; म्हणून ऐहिक सुख हे विषासमान मानले आहे.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

आधाराची अपेक्षा नको 
दुसर्‍याच्या आधाराची अपेक्षा करत राहिलो, तर कधीच उभे रहाता येणार नाही; 
म्हणूनच धडपडत का होईना, धारिष्ट्य करून स्वतःच्या पायांवर उभे रहाणे इष्ट !
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

एका पर्वाचा अंत !

संपादकीय
      तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या मृत्यूने देशभरात खळबळ माजली आहे. राष्ट्रपती, पंतप्रधान, अनेक राज्यांचे मुख्यमंत्री यांच्यासह देशभरातील अनेक नेते त्यांच्या मृत्यूविषयी शोक व्यक्त करत आहेत. गत दोन दिवस तेथील जनता रस्त्यारस्त्यांवर धाय मोकलून रडतांना दिसत होती. आताही तमिळनाडूमध्ये कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त ठेवला गेला आहे. यापूर्वी अम्मांना अटक झाल्यानंतर कुणा कार्यकर्त्याने आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. अम्मा यांनी इतकी लोकप्रियता कमावली होती, हे खरे आहे. तरीही त्यांच्या कारकीर्दीतील काही अप्रिय प्रसंग विस्मरणात जात नाही. अम्मा काळाच्या पडद्याआड गेल्या असल्या, तरी हे डाग पुसले जाणार नाहीत. ‘गेलेल्या व्यक्तीचे दोष पाहू नये’, असे म्हणतात. आज त्या इतिहासावर कुणी प्रकाश टाकणार नाही; कारण प्रत्येकाला स्वतःचा राजकीय स्वार्थ साधायचा आहे. आम्हाला मात्र राष्ट्रहित साधायचे असल्यामुळे येथे काही गोष्टींचे जनतेला स्मरण करून देणे, हे आमचे कर्तव्यच आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn