Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

चर्च ऑफ साऊथ इंडियाचे व्यवस्थापन विसर्जित करून प्रशासकाची नियुक्ती !

भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे प्रोटेस्टंट चर्चच्या
सर्वांत मोठ्या व्यवस्थापनावर कारवाई !
        चेन्नई - राष्ट्रीय कंपनी कायदा लवाद (दि नॅशनल कंपनी लॉ ट्रायब्युनल) या शासकीय संस्थेने प्रोटेस्टंट चर्चचे देशातील सर्वांत मोठे व्यवस्थापन चर्च ऑफ साऊथ इंडियाच्या संचालक मंडळावर भ्रष्टाचाराचे आरोप असल्याने ते विसर्जित केले आहे आणि त्याच्या जागी निवृत्त न्यायाधीश के. संपत यांची प्रशासक म्हणून नेमणूक केली आहे. सुमारे ४० लक्ष सदस्य असलेल्या या चर्चच्या विसर्जनामुळे ख्रिस्ती समाजात खळबळ उडाली आहे. (हिंदूंच्या मंदिरांतील व्यवस्थापनांवर अपप्रकाराचे आरोप नसतांनाही सरकार ते कह्यात घेते; मात्र सरकारच्याच विभागाने ज्या चर्चवर भ्रष्टाचाराच्या आरोपांची पुष्टी केली आहे, त्यावर केवळ प्रशासक नेमते; ती संस्था कह्यात घेत नाही. यालाच धर्मनिरपेक्षता म्हणावी काय ? - संपादक)
        चेन्नई येथे मुख्यालय असलेल्या चर्च ऑफ साऊथ इंडिया ट्रस्ट असोसिएशन या संस्थेची नोंदणी झाली असून तिच्या वतीने २३ चर्चच्या संस्था, १६ सहस्र गावांत शाळा, रुग्णालये चालवली जातात. दानशूर लोकांनी या संस्थेला मोठ्या प्रमाणावर भूमी दान केली आहे. त्यांच्या भाड्यापोटी संस्थेला प्रत्येक वर्षी १ सहस्र ३०० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. तसेच ४० लक्ष सदस्यता असलेल्या या चर्चला भक्तांकडूनही देणग्या मिळतात. 

कर्नाटकातील हिंदुत्वनिष्ठ नेत्यांच्या हत्यांच्या प्रकरणांची एन्आयएकडून चौकशी करावी ! - भाजपची केंद्रशासनाकडे मागणी

केंद्रात स्वतःच्या पक्षाची सत्ता असतांना अशी मागणी का करावी
लागते ? संघ आणि भाजप यांच्या १४ नेत्यांच्या हत्येनंतरही सरकार
निष्क्रीय असणार असेल, तर काँग्रेस आणि त्यांच्यात भेद तो काय राहिला ?
        बेळगाव - कर्नाटक राज्यात भाजप आणि रा.स्व. संघ यांच्या १४ नेत्यांची हत्या करण्यात आली. त्यांतील ८ जणांवर प्राणघातक आक्रमणे होऊन गंभीररित्या घायाळ करण्यात आले होते. या हत्यांची चौकशी करण्यासाठी केंद्रशासनाने राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेची (एन्आयएची) नियुक्ती करावी, अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते श्री. आर्. अशोक यांनी केली आहे. 
        या हत्यांमागे कर्नाटक फोरम फॉर डिग्निटी आणि पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या जिहादी संघटनांचा हात असल्याने त्या संघटनांवर बंदी घालावी, अशीही मागणी भाजपने केली आहे. कर्नाटकच्या काँग्रेस सरकारवर टीका करतांना श्री. अशोक म्हणाले की, राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. त्यामागे काँग्रेस सरकारचे अल्पसंख्यांकांचे लांगूलचालनाचे धोरण कारणीभूत आहे. 

जनतेने कॅशलेस व्यवहार करावेत, यासाठी सरकारचा जाणीवपूर्वक नोटा अल्प छापण्याचा प्रयत्न ! - अर्थतज्ञांचे मत

       नवी देहली - जनतेने अधिकाधिक कॅशलेस व्यवहार (चलनविरहित व्यवहार) करावेत, यासाठी केंद्र सरकार नोटांची छपाई अल्प करण्याचा प्रयत्न करत आहे, असे अर्थतज्ञांकडून सांगण्यात येत आहे. मागील काही दिवसांपासून नेटबँकिंग, मोबाईल बँकिंग आणि मोबाईल वॉलेट यांच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार करण्याचे आवाहन मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे. तसेच नोटाबंदीला २० दिवस झाले, तरी देशाच्या अनेक भागांमधून नोटांचा पुरवठा पुरेशा प्रमाणात होत नसल्याचे निदर्शनास येत आहे; मात्र सरकारकडून सर्व सुरळीत होईल, असे म्हटले जात आहे. या सर्व परिस्थितीवरून सरकार रोखीच्या व्यवहारांनाच आळा घालण्याच्या प्रयत्नात आहे, असे लक्षात येते, असे अर्थतज्ञ सांगत आहेत.
       पूर्वीसारख्याच नोटा मोठ्या प्रमाणावर मिळतील, या आशेवर कोणी राहू नये आणि डिजिटल पद्धतीने व्यवहार करणे हिताचे ठरेल, असा सल्ला तज्ञ मंडळी लोकांना देत आहेत. नोटांचे प्रमाण न्यून केल्याचे आधीच घोषित केल्यास देशात गोंधळ निर्माण होईल. हा गोंधळ टाळण्यासाठी आणि लोकांना डिजिटल व्यवहार करण्याची सवय व्हावी म्हणून जाणीवपूर्वक मर्यादीत नोटा आणि त्यातही प्राधान्याने २ सहस्र रुपयांच्या नोटा बाजारात आणून चाचपणी चालू आहे. लोकांचे डिजिटल व्यवहार वाढल्यावर सरकार आणखी आर्थिक सुधारणा करील, असा तर्क तज्ञ व्यक्त करत आहेत.

तणाव आणि नकारात्मक मानसिकता यांपासून सुटका करण्यासाठी अध्यात्म हा उपाय ! - डॉ. रसेल डिसूझा

       पुणे, १ डिसेंबर - आज प्रत्येक जण प्रगतीच्या मागे धावत आहे. त्यामुळे ताणतणाव, विविध आजार, नकारात्मक मानसिकता आदी गोष्टी या आपल्या पाठीशी लागलेल्या असतात. त्यांच्यापासून सुटका करायची असेल, तर अध्यात्म हाच त्यावरचा उपाय आहे. (अध्यात्मशास्त्र नाकारणार्‍या तथाकथित बुद्धिप्रामाण्यवाद्यांना चपराक ! - संपादक) आपल्या अवतीभोवती, निसर्गाच्या सान्निध्यात, एवढेच काय तर प्रत्येकाच्या आतमध्ये ईश्‍वर असतो. त्याला ओळखून त्याप्रमाणे वागले, तर आनंद, प्रेम आणि इच्छाशक्ती आदी दृढ होतात, असे प्रतिपादन ऑस्ट्रेलिया येथील युनेस्को अध्यासनाचे प्रमुख डॉ. रसेल डिसूझा यांनी केले.
       विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एम्आयटी, संत श्री ज्ञानेश्‍वर आणि संत श्री तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमाला न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने युनेस्को अध्यासनाच्या अंतर्गत आयोजित २१ वी तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्‍वर आणि संत श्री तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमालेत ते बोलत होते. या वेळी बंगळुरू येथील डॉ. ई. मोहनदास, डॉ. प्रमोद तिवारी आणि माईर्स एम्आयटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्‍वनाथ कराड यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

सांबा सेक्टरमध्ये आतंकवाद्यांनी ८० फूट लांबीच्या भुयारातून घुसखोरी केल्याचे उघड !

सीमेवरील झोपलेली सुरक्षा दले !
      सांबा (जम्मू) - ३ आतंकवाद्यांनी जम्मू-कश्मीरच्या सांबा सेक्टरमध्ये ८० फूट लांबीच्या भुयारातून घुसखोरी केल्याचे उघड झाले आहे. या भुयाराचे एक टोक पाकच्या हद्दीत तर दुसरे टोक भारतातील एका शेतात होते. या भुयाराद्वारे आंतरराष्ट्रीय सीमेवरील कुंपण न तोडता आतंकवाद्यांनी घुसखोरी केली होती. भुयार नेमके कोणत्या कालावधीत आणि कोणी बनवले याची चौकशी करण्यात येत आहे. 
      सीमा सुरक्षा दलाचे प्रमुख के.के. शर्मा म्हणाले की, पाकच्या सैन्याधिकार्‍यांच्या स्तरावर होणारी चर्चा सध्या बंद आहे; मात्र ही चर्चा झाली, तर भुयाराचे सूत्र उपस्थित करून पाकच्या कारवाईला आक्षेप घेतला जाईल. 
      हे भुयार ७ बाय ७ फूटांचे होते. भुयारातून आलेल्या आतंकवाद्यांकडे ट्राईनाइट्रोग्लिसरीन या ज्वालाग्रही रसायनाने भरलेल्या ५ बाटल्या, स्फोटके बनवण्यासाठी वापरल्या जाणार्‍या इतर वस्तूंचा साठा आणि शस्त्रास्त्रे होती. हे साहित्य जप्त करण्यात आले आहे. मात्र या वस्तूंचे स्वरुप आणि प्रमाण पाहता रेल्वे रुळ उडवून देणे, सैन्याचे वाहन स्फोटाने नष्ट करणे, अशा प्रकारचे घातपात करण्यासाठी आतंकवादी आल्याचे स्पष्ट होते, असे सीमा सुरक्षा दलाचे प्रमुख के.के. शर्मा म्हणाले.

(म्हणे) डोनाल्ड ट्रम्प यांनी नवाज शरीफ यांच्यावर स्तुतीसुमनांचा वर्षाव केला - पाकचा दावा

  • पाकचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष ट्रम्प यांच्यात म्हणे दूरभाषवरून संभाषण झाले आणि पाकने ते माहितीपत्रकातून प्रसिद्ध केले. पाकचा हा बेबनाव नाही कशावरून ?
  • पाकला हरप्रकारे साहाय्य करण्याचे आश्‍वासन !
       नवी देहली - अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानी जनता आणि नवाज शरीफ यांच्यावर स्तुतीसुमने उधळल्याचा दावा पाकने केला आहे. केव्हाही दूरभाष करा, पाकला साहाय्य करू, असे आश्‍वासनच त्यांनी दिल्याचा दावा पाकने केला आहे. पाककडून ३० नोव्हेंबरला नवाज शरीफ आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात झालेल्या दूरभाष संभाषणाविषयीची माहिती प्रसिद्धी करण्यात आली. या माहितीपत्रकात ट्रम्प यांनी पंतप्रधान नवाज शरीफ आणि पाक देश यांची स्तुती केल्याचे म्हटले आहे. नवाज शरीफ यांच्याशी संभाषण झाल्याच्या वृत्ताला ट्रम्प यांच्या प्रवक्त्याने दुजोरा दिला आहे; मात्र याविषयी सविस्तर माहिती देण्यास त्यांनी नकार दिला आहे.
१. तुम्ही भन्नाट आहात, असे ट्रम्प यांनी शरीफ यांना उद्देशून म्हटले आहे. पाकिस्तान राष्ट्र हे जगातील बुद्धिमान लोकांपैकी एक आहे आणि पाकिस्तान हा उत्कृष्ट देश आहे, असे ट्रम्प यांनी म्हटल्याचा दावा माहितीपत्रकात करण्यात आला आहे. 

खलिस्तानी आतंकवादी मिंटू याच्या गोव्यातील वास्तव्याच्या संदर्भातील तपास करत आहोत ! - पोलीस उपमहानिरीक्षक

खलिस्तानी आतंकवादी मिंटू गोव्यात वास्तव्यास होता, ही माहिती उघड झाल्याचे प्रकरण
      मोठमोठे आतंकवादी गोव्यात येऊन वास्तव्य करत असल्याचा गोवा पोलिसांना सुगावाही लागत नाही; मात्र प्रखर हिंदुत्वनिष्ठ श्री. प्रमोद मुतालिक यांच्या गोवा प्रवेशावर बंदी घालण्यात येते ! खलिस्तानी आतंकवादी, हेडली, यासिन भटकळ येथे कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित करतात; मात्र हिंदुत्वनिष्ठ शांतता भंग करतात, असे समजायचे का ?
      पणजी, १ डिसेंबर (वार्ता.) - पंजाबमधील नाभा कारागृहातून पळून गेलेला अन् नंतर पुन्हा जेरबंद करण्यात आलेला खलिस्तान कमांडो फोर्सचा नेता हरमिंदरसिंह मिंटू कमळामळ, बोरी येथे काही वर्षांपूर्वी एका बंगल्यात कुटुंबियांसह रहात होता, अशी खळबळजनक माहिती उघड झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर गोवा पोलीस खलिस्तानी आतंकवादी मिंटू याच्या गोव्याशी असलेल्या संबंधांचा तपास करत असल्याची माहिती पोलीस उपमहानिरीक्षक विमल गुप्ता यांनी दिली आहे.

विवाहित महिलांना ५० तोळे, अविवाहित महिलांना २५ तोळे आणि पुरुषांना फक्त १० तोळे सोने घरात ठेवता येणार !

      नवी देहली - लोकसभेत संमत करण्यात आलेल्या आयकर कायद्यातील सुधारणानुसार विवाहित महिलांना ५० तोळे, अविवाहित महिलांना २५ तोळे आणि पुरुषांना फक्त १० तोळे सोने घरात ठेवता येणार आहे. यापेक्षा अधिक सोन्याचे दागिने घरात असतील, तर त्याचे स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे; मात्र यात गृहिणींनी त्यांच्या घरगुती बचतीतून किंवा आधीच कर भरलेल्या उत्पन्नातून, खरेदी केलेल्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांची जप्ती करण्याचा किंवा त्यावर कर घेण्याचा सरकारचा कसलाही विचार नाही, याविषयी पसरवल्या जात असलेल्या बातम्या या अफवा आहेत, असेही आयकर विभागाने स्पष्ट केले आहे. 

गोव्यात १८ वर्षांखालील मुले हरवण्याच्या प्रमाणात वाढ :

वर्षाला सरासरी ३० मुले हरवतात !
     पणजी, १ डिसेंबर (वार्ता.) - राज्यात १८ वर्षांखालील मुले हरवण्याचे प्रमाण वाढले आहे. सरासरी ३० मुले वर्षाला हरवत असल्याची माहिती समोर आली आहे. देशभरात मुले हरवण्याची ही संख्या मोठी आहे, अशी माहिती दैनिक ‘गोवन् वार्ता’ यांनी प्रसिद्ध केलेल्या एका वृत्तात दिली आहे. (सध्या ‘इसिस’ ही जिहादी संघटना त्यांच्या संघटनेमध्ये सहभागी करून घेण्यासाठी मुलांना लक्ष्य करत आहे. त्यामुळे या समस्येवर शासनाने तात्काळ उपाययोजना काढणे आवश्यक आहे. - संपादक)

गोव्यात सत्तेवर आल्यास इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक शाळांचे अनुदान रहित करू ! - अधिवक्ता रोशन सामंत, उत्तर गोवा महिला अध्यक्ष, गोवा सुरक्षा मंच

     म्हापसा - आगामी विधानसभा निवडणुकीत गोवा सुरक्षा मंच-शिवसेना युती सरकार सत्तेवर आल्यास वर्ष २०१७-२०१८ या शैक्षणिक वर्षापासून इंग्रजी माध्यमाच्या खाजगी प्राथमिक शाळांचे सरकारी अनुदान रहित करण्यात येईल, अशी माहिती गोवा सुरक्षा मंचच्या उत्तर गोवा महिला अध्यक्षा अधिवक्ता रोशन सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
    या वेळी जिल्हा समितीचे अध्यक्ष नंदन सावंत, कोषाध्यक्ष तुकाराम नार्वेकर, उत्तर गोवा सरचिटणीस आत्माराम गांवस, समितीचे उपाध्यक्ष दामोदर नाईक आणि उत्तर गोवा युवाध्यक्ष प्रणव बाणावलीकर उपस्थित होते. अधिवक्ता रोशन सामंत म्हणाल्या, ‘‘काँग्रेस सरकारने खाजगी प्राथमिक शाळांना चालू केलेले आणि भाजप सरकारने चालू ठेवलेले सरकारी अनुदान बंद केले जाईल अन् भारतीय भाषांतील प्राथमिक शाळांनाच सरकारी अनुदान दिले जाईल.’’

पनवेलमध्ये सिडकोची अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाईसाठी नोटीस

        पनवेल - येथील सिडको वसाहतीतील अनधिकृत मंदिर पाडण्यासाठी सिडकोने कोणालाही विश्‍वासात न घेता व्यवस्थापकांना नोटिसा पाठवल्या आहेत. या विरोधात ग्रामस्थांनी विशेष बैठक बोलवली असून सर्वजण तीव्र विरोध करण्याच्या भूमिकेत आहेत. 
        काही दिवसांपासून सिडकोने शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळांना नोटिसा बजावून आपली पात्रता सिद्ध करण्याचे आवाहन केले. पात्रता सिद्ध न करणार्‍या धार्मिक स्थळांवर सरकारच्या विद्यमान धोरणानुसार कारवाई करण्याचे संकेत सिडकोने दिले आहेत. सिडकोने नागरी वस्तीसाठी भूखंडांचे आरक्षण केले; मात्र मंदिरासाठी कोणत्याही ठिकाणी भूखंड राखीव न ठेवल्यानेच आजची परिस्थिती निर्माण झाली आहे, असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. 
        सिडको प्रशासनाकडे धार्मिक स्थळांसाठी भूखंड आरक्षित करावा, अशी मागणी सातत्याने व्यवस्थापन समित्यांकडून करण्यात येत होती, त्याकडे दुर्लक्ष करून आता अनधिकृत मंदिरे उभारली म्हणून नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. याविषयी माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनीही तीव्र असंतोष व्यक्त करत यावर तोडगा निघेपर्यंत किमान सहा मास कारवाई स्थगित करावी, अशी मागणी केली आहे अन्यथा नागरिकांच्या भावनांचा उद्रेक होईल अशी चेतावणी दिली आहे. 

ग्रामीण भागांत यापुढे प्रतिमाह १२ ऐवजी २ मद्याच्या बाटल्या बाळगण्यास अनुमती !

राज्य सरकारने पूर्णतः मद्यबंदी करून समाजाला 
व्यसनमुक्त केले, तर खर्‍या विकासाकडे थोडीतरी वाटचाल होईल !
       मुंबई - ग्रामीण भागांत यापुढे मद्य पिण्याचा परवाना असलेल्यांना प्रतिमाह १२ मद्याच्या बाटल्यांऐवजी २ बाटल्या बाळगण्यास अनुमती देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. उत्पादन शुल्कमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी २९ नोव्हेंबरला काढलेल्या परिपत्रकात ही माहिती दिली. समाजसेवक अण्णा हजारे यांनी अवैध मद्यविक्रिला आळा घालण्यासाठी, तसेच मद्यबंदीची मागणी करतांना हा पर्याय सरकारला सुचवला होता. वैयक्तिक सेवनासाठी २ बाटल्या पुरेशा असल्याचे सरकारचे म्हणणे आहे, असे बावनकुळे यांनी सांगितले. गावात असलेल्या मद्याच्या दुकानांमुळे ग्रामस्थ त्रस्त होत असल्याने ग्रामसभेने ठराव केल्यास ही दुकाने गावाबाहेर १०० मीटर अंतरावर नेण्यात येतील, असेही सरकारने म्हटले आहे. (त्यासाठी ग्रामस्थांच्या ठरावाची काय आवश्यकता ? सरकार स्वतःहूनच हे का करत नाही ? - संपादक) 

स्वामी चक्रपाणी यांच्या हत्येची सुपारी घेणार्‍या गुंडांकडून २ चाकू जप्त

     नोएडा - अखिल भारतीय हिंदू महासभेचे अध्यक्ष स्वामी चक्रपाणी यांची हत्या करण्याची कुख्यात गुंड छोटा शकीलकडून सुपारी घेणार्‍या २ गुडांकडून उत्तरप्रदेशातील बिसरख येथील पोलिसांनी चोरीच्या ७ दुचाकी जप्त केल्या. तसेच २ चाकूही जप्त करण्यात आले. सुपारीच्या प्रकरणात ते जामीनावर सुटले होते.

कर्नाटकातील प्रस्तावित अंधश्रद्धा निर्मूलन विधेयकाच्या विरोधात हिंदु जनजागृती समितीकडून कर्नाटकाचे उर्जामंत्री डी.के. शिवकुमार यांना निवेदन !

डावीकडून (बसलेले) शिवकुमार, निवेदन देतांना 
अधिवक्ता श्री. चेतन मणेरीकर, श्री. मोहन गौडा, 
सौ. विदुला हळदीपूर आणि श्री. काशिनाथ शेट्टी
     बेंगळुरू - कर्नाटक राज्याचे उर्जामंत्री डी.के. शिवकुमार यांची हिंदु जनजागृती समितीचे श्री. मोहन गौडा, श्री. काशिनाथ शेट्टी, अधिवक्ता श्री. चेतन मणेरीकर आणि सौ. विदुला हळदीपूर यांनी भेट घेतली. त्यांना समितीकडून कर्नाटक सरकारच्या प्रस्तावित अंधश्रद्धा निर्मूलन विधेयकाला विरोध करणारे निवेदन देण्यात आले. तसेच कर्नाटकातील अनेक हिंदुत्वनिष्ठ नेत्यांच्या हत्यांचा आरोप असणार्‍या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या जिहादी संघटनेवर बंदी घालण्याचीही मागणी करण्यात आली. या वेळी शिवकुमार यांनी ‘मी या मागण्यांकडे लक्ष घालतो’, असे आश्‍वासन दिले.

कर्नाटकातील प्रस्तावित अंधश्रद्धा कायदा रहित करण्याची मागणी !

उडुपी येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन
आंदोलनात सहभागी झालेले धर्माभिमानी हिंदू
    उडुपी (कर्नाटक) - कर्नाटकातील उडुपी येथे २७ नोव्हेंबर या दिवशी राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. यामध्ये हिंदु जनजागृती समिती, श्रीराम सेना, सनातन संस्था, माता अमृतानंद इत्यादी संघटना सहभागी झाल्या होत्या. या आंदोलनामध्ये पुढील मागण्या करण्यात आल्या.

रायपूरमधील बंजारा मंदिरात ‘कॅशलेस दान’ !

     रायपूर (छत्तीसगड) - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबरला ५०० आणि १ सहस्र या चलनांवर बंदी घातली. त्यानंतर अनेक ठिकाणी मंदिरातील दानपेटीमध्ये भक्तांनी दान म्हणून ५०० आणि १ सहस्र च्या नोटा टाकणे चालू केले. यावर उपाय म्हणून रायपूर येथील प्रसिद्ध बंजारा मंदिरात दानपेटीसह ‘स्वाईप मशीन’ही ठेवण्यात आली आहे.
     या मंदिरात मोठ्या प्रमाणावर भाविक दान देतात. नोटाबंदीच्या निर्णयानंतर देणगीवर परिणाम होऊ नये; म्हणून मंदिर व्यवस्थापनाने देगणी देण्यासाठी हा उपाय योजला आहे.
कामख्या देवी मंदिराबाहेरची दानपेटी हालवली !
     देशातील इतर मंदिरांप्रमाणे गुवाहाटीतील कामख्या देवीच्या मंदिरातील दानपेटीतही भाविक ५०० आणि १ सहस्रच्या जुन्या नोटा टाकत असल्याचे मंदिर प्रशासनाच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी दानपेटीच हटवण्याचा निर्णय घेतला होता.आई-वडिलांच्या घरावर मुलाचा कायदेशीर अधिकार नाही ! - देहली उच्च न्यायालय

     नवी देहली - आईवडील रहात असलेल्या घरावर मुलाचा मग तो विवाहित असो कि नसो त्याचा कोणताही कायदेशीर अधिकार नाही. केवळ आईवडिलांची इच्छा असेल, तरच तो त्यांच्या घरात राहू शकतो, असा निकाल देहली उच्च न्यायालयाच्या न्या. प्रतिभा रानी यांनी दिला आहे. केवळ नाते आहे म्हणून आयुष्यभर मुलाचा भार पालकांनी वाहणे बंधनकारक नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे. 
     एका मुलाने आणि त्याच्या पत्नीने मुलाच्या आईवडिलांविरुद्ध खटला प्रविष्ट केला होता. आईवडिलांच्या घरात रहाण्याचा आपल्याला अधिकार आहे. त्यामुळे घराचा एका मजल्यावर आमचा अधिकार आहे, असे या मुलाचे म्हणणे होते; मात्र न्यायालयाने हा अधिकार फेटाळला आहे. मुलगा आणि सून आमचा छळ करत आहेत, असे आईवडिलांचे म्हणणे होते.


(म्हणे) ‘चित्रपटगृहात राष्ट्रगीत वाजवल्याने देशभक्ती जागृत होणार आहे का ?’

असदुद्दीन ओवैसी यांचा देशद्रोह दाखवणारा प्रश्‍न !
     ओवैसी यांच्यासारख्यांमध्ये देशभक्ती आहे का, हाच मुळात प्रश्‍न असल्याने त्यांच्यातील देशभक्ती राष्ट्रगीत वाजल्याने कशी जागृत होणार ? अशांना पाकचे राष्ट्रगीत ऐकवले, तर त्यांची देशभक्ती जागृत होईल, असे कोणी म्हटल्यास आश्‍चर्य वाटू नये !
     भाग्यनगर - एम्आयएम्चे अध्यक्ष खासदार असदुद्दीन औवेसी यांनी देशभरातील चित्रपटगृहांत राष्ट्रगीत वाजवण्याच्या आदेशाचे स्वागत केले आहे; मात्र यामुळे नागरिकांमध्ये राष्ट्रभक्ती जागणार आहे का, त्यासाठी उभे रहाणे आवश्यक आहे का ? असे प्रश्‍नही त्यांनी विचारले आहेत. गोव्यात काही दिवसांपूर्वी राष्ट्रगीत चालू झाल्यावर अपंग व्यक्तीला उभे न राहिल्याने मारहाण करण्यात आली होती, अशा घटना कशा रोखल्या जाणार, असेही त्यांनी विचारले आहे. (अशी घटना झाल्याने हा नियमच लावू नये, असे कसे म्हणता येईल ? - संपादक)
     ओवैसी पुढे म्हणाले की, माझ्या मते लहान मुलांना राष्ट्रगीताचा सन्मान करण्यास शिकवले पाहिजे. त्यासाठी सरकारने १९७१ च्या कायद्यात सुधारणा केली पाहिजे.
      चित्रपटगृहात राष्ट्रगीत चालवण्याची मागणी करणारी याचिका श्याम नारायण चौकसे यांनी केली होती. त्यावरून सर्वोच्च न्यायालयाने वरील निर्णय दिला आहे.

नौपाडा (ठाणे) येथील श्रीमती सुधा पाळंदेआजी यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

श्रीमती पाळंदेआजी (डावीकडे) यांचा
सत्कार 
करतांना सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर

        ठाणे, १ डिसेंबर (वार्ता.) - प्रत्येक कृती सूक्ष्मातून प.पू. डॉक्टर आणि श्रीकृष्ण यांना विचारून करणार्‍या, तसेच सतत अनुसंधानात असणार्‍या येथील साधिका श्रीमती सुधा पाळंदेआजी यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली, असे सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांनी घोषित केले. या सोहळ्यात सनातनच्या पू. (श्रीमती) कला प्रभुदेसाई आणि श्रीमती सुधा पाळंदेआजी यांची मुलगी सौ. वृषाली प्रभुदेसाई यांसह अनेक साधक उपस्थित होते. सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांनी श्रीकृष्णाचे चित्र आणि प्रसाद देऊन आजींचा सत्कार केला. या सोहळ्याच्या वेळी आजींची आणि उपस्थित साधकांची भावजागृती झाली.

राज्यात वर्ष २०१५ मध्ये पोलिसांवर ३७० आक्रमणे

कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे आणि पोलिसांचा धाक संपल्याचे लक्षण ! 
     पुणे, १ डिसेंबर - राज्यात वर्ष २०१५ मध्ये पोलिसांवर ३७० आक्रमणे झाली आहेत. त्यामध्ये ४४.५ टक्के आक्रमणे ही जमावाकडून, अपघातात २७.५७ टक्के, छापामारी करतांना १.३२ टक्के, तर गुन्हेगारांना पकडण्यासाठी गेल्यानंतरच्या आक्रमणाचे प्रमाण ९.१८ टक्के आहे, अशी माहिती राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचा गुन्हेविषयक अहवाल २०१५ यामधून उघड झाली आहे. (पोलिसांची सुरक्षा आणि कायदा सुव्यवस्था यांसाठी गृह विभाग आणि राज्य सरकार कोणती उपाययोजना करणार ? - संपादक) 

पाकव्याप्त काश्मीरमधील शरणार्थींसाठी २ सहस्र कोटी रुपयांचे पॅकेज !

पाक आणि बांगलादेशातील शरणार्थी
हिंदूंसाठी सरकार पॅकेज कधी घोषित करणार ?
       नवी देहली - केंद्र सरकारने पाकव्याप्त काश्मीरमधून येणार्‍या शरणार्थींच्या विकासासाठी २ सहस्र कोटी रुपयांच्या पॅकेजला संमती दिली आहे. तसेच विदेशी व्यक्तीच्या व्हीसासाठी नियम शिथिल करण्यात आले आहेत.
       जम्मू-काश्मीर सरकारने ३६ सहस्र ३४८ परिवारांची सूची बनवली आहे ज्यांना या पॅकेजमधून साहाय्य देण्यात येणार आहे. या परिवारांना प्रत्येकी साडेपाच लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे.

रिलायन्स जियोच्या ४ जी विनामूल्य सेवेत ३१ मार्च २०१७ पर्यंत वाढ !

      मुंबई - रिलायन्स जिओच्या ४ जी सेवेेविषयी रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी घोषणा केली आहे की, ४ डिसेंबरपासून नव्या ग्राहकालाही विनामूल्य सेवा देण्यात येणार आहे. डेटा, वॉईस सेवा पूर्णपणे विनामूल्य करण्यात आल्या आहेत. जिओची पहिली विनामूल्य सेवा ३१ डिसेंबरपर्यंत होती. आता ही सेवा ३१ मार्च २०१७ पर्यंत विनामूल्य देण्यात आली आहे. यात जुन्या आणि नव्या ग्राहकांना ही सेवा मिळणार आहे.

मुंबई नागरी परिवहन प्रकल्प फेज ३ (एम्यूटीपी ३) ला केंद्रशासनाची अनुमती

        मुंबई, १ डिसेंबर - मुंबई नागरी परिवहन प्रकल्प फेज ३ (एम्यूटीपी ३) ला केंद्रशासनाने अनुमती दिली असून १० सहस्र ९४७ कोटी रुपयांच्या प्रकल्पांना संमती देण्यात आली आहे. नरेंद्र मोदी अध्यक्ष असलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 
        या प्रकल्पाचा प्रस्तावित खर्च ८ सहस्र ६७९ कोटी रुपये आहे. या प्रकल्पात पनवेल-कर्जत या २८ किमीच्या मार्गात नवा उपनगरी मार्ग, ऐरोली-कळवा या ३ किमी मार्गाचा एलिव्हेटेड कॉरिडॉर विरार-डहाणू रोड या ६३ किमी मार्गाचे चौपदरीकरण, ५६५ नवीन कोचेसची खरेदी आदी गोष्टींचा समावेश आहे. महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ आल्या असून त्यांच्या तोंडावर हा निर्णय घेण्यात आल्याचे म्हटले जात आहे.

मुंबईतील पदपथांची अवस्था भीषण असून वृद्ध आई-वडिलांना बाहेर फिरायला नेण्याची भीती वाटते - अजोय मेहता, महापालिका आयुक्त

असे हतबलतेने बोलणारे नव्हे, तर कृती करणारे आयुक्त हवेत ! 
     मुंबई, १ डिसेंबर - मुंबईतील पदपथांची (फूटपाथची) अवस्था भीषण असून याच्यामुळे माझ्या वृद्ध आई-वडिलांना बाहेर फिरायला नेण्याची मला भीती वाटते. माझ्या प्रभागीय अधिकार्‍यांना मी नेहमी सांगतो की, ‘एकदा तुमच्या आईवडिलांना पदपथावरून नेऊन त्याची काय अवस्था आहे ते पहा’ असे मत महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांनी व्यक्त केले आहे. (पदपथांच्या दुरवस्थेचे केवळ वर्णन करणारे नको, तर त्यात पालट करणारे प्रशासन हवे ! आयुक्तांची या समस्येवरील अशी भूमिका असल्यास जनतेने आवश्यक सुविधा मिळण्यासाठी कुणाकडे पहायचे ? - संपादक) पादचार्‍यांसाठी पदपथ मोकळे करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असून वेळ आल्यास कठोर कारवाई करण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले. यावेळी रस्तेकामांचे डेब्रिज पदपथावर टाकण्यासही प्रतिबंध घालण्यात आला आहे. या संदर्भात शिवसेनेच्या नगरसेविका तृष्णा विश्‍वासराव यांनी आयुक्तांकडे सर्व अधिकार असूनही ते काही करत नाहीत, असे म्हटले आहे.

(म्हणे) ‘देशात उजव्या संघटनांचा धुमाकूळ चालू आहे !’

डावे आणि मुसलमान यांचा राष्ट्रद्रोह न दिसणारे डॉ. श्रीपाल सबनीस यांची टीका 
     पुणे - मुसलमानांंवर भाजपप्रमाणे काँग्रेसच्या सरकारनेही संशय घेतला. त्यामुळे सरकार ही संकल्पनाच संशयाच्या भोवर्‍यात आहे. सर्व मुसलमान देशभक्त नाहीत; पण सर्व हिंदू तरी कुठे देशभक्त आहेत ? काळाबाजार करणारे, गरिबांना लुटणारे हिंदूही देशद्रोहीच आहेत. देशात उजव्या संघटनांचा धुमाकूळ चालू आहे, अशी टीका अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी ३० नोव्हेंबरला केली. (आतंकवाद्यांना सर्वतोपरी साहाय्य करून देशात आतंकवाद माजवणारे धर्मांध आणि हिंदु धर्म, संस्कृती, परंपरा, कला, साहित्य यांवर आक्रमणे करून धर्मांधांना सातत्याने पाठिंबा देणारे डावे यांनी देशभर माजवलेला हलकल्लोळ न दिसणारे श्रीपाल सबनीस अखिल भारतीय मराठी संमेलनाचे अध्यक्ष व्हावेत, यासारखे दुसरे दुर्दैव काय ? - संपादक) बलराज साहनी-साहिर लुधियानवी फाऊंडेशनच्या वतीने मुजफ्फर सय्यद यांच्या ‘मातृभूमी’ कवितासंग्रहाच्या प्रकाशनाप्रसंगी ते बोलत होते. 

देशद्रोही डॉ. झाकीर नाईक यांच्या अनधिकृत शाळेतून पाल्यांना काढा ! - शिक्षणमंत्री

      मुंबई, १ डिसेंबर - देशद्रोही डॉ. झाकीर नाईक यांची मुंबईतील माझगाव येथील अनधिकृत शाळा ही अंजुमन-ए-इस्लामच्या कोणत्याही गटाने चालवण्यास घ्यावी अथवा पालकांनी त्यांच्या पाल्यांना दुसर्‍या शाळेत घालावे, असे दोन पर्याय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले आहेत. शासनाच्या अनुमतीशिवाय तसेच कोणत्याही बोर्डाशी संलग्न नसतांना ही शाळा चालवण्यात येत होती. २८ नोव्हेंबरला शिक्षण विभागाच्या अधिकार्‍यांनी या शाळेची पाहणी केली होती. त्या वेळी विद्यार्थ्यांना दुसर्‍या शाळेत प्रवेश देण्यासाठी सर्वतोपरी साहाय्य करण्याचे आश्‍वासन देण्यात आले. अंजुमन-ए-इस्लामच्या कोणत्याही गटाने शाळा चालवण्यासाठी घेतल्यास महिन्याभरात राज्य सरकार त्यांना अनुमती देईल, असे शिक्षणमंत्र्यांनी सांगितले आहे.

जळगाव येथे महसूल अधिकार्‍यांकडून हप्ते घेऊन अवैध वाळूवाहतूक चालू असल्याचे उघड

अशा भ्रष्ट अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करणे आवश्यक ! 
     जळगाव - तालुक्यातील वडनगरी गावातील ग्रामस्थांनी अवैध वाळू वाहतुकीचे १६ डंपर नुकतेच पकडून देऊनही महसूल प्रशासन ढिम्मच आहे. याविषयी जळगाव तहसील कार्यालयात २९ नोव्हेबर या दिवशी एका व्यक्तीचे डंपर पकडण्यात आले होते. त्या व्यक्तीने तहसील कार्यालयात येऊन महसूल अधिकार्‍यांना शिवीगाळ करीत ‘नियमित हफ्ते घेऊनही माझे डंपर (टॅक्टर) का पकडले ?’ अशी विचारणा केली. अशा प्रकारे त्या वाहनचालकाने उघड वाच्यता करीत महसूल अधिकार्‍यांचा भ्रष्टाचार उघडकीस आणला. (अवैध वाळूउपसा का चालू रहातोे, त्याचे ही घटना म्हणजे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. सरकारने याची गंभीर नोंद घेऊन संबंधितांवर बडतर्फीची कारवाई करणे अपेक्षित आहे. तरच या भ्रष्टाचाराला आळा बसेल. - संपादक) गावकर्‍यांना जमते ते शासकीय अधिकार्‍यांना का जमत नाही, अशी चर्चा गावकर्‍यांमध्ये चालू होती.

प.पू. भक्तराज महाराज आणि प.पू. रामानंद महाराज यांच्या पादुकांचे आज सांगलीत आगमन !

     सांगली, १ डिसेंबर (वार्ता.) - देहाची पर्वा न करता भक्तांसाठी सहस्रो किलोमीटर प्रवास करून त्यांना मार्गदर्शन करणारे थोर संत प.पू. भक्तराज महाराज आणि ‘आदर्श शिष्य कसा असावा ?’ याचे मूर्तीमंत उदाहरण असणारे प.पू. रामानंद महाराज यांच्या चरण पादुकांचे शुक्रवार, २ डिसेंबर या दिवशी इंदूर येथून सांगलीत आगमन होत आहे. या पादुका प्रथम दुपारी ५ वाजता महाराजांचे भक्त श्री. तात्या भोसले यांच्याकडे येतील. तिथे पूजा, आरती, भंडारा होईल.

फोर्ट, मुंबई येथे इमारतीला भीषण आग

     मुंबई, १ डिसेंबर - येथील फोर्ट परिसरातील जे.के. सोमाणी या पाच मजली इमारतीला लागलेल्या भीषण आगीत इमारतीतील शेअर ब्रोकर, अधिवक्ते यांची कार्यालये जळून खाक झाली आहेत. यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार ३० नोव्हेंबरला रात्री सव्वानऊच्या सुमारास वातानुकूलित यंत्र दुरुस्त करत असतांना इमारतीच्या तिसर्‍या मजल्याला आग लागली. पहाटे अग्निशमन दलाच्या चार आणि पाण्याच्या ३ गाड्यांच्या साहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.

पेट्रोल पंप आणि विमानतळ येथे जुन्या नोटा स्वीकारण्याचा आजचा शेवटचा दिवस !

        नवी देहली - पेट्रोल पंप आणि विमानतळ येथे जुन्या नोटा उद्या, २ डिसेंबरपर्यंतच स्वीकारल्या जाणार आहेत. जुन्या नोटा स्वीकारण्याची आधीची १५ डिसेंबर ही मुदत केंद्र सरकारने तातडीने मागे घेतली आहे. त्यामुळे आता बँकेतच जुन्या नोटा जमा करता येणार आहेत. पेट्रोल पंप आणि विमानतळ येथे ३०-३५ टक्के कमिशन घेऊन जुन्या नोटा स्वीकारण्यात येत असल्याचे आढळून आल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

जळगाव येथे हिंदु धर्मजागृती सभेच्या प्रसाराला वेग !

     जळगाव, १ डिसेंबर (वार्ता.)- जळगावनगरीत २५ डिसेंबर २०१६ या दिवशी हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सभेचा दिनांक जवळ येऊ लागला आहे, तसा शहर आणि ग्रामीण भागांत सभेच्या प्रचारकार्याला वेग येत आहे. अनेक धर्माभिमानी, हिंदुत्ववादी संघटना, संप्रदाय यांनी ही सभा यशस्वी करण्याचा मानस व्यक्त केला आहे. अनेक जण आपापल्या परीने यथाशक्ती नवनवीन संकल्पनांचा वापर करून सभेचा प्रसार करत आहेत. 
     या सभेच्या प्रचारासाठी ग्रामीण भागांत अनेक मोठ्या गावांमध्ये सभांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांपैकी झालेल्या काही सभांना लोकांचा उत्स्फूर्त प्र्रतिसाद मिळाला आहे. शहरात रहाणारे हिंदु धर्माधिमानी श्री. गजानन तांबट यांनी हिंदु धर्मजागृती सभेसाठीचे रेडियम स्टिकर अल्प दरात उपलब्ध करून दिले आहेत. ते स्टिकर दुचाकी, चारचाकी गाड्यांवर लावण्यासाठीही अनेक धर्माभिमानी युवक पुढे येत आहेत. दोनच दिवसांमध्ये १०० हून अधिक स्टीकर लावण्यात आले आहेत, असे श्री. तांबट यांनी सांगितले.

तांबवे (तालुका कराड) येथील पडलेल्या पाण्याच्या टाकीच्या ड्रेबिजचा ढीग ४ मासांपासून पडून !

     सातारा, १ डिसेंबर (वार्ता.) - कराड तालुक्यातील तांबवे या गावातील पिण्याच्या पाण्याची साठवण करण्याची टाकी जून २०१६ मध्ये अचानक पडली होती. अजूनही या पाण्याच्या टाकीचा ढीग आहे तसाच पडून आहे. याकडे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, जिल्हा परिषद किंवा ग्रामीण पाणी पुरवठा विभाग केव्हा लक्ष देणार आहे, असा संतप्त प्रश्‍न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. (पाण्याच्या टाकीच्या ड्रेबिजचा ढीग उचलू न शकणारे प्रशासन जिल्ह्याचा कारभार कसा चालवत असेल, याचा विचारच न केलेला बरा ! - संपादक) 

सोलापूर येथे हिंदु धर्मजागृती सभेच्या प्रसारकार्याला वेग

हिंदु धर्मसभेनिमित्त सोलापूर येथे भाजप-शिवसेना भवनामध्ये बैठक 
भाजप-सेना नगरसेवकांच्या बैठकीत विषय
मांडतांना समितीचे महाराष्ट्र राज्यसंघटक श्री. सुनील घनवट
     सोलापूर, १ डिसेंबर (वार्ता.) - येथे हिंदु जनजागृती समिती आणि समस्त हिंदु धर्मप्रेमी यांच्या वतीने ४ डिसेंबर या दिवशी घेण्यात येणार्‍या हिंदु धर्मजागृती सभेच्या प्रसारासाठी येथील भाजप-शिवसेना भवनामध्ये ३० नोव्हेंबर या दिवशी बैठक घेण्यात आली. बैठकीत भाजप आणि शिवसेना या पक्षांच्या नगरसेवकांनी धर्मसभेला कार्यकर्त्यांसह अधिक संख्येने उपस्थित रहाण्याचा निर्धार केला. बैठकीला १५ नगरसेवक, गटनेता, पदाधिकारी यांसह ४० मान्यवरांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्यसंघटक श्री. सुनील घनवट यांनी राष्ट्र-धर्माची सद्यस्थिती आणि धर्मसभेची आवश्यकता हा विषय मांडून धर्मसभेला अधिकाधिक संख्येत येण्याचे आवाहन केले. 

कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील अनधिकृत बांधकामांविषयी नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले

     कल्याण, १ डिसेंबर - अनधिकृत बांधकामांविषयी वारंवार तक्रारी करूनही पालिका प्रशासन त्यावर कोणतीच कारवाई करीत नाही, असे सांगत कल्याण-डोंबिवली महापालिकेची २९ नोव्हेंबरची सर्वसाधारण सभा दिवसभरासाठी तहकूब करण्यात आली. शिवाजी चौक ते मोहम्मद अली चौकातील वाढीव अनधिकृत बांधकामांच्या संदर्भात नगरसेवक श्रेयस समेळ यांनी सूत्र मांडले होते. त्याला सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या सदस्यांनी पाठिंबा देत महापालिका प्रशासन आणि संबंधित अधिकार्‍यांवर टीकेचे आसूड ओढले. 

त्रिची (तमिळनाडू) येथील स्फोटके निर्माण केंद्रात झालेल्या स्फोटात १० जणांचा मृत्यू !

        त्रिची (तमिळनाडू) - त्रिची जिल्ह्यातील स्फोटके निर्माण केंद्रात झालेल्या स्फोटात आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला आहे, तर काही जण घायाळ झाले आहेत. या केंद्रात डोंगर आणि टेकड्या तोडण्यासाठी वापरण्यात येणारी स्फोटके बनवली जातात. घटनेच्या वेळी येथे २० कर्मचारी उपस्थित होते. 

अंधश्रद्धा निर्मूलन समितीवर प्रशासक नेमण्याविषयी ठाणे जिल्ह्यात आमदारांना निवेदने !

कल्याण येथील आमदार श्री. नरेंद्र पवार (१) यांना निवेदन देतांना समितीचे कार्यकर्ते 
भिवंडी येथील आमदार श्री. महेश चौगुळे (१) यांना निवेदन देतांना धर्माभिमानी

     ठाणे, १ डिसेंबर (वार्ता.) - शासनाची फसवणूक करून अर्थिक घोटाळे करणार्‍या ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती, महाराष्ट्र (सातारा)’वर प्रशासक नेमण्याविषयी ठाणे जिल्ह्यात भिवंडी येथील आमदार श्री. महेश चौगुळे आणि कल्याण येथील आमदार श्री. नरेंद्र पवार यांना निवेदन देण्यात आले. 

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद निवडणुकीच्या उमेदवारीवरून काँग्रेसचे किशोर मर्गज यांना ठार मारण्याची धमकी

राजकारणाचे गुन्हेगारीकरण !
काँग्रेसचे आनंद शिरवलकर यांच्यासह चौघांवर गुन्हा प्रविष्ट
     कुडाळ - सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या वेताळबांबर्डे मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्याचा राग धरून कुडाळ पंचायत समितीचे काँग्रेसचे सदस्य किशोर मर्गज आणि त्यांच्या कुटुंबियांना अपशब्द वापरून ठार मारण्याची धमकी दिल्याच्या प्रकरणी, तसेच जिल्ह्यात लागू असलेल्या मनाई आदेशाचा भंग केल्याच्या प्रकरणी काँग्रेसचे सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघ युवक काँग्रेसचे अध्यक्ष आनंद शिरवलकर यांच्यासह चौघांवर कुडाळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. (पक्षांतर्गतही सामंजस्य नसलेले सदस्य असलेला पक्ष सत्ता मिळाल्यानंतर कसा कारभार करील ? - संपादक)

जळगाव येथे महापालिका अधिकार्‍यांकडून रस्ता दुरुस्तीच्या कामात हलगर्जीपणा !

अशा दायित्वशून्य अधिकार्‍यांकडूनच रस्ता 
दुरुस्तीच्या कामांचा खर्च वसूल करणे आवश्यक ! 
     जळगाव - शहरातील न्यायालय चौक ते गणेश कॉलनीपर्यंतच्या रस्त्याची दुरुस्ती करतांना महानगरपालिका बांधकाम विभागातील अधिकार्‍यांनी नाल्याचे पाणी रस्त्यावर वहात असूनही त्यावरच डांबर आणि खडी टाकून सहस्रो रुपयांचे बांधकामसाहित्य वाया घालवले. याविषयी पालिका आयुक्तांनी समज दिल्यावर ते काम अर्धवट स्थितीत टाकून दुसर्‍या रस्तावरील दुरुस्तीसाठी निघून गेले.

‘पोर्तुगीज सिव्हिल कोड’नुसार आजही गोव्यात समान नागरी कायदा !

     ‘पोर्तुगीज राजवट आपल्या सातासमुद्रापार असलेल्या वसाहतींवर पूर्ण नियंत्रण ठेवत असे, ती केवळ कडक कायद्यांच्या माध्यमातून ! त्यांतील एक उत्तम कायदा म्हणजे समान नागरी कायदा ! त्यांनी या कायद्याची अंमलबजावणीही कडकपणेच केली असेल. त्यामुळेच कालांतराने सर्वांना त्याची सवय झाली आणि आजतागायत हा कायदा पाळला जात आहे. ! ‘पोर्तुगीज सिव्हिल कोड १८५६’ आणि त्याविषयीचे हुकूम आणि वटहुकूम एकत्रितपणे समजणे, म्हणजे पर्वत सर करण्यासारखेच आहे. गोव्यातील नामांकित ज्येष्ठ विधीज्ञ अधिवक्ता मनोहर उसगांवकर यांनी पोर्तुगीज भाषेतील कायद्याचे इंग्रजी भाषांतर करून पुढील मार्ग सुकर केला आहे.

प्रथमोपचार प्रशिक्षण : भावी आपत्काळाची आवश्यकता !

सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात आजपासून 
चालू होणार्‍या प्रथमोपचार प्रशिक्षण शिबिराच्या निमित्ताने...
    सर्वसाधारणपणे ‘प्रथमोपचार’ म्हणजे रुग्णाला वैद्यकीय उपचार मिळेपर्यंत त्याच्यावर केले जाणारे प्राथमिक उपचार होत ! सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन हृदयविकारासारख्या काही गंभीर आजारांचे प्रमाण वाढते असणे, आधुनिक यंत्रांच्या वापराने अपघातांत वाढ होत असणे आदी कारणांसह भावी तिसरे महायुद्ध, नैसर्गिक आपत्ती आदींचाही विचार करता समाज आणि राष्ट्र यांच्याप्रतीचे कर्तव्य म्हणून ‘प्रथमोपचार प्रशिक्षण’ प्रत्येक सुजाण नागरिकाने घेऊन प्रथोमपचारक होणे आवश्यक झाले आहे.

मोहनदास गांधी, नेहरू आणि इंदिरा गांधी यांना सावरकर देशभक्त वाटणे; पण सत्तापिपासू काँग्रेसींना न वाटणे, हा विनोद !

     ‘काही मासांपूर्वी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकसभेत सरकारवर टीका करतांना ‘आमचे गांधी आणि तुमचे सावरकर’, असा उल्लेख केला. पुढे त्यांच्या पक्षातील लोकांनी सावरकरांना गद्दारही ठरवले ! काय दुर्दैव आहे पहा ! ज्यांच्या पायाच्या नखाचीही थोरवी या तथाकथित पुढार्‍यांहून किती पटीने अधिक आहे, त्यांनी सावरकरांना गद्दार ठरवावे ?
    स्वतः गांधीजींनी कस्तुरबांसह स्वातंत्र्यवीर सावरकर रत्नागिरीत स्थानबद्ध असतांना, ते ज्या पटवर्धनांच्या घरी रहात असत,

प्रदूषणावरील ठोस उपाय - अग्निहोत्र !

     गेल्या काही दिवसांपासून वाढत्या प्रदूषणामुळे दिल्लीकर हैराण झाले आहेत. प्रदूषणाच्या पातळीने उच्चांक गाठल्याने तेथील आरोग्यमंत्र्यांनी वाहने रस्त्यावर आणण्यासाठी ‘सम-विषम’ संकल्पना पुन्हा लागू करण्याचे ठरवले. ‘सफर इंडिया’ (सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी अ‍ॅण्ड वेदर फोरकास्टिंग रिसर्च) या संस्थेने दिलेल्या अहवालानुसार गेल्या ५ वर्षांतील सर्वात जास्त प्रदूषण यंदाच्या वर्षी झाले आहे. तेथील प्रदूषणाने परिसीमा गाठल्यामुळे शाळा बंद ठेवाव्या लागल्या आणि शेवटचा पर्याय म्हणून लोकांनी घराबाहेर पडू नये, अशी सूचनाही देण्यात आली होती. प्रदूषणाची समस्या इतकी गंभीर होईपर्यंत शासनाने वेळेवर उपाययोजना का काढली नाही, हा प्रश्‍नही तितकाच गंभीर आहे. राजधानी देहलीमध्ये प्रदूषण इतके आहे, तसेच ते भारतातील इतर ठिकाणीही आहे.

गोव्यातील चर्चसंस्थांना आयकरने पाठवलेल्या नोटिसीवरून ख्रिस्त्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप करणार्‍यांचा दैनिक लोकमतच्या संपादकीय लेखातून समाचार !

चर्चसंस्थांना नोटीस पाठवली; म्हणून ‘मंदिरांनाही ती पाठवा’, असे म्हणणे हा पोरकटपणा !
     हिंदु देवस्थाने आयकर खात्याच्या कक्षेत येत आहेत; मात्र गोव्यातील चर्चसंस्थांना आयकर खात्याने पाठवलेल्या नोटिसीचे निमित्त करून हिंदु मंदिरांना आयकर लागू नाही, असा खोटा प्रचार केला जात आहे. यासंदर्भातील वृत्त २९ नोव्हेंबर या दिवशी प्रसिद्ध करून दैनिक लोकमतच्या संपादकीय लेखातून असा खोटा प्रचार करणार्‍यांचा समाचार घेण्यात आला आहे.
मंदिरे महाजनी कायद्याखाली नोंदणीकृत 
     रामनाथ देवस्थानशी संबंधित असलेले मडगावातील लेखातपासनीस कृष्णा आंगले म्हणाले, ‘‘एकूण उत्पन्नापैकी ८५ टक्के उत्पन्नाचा वापर केला नाही, तर वरील रक्कम करपात्र ठरते. महाजनी कायद्याखाली नोंदणीकृत झालेले देवस्थान खासगी ट्रस्टच्या व्याख्येअंतर्गत येते. या देवस्थानांना हिशोब आणि अंदाजपत्रक तालुक्याच्या मामलेदारांना सादर करावे लागते. अधिकृत लेखापालांकडून हा हिशोब बनवावा लागतो आणि देवस्थानांना इतरांप्रमाणे रिटर्न्सही फाईल करावे लागतात.’’ रिवण येथील विमलेश्‍वर देवस्थानचे माजी अध्यक्ष आणि मडगावातील प्रसिद्ध सीए पांडुरंग प्रभुदेसाई म्हणाले, ‘‘आर्टीफिशिअल ज्युरिडिक्शन पर्सन या व्याख्येखाली देवही येतात. यामुळे देवस्थानांना इतरांप्रमाणेच करप्रणाली लागते.’’ मडगाव येथील आणखी एक नामांकित लेखा तपासनीस नागेश हेगडे आणि विधिज्ञ क्लिओफात आल्मेदा कुतिन्हो यांनीही याला दुजोरा दिला. ‘दामोदर देवस्थान प्रत्येक वर्षी रिटर्न्स फाईल करते आणि करपात्र उत्पन्नावर करही भरते’, असे जांबावलीच्या श्री रामनाथ दामोदर देवस्थानचे अध्यक्ष प्रकाश कुंदे यांनी सांगितले.

भारतीय ऋषींना सहस्रो वर्षांपूर्वी समजलेले पाण्याचे महत्त्व जपानी शास्त्रज्ञांना आता उकलणे, हा विज्ञानाचा थिटेपणा !

     ‘सहस्रो वर्षांपूर्वी हिंदूंच्या धर्मग्रंथांत सांगितलेल्या जलविषयक सूत्राला पूरक असे संशोधन जपानच्या शास्त्रज्ञांनी आता केले आहे. त्यानुसार ‘समाजाच्या एखाद्या क्रियेला जल प्रतिसाद देऊ शकते आणि स्वतःची पसंती दर्शवू शकते’, हे त्यांनी सप्रमाण सिद्ध केले आहे. या संशोधनामुळे, ‘जल हे सजिवांची निर्मिती करणारे मूळ रसायन आहे’, हा भारतीय ऋषींनी अनंत कालापूर्वी मांडलेला सिद्धांत आणि ‘जल अशुद्ध अथवा अपवित्र करू नये’, असे सांगून वेद, उपनिषदे, स्मृती, पुराणे आदी ग्रंथांतून झालेले प्रबोधन, यांना आता वैज्ञानिकदृष्ट्या प्रमाण मिळाले आहे.’ - डॉ. रा.श्री. मोरवंचीकर, निवृत्त प्राध्यापक (इतिहास), आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, संभाजीनगर (औरंगाबाद). (‘मासिक धर्मभास्कर’, सप्टेंबर २००७)

शिकण्याची तळमळ असल्याने अनेक कला आत्मसात करणार्‍या आणि साधनेच्या बळावर प्रतिकूल परिस्थितीला आनंदाने सामोर्‍या जाणार्‍या ठाणे येथील श्रीमती सुधा मधुसूदन पाळंदे (वय ७८ वर्षे) !

        पितांबरी उद्योगसमूहाचे संचालक श्री. रवींद्र प्रभुदेसाई यांच्या पत्नी सौ. वृषाली यांना त्यांच्या आई श्रीमती सुधा मधुसूदन पाळंदे (वय ७८ वर्षे) यांच्याविषयी जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे देत आहोत.
१. शिक्षणाची आवड 
१ अ. प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेणे : माझ्या आईला शिक्षणाची पुष्कळ आवड होती; पण त्या काळात मुलींनी शिकून काय उपयोग ? असा दृष्टीकोन असल्याने आजीने आईचेे ७ वी पर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर तिला पुढे शिकू दिले नाही. नंतर आईने विद्यालयात न जाता घरीच अकरावीचा अभ्यास करून परीक्षा दिली आणि त्यात उत्तीर्णही झाली. 
१ आ. जनसेवा करता येण्यासाठी नर्सिंगचे प्रशिक्षण घेणे : अकरावीनंतर तिला शिक्षिकेची नोकरी मिळाली असती; पण तिला जनसेवा करणे महत्त्वाचे वाटले. त्यामुळे ती नागपूरला नर्सिंगचे प्रशिक्षण घेण्यासाठी गेली. प्रशिक्षण घेतांना तिने समाजसेवेचा डिप्लोमाही केला. त्या अंतर्गत तिने एक गाव निवडले होते. त्या गावातील लोकांच्या घरी जाऊन त्यांच्या सर्व समस्या लिहून घ्यायच्या आणि त्यावर एक प्रबंध लिहून तो सरकारला द्यावा लागायचा. यात ती उत्तीर्ण झाली. 
‘लोक जागे होण्यासाठी लोकांचे सर्व प्रश्‍नांवर लोकजागर केले पाहिजे.’ (‘लोकजागर’, १९.८.२०११)

भारतातील अल्पसंख्यांकवाद !

    ‘भारतात पाकिस्तानी कलाकार हवेतच कशाला ? भारतीय समाजात भेदभाव निर्माण करण्यासाठी अल्पसंख्यांकवादाची निर्मिती झाली; परंतु अल्पसंख्यांकवादामुळेच मुसलमान समाजाच्या प्रगतीत अडथळे येत आहेत. त्यामुळे मुसलमान समाज जर अल्पसंख्यांकवादाच्या मानसिकतेतून बाहेर पडला, तरच या समाजाची प्रगती होऊ शकते.’ - तुफेल अहमद, ज्येष्ठ पत्रकार आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अभ्यासक 

आपण भारतात जन्मलो, या संस्कृतीत वाढलो, याचा प्रत्येक भारतियाला अभिमान असला पाहिजे !

     ‘जगाला पहिली भाषा, अर्थव्यवस्था, न्यायव्यवस्था, शिक्षणव्यवस्था, गणित, संस्कृती, आरोग्यशास्त्र आणि सर्वच भारताने शिकवले. आपली संस्कृती एवढी प्राचीन असतांना आपण मात्र सध्या इतर देशांकडे पहातो. २०० वर्षांपूर्वी ‘अ‍ॅलोपथी’ अस्तित्वात नव्हती, तेव्हा कोणते उपचार केले जात होते ? जग आपल्याकडे शिकायला येते. त्यामुळे आपण या देशात जन्मलो, या संस्कृतीत वाढलो, याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे.’ - योगऋषी रामदेवबाबा (२९.४.२०११)


परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...


सौ. वर्षा ठकार
गा मुकुंद कुणी हा पाहिला । ऐका मुकुंद मी तो पाहिला ॥
सांगा मुकुंद कुणी हा पाहिला । ऐका मुकुंद मी तो पाहिला ॥ धृ. ॥

हातात घेऊनी लेखणी । धर्म पोचवी जो घरोघरी ॥
साधना सांगूनी जो शहाणे करी । असा गिरिधर मी तो पाहिला ॥ १ ॥

सकळ जनाची घडवीत सेवा । सोडवितो जिवाचा ‘मी’पणा ।
असा मोहन मी तो पाहिला ॥ २ ॥

भावी आपत्काळात अन् नेहमीसाठीही उपयुक्त ठरणारी सनातनची ग्रंथमालिका : भावी आपत्काळातील संजीवनी !

     संत-महात्मे, ज्योतिषी आदींच्या सांगण्यानुसार आगामी काळ हा भीषण आपत्काळ असून या काळात समाजाला अनेक आपत्तींना तोंड द्यावे लागणार आहे. आपत्काळात दळणवळण तुटल्यामुळे रुग्णाला रुग्णालयात नेणे, डॉक्टर वा वैद्य यांच्याशी संपर्क साधणे आणि पेठेत (बाजारात) औषधे मिळणेही कठीण होते. आपत्काळात ओढवणार्‍या विकारांना (आजारांना) तोंड देेण्याच्या पूर्वसिद्धतेचा एक भाग म्हणून सनातन ‘भावी आपत्काळातील संजीवनी’ ही ग्रंथमालिका सिद्ध (तयार) करत आहे. या मालिकेतील १२ ग्रंथ आतापर्यंत प्रकाशित झाले आहेत. या ग्रंथांचा अभ्यास आतापासूनच केला, तर प्रत्यक्ष आपत्काळात विकारांना सामोरे जाण्यासाठी लागणारा आत्मविश्‍वास निर्माण होण्यास साहाय्य होईल. यासाठी हे सर्व ग्रंथ वाचकांनी अवश्य संग्रही ठेवावेत !
प्रथमोपचार प्रशिक्षण
भाग १ : रुग्ण तपासणी, गंभीर स्थितीतील रुग्णाचे जीवितरक्षण आणि मर्माघातादी विकारांवर प्रथमोपचार
भाग २ : रक्तस्राव, जखम, अस्थीभंग, स्नायूंच्या दुखापती आदींवर प्रथमोपचार
भाग ३ : गुदमरणे, भाजणे, विजेचा धक्का बसणे, प्राणीदंश, विषबाधा आदींवर प्रथमोपचार
     लहान-मोठा अपघात, भूकंप, पूर, बॉम्बस्फोट, युद्ध अशा आपत्ती कधी सांगून येत नाहीत. पाण्यात बुडाल्याने बेशुद्ध होणे, हृदयविकाराचा आकस्मिक झटका येणे अशा काही प्रसंगी तर वैद्यकीय साहाय्य मिळेपर्यंतचा कालावधी पुष्कळच महत्त्वाचा असतो. काही मिनिटांच्या या कालावधीत मिळालेल्या योग्य प्रथमोपचारामुळे रुग्ण मृत्यूच्या दारातून परत येऊ शकतोे. तसेच कापणे, भाजणे, हाड मोडणे, विजेचा धक्का बसणे, कुत्रा चावणे, सर्पदंश इत्यादी आपत्ती तर कौटुंबिक जीवनात केव्हाही उद्भवू शकतात. अशा विविध प्रसंगी वैद्यकीय साहाय्य मिळेपर्यंत रुग्णावर कोणते उपचार करावेत, याचे विवेचन १४० हून अधिक आकृत्यांच्या साहाय्याने करणारा ग्रंथ !
स्थानिक वितरकाचा संपर्क : ९३२२३१५३१७
सनातनची ग्रंथसंपदा आता SanatanShop.com वर उपलब्ध !

प.पू. पांडे महाराज यांचे अनमोल विचारधन !

प.पू. पांडे महाराज
काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर 
हे वाईट कि चांगले, ते त्यांच्या वापरावर अवलंबून आहे ! 
     ‘काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर हे सर्व देवाने साधना होण्यासाठी निर्माण केले आहेत. हे षड्रिपू नसून त्या शक्ती आहेत. ‘त्यांचा आपण कसा वापर करतो’, यावर ‘त्या वाईट कि चांगल्या आहेत’, हे अवलंबून आहे. गुणातीत होऊन त्यांचा उपयोग मायेतील सत्त्व-रज-तम गुणांना नियंत्रणात ठेवण्यासाठी करावा. ‘काम’ नसता, तर उत्पत्तीच झाली नसती. ‘क्रोध’ नसता, तर चुकांची जाणीव करून देता आली नसती. आई तिच्या अपत्यावर रागावली नाही, तर मुले घडणार नाहीत. येथे ‘क्रोध’ आवश्यक आहे; पण तेच आई जर स्वतः क्रोधात असेल, तर त्याचा वाईट परिणाम होईल. भक्ताच्या अवगुणांना सुधारण्यासाठी संतांनासुद्धा क्रोधाचा उपयोग करून त्याला त्याची जाणीव करून द्यावी लागते.’
- प.पू. परशराम पांडे महाराज 

शांत, समाधानी आणि आनंदी वृत्तीची ५५ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली, उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली शीव, मुंबई येथील चि. शर्वरी विकास सणस (वय २ वर्षे) !

उच्चलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र 
चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. शर्वरी सणस ही एक दैवी बालक आहे !
चि. शर्वरी सणस
पालकांनो, हे लक्षात घ्या ! 
     ‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ - (परात्पर गुरु) डॉ. आठवले 
     यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.

सगुणातील ईश्‍वराची अनुभूती देणारे एकमेवाद्वितीय संत प.पू. परशराम पांडे महाराज (वय ८९ वर्षे) !

प.पू. पांडे महाराज
‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी निर्माण केलेल्या या साधनेच्या विश्‍वातील एक उच्च विभूती म्हणजे प.पू. परशराम माधव पांडे महाराज (प.पू. बाबा) ! ३० नोव्हेंबर २०१६, म्हणजेच मार्गशीर्ष शुक्ल पक्ष प्रतिपदा या दिवशी त्यांनी ९० व्या वर्षात पदार्पण केले. त्यानिमित्ताने त्यांचे चरणी उतराई होण्यासाठी देवद आश्रमातील साधकांनी ही शब्द सुमनांजली अर्पण करण्याचा प्रयत्न केला आहे. हे लिखाण म्हणजे देवद आश्रमातील सर्व साधकांचे मनोगत आहे. त्यातील काही सूत्रे आपण ३० नोव्हेंबर आणि १ डिसेंबर या दिवशी पाहिली. आज त्यापुढील सूत्रे पाहूया.

संत आणि महर्षि यांच्या आशीर्वादामुळे अन् त्यांनी सांगितलेले विधी केल्यामुळे पुनर्जन्म प्राप्त झालेली ६६ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. दीपाली मतकर !

कु. दीपाली मतकर
१. आजारपणात झालेले त्रास आणि खालावत गेलेली स्थिती
१ अ. डोके दुखून ताप येणे आणि औषधोपचार केल्यावर ठीक होणे
     ‘१५.१०.२०१६ या दिवशीपासून माझे डोके दुखू लागले. रात्री त्याचे प्रमाण वाढायचे. त्यामुळे मला काहीच सुचत नव्हते. रात्री आयुर्वेदातील लेप लावला. त्यानंतर मी श्रीकृष्णाच्या चित्राकडे पहात नामजप केला. सकाळी मला थोडे बरे वाटले. दुपारी सोलापूरमधील वैद्यांनी मला गोळ्या आणि इंजेक्शन दिलेे. त्यामुळे ३ दिवस चांगले वाटले. ४ थ्या दिवशी बार्शीला गेल्यावर सत्संग चालू असतांनाच माझे डोके पुन्हा दुखू लागले आणि थोडा ताप आला. तेव्हा गोळी घेतल्यावर मला १ घंट्याने बरे वाटले.

धर्मरथांवर चालक-साधकांची तातडीने आवश्यकता !

सर्वत्रच्या साधकांना सेवेची सुवर्णसंधी ! 
       सनातनचे ग्रंथ म्हणजे समाजाला धर्मशिक्षण देणारे ज्ञानाचे अनमोल भांडारच ! मानवजातीसाठी ज्ञानामृत असलेल्या या ग्रंथांद्वारे समाजाला आचारधर्म, साधना, आदी नानाविध विषयांसंदर्भात दिशादर्शन केले जाते. या ग्रंथांना सर्वत्र मोठ्या प्रमाणावर मागणी येत आहे. 
       समाजापर्यंत शीघ्रतेेने पोहोचण्यासाठी सनातन संस्थेच्या वतीने ठिकठिकाणी धर्मरथाद्वारे ग्रंथप्रदर्शने लावली जात आहेत. या सेवेसाठी धर्मरथावर चालक-साधकांची आवश्यकता आहे. सेवेसाठी इच्छुक असलेल्या साधकांकडे लहान धर्मरथासाठी लाईट मोटर व्हेहिकल (LMV), दुसर्‍या लहान धर्मरथासाठी लाईट ट्रान्स्पोर्ट व्हेहिकल आणि तीन मोठ्या धर्मरथांसाठी हेव्ही ट्रान्स्पोर्ट व्हेहिकल असे परवाने असणे आवश्यक आहे. 

फलक प्रसिद्धीकरता

हिंदूंवर सातत्याने आगपाखड करणारे 
धर्मनिरपेक्षतावादी आता गप्प का ?
        राष्ट्रीय कंपनी कायदा लवाद या शासकीय संस्थेने प्रोटेस्टंट चर्चचे देशातील सर्वांत मोठे व्यवस्थापन चर्च ऑफ साऊथ इंडियाच्या संचालक मंडळावर भ्रष्टाचाराचे आरोप असल्याने ते विसर्जित केले आहे. या संस्थेचे ४० लक्ष सदस्य आहेत.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Church Of South Indiapar bhrashtacharka aarop; National Company Law Tribunal ne church mandalko barkhast kiya.
Hinduvirodhi Secularwadi ab chup kyu hai
जागो ! : चर्च ऑफ साउथ इंडिया पर भ्रष्टाचार का आरोप; नेशनल कंपनी लॉ टिब्यूनल ने चर्चमंडल को बरखास्त किया ।
हिन्दूविरोधी सेक्यूलरवादी अब चुप क्यों हैं ?

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
  • कुठे प्रत्येक क्षेत्रात सर्वोच्च स्तराचे ज्ञान देणारा हिंदु धर्म, तर कुठे बालवाडीप्रमाणे शिक्षण देणारे पाश्‍चात्त्य देश !
  • विज्ञान एकातरी क्षेत्रात धर्मशास्त्राच्या पुढे आहे का ?
       सर्वच क्षेत्रांत अशी स्थिती आहे. त्याचे एक उदाहरण येथे दिले आहे.
वास्तूशास्त्र 
(परिणाम, ज्योतिष, उपाय)
       वास्तूचे व्यक्तीवर रात्रंदिवस परिणाम होतात. हे ज्ञात नसल्यामुळे आधुनिक वास्तूशास्त्रज्ञ केवळ हवा, उजेड आणि दिसायला वास्तू कशी दिसेल, यांचाच विचार करतात. याउलट धर्मात वास्तू कशी असली की, तिच्यामुळे त्रास होणार नाही, उलट तिच्यामुळे साधना करण्यास पूरक वातावरण मिळेल, याचा विचार केलेला असतो. 
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
कर्माचे महत्त्व 
       कर्माविना तुम्हाला गती नाही; कारण कर्मालाच गती आहे. 
भावार्थ : दैनंदिन जीवनव्यापार असो, सुखप्राप्तीच्या साधनांचा शोध असो, दुःख टाळण्याचे उपाय असोत... सारी जगरहाटी, सारे विश्‍वचक्र कर्मामुळेच चालते. आध्यात्मिकदृष्ट्याही मनुष्याचा जन्म ही त्याच्यासाठी कर्मभूमीच आहे; कारण मनुष्य कर्म (साधना) करूनच ईश्‍वरप्राप्ती करून घेऊ शकतो. 
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

राष्ट्र आणि विश्‍व यांच्या उत्कर्षाकरिता समर्पित व्हा !

     ‘साड्या, सोफासेट, टी.व्ही., गाडी यातच गुदमरून एक दिवस जीवनयात्रा संपवायची नाही. समाज आणि धर्म यांचे काही कर्तव्य अन् ऋण आहे. प्रत्येकानेच ते बजावले पाहिजे. उपेक्षिले तर सर्वनाश अटळ आहे. धर्माकरिता समर्पित झाले पाहिजे. सर्वस्व वाहिले पाहिजे. त्यातच त्याचा, राष्ट्र आणि विश्‍व यांचाही उत्कर्ष आहे. कल्याण आहे आणि मुक्तीही ! धर्माकरिता बाजी लावण्याचा आजचा प्रसंग आहे. धर्माकरिता जीवन वेचण्याचा हा काळ आहे.’ - गुरुदेव डॉ. काटेस्वामीजीयोगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

मनाला साधना करण्याचे वळण लावा 
‘ऋतं वच्मि । सत्यं वच्मि ।’, म्हणजे ‘मी यथोचित असेच सांगत आहे; सत्य तेच 
सांगत आहे.’ स्पष्टीकरण : सत्य पालटू शकते, उदा. ‘देवदत्त तरुण आहे’, हे वाक्य आता 
सत्य असले, तरी देवदत्त वृद्ध झाल्यावर हे वाक्य असत्य ठरते; परंतु ऋत कधीही पालटत नाही, 
उदा. सूर्य पूर्व दिशेला उगवतो. ऋत म्हणजे न पालटणारे नैसर्गिक सत्य. म्हणजे सत्य आणि नित्य 
जे असेल, त्याची उपासना करण्याचे वळण मनाला लावावे, म्हणजे साधकांची उन्नती वेगाने होते.
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ । 
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥ 
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

‘लव्ह जिहाद’वर सरकार कधी जागे होणार ?

संपादकीय
     प्रेमाला कसलेही बंधन नसते, कोणीही कोणावर प्रेम करू शकतो, प्रेमाला जात, पंथ, धर्म यांच्या बंधनात बांधता येणार नाही, असे नेहमीच म्हटले जाते आणि ते सत्यही आहे; मात्र या व्यापक प्रेमभावाच्या नावाखाली काही जण जाणीवपूर्वक युद्धनीती वापरत असतील, तर अशा कथित प्रेमाला विरोध केला पाहिजे आणि त्या प्रेमाचा बुरखा फाडून त्यांचा खरा चेहरा उघड केला पाहिजे. यासाठी ते प्रेम कोणत्या स्वरूपाचे आहे आणि कोणत्या हेतूने ते करण्यात येत आहे, याचा शोध घेणे आवश्यक आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn