Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

दिनविशेष

आज श्री महालक्ष्मी देवीचा किरणोत्सव (कोल्हापूर)

आजपासून ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद होणार ! - पंतप्रधान मोदी

  • ३१ डिसेंबरपर्यंत ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा अधिकोष (बँक) अथवा पोस्टात जमा करता येणार !
  • काळा पैसा आणि भ्रष्टाचार रोखण्यासाठी केंद्र सरकारचा निर्णय
देहली - ८ नोव्हेंबरला रात्री ८ वाजता आपत्कालिन स्थितीत देशाला संबोधित करतांना पंतप्रधान मोदी यांनी ९ नोव्हेंबरपासून ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद होत असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. भ्रष्टाचार, काळा पैसा आणि बनावट नोटांच्या देशविघातक समस्यांवर आळा घालण्यासाठी हा ऐतिहासिक निर्णय घेत असल्याचे मोदी यांनी या वेळी सांगितले. मोदी यांनी या वेळी सांगितले की, सीमापार देशांतून मोठ्या प्रमाणात बनावट चलन भारतात आले असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. प्रत्येक देशाला त्याच्या इतिहासात असे महत्त्वपूर्ण पावले उचलावी लागत असतात.

इटलीला बसलेला भूकंपाचा धक्का हा समलिंगी संबंधाला अनुमती दिल्याने देवाने दिलेली शिक्षा ! - इटलीचे धर्मगुरु

  • अंनिस आणि बुद्धीवादी यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?
  • कि केवळ हिंदु धर्मावर टीका करणे हेच त्यांचे धोरण आहे ?
    रोम - नुकताच इटलीला ६.६ रिश्टर तीव्रतेचा भूकंपाचा बसलेला धक्का, त्यात शेकडो लोक मृत्यूमुखी पडणे आणि सहस्रावधी लोक बेघर होणे, ही कुटुंब व्यवस्था आणि विवाहाची प्रतिष्ठा यांचा अवमान करणार्‍या समलिंगी संबंधाला इटली सरकारने अनुमती दिल्याने दैवी शिक्षा आहे, असे इटलीचे ख्रिस्ती धर्मगुरु जिओवानी कॅवॅलकोली यांनी म्हटले आहे. ३० ऑक्टोबर या दिवशी मध्य इटलीला बसलेला भूकंपाचा धक्का हा गेल्या ३६ वर्षांतील सर्वांत अधिक तीव्रतेचा धक्का होता. गेल्या २ महिन्यांत मध्य इटलीला बसलेला भूकंपाचा हा तिसरा मोठा धक्का होता. व्हॅटिकनचे आर्चबिशप आग्नेलो बेस्यु यांनी कॅवॅलकोली यांचे विधान अवमानकारक असल्याचे म्हटले आहे; मात्र कॅवॅलकोली त्यांच्या विधानाशी ठाम आहेत. मानवाच्या पापामुळेच भूकंपासारखी संकटे येत असतात. व्हॅटिकनने ख्रिस्ती धर्मामध्ये प्रश्‍नोत्तराद्वारे दिलेल्या शिक्षणाचा अभ्यास करावा, असे कॅवॅलकोली यांनी म्हटले आहे.

बरेली (उत्तरप्रदेश) येथील दर्ग्यात पाक धर्मगुरूंवर प्रवेशबंदी !

‘दरगाह आला हजरत’ समितीचा निर्णय !
     बरेली (उत्तरप्रदेश) - उरी येथील सैन्यदलाच्या तळावर झालेल्या आतंकवादी आक्रमणानंतर पाककडून शस्त्रसंधीचे उल्लंघन चालूच आहे. यामुळे पाकच्या धर्मगुरूंवर बहिष्कार टाकण्याचा आणि त्यांना यावर्षी दर्ग्यात प्रवेश न देण्याचा निर्णय बरेलीमधील ‘दरगाह आला हजरत’ या दर्गा समितीने घेतला आहे. या कार्यक्रमात ६ पाकिस्तानी धर्मगुरू सहभागी होणार होते. 
१. येत्या २४ नोव्हेंबरपासून येथे प्रतिवर्षी होणारा ‘उर्स-ए-रझवी’चा कार्यक्रम चालू होणार आहे. गेल्या वर्षी पाकमधून १२ धर्मगुरूंना उरूसामध्ये येण्याचे निमंत्रण देण्यात आले होते. त्यांपैकी ५ धर्मगुरूंनी उरूसामध्ये सहभाग घेतला होता.
२. पाकमधील धर्मगुरूंनी आतंकवादाविरोधात आवाज उठवायला हवा, यासाठी आम्ही पाकिस्तानी धर्मगुरूंवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती ‘दरगाह आला हजरत’ दर्ग्याचे प्रवक्ते मुफ्ती महंमद सलीम नुरी यांनी सांगितले.

अशुभ वास्तू पाडून नवीन इमारतीसाठी तेलंगण सरकार ३४७ कोटी रुपये खर्च करणार !

अंनिसला याविषयी काय म्हणायचे आहे ?
      भाग्यनगर - तेलंगण राज्याचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव हे राज्यातील ‘सैफाबाद पॅलेस’ ही इमारत तोडून तेथे ३४७ कोटी रुपये खर्च करून नवीन इमारत बांधणार आहेत. कारण वर्ष १८८८ मध्ये बांधण्यात आलेली ही इमारत राज्यासाठी अशुभ आहे, असे सरकारचे म्हणणे आहे. याचे बांधकाम सहावा निजाम महबूब अली पाशा याने केले होते; मात्र नंतर त्याने या इमारतीला टाळे लावले होते. तेव्हापासून तिला अशुभ म्हटले जाते. वर्ष १९४० मध्ये सरकारमधील एका वरिष्ठ अधिकार्‍याने या इमारतीत प्रशासकीय कार्यालय स्थापन केले.

(म्हणे) अडवाणी हे देशाच्या उत्कर्षासाठी अथक परिश्रम घेणारे एक महान नेते !

महंमद अली जीना यांच्या कबरीवर जाऊन माथा टेकणारे लालकृष्ण अडवाणी
यांना ८८ व्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदी यांच्याकडून शुभेच्छा आणि गौरवोद्गार
    नवी देहली - भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना ८८ व्या वाढदिवसानिमित्त ७ नोव्हेंबर या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तत्पूर्वी मोदी यांनी ट्विटरवरून अडवाणींसाठी ‘निरोगी आणि दीर्घायुष्य लाभो’, अशी प्रार्थना केली. ‘आमचे प्रेरणास्थान, देशाच्या उत्कर्षासाठी अथक परिश्रम घेणारा भारतातील एक महान नेता’, अशा शब्दांत मोदी यांनी अडवाणी यांची प्रशंसा केली. लालकृष्ण अडवाणी यांनी १९९८ ते २००४ या वाजपेयी सरकारच्या काळात केंद्रीय गृहमंत्रीपद भुषवले होते.
(राममंदिरासाठी आंदोलन करून सत्ता मिळवल्यानंतर राममंदिरासाठी काहीही न करणार्‍या अडवाणी यांच्याविषयी हिंदूंना जिव्हाळा राहिलेला नाही, हे वास्तव आहे ! - संपादक)

आईचे किती दूध प्यायले आहे, ते बघुयाच !

  • गृहमंत्री राजनाथ सिंह यांची समाजवादी पक्षाला अप्रत्यक्ष चेतावणी !
  • एखाद्याच्या वाच्यतेतून त्या व्यक्तीमत्त्वाची ओळख ठरते, यानुसार केंद्रीय गृहमंत्र्यांनी योग्य आणि सभ्य शब्दांमध्ये चेतावणी देणे, अपेक्षित आहे !
  • राजनाथ सिंह यांनी अशा चेतावण्या देण्याऐवजी समाजवादी पक्षाच्या सरकारला कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजवल्याच्या प्रकरणी विसर्जित करून तेथे राष्ट्रपती राजवट लागू करावी !
    कैराना (उत्तरप्रदेश) - कैराना येथील आया-बहिणींचा आत्मसन्मान लुटला जात आहे. लोकांना खोट्या आरोपांखाली अडकवले जात आहे; मात्र भाजप राज्यातील विधानसभेत निवडून आल्यास आम्ही या विरोधात कारवाई करू. लोकांना घाबरवण्यासाठी जे बळाचा वापर करत आहेत, त्यांनी आईचे किती दूध प्यायले आहे, हे आम्ही पाहू, अशी चेतावणी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी येथे समाजवादी पक्षाला अप्रत्यक्ष दिली आहे. कैराना परिसरात धर्मांधांच्या दहशतीमुळे गेल्या काही महिन्यांपासून हिंदूंचे मोठ्या प्रमाणात पलायन होत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर राजनाथ सिंह यांनी वरील चेतावणी दिली आहे. भाजप मतांच्या राजकारणासाठी धार्मिकतेचा वापर करत आहे, असा आरोप विरोधी पक्षांकडून याविषयी करण्यात येत आहे.

कर्नाटकमध्ये भाजपचा आणखी एक कार्यकर्ता सुनील डोंगरे यांची हत्या !

देशाची सत्ता हातात असतांना देशातील स्वतःच्या कार्यकर्त्यांचे रक्षण होत नाही, हे कसे ?
  औरद (कर्नाटक) - कर्नाटकाच्या बिदर जिल्ह्यातील औरद शहरामध्ये भाजपचे कार्यकर्ते सुनील डोंगरे यांची ६ नोव्हेंबर या दिवशी हत्या करण्यात आली. येथील सरकारी शाळेच्या जवळ सुनील डोंगरे यांचा मृतदेह चाकूने भोसकलेल्या स्थितीत आढळला. सुनील डोंगरे हे औरदचे आमदार प्रभु चव्हाण यांचे जवळचे सहकारी होते. या प्रकरणी पोलीस तपास चालू आहे. काही दिवसांपूर्वी म्हैसूर जिल्ह्यातील मगाळी येथे भाजपचे कार्यकर्ते रवि यांचा मृतदेह आढळला होता. रवि यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला होता.

पाककडून भारतातील शीख आतंकवाद्यांद्वारे आक्रमण घडवण्याची शक्यता !

  नवी देहली - पाकच्या आयएस्आय या गुप्तचर संघटनेने भारतातील शीख आतंकवाद्यांचे ‘स्लीपर्स सेल’ (आतंकवादी कारवाया करणारा आणि आतंकवाद्यांना साहाय्य करणारा स्थानिक गट) कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न चालू केले आहेत. याद्वारे भारतात आतंकवादी आक्रमण घडवून आणण्याची आयएस्आयची योजना असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाला गुप्तचर संघटनांकडून मिळाली आहे.

अवैध आंदोलन करून सुरक्षेला बाधा निर्माण करणार्‍या वाराणसीतील काँग्रेस नेत्यांवर कारवाई करण्यासाठी अधिवक्ता कमलेशचंद्र त्रिपाठी यांची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी !

सामाजिक दायित्व ओळखून कृतीशील प्रयत्न करणारे अधिवक्ता कमलेशचंद्र त्रिपाठी यांचे अभिनंदन ! 
त्यांचा आदर्श प्रत्येक राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी अधिवक्त्यांनी घ्यायला हवा !
श्री. कमलेशचंद्र त्रिपाठी
       वाराणसी - येथील राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी अधिवक्ता श्री. कमलेशचंद्र त्रिपाठी यांनी अवैध आणि सुरक्षेला बाधा निर्माण करणारी आंदोलने करणार्‍या येथील काँग्रेस नेत्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी स्थानिक जिल्ह्याधिकार्‍यांकडे केली आहे. (अवैध आंदोलने करणार्‍या काँग्रेस नेत्यांना कठोर शिक्षा केली पाहिजे ! - संपादक)
      २ नोव्हेंबर या दिवशी उत्तरप्रदेशातील मंडुआडीह रेल्वे स्थानकावर रेल्वेगाडी रोखून आंदोलन करून प्रवाशांची गैरसोय करणारे काँग्रेस नेते डॉ. राजेश मिश्रा, सीताराम केसरी आदींच्या विरोधात अधिवक्ता श्री. कमलेशचंद्र त्रिपाठी यांनी येथील विशेष पोलीस अधीक्षकांकडे तक्रार नोंदवून या नेत्यांच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट करण्याची मागणी केली होती. या तक्रारीवर कारवाई करण्याचा आदेश विशेष पोलीस अधीक्षकांनी मंडुआडीह पोलीस ठाण्याच्या प्रभारीला दिला आहे.

संभल (उत्तरप्रदेश) येथे कल्कि धाम मंदिराच्या बांधकामाला समाजवादी पक्षाच्या मुसलमान नेत्याकडून विरोध !

राजकीय पक्षांतील हिंदु नेते कधी अवैध मशिदींच्या बांधकामाला विरोध करतात का ?
      मुरादाबाद/संभल - येथे आचार्य प्रमोद कृष्णम् यांच्याकडून कल्कि धाम मंदिर बांधण्यात येणार आहे. याच्या शिलान्यासाच्या कार्यक्रमाला येथील समाजवादी पक्षाचे नेते आणि माजी खासदार डॉ. शफीकुर्रहमान बर्क आणि संभलच्या ईदगाह ईमाम यांच्यासहित अनेक मुसलमान संघटनांनी विरोध केला आहे. ‘जर या कार्यक्रमाला प्रशासनाने अनुमती दिली, तर जिल्ह्यातील बांधकाम स्थगित असलेल्या मशिदींचे बांधकाम पुन्हा चालू केले जाईल आणि यातून कायदा आणि सुव्यवस्था बिघडली, तर त्याचे दायित्व प्रशासनाचे असेल’, अशी धमकी दिली आहे. या संदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम् म्हणाले की, कल्कि धाम नव्याने बांधण्यात येत असल्याची अफवा पसरवण्यात आली आहे. मुळात हे मंदिर १५ वर्षांपासून अस्तित्वात आहे. दुसरीकडे संभलचे जिल्हाधिकारी यांनी म्हटले की, मंदिराच्या बांधकामासाठी कोणतीही अनुमती घेण्यात आलेली नाही. त्यावर कायद्यानुसार कारवाई केली जाईल. शिलान्यासासाठी राज्याचे समाजवादी पक्षाच्या सरकारमधील मंत्री शिवपाल यादव उपस्थित रहाणार आहेत.


कोच्ची (केरळ) येथे १८ वर्षांच्या युवतीला झालेल्या बाळाचा पिता १२ वर्षांचा !

अनैतिकतेत पाश्‍चात्यांच्याही पुढे गेलेले भारतीय ! यालाच पुरोगामित्व म्हणायचे का ?
     कोच्ची (केरळ) - येथील पोलिसांनी १८ वर्षीय युवतीला गर्भवती बनवल्याच्या प्रकरणी १२ वर्षांच्या मुलाच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट केला आहे. या युवतीने खाजगी रुग्णालयात बाळाला जन्म दिल्यावर हा गुन्हा प्रविष्ट करण्यात आला. 
     पोलिसांनी रुग्णालयावर आरोप केला आहे की, त्यांनी या बाळंतपणाची पोलिसांना माहिती दिली नाही; कारण मुलीला १८ वर्षे पूर्ण होण्यास २ महिले शिल्लक होते. रुग्णालयाचे म्हणणे आहे की, ती १८ वर्षांची आहे. ‘ही युवती १२ वर्षांच्या मुलामुळे गर्भवती झाली, हे लक्षात आल्यावर आम्ही चाईल्ड लाईनला कळवले होते’, असेही रुग्णालयायाने म्हटले. पोलिसांनी मात्र रुग्णालयाच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट केला आहे.
      चाइल्ड लाइनचे संचालक फादर टॉमी एस्डीबी यांनी सांगितले की, आम्हाला रुग्णालयाने याची माहिती दिली होती आणि आम्ही थ्रीककारा येथील पोलीस अधीक्षकांना याची कल्पना दिली होती.सरकारकडून ‘एन्डीटीव्ही इंडिया’वरील एक दिवसाच्या बंदीला तात्पुरती स्थगिती !

      नवी देहली - पठाणकोट आक्रमणाची अतिसंवेदनशील माहिती प्रसारित केल्याच्या आरोपावरून सरकारने ‘एनडीटीव्ही इंडिया’च्या हिंदी वृत्तवाहिनीवर घातलेली एक दिवसाची बंदी तात्पुरती स्थगित केली आहे. त्यानुसार माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने एन्डीटीव्ही इंडियावरील बंदी स्थगित करण्याचे आदेश दिले आहेत. या बंदीच्या विरोधात एन्डीटीव्ही इंडिया वाहिनीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. ९ नोव्हेंबरला दुपारी एक वाजल्यापासून १० नोव्हेंबरला दुपारी एक वाजेपर्यंत वाहिनी बंद ठेवण्याचे आदेश केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने दिले होते.
भाग्यनगर येथे गरीब व्यक्तीने पैशांअभावी ढकलगाडीवरून पत्नीचा मृतदेह नेला !

  • भारताने स्वातंत्र्याच्या ६९ वर्षांत केलेली प्रगती (?) ! 
  • गरिबी हटवण्याच्या घोषणा देणार्‍या राजकारण्यांनी जनतेची किती फसवणूक केली, हे या घटनेवरून लक्षात येते !
     भाग्यनगर - रुग्णवाहिकेसाठी पैसे नसल्याने रामुलु नावाच्या व्यक्तीने त्याची पत्नी कविता हिचा मृतदेह ढकलगाडीवरून ८० कि.मी.पर्यंत नेल्याची घटना उघडकीस आली आहे. त्याला मनूरमधील माईकोड या मूळ गावी जाऊन पत्नीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करावयाचे होते. रुग्णवाहिकेच्या चालकांनी यासाठी ५ सहस्र रुपये मागितले होते. ढकलगाडीवरून मृतदेह नेतांना रामुलु रस्ता चुकल्याने याला अखेर पोलीस आणि ग्रामस्थ यांच्या साहाय्याने विक्रमगड येथेच अंत्यसंस्कार करावा लागला.

दाऊद भारतात सशर्त येण्यास अद्यापही सिद्ध ! - दाऊदच्या अधिवक्त्याचा दावा

आतंकवादी कधीही कोणतीही अट ठेवू शकत नाही ! 
     नवी देहली - आंतरराष्ट्रीय जिहादी आतंकवादी दाऊद इब्राहिम त्याला मुंबईतील आर्थर रोड मध्यवर्ती कारागृहात न ठेवण्याच्या त्याच्या जुन्या अटीवर भारतात येऊ शकतो, असा दावा त्याचे अधिवक्ता श्याम केसवानी यांनी केला आहे. यासंदर्भात दाऊदबरोबर चर्चा करावी लागेल, असेही केसवानी यांनी सांगितले. 
     दाऊदने ही अट ५ वर्षांपूर्वी त्याच्या विश्‍वासू माणसाच्या माध्यमातून ज्येष्ठ विधीज्ञ राम जेठमलानी यांना लंडनमध्ये भेटून कळवली होती; मात्र सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले, असा आरोप केसवानी यांनी केला. सरकारने अबू सालेम आणि छोटा राजन यांच्या अटी मान्य करत त्यांना भारतात आणले, असा आरोपही केसवानी यांनी केला आहे.

आतंकवादी हाफिज सईद भारतात नदीमार्गे आतंकवादी घुसवण्याच्या सिद्धतेत !

     नवी देहली - मुंबईवरील आक्रमणाचा सूत्रधार आणि लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफिज सईद पुन्हा एकदा भारतावर आक्रमण करण्याचा कट आखत आहे. हाफिज पुन्हा एकदा त्याच्या आतंकवाद्यांना नदीमार्गाने भारतात घुसवण्याच्या सिद्धतेत असल्याची माहिती समोर आली आहे. हाफिज सईद याने या आक्रमणाचे दायित्व तोयबाचा कमांडर अबू इरफान टांडेवाला याच्यावर सोपवले आहे. 
   तोयबाचे ८-९ आतंकवादी जम्मूमधील निक्की तवी आणि बडी तवी नद्यांचा वापर भारतात घुसखोरी करण्यासाठी करणार आहेत. यासाठी पाकिस्तानी सैन्य त्यांना मोठ्या प्रमाणात साहाय्य करत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
भारत सरकार हुतात्मा सैनिकांची केवळ संख्याच मोजणार आहे का ?
पाकच्या गोळीबारात आणखी एक सैनिक हुतात्मा !
नौशेरा - जम्मू-काश्मीरच्या सीमेवर पाक सैन्याच्या गोळीबाराच्या घटना अद्याप चालूच आहेत. ८ नोव्हेंबरला नौशेरा सेक्टरमध्ये पाकने केलेल्या गोळीबारात एक सैनिक हुतात्मा झाला.

कांगो येथे झालेल्या बॉम्बस्फोटामध्ये भारताचे ३२ शांती सैनिक घायाळ !

   किंशासा (कांगो) - कांगोमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटामध्ये भारताचे ३२ शांती सैनिक घायाळ झाले आणि एका लहान मुलाचा मृत्यू झाला आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांती मोहिमेत भारत १७ वर्षांपासून आहे. त्यामध्ये आतापर्यंत ३ सहस्र २६३ सैनिकांचा मृत्यू झाला आहे. त्यातील १५७ सैनिक भारतीय आहेत.

भारत-जपानमध्ये ११ नोव्हेंबरला अणूकरार होण्याची शक्यता !

     टोकियो - पंतप्रधान नरेंद्र मोदी १० नोव्हेंबरला ३ दिवसांच्या दौर्‍यासाठी जपानमध्ये दाखल होणार आहेत. ११ नोव्हेंबर या दिवशी त्यांच्या उपस्थितीत नागरी अणूकरार होण्याची शक्यता आहे. भारताने अण्वस्त्र प्रसारबंदी करारावर (एन्पीटी) स्वाक्षरी केलेली नाही. एन्पीटीवर करार न करूनही जपानबरोबर अणूकरार करणारा भारत पहिला देश ठरणार आहे, असे ‘साऊथ चीन मॉर्निंग पोस्ट’ने दैनिकाने (एस्सीएम्पी) त्याच्या वृत्तात म्हटले आहे. 
    दुसर्‍या महायुद्धात हिरोशिमा आणि नागासाकी शहरांमध्ये अणूबॉम्बचा विध्वंस अनुभवलेल्या जपानने याआधी भारताशी अणूकरार न करण्यामागेे भारताने ‘एन्पीटी’वर सही केली नव्हती, हे प्रमुख कारण होते. भविष्यात जर भारताने अणूचाचणी केली, तर जपान नागरी अणूकरारासंबंधी सहकार्य तातडीने थांबवेल, असे या करारात नमूद केल्याचेही या वृत्तात म्हटले आहे. या करारामुळे जपान भारतात अणूऊर्जा प्रकल्प उभारू शकणार आहे.२२२ वर्षांपासून सतत तेवत असणारा कर्णावती (गुजरात) येथील वैष्णव मंदिरातील दीप !

अंनिसला चपराक !
     कर्णावती - येथील वैष्णव मंदिरात गेल्या २२२ वर्षांपासून एक दीप तेवत आहे. या दिव्याला ‘दीपकजी’ असे नाव देण्यात आले आहे. गोस्वामी रघुनाथ यांनी २२२ वर्षांपूर्वी येथे नटवर प्रभु आणि श्यामल यांच्या मूर्तींची या मंदिरात स्थापना केली होती.बर्धवान (बंगाल) येथील पोलीस ठाण्यात रात्रभर चालला संगीतरजनीचा कार्यक्रम !

तृणमूल काँग्रेसच्या राज्यातील जनताद्रोही आणि कायदाद्रोही पोलीस !
     बर्धवान (बंगाल) - बर्धवान जिल्ह्यातील कटवा पोलीस ठाण्यात ४ नोव्हेंबरच्या रात्री संगीतरजनी आणि नाच यांचा कार्यक्रम चालला होता; मात्र पोलिसांना याची कोणतीही पर्वा नव्हती. वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या उपस्थितीत रात्रभर झालेल्या या कार्यक्रमाच्या वेळी ध्वनीक्षेपक लावण्यात आले होते. या वेळी फटाकेही फोडण्यात आले. यामुळे येथील शाळांमध्ये माध्यमिक परीक्षा चालू असलेल्या विद्यार्थ्यांना रात्रभर झोप मिळू शकली नाही.

थिरूवेल्लूर (तमिळनाडू) येथील शिवसेनेच्या जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत हिंदु जनजागृती समितीचा सहभाग !

       थिरूवेल्लूर (तमिळनाडू) - थिरूवेल्लूर जिल्ह्यातील शिवसेनेच्या कार्यकारिणीच्या बैठकीत हिंदु जनजागृती समितीच्या सदस्यांनीही सहभाग घेतला होता. समितीचे श्री. श्रीराम लुकतुके आणि सौ. उमा रविचंद्रन् यात सहभागी झाल्या होत्या. सौ. उमा रविचंद्रन् यांनी या वेळी सनातन पंचांगच्या तमिळ आवृत्तीविषयी माहिती दिली. तसेच प्रत्येक शिवसैनिकाच्या घरी सनातन पंचांग असावे, असे आवाहन केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील काही महत्त्वाच्या प्रसंगांची माहिती देऊन त्याद्वारे शारीरिक आणि मानसिक स्थितीसाठी आध्यात्मिक शक्तीची असलेली आवश्यकता प्रतिपादित केली. येथील श्रीकृष्ण महल हॉटेलमध्ये झालेल्या या बैठकीला ४० शिवसैनिक उपस्थित होते. यात शिवसेनेचे राज्यप्रमुख श्री. राधाकृष्णन्ही उपस्थित होते.ब्रिटनमध्ये अश्‍लील व्हिडिओ (पॉर्न) पाहून १२ वर्षांच्या मुलाने स्वतःच्या बहिणीवर अनेकदा केला बलात्कार !

अश्‍लील चित्रपटांमुळे (पॉर्नमुळे) काय घडू शकतो, हे भारतात ते 
पहाण्याचे समर्थन करणारे जाणतील का ? कि याचेही ते समर्थनच करणार ?
     लंडन - ब्रिटनमध्ये १२ वर्षांच्या मुलाने ‘इन्सेस्ट पॉर्न’ (कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईक यांच्यातील शारीरिक संबंध दाखवणारे अश्‍लील चित्रपट) पाहून स्वतःच्या ७ वर्षांच्या बहिणीवर अनेकदा बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना २ वर्षांपूर्वीची आहे. आता या मुलाचे वय १४ वर्षे आहे. त्याने संकेतस्थळावर हा अश्‍लील चित्रपट पाहिला होता. या संदर्भात न्यायालयात खटला चालू आहे. 
    अधिवक्ता इयान फेनी यांनी म्हटले की, अशा प्रकारच्या घटनांत वाढ होण्याची शक्यता आहे; कारण संकेतस्थळांमुळे असे चित्रपट पाहाणार्‍या युवकांच्या संख्येत वाढ होऊ शकते. ही एकमेव घटना नाही, तर अनेक घटना घडल्या आहेत. या घटनेत मुलगा निर्धास्त होता की, ही घटना कोणाला समजणार नाही; मात्र मुलीने आईला सांगितल्यावर ते उघडकीस आले.

ब्रिटनमध्ये क्रिकेट सामन्यांच्या वेळी ५० टक्के पंचांना खेळाडूंकडून शिवीगाळ होते !

नैतिक मूल्य नसणार्‍या खेळातून आनंद कसा मिळणार ? नैतिकता घसरत चाललेल्या 
भारतात क्रिकेट खेळाडूंकडून असा प्रकार होत असल्यास त्याविषयी आश्‍चर्य वाटू नये !
     लंडन - क्रिकेट हा सभ्य माणसांचा खेळ समजला जातो. याची उत्पत्ती ब्रिटनमधून झाल्याचे मानले जाते. मात्र सध्या हा खेळ सभ्य माणसांचा राहिलेला नाही, हे प्रत्यक्ष ब्रिटनमधील एका सर्वेक्षणातून लक्षात आले आहे. ब्रिटनच्या पोर्ट्समाउथ विश्‍वविद्यालयाने केलेल्या एका अभ्यासातून ब्रिटनमधील ५० टक्के पंचांना खेळांडूंकडून शिवीगाळ करणे, अपशब्द बोलणे आणि आक्रमक विरोध करणे आदी प्रकाराने पीडीत केले जाते. 
    नाव घोषित न करण्याच्या अटीवर डर्बीशायर येथील पंचाने सांगितले की, त्याला सातत्याने अशा प्रसंगांना सामोर जावे लागले होते. तर अन्य एका पंचाने सांगितले की, एक खेळाडू माझ्या तोंडावर थुंकला होता. जर एखादी व्यक्ती तुमच्या तोंडावर थुंकली, तर तुम्हाला कसे वाटेल ? हा सर्वांत निदंनीय प्रकार होता.

अमेरिकेतील राष्ट्रपती पदाची निवडणूक डोनाल्ड ट्रम्प आघाडीवर !

   वॉशिंग्टन - ८ नोव्हेंबरला अमेरिकेतील न्यू हॅम्पशायरच्या ३ लहान शहरांमध्ये पारंपरिक ‘मिडनाईट’ (मध्यरात्र) मतदानाने अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीच्या मतदानाला आरंभ झाला. सायंकाळी उशिरापर्यंतच्या मतदानाच्या फेरीमध्ये डोनाल्ड ट्रम्प आघाडीवर होते. डिक्सविले नॉच, हार्टस लोकेशन आणि मिल्स फिल्ड या ३ शहरांतील मतदानाच्या निकालानुसार ट्रम्प ३२-२५ असे आघाडीवर आहेत. या तीनही शहरांत १०० पेक्षा अल्प मतदार आहेत. येथे निवडणुकीच्या दिवशी मध्यरात्री मतदानाला प्रारंभ होतो.

‘'भारतीय वायूदलाकडे बेपत्ता झालेल्या विमानाविषयी १०० दिवसांनंतरही कोणतीही माहिती नाही !’'

फ्लाईट लेफ्टनंट कुणाल बारपट्टे यांच्या वडिलांची माहिती 
 भारतीय वायूसेनेचा हलगर्जीपणा म्हणायचा कि भोंगळ कारभार ? 
     पुणे, ८ नोव्हेंबर (वार्ता.) - पोर्ट ब्लेअरला जाणारे विमान १०० दिवसांपूर्वी बेपत्ता होऊनही त्याविषयी भारतीय वायूदलाकडे कोणतीही माहिती नाही. ते विमान अद्यापही बेपत्ता आहे, अशी माहिती फ्लाईट लेफ्टनंट कुणाल बारपट्टे यांचे वडील राजेंद्र बारपट्टे यांनी ७ नोव्हेंबर या दिवशी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

आमदार संभाजी पाटील आणि अरविंद पाटील यांच्यावर कारवाई करण्यासाठी स्वतंत्र शासन समितीची स्थापना करणार ! - विधानसभेचे सभापती के.बी. कोळीवाड

     बंगळुरू - राज्योत्सव दिनी आयोजित काळा दिन मोर्च्यात सहभागी झालेल्या म.ए. समितीचे आमदार श्री. संभाजी पाटील आणि श्री. अरविंद पाटील यांच्यावर कारवाई करण्याचा अधिकार राज्यपालांना आहे. या दोन्ही आमदारांवर कारवाई करण्याविषयी राज्य शासनाच्या वतीने स्वतंत्र शासन समितीची स्थापना करण्यात येणार आहे, अशी माहिती विधानसभेचे सभापती के.बी. कोळीवाड यांनी सुवर्णसौध येथे पत्रकारांना दिली.

एन्डीटीव्हीवरील बंदीच्या निषेधार्थ ठाण्यात मेणबत्ती मोर्चा !

राष्ट्राची सुरक्षा धोक्यात आणणार्‍या वाहिन्यांना पाठिंबा देणे योग्य कसे ठरते ?
    ठाणे, ८ नोव्हेंबर - सरकारने एन्डीटीव्ही या वृत्तवाहिनीवरील बंदी उठवली; मात्र ही बंदी घातल्याच्या निषेधार्थ ७ नोव्हेंबरला ठाण्यात मेणबत्ती मोर्चा काढण्यात आला होता. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड या वेळी उपस्थित होते. (आतंकवादी इशरत जहांचे समर्थक असणारे जितेंद्र आव्हाड यापेक्षा वेगळे काय करणार ? २६/११ च्या वेळी वाहिन्यांच्या अतातायी प्रक्षेपणामुळे आतंकवाद्यांना लाभ झाला होता. परदेशात वाहिन्या संवेदनशील स्थितीचे अशा प्रकारे कधीही प्रक्षेपण करत नाहीत. राष्ट्राच्या सुरक्षेच्या संदर्भातील माहितीचे प्रक्षेपण करणारी माध्यमे राष्ट्रहिताचा विचार करतात, असे म्हणू शकत नाही. - संपादक)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीमाप्रश्‍न सोडवण्यास पुढाकार घ्यावा ! - बिदर जिल्हा महाराष्ट्र एकीकरण समितीची मागणी

     बेळगाव, ८ नोव्हेंबर (वार्ता.) - सीमाप्रश्‍न गेल्या ६० वर्षांपासून प्रलंबित असल्यामुळे सीमाभागातील मराठी भाषिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. कर्नाटक शासनाकडून अत्याचार वाढले आहेत. याची नोंद घेऊन पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी सीमाप्रश्‍न सोडवण्यास पुढाकार घ्यावा, अशा मागणीचे पत्र बिदर जिल्हा महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने पंतप्रधान कार्यालयाला पाठवण्यात आले आहे. 

मराठी भाषिकांवरील अत्याचाराच्या संदर्भात पोलीस अधीक्षकांशी सर्वपक्षीय शिष्टमंडळाची भेट घडवून आणावी ! - विविध पक्ष आणि संघटना यांची पालकमंत्र्यांकडे मागणी

कर्नाटक दिनाचा निषेध केल्याचे प्रकरण 
     कोल्हापूर, ८ नोव्हेंबर (वार्ता.) - कर्नाटक शासनाने १ नोव्हेंबरपासून केलेल्या अत्याचारांच्या संदर्भात बेळगावच्या पोलीस अधीक्षकांशी सर्वपक्षीय शिष्टमंडळाची भेट घडवून आणावी, अशी मागणी करणारे निवेदन संयुक्त महाराष्ट्र कोल्हापूर जिल्हा विविध पक्षसंघटना समितीच्या वतीने ६ नोव्हेंबर या दिवशी सायंकाळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे देण्यात आले. '‘या संदर्भात आपण नक्कीच प्रयत्न करू'’, असे आश्‍वासन पालकमंत्री श्री. चंद्रकांत पाटील यांनी समितीचे निमंत्रक आणि पदाधिकारी यांना दिले. 

(म्हणे) बुरखा घालायची लाज वाटण्याची आवश्यकता नाही !’ - सुप्रिया सुळे, खासदार, राष्ट्रवादी काँग्रेस

मुसलमानांचे लांगूलचालन करण्याची एकही संधी न सोडणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकप्रतिनिधी !
मुंबई - मला माझी साडी घालण्याची लाज वाटत नाही, त्यामुळे बुरखा घालण्याची लाज वाटण्याची आवश्यकता नाही. साडी माझ्या संस्कृतीचा भाग आहे, तसाच बुरखाही आहे, असे वक्तव्य राष्ट्र्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी येथील एका कार्यक्रमात केले. (शारीरिक, मानसिक अन् आध्यात्मिक दृष्ट्या लाभदायक असलेली साडी आणि पारतंत्र्याचे प्रतीक असलेला बुरखा यांची तुलना कशी होऊ शकेल ? - संपादक)

राज्याचे आर्थिक वर्ष १ जानेवारीपासून होणार !

पाश्‍चात्त्यांचे अंधानुकरण करणारा निर्णय ! 
     मुंबई, ८ नोव्हेंबर - सध्या एप्रिल ते मार्च असे आर्थिक वर्ष गणले जाते. त्याऐवजी राज्य सरकारने आर्थिक वर्षच पालटण्याचा निर्णय घेतला असून यापुढे १ जानेवारी ते ३१ डिसेंबर असे आर्थिक वर्ष ठेवले जाणार आहे. (भारतीय संस्कृतीनुसार हे आर्थिक वर्ष बलीप्रतिपदा म्हणजेच कार्तिक शुक्ल पक्ष प्रतिपदेपासून चालू होऊन ते आश्‍विन अमावास्येला संपते. भारतीय संस्कृतीनुसार आर्थिक वर्ष चालू होण्यासाठी हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) अपरिहार्य आहे ! - संपादक) 

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी होणार्‍या कार्याचे साक्षीदार नव्हे, तर भागीदार होण्याची संधी घ्या ! - श्री. मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती

११ डिसेंबर या दिवशी कोल्हापूर येथे होणार्‍या हिंदु धर्मजागृती 
सभेच्या आयोजनाच्या बैठकीस ५५ हून अधिक हिंदु धर्माभिमान्यांची उपस्थिती ! 
उपस्थितांना मार्गदर्शन करतांना श्री. मनोज खाडये 

सभा निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी भवानीदेवीचा आशीर्वाद घेतांना सद्गुरु (कु.) स्वाती खाडये (१) 
     कोल्हापूर, ८ नोव्हेंबर (वार्ता.) - आज हिंदु धर्म आणि भारत देश यांवर विविध माध्यमांतून आघात होत आहेत. वर्ष १९९० मध्ये काश्मिरी हिंदु महिलांवर झालेल्या अत्याचारांमुळे आणि हिंदूंच्या कत्तलीमुळे हिंदूंना तेथून पलायन करावे लागले. त्यामुळे आपल्या देशातील काश्मिरी हिंदु बांधवांना आज विस्थापित जीवन जगण्याची पाळी आली आहे. आता या हिंदूंचे काश्मीरमध्ये पुनवर्सन होण्यासाठी ‘'पनून काश्मीर'’ची निर्मिती अपरिहार्य ठरते. असे होणे ही हिंदु राष्ट्राची पहिली पायरी असेल. त्याचे आपण साक्षीदार नव्हे, तर भागीदार बनण्याची संधी आहे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे पश्‍चिम महाराष्ट्र समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी व्यक्त केले. कोल्हापूर येथे ११ डिसेंबर या दिवशी भव्य हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच्या आयोजनासाठी ६ नोव्हेंबर या दिवशी श्री पंचमुखी गणेश मंदिर येथे एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. या बैठकीसाठी ५५ हून अधिक हिंदु धर्माभिमानी उपस्थित होते. 

पुण्यात २ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अटक !

   पुणे - अमली पदार्थांची विक्री करणार्‍या प्रखर चंद्रा आणि मोहन गौडगिरी यांना गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यांच्याकडून मेफेड्रोन आणि मोटार असे ५ लक्ष ९ सहस्र २०० रुपयांचा ऐवज शासनाधीन केला आहे.

सावित्रीबाई फुले रुग्णालयातील गैरव्यवहार न थांबल्यास आंदोलन ! - अवधूत भाट्ये

पत्रकार परिषदेत डावीकडून श्री. किरण दुसे, श्री. प्रसाद मोहिते, श्री. आकाश नवरुखे,
श्री. सुनील पाटील, अवधूत भाट्ये, श्री. सागर साळोखे आणि श्री. विशाल पाटील 
     कोल्हापूर, ८ नोव्हेंबर (वार्ता.) - गरीब लोकांची संजीवनी म्हणून ओळखले जाणारे सावित्रीबाई फुले रुग्णालय शेवटची घटका मोजत आहे. हे रुग्णालय आता केवळ आधुनिक वैद्य आणि खाजगी पॅथॉलॉजी यांसाठी संजीनवी बनले आहे. यामुळे गरीब रुग्णांचे शोषण चालू आहे. येथे अनागोंदी कारभार वाढला आहे. भूलतज्ञ नाही, अपुरी यंत्र सामुग्री, तसेच अतिदक्षता विभाग नसल्याचे कारण पुढे करून अनेक रुग्णांना सी.पी.आर् अथवा इतर खाजगी रुग्णालयाकडे पाठवले जाते. यात कुठेतरी आर्थिक देवाण-घेवाण असल्याचा संशय बळावतो. या गैरव्यवहारांकडे लक्ष देऊन तात्काळ कृती न केल्यास तीव्र आंदोलन करावे लागेल, अशी चेतावणी '‘वंदे मातरम् युथ ऑर्गनायझेशन'’चे अध्यक्ष श्री. अवधूत भाट्ये यांनी ८ नोव्हेंबर या दिवशी शाहू स्मारक येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. (ज्या गोष्टी एका सामाजिक संघटनेच्या लक्षात येतात, त्या सर्व यंत्रणा हाताशी असलेल्या महापालिका प्रशासनाच्या का लक्षात येत नाहीत ? तसेच इतका अनागोंदी कारभार चालू असतांना रुग्णालय प्रशासन, तसेच महापालिका प्रशासन काय करत आहे ? - संपादक)

(म्हणे) ‘'मराठा असल्यामुळेच माझा छळ केला जात आहे, दडपणामुळे मी कदाचित आत्महत्या करेन !’'

अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव यांचे विधान
याला पोलीस प्रशासनातील जातीय राजकारण म्हणायचे कि जातीयवाद ? 
     नागपूर - मी मराठा समाजाचा असल्यामुळे माझा वरिष्ठांकडून माझा छळ केला जात आहे. माझ्यावर येणार्‍या दडपणामुळे मी कदाचित आत्महत्या करेन, असा आरोप अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव यांनी केला आहे. 

डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांच्या न्यायालयीन कोठडीत २१ नोव्हेंबरपर्यंत वाढ !

   कोल्हापूर, ८ नोव्हेंबर (वार्ता.) - कॉ. गोविंद पानसरे खून प्रकरणात सनातनचे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना कोल्हापूर पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणात त्यांची न्यायालयीन कोठडीची मुदत संपत असल्याने त्या संदर्भातील सुनावणी सातवे सहदिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) श्रीमती व्ही.व्ही. पाटील यांच्यासमोर झाले. या वेळी न्यायाधिशांनी डॉ. तावडे यांच्या न्यायालयीन कोठडीत २१ नोव्हेंबर पर्यंत वाढ केली. या वेळी डॉ. तावडे यांच्या वतीने अधिवक्ता श्रीपाद होमकर हे उपस्थित होते.

कार्तिकी वारीच्या पूर्वी प्रशासनाने योग्य नियोजन करावे ! - ह.भ.प. सुधाकर इंगळे महाराज

जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदन सादर
    सोलापूर, ८ नोव्हेंबर (वार्ता.) - कार्तिकी वारीच्या पूर्वी प्रशासनाने पंढरपूर येथील अडीअडचणींच्या संदर्भात लक्ष घालून वारकर्‍यांना सर्व सोयीसुविधा पुरवण्याविषयी योग्य नियोजन करावे, अशी मागणी सोलापूर येथील अखिल भारतीय वारकरी मंडळाचे जिल्हाध्यक्ष ह.भ.प. सुधाकर इंगळे महाराज यांनी एका अर्जाद्वारे जिल्हाधिकारी रणजितकुमार यांच्याकडे केली आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की...
१. पंढरपूर ही महाराष्ट्रातील वारकर्‍यांची वैकुंठनगरी असून श्रद्धास्थान आहे. प्रत्येक वारीला पुष्कळ प्रमाणात भाविकांची उपस्थिती असते. त्या कालावधीत त्यांच्या सोयीसुविधांसाठी प्रशासनाला वारंवार निवेदने द्यावी लागतात.
२. कार्तिकी वारी ही ५-६ दिवसांवर येऊन ठेपली असतांनासुद्धा स्वच्छता, शौचालयांचे नियोजन आणि पिण्याच्या पाण्याचे नियोजन झाले नाही.
३. ६५ एकरमध्ये मोठ्या प्रमाणात काटेरी झुडुपांचे साम्राज्य पसरले आहे, पिण्याच्या पाण्याची टाकी अर्धवट बांधली आहे.

फलक प्रसिद्धीकरता

देशात सत्ता असतांना स्वतःच्या कार्यकर्त्यांचे रक्षण होत नाही, हे कसे ?
    कर्नाटकाच्या बिदर जिल्ह्यातील औरद शहरामध्ये भाजपचे कार्यकर्ते सुनील डोंगरे यांची ६ नोव्हेंबर या दिवशी चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. काही दिवसांपूर्वी म्हैसूर जिल्ह्यात भाजपचे कार्यकर्ते रवि यांची हत्या झाली होती.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Karnatak ke Bidar jileme ek BJP karyakarta ki hatya. Mysurume bhi ek BJP karyakartako mara gaya tha.
Deshme satta honepar bhi karyakarta asurakshit ?
जागो ! : कर्नाटक के बीदर जिले में एक भाजपा कार्यकर्ता की हत्या. मैसुरू में भी एक भाजपा कार्यकर्ता को मारा गया था.
देश में सत्ता होने पर भी कार्यकर्ता असुरक्षित ?

मुरादाबाद (उत्तरप्रदेश) येथील हिंदुद्वेषी पोलिसांची मोगलाई !

पोलिसांकडून हिंदु महासभेचे संमेलन थांबवून आयोजकांना अटक !
  मुरादाबाद (उत्तरप्रदेश) - हिंदु महासभेचे कार्यकारी अध्यक्ष कमलेश तिवारी कार्यकर्ता संमेलनासाठी येणार असल्याची सूचना मिळाल्यानंतर पोलिसांनी लाइन पार येथील साई सेलीब्रेशन सभागृहामध्ये अखिल भारत हिंदू महासभेच्या वतीने आयोजित कार्यकर्ता संमेलन थांबवले आणि आयोजकांना अटक केली. हिंदु महासभेचे उत्तरप्रदेशच्या कार्यकारिणीचे अध्यक्ष प्रांशु जोशी आणि जिल्हा अध्यक्ष सर्वेश यांना अटक करण्यात आली. प्रशासनाने या संमेलनाला अनुमती नाकारली होती. पोलिसांच्या या कारवाईनंतर हिंदु महासभेच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली आणि पोलिसांविरुद्ध घोषणा दिल्या. प्रत्यक्षात मूंढापांडे पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी श्री. कमलेश तिवारी यांना मुरादाबादमध्ये येण्यापासून रोखत त्यांना रामपूरच्या सीमेवरून परत पाठवून दिले.

टिपू सुलतान, नव्हे टिपू सैतान !

     लाखो हिंदूंना बाटवणार्‍या आणि असंख्य हिंदूंवर अनन्वित अत्याचार करणार्‍या क्रूरकर्मा टिपू सुलतानची कर्नाटकातील हिंदुद्रोही काँग्रेसी सरकार शासकीय स्तरावर १० नोव्हेंबर या दिवशी जयंती साजरी करणार आहे. यातून मतांच्या लाचारीसाठी कोट्यवधी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या काँग्रेसचा हिंदुद्वेषी चेहरा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. टिपू सुलतानने चालवलेल्या क्रूर अत्याचारांचा पुढील लेखात वेध घेण्यात आला आहे.
१. मानसिक गुलाम असलेले हिंदू !
    स्वामी विवेकानंद म्हणत, ‘‘स्वातंत्र्य काय आपण एका दिवसात आणून दाखवू शकतो; पण त्यासाठी आपण सिद्ध झालो आहोत का ? समाज जोपर्यंत त्यासाठी पूर्णतः सिद्ध होत नाही, तोपर्यंत स्वातंत्र्य अर्थहीन आहे.’’ स्वामी विवेकानंद यांचा हा प्रश्‍न आपण सर्वांनी स्वतःला विचारायला हवा. आपण खरंच स्वातंत्र्याच्या योग्यतेचे आहोत का ? आपण मानसिक गुलामच आहोत !

करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मीदेवीच्या मंदिरातील किरणोत्सव

९ नोव्हेंबर या दिवशी चालू होत असलेल्या किरणोत्सवाच्या निमित्ताने...
     श्री महालक्ष्मीदेवीच्या मंदिरातील किरणोत्सवाच्या निमित्ताने श्री महालक्ष्मीदेवीच्या स्थानाचा इतिहास, स्थानमहात्म्य आणि किरणोत्सवाच्या स्वरूपासंदर्भात माहिती देत आहोत.
१. श्री महालक्ष्मीदेवीच्या स्थानाचा इतिहास 
     एका कथेनुसार करवीर क्षेत्रातील कोल्हासुर नावाचा दैत्यराजा प्रजेला आणि देवांना पुष्कळ त्रास देत असे. श्री महालक्ष्मीदेवीने त्याचा वध केला. कोल्हासुराच्या अंतिम समयीच्या विनंतीनुसार या क्षेत्राचे नाव ‘कोल्हापूर’ करण्याचे आणि याच ठिकाणी वास्तव्य करण्याचे श्री महालक्ष्मीदेवीने मान्य केले. 
२. स्थानमाहात्म्य - साडेतीन शक्तीपिठांपैकी एक
कोलापुरं महास्थानं यत्र लक्ष्मी सदा स्थिता । 
                                                      मातुःपुरं द्वितीयं च रेणुकाधिष्ठितं परम् । 
                                                      तुलजापुरं तृतीयं स्यात् सप्तशृंगं तथैव च ॥
                                                   - देवीभागवत, स्कन्ध ७, अध्याय ३८, श्‍लोक ५
अर्थ : महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपिठांपैकी पहिले पीठ कोलापूर (कोल्हापूर) हे असून येथे श्री महालक्ष्मीदेवीचा सदैव वास असतो. भगवान परशुरामांची आई रेणुकामातेचे अधिष्ठान असलेले मातापूर (माहूरगड) हे दुसरे शक्तीपीठ आहे. तुळजापूर हे तिसरे पीठ असून सप्तशृंग (वणी) हे अर्धपीठ आहे.
     देवीभागवताप्रमाणेच पद्मपुराण, स्कंदपुराण आदी पुराणांतही करवीर शक्तीपिठाचा उल्लेख आढळतो.

पाकची विकृती ठेचून काढा !

     आतापर्यंत हुतात्मा भारतीय सैनिकाच्या मृतदेहाची आतंकवाद्यांनी केलेली विटंबना चीड आणणारी आहे. ‘इसिस’चे आंतकवादी त्यांच्या शत्रूंची अत्यंत क्रूरपणे हत्या करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, तसेच हे कृत्य आहे. याला विकृतांची विकृतीच म्हणावी लागेल. युद्ध फक्त बॉम्ब आणि गोळ्या यांनी न लढता अमानवीपणेही लढणे पाकची सवय आहे. त्यामुळे जो भारतीय सैनिक आणि महाराष्ट्राचा सुपुत्र शत्रूच्या कह्यात आहे, त्याची देशवासियांना चिंता वाटत आहे. शत्रू असले, तरी भारताने पकडलेल्या आतंकवाद्यांना कधीच अमानवीय वागणूक दिलेली नाही वा तसे कृत्यही केलेले नाही. कसायांचा देश असलेल्या पाकला रक्तपात, मृतदेहाची विटंबना वगैरे विकृत सवयींचे व्यसनच आहे. गेल्या काही दिवसांपासून सीमेपलीकडून अविरत गोळीबार चालू आहे आणि त्यास भारतीय सैनिकांकडून सडेतोड प्रत्युत्तर मिळत असल्याने शत्रूला त्यांचे डावपेच यशस्वी करण्यात अडथळे येत आहेत. त्याचा द्वेष पाकच्या मनात घुसमटत असणार आहे. असे असल्याने पाक संधी मिळताच सूड काढतो.

ओडिशा राज्याचा ऑक्टोबर २०१६ मधील हिंदु जनजागृती समितीच्या प्रसारकार्याचा आढावा

१. स्वतःला सनातनची उत्पादने अन् ग्रंथ 
आवडल्याने मित्रांना हे साहित्य घेण्यासाठी बैठकीचे 
आयोजन करण्यास सकारात्मकता दर्शवणारे आर्ट 
ऑफ लिव्हिंग संप्रदायाचे श्री. अशोक पसारी !
     ‘राऊरकेला येथील आर्ट ऑफ लिव्हिंग संप्रदायाचे श्री. अशोक पसारी आणि बडबिल येथे रहाणारे त्यांचे वडीलबंधू श्री. राजेंद्रकुमार पसारी हे वेदव्यास, राऊरकेला येथील सनातनच्या आश्रमात आले. त्यांना सनातनची सात्त्विक उदबत्ती आणि अत्तर हवे होते. त्यांना सर्व साहित्य आणि ग्रंथ दाखवतांना सनातन-निर्मित देवतांची सात्त्विक चित्रे अन् त्यांचे स्पंदनशास्त्राच्या दृष्टीकोनातून महत्त्व सांगितले. त्यामुळे ते पुष्कळ प्रभावित झाले. त्यांनी विविध देवतांची १५ - २० चित्रे घेतली, तसेच ग्रंथ आणि अन्य साहित्यही घेतले. बडबिलला गेल्यानंतर दोन दिवसांनी त्यांनी दूरभाष करून त्यांच्या मित्रांनाही देवतांची सात्त्विक चित्रे आवडल्याचे सांगितले. ‘‘माझे मित्र राऊरकेला येथे आश्रमात येऊन त्यांना हवे असलेले साहित्य आणि देवतांची चित्रे घेतील’’, असे त्यांनी सांगितले. यासंदर्भात बडबिल येथे एका बैठकीचे आयोजन करण्यासाठी त्यांनी सकारात्मकता दर्शवली.

पूज्यपाद संतश्री आसारामजी बापूंचे गोसंवर्धन आणि गोरक्षण यांचे कार्य !

      ‘पूज्यपाद संतश्री आसारामजी बापूंच्या मार्गदर्शनाखाली देशातील अनेक राज्यांत गोशाळा चालवल्या जात आहेत. कत्तलखान्यात घेऊन जात असलेल्या सहस्रो गायींचे रक्षण करून त्यांचे संगोपन यांपैकी अनेक गोशाळांमध्ये केले जात आहे. या गोशाळांमध्ये कित्येक गरीब गोपालक कुटुंबांना रोजगार मिळतो. आरोग्यवर्धक आणि मन-बुद्धीला सात्त्विक बनवणारी गोउत्पादने अल्प दरात उपलब्ध असल्याने यापासून समाजालाही लाभ होत आहे. इतर औषधांपेक्षा या गोरसांपासून बनणार्‍या औषधांना जागतिक आरोग्य संघटनेने अधिक प्रभावी असल्याचे सांगितले आहे. महाराष्ट्रासाठी कार्य आणि त्याग करण्याचा आशीर्वाद मिळावा !

चुनाभट्टी येथील श्री व्यंकटेश्‍वरा वैभवउत्सवात मुख्यमंत्री
श्री. देवेंद्र फडणवीस यांची तिरुपतीच्या चरणी मागणी
    मुंबई, ८ नोव्हेंबर (वार्ता.) - भगवान तिरुपती ही अशी देवता आहे की, जी सर्वांची मनोकामना पूर्ण करते. मी तिरुपतीच्या चरणी प्रार्थना करतो की, ‘महाराष्ट्र आणि संपूर्ण देशवासियांना सुख, समाधान आणि ऐश्‍वर्य लाभो. महाराष्ट्र आणि गरीब यांच्यासाठी कार्य आणि त्याग करण्याचा आशीर्वाद मिळू दे, अशी प्रार्थना मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी तिरुपतीदेवाच्या चरणी केली. चुनाभट्टी येथील सोमैय्या मैदान येथे ६ ते १२ नोव्हेंबर या कालावधीत तिरुमला तिरुपती देवस्थानम्चा श्री व्यंकटेश्‍वरा वैभवउत्सव चालू आहे. ७ नोव्हेंबरला या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी सपत्नीक देवाचे दर्शन घेतले.

हिंदूंना मूर्ती विसर्जनाला अनुमती नाकारणारे पोलीस भारताचे कि पाकचे ?

     ‘दसर्‍याच्या दुसर्‍या दिवशी मोहरम असल्याने मुसलमान धर्मियांना ‘ताजिया’ विसर्जनाला अडचण येऊ नये, यासाठी ‘धार्मिक तेढ निर्माण होऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो’, असे कारण पुढे करत पोलिसांनी धारावी येथील १६ नवरात्रोत्सव मंडळांना देवीच्या मूर्तीच्या विसर्जन मिरवणुकीला अनुमती नाकारली होती. विशेष म्हणजे यांतील २ नवरात्रोत्सव मंडळे मूर्तीविसर्जन करत असलेल्या तलावांच्या ठिकाणी ताजिया विसर्जन नसतांना त्यांनाही पोलिसांनी मूर्तीविसर्जनाची अनुमती नाकारली.

परात्पर गुरु (प.पू. डॉक्टर), उत्तरापुत्री (सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ) आणि कार्तिकपुत्री (सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ) या तीन गुरूंना महर्षींनी दिलेले वचन

महर्षींची शिकवण आणि कार्य !
१. तीनही गुरूंवर श्रद्धा असलेल्या 
साधकांना आम्ही काही अल्प पडू देणार नाही !
      कैलास यात्रेला जातांना मनुष्याला वाट माहिती नसेल, तर आम्ही महर्षि एखाद्या मनुष्याच्या रूपात येऊन त्याला वाट दाखवतो. परात्पर गुरु (प.पू. डॉक्टर), उत्तरापुत्री (सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ) आणि कार्तिकपुत्री (सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ) या तिघांवर श्रद्धा असलेल्या भक्तांना आम्ही अध्यात्मपथावर मार्गदर्शन करणार आहोत. या लोकात आणि परलोकातही आम्ही त्यांना सोडणार नाही. आम्ही अशा साधकांची फुलांप्रमाणे काळजी घेऊ. तो साधक कोणत्याही पंथात, प्रांतात किंवा देशात जन्मला असो, आम्ही त्याची काळजी घेऊ. ब्रह्मांडात जोपर्यंत शिव, सूर्य आणि नारायण हे तिघे आहेत, तोपर्यंत या तीनही गुरूंवर विश्‍वास ठेवणार्‍या साधकांना आम्ही काही अल्प पडू देणार नाही.

भृगुनाडीपट्टीच्या पूजेतील फूल हातात धरल्यावर शरिराला कंप सुटणे, कंप थांबल्यावर उत्साह जाणवणे आणि २ दिवसांपासून औषधे घेऊनही न उतरलेला ताप बरा होणे

  ६.११.२०१६ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात होशियारपूर, पंजाब येथील भृगुनाडीवाचक डॉ. विशाल शर्मा यांचे भृगुनाडीसह आगमन झाले. त्या वेळी भृगुनाडीचे पूजन करण्यात आले. रात्री एका साधिकेने मला त्या पूजेतील एक फूल प्रसाद म्हणून दिले. ते फूल हाती घेतल्यानंतर माझ्या संपूर्ण शरिराला कंप सुटला, तरीही मी ते फूल हातात धरून ठेवले होते. थोड्या वेळाने माझे शरीर शांत झाले आणि मला उत्साह जाणवू लागला. ४.११.२०१६ या दिवसापासून मला ताप होता. थंडी वाजत होती आणि घशाचा संसर्ग झाला होता. औषधे घेऊनही त्यात फारसा उतार पडला नव्हता. पूजेचे फूल हातात धरल्यानंतर शरिराला सुटलेला कंप थांबला. तेव्हाच माझा ताप पूर्णपणे उतरल्याचे माझ्या लक्षात आले. थंडी वाजणेही ७० प्रतिशत उणावले. घशाला आराम पडला. महर्षि आणि प.पू. डॉक्टर साधकांचे त्रास घालवण्यासाठी किती कृपा करत आहेत, असे वाटून कृतज्ञतेने माझे डोळे भरून आले. - एक साधक, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (६.११.२०१६)

श्री कालभैरवाचे स्तोत्र ऐकत असतांना कानात मी सकाळीही येऊन गेलो, असा ध्वनी ऐकू येणे आणि तेव्हा सकाळी आश्रमात काळ्या रंगाचा कुत्रा आल्याचे दृश्य दिसणे अन् श्री कालभैरव येऊन गेल्याची प्रचीती मिळणे

कु. मयुरी डगवार
    ४ ते ६.११.२०१६ या कालावधीत रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात भृगु नाडीपट्टीत आलेल्या आदेशानुसार ब्रह्मास्त्रयाग झाला. ५.११.२०१६ या दिवशी दुपारी ब्रह्मास्त्रयागाचे हवन झाल्यानंतर सनातनचे साधक-पुरोहित श्री. दामोदर वझेगुरुजी यांनी श्री कालभैरवाचे स्तोत्र म्हटले. ते ऐकत असतांना माझ्या कानात ध्वनी उमटला, मी सकाळीही येऊन गेलो. मला या ध्वनीचा अर्थ उमगला नाही. तेव्हा पुन्हा माझ्या कानात हाच ध्वनी उमटला. त्यावर माझ्या मनात प्रश्‍न आला, कोण ? तेव्हा मला आश्रमात काळ्या रंगाचा कुत्रा आल्याचे दृश्य दिसले. मग मला आठवले, आज सकाळी ६.३० वाजता काळ्या रंगाचे ३ कुत्रे आश्रमाबाहेर उभे होते. त्यातील एक कुत्रा आश्रमाच्या आवारात येऊन काही वेळ यज्ञकुंडाकडे बघत होता. थोड्या वेळानंतर ते तीनही कुत्रे निघून गेले. मी तो प्रसंग विसरून गेले होते. ब्रह्मास्त्रयागाच्या वेळी श्री कालभैरव या देवतेचेही पूजन करण्यात आले. श्री कालभैरवाचे वाहन काळ्या रंगाचा कुत्रा आहे. प्रत्यक्ष श्री कालभैरवानेच मला त्याच्या येण्याची साक्ष दिली. प.पू. डॉक्टरांच्या कृपेमुळे प्रत्यक्ष देवता साधकांना येऊन दर्शन देतात आणि त्याची साक्षही देतात, याची प्रचीती आली. यासाठी मी श्री कालभैरव, महर्षि आणि प.पू. डॉक्टर यांच्या चरणी कृतज्ञ आहे.
- कु. मयुरी विजय डगवार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (६.११.२०१६)
-------------
या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. - संपादक

चुकांसंबंधी सत्संगानंतर श्री. सत्यकाम कणगलेकर यांनी सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना लिहिलेले कृतज्ञता पत्र !

श्री. सत्यकाम कणगलेकर
सद्गुरु (सौ.) बिंदाताई,
शिरसाष्टांग नमस्कार !
चुकांसंबंधी सत्संगानंतर मला व्यष्टी साधनेचा आढावा आणि भावसत्संग यांमध्ये सहभागी होता आले. त्यामुळे अवघ्या ३ दिवसांतच श्रीकृष्णाच्या चैतन्याचा माझ्यावर परिणाम झाला आणि मला ‘प.पू. डॉक्टरांनी आणि तुम्ही माझ्यावर अपार कृपा केली आहे’, असे वाटू लागले. व्यष्टी साधनेच्या आढाव्यातून मला ‘माझ्या मनातील विचारांची दिशा कशी चुकत आहे ?’, हे स्पष्ट होत चालले आहे. तसेच माझ्या गढूळ मनाची स्वभावदोष आणि अहं-निर्मूलन प्रक्रिया राबवण्यासाठी सिद्धता होत आहे. मला ‘साक्षात् भगवंतच येणार्‍या प्रसंगांना सामोरे जाण्यासाठी माझी सिद्धता करवून घेत आहे’, याची जाणीव होत आहे.

नाजूक शारीरिक प्रकृती आणि दम्याचा विकार असूनही उंच हवेच्या अन् अल्प तापमानाच्या ठिकाणी महर्षींच्या आज्ञेने दैवी प्रवास करण्याची संधी मिळाल्यावर पू. (सौ.) गाडगीळकाकूंमधील चैतन्य, आशीर्वाद आणि सत्संग यांमुळे कोणताही शारीरिक त्रास न होणे

श्री. विनायक शानभाग
प.पू. गुरुदेवांच्या कृपेने गेल्या एक वर्षापासून मला पू. (सौ.) अंजली गाडगीळकाकूंसमवेत दैवी प्रवास करण्याची संधी मिळाली. माझी शारीरिक प्रकृती नाजूक असून फारशी चांगली नाही, तरीही या दैवी प्रवासात मी एकदाही आजारी पडलो नाही. सतत प्रवास असल्यामुळे खरेतर थकवा यायला हवा, प्रवास करून आल्यावर पू. गाडगीळकाकूंच्या काही घंट्यांच्या सहवासात सर्व थकवा दूर होऊन पुढच्या प्रवासाला शरीर आणि मन उत्साहाने सिद्ध होत असे.
    मे २०१६ मधे महर्षींच्या आज्ञेने ‘लेह-लडाख’ या ठिकाणी जाण्याची संधी मिळाली. चेन्नई, गोवा आणि मुंबई या शहरांपेक्षा लेह-लडाख ११,५०० फूट उंचीवर आहे. तेथे ऑक्सिजनचे प्रमाण भूमीपेक्षा अल्प असते. त्यामुळे तेथे गेल्यावर खोलीत न्यूनतम २४ घंटे विश्रांती घ्यावी लागते. मला दम्याचा विकार असल्याने ‘जास्त चालू नयेे आणि धावपळ करू नये’, असे सांगण्यात आले होते. पू. काकू मला म्हणाल्या, ‘‘विनायकदादा, तुम्हाला काही होणार नाही.’’ लेह-लडाखच्या पाच दिवसांच्या प्रवासात एकदाही मला दम्यासाठी ‘इनहेलर’ किंवा ‘अ‍ॅस्थिलिन’ची गोळी घ्यावी लागली नाही. मी ‘लेह-लडाख’ला पोचल्यावर ६ घंट्यांच्या आत चांगले वाटून सेवेला आरंभ केला. लगेच दुसर्‍या दिवशी १८,५०० फुटांवर असलेल्या ‘खारदुंगला’ (KHARDUNGLA) पर्वतावरील तापमान - २ डिग्री सेंटीग्रेड असूनही मला काही त्रास झाला नाही.

दीपावलीच्या कालावधीत रामराज्याची अनुभूती आल्यामुळे पुणे येथील संत प.पू. आबा उपाध्ये आणि पू. (सौ.) मंगला उपाध्ये यांनी प.पू. डॉक्टर, सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ अन् सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या चरणी व्यक्त केलेली कृतज्ञता !

॥ श्री ॥ 
प.पू. आबा उपाध्ये आणि पू. (सौ.) मंगला उपाध्ये
     जवळजवळ दीपावलीच्या दिवसांपासून सद्गुरु (सौ.) अंजलीताईंचा शोध घेत होतो. दूरभाषच्या आधारे सारा तमिळनाडू शोधून झाला; पण पत्ता लागेना. एकदा त्यांच्यासमवेत असणारा साधक म्हणाला, ‘‘त्या तुम्हाला दूरभाष करतील.’’ रात्र झाली, तरी दूरभाष आला नाही. मी मनात म्हटले, ‘मी किती कमनशिबी आहे की, महत्त्वाच्या दिवशी सद्गुरूंचा आशीर्वाद मला मिळत नाही.

समर्थ संप्रदायातील थोर संत प.पू. रामभाऊस्वामी यांचा प.पू. डॉक्टरांविषयी असलेला भाव

प.पू. रामभाऊस्वामी
‘जानेवारी २०१६ मध्ये तमिळनाडू राज्यातील तंजावूर येथील समर्थ संप्रदायातील थोर संत प.पू. रामभाऊस्वामी यांनी सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात ३ दिवसांचा ‘उच्छिष्ट गणेश याग’ केला होता. याग झाल्यानंतर त्यांची आणि परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांची भेट झाली. तेव्हापासून प.पू. रामभाऊस्वामी म्हणतात, ‘‘डॉ. आठवले यांना भेटल्यापासून प्रत्येक श्‍वासासोबत मी त्यांचे स्मरण करतो. दैनिक सनातन प्रभातचे प्रत्येक आठवड्याचे अंक मिळाल्यावर मी प्रथम त्यांच्याविषयी लिहिलेले वाचतो आणि नंतर बाकीचे वाचतो. महर्षींनी नाडीपट्टीच्या माध्यमातून त्यांच्याविषयी लिहिलेले सर्व वाचतांना मला पुष्कळ आनंद होतो. डॉ. आठवले यांच्या अमृत महोत्सवाच्या दिवशी त्यांचे छायाचित्र असलेला दैनिकाचा अंक मी वेगळा काढून तो जतन केला आहे.’’

प्रेमळ, संशोधक वृत्तीचा आणि प.पू. डॉक्टरांप्रती भाव असलेला ५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला कु. शिवानंद देशपांडे (वय ९ वर्षे) !

उच्चलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे 
पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. शिवानंद देशपांडे एक आहे !
कु. शिवानंद देशपांडे
      कार्तिक शुक्ल पक्ष नवमी (९.११.२०१६) या दिवशी कु. शिवानंद देशपांडे याचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या आईला त्याची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे देत आहोत. 
कु. शिवानंद देशपांडे याला वाढदिवसानिमित्त 
सनातन परिवाराच्या वतीने शुभाशीर्वाद ! 
१. ‘शिवानंद सतत हसतमुख, उत्साही आणि आनंदी असतो. 
२. तो पुष्कळ सकारात्मक आहे. 
३. वाचनाची आवड 
     शिवानंदला वाचनाची पुष्कळ आवड आहे. तो जे वाचन करतो, ते त्याला व्यवस्थित समजते. ‘वाचलेल्या गोष्टीतून काय शिकायला मिळाले ? ती व्यक्तीरेखा कशी होती ?’, हे तो मला सांगतो. ‘तो वर्णन करत असतांना ते मी प्रत्यक्षात अनुभवत आहे’, असे मला वाटते.

कु. ऐश्‍वर्या जोशी हिला मनाने प.पू. डॉक्टरांच्या खोलीत जाऊन उदबत्तीने स्वतःवरील काळ्या शक्तीचे आवरण काढल्यावर आलेली अनुभूती

कु. ऐश्‍वर्या जोशी
‘       मी मनाने प.पू. डॉक्टरबाबा (प.पू. डॉ. आठवले) यांच्या खोलीत गेले. तेव्हा ते आसंदीवर (खुर्चीवर) बसून पटलावर (टेबलवर) काहीतरी लिखाण करत होते. त्यांनी मला हाताने खूण करून त्यांच्या समोरच्या आसंदीवर बसण्यास सांगितले. तेव्हा मला त्यांचा तोंडवळा अतिशय गंभीर वाटत होता. मी आसंदीवर बसले आणि डोळे मिटले. तेव्हा मला एक चैतन्याचा पिवळा गोळा माझ्या संपूर्ण शरिराचे ‘स्कॅनिंग’ करतांना दिसला. थोड्या वेळाने मला मनातील विचारांचे प्रमाण अल्प होत असल्याचे जाणवले. मग मी डोळे उघडताच माझ्या डोक्यातून तो पिवळा गोळा प.पू. डॉक्टरांच्या दिशेने जातांना दिसला. मला त्या गोळ्याच्या भोवती तीन काळ्या रंगाची आवरणे (लेयर्स) दिसली. तेव्हा सूक्ष्मातील प.पू. डॉक्टरांनी ‘एक हात वर आणि एक हात खाली अशा प्रकारे तो गोळा हातात धरताच काळ्या शक्तीच्या आवरणासह तो गोळा दिसेनासा झाला. त्यानंतर त्यांनी मला ‘रजनीगंधा’ ही उदबत्ती देऊन सांगितले, ‘पाच मिनिटे वैखरी वाणीतून ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ हा नामजप करत उदबत्तीने स्वतःवरील आवरण काढ.’ नंतर ते पुन्हा लिखाण करू लागले. त्यांच्या सांगण्यानुसार उदबत्तीने आवरण काढल्यावर पाच मिनिटांनी ते मला म्हणाले, ‘आता कसे वाटते ?’ त्यावर मी ‘बरे वाटते’ असे सांगितले. तेव्हा मला त्यांचा तोंडवळा आनंदी दिसला. नंतरही त्याप्रमाणे उपाय केल्यावर मला आताही सर्व तसेच दिसते.’ 
- कु. ऐश्‍वर्या जोशी (वय १३ वर्षे), सनातन आश्रम, मिरज. (१५.९.२०१६)

सप्तर्षींनी सुब्रह्मण्य भुजंगम् म्हणण्यास सांगणे

१. आद्य शंकराचार्यांनी कार्तिकेयाला प्रार्थना केल्यावर सुब्रह्मण्याची
स्तुती करत ‘भुजंग छंदा’त म्हटलेले श्‍लोक म्हणजे ‘सुब्रह्मण्य भुजंगम्’ !
   ‘आद्य शंकराचार्यांनी तमिळनाडू येथील कार्तिकेयाच्या ६ प्रमुख स्थानांपैकी एक असलेल्या ‘तिरूचेंदूरु’ येथे कार्तिकेयाला प्रार्थना केल्यावर त्यांना आतून ३३ श्‍लोक स्फुरले. या श्‍लोकांमध्ये आद्य शंकराचार्यांनी सुब्रह्मण्याची स्तुती करत त्याचे वर्णन केले आहे. हे सर्व श्‍लोक ‘भुजंग छंदा’त म्हटल्याने या स्तोत्राला ‘सुब्रह्मण्य भुजंगम्’, असे म्हणतात. भुजंग म्हणजे साप. सापाचे शरीर नागमोडी वळणाप्रमाणे असते. त्याचप्रमाणे या स्तोत्रातील श्‍लोक एका लयीतून दुसर्‍या लयीत अगदी सहजपणे जातांना जाणवतात, म्हणजेच भुजंग छंदात आढळतात.
२. ‘सुब्रह्मण्य भुजंगम्’ हे स्तोत्र ऐकण्याचे महर्षींनी सांगितलेले कारण
३ ते ६.११.२०१६ या कालावधीत महर्षींनी हे स्तोत्र सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात लावण्यास सांगितले. याविषयी महर्षींनी पुढील सूत्रे सांगितली.
अ. कार्तिकेय हा देवांचा सेनाधिपती आहे. सध्या चालू असलेल्या वातावरणातील इष्ट-अनिष्ट शक्तींच्या लढ्यात आपल्याला देवतांच्या सेनाधिपतीला हाक मारणे अत्यंत आवश्यक आहे. सेनाधिपती आला की, त्याची सेनाही त्याच्या मागोमाग येते.

आश्रमातील धान्यामध्ये पुष्कळ अळ्या झाल्याचे पू. सौरभदादांना सांगणे आणि त्यांनी ‘आऊट - आऊट - आऊट !’ असे म्हटल्यानंतर धान्यात अळ्या मिळण्याचे प्रमाण नगण्य होणे

      ‘१६.९.२०१६ या दिवशी मी पू. सौरभदादांच्या (सनातनचे विकलांग अवस्थेतील पू. सौरभ जोशी यांच्या) खोलीत ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप भ्रमणभाषवर घेण्यासाठी गेले होते. तेव्हा सौ. प्राजक्ताताई (पू. सौरभदादांची आई) मला म्हणाल्या, ‘‘दोन दिवसांपासून ते तुमची वाट पहात होते.’’ मी त्यांना सांगितले, ‘‘आश्रमातील धान्यामध्ये पुष्कळ अळ्या झाल्यामुळे सेवेसाठी थांबावे लागले.’’ तेव्हा पू. सौरभदादा जोरात हसले आणि म्हणाले, ‘‘आता नाही होणार ! आऊट - आऊट - आऊट !’’ त्या दिवसापासून आश्रमातील धान्यामध्ये अळ्या मिळण्याचे प्रमाण नगण्य झाले आहे.
      गुरुदेवा, तुमच्या कृपेने आम्हाला पू. सौरभदादांसारखे संत मिळाले आणि त्यांच्या संकल्पाने समस्यांचे निराकरण होत आहे, यासाठी मी तुमच्या आणि पू. सौरभदादांच्या चरणी अनंत कोटी कृतज्ञ आहे.’
- श्रीमती गीता प्रभु, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.९.२०१६)

स्वतःच्या देहाकडे साक्षीभावाने पहाणार्‍या सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर !

सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर
      ‘एकदा सद्गुरु (सौ.) गाडगीळकाकूंना भ्रमणभाषवर सद्गुरु (कु.) अनुराधाताई वाडेकर त्यांना होणार्‍या त्रासाविषयी सांगत होत्या. सद्गुरु अनुताई म्हणाल्या, ‘‘मला अतिशय त्रास होत होता. मी अगदी असाहाय्य होऊन शेवटी प्रार्थना केली. ‘हे पेशींनो, स्नायूंनो, तुमची श्रद्धा वाढवा. माझ्यावर अवलंबून राहू नका.’ ‘एवढ्या त्रासातही सद्गुरु (कु.) अनुताई स्वतःच्याच देहाला ही प्रार्थना करतात आणि देहाकडे साक्षीभावाने पहातात’, हे शिकायला मिळाले.’ - श्री. दिवाकर आगवणे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२२.३.२०१५) 
तुळशी विवाहामागील अध्यात्मशास्त्र आणि तुळशीचे अद्वितीय महत्त्व

‘कार्तिक शुक्ल पक्ष द्वादशी (११ नोव्हेंबर) ते कार्तिक 
पौर्णिमेपर्यंत (१४ नोव्हेंबरपर्यंत) असणार्‍या तुळशी विवाहाच्या निमित्ताने...
‘     कार्तिक शुक्ल पक्ष द्वादशीपासून (या वर्षी ११ नोव्हेंबरपासून) पौर्णिमेपर्यंत (१४ नोव्हेंबरपर्यंत) एखाद्या दिवशी तुळशी विवाह हा विधी करतात. त्या दृष्टीने या लेखात ‘तुलसी दर्शनाचे महत्त्व, तुळशीची आध्यात्मिक वैशिष्ट्ये, तुळशीचा विवाह प्रतिवर्षी श्रीकृष्णासमवेतच लावण्यासंबंधीची कथा, तसेच ‘देवाला नैवेद्य दाखवतांना तुळशीच्या पानांचा वापर का करावा ?’, यासंबंधीची माहिती येथे देत आहोत. 
१. तुलसी दर्शनाचे महत्त्व
     ‘प्रत्येक हिंदूच्या घरी तुळस असायलाच हवी’, असा संकेत आहे. ‘सकाळी आणि सायंकाळी सर्वांनीच तुलसीदर्शन करावे’, असे सांगितले आहे. या तुलसीदर्शनाचा मंत्र पुढीलप्रमाणे आहे.
     तुलसि श्रीसखि शुभे पापहारिणि पुण्यदे ।
     नमस्ते नारदनुते नारायणमनःप्रिये ॥ - तुलसीस्तोत्र, श्‍लोक १५
अर्थ : हे तुलसी, तू लक्ष्मीची मैत्रीण, शुभदा, पापहारिणी आणि पुण्यदा आहेस. नारदाने स्तवलेल्या आणि नारायणाला प्रिय अशा तुला मी वंदन करतो.

अभ्यासातून प.पू. डॉक्टरांचे मन जिंकण्यासाठी धडपडणारी ५१ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली कर्णावती, गुजरात येथील कु. दुर्गा कद्रेकर (वय २० वर्षे) !

कु. दुर्गा कद्रेकर
       कर्णावती (अहमदाबाद), गुजरात येथील साधिका कु. दुर्गा कद्रेकर सध्या वास्तूविशारद शास्त्राचा (‘आर्किटेक्चर’चा) अभ्यास करत आहे. शिक्षण घेतांनाच ती वेगवेगळ्या सेवाही करत आहे. साधनेच्या तिच्या प्रयत्नांविषयी तिने दिलेली सूत्रे आणि तिच्या आईने दिलेली तिची काही वैशिष्ट्ये पुढे देत आहोत. 
पालकांनो, हे लक्षात घ्या ! 
      ‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

प.पू. डॉक्टरांच्या श्रेष्ठत्वाविषयी सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी काढलेले उद्गार !

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...
१. एका गादीत अडकण्यापेक्षा सनातनचा प्रत्येक साधक जेथे बसतो,
तेथे गादी आपोआपच सिद्ध होत असल्याने सनातनमध्ये गादी परंपरा नाही !
   ‘एकदा प.पू. डॉक्टर म्हणाले, ‘‘सनातनमध्ये गादी परंपरा नाही.’’ यावर पू. गाडगीळकाकूंनी (आताच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ) आम्हाला पुढीलप्रमाणे सांगितले, ‘‘प.पू. डॉक्टरांनी प्रत्येक साधकाला घडवले आहे. स्वयंपूर्ण बनवले आहे. हेच सर्व साधक समाजात साधनामार्गाचा प्रचार-प्रसार करत आहेत. एखाद्या संप्रदायात गुरूंच्या पश्‍चात त्यांची गादी असते; पण सनातन संस्थेत असे नाही.
   प.पू. डॉक्टरांंचा जो साधक जेथे बसला, तेथे गादी आपोआपच सिद्ध होते.’’ (यातून सद्गुरु (सौ.) काकूंना म्हणायचे होते, ‘‘पूर्वीसारखे प.पू. डॉक्टरांना कुठे जाण्याची आवश्यकता नाही. त्यांनी शिकवल्याप्रमाणे त्यांचे शिष्यच समष्टी प्रचार करत आहेत. ‘एका गादीत अडकण्यापेक्षा प्रत्येक शिष्य म्हणजे गादीच’, असे गुरूंनी केले आहे. यातून महर्षींनी म्हटल्याप्रमाणे त्यांच्या अवतारात्वाची जाणीव होते. ‘परिस लोखंडाला सोने करते; पण लोखंड परिस होत नाही.’ परम पूज्यांसारख्या महान गुरूंनी लोखंडालाच परिसत्वच दिले, म्हणजे शिष्यांना गुरुत्व दिले आहे.’’)

पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांची महर्षि सांगतील त्या वाक्यावर अपार श्रद्धा असणेे आणि यामुळेच ते सनातनचे साधक नसूनही प.पू. डॉक्टरांनाच आता स्वत:चे गुरु मानू लागले असल्याचे लक्षात येणे

      पू. डॉ. ॐ उलगनाथन् हे सनातन संस्थेवर संकट येऊ नये, म्हणून दिवसरात्र झटत आहेत. महर्षि कधी त्यांना यासाठी जप करण्यास सांगतात, तर कधी याग करण्याचा आदेश देतात, तर कधी त्यांना स्वतःलाच कोणत्यातरी देवतेच्या दर्शनाला जाऊन येण्यास सांगतात. म्हणजेच त्यांचे आपल्या परीने सर्वतः प्रयत्न चालू आहेत. त्यांची महर्षि सांगतील त्या वाक्यावर अपार श्रद्धा आहे आणि यामुळेच ते सनातनचे साधक नसूनही प.पू. डॉक्टरांनाच आता स्वत:चे गुरु मानू लागले आहेत, हे लक्षात येते.’
- (पू.) सौ. अंजली गाडगीळ, तिरुवण्णामलय, तमिळनाडू. (१८.७.२०१६, सायं. ६.१६)

गुरु-शिष्य हे एकच आध्यात्मिक नाते महत्त्वाचे !

      ‘साधना न करणार्‍या मनुष्याच्या जीवनात अनेक नात्यांचा गुंता असल्याने तो त्यात गुंतलेला असतो. शिष्याचा मायेतील गुंता सुटलेला असल्याने त्याच्या जीवनात गुरु-शिष्य हे एकच आध्यात्मिक नाते शेष असते. त्यामुळे शिष्य कालांतराने जीवनमुक्त होतो.’ - श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२.७.२०१६) 


॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
मी रस्त्यावर प्रेम करतो. रस्त्यात भेटणार्‍यावर प्रेम करीत
नाही; कारण आमची माघार नाही; म्हणून मी हरलो.
भावार्थ : ‘मी रस्त्यावर प्रेम करतो’ म्हणजे साधनेवर प्रेम करतो. ‘रस्त्यात भेटणार्‍यावर प्रेम करीत नाही’ म्हणजे साधनेत येणार्‍या अडचणी, सिद्धी आदींकडेे दुर्लक्ष करतो. ‘कारण आमची माघार नाही’ म्हणजे मोक्षाला जाऊन, नामाशी एकरूप झाल्यावर आम्हाला तेथून परत यावयाचे नाही. ‘म्हणून मी हरलो’ यातील मी म्हणजे ‘मी’पणा, अहंभाव हरलो.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन ‘संत भक्तराज महाराज यांची शिकवण.’)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
एखाद्या व्यक्तीचे प्रारब्ध पालटणे जवळजवळ अशक्य असते. पालटायचेच झाले, तर तीव्र साधना करावी लागते. असे असतांना भारताचे प्रारब्ध शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक स्तरांवर प्रयत्न केल्यास पालटणे शक्य आहे का ? त्याला आध्यात्मिक स्तराचेच उपाय, म्हणजे साधनेचे बळ हवे.’ - (परात्पर गुरु) डॉ. आठवले
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

बोधचित्र


योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

आध्यात्मिक प्रगती होण्याचे महत्त्व 
आध्यात्मिक प्रगती होऊ लागल्यावर माणसाचा जीवनाकडे पहाण्याचा 
दृष्टीकोन आपोआप पालटत जातो आणि शाश्‍वत सुखाच्या दिशेने त्याची वाटचाल चालू होते. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

‘सेल्फी’चा शासकीय खेळ !

संपादकीय
      शाळाबाह्य विद्यार्थी नियमित होण्यासाठी, तसेच अनुपस्थित रहाणार्‍या विद्यार्थ्यांवर विशेष लक्ष ठेवण्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांसमवेत सेल्फी (स्वतःच स्वतःचे छायाचित्र काढणे) काढण्याचा एक नवा शासननिर्णय प्रसारित करण्यात आला आहे. प्रत्येक सोमवारी पहिला घंटा या ‘सेल्फी’नामक नव्या खेळासाठी देण्यात आला आहे. पहिले दोन सोमवार सर्व विद्यार्थ्यांसमवेत आणि त्यानंतर केवळ अनुपस्थित रहाणार्‍या विद्यार्थ्यांसमवेत हे सेल्फी काढण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांसमवेत काढलेले ‘सेल्फी’ नंतर संगणकीय प्रणालीद्वारे ‘अपलोड’ करण्याचे काम शिक्षकांवर सोपवण्यात आले आहे. गेली दोन वर्षे शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शाळेत नियमित आणण्यासाठी प्रयत्न करूनही विशेष काही साध्य न झाल्यामुळे आता आधुनिक तंत्रज्ञानाचे हे नवे आमीष विद्यार्थ्यांसमोर ठेवण्यात आले आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn