Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

परेच्छेने वागणे, अनुसंधानात रहाणे, प्रेमभाव आणि ईश्‍वरावर दृढ श्रद्धा अशा ईश्‍वरी गुणांमुळे तीव्र प्रारब्धावर सहजतेने मात करणार्‍या आणि ६२ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या कुंभारवाडा (उत्तर कन्नड) येथील महर्लोकवासी सावित्री कामत !

सावित्री कामत
     ‘माझी आई श्रीमती सावित्री कामत यांचे २१.११.२०१६ या दिवशी निधन झाले. मागील दीड वर्ष त्या फुफ्फुसाच्या कर्करोगाने आजारी होत्या. त्यांच्या बाराव्या दिवसाच्या निमित्ताने त्यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये देत आहोत.
१. आजाराविषयी कधी तक्रार नसणे
      जून २०१५ मध्ये आईच्या कर्करोगाचे निदान झाले होते. त्यानंतर आतापर्यंत तिच्यावर आयुर्वेदिक आणि अ‍ॅलोपेथी असे उपचार करण्यात आले. त्या कालावधीत वेगवेगळ्या चाचण्या कराव्या लागल्या. आयुर्वेदाअंतर्गत कडू काढे घेणे, पथ्यानुसार आहार घेणे, असे सतत करावे लागले; पण तिने कधीही आजाराविषयी तक्रार केली नाही. शेवटचा १ मास (महिना) सोडल्यास ‘तिला कर्करोग झाला आहे’, असे कुणाला वाटायचेही नाही. शेवटी शेवटी तिला असह्य वेदना व्हायच्या. त्याचाही तिने कधी त्रागा केला नाही किंवा कुणाला दूषणे दिली नाहीत.

नागरोटा येथील आक्रमण महंमद अफझल याच्या फाशीचा सूड घेण्यासाठी !

सूड कसा धगधगत 
ठेवायचा, हे पाककडून शिका !
       श्रीनगर - जम्मूच्या नागरोटा येथील आतंकवादी आक्रमणात ठार झालेल्या ३ आतंकवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आणि स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. तसेच त्यांच्याकडे उर्दू भाषेत लिहिलेल्या आतंकवादी महंमद अफझल याचे नाव असलेल्या चिठ्ठ्याही सापडल्या आहेत. यात अफझल गुरु शहीद के इंतकाम की एक किस्त...गजवा-ए-हिंद के फिदयीन, असे लिहिले होते. संसदेवरील आक्रमणाचा मुख्य सूत्रधार असणार्‍या अफझल याला फाशी देण्यात आली होती. त्यामुळे हे आक्रमण त्यासाठी झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तसेच या आतंकवाद्यांकडून काही घातक रसायनेही जप्त करण्यात आली आहेत. अशीच रसायने उरी येथील आक्रमणात सहभागी झालेल्या आतंकवाद्यांकडूनही हस्तगत करण्यात आली होती. यावरून हे आतंकवादी रासायनिक आक्रमणाच्या सिद्धतेत होते का, असा संशयही व्यक्त होत आहे. हे आतंकवादी जैश-ए-महंमदशी संबंधित असण्याची शक्यता आहे. या आतंकवाद्यांना पाकमधून आदेश मिळत होते. सुरक्षायंत्रणांनी आतंकवाद्यांनी पाकमध्ये असलेल्या प्रमुखांशी ५ वेळा केलेल्या संभाषणाचा शोध घेतला आहे. यात पाकमधून त्यांना आक्रमणासाठी सिद्ध रहाण्याच्या सूचना मिळत होत्या.

(म्हणे) भारतातील ३३ कोटी देवता भंगारासमान !

शरद यादव असे वक्तव्य अन्य 
धर्मियांविषयी करू धजावतील का ?
       पुणे, ३० नोव्हेंबर (वार्ता.) - भारतात एवढ्या देवी-देवता आहेत, की त्या मोजताही येत नाहीत. काही लोकांनी देवतांनाही जाती-जातींमध्ये विभागले आहे. भारतातील ३३ कोटी देवता भंंगारासारख्या फेकून देण्यायोग्य आहेत, असे हिंदुद्वेषी वक्तव्य जनता दल (संयुक्त)चे राष्ट्रीय अध्यक्ष शरद यादव यांनी केले. (हिंदूंच्या धर्मभावना जाणीवपूर्वक दुखावणारे शरद यादव यांच्यासारख्यांचे हिंदुद्वेषाचे जाहीर उमाळे रोखायचे असतील, तर हिंदूंचे प्रभावी आणि कृतीशील संघटन आवश्यक ! - संपादक) अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने २८ नोव्हेंबर या दिवशी जनता दल (संयुक्त)चे राष्ट्रीय अध्यक्ष शरद यादव यांना महात्मा फुले समता पुरस्कार देण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. महाराष्ट्र विधानभवनाचे सभापती रामराजे निंबाळकर यांच्या हस्ते यादव यांना हा पुरस्कार देण्यात आला. या वेळी महाराष्ट्राचे जलसंपदामंत्री विजय शिवतारे, डॉ. बाबा आढाव, पंकज भुजबळ, आमदार कपिल पाटील, माजी आमदार दीप्ती चौधरी आदी उपस्थित होते.

चित्रपट चालू होण्यापूर्वी देशभरातील चित्रपटगृहांत राष्ट्रध्वजासह राष्ट्रगीत लावण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश !

        नवी देहली - देशभरातील सर्व चित्रपटगृहांमध्ये चित्रपट चालू होण्यापूर्वी राष्ट्रगीत लावण्यात यावे, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. केंद्र सरकारकडून लवकरच यासंबंधीच्या आदेशांची प्रत सर्व राज्यांना पाठवली जाणार आहे. आतापर्यंत केवळ महाराष्ट्रातच चित्रपट चालू होण्यापूर्वी चित्रपटगृहात राष्ट्रगीत वाजवणे बंधनकारक होते; मात्र आता संपूर्ण देशभरातील चित्रपटगृहांसाठी हा नियम लागू करण्यात आला आहे. चित्रपटाआधी राष्ट्रगीत पडद्यावरून सादर केले जात असतांना उभे राहावे कि नाही, याची निश्‍चित नियमावली नसल्यामुळे चित्रपटगृहात अनेकदा वादाचे प्रसंग उद्भवल्याचे समोर आले आहे; मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने याविषयीचे धोरण स्पष्ट केले आहे. 
न्यायालयाने दिलेले निर्देश 
१. राष्ट्रगीत चालू असतांना पडद्यावर राष्ट्रध्वजाचे छायाचित्रही दाखवावे.
२. राष्ट्रगीत चालू झाल्यावर चित्रपटगृहातील प्रत्येकाने राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ उभे राहिलेच पाहिजे. 

धर्म वाचवण्यासाठी प्रत्येक घरात धर्मशिक्षण दिले पाहिजे ! - अधिवक्त्या श्रीमती अपर्णा रामतीर्थकर

मार्गदर्शन करतांना श्रीमती अपर्णा रामतीर्थकर

      कोल्हापूर, ३० नोव्हेंबर (वार्ता.) - आज देशात हिंदूंच्या पावणे दोन लक्ष हिंदू मुली बेपत्ता आहेत. देश आणि धर्म धोक्यात आलेला आहे. दिवसभर आई-वडील कामात व्यस्त असल्याने मुलांकडे त्यांचे लक्ष नसते. लव्ह जिहाद हे हिंदूंची शक्ती अल्प करण्याचे षड्यंत्र आहे. एकही हिंदु मुलगी लव्ह जिहादाला बळी पडणार नाही, धर्मांतरण करणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. आज हिंदु धर्म, मंदिर आणि हिंदु मुली सुरक्षित नाहीत. हिंदु धर्मात जन्म घेणार आणि हिंदु धर्मातच मरणार, या तत्त्वानुसार प्रत्येक हिंदूने तसे आचरण केले पाहिजे. धर्म वाचवण्यासाठी प्रत्येक घरात धर्मशिक्षण दिले पाहिजे. धर्मरक्षणासाठी प्रत्येक हिंदूला सज्ज रहायला हवे, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि अधिवक्त्या श्रीमती अपर्णा रामतीर्थकर यांनी केले. शिरोली (पु) येथे २८ नोव्हेंबर या दिवशी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीने अधिवक्ता श्रीमती अपर्णा रामतीर्थकर यांचे हिंदु धर्माची संस्कृती या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्या प्रसंगी त्या बोलत होत्या. 

सैनिकांच्या पत्नींच्या धाडसामुळे आतंकवाद्यांचा कट फसला !

भारतीय सैनिक देशासाठी शौर्याचे प्रदर्शन 
करतात, तर त्यांच्या पत्नी प्रसंगावधान सांभाळून 
स्वसंरक्षण करतात आणि देशाची हानी रोखतात !
       जम्मू - नागरोटा आक्रमणाच्या वेळी येथील सैनिकांच्या पत्नींनी दाखवलेल्या धाडसामुळे याहून होणारी मोठी हानी टळली गेली आणि आतंकवाद्यांचा कट फसला, अशी माहिती समोर आली आहे. 
       या छावणीमध्ये सैन्यातील अनेक वरिष्ठ अधिकार्‍यांची निवासस्थाने आहेत. येथील २ सैनिक रात्रपाळीस होते. त्या वेळी त्यांच्या पत्नी मुलांसह घरी होत्या. या वेळी आतंकवादी सैन्याधिकार्‍यांची निवासस्थाने असलेल्या एका इमारतीमध्ये शिरले. ही गोष्ट या सैनिकांच्या पत्नींच्या लक्षात आली. तेव्हा त्यांनी अजिबात न घाबरता आतंकवाद्यांना त्यांच्या इमारतीमध्ये प्रवेश करता येऊ नये, यासाठी घरातील सामान आणून प्रवेशद्वार बंद करून टाकले. यामुळे आतंकवादी या इमारतीत घुसू शकले नाहीत आणि त्यांचा कट फसला. जर महिलांनी वेळीच हे धाडस दाखवले नसते, तर कदाचित् आतंकवाद्यांनी त्यांना ओलीस ठेवले असते, ज्यामुळे सैन्य आणि त्यांच्या कुटुंबांची मोठी हानी झाली असती, असे एका सैन्याधिकार्‍याने सांगितले.

सनातननिर्मित मनोविकारोंके लिए स्वसम्मोहन उपचार या हिंदी ग्रंथाचे शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तीकर यांच्या हस्ते प्रकाशन !

डावीकडून श्री. कार्तिक साळुंखे, श्री. अभय वर्तक,
श्री. गजानन कीर्तीकर आणि श्री. प्रसाद जोशी

      नवी देहली - शिवसेनेचे मुंबईतील खासदार श्री. गजानन कीर्तीकर यांच्या हस्ते सनातननिर्मित मनोविकारोंके लिए स्वसम्मोहन उपचार या हिंदी ग्रंथाचे त्यांच्या देहली येथील निवासस्थानी प्रकाशन करण्यात आले. या वेळी त्यांचे स्वीय साहाय्यक आणि मुंबई महानगरपालिकेतील निवृत्त अधिकारी श्री. प्रसाद जोशी, सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक अणि हिंदु जनजागृती समितीचे देहली समन्वयक श्री. कार्तिक साळुंखे उपस्थित होते. श्री. गजानन कीर्तिकर म्हणाले, हा ग्रंथ अधिकाधिक लोकांपर्यंत पोचावा आणि सर्व मनोविकारग्रस्तांनी हा ग्रंथ वाचून उपाय करावेत. 

प्रत्येक आईने तिच्या मुलांना धर्मशिक्षण दिले पाहिजे ! - अरविंद थलावर, धर्माभिमानी

डावीकडून दीपप्रज्वलन करतांना 
श्री. अरविंद थलावर, श्री. पुंडलिक पै, 
कु. नागमणी आचार आणि सौ. संगिता जानू
     थोरांगलु (बल्लारी, कर्नाटक) - हिंदुस्थानचा आत्मा धर्म आहे. आपल्या मुलांना शाळांमध्ये कसे शिक्षण मिळत आहे, याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर त्यांच्या आईने धर्म आणि राष्ट्र यांचे संस्कार केले. त्यामुळे त्यांनी हिंदवी राष्ट्र स्थापन केले. यातून प्रेरणा घेऊन प्रत्येक आईने तिच्या मुलांना धर्मशिक्षण शिकवणे आणि त्यांना मंदिरांमध्ये पाठवणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन धर्माभिमानी श्री. अरविंद थलावर यांनी केले. 
     हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील मदारी हिरिया प्राथामिक शाळेच्या पटांगणात २७ नोव्हेंबर या दिवशी हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेला समितीचे श्री. पुंडलिक पै, सनातन संस्थेच्या कु. नागमणी आचार्य, रणरागिणी शाखेच्या कु. संगीता जानू यांनी संबोधित केले. या सभेला ७२५ हून अधिक धर्माभिमानी उपस्थित होते.

जनधन खात्यातून महिन्याला केवळ १० सहस्र रुपयेच काढता येणार !

      नवी देहली - नोटाबंदीच्या निर्णयानंतर पंतप्रधान जनधन योजनेच्या अंतर्गत उघडण्यात आलेल्या खात्यांमध्ये आतापर्यंत ६५ सहस्र कोटी रुपये जमा झाले आहेत. यामुळे रिझर्व्ह बँकेने संबंधित जनधन खातेधारकांना महिन्याला त्यांच्या खात्यातून केवळ १० सहस्र रुपयेच काढण्याची अनुमती दिली आहे. नोटाबंदीच्या निर्णयानंतर ज्या जनधन खात्यांमध्ये ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या नोटांद्वारे रक्कम जमा करण्यात आली आहे, त्याच खात्यांसाठी हा नियम लागू असेल. त्यातही कागदपत्रांची पूर्तता केलेल्या ग्राहकांनाच जनधन खात्यातून ही रक्कम काढता येणार आहे. खातेधारकाला त्यापेक्षा अधिक रक्कम काढायची असल्यास त्याची निकड बघूनच त्याला अतिरिक्त रक्कम काढून दिली जाईल, असे रिझर्व्ह बँकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. जनधन योजनेअंतर्गत उत्तरप्रदेशमधील खात्यामध्ये सर्वाधिक १० सहस्र ६७० कोटी रुपये जमा झाले आहेत. 

पद्मनाभस्वामी मंदिरात प्रवेश करणार्‍या महिला भाविकांना पोशाखामध्ये व्यवस्थापनाकडून सूट !

  • मंदिरात प्रवेश करण्याची प्राचीन परंपरा असतांना त्यात पालट करण्याचा अधिकार मंदिर व्यवस्थापन समितीने कशाच्या आधारे घेतला, हे त्यांनी हिंदु भाविकांना सांगितले पाहिजे !
  • मंदिर व्यवस्थापनाच्या निर्णयाच्या विरोधात हिंदुत्वनिष्ठ संघटनांची निदर्शने !
       थिरूवनंतपुरम् - थिरूवनंतपुरम् येथील पद्मनाभस्वामी मंदिरात प्रवेश करणार्‍या महिलांना साडी ऐवजी सलवार-कमीज आणि चूडीदार असा पोशाख घालण्याची अनुमती मंदिर व्यवस्थापनाने ३० नोव्हेंबरपासून दिली. या निर्णयाला हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी विरोध केला आहे. या निर्णयाच्या विरोधात ३० नोव्हेंबरला मंदिरासमोर काही हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी निदर्शने केली. 
१. आतापर्यंत भाविक महिलांनी सलवार आणि चूडीदार घातल्यास त्यांना मंदिरात जाण्यापूर्वी मुंडू (धोतर) नेसावे लागत होते. 
२. मंदिराचे मुख्य कार्यकारी अधिकारी के.एन्. सतीश यांनी सलवार-कमीज आणि चूडीदार अशा पोषाखात असलेल्या महिलांना मंदिरात जाऊन दर्शन घेता येणार आहे, असा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले. 

गोपालन करा आणि सरकारी लाभ मिळवा ! - मनोहरलाल खट्टर, मुख्यमंत्री, हरियाणा

    अकबरपूर (नुह, हरियाणा) - जेे कोणी गोवंशाचे पालन करून दुग्ध व्यवसाय, तसेच घरी गायी पाळू इच्छितात त्यांंच्यासाठी सरकारने अनेक योजना आखलेल्या आहेत. या योजनांचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी केले. अकबरपूर येथे नव्यानेच उभारण्यात आलेल्या कामधेनु आरोग्य संस्थानया संस्थेचे उद्घाटन करतांना ते बोलत होते.
     गोपालनासाठी लोकांना उद्युक्त करतांना मुख्यमंत्री खट्टर म्हणाले, हरियाणा हे प्रथम राज्य आहे, जेथे गोहत्या प्रतिबंधक कायदा लागू करण्यात आलेला आहे. कामधेनु आरोग्य संस्थान या संस्थेत गायींना आश्रय मिळेल, तसेच त्यांच्यासाठी हे आरोग्यकेंद्रही आहे. येथे उपलब्ध होणारे गोमय तथा गोमूत्र यांचा उपयोग करून औषधे आणि कीटकनाशके बनवण्यात येणार आहेत. सरकारने आपल्या परीने येथील निवासी लोकांना गायी पाळण्यासाठी आणि गायींच्या कल्याणासाठी पावले उचलली आहेत. हरियाणामध्ये गायींच्या आश्रयाची एकूण ४३२ ठिकाणे आहेत. गायीकडे केवळ उपजीविकेचे साधन म्हणून न पाहता त्यांनी गायीचे महत्त्व जाणून घेऊन तिच्यापासून मिळणारे उत्पादनही लक्षात घ्यावे, असेही मुख्यमंत्री खट्टर म्हणाले.

सनातनच्या उपक्रमात सक्रियपणे सहभागी होणार ! - सौ. सिद्धी पवार, नवनिर्वाचित नगरसेविका

सौ. सिद्धी पवार (उजवीकडून
तिसर्‍या) यांना दैनिक सनातन प्रभात देतांना 

श्री. विजयकुमार काटवटे (उजवीकडून
पाचवे) यांना दैनिक सनातन प्रभात देतांना 

        सातारा, ३० नोव्हेंबर (वार्ता.) - सनातनमुळे समाज जागृत होत असून योग्य-अयोग्य यांची जाणीव निर्माण होऊ लागली आहे. व्यापक समाजहिताच्या दृष्टीकोनातून सनातन राबवत असलेल्या उपक्रमात सक्रियपणे सहभागी होणार आहे, असे आश्‍वासन सनातनच्या हितचिंतक आणि भाजपच्या सातारा नगरपालिकेतील नवनिर्वाचित नगरसेविका सौ. सिद्धी पवार यांनी दिले. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सौ. पवार यांच्या निवासस्थानी दैनिक सनातन प्रभातचा अंक आणि लघुग्रंथ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. तेव्हा त्या बोलत होत्या. 
        सौ. पवार पुढे म्हणाल्या की, गणेशमूर्ती विसर्जन, वीज, रस्ते, पाणी, प्राथमिक आरोग्य या आणि अन्य समस्यांविषयी नगरपालिकेला जनतेच्या रोषालाच सामोरे जावे लागले आहे. आता यामध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी आपणा सर्वांच्या साहाय्यानेच योग्य ती पावले उचलणार आहेत.

नेहरूंनीच प्राथमिक शिक्षणाचे वाटोळे केले ! - अमर्त्य सेन

नेहरूंच्या या कुकर्माविषयी काँग्रेसी इतक्या 
वर्षांपासून मूग गिळून गप्प बसले आहेत, हे लक्षात घ्या !
     देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन देशात बाल दिन म्हणून साजरा केला जातो; पण राष्ट्राचेे भावी आधारस्तंभ असलेल्या तमाम बालकांच्या प्राथमिक शिक्षणाचे वाटोळे नेहरूंनीच केले, हे सत्य नेहरूप्रेमी असलेले नोबेलचे मानकरी अमर्त्य सेन यांनी परखडपणे मांडले. नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ एज्युकेशनल प्लॅनिंग अ‍ॅण्ड अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (शैक्षणिक नियोजन आणि व्यवस्थापनाचे राष्ट्रीय विश्‍वविद्यालय) अर्थात् एन्यूईपीएच्या पदवीदान सोहळ्यात त्यांनी हे विधान केले.
    सेन पुढे म्हणाले, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही वर्षानुवर्षे प्राथमिक शिक्षण सरकारकडून दुर्लक्षितच राहिले. आधुनिकतेचा वसा घेतलेले जवाहरलाल नेहरू यांनीही पंतप्रधानपदाची सूत्रे घेतल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाचा पाया रचणार्‍या प्राथमिक शिक्षणाला प्राधान्य दिले नाही. त्यामुळेच देशात प्राथमिक शिक्षण क्षेत्र नेहमीच मागास राहिले. नेहरूंसारख्या नेत्याने देशाचे भावी नागरिक घडवणार्‍या प्राथमिक शिक्षणाकडे गांभीर्याने पहायला हवे होते; पण तसे घडले नाही. त्यामुळेच गेली अनेक वर्षे देशातील निरक्षरांची संख्या वाढतच गेली.
(संदर्भ : दैनिक सामना, ७ जुलै २०११)

राजस्थानमध्ये देवळातील देवतांच्या नावाने शिधा खाणार्‍या पुजार्‍याची लबाडी उघड !

धर्मशिक्षण नसल्यामुळेच देवासाठी त्याग करण्यापेक्षा 
त्यांच्या नावाने शिधा (रेशन) लाटण्याचे धाडस असे पुजारी करतात !
      जयपूर (राजस्थान) - देवळातील देवतांच्या नावाने बनावट शिधापत्रिका सिद्ध करून स्वस्त दरातील साहित्य स्वत: लाटणार्‍या काजीखेर गावातील बाबुलाल या ७० वर्षांच्या पुजार्‍याची लबाडी उघड झाली आहे. त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला नाही; मात्र त्याची शिधापत्रिका जप्त करण्यात आली आहे. 
     बरान जिल्ह्याचे पुरवठा अधिकारी शंकरलाल मीना यांनी सांगितले,बाबुलाल याने मागील वर्षी बनावट शिधापत्रिका सिद्ध करून घेतले होती. त्यावर कुटुंबातील व्यक्ती म्हणून मनोहरलाल (भगवान श्रीकृष्ण), ठाकुरानी (राधा) आणि श्रीगणेश अशी नावे घालण्यात आली होती. संशयावरून तपास केला असता पत्रिकेवरील नावे बाबुलाल ज्या देवळाचा पुजारी आहे, तेथील देवतांची असल्याचे उघड झाले.

जगप्रसिद्ध पर्सन ऑफ द इयर या पुरस्काराच्या शर्यतीत पंतप्रधान मोदी सर्वांत पुढे !

    नवी देहली - अमेरिकेतील प्रसिद्ध मासिक टाइमतर्फे प्रतिवर्षी देण्यात येणार्‍या पर्सन ऑफ द इयर या पुरस्काराच्या शर्यतीत असणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आतापर्यंत एकूण मतदानापैकी २१ टक्के मते घेऊन सर्वांच्या पुढे आहेत. जगाला प्रभावित करणार्‍या अथवा माध्यमांमध्ये प्रभाव निर्माण करणार्‍या व्यक्तीला या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
    मागील वर्षी जर्मनीच्या पंतप्रधान चॅन्सलर अँजेला मर्केल यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले होते. या वर्षी ३० व्यक्ती या पुरस्कारासाठी दावेदार आहेत. त्यात खेळाडू आणि पॉप गायक यांचाही समावेश आहे. या पुरस्कारासाठी घेण्यात येणार्‍या ऑनलाइन मतदानात पंतप्रधान मोदी यांनी विविध क्षेत्रांतील दिग्गजांना मागे टाकले आहे. सध्या पंतप्रधान मोदी यांच्या जवळपासही कुणी पोचलेले नाही. विशेष म्हणजे दुसर्‍या स्थानी विकिलिक्सचे वादग्रस्त संस्थापक ज्युलियन असांजे आहेत. त्यांना ८ टक्के मते मिळाली आहेत.

तेलंगण येथे हिंदु धर्मावरील आघातांच्या विरोधात मुख्य धर्माचार्यांकडून हिंदु धर्माचार्य प्रतिष्ठानची स्थापना

धर्मरक्षणार्थ हिंदु संतांना कृतीप्रवण व्हावे लागते, हे हिंदूंसाठी लज्जास्पद ! 
हिंदु धर्माचार्य प्रतिष्ठानविषयी माहिती
देतांना श्री श्री श्री परिपूर्णानंद स्वामीजी
     भाग्यनगर (हैद्राबाद) - हिंदु धर्मावर होत असलेल्या आघातांचा सामना करणे आणि धर्माची होणारी हानी रोखणे यांसाठी विशिष्ताद्वैत संप्रदायचे श्री श्री श्री चिन्ना त्रिदंडी श्रीमंनारायना जीयर स्वामीजी, श्रीपीठं काकीनाडा, भारत टुडे वाहिनीचे मुख्य श्री श्री श्री परिपूर्णानंद स्वामीजी आणि मंत्रालयम्, आंध्रप्रदेश येथील श्री सुबुधेन्द्र स्वामीजी यांनी संयुक्तपणे हिंदु धर्माचार्य प्रतिष्ठान या संस्थेची नुकतीच स्थापना केली. 
    या निमित्ताने स्थनिक ज्युबली हिल्स या भागात हिंदु धर्माच्या क्षेत्रात कार्यरत संघटनांची एक बैठक घेण्यात आली. या बैठकीत या संस्थेचे धोरण आणि स्वरूप स्पष्ट करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सौ. विनुता शेट्टी आणि सौ. तेजस्वी वेंकटापूर, तसेच विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

आयएएस् अधिकारी टिना डाबी आणि अतहर आमिर यांचा विवाह म्हणजे लव्ह जिहाद ! - श्री. मुन्नाकुमार शर्मा, राष्ट्रीय महासचिव, हिंदु महासभा

आता कथित निधर्मीवाद्यांनी श्री. शर्मा यांना असहिष्णु संबोधल्यास आश्‍चर्य ते काय ?
विवाह थांबवण्यासाठी शर्मा यांचे टिना यांच्या वडिलांना पत्र
      लक्ष्मणपुरी (लखनौ) - भारतीय प्रशासकीय सेवेतील उच्च श्रेणी प्राप्त टिना डाबी आणि द्वितीय श्रेणी प्राप्त सनदी अधिकारी अतहर आमिर यांनी घेतलेला विवाहाचा निर्णय दु:खद असून हा लव्ह जिहाद आहे. त्यामुळे हा विवाह थांबवण्यात यावा, असा सल्ला हिंदु महासभेचे राष्ट्रीय महासचिव श्री. मुन्नाकुमार शर्मा यांनी टिना डाबी यांचे वडील जसवंत डाबी यांना पत्र लिहून दिला. 
    या पत्रात श्री. शर्मा म्हणाले, डाबी कुटुंबाने त्यांच्या मुलीचा विवाह विचारपूर्वक करावा. अतहरशी लग्न करायचेच असेल, तर त्याची आधी घरवापसी (हिंदु धर्मात प्रवेश) करावी. त्याच्या शुद्धीकरणाच्या कार्यात हिंदु महासभा संपूर्ण सहकार्य करील. या पत्रात मुन्ना शर्मा म्हणाले की, लव्ह जिहादचे षड्यंत्र चालू आहे. मुसलमान युवक हिंदु मुलींना प्रेमाच्या जाळ्यात फसवून त्यांच्याशी विवाह करत आहेत आणि त्यांचे धर्मांतर करत आहेत. हे थांबणे आवश्यक आहे.

चेन्नई येथे हिंदु जनजागृती समितीकडून ताणतणाव या विषयावर व्याख्यान

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
करतांना सौ. सुगंधी जयकुमार
    चेन्नई (तमिळनाडू) - अण्णानगरमधील वाळियम्मल उच्च माध्यमिक शाळेमध्ये २५ नोव्हेंबरला हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ताणतणाव या विषयावर व्याख्यान घेण्यात आले. इयत्ता बारावीच्या सुमारे १३० विद्यार्थ्यांनी आणि दहावीच्या ८० विद्यार्थ्यांनी या व्याख्यानाचा लाभ घेतला. 
      समितीच्या वतीने सौ. सुगंधी जयकुमार आणि श्री. श्रीराम लुकतुके यांनी या वेळी मार्गदर्शन केले. या वेळी चर्चासत्रही आयोजित करण्यात आले होते. बर्‍याच विद्यार्थ्यांनी त्यांना वरचेवर ताणतणावाला सामोरे जावे लागत असल्याचे सांगितले; मात्र त्यावर कायमचा तोडगा कसा काढायचा, याविषयी अनभिज्ञ असल्याचे त्यांनी सांगितले. ताणविरहीत जीवन जगण्याच्या दृष्टीने दोष घालवणे आणि नीतीमूल्यांचे संवर्धन करणे किती महत्त्वाचे आहे, याविषयी विद्यार्थ्यांना संगणकीय प्रणालीद्वारे माहिती देण्यात आली. ही प्रक्रिया केवळ शालेय जीवनापुरतीच नव्हे, तर संपूर्ण जीवनभर महत्त्वाची असल्याचे सांगण्यात आले.

चौसा (बंगाल) येथील हिंदु जनजागृती समितीच्या ग्रामसभेत हिंदूंचा उत्स्फूर्त सहभाग !

ग्रामसभेत मार्गदर्शन करतांना श्री. चित्तरंजन सुराल,
शेजारी बसलेले मान्यवर आणि उपस्थित ग्रामस्थ
      दक्षिण २४ परगणा (बंगाल), ३० नोव्हेंबर (वार्ता.) - येथील डायमंड हार्बरच्या जवळील चौसा गावात २२ नोव्हेंबरला दुपारी ३ वाजता हिंदु जनजागृती समितीने ग्रामसभेचे आयोजन केले होते. या सभेला धर्म उत्थान समितीचे संस्थापक श्री. विकर्ण नस्कर, स्थानिक हिंदुत्वनिष्ठ श्री. प्रताप हाजरा, हिंदु जनजागृती समितीचे पूर्व आणि पूर्वोत्तर भारत समन्वयक श्री. चित्तरंजन सुराल यांच्यासहित काही मान्यवरांनी संबोधित केले. या सभेला १५० धर्माभिमानी ग्रामस्थ सहपरिवार उपस्थित होते.

(म्हणे) ख्रिस्त्यांवर अन्याय झाला असल्याने भाजपच्या ख्रिस्ती आमदारांनी त्यागपत्र द्यावे !

मिकी पाशेको यांचे ख्रिस्त्यांना धर्मांध आवाहन !
     मडगाव (गोवा) - आयकर खात्याने गोव्यातील चर्चसंस्थांना आर्थिक व्यवहाराची माहिती देण्यासाठी नोटीस पाठवली आहे. हा अल्पसंख्यांक ख्रिस्त्यांवर झालेला अन्याय आहे. या विरोधात सर्व ख्रिस्त्यांनी एकत्र येऊन आगामी निवडणुकीत सत्ताधारी पक्षाला जागा दाखवून द्यावी. भाजपमध्ये असलेल्या ख्रिस्ती आमदारांनी गप्प न रहाता त्यागपत्र द्यावे, अशी मागणी नुवेचे आमदार मिकी पाशेको यांनी मडगाव येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. (अशी नोटीस हिंदूंच्या देवस्थानांनाही पाठवण्यात आली असल्याने ती केवळ चर्चलाच पाठवण्यात आली असल्याचा खोटा प्रचार करून मिकी पाशेको गोव्यात धर्मांधता पसरवत आहेत. यासाठी त्यांच्यावर शासनाने कारवाई करायला हवी ! - संपादक)

अंनिसच्या भ्रष्टाचाराची सूत्रे हिवाळी अधिवेशनात घेऊ !

हिंदु जनजागृती समितीने दिलेल्या 
निवेदनावर भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांचे आश्‍वासन ! 

डावीकडून दीप्तेश पाटील, निवेदन
स्वीकारतांना आमदार नरेंद्र मेहता आणि कुंदन राऊ
     मुंबई, ३० नोव्हेंबर (वार्ता.) - अंनिसच्या भ्रष्टाचाराचे सूत्र आम्ही हिवाळी अधिवेशनामध्ये घेऊ, असे आश्‍वासन भाजपचे आमदार श्री. नरेंद्र मेहता यांनी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांना दिले. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या अंनिस या संस्थेच्या न्यासामध्ये कोट्यवधी रुपयांच्या देशी-विदेशी देणग्या घेऊन घोटाळा झाल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी घोटाळेबाज अंनिसवर तात्काळ प्रशासक नेमावा आणि दाभोलकर यांच्या खुनाशी त्यांच्या ट्रस्टमधील आर्थिक व्यवहार कारणीभूत आहेत का, याची कसून चौकशी व्हावी, यासाठी हिवाळी अधिवेशनात आवाज उठवावा, या विनंतीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आमदार श्री. नरेंद्र मेहता यांना देण्यात आले. त्या वेळी त्यांनी वरील आश्‍वासन दिले. निवेदन देतांना हिंदु गोवंश रक्षा समितीचे श्री. दीप्तेश पाटील आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. कुंदन राऊत उपस्थित होते. 

बंगालमध्ये सैन्याचे हेलिकॉप्टर कोसळून ३ अधिकार्‍यांचा मृत्यू !

संपतकाळात सैन्याची विमाने आणि हेलिकॉप्टर 
कोसळणाराजगातील एकमेव देश भारत ! 
       सुकना (बंगाल) - बंगालच्या सुकना येथे ३० नोव्हेंबरला सकाळी सैन्याचे चीता चॉपर हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात सैन्याच्या ३ अधिकार्‍यांचा मृत्यू झाला, तर १ अधिकारी घायाळ झाला.

तमिळनाडूत भाजपच्या नेत्याकडून बेहिशोबी २० लाख ५० सहस्र रुपये जप्त !

सत्तेत नसणार्‍या राज्यातील नेत्याकडून इतकी 
रक्कम मिळते, तर जेथे सत्तेत आहेत, तेथील 
नेत्याकडे किती रक्कम असू शकते, असा विचार 
जनतेच्या मनात आल्यावाचून रहाणार नाही !
       चेन्नई - तमिळनाडू पोलिसांनी भाजप नेत्याच्या चारचाकी गाडीच्या तपासणीतून बेहिशोबी २० लाख ५० सहस्र रुपये जप्त केले आहेत. यात २ सहस्र रुपयांच्या ९२६ नोटा आहेत. भाजप नेते अरुण पेरामनपूर येथील रहिवासी आहेत. ते भाजपच्या युवक शाखेचे सचिव आहेत. अरुण पैशाच्या स्रोताची समाधानकारक माहिती देऊ शकले नाहीत. त्यामुळे हे पैसे जप्त करण्यात आले. याची माहिती आयकर खात्यालाही देण्यात आली आहे. 

चेंबूर (मुंबई) येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात गोळीबार

गुंडांचा भरणा असलेले पक्ष कधीतरी समाजहित साधतील का ? 
     मुंबई, ३० नोव्हेंबर (वार्ता.) - चेंबूर येथे २९ नोव्हेंबरला झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार संजय पाटील यांनी त्यांच्या समर्थकांसह गोळीबार केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता नवाब मलिक यांनी पत्रकारांशी बोलतांना केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार संजय पाटील यांनी मात्र गोळीबाराचा आरोप फेटाळला आहे. "अशी कोणतीही घटना घडली नाही. मी मेळाव्यात गेलो असता माझ्यावर आक्रमण झाले. त्यामुळे हा आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत. माझ्याकडे पिस्तुलाची परवानगी आहे. स्वसंरक्षणासाठी मी पिस्तुल बाहेर काढले, यात काहीही चुकीचे नाही", असा खुलासा संजय पाटील यांनी केला. या घटनेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर आला आहे.

महिला आयोगाकडे पाच लक्ष खटले प्रलंबित ! - विजया रहाटकर, राज्य महिला आयोग अध्यक्षा

राज्य महिला आयोगाची (अ)कार्यक्षमता ? 
     पुणे, ३० नोव्हेंबर - राज्य महिला आयोगाकडे सध्या प्रतिदिन १२५ खटले प्रविष्ट होतात. त्यामध्ये 'लिव्ह-इन रिलेशनशिप' आणि लैंगिक अत्याचार यांच्या घटनांचे प्रमाण अधिक आहे. (पाश्‍चात्य संस्कृतीच्या अंधानुकरणाचा परिणाम ! अधर्माचरणाने ओढावलेली ही परिस्थिती सुधारण्यासाठी साधनेला पर्याय नाही. - संपादक) सध्या आयोगाकडे ५ लक्ष खटले प्रलंबित आहेत. त्यांपैकी ७० प्रतिशत खटले समुपदेशनातून सोडवले जातात, असे माहितीपर प्रतिपादन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी केले. पुणे बार असोसिएशनच्या वतीने आयोजित 'महिला सशक्तीकरण' या विषयावरील व्याख्यानात त्या बोलत होत्या. 
     रहाटकर पुढे म्हणाल्या, "एका आठवड्यात २ दिवस आयोगाचे न्यायालय असते. उच न्यायालयाला दिलेले अधिकार महिला आयोगाला दिलेले असल्याने आयोगाने केलेली सूचना शासनाला फेटाळता येत नाही. महिलांविषयीच्या योजनांवर सूचना देण्याचा अधिकार आयोगाला आहे."

यवतमाळ येथे धर्मसेवा प्रतिष्ठानच्या वतीने वृद्धाश्रमात खाऊ वाटप !

वृद्धांना खाऊ वाटतांना कार्यकर्ते वृद्धांना खाऊ वाटतांना कार्यकर्ते

      यवतमाळ - येथे धर्मसेवा प्रतिष्ठानच्या वतीने मातोश्री वृद्धाश्रम, सांस्कृतिक संवर्धन मंडळ, निळोणा (धरण) येथे खाऊ वाटप करण्यात आले. २५ वृद्धांनी याचा लाभ घेतला. मंडळाचे अध्यक्ष श्री. सु.पा. ढवळे सर, सचिव श्री. सु. मा. खातखेडकर सर यांनी या कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला. 

संभाजी ब्रिगेडचे अनधिकृत फलक महापालिका कर्मचार्‍यांनी हटवले !

     मुंबई - वांद्रे येथील रंगशारदा सभागृहाबाहेर संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते आणि महापालिका कर्मचारी यांच्यामध्ये कापडी फलक हटवण्यावरून वाद झाला. हे कापडी फलक अनधिकृत असल्याचे महापालिकेच्या कर्मचार्‍यांनी सांगितले. मात्र संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी पालिका कर्मचार्‍यांना रोखले. त्यानंतर महापालिका कर्मचार्‍यांनी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांविरोधात वांद्रे पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा प्रविष्ट करण्याची प्रक्रिया चालू केल्याचे वृत्त आहे. 

शिक्षणसंस्थांविषयी तक्रार करण्यासाठी 'अ‍ॅप'ची निर्मिती

     मुंबई, ३० नोव्हेंबर - शिक्षणसंस्थाविषयी तक्रार करण्यासाठी 'फोरम फॉर एज्युकेशन' या संस्थेकडून 'एफ्एफ्ई इंडिया' हे 'मोबाईल अ‍ॅप' चालू करण्यात आले आहे. या 'अ‍ॅप'द्वारे पालकांसह विद्यार्थी, शिक्षक आणि शालेय कर्मचार्‍यांना तक्रार करता येणार आहे, तसेच प्रत्येक आठवड्याला शैक्षणिक परिस्थितीचा अहवाल राज्य सरकारला सादर करण्यात येणार आहे. आधुनिक शिक्षण देण्याच्या नावाखाली भरमसाट शुल्क आकारणे, सोयी-सुविधांचा अभाव या प्रकारांना आळा घालण्यासाठी हे 'अ‍ॅप' चालू करण्यात आल्याचे संस्थेचे अध्यक्ष जयंत जैन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. त्यांनी या वेळी हे 'अ‍ॅप' वापरण्याच्या संदर्भात माहिती दिली.

८ मास राज्यातील महाअधिवक्ता हे पद रिक्त ठेवल्याने उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले

     मुंबई - राज्यातील महाअधिवक्ता हे पद ८ मास (महिने) रिक्त ठेवल्याने उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले असून १४ डिसेंबरपर्यंत याविषयी प्रतिज्ञापत्राद्वारे स्पष्टीकरण देण्याचे निर्देश दिले. 
     माजी महाअधिवक्ता श्रीहरि अणे यांच्या राजीनाम्यानंतर 'हंगामी महाअधिवक्ता' या पदावरच कारभार चालू होता. यामुळे अनेक महत्त्वाच्या याचिकांवरील सुनावण्या प्रलंबित राहिल्या असून सामान्य नागरिकांनाही नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे निरीक्षण न्या. अभय ओक आणि न्या. अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठाने २८ नोव्हेंबरच्या सुनावणीत नोंदवले. राज्यघटनेत हंगामी महाअधिवक्ता हे पदच अस्तित्वात नसल्याने ते अवैध ठरवावे आणि महाअधिवक्त्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी काँग्रेसचे आमदार संजय दत्त यांनी याचिकेद्वारे केली होती.

धर्मादाय संस्थांनी रहित नोटा स्वीकारू नयेत ! - आयकर विभागाच्या सूचना

        कोल्हापूर, ३० नोव्हेंबर (वार्ता.) - देवस्थान आणि धर्मादाय संस्था यांनी केंद्र शासनाने रहित केलेल्या रुपये ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या चलनी नोटा दानपेटीमध्ये स्वीकारू नयेत. मंदिरामध्ये महत्त्वाच्या ठिकाणी दर्शनी भागात, तसेच दानपेटीजवळ नोटा दानपेटीजवळ सूचना लावावी, म्हणजे भक्तगण जुन्या नोटा दानपेटीमध्ये टाकणार नाहीत. दानपेटीमध्ये रुपये ५०० किंवा १००० च्या जुन्या चलनी नोटा प्राप्त झाल्यास अशा नोटा अधिकोषात जमा करू नयेत. केंद्र शासनाकडून या संदर्भात पुढील स्पष्ट सूचना प्राप्त होईपर्यंत अशा चलनी नोटांचा स्वतंत्र अभिलेख सिद्ध करून विश्‍वस्त समितीकडे ठेवाव्यात, अशा सूचना आयकर विभागाचे पुणे संचालक यांनी दिल्या आहेत.
        दोन स्वतंत्र साक्षीदारांच्या समक्ष दानपेटी उघडण्यात यावी आणि दानपेटीतून मिळणारी सर्व देणगी योग्य रितीने नोंद करून ठेवावी, तसेच दानपेटी उघडणे आणि देणगी मोजण्याच्या सर्व प्रक्रियेचे चित्रीकरण करून चित्रचकतींचे जतन करण्यात यावे. सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय कोल्हापूर विभाग, कोल्हापूर येथे नोंदणीकृत असलेल्या देवस्थान आणि धर्मादाय संस्थांचे विश्‍वस्त/विश्‍वस्त मंडळ, कार्यकारी मंडळ यांना वर उल्लेख केलेल्या सूचनांची नोंद घेऊन त्याप्रमाणे कार्यरत रहावे, असे सूचित करण्यात आले आहे. 

धर्मप्रचार सभा न्यासाच्या वतीने सुसंस्कारित पिढी घडण्याविषयी प्रबोधन !

मार्गदर्शन करतांना सौ. रत्ना हस्ती

        वर्धा - समाजसाहाय्य, राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी कार्यरत धर्मप्रचार सभा या न्यासाच्या वतीने श्री. अनुप चौधरी यांच्या घरी सुसंस्कारित पिढी घडण्यासाठी पालकांची भूमिका याविषयी न्यासाच्या सौ. रत्ना हस्ती यांनी प्रबोधन केले. मुलांना घडवण्यात पालकांचा मोठा वाटा असतो, यासाठी न्यासाने या उपक्रमाचे आयोजन केले होते. हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी न्यासाच्या सौ. जयश्री माणिकपुरेे यांनी परिश्रम घेतले. या उपक्रमाचा लाभ २० स्त्रियांनी घेतला. असे उपक्रम स्तुत्य असून ते घेण्यात यावेत, अशी प्रतिक्रिया उपस्थितांनी दिली.

संसदेतील गदारोळामुळे लोकसभा दिवसभरासाठी स्थगित !

नागरोटा येथील आक्रमण आणि नोटाबंदी प्रकरण 
     नवी देहली - ३० नोव्हेंबरला लोकसभेचे कामकाज चालू झाल्यावर विरोधी पक्षांनी नोटाबंदी आणि नागरोटा येथील सैन्याच्या छावणीवरील आतंकवाद्यांचे आक्रमण या दोन विषयांवर गदारोळ घातला. या वेळी पंतप्रधान मोदी सभागृहात उपस्थित होते. नोटाबंदीच्या संदर्भात मृत्यू पावलेल्या नागरिकांना सरकारने हानीभरपाई द्यावी, अशी मागणी विरोधी पक्षांनी केली. राज्यसभेतही असाच प्रकार चालू होता. दोन्हीकडील गदारोळ थांबत नसल्याने अखेर दुपारी १२ पर्यंत दोन्ही सभागृहांचे कामकाज स्थगित करण्यात आले. राज्यसभा दुपारी १२ वाजल्यानंतर चालू झाल्यावर पुन्हा गदारोळ झाल्याने ती दुपारी २ पर्यंत स्थगित करण्यात आली. दुसरीकडे लोकसभेतही अशीच स्थिती राहिल्याने तिचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले. 
 कोट्यवधी रुपयांचा चुराडा ! 
१. संसदेच्या एका मिनिटासाठी एका निष्कर्षानुसार २९ सहस्र रुपये ते १ लाख ८३ सहस्र रुपये खर्च येतो. 
२. एका घंट्यासाठी साधारण १७ लाख ४० सहस्र ते १ कोटी १० लाख रुपये खर्च येतो. 
३. एका दिवसात १ कोटी ९१ लाख ते १२ कोटी रुपये खर्च येतो.

निमकर्दा (अकोला) येथे हिंदु धर्मजागृती सभा

डावीकडून सौ. माधुरी मोरे,
श्री. श्रीकांत पिसोळकर आणि श्री. धीरज राऊत
     निमकर्दा (अकोला), ३० नोव्हेंबर (वार्ता.) - येथील श्री निळकंठेश्‍वर संस्थानच्या सभागृहामध्ये 'हिंदु जनजागृती समिती'च्या वतीने आयोजित 'हिंदु धर्मजागृती सभा' नुकतीच पार पडली. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे विदर्भ समन्वयक श्री. श्रीकांत पिसोळकर, समितीचे श्री. धीरज राऊत, रणरागिणी शाखेच्या सौ. माधुरी मोरे यांनी उपस्थित धर्माभिमान्यांना मार्गदर्शन केले. या सभेला ह.भ.प विश्‍वराम पांडे महाराज यांची वंदनीय उपस्थिती होती. धर्माभिमानी श्री. महेश पाथरकर यांनी शंखनाद करून सभेचा प्रारंभ केला. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. वेदमंत्रांनी सभागृह चैतन्यमय झाले. कु. निधी बैस हिने सूत्रसंचालन केले. उपस्थित वक्ते आणि ह.भ.प. विश्‍वराम पांडे महाराज यांचा सत्कार धर्माभिमान्यांनी केला. या सभेस ४०० धर्माभिमानी उपस्थित होते. 

३१ डिसेंबरच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखा !प्रांत कार्यालयात निवेदन 
     मिरज, ३० नोव्हेंबर (वार्ता.) - देशभरात सध्या पाश्‍चात्य प्रथांच्या वाढत्या अंधानुकरणामुळे नववर्ष गुढीपाडव्याच्या जागी ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री १२ वाजता साजरे करण्याची कुप्रथा मोठ्या प्रमाणात वाढीस लागली आहे. मद्यपान, अमली पदार्थांचे सेवन करण्याचे प्रमाण वाढले आहे. बीभत्स गाण्यांच्या तालावर अश्‍लील अंगविक्षेप करून नाचणे, शिवीगाळ करणे, मुलींची छेडछाड करणे आदी कुकृत्ये करून एकूणच कायदा अन् सुव्यवस्था यांच्या दृष्टीने गंभीर स्थिती निर्माण होत आहे. हे गैरप्रकार रोखण्यासाठी ३१ डिसेंबरच्या रात्री राज्यातील प्रमुख पर्यटनस्थळे, गड-किल्ल्यांसारख्या ऐतिहासिक आणि सार्वजनिक ठिकाणी मद्यपान-धूम्रपान आणि पार्ट्या करणे यांस प्रतिबंध करण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन मिरज शहरात प्रांत कार्यालयात देण्यात आले. 

सदस्यपदी भाजपचे सुभाष वोरा आणि शिवसेनेचे शिवाजी जाधव यांची निवड !

पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अध्यक्षपदाची अद्यापही नियुक्ती नाही ! 
     कोल्हापूर, ३० नोव्हेंबर (वार्ता.) - पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या सदस्यपदी भाजपचे ज्येष्ठ नेते सर्वश्री सुभाष वोरा आणि शिवसेनेचे कोल्हापूर दक्षिण शहरप्रमुख शिवाजी जाधव यांची निवड झाली. विधी आणि न्याय खात्याने या निवडीचा आदेश २९ नोव्हेंबरला दिला. देवस्थान समितीच्या सदस्यपदी सदस्यांची निवड होत असली, तरी गेल्या ६ वर्षांपासून अध्यक्षपदी एकाचीही निवड झाली नाही. त्यामुळे अध्यक्षपद निवडीचेे भिजत घोंगडे किती दिवस ठेवणार, असा प्रश्‍न भक्तांमधून उपस्थित केला जात आहे. 

शिवसेनेचे हरिदास पडळकर यांची तुळजापूर यात्रा आज मार्गस्थ !

       सांगली, ३० नोव्हेंबर (वार्ता.) - शेतकर्‍यांचे प्रश्‍न सुटावेत, शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांना उदंड आयुष्य लाभून हिंदुत्वाच्या कार्यास बळकटी यावी, या मागण्यांसाठी शिवसेनेचे माजी उपशहरप्रमुख श्री. हरिदास पडळकर प्रतीवर्षी दुचाकीवरून तुळजापूर आशीर्वाद यात्रा काढतात. गेली ११ वर्षे ही यात्रा चालू असून यात ते दुचाकीवरून शिवसैनिक आणि भाविक यांच्यासह सांगली ते तुळजापूर असा प्रवास करतात. ही यात्रा गुरुवार, १ डिसेंबर या दिवशी सकाळी १० वाजता मारुती चौक येथील शिवतीर्थ येथून प्रारंभ होणार आहे, अशी माहिती श्री. हरिदास पडळकर यांनी दिली. 

डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना ९ डिसेंबरला न्यायालयात उपस्थित करण्याचा न्यायालयाचा आदेश !

अधिवक्ता समीर पटवर्धन यांच्याकडून पुरवणी दोषारोपपत्र कह्यात ! 
कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरण ! 

     कोल्हापूर, ३० नोव्हेंबर (वार्ता.) - कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणी विशेष पथकाचे (एस्आयटी) अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी २९ नोव्हेंबर या दिवशी जिल्हा न्यायालयात सनातनचे साधक आणि संशयित आरोपी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांच्यावर प्रविष्ट केलेले ४३८ पानांचे पुरवणी दोषारोपपत्र डॉ. तावडे यांचे अधिवक्ता श्री. समीर पटवर्धन यांनी ३० नोव्हेंबरला कह्यात घेतले. याच वेळी श्री. पटवर्धन यांनी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना ९ डिसेंबरला न्यायालयात उपस्थित करावे, अशी केलेली मागणी सातवे सहदिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) श्रीमती व्ही.व्ही. पाटील यांनी मान्य केली, तसेच या दिवशी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना न्यायालयात उपस्थित करण्याचा आदेशही पोलिसांना दिला. 

औंढा नागनाथ (जिल्हा हिंगोली) येथील एका अधिकोषात कागदपत्रांशिवाय नोटा पालटून दिल्याप्रकरणी रोखपाल निलंबित

     हिंगोली, ३० नोव्हेंबर - येथील औंढा नागनाथ तालुक्यातील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेत कागदपत्राशिवाय ६ लक्ष १० सहस्र रुपयांच्या नोटा पालटून दिल्याप्रकरणी रोखपालाला निलंबित करण्यात आले आहे. रोखपालाने कोणत्याही कागदपत्रांशिवाय पालटून दिल्याचे शाखाधिकार्‍याने केलेल्या चौकशीत आढळून आले. त्यामुळे त्या रोखपालावर निलंबनाची कारवाई केली आहे. (एवढ्यावरच न थांबता असा काळा पैसा पालटून घेणार्‍यावरही पोलीस कारवाई होणे आवश्यक आहे. - संपादक) नोटाबंदीनंतर अधिकोषांच्या व्यवहारांमध्ये अत्यंत पारदर्शकता ठेवण्याचे आदेश भारतीय रिझर्व्ह बँक आणि केंद्र सरकार यांच्याकडून देण्यात आले आहेत.

शासकीय आश्रमशाळेतील मुलांना अन्न नाही !

     जळगाव - पाल (जिल्हा जळगाव) येथील शासकीय आदिवासी वसतीगृहातील २५ विद्यार्थ्यांना भोजन न मिळाल्याने विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन करीत संताप व्यक्त केला. येथील शासकीय वसतीगृहातील विद्यार्थ्यांची जेवणाची आबाळ होत असूनही प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे निर्दशनास येत आहे. तसेच वसतीगृहात प्रचंड अस्वच्छता आहे. वारंवार तक्रार करूनही काही उपयोग होत नाही, असे तेथील विद्यार्थ्यांनी सांगितले. वसतीगृहातील अधीक्षक, शिपाई, ठेकेदार यांच्या आडमूठेपणामुळे वसतीगृहातील सर्व विद्यार्थी कंटाळले आहेत.

मुंबई येथील फोर्ट, काळा घोडा मार्ग येथील डीएजी मॉडर्न येथे २५ ते २८ नोव्हेंबर या कालावधीत हिंदुबहुल देशात हिंदुद्वेषी चित्रकाराची चित्रे प्रदर्शनात ठेवणार्‍या हिंदूंवर देव कृपा करील का ?

       २० व्या शतकातील भारतीय कला या नावाचे चित्रप्रदर्शन आयोजित करण्यात आले. या चित्रप्रदर्शनात भारतमातेचे नग्न चित्र काढणार्‍या आणि हिंदूंच्या देवतांची अश्‍लील चित्रे काढणारे हिंदुद्वेषी चित्रकार मकबूल फिदा हुसेन यांनी रेखाटलेल्या चित्रांचा समावेश करण्यात आला. हुसेन यांनी रेखाटलेली चित्रे प्रदर्शनात न ठेवण्याविषयी राष्ट्रप्रेमी नागरिकांनी केलेली विनंती आयोजकांपैकी अनिका मानकपूर यांनी नाकारली. 

हद्दपारी नको, समूळ उच्चाटन हवे !

      नुकतेच चांगल्या उद्देशाने दोन निर्णय घोषित केले गेलेे; पण उद्देशपूर्तीच्या दृष्टीने ते तकलादूच निघाले, असे म्हणावे लागेल. एक निर्णय होता, महाविद्यालयाच्या आवारात जंक फूडवर बंदी घालण्याचा आणि दुसरा होता देशी दारूची दुकाने गावाबाहेर हालवण्याचा ! विद्यापीठ अनुदान आयोगाने एक पत्रक काढून महाविद्यालयांच्या उपाहारगृहामध्ये जंक फूड ठेवण्यास बंदी केली, तर ग्रामसभेने ठराव केल्यास देशी दारूची दुकाने गावाबाहेर १०० मीटरवर हालवण्याचा निर्णय उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घोषित केला. जंक फूडचे सेवन व्यक्तीला शारीरिकदृष्ट्या कमकुवत बनवते, तर देशी दारू व्यक्तीगत स्वास्थ्यासह कौटुंबिक आणि सामाजिक स्वास्थ्यही बिघडवते. त्यामुळे या दोन्हींनाही अटकाव व्हायला हवाच होता; मात्र या दोन्ही वस्तूंवर बंदी घालण्याऐवजी त्या केवळ वेशीबाहेर नेण्याचा प्रकार झाल्याने या निर्णयाच्या फलनिष्पत्तीविषयी प्रश्‍नचिन्ह निर्माण होते.

सर्वत्रच्या साधकांना सेवेची सुवर्णसंधी !

धर्मरथांवर चालक-
साधकांची तातडीने आवश्यकता !
       सनातनचे ग्रंथ म्हणजे समाजाला धर्मशिक्षण देणारे ज्ञानाचे अनमोल भांडारच ! मानवजातीसाठी ज्ञानामृत असलेल्य या ग्रंथांद्वारे समाजाला आचारधर्म, साधना, आदी नानाविध विषयांसंदर्भात दिशादर्शन केले जाते. या ग्रंथांना सर्वत्र मोठ्या प्रमाणावर मागणी येत आहे. समाजापर्यंत शीघ्रतेेने पोहोचण्यासाठी सनातन संस्थेच्या वतीने ठिकठिकाणी धर्मरथाद्वारे ग्रंथप्रदर्शने लावली जात आहेत. या सेवेसाठी धर्मरथावर चालक-साधकांची आवश्यकता आहे. सेवेसाठी इच्छुक असलेल्या साधकांकडे लहान धर्मरथासाठी लाईट मोटर व्हेहिकल (LMV), दुसर्‍या लहान धर्मरथासाठी लाईट ट्रान्स्पोर्ट व्हेहिकल आणि तीन मोठ्या धर्मरथांसाठी हेव्ही ट्रान्स्पोर्ट व्हेहिकल असे परवाने असणे आवश्यक आहे. 

संस्काराने राष्ट्र तेजस्वी होणे

     पिढ्यान्पिढ्या जेव्हा चांगले संस्कार होत असतात, तेव्हा ती आत्मशक्ती जागृत रहाते आणि चांगले नियोजन करून जीवन सुखदायी आणि समृद्ध करते. मध्येच जर संस्कार बंद पडले, तर ते पुन्हा प्रस्थापित करण्यास वेळ लागतो. तेथपर्यंत राक्षसीवृत्ती बोकाळून विघटनकारी कृत्ये सुरू होतात. त्याचे परिणाम समाजाला आणि राष्ट्राला भोगावे लागतात. आज भारताचे असेच झाले आहे. सुसंस्कार नाहीसे झाले आहेत आणि विघटनकारी कृत्ये बोकाळली आहेत. भौतिक वाद पुढे येत आहे. तेव्हा नवीन पिढीवर परत सुसंस्कार करणे आवश्यक आहे. 
- प.पू. परशराम माधव पांडे (श्री गणेश-अध्यात्म दर्शन, पृष्ठ ७८)
      जग दुर्जनांच्या दुष्कृत्यांनी इतके पीडित नाही, जितके सज्जनांच्या निष्क्रीयतेने पीडित आहे. 
- स्वामी तद्रूपानंद सरस्वती

स्वातंत्र्यासाठी क्रांतीयुद्ध !

     शस्त्राचारावाचून केवळ निःशस्त्र मार्गाने स्वातंत्र्य मिळणे केव्हाही अशक्य आहे. त्यासाठी गुप्त संस्था पाहिजेत. त्यांचे प्रचारक आणि आचारक, असे दोन भाग हवेत. वृकयुद्धाच्या रणनीतीने शत्रूच्या केंद्रांवर आणि अधिकार्‍यांवर छापे घालावे. शत्रूच्या सैन्यातील स्वकीय सैनिकांना क्रांतीप्रवण करून वेळोवेळी बंड घडवून आणून क्रांतीयुद्धाने स्वातंत्र्य मिळवण्याचा आपला पाठपुरावा होतो. - स्वातंत्र्यवीर सावरकर (संदर्भ : मासिक स्वातंत्र्यवीर, मे २००४)

स्वतःच्या घरापासून आश्रमजीवनाचा आरंभ करून साधकांना नेहमी साहाय्य करणारे ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे महर्लोकवासी रंजन देसाईकाका !

रंजन देसाई
प.पू. डॉक्टरांनी देसाईकाकांची 
साधना चांगली चालू असल्याचे सांगणे 
     ५ मासांपूर्वी (महिन्यांपूर्वी) माधवबाग येथील आयुर्वेदिक उपचार घेण्याविषयी रंजन देसाई यांना विचारले होते. त्या वेळी काकांनी साधनेसाठी आणखी काय केले पाहिजे ?, असे विचारले होते. तेव्हा प.पू. डॉक्टर म्हणाले होते, मला आता रंजन देसाई यांची काळजी नाही. त्यांची साधना चांगली चालली आहे. ते आता पूर्वीचे राहिलेले नाहीत. त्यांच्यात पुष्कळ चांगले पालट आहेत. - एक साधक 
रंजन देसाई यांनी आधीच गाठली होती ६१ टक्के आध्यात्मिक पातळी ! 
     मी वरील वाक्य म्हणालो होतो; कारण रंजन देसाई यांनी ६१ टक्के पातळी गाठली होती, म्हणजे जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून ते मुक्त झाले होते. त्यांची पातळी जाहीर करणे त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे पुढे पुढे ढकलले जात होते. आता त्यांनी देहत्याग केला असला, तरी त्यांना त्यांची पातळी आतून ज्ञात आहे.
     त्यांच्या त्यागाचे एक उदाहरण म्हणजे त्यांनी साधनेला आरंभ केल्याकेल्याच त्यांच्या कुडाळ येथील कारखान्याच्या परिसरातील एक इमारत सनातन संस्थेला दिली. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सनातन संस्थेच्या कार्याला चालना मिळाली. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

रुग्णालयात प्रकृती अस्वस्थ असतांनाही मृत्यूच्या दिवसापर्यंत साधनारत असणारे रंजन देसाईकाका !

१. आध्यात्मिक उपायांचे गांभीर्य 
     रुग्णालयात प्रकृती अत्यवस्थ असूनही देसाईकाका सतत प्रार्थना आणि नामजप करत होते. तसेच प.पू. पांडे महाराज यांनी दिलेला मंत्र वाचता येण्यासाठी त्यांनी तो मंत्र लिहिलेला कागद त्यांच्यासमोर पलंगाला लावून ठेवावयास सांगितला. 
२. सेवेची तळमळ
    देसाईकाका सतत सांगत होते, मला भ्रमणभाष दे. मला देवद आश्रमातील वाहनांची सेवा करणार्‍या साधकांशी बोलून सेवेविषयी प्रलंबित सूत्रे पूर्ण करायची आहेत आणि सेवांचे आढावे घ्यायचे आहेत. अगदी शेवटच्या दिवसापर्यंत त्यांना त्यांच्याकडील सेवेच्या दायित्वाची काळजी होती.

गंभीर आजारपणात अखंड अनुसंधानात आणि आनंदी राहून परिस्थितीवर मात करणारी ६६ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. दीपाली मतकर !

कु. तृप्ती गावडे
कु. दीपाली मतकर पुष्कळ आजारी असल्याचे कळल्यावर मला तिच्याजवळ रहाण्याची आणि तिला पहाण्याची तीव्र इच्छा झाली. नंतर मला सोलापूरला दीपालीच्या साहाय्यासाठी जाण्याचा निरोप मिळाला. तिची भक्ती किती श्रेष्ठ आहे, पुष्कळ शारीरिक त्रास होत असतांनाही ती देवाशी कशी एकरूप होते, हे शिकण्यासाठी देवाने मला तिथे पाठवल्याचे माझ्या लक्षात आले. रुग्णालयात गेल्यानंतर देवाने तिला केलेले साहाय्य, दीपालीसमवेत असतांना तिची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये आणि प.पू. डॉक्टरांची अनुभवलेली प्रीती यांविषयी पुढे देत आहे.

देवद आश्रमातील साधक श्री. कृष्णा आय्या यांना ६१ टक्के पातळीचे रंजन देसाईकाका यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये

१. वाक्पटुत्व
     देसाईकाकांमध्ये बोलण्याचे कौशल्य होते. ते समोरच्या व्यक्तीला आपले म्हणणे योग्य पद्धतीने समजावून सांगत आणि समोरच्या व्यक्तीला ते लगेच पटत असे.
२. स्वभाव तापट असूनही साधकांविषयी मनात पूर्वग्रह नसणे
   देसाईकाकांचा स्वभाव तापट होता, तरी त्यांच्या मनात साधकांविषयी कसलाही पूर्वग्रह नव्हता. ते राग आल्यावर रागवायचे आणि लगेच सहजतेने बोलायचे. त्यांच्यात सर्व सहसाधकांविषयी पुष्कळ प्रेमभाव होता. 
३. स्थिरता
    काकांचे आजारपण गंभीर असूनही ते मनाने स्थिर रहात. ते प.पू. गुरुदेवांवर श्रद्धा ठेवून निश्‍चिंत असत. प.पू. गुरुदेवांनी सर्वकाही दिले आहे. त्यांच्यामुळे आज मी स्थिर राहू शकतो, असे ते नेहमी सांगत.

साधकांना कुटुंबातील सदस्यांप्रमाणे प्रेम देणारे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती अतिशय भक्तीभाव असणारे ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे महर्लोकवासी रंजन देसाईकाका !

१. एका आस्थापनाचे मालक असूनही सर्वसामान्यांसारखे वागणे
     देसाईकाकांचे घरचे राहणीमान सुखवस्तू आहे. त्यांना स्वत:ला घरातील कुठलीच कामे करण्याची कधी वेळ आली नाही. काही अडचण आली, तरी त्यांच्या आस्थापनातील (कंपनीतील) कामगारही त्यांच्या हाताशी असत. पंचक्रोशीतही ते देसाईसाहेब म्हणून प्रसिद्ध होते. तरीही स्वत:चे स्वत:च सर्व करणे, सर्वसामान्यांसारखे रहाणे, आश्रमजीवन स्वीकारणे अशा सर्वच गोष्टी वैशिष्ट्यपूर्ण होत्या. - श्री. यज्ञेश सावंत, सनातन आश्रम, देवद, पनवेल आणि सर्व साधक, सनातन सेवाकेंद्र, कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. (२१.११.२०१६)

देव भक्ताला काळाच्या दाढेतून कसे वाचवतो, याची कु. दीपाली हिच्याविषयी तिच्या सेवेतील साधिका सौ. उल्का जठार यांनी घेतलेली अनुभूती

१. २०.१०.२०१६ च्या रात्री दीपालीला पुष्कळ ताप येणे आणि तिचे डोके दुखत असल्याने लेप लावून डोके चेपून दिल्यावर तिला आराम मिळणे : २०.१०.२०१६ च्या रात्री ३ वाजता दीपालीचे डोके दुखू लागले आणि तिला पुष्कळ तापही आला. तेव्हा मी तिच्या डोक्याला लेप लावला आणि डोके चेपून दिले. त्यामुळे तिला आराम मिळाला.
२. दुसर्‍या दिवशीही रात्री ताप येणे : २१.१०.२०१६ या दिवशी दीपालीला रुग्णालयात नेले. त्या दिवशी नंतर ती थोडी बरी होती. संध्याकाळी माझ्या मनात विचार आला, ही आता बरी आहे; पण रात्री तिला ताप आला, तर काय करायचे ? कृष्णाने साधिका आधुनिक वैद्या (सौ.) काटोटेताईंना विचारून घ्यायला सुचवले. त्यांनी रात्री ताप आला, तर क्रोसिनची गोळी द्यायला सांगितले. त्याही रात्री ३ वाजता दीपालीला ताप येऊन तिचे डोके दुखू लागले. मी तिचे डोके चेपून दिले आणि तिच्या कपाळाला लेप लावला.

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...

सर्वत्र तू व्यापून आहेस गुरुराया !
अधिवक्ता नागेश ताकभाते

जळी, स्थळी, काष्ठी अन् पाषाणी आहेस तू व्यापून ।
गुरुविना होईना ही जाणीव जीवनी ॥ १ ॥

दुःख-क्लेश, आशा-अपेक्षा अजून ना सुटती ।
मान-अपमानाच्या कोड्यांची गणिते भ्रमित करती ॥ २ ॥

मंदिर मंदिर धुंडून काढले तुझ्याशी नाते जोडायला ।
गुरुविना जमेना एकरूप व्हावयाला ॥ ३ ॥

समंजस, लाघवी आणि प.पू. गुरुदेवांप्रती भाव असणारा ५३ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला जळगाव येथील कु. कृष्णा संदीप चौधरी (वय ९ वर्षे) !

उच्चलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र
चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. कृष्णा संदीप चौधरी एक दैवी बालक आहे !
कु. कृष्णा चौधरी
     मार्गशीर्ष शुक्ल पक्ष द्वितीया (१.१२.२०१६) या दिवशी कु. कृष्णा संदीप चौधरी याचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या आईला त्याची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये देत आहोत.
                                    पालकांनो, हे लक्षात घ्या ! 
      तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले 
     यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर यूट्यूबच्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.
कु. कृष्णा संदीप चौधरी याला वाढदिवसानिमित्त 
सनातन परिवाराच्या वतीने शुभाशीर्वाद !

कु. दीपाली मतकर हिच्या गंभीर आजारासाठी भृगु महर्षींनी श्री. विशाल शर्मा यांच्या माध्यमातून सांगितलेले उपाय

     कु. दीपाली मतकर या साधिकेला डेंग्यू झाल्यामुळे रुग्णालयाच्या अतीदक्षता कक्षात हालवण्यात आले होते. तिच्या प्लेटलेट्सची संख्या ८ सहस्र एवढी खाली आली होती. (सर्वसाधारण व्यक्तीत ती १.५ लक्ष ते ४ लक्ष असते.) दीपालीताईंच्या श्‍वसन प्रक्रियेमध्ये बिघाड झाल्याने तिच्या विविध अवयवांवर विपरीत परिणाम झाला होता. खोकला, लघवी आणि शौच यांमधून रक्तस्राव होत होता. डेंग्यूमुळे तिच्या हृदयाच्या एका बाजूवर परिणाम झाला होता. तिला ताप आला होता. तिची स्थिती अतिशय गंभीर असल्याचे आधुनिक वैद्यांनी सांगितले होते. या वेळी भृगु महर्षींनी होशियारपूरच्या श्री. विशाल शर्मा यांच्या माध्यमातून तिला खालील प्रतिबंधक समुपदेश दिले.
१. भृगु महर्षींना प्रार्थना केल्यावर त्यांनी उपाय आणि औषधे सांगणे
    कु. दीपालीताईंचा आजार दूर व्हावा, यासाठी श्री. विशालजी यांनी भृगु महर्षींना प्रार्थना केली. त्या वेळी भृगु महर्षींनी सांगितले, कु. दीपालीताई बरी होईल. एका आठवड्यात तिचा धोका टळेल.
     श्री. विशालजी यांच्याकडून हे कळले आणि भृगु महर्षींकडून मिळालेल्या प्रेरणेनुसार त्यांनी दीपालीताईंना खालील औषधे द्यावी आणि त्याच्या जोडीला उपाय करण्यास सांगितले.

सगुणातील ईश्‍वराची अनुभूती देणारे एकमेवाद्वितीय संत प.पू. परशराम पांडे महाराज (वय ८९ वर्षे) !

प.पू. पांडे महाराज
      परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी निर्माण केलेल्या या साधनेच्या विश्‍वातील एक उच्च विभूती म्हणजे प.पू. परशराम माधव पांडे महाराज (प.पू. बाबा) ! ३० नोव्हेंबर २०१६, म्हणजेच मार्गशीर्ष शुक्ल पक्ष प्रतिपदा या दिवशी त्यांनी ९० व्या वर्षात पदार्पण केले. त्यानिमित्ताने त्यांचे चरणी उतराई होण्यासाठी देवद आश्रमातील साधकांनी ही शब्द सुमनांजली अर्पण करण्याचा प्रयत्न केला आहे. हे लिखाण म्हणजे देवद आश्रमातील सर्व साधकांचे मनोगत आहे. त्यातील काही सूत्रे आपण ३० नोव्हेंबर या दिवशी पाहिली. आज त्यापुढील सूत्रे पाहूया.

कु. दीपाली मतकर गंभीर आजारातून बरी होण्यासाठी सप्तर्षि जीवनाडीपट्टीचे वाचक पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून महर्षींनी सांगितलेले उपाय

महर्षींचे कार्य !
     २४.१०.२०१६ या दिवशी प.पू. डॉक्टरांनी कु. दीपाली मतकर हिला झालेल्या डेंग्यू या गंभीर आजाराविषयी सप्तर्षि जीवनाडीपट्टीचे वाचन करणारे पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांना कळवायला सांगितले. तसे कळवल्यावर महर्षींनी पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांना त्या त्या दिवशी पुढील उपाय सांगितले. ते ते उपाय त्यांनी स्वतः, तसेच इतरांनी करून महर्षींचे आज्ञापालन केले.
२४.१०.२०१६
 प्रार्थना आणि नामजप करायला सांगणे
कु. दीपाली मतकर
१. दीपालीसाठी कार्तिकपुत्री सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ आणि उत्तरापुत्री सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी जास्तीत जास्त प्रार्थना कराव्यात. (त्याप्रमाणे त्या दोघी करत होत्या.)
२. रात्री ९ ते १२ पर्यंत पू. (डॉ.) ॐ उलगनाथन् हे स्वतः नामजपाला बसले.
२५.१०.२०१६
    दीपालीसाठी काही विधी रामनाथी आश्रमात करायला हवेत का ?, असे प.पू. डॉक्टरांनी महर्षींना विचारायला सांगितले. तेव्हा महर्षि म्हणाले, गुरूंच्या मनात असा विचार आला आहे, तर आम्ही तुम्हाला याविषयी निश्‍चित कळवू. लक्ष्मीपूजनापर्यंत (३०.१०.२०१६ पर्यंत) दीपाली जगली, तर ती पुढे जगेल. नाहीतर, तिच्या जगण्याविषयी काही सांगू शकत नाही.

साधकांना सूचना

       पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
दोन दिवसांपूर्वी अमावास्या झाली.

फलक प्रसिद्धीकरता

हिंदूंच्या धर्मभावना जाणीवपूर्वक 
दुखावणारे शरद यादव यांचा निषेध !
      भारतातील काही लोकांनी देवतांनाही जाती-जातींमध्ये विभागले आहे. भारतातील ३३ कोटी देवता भंंगारासारख्या फेकून देण्यायोग्य आहेत, असे हिंदुद्वेषी वक्तव्य जनता दल (संयुक्त)चे राष्ट्रीय अध्यक्ष शरद यादव यांनी केले.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Bharatke 33 karod devata Bhangar saman hai, unhe fek dena chahiye -Sharad Yadav, Adhyaksh, Janta Dal  
Dusre Dharmpar aisa bolne ka sahas Yadav karenge ?
जागो ! : भारत के ३३ करोड देवता भंगार समान हैं, उन्हें फेंक देना चाहिए ! - शरद यादव, अध्यक्ष, जनता दल 
दूसरे धर्म पर ऐसा बोलने का साहस यादव करेंगे ?

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
  • कुठे प्रत्येक क्षेत्रात सर्वोच्च स्तराचे ज्ञान देणारा हिंदु धर्म, तर कुठे बालवाडीप्रमाणे शिक्षण देणारे पाश्‍चात्त्य देश !
  • विज्ञान एकातरी क्षेत्रात धर्मशास्त्राच्या पुढे आहे का ?
        सर्वच क्षेत्रांत अशी स्थिती आहे. त्याचे एक उदाहरण येथे दिले आहे.
प्रारब्ध आणि देवाण-घेवाण हिशोब
        प्रारब्ध आणि देवाण-घेवाण हिशोब, असे काही असते, हेही पोलीस, वकील आणि न्यायाधीश यांना ज्ञात नसल्यामुळे त्यांच्याकडून न्याय नाही, तर अन्याय होतो, उदा. एखाद्या (पहिल्या) व्यक्तीने दुसर्‍या व्यक्तीचा गेल्या जन्मी खून केला असला, तर कधी या जन्मी दुसरी व्यक्ती पहिल्या व्यक्तीचा खून करते. अशा रितीने त्यांचा देवाण-घेवाण हिशोब पूर्ण होतो; मात्र हे ज्ञात नसल्यामुळे हल्लीची (अ)न्यायप्रणाली दुसर्‍या व्यक्तीला शिक्षा करते. अध्यात्मात प्रगती केलेल्यांना देवाण-घेवाण हिशोब कळत असल्यामुळे त्यांच्याकडून अन्याय होत नाही.
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान

जिसने पायो उसने छिपायो । 
वो नर सच्चा, वोही गुरुका बच्चा ।
भावार्थ : पायो म्हणजे आत्मानुभूती झाली. छिपायो म्हणजे आत्मानुभूती झाल्याचे कोणाला सांगितले नाही. (अर्थात ती शब्दांत सांगताही येत नाही.) गुरुका बच्चा म्हणजे गुरूचा खरा शिष्य. एखाद्याकडे अनमोल हिरा असला, तर तो काही सर्वांना त्याविषयी सांगत नाही. तसेच अनमोल आत्मानुभूती आलेला त्याविषयी कोणाला काही सांगत नाही. अहंभाव नसल्यामुळेच त्याला ती अनुभूती आलेली असते व म्हणूनच तो तिच्याविषयी बोलत नाही.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)
  ॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥ 
 ॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

साधकाचे शत्रू 
द्वेष, मत्सर आणि अहंकार हे साधकाचे प्रमुख शत्रू आहेत. 
त्यांच्यावर विजय मिळवला की, प्रगती झालीच ! 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)


-

आणखी किती सैनिक हुतात्मा होणार ?

संपादकीय 
     अलीकडे सीमेवर आपले शूर सैनिक हुतात्मा झाल्याचे वृत्त आले नाही, असा दिवस नाही. ही वृत्ते प्रत्येक राष्ट्रभक्ताचे मन अस्वस्थ करतात. भारताने सर्जिकल स्ट्राईक केल्याच्या दिवसापासून पाक चांगलाच चेकाळला आहे. २९ नोव्हेंबरला जम्मूतील नगरोटा येथील सैनिकी छावणीवर पाकपुरस्कृत आतंकवाद्यांनी आक्रमण केले. यात २ सैन्याधिकार्‍यांसह ५ सैनिक हुतात्मा झाले. पाकने गेल्या ७ दिवसांत केलेले हे ७ वे आक्रमण होते. नगरोटा येथील छावणी ही सैन्याच्या १६ व्या कोअरचे मुख्यालय आहे. या मुख्यालयावर झालेले आक्रमण हे पठाणकोट आणि उरी येथील आक्रमणांइतकेच मोठे होते. म्हणूनच ते तितकेच गांभीर्याने घेण्याची आवश्यकता आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn