Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कोटी कोटी प्रणाम

योगी अरविंद यांची आज पुण्यतिथी

दिनविशेष


कपिलाचार्य जयंती

नेरूळ (नवी मुंबई) येथील संत तुकाराम महाराज और इस्लाम हा वादग्रस्त परिसंवाद रहित !

हिंदुत्वनिष्ठांच्या संघटनाचा परिणाम !
        नवी मुंबई, ४ डिसेंबर (वार्ता.) - कुरआन द ट्रूथ फाऊंडेशन या संस्थेच्या वतीने ४ डिसेंबर या दिवशी येथील डी.वाय्. पाटील सभागृह येथे संत तुकाराम महाराज आणि इस्लाम या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. याविषयी विश्‍व हिंदु परिषदेच्या वतीने नवी मुंबईचे पोलीस आयुक्त यांना निवेदन देण्यात आले होते. हिंदुत्ववाद्यांचा विरोध लक्षात घेऊन पोलिसांनी या कार्यक्रमाला अनुमती नाकारली. त्यामुळे अखेर आयोजकांना हा कार्यक्रम रहित करावा लागला. याविषयी पोलिसांना निवेदन देतांना विश्‍व हिंदु परिषदेचे जिल्हामंत्री श्री. कृष्णा बांदेकर, तुर्भे येथील वारकरी श्री. रामनाथ म्हात्रे, भाजपचे नवी मुंबईचे उपाध्यक्ष प्रा. मारुती मतलापुरकर, नवी मुंबईचे उपाध्यक्ष श्री. शशी भानुशाली, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नवी मुंबईचे धर्मजागरण प्रसारप्रमुख श्री. सुरेशसिंग राणा आणि श्री. राजीव रेड्डी हे उपस्थित होते.

ही संपत्ती माझी नाही, तर देशभरातील नेत्यांची, उद्योगपतींची ! - शहा यांचा दावा

  • या प्रकरणाचे केंद्र सरकारने गांभीर्याने अन्वेषण करून एवढ्या मोठ्या रकमेच्या मागे कोण मंडळी आहेत, हे मागील महिनाभर उन्हामध्ये बँकांसमोर रांगा लावून त्रास सहन करणार्‍या जनतेला सांगितले पाहिजे !
  • १३ सहस्र ८६० कोटी रुपयांचे उत्पन्न घोषित करणारे महेश शहा यांची चौकशी चालू !
       नवी देहली - केंद्राच्या उत्पन्न प्रकटीकरण योजनेअंतर्गत १३ सहस्र ८६० कोटी रुपयांचे उत्पन्न घोषित केल्यानंतर बेपत्ता झालेले व्यावसायिक महेश शहा यांना ३ डिसेंबरला आयकर विभागाने कह्यात घेतले होते. रात्रभर त्यांची चौकशी केल्यानंतर त्यांना सोडण्यात आले. पुन्हा ५ डिसेंबरला सकाळी ११ वाजता त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. शहा यांच्या कुटुंबियांच्या जिवाला धोका असल्यामुळे त्यांना पोलीस सुरक्षा देण्यात आली आहे. 

प्राण्यांच्या चरबीपासून बनवलेल्या नोटा मागे घेण्याची इंग्लंडमधील हिंदु संघटनांची मागणी !

  • इंग्लंडमधील हिंदु संघटनांचे अभिनंदन ! 
  • भारतातील विविध हिंदु संघटना इंग्लंडप्रमाणे एकत्र येतील का ?
       लंडन - इंग्लंडमध्ये नव्यानेच चलनात आलेल्या ५ पौंडाच्या नोटांमध्ये प्राण्यांची चरबी वापरण्यात आल्याने इंग्लंडमधील हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. प्राण्यांची चरबी वापरून बनवलेल्या नोटा मागे घेऊन नव्या चरबीविरहित नोटा बाजारात आणाव्यात, अशी मागणी हिंदु संघटनांनी केली आहे. 
       ब्रिटनमधील हिंदू फोरम ऑफ इंग्लड या मंदिर आणि संस्था यांच्या संयुक्त संस्थेने हिंदु समाजाच्या वतीने इंग्लंड सरकारला ही नोट मागे घेण्याची विनंती केली आहे. नोटांच्या निर्मितीसाठी प्राण्यांचा वापर करणे किंवा त्यांना त्रास देणे याला आमचा विरोध आहे, असे इस्कॉन मंदिराचे प्रवक्ते श्री गौरीदास यांनी म्हटले आहे.
       ही नोट मागे घेण्यासाठी इस्कॉन मंदिर प्रशासनाने स्वाक्षरी मोहीमही चालू केली आहे. आतापर्यंत १ लाख २६ सहस्र ६०० हिंदु नागरिकांनी या याचिकेवर स्वाक्षर्‍या केल्या आहेत. दीड लाख स्वाक्षर्‍या झाल्यानंतर ही याचिका बँक ऑफ इंग्लंडकडे सादर केली जाणार आहे.

नोटाबंदीनंतर आतापर्यंत ९ लाख ८५ सहस्र कोटी रुपये अधिकोषांत जमा !

चलनातील काळा पैसा 
नष्ट होण्यावर तज्ञांना शंका !
        नवी देहली - ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या नोटा रहित झाल्यानंतर ३ डिसेंबरपर्यंत अधिकोषांमध्ये ९ लाख ८५ सहस्र कोटी रुपये जमा झाले आहेत. ही सर्व रक्कम ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या नोटांच्या स्वरूपात आहे. जुन्या नोटा जमा करण्याची मुदत ३० डिसेंबरला संपणार आहे. 
        नोटाबंदीनंतर व्यवहारात असलेल्या १४ लाख ६० कोटी रुपयांच्या अधिक मूल्यांच्या नोटांपैकी १० टक्के रक्कमही म्हणजे सुमारे ३ लाख कोटी रुपये रक्कम बँकेत येणार नसल्याचे सांगितले जात होते; मात्र ३० डिसेंबरपूर्वीच बँकांमध्ये ९ लाख ८५ सहस्र कोटी रुपये जमा झाल्यामुळे आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे; कारण चलनातून पूर्णपणे नोटा रहित करण्यास अद्याप २७ दिवस बाकी आहेत. या दिवसांत उर्वरित साडेचार लाख कोटी रुपये जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे काळा पैसा फिरवण्याच्या अनेक वाटा तातडीने रोखल्या नाहीत, तर बराचसा काळा पैसा हुशारीने पांढरा केला जाण्याची शक्यता आहे, अशी भीती केंद्रीय अर्थ मंत्रालयातील अधिकारी व्यक्त करत आहेत.

भारतीय संस्कृतीही सनातन म्हणजे नित्य नूतन आहे ! - डॉ. गो. बं. देगलूरकर, अध्यक्ष, डेक्कन अभिमत विद्यापीठ

      पुणे, ४ डिसेंबर (वार्ता.) - मंदिरे ही भक्तांची श्रद्धास्थाने आणि शक्तीचा स्रोत असल्याने त्यांना जपायला हवे. डॉ. श्रीकांत केळकर यांनी सिद्ध केलेल्या या पुस्तकातून जगाला आपल्या संस्कृतीचे दर्शन घडवण्याचे कार्य त्यांनी केले आहे. नदीचे वाहते पाणी जसे प्रत्येक वेळी नवीनच भासते, तसेच आपली भारतीय संस्कृतीही सनातन म्हणजे नित्य नूतन आहे, असे प्रतिपादन मूर्तीशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक आणि डेक्कन अभिमत विद्यापिठाचे अध्यक्ष डॉ. गो. बं. देगलूरकर यांनी केले. डॉ. श्रीकांत केळकर यांनी सिद्ध केलेल्या अबोड्स ऑफ द गॉड्स (देवतांची निवास्थाने) या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. येथील घोले रस्त्यावरील पंडित जवाहरलाल नेहरू सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला ज्येष्ठ चित्रकार आणि लेखक रवी परांजपे, ज्येष्ठ इतिहासकार पांडुरंग बलकवडे, पुस्तकाचे लेखक डॉ. श्रीकांत केळकर, सौ. अरुणा केळकर आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. डॉ. देगलूरकर पुढे म्हणाले...
१. डॉक्टर असून देवाला मानणारे श्रीकांत केळकर स्वतःला पुरोगामी नक्कीच समजत नसतील, म्हणूनच हे कार्य त्यांच्या हातून घडले, असे मला वाटते. 

जनधन खात्यांतील काळा पैसा गरिबांना ! - मोदी यांचे सुतोवाच

      मोरादाबाद (उत्तरप्रदेश) - नोटाबंदीच्या निर्णयानंतर गरिबांच्या जनधन खात्यांत काळा पैसा जमा करणार्‍यांना अद्दल घडवण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठरवले आहे. असे करणारे कारागृहात जातील आणि पैसा मात्र गरिबांकडेच राहील, अशी योजना मी बनवत आहे. हे शक्य होण्यासाठी तुमच्या खात्यात अन्य लोकांनी जमा केलेला पैसा तुम्ही खात्यातून काढू नका, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी येथील एका सभेत जनधन खातेधारकांना केले. (या प्रस्तावाने गरिबांना विश्‍वासघात करण्याची आणि आयत्या पैशातून जीवन कंठण्याची सवय लागून त्यांच्यातील तमोगुणांची वृद्धी होईल, असे वाटत नाही का ? त्याऐवजी जनधन खात्यांत जमा झालेला काळा पैसा सरकारने स्वत:कडे जमा करावा आणि त्यातून गरिबांना रोजगार, त्यांच्या मुलांना चांगले शिक्षण, शिष्यवृत्ती, आरोग्य सुविधा इत्यादी गोष्टींवर व्यय केल्यास सरकारला लोककल्याणाचे समाधान लाभेल आणि पैसा जमा करणार्‍यांना अद्दलही घडेल ! - संपादक)

मडगाव (गोवा) येथील ‘अभिव्यक्ती दक्षिणायन’ परिषदेतील पुरो(अधो)गाम्यांचे हिंदुद्वेष्टे विचार अन् परिषदेच्या आयोजनाच्या संदर्भात लक्षात आलेल्या त्रुटी

चित्रकार नामानंद मोडक यांचा सनातनवर खोटा आरोप !
(म्हणे) ‘एम्.एफ्. हुसेन यांच्याविषयी कौतुकास्पद उद्गार काढल्याने सनातनचा मला विरोध !’
म.फि. हुसेन यांनी भारतमाता, तसेच हिंदूंच्या देवता यांची अत्यंत 
अश्‍लाघ्य आणि विकृत चित्रे काढल्यामुळेच हिंदु जनजागृती समिती, 
सनातन संस्था आदी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी त्यांच्या विरोधात मोहीम उघडली होती ! 
अशांच्या चित्रांचे कौतुक करणे म्हणजे राष्ट्रद्रोह अन् धर्मद्रोह यांना पाठिंबा देणेच आहे ! 
      मडगाव - ‘महाराष्ट्रात एके ठिकाणी एका चित्रकाराच्या प्रदर्शनामध्ये मी चित्रकार एम्.एफ्. हुसेन यांच्याविषयी कौतुकास्पद उद्गार काढले होते. यामुळे मला सनातनच्या अध्यक्षाने बोलावले. त्यामुळे मला भीती वाटली’, असा आरोप चित्रकार रामानंद मोडक यांनी केला. (धादांत खोटे बोलणारे मोडक ! सनातनमध्ये अध्यक्षपद असे काही नसते, तर विश्‍वस्त आहेत, हेही ठाऊक नसणारे मोडक ! अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गप्पा मारणार्‍यांमध्ये खरे स्वरूप जाणा ! - संपादक) येथील अभिव्यक्ती दक्षिणायन परिषदेत ‘अंधश्रद्धा आणि राष्ट्रवाद’ या विषयावरील चर्चासत्रात बोलतांना चित्रकार मोडक यांनी सदर आरोप केला. या चर्चासत्राचे अध्यक्षपद तारा भवलकर यांनी भूषवले. या चर्चासत्रात गोव्यातील सनातनद्वेष्टे चित्रकार डॉ. सुबोध केरकर यांचीही उपस्थिती होती.

(म्हणे) काश्मीरमधील अशांततेला केवळ पाक उत्तरदायी नाही !

  • शेख अब्दुला, फारूख अब्दुल्ला आणि आता ओमर अब्दुल्ला या अब्दुल्ला परिवाराने नेहमीच पाकधार्जिणी भूमिका घेतली आहे. अशांना सत्तेत बसवणारी काश्मीरमधील जनताही तशीच आहे. त्यामुळे काश्मीरची समस्या सोडवण्यासाठी प्रथम अशी विधाने करणार्‍या नेत्यांना त्यांची सर्व संपत्ती जप्त करून आजन्म कारागृहात डांबले पाहिजे !
  • वडील फारूख अब्दुला यांच्यानंतर मुलगा ओमर अब्दुल्ला यांचा देशद्रोह !
        श्रीनगर - काश्मीरमधील अस्वस्थतेला पाकिस्तान उत्तरदायी आहे, असा अपसमज कोणी करून घेऊ नये. हा आपल्या चुकांचा परिणाम आहे. काश्मीर खोर्‍यातील सध्याच्या राजकीय स्थितीसाठी आणि अशांततेसाठी केवळ पाकिस्तानला उत्तरदायी धरणे म्हणजे सत्य स्थितीचे वर्णन चुकीच्या पद्धतीने केल्यासारखे होईल, असे वक्तव्य जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी केले आहे. काही दिवसांपूर्वी ओमर यांचे वडील फारूख अब्दुल्ला यांनी पाकव्याप्त काश्मीर भारताच्या बापाचे नाही, असे विधान केले होते. 
        ओमर अब्दुल्ला पुढे म्हणाले की, नवी देहलीत आलेल्या सरकारांनी दिलेली आश्‍वासने पूर्णत्वास नेली नाहीत. हीच अपूर्ण आश्‍वासने जम्मू-काश्मीरमधील स्थितीसाठी कारणीभूत आहेत. आज परिस्थिती कित्येक पटींनी बिघडली आहे; कारण केंद्रातील विद्यमान सरकारला काश्मीरमध्ये कोणतीही समस्या आहे, असे वाटतच नाही. 

तुर्कस्थानमधील गावात झालेल्या उल्कापाताने गावकरी श्रीमंत झाले !

व्हॉट्सऍप इत्यादी सामाजिक संकेतस्थळावर ‘स्टोन रेन’ या नावाने ‘व्हिडिओ’ व्हायरल !
     अंकारा (तुर्कस्थान) - सध्या व्हॉट्सऍप, ट्विटर, यू ट्यूब इत्यादी सामाजिक संकेतस्थळांवर तुर्कस्थानमध्ये ‘स्टोन रेन’ अर्थात् दगडांचा पाऊस झाला, या घटनेचा ‘व्हिडिओ’ ‘व्हायरल’ (मोठ्या प्रमाणात प्रसारित) होत आहे. प्रत्यक्षात या घटनेला ‘स्टोन रेन’ असे न म्हणता वैज्ञानिकदृष्ट्या याचे कारण वेगळे आहे. २ सप्टेंबर २०१५ या दिवशी आकाशात झालेल्या उल्कापाताचे लहान मोठे तुकडे तुर्कस्थानमधील बिंगोल राज्यात वसलेल्या सारीसिसेक या छोट्याशा गावात पडले होते. या उल्कापातातून पडलेल्या तुकड्यांना सोन्याचा भाव आला असून अनेक गावकर्‍यांचे दारिद्य्र कायमचे दूर झाले. सदर व्हिडिओ हा त्याच घटनेचा आहे.

१५ कोटी थकवूनही महापालिका रिलायन्सला कामे देत असल्यामुळे मनसेची आंदोलनाची चेतावणी

महापालिका प्रशासन कोट्यवधींच्या 
वसुली प्रकरणी काय कृती करणार ?
       कल्याण, ४ डिसेंबर - अवघ्या काही सहस्रोंच्या थकबाकीसाठी सर्वसामान्यांकडून कायद्याचा बडगा उगारत वसुली केली जात असतांना दुसरीकडे १५ कोटी रुपये थकवूनही रिलायन्स आस्थापनाला मात्र महापालिका आयुक्त पाठीशी घालत असल्याचा गंभीर आरोप मनसे उपाध्यक्ष श्री. राजेश कदम यांनी केला आहे. तसेच लवकरात लवकर ही वसुली न झाल्यास त्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याची चेतावणीही मनसेने दिली आहे. या संदर्भात राजेश कदम यांनी महापालिका आयुक्तांना एक निवेदन दिले आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात रिलायन्स आस्थापनाच्या वतीने २०१३ पासून केबल टाकण्याचे काम चालू आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या अनुमतीने हे काम केले जात आहे; मात्र आस्थापनाने अनुमती घेतल्यापेक्षा अधिक ठिकाणी काम केल्याचे निदर्शनास आल्याने महापालिकेने त्यांना १२ कोटी ५८ लाख रुपयांचा दंड आकारला असून त्याच्या वसुलीपूर्वी अन्य नवीन कामेही आस्थापनाला देण्यात आली आहेत, अशी माहिती श्री. कदम यांनी दिली. 

काश्मीर भारताचा अविभाज्य भाग हे शाश्‍वत सत्य ! - पंचखंड पीठाधीश्‍वर आचार्य धर्मेंद्रजी महाराज

     पुणे, ४ डिसेंबर - काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असून तेच शाश्‍वत सत्य आहे, हे पाकिस्तानसह देशविरोधी भूमिका मांडणार्‍या तथाकथित नेत्यांनी लक्षात घ्यावे, असे स्पष्ट प्रतिपादन राजस्थान येथील पंचखंड पीठाधीश्‍वर समर्थ गुरुपाद आचार्य स्वामी श्री धर्मेंद्रजी महाराज यांनी केले. 
    विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे आणि संतश्री ज्ञानेश्‍वर-संतश्री तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमाला न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने युनेस्को अध्यासनांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या २१ व्या तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्‍वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमालेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. माईर्स एम्आयटीच्या संत ज्ञानेश्‍वर सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमाला माईर्स एम्आयटीचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. विश्‍वनाथ कराड, डॉ. संजय उपाध्ये आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीवर प्रशासक नेमावा, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आमदारांना निवेदन !

निवेदन स्वीकारतांना शिवसेनेचे उरण
विधानपरिषदचे आमदार मनोहरशेठ भोईर (डावीकडे)

      उरण - आगामी हिवाळी आधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उरण येथील आमदार श्री. मनोहरशेठ भोईर आणि महाड येथील आमदार श्री. भरतशेठ गोगावले यांना कोट्यवधी रुपयांच्या देशी-विदेशी देणग्या घेऊन घोटाळे करणार्‍या अंधश्रद्धा निर्मूलन समितीवर प्रशासक नेमावा, याविषयाचे निवेदन देण्यात आले. या वेळी उरण येथे हिंदु जनजागृती समितीचे श्री. योगेश ठाकूर आणि श्री. महादेव ठाकूर हे उपस्थित होते, तर महाड येथे श्री. सुरेश पुरोहित यांनी हे निवेदन दिले. या वेळी दोन्ही आमदारांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

आम्ही आतंकवादी आणि त्यांना साहाय्य करणार्‍यांच्याही विरोधात ! - नरेंद्र मोदी

नुसते विरोधात असून काय उपयोग ? 
ठोस कारवाई करून आतंकवादी आणि त्यांना 
साहाय्य करणार्‍यांना कठोर शासन करायला हवे !
        अमृतसर - आम्ही केवळ आतंकवाद्यांच्या विरोधात नाही, तर त्यांना साहाय्य करणार्‍यांच्या किंवा आश्रय देणार्‍यांच्याही विरोधात आहोत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे केले. येथे ३ डिसेंबरपासून चालू झालेल्या हार्ट ऑफ एशिया परिषदेच्या दुसर्‍या दिवशी ते बोलत होते. आतंकवाद संपवण्यासाठी ठोस पावले उचलणे आवश्यक आहे. अफगाणिस्तान आणि इतर देशांमधील संपर्क वाढवा, असे आवाहनही त्यांनी परिषदेत सहभागी झालेल्या देशांना केले. (अन्य देशांना आवाहन करण्यापूर्वी आपण त्यासाठी काय प्रयत्न केले आहेत आणि त्याला किती यश मिळाले आहे, हेही सांगितले पाहिजे ! गेल्या काही दिवसांत आतंकवाद्यांच्या आक्रमणात भारताचे सैनिक हुतात्मा होत आहेत त्याला कधी आणि कसे रोखणार ? - संपादक)

कॅशलेस कारभारासाठी बेस्टच्या नव्या अ‍ॅपला १० डिसेंबरपासून प्रारंभ !

      मुंबई, ४ डिसेंबर - सर्वत्र कॅशलेस कारभार करण्याविषयीच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमा(बेस्ट)ने प्रवासी आणि वीज ग्राहकांसाठी २ नवीन अ‍ॅप्स निर्माण केल्याची घोषणा केली आहे. प्रवाशांच्या सुविधेसाठी बनवण्यात आलेल्या अ‍ॅपद्वारे प्रवासाचे तिकीट आणि मासिक बसपासचे नूतनीकरण करता येणे सहज शक्य होणार आहे. या अ‍ॅपमध्ये बस क्रमांक आणि प्रवासाचे ठिकाण यांची निवड केल्यानंतर प्रवाशाला एक सांकेतिक क्रमांक प्राप्त होईल. या सांकेतिक क्रमांकाच्या आधारे बसवाहकाकडे असणार्‍या तिकीट यंत्राच्याद्वारे प्रवाशाला तिकीट घेता येईल. हे अ‍ॅप १० डिसेंबरपासून कोणालाही भ्रमणभाषवर विनामूल्य घेता येईल. 

भारताला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी संस्कृतीचे आचरण करा ! - प्रवीण नाईक, हिंदु जनजागृती समिती

संविधान दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रम 
मार्गदर्शन करतांना श्री. प्रवीण नाईक
      पुणे, ४ डिसेंबर (वार्ता.) - जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतामध्ये युवकांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे समाजाला पुढे नेण्याचे दायित्वही त्यांच्याकडेच आहे. यासाठी युवकांनी भारतीय संस्कृतीचा अंगीकार करायला हवा. पाश्‍चात्त्य नव्हे, तर भारतीय संस्कृतीच मनुष्याला आनंद मिळवून देऊ शकते. युवकांमध्ये भारताला पुनर्वैभव प्राप्त करून देण्याची क्षमता आहे, हे लक्षात घेऊन युवकांनी भारतीय संस्कृतीनुसार आचरण करायला हवे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रवीण नाईक यांनी केले. वडगाव बुद्रुक येथील ‘सिंहगड कॉलेज ऑफ फार्मसी’ मध्ये २ डिसेंबर या दिवशी संविधान दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी ‘सिंहगड कॉलेज ऑफ फार्मसी’चे प्राचार्य डॉ. गुजर, ‘सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटीकल सायन्सेस’चे प्राचार्य डॉ. काणे, प्राध्यापक हेमंत रणपिसे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. कृष्णाजी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील १०० हून अधिक विद्यार्थी, तसेच शिक्षक उपस्थित होते.

युती असो, वा नसो मुंबई महानगरपालिकेवर भगवाच फडकणार - उद्धव ठाकरे

       मुंबई, ४ डिसेंबर (वार्ता.) - येत्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप यांची युती असो अथवा नसो मुंबई महानगरपालिकेवर भगवाच फडकणार, असा विश्‍वास शिवसेनेचे पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. शिवसेनेचे शाखाप्रमुख आणि विभागप्रमुख यांच्या बैठकीत श्री. ठाकरे बोलत होते. मुंबईचा भावी महापौर शिवसेनेचाच असेल, असा विश्‍वास शिवसेनेचे खासदार श्री. संजय राऊत यांनीही एका वृत्तवाहिनीवरील मुलाखतीत व्यक्त केला.

हुतात्मा सैनिकांच्या कुटुंबियांना देण्यात येणार्‍या आर्थिक साहाय्यात वाढ करणार !

राज्य शासनाचा निर्णय
      मुंबई, ४ डिसेंबर (वार्ता.) - राज्य शासनाने हुतात्मा सैनिक आणि निमलष्करी सैनिक यांच्या कुटुंबियांना देण्यात येणार्‍या आर्थिक साहाय्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी हुतात्मा सैनिकांच्या कुटुंबियांना ५ लक्ष रुपये आर्थिक साहाय्य देण्यात यायचे. वर्ष २०१६-१७ वर्षामध्ये ते ८ लक्ष रुपये इतके करण्यात आले आहे. वर्ष २०१७ नंतर प्रत्येक वर्षी या रकमेमध्ये ५० सहस्र रुपयांची वाढ केली जाणार आहे. ही रक्कम हुतात्मा सैनिकांची पत्नी, आई-वडील यांना विभागून दिली जाणार आहे. सैनिकाला अपंगत्व आल्यास सध्या 
      १ ते ३ लक्ष रुपये एवढे आर्थिक साहाय्य दिले जाते. यात वाढ करून ती रक्कम सवा ते ४ लक्ष रुपये इतकी करण्यात आली आहे. वर्ष २०१७ पासून प्रतिवर्षी या आर्थिक साहाय्यामध्ये ५० सहस्र रुपये इतकी वाढ करण्यात येणार आहे. नोटाबंदी, शेतकर्‍यांच्या आत्महत्या आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न यांवरून सरकारची कोंडी करणार ! - धनंजय मुंडे

स्वतःच्या सत्ताकाळात कोणत्याही समस्या सोडवू न शकलेल्या विरोधकांची पोपटपंची !
      नागपूर, ४ डिसेंबर (वार्ता.) - नोटाबंदी, शेतकर्‍यांच्या आत्महत्या आणि ढासळती कायदा आणि सुव्यवस्था यांवरून सरकारची ५ डिसेंबरपासून चालू होणार्‍या हिवाळी अधिवेशनात कोंडी करणार आहोत. राज्यातील हे महत्त्वाचे प्रश्‍न सरकार सोडवू न शकल्याने सत्ताधारी पक्षाने आयोजित केलेल्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार घातल्याचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी सांगितले. राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्षांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे राधाकृष्ण विखे-पाटील, शेकापचे आमदार जयंत पाटील, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे प्रा. जोगेंद्र कवाडे यांसह अनेक आमदार उपस्थित होते.

पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिराच्या दानपेटीत ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या नोटांच्या संख्येत अचानक वाढ !

श्री विठ्ठल मंदिराच्या दानपेटीत नोटांची अफरातफर ?
पंढरपूर, ४ डिसेंबर - केंद्र सरकारनेे चलनातील ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या नोटांवर बंदी घातल्याच्या दुसर्‍याच दिवसापासून पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिराच्या दानपेटीत या नोटांची मोठ्या प्रमाणात अचानकपणे वाढ झाल्याचे दिसून आले आहे. या संदर्भात आयकर विभागाने ८ नोव्हेंबरपासून मंदिर समितीचा आर्थिक ताळेबंद मागवला आहे, तर ताळेबंद सादर करण्यासाठी मंदिर समितीने मुदतवाढीची मागणी केली आहे. या संदर्भात अर्पण पेटीतील नोटांची फेरफार केल्याचा आयकर विभागाला संशय आहे.

शंकराचार्य अशी उपाधी धारण करून हिंदूंची दिशाभूल करणार्‍या भोंदू शंकराचार्यांपासून सावधान !

       शांती, मानवता आणि सुधारण्याची प्रक्रिया (पीस, ह्युमॅनिटी अ‍ॅण्ड रिफॉर्मेशन) या विषयावर ४ डिसेंबर या दिवशी नवी मुंबईतील नेरूळ येथे एका धर्मद्रोही परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत सामाजिक गैरसमजुतींचे निर्मूलन, संत तुकाराम महाराज आणि इस्लाम आणि शांती आणि मानवता यांत धर्माची भूमिका या विषयांवर अनुक्रमे डॉ. राम पुनियानी, डॉ. रफीक पारनेकर (इस्लामिक मराठी पब्लिकेशन ट्रस्ट), श्री स्वामी लक्ष्मी शंकराचार्य (लक्ष्मणपुरी) हे मार्गदर्शन करणार आहेत. 
      हिंदु धर्म परंपरेनुसार शंकराचार्यांची केवळ चार पीठे आहेत. तरीही सध्या स्वत:च्या नावासमोर शंकराचार्य अशी उपाधी लावून हिंदूंची दिशाभूल करण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. शंकराचार्य अशी उपाधी लावून धर्मद्रोह्यांच्या परिषदांना उपस्थित रहाणार्‍या अशा स्वयंघोषित शंकराचार्यांपासून हिंदूंनी सावध रहावे. शंकराचार्य या उपाधीप्रमाणे उद्या कोणी स्वत:च्या नावासमोर पैगंबर, महात्मा, पंडित अशा उपाध्या लावल्या, तर चालेल का ?

प्रतापगडावर शिवप्रतापदिनासाठी उपस्थित रहाण्यास जिल्हाबंदी करू नये ! - नितीन शिंदे, शिवप्रतापभूमी मुक्ती आंदोलनाचे निमंत्रक

भाजप शासनाच्या काळात शिवभक्तांना प्रतापगडावर
उपस्थित रहाण्यास बंदी करण्यात येते, हे अपेक्षित नाही !
      सांगली, ४ डिसेंबर (वार्ता.) - शिवप्रतापदिनाच्या दिवशी प्रतापगडावर होणार्‍या शिवप्रतापदिन उत्सव सोहळ्यास उपस्थित रहाण्यास सातारा जिल्हा बंदी का करू नये, अशा आशयाची नोटीस सातारा जिल्हाधिकार्‍यांनी मला बजावली आहे. या संदर्भात माझ्यासह समस्त शिवप्रेमींनी सातारा येथे जाऊन खुलासा दिला आहे. माझ्यासारख्या शिवभक्ताला प्रतापगडावर शिवप्रताप दिनासाठी उपस्थित रहाण्यास जिल्हाबंदी करू नये, अशा मागणीचे पत्र मी प्रशासनाला दिले आहे, अशी माहिती शिवप्रतापभूमी मुक्ती आंदोलनाचे निमंत्रक श्री. नितीन शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

देवद (पनवेल) येथील सनातन संस्थेच्या आश्रमात हरिनाम दिंडीचे आगमन !

विणेला हार घालतांना श्री. विनायक आगवेकर
       देवद (पनवेल), ४ डिसेंबर (वार्ता.) - ज्ञानोबामाऊली-तुकारामच्या गजरात येथील ग्रामस्थ मंडळाच्या हरिनाम दिंडीचे वाजतगाजत आगमन झाले. मंडळाच्या वतीने हरिनाम सत्संग सोहळा आयोजित करण्यात आला असून त्याचे यंदाचे १२ वेे वर्ष आहे. त्या अनुषंगाने प्रतीवर्षीप्रमाणे यंदाही दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.
       दिंडीचे आश्रमात आगमन झाल्यावर विणेकरींचे औक्षण आणि पाद्यपूजन आश्रमातील साधक श्री. विनायक आगवेकर यांनी केले, तर विणेकरींच्या समवेत तुळशीवृंदावन डोक्यावर घेऊन आलेल्या स्त्रियांचे सौ. श्रद्धा निंबाळकर यांनी औक्षण केले. या वेळी ह.भ.प. गणेश महाराज, देवद येथील ह.भ.प. परशुराम वाघमारे, ह.भ.प. महादू वाघमारे, ह.भ.प. रामभाऊ वाघमारे आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते. दिंडीत महिला आणि लहान मुलेही सहभागी झाली होती. या वेळी ह.भ.प. गणेश महाराज यांच्या वतीने आश्रमाकडून देण्यात आलेला प्रसाद आणि दैनिक सनातन प्रभात आकुर्लीचे ह.भ.प. बामा महाराज भोपी यांनी स्वीकारले.

परभणीमध्ये धर्मांधांकडून युवतीवर बलात्कार !

      सेलू, ४ डिसेंबर (जिल्हा परभणी) - सरपण आणण्यासाठी शेतात गेलेल्या युवतीचे अपहरण करून २ धर्मांध युवकांनी तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. अफसर पठाण आणि नासेर लाला अशी धर्मांधांची नावे आहेत. या दोघांनीही बळजोरीने युवतीला दुचाकी वाहनावर बसवून तिला पळवून नेले आणि नंतर तिच्यावर बलात्कार केला. या युवतीने नंतर घरी येऊन सर्व प्रकार आईला सांगितल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले आहे. स्थानिक पोलिसांनी अफसर पठाणला अटक केली असून नासेर लाला अद्याप फरार आहे. (लव्ह जिहादला प्रत्युत्तर देण्यासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेणे आवश्यक ! - संपादक)

नोटाबंदीच्या समर्थनार्थ पुण्यात भव्य मोर्चा !

       पुणे, ४ डिसेंबर - भ्रष्टाचार आणि काळे धन यांना आळा घालण्यासाठी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या नोटा चलनातून रहित करण्याचा मोठा निर्णय घेतला. या निर्णयाचे स्वागत करण्यासाठी ४ डिसेंबर या दिवशी डेक्कन येथील धर्मवीर संभाजी महाराजांच्या पुतळ्यापासून स.प. महाविद्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. भाजपचे खासदार संजय काकडे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्च्यामध्ये सहस्रो नागरिक सहभागी झाले होते. यामध्ये महिलांचा सहभागही लक्षणीय होता.

कॅशलेस अर्थव्यवस्था म्हणजे अल्प वेळेत भरपूर काही साध्य करायला बघण्यासारखे - अदि गोदरेज

       मुंबई, ४ डिसेंबर (वार्ता.) - केंद्र शासनाने घेतलेला नोटाबंदीचा निर्णय हा देशासाठी मध्यम ते दीर्घ काळ लाभदायी ठरेल; मात्र कॅशलेस अर्थव्यवस्था म्हणूजे अल्प वळेत भरपूर काही साध्य करायला बघण्यासारखे आहे, असे मत प्रसिद्ध उद्योगपती अदि गोदरेज यांनी व्यक्त केले. दि इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, भारतात विशेषत: ग्रामीण भागाचा विचार करता मला कॅशलेस अर्थव्यवस्था आणणे अवघड वाटत आहे.

२० आणि ५० रुपयांच्या नव्या नोटा येणार !

       मुंबई - लवकरच २० आणि ५० रुपयांची नवी नोट दाखल होणार आहे. बाजारात नव्या नोटा येणार असल्या, तरी जुन्या नोटा चालणार असल्याची माहिती रिझर्व्ह बँकेने दिली आहे. 

३१ डिसेंबर या दिवशी एकही अपप्रकार घडू देणार नाही ! - सुनील गोडसे, पोलीस निरीक्षक, मंचर

ख्रिस्ती नववर्षाच्या पार्श्‍वभूमीवर होणारे अपप्रकार रोखण्यासाठी पुणे पोलिसांना निवेदने 
पुणे ग्रामीण (अभिरूची) पोलीस ठाण्याचे ठाणे अंमलदार
बाळासाहेब जगताप(उजवीकडे) यांना निवेदन देतांना धर्माभिमानी
सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे (सनसिटी) पोलीस नाईक
किरण देशमुख (डावीकडे) यांना निवेदन देतांना धर्माभिमानी

‘श्री ज्ञानेश्‍वरी’ची ४२५ वर्षांपूर्वीची मराठी हस्तलिखितातील दुर्मिळ प्रत उपलब्ध !

     पुणे, ४ डिसेंबर - संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्‍वर महाराज यांची सेवा करण्याच्या उद्देशातून पंढरपूर येथील प्रल्हाद महाराज बडवे यांचे होळकर संस्थानातील शिष्य रामजी यांनी ‘श्री ज्ञानेश्‍वरी’ लिहिली होती. ४२५ वर्षांपूर्वीची मराठी हस्तलिखितातील ही दुर्मिळ प्रत येथील डेक्कन महाविद्यालयातील अमेरिकन इन्स्टिट्यूटच्या मराठी हस्तलिखित केंद्रात उपलब्ध झाल्याची माहिती जुन्या हस्तलिखितांचे अभ्यासक वा. ल. मंजूळ यांनी दिली.
वा. ल. मंजूळ पुढे म्हणाले की...
१. रामजी यांनी संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वरांची सेवा म्हणून ज्ञानेश्‍वरी लिहिली आहे. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्‍वर महाराज यांच्या ज्ञानेश्‍वरीनंतर लिहिलेली ही पहिलीच हस्तलिखित प्रत आहे. रामजी यांचा कालखंड हा नाथकालीन आहे. संत एकनाथ महाराज यांच्या काळातच ही प्रत लिहिली जाण्याचा योग साधला गेला आहे.

मुंबईमध्ये २ मासांत वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणार्‍या १ लक्ष १० सहस्रांहून अधिक वाहनचालकांवर कारवाई

गुन्हेगारी प्रवृत्ती रोखण्यासाठी नीतीमत्तेचे शिक्षण देणे, हाच एकमेव उपाय !
      मुंबई, ४ डिसेंबर (वार्ता.) - वाहतूक नियमनाकरिता शहरातील ‘सिग्नल्स’वर आतापर्यंत ४ सहस्र ७१७ ‘सीसीटीव्ही कॅमेरे’ बसवण्यात आले आहेत. यामुळे वाहतुकीचे नियम मोडणार्‍या वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करणे, पोलिसांना सुलभ झाले आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या २ मासांत वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणार्‍या १ लक्ष १० सहस्रांहून अधिक वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे.
    लाल सिग्नल असतांना वाहन पुढे नेणे, झेब्रा पट्टे ओलांडून वाहन पुढे थांबवणे, दुचाकी चालवतांना शिरस्त्राणाचा वापर न करणे, वाहनाच्या क्षमतेपेक्षा अधिक माणसे वाहनात बसवणे, वाहन चालवतांना भ्रमणभाषवर बोलणे, तसेच चारचाकी वाहन चालवतांना आसनपट्टा न लावणे यांसारखे नियमबाह्य वर्तन करणार्‍या वाहनचालकांच्या वाहनांचे क्रमांक त्या नियंत्रण कक्षात असणार्‍या वाहतूक पोलिसांकडून ‘सीसीटीव्ही’मध्ये मुद्रित केले जातात. त्याच वेळी वाहनचालकाच्या भ्रमणभाषवर दंडात्मक कारवाईचा लघुसंदेश पाठवला जातो. नियम मोडणार्‍या वाहनचालकाकडून ई-चलनाद्वारे दंड आकारला जातो.

जनतेला न्याय देण्यासाठी आम्ही सज्ज आहोत ! - मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस

नागपूर येथे आजपासून राज्य हिवाळी अधिवेशनास प्रारंभ
       नागपूर - हिवाळी अधिवेशनाच्या कालावधीत राज्य शासनाच्या वतीने सर्वच प्रश्‍नांवर गांभीर्याने चर्चा केली जाईल. जनतेला न्याय देण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. राज्याला पुढे नेण्यासाठी सहकार्य करावे, अशी विरोध पक्षालाही विनंती करतो. प्रत्येकच प्रश्‍न राज्यासमोरील महत्त्वाचा प्रश्‍न समजून तो सोडवण्यासाठी चर्चा आणि विचारविनीमय सर्व पक्षांकडून करण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी केले. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले...

दादर (पूर्व) येथे संतोषीमातेच्या ४२ वर्षे जुन्या मंदिरावर प्रशासनाकडून कारवाई

सर्वोच्च न्यायालयाने मशिदींवरील अनधिकृत भोंगे हटवण्याचेही 
आदेश दिले आहेत. प्रशासन न्यायालयाच्या या आदेशाचे पालन कधी करणार ?
      दादर पूर्व, मुंबई, ४ डिसेंबर (वार्ता.) - प्रशासनाकडून येथील संतोषीमातेचे ४२ वर्षेे जुने मंदिर २ डिसेंबरला पाडण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेच्या एफ् नॉर्थ विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. प्रशासनाच्या या कारवाईचा सर्व भाविकांनी निषेध केला असून मंदिर पाडण्यात आलेल्या ठिकाणी निषेधाचा फलक लावण्यात आला आहे. (महापालिकेने अनधिकृत ठरवलेल्या बांधकामांमध्ये एक मशीद आणि दर्गा यांचाही समावेश आहे. प्रशासन त्यांच्यावर कारवाई केव्हा करणार ? - संपादक)

भाजपच्या मुंबई प्रदेश उपाध्यक्षाच्या आस्थापनाने १ कोटी रुपयांचा कर चुकवला !

       मुंबई - भाजप मुंबई प्रदेश उपाध्यक्ष मिहीर कोटेचा यांच्या आस्थापनाने १ कोटी रुपयांचा कर चुकवल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे. या प्रकरणी सेवा कर विभागाने या नेत्याच्या आस्थापनात छापेमारी केली असून अधिक तपास चालू आहे. कोटेचा यांचे चांदीवली येथे इंटीग्रिटी लॉजिस्टीक सोल्यूशन नावाचे आस्थापन आहे. या आस्थापनावर पुण्याच्या सेवा कर विभागाने छापेमारी केली असता ही धक्कादायक माहिती पुढे आली. या कंपनीने एप्रिल २०१४ ते मार्च २०१५ या काळात कर चुकवल्याचे समोर आले आहे.

ताई ओरडली म्हणून अल्पवयीन मुलीची आत्महत्या

       मुंबई, ४ डिसेंबर (वार्ता.) - ताई आरेडली म्हणून २ डिसेंबरच्या रात्री भांडुप येथील १७ वर्षांच्या मुलीने रहात्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. ज्योती भोसले असे आत्महत्या करणार्‍या मुलीचे नाव आहे. घरात कुणी नसतांना रात्री ८.३० वाजता तिने गळफास लावला. त्यांनतर त्वरित रुग्णालयात प्रविष्ट केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

६० वर्षे सत्तेत असूनही देशापुढील भयावह समस्यांना आळा घालू न शकणारे नारायण राणे म्हणतात, (म्हणे) ‘अच्छे दिन’ आणण्याची शक्ती काँग्रेसमध्येच !

     पुणे - अच्छे दिन आणण्याची शक्ती केवळ काँग्रेसमध्येच आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी केले. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने २ ते ९ डिसेंबर या काळात पुण्यात सेवा-त्याग-कर्तव्य या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या प्रसंगी नोटाबंदीवरही त्यांनी टीका केली.

बनावट मद्य बनवणारी टोळी गजाआड !

     मुंबई, ४ डिसेंबर - नामांकित आस्थापनांच्या मद्याच्या बाटल्यांमध्ये हलक्या प्रतीचे मद्य भरून ते विकणार्‍या टोळीला पकडण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांना यश आले आहे. ना.म.जोशी मार्गावरील मोगल हाऊस या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर रिकाम्या ‘स्कॉच’च्या बाटल्यांमध्ये हलक्या प्रतीचे मद्य भरले जाऊन ते विकण्यात येत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे राज्य उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पोलिसांच्या साहाय्याने या ठिकाणी धडक कारवाई केली. 
     या वेळी नामांकित मद्य आस्थापनांचे वेष्टन असलेल्या बाटल्या, २ चारचाकी वाहने, मद्य बनवण्याचे साहित्य तसेच अनुमाने १४ लक्ष रुपये किमतीचे भारतीय आणि विदेशी मद्य जप्त करण्यात आले. या प्रकरणी ४ जणांना पोलिसांनी कह्यात घेतले आहे.

श्रीशिवप्रतापदिनाचे औचित्य साधून लावलेल्या प्रदर्शनास चांगला प्रतिसाद !

      बोरगाव (जिल्हा सांगली), ४ डिसेंबर (वार्ता.) - तासगाव तालुक्यातील बोरगाव येेथे श्रीशिवप्रतापदिनाचे औचित्य साधून हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री सिद्धेश्‍वर मंदिर येथे क्रांतीकारकांची शौर्यगाथा हे फ्लेक्सचे प्रदर्शन लावण्यात आले होते. हे प्रदर्शन बोरगाव येथील धर्मशिक्षण वर्गात येणार्‍या हिंदु धर्माभिमान्यांनी पुढाकार घेऊन लावले. याचा लाभ ७० जिज्ञासू आणि शाळेतील ४५ विद्यार्थ्यांनी घेतला. परिसरात असलेल्या शाळेतील शिक्षकांनाही विद्यार्थ्यांना आवर्जून प्रदर्शन पहाण्यास सांगितले. प्रदर्शन लावण्यात हिंदु धर्माभिमानी सर्वश्री हैबतराव पाटील, अनिल पवार, प्रदीप पाटील, राजेंद्र पाटील, भीमराव हजारे, जयसिंग गायकवाड यांनी पुढाकार घेतला.
क्षणचित्रे 
१. काही जिज्ञासूंनी प्रदर्शनातील माहिती घेऊन धर्मशिक्षणवर्गात येण्याची सिद्धता दर्शवली. 
२. विद्यार्थ्यांनी ‘धर्मशिक्षण घेण्यासाठी प्रत्येक रविवारी एक घंटा एकत्र येऊ’, असे सांगितले.
३. प्रदर्शन पाहून एका विद्यालयाने त्यांच्या शाळेत प्रदर्शन लावण्याची मागणी केली.

बोरिवली येथील देवांग भट्ट यांनी चायना प्रॉडक्ट एक्झिबिशन २०१६ प्रदर्शनाच्या विरोधात प्रबोधन करून दर्शवले राष्ट्रप्रेम !

श्री. देवांग भट्ट
      १५ ते १७ नोव्हेंबर या कालावधीत गोरेगाव (मुंबई) येथे चायना प्रॉडक्ट एक्झिबिशन २०१६ हे चिनी वस्तूंचे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन झाले. शत्रूराष्ट्र पाकिस्तानला साहाय्य करणार्‍या चीनची उत्पादने कुणी विकत घेऊ नये, या राष्ट्रीयत्त्वाच्या भावनेने बारिवली येथील हिंदु जनजागृती समितीच्या धर्मशिक्षणवर्गात येणारे धर्माभिमानी श्री. देवांग भट्ट यांनी प्रदर्शनाला येणार्‍यांचे प्रबोधन करून राष्ट्रप्रेम दर्शवले. श्री. देवांग भट्ट यांनी प्रदर्शनाला येणार्‍यांना खालील प्रश्‍न विचारले 
१. अझर मसूद हा कोण आहे?
२. अझर मसूदला आतंकवादी घोषित करण्यास विरोध कुणी केला ?
३. चीनने बनवलेल्या वस्तू विकत घेणार का ? 
       श्री. देवांग भट्ट यांनी विचारलेल्या या प्रश्‍नांमुळे प्रदर्शनाला येणार्‍यांना चीनच्या भारतविरोधी भूमिकेचे खरे स्वरूप लक्षात आले. त्यामुळे अनेकजण चिनी वस्तू घेण्यापासून परावृत्त झाले.
       (श्री. देवांग भट्ट यांच्याप्रमाणे देशातील प्रत्येक नागरिकाने राष्ट्रप्रेम दाखवले, तर जगात भारताची प्रतिमा उंचावल्याविना रहाणार नाही. श्री. देवांग यांचा आदर्श देशातील सर्व नागरिकांनी घ्यावा. - संपादक)

सुसंघटित आणि सामर्थ्यशाली रहा हे महर्षि महायोगी अरविंद घोष यांचे बोधवाक्य आपल्याला सदैव अन् सतत ध्यानात ठेवणे अत्यावश्यक !

आज असलेल्या योगी अरविंद 
यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने...
       महर्षि अरविंद यांचे हे मत आपल्या समस्त हिंदु बांधवांनी मनावर घेतले असते, तर आज आमच्या या भारताला सर्वच बाजूंनी छळणारा जिहादी आतंकवाद आणि त्यांचा हिंसाचार यांची भीषण समस्या उद्भवलीच नसती. सुसंघटित आणि सामर्थ्यशील अशा हिंदु समाजाला आघात पोहोचवण्यास्तव या जिहाद्यांना दहादा विचार करावा लागला असता. 
       सुसंघटित आणि सामर्थ्यशालीच रहा हे महर्षि महायोगी अरविंद घोष यांचे बोधवाक्य आपल्याला सदैव अन् सतत ध्यानात ठेवणे अत्यावश्यकच आहे.
- वसंत अण्णाजी वैद्य (मासिक धनुर्धारी, ऑगस्ट २०१०)

समान नागरी कायदा हा घटनात्मक मूल्यांसाठी !

       भारताने संविधान स्वीकारून ६७ वर्षे झाली. संविधान स्वीकारण्यापूर्वीच्या काळात ‘समान नागरी कायदा’ या विषयावर चर्चा करतांना वादविवादांमुळे हा विषय न टाळता तो संविधानाच्या चौथ्या भागातील कलम ४४ मध्ये समाविष्ट करून, या विषयावर जनमत तयार करून त्याच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा करण्यात आली. या विषयावर सर्वप्रथम विरोध संघ परिवाराने केला, कारण समान नागरी कायदा म्हणजे समान नागरिकत्व ! संघाला मुसलमानांना समान नागरिकत्व नाकारायचे होते. धर्माच्या नावाने पाकिस्तान निर्माण करण्यात आले होते. समाजवादी नेते राममनोहर लोहिया यांनी चौखंबामध्ये समान नागरी कायद्याची मागणी करणारा लेख प्रथम लिहिला.

अशी मागणी का करावी लागते ? सरकार स्वत:हून कृती का करत नाही ?

      यू-ट्यूब या संकेतस्थळावरील चित्रफीतीमध्ये पंतप्रधान श्री. मोदी यांना अश्‍लील शिव्या देणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन वीर लहुजी सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. हनुमंत मोहिते यांनी सायबर गुन्हे शाखेचे विभागीय पोलीस आयुक्त यांना दिले. 

हे कसले सरकारचे नियोजन ?

      देशातील चारही चलन निर्मिती केंद्रांनी पूर्ण क्षमतेने नोटा सिद्ध करण्याचे काम केले, तरीही बँकांना आवश्यक तेवढे चलन नजीकच्या काळात उपलब्ध होणे अवघड आहे. त्यामुळे आणखी ४ ते ५ महिने देशात नोटांचा तुटवडा जाणवेल, असे द बँक एम्लॉईज फेडरेशन ऑफ इंडियाने म्हटले आहे. 

भारत वगळून जगभरातील ३९ राष्ट्रांच्या चलनावर गोमातेची प्रतिमा !

जगातील अनेक राष्ट्रांनी त्यांच्या चलनावर गोमातेला स्थान देणे; मात्र गोमातेला अनन्यसाधारण 
महत्त्व असलेल्या भारतातच येथील चलनावर तिला स्थान नसणे भारतियांसाठी लज्जास्पद !
   ‘भारतीय समाजात गोमातेला महत्त्वपूर्ण स्थान आहे; परंतु तिचे छायाचित्र भारतीय चलनावर आजपर्यंत कधी दृष्टीस पडले नाही. तथापि जगभरातील ३९ राष्ट्रांनी गोमातेला चक्क त्यांच्या चलनावर स्थान दिले आहे. एवढेच नव्हे, तर ६ इस्लामी राष्ट्रांच्या चलनावरही गोमातेची सुंदर चित्रे रेखाटण्यात आली आहेत. छत्तीसगड राज्यातील राजनांदगाव येथील रहिवासी असलेले श्री. तेजकरण जैन यांनी ही माहिती दिली.

हिंदूंच्या लहान मुलांच्या जिवाशी खेळणे हे धर्मांधांचे षड्यंत्र ?

       ‘मुले ही देवाघरची फुले’ असे आपण मानतो. लहान मुलांचे मन निर्मळ असल्याने त्यांच्यामध्ये देवाचा अंश अधिक असतो. ती सर्वांनाच हवीहवीशी वाटतात. मुंबईत काही दिवसांपूर्वी घडलेली घटना मात्र माणुसकीला काळीमा फासणारी आहे. खारघर येथे ‘पूर्वा प्ले स्कूल’ या पाळणाघरात १० महिन्यांच्या मुलीला एका महिलेने अमानुषपणे मारहाण केली. ही घटना केवळ निंदनीयच नसून संतापजनक आहे. अफसाना शेख असेे या धर्मांध महिलेचे नाव आहे. ही धर्मांध महिला यापूर्वी ज्या घरात कामाला होती, ते ही एका हिंदूंचेच घर होते. तेथेही घरातील लहान मुलगी फरशीवरून पाय घसरून पडली तेव्हा या महिलेने ‘मुले मरत का नाहीत ?’ असे म्हटले. यानंतर तिला कामावरून काढून टाकले होते.

करणारा आधी बोलत नाही. भारताला अजून डिवचायचे काय राहिले आहे ? हे बोलणे फुकाचे मुखी बोलता काय जाते या संतवचनाप्रमाणे आहे.

       युद्धासाठी आम्ही उतावीळ झालेलो नाही. भारताला युद्ध नको; मात्र आम्हाला कोणी डिवचले, तर शत्रूचे डोळे काढून त्याच्या हातात देऊ. एवढे बळ भारतात आहे. - संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर 

ही जनतेच्या पैशाची उधळपट्टी होय ! स्वत:च्या खाजगी उपक्रमात सरकारमधील एकतरी मंत्री असे करतील का ?

     गोव्यात २२ नागरिकांमागे एक शासकीय कर्मचारी असे प्रमाण असून हे प्रमाण देशातील सर्व राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. राज्याची लोकसंख्या १४ लक्षांहून अधिक असून यामध्ये ६१ सहस्र २५६ शासकीय कर्मचारी आहेत. 

याचा अर्थ मुसलमानांकडे काळा पैसा अधिक आहे, असा होतो !

      मोदी सरकारच्या नोटाबंदी निर्णयाचा सर्वांत अधिक त्रास मुसलमानांना होत आहे. मी देहलीच्या चांदनी चौक परिसरात रहातो आणि तेथे मुसलमानांची संख्या अधिक आहे. 
- खासदार कपिल सिब्बल, काँग्रेस 

ही मागणी का करावी लागते ? सरकारला हे दिसत नाही का ?

     बंगालमध्ये हिंदुविरोधी दंगली करणारे आणि हिंदूंवर अत्याचार करणारे धर्मांध, आतंकवाद आणि धर्मांतराला प्रोत्साहन देणारे आणि धर्मांतर करणारे डॉ. झाकीर नाईक यांच्यावर कठोर कारवाई करावी, देशभरातील पीस स्कूलच्या सर्व विद्यालयांवर बंदी घालावी, या मागणीकरता २४ नोव्हेंबर २०१६ या दिवशी वाराणसी येथील शास्त्रीघाट येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले.

कर्नाटक आणि तमिळनाडू येथील छाप्यातून नव्या नोटांसहित बेहिशोबी १५२ कोटी रुपये जप्त !

असे देशभरात आणखी किती सरकारी अधिकारी आणि कंत्राटदार असतील, याची कल्पना
करता येत नाही, यांची आणि त्यांच्या कुटुंबियांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांना कारागृहात डांबा!
     नवी देहली - आयकर खात्याच्या अधिकार्‍यांनी कर्नाटकमधील २ सरकारी अधिकारी आणि तमिळनाडूतील २ कंत्राटदार यांच्या कार्यालयांवर छापे मारून १५२ कोटी रुपयांची बेहिशोबी संपत्ती जप्त केली आहे. यात ५ कोटी ७० लाख रुपयांच्या नव्या नोटा आहेत. यात २ सहस्र रुपयांच्या नोटांचा समावेश आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या महामार्ग विकास प्रकल्पाचे मुख्य नियोजन अधिकारी एस्.सी. जयचंद्र आणि कावेरी नारीवेरी निगम लि.चे व्यवस्थापकीय संचालक टी.एन्. चिक्कारायप्पा अशी या २ अधिकार्‍यांची नावे आहेत.
      २ दिवसांपूर्वी बेंगळुरू येथील एका अभियंत्याच्या घरातून ५ कोटी रुपये जप्त करण्यात आले होते. यात ४ कोटी ७० लाख रुपयांच्या नव्या २ सहस्र रुपयांच्या नोटा होत्या.


पंतप्रधान मोदी ट्रम्प यांच्यापेक्षा सरस !

पंतप्रधान मोदी यांच्यावर वारंवार खालच्या थराला जाऊन टीका 
करणारा आणि देशद्रोहाचा आरोप असलेला कन्हैयाकुमार याचे वक्तव्य !
      मुंबई, ४ डिसेंबर (वार्ता.) - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी माझे कितीही मतभेद असले, तरी ते अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षा सरस आहेत, असे वक्तव्य जेएन्यू विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैयाकुमार याने केले आहे. ३ डिसेंबरला टाइम्स लिटफेस्ट या कार्यक्रमातील फ्रॉम बिहार टू तिहार या विषयावरील एका सामूहिक चर्चेच्या वेळी कन्हैयाकुमार बोलत होता. काही मासांपूर्वी मुंबईमध्ये एका कार्यक्रमात कन्हैयाकुमार याने पंतप्रधान श्री. मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे आता कन्हैयाकुमार याच्या पालटलेल्या मतांविषयी आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

अंदमान बेटांवर ४.८ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप !

      अंदमान - येथील बेटांना ३ डिसेंबरच्या मध्यरात्री रिश्टर स्केलवर ४.८ क्षमतेच्या भूकंपाचा धक्का जाणवला. भूकंपाचा केंद्रबिंदू भूमीखाली १० कि.मी. खोल होता. भूकंपामुळे अंदमान बेटांवर जीवित अथवा वित्त हानी झाल्याचे वृत्त नाही. अंदमान-निकोबार बेटांचा समूह हा भूकंपप्रवण क्षेत्रात येतो. या भागात लहान, मध्यम आणि मोठ्या स्वरूपाचा भूकंप होऊ शकतो. 
महर्षींनी प्रलयकालाविषयी सतर्क करणे 
      १९.३.२०१६ या दिवशी झालेल्या नाडीवाचन क्रमांक ६७मध्ये महर्षि म्हणतात, हे पूर्ण वर्ष प्रलयकालाचे आणि आपत्तीजनक असणारे आहे. (अंदमान येथील बेटांना ३ डिसेंबरच्या मध्यरात्री रिश्टर स्केलवर ४.८ क्षमतेच्या भूकंपाचा धक्का जाणवला. या घटनेवरून प्रलयकालाविषयी महर्षींनी केलेले भाष्य किती तंतोतंत आहे, हे लक्षात येते ! - संपादक)

भ्रष्टाचाराचा रोग नष्ट होण्यासाठी जनतेच्या निर्धाराची आवश्यकता !

      ‘पदोपदी प्रत्येक कामासाठी लाच घेणारे शासकीय आणि अशासकीय कर्मचारी अन् अधिकारी या रोगाला जेवढे उत्तरदायी आहेत, तेवढीच लाच देऊन काम करून घेणारी जनताही याला उत्तरदायी आहे. ‘काम झाले नाही तरी ठीक; पण मी लाच घेणार नाही’, असा निर्धार जनतेने केल्यास हा रोग क्षणात नष्ट होईल.’ - पुं.बा. मोरजे (भ्रष्टाचार : स्वरूप, कार्यवाही आणि निर्मूलनाचे मार्गे)

करोडपती नेत्यांनी राष्ट्रीय आपत्तींच्यावेळी लोकांकडून साहाय्य मागणे आणि स्वतः मात्र साहाय्य न करणे

     ‘भारतात निवडणुकीला उभ्या रहाणार्‍या एकूण उमेदवारांपैकी जवळपास ३० टक्क्यांहून अधिक उमेदवार करोडपती आहेत. असे असतांना ‘उत्तराखंड प्रलय, ओडिशा आणि आंध्रप्रदेश येथील वादळ, आसाममधील पूर अशा राष्ट्रीय आपत्तींच्या वेळी लोकांकडून साहाय्याची मागणी करणारे हे करोडपती स्वतः किती साहाय्य करतात’, हा चिंतनाचा विषय आहे.’ - एक साधक (१०.१२.२०१३) 
     (‘निवडणुकीच्या वेळी लोकांकडे मतांची भीक मागणारे हे नेते निवडणुकीनंतर मात्र जनतेकडे ढुंकूनही पहात नाहीत. जनतेचा पैसा लुटून श्रीमंत झालेल्या या नेत्यांना राष्ट्रीय आपत्तींच्या वेळी मात्र आपद्ग्रस्तांना साहाय्य करावेसे वाटत नाही. ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्राची (सनातन धर्म राज्याची) स्थापना करणे अपरिहार्य आहे’ - संपादक)स्वच्छ आणि नितळ अंतरंगाचे अन् गुरुकार्याची तीव्र तळमळ असणारे ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे पिंगुळी, कुडाळ येथील रंजन देसाईकाका !

डॉ. संजय सामंत
रंजन रघुनाथ देसाई
     सनातनचे साधक रंजन रघुनाथ देसाई (वय ६१ वर्षे) यांचे २० नोव्हेंबरच्या रात्री १२.१० वाजता हृदयविकाराच्या झटक्याने बांबोळी, गोवा येथील रुग्णालयात देहावसान झाले. त्यांच्याविषयी साधकांनी केलेले लिखाण येथे देत आहोत.
१. वर्ष १९९५ मध्ये देसाईकाकांशी 
ओळख झाल्यावर पुढे त्यांच्या 
स्वभावाचे विविध पैलू उलगडणे 
    ‘१९९५ या वर्षी गुरुपौर्णिमेनंतर सावंतवाडी येथील साधक श्री. आठलेकरकाका यांच्यासमवेत देसाईकाका आमच्या घरी आले होते. जन्मोजन्मीचे ऋणानुबंध असल्याप्रमाणे त्या पहिल्या भेटीतच देसाईकाकांनी मला आपलेसे केले. पुढे सेवेच्या निमित्ताने झालेल्या प्रत्येक भेटीत देसाईकाकांच्या स्वभावाचे ‘प्रचंड उद्यमशीलता, कोकणच्या लाल मातीवर असणारे अतोनात प्रेम, ‘जे ठरवीन, ते करून दाखवीन’ अशा प्रकारची तीव्र जिद्द’, हे नवीन पैलू उलगडू लागले.

सौ. नेहा जोशी यांना प.पू. डॉक्टर आणि श्रीकृष्ण यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती

१. ‘प.पू. डॉक्टर आणि श्रीकृष्ण एकच आहेत’, अशी अनुभूती येणे आणि आनंदात पुष्कळ वाढ होऊन त्यांच्याप्रती भाव वाढणे : ‘प.पू. डॉक्टरांच्या अमृत महोत्सवाच्या काही दिवस आधीपासून मला ‘ते आणि श्रीकृष्ण एकच आहेत’, अशी अनुभूती येत होती. अमृत महोत्सवाच्या दुसर्‍या दिवशी जीवनाडी वाचनाच्या कार्यक्रमात महर्षींनी ‘प.पू. डॉक्टर आणि श्रीविष्णु हे एकच आहेत’, असे सांगितले. वरील अनुभूती बर्‍याचदा येऊ लागल्याने माझ्या आनंदात पुष्कळ वाढ होऊन त्यांच्याप्रती माझा भाव वाढला.
२. श्रीकृष्णाच्या प्रतिमेकडे पहातांना ‘मी त्याच्याकडेच ओढली जात आहे आणि मला त्याचेच वेड लागले आहे’, असे वाटून त्याच्या रूपाकडे मी एकटक बघत असे.
३. स्वयंपाक करतांना माझ्या मनात श्रीकृष्णाविषयीचे विचार आपोआपच चालू झाले. ते विचार थांबतच नव्हते आणि त्यातून पुष्कळ आनंद मिळत होता.’
- सौ. नेहा नागेश जोशी, पुणे

तपोधाम (तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी) परिसरामध्ये ‘शॉर्ट सर्किट’मुळे लागलेली मोठी आग शमण्यासाठी प.पू. पांडे महाराज यांच्या सांगण्यानुसार ६० टक्क्यांपेक्षा अधिक आध्यात्मिक पातळी असलेल्या ४ साधकांनी मंत्रपठण करणे

   ‘२५.११.२०१६ या दिवशी सकाळी ११.४५ वाजता तपोधाम परिसरामध्ये एक-दीड किलोमीटर अंतरावर विद्युत् वाहिनीच्या ‘शॉर्ट सर्किट’मुळे मोठ्या प्रमाणावर आग लागल्याचा निरोप एका साधिकेने प.पू. पांडे महाराज यांना कळवला. त्यानंतर प.पू. पांडे महाराज यांनी सांगितल्यानुसार ६० टक्क्यांपेक्षा अधिक आध्यात्मिक पातळी असलेल्या प्रत्येक साधकाने कोणता मंत्र किती वेळ म्हटला, ते पुढे देत आहे. मंत्रपठण चालू केल्यापासून मंत्रजपाची अपेक्षित संख्या पूर्ण होण्यापूर्वी दुपारी २.१० वाजता तपोधाम परिसरातील आग शमल्याने मंत्रपठण थांबवण्यात आले.
१. श्रीमती सत्यवती दळवी (पातळी : ६७ टक्के)
(दुपारी १२.३० ते दुपारी २.१०) अपेक्षित जपसंख्या : १००८
सौम्यानि यानि रूपाणि त्रैलोक्ये विचरन्ति ते ।
यानि चात्यर्थघोराणि तै रक्षास्मांस्तथा भुवम् ॥ - श्रीदुर्गासप्तशती, अध्याय ४, श्‍लोक २६

मोठे व्यावसायिक असूनही आश्रमात राहून भक्तीभावाने साधना करण्याचा आदर्श ठेवणारे रंजन देसाईकाका !

श्री अभय वर्तक 
      ‘रंजन देसाईकाका माझ्यापेक्षा वयाने मोठे होते. ते मला अगदी मुलाप्रमाणेच वागवायचे. नेहमी काही हवे-नको इत्यादी विचारायचे. काका देवद आश्रमात अनुमाने १२ वर्षांपासून असतील. काकांचा सहवास नेहमी आनंददायी असून हवाहवासा वाटायचा. काका कधीही भेटले की, हातात हात घेऊन बोलायचे. त्यांचे मन अतिशय मृदु, अगदी लहान मुलाप्रमाणे होते. काकांनी मनातून पैशांची निरर्थकता कधीच ओळखली होती; म्हणून काका आश्रमात पूर्णवेळ साधना करू शकले. त्यांच्या देहावसानानंतर माझ्या मनाला ‘ते गेले आहेत’, असे वाटत नाही. त्यामुळे त्यांच्याविषयी पुढील सूत्रे लिहिण्यास मला स्फूर्ती येत नव्हती. तरीही मी देवाला प्रार्थना करून त्यांच्या सहवासातील काही अनुभव लिहीत आहे.

कु. दीपाली मतकर रुग्णाईत असतांना तिला साहाय्य करतांना लक्षात आलेली सूत्रे

कु. दीपाली मतकर
१. दीपालताईला रुग्णालयात नेतांना ‘ती पुष्कळ
अशक्त झाली आहे’, असे वाटणे, रुग्णालयातील आधुनिक
वैद्य न भेटल्याने तिला साधिका-आधुनिक वैद्या
(सौ.) काटोटे यांच्याकडे सलाईन लावणे आणि तिचे रक्त तपासणीसाठी देणे 
    ‘२२.१०.२०१६ या दिवशी सकाळी मला समजले, ‘दीपालीताईला ताप आला आहे आणि तिला घेऊन रुग्णालयात जायचे आहे.’ मी सेवाकेंद्रात गेल्यावर ‘ताई पुष्कळ अशक्त झाली आहे’, असे वाटत होते. आम्ही चारचाकीतून रुग्णालयात गेल्यावर आधुनिक वैद्य गावी गेले असल्याने आमचा एकाही आधुनिक वैद्याशी संपर्क होऊ शकला नाही. तेव्हा दीपालीला साधिका-आधुनिक वैद्या (सौ.) काटोटे यांच्याकडे सलाईन लावले आणि तिचे रक्त तपासणीसाठी दिले. त्यानंतर मी कार्यशाळेच्या सेवेला गेले.

२. डेंग्यू झाल्याने अतीदक्षता विभागात ठेवलेल्या दीपालीताईला पाहून भीती वाटणे,
‘तिचे काही खरे नाही’, असा विचार मनात येणे आणि त्यामुळे तिला सूक्ष्मातून
गुरुदेवांच्या चरणांजवळ ठेवून ‘तुमच्या या बाळाला तुम्हीच सांभाळा’, अशी प्रार्थना करणे 
    दुसर्‍या दिवशी ‘दीपालीताईला डेंग्यू झाल्याने तिला रुग्णालयात अतीदक्षता विभागात ठेवले आहे’, असे समजले. मी तेथे गेल्यावर आधी ज्या आधुनिक वैद्यांनी ताईला तपासले होते, त्यांची भेट झाली नाही. तेव्हा मला वाटले, ‘हा अडथळाच आहे.’ तेव्हा माझ्याकडून प्रार्थना झाली, ‘गुरुदेवा, आधुनिक वैद्य भेटू दे.’ मी ताईला सूक्ष्मातून गुरुदेवांच्या चरणांजवळ ठेवून ‘तुमच्या या बाळाला तुम्हीच सांभाळा’, अशी प्रार्थना केली. मला अतीदक्षता विभागात ठेवलेल्या ताईला पाहून भीती वाटत होती. ‘ताईचे काही खरे नाही’, असा विचार तेव्हा माझ्या मनात आला.

गुरुराया, मोक्षाचा तूच भरवी घास ।

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...
हे गुरुराया, संकटसमयी साद घालू कुणाला ।
माता-पिता जन्म देऊनी सोडतात भवसागराला ।
बंधू-भगिनी तृप्त-अतृप्त होऊन रमतात संसारात ।
सखे-सोयरे कडेकडेनेच पहातात ।
सहकारी वरवरचे विचारतात ।
मित्र-मैत्रिणी दुःख वदने बाजूला बसतात ॥ १ ॥

देवा, किती म्हणतात, हे माझे माझे ।
विफल ठरते आता, कोण आहे माझे ।
देवा, मी किती कृतघ्न ।
हे ओळखण्यात गेले माझे जन्म ।
हे देवा, आता कळले, आता नको सोडू ही कास ।
शेवटचा मोक्षाचा तूच भरवी घास ॥ २ ॥

समाधानी, सर्वांना साहाय्य करणारा आणि साधनेची उपजत आवड असलेला ५४ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला वरंगळ, तेलंगणा येथील कु. अनुज मुकुंद जाखोटिया (वय १० वर्षे) !

उच्चलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु
राष्ट्र चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. अनुज जाखोटिया एक दैवी बालक आहे !
कु. अनुज जाखोटिया
      (कु. अनुज याची आध्यात्मिक पातळी वर्ष २०११ मध्ये ५३ टक्के होती.) 
पालकांनो, हे लक्षात घ्या ! 
     ‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ - (परात्पर गुरु) डॉ. आठवले 
    यासमवेतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.

सांगली जिल्ह्याचा ऑक्टोबर २०१६ मधील सनातन संस्थेच्या कार्याचा आढावा

सद्गुरु (कु.) स्वाती खाडये
१. दीपावलीनिमित्त विविध माध्यमांतून केलेला धर्मप्रसार
अ. प्रवचने : १२ ठिकाणी प्रवचने घेण्यात आली. यांमध्ये दीपावलीची माहिती सांगण्यात आली. १६५ जिज्ञासूंनी या प्रवचनांचा लाभ घेतला. गावभाग येथे झालेल्या प्रवचनानंतर उपस्थित महिलांनी धर्मशिक्षणवर्ग चालू करण्याची मागणी केली.
आ. विटा येथे जिज्ञासूंनी सनातन प्रभातच्या दीपावली विशेषांकांची मागणी केली. 
इ. फटाक्यांच्या विरोधात निवेदने देण्यात येणे : फटाक्यांच्या विरोधात लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी, तहसीलदार, ६ पोलीस ठाणी, १४ शाळा आणि महाविद्यालये यांना निवेदने देण्यात आली.
ई. आदर्श दीपावली साजरी करण्यासंदर्भात माहिती देणारी पत्रके ९ ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आली.
उ. दीपावली भेट संचांचे वितरण : दीपावलीनिमित्त ४१६ संचांचे वितरण करण्यात आले.
ऊ. पत्रकार परिषदेचे आयोजन

सगुणातील ईश्‍वराची अनुभूती देणारे एकमेवाद्वितीय संत प.पू. परशराम पांडे महाराज (वय ८९ वर्षे) !

प.पू. पांडे महाराज
१. प.पू. पांडे महाराज यांच्या सेवेत असणार्‍या साधकांचे त्यांच्याविषयीचे मनोगत 
१ अ. प.पू. बाबा यांचे श्रेष्ठत्व आणि महानता
    ‘मागील एक वर्षापासून परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने मला प.पू. बाबांसमवेत प्रतिदिन पहाटे ५.३० वाजता फिरण्याची संधी मिळत आहे. त्यामुळे मला पहाटे उठणे, सकाळीच संतांचे ज्ञानमोती वेचणे आणि सूक्ष्मातून प्रचंड चैतन्य मिळणे असे अनेक लाभ होत आहेत. माझे आवरण दूर होऊन मी चैतन्याने भारीत होऊन दिवसभर आनंदी रहात आहेेे. स्थुलातील आणि मायेतील मिळणार्‍या गोष्टींचा हिशोब करून आपण त्याचे उतराई होण्याचा प्रयत्न करू शकतो; मात्र प.पू. बाबा यांच्याकडून मिळणारे विचारधन आणि चैतन्य याविषयी समजून घेण्याची किंवा त्याविषयी लिहिण्याची माझी योग्यता नाही. त्यांनी मला केलेल्या साहाय्याविषयी जे स्थुलातून आकलन झाले, त्याविषयी थोडेसे सांगण्याचा प्रयत्न करत आहे. ‘शितावरून भात शिजल्याची परीक्षा करता येते’, या नियमानुसार प.पू. बाबा यांचे श्रेष्ठत्व आणि महानता काही उदाहरणावरून लक्षात येते.

जिल्हासेवक आणि साधक यांच्यासाठी महत्त्वाची सूचना

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती 
निर्मित धर्मसत्संगांचे केबल अथवा दूरचित्रवाणी 
यांवरून प्रसारण करण्याचे नियोजन करावे ! 
       १३.१२.२०१६ या दिवशी दत्तजयंती आहे. त्या निमित्ताने या संदर्भातील महत्त्व विशद करणारे हिंदी विशेष धर्मसत्संग सिद्ध करण्यात आले आहेत. या धर्मसत्संगांतर्गत अध्यात्मशास्त्र या विषयाचे २ धर्मसत्संग आहेत. या सत्संगांचा कालावधी २८ मिनिटे आहे. 
       या धर्मसत्संगांच्या माध्यमातून अधिकाधिक धर्मप्रसार होण्यासाठी साधकांनी पुढील प्रयत्न करावेत.
१. स्थानिक केबल अथवा दूरचित्रवाणी यांवरून या धर्मसत्संगांचे प्रसारण करण्याचे नियोजन करावे. 
२. गावोगावी चालू असणार्‍या धर्मशिक्षणवर्गात आवश्यकतेनुसार हे धर्मसत्संग दाखवावेत.
३. सध्या सर्वत्र चालू असलेल्या सभा, अधिवेशने यांमधून जोडल्या जाणार्‍या धर्माभिमान्यांना हे धर्मसत्संग आसपासच्या गावांत दाखवण्याची सेवा द्यावी.

फलक प्रसिद्धीकरता

सरकार देशद्रोही 
राजकारण्यांना कारागृहात डांबेल का ?
       स्वत:चे १३ सहस्र ८६० कोटी रुपयांचे उत्पन्न घोषित केल्यानंतर व्यावसायिक महेश शहा यांना आयकर विभागाने कह्यात घेतले. या संपत्ती संदर्भात शहा म्हणाले की, ही संपत्ती माझी नाही, तर देशभरातील राजकारण्यांची आणि उद्योगपत्तींची आहे. मी तर केवळ एक प्यादा आहे.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Yah dhan mera nahi, rajnetao aur udyogpatiyoka hai - 13000 karod rupaye kala dhan ghoshit karnewale Mahesh Shah
Kya sarkar in deshdrohiyoko dandit karegi ?
जागो ! : यह धन मेरा नहीं, राजनेताआें और उद्योगपतियों का है ! - १३,००० करोड रुपए कालाधन घोषित करनेवाले महेश शाह
क्या सरकार इन देशद्रोहियों को दंडित करेगी ?
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
  • कुठे प्रत्येक क्षेत्रात सर्वोच्च स्तराचे ज्ञान देणारा हिंदु धर्म, तर कुठे बालवाडीप्रमाणे शिक्षण देणारे पाश्‍चात्त्य देश !
  • विज्ञान एकातरी क्षेत्रात धर्मशास्त्राच्या पुढे आहे का ?
         सर्वच क्षेत्रांत अशी स्थिती आहे. त्याचे एक उदाहरण येथे दिले आहे.
वनस्पतीशास्त्र
         विज्ञान वनस्पतींची केवळ भौतिक माहिती सांगते. याउलट कोणत्या देवतेला कोणते पान, फूल, वहावे इत्यादी माहितीही अध्यात्मशास्त्र सांगते. 
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
वाटाड्या 
देव वाटाड्या आहे. 
मार्गात ठेच लागते; कारण मार्गात खाचखळगे असतात. आपण वाटाड्यावर संतापतो, तरी तो सांगतो, पुढे मार्ग चांगला आहे.
भावार्थ : येथे वाटाड्या म्हणजे मोक्षाचा मार्ग दाखविणारे गुरु. ठेच लागते म्हणजे त्रास होतो, आध्यात्मिक प्रगती खुंटते. मार्गात खाचखळगे असतात म्हणजे साधनेत अडचणी असतात. पुढे मार्ग चांगला आहे म्हणजे आध्यात्मिक प्रगती चांगली होणार आहे.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

बोधचित्र


योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

इच्छांवर मर्यादा हवी ! 
मनात निर्माण होणार्‍या इच्छा कशा पूर्ण होतील, याचा सतत विचार करून 
त्या पूर्ण करण्यापेक्षा इच्छा मर्यादित केल्या, तरच मानसिक शांतीचा लाभ होईल !
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

रोहिंग्या आणि वंशसंहार !

संपादकीय
      म्यानमार म्हणजेच पूर्वीचे बर्मा ! येथील रोहिंग्या मुसलमानांचा तेथील सैन्याने वंशसंहार आरंभल्याची टीका शेजारील मलेशिया या मुसलमानबहुल राष्ट्राने केली आहे. तसेच हे प्रकरण म्यानमारची अंतर्गत समस्या नसून आंतरराष्ट्रीय स्तरावर याची नोंद घेतली जावी, अशी मागणी होत आहे. भारतियांना आणि त्यातही मुंबईकरांना ऑगस्ट २०१२ मध्ये मुंबईच्या आझाद मैदानात रझा अकादमीने काढलेला हिंसक मोर्चा आठवत असेल, तर हा मोर्चा म्यानमारमध्ये वर्ष २०१२ मध्ये रोहिंग्या मुसलमानांच्या तेथील बौद्धांनी केलेल्या हत्यांवरूनच होता.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn