Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कोटी कोटी प्रणाम !
आज प.पू. शंकर महाराज प्रकटदिन

दिनविशेष
आज गोपाष्टमी


हिंदूंची भूमी हडपण्यासाठीच आक्रमण ! - बांगलादेशातील राष्ट्रीय मानवाधिकार आयोग

भारतातील मोठ्या हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि राजकीय पक्ष
बांगलादेशातील पीडित हिंदूंसाठी काहीही करत नाहीत, हे लक्षात घ्या !
बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणाचे प्रकरण
      ढाका - बांगलादेशात सातत्याने हिंदूंवर आणि त्यांच्या मंदिरांवर होणार्‍या आक्रमणांमागे सुनियोजित षड्यंत्र आहे. या आक्रमणांद्वारे हिंदूंची भूमी हडपण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा निष्कर्ष बांगलादेशातील राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने काढला आहे. (बांगलादेशातील मानवाधिकार आयोग हिंदूंवरील आक्रमणाची नोंद घेतो; मात्र भारतातील मानवाधिकार आयोगाला हिंदू मानव आहेत, याचा विसर पडला आहे; त्यामुळे भारतात हिंदूंवर काश्मीर ते केरळ आणि गुजरात ते आसामपर्यंत होत असलेली आक्रमणे त्याला दिसत नाहीत ! - संपादक)      राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून ब्राह्मणबाडीया जिल्ह्यातील नसीरनगरमधील हिंदूंच्या मंदिरावरील आक्रमणाविषयी चौकशी करण्यासाठी ३ सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. यातील प्रमुख सदस्य एनामुल हक चौधरी यांनी येथील दैनिक द डेली स्टारच्या प्रतिनिधीला माहिती देतांना सांगितले, आमच्या प्राथमिक चौकशीत हे आक्रमण सुनियोजित होते. येथील हिंदूंना पळवून लावून त्यांच्या भूमीवर अतिक्रमण करण्यासाठी हे आक्रमण करण्यात आल्याचे समोर येत आहे. पुढील २ दिवसांत आमची चौकशी पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
     बांगलादेशमधील भारतीय उच्चायुक्तालयाच्या मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ घटनास्थळी जाऊन हिंदूंची भेट घेणार आहे.

बंगालमधील बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू !

तृणमूल काँग्रेसच्या काळात दुसरा बांगलादेश होऊ घातलेला बंगाल !
     कोलकाता - बंगालच्या श्रीबती गावातील एका क्लबमध्ये ७ नोव्हेंबरच्या दिवशी बॉम्बस्फोट झाला. यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर काही जण घायाळ झाले. या क्लबमध्ये मोठ्या प्रमाणात बॉम्ब आणि स्फोटके लपवून ठेवण्यात आली होती. पोलीस या घटनेची चौकशी करत आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात येथे कोणी आणि कशासाठी स्फोटके आणली होती, याचा शोध घेण्यात येत आहे.

काश्मीरमध्ये १ आतंकवादी ठार, २ सैनिक घायाळ !

     श्रीनगर - काश्मीरमधील शोपियन जिल्ह्यात सीमा सुरक्षा दल आणि आतंकवादी यांच्यातील चकमकीत एक आतंकवादी ठार झाला, तर २ सैनिक घायाळ झाले. ही चकमक वनगाम येथे रात्री झाली.

शांततेचा भंग केल्याच्या प्रकरणी आपच्या आमदाराला अटक !

     देहली - येथील किराडी भागात छठ पूजेच्या पूर्वी शांततेचा भंग केल्याच्या प्रकरणी आम आदमी पक्षाचे आमदार रितुराज गोविंद यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी येथे कलम १४४ लागू केले होते. गोविंद यांनी या कलमाचे उल्लंघन केल्याचे पोलिसांनी म्हटले.

(म्हणे) शबरीमला मंदिरात सर्व वयोगटांतील महिलांना प्रवेश मिळावा !

केरळच्या साम्यवादी सरकारने काँग्रेस सरकारचे मत पालटले !
     नास्तिकतावादी साम्यवाद्यांना हिंदूंच्या धार्मिक परंपरांमध्ये ढवळाढवळ करण्याचा काय अधिकार ? साम्यवादीवाले मुस्लिम पर्सनल लॉमध्ये हस्तक्षेप करण्याला विरोध करतात आणि दुसरीकडे स्वतः हिंदूंच्या परंपरांमध्ये हस्तक्षेप करतात, हे त्यांचे ढोंगी पुरोगामित्व आहे !      नवी देहली - केरळच्या शबरीमला मंदिरात १० ते ५० वर्र्षे वयोगटातील महिलांना धार्मिक कारणामुळे प्रवेश करण्यास गेल्या दीड सहस्र वर्षांपासून बंदी आहे. ही बंदी उठवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्यात आली आहे. यावर पूर्वीच्या काँग्रेस सरकारने बंदी कायम ठेवण्याचे प्रतिज्ञापत्राद्वारे न्यायालयात म्हटले होते; मात्र केरळच्या साम्यवादी पक्षाच्या नव्या सरकारने नव्याने प्रतिज्ञापत्र सादर करत सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश मिळावा, असे मत न्यायालयात मांडले आहे. यावर शबरीमाला मंदिर बोर्डाने सरकारवर टीका करत अशा प्रकारे ते त्यांचे मत पालटू शकत नाहीत, असे म्हटले आहे. यावर १३ फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. २००६ पासून हे प्रकरण न्यायालयात चालू आहे.


गोहत्येप्रकरणी राज्यांना विश्‍वासात घेण्याची आवश्यकता ! - राजनाथ सिंह

     नवी देहली - अकबर, जहांगीर आणि बहादुरशाह जफर यांच्या काळातही गोहत्या होत नव्हती. बाबरनामा या पुस्तकात लिहिले आहे की, जर तुम्ही गोहत्या रोखली नाही, तर तुम्ही भारतावर राज्य करू शकत नाही. त्यापूर्वीच वैदीक काळात गोहत्येवर पूर्णपणे बंदी होती. देशातील अनेक राज्यांत गोहत्या बंदी आहे; मात्र तरीही गोहत्येच्या प्रकरणी राज्यांना विश्‍वासात घेण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी येथे केले. राजनाथ सिंह पुढे म्हणाले की, गोमातेचा संबंध केवळ सांस्कृतिक नाही, तर तो श्रद्धेचा विषय आहे. या प्रश्‍नाकडे आर्थिक, ऐतिहासिक आणि वैज्ञानिक स्तरावर पाहिले पाहिजे. आमचे सरकार बांगलादेशमध्ये गोमातांच्या होणार्‍या तस्करीवर पूर्ण प्रतिबंद लावण्यासाठी प्रयत्न करत आहेत. दोन देशांतील सीमा मोठी असून त्यावर सध्या काही प्रमाणातच यश मिळाले आहे.

मुसलमानांनी अमेरिकेच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मतदान केल्यास आक्रमण करू ! - इसिसची धमकी

     वॉशिंग्टन - ८ नोव्हेंबरला अमेरिकेत राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. यात मुसलमानांनी सहभाग घेतल्यास आक्रमण करू, अशी धमकी इसिसने दिली आहे. ही धमकी इसिसच्या नियतकालिकातील एका लेखातून देण्यात आली आहे. ७ पानांच्या या लेखाद्वारे अशा आक्रमणाचे समर्थन करण्यात आले आहे. तसेच रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक या दोन्ही पक्षांच्या मुसलमानांच्या संदर्भातील धोरणात कोणताही भेद नाही, असेही म्हटले आहे.


 

जेएन्यूमध्ये शस्त्र असलेेली काळी बॅग सापडली !

जेएन्यूचा आतापर्यंतचा एकूण प्रवास पहाता त्याला टाळे ठोकलेलेच योग्य ठरेल !
     नवी देहली - येथील जवाहरलाल नेहरू विश्‍वविद्यालयात (जेएन्यूमध्ये) शस्त्र असलेली काळी बॅग सापडली आहे. ६ नोव्हेंबरच्या रात्री २ वाजता उत्तर प्रवेशद्वारापासून ५० मीटर अंतरावर ही बॅग येथील सुरक्षारक्षकाच्या निदर्शनास आली. यात देशी पिस्तुल, ७ काडतुसे आणि एक स्क्रू ड्राईव्हर सापडला. पोलीस या घटनेची चौकशी करत आहेत.

शिक्षण हक्क कायद्यामुळे हिंदूंकडून चालवल्या जाणार्‍या शाळांवर विपरीत परिणाम !

हिंदूंकडून चालवण्यात येणार्‍या शाळांवर विपरीत परिणाम होणारे कायदे सरकारने पालटावेत !
      मुंबई - केंद्र सरकारच्या शिक्षण हक्क कायद्यातील नियमांमुळे हिंदूंकडून चालवल्या जाणार्‍या शाळांमधील मुलांसाठीच्या जागा अल्प झाल्या आहेत. त्यामुळे बर्‍याच शाळा बंद करणे भाग पडले आहे. आतापर्यंत भारतभर ३ सहस्रांहून अधिक शाळा बंद पडल्या आहेत. 
गरीब विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळायला हवे कि नको?
     कुठलीही सर्वसामान्य व्यक्ती या प्रश्‍नाला हो असेच उत्तर देईल. गरिबांना चांगले शिक्षण मिळाले, तर सर्वांना आनंदच होईल. शिक्षण हक्क कायद्यामुळे मात्र गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण मिळण्यात अडचणी येणार आहेत.

पाकिस्तान इस्लामचा सर्वार्ंत मोठा शत्रू ! - प्रा. नायला कादरी, अध्यक्ष, विश्‍व बलूच महिला मंच

भारतातील पाकप्रेमींना हे माहीत आहे का ?
पाकने ७५ लाखांहून अधिक मुसलमानांचा संहार केला !
      वाराणसी - पाकिस्तान इस्लामचा सर्वांत मोठा शत्रू आहे. त्याने इस्लामच्या नावाखाली आतंकवाद पसरवत ३० लाख बंगाली मुसलमान, ४० लाख अफगाणी मुसलमान आणि २ लाख बलुची मुसलमान यांची हत्या केली आहे, अशी टीका विश्‍व बलूच महिला मंचच्या अध्यक्षा प्रा. नायला कादरी यांनी केली आहे. वाराणसी येथे झालेल्या संस्कृती संसदेत त्या सहभागी झाल्या होत्या.
    प्रा. नायला कादरी म्हणाल्या की, मी इस्लामचा त्याग करून दामिनी बनणार आहे. माझा मुलगा ओम बनणार आहे. प्रा. नायला यांनी बलुचिस्तानला स्वातंत्र्य मिळेपर्यंत काशीमध्ये निर्वासित बलूच सरकार बनवण्यासाठी अनुमती द्यावी, अशी भारत सरकारकडे मागणी केली. त्याला संस्कृती संसदेतील उपस्थितांनी मान्यता दिली. या वेळी त्यांनी भारत-बलूच फोरमची घोषणा केली.


शिवमोग्गा आणि गदग (कर्नाटक) येथे टिपू सुलतान जयंतीच्या विरोधात आंदोलन

 
     शिवमोग्गा - कर्नाटक सरकारने १० नोव्हेंबर या दिवशी टिपू सुलतान जयंती साजरी करण्याविषयी नियोजन केले आहे. क्रूरकर्मा टिपू सुलतान जयंती उत्सवाला विरोध करण्यासाठी येथील हिंदु संघटनांनी शिवमोग्गा येथे जिल्हाधिकार्‍यांच्या कार्यालयासमोर ६ नोव्हेंबरला आंदोलन केले. या आंदोलनात अण्णा हजारे समिती, ब्लॅक बॉईज फ्रेन्ड्स क्लब, शिवप्पा नायक अभिमानी बळगा, हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था या संघटना सहभागी झाल्या होत्या.
      हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक श्री. प्रसन्ना कामत, सनातन संस्थेच्या सौ. सौम्या मोगेर यांनी आंदोलनाला संबोधित केले. (हिंदूंवर अनन्य अत्याचार करणार्‍या क्रूरकर्मा टिपू सुलतानच्या जयंतीला विरोध करणार्‍या धर्माभिमान्यांचे अभिनंदन ! - संपादक)
क्षणचित्रे :
१. प्रत्येक महिन्यात आंदोलनासाठी अनुमती घेतांना अर्ध्या किंवा एका दिवसात अनुमती मिळत होती. टिपू जयंतीच्या विरोधातील आंदोलनासाठी अनुमती मिळवण्यासाठी बर्‍याच हेलपाट्या घालाव्या लागल्या. तीन दिवस प्रयत्न करूनही अनुमती मिळाली नव्हती. आंदोलनाच्या एक दिवस अगोदर अनुमती मिळाली.

बंगाल हा जिहादी आतंकवाद्यांचा भारतातील संक्रमण तळ !

धर्मांधांना चुचकारण्याचे तृणमूल काँग्रेसचे राजकारण 
देशाच्या मुळावर उठले आहे, हेच ही स्थिती दर्शवते ! केंद्र सरकारने 
बंगालमधील जिहादी आतंकवाद समूळ नष्ट करावा, अशीच जनतेची मागणी आहे !
     कोलकाता - भारत आणि बांगलादेश येथे आतंकवादी कारवाया करणार्‍या अनेक संघटना बंगालचा संक्रमण तळाच्या रूपात वापर करत आहेत. संक्रमण म्हणजे लोक किंवा वस्तू यांची एका ठिकाणाहून अन्य ठिकाणी वाहतूक करणे होय. बंगालचा संक्रमण तळ म्हणून वापर करणे म्हणजे जिहादी आतंकवाद्यांना बंगालमध्ये प्रशिक्षण द्यायचे आणि नंतर त्यांची भारतात देशविघातक कारवाया करण्यासाठी अन्यत्र नेमणूक करायची, अशी आतंकवादी संघटनांची योजना आहे. जमात-उल्-मुजाहिदीन बांगलादेश (जे.एम्.बी.) आणि पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आय.एस्.आय. यांना सक्रीय होण्यासाठी बंगाल हे सुरक्षित राज्य झाले आहे.

ओडिशातून होणारी गोतस्करी रोखण्यासाठी मनेका गांधी यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे !

केंद्रात मंत्री असणार्‍या मनेका गांधी यांनी अशी मागणी करण्याऐवजी अधिकाराचा 
वापर करून ही तस्करी रोखण्यास ओडिशा शासनाला भाग पाडावे, अशी हिंदूंची अपेक्षा आहे ! 
     नवी देहली - ओडिशा राज्यातून बालासोरमार्गे बंगाल राज्यात मोठ्या प्रमाणात गोवंशाची तस्करी होत असल्याच्या विरोधात गोज्ञान फाऊन्डेशनने देहलीतील ओडिशा भवनासमोर निदर्शने केली. या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय महिला आणि बाल कल्याण मंत्री श्रीमती मेनका गांधी यांनी ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांना पत्र लिहून बालासोर पोलीस ठाण्यातील अधिकार्‍यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आवाहन केले आहे.

एन्डीटीव्ही इंडियावर आजन्म बंदी हवी ! - सुभाष चंद्रा, प्रमुख, झी मीडिया

     नवी देहली - केंद्र सरकारने एन्डीटीव्ही इंडियाच्या हिंदी वाहिनीवर एक दिवसाची बंदी घातली आहे. या वाहिनीने पठाणकोट येथील आक्रमणाच्या वेळी वार्तांकन करतांना भारतीय सैन्याच्या सिद्धतेविषयीच्या संवेदनशील माहितीचे प्रसारण केले होते. सरकारच्या या निर्णयावर तथाकथित बुद्धीवाद्यांनी टीका केली आहे; मात्र झी मिडीयाचे प्रमुख आणि राज्यसभेतील खासदार सुभाष चंद्रा यांनी बंदीला योग्य ठरवले आहे. त्यांनी एन्डीटीव्ही इंडियावर आजन्म बंदी घातली पाहिजे, अशी मागणी केली आहे.
     देशाच्या सुरक्षेशी खेळणार्‍यांना एक दिवसाची बंदी ही खूपच अल्प शिक्षा आहे, असे त्यांनी ट्विट केले आहे. एन्डीटीव्ही या संदर्भात न्यायालयात जरी गेली, तरी तेथेही तिला न्यायालयाकडून फटकारलेच जाईल. काँग्रेस सत्तेवर असतांना झी न्यूजवर बंदी घालण्याचा प्रयत्न केला जात होता. त्यावेळी एन्डीटीव्ही सहित सर्व तथाकथित बुद्धीवाद्यांनी मौन पाळले होते. एडिटर्स गिल्डही (संपादकांची संघटना) गप्प होती; मात्र आज ते देशात आणीबाणी लावण्यात आली आहे, अशी ओरड करत आहेत. त्यांना देशाच्या सुरक्षेशी काहीच देणेघेणे नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.धार्मिक कारणासाठी धर्मांधाने त्याच्या पत्नीला नवजात बाळाला १ दिवस स्तनपान करण्यापासून रोखले !

      थिरुवनंतपुरम् - केरळच्या कोझीकोड येथे धार्मिक प्रथांचे कारण देत येथील धर्मांध अबू बकर सिद्धीकी याने पत्नीला नवजात बाळाला स्तनपान करण्यापासून रोखले. डॉक्टर आणि पोलीस यांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केल्यावर त्याने बाळंतीण पत्नी आणि नवजात बाळासह रुग्णालयातून पळ काढला. मशिदीतून येणारा अजानचा आवाज बाळाने ऐकल्यानंतरच नवजात बाळाला दूध पिण्यास देईन, असे अबू याने म्हटले होते. 
    बाळाला दूध पाजले नाही, तर बाळाला अनेक आजार होतात, असे डॉक्टरांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला; पण तरीही त्याने ऐकले नाही. उलट त्यांने सांगितले की, मी माझ्या मोठ्या मुलालाही अशाच प्रकारे दूध पाजले होते, त्याला काहीच झाले नाही.

वाराणसी येथे ६३ वर्षांपासून रेती खाणारी महिला !

      वाराणसी - येथे रहाणारी ७८ वर्षीय कुसुमावती नावाची वृद्ध महिला गेल्या ६३ वर्षांपासून प्रतिदिन १ किलो रेती खात आहे. जर रेती खाण्यास मिळाली नाही, तर आपण आजारी पडू, असे तिला वाटत आहे. याव्यतिरिक्त ती नेहमीचे वरणभात, भाजी आणि चपाती असे भोजन घेत आहे. तिच्या मुलांनी सांगितले की, जर आईने रेती खाल्ली नाही, तर ती आजारी पडते. त्यामुळे तेच तिच्यासाठी रेती खरेदी करून आणतात. मुलांच्या म्हणण्यानुसार रेतीमधून तिला उर्जा मिळते. 
     डॉक्टरांनी सांगितले की, हा एक मानसिक आजार आहे. अनेक लोकांना अशा प्रकारचा आजार असतो आणि ते त्याची सवय करून घेतात. काही महिला मातीची भांडी आणि केसही खातात.

१२ वर्षे वयाच्या मुलींशी विवाह करण्याच्या अनुमतीसाठी श्रीलंकेतील मुसलमानांचे आंदोलन !

जगात मुसलमान कोणत्याही देशात गेले, तरी त्यांच्या धर्मातील 
रिती अयोग्य असूनही त्यानुसार वागण्यासाठी अडून रहातात, तर भारतात 
हिंदु धर्मातील चांगल्या धर्माचरणावर बंदी येऊनही त्याच्या विरोधात संघटित होत नाहीत !
     कोलंबो - श्रीलंका शासनाने मुलींच्या विवाहाचे किमान वय १६ वर्षे करण्याचा कायदा पारित करण्याचे प्रस्तावित केले आहे. हा कायदा श्रीलंकेतील बौद्ध, हिंदू, ख्रिस्ती आणि मुसलमान यांना लागू होणार आहे. सध्या मुसलमान शरीयत कायद्याप्रमाणे १२ वर्षे वयाच्या मुलींशी विवाह करण्यास मुक्त आहेत. नवीन कायद्याला त्यांचा विरोध दर्शवण्यासाठी मुसलमानांनी मोठ्या संख्येने कोलंबोत निदर्शने केली. यात महिलांचाही समावेश होता.

८ वर्षे नगरपालिकेने तक्रारींची नोंद न घेतल्याने संतापलेल्या नागरिकाने पाकचा झेंडा फडकवला !

तक्रारीची नोंद न घेणार्‍या संबंधितांना शिक्षा म्हणून 
पाकमध्येच पाठवायची मागणी कुणी केल्यास आश्‍चर्य वाटू नये !
      कानपूर (उत्तरप्रदेश) - येथील जवाहरनगरामध्ये घराच्या छतावर पाकिस्तानचा झेंडा फडकवणार्‍या चंद्रपाल सिंह या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. त्याच्या विरोधात राष्ट्रद्रोहाचा गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. चंद्रपाल एक ज्योतिषी आहे. त्याने पोलिसांना सांगितले की, वर्ष २००८ मध्ये त्याचे घरभाडे आणि पाण्याचे देयक अधिक प्रमाणात आले होते. तसेच शेजार्‍याने घराची दुरुस्ती केल्यामुळे चंद्रपाल यांच्या घराची हानी झाली होती. या दोन समस्यांविषयी त्यांनी नगरपालिका, पाणी खाते आदी ठिकाणी अनेकदा तक्रारी केल्या; परंतु कोणीही त्या समस्या सोडवल्या नाहीत. (जनतेच्या तक्रारींची नोंद न घेणार्‍या प्रशासनाला जनतेने पैसे देऊन पोसायचे कशाला ? अशा व्यवस्थेच्या विरोधात जनतेचा उद्रेक झाल्यास त्याला प्रशसनच उत्तरदायी असेल, हे त्याने जाणावे ! - संपादक) शेवटी संतप्त होऊन मी घरावर पाकचा झेंडा फडकवला. (आठ वर्षे समस्या सुटल्या नाहीत, तर संताप अनावर होणे साहजिक आहे; मात्र त्यासाठी देशविघातक कृती करणे, हे अक्षम्य आहे. समस्यांचे निवारण होत नसेल, तर निषेधाचे विविध मार्ग लोकशाहीने नागरिकांना दिले आहेत. नागरिकांनी त्याचा अवलंब करणे आवश्यक आहे ! - संपादक ) यानंतर आता चंद्रपाल यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

देहली येथील जामा मशिदीत ईशान्य भारतातील तरुणीची फसवणूक !

       नवी देहली - देहली विश्‍वविद्यालयातील विधी शाखेची अरुणाचल प्रदेशातील विद्यार्थीनी नियांग पेर्टिन हिची येथील जामा मशिदीमध्ये फसवणूक करण्यात आली. (धर्मांध आणि देशविघातक कारवायांचे अड्डे बनलेल्या मशिदींमध्ये फसवणूकही होते, हे जाणा ! अशा मशिदींवर तात्काळ कारवाई होणे आवश्यक ! - संपादक) तिला आणि तिच्या मित्रांना मशिदीत भ्रमणभाष घेऊन जाण्यासाठी ३०० रुपये द्यावे लागले. प्रत्यक्षात मशिदीत भ्रमणभाष नेण्यासाठी पैसे द्यावे लागत नाहीत; मात्र नियांग विदेशी असल्याचे समजून तिची फसवणूक करण्यात आली. नियांग हिने या संदर्भातील एक व्हिडिओ ट्विटरवर अपलोड केला आहे. हा व्हिडिओ केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांना शेअर करण्यात आल्यावर त्यांनी याची चौकशी करण्यात येईल, असे म्हटले आहे. (मंदिरे किंवा मठ यात असा प्रकार घडला असता, तर एव्हाना प्रसारमाध्यमांनी ब्रेकिंग न्यूज म्हणून हे वृत्त प्रसारित करून मंदिरांची अपकीर्ती केली असती ! जामा मशिदीत झालेली ही फसवणूक प्रसारमाध्यमांना दिसत नाही का ? - संपादक)

सौदी अरेबियाच्या राजकुमाराला चाबकाचे फटके !

     रियाध - स्वतःच्या मित्राची हत्या करणार्‍या सौदी अरेबियाच्या राजकुमाराचा शिक्षा म्हणून नुकताच शिरच्छेद करण्यात आला होता. आता अल् सौद या राजघराण्यातील दुसर्‍या राजकुमाराला चाबकाचे फटके मारण्यात आल्याचे वृत्त आहे. न्यायालयाने त्याला चाबकाचे फटके मारण्याची शिक्षा सुनावली होती. त्याची कार्यवाही जेद्दाहमधील कारागृहामध्ये करण्यात आली, अशी बातमी सौदीतील ओकाज या वृत्तपत्रानं दिली आहे. हा राजकुमार अजूनही कारागृहात शिक्षा भोगत असल्याचे या वृत्तात म्हटले आहे. शिक्षेचे कारण आणि राजकुमाराचे नाव गोपनीय ठेवण्यात आले आहे. देशातील कायदा सर्वांसाठी सारखाच असल्याचा संदेश सौदीने यातून दिला आहे. (भारतातील एकातरी राजकीय नेत्याच्या पुत्राला एखाद्या गुन्ह्यामध्ये तात्काळ आणि कठोर शिक्षा कधी होते का आणि झाली, तर त्याची कार्यवाही होते का ? - संपादक)

लिबियाच्या समुद्रकिनारी २ नौका बुडून २४० शरणार्थींचा मृत्यू !

     त्रिपोली (लिबिया) - लिबियाच्या समुद्रकिनारी नौका बुडण्याच्या २ घटनांमध्ये २४० लोकांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेबरोबरच धोकादायक असलेला भूमध्यसागर पार करतांना आतापर्यंत झालेल्या मृत्यूचा आणि बेपत्ता लोकांचा आकडा ४ सहस्र २२० पर्यंत पोचला आहे. रबरापासून बनवलेल्या २ नौकातून हे लोक जात होते.

भाजपच्या नेत्या जयवंतीबेन मेहता यांचे निधन

     मुंबई - भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री जयवंतीबेन मेहता यांचे ६ नोव्हेंबरच्या रात्री निधन झाले. त्या काही दिवसांपासून आजारी होत्या. त्यांनी नगरसेवक, आमदार, खासदार ही पदेही सांभाळली होती. आणीबाणीच्या काळात १९ मास त्यांनी बंदीवास भोगला. भाजप कार्यकर्त्यांसाठी त्या मातृतुल्य असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजली वाहिली.

सैन्य दलातील सैनिकाने सुरक्षारक्षकाच्या डोक्यात शिरस्त्राण घातले !

     नाशिक - त्र्यंबकेश्‍वर मंदिरामध्ये सैन्य दलातील एका जवानाने रांगेत उभे न रहाता थेट मंदिरात दर्शनासाठी सोडत नसल्याचा राग येऊन शिरस्त्राण सुरक्षारक्षकाच्या डोक्यात मारून त्याला दुखापत केली. सुनीलकुमार नेमिचंद असे त्या सैनिकाचे नाव आहे. त्र्यंबकेश्‍वर मंदिरामध्ये सध्या उत्तर महादरवाजाने प्रवेश दिला जातो. गर्दीमुळे दर्शनासाठी लांब रांग लागते. आई-वडिलांसमवेत आलेल्या या सैनिकांने लवकर प्रवेश देण्यावरून सुरक्षारक्षकाशी वाद घातला. अन्य सुरक्षारक्षक त्यांच्यामध्ये पडल्यावर वरील प्रकार घडला.

कर्नाटक सरकारची दडपशाही : बेळगावात मराठी तरुणांवर देशद्रोहाचे गुन्हे !

     बेळगाव - बेळगावमधील काळ्या दिनाच्या मिरवणुकीत सहभागी झालेल्या पाच तरुणांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करून कर्नाटक शासनाने दडपशाहीचे दर्शन घडवले आहे. बेळगावात १ नोव्हेंबरला पाळण्यात आलेल्या काळा दिन आंदोलनावरून मराठी-कन्नड वाद पेटला आहे. या वेळी आंदोलनाच्या वेळी सायकल फेरी काढण्यात आली होती. या फेरीत काही मराठी तरुण खेळण्यातील बंदुका घेऊन सहभागी झाले होते. या तरुणांपैकी पाच जणांवर देशद्रोह्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्यावर दोन राज्यांत तेढ निर्माण केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. (मराठी तरुणांवर अत्याचार आणि खोटे खटले प्रविष्ट होत असतांना स्वदेशी आणि स्वभाषा यांचा पुरस्कार करणारे केंद्र शासन काहीच हस्तक्षेप का करत नाही ? सर्वपक्षीय राज्यकर्त्यांच्या अनास्थेमुळे गेली अनेक वर्षे मराठी-कन्नड हा वाद अधिकच चिघळत आहे ! - संपादक)      गेले दोन-तीन दिवस काळा दिन आंदोलनात सहभागी झालेल्या मराठी तरुणांचा घरोघरी जाऊन शोध चालू आहे. या तरुणांना घरात घुसून पालकांसमोरच अमानुष मारहाण करण्यात येत आहे. कन्नड वेदिका संघटनेने मराठी भाषकांचे वर्चस्व असलेली बेळगाव महापालिका विसर्जित करण्याच मागणी कर्नाटक शासनाने केली.

संचित रजा (पॅरोल) घेऊन पलायन केलेल्या बंदीवानांमध्ये महाराष्ट्र राज्य प्रथम !

महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे ! 
     नागपूर, ७ नोव्हेंबर - महाराष्ट्रात संचित रजा घेऊन बाहेर पडलेल्या बंदीवानांपैकी १५२ बंदीवानांनी पलायन केले आहे. (यावरून संचित रजा म्हणजे पलायन हे जणू गुन्हेगारांसाठी समीकरणच झाले आहे. त्यामुळे सरकार आणि गृह विभाग यांनी यावर बंदीच आणायला हवी. - संपादक) 

बापूंना 'महात्मा' या पदवीतून मुक्त करावे लागणार आहे ! - तुषार गांधी, गांधींचे नातू

     पुणे - बापूंच्या हत्येचे अर्धसत्य सांगण्यात आले असून आजच्या पिढीला तेच खरे वाटते. हे टाळण्यासाठी बापूंना 'महात्मा' या पदवीतून मुक्त करावे लागणार असून ते माझे जीवनकर्तव्य आहे. बापू ही साधी व्यक्ती होती. आपल्या दुबळेपणावर प्रभुत्व मिळवून ते मोठे झाले. मी महात्मा गांधीचा वंशज नसून बापूंचा वशंज आहे. आपणही महात्म्याला विसरून बापू लक्षात ठेवू, असे प्रतिपादन गांधींचे नातू तुषार गांधी यांनी केले. चांगले विचार युवा व्याख्यानमालेंतर्गत 'गांधी हत्या : सत्य,  असत्य' या विषयावर ते बोलत होते. संकेत मुनोतलिखित 'एक धैयर्शील योद्धा गांधी' या पुस्तकाचे प्रकाशन या वेळी झाले. महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे संचालक विवेक सावंत, पत्रकार संजय आवटे या वेळी उपस्थित होते. 

त्र्यंबकेश्‍वर येथे भाविकांची गैरसोय, नगरपालिका उदासीन

भाविकांना सोयीसुविधा उपलब्ध न करून देणारे निष्क्रीय प्रशासन !
     त्र्यंबकेश्‍वर - येथे भाविक पर्यटकांना वाहनतळ, तसेच अन्य गोष्टींतही असुविधांना सामोरे जावे लागत आहे. त्यांच्या होणार्‍या गैरसोयीविषयी नगरपालिका उदासीन आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने यात लक्ष देण्याची मागणी भाविकांकडून करण्यात येत आहे.
१. येथील वाहनतळावर वाहने उभी करण्यास जागा नसते. तेथे कुणी सुरक्षारक्षकही नेमलेला नाही. त्यामुळे वाहनधारक एकमेकांशी वाद घालतात. लक्षावधी रुपयांचे वाहन भाविकांना तसेच सोडून आत जावे लागते.
२. स्वच्छतागृह, स्नानगृह यांचीही व्यवस्था अपुरी आहे. तरीही त्यासाठी पैसे आकारले जातात.
३. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने उभारलेल्या जलकुंभाच्या ठिकाणी तेथील झोपड्यांत रहाणारे लोक आंघोळी करतात. त्यामुळे पिण्यासाठी पाणीही मिळत नाही.


बोईसर (जिल्हा पालघर) येथे श्रीमद् भागवत् पुराण कथेला प्रारंभ !

      बोईसर - येथील श्रीमद् भागवत सप्ताह ज्ञान यज्ञ समितीच्या वतीने सर्कस ग्राऊंड येथे ७ नोव्हेंबरपासून श्रीमद् भागवत पुराण कथेला प्रारंभ झाला आहे. ७ नोव्हेंबरला कलशयात्रेचा कार्यक्रम झाला. श्रीमद् भागवत कथाकथनाचा कार्यक्रम १३ नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. दुपारी ३ ते रात्री ८ वाजेपर्यंत भागवत कथा, १३ नोव्हेंबरला दुपारी ३ ते रात्री ८ या वेळेत पूर्णाहुति, १४ नोव्हेंबरला सकाळी ८ ते दुपारी ३ या वेळेत हवन भंडारा असे कार्यक्रमाचे स्वरूप असणार आहे. लोक कल्याण संस्था, बोईसर यांच्या सौजन्याने हा कार्यक्रम होत आहे. पूज्य संत श्री शैलेंद्रजी शास्त्री महाराज त्यांच्या मधुरवाणीत श्रीमद् भागवत कथा सांगणार आहेत. समस्त भाविकांनी श्रीमद् भागवत कथेचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीमद् भागवत सप्ताह ज्ञान यज्ञ समिती, बोईसर यांच्या वतीने करण्यात आले आहे. या ठिकाणी नियमितपणे १३ नोव्हेंबरपर्यंत दुपारी ३ ते रात्री ८ या वेळेत सनातन संस्थानिर्मित ग्रंथ प्रदर्शन लावण्यात येणार आाहे.

(म्हणे) पुण्यातील कचर्‍याच्या समस्येमुळे मला माझ्या शहराची लाज वाटते !

हातात सत्ता असतांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार
वंदना चव्हाण यांचे असमर्थता व्यक्त करणारे बोल !
     पुणे - गेल्या दीड वर्षापासून पुण्यातील कचर्‍याविषयी मी आवाज उठवत आहे. तरीही पालिका प्रशासन आणि आयुक्त ऐकत नाहीत. कचरा वाढल्यामुळे चिकनगुनिया आणि डेंग्यू यांसारख्या व्याधी वाढत आहेत. जागोजागी पडलेला कचरा पाहून लोकप्रतिनिधी म्हणून मला माझ्या शहराची लाज वाटते, अशा शब्दांत राष्ट्रवादीच्या खासदार अधिवक्ता वंदना चव्हाण यांनी आपली असमर्थता व्यक्त केली. (निर्ढावलेले प्रशासन हे राष्ट्र्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचेच (कु) फलित आहे, असे म्हटल्यास चुकीचे का ? - संपादक) शहरातील कचर्‍याच्या प्रश्‍नाच्या संदर्भात वंदना चव्हाण आणि विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे महापौर प्रशांत जगताप यांची भेट घेतली आणि त्याविषयी चर्चाही केली. त्यानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
     कचरा प्रकल्प उभारण्यासाठी राज्य शासनाने जागा उपलब्ध करून दिलेली नाही. कचरा नेण्यासाठी गाड्यांचाही प्रश्‍न प्रलंबित आहे. पालिका प्रशासनाला सर्वसाधारण सभेत याविषयी खडसवले जाईल.

१० मासांत मराठवाड्यामध्ये ९०० शेतकर्‍यांच्या आत्महत्या

ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) आवश्यक !
     संभाजीनगर, ७ नोव्हेंबर - मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांमध्ये जानेवारी ते ऑक्टोबर २०१६ या कालावधीत ९०० शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ७०० शेतकर्‍यांनी आत्महत्या केली होती. गेल्या ४ वर्षांपासून मराठवाडा दुष्काळाने होरपळत असून त्यामुळे यंदा आत्महत्याचे प्रमाण वाढल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते.

१० वीच्या परीक्षेच्या वेळापत्रकात पालट करण्याचे आदेश

     मुंबई, ७ नोव्हेंबर - महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने नुकत्याच जाहीर केलेल्या १० वी परीक्षेच्या वेळापत्रकात पालट करण्याचे आदेश शिक्षण आयुक्त धीरज कुमार यांनी मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांना दिले आहेत. शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणारी १० वीची परीक्षा ७ मार्च २०१७ या दिवशी चालू होणार आहे. त्याचे वेळापत्रक २८ ऑक्टोबरला जाहीर केले होते. त्यानुसार २० ते २३ मार्च २०१७ या कालावधीत १० वीचे महत्त्वाच्या ४ विषयांचे सलग पेपर होते; परंतु 'त्या पेपरमध्ये एक दिवसाचे अंतर नसल्याने अभ्यास कसा करणार', असा प्रश्‍न विद्यार्थ्यांसमोर उभा राहिला होता. (हे शिक्षण मंडळाच्या आधीच कसे लक्षात आले नाही ? विद्यार्थी आणि पालक यांना अशी मागणी का करावी लागते ? - संपादक) त्यामुळे विद्यार्थ्यांना त्या पेपरच्या कालावधीत सुट्टी हवी, अशी मागणी विद्यार्थी आणि पालक यांनी केली होती. त्याची नोंद घेत शिक्षक आयुक्तांनी वरील आदेश दिले.

बेळगावमधील आक्रोश लाल किल्ल्यावर ऐकू येत नाही का ?

दैनिक 'सामना'च्या अग्रलेखातून विचारलेला परखड प्रश्‍न 
     मुंबई - बलुचिस्तानातील स्वातंत्र्यसैनिकांच्या किंकाळ्या लाल किल्ल्यावर ऐकू येतात; पण बेळगावमध्ये ६० वर्षांपासून चालू असलेला आक्रोश ऐकू जात नसेल, तर न्याय आणि अन्यायाच्या गोष्टी कोणी करू नयेत. अण्णा हजारे यांनी बेळगावमध्ये मराठी भाषिकांवर होणार्‍या अत्याचाराच्या विरोधात कधी उपोषण का केले नाही ? असा प्रश्‍न शिवसेनेने मुखपत्र 'सामना'त उपस्थित केला आहे. बेळगावमध्ये 'काळा दिन'' आंदोलनात सहभागी झालेल्या मराठी भाषिक तरुणांवर कर्नाटकमधील पोलिसांनी केलेल्या अत्याचारांच्या पार्श्‍वभूमीवर दैनिक 'सामना'मधून परखड टीका केली आहे. 

रेल्वेमध्येही विनामूल्य वाय-फाय सुविधा

     मुंबई - मुंबईसह देशातील मुख्य रेल्वेस्थानकांवर कार्यरत असलेली वाय-फायची सुविधा आता धावत्या मेल आणि एक्स्प्रेस यांमध्येही चालू करण्यात येणार आहे. यासाठी रेल्वे मंत्रालयाच्या रेलटेक आस्थापनाने पुढाकार घेतला आहे. येत्या २ वर्षांत ही सेवा चालू होईल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.


पुण्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या अनेक विद्यार्थ्यांना एका विषयात तांत्रिक कारणांमुळे शून्य गुण !

केंद्र सरकारच्या कौशल्य विकास विभागाचा अनागोंदी कारभार !
     पुणे - केंद्र सरकारच्या कौशल्य विकास विभागाकडून येथील औंधमधील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील (आयटीआय) विद्यार्थ्यांच्या घेण्यात आलेल्या सर्व्हेयर या अभ्यासक्रमाच्या दुसर्‍या सत्राच्या परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांना शून्य गुण मिळाले. पुण्यातील अनुमाने ५० विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. एम्प्लॉयबिलिटी स्कील या विषयाच्या उत्तरपत्रिका तपासणी आणि निकाल प्रक्रियेतील तांत्रिक चुकांमुळे हा प्रकार झाला आहे. (विद्यार्थ्यांची शैक्षणिक हानी करणार्‍या संबंधितांवर कठोर कारवाई व्हायला हवी ! - संपादक) अन्य अभ्यासक्रमांतील काही विद्यार्थ्यांविषयीही असेच घडले. मागील वर्षीही काही विषयांमध्ये विद्यार्थ्यांना शून्य गुण मिळाले होते. (वारंवार चुका करणार्‍या विभागाला विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याचा काय अधिकार ? - संपादक)       या प्रकाराविषयी संस्थेचे प्राचार्य पी. एल्. सायगावकर म्हणाले की, राज्यासह देशभरातील इतर संस्थांमध्ये असाच प्रकार घडल्याची शक्यता आहे. ही परीक्षा आणि त्याची प्रणाली देहली येथून पाहिली जात असल्याने ही चूक कशी झाली, हे लगेच सांगता येणार नाही;

आतंकवादी पाकिस्तानला पूर्णपणे संपवणे आवश्यक ! - ह.भ.प. रमाकांत बोंगाळे महाराज

     सांगली, ७ नोव्हेंबर (वार्ता.) - आपण किती दिवस पाकिस्तानच्या आतंकवादाशी लढत रहाणार आहोत ? एक ना एक दिवस आपल्याला आरपारचे उत्तर द्यावेच लागेल. आतंकवादी पाकिस्तानला पूर्णपणे संपवावे लागेल. नुकतेच भारतीय लष्कराने 'सर्जिकल स्ट्राईक' केले आहे, त्यावरून भारतीय लष्कर हे काम करू शकते, याची जाणीव सर्व जगाला झाली आहे, असे मनोगत सांगली जिल्हा वारकरी सेवा संप्रदायाचे संस्थापक ह.भ.प. रमाकांत बोंगाळे महाराज यांनी व्यक्त केले. लोकजागरच्या ३४ व्या दिवाळी अंकाचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. 

पोलिसांकडून फटाका असोसिएशनवर गुन्हा प्रविष्ट !

संभाजीनगर येथील फटाक्यांच्या दुकानाला आग लागल्याचे प्रकरण 
     संभाजीनगर - येथील फटाका बाजाराला २९ ऑक्टोबर या दिवशी आग लागून १८५ दुकाने जाळून खाक झाली होती. या प्रकरणात फटाका मार्केट असोसिएशनवर क्रांतीचौक पोलीस ठाण्यात ६ नोव्हेंबर या दिवशी अग्निशमन दलाच्या अधिकार्‍यांनी तक्रार प्रविष्ट केली आहे. त्यानुसार शहर फायर वर्क्स डिलर्स असोसिएशनचे कोषाध्यक्ष, इतर पदाधिकारी आणि संभाजीनगर फटाका असोसिएशन यांच्यावर गुन्हा प्रविष्ट केला आहे. (पोलिसांचा कूर्मगती कारभार ! पोलिसांनी एवढ्या उशिरा गुन्हा प्रविष्ट करणे म्हणजे असोसिएशनला मोकळीक दिल्यासारखेच नव्हे का ? - संपादक) 
     स्थानिक गुन्हे शाखेने फटाका असोसिएशनने दुकानदारांना आवश्यक त्या सुविधा पुरवल्या नव्हत्या. तसेच नियमानुसार असलेल्या अटी आणि शर्ती यांचे उल्लंघन करत स्फोटक पदार्थांविषयी निष्काळजीपणा केला, असा ठपका ठेवला आहे.

वाघांची शिकार वाढल्याने धोक्याची चेतावणी !

     पुणे - जानेवारी ते ऑक्टोबर २०१६ या काळात ७६ वाघांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण आणि ट्राफिक-इंडिया यांनी दिली आहे. वाघांची शिकार वाढली असून अनेक भागांमध्ये मृतदेह सापडले असल्याचे सांगत संवर्धनकर्त्यांनी धोक्याची चेतावणी दिली आहे. ७६ पैकी ४१ वाघांच्या मृत्यूचे कारण समजू शकलेले नाही. वाघांचे मृत्यू होण्यात मध्यप्रदेश पहिल्या, तर कर्नाटक दुसर्‍या स्थानावर आहे. वर्ष २०१५ मध्ये ६९ वाघांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली होती. वाघांच्या मृत्यूमागे शिकार, विषप्रयोग, रस्त्यावरील अपघात, विजेचा धक्का लागणे, तसेच एकमेकांवर केलेली आक्रमणे आदी कारणे असतात.

दारूबंदी कायदा होण्यासाठी लढा चालू करणार ! - अण्णा हजारे

दारूबंदी सरकारने स्वतःहून करणे अपेक्षित असतांना त्यासाठी 
सामाजिक कार्यकर्त्यांना लढा द्यावा लागणे, हे सरकारला लज्जास्पद ! 
     मुंबई - मद्य पिऊन महिलांवर होत असलेले अत्याचार आणि ग्रामीण भागातील वाढती व्यसनाधीनता लक्षात घेऊन दारूबंदी कायदा व्हावा, यासाठी लढा चालू करणार आहोत, अशी घोषणा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी ६ नोव्हेंबर या दिवशी केली. या कायद्याचा मसुदाही सिद्ध झाला असून मुख्यमंत्र्यांनीही त्याला अनुकूलता दर्शवली आहे. तडीपारी आणि सश्रम कारावास यांची शिक्षा यांसारख्या तरतुदी या कायद्यात आहेत, असे हजारे यांनी सांगितले.

सेल्फीच्या निर्णयास शिक्षक परिषदेचा विरोध !

     मुंबई, ७ नोव्हेंबर - राज्य शासनाच्या पटपडताळणीसाठी विद्यार्थ्यांसाठी 'सेल्फी' काढण्याच्या निर्णयाला महाराष्ट्र शिक्षक परिषदेने विरोध केला आहे. त्यामुळे शिक्षण खात्याच्या निर्णयावर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या अनुपस्थितीविषयी राज्य शासन गंभीर असून त्या दृष्टीने एक पाऊल म्हणून राज्य शासनाच्या शिक्षण विभागाकडून उपस्थित विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदवण्यासाठी प्रत्येक सोमवारी शाळेचा पहिला तास हा सेल्फीचा ठेवण्यात आला आहे. 'सेल्फी'च्या निर्णयामुळे शिक्षणाची गुणवत्ता सुधारणार नसून त्यामुळे शिक्षकांवर कामांचा अतिरिक्त बोजा वाढणार आहे, असे महाराष्ट्र शिक्षक संघटनेचे म्हणणे आहे. त्यामुळे संघटनेने या निर्णयाला विरोध दर्शवला आहे.

शिक्षकांनी विद्यार्थ्यांसमवेत 'सेल्फी' काढण्याच्या निर्णयाला मनविसेचा विरोध !


     मुंबई - विद्यार्थ्यांची पटावर नोंद होण्यासाठी शिक्षकांना प्रत्येक आठवड्याला वर्गातील विद्यार्थ्यांसमवेत 'सेल्फी' काढून तो 'सरल' या प्रणालीवर 'अपलोड' करावा लागणार आहे, असा निर्णय शिक्षण विभागाने नुकताच घोषित केला आहे. या निर्णयाला महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेनेही विरोध दर्शवला असून निर्णय तातडीने रहित करण्याची मागणी केली आहे. 
     मनविसेचे पश्‍चिम महाराष्ट्र प्रभारी अधिवक्ता सचिन पवार म्हणाले की, हा निर्णय म्हणजे शिक्षकांचे काम वाढवणारा आहे. शिक्षकांना विद्यार्थ्यांसमवेत 'सेल्फी' काढण्यासाठी नवे 'स्मार्ट' भ्रमणभाष खरेदी करावे लागतील. राज्यातील बहुतेक शाळा ग्रामीण भागात असल्याने तेथे 'नेटवर्क'ची समस्या आहे. अशा निर्णयाने मराठी शाळांचा दर्जा सुधारणार नाही किंवा गुणवत्तेत भर पडणार नाही. त्यामुळे शिक्षण मंत्री आणि शिक्षण विभाग यांनी हा निर्णय रहित करावा.

फलक प्रसिद्धीकरीता

बांगलादेशातील असाहाय्य हिंदूंना वाली कोण ?
     बांगलादेशात सातत्याने हिंदूंवर आणि त्यांच्या मंदिरांवर होणार्‍या आक्रमणांमागे सुनियोजित षड्यंत्र आहे. या आक्रमणांद्वारे हिंदूंची भूमी हडपण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा निष्कर्ष बांगलादेशातील राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने काढला आहे.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Bangladeshi Hindu aur mandiropar ho rahe akraman suniyojit shadyantra hai- Bangladesh Manvadhikar Aayog
Bangladeshi Hinduoki vyatha Bharat kab samjhega

जागो ! : बांग्लादेशी हिन्दू और मंदिरों पर हो रहे आक्रमण सुनियोजित षड्यंत्र है ! - बांग्लादेश मानवाधिकार आयोग
बांग्लादेशी हिन्दुआें की व्यथा भारत कब समझेगा ?

नालासोपारा (ठाणे) येथे छटपूजेच्या कार्यक्रमात अश्‍लील नाचगाणी !

गेल्या ७० वर्षांत जनतेला धर्मशिक्षण न दिल्याचे दुष्परिणाम ! 
     नालासोपारा - येथे बहुजन विकास आघाडी पक्षाच्या हिंदु भाषिक मंडलच्या वतीने छटपूजेच्या नावाखाली आयोजित करण्यात आलेल्या मनोरंजनाच्या कार्यक्रमात अत्यंत अश्‍लील नृत्ये करण्यात आली. अनेक स्थानिक नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित होते.

धर्मनिरपेक्षतेचे राजकारण केवळ भारतातच ! - पत्रकार तुफेल अहमद

सोलापुरात ज्येष्ठ पत्रकार अरुण रामतीर्थकर स्मृती समितीकडून 'राष्ट्रनिष्ठ' या स्मृतीग्रंथांचे प्रकाशन 
 ज्येष्ठ पत्रकार कै. अरुण रामतीर्थकर स्मृती समितीच्या राष्ट्रनिष्ठ या स्मृतीग्रंथांचे प्रकाशन करतांना मान्यवर
     सोलापूर, ७ नोव्हेंबर (वार्ता.) - धर्मनिरपेक्षता याचा अर्थ सध्या पाकिस्तानी कलाकारांना बोलावणे, सैन्यावर बलात्काराचा आरोप करणार्‍यांना पाठीशी घालणे असा दिसून येत आहे. हिंदु महिलांच्या अधिकाराविषयी बोलणारे धर्मनिरपेक्षवादी मुसलमान महिलांच्या अधिकाराविषयी चिडीचूप असतात. धर्मावर आधारित बेगडी धर्मनिरपेक्षतेचे राजकारण केवळ भारतातच आहे, अशी टीका ज्येष्ठ पत्रकार आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अभ्यासक तुफेल अहमद यांनी केली. 

कुडाळ (जिल्हा सातारा) येथील मंदिरात दानपेटीची चोरी !

     कुडाळ (तालुका जावळी, जिल्हा सातारा), ७ नोव्हेंबर (वार्ता.) - सरताळे (तालुका जावळी, जिल्हा सातारा) येथील ग्रामदेवता भाकमल्ला मंदिराच्या गाभार्‍याचे कुलूप तोडून ५ नोव्हेंबरच्या रात्री चोरट्यांनी मंदिरातील मोठी दानपेटी चोरून नेली. या घटनेमुळे भाविकांमध्ये संताप आहे. (भाविकांनो, केवळ संताप व्यक्त करण्यापेक्षा चोरांना पकडण्यासाठी पोलिसांचा पाठपुरावा घ्या ! - संपादक) याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा प्रविष्ट झाला आहे. 

लोणावळा (पुणे) येथील श्री एकवीरादेवीच्या पायथा मंदिरात चोरी

राज्यातील असुरक्षित मंदिरे ! मंदिरांच्या सुरक्षेसाठी 
हिंदु राष्ट्राची (सनातन धर्म राज्याची) स्थापना करणे अपरिहार्य आहे ! 
     पुणे - येथील लोणावळ्याजवळील श्री एकवीरादेवीच्या गड पायथ्याजवळील पुरातन देवीच्या मंदिरात ५ नोव्हेंबरला रात्री चोरी झाली. अज्ञात चोरांनी मंदिराच्या लोखंडी दरवाज्यांचे कुलूप तोडून मंदिरातील २ दानपेट्या, देवीचा चांदीचा मुकुट आणि कानातील सुर्वणफुले असा ६ लक्षांहून अधिक रुपयांचा ऐवज चोरला आहे. मंदिराच्या आजूबाजूला शोधाशोध केली असता मंदिरापासून १०० मीटर अंतरावर कुलूप तोडलेल्या अवस्थेतील दानपेट्या संबंधितांना दिसल्या.

ठाणे आणि रायगड जिल्ह्यांचा ऑक्टोबर २०१६ मासातील दुसर्‍या आठवड्यातील हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचा आढावा !

धर्माभिमान्यांचा धर्मकार्यातील सहभाग 
१. दसर्‍यानिमित्त ठाणे जिल्ह्यात 
सामूहिक सोने वाटपाचे नियोजन !
     डोंबिवली, अंबरनाथ आणि ठाणे येथे चौकांमध्ये सोने वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला. येणार्‍या जाणार्‍या लोकांना दसर्‍याच्या शुभेच्छाही देण्यात आल्या. त्या वेळी दैनिक सनातन प्रभातच्या दसरा विशेषांकाचे वाटपही करण्यात आले. या वेळी ठाणे येथे हिंदु जनजागृती समितीच्या सौ. अरुणा गायकवाड यांनी उपस्थित महिलांना दसर्‍याचे शास्त्र सांगितले.

राजकारण नको, तर व्यवस्था सुधारा !

     वन रँक वन पेन्शनच्या सूत्रावरून एका माजी सैनिकाने आत्महत्या केल्यावर देहलीतील राजकीय वातावरण लगेचच तापले. या सूत्रावरून झालेल्या राजकारणाने जनता संतप्त झाली आहे. अशामुळे मूळ प्रश्‍नापासूनच लक्ष विचलित होते. ही विरोधी मंडळी केवळ स्वतःच्या प्रसिद्धीच्या वर्तुळात रममाण असतात. जनतेच्या समस्येवर आम्ही आवाज उठवला, हा दिखावा त्यांना करायचा असतो.

सामाजिक व्यवस्था विस्कळीत होऊ नये !

      बलात्कार विषयक प्रकरणे सूड उगवण्यासाठी, सतावण्यासाठी, पैसे उकळण्यासाठी आणि इतकेच नव्हे, तर पुरुषांना लग्नासाठी विवश करण्यासाठी वापरली जात आहेत.- देहली उच्च न्यायालय
    सर्वोच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय खंडपीठाने राष्ट्रीय अपराध रेकॉर्ड ब्युरोचा हवाला देतांना लिहिले आहे की, परिच्छेद ४९८ अ (हुंडाविरोधी कायदा) अन्वये वर्ष २०१२ मध्ये अनुमाने २ लक्ष लोकांना अटक करण्यात आली. त्यापैकी एक चतुर्थांश स्त्रिया होत्या. परिच्छेद ४९८ अ च्या प्रकरणांत चार्जशीटचा दर ९३.६ टक्के आहे, या उलट शिक्षेचा दर १५ टक्के आहे, जो पुष्कळच अल्प आहे. सध्या ३ लक्ष ७२ सहस्र ७०६ प्रकरणांची सुनावणी चालू आहे, ज्यातील ३ लक्ष १७ सहस्र प्रकरणांत आरोपींच्या सुटकेची शक्यता आहे. हे आकडे पाहून वाटते की, या कायद्याचा दुरुपयोग पती आणि त्याच्या नातेवाईकांना त्रास देण्यासाठी हत्याराच्या रूपात केला जात आहे. हुंडाविषयक प्रकरणांत तपासानंतरच अटक व्हावी.

ट्रम्प जिंकले तर ? हरणार कोण?

आज (८ नोव्हेंबरला) असलेल्या अमेरिकी राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने...
श्री. भाऊ तोरसेकर
१. एफ्बीआयमुळे हिलरी क्लिंटन अडचणीत !
      अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणूक आता अगदी रंगात आलेली आहे. ८ तारखेला तिथे मतदान व्हायचे असून, अखेरच्या क्षणी मतदारांना आपल्याकडे ओढण्याची शर्यत दोन्ही उमेदवारात लागली आहे. त्यासाठी आपापले बालेकिल्ले सोडून हे दोन्ही प्रमुख पक्षाचे उमेदवार मुलूखगिरीवर फिरत आहेत. अमेरिकन मतदानात प्रत्यक्ष अध्यक्षाला निवडणार्‍या मतदारसंघाची निवड होत असते. म्हणजे असे की, प्रत्येक राज्यातली मते मोजून झाल्यावर तिथे ज्याला सर्वाधिक म्हणजे पन्नास टक्क्यांहून अधिक मते मिळतील, त्याने ते राज्य जिंकले असे मानले जाते. साहजिकच त्या राज्यातील जितकी मते अध्यक्षीय मतदारसंघात असतील, ती त्या विजयी उमेदवाराला मिळून जातात. अशा प्रतिनिधींची संख्या ५३८ आहे.
     ख्रिस्ती भारतात आले, तेव्हा त्यांच्या हातात बायबल नि आमच्या हातात सत्ता होती. आता आमच्या हातात बायबल नि ख्रिस्त्यांच्या हातात सत्ता आहे. - एक विचारवंत (स्वातंत्र्यवीर दिवाळी विशेषांक, २०११)

प्रेमळ, निरागस आणि सेवेची तीव्र तळमळ असलेल्या जळगाव येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. अलका मदन ठाकरे !

सौ. अलका ठाकरे
       सौ. अलका मदन ठाकरे (वय ५५ वर्षे) यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे २ नोव्हेंबर या दिवशी घोषित करण्यात आले. त्यांच्याविषयी त्यांच्या नातेवाइकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत. 
१. आतिथ्यशील 
       पूर्वी आमच्या घरी सतत पाहुणे येत असत. पाहुणे आल्यावर आई उत्साहाने त्यांच्या आवडीचे जेवणखाण बनवत असे. त्यांना हवे-नको ते पहात असे. आमच्याकडे येणारे पाहुणे नेहमी म्हणायचे, जेवणाच्या ताटात एवढे पदार्थ असतात की, कुठून जेवण चालू करावे ?, हे कळत नाही. सर्वच जेवण रूचकर असते. 
२. लहानपणापासूनच दायित्व घेऊन 
कामे करणे आणि सर्वांशी जुळवून घेणे 
       आईचा जन्म ७० जणांच्या मोठ्या कुटुंबात झाला. त्यामुळे तिला लहानपणापासूनच जुळवून घेण्याची सवय होती. तिच्या मोठ्या दोन बहिणींची लग्ने झाल्यावर घरातील कामांचा बराच भार आईवर आला. ती पाचवीत जायला लागल्यापासून ७० जणांचे जेवण बनवत असे. त्यासाठी तिला पहाटे ३ वाजता उठावे लागे. 
       लग्नानंतरही तिला मोठे घर मिळाले. घरात सासू-सासरे, ५ दीर अन् ५ जावा होत्या. तेथेही ती दायित्व घेऊन सर्व कामे करत असे. 

अनेक सिद्ध संत असले, तरी अवतारस्वरूप गुरु केवळ एकच आहेत आणि ते म्हणजे प.पू. डॉक्टर !

महर्षींची शिकवण आणि कार्य !
१. गुरु आणि त्यांच्यासोबतच्या दोन 
शिष्या - कार्तिकपुत्री आणि उत्तरापुत्री यांच्यामुळेच 
अध्यात्मप्रसाराचे कार्य होणार आहे, असे महर्षींनी सांगणे
     महर्षि म्हणतात, आम्ही जे साधनेविषयी तुम्हाला सांगतो, ते सर्व तुम्ही करता; म्हणून तुमच्या गुरूंना जे द्यायचे आहे, ते आम्हाला देता येते. याचे कारणकर्ता तुम्हीच आहात. एकच छोटेसे बीज असते, त्यातूनच झाड आणि फुले-फळे येतात. तसेच सूर्यकांतीचे फूल. याच्यामध्येच बीज असते. हे अद्भूत नाही का ? सूर्यदशेत तुमचा जन्म झाला. आध्यात्मिक प्रवासाला आरंभ करून बराच काळ झाला; पण तुम्ही आताच माझ्याकडे आलात ! मला हे तीनच जण ठाऊक आहेत आणि तेच मला हवेत. गुरु आणि त्यांच्या सोबतच्या दोन शिष्या - कार्तिकपुत्री आणि उत्तरापुत्री यांच्यामुळेच अध्यात्मप्रसाराचे कार्य होणार आहे. अनेक सिद्ध संत असले, तरी अवतारस्वरूप गुरु केवळ एकच आहेत आणि ते म्हणजेच तुमचे गुरु !

सुट्यांमध्ये आश्रमात राहून स्वतःमध्ये आमूलाग्र पालट घडवून आणणारा ५३ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला कु. यदुवीर सुनील मेहता (वय १० वर्षे) !

उच्चलोकांतून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे 
हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. यदुवीर सुनील मेहता एक दैवी बालक आहे !
कु. यदुवीर मेहता
      (कु. यदुवीरची वर्ष २०११ मध्ये आध्यात्मिक पातळी ५१ टक्के होती. - संकलक)
    आपल्या मुलाच्या आध्यात्मिक प्रगतीची काळजी वाटणार्‍या पालकांना हा लेख वाचून मुले कशी पालटू शकतात आणि तेव्हा आपण त्यांच्याशी कसे वागले पाहिजे, हे लक्षात येईल. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले 
पालकांनो, हे लक्षात घ्या ! 
    तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले
       माझा मुलगा कु. यदुवीर हा १० वर्षांचा आहे. तो ३ - ४ वर्षांचा असतांना एक संत म्हणाले होते, तो १२ वर्षांचा झाल्यानंतर त्याचा आध्यात्मिक त्रास उणावेल आणि त्यानंतर जीवनात काय करायचे ?, हे त्याचे तो ठरवू शकेल. या वर्षी त्याची परीक्षा झाल्यानंतर सुटीत तो रामनाथी आश्रमात रहाण्यासाठी आला होता. त्या वेळी त्याच्या वागण्यात झालेले पालट प्रकर्षाने मला जाणवले. ते पुढीलप्रमाणे आहेत.

कु. सर्वमंगला मेदी हिने प्रार्थना करून सहा घास काढून ठेवल्यावर जेवण्यापूर्वी कृष्णाचे स्मरणही न केल्याची खंत वाटणे, आता उष्टे अन्न त्याला कसे द्यायचे, असा विचार मनात येणे, कृष्णाला प्रार्थना केल्यावर त्याने वाडग्यातील एक घास खाऊन तू माझे लेकरूच असल्याने तुझे उष्टे मी आनंदाने खाऊ शकतो, असे सांगणे, त्या वेळी गहिवरून येणे आणि ३ - ४ घंटे भावावस्थेत जाणे

सौ. शालिनी मराठे
        मला फारच भूक लागली होती; पण पोळी-भाजी खावीशी वाटत नव्हती; म्हणून एका वाडग्यात आमटी -भात आणि ताटलीत आवळ्याचे लोणचे घेऊन मी भोजनकक्षात शेवटच्या पटलावर जेवायला बसले. तेवढ्यात ताटात जेवण (महाप्रसाद) वाढून घेऊन कु. सर्वमंगला मेदी आली आणि माझ्या शेजारी जेवायला बसली. तिने प्रार्थना केली आणि पोळी-भाजीचे ६ घास (चित्राहुती) ताटात एका कडेला काढून ठेवले. ते पाहून मी तिला विचारले, एवढे घास कुणासाठी ? त्यावर ती म्हणाली, पहिला प.पू. डॉक्टरांसाठी, दुसरा श्रीकृष्णासाठी, तिसरा प.पू. भक्तराज महाराज यांच्यासाठी, चौथा सद्गुरु (सौ.) बिंदाताईंसाठी, पाचवा सद्गुरु (सौ.) अंजलीताईंसाठी, सहावा धर्म आणि राष्ट्र यांचे कार्य करणार्‍यांसाठी. हे तिचे बोलणे ऐकून माझा भाव जागृत झाला आणि मला जाणीव झाली, मी जेवण्यापूर्वी श्रीकृष्णाचे स्मरणही केले नाही, तर घास कुठला भरवणार ! अधाशाप्रमाणे भराभरा जेवायला लागले. आता वाडग्यातले अन्न उष्टे झाले. मला अंतर्मनातून पुष्कळ खंत वाटली. 

सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ आणि सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या सद्गुरुपद प्राप्तीमागील पार्वतीमातेने उलगडलेले रहस्य !

श्री. श्रीकांत भट
१. पू. (सौ.) अंजलीताई गाडगीळ यांचे 
पृथ्वीवरील कार्य पूर्णत्वाला गेले असून इतर 
सूक्ष्म लोकांतील साधना अपूर्ण राहिलेल्या जिवांना साहाय्य 
करण्यासाठी ईश्‍वराने त्यांना सद्गुरुपदी लवकर विराजमान केलेे असणे
      सनातन संस्थेचे कार्य सप्त लोकांच्या पलीकडे जाण्याच्या सिद्धतेत आहे. ब्रह्मदेवाने पृथ्वीवर सनातनच्या साहाय्यार्थ पाठवलेल्या दोन शक्तींपैकी एका शक्तीचे, म्हणजेच पू. (सौ.) अंजलीताई गाडगीळ (ज्या महालक्ष्मीचे सगुण रूप आहेत आणि ज्यांच्यात महालक्ष्मीची शक्ती वास करते.) यांचे पृथ्वीवरील कार्य पूर्णत्वाला गेले आहे. त्यांना आता पृथ्वीवरील साधकांपेक्षा इतर सूक्ष्म लोकांतील साधना अपूर्ण राहिलेल्यांच्या (चांगले लिंगदेह, चांगल्या शक्ती, तसेच ऋषी-मुनी, साधु-संत यांचे लिंगदेह यांच्या) साहाय्याला जाण्यासाठीच ईश्‍वराने त्यांना सद्गुरुपदी लवकर विराजमान केले आहे. आता त्यांचा भू लोकाशी फारच अल्प संपर्क असेल !

सौ. अलका ठाकरे यांंच्याविषयी जळगाव येथील साधकांना जाणवलेली सूत्रे

१. पातळी घोषित होण्यासंदर्भात 
साधकांना मिळालेल्या पूर्वसूचना 
अ. ठाकरेकाकूंना सलग २ वर्षे गुरुपौर्णिमा महोत्सवात गुरुपूजन करण्याची संधी मिळाली. यावर्षी (२०१६) गुरुपौर्णिमेच्या वेळी वाटले, काही दिवसांतच काकू ६१ टक्के पातळी गाठतील. (१९.७.२०१६)
आ. ठाकरेकाकू आणि आम्ही एकत्रच सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात गेलो होतो. तेथे संतांचा सत्संग मिळाला. त्या वेळी काकू स्थिर आणि शांत वाटल्या आणि लवकरच काकूंची ६१ प्रतिशत पातळी घोषित होईल, असे वाटले. (२८.१०.२०१६)
- श्री. उदय बडगुजर, जळगाव 
इ. २.११.२०१६ या दिवशी सकाळी ठाकरेकाकूंची आध्यात्मिक पातळी घोषित होईल, असा विचार मनात येऊन सत्काराच्या कार्यक्रमात त्यांची कोणती गुणवैशिष्ट्ये सांगायची, हे मी ठरवले. प्रत्यक्षात त्याच दिवशी दुपारी सत्संगात काकूंनी ६१ टक्के पातळी गाठल्याचे घोषित झाले. 
- सौ. वेदांती बडगुजर, जळगाव

आजारी असतांनाही सेवेची संधी आणि निरपेक्षतेचा आनंद मिळाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणार्‍या सांगली येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. विद्या जाखोटीया !


सौ. विद्या जाखोटीया
     प्रत्येक जण नातेवाइकांकडे जातो. नातेवाइकांकडे गेल्यावर त्यांनाही साधना कशी सांगता येईल, याचा एक आदर्श सौ. विद्या जाखोटीया यांनी सर्वांसमोर ठेवला आहे. त्यांचे अभिनंदन ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले
    माझ्या मामेभावाचा मुलगा फिजिओथेरपिस्ट असल्याने मी मला होत असलेल्या गुडघेदुखीच्या त्रासासाठी नांदेडला (माहेरी आणि आजोळी) गेले होते. मी रुग्णाईत असल्याने प्राप्त परिस्थितीत वर्तमानात रहायचे, दिसेल ते कर्तव्य हा भाव ठेवायचा, जे करायचे ते भावपूर्ण करायचे आणि घरातल्या माणसांना आनंद द्यायचा, असे ध्येय ठरवून गेले होते. 
१. भावाचा वाढदिवस शास्त्रानुसार साजरा करणे
१ अ. भावाचे औक्षण करून रामरक्षास्तोत्रातील काही श्‍लोक म्हणणे : मी नांदेडला माझ्या आजोळी गेले, त्या दिवशी माझ्या मोठ्या भावाचा वाढदिवस होता. त्याच्यासाठी काहीतरी आनंदमय करूया, या विचारांनी प्रेरित होऊन रात्री सर्वांची जेवणे झाल्यावर एकत्रित बसून त्याचा वाढदिवस साजरा करायचे ठरवले. सर्व जण एकत्र आल्यावर आम्ही भावाचे औक्षण करून रामरक्षास्तोत्रातील काही श्‍लोक म्हटले.

प.पू. डॉक्टर आणि सनातनचे काही संत यांच्या प्रमुख कार्यानुसार त्यांच्या गुरुत्वाची ओळख !

पू. संदीप आळशी
प.पू. डॉक्टर : मोक्षगुरु
सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ : धर्मगुरु
सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ : साधनागुरु
पू. चारुदत्त पिंगळे : राष्ट्रगुरु
सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर आणि पू. नंदकुमार जाधव : प्रसारगुरु
पू. मुकुल गाडगीळ : उपायगुरु
- (पू.) श्री. संदीप आळशी
पू. संदीप आळशी : ग्रंथगुरु - (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

होऊया मुक्त माया-पाशातूनी ।

दीपावलीच्या शुभदिनी या ।
करतो वंदन तुम्हा गुरुराया ॥ १ ॥
धनत्रयोदशीच्या दिवशी या ।
तन-मनाच्या आरोग्यास सजवूया ॥ २ ॥
नरकचतुर्दशीच्या दिनी ।
चिरडूया दोष अन् अहं यांना गुणांनी ॥ ३ ॥
होऊया मुक्त दोष-अहंच्या जाळ्यातूनी ।
भाऊबीजेच्या या दिनी ॥ ४ ॥
श्रीकृष्णाला ओवाळूनी ।
होऊया मुक्त माया-पाशातूनी ॥ ५ ॥
- तुमच्या चरणी अर्पण, 
तुमच्या वैभवी, ऐश्‍वर्या, अमृता आणि मानसी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२९.१०.२०१६)
(कु. वैभवी झरकर (वय ११ वर्षे), कु. ऐश्‍वर्या जोशी (वय १२ वर्षे), कु. अमृता मुद्गल (वय १४ वर्षे) आणि कु. मानसी प्रभु (वय १५ वर्षे)) 

देवाधिदेवा, पदरात घ्यावे चुकांसहित !

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले 
यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...
देवा (टीप १), का दूर आहात ? 
कळत नाही या वेड्याला । 
झाल्या चुका अनंत ।
देवाधिदेवा, पदरात
घ्यावे चुकांसहित ॥ १ ॥
सुधारून घ्याव्यात चुका
मजकडूनी । 
हा तर आपलाच अधिकार ।
देवा, हवे केवळ तुमचे चरण । 
दृष्टीक्षेपात करावे विलीन त्यात ॥ २ ॥
नकोत मजसी टक्के साठ ।

दर्शकांना अमूल्य ज्ञान देणार्‍या धर्मसत्संगांचे केबल अथवा दूरचित्रवाणी यांवरून प्रसारण केल्याचा आढावा पाठवावा !

जिल्हासेवक आणि साधक यांच्यासाठी महत्त्वाची सूचना !

     सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती निर्मित धर्मसत्संग, म्हणजे दर्शकांना विविध विषयांचे ज्ञानामृत पाजणारे अनमोल भांडार ! अध्यात्म आणि धर्माचरण यांविषयीची माहिती या धर्मसत्संगातून सर्वसामान्यांपर्यंत पोचते.
     विविध धर्मसत्संगांच्या संगणकीय मार्गिका (लिंक) काही दिवसांपूर्वी सर्व जिल्ह्यांना पाठवण्यात आल्या होत्या. त्यानुसार सर्वत्र केबल अथवा दूरचित्रवाणी यांवरून प्रसारण चालू झाले आहे. अधिकाधिक दर्शकांना या धर्मसत्संगाचा लाभ घेता यावा, यासाठी त्या संदर्भातील माहिती दैनिक सनातन प्रभातमध्ये प्रसिद्ध करायची आहे. त्यासाठी धर्मसत्संगांचे प्रसारण केल्याचा विवरणात्मक आढावा पुढील सारणीनुसार avmagani@gmail.com या संगणकीय पत्त्यावर प्रत्येक मासाच्या (महिन्याच्या) १० दिनांकापर्यंत पाठवावा. ऑक्टोबरचा आढावा १० नोव्हेंबरपर्यंत पाठवावा. काही अडचणींमुळे हे प्रसारण बंद झाल्यास त्याची सविस्तर माहितीही वेळोवेळी पाठवावी.
 
    या संदर्भात काही अडचणी असल्यास रामनाथी आश्रमात सौ. वृंदा मराठे यांना ०८४५१००६०८५ या क्रमांकावर संपर्क करावा.

सनातन आश्रमांच्या नूतनीकरणाकरता पुढील साहित्याच्या खरेदीसाठी धनरूपात साहाय्य करा !

सर्वत्रचे वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांना नम्र विनंती !
    सनातनचे आश्रम म्हणजे हिंदु धर्माच्या पुनर्प्रतिष्ठेसाठी अविरत झटणार्‍या साधकांची आध्यात्मिक शाळाच ! आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करण्यास आणि राष्ट्र-धर्माच्या कार्याला हातभार लावण्यासाठी इच्छुक साधक अन् धर्माभिमानी यांची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. रामनाथी आणि देवद येथील आश्रम, तसेच मंगळुरू (कर्नाटक) अन् कुडाळ येथील सेवाकेंद्रे यांचे नूतनीकरण (renovation) करणे चालू आहे. त्यासाठी पुढील साहित्याची तातडीने आवश्यकता आहे. 
     जे वाचक, हितचिंतक अथवा धर्माभिमानी वरील साहित्य विकत घेण्यासाठी धनरूपात साहाय्य करू इच्छितात, त्यांनी श्री. गौतम गडेकर यांना vaastunirmiti@gmail.com या संगणकीय पत्त्यावर अथवा पुढील टपालाच्या पत्त्यावर किंवा ०८४५१००६२३२ या क्रमांकावर संपर्क साधावा.

विसरणार नाही हा भावसोहळा ।

अजून किती गाऊ गुणगान तुझे देवा । 
लय करून घेतला दोष-अहंचा ॥ १ ॥
कशी तुझ्या चरणी आले कळलेच नाही मला ।
त्रासांवर मात करून घेतली तू देवा ॥ २ ॥
प्रयत्न करवून घेतले भाव तळमळ वाढविण्या ।
सांग ना रे देवा, कशी आले मी तुझिया चरणा ॥ ३ ॥
तूच कर्ता करविता आहेस देवा ।
तन-मन-धन अर्पियले तुझिया चरणा ॥ ४ ॥
लागला तुझ्या चरणांचा ध्यास या जिवाला ।
पातळी घोषित झाली अन् वाहिले भावाश्रू तव चरणा ॥ ५ ॥
किती किती कृतज्ञता वाहिल्या ।
तरी अल्पच आहे देवा ॥ ६ ॥
विसरणार नाही हा भावसोहळा ।
अखंड राहू दे तुझिया चरणा ॥ ७ ॥ 
- श्रीमती उषा बडगुजर, जळगाव (२.११.२०१६)

तुजमुळे सार्थक झाले या जन्माचे ।

सौ. स्वराली पाध्ये
प्रेम देऊनी मातेचे ।
पालकत्व घेतले सर्व साधकांचे ॥
मार्ग दाव तू (टीप १) आम्हा मोक्षद्वाराचे ।
तुजमुळे सार्थक झाले या जन्माचे ॥
टीप १ - सद्गुरु सौ. बिंदाताई
- देवाची स्वराली 
(सौ. स्वराली आेंकार पाध्ये), 
सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.११.२०१६) 

विनायकाचे कार्य

श्री. विनायक शानभाग
जसे श्री गणेश माध्यम आहेत ।
आपली भाषा देवतांपर्यंत पोचवण्यासाठी ॥
तसे विनायकदादा (टीप १) माध्यम आहेत ।
आपली भाषा महर्षिंपर्यंत पोचवण्यासाठी ॥
म्हणूनच देवाने दादांचे नाव विनायक ठेवले असावे.
टीप १ - श्री. विनायक शानभाग
- कु. सुखदा गंगाधरे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.११.२०१६)
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥ 

या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
दिशा
माझ्याकडे उत्तर आहे; कारण मी दक्षिणेकडे पाठ फिरविली आहे.
भावार्थ अ : दक्षिण दिशा यमलोकाची आहे. तिच्याकडे पाठ फिरविली आहे म्हणजे मी उत्तरेकडे, यमलोकापासून दूर जात आहे. माझ्याकडे यमलोक कसा चुकवायचा, या प्रश्‍नाचे उत्तर आहे, या अर्थी माझ्याकडे उत्तर आहे, हे वाक्य आहे.
भावार्थ आ : पूर्व दिशा ज्ञानयोगाची, पश्‍चिम कर्मयोगाची, दक्षिण शक्तीयोगाची आणि उत्तर भक्तीयोगाची आहे. या संदर्भात मी शक्ती-उपासक नसून भक्तीमार्गी आहे, हे सुचविले आहे.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
राष्ट्र-धर्मासाठी आध्यात्मिक स्तरावरही कार्य करणे अत्यावश्यक !
     शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक स्तरांवर राष्ट्र-धर्मासाठी कार्य करून काही साध्य होत नाही, हे गेल्या ७० वर्षांत अनेकदा सिद्ध झाले आहे. आता त्यांच्या जोडीला आध्यात्मिक स्तरावरही कार्य करणे अत्यावश्यक आहे, हे सर्वांनी लक्षात घेणे आवश्यक आहे. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले


बोधचित्र


वेळेचे मूल्य-मापन करावे !

प.पू. पांडे महाराज यांचे अनमोल विचारधन
प.पू. पांडे महाराज
      प्रत्येक वेळेचे मूल्य-मापन झाले पाहिजे. आपला वेळ चालत रहातो. जन्म होणे ही संधी आहे. मृत्यू कधी येणार, हे ठाऊक नाही. त्यामुळे आपल्या हाती किती वेळ आहे, ते निश्‍चित नाही. त्यामुळे मिळालेल्या वेळेचा, संधीचा उपयोग करून उन्नतीसाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. 
- प.पू. परशराम पांडे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (५.१०.२०१४)


व्यष्टी आणि समष्टी साधना एकमेकांना पूरक !

१. व्यष्टी साधना
     ही साधना करणार्‍यांची पातळी ८० टक्के होईपर्यंत त्यांचे लक्ष स्वतःच्या प्रगतीकडेच असते. त्यापुढे गेल्यावर त्यांच्याकडून त्यांच्या नकळत समष्टीतील कार्य त्यांच्या अस्तित्वाने होऊ लागते. ईश्‍वराच्या केवळ अस्तित्वाने अनंत कोटी ब्रह्मांडांचे कार्य चालू असते, त्याप्रमाणे कार्य व्हायला लागते. 
२. समष्टी साधना
      काही जणांना वाटते की, व्यष्टी साधना करण्यापेक्षा समष्टी साधना करणे, म्हणजे अधिकाधिक जणांनी साधना करावी, म्हणजे मायेत अडकलेले लोक सात्त्विक व्हावेत, यासाठी प्रयत्न करणे अधिक महत्त्वाचे आहे; कारण तिच्यामुळे व्यापकत्व येते. येथे हे लक्षात घेतले पाहिजे की, व्यष्टी साधनेचा पाया चांगला असल्याशिवाय समष्टी साधना नीट होत नाही. व्यष्टी साधना नसल्यास ते जे करतात, ती समष्टी साधना न होता केवळ कार्य होते आणि त्याला भगवंताचा आशीर्वाद नसल्याने त्याची फलनिष्पत्तीही अल्प असते.
     थोडक्यात असे म्हणता येईल की, जलद आध्यात्मिक उन्नतीसाठी व्यष्टी आणि समष्टी या दोन्ही साधना एकमेकांना पूरक आहेत. 
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

खरे ज्ञान 
माणूस जेव्हा खरे ज्ञान प्राप्त करतो, तेव्हा त्याला कळते की, 
मी विश्‍वातील अमर्याद ज्ञानभांडारातील अत्यल्प असे ज्ञान प्राप्त केले आहे.
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

प्रदूषणावर चिनी उपाय !

संपादकीय
     देहलीत वायू प्रदूषणाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. यावर तात्काळ उपाययोजना म्हणून आप शासनाने शाळा बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे, तसेच नवीन बांधकामेही काही दिवस बंद ठेवण्यात आली आहेत. या सर्व उपाययोजनांबाबत पर्यावरणवादी मात्र समाधानी नाहीत. एकतर या उपाययोजना वरवरच्या आहेत आणि त्यांच्या कार्यवाहीस विलंब झाला आहे, असे अनेकांचे मत आहे. देहलीतील प्रदूषण ही काही आताच उद्भवलेली समस्या आहे, असे नाही. मागील वीस वर्षांत टप्प्याटप्प्याने ही समस्या बळावत गेली आहे. वास्तविक देशाचा मानबिंदू असणार्‍या राजधानीतील प्रदूषणाच्या निवारणासाठी तात्काळ पावले उचलली जात नाहीत, हेच लज्जास्पद म्हणावे लागेल.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn