Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

(म्हणे) ‘बाबरी मशीद पुन्हा बांधावी !’

समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांचे विखारी वक्तव्य !
   नागपूर, ६ डिसेंबर (वार्ता.) - अयोध्येमध्ये बाबरी मशीद पूर्वीपासून होती. ६ डिसेंबर या दिवशी ती मशीद पाडल्याने मी आजचा दिवस ‘काळा दिवस’ म्हणून पाळतो. ज्यांनी बाबरी मशीद पाडली, त्या कल्याण सिंह आणि अन्य अनेकांवर न्यायालयात खटला चालवला गेला पाहिजे. बाबरी मशीद पाडली जाणे, हे देशामध्ये कायदा-सुव्यवस्था आणि संविधान न मानण्याचे प्रतीक आहे. देशात जर कायदा-सुव्यवस्था, राष्ट्रपती आणि पंतप्रधान कार्यरत असतील, तर त्यांनी बाबरी मशीद पुन्हा बांधावी, असे विखारी वक्तव्य समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी पत्रकारांशी बोलतांना केले. (बाबरी मशिदीच्याही अगोदर तेथे राममंदिर होते आणि ते पाडून तेथे मशीद बांधली गेली, या त्रिवार सत्याविषयी आझमी यांना काय म्हणायचे आहे ? - संपादक) विधिमंडळाच्या कामकाजासाठी आलेल्या अबू आझमी यांनी बाबरी मशीद पाडल्याचा निषेध म्हणून त्यांच्या उजव्या दंडावर काळी फीत बांधली होती. (मुसलमान नेता प्रथम त्याच्या पंथाशी बांधिलकी दर्शवतो, हेच यातून दिसते. किती हिंदु नेते आतापर्यंत सहस्रो मंदिरे पाडली, म्हणून असा निषेध करतात ? - संपादक) या वेळी एम्आयएम्चे आमदार इम्यिताज जलील आणि वारिस पठाण हेही उपस्थित होते.

कोटी कोटी प्रणाम !

प.पू. भालचंद्र महाराज (सिंधुदुर्ग) यांची आज पुण्यतिथी

दिनविशेष


आज शिवप्रताप दिन

बांगलादेशमध्ये धर्मांधांनी हिंदूंची १० घरे पेटवली !

बांगलादेशात कोणीही धर्मनिरपेक्ष नसल्याने अल्पसंख्यांक 
हिंदूंच्या रक्षणासाठी किंवा त्यांच्या साहाय्यासाठी 
पुढे येत नाही, तसेच तेथील एकही लेखक बांगलादेशला 
असहिष्णु म्हणत नाही किंवा पुरस्कारही परत करत नाही !
       ढाका - बांगलादेशमधील बोचागंज उपजिल्ह्यात धर्मांधांनी भल्या पहाटे हिंदूंच्या १० घरांना आग लावून ती भस्मसात केली. दुर्गापूजेच्या समारंभात हिंदूंशी झालेल्या वादाचा सूड घेण्यासाठी धर्मांधांकडून हे कृत्य करण्यात आले. सुदैवाने या घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही. या प्रकरणी हिंदूंनी ज्युवेल राणा नावाच्या धर्मांधास पकडून पोलिसांच्या कह्यात दिले. या घटनेत हिंदूंची अनुमाने ५० लक्ष टक्याची (बांगलादेशी चलन) हानी झाली आहे. या घटनेमुळे हिंदूंमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. 
       धर्मांधांनी आग लावण्यासाठी पेट्रोलचा वापर केल्याने आग त्वरित पसरली. अग्नीशामक दलाने आग आटोक्यात आणली, तरी तोपर्यंत बरीच हानी झाली होती, असे बोचागंजचे नगरसेवक जहांगीर आलम लीतोन यांनी सांगितले. ज्युवेल राणा ही अपराधी प्रवृत्तीची व्यक्ती असून तिच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे प्रविष्ट झाले आहेत. १० ऑक्टोबरला ज्युवेल राणा हा दुर्गापूजा मंडपात खंडणी वसूल करण्यासाठी गेला असता त्याचा काही हिंदूंशी वाद झाला. तेव्हा त्याने मंडपातील कापडी फलक फाडून टाकले आणि सूड घेण्याची धमकी दिली, असे बोचागंज पोलीस ठाण्याचे प्रभारी हबिबूर इस्लाम यांनी सांगितले.

बांगलादेशमध्ये धर्मांधांनी पुन्हा हिंदूंच्या मंदिरांवर केलेल्या आक्रमणात ७ मूर्तींची तोडफोड !

  • भारतात अन्य धर्मियांच्या श्रद्धास्थानांवर कथित दगड जरी भिरकावण्यात आला, तरी देश-विदेशातील त्यांचे धर्मबंधू त्वरित त्याविरोधात बोलू लागतात; पण भारतातील हिंदू, त्यांचे नेते आणि संघटना हिंदूंविषयी काही बोलत नाहीत !
  • संरक्षणमंत्री पर्रीकर नुकतेच बांगलादेशच्या दौर्‍यावर जाऊन आले; मात्र त्यांनी कोठेही तेथील हिंदूंच्या रक्षणासाठी काही प्रयत्न केले, असे निदर्शनास आले नाही. !
  • भारत सरकार आणि मोठ्या हिंदुत्वनिष्ठ संघटना याविषयी काहीही करणार नाहीत, हे जाणा !
     ढाका - मुसलमानबहुल बांगलादेशमध्ये पुन्हा एकदा हिंदूंच्या मंदिरांना लक्ष्य करण्यात आले आहे. धर्मांधांनी २ विविध घटनांमध्ये येथील मंदिरांतील कालीमातेच्या ७ मूर्तींची तोडफोड केली आहे. गेल्या मासात येथील ब्राह्मणबरिया जिल्ह्यातील नसीरननगरमध्ये हिंदूंची २० मंदिरे आणि १५० घरे यांवर आक्रमण करण्यात आले होते. यांत २०० हून अधिक हिंदू घायाळ झाले होते.
१. ४ डिसेंबरला पहिली घटना बांगलादेशच्या उत्तरी नेत्रोकोना जिल्ह्यातील मिमेनसिंहरोही गावात घडली, तर दुसरी पबना जिल्ह्यातील बीरा भागात घडली.
२. बांगलादेशमधील वर्तमानपत्र ढाका ट्रिब्यूनने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार ४ डिसेंबरला नेत्रोकोना भागातील मंदिरावर आक्रमण करून तेथील कालीमातेच्या ४ मूर्तींची तोडफोड करण्यात आली. सकाळी भाविक मंदिरात आले असता त्यांना मूर्तींची तोडफोड झाल्याचे दिसून आले. यातील काही प्रतिमांचे तुकडे ६०० फूट अंतरावर टाकण्यात आले होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस येथे पोचले. त्यांनी याची चौकशी चालू केली आहे. 

नोटाबंदीचा निर्णय म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या सत्तेच्या अंताचा प्रारंभ ! - हिंदु महासभा

        नवी देहली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंदूंच्या लग्नसराईला प्रारंभ होण्यापूर्वी नोटाबंदीचा निर्णय घेतला. तसेच भाजपचे नेते आता इस्लामिक बँकिंगला प्रोत्साहन देत आहेत. नोटाबंदीच्या या निर्णयामुळे मोदी यांच्या सत्ताकाळाच्या शेवटाला प्रारंभ झाला आहे, अशी टीका अखिल भारतीय हिंदु महासभेच्या नेत्यांकडून करण्यात आली आहे. 
        हिंदु महासभेच्या सचिव पूजा शकुन पांडे यांनी म्हटले आहे की, सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयामागील उद्देश अद्याप समजलेला नाही. सरकारच्या या निर्णयामुळे २००-३०० रुपये कमावणार्‍या आणि सरकारी योजनांवर अवलंबून असलेल्या लोकांना फटका बसतो आहे. यामुळे श्रीमंतांना कोणताही त्रास झालेला नाही. हिंदूंच्या लग्नसराईचे मुहूर्त चालू होण्याआधी सरकारने नोटाबंदीचा निर्णय घोषित केला. त्यामुळे अनेक लोकांना याचा फटका बसला आहे. लोकांना त्यांच्या मित्रांकडून, नातेवाइकांकडून पैसे घ्यावे लागले. काहींना लग्नकार्य पुढे ढकलावे लागले. ऐन लग्नसराईच्या काळात हिंदूंना इतका त्रास सहन करावा लागत असतांना तथाकथित हिंदुत्वनिष्ठ पक्ष इस्लामिक बँकिंगसाठी प्रयत्न करत आहेे.

शोकप्रस्ताव झाल्यानंतर परिषदेचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित

विधान परिषदेत विरोधकांचा नोटाबंदीवरील 
चर्चेचा प्रस्ताव सभापतींनी तूर्तास फेटाळला !
        नागपूर, ५ डिसेंबर (वार्ता.) - राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन चालू झाले असून विधान परिषदेत विरोधकांनी नोटाबंदीवरील चर्चेचा प्रविष्ट केलेला प्रस्ताव सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी तूर्तास फेटाळला आहे. हा प्रस्ताव फेटाळल्यावर विरोधकांनी सभेच्या कामकाजात घोषणा देत व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सभापतींनी १५ मिनिटांसाठी सभेचे कामकाज स्थगित केले. त्यानंतर पुन्हा चालू झालेल्या कामकाजामध्ये दिवंगत झालेले विधान परिषदेचे सदस्य आणि हुतात्मा सैनिक यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आणि नंतर परिषदेचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले. (दिवसभरासाठी कामकाज स्थगित करण्यापेक्षा कामकाम चालू ठेवून राज्याच्या हिताचे निर्णय घेतले असते, तर ती खरी श्रद्धांजली ठरली असती ! - संपादक)
१. सभेचे कामकाज चालू झाल्यावर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी देशात आणि राज्यात नोटाबंदी प्रकरणावरून सर्वसामान्य जनतेला जो त्रास होत आहे, त्यावरून सभागृहामध्ये चर्चा करण्यात यावी, तसेच सरकारने त्यावर उत्तर द्यावे, अशी मागणी करणारा प्रस्ताव सादर केला. त्यावर काँग्रेसचे आमदार नारायण राणे आणि शेकापचे आमदार जयंत पाटील यांनीही चर्चेला समर्थन देणारे भाषण केले.

मुंबई येथे एटीएम्द्वारे बँकेच्या खात्यातून पैसे चोरणार्‍या धर्मांधाला अटक

गुन्हेगारीत अग्रेसर असणारे धर्मांध !
      मुंबई, ५ डिसेंबर - येथे एटीएम्द्वारे बँकेच्या खात्यातून पैसे चोरणार्‍या धर्मांधाला अटक करण्यात आली. सरफराज खान असे या धर्मांधाचे नाव असून पैसे काढण्यासाठी रांगेत उभे असतांना त्यांनी नरेश पाका या व्यक्तीच्या खात्याचा पिन क्रमांक पाहिला. नरेश यांनी पिन क्रमांक टाकूनही यंत्रातून पैसे आले नाहीत. तेव्हा खान याने त्यांना साहाय्य करण्याचे नाटक करून पुन्हा पिन क्रमांक टाकण्यास सांगितला. त्यानंतर खान याने नरेश यांच्या खात्यातून २ सहस्र रुपये काढले. या वेळी नरेश यांच्या भ्रमणभाषवर पैसे काढल्याचा संदेश आल्याने खान यांच्याविषयी त्यांना संशय आला. पोलिसांना ही माहिती दिल्यानंतर खान यांना अटक केली. चौकशीनंतर खान यांच्याविरुद्ध ६ गुन्हे प्रविष्ट झाल्याची माहिती मिळाली. 

मुंबईतील सिग्नल्सवरील सीसीटीव्ही कॅमेर्‍यांमुळे वाहतुकीचे नियम मोडणार्‍यांवर कारवाई करणे सुलभ

       मुंबई, ५ डिसेंबर - वाहतूक नियमनाकरिता मुंबईतील सिग्नल्सवर आतापर्यंत ४ सहस्र ७१७ सीसीटीव्ही छायाचित्रक बसवण्यात आले आहेत. यांद्वारे वाहतुकीचे नियम मोडणार्‍या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करणे वाहतूक पोलिसांना सुलभ होत आहे. लाल सिग्नल असतांना वाहन पुढे नेणे, झेब्रा पट्टे ओलांडून वाहन पुढे थांबवणे, दुचाकी चालवतांना शिरस्त्राणाचा वापर न करणे, वाहनाच्या क्षमतेपेक्षा अधिक माणसे वाहनात बसवणे, वाहन चालवतांना भ्रमणध्वनीवर बोलणे, तसेच चारचाकी वाहन चालवतांना आसनपट्टा न लावणे यांसारखे नियमबाह्य वर्तन करणार्‍या वाहनचालकांच्या वाहनांचे क्रमांक त्या नियंत्रण कक्षात असणार्‍या वाहतूक पोलिसाकडून सीसीटीव्हीमध्ये मुद्रित केले जातात आणि त्याच वेळी वाहनचालकाच्या भ्रमणभाषवर दंडात्मक कारवाईचा लघुसंदेश पाठवला जातो. नियम मोडणार्‍या वाहनचालकाकडून ई-चलनाद्वारे दंड आकारला जातो. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर मासांत १ लक्ष १० सहस्रांहून अधिक वाहनांवर अशाप्रकारे कारवाई करण्यात आली आहे.

जयललिता यांची प्रकृती चिंताजनक !

तमिळनाडूत तणावपूर्ण स्थिती
         चेन्नई - तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांचे निधन झाल्याची अफवा ५ डिसेंबरला सायंकाळी पसरली होती; मात्र अपोलो रुग्णालयाने त्या जिवंत असून त्यांच्यावर उपचार चालू असल्याचे सांगत ही अफवा खोटी ठरवली. ४ डिसेंबरला रात्री हृदयविकाराचा दुसरा झटका आल्यानंतर जयललिता यांना पुन्हा अतीदक्षता विभागात हालवण्यात आले. त्यांना कृत्रिम श्‍वासोच्छ्वासावर ठेवण्यात आले आहे. त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे येथील अपोलो रुग्णालयाबाहेर त्यांच्या समर्थकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अतीदक्षतेची चेतावणी देण्यात आली आहे. (लोकशाहीला निरर्थक ठरवणारी व्यक्तीनिष्ठता ! यामुळे निर्माण होऊ शकणारा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न जनतेची मानसिकता दर्शवतो ! - संपादक) केंद्र सरकारकडूनही साहाय्य मागण्यात आले आहे. ४ डिसेंबरला रात्री उशिरा तमिळनाडू मंत्रीमंडळाची आपत्कालीन बैठकही पार पडली. ६८ वर्षीय जयललिता यांना २२ सप्टेंबर या दिवशी ताप आल्यामुळे चेन्नईतील अपोलो रुग्णालयात भरती करण्यात आले होते; मात्र त्यानंतर जयललिता यांना मूत्रपिंड, यकृत आणि फुफ्फुस यांत संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे गेल्या २ मासांपासून त्यांच्यावर या रुग्णालयात उपचार चालू होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून लवकरच त्यांना सोडण्यात येईल, अशी माहिती रुग्णालयाने दिली होती; मात्र त्यातच त्यांना हृदयविकाराचा झटका आला.

मुंबई शहर आणि उपनगर भागांतील ध्वनीप्रदूषणाची तक्रार व्हॉट्स अ‍ॅपवर करता येणार

        मुंबई, ५ डिसेंबर - शहर आणि उपनगर भागांत ध्वनीप्रदूषण होत असल्यास यापुढे व्हॉट्स अ‍ॅपवर तक्रार करता येणार आहे. नागरिकांना तक्रार करणे सोपे होण्यासाठी पोलीस नियंत्रण कक्षाला थेट व्हॉट्स अ‍ॅपला जोडण्यात आले आहे. या तक्रारींची त्वरित नोंद घेण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले आहे. 
तक्रार नोंदवण्यासाठी व्हॉट्स अ‍ॅप क्रमांक
प्रादेशिक विभाग (मध्य) - ९८३३३४६१८२
प्रादेशिक विभाग (पूर्व) - ७०४५७५७२७२
प्रादेशिक विभाग (पश्‍चिम) - ९९८७०९३०६५
प्रादेशिक विभाग (उत्तर) - ९३०२१००१००
प्रादेशिक विभाग (दक्षिण) - ९८६९९३३५३६

पाकच्या पंतप्रधानांचे परराष्ट्र सल्लागार सरताज अझीज यांना सुवर्ण मंदिरात प्रवेश नाकारला !

     अमृतसर - पाकचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे परराष्ट्र सल्लागार सरताज अझीझ यांना सुरक्षेच्या कारणास्तव सुवर्ण मंदिरातील प्रवेश नाकारण्यात आला. सुवर्ण मंदिरात प्रवेश नाकारण्यात आल्यानंतर सरताज अझीज थेट इस्लामाबादला निघून गेले. अझीझ यांना पत्रकार परिषद घेण्याची अनुमतीही देण्यात आली नाही, असे वृत्त पाकिस्तानी माध्यमांनी दिले आहे. भारताकडून अझीज यांचा अपमान करण्यात आला आहे, असे वृत्तांकन पाकिस्तानी माध्यमांकडून केले जात आहे. (पाकच्या राज्यकर्त्यांप्रमाणे तेथील प्रसारमाध्यमेही कांगावा करतात, हे यातून दिसून येते ! - संपादक) अझीज हार्ट ऑफ एशिया परिषदेसाठी भारतात आले होते. अफगाणिस्तानमधील सुरक्षेची स्थिती अतिशय गंभीर आहे. हिंसक घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यासाठी एका देशाला उत्तरदायी धरणे अतिशय सोपे आहे, असे अझीज यांनी पाकला दोषी ठरवण्यात येत असल्याच्या सूत्राचा प्रतिवाद करतांना म्हटले आहे. (जे सत्य आहे, तेच परिषदेत मांडण्यात आले आणि पाकने ते कितीही नाकारले, तरी जगाला ते ठाऊक आहे, हे अझीज यांनी समजले पाहिजे ! - संपादक)

देशात कायद्याचा आधार घेत हिंदु धर्मावर आघात केले जात आहेत ! ह.भ.प. सुधाकर महाराज इंगळे, जिल्हाध्यक्ष, अखिल भारतीय वारकरी मंडळ, सोलापूर

सोलापूर येथील हिंदु धर्मजागृती सभेला ३ सहस्र ८०० हिंदूंची उपस्थिती 

ह.भ.प. सुधाकर महाराज इंगळे

उपस्थित जनसमुदाय 
     सोलापूर, ५ डिसेंबर ( वार्ता.) कीर्तने, प्रवचने यांना कायद्याचा धाक दाखवला जातो; मात्र पहाटे ५ वाजताच्या अजानाकडे दुर्लक्ष केले जाते. या देशात कायद्याचा आधार घेत हिंदु धर्मावर आघात केले जात आहेत. मी एकट्याने काय करावे, असा विचार जर छत्रपती शिवरायांनी केला असता, तर आज आपल्याला गुडघ्यावर बसून दर्शन घ्यावे लागले असते. छत्रपती शिवरायांच्या कृपेनेच आज आम्ही कीर्तन, प्रवचन करू शकत आहोत. त्यासाठी आपल्यासमोर छत्रपती शिवरायांचाच आदर्श असायला हवा, असे प्रतिपादन अखिल भारतीय वारकरी मंडळाचे जिल्हाध्यक्ष ह.भ.प. सुधाकर महाराज इंगळे यांनी व्यक्त केले. येथील हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानात ४ डिसेंबरला आयोजित हिंदु धर्मजागृती सभेत ते बोलत होते. या वेळी व्यासपिठावर सनातन संस्थेचे साधक श्री. दैवेश रेडकर, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट आणि रणरागिणी शाखेच्या सोलापूर जिल्हा संघटक सौ. अलका व्हनमारे उपस्थित होत्या. 

शिक्षण मंडळ साहित्य खरेदीत ६० लाख रुपयांचा भ्रष्टाचार

कल्याण-डोंबिवली 
महानगरपालिकेचा भ्रष्ट कारभार ! 
       कल्याण - कल्याण-डोंबिवली महापालिका शिक्षण मंडळाच्या शालेय साहित्य खरेदीत ६० लाख रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शिवसेनेचे माजी सभागृह नेते कैलास शिंदे यांनी केला आहे. 
१. वर्ष २०१६ शिक्षण मंडळाने शालेय साहित्य खरेदी केले असून हे सर्व साहित्य निकृष्ट दर्जाचे असल्याचे कैलास शिंदे यांनी सांगितले. शालेय साहित्यामध्ये दप्तर, वह्या, कंपास, रेनकोट आदी वस्तूंची खरेदी करण्यात आलेली आहे. 
२. बाजारात मिळणार्‍या चांगल्या दर्जाच्या याच वस्तूंपेक्षा कित्येक पट अधिक किंमत आकारून अतिशय निकृष्ट दर्जाची साहित्य खरेदी करण्यात आली. 
३. धक्कादायक गोष्ट म्हणजे पावसाळा उलटून गेल्यानंतर महापालिका विद्यार्थ्यांना रेनकोट वाटप केले जाणार आहे.
४. या भ्रष्टाचाराविषयी दोषींवर कडक कारवाई करण्याचे आश्‍वासन महापालिका आयुक्तांनी दिले आहे. 

रोकडरहित व्यवहार करण्यासाठी मध्य रेल्वेचा पुढाकार !

       मुंबई, ५ डिसेंबर - अधिकाधिक व्यवहार रोकडरहित (कॅशलेस) करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देतांना रेल्वे मंत्रालयानेही तिकीट खिडकीवर लोकल रेल्वे पास काढण्याकरिता प्रवाशांकडून डेबिट कार्डद्वारे रक्कम स्वीकारण्याची योजना आखली आहे. त्याकरिता मध्य रेल्वेकडून आवश्यक माहिती मागवण्यात आली आहे. स्मार्ट कार्डद्वारे लोकल तिकीट काढण्यासाठी रेल्वे स्थानकांवर बसवण्यात आलेल्या ए.टी.व्ही.एम्. यंत्राद्वारे तिकीट काढण्यासाठी डेबिट कार्डचाही वापर करता येईल का, याविषयीची चाचपणी क्रिस (सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टीम) कडून केली जात आहे. प्राथमिक टप्प्यात मोठ्या प्रमाणात प्रवासी असणार्‍या रेल्वे स्थानकांवर या नवीन योजनेची कार्यवाही करण्यात येणार आहे. त्यानंतर अन्य रेल्वे स्थानकांवरही या योजनेची कार्यवाही होईल. प्रारंभी लोकल रेल्वे पास आणि लांब पल्यांची तिकीटे काढण्याकरिता डेबिट कार्ड वापरण्याची मुभा असेल. 

महादेव जानकर यांनी निवडणुकीतील काँग्रेसचे आवेदन बाद करण्यासाठी अधिकार्‍यावर दबाव आणला !

       नागपूर, ५ डिसेंबर (वार्ता.) - नगरपालिका निवडणुकीतील काँग्रेसचे आवेदन बाद करण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आणि दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी भ्रमणभाषवरून प्रशासकीय अधिकार्‍यावर दबाव आणल्याचे संभाषण एका ध्वनीचित्र चकतीद्वारे उघड झाले आहे. या ध्वनीचित्र चकतीमध्ये जानकर भ्रमणभाषवरून एका प्रशासकीय अधिकार्‍याला विरोधकांचे आवेदन बाद करण्यासाठी दबाव टाकतांना दिसत आहेत. 
       मात्र जानकर यांनी या सर्व गोष्टी फेटाळल्या आहेत. कोणालाही कोणतीही धमकी दिलेली नाही. मी केवळ त्यांना विनंती केली. आरोप करणे हे विरोधकांचे काम आहे. मी संविधानाच्या तरतुदींचे उल्लंघन केलेले नाही, अशी सारवासारव जानकर यांनी केली आहे. (लोकप्रतिनिधींचे खरे स्वरूप ! - संपादक)

चोरी केलेल्या नोटा बदलून देतांना दोन धर्मांधांना अटक

       जळगाव - शहरातील तांबापूर येथील दोन धर्मांधांनी दुचाकीच्या डिक्कीतून ८८ सहस्र रुपयांची चोरी केली होती. याविषयी श्री. असोदेकर यांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. तांबापुरातील मोहसीन शहा सिकंदर शहा आणि रहीम खान रशिद खान हे दोघे युवक १ सहस्र आणि ५०० रुपयांच्या नोटा मोठ्या प्रमाणात पालटत असल्याचे निदर्शनास आल्याने पोलिसांनी त्यांच्यावर पाळत ठेवून पकडले असता त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली. (गुन्हेगारीत अग्रेसर असणारे धर्मांध ! - संपादक)

सनईवादक बिस्मिल्ला खान यांच्या चांदीच्या ५ सनईंची चोरी !

उत्तरप्रदेशातील समाजवादी पक्षाच्या राज्यातील 
कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा दर्शवणारी घटना !
         वाराणसी - भारतरत्न सनईवादक बिस्मिल्ला खान यांच्या चांदीच्या ५ सनई चोरीला गेल्या आहेत. बिस्मिल्ला खान यांचे पुत्र काजिम हुसेन यांच्या शहरातील चाहमामा-दालमंडीमधील घरातून या सनई चोरीला गेल्या आहेत. तसेच पुरस्कार स्वरूपात मिळालेली चांदीची तबके आणि लाखो रुपयांचे दागिनेही चोरीला गेले आहेत.

नागपूर विधानभवन परिसरात आतंकवादी आक्रमणाची गुप्तचर विभागाची माहिती

आतंकवादाची टांगती तलवार दूर करण्यासाठी 
राज्यशासनाने ठोस उपाययोजना करावी, ही जनतेची अपेक्षा !
        मुंबई, ५ डिसेंबर (वार्ता.) - नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या कालावधीत वाहनाचे अपहरण करून किंवा बनावट कार पास बनवून विधानभवन परिसरात आतंकवादी आक्रमण होण्याचा अंदाज गुप्तचर विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. यामुळे विधीमंडळ परिसरात वाहन पार्किंगचे नियम पालटण्यात आले आहेत.
        कोणत्याही मंत्र्यांच्या वाहनांना विधीमंडळ परिसरात पार्किंग करता येणार नाही. हा नियम मुख्यमंत्र्यांच्या गाडीलाही लागू असणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या वाहनाला विधीमंडळ परिसरात पार्किंग नाही, असे इतिहासात प्रथमच होत आहे. (ही वरवरची उपाययोजना झाली. आतंकवादाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पाकला धडा शिकवणे आवश्यक ! - संपादक)

महापालिकेचे आदेश न पाळणार्‍या मॉल्स, उपहारगृहे आणि गृहनिर्माण संस्था यांच्यावर कारवाई होणार

        मुंबई, ५ डिसेंबर - मुंबईतील कचर्‍याचा प्रश्‍न काही प्रमाणात सुटण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने मोठी उपहारगृहे, मॉल्स आणि गृहनिर्माण मंडळ यांना त्यांच्या परिसरात सेंद्रिय खत प्रकल्प कार्यान्वित करणे अनिवार्य केले आहे. याची कार्यवाही करण्यात मात्र कमालीची उदासीनता असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. (आदेशांचे तत्परतेने पालन करणारी सात्त्विक जनता मिळण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे ! - संपादक) यापुढे या आदेशाची कार्यवाही न करणार्‍यांची सूची सिद्ध करून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी साहाय्यक आयुक्तांना दिले आहेत.

नवी मुंबई येथील मंदिरांवरील कारवाई रोखण्यासाठी नवी मुंबई मंदिर समितीचे भाजपच्या आमदार सौ. मंदा म्हात्रे यांना निवेदन

मंदिरांवरील कारवाईच्या विरोधात कृती करणार्‍या नवी मुंबई मंदिर समितीचे अभिनंदन !
      नवी मुंबई, ५ डिसेंबर - सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर येथील अनधिकृत धार्मिक स्थळे पाडण्याची मोहीम नवी मुंबई महानगरपालिका आणि सिडको प्रशासन यांच्या वतीने हाती घेण्यात आली आहे; मात्र त्यात अन्य धर्मियांच्या स्थळांवर कारवाई न करता केवळ केवळ हिंदूंची मंदिरे पाडण्याचा सपाटा प्रशासनाने चालू केला आहे. आतापर्यंत या परिसरातील ३-४ मंदिरे अनधिकृत ठरवून पाडण्यात आली. प्रशासनाकडून चालवलेली ही एकतर्फी कारवाई थांबवावी. ज्या मंदिरांचा विकासकामात अडथळा येत नाही, अशा मंदिरांची सूची घोषित करून त्या मंदिरांना अधिकृत करण्यात यावी, अशी मागणी नवी मुंबई मंदिर समितीच्या वतीने भाजपच्या आमदार सौ. मंदा म्हात्रे यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. हिंदूंच्या श्रद्धेच्या या प्रश्‍नाकडे तातडीने लक्ष घालावे, अशी विनंतीही त्यात करण्यात आली आहे.

इंडोनेशियामध्ये भूकंपाचा धक्का !

      जकार्ता - इंडोनेशियाच्या पूर्व किनार्‍याला ५ डिसेंबरला सकाळी रिश्टर स्केलवर ६.० तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला; मात्र यामुळे त्सुनामी येण्याची चेतावणी देण्यात आलेली नाही. तसेच यात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. या भूकंपाचे केंद्र समुद्राच्या आत ५२२ किलोमीटर खोल होते.
महर्षींनी प्रलयकालाविषयी सतर्क करणे
१९.३.२०१६ या दिवशी झालेल्या नाडीवाचन क्रमांक ६७मध्ये महर्षि म्हणतात, हे पूर्ण वर्ष प्रलयकालाचे आणि आपत्तीजनक असणारे आहे. (इंडोनेशियाच्या पूर्व किनार्‍याला ५ डिसेंबरला सकाळी भूकंपाचा धक्का बसला. या घटनेवरून प्रलयकालाविषयी महर्षींनी केलेले भाष्य किती तंतोतंत आहे, हे लक्षात येते !- संपादक)

अनधिकृत वीजपुरवठा करणार्‍या धर्मांधाला पोलीस कोठडी !

       भिवंडी - येथील यंत्रमाग कारखान्यात बीबीसीची वेल्डींग तोडून अनधिकृत वीजपुरवठा कारखान्याला देणारा धर्मांध अफराज अली अहमद अली अन्सारी (वय ३० वर्षे) याला पोलिसांनी अटक केली. त्याला ५ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. (लोकसंख्येत अल्प असलेले धर्मांध गुन्हेगारीत मात्र पुढे ! - संपादक)मुंबई विमानतळावर ६७ नवीन आयफोन आणि ५७ जुने भ्रमणभाष संच घेऊन भारतात आलेल्या धर्मांधाला अटक

      मुंबई, ५ डिसेंबर - ६७ नवीन आयफोन आणि ५७ जुने भ्रमणध्वनी संच घेऊन भारतात आलेल्या मोहम्मद युनुसमिया या धर्मांधाला सीमा शुल्क विभागाने कह्यात घेतले. या सर्व संचांचे मूल्य ४३ लाख १८ सहस्र इतके आहे. हे सर्व संच एका प्लास्टिकच्या पिशवीत बांधून त्याने मोठ्या बॅगेत लपवले होते. २ डिसेंबरला रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली. (या धर्मांधाचे आतंकवाद्यांशी संबंध आहेत का, याची सखोल चौकशी होऊन त्वरित कारवाई व्हायला हवी ! - संपादक)

आज पू. संभाजीराव भिडे (गुरुजी) यांची विद्यामंदिर प्रशालेच्या प्रांगणात प्रगट सभा !

      मिरज, ५ डिसेंबर (वार्ता.) - आगामी पन्हाळगड ते विशालगड मार्गे पावनखिंड या गडकोट मोहिमेची माहिती देण्यासाठी श्रीशिवप्रतिष्ठानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडे (गुरुजी) यांची मंगळवार, ६ डिसेंबर या दिवशी विद्यामंदिर प्रशालेच्या प्रांगणात सायंकाळी ६ वाजता प्रगट सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

निवृत्त ब्रिगेडिअर हेमंत महाजन यांना सभेचे निमंत्रण !

(डावीकडे) निवृत्त ब्रिगेडिअर
हेमंत महाजन यांना निमंत्रण
देतांना डॉ. मानसिंग शिंदे (उजवीकडे)
कोल्हापूर - एका कार्यक्रमाच्या निमित्ताने निवृत्त ब्रिगेडिअर हेमंत महाजन ४ डिसेंबर या दिवशी येथे आले होते. त्या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. मधुकर नाझरे आणि डॉ. मानसिंग शिंदे यांनी भेटून त्यांना सभेचे निमंत्रण दिले.

भित्तीपत्रके आणि होर्डींगद्वारे सभेचे निमंत्रण !

निपाणी शहरात लावलेले होर्डींग
      कोल्हापूर, ५ डिसेंबर (वार्ता.) - सभेच्या प्रसाराची व्याप्ती वाढवण्याच्या दृष्टीने शहरात आणि ग्रामीण पातळीवर ठिकठिकाणी भीत्तीपत्रके आणि होर्डींग लावण्यात येत आहेत. कोल्हापूर शहर, निपाणी, तसेच अन्य ग्रामीण भागांत लावलेल्या होर्डींगमुळे सभेचे निमंत्रण सर्वदूर पोचत आहे. ग्रामीण भागांतूनही सभेसाठी विशेष उत्साह दिसून येत आहे.
राजासिंह ठाकूर यांचे जाज्ज्वल्य विचार ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहा ! - मलकारी लवटे

११ डिसेंबर या दिवशी असलेल्या हिंदु धर्मजागृती सभेच्या निमित्ताने
 
बैठकीत मनोगत व्यक्त करतांना शिवसेना उपजिल्हाप्रमुख
      इचलकरंजी, ५ डिसेंबर (वार्ता.) - हिंदूसंघटन आणि हिंदु ऐक्य यांसाठी कोल्हापूर येथे ११ डिसेंबर या दिवशी होणारी सभा महत्त्वपूर्व आहे. या सभेत भाग्यनगर येथील आमदार श्री. राजासिंह ठाकूर यांचे जाज्ज्वल्य विचार ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहा, असे आवाहन शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री. मलकारी लवटे यांनी केले. सभेची माहिती देण्यासाठी श्री शिवतीर्थ सेवा संघाचे श्री. आनंद मकोटे यांच्या घरी ४ डिसेंबर या दिवशी एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी त्यांनी हे आवाहन केले. श्रीशिवप्रतिष्ठानचे ज्येष्ठ धारकरी श्री. महाजन गुरुजी यांनीही या वेळी तरूणांना सभेसाठी उपस्थित रहाण्याचे आवाहन केले. 

पोलीस प्रशासनाकडून सुविधांची वानवा !

नागपूर शहरात बंदोबस्तासाठी असलेले पोलीस उपाशी !
      नागपूर, ५ डिसेंबर (वार्ता.) - शहरात अतिरिक्त पोलीस आयुक्तांसह २२ उपायुक्त आणि पोलीस अधीक्षक आणि ५ सहस्र ८०० कर्मचारी हिवाळी अधिवेशनाचा बंदोबस्त सांभाळणार आहेत. पोलिसांच्या शरीरावरही छायाचित्रक (कॅमेरे) लावले आहेत. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातून साडेसात सहस्र पोलिसांचा ताफा येथे दाखल झाला आहे. शहरात ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे; मात्र पोलीस यंत्रणेकडून सर्व पोलिसांना पुरेशा प्रमाणात सुविधा पुरवण्यात येत नसल्याने पोलिसांची उपासमार होत आहे. केवळ विधानभवन, रविभवन, रामगिरी, सचिवालय अशा ठिकाणी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांना वेळेवर जेवण आणि न्याहारी मिळत आहे.

नागपूर येथे आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजाचा विधानभवनावर मोर्चा

नागपूर, ५ डिसेंबर - आरक्षण आणि अन्य मागण्या यांसाठी धनगर समाजाचा ५ डिसेंबर या दिवशी विधानभवनावर मोर्चा काढला होता. या वेळी धनगर समाजातील शेकडो लोक मोर्च्यात सहभागी झाले होते. अनेकांनी आरक्षणाची मागणी दर्शवणार्‍या पिवळ्या टोप्या परिधान केल्या होत्या. विविध घोषणाही या वेळी देण्यात आल्या.

आतंकवादी आक्रमणाच्या पार्श्‍वभूमीवर सुरक्षात्मक निर्णय ! - माणिकराव ठाकरे

विधिमंडळ परिसरात वाहनांना प्रवेशबंदी !
      नागपूर, ५ डिसेंबर (वार्ता.) - संसदेच्या आत शिरून झालेले आतंकवादी आक्रमण, तसेच नुकतेच उरी आणि पठाणकोटमध्ये झालेल्या आक्रमणाच्या पार्श्‍वभूमीवर नागपूर विधानभवनावरही आक्रमण होऊ शकते, अशी चेतावणी गुप्तचर विभागाने विधीमंडळ समितीला दिल्याने अधिवेशनात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे, अशी माहिती विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी विधानभवनात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
      ते म्हणाले की, प्रतीवर्षी ४०० ते ५०० चालक, सुरक्षारक्षक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने विधीमंडळ परिसरात दिवसभर रहायचे. आता ते रहाणार नाहीत. आतंकवाद्यांचा प्रतिकार करण्याची व्यवस्था शासनाकडे नसल्यामुळेच वाहनांना बंदी करण्यात येत आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून आमदार, मंत्री, अधिकारी, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी सहकार्य करावे.

हिवाळी अधिवेशनासाठी विधान परिषदेत ६८७, तर विधानसभेत ४४२ तारांकित प्रश्‍न सादर

      नागपूर, ५ डिसेंबर - येथे चालू असलेल्या हिवाळी अधिवेशनासाठी विधान परिषदेत ६८७, तर विधानसभेत ४४२ तारांकित प्रश्‍न सादर झाल्याची माहिती विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी दिली.
      ठाकरे यांनी पुढे सांगितले की, या अधिवेशनासाठी विधान परिषदेतील ७६ आमदारांनी एकूण ३ सहस्र १७६ प्रश्‍न सादर केले आहेत. विधान परिषदेत १ सहस्र २७ लक्षवेधी, तर १४५ अशासकीय ठराव आले आहे. त्यापैकी १२३ ठरावांना संमती दिली आहे. विधानसभेत ८ सहस्र ५७९ तारांकित प्रश्‍न आले असून त्यातील ४४२ मंजूर, तर १ सहस्र ५८८ प्रश्‍न अतारांकीत म्हणून स्वीकृत झाले आहेत.

नारायण राणे यांना विरोधी पक्षनेतेपद मिळण्यासाठी समर्थकांकडून होमहवन

अंनिसला याविषयी काय म्हणायचे आहे ?
      मुंबई, ५ डिसेंबर (वार्ता.) - काँग्रेसचे नेते नारायण राणे यांना विरोधी पक्षनेतेपद मिळावे, यासाठी त्यांच्या समर्थकांकडून मुलुंड येथे होमहवन करण्यात आले. विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद सध्या राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे आहे. नगरपालिकेच्या निवडणुकीत सिंधुदुर्ग येथील ३ नगरपालिकांमध्ये काँग्रेसची सरशी झाल्याने राणे समर्थकांचे मनोबल वाढले आहे.

कर्तव्यचुकार मुख्याध्यापक आणि साहाय्यक आयुक्त निलंबित !

      नवी मुंबई, ५ डिसेंबर (वार्ता.) - कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी अडवली भुतवली शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश तुंबडे आणि साहाय्यक आयुक्त दिवाकर समेळ यांना नवी मुंबईचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी निलंबित केले आहे. (विद्यार्थ्यांची शैक्षणिक हानी करणार्‍यांचे केवळ निलंबन नको, तर अशांना बडतर्फच करायला हवे ! संपादक) २ डिसेंबर या दिवशी मुंढे यांनी शाळेला अचानक भेट दिली. त्या वेळी इयत्ता १ लीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना इयत्ता ३ रीची विद्यार्थिनी शिकवत असल्याचे निदर्शनास आले. या वेळी मुख्याध्यापक त्यांच्या कक्षात केवळ बसून होते. याविषयी मुंढे यांनी शिक्षणाधिकार्‍यांना चौकशीचे आदेश दिल्यावर वरील कारवाई करण्यात आली. या व्यतिरिक्त घणसोली विभाग कार्यालयाचे साहाय्यक आयुक्त दिवाकर समेळ यांना अनधिकृत बांधकामे, अनधिकृत फेरीवाले यांच्यावर नियंत्रण न ठेवणे, आदेशांचे पालन न करणे, कर्तव्यात कसूर करणे आदी कारणांमुळे निलंबित करण्यात आले आहे. आतापर्यंत मुंढे यांनी कारवाई केलेले कर्मचारी आणि अधिकारी यांची संख्या १८ इतकी झाली आहे.

फलटण (जिल्हा सातारा) येथे अवैधरित्या गोवंशाची वाहतूक करणार्‍या टेम्पोला अपघात, अपघातात गोवंशाचा मृत्यू

      फलटण (जिल्हा सातारा) - येथे पाच गोवंश विनापरवाना कत्तलखान्याकडे नेणार्‍या टेम्पोला ३ डिसेंबरला अपघात झाला. वाठार-निंबाळकर ते वडजल (तालुका फलटण) या मार्गावर झालेल्या या अपघातात एका गोवंशाचा मृत्यू झाला. या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलिसांनी इम्रान खान आणि तय्यब कुरेशी या धर्मांधांना अटक केली. (अपघात झाल्यामुळे कत्तलीसाठी अवैधरित्या नेण्यात येणार्‍या गोवंशियांविषयी समजले. अन्य वेळी किती मोठ्या प्रमाणावर गोवंशाची हत्या केली जात असेल, हे लक्षात येते ! गोवंश हत्याबंदी कायद्याची प्रभावी कार्यवाही करणे आवश्यक ! - संपादक)

राममंदिराची उपेक्षा हेच राज्यकर्त्यांचे आतापर्यंतचे धोरण !

बाबरी ढाचा उद्ध्वस्त केल्याच्या घटनेला ६ डिसेंबर २०१६ या दिवशी २४ वर्षे पूर्ण !
एक बाबरी ढाचा पाडला; म्हणून भारतात निधर्मी आणि धर्मांध 
६ डिसेंबर हा दिवस ‘काळा दिवस’ साजरा करतात. मुसलमान 
आक्रमणकर्त्यांनी हिंदूंची लक्षावधी मंदिरे पाडली. त्याचा निषेध करण्यासाठी 
हिंदूंनी असे काळे दिवस साजरे करायचे ठरवले, तर त्यांना ३६५ दिवसही पुरे पडणार नाहीत !
         १ फेब्रुवारी १९८६ या दिवशी फैजाबाद जिल्हा न्यायाधिशांनी रामजन्मभूमीचे टाळे त्वरित उघडण्याचा आदेश दिला. ही एक पुष्कळ महत्त्वाची आणि उत्साहवर्धक घटना होती. त्या वेळी सार्‍या देशाने दिवाळी साजरी केली. १४ फेब्रुवारी १९८६ या दिवशी देहलीत दुपारी जामा मशिदीतून नमाज पढून परतणार्‍या धर्मांधांनी दंगल केली. काश्मीरमध्ये हिंदूंची १०० मंदिरे उद्ध्वस्त करण्यात आली. शिवाय अलीगढ, कानपूरसारख्या मुसलमानबहुल शहरांत दंगली झाल्या. १५ फेब्रुवारी १९८६ या दिवशी धर्मांधांनी ‘बाबरी मशीद अ‍ॅक्शन समिती’ची स्थापना केली. उत्तरप्रदेशातील सर्व मुसलमान आमदार पक्षभेद विसरून एकत्र आले. त्यांच्या एका शिष्टमंडळाने उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांकडे बाबरी मशिदीला पुन्हा एकदा टाळे लावण्याची विनंती केली. मुसलमान नेते शहाबुद्दीन यांनी मुसलमानांना २६ जानेवारी १९८७ च्या प्रजासत्ताकदिनावर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले. अनेक मुसलमान नेत्यांनी या गोष्टीला त्यांचा विरोध असल्याचे घोषित केले.

पोलिसांची बहुउद्देशीय काठी !

     सध्या पोलिसांवरील आक्रमणांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. मग त्यात चोरट्यांनी त्यांच्यावर चाकूने केलेले आक्रमण असो किंवा धर्मांधांनी तलवारीने केलेले आक्रमण असो. अनेक आक्रमणांत पोलीस भीषणरित्या घायाळ होऊन काही वेळा दुर्दैवाने मृत्यूमुखीही पडले आहेत. वर्ष २०१५ मध्ये पोलिसांवर झालेल्या आक्रमणांत ३७० पोलीस घायाळ झाले. आक्रमणांत बळी पडण्यापेक्षा पोलिसांना प्रतिकार करता यावा आणि त्यांचे रक्षण व्हावे, या आत्मीयतेपोटी इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकी शाखेच्या एका विद्यार्थ्याने बहुउद्देशीय काठी सिद्ध केली आहे. त्या काठीत जीपीएस् यंत्रणेसह मेटल डिटेक्टर, एल्ईडी दिवे आणि प्रसंगी व्यक्तीला शॉक देण्याची यंत्रणाही बसवण्यात आली आहे. स्वतःच्या सुरक्षेसह गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी या काठीचा उपयोग होणार आहे. ‘पोलीस अधिकार्‍यांकडे बंदूक असते; मात्र अनेक पोलिसांच्या हातात केवळ लाकडी काठीच असते. त्या काठीनेच त्यांना गुन्हेगारांचा सामना करावा लागतो; म्हणून ही आगळीवेगळी काठी सिद्ध केली आहे’, हा या काठीमागील उद्देश असल्याचे मत त्या विद्यार्थ्याने व्यक्त केले.

नोव्हेंबर मासाच्या दुसर्‍या आठवड्यात केरळ राज्यातील विविध ठिकाणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रवचनांच्या माध्यमातून धर्मप्रसार

१. एर्नाकुलम् जिल्हा
      ‘केरळ येथील एर्नाकुलम् जिल्ह्यातील पळुरुत्ती या ठिकाणी एस्एन्डीपी नावाच्या संघटनेच्या बैठकीत एक प्रवचन घेण्यात आले होते. सौ. शालिनी सुरेश यांनी ‘पाप-पुण्य’ या विषयावर मार्गदर्शन केले आणि याचा लाभ ४५ जणांनी घेतला. या ठिकाणी सध्या नियमित प्रवचन चालू झाले आहे.
२. कोट्टयम् जिल्हा
     कोट्टयम् येथील कोडुमालून या ठिकाणी एका मंदिरात भागवत सप्ताह चालू होता. त्या निमित्ताने समितीच्या कार्यकर्त्यांना प्रवचन घेण्यास बोलवले होते. कु. रश्मी परमेश्‍वरन् यांनी ‘धर्माचरण’ या विषयावर मार्गदर्शन केले. याचा लाभ ७० जणांनी घेतला.

मीरा रोड येथील ३ बोगस कॉल सेंटर प्रकरणातील ८३ जणांच्या विरोधात आरोपपत्र प्रविष्ट

       ठाणे - अमेरिकन नागरिकांची फसवणूक करणार्‍या येथील तीन बोगस कॉल सेंटर प्रकरणातील ८३ आरोपींच्या विरोधात पोलिसांनी २ डिसेंबरला ठाणे न्यायालयामध्ये तीन वेगवेगळी आरोपपत्रे प्रविष्ट केली आहेत. बोगस कॉल सेंटरचे हे आंतरराष्ट्रीय प्रकरण उघडकीस आल्यानंतर २ मासांंच्या आत पोलिसांनी आरोपपत्र प्रविष्ट केले. येथील हरिओम आय.टी.पार्क, युनिव्हर्सल आऊट सोर्सिंग, ओस्वाल हाऊस या कॉल सेंटरच्या माध्यमातून अमेरिकन नागरिकांची आर्थिक फसवणूक करण्यात आली होती.

मुंबईत आयएन्एस् बेतवा युद्धनौकेला झालेल्या अपघातात दोन नौसैनिक बेपत्ता

युद्धनौकांचे शांतताकाळात अपघात होणे चिंताजनक !
      मुंबई - मुंबईतील नौदलाच्या गोदीमध्ये डागडुजीसाठी आलेल्या आयएन्एस् बेतवा या युद्धनौकेला समुद्रात सोडतांना टेकूवरून घसरल्याने अपघात झाला आहे. या अपघातात १४ नौसैनिकांची सुटका करण्यात आली असून अद्याप दोन नौसैनिक बेपत्ता झाले आहेत.

आज (तिथीनुसार) शिवप्रतापदिन, करूया शिवरायांना वंदन !

    ‘काही शतकांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी मार्गशीर्ष शुक्ल पक्ष सप्तमी या दिवशी अफझलखानाचा वध केला होता. छत्रपतींच्या पराक्रमाच्या स्मरणार्थ ही तिथी ‘शिवप्रतापदिन’ म्हणून ओळखली जाते. या वर्षी ही तिथी ६.१२.२०१६ या दिवशी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी ही काव्यसुमनांजली अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन करूया.
  देवाचे घेऊनी दर्शन, करूया पराक्रमाचे स्मरण ।
 आज शिवप्रतापदिन, करूया शिवरायांना वंदन ॥ १ ॥

 महादेवाचे लाभले वरदान अन् भवानीमातेचे कृपादान ।
 जिजाऊंचे सुपुत्र गुणवान, परम प्रतापी चारित्र्यवान ॥ २ ॥

बाबरीचा ढाचा उद्ध्वस्त होण्याचे असेही एक कारण !

     ‘अयोध्येतील बाबरी ढाच्याच्या संदर्भात चर्चा विश्‍व हिंदु परिषद (विहिंप) आणि अखिल भारतीय बाबरी मशीद कृती समिती (बाबरी समिती) यामध्ये झाल्या; पण त्या चर्चा विफल झाल्या आणि वादावर तोडगा निघाला नाही. माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांनी त्यांच्या काळात एक गोष्ट मान्य करून घेतली की, दोघांनी एकमेकांना प्रत्यक्ष पुरावे दाखवावेत; म्हणजे या चर्चेत प्रगती होईल. दोघांनी कागदपत्रे आणि लेखी युक्तीवाद देऊन चर्चा चालू केली. बाबरी समितीला साम्यवादी इतिहासकारांचा कंपू साहाय्य करत होता. साहाय्य नाही, खरे तर तो कंपूच चर्चा चालवत होता. हा कंपू भारत इतिहास संशोधन संस्थेचे सहकारी कार्यालय आणि येथील सुविधा वापरून बाबरी समितीची कागदपत्रे सिद्ध करत होता. त्यामुळेच त्या संस्थेच्या सदस्य सचिवाने त्यागपत्र दिले होते.

भारताचा स्वाभिमान राष्ट्रसंहारक बाबर कि राष्ट्रोद्धारक राम ?

      भारतातील देशद्रोही नेते भारतवर्षाचा आदर्श, गाय, स्त्री आणि असाहाय्य प्रजेचा पालनहार अन् राष्ट्रोद्धारक मर्यादापुरुषोत्तम भगवान श्रीरामाचा पदोपदी अवमान करतात, तर गोभक्षक, स्त्रियांना पळवणारा कामुक, लुटारू, राष्ट्रसंहारक आणि मंदिर भंजक विदेशी आक्रमक बाबरचा उदोउदो करतात. अशा या बाबराच्या क्रूर मानसिकतेची काही उदाहरणे पुढील लेखात पाहूया. म्हणजे बाबर समर्थकांचे खरे स्वरूप सर्वांच्या लक्षात येईल.
१. पूर्वजांचे अवगुण अंगभूतच असलेला बाबर !
     गोहत्यारा बाबराचा जन्म उझबेस्तान येथील फरगना प्रदेशातील अंधीजान गावात झाला. त्याच्या आईचे नाव कुतलक बेगम आणि वडिलांचे नाव उमरशेख मिर्झा होते. बाबर याच्या स्वभावातील दुष्टपणा, निष्ठुरता आणि मूर्खपणा, हे त्याच्या आईचे पूर्वज क्रूर चंगेजखां अन् वडिलांचे पूर्वज निर्दयी तैमूरलंग यांच्याकडून आले होते. तो मूळचा मंगोलियन होता; परंतु नंतर त्याच्या वंशाने पर्शियन धर्म स्वीकारला.

नुसत्या बातम्या देणारे नको, तर शत्रूराष्ट्राच्या कृत्यांना चाप लावणारे सरकार हवे !

        जम्मूपासून २० किलोमीटर अंतरावर नगरोटा भाग आहे. सैन्याच्या १६ व्या कोअरचे मुख्यालय येथे आहे. येथील सैन्याच्या छावणीवर २९ नोव्हेंबर २०१६ ला पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास जिहादी आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणात २ सैन्याधिकारी आणि ५ सैनिक हुतात्मा झाले, तर काही सैनिक घायाळ झाले. 

ख्रिस्त्यांनी हिंदूंवर केलेल्या अमानुष अत्याचारांविषयी आधी भाजपच्या ख्रिस्ती आमदारांनी माफी मागावी, अशी मागणी कोणी का करत नाही ?

       आयकर खात्याने गोव्यातील चर्चसंस्थांना आर्थिक व्यवहाराची माहिती देण्यासाठी नोटीस पाठवली आहे. या विरोधात भाजपमध्ये असलेल्या ख्रिस्ती आमदारांनी गप्प न रहाता त्यागपत्र द्यावे, अशी मागणी नुवेचे आमदार मिकी पाशेको यांनी मडगाव येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. 

बोलणे एक आणि वागणे दुसरे असलेले गांधी !

  ‘भारताने भेकडासारखे असाहाय्य होऊन स्वतःचा अपमान सहन करण्यापेक्षा स्वतःच्या सन्मानाच्या संरक्षणासाठी शस्त्रांचा आश्रय घेणे मी योग्य समजतो.’ - मोहनदास गांधी (‘साप्ताहिक विवेक’, दिवाळी २००३)
     (असे असले, तरी प्रत्यक्षात मात्र गांधींनी अहिंसेचा अतिरेक करून भारताला फाळणीला सामोरे जाण्यास भाग पाडले आणि हिंदूंमधील क्षात्रतेज जाणीवपूर्वक नष्ट करून त्यांना निष्क्रीय बनवले ! खरोखरीच मोहनदास गांधी यांनी वेळीच शस्त्राचा आश्रय घेतला असता, तर भारत आज इतका रसातळाला गेला नसता ! - संपादक)

काळगती ओळखून त्याप्रमाणे कार्य करणारे द्रष्टे परात्पर गुरु डॉ. आठवले !

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...
परात्पर गुरु
डॉ. जयंत आठवले
१. जगात ‘इंटरनेट’ही संकल्पना प्राथमिक 
टप्प्यात असतांना प.पू. डॉक्टरांनी सनातन संस्था 
आणि हिंदु जनजागृती समिती यांची संकेतस्थळे सिद्ध 
करण्यास (बनवण्यास) सांगणे अन् काही वर्षांनी इंटरनेटचा वापर 
वाढू लागल्यावर त्या संकेतस्थळांच्या माध्यमातून व्यापक प्रसार होणे
    ‘वर्ष २००४-०५ या कालावधीत जगात ‘इंटरनेट’ ही संकल्पना प्राथमिक टप्प्यात होती. त्या वेळी अनेकांकडे ‘इंटरनेट’ची सुविधा उपलब्ध नव्हती आणि ज्यांच्याकडे होती ती ‘६४ केबीपीएस्’ (किलो बाइट्स पर सेकंद) अर्थात् ‘डायलअप’ इतक्या अल्प गतीची होती. त्या वेळी ‘प्रसारासाठी एखादे संकेतस्थळ बनवावे’, ही कल्पना विशेष कोणाला सुचणारी नव्हती.

सद्गुरु राजेंद्रदादा यांना कु. शुभांगी आचार्य यांनी लिहिलेले कृतज्ञतापत्र !

सद्गुरु (श्री.) राजेंद्र शिंदे
सद्गुरु राजेंद्रदादा यांच्या चरणी कृतज्ञतापूर्वक साष्टांग नमस्कार !
१. सद्गुरु दादा, तुम्हाला पत्र लिहावे, अशी पुष्कळ इच्छा असल्याने हे पत्र लिहित आहे. दादा, माझी प्रकृती ठीक नसल्यामुळे तुमचे कपडे धुण्याच्या सेवेला मी आज येऊ शकले नाही, यासाठी मला क्षमा करा. 
२. महाप्रसाद घेतांना अकस्मात् सद्गुरु दादांना 
पाहून भावजागृती होऊन डोळ्यांतून भावाश्रू वाहू लागणे 
     दादा, महाप्रसाद घेतांना तुम्हाला बघितल्यावर माझी भावजागृती झाली. मी जेवायची थांबले आणि माझे डोळे आपोआप मिटले जाऊन डोळ्यांसमोर तुम्ही हसतांना दिसू लागलात. तेव्हा माझ्या डोळ्यांतून भावाश्रू वाहू लागले; परंतु नंतर माझी व्याकुळता एवढी वाढली की, मला रडायलाच येऊ लागले. गुरुपौर्णिमेला तुम्ही ‘सद्गुरुपदी’ आरुढ झालात. त्या भावसोहळ्याचे दृश्य डोळ्यांसमोर दिसू लागले आणि माझ्या डोळ्यांतून अधिक वेगाने भावाश्रू वाहू लागले. ही अवस्था २० मिनिटे टिकून होती. त्या वेळी मला ‘तुमच्या चरणांजवळ बसावे’, असे वाटत होते. काही क्षणांतच ‘मी तुमच्या चरणांजवळच बसले आहे’, असे जाणवत होते. माझी व्याकुळता मात्र थांबत नव्हती. काही वेळाने मन शांत होऊन अश्रू आणि डोळेही थंड झाल्याचे जाणवले. आपल्या कृपेनेच मला ही अनुभूती आली; म्हणून मी आपल्या चरणी अनंत कोटी कृतज्ञ आहे.

अमेरिकेतील पू. (सौ.) भावना शिंदे हर्ली यांना आलेल्या अनुभूती

पू. (सौ.) भावना शिंदे हर्ली
१. देवता काळ्या पाषाणाच्या मूर्तीच्या रूपात; 
परंतु जिवंत आणि तेजस्वी दिसणे 
१ अ. श्री विष्णु : ‘३.७.२०१६ या अमावस्येच्या दिवशी मी संध्याकाळी उपाय करतांना मला ‘श्रीविष्णु सोन्याच्या सिंहासनावर बसला आहे’, असे दिसले. श्रीविष्णु काळ्या पाषाणाच्या मूर्तीच्या स्वरूपात असला, तरी तो जिवंत आणि तेजस्वी दिसत होता.
१ आ. श्री विठ्ठल : ४.७.२०१६ या दिवशी दुपारी उपाय करतांना मला श्री विठ्ठलाचे कमरेपर्यंत दर्शन झाले. त्याचेही रूप काळ्या पाषाणाच्या मूर्तीसारखे असले, तरी ते जिवंत आणि तेजस्वी होते. 
    काही वेळाने माझे गाढ ध्यान लागले आणि त्यात ‘माझ्या उजव्या हातात त्रिशूळ आहे’, असे जाणवत होतेे. प्रत्यक्षात स्थुलातून माझ्या हातात काहीही नव्हते.

सद्गुरु राजेंद्र शिंदे यांना रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरात जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे

१. ध्यानमंदिरात प्रवेश करण्यापूर्वी 
    जेव्हा मी ‘डोळे मिटून काय जाणवते ?’, असे पाहिले, तेव्हा आजूबाजूला किंवा भोजनगृहात येणार्‍या आवाजाकडे माझे लक्ष जात होते. 
२. ध्यानमंदिरात प्रवेश केल्यावर
अ. ध्यानमंदिरात प्रवेश करतांना वृत्ती अंतर्मुख होऊ लागली. 
आ. ‘आपण एका पोकळीत आहोत आणि काळ पूर्णपणे थांबला आहे’, असे वाटले. 
इ. माझे मन लगेच एकाग्र होऊन शांत वाटू लागले. 
ई. माझे आजूबाजूच्या सगळ्या स्थितीचे भान नष्ट होऊन ध्यानमंदिरात येणार्‍या सूक्ष्म नादावर लक्ष एकाग्र झाले. 
उ. त्या वेळी माझ्या मनात विचार आला, ‘याला ध्यानमंदिर का म्हणतात, तर इथे ध्यान लगेचच लागते, त्यासाठी काही विशेष प्रयत्न करावे लागत नाहीत.’

साधकाने अनुभवलेली प.पू. पांडे महाराज यांची प्रीती आणि त्यांच्याप्रती व्यक्त केलेली पत्ररूपी कृतज्ञता !

श्री. सागर निंबाळकर
      ज्ञानसागरस्वरूप साधकवत्सल प.पू. पांडे महाराज (प.पू. बाबा) यांच्या चरणी, शिरसाष्टांग नमस्कार आणि कोटी कोटी कृतज्ञता !
      प.पू. बाबा, आपल्याला भेटून वर्ष होत आले; पण बाळ जसे आईपासून कितीही दूर गेले, तरी आईची आठवण त्याला अखंड असते, तसेच मी अनुभवत आहे. त्यामुळे ‘आपल्यापासून मी दूर गेलो आहे’, असे मला मुळीच वाटत नाही. 
१. प.पू. पांडे महाराज यांच्या 
सत्संंगातील अनमोल ज्ञानकण स्मरणात असणे
     प्रत्येक लिखाण करतांना मला आपल्या सत्संंगातील अनमोल ज्ञानकण आठवतात. खंडणाच्या लिखाणाच्या वेळी आपण दिलेली उदाहरणे, शिकवलेली ज्ञानजिज्ञासा, आपण कृतीतून शिकवलेली तळमळ सारं काही संचितासारखे पाठीशी उभे असते.

प.पू. पांडे महाराज यांनी ६६ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. दीपाली मतकर यांच्यासाठी सांगितलेले उपाय !

प.पू. पांडे महाराज
१. दर्भाने दृष्ट काढणे आणि दर्भ पोटाला बांधून मंत्र म्हणणे
    ‘२४.१०.२०१६ या दिवशी प.पू. पांडे महाराजांनी पहिला उपाय सांगितला. दर्भाने दृष्ट काढल्याप्रमाणे डोक्यापासून पायापर्यंत त्यांनी दिलेला मंत्र म्हणून फिरवण्यास सांगितले होते; पण तो उपाय करता आला नाही. दुसरा उपाय दर्भ पोटाला बांधून मंत्र म्हणण्यास सांगितले होते; परंतु हा उपाय रुग्णालयात असल्याने करता आला नाही. 
२. छायाचित्रासमोर तिळाचा दिवा अखंड लावून ठेवणे
    प.पू. पांडे महाराजांनी सेवाकेंद्रात माझे छायाचित्र ठेवून त्या समोर अखंड
तिळाचा दिवा लावून ठेवण्यास सांगितला होता. तसे २४.१०.२०१६ ते १०.११.२०१६
कु. दीपाली मतकर
पर्यंत, म्हणजे रामनाथीला जाईपर्यंत दिवा लावून ठेवला होता.
३. मंत्र म्हणणे
    वेदना वाढायच्या, त्या वेळी ते भ्रमणभाषवरून मंत्र म्हणायचे. त्या मंत्रांमुळे मला शक्ती मिळायची. प्रतिदिन दिवसभरातून बर्‍याचदा भ्रमणभाष करून त्रासांचा ते आढावा घ्यायचे आणि होत असलेल्या त्रासांवर ते मंत्र म्हणायचे. 
४. ‘त्रास होत आहे का ?’, असे साधकांना 
विचारण्यास सांगणे आणि आधीच उपाय चालू करणे
     त्रासामुळे रात्री झोप लागायची नाही. रात्र झाल्यावर ‘त्रास वाढणार.

एकाग्रतेने आणि भावपूर्ण केलेल्या मंत्रजपाचा पाण्यावर होणारा परिणाम

सौ. वैशाली राजहंस
     ‘सनातनचे पू. संदीप आळशी यांनी मला २ मासांपूर्वी (महिन्यांपूर्वी) ३ मंत्रजप २१ वेळा (अनुमाने १० मि.) आणि १ मंत्रजप ५० मिनिटे असे एकूण ४ मंत्रजप १ घंटा (तास) करायला सांगितले. तेव्हा त्यांनी ‘मंत्रजप करतांना तांब्याच्या पेल्यात किंवा काचेच्या ‘ग्लासा’त पाणी घेऊन त्यात स्वतःच्या उजव्या हाताची पाचही बोटे बुडवून ठेवा’, असे सांगितले. या पद्धतीप्रमाणे नियमित मंत्रजप करतांना पुढील सूत्रे माझ्या लक्षात आली. 
१. मी जेव्हा भावपूर्ण आणि एकाग्रतेने मंत्रजप करायचे, तेव्हा मंत्राची शक्ती पाण्यात येते अन् पाणी उष्ण (गरम) होते. यावरून ‘मंत्रजपात शक्ती असते’, हे शिकायला मिळाले. 
२. जेव्हा मंत्रजप करतांना मध्ये मध्ये माझ्या मनात सेवेचे विचार येतात, मन एकाग्र होत नाही आणि भक्तीभावही अल्प असतो, तेव्हा तांब्याच्या पेल्यातील पाणी कोमट असते.
३. एखादा प्रसंग घडल्यावर मंत्रजप केला जातो; पण त्यात मन एकाग्र झालेले नसते आणि भक्तीभावही नसतो, म्हणजे ‘एकदाचा मंत्रजप पूर्ण करूया’, अशा प्रकारे उरकण्याच्या विचाराने तो केला जातो, तेव्हा त्या मंत्रजपाचा पेल्यातील पाण्यावर काहीच परिणाम होत नाही.’
- सौ. वैशाली राजहंस, सनातन आश्रम, मिरज. (२४.९.२०१६)

भावसत्संगामध्ये श्रीकृष्णाचे आणि प.पू. डॉक्टरांचे अस्तित्व जाणवणे

कु. तृप्ती गावडे
      ‘देवाच्या कृपेने मला प्रतिदिन भावसत्संगात जाण्याची संधी मिळायची. त्या वेळी त्या सत्संगात देेवाच्या अस्तित्वाची अनुभूती येत असे. भावसत्संगात देवाने दिलेल्या अनुभूती पुढीलप्रमाणे आहेत. 
१. भावसत्संगासाठी श्रीकृष्ण आणि प.पू. डॉक्टरांना 
सूक्ष्मातून येण्यासाठी याचक भावाने प्रार्थना करणे 
     ‘प्रतिदिन भावसत्संगामध्ये १० ते १२ साधकांची उपस्थिती असायची. आम्ही त्याप्रमाणे आसंद्यांची मांडणी करीत होतो. सगळे साधक सत्संगाला आल्यावर मी श्रीकृष्णाला आणि गुरुदेवांना प्रार्थना करीत होते, ‘हे गुरुदेवा, या प्रार्थनेच्या माध्यमातून आम्ही या भावसत्संगामध्ये तुम्हाला याचक भावाने बोलावत आहोत. हे देवा, आमच्यामध्ये भाव निर्माण होण्यासाठी, या देहात भावाचे बीज रोवण्यासाठी तुम्ही या आणि आम्हाला साहाय्य करा. या सत्संगात आरंभीपासून ते शेवटपर्यंत आम्हाला तुमचे अस्तित्व अनुभवता येऊ दे.’

सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांना झालेले वाईट शक्तींचे त्रास आणि आलेली अनुभूती

सद्गुरु (कु.) स्वाती खाडये
१. झालेले त्रास 
१ अ. सभेतील भाषण संपल्यावर डोळ्यांसमोर अंधारी येऊन चक्कर येणे आणि श्री गणेशाचा नामजप केल्यावर त्रास उणावणे : ‘२३.१०.२०१६ या दिवशी पुणे येथे काश्मिरी हिंदूच्या पुनर्वसनासाठी ‘चलो कश्मीर अभियान’ या संदर्भात सभा आयोजित केली होती. त्या वेळी सनातन संस्थेच्या वतीने वक्ता म्हणून मला बोलण्याची संधी मिळाली होती. त्या वेळी भाषण झाल्यानंतर जागेवर येऊन बसल्यानंतर मला चक्कर येऊन डोळ्यांसमोर अंधारी आली. त्या वेळी माझ्या लक्षात आले, ‘आपल्याला त्रास होत आहे.’ प्रार्थना करून मी श्री गणेशाचा १५ मिनिटे नामजप केला. त्यानंतर अंधारी आणि चक्कर येण्याचे प्रमाण न्यून झाले आणि त्रास उणावला.

समाजातील व्यक्ती आणि अध्यात्मात प्रगती केलेला साधक यांची सत्काराच्या वेळची मनःस्थिती

श्री. राम होनप
१. समाजातील व्यक्ती
     ‘समाजात कलाकार, शास्त्रज्ञ, लेखक किंवा कवी यांनी त्यांच्या क्षेत्रात काही उल्लेखनीय कामगिरी केल्यास त्यांचा सत्कार केला जातो. या वेळी संबंधित व्यक्तीला मनोगत व्यक्त करण्यापूर्वी त्याच्या पूर्वायुष्यात घडलेल्या सुखदुःखाचे प्रसंग आठवतात आणि आपल्या भावना उचंबळून आल्याने तो मनोगतात स्वतःच्या जीवनाविषयी उपस्थितांना बरेच काही सांगण्याचा प्रयत्न करतो.
२. साधक
     सनातन संस्थेत आध्यात्मिक पातळी ६१ टक्के गाठलेल्या साधकांचा सत्कार केला जातो. या पातळीला साधकाच्या मनोलयाचा आरंभ झाला असल्याने मनात येणार्‍या विचारांचे प्रमाण अल्प झालेले असते आणि ‘साधनेत प्रगती झाली ती देवाच्या कृपेने आहे’, अशी त्याला जाणीव असते. त्यामुळे सत्काराच्या वेळी कृतज्ञतेने भाव दाटून आल्याने साधक दोन शब्द बोलून लगेच स्वतःचे बोलणे थांबवतो.’
- श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.९.२०१६)

देवाची ओढ असलेला ५५ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला पाळधी, जि. जळगाव येथील चि. गीतेश महेंद्र चौधरी (वय २ वर्षे) !

उच्चलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र 
चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. गीतेश चौधरी एक दैवी बालक आहे !
चि. गीतेश चौधरी
      मार्गशीर्ष शुक्ल पक्ष सप्तमी (६.१२.२०१६) या दिवशी पाळधी येथील चि. गीतेश महेंद्र चौधरी याचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या कुटुंबियांना जाणवलेली त्याची वैशिष्ट्ये पुढे देत आहोत. 
चि. गीतेश चौधरी याला सनातन परिवाराच्या
वतीने वाढदिवसानिमित्त शुभाशीर्वाद ! 
१. जन्मापूर्वी 
१ अ. सात्त्विक जीव जन्माला यावा, यासाठी प्रार्थना करणे : मी श्रीकृष्णाला ‘जन्माला येणारा जीव सात्त्विक, साधना करणारा आणि देव, राष्ट्र अन् धर्म यांचे कार्य करणारा असू दे’, अशी प्रार्थना करायचे.
१ आ. स्वप्नात पू. जाधवकाका दिसणेे : मला गर्भधारणा झाल्यानंतर दुसर्‍या मासात (महिन्यात) सतत ३ - ४ दिवस स्वप्नात टिळा लावलेले आणि प्रत्येक दिवशी वेगवेगळा सदरा घातलेले
पू. जाधवकाका दिसले आणि ते मला आश्रमात यायला सांगत असल्याचे जाणवले. जळगाव आश्रमात ‘यज्ञ चालू आहे’, असे दिसले.

सर्वत्रच्या साधकांना सेवेची सुवर्णसंधी !

धर्मरथांवर चालक-
साधकांची तातडीने आवश्यकता !
       सनातनचे ग्रंथ म्हणजे समाजाला धर्मशिक्षण देणारे ज्ञानाचे अनमोल भांडारच ! मानवजातीसाठी ज्ञानामृत असलेल्या या ग्रंथांद्वारे समाजाला आचारधर्म, साधना, आदी नानाविध विषयांसंदर्भात दिशादर्शन केले जाते. या ग्रंथांना सर्वत्र मोठ्या प्रमाणावर मागणी येत आहे. 
       समाजापर्यंत शीघ्रतेेने पोहोचण्यासाठी सनातन संस्थेच्या वतीने ठिकठिकाणी धर्मरथाद्वारे ग्रंथप्रदर्शने लावली जात आहेत. या सेवेसाठी धर्मरथावर चालक-साधकांची आवश्यकता आहे. सेवेसाठी इच्छुक असलेल्या साधकांकडे लहान धर्मरथासाठी लाईट मोटर व्हेहिकल (LMV), दुसर्‍या लहान धर्मरथासाठी लाईट ट्रान्स्पोर्ट व्हेहिकल आणि तीन मोठ्या धर्मरथांसाठी हेव्ही ट्रान्स्पोर्ट व्हेहिकल असे परवाने असणे आवश्यक आहे. 
       जे साधक वरील सेवांमध्ये काही कालावधीसाठी किंवा पूर्णवेळ सहभागी होऊ शकतात, त्यांनी जिल्हासेवकांच्या माध्यमातून श्री. माधव गाडगीळ यांच्याशी ०८४५१००६००८ या क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा. 
       ज्यांना धर्मरथ (ट्रक) चालवता येत नाही; मात्र शिकण्याची इच्छा आहे त्यांना धर्मरथ चालवण्यास शिकवण्यात येईल.

आज प्रतापगड उत्सव समिती आयोजित शिवप्रतापदिन !

वेळ : सायंकाळी ५ 
स्थळ : शिवतीर्थ, श्री महागणपति घाट, वाई (जिल्हा सातारा).
पुरस्कार वितरण कार्यक्रम : पुण्याचे माजी उपमहापौर श्री. सुरेश नाशिककर यांना वीर जीवा महाले पुरस्कार आणि हिंदु विधीज्ञ परिषदेचे अध्यक्ष अधिवक्ता श्री. वीरेंद्र इचलकरंजीकर यांना पंताजी काका बोकील अधिवक्ता पुरस्कार 
हिंदूंनो, सहस्रोंच्या संख्येने उपस्थित रहा !
आज श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान 
आयोजित शिवप्रतापदिन सोहळा ! 
वेळ : सायंकाळी ५ स्थळ : ग्रामपंचायत कार्यालयासमोर, कुडाळ (जिल्हा सातारा) 
प्रमुख व्याख्याते : श्री. सु.ग. शेवडे (गुरुजी)

फलक प्रसिद्धीकरता

भारताच्या परराष्ट्र धोरणाचा 
बांगलादेशी हिंदूंना काय उपयोग ?
    बांगलादेशमधील धर्मांधांनी उत्तरी नेत्रोकोना जिल्ह्यातील मिमेनसिंहरोही गावात आणि पबना जिल्ह्यातील बीरा भागात असणार्‍या मंदिरांतील कालीमातेच्या एकूण ७ मूर्तींची तोडफोड केली, तर बोचागंज उपजिल्ह्यात हिंदूंच्या १० घरांना आग लावून ती भस्मसात केली.

हिंदू तेजा जाग रे !

Jago !
        Jihadiyone Bangladesh ke Uttar Netrokona aur Pabna jiloke mandiro me sthapit Kalimata ki 7 murtiya todi.
Bharat ki videsh neeti me Hinduhit kyon nahi ?
जागो !
      जिहादियों ने बांग्लादेश के उत्तर नेत्रोकोना और पबना जिलों के मंदिरों में स्थापित कालीमाता की ७ मूर्तियां तोडीं ।
भारत की विदेशनीति में हिन्दूहित क्यों नहीं ?
परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
  • कुठे प्रत्येक क्षेत्रात सर्वोच्च स्तराचे ज्ञान देणारा हिंदु धर्म, तर कुठे बालवाडीप्रमाणे शिक्षण देणारे पाश्‍चात्त्य देश !
  • विज्ञान एकातरी क्षेत्रात धर्मशास्त्राच्या पुढे आहे का ?
       सर्वच क्षेत्रांत अशी स्थिती आहे. त्याचे एक उदाहरण येथे दिले आहे.
खगोलशास्त्र
       विज्ञान निरनिराळे ग्रह-तारे यांचा आकार, पृथ्वीपासूनचे अंतर इत्यादी माहिती सांगते, तर ज्योतिषशास्त्र ग्रह-तारे यांचा परिणाम आणि परिणाम वाईट होणार असल्यास त्यांवरील उपायही सांगते.
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज 
सनातनचे श्रद्धास्थान
ईश्‍वरालाच जिंकणे 
         विषयांपेक्षा विषयांच्या निर्मात्यालाच का जिंकू नये ? 
भावार्थ : एकेक विषय जिंकत जायचे म्हटले तर वासना, आवडी-निवडी, स्वभावातील दोष, असे लाखो विषय जिंकायला, म्हणजे त्यांच्यावर नियंत्रण मिळवायला लाखो जन्म लागतील. त्यापेक्षा त्या सर्वांच्या निर्मात्यालाच भक्तीने या जन्मात जिंकले, तर त्या सर्वांवर या जन्मातच नियंत्रण मिळविता येईल; म्हणूनच म्हटले आहे, एक साधै सब साधै । सब साधै सब जाय ॥ म्हणजे एका नामाला, भगवंताला (नाम आणि भगवंत एकच आहेत.) साध्य केले म्हणजे सर्वच साध्य होते. सर्व साध्य करायला गेलो, तर काहीच साध्य होत नाही.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

बोधचित्र


     ‘म्हातारपणी स्नायू आखडणे, सांधे दुखणे इत्यादी त्रास होऊ नयेत; म्हणून तरुण वयापासूनच प्रतिदिन अर्धा तास तरी सर्व सांध्यांना व्यायाम होईल, असे व्यायाम करा ! तेव्हा मनात नामजपही करा, म्हणजे शरीर आणि मन दोघांना लाभ होईल.’
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥ 
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. 
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची दिशा !

आजपासून वाचा नियमित सदर
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसंदर्भातील परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे मार्गदर्शन !
परात्पर गुरु डॉ. आठवले
     हिंदु धर्म आणि भारतवर्ष यांचे वैशिष्ट्य असे की, येथे भविष्यात घडणार्‍या अद्वितीय घटनांचा उच्चार त्या घडण्यापूर्वी होतो. वाल्मिकी ऋषींनी अलौकिक प्रतिभादृष्टीतून प्रथम रामायण रचले. तद्नंतर प्रभु श्रीरामाचा अवतार झाला आणि ऐतिहासिक ‘रामराज्य’ पृथ्वीतलावर अवतरले. भगवान श्रीकृष्णाच्या जन्माच्या पूर्वीही दैवी आकाशवाणी झाली. आकाशवाणीनुसार जन्मलेल्या भगवान श्रीकृष्णाने धर्मसंस्थापना केली आणि पुनश्‍च पृथ्वीवर ‘धर्मराज्य’ अवतरले. अध्यात्मातील अधिकारी व्यक्ती असलेले परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सर्वप्रथम १९९८ या वर्षी ‘भारतात वर्ष २०२३ मध्ये ‘ईश्‍वरी राज्य’ म्हणजे ‘हिंदु राष्ट्र’ स्थापित होईल’, असा विचार द्रष्टेपणाने मांडला होता. तेव्हापासूनच ते ‘हिंदु राष्ट्र’ या विषयावर सातत्याने वैचारिक आणि आध्यात्मिक स्तरांवरील लिखाण करत आहेत. या विचारांत आगामी काळात होणार्‍या आदर्श राष्ट्ररचनेचे, म्हणजेच धर्मसंस्थापनेचे बीज रोवलेले आहे. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेविषयी कोणत्याही आशादायी घटना स्थुलातून घडत नसतांना ‘हिंदु राष्ट्रा’विषयी सांगणे, ही काहींना अतिशयोक्ती वाटेल; पण काळाची पावले ओळखणार्‍या संतांना त्या उज्ज्वल भविष्याची चाहूल लागली आहे. आपण त्या दिशेने प्रयत्न करणे, ही आपली साधना आहे.

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

सदा प्रयत्नरत रहाण्याचेे महत्त्व !
निष्क्रीय रहाण्याची सवय लागली की, कोणतीही गोष्ट करण्याचा कंटाळा 
येतो आणि अंगीभूत गुणांवरही गंज चढतो; म्हणून नेहमी कार्यरत रहावे ! 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)


पाकप्रेमी अब्दुल्ला घराणे !

संपादकीय
     स्वतःचा पुत्र हा आपल्यापेक्षा अधिक सरस किंवा यशस्वी झाल्यावर पिता हर्षोल्हासित होणे स्वाभाविक आहे. तसेच काहीसे फारूख अब्दुल्ला यांच्याबाबतीत झाले असेल. पाकप्रेमाच्या बाबतीत फारूख अब्दुल्ला यांना त्यांचे पुत्र ओमर अब्दुल्ला यांनी मागे टाकले आहे. तसे अब्दुल्ला घराणे हे पाकप्रेमी घराणे ! शेख अब्दुल्ला यांच्या काळापासून पाकप्रेमाची परंपरा ही त्यांचे वारसदार पुढे चालू ठेवत आहेत. अब्दुल्ला घराण्याकडे आता काश्मीरची सत्ता नाही. त्यामुळे पिता-पुत्रांकडे वेळच वेळ असून तो वेळ ते पाकची भाटगिरी करण्यात घालवत आहेत.

एकटा पडलेला बंगाल !

संपादकीय
     बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या भारतातील एका राज्याच्या मुख्यमंत्री आहेत कि पाकमधील एका राज्याच्या ?, असा प्रश्‍न हल्ली भारतियांना वारंवार पडतांना दिसतो. याला कारणीभूत आहे त्यांचे वर्तन. बंगालमध्ये टोलनाक्यांवर भारतीय सैनिकांची नियुक्ती केल्यावर त्यांनी ‘बंगालमध्ये सैन्य घुसवून केंद्रशासन तेथील तृणमूल काँग्रेसची सत्ता उलथवून टाकण्याचा प्रयत्न करत आहे’, असा थयथयाट केला. हा सैन्य सरावाचा एक भाग असून त्याला बंगाल शासन आणि प्रशासन यांनी अनुमती दिल्याचे समोर आल्यावर त्या तोंडघशी पडल्या.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn