Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

नोटा रहित करण्याच्या विरोधात जनतेला भडकवले जात आहे ! - पंतप्रधान मोदी यांचा आरोप

     गाझीपूर (उत्तरप्रदेश) - माझ्या निर्णयाचे स्वागत करणारे अनेक जण मागून लोकांना भडकवण्याचे काम करत आहेत. आक्रमण करण्यासाठी चिथावणी देत आहेत, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे केला. अनेक जण कोणाला कळणार नाही, अशा तर्‍हेने जमवलेला काळा पैसा कचरापेट्यांमध्ये टाकत आहेत. गंगा नदीत नोटा फेकत आहेत. गंगेत फेकल्याने पापे धुवून निघणार नाहीत. नोटा फेकणारे सीसीटीव्हीत पकडले गेले, तर त्यांना हिशोब द्यावाच लागेल, अशी चेतावणीही त्यांनी दिली. येथे रेल्वे प्रकल्पाच्या उद्घाटनाच्या वेळी नरेंद्र मोदी बोलत होते. या वेळी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू आणि राज्यपाल राम नाईक उपस्थित होते.
मोदी म्हणाले,
१. ज्यांच्याकडे बेहिशोबी रुपये आहेत, ज्यांनी पलंगाखाली पैसे लपवलेत त्यांना सोडण्यात येणार नाही.
२. ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद करून मी तुमचेच काम करत आहे. हा निर्णय गरीब, शेतकरी, गाव आणि देश यांच्या भल्यासाठीच घेण्यात आला आहे.
३. मी लहान असतांना फलाटावर चहा विकायचो. तेव्हा लोक मला ‘चहा जरा कडकच बनवा’, असे सांगायचे. लोकांना कडक चहाच पसंत असतो, म्हणून नोटा रहित करण्याचा माझा निर्णयही तसाच काहीसा आहे.
४. काँग्रेसने त्यांच्या कुवतीप्रमाणे चारआणे बंद केले. आम्ही ५००, १ सहस्रच्या नोटा बंद केल्या.

रेल्वेस्थानकांच्या भिंतींवर रामायणातील प्रसंग आणि अकबरचा ‘पराक्रम’ असणारे चित्र लावण्यात येणार !

रेल्वे मंत्रालयाला पराक्रमी राजाच हवा होता, तर क्रूरकर्मा अकबरहून पराक्रमी कोणी
दिसलेच नाही कसे ? मंत्रालयात कोणी इतिहासाचा अभ्यास असलेले अधिकारी नाहीत
का ? अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन करण्याची काँग्रेसी पद्धत पुढे चालू ? हिंदु राष्ट्रात
असे अयोग्य निर्णय घेणारे प्रशासकीय अधिकारी नसतील !
     नवी देहली - देशातील विविध रेल्वेस्थानकांच्या भिंतींवर रामायणातील प्रसंग आणि मोगल बादशहा अकबर याच्या कथित पराक्रमाचे प्रसंग यांची चित्रे लावण्यात येणार आहेत. रेल्वे प्रशासनाने देशातील ४०० हून अधिक रेल्वेस्थानकांच्या आधुनिकीकरणाची योजना आखली आहे. यात स्थानकांचे सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. त्यातच भारताच्या विविधतापूर्ण सांस्कृतिक वारशाचे प्रदर्शन केले जाणार आहे. यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीकडून विविध प्रस्तावांवर विचार केला जाणार आहे. यासाठी पहिल्यांदा २८ रेल्वेस्थानकांची निवड करण्यात आली आहे. यात प्रयाग, कानपूर, कामाख्या, मुंबई, बेंगळुरू, चेन्नई आदी शहरांचा समावेश आहे. येथील स्थानकांना विकसित करणारी आस्थापने १५ वर्षे याची देखभाल करणार आहेत. याच्या बदल्यात या आस्थापनांना व्यावसायिक हेतूने काही अधिकार देण्यात येणार आहेत.

जुन्या नोटा २४ नोव्हेंबरपर्यंत चालणार !

     नवी देहली - केंद्र सरकारने सरकारी रुग्णालये, पेट्रोलपंप, रेल्वे, विमानतळ, दूधकेंद्र, औषधांची दुकाने यांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या जुन्या नोटा स्वीकारण्याची मुदत वाढवली आहे. आता येत्या २४ नोव्हेंबरपर्यंत या जुन्या नोटा स्वीकारल्या जातील. टोलनाक्यावरील वसुलीसंदर्भातील पुढील निर्णय रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाकडून घेण्यात येणार आहे.
     निवृत्तीवेतनधारकांना वार्षिक हयातीचा दाखला सादर करण्याची मुदत १५ जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे.
     लवकरच एटीएम्मधून ५०० आणि २ सहस्र रुपयांच्या नव्या नोटा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
नोटा बँकांपर्यंत पोचवण्यासाठी वायूदलाचे साहाय्य !
      केंद्र सरकारकडून नवीन नोटा बँकांपर्यंत पोचवण्यासाठी भारतीय वायूदलाचे साहाय्य घेण्यात येत आहे. सध्या नाशिकच्या सिक्युरिटी प्रेसमध्ये युद्धपातळीवर नोटांची छपाई चालू करण्यात आली आहे. येथे ५०० रुपयांच्या नोटेसोबतच १००, ५० आणि २० रुपयांच्या नोटांची छपाई चालू आहे. आठवडाभरात नोटांचा पुरवठा वाढवण्याची सरकारची योजना आहे. या नोटा तितक्याच वेगाने बँका आणि एटीएम् केंद्रांपर्यंत पोचवण्याची आवश्यकता असल्याने रिझर्व्ह बँकेला वायूदलाकडून साहाय्य करण्यात येत आहे. वायूदलाचे ग्लोबमास्टर विमान आणि हेलिकॉप्टर्स नोटांच्या वाहतुकीसाठी वापरले जात आहे.

हिंदूंनो, आपल्यासमोर गांधी, नेहरू व सर्वपक्षीय राजकारणी यांचा आदर्श नको, तर धर्म आणि राष्ट्र यांसाठी त्याग केलेले छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, छत्रपती संभाजी महाराज, गुरु गोविंद सिंग, स्वातंत्र्यवीर सावरकर इत्यादी धर्माभिमान्यांचा आदर्श ठेवा !भारताच्या गोळीबारात पाकचे ७ सैनिक ठार !

     नवी देहली - भारतीय सैन्याने पाकमधील भिमबेर चौकीवर केलेल्या गोळीबारात ७ सैनिक ठार झाल्याची माहिती स्वतः पाक सैन्याने दिली आहे. १३ नोव्हेंबरच्या मध्यरात्री भारतीय सैन्याने गोळीबार केला होता, अशी माहिती पाकने दिली आहे. पाकच्या सैनिकांनीही भारताला प्रत्युत्तर दिले असून भारतीय सैन्याचीही यात हानी झाल्याचे पाकने म्हटले आहे; पण भारतीय सैन्याने जीवितहानी किंवा वित्तहानी झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही.

३० लाख अवैध स्थलांतरितांना अमेरिकेतून हद्दपार करणार ! - डोनाल्ड ट्रम्प यांची चेतावणी

     वॉशिंग्टन - अमेरिकेतील अवैधरित्या स्थलांतरित झालेल्या ३० लाख लोकांना देशातून बाहेर काढण्यात येणार किंवा त्यांना कारागृहात तरी डांबीन, असे प्रतिपादन अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वृत्तवाहिनीवरील एका मुलाखतीत केले आहे. निवडणुकीत त्यांनी असे आश्‍वासन दिले होते. त्याचीच ते पूर्ती करणार आहेत. अमेरिकेत १ कोटी १० लाख स्थलांतरित असून त्यात भारतियांचाही समावेश आहे.
     या स्थलांतरितांमध्ये अनेक जण गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून त्यात गुन्हेगारी टोळीचे सदस्य, अमली पदार्थाचा धंदा करणारे यांचाच अधिक भरणा आहे. या सर्वांना बाहेर घालवून देशाच्या सीमारेषा सक्षम करण्याचा माझा हेतू आहे आणि त्यासाठी माझे प्रशासन नक्कीच प्रयत्न करील, असेही ट्रम्प म्हणाले.
ट्रम्प वर्षाला केवळ एक डॉलर मानधन घेणार
     डोनाल्ड ट्रम्प यांनी आपण राष्ट्राध्यक्ष म्हणून वर्षाला केवळ एका डॉलरचे (६७ रुपये) मानधन घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच राष्ट्राध्यक्षपदाच्या कार्यकाळात आपण एकही सुट्टी घेणार नसल्याचेही ट्रम्प यांनी घोषित केले आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला वर्षाकाठी ४ लाख डॉलर्स (२ कोटी ७० लाख) इतके मानधन मिळते. निवडणुकीपूर्वीही त्यांनी अशा प्रकारचे आश्‍वासन दिले होते.
ट्रम्प यांच्या विरोधात आंदोलन चालूच
     डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या अध्यक्षपदी निवडून आले असले, तरी त्यांच्याविरोधात चालू असलेले आंदोलन अद्यापही चालूच आहे.

विदिशा (मध्यप्रदेश) येथे बजरंग दलाच्या नेत्याच्या हत्येनंतर हिंसाचार !

भाजपशासित राज्यांत हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या होणे हे हिंदूंसाठी लज्जास्पद !
      विदिशा (मध्यप्रदेश) - विदिशा जिल्ह्यातील बक्सरिया येथे १२ नोव्हेंबरला दुपारी अज्ञातांकडून दीपक कुशवाह या बजरंग दलाच्या नेत्याची चाकूद्वारे भोसकून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर येथे हिंसाचार झाला. जमावाने येथील अनेक दुकाने, घरे यांना आग लावली. तसेच दगडफेक केली. यात काही पोलीस घायाळ झाले. यामुळे पोलिसांनी येथे संचारबंदी लागू केली आहे. हिंसाचारापूर्वी बजरंग दल आणि विश्‍व हिंदु परिषद यांच्या कार्यकर्त्यांनी येथे निदर्शने केली. पोलिसांनी हिंसाचाराच्या प्रकरणी १३ जणांना अटक केली आहे. जिल्हाधिकारी अनिल सुचारी यांनी सांगितले की, येथील स्थिती सध्या सामान्य आहे. विदिशा येथून परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज खासदार म्हणून निवडून आल्या आहेत.

सौदी अरेबियामध्ये अन्य धर्मियांच्या सुट्ट्यांवर बंदी !

      रियाध - सौदी अरेबियातील आंतरराष्ट्रीय शाळांमधील नाताळ आणि नववर्ष या वेळी देण्यात येणार्‍या सुट्ट्यांवर बंदी घालण्यात आली आहे. सौदीच्या शिक्षण खात्याने हा आदेश दिला आहे. या नियमाचा भंग करणार्‍यांवर कारवाई करण्याचीही चेतावणी देण्यात आली आहे. (इस्लामी देशांचा आतंकवाद ! भारतातील पुरोगामी आणि निधर्मीवादी अशा इस्लामी देशांच्या विरोधात कधी तोंड उघडत नाहीत ! - संपादक)इस्रायल मशिदींवरील भोंग्यांचा आवाज न्यून करणार !

भारत सरकारने इस्रायलकडून हा गुण घेऊन जनतेच्या झोपेची आणि
आरोग्याची काळजी घ्यावी, तसेच ध्वनीप्रदूषणावर नियंत्रण आणावे !
     जेरुसेलम - इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या मंत्रीमंडळाने धार्मिक किंवा सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये आवाजाची अधिकाअधिक मर्यादा निश्‍चित करणार्‍या विधेयकाला संमती दिली आहे. या विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाल्यास इस्रायलमधील मशिदींच्या भोंग्यांचा आवाज एकदम न्यून होणार आहे. इस्रायल सरकार जाहीरपणे बोलतांना कायदा सगळ्यांसाठी आहे, असा दावा करत असले, तरी हा कायदा प्रामुख्याने मशिदींच्या भोग्यांचा आवाज न्यून करण्यासाठीच असल्याचे सूत्रांकडून समजते. इस्रायलमध्ये १७.५ टक्के अरबी लोक रहातात. यातील बहुतांश मुसलमान आहेत.
     जगभरातील अनेक धार्मिक संस्था कमी-अधिक प्रमाणात भोंग्यांचा वापर करतात. मात्र मशिदींमध्ये भोग्यांच्या वापराचे प्रमाण सर्वांत अधिक असते. नमाज पठणाच्या वेळी मशिदींमध्ये मोठ्या आवाजात पठण केले जाते.

श्रीक्षेत्र चाफळ येथे समर्थ रामदासस्वामी यांनी स्थापन केलेल्या सुप्रसिद्ध वीर मारुति मंदिरातील दानपेटी चोरांनी फोडली !

असुरक्षित मंदिरे ! मंदिरांच्या रक्षणासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना अपरिहार्य आहे !
     सातारा - समर्थ रामदासस्वामी यांनी स्थापन केलेल्या ११ मारुतींपैकी एक असणारा श्रीक्षेत्र चाफळ येथील वीर मारुति होय. श्रीराम मंदिराच्या मागील बाजूस वीर मारुतिचे मंदिर आहे. मंदिराच्या गाभार्‍यातील लोखंडी दानपेटीचे कुलूप तोडून पेटीतील पैसे अज्ञात चोरांनी चोरून नेल्याची घटना १२ नोव्हेंबरच्या मध्यरात्री घडली. यापूर्वीही मंदिरातील लाकडी दानपेटी फोडून चोरीचा प्रकार घडला होता. त्यामुळे देवस्थानने या ठिकाणी मजबूत लोखंडी दानपेटी ठेवली होती.


शिया धर्मगुरु मौलाना कल्बे जव्वाद यांच्यावर अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप !

हिंदूंच्या संतांवर खोटे आरोप केल्यानंतरही त्यावरून त्यांची अपकीर्ती करणारी प्रसारमाध्यमे
मौलाना किंवा पाद्री यांच्यावरील आरोपांवर मात्र सोयीस्कररित्या मौन बाळगतात !
     लक्ष्मणपुरी - शिया धर्मगुरु मौलाना कल्बे जव्वाद यांच्यावर एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पीडित मुलीच्या वडिलांनी सांगितले की, त्यांच्या मुलीवर बलात्कार करण्यात आल्याचा आरोप केला आहे. हे प्रकरण दीड वर्षांपूर्वीचे आहे; मात्र आता मी गप्प बसणार नाही, असे पीडित मुलीच्या वडिलांनी म्हटले आहे. या प्रकरणी पोलीस काहीही बोलण्यास नकार देत आहेत. (अशा पोलिसांना वेतन देऊन पोसायचे तरी कशाला ? या ठिकाणी हिंदूंचे संत असते, तर पोलिसांनी लगेच कारवाई केली असती ! - संपादक)     पीडित मुलीच्या वडिलांनी सांगितले की, ते त्यांच्या मुलीला घेऊन विशेष पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात गेले होते; मात्र पोलिसांनी समाधानकारक सहकार्य केले नाही. धर्मगुरूच्या विरोधात प्रकरण असल्याने पोलीस कारवाई करण्यापासून टाळाटाळ करत आहेत, असा आरोप अली यांनी केला आहे. तसेच ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले. धर्मगुरु आणि पीडित मुलगी यांच्यातील भ्रमणभाषवरील संभाषणाचे मुद्रण पोलिसांना देण्यात आल्याची माहिती अली यांनी दिली.

मुळा-मुठा शुद्धीकरणासाठीचा २६ कोटींचा निधी पडून

भोंगळ कारभार
     पुणे - मुळा-मुठा नद्यांच्या शुद्धीकरणासाठी सुमारे ९११ कोटी रुपयांची नदीसुधार योजना संमत करण्यात आली. या योजनेसाठी शासनाने २६ कोटींचा निधी राज्यशासनाकडे वर्ग केला असला, तरी लालफितीच्या कारभारामुळे अद्याप त्यातील एक दमडीही खर्च झालेली नाही. जपान इंटरनॅशनल को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या (जायका) माध्यमातून राबवल्या जाणार्‍या या प्रकल्पाला केंद्रसरकारने फेब्रुवारीमध्येच मान्यता दिली. त्यानंतर मे मासात (महिन्यात) या प्रकल्पाचे काम चालू करण्याची घोषणा करण्यात आली; मात्र अद्याप नदी शुद्धीकरणाचे काम चालू झालेले नाही. (२६ कोटींचा निधी विनावापर ठेवणार्‍या संबंधित दायित्वशून्य अधिकार्‍यांंवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. - संपादक)      महानगरपालिकेच्या माहितीनुसार फेब्रुवारी मासात ४.९९ कोटी आणि सप्टेंबर मासात २१ कोटींचा हिस्सा राज्यशासनाला पाठवण्यात आला. ही रक्कम मिळाल्यानंतर ती महानगरपालिकेला देण्यासाठी त्याच महिन्यात राज्याच्या अंदाजपत्रकात या प्रकल्पाचे ‘बजेट हेड’ उघडणे आवश्यक होते; मात्र ते उघडले नाही. पावसाळी अधिवेशनात पुरवणी अंदाजपत्रकातही ते उघडण्यात आले नाही. ‘बजेट हेड’ जरी उघडले, तरी त्याला मंत्रिमंडळाची मान्यता मिळणे आवश्यक आहे,

(म्हणे) ‘गोव्यातील महिलांना समान वागणूक द्या !’ - मुसलमान धर्मगुरूंचा सरकारला अनाहुत सल्ला

सरकारला सल्ला देणार्‍यांनी ते स्वतःच्या धर्मातील 
महिलांना किती समान वागणूक देतात, हे सांगावे !
     बेळगाव - केंद्रात आणि गोव्यात दोन्ही ठिकाणी भाजप सरकार आहे. जर सरकारला मुसलमान महिलांचा एवढाच कळवळा आला असेल, तर त्यांनी आधी गोव्यातील महिलांना समान वागणूक मिळण्याकडे लक्ष द्यावे, असा अनाहूत सल्ला मुसलमान धर्मगुरु हझरत सय्यद फझलुल्ला साबरी चिश्ती यांनी दिला आहे. केंद्र सरकारने शरीयत कायद्याला विरोध करणारे शपथपत्र सर्वोच्च न्यायालयात सादर केले आणि समान नागरी कायद्यावर जनमत अजमावण्याची मोहीम चालू केली. त्याविरुद्ध जनमत सिद्ध करण्यासाठी चालवलेल्या मोहिमेचा एक भाग म्हणून सय्यद फझलुल्ला हे एका पत्रकार परिषदेस संबोधित करत होते. या वेळी कर्नाटकाचे मुख्य काझी हझरत मौलाना असल मिस्बाही हेही उपस्थित होते.

कर चुकवणार्‍या आणि काळा पैसा असणार्‍या लोकांविरुद्ध ३० डिसेंबरनंतर कठोर पावले उचलली जातील ! - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नागरिकांना आवाहन

      बेळगाव, १३ नोव्हेंबर (वार्ता.) - भ्रष्टाचार ही देशातील मोठी समस्या आहे. कर चुकवणार्‍या आणि काळा पैसा असणार्‍या लोकांविरुद्ध ३० डिसेंबरनंतर कठोर पावले उचलली जातील, अशी चेतावणी पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी दिली. १३ नोव्हेंबर या दिवशी येथील ‘कर्नाटक लिंगायत एज्युकेशन केएल्ई सोसायटी’ने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. 
ते पुढे म्हणाले की, 
१. ८ नोव्हेंबरला रात्री गरीब शांतपणे झोपला होता, तर श्रीमंत झोपेच्या गोळ्या घेण्यासाठी बाजारात गेला; मात्र तेथे देणारे कोणी नव्हते.
२. मी आधीच सांगितले होते की, या कामासाठी ५० दिवस हवे आहेत. लोकांना विश्‍वासात घेऊन काम केले. 
३. २०२० मध्ये टोकियो येथे होणार्‍या ऑलिम्पिकमध्ये ‘लिंगायत एज्युकेशन सोसायटी’ने सुवर्णपदक मिळवावे, अशी अपेक्षा व्यक्त करतो. जगातील सर्वोत्तम १०० विद्यापिठांमध्ये भारतातील एकदेखील विद्यापीठ नाही, ही चिंताजनक गोष्ट आहे. येणार्‍या काळात या समस्येचे निराकरण करू. 
४. काँग्रेसने चार आणे बंद करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा आम्ही प्रश्‍न विचारले का ? मग ते आमच्या या निर्णयावर टीका का करत आहेत ? काँग्रेसचे धाडस केवळ चार आणे बंद करण्याइतकेच आहे.

डॉ. प्रवीण तोगाडिया यांच्यावर दक्षिण कन्नड (कर्नाटक) जिल्ह्यात प्रवेशबंदी !

    नवी देहली - विश्‍व हिंदु परिषदेचे आंतरराष्ट्रीय महासचिव प्रवीण तोगाडिया यांना कर्नाटकातील दक्षिण कन्नड जिल्ह्यात प्रवेश करण्यावर १२ नोव्हेंबरपर्यंत बंदी घालण्यात आली होती. तोगाडिया यांनी आक्षेपार्ह विधाने केल्यास येथे अनुचित प्रकार घडू नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून ही बंदी घालण्यात आली होती. जिल्ह्यातील बेलथांगडीच्या कोक्कड गांवातील एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ते जाणार होते. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यातही त्यांना या जिल्ह्यात प्रवेश करण्यावर बंदी घालण्यात आली होती.

नदीपात्र माझे घरच आहे, असा विचार केला, तर नद्या प्रदूषणमुक्त रहातील ! - प्रसिद्ध जलतज्ञ डॉ. दीमकराव मोरे

     पंढरपूर - पंढरपुरातील चंद्रभागेप्रमाणेच आपल्या गावाच्या शेजारून वाहणार्‍या नदी किंवा ओढ्याला चंद्रभागा मानावे. तेथे घाण टाकू नये. नदीपात्र हे माझे घरच आहे, असा विचार केला तर सर्वच नद्या प्रदूषणमुक्त आणि स्वच्छ रहाण्यास साहाय्य होईल, असे उद्गार सुप्रसिद्ध जलतज्ञ डॉ. दीमकराव मोरे यांनी काढले.
     एकादशीच्या पूर्वसंध्येला, विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एम्आयटी पुणे, भारत आणि श्रीक्षेत्र आळंदी-देहू-पंढरपूर परिसर विकास समितीच्या वतीने झालेल्या चंद्रभागेच्या आरतीच्या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी माईर्स एम्आयटीचे संस्थापक-अध्यक्ष आधुनिक वैद्य विश्‍वनाथ कराड उपस्थित होते.
     ते पुढे म्हणाले की, पूर्वीच्याकाळी मंदिरे आणि इमारतींचे बांधकाम त्यामध्ये आपला जीव ओतून काम केले जात होते. त्यामुळे त्या अजूनपर्यंत टिकून आहेत.
वारकर्‍यांचे वर्तन आदर्श हवे ! - ह.भ.प. अनिल पाटील महाराज
      सोलापूर - माळकरी ही परमार्थातील पहिली पायरी असून वारकरी हा त्या प्रवासातील मुक्काम आहे. माळकरी माळ बाहेरून घालतो, पण अंतःकरणाची शुद्धी केल्याशिवाय वारकरी होता येत नाही. वारकर्‍याचे वर्तन, त्याचे आचरण आदर्श असायला हवे, असे प्रतिपादन ह.भ.प. अनिल पाटील महाराज यांनी केले.

बारा वर्षांपूर्वी बांधलेले उद्यान अद्याप रस्त्याच्या प्रतिक्षेत !

     पुणे - पाषाण-सूस रस्त्यावरील रामनदीच्या पूलाजवळ असलेल्या कै. निवृत्ती विठ्ठल निम्हण उद्यानाचे उद्घाटन होऊन १२ वर्षे झाली, तरी अद्याप त्या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता बांधण्यात आलेला नाही. ३ एकर भूमीत असलेल्या या उद्यानामध्ये ‘जॉगिंग ट्रॅक’, तसेच कुस्तीकरता भव्य आखाडाही आहे. उद्यानात एक रखवालदार असून उद्यानाची निगा राखली जाते; मात्र रस्त्याच्या अभावी, तसेच उद्यानासंदर्भात कोणताही फलक लावलेला नसल्याने नागरिक त्या ठिकाणी फिरकत नाहीत. याच जोडीला पाषाण पंचवटी येथे असलेल्या उद्यानालाही अद्याप नाव देण्यात आले नाही. (पालिका-प्रशासनाचा भोंगळ कारभार ! उद्यानात जायला रस्ताच बांधायचा नसेल, तर लक्षावधी रुपये खर्च करून उद्यान उभे तरी कशाला केले ? हा नागरिकांच्या पैशांचा चुराडाच आहे. उद्यानाला नाव देण्यासारख्या छोट्या गोष्टीही लक्षात येत नसतील, तर प्रशासन नावाचा पांढरा हत्ती पोसायचा कशाला ? - संपादक)


सरकारने शेतकर्‍यांची फसवणूक केल्याने महसूलमंत्र्यांविरुद्ध हक्कभंग प्रस्ताव आणणार ! - विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील

     शिर्डी (जिल्हा नगर) - सरकारने शेतकर्‍यांची फसवणूक केल्याने महसूलमंत्र्यांविरुद्ध हक्कभंग प्रस्ताव आणणार आहे, असे प्रतिपादन विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले. (आघाडी सरकारच्या काळातही तत्कालीन महसूलमंत्र्यांनी शेतकर्‍यांच्या कुटुंबियांना अनेक आश्‍वासने देऊन फसवणूक केली होती. शेतकर्‍यांची खरोखरच चिंता असेल, तर राधाकृष्ण विखे पाटील त्याविषयी का बोलत नाहीत ? - संपादक)      ते पुढे म्हणाले की, अर्थसंकल्पीय अधिवेशनात तत्कालीन महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी सभागृहामध्ये आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबियांना सरकारच्या वतीने देण्यात येणार्‍या १ लक्ष रुपयांच्या साहाय्यता निधीमध्ये वाढ करून ५ लक्ष रुपये करण्याचे आश्‍वासन दिले होते. खडसे यांचे मंत्रीपद गेल्याने सध्या महसूल खाते चंद्रकांत पाटील यांच्याकडे आहे. पाटील यांनी त्या आश्‍वासनाची अंमलबजावणी केलेली नाही. त्यांनी सभागृह आणि जनता यांची दिशाभूल केली आहे.

विद्यार्थ्यांसोबतचे सेल्फी प्रकरण शिक्षकांच्या नोकरीवर बेतणार ?

     मुंबई - राज्याच्या शिक्षण विभागाने जानेवारी २०१७ पासून शिक्षकांना आठवड्याच्या प्रत्येक सोमवारी विद्यार्थ्यांसमवेत सेल्फी काढून तो ‘सरल’ या प्रणालीवर ‘अपलोड’ करण्याचे आदेश दिले आहेत. सेल्फीमध्ये मुले दिसली नाहीत, तर ती मुले पटावर नाहीत, असे समजले जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थीसंख्या घटणार असून शिक्षक अतिरिक्त ठरणार आहेत. त्यामुळे अतिरिक्त शिक्षकांची नोकरीही जाऊ शकते. ग्रामीण भागात माहितीजालाची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे केवळ छायाचित्र अपलोड करण्यासाठी शहराच्या ठिकाणी यावे लागणार असल्याची तक्रार शिक्षक करीत आहेत. या निर्णयाला शिक्षकांचा विरोध होत असून शिकवण्याचे काम करायचे कि ‘फोटोग्राफी’, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. (असे वरवरचे उपाय योजण्यापेक्षा सरकारने आनंददायी शिक्षणप्रणाली राबवून विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानग्रहण करण्याची गोडी निर्माण करावी. - संपादक)

दूरचित्रवाणी संचाच्या पडद्याचा (स्क्रीन) आकार मोजून घ्या ! - भारतीय ग्राहक मार्गदर्शक सोसायटी

     मुंबई - दूरचित्रवाणी संच खरेदी करतांना आस्थापनाच्या प्रत्यक्ष दाव्यापेक्षा पडद्याचा आकार अल्प आढळून आल्याने ग्राहकांनी दूरचित्रवाणी संचाची खरेदी करतांना संचाच्या पडद्याचा आकार मोजून घ्या, असे आवाहन ‘भारतीय ग्राहक मार्गदर्शक सोसायटी’ने (सीजीएस् आय) केले आहे. सोसायटीने केलेल्या पहाणीत सुमारे ५२.६३ टक्के दूरचित्रवाणी संचांचा पडदा दावा केल्यापेक्षा कमी असल्याचे आढळून आले. एका ग्राहकाच्या गार्‍हाण्यावरून ही पाहणी करण्यात आली होती. ग्राहकांना संचात काही भेद (तफावत) आढळून आल्यास mah.helpline@gmail.com या संगणकीय पत्त्यावर अथवा १८००-२२-२२६२ या क्रमांकावर तक्रार नोंदवावी असे आवाहन सोसायटीचे अध्यक्ष श्रीराम दीक्षित केले आहे.
श्री साई संस्थानच्या दानपेटीत गेल्या ३ दिवसांत १ कोटी ७ लक्ष रुपयांच्या जुन्या नोटा

     शिर्डी - श्री साई संस्थानच्या दानपेटीत गेल्या ३ दिवसांत १ कोटी ७ लक्ष रुपयांच्या ५०० आणि १ सहस्रच्या नोटा मिळाल्या आहेत. दुपटीने वाढलेले हे प्रमाण ३० डिसेंबरपर्यंत अधिक वाढू शकते.

सहा मासांत १०० हून अधिक पिस्तुले जप्त

ढासळलेली कायदा-सुव्यवस्था
     पुणे - राज्याच्या सीमाभागातून शस्त्रसाठ्यांची तस्करी वाढल्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर अवैध पिस्तुले आणि काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. या घोडेबाजाराला आळा घालण्यासाठी गुन्हे शाखा आणि पोलीस ठाण्याच्या पातळीवर विविध ठिकाणी सापळे लावून सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात येत आहे. गेल्या ६ मासांत (महिन्यांत) १०० पेक्षा अधिक पिस्तुले जप्त करण्यात आली आहेत. (म्हणजे जवळपास दर दोन दिवसांनी अवैध शस्त्रे जप्त केली जात आहेत. पोलिसांच्या जाळ्यात न सापडलेल्या गुन्हेगारांची संख्या तर अजून मोठी असेल. यावरून शहरात ढासळलेल्या कायदा-सुव्यवस्थेचा अंदाज येतो. - संपादक)

नियतीमुळेच आपल्या देशात अर्थक्रांतीला आरंभ झाला ! - अनिल बोकील, अर्थक्रांती प्रतिष्ठान

श्री. अनिल बोकील
     पुणे, १४ नोव्हेंबर ( वार्ता.) - ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या नोटा चलनातून काढून टाकण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय ऐतिहासिक जरी असला, तरी तो नियतीमुळेच घडला, असे मी मानतो. नियतीमुळेच आपल्या देशात अर्थक्रांती आरंभ झाली आहे. त्या नियतीचे मी कृतज्ञतापूर्वक आभार मानतो. (श्री. अनिल बोकील यांची संकल्पना केंद्र शासनाने स्वीकारून आज देशात खरोखरच एक क्रांतिकारी पाऊल उचलले गेले आहे. असे असूनही कर्तेपणाची कोणतीही भावना नसणार्‍या, अल्प अहं असणार्‍या आणि सर्व श्रेय देवाला देणार्‍या श्री. बोकील यांच्यासारख्या व्यक्तीच हिंदु धर्माची आणि राष्ट्राची खरी शक्ती आहेत. - संपादक) अशीच क्रांती पूर्ण विश्‍वात व्हावी, यासाठी ‘वसुधैव कुटुंबकम्’ यानुसार पुढचे कार्य करू, असे प्रतिपादन अर्थक्रांती प्रतिष्ठानचे श्री. अनिल बोकील यांनी केले. येथील शनिवारवाड्याच्या पटांगणावर अर्थक्रांती प्रतिष्ठानच्या वतीने ‘अर्थक्रांती प्रस्ताव के मूल्यांकन के लिये’ या विषयावर १३ नोव्हेंबर या दिवशी कार्यक्रम आयोजित केला होता. त्या प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमात विविध राज्यांतूनही अनेक मान्यवर उपस्थित होते. 

श्री योगवेदांत सेवा समितीच्या वतीने आदिवासी कुटुंबियांना दिवाळी भेट !

     डोंबिवली - पूज्यपाद आसारामजी बापू प्रेरित श्री योगवेदांत सेवा समितीच्या वतीने आदिवासी कुटुंबियांची दिवाळी आनंदाने साजरी करण्याच्या हेतूने लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पहाटे पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील आदिवासी पाड्यातील गरीब कुटुंबियांना नवीन कपडे, आयुर्वेदिक तुलसी गोळी, तसेच सौंदर्य प्रसाधन साहित्य यांचे वाटप करण्यात आले. ४०० आदिवासी कुटुंबियांनी याचा लाभ घेतला. आदिवासी पाड्यात अशा प्रकारचा दिवाळी पहाट कार्यक्रम घेऊन सामाजिक बांधिलकीतून आदिवासींना साहाय्य करण्याचे समितीचे हे २० वे वर्ष आहे. या कार्यक्रमातर्गत या ठिकाणी बालसंस्कारवर्गदेखील आयोजित करण्यात आले होते. त्याचा शेकडो मुलांनी लाभ घेतला. साडी-चोळी, टॉवेल, शर्ट-पॅन्ट, मिठाई, लहान मुलांना तुलसी आयुर्वेदिक गोळी, टि-शर्ट, कंगवा आणि अन्य सौंदर्य प्रसाधन साहित्याचे वितरण करण्यात आले.

चलन नसल्याने ग्रामीण भागात लोकांच्या अडचणीत वाढ !

मालवाहतूक थंडावली !
     सांगली - केंद्र सरकारने ८ नोव्हेंबरच्या रात्रीपासून ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या नोटांवर बंदी घातल्यापासून सर्वत्रच पन्नास आणि शंभर रुपयांच्या नोटांचा तुटवडा भासत आहे. बहुतांश ग्रामीण भागात आर्थिक व्यवहार हे जिल्हा बँक, पतसंस्था, सोसायटी यांद्वारे होतात यांपैकी कोणालाही नोटा पालटून देण्याची अनुमती नसल्याने याचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागात बसत आहे. त्यात सोमवारपासून जिल्हा बँकांना पैसे स्वीकारण्यासही बंदी केल्याने ग्रामीण भागात लोकांच्या अडचणी वाढत आहेत.
     शेतमजुर, हमाल, तसेच या वर्गातील लोकांना मिळणारे वेतन हे १०० रुपयांच्या नोटांमध्ये मिळते. या नोटाच नसल्याने अनेक ठिकाणी मजुरांना काम नाही, तसेच उधारीवर काम करावे लागत आहे. विशेषकरून शेतमजुरांना रोजचा खर्च भागवायाचा कसा याची चिंता सतावत आहे. ग्रामीण भागातील शेतकर्‍यांनाही शेतीचा खर्च भागवणे अवघड होत आहे.
     चलन टंचाईचा मोठा फटका मालवाहतूकदारांनाही बसत आहे. एकूणच आर्थिक व्यवहार थंडावल्याने मालवाहतूकही थंडावली आहे. मालवाहतूक वेळीच सुधारली नाही, तर मालवाहतूक करणारे ट्रक आणि अन्य वाहने रस्त्यांच्या बाजूला उभे करून ठेवण्याची वेळ येईल, अशी चेतावणी ‘ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट’ या संघटनेने दिली आहे.

कालमहात्म्यानुसार व्यष्टी साधनेसमवेत समष्टी साधना आवश्यक ! - श्री. अभिजीत देशमुख, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीच्या पिंपरी (पुणे) 
येथील शिबिराने धर्माभिमानी साधनेसाठी कृतीप्रवण ! 
श्री. अभिजीत देशमुख आणि मार्गदर्शन करतांना कु. वैभवी भोवर 
     पिंपरी, १४ नोव्हेंबर (वार्ता.) - कालमहात्म्यानुसार व्यष्टी साधनेसमवेत समष्टी साधना आवश्यक आहे. त्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्याची स्थापना करू शकले. कारण त्यांच्या पाठीमागे श्री भवानीमाता, समर्थ रामदासस्वामी आणि संत तुकाराम महाराज यांचा आशीर्वाद होता. व्यष्टी साधना हा कोणतेही कार्य सिद्धीस नेण्याचा पाया आहे. साधनेने स्वतःत पालट होतो आणि त्यामुळे त्या साधकासह त्याच्या संपर्कात येणार्‍या सर्वांना लाभ होतो. आपण सर्वांनी ईश्‍वराच्या आशीर्वादाने हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी संघटितपणे कार्यरत व्हायला हवे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे पुणे जिल्हा समन्वयक श्री. अभिजीत देशमुख यांनी केले. येथील बळीराज मंगल कार्यालय येथे १२ नोव्हेंबर या दिवशी पार पडलेल्या हिंदु धर्माभिमान्यांच्या शिबिरात केले. 
     शिबिराचे सूत्रसंचालन श्री. अभिजीत कुलकर्णी यांनी केले. या शिबिरात पिंपरी-चिंचवड, भोर, जुन्नर, मंचर, पुणे शहर आदी भागांतून ५० धर्माभिमानी सहभागी झाले होते. 

८७ पतसंस्थांमधील १ सहस्र ४६५ जणांना गैरकारभाराप्रकरणी अटक !

 सहकारक्षेत्रात भ्रष्टाचाराची बजबजपुरी करणार्‍यांना कठोर शासन करा ! 
* ४६९ पतसंस्थांमध्ये गैरकारभार, २८९ पतसंस्था अडचणीत 
* सहाय्यक निबंधक, संचालक, लेखापरीक्षक आणि सनदी लेखापाल यांच्यावर फौजदारी गुन्हे 
     मुंबई - राज्यातील पतसंस्थांमध्ये गैरकारभार केल्याप्रकरणी ८७ पतसंस्थांमधील १ सहस्र ४६५ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. राज्यातील एकूण ४६९ पतसंस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरकारभार झाला आहे. संस्थाचालकांच्या मनमानी कारभारामुळे त्यांतील २८९ नागरी सहकारी पतसंस्था अडचणीत आल्या आहेत. या गैरकारभारावर सहाय्यक निबंधक, सनदी लेखापाल आणि लेखापरीक्षक यांनीही पांघरूण घातले आहे. त्यामुळे सहकार खात्याने, ५ साहाय्यक निबंधक, २ सहस्र ६१५ संचालकांसह १०४ लेखापरीक्षक आणि ४७ सनदी लेखापाल यांच्यावर फौजदारी गुन्हे प्रविष्ट केले आहेत. 

रुग्णांची अडवणूक न करता खाजगी रुग्णालयांनी धनादेश स्वीकारावेत ! - मुख्यमंत्र्यांचे आदेश

     मुंबई - चलनातून ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या नोटा रहित केल्यामुळे केवळ पैसे नाहीत, म्हणून वैद्यकीय उपचारासाठी येणार्‍या रुग्णांची अडवणूक करू नये. देयकापोटी धनादेश स्वीकारावा, असे आदेश मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व खाजगी रुग्णालयांना दिले आहेत. (ज्या रुग्णालयांनी अडवणूक करून रुग्णांची हानी केली आहे, त्या रुग्णालयांवर शासनाने कारवाई करावी. - संपादक) या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी होते कि नाही, यावर आरोग्य विभागाला देखरेख ठेवण्यास सांगण्यात आले आहे. 

विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क भरण्यासाठी जुन्या नोटा स्वीकारण्याची अभाविपची मागणी

    पुणे - १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क भरण्यासाठी जुन्या चलनातील ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या नोटा महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने स्वीकाराव्यात, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केली आहे. या आशयाचे निवेदन परिषदेचे प्रदेशमंत्री राम सातपुते यांनी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना पाठवले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, केंद्र सरकारने ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या नोटा रहित केल्याच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. विद्यार्थ्यांंचा वेळ हा वेळेत शुल्क भरणे आणि परीक्षेची सिद्धता करणे, यांसाठी वापरता यावा म्हणून त्यांच्याकडून जुन्या चलनातील नोटा स्वीकाराव्यात.


एरव्ही सामान्य नागरिकांच्या दृष्टीसही न पडणारे लोकप्रतिनिधी निवडणुकांच्या निमित्ताने मतदार राजाच्या चरणांशी !

     सातारा - अर्ज मागे घेण्याचा दिनांक पालटल्यानंतर आता उमेदवारांनी आपापल्या सहकारी मंडळींना हाताशी धरून पदयात्रा, कोपरा सभा, मतदार भेटीगाठींवर जोर लावला आहे. एरव्ही सामान्य नागरिकांच्या दृष्टीसही न पडणारे लोकप्रतिनिधी निवडणुकांच्या निमित्ताने मतदार राजाच्या चरणांशी लोटांगण घालतांना दिसत आहेत. उमेदवारांनी आपापल्या भागात केलेल्या कामांचा पाढाच नेतेमंडळी जनतेसमोर मांडत आहेत. सातारा शहरातील मनोमिलन दुभंगले असल्याने आता अपक्ष उमेदवारांनीही प्रचाराचा जोर लावला आहे. सोशल मिडियावरही भावनिक आवाहन करून उमेदवार मतदारराजाला जोडून घेत आहेत.

राज्यात गेल्या २ दिवसांत जुन्या नोटांद्वारे ४६४ कोटींहून अधिक रुपयांचा करभरणा

     मुंबई - राज्य सरकारने करभरणा करण्यासाठी जुन्या ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या नोटा वापरण्याची मुभा दिली होती. त्याचा लाभ घेत राज्यातील महानगरपालिकांमध्ये विविध थकीत करांपोटी नागरिकांनी गेल्या २ दिवसांत ४६४ कोटी ६८ लक्ष ८३ सहस्र रुपयांचा भरणा सरकारी तिजोरीत केला आहे. 

‘एस्आयटी’चे प्रमुख संजयकुमार यांनी अन्वेषण अधिकार्‍यांकडून घेतला अन्वेषणाचा आढावा !

कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरण !
     कोल्हापूर, १४ नोव्हेंबर (वार्ता.) - कॉ. गोविंदराव पानसरे हत्येच्या प्रकरणी नियुक्त ‘विशेष अन्वेषण पथका’चे (एस्आयटीचे) प्रमुख संजयकुमार कोल्हापूर दौर्‍यावर आले आहेत. १३ नोव्हेंबर या दिवशी त्यांनी अन्वेषण अधिकार्‍यांकडून अन्वेषणाचा आढावा घेतला. कॉ. पानसरे हत्येतील संशयित आरोपी तथा सनातनचे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांच्यावर एक डिसेंबरपूर्वी दोषारोपपत्र प्रविष्ट करण्यात येणार आहे. या अनुषंगाने १४ नोव्हेंबर या दिवशी त्यांनी सर्व पोलीस अधिकार्‍यांची बैठक घेतली. कॉ. गोविंद पानसरे हत्येच्या प्रकरणी नियुक्त करण्यात आलेल्या ‘एस्आयटी’ने २ सप्टेंबर २०१६ या दिवशी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना अटक केली होती. त्याआधी २ जून २०१६ या दिवशी डॉ. तावडे यांना केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने (सीबीआयने) डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या प्रकरणी अटक केली होती.

वासनांध धर्मांध !

हिंदु महिलेचा विनयभंग करणार्‍या धर्मांधास १ वर्ष कैद ! 
     सातारा, १४ नोव्हेंबर (वार्ता.) येथील हिंदु महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी शाहुपुरीतील येथील गडकर आळी येथे रहाणार्‍या शौकत चांद बागवान (वय २८) या धर्मांधाला न्यायालयाने १ वर्ष कैद आणि ५०० रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. 
     येथील एक हिंदु महिला २४ मार्च २०१६ या दिवशी सकाळी जवळच्या मंदिरात दर्शनासाठी गेली होती. त्या वेळी ही घटना घडल्यानंतर तक्रार नोंदवण्यात आली होती. जलदगती न्यायालयात झालेल्या सुनावणीत ११ नाव्हेंबर या दिवशी आठ महिन्यांनी हा निकाल देण्यात आला.

पाकिस्तानला आता धडा शिकवण्याची वेळ आली आहे ! - निवृत्त लेफ्टनंट जनरल मुकेश सभरवाल

     पुणे, १४ नोव्हेंबर - ‘आतंकवादी आक्रमण झाल्यानंतर ‘अमुक एका संघटनेवर बंदी घाला, त्याचा नायनाट करा !’, असे म्हटले जाते; मात्र जो देश आतंकवादाला खतपाणी घालत आहे, त्याच्या बंदीविषयी कोणी काहीच बोलत नाही. आतंकवादाला पैसे (रसद) पुरवणार्‍या आणि भारतावर आतंकवादी आक्रमणाला प्रोत्साहन देणार्‍या पाकिस्तानला आता धडा शिकवण्याची आणि लोकांनीच पाकिस्तानला जाब विचारून हिसका दाखवण्याची वेळ आली आहे’, असे प्रतिपादन निवृत्त लेफ्टनंट जनरल मुकेश सभरवाल यांनी केले. भारतीय विचार साधना, पुणे यांच्या वतीने १३ नोव्हेंबर या दिवशी ‘इंडो-पाक रिलेशन्स’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्याच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. या कार्यशाळेत जवाहरलाल कौल, ज्येष्ठ पत्रकार अरविंद गोखले, सामरिक शास्त्राचे अभ्यासक श्रीकांत परांजपे, मेजर जनरल विनायक पाटणकर, गौरव आर्य यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या वेळी भारतीय विचार साधनाचे अध्यक्ष किशोर शशीतल आणि संयोजक भगवान दातार आदी मान्यवर उपस्थित होते. 

संभाजीनगरमधील अधिकोषांत १८ नोव्हेंबरपर्यंत सुटे पैसे न आल्यास समस्या !

     संभाजीनगर - येथे आतापर्यंत १२५ कोटी रुपयांच्या २ सहस्र रुपयांचे चलन उपलब्ध झाले होते. त्याचे वितरण झाले असले, तरी व्यवहारात या नोटा उपयोगात आणणे अवघड होऊन बसले आहे. कारण २ सहस्र रुपयांची नोट दिल्यानंतर ग्राहकाला पैसे परत करण्यासाठी सुटे पैसे नसल्याने व्यापारी आणि नागरिक यांना समस्या जाणवत आहेत. बाजारात १०० रुपयांचे चलन उपलब्ध नसल्याने मोठी अडचण झाली आहे. विविध अधिकोषातील रोकड संपल्याने अनेक नागरिकांना हेलपाटे मारावे लागत आहेत. अधिकोष अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार १८ नोव्हेंबरपर्यंत अशीच स्थिती राहू शकते. नागपूरहून १ सहस्र कोटी रुपयांच्या सुट्ट्या पैशाच्या चलनाची प्रतीक्षा आहे. ही रक्कम १८ नोव्हेंबपर्यंत न आल्यास गंभीर समस्या निर्माण होईल.


फलक प्रसिद्धीकरता

अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन करण्याची काँग्रेसी पद्धत आताही चालूच ?
     देशातील विविध रेल्वे स्थानकांच्या भिंतींवर रामायणातील प्रसंग आणि मोगल बादशहा अकबर याच्या कथित पराक्रमाचे प्रसंग यांची चित्रे लावण्यात येणार आहेत. रेल्वे प्रशासनाने रेल्वे स्थानकांच्या सौंदर्यीकरणाच्या योजनेखाली हा निर्णय घेतला आहे.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Rail prashasan rail sthanako ki bhit Mugal Badshah Akbar ke kathit parakram ke prasango se rangayega.
Kya yah Alpasankhyako ka tushtikaran nahi ?

जागो ! : रेल प्रशासन रेल स्थानकों की भीत मुगल बादशहा अकबर के कथित पराक्रम के प्रसंगों से रंगाएगा.
क्या यह अल्पसंख्यकों का तुष्टीकरण नहीं ? 

(म्हणे) ‘शरियत कायद्यामध्ये पालट करण्याचा कोणी प्रयत्न केल्यास आम्ही प्रतिकार करू !’ - वहिदत-ए-इस्लामी

हिंदूंनो, भारतीय राज्यघटनेपेक्षा मुसलमानांना
 ‘शरियत कायदा’ अधिक महत्त्वाचा वाटतो, हे जाणा ! 
     संभाजीनगर, १४ नोव्हेंबर - ‘भारतात सर्वांना आपल्या संस्कृतीप्रमाणे आचरण करण्याचा अधिकार आहे. राज्यघटनेप्रमाणे तो अधिकार इस्लाम धर्म मानणार्‍यांनाही आहे. आम्ही इस्लाम धर्माच्या तत्त्वांनुसार शरियत कायद्याप्रमाणे वागणार. त्यामध्ये पालट करण्याचा कोणी प्रयत्न केल्यास आम्ही प्रतिकार करू’, असा ठराव वहिदत-ए-इस्लामी या संघटनेने केला आहे. वहिदत-ए-इस्लामी यांच्या वतीने १३ नोव्हेंबर ते फेब्रुवारी २०१७ या कालावधीत देशभर चालणार्‍या ‘अल्लाह से नाता जोडो’ या मोहिमेचा प्रारंभ येथील आमखास पटांगणावर झाला. त्या वेळी हा ठराव संमत करण्यात आला. ‘

आर्थिक सेवा सुरळीत होईपर्यंत शाळेच्या बसगाड्या बंद करण्याचा स्कूल बस ओनर्स असोसिएशनचा निर्णय रहित

     मुंबई - केंद्र शासनाने ५०० आणि १ सहस्रच्या नोटा बंद केल्या आहेत. याचा परिणाम म्हणून डिझेल भरायला पैसे नाहीत. त्यामुळे १६ नोव्हेंबरपासून पुढे सर्व आर्थिक सेवा सुरळीत होईपर्यंत शाळेच्या बसगाड्या बंद करण्याचा निर्णय स्कूल बस ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी जाहीर केला होता. (असा निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना वेठीस धरणे कितपत योग्य आहे ? त्यापेक्षा ‘ऑनलाईन’ पैसे हस्तांतरण करणे वा अन्य पर्यायांचा विचार असोसिएशनने करायला हवा. - संपादक) मात्र पालकांच्या मागणीनंतर त्यांनी तो निर्णय रहित केला आहे. 

इराकच्या सैन्याकडून इसिसच्या कह्यातून प्राचीन नीमरूद शहराची मुक्तता !

     बगदाद - इराकी सैन्याने मोसुल शहराच्या दक्षिण भागात असणारे प्राचीन शहर नीमरूद इसिसच्या कह्यातून मुक्त केले आहे. येथील अनेक प्राचीन वास्तू इसिसने बॉम्बद्वारे नष्ट केल्या आहेत.

गुप्तहेरांचे गोपनीय विश्‍व - अपसमज आणि वास्तव : एक दृष्टीक्षेप

श्री. भाऊ तोरसेकर
१. गुप्तहेर खात्याविषयी आजही बरेचसे अज्ञानच !
     हेरगिरी वा गुप्तचर विभाग यांविषयी सामान्यत: लोकांमध्ये अनेक अपसमज असतात. ‘जेम्स बॉन्ड’ किंवा ‘राम्बो’ असे चित्रपट पाहिलेले असतात किंवा तत्सम कथा-कादंबर्‍या वाचलेला वर्ग आपल्या काही कल्पना डोक्यात घेऊनच बातम्या चाळत-वाचत असतो. त्यामुळेच पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील (वकिलातीतील) असा कोणी पाक हेर पकडल्याच्या बातमीने तशाच काही चमत्कारिक समजूती समोर आल्यास नवल नाही. त्याचे कारण वर्तमानपत्रातून येणार्‍या बातम्या अधिक गोंधळ माजवणार्‍या असतात. गुप्तहेर वा गुप्तचर हे कसे काम करतात ? या विषयीचे बरेचसे अज्ञान त्याला कारण आहे.

धर्मावरील आघातांच्या विरोधात संघटित लढा देण्याच्या निर्धाराने अधिवेशनाची सांगता !

ठाणे, मुंबई, रायगड आणि पालघर या जिल्ह्यांचे पंचम प्रांतीय हिंदू अधिवेशन !
डॉ. उदय धुरी
हिंदु राष्ट्राचा विचार शेवटच्या हिंदूपर्यंत पोचवायला हवा ! 
- डॉ. उदय धुरी, प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती, मुंबई
     ठाणे, १४ नोव्हेंबर (वार्ता.) - हिंदूंवर होणार्‍या आघातांविषयी आपल्याला हिंदूंमध्ये संवेदना निर्माण करायची आहे. संवेदनशील हिंदूच हिंदु राष्ट्राची स्थापना करू शकतो. यासाठी आपल्याला धर्मशिक्षण घेणे आणि साधना करून आध्यात्मिक बळ वाढवणे आवश्यक आहे. यामुळे धर्मनिष्ठ वातावरणाची निर्मिती होते. यातच हिंदु राष्ट्राचा उदय आणि पोषण होईल. हिंदु राष्ट्राचा विचार आपल्याला शेवटच्या हिंदूपर्यंत पोेचवायचा आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे मुंबई प्रवक्ता डॉ. उदय धुरी यांनी केले. उल्हासनगर येथील ‘पंचम प्रांतीय हिंदु अधिवेशना’च्या समारोपीय भाषणात ते बोलत होते. धर्मावरील विविध आघातांच्या विरोधात संघटितपणे लढा देण्याच्या निर्धाराने या २ दिवसीय प्रांतीय अधिवेशनाची सांगता झाली. या अधिवेशनात मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांतील १७ हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी-कार्यकर्ते यांसह विचारवंत, पत्रकार, अधिवक्ते, उद्योजक, माहिती अधिकार कार्यकर्ते, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कार्यकर्ते असे एकूण ७५ धर्माभिमानी सहभागी झाले होते.

धर्मरक्षण करणारे हिंदुत्वनिष्ठ आणि त्यांचे धर्मकार्य !

१. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याशी जोडलो गेल्यावर हिंदु राष्ट्र 
स्थापनेचे ध्येय कळले ! - प्रभाकर भोसले, श्री शिवकार्य प्रतिष्ठान, विक्रोळी
     आमचे सौभाग्य आहे की, आमच्यासोबत हिंदु जनजागृती समिती आहे. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांना समर्थ रामदासस्वामी यांचे मार्गदर्शन लाभले, त्याप्रमाणे आम्हाला हिंदु जनजागृती समितीचे मार्गदर्शन मिळाले. आम्ही धर्मकार्य करत होतो; मात्र आम्हाला नेमकी दिशा नव्हती. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याशी जोडलो गेल्यावर मला हिंदु राष्ट्र स्थापनेचे ध्येय कळले. समितीच्या माध्यमातून मला धर्मशिक्षण मिळाले, असे प्रतिपादन श्री शिवकार्य प्रतिष्ठानचे श्री. प्रभाकर भोसले यांनी केले.

दैनिक ‘सनातन प्रभात’ च्या कक्षाला हिंदुत्वनिष्ठांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या कक्षाला भेट
देऊन अंक पहातांना हिंदुत्वनिष्ठ
     अधिवेशनाच्या ठिकाणी ‘दैनिक सनातन प्रभात - समस्त हिंदुत्वनिष्ठांचे हक्काचे व्यासपीठ’ असा कक्ष उभारण्यात आला होता. विविध हिंदुत्ववादी संघटनांनी धर्मावरील आघात रोखण्यासाठी केलेले प्रयत्न, राबवलेले उपक्रम, धर्मप्रसाराच्या कृती आदींची दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये देण्यात आलेली वृत्ते या कक्षावर मांडण्यात आली होती. अधिवेशनाला उपस्थित असलेल्या बहुसंख्य धर्माभिमान्यांनी या कक्षाला आवर्जून भेट दिली. या वेळी उपस्थित धर्माभिमान्यांना ‘राष्ट्र आणि धर्म रक्षण यांविषयीच्या कृती दैनिक ‘सनातन प्रभात’ मध्ये प्रसिद्धीसाठी पाठवण्याचे आवाहन करण्यात आले !

राष्ट्राला संकटात टाकणारे नेहरू आणि त्यांची मैत्री !

१४ नोव्हेंबर या दिवशी झालेल्या नेहरु जयंतीच्या निमित्ताने...
१. राष्ट्रहिताचा काहीएक विचार न करता स्वतःच्या ऐकण्यातील कृष्णमेनन 
यांच्यासारख्या अपात्र व्यक्तींना परराष्ट्रासारखे अतीमहत्त्वाचे खाते देणारे नेहरू !
     ‘राष्ट्र चालवण्याच्या पात्रतेच्या कितीतरी व्यक्ती भारतात असूनही नेहरूंनी खातेवाटप पात्रतेप्रमाणे केले नाही. केवळ भावनेच्या पोटी आणि त्यांच्या ऐकण्यातील व्यक्तींना खातेवाटप करण्यात आले. कोणताही विचार न करता व्ही.के. कृष्णमेनन यांच्यासारख्या निर्बुद्ध व्यक्तीकडे परराष्ट्र मंत्री पदासारखे महत्त्वाचे खाते दिले. कृष्णमेनन यांच्यावर पाश्‍चात्त्यांचा पगडा होता. त्यांची ओळख केवळ नेहरूंचे मित्र एवढीच होती. कृष्णमेनन भाषणाला उभे राहिले की, ४-५ घंटे भाषण देत; पण त्यांना नेमके काय म्हणायचे आहे, हे कोणालाही कळत नसे.

स्वतःला पैशांची निकड असूनही लोकमान्य टिळकांनी ‘मरण समोर दिसणार्‍या’ नातेवाइकाविषयी दाखवलेले औदार्य !

    ‘लोकमान्य टिळकांच्या औदार्याविषयी एक सुंदर कथा ऐकावयास मिळाली. टिळकांचे एक नातेवाईक कोकणात आजारी होते. त्यांनी टिळकांकडून ६०० रुपये (म्हणजे सध्याच्या भाषेतील ६० सहस्र रुपये) उसने घेतले होते. आपण कर्ज फेडू शकत नाही; म्हणून त्यांना फार वाईट वाटत असे. पुढे तर त्यांचा आजार इतका बळावला की, मरण समोर दिसू लागले. ही गोष्ट कोकणात असलेल्या टिळकांच्या भाच्याने टिळकांना कळवली.
     खरे म्हणजे त्या वेळी टिळकांना अतोनात ‘कर्ज’ झालेले होते आणि त्यांनाही पैशाची फार आवश्यकता होती. एका प्रकरणामुळे त्यांचा अतोनात खर्च झाला होता. तरीसुद्धा टिळकांनी ‘दस्तऐवजा’वर लिहून दिले, ‘सर्व देणे पावले, बाकी काही नाही.’ 
      पुढे टिळक म्हणाले, ‘‘यायचाच असेल, तर त्याला सुखाने मृत्यू येऊ दे.’’ पण टिळकांचा हा शेरा वाचून तो नातेवाईकही पूर्णतः चिंतामुक्त झाला आणि आजारातून बरासुद्धा झाला !’
- श्री. सु.ह. जोशी (‘मासिक प्रसाद’, दीपावली २००२)

लोककल्याणासाठी चिरसाधना करता यावी; म्हणून स्वर्गप्राप्तीचे वरदान नाकारणारे महान तपस्वी मुद्गल ऋषी !

      ‘कुरुक्षेत्राच्या धर्मभूमीत तपस्या करणारे ऋषी मुद्गलांचे धर्माचरण, आराधना आणि उदारवृत्तीने जीवन व्यतीत करणे आदर्श होते. मासाच्या पहिल्या पक्षात ते शेतातील तांदूळ वेचून एकत्र करत. दुसर्‍या पक्षात ते त्या तांदुळाचा उपयोग यज्ञ आणि अतिथींचा सत्कार यांसाठी करीत. ऋषीश्रेष्ठ दुर्वास आपल्या ६ सहस्र शिष्यांसह त्यांची परीक्षा घेण्यासाठी अनेक वेळा त्यांच्याकडे गेले; पण निस्पृह मुद्गल ऋषींनी त्यांना प्रत्येक वेळी आपल्या आतिथ्याने संतुष्ट केले.

स्वातंत्र्याचे समर्थक असलेल्या जम्मू-काश्मीरचे महाराजा हरि सिंग यांच्याशी शत्रुत्व आणि शेख अब्दुल्लाशी मैत्री करून काश्मीरची समस्या गुंतागुतीची करणारे नेहरू अन् घटनेने मान्यता देऊनही जम्मू-काश्मीरचे भारतात विलिनीकरण वैध न मानणारे शेख अब्दुल्ला !

     काश्मीरचे भारतात विलिनीकरण होण्यापूर्वी जम्मू-काश्मीरचे महाराजा हरि सिंग स्वातंत्र्याचे समर्थक होते. जम्मू-काश्मीरची स्वायत्तता कायम राखण्यासाठी त्यांनी भारत तसेच पाकिस्तानशी ‘समझोता’ करायचा प्रयत्न केला. त्या वेळी पाकिस्तानने त्या समझोत्यावर स्वाक्षरीही केली होती; परंतु भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी विभाजनामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्याचे कारण पुढे करून त्यावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला आणि ‘या प्रश्‍नावर नंतर विचार केला जाईल’, असे सांगितले.

साधना अपरिहार्य !

संपादकीय
      काळ्या पैशांना चाप लावण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या नोटा चलनातून रहित करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे काळा पैसाधारकांचे धाबे तर दणाणलेच; पण नागरिकांमध्येही अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले. त्यातच देशभरात मीठाची टंचाई निर्माण झाल्याची अफवा पसरवली गेली. या अफवेमुळे अनेक शहरांमध्ये मीठ खरेदी करण्यासाठी लोकांच्या रांगा लागल्या. काही ठिकाणी ४०० रुपये प्रतीकिलो दरानेही मीठ खरेदी झाल्याचे वृत्त होते. संभाजीनगर येथे मीठाच्या जवळपास ४०० गोण्या चोरून नेण्याची घटना घडली. मध्यप्रदेशातील इंदूर येथे मीठ खरेदी करण्यासाठी आलेल्या नागरिकांची अधिकार्‍यांनी समजूत घालून त्यांना परत पाठवले. केंद्रीय अन्नपुरवठामंत्री रामविलास पासवान यांनी मीठाचा पुरेसा साठा असल्याचे स्पष्ट करत कोणत्याही अफवांवर विश्‍वास न ठेवण्याचे आवाहन केले. तरी नागरिकांमध्ये अफवेचे पडसाद अनेक ठिकाणी उमटलेच होते.

नथुराम गोडसे यांचे मृत्यूपत्र !

आज (१५ नोव्हेंबरला) असलेल्या नथुराम गोडसे यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने...
नथुराम गोडसे
‘प्रिय बंधू (बंधो) चि. दत्तात्रय वि. गोडसे, (नथुराम गोडसे यांचे भाऊ)
     ‘माझ्या विम्याचे पैसे आले, तर त्याचा विनियोग घरच्या कामी करणे. रु. २ सहस्र आपल्या पत्नीला, रु. ३ सहस्र गोपाळच्या पत्नीला आणि रु. २ सहस्र आपल्याला माझ्या मृत्यूनंतर मिळावेत, असा मी विम्याच्या कागदपत्रांवर ‘लेख’ (उल्लेख) केला आहे.
     माझी उत्तरक्रिया करण्याचा अधिकार आपणास मिळाल्यास कोणत्याही प्रकारे ते काम करावेे; परंतु माझी एकच विशेष इच्छा इथे लिहित आहे. ‘जिच्या तीरावर प्राचीन द्रष्ट्यांनी वेदरचना केली, ती सिंधू नदी आपल्या भारतवर्षाची सीमारेषा आहे. ती सिंधू नदी ज्या शुभ दिवशी पुन्हा भारतवर्षाच्या ध्वजाच्या छायेत स्वच्छंदतेने वहात राहील, त्या दिवसात माझ्या अस्थींच्या रक्षेचा काही अंश त्या सिंधू नदीत प्रवाहित केला जावा.’

राष्ट्र हे सैन्याच्या बळावरच चालते ! - स्वातंत्र्यवीर सावरकर

     भारतीय लष्कराने केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राईक’विषयी सर्व पक्षांच्या विचारांचा डोंब उसळला होता आणि त्याच्या पुराव्यावरून वादही निर्माण झाला. हे होत असतांनाच वर्ष २०११ मध्ये लष्कराने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे ‘द हिन्दू’ या इंग्रजी वृत्तपत्राने प्रसिद्ध केले. ते वाचून मला पुण्यातील रमणबाग येथे २ ऑगस्ट १९४१ या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी केलेले भाष्य आठवले. 
पाकिस्तानी रोगावर औषध योजना !
     त्या भाषणाचा विषय होता, ‘‘पाकिस्तानी रोगावर औषध योजना !’’ व्याख्यानाचा आरंभ विलक्षण होता. ते म्हणाले, ‘‘मी जे बोलणार आहे, तुम्हा हिंदूंच्या हितासाठी. तुमच्या पितृभूमीत आणि पुण्यभूमीत तुम्ही सन्मानाने रहावे यासाठी. पाकिस्तानचा प्रश्‍न तर्काने, तत्त्वज्ञानाने अथवा टिकेने सुटणार नाही. तो सुटेल काय तो हिंदूसंघटनानेच. तुम्ही कुठेही जा; पण अंतःकरणात हिंदुत्वाची जागती ज्योत पेटलेली राहू द्या आणि प्रत्येक ठिकाणी भगवा ध्वज उंच फडकवत ठेवा. मी जे सांगतो आहे, ते तुम्ही मान्य करा किंवा न करा; पण त्याविषयी मला निदान शाप तरी देऊ नका !

हिंदुस्थानला जन्मभूमी मानणारे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पत्रकार तारेक फतेह

      तारेक फतेह पाकिस्तानात जन्मलेले कॅनडा निवासी आंतरराष्ट्रीय ख्यातनाम पत्रकार आहेत, तसेच अनेक पुस्तकांचे लेखक आहेत. ते स्वत:ला हिंदु वंशपरंपरेतील मानतात. एवढेच नव्हे, तर गर्वाने म्हणतात की, ते मूळत: भारतीय आहेत. फतेह म्हणतात, ‘‘हिंदुस्थान माझी पायाभूत जन्मभूमी आहे, तोच माझा देश आहे. माझी पाकिस्तानी ओळख विसरण्यास अथवा परत करण्यास कोणती पद्धत असेल, तर ती परत करण्यास मी सिद्ध आहे. मी माझ्या मातेला कसे विसरू शकतो ? आम्ही तर दाराशुकोहचे संतान आहोत. आम्ही त्या पंजाबची मुले आहोत, जेथील अत्यंत मोठ्या नेत्याची एका मोठ्या व्यक्तीने हत्या केली, त्याचे नाव होते औरंगजेब ! हिंदुस्थानच्या मुसलमानांना एक पर्याय आहे, ते दाराशुकोहचे अनुयायी आहेत कि औरंगजेबचे ?’’
- श्री. तारेक फतेह (साप्ताहिक ‘वीरवाणी’, वर्ष ३७, अंक ८, ५ जुलै २०१३)

असे होऊनही युद्ध न करणारा जगातील एकमेव देश ! ‘हा देश नपुंसकांचा तर नाही’, असे कोणाला वाटल्यास आश्‍चर्य वाटायला नको !

     ‘उरी येथे झालेल्या आतंकवादी आक्रमणाला प्रत्युत्तर म्हणून भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून २९ सप्टेंबर २०१६ या दिवशी ‘सर्जिकल स्ट्राईक’ करूनही पाकने ३०० पेक्षा अधिक वेळा शस्त्रसंधीचा भंग करत गोळीबार केल्याची माहिती शासकीय अधिकार्‍यांनी दिल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे.’ महर्षींनी सांगितलेले दैवी प्रवासाचे नियोजन आणि वार्ता !

महर्षींची शिकवण आणि कार्य !
सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ
   १७.३.२०१६ या दिवशी कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यातील कोलूर येथील श्री मूकांबिकादेवीचे दर्शन घेण्यास महर्षींनी सांगणे आणि सायंकाळी ६.३० ते ७ या वेळेत महर्षि त्या देवीकडून प.पू. डॉक्टरांना शक्ती पाठवणार असणे : ‘आता आम्ही दुपारी १२ वाजता मंगळुरू येथून कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यातील कोलूर येथील श्री मूकांबिकादेवीच्या दर्शनासाठी निघणार आहोत. ‘आज या स्थानी तुम्हाला रहायचे आहे’, असे महर्षींनी सांगितले आहे. आमच्याबरोबर पू. डॉ. ॐ उलगनाथन् आणि त्यांचे कुटुंबही (पत्नी ॐ पवित्रा आणि मुलगी ॐ अक्षरा) आहे. ‘आज सायंकाळी ६.३० ते ७ या वेळेत महर्षि देवीच्या स्थानातून काहीतरी विशिष्ट प्रकारची शक्ती परम गुरुजींकडे पाठवणार आहेत’, असे पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांनी सांगितले. श्री मूकांबिकादेवीची स्थापना आद्य शंकराचार्यांनी केली होती. हे स्थान मंगळुरूहून १३२ कि.मी. आहे.’
- (पू.) सौ. अंजली गाडगीळ, मंगळुरू, कर्नाटक. (१७.३.२०१६, सकाळी ७.४४)

भगवंताने एका साधिकेला स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रियेविषयी सांगितलेली सूत्रे अन् तिला त्यासंबंधी आलेल्या अनुभूती

सौ. अंजली कणगलेकर
   साधारण दीड-दोन मासांपूर्वी (महिन्यांपूर्वी) सारणी लिखाण करतांना प्रक्रिया हा शब्द २-३ वेळा आला. तेव्हा मला स्वभावदोष आणि अहं यांचे पैलू, त्यांच्यामुळे निर्माण होणारे प्रसंग, त्यांमुळे होणारी साधनेची हानी आणि मनावर येणारा ताण यांची जाणीव झाली. स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया राबवण्यासाठी विशेष प्रयत्न करणार्‍या साधकांकडूनही मी पुष्कळदा ताण आला, हे शब्द ऐकल्याचे आठवले. त्या वेळी या प्रक्रियेसंबंधी मनात आलेले प्रश्‍न, त्यांची भगवंताने दिलेली उत्तरे आणि त्यासंबंधी आलेल्या अनुभूती पुढे देत आहे.
१. भगवंताने प्रक्रियेचा अर्थ सांगितल्यावर स्वतःवरील काळ्या
शक्तीचे आवरण दूर होऊन पुष्कळ हलकेपणा आणि आनंद जाणवणे
प्रश्‍न : प्रक्रिया म्हणजे काय ?
उत्तर : प्रक्रिया म्हणजे स्वतःतील भगवंताला प्रकट करण्याची क्रिया.
अनुभूती : भगवंताने हे उत्तर देताक्षणी मला स्वतःवरील काळ्या शक्तीचे आवरण दूर झाल्याचे जाणवले आणि पुष्कळ हलकेपणा आणि आनंदही जाणवला.

कृष्ण, कृष्ण आणि केवळ कृष्ण हाच असावा मधुगंध ।

मी पाहिले आपणास, तेव्हा.. 
देव पाहिला मी, कृष्ण पहिला मी... 
हे कळण्याइतकीही बुद्धी नव्हती शहाणी 
पण आता कळते मजला काय पाहिले मी, 
ठाऊक नाही मज, कधी पाहीन तव चरण... ॥ १ ॥

तो परमोच्च सोहळा पहाण्याची 
पात्रता माझ्यात कधी निर्माण होईल ? 
त्या भावनेच्या पार मी कधी देवा जाईन ? ॥ २ ॥

कृष्णभेटीची ओढ लागलेल्या साधिकेची भावविभोर अवस्था

१. रामनाथी आश्रमात येण्याची संधी मिळाल्याचे कळल्यावर 
भाव जागृत स्थितीत प.पू. डॉक्टरांना केलेले आत्मनिवेदन !
     ‘मी इयत्ता पाचवीत असतांना प.पू. डॉक्टर देवद आश्रमात स्वभावदोष-निर्मूलन सत्संग घेण्यासाठी आले होते. तेव्हा मी आणि माझी बहीण त्यांच्या समोर बसलो होतो. प.पू. डॉक्टर काही साधकांना त्यांच्याकडून झालेल्या चुकांसाठी नवीन दृष्टीकोन देत होते. त्या वेळी ते काहीच कळले नाही आणि आता त्यांची पुसटशी प्रतिमा आठवत होती. आश्रमात येण्याचे नियोजन होण्यापूर्वी पुष्कळ दाटून आले. ‘प.पू. डॉक्टरांशी बोलावे. जे काही सुचेल, ते लिहून ठेवावे’, असे वाटत होते.
१ अ. जिवाला सतत गुरुचरणांचा ध्यास लागावा, यासाठी याचना करणे : हे गुरुदेवा, मला आरंभ कुठून करावा, हेच कळत नाही; पण देवा, आज तुम्हाला सर्व सांगायचे आहे. या जिवाला सतत तव चरणांचाच ध्यास असावा. तुम्हाला जे अपेक्षित आहे, ते स्वीकारण्याची क्षमता असावी, इतकीच भिक्षा पदरी घाला. गुरुदेवा, तुम्ही दयाळू आहात. तुम्ही सारे काही जाणता. अहोभाग्य त्या साधकांचे, जे रामनाथी आश्रमात रहातात ! देवा, तुम्ही या नेत्रांना दिसलात, तेव्हा काहीच उमगत नव्हते. तुम्हाला भेटण्यासाठी मनाला ओढून-ताणून आणलेली ती एक संधी होती. तुम्ही पुन्हा कधी भेटणार ?, हे ठाऊक नव्हते; म्हणून नियतीशी तडजोड करून आले होते.

धर्म म्हणजे नेमके काय ? याविषयी श्री. यशवंत कणगलेकर यांना सुचलेल्या व्याख्या

श्री. यशवंत कणगलेकर
धर्म म्हणजे नेमके काय ?, याचे समाजाला ज्ञान नसल्यामुळे धर्म म्हणजे रिलीजन अशी अपसमजूत समाजात रूढ झाली आहे आणि त्यामुळे समाजात मतभेद वाढत आहेत. धर्म म्हणजे नेमके काय, हे समजावे आणि किमान हिंदू तरी एकसंध व्हावेत या उद्देशाने धर्माच्या विविध व्याख्या जशा सुचल्या तशा पुढे देत आहे. धर्माचरण करून समाज सुखी होवो, हीच श्री गुरुचरणी प्रार्थना !
१. आद्य शंकराचार्य आणि स्वामी विवेकानंद यांनी केलेली धर्माची व्याख्या
अ. धर्म म्हणजे असे आचरण की, ज्यामुळे व्यक्तीची व्यावहारिक आणि आध्यात्मिक प्रगती होते आणि समाज सुखी होतो. - आद्य शंकराचार्य
आ. धर्म ही अशी गोष्ट आहे ज्यामुळे पशू मनुष्य आणि मनुष्य ईश्‍वर बनतो. - स्वामी विवेकानंद
२. धर्माविषयी सुचलेल्या व्याख्या आणि विचार
अ. ईश्‍वराने सृष्टीची रचना केली आणि मनुष्यासहित प्राणीमात्र सुखी व्हावेत; म्हणून शुद्ध ज्ञानाचे प्रक्षेपण केले. यालाच धर्म असे म्हणतात. आ. धर्म ही मनुष्याला सुखी करण्याची ईश्‍वराची कार्यपद्धत आहे. या कार्यपद्धतीच्या आचरणाला धर्माचरण म्हणतात.

श्री गुरूंवरील दृढ श्रद्धेमुळे गंभीर आजारपणात स्थिर आणि आनंदी रहाता आल्याची सांगली येथील श्रीमती शांताबाई पट्टणशेट्टी यांना आलेली अनुभूती !

१. पाठीत पुष्कळ वेदना होणे, छातीत आवळल्यासारखे होऊन अधिक घाम येणे
आणि हा त्रास प.पू. पांडे महाराज यांना सांगितल्यावर त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्रास दूर होणे
   मी वर्ष २०१५ मध्ये गुरुपौर्णिमेसाठी २ मास (महिने) आश्रमात रहायला आले होते. तेव्हा माझा शारीरिक त्रास वाढला होता. मला पाठीत पुष्कळ वेदना व्हायच्या आणि नंतर छातीत आवळून येऊन घाम अधिक यायचा. सलग ३ - ४ दिवस असे झाल्यावर मला हे आध्यात्मिक त्रासामुळे असावे, असे वाटून त्याविषयी मी प.पू. पांडे महाराज यांना सांगितले. त्यानंतर ४ मास (महिने) मला हा त्रास झालाच नाही.
२. सहा मासांनंतर (महिन्यांनंतर) पुन्हा हा त्रास उद्भवणे, तपासणी केल्यानंतर
शस्त्रकर्म करावे लागणार असल्याचे समजणे आणि गुरूंवरील श्रद्धेमुळे ताण न येणे
   सहा मासांनंतर (महिन्यांनंतर) मी नातेवाइकांकडे गेले असता काही गावे फिरून परत येतांना पुन्हा अकस्मात् हा त्रास उद्भवला. तेथील आधुनिक वैद्यांनी ईसीजी काढल्यानंतर त्यामध्ये दोष आहे, हे लक्षात आले आणि त्यांनी एन्जिओग्राफी करण्याचा समादेश दिला. त्यानंतर एका दिवसात मला माझ्या मुलांनी घरी सांगलीला आणले. अ‍ॅस्टर हॉस्पिटल, बेंगळुरू या रुग्णालयात एन्जिओग्राफी करवून घेतली. त्या तपासणीत ३ मोठे ब्लॉक्स निर्माण झाले आहेत आणि ते शस्त्रकर्म करून त्वरित काढावे लागतील, असे सांगितले. शस्त्रकर्म मोठे होते; पण वरील सर्व प्रसंगांत माझे मन स्थिर आणि आनंदी होते. मला कसलाही ताण आला नाही. माझे गुरु माझी काळजी घेण्यास समर्थ आहेत, अशी ठाम श्रद्धा होती. मला वाटत होते, मृत्यू देवाच्या हातात आहे. तेव्हा तो चुकणार नाही आणि त्याची वेळही पालटणार नाही.

सनातनचे रामनाथी, मिरज आणि देवद येथील आश्रम हे अनुक्रमे विष्णुलोक, ब्रह्मलोक अन् शिवलोक असल्याचे जाणवणे

श्री. योगेश जोशी
१. रामनाथी आश्रम
रामनाथी आश्रम म्हणजे विष्णुलोक आहे; कारण महर्षींनी सांगितल्यानुसार येथे प्रत्यक्षात प.पू. डॉक्टरांच्या रूपात भगवान श्रीविष्णु विराजमान आहे आणि श्रीविष्णूचे कार्य काय, तर भक्तांचे पालनपोषण करून त्यांना मोक्षाला नेणे; त्याचप्रमाणे श्रीविष्णु रामनाथी आश्रमात साधकांचे पालनपोषण करून त्यांचा उद्धार करत आहे.
२. मिरज आश्रम
मिरज आश्रम म्हणजे ब्रह्मलोकच आहे, असे जाणवले. त्याचे कारण म्हणजे मिरज आश्रमात वर्ष २००३ मध्ये प.पू. डॉक्टरांचे सूक्ष्मातील कार्य चालू झाले. त्यामुळे ते अनिष्ट शक्तींच्या निर्मूलनाचे उत्पत्ती स्थान असल्याने खरोखर तो ब्रह्मलोकच आहे, असे वाटले.

वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णालयात राहिल्यावर आलेल्या वाईट अनुभवांतूनही प.पू. डॉक्टरांच्या कृपेने साधनेचे दृष्टीकोन मिळणे आणि सद्गुरु (श्री.) राजेंद्र शिंदे यांच्या अनमोल सत्संगातून पुष्कळ शिकायला मिळणे

     ‘मी १२ वर्षे आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करत आहे. घरातील सर्व जण साधक आहेत. मी वर्षातून १ - २ वेळा ७ - ८ दिवस घरी जाते आणि पुन्हा आश्रमात येते. त्यामुळे मी आश्रमाबाहेर कधी राहिलेले नाही. वैद्यकीय उपचारांसाठी मी पहिल्यांदाच अडीच मास आश्रमाबाहेर एका रुग्णालयात राहिले. तिथे मला काही वाईट अनुभव आले. या अनुभवांतून देव मला शिकवत आहे आणि ‘तो सर्व पहात आहे’, याची मी घेतलेली अनुभूती पुढे देत आहे.
१. रुग्णालयातील समस्यांना सामोरे जाणे कठीण होणे 
आणि तेव्हा ‘आश्रम, साधक अन् प.पू. डॉक्टर यांच्याविषयी 
कृतज्ञता वाढवण्यासाठीच देवाने मला बाहेर ठेवले आहे’, याची जाणीव होणे 
     रुग्णालयात माझ्यासमवेत इतर साधकही होते. आरंभी माझ्याकडून नामजप, प्रार्थना व्यवस्थित होत होती. नंतर मला तिथे रहाणे अवघड झाले. मला आश्रम, साधक आणि प.पू. डॉक्टर यांची पुष्कळ आठवण येत होती. रुग्णालयातील समस्यांना सामोरे जाणे कठीण होत होते. त्या वेळी ‘आश्रम, साधक आणि प.पू. डॉक्टर यांच्याविषयी कृतज्ञता वाढवण्यासाठीच देवाने मला बाहेर ठेवले आहे’, याची मला जाणीव झाली.

तळमळ आणि प.पू. डॉक्टरांप्रती भाव असलेला ५३ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्ग लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला रामनाथी, गोवा येथील कु. वेदांत मिठबांवकर (वय ८ वर्षे) !

उच्चलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र 
चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. वेदांत भूषण मिठबांवकर एक दैवी बालक आहे !
कु. वेदांत मिठबांवकर
पालकांनो, हे लक्षात घ्या ! 
      ‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ - (परात्पर गुरु) डॉ. आठवले 
      (कु. वेदांत याची वर्ष २०११ मध्ये ५१ टक्के आध्यात्मिक पातळी होती. - संकलक)
१. वर्गातील मित्र अनावश्यक आणि चुकीचे हावभाव करत असतांना ‘असे केल्याने त्रास होईल’, असे सांगणारा वेदांत ! : ‘कु. वेदांतच्या वर्गात शिकणारा त्याचा मित्र सतत अनावश्यक बोलायचा आणि चुकीचे हावभाव करायचा. तेव्हा वेदांत त्याला ‘तसे केल्याने तुला त्रास होईल’, असे सांगायचा; परंतु ते त्याच्या मित्राला कळत नसे. वेदांत शाळेतून येतांना हे सर्व मला सांगायचा आणि विचारायचा, ‘‘त्याला हे कसे समजावून सांगायचे ?’’

व्यास निवासातील तत्त्वनिष्ठ पंचकन्या ।

आचार्य भगिनी नेहमीच माझ्या संपर्कात असतात. देवाच्या कृपेने त्यांच्या माध्यमातून माझ्या साधनेला आरंभ झाला. आज ते दिवस आठवले आणि गुरुकृपेने त्या पंचकन्यांविषयी पुढील काव्यपंक्ती सुचल्या.

व्यास (टीप १) निवासामध्ये गुरुदेवांचे लागले प्रथम चरण ।
व्यास निवासामध्ये होत्या पंचकन्या एकत्र धरून ॥

त्यांना होती फार साधनेची तळमळ ।
गुरुदेवांची त्यांना झाली भेट आपोआप ॥ १ ॥

सांगूनी गुरुदेवांनी साधना आणि कार्याचे महत्त्व ।
त्या सार्‍या झाल्या साधना करण्यास तत्पर ॥

एका मागूनी एक गावागावांत करिती धर्मप्रसार ।
गाती सदासर्वदा देवाचे गुणगान ॥ २ ॥

प.पू. डॉक्टरांचे साधकांसाठी आश्‍वासक उद्गार !

(पू.) श्री. संदीप आळशी
     एकदा सेवेनिमित्त मी प.पू. डॉक्टरांना भेटायला त्यांच्या खोलीत गेलो होतो. प.पू. डॉक्टरांनी त्यांच्या खोलीतील लादीचा गुळगुळीतपणा वाढल्यासारखा वाटतो का, याविषयी प्रयोग करून पहाण्यास सांगितले. खोलीतील लादीचा गुळगुळीतपणा पूर्वीच्या तुलनेत वाढला असल्याचे मी त्यांना सांगितले. त्यावर ते म्हणाले, निर्जीव लादीचीही प्रगती होत आहे, तर साधकांची प्रगती कशी होणार नाही ?
- (पू.) श्री. संदीप आळशी

जिल्ह्यांत होणार्‍या हिंदु धर्मजागृती सभांच्या ठिकाणी लावावयाच्या प्रदर्शनातील फलकांची सूची उपलब्ध !

हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांना सूचना
     जिल्ह्यांत होणार्‍या हिंदु धर्मजागृती सभांना येणार्‍या हिंदुत्ववादी आणि जिज्ञासूंना समितीच्या कार्याची माहिती व्हावी, तसेच त्यांना हिंदु धर्म अन् राष्ट्र यांची स्थिती कळावी या उद्देशाने काही फलक उपलब्ध करण्यात आले आहेत. या फलकांमध्ये ‘हिंदु जनजागृती समिती’ चे कार्य, धर्मशिक्षण, हिंदु राष्ट्र स्थापनेची आवश्यकता, राष्ट्र आणि धर्म यांवरील आघात, सनातनची ग्रंथसंपदा, सनातन प्रभात, आदींविषयी माहिती देण्यात आली आहे. सभास्थळी उपलब्ध जागेनुसार लहान किंवा मोठे प्रदर्शन लावता येईल. प्रदर्शनात लावावयाच्या फलकांची सूची (‘एक्सेल’ धारिका) नेहमीच्या ठिकाणावर उपलब्ध आहेत.
     धर्मजागृती सभेच्या ठिकाणी व्यासपिठावर लावण्यासाठी जिल्ह्यात उपलब्ध पडदा (बॅकड्रॉप) (श्रीकृष्णार्जुनाचे चित्रं असलेला) सुस्थितीत असल्यास तोच वापरावा, आपल्याकडे उपलब्ध पडदा खराब झाला असल्यास नवीन पडद्याची मागणी नेहमीप्रमाणे कळवावी.


अध्यात्मातील सर्वोच्चपदी विराजमान असूनही अखंड शिष्यावस्थेत रहाणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...
    प.पू. डॉक्टर हे परात्पर गुरु या सर्वोच्चपदी विराजमान आहेत. एवढ्या उच्च स्थितीला असूनही प.पू. डॉक्टरांनी आपले शिष्यत्व टिकवून ठेवले आहे. ते त्यांच्या अनेक कृतींतून शिकायला मिळते. त्यांपैकी काही उदाहरणे पुढे देत आहे.
१. भेटायला आलेल्या संतांसमोरही शिष्यभावात वावरणारे प.पू. डॉक्टर !
    काही वर्षांपूर्वी एक संत त्यांच्या काही शिष्यांसमवेत प.पू. डॉक्टरांना भेटायला आले होते. प.पू. डॉक्टर रात्री दीड-दोन वाजेपर्यंत त्या संतांशी बोलत होते. प.पू. डॉक्टर भेटीला जातांना त्या संतांना दाखवण्यासाठी दैवी पालट झालेल्या, तसेच अनिष्ट शक्तींची आक्रमणे झालेल्या काही निवडक वस्तू ठेवलेला खोका घेऊन गेले होते. भेट संपेपर्यंत त्या संतांचे शिष्य बाहेर त्यांची वाट पहात उभे होते. भेट संपली, तेव्हा आश्रमातील बहुतांश साधक झोपले होते. प.पू. डॉक्टर तो खोका हातात घेऊन कक्षातील दिवा आणि पंखा बंद करून बाहेर आले. तेव्हा त्या संतांनी विचारले, तुमचे शिष्य ही कामे करत नाहीत का ? त्या वेळी प.पू. डॉक्टर म्हणाले, मीही आश्रमातील एक शिष्यच आहे. मी आश्रमात प.पू. भक्तराज महाराजांचा शिष्य असल्याप्रमाणेच रहातो. याचे त्या संतांना पुष्कळ आश्‍चर्य वाटले. हा प्रसंग प.पू. डॉक्टरांनी एकदा साधकांना सांगितला. तेव्हा ते म्हणाले, नेहमी शिष्यावस्थेत राहिल्यास आपण आनंदी राहू शकतो. शिष्य म्हणजे शिकण्याच्या स्थितीत !

साधकांना सूचना

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
काल पौर्णिमा झाली.

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज 
सनातनचे श्रद्धास्थान
आनंद माझ्या मागे आहे. दुःख माझ्या पुढे आहे. माझ्या मागे जो आनंद
आहे, तो तुमच्या मागे येईल, तेव्हा मी सुखी होईन. मी दुःखी आहे.
     भावार्थ : ‘आनंद माझ्या मागे आहे’, याचा अर्थ याप्रमाणे आहे. सुषुम्ना नाडीतून शक्तीप्रवाह जाऊ लागला की, आनंदाची अनुभूती येते. ही सुषुम्ना नाडी पाठीच्या मणक्यातून, म्हणजे शरीराच्या मागच्या भागातून जात असल्याने ‘आनंद माझ्या मागे आहे’, असे म्हटले आहे. ‘दुःख माझ्या पुढे आहे’ म्हणजे प्रकृतीमुळे निर्माण झालेले भोग समोर येतात, त्याचे दुःख होत असते. ‘मी दुःखी आहे’ म्हणजे तुम्ही नामजप करून आनंदी होत नाही, याचे मला दुःख आहे.
(संदर्भ ः सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण)

क्षयरोगावर खोकल्याचे औषध देण्यासारखा ‘नोटा पालटणे’ हा वरवरचा हास्यास्पद उपाय आहे !

परात्पर गुरु डॉ. आठवले
परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
      ‘आता ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा सरकारने रहित केल्या आहेत आणि २००० रुपयांच्या नोटा व्यवहारात आणल्या आहेत. पुढे २००० रुपयांच्या नकली नोटा व्यवहारात येतील. पुढे त्याही पालटाव्या लागतील. असे कायमचे चालू राहील. समाजातील गुन्हेगारी वृत्ती नाहीशी केल्याशिवाय सर्व तर्‍हेचे गुन्हे थांबणार नाहीत. त्यावरचा एकमेव उपाय म्हणजे सर्वांना सात्त्विक करण्यासाठी त्यांच्याकडून साधना करवून घेणे. हिंदु राष्ट्रात सर्वांकडून साधना करवून घेतली जाईल; म्हणून तेव्हा गुन्हेगार नसल्याने कोणत्याही प्रकारचे गुन्हे होणार नाहीत.’
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले


बोधचित्र


प.पू. डॉक्टरांनी साधकांना केलेले अमूल्य मार्गदर्शन

१. भावाचे महत्त्व 
     ‘भावात आनंद आहे. भावानंतर शांतीचा टप्पा आहे. भावाच्या स्थितीत जाणे अवघड असते. सतत शरणागत भावाने प्रयत्न करायला हवेत. भावाच्या स्तरावर असणार्‍या साधकांची प्रार्थना देव ऐकणारच ! भाव-भक्ती वाढली की, शक्ती वाढते. पुढील आपत्काळात ज्यांच्यात शारीरिक बळ आहे, ते शारीरिक स्तरावर कार्य करतील. ज्यांच्यात बौद्धिक बळ आहे, ते नियोजन करतील आणि या दोघांनाही चैतन्य पुरवण्याचे कार्य भाव असणारे, म्हणजेच आध्यात्मिक बळ असणारे साधक करतील; मात्र त्या वेळी हे चैतन्य ग्रहण करण्याची क्षमता साधकांत असायला हवी. त्यासाठी आता नामजप आणि साधना करणे आवश्यक आहे.

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

दुसर्‍याच्या चांगल्या गुणाचा अंगीकार करा !
‘गुणग्राहकता’ हा सद्गुण अंगिकारून दुसर्‍याच्या चांगल्या गुणाचा अंगीकार करावा. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

तंबाखू आणि भारतीय महिला !

संपादकीय
       आरोग्य मंत्रालय, डब्लूएच्ओ, हिलीस सेक्षारिया इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, सेंटर फॉर डिसिज कंट्रोल अ‍ॅण्ड प्रिव्हेन्शन आणि अमेरिका येथील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट या सगळ्यांनी मिळून तंबाखू खाणार्‍यांवर त्याचा काय प्रभाव पडतो याचा एक सविस्तर अहवाल १२ नोव्हेंबर या दिवशी घोषित केला आहे. यात प्रत्येक वर्षी ८५ सहस्र पुरुष आणि ३४ सहस्र महिलांना कर्करोग होतो, यातील ९० प्रतिशत लोक कोणत्या ना कोणत्या स्वरूपात तंबाखूचा वापर करतात, असे पुढे आले आहे.

अणूऊर्जा आणि भारत !

संपादकीय
    भारतात ऊर्जेची मागणी प्रतिदिन वाढतच आहे, त्यामुळे नैसर्गिक ऊर्जास्रोतांना मर्यादा येत आहेत. देशातील कोळसा अन्य मार्ग यांमुळे वायू, तसेच अन्य प्रदूषण न होण्यासाठी भारत अधिकाधिक अणूऊर्जेच्या वापराकडे वळत आहे. त्या दृष्टीने गेल्या पाच-सहा वर्षांपासून वाटचालही चालू आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जपान दौर्‍यात झालेल्या अणूकराराच्या निर्णयास विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. अण्वस्त्रचाचणीबंदी करार (सीटीबीटी) आणि अण्वस्त्र प्रसारबंदी करार (एन्पीटी) या दोन्हीवर भारताने स्वाक्षरी केली नसल्याने नागरी अणूकरार करण्यास जपानने आतापर्यंत नकार दिला होता; मात्र वर्ष २०१६ मध्ये जपानसमोर निर्माण झालेली परिस्थिती आणि श्री. मोदी यांची कुशलता यांमुळे हा करार पूर्णत्वास गेला. सुमारे सात वर्षांनंतर झालेला हा करार भारत आणि जपान या दोघांसाठीही ऐतिहासिक असाच म्हणावा लागेल. या करारामुळे जपानकडून अणूभट्या उभारणे, त्याचे तंत्रज्ञान आणि सुटे भाग मिळवणे, हे शक्य होणार आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn