Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

सनातन प्रभातच्या रत्नागिरी आवृत्तीचा आज सतरावा वर्धापनदिन
आयकर खात्याची अयोध्येतील मंदिरांना अर्पणाची माहिती सादर करण्यासाठी नोटीस !

आयकर खाते चर्च आणि दर्गे यांच्याकडून कधी माहिती घेणार ?
      अयोध्या - अयोध्येतील सर्व धार्मिक संस्था आणि मंदिरे यांना ८ नोव्हेंबरपर्यंत देणगीच्या स्वरूपात जमा झालेल्या प्रत्येक रुपयाचा हिशोब द्या, अशी नोटीस आयकर विभागाने पाठवली आहे. नोटा रहित झाल्यानंतर काळा पैसा असणार्‍यांनी मंदिरात तो अर्पण केल्याचे लक्षात आल्यानंतर सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे आयकर खात्याने मंदिरांना ताळेबंद सादर करण्याची नोटीस बजावली आहे. हिशोेबात विसंगती आढळल्यास संबंधित संस्थेवर कारवाई करण्यात येईल, असे आयकर आयुक्त विजय कुमार यांनी सांगितले.
     आमचा कारभार पारदर्शी असल्याने आम्हाला घाबरण्याची आवश्यकता नाही, असे अयोध्येतील पातेश्‍वरी मंदिर प्रशासनाने म्हटले आहे.
     नोटीस मिळाल्यानंतर आम्ही पुढील दिशा ठरवू, असे अयोध्येतील अनेक देवस्थानांची करविषयक प्रकरणे हाताळणारे अधिवक्ता अनुज सिंघल यांनी म्हटले आहे.

नोटबंदीच्या निर्णयावर सरकारने गृहपाठच केला नाही !

     न्यायालयाला असे सांगावे लागते, हे सरकारला लज्जास्पद ! घेतलेले निर्णय लगेच पालटावे लागतात, यावरून सरकार वेळीच योग्य निर्णय घेण्यात कमी पडत आहे, असे जनतेला वाटल्यास चूक ते काय ?
नोटबंदीच्या निर्णयावरून कोलकाता उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारले !
     कोलकाता - नोटबंदीवरून केंद्र सरकार प्रतिदिन नवीन निर्णय घोषित करते आणि दुसर्‍या दिवशी पुन्हा त्यामध्ये पालट केले जातात. सरकारने हा निर्णय घेतांना गृहपाठच केला नसल्याचे यातून दिसते, अशा शब्दांत कोलकाता उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारले आहे. बँक आणि एटीएम्बाहेरील रांगा यांमुळे जनता कंटाळली आहे, असेही न्यायालयाने या वेळी म्हटले आहे. नोटबंदीच्या संदर्भात कोलकाता उच्च न्यायालयात प्रविष्ट करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करतांना न्यायालयाने वरील शब्दांत फटकारले. या प्रकरणावरील पुढील सुनावणी २५ नोव्हेंबरला होणार असून त्या वेळी न्यायालय निकाल देणार आहे. न्यायालयाने पुढे म्हटले की, आम्ही सरकारचे धोरण पालटू शकत नाही; पण बँक कर्मचार्‍यांमध्ये प्रामाणिकपणे काम करण्याचा अभाव आहे.
लोकांकडून हिंसाचार होईल ! - सर्वोच्च न्यायालय
     नोटबंदीमुळे जनता त्रस्त झाली आहे. याकडे सरकार कानाडोळा करू शकत नाही. नोटबंदीमुळे होत असलेला त्रास कायम राहिल्यास जनतेचा उद्रेक होईल, लोक रस्त्यावर उतरतील आणि हिंसेचा आगडोंब उसळेल, अशी भीती सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली आहे.

श्री महालक्ष्मी मंदिरातील सहा दानपेट्यांतील ३५ लक्ष ३३ सहस्र रुपये अधिकोषात जमा !

मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम ! मशीद आणि चर्च येथील किती
निधी अधिकोषात जमा केला, हेही सरकारने घोषित करावे !
प्रतिदिन दानपेट्या उघडण्याचा विचार चालू ! - जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी
      कोल्हापूर - करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मंदिरातील १७ दानपेट्यांची मोजदाद चालू करण्यात आली आहे. २ दिवसांत ६ दानपेट्या उघडण्यात आल्या. या दानपेट्यांमधून मिळालेली ३५ लक्ष ३३ सहस्र रुपयांची रक्कम १७ नोव्हेंबर या दिवशी अधिकोषात जमा करण्यात आली. यापुढेही श्री महालक्ष्मी मंदिरातील दानपेट्या प्रतिदिन उघडण्याविषयी विचार चालू आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ. अमित सैनी यांनी दिली. (हिंदु राष्ट्रात भक्तांनी अर्पण केलेला पैसा केवळ धर्मकार्यासाठीच वापरला जाईल ! - संपादक)
१. दानपेटीत नाण्यांसह दहा, वीस, पन्नास आणि शंभर रुपयांच्याच नोटा अधिक प्रमाणात आढळून आल्या. ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या नोटांचे प्रमाण अल्प होते. २ सहस्र रुपयांच्या १० नव्या नोटांसह सिंगापूर आणि नेपाळ देशांतील नोटाही दानपेटीत आढळल्या.
२. १७ दानपेट्यांपैकी १० दानपेट्यांची मोजदाद पूर्ण झालेली नाही.

नोटाबंदीवरून तिसर्‍या दिवशीही संसदेत गदारोळ !

संसदेत गोंधळ घालून जनतेचा पैसा वाया घालवणारे लोकप्रतिनिधी लोकशाहीला कलंकच !
लोकसभा २० नोव्हेंबरपर्यंत स्थगित
     नवी देहली - संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या तिसर्‍या दिवशीही नोटाबंदीच्या निर्णयावरून विरोधकांकडून गदारोळ करण्यात आला. यामुळे लोकसभेचे कामकाज २० नोव्हेंबरपर्यंत स्थगित करावे लागले. या वेळी सरकारनेही आपण चर्चेसाठी सिद्ध आहोत; पण विरोधकांनी कामकाज होऊ द्यावे, अशी भूमिका मांडली. तरीही विरोधकांनी गोंधळ घालणे चालूच ठेवल्याने कामकाज होऊ शकले नाही.
     सकाळी कामकाजाला प्रारंभ झाल्यावर विरोधी पक्षांनी गोंधळ घालायला आरंभ केला. लोकसभेत नोटाबंदीच्या निर्णयावर चर्चा तसेच मतदान घ्यावे, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली. विरोधकांच्या गोंधळानंतर शेवटी कामकाज स्थगित करावे लागले.
     राज्यसभेतही नोटाबंदीवर चर्चेची मागणी विरोधकांनी लावून धरली.

नोटाबंदीचे केवळ ५० टक्केच उद्दिष्ट साध्य ! - डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी, खासदार, भाजप

जनतेच्या भल्यासाठी सरकारने प्राप्तीकरही रहित करावा !
     नवी देहली - ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या नोटा रहित करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयामुळे मूळ उद्देश पूर्णपणे यशस्वी झालेला नाही. नोटा रहित करण्याच्या निर्णयामुळे केवळ ५० टक्केच मूळ उद्देश साध्य झाला आहे, असा दावा भाजपचे खासदार डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी केला आहे. त्याचबरोबर देशातील प्राप्तीकरच पूर्णपणे रहित करण्याचीही मागणी त्यांनी या वेळी केली. ते हॉर्वर्ड विद्यापिठात बोलत होते.
डॉ. स्वामी यांनी मांडलेली सूत्रे १. नोटा रहित करण्याचा निर्णय घोषित करण्यापूर्वी मला विचारले असते, तर मी सरकारला सांगितले असते की, जे लोक जुन्या नोटा भरण्यासाठी बँकेत येतील, त्यांना प्राप्तीकरामध्ये पूर्णपणे सूट देण्यात यावी. फक्त एवढेच करू नये, तर देशातील सर्वसामान्य माणसाच्या भल्यासाठी संपूर्ण प्राप्तीकरच रहित करण्यात यावा. लोकांना त्यामुळे मोठा आनंद झाला असता. आज जरी सरकारने प्राप्तीकर रहित केलेला नसला, तरी भविष्यात सरकार हे पाऊल नक्की उचलेल, असा विश्‍वास डॉ. स्वामी यांनी व्यक्त केला.
२. नोटा रहित केल्यामुळे काश्मीरमधील सर्व निदर्शने थांबली आहेत. काश्मीरमधील सरकारने कोणतीही नवी घोषणा केलेली नसली, तरी निदर्शने बंदच झालेली आहेत.
३. ५०० रुपयांच्या बनावट नोटा पाककडून बनवून येत होत्या आणि त्या भारतात चलनात आणल्या जात होत्या

केंद्र सरकार आता स्वतःजवळ पैसे ठेवणे आणि पैशांचे व्यवहार यांवर मर्यादा घालण्याच्या सिद्धतेत !

     नवी देहली - केंद्र सरकार ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या नोटा बंद केल्यानंतर स्वत:जवळ पैसे बाळगणे आणि रोख पैशांत व्यवहार करणे, यांवर मर्यादा घालण्याच्या सिद्धतेत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. या संदर्भात सरकारने वरिष्ठ कर अधिकारी आणि तज्ञ यांच्याकडून सल्ला मागितला होता. त्याआधारे हा तर्क करण्यात येत आहे. सरकारने जर असा निर्णय घेतला, तर त्यातून कोणत्या समस्या निर्माण होऊ शकतात, याची माहिती तज्ञांकडून घेण्यात येत आहे.
     सर्वोच्च न्यायालयाकडून स्थापन करण्यात आलेल्या काळ्या पैशांच्या संदर्भातील विशेष अन्वेषण पथकाने जुलै मासात सरकारला सल्ला दिला होता की, पैसे जवळ राखण्याची मर्यादा १५ लाख रुपये आणि रोकडमध्ये व्यवहार करण्याची मर्यादा ३ लाख रुपये अशी केली जावी. या निर्णयामुळे काळ्या पैशावर नियंत्रण आणण्यास साहाय्य मिळू शकेल, असे तज्ञांचे मत आहे.

डॉ. झाकीर नाईक हिंदूंच्या देवतांच्या विरोधात भाषणे देऊन लादेनचे गुणगान करत होता ! - केंद्र सरकारचे गृहमंत्रालय

हिंदूंच्या देवतांचा अवमान करणार्‍या प्रत्येकावर सरकारने
कठोर कारवाई करावी, अशीच हिंदूंची मागणी आहे !
     नवी देहली - इस्लामचा प्रचारक म्हणून काम करणारे डॉ. झाकीर नाईक हिंदूंच्या देवतांच्या विरोधात भाषणे देत होते. तसेच अल् कायदाचा प्रमुख ओसामा बिन लादेन याचे गुणगान करणे, हा त्यांचा एककलमी कार्यक्रम होता, असे केंद्र सरकारच्या गृहमंत्रालयाने म्हटले आहे.
     केंद्र सरकारने डॉ. झाकीर यांच्या इस्लामिक रिसर्च फाऊण्डेशन या संस्थेवर देशविघातक कृत्यात सहभागी असल्याचा ठपका ठेवत बंदी घातली आहे. सरकारने त्यांच्या संस्थेवर बंदी घालत असताना बंदीसाठीची कारणे देतांना वरील माहिती दिली आहे.
    डॉ. झाकीर त्यांच्या भाषणांमध्ये प्रत्येक मुसलमानाने आतंकवादी असायला हवे आणि इस्लामने ठरवले असते, तर देशात ८० टक्के हिंदू राहिलेच नसते; कारण त्यांना तलवारीच्या बळावर मुसलमान करण्यात आले असते, असेही म्हणत होते. तसेच सुवर्ण मंदिर इतके पवित्र नाही जितके मक्का आणि मदिना आहे, असेही त्यांनी म्हटले होते. डॉ. झाकीर यांनी आत्मघाती बॉम्बस्फोटांना योग्य ठरवले होते.

१ सहस्र रुपयांची नोट येणार नाही ! - अर्थमंत्री अरुण जेटली

     नवी देहली - एक सहस्र रुपयांची नवी नोट येणार नाही, असे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी स्पष्ट केले आहे. यापूर्वी केंद्रीय अर्थसचिव शक्तिकांत दास यांनी घोषित केले होते की, लवकरच १ सहस्र रुपयांची नवी नोट नव्या सुरक्षा मानंकासह येणार आहे.

पेट्रोल पंपावर पीओएस् यंत्रावरून २ सहस्र रुपयांपर्यंत पैसे काढता येतील !

     नवी देहली - एटीएम्साठी लागलेल्या लांबच लांब रांगांवर उपाययोजना काढतांना केंद्र सरकारने आता १८ नोव्हेंबरपासून पेट्रोल पंपांवरही पैसे काढण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. सध्या स्टेट बँक ऑफ इंडियाचे पीओएस् यंत्र असलेल्या पेट्रोलपंपावर या सुविधेचा लाभ घेता येईल. पेट्रोल पंपावर या यंत्रात कार्ड स्वाईप करून प्रतिव्यक्ती २ सहस्र रुपयांपर्यंत पैसे काढता येतील. एस्बीआय आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने हा संयुक्त उपक्रम राबवला आहे. पहिल्या टप्प्यात देशातील अडीच सहस्र पेट्रोल पंपांवर पैसे काढणे शक्य होणार आहे. आगामी काळात देशभरातील २० सहस्र पेट्रोल पंपांवर पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल, अशी माहिती अधिकार्‍यांनी दिली. एस्बीआयचे डेबिट आणि क्रेडिट कार्ड असलेल्या ग्राहकांना या निर्णयाचा लाभ होईल. आगामी काळात एच्डीएफ्सी, आयसीआयसीआय, सिटी बँक यासारख्या बँकांच्या ग्राहकांनाही या सुविधेचा लाभ घेता येईल.

पुण्यामध्ये धर्मांधाकडून हिंदु युवतीवर अमानुष अत्याचार : धर्मांधाला अटक

  • हिंदु युवतींनो, लव्ह जिहादच्या षड्यंत्रापासून रक्षण होण्यासाठी धर्मशिक्षण आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घेण्याला पर्याय नाही, हे जाणा !
  • अ‍ॅसिड फेकण्याची धमकी
  • सिगारेटचे चटके देऊन लाथाबुक्क्यांनी मारहाण
  • पोलिसांकडून तक्रार प्रविष्ट करून घेण्यास प्रारंभी टाळाटाळ
       पुणे, १८ नोव्हेंबर (वार्ता.) - कोंढवा येथील व्यसनाच्या आहारी गेलेल्या सनी अमनुल्ला मन्सुरी (वय २३ वर्षे) याच्याकडून एका २३ वर्षीय हिंदु युवतीवर वारंवार अत्याचार करण्यात आले. तो या हिंदु युवतीवर लग्नासाठी बळजोरी करत असे, तसेच रस्त्यात गाठून तिला मारहाणही करत असे. युवतीने सनी याला लग्नासाठी स्पष्ट शब्दांत नकार देऊनही त्याच्याकडून युवतीचा अघोरी छळ होत होता. विशेष म्हणजे या प्रकरणी खडक पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करण्यास जाऊनही पोलिसांनी युवतीची नोंद घेतली नाही. (या प्रकरणी संबंधित पोलीस अधिकार्‍यांचीही चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. पीडितांची नोंद न घेणारे पोलीस अन्यायग्रस्तांंना काय न्याय देणार ? - संपादक) त्यानंतर पोलीस आयुक्तांना केलेल्या तक्रारीत युवतीने वरीलप्रकारे तिच्यावर झालेल्या अत्याचाराविषयी, तसेच झालेल्या मानसिक छळाविषयी अवगत केले. त्यानंतर या प्रकरणी खडक पोलीस ठाण्यात सनी याच्या विरोधात गुन्हा दाखल असून त्याला अटक करण्यात आली आहे.

खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या कराड येथील सभेस अनुमती नाकारून त्यांना जिल्हाबंदी करण्यात यावी !

सातारा येथील हिंदुत्वनिष्ठ संघटनांची मागणी 

पोलीस उपअधीक्षक श्री. पवार (डावीकडे) यांना निवेदन देतांना

       सातारा, १८ नोव्हेंबर (वार्ता.) - कराड (जिल्हा सातारा) नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी २० नोव्हेंबर या दिवशी एम्.आय्.एम्. पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला येथील समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी विरोध दर्शवला आहे. सभा रहित करून त्यांना सातारा जिल्हाबंदी करण्यात यावी, अशी एकमुखी मागणी हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. जिल्हा पोलीस प्रमुख यांच्या वतीने जिल्हा पोलीस उपअधीक्षक श्री. पवार यांनी निवेदन स्वीकारले. या वेळी हिंदु महासभेचे कार्यकारणी सदस्य श्री. उमेश गांधी, श्री. ओसवाल, हिंदु जनजागृती समितीचे श्री. हेमंत सोनवणे, श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्यकर्ते आदी मान्यवर उपस्थित होते.

२४ नोव्हेंबरनंतर जुन्या नोटा पालटण्यावर येऊ शकते बंदी !

     नवी देहली - सध्याच्या व्यवस्थेप्रमाणे ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या जुन्या नोटा ३० डिसेंबरपर्यंत एकदाच पालटून घेण्याची संधी आहे; मात्र या सुविधेवर २४ नोव्हेंबरनंतर गदा येऊ शकते, असे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. या संधीचा लाभ काळा पैसेवाल्यांकडून घेण्यात येत असल्याचे लक्षात आल्यामुळे ही कारवाई केली जाऊ शकते. याच उद्देशाने सरकारने पूर्वीच्या साडेचार सहस्र रुपयांची मर्यादा अल्प करत ती २ सहस्र रुपये इतकी केली आहे. आता जनतेने स्वतःच्या खात्यात पैसे जमा करून खात्यातून ते काढून घ्यावेत, असे पूर्वी सांगितल्याप्रमाणेच सांगण्यात येण्याची शक्यता आहे.

नोटा पालटून घेतल्यावर बोटांवर शाई लावू नये ! - निवडणूक आयोगाची सरकारला सूचना

     नवी देहली - ५०० आणि १ सहस्र रुपयाच्या नोटा पालटून घेणार्‍यांच्या बोटावर शाईने खूण करण्याचा निर्णय पालटावा, अशी सूचना निवडणूक आयोगाने केंद्र सरकारला केली आहे. येत्या काळात होणार्‍या निवडणुकांमुळे आयोगाने ही सूचना केली आहे.

नोटा पालटण्याचा अधिकार न मिळाल्यास सहकारी अधिकोष बंद !

पुणे जिल्हा नागरी सहकारी 
बँक असोसिएशनची चेतावणी
       पुणे, १८ नोव्हेंबर - ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या नोटा पालटण्याचा अधिकार न मिळाल्यास सहकारी अधिकोष बंद ठेवण्याची चेतावणी पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनने दिली आहे. सहकारी अधिकोषांच्या संदर्भात रिझर्व्ह बँकेकडून दुजाभाव केला जात असल्याच्या संदर्भात उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्यात आली असून त्याची २१ नोव्हेंबर या दिवशी सुनावणी असल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष विजय ढेरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. देशभरातील १ सहस्र ५७५ नागरी सहकारी अधिकोष असून तेथे जवळपास ४२ सहस्र कोटींच्या ठेवी आहेत. सहकारी अधिकोषांची व्यापारी अधिकोषांमध्ये खाती आहेत; मात्र व्यापारी अधिकोष सहकारी अधिकोषांना रक्कम देण्यास सिद्ध नाही, असेही ढेरे यांनी सांगितले.
सहकारी अधिकोषांच्या पुढील समस्या
१. पाचशे आणि एक सहस्र रुपयांच्या नोटा चलनातून रहित केल्यानंतर सहकारी अधिकोषांमध्ये १ सहस्र कोटी रुपयांचा भरणा झाला. एवढी रक्कम ठेवण्यासाठी सहकारी अधिकोषांकडे जागा उपलब्ध नाही. ज्या मोठ्या अधिकोषांमध्ये सहकारी अधिकोषांचे खाते आहे, तेथे ही रक्कम स्वीकारली जात नाही. त्यामुळे अधिकोषांमध्ये रोख रक्कम शिल्लक ठेवण्याच्या मर्यादेचे उल्लंघन होत असून त्यासाठी काढलेला विमा अल्प पडत आहे. 

(म्हणे) ‘विरोध करणार्‍यांना हिंदु धर्माचा अर्थच समजलेला नाही !’ - परिषदेचे आयोजक दत्ता नायक यांची वैचारिक दिवाळखोरी उघड !

पुरोगामित्वाचा ढोल बडवण्यासाठी मडगाव येथे ‘अभिव्यक्ती : दक्षिणायन परिषदे’चे आयोजन !
      मडगाव, १८ नोव्हेंबर (वार्ता.) - ज्यांच्यावर विचारवंतांच्या हत्येचा संशय आहे, असे लोक ‘अभिव्यक्ती : दक्षिणायन परिषदे’ला विरोध करत आहेत. या परिषदेच्या आयोजकांपैकी ९० टक्के हिंदु आहेत. विरोध करणार्‍यांना हिंदु धर्माचा अर्थच समजलेला नाही. ख्रिस्ती आणि मुसलमान यांना आपण धर्मांतरित करून हिंदु धर्मात घेतले, तर त्यांना आपण कुठल्या जातीत स्थान देणार आहोत, याचे उत्तर परिषदेला विरोध करणारे हिंदु जनजागृती समितीच्या डॉ. मनोज सोलंकी यांनी द्यायला हवे, असे मडगाव येथे आयोजित ‘अभिव्यक्ती : दक्षिणायन परिषद’चे अध्यक्ष दत्ता नायक पत्रकार परिषदेत म्हणाले. (हिंदु धर्मात जातीव्यवस्था नाही, तर वर्णाश्रमव्यवस्था आहे. जाती मानवनिर्मित आहेत. प्रत्येकाच्या गुणकर्मानुसार त्याचा वर्ण ठरतो, असे हिंदु धर्म मानतो ! शुद्धीकरण केल्यानंतर कोणत्या जातीत घालायचे, याविषयी कांगावा करून अहिंदूंच्या शुद्धीकरणाला विरोध करणे, हे या पुरोगामी म्हणवणार्‍या जात्यंधांचे नेहमीचेच आहे ! - संपादक)

आतंकवादाच्या विरोधातील लढाईसाठी भारत-चीन यांचा संयुक्त सैनिकी सराव !

हा सराव करतांना १९६२ चेही भारताने सातत्याने स्मरण ठेवावे, ही अपेक्षा !
      पुणे - दक्षिण आशियात शांतता, स्थैर्य आणि समृद्धी निर्माण व्हावी, या उद्देशांसाठी भारतीय सैन्य आणि चीनची पीपल्स लिबरेशन आर्मी यांनी पुण्यात संयुक्त सैनिकी सराव केला. आतंकवादाच्या विरोधात भारत आणि चीन यांनी एकत्रित लढा द्यावा, अशी अपेक्षा भारताचे लेफ्टनंट जनरल योगेशकुमार जोशी आणि चीनचे लेफ्टनंट जनरल वॅन जुआंग यांनी व्यक्त केली. भारतीय सैन्यदलातील आधुनिक शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन या वेळी आयोजित करण्यात आले होते. आैंध येथील मिलिटरी स्टेशन येथे २७ नोव्हेंबरपर्यंत दोन्ही राष्ट्रांचे सैनिक सराव करणार आहेत. या सरावाच्या काळात एकमेकांची शस्त्रे सैनिकांना हाताळता येणार आहेत. (आतापर्यंतचा अनुभव पहाता चीनने भारताचा शत्रूराष्ट्र असलेल्या पाकिस्तानला सातत्याने आर्थिक, तसेच लष्करी साहाय्य केले आहे. भारताच्या अरुणाचल प्रदेशसह काश्मीरमधील भागांवरही चीनने अवैध दावा मांडला आहे. विस्तारवादी चीनने त्यांच्या सीमाभागापर्यंत रस्ते बांधून दळणवळणाच्या सुविधा निर्माण केल्या आहेत. मुंबईवर झालेल्या आतंकवादी आक्रमणाचा सूत्रधार आणि जैश-ए-महंमदचा म्होरक्या मसूद अझहर याचीही चीनने भारताला न जुमानता बाजू घेतली होती.

नोटाबंदीच्या विरोधात जिल्हा बँका उच्च न्यायालयात ! - दिलीपतात्या पाटील

        सांगली, १८ नोव्हेंबर - जिल्हा मध्यवर्ती बँकांत पाचशे आणि १ सहस्र रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी नकार दिला आहे. या निर्णयाच्या विरोधात सर्व जिल्हा बँकांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका प्रविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती सांगली जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील यांनी दिली.
या संदर्भात पाटील म्हणाले की...
१. मुंबईत जिल्हा मध्यवर्ती बँकेत राज्यातील जिल्हा बँक अध्यक्षांची बैठक झाली. यात हा निर्णय घेण्यात आला.
२. देशातील एकूण अर्थकारणाच्या केवळ २ प्रतिशत पैसेच सहकारी बँकांमध्ये आहेत. त्यात किती काळा पैसा असणार ? जिल्हा बँका या सुरक्षित आहेत.
३. कोणत्या कारणास्तव आम्हाल नोटा स्वीकारण्यास नाकारले आहे, याचे कारण देणे अपेक्षित असतांना ते देण्यात आलेले नाही.

ग्रामीण भागातील नेत्यांनी काळा पैसा वाचवण्यासाठी सहकारी बँकांतून नोटबंदीवर उपाय काढला !

      मुंबई - ग्रामीण भागात सहकारी बँकेचे जाळे आहे. त्यातील बहुतेक बँका काँग्रेस नेत्यांच्या अधिपत्याखाली आहेत. या बँकांतून मागील तारखेचे डिमांड ड्राफ्ट, पे ऑर्डर काढून नेत्यांजवळचा काळा पैसा नवीन चलनात रूपांतर करण्याचे प्रयत्न चालू आहेत. 
    रिझर्व्ह बँकेच्या एका नियमातील त्रुटीचा लाभ घेऊन सहकारी बँका ग्राहकांचे पैसे जुन्या चलनात स्वीकारतात; मात्र त्याच्या बदल्यात मागील तारखेचे डिमांड ड्राफ्ट, पे ऑर्डर काढून ग्राहकांना देतात. सहकारी बँकांचे पैसे एका सामूहिक फंडात जमा असतात. त्यामुळे डिमांड ड्राफ्ट, पे ऑर्डर काढून देण्यास काही अडचण नसते; मात्र ग्राहक हे डिमांड ड्राफ्ट, पे ऑर्डर इतर बँकांत जमा करत नाहीत. त्यामुळे सहकारी बँकांवर आर्थिक बोजा येत नाही. ३१ मार्चनंतर ग्राहक हे न वटलेले डिमांड ड्राफ्ट, पे ऑर्डर मूळ बँकांना परत करतात आणि त्या बदल्यात पैसे परत मागतात. तोपर्यंत सहकारी बँका त्यांच्याजवळ गोळा झालेले जुने चलन पालटून घेत आहेत आणि ग्राहकांना नव्या चलनात पैसे परत करत आहेत. अशा रितीने हा धंदा चालू आहे.
     या व्यवहाराची कल्पना रिझर्व्ह बँकेला असून त्या बँकेने सहकारी बँकांना कठोर शब्दात हे प्रकार बंद करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच आजपर्यंत झालेल्या व्यवहारांची माहितीही घेतली आहे. त्यामुळे या सहकारी बँकांना जुने चलन नवीन चलनात रूपांतरित करण्यात अडचणी येऊ शकतात.

(म्हणे) ‘मोदी फर्माना’मुळे सामान्यांना जीवन जगणे असह्य !’ - नवाब मलिक

आघाडी काँग्रेस सरकारच्या काळात काळे धन जमवण्यास 
प्रोत्साहन देणार्‍यांना काही बोलण्याचा अधिकार आहे का ?
     मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीचा घेतलेला निर्णय हा ‘तुघलकी फर्मान’ आहे. मोदी फर्मानामुळे सामान्य नागरिकांचे जीवन जगणे असह्य झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता खासदार नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटमध्ये केला. (साध्वी प्रज्ञासिंह, कर्नल पुरोहित यांना कारागृहात डांबण्याचे तुघलकी फर्मान काढणार्‍यांना मोदींची राष्ट्रभक्ती काय कळणार ? - संपादक) 
    त्यांनी म्हटले आहे की, नोटबंदीमुळे देशातील नागरिकांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. अधिकोष आणि एटीएम्मध्ये पैशांची कमतरता निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. हा निर्णय घोषित झाल्यापासून देशभरात आतापर्यंत २४ हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. (सिंचन घोटाळा करून शेतकर्‍यांना आत्महत्या करण्यास भाग पडणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेसला जनतेचा पुळका केव्हापासून यायला लागला ? - संपादक) पंजाब आणि राजस्थान या राज्यांत २ सहस्र रुपयांच्या बनावट नोटा सापडल्या !

     चंदीगढ/जयपूर - पंजाबमध्ये भारत-पाकिस्तान सीमेजवळ तरन तारण जिल्ह्यात २ व्यक्तींना २ सहस्र रुपयांच्या बनावट नोटांसह अटक करण्यात आली. या व्यक्तींकडे २ सहस्र रुपयांच्या नोटांच्या रंगीत छायांकित प्रती होत्या. पोलिसांनी हरजिंदर सिंह आणि संदीप या दोघांना भिखीविंड गावातून अटक केली आहे. पोलिसांनी नोटा, प्रिंटर, स्कॅनर आणि संगणक जप्त केले आहेत. 
     राजस्थानच्या झुनझुनू जिल्ह्यातील छिरवा गावामध्ये बनावट नोटेद्वारे मद्य खरेदी करण्याचा प्रयत्न करणार्‍या लाल सिंग नावाच्या ६० वर्षाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. त्यानेही या नोटेची रंगीत छायांकित प्रत काढली होती.

नागपूरमधील क्रिकेट बुकींकडे ५ सहस्र कोटी रुपयांहून अधिक काळे धन !

मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात असे अवैध केंद्र असणे लज्जास्पद !
     नागपूर - देशातील सर्वांत मोठा क्रिकेट सट्ट्याचा बाजार नागपुरात आहे. त्या क्रिकेट बुकींकडे ५ सहस्र कोटी रुपयांहून अधिक काळेधन असल्याची माहिती समोर येत आहे. (देशातील अर्थविषयक कायदे आणि पोलिसांचा धाक संपल्याचे निदर्शक ! - संपादक)
     शहरात ५०० हून अधिक बुकी आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील क्रिकेट सट्टा किंग आहेत. त्यांच्याकडे काळेधन म्हणून ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या रहित केलेल्या नोटा आहेत. येथील बुकी छोटू अग्रवाल, सुनील भाटिया यांची नावे इंडियन प्रीमिअर लीगच्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणातही आली आहेत. नागपूर क्रिकेट सट्टा बाजारात प्रतिदिन शेकडो कोटींची उलाढाल होते. क्रिकेट सट्ट्याच्या व्यवहारातील सर्व धन हे काळे असते आणि त्यातील देवाणघेवाण केवळ रोख स्वरूपातच होते. (हा सट्टेबाजार आणि त्यांचे मूळ पोलीस प्रशासन नष्ट करणार का ? - संपादक)

वर्ष २००६ च्या मालेगाव स्फोटातील ८ धर्मांध आरोपींना उच्च न्यायालयाची नोटीस !

       मुंबई - वर्ष २००६ च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात अटक झालेल्या आठ धर्मांधांना सबळ पुराव्यांअभावी एप्रिल २०१६ मध्ये दोषमुक्त सोडण्यात आले होते. या सत्र न्यायालयाच्या निर्णयाला राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. राज्य सरकारच्या याचिकेच्या आधारे उच्च न्यायालयाने निर्दोष सुटलेल्या आठही जणांना नोटीस बजावली आहे. न्या. आर्.व्ही. मोरे आणि न्या. शालिनी फणसाळकर जोशी यांच्या खंडपिठाने चार आठवड्यांत उत्तर द्यावे, असे निर्देश प्रतिवाद्यांना दिले आहेत.
       मुसलमान व्यक्ती मशिदीच्या आत बॉम्बस्फोट घडवू शकत नाही, हे कोर्टाचे निरीक्षण अयोग्य आणि अवैध असल्याचा दावा राज्य सरकारने उच्च न्यायालयात आता केला आहे.
       या बॉम्बस्फोटात ३७ जणांचा मृत्यू झाला होता. तर १०० हून अधिक जण घायाळ झाले होते. सायकलवर हा बॉम्ब ठेवला होता. या प्रकरणी पोलिसांनी आरंभी नऊ जणांना अटक केली होती. हे नऊ आरोपी सिमीशी संबंधित होते. यातील एका आरोपीचा मधल्या काळात मृत्यू झाला. २००७ मध्ये स्वामी असिमानंद यांना एका बॉम्बस्फोटाप्रकरणी अटक झाल्यावर त्यांच्या खुलाशावरून एन्आयएने या ८ आरोपींविरुद्ध पुरावा नसल्याचा अहवाल न्यायालयात सादर केला होता. मात्र यानंतर एन्आयएने पुन्हा एकदा त्यांच्या भूमिकेत पालट करत आरोपींच्या सुटकेला विरोध दर्शवला होता.

देशाच्या सीमेचे रक्षण करणार्‍या सैनिकाच्या भूमीवर गुंडांचे अतिक्रमण !

देशाच्या सैनिकांच्या भूमीचे रक्षण होणार नसेल, तर जनतेने सैन्यात 
जाण्याऐवजी स्वतःच्या घराचेच रक्षण करावे, असे वाटल्यास त्याला उत्तरदायी कोण ?
     शिवपुरी (उत्तरप्रदेश) - येथील नारैयाखेडी गावात रहाणारे नारायण दुबे भारत-तिबेट सीमा सुरक्षा दलात निरीक्षक म्हणून सेवेत आहेत. ते सीमेवर तैनात असतांना त्यांच्या भूमीवर गुंडांनी अतिक्रमण केले. दुबे यांनी जिल्हा प्रशासनाकडे या संदर्भात तक्रार केली. नारायण दुबे यांचे म्हणणे आहे की, गुंडांमुळे आणि अवैध व्यवहार करणार्‍यांमुळे गावात दहशत आहे. त्यामुळे माझ्या परिवारालाही गाव सोडून पलायन करावे लागले आहे आणि भाड्याच्या घरात रहावे लागत आहे. प्रशासनाकडून त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. (अशा प्रशासनातील सर्व संबंधितांना नोकरीतून काढून त्यांच्यावर कठोर कारवाई करायला हवी ! - संपादक)

क्रिकेट कसोटी सामन्यामध्ये विघ्न येऊ नये; म्हणून सामन्याआधी खेळपट्टीची पूजा !

अंनिस यालाही अंधश्रद्धा म्हणणार का ? 
       विशाखापट्टणम् (आंध्रप्रदेश) - भारत आणि इंग्लंड यांच्या कसोटी क्रिकेट स्पर्धेतील दुसर्‍या कसोटीला १६ नोव्हेंबरपासून येथे प्रारंभ झाला. या सामन्याच्या आधी खेळपट्टीची पूजा करण्यात आली. या वेळी भारतीय संघाचे प्रशिक्षक अनिल कुंबळे, खेळपट्टीची देखरेख करणारे आणि मैदानातील कर्मचारी सहभागी झाले होते. सामन्यामध्ये कोणत्याही प्रकारचे विघ्न येऊ नये, यासाठी ही पूजा करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या खेळपट्टीवर पहिल्यांदाच सामना खेळवण्यात येत आहे. या संदर्भात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली यांना विचारले असता ते म्हणाले, ‘‘यात आश्‍चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. याआधीही अनेकदा अशा पद्धतीने पूजा करण्यात आल्या आहेत.’’

पाक-चीन आर्थिक महामार्गाला शेवटच्या श्‍वासापर्यंत विरोध करू ! - बलुच नेत्यांचा निर्धार

    नवी देहली - पाक आणि चीन यांच्यामधील आर्थिक महामार्गाचे उद्घाटन झाले आहे. याला बलुचिस्तानमधील लोकांचा पूर्वीपासून विरोध होता. त्यांचा विरोध डावलून हा महामार्ग बांधण्यात आला. याविषयी बलुच नेते हम्मल हैदर म्हणाले की, या महामार्गाला आमचा विरोध होतच रहाणार; कारण हा आमच्या जीवनमृत्यूचा विषय आहे. 
        दुसरे बलुच नेते जवाद बलोच म्हणाले की, पाकने ग्वादर बंदराचे उद्घाटन केले आहे ते बलुची नागरिकांच्या रक्ताने बनवण्यात आले आहे. बलुची याचा विरोध करत रहाणार आहेत.
      आर्थिक महामार्गाचा पाकव्याप्त काश्मीरमधूनही विरोध होत आहे. या योजनेमुळे येथील साधनसामग्रीचा वापर केला जात आहे. त्याचा लाभ स्थानिकांना नाही, तर केवळ पाकला होणार आहे.

जगभरातील सर्वाधिक आतंकवादी आक्रमणे झालेल्या ४ देशांत भारत !

देशात आतंकवादाची समस्या इतकी मोठी असतांना सरकार 
त्यावर कायमस्वरूपी प्रतिबंध करण्याऐवजी केवळ विकासाचाच विचार करत आहे !
     लंडन - गेल्या वर्षी जगभरात झालेल्या आतंकवादी आक्रमणांपैकी ५० टक्के आक्रमणे इराक, अफगाणिस्तान, पाक आणि भारत या ४ देशांत झाले आहेत. वर्ष २००० नंतर वर्ष २०१५ मध्ये भारतात आतंकवादी आक्रमणे सर्वाधिक झाली आहेत, अशी माहिती इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अ‍ॅण्ड पीस संस्थेने प्रकाशित केलेल्या वैश्‍विक आतंकवाद सूचकांक वर्ष २०१५ या अहवालामध्ये दिली आहे. 
१. वर्ष २०१५ मध्ये आतंकवादी आक्रमणात २९ सहस्र ३७६ नागरिक ठार झाले. वर्ष २०१४ मध्ये ही संख्या ३ सहस्र ३८९ इतकीच होती. 
२. वर्ष २०१५ मधील आक्रमणातील ७५ टक्के आक्रमणांत कोणाचाही मृत्यू झाला नाही.


खरे युद्ध तर आता चालू झाले !

आफ्रिकेतील आतंकवादी संघटना बोकोहरमची ट्रम्प यांना धमकी !
      कानो (नायजेरीया) - आफ्रिकेतील आतंकवादी संघटना बोकोहरमच्या नेत्यांनी अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना धमकी दिली आहे. पश्‍चिमेविरुद्धचे युद्ध तर आता कुठे चालू झाले. निवडणुकीतील विजयामुळे त्यांनी फार काही हुरळून जाऊ नये. जागतिक आघाडी आमच्या बांधवांविरुद्ध इराक, सिरीया, अफगाणिस्तान यांसह सर्वत्र लढते आहे, अशा प्रकारची धमकी दिली आहे. बोकोहरमचा प्रमुख अबुबकर शेखू याने यू ट्यूबवर नुकत्याकच पोस्ट केलेल्या ऑडिओमध्ये ही धमकी दिली आहे.

तरुणांनी हिंदु धर्माचा अभिमान बाळगून धर्माचरण करावे ! - रमेश शिंदे

भोपाळ येथे धर्मरक्षण संघटनेच्या बैठकीत जनजागृती !
व्यासपीठावर डावीकडून श्री. योगेश व्हनमारे,
मार्गदर्शन करतांना श्री. रमेश शिंदे,
श्री. विनोद यादव आणि श्री. केदार सिंह
     भोपाळ, १८ नोव्हेंबर (वार्ता.) - पूर्वी पूर्ण विद्या प्राप्त केल्यानंतर शिष्य गुरूंना कृतज्ञता म्हणून दक्षिणा द्यायचा, आताच्या विज्ञानाच्या युगात मात्र ‘आधी डोनेशन आणि नंतर एज्युकेशन’, अशी स्थिती निर्माण झाली आहे. सध्या शिक्षणात देश आणि धर्म, यांविषयी शिकवले जात नसल्याने आपण स्वाभिमान गमावून बसलो आहोत. त्यामुळेच हिंदु जनजागृती समिती धर्मशिक्षण देऊन तरुणांमध्ये स्वाभिमान जागृत करण्याचे कार्य करत आहे. प्रत्येकाने हे धर्मशिक्षण घेऊन त्यानुसार धर्माचरण करायला हवे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे यांनी केले.

शिकागो (अमेरिका) येथे मुसलमान विद्यार्थिनीचा हिजाब काढला !

हिंदूंना असहिष्णु म्हणणारे या घटनांविषयी मात्र मौन बाळगत आहेत !
     शिकागो (अमेरिका) - अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर मुसलमान महिलांवरील आक्रमणाच्या प्रकरणांत वाढ झाली आहे. शिकागो शहरातील मिनेसोटा येथे नोर्थडेल मिडिल स्कूलमधील एका मुसलमान विद्यार्थिनीच्या डोक्यावरील हिजाब खेचून काढण्यात आला. तसेच तिचे केस मोकळे करण्यात आले. या घटनेची पोलीस चौकशी करत आहेत.

चीनमध्ये ‘आयफोन ७ प्लस’ चा स्फोट !

      बीजिंग - दक्षिण चीनच्या युनान प्रांतामध्ये ‘आयफोन ७ प्लस’ हा भ्रमणभाष संच भूमीवर आपटल्याने त्याचा स्फोट झाला. या ‘आयफोन ७ प्लस’च्या बॅटरीने पेट घेतल्याने हा स्फोट झाला. ‘आयफोन ७ प्लस’चा स्फोट होण्याची ही चौथी घटना आहे.

निम्म्याहून अधिक कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये स्वतंत्र प्रयोगशाळा नाहीत !

शैक्षणिक विभागाची दुःस्थिती !
     पुणे - गतवर्षीच्या शैक्षणिक अहवालात राज्यातील ५० टक्क्यांहून अधिक कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र प्रयोगशाळा नसल्याचे समोर आले आहे. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, संगणकशास्त्र, भूगोल, गणित, मानसशास्त्र, भाषा, गृहकौशल्य आदी विषयांसाठी प्रयोगशाळा असणे अपेक्षित आहे; मात्र संगणकशास्त्र विषय सोडला, तर अन्य विषयांसाठी स्वतंत्र प्रयोगशाळांची वानवा आहे. ग्रंथालयांची स्थितीही असमाधानकारक आहे. साधारण ५ टक्के कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये ग्रंथालयच नाही, तर ६६ टक्के ग्रंथालयांमध्ये ग्रंथपालच नाहीत. (ही स्थिती पालटण्यासाठी शिक्षण विभाग ठोस उपाययोजना करणार का ? - संपादक)

पुणे येथे बंद नोटा खपवण्यासाठी दलाल सक्रिय !

याला शासन आणि पोलीस प्रशासन कसा आळा घालणार आहे ?
     पुणे - ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या नोटांवर बंदी आल्यावर त्या पालटून देण्यासाठी जास्तीचे पैसे घेऊन त्या नोटांच्या बदल्यात सुट्टे पैसे देणारे दलाल सक्रिय झाले आहेत. (केवळ नोटांवरील बंदीने काळ्या पैशाला आळा बसणार नसून त्यावर धर्माचरण हाच उपाय आहे, हेच यातून सिद्ध होते. - संपादक) काळ्या पैशांवर गदा आणण्यासाठी नोटाबंदीचा निर्णय घेतलेला असतांना अवैध पैसे मिळवण्याचा नवीनच धंदा काही लोकांनी चालू केला आहे. पैसे काढण्याच्या केंद्राबाहेर आणि अधिकोषातील रांगांमध्ये उभे रहाण्याचा वेळ वाचवण्यासाठी नागरिक ही तूट स्वीकारत आहेत.

पिंपरी येथे अवैध भंगार व्यवसायात लक्षणीय वाढ !

      पिंपरी - महानगरपालिकेने भंगार व्यावसायिकांचे सर्वेक्षण केले असता १ सहस्र ५९८ दुकानांपैकी ९० टक्के दुकाने अवैध असल्याची माहिती समोर आली आहे. ९० प्रतिशत व्यावसायिकांनी अनुज्ञप्ती न घेताच भंगार व्यवसाय थाटला असून ज्यांच्याकडे अनुमतीपत्रे आहेत, त्यांनी त्यांची नूतनीकरण न केल्याचे उघड झाले आहे.
     अवैध व्यावसायिकांकडून महापालिकेला व्यवसाय कर मिळत नसल्याने महापालिकेची आर्थिक हानी होते. पाणी, वीज यांसह सर्व मूलभूत सुविधा व्यावसायिकांना पुरवल्या जात असल्याने भंगार व्यावसायिक अनुज्ञप्ती घेण्यासाठी पुढे येत नाहीत. शहरात १५ सहस्रांपेक्षा अधिक कामगार हे भंगार व्यवसायाशी निगडित आहेत. यामुळे अनेक गुन्हेगारही या व्यवसायामध्ये उतरत आहेत. (अवैध भंगार व्यवसायावर नियंत्रण आणण्यासाठी महानगरपालिका ठोस उपाय उचलेल कि केवळ सर्वेक्षण करून विषय सोडून देईल ? - संपादक)

शिराळे (कोल्हापूर) गावचे सैनिक सतीश पाटील यांचे अपघाती निधन

     शिराळे (कोल्हापूर)- ३४ फिल्ड रेजिमेंटचे सैनिक सतीश बाळू पाटील यांचे हिमाचल प्रदेशात अपघाती निधन झाले. त्यांचे पार्थिव २० नोव्हेंबरला त्यांच्या मूळगावी आणण्यात येईल.

सैनिकी राजवट लागू व्हावी यासाठी ब्राझीलमध्ये जनतेने संसद कह्यात घेतली !

        ब्राझिलिया (ब्राझील) - ब्राझिलमध्ये १७ नोव्हेंबरला तेथील नागरिकांनी संसदेच्या कनिष्ठ सभागृहात घुसून इमारत कह्यात घेतली. देशातील भ्रष्ट सरकार हटवून सैनिकी राजवट लावण्यात यावी, अशी या नागरिकांची मागणी होती. ब्राझीलमध्ये १९६४ पासून १९८५ पर्यंत सैनिकी राजवट होती. सुमारे २००० आंदोलकांमध्ये शिक्षकांपासून ते निवृत्त सैनिक आणि विद्यमान पोलीस यांचाही समावेश होता. यावर्षी ब्राझीलमधील रिओ ऑलिम्पिकपासून देशात आर्थिक आणीबाणी लागू आहे. अनेक महिन्यांपासून कर्मचार्‍यांना वेतन मिळालेले नाही. रिओ ऑलिम्पिकच्या वेळी ब्राझीलच्या पहिल्या महिला अध्यक्षा डिल्मा रुसेफ यांना संसदेने महाभियोग चालवून बडतर्फ केले होते. त्यांची जागा उपाध्यक्ष मायकेल टेमर यांनी घेतली होती. टेमर हेही भ्रष्ट आहेत, असा जनतेचा आरोप आहे.

पुण्यातील खाजगी रुग्णालयांमध्ये जुन्या नोटा स्वीकारण्यात येणार नाही !

रुग्णालय संघटनेच्या बैठकीतील निर्णय
       पुणे - येथील रुग्णालय संघटनेच्या बैठकीत जुन्या नोटा न स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीसाठी शहरातील प्रमुख रुग्णालयांचे प्रतिनिधी उपस्थित होते. संघटनेचे अध्यक्ष बोमी भोट म्हणाले, आजपासून १ सहस्र आणि पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा स्वीकारायच्या नाहीत. याला रुग्णालयाशी संबंधित औषध दुकाने अपवाद रहातील. तेथे जुन्या नोटा स्वीकारण्यात येणार आहेत.
       संघटनेच्या सचिव मंजुषा कुलकर्णी म्हणाल्या, सरकारच्या लेखी सूचनेनुसार रुग्णालयांमधून जुन्या नोटा स्वीकारल्या जायच्या; पण नव्याने घेतलेल्या निर्णयाची माहिती कोणत्याही माध्यमातून माहिती रुग्णालयांपर्यंत आलेली नाही. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. रुग्णांना डेबिट, क्रेडिट कार्डच्या माध्यमातून अथवा ऑनलाइन देयके भरता येतील. या सर्व प्रक्रियेत रुग्णांची गैरसोय होणार नाही, याची काळजी रुग्णालयांकडून घेण्यात येणार आहे.

देश चालवणारी व्यवस्थाच दोषी आहे ! - अनिल बोकील, अर्थक्रांती प्रतिष्ठान

      पुणे, १८ नोव्हेंबर - चलनातील नोटा रहित करणे म्हणजे, शस्त्रकर्माचा प्रारंभ आहे, तर कररचना रहित करणे, ही शस्त्रक्रियेआधी दिली जाणारी भूल आहे, असे अर्थक्रांतीचे म्हणणे आहे. संयमी शल्यविशारद असलेल्या पंतप्रधानांनी मात्र भूल देण्याआधीच शस्त्रकर्म चालू केले आहे. आता शल्यविशारद असलेल्या पंतप्रधानांना दोष देऊन चालणार नाही; कारण ही व्यवस्थाच दोषी आहे, असे प्रतिपादन अर्थक्रांती प्रतिष्ठानचे अनिल बोकील यांनी केले. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, वेस्टर्न महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स आणि पूना मर्चंट्स चेंबर यांच्या वतीने आर्थिक परिवर्तनाचा व्यापार-उद्योगावरील परिणाम या विषयावर आयोजित केलेल्या परिसंवादात ते बोलत होते.
      बोकील पुढे म्हणाले की, सध्या राष्ट्रात रक्तविहीन क्रांतीस प्रारंभ झाला आहे. आता गोंधळ चालू झाला असेल, तरी तो काही दिवसच टिकेल; पण ज्यांच्याकडे काळा पैसा आहे, त्यांची मात्र भंबेरी उडाली आहे. चलनातील नोटा बंद करण्याची ही योग्य वेळ असेलही; पण नियोजन नीट करणे आवश्यक होते.

एका मुसलमान लेखकाला कळते, ते एकाही भारतीय राजकारण्याला कळत नाही !

     भारताने पाकशी सर्व संबंध तोडून टाकले पाहिजेत, आयएस्आयच्या पूर्वानुमतीशिवाय पाकिस्तानातून कुणीही भारतात येऊ शकत नाही. ज्या दिवशी भारत स्वाभिमानाने पाकिस्तानला सुनावेल की, आम्हाला तुमच्याशी बोलणी करायची नाहीत, आम्हाला तुमच्या बरोबर व्यापार करायचा नाही, आम्हाला तुमचे सिमेंट नको, अमन की आशा नको, तेव्हा पाकिस्तान वठणीवर येईल. - पाकिस्तानात जन्मलेले कॅनडा येथील लेखक तारेक फतेह

आणखी किती आक्रमणांनंतर भारत अणुबॉम्ब वापरणार ? कि हे केवळ फुकाचे बोल आहेत ?

     भारताने आधी अण्वस्त्रांचा वापर न करण्याच्या धोरणात का अडकून रहायचे ? देशासाठी जेव्हा एखादा धोका निर्माण होईल, तेव्हा अशा जुन्या धोरणांविषयी नक्कीच विचार करता येणार नाही. आधीच ठरलेल्या धोरणानुसार वर्तन केले किंवा तुम्ही अण्वस्त्रांविषयीच्या एखाद्या भूमिकेवर कायम राहिलात, तर आपण अण्वस्त्राची शक्ती गमावून बसू असे मला वाटते. - संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात पोलिसांकडे फसवणुकीची तक्रार प्रविष्ट

अधिकोषात ठेवलेले पैसे 
उपलब्ध होत नसल्याचे प्रकरण
        पुणे, १८ नोव्हेंबर - हक्काचे आणि विश्‍वासाने ठेवलेले पैसे अधिकोष उपलब्ध करून देत नसल्यामुळे अधिवक्ता तौसिफ शेख या खातेदाराने पंतप्रधान नरेंद्र मोदी, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या विरुद्ध फसवणूक आणि अपहार यांची तक्रार प्रविष्ट केली आहे. शेख यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात ही तक्रार १६ नोव्हेंबर या दिवशी प्रविष्ट केली. नोटा बंदीवरून पोलिसांकडे देण्यात आलेली ही पहिलीच तक्रार आहे. अधिवक्ता तौसिफ शेख यांनी सांगितले की, पोलीस ठाण्यात गुन्हा प्रविष्ट न झाल्यास शिवाजीनगर न्यायालयात तक्रार प्रविष्ट करीन.
        अधिकोषातील जमा आणि ठेव रक्कम जेव्हा खातेधारकाला लागेल, तेव्हा ती उपलब्ध करून देणे अधिकोषाला बंधनकारक असते. शेख यांचे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये बचत खाते आहे. त्यांना अधिकोषातून ३० सहस्र रुपये तातडीने काढायचे होते. त्यासाठी त्यांनी १४ नोव्हेंबरला तसा अर्ज केला. अधिकोष व्यवस्थापकांनी ती रक्कम देण्यास नकार दिला आणि प्रधानमंत्री आणि गव्हर्नर यांनी मोठी रक्कम देण्यावर निर्बंध घातले आहेत, असे सांगितले.

हिंदूंचा देव विश्‍वात्मके असतो. दुरितांचे तिमिर जावो । विश्‍व स्वधर्म सूर्ये पाहो ॥, अशा प्रार्थना करत हिंदु लहानाचा मोठा झालेला असतो. आपल्याप्रमाणे सारे जग साधे आणि सरळ आहे, अशी समजूत तो करून घेतो आणि फसतो; कारण जग कधीच साधे आणि सरळ नसते ! - श्री. अरविंद विठ्ठल कुळकर्णी, ज्येष्ठ पत्रकार, मुंबई.
४ सहस्र रुपयांची लाच घेणार्‍या प्रांताधिकारी कार्यालयातील खासगी पंटरला अटक

लाचखोरांचा देश भारत !
     भुसावळ - जात प्रमाणपत्रासाठी ४ सहस्र रुपयांची लाच घेतांना फैजपूर प्रांताधिकारी कार्यालयातील खासगी पंटर पद्माकर उपाख्य प्रदीप भारंबे (वय ४८ वर्षे) यांना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक करण्यात आली. त्यांच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला.
१. अमळनेर येथील मूळ रहिवाशाने जात प्रमाणपत्रासह आवश्यक पुराव्यानिशी अर्ज केला होता. हे प्रकरण फैजपूर प्रांताधिकार्‍यांकडे आल्यानंतर चौकशी केली असता लिपीक संदीप जैयस्वाल यांनी खासगी पंटर पद्माकर भारंबे यांच्याशी बोलणे करून घेण्यास सांगितले.
२. जात प्रमाणपत्रासाठी पंटरने १५ सहस्र रुपयांची मागणी केली. यानंतर जळगाव येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आली. विभागाचे उपअधीक्षक पराग सोनवणे यांच्यासह पथकाने भारंबे यांना ४ सहस्र रुपयांची लाच घेतांना अटक केली.

चोपडा येथील वनपालास लाच घेतांना अटक !

जळगाव येथील वाढती लाचखोरी रोखण्यासाठी प्रशासन काय उपाययोजना काढणार आहे ?
     चोपडा (जिल्हा जळगाव) - वनविभागाच्या हद्दीतून गौण खनिजाची वाहतूक करण्याच्या मोबदल्यात ७ सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना वनपाल दिलीप ठाकरे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली. वनपाल ठाकरे यांनी वना महाजन यांच्या भाडोत्री टॅ्रक्टरमधून गौण खनिजाची वाहतूक केली आणि त्यानंतर त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. वना महाजन यांनी पथकाकडे तक्रार केली होती. त्यानुसार पथकाने कारवाई केली.

देशातील काळा पैसा बाहेर काढल्यास आपण अमेरिकेलाही टक्कर देऊ शकतो ! - योगऋषी रामदेवबाबा

       नगर - आपल्या देशामध्ये दहा लाख कोटी रुपये इतका काळा पैसा आहे. तो बाहेर पडल्यास आपली अर्थव्यवस्था चीनपेक्षाही बळकट होईल आणि येत्या पाच-सात वर्षांत आपण अमेरिकेलाही टक्कर देऊ शकू आणि देशाचा विकासदर वाढेल, असे प्रतिपादन योगऋषी रामदेवबाबा यांनी येथील योग शिबिरानंतर आयोजित पत्रकार परिषदेत केले.
       ते पुढे म्हणाले, देशाच्या विकासासाठी बाहेरून पैसा आणण्याची आवश्यकता नाही. काळा पैसा आणि भ्रष्टाचार, बनावट चलन, राजकीय आणि ड्रगमाफियांचा खरा चेहरा समोर आणायचा आहे. त्यातूनच देशाचे भविष्य पालटेल. सर्वांचे उत्पन्न वाढेल, डॉलर आणि पाउंडच्या तुलनेत रुपया मजबूत होईल. त्यासाठी सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता आहे. पंतप्रधान मोदी यांनी वार आणि प्रहार एकाच वेळी केला आहे. पतंजली डेअरीचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होईल. त्यानंतर दहा लक्ष लिटर गायीचे दूध वापरून पनीर, चीज, लोणी सिद्ध करण्यात येणार आहे. यामुळे शेतकर्‍यांना जास्त मोबदला मिळेल. आत्महत्या करणार्‍या शेतकर्‍यांच्या जीवनात समृद्धी येईल. शेतकरी समृद्ध झाल्यास देश समृद्ध होईल.

चाळीसगाव येथे उमेदवारांकडून विद्यार्थ्यांना मद्याचे आमिष !

अशी आमिषे दाखवून देशाच्या युवा पिढीची शक्ती 
व्यर्थ घालवणार्‍या उमेदवारांवर कारवाई होणे अपेक्षित !
        चाळीसगाव - येथे चालू असणार्‍या निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात उमेदवारांकडून विद्यार्थ्यांना मद्याचे आमिष दाखवण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी प्रचारात सहभाग घ्यावा, हा यामागील हेतू आहे. त्यामुळे शहरातील मद्यालये आणि उपहारगृहे यांच्या बाहेर पुष्कळ गर्दी दिसून येत आहे. वयोवृद्धांसह १४ ते १५ या वयोगटातील मुलेही त्यात सहभागी होत आहेत. हीच मुले मद्य पिऊन रात्री सुसाट वेगाने दुचाकीही पळवतात. (अशा अवस्थेतील मुलांचे अपघात झाल्यास त्याला उत्तरदायी कोण ? - संपादक) विद्यार्थ्यांना अशी आमिषे दाखवणे योग्य नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाने या संदर्भात नियमावली करायला हवी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. प्रचाराच्या काळात बनावट मद्यही मोठ्या प्रमाणात येत असल्याने उत्पादन शुल्क विभागाने त्यावरही लक्ष ठेवायला हवे.

याऐवजी भारताला जगातील सर्वांत सात्त्विक राष्ट्र बनवायचे हिंदु राष्ट्राचे ध्येय असेल !

     भारताला जगातील सर्वांत मुक्त अर्थव्यवस्था बनवण्यासाठी आमचे सरकार प्रयत्नशील असून त्यासाठी सुधारणा केल्या जात आहेत. आम्ही आमच्या विकासासाठी आवश्यक प्राथमिक गोष्टींना गती देण्याचा प्रयत्न करत आहोत; मात्र त्यासाठी पर्यावरणाकडेही लक्ष देण्यात येत आहे. आपल्याला भारतात सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. - पंतप्रधान नरेंद्र मोदी (जपानच्या दौर्‍यावर असतांना तेथील व्यावसायिकांंना संबोधित करतांना काढलेले उद्गार)

तृणमूल काँग्रेसला निवडून देणार्‍या हिंदूंना हीच शिक्षा योग्य !

     बंगालच्या श्रीबती गावातील एका क्लबमध्ये ७ नोव्हेंबर २०१६ या दिवशी बॉम्बस्फोट झाला. यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर काही जण घायाळ झाले. या क्लबमध्ये मोठ्या प्रमाणात बॉम्ब आणि स्फोटके लपवून ठेवण्यात आली होती. पोलीस या घटनेची चौकशी करत आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात येथे कोणी आणि कशासाठी स्फोटके आणली होती, याचा शोध घेण्यात येत आहे.
       कोल्हापूर, १८ नोव्हेंबर (वार्ता.) - जलसंपदा विभागाचे निवृत्त सहसचिव सुरेश लक्ष्मण तथा एस्.एल्. पाटील (वय ६१ वर्षे) यांच्या बेहिशेबी मालमत्तेची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने चालू करण्यात आली आहे. १७ नोव्हेंबर या दिवशी पाटील यांच्या कोल्हापूर, सांगली, पुणे आणि सोलापूर येथील घरांवर एकाच वेळी पथकाने धाडी टाकल्या. त्यांची शेतभूमी आणि रिकामे प्लॉट या मिळकतींचीही पथकांनी पाहणी करून त्याविषयीच्या व्यवहारांची चौकशी चालू केली.

इंडियन बँक असोसिएशनचा निर्णय !

  • १९ नोव्हेंबरला नोटा पालटून मिळणार नाही !
  • ज्येष्ठ नागरिकांना सूट
        नवी देहली - इंडियन बँक असोसिएशनने १८ नोव्हेंबरला घोषित केलेल्या निर्णयानुसार १९ नोव्हेंबर या दिवशी बँकांमधून नोटा पालटून देण्यात येणार नाही. हा निर्णय केवळ याच दिवसासाठी मर्यादित असणार आहे. या दिवशी केवळ ज्येष्ठ नागरिकांना (६० वर्षांहून अधिक वयाच्या नागरिकांना) ही सुविधा देण्यात येणार आहे. बँकांत नोटा जमा करणे आणि काढणे, हे चालू रहाणार आहे.

गोहत्या बंदीसाठी मुसलमान राज्यकर्त्यांचा संदर्भ द्यावा लागतो, हे सरकारला लज्जास्पद ! हिंदूंची श्रद्धा म्हणून बंदी का आणता येत नाही ?

     अकबर, जहांगीर आणि बहादुरशाह जफर यांच्या काळातही गोहत्या होत नव्हती. बाबरनामा या पुस्तकात लिहिले आहे की, जर तुम्ही गोहत्या रोखली नाही, तर तुम्ही भारतावर राज्य करू शकत नाही.

फलक प्रसिद्धीकरता

हिंदूंची जगभरातील असुरक्षित मंदिरे !
     मलेशियातील पेनांग राज्यातील १८० वर्षे प्राचीन श्री राजा मादुताई विरम हिंदु मंदिरातील मूर्तींची अज्ञातांनी तोडफोड करून विटंबना केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गेल्या जून मासापासून मलेशियात मंदिरांवर झालेल्या आक्रमणांची ही ६ वी घटना आहे.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Malaysiake Penangme ek prachin mandirpar akraman. Pichle kuch samayme ghati ye chathi ghatna.
Hindusangthan ka abhavhi Dharmpar honewale aghatoka karan
जागो ! : मलेशिया के पेनांग में एक प्राचीन मंदिर पर आक्रमण । पिछले कुछ समय में घटी यह छठी घटना ।
हिन्दूसंगठन का अभाव ही धर्म पर होनेवाले आघातों का कारण !

येरवडा कारागृहात बंदीवानाची आत्महत्या

        येरवडा (जिल्हा पुणे), १८ नोव्हेंबर - पाच वर्षांच्या मुलावर बलात्कार करून त्याची हत्या केल्याच्या प्रकरणी फाशीची शिक्षा सुनावलेल्या बंदीवानाने १७ नोव्हेंबरला रात्री येरवडा कारागृहात गळफास घेऊन आत्महत्या केली. राजगुरुनगर न्यायालयाने या क्रूर गुन्ह्यासाठी खाडकसिंह पांचाळ (वय ३८ वर्षे) याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली होती. त्या नैराश्यातून खाडकसिंह याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

नोटाबंदीचा निर्णय जनहिताचा ! - मुंबई उच्च न्यायालय

      मुंबई - केंद्र सरकारने घेतलेला नोटाबंदीचा निर्णय जनहिताचा असून जनतेने सरकारला सहकार्य केले पाहिजे, असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती मंजुला चेल्लुर यांनी मांडले आहे. या प्रकरणात याचिकाकर्त्यांना सर्वोच्च न्यायालयात जाऊन याचिका करण्याची मुभा आहे, असे सांगत उच्च न्यायालयाने याचिका फेटाळून लावली आहे. नोटाबंदीच्या निर्णयाच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अखिल चित्रे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती.
      पुणे, १८ नोव्हेंबर - नोटाबंदीच्या निर्णयानंतर देशाच्या विविध भागांत अधिकोषांसमोर रांगेत उभ्या असलेल्या ३६ जणांचा मृत्यू झाला. या निर्णयामुळेच नागरिकांना प्राण गमवावे लागल्याचा आरोप करत मृतांना श्रद्धांजली वाहून पुणे महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा स्थगित करण्यात आली. (सभा स्थगित करणे म्हणजे जनतेच्या पैशांचा चुराडा करण्यासारखेच आहे. - संपादक)

संस्कृत भाषेचे विदेशींनी जाणलेले महत्त्व अन् भारतियांकडून संस्कृतची होणारी अक्षम्य हेळसांड !

डॉ. सच्चिदानंद शेवडे
      गेली ७ दशके सातत्याने मेकॉलेप्रणित शिक्षणपद्धतच विद्यार्थ्यांना शिकवली गेल्याने इंग्रजी भाषेलाच ‘करिअर’चा केंद्रबिंदू समजले जात आहे. इंग्रजी भाषेचा वाढता प्रभाव आणि भारतीय मनांवर असलेला तिचा प्रचंड पगडा पहाता प्रस्तुत लेखातून अभारतियांना संस्कृत भाषेचे महत्त्व किती आहे आणि स्वभाषेमध्ये असलेल्या अमूल्य, अलौकिक अशा ज्ञानापासून भारतीय किती अनभिज्ञ आहेत, हे लक्षात येते. संस्कृतचे महत्त्व लक्षात घेऊन तिच्या संरक्षणाचे कर्तव्य पार पाडण्यासाठी प्रत्येकाने स्वतःतील स्वभाषाभिमान वाढवण्याची अनिवार्यता लक्षात आणून देणारा लेख !
१. विदेशींनी ओळखलेले संस्कृत भाषेचे महत्त्व !
      जे.टी. ग्लोव्हर हे लंडनमधील ‘सेंट जेम्स बॉइज स्कूल’चे उपप्राचार्य आहेत. ते वैदिक गणित शिकले. गेली २५ वर्षे ते लंडनमध्ये तो विषय शिकवत आहेत. प्रतिवर्षी १०० मुले गणित शिकून बाहेर पडतात. यात ब्रिटीश, अमेरिकन, चिनी, वेस्ट इंडियन्स आदी वंशाची मुले असतात; पण भारतीय नसतात. ‘हे भारतीय गणितशास्त्र भारतातील प्रत्येक शाळेत शिकवायला हवे’, असे ते आवर्जून सांगतात; पण गणकयंत्राची (‘कॅलक्युलेटर’ची) विक्री बंद होईल, अशी आपल्याला चिंता वाटते. जानेवारी २०११ मध्ये बेंगळूरुमधील नॅशनल हायस्कूलमध्ये विश्‍व संस्कृत पुस्तक मेळा भरला होता. त्या वेळी तिथे ग्लोव्हर आले होते. २५ वर्षीय मायकेल विल्यम्स हा तरुण मँचेस्टरहून या मेळ्यासाठी आला होता. तेथील विद्यापिठात तो संस्कृत शिकवतो आणि पीएच्डीचा अभ्यास करतो.

यांना आपल्या देशाचे कसे म्हणायचे ?

       २६/११ या मुंबईवरील आतंकवादी आक्रमणाचा आरोपी जिहादी डेव्हिड हेडलीने फेब्रुवारी २०१६ मध्ये ‘इशरत जहाँ ही लष्कर-ए-तोयबाची आतंकवादीच होती’, अशी साक्ष दिली होती. यावरून देशभरातील सेक्युलरवादी आणि पुरोगामी यांनी हेडलीला खोटे ठरवत इशरतची पाठराखण करण्यात धन्यता मानली. इशरतच्या प्रातिनिधिक उदाहरणाच्या माध्यमातून अशा देशद्रोही पुरोगाम्यांचा समाचार घेणारा सदर लेख आमच्या वाचकांसाठी साभार प्रकाशित करत आहोत.

पुणे येथे ‘एक भारत अभियान - कश्मीर की ओर’ उपक्रमाच्या अंतर्गत आयोजित हिंदु धर्मजागृती सभेचा प्रसार करतांना समाजातून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि वैशिष्ट्यपूर्ण घटना !

श्री. अभिजीत देशमुख
१. हिंदु धर्मजागृती सभेच्या पूर्वनियोजनाच्या 
आढावा बैठकीला हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा सक्रीय सहभाग
    ‘एक भारत अभियाना’च्या अंतर्गत आयोजित हिंदु धर्मजागृती सभेच्या पूर्वनियोजन आढावा बैठकीस जवळपास ४५ हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे १३० हून अधिक धर्माभिमानी उपस्थित होते. बैठकीत हिंदुत्वनिष्ठांनी सभेच्या विविध सेवांमध्ये सहभागी होण्याचे नियोजन केले. ही पूर्वनियोजन बैठक, तसेच विविध गावांमध्ये सभेच्या प्रसारामध्ये हिंदुत्वनिष्ठांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
१ अ. सामाजिक संकेतस्थळांद्वारे व्यापक प्रसार : ७० हून अधिक हिंदुत्वनिष्ठांनी सामाजिक संकेतस्थळांच्या माध्यमातून जवळपास २८ लक्ष लोकांपर्यंत सभेचा विषय पोचवण्याचे नियोजन केले.

पत्रकारांना संरक्षण हवे !

      बिहारमध्ये दैनिक भास्करचे पत्रकार श्री. धर्मेंद्र सिंह यांची गोळी घालून हत्या करण्यात आली. धर्मेंद्र हे सासाराममध्ये अवैध खाण माफियांच्या निशाण्यावर होते. सिंह यांनी त्याविषयी वाचा फोडणारे लेखन केले होते आणि त्यातूनच ही हत्या झाल्याचा संशय आहे.

नक्षलवादी महिलांनी शरणागती पत्करण्यामागील कारणे !

     ‘गेल्या काही वर्षांच्या तुलनेत गत काही मासांमध्ये महिला नक्षलवाद्यांनी मोठ्या संख्येने पोलिसांसमोर शरणागती पत्करली आहे. शरणागती पत्करण्यामागे त्यांनी सांगितलेली पुढील कारणे चकित करणारी आहेत.
१. विवाह करण्यास बंदी; मात्र वरिष्ठांकडून लैंगिक शोषण ! 
     नक्षलवादी महिलांना विवाह करण्याची अनुमती नसते. त्यांच्या गटाचे वरिष्ठ सदस्य या महिलांचा लैंगिक छळ करतात. विरोध केल्यावर हे सदस्य त्यांना निमूटपणे सहन करण्याचा समुपदेश करतात. जेव्हा नक्षलवादी महिला गरोदर रहाते, तेव्हा तिचा गर्भपात केला जातो, अशीही अनेक उदाहरणे समोर आली आहेत. गरोदर असतांना नक्षलवादी गटात रहाणे अवघड असल्याने प्रसंगी त्यांना गर्भपातासाठी स्फोटात वापरली जाणारी दारूही खायला दिली जाते. शरणागती पत्करणार्‍या अनेक महिलांनी त्यांना आई होण्याची इच्छा असणे, हे त्यांनी नक्षलवाद सोडण्यामागचे कारण असल्याचे सांगितले आहे.

भ्रष्टाचार : सामाजिक विघटनास कारणीभूत कुकर्म !

     हल्ली भ्रष्टाचार हा शिष्टाचार बनला आहे. कुठलेही क्षेत्र यास अपवाद नाही. भ्रष्टाचार खर्‍या अर्थाने घालवण्यासाठी आधी व्यक्तीची भ्रष्टाचारी वृत्ती घालवली पाहिजे. ही वृत्ती घालवायची असेल, तर साधना करणे क्रमप्राप्त आहे. यासाठी सत्वगुणी लोकांचे हिंदु राष्ट्र आवश्यक आहे. 
१. ‘भ्रष्टाचार तळागाळापर्यंत पोचला आहे. त्याची झळ सामान्यांना बसते. पैसे दिल्याशिवाय कामच पुढे सरकत नसल्याच्या हतबलतेतून ती भ्रष्टाचारात ओढली जातात. त्यामुळे देशाच्या भवितव्याविषयी सामान्य माणूस मुळीच आशावादी नाही.
२. आरंभी लोकसभेमध्ये विद्वान लोक होते. आचार्य कृपलानी, गोपालन, डॉ. राम मनोहर लोहिया अशी अभ्यासू मंडळी होती. जवळ पैसे नसलेला एस्.एम्. जोशी यांच्यासारखा नेता निवडून दिला जात होता. लोकच त्यांना निवडणुकीसाठी पैसे देत होते. आजचे खासदार कोट्यधीश असतात. त्यांना गरिबांविषयी काय आणि किती आस्था असणार आहे ?

भक्तांकडून देवीवर होणार्‍या नारळांच्या वर्षावाने पुजार्‍यांना दुखापत होणे, हे हिंदूंमधील धर्मशिक्षणाच्या अभावाचे फलित !

      ‘गाझियाबादमधील मोदीनगर येथील महामाया देवीची जत्रा प्रतिवर्षी भरते. या जत्रेत महादेवीला भक्तांकडून नारळ आणि खण अर्पण करण्याची प्रथा विलक्षण वाटते. सारे भक्त गाभार्‍यात असलेल्या देवीच्या पायाशी खण आणि नारळ यांचा वर्षाव करतात. त्या वर्षावामुळे काही क्षणातच देवी नारळाच्या ढिगामध्ये बुडून जाते. त्यानंतर पुजार्‍यांनी गाभारा रिकामा केल्यानंतर पुन्हा पहिलाच प्रकार चालतो. नारळांनी डोकी फुटू नयेत; म्हणून पुजार्‍यांनी डोक्यावर शिरस्त्राण घातलेले असते, असे असले तरी अंगावर नारळ पडल्याने त्यांना काही प्रमाणात दुखापत होतेच.’ (तरुण भारत, २७.३.१९९९) 
     असे तामसी कृत्य करणे धर्माला अनुसरून नाही. देवीला नारळ आणि खण भावपूर्ण अर्पण केल्याने तिचा कृपाशीर्वाद लाभतो ! स्वतः निखळ आनंद अनुभवत इतरांवर चैतन्यमय मधुर वाणीने आनंदाची उधळण करणार्‍या सनातनच्या ३६ व्या संत पू. (श्रीमती) शालिनी नेनेआजी (वय ९३ वर्षे) !

पू. शालिनी नेने
      सनातनच्या ३६ व्या संत पू. शालिनी नेनेआजी यांचा शनिवार, कार्तिक शुक्ल पक्ष त्रयोदशी (१२.११.२०१६) या दिवशी तिथीनुसार वाढदिवस झाला. त्यांचा आज १९.११.२०१६ या दिवशी दिनांकानुसार वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.
पू. नेनेआजी यांना वाढदिवसानिमित्त 
सनातन परिवाराकडून कृतज्ञतापूर्वक नमस्कार !
     ‘पू. नेनेआजींनी देवद आश्रमात रहायला येऊन साधकांना सेवेची जी संधी दिली आणि जो आनंद दिला, त्याबद्दल साधकांच्या वतीने मी त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो आणि वाढदिवसानिमित्त त्यांना नमस्कार करतो.’ - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

मग ईश्‍वरप्राप्तीचा आनंद अनुभवेल माझे हे मन ।

श्री. अजित तावडे
४.१०.२०१६ या दिवशी व्यष्टी आढाव्यामध्ये माझ्या मनात आता चूक लपवूया. आधीच्या आढावा घेणार्‍या साधकाने करायला सांगितलेला एक प्रयत्न आताच्या आढावा घेणार्‍या साधकाला ठाऊक नसणार, असा विचार आला. तेव्हा मी सूक्ष्मातील प.पू. डॉक्टरांना संपूर्णपणे शरण गेलो आणि तुम्हीच माझ्याकडून योग्य काय, ते करवून घ्या, अशी प्रार्थना झाली. नंतर मी आढाव्यामध्ये ती चूक सांगून क्षमा मागितली. तेव्हा माझ्या लक्षात आले, आपले स्वभावदोष आणि अहं यांमुळे आपण कितीही चुका लपवण्याचा प्रयत्न केला, तरी ईश्‍वर आपल्याला त्यांविरुद्ध प्रक्रिया शिकवून पुढे घेऊन जातातच. प.पू. डॉक्टर आपल्याला या सर्वांतून बाहेर काढून नेणारच आहेत. त्या वेळी मला त्यांच्या कृपेने पुढील काव्यपंक्ती सुचल्या.

महर्षींच्या आज्ञेनुसार सातारा येथील श्‍वेत गणपतीला पुष्पहार अर्पण करण्याची सेवा करतांना आलेल्या अनुभूती

१. सेवा मिळाल्यावर भाव जागृत होऊन पुष्कळ आनंद जाणवणे 
आणि अशक्य असतांना पुष्पहार करण्यासाठी सहजतेने फुले मिळणे 
      ‘श्‍वेत गणपतीला पुष्पहार अर्पण करण्याची सेवा मिळाल्यावर प्रथम मला पुष्कळ कृतज्ञता वाटली आणि भाव जागृत होऊन आतून पुष्कळ आनंद जाणवत होता. ‘पुष्पहार करण्यासाठी फुले कुठून मिळणार ?’, असा विचार माझ्या मनात आला नाही. जवळपास कुठेच फुले नव्हती; पण ती सहज मिळाली. ज्यांच्याकडून फुले मिळतील, असे वाटले नाही, त्यांनीही फुले देऊन सहकार्य केले. श्‍वेत गणपतीचे मंदिर ठराविक वेळीच उघडे असते; परंतु मंदिरात गेल्यावर तेथील पुजारी मंदिर त्वरित उघडून श्‍वेत गणपतीला पुष्पहार घालण्यासाठी आले.

शस्त्रकर्म झाल्यानंतर देवद आश्रमातील साधिका सौ. नीला गडकरी यांना आलेल्या अनुभूती

सौ. नीला रमेश गडकरी
१. शुद्धीवर येत असतांना साधिकेने प.पू. डॉक्टरांना हाक मारणे
आणि त्याच वेळी आधुनिक वैद्य तिला हाक मारून जागे करत असणे
   २३.९.२०१६ या दिवशी माझे पित्ताशयातील खडे काढण्याचे शस्त्रकर्म झाले. मी शुद्धीवर येत असतांना प.पू. डॉक्टरांना हाक मारत होते. त्या वेळी तेथील आधुनिक वैद्यांचा (डॉक्टरांचा) मला आवाज ऐकू आला. ते मला हाक मारून जागे करत होते. मला सतत प.पू. डॉक्टरांची आठवण येत होती.
२. सेवेसाठी आलेल्या कु. शलाका सहस्रबुद्धे हिला ईश्‍वरानेच पाठवले आहे,
असे वाटणे, त्या साधिकेने पुष्कळ आनंदाने सेवा करणे आणि
ती मुलगी असल्याबद्दल इतर रुग्णांनी विचारणे
   २४.९.२०१६ या दिवशी सकाळी ९.३० वाजता सेवेसाठी आलेल्या पुण्याच्या कु. शलाका सहस्रबुद्धे या साधिकेला पाहून मला पुष्कळ आनंद झाला. ईश्‍वरानेच हिला पाठवले आहे, असे वाटले. तिने माझा हात हातात घेतला. माझ्या तोंडवळ्यावरून हात फिरवला. माझ्या डोक्यावरून हात फिरवत ती म्हणाली, काकू, बरं वाटतं का ? त्या वेळी ती हात फिरवत नसून ईश्‍वरच हात फिरवत आहे. तिच्या माध्यमातून देव माझी विचारपूस करत आहे, असे वाटत होते. त्या वेळी सलाईन लावल्यामुळे मला हलता येत नव्हते. ती साधिका माझी कोणतीही सेवा आनंदाने करत होती. रुग्णालयातील इतर रुग्ण विचारायचे, तुमची मुलगी आहे का ? मी हो म्हणायचे. पुष्कळ कृतज्ञता व्यक्त व्हायची. देवा ! तू किती करतोस रे माझ्यासाठी !

सनातनच्या रामनाथी आश्रमातील सौ. विजयलक्ष्मी आमाती यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

सौ. विजयलक्ष्मी आमाती
१. अक्षतांच्या हवनानंतर मनातील विचार उणावून
नामजपाव्यतिरिक्त कोणताही विचार मनात न येणे
   सप्टेंबर २०१६ च्या आरंभीपासून मला पुष्कळ त्रास होत होता. अंगदुखी, जडपणा आणि मनात असंख्य विचार यांनी मी हैराण झाले होते. १६.९.२०१६ या दिवशी पौर्णिमा असल्याने सायंकाळी झालेल्या अक्षतांच्या हवनानंतर मला चांगले वाटू लागले. (प्रत्येक पौर्णिमा आणि अमावास्या या दिवशी साधकांचे शारीरिक, मानसिक अन् आध्यात्मिक त्रास दूर होण्यासाठी हवन केले जाते. त्यात साधक अक्षतांची आहुती देतात. - संकलक) हवनाच्या दुसर्‍या दिवशी नामजपाला बसल्यावर माझ्या मनात नामजपाव्यतिरिक्त कोणताही विचार नव्हता. पुष्कळ मासांनंतर (महिन्यांनंतर) ही अनुभूती आल्यामुळे मला पुष्कळ आनंद झाला.

शिष्याची साधना व्यर्थ जाऊ नये, यासाठी गुरूंनी त्याला समग्र ज्ञान देणे आवश्यक !

     ‘एका गुरूंकडे चार व्यक्ती गेल्या. चौघांनाही मुले हवी होती. गुरूंनी तिघांना निरनिराळे उपाय सांगितले. चौथ्याला ते म्हणाले, ‘‘तू तुझा हट्ट मागे घे. तुझ्या नशिबी मूल नाही.’’ तेव्हा तो म्हणाला, ‘‘देवाला जे अशक्य, ते गुरूंना शक्य असते. तुम्ही काहीही करा; पण मला मुलगा द्याच.’’
     गुरूंनी मंत्र दिला. एक वर्षात चौघांनाही मुले झाली. एक वर्षाने तो गुरूंजवळ आला आणि म्हणाला, ‘‘बघा गुरुदेव, झाला कि नाही मुलगा !’’ गुरु म्हणाले, ‘‘तुझी १० वषार्र्र्र्र्ंची साधना मी त्याच्यासाठी खर्ची घातली. आता तू पुन्हा ‘अ आ इ ई..’ पासून शिक.’’ याचे ज्ञान जर आधीच असते किंवा शिकवले असते तर ! म्हणून शिष्य जे करतो, त्या प्रत्येक गोष्टीचे ज्ञान हवे.’ 
      (गुरूंनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीवर श्रद्धा ठेवून गुरूंचे आज्ञापालन करणे, हे शिष्याचे कर्तव्य असते. गुरु बर्‍याचदा सर्व गोष्टींची कारणमीमांसा सांगत नाहीत; म्हणून केवळ त्यांचे आज्ञापालन करणे, हेच शिष्यत्वाचे श्रेष्ठ लक्षण आहे. - संकलक) 
- पुष्पांजली, बेळगाव (२३.११.२०१४, रात्री ११.३०)आनंदी असणारा ५५ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला रायचुरू, कर्नाटक येथील चि. श्रीकर विनोद (वय २ वर्षे) !

उच्चलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी !
या पिढीतील चि. श्रीकर विनोद आणि कु. श्रीरक्षा विनोद ही दैवी बालके आहेत !
चि. श्रीकर विनोद
पालकांनो, हे लक्षात घ्या ! 
     ‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ - (परात्पर गुरु) डॉ. आठवले 
चि. श्रीकर विनोद याला वाढदिवसानिमित्त 
सनातन परिवाराच्या वतीने शुभाशीर्वाद !
१. श्रीकर नेहमी आनंदात असतो. झोपतांना मुद्रा करून झोपतो.
२. श्रीकर ध्यानमंदिरात आनंदाने हसत असणे
     श्रीकर ५ मासांचा (महिन्यांचा) असतांना आम्ही रामनाथी आश्रमात गेलो होतो. सायंकाळी आरतीच्या वेळी मी श्रीकरला घेऊन ध्यानमंदिरात बसले. तेव्हा तो पुष्कळ आनंदाने हसत होता. त्याला पाहून शेजारच्या साधकाने सांगितले, ‘‘तुमचा मुलगा प.पू. भक्तराज महाराजांसमवेत बोलत आहे.’’ त्याचे अंग घामाने भिजलेले होते, तरीही तो चिडचिड न करता आनंदात होता.

धर्माचरणाची आवड असलेली ५१ टक्के आध्यात्मिक पातळीची आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली रायचुरू, कर्नाटक येथील कु. श्रीरक्षा विनोद (वय ६ वर्षे) !

कु. श्रीरक्षा विनोद
१. ‘श्रीरक्षाला देवळातील प्रसाद पुष्कळ आवडतो.
२. प्रत्येक सणाच्या दिवशी उटणे लावून अंघोळ करणे
     प्रत्येक सणाच्या दिवशी ती उटणे लावून अंघोळ करते, तसेच घरातील सर्वांना आठवण करून देते.
३. वाढदिवसाच्या दिवशी देवाला आणि मोठ्यांना नमस्कार करणे
     तिचा वाढदिवस आम्ही तिथीनुसार साजरा करतो. त्या दिवशी उटणे लावून अभ्यंगस्नान करून ती नवीन कपडे घालते. नंतर पाट, रांगोळी, एका ताटात सनातन कुंकू, अक्षता, फुलांचा हार, मिठाई ठेवण्यास मला ती साहाय्य करते. तिला औक्षण केल्यानंतर देवाला तसेच तिच्यासाठी वडिलधार्‍या व्यक्तींना नमस्कार करते. ती कुणाचाही तिथीप्रमाणे वाढदिवस साजरा करायचा असल्यास उत्साहाने साहाय्य करण्यास येते.

देवाचे स्मरण आणि ज्ञान परस्परांना पूरक असणे

श्री. राम होनप
   देवाचे स्मरण चालू असल्यामुळे ईश्‍वरी ज्ञान मिळते आणि ज्ञानाच्या विषयातील देवाच्या गुणगानामुळे त्याचे स्मरण टिकून रहाण्यास साहाय्य होते. त्यामुळे देवाचे स्मरण आणि ज्ञान परस्परांना पूरक ठरते. - श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (८.११.२०१६)


प.पू. डॉक्टरांच्या रूपे आम्हास भेटली ही गुरुमाऊली ।

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...
गुरुमाऊली, तव प्रेम अपरंपार ।
तव मधुर नेत्रास पाहुनी ते मज कळे ॥ १ ॥

त्या प्रेमाचे वर्णन करण्या शब्दही अपुरे पडती ।
तुझ्या या कृपेची महती काय गाऊ मी ॥ २ ॥

माऊलीस कसे आळवावे, ते कळेना या लेकरासी ।
सौ. सायली करंदीकर

आठवण्या गेले, तर कळते असमर्थता स्वतःची ॥ ३ ॥ 

दगडाचे फूल बनून जायचे त्या चरणी ।
निर्मळता आणायची फुलाप्रमाणे या मनी ॥ ४ ॥

पावलो-पावली अध्यात्म जगण्या मज ती शिकवी ।
सर्वांनाच घडवूनी आमच्या जीवनाचा उद्धार करी ॥ ५ ॥

प.पू. डॉक्टरांच्या रूपे आम्हास भेटली ही गुरुमाऊली ।
आम्ही सर्व साधक शरण आलो या कोमल चरणी ॥ ६ ॥
- सौ. सायली करंदीकर (पूर्वाश्रमीच्या कु. सायली गाडगीळ) (वय २० वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

साधनेविषयीच्या पोषक वातावरणामुळे सर्वाधिक फलनिष्पत्ती असणारे आणि सनातन धर्म राज्याची अनुभूती देणारे रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमातील स्वयंपाकघर !

कु. हर्षदा दातेकर
१. स्वयंपाकघरात गेल्यावर मला येथील वेगवान सेवा करायला जमेल का ?,
असा विचार मनात येणे आणि श्री अन्नपूर्णादेवीला प्रार्थना करताच
स्वतःकडून देवीच सेवा करवून घेणार आहे, असे वाटून मन निश्‍चिंत होणे
   मी शस्त्रकर्मातून बरी झाल्यानंतर प्रथमच आज स्वयंपाकघरात १ घंटा (तास) सेवेसाठी जाणार होते. खरेतर पूर्वी मी अन्य साधकांसमवेत अल्पाहार सेवेला स्वयंपाकघरात ५ ते ६ वेळा गेले होते; पण तेथे महाप्रसाद बनवण्याच्या सेवेच्या वेगाप्रमाणे मला पटापट सेवा करायला जमेल का ?, असा विचार माझ्या मनात येत होता. तेव्हा मी स्वयंपाकघरातील श्री अन्नपूर्णादेवीच्या मूर्तीसमोर उभी राहिले आणि मला येथे सेवा करता येऊ दे आणि माझ्याकडून स्वभावदोष अन् अहं निर्मूलनासाठी प्रयत्न होऊ देत, अशी प्रार्थना केली. क्षणार्धातच माझे मन निर्विचार झाले. तसेच माझ्याकडून अन्नपूर्णादेवीच सेवा करून घेणार आहे, असा तीव्र विचार मनात आला आणि माझे मन हलके होऊन मी निश्‍चिंत झालेे.

बोधचित्र

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
वेळ न मिळणे
     जे व्यय (खर्च) करायचे आहे, ते तुम्ही गोळा (जमा) करता आणि जे गोळा करायचे आहे, ते व्यय करता. याउलट कसे करायचे ते शिका.
भावार्थ :
जे व्यय करायचे आहे, ते तुम्ही गोळा करता म्हणजे पैसा गोळा करता आणि जे गोळा करायचे आहे, ते व्यय करता म्हणजे साधना करण्याचा बहुमूल्य वेळ वाया घालविता. याउलट कसे करायचे ते शिका म्हणजे वेळेचा जास्तीतजास्त वापर साधना करण्यासाठी करा.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)
परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
      स्वतःच्या आई-वडिलांची, भावंडांची, सासू-सासर्‍यांची काळजी न घेणारे तरुण राष्ट्र आणि धर्म यांसाठी कधी काही करतील का ? हे आहे स्वातंत्र्यानंतरच्या ७० वर्षांतील धर्मशिक्षणाच्या अभावामुळे आणि बुद्धीप्रामाण्यवाद्यांच्या प्रसारामुळे धर्माविषयी तरुण भ्रमित झाल्याचे फळ ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले


योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

परमेश्‍वरावर दृढ श्रद्धा ठेवा 
परमेश्‍वरावरील दृढ श्रद्धा कोणत्याही संकटाशी सामना 
करण्याचे बळ देते. परमेश्‍वराने कितीही परीक्षा घेतली, तरी श्रद्धा स्थिर असावी. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

शिक्षणक्षेत्रातही ‘सर्जिकल स्ट्राईक’ हवा !

संपादकीय
      दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तीच्या बाह्यरंगाकडे लक्ष न देता त्याचा रोग कसा समूळ नाहीसा होईल, याकडे सर्वसामान्यतः लक्ष दिले जाते. रुग्ण व्यक्ती ताजातवाना व्हावा, यासाठी आधुनिक वैद्यांकडे जाण्याऐवजी कुणी व्यक्ती रुग्णाला सौंदर्यवर्धनालयात घेऊन जाऊ लागली, तर त्या व्यक्तीला वेड्यात काढले जाईल. सामान्य स्तरावर साहजिकपणे होणारी ही विचारप्रक्रिया राष्ट्रीय समस्यांच्या संदर्भात होतांना मात्र आढळून येत नाही. त्यामुळेच मग बर्‍याच वेळेला ‘आग रामेश्‍वरी आणि बंब सोमेश्‍वरी’ अशी अवस्था विविध क्षेत्रांमध्ये अनुभवायला मिळते. उच्च शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी ‘नॅक’ समिती नेमली जाऊनही महाविद्यालयांमध्ये सुधारणा झाल्या नसल्याने ‘नॅक’च्या संदर्भातही असाच अनुभव येतो. ‘नॅक’चा उद्देश आणि फलनिष्पत्ती यांचा ताळमेळ लागत नाही. शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न होत असतांना ही दुरवस्था आहे. त्यामुळेच सरकारला कोट्यवधी रुपये खर्चून कौशल्य विकास कार्यक्रम घेण्याची वेळ आली आहे. या परिस्थितीमुळेच उमेदवार पदवीधारक असला, तरी तो लायक असण्याची हमी देण्याचे धाडस कुणी करत नाही.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn