Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कार्तिक दीपोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले !

नांगनूर येथे प.पू. प्रणालिंग स्वामी 
यांना हिंदु धर्म रत्न पुरस्कार प्रदान ! 

(मध्यभागी) प.पू. प्रणालिंग स्वामी यांना हिंदु धर्म रत्न पुरस्कार
प्रदान करतांना (डावीकडे) ह.भ.प. श्रीधर महाराज आणि (उजवीकडे) श्री. किरण दुसे

        नांगनूर (जिल्हा बेळगाव), २८ नोव्हेंबर (वार्ता.) - कार्तिक मासानिमित्त येथील ग्रामदैवत श्री अंबिका मंदिरात मोठ्या उत्साहात कार्तिक दीपोत्सव आणि विविध धार्मिक कार्यक्रम झाले. २० नोव्हेंबरला सायंकाळी ६.१५ वाजता विरुपाक्षलिंग समाधी मठाचे प.पू. प्रणालिंग स्वामी, ह.भ.प. श्रीधर महाराज, हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे आणि धर्माभिमानी श्री. राजेश आवटे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून दीपोत्सवाला प्रारंभ झाला. या वेळी येथील श्रीराम सेना आणि योग वेदांत सेवा समिती यांच्या वतीने प.पू. प्रणालिंग स्वामी यांना ह.भ.प. श्रीधर महाराज आणि श्री. किरण दुसे यांच्या हस्ते हिंदु धर्म रत्न हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
        राष्ट्र आणि धर्म रक्षणार्थ अहोरात्र झटणार्‍या मान्यवरांना येथील श्रीराम सेना आणि योग वेदांत सेवा समिती यांच्या वतीने प्रतीवर्षी हा पुरस्कार दिला जातो. त्याप्रमाणे प.पू. प्रणालिंग स्वामींना हा पुरस्कार देण्यात आला. शाल, श्रीफळ, मानपत्र, भगवद्गीता असे या पुरस्काराचे स्वरूप होते.

म्यानमार रोहिंग्या मुसलमानांचा वंशसंहार करण्याच्याच प्रयत्नात ! - संयुक्त राष्ट्रांचा आरोप

संयुक्त राष्ट्र संघाला पाकिस्तान आणि बांगलादेश येथील हिंदूंचा होत असलेला
वंशसंहार एवढ्या वर्षांत का दिसला नाही ? काश्मीरमध्ये हिंदूंचा झालेला वंशसंहार
कसा दिसला नाही ? त्यांना केवळ रोहिंग्या मुसलमानांचा वंशसंहार कसा दिसतो ? 
       टेकनॅफ (बांगलादेश) - म्यानमारमधून रोहिंग्या मुसलमानांचा वंशसंहार करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तेथे रोहिंग्या मुसलमानांशी मोठ्या प्रमाणात भेदभाव आणि दुर्व्यवहार केला जात आहे. त्यांच्या महिलांवर सामूहिक बलात्कार करण्याबरोबर हिंसाचार आणि हत्या यांतही वाढ झाली आहे, असा आरोप संयुक्त राष्ट्रांकडून करण्यात आला आहे.
       बांगलादेशच्या सीमेवरील शहर कॉक्स बाजारमधील संयुक्त राष्टांच्या शरणार्थी साहाय्यता यंत्रणेचे प्रमुख जॉन मॅककिसिस्क यांनी सांगितले की, म्यानमारचे सैन्य रोहिंग्या पुरुषांची गोळ्या झाडून हत्या करत आहे. मुलांनाही ठार केले जात आहे. महिलांवर बलात्कार केले जात आहेत. त्यांच्या घरांना लुटून आग लावण्यात येत आहे. त्यामुळे सहस्रो रोहिंग्या बांगलादेशमध्ये पळून येत आहेत.

बांगलादेशातील धर्मांधांपासून हिंदूंचे रक्षण करण्याची ट्रम्प यांच्याकडे मागणी !

  • अमेरिकेतील बांगलादेशी हिंदू बहुसंख्य हिंदूंचे प्रतिनिधित्व करणार्‍या भारत सरकारकडे नव्हे, तर ट्रम्प यांच्याकडे ही मागणी करतात ! याचा अर्थ भारत शासन नव्हे, तर ट्रम्प त्यांचे रक्षण करतील, याचा त्यांना विश्‍वास आहे !
  • न्यूयॉर्कमधील ट्रम्प टॉवरच्या बाहेर बांगलादेशी हिंदूंचे आंदोलन !
        न्यूयॉर्क - अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या येथील ट्रम्प टॉवर या इमारतीबाहेर बांगलादेशी हिंदूंनी २७ नोव्हेंबरला आंदोलन केले. बांगलादेशात हिंदूंवर जिहाद्यांकडून होणारे अत्याचार रोखण्यासाठी ट्रम्प यांच्याकडे या आंदोलनाद्वारे मागणी करण्यात आली. आंदोलनाचे आयोजन येथील बांगलादेशी वंशाच्या हिंदूंनी केले होते. आंदोलनानंतर ट्रम्प यांना निवेदन देण्यात आले. यात दिवाळीच्या वेळी बांगलादेशमधील ब्राह्मणबरीया आणि संताल येथील हिंदूंवरील आक्रमणाचा उल्लेख करण्यात आला आहे.
        आंदोलनाच्या आयोजकांपैकी एक असणारे सितांग्शु गुहा यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, आम्ही ट्रम्प यांना मतदान केले आहे आणि आम्ही त्यांना सांगू इच्छितो की, बांगलादेशमध्ये सातत्याने हिंदू आणि अन्य अल्पसंख्यांक यांवर अत्याचार होत आहेत. ते थांबवले जात नाहीत. आम्हाला वाटते की, ट्रम्प यांनी कार्यभार स्वीकारताच याविषयी पाऊल उचलावे.

पनवेलमध्ये संविधानदिनाला विरोध !

भाषण करतांना श्री. अजयसिंह सेंगर

देशात जाती आणि धर्म यांत 
विष कालवणारी व्यवस्था 
सर्वश्रेष्ठ कशी ? - अजयसिंह सेंगर
        पनवेल - भारतात मुसलमानांना वेगळे कायदे करून त्यांच्यासाठी चार पत्नी आणि त्यांना तलाक देण्याची सोय केली. ही बाब धर्मनिरपेक्ष राष्ट्रासाठी खेदजनक आहे. देश जातीयवाद आणि धर्मवाद याला तोंड देत आहे. कायदे सक्षम नसल्यामुळे समाज दोन भागांत विभागला गेला आहे. अशामुळे देशाचा विकास कसा होईल ? जाती आणि धर्म यांत विष निर्माण करणारी व्यवस्था सर्वश्रेष्ठ कशी, असा प्रश्‍न महाराणा प्रताप बटालियनचे अध्यक्ष श्री. ठाकुर अजयसिंह सेंगर यांनी उपस्थित केला. पनवेलमध्ये पृथ्वी सभागृह येथे संविधान निषेध सभा और विषमता दिन या कार्यक्रमात ते बोलत होते. यामध्ये संविधानाच्या मर्यादा सांगण्यात आल्या. या वेळी नेहरूंच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले.

विदेशात पळून गेलेल्या भारतियांना परत आणून त्यांच्यावर खटला चालवा ! - सर्वोच्च न्यायालय

कायदेशीर कारवाईपासून वाचण्यासाठी १०० जणांनी विदेशात पलायन करेपर्यंत 
प्रशासन काय करत होते ? त्यांना परत आणा, हेही न्यायालयाला का सांगावे लागते ?
     नवी देहली - कायदेशीर कारवाईपासून वाचण्यासाठी ज्या भारतियांनी परदेशात पलायन केले आहे, त्यांना पुन्हा भारतात आणून त्यांच्यावर खटला चालवण्यात यावा. यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेत पाऊले उचलावीत, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. १०० हून अधिक भारतीय पलायन करून विदेशात स्थायिक झाले आहेत. या पलायनाविषयी न्या. जे.एस्. खेहर आणि न्या. अरुण मिश्रा यांनी चिंता व्यक्त केली आहे. या पलायनवाद्यांना न्यायालयासमोर उपस्थित करण्यात यावे, असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

आणखी ४ ते ५ मास देशात नोटांचा तुटवडा जाणवेल !

चलन समस्येला समर्थपणे सामोरे जाण्यासाठी जनतेत राष्ट्रप्रेम निर्माण करणे 
आवश्यक आहे ! अशा राष्ट्रप्रेमी जनतेच्या बळावरच देशातील भ्रष्टाचार नष्ट करणे शक्य होईल !
बँक एम्प्लॉईज फेडरेशनची माहिती
     नवी देहली - देशातील चारही चलन निर्मिती केंद्रांनी पूर्ण क्षमेतेने नोटा सिद्ध करण्याचे काम केले तरीही बँकांना आवश्यक तेवढे चलन नजीकच्या काळात उपलब्ध होणे अवघड आहे. त्यामुळे आणखी ४ ते ५ महिने देशात नोटांचा तुटवडा जाणवेल, असे द बँक एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडियाने म्हटले आहे. एवढेच नव्हे, तर काही दिवसांनीच नोकरदार वर्गाचे वेतन जमा झाल्यावर बँकांच्या पुढील अडचणीत आणखीनच भर पडेल, असेही फेडरेशनने म्हटले आहे.
     बँक फेडरेशनचे सरचिटणीस पी.के. विश्‍वास म्हणाले, बँकांकडे पुरेशी रोकड नसल्यामुळेच लोकांमध्ये संताप आहे. ही समस्या सुटल्यावरच परिस्थिती सुरळीत होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबरच्या रात्री अचानक ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर जुन्या नोटा पालटण्यासाठी देशभरात लोकांचा एकच गोंधळ उडाला होता. या नवीन अडचणीमुळे तुर्तास बँकांसमोरील रांगा कायम राहील, असे चित्र दिसते.

स्विस बँकांमध्ये खाती असणार्‍या काही भारतियांची नावे मिळाली !

         नवी देहली - भारत सरकारला स्वित्झर्लण्डमधील बँकांमध्ये खाती असणार्‍या काही भारतियांची नावे मिळाली आहेत. यात शेअर मार्केटमध्ये ३ आस्थापने आहेत. तसेच रिअल इस्टेट आस्थापनाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी, देहलीत रहाणार्‍या माजी सरकारी अधिकार्‍याची पत्नी, दुबईत स्थायिक झालेला इनव्हेस्टमेंट बँकर, भारतातून पळून गेलेला व्यापारी अन् त्याची पत्नी आणि संयुक्त अरब अमिरातच्या एका आस्थापनाचा यात समावेश आहे. तसेच काही उद्योगपतींचीही नावे आहेत. काही वर्षांपूर्वी ते भारतात रहायचे; पण आता विदेशात स्थायिक झाले आहेत. या लोकांनी पनामा आणि ब्रिटीश व्हर्जिन आयलंडमधील आस्थापनांची नावे देऊन स्विस बँकेमध्ये खाती उघडली आहेत.
         गेल्या आठवड्यात भारत आणि स्वित्झर्लण्ड यांनी एका करारावर स्वाक्षरी केली होती. त्यामुळे २०१८ नंतर दोन्ही देशांतील खात्यांची सविस्तर माहिती दिली जाणार आहे. यापूर्वीही स्वित्झर्लण्डने काही खात्यांची माहिती भारताला दिली होती. या खात्यावरून संबंधितांवर कारवाई करण्यात आली होती.

बरेली (उत्तरप्रदेश) येथे उरूसच्या मिरवणुकीला हिंदूंच्या वस्तीतून नेण्यास विरोध करणार्‍या हिंदूंवर धर्मांधांची दगडफेक !

       उत्तरप्रदेशातील समाजवादी पक्षाच्या राज्यात हिंदूंची स्थिती काश्मीरच्या हिंदूंप्रमाणे झाली आहे ! केंद्रातील सरकारही त्याकडे पूर्वीच्या काँग्रेस सरकारप्रमाणेच दुर्लक्ष करत आहे, यासाठी हिंदु राष्ट्राचीच आवश्यकता आहे ! 
       बरेली (उत्तरप्रदेश) - येथे आला हजरत यांच्या उरूसमध्ये चादर चढवण्यासाठी काढण्यात आलेल्या मिरवणुकीचा नेहमीचा मार्ग पालटून ती हिंदूंच्या वस्तीतून काढण्याला आणि डिजे वाजवण्याला हिंदूंनी विरोध केल्यावर धर्मांधांकडून त्यांच्यावर दगडफेक करण्याची घटना घडली. प्रथम हिंदूंनी विरोध केल्यावर पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर मिरवणुकीचा नेहमीचा मार्ग अवलंबण्यात आला होता; मात्र त्या मार्गाच्या अर्ध्या वाटेत चिखल असल्याचे ती पुन्हा हिंदूंच्या वस्तीतून नेण्यात आल्यावर त्याला हिंदूंनी विरोध केल्यावर त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली. यात काही जण घायाळ झाले. त्यातील काहींना रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.
       पोलिसांनी ११ व्यक्ती आणि ४० अज्ञात यांच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट केला. या प्रकरणी प्रधान कृष्णपाल यादव यांच्यासहित ७ जणांना अटक करण्यात आली. सध्या येथे पोलीस दल तैनात करण्यात आले आहे. (दगडफेक करणार्‍या धर्मांधांना अटक करण्याऐवजी हिंदूंनाच अटक करणारे उत्तरप्रदेशातील हिंदुद्वेषी पोलीस ! - संपादक)

१० वर्षांत पाकची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होईल ! - पाकचे शिक्षणमंत्री मेहताब हुसेन यांची चेतावणी

पाकने भारताला त्रास देण्याचे न थांबवल्यास हुसेन 
यांची चेतावणी खरी ठरल्यास आश्‍चर्य वाटणार नाही !
     कराची - पाकची अर्थव्यवस्था येणार्‍या १० वर्षांत उद्ध्वस्त होईल आणि त्याची स्थिती ग्रीसच्या अर्थव्यवस्थेसारखी होईल, अशी चेतावणी पाकचे शिक्षणमंत्री मेहताब हुसेन यांनी दिली आहे. देशात मोठ्या प्रमाणात सामाजिक विषमता असून तिला त्वरित दूर करणे आवश्यक आहे, असेही हुसेन यांनी सांगितले.
      एक्सप्रेस ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन ट्रान्सफॉर्मिंग इकॉनॉमिक डेव्हलपमेंट मध्ये हुसेन म्हणाले, पाकमध्ये अतिशय आर्थिक विषमता आहे. समाज श्रीमंत आणि गरिब यांच्यात विभागला गेला आहे. पाक निरक्षरता, गरिबी, भ्रष्टाचार आणि प्रशासन यांच्याशी संबंधित आव्हानांशी लढत आहे. याचा परिणाम देशाच्या आर्थिक विकासावर होत आहे. अप्लाइड इकॉनॉमिक्स रिसर्च सेंटरच्या संचालिका प्राध्यापक समीना म्हणाल्या, पाक सामाजिक आणि आर्थिक वादळाकडे सरकत आहे. ज्यामुळे देशाची मोठ्या प्रमाणात हानी होईल. हे आथिर्र्क वादळ देशाची सध्याची अर्थव्यवस्था आणि भविष्य उद्ध्वस्त करील.









कायदेशीर कारवाईपासून वाचण्यासाठी १०० जणांनी विदेशात पलायन करेपर्यंत

प्रशासन काय करत होते ? त्यांना परत आणा, हेही न्यायालयाला का सांगावे लागते ?

विदेशात पळून गेलेल्या भारतियांना परत आणून त्यांच्यावर खटला चालवा ! - सर्वोच्च न्यायालय

नवी देहली - कायदेशीर कारवाईपासून वाचण्यासाठी ज्या भारतियांनी परदेशात पलायन केले आहे, त्यांना पुन्हा भारतात आणून त्यांच्यावर खटला चालवण्यात यावा. यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेत पाऊले उचलावीत, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. १०० हून अधिक भारतीय पलायन करून विदेशात स्थायिक झाले आहेत. या पलायनाविषयी न्या. जे.एस्. खेहर आणि न्या. अरुण मिश्रा यांनी चिंता व्यक्त केली आहे. या पलायनवाद्यांना न्यायालयासमोर उपस्थित करण्यात यावे, असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. 

व्यावसायिक ललित मोदी, विजय माल्या यांसारखे अनेक जण कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी देश सोडून विदेशात पळून गेले आहेत. यासंदर्भात बोलतांना न्यायालय म्हणाले, गेल्या काही कालावधीपासून प्रत्येक जण कायदेशीर कारवाईपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी पलायन करत असल्याचे आमच्या निदर्शनात आले आहे. अशा लोकांना देशात परत आणणे आवश्यक आहे. ज्यामुळे कायदा सर्वांसाठी सारखा आहे आणि कोणला सूट नाही, असा संदेश लोकांमध्ये जाईल.

व्यावसायिक हृतिका अवस्थी

यांना परत आणण्याचे न्यायालयाचे केंद्र सरकारला आदेश



भारतातून पलायन करून लंडनमध्ये वास्तव्यास असलेल्या व्यावसायिक हृतिका अवस्थी यांनाही परत आणण्यासाठी आवश्यक असलेले सर्व पर्याय वापरावेत, असा आदेश न्यायालयाने केंद्र सरकारला दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना लंडनमध्ये जाऊन त्यांच्या आजारी पतीला भेटण्याची अनुमती दिली होती; परंतु त्या पुन्हा परतल्या नाहीत. अवस्थी यांच्या विरोधात फौजदारी खटला दाखल आहे. त्यांनी कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जाण्यासाठी भारतात येण्यास नकार दिला होता. त्यांचा पासपोर्ट रहित करण्याचा न्यायालयाने आदेश दिला आहे.

(म्हणे) बंदीला मी कायदेशीर उत्तर देईन !

डॉ. झाकीर नाईक यांचा कांगावा 
      नवी देहली - सरकारने मला बाजू मांडण्याची संधी न देताच माझ्यावर बंदी लादली आहे. या बंदीला मी कायदेशीर उत्तर देईन, असा कांगावा आतंकवादाला खतपाणी घालण्याचा आरोप असलेल्या कथित मुसलमान तत्त्वचिंतक डॉ. झाकीर नाईक यांनी केला आहे.
     डॉ. नाईक म्हणाले, सरकारकडून मला कोणतीही सूचना देण्यात आली नाही, तसेत कोणताही समन्स देण्यात आला नाही, तसेच मला माझी बाजू मांडण्यासाठी संपर्क करण्यात आला नाही. यासाठी मी प्रयत्न केला; परंतु त्याला कोणीही ऐकून घेतले नाही. 
      अलिकडेच डॉ. झाकीर नाईक यांच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन या संस्थेवर ५ वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय तपास यंत्रणेने आतंकवाद विरोधी कायद्याच्या अंतर्गत प्रतिबंधित इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनचे संस्थापक डॉ. झाकीर नाईक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून मुंबईतील फाऊंडेशनच्या १० ठिकाणी छापा टाकला होता. त्याचबरोबर या संघटनेची सर्व बँक खातीही गोठवण्याचा निर्देश राष्ट्रीय तपास यंत्रणेने दिला होता.



अवैध मंदिरांवरील कारवाई थांबवण्यासाठी राज्य सरकारने पुनर्निरीक्षण याचिका प्रविष्ट करावी ! - श्री. मिलिंद एकबोटे

पुण्यातील अवैध मंदिरे पाडल्याचे प्रकरण
        पुणे, २८ नोव्हेंबर (वार्ता.) - गेल्या काही दिवसांत येथील कर्वेनगर भागातील काही मंदिरे अवैध म्हणून पाडण्यात आली. सरकारने प्रशासनाकडील अवैध मंदिरांच्या यादीचे पुन्हा एकदा निरीक्षण करावे. त्यासाठी सरकारने मंदिर पाडण्याचे अवैध प्रकार थांबवावेत. जशी अवैध घरे अथवा झोपड्या नियमित करता येतात, तशी मंदिरे नियमित करण्यासाठी शासनाने उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात पुनर्निरीक्षण याचिका प्रविष्ट करावी, असे प्रतिपादन समस्त हिंदू आघाडीचे श्री. मिलिंद एकबोटे यांनी केले. येथील पत्रकार भवनमध्ये २५ नोव्हेंबर या दिवशी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी जय हिंदुराष्ट्र समूहाचे अध्यक्ष सचिन वाडकर हे उपस्थित होते.
या वेळी श्री. मिलिंद एकबोटे यांनी मांडलेली सूत्रे -
१. औरंगजेबाने जेवढी मंदिरे पाडली नसतील, त्यापेक्षा अधिक मंदिरे सध्या प्रशासन पाडत आहे. अवैध मंदिरे म्हणून प्रशासनाने जी सूची सिद्ध केली आहे, त्यामध्ये वर्ष २००९ पूर्वीही बांधण्यात आलेल्या मंदिरांची सूची करण्यात आली आहे. तसेच त्यात अनेक पुरातन अशा मंदिरांचाही समावेश आहे.

अमेरिकेत हिजाब घातलेल्या महिलेला आतंकवादी संबोधले !

     जगभरात मुसलमान पोशाख घातलेल्या व्यक्तींना आतंकवादी संबोधले गेल्याच्या घटना पुन: पुन्हा घडतांना दिसून येतात. याला उत्तरदायी कोण आहे ? त्यांनी जिहादी आतंकवादाला पाठीशी न घालता आतंकवादाचा कठोरपणे विरोध करणे आवश्यक आहे, तेव्हाच अशा घटनांची पुनरावृत्ती टळेल !
     लॉस एन्जलिस - अमेरिकेत एका दुकानात एका महिलेला हिजाब (कापडाने डोळे सोडून तोंडवळा झाकणे) घातलेले पाहून अन्य एका ग्राहकाने तिला आतंकवादी संबोधले आणि देशाबाहेर जाण्यास सांगितले. केआरक्यूई वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार ही घटना मेक्सिकोमधील अल्बुकर्कच्या स्मिथ्स दुकानात घडली. अमेरिकेच्या अध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प आल्यावर हिजाब परिधान करणार्‍या महिलांना लक्ष्य केले जात असल्याचे म्हटले जाते.
     बर्नी लोपेज नावाच्या ग्राहकाने सांगितले, मी सोडा खरेदी करण्यासाठी खालच्या माळ्यावर गेलो असतांना अचानक मी एका महिलेला हिजाब घातलेल्या महिलेवर ओरडतांना बघितले. ती म्हणाली, आमच्या देशातून चालती हो, तू येथील नाही, तू आतंकवादी आहेस. लोपेजने सांगितले की, त्यावेळी सर्व लोक स्तब्ध झाले आणि हिजाब घातलेल्या महिलेच्या बचावासाठी धावले. स्मिथ्सच्या कर्मचार्‍यांनी त्या महिलेचे संरक्षण केले आणि तिला तिच्या कारपर्यंत सोडले. अमेरिकी दूरचित्रवाहिनीने स्मिथ्सच्या व्यवस्थापकाशी या घटनेविषयी विचारल्यावर त्यांनी याला पुष्टी दिली.

इसिसचा जिहादी आतंकवादी नील प्रकाशला पश्‍चिम आशियातून अटक

     न्यूयॉर्क - ऑस्ट्रेलियातील इसिसचा जिहादी आतंकवादी नील प्रकाशला पश्‍चिम आशियातील एका देशातून अटक करण्यात आली आहे. काही मासांपूर्वी अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया यांनी इराकमध्ये अमेरिकेच्या हवाई आक्रमणात आतंकवादी प्रकाश ठार झाल्याचा दावा केला होता. 
    प्रकाशचा जन्म ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे झाला होता. प्रकाशने वर्ष २०१२मध्ये बौद्ध धर्म सोडून मुसलमान धर्म स्वीकारला होता. वर्ष २०१३ ला इसिसमध्ये सहभागी झाल्यानंतर त्याला अबू खालिद अल् कंबोडीया नावाने ओळखण्यात येत होते. २५ वर्षीय नील प्रकाश ऑस्ट्रेलियाच्या तरुणांना इसिसमध्ये दाखल करण्याचे काम करत होता. वर्ष २०१५मध्ये ऑस्ट्रेलियाच्या फेडरल पोलिसांनी त्याच्या विरोधात अटक वारंट काढला होता. तो ऑस्ट्रेलियात अनेक आक्रमणांमध्ये सहभागी झाला होता. एका वरिष्ठ अमेरिका अधिकार्‍याच्या नुसार अमेरिकेच्या सैन्याने यावर्षी प्रकाशला लक्ष्य केले होते; परंतु तो या आक्रमणात घायाळ झाला होता.

चीनच्या मुसलमानबहुल प्रांतामध्ये त्यांच्या धार्मिक परंपरांची माहिती देण्याचे सरकारचे आदेश !

चीन मुसलमानांच्या धार्मिक प्रथा-परंपरांवर बंधने 
घालतो, तर भारत त्यांच्यासाठी सवलती पुरवतोे !
     पेइचिंग (चीन) - मुसलमानबहुल शिनचियांग प्रांतातील मुसलमानांच्या सर्व धार्मिक प्रथा-परंपरांची माहिती देण्याचे आदेश चीन सरकारने आधिकार्‍यांना दिले आहेत. यात मुसलमानांच्या खतना, विवाह, अंतिम संस्कार आदींचा समावेश आहे. 
    ग्लोबल टाइम्सच्या वृत्तानुसार उत्तर-पश्‍चिम चीनच्या शिनचियांग उइगर स्वायत्त क्षेत्रातील काही भागातील लोकांना त्यांच्या धार्मिक प्रथा-परंपरांविषयी स्थानिक समितींना माहिती देणे बंधनकारक करण्यात आले होते. आता हा नियम संपूर्ण शिनचियांग क्षेत्राला लागू करण्यात आला आहे. चीनचा कॅम्युनिस्ट पक्ष धर्माला मानत नाही आणि त्यांच्या सदस्यांनाही धार्मिक कार्यक्रमांपासून लांब रहाण्यास सांगते.

गर्भपाताच्या गुन्ह्याला क्षमा करण्याचापाद्य्रांकडील अधिकार कायम रहाणार ! - पोप फ्रान्सिस

    ज्या प्रमाणे कर्मे असतात, तसे त्यांचे फळ या जन्मात किंवा पुढच्या जन्मांत भोगायला मिळत असतात, यात ईश्‍वरही हस्तक्षेप करत नाही; मात्र साधना केली, तर ईश्‍वर मिळणार्‍या त्रासाची तीव्रता न्यून करतो किंवा ते भोगण्याची शक्ती देतो, असे हिंदु धर्मशास्त्र आहे. ख्रिस्त्यांचे अनेक पाद्री लैंगिक शोषणाच्या प्रकरणात अपकीर्त झालेले आहेत, अशांना एखाद्याच्या गुन्ह्यासाठी अपराध्याला क्षमा करण्याचा अधिकार कसा असेल ?
     नवी देहली - गर्भपाताच्या गुन्ह्याला क्षमा करण्याचा कॅथलिक पाद्य्रांकडे असलेला अधिकार तसाच कायम रहाणार आहे, असे स्पष्टीकरण पोप फ्रान्सिस यांनी केले आहे. हा अधिकार अनिश्‍चित काळासाठी वाढवण्यात आल्याचे पत्र पोप यांनी प्रसारित केले आहे.

राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात फटाक्यांच्या खरेदी-विक्रीवर सर्वोच्च न्यायालयाचा प्रतिबंध !

हा निर्णय केवळ देहलीपुरता सीमित न ठेवता देशभरातील 
जनतेचीच फटाक्यांमुळे होणार्‍या प्रदूषणातून सुटका करणे आवश्यक आहे !
फटाक्यांच्या खरेदी-विक्री संदर्भातील सर्व अनुज्ञप्ती निलंबित करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्देश !
     नवी देहली - सर्वोच्च न्यायालयाने देहलीसह राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील सर्व फटाके विक्रेत्यांच्या अनुज्ञप्ती पुढील आदेशापर्यंत निलंबित केल्या आहेत. न्यायालयाच्या या आदेशामुळे फटाक्यांची खरेदी आणि विक्री यांच्यावर एकप्रकारे प्रतिबंध लावण्यात आला आहे. पुढील आदेश मिळेपर्यंत कोणत्याही परवान्यांचे नुतनीकरण करण्यात येऊ नये, असा निर्देश न्यायालयाने केंद्र सरकारला दिला आहे, तसेच न्यायालयाने केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाला या पटाक्यांमधील घटकांच्या दुष्परिणामाचा अभ्यास करून ६ मासांच्या आत अहवाल सादर करण्याचाही निर्देश दिला आहे.

...तर काश्मीरमधून आतंकवादी आणि देशद्रोही यांचे अस्तित्व नष्ट होईल ! - श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती

भारत रक्षा मंचाच्या तिरंगा यात्रेद्वारे उज्जैनमध्ये जनजागृती
जनजागृती यात्रेला संबोधित
करतांना श्री. रमेश शिंदे
     उज्जैन, २८ नोव्हेंबर (वार्ता.) - काश्मीरचे हिंदू आता एकटे नाहीत, त्यांच्या सोबत देशातील १०० कोटी हिंदू आहेत. आज अमरनाथच्या यात्रेला हिंदूंची एवढी गर्दी होते, उद्या सर्व हिंदूंनी अमरनाथकडे कूच केले, तर काश्मीरमधून आतंकवादी आणि देशद्रोही यांचे अस्तित्व नष्ट होईल, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे यांनी केले. 
     देशात बांगलादेशी घुसखारी थांबवण्यासाठी आणि काश्मिरी हिंदूंचे पूनर्वसन करण्यासाठी भारत रक्षा मंचाच्या वतीने तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेच्या निमित्ताने उज्जैन येथे जनजागृतीसाठी नुकतीच एक वाहन फेरी काढण्यात आली या वाहन फेरीचा प्रारंभ नागझिरी येथून होऊन कंठाल येथे समारोप करण्यात आला. या वेळी श्री. शिंदे बोलत होते. यात्रेचा प्रारंभ ग्वाल्हेरपासून झाला असून समारोप २७ नोव्हेंबरला शहीद भवन, भोपाळ येथे होणार आहे.



देशभरातील पीस स्कूलंवर बंदी घालावी !

वाराणसी येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन
आंदोलन करतांना हिंदु धर्माभिमानी 
     वाराणसी - बंगालमध्ये हिंदूविरोधी दंगली करणारे आणि हिंदूंवर अत्याचार करणार्‍या धर्मांधांवर केंद्रशासनाने त्वरीत कारवाई करावी, आतंकवाद आणि धर्मांतराला प्रोत्साहन देणारे आणि धर्मांतर करणारे डॉ. झाकीर नाईक यांच्यावर कठोर कारवाई करावी, देशभरातील पीस स्कूलच्या सर्व विद्यालयांवर बंदी घालावी, तसेच कर्नाटक आणि केरळ येथील हिंदु नेत्यांच्या हत्या प्रकरणांचा संपूर्ण तपास न करणे आणि दोषींवर कारवाई न करणे यांच्या विरोधात २४ नोव्हेंबरला वाराणसी येथील शास्त्रीघाट, वरुणापुल येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये इंडिया विथ विझडम्, हिंदु युवा वाहिनी, हिंदु शक्ती सेना, भारत विकास परिषद, सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांसह अन्य धर्माभिमानी हिंदुत्वनिष्ठ कार्यकत्यांनी सहभाग घेतला.

अघोषित संपत्तीवर ७५ टक्के कर आणि १० टक्के दंड बसणार !

आयकर कायद्यात पालट 
करण्याचा प्रस्ताव संसदेत सादर !
         नवी देहली - २८ नोव्हेंबरला केंद्र सरकारने संसदेत आयकराच्या कायद्यात पालट करणारा प्रस्ताव सादर केला. या प्रस्तावानुसार ५०० किंवा १ सहस्र रुपयांच्या जुन्या नोटांद्वारे बँकेत काळा पैसा जमा केल्यास त्यावर ३० टक्के कर, १० टक्के दंड आणि ३३ टक्के अधिभार लावण्यात येईल. हा अधिभार पंतप्रधान गरीब कल्याण योजनेत जमा होईल. नोटाबंदीच्या प्रक्रीयेच्या कालावधीत अघोषित रकमेविषयी योग्य खुलासा न करणार्‍यांवर ७५ टक्के कर आणि १० टक्के दंड लावण्यात येणार आहे.
         या कायद्यानुसार परिवारातील सर्व सदस्यांच्या खात्यांची चौकशी केली जाणार आहे. जर८ नोव्हेंबरनंतर अडीच लाखांच्या मर्यादेपेक्षाअधिक किंवा तितकीच एकूण रक्कम या सर्वखात्यांमध्ये भरली गेली असेल, तर त्याचीहीचौकशी करण्यात येणार आहे. याविषयी योग्य खुलासा न केल्यास ४० टक्के कर आणि ३३ टक्के दंड भरावा लागणार आहे.

खांडवा (मध्यप्रदेश) येथे सिमीच्या आतंकवाद्यांच्या कबरीवर शहीद लिहिलेला शिलालेख काढला !

शिलालेख पुन्हा लावला जाणार 
नाही, यासाठी पोलीस आणि प्रशासन काय 
काळजी घेणार आहे, हे त्यांनी सांगितले पाहिजे !
         खांडवा (मध्यप्रदेश) - येथे सिमीच्या ५ आतंकवाद्यांच्या कबरीवर धर्मांधांकडून शहीद म्हणून लावण्यात आलेला शिलालेख हटवण्यात आला आहे. भोपाळ येथील कारागृहातून काही आठवड्यांपूर्वी ८ आतंकवाद्यांनी पलायन केले होते. त्यांना काही घंट्यातच पोलिसांनी चकमकीत ठार केले होते. त्यातील ५ आतंकवादी खांडवा येथील होते. त्यांचे मृतदेह येथे दफन करण्यात आले होते; मात्र काही धर्माधांनी त्यांची कबर बांधून तेथे ते शहीद असल्याचा उल्लेख करणारा शिलालेख लावला होता. याविषयीच्या तक्रारीनंतर प्रशासनाने प्रथम त्यावर चुना लावून लपवण्याचा प्रयत्न केला; मात्र दुसर्‍या दिवशी धर्मांधांनी चुना काढून टाकला होता. (शिलालेखावर चुना का लावण्यात आला ? तो पहिल्यांदाच का हटवण्यात आला नाही ? - संपादक) हे लक्षात आल्यावर प्रशासनाने मुसलमान धर्मगुरु आणि आतंकवाद्यांचे नातेवाईक यांच्या उपस्थितीत हा शिलालेख हटवला. (प्रशासनाने थेट कारवाई करून तो का हटवला नाही ? धर्मगुरु आणि नातेवाईक यांना बोलावण्यामागे काय उद्देश होता, हे त्यांनी स्पष्ट केले पाहिजे ! - संपादक) शिलालेख लावण्याच्या प्रकाराची पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे. (कबरीवर शिलालेख कोणी लावला हे शोधण्यासाठीही काही दिवस घेणारे पोलीस आतंकवाद्यांना कसे शोधणार ? - संपादक)

नगरपरिषदा आणि नगरपंचायती यांच्या निवडणुकीत भाजप-शिवसेनेची मुसंडी !

राज्यात भाजप क्रमांक १ वर 
     मुंबई, २८ नोव्हेंबर - राज्यातील मिनी विधानसभा म्हणून गणल्या गेलेल्या १४७ नगरपरिषदा आणि १८ नगरपंचायती यांचे निकाल लागले असून गत निवडणुकांच्या तुलनेत भाजप-शिवसेना महायुतीने राज्यात जोरदार मुसंडी मारली आहे. राज्यात अनेक नगरपालिकांत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे गड ढासळले आहेत. या वेळी नगराध्यक्षपदाची निवडणूक थेट झाली होती, यात सगळ्यात अधिक भाजपचे ५२ नगराध्यक्ष निवडून आले आहेत. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा भाजप ५१, शिवसेना २५, काँग्रेस २४, राष्ट्रवादी काँग्रेस १४, तर इतर स्थानिक आघाड्या २८ नगरपरिषदांमध्ये विजयी झाल्या आहेत. 

नोटाबंदीच्या निर्णयाच्या निषेधार्थ रा.स्व. संघाचे ज्येष्ठ प्रचारक पद्मकुमार माकपमध्ये प्रवेश करणार !

         एखाद्याने गाय मारली म्हणून आपण वासरू मारणार, अशा प्रकारचा निर्णय घेणारे संघाचे ज्येष्ठ प्रचारक ! माकपचा इतिहास पाहिला, तर नोटाबंदीमुळे होणार्‍या त्रासापेक्षा सहस्रो पटींनी जनेतला, विशेषतः हिंदूंना त्रास देण्याचे कार्य त्यांनी केले आहे, हे पद्मकुमार यांना लक्षात का येत नाही ?
         थिरुवनंतपुरम् (केरळ) - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते पद्मकुमार यांनीकेंद्र सरकारच्या नोटाबंदी निर्णयाच्या निषेधार्थ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात प्रवेश करणार असल्याची घोषणा एका पत्रकार परिषदेत केली. गेल्या ४२ वर्षांपासून ते संघात सक्रिय होते आणि विविध पदांवर त्यांनी काम केले. पद्मकुमार म्हणाले की, नोटाबंदीच्या निर्णयाने मला धक्का बसला. या निर्णयाने मी हताश झालो आहे. या निर्णयामुळे सामान्यांची मोठी गळचेपी झाली. वयाच्या १० व्या वर्षांपासून संघाचे काम करत आहोत; परंतु प्रथमच माझ्या पदरी निराशा पडली आहे. नोटाबंदीने केरळातील नागरिकांची होत असलेली घुसमट मी पहात आहे. ते सहन करण्यापलीकडचे आहे. त्यामुळे मला माकपमध्ये जाण्याची इच्छा आहे. मागील चुकांसाठी मी क्षमा मागतो.

पळालेला खलिस्तानी आतंकवादी हरमिंदरसिंह मिंटू याला देहलीत अटक !

     नवी देहली - पंजाबच्या पतियाळ येथील नाभा कारागृहावर १० खलिस्तानी आतंकवाद्यांनी पोलिसांच्या वेशात येऊन आक्रमण करून कारागृहातून पळवून नेलेला खलिस्तान लिबरेशन फोर्सचा प्रमुख आतंकवादी हरमिंदरसिंह मिंटू याला देहलीमध्ये अटक करण्यात आली आहे. कैद्यांना पळून जाण्यास साहाय्य करणार्‍यांपैकी परमिंदरसिंह याला पोलिसांनी उत्तरप्रदेशमधून अटक केली. परमिंदरच्या चौकशीअंती पोलिसांनी हरमिंदरसिंह मिंटू याला अटक केली. परमिंदरकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रे जप्त करण्यात आली. हरमिंदरबरोबर पळालेल्या गुरप्रीत सिंह, विक्की डोंगरा, नितिन देओल, विक्रमजीत सिंह आणि विक्की या ५ कैद्यांचा अद्याप शोध चालू आहे.

नेपाळच्या सीमेवरून जिहादी आतंकवादी साधूंच्या वेशात भारतात घुसण्याच्या सिद्धतेत !

भारताने सीमेवर सतर्कता वाढवण्याऐवजी 
आतंकवादाचा कायमचा नाश कसा होईल, यासाठी प्रयत्न केला पाहिजे ! 
     नवी देहली - उत्तराखंड आणि उत्तरप्रदेश या राज्यांना लागून असलेल्या नेपाळच्या सीमेवरून २०-२५ जिहादी आतंकवादी साधूंचा वेश करून भारतात घुसण्याच्या सिद्धतेत असल्याची माहिती मिळाली आहे. या माहितीनंतर सीमेवर सतर्कता वाढवण्यात आली आहे. सशस्त्र सीमा दलाचे सैनिक दिवसरात्र आतंकवाद्यांचा शोध घेत आहेत. भारत-पाक सीमेवर कडक सुरक्षा व्यवस्था असल्याचे ते या मार्गाने घुसण्याचा प्रयत्न करू पहात आहेत, अशी माहिती मिळाली आहे.

काँग्रेस पक्षाचे नेतृत्व सक्षम नसल्याची नारायण राणे यांची टीका

     मुंबई, २८ नोव्हेंबर - काँग्रेस पक्षात गुणवत्तेऐवजी पैसे घेऊन वशिल्याने पदे वाटली जातात. यामुळे चांगले कार्यकर्ते मिळत नाहीत, तसेच काँग्रेस सरकारविरुद्ध पूर्णपणे आक्रमक होऊ शकत नाही. प्रदेश नेतृत्व पुरेसे गंभीर नाही. पक्षाचे नेतृत्वही सक्षम नाही. कार्यकर्ते असले तरी उदासिन नेत्यांमुळे काँग्रेसला नोटाबंदी आणि मराठा मोर्चा या सूत्रांचा उपयोग करून घेता आला नाही. या स्थितीमुळे पक्षाला निर्भेळ यश मिळणे कठीण आहे, अशी टीका काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी केली. वेंगुर्ला आणि सावंतवाडी नगरपालिकेची निवडणूक जिंकल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

पन्हाळा नगरपालिकेवर भाजप, तर मुरगूड नगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता !

     कोल्हापूर, २८ नोव्हेंबर (वार्ता.) - कोल्हापूरमध्ये जनसुराज्य पक्षाच्या मदतीने भाजपने पहिली नगरपालिका जिंकली आहे. येथील पन्हाळा नगरपरिषद जनसुराज्य पक्षाने जिंकली आहे. नगराध्यक्ष पदासह १२ जागा जनसुराज्य पक्षाने जिंकल्या आहेत. श्रीमती रूपाली धडेल यांची पन्हाळ्याच्या नगराध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. सरासरी ७० टक्के मतदान झाले होते.

लाच घेतांना महिला पोलीस हवालदाराला पकडले !

आता लाचखोरीतही 
महिला पुढे असे म्हणायचे का ?
         इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर), २८ नोव्हेंबर (वार्ता.) - येथील रहिवासी आणि तक्रारदार श्री. महावीर मंजाळी (वय ४६ वर्षे) यांना त्यांची हरवलेली दुचाकी परत देण्यासाठी त्यांच्याकडून १ सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना गावभाग पोलीस ठाण्यातील महिला पोलीस हवालदार प्रभावती सावंत (रा. जयसिंगपूर) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी अटक केली. २६ नोव्हेंबरला तात्यासाहेब मुसळे हायस्कूल येथील पोलीस बुथवर ही कारवाई करण्यात आली. २५ नोव्हेंबरला सकाळी १० वाजता सारथी उपाहारगृहासमोरून श्री. मंजाळी यांची दुचाकी चोरीला गेली होती. नंतर त्याचदिवशी सायंकाळी ५ वाजता ही दुचाकी काळा ओढा येथे सापडली होती.

इसिसमध्ये भरती झालेल्या कल्याणमधील आणखी एका तरुणाचा मृत्यू

       कल्याण - मे २०१४ मध्ये कल्याणमधून ४ तरुण इसिस या जिहादी आतंकवादी संघटनेत भरती झाले होते. त्यांपैकी अमान तांडेल याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. इराकवर सध्या चालू असणार्‍या हवाई आक्रमणात या तरुणाचा मृत्यू झाल्याचे समोर येत आहे. २६ नोव्हेंबरला रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास या तरुणाच्या कुटुंबियांना तुर्कीहून भ्रमणभाष आला होता. त्या वेळी भ्रमणभाषवरील संबंधित व्यक्तीने त्याच्या वडिलांशी आरंभी इतर बोलणी करून नंतर तुमचा मुलगा हवाई आक्रमणात मारला गेला आहे असे सांगून लगेच भ्रमणभाष ठेवून दिला. एका तरुणाचा मृत्यू मागील वर्षीच झाला होता.
       अमान हा इसिसचा कमांडर होता आणि त्याच्यावर भारतावर आक्रमण करण्याचे दायित्व होते.
       इसिसमध्ये सहभागी झालेल्या युवकांना मृत घोषित केल्याने पोलीस आणि अन्वेषण यंत्रणांच्या चौकशीचा ससेमिरा पाठी लागत नाही. असे असल्यामुळे मृत घोषित केले जात आहे कि काय, अशीही चर्चा आहे.

मुंबई विमानतळावर २ कोटी रुपयांचे सोने अन् ७.५० लाखांची रक्कम शासनाधीन !

सोनेतस्करीची घटना म्हणजे सुरक्षायंत्रणेचे अपयशच ! 
     मुंबई - येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर अवैधरित्या २ कोटी किमतीचे सोने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर २६ नोव्हेंबरला रात्री पोलिसांनी शासनाधीन केले. या प्रकरणी रायपूर येथील नवरत्न गोलेचा या प्रवाशाला अटक केली असून त्याच्याकडून सोन्यासह ७.५० लाख रुपयांची रक्कमही मिळाली आहे. यासंदर्भात पोलीस ठाण्यात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला असून आरोपीला ९ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. 

घोटाळेबाज अंनिसवर बंदी घालण्याच्या संदर्भात अन्न आणि नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांना निवेदन

श्री. गिरीश बापट (उजवीकडे) यांना निवेदन देतांना समितीचे कार्यकर्ते
     पुणे, २८ नोव्हेंबर (वार्ता.) - अंधश्रद्धा निर्मूलनाच्या नावाखाली समाजाला नास्तिकतेकडे नेणार्‍या अंनिसचा भ्रष्ट चेहरा सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती, तसेच हिंदु विधीज्ञ परिषद यांनी उघडा पाडला होता. अंनिसविरोधात करण्यात आलेल्या तक्रारींची नोंद घेत सातारा येथील सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाच्या अधीक्षकांनी चौकशी अहवालामध्ये अंनिसवरील आर्थिक घोटाळ्यांच्या आरोपांमध्ये तथ्य असल्याचे नमूद करून अंनिसवर प्रशासक नेमावा असे सूचित केले होते. नुकतेच केंद्रीय गृहमंत्रालयानेही अंनिसची एफ्सीआर्ए नोंदणी रहित केली होती. या पार्श्‍वभूमीवर घोटाळेबाज अंनिसची सखोल चौकशी करून बंदी घालण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन अन्न आणि नागरी पुरवठामंत्री, तसेच पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांना देण्यात आले. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री दीपक आगवणे आणि गजानन केसकर उपस्थित होते. 

सोलापूर येथील हिंदु धर्मजागृती सभेच्या यशस्वीतेसाठी आयोजित बैठकीत ५५ धर्माभिमान्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

श्री. सुनील घनवट यांचे मार्गदर्शन ऐकतांना धर्माभिमानी
     सोलापूर, २८ नोव्हेंबर (वार्ता.) - येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ४ डिसेंबर या दिवशी घेण्यात येणारी हिंदु धर्मजागृती सभा यशस्वी करण्यासाठी साखरपेठ येथील हिंगुलआंबिका मंदिरात बैठकीचे आयोजन करण्यात आले. या वेळी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांसह ५५ धर्माभिमानी उपस्थित होते. अनेकांनी सभेला पाठिंबा देऊन सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले. या वेळी अनेक धर्माभिमान्यांनी मनोगत व्यक्त केले. धर्मसभेच्या प्रसाराविषयी रणरागिणी शाखेच्या सौ. अलका व्हनमारे यांनी माहिती दिली. 

सौंदत्ती (जिल्हा बेळगाव) यात्रेसाठी २४ घंटे पाणी पुरवावे; वाहनांची अडवणूक करू नये ! - श्री रेणुकाभक्तांचे बेळगाव जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

         कोल्हापूर, २८ नोव्हेंबर (वार्ता.) - श्री रेणुकादेवीचे भक्त येत्या १० ते २३ डिसेंबर या दिवशी कर्नाटकातील सौंदत्ती यात्रेला जाणार आहेत. जिल्हा प्रशासनाने भूमीअभावी कुंड येथे पाण्याची व्यवस्था करावी. भक्तांसाठी पिण्याचे पाणी पुरवावे. तसेच कोल्हापूरहून येणार्‍या वाहनांची अडवणूक करू नये आदी मागण्या श्री रेणुकाभक्त संघटनांनी बेळगाव येथील जिल्हाधिकारी एन्. जयराम यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
         कोल्हापूर येथील श्री रेणुकाभक्त सहस्रोंच्या संख्येने डिसेंबर मासात यात्रेसाठी सौंदत्ती येथे येतात. गेल्या वर्षी जिल्हा प्रशासनाने सौंदत्ती डोंगरावर भाविकांची चांगली व्यवस्था केली होती. त्याचप्रमाणे यंदाही सुविधा द्या. यल्लम्मा डोंगरावर जुन्या पथकर नाक्याजवळ वाहनांची अडवणूक केली जाते; मात्र सर्व भाविकांना एकाच ठिकाणी रहाण्याची व्यवस्था करावी. तसेच कायमस्वरूपी भूमी द्यावी, अशी मागणी भक्तांनी या वेळी केली आहे. या वेळी जिल्हाधिकारी एन्.जयराम यांनी कोल्हापूरच्या भक्तांना अडचण येणार नाही. सर्व सुविधा देण्यात येतील, असे आश्‍वासन दिले.

कोट्यवधींचा कर थकवल्यामुळे बंद केलेले एस्एम् -५ मल्टीप्लेक्स चालूच !

        कल्याण, २८ नोव्हेंबर (वार्ता.) - ३ कोटी ६० लक्ष रुपयांचा मालमत्ता कर थकवल्याने महापालिकेने बंद केलेले एस्एम्-५ मल्टिप्लेक्स मागच्या दाराने मात्र राजरोसपणे चालू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पालिकेने २३ नोव्हेंबरला हे मल्टिप्लेक्स सील करण्याची कारवाई केली; मात्र त्याला मल्टिप्लेक्स प्रशासनाकडून केराची टोपली दाखवण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे. (याविषयी महापालिका प्रशासन दुर्लक्ष का करत आहे ? - संपादक)

राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या महिला महाअधिवेशनात मनुस्मृतीचे दहन !

  • ग्रंथ जाळल्याने त्यातील तेजस्वी विचार कधीही नष्ट होत नाहीत, हेही न कळणारे हिंदुद्वेष्टे ! आजपर्यंत हिंदुद्वेष्ट्यांनी अनेकदा मनुस्मृति जाळली; पण तिचे महत्त्व उत्तरोउत्तर वाढतच गेले, हे लक्षात घ्यावे ! 
  • विचारांचा प्रतिवाद विचारांनी न करता जाळपोळीचा मार्ग अवलंबणारे हिंदुद्वेष्टे ! त्यांची ही कृती असहिष्णुताच नव्हे का ? सरकार दोषींवर काय कारवाई करणार आहे ? 
  • प्राचीनतम हिंदु धर्माचे महत्त्व लक्षात घेऊन आज सर्व जग भारताकडे आशेने पहात आहे. त्यामुळे इंग्रज-निर्मित जातीद्वेषी राजकारणाची री ओढणार्‍यांनी स्वार्थ सोडून देऊन स्वहित आणि राष्ट्रहित साधावे ! 

     नागपूर - राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने धनवटे नॅशनल महाविद्यालयाच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात राज्यस्तरीय महिला महाधिवेशनात सहभागी झालेल्या महिलांकडून मनुस्मृति या हिंदूंच्या मार्गदर्शक धर्मग्रंथाचे दहन करण्यात आले. 

अभिनेता अक्षय कुमार यांच्या 'टॉयलेट : एक प्रेमकथा' चित्रपटाचे चित्रीकरण न थांबवल्यास आत्महत्या करण्याची महंतांची धमकी !

     मथुरा - 'टॉयलेट : एक प्रेम कथा' या चित्रपटाचे मथुरा आणि वृंदावन येथे चालू असलेले चित्रीकरण १ डिसेंबरपर्यंत थांबवले गेले नाही, तर आमरण उपोषण करून आत्महत्या करू, अशी धमकी चतुर्संप्रदायाचे महंत फूलडोल महाराज यांनी दिली आहे. या चित्रपटाच्या शीर्षकाला विरोध केला जात आहे. तसेच बरसाना अन् नंदगाव यांच्यात वैवाहिक संबंध जोडले जात नसतांना या चित्रपटात तसे संबंध दाखवण्यात आले आहेत, यालाही विरोध होत आहे. यामुळे चित्रपटाचे दिग्दर्शक नारायण सिंह यांची जीभ कापणार्‍यास १ कोटी रुपयांचे बक्षीसही घोषित करण्यात आले आहे. काही लोकांनी येथील खासदार हेमामालिनी यांना निवेदन देऊन चित्रीकरण बंद करण्याची मागणी केली आहे. हेमामालिनी यांनी म्हटले आहे की, मी लवकरच अभिनेता अक्षय कुमार यांच्याशी या विषयावर चर्चा करून वाद मिटवण्याचा प्रयत्न करीन.

आरोप निश्‍चिती पुढे ढकलण्याचा केंद्रीय अन्वेषण यंत्रणेचा अर्ज न्यायालयाने पुन्हा फेटाळला !

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण ! 
 यंत्रणेला शेवटची संधी देत पुढील सुनावणी ९ डिसेंबरला ! 
     पुणे, २८ नोव्हेंबर - डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणातील संशयित आरोपी सनातनचे डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांच्यावरील आरोप निश्‍चितीची सुनावणी ३ मास पुढे ढकलावी, असा विनंती अर्ज केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने न्यायालयात पुन्हा सादर केला. येथील जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश पी.वाय. लाडेकर यांनी हा अर्ज फेटाळून लावत आरोप निश्‍चितीची सुनावणी ९ डिसेंबर या दिवशी ठेवली. २८ नोव्हेंबर या दिवशी उपरोक्त प्रकरणाची सुनावणी झाली, त्या वेळी यंत्रणेचे शासकीय अधिवक्ता मनोज चालाडे, डॉ. तावडे यांचे अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर आणि यंत्रणेचे अधिकारी एस्.आर्. सिंग उपस्थित होते. या सुनावणीला डॉ. तावडे यांनाही उपस्थित करण्यात आले होते. या पूर्वी २६ ऑक्टोबर, १६ नोव्हेंबर या दोन्ही दिवशी झालेल्या सुनावणीच्या वेळी आरोप निश्‍चितीची सुनावणी पुढे ढकलत असल्याच्या कारणावरून न्यायालयाने तपास यंत्रणेला अत्यंत कडक शब्दांत फटकारले होते.

गुन्ह्यांच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात घट !

  • नोटाबंदीच्या सकारात्मक परिणामांविषयी अन्य राजकीय पक्षांना काय म्हणायचे आहे ?
  • नोटाबंदीचे प्रकरण
        मुंबई - नोटाबंदीमुळे गुन्हेगारी जगताला फटका बसला असून गेल्या २० दिवसांत गुन्ह्यांच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

वर्धा येथे राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या गाडीतून रोख ३ लक्ष ३६ सहस्र रुपये कह्यात

        वर्धा, २८ नोव्हेंबर - येथील राष्ट्रवादीचे उमेदवार सुधीर कोठारी यांच्या गाडीतून ३ लक्ष ३६ सहस्र रुपये शासनाधीन करण्यात आले. या रकमेमध्ये सर्व ५०० च्या जुन्या नोटा आहेत. पोलिसांनी रात्री दीड वाजता नाकाबंदीच्या वेळी ही कारवाई केली. ही कारवाई चालू असतांना सुधीर कोठारी यांनी पोलिसांसमक्ष पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी हे प्रकरण निवडणूक निर्णय अधिकार्‍याकडे सोपवले आहे. या नोटांचा वापर निवडणुकीच्या कालावधीत लोकांना वाटण्यासाठी होत असल्याचे बोलले जात आहे; मात्र रक्कम गाडीत सापडल्याने गुन्हा प्रविष्ट झालेला नाही. चौकशीनंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे कळते.

तपासयंत्रणेने एखाद्या पिस्तुलात नवीन गोळ्या घालून त्या वापरून पिस्तुल-गोळ्यांचा संबंध दाखवल्यास आश्‍चर्य वाटणार नाही !

पिस्तूल आणि गोळ्या स्कॉटलॅण्ड यार्डला 
तपासासाठी द्याव्या लागतात, हे भारतासाठी लज्जास्पद !
        डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणाचा तपास कधी संपणार ? केंद्रीय अन्वेषण यंत्रणा (सीबीआय) तपासामध्ये वेळकाढूपणा करून न्यायालयाचा वेळ घालवत आहे. सीबीआय गुन्हेगारांना पकडू शकत नाही, हे खेदजनक आहे. हा प्रश्‍न एका कुटुंबाचा नसून समाजाचा आहे. त्यामुळे १६ डिसेंबरला होणार्‍या पुढील सुनावणीच्या वेळी केंद्रीय अन्वेषण यंत्रणेच्या सहसंचालकांनी तपासाच्या अहवालासह उपस्थित रहावे, असा आदेश देत मुंबई उच्च न्यायालयाने यंत्रणेला फटकारले. स्कॉटलॅण्ड यार्ड येथे पडताळणीसाठी पिस्तुल आणि गोळ्या पाठवल्यावर त्याचा अहवाल अद्याप प्राप्त झाला नसल्याचे कारण सांगून तपास यंत्रणा हे प्रकरण पुढे पुढे ढकलत आहे.

पुरोगाम्यांची बडदास्त !

लेखक बी. जयामोहन यांचा परिचय
 श्री. बी. जयामोहन
     कन्याकुमारी, तमिळनाडू येथील बी. जयामोहन यांचे तमिळ आणि मल्याळम् या दोन्ही भाषांवर प्रभुत्व असून ते श्रेष्ठ साहित्यिक आणि समीक्षक आहेत. त्यांची गाजलेली साहित्यिक कृती विष्णूपुरम् यात त्यांनी भारतीय तत्त्वज्ञानाचा आणि पौराणिक वास्तवाचा सखोल शोध घेतला आहे. त्यांची एक श्रेष्ठ साहित्यिक कृती म्हणजे वेन्मुरसु अर्थात् महाभारताचे आधुनिक पुनर्वर्णन ! त्यांच्या अनेक कादंबर्‍या लोकप्रिय ठरल्या आहेत.
     वस्तुस्थिती काहीही असो, आम्ही म्हणू तेच सत्य !, अशा भ्रमात वावरणार्‍या आणि आपले मत जनतेच्या गळी उतरवण्यासाठी आटापिटा करणार्‍या पुरोगामी मंडळींना देशाने अनेकवेळा पाहिले अन् अनुभवले आहे. त्याचे सध्याच्या काळातील ज्वलंत उदाहरण म्हणजे दादरी हत्याकांड आणि प्रा. कलबुर्गी यांच्या हत्येनंतर पुरो(अधो)गाम्यांकडून देशातील बहुसंख्यांक अर्थात् हिंदु समाज असहिष्णू झाला आहे, अशी आरोळी ठोकून पुरस्कार वापसीचे नाटक करण्यात येणे ! सदर लेखातून अशा पुरो(अधो)गाम्यांची रहाणी, त्यांच्याकडून सरकारी सोयीसुविधांचा होत असलेला गैरवापर अन् सध्याचे केंद्रातील सरकार त्यांच्यासाठी कशाप्रकारे पोटदुखी बनले आहे इत्यादी विषयांवर प्रकाश टाकण्यात आला आहे.

तक्रार का करावी लागते ? पोलीस स्वतःहून चौकशी का करत नाहीत ?

       बलात्कारासारख्या आरोपात तीन मास कारागृहात राहिलेले उपराकार लक्ष्मण माने यांनी पत्रकार परिषदेत सनातनचे आश्रम उद्ध्वस्त करणार, अशी धमकी दिली होती. जाहीर धमकीनंतर हिंदु विधीज्ञ परिषदेने सातारा येथील पोलीस अधीक्षक, पोलीस महासंचालक आणि मुख्यमंत्री यांच्याकडे माने यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी तक्रार केली होती. त्यावर सातार्‍याच्या पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार सातारा येथील शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या पोलिसांकडून माने यांची चौकशी चालू करण्यात आली आहे.

ब्रिटन, कॅनडा आणि मलेशिया यांच्यानंतर भारताने जागे होणे लज्जास्पद !

       आतंकवादाला खतपाणी घालण्याचा आरोप असलेल्या डॉ. झाकीर नाईक यांच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन या संस्थेवर सरकारने ५ वर्षांची बंदी घातली आहे. डॉ. नाईक यांच्यावर ब्रिटन, कॅनडा आणि मलेशिया या देशांत यापूर्वीच बंदी घालण्यात आली आहे.

गोवा राज्याचा ऑक्टोबर २०१६ मधील हिंदु जनजागृती समितीच्या प्रसारकार्याचा आढावा

डॉ. मनोज सोलंकी-
१. राष्ट्रीय हिंदू आंदोलनात विविध संघटनांचा सहभाग 
     म्हापसा, गोवा येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलनांतर्गत ९ ऑक्टोबर या दिवशी म्हापसा नगरपालिका बाजारात आंदोलन करण्यात आले. यामध्ये सनातन संस्था, रणरागिणी शाखा, मराठी राजभाषा समिती, गोमंतक मंदिर आणि धार्मिक संस्था महासंघ, शिवसेना, विठ्ठल-रुक्मिणी देवस्थान समिती, राष्ट्रप्रेमी संघटना आणि भारतीय भाषा सुरक्षा मंच या संघटनांचा सहभाग होता. बिलिव्हर्स पंथियांच्या विरोधात जागृती करणार्‍यांची मुस्कटदाबी थांबवा, फटाक्यांवर तात्काळ बंदी घाला आणि मराठीला राजभाषेचा दर्जा द्या, हे या आंदोलनाचे विषय होते.

जंक फूड त्यागून आयुर्वेद अंगीकारा !

     काही दिवसांपूर्वी विद्यापीठ अनुदान आयोगाने महाविद्यालयांमधून जंक फूडवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. यामुळे महाविद्यालयांमधील जंक फूडच्या सर्रास विक्रीवर गदा येईल. महाविद्यालयांमध्ये लावण्यात येणार्‍या चिनी आणि अन्य जंक फूडच्या गाड्या महाविद्यालयातून हद्दपार होतील, ही जमेची बाजू. त्याची अंमलबजावणी मुंबईतील काही महाविद्यालयांमधून चालू झाली आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून शासनाने घेतलेला हा निर्णय अभिनंदनीय आहे; परंतु या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या जीवनातूनच जंक फूड हद्दपार होईल, असे मात्र होणार नाही. त्यामुळे शासनाने या निर्णयापर्यंतच न थांबता त्याची काटेकोर अंमलबजावणी आणि देशात अन्यत्र कुठेच जंक फूडच्या गाड्या लागणार नाहीत, या दृष्टीने काही पावले उचलली जाणे आवश्यक आहे.

राजकीय पक्षांकडील संपत्तीचाही स्रोत शोधावा !

       पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीच्या घेतलेल्या निर्णयाचे सर्वसामान्य जनतेने भरभरून स्वागत केले. स्वत:ला त्रास होऊनही जनतेने हा पालट मनापासून स्वीकारला, यावरून जनतेच्या मनात काळ्या पैशांविषयी किती चीड आहे, हे स्पष्ट होते. या निर्णयानंतर सरकारने आता एक पाऊल पुढे जाऊन सर्व राजकीय पक्षांच्या संपत्तीचा स्रोतही शोधला पाहिजे, अशी मागणी जनतेकडून केली जात आहे. याविषयी इंदूर (मध्यप्रदेश) येथील दैनिक स्वदेशचे मुख्य पत्रकार श्री. अजय जैन यांनी लिहिलेला लेख आमच्या वाचकांसाठी येथे प्रसिद्ध करत आहोत.

फलक प्रसिद्धीकरता

संयुक्त राष्ट्रांना कोट्यवधी बांगलादेशी 
हिंदूंचा वंशसंहार कसा दिसत नाही ?
        म्यानमारमधून रोहिंग्या मुसलमानांचा वंशसंहार करण्याचा प्रयत्न होत आहे. तेथे मुसलमानांशी मोठ्या प्रमाणात भेदभाव आणि दुर्व्यवहार केला जात आहे. त्यांच्या महिलांवर सामूहिक बलात्कार केले जातात, असा आरोप संयुक्त राष्ट्रांकडून करण्यात आला आहे.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Myanmar me Rohingya Musalmanoke vanshsanharki ghatnaye badhi- Sanyukt Rashtra Sangh
Karodo Bangladeshi Hinduoki vyathapar ye Sangh chup kyon rehta hai ?
जागो ! : म्यांमार में रोहिंगा मुसलमानों के वंशसंहार की घटनाएं बढीं ! - संयुक्त राष्ट्रसंघ
करोडों बांग्लादेशी हिन्दुआें की व्यथा पर यह संघ चुप क्यों रहता है ?

सर्वपक्षीय राज्यकर्त्यांचेे पक्षपाती वर्तन

     अमरनाथ यात्रेला विरोध करणार्‍या मुसलमानांच्या विरोधात कोणतीही कार्यवाही होत नाही. देशात बहुसंख्य हिंदूंच्या करातून मिळणारा पैसा शासन मुसलमानांच्या हज यात्रेसाठी वापरते आणि हिंदूंवर मात्र यात्राकर लादते. सध्याचे राज्यकर्तेच भिन्न धर्मीय जनतेशी पक्षपाती वर्तन करतात. - श्री. दुर्गेश परुळकर (संदर्भ : मासिक धर्मभास्कर, सप्टेंबर २०१३) 
सर्वधर्मसमभावचा खरा अर्थ काय ?
       सर्वधर्मसमभाव याचा अर्थ आपल्या धर्माविषयी उदासीनता बाळगणे, असा होत नाही. मध्यप्रदेशमधील भोजशाळेत, म्हणजे सरस्वती मंदिरात मुसलमान समाजाला प्रत्येक शुक्रवारी नमाज पढण्यासाठी अनुमती दिली गेली; मात्र हिंदूंच्या गणपतीच्या मिरवणुकीला मशिदीसमोरून जाण्यास अनुमती दिली जात नाही. 
- श्री. दुर्गेश परुळकर (संदर्भ : मासिक धर्मभास्कर, सप्टेंबर २०१३)

भारतातील बेगडी धर्मनिरपेक्षता !

     धर्मनिरपेक्षतेचा अर्थ सध्या पाकिस्तानी कलाकारांना बोलावणे, सैन्यावर बलात्काराचा आरोप करणार्‍यांना पाठीशी घालणे, असा दिसून येत आहे. हिंदु महिलांच्या अधिकाराविषयी बोलणारे धर्मनिरपेक्षतावादी मुसलमान महिलांच्या अधिकाराविषयी चिडीचूप असतात. धर्मावर आधारित बेगडी धर्मनिरपेक्षतेचे राजकारण केवळ भारतातच आहे. 
- तुफेल अहमद, ज्येष्ठ पत्रकार आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अभ्यासक

सेवेतून ईश्‍वरी गुणांची प्राप्ती होण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकाला प्रसंगानुरूप घडवणे

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...
परात्पर गुरु
डॉ. जयंत आठवले
१. प.पू. गुरुदेवांनी कळफलकाकडे न पहाता टंकलेखन करण्यास 
सांगणे आणि तसे केल्यावर टंकलेखनाची गती वाढून चुका अल्प होणे 
     मी टंकलेखनाची सेवा करायचो. त्या वेळी मी कळफलकाकडे (की-बोर्डकडे) पाहून टंकलेखन करायचो. संगणकाच्या पडद्यावर (स्क्रिनवर) काय लिहिले जात आहे, ते पहात नसल्याने टंकलेखनात पुष्कळ चुका होत होत्या. माझी टंकलेखनाची गती पुष्कळ होती; पण त्यात चुकाही होत होत्या. वर्ष २००० मध्ये प.पू. गुरुदेव म्हणाले, तुझी टंकलेखनाची गती आणखी वाढायला हवी. आजपासून तू कळफलक न पहाता संगणकाच्या पडद्याकडे पाहून टंकलेखन कर. त्यामुळे टंकलेखनातील चुका अल्प होऊन तुझी सेवेची गती आणखी वाढेल. एखाद्या अक्षराचे टंकलेखन करतांना आपल्या बोटांना कळफलकावर कुठे जायचे, ते कळायला हवे, असा प्रयत्न कर. प.पू. गुरुदेवांनी सांगितल्याप्रमाणे प्रयत्न करायला लागल्यावर ५ - ६ दिवसांत माझी टंकलेखनाची गती वाढली आणि चुकांचे प्रमाण अल्प झाले.

संत आणि महर्षि यांच्या आशीर्वादामुळे अन् त्यांनी सांगितलेले विधी केल्यामुळे पुनर्जन्म झालेली ६६ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. दीपाली मतकर !

पू. डॉ. मुकुल गाडगीळ
२. पू. डॉ. मुकुल गाडगीळ यांनी केलेले उपाय 
      २४.१०.२०१६ या रात्री सोलापूर येथे असलेल्या कु. दीपाली मतकर या साधिकेला डेंग्यू झाला आहे आणि त्या गंभीररीत्या आजारी आहेत, असे कळले. दीपाली यांची स्थिती इतकी गंभीर होती की, २ दिवसांपासून त्यांच्यावर उपचार करणार्‍या रुग्णालयातील डॉक्टरांनी अधिक चांगल्या उपायांसाठी त्यांना दुसर्‍या रुग्णालयात हालवण्यास सांगितले. त्याप्रमाणे तसे केले. त्यांच्यावर रुग्णालयात होत असलेल्या वैद्यकीय उपचारांना आध्यात्मिक उपायांची जोड देता यावी, यासाठी त्या रात्रीपासून विविध आध्यात्मिक उपाय करणे आरंभ केले. उपाय करतांना माझा देह हा त्यांचाच देह आहे, असा भाव ठेवला, उदा. माझ्या कुंडलिनीचक्रस्थानी उपाय करतांना मी कु. दीपाली यांच्याच कुंडलिनीचक्रस्थानी उपाय करत आहे, असा भाव ठेवला. प.पू. डॉक्टरांनी प्राणशक्तीवहन उपायपद्धती या ग्रंथात सांगितल्याप्रमाणे न्यास, मुद्रा आणि नामजप शोधून त्याप्रमाणे उपाय केले. केलेल्या उपायांची माहिती पुढे दिली आहे.

कु. दीपाली मतकर हिच्या पत्रिकेतील ग्रहस्थिती आणि तिला होणारे शारीरिक त्रास

१. कु. दीपाली मतकर हिची जन्मपत्रिका पाहून 
तिला तीव्र शारीरिक त्रास होत असल्याचे जाणवणे 
     २६.१०.२०१६ या दिवशी सायंकाळी सौ. भक्ती खंडेपारकर यांचा भ्रमणभाष आला. त्यांनी माझ्याकडे कु. दीपाली मतकर हिचा जन्मदिनांक आणि इतर माहिती विचारली. भक्तीताईंना माहिती दिल्यानंतर मी दीपालीची जन्मकुंडली पाहिली. इतर वेळी कुणाचीही जन्मकुंडली पाहिल्यावर आध्यात्मिक भाग अभ्यासला जातो; परंतु त्या दिवशी दीपालीची कुंडली पहाताच तिला तीव्र शारीरिक त्रास होत आहे, असे जाणवले. तिला होणार्‍या शारीरिक त्रासाची तीव्रता भाऊबिजेपर्यंत अधिक असेल. त्यानंतर ती उणावेल आणि १६.११.२०१६ नंतर तिला बरे वाटेल. प्राणशक्ती वाढण्यास विलंब लागेल, असे जाणवले. यापूर्वी बुधवारी, म्हणजे १९.१०.२०१६ या दिवशी होणार्‍या भावसत्संगातील तिची प्रार्थना ऐकतांनाही तिला शारीरिक वेदना होत असल्याचे जाणवले होते.

महर्षींच्या आज्ञेनुसार कु. दीपाली मतकर यांच्या प्रकृतीस्वास्थ्यासाठी केलेल्या आयुष्यवृद्धी होमाचे सूक्ष्म परीक्षण

कु. मधुरा भोसले
     २७.१०.२०१६ या दिवशी दुपारी १.३० ते ४ या कालावधीत सनातनच्या रामनाथी आश्रमात सनातनच्या साधक-पुरोहितांनी सोलापूर येथील कु. दीपाली मतकर यांच्या प्रकृतीस्वास्थ्यासाठी सप्तर्षि जीवनाडीपट्टीच्या वाचनात सांगितल्याप्रमाणे आयुष्यवृद्धीहोम केला. या यागाचे कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म-परीक्षण येथे देत आहोत. 

५१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेला आणि उच्च स्वर्गलोकातून जन्माला आलेला संगमेश्‍वर, जिल्हा रत्नागिरी येथील चि. ऐश्‍वर्य विशाल पारकर (वय १ वर्ष ९ मास) !

उच्चलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र
चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. ऐश्‍वर्य विशाल पारकर एक दैवी बालक आहे !
चि. ऐश्‍वर्य पारकर
पालकांनो, हे लक्षात घ्या ! 
     तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले 
     (नोव्हेंबर २०१५ मध्ये चि. ऐश्‍वर्यची आध्यात्मिक पातळी ५१ टक्के होती. - संकलक)
     यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर यूट्यूबच्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.

साधकांना सूचना

       पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
प्रारंभ - कार्तिक कृष्ण पक्ष चतुर्दशी (२८.११.२०१६) दुपारी ३.२१ वाजता
समाप्ती - कार्तिक अमावास्या (२९.११.२०१६) सायंकाळी ५.४८ वाजता
आज अमावास्या आहे.

१०.१२.२०१६ ते १०.५.२०१७ या कालावधीत सर्वांनी करावयाचे नामजपादि उपाय

         महर्षींनी जीवनाडीपट्टीत सांगितलेल्या उपायांच्या जोडीला पुढील उपायही करावेत.
१. सर्वांनी करावयाचे उपाय

१ अ. विविध चक्रांवर लावावयाची देवतांची चित्रे : देवतेचे चित्र शरिराला स्पर्श करून बाहेरच्या दिशेने मुख करून (निर्गुण) ठेवायचे कि आतल्या दिशेने मुख करून (सगुण) ठेवायचे, हे येथे दिले आहे. संबंधित देवतेची नामपट्टी वापरायची असल्यास तिच्या अक्षरांच्या संदर्भात तसेच करता येईल. अनाहतचक्राच्या खालील चक्रांसाठी नामपट्टीचा उपयोग करावा.
टीप १ - पुढे म्हणजे शरिराचा पुढचा भाग (चक्राशी संबंधित भाग)
टीप २ - पाठी म्हणजे शरिराचा पाठचा भाग (चक्राशी संबंधित भाग)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
  • कुठे प्रत्येक क्षेत्रात सर्वोच्च स्तराचे ज्ञान देणारा हिंदु धर्म, तर कुठे बालवाडीप्रमाणे शिक्षण देणारे पाश्‍चात्त्य देश !
  • विज्ञान एकातरी क्षेत्रात धर्मशास्त्राच्या पुढे आहे का ?
         सर्वच क्षेत्रांत अशी स्थिती आहे. त्याची काही उदाहरणे येथे दिली आहेत.
वैद्यकीय क्षेत्र
         एकच विकार झालेल्या सर्वच रुग्णांवर उपाय करतांना डॉक्टर फक्त आजार काय आहे ?, हे लक्षात घेऊन त्यानुसार सर्वांना सारखीच औषधे देतात. याउलट वैद्य रुग्णाच्या आजारासोबत त्याच्या प्रकृतीत वात-पित्त-कफ यांपैकी कोणता दोष प्रबळ आहे, हेही लक्षात घेऊन औषधे देतात.
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
अढळपद
        अशा ठिकाणी बसा की, तुम्हाला जिथून कोणी ऊठ म्हणून सांगणार नाही. असे बोला की, हे खोटे आहे असे कोणी बोलणार नाही.
भावार्थ :
ब्रह्मस्थितीला पोहोचल्यावर ऊठ असे म्हणायला दुसरा कोणी उरतच नाही आणि ती सर्वव्यापी अवस्था असल्याने तिथून उठायचा प्रश्‍नच निर्माण होत नाही. हे खोटे आहे असे कोणी बोलणार नाही, असा बोलण्याचा विषय म्हणजे ब्रह्माची किंवा परमेश्‍वराची अनुभूती. मायाच खोटी असल्याने मायेतील सत्य बोलणेही खोटेच असते.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

संतांचा आदर करा !
सत्पुरुष आणि संत यांच्याविषयी आदर बाळगावा. ते परमेश्‍वराचे प्रेषित आणि 
प्रतिनिधी असतात. त्यांचा जन्म मानवी कल्याणासाठी आणि शोषितांच्या उद्धारासाठी असतो.
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

कॅस्ट्रोपर्वाचा अंत !

संपादकीय
      क्युबाचे सर्वेसर्वा फिडेल कॅस्ट्रो यांच्या मृत्यूनंतर जगात टोकाच्या प्रतिक्रिया उमटल्या. कॅस्ट्रे गेलेे म्हणून अमेरिकेत काही ठिकाणी लोकांनी आनंदोत्सव साजरा केला. याउलट अनेक राष्ट्रांच्या नेत्यांनी त्यांना गौरवले. कॅस्ट्रो हे साम्यवादी हुकूमशाही नेते ! असे असले, तरी शेवटपर्यंत त्यांची ओळख ही अमेरिकेसमोर न झुकणारे स्वाभिमानी नेते, अशीच राहील. क्युबा हे छोटेसे बेट. असे असतांनाही अख्ख्या जगावर दादागिरी गाजवणार्‍या अमेरिकेला क्युबा पुरून उरला. वर्ष १९६१-६२ च्या काळात अमेरिकेला संपवण्यासाठी इरेला पेटलेल्या रशियाने क्युबाशी हातमिळवणी केली आणि अमेरिकाविरोधी कारवाया चालू ठेवल्या. यामुळे अमेरिकेला कॅस्ट्रो सतत अडसर वाटले. एवढे की अमेरिकेच्या सीआए, एफ्बीआय या गुप्तचर संस्थांनी त्यांना ६०० हून अधिक वेळा ठार मारण्याचा प्रयत्न केला; मात्र प्रत्येक वेळी त्यांनी मुत्यूला चकवा दिला. कॅस्ट्रो यांच्या हयातीत अमेरिकेचे ११ राष्ट्राध्यक्ष पालटले; मात्र क्युबात कॅस्ट्रो यांची सत्ता आबाधित राहिली.

बाजवा शौर्य गाजवणार ?

संपादकीय
       पाक सैन्यदलप्रमुखाची माळ ही जनरल कमर जावेद बाजवा यांच्या गळ्यात पडल्यावर भारतात अनेक तर्क-वितर्क लावण्यात येत आहेत. कोणी ते मवाळ असल्याचा जावईशोध लावला आहे, तर कोणी ते लोकशाहीचे हित जपणारे असल्याने भारताच्या विरोधात कठोर पावले उचलणार नाहीत, असा कयास बांधला आहे. काहींनी तर नवाझ शरीफ यांच्याकडे काळा पैसा असून त्यांना अभय देण्याचे बाजवा यांनी मान्य केल्यामुळेच त्यांना सैन्यदलप्रमुखपदी बढती दिल्याचे बोलले जात आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn