Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

आज तुळशीविवाह प्रारंभ

तुळशीविवाह समाप्ती कार्तिक पौर्णिमा (१४ नोव्हेंबर २०१६)

कोटी कोटी प्रणाम !

आज कार्तिकी एकादशी
आज संत नामदेव महाराज यांची जयंती आज कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी देवीचा किरणोत्सव समाप्त

कोटी कोटी प्रणाम !

सनातनचे ४७वे संत पू. रघुनाथ राणेआजोबा यांचा आज वाढदिवस

अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्रच्या परदेशी देणग्या ५ वर्षांसाठी रोखल्या जाणार !

अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्र या संस्थेची एफ्.सी.आर्.ए. नोंदणी
रहित केल्याविषयी केंद्रीय गृहमंत्र्यांचे अभिनंदन ! - सनातन संस्था
     मुंबई - मुदतीमध्ये परवाना नूतनीकरणाचा अर्ज सादर करण्यामध्ये हलगर्जीपणा करणार्‍या राज्यातील एक सहस्रांहून अधिक सरकारी आणि बिगर सरकारी स्वयंसेवी संस्थांची (एन्जीओची) परकीय देणगी नियम कायद्याखालील (एफ्.सी.आर्.ए.) नोंदणी रहित करण्याचा बडगा केंद्रीय गृहमंत्रालयाने अलीकडेच उगारला. त्या अंतर्गत अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्र संस्था कारवाईच्या कक्षेत आली आहे. या कारवाईमुळे या संस्थेला परदेशी देणगीदारांकडून मिळणार्‍या देणग्या पुढील पाच वर्षांसाठी रोखल्या गेल्या आहेत, अशी माहिती सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
     अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्र या संस्थेच्या विरोधात सनातन प्रभातचे वार्ताहर श्री. राहुल कोल्हापुरे, तसेच हिंदु विधीज्ञ परिषद यांनी गृहखात्याकडे वेळोवेळी लेखी तक्रारी केल्या होत्या. एक दशकाहून अधिक काळ जमाखर्च आणि ताळेबंद सादर न करणे, एफ्.सी.आर्.ए. देणग्यांविषयी खोटी माहिती धर्मादाय आयुक्तांना सादर करणे, वार्तापत्र प्रकाशित करत असल्याने एफ्.सी.आर्.ए. नोंदणीसाठी पात्र नाही, ही माहिती लपवून एफ्.सी.आर्.ए.ची नोंदणी मिळवणे यांसह नुकताच धर्मादाय आयुक्तांनी दिलेला आर्थिक गैरव्यवहाराचा अहवाल या सर्व गोष्टींचे कागदोपत्री पुरावे अलीकडेच केंद्रीय गृहमंत्रालयाच्या निदर्शनाला आणून देण्यात आले होते.

बांगलादेशमधील हिंदूंवर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात २ ठार, ३० घायाळ !

बांगलादेशातील हिंदूंना साहाय्य करण्याचे आश्‍वासन देणारे केंद्र सरकार कुठे आहे ?
      ढाका - बांगलादेशमधील गोविंदपूर जिल्ह्यात असलेल्या रंगपूर साखर कारखान्याच्या परिसरातील हक्काच्या भूमीतून जाण्यास नकार देणार्‍या मूळ हिंदु संथाल आदिवासींवर पोलीस, शीघ्र कृती दल आणि स्थानिक गुंड यांनी आक्रमण केले. या आक्रमणात २ हिंदु संथाल आदिवासी ठार झाले असून ८ पोलिसांसह ३० जण घायाळ झाले, तर १ सहस्र २०० हिंदु आदिवासी कुटुंबे घरे सोडून पळून गेली.
१. १९७१ पूर्वीच्या पूर्व पाकिस्तानात रंगपूर येथे साखर कारखाना काढण्याचा निर्णय झाला. त्यासाठी आवश्यक अशी १ सहस्र ८४२ एकर भूमी स्थानिक हिंदु संथाल आदिवासींकडून अधिग्रहित केली गेली आणि त्यावर रहात असलेल्या आदिवासींना विस्थापित करण्यात आले. अधिग्रहण कराराप्रमाणे जर या भूमीवर ऊसाव्यतिरिक्त अन्य पिके घेण्यात आली, तर ती भूमी मूळ आदिवासींना परत करण्याचे प्रावधान आहे.
२. हा साखर कारखाना ३१ मार्च २००४ या दिवशी भ्रष्टाचार, गैरव्यवस्थापन इत्यादी कारणांनी बंद पडला. तेव्हा सरकारने ती भूमी स्थानिक खासदार आणि काही वजनदार राजकीय पुढारी यांना दिली. त्यावर तांदूळ, गहू, तंबाखू, बटाटे इत्यादी पिके घेण्यास या पुढार्‍यांनी प्रारंभ केला. याला मूळ आदिवासी मालकांनी आक्षेप घेऊन ते या भूमीवर येऊन वस्ती करून राहू लागले. त्यांना तेथून हाकलून देण्यासाठी राजकीय पुढार्‍यांनी कट करून पोलीस, शीघ्र कृती दल आणि स्थानिक गुंड यांच्या साहाय्याने ६ आणि ७ नोव्हेंबर या दिवशी आक्रमण केले.

कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारकडून टिपू सुलतान (सैतान) याची जयंती साजरी !

हिंदुत्वनिष्ठ आणि भाजप यांच्याकडून टिपू सुलतान (सैतान) जयंतीला विरोध !
     बेंगळुरू - कर्नाटकातील टिपू सुलतान(सैतान) याची वंशज असल्याप्रमाणे त्याची १० नोव्हेंबरला जयंती साजरी करणार्‍या कर्नाटकातील काँग्रेस सरकारच्या विरोधात हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून, तसेच भाजपकडून विरोध प्रदर्शन करण्यात आले.
१. येथील टाऊन हॉलमध्ये सरकारने जयंतीचा कार्यक्रम आयोजित केला होता. यात मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि अन्य मंत्री सहभागी झाले होते. याविरोधात भाजपचे कार्यकर्ते टाऊन हॉलच्या बाहेर जमा झाले होते. त्यांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत काळे झेंडे दाखवले आणि मोर्चाही काढला. यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा सहभागी झाले होते. या वेळी पोलिसांनी त्यांना कह्यात घेतले.
२. येडियुरप्पा म्हणाले की, आम्ही मुसलमानांच्या विरोधात नाही; मात्र आमचा टिपू जयंतीला विरोध आहे. (असे बोलून येडियुरप्पा दोन दगडांवर पाय ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत, हे न समजायला जनता दूधखुळी नाही ! - संपादक)
३. राज्यातील मडिकेरी येथे निदर्शने करणार्‍या ७० हिंदुत्वनिष्ठांना अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये भाजपचे कोडगू जिल्हा अध्यक्ष मनू मुथप्पा यांचा समावेश होता. तसेच आमदार के.जी. भोपय्या, अप्पाचू राजन आणि सुनील सुब्रह्मणी यांनाही अटक करण्यात आली.

१०० मुसलमान बुद्धीवाद्यांच्या बैठकीत गुजरात दंगल लाजिरवाणी घटना असल्याचे संघाचे प्रतिपादन !

     नवी देहली - येथे नुकतीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते आणि मुसलमान समाजातील बुद्धीवादी यांची बैठक पार पडली. या बैठकीत वर्ष २००२ मध्ये झालेली गुजरात दंगलीची घटना लाजिरवाणी होती. अशी घटना पुन्हा होऊ नये, असे संघाच्या नेत्यांनी म्हटल्याची माहिती अलीगढ मुस्लिम विद्यापिठाच्या ३ प्राध्यापकांनी दिली आहे. यातील २ प्राध्यापक निवृत्त झाले आहेत. एका इंग्रजी दैनिकाने या संदर्भात वृत्त प्रसिद्ध केले आहे. या वृत्तात म्हटले आहे की, मुसलमान समाजाच्या मनातील संघाविषयीचे गैरसमज दूर करणे, हे या बैठकीचे उद्दिष्ट होते.
     अलीगड मुस्लिम विद्यापिठाचे साहाय्यक प्राध्यापक मुफ्ती जाहिद हे इतर ४ प्राध्यापकांबरोबर या बैठकीला उपस्थित होते. बैठकीला जेएन्यू विद्यापिठाच्या प्राध्यापकांबरोबर विविध विद्यापिठांचे १०० पेक्षा अधिक मुसलमान बुद्धीवादी सहभागी झाले होते, अशी माहिती जाहिद यांनी दिली आहे.
     जाहिद म्हणाले की, या बैठकीत मी वर्ष २००२ च्या गुजरात दंगलीचे सूत्र उपस्थित केले. गुजरात दंगल मुसलमान समाज कधीही विसरू शकत नाही, असे मी म्हटले. (मुसलमान गुजरात दंगलीला कधीही विसरत नाहीत; मात्र ती ज्या कारणामुळे झाली त्या गोध्रा येथील रेल्वे स्थानकावर उभ्या असणार्‍या गाडीतील ५९ कारसेवकांना जाळून ठार करण्यात आलेली घटना सोयीस्कररित्या विसरतात. ही घटना हिंदूंही कधी विसरू शकत नाहीत, त्याचे काय ? - संपादक) याला उत्तर देतांना संघाचे सह सरकार्यवाह (संयुक्त महासचिव) कृष्ण गोपाल शर्मा यांनी ती घटना लाजीरवाणी होती आणि अशी घटना पुन्हा व्हायला नको, असे म्हटले.

देशाच्या भल्यासाठीच नोटांवर बंदी ! - मद्रास उच्च न्यायालय

     चेन्नई - देशाच्या भल्यासाठीच ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या नोटांवर बंदी घालण्यात आली आहे, असे मद्रास उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. न्यायालयाने या बंदीला स्थगिती देण्यासही नकार दिला. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. लोकांची गैरसोय टाळण्यासाठी ही याचिका प्रविष्ट करण्यात आली होती. या याचिकेत केंद्र सरकारच्या निर्णयाला स्थगिती द्यावी, अशी मागणी करण्यात आली होती.
     केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयातही याचिका प्रविष्ट झाली आहे. उत्तरप्रदेशमधील अधिवक्त्याने ही याचिका प्रविष्ट केली आहे. या याचिकेनंतर केंद्र सरकारनेही न्यायालयात कॅव्हेट दाखल केले आहे. याचिकेवर अंतरिम आदेश देतांना आमचा युक्तीवादही ऐकून घ्यावा, असे या कॅव्हेटमध्ये म्हटले आहे.

महाराष्ट्रात ११ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत पाणी, वीज, मालमत्ता करासह इतर शासकीय देयकांसाठी ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या जुन्या नोटा स्वीकारणार

     मुंबई - जनतेकडून पाणी, वीज, मालमत्ता कर, घरपट्टी यासह इतर शासकीय देयकांचा भरणा करतांना ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या चलनी नोटा ११ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत स्वीकारण्याची अनुमती देण्याची विनंती महाराष्ट्र सरकारने केंद्र शासनाकडे केली होती. ही विनंती केंद्र सरकारने मान्य केल्याने जनतेची मोठ्या प्रमाणावर सोय होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तशा सूचना महावितरणसह संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत. राज्य सरकारच्या निर्देशानुसार राज्यातील सर्व महापालिका आणि नगरपालिका यांच्यामध्ये सर्व प्रकारचे कर भरणा करण्यासाठी ११ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या नोटा स्वीकारल्या जाणार आहेत. वाहतूकदारांना अडचणी येऊ नयेत, यासाठी महाराष्ट्रातील सर्व राज्यमार्गांवरील टोल टॅक्स (पथकर) ११ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत माफ करण्याचा निर्णय ९ नोव्हेंबरला घेण्यात आला आहे.
साधकांना सूचना
     महाराष्ट्रातील शासकीय देयकांचा भरणा करण्यासाठी साधक ११ नोव्हेंबरला ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या जुन्या नोटांचा वापर करू शकतात. ही माहिती आपले सहसाधक, तसेच वाचक, हितचिंतक यांनाही कळवावी.

साधकांना महत्त्वाची सूचना

अर्पण, नियतकालिकांची वर्गणी किंवा वसुली स्वीकारतांना 
सध्या वापरात असलेल्या नोटाच स्वीकाराव्यात !
     नव्याने लागू झालेल्या रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार ५०० आणि १००० रुपयांच्या सध्या चलनात असलेल्या नोटा आता वापरता यायच्या नाहीत. त्यामुळे साधकांनी यापुढे अशा नोटा स्वीकारू नयेत. यापुढे साधकांनी अर्पण, नियतकालिकांची वर्गणी किंवा वसुली स्वीकारतांना धनादेश, डिमांड ड्राफ्ट या स्वरूपात किंवा चलनामध्ये सध्या वापरात असलेल्या १००, ५०, २०, १० रुपयांच्या नोटा, तसेच नवीन चलनात येणार्‍या ५०० आणि २००० रुपयांच्या नोटा स्वीकाराव्यात.

काश्मीरमध्ये २ दिवसांत ३ सैनिक हुतात्मा !

     श्रीनगर - पाक सैन्याच्या गोळीबारात गेल्या २ दिवसांत ३ सैनिक हुतात्मा झाले आहेत. राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टर येथे प्रेम सिंह आणि हरिंदर कुमार यादव हे ८ नोव्हेंबरला हुतात्मा झाले. प्रेम सिंह राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यातील, तर हरिंदर यादव उत्तरप्रदेशातील बलिया जिल्ह्याच्या अब्बासपूर गांवात रहाणार होते.

   

उत्तरप्रदेशमध्ये ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या नोटा जाळल्या !

     बरेली (उत्तरप्रदेश) - येथील सीबीगंजमधील परसा खेडा मार्ग क्रमांक १ वर ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या नोटा जळतांना आढळून आल्या. एका प्रसिद्ध आस्थापनाच्या कर्मचार्‍यांनी गोण्यांमध्ये भरून नोटा आणल्या आणि त्या येथे जाळल्या. पोलिसांनी या घटनेची माहिती रिझर्व्ह बँकेला दिली आहे.

देहलीत हिंदू सेनेकडून डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय साजरा !

     नवी देहली - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय झाल्यानंतर हिंदू सेनेने नवी देहलीत विजय साजरा केला. 
     डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनल्याने आम्हाला खूप आनंद झाला आहे. ट्रम्पमुळे भारत-अमेरिकेचे संबंध अधिक दृढ होतील. तसेच भारत हा व्हाईट हाऊसचा सर्वांत जवळचा मित्र होईल. आतंकवादविरोधात लढण्यासाठी भारत-अमेरिका हे दोन देश एकत्र येतील, असा विश्‍वास हिंदू सेनेचे अध्यक्ष श्री. विष्णु गुप्ता यांनी व्यक्त केला. 

लक्ष्मणपुरी (लखनौ) हे भारतातील सर्वांत प्रदूषित शहर !

विज्ञानाने केलेल्या प्रगतीचा दुष्परिणाम ! 
     नवी देहली - प्रदूषित वातावरणामुळे प्रथमच लक्ष्मणपुरी (लखनौ) देशातील सर्वांत प्रदूषित शहर झाले आहे. ७ नोव्हेंबर या दिवशी लक्ष्मणपुरीमध्ये सर्वाधिक प्रदूषण होते. त्यानंतर आग्रा, देहली आणि कानपूर ही शहरे होती. तज्ञांच्या मते, येत्या काही दिवसांमध्ये हवेतील पालटामुळे स्वच्छ झालेले वातावरण आणि वाढलेले तापमान यांच्या एकत्रित परिणामामुळे देहली-एनसीआर्चे प्रदूषण अल्प होण्याची शक्यता आहे. ‘सिस्टम फॉर एयर क्वॉलिटी’ आणि ‘वेदर फोरकास्टिंग रिसर्च (सफर)’ यांच्या अनुमानानुसार १० नोव्हेंबरपर्यंत वातावरणात प्रदूषणाचे प्रमाण अधिक राहील.

वडगावशेरी (जिल्हा पुणे) येथे धर्मांधांकडून हिंदु तरुणावर प्राणघातक आक्रमण : घरावर दगडफेक

घरामध्ये पडलेले दगड, दगडफेकीने अस्ताव्यस्त झालेले सामान दिसत आहे
  • हिंदूंनो, तुमच्या जिवावर उठलेल्या धर्मांधांना कायमचा धाक बसवण्यासाठी संघटित व्हा !
  • लव्ह जिहाद्यांना विरोध केल्याचा परिणाम !
      वडगावशेरी (जिल्हा पुणे), १० नोव्हेंबर (वार्ता.) - हिंदूंच्या मालकीच्या रिक्शात बसून मुलींशी चाळे करणार्‍या धर्मांधांना जाब विचारणार्‍या हिंदुत्वनिष्ठ रिक्शामालकाला धर्मांधांनी सळया आणि विटा यांच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणात मारहाण करण्याची घटना घडली. ९ नोव्हेंबरला रात्री ११.३० वाजता घडलेल्या या घटनेमध्ये श्री. संदीप सदामत यांच्यावर प्राणघातक आक्रमण करणार्‍या धर्मांधांच्या टोळक्याने श्री. सदामत यांच्या घरावरही दगडफेक केली. या दगडफेकीमुळे श्री. सदामत यांच्या घराच्या काचा तुटल्या असून कुंड्या, तसेच देवघर यांचीही मोडतोड झाली आहे. नूरजहाँ आणि तिचे कुटुंबीय मारहाण करण्यात आघाडीवर होते, असे श्री. सदामत यांच्या कुटुंबियांनी सांगितले. 

५०० आणि १००० रुपयांच्या नोटा रहित झाल्यानंतर झालेले निर्णय !

प्रवासाचे आरक्षण रहित झाल्यास 
पैसे लगेच परत मिळणार नाहीत !
       अचानकपणे गाड्यांचे आरक्षण रहित झाल्यास त्याचा परतावा लगेच परत न देण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. पंतप्रधान मोदी यांनी घोषित केलेल्या निर्णयानंतर लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे आरक्षण होण्यात अचानक वाढ झाल्याचे आढळून आले. प्रवासाचे आरक्षण रहित केल्यानंतर देयकाचा परतावा लगेच मिळणार नसून त्याची प्रवाशांना केवळ पावती दिली जाईल. नोटांचा तुटवडा निर्माण झाल्याने हा निर्णय घेतला असल्याचे रेल्वेच्या अधिकार्‍यांनी सांगितले. पश्‍चिम रेल्वेनेही १३ नोव्हेंबरनंतरच्या प्रवासांसाठी फर्स्ट किंवा सेकंड एसीच्या तिकिटांचे प्रतिक्षा सूचीत (वेटिंग लिस्ट) आरक्षण न करण्याचा निर्णय घेतला आहे. 
आठपेक्षा अधिक खोट्या नोटा 
आढळल्यास कारवाई होणार ! 
       ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या नोटा जमा करतांना ८ किंवा त्यापेक्षा अधिक खोट्या नोटा आढळल्यास पोलिसांना सूचित केल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांनी सांगितले. 

केंद्र सरकारने अनुमती दिल्यास पाकमध्ये आत्मघातकी पथक घुसवण्याची नागा साधूंची सिद्धता !

समाजाला आध्यात्मिक उन्नतीसाठी मार्गदर्शन करणार्‍या
 संतांना राज्यकर्त्यांच्या निष्क्रीयतेमुळे अशी अनुमती मागावी 
लागते’, हे जाणून राज्यकर्ते त्यांची निष्क्रीयता सोडतील का ? 
राज्यकर्त्यांच्या निष्क्रीय कारभाराचा परिणाम ! 
     हरिद्वार - केंद्र सरकार आणि आखाडा परिषद यांनी अनुमती दिल्यास पाकिस्तानमध्ये नागा साधूंचे आत्मघातकी पथक घुसवण्यासाठी सिद्ध आहेत, असे अखिल भारतीय आखाडा परिषदेने म्हटले आहे. ७ नोव्हेंबरला झालेल्या या परिषदेच्या बैठकीमध्ये ६ प्रस्ताव पारित करण्यात आले. ही बैठक परिषदेचे अध्यक्ष श्री महंत नरेंद्र गिरि यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत १३ आखाड्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. 

यापुढे चित्रपटांतील अश्‍लील दृश्यांवर सेन्सॉर बोर्डाकडून बंदी नाही !

अश्‍लील चित्रपट आणि दृश्ये यांमुळे समाजात अनैतिकता वाढण्यास 
साहाय्य होत असतांना त्यावर नियंत्रण ठेवण्याचे काम करणार्‍या सेन्सॉर 
बोर्डाने त्याला मान्यता देणे म्हणजे समाजाला अधोगतीकडे नेण्यास साहाय्य करणे होय ! 
     मुंबई - गेल्या काही काळामध्ये ‘उडता पंजाब’, ‘बार बार देखो’ आणि ‘ए दिल है मुश्किल’ या चित्रपटांमधील काही अश्‍लील दृश्ये केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाने (सेन्सॉर बोर्डाने) काढायला लावली होती. यामुळे सेन्सॉर बोर्डावर वारंवार टीका झाल्याने यापुढे चित्रपटातील अश्‍लील दृश्ये न हटवण्याचा निर्णय सेन्सॉर बोर्डने घेतला आहे. यासाठी श्याम बेनेगल यांच्या समितीची शिफारस सेन्सॉर बोर्डाने स्वीकारली आहे. त्यामुळे आता अशा चित्रपटांसाठी एक नवा विभाग करण्यात आला आहे. ए/सी या विभागांतर्गत या चित्रपटाविषयीची सेन्सॉरची पुढील धोरणे स्पष्ट करण्यात येतील. सेन्सॉर बोर्ड यापुढे अश्‍लील दृश्ये आणि संवाद न हटवता त्यांना या विभागांतर्गत प्रमाणित करणार आहे. त्यासाठी काही नियम बनवून सेन्सॉर बोर्ड पुढील नियमावली लागू करणार आहे. त्यामुळे सेन्सॉर बोर्डच्या पुढील निर्णयाविषयी अनेकांमध्ये उत्सुकता आहे. 

वर्ष १९७८ पर्यंत होत्या १, ५ आणि १० सहस्र रुपयांच्या नोटा !

     नागपूर - केंद्र सरकारने ५०० आणि १ सहस्रच्या नोटा चलनातून रहित केल्याच्या घटनेवरून ३८ वर्षांपूर्वी अशाच प्रकारचा निर्णय तत्कालिन पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी घेतल्याची आठवण पुन्हा झाली. 
     वर्ष १९७८ मध्ये मोरारजी देसाई यांनी १ सहस्र, ५ सहस्र आणि १० सहस्र रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला होता. भारतात स्वातंत्र्यापूर्वीपर्यंत म्हणजे वर्ष १९४६ पर्यंत १० सहस्र रुपयांची नोट होती. नंतर ती बाद करण्यात आली. स्वातंत्र्यानंतर पंतप्रधान नेहरू यांनी वर्ष १९५४ मध्ये १० सहस्र रुपयांची नोट पुन्हा चलनात आणली. तसेच ५ सहस्र रुपयांचीही नोट जारी करण्यात आली. वर्ष १९७८ पर्यंत या नोटा चलनात होत्या.

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या बंगालमधील घरापासून ५ किमी अंतरावर स्फोटके सापडली !

तृणमूल काँग्रेसच्या राज्यात आतंकवाद्यांचा गड झालेला बंगाल ! 
     बेहरामपूर (बंगाल) - बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यातील जंगीपूर येथील राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या घरापासून ५ किमी अंतरावर २०० किलो स्फोटके आणि सल्फर जप्त केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी ५ जणांना अटक केली आहे. यात ९४ किमी गन पावडरचा समावेश आहे.

अल्पवयीन हिंदु युवतीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करणार्‍या धर्मांधाला अटक

     पणजी, १० नोव्हेंबर (वार्ता.) - गोव्यातील करासवाडा, म्हापसा येथे मंदिरात जात असलेल्या अल्पवयीन हिंदु युवतीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करणार्‍या मरड, म्हापसा येथील महंमद मदार (वय २१ वर्षे) याला युवतीच्या वडिलांनी स्थानिकांना सोबत घेऊन चोप दिला आणि त्यानंतर पोलिसांच्या स्वाधीन केले. म्हापसा पोलिसांनी या युवकाला अटक केली. न्यायाधिशांनी त्याला १० दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे. ही हिंदु मुलगी रात्री ९च्या सुमारास मंदिरात जात असतांना महंमद मदार याने तिचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. ‘तुला मंदिरात सोडतो’, असे सांगून त्याने या युवतीला मंदिराच्या पाठीमागे नेण्याचा प्रयत्न केला. ही गोष्ट युवतीच्या वडिलांना कळताच त्यांनी त्याला पकडून बराच चोप दिला.

भावोजीने अत्याचार केल्याची मेहुणीची तक्रार !

हे अध:पतन रोखण्यासाठी समाजाला धर्मशिक्षण देण्यावाचून पर्याय नाही ! 
     हणजूण, १० नोव्हेंबर (वार्ता.) - भावोजीने मारहाण करून अत्याचार केल्याची तक्रार देहली येथील एका युवतीने गोव्यातील हणजूण पोलीस ठाण्यात केली. या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवला आणि गुजरात येथील आरोपीला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडिती युवती आणि तिच्या बहिणीचे कुटुंबीय गोव्यात पर्यटनासाठी आले होते. ६ नोव्हेंबरला गोव्यात आल्यानंतर ते सर्वजण हणजूण येथील सी हॉर्स व्हिला हॉटेलमध्ये उतरले होते. रात्री आरोपी पीडितेच्या खोलीत गेला आणि तिला मारहाण करून त्याने तिच्यावर अतिप्रसंग केला, असे तक्रारीत म्हटले आहे.

स्वामी विवेकानंदांकडून राष्ट्र्रसेवेची प्रेरणा मिळाली ! - अण्णा हजारे

(डावीकडे) श्री. वेलणकर यांना भेट देतांना श्री. पराग गोखले आणि श्री. सुनील ओजाळे
      पुणे - स्वतःसाठी नाही, तर राष्ट्रहितासाठी जगणारी माणसे अमर होतात. म्हणून प्रपंचातून वेळ काढून राष्ट्र आणि समाजासाठी वेळ द्या. प्रथम दुसर्‍यांना सुखी करा !, या संतांच्या शिकवणीचे आचरण करत असल्याने शांत झोप लागते. स्वामी विवेकानंदांकडून मला राष्ट्रसेवा आणि मानवसेवा यांची प्रेरणा मिळाली, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक श्री. अण्णा हजारे यांनी केले. येथील व्यवस्थापन विकास आणि संशोधन संस्थेच्या सभागृहात ६ नोव्हेंबर या दिवशी सजग नागरिक मंच या समाजसेवी संस्थेचा दशकपूर्ती सोहळा पार पडला. त्या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी माजी सनदी अधिकारी डॉ. माधव गोडबोले, मंचचे संस्थापक श्री. विवेक वेलणकर, श्री. जुगल राठी आणि श्री. विश्‍वास सहस्रबुद्धे आदी मान्यवर उपस्थित होते.
     ते पुढे म्हणाले, भारत प्रजासत्ताक बनले म्हणजे भारतातील नागरिकांना शासकीय पैसा कुठे आणि कसा व्यय होतो, हे विचारण्याचा अधिकार आहे. माहितीच्या अधिकाराच्या आधारे शासन जनतेच्या सर्व प्रश्‍नांना उत्तरे देण्यास बांधील आहे. समाज आणि देश पालटायचा असेल, तर देशासंबंधी सर्व कर्तव्यांची जाणीव आपल्याला असली पाहिजे. सध्या लागू असलेल्या माहिती अधिकार कायद्यात अनेक अपवाद असल्याने या कायद्यात नव्याने सुधारणा होणे आवश्यक आहे.
प्रत्येक नागरिकाने पुढे येणे ही लोकशाही ! - डॉ. माधव गोडबोले
     डॉ. माधव गोडबोले म्हणाले, माहिती अधिकार कायदा होऊनही लोकांना त्याविषयी ठाऊक नसल्याने महाराष्ट्रात माहिती अधिकारी कार्यालयातील अनेक पदे रिकामी आहेत. माहिती अधिकार कायद्यामध्ये खाजगी संस्था अपवाद असल्याने योग्य ती माहिती जनतेला मिळत नाही. कायदा केला जातो; परंतु तो अमलात आणला जात नाही, असे प्रत्येक शासन करते. त्यामुळे माहिती अधिकार कायद्याच्या वापराचा आढावा घेऊन त्यात पालट करण्याची आवश्यकता आहे.

५०० आणि १००० रुपयांच्या नोटा रहित झाल्यानंतर उमटलेले पडसाद !

  • मद्रास उच्च न्यायालयाने अशी एक याचिका फेटाळून लावली आहे, त्याप्रमाणेच मुंबई उच्च न्यायालय करेल, ही अपेक्षा !
  • नोटा बंदीच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका प्रविष्ट !
        मुंबई - ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या निर्णयाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात २ अधिवक्त्यांनी जनहित याचिका प्रविष्ट केली आहे. केंद्र सरकारने नोटा रहित करण्याचा निर्णय अचानक घेतला. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणाची स्वत:हून नोंद घेत जनहित याचिका (सुओमोटो) प्रविष्ट करून घ्यावी, असे सांगत अधिवक्ता जमशेद मिस्त्री आणि अधिवक्ता जब्बार सिंह यांनी ९ नोव्हेंबर या दिवशी याचिका प्रविष्ट केली. 
        नोटा चलनातून बंद करायच्या झाल्यास त्याविषयी अध्यादेश काढणे, तसेच संबंधित कायद्यात पालट करणे आवश्यक असते; परंतु केंद्र सरकारने यांपैकी काहीही केलेले नाही. त्यामुळे सरकारचा हा निर्णय कायदेशीररित्या अवैध आहे, असा दावा अधिवक्त्यांनी केला आहे.

२ सहस्रच्या नव्या नोटांवर चीप असल्याचे वृत्त चुकीचे ! - अर्थमंत्री अरुण जेटली

   नवी देहली - आता चलनात ५०० आणि २ सहस्र रुपयांच्या नव्या नोटा येणार आहेत. यातील २ सहस्रची नोट कोठेही ठेवली किंवा लपवली, तरी ती उपग्रहाच्या (सॅटेलाईटच्या) माध्यमातून शोधता येणार आहे, अशा प्रकारचे वृत्त गेले दोन दिवस देशभरात पसरले होते; मात्र हे वृत्त चुकीचे आहे, असे स्वतः अर्थमंत्री अरुण जेटली यांना स्पष्ट केले आहे.
   रिझर्व्ह बँकेकडून २ सहस्र रुपयांच्या नोटांची छपाई पूर्ण झाली आहे. या नोटांची निर्मिती करण्यासाठी नॅनो तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या नोटा फक्त कागदाच्या नोटा असणार नाहीत. या नोटेमध्ये जीपीएस् चीप असणार आहे. यामुळे भ्रष्टाचार आणि बनावट नोटांच्या निर्मितीला आणि काळ्या पैशाला आळा बसेल, असा दावा करण्यात येत असलेले वृत्त प्रकाशित झाले होते.

बांदा पोलीस ठाण्याच्या तीन कर्मचार्‍यांवर कारवाई : पोलीसदलात खळबळ

सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षकांची धडक कारवाई 
 इन्सुली (सावंतवाडी) पोलीस तपासणी नाक्यातील पोलिसांच्या भ्रष्ट कारभाराला चाप 
जनतेतून समाधान व्यक्त 
     सावंतवाडी - मुंबई-गोवा महामार्गावरील इन्सुली पोलीस तपासणी नाक्यावर टेम्पो ट्रॅव्हलर चालकाकडून लाच स्वीकारल्याप्रकरणी पोलीस कर्मचारी धनाजी धडे यांच्यावर कारवाई करण्यात आली. ८ नोव्हेंबरला पोलीस कर्मचारी धडे पाठोपाठ बांदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस फौजदार यशवंत जयराम पाटील यांच्यासह तीन पोलीस कर्मचार्‍यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली. या तिघांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी दिली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली होणार्‍या या कारवाईमुळे पोलीसदलात खळबळ उडाली आहे; मात्र जनतेकडून समाधान व्यक्त केले जात आहे.(विविध ठिकाणी उभारण्यात येणारे पोलीस तपासणी नाके समाजविघातक प्रकारांना वेळीच आळा बसावा आणि जनतेला शांत अन् सुरक्षित जीवन जगता यावे, यासाठी निर्माण केले आहेत. यासाठी पोलिसांना शासन वेतनही देते, तरीही केवळ स्वार्थासाठी पोलिसांकडून भ्रष्टाचारासारखी समाजविघातक कृती होत असेल, तर जनतेला पोलिसांवर अवलंबून रहाता येईल का ? - संपादक) 

पाकमध्ये दीडशे वर्षांपूर्वीचे हिंदूंचे मंदिर पाडण्याच्या विरोधात न्यायालयात याचिका प्रविष्ट !

जगभरात हिंदूंना कोणीच वाली नसल्याचे दर्शक असणार्‍या घटना ! 
     पेशावर - येथील जुन्या शहराच्या परिसरातील दीडशे वर्षांपूर्वीचे हिंदूंचे मंदिर गुपचूप पाडले जाण्याच्या विरोधात मुहीबुर रहमान आणि वाकिफ सलीम यांनी पेशावर उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे. या ठिकाणावर व्यापारी संकुल बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे. या मंदिरात काही वर्षांपूर्वीपासून भक्तांचे येणे-जाणे बंद झाले होते. 

ट्रम्प यांच्या विजयापूर्वी जॉर्डन सरकारच्या एअरलाईन्सकडून वादग्रस्त विज्ञापन !

     नवी देहली - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय होण्यापूर्वी जॉर्डन सरकारच्या एअरलाईन्सने एक वादग्रस्त विज्ञापन केले होते. यात त्याने लिहिले होते, ‘जोपर्यंत ‘तो’(डोनाल्ड ट्रम्प) विजेता होत नाही आणि तुम्हाला तेथे (अमेरिकेला) जाण्याची अनुमती नाकारली जात नाही, तोपर्यंत अमेरिकेचा प्रवास चालू ठेवा.’ 
     डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेकदा मुसलमान समाजाविरोधात विधाने केली होती. ‘अमेरिकेतून मुसलमान समाजाला हाकलले पाहिजे’, असे म्हटले होते; म्हणून जॉर्डन एअरलाईन्सने ट्रम्प यांच्या वक्तव्याचे विडंबन करत हे विज्ञापन केले होते. जॉर्डनमध्ये ९७ टक्के नागरिक हे मुसलमान आहेत. याबरोबरच एअरलाईन्सने अमेरिकेच्या प्रवासाचे दर अल्प ठेवले होते.

राज्यातील लाचखोरीच्या प्रकरणांमध्ये पुणे आघाडीवर !

‘'भ्रष्टाचारग्रस्त पुणे'’ अशी ओळख पालटण्यासाठी पुणे प्रशासन काय प्रयत्न करणार ? 
     मुंबई - जानेवारी ते ऑक्टोबर २०१६ पर्यंत राज्यातील लाचखोरीच्या प्रकरणांत पुणे आघाडीवर आहे. लाचखोर प्रकरणात पुण्यात १२५ हून अधिक गुन्हे, त्यानंतर नाशिक १२५, नागपूर ११३ आणि संभाजीनगरमध्ये १०८ गुन्ह्यांची नोंद झाली आहे, अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने सांगण्यात आली. 

तीन आक्रमणकर्त्या धर्मांधांवर अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत कारवाई करावी ! - बुरूड समाजाचे पोलिसांना निवेदन

इचलकरंजी येथील श्री. अशोक साळुंखे यांना धर्मांधांनी मारहाण केल्याचे प्रकरण 
पोलीस निरीक्षक सतीश पवार यांना निवेदन देतांना बुरूड समाज संघटनेचे पदाधिकारी
     इचलकरंजी, १० नोव्हेंबर (वार्ता.) बाळनगर येथील श्री. अशोक साळुंखे यांच्यावर प्राणघातक आक्रमण करून घरातील महिलांनाही मारहाण करणारे धर्मांध सलीम अत्तार, इरफान सय्यद आणि फरिदा सय्यद यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत कठोर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन अखिल भारतीय महाराष्ट्र बुरूड समाज संघटनेच्या वतीने शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश पवार यांना नुकतेच देण्यात आले. (आक्रमणत्यार्र्ंना अटक करा, असे पोलिसांना का सांगावे लागते कि धर्मांधांवर कारवाई करण्यास पोलीस कचरतात ? - संपादक) संघटनेच्या शिष्टमंडळात अध्यक्षा शामला सोनावणे, सरचिटणीस मारुती साळुंखे, दत्तात्रय सूर्यवंशी, धोंडीराम सूर्यवंशी, रामचंद्र सपाटे, वसंत सूर्यवंशी आदी उपस्थित होते. 

पुरातत्व विभागाने ऐतिहासिक शिल्पाकृतींच्या अधिकृत नोंदी ठेवणे आवश्यक ! - डॉ. किरीट मनकोडी

याविषयी प्रशासन सतर्क राहून नोंदींचे गांभीर्य कधी लक्षात घेणार ?
     पुणे - अपुर्‍या नोंदींअभावी आंतरराष्ट्रीय दलाल ऐतिहासिक प्राचीन ठेव्याची करत असलेली चोरी पकडण्यात अडचणी येत आहेत. त्यासाठी पुरातत्व विभागाने प्राचीन वस्तू आणि शिल्प यांच्या अधिकृत नोंदी ठेवल्या पाहिजेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ पुरातत्व संशोधक डॉ. किरीट मनकोडी यांनी केले. (अशा पुरातन वस्तूंचे जतन आणि संवर्धन यांसाठी राज्य शासन पुढाकार घेईल का ? - संपादक)
१. अनेक मूर्तींच्या मालकी हक्काची नोंद नसल्याने त्यांच्या चोरीसंबंधी पोलिसांकडे तक्रार करता येत नाही.
२. राजस्थान, मध्यप्रदेश, तमिळनाडू येथून होणार्‍या प्राचीन शिल्पांची तस्करी आणि मंदिरांमधून चोरीला गेलेल्या देवतांच्या मूर्ती तात्काळ संबंधित देशाकडे पत्रव्यवहाराद्वारे ती भारतीय असल्याचे पुरावे सादर करून ती मिळवण्यात यश आले आहे.
३. वाढत्या तस्करीचे गांभीर्य लक्षात घेऊन नागरिकांनी त्याविषयी सतर्क होणे आवश्यक आहे.

नोटांवरील बंदीच्या प्रकरणामुळे ठाणे येथे वाहतूककोंडी

      ठाणे - सरकारने ५०० आणि १००० च्या नोटांवर बंदी घातल्यावर येथील खारेगाव आणि मुंबईच्या दिशेने आनंद नगर चेक नाका येथे काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली. ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या नोटा पथकर नाक्यावर घेण्यात येत नव्हत्या. त्यामुळे तेथे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. काही वेळाने वाद मिटल्यावर रांग पूर्ववत झाली. नोटांवरील बंदीमुळे बँकेतील कर्मचार्‍यांवर अधिक कामाचा बोजा पडणार आहे. तसेच नोटा मोजण्याच्या यंत्रांचीही आवश्यकता आहे, असे बँक कर्मचारी संघटनेचे नेते विश्‍वास उटगी यांनी सांगितले. 

कोपर्डी (जिल्हा नगर) अत्याचार प्रकरणातील तीनही आरोपींवर दोषारोप निश्‍चित !

       नगर, १० नोव्हेंबर - कोपर्डी अत्याचार प्रकरणातील तीनही आरोपींवर दोषारोप निश्‍चित करण्यात आले आहे. आरोपी जितेंद्र उपाख्य पप्पू शिंदे, संतोष भवाळ, नितीन भैलुमे यांच्यावर न्यायालयाने ९ नोव्हेंबर या दिवशी बलात्कार, कट, हत्या आणि बाललैंगिक अत्याचार हे आरोप निश्‍चित केले. या वेळी तीनही आरोपींनी गुन्हा मान्य नसल्याचे न्यायालयात सांगितले. खटल्याच्या वेळी विशेष शासकीय अधिवक्ता उज्ज्वल निकम उपस्थित होते. आरोपी नितीन भैलुमे याच्या जामीन अर्जावर नंतर सुनावणी होणार असून खटल्याची पुढील सुनावणी २० ते २३ डिसेंबरपर्यंत नियमित ठेवण्याचे आदेश जिल्हा आणि सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी दिले.

त्रिपुरारी पौर्णिमेला सैनिकांप्रती कृतज्ञतेसाठी वीर जवान तुझे सलाम कार्यक्रमाचे आयोजन ! - जिल्हाधिकारी

     सांगली - देशाचे संरक्षण करणार्‍या सैनिकांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने त्रिपुरारी पौर्णिमेला वीर जवान तुझे सलाम-एक पणती जवानांसाठी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. या उपक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. शेखर गायकवाड यांनी केले. या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते.
     जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, १४ नोव्हेंबर या दिवशी सायंकाळी ६.३० वाजता हा उपक्रम घ्यावयाचा आहे. जिल्ह्यातील नदीघाटावर त्या त्या ठिकाणच्या महिलांनी हा उपक्रम राबवावा. या उपक्रमासाठी नागरिकांनी ध्वजनिधीसाठी सढळ हातांनी साहाय्य करावे. या उपक्रमामुळे सामाजिक बांधिलकीची जोड मिळणार आहे. या वेळी वंदना शेखर गायकवाड, मिरज तहसीलदार शरद पाटील, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कर्नल प्रदीप ढोले यांसह अन्य उपस्थित होते.

एक सहस्र रुपयांचीही नवी नोट येणार !

        चलनात प्रचलित असलेल्या ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या नोटा बंद करून नवीन ५०० आणि २ सहस्र रुपये मूल्याच्या नोटा चलनात आणण्याचा निर्णय झाल्यावर परत एक सहस्र रुपयांच्या नोटा छापण्यासाठी धावपळ कशासाठी ? सरकारचे निर्णय असे धरसोड स्वरूपाचे असल्याने ते हास्यास्पद ठरतात. 
        नवी देहली - केंद्र सरकारने बंद केलेली १ सहस्र रुपयाची नोट नव्या स्वरूपात लवकरच येणार आहे. सुरक्षेच्या संदर्भातील गोष्टींचा अंतर्भाव करून पुढील काही मासांत ही नोट चलनात येईल, अशी माहिती केंद्रीय अर्थसचिव शक्तीकांत दास यांनी दिली. आगामी काळात सर्वच नोटांचे स्वरूप पालटण्यात येणार आहे, असेही दास यांनी स्पष्ट केले.

राजकीय पक्षांना मिळणार्‍या देणग्यांचे लेखापरीक्षण करावे ! - अण्णा हजारे

केंद्र सरकारने या मागणीवर कारवाई 
करावी, अशी जनतेची अपेक्षा आहे !
       नगर (पुणे) - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मोठ्या नोटा रहित करण्याच्या निर्णयाचे स्वागत करून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मागणी केली आहे की, आता निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना मिळणार्‍या देणग्यांचे काटेकोर लेखापरीक्षण करावे. 
अण्णा हजारे पुढे म्हणाले की, 
१. मी ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या नोटा रहित करण्याची मागणी केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेला निर्णय क्रांतीकारक आहे. यामुळे काळा पैसा बाहेर पडेल आणि देशाची प्रगती होईल. 
२. अनेक राजकीय पक्ष २० सहस्र रुपयांच्या आतील देणग्यांचा हिशोब देत नाहीत. मिळालेल्या मोठ्या देणग्यांचीही २० सहस्र रुपयांप्रमाणे वर्गवारी दाखवून खोट्या नावांनी काळा पैसा पांढरा केला जातो. (राजकीय पक्षांचे भ्रष्टाचारी खरे स्वरूप जाणा ! - संपादक)

बत्तीसशिराळा येथे १२ नोव्हेंबरला श्री महायोगी शंभुजती गुरु गोरक्षनाथजी उत्सव दिन !

     बत्तीसशिराळा (जिल्हा सांगली) - येथील श्रीगोरक्षनाथ मंदिरात १२ नोव्हेंबर या दिवशी श्री महायोगी शंभुजती गुरु गोरक्षनाथजी उत्सव जयंती उत्सांात साजरी होत आहे. या उत्सवाच्या निमित्ताने देशभरातून ३० हून अधिक साधू, संत, महायोगी, मठाधिपती उपस्थित रहाणार आहेत. ११ नोव्हेंबरच्या रात्री १० नंतर राजस्थानी भक्त भजनी मंडळाचा कार्यक्रम होईल. १२ नोव्हेंबरला सकाळी ७ ते ११ श्री गुरु गोरक्षनाथजी महाअभिषेक, सकाळी १०.१५ ते ११.४५ कीर्तन, भजन, दुपारी १२ वाजता श्री नवनाथ पुष्पवृष्टी, तर दुपारी १२.३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत महाप्रसाद होईल. तरी या सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा आणि श्री गोरक्षनाथ भक्तांनी तन-मन-धन यांनी सहकार्य करावे, असे आवाहन श्री गोरक्षनाथ मठाचे मठाधिपती श्री पीरयोगी पारसनाथजी महाराज यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ८२७५७०२१०५, ९११९४४८१५६ या क्रमांकावर संपर्क साधावा.

निवृत्ती वेतनधारकांनी न विसरता नोव्हेंबर मासात अधिकोषाला लाईफ सर्टिफिकेट द्यावे !

     ज्या शासकीय अथवा अन्य कर्मचार्‍यांना निवृत्तीनंतर प्रत्येक मासाला निवृत्ती वेतन (पेन्शन) देण्यात येते, त्यांनी ज्या अधिकोषातून आपण निवृत्ती वेतन घेतो, तेथे प्रतिवर्षी नोव्हेंबर मासात लाईफ सर्टिफिकेट द्यायचे असते आणि ते दिल्यानंतरच पुढील वर्षभर निवृत्ती वेतन चालू राहू शकते. हे सर्टिफिकेट देण्यासाठी अधिकोषाच्या ज्या शाखेतून खाते उघडले आहे, तेथे प्रत्यक्ष जाण्याची आवश्यकता नाही. सध्याच्या वास्तव्याच्या ठिकाणी त्या अधिकोषाची शाखा असल्यास तेथे आपल्या आधारकार्डाची मूळ आणि झेरॉक्स प्रत, तसेच पासबूक दाखवून लाईफ सर्टिफिकेट देता येते. (उदा. एखाद्याने निवृत्त वेतनासाठी ठाणे येथील अधिकोषातून खाते उघडले असेल आणि सध्या तो देहलीला वास्तव्याला असेल, तर देहली येथील त्या अधिकोषाच्या शाखेतूनही तो सर्टिफिकेट देऊ शकतो.) तरी नोव्हेंबर मासात लवकरात लवकर सर्टिफिकेट द्यावे.


बेळगाव येथील सीमावासियांवर झालेल्या अत्याचाराचा राज्य शासनाकडून निषेध !

      मुंबई - कर्नाटक सरकारने बेळगाव येथील सीमावासियांवर केलेल्या अत्याचाराचा राज्य शासनाकडून निषेध करण्यात आला. बेळगाव-निपाणीसह सीमा भागात १ नोव्हेंबर या दिवशी लोकशाही मार्गाने काळा दिन आंदोलन करणार्‍या मराठी तरुणांना कर्नाटक पोलिसांनी अमानुष मारहाण केली होती. तसेच बेळगाव महानगरपालिका बरखास्तीची नोटीस दिली होती. याचे तीव्र पडसाद ९ नोव्हेंबर या दिवशी मंत्रीमंडळाच्या बैठकीत उमटले.
१. परिवहनमंत्री आणि शिवसेनेचे नेते दिवाकर रावते यांनी कर्नाटक सरकारचा निषेध करण्याची मागणी केली. (यामुळेच शिवसेनेचा जनसामान्यांना आधार वाटतो. - संपादक) त्यानंतर मंत्रिमंडळाने त्या घटनांचा एकमुखी निषेध केला आणि कर्नाटक सरकारला शासनाच्या तीव्र भावना कळवण्याचा निर्णय घेतला.
२. या प्रकरणी महाराष्ट्र सरकारच्या भावना तीव्र असून सीमाभागातील मराठी बांधवांवर अन्याय होऊ नये, अशी भूमिका मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली.
३. पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी शिवसेनेची भूमिका मांडतांना सांगितले की, शासनाचा हा ठराव केवळ कर्नाटक आणि केंद्र सरकार या दोहोंना पाठवला पाहिजे.

सनातन गौरव विशेषांक

सनातनच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त साप्ताहिक सनातन प्रभातचा...
विशेषांकात प्रसिद्ध करण्यात येणारे लेख
सनातनच्या २५ वर्षांच्या कार्याचे सिंहावलोकन
सनातनचे प्रचंड वेगाने वाढणारे प्रसारकार्य
सनातनचे अद्वितीय आश्रम
संत, मान्यवर आणि हिंदुत्ववादी यांनी गौरवलेला सनातन परिवार
... यासह अन्य वैशिष्ट्यपूर्ण लिखाण !
सनातनचे अद्वितीय कार्य जाणून घेण्यासाठी आपली मागणी आजच नोंदवा !

पृष्ठे २४, मूल्य ८ रुपये
वितरकांनी अतिरिक्त अंकांची मागणी १४ नोव्हेंबर २०१६ या दिवशी दुपारी २ वाजेपर्यंत ईआरपी प्रणालीत भरावी.

नोटा रहित केल्यामुळे ३ लाख कोटी रुपयांचा काळा पैसा नष्ट होणार !

       नवी देहली - केंद्र सरकारच्या ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या नोटा रहित करण्याच्या निर्णयामुळे देशातील अनुमाने ३ लाख कोटी रुपयांचा काळा पैसा नष्ट होणार आहे, असा अंदाज तज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे. या अंदाजानुसार बेहिशेबी संपत्ती उघड होण्याच्या भीतीने अनेक जण त्यांच्याकडे असलेल्या ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या नोटा बँकेत जमा करणे टाळतील. अर्थव्यवस्थेत असलेल्या ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या एकूण नोटांच्या तुलनेत हे प्रमाण २० टक्के इतके आहे. २० टक्के इतके प्रमाण गृहीत धरल्यास देशातील ३ लाख कोटी रुपयांचा काळा पैसा नष्ट होईल, असे या क्षेत्रातील अभ्यासकांचे म्हणणे आहे. यामुळे सावकारी, गृहनिर्माण क्षेत्र, दागिने आणि अशाच प्रकारच्या संशयास्पद व्यवहारांमध्ये गुंतलेल्या बँकांवर परिणाम होणार आहे, असे टाटा अ‍ॅसेट मॅनेजमेंटचे मुख्य गुंतवणूक अधिकारी रितेश जैन यांनी सांगितले.

टिटवाळा येथे ७ कुपोषणग्रस्त मुले आढळली !

     टिटवाळा - येथील एका वैद्यकीय शिबिरात ७ मुले कुपोषित असल्याचे आढळून आले. यासंदर्भात माहिती देण्यासाठी आधुनिक वैद्यांनी संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांशी दूरभाषवर बोलण्याचा प्रयत्न केला; पण त्या अधिकार्‍यांना आम्हाला सुटी आहे, असे सांगत दूरभाष ठेवून दिला. ५ वर्षांच्या मुलांचे वजन १२ किलो आवश्यक असतांना ते केवळ ७ किलोच आहे.

फलक प्रसिद्धीकरता

बांगलादेशातील अल्पसंख्यांक हिंदूंची दयनीय स्थिती !
     बांगलादेशच्या गोविंदपूर जिल्ह्यात हक्काच्या भूमीवरून हाकलून देण्यास विरोध करणार्‍या हिंदु आदिवासींवर पोलीस, शीघ्र कृती दल आणि स्थानिक गुंड यांनी केलेल्या आक्रमणात २ हिंदु ठार झाले, तर १२०० हिंदु आदिवासी कुटुंबे घरे सोडून पळून गेली.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Bangladeshke Govindpur jileme police aur gundodwara Hindu adivasiopar kiye akramanme 2 Hindu mare gaye.
Hinduo, Hindu bandhuoki raksha hetu awaaj uthao

जागो !: बांग्लादेश के गोविंदपुर जिले में पुलिस और गुंडों द्वारा हिन्दू आदिवासियों पर किए आक्रमण में २ हिन्दू मारे गए.
हिन्दुओ, हिन्दू बन्धुआें की रक्षा हेतु आवाज उठाओ !

केंद्र सरकारने नोटा रहित करण्याचा निर्णय मागे घ्यावा ! - ममता बॅनर्जी

       कोलकाता - केंद्र सरकारने ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या नोटा रहित करण्याचा घेतलेला निर्णय निर्दयी आणि अविचारी असून तो त्वरित मागे घेण्यात यावा, अशी मागणी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांनी ट्विटद्वारे केली आहे. 
       ममता बॅनर्जी पुढे म्हणाल्या की, विदेशातून काळा पैसा आणू न शकल्याच्या अपयशापासून लक्ष हटवण्यासाठी मोदी सरकारने नोटा रहित करण्याचे नाटक केले आहे. मी काळा पैसा आणि भ्रष्टाचार यांच्या विरोधात कठोर आहे; मात्र सामान्य नागरिक आणि लहान व्यावसायिक यांच्याविषयी चिंतीत आहे. (ममता बॅनर्जी यांनी राज्यातील सामान्य हिंदूंचीही चिंता करावी. त्यांच्यावर सातत्याने होणार्‍या धर्मांधांच्या आक्रमणापासून त्यांचे रक्षण करावे आणि धर्मांधांवर कठोर कारवाई करावी ! - संपादक) त्यांना व्यवहार करतांना अडचण येत आहे. ही आर्थिक अव्यवस्था आणि आणीबाणी आहे. 

२ सहस्रच्या नव्या नोटांवर चीप असल्याचे वृत्त चुकीचे ! - अर्थमंत्री अरुण जेटली

    नवी देहली - आता चलनात ५०० आणि २ सहस्र रुपयांच्या नव्या नोटा येणार आहेत. यातील २ सहस्रची नोट कोठेही ठेवली किंवा लपवली, तरी ती उपग्रहाच्या (सॅटेलाईटच्या) माध्यमातून शोधता येणार आहे, अशा प्रकारचे वृत्त गेले दोन दिवस देशभरात पसरले होते; मात्र हे वृत्त चुकीचे आहे, असे स्वतः अर्थमंत्री अरुण जेटली यांना स्पष्ट केले आहे.
   रिझर्व्ह बँकेकडून २ सहस्र रुपयांच्या नोटांची छपाई पूर्ण झाली आहे. या नोटांची निर्मिती करण्यासाठी नॅनो तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या नोटा फक्त कागदाच्या नोटा असणार नाहीत. या नोटेमध्ये जीपीएस् चीप असणार आहे. यामुळे भ्रष्टाचार आणि बनावट नोटांच्या निर्मितीला आणि काळ्या पैशाला आळा बसेल, असा दावा करण्यात येत असलेले वृत्त प्रकाशित झाले होते.

अडीच लक्ष्यांपेक्षा अधिक डिपॉझिटवर कर !

बेहिशोबी रक्कम आढळल्यास २०० टक्के दंड !
    मुंबई - ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर यापुढे अडीच लक्ष्यांपेक्षा अधिक रक्कम बँकेत ‘डिपॉझिट’ (जमा) केल्यास त्यावर कर भरावा लागू शकतो. याशिवाय खातेदारांच्या उत्पन्नाशी या रक्कमेचा मेळ बसत नसेल म्हणजेच जमा केलेली रक्कम बेहिशोबी आढळली, तर त्यावर २०० टक्के दंड आकारला जाईल, असे वृत्त एका वृत्तवाहिनीने दिले आहे. या ५० दिवसांत जे लोक मोठ्या रक्कमा जमा करतील, त्यांचे ‘पॅनकार्ड’ क्रमांक आणि इतर माहिती ठेवण्यास बँकांना सांगण्यात आले आहे. त्याचप्रमाणे सोनारांनाही दागिने विकत घेणार्‍यांचे ‘पॅनकार्ड’ क्रमांक आणि इतर माहिती ठेवण्यास सांगण्यात आले आहे. जे या निर्देशांचे पालन करणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.

खोट्या बनावट नोटांवर मोदी सरकारचा सर्जिकल स्ट्राइक !

५०० आणि २००० रुपयांच्या नविन नोटांचे छायाचित्र
१. पाकद्वारे धाडण्यात येणार्‍या
बनावट भारतीय नोटांचे कारस्थान !
    कराची, लाहोर आणि पेशावर येथील पाकिस्तानच्या प्रेसमधे भारतीय चलनाच्या ५०० अन् १००० रुपयाच्या बनावट नोटा छापल्या जातात. ‘पकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स’, समझोता एक्सप्रेस, हवाला, कुरियरच्या माध्यमातून बनावट भारतीय नोटा नेपाळ, श्रीलंका आणि बांगलादेश येथे धाडण्यात येतात. बनावट नोटा भारतात चोरट्या मार्गाने आणण्यासाठी शेजारी राष्ट्रांच्या भूमीचा वापर करण्यात येतो. ढाक्यात पाकिस्ताचा एक राजनैतिक अधिकारीच बनावट नोटा वितरित करतांना सापडला. मैत्री आणि सद्भावना यांसाठी चालू करण्यात आलेल्या थर एक्स्प्रेसमधूनच बनावट नोटा भारतात आणल्या जात होत्या. गेल्या वर्षी बनावट नोटा भारतात घुसवणार्‍या अनेक यंत्रणा उघडकीस आल्या. काही महिला आणि मुले यांच्यावर हे काम सोपवले जाते अन् जितक्या रकमेच्या बनावट नोटा ते भारतात आणतील, त्याच्या दोन टक्के रक्कम त्यांना बक्षीस म्हणून द्यायची, असे हे कारस्थान चालू असते. भारताची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करायची, हा आयएस्आयचा डाव आहे. त्यासाठीही बनावट नोटांच्या शस्त्राचा उपयोग करण्यात आला. अशा प्रकारच्या कारवायांत दाऊद टोळीही गुंतली आहे. या नोटांची छपाई, कागदाचा दर्जा आणि त्यावरील गव्हर्नरची स्वाक्षरी हे सर्व इतके तंतोतंत असते, की खोटी अन् खरी नोट यांतील फरक कळणे अवघड होते.

ब्रिटीशपूर्व काळातील सर्वोच्च हिंदु शिक्षणपद्धत

आज असलेल्या शिक्षण दिनाच्या निमित्ताने...
‘ब्रिटीशकाळात शालेय शिक्षणातील पदव्या इत्यादीची पद्धतच नव्हती. श्रेष्ठ असे पारंपरिक शिक्षण होते.
१. शूद्र, अतीशूद्र अशा व्यक्तींनाही शिक्षणाची द्वारे खुली असणे : ‘Memoirs of late Asia’ (J Murray London 1767) या विख्यात ग्रंथात कर्नल वेली हा एक उच्चपदस्थ ब्रिटीश शिक्षणाधिकारी हिंदूंच्या शिक्षणव्यवस्थेसंबंधी लिहितो, ‘शूद्र, अतीशूद्र अशा निकृष्ट स्तरातील व्यक्तींनाही वाचन, लेखन, गणित, रामायण, महाभारत, पुराणादी प्रसंग शिकवले जात असत. तरुण विद्यार्थ्यांत हे पारंपरिक शिक्षण चार भिंतीच्या आड खोलीत न देता मोकळ्या जागेत वृक्षाखाली दिले जात असे. प्रत्येक ग्रामात एक थोर आदरणीय व्यक्ती वृक्षाला टेकून सभोवती गोळा झालेल्या कितीतरी विद्यार्थ्यांना शिकवत असे. विद्यार्थी अत्यंत पूज्य बुद्धीने ती विद्या ग्रहण करत.

अमेरिकेतील पक्षपाती प्रसारमाध्यमांवर विजयी उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांची मात !

  • अमेरिकाच नव्हे, तर भारतातील प्रसारमाध्यमेही कमालीची पक्षपाती, खोटारडी आणि द्वेषी आहेत, याचा अनेकांनी जसा अनुभव घेतला आहे, तसा सनातननेही घेतला आहे. त्यामुळे एकूणच प्रसारमाध्यमांवर किती विश्‍वास ठेवावा, हेच यातून समोर येते. जनता प्रसारमाध्यमांपेक्षा सूज्ञ आहे, कोणी कितीही लपवण्याचा आणि खोटे दाखवण्याचा प्रयत्न केला, तरी जनता योग्य तेच करते !
नवी देहली - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या वेळी बहुतांश प्रसारमाध्यमांनी उघडपणे डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात भूमिका घेतली आणि हिलरी क्लिंटन यांना साहाय्य केले. मात्र तरीही याचा लाभ हिलरी यांना झाला नाही. यातून प्रसारमाध्यमांनी कितीही प्रयत्न केले, तरी जनतेला योग्य आणि अयोग्य हे समजते, हे यातून उघड झाले आहे.
प्रसारमाध्यमांवर लक्ष ठेवणार्‍या एका संस्थेने याविषयी एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. यात प्रसारमाध्यमांनी कशा प्रकारे हिलरी यांना साहाय्य केले, ते देण्यात आले आहे. हिलरी क्लिंटन यांना ८४ प्रसारमाध्यमांनी समर्थन दिले होते, तर ट्रम्प यांच्यामागे १० पेक्षाही अल्प प्रसारमाध्यमे उभी राहिली. प्रसारमाध्यमांनी घेतलेल्या आदल्या दिवशीच्या पोलमध्ये हिलरी यांना ९५ टक्के पसंती दाखवण्यात आली होती; मात्र काही घंट्यांतच त्यांचा खोटेपणा जनतेने उघडा पाडला.

मराठी भाषेविषयीची दुरवस्था दूर होणार का ?

मध्यंतरी पुण्यामध्ये मराठी भाषेला ‘अभिजात भाषे’चा दर्जा मिळावा, या विषयाच्या अनुषंगाने चर्चासत्र आयोजित केले होते. यामध्ये सध्याचे साहित्य संमेलनाध्यक्ष, माजी संमेलनाध्यक्ष, भाषा सल्लागार समितीचे माजी अध्यक्ष, साहित्य महामंडळाचे अध्यक्ष इत्यादी मान्यवर सहभागी झाले होते. त्यामध्ये मराठी भाषेला ‘अभिजात भाषे’चा दर्जा द्यावा आणि मराठीसाठी स्वतंत्र विद्यापीठ हवे, या मागण्यांनी जोर धरला. या २ मागण्यांचा विचार करता मागण्या योग्य असल्या तरी त्यांची कितपत आवश्यकता आहे आणि त्यातून मराठी भाषा संवर्धन खरेच होणार का, याचा विचार होणेही आवश्यक आहे. आपण क्षणभर असे मानून जरी चाललो की, केंद्र आणि राज्य सरकारने या दोन्ही मागण्या मान्य केल्या, तरी त्यातून मराठी भाषेची जी मरणासन्न अवस्था झाली आहे, ती दूर होणार का ? याचे उत्तर कोणीही ‘नाही’, असेच देईल.

सनातनच्या साधिका सौ. उमा रविचंद्रन् यांच्याविषयी सनातनचे साधक प्रा. श्रीकांत भट यांना माता पार्वतीकडून मिळालेली माहिती

१. माता पार्वतीची शक्ती सनातनला मिळवून देण्यासाठीच
सौ. उमा रविचंद्रन् यांचे भूतलावर पदार्पण !
     ‘९.१०.२०१६ या दिवशीच्या दैनिक सनातन प्रभातमधील सनातनच्या साधिका सौ. उमा रविचंद्रन् यांनी लिहिलेला लेख वाचत असतांना त्यांच्याविषयी आपोआप माहिती मिळू लागली. ही माहिती माता पार्वती स्वतःच देत असल्याचे जाणवले. त्याच वेळी दैनिकातील सौ. उमाक्का यांचे छायाचित्र पालटले जाऊन, तेथे पार्वती दिसू लागली. छायाचित्रातून पांंढरे प्रकाश किरण बाहेर पडू लागले. पार्वतीने पांढरी सुगंधी फुले डोक्यात घातली होती. त्या फुलांच्या सुगंधाने माझे भान हरपले, तरीही पार्वतीचे बोलणे मात्र मला ऐकू येतच होते.
२. सौ. उमा रविचंद्रन् ही माझी शिष्या असून, मागच्या जन्मातील श्रीविष्णूची राहिलेली सेवा
करण्यासाठी ती भूतलावरील वैकुंठलोकास प्राप्त झाली आहे, असे पार्वतीने सांगणे
     पार्वती म्हणाली, ‘सौ. उमा रविचंद्रन् ही माझीच शिष्या असून, मागच्या जन्मातील श्रीविष्णूची राहिलेली सेवा करण्यासाठीच ती भूतलावरील वैकुंठलोकास प्राप्त झाली आहे. सनातनरूपी वैकुंठभूमी आता या (२०१६ च्या) नवरात्रोत्सवापासून अधिक शक्तीशाली आणि चैतन्यदायी होण्यासाठीच या भूमीत (आश्रमात) मीच श्री गणेशयाग आणि बगलामुखी-ब्रह्मास्त्र मंत्रपठण करण्याचे योजिले होते. सनातन आश्रमातील मनुष्यदेहातील जगत्जननीचे एक रूप असलेल्या माझ्याच शक्तीरूपानेे (सद्गुरु सौ. बिंदाताईच्या माध्यमातून) ‘मातृरूपेण संस्थिता’ (देवी सर्व प्राणीमात्रांमध्ये आईच्या रूपात आहे.) अशा त्यांच्याकडून हा यज्ञयाग घडवून आणला आहे. त्यामुळे येणार्‍या भीषणकाळात माझी (पार्वतीची) शक्तीच या पुण्यभूमीचे दाही दिशांतून शक्तीशाली कवचांनी संरक्षण करणार आहे. सनातनला आता शक्तीउत्सवांचेच आयोजन करावयाचे असून, त्यासाठी माझीच सगुण शक्ती आश्रमात आकार धारण करत आहे. श्री दुर्गादेवीच्या मूर्तीच्या बाबतीत सौ. उमा रविचंद्रन्च साहाय्य करणार असून, ती माझी लाडकी सखी आहे. माझी साहाय्यता म्हणूनच सौ. उमा रविचंद्रन पृथ्वीवर अवतरली आहे.

शिकण्याची वृत्ती आणि सेवेची तळमळ असलेले ६१ प्रतिशत आध्यात्मिक पातळीचे देवद आश्रमातील श्री. अरविंद गाडगीळ !

श्री. अरविंद गाडगीळ
१. वेळेचे पालन करणे
     श्री. अरविंद गाडगीळकाका साधारणत: १४ - १५ वर्षांपूर्वी ग्रंथ, ध्वनीफिती इत्यादी अहवाल पडताळणी, अहवालांचे संगणकावर एकत्रीकरण करणे अशा अत्यंत किचकट सेवा करत. या सर्व सेवा प्रत्येक मासाला पूर्ण करण्यासाठी समयमर्यादा होत्या. प्रत्येक सेवा वेळेत आणि अचूक व्हावी, याकडे त्यांचा कटाक्ष असे. सत्संग किंवा महाप्रसाद इत्यादींच्या वेळा ते अचूक पाळत.
२. शिकण्याची वृत्ती
     पूर्वी काकांना संगणकावर अहवाल सारणी भरणे, इ-मेल पाठवणे इत्यादी सेवा नवीन होत्या. त्यांनी त्या कुशलतेने आत्मसात केल्या.
३. चुका ठामपणे मांडणे आणि स्वीकारणे
     त्यांना आश्रम स्तरावर एखादी गोष्ट खटकल्यास ते त्या संदर्भात बैठकीत ठामपणे सूत्रे मांडत. बैठकीत त्यांची एखादी चूक लक्षात आणून दिल्यास ती लगेच स्वीकारत.
४. सेवेची तळमळ
     काका प्रतिदिन पहाटे ४.३० वाजता आश्रमात येऊन सेवेला प्रारंभ करत. मला कधी कधी रात्री सेवा असतांना मी त्यांना रात्री ३ वाजता संकुलातील घरी जाऊन घरातून परत आश्रमात सेवेला आल्याचे पाहिले आहे. याविषयी त्यांना विचारल्यावर ते सहज उत्तर देत, ‘‘अरे, घरी झोप येत नव्हती; म्हणून आलो !’’ हिवाळ्यात संधीवातामुळे त्यांना पाय नीट उचलता येत नसे, तरी वेदनांची तमा न बाळगता ते नियमितपणे सेवेस येत. एखाद्या दिवशी काका सेवेला न आल्यास आम्हाला चुकल्यासारखे होत असे.
५. व्यष्टी साधनेचे गांभीर्य
     त्यांना प्रतिदिन काही घंटे नामजप करायला सांगितला होता. तो ते वेळ काढून पूर्ण करत.

काही क्षणांच्या अमूल्य सत्संगातून जीवनाला दिशा देणारे प.पू. डॉक्टर !

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले 
यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...
१. गुरुपौर्णिमेच्या सेवेसाठी 
भोपाळ येथे जाण्यास सांगणे
       ‘१९९७ या वर्षी भोपाळ, मध्यप्रदेश येथे सनातन संस्थेच्या वतीने पहिली गुरुपौर्णिमा साजरी झाली. मी सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार नुकताच साधना करू लागलो होतो. माझ्या आध्यात्मिक जीवनातील ही पहिली गुरुपौर्णिमा होती. मला भोपाळ येथे गुरुपौर्णिमा सेवेसाठी जाण्यासाठी उत्तरदायी साधकाने सांगितले. देवानेच मला तिकडे जाण्याचा विचार दिला. 
२. भोपाळ येथे जाण्यासाठी दादरहून 
रेल्वेत बसण्याच्या निमित्ताने 
प.पू. डॉक्टरांचा लाभलेला सत्संग
२ अ. सेवाकेंद्रात प.पू. डॉक्टर यांचे प्रथम दर्शन आणि सत्संग लाभणे : त्या वेळी प.पू. डॉक्टर सेवाकेंद्रात रहात होते. भोपाळला जाण्यासाठी दादर येथून रेल्वे होती. ‘ठाणे येथून श्री. रोहित साळुंखे आणि गोरेगाव येथून मी असे आम्ही सेवाकेंद्रात भेटायचे’, असे ठरवले. त्या वेळी मला साक्षात् श्रीमत् नारायण प.पू. डॉक्टर यांचे प्रथम दर्शन आणि सत्संग लाभला.

मुंबई जिल्ह्याचा ऑक्टोबर २०१६ या मासातील चौथ्या सप्ताहाचा हिंदु जनजागृती समितीच्या प्रसारकार्याचा आढावा !

१. लोअर परळ
‘येथील ‘दीप क्रीडा मंडळा’ने दिवाळीनिमित्त क्रांतीकारकांची माहिती देणार्‍या फ्लेक्स फलकांचे प्रदर्शन लावले. या प्रदर्शनासाठी तेथील स्थानिक धर्माभिमानी श्री. बिपीन तावडे यांनी पुढाकार घेतला.
२. फटाक्यांमुळे होणारी हानी आणि त्यांवर असणार्‍या देवतांच्या
चित्रामुळे होणारा देवतांचा अनादर रोखण्यासाठी निवेदन देणे
फटाक्यांमुळे होणारी हानी रोखणे, तसेच त्यांवर असणार्‍या देवतांच्या चित्रामुळे देवतांचा होणारा अनादर रोखणे या हेतुने खारघर, नेरुळ आणि बेलापूर पोलीस ठाणे येथे समितीच्या वतीने श्री. संतोष मांडोळे आणि धर्माभिमानी श्री. दिनेश चासकर यांनी निवेदन दिले. तसेच वाशी येथे समितीचे श्री. वसंत सनस आणि हिंदु राष्ट्र्र सेनेचे श्री. भालचंद्र गायकवाड यांनी निवेदन दिले.

प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर महर्षि आम्हाला तेथे ३ दिवस रहाण्यास सांगत असण्याचे महर्षींनीच उलगडून सांगितलेले कारण

काळाचा महिमा !
महर्षींची शिकवण आणि कार्य !
    ‘कुठेही गेलो, तरी महर्षि आम्हाला बहुतेक वेळा त्या त्या ठिकाणी ३ दिवस रहाण्यास सांगतात. याचे कारण सांगतांना महर्षि म्हणतात - ‘भूत, वर्तमान आणि भविष्य’ या काळांवर तुमचा ताबा येण्यासाठी आम्ही तुम्हाला त्या त्या स्थानी ३ दिवस रहाण्यास सांगतो. तीन दिवस हे तीन प्रकारच्या काळांचे प्रतीक आहेत.’ यावरून पुढील सूत्रे लक्षात आली.
१. काळच कृपावंत झाला, तर विजयाची निश्‍चिती असणे, असे लक्षात येणे
      ‘काळाचा महिमा मोठा आहे. काळ हा सर्वस्व आहे. काळालाच जिंकता आले किंवा त्या काळाचीच कृपा आपल्यावर झाली, तर विनाशकालाला घाबरण्याचे काहीच कारण नाही; कारण काळच कृपावंत झाला, तर विजय निश्‍चित आहे.
२. काळ अनुकूल असेल, तरच प्रत्येक गोष्टीला यश प्राप्त होणे
     प.पू. डॉक्टरांच्या कृपेमुळे महर्षि आम्हाला एक प्रकारे काळाचे वरदानच मिळवून देत आहेत. काळ अनुकूल असेल, तरच प्रत्येक गोष्टीला यश प्राप्त होते. नाहीतर कितीही मेहनत केली, तरी ती वाया जाते. आमचे कोणतेच कर्म वाया जाऊ नये, यासाठी महर्षि किती काळजी घेत आहेत, हे यातून लक्षात येते.
३. काळाशी जवळीक होणे, ही प.पू. डॉक्टरांची कृपा !
     प.पू. डॉक्टरांच्या कृपेमुळे महर्षि आमची जवळीक सर्वश्रेष्ठ अशा काळाबरोबरही करून देत आहेत.

निर्मळ मनाचे, प्रेमळ आणि कुटुंबियांना साधनेत साहाय्य करणारे पुणे येथील श्री. शशिकांत गजेंद्र टोणपे !

श्री. शशिकांत टोणपे
     कार्तिक शुक्ल पक्ष एकादशी (११.११.२०१६) या दिवशी पुण्यातील पिंपरी, चिंचवड येथील श्री. शशिकांत टोणपे यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या बहिणींना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे देत आहोत.
श्री. शशिकांत टोणपे यांना सनातन परिवाराच्या वतीने 
वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा !
१. वाचनाची आवड
     ‘दादाला विविध विषयांवरील पुस्तके वाचायला आवडतात. वाचनामुळे दादाला कुठल्याही विषयावर चांगले बोलता येते. हिंदु आणि इतर धर्म, इतिहास, राजकारण, स्वामी विवेकानंद आणि वैद्यकशास्त्र या क्षेत्रांतील पुष्कळ गोष्टींची दादा समर्पक माहिती देतो.
२. लिखाण, कविता आणि वक्तृत्व यांवर प्रभुत्व
     दादा एखाद्या विषयावरील वैचारिक लिखाण पुष्कळ छान लिहितो. तो विविध वृत्तपत्रांत ‘वाचकांची पत्रे’ या सदरासाठी स्वतःची मते लिहून पाठवतो. ती सर्वांना आवडतात.
     शाळेत असतांनाही तो निबंध पुष्कळ छान लिहित असे. त्याचे निबंध वर्गशिक्षिका पूर्ण वर्गाला वाचून दाखवत असत. त्याला कविताही पुष्कळ छान आणि अर्थपूर्ण सुचतात. त्याचे वक्तृत्व कौशल्यही पुष्कळ चांगले आहे. धर्मशिक्षणवर्ग घेण्यासाठी त्याला त्याचा पुष्कळ लाभ होतो.
३. निर्मळ मन
     दादाचे मन निर्मळ आहे. तो मनात येणारी प्रत्येक गोष्ट तारतम्याने समोरच्याला त्वरित सांगतो. यामुळे काही वेळा त्याला त्रासही झाला आहे. तो म्हणतो, ‘‘देवाला आपले मन ठाऊक आहे आणि मनातील भावही ठाऊक आहे. मग समोरच्याने ‘आपण सांगितलेले कसे घ्यायचे ?’, हा त्याचा प्रश्‍न आहे.’’
- कु. सुप्रिया टोणपे (बहीण), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
४. इतरांचा विचार करणे
अ. ‘लहानपणापासून भावाने आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आमच्यासाठी बर्‍याच तडजोडी केल्या आहेत.

‘संतांकडून खाऊ मिळणार आहे’, असे वाटणे आणि सहसाधिकेच्या स्वप्नात तेच संत येऊन त्यांनी साधिकेला खाऊ देण्यास सांगणे

     ‘२३.४.२०१६ या दिवशी सकाळी मला ‘संतांकडून खाऊ मिळणार आहे’, असे वाटत होते. मी विभागात सेवेसाठी गेल्यावर साधिका कु. वर्षा जबडे हिने सांगितले, ‘‘माझ्या स्वप्नात एक संत आले होते. त्यांनी मला खाऊ दिला. नंतर ते म्हणाले, ‘नंदाला खाऊ द्यायचा राहिला. हा नंदाला वेगळा खाऊ ने आणि त्यांनी माझ्याकडे दुसरा खाऊचा खोका दिला. तेव्हा मी त्यांना म्हणाले, ‘दीपालाही खाऊ द्यायचाय. त्यावर संत म्हणाले, ‘तू खाऊ एकटी खाणार नाहीस. तू सगळ्यांना देणार आहेस, तर दीपाला आपोआपच खाऊ मिळेल !’’ संतांनी अशा प्रकारे मला सूक्ष्मातून खाऊ दिला. मला संतांकडून खाऊ मिळायचा असेल, तर तशी पूर्वसूचना मिळते.’
- कु. नंदा सदानंद नाईक, सनातन आश्रम, रामनाथी गोवा. (२४.४.२०१६)

ध्यानमंदिरात बसून नामजप करत असतांना ‘ॐ’चा नाद ऐकू आल्याची साधकाला आलेली अनुभूती आणि साधकाची झालेली विचारप्रक्रिया

१. ध्यानमंदिरात बसून दत्ताचा नामजप करत असतांना ‘ॐ’चा नाद ऐकू येऊन हिमालयात असल्याप्रमाणे शीतलता जाणवणे आणि १५ मिनिटांनंतर डोके बधीर होणे : ‘२२.९.२०१६ या दिवशी सायंकाळी मी ध्यानमंदिरातील खिडकीच्या बाजूला असलेल्या आसंदीवर बसून दत्ताचा नामजप करत होतो. मी नामजप करत असतांना काही वेळाने मला ‘ॐ’चा नाद ऐकू आला. ‘नासाने सूर्याच्या कक्षेत जाऊन ध्वनीमुद्रित केलेल्या नादासमान हा ‘ॐ’चा नाद येत आहे’, असे मला जाणवले. मला या नादाची स्पंदनेही जाणवत होती. माझे मन एकाग्र झाले आणि ‘मी हिमालयात आहे’, असे वाटून मला शीतलता जाणवू लागली. मला हा नाद ऐकू येत असतांना माझ्या मनाची एकाग्रता भंग झाली नाही. अनुमाने १५ मिनिटांनंतर माझे डोके बधीर होऊ लागले. मला हा नाद ४५ मिनिटे ऐकू येत होता. 
२. पूर्वी ऐकू आलेल्या नादाच्या तुलनेत या दिवशी ऐकू येत असलेल्या ‘ॐ’च्या नादाची स्पंदने अधिक मारक आणि शक्तीदायक जाणवणे अन् १० मिनिटांनंतर डोके बधीर होऊन कानाला दडे बसणे : ३०.९.२०१६ या दिवशी सायंकाळी ध्यानमंदिरात जप करायला बसल्यावर मला पुन्हा ‘ॐ’ चा नाद ऐकू आला. पूर्वी ऐकू आलेल्या नादाच्या तुलनेत या नादाची स्पंदने अधिक मारक आणि शक्तीदायक होती. मला आरंभी शांत वाटले. नंतर अनुमाने १० मिनिटांनंतर माझे डोके बधीर होऊन कानाला दडे बसू लागले. एकापेक्षा अधिक जणांनी ‘ॐ’चा जप केल्यावर जसा नाद उत्पन्न होतो, तसा हा नाद ऐकू येत होता. 

६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. देवी कपाडिया यांना वाढदिवसानिमित्त त्यांच्या मुलीने दिलेले कृतज्ञता पत्र !

सौ. देवी कपाडिया
        ‘कु. भाविनी कपाडिया यांनी त्यांची आई सौ. देवी कपाडिया यांना वर्ष २०१५ मध्ये वाढदिवसानिमित्त पुढील कृतज्ञता पत्र दिले होते. आज कार्तिक शुक्ल पक्ष द्वादशी (११.११.२०१६) या दिवशी त्यांचा तिथीनुसार ६४ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त ते कृतज्ञता पत्र येथे देत आहोत.
सौ. देवी कपाडिया यांना आज ६४ व्या 
वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून नमस्कार ! 
(शेजारील कृतज्ञतापत्रातील लिखाण)
आई, तुला वाढदिवसानिमित्त नमस्कार !
        तू लवकर लवकर संत हो आणि त्यानंतरही सतत तुझी प्रगती शीघ्र गतीने होवो’, यासाठी श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना !
        (साधिकेने सोनेरी रंगाचे मोरपीस काढून त्याच्या शेजारी लिहिलेला संदेश) हे सोनेरी मोरपीस श्रीकृष्णाने तुझ्यासाठी पाठवले आहे; कारण त्याला सांगायचे आहे, ‘याच जन्मी तू मोक्षाला जाशील’ आणि ही सोनेरी संधी तुला त्यानेच दिली आहे.

कु. निधी देशमुख यांच्याकडून आर्ततेने झालेल्या प्रार्थना !

कु. निधी देशमुख
        रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील सेवा करणार्‍या कु. निधी देशमुख यांचा आज कार्तिक शुक्ल पक्ष एकादशी (११ नोव्हेंबर) या दिवशी वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने कु. निधी देशमुख यांना सुचलेली प्रार्थना आणि आलेल्या अनुभूती येथे देत आहोत. 
कु. निधी देशमुख यांना सनातन 
परिवाराकडून वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा !
        ‘६.७.१०१६ या दिवशी अचानक माझ्याकडून देवाला अशी प्रार्थना झाली, ‘देवा, भक्तांच्या रक्षणासाठी तू वेळोवेळी धावून आला आहेस. आपल्या भक्तांसाठी तू नेहमी धावून येतोस. भगवंता, तुझ्या भक्तांच्या जीवनाचाच नाही; जन्मो-जन्मी केलेल्या साधनेचा प्रश्‍न आहे. भगवंता, तूच द्रौपदीच्या रक्षणासाठी धावून आलास. आज तुझ्या भक्तांवर संकट आले आहे. तू आता आपल्या भक्तांसाठी धावून ये. प्रभो, तू करुणामूर्ती आहेस, दयासागर आहेस, आपल्या भक्तांची अशी अवस्था झालेली पाहूनही तू शांत कसा आहेस ? भगवंता, एका प्रल्हादासाठी तू अवतार घेतलास, तशी कृपा परत कर ! दीनदयाळा, या हाकेला धावून ये. ही वसुंधराच त्राहिमाम् करत आहे, आता कृपा कर करुणाकरा !’ 

कुटुंबातील सर्वांची काळजी घेणारा आणि धर्माचरणाची आवड असलेला ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचा महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला सोलापूर येथील कु. रितेश राजन जबडे (वय १३ वर्षे) !

कु. रितेश जबडे
(‘कु. रितेश याची वर्ष २०१२ मध्ये ६० टक्के आध्यात्मिक पातळी होती.’ - संकलक)
कार्तिक शुक्ल पक्ष एकादशी (११.११.२०१६) या दिवशी कु. रितेश जबडे याचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या आत्या (कु. वर्षा जबडे यांना) त्याची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे देत आहोत.
कु. रितेश जबडे याला वाढदिवसानिमित्त
सनातन परिवाराच्या वतीने शुभाशीर्वाद !
१. कुटुंबासाठी आधार
१ अ. धाकट्या बहिणीवरील प्रेम : ‘कु. रितेशचे त्याच्या ८ वर्षांच्या लहान बहिणीवर पुष्कळ प्रेम आहे. तो तिला आवडणार्‍या वस्तू नेहमी आणून देतो. तिच्या अभ्यासातील अडचणी सोडवतो. त्याने तिला सायकल शिकवण्याचे नियोजन केले होते.
१ आ. रुग्णाईतांची सेवा करणे : घरात कोणी रुग्णाईत असेल, तर तो त्यांची विचारपूस करतो, तसेच त्यांचे डोके, पाय इत्यादी दाबून देतो.
१ इ. नियोजनकुशलता : घरात कुणाचा वाढदिवस असेल, तर तो स्वत:हून कार्यक्रमाचे आयोजन करून वाढदिवस साजरा करतो. एकदा त्याच्या आई-वडिलांच्या लग्नाचा वाढदिवस त्याने घरात कुणालाही कळू न देता साजरा करण्याचे नियोजन करून ऐनवेळी सर्वांना चकित केले.

तीव्र त्रास होत असतांना ‘देवाने डोक्यावरून हात फिरवायला हवा’, असे वाटणे आणि ती इच्छा सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या माध्यमातून पूर्ण होणे

       ‘१९.९.२०१६ या दिवशी सकाळपासून मला आध्यात्मिक त्रास होत होता. त्यावर ‘देव आपल्यासमवेत आहे’, असा भाव ठेवण्याचा मी प्रयत्न करत होते. मधे-मधे ते जाणवायचेही. दुपारी एका संतांना या त्रासाविषयी विचारले आणि त्यांच्याकडून मंत्र घेतला. रात्री त्रास अधिक झाल्यावर ‘देवाने येऊन धीर द्यायला हवा. त्याने डोक्यावर हात फिरवायला हवा’, असे मला वाटू लागले. नामजपाच्या खोलीत बसून मी मनाला सूचना देत होते की, देव माझ्या डोक्यावरून हात फिरवत आहे, मला धीर देत आहे, असे मला जाणवेल आणि माझा त्रास न्यून होईल. तेवढ्यात मला एका साधिकेने सांगितले की, सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी भेटायला बोलावले आहे.
       मी त्यांच्याकडे गेले, तेव्हा त्रासामुळे माझ्या छातीत धडधडत असल्याचे लक्षात आले. सद्गुरु (सौ.) बिंदाताई भ्रमणभाषवर बोलत असल्याने मी नामजप करत बसले. त्यांनी सांगितले, ‘‘तुझी आठवण येत असल्यामुळे तुला बोलावले.’’ थोड्या वेळाने मी त्यांना मला होत असलेल्या त्रासाविषयी सांगितले. तेव्हा त्यांनी माझ्या डोक्यावरून हात फिरवला. त्या वेळी मला रडू आले. ‘देवाने स्थुलात येऊन डोक्यावरून हात फिरवला’, असे वाटले. ‘भगवंत किती लवकर ऐकतो, कृपा करतो’, असे जाणवून त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त झाली.’
- कु. निधी देशमुख, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२१.९.२०१६) 

हिंदीतील ‘अक्षरयोग’ ग्रंथाशी संबंधित सेवा करत असतांना ‘ग्रंथातील ‘ऋ’ या वर्णाविषयी एका संतांना विचारायला हवे’, असा विचार आल्यावर दुसर्‍या दिवशी त्यांनी एका साधकाला त्याविषयी सांगणे

       ‘हिंदीतील ‘अक्षरयोग’ ग्रंथाशी संबंधित सेवा करत असतांना ग्रंथातील ‘ऋ’ या वर्णाविषयी बोलणे चालू होते. त्या वेळी मनात विचार आला, ‘दीर्घ ऋ प्रचलित नसल्यामुळे ग्रंथात घ्यायला नको; पण हा वर्ण साक्षात् शिवाने निर्मिला असल्याने त्याच्या अनुमतीविना तो काढायलाही नको. आपले गुरु साक्षात् शिव असल्यामुळे त्यांनी याविषयी सांगितले, तर बरे होईल.’
       दुसर्‍या दिवशी एक साधक एका संतांना भेटल्यावर त्यांनी सांगितले,‘‘ऋ ग्रंथात असायला हवा. सर्वांना समजण्यासाठी टिपणी देऊ शकतो.’’ देवाने मनातील इच्छा ओळखून प्रत्यक्ष मार्गदर्शन केल्याविषयी कृतज्ञता वाटली.’
- कु. निधी देशमुख, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.८.२०१६) 

सनातनच्या संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नका !

साधकांना सूचना
     सनातनच्या संतांचा वाढदिवस असलेल्या दिवशी त्यांच्या संदर्भात साधकांनी दैनिक सनातन प्रभातमध्ये गुणवैशिष्ट्ये लिहून दिलेली असतात. त्यामुळे सर्वत्रच्या साधकांचे त्या संतांना भ्रमणभाष येतात. संतांना दिवसभर अनेक साधकांशी भ्रमणभाषवर बोलावे लागत असल्याने त्यांच्या सेवेतील अमूल्य वेळ वाया जातो. सध्या आपत्काळाला आरंभ झाल्यामुळे एकेक क्षण महत्त्वाचा आहे. स्थुलापेक्षा सूक्ष्म श्रेष्ठ असल्याने साधकांनी संतांना भ्रमणभाष न करता त्यांना मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

समष्टीचे महत्त्व !

कु. प्रेरिता धोतमल
‘समष्टी आपला खरा आरसा आहे.’ - कु. प्रेरिता धोतमल (वय १७ वर्षे) 

स्त्री आणि पुरुष यांच्या दिवसभरातील कार्याचा वेळ आणि त्याचा परिणाम

१. ‘पुरुषांना आठवड्यात शनिवार आणि रविवार अशी दोन दिवस रजा मिळते. स्त्रियांना मात्र सातही दिवस काम करावे लागते.
२. पुरुष कार्यालयातून घरी परतल्यावर दूरदर्शनवरील कार्यक्रम पहा, काही वाचन करा, मुलांबरोबर गप्पा मारा इत्यादी करतात. स्त्रियांना मात्र असे करायला कमी वेळ असतो; कारण त्यांना दिवसभर कामे असतात.’
      असे असले, तरी स्त्रिया पुरुषांप्रमाणे वेळ फुकट घालवत नसल्यामुळे त्या साधनेत जलद प्रगती करू शकतात.’
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥

या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. 
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

हरि ॐ तत्सत

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
हे असे आहे का ? ते तसे आहे का ? हे असेही नाही, तसेही नाही.
ते कशात नाही ? मग ते असेही आहे आणि तसेही आहे.
 भावार्थ : हे असे आहे का ? मधील हे मायेविषयी आहे. ते तसे आहे का ? मधील ते ब्रह्मासंबंधी आहे. हे असेही नाही, तसेही नाही, म्हणजे म्हटले तर ही म्हणजे माया, असेही नाही म्हणजे दिसते तशी नसून ब्रह्म आहे आणि तशीही नाही म्हणजे ब्रह्म म्हटले तर ब्रह्मस्वरूपातही नाही. ते कशात नाही ? म्हणजे ब्रह्म सर्वत्र आहे, मायेतही आहे. मग ते असेही आहे आणि तसेही आहे म्हणजे माया आणि ब्रह्म दोन्ही एकच आहेत.
(संदर्भ ः सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
     बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी अध्यात्माविरुद्ध वादळ उठवल्याने हिंदू अध्यात्मापासून दूर गेल्यामुळे अधोगतीला गेले. बुद्धीप्रामाण्यवादीच भारताच्या केविलवाण्या स्थितीला उत्तरदायी आहेत. हिंदु राष्ट्रात त्यांना आजन्म कठोर साधना करण्याची शिक्षा देण्यात येईल. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

अभिजनांचा पराभव !

श्री. भाऊ तोरसेकर
१. मतदानपूर्व चाचण्यांचे निकाल फोल ठरवणारे डोनाल्ड ट्रम्प !
    ‘अमेरिकेच्या नव्या अध्यक्षांची निवड झाली असून येत्या जानेवारी मासात त्यांच्या हाती देशाची सुत्रे सोपवली जातील. या निवडणुकीने १० वर्षे सत्तेत असलेल्या डेमॉक्रेट पक्षाला मोठाच दणका बसला आहे; कारण त्यांच्या लोकप्रिय उमेदवार हिलरी क्लिंटन यांचा दारूण पराभव झाला आहे. त्यांना पराभूत करणार्‍या डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्वच संदर्भात हिलरींना निर्विवाद पराभूत केले आहे. सहसा आजवर कुठल्या रिपब्लिकन उमेदवाराने इतका निर्णायक विजय मिळवलेला नाही. प्रत्येक वेळी रिपब्लिकन उमेदवार जिंकला, तरी त्याला सहसा सर्वाधिक मते मिळवता आलेली नव्हती किंबहुना पराभूत डेमॉक्रेट उमेदवार सर्वाधिक मते मिळवत आणि अमेरिकन मतमोजणीच्या पद्धतीमुळे अल्प मते असूनही रिपब्लिकन उमेदवार अध्यक्षपदी विराजमान झालेला होता. ज्या राज्यात सर्वाधिक मते, तिथली सर्व निर्णायक मते त्या उमेदवाराला; अशी पद्धत असल्याने अनेकदा अल्प मतातही उमेदवार अध्यक्ष होऊ शकतो. आताही ट्रम्प यांचे अध्यक्षपद निश्‍चित झाले असले, तरी अजून ते निवडून यायचे आहेत. ८ नोव्हेंबरला झालेल्या मतदानात अध्यक्षाला निवडणार्‍या मतदारसंघाची निवड झाली आहे. ट्रम्प यांचे प्रतिनिधी निवडले गेले आहेत आणि त्यांची संख्या २७० हून अधिक असल्याने ट्रम्प विजयी झाले, असे मानले जात आहे. वर्ष २००० मध्ये जॉर्ज बुश यांच्यापेक्षा अधिक मते मिळवूनही प्रतिनिधी संख्येत अल्प असलेल्या अल् गोअर यांचा पराभव झाला होता. या वेळी मात्र ‘ट्रम्प जिंकणे शक्यच नाही’, असे ठामपणे सर्व चाचण्या सांगत असतांना त्यांनी प्रतिनिधी संख्येत हिलरी यांच्यावर मात तर केलीच; पण लोकप्रिय मतातही त्यांनी निर्विवाद यश मिळवले आहे. तथापि ट्रम्प यांचा विजय हा एकट्या हिलरीचा पराभव नाही. तो एकूणच अमेरिकन आणि जगभरातील उदारमतवादी राजकारणाचा पराभव आहे.

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

खरे दान
    खरे दान सत्पात्री असावे आणि त्याची वाच्यता दुसर्‍याजवळ होऊ नये. त्याची आठवणही क्षणार्धात विसरण्याचा प्रयत्न करावा.
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी
हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

अनैतिकतेचे टोक !

देशाच्या माजी अतिरिक्त महाधिवक्त्या इंदिरा जयसिंह यांनी ‘द वीक’ या नियतकालिकाला दिलेल्या मुलाखतीत ‘सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात महिला अधिवक्त्यांचे लैंगिक शोषण केले जाते आणि त्यांचेही ते झाले होते’, असे म्हटल्याचे प्रसिद्ध झाल्यावर महिलांच्या शोषणाचा आणखी एक प्रकार समोर आला आहे. जयसिंह यांनी उघड केलेल्या या माहितीने भारताची मान लज्जेने खाली गेली आहे. उद्या कोणी संसदेच्या आवारात महिला लोकप्रतिनिधींचे लैंगिक शोषण केले जाते, अशी माहिती सांगू लागल्यास आश्‍चर्य वाटू नये, अशी स्थिती आज झाली आहे. यापूर्वी अधिवक्त्या असलेल्या एका काँग्रेस नेत्यावर महिला सहकारी अधिवक्त्याचे लैंगिक शोषण करण्यात आल्याचा आरोप झाला होता. त्याला जयसिंह यांच्या विधानाने बळकटी मिळाली आहे. न्यायपालिकेच्या आवारातच अशा घटना घडणे आणि तेही सुशिक्षित महिलांच्या संदर्भात ज्या की देशाच्या कायद्यांचे रक्षण करण्यासाठी येथे झटत आहेत, त्यांच्यासंदर्भातच घडणे हे भयावह आहे. देहली देशाची राजधानी आहे, तशी ती बलात्कार्‍यांची राजधानी झाल्याची टीका केली जाते. त्याच देहलीत सर्वोच्च न्यायालयही येते, हा योगायोग नाही. आतापर्यंत जयसिंह यांच्या या माहितीवरून देशात चर्चा चालू झाली पाहिजे होती; मात्र तशी कोणतीही प्रतिक्रिया कोणाकडूनही व्यक्त झाल्याचे दिसून आलेले नाही. जसे काही या घटना एकतर होतच आहेत आणि त्या आम्हाला माहिती आहेत, अशी भावना जनतेमध्ये आहे किंवा आता अशा घटना सामान्य आहेत, अशा भावनेमुळे त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे, असे समजायचे का हा प्रश्‍न आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn