Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

पाकला भारताची शक्ती माहीत आहे ! - पंतप्रधान

भारताची सैन्यशक्ती पाकपेक्षा अधिक आहे, हे संपूर्ण जगालाच 
माहिती आहे; मात्र त्याचा योग्य वापर करून पाकला नष्ट करण्याची 
इच्छाशक्ती भारत सरकारकडे नाही, हेही पाकला आणि जगाला माहिती आहे !
        भटिंडा (पंजाब) - येथून पाकिस्तान दूर नाही. सीमेवर रहाणार्‍यांना सीमेपलीकडून होणारे अत्याचार सहन करावे लागतात. भारतीय सैन्यात काय शक्ती आहे, हे पाकने आता पाहिले आहे. जेव्हा आमच्या सैनिकांनी पराक्रम करून सर्जिकल स्ट्राइक केले, त्यानंतर सीमेपलीकडे भूकंप झाला. अजूनही ते स्थिरस्थावर झालेले नाही. (सर्जिकल स्ट्राइकनंतर ३०० हून अधिक वेळ पाकने शस्त्रसंधी कराराचे उल्लंघन करून भारतीय सीमेवर गोळीबार केला आहे. यात ३० हून अधिक सैनिक हुतात्मा झाले आहेत, तसेच अनेक नागरिकही ठार झाले आहेत. २ सैनिकांच्या मृतदेहांची विटंबनाही करण्यात आली. देशाची झालेली ही हानी दुर्लक्षित करता येत नाही, हेही तितकेच महत्त्वाचे आहे - संपादक) पाकला आता लढायचेच असेल, तर त्यांनी भ्रष्टाचार, काळापैसा आणि गरिबी यांविरोधात लढले पाहिजे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे म्हटले आहे. (पाकला असा सामंजस्याचा सल्ला उपयोगी आहे का ? - संपादक) येथे एम्सच्या उद्घाटनाच्या वेळी ते बोलत होते. 

पिंपळगांव हरेश्‍वर (जिल्हा जळगाव) येथील अवैध धंद्यांच्या विरोधात उपोषणाला बसलेल्या ग्रामस्थांना पोलिसांकडून अमानुष मारहाण

अवैध धंद्यांना प्रोत्साहन देणारे पोलीस निरीक्षक
संदीप पाटील यांना निलंबित करावे ! - ग्रामस्थांची मागणी
       जळगाव - पाचोरा तालुक्यातील पिंपळगांव हरेश्‍वर येथील ग्रामस्थांनी सट्टापेढी, पत्त्यांचे अड्डे आणि तत्सम अवैध धंद्यांच्या विरोधात आमरण उपोषण चालू केले होते. २४ नोव्हेंबर या दिवशी पहाटेच्या सुमारास पिंपळगांव हरेश्‍वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी ग्रामस्थांना दमदाटी करून मारहाण केली आणि बलपूर्वक पोलीस वाहनात घालून जिल्हा रुग्णालयात नेले. पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी या वेळी महिलांनाही धक्काबुक्की केली. या प्रकरणी संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी पाटील यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
१. पंचायत समिती सदस्य श्री. मधुकर गोरे, तंटामुक्ती समिती अध्यक्ष श्री. विनोद पाटील, विकास सोसायटीचे श्री. संजय तेली, युवा सेनेचे श्री. सिद्धार्थ चैतमल, सौ. सीमा पाटील यांच्यासह २० ग्रामस्थ २० नोव्हेंबरपासून आमरण उपोषणाला बसले होते. 
२. २४ नोव्हेंबरला पहाटेच्या वेळी पोलिसांनी उपोषणकर्त्यांना अमानुष मारहाण केली. त्यांना दमदाटी करत जिल्हा रुग्णालयात नेले. तसेच उपोषणकर्त्यांनी उपोषणाला बसण्यासाठी बांधलेल्या मंडपाची मोडतोड केली.

न्यूयॉर्कमध्ये हिंदु संघटनांकडून २७ नोव्हेंबरला ट्रम्प टॉवरसमोर मोर्चा !

न्यूयॉर्कमध्ये बांगलादेशातील हिंदूंसाठी हिंदु संघटना मोर्चा काढतात; 
मात्र भारतातील मोठ्या हिंदुत्वनिष्ठ संघटना निष्क्रीय रहातात !
                                    बांगलादेशमध्ये अल्पसंख्यांक हिंदूंवरील आक्रमणाचे प्रकरण
      न्यूयॉर्क - बांगलादेशमध्ये हल्लीच जिहादी आतंकवाद्यांकडून अल्पसंख्यांक हिंदूंवर झालेल्या आक्रमणाच्या प्रकरणी अमेरिकेचे नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कल्पना देणे आणि त्यांचे साहाय्य मिळवणे, यासाठी न्यूयॉर्कमधील हिंदु संघटनांनी रविवार, २७ नोव्हेंबर या दिवशी येथील ट्रम्प टॉवरसमोर मोर्चा आयोजित केला आहे. बांगलादेशमध्ये अल्पसंख्यांकांना सुरक्षा पुरवण्याविषयी बांगलादेश सरकारवर दबाव आणण्याच्या उद्देशाने या मोर्च्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्च्यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. यापूर्वी अशा प्रकारचा मोर्चा संयुक्त राष्ट्रांच्या कार्यालयासमोर काढण्यात आला होता. तसेच ११ डिसेंबर या दिवशी अमेरिकेच्या ‘व्हाईट हाऊस’ समोर असा मोर्चा काढण्यात येणार आहे.


(म्हणे) पाकने सर्जिकल स्ट्राइक केला, तर भारत पिढ्यान् पिढ्या विसरू शकणार नाही !

  • बेडकी कितीही फुगली तरी बैलाएवढी होत नाही, हे पाकने लक्षात ठेवावे ! सर्जिकल स्ट्राइक भारताने पाकला शिकवले, हे जगाला माहीत असतांना त्याच्या दोन मासांनंतर भारताला धमकी देणारे पाकचे सैन्यदल प्रमुख त्या पदाला लायक आहेत का ?
  • पाकचे सैन्यदल प्रमुख जनरल राहील शरीफ यांचे फुत्कार !
        इस्लामाबाद - पाकने सर्जिकल स्ट्राईक केला, तर भारत पिढ्यान् पिढ्या विसरू शकणार नाही. सर्जिकल स्ट्राईक काय असते, हे भारत विद्यार्थ्यांना शाळेतील अभ्यासक्रमात शिकवेल, अशी धमकी पाकचे सैन्यदलप्रमुख जनरल राहील शरीफ यांनी दिली आहे. एका कार्यक्रमाच्या वेळी ते बोलत होते.
        पाकच्या वायूदलाचे प्रमुख सोहेल अमान यांनी म्हटले की, भारताकडून होणार्‍या कारवाईमुळे पाक चिंतेत नसून कुठल्याही आक्रमणाला उत्तर देण्यासाठी आमचे सैन्य सक्षम आहे.

सर्वांचे वैध धन पूर्णत: सुरक्षित ! - पंतप्रधान मोदी

      नवी देहली - प्रत्येक नागरिकास त्याचे धन खर्च करण्याचा पूर्ण अधिकार आहे. कोणीही कोणाचेही धन हिरावून घेऊ शकत नाही. देशातील जनतेने वैध मार्गाने जमा केलेले धन पूर्णत: सुरक्षित आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे व्यक्त केले. काळे धन आणि भ्रष्टाचार यांविरोधातील युद्धामध्ये आता सामान्य नागरिक हा सैनिक झाला आहे, असेही ते म्हणाले. राज्यघटनादिनानिमित्त संसदेमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमानिमित्त पंतप्रधान बोलत होते. 
      मोदी पुढे म्हणाले की, आता नागरिक मोबाईल तंत्रज्ञानाच्या माध्यमामधूनही धन खर्च करू शकतात. जग पालटत आहे. तेव्हा आपणही कॅशलेस (विनारोकड) अर्थव्यवस्थेकडे मार्गक्रमण करावयास हवेे. 
भ्रष्टाचार्‍यांना वेळ दिला नाही ; 
म्हणून नोटाबंदीला विरोध ! - मोदी
      नोटाबंदीसाठी सरकारने सिद्धता केली नाही, अशी विरोधक टीका करत आहेत. सध्या ही मोठी अडचण असल्याचे बोलले जात आहे; पण ही खरी अडचण नाही, तर भ्रष्टाचार्‍यांना काळा पैसा पांढरा करण्यासाठी सिद्धता करता आली नाही, ही खरी अडचण आहे. भ्रष्टाचार्‍यांना यासाठीच्या सिद्धतेला वेळ दिला नाही; म्हणून नोटाबंदीला विरोध होत आहे.

१० वीच्या इतिहासाच्या पुस्तकांत आता चित्रपट, नाट्य, प्रसारमाध्यमे यांचा इतिहास !

      अशा अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांवर कोणते संस्कार होणार आहेत ? यापेक्षा विद्यार्थ्यांना राष्ट्रपुरुष आणि पूर्वीचे राजे यांच्या शौर्याचा इतिहास, नीतीमत्ता शिकवणे, तसेच धर्मशिक्षण देणे आवश्यक आहे ! विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण मिळण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !
      पुणे, २५ नोव्हेंबर - राज्याच्या अभ्यासक्रमात एकसंधता यावी, यासाठी ७ वी ते १० वीसाठी एकच अभ्यासमंडळ नेमून नवा अभ्यासक्रम आराखडा सिद्ध केला आहे. त्यानुसार सगळ्या विषयांच्या आराखड्यात काही पालट करण्यात आले आहेत. १० वीच्या इतिहास विषयात आता राजकीय, सामाजिक, भौगोलिक घटकांसमवेत सांस्कृतिक घटकांचाही समावेश केला आहे. आतापर्यंत इतिहासाच्या पुस्तकांत असलेली महायुद्धे, परदेशातील चळवळी, क्रांती यांचे अभ्यासक्रमातील प्रमाण न्यून होणार आहे. इतिहासाच्या पुस्तकात चित्रपट, नाट्य, प्रसारमाध्यमे यांचा इतिहास आणि त्यांचे ऐतिहासिक घटनांमधील स्थान यांचाही अभ्यास विद्यार्थ्यांना यापुढे करावा लागणार आहे. पुढील वर्षापासून या नव्या आराखड्यानुसार टप्प्याटप्प्याने पुस्तके लागू होणार आहेत.

मुंबई येथे चित्रप्रदर्शनात म.फि. हुसेन यांच्या चित्रांचा समावेश !

हिंदुबहुल देशात हिंदुद्वेषी चित्रकाराची 
चित्रे प्रदर्शनात ठेवली जातात, हे संतापजनक !
       मुंबई, २५ नोव्हेंबर (वार्ता.) - फोर्ट, काळा घोडा मार्ग येथील डीएजी मॉडर्न येथे २५ ते २८ नोव्हेंबर या कालावधीत २० व्या शतकातील भारतीय कला या नावाचे चित्रप्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या चित्रप्रदर्शनात भारतमातेचे नग्न चित्र काढणार्‍या आणि हिंदूंच्या देवतांची अश्‍लील चित्रे काढणार्‍या हिंदुद्वेषी चित्रकार मकबूल फिदा हुसेन यांनी रेखाटलेल्या चित्रांचा समावेश आहे. याविषयी हुसेन यांनी रेखाटलेली भारतमाता आणि देवता यांची विटंबना करणारी चित्रे प्रदर्शनात न लावण्याविषयी राष्ट्रप्रेमी नागरिकाने केलेली विनंती आयोजकांपैकी अनिका मानकपूर यांनी नाकारली. 
       या प्रदशर्नात म.फि. हुसेन यांच्या चित्रांचा समावेश असल्याचे लक्षात आल्यावर मुंबई येथील एका राष्ट्रप्रेमी नागरिकाने आयोजक अनिका मानकपूर यांना संपर्क केला. यावर मानकपूर यांनी हे तुमचे वैयक्तिक मत आहे. हुसेन हे आंतरराष्ट्रीय चित्रकार असून त्यांची चित्रे आम्ही काढणार नाही. आम्ही व्यावसायिक आहोत. त्यांची चित्रे आम्ही विकणार आहोत, असे उत्तर दिले. ही बाब राष्ट्रप्रेमी नागरिकाकडून दैनिक सनातन प्रभात च्या प्रतिनिधींना कळवण्यात आली. 

नागालॅण्डमध्ये सुरक्षादलांनी पकडलेल्या साडेतीन कोटी रुपयांच्या जुन्या नोटा गायब होण्याच्या प्रकरणी भाजप समर्थक खासदाराच्या जावयाला अटक !

     गुवाहाटी - नागालॅण्डची राजधानी दिमापूर येथे ‘सेंट्रल इंडस्ट्रिअल सेक्युरिटी फोर्स’च्या (सीआयएस्एफ्च्या) सुरक्षारक्षकांनी पकडलेल्या ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या साडेतीन कोटी रुपये मूल्याच्या नोटांची चोरी झाली होती. या प्रकरणी अनातो झिमोमी या व्यापार्‍याला अटक करण्यात आली आहे. तसेच त्याने अटकेपूर्वी या पैशाच्या संदर्भातील कागदपत्रे सादर केल्याने प्राप्तीकर खात्याने त्याला पैसे परत दिले होते. झिमोमी नागालॅण्ड पीपल्स फ्रंटचे नेते आणि राज्यातील एकमेव खासदार नेफियू रियो यांचे जावई आहेत. तसेच झिमोमी यांचे वडील खेकिहो झिमोमी हे राज्यसभेचे माजी खासदार होते. रियो केंद्रातील भाजप सरकारचे समर्थक खासदार आहेत.

काळा पैसा वाचवण्यासाठी ईशान्य राज्यांच्या करसवलतींचा अपवापर ?

काळा पैसा साठवणे राष्ट्रद्रोह असून सरकारने त्यांच्या विरोधात कठोर निर्णय घ्यावा !
      नवी देहली - केंद्र सरकारने १ सहस्र आणि ५०० रुपयांच्या नोटांवर बंदी घातल्यानंतर काळा पैसा साठवणार्‍या धनिकांकडून ईशान्य राज्यांना मिळणार्‍या आयकर सवलतींचा अपलाभ घेण्यात येत आहे. नुकतेच हरियाणाहून नागालॅण्डमध्ये जाणारे पैसे जप्त करण्यात आले आहेत. 
      भारताच्या आयकर कायद्यात देशाच्या ईशान्येकडील नागालॅण्ड, मणीपूर, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश, मिझोराम या प्रदेशांमधील आदिवासी जमातींना आयकरातून पूर्ण सवलत मिळते. त्याचबरोबर आसामची नॉर्थ कचार हिल्स आणि मिकिर हिल्स, मेघालयातील खासी हिल्स, गारो हिल्स आणि जयंतिया हिल्स, तसेच जम्मू-काश्मीरच्या लडाखमधील अनुसूचित जमातींना आयकरातून सूट देण्यात येते. त्यांना कोणत्याही मार्गाने मिळालेले उत्पन्न किंवा लाभांश किंवा व्याज यांवर आयकर भरावा लागत नाही. अशीच सवलत सिक्कीममधील लोकांनाही देण्यात येतेे. या सवलतीचा अपवापर धनदांडग्यांकडून काळा पैसा पांढरा करण्याकरिता करण्यात येत आहे.

ट्रम्प यांनी प्रसारमाध्यमांना विश्‍वासघातकी आणि खोटारडे संबोधले !

     वॉशिंग्टन - अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्थानिक प्रसारमाध्यमांना विश्‍वासघातकी आणि खोटारडे संबोधत फटकारल्याचे स्थानिक वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाले आहे. ‘निवडणुकीनंतर प्रसारमाध्यमांशी सौहार्दाचे संबंध प्रस्थापित करण्याऐवजी ट्रम्प लढण्याच्या भूमिकेतच आढळून आले’, असे ‘द वॉशिंग्टनपोस्ट’च्या वृत्तात म्हटले आहे. 
     या वृत्तानुसार ट्रम्प यांची पत्रकार आणि प्रसारमाध्यम अधिकारी यांच्याशी बैठक पार पडली. या बैठकीत ट्रम्प उपस्थितांना शांतपणे म्हणाले, ‘‘दर्शक आणि वाचक यांना निःपक्ष अन् योग्य बातम्या देण्यात अयशस्वी ठरले आहेत, तसेच त्यांनी ट्रम्प आणि कोट्यवधी अमेरिकी नागरिक यांच्याकडून करण्यात आलेले आवाहनही लक्षात घेतले नाही.’’ ‘द वॉशिंग्टन पोस्ट’नुसार ट्रम्प यांनी प्रसारमाध्यमांसाठी पुन:पुन्हा अयोग्य आणि विश्‍वासघातकी अशा शब्दांचा वापर केला. ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने एका सुत्रानुसार म्हटले, ‘‘ही बैठक एक मोठी अडचण ठरली. सरकारमधील प्रसारमाध्यमांच्या सहभागाविषयी पत्रकार आणि ट्रम्प यांच्यात चर्चा होईल, असे वाटले होते; मात्र ट्रम्प यांच्याकडून पत्रकारांना फटकारच झेलावी लागली.’’५०० रुपयांच्या २ प्रकारच्या नोटांमुळे लोकांमध्ये संभ्रम !

       नवी देहली - ५०० रुपयांच्या जुन्या नोटा रहित झाल्यानंतर सरकारने आता ५०० रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणल्या आहेत. काही दिवसांपासून याचे देशात वितरण चालू झाले आहे. मात्र या नव्या नोटांमध्ये २ प्रकार दिसून आले आहेत. त्यामुळे लोकांमध्ये त्यांच्या सत्यतेविषयी संभ्रम निर्माण झाला आहे. यामुळे बनावट नोटांचे प्रमाण वाढू शकते, अशी शक्यता तज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे. एका इंग्रजी दैनिकाने याविषयीचे वृत्त प्रसिद्ध केले आहे.
१. एका नोटेवर गांधी यांची सावली अधिक दिसत आहे. तसेच क्रमांक, अशोक स्तंभ यांच्या आकारातही भेद आहे, असे देहलीतील एका नागरिकाने म्हटले आहे. 
२. गुरुग्राममध्ये रहाणारे रेहन शाह यांनी दोन्ही नोटांचे काठ वेगवेगळे असल्याचे सांगितले आहे. 
३. मुंबईत रहाणार्‍या एका व्यक्तीने २ सहस्र रुपये सुट्टे केल्यावर मिळालेल्या ५०० च्या नोटा २ प्रकारच्या असल्याचे सांगितले आहे. या दोन्ही नोटांच्या रंगांमध्ये भेद आहे. यातील एका नोटेची छपाई थोडी फिकट रंगाची असल्याचे दिसून येत आहे. 

गांधी यांना ‘राष्ट्रपिता’ संबोधण्याविषयी कोणताही नियम नाही !

      ‘गांधी यांना राष्ट्रपिता संबोधण्याविषयी कोणताही नियम अस्तित्वात नसल्याचे माहितीच्या अधिकारांतर्गत विचारलेल्या प्रश्‍नच्या उत्तराद्वारे उघड झाले आहे. हा प्रश्‍न लक्ष्मणपुरी (लखनौ) येथे ६ वीत शिकणार्‍या ऐश्‍वर्या पराशर हिने १३ फेब्रुवारी २०१२ या दिवशी विचारला होता. यावर उत्तर देतांना केंद्रीय गृहमंत्रालयाने ‘गांधी यांना ‘राष्ट्रपिता’ ही उपाधी दिली नाही. घटनेच्या परिच्छेद ८(१) प्रमाणे शैक्षणिक आणि सैन्य यांव्यतिरिक्त आणखी कोणतीही उपाधी देण्याची अनुमती (परवानगी) शासनाला नाही’, असे सांगितले. 
कोणी दिली होती ही उपाधी ?
     ४ जून १९४४ या दिवशी सुभाषचंद्र बोस यांनी सिंगापूर आकाशवाणीवरून एक संदेश प्रसारित केला. त्या वेळी त्यांनी गांधी यांना ‘देशाचे पिता’ असे संबोधित केले. नंतर भारत शासनानेही या नावाला मान्यता दिली. यानंतर २८ एप्रिल १९४७ या दिवशी सरोजिनी नायडू यांनी एका संमेलनामध्ये त्यांना हीच उपाधी दिली. गांधींच्या मृत्यूनंतर भारताचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी आकाशवाणीद्वारे देशाला संबोधित करतांना ‘राष्ट्रपिता आता राहिले नाहीत’, असे वाक्य उच्चारले.’ यानंतर शालेय पाठ्यपुस्तकांमध्येही राजकीय लाभांसाठी गांधी यांना ‘राष्ट्रपिता’ असे लिहिले गेले.’ (संदर्भ : ‘मासिक राष्ट्रबोध’, जून २०१६) नोटाबंदीला ८७ टक्के लोकांचे समर्थन असल्याचा सर्वेक्षणाचा दावा !

      नवी देहली - हफिंग्टन पोस्ट-बीडब्ल्यू आणि सीव्होटर या संस्थांच्या सर्वेक्षणात देशातील ८७ टक्के लोकांनी ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या नोटा रहित करण्याच्या निर्णयाला समर्थन दिले आहे. या निर्णयामुळे काळापैसावाल्यांना धक्का बसला आहे, असे त्यांनी म्हटले आहे. 
       हफिंग्टन पोस्टमधील वृत्तानुसार गैरसोय होत असतांनाही सर्वसामान्य नागरिकांनी मोदी यांच्या निर्णयाला भक्कम पाठबळ दिल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. देशभरातील २५२ लोकसभा मतदारसंघात २१ नोव्हेंबर या दिवशी हे सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये १ सहस्र २१२ लोकांनी भाग घेतला. निमशहरी आणि ग्रामीण भागातील लोकांमध्ये नोटाबंदीविषयी किंचितशी नकारात्मक भावना दिसल्याचेही सर्वेक्षणाच्या निकालात म्हटले आहे. 
       नोटाबंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी चांगली झाल्याचे ६३ टक्के प्रतिसादकर्त्यांचे मत आहे, तर ७ टक्के लोकांनी अंमलबजावणी सुमार असल्याचे मत मांडले आणि ६ टक्के लोकांनी ती अत्यंत वाईट असल्याचे सांगितले. अंमलबजावणी अजून चांगल्या पद्धतीने करता आली असल्याचे तब्बल ७४ टक्के लोकांनी सांगितले. 

तमिळनाडूतील वाहतूक खाते आणि शासनमान्य दारू दुकानदार यांच्याकडून अवैधरित्या नोटा पालटण्याच्या कृत्याविरुद्ध हिंदु मक्कल कत्छी संघटनेकडून पंतप्रधानांकडे तक्रार !

     चेन्नई - तमिळनाडूतील शासकीय वाहतूक व्यवस्था आणि शासनमान्य दारू दुकानदार यांनी बँक अधिकार्‍यांना हाताशी धरून काळे पैसे पांढरे करण्याचा व्यवसाय चालू केल्याचे लक्षात आल्यावर हिंदु मक्कल कत्छी या हिंदुत्वनिष्ठ संघटनेचे उपाध्यक्ष श्री. देवागोविंद राजू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्र लिहून कारवाई करण्याची मागणी केली आहे. 
      पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ९ नोव्हेंबरपासून नोटाबंदीची घोषणा केली होती, मात्र त्याच वेळी शासकीय वाहतूक व्यवस्था, शासनमान्य दारू दुकानदारे, रुग्णालये इत्यादी ठिकाणी जुन्या नोटा स्वीकारण्यात येतील, असे घोषित केले होते. याचा अपलाभ घेऊन अनेक शासकीय वाहतूक व्यवस्था आणि शासनमान्य दारू दुकानदार यांनी जुन्या नोटा स्वीकारण्यास नकार दिला अन् नवीन चलनात पैसे घेणे चालू केले. यानंतर त्यांनी हे नवीन चलन लोकांना त्यांच्याकडून काही पैशांचा मोबदला घेऊन त्यांच्या जुन्या नोटा घेऊन त्यांना नव्या नोटा पालटून देत आहेत. जुन्या नोटा नंतर पुन्हा बँकेच्या अधिकार्‍यांना हाताशी धरून त्यांच्याकडून नव्या नोटा घेऊन पुन्हा त्या लोकांना देऊन जुन्या नोटा स्वीकारत आहेत. अशा प्रकारे ते अवैध व्यवहार करत आहेत. तरी पंतप्रधानांनी या प्रकरणी लक्ष घालून चौकशी करावी आणि अशी अवैध कृत्ये करणार्‍यांवर कडक कारवाई करावी, अशी विनंती या पत्राद्वारे करण्यात आली आहे.

जनधन’ खात्यांमध्ये १५ दिवसांत २१ सहस्र कोटी रुपयांची माया !

  • जनधनमध्ये पैसा जमा करण्यात बंगाल आघाडीवर
  • केंद्र सरकारच्या नोटाबंदीचा परिणाम
      नवी देहली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबरला रात्री ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर ‘प्रधानमंत्री जनधन योजने’च्या अंतर्गत उघडण्यात आलेल्या खात्यांमध्ये मागील १५ दिवसांमध्ये तब्बल २१ सहस्र कोटी रुपये जमा झाल्याचे वृत्त ‘एएन्आय’ या वृत्तसंस्थेने सरकारी अधिकार्‍याच्या हवाल्याने दिले आहे. 
     असंघटित क्षेत्रातील लोकांना बँकिंग व्यवहाराची सवय लागावी, यासाठी केंद्र सरकारने ‘प्रधानमंत्री जनधन योजना’ लागू केली होती. या योजनेच्या अंतर्गत शून्य जमा खाते उघडण्यात आले होते. या जनधन खात्यांमध्ये काहीच रक्कम जमा न करण्यात आल्यामुळे सरकारवर टीका करण्यात येत होती. आता मात्र ही खाते पैशांनी ओसंडून वाहत आहेत. यात बंगाल आघाडीवर असून कर्नाटक राज्याचा दुसरा क्रमांक आहे. या खात्यांचा वापर काळा पैसा पांढरा करण्यासाठी होत असल्याचा संशय आहे. ज्या खात्यांमध्ये सरकारने आखून दिलेल्या मर्यादेच्या वर रकमा जमा होत आहेत, त्यांना प्राप्तीकर खात्याकडून नोटिसा पाठवण्यात येत आहेत.

नेपाळमध्ये भारताच्या ५०० आणि २ सहस्र रुपयांच्या नव्या नोटांवर तात्कालिक बंदी !

       काठमांडू - नेपाळ राष्ट्र बँकेने (एन्आर्बीने) भारताच्या नव्याने चलनात आलेल्या ५०० आणि २ सहस्र रुपयांच्या नव्या नोटांना अवैध आणि अनधिकृत ठरवून त्यावर तात्कालिक बंदी घातली आहे. नेपाळमध्ये या नोटा स्वीकारल्या जाणार नाहीत, असे या बँकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. नेपाळ राष्ट्र बँकेचे प्रवक्ते नारायण पौडल यांनी सांगितले की, भारताने परकीय चलन व्यवस्थापन कायद्यांंतर्गत (फेमा) याविषयी अधिसूचना जारी केल्यानंतरच या नोटा नेपाळमध्ये वैध ठरतील.

हुब्बळ्ळी (कर्नाटक) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘धर्मशिक्षण आणि धर्माचरण’ या विषयावर व्याख्यान

      हुब्बळ्ळी (कर्नाटक) - येथील श्रीमद् उज्जयनी श्री सिद्धलिंग जगद्गुरु पुराण कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘धर्मशिक्षण आणि धर्माचरण’ या विषयावर व्याख्यान घेण्यात आले. या कार्यक्रमात १५० हून अधिक भाविक उपस्थित होते. 
      कार्यक्रमाला प्रार्थनेने प्रारंभ करण्यात आला. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या कु. नागमणी आचार यांनी ‘धर्मशिक्षण आणि धर्माचरण’ याविषयीचे महत्त्व विशद केले. त्यानंतर त्यांनी नमस्काराच्या पद्धती आणि कृती यांविषयी माहिती दिली. वाढदिवस कसा साजरा करायचा, मंदिरात दर्शन कसे घ्यायचे यांविषयीच्या धार्मिक कृतीसंदर्भातही माहिती देण्यात आली. या वेळी सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले होते. उपस्थितांनी त्याचा लाभ घेतला.

देहली येथे ‘संतकृपा प्रतिष्ठान’कडून वृद्धाश्रमात फळांचे वाटप

फळांचे वाटप करतांना कार्यकर्ती
     देहली - येथील ‘राणा सीनियर सिटीजन होम’ या वृद्धाश्रमात १९ नोव्हेंबर या दिवशी ‘संतकृपा प्रतिष्ठान’कडून फळे आणि बिस्किटे यांचे वाटप करण्यात आले. सामाजिक जाणिवेतून या संस्थेकडून असे सामाजिक कार्य करण्यात येते.
आदर्श भावी पिढी घडवण्यासाठी शिक्षणाला धर्मशिक्षणाची जोड आवश्यक ! - श्री. रमेश शिंदे

       उज्जैन, २५ नोव्हेंबर (वार्ता.) - आज पालक मुलांना धर्मशिक्षण आणि संस्कार यांचे महत्त्व न सांगता केवळ कॉन्व्हेंट पद्धतीचे शिक्षण देण्यासाठी आयुष्यभर कष्ट करतात, त्यांच्या वृद्धावस्थेत मुले मात्र परदेशात असतात; कारण त्यांना कॉन्व्हेंटमध्ये मातृ-पितृ ऋणाचे महत्त्वच शिकवले जात नाही. त्यामुळे आदर्श भावी पिढी घडवण्यासाठी शिक्षणाला धर्मशिक्षणाची जोडही द्यायला हवी. ‘विज्ञानामुळे प्रगती झाली’, असे एकांगी सांगणार्‍यांनी ‘आपण आता सुखी आहोत कि २५ वर्षांपूर्वी अधिक सुखी होतो’, असा प्रश्‍न स्वतःला करावा. या प्रश्‍नाच्या उत्तरातच धर्मशिक्षणाचे महत्त्व दडले आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे यांनी केले. ते १८ नोव्हेंबरला आयोजित एका युवकांच्या बैठकीत बोलत होते.

हिंदूंनी ‘हिंदु’ म्हणून संघटित व्हावे ! - श्री. चित्तरंजन सुराल, हिंदु जनजागृती समिती

डावीकडून श्री. दुलाल सरदार,
श्री. विकर्ण नस्कर, श्री. चित्तरंजन
सुराल आणि बोलतांना श्री. उपानंद ब्रह्मचारी
     दक्षिण २४ परगणा (बंगाल), २५ नोव्हेंबर (वार्ता.) - आज हिंदु समाज जात, भाषा, आरक्षण, राजकीय पक्ष आदींच्या माध्यमांतून विखुरलेला आहे. बहुसंख्य हिंदू असलेल्या देशात हिंदूंच्या कल्याणासाठी संघटितपणे कार्य करणार्‍या हिंदूंची संख्या पुष्कळ अल्प आहे. सध्याची हिंदूंची स्थिती सुधारण्यासाठी हिंदूंनी ‘हिंदु’ म्हणून एकत्र येण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे पूर्व आणि पूर्वोत्तर भारताचे समन्वयक श्री. चित्तरंजन सुराल यांनी केले. ते येथील पालबाडी गावात आयोजित ग्रामसभेत बोलत होते. या वेळी ‘हिंदु एक्झिस्टन्स’ या वृत्तसंकेतस्थळाचे संपादक श्री. उपानंद ब्रह्मचारी, धर्म उत्थान समितीचे संस्थापक श्री. विकर्ण नस्कर आणि स्थानिक हिंदुत्वनिष्ठ श्री. दुलाल सरदार यांनीही मार्गदर्शन केले. या सभेचा लाभ २०० ग्रामस्थांनी घेतला. यात तरुणांची उपस्थिती लक्षणीय होती.

हिंदु संहतीकडून उरी (काश्मीर) येथील आक्रमणातील हुतात्मा सैनिक बिस्वजित गोरोई यांना श्रद्धांजली

बिस्वजित यांच्या छायाचित्राला पुष्पहार घालतांना हिंदु संहतीचे कार्यकर्ते
     कोलकाता - हिंदु संहतीचे कार्यकर्ते सर्वश्री देबतानु भट्टाचार्य, सुजित मेटी, सुंदर गोपाल दास, सुखेन मंडल आणि टोटन ओझा यांनी उरी आक्रमणातील हुतात्मा सैनिक बिस्वजित गोरोई यांच्या घरी जाऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच त्यांनी हुतात्मा बिस्वजित गोरोई यांच्या कुटुंबियांना साहाय्यापोटी ५१ सहस्र रुपयांचा धनादेश सुपुर्द केला.

नैसर्गिक आणि भौगोलिक प्रतिकूलता असल्याने युरोपमध्ये जगाचे नेतृत्व करण्याची क्षमता नाही ! - प्रा. कुसुमलता केडिया

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या 
आश्रमात वक्ता प्रशिक्षण कार्यशाळेला प्रारंभ !

दीपप्रज्वलन करतांना प्रा. कुसुमलता केडिया, डावीकडून
सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ, प्रा. रामेश्‍वर मिश्र आणि श्री. रमेश शिंदे

       रामनाथी, २५ नोव्हेंबर (वार्ता.) - नैसर्गिक आणि भौगोलिक प्रतिकूलता असल्याने युरोपमध्ये जगाचे नेतृत्व करण्याची क्षमता नाही. १९ व्या शतका पूर्वीपासून युरोप हा खुनी संघर्षाची प्रार्श्‍वभूमी असलेल्या आदीवासी जमातींचा समूह होता. या भागांत निसर्ग आणि भौगोलिक प्रतिकूलता असल्याने कृषी, औद्योगिक, अन्न धान्य यांची निर्मिती अल्प होते. त्यामुळे युरोपमधील लोकांना अन्नधान्यासाठी उष्ण कटिबंधातील देशांवर अवलंबून रहावे लागते. त्या तुलनेत निसर्गाची देण लाभलेला भारत सांस्कृतिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या विकसित होता आणि आजही आहे. त्यामुळे युरोपातील प्रमुख राष्ट्रांना पुढील काळात मोठी क्षमता असलेल्या भारताशी मैत्री केल्याशिवाय पर्याय उरणार नाही, असे प्रतिपादन भोपाळ येथील धर्मपाल शोधपीठाच्या संचालिका तथा अर्थशास्त्रतज्ञ प्रा. कुसुमलता केडिया यांनी केले. 

पाकच्या सिंध प्रांतात हिंदूंच्या धर्मांतरावर प्रतिबंध लागणार !

पाकमध्ये कायद्याला जुमानतात का ? त्यातही 
हिंदूंसाठी केलेल्या कायद्याला काही अर्थ असेल का ?
      कराची - पाकच्या सिंध प्रांतात अल्पसंख्याकांच्या विशेषतः हिंदूंच्या होणार्‍या धर्मांतराला रोख लावण्यासाठी कायदा करण्यात आला आहे. आता सिंधमध्ये धर्मांतर करणे गुन्हा मानला जाणार आहे. त्यासाठी कमीत कमी ५ वर्षाची, तसेच आजीवन कारावासाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. तसेच ज्यांना धर्मांतर करायचे आहे, अशा लोकांना २१ दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यानंतरच त्यांना धर्मांतर करता येणार आहे. या कायद्यानुसार १८ वर्षाखालील तरुणांना धर्मांतर करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा ऐतिहासिक निर्णय आहे, अशी प्रतिक्रिया पाकमधील हिंदु खासदार नंद कुमार गोकलानी यांनी व्यक्त केली. सिंध प्रांतात सातत्याने होणार्‍या बळजोरीच्या धर्मांतराविरोधात अनेक संघटनांनी आंदोलने केली होती, त्यानंतर हा कायदा करण्यात आला आहे.

(म्हणे) पाकव्याप्त काश्मीर भारताच्या बापाची जागा नाही !

  • फारूख अब्दुल्ला यांचे देशद्रोही विधान !
  • पाकव्याप्त काश्मीर स्वतःच्या वडिलांची जागा असल्याच्या आविर्भावात बोलणारे फारूख अब्दुल्ला हिंदु राष्ट्र स्थापनेची अपरिहार्यता स्पष्ट करतात.
       श्रीनगर - पाकव्याप्त काश्मीर ही भारताच्या बापाची जागा नाही, असे देशद्रोही विधान जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी केले आहे. काश्मीरमधील चेनाबमध्ये आयोजित सभेत ते बोलत होते. या वेळी त्यांचे पुत्र ओमर अब्दुल्लाही उपस्थित होते. 
       फारूख अब्दुल्ला पुढे म्हणाले की, पाकव्याप्त काश्मीर सध्या पाककडे आहे. ती भारताची खाजगी मालमत्ता नाही. कौटुंबिक संपत्ती असल्यासारखे भारत त्यावर दावा करू शकत नाही. पाकव्याप्त काश्मीर पाककडून परत घेण्याचे धाडस भारतात नाही आणि पाकही भारताकडून काश्मीर हिसकावून घेऊ शकत नाही; मात्र या दोन्ही देशांमध्ये काश्मीरमधील सर्वसामान्य जनता होरपळून निघत आहे. (काश्मीरमध्ये नेतेगिरी करतांना जनतेची पिळवणूक करून प्रचंड मोठी संपत्ती गोळा करणारे अब्दुल्ला यांना राज्यातील सर्वसामान्य जनता दिसायला लागली, हेही नसे थोडके ! - संपादक) 
       भारताकडे पाकशी चर्चा करण्याव्यतिरिक्त दुसरा पर्याय नाही. त्यानंतरच जम्मू-काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित होईल.

कोट्यवधी रुपयांच्या देशी-विदेशी देणग्या घेऊन घोटाळे करणार्‍या अंधश्रद्धा निमूर्र्लन समितीवर प्रशासक नेमावा !

हिंदु जनजागृती समितीची लोकप्रतिनिधींकडे निवेदनाद्वारे मागणी 
निवेदन स्वीकारतांना आमदार श्री. अशोक पाटील (उजवीकडून पहिले)
निवेदन स्वीकारतांना शिवसेनेचे वरळी विधानसभेचे आमदार श्री. सुनील शिंदे (उजवीकडे)
निवेदन स्वीकारतांना भाजपचे आमदार श्री. सरदार तारासिंह (बसलेले)
निवेदन स्वीकारतांना शिवसेनेचे आमदार श्री. तुकाराम काते (डावीकडून पहिले)
     मुंबई, २५ नोव्हेंबर (वार्ता.) - २८ जून २०१६ या दिवशी निरीक्षण, सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, साताराच्या वतीने डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या अंधश्रद्धा निर्मूलन समिती, महाराष्ट्र (सातारा) या ट्रस्टविषयी अहवाल सादर करण्यात आला आहे. या अहवालाद्वारे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा विवेकवादाचा, पुरोगामित्त्वाचा आणि बुद्धीप्रामाण्यवादाचा बुरखा फाटला असून त्यांचा घोटाळेबाज चेहरा समाजासमोर आला आहे.

कसबा सांगाव (जिल्हा कोल्हापूर) येथे पोषण आहारातील तांदूळ चोरतांना महिलांना रंगेहात पकडले ! - बजरंग दलाची कारवाई

तहसीलदारांचे चौकशीचे आदेश
दादासाहेब रामचंद्र मगदूम हायस्कूलचा भोंगळ कारभार !
   कोल्हापूर, २५ नोव्हेंबर (वार्ता.) - कागल तालुक्यातील कसबा सांगाव येथील मगदूम हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांसाठी माध्यान्ह भोजनात देण्यात येणार्‍या शालेय पोषण आहारामधील दोन पोती तांदूळ काही महिला चोरून नेत असतांना त्यांना बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पकडले. या प्रकरणी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी शिक्षकांसह शाळा समितीच्या अध्यक्षांना धारेवर धरले. याविषयी सखोल चौकशी करून कारवाई करण्यात यावी, असे निवेदन कार्यकर्त्यांनी कागल येथील तहसीलदार यांना दिले.

समीर गायकवाड यांच्यावरील आरोप निश्‍चितीच्या संदर्भातील सुनावणी ८ डिसेंबरला !

कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरण !
    कोल्हापूर, २५ नोव्हेंबर (वार्ता.) - सनातनचे साधक आणि कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील संशयित आरोपी श्री. समीर गायकवाड यांच्यावरील आरोपनिश्‍चिती करण्याविषयाची सुनावणी ८ डिसेंबर या दिवशी होणार आहे. अतिरिक्त आणि सत्र न्यायाधीश श्री. एल्.डी. बिले हे सुट्टीवर असल्याने ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.

खाजगी रुग्णालयांनी तातडीने रुग्णांना सेवा द्यावी ! - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नोटाबंदीचे प्रकरण
        मुंबई, २५ नोव्हेंबर (वार्ता.) - खाजगी रुग्णालयांनी नवीन चलनासाठी आग्रही न रहाता तातडीने उपचारांची आवश्यकता असणार्‍या रुग्णांना सेवा द्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. रुग्णांकडे नवीन चलन उपलब्ध नसल्यास त्यांच्या सोयीने शुल्क स्वीकारण्याविषयी रुग्णालयांनी सामंजस्याने तोडगा काढावा, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे. केंद्र शासनाने पाचशे आणि १ सहस्र रुपयांच्या नोटा व्यवहारातून रहित केल्याने खाजगी रुग्णालयात तातडीच्या उपचारासाठी प्रविष्ठ होणार्‍या रुग्णांना नवीन चलनाअभावी अडचणी येत असल्याच्या तक्रारी होत्या. याविषयी मुख्यमंत्र्यांनी गंभीर नोंद घेतली आहे.
        याविषयी असहकार्य करणार्‍या रुग्णालयांच्या संदर्भात संबंधित रुग्ण तक्रार करू शकतात. पालिका क्षेत्रातील खाजगी रुग्णालयांसाठी संबंधित पालिकेकडे तक्रार करता येईल. त्याव्यतिरिक्त अन्य शहरी भागासाठी जिल्हा शल्य चिकित्सक आणि ग्रामीण भागात जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे तक्रार करता येणार आहे. या स्तरांवर तक्रारीचे निवारण न झाल्यास त्या विभागाच्या उपसंचालकांकडे दाद मागता येऊ शकेल. त्यानंतरही कार्यवाही न झाल्यास आरोग्य सहसंचालक डॉ. बी. डी. पवार यांच्याशी संपर्क साधता येईल. १०४ आणि १०८ या विनाशुल्क क्रमांकावरही तक्रार करता येणार आहे. 

काश्मीरमध्ये १ सैनिक आणि २ पोलीस हुतात्मा !

भारतीय सैनिक, पोलीस केवळ हुतात्मा होण्यासाठीच
आहेत का ? आतंकवाद्यांना कायमचे नष्ट कधी करणार ?
     श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या बांदिपुरामध्ये २५ नोव्हेंबरला पहाटे सुरक्षारक्षक आणि आतंकवादी यांच्यामध्ये झालेल्या चकमकीत एक सैनिक हुतात्मा झाला, तर २ आतंकवाद्यांना ठार करण्यात आले. कुलगाम येथे आतंकवाद्यांनी पोलीस पथकावर आक्रमण केले. यात २ पोलीस हुतात्मा झाले.

संपूर्ण शक्तीनीशी संभाजी आरमारचे कार्यकर्ते हिंदु धर्मजागृती सभेत सहभागी होणार ! - श्रीकांत डांगे, संस्थापक अध्यक्ष, संभाजी आरमार, सोलापूर

विडी घरकुल येथील महिला मेळाव्यात मार्गदर्शन करतांना
रणरागिणी शाखेच्या सौ. अनिता बुणगे आणि समोर उपस्थित समुदाय
संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे (डावीकडून दुसरे) यांना
सभेचे अंक आणि निमंत्रण देतांना समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक सुनील घनवट (उजवीकडून तिसरे)
  सोलापूर, २५ नोव्हेंबर (वार्ता.) संपूर्ण शक्तीनीशी संभाजी आरमारचे कार्यकर्ते येथे होणार्‍या हिंदु धर्मजागृती सभेत सहभागी होणार असून येथील धर्मजागृती सभेला पुष्कळ प्रमाणात उपस्थिती लाभण्यासाठी आमच्या १२५ शाखांमध्ये धर्मसभेला येण्याविषयी निमंत्रण पोचवू, असे आश्‍वासन सोलापूर येथील संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्री. श्रीकांत डांगे यांनी दिले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने त्यांना सभेचे निमंत्रण देण्यासाठी भेट घेतली असता ते बोलत होतेे. या वेळी समितीच्या वतीने महाराष्ट्र राज्यसंघटक श्री. सुनील घनवट आणि श्री. हिरालाल तिवारी उपस्थित होते.

अवघ्या ३५० रुपयांत मुंबईमध्ये सर्रासपणे होते चोरीच्या आणि हरवलेल्या भ्रमणभाषांची खरेदी-विक्री !

असे उघडपणे होऊ देऊन गुन्हेगारी आणि आतंकवाद पोसणारे मुंबई पोलीस !
   मुंबई - येथील छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि दादर यांसारख्या वर्दळीच्या ठिकाणी सर्रासपणे चोरी केलेल्या आणि हरवलेल्या भ्रमणभाषांची अवघ्या ३५० रुपयात खरेदी-विक्री चालू असते. थेट रस्त्याच्या कडेला बाकडे टाकून हा अनधिकृत व्यवहार चालू असतो. (मुंबई पोलीस याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष का करतात ? त्याचे त्यांना हप्ते मिळतात का ? - संपादक) बाजारभावात ज्या भ्रमणभाषांची किंमत १ ते ५० सहस्र रुपयांपर्यंत आहे, ते भ्रमणभाष येथे ३५० रुपये ते २० सहस्र रुपयांपर्यंत विकले जातात. ज्या व्यक्तीला भ्रमणभाष विकला जातो त्याच्याकडून ओळखपत्र किंवा कोणताही पुरावा घेतला जात नाही आणि खरेदी केल्याची पावतीही दिली जात नाही. (खरेदी केलेल्या व्यक्तीने त्या भ्रमणभाषचा गैरवापर केल्यास त्याचे उत्तरदायित्व मुंबई पोलीस घेणार का ? - संपादक)

नोकरीचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक करणार्‍या धर्मांधांना अटक !

लोकांकडून उकळलेले हे पैसे 
धर्मांधांकडून वसूल करून घ्यायला हवेत ! 
        सातारा, २५ नोव्हेंबर (वार्ता.) - येथील नामवंत रयत शिक्षण संस्थेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून ६८ लाख रुपयांची फसवणूक करणारे सलीम मुसा शेख आणि अब्दुल अजीज करीम शेख या धर्मांधांना पोलिसांनी अटक केली. त्यांनी जिल्ह्यातील दहापेक्षा अधिक जणांची लाखो रुपयांची फसवणूक केली. लेखाधिकारी असलेल्या शबनम सलीम शेख या संशयित धर्मांध महिलेचा पोलीस शोध घेत आहेत. 
१. तीनही धर्मांध वर्ष २०१३ पासून रयत शिक्षण संस्थेत शिक्षक, लिपीक, तसेच शिपाई या पदांवर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून सुशिक्षित बेकार युवक-युवतींकडून पैसे उकळत होते. विविध पदांनुसार ७ लाख, १० लाख आणि १४ लाख अशी रक्कम घेत होते. 
२. या प्रकरणी भानुदास जाधव यांनी आपल्या मुलीची फसवणूक झाल्याची तक्रार दिली होती. यानंतर नऊ तक्रारदार पुढे आले आहेत. महत्त्वाचे म्हणजे फसवणूक झालेले सर्व तक्रारदार हिंदु आहेत. त्यामुळे धर्मांधांनी हिंदूंच्या विरोधात लव्ह जिहाद आणि लँड जिहाद नंतर फ्रॉड जिहाद चालू केल्याची चर्चा होत आहे. 
३. या प्रकरणात धर्मांधांनी खोटे धनादेश आणि खोटे स्टँप पेपर दिल्याचेही समोर आले आहे. 

सातारा येथील मशिदींवरून पहाटे सवापाच वाजता होणार्‍या अजानमुळे आबालवृद्धांचा निद्रानाश !

   सातारा, २५ नोव्हेंबर (वार्ता.) - जिल्ह्यात नगरपालिका आणि नगरपंचायत यांच्या निवडणुका जाहीर होताच तत्काल आचारसंहिता लागू झाली. याच काळात उच्च न्यायालयाच्या नियमानुसार पहाटे ६ वाजल्यानंतर वाजणारे भोंगे अचानक पहाटे ५.१५ वाजताच वाजायला प्रारंभ झाला आहे. (उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणारे समाजात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण करत आहेत.- संपादक)
   काही मासांपूर्वी शहर पोलीस ठाण्यात याविरोधात कारवाई करण्यासाठी स्थानिक हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने निवेदन देण्यात आले होते. २-४ वेळा पाठपुरावा घेतल्यानंतर पोलिसांनी याविषयी संबंधितांना समज दिल्याचे सांगितले. या गोष्टीला काही कालावधी जातो न जातो तोच पुन्हा मशिदींमधून अचानक पहाटे ५.१५ वाजताच भोंगे वाजायला प्रारंभ झाला आहे.

टिपू सुलतानचे उदात्तीकरण करणारे श्रीमंत कोकाटे यांचे व्याख्यान रहित करण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

आमदार श्री. सुधीर गाडगीळ (उजवीकडून तिसरे) यांना निवेदन देतांना हिंदुत्ववादी
    सांगली, २५ नोव्हेंबर (वार्ता.) - इतिहासात टिपू सुलतानची क्रूरकर्मा म्हणून नोंद आहे. अशा हिंदुविरोधी आणि राष्ट्रविरोधी टिपू सुलतानचे उदात्तीकरण करण्याच्या उद्देशाने टिपूच्या जयंतीच्या निमित्ताने सांगली शहरातील खणभाग मधील नगारजी गल्ली येथे २५ नोव्हेंबर २०१६ या दिवशी सायंकाळी ६ ते ९.३० या कालावधीत आसिफभाई बावा युथ फाऊंडेशन हेल्प लाईन आणि समस्त मुस्लीम समाज, सांगली शहरच्या वतीने यांच्या हिंदुद्वेष्टे श्रीमंत कोकाटे यांच्या जाहीर व्याख्यानाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. तरी टिपू सुलतानचे उदात्तीकरण करणारे सदरचे व्याख्यान रहित करावे, या मागणीसाठी समस्त हिंदुत्ववादी संघटनांनच्या वतीने २५ नोव्हेंबर या दिवशी पोलीस अधीक्षक श्री. दत्तात्रय शिंदे यांना निवेदन देण्यात आले. आपल्या देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य असल्याने कोणालाही व्याख्यान घेऊ नका, असे सांगता येत नाही; मात्र अयोग्य व्यक्तव्य होऊ नये यांसाठी योग्य ती कृती करू, असे आश्‍वासन पोलीस अधीक्षकांनी हिंदुत्वववाद्यांना दिले. (अफझलखान वधाचे चित्र लावण्यास विरोध करतांना, पोलिसांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आठवत नाही का ? इतरत्रच्याही हिंदुत्ववाद्यांनी यातून दखल घेऊन अन्य ठिकाणाही टिपूचे होत असलेले उदात्तीकरण रोखले पाहिजे ! - संपादक)

पुण्यात बांधकाम व्यावसायिकाला १ कोटी रुपयांहून अधिक जुन्या नोटांच्या रकमेसह अटक

इतक्या मोठ्या प्रमाणात संपत्तीचे 
घबाड जमवणार्‍या सर्वच धनिक बांधकाम 
व्यावसायिकांची चौकशी व्हायला हवी !
         पुणे, २५ नोव्हेंबर - येथील अंकेश अनंत अगरवाल या बांधकाम व्यावसायिकाला १ कोटी ११ लक्ष ४६ सहस्र रुपयांच्या जुन्या नोटांच्या रकमेसह गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. येथील महानगरपालिका इमारतीजवळील किशोर पोरवाल यांच्या कार्यालयात ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या जुन्या नोटा पालटून घेण्यासाठी आल्याचे पोलिसांच्या गुन्हे शाखेला समजले. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करून अगरवाल यांना अटक केली. त्यांच्याकडील सर्व रक्कम आयकर विभागाने शासनाधीन केली असून विभागाकडून त्याची पुढील चौकशी करण्यात येत आहे. अगरवाल त्या नोटा ३० प्रतिशत दराने पालटणार होते. 

देश आणि राज्य यांप्रमाणेच सातार्‍यातही भाजपची सत्ता आणा ! - मुख्यमंत्री

नगरपालिका निवडणूक २०१६ : सातारा 
आणि कराड येथे मुख्यमंत्र्यांच्या प्रचारसभा
       सातारा, २५ नोव्हेंबर (वार्ता.) - आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आशीर्वादामुळेच सत्तेत आहोत. त्यांच्यामुळेच देशात आणि राज्यात सत्तेचे परिवर्तन घडले. आता देश आणि राज्य यांप्रमाणे सातार्‍यातील नगरपालिकेतही भाजपची सत्ता आणा, असे आवाहन मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी केले. येथील गांधी मैदानावर भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ. सुवर्णा पाटील आणि अन्य उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. या वेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.
       मुख्यमंत्री पुढे म्हणाले, पंतप्रधान मोदींनी सर्वसामान्यांचे राज्य आणले असून या आर्थिक स्वातंत्र्याच्या लढ्यात सैनिक म्हणून काम करा. शेवटी मान्यवरांच्या हस्ते भाजपच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन करण्यात आले.

द्रुतगती मार्गावर नवीन वाहतूक प्रणाली राबवण्याचा निर्णय बैठकीच्या इतिवृत्तातून वगळला !

       पुणे - पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील कामाच्या संदर्भात लेखाजोखा मांडण्यासंदर्भात मध्यंतरी झालेल्या प्रधान सचिवांच्या बैठकीत बुद्धीमान वाहतूक व्यवस्थापन प्रणाली राबवण्यासंदर्भात आणि त्यासाठी किती खर्च येईल, याविषयी चर्चा करण्यात आली; परंतु यासंदर्भात कोणतेही स्पष्टीकरण न देता हा निर्णय बैठकीच्या इतिवृत्तातून वगळण्यात आला. (नेमका हाच निर्णय वगळण्यामागे द्रुतगती मार्गावरील वाहतुकीच्या संदर्भात शासनाची अनास्था आहे, असे कोणी म्हटल्यास त्यात वावगे ते काय ? - संपादक)

वेळ आता नाही, तर स्वातंत्र्य मिळाले तेव्हाच आली होती आणि स्वातंत्र्योत्तर आतापर्यंत म्हणजे गेली ७० वर्षे प्रत्येक वर्षी आली होती !

      आतंकवादी आक्रमण झाल्यानंतर अमुक एका संघटनेवर बंदी घाला, त्याचा नायनाट करा !, असे म्हटले जाते; मात्र जो देश आतंकवादाला खतपाणी घालत आहे, त्याच्या बंदीविषयी कोणी काहीच बोलत नाही. आतंकवादाला पैसे (रसद) पुरवणार्‍या आणि भारतावर आतंकवादी आक्रमणाला प्रोत्साहन देणार्‍या पाकिस्तानला आता धडा शिकवण्याची आणि लोकांनीच पाकिस्तानला जाब विचारून हिसका दाखवण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन निवृत्त लेफ्टनंट जनरल मुकेश सभरवाल यांनी पुणे येथील एका कार्यशाळेत केले. 

आम्ही ४ विवाह करू आणि अनेक मुलांना जन्म देऊ आणि नंतर आमची स्थिती ठीक नाही, असे सर्वांना सांगू ! ही मानसिकता सरकार कधीच लक्षात घेणार नाही आणि लगेच आर्थिक मदत देईल !

      सध्या मुसलमान समाज अतिशय निकृष्ट दर्जाचे जीवन जगत आहे. त्यांची स्थिती लक्षात येण्यासाठी त्यांचे सर्वेक्षण करावे आणि त्यासाठी आयोग नेमावा, अशी मागणी मुस्लिम विकास परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. ही मागणी करणारे निवेदन मुस्लिम विकास परिषदेचे अध्यक्ष अमीनभाई जामगावकर यांनी समाजकल्याण अधिकार्‍यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे पाठवले आहे.

पेटंटविषयीच्या दंडविधानांचा प्रवास, अन्य राष्ट्रांची कुरघोडी आणि भारताची उदासीनता

आज असलेल्या राष्ट्रीय कायदा दिनाच्या निमित्ताने...
      भारतात भाषिक, धार्मिक आणि सांस्कृतिक विविधता आहे. या सर्वांवरच आता परकीय आक्रमण होत आहे. भाषेवर इंग्रजीचे, संस्कृतीवर पाश्‍चिमात्त्य संस्कृतीचे आक्रमण होत आहे. त्याची प्रसारमाध्यमांद्वारे चर्चाही होत आहे. या आक्रमणानंतर पाश्‍चिमात्यांनी विशेषतः अमेरिका आणि जपान यांनी भारतीय शेतमाल उत्पादन, त्यासंबंधित औषधे आणि अन्य पदार्थ यांवर स्वतःचे स्वामित्व गाजवून एकाधिकार मिळवण्यासाठी आवेदन पत्र (अर्ज) प्रविष्ट केले आहे अन् करत आहेत. प्रस्तुत लेखात एकाधिकार (पेटंट) म्हणजे नेमके काय, भारतातील या दंडविधानाचा प्रवास आणि पाश्‍चिमात्त्य राष्ट्रांची कुरघोडी, यांविषयी ऊहापोह करण्यात आला आहे.’

ही संख्या म्हणजे प्रतीदिन १ बलात्कार !

        गेल्या ५ वर्षांमध्ये मुंबईत २ सहस्र २८४ बलात्कार, तर ६ सहस्र ३७६ विनयभंग यांच्या घटनांची नोंद झाली. गंभीर म्हणजे १८ वर्षांच्या आतील पीडितांचे प्रमाण सर्वाधिक असून वर्ष २०१५ मध्ये बलात्काराच्या नोंद झालेल्या घटनांमध्ये ते ६३ टक्के आहे. प्रजा फाऊंडेशनच्या वतीने प्रतिवर्षी सादर करण्यात येत असलेल्या अहवालातून दिसून येत आहे. 

हे सर्वोच्च न्यायालयाला विचारावे लागते, हे सरकारला लज्जास्पद !

     ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या नोटा रहित केल्यानंतर त्या पालटून देतांना नागरिकांची गैरसोय आणि असुविधा होऊ नये, यासाठी केंद्र सरकारने काय उपाययोजना केल्या, असा प्रश्‍न सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला विचारला आहे. 

ऐतिहासिक ठेव्याचे संवर्धन : काळाची आवश्यकता !

     ऐतिहासिक शिलालेख, वस्तू आणि शिल्पकृती चोरीस गेल्याची आणि ऐतिहासिक स्मारके मोडकळीस आल्याची वृत्ते वृत्तपत्रांमध्ये येत आहेत. इतिहास संशोधक अथवा पुरातत्व या क्षेत्रांत कार्यरत अभ्यासक या घटनांविषयी नोंद घेऊन खेद व्यक्त करतात. अनेक वेळा अशा प्रकरणी शासनदरबारी अर्ज करणे आणि निवेदने देणे, या कृतीही केल्या जातात. आतापर्यंत तरी या निवेदनांची गांभीर्याने दखल घेतलेली दिसत नाही. तरीही या इतिहासप्रेमी मंडळींचा एकमार्गी लढा चालूच असतो. त्याविषयीच्या विस्तृत बातम्या प्रसिद्ध करण्यामध्ये लोकशाहीचा चौथा स्तंभही विशेष रस घेतांना दिसत नाही.

फलक प्रसिद्धी

पाकच्या सिंधमध्ये हिंदूंच्या धर्मांतराला बंदी 
घालणारा कायदा झाला, आता भारतात कधी होणार ?
      पाकच्या सिंधमध्ये हिंदूंच्या धर्मांतराला रोख लावण्यासाठी कायदा करण्यात आला आहे. आता सिंधमध्ये धर्मांतर करणे गुन्हा मानला जाणार आहे. त्यासाठी ५ वर्ष ते आजन्म कारावासाची शिक्षा होणार आहे. 

हिंदू तेजा जाग रे

Jago !
      Pak ke Sindh me Hinduonka dharmantaran par pabandi laganewala kanun bana ! 
Hinduonke Bhart me kab banega !
जागो ! 
      पाक के सिंध में हिन्दुआें के धर्मांतरण पर प्रतिबंध लगानेवाला कानून बना ! 
हिन्दुआें के भारत में यह कानून कब बनेगा ?

कशाला हव्यात नोटा ?


     ‘सरकारने ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या चलनातील नोटा एका झटक्यात हद्दपार केल्या अन् नागरिकांना अगदी किरकोळ रकमांसाठीही अधिकोषांसमोर आणि एटीएम् केंद्रांसमोर मोठमोठ्या रांगा लावाव्या लागल्या. अनेकजणांना तर पैशाअभावी रोजचे व्यवहार कसे करायचे आणि जगायचे कसे ? याचीच चिंता पडली; कारण आपल्याकडे मुख्यत: रोखीतच होणारे सर्व व्यवहार ! सर्वसामान्य माणसे हेच व्यवहार जर ‘कॅशलेस इकॉनॉमी’ने (रोखीने व्यवहार न करणारी अर्थव्यवस्था) करत असते, तर एवढी अडचण आली नसती आणि अधिकोषांसमोर एवढ्या मोठ्या रांगा लागून शारीरिक आणि मानसिक त्रासही भोगावा लागला नसता.

हिंदु जनजागृती समितीच्या ऑक्टोबर २०१६ मधील चौथ्या सप्ताहातील प्रसारकार्याचा रत्नागिरी जिल्ह्याचा आढावा !

धर्मकार्यातील धर्माभिमान्यांचा अनुकरणीय सहभाग ! 
अ. चिनी फटाक्यांच्या विरोधात जनजागृती ! : चिनी फटाक्यांच्या विरोधात चिपळूण आणि दापोली येथे पोलिसांना २, प्रशासनाला २ आणि ५ व्यापार्‍यांना निवेदने देण्यात आली. समितीच्या या मोहिमेला व्यापार्‍यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. व्यापार्‍यांनी चिनी फटाके विक्रीस ठेवले नसल्याचे सांगितले, तसेच ‘चीनकडून फटाके विकत घेण्याची आवश्यकता नाही. पैसा कमवण्यासाठी राष्ट्रहित आणि स्वाभिमान याला तिलांजली देणे पटत नाही’, अशी परखड प्रतिक्रियाही व्यापार्‍यांनी व्यक्त केली. चिपळूण येथेे माजी सैनिक संघटना, शिवसेना महिला आघाडी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे), छत्रपती शिवाजी चौक रिक्शा मंडळ आणि श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनांनी प्रबोधन चळवळीला पाठिंबा दिला. फटाक्यांच्या संदर्भात देण्यात आलेल्या निवेदनांच्या बातमीला दैनिक लोकमत, दैनिक पुढारी, दैनिक प्रहार आणि दैनिक तरुण भारत यांनी ठळक प्रसिद्धी दिली.

चित्रपटांमुळे समाजावर झालेले दुष्परिणाम

      ‘शूट आऊट अ‍ॅट वडाळा’ नावाचा मन्या सुर्वेनामक गुंडाच्या जीवनावर आधारित चित्रपट आला होता. ‘फेसबूकवर’ त्याच मन्या सुर्वेला तब्बल ३५ सहस्र ‘लाईक्स’ आणि १ सहस्र ‘कॉमेंट्स’ आल्या. त्याच ‘फेसबूकवर’ हुतात्मा भगतसिंह यांच्याविषयीच्या लिखाणाला शंभर ‘लाईक्स’ मिळत नाहीत. (साप्ताहिक ‘वज्रधारी’, वर्ष ७ वे, अंक १८, ६ ते १२ जून २०१३)

विश्‍वकल्याणासाठी भारताचे रक्षण आवश्यक !

     ‘विश्‍वाचे कल्याण आणि लाभ यांच्यासाठी भारताचे रक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे; कारण केवळ भारतच विश्‍वाला शांती आणि न्याय व्यवस्था देऊ शकतो.’ - मदर, अरविंद आश्रम (हिन्दू चिंतन)
     या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. - संपादक

चूल-बोळक्याचा नाही, तर आमचा पृथ्वीचा संसार !

      ‘आम्हाला जर चूल-बोळक्याचा संसार करायचा असता, तर आम्ही तेव्हाच केला असता. आम्हाला पृथ्वीचा संसार करायचा होता. आकाशावर प्रेम करणार्‍या आमच्या मनाने ‘आकाशतत्त्व’ पृथ्वीवर आणले. (‘आकाशतत्त्वा’ला पृथ्वीवर यावे लागले.) आमचे काम झाले. आम्ही संसाराचा ‘घडा’ फोडून टाकला. आता उरलेले काम त्यांचे (प.पू. डॉक्टरांचे). आम्ही दुरून पहाणार. घडोघडी हात जोडणार. त्यांच्यावर अपरंपार प्रेम करणार !’ - पुष्पांजली, बेळगाव (२३.११.२०१४, रात्री ११.३०)

जीवनात कधीच नैराश्य येऊ नये; म्हणून मुलांना हिंदु राष्ट्रात साधना शिकवली जाईल !

     ‘आजच्या जगात पालक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये अजिबातच सुसंवाद नाही. केवळ भौतिक सुविधा आपल्या मुलांना उपलब्ध करून दिल्या की, आपले उत्तरदायित्व संपले, असे करू नका. मुलांवर अपेक्षांचे ओझे न लादता, तसेच त्यांची क्षमता बघूनच त्यांना योग्य मार्गदर्शन करा अन्यथा मुलांमध्ये नैराश्य येईल.’
- गंगाधर म्हमाणे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ

मिरज आश्रमातील प.पू. डॉक्टरांची खोली, पू. जयराम जोशी यांची खोली, पायर्‍या आणि ध्यानमंदिर येथे गेल्या दोन मासांपासून जाणवलेले पालट

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...
परात्पर गुरु
डॉ. जयंत आठवले
     ‘प.पू. डॉक्टर प्रत्यक्षात मिरज आश्रमात स्थुलातून नसले, तरी सूक्ष्मातून त्यांचे वास्तव्य आश्रमात असल्याचे साधकांना जाणवते. प.पू. डॉक्टरांच्या कृपेने मिरज आश्रमात आध्यात्मिक पालट झाले आहेत. ते पुढे देत आहे.
१. प.पू. डॉक्टरांनी वापरलेली आसंदी, त्यांची खोली, 
खोलीतील श्रीकृष्णाचे चित्र यांत जाणवलेले पालट 
अ. प.पू. डॉक्टरांच्या खोलीत त्यांनी वापरलेली आसंदी आहे. सर्व साधकांना त्या आसंदीवर ‘प.पू. डॉक्टर प्रत्यक्षात बसलेले आहेत’, असे जाणवते.
आ. प.पू. डॉक्टरांच्या खोलीत नामजपाला बसल्यावर काही विशिष्ट नाद ऐकू येत असल्याचे जाणवते.
इ. प.पू. डॉक्टरांच्या खोलीतील श्रीकृष्णाच्या चित्रात जिवंतपणा असून तो प्रतिदिन वाढत असल्याचे जाणवते.

सहज बोलण्यातून साधकांना घडवणारे पू. महादेव नकातेकाका !

पू. महादेव नकाते
१. पू. नकातेकाकांनी भावाला समजावल्यावर 
माझी ‘देव क्षणोक्षणी काळजी घेत आहे’, ही जाणीव वाढणे 
     ‘एकदा मी काही कार्यक्रमानिमित्त घरी गेले होते. भावाचे नोकरीतील स्थानांतर झाले होते. तो मला आग्रहाने ‘काही दिवस घरी थांब’, असे सांगत होता. ‘सेवेत राहिल्यावर माझा त्रास अल्प होतो’, हे त्याला सांगणे कठीण होते. मी ‘देव काळजी घेईल’, असा विचार करून आश्रमात आले. त्यानंतर भावाची पू. नकातेकाकांशी भेट झाली. त्यांनी भावाला समजावले. त्यानंतर माझी ‘देव क्षणोक्षणी काळजी घेत आहे. तोच कर्ता- करविता आहे’, याची जाणीव तीव्रतेने वाढली आणि कृतज्ञता वाटली.

साधनेत अभ्यासाचे महत्त्व

      ‘अनेक वर्षे साधना करणारे एक वयस्कर गृहस्थ मला भेटले होते. तेव्हा आमच्यात पुढील संभाषण झाले. 
गृहस्थ : मला रडणे आवडत नाही. आपल्याला लढता आले पाहिजे; म्हणून मी एखाद्या प्रसंगी रडू आले, तर त्याच्याशी लढतो.’’ 
मी : रडू येते, असे प्रसंग कोणते असतात ?
गृहस्थ : नामजप किंवा प्रार्थना करतांना, देवळात दर्शन घेतांना, संतांना भेटतांना अशा काही प्रसंगी मला रडू येते.
मी : तेव्हा मनाला काय जाणवते ? त्रास होतो कि आनंद जाणवतो ?
गृहस्थ : आनंद !
मी : अहो, तेव्हा आपला भाव जागृत होत असतो ! हे प्रगतीचे लक्षण आहे. पुढे अखंड भावावस्थेत रहाता आले, तर खूपच प्रगती झालेली असेल.
     त्यानंतर ते गृहस्थ बराच वेळ भावावस्थेतच होते. 
   या प्रसंगावरून अध्यात्मशास्त्राच्या अभ्यासाचे महत्त्व लक्षात आले. त्या गृहस्थांना ‘त्यांची भावावस्था असते, तेव्हा भावाश्रू येतात’, हे ज्ञात असते, तर त्या अवस्थेत अधिकाधिक राहून ते साधनेत एव्हाना पुढे गेले असते.’
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

श्रद्धा आणि अश्रद्धा !

प.पू. पांडे महाराज यांचे अनमोल विचारधन
प.पू. परशराम पांडे
१. भगवंतावर दृढ श्रद्धा का ठेवावी ?
अ. ‘जर मनुष्य ‘भगवंत आहे’, या श्रद्धेवर राहिला, तर त्याच्या विरुद्ध कोणतीही वाईट शक्ती किंवा नकारात्मक शक्ती कार्य करू शकत नाही. 
आ. दृढ श्रद्धा असणार्‍याला कोणत्याही नियमाचे बंधन रहात नाही, ना अमावास्या ना पौर्णिमा ! श्रद्धावंतासाठी सर्व दिवस शुभ आहेत, कोणत्या संदर्भाची आवश्यकता नाही. केवळ भगवंतावर दृढ श्रद्धा पाहिजे. 
इ. आमची श्रद्धा उणी पडते. श्रद्धा नाही ठेवली, तर हानीच अधिक आहे; पण श्रद्धा ठेवून जर केले, तर लाभच लाभ आहे.

प.पू. डॉक्टरांनी साधकांना वेळोवेळी केलेले मार्गदर्शन आणि त्यांनी सांगितलेली साधनेविषयी अनमोल सूत्रे

१. प्रारब्ध 
१ अ. आजार म्हणजे प्रारब्धभोगच असणे : आजारात ८० टक्के आपले प्रारब्धभोगच असतात. साधनेने ते अल्प होऊ शकतात. साधनेत प्रगती झाल्यावर देहबुद्धी नाहिशी होते. मग आजारपणाचे काही वाटत नाही.
१ आ. देवाण-घेवाण हिशोब : ‘मुलांनी साधना करावी’, असे वाटणे, हेही चूक आहे; कारण तीही स्वेच्छा आहे. पती-पत्नी, मुले, चाकरीच्या ठिकाणचे हे सर्व केवळ देवाण-घेवाण हिशोब पूर्ण करण्यासाठी एकत्र आले असतात.
१ इ. चिंता : मन आहे तोपर्यंत चिंता आणि काळजी आहे. मनोलयानंतर चिंता नाही.
२. अध्यात्मात मायेच्या शिक्षणाला किंमत शून्य आहे.

काही वर्षे साधनेच्या संदर्भात अयोग्य दृष्टीकोन ठेवल्याचे लक्षात आल्यावर झालेली विचारप्रक्रिया

श्री. विश्‍वनाथ कुलकर्णी
१. जिल्हासेवकांनी रामनाथी आश्रमात स्वभावदोष 
निर्मूलन प्रक्रियेला जाण्यासंदर्भात विचारल्यावर मनाची सिद्धता न 
होणे आणि प्रक्रिया करण्याची सुवर्णसंधी निघून जात असल्याचे वाटणे 
     ‘प्रसारात असतांना जिल्हासेवक आणि प्रसारसेवक पुष्कळ साधकांना ‘रामनाथी आश्रमात प्रक्रियेला जाल का ?’, असे विचारायचे. तेव्हा अनेक साधकांच्या मनात असा विचार असायचा, ‘१५ दिवसांची किंवा १ मासाची सुट्टी कशी मिळणार ? तसेच घरी कार्यक्रम आणि सण आहेत.’ त्यामुळे सर्वांची प्रक्रिया करण्याची सुवर्णसंधी निघून जायची. मलाही सत्संगात प्रक्रियेविषयी विचारल्यावर ‘कार्यालयातून सुट्टी कशी मिळणार ?’ याचा ताण आला होता.

ध्यान लावते, ते ध्यानमंदिर ! - सद्गुरु (श्री.) राजेंद्र शिंदे

सद्गुरु (श्री.) राजेंद्र शिंदे
      ‘रामनाथी आश्रमातील देवघर असलेल्या खोलीला आम्ही ‘ध्यानमंदिर’ म्हणतो. साधक तेथे नामजपासाठी बसतात. सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी त्या खोलीला भेट दिली. नंतर ते म्हणाले, ‘या खोलीला ‘ध्यानमंदिर’ म्हणतात, हे अगदी योग्य आहे. खोलीत गेल्यावर माझे आपोआप ध्यान लागले. ध्यान लावते, ते ध्यानमंदिर !’ 
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले 


शांत, संयमी स्वभावाचे, परिस्थिती स्वीकारून रुग्णाईत पत्नीची मनापासून सेवा करणारे आणि देहभान विसरून आश्रमातील अन्य सेवा करणारे साधक श्री. नटवरलाल जाखोटिया !

श्री. नटवरलाल जाखोटिया
‘     देवद आश्रमात रहाणारे साधक श्री. नटवरलाल जाखोटिया (देवद आश्रमात रहाणार्‍या माझ्या नणंद सौ. रेखा जाखोटिया (सौ. जीजी) यांचे यजमान) हे माझे नणंदोई (भावोजी) आहेत. त्यांना आम्ही जीजाजी म्हणतो. मला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये लिहिण्याची देवाने संधी आणि बुद्धी दिली, त्यासाठी मी प.पू. डॉक्टरांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता व्यक्त करते. 
१. शांत आणि संयमी स्वभाव 
     आमच्या लग्नानंतर अनेकदा आम्हाला माधवनगर (सांगली) येथे त्यांच्या घरी जाण्याचा योग आला; परंतु आम्ही कधीही त्यांना रागावलेले बघितले नाही. त्यांचा स्वभाव अतिशय साधाभोळा आहे.

कु. योगिनी वैभव आफळे यांनी सौ. अश्‍विनी अतुल पवार यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त दिलेले शुभेच्छापत्र !

कुलबांधवांना गुरुकृपायोगानुसार साधना करण्याचे महत्त्व सांगितल्यावर त्यांना मान्य न होणे; मात्र कुलदेवाला जात असतांना प्रवासात आलेल्या अनुभूतींमुळे गुरुकृपायोगानुसार साधना करण्याचे महत्त्व लक्षात येणे

सौ. शालिनी मराठे
१. कुलदैवताचे दर्शन घ्यायला जातांना कुलबांधवांना 
गुरुकृपायोगानुसार साधना करण्याचे महत्त्व सांगणे
     ‘गुहागर (जिल्हा रत्नागिरी) येथील श्री व्याडेश्‍वर हे आमचे कुलदैवत आहे. वर्ष १९९४ मध्ये आम्ही ९ - १० मराठे आडनावाचे कुलबांधव एकत्र जमून चारचाकीने उत्सवासाठी जायला निघालो. तेव्हा आम्ही नुकतेच सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करू लागलो होतो. आम्ही प्रत्येकाला कुलदेवतेचा नामजप आणि गुरुकृपायोगानुसार साधना करण्याचे महत्त्व सांगत असू. आम्ही गाडीतून जातांनाही आमच्या कुलबांधवांना गुरुकृपायोगानुसार साधना करण्याचे महत्त्व सांगितले.

पायाला छोटासा व्रण होऊन दुसर्‍या दिवसापर्यंत दुखणे अनपेक्षितपणे वाढणे आणि आध्यात्मिक उपाय केल्यावर व्रणाव्यतिरिक्त अन्य ठिकाणी होत असलेल्या वेदना थांबणे अन् यावरून ‘अल्प असलेल्या शारीरिक व्याधीची तीव्रता आध्यात्मिक त्रासामुळे किती बळावू शकते’, हे लक्षात येणे

श्री. निमिष म्हात्रे
      ‘२४.३.२०१४ या दिवशी माझ्या पायावर मांडीजवळ एक छोटासा व्रण झाला. त्यावर विजारीने घर्षण झाल्यामुळे फार चुरचुरत होते. दुसर्‍या दिवशी हे दुखणे वाढले. व्रण मांडीच्या पुढील बाजूस असूनही दुपारपर्यंत पायाच्या मागील बाजूला दुखू लागले, तसेच वर व्रणापर्यंत आखडल्यासारखे होऊ लागले. माझे दोन्ही पाय तळव्यापर्यंत दुखू लागले. ‘एका छोट्याशा व्रणामुळे इतका त्रास होईल’, असे मला वाटत नव्हते. ‘आध्यात्मिक उपाय करून बघूया’, असा विचार केला आणि मी ध्यानमंदिरात बसून उदबत्तीने आवरण काढले आणि व्रणाभोवती उदबत्ती फिरवली. मी असे करत असतांना मला ढेकर आणि जांभया येऊन त्या माध्यमातून काळी शक्ती बाहेर पडली. हे उपाय केल्यावर केवळ व्रण असलेल्या जागीच वेदना होऊ लागल्या. त्या व्यतिरिक्त अन्य ठिकाणी होत असलेल्या वेदना थांबल्या. यावरून ‘अल्प असलेल्या शारीरिक व्याधीची तीव्रता आध्यात्मिक त्रासामुळे किती बळावू शकते’, हे लक्षात आले.’
- श्री. निमिष म्हात्रे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२७.३.२०१४)

साधी भोळी कृष्णवेडी संध्या ।

कु. संध्या माळी
     आज कार्तिक कृष्ण पक्ष द्वादशी (२६.११.२०१६) या दिवशी कु. संध्या माळी यांचा तिथीनुसार वाढदिवस आहे. त्यानिमित्त ‘त्यांचे नाव आणि विविध संध्यांची नावे’ यांचा सुरेख मिलाप साधून कु. मधुरा भोसले यांनी केलेली कविता येथे देत आहोत.
सनातन गोकुळाकडून कु. संध्या माळी
यांना वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा !
सकाळची प्रातःसंध्या । सायंकाळची सायंसंध्या ।
कोवळ्या उन्हाची श्रावणसंध्या । कृष्णकुंतलासारखी आषाढसंध्या ॥ १ ॥

फुलांनी बहरलेली वसंतसंध्या । गुलाबी थंडीने शहारलेली शिशिरसंध्या । 
पालवी फुटलेली चैत्रातील संध्या । 
दिव्यांनी सुशोभित दिवाळीतील संध्या ॥ २ ॥

रामनाथी आश्रमातील स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेमुळे कु. रेवती कानशुक्ले यांच्यात मनाच्या स्तरावर झालेले पालट

आश्रमातील साधकांकडून 
शिकायला मिळालेली सूत्रे
१. स्वयंपाकघरातील साधक
अ. चुकांची जाणीव तत्त्वनिष्ठतेने आणि प्रेमाने करून देतात. त्यामुळे चूक सांगितल्यावर वाईट न वाटता चुकांची खंत वाटते.
आ. सहसाधकांना सांभाळून घेतात. कुटुंबात जसे ‘हे आपलेच आहेत’, असे वाटून स्वीकारतो, तसेच प्रक्रियेतील साधकांना स्वीकारून त्यांच्याशी वागतात. त्यांच्याकडून कुटुंबभावना शिकायला मिळाली.
२. खोलीतील सहसाधिका 
अ. खोलीतील सहसाधिका सौ. कपाडियाकाकू आणि सौ. पडियारकाकू या सर्व सेवा आपल्याच आहेत, अशा भावाने करत असायच्या. त्यामुळे त्यांनी कधी सहसाधिकांकडून अपेक्षा केली नाही.’ - कु. रेवती कानशुक्ले, नांदेड (७.१२.२०१५)

हसतमुख, सहनशील आणि कृष्णबाप्पाचे चित्र पाहून त्याला अचूक ओळखणारी ६१ टक्के पातळीची आणि महर्लोकातून जन्माला आलेली पुणे येथील चि. कृष्णाली बागवडे (वय १ वर्षे) !

उच्चलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र 
चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. कृष्णाली बागवडे एक दैवी बालक आहे !
चि. कृष्णाली बागवडे
पालकांनो, हे लक्षात घ्या ! 
     ‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ - (परात्पर गुरु) डॉ. आठवले 
    यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.

सद्गुरु (श्री.) राजेंद्रदादा हे नाव कानावर पडता । आनंद आणि आनंदची होत असे ।

      ‘सद्गुरु श्री. राजेंद्र शिंदे यांची आठवण येत असतांना मला पुढील काव्य सुचले.
हे श्रीकृष्णा, पाहूनी ज्यांना दैनिकातून (टीप १) 
परमानंद होत असे ।
अनुभवूनी ज्यांना प्रीती 
सगुणातून अवतरलेली भासे ॥ १ ॥

आठवूनी ज्यांना कंठ दाटून येत असे ।
सत्संगामध्ये ज्यांच्या मायमाऊलीचे दर्शन होत असे ॥ २ ॥

शब्दाशब्दांतूनी ज्यांच्या 
चैतन्याचा वर्षाव होत असे ।
बोलतांना ज्यांच्याशी अश्रू भरभरून वहाती ॥ ३ ॥

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
        कुठे पृथ्वीवर राज्य करण्याचे ध्येय असणारे इतर धर्म, तर कुठे प्रत्येकाला ईश्‍वरप्राप्ती व्हावी, हे ध्येय असणारा हिंदु धर्म ! 
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

बोधचित्र


॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
 
संतांचे विश्‍लेषणकरू नये
      संतांचा शोध घेऊन काही सापडत नाही; कारण तेथे केवळ शून्य असते.
भावार्थ : प्रकृतीतील गोष्टी पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्याद्वारे शोध घेऊन सापडणे शक्य आहे; पण पुरुष, शिव किंवा ब्रह्मतत्त्व यांचा शोध घेता येत नाही; कारण ते पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडचे आहे. संत ब्रह्माशी एकरूप झालेले असल्याने त्यांचा शोध घेऊन काही सापडत नाही.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. 
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

परमार्थ म्हणजे काय ? 
‘स्वार्थाची (‘स्व’चा अर्थ जाणून घ्यायची) पराकाष्ठा, म्हणजे परमार्थ !’ 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

असेही देशद्रोही !

संपादकीय
     मध्यप्रदेशमधील खांडवा मध्यवर्ती कारागृहातून काही दिवसांपूर्वी सीमीचे आठ आतंकवादी पळून जात असतांना झालेल्या चकमकीत ठार झाले. त्यांच्यापैकी पाच जण खांडवा येथीलच असल्यामुळे त्यांचे खांडवा येथेच दफन करण्यात आले. त्यांना दफन केलेल्या ठिकाणी ते हुतात्मा असल्याची पाटी लावण्यात आली आहे. आतंकवाद्यांना ‘हुतात्मा’ ठरवण्याचा हा प्रकार देशप्रेमींना विचारप्रवण करणारा आहे. ‘सीमी’ ही विद्यार्थी संघटना होती आणि विद्यार्थी संघटनेने अशी विचारधारा अंगीकारल्याने देशाचे भवितव्य आहे तरी काय ? असा प्रश्‍न पडू शकतो.

आंधळे विरोधक !

संपादकीय
     देशातील काळा पैसा बाहेर काढण्यासाठी केंद्रशासनाने ८ नोव्हेंबरपासून ५०० आणि १ सहस्र रुपये मूल्याच्या नोटा चलनातून रद्दबातल ठरवल्या. शासनाच्या या निर्णयाला काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, बसपा, आप या पक्षांनी कडाडून विरोध केला. त्यांच्या विरोधातून भारतीय जनता जे समजायला हवे, ते समजून गेली. जुन्या नोटा पालटण्यासाठी रांगेत उभे रहाणार्‍यांपैकी ५० जण विविध कारणांमुळे मरण पावले. त्याचे भांडवल करून विरोधकांनी कांगावा करायला आरंभ केला.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn