Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदी डोनाल्ड ट्रम्प !

     न्यूयॉर्क - अमेरिकेच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांचा पराभव करून विजय नोंदवला आहे. ट्रम्प आता अमेरिकेचे ४५ वे राष्ट्रपती होणार आहेत. ट्रम्प यांनी अमेरिकेतील ‘इलेक्टोरल कॉलेज’ (मतदार मंडल) व्यवस्थेनुसार २७ राज्यांमधील २७६ मते जिंकून विजयावर शिक्कामोर्तब केले. ट्रम्प यांच्या तुलनेत हिलरी यांना केवळ २१८ मते मिळाली. विजय मिळवण्यासाठी २७० इलेक्टोरल कॉलेजेसचा कौल आवश्यक होता. ७० वर्षीय ट्रम्प २० जानेवारी २०१७ या दिवशी अध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत.
मी प्रत्येक अमेरिकी नागरिकाचा राष्ट्राध्यक्ष ! - डोनाल्ड ट्रम्प
     मी प्रत्येक अमेरिकी नागरिकाचा राष्ट्राध्यक्ष असून आपण सर्वांनी एकत्र येऊन देश नव्याने घडवूया, असे आवाहन करत भावी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समर्थकांना संबोधित केले. माझ्याकडे देशाच्या आर्थिक व्यवस्थेसाठी आराखडा तयार असून आता आणखी वेगाने देशाचा विकास करू. ही ऐतिहासिक घटना आहे; पण आपल्याला आता चांगले कार्य करून इतिहास रचवून दाखवायचा आहे. आमच्यासोबत येण्यासाठी इच्छुक असलेल्या देशांना बरोबर घेऊन पुढे जाऊ. आपली अर्थव्यवस्था दुप्पट करायची आहे. अमेरिकेला आर्थिक महासत्ता बनवायचे आहे. यासाठी आपण एकत्र काम करणे गरजेचे असून आपल्यात खूप क्षमता आहे

दैनिक सनातन प्रभातच्या पुणे येथील कार्यालयाला एका धर्मांधाकडून धमकीपत्र : पोलिसांकडे तक्रार प्रविष्ट

प्रखर हिंदुत्वनिष्ठ दैनिक सनातन प्रभातला असे धमकीपत्र येणे,
हे कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे ! ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !
     ईश्‍वर आणि संत यांच्या आशीर्वादाच्या बळावर चालू असलेले सनातन प्रभातचे राष्ट्र आणि धर्म जागृतीचे कार्य अशा धमक्यांनी कधीही थांबणार नाही. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेपर्यंत हे कार्य अव्याहतपणे चालूच रहाणार आहे, हे धर्मांधांनी लक्षात घ्यावे !
धर्मांधांनी पाठवलेले पत्र

     पुणे
- दैनिक सनातन प्रभातच्या पुणे कार्यालयामध्ये एका धर्मांधाने धमकीपत्र पाठवले आहे. हे पत्र एस्एम् पगडीवाले (रहाणार सोलापूर) याने पाठवले असून ते येथील दैनिकाच्या कार्यालयामध्ये ४ नोव्हेंबर या दिवशी प्राप्त झाले आहे. त्या पत्राच्या अनुषंगाने तपास करण्यासाठी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यामध्ये ९ नोव्हेंबर या दिवशी सनातन प्रभातमार्फत तक्रारअर्ज प्रविष्ट करण्यात आला आहे. ‘पोलिसांनी या प्रकरणी त्वरीत लक्ष घालून धमकी देणार्‍या धर्मांधावर कारवाई करावी’, अशी मागणी या अर्जातून करण्यात आली आहे. हे धमकीपत्र इंग्रजी, उर्दू आणि हिंदी भाषेत लिहिले आहे. त्यात म्हटले आहे की,
१. जे अल्लाहला मानत नाहीत, ते यहूदी, बौद्ध, हिंदू कोणीही असोत, ते आमच्यासाठी काफीरच आहेत. आमचा शत्रू हिंदुस्थान असून नागपूरवाले आणि पुण्यातील ब्राह्मणांनो, तुमचे स्थान ‘वैकुंठ वा कैलास’ घाट आहे.
२. आम्ही तुमची झोप उडवून देऊ. पठाणकोट आणि उरी येथे झालेले आक्रमण हा एक ‘ट्रेलर’ असून आणखी खूप काही बाकी आहे.

‘पूर्वी जगात केवळ हिंदूच होते. आता ८९ देश ख्रिस्ती आणि ८० देश मुसलमानांचे आहेत. आज या धरणीवर एकही ‘हिंदु देश’ नाही.’ (‘सावरकर टाइम्स’, मे २०१०)


मंगळुरू (कर्नाटक) येथे क्रूरकर्मा टिपू सुलतान(सैतान) जयंतीला विरोध दर्शवण्यासाठी आंदोलन !

आंदोलन करतांना धर्माभिमानी
     मंगळुरू - क्रूरकर्मा टिपू सुलतान(सैतान) जयंती उत्सवाला विरोध दर्शवण्यासाठी मंगळुरू येथे हिंदु जनजागृती समिती, रणरागिणी आणि इतर हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी ७ नोव्हेंबरला आंदोलन केले. टिपूचे जणू वंशज असल्याप्रमाणे कर्नाटक सरकारने १० नोव्हेंबरला टिपू सुलतान(सैतान) जयंती उत्सव साजरा करण्याचे नियोजन केले आहे.कर्नाटक सरकारने हिंदुद्रोही, कन्नडविरोधी, मूर्तीभंजक क्रूरकर्मा टिपू सुलतान(सैतान) जयंती उत्सव रहित करावा, अशी मागणी हिंदूंनी या वेळी केली.

उत्तरप्रदेशातील निम्म्याहून अधिक मंत्र्यांवर गुन्ह्याचे आरोप

गुन्हेगारीवृत्तीचे लोकप्रतिनिधी लोकशाहीला निरर्थक ठरवत असल्याने त्याऐवजी
आता धर्माचरणी राज्यकर्त्यांचे हिंदु राष्ट्रच (सनातन धर्म राज्यच) हवे !
     लक्ष्मणपुरी - उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या मंत्रीमंडळातील अर्ध्यापेक्षा अधिक मंत्र्यांची पार्श्‍वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची आहे, असे ‘असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स’ने केलेल्या निवडणूकपूर्व सर्वेक्षणात म्हटले आहे. ५५ सदस्यीय मंत्रीमंडळातील २८ मंत्र्यांवर गुन्ह्यांविषयी आरोप आहेत, असे या अहवालात म्हटले आहे. या २८ मंत्र्यांपैकी ११ मंत्र्यांच्या विरोधात हत्या, हत्येचा प्रयत्न, अपहरण यांसारखे गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत. या आरोपी मंत्र्यांना ५ वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते, असे या अहवालात म्हटले आहे.

‘१ सहस्रऐवजी आता २ सहस्र रुपयांच्या नोटा काळा पैसा म्हणून बाळगा’, असा संदेश मोदी देत आहेत का ? - काँग्रेस

काँग्रेसचा विरोधासाठी विरोध ! पंतप्रधानांनी दोन सहस्र रुपयांच्या नोटा छापतांना
जे कौशल्य दाखवले आहे, त्यातून त्यांची काळ्या पैशाला कायमचा आळा
घालण्याची दूरदृष्टी स्पष्ट होते. असा नेता काँग्रेसकडे आहे का ?
     नवी देहली - पंतप्रधान नरेंद्र मोदी एक सहस्र रुपयांच्या नोटा परत घेत आहेत आणि २ सहस्र रुपयांच्या नव्या नोटा मात्र चलनात आणत आहेत. यातून एक सहस्रच्या जागी २ सहस्र रुपयांच्या नोटांचा काळा पैसा बाळगा, असा संदेश तर पंतप्रधान मोदी काळा पैसेवाल्यांना देत नाहीत ना, असा प्रश्‍न काँग्रेसचे प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी उपस्थित केला आहे. (मोदी यांनी जो निर्णय घेतला, त्यातील काँग्रेसला जो आक्षेपार्ह वाटतो तो वगळून काँग्रेसने स्वतःच्या सत्ताकाळात का घेतला नाही, याचे उत्तर सुरजेवाला यांनी दिले पाहिजे ! - संपादक) नागरिकांनी किती पैसै काढावेत याविषयी आखण्यात आलेली मर्यादा म्हणजे त्रास देण्याचा प्रकार नाही का ?
     ज्यांना लग्नासाठी दागदागिने आणि कपडे अशा अत्यंत गरजेच्या वस्तू खरेदी करायच्या आहेत, अशांची अवस्था काय होईल, असेही सुरजेवाला म्हणाले. (जनतेची इतकी काळजी काँग्रेसला केव्हापासून वाटायला लागली ? मोदी शासनाच्या काळात जनता देशाच्या हितासाठी त्याग करायला सिद्ध झाली आहे, यावर सुरजेवाल यांचा विश्‍वास बसेल का ? - संपादक)
     शेतकरी खत, बियाणे विकत घेत आहेत, त्यांना बाजारातही जावे लागणार आहे. यासाठी शेतकर्‍यांना मोठ्या रकमेचा वापर करावा लागणार आहे.

‘हिंदु जनजागृती समितीचे कार्य शासनापेक्षा चांगले आहे. या कार्याचे कोणतेही मोजमाप करता येत नाही. या कार्यासाठी मी हिंदु जनजागृती समितीचा आजन्म आभारी आहे !’ - श्री. गौरीश केळकर, भटवाडी, शिरोडा, गोवा.
साधकांना महत्त्वाची सूचना

अर्पण, नियतकालिकांची वर्गणी किंवा वसुली स्वीकारतांना
सध्या वापरात असलेल्या नोटाच स्वीकाराव्यात !
     ‘नव्याने लागू झालेल्या रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार ५०० आणि १००० रुपयांच्या सध्या चलनात असलेल्या नोटा आता वापरता यायच्या नाहीत. त्यामुळे साधकांनी यापुढे अशा नोटा स्वीकारू नयेत. यापुढे साधकांनी अर्पण, नियतकालिकांची वर्गणी किंवा वसुली स्वीकारतांना धनादेश, डिमांड ड्राफ्ट या स्वरूपात किंवा चलनामध्ये सध्या वापरात असलेल्या १००, ५०, २०, १० रुपयांच्या नोटा, तसेच नवीन चलनात येणार्‍या ५०० आणि २००० रुपयांच्या नोटा स्वीकाराव्यात.’

५०० आणि १ सहस्र रुपयांच्या नोटा रहित झाल्यानंतर करायची प्रक्रिया !

     नवी देहली - ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या नोटा बंद झाल्यानंतर आता पुढील प्रक्रियेसाठी या गोष्टी कराव्यात.
१. स्वत:चे खाते असलेल्या कोणत्याही बँकेत, कोणत्याही शाखेत किंवा पोस्टात २४ नोव्हेंबरपर्यंत दिवसाला ४ सहस्र रुपयांपर्यंतच्या नोटा पालटून घेता येतील; त्यासाठी पॅन कार्ड, आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र यांचा ओळखपत्र म्हणून उपयोग करता येईल. ३१ डिसेंबरनंतर मात्र थेट रिझर्व्ह बँकेत नोटा पालटाव्या लागतील.
२. समजा तुमच्याकडे ५०० रुपयाच्या २० नोटा म्हणजे १० सहस्र रुपये असतील, तर त्यापैकी ४ सहस्र रुपयेच एका दिवसात पालटून मिळतील. म्हणजे तुमच्याकडच्या ५०० रुपयाच्या ८ नोटाच बँकेत/पोस्टातून एका दिवसात पालटून घेता येऊ शकतील. परत दुसर्‍या दिवशी हीच प्रक्रिया असेल. तुम्ही तुमच्या बँकेच्या खात्यात कितीही रक्कम भरू शकता. केवळ नोटा पालटून घेण्यासाठीच ४ सहस्र रुपयांची मर्यादा असेल.
३. १० नोव्हेंबर ते २४ नोव्हेंबरपर्यंत दिवसाला ४ सहस्र रुपये तुम्ही पालटून घेऊ शकता. त्यानंतर यामध्ये वाढ होईल.
४. स्वत:च्या खात्यातून दिवसाला १० सहस्र रुपये आणि आठवड्याला २० सहस्र रुपयांपर्यंतची रक्कम काढू शकाल. समजा उद्या ८ सहस्र रुपये काढले, तर आठवडाभरात १२ सहस्र रुपयेच काढता येतील. प्रत्येक वेळी १० सहस्र रुपयांची मर्यादा असेल. (त्यामुळे १२ सहस्र रुपये काढायचे असतील, तर १० सहस्र रुपयेच निघतील, त्यानंतर दुसर्‍या दिवशी २ सहस्र रुपये काढावे लागतील.) त्यानंतर पुढच्या आठवड्यात पुन्हा २० सहस्र रुपये काढता येतील. ही मर्यादा नोटांचा पुरेसा साठा उपलब्ध होईपर्यंत असेल.

सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात महिला न्यायाधिशांचेही लैंगिक शोषण होते, माझेही झाले होते ! - प्रसिद्ध अधिवक्त्या इंदिरा जयसिंह यांचा दावा

भारतातील न्यायपालिकांमधील वास्तव किती भयानक आहे, हे यातून उघड होते !
     नवी देहली - सर्वोच्च न्यायालयाच्या आवारातच माझे लैंगिक शोषण झाले होते. तेथे महिला न्यायाधिशांचेही लैंगिक शोषण केले जाते, असा दावा सर्वोच्च न्यायालयाच्या वरिष्ठ अधिवक्त्या आणि भारताच्या पहिल्या अतिरिक्त महाधिवक्त्या राहिलेल्या इंदिरा जयसिंह यांनी केला आहे. ‘द वीक’ या नियतकालिकात त्यांची मुलाखत प्रसिद्ध झाली आहे. त्यात त्यांनी हा दावा केला आहे. त्यांच्या मते तरुण महिला अधिवक्त्या आणि न्यायाधिश यांच्यासाठी हे क्षेत्र या संदर्भात असुरक्षित आहे.
इंदिरा जयसिंह यांनी पुढे म्हटले की,
१. भारतीय न्यायपालिका आणि बार काऊन्सिलमध्ये पुरुषांचे प्राबल्य आहे. न्यायालयांमध्ये महिलांना काम करण्यालायक वातावरण नाही. यामुळेच महिला या व्यवसायापासून दूर राहू लागल्या आहेत. यात महिलांचे लैंगिक शोषण हे एक महत्त्वाचे सूत्र आहे.
२. मी एका महिला न्यायाधिशाचा खटला चालवत आहे. तिचे अन्य एका पुरुष न्यायाधिशाने लैंगिक शोषण केले आहे. हे कायद्याच्या संदर्भातील व्यवसायामधील अंतर्गत घृणास्पद सत्य आहे.
३. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांकडून दोघा शिकाऊ अधिवक्त्यांचे लैंगिक शोषण झाल्याचे प्रकरण समोर आले होते. सर्वोच्च न्यायालयातच असे प्रकार घडत असतील, तर त्याची भयानकता कुठपर्यंत पोचली आहे, हे लक्षात येते.
४. लैंगिक शोषणाच्या घटनेत वयाचा कोणताही संबंध नसतो. अधिक वयाच्या महिलांनाही याचा सामना करावा लागतो.
५. काही वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात मला एका वरिष्ठ अधिवक्त्याने ठोकर मारली. येथे गर्दी असल्याने ती सामान्य गोष्ट होऊ शकते; मात्र ती जाणीवपूर्वक मारण्यात आली होती.

७ देशांतील भारतीय दुतावासांची संकेतस्थळे ‘हॅक’!

सायबर आक्रमणांपासून संकेतस्थळांचे रक्षण करू न शकणारी 
सुरक्षायंत्रणा कधीतरी आतंकवाद्यांपासून देशाचे रक्षण करू शकेल का ?
नागरिकांची गोपनीय माहिती सार्वजनिक !
     नवी देहली - इटली, स्वित्झर्लंडसह ७ देशांमधील भारतीय दुतावासांची संकेतस्थळे संगणक चाच्यांनी हॅक केली आहेत. यात रोमानिया, लिबिया, दक्षिण आफ्रिका, मलावी आणि माली येथील भारतीय दुतावास कार्यालयांचाही समावेश आहे. संकेतस्थळे हॅक होऊनही ती कार्यरत असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. तसेच विदेशात वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांची गोपनीय माहिती सार्वजनिक झाली आहे. हँकर्सचा शोध घेण्यात येेत असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले आहे.

आदिवासीच्या हत्येच्या प्रकरणी जेएन्यू आणि डीयू या विश्‍वविद्यालयांच्या प्राध्यापकांवर गुन्हा प्रविष्ट !

नक्षलवादी विचारसरणीचे प्राध्यापक असणार्‍या जेएन्यू विश्‍वविद्यालयाला टाळे ठोका !
      सुकमा (छत्तीसगड) - छत्तीसगडच्या नक्षलवादग्रस्त सुकमा जिल्ह्यात एका आदिवासी गावकर्‍याची हत्या केल्याच्या प्रकरणी जेएन्यू आणि डीयू (देहली विश्‍वविद्यालय) विश्‍वविद्यालयांच्या दोघा प्राध्यापकांसह माओवाद्यांच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. 
    पोलीस महानिरीक्षक एस्आर्पी कल्लूरी यांनी सांगितले की, शामनाथ बघेल याच्या हत्येच्या प्रकरणी त्याच्या पत्नीने केलेल्या तक्रारीवरून काही माओवाद्यांच्या विरोधात, तसेच देहली विश्‍वविद्यालयाच्या प्रा. नलिनी सुंदर, जेएनयूच्या अर्चना प्रसाद देहलीच्या ‘जोशी अधिकारी संस्थे’चे विनीत तिवारी, छत्तीसगडच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव संजय पराटे यांच्याविरोधात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. 
     सशस्त्र नक्षलवाद्यांनी ४ नोव्हेंबर या दिवशी बघेल यांची त्यांच्या घरातच हत्या केली होती. हत्येच्या वेळी नक्षलवादी बघेल यांना सांगत होते, तुमची हत्या सुंदर आणि अन्य लोकांची गोष्ट न ऐकता विरोध चालू ठेवल्यामुळे केली जात आहे.

तिबेटच्या ‘पंतप्रधानां’ची चीनवर चौफेर टीका !

     काणकोण (गोवा) - तिबेटचे ‘पंतप्रधान’ श्री. लोबसंग सांगय यांनी येथील ३ र्‍या ‘भारतीय विचार गोष्टी’त बोलतांना ‘चीनने तिबेटमधील नद्यांच्या प्रवाहात पालट केल्याने दक्षिण आशियातील भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश येथील जनतेला पाण्याचे दुर्भिक्ष्य भासत आहे’, असे सांगून चीनवर चौफेर टीका केली. 
     श्री. लोबसंग सांगय म्हणाले, ‘‘चीनने तिबेटच्या जनतेच्या अधिकारांचा मान ठेवून त्यांचे मूलभूत अधिकार त्यांना परत केले पाहिजेत. तिबेटमधील लारुंग गार पागोडा चीन उद्ध्वस्त करत आहे. ब्रह्मपुत्रा नदीवर धरणे बांधून खाली येणारे पाणी अडवत आहे. तिबेट हा देश आशियातील पाण्याचे जीवनस्रोत आहे. चीनमध्येही पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे; मात्र भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश येथील परिस्थिती अधिक गंभीर आहे; पण त्याची चीनला चिंता नाही. यानंतर होणारे महायुद्ध पाण्यावरूनच होईल, अशी स्थिती आहे.’’
     श्री. लोबसंग सांगय यांनी भारताची स्तुती करत ‘भारतामुळेच तिबेटच्या जनतेला लोकशाहीचे महत्त्व कळाले आणि भारतातील तिबेटचे शासन ती अमलात आणत आहे. तिबेटच्या शाळांना भारत अनुदान देत आहे.’, असे सांगितले. 
     या ‘विचार गोष्टी’त श्री. दलाई लामा यांची उपस्थिती अपेक्षित होती; मात्र काही अपरिहार्य कारणांमुळे त्यांचे येणे रहित झाले. तरीही त्यांनी संगणकीय प्रणालीद्वारे लोकांना संबोधित केले.

काश्मीरमध्ये दंगलखोरांकडून शाळांवर होणारी आक्रमणे रोखण्यासाठी शिक्षकांवर सुरक्षेचे दायित्व !

पीडीपी-भाजप शासनाचा हास्यास्पद निर्णय !
     श्रीनगर - काश्मीरमध्ये गेल्या काही आठवड्यांपासून दंगलखोर धर्मांधांकडून शाळांना लक्ष्य करण्यात येत आहे. आतापर्यंत २९ शाळांची तोडफोड करून त्यांना आग लावण्यात आली आहे. यावर उपाय काढण्यासाठी सरकारने शाळेच्या शिक्षकांनांच सुरक्षारक्षक म्हणून दायित्व दिले आहे. या विषयीचे निर्देश शिक्षण अधिकार्‍यांनी दिले आहेत. शिक्षण विभागाच्या या निर्णयावर शिक्षकांनी अप्रसन्नता दर्शवली आहे.
१. शाळांवरील आक्रमणाची नोंद जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाने घेऊन राज्य सरकार, पोलीस तसेच शिक्षण विभाग यांना शाळेचे संरक्षण करण्याचे निर्देश दिले आहेत.
२. महिला शिक्षकांना शक्य नसेल, तर त्यांनी त्यांच्या घरातील एखाद्या पुरुषाला रात्रपाळीसाठी शाळेत पाठवावे, असे तोंडी आदेश देण्यात आल्याचे एका मुख्याध्यापकाने सांगितले.

शरीयतमधील हातपाय तोडण्याचेही कायदे लागू करा ! - डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

     नवी देहली - ब्रिटन, ऑस्ट्रेलिया येथे तीन वेळा तलाक म्हणण्याचा कायदा लागू नाही, तर येथे तो का असावा ? भारतीय दंड विधान लागू असल्याने तो सर्वांना समान आहे. जर पुरुष तीन वेळा तलाक म्हणू शकतात, तर महिला का म्हणू शकत नाही ? शरीयतमध्ये आणखीही कायदे आहेत, मग तेही लागू करा. उदा. डोळ्यांना इजा केल्यास डोळे काढा, चोरीच्या बदल्यात हात कापा आदी शिक्षा करण्यात याव्यात, अशी मागणी डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी केली. ते रायपूर येथे एका व्याख्यानात बोलत होते.
     डॉ. स्वामी पुढे म्हणाले की, राज्यघटनेत म्हटले आहे की, हिंदीमध्ये संस्कृतच्या शब्दांचा वापर झाला पाहिजे. संगणकासाठीही संस्कृत अत्यंत अनुकूल भाषा आहे आणि ही गोष्ट नासानेही मान्य केली आहे. त्यामुळे देशात संस्कृत भाषेला अनिवार्य करण्याची आवश्यकता आहे; कारण देशात प्रत्येक भाषेत संस्कृत आहे.

आयएस्आयच्या पूर्वानुमतीव्यतिरिक्त पाकमधून कुणीही भारतात येऊ शकत नाही ! - तारेक फतेह

     काणकोण (गोवा) - भारताने पाकशी सर्व संबंध तोडून टाकले पाहिजेत, आयएस्आयच्या पूर्वानुमतीशिवाय पाकिस्तानातून कुणीही भारतात येऊ शकत नाही, असे प्रतिपादन पाकिस्तानात जन्मलेले कॅनडा येथील लेखक तारेक फतेह यांनी केले. ते येेथील ३ र्‍या ‘भारतीय विचार गोष्टी’ला संबोधन करतांना बोलत होते. 
    तारेक फतेह पुढे म्हणाले, ‘‘ज्या दिवशी भारत स्वाभिमानाने पाकिस्तानला सुनावेल की, ‘आम्हाला तुमच्याशी बोलणी करायची नाहीत, आम्हाला तुमच्या बरोबर व्यापार करायचा नाही, आम्हाला तुमचे सिमेंट नको, ‘अमन की आशा’ नको, तेव्हा पाकिस्तान वठणीवर येईल.’’ 
    भारताने पाकिस्तानच्या कलाकारांना देशात येण्याची बंदी घातली पाहिजे या मागणीवर बोलतांना तारेक फतेह म्हणाले की, आयएस्आयच्या पूर्वानुमतीव्यतिरिक्त पाकिस्तानातून कुणीही भारतात येऊ शकत नाही; मग भारतीय पाकिस्तानी कलाकारांना का समर्थन देतात ? ते कुणाला मूर्ख बनवत आहेत ?मध्यप्रदेश मराठी साहित्य संमेलनाची उत्साहात सांगता !

      इंदूर, ९ नोव्हेंबर (वार्ता.) - ‘मुक्त संवाद’ या संस्थेच्या वतीने आयोजित ३ दिवसीय मध्यप्रदेश मराठी साहित्य संमेलनाची ८ नोव्हेंबरला सांगता झाली. ६ नोव्हेंबरपासून चालू झालेल्या या संमेलनाचा प्रारंभ ग्रंथदिंडीने झाला. पहिल्या दिवशी ‘भारतीय भाषांचे भवितव्य’ या विषयावर भारतीय विदेश विभागाचे सचिव आणि वरिष्ठ साहित्यकार श्री. ज्ञानेश्‍वर मुळे यांचे व्याख्यान झाले. दुसर्‍या दिवशी ‘आहे मनोहर तरी...’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात उपस्थित मान्यवरांनी ‘प्रगतीचे हे आधुनिक युग मनोहर असले, तरी मागच्या काही गोष्टी आजही कशा हव्याहव्याशा वाटतात’, या विषयी त्यांचे मनोगत व्यक्त केले. तिसर्‍या दिवशी कवितावाचनाचा कार्यक्रम पार पडला. या संमेलनात ‘लयपश्‍चिमा’ हा पुणे येथील डॉ. आशुतोष जावडेकर यांचा पाश्‍चात्त्य संगीताचा परिचय देणारा कार्यक्रम ही पार पडला. या संमेलनाच्या कालावधीत लावण्यात आलेले दिवाळी अंक आणि मराठी पुस्तके यांचे प्रदर्शनही श्रोत्यांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले. येथील प्रितमलाल दुआ सभागृहात या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
सनातनच्या ग्रंथाचे प्रदर्शन ! 
     या कार्यक्रमात सनातनच्या विविध ग्रंथांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. याचा अनेक जिज्ञासूंनी लाभ घेतला. अनेकांनी ‘हे ग्रंथ वेगळे आहेत’, अशा शब्दांत ग्रंथांचे कौतुक केले. हे प्रदर्शन लावण्यासाठी मुक्त संवादचे श्री. मोहन येडगावकर आणि अन्य सदस्य यांचे सहकार्य लाभले. वाढत्या वायूप्रदूषणामुळे पर्यटकांचे देहलीऐवजी अन्य ठिकाणांना प्राधान्य !

     नवी देहली - देहलीत वायू प्रदुषणामुळे तेथील लोकांच्या आरोग्यासह पर्यटनावरही विपरीत परिणाम होत आहे. भारतात पर्यटनासाठी आलेले अनेक परदेशी पर्यटक प्रदूषणामुळे देहलीऐवजी जवळच्या थंड हवेच्या ठिकाणी जात आहेत. ‘देहलीतील प्रदुषणाचा अनुभव घेतलेल्या परदेशी महिलेने देहलीत धुक्याच्या पातळीत लक्षणीयरित्या वाढ झाली असून प्रदूषणामुळे घशाला कोरड पडते’, असे सांगितले. राष्ट्रीय हरित लवादाकडून या सगळ्या प्रकाराची गंभीर दखल घेण्यात आली असून संबंधित राज्यांच्या भूमिकेवर कडक ताशेरे ओढण्यात आले आहेत. प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी तुम्ही काय उपाययोजना केल्या, असा प्रश्‍न लवादाने पंजाब, हरियाणा, देहली, राजस्थान आणि केंद्र सरकार यांना विचारला आहे.

गुलशनकुमार यांच्या हत्येतील दोषी अब्दुल रौफ याला बांगलादेश भारताच्या कह्यात देणार !

     नवी देहली - टी सीरिजचे मालक गुलशनकुमार यांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरलेला आणि दाऊद इब्राहिमचा साथीदार अब्दुल रौफ दाऊद मर्चंट याला लवकरच भारतात आणले जाणार आहे. सध्या बांगलादेशमध्ये असलेल्या दाऊद मर्चंटला भारताकडे सोपवण्याची सिद्धता बांगलादेश सरकारने दर्शवल्याचे सूत्रांनी सांगितले. या हत्येच्या प्रकरणी दाऊद मर्चंट याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.
    अब्दुल रौफ याला वर्ष २००९ मध्ये बांगलादेशमध्ये अवैधरित्या घुसखोरी करणे आणि बनावट पासपोर्टप्रकरणी अटक करण्यात आली होती. शिक्षेचा कालावधी पूर्ण झाल्याने रौफला कारागृहातून सोडण्यात आले आहे. अब्दुल रौफला भारताच्या कह्यात देण्यास बांगलादेश सरकार सिद्ध असल्याचे सूत्रांनी सांगितले.

इंदूर (मध्यप्रदेश) येथे विविध आंदोलनांद्वारे गोरक्षणार्थ बलीदान देणार्‍यांना श्रद्धांजली !

हिंदुत्वनिष्ठांच्या वतीने आंदोलनाचे आयोजन 
     इंदूर (मध्यप्रदेश), ९ नोव्हेंबर (वार्ता.) - नवी देहलीत ७ नोव्हेंबर १९६६ या दिवशी गोरक्षा आंदोलनाच्या वेळी इंदिरा गांधी सरकारने आंदोलनात उपस्थित गायी, संत आणि हिंदू यांच्यावर गोळ्या झाडण्याचा आदेश दिला होता. भारताच्या इतिहासाला कलंकित करणार्‍या या घटनेला काल ५० वर्षे पूर्ण झाली. त्यामुळे या घटनेच्या निषेधार्थ इंदूर येथे हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने आंदोलनांचे आयोजन करण्यात आले.

जिहादी आतंकवादी मौलाना मसूद अजहर याच्यावर बंदी न घालण्यावरून भारताने संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेला खडसावले !

      संयुक्त राष्ट्र - जैश-ए-महंमद या आतंकवादी संघटनेचा प्रमुख मौलाना मसूद अजहरवर बंदी घालण्यास होत असलेल्या विलंबावरून भारताने संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेला खडसवले. ‘सुरक्षा परिषद राजकारणात व्यस्त असून तिला राजकीय लकव्याने ग्रासले आहे’, अशा शब्दांत भारताने सुरक्षा परिषदेला फटकारले. संयुक्त राष्ट्रातील भारताचे कायमस्वरूपी प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दीन यांनी सुरक्षा परिषदेच्या एका कार्यक्रमात हे परखड मत मांडले. 
    मसूद अजहरवर बंदी घालण्याच्या भारताच्या प्रयत्नांमध्ये चीनने खोडा घातला होता. चीनमुळे ६ महिन्यांसाठी हा निर्णय लांबणीवर पडला होता. या सर्व घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर अकबरुद्दीन यांनी अप्रसन्नता व्यक्त केली. जागतिक संघटनेमध्ये तातडीने सुधार करण्याची आवश्यकता आहे, असे ते म्हणाले. जैश-ए-महंमदला संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषद समितीने २००१ मध्ये काळ्या सूचीत टाकले आहे. त्यामुळे मसूद अजहरवर निर्बंध लादण्यास काहीच अडचण येणार नाही, अशी भारताची भूमिका होती; मात्र चीनने नकाराधिकाराचा वापर केल्याने मसूदला दिलासा मिळाला होता.

बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणाचा नेपाळच्या हिंदु संघटनांकडून तीव्र निषेध !

भारतातील किती हिंदु संघटनांनी बांगलादेशमधील हिंदूंवरील अत्याचाराचा निषेध केला ?
      बिरगुंज (नेपाळ) - नेपाळच्या विश्‍व हिंदू परिषद आणि इतर अनेक हिंदु संघटनांनी एकत्र येऊन बांगलादेशात अल्पसंख्यांक हिंदूंवर होणार्‍या आक्रमणाचा तीव्र निषेध केला. बांगलादेशमधील हिंदूंच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहाण्याचा निर्धार नेपाळच्या हिंदु संघटनांनी केला आहे. बांगलादेशच्या ब्राह्मणबाडीया जिल्ह्यात दिवाळीच्या वेळी धर्मांधांनी हिंदूंची घरे आणि मंदिरे यांची नासधूस केली. हिंदूंवर धारदार हत्यारांनी आक्रमण केले. हिंदूंच्या मौलव्यान वस्तू आणि देवतांच्या मूर्ती पळवल्या. तसेच हिंदूंची घरे आगीत भस्मसात करून टाकली. हिंदूंवरील या अत्याचाराच्या निषेधार्थ विश्‍व हिंदू परिषद, हिंदु स्वयंसेवक संघ, विश्‍व हिंदू महासंघ इत्यादी संघटनांचे शेकडो कार्यकर्ते नेपाळच्या बिरगुंज येथे आयोजित निषेधमोर्च्यात सहभागी झाले होते. बांगलादेशातील जिहादी आतंकवाद, हिंदूंवरील आक्रमण आणि बांगलादेश सरकार यांचा निषेध करणारे फलक सर्वत्र प्रदर्शित करण्यात आले होते.
        विश्‍व हिंदू परिषदेचे पारसा शाखेचे अध्यक्ष पंडित पुरुषोत्तम दुबे यांनी मोर्च्याचे नेतृत्व केले. श्री. दुबे यांनी त्यांच्या भाषणात बांगलादेशमध्ये जिहाद्यांकडून हिंदूंवर होणार्‍या अत्याचाराची संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार आयोगाच्या माध्यमातून चौकशी करण्याची मागणी केली. हिंदूंवर होणार्‍या अत्याचाराची तातडीने नोंद घेण्याच्या दृष्टीने हिंदूंचे व्यापक संघटन करण्याची मागणी या मोर्चामध्ये करण्यात आली.

आदिवासी विकास विभागातील दोषी अधिकार्‍यांचीही चौकशी करा ! - डॉ. नीलम गोर्‍हे, आमदार, शिवसेना

बुलढाणा - आदिवासी आश्रमशाळेत झालेल्या अत्याचाराच्या प्रकरणात आदिवासी विकास विभागातील दोषी अधिकार्‍यांचीही चौकशी करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन शिवसेनेच्या आमदार डॉ. नीलम गोर्‍हे यांनी केले. पाळा येथील आश्रमशाळेला गोर्‍हे यांनी ७ नोव्हेंबर या दिवशी भेट दिली. त्यानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

महाराष्ट्रात सामान्यांची अडवणूक, तसेच गोंधळाची स्थिती

५०० आणि १००० च्या नोटा रहित करण्याच्या निर्णयाचे प्रकरण 
     मुंबई - ५०० आणि १००० च्या नोटा रहित करण्याच्या निर्णयानंतर ८ नोव्हेंबरला रात्री आणि ९ नोव्हेंबरला मुंबई, पुणे, नाशिक, संभाजीनगर, रत्नागिरी यांसारख्या अनेक प्रमुख शहरांमध्ये सुट्या पैशांवरून प्रचंड समस्या निर्माण झाली. मुंबईत लोकांनी मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करणे चालू केल्याने सोन्याचे दर ४ सहस्र रूपयांनी वाढले. तसेच सकाळी शेअर बाजार घसरला. ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या नोटा ९ नोव्हेंबरपासून व्यवहारातून बाद करण्याच्या सरकारच्या निर्णयानंतर सर्वसामान्य लोकांचा गोंधळ उडाला, तसेच काही व्यावसायिकांनी सामान्य ग्राहकांची अडवणूक केली. यामुळे वादाचे प्रसंग उद्भवत होते. या निर्णयामुळे देशातील बहुतांश नागरिक सुट्ट्या पैशांसाठी धडपडत आहेत, असे चित्र सर्वत्र दिसत होते. भाजीपाला, दूध, कपडे विक्रेते, रिक्शा-बस, औषधालय, रुग्णालये, पथकर (टोल) अशा सर्वच ठिकाणी गोंधळ आणि अडचणी निर्माण झाल्या. राज्यातील या सर्व पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५०० आणि १००० च्या नोटा रहित झाल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीविषयी ‘घाबरू नका आणि काळजी करू नका’ असे आवाहन केले आहे.

संपूर्ण देशभरात गोहत्या बंदी कायदा लागू करा !

गोविज्ञान संशोधन संस्थेच्या वतीने मागणी 
उपजिल्हाधिकार्‍यांना निवेदन देतांना कार्यकर्ते
   पुणे, ९ नोव्हेंबर (वार्ता.) - संपूर्ण देशभरात गोहत्या बंदी कायदा लागू करावा आणि त्याचे सक्तीने पालन व्हावे, अशी मागणी करणारे निवेदन गोविज्ञान संशोधन संस्थेच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. हे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय घुले यांनी ७ नोव्हेंबर या दिवशी गोभक्तांकडून स्वीकारले.

नोटांवरील निर्णयाचा देशाच्या अर्थव्यवस्थेला लाभ होणार ! - अर्थमंत्री अरुण जेटली

         नवी देहली - ५०० आणि १ सहस्रच्या नोटांसंदर्भात घेतलेल्या निर्णयाचा देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा लाभ होणार आहेे, असा दावा अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केला आहे. 
जेटली पुढे म्हणाले की, 
१. याचा सर्वात मोठा परिणाम निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये होणार आहे. काही जण या रहित प्रक्रियेसाठी वेळ मागत आहेत; कारण त्यांना त्यांचा काळा पैसा पांढरा करायचा आहे. ज्यांच्याकडे २०-२५ सहस्र रुपये आहेत त्यांना कोणतीही अडचण नाही. त्यांनी बँकेत ते जमा करावेत. त्यांना त्यावर व्याजही मिळेल; मात्र अवैध पैसा बँकेत जमा केला, तर त्यावर कारवाई होईल. तुम्ही कितीही पैसे बँकेत जमा करू शकता मात्र त्यावर कर भरावा लागणार आहे. 

काळा पैसा आणि आतंकवादासाठी मिळणारी रसद यामुळे बंद होईल ! - शरद पवार

५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद होण्याच्या संदर्भातील प्रतिक्रिया 
     मुंबई - शरद पवार यांनी मोदींच्या निर्णयाचे स्वागत केले असून ‘या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. काळा पैसा आणि आतंकवादासाठी मिळणारी रसद यामुळे बंद होईल’, असे त्यांनी म्हटले आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी म्हटले आहे, ‘मोदी यांचा हा निर्णय क्रांतीकारक असून अभिनंदनीय आहे. राजकीय पक्षांच्या देणग्यांचेही आता ऑडिट करावे.’ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही निर्णयाचे स्वागत केले असून 'आता निवडणुकीत भाजप काय आपट्याची पाने वाटणार का ?’ असा टोमणा मारला आहे.

पुणे पालिकेच्या कर्मचार्‍याला शिवीगाळ आणि धमकी देणारे मनसेचे नगरसेवक रवींद्र धंगेकर यांच्यावर गुन्हा प्रविष्ट !

असे लोकप्रतिनिधी असणे, हे मनसेला लज्जास्पद !
    पुणे, ९ नोव्हेंबर - महानगरपालिकेचे कर्मचारी राजेंद्र पंढरीनाथ गोगावले यांना अर्वाच्च शिवीगाळ करून धमकी दिल्या प्रकरणी मनसेचे नगरसेवक रवींद्र धंगेकर आणि एक कार्यकर्ता यांच्यावर फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. (असे लोकप्रतिनिधी कायद्याचे राज्य देतील का ? - संपादक)
गोगावले हे पालिकेत बिगारी म्हणून काम करतात. त्यांनी धंगेकर यांच्या कार्यालयाजवळील काही झाडांच्या फांद्या तोडल्या. त्यामुळे धंगेकर आणि किशोर या कार्यकर्त्यांनी गोगावले यांना ‘मला न विचारता माझ्या प्रभागातील झाडांच्या फांद्या कशा काय तोडल्या ?’, असे खडसवत शिवीगाळ केली आणि धमकीही दिली.

काळबादेवी (मुंबई) येथे विश्‍व हिंदु परिषदेच्या वतीने गोभक्तांना श्रद्धांजली !

वर्ष १९६६ मध्ये गोभक्तांवरील गोळीबाराला ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त कार्यक्रम 
कार्यक्रमाला उपस्थित गोप्रेमी
    मुंबई, ९ नोव्हेंबर (वार्ता.) - ८ नोव्हेंबर १९६६ मध्ये गोपाष्टमीच्या दिवशी गोवंश रक्षणाचा कायदा व्हावा, या मागणीसाठी देशभरातून देहली येथील रामलीला मैदानावर एकत्र जमलेल्या लक्षावधी गोभक्तांवर गोळीबार करण्यात आला होता. यामध्ये शेकडो गोभक्तांचा मृत्यू झाला. या घटनेला ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त विश्‍व हिंदु परिषदेच्या वतीने संपूर्ण देशभरात ठिकठिकाणी सभा आयोजित करून हुतात्मा गोभक्तांना श्रद्धांजली वाहण्यात आली. काळबादेवी येथील श्री नरनारायण मंदिरातही ८ नोव्हेंबरला श्रद्धांजली वाहण्यात आली. या वेळी मोठ्या संख्येने गोप्रेमी उपस्थित होते.

चंद्रभागा वाळवंटातही तीन क्लोज्ड सर्किट टीव्ही कॅमेरे

   सोलापूर - चंद्रभागा वाळवंटात सध्या तीन क्लोज्ड सर्किट टीव्ही कॅमेरे बसवले आहेत. त्याद्वारे वारीवर नियंत्रण ठेवणे, परिसरातील घटनांकडे लक्ष ठेवणे, तसेच चंद्रभागा नदीतून अवैध वाळू उपसा करणे यांवर नियंत्रण ठेवले जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी रणजित कुमार यांनी दिली. जिल्हाधिकार्‍यांनी ६५ एकर परिसरात चालू असलेल्या कामांची पाहणी करून त्याविषयी संबंधित अधिकार्‍यांना सूचना दिल्या. वाळवंट आणि नदीपात्रात अस्वच्छता होणार नाही, याची कटाक्षाने दक्षता घ्यावी. महाद्वार रस्ता भाविकांसाठी खुला रहावा. तेथे अतिक्रमण करणारी दुकाने नगरपालिकेने तात्काळ काढावीत.

नोटांवरील बंदीचा प्रभाव परदेशात काळा पैसा ठेवणार्‍या श्रीमंतांवर होणार नाही !

केंद्र सरकारने देशांतर्गत काळा पैसा बाहेर 
काढण्यासाठी नोटा रहित करण्याचा निर्णय घेतला; मात्र परदेशातील
 काळ्या पैशांवर अद्याप ठोस कारवाई झालेली नाही, हे वास्तव आहे ! 
     नवी देहली - केंद्र सरकारने ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या नोटा रहित करण्याचा निर्णय घेतला आहे; मात्र ५०० च्या आणि २ सहस्र रुपयांच्या नवीन नोटा चलनात येणार आहेत. काळ्या पैशांच्या विरोधात पाऊल म्हणून हा निर्णय घेण्यात आला असला, तरी याचा परिणाम परदेशात काळा पैसा ठेवणार्‍या श्रीमंतांवर होणार नाही, असे तज्ञांचे मत आहे. दुसरीकडे सामान्य नागरिकांना यामुळे समस्या निर्माण होऊ शकते, असेही म्हटले आहे.

हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या पाठीशी सदैव उभे रहाणार !

अकोला येथील अधिवक्त्यांचा निर्धार 
धर्मरक्षणासाठी संघटित होणार्‍या अकोला येथील अधिवक्त्यांचा आदर्श सर्वत्रच्या अधिवक्त्यांनी घ्यावा ! 
बैठकीत चर्चा करतांना अधिवक्ते
     अकोला (वार्ता.) - धर्मासाठी अव्याहतपणे कार्यरत असणार्‍या प्रामाणिक हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या सदैव पाठीशी उभे राहू, असा दृढ निर्धार येथील अधिवक्त्यांनी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ६ नोव्हेंबर या दिवशी अभिरूची गार्डन, अकोला येथे आयोजित अधिवक्त्यांच्या बैठकीत व्यक्त केला.

मी पाक कलाकारांवर कायमची बंदी आणू शकतो ! - राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

अशी कणखर भूमिका एकही लोकप्रतिनिधी का घेत नाही ? 
     पुणे, ९ नोव्हेंबर (वार्ता.) - 'येथून पुढे पाकिस्तानी कलाकार भारतीय चित्रपटात काम करणार नाहीत', असे मी निर्मात्यांकडून लिहून घेतले आहे. मी निवडणूक न लढवताही पाक कलाकारांवर कायमची बंदी आणू शकतो’, असे सडेतोड प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री. राज ठाकरे यांनी केले. येथील गणेश कला क्रीडा मंचमध्ये ८ नोव्हेंबर या दिवशी शहरातील मनसे गटनेते आणि कार्यकर्ते यांच्या आयोजित मेळाव्यात ते बोलत होते.

आता पॅसेंजर रेल्वेतही तिकीट तपासणार !

हिंदु राष्ट्रात जनता नीतीमान असल्याने प्रामाणिक असेल !
    सांगोला (जिल्हा सोलापूर), ९ नोव्हेंबर (वार्ता.) येथील सोलापूर-मिरज तसेच कुर्डूवाडी-मिरज यांसारख्या पॅसेंजर रेल्वेतही नियमित तिकीट तपासणी चालू केली आहे. त्यामुळे आता विनातिकीट प्रवास करणार्‍या प्रवाशांना चाप बसत आहे. प्रतिदिन ३० ते ४० विनातिकीट प्रवास करणारे प्रवासी तिकीट तपासनीसाच्या जाळ्यात अडकत आहेत. त्यांच्याकडून तिकिटाच्या रकमेसह २५० रुपयांचा दंड आकारण्यात येत आहे. (दंडाच्या जोडीला त्यांच्यावर कारवाईही हवी ! - संपादक)

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या उपहारगृहामध्ये आरोग्यास हानीकारक गोष्टी !

    पुणे, ९ नोव्हेंबर - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या ४ उपहारगृहांमध्ये अन्न आणि औषध प्रशासन विभागाला आरोग्याच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात त्रुटी आढळल्या आहेत, अशी माहिती प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी दिली.
१. विभागाने २५ ऑक्टोबर या दिवशी विद्यापिठाच्या उपहारगृहातील स्वच्छता, अन्न पदार्थाचा दर्जा आणि सुविधा यांची तपासणी केली. त्यात कामगारांच्या आरोग्याची तपासणी न करणे, पाण्याची स्वतंत्रपणे साठवणूक न करणे, कामगारांना हात धुण्यासाठी व्यवस्था नसणे आणि उपहारगृहातील अस्वच्छता या त्रुटी आढळून आल्या. (विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळणारे उपहारगृहचालक ! अशांवर कठोर कारवाईच हवी ! - संपादक)

दुसर्‍याचे स्वप्नातही वाईट चिंतू नका ! - जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज

   चेंबूर, ९ नोव्हेंबर (वार्ता.) - दिवसातून किमान १० मिनिटे तरी भक्ती करा. स्वप्नातही दुसर्‍याचे वाईट चिंतू नका, असे मार्गदर्शन जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांनी केले. घाटलेगाव गावदेवी मैदान येथे ५ ते ६ नोव्हेंबर हे २ दिवस जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांचा दर्शन सोहळा पार पडला. या वेळी केलेल्या मार्गदर्शनात ते बोलत होते. या सोहळ्याचा लाभ १० ते १५ सहस्र भाविकांनी घेतला.

११ नोव्हेंबरपासून कार्तिक वारीसाठी जादा रेल्वेगाडी !

   मिरज, ९ नोव्हेंबर (वार्ता.) - पंढरपूर येथील कार्तिक वारीसाठी मध्य रेल्वे सोलापूर विभागाच्या वतीने ११ ते १३ नोव्हेंबर या कालावधीत पंढरपूर-मिरज अशी तीन दिवस जादा पॅसेंजर रेल्वे गाडी सोडण्यात येणार आहे. ही गाडी सकाळी १०.४५ वाजता पंढरपूर येथून सुटून दुपारी १.२० वाजता मिरज येथे येईल आणि सदरची गाडी दुपारी २.३५ वाजता सुटून पंढरपूर येथे सायंकाळी ५.१० वाजता पोहोचेल.

कार्वे (जिल्हा कोल्हापूर) येथे हुतात्मा सैनिक राजेंद्र तुपारे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार !

     चंदगड (जिल्हा कोल्हापूर), ९ ऑक्टोबर (वार्ता.) - कृष्णा घाटीतील भारत-पाकिस्तानच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पाक सैन्याशी लढतांना मजरे कार्वे येथील हुतात्मा सैनिक श्री. राजेंद्र तुपारे (वय ३३ वर्षे) यांना ६ नोव्हेंबर या दिवशी वीरमरण आले होते. ८ नोव्हेंबर या दिवशी त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी उपस्थित नागरिकांनी ‘अमर रहे, अमर रहे... राजेंद्र तुपारे अमर रहे’, ‘वीर जवान तुझे सलाम’ अशा गगनभेदी घोषणा दिल्या. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी हुतात्मा तुपारे यांच्या कुटुंबियांना शासनाकडून १५ लक्ष रुपयांचे साहाय्य करण्यात येईल, असे सांगितले. त्याविषयीचे मुख्यमंत्र्यांचे पत्र त्यांनी संयोजकांकडे सोपवले. कु. आर्यन तुपारे याने त्याच्या वाढदिवशीच वडिलांना भडाग्नी दिल्याने सर्वांची मने हेलावली.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या जिल्हा सरचिटणीसाला अटक आणि पोलीस कोठडी !

सातारा येथे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केल्याचे प्रकरण 
वासनांध पदाधिकार्‍यांचा भरणा असलेली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया !
     सातारा, ९ नोव्हेंबर (वार्ता.) - साहित्य देण्यासाठी घरी आलेल्या ६ वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा सरचिटणीस मधुकर आठवले (वय ५८ वर्षे) यांना शाहुपुरी पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्यांना १ दिवसाची पोलीस कोठडी सुनवाली आहे. ३० ऑक्टोबरला पीडित मुलगी आठवले यांच्या घरी आली होती. ते घरात एकटेच होते. त्यांनी लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्यावर बालिकेने आरडाओरडा केला; मात्र आजूबाजूला कोणीही नसल्याने तिला साहाय्य मिळाले नाही. तिने याविषयी आई-वडिलांना सांगणार असल्याचे धमकावताच त्यांनी सांगितले, ‘‘मी तुझ्या आईवर खटला प्रविष्ट करीन आणि वडिलांचीही नोकरी घालवीन.’’ (आज छत्रपती शिवाजी महाराज असते, तर त्यांना अशा उद्दाम वासनांधांचा कडेलोटच केला असता ! - संपादक) घरी आल्यावर तिने झालेला प्रकार मोठ्या भावाला सांगितला. या प्रकरणी पीडितेच्या आई-वडिलांनी पोलिसांना सांगितले. पोलिसांनी गुन्हा प्रविष्ट करून त्यांना अटक केले.

रामजन्मभूमीवर श्रीराम मंदिर बनवण्यापासून कोणीही रोखू शकत नाही ! - राजेश पांडेय, अखिल भारतीय संयोजक, बजरंग दल

     पुणे, ९ नोव्हेंबर - रामजन्मभूमीच्या आंदोलनासाठी कित्येक रामभक्तांनी बलीदान दिले असून ते व्यर्थ जाता कामा नये. प्रभु श्रीरामचंद्रांच्या कृपेने रामजन्मभूमीवर भव्य राममंदिर अवश्य बनेल. जगातील कोणतीही शक्ती मंदिर बनवण्यापासून आम्हाला थांबवू शकत नाही, असे प्रतिपादन बजरंग दलाचे अखिल भारतीय संयोजक राजेश पांडेय यांनी केले. रामजन्मभूमी आंदोलनातील हुतात्मा कारसेवकांच्या स्मृतीदिनानिमित्त विश्‍व हिंदू परिषद आणि बजरंग दल पुणे महानगरच्या वतीने ६ नोव्हेंबर या दिवशी शहरातील विविध ठिकाणी रक्तदान महायज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. सिंहगड रस्त्यावरील रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी विश्‍व हिंदू परिषदेचे अखिल भारतीय सत्संगप्रमुख श्री. दादा वेदक, श्री. अतुलशास्त्री भगरेगुरुजी, आमदार भीमराव तापकीर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पुणे महानगर संघचालक श्री. रवींद्र वंजारवाडकर, हिंदु जनजागृती समितीचे श्री. कृष्णाजी पाटील यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते. 
 क्षणचित्रे 
१. रक्तदान मोहिमेत ४५० हून अधिक नागरिकांनी रक्तदान शिबिरात सहभाग घेतला. 
२. या उपक्रमात ८ रक्तपेढ्या आणि ७५ हून अधिक स्थानिक गणेशोत्सव मंडळे सहभागी झाली होती.

फलक प्रसिद्धीकरता

लांगूलचालनाचे राजकारण करणार्‍या भारतीय राजकारण्यांना चपराक !
    अमेरिकेच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प विजयी झाले असून ते ४५ वे राष्ट्रपती होणार आहेत. ट्रम्प यांनी अनेकवेळा जिहादी आतंकवाद रोखण्यासाठी अत्यंत कठोर पावले उचलण्याचे सूतोवाच केले होते.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Jihadke virodhme kathor nirnay lenge, aisa kehnewale Donald Trump Americake naye rashtrapati bane.
Tushtikaranki apeksha rashtrahit hi mahatvapurna hai
जागो ! : जिहाद के विरोध में कठोर निर्णय लेंगे, ऐसा कहनेवाले डोनाल्ड ट्रम्प अमेरिका के नए राष्ट्रपति बने ।
तुष्टीकरण की अपेक्षा राष्ट्रहित ही महत्त्वपूर्ण है !

एन्जीआें’चा (स्वयंसेवी संस्थांचा) वैचारिक आतंकवाद !

स्वयंसेवी संस्थांच्या घातक कार्यांवर जरब बसवा !
निवृत्त ब्रिगेडियर
हेमंत महाजन
     देशातील सहस्रो स्वयंसेवी संस्था आज लोककल्याणकारी योजना राबवण्याच्या नावाखाली देशविरोधी कारवायांमध्ये गुंतल्या आहेत. या संस्थांकडून वैचारिक आतंकवादाला खतपाणी घालण्याचे घृणास्पद कार्य चालू आहे. यावर प्रकाश टाकणारा हा लेख आमच्या वाचकांसाठी साभार प्रसिद्ध करत आहोत.
१. ‘एफ्सीआर्ए’च्या नियमांचे उल्लंघन 
करणारी तिस्ता सेटलवाड यांची एन्जीओ !
     गुजरातच्या तिस्ता सेटलवाड यांची संस्था ‘सबरंग’ न्यासाची (ट्रस्टची) नोंदणी गृहमंत्रालयाने १६ जून २०१६ या दिवशी रहित केली. या संस्थेवर ‘फॉरेन कॉन्ट्रीब्यूशन रेग्युलेट्री अ‍ॅक्ट (एफ्.सी.आर्.ए.)’ म्हणजेच विदेशी देणगी विनियमन कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप होता. ‘सबरंग’ ही स्वयंसेवी संस्था तिस्ता आणि त्यांचे पती जावेद आनंद चालवतात.

पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्या विरोधात पोलिसांनी वापरलेले दबावतंत्र आणि उभे केलेले खोटे साक्षीदार !

पूज्यपाद संतश्री
आसारामजी बापू
‘     पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्याविरुद्ध कशा प्रकारे आणि किती व्यापक षड्यंत्र रचण्यात आले आहे, याचे पितळ आता उघडे पडत चालले आहे. सुनियोजित पद्धतीने बापूजींविरुद्ध खोटे पुरावे आणि साक्षीदार कसे उभे करण्यात आले, याचे बिंग ८.७.२०१५ या दिवशी जोधपूर सत्र न्यायालयात सुधा पटेल यांनी दिलेल्या माहितीमुळे फुटले. 
१. पोलिसांनी काहीही न सांगता बळजोरीने स्वाक्षरी करून 
घेणे आणि त्याआधारे सुधा यांची खोटी साक्ष सिद्ध करणे 
      पोलिसांनी नोंदवलेल्या आरोपपत्रात सुधा पटेल यांच्या नावे लिहिलेल्या माहितीमध्ये ज्या वाह्यात, निराधार गोष्टींचा उल्लेख करण्यात आला होता, त्या गोष्टी सुधा यांनी खोट्या, कपोलकल्पित असल्याचे सांगितले. पोलिसांच्या सर्वांत मोठ्या धूर्तपणाचा खुलासा करतांना सुधा यांनी सांगितले, ‘‘पोलिसांनी १६.९.२०१३ या दिवशी माझी साक्ष घेतली, ही गोष्ट पूर्ण खोटी आहे. यापूर्वी मी कधीही जोधपूरला आले नव्हते आणि कधीही साक्ष दिली नव्हती. जोधपूर पोलीस कर्णावतीला (अहमदाबादला) आले होते. त्यांनी माझी कोणतीही चौकशी केली नव्हती. माझ्याकडून स्वाक्षरी करून घेतली होती; परंतु त्यांनी ती कशासाठी करून घेतली, हे मला ठाऊक नाही.

देहली राज्याचा ऑक्टोबर २०१६ या मासातील दुसर्‍या सप्ताहाचा हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या प्रसारकार्याचा आढावा !

१. नवरात्रोत्सवात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने केलेला प्रसार
१ अ. हस्तपत्रकांचे वितरण : ‘देहली येथे नवरात्रोत्सवासंबंधी शास्त्रीय माहिती देणार्‍या हस्तपत्रकांचे वितरण करण्यात आले. 
१ आ. प्रवचन : ‘नवरात्री मंडळ, सेक्टर ७१, नोएडा’ येथे १०.१०.२०१६ या दिवशी समितीचे कार्यकर्ते श्री. अरविंद गुप्ता यांनी ‘नवरात्री’ या विषयावर मार्गदर्शन केले. या प्रवचनाचा ३०० जिज्ञासूंनी लाभ घेतला. या प्रसंगी ग्रंथ प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले होते.
२. नवरात्रोत्सवात सनातन संस्थेच्या वतीने केलेला प्रसार
२ अ. ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन 
२ अ १. दादरी, उत्तर प्रदेश : येथील ‘लव-कुश रामलीला समिती’च्या वतीने आयोजित उत्सवात हितचिंतक श्री. पवन बन्सल यांच्या सहकार्याने ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले. या प्रदर्शनाचा २०० हून अधिक जिज्ञासूंनी लाभ घेतला.
२ अ २. नोएडा : १५.१०.२०१६ या दिवशी शरद पौर्णिमेच्या निमित्ताने ‘शनिपीठ मंदिर, सेक्टर १४, नोएडा’ येथे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले. या प्रदर्शनाचा अनेक जिज्ञासूंनी लाभ घेतला.’
- सौ. तृप्ती जोशी आणि कु. मनिषा माहुर, सनातन संस्था

हिंदु स्त्रियांविषयीच्या प्रश्‍नांचे ‘पाखंड खंडण’ कराच !

     हिंदु विवाहसंस्था हे पुरुषसत्ताक व्यवस्थेचे उदाहरण असल्याचे सांगत कथित स्त्रीवादी कार्यकर्त्यांकडून नेहमी भारतीय संस्कृतीत स्त्रीला दुय्यम स्थान दिले जात असल्याचा अपप्रचार केला जातो. मुलींनीच नाव का पालटायचे ?, मुलींनीच सासरी का जायचे ?, मुलींनीच वटसावित्रीचे व्रत का करायचे ?, मुलींनीच मंगळसूत्र का घालायचे ? अशा प्रकारचे धर्माविषयी विकल्प निर्माण करणारे प्रश्‍न उपस्थित करून या मंडळींकडून समाजाचा बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न केला जातो. धर्मशिक्षणाच्या अभावी या शंकांचे निरसन करणार्‍या व्यक्तींची संख्या अल्प असल्याने हिंदुविरोधकांच्या कुप्रचाराला अधिकच वाव मिळतो.

तालिबानी’ वृत्तीच्या निधर्मीवाद्यांचा त्रिसूत्री कार्यक्रम !

श्री. विक्रम डोंगरे
१. हिंदूंना आणि हिंदु धर्माला झोडा !
     ‘निधर्मीवाद्यांकडून भारतातील हिंदुत्वनिष्ठांना ‘राईट-विंग’ (उजवी विचारसरणी), ‘हिटलरशाही’, ‘हिंदु तालिबानी’ या नवनवीन नावांनी हिणवले जाते. देशातील तथाकथित ‘सेक्युलरवादी ब्रिगेड’मधील मंडळी असे आरोप करण्यात एकमेकांशी जणू स्पर्धाच करत असतात. ‘हिंदूंवर टीका करणे’ म्हणजे पुरोगामित्व’, हिंदु संत अथवा हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी हिंदूंच्या आणि पर्यायाने राष्ट्रीय हितासाठी दिलेले सल्ले म्हणजे ‘हिंदु तालिबान्यांचे फतवे’, तसेच गोहत्या, लव्ह जिहाद, हिंदूंचे धर्मांतर यांविरोधात आवाज उठवणे म्हणजे ‘हिटलरशाही’, हे भारतीय निधर्मी शब्दकोषातील काही शब्द आहेत. अशा प्रकारे ‘हिंदूंना अथवा हिंदु धर्माला झोडा’ हा पुरोगाम्यांच्या त्रिसूत्रीतील पहिला कार्यक्रम होय !

घुसके लेंगे हिंदुस्थान ?

     ‘पाकिस्तानी मुसलमानांचा उद्देश भारतावर जय मिळवणे, हाच आहे. युद्ध करून त्यांना ते साध्य न झाल्याने ‘हसके लिया पाकिस्तान, घुसके लेंगे हिंदुस्थान’ असे म्हणत हा जिहादी प्रकार त्यांनी चालवला आहे.’ - श्री. प्रमोद मुतालिक, अध्यक्ष, श्रीराम सेना.
      समुद्रकिनारी असलेल्या वाळूचे कण एकमेकांना अजिबात चिकटत नाहीत. त्याप्रमाणे हिंदु समाजाची स्थिती आहे.

ही आहे भारतातील नोकरशाही ! अशांना आयुष्यभर कारागृहात टाका !

     ‘सिंधुदुर्ग जिल्हा परिषद वित्त समितीची सभा छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात सभापती दिलीप रावराणे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी समिती सचिव तथा मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी मारुती कांबळे, सदस्य सुरेश ढवळ, सोनाली घाडीगावकर, रीटा अल्फान्सो, सुगंधा दळवी आदी उपस्थित होते.
    या सभेत प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत शिक्षण विभागाने तरतूद केलेल्या निधीच्या खर्चाविषयी सदस्य सुरेश ढवळ यांनी माहिती मागितली. याला उत्तर देतांना प्राथमिक शिक्षण विभागाच्या अधिकार्‍याने ‘संबधित धारिका मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडे स्वाक्षरीसाठी प्रलंबित आहे’, असे सांगून दायित्व झटकण्याचा प्रयत्न केला. हा सर्व प्रकार वित्त अधिकार्‍यांच्या लक्षात येताच त्यांनी संबधित अधिकार्‍याला तात्काळ रोखले.

श्रीमत् नारायणाच्या हिंदु राष्ट्र्र स्थापनेच्या कार्यासाठी पृथ्वीवर अवतरलेल्या आणि अविरत सेवारत रहाणार्‍या देवीस्वरूप सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांची जाणवलेली वैशिष्ट्ये !

सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ
१. सद्गुरु (सौ.) बिंदाताई यांच्या चरणी केलेली प्रार्थना आणि कृतज्ञता !
    ‘सद्गुरु (सौ.) बिंदाताई यांच्याविषयी काही लिहिणे; म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्यासारखे आहे. हा दिवा दाखवून आम्ही साधक या देवीची एकप्रकारे आरतीच करत आहोत. ही आरती माऊलीने स्वीकारावी, अशी त्यांच्या चरणी प्रार्थना !
माय म्हणू कि आई, अशा आमच्या बिंदाताई ।
वाटतात मारक; पण आहेत तारक ताई ॥ १ ॥
प्रीतीचे मूर्तीमंत रूप हे, गुरूंचे स्वरूप हे ।
आहे राधा, अनुभवती साधक हे ॥ २ ॥
                                                 त्या आहेत सर्व साधकांचा आधार । 
                                                 सर्वव्यापी माऊली करील सर्वांची नौका पार ॥ ३ ॥
      साधकांना वेळोवेळी अमूल्य मार्गदर्शन करून त्यांच्या साधनेतील अडचणी सोडवून कोणत्याही बिकट प्रसंगात एखाद्या ढालीप्रमाणे नव्हे, तर एका कवचाप्रमाणे प्रत्येक साधकासाठी सदैव तत्पर असणार्‍या सद्गुरु ताई साधकांना या साधनारूपी सागरातून नौका पार करून गुरुचरणांशी एकरूप करून घेत आहेत.

मूत्रपिंड-प्रत्यारोपण शस्त्रकर्माच्या वेळी आणि त्यानंतर उद्भवलेल्या गंभीर आजारात पदोपदी अनुभवलेले गुरुकृपेचे क्षण !श्री. जयेश श्रीकांत राणे
  १. श्री. जयेश श्रीकांत राणे (वय ३३ वर्षे), भांडुप, मुंबई
१ अ. मूत्रपिंड-प्रत्यारोपण शस्त्रकर्म
१ अ १. आईने मूत्रपिंड दिल्यामुळे शस्त्रकर्म होणे आणि शस्त्रकर्मानंतर ‘स्टेंट’ काढतांना असह्य वेदना झाल्याने प.पू. गुरुदेवांनाच प्रार्थना होणे : ‘२७.११.२०१५ या दिवशी माझे मूत्रपिंड रोपणाचे शस्त्रकर्म झाले. माझ्या आईने मला मूत्रपिंड दिले. शस्त्रकर्मानंतर ‘पूर्वीपेक्षा एका वेगळ्याच जगात आलो आहे’, असे वाटते. ‘देवाने दिलेले हे नवीन जीवन केवळ त्याच्यासाठीच आहे’, हा विचार मनात प्रबळ होत राहिल्याने ‘मायावी विचारांच्या मोहपाशात आपण किती वर्षे वाया घालवली’, याची जाणीवही तीव्र होत गेली. शस्त्रकर्मानंतर १ मासाने मूत्रपिंडामध्ये बसवलेला ‘स्टेंट’ काढतांना आधुनिक वैद्यांनी लघवीच्या जागेवर पुष्कळ जोर दिल्याने मला असह्य वेदना झाल्या. मी प.पू. गुरुदेवांनाच प्रार्थना करत होतो, ‘हे सर्व मला सहन होत नाही. यात माझा जीवही जाईल.’
१ अ २. घरी आल्यावर लघवी होण्यात अडचण येऊ लागल्याने ‘सोनोग्राफी’ करावी लागणे आणि त्याद्वारे मूत्रमार्गात अडथळा आल्याचे समजणे : ‘स्टेंट’ काढल्यानंतर लघवीतून थेंब थेंब रक्त येऊ लागले आणि भयंकर जळजळही होऊ लागली. घरी आल्यानंतर लघवी होईना; म्हणून पुन्हा रुग्णालयात गेल्यावर तेथे ‘सोनोग्राफी’ केली. त्या वेळी लक्षात आले की, लघवी मूत्राशयात जमा होते; पण ती बाहेर जाण्याच्या मार्गात काहीतरी अडथळा आहे. आधुनिक वैद्यांनी मूत्रमार्गात नळी टाकून साचलेली लघवी बाहेर काढली.
१ अ ३. ‘शस्त्रकर्मानंतर ६ मास संगणकीय सेवा करू नये’, असे कळल्याने सेवा करण्याविषयी प्रश्‍न पडणे आणि याच वेळी दैनिकात एक सूत्र प्रसिद्ध झाल्याने सेवा आरंभ करण्यास प्रोत्साहन मिळणे : शस्त्रकर्म झालेल्या काही रुग्णांनी सांगितले होते, यानंतर ६ मास संगणक हाताळायचा नाही; कारण ‘स्क्रीन’मधून बाहेर पडणार्‍या किरणामुळे त्रास होईल आणि अधिक वेळ आसंदीवर बसणेही चांगले नाही

प.पू. डॉक्टर, कार्तिकपुत्री आणि उत्तरापुत्री यांना नवग्रहांचे सांगणे, ‘आता आम्ही सूक्ष्मातील युद्धासाठी तयार झालो आहोत !’


महर्षींची शिकवण आणि कार्य !
     ‘महर्षि म्हणतात, ‘देवाच्या कार्यासाठी त्यानेच तुम्हा तिघांना पृथ्वीवर पाठवले आहे. नवग्रह तुम्हा तिघांना सांगत आहेत की, तुम्हा तिघांसाठी आम्ही सूक्ष्मातील युद्ध करण्यासाठी (वातावरणातील इष्ट आणि अनिष्ट शक्ती यांच्यामधील युद्ध) तयारच आहोत. रामनाथी आश्रमातील बगलामुखी यागाच्या पूर्णतेसाठी आम्ही थांबलो होतो. आता हा याग झाला आहे.
   हे कार्तिकपुत्री, तुला महर्षि सांगत आहेत की, तूच तुझ्यासाठी एक साक्ष आहेस. तू लहान असतांना रांगत होतीस. अगदी त्याच वेळेला भारताचे रणगाडे (सैन्य) रांगत रांगत बांगलादेशाकडे निघाले होते.’ (सद्गुरु सौ. अंजली गाडगीळ यांच्या जन्मानंतर वर्षभरातच, म्हणजे वर्ष १९७१ मध्ये भारत-पाक युद्ध झाले होते. त्याविषयी महर्षि बोलत आहेत. - संकलक) (संदर्भ : नाडीवाचन क्रमांक १०१, कांचीपूरम्, तमिळनाडू, १७.१०.२०१६)’
- (सद्गुरु) सौ. अंजली गाडगीळ, तिरुवण्णामलई, तमिळनाडू. (२२.१०.२०१६, सायं. ५.१३)

प्रदोषच्या दिवशी शिवपिंडीवर दुधाचा अभिषेक करतांना शिवपिंंडी एकदम सजीव दिसणे, ती पाहून भीती वाटणे आणि यासाठी देवाची क्षमा मागितल्यावर देवावर वाहिलेले कमळ पुढे पडणे

     ‘१ - २ वर्षांपूर्वी माझे सासरे श्री. बाबुराव पवार यांचे नाडीपट्टीद्वारे भविष्य पाहिले होते. त्यात माझ्यासाठी काही उपाय सांगितले होते. त्यातील एक उपाय म्हणजे प्रदोषच्या दिवशी शिवपिंडीवर दुधाचा अभिषेक करणे. १९.१२.२०१५ या प्रदोषच्या दिवशी शिवपिंडीवर दुधाचा अभिषेक करण्यासाठी मी मंदिरात गेले. प्रार्थना करून अभिषेक चालू केला. त्या वेळी ‘शिवपिंंड एकदम सजीव दिसून हलत आहे’, असे जाणवले. ती इतकी स्पष्ट दिसली की, ते पाहिल्यावर मला भीतीने पोटात गोळा आला. मी अवतीभवती पाहिले, तर कोणाचे लक्ष नव्हते. त्यानंतर ‘देव अनुभूती देत आहे आणि आपल्याला भीती वाटली’, असा विचार मनात आला. मी देवाची क्षमा मागितली आणि डोके टेकून नमस्कार केला. त्या वेळी देवावर वाहिलेले कमळ माझ्या पुढे पडले. माझ्या बाजूला असलेली एक व्यक्ती म्हणाली, ‘‘देवाला जे सांगितले, ते पोचले; म्हणून फूल पडले !’’
- सौ. श्रद्धा पवार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२५.१.२०१६)

लहान वयातच साधनेसाठी आश्रमात आनंदाने रहाणारी आणि मायेपासून अलिप्त असलेली ५७ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली अन् उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली कु. समृद्धी जोशी (वय १७ वर्षे) !

उच्चलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र 
चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. समृद्धी जोशी ही एक आहे !
    
कु. समृद्धी जोशी
कु. समृद्धी जोशी हिचा कार्तिक शुक्ल पक्ष नवमी (९.११.२०१६) या दिवशी तिथीनुसार वाढदिवस झाला. त्यानिमित्ताने तिच्याविषयी तिच्या आईला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.
१. समृद्धीची वैशिष्ट्ये
१ अ. अपेक्षा नसणे
     ‘ती आमच्याकडून कोणतीही अपेक्षा करत नाही. मी तिला संपर्क केला नाही, तरी ती रागावत नाही. याउलट तिला वेळ असेल, तेव्हा मला भ्रमणभाष करून आमची विचारपूस करते.
१ आ. तत्त्वनिष्ठ
     आमच्यातील दोषांचीही तेवढ्याच कठोरतेने जाणीव करून देते.
१ इ. समंजसपणा
      समृद्धी अतिशय समंजस आहे. ती कधीच हट्ट करत नाही. परिस्थितीचा विचार करते. अनावश्यक पैसे खर्च करत नाही. तिच्याजवळ असलेले पैसे पाहूनच खर्च करते.
१ ई. आसक्ती नसणे
     मध्यंतरी शिबिराच्या निमित्ताने रामनाथी आश्रमात जाण्याचा योग आला. दिवसभर आम्ही व्यस्त असायचो. रात्रीच्या महाप्रसादाच्या वेळी तिला भेटायला बोलावले, तर ती यायची, दोन मिनिटे थांबायची आणि ‘जाऊ का ?’ असे विचारायची. यावरून ‘ती आमची सतत विचारपूस करत असली, तरी ती आमच्यात अडकली आहे’, असे वाटत नाही. तिच्यात पूर्वीपेक्षा पुष्कळच पालट झाले आहेत.

झाडांना पाणी घालण्याची सेवा करत असतांना कु. सुप्रिया जठार यांना झाडांनी साधनेविषयी केलेले अनमोल मार्गदर्शन !

कु. सुप्रिया जठार
‘      गुरुमाऊली, आपल्या कृपेमुळे मला आश्रमाच्या आगाशीत असलेल्या झाडांना पाणी घालण्याची सेवा मिळाली. माऊली, ही सेवा करतांना आपल्या कृपेमुळे मी झाडांशी संवाद साधू शकले. त्यांनी मला साधनेविषयी मार्गदर्शन केले. ते आपल्या चरणी कृतज्ञतापूर्वक अर्पण करते.
१. झाडाने मनातील कर्तेपणाच्या विचारांची जाणीव करून देणे
     ‘मी सेवेचे आरंभीचे २ दिवस केवळ झाडांना पाणी घालत होते. तिसर्‍या दिवशी माझ्या मनात विचार आला, ‘माझ्याकडून ही कृती ‘सेवा’ या भावाने व्हायला हवी.’ मला ही सेवा करण्याचा विसर पडू नये; म्हणून मी आठवण होण्यासाठी भ्रमणभाषमधे गजर लावला. माझ्या मनात याविषयी कर्तेपणाचे विचार होते; पण मला त्याची जाणीव नव्हती. मी संध्याकाळी झाडांना पाणी घालायला गेल्यावर पहिलेच झाड मला म्हणाले, ‘तू केवळ पोस्टमन आहेस. तू ना झाड निर्माण केले आहेस, ना पाणी.’ तेव्हा मला माझ्यातील अहंची जाणीव झाली.

साधक आणि नातेवाईक यांच्या विवाहसोहळ्यात जाणवलेला भेद

     ‘४.२.२०१४ या दिवशी देवाच्या कृपेने मला श्री. विनय तळेकर आणि कु. वर्षा दामले यांच्या रामनाथी आश्रमात झालेल्या विवाहसोहळ्याला उपस्थित रहाण्याची संधी मिळाली. या आधी मी साधकांचा आणि आश्रमात होणारा विवाहसोहळा कधी पाहिला नव्हता. तो पाहिल्यावर नातेवाईक आणि साधक यांचा विवाह सोहळा यांत पुष्कळ भेद जाणवला. तो येथे येथे देत आहे. 
१. साधकांचा विवाहसोहळा 
१ अ. वधू आणि वर यांच्यामध्ये अंतरपाट धरल्यावर त्या दोघांच्या वर चैतन्याचा एक गोळा असून त्यातून त्या दोघांकडे चैतन्याचा प्रवाह जात असून दोघांंच्या मध्येही तो प्रवाह असल्याचे दिसणे : वधू आणि वर यांच्यामध्ये अंतरपाट धरला होता. तेव्हा माझ्या मनात विचार आला ‘या क्षणी त्या दोघांना काय वाटत असेल ?’ त्या वेळी देवाने मनात विचार दिला, ‘भावनिक स्तरावर विचार करू नकोस. आध्यात्मिक स्तरावर काय जाणवते, ते बघ.’ तेव्हा त्या दोघांच्या वर एक चैतन्याचा गोळा दिसला. ‘त्यातून चैतन्याचा प्रवाह त्या दोघांकडे जात होता आणि दोघांंच्या मध्येही तो प्रवाह होता. अशा प्रकारे चैतन्याचा त्रिकोण निर्माण झाला आहे’, असे दिसले.

हे भगवंता, मी काय सांगणार गुपित ।

कु. कौमुदी जेवळीकर
परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या
अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...

हे भगवंता,
मी काय सांगणार गुपित ।
महर्षींनी आधीच उलगडले
तुमच्या अवतारत्वाचे गुपित ॥

साक्षात् विष्णुस्वरूप गुरुमाऊलीची प्रीती अनुभवल्यावर ।
प्रत्येकच जीव सततच
राहील ना आनंदी ॥

      ‘देवा, तुझा हा आनंद मला सतत अनुभवता येवून समष्टीलाही देता येऊ दे’, हीच प्रार्थना ।’
- कु. कौमुदी जेवळीकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२.११.२०१६)

जिज्ञासू, प्रेमळ वृत्तीचा आणि आरती अन् श्‍लोक म्हणण्याची आवड असलेला ५३ टक्के आध्यात्मिक पातळी असलेला आणि उच्च स्वर्गलोकातून जन्माला आलेला जयसिंगपूर, सांगली येथील चि. यदुनंदन अजिंक्य वरेकर (वय ३ वर्षे) !

उच्चलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र 
चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. यदुनंदन अजिंक्य वरेकर एक दैवी बालक आहे !
चि. यदुनंदन वरेकर
पालकांनो, हे लक्षात घ्या ! 
     ‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ - (परात्पर गुरु) डॉ. आठवले 
१. गुणवैशिष्ट्ये 
१ अ. सौ. प्रीती वरेकर (यदुनंदनची आई)
१ अ १. गर्भारपणात ‘सात्त्विक बाळ जन्माला यावे’, अशी प्रार्थना करणे : ‘श्रीकृष्णाच्या कृपेने यदुनंदनच्या वेळी गर्भारपणात मला कुठलाही शारीरिक त्रास झाला नाही. मला धर्म आणि राष्ट्र यांच्याविषयी अभिमान आणि अध्यात्माची आवड असल्याने ‘सात्त्विक बाळ जन्माला यावे’, अशी प्रार्थना मी करीत होते. त्या काळात मला बाळकृष्णाची प्रतिमा पुष्कळ आवडत असे.
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. 
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
दुसरा आणि स्वतः
दुसर्‍याला उमजू न देणे, स्वतःचे स्वतःला न उमजणे,
स्वतःचे दुसर्‍याला उमजू न देणे, ही अवस्था आल्यास
तो जीव ईश्‍वराच्या अगदी निकट आला आहे, असे समजावे.
भावार्थ : ‘दुसर्‍याला उमजू न देणे’ म्हणजे आपल्यातील शक्ती दुसर्‍याला समजणार नाही, असे वागणे. ‘स्वतःचे स्वतःला न उमजणे’ म्हणजे अद्वैतात गेल्यावर स्वतःचे स्वतःला उमजण्यासारखे काही उरत नाही; कारण तो स्वतःला विसरूनच गेलेला असतो. ‘स्वतःचे दुसर्‍याला उमजू न देणे’ म्हणजे ‘आपण स्वतः ब्रह्मस्थितीत आहोत’, हे प्रकृतीतील दुसर्‍याला उमजून येत नाही. ही ईश्‍वराची, ब्रह्माची लक्षणे असल्याने तशा स्थितीत जो असेल, तो साहजिकच ईश्‍वराच्या निकट आलेला असतो.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन ‘संत भक्तराज महाराज यांची शिकवण.’)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
      भ्रष्टाचार रोखण्यासाठी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद करण्यासारख्या वरवरच्या उपायांऐवजी जनतेला साधना करायला लावल्यास भ्रष्टाचारच नाही, तर बलात्कार, चोर्‍या, खून इत्यादी सर्वच गुन्हे करण्याचा कोणाच्या मनात विचारही येणार नाही ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले
बोधचित्र


प.पू. पांडे महाराज यांचे अनमोल विचारधन

प.पू. पांडे महाराज
१. ‘आपला विचार न करता सतत ईश्‍वराच्या विचारात रहाणे, म्हणजे अनुसंधानात रहाणे. सर्वत्र तोच असल्याने त्याचाच विचार करावा. त्यामुळे आपली प्रतिमा गळून पडेल आणि स्वतःविषयी विचार अन् विकार येणारच नाहीत.
२. दुसर्‍याविषयी वाईट विचार म्हणजे भगवंताविषयी वाईट विचार झाला. यात भगवंताचा दुर्लौकिक (बदनामी) नाही का ?
३. ‘भगवंताने या वस्तू निर्माण केल्या; म्हणून मी त्यांचा उपयोग करू शकतो. भगवंता, तू माझ्यासाठी हे निर्माण केलेस. वाचाही नाही आणि भाषाही नाही, तर आपल्याला भगवंत कळला असता का ? माझ्या संवेदना दुसर्‍याला सांगण्यासाठी भगवंताने वाचा आणि ही सुंदर भाषा दिली; म्हणून आपण बोलू शकतो. ‘भगवंताने किती सुविधा दिल्या आहेत’, असा विचार सदैव करू शकतो. त्याचे किती उपकार आहेत, हे आपल्या लक्षातच येत नाही. भगवंताचे नियोजन समजून घेतले पाहिजे, म्हणजे भगवंताप्रतीचा भाव निर्माण होतो.’ 
- प.पू. परशराम पांडे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१७.८.२०१६) योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

सद्गुरूंना आपल्यापेक्षा वेगळे समजू नका !
जो सद्गुरूंना आपल्यापेक्षा वेगळा आणि दूर समजतो, 
तो त्यांच्यापासून पूर्ण लाभ मिळवू शकत नाही. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

अमेरिकेतील निकाल हा आतंकवादविरोधी एकजुटीचा विजय

संपादकीय
      नशिबाची साथ असेल, तर निर्भेळ यश मिळण्यापासून कोणीही रोखू शकत नाही, हे डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडणुकीतील यशावरून सिद्ध झाले आहे. ट्रम्प यांनी भल्याभल्यांचे अंदाज चुकीचे ठरवत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत निर्विवाद विजय संपादन केला. त्यांनी ओबामा मंत्रीमंडळातील वजनदार मंत्री म्हणून ओळखल्या जाणार्‍या हिलरी क्लिंटन यांचा सहज पराभव केला. कोणताही राजकीय वारसा नसतांना, तसेच दखल घेण्याजोगे राजकीय कर्तृत्व नसतांना ट्रम्प थेट राष्ट्राध्यक्ष झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

काळ्या पैशांवरचा ‘सर्जिकल स्ट्राईक’ !

संपादकीय
      पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. त्या बदल्यात ५०० आणि २ सहस्र रुपयांच्या नोटा ११ नोव्हेंबरपासून चलनात आणणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. काळा पैसा बाहेर काढणे आणि खोट्या नोटांना आळा घालणे, यांसाठी मोदी शासनाने घेतलेला हा निर्णय स्वागतार्हच आहे. एवढेच नव्हे, तर वर उल्लेखिलेल्या नोटा रहित करण्याची पद्धत आणि त्याची कार्यवाही यांविषयी त्यांनी ठरवलेली कार्यपद्धतही कौतुकास पात्र आहे. राजकीय हित-अहिताचा विचार बाजूला ठेऊन केवळ राष्ट्रहितासाठी असे निर्णय घ्यायला धाडस लागते. ते पंतप्रधानांनी दाखवले. अनेक वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्या यांनी सरकारच्या या निर्णयास ‘मोदी शासनाचा काळ्या पैशावरील ‘सर्जिकल स्ट्राईक’ अशा शब्दांत प्रसिद्धी दिली आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn