Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

मंदिरातील दानपेट्यातील रक्कम त्याच दिवशी अधिकोषात जमा करा ! - केंद्र सरकार

मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम ! हिंदूंच्या मंदिरांतील संपत्तीविषयी असा निर्णय
घेणारे केंद्र सरकार चर्च आणि मशीद यांच्याविषयी कोणती भूमिका घेणार आहे ?
     कोल्हापूर - राज्यातील सर्व सरकारीकरण झालेल्या मंदिरातील दानपेट्या प्रतिदिन उघडा आणि त्यातील रक्कम अधिकोषात जमा करा, असा आदेश केंद्र सरकारने देशातील सर्व देवस्थानांना १६ नोव्हेंबर या दिवशी दिला आहे. केंद्रीय मंत्रीमंडळाचे सचिव प्रदीपकुमार सिन्हा यांनी सर्व राज्यांचे मुख्य सचिव आणि देशातील निवडक २० जिल्हाधिकार्‍यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. यामध्ये राज्यातील कोल्हापूर, नगर आणि सोलापूर येथील जिल्हाधिकारी सहभागी झाले होते. या बैठकीनंतर राज्याच्या विधी आणि न्याय विभागाने तात्काळ परिपत्रक काढून वरील आदेश दिला.
     या बैठकीला पशुपतीनाथ, शबरीमाला, तिरूमला आदी देवस्थानांसह महाराष्ट्रातील कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी, तुळजापूर येथील श्री भवानी, पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई, शिर्डी येथील श्री साईबाबा या देवस्थानांचे प्रतिनिधी म्हणून देशभरातील २० जिल्हाधिकारी उपस्थित होते. चलनातून ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या नोटा रहित झाल्याने, त्या जागी पालटून देण्यात येणार्‍या नव्या नोटांचा देशभर तुटवडा जाणवत आहे. अधिकोषांत सुट्या पैशांचा प्रचंड तुटवडा आहे.

नोटा पालटण्याची मर्यादा साडेचार सहस्रांवरून २ सहस्र रुपये !

एकदा घेतलेले निर्णय लगेच पालटावे लागतात, यावरून सरकार वेळीच योग्य
निर्णय घेण्यात कमी पडत आहे, असे जनतेला वाटल्यास चूक ते काय ?
  • विवाहासाठी कागदपत्रे दाखवून अडीच लाख रुपये काढण्याची मुभा
  • खाद्यबिजांसाठी शेतकर्‍यांना आठवड्याला २५ सहस्र रुपये काढण्याची अनुमती
  • मंदिर आणि विश्‍वस्त संस्था यांना मिळणार्‍या अर्पणावरही लक्ष
     नवी देहली - केंद्रीय अर्थमंत्रालयाचे अतिरिक्त सचिव शक्तीकांत दास यांनी १७ नोव्हेंबरला सकाळी पत्रकार परिषद घेऊन नोटा रहित करण्याच्या निर्णयाच्या संदर्भातील नवीन सूचना घोषित केल्या. दास यांनी सांगितले की, ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या नोटा पालटण्याची मर्यादा साडेचार सहस्र रुपयांवरून २ सहस्र रुपये इतकी करण्यात आली आहे. हा नियम १८ नोव्हेंबरपासून लागू करण्यात येणार आहे. तसेच विवाहासाठी अधिकोषातून अडीच लाख रुपये काढण्यात येऊ शकतात; मात्र यासाठी त्या संदर्भातील कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. तसेच ही रक्कम एकाच वेळी आणि मुला/मुलींचे आईवडील काढू शकतात. या व्यतिरिक्त शेतकर्‍यांना खत आणि बियाणे यांसाठी आठवड्याला २५ सहस्र रुपये अधिकोषातून काढण्याची अनुमती देण्यात आली आहे. सर्वसामान्य नागरिकांना ही मर्यादा २४ सहस्र रुपये इतकीच ठेवण्यात आली आहे.
दास पुढे म्हणाले की,
१. काही गट लोकांना परत परत बँकेत पैसे भरण्यासाठी पाठवत असल्याने मोठ्या रांगा लागत आहेत. या संदर्भात बँकांना काही सूचना करण्यात आल्या आहेत.
२. सरकारी औषधालयांप्रमाणे जुन्या नोटा घेण्याची अनुमती आता खाजगी औषधालयांनाही देण्यात आली आहे. सरकारी औषधालयांत कोणी या नोटा घेत नसतील, तर कारवाई करण्यात येईल.
३. देशातील मंदिर आणि विश्‍वस संस्था यांमध्ये जमा होणार्‍या पैशांवरही लक्ष ठेवण्यात येत आहे.

सहकारी बँकांना नोटा पालटण्याची अनुमती नाहीच ! - केंद्र सरकार ठाम

     नवी देहली - ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास आणि पालट करून देण्यास सहकारी बँकांना कदापि अनुमती देणार नाही, असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी स्पष्ट केले. अशी अनुमती दिली गेल्यास सहकारी बँका काळा पैसा पांढरा करण्याचे केंद्र बनतील, असे जेटली यांनी सांगितले.
    रिझर्व्ह बँकेने १४ नोव्हेंबर या दिवशी परिपत्रक काढून जिल्हा सहकारी बँकांना रोकड स्वीकारण्यास आणि नोटा पालटून देण्यास बंदी घातली होती. राज्यात अनेक ठिकाणी राष्ट्रीयकृत किंवा खासगी बँकांच्या शाखा नसल्यामुळे सहकारी बँकांवरील ही बंदी मागे घेण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे. शिवसेनेकडूनही ही मागणी करण्यात आली आहे. शिवसेनेच्या खासदारांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना दिलेल्या निवेदनात याविषयी उल्लेख करण्यात आला होता.

बचत खात्यात अडीच लाख रुपये भरणार्‍यांनाही नोटीस पाठवणार !

     नवी देहली - सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सिज (सीबीडीटी) या सरकारी संस्थेने १५ नोव्हेंबरला आयकर कायद्यात काही पालट केले आहेत. त्यानुसार सीबीडीटीने बँकांना आदेश दिला आहे की, ९ नोव्हेंबर ते ३० डिसेंबर या कालावधीत एखाद्या व्यक्तीच्या एक आणि त्याहून अधिक करंट खात्यामध्ये साडेबारा लाख रुपये किंवा त्याहून अधिक रक्कम जमा करण्यात आली, तर त्याची माहिती तात्काळ बोर्डाला देण्यात यावी. तसेच बचत खात्यामध्ये अडीच लाख रुपये किंवा त्याहून अधिक रक्कम भरण्यात आली असेल, तर त्याचीही माहिती बोर्डाला देण्यात यावी. या माहितीवरून आयकर विभाग संबंधितांना नोटीस पाठवणार आहे.
    नोटिशीमध्ये संबंधितांना जमा करण्यात आलेली रक्कम कोठून मिळवली, त्या स्रोताची माहिती द्यावी लागणार आहे. यापूर्वी एका वर्षामध्ये बचत खात्यात १० लाख रुपयांपर्यंतची रक्कम जमा करण्याची मुभा होती; परंतु नव्या नियामामुळे ही मर्यादा अडीच लाख रुपये करण्यात आली आहे. तसेच करंट खात्यासाठी ५० लाखावरून ती साडेबारा लाख करण्यात आली आहे.

राजस्थानमध्ये इसिसच्या आतंकवाद्याला अटक !

     जयपूर - राजस्थानमधील सिकर जिल्ह्यातील फतेहपूर येथून इसिसच्या आतंकवाद्याला पोलिसांनी अटक केली आहे. जमीर अहमद असे या आतंकवाद्याचे नाव आहे. तो १५ दिवसांपूर्वीच भारतात आला होता.
     मुसलमान युवकांना इसिसमध्ये भरती करणार्‍या एका आतंकवाद्याची माहिती काही दिवसांपूर्वी गुप्तचर यंत्रणेला मिळाली आहे. साझीर अब्दुल्ला असे या आतंकवाद्याचे नाव असून भारतीय गुप्तचर यंत्रणा त्याचा शोध घेत आहेत. युवकांना प्रेरित करून त्यांना इसिसमध्ये भरती करण्याचे काम अब्दुल्ला करत आहे.

डोनाल्ड ट्रम्प पाकला आतंकवादी देश घोषित करणारे विधेयक संमत करू शकतात ! - ट्रम्प यांच्या सल्लागाराचा दावा

जे भारताने प्रथम करायला हवे, ते अमेरिका करत आहे. ही विसंगती असतांना
जागतिक महाशक्ती बनण्याचे भारतीय सरकाचे ध्येय साध्य होईल का ?
     नवी देहली - पाकिस्तानला आतंकवादी देश घोषित करावे, हे अमेरिकी संसदेतील दोघा खासदारांनी मांडलेले विधेयक नवे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प संमत करू शकतात, असे ट्रम्प यांचे सल्लागार आणि भारतीय वंशाचे उद्योगपती शलभ कुमार यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ट्रम्प यांच्यात सलोख्याचे संबंध निर्माण होतील आणि भारत-अमेरिकेतील मैत्री अधिक दृढ होईल, असा विश्‍वासही शलभ कुमार यांनी व्यक्त केला आहे.
    रिपब्लिकन पक्षाचे टेड पो आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे डाना रोहराबाचर या दोन प्रभावशाली खासदारांनी पाकविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनीच वरील विधेयक आणले आहे. या विधेयकासंबंधी प्रशासनाकडून अहवाल मागवण्यात आला आहे.

मलेशियातील हिंदूंच्या मंदिरात मूर्तींची तोडफोड केल्याची ६ वी घटना !

हिंदूंच्या संघटनाची आवश्यकता ! हिंदूंवर भारतातच नव्हे, तर आता जगभरही आघात होत आहेत.
बहुसंख्य हिंदूंचे भारत सरकार त्याविषयी काही करत नाही; म्हणून हिंदु राष्ट्राची स्थापना करा !
     जॉर्ज टाउन (मलेशिया) - मलेशियातील पेनांग जलन तिमाह येथील श्री राजा मादुताई विरम हिंदु मंदिरातील मूर्तींची अज्ञातांनी तोडफोड करून विटंबना केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गेल्या जून मासापासून राज्यात मंदिरावर होणार्‍या आक्रमणाची ही ६ वी घटना आहे.
     हे मंदिर १८० वर्षे प्राचीन असून तेथील ३ मूर्तींची विटंबना झाली आहे. भगवान मुनिश्‍वरम् मूर्तीचा हात तोडला आहे, कालीमातेच्या हातातील तलवार गायब आहे, तर श्री गणेशाची मूर्ती जागेवरून हलवून तोडण्यात आली आहे.
     मंदिर व्यवस्थापनाचे अध्यक्ष मायकेल अंथोनी यांनी दिलेल्या माहितीनुसार हा प्रकार सायंकाळी घडला. या मंदिराला द्वारे नसून ते खुल्या मैदानात बांधले आहे. कोमतार येथील आमदार तेह लाई हेंग यांनी पोलिसांना आरोपींचा त्वरित शोध लावण्यास सांगितले आहे. तसेच मंदिरातील मूर्ती नव्याने स्थापन करण्यासाठी ३० सहस्र रुपये दान केले आहेत.

बांगलादेशमध्ये एका धर्मांधाने फेसबूकवर कालीमातेच्या मूर्तीवर श्‍वानाने लघुशंका केल्याचे दाखवून देवीचे विडंबन केले !

     ढाका (बांगलादेश) - बांगलादेशातील नौखाली जिल्ह्यातील चार हजारी गावातील निवासी युसुफ अली मास्तर याने १३ नोव्हेंबर या दिवशी त्याच्या फेसबूकवरील पानावर कालीमातेच्या मूर्तीवर श्‍वानाने लघुशंका केल्याचे दाखवून हिंदु देवतेचे विडंबन केल्याने हिंदूंच्या धार्मिक भावना संतप्त झाल्या आहेत; मात्र पोलिसांनी या घटनेची कोणतीही नोंद न घेता गुन्हा दाखल केला नाही. (काही दिवसांपूर्वी एका फेसबूकवर मुसलमानांच्या श्रद्धास्थानाचा अवमान केल्यावरून ३ सहस्र धर्मांधांनी हिंदूंवर आक्रमण करून २० मंदिरांची तोडफोड केली होती. तसेच हिंदूंची १५० घरे जाळण्यात आली होती. पोलिसांनी तात्काळ कृती करत एका हिंदूला अटक केली. आता हिंदूंच्या श्रद्धास्थानाचा अवमान करण्यात आला आहे. हिंदू सहिष्णु आणि अल्पसंख्यांक असल्यामुळे ते कधीही कायदा हातात घेणार नाहीत; मात्र बांगलादेश सरकारने आरोपीवर तात्काळ कारवाई केली पाहिजे. - संपादक)      बांगलादेश मायनॉरिटी वॉच या बांगलादेशातील हिंदुत्वनिष्ठ मानवाधिकार संघटनेचे अध्यक्ष श्री. रवींद्र घोष यांना ही बातमी कळताच त्यांनी कंपनीगंज पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकार्‍याशी दूरभाषवर संपर्क केला. तेथील पोलीस ठाण्यात या घटनेची केवळ नोंद केली असून कोणाच्याही विरुद्ध गुन्हा दाखल केला नसल्याची माहिती मिळाली. नंतर श्री. घोष यांनी नौखालीचे पोलीस अधीक्षक यांच्याशी संपर्क केला.

उद्योगपती अदानी आणि अंबानी यांना नोटा रहित होणार असल्याची पूर्वकल्पना होती !

भाजप आमदार भवानी सिंह यांचा गौप्यस्फोट
     नवी देहली - अदानी आणि अंबानी यांसारख्या उद्योगपतींना केंद्र सरकारच्या ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या नोटा चलनातून रहित करण्याच्या निर्णयाची अगोदरपासूनच माहिती होती. त्यांना सावध करण्यात आले होते. त्यामुळे त्यांनी या निर्णयाची घोषणा होण्यापूर्वीच योग्य ती व्यवस्था केली होती, असा गौप्यस्फोट भाजपचे राजस्थानमधील आमदार भवानी सिंह यांनी केला आहे. आमदार भवानी सिंह यांचा याविषयीचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांमध्ये प्रसारित झाला आहे.
     या व्हिडिओनंतर भवानी सिंह यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. या व्हिडिओत छेडछाड करण्यात आली आहे. मी केवळ अनौपचारिक बोलत होतो, असे त्यांनी म्हटले आहे.

श्रीलंकेच्या नौदलाच्या गोळीबारात २ भारतीय मच्छीमार घायाळ !

     श्रीलंकेच्या नौदलाचे भारतीय नागरिकांवर गोळीबार करण्याचे धाडस होते, हे भारत सरकारच्या कणाहीनतेचेच दर्शक ! काँग्रेस सरकारच्या काळापासून चालत आलेला श्रीलंकेचा उद्दामपणा आताही तसाच चालू आहे, हे लज्जास्पद !
     कराईकल (पुद्दूचेरी) - श्रीलंकेच्या नौदलाकडून येथून ८० कि.मी. अंतरावरील कोदियाकरई किनार्‍याजवळ भारतीय मच्छीमारांच्या नौकांवर गोळीबार केला. यात २१ वर्षीय बालामुरगन आणि २२ वर्षीय अरविंद हे २ मच्छीमार घायाळ झाले. या वेळी अन्य मच्छीमारांनी येथून पलायन करत किनारा गाठला.

ऑस्ट्रेलियात प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना हिंदी भाषा शिकवणार !

      मेलबर्न - ऑस्ट्रेलिया सरकारने इंग्रजी व्यतिरिक्त विदेशी भाषेला प्रोत्साहन देण्यासाठी काही विदेशी भाषांची निवड केली असून त्यात हिंदीचाही समावेश आहे. यासाठी ऑनलाईन कार्यक्रमाद्वारे प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना हिंदी शिकवण्यात येणार आहे. 
       द अर्ली लर्निंग लॅग्वेजेस ऑस्ट्रेलिया ही संस्था विद्यार्थी आणि शिक्षक यांना हिंदी शिकवण्यासाठी साहाय्य करणार आहे. ऑस्टे्रलियाचे शिक्षण आणि प्रशिक्षणमंत्री सायमन बर्मिंघम यांनी सांगितले की, सरकारने इटालियन आणि स्पॅनिश भाषेचे प्रशिक्षण वर्ष २०१७ पासून शिकवण्यास प्रारंभ करणार आहेत, तर वर्ष २०१८ पासून हिंदी आणि मॉर्डन ग्रीक भाषा शिकवण्यात येणार आहे. काही विद्यार्थी चिनी आणि जपानी भाषाही शिकत आहेत. या योजनेअंतर्गत १० सहस्र विद्यार्थ्यांना विदेशी भाषांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी ६७ कोटी रुपये व्यय करण्यात येणार आहेत.शिवमोग्गा (कर्नाटक) येथे अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याच्या विरोधात राष्ट्रीय हिंदू आंदोलन !

आंदोलन करतांना हिंदु धर्माभिमानी !
     शिवमोग्गा (कर्नाटक) - कर्नाटकातील काँग्रेस सरकार येणार्‍या हिवाळी अधिवेशनात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा संमत करू पहात आहे. या कायद्याद्वारे हिंदूंच्या श्रद्धांचेच निर्मूलन करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याने या कायद्याला विरोध दर्शवण्यासाठी कर्नाटकच्या शिवमोग्गा जिल्ह्यातील शिवमोग्गा शहरात राष्ट्रीय हिंदु आंदोलन करण्यात आले. अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याला विरोध करण्याबरोबरच दक्षिण भारतात हिंदुत्वनिष्ठांच्या होणार्‍या हत्यांना विरोध करणे, यासाठी १५ नोव्हेंबर या दिवशी शिवमोग्गा जिल्हाधिकार्‍यांच्या कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात कर्नाटक राज्य मानवाधिकार रक्षण आणि भ्रष्टाचार निर्मूलन समिती, वीर शिवप्पा नायक अभिमानी गट, सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती सहभागी झाल्या होत्या. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक श्री. प्रसन्न कामत आणि कर्नाटक राज्य मानवाधिकार रक्षण आणि भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे श्री. मंजुनाथ पुजारी यांनी उपस्थितांना संबोधित केले. या आंदोलनात धर्माभिमानी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी १८ पत्रकार, २ वृत्तवाहिनींचे प्रतिनिधी उपस्थित होते.

तमिळनाडूतील हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या हिंदु परिवाराची बैठक : निषेध आंदोलनाचे आयोजन !

आंदोलन करताना हिंदुत्वनिष्ठ
     चेन्नई - तमिळनाडूतील विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी एकत्र येऊन हिंदु परिवाराची स्थापना केली. भविष्यातील कार्यक्रम निश्‍चित करण्यासाठी या परिवाराची मदुराई येथे १३ नोव्हेंबर या दिवशी बैठक पार पडली. या बैठकीत विविध संघटनांचे ४५ नेते आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. या बैठकीत शिवसेना, अखिल भारतीय हिंदु महासभा, हिंदु मक्कल कच्छी, हनुमान सेना, विवेकानंद केंद्र, अखिल भारतीय हिंदु मक्कल सेना, हिंदु सत्य सेना, हिंदु मक्कल मुन्नेत्र कळघम्, इंदू देसिया कच्छी, हिंदु एलयंगार एळूची पेरवई, हिंदु जनजागृती समिती इत्यादी संघटना सहभागी झाल्या होत्या. बैठकीचा प्रारंभ प्रार्थनेने झाला. भारत हिंदुमुन्नानीचे श्री. आर्.डी. प्रभू यांनी गेल्या मासांत हिंदु परिवाराने केलेल्या कार्याची माहिती दिली. उपस्थित सर्व संघटनांच्या प्रतिनिधींनी त्यांच्या कार्याची थोडक्यात माहिती दिली. हिंदु जनजागृती समितीचे श्री. श्रीराम लुकतुके आणि सौ. उमा रविचंद्रन् उपस्थित होते.

क्रिकेटपटू हाशिम अमला याला आतंकवादी म्हणणार्‍या प्रेक्षकाला मैदानात येण्यास ३ वर्षांची बंदी !

      होबॉर्ट (ऑस्ट्रेलिया) - ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसर्‍या क्रिकेट कसोटी सामन्याच्या तिसर्‍या दिवशी एका प्रेक्षकाने दक्षिण आफ्रिका संघाचा खेळाडू हाशिम अमला याला आतंकवादी म्हटले. अमला मुसलमान असून त्याने इमामाप्रमाणे मोठी दाढी ठेवली आहे. या प्रेक्षकाच्या हातात असलेल्या फलकावर अमलाविरोधी आक्षेपार्ह मजकूर लिहिण्यात आला होता. पोलिसांनी तातडीने सीसीटीव्हीच्या साहाय्याने त्या प्रेक्षकाला ओळखून मैदानाबाहेर हाकलून दिले. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने देखील तात्काळ कारवाई करत त्या प्रेक्षकाला मैदानात येण्यास ३ वर्षांसाठी बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रेक्षकाला आता ऑस्ट्रेलियात होणारा कोणताही क्रिकेटचा सामना मैदानात पाहता येणार नाही. आणि जर त्याने याचा भंग केला, तर त्याला पोलिसी कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

काँग्रेसने भ्रष्ट मार्गाने जमा केलेल्या १२ लाख कोटी रुपयांची रद्दी झाली ! - अमित शहा

     कर्णावती - काँग्रेसच्या १० वर्षांच्या सत्ताकाळात प्रत्येक मासात एक घोटाळा होत होता. २-जी, कोळसा खाण वाटप, आदर्श सोसायटी, विमान खरेदी हे यातील काही घोटाळे आहेत. याद्वारे काँग्रेसने १२ लाख कोटी रुपये जमा केले होते. जे देशाच्या ३ अर्थसंकल्पांच्या बरोबरीचे होते. पंतप्रधान मोदी यांनी नोटा रहित करण्याच्या घेतलेल्या निर्णयानंतर एका रात्रीत काँग्रेसने भ्रष्टाचाराद्वारे जमा केलेल्या या १२ लाख कोटी रुपयांची रद्दी झाली आहे, असे प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी गुजरातमधील भरूच येथे एका सहकारी बँकेच्या भवनाचे उद्घाटन करतांना केले. 
     एकीकडे अमित शहा हा आरोप करत असतांना दुसरीकडे काँग्रेसनेही अशाच प्रकारचा आरोप केला आहे. केंद्र सरकारने नोटा बंदी रहित करण्याच्या निर्णयापूर्वीच भाजपने त्याच्याकडील काळा पैसा आधीच पांढरा करून घेतला असून जवळपास ६ लाख कोटी रुपयांचा आहे.

जिल्हा सहकारी बँकांना नोटा पालटून देण्याचा अधिकार नसल्याच्या निर्णयाला गुजरातमधील भाजपच्या खासदाराचा विरोध !

     नवी देहली - भाजपचे गुजरातच्या पोरबंदर येथील खासदार विठ्ठलभाई राडदिया यांनी जिल्हा सहकारी बँकांना नोटा पालटून देण्याचा अधिकार दिला नसल्याच्या निर्णयाला विरोध केला आहे. 
    प्रसारमाध्यमांशी बोलतांना राडदिया म्हणाले की, या निर्णयामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था आणि शेतकरी अस्वस्थ आहेत. रिझर्व्ह बँकेने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या नोटा जिल्हा सहकारी बँकांमध्ये पालटून देण्याची अनुमती देण्यात आलेली नाही. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था ढासळून जाईल. शेतकर्‍यांनी नोटा पालटण्यासाठी कोठे जायचे ? इतर सर्व बँकांना नोटा पालटण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे; मात्र केवळ जिल्हा सहकारी बँकांनाच का दिले नाही ? या संदर्भात राडदिया यांनी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना याची माहिती दिली आहे.एटीएम् यंत्रातील रकमेत ३ कोटी रुपयांचा घोटाळा करणार्‍या दोन धर्मांधांना अटक !

इतक्या मोठ्या प्रमाणात घोटाळा होईपर्यंत बँक प्रशासन काय करत होते ?
     सांगली - 'एटीएम्' यंत्रात पैसे भरणार्‍या एजन्सीच्या २ धर्मांध कर्मचार्‍यांनी ३ कोटी ३३ लाख ३९ सहस्र रुपयांची फसवणूक केली असून या प्रकरणी लियाकत सरफराज खान (वय ३३ वर्षे) आणि आश्पाक अस्लम बैरागदार (वय २१ वर्षे) यांना पोलिसांनी अटक केली. यंत्रात पैसे भरतांना त्यांनी १७ ठिकाणी चोरी केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. सायंटिफिक 'सेक्युरिटी मॅनेजमेंट सर्व्हिस' या खाजगी आस्थापनाचे संचालक मनमोहन जगदीश सिंह (वय ३५ वर्षे) यांनी तक्रार दिली. 
१. ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या नोटा चलनातून रहित केल्यानंतर सर्व 'एटीएम्' यंत्रे बंद ठेवली होती. १४ नोव्हेंबरला या यंत्रांतील रकमेची मोजणी केल्यावर त्यात ३ कोटी ३३ लाख ३९ सहस्र रुपये अल्प मिळाले.
२. धर्मांध लियाकत खान आणि आश्पाक बैरागदार हे उपरोक्त खाजगी आस्थापनाचे सांगलीतील प्रतिनिधी आहेत. यंत्रातील पैसे संपल्यानंतर ते भरण्याचे दायित्व त्यांच्याकडे होते. ते दोघे पैसे भरतांना संगनमत करून वेळोवेळी 'एटीएम्' यंत्रातून पैसे काढत. हा प्रकार वर्षभर चालू होता. (वर्षभर हे कुणाच्याच कसे लक्षात आले नाही ? - संपादक)

बोर्डाच्या विद्यार्थ्यांना परीक्षाअर्जाचे पैसे भरण्यासाठी सवलत ! - विनोद तावडे

     मुंबई - इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी आधी परीक्षेचा अर्ज भरावा. त्याचे पैसे भरण्यासाठी मुदत वाढवून देऊ, असे आश्‍वासन शिक्षणमंत्री श्री. विनोद तावडे यांनी दिले आहे. ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या नोटा बंद केल्यामुळे राज्यात उद्भवलेल्या स्थितीच्या पार्श्‍वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला.

शालेय शिक्षण मातृभाषेतच असावे ! - रंगनाथ पठारे

     पुणे - मातृभाषेत सहस्रो वर्षांच्या ज्ञानाचे संचित आहे. ज्ञानाच्या बहुविध संकल्पना मातृभाषेतच अधिक चांगल्या रितीने समजू शकतात. त्यासाठी परकीय भाषांची आवश्यकता नाही. शालेय शिक्षण मातृभाषेतच असावे. आनंद आणि मानसिक समाधान मिळण्यासाठी मातृभाषेतूनच शिक्षण दिले जावे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांनी व्यक्त केले. एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाच्या वेळी ते बोलत होते.

कणकवली येथे जनकल्याण महायागाला संतांच्या वंदनीय उपस्थितीत ध्वजारोहण करून प्रारंभ

     कणकवली - येथे होणार्‍या जनकल्याण महायाग अर्थात् श्री लक्ष्मीनारायण महायागाचा ध्वजारोहण सोहळा १६ नोव्हेंबरला संतांच्या वंदनीय उपस्थितीत अन् मोठ्या भक्तीमय वातावरणात मुडेश्‍वर मैदानात पार पडला. शंखनाद आणि मंत्रघोषाच्या गजरात महंत आखाड्याचे राष्ट्रीय अध्यक्ष मठाधिपती गरीबदासजी महाराज यांच्या शुभहस्ते अन् महंत मौनी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत या सोहळ्याला प्रारंभ झाला. धर्म कि जय हो, अधर्म का नाश हो, प्राणीयो में सद्भाव हो, अशा घोषणांनी येथील परिसर दुमदुमून गेला होता. केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या या यागाच्या ध्वजारोहण सोहळ्याला प.पू. गावडेकाका महाराज, जनकल्याण महायाग समितीचे अध्यक्ष सतीश गिरप, कार्याध्यक्ष गणेश घाडीगांवकर यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि शेकडो भाविक उपस्थित होते.
    १९ ते २५ डिसेंबर या कालवधीत कणकवली येथील प्रशस्त मुडेश्‍वर मैदानात हा याग होणार आहे. यागाचा शुभारंभ ध्वजारोहणाने झाला आहे. ध्वजारोहण झाल्यापासून १९ डिसेंबर या यागाच्या पहिल्या दिवसापर्यंत येथे रामसंकीर्तन (नामस्मरण) आणि धार्मिक विधी होणार आहेत. ध्वजारोहण करण्यात आलेल्या महाध्वजाचे म्हणजेच हनुमान पताकाचे १५ नोव्हेंबरला हरिद्वार येथून सिंधुदुर्ग जिल्ह्यात आगमन झाले. माड्याचीवाडी (कुडाळ) येथे प.पू. गावडेकाका महाराज यांच्या स्वामी समर्थ मठामध्ये तो मिरवणुकीने आणला गेला.

कोयना प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन पोलिसांनी उधळल्याचा डॉ. भारत पाटणकर यांच्या कार्यकर्त्यांचा आरोप

     सातारा, १७ नोव्हेंबर (वार्ता.) - कोयनानगर येथे प्रकल्पग्रस्तांनी काढलेला मोर्चा नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी तो नेहरू उद्यानाजवळ अडवला; मात्र 'पोलिसांनी आंदोलन उधळले', असा आरोप डॉ. भारत पाटणकर यांच्या कार्यकर्त्यांनी केला. 

भारताचे ११ सैनिक ठार केल्याचा पाकचा दावा खोटा ! - भारतीय सैन्याचे स्पष्टीकरण

     नवी देहली - सीमारेषेवर पाक सैन्याच्या गोळीबारात भारताचे ११ सैनिक ठार झाल्याचा पाक सैन्यदल प्रमुख राहील शरीफ यांचा दावा भारतीय सैन्याने फेटाळून लावला आहे. १४, १५ आणि १६ नोव्हेंबर या दिवशी झालेल्या गोळीबारात कोणी घायाळही झाले नव्हते, असे सैन्याने स्पष्ट केले आहे. पाकने गेल्या काही दिवसांत ४० ते ४५ भारतीय सैनिकांना ठार मारले; पण भारत याची स्वीकृती देणार नाही, असेही शरीफ म्हणाले होते. भारताने धाडस दाखवून सैनिकांच्या मृत्यूची बातमी घोषित केली पाहिजे, असे आव्हानच त्यांनी भारताला दिले होते. पाक सैन्याने त्यांच्या सैनिकांच्या मृत्यूची बातमी घोषित केली होती, असे त्यांनी नमूद केले होते. ३ दिवसांपूर्वी भारताने पाकच्या भिमबेर सेक्टरमध्ये गोळीबार केला होता. यात पाकचे ७ सैनिक ठार झाल्याचे पाकने म्हटले होते.

सौदी अरेबिया येथे घरकामाच्या आमिषाने इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) येथील ५० हून अधिक महिलांची फसवणूक !

  • लोकप्रतिनिधी आणि पोलीस यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष ! 
  • अरबांकडून महिलांचा अतोनात छळ ! 

     कोल्हापूर, १७ नोव्हेंबर (वार्ता.) - दलालाद्वारे सौदी अरेबियामध्ये प्रत्येक मासाला २० ते २५ सहस्र रुपयांत घरकामाची नोकरी देण्याच्या आमिषाने गेलेल्या इचलकरंजीसह परिसरातील गरीब महिलांचा शारीरिक आणि मानसिक छळ होत आल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या खचलेल्या या महिला पुन्हा मायदेशी परतण्यासाठी जिवाच्या आकांताने टाहो फोडत आहेत. अशाप्रकारे ५० हून अधिक महिला तिथे अडकून पडल्याचे सांगण्यात येत आहे. एका अरबाच्या साहाय्याने सुटका करून इचलकरंजी येथे परत आलेल्या एका महिलेमुळे हे फसवणुकीचे प्रकरण चव्हाट्यावर आले आहे. या प्रकरणाकडे लोकप्रतिनिधी आणि पोलीस यांनी दुर्लक्ष केले आहे. (खरेतर पोलिसांनी गुप्त पोलिसांद्वारे या प्रकरणाची माहिती घेऊन सौदी अरेबिया येथून महिलांना सोडवण्यासाठी प्रयत्न करायला हवे होते. - संपादक) 

जिल्हा सहकारी अधिकोष अर्थमंत्र्यांकडे दाद मागणार

     पुणे - रिझर्व्ह बँकेने चलनातून रहित केलेल्या नोटा खात्यात भरण्यास आणि पालटून देण्यास जिल्हा सहकारी अधिकोषांना बंदी घातली आहे. ही बंदी अयोग्य असून त्यासंदर्भात पुढील कार्यवाहीसाठी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडे दाद मागण्यात येणार आहे. अधिकोषाच्या संदर्भातील कायद्यानुसार अधिकोषाचा परवाना (लायसन्स) मिळालेले सर्व अधिकोष एकसमान आहेत. रिझर्व्ह बँकेला कोणत्याही अधिकोषानुसार भेदभाव करता येणार नाही. त्यामुळे जिल्हा सहकारी अधिकोषांना जुन्या नोटा स्वीकारण्यास अथवा पालटून देण्यास अनुमती नाकारणे कायदेशीरदृष्ट्या योग्य नाही, असे महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह फेडरेशनच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे.

भ्रष्टाचार्‍यांचा पैसा शेतकर्‍यांना द्या ! - मकरंद अनासपुरे

याविषयी शासनाला काय म्हणायचे आहे ?
     पुणे - आजची साहेबी व्यवस्था आणि त्यातील चुका यांमुळे शेतकर्‍यांच्या हाती पैसाच रहात नाही. त्यामुळे देशातील भ्रष्टाचार्‍यांचा काळा पैसा शेतकर्‍यांना द्या, अशी मागणी अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी केली. नाम फाऊंडेशनच्या सामाजिक कार्यासाठी पुलोत्सव कार्यक्रमात त्यांना सामाजिक कृतज्ञता पुरस्कार मिळाला. त्या वेळी ते बोलत होते.

विशिष्ट व्यक्तीच्या निवडीसाठी पैशांचे आमिष !

साहित्य क्षेत्रालाही राजकारणाची कीड !
     पुणे - डोंबिवली येथे होणार्‍या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी जर प्रवीण दवणे निवडून आले, तर आयोजकांना दोन कोटी रुपये देईन, असे वक्तव्य एका बांधकाम व्यावसायिकाने केले होते. यावर सरस्वतीच्या वीणेची तार लक्ष्मीच्या तालावर ताल धरणार का ? हा प्रकार साहित्यासाठी घातक आहे, असा आरोप संमेलनाध्यक्षपदासाठीचे उमेदवार डॉ. जयप्रकाश घुमटकर यांनी पत्रकार परिषदेत केला. बांधकाम व्यावसायिकाच्या वक्तव्याच्या संदर्भात साहित्य महामंडळाकडे लेखी तक्रार केली असल्याचेही त्यांनी सांगितले.

हडपसर येथे बेपत्ता झालेल्या मुलीचा मृतदेह सापडला

कायदा आणि सुव्यवस्था यांचा उडालेला बोजवारा !
     हडपसर (जिल्हा पुणे) - येथील ज्ञानप्रबोधिनी प्राथमिक आणि माध्यमिक शाळेच्या बेपत्ता झालेल्या दोन मुलींपैकी विद्या भद्रे हिचा मृतदेह शाळेजवळच्या नाल्यामध्ये सापडला आहे. वैष्णवी बिराजदार अजूनही बेपत्ताच आहे. १५ नोव्हेंबरपासून त्या दोघी बेपत्ता झाल्या होत्या.

राहुल गांधींना भिवंडी न्यायालयाकडून जामीन संघाविषयी आक्षेपार्ह विधान केल्याचे प्रकरण

पुढील सुनावणी ३० जानेवारी २०१७ ला
      भिवंडी, १७ नोव्हेंबर - २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राहुल गांधी यांनी महात्मा गांधी यांची हत्या संघाच्या लोकांनीच केली असे आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थानिक पदाधिकार्‍यांनी गांधी यांच्या विरोधात अब्रुहानीचा दावा प्रविष्ट केला होता. या खटल्याच्या सुनावणीच्या वेळी भिवंडी न्यायालयाने गांधी यांना जामीन संमत केला. या प्रकरणाची पुढील सुनावणी ३० जानेवारी २०१७ ला होणार आहे. या वक्तव्याविषयी गांधी यांनी क्षमा मागावी, तसेच यापुढे असे विधान करणार नाही याची हमी दिली, तर खटला मागे घेऊ असे तक्रारदाराने न्यायालयात सांगितले; मात्र गांधी यांच्या अधिवक्त्याने पुढील तारखेची मागणी केली. जामीन मिळाल्यानंतर राहुल गांधी यांनी मोदी हे सर्वसामान्यांच्या खिशातील पैसे उद्योगपतींना देत आहेत, अशी टीका केली.

यवतमाळ येथे सार्वजनिक उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांची बैठक !


      यवतमाळ - राष्ट्ररक्षण आणि धर्मरक्षण यांसाठी सार्वजनिक उत्सव मंडळांची भूमिका काय, या विषयावर १३ नोव्हेंबर या दिवशी येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत श्री दुर्गा आणि श्री गणेश या मंडळांचे ७ पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी १ डिसेंबरला आयोजित हिंदु धर्मजागृती सभेच्या निमित्ताने धर्मावर होणार्‍या आघातांना विरोध करण्याचा हिंदुत्वनिष्ठांनी निर्धार केला. 
     समितीचे विदर्भ समन्वयक श्री. श्रीकांत पिसोळकर यांनी राष्ट्र आणि धर्म यांसाठी सार्वजनिक उत्सव मंडळे कशा प्रकारे सेवा करू शकतात, याविषयी मार्गदर्शन केले, तसेच सार्वजनिक उत्सवांमध्ये होणारे गैरप्रकार रोखून छत्रपती शिवरायांप्रमाणे धर्माच्या नावावर संघटन करण्याचे आवाहनही केले. या बैठकीमध्ये प्रत्येक शाळेमध्ये संस्कृती रक्षण मोहीम राबवणे, ३१ डिसेंबर साजरा करण्याचा विरोध करणे, तसेच पंधरा दिवसांनी एकदा बैठक घेणे, असे ठरवण्यात आले.

(म्हणे) धर्मांधांना दफन विधीसाठी जागा, तसेच अंत्ययात्रेचे साहित्य दिले जाईल !

मुरबाड येथील भाजपचे आमदार किसन कथोरे यांना धर्मांधांचा पुळका !
      टिटवाळा - गावात मुसलमानांची २ किंवा सहस्रो घरे असली, तरी त्यांना तेथे दफन विधीसाठी जागा, तसेच अंत्ययात्रेचे साहित्य दिले जाईल, अशी माहिती मुरबाड येथील भाजपचे आमदार किसन कथोरे यांनी सरळगाव येथे मुसलमानांच्या मेळाव्यात दिली. (हिंदूंच्या अंत्यविधींच्या संदर्भातही आमदार कथोरे सर्व साहित्य पुरवणार का ? - संपादक) मेळाव्यात समाजमंदिर उभारण्याची मागणी मुसलमानांनी केली. 
     कथोरे पुढे म्हणाले, तालुक्यात प्रत्येक गावात कब्रस्तानला जागा दिली जाईल. अल्पसंख्यांक समुदायाला उच्च शिक्षण मिळत नसल्याने त्यांच्यासाठी वैद्यकीय महाविद्यालय चालू करण्याचाही प्रयत्न केला जाईल. या वेळी कथोरे यांनी दिलेली आश्‍वासने पूर्ण करणार असल्याचे खासदार कपील पाटील यांनी सांगितले.

नोटांवरील बंदीविषयीची याचिका प्रविष्ट करून घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार

     मुंबई - ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या नोटांवरील बंदीविषयीची याचिका प्रविष्ट करून घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने १६ नोव्हेंबर या दिवशी नकार दिला आहे. केंद्र सरकारने नोटा चलनातून रहित करण्याचा निर्णय अचानक घेतला. त्यामुळे उच्च न्यायालयाने या प्रकरणाची स्वत:हून नोंद घेत जनहित याचिका (सुओमोटो) प्रविष्ट करून घ्यावी, अशी मागणीपर याचिका अधिवक्ता जमशेद मिस्त्री आणि अधिवक्ता जब्बार सिंह यांनी केली होती. त्यावर न्यायालयाने वरील निर्णय दिला. 

चार दिवसांत विविध कर रूपाने महापालिकेची १० कोटी रुपयांची वसुली !

     सांगली - शासनाने महापालिकांना कर वसुलीसाठी जुन्या नोटा स्वीकारण्याचे निर्देश दिल्यावर केवळ चार दिवसांत सांगली महापालिकेला १० कोटी रुपयांची कर वसुली मिळाली आहे. यात घरपट्टी, पाणीपट्टी, मालमत्ता कर, तसेच अन्य करांचा समावेश आहे. या वसुलीसाठी महापालिकेने ७ विविध केंद्रे उघडून ती २४ घंटे चालू ठेवली होती. गेली अनेक वर्षे महापालिकेने विविध योजना घोषित करूनही ही करवसुली होत नव्हती. अखेर नोटा चालणारच नाहीत,असे म्हटल्यावर नागरिकांनी रांगा लावून हे सर्व कर भरले. सोमवारी केवळ एका दिवसांतच दोन कोटी रुपये जमा झाले.

देहली, हरियाणा आणि राजस्थान या राज्यांना भूकंपाचे धक्के !

महर्षींनी प्रलयकालाविषयी सतर्क करणे
     १९.३.२०१६ या दिवशी झालेल्या नाडीवाचन क्रमांक ६७मध्ये महर्षि म्हणतात, हे पूर्ण वर्ष प्रलयकालाचे आणि आपत्तीजनक असणारे आहे. (१७ नोव्हेंबरच्या पहाटे साडेचार वाजता देहली एन्सीआर्, हरियाणा आणि राजस्थान या राज्यांमधील काही भागाला ४.२ तीव्रतेचे भूकंपाचे धक्के बसले. या घटनेवरून प्रलयकालाविषयी महर्षींनी केलेले भाष्य किती तंतोतंत आहे, हे लक्षात येते ! - संपादक)
     देहली - १७ नोव्हेंबरच्या पहाटे साडेचार वाजता देहली एन्सीआर्, हरियाणा आणि राजस्थान या राज्यांमधील काही भागाला भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर त्यांची तीव्रता ४.२ होती. या भूकंपाचे केंद्र हरियाणातील रेवरीजवळ होते. या भूकंपामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे. जवळपास ३० सेकंद हे धक्के जाणवले. यामुळे रहिवासी घरातून बाहेर पडून रस्त्यावर येऊन थांबले.

२० नोव्हेंबरला असदुद्दीन औवैसी यांची ईश्‍वरपूर येथे सभा !

     ईश्‍वरपूर - ईश्‍वरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत प्रथमच मजलिस-ए-इत्तेहादूल मुसलमीन (एम्आयएम्) या संघटनेने सहभाग घेतला आहे. या निवडणुकीसाठी तीन प्रभागात उभ्या केलेल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी २० नोव्हेंबर या दिवशी पक्षाचे संस्थापक आणि खासदार असदुद्दीन औवैसी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती एम्आयएम्चे जिल्हाध्यक्ष शाकीर तांबोळी यांनी पत्रकार परिषदेत दिली. (असदुद्दीन औवेसी आणि त्यांचा पक्ष यांची भूमिका नेहमीच हिंदुविरोधी राहिलेली आहे. औवेसी यांनी त्यांच्या अनेक भाषणांमधून जातीय तेढ निर्माण होईल, अशी वक्तव्ये केलेली आहेत. त्यांच्या येण्यामुळे ईश्‍वरपूर येथेही कायदा-सुव्यवस्था यांचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अशा सभेसाठी पोलीस प्रशासनाने अनुमती देणे नागरिकांच्या हिताचे नाही ! - संपादक)

राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला ५ डिसेंबरपासून नागपूर येथे प्रारंभ

     मुंबई - राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या ५ ते १७ डिसेंबर या कालावधीत नागपूर येथे होणार आहे. या अधिवेशनात विधानसभेतील २, विधानपरिषदेतील ६ प्रलंबित विधेयकांवर, तर ४ नवीन आणि ११ प्रख्यापित अध्यादेशांवर चर्चा होणार आहे.
     विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली, तर विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक विधानसभाध्यक्ष श्री. हरिभाऊ बागडे यांच्या अध्यक्षतेखाली विधीमंडळात झाली. या बैठकीत विधीमंडळाचे अधिवेशन २ आठवड्यांचे ठेवण्याचे ठरवण्यात आले. याविषयी माहिती देतांना संसदीय कार्यमंत्री श्री. गिरीश बापट यांनी सांगितले, या अधिवेशनात माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दीवर्षानिमित्त विशेष चर्चासत्र होणार आहे.

माहिती सेवा समितीचे श्री. चंद्रकांत वारघडे यांना मोरोपंत पिंगळे गोसेवा पुरस्कार प्रदान

पुरस्कार स्वीकारतांना श्री. चंद्रकांत वारघडे (डावीकडे)
     पुणे, १७ नोव्हेंबर - यंदाच्या वर्षीचा मोरोपंत पिंगळे गोसेवा पुरस्कार २०१६ हा माहिती अधिकार आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे दादा बाबाजी वारघडे प्रतिष्ठानचे अध्यक्ष अन् माहिती सेवा समिती, महाराष्ट्रचे श्री. चंद्रकांत गोविंद वारघडे यांना प्रदान करण्यात आला. हा राज्यस्तरीय गोसेवा पुरस्कार श्री. वारघडे यांना बुधानी वेफर्सचे मालक अरविंद बुधानी यांच्या हस्ते आणि शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या उपस्थितीत देण्यात आला. गोविज्ञान संशोधन संस्था, पुणे; दादर-नगर हवेली मुक्तिसंग्राम समिती आयोजित अन पुणे पांजरपोळ संस्था (भोसरी) आणि पुणे महानगर गोसेवा समिती यांच्या सहकार्याने हा पुरस्कार देण्यात आला. 
      या कार्यक्रमासाठी सकाळ समूह संचालित अ‍ॅग्रोवन नियतकालिकाचे संपादक आदिनाथ चव्हाण, रा.स्व. संघाचे पश्‍चिम क्षेत्र प्रचारक रवी जोशी, गोविज्ञान संशोधन संस्थेचे (पुणे) अध्यक्ष राजेंद्र लुंकड, पुणे पांजरपोळ संस्थेचे अध्यक्ष श्रीधर प्रीती आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात उल्लेखनीय कार्याविषयी उत्तरप्रदेश येथील संशोधक डॉ. महेंद्र दारोकर, गोरक्षक शिवशंकर स्वामी आदींसह अनेकांना गोसेवा पुरस्कार देण्यात आला.

दुर्घटना होण्यापूर्वीच प्रशासनाने शिवसागर जलाशयाच्या संदर्भात उपाययोजना राबवावी !

अशी मागणी का करावी लागते ? प्रशासनाला स्वतःचे दायित्व लक्षात येत नाही का ?
सातारा येथील नागरिकांची मागणी
     सातारा, १७ नोव्हेंबर (वार्ता.) - महाराष्ट्रातील कोयना धरणाला शिवसागर जलाशय संबोधले जाते. कोयना पाणलोट भागातील दळणवळणासाठी सातारा जिल्हा परिषदेच्या वतीने बोटींची (लाँच) व्यवस्था करण्यात आली आहे; मात्र सध्या बोटींमधून क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक केली जाते. त्यामुळे दुर्घटना होण्यापूर्वीच प्रशासनाने योग्य ती उपाययोजना राबवावी, अशी मागणी समाजातून होत आहे. 
      दोन वर्षांपूर्वी या ताफ्यामध्ये तीन बोटी होत्या; मात्र त्यातील एक बोट नादुरुस्त झाली. त्यामुळे सध्या २ बोटींवरच प्रवासी वाहतूक केली जाते. एका बोटीची प्रवासी क्षमता ३० असून प्रसंगी ६० पेक्षाही अधिक प्रवासी त्यातून प्रवास करतात. प्रत्येक प्रवाशाला सुरक्षिततेसाठी लाईफ जॅकेट देणे बंधनकारक असते; मात्र त्याचा पुरवठा होत नाही. जिल्हा परिषदेच्या वतीने पूर्वीच तीन बोटींसाठी १२० ते १२५ लाईफ जॅकेट देण्यात आली; मात्र ती बोटीच्या पुढील भागातील मोठ्या हौद्यात बंद करून ठेवण्यात आली होती. त्यातील काही जॅकेट कुजून गेली, तर बहुतांश जॅकेट खाजगी बोटींच्या मालकांना दिली गेल्याची चर्चा आहे. यामुळे आजपर्यंत अनेक प्रवाशांचा शिवसागर जलाशयात बुडून मृत्यू झाला. (अजून किती जणांचे बळी घेतल्यानंतर प्रशासन उपाययोजना काढणार ? - संपादक)

चिंचवड मंडईत भाजीखरेदीसाठी एटीएम् आणि पेटीएम् सुविधा

      चिंचवड, १७ नोव्हेंबर - येथील भाजीविक्रेता महेश गरुड यांनी नागरिकांकडे असणार्‍या नोटांच्या टंचाईच्या पार्श्‍वभूमीवर भाजीखरेदीसाठी एटीएम् कार्ड आणि पेटीएम् या सुविधा पुरवल्या आहेत. या सुविधांमुळे दिवसाला ८ ते १० सहस्र रुपये एवढी भाजीविक्री होत आहे. पेटीएम्वर ५ रुपयांपासून भाजी विक्री केली जाते, तर एटीएम् कार्डधारकांसाठी न्यूनतम ४० रुपयांची खरेदी करणे अनिवार्य आहे.

स्वेच्छेने शस्त्रे जमा न केल्यास परवाने जप्त करणार ! - जिल्हाधिकारी, सातारा

      सातारा, १७ नोव्हेंबर (वार्ता.) - जिल्ह्यातील निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर शस्त्रधारकांनी त्यांची शस्त्रे स्वेच्छेने जमा करावीत. तसे न करणार्‍यांचे परवाने जप्त करण्यात येतील, अशी चेतावणी जिल्हाधिकारी श्री. अश्‍विन मुद्गल यांनी दिली. निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते.

महाराष्ट्र एकीकरणच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याप्रकरणी राज्याच्या सचिवांना उत्तर देण्याची पंतप्रधान कार्यालयाची सूचना !

कर्नाटक शासनाने महाराष्ट्र एकीकरणच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचे प्रकरण
      बेळगाव, १७ नोव्हेंबर (वार्ता.) - काळा दिनाच्या वेळी निघालेल्या सायकल फेरीनंतर सहभागी तरुणांची धरपकड करून त्यांना पुष्कळ मारहाण केल्याप्रकरणी याची नोंद घ्यावी आणि सीमावासियांच्या अन्यायाकडे लक्ष द्यावे, अशा आशयाचे पत्र शहर महाराष्ट्र एकीकरण समितीने पंतप्रधानांना लिहिले होते. पत्राची नोंद घेऊन पंतप्रधान कार्यालयाने राज्याच्या मुख्य सचिवांना याची चौकशी करून उत्तर देण्याची सूचना केली आहे. या संदर्भात लिहिलेल्या पत्रात पंतप्रधान कार्यालयातून त्वरित प्रतिउत्तराची सूचना नमूद करण्यात आली आहे. 
      श्री. दीपक दळवी यांना या पत्राची प्रत पाठवण्यात आली आहे. काळादिनी शहरात भव्य फेरी काढून समस्त मराठी भाषिकांनी त्यांचा निर्धार व्यक्त केला होता. लोकशाही मार्गाने लढा चालू ठेवण्याचे धोरणही दाखवून दिले; मात्र याचा पोटशूळ उठलेल्या कर्नाटकी पोलिसांनी निष्पाप मराठी तरुणांना मारहाण करून त्यांच्यावर खटले प्रविष्ट केले होते.

अवैध उद्योगांना अप्रत्यक्षपणे पाठबळ देणारे सातारा येथील हवालदार श्री. बाकले निलंबित !

वरिष्ठांच्या आदेशाचे उल्लंघन करणार्‍यांवर कठोर कारवाईच व्हायला हवी !
     सातारा, १७ नोव्हेंबर (वार्ता.) - अवैध उद्योगांवरील कारवाईकडे दुर्लक्ष करून वरिष्ठांचे आदेशही न पाळणारे हवालदार श्री. बाकले यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई चालू करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. संदीप पाटील यांनी दिले आहेत. 
१. सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची जन्मभूमी असणार्‍या तळबीड (जिल्हा सातारा) येथे अवैध उद्योग वाढत आहेत. तक्रारी देऊनही पोलीस त्यांची नोंद घेत नसल्याने नागरिकांनी वरिष्ठांना याप्रकरणी माहिती दिली. 
२. श्री. बाकले यांनी वरिष्ठांच्या आदेशाकडेही दुर्लक्ष करून अवैध उद्योगांना पाठिंबा दिला. 
३. चोरटी मद्यविक्री, तसेच अवैध व्यवसाय यांच्या ठिकाणी धाडी टाकण्याच्या आदेशांनाही त्यांनी जुमानले नाही. तसेच त्यांच्या विरोधात कारवाईही केली नाही.

जिथे देशाच्या पंतप्रधानांना सुरक्षित वाटत नाही, तिथे नागरिकांची काय स्थिती असेल !

     मला ठाऊक आहे की, भ्रष्टाचार्‍यांच्या विरोधात लढा चालू करून मी कुणाशी वैर घेतले आहे. आता कोण कोण माझ्या विरोधात जाणार, हेही मला ठाऊक आहे. कदाचित् ते मला संपवण्याचाही प्रयत्न करतील. त्यांना हवे ते करू द्या, कोणी मला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला, तरीही आता मी मागे फिरणार नाही. - पंतप्रधान नरेंद्र मोदी

सत्तेवर येऊन २ वर्षे झाली, तरी अजून माहितीच गोळा करत आहे ! ही आहे सरकारची कार्यक्षमता ! माहिती जमवायला एवढा वेळ लागणारे सरकार कृती करायला किती वर्षे लावील ?

     देशाची झालेली लूट आणि भारताबाहेर गेलेला पैसा, या दोन्हींची माहिती गोळा करणे आमचे कर्तव्य आहे, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पणजी, गोवा येथील एका सभेत केले.

नोटा रहित प्रकरणावरून झालेल्या गदारोळामुळे संसदेचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित !

देशहिताच्या सूत्रावरूनही संसदेत गोंधळ घालणार्‍या लोकप्रतिनिधींना घरी पाठवा ! 
     नवी देहली - संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला १६ नोव्हेंबरपासून आरंभ झाल्यावर पहिल्याच दिवशी नोटा रहित प्रकरणावरून विरोधी पक्षांनी सरकारला धारेवर धरले. त्यानंतर १७ नोव्हेंबरला राज्यसभेत विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी करत गदारोळ घातल्याने राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले. विरोधकांच्या आक्रमकपणामुळे लोकसभेचे कामकाजही दिवसभरासाठी स्थगित करावे लागले. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद म्हणाले की, उरी येथील सैनिकी तळावरील आक्रमणात आतंकवाद्यांनी मारलेल्या लोकांपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू सरकारच्या नोटा रहित करण्याच्या चुकीच्या धोरणामुळे झाला. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या निर्णयामागे जनतेने खंबीरपणे उभे रहावे ! - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

     नगर, १७ नोव्हेंबर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळ्या पैशांविरोधात चालू केलेली मोहीम देशात क्रांती घडवेल. या परिस्थितीत जनतेनेही प्रामाणिकपणा दाखवणे आवश्यक आहे. नोटा पालट किंवा खात्यात जमा करणे यांसाठी त्रास सहन करणे, ही आजची खरी देशभक्ती आहे. मोदी यांनी घेतलेल्या निर्णयामागे जनतेने खंबीरपणे उभे रहावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी त्यांनी हे आवाहन केले. आतापर्यंत ३ लक्ष कोटी रुपये एवढा काळा पैसा बाहेर आला असून ही रक्कम अजून तिप्पट वाढेल, असा दावाही श्री. फडणवीस यांनी केला.

हेही हिंदूंना सांगावे लागते, हे लज्जास्पद !

      हिंदु जनजागृती समितीने हिंदूंच्या देवता आणि राष्ट्रपुरुष यांची चित्रे असलेले गोणपाट वापरणे थांबवून देवतांची होणारी विटंबना टाळण्यासंबंधी नुकतेच पणजी (गोवा) येथील व्यापार्‍यांचे प्रबोधन केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने एक निवेदन या वेळी व्यापार्‍यांना देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, देवतांची किंवा राष्ट्रपुरुषांची चित्रे असलेले गोणपाट वापरल्याने अजाणतेपणाने धर्म अथवा राष्ट्र यांची हानी होत असते. देवतांची किंवा राष्ट्रपुरुष यांची चित्रे असलेले गोणपाट अस्वच्छ जागेत किंवा मांसाहार होत असलेल्या ठिकाणी ठेवले जात असल्याने किंवा हे गोणपाट पायाखालीही तुडवले जात असल्याने देवतांचे विडंबन होतेे. यास्तव देवतांची अथवा राष्ट्रपुरुषांची चित्रे असलेले गोणपाट वापरणे थांबवावे.


जुन्या नोटांद्वारे मालमत्ता कर भरण्यासाठी २४ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ !

     पुणे - जुन्या नोटांद्वारे मालमत्ता घर भरण्याच्या प्रकियेला २४ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अभय योजनेच्या अंतर्गतही मिळकत कराच्या दोन टक्के दंडाच्या रकमेवर मिळणार्‍या ७५ टक्के सवलतीचा कालावधी ३० नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आला आहे. त्यासाठी महापालिकेची सर्व क्षेत्रीय कार्यालये, संपर्क कार्यालये, नागरी सुविधा केंद्रे सकाळी १० ते सायंकाळी ६ चालू ठेवण्यात येणार असून २४ नोव्हेंबरच्या रात्री १२ वाजेपर्यंत ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामुळे करसंकलनाचे प्रमाण वाढले असून गेल्या चार दिवसांत ९७ कोटी १२ लक्ष हून अधिक महसूल महापालिकेला मिळाला आहे.

न्यायालयीन विभागाने ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या नोटा घेऊ नयेत !

मुंबई उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार यांचे आदेश
     सातारा - सरकारने ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्यावर त्या नोटा न्यायालयातील कोणत्याही विभागाने नागरिकांकडून स्वीकारू नयेत, असे स्पष्ट आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे रजिस्ट्रार यांनी ९ नोव्हेंबर या दिवशी दिले.
१. न्यायालयीन कामकाजासाठी विविध न्यायालयांत शासकीय रक्कम भरावी लागते. न्यायालयात नक्कल काढणे, माहिती अधिकारात माहिती मागवणे, अहवाल मागवणे, टिपण्या मागवणे आदींसाठी रोख रक्कम भरावी लागते.
२. प्रतींची संख्या अधिक असल्यास मोठ्या प्रमाणात रकमेचा भरणा करावा लागतो. या वेळी ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या नोटांचा संबंध येतो; मात्र भारत सरकारने ८ नोव्हेंबरपासून या नोटा चलनातून बाद केल्याने त्या कुठेही स्वीकारल्या जाणार नाहीत, हे स्पष्ट झाले आहे.
३. काही ठराविक शासकीय कार्यालयांत ही सवलत देण्यात आली आहे. नागरिकांनी निश्‍चिती करूनच रक्कम भरायला यावे, असे आवाहन कार्यालयिन लिपीक यांच्याकडून केले जात आहे.
४. शासकीय कार्यालयांतून ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या जुन्या नोटा घेतल्या जात आहेत; मात्र सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालयात सध्या त्या स्वीकारल्या जात नाहीत

भक्तांकडून जुन्या नोटा स्वीकारू नका ! - आयकर खात्याची नोटीस

     मुंबई, १७ नोव्हेंबर - केंद्र सरकारने ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या नोटा चलनातून रहित करण्याच्या निर्णयानंतर अनेकांनी आपल्याकडील पैसा धर्मादाय संस्था आणि मंदिरांच्या दानपेट्या यांमध्ये देण्यास प्रारंभ केला आहे. या पैशाला आळा घालण्यासाठी आयकर खात्याने एक नोटीस काढून 'भक्तांकडून ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या जुन्या नोटा स्वीकारू नका', असे बजावले आहे.

विदर्भातील अनेक जिल्ह्यांत कोट्यवधी रुपयांची रोकड शासनाधीन

या प्रकरणी सखोल तपास होऊन कारवाई होणे अपेक्षित आहे !
     पुणे - केंद्र सरकारने चलनातून ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या नोटा रहित केल्यानंतर विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत गेल्या २ दिवसांत कोट्यवधी रुपयांची रोकड पोलिसांनी शासनाधीन केली आहे. 

नांदेडमध्ये महिला डॉक्टरकडून पोलिसांनी ६५ लक्ष रुपये आणि ५० तोळे सोने शासनाधीन केले !

अनैतिक मार्गाने धन मिळवणार्‍या व्यक्तींना हिंदु राष्ट्रात स्थान नसेल ! 
     नांदेड - शहरातील एका प्रतिष्ठित स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर महिलेच्या गाडीतून ६५ लक्ष रुपये आणि ५० तोळे सोने स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी १५ नोव्हेंबर या दिवशी शासनाधीन केले. येथील खाजगी रुग्णालयात चाकरी करणार्‍या महिला डॉक्टरने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतील लॉकरमधून वर उल्लेखलेल्या दोन्ही गोष्टी काढल्या. ही माहिती स्थानिक गुन्हे शाखा विभागाला मिळाली आणि त्यांनी कारवाई केली. या प्रकरणी वजिराबाद पोलिसांनी महिला डॉक्टर, रुग्णालयातील अन्य डॉक्टर आणि कर्मचारी यांची चौकशी केली. आयकर विभागाच्या अधिकार्‍यांनीही महिला डॉक्टरची चौकशी केली.

सुट्या पैशांच्या अनुपलब्धतेमुळे पुणे शहरातील विकासकामे रखडली !

यासंदर्भात शासनाला काय म्हणायचे आहे ?
      पुणे, १७ नोव्हेंबर - ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या नोटा चलनातून बंद करण्याच्या निर्णयामुळे शहरात चालू असलेली रस्ते बांधणी, उड्डाणपूल, पदपथ आदी विकासकामे थांबवावी लागत आहेत, असे संबंधित ठेकेदारांनी पुणे महानगरपालिकेच्या अधिकार्‍यांना कळवले आहे. बहुतेक विकास कामांच्या ठिकाणी काम करणार्‍या मजुरांना प्रतिदिन किंवा आठवड्याला वेतन दिले जाते; पण नोटा चलनातून बंद झाल्यानंतर मजुरांना ठरलेल्या दिवशी सुट्टे पैसे देणे अशक्य होत आहे. तसेच कामासाठी लागणारी लहान किंवा मोठी यंत्र सामग्री यांसाठीही रोख पैसे देणे अवघड जात आहे. त्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

समाजजीवनाशी सुसंगत प्राचीन भारतीय विज्ञान स्वीकारणे सयुक्तिक ! - डॉ. जयंत नारळीकर

      पुणे, १७ नोव्हेंबर - प्राचीन काळातही विज्ञान होते, हे तथ्य नाकारता येत नाही; मात्र विज्ञानाच्या इतिहासाचा मागोवा घेतांना तत्कालीन इतिहास आणि समाजजीवन यांच्याशी सुसंगत ठरेल, असेच प्राचीन भारतीय विज्ञान स्वीकारणे सयुक्तिक ठरेल, असे मत खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी व्यक्त केले. (प्राचीन काळातील शास्त्रज्ञांना साधनेचा पाया असल्याने त्या काळी लागलेले सर्वच शोध मानवजातीच्या कल्याणासाठी होते. - संपादक) 
       प्राचीन काळात भारतातील ग्रंथांचे महत्त्व लक्षात घेऊन त्यांचे विदेशी भाषांमध्ये भाषांतर केले गेले. त्यातून भारतात निर्माण झालेले ज्ञान जगभर पोचले. हे अभिमानास्पद असले, तरी जगभरातील ज्ञान आपल्या भाषांमध्ये का आले नाही, याचाही शोध घ्यायला हवा.

अपुर्‍या नवीन चलन पुरवठ्याअभावी सामान्य नागरिकांची ससेहोलपट

शासन नागरिकांच्या या अडचणींकडे लक्ष देईल का ?
     सातारा, १७ नोव्हेंबर (वार्ता.) - नोटाबंदीचा निर्णय होऊन एक आठवडा उलटूनही नवीन चलनी नोटांची टंचाई भासत असल्याने नागरिकांना असंख्य अडचणींना सामोरे जावे लागत आहे. २ सहस्र रुपयांच्या नोटेवर खरेदीनंतर तेवढी मोड मिळत नसल्याने अनेकांची गैरसोय होत आहे. बाजारपेठाही ठप्प होण्याची वेळ आली आहे. काही जण १ सहस्र रुपयांच्या बदल्यात ८०० किंवा ९०० रुपयेच देत आहेत. भाजीमंडईतही १००, ५०, २० आणि १० रुपयांच्या नोटांचा अचानक तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे भाजीमंडई, तसेच किराणा दुकान येथून भाजी आणि सामान उधार नेण्याची वेळ आली आहे.

सीट बेल्ट का लावला नाही, असा प्रश्‍न विचारणार्‍या तरुणाला पोलिसांकडून मारहाण !

      नागपूर - मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील पोलीस अधिकार्‍यांनी सीट बेल्ट का लावले नाहीत, असा प्रश्‍न विचारणारा तरुण स्वप्नील तुपे याला पोलिसांनी पुष्कळ मारहाण केली. (अशा उद्दाम पोलिसांना कठोर शासनच व्हायला हवे ! - संपादक) स्वप्नीलने त्याच्या भ्रमणभाषमध्ये सीट बेल्ट न लावणार्‍या पोलीस वाहनचालकाचे छायाचित्र काढले आणि त्याची लेखी तक्रार वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांकडे केली; मात्र त्याने विचारलेला प्रश्‍न न आवडल्याने सीताबर्डी पोलिसांनी मारहाण करत त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली. ( स्वतःच नियमांचे उल्लंघन करायचे आणि त्याची जाणीव करून देणार्‍यावर हात उगारायचा, हा कुठला न्याय ? - संपादक)

विद्युत खांब उभे करण्यासाठी शेतभूमीवरील पिकांवर ट्रॅक्टर फिरवला

असंवेदनशील आणि भोंगळ कारभाराचा नमुना ! 
      अंबाजोगाई (जिल्हा बीड), १७ नोव्हेंबर - बर्दापूरमधील एका महिला शेतकर्‍याच्या शेतात विद्युत खांब उभे करण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण आस्थापनाने उभ्या पिकांवर ट्रॅक्टर फिरवला. शेतभूमीधारक ठकुबाई भीमराव कचरे यांची या संदर्भात कोणतीही अनुमती घेण्यात आली नव्हती. या प्रकरणी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण आस्थापनाच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे.

फलक प्रसिद्धीकरता

धर्मनिरपेक्ष भारतात केवळ मंदिरांच्या संपत्तीवरच सरकारचे लक्ष का ?
     देशातील सर्व सरकारीकरण झालेल्या मंदिरांतील दानपेट्या प्रतीदिन उघडा आणि त्यातील रक्कम अधिकोषात जमा करा, असा आदेश केंद्र शासनाने देशातील सर्व देवस्थानांना दिला आहे. देशातील निवडक २० जिल्हाधिकार्‍यांना हे आदेश देण्यात आले आहेत.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Sarkar adhigrahit sabhi mandirome bhaktodwara kiya dan pratidin bankme jama karneka sarkar ka adesh.
Secular Bharatme keval Mandiropar hi drishti kyon ?
जागो ! : सरकार अधिग्रहित सभी मंदिरों में भक्तों द्वारा किया दान प्रतिदिन बैंक में जमा करने का सरकार का आदेश.
सेक्यूलर भारत में केवल मंदिरों पर ही दृष्टि क्यों ?

ओळखपत्राची मूळ प्रत दाखवून नोटा पालटता येणार ! - भारतीय रिझर्व्ह बँक

     मुंबई - अधिकोषातून ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या जुन्या नोटा पालटून घेतांना ठरवून दिलेल्या ओळखपत्राची छायांकित प्रत देण्याची आवश्यकता नसून त्याऐवजी स्वतः उपस्थित राहून केवळ ओळखपत्राची मूळ प्रत दाखवावी, असे भारतीय रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे. 

नोटा रहित झाल्याच्या घटनेमुळे देशभरात ३३ जणांचा मृत्यू !

     नवी देहली - ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या नोटा चलनातून रहित केल्यानंतर गेल्या ८ दिवसांमध्ये देशाच्या विविध भागांमध्ये ३३ जणांचा मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे. मृत्युमुखी पडलेल्या व्यक्ती प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे या नोटा रहित झाल्यानंतरच्या घटनांशी संबंधित आहेत. यातील काही जण नोटा पालटण्याच्या रांगेत, तर काही या निर्णयानंतर हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू पावले आहेत.

काळा पैसा कचर्‍यात पडण्यापेक्षा शेतकर्‍यांची कर्जमुक्ती करावी ! - श्रीपाल सबनीस

     पुणे, १७ नोव्हेंबर (वार्ता.) - पंतप्रधानांनी चलन पालटण्याचा घेतलेल्या निर्णयामुळे अनेक ठिकाणी काळा पैसा हा कचरा आणि पाणी येथे फेकला जात आहे. त्यापेक्षा अशा काळ्या पैशाने शेतकर्‍यांची कर्जमुक्ती करावी. त्यामुळे शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबतील, असे प्रतिपादन अखिल भारतीय साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले. (सबनीस यांचा भाबडा आशावाद ! - संपादक) महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात १७ नोव्हेंबर या दिवशी आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत केले. 

जिल्हा सहकारी अधिकोषांंना नोटा पालटण्यास बंदी केल्याच्या निर्णयाच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका !

     मुंबई - जिल्हा सहकारी अधिकोषांना नोटा पालटण्यास बंदी केल्याच्या निर्णयाच्या विरोधात मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने १६ नोव्हेंबर या दिवशी मुंबई उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने १४ नोव्हेंबरला परिपत्रक काढून जिल्हा सहकारी अधिकोषांना चलनातून रहित केलेल्या जुन्या नोटा स्वीकारणे आणि त्या नोटा पालटून देणे, या दोन्हीला मज्जाव केला आहे. त्यामुळे ही याचिका प्रविष्ट केली आहे. त्या याचिकेवर न्यायालयाने २१ नोव्हेंबरला सुनावणी ठेवली आहे.

पालघर जिल्ह्यात ८ वर्षीय मुलाची निर्घृण हत्या !

       वाडा (जिल्हा पालघर), १७ नोव्हेंबर - येथील कुडूस गावाच्या हद्दीत लक्ष्मीनगरमध्ये रहाणार्‍या एका आठ वर्षीय विशाल भारती या मुलाची निर्घृण हत्या करण्यात आली. तो घरातून बेपत्ता झाला होता. त्याचा मृतदेह एका माळरानावर आढळून आला. त्याचा तोंडवळा दगडाने ठेचलेला असून प्रथमदर्शनी दिसणार्‍या लक्षणांवरून त्याच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. यापूर्वीही कुडूस भागातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. (कायदा-सुव्यवस्था यांचा बोजवारा ! सर्वत्र होणारा अनाचार आणि अत्याचार यांच्या घटना रोखण्यासाठी नागरिकांना सुसंस्काराचे धडे देणे आवश्यक आहे. - संपादक)सिल्लोड (जिल्हा संभाजीनगर) येथे अवैध वाळूचे दोन ट्रॅक्टर पकडले

      सिल्लोड (जिल्हा संभाजीनगर), १७ नोव्हेंबर - सिल्लोड पोलिसांनी १६ नोव्हेंबर या दिवशी भराडी शिवारात अवैध वाळूची तस्करी करणारे दोन ट्रक पकडले. पूर्णा नदीपात्रातून हे ट्रक भरण्यात आले. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. (अवैध वाळूउपशामुळे होणारी पर्यावरणाची हानी, त्यातून चालणारा काळाबाजार यांना आळा घालण्यासाठी सरकार अवैध वाळूउपशाच्या विरोधात ठोस पावले उचलेल का ? - संपादक) उमरगा (जिल्हा धाराशिव) येथे ९१ लक्ष ५० सहस्र रुपये पकडले !

      उमरगा (जिल्हा धाराशिव), १७ नोव्हेंबर - उमरगा चौरस्ता येथे एका सुमो जीपमधून ९१ लक्ष ५० सहस्र रुपये जप्त करण्यात आले. त्यात पाचशे आणि १ सहस्र रुपयांच्या नोटा आहेत. एस्एस्टी पथकाच्या वतीने ही कारवाई करण्यात आली.


इंदापूरला जन्माला येणार पहिले टेस्ट ट्यूब वासरू

       इंदापूर (जिल्हा पुणे), १७ नोव्हेंबर - टेस्ट ट्यूब बेबीच्या तंत्राचा वापर करून नवीन वासरू निर्माण करण्याचा प्रयोग केला जात आहे. देशातील खिलार गायींवरील पहिला प्रयोग इंदापूरमध्ये करण्यात आला. या प्रयोगामुळे खिलारी गायीचे देशातील पहिले टेस्ट ट्यूब वासरू इंदापूरमध्ये जन्माला येणार आहे. (नैसर्गिक निर्मितीची तुलना वैज्ञानिक प्रगतीच्या आधारे होणार्‍या निर्मितीशी होऊच शकत नाही. असे प्रयोग करण्यापेक्षा सरकारने देशस्तरावर गोवंश हत्याबंदी कायदा लागू करून त्याची कठोर अंमलबजावणी करावी. त्यामुळे गाोवंशियांचे प्रमाण वाढून टेस्ट ट्यूब बेबीसारखे प्रयोग करण्याची आवश्यकताच भासणार नाही. - संपादक)

अशाश्‍वत जगात पैसा नव्हे, तर संस्कार महत्त्वाचे !

श्री. शरद पोंक्षे
     केंद्रशासनाने काळ्या पैशावर आळा घालण्यासाठी नोट बंदीचा ऐतिहासिक निर्णय घेतल्याने काळा पैसा असणार्‍या राष्ट्रद्रोही नागरिकांचे धाबे दणाणले आहेत. आपली काळी कमाई लपवण्यासाठी ते नानाविध क्लृप्त्या शोधत आहेत; परंतु त्यांना हे कळत नाही की, हे सर्व क्षणभंगूर आहे. नेमक्या याच सूत्रावर प्रसिद्ध अभिनेता आणि हिंदुत्वनिष्ठ श्री. शरद पोंक्षे यांनी आसूड ओढले आहे. भारतियांना अंतर्मुख करायला लावणारा सदर लेख आमच्या वाचकांसाठी प्रसिद्ध करत आहोत.
१. नोटांसाठी धावाधाव !
      आज नोटांसाठी किती वेगवेगळ्या पातळ्यांवर धावाधाव चालली आहे. बँकांच्या समोर मोठ्या रांगा ! सामान्य माणसं साधी भाजी खरेदी करायला १०० ची नोट नाही म्हणून त्रस्त ! तर करोडो रुपयांच्या रद्दीच काय करायचे ? म्हणून श्रीमंत त्रस्त ! किती गंमत आहे ! अजुनही लक्षात येत नाही आपल्याला कि किती आणि काय जमवायचे ? कशासाठी जमवायचे ? कोणासाठी जमवायचे ? सगळंच अशाश्‍वत आहे.एकाक्षणात होत्याचं नव्हतं होऊन जातं. सगळ्याच विषयांत. पैसा. वस्तु. किंवा माणूस. पंधरा दिवसांपूर्वी अश्‍विनी (प्रसिद्ध कलाकार आणि नृत्यांगना अश्‍विनी एकबोटे) गेली. असंच एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. ८.१५ ला होती, ८.३० ला जगातूनच निघून गेली. (२२ ऑक्टोबर २०१६ या दिवशी पुण्यात आयोजित एका कार्यक्रमात नृत्य सादर करतांना अश्‍विनी एकबोटे या अचानक कोसळल्या आणि हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.) परवा पैशांचंही तसंच. काही लोकं ११.५५ ला रात्री अब्जाधीश होते. १२ वाजून १ मिनिटाला वरची फक्त शुन्य शिल्लक राहिली. किती नश्‍वर आहे सगळंच. तरीही आपण अडकत रहातो. सतत प्रत्येक गोष्टीत.

मुले संस्कारक्षम करण्याची आवश्यकता !

     अगदी अलीकडील काळापर्यंत १३-१४ वर्षांचे वय म्हणजे चांगले शिकायचे, खेळायचे आणि भावंडांशी मस्ती करण्याचे वय, अशी व्याख्या होती. त्यानंतर उज्ज्वल भविष्याची स्वप्ने पाहून त्यासाठी करियरसाठी मेहनतीला आरंभ होत असे; परंतु आता १३-१४ वर्षांच्या कोवळ्या वयात मुले-मुली खोटे प्रेम या संकल्पनेत गुरफटून जात असल्याचे प्रमाण वाढल्याचे दिसत आहे. पूर्वी मुले महाविद्यालयातील अभ्यासाच्या तासिकांनाच दांडी मारायची; पण आता शाळेलाच दांडी मारून उज्ज्वल भविष्याकडे पाठ फिरवून प्रेमाच्या जाळ्यात गुंतून वेळ घालवत असल्याचे चित्र दिसते. मुलांची ही सैरभैर वागणूक पालकांच्या दृष्टीत येतेच ! त्यावर उपाय म्हणून पालक मुलांना समजावून सांगतात आणि न ऐकल्यास मार देतात. अशा वेळी प्रेम टिकवायचे कि आई-वडिलांचे ऐकायचे, अशा मन:स्थितीत काही मुलांची जीव देण्यापर्यंत मजल जात आहे.

कॉन्व्हेंट शाळांमधील हिंदु विद्यार्थ्यांचे होत असलेले ख्रिस्तीकरण !

१. कॉन्व्हेंट शाळेत जाण्यापूर्वी जी मुले आई-वडिलांना आई-बाबा म्हणत असतात, ती शाळेत जाऊ लागल्यानंतर मम्मी-डॅडी म्हणू लागतात. 
२. या शाळांतील मुलांमधील देवाला हात जोडून नमस्कार करण्याचा संस्कार जातो आणि ती मुले छातीला हात लावून आकाशाकडे पाहू लागतात. 
३. स्वधर्मातील धर्मग्रंथ, देवता, चालीरीती आदींची निंदानालस्ती ऐकण्याची त्यांना सवय होते. 
४. या विद्यार्थ्यांसाठी नाताळ, नववर्षदिन हे महत्त्वाचे सण बनतात. 
५. येशूवरून कृष्णाची संकल्पना निर्माण झाली आहे, हे मुलांच्या मनावर बिंबवले जाते. 
६. सरस्वतीवंदना मुलांच्या कानावरच पडत नाही.

हिंदूंनी हिंदु धर्म आणि संस्कृती यांच्या रक्षणासाठी केलेले प्रयत्न अराष्ट्रीय नाहीत !

     स्वातंत्र्यपूर्व काळात हिंदुस्थान सरकारच्या मंत्रीमंडळात असलेल्या सर फजली हुसेन यांनी उत्तर हिंदुस्थानातील मुसलमानांत गुप्त पत्रक मोठ्या प्रमाणावर प्रसृत केले होते. त्यात म्हटले होते, सांभाळा ! या हिंदु-मुसलमानांच्या एकीच्या जाळ्यात सापडू नका ! आपणाला भिकारड्या हिंदूंशी एकी करून काय लाभ ? आपण इंग्रजांशी एकी करून आपला लाभ करून घेतला पाहिजे. त्यामुळेच हिंदु धर्म आणि संस्कृती यांच्या रक्षणासाठी हिंदुस्थानातील हिंदूंनी केलेले प्रयत्न हे जातीय आणि अराष्ट्रीय असूच शकत नाहीत.
(लोकजागर, वर्ष २ रे, अंक ४०, १२ एप्रिल २०१३)

हिंदु धर्माचे महत्त्व !

     सुखं न विना धर्मात् । तस्मात् धर्मपरो भवेत् ॥ म्हणजेच खरे सुख (आनंद) हे धर्मपरायण झाल्याविना मिळत नाही; म्हणून नेहमी धर्मपरायण असावे. सतत धर्मपरायण बनण्याची, म्हणजेच धर्माचरण करण्याची सोपी संधी हिंदु धर्माने विविध धार्मिक कृती, संस्कार, सण, व्रते इत्यादींच्या माध्यमातून दिली आहे.         या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. - संपादक

गुरुकार्याची ओढ, गुरूंवरील श्रद्धा आणि साधकांविषयी प्रेम असणारे ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे नागपूर येथील श्री. दिलीप पागनीस (वय ६२ वर्षे) !

श्री. दिलीप पागनीस
१. साधकांना घडवणे
१ अ. जिज्ञासूंना गुरुचरणी श्रद्धा ठेवायला शिकवणे 
     वर्ष २००१ मध्ये माझी पागनीसकाकांची प्रथम ओळख झाली. तेव्हा सौ. पागनीसकाकू लक्ष्मीनगरच्या केंद्रसेविका होत्या. एकदा संध्याकाळी ६ वाजण्याच्या वेळी पागनीसकाका आणि काकू आमच्या घरी आले. दोघांनी स्वतःची ओळख करून दिली आणि सौ. पागनीसकाकू म्हणाल्या, आपल्याला या भागात प्रसार चालू करायचा आहे. तुम्ही आमच्यासमवेत आलात, तर चांगले होईल. मला रात्रीचा पूर्ण स्वयंपाक करायचा होता. मुलांना भूक लागली होती. मी त्यांना अडचण सांगितली. तेव्हा पागनीसकाका म्हणाले, आपण सेवेला गेलो, तर आपल्या अडचणी आपोआप सुटतात. मी यजमानांना सांगितल्यावर त्यांनी प्रसाराला जाण्यास सांगितले. मी लगेचच त्यांच्यासमवेत प्रसाराला निघाले. दीड घंटा कसा गेला, ते कळलेच नाही. घरी आल्यावर मुलांनी काहीही हट्ट न करता केवळ पिठलं आणि पोळी करण्यास सांगितले. या प्रसंगावरून माझी ईश्‍वरावरील श्रद्धा वाढण्यास साहाय्य झाले.

पृथ्वीवरील सूक्ष्मातील युद्धात अवताराच्या साहाय्यासाठी धावून आलेल्या ४ धर्मध्वजांचे महत्त्व आणि कार्य !

प्रा. श्रीकांत भट
     १६.९.२०१६ या दिवशी हरियाणा येथील भृगु संहितावाचक श्री. अमरदासजी महाराज यांच्या आज्ञेनुसार सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात ४ वैशिष्ट्यपूर्ण ध्वजांची स्थापना करण्यात आली. दैनिक सनातन प्रभातमध्ये हे वृत वाचत असतांनाच आतून या चारही ध्वजांंविषयी माहिती प्राप्त झाली. 
१. धर्मध्वजांचे महत्त्व
१ अ. सनातन संस्थेच्या गौरवार्थ स्वर्गस्थ 
देवतांनी चार ध्वज वरदान म्हणून देणे 
     वैदिक संस्कृती अन् परंपरा जतन करून साधकांना एकाच जन्मात धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चारही पुरुषार्थ मिळवून देणार्‍या सनातन संस्थेच्या गौरवार्थ स्वर्गस्थ देवतांनी हे चार ध्वज सनातन आश्रमाला एक वरदान म्हणून दिलेले आहेत. त्यांचे विशेष असे स्थान या चैतन्यमय वास्तूत दीर्घकालपर्यंत टिकून रहाणार आहे.

नेहमी हसतमुख आणि आनंदी राहून व्यष्टी अन् समष्टी साधनेत मग्न रहाणार्‍या ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असणार्‍या नागपूर येथील सौ. मंगला पागनीस (वय ५९ वर्षे) !

सौ. मंगला पागनीस
१. नवीन व्यक्तीशीही बोलण्यातून जवळीक साधणे 
     नागपूर येथील राजहंसकाकांच्या घरी सनातनचे सेवाकेंद्र होते. तेव्हा सौ. पागनीसकाकू आमच्या केंद्रसेविका होत्या. काही दिवस आम्ही सभोवतालच्या भागात प्रसाराला गेलो. तेव्हा पागनीसकाकू नवीन व्यक्तीशीही सहजतेने जवळीक साधायच्या. प्रसाराला कुठेही जातांना त्यांना ताण नसायचा. जिज्ञासूंनी त्यांना कितीही प्रश्‍न विचारले, तरी त्यांना उत्तरे देता येत होती. 
२. सत्संगात नामजप करतांना साधिकेला रडू येऊन ती थरथरायला 
लागणे आणि पागनीसकाकूंनी भावजागृती झाली असल्याचे सांगणे 
     त्या सत्संगही चांगला घ्यायच्या. आम्ही रहातो तेथील लक्ष्मीनगर भागात त्यांनी १५ नामसत्संग चालू केले होते. आमच्या घरीही त्यांनी एक नामसत्संग चालू केला होता. एक दिवस त्यांनी मला तो सत्संग घ्यायला सांगितला. तेव्हा सामूहिक नामजप करतांना मला रडू आले, माझा कंठ दाटून आला आणि मी थरथरायला लागले. सत्संग संपल्यावर मी त्यांना विचारले, मला अकस्मात् असे काय झाले ? त्यावर त्या म्हणाल्या, तुमची भावजागृती झाली. मला नवनवीन आध्यात्मिक शब्द कळत होते. माझ्या मनात त्यांच्याविषयी आदर दुणावला.

सहनशील आणि सकारात्मक असलेल्या अन् दुर्धर आजारातही इतरांचा विचार करणार्‍या कै. (सौ.) मंगला खेडकर (वय ७५ वर्षे) !

कै. (सौ.) मंगला खेडकर
    कै. (सौ.) मंगला खेडकर यांचे रक्ताच्या कर्करोगाने निधन झाले. त्यांची मोठी मुलगी सौ. अमृता संभूस, जावई श्री. अजय संभूस आणि त्यांची धाकटी मुलगी सौ. सीमा जोशी यांना त्यांची जाणवलेली काही गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.
१. सौ. अमृता संभूस (कै. (सौ.) मंगला खेडकर 
यांची मुलगी), डोंबिवली, जि. ठाणे. 
१ अ. आईची साधना 
     ११.६.२०१६ या दिवशी माझ्या आईला रक्ताचा कर्करोग झाल्याचे निदान झाले; परंतु तिला ते शेवटपर्यंत ठाऊक नव्हते. निदानानंतर एक मासातच म्हणजे ११.७.२०१६ या दिवशी तिचे निधन झाले. आई अमरावती येथे रहायची. ती पूर्वी सनातनच्या सत्संगात जात असे. त्यानंतर सत्संग बंद झाल्यावर ती भजनाला जात असे. ती श्रीकृष्णाचा नामजप करत असे.

सत्संग, नामजप करतांना आरंभी भावाच्या स्तरावर प्रयोग केल्यास भावजागृती होण्यास साहाय्य होणे

      सप्टेंबर २०१६ मध्ये देहली आणि वाराणसी सेवाकेंद्र येथे पू. (डॉ.) पिंगळेकाका यांनी आमचा व्यष्टी साधनेचा आढावा घेतला. त्या वेळी त्यांनी आढाव्याच्या आधी आमच्याकडून भावजागृतीचा एक प्रयोग करवून घेतला. धन्य धन्य हम हो गये गुरुदेव । आपने हमे जो अपना लिया । आपकी कृपा से जो भिगो दिया, धन्य धन्य हम हो गये गुरुदेव । या ओळी प्रत्येक साधकाला मनातल्या मनात दोन वेळा म्हणायला सांगितल्या. त्यानंतर आम्हाला सगळ्यांना सामूहिकरित्या या दोन ओळी म्हणायला सांगितल्या आणि दोन्ही वेळेस काय जाणवले, ते सांगायला सांगितले. त्यामुळे आमचा भाव जागृत झाला आणि चांगल्या अनुभूतीही आल्या. त्या दिवशी व्यष्टी साधनेचा आढावाही भावाच्या स्तरावर झाला. असा प्रयोग सलग तीन दिवस आम्ही केला. त्यामुळे साधकांच्या उत्साहात वाढ झाली. साधकांना आलेल्या अनुभूती पुढे देत आहोत.

श्री. उपाध्ये आनंदावस्थेत असल्याचे जाणवणे

     सध्या रामनाथी आश्रमात प.पू. भाऊ करंदीकर यांचे शिष्य श्री. उपाध्ये आले आहेत. त्यांच्याकडे पाहिल्यावर ते आनंदात आहेत, असे जाणवले; म्हणून मी त्यांना बोलतांना सहज म्हणालो आपण दिवसभर आनंदातच असता ना ? तेव्हा ते म्हणाले, हो. आता आनंद मिळण्यास आरंभ झाला आहे. श्री. उपाध्ये यांना भेटून पुष्कळ चांगले वाटले.
- श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१६.११.२०१६)

पती समवेतच्या भांडणांत साधनेमुळे सौ. अनन्या सेठी यांच्यात झालेले पालट आणि अंतर्मुखतेतून प्राप्त झालेला दृष्टीकोन !

सौ. अनन्या सेठी
      साधना चालू करण्यापूर्वी माझी यजमानांसमवेत पुष्कळ भांडणे होत असत. मी साधनेला आरंभ केल्यानंतर भांडणांचे प्रमाण न्यून झाले. असे असले, तरी अधून-मधून खटके उडायचे. भांडण संपल्यावर मी श्रीकृष्णाला प्रार्थना करत असे. 
१. साधनेच्या कालावधीनुसार प्रार्थनांमध्ये झालेले पालट 
अ. प्रारंभीच्या काळात मी प्रार्थना करत असे, श्रीकृष्णा, मला हा प्रसंग स्वीकारता येेत नाही. तूच मला यातून बाहेर काढ.
आ. काही वर्षे साधना केल्यानंतर आमचे भांडण झाल्यावर हा प्रसंग सहन करण्याची मला शक्ती दे.
इ. साधनेतील आणखी काही वर्षांनंतर मी प्रार्थना करत असे, आमच्यावर अनिष्ट शक्तींचा असलेला प्रभाव नष्ट होऊ दे ! माझ्या यजमानांना ते कुठे चुकत आहेत, हे लक्षात येण्यासाठी त्यांना सात्त्विक बुद्धी दे ! 
ई. त्यानंतर मी प्रार्थना करत असे, आम्ही दोघेही कुठे चुकत आहोत, हे आमच्या लक्षात येऊ दे !

न धरी शस्त्र मी करी, तरीही कृष्णच युद्धा कारण झाला ।

     महाभारत युद्धाच्या वेळी श्रीकृष्णाने आव्हान केले, अजूनही ज्यांना धर्माच्या बाजूने यायचे आहे, त्यांनी यावे. त्यानंतर विकर्ण आला. ही धर्मशक्ती असुराकडे होती. तीही कृष्णाने काढून घेतली; म्हणून तर १८ दिवसांत युद्ध संपले.
हेच तर वैश्य तत्त्वाचे डावपेच, होय ना राजा । 
मनात ठेव सारे करू नकोस याचा गाजावाजा ॥ १ ॥

न धरी शस्त्र मी करी, तरीही तोच युद्धा कारणीभूत झाला । 
असा कारणीभूत होऊनी 
मायेत न अडकता यादवांचाही नाश केला ॥ २ ॥

संतांनी एकदा स्पर्श केलेल्या वस्तूतसुद्धा पुष्कळ चैतन्य येणे

सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ
      जून २०१६ मध्ये मी रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमात एका शिबिरासाठी गेले होते. त्या वेळी माझी लेखणी (पेन) सनातनच्या सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी थोडा वेळ लिहिण्यासाठी घेतली होती. काही दिवसांनी मी केरळ येथे गेल्यावर एका साधकाला आध्यात्मिक त्रास होत होता. तेव्हा तो साधक लेखणीतील चैतन्य सहन होत नसल्याने लेखणी हातात घेत नव्हता. त्यावरून संतांनी एकदा जरी एखाद्या वस्तूला हात लावला, तरी त्यात कितीतरी चैतन्य येते, हे देवाने मला शिकवले. 
- कु. अदिती सुखटणकर, केरळ (जून २०१६)


धर्माचरणी, राष्ट्रीय हिंदू आंदोलनांत उत्साहाने सहभागी होणारा ५३ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला आग्रा, उत्तरप्रदेश येथील कु. शौर्य सिंह (वय ७ वर्षे) !

कु. शौर्य सिंह
    (कु. शौर्य याची वर्ष २०११ मध्ये ५१ टक्के आध्यात्मिक पातळी होती. - संकलक)
    कार्तिक कृष्ण पक्ष पंचमी (१८.११.२०१६) या दिवशी कु. शौर्य सिंह याचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या आईला त्याची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे देत आहोत.
कु. शौर्य सिंह याला वाढदिवसानिमित्त
सनातन परिवाराच्या वतीने शुभाशीर्वाद !
१. साधना : तो नियमित नामजप आणि प्रार्थना करतो.
२. सेवेची आवड : तो कोणत्याही राष्ट्रीय हिंदू आंदोलनामध्ये आईवडिलांसमवेत नियमितपणे सहभागी होतो आणि हस्तफलक पकडून उत्साहाने घोषणा देतोे.

लहान वयातच व्यष्टी साधनेचे गांभीर्य आणि प.पू. डॉक्टरांवर अपार श्रद्धा असणारा ५५ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला पनवेल येथील कु. कौस्तुभ प्रमोद बेंद्रे (वय ९ वर्षे) !

उच्चलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र 
चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. कौस्तुभ प्रमोद बेंद्रे आणि कु. शौर्य सिंह ही दैवी बालके आहे !
कु. कौस्तुभ बेंद्रे
     (वर्ष २०११ मधे कु. कौस्तुभची आध्यात्मिक पातळी ५१ टक्के होती. - संकलक)
      पालकांनो, हे लक्षात घ्या ! 
     तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले 
      कार्तिक कृष्ण पक्ष पंचमी (१८.११.२०१६) या दिवशी कु. कौस्तुभ बेंद्रे याचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या वडिलांना त्याची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे देत आहोत.

मकरसंक्रांतीच्या निमित्ताने धर्मशिक्षण देणारे पत्रक उपलब्ध !

साधकांना सूचना
     सनातन संस्थेच्या वतीने मकरसंक्रांतीच्या निमित्ताने धर्मशिक्षण देणारे ए-५ आकारातील पाठपोट हस्तपत्रक नेहमीच्या संगणकीय ठिकाणावर उपलब्ध करण्यात आले आहे. या पत्रकात मकरसंक्रांतीचे अध्यात्मिकदृष्ट्या महत्त्व, तीळगूळ आणि वाण देण्याचे महत्त्व दिले आहे. वाण देण्यास उपयुक्त होतील असे सनातन-निर्मित लघुग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांची यादीही या पत्रकात देण्यात आली आहे.
टीप : वरील प्रसारसाहित्यासाठी प्रायोजक मिळवून त्याचा सुयोग्य ठिकाणी वापर करावा.

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज 
सनातनचे श्रद्धास्थान
इतरांकडे बघण्याचा दृष्टीकोन
१. तुम्ही माझ्याकडे ज्या भावनेने पहाता, त्याच भावनेने मी तुमच्याकडे पहातो.
२. आपल्याकरिता कुणी नाही, आपण सर्वांकरिता आहोत.
३. दरिद्रका मुंह नहीं देखता । गरीबका साथ नहीं देता । लखपतीके घर नहीं जाता । धनवानके घर रहता हूं ।
भावार्थ : दरिद्र, गरीब हे शब्द नाम न घेणार्‍याच्या संदर्भातील आहेत. लखपती हा मायेसंबंधातील, तर धनवान हा नाम घेणार्‍या साधकाला उद्देशून आहे.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)


बोधचित्र


परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
     अभिव्यक्ती स्वातंत्र्य, स्वैराचार हे एक वेळ प्राण्यांचे वैशिष्ट्य असू शकते, माणसाचे नव्हे. धर्मबंधनात रहाणे, धर्मशास्त्रांचे अनुकरण, असे करणार्‍यांनाच माणूस म्हणता येते. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले
स्वयंसूचना सत्र करता होईल गुर्वाज्ञेचे पालन ।

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...
परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले
     व्यष्टी साधनेचा आढावा देत असतांना स्वयंसूचना सत्राने अहंरूपी राक्षसाला मारण्यासाठी शस्त्रांसारखे काम केले आणि माझ्यातील अहंचा एक पैलू न्यून झाला, असे माझ्या लक्षात आले. त्या वेळी मला प.पू. गुरुदेवांच्या कृपेने पुढील कविता सुचली. 
अवतरले श्रीमत् नारायण । उद्धार करण्यास मम पामराचा ।
परि कळत नसे मजला ही गुरुकृपा ।
कारण देही वसे अहंरूपी राक्षस ॥ १ ॥

करूनी प्रार्थना श्रीगुरुचरणी ।
अहंरूपी राक्षस वधण्याचे ध्येय ठेवले मनी ॥ 
झाली मग मजवर गुरुकृपा ।
गुरूंनी दिले मज स्वयंसूचनारूपी दिव्यास्त्र ॥ २ ॥
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. 
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे 


प.पू. पांडे महाराज यांचे अनमोल विचारधन

कृपा करा अशी प्रार्थना करण्यापेक्षा आज्ञापालन करून कृपा अनुभवावी ! 
प.पू. परशराम पांडे
      कृपा करा म्हणणे चुकीचे आहे. प.पू. डॉक्टर ती आपल्यावर करतच आहेत. पुन्हा त्यांच्याकडे कृपा करा असे म्हणणे, म्हणजे त्यांचा अपमान केल्यासारखे आहे. कृपा केवळ डोक्यावर हात ठेवून होते, असे नाही. आज्ञापालनाने शिष्य आणि साधक यांच्यावर कृपा होते; म्हणून आज्ञापालन करावे. गुरूंच्या आत्म्याला शिष्याच्या कृतीमुळे आनंद मिळतो आणि शिष्याला त्यांचे आशीर्वाद मिळतात अन् त्याची प्रगती होते. - प.पू. परशराम पांडे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (४.१०.२०१४)


सर्वसाधारण व्यक्ती आणि साधक यांची कर्मे

१. सर्वसाधारण व्यक्ती 
       व्यवहारातील कर्मे
२. साधक
अ. कर्मयोग : साधनेतील कर्मे
आ. भक्तीयोग : कर्मकांडे, यज्ञयाग इत्यादी 
इ. ज्ञानयोग : अकर्म कर्म 
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

व्यक्तीच्या सद्गुणाकडे लक्ष द्या 
प्रत्येक व्यक्तीमध्ये कुठला ना कुठला सद्गुण असतोच. 
त्याच्याकडेच लक्ष द्यावे. दोष दृष्टीआड करावेत, म्हणजे जग सुंदर दिसते. ॐ
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

कठीण काळ पुढेच !

संपादकीय
      नोव्हेंबर मासाचे वेतन रोख रकमेत द्या, सध्या अधिकोषातून पैसे काढतांना मोठ्या रांगेत उभे रहावे लागत आहे, अशा आशयाचे पत्र गोवा शासन कर्मचारी संघटनेने राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पाठवले. अर्थात् मुख्यमंत्र्यांनी कर्मचारीवर्गाची ही मागणी फेटाळून लावली, हा भाग वेगळा. काळ्या पैशाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी केंद्रशासनाने ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या नोटा चलनातून मागे घेण्याचा निर्णय घोषित केला आणि या नोटा पालटून घेण्यासाठी आणि अधिकोषातील खात्यांत भरण्यासाठी देशभरातील अधिकोषांच्या शाखांबाहेर मोठमोठ्या रांगा दिसू लागल्या. देशातील काळा पैसा बाहेर काढण्यासाठी केंद्रशासनाने एक योजना लागू करून लोकांना एक संधी दिली.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn