Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Jab mai CPI (M) me tha, tab lagta tha ki ISIS
ke jihadi atankiyoke sath reh raha hu- RSSme loutnewale Padmakumar
    Kya Communisto ka yahi asli chehra hai
हिंदू तेजा जाग रे ! जब मैं सीपीआई (एम्) में था, तब लगता था कि इसिस
के जिहादी आतंकियों के साथ रह रहा हूं ! - आरएसएस में लौटनेवाले पद्मकुमार
    क्या कम्युनिस्टों का यही असली चेहरा है ?

कोटी कोटी प्रणाम !

सनातनच्या ३९ व्या संत
पू. श्रीमती रुक्मिणी लोंढेआजी यांचा आज वाढदिवस

---------
सनातनचे ११ वे संत 
पू. संदीप आळशी यांचा आज वाढदिवस
----------

हिंदु तत्त्वचिंतक पू. सीताराम गोयल यांचा आज स्मृतीदिन

(म्हणे) सरकार कुणाचेही असले, तरी राममंदिर होणारच !

भाजपचे खासदार विनय कटियार यांची पोकळ गर्जना !
 राममंदिर होणारच, अशी दैववादी घोषणा करण्यापेक्षा सत्ताधारी नेते त्यांच्या क्रियमाणातून
राममंदिर कधी उभारणार ते का सांगत नाहीत ? हिंदु जनतेला तसे आश्‍वासन हवे आहे !
    हाथरस (उत्तरप्रदेश) - अयोध्येत राम जन्मभूमीवर राममंदिर उभारावे, हा आमचा संकल्प आहे; मग कोणतेही सरकार येवो अथवा जावो. अयोध्येत राममंदिर बनवणारच. त्यासाठी कोणतीही तडजोड होणार नाही, असे प्रतिपादन भाजपचे खासदार विनय कटियार यांनी येथे केले. (गेल्या २५ वर्षांपासून तडजोड होतच आल्याने राममंदिर उभे राहिले नाही, हेच वास्तव आहे ! - संपादक) हाथरसमध्ये भाजपकडून काढण्यात आलेल्या परिवर्तन यात्रेत ते बोलत होते.

तत्कालीन काँग्रेस सरकारमुळे हिंदुजा बंधू बोफोर्स प्रकरणातून सुटले !

घोटाळेबाज काँग्रेसच्या नेत्यांना कारागृहात डांबून त्यांना कठोर शिक्षा
होण्यासाठी सध्याच्या सरकारने प्रयत्न करावेत, अशीच जनतेची अपेक्षा आहे !
    नवी देहली - ३१ मे २००५ या दिवशी देहली उच्च न्यायालयाने बोफोर्स आस्थापनासह सिरचंद, गोपीचंद आणि प्रकाशचंद या हिंदुजा बंधूंची सुटका केली. या निकालाच्या विरोधात सीबीआयला सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याची अनुमती नाकारण्यात आली, असे सीबीआयचे अधिवक्ता पी.के. डे यांनी सर्वोच्च न्यायालयात एका याचिकेवरील सुनावणीच्या वेळी सांगितले. (वर्ष २००५ मध्ये काँग्रेसचे सरकार होते आणि बोफोर्स प्रकरणात लाचखोरी केल्याचा गांधी परिवारावरच आरोप होता. त्यामुळे हिंदुजा बंधूंची सुटका होणे त्यांच्यासाठी आवश्यक होते. त्यामुळेच ही अनुमती नाकारण्यात आली, असेच म्हणावे लागतेे. आता याला आव्हान देण्यासाठी सध्याच्या सरकारने अनुमती दिली पाहिजे ! - संपादक)

पंतप्रधान मोदी यांच्या विज्ञापनांवर गेल्या अडीच वर्षांत १ सहस्र १०० कोटी रुपयांचा खर्च !

जनतेचा पैसा अशा प्रकारे उधळणार्‍यांकडून तो व्याजासहित वसूल केला पाहिजे !
    नवी देहली - केंद्र सरकारने गेल्या अडीच वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा समावेश असलेल्या विज्ञापनांवर १ सहस्र १०० कोटी रुपये खर्च केल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये दूरचित्रवाहिनी, इंटरनेट, वृत्तवाहिन्यांवरील विज्ञापने यांचा समावेश आहे; मात्र वर्तमानपत्रातील विज्ञापने, फलक, पत्रके, पुस्तिका आणि दिनदर्शिकांवरील विज्ञापने यांचा समावेश नाही. माहितीच्या अधिकारातून ही माहिती मिळाली आहे. ग्रेटर नोयडामधील श्री. रामवीर सिंह यांनी या संदर्भात अर्ज प्रविष्ट केला होता.केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने १ जून २०१४ ते ३१ ऑगस्ट २०१६ या कालावधीतील विज्ञापनांच्या खर्चाचा तपशील दिला आहे.
१. १ जून २०१४ ते ३१ मार्च २०१५ या कालावधीत मोदी यांचा समावेश असणार्‍या विज्ञापनांवर ४४८ कोटी रुपये खर्च करण्यात आले.

तृप्ती देसाई यांनी शबरीमाला मंदिरात येऊनच दाखवावे ! - अय्यप्पा धर्म सेनेची चेतावणी

    थिरूवनंतपुरम् - अय्यप्पा धर्म सेनेचे अध्यक्ष श्री. राहुल ईश्‍वर यांनी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई अथवा त्यांच्या पुरोगामी अनुयायांनी शबरीमाला मंदिरात येण्याचे धाडसच दाखवावे, अशी चेतावणी दिली आहे. भारतीय मुस्लिम महिला आंदोलनाच्या मुंबईतील हाजी अली दर्ग्यातील गर्भगृहातील प्रवेशाच्या यशाला श्री. राहुल यांनी बनावट म्हटले आहे. 

तिस्ता सेटलवाड यांनी संस्थेच्या निधीत अपहार केल्याचे पोलिसांकडे पुरावे !

    पुरोगामी आणि निधर्मीवादी समाजसेवेच्या नावाखाली लोकांकडून आणि विदेशातून पैसे घेऊन त्याचा अपहार करतात, हे यातून उघड होते ! आता डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या संस्थेतही घोटाळ झाल्याचे पुरावे माहितीच्या अधिकाराखाली समोर आले असतांना महाराष्ट्र सरकार त्यावर कारवाई कधी करणार ?
    नवी देहली - तिस्ता सेटलवाड आणि तिचे पती जावेद आनंद यांनी त्यांच्या सेवाभावी संस्थेला वर्ष २००२च्या गुजरात दंगलीतील पीडितांच्या साहाय्यासाठी मिळालेल्या ९ कोटी ७५ लाख रुपयांच्या देणगीतील ३ कोटी ८५ लाख रुपये वैयक्तिक उपयोगात आणल्याचे कागदोपत्री पुरावे मिळाले असल्याचा दावा गुजरात पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात केला आहे. वैयक्तिक वापरासाठी केलेल्या अपहाराच्या पैशातून तिस्ता यांनी विदेशी मद्य आणि पंचतारांकित उपहारगृहे यांवर व्यय केल्याचेही आढळून आले आहे.

पोलिसांकडून केवळ हिंदूंची उत्सव मंडळे लक्ष्य; मशिदींवरील भोंगे मोकाट

  •   ४०० मंडळांना नोटिसा   
  • १०० पेक्षा अधिक खटले
हिंदूंच्या उत्सव मंडळांवर कारवाई करण्यास कर्तव्यतत्परता
दाखवणारे पोलीस मशिदींच्या बाबतीत कर्तव्यचुकार का होतात ?
    पुणे, २ डिसेंबर - उच्च न्यायालयाचा आदेश आणि सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश यांनुसार ध्वनीप्रदूषण करणार्‍या शिवजयंती, गणेशोत्सव यांसह अन्य उत्सव साजरे करणार्‍या मंडळांवर पुणे पोलीस गुन्हे प्रविष्ट करत आहेत. ४०० उत्सव मंडळांना ध्वनीप्रदूषणाच्या नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत, तर १०० पेक्षा अधिक जणांवर खटले प्रविष्ट करण्यात आले आहेत; मात्र त्याच वेळी न्यायालयाने मशिदींवरील बेकायदा भोंगे काढण्याचेही आदेश दिले आहेत. पुण्यात एकेका मशिदीवर १० ते १२ भोंगे आहेत; पण त्यावर कारवाई करण्यास पोलीस कचरत आहेत. मशिदींच्या भोंग्यांना मोकाट साडून पोलीस केवळ हिंदूच्या सणांना लक्ष्य करत असल्याने कार्यकर्ते आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्याकडून संताप व्यक्त केला जात आहे.

न्यायालयांत राष्ट्रगीताची सक्ती नको ! - सर्वोच्च न्यायालय

    नवी देहली - न्यायालयाचे कामकाज चालू होण्यापूर्वी न्यायालयात राष्ट्रगीत म्हणणे  बंधनकारक करावे, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. राष्ट्रगीताविषयी आम्ही नुकत्याच दिलेल्या आदेशाचे निमित्त करून तो विनाकारण फार ताणण्याची आवश्यकता नाही, असे न्यायालयाने या वेळी स्पष्ट केले. एका अधिवक्त्याने या संदर्भात याचिका केली होती.

देशभरातील ‘पीस स्कूल’वर बंदी घालण्यासाठी यवतमाळ येथे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन !

      यवतमाळ - आतंकवादाला खतपाणी घालणार्‍या डॉ. झाकीर नाईक यांचे प्रत्यार्पण करून त्यांना भारतात आणावे, त्यांच्यावर कठोर कारवाई करून देशभरातील ‘पीस स्कूल’वर बंदी घालावी, यासाठी केंद्रीय गृहमंत्री यांच्या नावे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना ३० नोव्हेंबर या दिवशी निवेदन देण्यात आले. या वेळी जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रतिनिधी नायब तहसीलदार अजय गौरकार यांनी ते स्वीकारले. निवेदन देतांना हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रशांत सोळंके आणि श्री. दत्ता फोकमारे उपस्थित होते.
     याच निवेदनात कर्नाटक आणि केरळ राज्यांमध्ये हिंदु नेत्यांच्या हत्या प्रकरणाचा संपूर्ण तपास केंद्रीय अन्वेषण यंत्रणेच्या माध्यमातून करण्यात यावा, अशी मागणी समितीच्या वतीने गृहमंत्र्यांना करण्यात आली.


रांची (झारखंड) येथे नियमापेक्षा अधिक पैसे घेणार्‍या वाहतूक पोलिसाला महिलेने चपलेने चोपले !

भ्रष्टाचारामुळे त्रस्त झालेल्या जनतेकडून उद्या
देशभरात सर्वत्र अशाच घटना घडू लागल्यास आश्‍चर्य वाटू नये !
    रांची (झारखंड) - १ डिसेंबरला येथे घडलेल्या एका घटनेत पोलिसाने एका महिलेच्या पतीकडून पार्किंगचा नियम तोडल्याने नियमापेक्षा अधिक दंड वसूल केला होता. यावरून संतापलेल्या महिलेने या पोलिसाला चोपले. या सर्व प्रकाराची छायाचित्रे सामाजिक माध्यमांमध्ये प्रसारित झाली आहेत. ज्या पोलिसाला चोपले तो रांची वाहतूक पोलीसमध्ये अतिरिक्त निरीक्षक आहे.

नोव्हेंबर मासापर्यंत २ सहस्र १८७ लोकांची सीमेवरून घुसखोरी !

घुसखोरांचे नंदनवन झालेला भारत !
     नवी देहली - देशात यावर्षी नोव्हेंबरपर्यंत २ सहस्र १८७ विदेशी लोकांनी घुसखोरी केली, अशी माहिती गृहमंत्रालयाकडून देण्यात आली आहे. (गृहमंत्रालयाने ही घुसखोरी रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या, हेही सांगायला हवे ! - संपादक) यांतील १ सहस्र ९९० जणांनी बांगलादेशातून, तर ८१ जणांनी पाकमधून घुसखोरी केली आहे. पाकमधून आलेल्यांमध्ये आतंकवाद्यांचाही समावेश आहे. तसेच म्यानमारमधून ११० जणांनी घुसखोरी केली आहे. या सर्वांना अटक करण्यात आली आहे. ही अधिकृत आकडेवारी असली, तरी सरकारी आकडेवारीव्यतिरिक्त सहस्रो जणांनी घुसखोरी केल्याची शक्यता आहे; कारण बांगलादेशातून देशात ५ कोटीहून अधिक लोकांनी घुसखोरी केल्याचे म्हटले जाते; मात्र प्रत्यक्षात सरकारी आकडेवारी इतकी नाही. त्यामुळे या आकडेवारीवरून घुसखोरीची संपूर्णपणे कल्पना येत नाही.

नोटाबंदीमुळे पत्नीच्या अंत्यसंस्कारासाठी रोख पैसे नसल्याने ६५ वर्षीय वृद्धाला२ दिवसांनंतर करावा लागला अंत्यसंस्कार !

भविष्यात कठोर कारवाया करतांना जनतेला असेे त्रास होऊ नये, 
याची शासनाने नोंद घेऊन त्याविषयी खबरदारीची उपाययोजना करावी !
     नोएडा - नोटाबंदीमुळे शहरातील बँकेत रोकड नसल्याने मुन्नीलाल या ६५ वर्षीय वृद्ध मजुराला पैशांअभावी पत्नीवर २ दिवस अंत्यसंस्कार करता आले नाहीत. येथील जे.जे. क्लस्टरसमोरील पदपथावर पत्नीच्या मृतदेहाजवळ मुन्नीलाल २ दिवस बसून होते. तिसर्‍या दिवशी पोलीस आणि एका समाजसेवक यांनी पैसे दिल्यानंतर पत्नीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. मुन्नीलाल यांची पत्नी फूलमती यांचा नोएडा येथील रुग्णालयात कर्करोगाने मृत्यू झाला होता.

बेंगळुरूमध्ये ४ कोटी रुपयांच्या नवीन बेहिशोबी नोटा जप्त !

नोटाबंदीशी निगडीत वृत्ते !
नोटाबंदीद्वारे काळा पैसा रोखण्याच्या प्रयत्नाला धक्का !
     बेंगळुरू - येथे आयकर विभागाने छापे टाकून दोघांकडून नवीन नोटा असलेली ४ कोटी रुपयांची रक्कम जप्त केली आहे. आयकर विभागाने याची चौकशी चालू केली आहे. या प्रकरणात बँक कर्मचारीही सहभागी असल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे. (व्यवस्था कितीही चांगली आणि परिणामकारक असली, तरी माणसाची प्रवृत्ती जोपर्यंत सत्यनिष्ठ आणि प्रामाणिक होत नाही, तोपर्यंत अशा गोष्टी होतच रहाणार ! प्रवृत्ती पालटण्यासाठी साधनेला पर्याय नसल्याने सरकारने त्यासाठी प्रयत्न करायला हवेत ! - संपादक)

नोटाबंदीचा निर्णय योग्यच ! - अमेरिका

     नवी देहली - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा घेतलेला निर्णय योग्यच आहे. कर चोरी आणि भ्रष्टाचार रोखण्यासाठीचे सरकारचे हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे, अशा शब्दांत अमेरिकेने केंद्र सरकारचे कौतुक करत नोटाबंदीचे समर्थन केले आहे.
    अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे उपप्रवक्ते मार्क टोनर यांनी पत्रकार परिषद म्हटले की, गेल्या २ वर्षांपासून मोदी सरकारने काळ्या पैशाविरोधात चालवलेल्या मोहिमेचा नोटाबंदी हा एक भाग आहे. सुधारणावादी निर्णय म्हणून या निर्णयाकडे आम्ही पाहत आहोत. या निर्णयामुळे भारत आणि अमेरिका यांच्या नागरिकांना थोड्या त्रासाला सामोरे जावे लागले.

उत्तराखंडमधील भारत-नेपाळ सीमेवर भूकंपाचे धक्के !

      नवी देहली - २ डिसेंबरला सकाळी उत्तराखंडमध्ये ५.२ रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. कोणीतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. 
महर्षींनी प्रलयकालाविषयी सतर्क करणे
      १९.३.२०१६ या दिवशी झालेल्या ‘नाडीवाचन क्रमांक ६७’मध्ये महर्षि म्हणतात, ‘‘हे पूर्ण वर्ष प्रलयकालाचे आणि आपत्तीजनक असणारे आहे.’’ (उत्तराखंडच्या भारत-नेपाळ सीमेवर भूकंपाचे धक्के बसले. या घटनेवरून प्रलयकालाविषयी महर्षींनी केलेले भाष्य किती तंतोतंत आहे, हे लक्षात येते ! - संपादक)

३ दिवसांत १ लाख ‘आयफोन’ची विक्री !

     नवी देहली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळ्या पैशांवर सर्जिकल स्ट्राईक करत ८ नोव्हेंबरच्या रात्री ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या नोटा बाद ठरवल्या. त्यानंतर केवळ ३ दिवसांत ‘आयफोन’ या आस्थापनाचे १ लाख भ्रमणभाष संच विकले गेल्याची माहिती समोर आली आहे. दर मासाला हे प्रमाण तीन चतुर्थांस असते. आयफोन-७ आणि ७ आयफोन-प्लस यांची किंमत साधारणत: ६० सहस्र ते ९२ सहस्र एवढी आहे. काळा पैसेधारकांनी काळे पैसा पांढरा करण्यासाठी ही शक्कल राबवली, असे सांगितले जाते.

युनेस्कोच्या जागतिक वारसा सूचीमध्ये योगाचा समावेश !

देश स्वतंत्र होऊन ६९ वर्षांनंतर योगाचा युनेस्कोच्या 
सूचीत समावेश होतो, हे भारतासाठी लज्जास्पद !
     नवी देहली - आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या माध्यमातून योगाचा प्रसार-प्रचार केल्यानंतर आता भारताला युनेस्कोच्या जागतिक सांस्कृतिक वारसा सूचीत योगाचा समावेश करण्यात यश मिळाले आहे. संयुक्त राष्ट्राच्या ‘युनेस्को’च्या सूचीत योगाला समाविष्ट करण्याची घोषणा संघटनेच्या भारताच्या प्रतिनिधी रुचिरा कांबोज यांनी नुकतीच केली. 
    युनेस्कोनुसार अमूर्ती सांस्कृतिक वारसाच्या कक्षेत मौखिक परंपरा आणि अभिव्यक्ती, प्रदर्शन कला, सामाजिक प्रथा-परंपरा, उत्सव, ज्ञान इत्यादींना ठेवण्यात येते. योगाला खेळाचा भाग समजण्यात येत असल्याने याला या सूचीत स्थान मिळण्यास अडचण येत होती. भारताकडून याला या सूचीत समाविष्ट करण्यासाठी ‘डॉजियर’ पाठवण्यात आले होते.


कामचुकार अधिकार्‍यांचे वेतन रोखण्यासह त्यांच्यावर कारवाईही करा !

बरेलीच्या महानगर न्यायदंडाधिकार्‍यांनी कामचुकार अधिकार्‍यांचे वेतन रोखले !
     बरेली (उत्तरप्रदेश) - येथील विविध सरकारी कार्यालयांकडे लोकांच्या असंख्य तक्रारी प्रलंबित आहेत. अनेक दिवसांनंतरही त्यांचे निराकरण होऊ शकलेले नाही. याची गंभीर नोंद घेऊन बरेलीचेमहानगर न्यायदंडाधिकारी पंकज यादव यांनी लोकांची कामे रखडवणार्‍या१७६ अधिकार्‍यांचे वेतन रोखले आहे, तसेच स्वत:ही वेतन न घेण्याचा निर्णय घेतला आहे. (यादव यांच्यासारखे अधिकारी असल्यास देश पालटायला वेळ लागणार नाही ! - संपादक)
   या संदर्भात यादव म्हणाले, ‘‘खेड्यापाड्यांतून लोक मोठ्या आशेने सरकारी कार्यालयांमध्ये तक्रारी घेऊन येतात. या तक्रारींचे निराकरण करणे, हे माझ्यासह सर्व अधिकार्‍यांचे कर्तव्य आहे. त्यात कसूर झाल्यास या तक्रारी वरिष्ठ पातळीवर जातात. तिथून पुन्हा आम्हाला विचारणा होते. असे होणे बरोबर नाही.’’

ज्या राष्ट्रात राष्ट्रगीताचा सन्मान करण्याविषयी न्यायालयाला आदेश द्यावा लागतो, ते राष्ट्र कधी महासत्ता होईल का ?

चित्रपटगृहात राष्ट्रगीत लावण्याच्या न्यायालयाच्या 
आदेशामागे एका राष्ट्राभिमान्याचा १३ वर्षांचा लढा ! 
     नवी देहली - देशभरातील सर्व चित्रपटगृहांमध्ये चित्रपट चालू होण्यापूर्वी राष्ट्रगीत लावण्यात यावे आणि प्रत्येकाने त्यावेळी उभे रहावे, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिला. केंद्र सरकारकडून लवकरच यासंबंधीच्या आदेशाची प्रत सर्व राज्यांना पाठवली जाणार आहे.
१. यासंदर्भात मध्यप्रदेशातील श्याम नारायण चौकसे यांनी जबलपूरच्या उच्च न्यायालयात वर्ष २००३ मध्ये एक याचिका प्रविष्ट केली होती. यात त्यांनी सभागृहात राष्ट्रगीत चालू असतांना सर्वांना उभे रहाणे अनिवार्य करण्याची मागणी केली होती. 
२. करण जोहर यांचा ‘कभी खुशी कभी गम’ हा चित्रपट वर्ष २००२ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील एका दृष्यात राष्ट्रगीत वाजवण्यात आले आहे. चौकसे यांनी सांगितल्यानुसार या दृष्याच्या वेळी वाजवण्यात येणार्‍या राष्ट्रगीताच्या वेळी ते उभे राहिले, तेव्हा चित्रपटगृहातील प्रेक्षक राष्ट्रगीताच्या सन्मानासाठी उभे राहिले नाहीच; मात्र त्यांनी चौकसे यांचीच खिल्ली उडवली.

न्यूयॉर्क येथील संग्रहालयाकडून ‘ॐ’च्या सामूहिक जपाचे आयोजन !

विदेशी लोकांना ‘ॐ’चे महत्त्व कळते, भारतियांना ते कधी कळणार ?
      न्यूयॉर्क - येथील रविन संग्रहालयाकडून ‘म्यूझियम् ऑफ आर्ट’ येथे फेब्रुवारी २०१७ मध्ये ‘ओम लॅब’ प्रदर्शनाचे आयोजन करणार आहे. या प्रदर्शनामध्ये लोकांना ‘ॐ’चा अर्थ समजावून सांगण्यात येणार आहे, तसेच त्यांना सामूहिकपणे एकाच वेळी ‘ॐ’चा जप करण्यासाठी आमंत्रित करण्यात येणार आहे. जून २०१७ मध्ये ‘द वर्ल्ड इज साऊंड’या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात सामूहिकपणे हा जप करण्यात येणार आहे. संग्रहालयाने सांगितले की, ‘ॐ’च्या ध्वनीत इतर सर्व मंत्रांची शक्ती सामावली असल्याने त्याच्या जपाचे आयोजन करण्यात आले आहे. अमेरिकेत पोलिसांकडून पाकिस्तानी दूतावासावर छापा !

     वॉशिंग्टन - अमेरिकेतील ओहियो विश्‍वविद्यालयात ३ दिवसांपूर्वी झालेल्या आतंकवादी आक्रमणाच्या प्रकरणी पोलिसांनी पाकच्या दूतावासावर छापा टाकला. पाकने याविषयी टीका केली आहे. सोमालिया वंशाच्या अब्दुल रजाक अली या १८ वर्षीय विद्यार्थ्याने चाकूने आक्रमण करत ११ जणांना घायाळ केले होते. या वेळी पोलिसांनी त्याला गोळ्या घालून ठार केले होते. अब्दुल ७ वर्षे पाकिस्तानमध्ये राहिला होता. त्यामुळे पोलिसांनी या दूतावासावर छापा मारला. पोलिसांनी येथून काही कागदपत्रे जप्त केली. अली याने यापूर्वी प्रसारमाध्यमांमध्ये मुसलमानांच्या चित्रीकरणांवर त्यांच्यावर टीका केली होती. 
     ओहियो विश्‍वविद्यालय अमेरिकेतील सर्वांत मोठे विश्‍वविद्यालय आहे. येथे ६० सहस्र विद्यार्थी शिक्षण घेतात. येथे यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत.


नेदरलॅण्डमध्ये सार्वजनिक ठिकाणी बुरखा घालण्यावर बंदी !

     अ‍ॅमस्टरडॅम (नेदरलॅण्ड) - नेदरलॅण्डच्या संसदेने देशातील मुसलमान महिलांना सार्वजनिक ठिकाणी बुरखा घालण्यावर बंदी घालणारा प्रस्ताव संमत केला आहे. आता याला सिनेटची संमती मिळाल्यावर तो लागू करण्यात येईल. या नियमामुळे ज्या सार्वजनिक ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने ओळख दाखवणे आवश्यक आहे, तेथे बुरखा घालण्यावर बंदी असणार आहे. (जिहादी आतंकवादाने ग्रस्त असणार्‍या भारतात असा नियम का बनवण्यात येत नाही ? - संपादक) यात सरकारी इमारती, सार्वजनिक परिवहन, शाळा आणि रुग्णालय यांचा सहभाग आहे.

नोटाबंदीमुळे राज्यातील विविध जिल्हा बँकांमध्ये ३ सहस्र कोटी रुपये पडून !

यावर भारतीय रिझर्व्ह बँक आणि केंद्र सरकार कोणती उपाययोजना करणार आहे ?
      संभाजीनगर, २ डिसेंबर - केंद्र सरकारने ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या नोटा रहित केल्यानंतर जिल्हा सहकारी अधिकोषांना ११ ते १४ नोव्हेंबर या ३ दिवसांत जुन्या नोटा स्वीकारण्याची अनुमती मिळाली होती. त्यानंतर त्या नोटा स्वीकारण्यास भारतीय रिझर्व्ह बँकेने प्रतिबंध केला होता. त्यामुळे राज्यातील विविध जिल्हा बँकांमध्ये जमा झालेले सुमारे ३ सहस्र कोटी रुपये गेल्या १५ दिवसांपासून पडून आहेत.

बोरगाव (जिल्हा सातारा) येथे ‘लव्ह जिहाद’चे प्रकरण उघडकीस !

  • पोलिसांकडून २२ हिंदूंविरोधात गुन्हे प्रविष्ट करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न !
  • धर्मांधाकडून हिंदु युवतीच्या भावास मारहाण
      बोरगाव (जिल्हा सातारा), २ डिसेंबर (वार्ता.) - फत्यापूर येथील अल्पवयीन हिंदु मुलीचा सातत्याने पाठलाग करून आणि तिची छेड काढून अश्‍लाघ्य शेरेबाजी करणारा धर्मांध युवक रईस दस्तगीर मुलाणी (वय २२) यास कह्यात घेऊन गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. या वेळी पोलिसांनी २२ हून अधिक हिंदूंच्या विरोधात बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. (धर्मांधांनी हिंदूंच्या वाटेला जायचे आणि गुन्हे मात्र हिंदूंवर प्रविष्ट करायचे, हे पोलीस किती दिवस आणि कुणाच्या दबावाखाली करणार ? - संपादक)

सोलापूर येथे हिंदु धर्मजागृती सभेनिमित्त पत्रकार परिषद !

डावीकडून सर्वश्री योगेश जोगदनकर, सिद्धराम चरकुपल्ली, बापू ढगे,
सुनील घनवट, सौ. अलका व्हनमारे, सौ. विद्या कुलकर्णी, विनोद रसाळ
     सोलापूर, २ डिसेंबर (वार्ता.) - हिंदूंवर होणार्‍या अन्यायाला वाचा फोडणे, तसेच त्यांच्यात धर्माभिमान जागृत करून त्यांना धर्माचरणास कृतीप्रवण करणे, हिंदूसंघटन करणे आणि हिंदु राष्ट्राची स्थापना करणे या हेतूने सोलापूर येथे ४ डिसेंबरला हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन केले आले आहे, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक सुनील घनवट यांनी दिली. सभेनिमित्त येथील श्रमिक पत्रकार संघात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी सनातन संस्थेच्या सौ. विद्या कुलकर्णी, रणरागिणी शाखेच्या सोलापूर जिल्हासंघटक सौ. अलका व्हनमारे, माजी नगरसेवक बापू ढगे, बजरंग दलाचे योगेश जोगदनकर, श्री. सिद्धराम चरकुपल्ली, समितीचे विनोद रसाळ उपस्थित होते.

पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचा पालकांचा आरोप

खारघर येथील पाळणाघरातील मारहाणीचे प्रकरण
     नवी मुंबई, २ डिसेंबर (वार्ता.) - खारघर पाळणाघरातील लहानग्या मुलीला मारहाण केलेल्या प्रकरणातील आरोपींना पकडण्याविषयी पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे, असा आरोप पीडित मुलीच्या पालकांनी केला आहे. पिडीत मुलीच्या पालकांनी थेट पोलीस आयुक्तांची भेट घेऊन ही भावना व्यक्त केली. या प्रकरणी आया अफसाना शेख यांना १४ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे; मात्र पाळणाघराच्या संचालिका अजूनही फरार आहेत.


(म्हणे) ‘दंगली घडवणार्‍या माणसाला महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला गेला !’ - मनोज आखरे, प्रदेशाध्यक्ष, संभाजी ब्रिगेेड

संभाजी ब्रिगेेडच्या राजकीय पक्षस्थापना दिनाच्या 
कार्यक्रमात देव, धर्म आणि ब्राह्मण यांच्यावर विद्वेषी टीका !
वेदांची अपकीर्ती करण्याचा प्रयत्न ! 
     कार्यक्रमात एका वक्त्याने ‘दारूमुक्त गाव’ हे आमचे ध्येय आहे. वेदांमध्ये आम्हाला शिकवण्यात आले की, ‘पित्वां पित्वां पुन: पित्वां यावद् पतित भूतले’ म्हणजे इतकी प्या की जोपर्यंत पिऊन पडणार नाही तोपर्यंत तुमचा उद्धार होणार नाही. असे धर्मग्रंथ आमच्या महापुरुषांनी जाळून टाकले होते, असे विधान केले.
    मुंबई, २ डिसेंबर (वार्ता.) - संभाजी ब्रिगेडने सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि राजकीय आतंकवादाचे उच्चाटन करण्यासाठी लढा दिला. जेम्स लेन आणि भांडारकर यांनी शिवाजी महाराजांवर टीका केली. हा सांस्कृतिक आतंकवाद होता. त्या वेळी त्याच्या विरोधात केवळ संभाजी ब्रिगेडच पुढे आली. ज्या व्यक्तीने दंगलीचा इतिहास लिहिला, अशा व्यक्तीला महाराष्ट्रभूषण पुरस्कार देण्यात आला. ४ थी च्या पाठ्यपुस्तकात दादाजी कोंडदेव यांचा विकृत इतिहास देण्यात आला. संभाजी ब्रिगेड सत्तेत आल्यानंतर पाठ्यपुस्तकात सत्य विचारधारा आणि संविधानकेंद्रीत अभ्यासक्रम देण्यात येईल, तसेच ‘केजी’ ते ‘पीजी’ शिक्षण मोफत करण्यात येईल. यासाठी धार्मिक स्थळांचे राष्ट्रीयीकरण करून शिर्डी देवस्थानचा पैसा उपयोगात आणला जाईल, असे ब्राह्मणद्वेषी आणि धर्मद्वेषी वक्तव्य संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी केले. (बाबासाहेब पुरंदरे यांनी कोणते विधान अथवा लेखन केल्यामुळे दंगली उसळल्या, याची माहिती आखरे यांनी द्यावी ! - संपादक)

हिंदु विधीज्ञ परिषदेचे अध्यक्ष अधिवक्ता श्री. वीरेंद्र इचलकरंजीकर यांना ‘अधिवक्ता पंताजीकाका बोकील पुरस्कार’ जाहीर !

अधिवक्ता श्री. वीरेंद्र इचलकरंजीकर
      सातारा, २ डिसेंबर (वार्ता.) - वाई येथील प्रतापगड उत्सव समितीच्या वतीने देण्यात येणारा ‘अधिवक्ता पंताजीकाका बोकील पुरस्कार’ हिंदु विधीज्ञ परिषदेचे अध्यक्ष अधिवक्ता श्री. वीरेंद्र इचलकरंजीकर यांना जाहीर झाला आहे.
      ६ डिसेंबर या दिवशी सायंकाळी ५ वाजता श्रीमहागणपति घाटावर शिवप्रतापदिन अर्थात अफजलखान वधाचा आनंदोत्सव साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात मान्यवरांच्या शुभहस्ते ‘वीर जीवा महाले पुरस्कार’ आणि मानाचे कडे पुणे शहराचे माजी महापौर श्री. सुरेश नाशिककर यांना देण्यात येणार आहे, तसेच ‘अधिवक्ता पंताजीकाका बोकील पुरस्कार’ हिंदु विधीज्ञ परिषदेचे अध्यक्ष अधिवक्ता श्री. वीरेंद्र इचलकरंजीकर यांना देण्यात येईल. आतापर्यंत सोलापूर येथील अधिवक्त्या श्रीमती अपर्णा रामतीर्थकर, हिंदु विधीज्ञ परिषदेचे सचिव अधिवक्ता श्री. संजीव पुनाळेकर यांनाही हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील समस्त शिवप्रेमींनी अगत्याने उपस्थित राहून त्यांचे धर्मकर्तव्य बजावावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

आयुक्त तुकाराम मुंढे आणि नगरसेवक यांच्यातील वादाचा परिणाम ६३ कोटी रुपयांच्या विकासकामांचा प्रस्ताव मान्यतेसाठी प्रशासनाला सादर अंतर्गत वाद घालणारे नव्हेत; तर लोकहिताकडे लक्ष देणारे प्रशासक आणि लोकप्रतिनिधी हवेत !

      नवी मुंबई, २ डिसेेंबर (वार्ता.) - नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महासभेत मान्यतेसाठी पाठवलेला ६३ कोटी रुपयांचा विकासकामांचा प्रस्ताव सभेत मान्य न झाल्याने त्यांनी तो प्रशासनाच्या नगरविकास विभागाकडे पाठवला आहे. आयुक्त तुकाराम मुंढे आणि नगरसेवक यांच्यातील वादामुळे महासभेत ही कामे संमत झालेली नाहीत. 
     सर्वसाधारण सभेच्या मान्यतेसाठी दिलेले प्रस्ताव नगरसेवकांकडून मान्य केले न गेल्यामुळे जुलैपासून शहरात नागरी सुविधा पुरवण्यास लागणारे बारा प्रस्ताव पडून होते. प्रशासनाने एखादा सर्वसाधारण सभेच्या मान्यतेसाठी पाठवलेला प्रस्ताव ९० दिवसांत मान्य झाला नाही, तर शासनाच्या संमतीने त्यावर कार्यवाही करता येते. अत्यावश्यक आणि नागरी सुविधांचे हे प्रस्ताव असल्याने नगरविकास विभाग त्यांना लवकरच मान्यता देईल, असा विश्‍वास पालिकेतील एका वरिष्ठ अधिकर्‍यांनी व्यक्त केले आहे.

देशात समान नागरी कायदा झालाच पाहिजे ! - प्रशांत जुवेकर, हिंदु जनजागृती समिती

जळगाव येथील विराट हिंदु धर्मजागृती सभेनिमित्त घार्डी (ता. जळगाव) येथे सभा !
     जळगाव, २ डिसेंबर (वार्ता.)- या देशात बहुसंख्य हिंदू असतांना हिंदूंच्या भावनांना किंमत दिली जात नाही. अल्पसंख्यांकांच्या धार्मिक यात्रांवर अनुदानाची खैरात केली जाते, तर हिंदूंच्या यात्रांवर कर लादले जातात. अशा प्रकारचा भेदभाव करायचा आणि धर्मनिरपेक्षतेच्या गोष्टी करायच्या, हा ढोंगीपणा आता हिंदू खपवून घेणात नाहीत. या देशात समान नागरी कायदा व्हायलाच हवा, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रशांत जुवेकर यांनी घार्डी (ता. जळगाव) येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेत केले. जळगाव येथे २५ डिसेंबर या दिवशी विराट हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. त्याच्याच प्रचाराचा एक भाग म्हणून या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला श्री. प्रशांत जुवेकर यांच्यासोबत हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेच्या कु. रागेश्री देशपांडे यांनी संबोधित केले. सभेचे सूत्रसंचालन श्री. शैलेश पोळ यांनी केले.

धरणगुत्ती (जिल्हा कोल्हापूर) येथे ४ डिसेंबरला हिंदु धर्मजागृती सभा

  • स्थळ : श्री महालक्ष्मीदेवी सभागृह, धरणगुत्ती, कोल्हापूर
  • वेळ : सायंकाळी ६.३० ते रात्री ८ 
हिंदूंनो, मोठ्या संख्येने सहभागी व्हा !

सोलापूर येथील धर्मजागृती सभेचा असा चालू आहे प्रसार !

यंत्रमाग उद्योजक संघटनेला निमंत्रण देतांना
  • ५०० रिक्शांना सभेचे फलक आणि भगवे ध्वज लावण्यात आले आहेत. अनेक रिक्शाचालकांनी रिक्शाला स्वतःहून ध्वज लावत आहेत.
  • आदर्श मंगल कार्यालयात श्री सद्गुरु मार्गदर्शन संघाच्या ब्राह्मण पुरोहितांसाठीच्या कार्यक्रमात समितीच्या सौ. अलका व्हनमारे यांनी राष्ट्र-धर्माच्या सद्यस्थितीविषयी सांगून सभेला येण्याचे आवाहन केले. अनेकांनी त्याला प्रतिसादही दिला. या वेळी ५० ब्राह्मण पुरोहितांची उपस्थिती लाभली. सौ. अलका व्हनमारे यांचा संघाच्या वतीने अध्यक्ष श्री. जयंत फडके यांनी सत्कार करण्यात आला.

येणार्‍या संकटकाळात प्रथमोपचार ही संजीवनी ठरणार ! - श्री. चेतन राजहंस, प्रवक्ता, सनातन संस्था

रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमात प्रथमोपचार प्रशिक्षण शिबिराला प्रारंभ
      रामनाथी (गोवा), २ डिसेंबर (वार्ता.) - काळानुसार संपत्काळात सर्व काही व्यवस्थित असते.आपत्काळ हा विविध आपत्तींचा असतो. यामध्ये पूर, भूकंप, वादळ, सुनामी आदी आपत्तींमधून जीवित आणि संपत्तीची हानी होते. यापेक्षा युद्धकाळात नरसंहार होऊन लक्षावधी लोक घायाळ होतात. अशा संकटकाळात प्रथमोपचार ही संजीवनी ठरणार आहे. खरेतर शासनकर्त्यांनी नागरिकांना निःशुल्क प्रथमोचार दिले पाहिजेत; मात्र आज शासनकर्ते त्यांच्या कर्तव्यापासून दूर आहेत. त्यामुळे काळाची पावले ओळखून हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था या स्वयंसेवी संस्थांनी संयुक्तपणे प्रथमोपचार प्रशिक्षण हा समाजसाहाय्यविषयक उपक्रम चालू केला आहे, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. चेतन राजहंस यांनी केले. ते या ठिकाणी आयोजित तीन दिवसीय प्रथमोपचार प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. या शिबिरासाठी महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या राज्यांमधील ६० शिबिरार्थी सहभागी झाले आहेत.    

बदलापूरमध्ये मद्यधुंद टोळक्याकडून साहाय्यक पोलीस निरीक्षकास पुष्कळ मारहाण

      बदलापूर (जिल्हा ठाणे) पूर्व येथील कात्रप भागातील शुभम बारच्या बाहेर साहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. मारुति कोहीनकर यांना किरकोळ वादातून पुष्कळ मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. (स्वत:चे रक्षण करू न शकणारे पोलीस जनतेचे रक्षण काय करणार ? - संपादक). शुभम बार मधून काही तरुण बाहेर पडले. त्याच्यातील एक जण पोलीस अधिकारी कोहीनकर यांच्या इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ लघुशंका करीत असल्याने त्या तरुणास कोहीनकर यांनी हटकले. त्या वेळी त्या तरुणाला राग आल्याने त्याने आणि त्याच्या मित्रांनी मिळून कोहीनकर यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली (याचा अर्थ पोलिसांचा धाक संपत आला असे म्हणायचे का ? - संपादक) साहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. मारुति कोहीनकर यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. या प्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला असून मारहाण करणार्‍यांचा शोध घेण्यात येत आहे.

लोधी समाजाचा धर्मसभेला पाठिंबा ! - भगतसिंग कल्लावाले, अध्यक्ष, लोधी समाज, सोलापूर

      धर्मजागृती सभेला आमचा पाठिंबा आहे, असे आश्‍वासन समाजाचे अध्यक्ष भगतसिंग कल्लावाले यांनी दिले. या वेळी समितीचे श्री. सुनील घनवट यांनी विषय मांडला. या वेळी पतित पावन संघटनेचे बाबू विठे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रकाश झंपले (सर), शिवसेना नेते सुनील कामाठी, समितीचे विनोद रसाळ उपस्थित होते.

भाजप पदाधिकार्‍यांसमवेत श्री. सुनील घनवट (उजवीकडून दुसरे)
      सोलापूर - येथील सोमवंशीय क्षत्रिय समाजाने येथे होणार्‍या हिंदु धर्मजागृती सभेला पाठिंबा दिला असून पुष्कळ संख्येने सभेला उपस्थित राहू, असे आश्‍वासनही दिले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने क्षत्रिय समाजाच्या मंगलकार्यात समाजाची बैठक घेण्यात आली. समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या बैठकीला समाजाचे अध्यक्ष श्री. गणपतसा मिरजकर यांसह ३० पदाधिकार्‍यांची उपस्थिती लाभली.

फलक प्रसिद्धीकरता

सरकार घोटाळेबाज काँग्रेसींना कारागृहात डांबेल का ?
      वर्ष २००५ मध्ये देहली उच्च न्यायालयाने बोफोर्स आस्थापनासह हिंदुजा बंधूंची सुटका केली. निकालाच्या विरोधात सीबीआयला तत्कालीन काँग्रेस सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याची अनुमती नाकारली होती, असे सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात सांगितले आहे.

हिंदू तेजा जाग रे !

Jago !
 Bofors prakaran me Congressne CBI ko Hinduja
bandhuoke virudh Supreme Court janese roka tha.
    Kya yah sarkar Bhrashtachari Congressiyoko sabak sikhayegi
जागो !
 बोफोर्स प्रकरण में कांग्रेस ने सीबीआई को हिन्दुजा बंधुआें के विरुद्ध सुप्रीम कोर्ट  जाने से रोका था ।
    क्या यह सरकार भ्रष्टाचारी कांग्रेसियों को सबक सिखाएगी ?

महान हिंदु तत्त्वचिंतक पू. सीताराम गोयल यांचे तेजस्वी विचारधन !

महान हिंदु तत्त्वचिंतक पू. सीताराम गोयल यांच्या स्मृतीदिनानिमित्त...
     आज प्रखर हिंदुत्वनिष्ठ आणि महान हिंदु तत्त्वचिंतक पू. सीताराम गोयल यांचा स्मृतीदिन आहे. त्यानिमित्त त्यांनी राष्ट्र आणि धर्म यांविषयी मांडलेले तेजस्वी विचारधन प्रसिद्ध करत आहोत.
‘सनातन धर्म’ म्हणजे साम्राज्यवाद्यांच्या 
आक्रमणातून तावून-सुलाखून निघालेली 
सुधारित वैभवशाली जीवनपद्धती ! 
      ‘सनातन धर्म ज्याला आपण हिंदु धर्म म्हणून ओळखतो, हा केवळ धर्मच नाही, तर अनादी काळापासून या देशाच्या कानाकोपर्‍यांत पसरलेली ती एक सुधारित वैभवशाली जीवनपद्धती आहे. तसेच साम्राज्यवाद्यांच्या आक्रमणातून तावून-सुलाखून निघालेला तो धर्म आहे. अन्य पंथांना मी धर्म मुळीच मानत नाही. ‘नाझीझम्’ आणि ‘कम्युनिझम्’ यांसारख्या साम्राज्यवाद्यांचे ते कल्पनाशास्त्र आहे. देवाच्या नावाखाली एका गटाने दुसर्‍या गटावर आक्रमण केले आणि नंतर त्याला कायदेशीर रूप दिले गेले. हिंदूंच्या विरोधात लढा उभारण्यासाठी माणसे सिद्ध केली जात आहेत. हिंदु धर्माला अन्य पंथांच्या बरोबरीने वागणारा निधर्मीवाद माझ्या दृष्टीने काही उपयोगाचा नाही.’ - पू. सीताराम गोयल (‘हाऊ आय बीकेम अ हिंदु’ या पुस्तकातून)

माझे मृत्यूपत्र

    ‘मार्च १९१० मध्ये स्वातंत्र्यवीर विनायकराव सावरकर विलायतेत पकडले गेले, तेव्हा त्यांनी या जन्मात जिची भेट होणे जवळ जवळ असंभवनीय होते, अशा त्यांच्या स्वत:च्या वहिनीस लंडनमधील ब्रिक्सन कारागृहातून या जन्मातील त्यांचा बहुधा शेवटचा निरोप देणारे हे मृत्यूपत्र लिहून धाडले होते.
      हे मातृभूमी तुजला मन वाहियेले, वक्तृत्व वाग्विभवही तुज अर्पियेले, तुतेंची अर्पिली नवी कविता रसाला, लेखप्रती विषय तुंचि अनन्य झाला.
     ‘हे मातृभूमी, मी आतापर्यंत माझे मन, बुद्धी, कविता, लेखन, वक्तृत्व हे सर्व केवळ तुझ्याच कारणी लावले आहे. या सगळ्यांतून केवळ तुझेच वर्णन, तुझीच सेवा करीत आलो आहे.

आता आतंकवाद्यांकडेही नव्या नोटा !

     जम्मू काश्मीरमध्ये लष्करासमवेत झालेल्या एका चकमकीत ठार झालेल्या आतंकवाद्यांंकडून नुकत्याच चलनात आलेल्या दोन सहस्र रुपयांच्या नोटा हस्तगत करण्यात आल्या आहेत. अशा घटनांना अटकाव करण्यासाठी आतंकवाद्यांपर्यंत या नोटा पोचवण्याचे काम करणार्‍यांच्या शीघ्रतेने मुसक्या आवळणे आवश्यक आहे. नोटाबंदीच्या निर्णयाचा तडाखा आतंकवाद्यांना बसला असल्याने त्यांचे आर्थिक स्रोत समूळ नष्ट करण्याच्या दृष्टीने वाटचाल करायला हवी.

देशाच्या सर्व समस्यांवरील उपाय : ‘हिंदू व्होट बँक’ !

     मुसलमान, ख्रिस्ती आदी त्यांची ‘व्होट बँक’ बनवतात. हिंदूंनीही त्यांच्या समस्यांवरील एकमेव उपाय म्हणून ‘हिंदू व्होट बँक’ बनवली पाहिजे. हा धार्मिक नसून लोकशाही मार्ग आहे. 
- श्री. आनंद शंकर पंड्या, उपाध्यक्ष, विश्‍व हिंदू परिषद

शंकराचार्य अशी उपाधी धारण करून हिंदूंची दिशाभूल करणार्‍या भोंदू शंकराचार्यांपासून सावधान !

    शांती, मानवता आणि सुधारण्याची प्रक्रिया (पीस, ह्युमॅनिटी अ‍ॅण्ड रिफॉर्मेशन) या विषयावर ४ डिसेंबर या दिवशी नवी मुंबईतील नेरूळ येथे एका धर्मद्रोही परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत सामाजिक गैरसमजुतींचे निर्मूलन, संत तुकाराम महाराज आणि इस्लाम आणि शांती आणि मानवता यांत धर्माची भूमिका या विषयांवर अनुक्रमे डॉ. राम पुनियानी, डॉ. रफीक पारनेकर (इस्लामिक मराठी पब्लिकेशन ट्रस्ट), श्री स्वामी लक्ष्मी शंकराचार्य (लक्ष्मणपुरी) हे मार्गदर्शन करणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नीतीमत्ताहीन लोकप्रतिनिधी !

     ‘पिंपरी-चिंचवडचे तत्कालीन महापौर योगेश बहल यांनी एका स्वागत समारंभात ‘कोंबडी पळाली’ या गाण्यावर बेधुंद नृत्य केले होते. त्या ‘नृत्यकौशल्याची’ बातमी पक्षाध्यक्ष आणि केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.’ (दैनिक लोकसत्ता, १.१.२०१२)

सोलापूर येथे ४ डिसेंबरला हिंदु धर्मजागृती सभा

स्थळ : हरिभाई देवकरण प्रशाला मैदान, सोलापूर
वेळ : सायंकाळी ५.३०
संपर्क : ८३०८६५२३६३
      धर्मप्रेमींनी धर्मसभेला पुष्कळ संख्येने उपस्थित राहून धर्मकर्तव्य बजावावे, असे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.

सगुणातील ईश्‍वराची अनुभूती देणारे एकमेवाद्वितीय संत प.पू. परशराम पांडे महाराज (वय ८९ वर्षे) !

प.पू. पांडे महाराज
      ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी निर्माण केलेल्या या साधनेच्या विश्‍वातील एक उच्च विभूती म्हणजे प.पू. परशराम माधव पांडे महाराज (प.पू. बाबा) ! ३० नोव्हेंबर २०१६, म्हणजेच मार्गशीर्ष शुक्ल पक्ष प्रतिपदा या दिवशी त्यांनी ९० व्या वर्षात पदार्पण केले. त्यानिमित्ताने त्यांचे चरणी उतराई होण्यासाठी देवद आश्रमातील साधकांनी ही शब्द सुमनांजली अर्पण करण्याचा प्रयत्न केला आहे. हे लिखाण म्हणजे देवद आश्रमातील सर्व साधकांचे मनोगत आहे. त्यातील काही सूत्रे आपण ३० नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत पाहिली. आज त्यापुढील सूत्रे पाहूया.

संत आणि महर्षि यांच्या आशीर्वादामुळे अन् त्यांनी सांगितलेले विधी केल्यामुळे पुनर्जन्म प्राप्त झालेली ६६ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. दीपाली मतकर !

कु. दीपाली मतकर
    कु. दीपाली मतकर यांच्या गंभीर आजारपणात त्यांनी अनुभवलेली गुरुंची प्रीती आणि त्यांना आलेल्या अनुभूतींपैकी काही भाग आपण २ डिसेंबरच्या अंकात पाहिला. आज आपण उर्वरित अनुभूती पाहूया.
५ उ. आधुनिक वैद्यांनी ‘खायला देऊ शकतो’, असे
सांगितल्यावर गोरेमामांनी प्रेमाने बिस्कीटचे बारीक तुकडे करून देणे
     एकदा सकाळी आधुनिक वैद्य म्हणाले, ‘‘यांना खायला देऊ शकतो.’’ तेव्हा ‘मी आता ठीक होणार’, असे मला वाटले. गोरेमामा चहा आणि बिस्कीट घेऊन आले. ते खाण्याची इच्छा आणि ते उचलून खाण्याची शक्तीही नसायची; पण मामा त्याचे बारीक तुकडे करून द्यायचे. ते इतके प्रेमाने द्यायचे की, त्या कृतज्ञतेपोटी ‘२ तुकडे तरी खाऊया’, असे वाटायचे.

६१ वर्षे वय असलेले सतत उत्साहाने कार्यरत रहाणारे आणि प्रत्येकावर निरपेक्ष प्रेम करून आनंदी रहाणारे ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे साधक वैद्य अशोक शिंदे !

वैद्य अशोक शिंदे
१. सतत उत्साहाने कार्यरत रहाणे आणि
उपचारांच्या विविध पद्धती शिकण्याला प्राधान्य देणे
     ‘६१ वर्षे वय असलेले काका रुग्णालयात सर्वांत अधिक उत्साही आणि कार्यक्षम वैद्य आहेत. काम करतांना ते स्वतःला विसरून जातात. ते सतत उत्साही असतात आणि इतरांनाही उत्साही करतात. त्यांना पाहून ‘रुग्णालयात तेच सर्वांत अधिक तरुण आहेत’, असे वाटते. त्यांच्यातील जिज्ञासा आणि शिकण्याची वृत्ती यांमुळे ते सतत काही ना काही शिकत असतात. शिकण्यासाठी ते विविध ठिकाणी, जिल्ह्यांत असलेल्या कार्यशाळांना जातात. तिथे ते विविध प्रकारच्या उपचारांची माहिती घेतात. हे सर्व ते ‘भविष्यात साधकांना साहाय्य होईल; म्हणून करतात’, असे वाटते. त्यांना शिकत रहाण्यातून आनंद मिळतो.

‘जिंकूनी गुरूंचे मन’ हा आदर्श निर्मिणारे पू. संदीप आळशी !

‘जाणूनी गुरूंचे मन’ करणे ।
हा असे लौकिक अर्थ ॥
‘जिंकूनी गुरूंचे मन’ ।
हा आदर्श आपणच केला सार्थ ॥ १ ॥
एकाच खोलीत राहूनही (टीप १) ।
आपले आम्हा सर्वांवरी लक्ष ॥
माऊलीसम सर्वांगीण काळजी ।
घेण्या आपण असता सदैव दक्ष ॥ २ ॥

प्रथमोपचार प्रशिक्षण

भावी आपत्काळात अन् नेहमीसाठीही उपयुक्त ठरणारी 
सनातनची ग्रंथमालिका : भावी आपत्काळातील संजीवनी !
      संत-महात्मे, ज्योतिषी आदींच्या सांगण्यानुसार आगामी काळ हा भीषण आपत्काळ असून या काळात समाजाला अनेक आपत्तींना तोंड द्यावे लागणार आहे. आपत्काळात दळणवळण तुटल्यामुळे रुग्णाला रुग्णालयात नेणे, डॉक्टर वा वैद्य यांच्याशी संपर्क साधणे आणि पेठेत (बाजारात) औषधे मिळणेही कठीण होते. आपत्काळात ओढवणार्‍या विकारांना (आजारांना) तोंड देेण्याच्या पूर्वसिद्धतेचा एक भाग म्हणून सनातन ‘भावी आपत्काळातील संजीवनी’ ही ग्रंथमालिका सिद्ध (तयार) करत आहे. या मालिकेतील १२ ग्रंथ आतापर्यंत प्रकाशित झाले आहेत. या ग्रंथांचा अभ्यास आतापासूनच केला, तर प्रत्यक्ष आपत्काळात विकारांना सामोरे जाण्यासाठी लागणारा आत्मविश्‍वास निर्माण होण्यास साहाय्य होईल. यासाठी हे सर्व ग्रंथ वाचकांनी अवश्य संग्रही ठेवावेत !

डोळ्यांपेक्षा मन अधिक जलद कार्य करत असल्याने स्तोत्र पाठ करून म्हटल्यास अनुष्ठानातील वेळ वाचेल !

     ‘हे समजून घेण्यासाठी एखादा जप कागदावर लिहून तो जलद गतीने वाचून करण्याचा प्रयत्न करा. नंतर कागदावरून न वाचता मनाने जलद गतीने करण्याचा प्रयत्न करा. तेव्हा लक्षात येईल की, मनाने जप करणे अधिक जलद गतीने होते. यासाठी एखाद्या अनुष्ठानात शेकडो किंवा हजारो वेळा स्तोत्र इत्यादी म्हणायचे असल्यास ते पाठ करा, म्हणजे कमी वेळेत स्तोत्रपठण होईल.’ - (परात्पर गुरु) डॉ. आठवले


परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...

मैं तो गई काम से......
मैं तो गई काम से, काम से, काम से ।
सगुणने जीता निर्गुण से ॥ १ ॥
सिंहासन सजे अंतरभाव से ।
उसपर गुरु विराजे ॥ २ ॥
भाव अश्रूकी, निर्मल धार उन ।
चरणों पर बरसे ॥ ३ ॥
प्रेम भक्तीके पुष्प-कुंजसे ।
गुरु चरण शोभे ॥ ४॥
अंतरज्योत की दिव्य ज्योतसेे ।
गुरु आरती कीजे ॥ ५ ॥
सप्त सूरभी नाद-ताल पे ।
भाव से नाचे ॥ ६ ॥
- सौ. अपर्णा प्रभुदेसाई, मडगाव, गोवा.

एका साधिकेला पू. संदीप आळशी यांच्या दैनंदिन सहज कृतींतून त्यांच्यातील प्रीतीचे झालेले दर्शन !

पू. संदीप आळशी
     सनातनचे ११ वे संत पू. संदीप आळशी यांचा आज मार्गशीर्ष शुक्ल पक्ष चतुर्थी (३.१२.२०१६) या दिवशी वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने साधकांनी त्यांच्याविषयी लिहिलेली सूत्रे आणि कविता येथे देत आहोत.
पू. संदीप आळशी यांना वाढदिवसानिमित्त
सनातन परिवाराचा कृतज्ञतापूर्वक नमस्कार !
१. पू. संदीप आळशी यांनी ‘पूर्णवेळ साधना
करायला मिळणे’, ही देवानेदिलेली मोठी अनुभूती असल्याचे सांगणे
     ‘जून २०१५ मध्ये मी पूर्णवेळ साधना करण्यासाठी रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमात रहायला आले. त्यानंतर दोन-तीन दिवसांनी सनातनचे पू. संदीप आळशी (पू. दादा) यांच्याशी माझी भेट झाली. त्या वेळी त्यांनी मला विचारले, ‘‘आनंदी आहात ना !’’ त्यावर मी ‘हो’ असे म्हटले. तेव्हा पू. दादा म्हणाले, ‘‘पूर्णवेळ साधना करायला मिळणे, ही देवाने दिलेली मोठी अनुभूती आहे. या अनुभूतीहून आणखी दुसरी कोणती मोठी अनुभूती असणार !’’ त्या वेळी माझ्याकडून देवाचरणी कृतज्ञता व्यक्त झाली आणि मनात विचार आला, ‘देवाची केवढी ही कृपादृष्टी आहे !’

श्रीकृष्णाचे चित्र, देवपूजा, आरती, नामपट्ट्या अशा सात्त्विक गोष्टींची आवड असणारा ५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला चि. दर्श गिरीश भिरूड (वय ४ वर्षे) !

उच्चलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे 
हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. दर्श भिरूड एक दैवी बालक आहे !
चि. दर्श  भिरूड
पालकांनो, हे लक्षात घ्या ! 
     ‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ - (परात्पर गुरु) डॉ. आठवले 
    यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.

प्रत्येक मिनिटाचा सदुपयोग करणे, ही साधनाच आहे !

     ‘साधक एकमेकांशी बोलत असतात. ‘आपण बोलत असलेले साधनेच्या दृष्टीने खरंच किती आवश्यक असते’, असा प्रश्‍न साधकांनी स्वतःला विचारायला हवा. काही साधक साधनेचा किंवा सेवेचा आढावा मोजक्या शब्दांत देत नाहीत. काही साधक साधनेतील त्याच त्याच अडचणी पुन्हा पुन्हा सांगत असतात. त्रास असलेले काही साधक त्रासामुळे नकळत अनावश्यक विषयामध्ये किंवा विचारांत वहावत जातात, तसेच त्यांना बोलतांना वेळेचे भानही रहात नाही.

जिल्हासेवक आणि लेखासेवक यांच्यासाठी महत्त्वाची सूचना

सर्व सनातन प्रभात नियतकालिकांच्या हस्ते, तसेच पोस्टाच्या वाचकांना अंक
मिळत असल्याची निश्‍चिती करण्याची सेवा ३१.१२.२०१६ या दिवसापर्यंत पूर्ण करा !
     ‘बाहेरचे वितरक, नियतकालिकांचे वितरण करणारे संस्थेचे कार्यकर्ते यांच्याकडून होणार्‍या अक्षम्य चुका किंवा पोस्टाच्या अडचणी यांमुळे काही वाचकांना नियतकालिक नियमितपणे मिळण्यात विविध अडचणी येत असल्याचे समजले आहे. बर्‍याच वाचकांनी वर्गणीचे पैसे वेळेत भरूनही त्यांना लगेचच नियतकालिक चालू केले जात नाही अथवा त्यांना वेळोवेळी अंक न देता एकत्रित दिले जातात आदी अडचणी येत असल्याचे लक्षात आले आहे.
     या अडचणींवर उपाययोजना काढण्याच्या दृष्टीने ‘सर्व वाचकांना सनातन प्रभातची नियतकालिके मिळतात का’, याची निश्‍चिती जिल्ह्यांनी ३१.१२.२०१६ या दिवसापर्यंत पूर्ण करायची आहे. या संदर्भातील महत्त्वाची सूत्रे पुढे देत आहोत.

साधकांना सूचना

सनातनच्या संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नका !
      ‘सनातनच्या संतांचा वाढदिवस असलेल्या दिवशी त्यांच्या संदर्भात साधकांनी दैनिक सनातन प्रभातमध्ये गुणवैशिष्ट्ये लिहून दिलेली असतात. त्यामुळे सर्वत्रच्या साधकांचे त्या संतांना भ्रमणभाष येतात. संतांना दिवसभर अनेक साधकांशी भ्रमणभाषवर बोलावे लागत असल्याने त्यांच्या सेवेतील अमूल्य वेळ वाया जातो. सध्या आपत्काळाला आरंभ झाल्यामुळे एकेक क्षण महत्त्वाचा आहे. स्थुलापेक्षा सूक्ष्म श्रेष्ठ असल्याने साधकांनी संतांना भ्रमणभाष न करता त्यांना मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.’ - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

सर्वत्रच्या साधकांना सेवेची सुवर्णसंधी !

धर्मरथांवर चालक-साधकांची तातडीने आवश्यकता !
     सनातनचे ग्रंथ म्हणजे समाजाला धर्मशिक्षण देणारे ज्ञानाचे अनमोल भांडारच ! मानवजातीसाठी ज्ञानामृत असलेल्या या ग्रंथांद्वारे समाजाला आचारधर्म, साधना, आदी नानाविध विषयांसंदर्भात दिशादर्शन केले जाते. या ग्रंथांना सर्वत्र मोठ्या प्रमाणावर मागणी येत आहे.
     समाजापर्यंत शीघ्रतेेने पोहोचण्यासाठी सनातन संस्थेच्या वतीने ठिकठिकाणी धर्मरथाद्वारे ग्रंथप्रदर्शने लावली जात आहेत. या सेवेसाठी धर्मरथावर चालक-साधकांची आवश्यकता आहे. सेवेसाठी इच्छुक असलेल्या साधकांकडे लहान धर्मरथासाठी ‘लाईट मोटर व्हेहिकल’ (LMV), दुसर्‍या लहान धर्मरथासाठी ‘लाईट ट्रान्स्पोर्ट व्हेहिकल’ आणि तीन मोठ्या धर्मरथांसाठी ‘हेव्ही ट्रान्स्पोर्ट व्हेहिकल’ असे परवाने असणे आवश्यक आहे.
     जे साधक वरील सेवांमध्ये काही कालावधीसाठी किंवा पूर्णवेळ सहभागी होऊ शकतात, त्यांनी जिल्हासेवकांच्या माध्यमातून श्री. माधव गाडगीळ यांच्याशी ०८४५१००६००८ या क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा. 
     ज्यांना धर्मरथ (ट्रक) चालवता येत नाही; मात्र शिकण्याची इच्छा आहे त्यांना धर्मरथ चालवण्यास शिकवण्यात येईल.॥ हरि ॐ तत्सत् ॥ 
संत भक्तराज सनातनचे श्रद्धास्थान
गुरु-शिष्य नात्याविषयी गुरूंचा दृष्टीकोन
मी कोणाचा गुरु नाही; पण शिष्य केल्याविना सोडणार नाही.
भावार्थ १ : ‘मी कोणाचा गुरु नाही’, यातील ‘मी’ प्रकृतीतील ‘मी’विषयी आहे. ‘शिष्य केल्याविना सोडणार नाही’, म्हणजे पुरुषतत्त्वाचा किंवा बाबांच्या गुरूंचा, म्हणजे प.पू. अनंतानंद साईश यांचा शिष्य केल्याविना सोडणार नाही किंवा असा नामजप चालू करून देईन की, सर्वजण नामाचे शिष्य होतील.
भावार्थ २ : गुरु म्हणजे शिव. शिवदशेत मनात विचार येत नाहीत; म्हणूनच ‘मी गुरु आहे’ हा विचार मनात येऊ शकत नाही. जीवदशेत आल्यावर ‘मी शिष्य आहे’ एवढाच विचार मनात येतो; म्हणूूनच ‘माझ्या गुरूंकडे मी साधकांना घेऊन जाईन, त्यांना माझ्या गुरूंचे शिष्य करीन’.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन ‘संत भक्तराज महाराज यांची शिकवण.’)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
विज्ञान एकातरी क्षेत्रात धर्मशास्त्राच्या पुढे आहे का ?
कुठे प्रत्येक क्षेत्रात सर्वोच्च स्तराचे ज्ञान देणारा हिंदु धर्म, तर कुठे बालवाडीप्रमाणे शिक्षण देणारे पाश्‍चात्त्य देश !
     सर्वच क्षेत्रांत अशी स्थिती आहे. त्याचे एक उदाहरण येथे दिले आहे.
प्राणीशास्त्र
    विज्ञान प्राण्यांच्या स्थूलदेहाची माहिती सांगते. याउलट कोणत्या प्राण्यांत कोणत्या देवतेचे तत्त्व आहे इत्यादी माहिती अध्यात्मशास्त्र सांगते.  (क्रमश:)
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

मनातील वादळे नकोत !
समुद्रातील वादळ थोड्या काळात नाहीसे होते; पण मनातील वादळ 
एकदा निर्माण 
झाले की, ते आवरणे कठीण ! म्हणून मनातील ही वादळे निर्माण होऊ न देणेच श्रेयस्कर !
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

पाकची हुशारी !

अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हणे पाकच्या पंतप्रधानांवर दूरभाषद्वारे स्तुतीसुमनांचा वर्षाव केला. हे वृत्त केवळ पाकनेच माहितीपत्रकातून प्रसिद्ध केले आहे. अमेरिका आणि पाकिस्तान या देशांच्या नेत्यांमधील संभाषणाची दखल प्रसिद्धीमाध्यमांनी घेतली नाही, असे प्रथमच झाले असेल. डोनाल्ड ट्रम्प पुढील मासात अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे हातात घेतील. त्यांनी अध्यक्षपदाची निवड लढवतांना जी काही आश्‍वासने दिली होती, त्यात पाकला धारेवर धरण्याविषयी त्यांनी सूतोवात केले होते. पाकमधील आतंकवाद आणि पाकच्या सरकारची निष्क्रीयता यांच्याविषयी ट्रम्प यांना गप्प रहावेसे वाटत नाही. या सूत्रावर काहीतरी कारवाई केल्याशिवाय जगात शांतता नांदणार नाही, असे त्यांना वाटते. त्यामुळे ट्रम्प प्रशासन पाकच्या विरोधात उभे रहाण्याची भीती निर्माण झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर ट्रम्प पाकच्या पंतप्रधानांशी दूरभाषवर बोलले असतील, अशी सूतराम शक्यता नाही.

देशप्रेम जागवा !

देशभरातील चित्रपटगृहांत चित्रपट चालू होण्यापूर्वी राष्ट्रगीत लावण्यात यावे, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. ‘न्यायालयाचा कालोचित असा निर्णय’ असे येथे म्हणता येते. न्यायालयाने दिलेला हा निर्णय कृतीत आणला म्हणजे देशवासियांमध्ये आपोआप देशभक्ती जागवली जाईल. भारतीय शासनाने नुकताच ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून मागे घेण्याचा निर्णय घेतला. काही लोकप्रतिनिधींनी या निर्णयाला विरोध केला, तरी शंभर प्रतीशत जनतेने शासनाच्या निर्णयाचे स्वागत केले, केंद्रशासनाचे अभिनंदन केले आणि पंतप्रधानांनी थेट विचारलेल्या प्रश्‍नाला सकारात्मक उत्तर देऊन ‘कष्ट पडले, तरी जनता पंतप्रधानांच्या मागे खंबीरपणे उभी आहे’, हे दाखवून दिले.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn