Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

विनम्र अभिवादन !

आज सेनापती बापट स्मृतीदिन

पंजाबमध्ये पोलिसांच्या वेशात १० खलिस्तानी आतंकवाद्यांचे कारागृहावर आक्रमण !

  • भाजप-अकाली दल सरकारची निष्क्रीयता !
  • खलिस्तानी लिबरेशन फोर्सचा प्रमुख आतंकवादी हरमिंदरसिंह मिंटू आणि अन्य ४ कैदी यांचे पलायन !
  • देशातील ढिसाळ सुरक्षा यंत्रणांची कारागृहे ! दिवसाढवळ्या सशस्त्र आतंकवादी आक्रमण करून कारागृहातील कैद्यांना पळवून नेतात, ही कसली व्यवस्था ?
   पतियाळा (पंजाब) - २७ नोव्हेंबरला सकाळी पंजाबमधील पतियाळा जिल्ह्यातील नाभा कारागृहावर पोलिसांच्या वेषात आलेल्या १० सशस्त्र खलिस्तानी आतंकवाद्यांनी आक्रमण केले. यानंतर खलिस्तानी लिबरेशन फोर्स या आतंकवादी संघटनेचा प्रमुख हरमिंदरसिंह मिंटू आणि अन्य ४ कैदी यांना घेऊन त्यांनी पलायन केले.
   आक्रमण करणार्‍या सर्व आतंकवाद्यांकडे अत्याधुनिक शस्त्रे होती. त्यांनी किमान १०० गोळ्या झाडल्या. कारागृहात घुसल्यानंतर दहशत निर्माण करत त्यांनी हरमिंदर, तसेच गुरप्रीतसिंह, विकी गोंदरा, नितीन देओल आणि विक्रमजीत सिंह अशा ५ कैद्यांना कोठडीतून मुक्त केले आणि त्यांना घेऊन ते पसार झाले. टोयाटो फॉर्च्युनर, मारुती स्विफ्ट आणि हुंडाई वेर्णा अशा ३ गाड्या आतंकवाद्यांनी वापरल्या. फरार कैदी आणि आतंकवादी यांचा शोध घेण्यासाठी संपूर्ण राज्यात, तसेच हरियाणा आणि जम्मू-काश्मीरच्या सीमांवर अतीदक्षतेची चेतावणी देण्यात आली आहे. सर्वत्र नाकाबंदी करण्यात आली आहे.

चलनविरहित अर्थव्यवस्था लगेच शक्य नसली, तरी रोखीतून अल्प प्रमाणात व्यवहार करा ! - पंतप्रधान मोदी

    नवी देहली - अर्थव्यवस्था कॅशलेस (चलनविरहित) होणे, हे आता लगेचच शक्य नाही; मात्र रोख रकमेवर अल्पशः प्रमाणात अवलंबून रहाणे शक्य आहे. लोकांनी रोख रकमेचा अल्पशः प्रमाणात (लेस कॅश) वापर करावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या आकाशवाणीवरील त्यांच्या मासिक कार्यक्रमामधून केले.
मोदी यांनी मांडलेली सूत्रे,
१. कार्ड पेमेंट, इतर इलेक्ट्रॉनिक पेमेंट करणे शिकायला हवे. कॅशलेस अर्थव्यवस्था सुरक्षित आहे. तुमच्याकडे देशाला डिजीटल बनवण्याची संधी आहे. युवकांच्या पालकांना किंवा घरातील ज्येष्ठ व्यक्तींना कदाचित् याविषयी माहिती नसेल; मात्र रेल्वेचे तिकीट ऑनलाईन कसे काढायचे, वस्तू ऑनलाइन कशा मागवायच्या, याची माहिती युवकांना आहे. युवक केवळ त्यांच्या कुटुंबियांनाच नव्हे, तर छोट्या व्यावसायिकांना देखील डिजीटल पेमेंटचे लाभ सांगू शकतात.
२. युवकांना आवाहन करतांना मोदी म्हणाले की, तुम्ही प्रतिदिन तुमच्या ५ शेजार्‍यांना ऑनलाईन आणि डिजीटल पेमेंट यांची माहिती देऊ शकता. त्यांना कॅशलेस व्यवहार कसे करायचे, हे सांगू शकता. जर तुम्ही भाजी विक्रेत्याला किंवा हातगाडीवरून सामान विकणार्‍या रोख न वापरता व्यवहार करणे शिकवू शकलात, तर आपण नक्कीच कॅशलेस अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करू शकतो.

(म्हणे) नोटाबंदीचा सर्वाधिक त्रास मुसलमानांना सहन करावा लागत आहे ! - कपिल सिब्बल

  • काँग्रेस खासदार कपिल सिब्बल यांचा जावईशोध !
  • प्रत्येक गोष्टीशी मुसलमानांचा संबंध जोडण्याची सवय लागलेल्या काँग्रेसी नेत्यांकडून याहून वेगळी अपेक्षा काय करणार ! उलट असे विधान करण्यास त्यांनी उशीरच केला, असे म्हणावे लागेल !
    नवी देहली - मोदी सरकारच्या नोटाबंदी निर्णयाचा सर्वात अधिक त्रास मुसलमानांना होत आहे. मी देहलीच्या चांदनी चौक परिसरात रहातो आणि तेथे मुसलमानांची संख्या अधिक आहे. मी मुसलमानांशी जोडला गेलो असल्याने मला याविषयी माहिती आहे, असे विधान काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार कपिल सिब्बल यांनी केले आहे. (काँग्रेसच्या नेत्यांनी असे मतप्रदर्शन करणे, यात काही नवीन नाही. नोटाबंदीचा परिणाम सर्वांवर सारखाच होत असतांना सिब्बल यांनी एका विशिष्ट गटालाच तो सर्वाधिक होतो, असे सांगण्यात त्यांचा हेतू कलुषिक दिसतो ! - संपादक) ते लक्ष्मणपुरी येथील अल्पसंख्यांकांच्या बैठकीला संबोधित करत होते. (काँग्रेसचे नेते कधी हिंदूंच्या बैठकीला जातात का ? - संपादक)

भारतबंदच्या विरोधात २ घंटे अधिक काम करा ! - सामाजिक संकेतस्थळावरून संदेश

     मुंबई - विरोधी पक्षांनी पंतप्रधान मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयाच्या विरोधात २८ नोव्हेंबरला भारत बंदची हाक दिली आहे. पण सध्या सर्वच जनता भ्रष्टाचार आणि महागाई यांना कंटाळली ; असल्याने सर्व सामान्य नागरिक मात्र कितीही त्रास झाला, तरी पंतप्रधान मोदी यांच्या बाजूने रहाण्याच्या मानसिकतेत असल्याचे दिसून येते. त्यामुळेच सध्या सामाजिक संकेतस्थळांवर विरोधी पक्षांना सहाय्य करू नका, त्यादिवशी २ घंटे अधिक काम करूया असा संदेश फिरत आहे.

कर्नाटक पोलिसांनी राजद्रोहाचा गुन्हा प्रविष्ट केलेल्या ५ तरुणांना न्यायालयाकडून जामीन संमत !

     बेळगाव, २७ नोव्हेंबर (वार्ता.) - महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी १ नोव्हेंबर या काळ्या दिनी मोर्च्यात भाग घेतल्याच्या कारणास्तव कर्नाटक पोलिसांनी ५ तरुणांवर राजद्रोहाचा गुन्हा प्रविष्ट केला होता. या गुन्ह्यातील ५ तरुणांना नवव्या अतिरिक्त जिल्हासत्र न्यायालयाने २५ नोव्हेंबरला जामीन संमत केला आहे. या वेळी या तरुणांवर प्रविष्ट केलेला गुन्हा तक्रारीत नोंदवलेल्या सूत्राशी जुळणारा नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.

डॉ. झाकीर नाईक यांच्या संस्थेने राजीव गांधी ट्रस्टला ५० लाख रुपयांची देगणी दिली होती !

   नवी देहली - डॉ. झाकीर नाईक यांची बंदी घालण्यात आलेली संस्था इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनने राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्टला २०११ मध्ये ५० लाख रुपयांची देणगी दिली होती, असे आता पुराव्यांद्वारे समोर आले आहे. यापूर्वीही माहिती समोर आली होती. या देणगीच्या एका मासानंतर पुन्हा रुग्णालयाच्या माध्यमातून आणखी २५ लाख रुपये देण्यात येणार होते. असा एकूण ७५ लाख रुपये देणगी देण्याचा त्यांचा विचार होता. राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने केलेल्या चौकशीत ही माहिती समोर आली आहे. झाकीर यांचे घर आणि कार्यालय यांवर मारलेल्या छाप्यातून याविषयीची कागदपत्रे सापडली आहेत.

भारताला युद्ध नको; मात्र डिवचले तर शत्रूंचे डोळे काढू ! - संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर

संरक्षणमंत्र्यांनी हे बोल खरे करून दाखवावेत, अशी जनतेची अपेक्षा आहे !
    पणजी - युद्धासाठी आम्ही उताविळ झालेलो नाही. भारताला युद्ध नको; मात्र आम्हाला कोणी डिवचले, तर शत्रूंचे डोळे काढून त्यांच्या हातात देऊ. एवढे बळ भारतात आहे, असे वक्तव्य संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गोव्यातील भाजपच्या प्रचारसभेत बोलतांना केले.
   गोव्यातील हळदोणा विधानसभा मतदारसंघात एका सभेत संबोधित करतांना संरक्षणमंत्री पर्रीकर यांनी भारतीय जवानांच्या मृतदेहाची विटंबना करणार्‍या कुरापतखोर पाकला खडेबोल सुनावले. पर्रीकर म्हणाले, आमच्या सीमा सुरक्षित आहेत. देशाची अर्थव्यवस्था मजबूत आहे. नोटबंदीनंतरही देशातील जनतेने त्याचा अनुभव घेतला आहे. पाकला जशास तसे उत्तर दिले जात आहे.

डीएजी मॉडर्न (मुंबई) येथील चित्रप्रदर्शनातील हिंदुद्वेषी चित्रकार म.फि. हुसेन यांच्या चित्रांच्या विरोधात हिंदु जनजागृती समितीकडून पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट !

तक्रार घेण्यास प्रारंभी पोलिसांकडून टाळाटाळ ! धर्माभिमान्याला
पोलीस ठाण्यात पाऊण घंटा ताटकळत ठेवले !
तक्रारदाराची तक्रार प्रविष्ट न करता त्याला ताटकळत ठेवणे म्हणजे
तक्रारदाराला नाहक दिलेली ही शिक्षा आहे. अशा पोलिसांविषयी
त्यांच्या वरिष्ठांकडे तक्रार करणे आवश्यक आहे !
    मुंबई, २७ नोव्हेंबर (वार्ता.) - फोर्ट, काळा घोडा मार्ग येथील डीएजी मॉडर्न येथील २० व्या शतकातील भारतीय कला या नावाने हिंदुद्वेषी चित्रकार म.फि. हुसेन यांच्या चित्रांचे प्रदर्शन आयोजित केले आहे. या प्रदर्शनाच्या विरोधात २६ नोव्हेंबर या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे. ही तक्रार प्रविष्ट करण्यासाठी गेलेले हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रसाद मानकर यांना कुलाबा पोलीस ठाण्यात तक्रार न स्वीकारता पोलिसांनी पाऊण घंटा ताटकळत ठेवले. तक्रार देतांना श्री शिवकार्य प्रतिष्ठान (विक्रोळी)चे अध्यक्ष श्री. प्रभाकर भोसले हेसुद्धा उपस्थित होते. अखेरीस माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवून घेण्यात आली.

हुबळी (कर्नाटक) येथे हिंदुत्वनिष्ठांचे (अंध)श्रद्धा निर्मूलन कायद्याच्या विरोधात आंदोलन

आंदोलन करतांना धर्माभिमानी हिंदू
     हुबळी (कर्नाटक) - (अंध)श्रद्धा निर्मूलन कायद्याच्या विरोधात हिंदुत्वनिष्ठांनी येथील प्रसिद्ध सांगोली रायण्णा चौकात २३ नोव्हेंबरला तीव्र आंदोलन केले. या वेळी बोलतांना धर्माभिमानी श्री. दयानंद राव यांनी हिंदु संस्कृती नष्ट करण्यासाठी काँग्रेसची स्थापना झाल्याचे सांगितले. या कायद्यावर बंदी घातली नाही, तर हिंदु संस्कृती लोप पावेल, असेही ते म्हणाले. हिंदु जनजागृती समितीच्या सौ. विदुला हळदीपूर यांनी राज्य सरकार हिंदुविरोधी धोरण अवलंबत असल्याचा आरोप केला. या वेळी श्रीराम सेनेचे हुबळीचे अध्यक्ष श्री. गणेश कदम, श्री. मोहन गुरुस्वामी (अय्यप्पा वृंद) यांच्यासह मोठ्या प्रमाणात हिंदु धर्माभिमानी सहभागी झाले होते.
आंदोलनातील मागण्या 
१. दक्षिण भारतात होणार्‍या हिंदुत्वनिष्ठांच्या हत्यांच्या प्रकरणांची केंद्रीय अन्वेषण विभागाच्या मार्फत चौकशी करण्यात यावी. 
२. इस्लामी प्रचारक डॉ. झाकीर नाईक यांनी स्थापन केलेले इस्लामिक रिसर्च फाऊन्डेशन आणि पीस इंटरनॅशनल स्कूल यांवर बंदी घालावी.

सनातनच्या ग्रंथांची माहिती रायचूर (कर्नाटक) जिल्ह्यातील सर्व शाळांच्या प्रमुखांपर्यंत पोचवणार ! - शिक्षण उपसंचालक, कर्नाटक

     रायचूर (कर्नाटक) - येथील हिंदु जनजागृती समितीचे समन्वयक बी. रमेश यांच्या नेतृत्वाखाली समितीच्या कार्यकर्त्यांनी मनवीनगरच्या सार्वजनिक शिक्षण क्षेत्राचे उपसंचालक श्री. रमंजीनेय्या यांची भेट घेऊन त्यांना सनातनच्या ग्रंथांची माहिती दिली. यावर ते म्हणाले, हे ग्रंथ खूप उपयुक्त आहेत. याविषयी शाळांतील विद्यार्थ्यांना माहिती दिल्यास ते पुढे आदर्श व्यक्ती होऊ शकतात. या ग्रंथांची माहिती मी रायचूर जिल्ह्यातील सर्व शाळाप्रमुखांपर्यंत पोचवणार, असे आश्‍वासनही त्यांनी यावेळी दिले. या वेळी मनवीनगरचे अधिकारी श्री. रीवन सिद्धय्या उपस्थित होते. श्री. सिद्धय्या म्हणाले, सनातनचे ग्रंथ सर्व शाळांमध्ये पोचणे आवश्यक आहे. हे ग्रंथ आम्हाला मिळतात हे आमचे भाग्य आहे. ग्रंथांच्या माध्यमातून सनातन संस्था श्रेष्ठ कार्य करत आहे.

मणीपाल (कर्नाटक) येथील हिंदु धर्मजागृती सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद !

डावीकडून सौ. लक्ष्मी पै, डॉ. (सौ.) श्रीकला जोशी, दीपप्रज्वलन 
करतांना अधिवक्ता श्री. दिनेश नायक आणि श्री. गुरुप्रसाद
      मणीपाल (कर्नाटक) - येथील शिवपिंडी श्री उमामहेश्‍वर मंदिरात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित हिंदु धर्मजागृती सभा नुकतीच पार पडली. या वेळी अधिवक्ता श्री. दिनेश नायक, हिंदु जनजागृती समितीचे राज्य प्रवक्ता श्री. गुरुप्रसाद, सनातन संस्थेच्या सौ. लक्ष्मी पै आणि रणरागिणी शाखेच्या डॉ. (सौ.) श्रीकला जोशी यांनी उपस्थित धर्माभिमान्यांना मार्गदर्शन केले. सभेला धर्माभिमान्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

थायलंडच्या राजकुमारी महाचक्री श्रीधरन् यांना जागतिक संस्कृत पुरस्कार

     नवी देहली - संस्कृत भाषेला पुढे नेण्यासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाविषयी थायलंडच्या राजकुमारी महाचक्री श्रीधरन् यांना भारताचे उपराष्ट्रपती हामिद अंसारी यांच्या हस्ते जागतिक संस्कृत पुरस्कार देऊन नुकतेच गौरवण्यात आले. हा पुरस्कार इंडियन काऊन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स द्वारे देण्यात आला आहे. श्रीधरन् संस्कृत आणि पाली या भाषेतील तज्ञ आणि विद्वान आहेत.

अधिक दुधाच्या लोभापायी देशी गायींच्या अनेक जाती लुप्त होण्याच्या मार्गावर !

देशी गायीच्या दुधात अनेक रोगांना समूळ नष्ट करण्याची क्षमता !
     मेरठ (उत्तरप्रदेश) - जगभरात दुधाच्या शुद्धतेसाठी आदर्श असलेल्या भारतीय दुधाळू संपदेला ग्रहण लागले आहे. देशी गायींच्या अनेक जाती लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. सिंथेटिक दुधाचा वापर, हिरव्या चार्‍याची कमतरता आणि पशूवध यांमुळे त्यांच्या पोषणाची गंगा आटत चालली आहे. दुध वाढवण्याच्या लोभापायी भारतीय आणि विदेशी जातींचे गोवंश यांच्यात क्रॉस ब्रीड करण्यात येत आहे. त्यामुळे अमृतावरच अन्याय होत आहे. न्युझीलंडमध्ये प्राध्यापक डॉ. वुडफोर्ड यांनी त्यांच्या शोधपत्रात स्पष्ट केले आहे की, भारताच्या सर्व गायींमध्ये बीटा कॅसिन-२ आढळून येते, ज्यात शरीरस्वास्थ्य आणि बुद्धीवर्धक सर्वच गुणधर्म आहेत. त्यात अनेक रोगांना समूळ नष्ट करण्याची क्षमता वैज्ञानिक आधारे सिद्ध झाली आहे.

(म्हणे) राष्ट्रीय स्वयंसेवक संघ दंगली घडवणारी संघटना ! - श्रीमंत कोकाटे यांचा जावईशोध

सांगली येथे क्रूरकर्मा टिपू सुलतानची जयंती साजरी करून उदात्तीकरण !
  • संघाने दंगली घडवल्या असत्या, तर कोकाटे यांनी असे बोलण्याचे धाडस केले असते का ?
  • दंगली कोण घडवते, हे उघड असतांना धादांत खोटी विधाने करून समाजात फूट पाडू पहाणारे कोकाटे !
    सांगली, २७ नोव्हेंबर - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही देशात दंगली घडवणारी संघटना आहे. संविधान, आरक्षण आणि लोकशाही त्यांना मान्य नाही. देश पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी चालवत नाहीत, तर संघाचे मोहन भागवत चालवत आहेत, अशी मुक्ताफळे श्रीमंत कोकाटे यांनी उधळली. (राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही देशात दंगली घडवणारी संघटना आहे, असे कोकाटे म्हणत असतील, तर तसे पुरावे त्यांनी दिले पाहिजेत. राष्ट्र आणि समाज कार्य करणार्‍या संघाने देशभक्त नागरिक सिद्ध केले आहेत. याउलट देशात धर्मांधच सर्वत्र दंगली घडवत असल्याचे सर्वत्र ढळढळीत पुरावे असतांना अशी दिशाभूल करणारी वक्तव्य करणे म्हणजे हा समाजात दूही माजवण्याचाच प्रकार आहे. अशांवर पोलिसांनी आता कायदेशीर कारवाई करणे अपेक्षित आहे ! - संपादक) टिपू सुलतानच्या जयंतीच्या निमित्ताने सांगली शहरातील खणभागमधील नगारजी गल्ली येथे २५ नोव्हेंबर या दिवशी आसिफभाई बावा युथ फाऊंडेशन हेल्प लाईन आणि समस्त मुस्लीम समाज, सांगली शहर यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात कोकाटे बोलत होते. (जे लोक राष्ट्रविरोधी आणि हिंदुविरोधी टिपू सुलतान यांची जयंती आयोजित करतात, ते लोक समाजात फूट पाडण्याचे काम करत आहेत. अशा लोकांवर पोलीस प्रशासनाने आपणहून कारवाई केली पाहिजे ! - संपादक)

गोरेगाव ते जोगेश्‍वरी रेल्वेमार्गातील नवीन रेल्वेस्थानकाला राम मंदिर हे नाव देण्याला राज्यशासनाकडून मान्यता !

नवीन रेल्वेस्थानकाचा फलक

प्रसारमाध्यमांसमोर भूमिका मांडतांना वीर सेनेच्या कार्यकर्त्यांसोबत श्री. निरंजन पाल
श्री. निरंजन पाल आणि वीर सेना यांच्या प्रयत्नांना यश !
    मुंबई, २७ नोव्हेंबर (वार्ता.) - गोरेगाव ते जोगेश्‍वरी या रेल्वेस्थानकांच्या मध्यभागी होणार्‍या नवीन रेल्वेस्थानकाला राम मंदिर हे नाव द्यावे, यासाठी वीर सेनेचे श्री. निरंजन पाल आणि वीर सेना मागील एक वर्षापासून सातत्याने प्रयत्न करत होते. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून नवीन रेल्वेस्थानकाला राम मंदिर हे नाव देण्याविषयी राज्यशासनाने मान्यता दिली आहे. याविषयी २५ नोव्हेंबर या दिवशी राज्यशासनाच्या गृहविभागाकडून जिल्हा प्रशासनाला अधिकृत पत्र प्राप्त झाले आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री श्री. सुरेश प्रभू या रेल्वेस्थानकाचे उद्घाटन आणि नामकरण करणार आहेत. नामकरणाच्या राबवलेल्या मोहिमेत हिंदु गोवंश रक्षा समिती; श्री शिवकार्य प्रतिष्ठान, विक्रोळी आणि हिंदु जनजागृती समिती या हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून वीर सेनेला पाठिंबा देण्यात आला.
निरंजन पाल यांनी चिकाटीने केलेले प्रयत्न
१. या रेल्वेस्थानकाला राम मंदिर हे नाव देण्यासाठी ऑक्टोबर २०१५ पासून श्री. निरंजन पाल वीर सेनेच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न करत होते.
२. त्यांनी गोरेगाव रेल्वेस्थानक, बेस्ट कॉलनी, एम्.जी. रोड, राम मंदिर रोड आदी ठिकाणी स्वाक्षरी मोहीम राबवली. या मोहिमेत ५ सहस्रांहून अधिक नागरिकांनी स्वाक्षर्‍या करून नवीन रेल्वेस्थानकाला राम मंदिर नाव देण्याला संमती दर्शवली.

३५० व्या शिवचातुर्यदिनानिमित्त ४ डिसेंबरला राजगडाच्या पायथ्याशी शौर्यजागरण !

     पुणे, २७ नोव्हेंबर (वार्ता.) - छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील अद्भुत नाट्यमय घटना म्हणजे त्यांची आग्य्राहून सुटका ! औरंगजेबाच्या तावडीतून शिवरायांनी युक्तीच्या बळावर स्वतःसह धर्मवीर संभाजीराजे, तसेच सर्व मावळे, हत्ती-घोडे यांची मृत्यूच्या दाढेतून सुटका करून घेतली. आग्य्राहून परत आल्यानंतर ते प्रथम राजगडावर आले. छत्रपती शिवरायांनी राजगडावर पोचण्याचा दिवस श्री शिवाजी राजगड स्मारक मंडळाच्या वतीने शिवचातुर्यदिन म्हणून साजरा केला जातो. यंदा या घटनेला ३५० वर्षे पूर्ण होत असून त्यानिमित्त समस्त शिवप्रेमी संघटनांच्या वतीने ४ डिसेंबरला राजगडाच्या पायथ्याशी पाली या गावामध्ये शौर्यजागरण करणार्‍या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यामध्ये अधिकाधिक जणांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

आजचे तथाकथित समाजसुधारक म्हणून मिरवणारे हेच खरे धर्मविध्वंसक ! - पू. (ह.भ.प.) निवृत्ती महाराज वक्ते

श्रीक्षेत्र आळंदी (पुणे) येथे १२ वे वारकरी महाअधिवेशन
अधिवेशनाला उपस्थित संत, धर्माचार्य आणि मान्यवर
    श्रीक्षेत्र आळंदी, २७ नोव्हेंबर (वार्ता.) - धर्माचे रक्षण करणे, हे सर्व वारकर्‍यांचे कर्तव्य आहे. सध्या हिंदु धर्मावर होत असलेले अन्याय सहन होत नाहीत; म्हणून या अधिवेशनाचे आयोजन केले आहे. संभाजी ब्रिगेड ही धर्मविध्वंसक आहे. त्यांनी संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले नसून त्यांचा खून केला गेला, असे समाजात खोटे पसरवले. त्याविषयी कोणी खंडण करत नाही, याचा अर्थ ते सर्वांना मान्य आहे, असा अर्थ निघतो.
ह.भ.प. आदिनाथ महाराज पोळ यांचा
सत्कार करतांना पू. ह.भ.प. वक्ते महाराज (उजवीकडे)
यामुळे संभाजी ब्रिगेडची शक्ती वाढली आणि आघाडी शासनाच्या कार्यकाळात त्याविषयीचे पुस्तक शासनमान्य करवून घेतले. दाभोलकर, पुरुषोत्तम खेडेकर, श्रीमंत कोकाटे यांसारखे अनेक तथाकथित समाजसुधारक म्हणून मिरवणारे असे लोक हेच खरे धर्मविध्वंसक आहेत. कुराणचे पालन करणे, ही अंधश्रद्धा आहे, हे सांगण्याची त्या समाजसुधारकांची हिंमत नाही. नोटांवर संस्कृत भाषेचा उपयोग केला; म्हणून अनेकांचा जळफळाट व्हायला हा देश ख्रिस्ती आहे का ? असे असेल, तर मग नोटांवर इंग्रजी भाषाही वापरली जाऊ नये, असे सडेतोड मार्गदर्शन पू. (ह.भ.प.) निवृत्ती महाराज वक्ते यांनी केले. राष्ट्रीय वारकरी सेना, वारकरी संप्रदाय आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने येथे २६ नोव्हेंबर या दिवशी आयोजित महाअधिवेशनात ते बोलत होते. अधिवेशनाला ५५० हून अधिक वैष्णवजन आणि धर्माभिमानी उपस्थित होते.

निपाणी येथे धर्मसभेच्या बैठकांना धर्माभिमान्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

     निपाणी (जिल्हा बेळगाव), २७ नोव्हेंबर (वार्ता.) - कोल्हापूर येथील पद्माराजे गर्ल्स हायस्कूलच्या मैदानावर ११ डिसेंबरला हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्‍वभूमीवर निपाणी आणि परिसरातील गावांमध्ये घेण्यात आलेल्या बैठकांना धर्माभिमान्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. धर्माभिमान्यांनी धर्मसभेचा प्रचार करून धर्मसभेच्या सेवेत सहभागी होण्याचा निर्धार केला.

हिंदु धर्मजागृती सभा यशस्वी करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांसह सभेला उपस्थित रहाणार ! - श्री. अनिल क्षत्रबंद, जिल्हा सरचिटणीस, मनसे, सोलापूर

श्री. बिज्जु प्रधाने-लोणारी (डावीकडून तिसरे)
यांना निमंत्रण आणि अंक भेट देतांना समितीचे
महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट
     सोलापूर, २७ नोव्हेंबर (वार्ता.) ४ डिसेंबर २०१६ या दिवशी होणारी हिंदु धर्मजागृती सभा यशस्वी करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांसह सभेला उपस्थित राहू, असे आश्‍वासन मनसेचे जिल्हा सरचिटणीस अनिल क्षत्रबंद यांनी दिले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने समितीचे श्री. विनोद रसाळ यांनी धर्मसभेचे निमंत्रण देण्यासाठी त्यांची भेट घेतली असता, क्षत्रबंद यांनी वरील आश्‍वासन दिले. या वेळी नवयुग सरगम फ्रेंड्स ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार उपस्थित होते.
समितीचे विनोद रसाळ मनसेचे सरचिटणीस
अनिल क्षत्रबंद यांना निमंत्रण देतांना
धर्मसभेला सर्वतोपरी साहाय्य करू ! 
-श्री. बिज्जु (आण्णा) प्रधाने-लोणारी, शहर सरचिटणीस, भाजप युवा मोर्चा, सोलापूर
    सोलापूर धर्मसभेला आम्ही सर्वतोपरी साहाय्य करू, तसेच आम्ही सर्व कार्यकर्त्यांसह सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहू, असे आश्‍वासन भाजप युवा मोच्यार्र्चे शहर सरचिटणीस श्री. बिज्जु (आण्णा) प्रधाने-लोणारी यांनी दिले. या वेळी त्यांचे कार्यकर्ते उपस्थित होते. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने त्यांची भेट घेऊन त्यांना सभेचे निमंत्रण आणि अंक भेट दिला, त्या वेळी त्यांनी वरील आश्‍वासन दिले. या वेळी समितीच्या वतीने महाराष्ट्र राज्य संघटक सुनील घनवट आणि विनोद रसाळ उपस्थित होते.

अंनिसमध्ये होत असलेल्या भ्रष्टाचार प्रकरणी हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी सूचना मांडणार ! - आमदार श्री. लक्ष्मण जगताप

अंनिसवर कारवाई व्हावी यासाठी पुण्यातील भाजप आमदारांचा सकारात्मक प्रतिसाद
प्रा. (सौ.) मेधा कुलकर्णी (उजवीकडे) यांना
विषय समजावून सांगतांना श्री. प्रवीण नाईक
     पुणे, २७ नोव्हेंबर (वार्ता.) - नागपूर येथे येत्या हिवाळी अधिवेशनात अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये झालेल्या आर्थिक घोटाळ्याची चौकशी करून त्यांच्यावर बंदी आणावी, या मागणीसाठी मी लक्षवेधी सूचना मांडून प्रयत्न करेन, असे प्रतिपादन पिंपरी-चिंचवड येथील भाजप आमदार श्री. लक्ष्मण जगताप यांनी केले. हिंदु जनजागृती समितीचे श्री. नागेश जोशी आणि अन्य कार्यकर्त्यांनी यांनी श्री. जगताप यांच्या कार्यालयात भेट घेतली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी समितीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना अंनिसमध्ये होत असलेला भ्रष्टाचार, साहाय्यक धर्मादाय आयुक्त यांनी सादर केलेला अहवाल यांविषयीची माहिती दिली.

जळगाव महानगरपालिकेकडून ७ मंदिरे भुईसपाट !

     जळगाव - जळगाव महानगरपालिकेने २३ नोव्हेंबर या दिवशी शहरातील शिवाजीनगर, दादावाडी, निमखेडी रोड येथील ७ मंदिरे भुईसपाट केली. कारवाई करतांना दादावाडी परिसरात काही धर्माभिमानी हिंदूंनी विरोध केला. त्या वेळी महानगरपालिकेच्या अधिकार्‍यांनी त्यांना न्यायालयाच्या आदेशानुसार आम्ही ही कारवाई करीत आहोत. यात अडथळा आणू नका, असे सांगितले. मंदिरांमधील मूर्ती अगोदर काढण्यात आल्या. त्यानंतर मंदिरे पाडण्यात आली.
     जळगाव महानगरपालिकेचे आयुक्त श्री. जीवन सोनवणे यांना या कारवाई संदर्भात संपर्क केला असता त्यांनी भ्रमणध्वनी उचलला नाही.
... तर आंदोलन करू ! - श्री. ललीतभैय्या चौधरी, बजरंग दल जिल्हा संयोजक आणि 
 श्री. मोहन तिवारी, शिवसेना 
     ज्याप्रमाणे प्रशासन हिंदु देवतांच्या मंदिरांवर तडकाफडकी कारवाई करते, त्याप्रमाणे अन्य धर्मियांची प्रार्थनास्थळेही पाडावी. केवळ हिंदूंच्या मंदिरांवर कारवाई होणार असेल, तर आंदोलन करू !

डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांच्यावर ३० नोव्हेंबरला पोलीस ४०० पानांचे दोषारोपपत्र प्रविष्ट करणार

कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरण
    कोल्हापूर, २७ नोव्हेंबर (वार्ता.) - कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणी सनातनचे साधक आणि संशयित आरोपी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांच्यावर दोषारोपपत्र प्रविष्ट करण्याची अंतिम मुदत ३० नोव्हेंबर आहे. याच दिवशी पोलिसांकडून हे आरोपपत्र अतिरिक्त सत्र न्यायालयात प्रविष्ट होण्याची शक्यता असून पोलिसांनी सुमारे ४०० पानांचे दोषारोपपत्र सिद्ध केले आहे. विशेष म्हणजे कॉ. पानसरे हत्या प्रकरणात डॉ. तावडे यांचा काडीमात्र संबंध नाही, तसेच या प्रकरणी पोलिसांकडे अद्यापही कोणताही पुरावा उपलब्ध नसतांना एवढ्या पानांचे पोलिसांनी दोषारोपपत्र सिद्ध केल्याविषयी सर्वत्र आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

जामखेड (जिल्हा नगर) येथील निवृत्त सैनिकाने १ तप लिहिला श्रीरामनामाचा जप !

     जामखेड - वर्ष १९६५ आणि १९७२ च्या युद्धात सहभागी झालेले येथील डोणगाव तालुक्यातील माजी सैनिक अण्णासाहेब खंडेराव मोहिते यांनी निवृत्ती पश्‍चात वर्ष १९८० पासून सलग एक तप श्रीरामनामाचा लिखीत स्वरूपात जप केला. या कालावधीमध्ये ५० लक्ष २५ सहस्र २३२ वेळा त्यांचा हा जप लिहून झाला. २४ वर्षांनंतर १४ नोव्हेंबर या दिवशी जप लिहिलेले कागद मोहिते यांच्या इच्छेनुसार रामेश्‍वर दरीतील धबधब्यात विसर्जित करण्यात आले. (एका माजी सैनिकाला १ तपाहून अधिक काळ नामसाधना करावीशी वाटते, यातूनच साधना आणि अध्यात्म यांचे महत्त्व अधोरेखित होते. हे बुद्धीप्रामाण्यवाद्यांच्या लक्षात येईल तो सुदिन ! - संपादक)

कोल्हापूर जिल्ह्यातील ३६१ कर्जदारांची राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून चौकशी करण्यात येणार !

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळ अपहार प्रकरण
     कोल्हापूर, २७ नोव्हेंबर (वार्ता.) - लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळात झालेल्या आर्थिक घोटाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर वर्ष २०१२ ते २०१५ या तीन वर्षांच्या कालावधीत कोल्हापूर जिल्ह्यात महामंडळाकडून झालेल्या कर्जवाटपाची राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या वतीने जून मासापासून चौकशी चालू झाली आहे. विविध कामांसाठी जिल्ह्यातील ३६१ जणांनी महामंडळाकडून कर्ज घेतले. कर्ज कोणी, कशासाठी घेतले आहे, ज्यांच्या नावावर कर्जाची उचल झाली आहे, तीच व्यक्ती आहे का, या गोष्टी यातून पडताळल्या जाणार आहेत.

पालघर येथे ५० लाख रुपयांची लाच घेतांना उपजिल्हाधिकारी शिवाजी दावभट यांना अटक

     अशा लाचखोरांवर सरकारने कठोर कारवाई केल्यासच पुन्हा असे कृत्य करण्याचे कोणी धाडस करणार नाही ! समाजातील गुन्हेगारी वृत्ती नाहीशी केल्याशिवाय भ्रष्टाचारासह सर्व तर्‍हेचे गुन्हे थांबणार नाहीत. त्यावरचा एकमेव उपाय म्हणजे सर्वांना सात्त्विक करण्यासाठी त्यांच्याकडून साधना करवून घेणे. हिंदु राष्ट्रात सर्वांकडून साधना करवून घेतली जाईल.
     पालघर - पालघर तालुक्यातील सालवड गावातील एका पारशी कुटुंबाच्या ६० वर्षांपूर्वीच्या वेगवेगळ्या चार जमिनींच्या प्रकरणाचे निकाल गेले काही महिने अडकून ठेवण्यात आले होते. त्यासाठी पालघरचे महसूल विभागाचे उपजिल्हाधिकारी शिवाजी दावभट यांनी ५० लाख रुपयांची लाचेची मागणी केली होती. ही लाच स्वीकारतांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने दावभट यांना पकडले आहे. नायब तहसीलदार सतीश मानिवडे आणि खाजगी वाहनचालक जयेश पाटील या अन्य दोघांनाही दावभट यांच्यासह अटक करण्यात आली आहे.

ठाण्यातील मलीन भिंतींना चढणार नवीन साज !

     ठाणे, २७ नोव्हेंबर - ठाणे शहराच्या सौंदर्यात भर पडावी म्हणून शहरातील मलीन झालेल्या भिंतींना रंग देऊन त्यावर प्रबोधनात्मक चित्रे काढण्याची संकल्पना राबवणार असल्याची घोषणा मनपा आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केली आहे. या उपक्रमाच्या अंतर्गत शहरातील ५५ सहस्र चौरस फुटांच्या भिंती रंगवण्यात येणार आहेत. शहरातील नामवंत चित्रकार या उपक्रमात सहभागी होणार आहेत. ४ डिसेंबरपासून चालू होणार्‍या या उपक्रमात विद्यार्थी आणि नागरिकांनीही सहभागी व्हावे, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे. (भिंती सुशोभित करण्यासोबतच त्या लोकांकडून पुन्हा मलीन होणार नाहीत, यासाठीही पालिकेने उपाययोजना करायला हवी. - संपादक)

खार येथे अल्पवयीन युवकावर लैंगिक अत्याचार करणार्‍या धर्मांधाला अटक !

     मुंबई, २७ नोव्हेंबर (वार्ता.) - खार येथे रहाणार्‍या १५ वर्षीय मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करणार्‍या धर्मांध टॅक्सीचालक नूरहसन गुलहसन खान याला पोलिसांनी अटक केली. त्याला विशेष सेशन न्यायालयात उपस्थित केले असता २८ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
    पीडित मुलगा मित्राकडून घरी जात असतांना सोडण्याच्या निमित्ताने नूरहसन याने त्याला टॅक्सीमध्ये बसण्यास सांगितले. त्यानंतर निर्जनस्थळी नेऊन त्याच्यावर लैंगिक अत्याचार केले. हा प्रकार मुलाने सांगितल्यावर पालकांनी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली. मुलाने सांगितलेल्या टॅक्सी क्रमांकावरून पोलिसांनी नूरहसन याला अटक केली.

भिवंडी येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्‍या धर्मांधाविरोधात गुन्हा प्रविष्ट

वासनांध धर्मांध !
    ठाणे, २७ नोव्हेंबर (वार्ता.) - भिंवडी निजामपुरा येथील धर्मांध आयसान अन्सारी याच्यावर ४ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून अमानुष अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे.

वाई (जिल्हा सातारा) येथे पोलिसांवर गुंडांचे आक्रमण

     वाई (सातारा), २७ नोव्हेंबर (वार्ता.) - येथील लाखानगर भागातील गुंड आणि त्यांच्या कुटुंबियांनी २३ नोव्हेंबर या दिवशी पोलिसांवर आक्रमण करून त्यांना घायाळ केले आहे. 
१. वाई पोलिसांना निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर गुन्हेगार तपासण्याविषयी कोम्बिंग ऑपरेशनचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार पोलीस सनी घाडगे या व्यक्तीची चौकशी करतांना त्याने पोलीस माझे काय वाकडे करणार ? बघून घेतो सर्वांना, अशी धमकीची भाषा वापरली. 
२. पोलिसांनी त्याला आम्ही आमचे कर्तव्य करत असून व्यवस्थित बोल, असे सांगितले; मात्र त्याने जागेवरूनच आरडाओरडा करणे चालू केले. त्यामुळे त्याच्या घरातील सदस्य आणि शेजारी रहाणारे १५-२० महिला आणि पुरुष हातात काठ्या आणि लोखंडी गज घेऊन आले.

वर्धा येथे राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या गाडीतून रोख ३ लक्ष ३६ सहस्र रुपये कह्यात

     वर्धा, २७ नोव्हेंबर - येथील राष्ट्रवादीचे उमेदवार सुधीर कोठारी यांच्या गाडीतून ३ लक्ष ३६ सहस्र रुपये शासनाधीन करण्यात आले. या रकमेमध्ये सर्व ५०० च्या जुन्या नोटा आहेत. पोलिसांनी रात्री दीड वाजता नाकाबंदीच्या वेळी ही कारवाई केली. ही कारवाई चालू असतांना सुधीर कोठारी यांनी पोलिसांसमक्ष पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी हे प्रकरण निवडणूक निर्णय अधिकार्‍याकडे सोपवले आहे. या नोटांचा वापर निवडणुकीच्या कालावधीत लोकांना वाटण्यासाठी होत असल्याचे बोलले जात आहे; मात्र रक्कम गाडीत सापडल्याने गुन्हा प्रविष्ट झालेला नाही. चौकशीनंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे कळते.

पुरोगाम्यांचे प्राक्तन

      पुरोगाम्यांच्या संदर्भात चीनमध्ये पाऊस पडला, तर भारतात छत्री उघडणारे, असे म्हटले जाते. हिंदुद्वेष हा पुरोगामी विचारांचा पाया आहे. मडगाव (गोवा) येथे नुकत्याच पार पडलेल्या दक्षिणायन या हिंदुद्वेषी परिषदेत हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. याशिवाय समाजातील अन्य कुठल्याही गोष्टीला यांचा विरोध करणे जणू यांच्या कार्यपद्धतीचाच एक भाग ! म्हणूनच समाजाच्या दृष्टीने ते पुरो(अधो)गामी ठरतात ! अशा पुरोगाम्यांच्या डोळ्यांत अंजन घालणारा अग्रलेख दैनिक लोकसत्तामध्ये २२.११.२०१६ या दिवशी प्रसिद्ध झाला आहे. त्यातील निवडक सूत्रे आमच्या वाचकांसाठी येथे देत आहोत.

लोक जिंकले, माध्यमे हरली... !

     काळा पैसा, बनावट चलन आणि जिहादी आतंकवाद यांच्यावर आळा घालण्यासाठी ८ नोव्हेंबर या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा ऐतिहासिक निर्णय दिला. त्यानंतर मात्र एकीकडे बहुतांश नागरिकांनी या निर्णयाला आपले अनुमोदन दिले असले, तरी दुसरीकडे बहुतांश प्रसारमाध्यमांनी जनतेला कशाप्रकारे हालअपेष्टा सोसाव्या लागत आहेत, अशा प्रकारची वृत्ते द्यायला किंबहुना रंगवायला आरंभ केला. या संपूर्ण घटनाक्रमाचा वेध घेणारा लेख आमच्या वाचकांसाठी साभार प्रकाशित करत आहोत. 
१. भारतीय जनतेने वेळोवेळी दिलेला राष्ट्रहितैशी कौल !
     आठवड्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चलनातील ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा क्रांतीकारक निर्णय घेतला. हा निर्णय प्रत्येक भारतियाच्या जीवनाला स्पर्श करणारा होता. अगदी युद्धाचा निर्णय घेतला, तरी त्याची झळ प्रत्येकाला पोहोचतेच असे नाही. परंतु, हा निर्णयच असा होता की, प्रत्येकाला त्याची झळ बसणे आणि त्याचा जीवनव्यवहार अवघड बनणे अपरिहार्य होते.

राष्ट्रभक्त स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासारखा द्रष्टा नेता सद्यस्थितीत देशात एकतरी आहे का ?

     जेव्हा देशाची फाळणी झाली, तेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकरांचे अखंड हिंदुस्थानचे स्वप्न भंगले. मात्र त्यांनी त्यासंबंधी अत्यंत दुःखाने केलेले भाकीत खरे ठरले. शस्त्रबळ वाढवा. प्रसंगी ब्रिटीश सैन्यात शिरूनही युद्धशास्त्र शिकून घ्या, अशी शिकवण सावरकर यांनी लेखणीने आणि वाणीने सतत दिली. त्या वेळी त्यांच्यावर टीका झाली. रिक्रूटवीर म्हणून त्यांची कुचेष्टा करण्यात आली; पण १९६२ या वर्षी चीनचे सत्य आणि क्रूर स्वरूप जेव्हा प्रकट झाले, तेव्हा अनेकांना सावरकर यांच्या द्रष्टेपणाची ओळख पटू लागली. सैन्यसामग्री वाढवण्याची घोषणा तेव्हाच्या संरक्षणमंत्र्यांना करावी लागली. केंद्रशासनालाही ती पटू लागली. वर्ष १९६५ मध्ये भारतीय सैन्याने जेव्हा पाकिस्तानवर एकामागून एक विजय मिळवले, तेव्हा रुग्णशय्येवर असलेल्या या पुरुषश्रेष्ठाच्या डोळ्यांत आनंदाश्रू उभे राहिले.
(साभार : सावरकर इतिहास दैनंदिनी) 
(संदर्भ : स्वातंत्र्यवीर दिवाळी विशेषांक २०१६)

घोटाळेबाज कंत्राटदारांना किती दिवस झेलायचे ?

     मुंबई महानगरपालिका ३०५ रस्त्यांची कामे नव्याने चालू करणार आहे. हे काम ज्या कंत्राटदारांना देण्यात येणार आहे, त्यांचा यापूर्वीच्या रस्त्याच्या कामात झालेल्या घोटाळ्यात सहभाग होता. यात ५७२ कोटी रुपयांचा घोटाळा झाला होता. निवडणुका तोंडावर आल्याने हा निर्णय घेण्यात आल्याची टीका प्रसारमाध्यमांतून होत आहे. सध्या खड्ड्यांमध्ये रस्ते अशी मुंबईची ओळख झाली आहे. खड्डेमुक्त रस्ते मिळण्याची स्वाभाविक मागणी जनतेकडून सातत्याने केली जाते. दुर्दैवाने या वर्षभरामध्ये रस्त्यांमुळे अनेक जणांचे बळी गेले. मग ती महाड येथे पूल कोसळल्याची दुर्घटना असो, रस्ते खचल्यामुळे किंवा खड्ड्यांमुळे झालेले अपघात असोत. त्यामुळे महापालिकेच्या या घोटाळेबाज कंत्राटदारांना रस्त्याची कामे देण्याच्या निर्णयाचा सर्वसामान्यांना फटका बसून त्याचे परिणामही गंभीर होऊ शकतात आणि तसे झाले, तर त्याला उत्तरदायी कोण रहाणार ?

संत आणि महर्षि यांच्या आशीर्वादामुळे अन् त्यांनी सांगितलेले विधी केल्यामुळे पुनर्जन्म झालेली ६६ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. दीपाली मतकर !

कु. दीपाली मतकर यांच्या आजारपणाचा घटनाक्रम, तिच्या सेवेतून 
अनुभवलेला आनंद आणि देव भक्ताची कशी काळजी घेतो ?, याची घेतलेली अनुभूती 
आधुनिक वैद्या
(सौ.) शिल्पा कोठावळे
कु. दीपाली मतकर
     २२.१०.२०१६ या दिवशी कु. दीपाली मतकर यांना डेंग्यू, न्यूमोनिया आणि कावीळ, असे विविध गंभीर आजार झाले. त्या वेळी त्यांना रुग्णालयात अतीदक्षता विभागात ठेवण्यात आले. त्यांच्या आजारपणाचा घटनाक्रम, त्यांची सेवा करतांना अनुभवलेला आनंद आणि अशा परिस्थितीत देव कशी काळजी घेतो ?, हे कोल्हापूर येथील साधिका आधुनिक वैद्या (डॉ.) सौ. शिल्पा कोठावळे यांनी जवळून अनुभवले. ते येथे देत आहोत.
         संत आणि महर्षि यांनी कु. दीपाली मतकर हिचा मृत्यू टळावा, यासाठी मार्गदर्शन करणे आणि त्यांच्या आशीर्वादामुळे तिचा मृत्यू टळणे, हेच तिची व्यष्टीसह समष्टी साधना किती चांगल्या तर्‍हेने चालू आहे, हे सिद्ध करते. यावरूनच ती संतपदाकडे लवकरच वाटचाल करील, याची निश्‍चिती झाली. 
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

कोल्हापूर येथील सनातन सेवाकेंद्रातील ध्यानमंदिरात ठेवलेल्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्राच्या सजीवतेविषयी साधकांना आलेल्या अनुभूती

१. कु. तृप्ती गावडे 
१ अ. छायाचित्र पाहिल्यावर प.पू. डॉक्टरांना स्थुलातून भेटल्याचा आनंद मिळणे : ६.३.२०१६ या दिवशी मी ध्यानमंदिराचा दरवाजा उघडून आत गेल्यावर छायाचित्रातील प.पू. डॉक्टरांचे डोळे पाणीदार दिसून ते हलत असल्याचे जाणवले. त्या वेळी जणू काही ते स्थुलातूनच येथे आहेत, असे वाटले. माझी दृष्टी प.पू. डॉक्टरांच्या छायाचित्रावर पडली आणि माझ्याकडून स्मितहास्य केले गेले. तेव्हा मला प.पू. डॉक्टर स्थुलातून भेटल्याप्रमाणे आनंद झाला. पूर्वी त्यांना स्थुलातून भेटायची पुष्कळ इच्छा व्हायची; पण आता नेहमीच ध्यानमंदिरातील त्यांचे छायाचित्र पाहून त्यांना प्रत्यक्ष भेटल्याप्रमाणे आनंदाची अनुभूती येते.

विविध दैवी घटना घडणे, ही भगवंताची कृपा असून ती भगवंत प.पू. डॉक्टरांच्या रूपाने समाजाला सांगत असणे आणि दैवी घटना या बुद्धीपलीकडील असल्याने अन्य कुणाच्याही लक्षात न येणे

श्री. राम होनप
     उच्च लोकांतून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके, दैवी नाद ऐकू येणे, दैवी कण प्राप्त होणे, रामनाथी आश्रमात दिव्याभोवती दिसणारी रंगीत वर्तुळे, चैतन्यामुळे लादी गुळगुळीत होणे, प.पू. डॉक्टरांच्या खोलीतील काचा अधिक पारदर्शक आणि आरशासारख्या होणे अन् खोलीतील भिंतींचा रंग फिकट पोपटी होणे इत्यादी अनेक दैवी पालटांची ओळख प.पू. डॉक्टरांच्या कृपेमुळे साधकांना झाली आहे. 
    एकदा माझ्या मनात विचार आला, या सर्व दैवी घटना सर्वप्रथम प.पू. डॉक्टरांनाच कशा समजतात ? अन्य कुणाच्या का लक्षात येत नाही ? त्यानंतर मनात पुढील विचार आले, काळानुरूप दैवी घटना घडणे, ही भगवंताचीच कृपा आहे. त्याची कृपा तोच जाणे !, यानुसार हे दैवी पालट घडत आहेत, हे पालट भगवंत आपल्याला प.पू. डॉक्टरांच्या रूपाने सांगत आहे. हे दैवी पालट बुद्धीपलीकडील असल्याने ते अन्य कुणाच्या लक्षात येत नाही.
- श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.११.२०१६)
सनातन प्रभातच्या वाचकांचा विश्‍वास संपादन करणारे आणि मृत्यूसमयीही सेवा पूर्ण करण्याचा ध्यास असणारे विवेक आफळे (वय ६० वर्षे) !

विवेक आफळे
     गोरेगाव, मुंबई येथील साधक विवेक आफळे (वय ६० वर्षे) १९९५ या वर्षापासून सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करत होते. यांच्यामुळेच सनातनचे पूर्णवेळ साधक श्री. वैभव आफळे (चुलत भाऊ) साधनेत आले. १९.११.२०१६ या दिवशी विवेक आफळे यांचे अकस्मात् निधन झाले. श्री. वैभव आफळे आणि त्यांच्या पत्नी सनातनच्या बोधचित्रकर्त्या सौ. गौरी वैभव आफळे यांना विवेक आफळे यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे त्यांच्या दशक्रियाविधीच्या निमित्ताने त्यांच्या चरणी कृतज्ञतापूर्वक अर्पण करत आहोत.
१. गुणवैशिष्ट्ये
१ अ. काटकसरीपणा
आर्थिक सुबत्ता असूनही ते स्वतःसाठी महागडे कपडे अथवा वस्तू यांसाठी पैसे व्यय करत नसत. त्यांचे राहणीमान साधे होते.
१ आ. निर्मळ मन
सनातन प्रभातचा नवीन वर्गणीदार झाला किंवा एखाद्या धर्मप्रेमीने धर्मकार्यात सहभागी होण्याचा विचार व्यक्त केला, तर एखाद्या लहान मुलाला परीक्षेत छान गुण मिळतात आणि तो आनंदाने सांगतो, त्याप्रमाणे दादा आम्हाला आनंदाने सांगायचे.

देवाप्रती श्रद्धा आणि भाव असणारा ५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा अन् उच्च स्वर्गलोकातून जन्माला आलेला कु. नलिन श्रेय टोंपे (वय ६ वर्षे) !

उच्चलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र 
चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. नलिन श्रेय टोम्पे एक दैवी बालक आहे !
कु. नलिन टोंपे
     (कु. नलिन याची वर्ष २०११ मध्ये आध्यात्मिक पातळी ५० टक्के होती. आता ५१ टक्के आहे.)
पालकांनो, हे लक्षात घ्या ! 
     तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले 
    यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर यूट्यूबच्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.

ऐसी भक्ती दे मज, तव चरणी लीन होण्यास ।

श्री. निमिष म्हात्रे
तव भक्ती दे मज, तव चरणी लीन होण्यास ।
तव भक्तीत हरपूनी जाई, होई सर्वांत तो निपुण ॥ १ ॥

नको फेडायला तुझे हे ऋण, तव भक्तीचाच येई मज गुण । 
दिली अमूल्य तू मज सेवा, साधकांचे रोग निवारण ॥ २ ॥

तव भक्तीतच याचे मूळ, तव भक्तीतच हे फळ । 
अशी भक्ती दे मज, तव चरणी लीन होण्यास ॥ ३ ॥ 

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...

सौ. ऋतुजा नाटे
साधकांना भावसागरात डुंबवणारा परात्पर गुरु डॉ. आठवले 
यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेला भावसोहळा !
       १०.५.२०१५ या दिवशी झालेल्या भावसोहळ्याला आज, म्हणजे १०.५.२०१६ या दिवशी एक वर्ष पूर्ण झाले. आजही ते क्षण आठवले की, भाव जागृत होतो. परात्पर गुरु डॉ. आठवले, तुम्ही विष्णूचे अवतार असल्याचे याच दिवशी महर्षींनी घोषित केले. हा दिवस सनातनच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवल्यासारखा दिवस होता, म्हणजे तो दिवस सुवर्णमय होय. आज तुमची आठवण आली, तेव्हा हा सोहळा आठवला. त्या सोहळ्याच्या माध्यमातूनही आम्हा सर्वांची साधना कशी झाली ?, हे आपल्या कृपेने लक्षात आले. ती सूत्रे मांडण्याचा प्रयत्न करते. 

१. भावसोहळा सर्वांनी अनुभवायचा असल्याचा निरोप आल्यावर देवाने सर्वांच्या मनाची दिशा एकाच विचारप्रक्रियेवर आणण्याचे कार्य करणे
      सोहळा सर्वांनी अनुभवायचा आहे, हा निरोप आदल्या रात्री आला. त्या वेळी संस्था स्तरावरील सर्व साधकांच्या मनाची दिशा एकाच विचारप्रक्रियेवर आणण्याचे कार्य देवाने केले. प्रत्येक जण हा सोहळा आपल्या जिल्ह्यात चांगला कसा अनुभवता येईल ? जास्तीत जास्त जणांपर्यंत निरोप कसा पोचेल ?, या नियोजनात होते. साधनेच्या मुख्य सूत्रांपैकी एक असलेले सूत्र, म्हणजे अनेकातून एकात जाणे !

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : 
Zakir Naik ke pratibandhit sangathan ne Rajiv Gandhi Trustko 
50 lakh rupayoka dan diya- NIA
Congresska jihadi chehra antataha sansarke samne aa hi gaya
जागो ! : 
जाकिर नाइक के प्रतिबंधित संगठन ने राजीव गांधी ट्रस्ट को ५० लाख रुपयों का दान दिया. - एनआइए
कांग्रेस का जिहादी चेहरा अंतत: संसार के सामने आ ही गया !

साधकांना सूचना

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
प्रारंभ - कार्तिक कृष्ण पक्ष चतुर्दशी (२८.११.२०१६) दुपारी ३.२१ वाजता
समाप्ती - कार्तिक अमावास्या (२९.११.२०१६) सायंकाळी ५.४८ वाजता
उद्या अमावास्या आहे.

काँग्रेसचा जिहादी चेहरा उघड !

फलक प्रसिद्धीकरता 
     डॉ. झाकीर नाईक यांची बंदी घालण्यात आलेली संस्था इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनने सोनिया गांधी आणि राहुल गांधी सदस्य असलेल्या राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्टला ५० लाख रुपयांची देणगी दिली होती, अशी माहिती राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या हाती आली आहे.

बोधचित्र


आनेवालेको कहना नहीं, जानेवालेको रोकना नहीं और पूछे बिगर रहना नहीं ।

॥ हरि ॐ तत्सत् ॥
संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
भावार्थ : आनेवालेको कहना नहीं मधे कहना हे विचारणे या अर्थी आहे. येणार्‍याला, म्हणजे जन्माला आलेल्याला तू जन्माला का आलास ? असे आपण विचारू शकत नाही. सृष्टीचे निर्माण बंद होऊ शकत नाही. जानेवालेको, म्हणजे मृत्यू पावणार्‍याला रोकना नहीं, म्हणजे आपण थांबवू शकत नाही. पूछे बिगर रहना नहीं, म्हणजे तू खरोखर कोण आहेस ? हे स्वतःला विचारल्याविना राहू नये. या प्रश्‍नाने तरी तो स्वतःच्या खर्‍या रूपाची ओळख करून घ्यायचा प्रयत्न करील. 
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥ 
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
   कुठे परधर्मियांवर कुरघोडी करून त्यांच्यावर राज्य करण्याची शिकवण देणारे काही पंथ, तर कुठे सर्वेषाम् अविरोधेण् ।, अशासारखी सहिष्णुतावादी शिकवण देणारा महान हिंदु धर्म ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

बुद्धीप्रामाण्यवाद्यांचे आधुनिक वाङ्मय राष्ट्र, धर्म आणि संस्कृती विघातक असणे अन् आंग्लछायेचा बुद्धीमान पंडितांवर विलक्षण परिणाम होणे

     आधुनिक वाङ्मय राष्ट्र, धर्म आणि संस्कृती विघातक आहे. त्यात भारताची अस्मिता नाही. ते भाडोत्री आहे. तिथे उचलेगिरी आहे. अपौरुषेय वेदांना वेड्याची बडबड आणि दारुड्याचे बरळणे ठरवणार्‍या या आधुनिकांचे तर्कबुद्धी मारण्याचे प्रकार फार अमानुष आहेत. या पराभूत मनोवृत्तीचा प्रभाव आमच्या आंग्लछायेच्या बुद्धीमान पंडितांवर विलक्षण व्यापक आणि खोल आहे. आम्ही विचार करणार कि नाही ?
- गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (मासिक घनगर्जित, फेब्रुवारी २०१३)

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

संयमाची आवश्यकता !
संस्कृती हा केवळ विद्वत्तापूर्ण चर्चा करण्याचा विषय नसून 
नित्य आपल्या मनावर नियंत्रण ठेवणे आणि इतरांच्या दुःखाची जाणीव ठेवणे, हीच खरी संस्कृती !
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

सुरक्षेचे दायित्व !

संपादकीय
     विधानसभा निवडणुकांपूर्वी सर्व हिंदुत्वनिष्ठ नेत्यांना ठार मारा, असा आदेश जिहादी आणि खलिस्तानी आतंकवादी यांना आयएस्आयने दिला आहे. हिंदुत्वनिष्ठ नेत्यांच्या हत्या झाल्यामुळे जातीय दंगली उसळून त्याचा लाभ शीख आतंकवादी, लष्कर-ए-तोयबा आदी आतंकवादी संघटना उठवतील, असा आयएस्आयचा कयास आहे. त्यासाठी कालावधीही निवडणुकीपूर्वीचाच निवडला आहे. यामुळे हिंदूंच्या सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण झाला असला, तरी यामुळे निवडणूक प्रक्रियेतील सुरक्षेच्या संदर्भातही प्रश्‍न उपस्थित होत आहेत. केवळ हिंदुत्वनिष्ठ नेत्यांना सुरक्षा पुरवा, असे म्हणणे संकुचितपणाचे होईल. निवडणूक प्रक्रियेतील ज्या त्रुटींचा आधार घेत पाकड्यांना आक्रमण करावे वाटत आहे, त्या त्रुटी सुधारण्यासाठी प्रयत्न केल्यास ती उपाययोजना दीर्घकालीन असेल.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn