Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

३० डिसेंबरनंतर आणखी कठोर निर्णय घेणार ! - पंतप्रधान मोदी यांचे सुतोवाच

    टोकियो - ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या नोटा पालटण्यासाठी ३० डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. ही योजना पूर्ण झाल्यानंतर आम्ही तिथेच थांबणार नाही. मी संधी दिली होती; मात्र त्या वेळी काळा पैसा जमवणार्‍यांनी लक्ष दिले नाही. काळा पैसेवाल्यांना धडा शिकवण्यासाठी आणखी कठोर निर्णय घेतला जाईल, अशी चेतावणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे दिली. जपानच्या दौर्‍यावर असलेल्या पंतप्रधानांनी कोबे येथे अनिवासी भारतियांना मार्गदर्शन करतांना वरील विधान केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले,
१. नोटा चलनातून बाद करण्यात आल्यानंतर या निर्णयाचे सामान्य जनतेने ज्या पद्धतीने स्वागत केले आहे, त्याला माझा सलाम आहे. देशाच्या गरिबांनी श्रीमंती दाखवली, श्रीमंतांची गरिबी तर अनेकदा पाहिली आहे.
२. सरकारच्या निर्णयाचा त्रास होत असला, तरी लोक सरकारच्या बाजूने उभे आहेत. अशा प्रामाणिक लोकांच्या पाठीशी सरकार नेहमीच उभे रहाणार आहे; मात्र जे काळा पैसा बाळगत आहेत, त्यांची कदापि सुटका नाही.
३. नोटबंदी हे एक सर्वांत मोठे स्वच्छता अभियान आहे. कोणाला त्रास देण्याच्या उद्देशाने हे अभियान चालू करण्यात आलेले नाही.

कर्नाटकात २ सहस्र रुपयांची बनावट नोट !

काळा पैसा रोखण्याच्या प्रयत्नाला प्रारंभीच धक्का !
    चिकमगळूर (कर्नाटक) - काळा पैसा रोखण्यासाठी केंद्र सरकारने ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या नोटा चलनातून बाद करून २ सहस्र रुपयांची नोट आणण्याला २ दिवस उलटण्यापूर्वीच २ सहस्र रुपयांची बनावट नोट सापडली आहे. कर्नाटकातील चिकमगळूर एपीएम्सी बाजारात कांदा विक्रेता अशोक नावाच्या व्यक्तीला कांदा विकल्यानंतर कोणीतरी ही बनावट नोट दिली आहे. २ सहस्र रुपयांच्या नोटेच्या दोन्ही बाजूंची रंगीत झेरॉक्स काढून एकमेकांना चिकटवून २ सहस्र रुपयाची नोट बनवली आहे. कांदा विक्रेत्याच्या हे लक्षात आल्यानंतर त्याने ही माहिती पोलिसांना दिली.

लोकांनी संयम बाळगल्यास सर्वकाही पूर्ववत होईल ! - अर्थमंत्री अरुण जेटली

   नवी देहली - आम्ही आधीपासूनच पर्यायी व्यवस्था केली असती, तर गोपनीयता राहिली नसती. लोकांना त्रास होत आहे हे खरे असले, तरी व्यवस्था चोख ठेवण्यात आली आहे. सर्व व्यवहार सुरळीत चालू आहेत. बँकांबाहेर रांगा असल्या, तरी कोणताही गोंधळ नाही. बँकेचे कर्मचारी सुट्टी न घेता काम करत आहेत. सगळ्यांना एकाच वेळी नोटा पालटून देणे शक्य नाही. अद्याप बरीच मुदत आहे. त्यामुळे थोडा संयम बाळगल्यास सर्वकाही पूर्ववत होईल, असे आवाहन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केले आहे. बँकांमध्ये नोटा पालटण्याच्या प्रक्रियेवर सतत लक्ष ठेवले जात आहे, असेही त्यांनी नमूद केले.

चलनपालट पूर्ण होईपर्यंत अधिकोषातून प्रतिव्यक्ती ४ सहस्र रुपयांपर्यंतच्याच नोटा पालटता येणार !

    मुंबई - चलनातील पालट पूर्ण होईपर्यंत नोटा पालटून घेतांना एका व्यक्तीला ४ सहस्र रुपयांपर्यंतच्या नोटा पालटून घेता येणार आहेत.
    रिझर्व्ह बँकेने चलनातील पालट पूर्ण होईपर्यंत खातेदाराला ४ सहस्र रुपयांपर्यंत नोटा पालटता येतील, असे परिपत्रक लागू केले आहे; मात्र त्यात नमूद करण्यात आलेल्या एका दिवसाला ४ सहस्र रुपये या आदेशाचा चुकीचा अर्थ घेतला जात असल्याचे आता स्पष्ट होत आहे. ८ नोव्हेंबरला जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, नोटा पालटून घेतांना त्यांचे एकत्रित मूल्य ४ सहस्र रुपये किंवा त्यापेक्षा अल्प असेल, तर या नोटा पालटून मिळणार आहेत. याचा अर्थ ४ सहस्र रुपये प्रतिव्यक्ती दिले जाणार आहेत; परंतु हा चलनपालट त्या व्यक्तीला एकदाच करता येणार आहे. ही स्थिती साधारणपणे २२ नोव्हेंबरपर्यंत किंवा रिझर्व्ह बँकेने आढावा घेईपर्यंत रहाणार आहे.

भारतीय कार्यक्रम दाखवल्यामुळे पाकमध्ये अमेरिकी वाहिनीवर बंदी !

भारतातील पाकप्रेमी आता गप्प का ?
     हिंदीमध्ये डब (अनुवादित) केलेल्या कार्टून मालिका पाकमध्ये दाखवल्यामुळे पाकिस्तान प्रसारमाध्यम नियामक प्राधिकरणाने अमेरिकी वाहिनी निकलोडियनचा परवाना रहित केला आहे. भारताबरोबरील संबंधात तणाव निर्माण झाल्यामुळे पाकने काही दिवसांपूर्वी भारतीय वाहिन्या आणि रेडिओ यांवर पूर्णपणे बंदी घातली होती.

तिलारी प्रकल्पग्रस्त १६ नोव्हेंबरला घेणार जलसमाधी : १३ नोव्हेंबरला प्रकल्पग्रस्तांची बैठक

तिलारी धरण प्रकल्पग्रस्तांचा संघर्ष चालूच 
      सिंधुदुर्गनगरी - तिलारी प्रकल्पग्रस्तांना नोकरी नाही, तर एकरकमी भरपाई द्यावी, या मागणीसाठी गेली नऊ वर्षे संघर्ष करूनही प्रकल्पग्रस्तांना एकरकमी प्रत्येकी ५ लाख रुपये देण्यास गोवा आणि महाराष्ट्र सरकार टाळाटाळ करत आहे. पालकमंत्र्यांकडूनही प्रगल्पग्रस्तांची फसवणूक केली जात आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी बुधवार, १६ नोव्हेंबरला तिलारी मुख्य धरणात जलसमाधी घेण्याचा निर्णय घेतला आहे. प्रकल्पग्रस्त जलसमाधी आंदोलनाच्या नियोजनासाठी रविवार, १३ नोव्हेंबरला दुपारी २ वाजता आयनोडे येथील श्री भूतनाथ मंदिरामध्ये बैठक आयोजित केली आहे. या बैठकीला प्रकल्पग्रस्तांनी उपस्थित राहवे, असे आवाहन तिलारी प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या वतीने संजय नाईक यांनी पत्रकारांना माहिती देतांना केले. (शासनाने यापूर्वी दिलेली आश्‍वासने पाळलेली नाहीत, असा अनुभव अनेक प्रकल्पग्रस्तांना आला आहे. त्यामुळेच नवीन प्रकल्प उभारणीला जनता विरोध करते. स्वत:चे मानधन वाढवून घेतांना एकजूट दाखवणारे सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी प्रकल्पग्रस्तांची फरपट होत असतांना गप्प का ? - संपादक)

(म्हणे) राष्ट्रीय वृत्तवाहिनीवर कारवाई करणे चुकीचे !

हिंदु जनजागृती समितीच्या संकेतस्थळावर कित्येक दिवस बंदी होती, तेव्हा
हे अभिव्यक्ती स्वातंत्र्यवाले कुठे होते ? कि हिंदुत्वनिष्ठांना या देशात स्वातंत्र्य नाही ?
  • अभिव्यक्ती स्वातंत्र्य रक्षणाच्या आड देशघातकी कृत्याला पाठीशी घालणारे पुरो(अधो)गामी डॉ. गणेश देवी !
  • देशद्रोही कृत्याला पाठिंबा देणारे देशद्रोहीच होत !
     पणजी, १२ नोव्हेंबर (वार्ता.) - देशातील एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीवर कारवाई करणे चुकीचे आहे. संविधान प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य देते. वृत्तवाहिनीवर बंदी घालणे अवैध आहेे, असे प्रतिपादन गुजरात येथील पुरो(अधो)गामी लेखक डॉ. गणेश देवी यांनी येथे पत्रकार परिषदेत केले. (बंदी घालणे अवैध असेल, तर वृत्तवाहिनी न्यायालयात दाद मागू शकते; पण ती तसे करणार नाही; कारण न्यायालयही त्या वाहिनीला देशविरोधी वृत्त दाखवल्याविषयी फटकारणारच ! गणेश देवी या वृत्तवाहिनीला न्यायालयात जायचा सल्ला का देत नाहीत ? - संपादक) मडगाव, गोवा येथे १८ नोव्हेंबरपासून आयोजित करण्यात आलेल्या दक्षिणायन परिषदेविषयी माहिती देण्यासाठी परिषदेचे आयोजक डॉ. देवी यांनी ही पत्रकार परिषद घेतली होती.

बिहारमध्ये दैनिक भास्करच्या पत्रकाराची हत्या !

  • बिहारमधील जंगलराज !
  • दाभोलकर, पानसरे आणि कलबुर्गी यांच्या हत्येनंतर ऊर बडवणारे निरपराध आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवणार्‍या पत्रकारांच्या हत्येविषयी मात्र मौन बाळगतात !
पाटलीपुत्र - बिहारच्या सासाराम जिल्ह्यात १२ नोव्हेंबरला सकाळी दैनिक भास्करचे पत्रकार धर्मेंद्र सिंह यांची गोळी घालून हत्या करण्यात आली. दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्यांची हत्या केली. तिघे आरोपी घटनास्थळाहून फरार झाले. धर्मेंद्र हे सासाराममध्ये अवैध खाण माफियांच्या निशाण्यावर होते. त्यांच्या हत्येनंतर लोकांनी रस्त्यावर उतरून आरोपींच्या अटकेची मागणी केली. १३ मे या दिवशी पत्रकार राजदेव रंजन यांचीही हत्या झाली होती.

म्हापसा येथील सेंट झेवियर महाविद्यालयात पोर्तुगीज दिन साजरा !

पोर्तुगिजांनी गोमंतकियांवर केलेल्या अत्याचाराच्या व्रणांवर मीठ चोळण्याचा प्रकार !
देशप्रेमी नागरिकांनो असे कार्यक्रम आयोजित करणार्‍या सेंट झेवियर 
महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाला याविषयी विचारा ! या पोर्तुगीजधार्जिण्या
महाविद्यालयाचे अनुदान आणि मान्यता रहित करण्याची मागणी का करू नये ?
    म्हापसा येथील सेंट झेवियर महाविद्यालयाने फुंदासाव ओरियंट आणि इन्स्टिट्यूट कामोईश यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालय आवारात नुकताच पोर्तुगीज दिन साजरा केला. (हिंदूंवर अनन्वित अत्याचार करण्यासाठी इन्क्विझिशन राबवणारा ख्रिस्ती धर्मगुरु झेवियर याचे नाव असलेल्या महाविद्यालयात पोर्तुगीज दिन साजरा केला गेला यात नवल नाही. - संपादक)

हिंदूंच्या देवता आणि राष्ट्रपुरुष यांची चित्रे असलेल्या गोणपाटांचा वापर थांबवण्याविषयी पणजी येथील व्यापार्‍यांचे प्रबोधन : उपक्रमाला व्यापार्‍यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

देवतांचे विडंबन टाळण्यासंबंधी हिंदु जनजागृती समितीचा उपक्रम !
पणजी येथील भगत एन्टरप्राईझेस आस्थापनाच्या
मालकाला निवेदन देतांना हिंदु जनजागृती
समितीचे शिष्टमंडळ
      पणजी, १२ नोव्हेंबर (वार्ता.) - हिंदु जनजागृती समितीने हिंदूंच्या देवता आणि राष्ट्रपुरुष यांची चित्रे असलेले गोणपाट वापरणे थांबवून देवतांची होणारी विटंबना टाळण्यासंबंधी नुकतेच गोव्याची राजधानी असलेल्या पणजी येथील व्यापार्‍यांचे प्रबोधन केले. पणजी येथील व्यापार्‍यांनी हा उपक्रम चांगला असल्याचे सांगून या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद दर्शवला. 
     या उपक्रमांतर्गत हिंदु जनजागृती समितीच्या एका शिष्टमंडळाने पणजी येथील व्यापारी अजय अमित ट्रेडर्स, दामोदर लक्ष्मीदास, काशीनाथ भोबे, भगत एन्टरप्राईझेस आणि पै ट्रेडर्स या व्यापार्‍यांची भेट घेऊन त्यांचे या विषयावर प्रबोधन केले.

हिंदु जनजागृती समिती करत असलेले हिंदूसंघटन ही काळाची आवश्यकता ! - श्री. तोळयो गावकर, सरपंच, गोवा

हिंदूसंघटन मेळाव्याच्या निमित्ताने गोव्यातील 
केपे तालुक्यातील काजूर गावातील हिंदूंची बैठक !
     काणकोण, १२ नोव्हेंबर (वार्ता.) - हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्र आणि धर्म यांविषयीचे कार्य मी सतत वृत्तपत्रातून वाचतो. समितीच्या कार्यकर्त्यांनी केपे तालुक्यातील दुर्गम भागत असलेल्या आमच्या काजूर गावात हिंदूसंघटन मेळाव्यानिमित्त बैठक घेऊन केलेले मार्गदर्शन प्रेरणादायी आणि समाज, राष्ट्र आणि धर्म यांच्या हिताचे आहेे. असे कार्य ही काळाची आवश्यकता आहे. समितीच्या या कार्याला आम्ही आवश्यक ते सर्व सहकार्य करणार, असे प्रतिपादन गोव्यातील काजूर गावचे पंचसदस्य आणि कावरे-पिर्ला ग्रामपंचायतीचे सरपंच श्री. तोळयो गावकर यांनी स्थानिक हिंदूंच्या बैठकीत बोलतांना केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २० नोव्हेंबर या दिवशी आयोजित हिंदूसंघटन मेळाव्याच्या आयोजनाच्या निमित्ताने अलीकडेच ही बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत हिंदु जनजागृती समितीच्या सौ. ज्योती पैंगीणकर यांनी राष्ट्र आणि धर्म यांच्या सद्यस्थितीचा विषय मांडला.

रायचूर (कर्नाटक) येथे सनातनचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन

डावीकडून श्री. सुरेंद्र चाळके,
श्री. रमेश बी आणि श्री. ए. मारेप्पा
       रायचूर (कर्नाटक) - येथे सनातनचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादन यांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन नुकतेच येथील माजी नगराध्यक्ष ए. मारेप्पा यांच्या हस्ते करण्यात आले. धर्मरथामध्ये लावण्यात आलेल्या प्रदर्शनाच्या उद्घाटनाच्या वेळी हिंदु जनजागृती समितीचे रायचूर समन्यवक श्री. रमेश बी, श्री. सुरेंद्र चाळके, धर्माभिमानी श्री. श्याम यादव आणि श्री. मल्लिकार्जुन स्वामी उपस्थित होते.

(म्हणे) तिबेट चीनचाच भाग आहे !

नेपाळचेे माजी पंतप्रधान शेर बहादूर देऊबा यांचे चीनप्रेमी विधान !
      काठमांडू - नेपाळ काँग्रेस अध्यक्ष आणि ३ वेळा नेपाळच्या पंतप्रधानपदावर राहिलेले शेर बहादूर देऊबा त्यांचा ६ दिवसांचा भारताचा ६ दौरा आटपून नेपाळला परत गेले; मात्र तेथे जाऊन त्यांनी त्यांचे चीनप्रेम व्यक्त करत तिबेट चीनचाच भाग आहे, असे विधान केले.
     देऊबा यांनी त्यांच्या भारताच्या दौर्‍याची माहिती पत्रकारांना देतांना सांगितले की, मी गोव्याला एका परिषदेत भाग घेण्यास गेलो होतो; मात्र तेथे तिबेटच्या नेत्यांची भेट घेतली ही घटना चुकीची आहे. 
     देऊबा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतली. मोदी यांच्या सदिच्छा नेपाळला आहेत, असे ते म्हणाले. नेपाळच्या घटनेत आवश्यक ते पालट करून मधेसी प्रदेशातील जनतेच्या आशाआकांक्षा पूर्ण करण्यात येतील, असेही देऊबा म्हणाले.


स्वाक्षरी मोहिमेद्वारे केलेल्या जागरूकतेमुळे १५ वर्षे प्रलंबित सार्वजनिक शौचालयाच्या नळवाहिनी दुरुस्तीच्या कामाला महापालिकेकडून प्रारंभ

आझाद गल्ली, चुनाभट्टी येथील रहिवाशांच्या संघटित कृतीचे यश !
सर्वांचे हित साधणार्‍या हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी अशा प्रकारे संघटित होऊया !
   मुंबई, १२ नोव्हेंबर (वार्ता.) - आझाद गल्ली, चुनाभट्टी येथील गौरीशंकर चाळीजवळील सार्वजनिक शौचालयाच्या सांडपाण्याची नळवाहिनी फुटल्याने मागील १५ वर्षांपासून दुर्गंधी, अस्वच्छता यांमुळे स्थानिक रहिवाशी त्रस्त झाले होते. याविषयी येथील जागरूक रहिवाशांनी स्वाक्षरी मोहीम राबवून या समस्येविषयी जागृती निर्माण करण्यास प्रारंभ केला. याविषयी माहिती मिळताच स्थानिक नगरसेवकांनी तातडीने येथील शौचालयांच्या सर्व टाक्या आणि नळवाहिन्या यांची दुरुस्ती केली. यासाठी राबवण्यात आलेल्या स्वाक्षरी मोहिमेत ५०० रहिवाशांच्या स्वाक्षर्‍या घेऊन हे काम होण्यासाठी सर्वांचे एकमत झाले. ही स्वाक्षरी मोहीम राबवण्यासाठी सर्वश्री मनोज यादव, राजेश पाल, संदीप पाल, राकेश पाल, श्रीराम यादव, सचिन पाटील, जितल कनोजिया, प्रशांत चौबे, निशांत चौबे, अमर सिंग, मनिष पाल यांनी पुढाकार घेतला. हे युवक हिंदु जनजागृती समितीच्या धर्मशिक्षणवर्गात येतात.

बजरंग दलाच्या कार्यकर्त्याच्या हत्येप्रकरणी अटकेत असणार्‍या मुस्तफाची कारागृहात हत्या !

    म्हैसुरू - वर्ष २०१५ मध्ये बजरंग दलाचा कार्यकर्ता प्रशांत पुजारी यांच्या हत्येच्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या २८ वर्षीय मुस्तफा कंवूर याची येथील कारागृहात हत्या करण्यात आली आहे. करण शेट्टी या कैद्याकडून मुस्तफा याची हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे. करण हा प्रशांत याचा मित्र होता. करण गेल्या २ वर्षांपासून हत्येचा प्रयत्न करण्याच्या गुन्ह्यात या कारागृहात आहे. मुस्तफा याला काही महिन्यांपूर्वी म्हैसुरू कारागृहात आणण्यात आले होते. करण आणि मुस्तफा यांच्यात पुजारी यांच्या हत्येवरून वाद झाला आणि नंतर करण याने धारदार चमच्याने मुस्तफाला ठार केले.

नोटा रहित झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात सोने विक्री करणार्‍या सराफांच्या व्यवहाराची चौकशी होणार !

    नवी देहली - नोटा रहित झाल्यानंतर देशात मोठ्या प्रमाणात नागरिकांनी सोने खरेदीकडे मोर्चा वळवला होता. अनेकांनी काळा पैसा पांढरा करण्यासाठी सोन्यामध्ये गुंतवणूक केली. या व्यवहाराची आता केंद्र सरकारचे केंद्रीय उत्पादन अन्वेषण महासंचालनालय चौकशी करणार आहे. त्याने देशातील २५ शहरांतून ६०० हून अधिक सराफांकडून ७ नोव्हेंबरपासून ४ दिवसांत किती सोने विकले गेले याचा तपशील मागितला आहे. यामध्ये त्यांच्याकडे सोन्याचा किती साठा होता आणि किती विकला याचा तपशील द्यायचा आहे. उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी देशातील प्रमुख ज्वेलर्सच्या दालनांना भेटी देऊन हा तपशील मागत आहेत.

हिंदूंनो, धर्मसंस्थापनेसाठी भगवतांला घेऊन कुरुक्षेत्रात लढायचे आहे ! - प.पू. स्वामी कृष्णानंद सरस्वती, मठाधिपती, रामदास आश्रम, बदलापूर

उल्हासनगर येथील प्रांतीय हिंदू अधिवेशनाचा प्रथम दिवस
हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी दिशादर्शक असणार्‍या प्रांतीय हिंदू अधिवेशनास उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ ! 
दीपप्रज्वलन करतांना प.पू. स्वामी कृष्णानंद सरस्वती, सौ. दीक्षा 
पेंडभाजे, सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर आणि डॉ. उदय धुरी
     उल्हासनगर (जि. ठाणे), १२ नोव्हेंबर (वार्ता.) - भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला नदीकाठी नाही, तर जेथे रक्त सांडले, लढाई चालू होती, त्या कुरुक्षेत्रात गीता सांगितली. आपल्याला मंदिरात जाऊन रडायचे नाही, तर भगवंताला समवेत घेऊन धर्मसंस्थापनेसाठी लढायचे आहे, असे मार्गदर्शन बदलापूर (जि. ठाणे), रामगिरी येथील रामदास आश्रमाचे मठाधिपती प.पू. स्वामी कृष्णानंद सरस्वती यांनी केले. 

हिंदुत्वनिष्ठ नेते शिवप्रसाद जोशी यांची शिवसेनेचे गोवा सहराज्यप्रमुखपदी नेमणूक !

श्री. शिवप्रसाद जोशी
 पणजी, १२ नोव्हेंबर (वार्ता.) - हिंदुत्वरक्षणाची तळमळ असलेले गोव्यातील हिंदुत्वनिष्ठ नेते श्री. शिवप्रसाद जोशी यांची शिवसेनेचे सहराज्यप्रमुखपदी नेमणूक करण्यात आली आहे. १२ नोव्हेंबर या दिवशी पणजी येथील पत्रकार परिषदेत शिवसेनेचे गोवा राज्य संपर्कप्रमुख श्री. संजीव कामत यांनी या नेमणुकीविषयी घोषणा केली.
श्री. संजीव कामत म्हणाले, शिवसेनेचा गोव्यात व्याप वाढला आहे. हा वाढता व्याप सांभाळण्यासाठी शिवसेना गोवा राज्यप्रमुख सुदीप ताम्हणकर यांच्या बरोबरीने श्री. शिवप्रसाद जोशी पक्षाच्या गोव्यातील कार्याची धुरा सांभाळणार आहेत. पेडणे येथील श्री. शिवप्रसाद जोशी हे गेली अनेक वर्षे हिंदु महासभेच्या माध्यमातून हिंदुत्वाचे कार्य निरपेक्षपणे करत आहेत. गेली अनेक वर्षे ते हिंदु महासभेचे गोवा अध्यक्ष आहेत, तसेच त्यांचा आध्यात्मिक स्तर ६१ टक्के आहे.

भारताप्रमाणे आता पाकमध्येही मोठ्या नोटांवर बंदी घालण्याची मागणी !

   इस्लामाबाद - भारतात ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या नोटा बंद करण्यात आल्यानंतर आता पाकनेही १ सहस्र आणि ५ सहस्र रुपयांच्या नोटा बंद करण्याची मागणी केली आहे. पाकिस्तान पिपल्स पार्टीचे (पीपीपीचे) खासदार उस्मान सैफुल्ला खान यांनी मोठ्या नोटा बंद करण्याचा प्रस्ताव संसदेत मांडला. भ्रष्टाचार रोखणे आणि काळा पैसा बाहेर काढणे यांसाठी भारताचे अनुकरण करण्याचा सल्लाही सरकारला दिला आहे.

उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत बनावट मद्य जप्त !

मद्यवाटप करून मतांचे दान मागण्याची वेळ आणणारी निरर्थक लोकशाही !
    जळगाव, १२ नोव्हेेंबर (वार्ता.) - नगरपालिका आणि विधान परीषद निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर अवैध मद्याचा साठा जप्त करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने भरारी पथके निर्माण केली आहेत. या पथकाने १० नोव्हेंबर या दिवशी पूरनाड (तालुका मुक्ताईनगर) सीमा तपासणी नाक्यावर सवालाखाचे अवैध मद्य जप्त केले. यासोबतच सवादोन लाखांची कार असा साडेतीन लाखांचा ऐवज पकडण्यात आला आहे. बुरहानपूर (मध्यप्रदेश) येथून आलेले हे अवैध मद्य महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात विक्रीसाठी वापरण्यात येणार होते. महाराष्ट्रात या मद्यावर बंदी आहे.

तेलंगणच्या कारागृहातून २ कैद्यांचे पलायन !

भारतातील भगदाडे असणारी कारागृहे !
    वारंगळ (तेलंगण) - येथील मध्यवर्ती कारागृहातून १२ नोव्हेंबरला पहाटे राजेश यादव आणि सिंह नावाचे एक सैनिक या २ कैद्यांनी पलायन केले. त्यांनी चादरीचा रस्सीसारखा वापर करून ते पळून गेले. यादव हत्येच्या, तर सिंह एका कोर्ट मार्शल प्रकरणी कारागृहात होते. त्यांना २ महिन्यांपूर्वी भाग्यनगरच्या चेरलापल्ली कारागृहातून येथे आणण्यात आले होते. पोलीस या दोघांचा शोध घेत आहेत.

सिंचन घोटाळ्यामुळेच आघाडीची सत्ता गेली ! - हर्षवर्धन पाटील

     इंदापूर (पुणे), १२ नोव्हेंबर राज्यात सत्तर सहस्र कोटींचा सिंचन घोटाळा केल्यामुळेच आघाडी सरकारची सत्ता गेली, असे प्रतिपादन काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी केले. अजित पवार यांनी १२० कोटींचा जरंडेश्‍वर सहकारी साखर कारखाना केवळ ७ कोटी रुपयांना खरेदी केला असा खासदार राजू शेट्टी यांचा आरोप खरा आहे, असेही हर्षवर्धन पाटील म्हणाले. अजित पवार यांनी त्यांच्यावर केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देतांना ते बोलत होते. (आघाडी सरकारमध्ये काँग्रेसपक्षही सत्तेत होताच. मग काँग्रेसने या भ्रष्टाचाराला का आळा घातला नाही ? - संपादक)

(म्हणे) मराठा आरक्षणासाठी घटनादुरुस्ती हाच पर्याय ! - रामदास आठवले

आरक्षणाने पोखरलेला भारत ! नरेंद्र मोदी यांनी जातीवर आधारित आरक्षण नष्ट करून देशाला लागलेली कीडही नष्ट करावी, ही अपेक्षा ! 
     कोल्हापूर, १२ नोव्हेंबर - मराठा आरक्षणाचे सूत्र न्यायालयीन पातळीवर कितपत टिकू शकेल, याविषयी साशंकता आहे. कायमस्वरूपी आरक्षण देण्यासाठी घटनेत दुरुस्ती करणे, हाच पर्याय आहे. त्यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने होत असलेल्या मराठा-दलित ऐक्य परिषदेसाठी शहरात आल्यावर पत्रकारांशी बोलतांना त्यांनी हे वक्तव्य केले.

मराठा आरक्षणासाठी जनहित याचिका दाखल !

      पुणे, १२ नोव्हेंबर - मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका प्रविष्ट करण्यात आली आहे. आरक्षणासाठी विशेष असामान्य परिस्थिती म्हणून मराठा क्रांती मोर्च्याची नोंद घ्यावी, अशी विनंती याचिकाकर्ते बाळासाहेब सराटे यांच्याकडून करण्यात आली आहे.

दैनिक सनातन प्रभात म्हणजे आकाशात तळपणारा सूर्य आहे ! - पू. संभाजीराव भिडेगुरुजी

डावीकडे पू. संभाजीराव भिडेगुरुजी
यांना माहिती देतांना श्री. राहुल कोल्हापुरे
     सातारा, १२ नोव्हेंबर (वार्ता.) - आतापर्यंत मी अनेक दैनिकांचे वाचन केले. त्यांचे विचारही अनुभवले. आंधार पडल्यावर काजवे चमकू लागतात, तारे चमकू लागतात, चंद्र प्रकाशित होतो; मात्र या सर्वांपुढे जेव्हा सूर्य उगवतो, तेव्हा या सर्वांचा प्रकाश नसल्याप्रमाणे होतो. दैनिक सनातन प्रभातचेही तसेच आहे. दैनिक सनातन प्रभात म्हणजे आकाशात तळपणारा सूर्य आहे, असे गौरोवोद्गार श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी काढले. 
  येथील नवीन एम्.आय.डी.सी.मध्ये एका कार्यक्रमासाठी पू. भिडेगुरुजी आले होते. तेव्हा दैनिक सनातन प्रभातच्या वार्ताहराशी ते बोलत होते. या वेळी श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हाप्रमुख श्री. सतीश (बापू) ओतारी, सर्वश्री सुधन्वा गोंधळेकर, आेंकार डोंगरे, चंदन जाधव, संभाजी जगताप, हिंदु जनजागृती समितीचे श्री. विनायक कुलकर्णी आदी उपस्थित होते.

जळगाव येथे वाहनातून धर्मांधाकडून ४ कोटी रुपये जप्त

     जळगाव, १२ नोव्हेंबर (वार्ता) - मुक्ताईनगर तालुक्यातील अंर्तुली फाट्याजवळ एका वाहनातून तीन बॅगांमधून जुन्या ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा पोलिसांनी जप्त केल्या आहेत. या नोटांचे एकूण मूल्य ४ कोटी रुपये एवढे आहे. मलकापूर येथील शब्बीर हुसेन हा एका गाडीने बुर्‍हानपूर (मध्यप्रदेश) येथे जात असतांना अंर्तुली फाट्याजवळ पोलिसांना संशय आल्याने गाडी थांबवून ही कारवाई केली.

विमा आस्थापनांच्या मनमानी कारभाराच्या विरोधात सर्व मालवाहतूक वाहनधारक आंदोलन करणार ! - मनसे

     कोल्हापूर, १२ नोव्हेंबर (वार्ता.) - रिक्शा, मालवाहतूक ट्रक, डंपर अशा अनेक प्रकारांतील जिल्ह्यातील सहस्रो वाहनधारक गेल्या ४० वर्षांपासून अन्यायीरूपी विमाच्या माध्यमांतून भरडला जात आहे. महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीने या अन्यायरूपी विम्याच्या विरोधात तीव्र लढा उभा करणार असून त्याचा प्रारंभ प्रथम महामार्ग बंद, रेल्वे बंद आंदोलनाद्वारे करणार आहे. त्यानंतरही निर्णय न झाल्यास वाहतूक सेनेच्या वतीने कोल्हापूर बंदची हाक दिली जाईल, अशी चेतावणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष श्री. राजू जाधव यांनी ११ नोव्हेंबर या दिवशी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. या वेळी सर्व क्षेत्रातील मालवाहतूकधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

नोटा नाकारून रुग्णांची गैरसोय केल्याविषयी कल्याण येथील खाजगी रुग्णालयास नोटीस

     कल्याण - पाचशे आणि एक सहस्रच्या नोटा नाकारून रुग्णाची गैरसोय केल्याविषयी कल्याण येथील फोर्टीज हॉस्पीटलला जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या निर्देशाप्रमाणे नोटीस बजावण्यात आली आहे.
      आरोग्य सेवा संचालनालय, तसेच जिल्हा शल्य चिकित्सक यांनी पाचशे आणि एक सहस्रचे चलन स्वीकारण्याविषयी जिल्ह्यातील सर्वच खाजगी रुग्णालयांना रुग्णांची गैरसोय होऊ नये, याविषयी सूचना दिल्या होत्या, तसेच आवाहनही केले होते. भिवंडीचे रतिलाल शहा या रुग्णाच्या १ लक्ष ७० सहस्र ११८ एवढ्या रकमेच्या देयकासाठी नोटा स्वीकारण्यास या रुग्णालयाच्या कर्मचार्‍यांनी नकार दिल्याने त्यांचा मुलगा मितेश शहा यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार केली.

संभाजी आरमारकडून तीव्र आंदोलनाची चेतावणी

छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या परिसराच्या सुशोभिकरणासाठी सोलापूर महानगरपालिकेला मंगळवारपर्यंत मुदत 
     सोलापूर - मागील दोन वर्षांपासून ३० लक्ष रुपये निधी संमत झाला असूनही छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या परिसराचे सुशोभिकरण करण्याच्या कामात दिरंगाई करणार्‍या महापालिका प्रशासनाला संभाजी आरमारने सात दिवसांची मुदत दिली आहे. त्या वेळेत कामाला प्रारंभ न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याची चेतावणी पालिका आयुक्त विजयकुमार काळम पाटील यांना दिला आहे.

५०० आणि १००० रुपयांच्या नोटा रहित केल्यानंतरचे काही पडसाद !

१. सोलापूरच्या महापौर सुशीला आबुटे यांनी तीन वर्षांचा थकीत मिळकत कर एकदम जमा केला. दंडासह सवालक्ष रुपयांची रक्कम त्यांनी पालिकेच्या तिजोरीत जमा केली. (महापौरच ३ वर्षे कर भरत नसतील, तर जनतेची काय कथा ? - संपादक) 
२. अकोला येथील मराठा हॉटेलचे मालक मुरलीधर राऊत यांनी त्यांच्या हॉटेलच्या बाहेर १००० किंवा ५०० रुपयांच्या नोटा नसतील, तर जेवणाची चिंता करू नका. जेवण करून जा. पुढच्या वेळी आलात की पैसे द्या ! असा फ्लेक्स लावला आहे. 
३. मुलुंडच्या हरिओम नगरमध्ये एका अधिकोषाच्या समोर नोटा पालटण्यासाठी रांगेत उभे असलेले वृद्ध गृहस्थ श्री. विश्‍वनाथ वर्तक (वय ७३ वर्षे) यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई भागात १०० रुपयांचा काळा बाजार जोमात

     मुंबई - ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या नोटा रहित झाल्यानंतर मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई भागांत दलालांकडून १०० रुपयांच्या देण्यासाठी २० ते ३० टक्के दलाली (कमिशन) म्हणून घेण्याचा काळा बाजार उघड उघड होत आहे. (ही कृती समाजद्रोही असून अशा दलालांवर शासनाने कठोर कारवाई करायला हवी. - संपादक) कृषिमालाच्या काही घाऊक बाजारांत हा अपप्रकार मोठ्या प्रमाणात चालू आहे. बाजारातील सुट्ट्या पैशांच्या टंचाईसदृश परिस्थितीमुळे १०० रुपयांचा एकगठ्ठा साठा असणारी मंडळी सक्रिय झाली आहेत. दलालांकरवी त्या नोटांच्या माध्यमातून जुन्या नोटा वटवण्याचे कार्य चालू आहे. 

भंगारवाल्याकडून ४ कोटी जप्त

     बुलढाणा, १२ नोव्हेंबर - आयकर विभाग सध्या देशात काळ्या पैशांवर लक्ष ठेवत विविध ठिकाणे छापे टाकत आहे. येथे टाकलेल्या छाप्यात एका भंगारवाल्याकडून ४ कोटी रुपये जप्त करण्यात आले.

वैशाली मोतेवार फरार

      पुणे, १२ नोव्हेंबर - समृद्ध जीवनचे महेश मोतेवार यांच्या पत्नी सौ. वैशाली मोतेवार फरार झाल्या असून यांना न्यायालयाने ७ डिसेंबर या दिवशी न्यायालयासमोर उपस्थित रहाण्याचा आदेश दिला आहे. फसवणूक केल्याच्या आरोपावरून चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात त्यांच्या विरुद्ध गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. या गुन्ह्यात अटक वॉरंट काढूनही आरोपी सापडत नसल्याचे राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने न्यायालयाला सांगितल्यानंतर हा आदेश देण्यात आला.

रत्नागिरी येथे नोटा पालटण्यासाठी नागरिकांच्या अधिकोषांत आणि पोस्ट कार्यालयांत लागल्या रांगा !

     रत्नागिरी, १२ नोव्हेंबर (वार्ता.) - ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या नोटा चलनातून बंद झाल्यानंतर अधिकोषांमध्ये जुन्या नोटा बदलण्यास प्रारंभ झाला आहे. यासाठी सकाळपासूनच अधिकोषांमध्ये नोटा पालटण्याकरता नागरिकांच्या रांगाच रांगा लागत आहेत. ४ सहस्र रुपयांपर्यंतच्या नोटा पालटून मिळणार असे घोषित करण्यात आले असले, तरी लोकांची वाढलेली गर्दी लक्षात घेऊन काही अधिकोषांनी पहिल्याच दिवशी २ सहस्र रुपयेच पालटून दिले आहेत. 
     नोटा बदलण्याकरिता नागरिकांनी अधिकोषासह पोस्ट कार्यालयामध्येही रांग लावली आहे. एक अर्ज भरून नोटा पालटून दिल्या जात होत्या. एटीएम् मशीन्स चालू झाल्यानंतर त्यामधून ५० आणि १०० रुपयांच्या नोटा उपलब्ध होणार आहेत.

अमरावती येथील बालसाधक चि. अनय पुंड याचे धनुर्विद्या परीक्षेत सुयश

चि. अनय पुंड
अमरावती, १२ नोव्हेंबर - येथील सनातनचा बालसाधक चि. अनय पुंड याने जिल्हास्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत १४ वर्षांखालील गटात प्रथम क्रमांक पटकावला. पाच जिल्ह्यांतील स्पर्धकांमधून त्याने हे सुयश प्राप्त केले असून त्याची अलिबाग येथे होणार्‍या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. नामजप केल्यानेच मला खेळामध्ये एकाग्रता करण्यास साहाय्य मिळते, असे चि. अनय याने सांगितले. चि. अनय याने यापूर्वी ६१ प्रतिशत आध्यात्मिक स्तर प्राप्त केला असून परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले, आई-वडील आणि शिक्षक यांच्यामुळेच हे यश मिळवू शकल्याचे त्याने सांगितले.

आदिवासी आश्रमशाळेतील सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींना १८ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी

सर्वपक्षीय राज्यकर्त्यांनी स्वातंत्र्यानंतर जनतेला धर्मशिक्षण दिले नसल्यामुळेच जनतेची नीतीमत्ता रसातळाला गेली आहे ! बलात्काराची वाढती विकृती रोखण्यासाठी सर्व स्तरांवर नीतीमत्तेचे शिक्षण देणे आवश्यक ! 
     बुलढाणा, १२ नोव्हेंबर - खामगाव तालुक्यातील पाळा येथील स्वर्गीय निंबाजी कोकरे आदिवासी आश्रमशाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार झाल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. यातील ११ आरोपींना खामगाव न्यायालयाने १० नोव्हेंबर या दिवशी १८ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. अन्य ४ आरोपीही न्यायालयीन कोठडीत असून अन्य २ आरोपी अद्यापही पसार आहेत. (पोलिसांची निष्क्रीयता ! - संपादक) अटक केलेल्यांपैकी ४ जणांनी जामीनासाठी अर्ज केला होता. त्यावरील सुनावणी न्यायालयाने १५ नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलली आहे.

अफगाणिस्तानमधील अमेरिकेच्या सैन्य तळावरील आक्रमणात काही जण ठार !

     काबुल - काबूलपासून जवळ असणार्‍या बगराम येथील अफगाणिस्तानमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या सैन्य तळावर १२ नोव्हेंबरला पहाटे बॉम्बस्फोट झाला. यात काही जण ठार झाले. या आक्रमणाचे दायित्व कोणत्याही आतंकवादी संघटनेने अद्याप घेतलेले नाही. गेल्यावर्षी येथे झालेल्या आक्रमणात ६ अमेरिकी सैनिक ठार झाले होते. आदल्या दिवशीच अफगाणिस्तानमधील जर्मनीच्या दुतावासाबाहेर स्फोट घडवण्यात आला होता.

जपानच्या मियागी प्रांतात भुकंपाचे धक्के !

     टोकीयो - जपानच्या मियागी प्रांतात १२ नोव्हेंबरच्या सकाळी भुकंपाचा धक्का बसला. याची रिश्टर स्केलवर तीव्रता ५.८ इतकी होती. यानंतर सुनामीविषयी कोणतीही चेतावणी देण्यात आलेली नाही. असेच धक्के फुकीशिमा प्रांतातही जाणवले. पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या जपानच्या दौर्‍यावर आहेत. 
 महर्षींनी प्रलयकालाविषयी सतर्क करणे
      १९.३.२०१६ या दिवशी झालेल्या नाडीवाचन क्रमांक ६७मध्ये महर्षि म्हणतात, "हे पूर्ण वर्ष प्रलयकालाचे आणि आपत्तीजनक असणारे आहे." (जपानच्या मियागी प्रांतात १२ नोव्हेंबरला ५.८ तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला. या घटनेवरून प्रलयकालाविषयी महर्षींनी केलेले भाष्य किती तंतोतंत आहे, हे लक्षात येते ! - संपादक)

खोट्या कॉलसेंटरद्वारे 'क्रेडिट कार्ड'ची माहिती चोरणारे दोघे पोलिसांच्या कह्यात

खोट्या कॉलसेंटरद्वारे उघडपणे होणारी फसवणूक राज्यातील कायद्याच्या अस्तित्वाविषयी प्रश्‍न निर्माण करणारी आहे ! 
     पुणे, १२ नोव्हेंबर - 'मायक्रोसॉफ्ट' आस्थापनाच्या नावाचा अपवापर करून 'कॉलसेंटर'द्वारे अमेरिका आणि इंग्लंड येथील नागरिकांना दूरभाष करून 'क्रेडिट कार्ड'ची माहिती घेऊन फसवणार्‍या दोघांना पोलिसांनी कह्यात घेतले आहे. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथक (एस्आयटी) स्थापन केले आहे. (अशा गुन्हेगारांना कठोर शिक्षा झाल्यासच वचक बसेल ! - संपादक) 

फलक प्रसिद्धीकरता

आता असहिष्णुतेची ओरड चालू झाल्यास आश्‍चर्य नको !
    वर्ष २०१५ मध्ये बजरंग दलाचा कार्यकर्ता प्रशांत पुजारी यांच्या हत्येच्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या मुस्तफा कंवूर याची म्हैसुरु येथील कारागृहात हत्या करण्यात आली आहे. करण शेट्टी या कैद्याकडून मुस्तफा याची हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Karnatakme 2015me Bajrang Dalke Prashant Pujariki hatya karnewale Mustafaki karagarme hatya!
Ab Asahishnutaki baang hone lage to koi ascharya nahi hoga
जागो ! : कर्नाटक में २०१५ में बजरंग दल के प्रशांत पुजारी की हत्या करनेवाले मुस्तफा की कारागार में हत्या !
अब असहिष्णुता की बांग होने लगे तो कोई आश्‍चर्य नहीं होगा !

हिंदूंनो, इतिहासाची पुनरावृत्ती करून धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र स्थापण्यासाठी जागृत आणि संघटित व्हा !

श्री. ऋषीकेश गायकवाड
१. सर्व हिंदूंना १५ मिनिटांत संपवण्याची भाषा 
करणारी धर्मांध व्यक्ती ज्या देशात रहाते, तो देश 
राजा विक्रमादित्य, छत्रपती शिवाजी महाराज अशांसारख्या 
महापराक्रमी राजांचाच आहे का ?, असा प्रश्‍न पडणे
आज आपल्या हिंदुस्थानची स्थिती इतकी दयनीय आहे की, या देशातील शंभर कोटी हिंदूंना १५ मिनिटांत संपवण्याची भाषा करणारी धर्मांध व्यक्ती याच हिंदुस्थानच्या भाग्यनगरमध्ये रहाते. खरेच देशातील हिंदू एवढे निर्बल झाले आहेत का ? हिंदुस्थानातील हिंदूंकडे पाहिले, तर प्रश्‍न पडतो, राजा विक्रमादित्य, सम्राट पृथ्वीराज चौहान, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज या महापराक्रमी राजांंचा हिंदुस्थान तो हाच आहे का ?

हिवाळ्यातील ऋतूचर्या

वैद्य मेघराज पराडकर
१. आरोग्यदायी हिवाळा 
     हिवाळ्यातील थंडीमुळे त्वचेवरील छिद्रे बंद होत असल्याने शरिरातील अग्नी आतल्या आत कोंडला जाऊन जठराग्नी प्रदीप्त होतो. शरिरातील रोगप्रतिकारक क्षमता आणि बळ अग्नीवर अवलंबून असल्याने तीसुद्धा या ऋतूत चांगली असतात; म्हणून हिवाळ्याचे अनुमाने ४ मास (महिने) निसर्गतःच आरोग्य उत्तम रहाते.
२. ऋतूनुसार आहार 
२ अ. हिवाळ्यात काय खावे आणि काय खाऊ नये ? : या ऋतूमध्ये जठराग्नी उत्तम असल्याने कोणत्याही प्रकारचे अन्न सहज पचते. यामुळे या ऋतूमध्ये खाण्यापिण्याला फार मोठे बंधन नसते. या काळात रात्री मोठ्या असल्याने सकाळी उठल्या उठल्या भूक लागते, म्हणून सकाळी अन्हिके आटोपल्यावर पोटभर जेवून घ्यावे, असे आयुर्वेदात सांगितले आहे. हिवाळ्यात कोरडेपणा वाढलेला असतो. त्यामुळे आहारामध्ये स्निग्ध (तेलकट) घटक उदा. तीळ, शेंगदाणे, खोबरे आवर्जून आणि भरपूर प्रमाणात असावेत; म्हणूनच या दिवसांत तीळगूळ वाटण्याची परंपरा आहे. या ऋतूत पौष्टिक पदार्थ खाऊन तब्येत चांगली सुधारून घ्यावी. अधेमधे खात रहाणे आरोग्याला हानीकारक असते; म्हणून दिवसाच्या ठरवलेल्या २ वेळांमध्ये पोटभर जेवावे, म्हणजे अवेळी भूक लागत नाही. पचन चांगले होण्यासाठी जेवणानंतर विडा खावा. लगेच पचून लगेच भूक लागेल, असे पदार्थ उदा. चुरमुरे, कुरकुरे शक्यतो टाळावेत.

सर्वांनी संघटितपणे समान नागरी कायद्याची मागणी करणे, हीच काळाची आवश्यकता !

कु. वैष्णवी जाधव
१. आरक्षणासाठी निघत असलेल्या मराठ्यांच्या मोर्च्यांतील 
समुदायाकडून राष्ट्रीय संपत्तीची हानी न होणे, हे विशेष असणे
     आज महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत मराठ्यांच्या आरक्षणासाठी निघत असलेले मूकमोर्चे सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. प्रत्येक वेळी कोणताही समुदाय त्यांच्या मागण्यांसाठी एकत्र आला की, राष्ट्रीय संपत्तीची हानी होते; पण या वेळी लक्षावधी जनसमुदाय एकत्र येऊनही हानी झाली नाही, हे विशेष !
२. आज आरक्षणाचा भस्मासूर समाजाला गिळत असणे आणि तो पदोपदी 
आड येत असल्याने भारताच्या एकात्मतेला धक्का पोचणार असणे
     घटनेप्रमाणे काही जातींना आरक्षण देण्याच्या शासनाच्या धोरणानुसार काही आरक्षित आणि बहुतांश अनारक्षित समाज यांना आरक्षणाचा भस्मासूर गिळत आहे. या प्रश्‍नाकडे दुर्लक्ष केल्यास तो भारताच्या एकात्मतेला धक्का पोचवेल. आज देशवासियांची एकी केवळ आरक्षणामुळे विभागली जात आहे. आम्ही सारे भारतीय म्हणून देशातील समाजाला एकत्रित पहायचे ठरवले, तरी आरक्षणाचेे धोरण पदोपदी आड येते.

एका शिवभक्ताला केदारनाथ यात्रेत आलेले कटू अनुभव !

      मुसलमानांना मक्केला जाण्यासाठी सर्वपक्षीय सरकारे ठिकठिकाणी हज हाऊस बांधतात आणि त्यांच्या विमानप्रवासाची सोय करतात; पण हिंदूंना तीर्थयात्रा सोयीची व्हावी, यासाठी एकही कृती करत नाहीत. याचे एक उदाहरण पुढे दिले आहे.
      केदारनाथ म्हणजे हिंदूंचे श्रद्धास्थान ! हे चारधाम यात्रेतील महत्त्वपूर्ण ठिकाण आहे. आम्ही काही भाविक तीर्थयात्रेला जाण्याविषयी चर्चा करत असतांना सर्वांनीच केदारनाथला जायची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे एवढ्या जणांना तेथे नेण्याआधी वर्ष २०१३ च्या आपत्काळानंतर तेथील परिस्थिती कशी आहे ?, हे पहाण्यासाठी मी आणि आमचे काही स्नेही यांनी ही यात्रा करायचे ठरवले. तेथे गेलो असता मोठ्या श्रद्धेने केदारनाथाच्या दर्शनासाठी आलेल्या यात्रेकरूंना यात्रेच्या काळात कसा त्रास सहन करावा लागतो ?, याचे कटू अनुभव आम्हाला आले. हिंदूंंच्या प्रसिद्ध तीर्थक्षेत्राची झालेली अशी अवस्था खरोखरच उद्विग्नता निर्माण करते. ही स्थिती पालटण्यासाठी प्रत्येक हिंदु भाविकाने प्रयत्न करणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठीच केदारनाथ यात्रेचे हे अनुभव आपल्यासमोर मांडत आहे. 
      केदारनाथला जाण्यासाठी आम्ही दोन गट बनवले. एका गटाने मार्गावरून चालत जायचे. दुसर्‍या गटाने पुण्याचे स्नेही श्री. जोशी यांच्यासह हेलीकॉप्टरने जाण्याचे ठरवले. आम्ही नवीन पर्यटक असल्याप्रमाणे वागायचे ठरवले. 

लोकांस शिकवे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण या म्हणीची सत्यता दर्शवणारे एका राज्यातील आरोग्यखाते !

असे प्रकार रोखण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करणे अपरिहार्य !
श्री. धनंजय हर्षे
१. एका राज्यातील आरोग्य खात्याच्या कार्यालयासमोरच्या 
अखंड वहाणार्‍या नळाची दुरुस्ती दीड वर्षांनंतर होणे
     मी एकदा एका राज्यातील आरोग्य खात्याच्या कार्यालयात विज्ञापन घेण्यासाठी गेलो होतो. त्या वेळी मला कार्यालयासमोर एक पाण्याचा नळ अखंड वहात असलेला दिसला. संबधित व्यक्तींना दोन-तीन वेळा भेटून मी याविषयी सांगितले. विज्ञापन घेण्यासाठी मला त्या कार्यालयात वर्षातून दोन-तीन वेळा जावे लागते; पण पाणी वहाणार्‍या त्या नळाच्या दुरुस्तीकडे कुणीही लक्ष देत नसल्याचे मला आढळायचे. मी प्रत्येक वेळी पाठपुरावा घ्यायचो. दीड वर्षांच्या कालावधीनंतर त्या नळाची दुरुस्ती करून पाणी वहाणे बंद झाल्याचे माझ्या पहाण्यात आले.

वरवरच्या उपायांनी भ्रष्टाचार रोखता येईल का ?

     पंतप्रधान मोदी यांनी ९ नोव्हेंबरपासून ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा वापरात नसणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. अशा वरवरच्या उपायांनी भ्रष्टाचार रोखता येईल का ? असा उपाय म्हणजे क्षयरोग झालेल्याला क्षयाचे जंतू मारण्याचे औषध न देता केवळ खोकल्यासाठी औषध देणे ! जनतेला साधना करायला लावल्यास भ्रष्टाचारच नाही, तर चोर्‍या, बलात्कार, खून इत्यादी सर्वच गुन्हे करण्याचा विचारही कोणाच्या मनात येणार नाही !

भावी आपत्काळात अन् नेहमीसाठीही उपयुक्त ठरणारी सनातनची ग्रंथमालिका : भावी आपत्काळातील संजीवनी !

     संत-महात्मे, ज्योतिषी आदींच्या सांगण्यानुसार आगामी काळ हा भीषण आपत्काळ असून या काळात समाजाला अनेक आपत्तींना तोंड द्यावे लागणार आहे. आपत्काळात दळणवळण तुटल्यामुळे रुग्णाला रुग्णालयात नेणे, डॉक्टर वा वैद्य यांच्याशी संपर्क साधणे आणि पेठेत (बाजारात) औषधे मिळणेही कठीण होते. आपत्काळात ओढवणार्‍या विकारांना (आजारांना) तोंड देेण्याच्या पूर्वसिद्धतेचा एक भाग म्हणून सनातन भावी आपत्काळातील संजीवनी ही ग्रंथमालिका सिद्ध (तयार) करत आहे. या मालिकेतील १२ ग्रंथ आतापर्यंत प्रकाशित झाले आहेत. या ग्रंथांचा अभ्यास आतापासूनच केला, तर प्रत्यक्ष आपत्काळात विकारांना सामोरे जाण्यासाठी लागणारा आत्मविश्‍वास निर्माण होण्यास साहाय्य होईल. यासाठी हे सर्व ग्रंथ वाचकांनी अवश्य संग्रही ठेवावेत !

साबण वापरणे आरोग्याला हानीकारक

      अंगाला लावण्याचा साबण आपण कागदात गुंडाळून ठेवला, तर ४-५ दिवसांतच तो कागद जीर्ण होऊन फाटून जातो. साबण काही दिवस फरशीवर राहिला, तर फरशीवर पांढरे डाग पडतात. हे सर्व साबण बनवतांना वापरण्यात येणार्‍या कॉस्टिक सोडासारख्या हानीकारक रसायनांमुळे होते. अंघोळीसाठी नियमितपणे साबण लावल्याने त्वचेचा नैसर्गिक स्निग्धपणा निघून जातो. त्वचेला आवश्यक तो स्निग्धपणा परत मिळवण्यासाठी त्याखालील मेद, मांस, मज्जा या धातूंमधून स्नेहांश (तेलकटपणा) घ्यावा लागत असल्याने या धातूंचा स्नेहांशही न्यून होतो. यामुळे हात-पाय दुखणे, हाडे ठिसूळ होणे, चिडचिड वाढणे यांसारखे विकार निर्माण होतात. साबण वापरणे बंद केल्याने आणि अंघोळीपूर्वी त्वचेला नियमितपणे तेल लावल्याने हे सर्व विकार न्यून होऊ लागतात, असा अनुभव आहे. म्हणून निरोगी शरिरासाठी साबण न लावणेच इष्ट होय. साबणापेक्षा डाळीचे (उदा. हरभरा डाळ किंवा मसूर डाळ यांचे) पीठ अथवा वारुळावरची किंवा चांगल्या जागेवरील चाळलेली माती वापरणे चांगले आणि स्वस्तही आहे. हे नसल्यास काही न लावता नुसतेच अंग चोळून धुतले, तरी चालते. - वैद्य सुविनय दामले, कुडाळ यांच्या मार्गदर्शनातून संकलित (२७.५.२०१४)
      (टीप : ज्यांना काही कारणास्तव अंगाला साबण लावूूून अंघोळ करायची असेल, त्यांनी आयुर्वेदीय घटक असलेला साबण अल्प प्रमाणात वापरण्यास आडकाठी नाही. साबण वापरतांना त्वचेवरील तेलकटपणा पूर्णपणे निघून जात नाही ना, याकडे लक्ष द्यावे. सनातन साबणामध्ये पंचगव्य, कोरफड, तुळस यांसह करंज तेल हे आयुर्वेदीय घटक आणि अल्प प्रमाणात रासायनिक पदार्थ वापरलेले आहेत.)

हिंदु जनजागृती समितीचा आकाशकंदिल घरावर लावणार्‍या हितचिंतकाकडे पोलिसांकडून सनातन संस्थेविषयी चौकशी !

राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणार्थ निःस्वार्थी वृत्तीने कार्य 
करणार्‍या सनातन संस्थेची वेगवेगळ्या माध्यमातून नाहक 
चौकशी करणार्‍या पोलिसांनी हाच वेळ जनतेचे वारंवार नाहक बळी घेणार्‍या 
आतंकवाद्यांच्या शोधार्थ दिला असता, तर देश एव्हाना आतंकवादमुक्त झाला असता !
      एका शहरातील हिंदु जनजागृती समितीच्या एका हितचिंतकांनी दीपावलीच्या कालावधीत घरावर हिंदु जनजागृती समितीचा आकाशकंदिल लावला होता. हा आकाशकंदिल पाहून २ नोव्हेंबर २०१६ या दिवशी २ साध्या गणवेशातील पोलिसांनी घरी येऊन सनातनची चौकशी केली. या वेळी पोलिसांनी तुम्ही काय करता ? येथे सनातनचे कार्य चालते का ?, असे प्रश्‍न या हितचिंतकांना विचारले. चौकशी झाल्यावर पोलीस त्यांच्या वाहनात जाऊन बसले. काही वेळ थांबून नंतर वाहनातून निघून गेले. इतकी वर्षे हे साध्य केले नाही, तर मतदार आता विश्‍वास ठेवतील का ?

     गोव्याच्या सर्वांगीण विकासाबरोबरच प्रत्येक गोमंतकियाचे जीवनमान सुधारावे, प्रत्येक नागरिक तणावमुक्त व्हावा, ज्ञानी व्हावा आणि खुश व्हावा, हेच भाजपचे पुढील पाच वर्षांसाठीचे ध्येय आहे. हे ध्येय ठेवून भाजप आगामी विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार आहे, अशी घोषणा संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी कुडचडे (गोवा) येथे भाजपने आयोजित केलेल्या पहिल्या विजय संकल्प महामेळाव्यात केली.

असे होऊनही युद्ध न करणारा जगातील एकमेव देश ! हा देश नपुंसकांचा तर नाही, असे कोणाला वाटल्यास आश्‍चर्य वाटायला नको !

     उरी येथे झालेल्या आतंकवादी आक्रमणाला प्रत्युत्तर म्हणून भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून २९ सप्टेंबर २०१६ या दिवशी सर्जिकल स्ट्राईक करूनही पाकने ३०० पेक्षा अधिक वेळा शस्त्रसंधीचा भंग करत गोळीबार केल्याची माहिती शासकीय अधिकार्‍यांनी दिल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे.
     हल्ली भारतात धर्म राजकारणावर अवलंबून आहे ! - शंकराचार्य जयेंद्र सरस्वती 
(इतरत्र मात्र राजकारण धर्मावर अवलंबून आहे ! - संपादक)
   ज्ञानी व्यक्तीचे बोलणे आणि विचार यांतून ईश्‍वरी ज्ञान प्रगट होत असते. त्या ज्ञानात देवत्व असल्याने साधकाला दिशा मिळून साधनेला चालना मिळते. - श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१९.६.२०१६)

सनातनच्या निरपराध साधकांवरील हा अन्याय लक्षात ठेवा !

   कोणताही गुन्हा केला नसतांना श्री. समीर गायकवाड यांना मागील १ वर्ष ५५ दिवसांपासून, तर डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना ५ महिने ४ दिवसांंपासून कारागृहात डांबण्यात आले आहे.
केवळ हिंदुत्वाची मानहानी करण्यासाठी सनातनच्या निरपराध
साधकांना कारागृहात डांबणार्‍यांना हिंदु राष्ट्रात दामदुप्पटीने शिक्षा देण्यात येईल !

शिक्षिकेची चाकरी करतांना प.पू. गुरुदेवांच्या कृपेने समष्टी सेवा तळमळीने करून शाळेतील विद्यार्थ्यांना साधनेचे महत्त्व सांगणार्‍या रायचुरू, कर्नाटक येथील सौ. विजयालक्ष्मी विनोद !

सौ. विजयालक्ष्मी विनोद
     मी सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाप्रमाणे १५ वर्षांपासून साधना करत आहे. रायचुरू जिल्ह्यातील देवनपल्ली गावी सुमारे १० वर्षांपासून मी सरकारी शाळेत शिक्षिका म्हणून चाकरी (सेवा) करत आहे. प.पू. गुरुदेवांच्या कृपेने या माध्यमातून मला समष्टी सेवा करण्याची संधी प्राप्त झाली आहे. शाळेत मी पुढील प्रासंगिक सेवा करते.
      आदर्श शिक्षक कसे असावेत आणि हिंदु राष्ट्रातील शिक्षक कसे असतील, याचा आदर्श सौ. विजयालक्ष्मी विनोद यांनी सर्व शिक्षकांपुढे ठेवला आहे. त्यांचे कौतुक करावे, तेवढे थोडे ! या समष्टी साधनेमुळे त्यांची साधनेतही चांगली प्रगती होईल. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

एस्.एस्.आर्.एफ्. आणि महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय यांच्या वतीने युरोप येथे आयोजित केलेल्या दुसर्‍या तीन दिवसीय कार्यशाळेचा आढावा

एस्.एस्.आर्.एफ्. आणि महर्षि अध्यात्म
विश्‍वविद्यालय यांच्या वतीने आयोजित
कार्यशाळेत उपस्थित जिज्ञासू आणि
एस्.एस्.आर्.एफ्.चे साधक 
   श्रीकृष्ण आणि प.पू. डॉक्टर यांच्या कृपेने २१ ते २३.१०.२०१६ या कालावधीत झाग्रेब, क्रोएशिया (युरोप) येथे तीन दिवसीय अध्यात्म कार्यशाळा यशस्वीपणे पार पडली. एस्.एस्.आर्.एफ्. आणि महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय यांच्या वतीने या वर्षातील ही दुसरी कार्यशाळा होती. 
१. कार्यशाळेला उपस्थित असलेले जिज्ञासू 
अ. या कार्यशाळेला एकूण ७ जिज्ञासू उपस्थित होते. यांतील चौघांनी एस्.एस्.आर्.एफ्.च्या प्रसार दौर्‍यातील प्रवचने ऐकून साधनेला आरंभ केला आहे. हे चौघेही एस्.एस्.आर्.एफ्.च्या सत्संगांना उपस्थित असतात.
आ. एक महिला जिज्ञासू रिजेका या शहरातून आल्या होत्या. त्या रिजेका येथे आयोजित करण्यात आलेल्या तिन्ही सार्वजनिक सत्संगांना उपस्थित होत्या. 
इ. कार्यशाळेला प्रथमच उपस्थित असणारे अन्य दोन जिज्ञासू एस्.एस्.आर्.एफ्.च्या संकेतस्थळाचे वाचक होते.

सनातन संस्थेच्या अचंबित करणार्‍या कार्यामागे आहे सूक्ष्मातील जाणणारे संत आणि ऋषि यांचा आशीर्वाद !

     मोठमोठ्या संतांच्या संस्थांच्या तुलनेत सनातन संस्थेला फारच थोडे ओळखतात. हे झाले स्थुलातून ओळखण्यासंदर्भात. सूक्ष्मातून सनातनची स्थिती कशी आहे, हे येथे दिले आहे.
१. सनातन संस्थेचे अचंबित करणारे कार्य ! 
      सनातन संस्थेचे कार्य गेल्या २५ वर्षांत अतिशय जलद गतीने वाढत आहे, उदा. 
अ. ग्रंथाच्या २१ वर्षांत १२ भारतीय आणि जर्मन, स्पॅनिश (सर्बियन) आणि नेपाळी या ३ विदेशी भाषांत, २९४ ग्रंथांच्या ६६,४५,००० प्रती प्रकाशित झाल्या आहेत. 
आ. ४५०० हून अधिक ग्रंथांचा मजकूर संगणकांत आहे. 
इ. जगातील अनेक देशांत सनातन संस्थेच्या शिकवणीनुसार हजारो साधना करत आहेत. 
ई. गेल्या २५ वर्षांत भारतातील ६३ साधक संत झाले. एवढेच नव्हे, तर विदेशांतील ५ साधक संत झाले.
उ. गेल्या २५ वर्षांत भारतातील ८५८ साधक आणि विदेशांतील १७ साधक ६० टक्क्यांहून अधिक पातळीचे झाले. त्यांतील अनेक जण येत्या ५-६ वर्षांत संत होतील. 
ऊ. सनातनच्या साधकांनी आतापर्यंत उच्च स्वर्गलोक आणि महर्लोक यांतील एकूण ५४९ दैवी बालकांना जन्म दिला आहे. पुढे हीच बालके हिंदु राष्ट्र चालवतील.

घराला आश्रमाप्रमाणे बनवण्याचे केलेले प्रयत्न आणि त्यामुळे जाणवलेले पालट अन् आलेल्या अनुभूती

स्वयंपाकघरातील डब्यांची केलेली मांडणी 

१. घरातील सामान न आवरल्याने वाईट शक्तींचा 
त्रास वाढणेे, मनात नकारात्मक विचार येणे 
आणि साधना करूनही म्हणावा तसा आनंद न मिळणे 
       मी सेवानिवृत्त झाल्यानंतर वर्ष २०१२ मध्ये आम्ही भाड्याच्या घरात राहू लागलो. मुंबई (बोईसर) येथून आमचे सर्व सामान बेळगावच्या घरात आणून ठेवले. त्यातील आवश्यक तेवढे सामान काढून घेतले आणि सर्व खोके माळ्यावर तसेच ठेवले. बेळगावला आल्यानंतर आम्हाला सेवेचे दायित्व असल्यामुळे घराकडे लक्ष द्यायला वेळच मिळाला नाही. सामानाचे खोके तसेच ठेवल्यामुळे घरात वाईट शक्तींचा त्रास वाढला. सतत नकारात्मक विचार येत होते. आम्हा दोघांचे एकमत होत नव्हते. कुठल्याही कामात यश येत नव्हते. साधना करूनसुद्धा म्हणावा तसा आनंद मिळत नव्हता. स्वच्छता करण्यापूर्वी नामजपच होत नव्हता. अशा प्रकारे ३ वर्षे गेली. नंतर आम्ही घराची स्वच्छता करण्याचे ठरवले.
२. आश्रमाप्रमाणे घराची स्वच्छता करणे
२ अ. शयनकक्ष आणि स्वयंपाकघर आवरणे अन् प्रत्येक खणावर आतील वस्तूंची नावे लिहिणे : ३०.८.२०१५ या दिवशी आम्ही कपड्यांचे कपाट व्यवस्थित आवरले. नंतर आम्ही शयनकक्षामधील सामानाचा एकेक खोका उघडला आणि त्यातील सामान जागेवर लावले. एका शयनकक्षाची स्वच्छता केल्यानंतर दुसरा शयनकक्ष आवरला. प्रत्येक खणावर आतील वस्तूंची नावे लिहिली. नंतर स्वयंपाकघराची स्वच्छता केली. डब्यांवर आतील वस्तूंची नावे घातली. डब्यांची व्यवस्थित मांडणी केली. 

अमरावती येथील चि. गिरिजा टवलारे (वय ३ वर्षे ३ मास) हिचा दैनिक सनातन प्रभातविषयी असलेला भाव आणि तिचे प.पू. डॉक्टरांच्या अमृत महोत्सवी विशेषांकातील त्यांच्या छायाचित्राशी झालेले संभाषण

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले 
यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...
         प.पू. डॉक्टरांच्या अमृत महोत्सवाचा दैनिक सनातन प्रभातचा विशेषांक २९ मे या दिवशी मिळाला. मी तो विशेषांक चि. गिरिजाच्या (उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली, वय ३ वर्षे ३ मास) हातात दिला आणि तिला म्हटले, तुला दैनिक बाप्पाकडे (चि. गिरिजा दैनिक सनातन प्रभातला दैनिक बाप्पा म्हणते.) बघून काय वाटते ? नंतर मी दुसर्‍या खोलीत गेले. थोड्या वेळाने मी गिरिजा असलेल्या खोलीत गेले, तर मला तिच्या हातात दैनिक सनातन प्रभात दिसला नाही. तिला त्याविषयी विचारल्यार ती म्हणाली, मी दैनिक बाप्पामधील गुरुदेवांना हात लावला. त्यांनीही मला हात लावला. त्यानंतर तिने दैनिकातील प.पू. डॉक्टरांच्या छायाचित्राशी तिचे झालेले संभाषण सांगितले.

विविध वस्तूंभोवती विविध प्रकारचे काहीतरी दिसण्यासंदर्भात अनुभूती येणे

१. संगणकाच्या पडद्यासमोर मध्ये मध्ये पांढरा धूर दिसणे 
     मागील ८ दिवसांपासून संगणकासमोर बसून सेवा करतांना दिवसभरात एक-दोन वेळा मध्येच ढगासारखा पांढरा धूर डोळ्यांसमोर येतो. काही वेळाने तो लुप्त होतो. कधी तो धूर संगणकाच्या पडद्यातून बाहेर येतांना दिसतो, तर कधी नुसताच समोर दिसतो; पण माझ्यासमवेत सेवेसाठी बसणार्‍या इतर साधकांना त्याच वेळी तसे काही दिसले नाही. या धुरामुळे मला चांगले किंवा त्रासदायक वाटणे, असे काही अनुभवास आले नाही. - अधिवक्ता योगेश जलतारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२१.३.२०१६)

निद्रिस्त आणि जागृत मनुष्य यांविषयी अध्यात्मशास्त्रदृष्ट्या विश्‍लेषण !

पू. डॉ. चारुदत्त पिंगळे
     समाज, राष्ट्र आणि धर्म या संदर्भात कार्य करतांना बहुतांश वेळा हिंदू किंवा समाज निद्रिस्त आहे अन् त्यांना जागृत करणे आवश्यक आहे, असा उल्लेख होतो. त्या संदर्भात निद्रिस्त आणि जागृत मनुष्य म्हणजे काय ?, याचे विवरण पुढे दिले आहे.
१. निद्रिस्त मनुष्य
     येथे निद्रिस्त या शब्दाचा अर्थ झोपण्याच्या संदर्भात नाही. निद्रिस्त मनुष्य म्हणजे मायेच्या आवरणात बद्ध मनुष्य ! तो मनुष्य भौतिक जीवनात गुरफटलेला असून धर्म आणि अध्यात्म यांविषयी अज्ञानी अन् अक्रियाशील असतो.

प.पू. डॉक्टरांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने अमरावती येथील सौ. अनुभूती नीलेश टवलारे यांना आलेल्या अनुभूती

१. अमृत महोत्सवी विशेषांक 
हातांत घेतल्यावर आलेल्या अनुभूती
१ अ. प.पू. डॉक्टरांचे छायाचित्र पाहिल्यावर मन अंतर्मुख होणे : २९.५.२०१६ या दिवशीचा दैनिक सनातन प्रभात हातात घेतला आणि त्यातील प.पू. डॉक्टरांचे छायाचित्र बघितले. तेव्हा लक्षात आले, देवाने आपले आयुष्य किती सोपे करून दिले आहे; परंतु आपण ते कठीण बनवले आहे. गुरुदेवांनी आपल्याला सोपा साधनामार्ग सांगूनही आपण स्वतःच दोषांत अडकले आहोत. त्यामुळे आपल्याला संसार आणि साधना यांची घडी बसवणे कठीण वाटते.
१ आ. दैनिकाचे वाचन करतांना गुरुदेवांविषयी कृतज्ञता वाटून डोळ्यांतून अश्रू येणे आणि साधना करण्यासाठी जोमाने प्रयत्न करावेसे वाटणे : दैनिकाचे वाचन करतांना गुरुदेवांनी आतापर्यंतच्या आयुष्यात आपल्याला काय काय दिले आहे ? किती संकटांतून बाहेर काढले आहे ? इतके स्वभावदोष-अहं असतांनाही आधार देऊन साधनेत ठेवले आहे, या विचारांनी माझ्या डोळ्यांत अश्रू आले. दैनिक सनातन प्रभातवर डोके ठेवून मी पुष्कळ वेळ रडले. त्यानंतर मन हलके होऊन साधना करण्यासाठी आणखी जोमाने प्रयत्न करूया, असा विचार मनात येऊन आनंदाची स्थिती अनुभवता आली.

एका ग्रंथाची बांधणी करण्यासाठी गेल्यावर छापखान्याच्या मालकाचा सनातन संस्थेवर असलेला विश्‍वास अनुभवता येणे

१. सनातन संस्थेच्या एका ग्रंथाची अल्प संख्येत बांधणी 
(बाइंडींग) करायची असतांनाही छापखान्याच्या मालकांनी ते मान्य करणे 
     बेळगाव येथील हिंदु धर्मजागृती सभेच्या वेळी सनातनचा ग्रंथ पाखंडी साधुसंतांसेे होनेवाली धर्महानी हा प्रकाशित करायचा होता. हिंदु धर्मजागृती सभेच्या एक दिवस आधी सायंकाळी ४ वाजता ग्रंथ बांधणीसाठी दिले. ग्रंथाच्या घड्या करणे, त्या व्यवस्थित लावणे आणि बांधणी करणे यासाठी न्यूनतम दोन दिवस लागतात. आम्ही दशरथ बाइंडर यांच्या मालकांना सांगितले, उद्या बेळगाव येथे होत असलेल्या हिंदु धर्मजागृती सभेच्या वेळी हा ग्रंथ प्रकाशित करायचा असल्याने या ग्रंथांची बांधणी करून हवी आहे.
   त्या दिवशी त्यांनी छापखान्यातील बांधणी यंत्र दिवसभर चालू केले नव्हते. त्यांना केवळ २० ग्रंथ बांधण्यासाठी यंत्र चालू करावे लागणार होते. (यंत्र चालू करण्यासाठी न्यूनतम ६०० ते ७०० ग्रंथ असल्यास बांधणी करणे परवडते. त्यापेक्षा ग्रंथांची संख्या अल्प असल्यास हानी होते.) एवढ्या अल्प संख्येत ग्रंथाची बांधणी करायची असूनही ते म्हणाले, हे सनातन संस्थेचे काम आहे. त्यामुळे माझी काही हानी होणार नाही. छापखाना बंद करण्याच्या वेळी ग्रंथांची बांधणी करून देतो.

अस्वच्छता आणि अव्यस्थितपणा असेल तेथे अनिष्ट शक्तींचा प्रादुर्भाव होणे आणि प.पू. डॉक्टरांनी आश्रमातील वाईट स्पंदने दूर करण्यासाठी स्वतः स्वच्छता करणे

१. फोंडा आश्रमात असलेली अस्वच्छता, अव्यस्थितपणा यांमुळे तेथे अनिष्ट शक्तींचा पुष्कळ त्रास असणे आणि प.पू. डॉक्टरांनी आश्रमात सर्वत्र फिरून अस्वच्छता आणि अव्यस्थितपणा दूर करवून घेतल्याने वास्तूतील त्रास उणावणे : वर्ष २००० मध्ये दैनिक सनातन प्रभातचे मुख्य कार्यालय फोंडा, गोवा येथील आश्रमात (सुखसागर) स्थलांतरित झाले. फोंडा आश्रमात प.पू. डॉक्टर रहायला आले त्या वेळी त्या वास्तूत पुष्कळ त्रास होता. तेथे संगणकांत वारंवार बिघाड होणे, विद्युत पुरवठा करणारी यंत्रे (UPS) बिघडणे, अशा बर्‍याच अडचणी येत होत्या. त्या वेळी एका साधकाने आश्रमात होणार्‍या त्रासांविषयी प.पू. डॉक्टरांना विचारले. तेव्हा प.पू. डॉक्टरांनी सांगितले, वास्तूतील अनिष्ट शक्तींचा प्रभाव साधकांच्या साधनेच्या प्रभावापेक्षा अधिक आहे. त्यामुळे साधकांनी साधना वाढवायला हवी. त्यानंतर १ - २ दिवसांतच प.पू. डॉक्टर आश्रमातील प्रत्येक खोलीत गेले. त्यांना प्रत्येक ठिकाणी पुष्कळ अस्वच्छता, अडगळ, अव्यवस्थितपणा दिसला. ते सर्व प.पू. डॉक्टरांनी नीट करवून घेतले. आश्रमाच्या संपूर्ण परिसरातच असलेला अव्यवस्थितपणा आणि अस्वच्छता प.पू. डॉक्टरांनी स्वतः साधकांसमवेत दूर केला. त्यानंतर वास्तूतील त्रास उणावला.

दिव्यत्वाची जेथ प्रचीती तेथे कर माझे जुळती ।

डॉ. (सौ.) कस्तुरी भोसले
       रामनाथी गोवा येथील सनातनच्या आश्रमात सेवा करणार्‍या आधुनिक वैद्या (सौ.) कस्तुरी भोसले यांचा कार्तिक शुक्ल पक्ष चतुर्दशी (१३.११.२०१६) या दिवशी वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांना सुचलेली कविता येथे देत आहोत.
आधुनिक वैद्या (सौ.) कस्तुरी भोसले यांना 
सनातन परिवाराकडून वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा !
ज्यांची चाल असे, जणू अलगद झुळुक वार्‍याची ।
ज्यांची दृष्टी वर्षे, शीतलता प्रीतीची ॥ १ ॥
ज्यांची वाणी असे अमृतकुंभासम ।
ज्यांची शब्दरत्ने भासती हिमप्रपातासम ॥ २ ॥
ज्यांच्या विचारात असे, ध्यास सदैव विश्‍वकल्याणाचा ।
एकमेव असे कोण असती भूतलावर अवघ्या ॥ ३ ॥

साधक, हितचिंतक आणि वाचक यांच्यासाठी सूचना !

स्वतःचे मृत्यूपत्र सिद्ध करा 
आणि त्यामुळे होणारे लाभ मिळवा !
अधिवक्ता रामदास केसरकर
      सध्याचे असुरक्षित वातावरण, अकार्यक्षम प्रशासकीय यंत्रणा आणि येणारा आपत्काळ यांचा विचार करता आपण संपूर्ण जीवन कष्ट करून स्वतः मिळवलेेल्या मालमत्तेचा उपभोग आपल्या पश्‍चात् कुणी आणि कसा घ्यावा ?, याविषयीचा निर्णय इच्छापत्राद्वारे (मृत्यूपत्राद्वारे) स्वतः स्पष्ट केल्यास आपल्या मालमत्तेचे पुढे काय होईल ?, याची काळजी उरत नाही आणि पुढील लाभही होतात.
१. आपल्या मालमत्तेवरून नातेवाइकांत उत्पन्न होणारे वादविवाद आणि त्यामुळे होणारे त्रास टाळता येतात. 
२. स्वकष्टार्जित मिळकत योग्य व्यक्तीच्या हाती जात आहे, याचे समाधान लाभते.
३. आपले वारस असल्यास अथवा नसल्यास काही कारणाने ज्यांच्याशी सर्व संबंध तोडलेले आहेत, असे नातेवाईक मृत्यूनंतर संपत्ती हडप करण्याचा धोका इच्छापत्र करून टाळता येतो.
४. इच्छापत्र केले नाही, तर कुमार्गाला लागलेले एखादे अपत्य अथवा नातेवाईक आपल्या मृत्यूनंतर संपत्तीत वाटा मागू शकेल आणि त्यासाठी कोर्टकचेरीचा नाहक त्रास अन् अनावश्यक व्यय आपल्या आप्तेष्टांना सोसावा लागेल.
५. अनेकांची आर्थिक परिस्थिती प्रारंभी नाजूक असल्याने ते इच्छा असूनही धार्मिक आणि सामाजिक कार्यासाठी देणगी देऊ शकत नाहीत. पुढे त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारते. त्या वेळी ते आपल्या संपत्तीचा वाटा इच्छापत्राद्वारे अशा कार्यासाठी देणगीरूपात देऊ शकतात.

साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती

      आपल्या बालकांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण आध्यात्मिक गुण असल्याचे लक्षात आल्यास त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करून त्याच्या जन्माचे कल्याण करा ! अशा बालकांची लक्षात आलेली वैशिष्ट्ये कळवा !
      आताच्या घोर कलियुगात आणि तीव्र आपत्काळात पृथ्वीवरील वातावरण अधिक शुद्ध करण्यासाठी, तसेच साधना करणार्‍यांना अधिक सात्त्विकता अन् चैतन्य यांचा लाभ मिळण्यासाठी ईश्‍वर काही उन्नत जिवांना जन्माला घालत आहे. हे जीव उच्च स्वर्ग, महर् आणि जन अशा उच्च लोकांतून पृथ्वीवर जन्माला आले आहेत आणि अजूनही येत आहेत. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी ही बालके आपले अमूल्य योगदान देत आहेत आणि पुढेही देणार आहेत. ही बालके सर्वसामान्य बालकांपेक्षा निराळी असून त्यांच्यातील वैशिष्ट्यपूर्ण आध्यात्मिक गुणांमुळे ही बालके दैवी(सात्त्विक) आहेत, हे लक्षात येते.
      अशी बालके ओळखणे सहज शक्य व्हावे, यासाठी अशा सात्त्विक बालकांत सर्वसाधारणतः आढळणारी गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

निवृत्ती वेतनधारकांनी न विसरता नोव्हेंबर मासात अधिकोषाला लाईफ सर्टिफिकेट द्यावे !

   ज्या शासकीय अथवा अन्य कर्मचार्‍यांना निवृत्तीनंतर प्रत्येक मासाला निवृत्ती वेतन (पेन्शन) देण्यात येते, त्यांनी ज्या अधिकोषातून आपण निवृत्ती वेतन घेतो, तेथे प्रतिवर्षी नोव्हेंबर मासात लाईफ सर्टिफिकेट द्यायचे असते आणि ते दिल्यानंतरच पुढील वर्षभर निवृत्ती वेतन चालू राहू शकते. हे सर्टिफिकेट देण्यासाठी अधिकोषाच्या ज्या शाखेतून खाते उघडले आहे, तेथे प्रत्यक्ष जाण्याची आवश्यकता नाही. सध्याच्या वास्तव्याच्या ठिकाणी त्या अधिकोषाची शाखा असल्यास तेथे आपल्या आधारकार्डाची मूळ आणि झेरॉक्स प्रत, तसेच पासबूक दाखवून लाईफ सर्टिफिकेट देता येते. (उदा. एखाद्याने निवृत्त वेतनासाठी ठाणे येथील अधिकोषातून खाते उघडले असेल आणि सध्या तो देहलीला वास्तव्याला असेल, तर देहली येथील त्या अधिकोषाच्या शाखेतूनही तो सर्टिफिकेट देऊ शकतो.) तरी नोव्हेंबर मासात लवकरात लवकर सर्टिफिकेट द्यावे.

साधकांना सूचना

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
प्रारंभ - कार्तिक शुक्ल पक्ष चतुर्दशी (१३.११.२०१६) रात्री ११.१८ वाजता
समाप्ती - कार्तिक पौर्णिमा (१४.११.२०१६) सायंकाळी ७.२२ वाजता
उद्या पौर्णिमा आहे.

सर्वत्रचे वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांना नम्र विनंती !

सनातन आश्रमांच्या नूतनीकरणाकरता पुढील साहित्याच्या खरेदीसाठी धनरूपात साहाय्य करा !
  सनातनचे आश्रम म्हणजे हिंदु धर्माच्या पुनर्प्रतिष्ठेसाठी अविरत झटणार्‍या साधकांची आध्यात्मिक शाळाच ! आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करण्यास आणि राष्ट्र-धर्माच्या कार्याला हातभार लावण्यासाठी इच्छुक साधक अन् धर्माभिमानी यांची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. रामनाथी आणि देवद येथील आश्रम, तसेच मंगळुरू (कर्नाटक) अन् कुडाळ येथील सेवाकेंद्रे यांचे नूतनीकरण (renovation) करणे चालू आहे. त्यासाठी पुढील साहित्याची तातडीने आवश्यकता आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले संकलित करत असलेल्या ग्रंथांच्या निर्मिती-कार्यात सहभागी व्हा !

१. परात्पर गुरु डॉ. आठवले संकलित करत असलेल्या अध्यात्म
या विषयावरील ग्रंथांच्या निर्मितीचे कार्य लवकरात लवकर करण्याची आवश्यकता !
   सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले संकलित करत असलेल्या धर्म, अध्यात्म, साधना, ईश्‍वरप्राप्तीसाठी कला, आध्यात्मिक संशोधन यांसारख्या विविधांगी विषयांवरील मराठी भाषेतील सुमारे ४५०० ग्रंथ लवकरात लवकर अंतिम करणे आणि त्यांचे विविध भाषांत भाषांतर करणे भावी काळाच्या दृष्टीकोनातून अत्यावश्यक झाले आहे. याची कारणे पुढे दिली आहेत.
१ अ. दूरचित्रवाहिन्यांसाठी धर्मशिक्षणाचे कार्यक्रम सिद्ध करणे : विविध दूरचित्रवाहिन्यांसाठी या ग्रंथांतील ज्ञानावर आधारित धर्मशिक्षणाचे कार्यक्रम सिद्ध करता येणार आहेत.
१ आ. आगामी भीषण काळापूर्वी करावयाची सिद्धता: तिसर्‍या महायुद्धाला काही वर्षांतच आरंभ होणार असल्यामुळे या ग्रंथांच्या संगणकीय धारिका लवकरात लवकर सिद्ध करायच्या आहेत.
१ इ. अखिल मानवजातीला पुढील सहस्रो वर्षे मार्गदर्शक ठरणे : हे ग्रंथ अखिल मानवजातीला पुढील सहस्रो वर्षे मार्गदर्शक ठरणार आहेत. या संदर्भातील ग्रंथांची वैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
१. कलियुगात पुढील शेकडो वर्षे आधुनिक विज्ञानाची भाषा प्रचलित रहाणार आहे. यासाठी हे ग्रंथ तुलनात्मक सारणी, टक्केवारी अशा वैज्ञानिक परिभाषेत लिहिले आहेत.
      अमेरिकेत आतंकवादाला टेररिझम म्हणतात, पाकमध्ये त्याला जिहाद म्हणतात आणि भारतात काँग्रेसवाले त्याला सेक्युलरिझम म्हणतात.

बोधचित्र


॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
प्रेम आणि प्रीती
१. प्रेम असल्यावर सहवासाची ओढ लागते व मग प्रेम वृद्धींगत होते. ते केवळ प्रकृतीतीलच असते.
२. आपण अशाश्‍वतावर प्रेम करतो आणि ते सुटून जाईल म्हणून भितो. जे शाश्‍वत आहे, त्यावर प्रेम करीत नाही.
३. द्वैतात प्रेम असते; पण प्रेमात द्वैत नसते. प्रकृतीत प्रेम असते; पण ब्रह्मात द्वैत नसते.
४. जर तुम्ही माझ्यावर प्रेम करीत असाल, तर मी प्रेमात आहे.
भावार्थ : येथे प्रेम हा शब्द प्रीती, म्हणजे पारमार्थिक प्रेम, या अर्थाने वापरला आहे.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
   गुन्हा सिद्ध झाल्यावर न्यायाधीश गुन्हेगाराला शिक्षा ठोठावतात. तेव्हा गुन्हेगाराची खोटी बाजू लढवल्याबद्दल, त्याचे साथीदार झाल्याबद्दल त्याच्या अधिवक्त्यांना शिक्षा केली जात नाही. हिंदु राष्ट्रात अशा अधिवक्त्यांची वकिलीची सनद रद्द करून त्यांना आजन्म कारागृहात ठेवण्याची कडक शिक्षा केली जाईल.
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

मन आणि इंद्रिय यांच्या आधीन होऊ नका !
जो मन आणि इंद्रिये यांच्या आधीन नसतो, तोच खर्‍या अर्थाने स्वतंत्र होय. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

विरोधकांनो, शहाणे व्हा !

संपादकीय
     स ध्या राष्ट्रीय पातळीवर चर्चेत असलेले सूत्र म्हणजे चलनातील ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या नोटा रहित करून नव्या नोटा चलनात आणण्याचे केंद्रशासनाचे धोरण ! यामागील उद्देश शासनाने आरंभीच स्पष्ट केला आहे. नोटा मागे घेण्याची पद्धतही घालून दिली आहे. जनतेला आर्थिक व्यवहार करण्यासाठी कोणताही त्रास होऊ नये, याकरता ३० डिसेंबर २०१६ पर्यंतची दीर्घ मुदतही घालून दिली. सर्व प्रक्रिया सुस्पष्ट असतांना जनता मात्र त्याचा लाभ घेण्यात न्यून पडली आणि केवळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. परिणामी अधिकोषांच्या सर्व शाखा लोकांनी भरून गेल्या आणि अधिकोषांवर सेवेचा ताण अनावश्यकपणे वाढला. एवढ्या लोकांना तोंड द्यायचे कसे, हा प्रश्‍न अधिकोषांतील कर्मचार्‍यांना भयभीत करून सोडत होता. असे करत करत तीन दिवस निघून गेले, तरीही बँक कर्मचार्‍यांवरील सेवेचा ताण उणावला नाही.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn