Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।


परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कृतज्ञता

    वैशाख कृष्ण पक्ष सप्तमी (२९.५.२०१६) ते वैशाख कृष्ण पक्ष सप्तमी (१८.५.२०१७) हे मंगलमयी वर्ष सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अमृतमहोत्सवी वर्ष आहे. अध्यात्मातील जिज्ञासूंना मोक्षाचा मार्ग दाखवणारे, आनंदी जीवनासाठी सामान्यजनांना सहज-सोप्या भाषेत अध्यात्म शिकवून त्यांच्या जीवनातील अंधःकार दूर करणारे, हिंदु धर्माभिमान्यांच्या कार्याला दिशा देऊन हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी अहोरात्र झटणारे परात्पर गुरु डॉ. आठवले; म्हणजे आमची गुरुमाऊली !

श्रीमत्नारायणाची स्तुती करण्यासाठीच साधकांचा जन्म आहे !

   महर्षी म्हणतात, खरे अध्यात्म काय आहे ?, हे साधकांना कळले पाहिजे. नारदांप्रमाणे श्रीमत्नारायणाची स्तुती संपूर्ण जगामध्ये करण्यासाठीच आपल्या सर्व साधकांचा जन्म आहे, हे प्रत्येक साधकाने लक्षात ठेवले पाहिजे. (संदर्भ : नाडीवाचन क्रमांक १०२, कांचीपूरम्, तमिळनाडू, १७.१०.२०१६)
- (पू.) सौ. अंजली गाडगीळ, ईरोड, तमिळनाडू. (१२.३.२०१६, सायं. ५.१३)

साधकांनो, गुरुचरण सोडून कुठेही जाऊ नका ! - महर्षि

   महर्षी म्हणतात, देवावर आमची पूर्ण श्रद्धा आहे. देवाने आम्हाला जे सांगितले, तेच आम्ही या नाडीशास्त्रात लिहिले. देवाने आम्हाला सांगितले की, साधकांना कैलासात, वैकुंठात दर्शन घ्यायला यायची आवश्यकता नाही. त्यासाठी आम्ही परम गुरुजींनाच अवताराच्या रूपात पृथ्वीवर पाठवले आहे. त्यांच्या दर्शनानेच साधकांना देवाचा आशीर्वाद मिळणार आहे. त्यामुळे साधकांनो, गुरुचरण सोडून कुठेही जाऊ नका. (संदर्भ : नाडीवाचन क्रमांक ६५, १०.३.२०१६)

परात्पर गुरु डॉ. आठवले प्रत्यक्ष श्रीरामच आहेत ! - महर्षि

    महर्षि म्हणतात, श्रीरामाचे गुरु श्री वशिष्ठ होते. त्या काळातही यज्ञयागात अनेक राक्षस ऋषिमुनींना त्रास देत होते. राक्षसांकडून कोणत्याही प्रकारचा उपद्रव होऊ नये आणि यज्ञाचे रक्षण व्हावे, यासाठी दशरथाकडून श्रीरामाला घेऊन येण्यासाठी महर्षि विश्‍वामित्र तेथे गेले; परंतु दशरथ श्रीराम अजून लहान आहे, असे म्हणून श्रीरामचंद्रांना पाठवण्यास तयार होईना. त्या वेळी महर्षि वशिष्ठ स्वतः तेथे गेले आणि त्यांनी दशरथाला वचन दिले, श्रीरामाला काही होणार नाही. त्याची सर्वतोपरी काळजी आम्ही घेऊ. हे पहा !, आताच्या नाडीवाचनात सांगणारा मी वशिष्ठ आहे, मला प्रश्‍न विचारणारे विश्‍वामित्र आहेत आणि तेच श्रीराम आता प.पू. डॉक्टर आहेत. परम गुरुजी स्वयंप्रकाशी आहेत. श्रीराम जसे सर्वत्र फिरले, तसे आता दैवी प्रवासाअंतर्गत परम गुरुजींच्या आज्ञेनुसारच ही कार्तिक पुत्री सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ) सर्वत्र जात आहे. या सर्वांनाच आमचा भरभरून आशीर्वाद आहे. (संदर्भ : नाडीवाचन क्रमांक ४८, २६.११.२०१५)- सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ, तिरुवण्णामलै, तमिळनाडू. (२६.११.२०१५)

कोटी कोटी प्रणाम !

संत ज्ञानेश्‍वर महाराज समाधीदिन
सनातनच्या ८ व्या संत पू. प्रेमा कुवेलकर आजी
यांचा आज वाढदिवस
दैनिक सनातन प्रभातच्या पश्‍चिम महाराष्ट्र
आवृत्तीचा आज वर्धापनदिन

हिंदु जनजागृती समितीच्या फेसबूक पानाने ओलांडला १२ लाख सदस्यसंख्येचा टप्पा !

हिंदु जनजागृती समितीच्या हिंदू अधिवेशन या पानाला हिंदूंचा मोठ्या प्रमाणावर सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. १५ सप्टेंबर २०१६ या दिवशी पानाच्या सदस्यसंख्येने ११ लक्ष सदस्यसंख्येचा हा टप्पा ओलांडला होता. म्हणजेच साधारण २ महिन्यांच्या कालावधीत समितीच्या या फेसबूक पानाची सदस्यसंख्या १ लक्षाने वाढली. हे सर्व श्रीकृष्णाच्या आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळेच शक्य झाले आहे, अशी कृतज्ञता संकेतस्थळ प्रतिनिधींनी व्यक्त केली.
     
मुंबई - हिंदु जनजागृती समितीच्या हिंदू अधिवेशन या फेसबूक पानाच्या सदस्यसंख्येने १४ नोव्हेंबर २०१६ या दिवशी १२ लक्ष सदस्यसंख्येचा महत्त्वाचा टप्पा ओलांडला. हिंदु जनजागृती समितीच्या कार्याची ओळख आणि प्रसाराचाच एक भाग म्हणून समितीने इंग्रजी भाषेतील हिंदूजागृती हे फेसबूक पान चालू केले होते. आसाम दंगलीच्या संदर्भात सत्यनिष्ठ वृत्ते दिल्यामुळे तत्कालीन काँग्रेस सरकारने समितीचे हिंदूजागृती हे फेसबूक पान बंद केले होते. त्यामुळे समितीने अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या प्रसारासाठी प्रारंभ केलेले हिंदू अधिवेशन हे फेसबूक पान समितीचे अधिकृत फेसबूक पान म्हणून वापरण्यास प्रारंभ केला. हे पान गेल्या ४ वर्षांहून अधिक काळ राष्ट्र आणि धर्म यांच्या जागृतीचे कार्य करत आहे. समितीच्या फेसबूक पानाची मार्गिका : https://www.facebook.com/HinduAdhiveshan

आळंदी येथील वारकरी महाअधिवेशनात समस्त वारकर्‍यांची एकमुखी मागणी !


अंधश्रद्धा निर्मूलन समितीवर बंदी घाला ! 
 श्रीक्षेत्र आळंदी (जिल्हा पुणे), २६ नोव्हेंबर (वार्ता.) - अंधश्रद्धा निर्मूलनाच्या नावाखाली सातत्याने सनातन हिंदु धर्म, धर्मपरंपरा, रूढी यांवर टीका करणार्‍या अंधश्रद्धा निर्मूलन समितीवर बंदी घाला, अशी एकमुखी मागणी आळंदी येथे झालेल्या १२ व्या वारकरी महाअधिवेशनात करण्यात आली. संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त प्रतिवर्षीप्रमाणे वारकरी संप्रदाय, राष्ट्रीय वारकरी सेना आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने या महाअधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. (नुकतेच अंनिसने त्यांच्या मासिक आंदोलनात काही वारकर्‍यांना सोबत घेऊन वारकरी संप्रदाय अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी नाळ जोडू पहात असल्याचा दावा केला होता. आळंदी येथे वारकरी अधिवेशनात अंनिसवर बंदी घालण्याच्या संदर्भात केलेल्या ठरावामुळे मात्र अंनिसचे पितळ उघडे पडले ! - संपादक) या जोडीला सर्व तीर्थक्षेत्रे मद्य-मांस मुक्त करावीत, अशी आग्रही मागणीही या वेळी करण्यात आली. २५ नोव्हेंबर या दिवशी येथील श्री संत मोतीराम महाराज फळेकर फड या ठिकाणी हे महाअधिवेशन पार पडले.

मुंबई येथील सॅफरन आर्ट गॅलरीच्या वतीने हिंदुद्वेषी चित्रकार म.फि. हुसेन यांच्या चित्रांचा ऑनलाईन लिलाव

  • चित्रविक्रीला वैध मार्गाने निषेध नोंदवण्याचे हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी नागरिकांना आवाहन !
  • हिंदुबहुल देशात हिंदूंच्या देवता आणि भारतमाता यांचे चित्राद्वारे विकृतीकरण करणे अन् अशा चित्रांची विक्री होणे, हे संतापजनक ! अशी चित्रे विक्री आणि खरेदी करणार्‍या हिंदूंवर देव कधी कृपा करील का ? 
     मुंबई, २६ नोव्हेंबर (वार्ता.) - भारतमातेचे नग्न चित्र काढून समस्त भारतियांची राष्ट्रीय भावना दुखवणारे आणि हिंंदूंच्या देवतांची अश्‍लील चित्रे काढून कोट्यवधी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखवणारे दिवंगत हिंदुद्वेषी चित्रकार म.फि. हुसेन यांच्या चित्रांचा येथील सॅफरन आर्ट गॅलरीच्या वतीने ऑनलाईन लिलाव करण्यात येणार आहे. यासाठी ३० नोव्हेंबर ते १ डिसेंबर या कालावधीत saffronart.com या संकेतस्थळावर हुसेन यांची चित्रे विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहेत. हुसेन यांच्या चित्रांची विक्री करण्याच्या या धोरणाविषयी अनेक राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी नागरिकांनी हिंदु जनजागृती समितीकडे निषेध नोंदवला आहे. या चित्रव्रिकीला वैध मार्गाने निषेध नोंदवावा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी नागरिकांना करण्यात आले आहे.

राष्ट्रद्रोही आणि हिंदुद्रोही घटनांचा निषेध संयत मार्गाने करा !


हिंदुद्रोह्यांचा निषेध करण्यामागचा मुख्य उद्देश त्यांचे वैचारिक परिवर्तन करणे, हा आहे. त्यामुळे कोणाचाही निषेध करतांना तात्त्विक सूत्रांच्या आधारे वैचारिक स्तरावर करा ! चुकणार्‍या व्यक्तीला तिच्या चुका सांगून योग्य मार्गावर आणणे, हा व्यापक दृष्टीकोन निषेध व्यक्त करण्यामागे हवा !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आजारपणात उलटी करण्यासाठी वापरलेल्या भांड्याला आपोआप सुगंध येत असल्याने त्याचा वातावरणावर होणारा परिणाम अभ्यासण्यासाठी पिप तंत्रज्ञानाच्या साहाय्याने महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने केलेली वैज्ञानिक चाचणी !

        संतांचे जीवन अद्भुत असते. संत जसजसे ईश्‍वराच्या समीप जातात, तसतसे त्यांच्या शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक गुणवैशिष्ट्यांत पालट होत जातात. साधनेमुळे हे पालट होतात; कारण त्यांच्यात सत्त्वगुण वाढतो. संतांच्या गुणांतील पालटांसह त्यांच्या शरिरामध्येही स्थुलातून पालट होतात, म्हणजे त्यांच्यातील दैवीपण स्थुलातूनही दिसू लागते; म्हणूनच याला दैवी पालट म्हणतात. संतांच्या चैतन्याचा परिणाम त्यांच्या वापरातील वस्तूंवरही होतो. अशा दैवी पालटांचा अभ्यास केल्यास अध्यात्मातील अनेक नवीन गोष्टी उलगडतील आणि मिळालेल्या ज्ञानाचा मानवाच्या कल्याणासाठी उपयोग होईल. या उद्देशाने परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी स्वतःचा देह, वस्तू आणि वास्तू यांमधील पालटांचा अभ्यास केला आहे.
         वर्ष २००७ मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आजारपणात उलटी करण्यासाठी वापरलेल्या भांड्याला आपोआप सुगंध येऊ लागल्याचे लक्षात आले. हा सुगंध अजूनही टिकून आहे. संतांच्या वापरातील वस्तूमध्ये झालेल्या दैवी पालटाचे हे एक उदाहरण आहे. या वैशिष्ट्यपूर्ण भांड्याचा वातावरणावर होणार्‍या परिणामाचा वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यास करण्यासाठी १६.११.२०१६ या दिवशी गोवा येथील सनातनच्या आश्रमात घेण्यात आलेल्या चाचणीत पिप (पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी) या वस्तू आणि व्यक्ती यांच्या ऊर्जाक्षेत्राचा (ऑराचा) अभ्यास करण्यासाठी उपयुक्त असलेल्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. या चाचणीची निरीक्षणे आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे.

आज संत ज्ञानेश्‍वर महाराज समाधीदिन त्यानिमित्ताने...

१. आळंदीचे बोलणारे वृक्ष ! 
     वनस्पती बोलतात, हे ज्ञानेश्‍वरांनी सिद्ध करून दाखवलेले आहे. आधुनिक विज्ञानामध्ये हेही घडू शकते की, वनस्पती बोलतात, माणसांना ते कळते आणि त्याप्रमाणे माणसे वागतात. ज्ञानेश्‍वरांची पालखी आळंदीहून पंढरपूरला जाण्यासाठी ज्या क्षणी उचलली जाते, त्या क्षणी आळंदीतील ज्ञानेश्‍वरांच्या समाधी मंदिराचा कळस हलतो आणि त्याच वेळी अजानवृक्षाची शाखा त्यांच्याकडे झेपावलेली असते. हे मी बर्‍याच वेळा पाहिलेले आहे. अशा रितीने वास्तू आणि वनस्पती एकमेकांशी किती संलग्न असतात, याचे उत्तम उदाहरण म्हणजे आळंदी !
२. विशिष्ट उपकरणांनी आळंदीतील चैतन्य मोजणे शक्य ! 
     आळंदीत जर विशिष्ट उपकरणे (मीटर्स) घेऊन गेलो, तर ठराविक दिवशी, ठराविक वेळी, ठराविक काळी आणि ठराविक प्रहरामध्ये तेथील चैतन्य आपल्याला त्याने मोजता येते. 
लेखक : डॉ. रघुनाथ शुक्ल (संदर्भ : विश्‍वचैतन्यातील गूढ, भाग १)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे गौरवशाली चरित्रग्रंथ !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या 
कार्याची महती सांगणारा सनातनचा ग्रंथ !
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कार्याचा 
संक्षिप्त परिचय आणि संतांनी केलेला गौरव
  • परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अद्वितीय सर्वव्यापी कार्य ! 
  • परात्पर गुरु डॉ. आठवले यांंच्या कार्याचा गुरूंनी केलेला गौरव ! 
  • परात्पर गुरु डॉ. आठवले यांंच्या कार्याविषयी संतांचे गौरवोद्गार !
  • परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा विविध संतांनी केलेला सन्मान ! 
  • परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयीचा संतांचा कृतज्ञताभाव !
  • परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा गुरूंविषयी असलेला कृतज्ञताभाव !

सनातनची ग्रंथसंपदा ऑनलाईन खरेदी करा !

SanatanShop.com
------------------------------------------------
सनातनच्या वितरकांकडे उपलब्ध असलेले ग्रंथ
संपर्क : ९३२२३ १५३१७

विकार-निर्मूलनासाठी रिकाम्या खोक्यांचे उपाय (२ भाग)

भावी आपत्काळातील संजीवनी 
या सनातनच्या ग्रंथमालिकेतील नूतन ग्रंथ !
भाग १ : महत्त्व आणि उपायपद्धतीचे मूलभूत विवेचन 
भाग २ : खोक्यांचे उपाय कसे करावेत ?
       बहुतांश विकारांना कारणीभूत असणारा वाईट शक्तींचा त्रास नष्ट करण्यासाठी आध्यात्मिक स्तरावरील उपायच योजावा लागतो. रिकाम्या खोक्यांचे उपाय हा एक उत्तम आध्यात्मिक उपाय आहे.
       रिकाम्या खोक्यात पोकळी असते. पोकळीत आकाशतत्त्व असते. आकाशतत्त्वामुळे आध्यात्मिक उपाय होतात. आध्यात्मिक उपायासाठी खोके वापरल्याने व्यक्तीचा देह, मन आणि बुद्धी यांवरील त्रासदायक शक्तीचे आवरण, तसेच व्यक्तीमधील त्रासदायक शक्ती खोक्यातील पोकळीत खेचली जाऊन नष्ट केली जाते. यामुळे विकारही लवकर नष्ट होण्यास साहाय्य होते.
       ही अत्यंत सोपी आणि बंधनविरहित उपायपद्धत केवळ आपत्काळाच्या दृष्टीनेच नाही, तर नेहमीसाठीही उपयुक्त आहे.
प्रस्तुत ग्रंथ ५ डिसेंबर २०१६ 
पर्यंत वितरणासाठी उपलब्ध होईल.

प्राणशक्ती (चेतना) वहन संस्थेतील अडथळ्यांमुळे होणार्‍या विकारांवरील उपाय

भावी महायुद्धकाळात डॉक्टर, 
वैद्य, औषधे आदी उपलब्ध नसतांना, 
तसेच नेहमीसाठीही उपयुक्त ग्रंथ !
        शरिरातील प्राणशक्ती (चेतना) वहन संस्थेत अडथळे निर्माण झाल्यास विकार निर्माण होतात. ते अडथळे स्वतः शोधून दूर करण्याचे नाविन्यपूर्ण उपाय या ग्रंथात सांगितले आहेत. आगामी भीषण आपत्काळाचा विचार करता रोगनिवारणाच्या संदर्भात कोणाच्याही साहाय्याची आणि कोणत्याही साधनांची आवश्यकता न भासणारी प्राणशक्तीवहन संस्था उपायपद्धत अधिक स्वयंपूर्ण ठरते. या ग्रंथातील माहितीच्या आधारे स्वतःच स्वतःवर उपाय करा आणि रोगमुक्त व्हा ! 

प.पू. डॉक्टरांच्या अमृत महोत्सवानिमित्त अर्पिलेली भावसुमनांजली !

श्री. श्रीरामप्रसाद कुष्टे
प.पू. गुरुमाऊली, तुझ्या चरणी शिरसाष्टांग नमस्कार
       आज मला पहाटे २.४५ वाजता जाग आली आणि तुझ्या आठवणीने कंठ दाटून भावजागृती झाली. एक कविता तू लिहून घेतलीस. ती अशी आहे. या वेळी श्रीश्रीजयंत बाळाजी आठवले, जय गुरुदेव । हा नामजप सतत होत होता.
चैतन्याची माऊली ।
चैतन्याची माऊली चैतन्यच प्रसवणार । 
चैतन्याच्या पोटी चैतन्यच जन्मणार ॥ १ ॥
चैतन्याच्या खाणीत चैतन्यच मिळणार । 
चैतन्य आनंदच पसरवणार, तेथे दुःखाला थारा कसा मिळणार ? ॥ २ ॥
चैतन्य प्रकाशच देणार, तेथे अंधार कसा असणार ? ।
म्हणूनी आम्ही सारे आनंदी, एकमेकांना आनंदच देणार ॥ ३ ॥
आनंदाच्या डोहात सर्वच बुडणार, आनंदात न्हाऊन जाणार ।
एकूणच काय, आपण सतत चैतन्यात अन् आनंदात रहाणार ।
एक दिवस चैतन्यात विलीन होणार, म्हणजे मोक्षास जाणार ॥ ४ ॥
- श्री. श्रीरामप्रसाद कुष्टे, ढवळी, फोंडा, गोवा. (२९.५.२०१६)

सहस्रो वर्षांच्या कालपटलावर ठसा उमटवणारे अवतारी पुरुष परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले !

त्रैलोक्याचे योगीराज हे अवतरले भूवरी !
     सर्वसामान्य माणसाचे जीवन म्हणजे चिमण्या-पाखरं करतात, तसा चार काटक्यांचा संसार ! त्यातूनही जी व्यक्तीमत्त्वे स्वार्थ त्यागून समाज, राष्ट्र आणि धर्म यांच्यासाठी जगतात, ते विभूती असतात. अशा अनेक विभूती भारताने अंगाखांद्यावर खेळवल्या आहेत. काही व्यक्तीमत्त्वे स्वत:च्या कार्याचा ठसा त्या-त्या काळावर उमटवतात आणि कीर्तीवंत होतात. अशा काही महापुरुषांची देणगीही भारताने जगाला दिली आहे. या सर्वांच्याही पुढे जाऊन सहस्रो वर्षे मानवजातीवर प्रभाव राहील, असे कार्य करणारे, लाखो जिवांच्या अंतरंगात पालट करून त्यांच्यामध्ये देवत्व निर्माण करणारे अवतारी पुरुषही या भूमीवर जन्मले आहेत. असेच एक अवतारी रूप ईशकृपेने आम्ही साधक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या माध्यमातून अनुभवत आहोत. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे संपूर्ण जीवन आणि शिकवण जीवन कशासाठी आणि कसे जगायचे ? याचा एक वस्तूपाठ आहे. त्यांच्या शब्दांतील आणि कृतींतील शिकवणीमुळे अनेक साधकांच्या भावविश्‍वाला देवत्वाचे कोंदण लाभले आणि ते जीवन धन्य झाले ! या कृतज्ञताभावात आज जगत आहेत. असे सहस्रो व्यक्तींचे जीवन सर्वार्थाने समृद्ध करणारे हे अवतारी पुरुष कसे असतात ?, याचे संपूर्ण आकलन सामान्य बुद्धीला होणे किंवा त्यांना शब्दांत साठवणे तसे कठीणच; पण आम्हाला त्यांचे अवतारत्व अंशरूपाने अनुभवता येते. त्यांच्याच कृपेने आम्ही अनुभवलेले परमपूज्य डॉक्टर (परात्पर गुरु डॉ. आठवले) शब्दबद्ध करण्याचा हा बाळबोध प्रयत्न !

आध्यात्मिक उपायांच्या नवनवीन पद्धतींचे जनक : परात्पर गुरु डॉ. आठवले !

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे द्रष्टेपण !
       जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, असे सुवचन आहे. उच्च कोटीतील संत काळाच्या पलीकडीलही पाहू शकतात. अशाच उच्च कोटीतील संतांपैकी एक म्हणजे सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले ! तिसरे महायुद्ध, भयंकर नैसर्गिक आपत्ती आदींच्या रूपातील आगामी आपत्काळ परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी वर्ष २००४ मध्येच ओळखला आणि अखिल मानवजातीचे जीवित आणि आरोग्य यांच्या रक्षणासाठी त्यांनी भावी आपत्काळातील संजीवनी ही ग्रंथमालिका सिद्ध करण्यास आरंभ केला. पुढील ग्रंथ हे याच मालिकेतील ग्रंथ आहेत.
आध्यात्मिक उपायांच्या नवनवीन पद्धतींचे विवेचन करणारे 
जगाच्या पाठीवरील एकमेव परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले !
       व्यक्तीला होणार्‍या शारीरिक आणि मानसिक त्रासांचे कारण बहुतेक वेळा आध्यात्मिक असते. त्यातील प्रमुख कारण म्हणजे वाईट शक्तींचा त्रास. हे त्रास दूर होण्यासाठी आजवर परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आध्यात्मिक उपायांच्या अनेक नवनवीन पद्धतींचे विवेचन केले आहे, उदा. प्राणशक्ती (चेतना) वहन संस्थेतील अडथळ्यांमुळे होणार्‍या विकारांवरील उपाय, रिकाम्या खोक्यांचे उपाय. या उपायपद्धतींचा सनातनच्या शेकडो साधकांना लाभ होत असल्याने या पद्धती प्रमाणभूत शास्त्रेच झाली आहेत. या पद्धतींचे सविस्तर विवेचन करणारे पुढील ग्रंथ वाचकांनी अवश्य संग्रही ठेवावेत.

सनातनच्या आश्रमांमध्ये घडलेल्या आणि घडणार्‍या सूक्ष्मातील अद्वितीय चांगल्या घटना

     बहुतेक सर्वच घटना (परात्पर गुरु) डॉ. आठवले रहात असलेल्या रामनाथी आश्रमातील आहेत, तर काही देवद आश्रमातील आहेत. देवद आश्रमातील घटनांत देवद आश्रमाचा उल्लेख केला आहे.
१. पंचमहाभूते
१ अ. पृथ्वीतत्त्व
१. आश्रमात ठिकठिकाणी विविध गंध येणे आणि काही वेळा गंध आल्यावर नाकात झिणझिण्या येणे 
२. प.पू. डॉक्टरांनी भृगु महर्षींच्या आदेशावरून भृगुसंहितेचे प्रासादिक पान प्रतिदिन डोक्याला लावून त्याला नमस्कार केल्यावर ६ मासांनी (महिन्यांनी) त्या पानाला पुष्कळ सुगंध येण्यास आरंभ होणे (१५.१०.२०१६)

साधकांना कधी विनोदातून, तर कधी गंभीरपणे अध्यात्म शिकवणारे आणि योग्य दृष्टीकोन देऊन समष्टीचे कल्याण करणारे अवताररूपी परात्पर गुरु डॉ. आठवले !

     प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) भक्तांना विनोदातून काही ना काही अध्यात्म शिकवत असत. त्याप्रकारे प.पू. डॉक्टरही साधकांना विनोदातून शिकवतात. संत आणि गुरु यांचे वाक्य हे ब्रह्मवाक्य असते आणि ते समष्टीला काहीतरी शिकवते. असेच काही विनोद सेवा करतांना शीव येथेही घडत असत. ते प्रसंग खाली दिले आहेत. त्याकडे विनोद म्हणून न पहाता त्यातून प्रत्येकाला शिकता येईल आणि त्याचा साधनेच्या दृष्टीकोनातून उपयोग करता येईल. 
१. व्यावहारिक जीवनातील
व्यक्तीचेही कल्याण व्हावे, असा विचार 
करणारी जगद्गुरु माऊली प.पू. डॉक्टर ! 
श्री. दिनेश शिंदे
१ अ. भिंतीला फळी ठोकण्यासाठी बाहेरून सुतार येणे आणि त्याने फळी ठोकतांना प.पू. डॉक्टरांनी केलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष करणे : एकदा शीव येथे साहित्य ठेवण्यासाठी भिंतीला लाकडाची फळी ठोकायची होती. त्यासाठी एका साधकाच्या सुतारकाम करणार्‍या मित्राला बोलावले होते. तो भिंतीला फळी ठोकत असतांना प.पू. डॉक्टर मधे-मधे येऊन त्याला काही सूचना देत होते, भिंतीत खिळा मोठा मारा म्हणजे फळीला वजन पेलवेल. तो त्या सूचनेचा विचार न करता प.पू. डॉक्टरांना इंग्रजीमधे डोन्ट वरी, बी हॅपी असे म्हणाला. त्या वेळी आम्ही त्याला हळूच कानात सांगितले, अरे, त्यांच्याशी असे काही बोलू नकोस. ते सांगतात तसे कर. असे सांगितल्यानंतरही त्याचे ते पालूपद चालूच होते.

ज्ञानेश्‍वरमाऊलींचे पसायदान आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे महान कार्य यांतील साम्य दर्शवणारी सूत्रे !    एके दिवशी मी ध्यानमंदिरात जप करत बसलो होतो. कानांवर विश्‍वदर्शन देवतेचा जप पडत होता. इतक्यात माझ्या मनःपटलावर आतां विश्‍वात्मकें देवें ...। या पसायदानातील पहिल्या काही ओळी तरळून गेल्या. त्याच वेळी सप्तर्षींनी प.पू. डॉक्टरांविषयी सांगितलेल्या ओळी आठवल्या आणि प.पू. डॉक्टर हे विश्‍वात्मक देव असल्याचे अंतर्मनातून येऊ लागले. सर्व विचारांना एकत्रित करून ते लिहून काढले. तेव्हा लक्षात आले की, ८०० वर्षांपूर्वी संत ज्ञानेश्‍वरांनी पसायदानात विश्‍वात्मक देवाकडे जे मागणे मागितले, ते आणि प.पू. डॉक्टर करत असलेले महान कार्य यांत पुष्कळ साम्य आहे. माझ्या अल्पमतीला जे आकलन झाले, जे श्रीकृष्ण मला सांगत आहेत, असे वाटले, ते आपल्या पुढे सादर करत आहे.

तव हस्तस्पर्शे तुलसीमाता पावन होई । तव दर्शने साधनेस मिळावे चैतन्यपाणी ।

चित्रांकन : सौ. उमा रविचंद्रन, चेन्नई.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कार्याविषयी मान्यवरांनी काढलेले उद्गार

परात्पर गुरु डॉ. आठवले यांना आद्य शंकराचार्य 
किंवा समर्थ रामदास यांचे अवतारच म्हणावे लागेल !
     आज जाणीवपूर्वक, श्रद्धेने आणि ईश्‍वरी प्रेरणेने जागृती करणारी व्यक्ती कोण असेल, तर डॉ. जयंतराव आठवले ! त्यांना आद्य शंकराचार्य किंवा समर्थ रामदास यांचे अवतारच म्हणावे लागेल. डॉ. आठवले यांना आजच्या भाषेत संत म्हणणे चूक ठरेल. मला तुलना करायची नाही; पण सांप्रदायिक संतांमध्ये आरती स्वतःभोवती असते. असे एक चालकानुवर्तेपण सनातनमध्ये नाही. डॉ. आठवलेे निरीच्छ आहेत ! - ज्योतिर्विद्यावाचस्पति श्री. श्री. भट, डोंबिवली, जिल्हा ठाणे (मासिक धनुर्धारी, जून २०११)

प.पू. डॉक्टर, तुमच्याकडून हरण्यातच आम्हाला आनंद आहे !

(पू.) श्री. रमेश गडकरी
      २४.७.२०१६ या दिवशी दैनिक सनातन प्रभातमध्ये प.पू. गुरुदेवांची प.पू. डॉक्टर कृष्ण नसल्याचे आणखी एक विश्‍लेषण या मथळ्याखालील चौकट प्रसिद्ध झाली होती. ती वाचून माझ्या मनात आलेले विचार पुढे देत आहे.
       खरंच गुरुदेवा ! जरी तुम्ही म्हणत असाल, साधकांनो, तुम्ही जिंकलात आणि मी हरलो, तरी बोलण्यात तुम्हाला कुणीच हरवू शकत नाही. नेहमी तुम्हीच जिंकता अन् आम्ही हरतो.
       प्रारंभी तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही कुलदेवतेचा जप केला. त्यामुळे आम्हाला आपण गुरु म्हणून मिळालात. तेव्हा आम्हाला कुलदेवतेच्या जागी तुम्हीच जाणवायचा आणि आम्हाला तुमचे नाम घेण्यात अधिक आनंद मिळायचा. नंतर नामातील आनंद मिळत असतांना तुम्ही म्हणालात, त्याप्रमाणे आम्ही तुमचे नाम न घेता श्रीकृष्णाचा नामजप केला; म्हणून आम्हाला श्रीकृष्ण मिळाला. श्रीकृष्णाचे नाम घेतांनासुद्धा त्याच्या ठिकाणी आम्हाला तुम्हीच जाणवत होता. आता प्रत्यक्ष महर्षींनी सांगितले आहे, तुम्ही भगवान नारायण, हरि आहात; पण तुम्ही म्हणता, मी त्याचा निरोप देणारा आहे. तुम्हाला कोण हरवणार ? तुमच्याकडून हरण्यातच आम्हाला आनंद आहे.
     हे लिहिल्यावर मनात विचार आला, हे वाचून पुन्हा एकदा आपण म्हणाल, साधकांनो, तुम्ही जिंकलात, मी हरलो !
- (पू.) श्री. रमेश गडकरी, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२६.८.२०१६)

साधकांना सूचना

सनातनच्या संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नका !
सनातनच्या संतांचा वाढदिवस असलेल्या दिवशी त्यांच्या संदर्भात साधकांनी दैनिक सनातन प्रभातमध्ये गुणवैशिष्ट्ये लिहून दिलेली असतात. त्यामुळे सर्वत्रच्या साधकांचे त्या संतांना भ्रमणभाष येतात. संतांना दिवसभर अनेक साधकांशी भ्रमणभाषवर बोलावे लागत असल्याने त्यांच्या सेवेतील अमूल्य वेळ वाया जातो. सध्या आपत्काळाला आरंभ झाल्यामुळे एकेक क्षण महत्त्वाचा आहे. स्थुलापेक्षा सूक्ष्म श्रेष्ठ असल्याने साधकांनी संतांना भ्रमणभाष न करता त्यांना मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

साधकांना सूचना

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
प्रारंभ - कार्तिक कृष्ण पक्ष चतुर्दशी (२८.११.२०१६) दुपारी ३.२१ वाजता
समाप्ती - कार्तिक अमावास्या (२९.११.२०१६) सायंकाळी ५.४८ वाजता
दोन दिवसांनी अमावास्या आहे.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! :
 Jihadi Atankiyone Vidhansabha chunav ke pahale Hindu netaonki hatya ka shadyantra racha hai ! - Kya ab to Kendra Sarkar Hindu netaonki suraksha karegi ?
जागो ! :
 जिहादी आतंकियों ने विधानसभा चुनाव से पहले हिन्दू नेताआें की हत्या का षड्यंत्र रचा है ! 
- क्या अब तो केंद्र सरकार हिन्दू नेताआें की सुरक्षा करेगी ?

लोकहो, जिहादी आणि खलिस्तानी आतंकवादी यांचे विधानसभा निवडणुकांपूर्वी सर्व हिंदुत्वनिष्ठ नेत्यांना ठार मारण्याचे षड्यंत्र ओळखा !

फलक प्रसिद्धीकरता
     विश्‍व हिंदु परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या नेत्यांना खलिस्तानी आतंकवादी आणि लष्कर-ए-तोयबा यांनी काही राज्यांत होणार्‍या विधानसभा निवडणुकीपूर्वी ठार मारण्याचा कट पाकमध्ये रचला आहे.

सनातन सांगत असलेल्या आध्यात्मिक उपायांचा अपलाभ उठवणार्‍या महाठगापासून सावधान !

साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती
     सनातन संस्थेकडून साधना आणि आध्यात्मिक उपाय यांसंदर्भात जिज्ञासूंना विनामूल्य मार्गदर्शन केले जाते. त्यासाठी कोणताही मोबदला किंवा शुल्क आकारले जात नाही. या मार्गदर्शनाचा सर्वांना होणार्‍या आध्यात्मिक त्रासात घट होऊन त्यांच्या लौकीक, तसेच परलौकीक जीवनातील अडथळे दूर व्हावेत आणि सर्वांना साधना करता येऊन आनंदी जीवन जगता यावे, हा निःस्वार्थी हेतू असतो. सनातनकडून आध्यात्मिक त्रासाविषयी करण्यात येणार्‍या मार्गदर्शनाचा गोव्यातील एका व्यक्तीकडून स्वार्थासाठी अपलाभ उठवण्यात येत आहे. ती व्यक्ती सनातन संस्था वाईट शक्तींच्या त्रासासंदर्भात करत असलेल्या मार्गदर्शनाची एकप्रकारे चोरी करून त्याला व्यावहारिक स्वरूप देत आहे. लोकांकडून मार्गदर्शनाच्या मोबदल्यात पैसे घेऊन फसवणूक करत आहे.

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
गुरूंकडे काय मागावे ?
माझ्याकडे सुख मागू नका, दुःख सहन करण्याचे बळ मागा.
      भावार्थ : सुख हे प्रकृतीतील असल्याने अशाश्‍वत असते, म्हणून गुरूंकडे मागू नये. तसेच हेही लक्षात ठेवले पाहिजे की, शाश्‍वत आनंद मिळवून देणे, हेच गुरूंचे खरे कार्य असते. प्रारब्धामुळे दुःख भोगावे लागणार असल्यास, त्या दुःखदायक प्रसंगांमुळे होणारे दुःख सहन करण्याची शक्ती मात्र गुरु निश्‍चित (नक्कीच) देतात; म्हणून ती मागायला आडकाठी (हरकत) नाही. 
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

सन्मार्गावरून चालण्याचे महत्त्व ! 
सत्प्रवृत्ती अंगी बाणवणे आणि तशी इच्छा होणे हे चांगलेच; 
पण चित्तवृत्ती संपूर्णपणे सन्मार्गाला लागणे, हा मनुष्य जीवनातील सुवर्णक्षण होय ! 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

नव्हे पार ज्यांच्या असे त्या दयेला । नमस्कार साष्टांग गुरुमाऊलीला ॥

चित्रांकन : सौ. उमा रविचंद्रन, चेन्नई.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार


परात्पर गुरु डॉ. आठवले
एखादे औषध लागू पडले नाही, तर आपण ते पालटतो. त्याप्रमाणे राष्ट्र आणि धर्म यांच्या संदर्भात लोकशाही पूर्णपणे अयशस्वी ठरल्याने आज हिंदु राष्ट्राच्या (सनातन धर्म राज्याच्या ) स्थापनेला पर्याय नाही ! 
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

हिंदूंवरील अत्याचार आणि उपाय !

संपादकीय
      धार्मिक अत्याचारांमुळे देश सोडून जाणार्‍या हिंदूंचे लोंढे चालूच राहिले, तर ३० वर्षांनी बांगलादेशात एकही हिंदू नागरिक नावाला शिल्लक रहाणार नाही, असा निष्कर्ष ढाका विद्यापिठातील प्रा. अब्दुल बरकत यांनी काढला आहे. त्यांच्या या निष्कर्षाच्या पुष्ट्यर्थ त्यांनी म्हटले आहे की, वर्ष १९६४ ते २०१३ या ४९ वर्षांत १ कोटी १३ लाख हिंदू धार्मिक छळवादाला कंटाळून अन्यत्र निघून गेले. अन्यत्र म्हणजे त्यांच्यापैकी बहुतांश लोकांनी भारतीय प्रदेशात स्थलांतर केले आणि ज्यांना शक्य होते, ते अमेरिकेसारख्या देशांत जाऊन स्थायिक झाले. पुढे वर्ष १९७१ मध्ये बांगलादेश स्वतंत्र झाल्यापासून जेव्हा-जेव्हा सैनिकी राजवट राहिली, तेव्हा हिंदूंवर उघडपणे अत्याचार झाले आणि हिंदूंनी सर्वाधिक पलायन केलेे. वर्ष १९७१ च्या मुक्ती संग्रामाच्या आधी हिंदूंनी बांगलादेश सोडून जाण्याचे दैनंदिन सरासरी प्रमाण ७०५ एवढे होते.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn