Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

एका सैनिकाच्या मृतदेहाची विटंबना !

पाकच्या गोळीबारात ३ सैनिक हुतात्मा !
      काँग्रेसच्या काळातही पाककडून भारतीय सैनिक हुतात्मा होऊन त्यांच्या मृतदेहाची विटंबना होत होती, तशाच घटना आताही चालू आहेत, तर मग पालटले काय ? अशा घटना लोकशाहीतून निवडून आलेली आतापर्यंतची सरकारे रोखू शकत नाहीत, त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याप्रमाणे असलेले हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) आवश्यक आहे, हे लक्षात घ्या !
       जम्मू, २२ नोव्हेंबर - जम्मू-काश्मीरच्या माछिल सेक्टरमध्ये पाकने २२ नोव्हेंबरला केलेल्या गोळीबारात ३ सैनिक हुतात्मा झाले. यातील एका सैनिकाच्या मृतदेहाची पाकच्या सैनिकांनी विटंबना केल्याचे वृत्त आहे. ही कृती पाकच्या बॉर्डर अ‍ॅक्शन टीम अर्थात बॅटच्या सैनिकांनी केल्याचे म्हटले जात आहे. हे दल यासाठीच कुप्रसिद्ध आहे. काही दिवसांपूर्वी मनदीप या सैनिकाच्या संदर्भातही अशीच घटना घडली होती. तसेच या दलाने काही वर्षांपूर्वी दोघा भारतीय सैनिकांचा शिरच्छेद करून त्यांचे डोके पाकमध्ये नेले होते. 
       माछिल सेक्टरमध्ये सकाळी भारतीय सैनिक पेट्रोलिंग करत असतांना बॅटच्या सैनिकांनी त्यांच्यावर हे आक्रमण केले. विटंबनेच्या प्रकारानंतर भारतीय सैन्यात संताप व्यक्त होत आहे. सैन्याने याची माहिती संरक्षणमंत्री यांना दिली आहे. त्यांनी या घटनेला प्रत्युत्तर देण्याचा आदेश दिला आहे.

दिग्दर्शकाची जीभ कापणार्‍यास १ कोटी रुपयांचे पारितोषिक देणार !

  • टॉयलेट : एक प्रेमकथा चित्रपटातून भगवान श्रीकृष्ण आणि राधा यांचा अवमान !
  • मथुरेतील संतांचा चित्रपटाला विरोध !
         मथुरा - अभिनेता अक्षय कुमार यांचा आगामी हिंदी चित्रपट टॉयलेट : एक प्रेमकथा याला येथील संतांनी विरोध केला आहे. या चित्रपटाचे येथे चित्रीकरण चालू आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक नारायण सिंह यांची जीभ कापून आणणार्‍यास १ कोटी रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल, असेही घोषित केले आहे. येथील नंदगाव आणि बरसाना गाव यांमधील मुला-मुलींचा विवाह होत असल्याचे या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. येथील गावकरी चित्रपटाच्या विरोधात उच्च न्यायालयातही जाणार आहेत. येथील श्रीजी मंदिराचे पुजारी भगवान दास गोस्वामी यांचे म्हणणे आहे की, गेल्या ५ सहस्र वर्षांत बरसाना आणि नंदगाव येथील मुला-मुलींचे एकमेकांशी लग्न लावले गेलेले नाही. भगवान श्रीकृष्ण नंदगावचे होते, तर राधा बरसाना गावातील होती. नंदगावातील प्रत्येक मुलाला सखा आणि बरसानाच्या मुलींना राधाच्या रूपात मानले जाते. त्यामुळे त्यांच्यात विवाह होत नाही. चित्रपटात ही परंपरा तोडण्यात आली आहे. 
१. नुकतीच बरसाना येथे महापंचायतीचे आयोजन करण्यात आले होते. यात वृंदावनचे महामंडलेश्‍वर नावलगिरी महाराज म्हणाले, निर्मात्याने या चित्रपटाचे नाव टॉयलेट : एक प्रेमकथा का ठेवले ? त्याऐवजी टॉयलेट : एक स्वच्छता अभियान असे नाव का दिले नाही ? 

आतंकवाद्यांकडे २ सहस्र रुपयांच्या नव्या नोटा सापडल्या !

केवळ नोटा पालटून आतंकवाद रोखला जाणार नाही, 
त्यासाठी युद्धच करावे लागेल, हे सरकारला कधी समजणार ?
      जम्मू, २२ नोव्हेंबर - जम्मू-काश्मीरमधील बंदिपोर येथे २२ नोव्हेंबरच्या पहाटे सैनिकांनी केलेल्या कारवाईत २ आतंकवादी ठार झाले. या आतंकवाद्यांकडे २ सहस्र रुपयांच्या नव्या नोटा सापडल्या आहेत. नोटाबंदीच्या निर्णयानंतर आतंकवाद्यांकडील ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या नोटांची रद्दी झाली, असे म्हटले जात होते; मात्र त्यांच्याकडे मिळालेल्या या नोटांमुळे आश्‍चर्य व्यक्त होत आहे. भारतातील लोकांना नव्या नोटा मिळवतांना त्रास होत असल्याचे म्हटले जात असतांना पाकपुरस्कृत आतंकवाद्यांकडे त्या मिळणे ही केंद्र सरकारच्या काळा पैसा बाहेर काढण्याच्या योजनेवर प्रश्‍न निर्माण करणारी घटना आहे. 
      पाकमधून घुसखोरी करून भारतात घुसलेल्या एकाला शरण येण्यास सांगितल्यावर तो पळून जात असतांना सैन्याने केलेल्या गोळीबारात तो ठार झाल्याची घटना घडली आहे.

गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथील सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाचे केंद्रीय राज्यमंत्री व्ही.के. सिंह यांच्याकडून कौतुक !

केंद्रीय राज्यमंत्री व्ही.के. सिंह (उजवीकडे) यांना
ग्रंथ भेट देतांना सनातनचे साधक श्री. हरिकृष्ण शर्मा

       गाझियाबाद (उत्तरप्रदेश) -
येथील कविनगरच्या रामलीला मैदानावर १७ ते २० नोव्हेंबर या कालावधीत आध्यात्मिक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यात सनातन संस्थेनेही प्रदर्शन लावले होते. यात अध्यात्म, राष्ट्ररक्षण, धर्मशिक्षण, आयुर्वेद आदी विषयांचे ग्रंथ आणि त्यांची माहिती देणारे फ्लेक्स फलक लावण्यात आले होते. या प्रदर्शनाला भेट देतांना केंद्रीय राज्यमंत्री आणि माजी सैन्यदल प्रमुख व्ही.के. सिंह यांनी सनातनचे प्रदर्शन केंद्रही पाहिले. हे प्रदर्शन चांगले आहे, असे कौतुकही त्यांनी या वेळी केले. सनातनच्या या प्रदर्शनाचा २ सहस्र भाविकांनी लाभ घेतला. 
       तसेच भाजपचे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री श्री. प्रकाश यांनीही प्रदर्शनाला भेट दिली. या वेळी उत्तरप्रदेशचे क्षेत्रीय संघटनमंत्री श्री. चंद्रशेखर आदी मान्यवरही उपस्थित होते.

(म्हणे) टिपूने देशासाठी प्राणांची आहुती दिली !

  • लक्षावधी हिंदूंची हत्या करणार्‍या, हिंदूंचेे बलपूर्वक धर्मांतर करून छळ करणार्‍या, हिंदु स्त्रियांना मुसलमानांत वाटण्याचे आदेश देऊन त्यांच्यावर बलात्कार करायला लावणार्‍या टिपू सुलतान(सैतान) याला महापुरुष बनवणारे श्रीपाल सबनीस यांच्यासारखे साहित्यिक कशा प्रकारचे साहित्य लिहीत असतील, याचा विचारच न केलेला बरा !
  • क्रूरकर्मा टिपू सुलतानचे वंशज असल्याप्रमाणे त्याचे गोडवे गाणारे श्रीपाल सबनीस यांची बौद्धिक दिवाळखोरी !
        सोलापूर - टिपूने दलित मुक्ततेचा नारा दिला. तो स्वदेशी भक्त होता. त्याने अनेक कारखाने उभे केले, लोकशाही भारतीय संस्कृती जिवंत ठेवली. विद्यापीठ उभे करून शिक्षणाची गंगा तळागाळापर्यंत पोचवली. कोणाला बलपूर्वक धर्मांतर करून घेतले नाही. बालसुधार, गृहस्त्रीसंरक्षण गृह उभे केले. सिंचन व्यवस्था उभी केली. शेतकर्‍यांसह सर्व कष्टकर्‍यांना भरघोस साहाय्य केले. ब्रिटिशांना सळो कि पळो केले. देशासाठी प्राणाची आहुती दिली. तो शहीद झाल्यानंतर मात्र भारताच्या स्वातंत्र्यावर गदा आली. भारतीय एकतेला अबाधित ठेवण्याचे काम टिपू सुलतान याने केले, असे हिंदुद्वेषी फुत्कार साहित्यिक श्रीपाल सबनीस यांनी काढत आपली बौद्धिक दिवाळखोरी दाखवून दिली. (टिपूच्या दैत्यासारख्या क्रूर छळामुळे सहस्रो हिंदु स्त्री-पुरुषांनी कृष्णा तुंगभद्रा नदीत जीव दिला. त्यांची प्रेते खाऊन कोल्हे आणि कुत्रे कंटाळले. त्याच्या आदेशाच्या भीतीने एका रात्रीत ५० सहस्र हिंदू मुसलमान झाले. 

(म्हणे) ‘सनातन संस्था धार्मिक तेढ निर्माण करते, संस्थेच्या सदस्यांचा हत्यांमध्ये सहभाग, विशेष न्यायालयाद्वारे संशयितांचा तपास करावा !’

खोटारडेपणावर आधारित मडगाव येथील अभिव्यक्ती 
दक्षिणायन परिषदेत सनातन संस्थेच्या विरोधातील ठराव अग्रक्रमांकावर !
      सर्वाधिक अल्पसंख्यांक असलेल्या गोव्यात, तसेच भारतात कुठेही सनातनमुळे धार्मिक तेढ निर्माण झाल्याचे एकही उदाहरण नाही, तसेच सनातनच्या एकाही साधकाचा कुठल्याही हत्येत सहभाग असल्याचे सिद्ध झालेले नाही. असे असतांना असा ठराव करणार्‍यांनी त्यांची वैचारिक दिवाळखोरीच घोषित केली आहे. यांना विचारवंत तरी कसे म्हणणार ?
      मडगाव, २२ नोव्हेंबर (वार्ता.) - मडगाव येथे झालेल्या अभिव्यक्ती दक्षिणायन परिषदेत २० नोव्हेंबर या दिवशी शेवटच्या दिवशी करण्यात आलेल्या ठरावात सनातन संस्थेच्या विरोधातील ठराव अग्रक्रमांकावर होता. या ठरावात म्हटले आहे की, गोव्यात मुख्य कार्यालय असलेली सनातन संस्था धार्मिक तेढ निर्माण करते आणि संस्थेच्या सदस्यांचा डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे आणि प्रा. कुलबर्गी यांच्या हत्यांमध्ये सहभाग आहे. या तिन्ही हत्यांमधील दोषींना त्वरित अटक करावी आणि जलद न्याय मिळण्यासाठी त्यांचे विशेष न्यायालयाद्वारे अन्वेषण करण्यात यावे. परिषदेच्या समारोप सत्रात प्रभाकर तिंबले यांनी हे ठराव वाचून दाखवले. 

नोटाबंदी सर्जिकल स्ट्राईक नसून लोकांच्या हितासाठी आहे ! - नरेंद्र मोदी

       नवी देहली - नोटाबंदीचा निर्णय काळ्या पैशाच्या विरोधातील युद्धाचा भाग आहे. नोटाबंदीला सर्जिकल स्ट्राईक न म्हणता तो निर्णय लोकांच्या हितासाठीच आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदीय पक्षाच्या बैठकीत केले. या वेळी बोलतांना मोदी भावूक झाले होते. अरुण जेटली यांनीदेखील नोटाबंदीचा निर्णय हा राष्ट्रहिताचा असून यामुळे गरिबी दूर करण्यात साहाय्य मिळेल, असे सांगितले. या वेळी भाजपचे सर्व खासदार उपस्थित होते. विरोधी पक्ष चुकीची माहिती पसरवत असून लोकांना या निर्णयाच्या फायद्यांची योग्य माहिती द्या, असेही मोदी यांनी खासदारांना सांगितले. 
नोटा रहित करण्याच्या निर्णयावर 
तुमचा विचार कळवा ! - मोदी यांचे आवाहन 
       नोटाबंदीचा निर्णय योग्य कि अयोग्य असे मत थेट पंतप्रधान मोदी यांना कळवण्यासाठी त्यांनी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यासाठी मोदी यांनी ट्विटरवरच nm4.in/dnldapp ही लिंक जोडली आहे, ज्यात तुम्हाला हा निर्णय किती आवडला, आवडला असेल किंवा नसेल, तर त्यासाठीची कारणे काय आणि या निर्णयाविषयीचा तुमचा सल्ला काय आहे या सगळ्या गोष्टी तुम्ही येथे नोंदवू शकता.

(म्हणे) ‘आयबीएन्’ समूहाने काढून टाकले, त्या वेळी कोणत्याही पत्रकाराने आम्हाला पाठिंबा दिला नाही’ !

सनातनद्वेष्टे पत्रकार निखिल वागळे आणि पत्रकार सागरिका घोष यांचे नक्राश्रू !
      मडगाव, २२ नोव्हेंबर (वार्ता.) - अंबानी समूहाने ‘आयबीएन्’ समूहाची मालकी घेतल्यानंतर आम्हाला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला; मात्र त्या वेळी कोणत्याही पत्रकाराने आम्हाला पाठिंबा दर्शवला नाही. पत्रकारांना आज अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही, असे नक्राश्रू सनातनद्वेष्टे पत्रकार निखिल वागळे आणि ‘आयबीएन्’मध्ये पूर्वी उच्च पदावर असलेल्या पत्रकार सागरिका घोष यांनी ढाळले. (स्वतःवर अन्याय झाल्यावर वागळे यांच्यासारख्या पत्रकारांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आठवते. यांना पाहिजे ते करू देणे ही यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची व्याख्या ! सनातनचे अभय वर्तक यांना चर्चेला बोलावून त्यांना बोलायला न देता नंतर जाण्यास सांगितले, तेव्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्य कुठे गेले होते ? - संपादक) मडगाव येथे अभिव्यक्ती दक्षिणायन परिषदेच्या अखेरच्या दिवशी ‘प्रसारमाध्यमांचे स्वातंत्र्य आणि लोकशाही’ या विषयावर आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. आज पत्रकारिता भाजप आणि प्रसारमाध्यमांचे मालक यांची बटीक झाली आहे. एक केंद्रीयमंत्री प्रसारमाध्यमांच्या मालकांना वृत्तवाहिनी अथवा वृत्तपत्रे यांचा भाजपला पाठिंबा देणाराच संपादक असावा, असे निर्देष करू लागले आहेत, असा आरोप या दोघांनी या वेळी केला. या चर्चासत्राचे अध्यक्षपद दैनिक ‘लोकमत’चे गोवा आवृत्तीचे संपादक राजू नायक यांनी भूषवले.

केवळ हिंदुत्वनिष्ठ युवकांची एकांगी चौकशी थांबवा, धार्मिक तणाव निर्माण करणार्‍या धर्मांधांना अटक करा ! - हिंदुत्वनिष्ठ संघटनांची पोलिसांकडे मागणी

मडगाव येथे क्रूर टिपू सुलतान जयंती साजरी करण्याचा 
धर्मांधाचा डाव हिंदुत्वनिष्ठ युवकांनी हाणून पाडल्याचे प्रकरण !
मडगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक 
मडकईकर यांच्याशी संवाद साधतांना हिंदुत्वनिष्ठ
     मडगाव, २२ नोव्हेंबर (वार्ता.) - मडगाव येथे टिपू सुलतान जयंती साजरी करण्याचा धर्मांधाचा डाव हिंदुत्वनिष्ठ युवकांनी हाणून पाडल्याच्या प्रकरणी मडगाव पोलिसांनी केवळ हिंदुत्वनिष्ठ युवकांची चौकशी आरंभून एकांगी तपास चालवला आहे. टिपू सुलतान याचा गोवा राज्याशी कोणताही ऐतिहासिक संबंध नसतांना त्याची जयंती साजरी करण्याचा प्रयत्न करून धार्मिक तणाव निर्माण करणार्‍यांना पोलिसांनी मोकळे सोडले आहे. पोलिसांनी या धर्मांधांना अटक करून त्यांची चौकशी करावी, अशी मागणी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी २० नोव्हेंबर या दिवशी मडगाव शहर पोलिसांची भेट घेऊन केली. या वेळी शिवसेना, शिवसाम्राज्य, म्हापसा व्यापारी संघटना, गोमंतक मंदिर आणि धार्मिक संस्था महासंघ, हिंदु जनजागृती समिती आणि अनेक हिंदुत्वनिष्ठ मिळून एकूण २००हून अधिक हिंदूंनी मडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मडकईकर यांची भेट घेऊन केली. या वेळी श्री. जयेश नाईक, म्हापसा व्यापारी संघटनेचे श्री. मनोज वाळके, गोमंतक मंदिर आणि धार्मिक संस्था महासंघाचे श्री. उदय मूंज, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख किशोरराव, श्री. जयेश थळी आदींचा सहभाग होता.
      टोकियो - जपानमध्ये २२ नोव्हेंबरला पहाटे स्थानिक प्रमाणवेळेनुसार सकाळी ६.३८ मिनिटांनी ७.३ रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपानंतर लगेचच हवामान खात्याने ३ मीटरपर्यंतच्या सुनामीच्या लाटा किनार्‍याला धडकण्याची चेतावणी दिली. याच वेळी फुकुशिमा अणुऊर्जा प्रकल्पाच्या भागात सुमारे एक मीटर उंचीच्या लाटाही धडकल्या. भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर काही काळासाठी फुकुशिमामधील एक रिअ‍ॅक्टर बंद ठेवण्यात आला होता.

महिलांनी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक बळ वाढवणे आवश्यक ! - सौ. शुभा सावंत, रणरागिणी

गोळजुवे, गोवा येथे हिंदु धर्मजागृती सभा
      म्हापसा (गोवा), २२ नोव्हेंबर (वार्ता.) - महिलांनी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक बळ वाढवणे आवश्यक आहे. या अनुषंगाने ‘रणरागिणी’ शाखा अनेक उपक्रम राबवत असते आणि या उपक्रमामध्ये महिलांनी सहभागी होणे आवश्यक आहे. महिलांवरील अत्याचार वाढत असून हे अत्याचार रोखण्यासाठी महिलांनी स्वसंरक्षण प्रशिक्षण वर्गात सहभागी होणे आवश्यक आहे, तसेच महिलांनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेण्याबरोबरच संघटनशक्तीही वाढवली पाहिजे, असे आवाहन ‘रणरागिणी’च्या सौ. शुभा सावंत यांनी केले. हिंदु जनजागृती समितीने श्री हनुमान राष्ट्रोळी पंचायत देवस्थान, गोळजुवे (बार्देश) येथे १९ नोव्हेंबर या दिवशी आयोजित केलेल्या हिंदु धर्मजागृती सभेत ‘स्वसंरक्षण प्रशिक्षणाची आवश्यकता’ या विषयावर बोलतांना त्यांनी हे आवाहन केले. या वेळी व्यासपिठावर हिंदु जनजागृती समितीचे उत्तर गोवा समन्वयक श्री. गोविंद चोडणकर यांची उपस्थिती होती.

(म्हणे) ‘केंद्रशासनाचा नोटाबंदीचा निर्णय अयोग्य !’

काळ्या धनाविषयी कधीही न बोलणारे पत्रकार 
राजदीप सरदेसाई यांचा पंतप्रधानांच्या विरोधात पुन्हा थयथयाट !
     पणजी, २२ नोव्हेंबर (वार्ता.) - केंद्रशासनाचा ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या नोटा रहित करण्याचा निर्णय योग्य नाही, असे मत पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी गेरा या बांधकाम व्यवसायिक आस्थापनाने येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात व्यक्त केले. (उठसूट शासनावर टीका करणारे पत्रकार राजदीप सरदेसाई काळ्या धनाच्या विषयावर शासनाने कोणती पावले उचलायला हवीत, हे सांगतील का ? - संपादक)

कर्णावती (अहमदाबाद) येथे महानगरपालिकेच्या गृहप्रकल्प योजनांना हिंदूंच्या देवतांची नावे देण्यास धर्मांधांचा विरोध !

प्रसंगी आंदोलन करण्याची चेतावणी !
हिंदूंना असा विरोध व्हायला हा भारत आहे कि पाक ?
       हिंदुबहुल भारतात आजही औरंगाबाद, निझामाबाद आदी आक्रमकांच्या नावांनी शेकडो शहरे अस्तित्वात असतांना त्यास हिंदू साधा विरोधही करत नाहीत. याउलट काही गृहप्रकल्प योजनांना हिंदूंच्या देवतांची नावे देण्यास धर्मांध विरोध दर्शवून प्रसंगी आंदोलनाची भाषा करतात ! यातून त्यांचा धर्माभिमान दिसून येतो !
     कर्णावती - येथील महानगरपालिका आणि शहर विकास प्राधिकरण यांच्याकडून आर्थिकदृष्ट्या कमकुवत लोकांसाठी गृहप्रकल्प योजना सिद्ध केल्या जात असून त्यापैकी १२ गृहप्रकल्पांना श्रीकृष्ण आणि शिव यांची नावे देण्यात आली आहेत. यावर काही स्थानिक धर्मांधांनी आक्षेप घेत वसाहतींना देवतांची नावे देण्यास विरोध दर्शवला. 
     वर्ष २००१ पासून आजपर्यंत वरील सरकारी संस्थांनी विविध गृहप्रकल्प योजनांच्या अंतर्गत अनुमाने २० सहस्र घरे बांधली आहेत. यातील ६५ टक्के योजनांना नंदावन, वृंदावन, वृज विहार, गोकुल, वृज नगरी, अशी श्रीकृष्णाशी संबंधित सात्त्विक नावे देण्यात आली आहेत. अशाचप्रकारे कर्णावती महानगरपालिकेने वर्ष २०१४ पासून आतापर्यंत १२ गृहप्रकल्प योजनेच्या अंतर्गत २ सहस्र ३०० घरे बांधली आहेत. या योजनांना रामेश्‍वर, कोटेश्‍वर, भीमनाथ, त्र्यंबकेश्‍वर, वैजनाथ, सोमेश्‍वर, रुद्राक्ष, चांदेश्‍वर, सोमनाथ, करमुक्तेश्‍वर, नीलकण्ठ, शिव-शक्ति, अशी नावे देण्यात आली आहेत. ही सर्व नावे भगवान शिवाशी निगडित आहेत.

विश्‍वामध्ये शांती नांदण्यासाठी सनातन धर्माची पुनर्स्थापना हाच एकमेव उपाय ! - श्री. मोहन गौडा, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने तुमकुर (कर्नाटक) येथे हिंदु धर्मजागृती सभा !
दीपप्रज्वलनाच्या वेळी डावीकडून कु. भव्या गौडा,
सौ. गायत्री राव, श्री श्री श्री ज्ञानंदपुरी महास्वामी,
श्री. मोहन गौडा आणि कु. दिव्या बाळेहितल
     तुमकुर (कर्नाटक) - जिहादी आतंकवादामुळे आज जगामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली हिंदूंवर अन्याय होत आहे. युरोप आणि अमेरिका खंडांतील अनेक देशांमध्ये सनातन धर्माचे स्वागत केले जाते; मात्र दुर्दैवाने भारतीय पाश्‍चात्त्य संस्कृती अंगीकारून गुलामगिरी करत आहेत. धर्मांतर, लव्ह जिहाद, हिंदु नेत्यांच्या हत्या इत्यादी समस्यांनी हिंदू घेरलेले आहेत. या परिस्थितीत भारताला हिंदु राष्ट्र घोषित करणे, हाच विश्‍वात शांती नांदण्यासाठीचा उपाय आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. मोहन गौडा यांनी येथे केले. तुमकुरमधील श्री वसावी अमृत महाल, चिक्कापेटे येथे हिंदुत्व रक्षणासाठी, तसेच हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी २० नोव्हेंबर या दिवशी हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. तुमकुर येथील सारापल्ली मठाचे श्री श्री श्री ज्ञानंदपुरी महास्वामी, सनातन संस्थेच्या सौ. गायत्री राव, रणरागिणी शाखेच्या कु. भव्या गौडा, तसेच उच्च न्यायालयाच्या अधिवक्त्या कु. दिव्या बाळेहितल यांनी मार्गदर्शन केले.

केरळ उच्च न्यायालयात वार्तांकन करणार्‍या वार्ताहराकडे कायद्याची पदवी अनिवार्य !

      कोच्चि (केरळ) - केरळ उच्च न्यायालयाने नियमित स्वरूपात न्यायालयात वार्तांकन करण्यासाठी येणार्‍या वार्ताहरांकडे कायद्याची पदवी असणे बंधनकारक केले आहे. या नियमाला १० नोव्हेंबर या दिवशी न्यायालयाने अनुमती दिली. या वार्ताहराकडे बार काऊन्सिल ऑफ इंडियाद्वारा स्वीकृत पदवी आणि न्यायालयांतील वार्तांकनाचा ५ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे, असे या नियमात म्हटले आहे. या ५ वर्षांतील किमान ३ वर्षे उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या वार्तांकनाचा अनुभव असणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.

प्रयाग येथे मशिदीतून अजान चालू झाल्यावर सोनिया गांधी यांनी भाषण थांबवले !

मंदिरात आरती चालू झाल्यावर सोनिया गांधी यांनी अशीच कृती केली असती का ?
      प्रयाग - येथे २१ नोव्हेंबरला इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सोनिया गांधी सहभागी झाल्या होत्या. येथे त्यांचे भाषण चालू असतांना शेजारील मशिदीमधून अजान चालू झाली. त्या वेळी त्यांनी भाषण मध्येच थांबवत डोके आणि चेहर्‍यावरून हिजाबसारखा पदर घेतला. अजान संपल्यावर त्यांनी पुन्हा भाषण चालू केले. या वेळी राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि रॉबर्ट वडेरा हेही उपस्थित होते.


राष्ट्रद्रोही डॉ. झाकीर नाईक यांचे ईडीकडून अन्वेषण

     मुंबई, २२ नोव्हेंबर (वार्ता.) - राष्ट्रद्रोही डॉ. झाकीर नाईक यांच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन या संस्थेला समन्स पाठवण्यात आले असून ईडीकडून (अंमलबजावणी संचालनालयाकडून) संस्थेचे आर्थिक व्यवहार तपासण्यात येणार आहेत. यामध्ये डॉ. झाकीर नाईक दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती ईडीच्या एका अधिकार्‍याकडून प्राप्त झाली आहे. अन्वेषण यंत्रणांच्या हाती पुरावे लागल्यास डॉ. झाकीर नाईक यांच्या विरोधात लूकआऊट किंवा रेड कॉर्नर नोटीस बजावली जाण्याची शक्यता आहे.

भारताच्या अण्वस्त्रवाहक अग्नी-१ क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी !

भारतीय शास्त्रज्ञ नवनवीन आणि परिणामकारक 
मारा करणारी शस्त्रे बनवत आहेत; मात्र त्यांचा वापर करणारे 
भारताकडे नसल्याने त्यांचा उपयोग शून्यच ठरत आहे !
        चंडीपूर (ओडिशा) - २२ नोव्हेंबरला सकाळी स्वदेशी बनावटीच्या अण्वस्त्रवाहक अग्नी-१ या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करण्यात आली. येथील एकीकृत चाचणी केंद्रातून ही चाचणी करण्यात आल्याचे डीआर्डीओच्या वतीने घोषित करण्यात आले.
        याआधी डीआर्डीओने २१ नोव्हेंबरला पृथ्वी-२ या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली होती. अग्नी-१ हे १२ टन वजनाचे, १५ मीटर लांबीचे क्षेपणास्त्र सैन्याच्या सेवेत दाखल झाले आहे. घनरूप इंधनाचा वापर करून भूमीवरून भूमीवर आक्रमण करण्यासाठी या क्षेपणास्त्राचा वापर केला जातो.

हिंदी चित्रपटसृष्टी ही वाईट लोकांनी भरलेली आहे ! - गायिका हेमा सरदेसाई

हिंदी चित्रपटसृष्टीच्या मोहात अडकणार्‍या तरुणाईने याचा विचार करावा !
      मुंबई, २२ नोव्हेंबर - हिंदी चित्रपटसृष्टी ही वाईट लोकांनी भरलेली असून आजपर्यंत मला तेथे कुणी चांगली व्यक्ती भेटलीच नाही. संघर्षाच्या काळात यातील अनेकांनी माझा अपलाभ घेण्याचा प्रयत्न केला. मी ज्या चित्रीकरणकक्षात गेले, तेथील लोकांनी मला वाईट दृष्टीनेच पाहिले. आयुष्यभर मी संगीताची आराधना केली आहे. त्यामुळे त्याची प्रतिष्ठा मी न्यून होऊ देणार नाही. माझ्या संगीतामध्ये भगवंताचा वास आहे, असे प्रतिपादन गायिका हेमा सरदेसाई यांनी केले. एका मुलाखतीत त्या बोलत होत्या.

वाळूमाफिया देशासाठी सर्वाधिक घातक ! - मुंबई उच्च न्यायालय

वाळूमाफियांच्या प्रश्‍नाचे गंभीर स्वरूप हे पोलीस आणि प्रशासन यांचा नाकर्तेपणा होय ! 
 वाळूमाफियांना पाठीशी घालणार्‍यांवर 
न्यायालयाने कठोर कारवाई करावी, अशी जनतेची अपेक्षा आहे ! 
     मुंबई, २२ नोव्हेंबर (वार्ता.) - वाळूमाफिया देशासाठी सर्वाधिक घातक आहेत, अशी टिपणी मुंबई उच्च न्यायालयाने केली आहे. येथील वैतरणा खाडीतील अनधिकृत वाळूउपशाविषयी न्यायालयात प्रविष्ट केलेल्या एका याचिकेवर न्यायालयाने ही टिपणी दिली आहे. रायगड जिल्हा आणि पालघर जिल्ह्यातील वैतरणा खाडीत केल्या जाणार्‍या अनधिकृत वाळूउपशाविषयी न्यायालयात २ स्वतंत्र याचिका प्रविष्ट करण्यात आल्या होत्या.

धरणगाव (जळगाव) येथील हिंदु व्यापार्‍यांनी अनधिकृत दर्ग्याचे बांधकाम रोखले !

सतर्क आणि कृतीशील असणार्‍या हिंदु व्यापार्‍यांचे अभिनंदन ! 
     धरणगाव, २२ नोव्हेंबर (वार्ता.) - येथील सतर्क हिंदु व्यापार्‍यांनी अनधिकृत दर्ग्याचे बांधकाम रोखले. व्यापार्‍यांच्या निवेदनानंतर धरणगाव पोलिसांनी कारवाई करत अनधिकृत बांधकाम थांबवले. (अनधिकृत बांधकाम करणार्‍यांवर पोलीस कोणती कारवाई करणार ? - संपादक) 

काश्मीरमधील ३७० कलम रहित करण्याविषयी सरकार काही कृती करणार आहे का ? - पू. डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

एक भारत अभियान - कश्मीर की ओर उपक्रमाच्या अंतर्गत
लक्ष्मणपुरी येथे हिंदु धर्मजागृती सभेतील मान्यवरांचे उद्बोधक विचार 
ऑटोहिप्नोथेरपी फॉर सायकॉलॉजिकल डिसऑर्डर्स - भाग १ आणि भाग २, ऑटोहिप्नोथेरपी फॉर फिजिकल एलमेंट्स आणि ऑटोहिप्नोथेरपी फॉर सेक्शुअल प्रॉब्लेम या इंग्रजी भाषेतील सनातनच्या ग्रंथांचे, तसेच सात्त्विक देवनागरी लिपी के अक्षर और अंक लिखने की पद्धती या हिंदी भाषेतील सनातनच्या ग्रंथाचे प्रकाशन करतांना हिंदुत्वनिष्ठ

      विद्यमान सरकार काश्मीरमधील ३७० कलम रहित करण्यासाठी काही प्रयत्न करणार आहे का ? ३७० कलमाच्या अंतर्गत जर काश्मीरमधील मुलींनी अन्य प्रांतातील मुलासमवेत विवाह केला, तर तिचे काश्मीरचे नागरिकत्व रहित होते आणि जर तिने पाकव्याप्त काश्मीरमधील मुलाशी लग्न केले, तर त्या मुलीच्या काश्मीरच्या नागरिकत्वास काही धक्का लागत तर नाहीच, उलट पाकिस्तानच्या मुलास भारताचे नागरिकत्व सहज मिळते. या कलमामुळे काश्मीर भारताचाच भाग असून सुद्धा तिथल्या नागरिकांना शरणार्थ्यांप्रमाणे रहावे लागत आहे आणि भारतातील अन्य प्रांतियांना काश्मीरमध्ये साधी जमीन सुद्धा विकत घेता येऊ शकत नाही. असे कलम सुरु ठेवण्यासाठी ते काही वेगळे राष्ट्र आहे का असा प्रश्‍न हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी उपस्थितांना विचारला.

मुसलमानांसाठी उद्या नोटाही नवीन काढणार का ? - आनंद दवे, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ

मुसलमानांसाठी इस्लामी अधिकोष चालू करण्याच्या प्रस्तावावरची प्रतिक्रिया ! 
     पुणे, २२ नोव्हेंबर - मुसलमानांसाठी शरियतच्या नियमांनुसार व्याजाची संकल्पना नसलेला इस्लामी अधिकोष चालू करण्याचा प्रस्ताव रिझर्व्ह बँकेच्या वतीने केंद्र सरकारकडे मांडण्यात आला. या प्रकाराची 'समान नागरी कायद्याच्या विरुद्ध दिशेने चाललेला प्रवास' अशी निर्भत्सना करत अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे पुणे जिल्हाध्यक्ष श्री. आनंद दवे यांनी 'मुसलमानांसाठी उद्या नव्या नोटाही काढणार का', असा उपरोधिक प्रश्‍न उपस्थित केला. या प्रस्तावाच्या पार्श्‍वभूमीवर भूमिका स्पष्ट करतांना त्यांनी सांगितलेली सूत्रे 

मंदिर पदाधिकार्‍यांना पूर्वकल्पना न देता पुणे महानगरपालिकेने केली १४ मंदिरे भुईसपाट

देवतांच्या मूर्ती परत मिळवण्यासाठी हिंदुत्वनिष्ठांचे महानगरपालिकेमध्ये ठिय्या आंदोलन ! 
     पुणे, २२ नोव्हेंबर (वार्ता.) - महानगरपालिकेने कोणतीही पूर्वकल्पना अथवा नोटीस न बजावता १९ आणि २० नोव्हेंबरच्या मध्यरात्री २ वाजता वारजे, कर्वेनगर आणि कोथरूड परिसरातील १४ मंदिरे भुईसपाट केली. अवैध मशिदी आणि दर्गे, तसेच चर्च यांवर कारवाई करण्यास कचरणारे शासन हिंदूंचे मंदिरे कुणालाही विश्‍वासात न घेता पाडते. हेच प्रशासन मग अवैध सुभानशहा दर्गा आणि आदमबाग मशिद यांच्यावर का कारवाई करत नाही, मशिदींवरील भोंगे काढा, असे न्यायालयाचे आदेश असतांना त्या आदेशाचे पालन प्रशासन का करत नाही, असे प्रश्‍न उपस्थित करून भाविकांनी २२ नोव्हेंबर या दिवशी महापालिकेमध्ये आंदोलन करून या कारवाईचा निषेध नोंदवला. न्यायालयाच्या आदेशानुसार अवैध प्रार्थनास्थळे हटवण्याच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आल्याचे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले. या वेळी शिवगर्जना प्रतिष्ठानचे सर्वश्री धीरज घाटे, भाजयुमोचे सुशील मेंगडे, जय हिंदुराष्ट्र समूहाचे अध्यक्ष सचिन वाडकर, खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे भाजप सरचिटणीस वासुदेव भोसले यांसह ५० हून अधिक गणेशभक्त, तसेच हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते. 

हिंदु धर्मजागृती सभेला शिवसेनेच्या वतीने सर्वतोपरी साहाय्य केले जाईल ! - संजय पवार, शिवसेना जिल्हाप्रमुख, कोल्हापूर

१. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख श्री. संजय पवार यांच्याशी चर्चा करतांना हिंदु जनजागृती समितीचे शिष्टमंडळ 


२. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख श्री. विजय देवणे यांना निमंत्रण देतांना सर्वश्री सुनील घनवट, मधुकर नाझरे आदी
     कोल्हापूर, २२ नोव्हेंबर (वार्ता.) - हिंदु धर्मजागृती सभेला शिवसेनेच्या वतीने सर्वतोपरी साहाय्य केले जाईल, असे आश्‍वासन येथील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख श्री. संजय पवार यांनी दिले. येथे पद्माराजे गर्ल्स हायस्कूलच्या मैदानावर ११ डिसेंबर या दिवशी होणार असलेल्या हिंदु धर्मजागृती सभेचे निमंत्रण हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना दिले. त्या वेळी झालेल्या चर्चेत ते बोलत होते. 

सनातनची साधिका कु. सानिका सणगर हिचे विविध स्पर्धांमध्ये सुयश !


कु. सानिका सणगर
     कागल (जिल्हा कोल्हापूर), २२ नोव्हेंबर (वार्ता.) - येथील जयसिंगराव घाटगे हायस्कूलमध्ये इयत्ता सातवीमध्ये शिक्षण घेणारी सनातनची साधिका कु. सानिका सणगर हिने जिल्हास्तरीय मुख्याध्यापक संघ कोल्हापूरकडून घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत खेल का जीवन मे महत्व या विषयात तृतीय क्रमांक मिळवला आहे. तसेच कागलमधील दिवंगत उमेश चंद्रकांत गवळी यांच्या तृतीय पुण्यस्मरणार्थ घेतलेल्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत उत्तेजनार्थ पहिला आणि जयसिंगराव घाटगे हायस्कूल अ‍ॅन्ड ज्युनिअर महाविद्यालयामधील वक्तृत्व स्पर्धेत चौथा क्रमांक मिळवला.
      या स्पर्धेत तिने मना घडवी संस्कार हा विषय निवडला होता. या यशाविषयी कु. सानिका हिने मी सतत प्रार्थना आणि नामजप केल्यामुळे मला यश मिळाले, असे सांगितले.

औषध खरेदीसाठी राज्यात स्वतंत्र खरेदी महामंडळाची स्थापना करण्यासाठी याचिका !

      संभाजीनगर, २२ नोव्हेंबर - औषध खरेदीसाठी राज्यात स्वतंत्र खरेदी महामंडळ स्थापन करावे, अशी मागणी करणारी एक याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपिठात प्रविष्ट करण्यात आली आहे. 
     याचिकेत म्हटले आहे की, एकाच आस्थापनाची औषधे सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय महाविद्यालये याठिकाणी वेगवेगळ्या दराने खरेदी होतात. (प्रशासकीय भोंगळ कारभार ! - संपादक) केवळ सुसूत्रता नसल्याने कोट्यवधी रुपयांची औषधे वाया जातात. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी औषध खरेदी महामंडळ उपयोगी होईल. याचसमवेत औषधे पुरवण्यासाठी निकष ठरवावेत, त्याच्या मागणी आणि पुरवठ्यात विलंब झाल्यास कारवाईची तरतूद करावी, तसेच कोणत्या ठिकाणी किती आणि कोणती औषधे उपलब्ध आहेत, याची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोचवण्याची व्यवस्थाही करावी, अशी मागणी त्या याचिकेत केली आहे.

नवी मुंबई येथे पोलिसांना न जुमानता नायजेरियन तरुणांकडून स्थानिकांना दमदाटी

      नवी मुंबई - येथे अमली पदार्थांच्या विक्रीनंतर नायजेरियन तरुणांकडून आता खेळाच्या मैदानावर अधिग्रहण करण्यात येत आहे. स्थानिक तरुणांना खेळण्याची संधी दिली जात नसून दमदाटीही सहन करावी लागत आहे. यासंदर्भात अनेकवेळा तक्रार करूनही ठोस कारवाई केली जात नाही, अशी प्रतिक्रिया स्थानिकांनी व्यक्त केली आहे. पोलिसांना न जुमानणार्‍या नायजेरियनांवर कारवाई करून स्थानिकांना प्रथम प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे.

स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या अध्यक्षपदी अरुण जोशी, तर कार्याध्यक्षपदी रणजित सावरकर यांची निवड !

      मुंबई, २२ नोव्हेंबर (वार्ता.) - स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या अध्यक्षपदी सलग सहाव्यांदा श्री. अरुण जोशी यांची, तर कार्याध्यक्षपदी श्री. रणजित विक्रम सावरकर यांची निवड करण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या स्मारकाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत निवडणूक अधिकारी श्री. राजेंद्र वराडकर यांनी ही घोषणा केली. कोषाध्यक्ष सौ. मंजिरी मराठे, कार्यवाह श्री. राजेंद्र वराडकर, कार्यकारिणी सदस्य अनुराधा खोत, डॉ. सुमेधा मराठे, सर्वश्री मुकुंद गोडबोले, महेश कुलकर्णी, विज्ञानेश मासावकर, महेश भालेराव, सतीश दीक्षित, इंद्रजीत साठे, अनिल कानिटकर, श्रीमती के. सरस्वती अशी स्मारकाची कार्यकारिणी आहे.

संत नामदेव आणि स्वामी विवेकानंद यांच्या साहित्यामुळे आत्महत्येपासून परावृत्त ! - अण्णा हजारे

वैफल्यग्रस्त यातून काही बोध घेतील का ?
      पुणे, २२ नोव्हेंबर - जगामध्ये अनेक वाईट गोष्टी चालू आहेत. त्यासंदर्भात मी काही करू शकत नाही, या विचाराने वाईट वाटून तरुणपणी आत्महत्येचा विचार मनात आला होता; पण संत नामदेव आणि स्वामी विवेकानंद यांच्या साहित्याचे वाचन केल्यानंतर आत्महत्या करण्याचा विचार दूर गेला, असे वक्तव्य ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले. पहिल्या विश्‍व पंजाबी साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. समाजसेवा करण्याची प्रेरणा साहित्यातून मिळते, असेही त्यांनी सांगितले.
गीता फाऊंडेशनचे दिलीप आपटे यांना संतकवी श्रीदासगणु महाराज पुरस्कार घोषित !

      मिरज, २२ नोव्हेंबर (वार्ता.) - प.पू. स्वामी वरदानंद भारती यांच्या प्रेरणेने चालू झालेल्या संतविद्या प्रबोधिनी योजनेच्या अंतर्गत वर्ष १९९८ पासून प्रतिवर्षी समाजात संस्कृती संरक्षण-संवर्धन यांचे उत्कृष्ट कार्य करणार्‍या व्यक्ती, संस्था यांना संतकवी श्रीदासगणु महाराज यांच्या नावे असलेला पुरस्कार देण्यात येतो. यंदाचा पुरस्कार गीता फाऊंडेशनचे श्री. दिलीप आपटे यांना घोषित झाला आहे. एक लक्ष रुपये, तसेच सन्मानचित्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
     हा पुरस्कार २७ नोव्हेंबर या दिवशी श्रीदासगणु महाराज यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी पंढरपूर येथे देण्यात येणार आहे. श्री. आपटे हे दिव्यांग असूनही गीतेचे ज्ञान सर्वांपर्यंत पोेचवण्यासाठी प्रयत्नशील आहेत, तसेच श्री. आपटे हे सनातन संस्थेचे हितचिंतक आहेत.

अवैध मद्यविक्रीची तक्रार करण्यासाठी शासनाकडून व्हॉट्स अ‍ॅप क्रमांक !

      ठाणे, २२ नोव्हेंबर - अवैध मद्यविक्री रोखण्यासाठी राज्य शासनाच्या उत्पादन शुल्क विभागाने व्हॉट्स अ‍ॅप आणि टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून दिला असून आपल्या परिसरात चालणारी अवैध मद्य निर्मिती, मद्यविक्री आणि मद्याचा साठा करणार्‍यांच्या विरोधात थेट व्हॉट्स अ‍ॅपवरून तक्रार करता येणार आहे. तक्रार करणार्‍याचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्त व्ही. राधा यांच्या आदेशानुसार कोकण विभागाचे उपायुक्त तानाजी साळुंखे यांनी मुंबई शहर, उपनगरे, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्याच्या अधीक्षकांना व्हॉट्स अपवरून आलेल्या तक्रारीनुसार कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
  • तक्रारींसाठी व्हॉट्स अप क्रमांक - ८४२२००११३३
  • टोल फ्री क्रमांक - १८०० ८३३ ३३३३

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त लाल महाल (पुणे) येथे दीपोत्सव !

       पुणे, २२ नोव्हेंबर - त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त लाल महाल उत्सव समितीच्या वतीने लाल महाल येथे दीपोत्सव साजरा करण्यात आला. दीपोत्सवाचे यंदाचे १४ वे वर्ष होते. या मंगल प्रसंगी आवारात भव्य रांगोळी काढण्यात आली, तसेच सामुदायिक शिववंदना म्हणण्यात आली. या वेळी फरासखाना पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक रेखा साळुंखे यांच्या हस्ते महालातील जिजामातेच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करण्यात आला. भारतमातेच्या रक्षणार्थ हुतात्मा झालेल्या सैनिकांना या वेळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाचे नियोजन सर्वश्री चंद्रशेखर शिंदे, राहुल जोशी, अनिता राठोड, अमेय संत, अजय शिंदे यांनी केले.

विरार येथे २ सहस्र रुपयाची खोटी नोट देणार्‍या युवकाला अटक !

पालघर, २२ नोव्हेंबर (वार्ता.) - विरारमध्ये एका वाईन शॉप मध्ये २ सहस्र रुपयांची खोटी नोट देणार्‍या तुषार कचरू या युवकाला पोलिसांनी अटक केली. नोटेवर कुठेही रेखीवपणा नसल्याने दुकानदाराला नोटेविषयी संशय आल्याने त्याने याविषयी पोलिसांना कळवले. त्यानंतर पोलिसांनी अटकेची कारवाई केली.

आम्ही हिंदु जनजागृती समितीच्या समवेत आहोत ! - श्री. प्रताप चव्हाण, शिवसेना, सोलापूर शहरप्रमुख

सोलापूर येथील हिंदु धर्मजागृती सभेचे निमंत्रण

१. शिवसेना शहरप्रमुख श्री. प्रताप चव्हाण यांना निमंत्रण देतांना श्री. सुनील घनवट (उजवीकडून तिसरे) 
२. ह.भ.प. सुधाकर इंगळे महाराज यांना निमंत्रण देतांना उजवीकडे श्री. सुनील घनवट

     सोलापूर, २२ नोव्हेंबर (वार्ता.) - येथील शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी यांना हिंदु धर्मजागृती सभेचे निमंत्रण देण्यासाठी आम्ही बैठका ठरवू. प्रभागातील बैठकांमध्ये सभेचा विषय मांडा. आम्ही तुमच्या समवेत आहोत, असे आश्‍वासक उद्गार येथील शिवसेनेचे शहरप्रमुख श्री. प्रताप चव्हाण यांनी काढले. येथील हिराभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ४ डिसेंबर या दिवशी हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यकर्त्यांनी त्यांना सभेचे निमंत्रण दिल्यावर ते याविषयी बोलत होते. 
     सभेसाठी ह.भ.प. सुधाकर इंगळे महाराज यांनी आशीर्वाद देऊन 'माझ्या प्रवचनांमधूनही मी सर्वांना सभेला उपस्थित रहाण्यास सांगणार आहे', असे आश्‍वासन दिले. या वेळी समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट, सोलापूर येथील कार्यकर्ते उपस्थित होते. 


धार्मिक कार्यक्रमांसाठी मांडव उभारायलाही अनुमती घ्यावी लागणार !

उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नगरविकास विभागाकडून प्रशासनाला सूचना    
     पिंपरी, २२ नोव्हेंबर - सण-उत्सव यांच्या जोडीला धार्मिक कार्यक्रमांसाठी रस्त्यावर मांडव उभारायचा असेल, तर आता महानगरपालिकेची अनुमती घ्यावी लागणार आहे. एवढेच नाही, तर तसे अनुमतीपत्र मांडवाच्या दर्शनी भागात लावावे लागणार आहे. या संदर्भात राज्याच्या नगरविकास विभागाने प्रशासनाला सूचना दिल्या असून वरील नियमांचे उल्लंघन झाल्यास मांडव हटवण्यात येणार आहेत. वाहतुकीला अडथळा करत अवैधरित्या उभारण्यात येणार्‍या मांडवांच्या विरोधात डॉ. महेश बेडेकर यांनी राज्य शासनाच्या विरोधात उच्च न्यायालयात वर्ष २०१० मध्ये जनहित याचिका प्रविष्ट केली होती. या याचिकेवर सुनावणी करतांना न्यायालयाने ऑगस्ट २०१६ मध्ये हा निकाल दिला. या निकालाच्या अनुषंगाने नगरविकास विभागाने एक परिपत्रक काढले आहे. (वाहतुकीला अडथळा होत असल्याच्या नावाखाली धार्मिक उत्सवांवर अकारण गदा तर आणली जात नाही ना, याकडेही प्रशासनाने लक्ष द्यावे, ही अपेक्षा ! - संपादक) 

विधान परिषद निवडणुकीच्या ६ जागांचे निकाल घोषित !

      मुंबई, २२ नोव्हेंबर - राज्यातील विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील पुणे, सांगली-सातारा, जळगाव, नांदेड, यवतमाळ आणि भंडारा-गोंदिया या ६ ठिकाणच्या जागांसाठी निवडणुकांचे निकाल घोषित झाले. भाजप आणि काँग्रेस पक्षाला २ जागा मिळाल्या असून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी प्रत्येकी एका जागेवर विजय मिळवला आहे. पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल भोसले, यवतमाळमध्ये शिवसेनेचे तानाजी सावंत, जळगावमध्ये भाजपचे चंदूलाल पटेल, नांदेडमध्ये काँग्रेसचे अमर राजूरकर, सांगली-सातारा विधान परिषदेत काँग्रेसचे उमेदवार मोहनराव कदम, भंडारा-गोंदिया येथे भाजपचे परिणय फुके हे उमेदवार विजयी झाले आहेत.

हुबळ्ळी (कर्नाटक) येथे एका कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मार्गदर्शन !

      हुबळ्ळी - येथे आयोजित ‘श्रीमद् उज्जयनी श्री सिद्धलिंग जद्गुरु पुराण’ या कार्यक्रमात १९ नोव्हेंबर या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘धर्मशिक्षणाचे महत्त्व’ या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये ‘नमस्कार करण्याची योग्य पद्धत, वाढदिवस कसा साजरा करावा?, देवळात दर्शन कसे घ्यावे ?’ इत्यादी धार्मिक कृतींच्या संदर्भात समितीच्या कु. नागमणी आचार्य यांनी माहिती दिली. श्री गुरुसिद्धेश्‍वर शिवाचार्य स्वामी यांनी समितीच्या कार्याची प्रशंसा केली आणि श्री मरुलसिद्ध शिवाचार्य स्वामी यांनी समितीच्या कार्याला आशीर्वाद दिले, तसेच २१ नोव्हेंबरच्या कार्यक्रमात ग्रंथप्रदर्शन लावण्याची अनुमतीही दिली. सुमारे १५० जणांनी या मार्गदर्शनाचा लाभ घेतला.

हिंदुत्वनिष्ठांचे शासन असूनही हिंदुत्वनिष्ठांच्या मारेकर्‍यांवर कारवाई होत नसेल, तर कुणाकडून अपेक्षा करणार ? - श्री. अमोल कुलकर्णी, संतश्री आसारामबापू साधक परिवार

भोसरी (पुणे) येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन 
     भोसरी (जिल्हा पुणे), २२ नोव्हेंबर (वार्ता.) - साम्यवाद्यांच्या हत्या झाल्यावर विशेष तपास पथकाची स्थापना केली जाते, तसेच सीबीआय चौकशीही करण्यात येते. त्याचप्रमाणे हिंदुत्वनिष्ठांच्या हत्यांचीही चौकशी करा. हिंदुत्वनिष्ठांचेे शासन असून हिंदुत्वनिष्ठांच्या मारेकर्‍यांवर कारवाई होत नाही, मग अपेक्षा कोणाकडून करायची, या हत्यांविषयी प्रसारमाध्यमांनीही मौन बाळगले आहे, असे प्रतिपादन पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू साधक परिवाराचे श्री. अमोल कुलकर्णी यांनी २० नोव्हेंबर या दिवशी येथे झालेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनात केले. या आंदोलनाला २५० हून अधिक हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.

फलक प्रसिद्धीकरता

नोटा पालटून आतंकवाद रोखला जाणार नाही, हे सरकारला कधी समजणार ?
काश्मीरच्या बंदिपोरमध्ये सैनिकांनी २ आतंकवाद्यांना ठार केले. त्यांच्याकडे २ सहस्र रुपयांच्या नोटा सापडल्या आहेत. नोटाबंदीनंतर आतंकवाद्यांकडील पैशाची रद्दी झाल्याने त्यांच्या कारवाया थांबतील, अशी अपेक्षा होती. ती फोल ठरली आहे.

प्रस्ताव जसाच्या तसा स्वीकारला असता, तर दुष्परिणाम टळले असते ! - अनिल बोकील, अर्थक्रांती प्रतिष्ठान

     पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा घेतलेला निर्णय योग्यच आहे. या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो; परंतु नोटाबंदीविषयी आम्ही सादर केलेला प्रस्ताव (किंवा 'रोड मॅप') जशाच्या तसा स्वीकारला असता आणि त्याची तंतोतंत अंमलबजावणी केली असती, तर या निर्णयाचा केवळ आणि केवळ काळा पैसा, आतंकवाद आणि खंडणीखोरी यांसारख्या प्रकारांवर परिणाम झाला असता, शिवाय व्यवस्था परिवर्तनही झाले असते. एटीएम्बाहेर लोकांच्या रांगा दिसल्या नसत्या, पण सरकारने गुंगीचे औषध देण्याआधीच रुग्णाची शस्त्रक्रिया केली, त्यामुळे रुग्णाला प्राण गमवावा लागला, अशी मार्मिक टिपणी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अर्थक्रांती प्रतिष्ठानचे अनिल बोकील यांनी केली आहे. 

मलेशियामध्ये भ्रष्टाचाराचा आरोप असणार्‍या पंतप्रधानांच्या त्यागपत्रासाठी जनता रस्त्यावर !

   कुआलालंपूर (मलेशिया) - भारतात काळा पैसा नष्ट करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटा रहित करण्याच्या निर्णयानंतर जनता नोटा पालटून घेण्यासाठी रस्त्यावर उतरली, तर दुसरीकडे मलेशियातील पंतप्रधान नजीब यांंनी केलेल्या भ्रष्टाचाराप्रकरणी त्यांनी त्यागपत्र द्यावे, यासाठी जनता २० नोव्हेंबरला रस्त्यावर उतरली होती. साधारण २० लाख लोकांनी नजीब यांच्या विरोधात एकत्र येऊन आंदोलन केले. बेरसिह या संघटनेकडून हे आंदोलन करण्यात आले होते. अशा प्रकारचे हे ५ वे आंदोलन होते.

पुण्यात अमली पदार्थाची विक्री करणार्‍याकडून ५३ लक्ष रुपयांचे हेरॉइन शासनाधीन

     पुणे, २२ नोव्हेंबर (वार्ता.) - येथील सिंहगड रस्ता भागामध्ये अमली पदार्थाची विक्री करणार्‍या विशाल पटेल यालाा अटक केली असून त्याचा एक साथीदार पसार झाला आहे. पोलिसांनी पटेल याच्याकडून ५३ लक्ष रुपयांचे हेरॉइन शासनाधीन केले. या प्रकरणी पटेल आणि त्याच्या साथीदारावर सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. 
     पटेल गेल्या ६ मासापासून अवैधरित्या अमली पदार्थाची विक्री करत असून त्याच्याद्वारे एक मोठी टोळी उघडकीस येण्याची शक्यता आहे, अशी माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे. (ही माहिती पुणे पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाला आधीच लक्षात का आली नाही ? - संपादक)

दोन मास उलटूनही ‘अन्न सुरक्षा अनुज्ञप्ती’साठी अधिकार्‍यांकडून सर्वेक्षण नाही !

अन्न आणि औषध प्रशासनाचा भोंगळ कारभार !
       पुणे, २२ नोव्हेंबर (वार्ता.) - अन्न सुरक्षा अनुज्ञप्ती मिळवण्यासाठी सर्व कागदपत्रे सादर करून २ मास उलटले असतांनाही अन्न सुरक्षा अधिकारी सर्वेक्षणासाठी न आल्याने हडपसर येथील फळविक्रेते महेंद्र जगताप यांनी संताप व्यक्त केला. 
ते म्हणाले...
१. अनुज्ञप्तीच्या कार्यपद्धतीनुसार १५ दिवसांमध्ये अधिकारी सर्वेक्षणासाठी येणे अपेक्षित असते; मात्र २ मास होऊनही ते आले नाहीत, तसेच प्रशासनाकडून कागदपत्रे मिळाली असल्याचेही कळवलेले नाही.
२. अनुज्ञप्तीसाठी शासकीय कार्यालयात आल्यावर अधिकारी सर्वेक्षणासाठी गेले असल्याने त्यांची भेट घेण्यासाठी २ वेळा हडपसर येथून औंध येथील कार्यालयात यावे लागले.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने खेळाडूंचा सत्कार

अकोला येथे राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय खेळाडूंचा धर्मकार्यामध्ये सहभाग !
      अकोला - अधिवक्त्यांचा हिंदु विधीज्ञ परिषदेत सहभाग वाढावा, या दृष्टीने प्रयत्नशील असलेले येथील अधिवक्ता पप्पूभाऊ मोरवाल हे अकोला जिल्हा कुडो असोशियनचे अध्यक्ष आहेत. राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय खेळाडूंनीही धर्मकार्यात सहभाग घ्यावा, या उद्देशाने जलाराम मंदिर येथे राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय खेळांमध्ये प्राविण्य मिळवलेल्या खेळाडूंचा हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यात श्री. ऋषिकेश काळे, श्री. ईशान पाटील, श्री. आदित्य धोटे, श्री. आकाश यादव, तसेच त्यांना मार्गदर्शन करणारे प्रशिक्षक काळा पट्टा (ब्लॅक बेल्ट) मिळवलेले आंतरराष्ट्रीय खेळाडू श्री. मनोज अंबेरे यांचा सत्कार केला गेला. सर्व अधिवक्ता श्री. शर्मा, श्री. कोठारी, श्री. तिवारी, श्री. गोरे आणि सौ. गावंडे यांनी प्राविण्यप्राप्त खेळाडूंचा सत्कार केला.

हिंदू तेजा जाग रे !

Jago !
Kashmir me mare gaye atankiyonke pas se २ hajar ke Note japt kiye gaye. - Atankwad rokane ke liye keval NoteBandi nahi, yudha karana chahiye !

जागो !
कश्मीर में मारे गए आतंकियों के पास से २ हजार के नोट जप्त किए गए । - आतंकवाद रोकने हेतु केवल नोटबंदी नहीं, युद्ध आवश्यक !

पोलिसांची अपप्रवृत्ती दूर होणे आवश्यक !

     कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी आणि हुपरी या दोन्ही गावांतील पोलिसांच्या भ्रष्ट कारभाराला जनता वैतागली आहे. येथे लाच घेणार्‍या पोलीस कर्मचार्‍यांच्या संख्येत वाढ होत असल्याने संपूर्ण पोलीस दलाची अपकीर्ती होत आहे. दोन दिवसांपूर्वी हुपरी पोलीस ठाण्यातील साहाय्यक पोलीस निरीक्षकासह ७ पोलीस खंडणी आणि लाचखोरीत निलंबित झाले आहेत. त्यामुळे हुपरी परिसरात पोलीस खात्याविषयी संतप्त भावना आहेत. जनतेत पोलिसांविषयी विश्‍वास वाढवण्याच्या उद्देशाने विशेष पोलीस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी हुपरीतील जनतेशी नुकताच संवाद साधला. त्यांनी जनतेला सन्मानाची वागणूक दिली जाईल, गुन्हेगारांना तडीपार करण्यात येईल, हुपरीत अवैध धंदे करणार्‍या समाजकंटकांवर कारवाई करण्यात येईल, अशी आश्‍वासने दिली.

हिंदूंनी हिंदु धर्म आणि संस्कृती यांच्या रक्षणासाठी केलेले प्रयत्न अराष्ट्रीय नाहीत !

     स्वातंत्र्यपूर्व काळात हिंदुस्थान सरकारच्या मंत्रीमंडळात असलेल्या ‘सर’ फजली हुसेन यांनी उत्तर हिंदुस्थानातील मुसलमानांत गुप्त पत्रक मोठ्या प्रमाणावर प्रसृत केले होते. त्यात म्हटले होते, ‘‘सांभाळा ! या हिंदु-मुसलमानांच्या एकीच्या जाळ्यात सापडू नका ! आपणाला भिकारड्या हिंदूंशी एकी करून काय लाभ ? आपण इंग्रजांशी एकी करून आपला लाभ करून घेतला पाहिजे.’’
       त्यामुळेच हिंदु धर्म आणि संस्कृती यांच्या रक्षणाकरता हिंदुस्थानातील हिंदूंनी केलेले प्रयत्न हे जातीय आणि अराष्ट्रीय असूच शकत नाहीत.
(‘लोकजागर’, वर्ष २ रे, अंक ४०, १२ एप्रिल २०१३)

शोभाचा प्रेमळपणा, वासुदेवची भावपूर्ण सेवा । तुझ्या चरणांपर्यंत घेऊन जा उभयतांना देवा ॥

चि. वासुदेव गोरल
चि.सौ.कां. शोभा मिसाळ
     कार्तिक कृष्ण पक्ष दशमी (२३.११.२०१६) या दिवशी रामनाथी आश्रमातील बांधकामाची सेवा करणारे चि. वासुदेव गोरल आणि स्वयंपाकघरात सेवा करणार्‍या चि.सौ.कां. शोभा मिसाळ यांचा शुभविवाह आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या सहसाधकांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत. 
चि. वासुदेव गोरल आणि चि.सौ.कां. शोभा मिसाळ यांना सनातन परिवाराच्या वतीने शुभविवाहानिमित्त हार्दिक शुभेच्छा !

समाधानी, प्रेमळ आणि मुलांना पूर्णवेळ साधना करण्यास अनुमती देणार्‍या बेळगाव जिल्ह्यातील असोगा येथील सौ. शांता गोरल !

सौ. शांता गोरल
सौ. वेदश्री गोरल
१. सतत कार्यमग्न असणे : ‘आई नेहमी कामातच असतात. त्यांना वेळ वाया घालवलेला आवडत नाही. त्या पुष्कळ गतीने आणि परिपूर्णतेने घरातील, शेतातील अन् बाहेरील कामे पूर्ण करतात. दिवसभरात कितीही कष्टाची कामे त्या न कंटाळता करत असतात. त्यांना मी कधीही थकून आणि कंटाळून बसलेले आतापर्यंत पाहिले नाही.
२. उत्तम निरीक्षणक्षमता : आईंची निरीक्षणक्षमता पुष्कळ चांगली आहे. ‘कोणती व्यक्ती कशी आहे ?’, हे त्यांना चटकन ओळखता येते. घरातील कामे करतांना माझ्याकडून चुका झाल्यास त्या त्याविषयी पटकन सांगून मला साहाय्य करतात.

रामनाथी आश्रमात अनुभवलेली अनमोल क्षणांची शिदोरी !

कु. स्नेहा झरकर
कु. पूजा जठार
      आम्हाला रामनाथी आश्रमात रहाण्याची संधी मिळाली. त्या वेळी प.पू. डॉक्टरांच्या कृपेने तिथे मिळालेल्या अनमोल शिकवणीने धन्य झालो. तेथील काही क्षण आणि अनुभव आठवून पुष्कळ कृतज्ञता वाटत होती. त्या वेळी देवानेच पुढील गोष्टी लक्षात आणून देऊन पुन्हा एकदा साधनेच्या प्रयत्नांना उत्साह दिला. ते थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न करत आहोत.

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...

श्रीविष्णूने अवतार घेतला ।
हरि आला रे घरी, गोळा झाली पंढरी ।
त्याच्या गळा तुळशीमाला घातली ।
आईने पुंडलिकाची गोष्ट सांगितली ॥ १ ॥
पहिल्या हाती शंख, दुसर्‍या हाती चक्र ।
दुष्प्रवृत्तींवरी नजर असे वक्र ।
श्रीविष्णूने घेतला अवतार ॥ २ ॥

अंगभूत कलागुणांमुळे सुंदर चित्रे रेखाटणारा आणि स्फूर्तीप्रद लिखाण करणारा ६३ टक्के आध्यात्मिक पातळी असलेला महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला पुणे येथील कु. नीरज प्रवीण कर्वे (वय १० वर्षे) !

उच्चलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे 
हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. नीरज प्रवीण कर्वे एक दैवी बालक आहे !
कु. नीरज कर्वे
     (कु. नीरज याची २०१४ मध्ये ६१ टक्के आध्यात्मिक पातळी होती.) 
पालकांनो, हे लक्षात घ्या ! 
     ‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ - (परात्पर गुरु) डॉ. आठवले 
१. गुणवैशिष्ट्ये 
१ अ. स्वावलंबी 
१ अ १. स्वतःचे दप्तर स्वतः घेणे : ‘नीरज लहान असतांना त्याचे दप्तर मला कधी उचलून घ्यायला लागले नाही. त्याच्या मित्राचे दप्तर त्याची आई घेते, हे पाहूनही तो मला कधी दप्तर घेण्याविषयी काही म्हणाला नाही.

प.पू. डॉक्टरांप्रमाणेच साधकांच्या साधनेची काळजी घेणारे सद्गुरु (श्री.) राजेंद्र शिंदे !

सद्गुरु (श्री.) राजेंद्र शिंदे
सौ. अंजली झरकर
      ‘प.पू. गुरुदेव सूक्ष्मरूपाने सर्वत्र आहेत; पण स्थूलरूपाने रामनाथी आश्रमात आहेत. हे सत्य असले, तरी प.पू. गुरुदेवांची २ रूपे आहेत. एक रूप रामनाथी आश्रमात आणि दुसरे सद्गुरु राजेंद्रदादांच्या रूपात देवद आश्रमात आहे. त्यांच्या माध्यमातून साक्षात् प.पू. गुरुदेवच आमची काळजी घेतात, याची प्रचीती आलेली काही उदाहरणे येथे देत आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
         सर्व रोगांना एकच औषध किंवा सर्व दाव्यांना एकच कायदा नसतो; पण राष्ट्र आणि धर्म यांच्या सर्व समस्यांना एकच उत्तर आहे आणि ते म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना ! 
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

॥ हरि ॐ तत्सत् ॥

गुरूंनी दिलेले नाव
लक्षणांवरून दिलेले नाव निर्गुणातील, 
तर बाकीची नावे सगुणातील असतात.
      भावार्थ : लक्षणांवरून दिलेले नाव निर्गुणातील, यातील निर्गुणातील म्हणजे आध्यात्मिक प्रगतीच्या लक्षणांवरून किंवा संप्रदायाप्रमाणे गुरूंनी शिष्याचे नाव ठेवलेले असते. याउलट आई-वडील सगुणातील लक्षणांवरून किंवा त्यांच्या प्रकृतीनुसार मुलाचे नाव ठेवतात.
      गुरु मिळाले असे म्हणू नये. गुरु दिले गेले, असे म्हटले पाहिजे. ज्याचा जो गुरु (नाम), तो त्याला आम्ही दिला. तोच तारील.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे


बोधचित्र


योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

परमेश्‍वराची उपासना सोडू नये
कितीही संकटांशी सामना करावा लागला, तरी परमेश्‍वरी 
उपासना सोडू नये. हताश होऊ नये. उपासनाच आपल्याला तारते. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

भारतीय रेल्वे आणि रेल्वे अपघात !

संपादकीय
      नुकतेच हरियाणा येथे रेल्वेची कार्यक्षमता वाढवणे, संघटन वाढवणे, नवीन विचारांचे आदान-प्रदान, नवीन संकल्पना, तसेच एकूण रेल्वेच्या भविष्याच्या दृष्टीने अजून काय करू शकतो याचे चिंतन वाढवण्याच्या दृष्टीने देशव्यापी चिंतन शिबीर झाले. पहिला दिवस उत्साहात गेला. सायंकाळी पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी दृकश्राव्य तंत्रज्ञानाने (व्हिडिओ कॉन्फरसिंग) या सर्वांशी संवाद साधून मी तिसर्‍या दिवशी तुम्हाला भेटायला येणार आहे, असे सांगितले. एकीकडे रेल्वेच्या प्रगतीविषयी चिंतन चालू असतांना शिबिराच्या शेवटच्या दिवशी २० नोव्हेंबरला इंदूर-पाटणा रेल्वेच्या अपघाताचे वृत्त धडकले.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn