Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

रोहिंग्या मुसलमानांचा वंशसंहार थांबवा ! - इस्लामी देश मलेशियाचे म्यानमारला आवाहन

म्यानमारमधील रोहिंग्या मुसलमानांसाठी जवळचा मलेशिया हा इस्लामी देश आवाज उठवतो,
तर दुसरीकडे पाक आणि बांगलादेश येथील हिंदूंसाठी बहुसंख्य हिंदूंचा देश असलेला भारत तोंड उघडत नाही, हे हिंदूंना लज्जास्पद ! ही स्थिती हिंदु राष्ट्राच्या (सनातन धर्म राज्याच्या) स्थापनेनंतरच पालटू शकते !
      कुआलालंपूर - मलेशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्यानमारमध्ये होत असलेल्या रोहिंग्या मुसलमानांच्या वंशसंहारावर टीका केली आहे. त्यांचा वंशसंहार त्वरित बंद करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
     मंत्रालयाने पुढे म्हटले आहे की, दक्षिण-पूर्व आशियातील काही देशांमध्ये रोहिंग्या मुसलमान रहातात. अशा हिंसाचारामुळे या क्षेत्रातील शांती आणि स्थिरता यांना धोका निर्माण होत आहे. रोहिंग्या मुसलमानांचा प्रश्‍न भावनेच्या स्तरावर उठवण्यात आलेला नाही, तर मानवतेच्या दृष्टीने मांडला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या प्रतिनिधींनी शिवसेना-भाजपच्या खासदारांच्या घेतलेल्या भेटीचा छायाचित्रात्मक वृत्तांत !

डावीकडून श्री. अरविंद सावंत,
श्री. अभय वर्तक आणि श्री. कार्तिक साळुंके
डावीकडून श्री. अभय वर्तक आणि श्री. श्रीरंग बारणे

ट्रम्प-शरीफ संभाषणामुळे भारताला चुकीचा संदेश ! - फोर्ब्स नियतकालिक

     वॉशिंग्टन - पाकचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्याशी अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेले संभाषण हे भारताला चुकीचा संदेश देणारे आहे आणि ट्रम्प यांचे संभाषण फारच अज्ञानमूलक होते, असे फोर्ब्स नियतकालिकाने म्हटले आहे.
     फोर्ब्स नियतकालिकाने पुढे म्हटले आहे की, ट्रम्प यांनी जे अघळपघळ संभाषण केले आहे, त्यावरून त्यांना अमेरिका, पाकिस्तान आणि भारत यांच्यातील संबंधाची काही माहिती नाही असाच संदेश गेला आहे. त्यांचे हे संभाषण त्यांच्या प्रशासनाची प्राथमिक भूमिका म्हणून गणले जात आहे, त्यात त्यांनी पाकचे वर्णन करतांना त्या देशाचे काम चांगले आहे, लोकही चांगले आहेत, त्या देशाची प्रतिमाही चांगली आहे, असे गोडवे गायिले होते. त्यांच्या या संभाषणातून त्यांना अमेरिका-पाकिस्तान आणि भारत यांच्यातील प्रश्‍नांचे किंवा सूत्रांचे ज्ञान नाही हेच दिसून आले. ट्रम्प यांना दक्षिण आशियातील वास्तव माहीत नाही.

मुंबईतील ‘राम मंदिर’ रेल्वेस्थानकासाठी शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तीकर यांचे योगदान !

श्री. गजानन कीर्तीकर
संसदेत आवाज उठवून शेवटपर्यंत केला पाठपुरावा !
      मुंबई, ३ डिसेंबर (वार्ता.) - जोगेश्‍वरी ते गोरेगाव रेल्वेमार्गामध्ये बांधण्यात आलेल्या नवीन रेल्वेस्थानकाला ‘राम मंदिर’ नाव द्यावे, यासाठी शिवसेनेचे खासदार श्री. गजानन कीर्तीकर यांनी १५ डिसेंबर २०१५ या दिवशी ‘जनतेचे महत्त्वाचे विषय’ या सत्रात संसदेत आवाज उठवला होता. ‘वीर सेना’, तसेच स्थानिक नागरिकांची ही मागणी श्री. गजानन कीर्तीकर यांनी संसदेत मांडून या विषयाला बळकटी दिली आणि विविध पत्रांद्वारे शेवटपर्यंत या विषयाचा पाठपुरावा केला. या प्रयत्नांना यश येऊन अखेर २५ नोव्हेंबर या दिवशी महाराष्ट्र राज्य शासनाच्या गृह विभागाने या रेल्वेस्थानकाला ‘राम मंदिर’ असे नाव देण्याविषयीचे अधिकृत पत्र जिल्हा प्रशासनाला पाठवले आहे.

पादत्राणांवर हिंदूंच्या देवतांची चित्रे आणि मुसलमानांची अक्षरे छापण्यावर आळा घाला ! - उच्च न्यायालय

हे न्यायालयाला का सांगावे लागते ? शासनाने हे स्वतः करणे अपेक्षित आहे !
      मुसलमानांच्या श्रद्धा दुखावल्याच्या प्रकरणी पोलीस तत्परतेने न्यायालयात अहवाल देतात. पोलिसांनी हिंदूंच्या देवतांची अश्‍लील चित्रे रेखाटणारे म.फि. हुसेन यांच्यावर देशभरात १ सहस्र २५० हून अधिक तक्रारी प्रविष्ट होऊनही काहीच कारवाई केली नाही. यावरून बहुसंख्य हिंदूंची देशात काय पत आहे, हे लक्षात येते. त्यामुळे हिंदूहित साधणार्‍या हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता लक्षात येते !
     मुंबई, ३ डिसेंबर (वार्ता.) - पादत्राणांवर हिंदूंच्या देवता आणि मुसलमानांची अक्षरे छापली जातात. अशा प्रकरणात पोलिसांनी योग्य तो शोध घेऊन अन्वेषण करावे. जेणेकरून धार्मिक तेढ निर्माण होण्याआधीच अशा प्रकारांना आळा घालता येईल. यापुढे अशा प्रकरणात तज्ञांचा सल्ला घेऊन प्रकरणे हाताळावीत. पादत्राणांवर हिंदूंच्या देवतांची चित्रे, मुसलमानांची अक्षरे छापण्यावर आळा घाला, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. वर्ष २०१४ मध्ये ठाणे येथे घडलेल्या एका प्रकरणाच्या सुनावणीवर अंतिम निकाल देतांना न्यायालयाने हा आदेश दिला.

मला इसिसच्या आतंकवाद्यांबरोबर राहिल्यासारखे वाटले !

  मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात प्रवेश केल्यानंतर उपरती झालेले
रा.स्व. संघाचे पद्मकुमार यांची माकपवर टीका आणि ‘घरवापसी’!
४० वर्षे संघात राहिल्यानंतरही माकपमध्ये प्रवेश करण्याचा विचार करणारे आणि प्रवेश केल्यावर माकपवर टीका करणारे पद्मकुमार यांना हे आधीच का समजले नाही कि धर्मशिक्षणाच्या अभावी त्यांचा गोंधळ उडाला ?
     थिरूवनंतपुरम् - ४ दशके राष्ट्रीय स्वयंसेवक संघात राहून नुकतेच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात (माकप) प्रवेश केलेले थिरूवनंतपुरममधील नेते पी. पद्मकुमार यांनी पुन्हा संघात प्रवेश केला आहे. ‘माकपमध्ये इसिसच्या जिहादी आतंकवाद्यांमध्ये राहिल्यासारखे वाटले’, असे विधान पद्मकुमार यांनी केले आहे. माकपमध्ये प्रवेश करतांना पद्मकुमार यांनी संघावर आणि संघटेनेच्या कार्यशैलीवर टीका केली होती. तेथील अमानवी वागणूक, राजकारण आदींच्या विरोधात असल्याचे पद्मकुमार यांनी सांगितले होते. तसेच नुकत्याच घेण्यात आलेल्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर संघातून बाहेर पडत असल्याचे त्यांनी सांगितले होते.

हिंदुत्वाचे सूत्र संसदेत उपस्थित करण्याचे खासदारांचे आश्‍वासन !

ग्रंथ भेट देतांना डावीकडून पू. डॉ. चारुदत्त पिंगळे
आणि शिवसेनेचे खासदार श्री. हेमंत गोडसे
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने देहली येथे सनातन संस्था
आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने शिवसेना-भाजप यांच्या खासदारांची सदिच्छा भेट !
     देहली - सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने येथील शिवसेना आणि भाजप यांच्या खासदारांची भेट घेण्यात आली. या भेटीत त्यांना संसदेत हिंदुत्वाची सूत्रे उपस्थित करण्याचे आवाहन करण्यात आले.
     ठाणे येथील खासदार श्री. राजन विचारे, नाशिक येथील खासदार श्री. हेमंत गोडसे, सिंधुदुर्ग येथील खासदार श्री. विनायक राऊत, मुंबई येथील खासदार श्री. गजानन कीर्तिकर, श्री. अरविंद सावंत, मावळ येथील खासदार श्री. श्रीरंग बारणे या शिवसेनेच्या खासदारांसहित कर्नाटकमधील भाजपचे खासदार श्री. प्रल्हाद जोशी, तसेच भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री. श्याम जाजू यांची भेट घेण्यात आली. या सर्व खासदारांनी सकारात्मक प्रतिसाद देत हिंदुत्वाचे विषय संसदेत मांडण्याचे आश्‍वासन दिले.

शिवसेना देहली येथे ६ डिसेंबर हा शौर्य दिन म्हणून साजरा करणार !

डावीकडून श्री. अभय वर्तक, 
श्री. संतोष बसनेत, श्री. निरज सेठी 
श्री. अशोक कुमार कपिल आणि श्री. कार्तिक साळुंके
      देहली - ६ डिसेंबर या दिवशी येथे जंतरमंतरवर मुसलमान मोठ्या संख्येने एकत्र येऊन काळा दिवस साजरा करणार आहेत. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी येथील शिवसेनेने या दिवशी शौर्य दिन म्हणून साजरा करण्याचे ठरवले आहे. त्याकरता सर्व हिंदूंनी सहस्रोच्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन देहली शिवसेनेचे राज्यप्रमुख श्री. निरज सेठी यांनी केले आहे. ६ डिसेंबर या दिवशी बाबरी मशिदीचा ढाचा उद्ध्वस्त करण्यात आला होता. 
     हिंदु धर्मियांवर होणार्‍या अत्याचारांना वाचा फोडण्यासाठी देहलीच्या जंतरमंतर येथे प्रत्येक मासाला राष्ट्रीय हिंदु आंदोलन करण्यात येते. या आंदोलनात शिवसेनेचे सहकार्य मिळावे याकरता सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक, हिंदु जनजागृती समितीचे देहली समन्वयक श्री. कार्तिक साळुंके यांनी श्री. सेठी यांची नुकतीच सदिच्छा भेट घेतली. 
     या वेळी त्यांना सनातन पंचाग भेट म्हणून देण्यात आले. या वेळी शिवसेना नेपाळचे श्री. संतोष बसनेत, शिवसेना देहली उपाध्यक्ष श्री. अशोक कुमार कपिल उपस्थित होते.

प्रस्तावित अंधश्रद्धा निर्मूलन विधेयक रहित करणे आणि ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या संघटनेवर बंदी घालणे यांसाठी विविध पक्षांच्या आमदारांना हिंदु जनजागृती समितीकडून निवेदने !

डावीकडून सौ. विदुला हळदीपूर, श्री. मोहन गौडा आणि आमदार श्री. ईश्‍वरप्पा
भाजपच्या आमदारांकडून विधानसभेत पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर बंदी घालण्याची मागणी !
     बेळगाव - २२ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर या कालावधीत बेळगाव येथे कर्नाटक राज्याच्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राज्यशासनाचे विविध सचिव आणि विविध पक्षांचे आमदार यांंना प्रस्तावित अंधश्रद्धा निर्मूलन विधेयक रहित करावे आणि देशविरोधी कारवाया करणार्‍या ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या संघटनेवर बंदी घालण्यात यावी, या आशयाचे निवेदन देण्यात आले.

(म्हणे), आम्हीदेखील भक्त असल्याने देवाच्या दरबारी महिलांचे अस्तित्व नाकारू नका !

धर्माचे नियम पायदळी तुडवणार्‍या तृप्ती देसाईंचा कांगावा
    मुंबई, ३ डिसेंबर (वार्ता.) - आम्ही कोणत्याही परंपरेला ठेच पोचवलेली नाही. आमची लढाई धर्मातील चुकीच्या रूढी आणि परंपरा यांच्या विरोधात आहे. याआधीही सतीसारख्या चुकीच्या प्रथा बंद करून विधवा पुनर्विवाहाला मान्यता देण्यात आली. २१ व्या शतकात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून पुढे जात असतांना तुम्ही त्यांना अपवित्र ठरवत आहात, हे चुकीचे आहे. ज्या आईच्या उदरातून देवाने जन्म घेतला त्यांचे प्रतिनिधीत्व आम्ही करत आहोत. आम्हीदेखील भक्त असल्याने देवाच्या दरबारी महिलांचे अस्तित्व नाकारू नका, असे (कु) विचार भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी केले. ३ डिसेंबर या दिवशी तृप्ती देसाई यांनी हाजी अली दर्ग्यामध्ये मजारपर्यंत जाऊन चादर चढवली. (देवता म्हणजे व्यक्ती नसून तत्त्व आहे, हेही न जाणणार्‍या तृप्ती देसाई म्हणे देवाच्या भक्त आहेत ! - संपादक)

पेरूमधील भूकंपात १ ठार, १७ घायाळ !

महर्षींनी प्रलयकालाविषयी सतर्क करणे
    १९.३.२०१६ या दिवशी झालेल्या नाडीवाचन क्रमांक ६७मध्ये महर्षि म्हणतात, हे पूर्ण वर्ष प्रलयकालाचे आणि आपत्तीजनक असणारे आहे. (दक्षिण अमेरिका खंडातील पेरू देशातील पुनो क्षेत्रात भूकंपाचे धक्के बसले. या घटनेवरून प्रलयकालाविषयी महर्षींनी केलेले भाष्य किती तंतोतंत आहे, हे लक्षात येते ! - संपादक)
     लांपा (पेरू) - दक्षिण अमेरिका खंडातील पेरू देशातील पुनो क्षेत्रात झालेल्या भूकंपात १ जण ठार, तर १७ जण घायाळ झाले. रिश्टर स्केलवर ५.५ तीव्रता असणार्‍या या भूकंपामुळे लांपा आणि पराशिया या जिल्ह्यांतही अनेक घरांची पडछड झाली.

सभेचा प्रसार अंतिम टप्प्यात !

डावीकडून सौ. अलका व्हनमारे, श्री. सुनील घनवट, सूत्रसंचालक
श्री. नारायण येरवा, नगरसेवक बापू ढगे आणि श्री. विनोद रसाळ
आज सोलापूर येथे हिंदु धर्मजागृती सभा
  • स्वरांजली केबलवाहिनीकडून धर्मसभेनिमित्त समितीच्या कार्यकर्त्यांसमवेत टॉक शो !
  • ४ लक्ष नागरिकांपर्यंत पोचणार धर्मसभेचा विषय
     सोलापूर - येथील स्वरांजली केबल वाहिनीने सभेनिमित्त समितीच्या कार्यकर्त्यांसमवेत टॉक शो कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यात हिंदु राष्ट्राची आवश्यकता, हिंदु धर्मजागृती सभेची आवश्यकता, राष्ट्र आणि धर्म या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. या वेळी समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट, श्री. विनोद रसाळ, रणरागिणी शाखेच्या सोलापूर जिल्हासंघटक सौ. अलका व्हनमारे यांसह माजी नगरसेवक श्री. बापू ढगे यांनी सहभाग घेतला. कार्यक्रम १ घंट्याचा होता. त्याचे ३ वेळा प्रक्षेपण होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. या टॉक शोमुळे धर्मजागृती सभेचा विषय ४ लक्ष नागरिकांपर्यंत पोचण्यास साहाय्य होणार आहे.

कराड येथे नायब तहसीलदारांना हिंदुत्वनिष्ठांच्या वतीने निवेदन

नायब तहसीलदारांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ
     कराड, ३ डिसेंबर (वार्ता.) - हिंदू आणि हिंदु धर्म यांवर होणार्‍या विविध आघातांच्या संदर्भात येथील नायब तहसीलदार सौ. मीनल भामरे यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गृहमंत्र्यांकडे द्यावयाच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या वेळी समितीचे कार्यकर्ते, श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. साळवी, अभिजीत देशमुख, सनातनचे साधक आणि हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.

माऊलींच्या समाधीला प्रसाद दाखवण्यावरून मतभेद

विश्‍वशांती केंद्र आणि आळंदी देवस्थान यांमध्ये वादंग
     आळंदी (जिल्हा पुणे), ३ डिसेंबर - २७ नोव्हेंबर या दिवशी श्री ज्ञानेश्‍वर महाराज संस्थान आणि विश्‍वशांती केंद्राचे डॉ. विश्‍वनाथ कराड, तसेच अन्य पदाधिकारी यांच्यामध्ये वाद झाला. ज्ञानेश्‍वर महाराजांच्या संजीवन समाधीला नैवेद्य अर्पण करण्यावरून दोन्ही संस्थांच्या पदाधिकार्‍यांमध्ये धक्काबुक्की झाली. 
१. यावर आळंदी देवस्थानने निवेदन प्रसिद्ध करून देवस्थानची बाजू मांडली. देवस्थानने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मंदिरातील वीणा मंडपात सकाळी १० ते १२.३० या वेळेत कीर्तनसेवा चालू असतांना नैवेद्य दाखवण्याचा संकेत नाही. समाधी सोहळ्याचे कीर्तन होऊन परंपरेनुसार मानाचे श्रीफळ वाटप झाल्यानंतर संस्थानचा महानैवेद्य अर्पण होतो. त्यानंतर अन्य भाविकांना त्यांचे नैवैद्य अर्पण करण्यासाठी गाभार्‍यात प्रवेश दिला जातो. २७ नोव्हेंबर या दिवशीही प्रथेप्रमाणे विश्‍वशांती केंद्राच्या पदाधिकार्‍यांना संस्थानचा महानैवेद्य अर्पण झाल्यानंतर नैवेद्य दाखवण्याविषयी सांगण्यात आले; मात्र विश्‍वशांती केंद्राच्या पदाधिकार्‍यांनी सुरक्षाव्यवस्था भेदून प्रथेचे उल्लंघन करत गाभार्‍यात प्रवेश केला.

बैठका-संपर्क, सामाजिक संकेतस्थळांच्या माध्यमातून धर्मजागृती सभेचा व्यापक प्रसार !

गोरंबे येथे शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यासमोर विषय मांडतांना श्री. सुनील घनवट
पतंजली योग समितीचे उपाध्यक्ष श्री. गिरीश आरेकर (उजवीकडे)
यांना निमंत्रण देतांना हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते
११ डिसेंबरच्या कोल्हापूर येथील हिंदु धर्मजागृती सभेच्या निमित्ताने
    कोल्हापूर, ३ डिसेंबर (वार्ता.) - येथील हिंदु धर्मजागृती सभेसाठी कोल्हापूर शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात प्रसार चालू आहे. शहरात लक्षतीर्थ सुतारमळा येथे सौ. अंजली कोटगी यांनी महिलांची बैठक घेतली. या वेळी २५ हून अधिक महिला उपस्थित होत्या. बैठकीचे नियोजन सौ. प्रतिभा गावडे यांनी केले होते. बैठकीत सौ. मंगला पाटील यांनी सभेसाठीचे ५० विशेषांक प्रायोजित केले, तर धर्मशिक्षण वर्गाची मागणीही करण्यात आली. याच समवेत शिरोली येथील श्री बिरदेव मंदिरात झालेल्या बैठकीत ५५ महिला उपस्थित होत्या, तर गंगावेश सावंतवाडा येथे झालेल्या बैठकीसाठी ३० हून अधिक महिला उपस्थित होत्या. नागोबा मंदिर, पाचगाव भैरवनाथाचे मंदिर, मंगळवार पेठ मंडलिक वसाहत, जरगनगर साईनाथ मंदिराच्या शेजारी, भक्तीपूजानगर या ठिकाणी झालेल्या बैठकीत आम्ही सभेसाठी येणार, असे सर्वांनी सांगितले. या वेळी ह.भ.प. गावडे आणि ह.भ.प. गणेश महाराज यांना निमंत्रण अन् अंक देण्यात आले.

(म्हणे) भगवद्गीता आणि संविधान एकच आहे ! - मुख्य न्यायमूर्ती मंजुळा चिल्लूर

     भारताच्या संविधानात आतापर्यंत शंभरहून अधिक वेळा पालट करण्यात आले, तर भगवद्गीतेत जराही पालट झालेला नाही ! गीतेत सांगितलेल्या वचनानुसार अनेकांच्या जीवनाचा उद्धार झाला ! संविधानानुसार आचरण करून
किती जणांच्या आयुष्यात असा पालट झाला ?

    मुंबई, ३ डिसेंबर - भगवद्गीता जीवन जगण्याची कला आहे, तर माणसाने कसे जगावे हे संविधान शिकवते. त्यामुळे भगवद्गीता आणि संविधान एकच आहे, असे मत मुख्य न्यायमूर्ती मंजुळा चिल्लूर यांनी व्यक्त केले. देशात २६ नोव्हेंबरला संविधान दिन होता. या दिवशी उच्च न्यायालयाला सुटी असल्याने तो उशिरा साजरा करण्यात आला. या वेळी झालेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. न्यायमूर्ती चिल्लूर पुढे म्हणाल्या, संविधान दिन हा पुष्कळ चांगला असून तो प्रतीदिन साजरा व्हायला हवा. प्रत्येक नागरिकाने संविधानाविषयी जाणून घेतले, तर हा दिवस खर्‍या अर्थाने साजरा होईल. प्रत्येक नागरिकाला शांतपणे झोप लागेल, अशी व्यवस्था संविधानात करण्यात आली आहे. (संविधानाने अधिकार प्रदान केले असले, तरी मशिदींवरून अवैध भोंगे न हटवल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे ! - संपादक)

ठाण्यातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई !

मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे होईपर्यंत पालिका प्रशासन निष्क्रीय राहिले का ?
    ठाणे, ३ डिसेंबर - येथील शहरातील सर्व्हिस रोड (रहदारीच्या मार्गावर) अनधिकृत बांधकामांवर ठाणे महानगरपालिकेने ३० नोव्हेंबरपासून कारवाई चालू केली आहे. उपवन तलावाजवळ असणार्‍या सत्यम लॉजमधील तळघरात अनैतिक धंदे चालू असल्याचे उघडकीस आले असून तेथील २९० खोल्या महापालिकेच्या अतिक्रमणविराधी पथकाने जमीनदोस्त केल्या. (अनधिकृत बांधकामांकडे दुर्लक्ष करणार्‍या संबंधीत आधिकार्‍यांवरही कारवाई होणे आवश्यक आहे. - संपादक) लॉजच्या नावाखाली बेकायदे धंदे चालू असल्याचे आढळून आले असून ठाण्यातील सर्व लॉज उद्ध्वस्त करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या वेळी पोलीस बंदोबस्तात पाच लेडीज बार, आठ लॉज, २५ धाबे, २५ गॅरेज तसेच तीन फर्निचरची दुकाने तोडून टाकण्यात आली. या कारवाईच्या वेळी महापालिका आयुक्त श्री. संजय जयस्वाल आणि अतिरिक्त आयुक्त श्री. सुनील चव्हाण यांच्या उपस्थितीत या कारवाया चालू झाल्या आहेत.

खोटे ओळखपत्र बनवून सीमकार्ड घेणार्‍या धर्मांधांच्या टोळीला अटक !

    मुंबई, ३ डिसेंबर - संगणकाच्या आधारे खोटे ओळखपत्र बनवून त्याद्वारे विविध आस्थापनांचे सीमकार्ड घेणार्‍या धर्मांधांच्या टोळीला पोलिसांनी पकडले आहे.
१. चेंबूर येथील एक दुकानदार संगणकावर खोटे आधारकार्ड बनवून सीमकार्ड घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी दुकानावर धाड टाकून इमान शेख या आरोपीला कह्यात घेतले.
२. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे समीर कुरेशी, मेराज खान आणि भावेश पटेल या आरोपींना कुर्ला आणि पालघर येथून पकडण्यात आले. त्यांच्याकडून विविध आस्थापनांची ७५ सीमकार्ड, खोटे रबरी शिक्के आणि रोख रक्कम पोलिसांनी हस्तगत केली.
३. संगणकावर बनवलेल्या खोट्या आधारकार्डाची छायांकित प्रत काढून त्याआधारे ही टोळी सीमकार्ड घेत होती. या टोळीने आतापर्यंत सहस्रो सीमकार्ड घेतल्याचा पोलिसांना संशय आहे. (लोकसंख्येत अल्पसंख्य असलेले धर्मांध गुन्हेगारीत मात्र पुढे ! - संपादक)

काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांना विनयभंगाच्या गुन्ह्यात अंतरिम अटकपूर्व जामीन !

    सातारा, ३ डिसेंबर (वार्ता.) - येथील शहर पोलीस ठाण्यात प्रविष्ट असलेल्या विनयभंगाच्या गुन्ह्यात काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांना तात्पुरत्या स्वरूपाचा अंतरिम अटकपूर्व जामीन जिल्हा न्यायालयाने दिला आहे.
१. पीडित महिला व्यक्तीमत्त्व विकासाचे प्रशिक्षण देणार्‍या एका संस्थेत प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहे. गोरे यांनी पीडित महिलेशी ओळख करून घेतली. तिचा भ्रमणभाष क्रमांक घेऊन व्हॉट्स अ‍ॅपवर अश्‍लील संदेश, छायाचित्रे आणि चलचित्रे पाठवली.
२. या प्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून २५ नोव्हेंबर या दिवशी शहर पोलीस ठाण्यात काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. आमदार गोरे यांच्या शोधार्थ दोन पोलीस पथके पाठवण्यात आली; मात्र त्यांना आमदार गोरे यांचा सुगावा लागला नाही.

अनधिकृत बांधकामांवर कारवाईसाठी भाजप नगरसेविकेचे ठिय्या आंदोलन

लोकप्रतिनिधींनाच आंदोलन करायला लावणारे निष्क्रीय प्रशासन !
    कल्याण, ३ डिसेंबर (वार्ता.) - अनधिकृत बांधकामांवर कारवाई होत नसल्याची तक्रार ऐकून घेण्यासाठी आयुक्तांना वेळ नसल्याच्या विरोधात भाजप नगरसेविका रविना माळी यांनी आयुक्तांच्या दालनाबाहेरच नुकतेच ठिय्या आंदोलन केले; मात्र या आंदोलनाची माहिती मिळताच आयुक्तांनी लगेचच माळी यांची भेट घेत तक्रारींवर कारवाई करण्याचे आश्‍वासन देत प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

पथकर वसुलीस पुन्हा प्रारंभ, २०० रुपयांवरील पथकरासाठी ५०० ची जुनी नोट स्वीकारणार

    मुंबई, ३ डिसेंबर - राज्यासह देशभरात आजपासून (३ डिसेंबर) पथकर वसुलीस पुन्हा प्रारंभ झाला असून १५ डिसेंबरपर्यंत २०० रुपयांपेक्षा अधिक पथकर असल्यास ५०० ची जुनी नोट स्वीकारण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. पथकर २०० रुपयांहून न्यून असल्यास सुटे पैसे द्यावे लागणार आहेत. नोटाबंदीच्या निर्णयानंतर सरकारने ५ वेळा पथकरातून सवलत देण्याची घोषणा केली होती. २ डिसेंबरपर्यंत असलेली ही मुदत संपली असल्याने आज पथकर नाक्यांवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

सेतू सुविधा केंद्रात उत्पन्नाच्या दाखल्यासाठी दलालांकडून गरिबांची फसवणूक

    जळगाव - प्राधान्य कुटुंब योजनेच्या अंतर्गत प्रती व्यक्ती तीन रुपये किलोने गहू अणि दोन रुपये किलोने तांदूळ देण्यात येतो; मात्र त्यात सहभागी होण्यासाठी दलालांकडून गरिबांची फसवणूक होत आहे. उत्पन्नाच्या दाखल्यासाठी अचानक गर्दी वाढल्याने आणि सेतू सुविधा केंद्र वेळेपूर्वीच बंद केल्याने दिवसभर रांगेत उभे असलेल्या महिलांनी संताप व्यक्त करत प्रशासनाच्या विरोधात घोषणा दिल्या.
    एका कुटुंबाकडून प्रत्येकी ५०० ते ७०० रुपये घेऊन योजनेत सहभागी करण्याचे आमिष दाखवले जात आहे, तर उत्पन्न आणि रहवासी दाखला यांसाठी १० ते २० रुपये अधिक घेत असल्याचे निर्दशनास येत आहे.

क्रूरकर्मा संतोष पोळ याच्या विरोधात अधिवक्ता उज्ज्वल निकम यांची नियुक्ती !

      सातारा, ३ डिसेंबर (वार्ता.) - वाई येथील क्रूरकर्मा संतोष पोळ याच्या विरोधात सरकार पक्षाच्या वतीने बाजू मांडण्यासाठी विशेष सरकारी अधिवक्ता उज्ज्वल निकम यांची राज्य शासनाने नियुक्ती केली आहे. नियुक्तीसाठी पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी शासनाकडे पत्रव्यवहार केला होता. सातारा जिल्हा पोलिसांनी त्यांची मागणी केली होती. याला पोलीस महासंचालक आणि कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. विश्‍वास नांगरे-पाटील यांनी मान्यता दिली.

३१ डिसेंबरपूर्वी सेट टॉप बॉक्स बसवणे आवश्यक ! - निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे

      कोल्हापूर, ३ डिसेंबर (वार्ता.) - जिल्ह्यामधील केबल टी.व्ही डिजीटायझेशन अंतर्गत ग्रामीण भागातील सर्व केबल ग्राहकांनी दिनांक ३१ डिसेंबर अखेर सेट टॉप बॉक्स बसवावेत, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी श्री. संजय शिंदे यांनी ३० नोव्हेंबर या दिवशी केले. नागरिकांनी स्थानिक केबल ऑपरेटरशी संपर्क साधून ३१ डिसेंबरपूर्वी सेट टॉप बॉक्स बसवणे आवश्यक आहे. ३१ डिसेंबरनंतर नालॉग सिग्नल बंद करण्यात येणार आहे. केवळ सेट बॉक्सद्वारेच टी.व्ही. सिग्नल पुरवण्यात येणार आहे. ग्राहकांनी सेट टॉप बॉक्स न बसवल्यास केबल टी.व्ही.द्वारे प्रक्षेपण पाहाता येणार नाही.

पिंपरी (पुणे) येथील कुल जमाअती तंजीम आयोजित निषेध सभेत असदुद्दीन ओवैसी अनुपस्थित !

हिंदुत्वनिष्ठांच्या संघटितपणाचे यश !
      पिंपरी (पुणे) - येथील एच्ए आस्थापनाच्या पटांगणावर ३० नोव्हेंबर या दिवशी झालेल्या कुल जमाअती तंजीमआयोजित सरकारविरोधाच्या निषेध सभेत असदुद्दीन ओवैसी अनुपस्थित राहिले. समस्त हिंदु संघटनांच्या वतीने ही सभा रहित करण्याच्या संदर्भात पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले होते. हिंदुत्वनिष्ठांच्या संघटित प्रयत्नांची परिणती एम्आयएम्चे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी या सभेला अनुपस्थित रहाण्यात झाली. 
१. या सभेत मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सदस्य उबेदुल्ला खान आझमी म्हणाले, केंद्रशासन मुसलमान महिलांची काळजी करत असल्याचा देखावा करून तीन वेळा तलाक देण्याच्या सूत्रावरून मुसलमान कायद्यात पालट करू पहात आहे. या पालटाच्या विरोधात पाच कोटी मुसलमान महिलांच्या स्वाक्षर्‍या घेण्यात आल्या. केंद्रशासनाचा हा हस्तक्षेप म्हणजे संविधानाला धोका आहे. (मुसलमानांना मुख्य प्रवाहात मिसळून न जाता त्यांना त्यांचे वेगळे अस्तित्व ठेवायचे आहे, हेच यावरून लक्षात येते. मुसलमानांसाठी वेगळे कायदे हाच उलट संविधानाला धोका आहे. - संपादक)

(म्हणे) समाजाला मनुवादी जोखडातून बाहेर काढण्याचे काम करायचे आहे !- चंद्रकांत कोबनाक

धर्मविषयी अज्ञान दूर करण्यासाठी हिंदूंना धर्मशिक्षण देणे, हाच यावरील एकमेव पर्याय !
      मुंबई, ३ डिसेंबर (वार्ता.) - कुणबी समाजातील सुशिक्षित तरुणांनी भारतीय संविधान समजून घेणे आवश्यक आहे. भारतीय घटना, हक्क आणि अधिकार यांची माहिती नसल्याने कुणबी समाजाची पुष्कळ हानी झाली आहे. आजपर्यंत आम्हाला केवळ धार्मिक कर्मकांड आणि पोथी-पुराणे यांत अडकवून ठेवण्यात आले. वर्षभर परंपरांत गुंतलेला समाज त्यांतून बाहेर यायला हवा. त्याला या मनुवादी जोखडातून बाहेर काढण्याचे काम आम्हाला करायचे आहे, असे प्रतिपादन कुणबी युवाचे सल्लागार चंद्रकांत कोबनाक यांनी केले. (मनु हे जोखड नसून आदर्श समाजनिर्मितीसाठी वरदान कसे आहे, हे त्याच्या वचनांचा अभ्यास आणि त्याचे आचरण केल्याशिवाय कसे लक्षात येईल ? केवळ जातीयवादातून अशा प्रकारे व्यक्तव्य करत सुटणार्‍या हिंदुद्वेष्ट्यांनी लक्षात घ्यावे की, संपूर्ण विश्‍व आज मोठ्या प्रमाणात हिंदु संस्कृतीकडे आकृष्ट होत आहे, ते त्यातील चैतन्यामुळेच ! - संपादक)
       संविधान प्रदानदिनाच्या निमित्ताने कुणबी युवा मुंबईच्या वतीने परळ येथे एका चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते.

नवी मुंबई महानगरपालिकेत ७ मुख्याधिकार्‍यांच्या प्रतिनियुक्तीला मान्यता

   नवी मुंबई, ३ डिसेंबर (वार्ता.) - नगरविकास अधिकार्‍यांकडून नवी मुंबई महानगरपलिकेत ७ मुख्याधिकार्‍यांच्या प्रतिनियुक्तीला मान्यता देण्यात आली असून लवकरच हे मुख्याधिकारी साहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत होणार आहेत. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अधिकारांचे विकेंद्रीकरण करण्यासाठी विभाग अधिकारी या पदाला साहाय्यक आयुक्त हा दर्जा देऊन त्यांना अतिरिक्त अधिकार दिले आहेत. सध्या महापालिकेतील साहाय्यक आयुक्त दर्जाचे अधिकारी विभाग कार्यालयांत कार्यरत आहेत. त्यामुळे मुंढे यांनी मे मासात शासनाकडे ८ मुख्याधिकार्‍यांची मागणी केली होती. त्यातील एका अधिकार्‍यांची नियुक्ती यापूर्वी करण्यात आली आहे. उर्वरित अधिकार्‍यांच्या नियुक्तीविषयी तत्त्वत: संमती दिली आहे. येत्या ८ दिवसांत हे अधिकारी महापालिकेत प्रतिनियुक्तीवर येण्याची शक्यता आहे.

ख्रिस्ती मिशनर्‍यांवर होणारी आक्रमणे, हिंदुत्वनिष्ठांवर येणारा दोष आणि त्या संदर्भातील उपाययोजना !

अधिवक्ता
श्री. संजीव पुनाळेकर
     काही मासांपूर्वी ख्रिस्ती मिशनर्‍यांवर होणार्‍या आक्रमणांच्या संख्येत वाढ झाली आहे, अशी ओरड माध्यमांतून होत होती. मिशनर्‍यांवर आक्रमणे झाली किंवा तत्सम प्रकार घडले की, त्याचा दोष हिंदुत्वनिष्ठांना दिला जातो. या संदर्भात हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांनी काही धोरण अवलंबणे आवश्यक वाटते. त्याविषयीची माहिती येथे दिली आहे.
१. मिशनर्‍यांवरील आक्रमणाचा हिंदुत्वनिष्ठांवर
येणारा दोष, त्याची कारणे आणि परिणाम !
१ अ. माध्यमांचा दुटप्पीपणा : भाजप सत्तेत आल्यामुळे मिशनर्‍यांवरील आक्रमणांचे प्रमाण वाढले आहे, अशी ओरड माध्यमांतून चालू असते. हिंदुत्वनिष्ठांवरील आक्रमणाचे मात्र साधे वृत्तदेखील दाखवले जात नाही. त्याच माध्यमांना मिशनर्‍यांचा फार पुळका असतो. त्याची कारणे किती अर्थपूर्ण असतात, हे सर्वच जण जाणतात. त्याचे उदाहरण म्हणजे मदर तेरेसा यांना संत घोषित करण्याच्या चर्चा झडत असतांना दैनिक लोकसत्ताने असंतांचे संत, अशा मथळ्याखाली एक लेख प्रसिद्ध केला होता. हा लेख मदर तेरेसा आणि चर्च संस्था यांचे बेगडी स्वरूप जनतेसमोर मांडणारा होता. या लेखाला साहजिकच असहिष्णु आणि मूलतत्त्ववादी ख्रिस्त्यांनी आक्षेप घेतला. दुसर्‍या दिवशी दैनिक लोकसत्ताच्या संपादकांकडून क्षमा मागण्यात आली. हे कशामुळे घडले ? हे नंतर सर्वांनाच समजले. मिशनर्‍यांवर न झालेल्या आक्रमणांविषयीही बेंबीच्या देठापासून ओरडण्याची सवय माध्यमांना का लागली ? हे त्यावरून लक्षात येते.

काश्मिरी हिंदूंना पाठिंबा देण्यासाठी एका शहरात आयोजित केलेल्या हिंदु धर्मजागृती सभेत अडथळा निर्माण करणार्‍या मोठ्या हिंदुत्वनिष्ठ संघटना

कधी नव्हे एवढी हिंदुऐक्याची आवश्यकता असतांना हिंदूसंघटनाच्या कार्यात 
अडथळे निर्माण करणार्‍या मोठ्या हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदूंचे रक्षण कसे करणार ?
      एका शहरात नुकतेच एक भारत अभियान - कश्मीर की ओर या उपक्रमाच्या अंतर्गत हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. काश्मिरी हिंदूंच्या रक्षणासाठी आयोजित केलेल्या या उपक्रमाला भारतभरातील हिंदूंचा संघटित पाठिंबा मिळणे अपेक्षित होते; मात्र हिंदूंच्या संघटनाला खीळ घालण्याचा प्रयत्न काही मोठ्या हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडूनच केला जात असल्याचा अनुभव हिंदुत्वनिष्ठांना आला. 
१. ज्या दिवशी शहरात हिंदु धर्मजागृती सभा आयोजित करण्यात आली होती, त्याच दिवशी एका मोठ्या हिंदुत्वनिष्ठ संघटनेने दुसरी एक सभा आयोजित केली. हिंदु धर्मजागृती सभेला हिंदूंची उपस्थिती लाभू नये, या हेतूने मोठ्या हिंदुत्वनिष्ठ संघटनेने शहरात स्वतःची सभा आयोजित केली होती, असे स्थानिक हिंदुत्वनिष्ठांकडून समजले.

काश्मीरसंदर्भातील ३७० कलम रहित करण्याविषयी सरकार काही कृती करणार आहे का ?

      ३७० कलमाच्या अंतर्गत जर काश्मीरमधील मुलींने अन्य प्रांतातील मुलासोबत विवाह केला, तर तिचे काश्मीरचे नागरिकत्व रहित होते आणि जर तिने पाकव्याप्त काश्मीरमधील मुलाशी लग्न केले, तर त्या मुलीच्या काश्मीरच्या नागरिकत्वास काही धक्का लागत तर नाहीच, उलट पाकिस्तानच्या मुलास भारताचे नागरिकत्व सहज मिळते. या कलमामुळे काश्मीर भारताचाच भाग असूनही तिथल्या नागरिकांना शरणार्थ्यांप्रमाणे रहावे लागत आहे आणि भारतातील अन्य प्रांतियांना काश्मीरमध्ये साधी भूमीही विकत घेता येऊ शकत नाही. - पू. डॉ. चारूदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

बांगलादेशातच काय; पण भारतातील काश्मीरसह अनेक नगरांत आणि जिल्ह्यांत हिंदू रहाणार नाहीत. हे टाळण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

      बांगलादेशातील एका मुसलमान प्राध्यापकाच्या जे लक्षात येते, ते भारतातील एकाही शासनकर्त्याच्या, लेखकाच्या, पत्रकाराच्या आणि मोठ्या हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या लक्षात येत नाही, हे लक्षात घ्या ! अखलाकच्या प्रकरणात मात्र हेच लेखक आणि पत्रकार पुरस्कार परत करण्यासाठी सर्वांत पुढे होते आणि सहिष्णू हिंदूंना असहिष्णू ठरवण्यात त्यांची जणू स्पर्धाच चालू होती !
हिंदूंचा छळ चालूच राहिल्यास ३० वर्षांनी बांगलादेशात हिंदू रहाणार नाहीत ! 
- प्रा. अब्दुल बरकत, ढाका विद्यापीठ
     धार्मिक अत्याचारांमुळे देश सोडून जाणार्‍या हिंदूंचे लोंढे चालूच राहिले, तर ३० वर्षांनी बांगलादेशात एकही हिंदु नागरिक नावाला शिल्लक रहाणार नाही, असा निष्कर्ष बांगलादेशमधील ढाका विद्यापिठाचे प्रा. अब्दुल बरकत यांनी काढला आहे.

गोरक्षकांनो, हे लक्षात घ्या !

अनेक ठिकाणी गोरक्षक गोवंशाची अवैध वाहतूक रोखतात. ही वाहतूक रोखत असतांना काही ठिकाणी संतप्त गोरक्षकांकडून गोवंशाची अवैध वाहतूक करणारे वाहनही (उदा. ट्रक, टेम्पो) जाळण्यात येते. या ठिकाणी गोरक्षकांनी हे लक्षात घ्यायला हवे की, वाहन जाळणार्‍या गोरक्षकांवरच पोलीस गुन्हे दाखल करतात, त्याचबरोबर वाहन जाळल्यामुळे वाहनमालकाला विमा मिळतो. त्यामुळे त्याची विशेष हानी होत नाही; मात्र त्याच्या वाहनाच्या विम्याची रक्कम भरून देण्यासाठी देशाची आर्थिक हानी होते. त्यामुळे भावनेच्या भरात वाहन जाळण्यासारखी कृती करण्याऐवजी गोरक्षणासाठी वैध मार्गाने कृती करावी. गोरक्षणासह सर्व समस्या सुटण्यासाठी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेला पर्याय नाही. -

गेल्या २६ वर्षांमध्ये काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन होऊ न शकणे, हे लज्जास्पद !

     काश्मीर आपल्या पूर्वजांची संपत्ती आहे; कारण काश्मीर ही कश्यप ऋषींची भूमी आहे. कोट्यवधी हिंदूंचे गोत्र हे कश्यप आहे, ज्यांचे गोत्र ठाऊक नसते, त्यांचे सुद्धा गोत्र कश्यप मानले जाते. आम्हा हिंदूंची श्रद्धा आहे की, सगळ्या जिवांची निर्मिती कश्यप ऋषींपासून झाली आहे. गेल्या २६ वर्षांमध्ये काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन होऊ शकले नाही, हे लज्जास्पद आहे, ही गोष्ट लोकशाहीला काळिमा फासणारी आहे. - श्री. नीलेश सिंगबाळ, सनातन संस्था, वाराणसी

गेल्या सहस्र वर्षांच्या इतिहासात मूठभर आक्रमकांनी बघता बघता भारत जिंकला, तर आता त्यांना भारत जिंकणे अशक्य आहे का ?

      भारतीय सैन्यात काय शक्ती आहे, हे पाकने आता पाहिले आहे. जेव्हा आमच्या सैनिकांनी पराक्रम करून सर्जिकल स्ट्राइक केले. त्यानंतर सीमेपलीकडे भूकंप झाला. अजूनही ते स्थिरस्थावर झालेले नाही. पाकला आता लढायचेच असेल, तर त्यांनी भ्रष्टाचार, काळा पैसा आणि गरिबी यांविरोधात लढले पाहिजे.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी

कुठे एकेका सैनिकासाठी आणि पोलिसासाठी लढणारे देश, तर कुठे पोलीस आणि सैनिक यांच्या जिवाची किंमत नसलेले भारत सरकार ! सरकार केवळ बातम्या देण्यासाठी असते कि कृती करण्यासाठी ?

     जम्मू-काश्मीरच्या बांदिपुरामध्ये २५ नोव्हेंबर २०१६ या दिवशी पहाटे सुरक्षारक्षक आणि आतंकवादी यांच्यामध्ये झालेल्या चकमकीत एक सैनिक हुतात्मा झाला, तर २ आतंकवाद्यांना ठार करण्यात आले. कुलगाम येथे आतंकवाद्यांनी पोलीस पथकावर केलेल्या आक्रमणात २ पोलीस हुतात्मा झाले.

एका मोठ्या हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या पदाधिकार्‍याने हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्याविषयी काढलेले गौरवोद्गार

असे हिंदुत्वनिष्ठ हीच हिंदु धर्माची खरी शक्ती !
      एका जिल्ह्यात हिंदु जनजागृती समितीच्या हिंदूसंघटन मेळाव्यात एका मोठ्या हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या पदाधिकार्‍यांचा सत्कार करण्यात आला होता. त्या मेळाव्यानंतर त्या मोठ्या हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या जिल्हा पदाधिकार्‍यांनी त्या सत्कार केलेल्या पदाधिकार्‍यांना विचारले, हिंदु जनजागृती समितीचा सत्कार तुम्ही का स्वीकारला ? त्यावर त्यांनी सांगितले, हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था हिंदुत्वाचे कार्य करतात. ते मला आवडते. जिथे हिंदुत्वाचे कार्य आहे, तिथे मी जाणार. त्यासाठी मी संघटनेचे पदही सोडू शकतो. मला त्याची आवश्यकता नाही.

आगामी काळात भीषण आपत्तींतून वाचण्यासाठी साधना करणे आणि भगवंताचे भक्त बनणे अपरिहार्य

       भावी आपत्काळाचा धैर्याने सामना करता येण्यासाठी सनातनच्या भावी आपत्काळातील संजीवनी या ग्रंथमालिकेतील विविध उपचारपद्धती शिकून घ्याव्यात. तथापि आपण कितीही उपचारपद्धती शिकून घेतल्या, तरी त्सुनामी, भूकंप अशा काही क्षणांत सहस्रो नागरिकांचा बळी घेणार्‍या महाभयंकर आपत्तींमध्ये जिवंत राहिलो, तरच त्यांचा उपयोग करू शकतो अशा आपत्तींत आपल्याला कोण वाचवू शकतो, तर केवळ देवच  भगवंताने आपल्याला वाचवावे, असे वाटत असेल, तर आपण साधना आणि भक्ती करायला हवी. श्रीकृष्णाने गीतेमध्ये न मे भक्तः प्रणश्यति । (अर्थ : माझ्या भक्तांचा नाश होणार नाही), असे वचन त्याच्या भक्तांना दिले आहे. याचाच अर्थ असा की, कोणत्याही आपत्तीतून वाचण्यासाठी आपल्याला साधना करणे अनिवार्य आहे.

‘२ प्रतिशत सर्वसाधारण लौकिक ज्ञानाच्या पायावर ईश्‍वरी ज्ञानाची ९८ प्रतिशत इमारत उभी असते.’

     २ प्रतिशत लौकिक ज्ञानाचा पाया म्हणजे सप्तलोक आणि सप्तपाताळ असतात. त्यांचे सर्वसाधारण कार्य, पंचमहाभूते, चार वेद, संत म्हणजे काय ? व्यवहार आणि अध्यात्म म्हणजे काय ? इतिहासातील विशिष्ट घटना इत्यादी विषयांचे ढोबळ ज्ञान ज्ञानी व्यक्तीला असल्यास तो ईश्‍वरी ज्ञानातून विविध विषयांतील अनेक सूक्ष्म पैलूंचा उलगडा करू शकतो; परंतु त्यासाठी ढोबळ ज्ञानाची आवश्यकता असते.’ - श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१९.६.२०१६)

सनातनच्या निरपराध साधकांवरील हा अन्याय लक्षात ठेवा !

     कोणताही गुन्हा केला नसतांना श्री. समीर गायकवाड यांना मागील १ वर्ष ७६ दिवसांपासून, तर डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना ५ महिने २५ दिवसांंपासून कारागृहात डांबण्यात आले आहे.
     केवळ हिंदुत्वाची मानहानी करण्यासाठी सनातनच्या निरपराध साधकांना कारागृहात डांबणार्‍यांना हिंदु राष्ट्रात दामदुप्पटीने शिक्षा देण्यात येईल !

फलक प्रसिद्धीकरता

हिंदुद्वेष्ट्या साम्यवाद्यांचे खरे स्वरूप उघड !
   ४ दशके राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये राहून संघाविरोधातील नाराजीमुळे नुकतेच माकपमध्ये प्रवेश केलेले थिरूवनंतपुरम् येथील नेते पी. पद्मकुमार यांनी संघात घरवापसी केली. ‘माकपमध्ये इसिसच्या जिहादी आतंकवाद्यांमध्ये राहिल्यासारखे वाटले’, असे पद्मकुमार म्हणाले.
      शांती, मानवता आणि सुधारण्याची प्रक्रिया’ (पीस, ह्युमॅनिटी अ‍ॅण्ड रिफॉर्मेशन’) या विषयावर ४ डिसेंबर या दिवशी नवी मुंबईतील नेरूळ येथे एका धर्मद्रोही परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत ‘सामाजिक गैरसमजुतींचे निर्मूलन’, ‘संत तुकाराम महाराज आणि इस्लाम’ आणि ‘शांती आणि मानवता यांत धर्माची भूमिका’ या विषयांवर अनुक्रमे डॉ. राम पुनियानी, डॉ. रफीक पारनेकर (इस्लामिक मराठी पब्लिकेशन ट्रस्ट), श्री स्वामी लक्ष्मी शंकराचार्य (लक्ष्मणपुरी) हे मार्गदर्शन करणार आहेत.

संतांचा छळ करणार्‍या राजकारण्यांनो, संतांना वेळीच शरण जा आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार अन्याय, भ्रष्टाचार अशा गोष्टी नसलेले सनातन धर्म राज्य (हिंदु राष्ट्र) स्थापन करा !

सौ. शालिनी मराठे
  राजा विश्‍वामित्राने वसिष्ठऋषींकडे असलेली कामधेनू मिळवण्यासाठी त्यांच्यावर आपल्या सर्व सैन्यानिशी आक्रमण केले; पण तो वसिष्ठऋषींचा पराभव करू शकला नाही. पुढेही त्यांचा पराभव करण्याच्या हेतूने विश्‍वामित्र राजाने राज्य सोडून तपश्‍चर्येला आरंभ केला आणि तो राजर्षि झाला, तरीही त्यास वसिष्ठऋषींचा पराभव करता आला नाही, तिथे इतर राजांची काय कथा !
    क्षात्रतेजाने ब्राह्मतेज जिंकणे, हे सर्वथा अशक्य आहे. तरीही विश्‍वामित्र राजापासून आजपर्यंत अनेक राज्यकर्त्यांनी ऋषी, संत आदींचा, म्हणजे धर्मसत्तेचा द्वेष करणे चालूच ठेवले. सध्याच्या कलियुगातही राज्यकर्ते संतांचा का आणि कसा द्वेष करतात आणि ईश्‍वराचा कर्मफलन्यायाचा नियम अन् त्यातून राजकारण्यांनी लक्षात घ्यावयाचा बोध या लेखात देत आहोत. हा लेख वाचून काही राजकारण्यांनी तरी संतद्वेष करणे सोडले आणि त्यांनी संतांना शरण जाऊन त्यांची कृपा संपादन केली, तर हा लेख लिहिल्याचे सार्थक झाल्यासारखे होईल.

सगुणातील ईश्‍वराची अनुभूती देणारे एकमेवाद्वितीय संत प.पू. परशराम पांडे महाराज (वय ८९ वर्षे) !

प.पू. परशराम पांडे महाराज
      परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी निर्माण केलेल्या या साधनेच्या विश्‍वातील एक उच्च विभूती म्हणजे प.पू. परशराम माधव पांडे महाराज (प.पू. बाबा) ! ३० नोव्हेंबर २०१६, म्हणजेच मार्गशीर्ष शुक्ल पक्ष प्रतिपदा या दिवशी त्यांनी ९० व्या वर्षात पदार्पण केले. त्यानिमित्ताने त्यांचे चरणी उतराई होण्यासाठी देवद आश्रमातील साधकांनी ही शब्द सुमनांजली अर्पण करण्याचा प्रयत्न केला आहे. हे लिखाण म्हणजे देवद आश्रमातील सर्व साधकांचे मनोगत आहे. त्यातील काही सूत्रे आपण ३० नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत पाहिली. आज त्यापुढील सूत्रे पाहूया.

सनातनच्या भावी आपत्काळातील संजीवनी या ग्रंथमालिकेतील ग्रंथ ! - अग्नीशमन प्रशिक्षण

आगामी महायुद्धकाळात उद्भवणार्‍या समस्यांच्या वेळी, तसेच नेहमीसाठीही उपयुक्त !
मनोगत
      आग ही दैनंदिन जीवन-व्यापारातील एक अत्यावश्यक घटक असली, तरी तिच्या संदर्भात नियंत्रित आणि अनियंत्रित यांमधील लक्ष्मणरेषा फार महत्त्वाची असते. सर्वसाधारणतः मनुष्य उपयोगात आणत असलेल्या सर्व आगी नियंत्रित असतात; पण एखाद्या प्रसंगी आग नियंत्रणाची लक्ष्मणरेषा ओलांडू शकते. असे झाल्यास त्यावर काय उपाययोजना करायची, याचे ज्ञान ती आग हाताळणार्‍यांना असणे महत्त्वाचे असते. अग्नीशमनाविषयीचे प्रशिक्षण मोठमोठे कारखाने, प्रवासी नौका (जहाजे), विमाने आदींमध्ये दिले जाते; परंतु खेदाची गोष्ट म्हणजे सर्वसामान्य मनुष्य, तसेच दिवसातील ५ - ६ घंटे आगीवर स्वयंपाक करणारी गृहिणी आगीचे शास्त्र आणि अग्नीशमनाचे उपाय यांसंदर्भात पूर्णतः अनभिज्ञ असते. या अज्ञानातून कित्येक अपघात घडतात. आगीचे शास्त्र, अग्नीशमनाची विविध माध्यमे आणि त्यांचा उपयोग करण्याच्या पद्धती, चुकीची माध्यमे वापरल्याने होणारे दुष्परिणाम इत्यादींविषयी शास्त्रीयदृष्ट्या आणि सोप्या भाषेत ज्ञान देणे, हा प्रस्तुत ग्रंथ संकलित करण्याचा मुख्य उद्देश आहे. 

दैवी कण : प्रकार, वैशिष्ट्ये आणि कार्य !

कु. मधुरा भोसले
१. दैवी कणांचे आकार
अ. लहान : १ मि.मी. हून लहान 
आ. मध्यम : १ मि.मी.
इ. मोठा : १ मि.मी. हून अधिक 
- कु. मधुरा भोसले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२०.११.२०१६, रात्री ९.२१)

दैनिक सनातन प्रभात म्हणजे अज्ञानाच्या अंधःकारात चाचपडणार्‍या हिंदु समाजाला ज्ञानाचा प्रकाश देऊन नवचैतन्याने प्रेरित करणारा ज्ञानसूर्य !

श्री. संदीप जगताप
        आज समाजमनामध्ये राष्ट्र आणि धर्म यांच्या निष्ठेच्या उणिवा प्रकर्षाने जाणवत आहेत. दूरचित्रवाहिन्या अन् वर्तमानपत्रे यांनी त्या उणिवा दूर होण्यासाठी मोठे कार्य हाती घेऊन लोकशाहीचा खर्‍या अर्थाने चौथा आधारस्तंभ होण्याची आज आवश्यकता आहे. हे करतांना समाजमनाला त्याच्या कर्तव्याची आणि सर्वत्रच्या सत्य परिस्थितीची जाण निर्माण करून योग्य दिशादर्शन करायला हवे. दैनिक सनातन प्रभात हे कार्य समर्थपणे पार पाडत आहे. याच्या तुलनेत इतर मोठमोठी वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्या या त्यांच्या कर्तव्याला पाठ फिरवत असल्याचे लक्षात येत आहे. या कर्तव्याला पाठ फिरवणारी अन्य वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्यांच्या तुलनेत सनातन प्रभातची वैशिष्ट्ये पुढील सारणीवरून आपल्या लक्षात येतील.

संत आणि महर्षि यांच्या आशीर्वादामुळे अन् त्यांनी सांगितलेले विधी केल्यामुळे पुनर्जन्म प्राप्त झालेली ६६ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. दीपाली मतकर !

कु. दीपाली मतकर
    २२.१०.२०१६ या दिवशी कु. दीपाली मतकर यांना डेंग्यू, न्यूमोनिया आणि कावीळ, असे विविध गंभीर आजार झाले. त्या वेळी त्यांना रुग्णालयात अतीदक्षता विभागात ठेवण्यात करण्यात आले. त्यांच्या आजारपणाचा घटनाक्रम, त्या गंभीर आजारातून बर्‍या होण्यासाठी सप्तर्षि जीवनाडीपट्टीचे वाचक पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून महर्षींनी सांगितलेले उपाय, भृगु महर्षींनी श्री. विशाल शर्मा यांच्या माध्यमातून सांगितलेले उपाय आणि देव भक्ताला काळाच्या दाढेतून कसे वाचवतो, याच्या साधकांनी घेतलेल्या अनुभूती आपण २८ नोव्हेंबरपासून क्रमश: लेखांत पाहिल्या. आजच्या लेखात कृतज्ञताभाव तसेच संतांनी कु. दीपाली यांना उपाय सांगितले याविषयी आज पाहूया.


॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

देवतांच्या मूर्तीची उंची शास्त्रानुसारच हवी !

देवतांच्या मूर्तीची उंची
     ९ ते १२ इंच यापेक्षा अधिक उंचीची देवतांची मूर्ती घरातील पूजेसाठी असू नये. दैवतशास्त्राच्या संकेताप्रमाणे यापेक्षा अधिक आकाराच्या मूर्ती या स्वतंत्र मंदिरात स्थापन कराव्यात, असे शास्त्र सांगते.
१. पूूजेत न ठेवलेली मूर्ती
    पूजन न केलेल्या मूर्तीमध्ये असणारे देवतेचे तत्त्व सगुण स्तरावर पृथ्वी तत्त्वाच्या स्तरावर सुप्त अवस्थेत असते, तसेच या मूर्तीतील देवतेचे चैतन्य आकाशतत्त्वाच्या आधारे मूर्तीमध्ये सुप्तावस्थेतच अंतर्भूत असते.

माझ्यासाठी सर्वकाही प.पू. डॉक्टर !

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...
परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले
कोणी पाहिला राम ।
कोणी पाहिला कृष्ण ॥
मला तर दिसले नाही कोणी ।
पण या डोळ्यांनी पाहिले ।
केवळ परम पूज्य, केवळ परम पूज्य ॥ १ ॥

ते म्हणाले, व्हा एकरूप कृष्णासी ।
अहो, पण कृष्ण आहे कोणाकडे ॥ 
ते म्हटले, जा मोक्षासी । 
हे खरे, पण मोक्ष आहे कोणाकडे ॥

स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाउंडेशनच्या प्रसारकार्याचा सप्टेंबर २०१६ मधील आढावा

पू. मिलुटीन पांक्रात्स
१. ठळक वैशिष्ट्ये
अ. सप्टेंबर २०१६ मध्ये एस्.एस्.आर्.एफ्.च्या संकेतस्थळाला भेट देणार्‍यांची संख्या १० लक्षांहून अधिक झाली.
आ. नवीन चालू केलेल्या तिसर्‍या अ‍ॅड वडर्स खात्यामुळे एस्.एस्.आर्.एफ्.संकेतस्थळाला भेट देणार्‍यांच्या संख्येत वृद्धी झाली.
इ. सप्टेंबर मासात (महिन्यात) बहुतांश सर्व प्रमुख लेखांना भेट देणार्‍यांच्या संख्येत वृद्धी झाली, उदा. इंग्रजी भाषेतील ग्रहण, श्राद्ध आणि तिसर्‍या महायुद्धाचे भाकित या लेखांना भेट देणार्‍यांची संख्या लक्षणीयरित्या वाढली.
२. संकेतस्थळाच्या संदर्भातील संख्यात्मक आढावा
२ अ. विविध माध्यमांतून संकेतस्थळाला भेट देणार्‍यांची संख्या 

ईश्‍वरी ज्ञानाशी संबंधित सेवा करतांना प.पू. डॉक्टर आणि साधक यांना होणारा त्रास अन् ज्ञानसेवेचा सूक्ष्म-जगतावर होणारा परिणाम

श्री. राम होनप
      सनातनच्या ग्रंथांत पृथ्वीवर आतापर्यंत उपलब्ध नसलेले, तसेच बर्‍याच विषयांच्या संदर्भात का आणि कसे ? यासंदर्भातील उत्तरे देणारे बरेच ज्ञान असते. ज्ञान मिळण्याच्या प्रक्रियेसंदर्भात अनेकांना जिज्ञासा असते. ज्ञान मिळवण्याच्या प्रक्रियेत प.पू. डॉक्टर आणि साधक यांना होणारे त्रास यासंदर्भातील ज्ञान येथे दिले आहे. 

१. प.पू. डॉक्टर आणि ईश्‍वरी ज्ञानप्राप्तकर्ते साधक यांचा 
आध्यात्मिक स्तर आणि त्यांना ज्ञानसेवेत होणार्‍या त्रासाचे प्रमाण 

१०.१२.२०१६ ते १०.५.२०१७ या कालावधीत सर्वांनी करावयाचे नामजपादि उपाय

      महर्षींनी जीवनाडीपट्टीत सांगितलेल्या उपायांच्या जोडीला पुढील उपायही करावेत. उपायांच्या एकूण कालावधीतील ३० टक्के वेळ पुढे दिलेल्या उपायांना द्यावा. महर्षींनी सांगितलेला ‘ॐ निसर्गदेवो भव । ॐ वेदम् प्रमाणम् । हरि ॐ जयमे जयम् । जय गुरुदेव ।’ हा जप उरलेल्या वेळेत अधिकाधिक करावा.

साधकांनी देवाला आणि संतांना प्रतिदिन करावयाच्या प्रार्थना

     साधकांनी पुढील प्रार्थना प्रतिदिन सकाळी, तसेच मंदिर, मठ येथे गेल्यावर, संतांच्या दर्शनाला गेल्यावर एकदा करावी आणि एरव्हीही करावी.
१. ‘देवा, माझ्यावर झालेल्या अनिष्ट शक्तींच्या हल्ल्यांचा परिणाम समूळ नष्ट होऊ दे. माझ्या देहातील सर्व रोगांचा नाश होऊन मला उत्तम आरोग्य लाभू दे. (एखाद्याला अनिष्ट शक्तींचा त्रास आणि एखादा रोग नसल्यास त्याने पुढील प्रार्थना करावी - ‘मला अनिष्ट शक्तींचा त्रास होऊ देऊ नकोस आणि माझे आरोग्य चांगले राहू दे.)
२. साधकांचे त्रास दूर होऊ देत.
३. माझी आणि साधकांची आध्यात्मिक उन्नती होऊ दे.
४. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या कार्यांतील अडथळे दूर होऊन हिंदु राष्ट्राची स्थापना होऊ दे.’
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

साधकांना सूचना, वाचक आणि हितचिंतक यांना विनंती

माहिती अधिकाराच्या अंतर्गत मिळवलेली उपयुक्त माहिती दैनिक सनातन प्रभातला पाठवा !
      ‘अनेकजण माहिती अधिकाराच्या अंतर्गत विविध क्षेत्रांतील माहिती मागवत असतात. या मिळालेल्या माहितीपैकी काही माहिती सर्वांसाठी उपयुक्त असते. या माहितीचा लाभ जनतेला मिळावा यासाठी माहिती अधिकारच्या अंतर्गत मिळालेली माहिती वृत्त, लेख आदीच्या स्वरूपात सनातन प्रभातला पाठवल्यास त्याला उचित प्रसिद्धी दिली जाईल. ही माहिती दैनिक सनातन प्रभातच्या पुढील संपर्क पत्त्यावर पाठवावी.’
इ मेल : dspgoa1@gmail.com
संपर्क क्रमांक : (०८३२)२३१२६६४
पत्ता : सनातन आश्रम, २४/बी, रामनाथी, बांदीवडे, फोंडा, गोवा.

भ्रष्टाचारी कर्मचार्‍यांच्या कुटुंबियांनो, भ्रष्टाचार्‍यांना उघड करण्याची साधना करा !

    नोकरी किंवा धंदा करणार्‍या भ्रष्टाचार्‍याची मासिकप्राप्ती त्याच्या कुटुंबियांना ज्ञात असते. एखादा मासिकप्राप्तीपेक्षा अधिक पैसे घरी आणायला लागला किंवा खर्च करू लागला, तर त्याचा निष्कर्ष एकच असतो आणि तो म्हणजे ‘ती व्यक्ती भ्रष्टाचार करून पैसे मिळवत आहे. तिच्या पापाच्या पैशांचा उपभोग घेणे, हे पाप आहे, तर तिचा गुन्हा उघडकीस आणणे, हे पुण्य आहे आणि समष्टी साधनाही आहे. यासाठी प्रत्येकानेच आपले कुटुंबीय, शेजारी, कार्यालयात काम करणारे इत्यादी भ्रष्टाचार करत आहेत, हे लक्षात आल्यावर लगेच त्याविरुद्ध तक्रार दाखल करा आणि तिची एक प्रत सनातन प्रभातलाही पाठवा.
सनातन प्रभातचा संपर्क क्र. - (०८३२) २३१२६६४  

॥ हरि ॐ तत्सत् ॥

शिष्याचा विश्‍वास
      गुरु विश्‍वासावर आहे. आपल्या विश्‍वासावर गुरूंची महती अवलंबून आहे. गुरु तुमच्यापण विश्‍वासावर
आहे. तुमच्या विश्‍वासातच गुरु आहे.
     भावार्थ : ‘गुरु विश्‍वासावर आहे. आपल्या विश्‍वासावर गुरूंची महती अवलंबून आहे’, यातील ‘गुरु’ हा शब्द बाह्य गुरूविषयी वापरलेला आहे. गुरूवर विश्‍वास असेल, तरच गुरु ‘गुरु’ म्हणून कार्य करू शकतो. ‘गुरु तुमच्यापण विश्‍वासावर आहे. तुमच्या विश्‍वासातच गुरु आहे’, यातील ‘गुरु’ हा अंतर्यामी असलेला गुरु होय.
संत भक्तराज सनातनचे श्रद्धास्थान
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन ‘संत भक्तराज महाराज यांची शिकवण.’)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले

     ‘पाकिस्तान्यांकडून वारंवार आक्रमणे होत असतांना ‘आक्रमण करणे’ हेच स्वरक्षणाचे सर्वोत्तम साधन आहे (Attack is the best policy of defence), हे स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या एकाही सरकारला ज्ञात नाही; म्हणून भारत आणि हिंदूही नेहमी शत्रूंकडून मार खातात !’ - (परात्पर गुरु) डॉ. आठवलेयोगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

खरे यश !
स्वतःच्या यशाच्या धुंदीत रहाणार्‍यांपेक्षा जो दीन-दुबळे, दरिद्री आणि गरजू 
अशा व्यक्तींच्या साहाय्याला धावून जातो अन् यालाच कर्तव्य मानतो, तोच खरा यशस्वी माणूस !
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

देशभक्तीचे अज्ञानी !

संपादकीय
      दोन दिवसांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने एका आदेशाद्वारे देशातील सर्व चित्रपटगृहांत चित्रपट चालू होण्यापूर्वी राष्ट्रगीत लावणे सक्तीचे केले. देशवासियांमध्ये देशभक्ती जागृत करणे, हाच त्यामागील उदात्त हेतू आहे; मात्र एम्.आय.एम्.चे खासदार असदुद्दीन ओवैसी यांना त्याविषयी खात्री वाटत नाही. ते प्रश्‍न विचारत आहेत, चित्रपटगृहांत राष्ट्रगीत वाजवल्याने देशभक्ती जागृत होणार आहे का ? देशाची विद्यमान स्थिती अशी आहे की, जनतेने एकसंध रहाणे आणि देशाविषयी प्रेम आणि आत्मियता दाखवणे आवश्यक झाले आहे. लोकनियुक्त शासन लोकप्रतिनिधींच्या साहाय्याने सदासर्वकाळ यशस्वी होण्याची शक्यता नाही. अशा वेळी जनतेनेच शासनाच्या पाठीशी उभे रहाणे आवश्यक आहे.

शासनाच्या प्रोत्साहनाची परिणती !

संपादकीय
       परवा एक डिसेंबर या दिवशी झारखंड राज्यात घडलेला एक प्रसंग पहा. एका व्यक्तीनेे तिचे वाहन वाहनतळावर उभे करण्याविषयी चूक केली. त्या चुकीचा दंड वसूल करतांना नियमापेक्षा अधिक रक्कम वसूल केली; म्हणून त्या व्यक्तीच्या पत्नीने वाहतूक पोलिसाला चपलेने चोपले. देशवासियांनी त्या महिलेच्या कृतीला दाद दिली आहे. ब्रिटीशकालापासून चालत आलेला पोलिसावर हात न उगारण्याचा नियम या महिलेने मोडला.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn