Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।
विनम्र अभिवादन !

थोरले माधवराव पेशवे यांचा आज स्मृतिदिन

कोटी कोटी प्रणाम !

आज श्री कालभैरव जयंती

कानपूर येथील रेल्वे अपघातात १२२ प्रवासी ठार !

अपघातात जागतिक विक्रम करणारी भारतीय रेल्वे !
अशा रेल्वेप्रशासनाकडून बुलेट ट्रेन कशी चालवली जाईल, याची कल्पना येते !
     कानपूर (उत्तरप्रदेश) - १९ नोव्हेंबरच्या रात्री साडेतीनच्या सुमारास उत्तरप्रदेशातील कानपूरजवळील पुखराया येथे पाटणा-इंदूर एक्सप्रेस रेल्वे गाडीचे १४ डबे रुळावरून घसरल्याने झालेल्या भीषण अपघातात ११५ प्रवासी ठार, तर १२२ हून अधिक प्रवासी घायाळ झाले आहेत. घायाळांपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. अपघातग्रस्त गाडी इंदूरहून पाटण्याच्या दिशेने निघाली होती. हा अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही; मात्र रेल्वे रुळ उखडले गेल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. घटनास्थळी साहाय्यताकार्य मोठ्या प्रमाणात चालू आहे. राष्ट्रीय आपत्ती विभागाचे पथक साहाय्य करत आहे. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांना साहाय्यता कार्यावर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

नोटाबंदीचे स्वागत करणार्‍या जनतेचा त्याग व्यर्थ जाऊ देणार नाही ! - पंतप्रधान मोदी

राजकीय नेत्यांनी चिटफंडद्वारे लोकांचे पैसे लुटले !
     आग्रा - नोटाबंदीच्या निर्णयाचा त्रास होत असला, तरी सर्वसामान्य नागरिकांकडून याचे स्वागत होत असून त्यांनी या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. प्रारंभी त्रास होणार हे मी सांगितलेच होते. जनतेचा त्याग व्यर्थ जाणार नाही याची खात्री मी देतो, असा विश्‍वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील सभेत दिला. बंगालमध्ये झालेल्या शारदा चिटफंड घोटाळ्यामध्ये तृणमूल काँग्रेसचे नेते आणि ममता बॅनर्जी यांच्यावर आरोप आहेत. त्यावरून मोदी यांनी त्यांचे नाव न घेता टीका केली.

चुनवरे, मालवण येथे आज श्री कालभैरव पूजन

        मालवण - कालभैरव शिवस्वरूप देवता आहे. कालभैरवाने प्रत्येक युगात दुष्ट, दुर्जन आणि अधर्मी यांचा नाश केला आहे. २१ नोव्हेंबर या दिवशी कालभैरव जयंती आहे. त्यादिवशी चुनवरे, मालवण येथील श्री रामस्वरूप गावडेस्वामींच्या निवासस्थानी रामस्वरूप गावडेस्वामींचे पूजन करण्यात येणार आहे.
        प.पू. रमेश महाराज श्री कालभैरवाचे षोडशोपचार महापूजन करणार आहेत. या वेळी श्री कालभैरव देवता सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले महाराजांच्या रक्षणासाठी सतत परात्पर गुरु डॉ. आठवलेस्वामींच्या सोबत राहू दे, असा संकल्प करून हे पूजन होणार आहे. त्यानंतर रामस्वरूप गावडेस्वामींचे दत्तरूप पूजन आणि प.पू. नामदेव महाराजांच्या रामरथाची पंचोपचार पूजा करण्यात येणार आहे. दुपारी महाआरती आणि नंतर महाप्रसाद होणार आहे. या दिवशी संपूर्ण दिवस भजनादी कार्यक्रम होणार आहेत. पुरोहित नितीन अभ्यंकर या विधीचे पौरोहित्य करणार आहेत, असे प.पू. रमेश महाराज यांनी सांगितले. 
१५ ते १७ एप्रिल २०१७ या 
कालावधीत चुनवरे येथे रामयाग होणार 
        चैत्र कृष्ण पक्ष चतुर्थी ते षष्ठीपर्यंत म्हणजे १५ ते १७ एप्रिल २०१७ या कालावधीत समष्टी कल्याणाचा संकल्प करून प.पू. रमेश महाराजांनी रामस्वरूप गावडेस्वामींच्या चुनवरे येथील निवासस्थान परिसरात रामयाग करण्याचे आयोजन केले आहे. चैत्र कृष्ण पक्ष षष्ठी (१७ एप्रिल) या दिवशी रामस्वरूप गावडेस्वामींचा तिथीनुसार जन्मदिन साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी २१ नोव्हेंबर २०१६ या दिवशी दुपारी महाप्रसाद झाल्यावर भक्तांची बैठक घेण्यात येणार आहे.

पुण्यात उपचाराच्या व्ययाची संपूर्ण रक्कम रोख (कॅश) न दिल्याने उपचाराअभावी नवजात बाळ दगावले !

      पुणे, २० नोव्हेंबर - येथील रुबी रुग्णालयामध्ये एका नवजात बाळावर उपचार करण्यासाठी येणार्‍या व्ययाची संपूर्ण रक्कम रोख स्वरूपात न भरल्याने उपचाराअभावी एका नवजात बालकाचे निधन झाले आहे. 
१. येथील आम्रपाली आणि गौरव खुंटे या दांपत्याला काही दिवसांपूर्वी मुलगी झाली; परंतु बाळाच्या हृदयाला त्रास असल्याने डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्यास सांगितले. त्या शस्त्रक्रियेसाठी खुंटे कुटुंबीय बाळाला घेऊन १९ नोव्हेंबर या दिवशी येथील रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले.
२. या वेळी रुग्णालय प्रशासनाने त्यांना ३ लक्ष ५० सहस्र रुपये रोख भरण्यास सांगितले. त्यामुळे खुंटे यांनी तातडीने १ लक्ष ५० सहस्र रुपये रोख रकमेच्या स्वरूपात, तर काही रक्कम अधिकोषाद्वारे भरण्याची सिद्धता दर्शवली होती. असे असतांनाही रुग्णालय प्रशासनाने सर्व रक्कम रोख मागत बाळावर उपचार करण्यास नकार दिला, असे समजले.
३. त्यानंतर सायंकाळी बाळाच्या अवयवांचे काम करणे हळूहळू न्यून होत गेले. त्यामुळे बाळावर शस्त्रक्रिया करता येणार नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले आणि बाळाला व्हेंटिलेटरवर ठेवले. २० नोव्हेंबर या दिवशी पहाटे ते बाळ दगावले.

(म्हणे) नोटाबंदी करून भाजपने हिंदूंचे वाटोळे केले ! - केजरीवाल

      स्वतः केजरीवाल यांनी हिंदूंचे किती भले केले, हेही त्यांनी सांगावे ! देशाच्या स्वातंत्र्याच्या ६९ वर्षांत देशातील सर्वच राजकीय पक्षांनी हिंदूंचे वाटोळेच केले आहे ! ही स्थिती पालटण्यासाठीच आता हिंदु राष्ट्राची (सनातन धर्म राज्याची) स्थापना करणे अपरिहार्य आहे !
     नवी देहली -
भाजप स्वतःला हिंदूंचा पक्ष समजतो; मात्र नोटाबंदीचा निर्णय घेऊन त्यांनी हिंदूंनाही सोडलेले नाही, त्यांनी हिंदूंचे वाटोळे केले आहे, अशी टीका देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करून केले आहे. नोटाबंदीमुळे जनतेला होत असलेल्या त्रासावरून त्यांनी हे विधान कले आहे.

कर्नाटकात काँग्रेस सरकारकडून दूरचित्रवाहिनीवरून फलज्योतिषाचे प्रसारण करण्यास बंदी घालण्याचा प्रस्ताव !

      काँग्रेस सरकारची मोगलाई ! देश-विदेशात दूरचित्रवाहिन्यांवरून फलज्योतिषाचे कार्यक्रम सादर केले जात असतांना फलज्योतिषावर बंदी घालू पहाणार्‍या कर्नाटकातील काँग्रेस सरकारने फलज्योतिषाविषयीचा कोणता अभ्यास केला आहे ? कि ते पुरो(अधो)गाम्यांना खुश करण्यासाठी हा खटाटोप करत आहे ?
     बेंगळुरू - समाजात अंधश्रद्धा पसरू नयेत, असे कारण पुढे करून कर्नाटकातील काँग्रेस सरकारने फलज्योतिषाविषयीचे सर्वच कार्यक्रम राज्यातील दूरचित्रवाहिन्यांवरून प्रसारित करण्यावर पूर्णपणे बंदी घालण्याचा प्रस्ताव बनवला आहे. राज्यातील बहुतेक वाहिन्या फलज्योतिषाविषयीचे कार्यक्रम नियमितपणे प्रसारित करत असतात.

पुरो(अधो)गाम्यांच्या मडगाव येथील दक्षिणायन अभियानातील पहिल्या दिवशी काही वक्त्यांची वैचारिक दिवाळखोरी दर्शवणारी भाषणे !

मडगाव स्फोट प्रकरणातील सनातनच्या साधकांचे 
निर्दोषत्व पचवू न शकणारे सनातनद्वेष्टे प्रशांत नाईक !
प्रशांत नाईक म्हणाले, 
१. मडगावमध्ये येथून २५ मीटरच्या अंतरावर नरकासुर प्रथेच्या वेळी स्फोट करून त्याचे खापर मुसलमानांवर फोडण्याचा डाव सनातन संस्थेच्या साधकांनी आखला होता. (हा जावईशोध प्रशांत नाईक यांनी कशावरून लावला ? आयते व्यासपीठ मिळाले आहे; म्हणून सनातनच्या विरोधातील कंड नाईक शमवून घेत आहेत का ? - संपादक) 
२. या वेळी संस्थेचे दोन साधक मारले गेले; मात्र पोलीस खाते आणि राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणा यांनी योग्य तर्‍हेने खटला बनवला नाही. त्यामुळे सर्व आरोपी सुटले. आरोपींवर कारवाई करण्यात शासन पूर्णपणे अपयशी ठरले आहे. (जे आरोपी निर्दोष सुटतात त्या सर्वांविषयी त्यांचे विरोधक असेच म्हणत असणार. त्यामुळे सनातनच्या विरोधकांच्या या म्हणण्याला काय अर्थ आहे ? संविधानाला धर्मग्रंथ मानणारे संविधानानुसार सनातनचे साधक न्यायालयात आरोपांतून निर्दोष सुटल्यावर त्यांचे निर्दोषत्व मान्य करण्याचे सौजन्य किंवा विवेक दाखवत नाहीत. यांचा विवेक आणि संविधानावरील श्रद्धा बेगडीच म्हणावी लागेल ! - संपादक)

मुसलमानांसाठी शरीयतनुसार बँकिंग सेवा चालू करावी !

रिझर्व्ह बँकेचा अर्थमंत्रालयाकडे प्रस्ताव
     शरीयतनुसार चालू झालेल्या बँकिंगमधील पैसा आतंकवाद्यांकडे जाणार नाही, याची निश्‍चिती रिझर्व्ह बँक देणार आहे का ? निधर्मी देशात धर्माच्या आधारे बँकिंग सेवा कशासाठी ?
     नवी देहली - रिझर्व्ह बँकेने मुसलमानांसाठी व्याजमुक्त बँकिंग सेवा शरीयतनुसार चालू करावी, असा प्रस्ताव केंद्रीय अर्थमंत्रालयाला दिला आहे. देशातील बँकांनी त्यांच्या शाखेत इस्लामी खिडकीला स्थान द्यावे, असे यात नमूद करण्यात आले आहे. ही सेवा चालू केल्यानंतर बँकिंग क्षेत्राला काय लाभ होईल, यासंबंधीही बँकेने विश्‍लेषण अहवाल अर्थमंत्रालयाला दिला आहे. शरीयतनुसार अर्थिक व्यवहारात व्याजाची वसुली करण्याचा सिद्धांत नाही.

भ्रष्टाचार दूर करण्यासाठी नैतिकता आणि अध्यात्म शिकवा ! - पुरी पीठाचे शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती

    पुरी (ओडिशा) - पंतप्रधान मोदी प्रामाणिक आहेत; परंतु नोटाबंदी हा काळा पैसा रोखण्याचा मार्ग नाही. पंतप्रधानांनी देशातील भ्रष्टाचार, अप्रामाणिकपणा रोखण्याचा प्रयत्न करण्याऐवजी नैतिकता वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे तेव्हाच शक्य आहे, जेव्हा देशातील शिक्षणपद्धतीत पालट कला जाईल. अभ्यासक्रमात नैतिकता आणि अध्यात्म शिकवले पाहिजे. सरकार कोणाचा सल्ला घेत नाही. जर अशी शिक्षणपद्धत आणली, तर जगभरात त्याचे कौतुक होईल, असे प्रतिपादन पुर्वाम्नाय पुरी पीठाचे शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती यांनी येथे केले.
शंकराचार्य पुढे म्हणाले,
१. २ सहस्र रुपयांच्या नोटांमुळे आता काळ्या पैशांत आणखी वाढ होईल. पूर्वी ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या नोटांसाठी मोठा खोका लागत होता, आता २ सहस्र रुपयांच्या नोटांमुळे लहान खोकाच लागेल.

मडगाव येथे बुद्धीजीवींच्या अभिव्यक्ती दक्षिणायन परिषदेत दुसर्‍या दिवशी पत्रकार राजदीप सरदेसाई यांची हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका !

     मडगाव, २० नोव्हेंबर (वार्ता.) - येथील रवींद्र भवन येथे आयोजित अभिव्यक्ती दक्षिणायन परिषदेच्या दुसर्‍या दिवशी देशभक्ती, राष्ट्रवाद आणि मानवता या विषयावर आयोजित गटचर्चेत पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्यातच धन्यता मानली. यातून त्यांची देशद्रोही विचारसरणीच त्यांनी एकप्रकारे दाखवून दिली. अधिवक्ता अमृत कासार हे गटचर्चेच्या अध्यक्षपदी होते. या गटचर्चेत सत्येंद्र सोनार, स्वाती जोशी यांनीही भाग घेतला होता.

पेठवडगाव-आष्टा मार्गावर १ कोटी रुपयांची रोकड जप्त !

       कोल्हापूर, २० नोव्हेंबर (वार्ता.) - पेठवडगाव-आष्टा मार्गावर पोलिसांनी बोलेरो गाडीतून गाडीतून १ कोटी रुपयांच्या ५०० आणि १००० च्या नोटा जप्त केल्या. या प्रकरणी तिघांना चौकशीसाठी कह्यात घेण्यात आले आहे. या घटनेची माहिती आयकर विभागाला देण्यात आली आहे. 

परिषदेत गोमंतकातील मराठी साहित्यिकांना वगळले, राज्यातील मराठीप्रेमींमध्ये संतापाची लाट !

मडगाव येथील अभिव्यक्ती दक्षिणायन परिषदेतील (बेगडी) अभिव्यक्ती स्वातंत्र्य उघड !
     मडगाव, २० नोव्हेंबर (वार्ता.) - येथील रवींद्र भवन येथे १८ नोव्हेंबरपासून प्रारंभ झालेल्या अभिव्यक्ती दक्षिणायन परिषदेत गोव्यातील आणि गोव्याबाहेरील साहित्यिक आणि विचारवंतांना स्थान देण्यात आलेले असले, तरी गोव्यातील मराठीप्रेमी साहित्यिकांना वगळण्यात आल्याने राज्यातील मराठीप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. ज्येष्ठ गोमंतकीय कवयित्री डॉ. अनुजा जोशी, कथाकार डॉ. विठ्ठल ठाकूर, ज्येष्ठ कवी पुष्पाग्रज उपाख्य अशोक नाईक आदींनी या प्रकाराविषयी तीव्र असंतोष व्यक्त केला आहे, असे वृत्त दैनिक नवप्रभाने प्रसिद्ध केले आहे.

मडगाव येथे टिपू सुलतानची जयंती साजरी करण्याचा धर्मांधांचा डाव हाणून पाडणार्‍या हिंदुत्वनिष्ठ युवकांचा पोलिसांकडून छळ !

हिंदु युवकांवर तत्परतेने कारवाई करून मर्दुमकी गाजवणारे पोलीस ! 
हे पोलीस टिपू सुलतानची जयंती साजरी करण्याचा घाट घालून सामाजिक 
तेढ निर्माण करू पहाणार्‍या धर्मांधांवर मात्र कोणतीही कारवाई का करत नाहीत ? 
  • एका हिंदु युवकाला अटक ! 
  • हिंदु युवकांचा छळ थांबवण्याची मागणी ! 
  • मोठ्या संख्येने शिवसैनिक मडगाव पोलीस अधिकार्‍यांना खडसवण्यासाठी पोलीस ठाण्यात 
पोलीस अधिकार्‍यांना निवेदन सादर करतांना शिवसेनेचे 
श्री. शिवप्रसाद जोशी आणि इतर हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते
     मडगाव, २० नोव्हेंबर (वार्ता.) - टिपू सुलतान यांचा गोवा राज्याशी कोणताही ऐतिहासिक संबध नसतांना मडगाव येथे काही धर्मांधांनी २० नोव्हेंबर या दिवशी टिपूू सुलतान जयंती साजरी करण्याचा घाट घातला आहे. या संदर्भात अवैधपणे फलक ठिकठिकाणी लावण्यात आले होते; मात्र स्थानिक शिवसाम्राज्य संघटनेच्या जागरूक हिंदूंनी या अवैध फलकांच्या विरोधात तक्रार करून हे फलक काढण्यास प्रशासनाला भाग पाडले.

बांगलादेशात हिंदूच्या घरावर दुसर्‍यांदा आक्रमण !

ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेला पर्याय नाही !
     ढाका - ३० ऑक्टोबर या दिवशी इस्लामच्या कथित अवमानावरून ब्राह्मणबरीया जिल्ह्यात उसळलेल्या दंगलीत हानी झालेल्या हिंदूच्या घरावर पोलीस आणि शीघ्र कृती दलाचे सैनिक जवळ असतांनाही धर्मांधांनी दुसर्‍यांदा आक्रमण केले अन् घराला आग लावली.
     दत्ता पारा येथील रहिवासी अंजन देव यांच्या घरावर धर्मांधांनी आक्रमण करून त्याची हानी केली होती. त्यानंतर या हिंसाचाराला आळा घालण्यासाठी पोलीस आणि शीघ्र कृती दलाचे सैनिक यांची नेमणूक करण्यात आली होती. तरीही धर्मांधांनी अंजन देव यांच्या घरातील गोठ्याला १७ नोव्हेंबर या दिवशी आग लावली.

हिंदुद्वेषी ओवैसी यांची इचलकरंजी येथील सभा रहित !

हिंदुत्वनिष्ठांच्या संघटनाचेे यश !
     इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर), २० नोव्हेंबर (वार्ता.) - येथे थोरात चौकात नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी २० नोव्हेंबर या दिवशी एम्.आय.एम्. पक्षाचे संस्थापक आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांची आयोजित केलेली जाहीर सभा धर्माभिमान्यांच्या विरोधामुळे संयोजकांना रहित केली. त्यामुळे ओवैसी इचलकरंजी येथे न येता परस्पर मिरजहून कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाले. (राष्ट्रद्रोह्याची सभा रहित करण्यासाठी संघटित होणार्‍या बजरंग दलासह सर्व धर्माभिमान्यांचे अभिनंदन ! यातून इतर धर्माभिमान्यांनी बोध घ्यावा. - संपादक)

माजी महापौर इद्रिस नायकवडी, माजी नगरसेविका आयेशा नायकवडी यांच्यासह दहा जणांवर गुन्हा प्रविष्ट करा !

  • असे राजकारणी जनहितकारी राज्यकारभार कधीतरी करतील का ? अशा राजकारण्यांमुळेच लोकशाही निरर्थक ठरली आहे !
  • आयेशा नायकवडी यांनी बनावट जात प्रमाणपत्र दिल्याचे प्रकरण !
       सांगली, २० नोव्हेंबर - सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या निवडणुकीत जातीचा बनावट जातीचा दाखला देऊन फसवणूक केल्याच्या प्रकरणी माजी महापौर तथा काँग्रेसचे कार्यकर्ते इद्रिस नायकवडी, काँग्रेस पक्षाच्या माजी नगरसेविका आयेशा इद्रिस नायकवडी यांच्यासह दहा जणांवर गुन्हा प्रविष्ट करून तपास करावा, असे आदेश सांगली येथील मुख्य न्यायदंडाधिकारी एम्.आर्.ए. शेख यांनी शहर पोलिसांना दिला आहे. या संदर्भात माजी नगरसेवक साजीदअली पठाण यांनी सांगली येथील न्यायालयात फिर्याद दाखल केली आहे. (माजी महापौर आणि माजी नगरसेविका यांच्यावर गुन्हा प्रविष्ट करण्याचा आदेश देण्यात येतो, यावरून राजकारण्यांची गुन्हेगारी वृत्तीच समोर येते ! अशांवर शासनाने कठोर कारवाई करावी, अशी जनतेची अपेक्षा आहे ! - संपादक) 

काही वर्षांत देशाची पुन्हा फाळणी होऊ शकते ! - हुकूम सिंह, खासदार, भाजप

एक भारत अभियान - कश्मीर की ओर अंतर्गत लक्ष्मणपुरी येथील हिंदु धर्मजागृती सभा
     लक्ष्मणपुरी (लखनऊ) - मी जिवंत असतांना देशाची फाळणी होणार नाही; मात्र येणार्‍या १० ते २० वर्षांमध्ये एखादा सय्यद अहमद खान जन्म घेईल आणि पुन्हा एक फाळणी व्हावी, असे म्हणेल, असे विधान भाजपचे खासदार हुकूम सिंह यांनी येथे केले आहे. एक भारत अभियान- कश्मीर की ओर या उपक्रमाच्या अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या हिंदु धर्मजागृती सभेत सिंह बोलत होते. हा उपक्रम कैराना आणि काश्मीरमधील विस्थापित हिंदूंवर आधारित आहे. सर सय्यद अहमद खान मुस्लिम विद्यापिठचे संस्थापक होते.

कार्तिकी पौर्णिमेनिमित्त विलासपूर (हरियाणा) येथे सनातन भारतीय संस्कृती संस्थेच्या वतीने ग्रंथ आणि फलक प्रदर्शन !

जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सनातनच्या वतीने लावण्यात आलेले ग्रंथ
आणि फलक प्रदर्शन बघतांना जिज्ञासू
     विलासपूर - येथे प्रसिद्ध कपालमोचन मेळाव्याच्या निमित्ताने अध्यात्माविषयी मार्गदर्शन आणि धर्मशिक्षण मिळावे, यासाठी सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले. यासह हिंदु भाविकांना प्रत्येक कृती करण्यामागील अध्यात्मशास्त्र समजण्यासाठी धर्मशिक्षण देणार्‍या फलकांचे प्रदर्शनही लावले होते. सहस्रो जिज्ञासूंनी या प्रदर्शनाला भेट देऊन अध्यात्म, राष्ट्र आणि धर्म यांविषयीच्या ग्रंथांतील अमूल्य माहितीचा लाभ घेतला.

चीनच्या सॉफ्टवेअर आस्थापनाने अमेरिकी नागरिकांच्या अ‍ॅन्ड्रॉईड भ्रमणभाषमधून माहिती चोरल्याचा आरोप !

     न्यूयॉर्क - चीनमधील एका सॉफ्टवेअर आस्थापनाने नागरिकांच्या अ‍ॅन्ड्रॉईड भ्रमणभाषमधील माहिती चोरल्याचा आरोप अमेरिकेने केला आहे. या आस्थापनाने दर तीन दिवसांच्या अंतराने मोठ्या प्रमाणात माहिती पाठवली. माहितीनुसार शांघाय एडप्स टेक्नॉलॉजी कंपनीने चिनी सर्व्हरला लघुसंदेश, संपर्क सूची, लोकेशन, तसेच अन्य माहिती पाठवली, असे किप्टोवायर या मोबाइल सिक्युरिटी फर्मने म्हटले आहे. या आस्थापनाने भ्रमणभाषमध्ये आधीपासून कोड इन्स्टॉल केले होते; मात्र नागरिकांना याविषयी कल्पना दिली नसल्याचे अमेरिकेच्या प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे.

आतंकवाद्यांच्या मुसक्या आवळा ! - अमेरिकेची पाकिस्तानला चेतावणी

पाकला आतंकवादी राष्ट्र घोषित करण्याची अमेरिकी नागरिकांची मागणी !
      एकीकडे अमेरिका पाकला चेतावणी देते, तर दुसरीकडे त्यालाच शस्त्रास्त्रांची विक्री करते ! मग पाककडून हीच शस्त्रास्त्रे भारतविरोधी कारवाया करण्यासाठी वापरली जातात. यावरून अमेरिकेचा आतंकवादाविषयीचा दुतोंडीपणा दिसून येतो ! अशा धूर्त अमेरिकेवर किती विश्‍वास ठेवायचा, हे आता सरकारने ठरवावे !
     न्यूयॉर्क - पाकिस्तानच्या भूमीत आश्रय घेणार्‍या आतंकवादी संघटनांवर कठोर कारवाई करा, अशी चेतावणी अमेरिकेने पाकिस्तानला दिली आहे. कोणत्याही देशाने स्वत:च्या भूमीचा आतंकवाद्यांना वापर करू देऊ नये. दुसर्‍या देशांवर आक्रमणे करण्याचा कट रचत असलेल्या आतंकवाद्यांना थारा देऊ नये, असेही अमेरिकेने म्हटले आहे. वी द पीपल ऑनलाइन याचिकेत विचारलेल्या प्रश्‍नांना उत्तर देतांना राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा बोलत होते. या याचिकेवर जवळपास साडेसहा लाख लोकांनी स्वाक्षर्‍या केल्या आहेत. या याचिकेत पाक आतंकवादाला प्रोत्साहन देणारा देश घोषित करण्यात यावा, अशी मागणी केली होती. यापूर्वीही अमेरिकेने अनेकदा पाकिस्तानला या सूत्रावरून फटकारले आहे.

काश्मीर खोर्‍यातील जनजीवन अनुमाने ४ मासांनंतर पूर्वपदावर !

एका भागात विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर आणायला ४ मास लागणे, 
हे सरकारचे अपयशच नव्हे का ? हिंसाचार घडवून आणणार्‍यांवर तात्काळ कठोर कारवाई करा !
     श्रीनगर - अनुमाने ४ मासांनंतर काश्मीर खोर्‍यातील जनजीवन पूर्वपदावर आले आहे. ८ जुलैला सैन्यासमवेत झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीन या जिहादी आतंकवादी संघटनेचा म्होरक्या बुरहान वाणी मारला गेल्यानंतर काश्मीर खोर्‍यात संचारबंदी लागू करण्यात आली होती. 
      हिंसाचारानंतर काश्मीर खोर्‍यात १९ नोव्हेंबरला प्रथमच शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये, पेट्रोल पंप आदी चालू झाले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकांनी फुटीरतावाद्यांच्या धमकीकडे दुर्लक्ष करत दैनंदिन कामासाठी शासकीय कार्यालयांत ये-जाही चालू झाली आहे. हळूहळू येथील जनजीवन पूर्वपदावर येत आल्याचे चित्र आहे. दुसरीकडे फुटीरतावाद्यांचाही विरोध २ दिवसांपासून अल्प झाला आहे. सार्वजनिक परिवहन सेवेच्या बसही रस्त्यावर धावतांना दिसत होत्या. त्यामुळे श्रीनगरमधील रस्ते गजबजून गेले होते.

पुणे येथील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपति मंदिरातील दानपेट्यांमधील १८ लक्ष रुपये अधिकोषात जमा

       पुणे, २० नोव्हेंबर - ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या नोटा चलनातून रहित केल्यानंतर नागरिकांची सट्या पैशांची अडचण टाळण्यासाठी दानपेट्यांतील रकमा अधिकोषात जमा करण्याचे देवस्थानांना आदेश देण्यात आले होते. त्यानुसार येथील सुप्रसिद्ध दगडूशेठ गणपति मंदिरातील सर्व दानपेट्यांची एकूण मोजणी केल्यानंतर त्यात १८ लक्ष रुपये मिळाले. त्यांपैकी ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या रकमेचे मूल्य ६ लक्ष रुपये होते. धर्मादाय आयुक्त कार्यालयाचे निरीक्षक कैलास महाले यांच्या उपस्थितीत मोजणी केल्यानंतर ही रक्कम अधिकोषात जमा करण्यात आली, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी दिली. श्री देवदेवेश्‍वर संस्थाननेही त्यांच्या दानपेटीत जमा झालेली १ लक्ष ८१७ रुपये एवढी रक्कम अधिकोषात भरली. दोन्ही ठिकाणी ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या नोटांचे प्रमाण तुलनेने अल्प आढळले. 

सरकारी अधिवक्ता अभिनंदन वग्यानी यांना धमक्या !

या धमक्या हिंदुत्वनिष्ठच देत असल्याचा कांगावा 
पुरो(अधो)गाम्यांनी केल्यास आश्‍चर्य वाटणार नाही !
       मुंबई - मुंबई उच्च न्यायालयात डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरण, मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांविरुद्धच्या याचिका, अनधिकृत बांधकामांविरुद्धच्या याचिका आदींमध्ये राज्य सरकारची बाजू मांडणारे मुख्य सरकारी अधिवक्ता अभिनंदन वग्यानी यांना मागच्या पाच-सहा मासांपासून धमक्या येऊ लागल्याने पोलीस संरक्षण पुरवण्यात आले आहे. 
       या प्रकरणी आझाद मैदान पोलीस ठाण्यात एफ्आयआर्ही नोंदवण्यात आला. त्यानंतर पोलिसांच्या गुप्तचर विभागाने त्यांना असलेल्या धोक्याचा अंदाज घेऊन अलीकडेच एक शस्त्रधारी अंगरक्षक दिला आहे. वग्यानी यांना भ्रमणभाषवर देशाबाहेरील क्रमांकावरूनही धमक्या आल्या आहेत. 

वेळ न पाळणारे लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांवर यापुढे कारवाई ! - कल्याण महापौर

   कल्याण - वेळेचे पालन न करणारे लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांवर यापुढे कारवाई करा, अशी चेतावणी महापौर राजेंद्र देवळेकर यांनी दिली आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेची १९ नोव्हेंबरची सर्वसाधारण सभा लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीअभावी तहकूब करण्यात आली. या पार्श्‍वभूमीवर ही चेतावणी त्यांनी दिली.
   कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या सर्वसाधारण सभा चालू होऊन अर्धा घंट्यानंतरही केवळ २० नगरसेवक उपस्थित होते. त्यामुळे महापौरांनी सभा तहकूब करण्याचा निर्णय घोषित केला; मात्र त्याविषयीची माहिती लोकप्रतिनिधींना नसल्याने ते येत राहिले. मनसेचे गटनेते मंदार हळबे म्हणाले, सेनेच्या सदस्यांना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडील कार्यक्रमाला जायचे होते, तर भाजप सदस्यांना नगरपालिका निवडणुकांसाठी जायचे होते, त्यामुळे त्यांनी ठरवून ही महासभा तहकूब केली. (वैयक्तिक कामांसाठी सभा तहकूब करणे म्हणजे जनतेचा वेळ आणि पैसा अपव्यय करणे ! - संपादक)

अनधिकृत दालनाला तिप्पट घरपट्टी न आकारणार्‍या उपायुक्तांसह चौघांना निलंबित करा !

कोल्हापूर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मागणी 
       कोल्हापूर, २० नोव्हेंबर (वार्ता.) - मार्जिन एरियातील मिळकतीमधील अनधिकृत दालनाला (केबीनला) तिप्पट घरपट्टी न आकारल्याने संबंधित विभागाचे अधीक्षक, कर निर्धारक आणि संग्राहक, तसेच उपायुक्त यांना दोषी धरून निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी येथील सर्वपक्षीय नगसेवकांनी १९ नोव्हेंबरला महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत केली. नगरसेवक अभिजीत चव्हाण आणि घरपट्टी विभागाचे साहाय्यक अधीक्षक विशाल सुगते यांच्यातील वादाचे पडसाद सभेत उमटले. एका महत्त्वाच्या प्रश्‍नांवर चर्चेसाठी आयुक्त अनुपस्थित असल्याने त्यांचा निषेध करून सभा स्थगित करण्यात आली. 

विधानपरिषदेसाठी सातारा जिल्ह्यात १०० प्रतिशत मतदान

      सातारा, २० नोव्हेंबर (वार्ता.) - सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीचे मतदान १९ नोव्हेंबर या दिवशी झाले. इतर उमेदवार लक्षात न घेता राष्ट्रवादी काँग्रेसचे श्री. शेखर गोरे आणि राष्ट्रीय काँग्रेसचे श्री. मोहनराव कदम यांच्यामधे मुख्य लढत होती. सातारा जिल्ह्यातील सातारा, वाई, फलटण आणि कराड या चार केंद्रांवर सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत मतदान झाले. दोन्ही मतदारसंघांत एकूण ५७० मतदार होते. त्यांपैकी ३०४ मतदार सातारा जिल्ह्यात, तर २६६ मतदार सांगली जिल्ह्यात होते. 

प्रत्येक सुनावणीला सरकारी अधिवक्त्यांनी न्यायालयामध्ये उपस्थित रहाण्याचा आदेश !

  • लक्षावधी खटल्यांचे न्यायदान प्रलंबित असतांना सुनावणीला उपस्थित न रहाणारे सरकारी अधिवक्ते देणारी न्यायप्रणाली अन्यायकारकच ! 
  • अशा अधिवक्त्यांवर न्यायालयाने कारवाई करावी, अशी जनतेची अपेक्षा आहे !
        मुंबई, २० नोव्हेंबर - नवीन येणार्‍या जनहित याचिकांसाठी एकही सरकारी अधिवक्ता उपस्थित नसतो, हे वारंवार घडत आहे. सरकारी अधिवक्ता न्यायालयामध्ये उपस्थित रहात नसल्याने न्यायालयाचे कामकाज थांबते. त्यामुळे प्रत्येक सुनावणीला सरकारी अधिवक्त्याने न्यायालयात उपस्थित रहावे, अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने अधिवक्त्यांच्या अनुपस्थितीवर फटकारले आहे. (सरकारी अधिवक्त्यांनाच जर न्यायालयाच्या वेळेचे मूल्य नसेल, तर इतर अधिवक्त्यांच्या स्थितीचा विचारच न केलेला बरा ! या प्रकरणी न्यायालयाने संबंधित सरकारी अधिवक्त्यांवर दंडात्मक कारवाई करावी, ही अपेक्षा ! - संपादक) 
        मुख्य न्यायमूर्ती मंजुळा चेल्लूर आणि न्यायमूर्ती एम्.एस्. सोनक यांच्या खंडपिठासमोर एका पोठापाठ एक अशा जनहित याचिकांची सुनावणी चालू होती. त्या वेळी एका तरी सरकारी अधिवक्त्याने कायमस्वरूपी न्यायालयात उपस्थित रहाणे अपेक्षित होते; मात्र आपल्याला नेमून दिलेल्या याचिकेची सुनावणी झाल्यानंतर संबंधित सरकारी अधिवक्ता न्यायालयातून बाहेर पडत होता. परिणामी काही याचिकांवर बाजू मांडण्यासाठी सरकारी अधिवक्त्यांना बोलवून आणावे लागत होते आणि न्यायालयाचा वेळ जात होता. त्यामुळे संतप्त झालेल्या न्यायालयाने सरकारी अधिवक्त्यांना वरील आदेश दिला. 

५०० आणि १ सहस्र रुपयांच्या नोटांसंदर्भातील निर्णयामुळे बाजारात मंदी

      सातारा, २० नोव्हेंबर (वार्ता.) - भारत सरकारने ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या नोटा चलनातून रहित केल्याचा परिणाम शहरी भागापेक्षा अधिक ग्रामीण भागात झाल्याचे दिसून येत आहे. अधिकोषांमध्ये लागलेल्या लांबचलांब रांगा, पैसे भरणे आणि काढणे यांवर घातलेल्या मर्यादा यांमुळे सामान्य नागरिक त्रस्त झाला आहे. याचा परिणाम बाजारपेठांवर झालेला दिसून येत आहे. व्यावसायिकांची उलाढाल थंडावली असून बाजारात मंदीचे वातावरण निर्माण झाले आहे. 
ग्रामीण जनतेची गैरसोय ! 
      ग्रामीण जीवनाची अर्थवाहिनी असणार्‍या जिल्हा मर्ध्यवर्ती बँकेतही ५०० आणि १ सहस्रच्या नोटा स्वीकारत नसल्याने ग्रामीण भागातील शेतकरी आणि नागरिक यांची मोठी गैरसोय होत आहे. शहरी नागरिकांप्रमाणे शेतकरी वर्गाकडे डेबिट कार्ड असतेच असे नाही. राष्ट्रीयकृत अधिकोषांची संख्या ग्रामीण भागात अगदीच नगन्य आहे. नोटा पालटून घेण्यासाठी कामाला सुटी घेऊन स्वत:चे प्रवासभाडे खर्च करून शहरात यावे लागत आहे. हातावरचे पोट असणार्‍यांचे जगणे यामुळे अवघड झाले आहे.

रिक्शाचालकांना प्रादेशिक भाषा आलीच पाहिजे ! - मुंबई उच्च न्यायालय

हा निकाल म्हणजे मराठी भाषा विरोधकांना मिळालेली सणसणीत चपराकच होय !
     मुंबई, २० नोव्हेंबर - सार्वजनिक वाहतूकदार आणि रिक्शाचालक यांना प्रादेशिक भाषा आलीच पाहिजे. अन्यथा त्यांना प्रवाशांनी दिलेल्या सूचना कळणार नाहीत, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. तसेच परिवहन विभागाने काढलेल्या परिपत्रकावर उच्च न्यायालयाने स्थगिती देण्यास नकार दिला आहे. परिवहन विभागाने रिक्शाचालकांसाठी मराठी भाषेची सक्ती करण्यासंदर्भात परिपत्रक काढले होते. त्याच्या विरोधात मीरा-भाईंदर रिपब्लिकन रिक्शाचालक-मालक युनियनने मुंबई उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती. १७ नोव्हेंबर या दिवशी झालेल्या सुनावणीच्या वेळी न्यायमूर्ती विद्यासागर कानडे आणि न्यायमूर्ती नूतन सरदेसाई यांच्या खंडपिठाने वरील निर्णय दिला.

अतिमहनीय व्यक्तींकडून पोलीस सुरक्षा व्यवस्थेसाठी नागरिकांचा पैसा व्यय का करायचा ? - मुंबई उच्च न्यायालय

हे न्यायालयाला का सांगावे लागते ? पोलीस प्रशासनाच्या स्वतःहून लक्षात का येत नाही ?
     मुंबई, २० नोव्हेंबर - अतिमहनीय व्यक्तींकडून पोलीस सुरक्षेचे शुल्क दिले जात नसेल, तर त्यासाठी नागरिकांचा पैसा व्यय का करायचा, असा प्रश्‍न मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला विचारला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी पोलिसांच्या व्यथा आणि पोलीस व्यवस्थेतील आवश्यक सुधारणांविषयी जनहित याचिका केली आहे. त्यावर मुख्य न्यायमूर्ती मंजुला चेल्लूर आणि न्यायमूर्ती एम्.एस्. सोनक यांच्या खंडपिठापुढे १८ नोव्हेंबर या दिवशी झालेल्या सुनावणीच्या वेळी वरील प्रश्‍न उपस्थित करण्यात आला.
१. याचिकेत म्हटले आहे की, पोलिसांना अल्प वेतन आणि आवश्यक सुविधा नसतांना खाजगी अन् अतिमहनीय लोकांच्या सुरक्षेसाठी मात्र पोलीस तैनात केले जातात. दुसरीकडे त्याच लोकांकडून पोलीस सुरक्षेच्या शुल्काची थकबाकी वर्षानुवर्षे रहाते. (पोलीस प्रशासनाचा भोंगळ कारभार ! - संपादक)

देश इस्लाममुक्त झाला पाहिजे ! - कमलेश तिवारी, हिंदुमहासभा

   पनवेल - हा देश इस्लाममुक्त झाला, तरच हा देश आतंकवादापासून मुक्त होऊन हिंदु राष्ट्र बनेल. देशात निर्दोष हिंदू, पोलीस, सैनिक मरत आहेत. ही देशासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. हिरव्या आतंकवादापुढे काँग्रेस आणि भाजप दोन्ही अपयशी ठरले आहेत, असे प्रतिपादन हिंदूमहासभेचे कार्यवाहक अध्यक्ष श्री. कमलेश तिवारी यांनी केले. ते १५ नोव्हेंबर या दिवशी नथुराम गोडसे आणि नारायण आपटे याच्या पुण्यतिथीनिमित्त महाराणा प्रताप बटालियनने आयोजित केलेल्या शौर्य दिवस या कार्यक्रमात बोलत होते. या वेळी गोडसे आणि आपटे यांना पुष्पहार अर्पण करून त्यांचा गौरव करण्यात आला. विशेष अतिथी म्हणून अनिल महाराज देवळेकर महाराज, शिव व्याख्याता रसिका वरूडकर, हिन्दू राष्ट्रसेनेचे आदित्य देशमुख, तसेच महाराणा प्रताप बटालियनचे अध्यक्ष श्री. अजय सिंह सेंगर उपस्थित होते.

(म्हणे) सुभाष देशमुख यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी !

भ्रष्टाचाराची परमावधी गाठलेल्या काँग्रेसच्या काळात
भ्रष्ट मंत्र्यांविषयी काही न बोलणारे अबू आझमी !
    मुंबई, २० नोव्हेंबर (वार्ता.) - काळा पैसा बाळगणार्‍यांना सोडणार नाही, असे वक्तव्य पंतप्रधानांनी केले होते. आता राज्याच्या सहकारमंत्र्यांच्या मालकीच्या बँकेच्या गाडीत लक्षावधी रुपयांची रक्कम पोलिसांनी जप्त केल्यानंतरही पंतप्रधान गप्प का ? सहकारमंत्री सुभाष देशमुख यांची मंत्रीपदावरून हकालपट्टी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आझमी यांनी १९ नोव्हेंबर या दिवशी पत्रकार परिषदेत केली. या वेळी भाजपवर टीका करतांना अबू आझमी म्हणाले, स्वत:च्या नेत्यांची काळी कृत्ये पंतप्रधान दुर्लक्षित करत आहेत. भाजपमधील भ्रष्ट नेत्यांवर कारवाई करण्याचे धैर्य पंतप्रधान दाखवणार का ?

मल्ल्याप्रमाणे आम्हालाही कर्जमाफी द्या ! - सफाई कामगाराचे स्टेट बँकेच्या शाखाधिकार्‍यास पत्र

कर्जबुडव्यांच्या विरोधात कृती न करणार्‍या शासनाला याविषयी काय म्हणायचे आहे ?
    नाशिक, २० नोव्हेंबर - स्टेट बँक ऑफ इंडियाने विजय मल्ल्यासारख्या कर्ज बुडव्या ६३ कर्जदारांची कर्जमाफी केली आहे. ही बातमी वाचून त्र्यंबकेश्‍वर पालिकेचे सफाई कामगार भाऊराव सीताराम सोनवणे यांनी येथील स्टेट बँकेच्या शाखाधिकार्‍यास एक पत्र देऊन आता घरात पैसा नसल्याने मलाही मल्ल्याप्रमाणे कर्जमाफी द्या ! असे म्हटले आहे. (अधिकोषाच्या धोरणाचे वाभाडे म्हणायचे कि धनदांडग्यांचे लांगूलचालन ? - संपादक) या पत्रामुळे कर्जदाराचे शंकानिरसन कसे करायचे, या चिंतेने अधिकोषाचे कर्मचारी हतबल झाले.

महानगरपालिकेने आदिवासींना सहस्रो रुपयांची मालमत्ता देयके पाठवली

कल्याण महापालिकेचा भोंगळ कारभार !
    कल्याण - येथील महानगरपालिकेने आदिवासी पाड्यावरील लोकांना सहस्रो रुपयांची मालमत्ता देयके पाठवली आहेत. त्यामुळे कुडाच्या घरात रहाणारे आदिवासी लोक त्रस्त झाले आहेत.
    या लोकांना दिवसाला केवळ ५० ते ६० रुपये मिळतात. असे असतांना इतक्या मोठ्या प्रमाणात आलेली देयके भरायची कशी, असा प्रश्‍न त्यांच्या समोर आहे. त्यांनी महापौर राजेंद्र देवळेकर यांना अडचणी सांगितल्या आहे. येत्या ५ दिवसांत हा थकीत मालमत्ता कर न भरल्यास संबंधित घरांचा लिलाव करून त्याद्वारे हे पैसे वसूल करण्यात येतील, असेही महापालिकेने नोटिसीद्वारे म्हटले आहे.

स्वत: निर्णय घेणारा सक्षम नगराध्यक्ष हवा कि बाहुला नगराध्यक्ष हे जनताच ठरवेल - शिवेंद्रसिंहराजे भोसले

     सातारा, २० नोव्हेंबर (वार्ता.) - नगरपालिकेला स्वत:चा निर्णय स्वत: घेणारा सक्षम नगराध्यक्ष मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे सक्षम नगराध्यक्ष हवा कि बाहुला नगराध्यक्ष हवा, हे जनताच ठरवेल, असे प्रतिपादन नगर विकास आघाडीचे नेते आमदार श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले. करंजे येथील एका कोपरा सभेत ते बोलत होते.
   ते पुढे म्हणाले की, नगरविकास आघाडीच्या माध्यमातून सातारा शहरात विकासकामे झाली. आतापर्यंत जनतेची कामे करत आलो आहोत. जनता यापुढेही देणार असलेले दायित्व पार पाडण्यासाठी नगर विकास आघाडी कटीबद्ध आहे. जनतेच्या विश्‍वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही.

केंद्रीय अन्वेषण यंत्रणेकडून वेळकाढूपणा ! - डॉ. हमीद दाभोलकर

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचे प्रकरण 
      पुणे, २० नोव्हेंबर (वार्ता.) - केंद्रीय अन्वेषण यंत्रणेकडून डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचे अन्वेषण करण्यात दिरंगाई का केली जात आहे ? स्कॉटलंड यार्डला पाठवलेल्या गोळ्यांचा अहवाल येण्यासही विलंब लागत आहे. अन्वेषण करतांना वेळकाढूपणाचे काम केले जात आहे, असा आरोप अंनिसचे डॉ. हमीद दाभोलकर यांनी केला. २० नोव्हेंबर या दिवशी येथील विठ्ठल रामजी शिंदे पुलावर करण्यात आलेल्या आंदोलनाच्या वेळी ते बोलत होते. (आतापर्यंत सनातनवर पूर्वग्रहातून मनमानी आरोप करून डॉ. दाभोलकर यांच्या हत्येचे अन्वेषण भरकटवण्यास अंनिसने साहाय्य केले. प्रारंभीपासूनच त्यांनी यंत्रणांची दिशाभूल करून सनातनवर चिखलफेक केली. सनातन संस्थेने कोणताही गुन्हा केलेला नसतांना केवळ त्या दृष्टीनेच अन्वेषण झाल्याने खर्‍या मारेकर्‍यांपर्यंत पोेचण्यात अपयश आले आहे. विवेकाची भाषा बोलणारे अंनिसवाले हे सत्य स्वीकारण्याचे धाडस दाखवतील का ? - संपादक) श्री. सारंग अकोलकर आणि श्री. विनय पवार यांना फरार म्हणून घोषित करावे, अशी मागणीही त्यांनी केली.

कोल्ड प्ले कार्यक्रमात विदेशी गायकाकडून राष्ट्रध्वजाचा अवमान

  • याविषयी राज्य सरकार कोणती कारवाई करणार ?
  • कलाकारावर कारवाईची विरोधकांची मागणी
     मुंबई, २० नोव्हेंबर - येथील ग्लोबल सिटिझनसंस्थेच्या वतीने आयोजित कोल्ड प्ले या प्रसिद्ध बॅण्ड कार्यक्रमात ख्रिस मार्टिन नामक विदेशी गायकाने राष्ट्र्रध्वजाचा अवमान केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. त्यामुळे मार्टिन याच्यावर सरकारने कठोर कारवाई करावी, अशी मागणी मलिक आणि अन्य पक्षांनी केली आहे. 
१. ख्रिस मार्टिन या गायकाने कला सादर करताना आपल्या पॅन्टच्या मागील खिशामध्ये राष्ट्रध्वज खोचून नृत्य केले. ख्रिस मार्टिनची तशी छायाचित्रे सामाजिक संकेतस्थळावर व्हायरल झाली आहेत. (असा अपप्रकार होत असतांना त्याला कोणीही आक्षेप न घेणे, हे लज्जास्पद ! यासाठी समाजात राष्ट्रभक्तीपर शिकवण देणे आवश्यक आहे. - संपादक)
२. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले आहे की, राष्ट्रध्वजाचा अवमान खपवून घेतला जाणार नाही. सरकारने कायद्यानुसार त्या कलाकारावर कारवाई करावी. 

ख्रिस्ती मिशनरीकडून पत्रकाच्या माध्यमातून धर्मांतराचा प्रयत्न

वाढते धर्मांतर रोखण्यासाठी हिंदु राष्ट्र अपरिहार्य आहे !
     डोंबिवली, २० नोव्हेंबर (वार्ता.) - नांदिवली गावात द पेनटाकोस्टल मिशन या ख्रिस्ती मिशनरीकडून प्रसिद्ध केलेल्या एका पत्रकाद्वारे धर्मांतराचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यात बायबलचा आधार घेत गोष्ट रंगवण्यात आली असून त्या कथेप्रमाणे मनुष्याचे जीवन कसे आहे, असा संभ्रम निर्माण करून धर्मांतराचा प्रयत्न केला जात आहे. (धर्मशिक्षण दिल्यासच धर्मांतर रोखणे शक्य होईल ! - संपादक) तसेच तुम्ही येशूसाठी विशेष कसे आहात, येशू कसे प्रेम करतो, तुमच्या उद्धारासाठी येशू मरण पावला आहे का ? तुम्ही शोधत असलेली शांती, आनंद देण्यासाठी आम्ही आहोत. तुम्ही येशूकडे येऊ शकता, त्याचे बालक बनू शकता, तुमचे जीवन येशूला सोपवा, असे सांगण्यात आले आहे. पत्रकात पत्ता देऊन संबंधित स्थळी प्रार्थनेसाठी येण्याविषयीचे आवाहन करण्यात आले आहे.

ग्रामदैवत सिद्धेश्‍वराला श्रीफळ अर्पण करून आणि श्री रूपाभवानीदेवीची ओटी भरून सभेच्या प्रसारास शुभारंभ

सोलापूर येथे ४ डिसेंबरला हिंदु धर्मजागृती सभा 
ग्रामदैवत सिद्धेश्‍वराला हार आणि
श्रीफळ अर्पण करतांना कार्यकर्ते
     सोलापूर, २० नोव्हेंबर (वार्ता.) - येथे हिंदु जनजागृती समिती आणि समस्त हिंदु धर्मप्रेमी यांच्या वतीने धर्मरक्षण आणि हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी ४ डिसेंबर २०१६ या दिवशी हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर सायंकाळी ५.३० वाजता हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सभेच्या प्रसारासाठी देवतांचे आशीर्वाद मिळावेत; म्हणून समितीच्या वतीने नुकतेच येथील ग्रामदैवत सिद्धेश्‍वराला हार आणि श्रीफळ अर्पण करण्यात आले, तसेच श्री रूपाभवानीदेवीची ओटी भरण्यात आली. त्यानंतर सभेच्या प्रसारास उत्साहाने प्रारंभ केला. 
     या वेळी पद्मशाली समाजाचे सत्यनारायण गुर्रम, माजी नगरसेवक बापू ढगे, आजोबा गणपती ट्रस्टचे गंगाधर गवसने, शिवसेना विभागप्रमुख संजय साळुंखे, समितीचे कार्यकर्ते आणि रणरागिणी शाखेच्या कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

सावरकरबंधूंच्या इतकेच त्यांच्या वीरपत्नींनी केलेले कार्य प्रभावी ! - प्रा. अशोक मोडक

सावरकरबंधूंच्या वीरपत्नींचा स्मृतीदिन
   मुंबई, २० नोव्हेंबर (वार्ता.) - भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासाची पाने चाळता सावरकरबंधूंचे योगदान जितके प्रभावीपणे आढळून येईल, तितक्याच प्रभावीपणे त्यांच्या वीरपत्नींनी देशासाठी केलेले कार्य प्रभावी आहे, असे प्रतिपादन वीर सावरकर - विवेकानंदांचे वारसदार या ग्रंथाचे लेखक प्रा. अशोक मोडक यांनी केले. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि नंदादीप समिती यांच्या वतीने २० नोव्हेंबर या दिवशी सावरकरबंधूंच्या वीरपत्नी कै. येसूवाहिनी सावरकर, माई तथा कै. यमुनाबाई सावरकर आणि कै. शांताबाई सावरकर यांचा एकत्रित स्मृतीदिन स्मारकाच्या मादाम कामा सभागृहात साजरा करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष श्री. अरुण जोशी यांसह सावरकरप्रेमी उपस्थित होते.

नोटाबंदीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला धोका पोहोचवणारी समांतर अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली ! - सुधीर मुनगंटीवार, वित्तमंत्री

   मुंबई, २० नोव्हेंबर (वार्ता.) - नोटाबंदीमुळे विषमतायुक्त भारताचे स्वप्न साकार होण्यास साहाय्य होईल. चलनातील पाचशे आणि सहस्र रुपयांच्या नोटांचा वापर कायदेशीररित्या बंद केल्याने देशाच्या अर्थव्यवस्थेला धोका पोहोचवणारी समांतर अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे, असे प्रतिपादन वित्तमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या सह्याद्री वाहिनीवरून प्रसारित झालेल्या जय महाराष्ट्र या कार्यक्रमात ते बोलत होते.
   या वेळी श्री. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, देशातील सामाजिक विषमतेची दरी थांबवणे, भारतीय अर्थव्यवस्थेला शिस्त लावणे आणि व्यवहारात पारदर्शकता आणणे नितांत आवश्यक होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा धाडसी निर्णय घेऊन अर्थक्रांतीचे महत्त्वाचे पाऊल टाकले. यामुळे देशाची आर्थिक प्रकृती सुधारण्यास नक्कीच साहाय्य होईल. यातून प्रामाणिकतेला प्रोत्साहन मिळेल.

३ वर्षांपासून फरार असलेला संशयित आणि अपक्ष उमेदवार याला पोलिसांकडून अटक

फरार संशयित गुन्हेगाराने अपक्ष उमेदवार म्हणून
निवडणूक लढवणे ही लोकशाहीची निरर्थकता !
   सातारा, २० नोव्हेंबर (वार्ता.) - राजापूर (जिल्हा रत्नागिरी) येथे व्यवसायाची भुरळ पाडून अनेकांना लक्षावधी रुपयांचा गंडा घालणारा संशयित आरोपी नितीन ज्ञानेश्‍वर पिसाळ (पाटील) याला राजापूर पोलिसांनी अटक केली आहे. गेली तीन वर्षे हा संशयित आरोपी फरार होता. पाटण (जिल्हा सातारा) येथील नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये आरोपी नितीन पिसाळ हा अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात होता.

आळंदीत आजपासून ज्ञानेश्‍वर माऊलींचा संजीवन समाधी सोहळा

        आळंदी (जिल्हा पुणे), २० नोव्हेंबर - २१ नोव्हेंबरपासून संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराजांच्या ७२० व्या संजीवन समाधी सोहळ्याला प्रारंभ होत आहे. श्री गुरु हैबतबाबा यांच्या विधिवत् पायरीपूजनाने सोहळ्यास प्रारंभ होईल. २९ नोव्हेंबरपर्यंत हा सोहळा चालणार आहे. येथे होणार्‍या कार्तिकी यात्रेस राज्यभरातून सहस्रो भाविक येतात. त्या दृष्टीने भाविकांसाठी व्यवस्था करण्यात आल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. याच जोडीला पोलिसांचा बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.

वारजे (पुणे) येथील क्रिकेट स्टेडियमच्या निधीचा विद्युत व्यवस्थेसाठी परस्पर व्यय !

पुणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार !
    पुणे, २० नोव्हेंबर - वारजे येथील क्रिकेट स्टेडियमच्या कामासाठीचा निधी परस्पर विद्युत व्यवस्थेसाठी व्यय केला गेला आहे. त्यासाठी स्थायी समितीची मान्यता न घेताच ठेकेदाराला त्याच्या देयकाचे पैसे देण्यात आले. यासंबंधी मुख्यमंत्री कार्यालयाने पालिकेकडून खुलासा मागवला आहे.
१. वारजे येथे क्रिकेट स्टेडियम बांधण्यासाठी ६ मासांपूर्वी १ कोटी ९० लक्ष रुपयांचे वर्गीकरण, तर विद्युत व्यवस्थेसाठी २ कोटी ६० लक्ष रुपयांचे निविदा काढण्यात आली.
२. मार्चच्या अखेरच्या २ दिवसांत ठेकेदाराला वर्क ऑर्डर देऊन २ दिवसांत साहित्य पालिकेत पोहोचले आणि संबंधित ठेकेदाराला तातडीने ९० लक्ष रुपये देण्यात आले.

पंतप्रधान मोदी यांनी घेतलेला निर्णय धाडसी ! - ज्येष्ठ अर्थतज्ञ जोशी

        सातारा, २० नोव्हेंबर (वार्ता.) - ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या नोटा चलनातून बाद करणे हा पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी घेतलेला अत्यंत धाडसी निर्णय आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ अर्थतज्ञ पी.एन्. जोशी यांनी केले. नोटा रहित करण्याच्या निर्णयाविषयी पाठक सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रात ते बोलत होते. 
        या वेळी व्यासपिठावर ज्येष्ठ करसल्लागार श्री. अरुण गोडबोले, बँक ऑफ महाराष्ट्रचे विभागीय प्रबंधक श्री. अहिलाजी थोरात आदी मान्यवर उपस्थित होते. 
        श्री. जोशी म्हणाले की, देशातील चलनामध्ये एकूण ८६ प्रतिशत ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या नोटा होत्या. भारत सरकारच्या निर्णयामुळे सामान्य नागरिकांना थोडा त्रास सहन करावा लागेल; मात्र देशातील अगणित काळा पैसा यामुळे चलनातून बोहर फेकला जाणार आहे. हा पैसा आतंकवादी कारवायांसाठी वापरला जात होता. आता या निर्णयामुळे आतंकवादी कृत्यांना आळा बसण्यास साहाय्यच होणार आहे. (त्याचसमवेत नोटाबंदीच्या निर्णयामुळे सामान्य नागरिकांना होत असलेल्या त्रासाविषयी काय उपाययोजना करू शकतो, हे कळणेही आवश्यक आहे. - संपादक)

इचलकरंजी येथील अवैध धंदे बंद करावेत ! - रिपब्लिकन पक्षाची मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी

    इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर), २० नोव्हेंबर (वार्ता.) - येथे अवैध मद्य विक्री, मटका, कार्यकर्त्यांमध्ये मारामारी, दगडफेक आणि हत्या यांसारख्या गंभीर प्रकारच्या घटना घडत आहेत. शहरात कुख्यात गुंड वावरत असल्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. सामान्य नागरिकांना जीव मुठीत धरून वावरावे लागत आहे. यासाठी शहरातील अवैध धंदे बंद करण्यात यावेत, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे शहराध्यक्ष श्री. श्रीनिवास कांबळे यांनी १६ नोव्हेंबर या दिवशी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. 
     निवेदनात म्हटले आहे की, इचलकरंजी नगरपालिकेच्या मालकीचे पशूवधगृह कायमस्वरूपी बंद करावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल. प्रशासनाने या प्रकरणांत त्वरित गांभीर्याने लक्ष घालून पशूवधगृह आणि अवैध दुकाने चालवणार्‍यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.निपाणी बसस्थानकाला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्यास नगरपालिकेची संमती !

राष्ट्रप्रेमी नागरिकांच्या इच्छेची पूर्तता करणार्‍या 
निपाणी नगरपालिकेचा आदर्श सर्वत्रच्या नगरपालिकांनी घ्यावा !
     निपाणी (जिल्हा बेळगाव), २० नोव्हेंबर (वार्ता.) - येथील नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत हायटेक बसस्थानकाचे धर्मवीर छत्रपती संभाजीराजे बसस्थानक असे नामकरण करण्याचा प्रस्ताव सर्वानुमते संमत करण्यात आला. या ऐतिहासिक निर्णयाने निपाणी नगरपालिकेकडून धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांचा यथोचित सन्मान झाल्याची चर्चा होत आहे. प्रस्ताव संमतीमुळे पालिकेचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे. 
    हिंदवी स्वराज्य स्थापनेत छत्रपती शिवाजी महाराजांसमवेत बलीदान देणार्‍या आणि गरीब जनतेला सुलतानी त्रासातून मुक्त करणार्‍या छत्रपती संभाजी महाराज यांनी निपाणी, बेळगाव आणि येळ्ळूर येथे वास्तव्य केल्याचे पुरावे आहेत. त्यामुळे या धर्मवीराचे नाव हायटेक बसस्थानकास द्यावे, अशी नागरिकांची इच्छा होती. त्यानुसार सभापती श्री. संजय सांगावकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने परिवहन मंत्र्यांना निवेदन दिले होते. खासदार श्री. प्रकाश हुक्केरी आणि परिवहनमंत्री श्री. रामलिंगा रेड्डी यांनी हा विषय नगरपालिकेच्या अखत्यारितील असून त्याविषयीचा प्रस्ताव नगरपालिकेत संमत करून घेण्याची सूचना केली होती.

मराठा समाजाच्या मागण्यांवर भूमिका स्पष्ट न केल्यास येत्या निवडणुकांमध्ये त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील !

मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांची चेतावणी 
     मुंबई - राज्यभर मराठा समाजाने लक्षावधींच्या संख्येने मोर्चे काढून आपल्या मागण्या शांततेने मांडल्या आहेत. राज्याच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी सर्व राजकीय पक्षांनी मराठा समाजाच्या मागण्यांवर आपली भूमिका स्पष्ट करावी. अन्यथा येणार्‍या निवडणुकांमध्ये त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी चेतावणी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रविंद्र काळे-पाटील आणि अशोक वाघ यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे. 
प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की,
१. राज्यात मराठा समाजाने अनेक मोर्चांद्वारे सनदशीर मार्गाने आपला आक्रोश रस्त्यावर येऊन व्यक्त केला; परंतु राज्य सरकार त्याची नोंद घेण्यास सिद्ध नाही. मराठा समाजाच्या मागण्यांवर सरकार वेळकाढू धोरण अवलंबत आहे. त्यावर आम्हाला योग्य ती भूमिका ठरवावी लागेल.

शिवसेनेचे नगरसेवक अभिजीत चव्हाण यांच्याकडून महापालिका घरपट्टी अधिकार्‍याला मारहाण !

अनधिकृत बांधकामाच्या ठिकाणी घरपट्टी आकारल्याचे प्रकरण
     कोल्हापूर, २० नोव्हेंबर (वार्ता.) - अनधिकृतपणे बांधलेल्या अमर पाटील यांच्या नावाने असणार्‍या विनापरवाना दालनाला (केबिनला) घरपट्टी आकारणी केल्याच्या रागातून शिवसेना नगरसेवक अभिजीत चव्हाण आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या घरपट्टी विभागातील साहाय्यक अधीक्षक विशाल सुगते यांना मारहाण केली. १७ नोव्हेंबर या दिवशी गांधी मैदान विभागीय कार्यालयात सकाळी १०.३० वाजता ही घटना घडली. संतप्त कर्मचारी आणि अधिकारी यांनी मारहाणीच्या निषेधार्थ काम बंद आंदोलन केले. याप्रकरणी चव्हाण यांच्यावर गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. नगरसेवक चव्हाण यांना अटक न केल्यास तीव्र आंदोलन करण्याची चेतावणी कर्मचारी संघाने दिली आहे.

हुतात्मा सहकारी अधिकोषाचे १ कोटी जप्त !

      कोल्हापूर - भादोले-पेठवडगाव रस्त्यावर जागतेश्‍वर पेट्रोल पंपासमोर येथील पोलिसांनी १९ नोव्हेंबरला केलेल्या नाकाबंदीमध्ये एका मोटारीत १ कोटी रुपयांची रोकड आढळली. पाचशे आणि सहस्र रुपयांची ही रोकड हुतात्मा सहकारी अधिकोषाची असल्याचे समजते. प्राप्तीकर विभागाचे अधिकारी रात्री उशिरापर्यंत या रकमेची पडताळणी करत होते. 

महाराष्ट्र सदनसह अन्य आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी तपास अहवाल सादर करा !

मुंबई उच्च न्यायालयाचे अंमलबजावणी संचालनालयाला आदेश
    मुंबई, २० नोव्हेंबर - महाराष्ट्र सदनसह अन्य आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी सध्या अटकेत असलेले माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, अन्य आरोपी आणि तपास यांच्याविषयी अहवाल सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने अंमलबजावणी संचालनालयाला दिले आहेत.
    भुजबळ यांनी पदाचा दुरुपयोग करून आर्थिक गैरव्यवहार केला आहे, त्यासाठी त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना कोट्यवधींची लाच देण्यात आली आहे, असा आरोप करत आम आदमी पक्षाने त्यांच्या चौकशीची मागणी करणारी जनहित याचिका प्रविष्ट केली होती. त्या याचिकेच्या १७ नोव्हेंबर या दिवशी झालेल्या सुनावणीच्या वेळी मुख्य न्यायमूर्ती मंजुला चेल्लूर आणि न्यायमूर्ती एम्.एस्. सोनाक यांच्या खंडपिठाने हे आदेश दिले.

महानगरपालिका आणि नगरपालिका यांच्या तिजोरीत ९१४ कोटींची भर !

२४ नोव्हेंबरपर्यंत जुन्या 
चलनाने करस्वीकृती चालू !
     मुंबई - एक सहस्र आणि पाचशे रुपये मूल्यांच्या नोटा व्यवहारातून रहित झाल्याच्या निर्णयानंतर महानगरपालिका आणि नगरपालिका यांच्या तिजोरीत विविध करांपोटी ९१४ कोटी ३५ लाख रुपयांची भर पडल्याची माहिती नगरविकास विभागाने दिली आहे. सर्वाधिक कर बृहन्मुंबई महानगरपालिकेत जमा झाला असूनही तो २६६ कोटी ९५ लाख रुपये इतका आहे.

मुंबईतील महाविद्यालयांमध्ये जंक फूडवरील बंदीची कार्यवाही चालू !

      मुंबई, २० नोव्हेंबर - विद्यापीठ अनुदान आयोगाने दिलेल्या आदेशानुसार येथील महाविद्यालयांमध्ये पिझ्झा, बर्गर आदी जंक फूडवर बंदीची कार्यवाही चालू झाली आहे. अनेक महाविद्यालयांनी आपल्या उपहारगृहांमध्ये ते पदार्थ, तसेच शीतपेये ठेवण्यावर बंदी घातली आहे. उपहारगृहात उपलब्ध पदार्थांमधील कॅलरीजच्या प्रमाणाची माहितीही विद्यार्थ्यांना फलकाद्वारे दिली जात आहे.
       करिअर इंडियाच्या अहवालानुसार मुंबईतील महाविद्यालयांनी उपहारगृहांमध्ये शीतपेय विकण्यास मज्जाव केला असून तळलेले आणि भाजलेले पदार्थ ठेवले आहेत. माटुंगा येथील एस्आय्ईएस् महाविद्यालयाने आयोगाचे निर्देश गांभीर्याने घेतले आहेत. त्यासंबंधी प्राचार्या उमा शंकर यांच्या अध्यक्षतेखाली महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाची नुकतीच बैठक झाली असून त्यात हा निर्णय घेण्यात आला. विलेपार्ले येथील मिठीबाई महाविद्यालयाने विद्यार्थ्यांमध्ये जंक फूडच्या दुष्परिणामांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी कार्यक्रमाच्या आयोजनाचा निर्णय घेतला आहे. (आयोगाच्या सूचनेनुसार महाविद्यालयात जंक फूडवर बंदी घालणार्‍या उपरोक्त दोन्ही महाविद्यालयांचे अभिनंदन ! - संपादक)

प्रवाहाबाहेरील विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण होणार ! - विनोद तावडे, शिक्षणमंत्री

     संभाजीनगर, २० नोव्हेंबर - १० वीनंतर २ लक्षहून अधिक विद्यार्थी शिक्षण प्रवाहातून बाहेर फेकले जातात. ही गळती आहे कि इच्छेने शिक्षण सोडणारेही त्यामध्ये आहेत, याचे सर्वेक्षण करण्याची आवश्यकता आहे. पुढील ३ वर्षे असे सर्वेक्षण शिक्षण विभागाच्या वतीने हाती घेतले जाईल, असे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सांगितले. येथील विज्ञानविर्धिनी हायस्कूलच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते पत्रकारांशी बोलत होते.
    तावडे पुढे म्हणाले की, शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडणारी ही मुले शिक्षणाची संधी नाही, म्हणून शिकली नाहीत, असे नाही. १० वीतून उत्तीर्ण झालेले आणि ११ वीमध्ये महाविद्यालयात प्रवेश घेणार्‍यांच्या संख्येवर सातत्याने ३ वर्षे लक्ष ठेवले, तरच निष्कर्ष काढणे योग्य ठरेल. १० वीनंतर अनेक जण रोजगार आणि शेतीमध्ये जातात. त्यामुळे त्यांची गळती झाली आहे, असे म्हणता येणार नाही.

साहित्यातून आदर्श राष्ट्र आणि समाज घडू शकतो ! - नितीन गडकरी

     पुणे, २० नोव्हेंबर (वार्ता.) - लोकांपर्यंत योग्य विचार पोचवण्यासाठी साहित्य महत्त्वाचे ठरते. साहित्यामध्ये सत्तेला नष्ट करण्याची शक्ती असते. भविष्याला दिशा देऊन ते समृद्ध करण्याचे कार्य साहित्य करते. साहित्य, संस्कृती आणि ऐतिहासिक वारसा यांमुळे मूल्याधिष्ठित समाज घडून आदर्श राष्ट्र आणि समाज घडू शकतो, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले. सरहद या संस्थेच्या वतीने येथील गणेश कला क्रीडा मंच येथे पहिले विश्‍व पंजाबी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. त्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. 
     या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी केंद्रीय कृषीमंत्री खासदार शरद पवार, पालकमंत्री गिरीश बापट, महापौर प्रशांत जगताप, सरहदचे अध्यक्ष संजय नहार, विश्‍व पंजाबी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सुरजीत पातर, अभिनेते धर्मेंद्र, माजी पोलीस महासंचालक एस.एस. वीर्क यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.
     या वेळी अभिनेते धर्मेंद्र यांच्यासह उज्ज्वल डोसांझ, डॉ. ओबेरॉय, डॉ. त्रिलोचनसिंग, राजीई शिंदे, डॉ. केवल धीर यांना विश्‍व पंजाबी गौरव पुरस्कार देण्यात आला. या प्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, साहित्याला भाषेचे बंधन असू नये. पंजाबी साहित्याने समाजाला चिरंतन विचार दिला आहे.

तत्कालीन शासनाने राजकीय स्वार्थापोटी समान नागरी कायदा करण्याचे टाळले ! - ज्येष्ठ विधीज्ञ गणेश सोवनी

     मुंबई, २० नोव्हेंबर (वार्ता.) - प्रत्येकाला राष्ट्रीय प्रवाहात आणण्यासाठी समान नागरी कायदा अत्यावश्यक आहे. घटनेत प्रावधान असतांनाही तत्कालीन शासनाने केवळ राजकीय स्वार्थापोटी हा कायदा करण्याचे टाळले, असा आरोप ज्येष्ठ विधीज्ञ अधिवक्ता गणेश सोवनी यांनी केला. १७ नोव्हेंबरला दादर येथे रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या वतीने आयोजित समान नागरी कायदा - काळजी गरज या विषयावर व्याख्यान देतांना ते बोलत होते. 
     या वेळी अधिवक्ता सोवनी यांनी समान कायदा न होण्यामागील स्वातंत्र्यापासून आतापर्यंतची स्थिती व्याख्यानातून मांडली.
      या वेळी अधिवक्ता गणेश सोवनी म्हणाले, जगातील २२ इस्लामी राष्ट्रांमध्ये तीन तलाक पद्धतीवर बंदी असतांना भारतात का नाही ? फौजदारी खटल्यांत शरियतची पाठराखण करणारे अल्पसंख्यांक दिवाणी खटल्यांमध्ये मात्र शरियतचा अवलंब नाकारतात.

वाहतूक नियमांचे २० वेळा उल्लंघन केल्यास वाहन अनुज्ञप्ती (परवाना) कायमची रहित ! - गृह विभाग

     मुंबई - वाहतूक नियमनात ई-चलन प्रणाली अस्तित्वात आली असून वाहनचालकाने किती वेळा नियम तोडला, त्याचा तपशील उपलब्ध असेल. वाहतूक नियम १० वेळा मोडल्यास २ मास, तर २० वेळा उल्लंघन केल्यास चालकाची वाहन अनुज्ञप्ती कायमची रहित करण्यात येणार आहे, अशी माहिती गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव के.पी. बक्षी यांनी १८ नोव्हेंबर या दिवशी दिली. (पहिल्या उल्लंघनापासूनच कठोर दंडाची कारवाई का करत नाही ? - संपादक)

सांगली येथे धर्मांध दुचाकीस्वाराकडून १९ लक्ष रुपये शासनाधीन

     सांगली, २० नोव्हेंबर (वार्ता.) - दुचाकीवरून अनधिकृतरित्या १९ लक्ष रुपये रोख रक्कम घेऊन जाणारा धर्मांध हाफिज शेख या दुचाकीस्वाराला पोलिसांनी १९ नोव्हेंबर या दिवशी अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडून १९ लक्ष रुपयांची रक्कम शासनाधीन केली. हाफिज हा दुचाकीवरून १९ लक्ष रुपये घेऊन जात असल्याची कुणकुण पोलिसांना मिळाली होती. यानुसार त्यांनी ही कारवाई केली. या रकमेविषयची अधिक चौकशी चालू आहे.

खड्ड्यांतून मुक्ती (?)

     खड्ड्यांत रस्ते कि रस्त्यात खड्डे, खड्डेमुक्त महाराष्ट्र, खड्ड्यांच्या देशा अशा प्रकारे विविध शब्दप्रयोग खड्ड्यांच्या अनुषंगाने केले जातात आणि काही वेळा खड्ड्यांचा विषय हसण्यावारीही नेला जातो; पण या संदर्भात गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. रस्त्यावरून ये-जा करणार्‍यांच्या मनात प्रत्येक वेळी हे खड्डे खरोखर बुजवले जातील का, हा प्रश्‍न असतो; पण त्याचे उत्तर होकारार्थी कधीच नसते; कारण ना त्याकडे प्रशासन लक्ष देते, ना शासन त्यातील संबंधितांवर कारवाई करते. येथे आवर्जून एक उदाहरण नमूद करावेसे वाटते. ते म्हणजे काही दिवसांपूर्वी जपानमध्ये १०० फूट खड्डा पडला होता. त्या खड्ड्यामुळे नागरिकांना असुविधा होत होती, तसेच त्याखालील पाईपलाईनही नादुरुस्त झाली होती. खड्ड्यामुळे तेथील वाहतूकही कोलमडली होती. इतक्या भल्या मोठ्या खड्ड्याची नोंद जपान शासनाने त्वरित घेतली आणि केवळ ७ दिवसांत १०० फुटांचा खड्डा बुजवला. त्यासाठी तेथील कामगार दिवसरात्र कार्यरत होते. खड्डा बुजवल्यावर तेथील महापौरांनी जनतेची गैरसोय झाल्यामुळे क्षमाही मागितली. खरोखर जपानचे हे उदाहरण आदर्शवतच आहे. महाराष्ट्र सरकारनेही यातून काही बोध घ्यावा, ही सर्वच नागरिकांची कळकळीची मागणी आहे !

भारताच्या युगायुगांच्या इतिहासात ज्यांना अकबर श्रेष्ठ वाटला, त्यांना हिंदु राष्ट्रात कारागृहात आजन्म भारताचा इतिहास अभ्यासण्याची शिक्षा देण्यात येईल !

  देशातील विविध रेल्वेस्थानकांच्या भिंतींवर रामायणातील प्रसंग आणि मोगल बादशहा अकबर याच्या कथित पराक्रमाचे प्रसंग यांची चित्रे लावण्यात येणार आहेत. रेल्वे प्रशासनाने देशातील ४०० हून अधिक रेल्वेस्थानकांच्या आधुनिकीकरणाची योजना आखली आहे. यात स्थानकांचे सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. त्याअंतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे.

सद्गुरु (श्री.) राजेंद्र शिंदे आणि रामनाथी आश्रमातील त्यांची कन्या कु. वैदेही शिंदे यांच्यामध्ये तिच्या वाढदिवसाच्या दिवशी काव्य स्वरूपात झालेले संभाषण !

सद्गुरु (श्री.) राजेंद्र शिंदे
    सनातनच्या रामनाथी आश्रमात सेवा करणारी कु. वैदेही शिंदे हिचा आज कार्तिक कृष्ण पक्ष अष्टमी (२१.११.२०१६) वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने तिचे वडील सद्गुरु (श्री.) राजेंद्र शिंदे यांनी गेल्या वर्षीच्या वाढदिवसाला पाठवलेला शुभेच्छापर लघुसंदेश आणि कु. वैदेहीने कृतज्ञता म्हणून त्यांना पाठवलेली कविता येथे देत आहोत. 
कु. वैदेही शिंदे यांना वाढदिवसानिमित्त 
सनातन परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा !
    ती. बाबांनी (सद्गुरु (श्री.) राजेंद्र शिंदे यांनी) माझ्या वाढदिवसाला पुढील कवितेच्या ओळींचा लघुसंदेश (SMS) पाठवला.
कु. वैदेही राजेंद्र शिंदे
कार्तिक कृष्ण अष्टमीला ।
जन्मली एक मुलगी ॥ १ ॥
त्या सुंदर बालिकेचे नाव ।
ठेविले वैदेही ॥ २ ॥
सोडून शिक्षण अर्ध्यावरी ।
गेली ती रामनाथी आश्रमी ॥ ३ ॥
मोक्षप्राप्ती करण्या ।
झाली ती कृष्णवेडी ॥ ४ ॥
     त्या वेळी मला पुष्कळ आनंद झाला. बाबा आणि प.पू. डॉक्टर यांच्या चरणी पुष्कळ कृतज्ञता वाटली. तेव्हा पुढील कवितेच्या ओळी देवाने सुचवल्या.

मग काँग्रेसच्या भूलथापांना बळी पडायचे का ?

   देहली प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष अजय माकन यांनी देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना देहलीच्या विकासाला अनुसरून चर्चेचे खुले आव्हान दिले आहे. गोव्यात कुठेही आणि कधीही याविषयी चर्चा करण्यास सिद्ध असल्याचे अजय माकन यांनी म्हटले आहे. देहलीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या भूलथापांना बळी पडू नका, असे आवाहनही अजय माकन यांनी येथील काँग्रेस हाऊस येथे पत्रकारांशी बोलतांना केले आहे.

धनत्रयोदशीच्या शुभमुहूर्तावर रामनाथी आश्रमात झालेल्या धन्वंतरी यागाचे केलेले सूक्ष्म-परीक्षण

कु. मधुरा भोसले
       २८.१०.२०१६ या दिवशी सकाळी १०.३० ते दुपारी ३.३० या कालावधीत सनातनच्या रामनाथी आश्रमात धनत्रयोदशीच्या शुभमुहूर्तावर सनातनच्या साधक-पुरोहितांनी धन्वंतरी याग केला. या यागाचे कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म-परीक्षण येथे देत आहोत.
       बुद्धीप्रामाण्यवादी यज्ञाला विरोध करतात. त्यांच्यात यज्ञाचे शास्त्र जाणून घेण्याची जिज्ञासाही नसते. यज्ञात जे तूप इत्यादी आहुती म्हणून देतात, ते गरिबांना द्यावे, असा प्रचार ते करतात. त्यांच्या प्रचारामुळे समाजात यज्ञाविषयी गैरसमज निर्माण होतात. जिज्ञासूंच्या मनात यज्ञाविषयी गैरसमज निर्माण होऊ नयेत, यासाठी हा लेख महत्त्वाचा आहे. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

भाव आणि तळमळ वाढवूनी । अहंला घालूया लक्ष्मणरेषा ॥

      एके दिवशी मी अहं-निर्मूलनाच्या सारणीत चुका लिहीत असतांना मनात हा अहं नेमका कसा आहे ?, असा विचार आला. तेव्हा त्याच्यात सतर्कता आणि तत्परता हा गुण आहे अन् तो अतिशय चतुर आहे, असे लक्षात आले. त्या प्रसंगी आपणही सतर्कता आणि तत्परता वाढवून अहंवर मात कशी करू शकतो ?, असा विचार करतांना देवाने पुढील कविता सुचवली.
हा आहे महाचतुर ।
लगेच डोकावतो हळूच मनातून ॥ १ ॥

त्याचक्षणी जाणीव होते काही वेळा ।
काही वेळा उलटून जातात साधनेच्या अमूल्य वेळा ॥ २ ॥

देवाने मनातील भाव असा केला शब्दबद्ध !

     ३०.११.२०१४ या दिवशी सकाळी ध्यानमंदिरात बसल्यावर देवाने कवितेच्या पुढील ओळी लिहून घेतल्या. देवाच्या कृपेमुळे मनातील भाव काव्य रूपात मांडून घेतल्यामुळे देवाप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटली.
देवा हे वेड कसे ?
देवा हे वेड कसे ?
तुझ्या चरणी जाण्याचे हे वेड असे ।
देवा हे वेड कसे ?
भगवंताविना जीवन नसे ।
देवा हे वेड कसे ?
तुझ्याविना कोणीच माझे नसे ।
देवा हे वेड कसे ?
मोक्षप्राप्तीची तळमळ तूच लावलीसे ।

धन्वंतरी यागाच्या वेळी साधक-पुरोहित वरुण कलशातील जलाने साधकांवर प्रोक्षण करत असतांना आलेली अनुभूती

श्री धन्वंतरीदेवता मूर्तीतून साकार झाल्याचे जाणवणे आणि 
श्री धन्वंतरीदेवतेचे रूप स्वतःमध्ये विलीन झाल्याचे जाणवून आनंद होणे 
     वरुण कलशातील जलाने साधक-पुरोहित आमच्यावर प्रोक्षण करत असतांना पूजेत ठेवलेल्या धन्वंतरी देवतेच्या मूर्तीतून श्री धन्वंतरीदेवता साकार होऊन माझ्या दिशेने पुढे एक-एक पाऊल टाकून येत आहे, असे मला जाणवले. तिसर्‍यांदा प्रोक्षण करत असतांना श्री धन्वंतरीदेवतेचे रूप माझ्या हृदयात विलीन झाल्याचे जाणवून मला पुष्कळ आनंद झाला. देवाने आमच्यावर पवित्र जलाचे प्रोक्षण आम्हावर केले, याविषयी माझे कृतज्ञतेने मन भरून आले. - आधुनिक वैद्या (डॉ.) सौ. कस्तुरी भोसले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

स्वतःतील दोषांची जाणीव झाल्याने देवाजवळ व्यक्त केलेले मनोगत आणि प्रार्थना !

श्रीमती वैशाली कुलकर्णी
१. स्वतःच्या मनाने निर्णय घेतल्याने आर्थिक 
हानी होऊन मुला-मुलींची बोलणी खावी लागणे
देवा, या निराधार जिवाला तुझाच आधार मिळाला आणि माझे सर्व प्रश्‍न सुटले. हे श्रीकृष्णा, चाकरी करत असतांना माझ्याकडून एक अक्षम्य चूक झाली. मी चाकरीचे १८ मास (महिने) शिल्लक असतांना त्यागपत्र दिले. तेव्हा मी कुणालाही विचारले नाही कि सांगितले नाही. त्याचा परिणाम मला प्रती मासाला (महिन्याला) १० ते १२ सहस्र रुपये निवृत्तीवेतन मिळायला पाहिजे होते, ते मिळाले नाही. स्वतःच्या मनाने निर्णय घेतल्याने माझी आर्थिक हानी झाली आणि मुला-मुलींकडून बोलणी खावी लागली.

देवा, तुझ्यात होता यावे मज एकरूप ।

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...
परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले
आठवावे देवा 
तव कोमल चरणकमलास ।
रंगुनी जावे 
त्याच भाव स्मरणात ॥ १ ॥

तुझे मधुर रूप या नेत्रांनी पहावे ।
ते पहाता स्वतःला 
विसरूनी जावे ॥ २ ॥

स्वतःच्या नावे मिळालेला प्रसाद सेवाकेंद्रासाठीच आहे, असा समष्टी भाव असणारे मंगळुरू (कर्नाटक) येथील साधक श्री. प्रशांत हरिहर !

श्री. प्रशांत हरिहर
     मंगळुरू येथील सनातन सेवाकेंद्रासाठी रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमातून नेहमी प्रसाद येतो. तेव्हा त्या प्रसादाच्या पाकिटावर मंगळुरूसाठी - श्री. प्रशांत हरिहर असे लिहिलेले असते; पण या वेळी पाकीटावर केवळ माझे नाव लिहिले होते. त्या वेळी माझ्या मनात विचार आला, मला तर प्रसाद कधीच येत नाही, मग आज कसा काय आला ? त्याविषयी रामनाथी आश्रमात विचारल्यावर कळले की, तो प्रसाद सेवाकेंद्रासाठीच आहे. नंतर परत एकदा माझा नावाने प्रसाद आला होता. तेव्हा मनात विचार आला, मी आणि सेवाकेंद्र वेगळे नाही ना ? मी येथे सेवा करतो, तर मी आणि सेवाकेंद्र वेगळे कसे असू शकते ? मग एकट्याने प्रसाद का घ्यायचा ? तेव्हा मी कुठलाही विचार न करता ते पाकीट सेवाकेंद्रातील स्वयंपाकगृहात नेऊन दिले. त्या वेळी माझे मन हलके झाल्याचे मला जाणवले. 
- श्री. प्रशांत हरिहर, मंगळुरू, कर्नाटक. (१३.१०.२०१६)

जिवावर आलेले संकट किरकोळ दुखापतीवर आणून प्रारब्ध अल्प करून प.पू. डॉक्टर साधकांसमवेत सनातन प्रभातच्या वाचकांचीही काळजी घेत असल्याचे अनुभवणारी साप्ताहिक सनातन प्रभातची एक वाचक !

१. आई साधनेत असल्याने सनातन संस्थेविषयी माहिती असणे आणि लग्न झाल्यानंतर आईने सांगितल्यामुळे साप्ताहिक सनातन प्रभातची वर्गणीदार होणे अन् ३ वर्षांचा साप्ताहिकाचा गठ्ठा जमा झाल्यावर तो आईला देण्याचा विचार मनात येणे : माझी आई सौ. विद्या विनय वरणगांवकर ही सनातनची साधिका आहे. त्यामुळे मला लहानपणापासून सनातन संस्थेविषयी माहिती होती. माझ्या लहानपणी मी आईसमवेत बालसंस्कार वर्गाला आणि गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाला जायचे. धर्मजागृती सभेलाही थोडा वेळ जाऊन यायचे. त्यामुळे आपसूकच सनातनवर विश्‍वास आणि प.पू. डॉक्टरांवर श्रद्धा बसली. माझे लग्न झाल्यावर मी पुण्याला स्थायिक झाले. साधकांशी संपर्क करून आईने मला साप्ताहिक सनातन प्रभातचे वर्गणीदार होण्यास सांगितले. त्याचबरोबर मी सनातनची सात्त्विक उत्पादने वापरण्यास आरंभ केला. माझ्या घरी गेल्या ३ वर्षांचा साप्ताहिक सनातन प्रभातचा गठ्ठा होता. तो साप्ताहिकांचा गठ्ठा आईला द्यावा. ती त्याचा योग्य वापर करील, असे मला वाटले.

वेगवेगळ्या वेळी मिळणारे ज्ञान ठराविक वेळेत मिळण्याच्या संदर्भात प्रार्थना केल्यावर ठराविक वेळांत ज्ञान मिळू लागल्याने साधकाला भगवंत दयाळू आणि कृपाळू असल्याची प्रचीती येणे

श्री. राम होनप
      गेल्या ३ - ४ महिन्यांपासून (मासांपासून) मला दिवसभरात वेगवेगळ्या वेळी ईश्‍वरी ज्ञान मिळत होते, उदा. स्नान करतांना, वैयक्तिक आवरतांना, झोपण्यापूर्वी, झोपेतून उठल्यानंतर, चालतांना इत्यादी. हे ज्ञान मी त्या त्या वेळी एका कागदावर थोडक्यात नोंद करून त्याचे सेवेच्या वेळेत संगणकात सविस्तर टंकलेखन करत होतो. या प्रक्रियेत ज्ञानाची कागदावर नोंद करणे आणि त्याचे टंकलेखन करणे, असा माझा दोनदा वेळ जात होता. मी ऑक्टोबर महिन्यात (मासात) एकदा देवाला प्रार्थना केली की, जेव्हा मी संगणकासमोर बसतो, त्या वेळी मला ज्ञान मिळाले, तर त्याचे लिखाण करण्यातील वेळ वाचून मला आणखीन सेवा करता येईल. त्यानंतर मला दिवसभरात वेगवेगळ्या वेळी मिळणारे ज्ञान बंद झाले आणि ठराविक वेळी, म्हणजे जेव्हा मी संगणकासमोर सेवेला बसायचो, त्या वेळी मला ज्ञान मिळण्यास आरंभ झाला.
     या प्रसंगावरून स्वतःहून देव विविध विषयांवर ज्ञान देऊन माझ्यावर कृपा करतो. यावरून तो कृपाळू आहे आणि माझी अडचण समजून घेऊन देवाने ठराविक वेळी ज्ञान देण्यास आरंभ केला यावरून तो दयाळू आहे, हे लक्षात आले. 
- श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (८.११.२०१६)

प.पू. भक्तराज महाराज यांच्या भजनांची आवड असणारी, संत अन् साधक यांच्यामध्ये रमणारी ५१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली अन् उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली वालचंदनगर, पुणे येथील चि. ऋग्वेदी अतुल गोडसे (वय १ वर्ष) !

उच्चलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र 
चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. ऋग्वेदी अतुल गोडसे एक दैवी बालक आहे !
चि. ऋग्वेदी गोडसे
पालकांनो, हे लक्षात घ्या ! 
      तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले 
      यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर यूट्यूबच्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.
      चि. ऋग्वेदी अतुल गोडसे हिचा पहिला वाढदिवस कार्तिक कृष्ण पक्ष पंचमी (१८ नोव्हेंबर २०१६) यादिवशी झाला. त्यानिमित्ताने तिची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.

रामनाथी आश्रमातील खांबांमध्ये देवतांचे अस्तित्व जाणवणे आणि आश्रम तीर्थक्षेत्र झाल्याची जाणीव होऊन कृतज्ञता वाटणे

डॉ. (कु.) आरती तिवारी
१. आश्रमातील खांबांऐवजी देव शरणागत 
भावाने उभे असल्याचे दिसणे आणि ईश्‍वराने ते 
धर्म, अर्थ, काम, मोक्ष अन् पंचमहाभूते असल्याचे सांगणे 
     आश्रमातील पहिल्या माळ्यावरील एका बाजूच्या मार्गिकेत चार खांब आहेत. मार्च २०१६ मध्ये एकदा प्रार्थनेची उद्घोषणा झाल्यावर प्रार्थना करतांना मला त्या चार खांबांऐवजी चार देव शरणागत भावाने नमस्कार करत असल्याचे दिसले. त्या वेळी हे देव कोण असावेत ? असा प्रश्‍न ईश्‍वराला विचारल्यावर ईश्‍वराने ते धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष असल्याचे सांगितले. 
    साधारण चौथ्या आठवड्यात तिसर्‍या माळ्यावरून येत असतांना मार्गिकेतील खांबांऐवजी देव नमस्काराच्या मुद्रेत उभे असलेले दिसले. त्या वेळी ते देव म्हणजे पंचमहाभूते आहेत, असे ईश्‍वराने सांगितले. त्यानंतर काही क्षणांतच आश्रमातील सर्व खांब म्हणजे देवता आहेत आणि देवाच्या आधारावर हा आश्रम उभा आहे, असा ध्वनी ऐकू येऊन भावजागृती झाली.

साधक आणि कार्यकर्ते यांना सूचना

मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम दर्शवणारा मंदिरों पर हो
रहे आघात एवं उनसे रक्षा हा हिंदी भाषेतील लघुपट उपलब्ध !
    सद्य:स्थितीत भारतात सर्वत्रच हिंदूंच्या मोठ्या मंदिरांचे सरकारीकरण झालेले दिसते. सरकारीकरणामुळे मंदिरात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे. तसेच मंदिरांचे आणि तेथील पावित्र्याचे रक्षण होत नसल्याने त्यांवर विविध आघात होत आहेत. या सर्व समस्यांवर प्रकाश टाकणारा मंदिरों पर हो रहे आघात एवं उनसे रक्षा हा हिंदी भाषेतील १५ मिनिटांचा लघुपट हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निर्माण करण्यात आला आहे. या लघुपट पुढील लिंकवर ठेवण्यात आला आहे. साधक आणि कार्यकर्ते या लघुपटाचा उपयोग जनजागृतीसाठी करू शकतात. हा लघुपट डाऊनलोड करण्यात काही अडचण असल्यास श्री. विनयकुमार यांना ८४५०९५०४८८ या क्रमांकावर संपर्क साधावा.
व्हीडीओ लिंक : Mandir_Aghat : https://goo.gl/hPeVTC

बोधचित्र


॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
दुसर्‍याला उमजू न देणे, स्वतःचे स्वतःला न उमजणे,
स्वतःचे दुसर्‍याला उमजू न देणे, ही अवस्था आल्यास
तो जीव ईश्‍वराच्या अगदी निकट आला आहे, असे समजावे.
भावार्थ : दुसर्‍याला उमजू न देणे म्हणजे आपल्यातील शक्ती दुसर्‍याला समजणार नाही, असे वागणे. स्वतःचे स्वतःला न उमजणे म्हणजे अद्वैतात गेल्यावर स्वतःचे स्वतःला उमजण्यासारखे काही उरत नाही; कारण तो स्वतःला विसरूनच गेलेला असतो. स्वतःचे दुसर्‍याला उमजू न देणे म्हणजे आपण स्वतः ब्रह्मस्थितीत आहोत, हे प्रकृतीतील दुसर्‍याला उमजून येत नाही. ही ईश्‍वराची, ब्रह्माची लक्षणे असल्याने तशा स्थितीत जो असेल, तो साहजिकच ईश्‍वराच्या निकट आलेला असतो.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
      आपली ८ - १० वर्षांची मुले आतंकवादी बनण्यासाठी गेली, तर मुसलमानांना त्यांचा अभिमान वाटतो. याउलट साधना करण्यासाठी मुले सनातन संस्थेच्या आश्रमात आली, तर धर्मद्रोही सनातन मुले पळवते, असा ओरडा करतात ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले


योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

सद्गुरूंचे महत्त्व 
परमेश्‍वराशी संपर्क साधण्याएवढी पुण्याई अभावनेच आढळते; 
म्हणूनच सद्गुरु आवश्यक आहेत; मात्र त्यांच्याशी संपूर्णपणे एकनिष्ठ रहावे. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

अध्यात्माला विरोध करणे, हे बुद्धीप्रामाण्यवाद्यांचे प्रतिष्ठा मिळवण्याचे साधन !

     या भरतखंडाच्या राजकीय, सांस्कृतिक आणि बौद्धिक जीवनाचे नियमन करणारा वर्ग विलक्षण ताठरपणे, अभिमानाने नास्तिकवाद आणि पाखंड यांचा उद्घोष करतो आहे. आज भरतखंडाचा जो अभिमान आहे, तो सर्वधर्मसमभाव (secular) आहे, इहवादी आहे. हा जो इहवाद आहे, हा अध्यात्माला (spiritual) सर्वथा नाकारणारा आहे. It is more anti-spiritual than anti-communal in it‘s temper. सामाजिक परिवर्तन हा प्रतिष्ठेचा भाग झाला आहे. 
- गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (संदर्भ : मासिक घनगर्जित, जानेवारी २०१४)

आता झाकीर यांना पकडा !

संपादकीय
    केंद्र सरकारने तथाकथित मुसलमान विचारवंत डॉ. झाकीर नाईक यांच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनवर बंदी घालून त्यांच्या मुंबईतील १० कार्यालयांना सील ठोकले. पोलिसांना येथून काही कागदपत्रे आणि रोख रक्कम सापडली. झाकीर यांच्यावर झालेल्या या कारवाईला तसे म्हटल्यास उशीरच झाला आहे. ती खूप वर्षांपूर्वीच व्हायला हवी होती. बांगलादेशातील ढाका येथील एका बेकरीवर जुलै महिन्यात झालेल्या आक्रमणामधील आतंकवाद्याच्या फेसबूकवरील पानावर झाकीर यांच्या भाषणामुळे मी प्रेरित झालो, असे लिहिले होते. यावरून झाकीर यांचा आतंकवाद्यांशी असलेला संदर्भ समोर आला.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn