Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

विनम्र अभिवादन !

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आज पुण्यतिथी

विनम्र अभिवादन !

लाला लजपतराय यांचा स्मृतीदिन

देशातील मुसलमान पाक आणि बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारांवर आवाज का उठवत नाहीत ? - काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांचा प्रश्‍न

     हा प्रश्‍न आझाद यांनी स्वतःलाही विचारावा ! आझाद यांनी किती वेळा तेथील आणि देशातीलही हिंदूंवरील अत्याचारांवर आवाज उठवला, तेही सांगावे किंवा काँग्रेसच्या कोणत्या नेत्याने किंवा गांधी परिवारापैकी कोणत्या व्यक्तीने हिंदूंसाठी आवाज उठवला तेही सांगावे ! केवळ काँग्रेसच नव्हे, तर देशातील कोणताही राजकीय पक्ष हिंदूंविषयी पोटतिडकीने बोलत नाही, हीच वस्तूस्थिती आहे !      नवी देहली - भारतात हिंदूंकडून धर्मनिरपेक्षता दाखवण्यात कधीही कमतरता आलेली नाही; मात्र जेव्हा पाक आणि बांगलादेश येथील हिंदूंवर तेथील बहुसंख्यांकाडून अत्याचार होत असतात, तेव्हा आपण (मुसलमान) या विषयावर आवाज का उठवत नाही ?, असा प्रश्‍न काँग्रेस नेते गुलाब नबी आझाद यांनी येथे केला. ते येथील ‘नॅशनल ट्राय कलर असोसिएशन ऑफ इंडिया’च्या वतीने आयोजित ‘रोल ऑफ यूथ इन स्ट्रेनथिंग डेमोक्रसी’ या विषयावरील परिसंवादात बोलत होते. (काश्मीरमध्ये २५ वर्षांपासून हिंदूंवर अत्याचार होत आहेत, त्यावर कधी मुसलमानांनी आवाज उठवला आहे का ? जिहादी आतंकवादाच्या विरोधात आवाज उठवणे तर सोडा, सातत्याने आतंकवाद्यांची बाजू घेण्याचाच प्रयत्न होत आला आहे ! जिहादी आतंकवाद्यांना अटक करण्यास विरोध केला जातो, त्यांना फाशी देण्यास विरोध केला जातो, फाशी दिल्यावर त्याच्या अंत्ययात्रेमध्ये सहस्रोंच्या संख्येने मुसलमान सहभागी होतात, त्यावर कोणीच बोलत नाहीत !

पुनःपुन्हा खटला लांबवत असल्याच्या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण यंत्रणेला न्यायालयाने फटकारले !

न्यायालयालाही न जुमानणार्‍या अन्वेषण यंत्रणा !
पुढील सुनावणी २८ नोव्हेंबरला
     पुणे - डॉ. दाभोलकर हत्येच्या प्रकरणी आरोप निश्‍चिती करण्याची सुनावणी बंदुकीच्या गोळ्यांचा अहवाल स्कॉटलंड यार्डहून येईपर्यंत पुढे ढकलावी, असा विनंतीअर्ज केंद्रीय अन्वेषण यंत्रणेचे (सीबीआयचे) अतिरिक्त शासकीय अधिवक्ता मनोज चलाडे यांनी न्यायालयात सादर केला. त्यावर संशयित म्हणून अटकेत असलेले सनातनचे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांचे अधिवक्ता श्री. वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी जोरदार आक्षेप घेतला. त्यामुळे जिल्हा सत्र न्यायाधीश पी.वाय्. लाडेकर यांनी केंद्रीय अन्वेषण यंत्रणेला फटकारत सुनावले की, ‘तुम्हाला उच्च न्यायालयाने ६ आठवड्यांची मुदत दिली होती. आता ती संपली आहे. असे असतांना तुम्हाला आणखी मुदत हवी कशाला ? त्या कालावधीत काय केले ?’, अशा शब्दांत खडसवत न्यायालयाने अन्वेषण यंत्रणेचा अर्ज फेटाळून लावला. तसेच अन्वेषण यंत्रणेला एक संधी म्हणून २८ नोव्हेंबरला पुढील सुनावणी ठेवली आहे.
     डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणाची सुनावणी १६ नोव्हेंबर या दिवशी झाली. या वेळी केंद्रीय अन्वेषण यंत्रणेचे अधिकारी एस्.आर्. सिंह उपस्थित होते. या पूर्वी २१ ऑक्टोबरला झालेल्या पूर्वसुनावणीच्या वेळी न्यायालयाने अन्वेषण यंत्रणेला गंभीर शब्दांत ‘पुढील सुनावणी ४ नोव्हेंबरला चालू करायचीच आहे आणि आतापर्यंत अनेक वेळा मुदत दिलेली आहे. हा खटला कायद्यानुसार चालवावा’, असे सुनावले होते;

मशिदींवरील भोंग्यांवर कारवाई कधी होणार ? - उद्धव ठाकरे

     मुंबई - इस्रायल सरकारने मशिदींवरील भोंगे हटवण्याचा खमका निर्णय घेतला, तसा निर्णय आपल्याकडचे सरकार कधी घेणार ?, असा प्रश्‍न शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांनी दैनिक सामनाच्या अग्रलेखातून विचारला आहे.
उद्धव ठाकरे यांनी मांडलेली सूत्रे १. मशिदींवरील भोंग्यांची डोकेदुखी केवळ भारतातच नाही, तर जगातील अनेक देश या व्याधीमुळे बेजार आहेत. यावर अन्य ‘भोंगेपीडित’ देश उपाय शोधून काढत आहेत आणि भारतात मात्र मशिदींवरील भोंगे हटवण्याविषयी सरकारी पातळीवर ठोस उपाययोजना कधीच होत नाही.
२. कोलकाता उच्च न्यायालयाने तर २० वर्षांपूर्वी धार्मिक स्थळांवरील भोंगे काढून टाकण्याचे आदेशच दिले होते. त्याचीही अद्याप अंमलबजावणी नाही.
३. इस्रायलमधील ज्यू, ख्रिस्ती यांच्याबरोबरच काही मुसलमानांनीही मशिदींवरील भोंग्यांविरुद्ध आवाज उठवला होता. भारतात मशिदींवरील भोंग्यांविरुद्ध लाखो तक्रारी गेल्या अनेक वर्षांत सरकारकडे करण्यात आल्या आणि धूळ खात पडल्या. इस्रायलने मात्र तसे केले नाही.
४. इस्रायलचा पूर्वेतिहास बघता या निर्णयाची कठोरपणे कार्यवाही होणार हे उघड आहे. तसेच ‘या निर्णयामुळे आमच्या भावना दुखावल्या हो ऽऽऽ’ किंवा ‘इस्लाम खतरे में’, अशी बांग ठोकून आपल्याकडे जसे मुसलमान रस्त्यावर उतरतात, तसे काही इस्रायलमध्ये घडण्याची सुतराम शक्यता नाही.

८ नोव्हेंबरपर्यंत जमा असलेल्या रोकडची माहिती द्या !

आयकर विभागाकडून धर्मादाय विश्‍वस्त संस्था आणि सोसायटी यांना नोटिसा !
     नवी देहली - आयकर विभागाने धार्मिक आणि धर्मादाय ट्रस्ट, तसेच सोसायटी (संस्था) यांना त्यांच्याकडे ८ नोव्हेंबर २०१६ या दिवसापर्यंत किती रोकड जमा होती, याची माहिती मागवणार्‍या नोटिसा पाठवणे प्रारंभ केले आहे. याच दिवशी केंद्र सरकारने ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या नोटा रहित करण्याचा निर्णय घोषित केला होता. अशा प्रकारच्या नोटिसा पाठवणे चालू झाले असून येत्या काही दिवसांत आणखी नोटिसा पाठवण्यात येतील, असे एका सूत्राने सांगितले. केंद्र शासनाने उचललेले हे पाऊल केवळ प्रतिबंधक स्वरूपाचे असून ज्या संस्था कायद्याचा भंग करतांना आढळतील त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई केली जाईल, असे आयकर विभागाच्या एका अधिकार्‍याने सांगितले.

जुन्या नोटा पालटतांना आता ओळखपत्राची छायांकित प्रत दाखवण्याची आवश्यकता नाही !

     नवी देहली - अधिकोष किंवा टपाल कार्यालय येथे ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या नोटा पालटून घेतांना पॅन कार्ड, आधार कार्ड, वाहन चालवण्याचा परवाना आदी ओळखपत्राची मूळ प्रत आणि त्याची छायांकित प्रत (झेरॉक्स कॉपी) दाखवणे बंधनकारक होते; मात्र आता रिझर्व्ह बँकेने छायांकित प्रत दाखवण्याचा नियम रहित केला आहे. केवळ मूळ प्रत दाखवावी, असे घोषित केले आहे.

देशात १० लाख कोटी रुपयांचा काळा पैसा ! - योगऋषी रामदेवबाबा

     सोनीपत (हरियाणा) - देशात १० लाख कोटी रुपयांचा काळा पैसा आहे. हा पैसा बाहेर आला, तर देशाची अर्थव्यवस्था चीनपेक्षाही मोठी होईल आणि येत्या ५-७ वर्षांत अमेरिकेलाही आपण मागे टाकू, असा दावा योगऋषी रामदेवबाबा यांनी येथे पत्रकारांशी बोलतांना केला. देशातच एवढा पैसा आहे की, परदेशी गुंतवणुकीची आपल्याला आवश्यकताच रहाणार नाही. आपल्या चलनातील रुपयाचे मूल्य डॉलरसारखे होऊ शकेल, असाही विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

नेपाळच्या जनतेकडील नोटा पालटून देण्यासाठी पंतप्रधान प्रचंड यांचा मोदी यांना दूरभाष !

     काठमांडू - नेपाळचे पंतप्रधान प्रचंड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दूरभाष करून नेपाळी नागरिकांकडे असलेल्या भारतीय चलनातील ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या नोटा बदलून देण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती केली.

सोपोरमध्ये एक पोलीस हुतात्मा !

     सोपोर (जम्मू-काश्मीर) - येथे आतंकवादी आणि सुरक्षादल यांच्यामधील चकमकीत एक पोलीस हुतात्मा झाला. सायंकाळी उशिरापर्यंत ही चकमक चालू होती.

‘हेराल्ड’ या इंग्रजी दैनिकाकडून राष्ट्रीय हिंदू आंदोलनाविषयी खोटे आणि हिंदु जनजागृती समितीची मानहानी करणारे वृत्तांकन !

क्षमा मागून स्पष्टीकरण प्रसिद्ध करण्याची हिंदु जनजागृती समितीची मागणी !
     पणजी - दैनिक हेराल्ड या इंग्रजी वृत्तपत्राने १६ नोव्हेंबर या दिवशी पृष्ठ २ वर मडगाव येथे झालेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनाविषयी चुकीचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. या वृत्तात हिंदु जनजागृती समितीविषयी मानहानीकारक मजकूर आहे. या संदर्भात दैनिक हेराल्डने स्पष्टीकरण देऊन हिंदु जनजागृती समितीची क्षमा मागावी, असे पत्र हिंदु जनजागृती समितीचे गोवा राज्य समन्वयक डॉ. मनोज सोलंकी यांनी या दैनिकाच्या संपादकांना पाठवले आहे.
     मडगाव येथे १५ नोव्हेंबर २०१६ या दिवशी विविध मागण्यांसाठी हिंदु जनजागृती समितीसह विविध हिंदू संघटनांनी उत्स्फूर्तपणे राष्ट्रीय हिंदू आंदोलन केले होते. गोवा ‘कॅसिनो’मुक्त करावा, पुरो(अधो)गाम्यांच्या मडगाव येथे होणार असलेल्या दक्षिणायन परिषदेवर बंदी घालावी, डॉ. झाकीर नाईक यांच्या ‘इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन (IRF)’सह ‘पीस स्कूल’च्या सर्व शाखांवर बंदी घालावी, आदी मागण्या या आंदोलनाच्या वेळी करण्यात आल्या होत्या. या आंदोलनासाठी प्रशासनाकडून रितसर अनुमती घेण्यात आलेली असतांना वृत्तात अनुमतीशिवाय आंदोलन केल्याचे म्हटले आहे. या वृत्तात हिंदु जनजागृती समिती ही नोंदणीकृत संघटना नसल्याचे म्हटले आहे. पादचार्‍यांना जाण्यासाठी पुरेशी जागा ठेवून आंदोलन पदपथाच्या एका कोपर्‍यात करण्यात आले होते. असे असतांना हिंदु जनजागृती समितीने आंदोलन करून पदपथ आणि रस्ते अडवले होते, असा खोटा आरोप या वृत्तात करण्यात आला आहे. (वस्तूस्थितीचाही विपर्यास करणारे वृत्त प्रसिद्ध करणे म्हणजे पीतपत्रकारितेचा कहर आहे. अशी वृत्तपत्रे ही पत्रकारितेला लागलेला कलंक आहे. - संपादक) याविषयी आक्षेप घेऊन निषेध करणारे पत्र डॉ. मनोज सोलंकी यांनी हेराल्डच्या संपादकांना पाठवले आहे.

आता डॉ. झाकीर नाईक यांचे प्रत्यार्पण करून पुढील कायदेशीर कारवाई करावी ! - हिंदु जनजागृती समिती

डॉ. झाकीर नाईक यांच्या ‘इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन’वरील बंदीचे स्वागत !
     मुंबई - ‘इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन’च्या माध्यमातून डॉ. झाकीर नाईक आतंकवादी कारवाया करण्यासाठी मुसलमान युवकांना प्रोत्साहन देत होते, तसेच विदेशातून कोट्यवधी रुपये घेऊन भारतात मुसलमानेतरांचे धर्मांतर करून त्यांनाही आतंकवादी कारवायांकडे वळवत होते. देशाची शांतता, सामाजिक सलोखा आणि सुरक्षा धोक्यात आणणारे डॉ. झाकीर नाईक यांच्या ‘इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन’वर केंद्रशासनाने बंदी आणण्याच्या निर्णयाचे हिंदु जनजागृती समिती स्वागत करत आहे. आता अटकेच्या भीतीने विदेशात लपलेल्या डॉ. नाईक यांचे प्रत्यार्पण करून घेऊन त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे. शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे डॉ. नाईक आणि त्यांच्या संस्थेच्या माध्यमांतून होणार्‍या आतंकवादी कारवायांना आळा बसेल, असे यात पुढे म्हटले आहे.
१. वर्ष २०१२ मध्ये डॉ. झाकीर नाईक यांनी हिंदूंचे आराध्य दैवत श्रीगणेश आणि भगवान शिव यांच्याविषयी अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्ये केली होती. त्या वेळी सर्वप्रथम हिंदु जनजागृती समितीने समविचारी हिंदुत्वनिष्ठ संघटनांना सोबत घेऊन त्यांच्या विरोधात देशव्यापी आंदोलन छेडले.
२. हिंदु जनजागृती समितीने डॉ. नाईक यांच्या आतंकवादी कारवायांतील सहभागाविषयी, तसेच जगभरात त्यांच्यावर घालण्यात येणार्‍या प्रतिबंधांविषयी सर्व पुरावे आणि माहिती गोळा करून तत्कालीन केंद्रीय गृहमंत्र्यांना सादर केली होती

पाकिस्तान असेपर्यंत भारताला कधीही शांतता मिळणार नाही ! - विचारवंत तारेक फतेह

ज्या दिवशी भारतीय पाठ्यक्रमातून बाबरला बाहेर 
काढले जाईल, त्या दिवशी भारत शक्तीशाली होईल !
      भोपाळ - पाकिस्तान अनेक वर्षांपासून भारताला धोका देत आहे. जोपर्यंत पाकिस्तान अस्तित्वात आहे, तोपर्यंत भारताला कधीही शांतता लाभणार नाही, असे परखड विधान पाकिस्तानी वंशाचे लेखक आणि विचारवंत तारेक फतेह यांनी येथे केले. येथे चालू असलेल्या ‘लोकमंथन’ या कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांनी पाकबरोबरील शांती चर्चेसारखे प्रकार बंद करावेत, अशी मागणीही केली. 
१. भारत सभ्य असल्याने तो पठाणकोटवरील आक्रमणाचे अन्वेषण करणार्‍या पाकच्या लोकांना बोलावून जेवायला देतो, असे अन्य कोणताही देश करत नाही. 
२. हा बाबरचा भारत नाही. तो येथे जन्मला नाही आणि मेलाही नाही. ज्या दिवशी भारतीय पाठ्यक्रमातून बाबरला बाहेर काढण्यात येईल त्या दिवशी भारत शक्तीशाली होईल.

बुरखाबंदीची मागणी करणारी जनहित याचिका देहली उच्च न्यायालयाने फेटाळली !

       नवी देहली - जनतेच्या सुरक्षेच्या दृष्टीने बुरखा आणि तत्सम तोंड झाकणार्‍या वस्त्रांंवर बंदी घालण्यात यावी, अशा आशयाची सरदार रवि रंजन सिंह यांनी केलेली जनहित याचिका देहली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश जी. रोहिणी आणि न्या. संगीता धिंग्रा यांनी फेटाळून लावली. या संदर्भात शासन कायदा करू शकते. या प्रकरणात आम्ही हस्तक्षेप करणार नाही, असे न्यायमूर्तींनी सांगितले. 
     या याचिकेत ‘वाहतूक, शासकीय इमारती, प्राचीन प्रेक्षणीय स्थळे इत्यादी ठिकाणी बुरखा, हेल्मेट, तोंड झाकणार्‍या वस्त्रांमुळे सुरक्षेत बाधा येऊ शकते’, असे म्हटले आहे. ‘बुरखाधारी व्यक्ती आतंकवादी असण्याची दाट शक्यता असते. सध्याच्या अस्थिर परिस्थितीत अशा वस्त्रांवर बंदी घालणे आवश्यक आहे’, असेही याचिकेत नमूद करण्यात आले होते.

बांगलादेशमधील हिंदूंवरील अत्याचाराची बाजू मांडू नये, यासाठी बांगलादेशच्या मंत्र्यांकडून इस्रायलच्या अधिकार्‍याला लाच देण्याचा प्रयत्न !

     ढाका - स्वित्झर्लंडमधील झुरीच शहरात इस्रायलचे नागरिक मेंदी सफादी हे आंतरराष्ट्रीय व्यवहार पहाणारे आस्थापन चालवतात. बांगलादेशाची आंतरराष्ट्रीय पत वाढवावी, यासाठी बांगलादेशच्या मंत्र्यांनी मेंदी सफादी यांची भेट घेतली. सफादी यांनी बांगलादेशमध्ये अल्पसंख्यांक हिंदूंवर होत असलेले अत्याचार पाहून हे काम स्वीकारण्यास नकार दिला. सफादी यांना लाच देण्याचाही प्रयत्न या मंत्र्यांनी केला; मात्र सफादी त्याला बधले नाहीत. ही माहिती बांगलादेशातील हिंदुत्वनिष्ठ संघटना ‘हिंदू स्ट्रगल समिती’चे अध्यक्ष श्री. सहीपण कुमार बसू यांनी दिली.

नोटबंदीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विदेशी प्रसारमाध्यमांमधून स्तुती !

     नवी देहली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीचे धाडसी पाऊल उचलून भारतीय अर्थव्यवस्थेला निराळे वळण दिले म्हणून विदेशी प्रसारमाध्यमांनी त्यांची भरपूर स्तुती केली आहे.
१. सिंगापूर येथील ‘इंडिपेंडन्ट’ या वृत्तपत्राने नरेंद्र मोदी यांच्या अचानक घेतलेल्या कृतीचे कौतुक केले आहे. त्यांची तुलना सिंगापूरचे संस्थापक ली कुआन यु यांच्याशी केली आहे. यु हे सिंगापूरचे लोहपुरुष मानले जात होते. मोदी यांनी त्यांना सिंहाची उपमा दिली होती. 
२. ‘फोर्ब्स’ या नियतकालिकाने नोटबंदीचे पाऊल अत्यंत चांगल्या रितीने हाताळल्याचे म्हटले आहे. ही अत्यंत शहाणपणाची कृती असल्याचेही म्हटले आहे.

त्रिपुरारि आणि कार्तिक पौर्णिमेनिमित्त बाणगंगा येथे दीपोत्सव अन् गंगेची महाआरती !

     मुंबई - वाळकेश्‍वर बाणगंगा येथे १४ नोव्हेंबरला सायंकाळी कार्तिक पौर्णिमा आणि त्रिपुरारि पौर्णिमा यांच्या निमित्ताने दीपोत्सव आणि गंगेची महाआरती करण्यात आली. गौड सारस्वत ब्राह्मण टेंपल ट्रस्टच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी उपस्थित सहस्रावधी भाविकांनी बाणगंगेच्या तीरावर शेकडो दीप लावून गंगेचे मनोभावे पूजन केले. या कार्यक्रमाला सौ. शर्मिला ठाकरे, स्थानिक आमदार श्री. मंगलप्रभात लोढा, माजी आमदार श्री. नितीन सरदेसाई, आयोजकांपैकी श्री. प्रविण कानविंदे यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.

पोलिसांनाच आता संरक्षण देण्याची वेळ आली आहे ! - मुंबई उच्च न्यायालयाचे खडे बोल

न्यायालयाला असे सांगावे लागणे, हे सरकार आणि पोलीस प्रशासन 
यांना लज्जास्पद आहे ! अशी पोलीस यंत्रणा जनतेचे रक्षण कसे करणार ? 
     मुंबई - जनतेच्या संरक्षणासाठी अहोरात्र झटणार्‍या पोलिसांनाच आता संरक्षण देण्याची वेळ आली आहे. रस्त्यावर कर्तव्य बजावणार्‍या पोलिसांवर आक्रमणे होतात आणि त्यात त्यांचा मृत्यू होतो. हे गंभीर असून पोलिसांकडे फक्त काठी उरली आहे, असे खडे बोल मुंबई उच्च न्यायालयाने सुनावले आहेत. तसेच पोलिसांना तपासाच्या अत्याधुनिक पद्धतीचा अवलंब करणे आणि अधिकार्‍यांना त्याचे विशेष प्रशिक्षण देणे, यांची आवश्यकता आहे. त्यासाठी राज्य सरकारने त्याविषयीचे धोरण तातडीने आखण्याची सूचनाही न्यायालयाने केली. (हे न्यायालयाला का सांगावे लागत आहे ? राज्य सरकार आणि पोलीस प्रशासन यांना असे का वाटत नाही ? आतातरी काही उपाययोजना करणार का ? - संपादक) 

बोईसर येथे १९ नोव्हेंबरला श्री पद्मावती श्रीनिवासमंगल महोत्सव !

     बोईसर - इच्छा असूनही ज्या भाविकांना तिरुपती येथे जाऊन श्री बालाजीचे दर्शन घेणे शक्य होत नाही, अशा भाविकांसाठी तिरुपती देवस्थानाच्या वतीने विविध ठिकाणी श्री पद्मावती श्रीनिवास मंगल महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. बोईसर येथे १९ नोव्हेंबर या दिवशी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती प्रसिद्धीसेवक सर्वश्री नीरज राऊत आणि अविनाश चुरी यांनी १३ नोव्हेंबर या दिवशी पत्रकार परिषदेत दिली. श्री पद्मावती श्रीनिवास मंगल महोत्सव समिती, बोईसरच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

सर्व हिंदूंनी संघटित होऊन वर्ष २०२३ मध्ये हिंदु राष्ट्र स्थापन करायचे आहे ! - श्री. चैतन्य तागडे, हिंदु जनजागृती समिती

कात्रज (पुणे) येथील संत खेतेश्‍वर आश्रम येथे दुमदुमली हिंदु राष्ट्र स्थापनेची गर्जना !
     पुणे - भारतात लव्ह जिहाद, धर्मांतर या समस्यांसमवेतच आता ‘इसिस’ने शिरकाव केला आहे. काश्मीरमध्ये जिहादी आतंकवादामुळे ४ लक्ष ५० सहस्र हिंदूंना एका रात्रीत विस्थापित व्हावे लागले. काश्मीरप्रमाणे येथील परिस्थिती होऊ नये आणि समाजविघातक गोष्टींना विरोध करणे, यासाठी हिंदूंनी संघटित होणे आवश्यक आहे. महाराणा प्रताप आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी मोगलांविरुद्ध लढा देऊन हिंदवी स्वराज्य स्थापन केले, तसे सर्व हिंदूंनी संघटित होऊन २०२३ मध्ये आपल्याला हिंदु राष्ट्र स्थापन करायचे आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. चैतन्य तागडे यांनी केले. त्रिपुरी पौर्णिमेनिमित्त येथील कात्रज भागातील संत खेतेश्‍वर आश्रम येथे १४ नोव्हेंबर या दिवशी अखिल राजस्थानी समाज संघ यांच्या वतीने पुरुषांसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

केंद्र सरकारने ‘बॉम्बे हायकोर्ट’च्या नामांतराचे विधेयक मागे घेतले !

उच्च न्यायालयांचे नामांतर करण्याचा घेतलेला योग्य निर्णय 
मागे घेऊन केंद्रशासन असे धरसोडीचे धोरण का अंगीकारत आहे ? 
     नवी देहली - बॉम्बे हायकोर्टाचे नामांतर ‘मुंबई उच्च न्यायालय’ करण्याचे विधेयक केंद्र सरकारने अचानक मागे घेतले आहे. यामागील अधिकृत कारण समजू शकले नाही; परंतु ‘कोलकाता उच्च न्यायालय’ असे नामांतर करण्यास कलकत्ता उच्च न्यायालय आणि बंगाल सरकार यांनी केलेल्या विरोधामुळे हे विधेयक मागे घ्यावे लागल्याचे कारण सांगितले जात आहे.
     बॉम्बे हायकोर्टा’चे ‘मुंबई उच्च न्यायालय’ असे नामांतर करण्याबरोबरच ‘मद्रास हायकोर्टा’चे नामांतर ‘चेन्नई उच्च न्यायालय’ आणि ‘कलकत्ता हायकोर्टा’चे नामांतर ‘कोलकाता उच्च न्यायालय’ करण्याचा प्रस्ताव असलेले ‘उच्च न्यायालये (नामांतर) विधेयक’ जुलैमध्येच केंद्रीय मंत्रीमंडळाने संमत केले होते. त्यानुसार ते लोकसभेत सादर करण्यातही आले होते; मात्र पुढे ते स्थायी समितीकडे पाठवले गेले नाही. आता तर ते थेट मागेच घेण्यात आले आहे.

मुंबईत गेल्या ५ वर्षांमध्ये २ सहस्र २८४ बलात्कार, तर ६ सहस्र ३७६ विनयभंग यांच्या घटनांची नोंद

देशाची आर्थिक राजधानीच असुरक्षित असेल, तर राज्याची स्थिती किती विदारक असेल ?
महिलांना सुरक्षित जीवन जगण्यासाठी हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) आवश्यक !
मुंबई बलात्काराची राजधानी !
     मुंबई - गेल्या ५ वर्षांमध्ये मुंबईत २ सहस्र २८४ बलात्कार, तर ६ सहस्र ३७६ विनयभंग यांच्या घटनांची नोंद झाली. गंभीर म्हणजे १८ वर्षांच्या आतील पीडितांचे प्रमाण सर्वाधिक असून वर्ष २०१५ मध्ये बलात्काराच्या नोंद झालेल्या घटनांमध्ये ते ६३ टक्के आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचे हे भीषण वास्तव ‘प्रजा फाऊंडेशन’च्या वतीने प्रतिवर्षी सादर करण्यात येत असलेल्या अहवालातून दिसून येत आहे. ही आकडेवारी माहिती अधिकारातून मिळवलेल्या माहितीवरून देण्यात आली आहे. (राज्यातील गुन्हेगारीचे प्रमाण न्यून झाले आहे, असे सांगून स्वतःची पाठ थोपटणार्‍या पोलीस महासंचालकांना यावर काय म्हणायचे आहे ? - संपादक)

याला अंनिसचा बुद्धीप्रामाण्यवाद म्हणायचे का ?

    ‘मुदतीमध्ये परवाना नूतनीकरणाचा अर्ज सादर करण्यामध्ये हलगर्जीपणा करणार्‍या राज्यातील एक सहस्रांहून अधिक सरकारी आणि बिगर सरकारी स्वयंसेवी संस्थांची (‘एन्जीओ’ची) परकीय देणगी नियम कायद्याखालील (एफ्.सी.आर्.ए.) नोंदणी रहित करण्याचा बडगा केंद्रीय गृहमंत्रालयाने अलीकडेच उगारला. त्याअंतर्गत ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्र’ संस्था कारवाईच्या कक्षेत आली आहे. या कारवाईमुळे अंनिसला परदेशी देणगीदारांकडून मिळणार्‍या देणग्या पुढील पाच वर्षांसाठी रोखल्या गेल्या आहेत.
     अंनिसने एक दशकाहून अधिक काळ जमाखर्च आणि ताळेबंद सादर न करणे, एफ्.सी.आर्.ए. देणग्यांविषयी खोटी माहिती धर्मादाय आयुक्तांना सादर करणे, वार्तापत्र प्रकाशित करत असल्याने एफ्.सी.आर्.ए. नोंदणीसाठी पात्र नाही, ही माहिती लपवून एफ्.सी.आर्.ए.ची नोंदणी मिळवणे, यांसह नुकताच धर्मादाय आयुक्तांनी दिलेला आर्थिक गैरव्यवहाराचा अहवाल, या सर्व गोष्टींचे कागदोपत्री पुरावे अलीकडेच केंद्रीय गृहमंत्रालयाच्या निदर्शनाला आणून देण्यात आले होते.’

इतका काळा पैसा जमेपर्यंत सर्वपक्षीय सरकारे झोपली होती का ? त्यांनाही कर्तव्यच्युती म्हणून आजन्म कारागृहात ठेवा !

     ‘केंद्र सरकारच्या ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या नोटा रहित करण्याच्या निर्णयामुळे देशातील तब्बल ३ लाख कोटी रुपयांचा काळा पैसा नष्ट होणार आहे, असा अंदाज तज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे. या अंदाजानुसार बेहिशेबी संपत्ती उघड होण्याच्या भीतीने अनेक जण त्यांच्याकडे असलेल्या ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या नोटा बँकेत जमा करणे टाळतील. अर्थव्यवस्थेत असलेल्या ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या एकूण नोटांच्या तुलनेत हे प्रमाण २० टक्के इतके आहे. यानुसार देशातील तब्बल ३ लाख कोटी रुपयांचा काळा पैसा नष्ट होईल.’

(म्हणे) ‘महापालिका आयुक्तांना ३०० वर्षे जुना दर्गा हटवता येणार नाही !’

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे आयुक्तांना पत्र 
किती हिंदू त्यांच्या प्राचीन मंदिरांविषयी असे जागरूक असतात ? 
     कल्याण - शहराच्या पश्‍चिम भागातील काळा तलाव परिसरात हजरत निगरानी शहा बाबा दर्ग्याच्या जागेवर महापालिकेने वाहनतळ उभारण्याचा ठराव केला आहे. या संदर्भात ‘वाहनतळासाठी आयुक्तांना ३०० वर्षे जुना दर्गा हटवता येणार नाही. वक्फ मंडळाच्या कोणत्याही मालमत्तेवर अशा प्रकारची कारवाई महापालिकेस करता येणार नाही. त्यासाठी ‘ना हरकत’ प्रमाणपत्र महापालिकेने वक्फ मंडळाकडून घेणे आवश्यक आहे’, असे राज्य वक्फ मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी ७ नोव्हेंबरला महापालिका आयुक्त ई. रविंद्रन यांना पत्राद्वारे कळवले आहे. 

नागपूरमध्ये वर्ष २०१५ मध्ये ११ सहस्र १८ दखलपात्र गुन्हे !

राष्ट्रीय क्राईम रेकॉर्ड ब्युरोचा अहवाल 
     नागपूर, १६ नोव्हेंबर - ‘राष्ट्रीय क्राईम रेकॉर्ड ब्युरो’च्या अहवालानुसार वर्ष २०१४ मध्ये शहरात १० सहस्र ३५९ दखलपात्र, तर वर्ष २०१५ मध्ये ११ सहस्र १८ दखलपात्र गुन्हे नोंदवण्यात आले. एका वर्षात ६५९ गुन्हे वाढले. शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून गुन्ह्यांच्या प्रमाणातही वाढ होत आहे; मात्र पोलिसांच्या संख्येत कोणतीच वाढ झालेली नाही. 

‘व्हॉटस् अ‍ॅप’वर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी अश्‍लील टिपणी करणार्‍यांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट !

पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांच्याकडे तक्रार देतांना सर्वश्री महेश उरसाल आणि संभाजी साळुंखे
     कोल्हापूर, १६ नोव्हेंबर (वार्ता.) - पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १ सहस्र रुपयांची नोट बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर एका सुशिक्षित नागरिकाने श्री. मोदी यांच्याविषयी अश्‍लील वक्तव्य केले होते. या वेळी तेथे समाजवादी पक्षाचे नेते अमरसिंह उपस्थित होते. एका ध्वनीचित्रफीतीद्वारे ही माहिती ‘व्हॉटस् अ‍ॅप’वर उघड झाली आहे. या दोघांच्या विरोधात १४ नोव्हेंबर या दिवशी सायंकाळी ६ वाजता जुना राजवाडा पोलीस ठाणे येथे बजरंग दलाचे जिल्हाप्रमुख सर्वश्री संभाजी साळुंखे आणि शहरप्रमुख महेश उरसाल यांनी तक्रार प्रविष्ट केली आहे. या आवेदनात श्री. उरसाल यांनी अश्‍लील टिपणी करणार्‍या नागरिकाचा शोध घेऊन त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या वेळी हिंदु एकता आंदोलनाचे सर्वश्री शिवाजीराव ससे, धर्माभिमानी राजेंद्र सूर्यवंशी, सुनील पाटील, अवधूत भाट्ये, सुधीर सूर्यवंशी, आकाश नवरुखे आदी उपस्थित होते. 

इयत्ता नववीमध्ये अडीच लक्ष विद्यार्थी अनुत्तीर्ण

     पुणे - गेल्या वर्षी राज्यातील अडीच लक्ष विद्यार्थी इयत्ता नववीत अनुत्तीर्ण झाल्याचे शासकीय आकडेवारीवरून उघड झाले आहे. राज्यातील शाळा, विद्यार्थी संख्या आणि शिक्षक यांची ‘युडाएस्’ या प्रणालीकडून जमवण्यात आलेली माहिती घोषित करण्यात आली. त्यानुसार शैक्षणिक वर्ष २०१४-१५ मध्ये १९ लक्ष ७० सहस्र ५१४ विद्यार्थी इयत्ता नववीच्या वर्गात होते. त्यांपैकी केवळ १७ लक्ष २७ सहस्र ५५९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. (आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याच्या निर्णयाचा परिणाम ! - संपादक)

सातारा येथे समाजद्रोही आमदारांच्या वाढदिवसानिमित्त लावण्यांच्या कार्यक्रम !

     सातारा, १६ नोव्हेंबर (वार्ता.) - येथील एका जिल्ह्यातील एका तालुक्याच्या आमदारांच्या वाढदिवसानिमित्त नागरिकांचे मनोरंजन करण्यासाठी लावण्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. (राज्यकर्त्यांच्या अशा वृत्तीमुळेच समाजाची नैतिकताही लयाला जात आहे. कुठे राष्ट्रप्रेमापोटी राष्ट्रहितार्थ निर्णय घेणारे पूर्वीचे राजे आणि कुठे मतांच्या लालसेपोटी लावणीच्या कार्यक्रमाचे आयोजन करणारे आताचे राज्यकर्ते ! ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्र हवे ! - संपादक)

ध्वनीप्रदूषणाचे नियम तोडल्यास कठोर कारवाई करा ! - महाराष्ट्र शासन

     मुंबई - ध्वनीप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करा, असा आदेश महाराष्ट्र शासनाने पोलिसांना दिला आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास ५ वर्षांचा कारावास अथवा १ लक्ष रुपये दंड अथवा दोन्हीही शिक्षेची तरतूद आहे. ध्वनीप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन म्हणजेच नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन असून याविषयी नागरिकांनी पोलिसांत तक्रार करावी आणि पोलिसांनी तातडीने कारवाई करावी, असेही शासनाने पत्रकात म्हटले आहे.

मुंबई उच्च न्यायालयात या निर्णयाच्या विरोधात आवेदन करणार ! - अधिवक्ता समीर पटवर्धन

डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना अधिवक्त्यांना भेटू न देणे आणि 
न्यायालयाचा अवमान करणे, यांसंदर्भातील याचिका न्यायालयाने केल्या अमान्य ! 
कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरण ! 
     कोल्हापूर, १६ नोव्हेंबर (वार्ता.) - न्यायालयाच्या आदेशानंतरही कॉ. पानसरे हत्येच्या प्रकरणातील संशयित तथा सनातनचे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना त्यांच्या अधिवक्त्यांना भेटू देण्याच्या संदर्भातील याचिका आणि पोलिसांनी पत्रकारांना डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांची छायाचित्रे काढू दिल्याच्या संदर्भातील अवमान याचिका या दोन्ही याचिका १६ सप्टेंबर या दिवशी येथील सातवे सहदिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) श्रीमती व्ही.व्ही. पाटील यांनी अमान्य केल्या आहेत.

(म्हणे) ‘आता जनताच सर्जिकल स्ट्राईक करेल !’ - अशोक चव्हाण, खासदार, काँग्रेस

स्वतःच्या हातात सत्ता असतांना जनतेसाठी काहीही न 
करणार्‍या काँग्रेसींना जनतेविषयी बोलायचा काय अधिकार ? 
     पंढरपूर (जिल्हा सोलापूर) - दुष्काळ गेला, लोकांना पिण्यासाठी पाणी मिळाले नाही, ना जनावरांना चारा. दसरा, दिवाळी असे सण एकापाठोपाठ गेले; पण जीवनावश्यक वस्तूंचे दर अल्प झाले नाहीत. ‘अच्छे दिन’च्या नावाखाली सरकार विविध पद्धतीने जनतेवरच ‘सर्जिकल स्ट्राईक’ करू लागली आहे; मात्र आता जनता हुशार झाली आहे. आगामी निवडणुकांमध्ये सरकारवरच ही जनता पलटेल आणि ‘सर्जिकल स्ट्राईक’ करेल, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केले. येथील शिवतीर्थावर आयोजित काँग्रेस, तीर्थक्षेत्र विकास आघाडी उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत ते बोलत होते.

ग्रामीण भागातील प्रसार बैठकांना जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

कोल्हापूर येथे ११ डिसेंबरला होत असलेल्या हिंदु धर्मजागृती सभेच्या निमित्ताने...
अधिकाधिक सभेला लोकांना उपस्थित करून सभा यशस्वी करण्याचा निर्धार ! 
बच्छे सावर्डे येथील बैठकीत उपस्थित जिज्ञासू
    कोल्हापूर, १६ नोव्हेंबर (वार्ता.) - येथील ‘पद्माराजे गर्ल्स हायस्कूल’च्या मैदानावर ११ डिसेंबर या दिवशी भव्य हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सभेच्या अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात धर्माभिमानी आणि जिज्ञासू यांच्या बैठका होत आहेत. या बैठकांना धर्माभिमानी आणि जिज्ञासू यांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे. सभेला भाग्यनगर (हैद्राबाद) येथील आमदार श्री. राजासिंह ठाकूर उपस्थित रहाणार
असल्याने सभेची उत्सुकता शिगेला पोचली आहे. बैठकांमध्ये जिज्ञासू आणि धर्माभिमानी यांनी ही धर्मजागृती सभा यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त केला असून त्यांनी सभेसाठी साहाय्य करण्याविषयी आश्‍वासन दिले आहे.

फलक प्रसिद्धीकरता

 हिंदुद्वेष्ट्या काँग्रेसला आली उपरती ?
     ‘भारतात हिंदूंकडून धर्मनिरपेक्षता दाखवण्यात कधीही कमतरता आलेली नाही; मात्र जेव्हा पाक आणि बांगलादेशच्या हिंदूंवर तेथील बहुसंख्यांकांकडून अत्याचार होतात, तेव्हा आपण (मुसलमान) या विषयावर आवाज का उठवत नाही ?, असा प्रश्‍न काँग्रेसचे गुलाब नबी आझाद यांनी केला आहे.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Pak aur Bangladeshke Hinduopar atyachar honepar Musalman chup kyu- Congresske Ghulam Nabi Azad - Hindudweshi Congresski Hinduoko lubhane ki yah nai chal ?
जागो ! : पाक और बांग्लादेश के हिन्दुआें पर अत्याचार होने पर मुसलमान चुप क्यों ? - कांग्रेस के गुलाम नबी आजाद - हिन्दूद्वेषी कांग्रेस की हिन्दुआें को लुभाने की यह नई चाल ?

परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्यावर मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होणार !

     नवी देहली - केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे मूत्रपिंड निकामी झाल्याने त्यांना येथील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्या डायलिसिसवर आहेत. लवकरच त्यांच्यावर मूत्रपिंड प्रत्यारोपणाचे शस्त्रकर्म केले जाणार आहे. स्वतः सुषमा स्वराज यांनी ही माहिती ट्वीटरद्वारे दिली आहे. ‘या संकटातून भगवान श्रीकृष्ण माझे रक्षण करील’, असेही त्यांनी या वेळी म्हटले आहे. (काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या आजाराविषयी जनतेला कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती, तेथे स्वराज यांनी स्वतःच स्वतःच्या आजाराची माहिती जनतेला देणे आश्‍चर्यकारकच म्हणायला हवे ! - संपादक)

नेपाळमार्गे बनावट नोटा भारतात पाठवण्याचा पाकचा प्रयत्न !

     काठमांडू - भारताने ५०० आणि १ सहस्रच्या नोटा रहित केल्यानंतर बनावट भारतीय नोटांचे करायचे काय, असा प्रश्‍न पाकला पडला असतांना त्याने नेपाळमार्गे या नोटा भारतात खपवण्याचा प्रयत्न चालू केला आहे. यासाठी आयएस्आय तिचे हस्तक आणि आतंकवादी यांचा वापर करत आहे, अशी माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. नोटबंदीच्या निर्णयाआधी एक लाख रुपयांच्या बनावट नोटा नेपाळमार्गे भारतात पोचवण्यासाठी आयएस्आय तिच्या हस्तकाला ५० ते ६० सहस्र रुपये देत होती; मात्र आता हा आकडा प्रति लाख २५ ते ३० सहस्र रुपये झाला आहे.

नोटा रहित करण्याच्या सरकारच्या निर्णयावर संसदेत विरोधी पक्षांकडून टीका !

     नवी देहली - ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या नोटा चलनातून रहित करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर १६ नोव्हेंबरला प्रारंभ झालेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षांनी जोरदार टीका केली. ‘स्वत:चे पैसे बँकेतून काढण्यासाठी लोकांना भीक मागावी लागत आहे. केंद्र सरकारने सर्वसामान्यांना भिकारी बनवून टाकले आहे’, अशी टीका करण्यात आली. 
     पिंपरी, १६ नोव्हेंबर - येथील मतदार नोंदणी कार्यालयातील विभागीय लिपिक प्रल्हाद पाटील यांना मतदार नोंदणीमधील त्रुटी न काढण्यासाठी ५० सहस्र रुपयांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने १५ नोव्हेंबरला अटक केली. चिंचवड विधानसभा मतदारसंघातील एका उमेदवाराने मतदार नावनोंदणीसाठी दिलेल्या ३०० अर्जात त्रुटी निघू नयेत, यासाठी पाटील यांनी उमेदवाराकडे २ लक्ष ४० सहस्र रुपयांची मागणी केली. त्या प्रकरणी उमेदवाराने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली आणि त्यानुसार विभागाने कारवाई करत पाटील यांना अटक केली.

बांद्रा येथे ‘डबल डेकर बस’ झाडाच्या फांदीला आपटून ५ जण घायाळ

     मुंबई, १६ नोव्हेंबर (वार्ता.) - वांद्रे येथून कुर्ला येथे जाणारी धारावी डेपोची ३१० क्रमांकाची बस बांद्रा फॅमिली कोर्ट येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाच्या फांदीला आपटली. यामध्ये बसचा वरील भाग चेपला गेला. या वेळी झालेल्या अपघातात बसमधील ५ जण घायाळ झाले. त्यांना उपचारासाठी जवळच्या गुरुनानक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुबोध सिंग (वय ४० वर्षे), सौराज शेख (वय १८ वर्षे), मुशरफ शेख (वय १६ वर्षे), मनीष फिरोज (वय २२ वर्षे) आणि संतालाल फिरोज (वय ३१ वर्षे) अशी घायाळ व्यक्तींची नावे आहेत. यांतील सुबोध सिंग यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून त्यांना घरी पाठवण्यात आले आहे. अपघात चालकाच्या निष्काळजीपणामुळे झाला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.

तुळजापूर येथे निवडणूक अधिकार्‍यांनी कह्यात घेतलेली रक्कम सांगली अर्बन को-ऑप. बँकेची अधिकृत रक्कम ! - गणेशराव गाडगीळ

      सांगली, १६ नोव्हेंबर (वार्ता.) - सांगली अर्बन को-ऑप. बँकेची मराठवाड्यातील परभणी आणि माजलगाव येथील शाखांची रोख ६ कोटी रुपये रक्कम ही १४ नोव्हेंबर या दिवशी तुळजापूर येथे निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी कह्यात घेतली. वास्तविक ही रक्कम बँकेची अधिकृत रक्कम होती, तसेच त्या समवेत बँकेची सर्व कागदपत्रे, अधिकृत अधिकारी, विमा, तसेच अन्य कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली होती. असे असतांना काही प्रसिद्धीमाध्यमांत या रकमेविषयी आणि बँकेच्या संदर्भात अफवा पसरवल्या गेल्या. तरी या संदर्भात बँकेचे ग्राहक, नागरिक यांनी तुळजापूर येथे निवडणूक अधिकार्‍यांनी कह्यात घेतलेली रक्कम सांगली अर्बन को-ऑप. बँकेची अधिकृत रक्कम होती, हे लक्षात घ्यावे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष श्री. गणेशराव गाडगीळ यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी संचालक श्री. शैलेंद्र तेलंग, श्री. हरिदास कालीदास, तसेच अन्य उपस्थित होते.

कोल्हापूर येथे शिक्षण विभागातील वरिष्ठ सहाय्यकाला लाच घेतांना अटक

     कोल्हापूर - येथील लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील वरिष्ठ साहाय्यक चंद्रकांत सावर्डेकर यांना नव्या २ सहस्रांच्या १७ नोटांची लाच घेतांना पकडले.
   सावर्डेकर यांनी मुख्याध्यापक पदोन्नती प्रस्तावावर मंजुरीसाठी माध्यमिक शिक्षणाधिकार्‍यांची सही घेण्यासाठी ही लाच स्वीकारली. त्यांनी संबंधिताला दसरा चौक येथील एका उपहारगृहासमोर येण्यास सांगितले होते.

गुन्हेगाराला शिक्षा काय असाव्यात ?

प.पू. आबा उपाध्ये
     ‘२६ ऑक्टोबर २०१६ या दिवशीच्या दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ‘बलात्कार प्रकरणात विविध देशांमध्ये देण्यात येणार्‍या शिक्षा’ या सदराखाली सविस्तर माहिती दिली आहे. माझ्या मते खालील गोष्टीही लक्षात घेतल्या पाहिजेत.
      मध्यंतरी भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मध्ये आवाहन केले होते की, ‘जनतेला काही सांगायचे असल्यास ती थेट आपल्याशी (पंतप्रधानांशी) बोलू शकते.’ या आवाहनाचा मला असा लाभ झाला की, बरेच दिवस माझ्या मनात रेंगाळत असलेल्या एका प्रश्‍नाच्या संदर्भात श्री. मोदी यांच्याशी बोलण्याची संधी मिळाली. ‘गुन्हेगाराला कोणत्या शिक्षा असाव्यात की, ज्यामुळे न्यायालयात पडून राहिलेली प्रकरणे मार्गी लागतील, गुन्हेगारांमुळे वाढणारा आर्थिक बोजा अल्प होईल ?’, हा प्रश्‍न मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापुढे ‘मन की बात’मध्ये मांडला. काही दिवसांनी त्याचे उत्तर आले की, ‘तुम्ही मांडलेला प्रश्‍न विचाराधीन आहे. लवकरच तुम्हाला संपर्क साधला जाईल.’ 
      सरकारचा गुन्हेगारांना धाक वाटला पाहिजे, अशी कठोर शिक्षा देणे, हीच गुन्हेगारांना खर्‍या अर्थाने आजन्म जन्मठेप होईल.’ - प.पू. आबा उपाध्ये, पुणे.

‘....न स्त्री स्वातंत्र्यम् अर्हति ।’

     एकतर्फी प्रेमातून एका तरुणीच्या आईवर ब्लेडने आक्रमण करण्याची घटना पुणे येथे नुकतीच घडली. एकतर्फी प्रेमातून प्रेयसीवर प्राणघातक आक्रमण करणे अथवा तिच्या शीलाचे धिंडवडे काढणारी कृत्ये करणे, यांसारखी वृत्ते सातत्याने वाचनात येणे, हे चालूच आहे. प्रेमाला नाकारले म्हणून चेहर्‍यावर आम्ल फेकण्याचे रिंकू पाटील प्रकरण असो अथवा अन्य प्रकरण असोत, ही शृंखला चालूच आहे. प्रश्‍न हा आहे की, खरेच हे प्रेम आहे का ? जिच्यावर प्रेम केले जाते, तिच्याच जीवाशी खेळायला मागेपुढे पहिले जात नाही. हे कसले प्रेम ? एकतर्फी प्रेमसंबंधातून घडणार्‍या घटनांच्या व्यतिरिक्तही अनेक घटना स्त्रियांच्या सुरक्षिततेविषयी प्रश्‍नचिन्ह उभे करतात.

हिंदु विद्यार्थ्यांना स्वधर्मापासून दूर नेणार्‍या कॉन्व्हेंट शाळा !

१. ‘कॉन्व्हेंट शाळेच्या सेवानिवृत्त शिक्षिका श्रीमती रीटा सांगतात, ‘‘प्रत्यक्ष का अप्रत्यक्षपणे या शैक्षणिक संस्था विद्यार्थ्यांना स्वतःची संस्कृती, उत्सव आणि संस्कार यांपासून दूर नेतात. या शाळांमध्ये गणेशोत्सव, नवरात्र आणि मकरसंक्रांत या सणांच्या वेळी हेतूपुरस्सर परीक्षा घेतल्या जातात. साहजिकच विद्यार्थी हिंदु धर्मातील हे सण साजरे करू शकत नाहीत.’ 
२. ख्रिस्ती शिक्षक आणि मुख्याध्यापक ‘क्रॉस’ असणारी अंगठी वा साखळी घालू शकतात; परंतु हिंदु विद्यार्थ्यांना देवता किंवा संत यांची चित्रे असलेली पदके वापरण्याची अनुमती नाही.’
      पालकांनो, अशा शाळांमध्ये घालून तुमच्या पाल्याचे जीवन उद्ध्वस्त करायचे का, याचा निर्णय तुम्हीच घ्या !
(संदर्भ : हिंदुजागृतीद्वारे संस्कृतीचे रक्षण)

शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे हेच आमचे ‘हिंदूहृदयसम्राट’।

आज असलेल्या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने...
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे
हिंदूंना न्याय मिळवून देण्या ।
धुमसत असलेला आमचा 
श्‍वास ॥
प्राण पणासी लावू आमचे ।
न्यायहक्क मिळवण्यास ॥ १ ॥

हिंदूंवरील अन्यायामुळे झालाय ।
आसुसलेल्या भावनांचाही कोंडमारा ॥
आज नाही, तर केव्हा
येणार एकत्र ? 
हाच तुम्हा निर्वाणीचा इशारा ॥ २ ॥

भारतातील राष्ट्रीय संग्रहालयांची असलेली गंभीर दुरवस्था !

श्री. अनिल धीर
संग्रहालये म्हणजे भावी पिढीसाठी जणू जिवंत इतिहासच ! स्वत:च्या देशाचा इतिहास जपण्यासाठी आणि त्याद्वारे भावी पिढीमध्ये स्वधर्म अन् संस्कृती यांचा अभिमान रूजवण्यासाठी आज जगभरातील सर्व देश धडपडत आहेत. तथापि ज्या देशामध्ये रामकृष्णादि असे साक्षात् श्री महाविष्णुचे अवतार होऊन गेले आणि ज्या देशाला सहस्रो वर्षांची गौरवशाली परंपरा अन् जाज्ज्वल्य इतिहास आहे तो भारत देश मात्र दुर्दैवाने अपवाद राहिला आहे. सध्या देशातील संग्रहालयांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. ही दुरवस्था पाहून ही संग्रहालये म्हणजे इतिहासाच्या पाऊलखुणा आहेत कि उदासीनतेच्या, असा प्रश्‍न कोणत्याही इतिहासप्रेमी मनाला पडल्याशिवाय रहाणार नाही. संग्रहालयांची ही दुरवस्था पालटण्याची आवश्यकता आहे. इतिहासाची अशी हेळसांड हिंदु राष्ट्रात कदापि होणार नाही !
(काल आपण या लेखाचा पूर्वार्ध पाहिला. आज उत्तरार्ध पाहू.)
७. मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय 
शासनाच्या साहाय्याविना यशस्वीपणे चालू असणे
    मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाने (पूर्वीचे प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम) यश मिळवले आहे. २० व्या शतकाच्या आरंभी मुंबईतील बोटावर मोजता येणार्‍या काही मान्यवर व्यक्तींनी विश्‍वस्त म्हणून चालू केलेले हे संग्रहालय शासनाच्या साहाय्याविना चालू आहे.
दैवी कण : सात्त्विक व्यक्ती, स्थान आदी ठिकाणी सोनेरी, रूपेरी आदी अनेक रंगांत दिसणार्‍या या कणांचे ‘भाभा अ‍ॅटोमिक रिसर्च सेंटर’मध्ये पृथक्करण करण्यात आले. आय.आय.टी. मुंबई येथे केलेल्या चाचणीनुसार या कणांमध्ये कार्बन, नायट्रोजन आणि ऑक्सिजन हे घटक असल्याचे सिद्ध झाले. या घटकांच्या मूलद्रव्यांच्या प्रमाणावरून शोधलेले त्यांचे ‘फॉर्म्युले’ सध्या अस्तित्वात असलेल्या कोणत्याही कणांच्या ‘फॉर्म्युल्या’शी मिळतीजुळती नाहीत. त्यामुळे हे कण नाविन्यपूर्ण आहेत, हे लक्षात येते. साधक या कणांना ‘दैवी कण’ असे संबोधतात.

भारतीय तत्त्वज्ञानाचे अद्वितीयत्व !

आज १७ नोव्हेंबर अर्थात् जागतिक तत्त्वज्ञान दिनाच्या निमित्ताने...
    नोव्हेंबर मासाच्या तिसर्‍या गुरुवारी जागतिक तत्त्वज्ञान दिन साजरा केला जातो. यावेळी १७ नोव्हेंबर या दिवशी हा दिन साजरा करण्यात येत आहे.
आजही विश्‍वातील अनेक देशांच्या (पौर्वात्य) न्यायव्यवस्थेचा आधार मनुस्मृतीच आहे. विश्‍वातील सर्वश्रेष्ठ आणि निर्दोष व्याकरण ग्रंथ अष्टाध्यायीचे लेखक भारतीय आहेत. संपूर्ण भारताला ख्रिस्ती करण्याच्या उद्देशाने वेदांचा अभ्यास करणारा जर्मन विद्वान मॅक्समुलरलाही जीवनाच्या अंतिम क्षणी असे म्हणणे भाग पडले की, मला जर विचारले की, मानवाने आपले मुख्य गुण आणि शक्ती यांचा विकास, तसेच जीवनाच्या महत्त्वाच्या समस्यांवर सखोल विचार करून समाधानकारक उत्तरे कोणत्या ठिकाणी शोधली, तर ती भारतामध्येच, असे मी सांगेन. प्लेटो (ग्रीक तत्त्वज्ञ) आणि इमॅन्यूएल कांट (जर्मन वैज्ञानिक आणि नीतीशास्त्रज्ञ) यांच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास करणार्‍या भारतियांनी या गोष्टीकडे लक्ष दिले पाहिजे.
- (गीता स्वाध्याय, जानेवारी २०११)

पाऊण घंट्यातही पूर्ण न होणारी सेवा कर्तेपणा अर्पण करून भावपूर्ण प्रार्थना केल्यानंतर दोन मिनिटांत पूर्ण होणे

श्री. योगेश व्हनमारे
१. पू. सौरभदादांच्या खोलीतील वातानुकूलन यंत्र (ए.सी.) दुरुस्त 
करतांना अडचण किरकोळ वाटणे; पण पाऊण घंट्यातही ती न सुटणे 
    ‘मी रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमातील पू. सौरभदादांच्या (सनातनचे पू. सौरभ जोशी यांच्या) खोलीतील वातानुकूलन यंत्र दुरुस्त करायला गेलो होतो. तेव्हा वातानुकूलन यंत्र पडताळल्यावर ‘अडचण अगदीच किरकोळ आहे आणि मी अनुभवाच्या आधारे ती त्वरित सोडवू शकतो’, असे मला वाटले. मी एका साधकासमवेत वातानुकूलन यंत्राच्या दुरुस्तीला आरंभ केला. अर्धा ते पाऊण घंटा झाला. आम्ही वेगवेगळे प्रयत्न केले, तरी अडचण समोर दिसत असूनही सुटत नव्हती.

महर्षींनी तमिळनाडूतील नामक्कल जिल्ह्यातील कोळ्ळीमलई पर्वतावर असलेल्या श्री अरप्पाळीश्‍वर मंदिराचे दर्शन घेण्यास सांगणे आणि हे स्थान म्हणजे गोरक्षनाथांचे आणि १८ सिद्धांचे स्थान असणे

सद्गुरु (सौ.) अंजली
गाडगीळ
      ‘१८.६.२०१६ या दिवशी महर्षींनी तमिळनाडूतील चेन्नई येथे झालेल्या ८५ व्या नाडीवाचनात सांगितल्याप्रमाणे आम्ही ३०.६.२०१६ या दिवशी श्री अरप्पाळीश्‍वर देवाची पूजा, तसेच त्या मंदिरातच असलेल्या देवी नाथम्माळ (अरप्पाळनायकी) हिला ‘ललितासहस्रनाम मंत्रपठणात कुंकूमार्चन केले. सनातनवरील संकटे दूर व्हावीत आणि हिंदु राष्ट्राच्या (सनातन धर्म राज्याच्या) स्थापनेतील अडथळे दूर व्हावेत, यांसाठी या पूजा करण्यात आल्या.
१. मंदिराचा इतिहास 
    श्री अरप्पाळीश्‍वर मंदिर हे तमिळनाडूतील नामक्कल जिल्ह्यातील कोळ्ळीमलई पर्वतावर आहे. हा पर्वत साडेचार सहस्र फूट उंच आहे. हे प्राचीन मंदिर असून पूर्वी या मंदिराचे नाव चटूरगिरी होते. नाथ संप्रदायातील प्रमुख गोरक्षनाथ येथे वास्तव्यास होते. याची साक्ष देणारी गोरक्ष गुंफा येथे आहे. ‘या पर्वतावर अजूनही १८ सिद्ध रहातात आणि ते ज्योतीच्या रूपाने दर्शन देतात’, असे मानले जाते. या पर्वतावर २५०० वर्षांपूर्वीपासून केरळ प्रांतातील लोक रहायला आले आणि ते शेती करत होते. एके दिवशी एका शेतकर्‍याच्या नांगराला एक स्वयंभू लिंग लागले आणि त्या लिंगातून रक्त येऊ लागले. सर्व शेतकरी घाबरले आणि ते गोरक्षनाथांकडे गेले. नाथ म्हणाले, ‘काही काळजी करू नका. येथे लिंगाची स्थापना करूया आणि प्रतिदिन पूजा करूया.’ पुढे कालांतराने या शिवाचे ‘अरप्पाळीश्‍वर’ हे नाव प्रसिद्ध झाले. या नावाची फोड अशी आहे.
      अर + प्पाळी + ईश्‍वर (म्हणजेच धर्म(रक्षण) + अधर्मनाश करणारा देव) = अरप्पाळीश्‍वर

इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनचे संस्थापक आणि हिंदुद्वेष्टे डॉ. झाकीर नाईक यांची राष्ट्र अन् धर्मद्रोही पार्श्‍वभूमी !

आतंकवादाला खतपाणी घालण्याचा आरोप असलेल्या डॉ. झाकीर नाईक यांच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन या संस्थेवर केंद्रशासनाने ५ वर्षांची बंदी घातली आहे. अनेक जिहाद्यांनी नाईक यांच्याकडून प्रेरणा घेऊन आतंकवादी कारवाया केल्याचे समोर आले आहे. नाईक यांनी जिहादचा पुरस्कार करण्यासमवेतच अनेक वेळा हिंदु धर्माच्या विरोधात धादांत खोटी आणि निराधार विधाने करून कोट्यवधी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेेत. तसेच अनेक वादग्रस्त विधानांसाठी ते कुप्रसिद्ध आहेत. त्याचा वेध घेणारा हा लेख !
डॉ. झाकीर नाईक अशा मुसलमान धर्मगुरूंधील एक आहेत, ज्यांचा प्रभाव नवीन पिढीतील मुसलमान युवकांवर स्पष्टपणे दिसून येतो. वर्ष १९६५ मध्ये मुंबई येथे जन्मलेले डॉ. झाकीर नाईक स्वत: एमबीबीएस् डॉक्टर असल्याचे सांगतात. प्रत्येक प्रश्‍नाच्या उत्तरामध्ये धार्मिक पुस्तकांचा संदर्भ देत (कथित) वैधता प्रदान करून दिशाभूल करण्याच्या कौशल्यामुळे त्यांना इतर धर्मगुरूंपेक्षा वेगळे स्थान आहे.

प.पू. गुरुमाऊलींच्या अमृत महोत्सव वर्षारंभदिनी साधकाने त्यांच्या चरणी वाहिलेली भावसुमनांजली !

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...
परात्पर गुरु
डॉ. जयंत आठवले
प.पू. गुरुमाऊली, 
     तुझ्या चरणी शिरसाष्टांग नमस्कार
आज मला पहाटे २.४५ वाजता जाग आली आणि तुझ्या आठवणीने कंठ दाटून भावजागृती झाली. एक कविता तू लिहून घेतलीस. ती अशी आहे. या वेळी ‘श्रीश्रीजयंत बाळाजी आठवले, जय गुरुदेव ।’ हा नामजप सतत होत होता.
चैतन्याची माऊली ।
चैतन्याची माऊली चैतन्यच प्रसवणार । 
चैतन्याच्या पोटी चैतन्यच जन्मणार ॥ १ ॥

चैतन्याच्या खाणीत चैतन्यच मिळणार ।
श्री. श्रीरामप्रसाद कुष्टे
चैतन्य आनंदच पसरवणार,
तेथे दुःखाला थारा कसा मिळणार ? ॥ २ ॥

चैतन्य प्रकाशच देणार, तेथे अंधार कसा असणार ? ।
म्हणूनी आम्ही सारे आनंदी, एकमेकांना आनंदच देणार ॥ ३ ॥

आनंदाच्या डोहात सर्वच बुडणार, आनंदात न्हाऊन जाणार ।
एकूणच काय, आपण सतत चैतन्यात अन् आनंदात रहाणार ।
आणि एक दिवस चैतन्यात विलीन होणार, म्हणजे मोक्षास जाणार ॥ ४ ॥’
- श्री. श्रीरामप्रसाद कुष्टे, ढवळी, फोंडा, गोवा. (२९.५.२०१६)

६१ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. ऐश्‍वर्या जोशी (वय १२ वर्षे) हिने तिच्या वाढदिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना पाठवलेले नमस्काररूपी पत्र


मुकांबिकादेवीची पूजा करत असतांना केलेले सूक्ष्म-परीक्षण

श्री. राम होनप
    १७.३.२०१६ या दिवशी संध्याकाळी ६.३० ते ७ या वेळेत पू. (सौ.) गाडगीळकाकूंनी देवीची पूजा केली. या वेळी श्री. राम होनप यांनी केलेले परीक्षण येथे देत आहोत.
सायं ६.३२ : ‘पू. (सौ.) गाडगीळकाकू काहीतरी बोलत असल्याचा आवाज आला. हिरवी साडी नेसलेली देवीची मूर्ती दिसली. तेव्हा ‘हीच ती मुकांबिकादेवी असावी’, असा विचार मनात आला.
सायं ६.३३ : देवीची मूर्ती कंप पावून जागृत होत असल्याचे दृश्य दिसले.
सायं ६.३४ : काही क्षण माझ्याकडून आपोआप मुकांबिकादेवीचा जप होऊ लागला.

अंगणामध्ये चहा पीत असतांना गरुड उडत येऊन जवळ बसणे, बालसाधक ओमकडे पाहून झाल्यावर उडून जाणे आणि ‘ईश्‍वर सर्व साधकांची काळजी घेतो’, या आशयाचा महर्षींचा संदेश आठवून कृतज्ञता वाटणे

     ‘एकदा सायंकाळी मी आणि माझे पती आमच्या घरातील अंगणात चहा पीत बसलो होतो. त्या वेळी आकाशातून अकस्मात एक गरुड (अमेरिकेतील गरुड) उडत आला आणि अंगणात बसून न घाबरता आमच्याकडे पाहू लागला. गरुडाने इतक्या जवळ बसणे, हे क्वचितच घडू शकत असल्याने आम्हाला त्याचे पुष्कळ आश्‍चर्य वाटले. एरव्ही प्राणीसंग्राहलयातील पिंजर्‍यातही एवढ्या जवळून गरुडाला पाहू शकत नाही.

इतरांना साहाय्य करणार्‍या आणि गुरूंवर दृढ श्रद्धा असणार्‍या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. मनीषा गाडगीळ !

सौ. मनीषा गाडगीळ
     सौ. मनीषा गाडगीळ यांची त्यांच्या विहीण सौ. रोहिणी ताम्हनकर यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे देत आहोत.
१. मनमोकळेपणा
      सौ. मनीषाकाकूंची आणि आमची ओळख माझी मुलगी सौ. तनुजा अन् त्यांचा मुलगा श्री. निनाद गाडगीळ यांच्या विवाहाच्या निमित्ताने झाली. विवाह ठरल्यानंतर त्यासाठीचा व्यय, दागिने आणि अन्य सर्व खरेदी त्या अन् मी एकमेकींना विचारूनच करत होतो. त्या वेळी त्यांच्याशी बोलतांना परकेपणा जाणवत नव्हता. ‘आमची पूर्वीपासूनची ओळख आहे’, असेच जाणवत होते. ‘मनमोकळेपणा’ या त्यांच्यातील गुणामुळे एकाच वस्तूची खरेदी दोघांनी केली, असे झाले नाही. त्यामुळे एकाच वस्तूसाठी दोघांचा होणारा अनावश्यक व्यय वाचला.

स्वभावदोष आणि अहं यांतील चिवटपणा घालवण्यासाठी चिकाटीने प्रयत्न करणे आवश्यक !

सौ. सुलभा कुलकर्णी
     ‘१७.६.२०१६ या दिवशी दैनिक सनातन प्रभातमधील ‘रामनाथी आश्रम या तीर्थक्षेत्री स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रियेत न्हाऊन निघाल्याने खर्‍या अर्थाने पवित्र झाल्याची घेतलेली अनुभूती’ हा कु. कविता कुलकर्णी हिने लिहिलेला लेख वाचला. त्यानंतर झालेली विचारप्रक्रिया पुढे देत आहे.
१. स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रियेत
साधकांची चिकाटी अल्प पडत असल्याचे जाणवणे
    लेखातील सूत्रांच्या विचारांत असतांना मी पूजेची सिद्धता करू लागले. देवघरातील निरांजन घासायचे असल्याने मी दुसर्‍या समईत तेल घातले; पण त्यातील वात पेटेना. ती पेटायची; पण लगेच विझायची. त्या वेळी माझ्या मनामध्ये विचारचक्र चालू होते की, बरेच साधक (मीसुद्धा) गेली कित्येक वर्षे साधनेत आहेत; मात्र त्यांची प्रगती झाल्याचे दिसत नाही. कित्येक साधक स्वभावदोष निर्मूलन आणि गुणसंवर्धन ही प्रक्रिया राबवत आहेत; पण ते साधनेतील आनंद अनुभवू शकत नाहीत; कारण त्यांच्यामधे चिकाटी अल्प पडते. माणसातील अहं त्याला घेऊनच जातो. जशी कांद्याची टरफले काढत गेल्यास आत आत असतातच तशी.

आध्यात्मिक त्रास नव्हे, उन्नतीची संधी !

श्री. यज्ञेश सावंत
‘     आपत्कालाची तीव्रता जशी वाढते आहे, त्यानुसार साधकांना होणार्‍या आध्यात्मिक त्रासांचे प्रमाणही वाढत आहे. आध्यात्मिक त्रासांमुळे अनावश्यक विचारांचे प्रमाण वाढणे, प्राणशक्ती उणावणे, आत्मविश्‍वास अल्प झाल्यासारखे होणे किंवा ‘दायित्व घेऊ नये’, असे वाटणे, सेवा करतांना निरुत्साह वाटणे, अशी विविध लक्षणे आणि परिणाम दिसून येत आहेत. त्यामुळे काही साधकांना निराशाही येते; मात्र याच आध्यात्मिक त्रासांकडे आपण संधी म्हणून पाहिल्यास देवाच्या कृपेसाठी आपण पात्र होऊ, हेही तितकेच खरे ! याविषयी येथे काही सूत्रे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

व्यष्टी साधनेचा आढावा घेतांना सौ. सुप्रिया माथूर यांनी साधना, स्वभावदोष आणि अहं यांविषयी केलेले मार्गदर्शन अन् आलेली अनुभूती

सौ. सुप्रिया माथूर
१. साधना
अ. ‘इतरांच्या दोषांचा परिणाम आपल्या मनावर होत असेल, तर आपली साधना होत नाही.
आ. आपण अनेक कृती बुद्धीने करत असल्यामुळे त्या मनापासून होत नाहीत; म्हणून त्यात सातत्य रहात नाही.
इ. चूक झाल्यावर प्रायश्‍चित्त न घेतल्यामुळे आपली साधना अल्प होते. याचा विचार आपण केला पाहिजे.
ई. मनाप्रमाणे करण्याची सवय लागल्यावर प्रत्येक कृती करतांना संघर्ष होतो.

इतरांना प्रेमाने, चिकाटीने आणि निरपेक्षभावाने साधना सांगून त्या करवून घेणार्‍या सौ. मनीषा गाडगीळ !

     ‘सौ. मनीषा गाडगीळ यांची ६१ प्रतिशत पातळी घोषित झाल्यावर मला पुष्कळ आनंद झाला. सौ. गाडगीळ यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे येथे देत आहे.
१. इतरांना चिकाटीने साधना सांगणे
     सौ. गाडगीळवहिनींमुळे आमचे कुटुंब सनातन संस्थेच्या संपर्कात आले. त्या आम्हाला कुलदेवतेचा आणि ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हे जप का करायचे ? याची कारणे सांगायच्या. त्या वेळी आम्ही दोघी साधना आणि नामजप या विषयांवर बोलत असू. तेव्हा आमचे एकत्र कुटुंब होते. आमचा खाद्यपदार्थांचा व्यवसाय असल्यामुळे मला फार वेळ त्यांच्याशी बोलता यायचे नाही. त्या वेळी त्या अंधेरीला आणि आम्ही विरारला रहात होतो. त्या वेळी त्या जे काही साधनेसंदर्भात सांगायच्या, ते माझ्या यजमानांना आवडायचे नाही. तेव्हा त्या ‘श्री. शहाणे घरात आहेत का ?’, हे विचारून घरी यायच्या. त्या आमच्याकडे येण्याने घरातील सर्व नाराज असले, तरी त्या कधी रागावल्या नाहीत किंवा निराश झाल्या नाहीत. त्या नेहमीच प्रेमाने साधनेविषयी बोलत असत.

श्रीकृष्ण आणि प.पू. डॉक्टर यांच्यावर अपार श्रद्धा असणारी ५५ टक्के आध्यात्मिक पातळीची अन् उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली विर्नोेडा, पेडणे, गोवा येथील चि. गार्गी अंकुश परब (वय ५ वर्षे) !

उच्चलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र 
चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. गार्गी अंकुश परब एक दैवी बालक आहे !
चि. गार्गी परब
पालकांनो, हे लक्षात घ्या ! 
     ‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ - (परात्पर गुरु) डॉ. आठवले 
१. गर्भारपण
१ अ. हिंदु धर्मजागृती सभेची आणि गुरुपौर्णिमेची प्रसारसेवा नियमित करूनही त्रास न होणे अन् गर्भातील बाळामुळे नंतर तीव्र पोटदुखीची जुनी व्याधी न्यून होणे : ‘मडगाव येथे हिंदु धर्मजागृती सभेच्या कालावधीत सौ. स्वप्ना गरोदर होती, तरीही साधकांसह घरोघरी जाऊन प्रसार करत होती. ती बाळ्ळी या गावाहून मडगावला सेवेला जायची. प्रसार करतांना इमारतीतल्या जिन्याच्या पायर्‍या चढाव्या लागायच्या; पण तिला त्याचा कोणताही त्रास झाला नाही. नंतर तिने गुरुपौर्णिमेच्या प्रसाराची सेवाही केली. सौ. स्वप्नाला ८ वर्षे पोटदुखीचा तीव्र त्रास होता. बाळ पोटात असतांना तिसर्‍या मासात तिला होत असलेला पोटदुखीचा त्रास अल्प झाला आणि बाळाच्या (गार्गीच्या) जन्मानंतर तो पुष्कळ न्यून झाला.

हिंदूंनी ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री नववर्ष साजरे करू नये, याविषयी प्रबोधन करणारे हस्तपत्रक, भित्तीपत्रक, होर्डिंग आणि हातात धरायचे फलक उपलब्ध !

     हिंदूंनी पाश्‍चात्त्य प्रथेप्रमाणे ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री नववर्ष साजरे न करता, हिंदु संस्कृतीप्रमाणे गुढीपाडव्यालाच नववर्ष साजरे करावे, याविषयी प्रबोधन करणारे खालील प्रसारसाहित्य नेहमीच्या संगणकीय ठिकाणावर उपलब्ध आहे.
१. ‘ए ५’ (पाठपोट) आकारातील प्रबोधनपर हस्तपत्रक
२. ‘ए २’ आकारातील भित्तीपत्रक (याची कलाकृती खाली दिली आहे. ती पाहून नेहमीच्या पद्धतीप्रमाणे दायित्व असणार्‍या साधकांना भित्तीपत्रकाची मागणी नोंदवता येईल.)
३. गर्दीच्या ठिकाणी लावण्यासाठी १० फूट x ८ आणि १० x १२ फूट आकारातील होर्डिंग
४. हातात धरायाचे ‘ए २’ आकारातील फलक
टीप : वरील प्रसारसाहित्यासाठी प्रायोजक मिळवून त्याचा सुयोग्य ठिकाणी वापर करावा.

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
माया आणि परमेश्‍वर
अ. परमेश्‍वराची माया समजून घेऊन आहे तिथेच समाधानाने रहावे.
भावार्थ : ‘माया समजून घेऊन’ म्हणजे मायेतील ब्रह्म समजून घेऊन. ते झाले की समाधान, आनंदच आहे.
आ. परमेश्‍वर पहाण्यापेक्षा परमेश्‍वराच्या रचनेची जाणीव करून घेणे, हेच खरे ज्ञान.
भावार्थ : परमेश्‍वराची रचना म्हणजे माया. तिची खरी जाणीव, ओळख करून घेणे, म्हणजेच मायेतील ब्रह्म ओळखणे. हेच खरे ज्ञान.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन ‘संत भक्तराज महाराज यांची शिकवण.’)


परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
शालेय शिक्षणाची व्यर्थता !
    ‘शाळेत गणित, भूगोल, अर्थशास्त्र इत्यादी अनेक विषय शिकवतात. त्यांपैकी किती विषयांचा जीवनात १ टक्का तरी लाभ होतो ? असे आहे, तर विद्यार्थ्यांचा वेळ ते विषय शिकवण्याऐवजी समाजप्रेम, राष्ट्रप्रेम, धर्मप्रेम, अध्यात्मशास्त्र, साधना यांसारखे विषय शिकवण्यासाठी का वापरत नाही ? हिंदु राष्ट्रात असे सर्व विषय शिकवले जातील.’ - (परात्पर गुरु) डॉ. आठवले


॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. 
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

समष्टी साधनेतच प्रगती आहे !

प.पू. पांडे महाराज
       ‘संत नामदेव महाराज देवाशी बोलत असूनही कच्चे मडके ठरवले गेले; मात्र समष्टी साधनेत गेल्यावर ते पुढे गेले. प.पू. डॉक्टर यांचा प्रत्यक्ष सहवास मिळालेल्या काहींची अजून प्रगती झाली नाही, तर अनेकजण दूर राहूनही प्रगती करीत आहेत.’ - प.पू. परशराम पांडे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (५.१०.२०१४) 
कलियुगातील बहुसंख्य आई-वडिलांचा साधनेसंदर्भात दृष्टीकोन

१. ‘पूर्वी मुलाला साधना करू न देणार्‍या आई-वडिलांची थोडी उदाहरणे होती, उदा. प्रल्हाद. आता बहुसंख्य आई-वडील तमोगुणी वृत्तीचे असल्याने मुलाला साधना करण्यास विरोध करतात.
२. आम्ही स्वतः साधना करणार नाही आणि तुम्हालाही (मुलांनाही) साधना करू देणार नाही.
३. ‘साधना, साधना’ काय म्हणतोस ? देव तुला पोसणार आहे का ? त्याऐवजी शिक्षण घे, म्हणजे नोकरी मिळेल आणि तुझे जीवन सुखी होईल.’
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

खरा ज्ञानी 
खरा ज्ञानी निरिच्छ असतो. त्याने षड्रिपूही जिंकलेले असतात. 
त्याच्या प्रत्येक कृतीला कार्यकारणभाव असतो. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

बोधचित्र


‘निधर्मी’ प्रसारमाध्यमांचे सुतकी तोंडवळे !

संपादकीय
      आपण कुठलेही वर्तमानपत्र नीट पाहिले, तर त्याच्या अगदी वर ठळक अक्षरांत ते वर्तमानपत्र कशातरी ‘एकमेव’ तत्त्वाचे असल्याचे लिहिलेले असते. तथापि अनेक वर्तमानपत्रांच्या दृष्टीने हे केवळ लिहिण्यापुरते असते. जसे राजकारणी कधीही तत्त्वांना धरून चालत नाहीत, तसेच निधर्मी माध्यमेदेखील कधीही तत्त्वांना धरून लिहितात असे होत नाही किंबहुना त्यांना तत्त्वच आहेत कि नाही, अशी शंका उपस्थित होते. सध्या काही तुरळक माध्यमांचा अपवाद वगळता बहुतांश वर्तमानपत्रे वा वृत्तवाहिन्या हिंदुद्वेष प्रकट करत असतात किंबहुना ती चालू करण्यामागचे प्रयोजनच तसे असते. त्यामुळे हल्लीच्या वर्तमानपत्रांच्या वर जर त्यांना काही लिहायचेच असेल, तर त्यांनी ‘हिंदुद्वेष बागळण्यात एकमेव’, असे लिहिले पाहिजे. प्रसारमाध्यमांकडून जोपासल्या जाणार्‍या हिंदुद्वेषाचे ‘निधर्मी’ हे गोंडस नाव होय. अशा निधर्मी प्रसारमाध्यमांत कमालीची एकी पहावयास मिळते. तथापि त्यांचा खरा तोंडवळा अनेक प्रकरणांत समोर येत असतो. तो हिंदूंनी जाणून घेतला पाहिजे. त्यासाठी आपण आपले निरीक्षण वाढवायला हवे. आताही राष्ट्रद्रोही आणि धर्मद्रोही डॉ. झाकीर नाईक यांच्या ‘इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन’वर ५ वर्षांसाठी बंदी घातल्याच्या घटनेनंतर प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तांचे प्रत्येक हिंदूने निरीक्षण केले पाहिजे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn