Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कोटी कोटी प्रणाम !

श्री चंद्रशेखरानंद पुण्यतिथी, मध्यप्रदेश
श्री चंद्रशेखरानंद यांच्या पुण्यतिथी 
निमित्ताने अधिक लिखाण खाली वाचा 
 
-----------------------------

 
सनातनचे २७ वे संत
पू. डॉ. वसंत (अप्पा) आठवले पुण्यतिथी
पू. डॉ. वसंत आठवले यांच्या तृतीय पुण्यतिथी 
निमित्ताने अधिक लिखाण खाली वाचा

प्रदर्शनाद्वारे छत्रपती शिवाजी महाराज यांनी निर्माण केलेला ऐतिहासिक वारसा जपण्याचा प्रयत्न !

पुणे येथे श्री शिवदुर्ग संवर्धनच्या वतीने आयोजित 
गडकिल्ले आणि दुर्ग संवर्धन यांचे छायाचित्र प्रदर्शन
      पुणे, ६ नोव्हेंबर ( वार्ता.) - गडकोट हीच राजलक्ष्मी, गडकोट हीच संपत्ती, या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेला अनुसरून श्री शिवदुर्ग संवर्धन संस्थेद्वारे विविध किल्ल्यांवर संवर्धनात्मक कार्य केले जात आहे. गड किल्ल्यांविषयी आपुलकी आणि अभिमान निर्माण व्हावा, तसेच त्यांचा वारसा जपण्यासाठी सर्व इतिहासप्रेमींनी या कार्यात सहभाग घ्यावा, यासाठी संस्थेच्या वतीने येथील बालगंधर्व रंगमंदिरातील कलादालनामध्ये छायाचित्र प्रदर्शन भरवण्यात आले आहे. शिवदुर्ग संवर्धनचे अध्यक्ष श्री. पंडित अतिवाडकर, उपाध्यक्ष राजेश नेळगे, सचिव विनायक रेणके आणि इतर कार्यकर्ते यांच्या वतीने प्रदर्शन आयोजित केले आहे. हे प्रदर्शन ४ ते ७ नोव्हेंबर या कालावधीत सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत सर्वांना विनामूल्य पहायला मिळणार आहे.
      प्रदर्शन, तसेच संस्थेचे कार्य यांविषयी बोलतांना श्री. विनायक रेणके म्हणाले की, सध्याची किल्ल्यांची दुरवस्था पहाता छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारसा जपण्यासाठी इतिहासप्रेमींनी पुढे येणे आवश्यक आहे. आम्ही वर्ष २००९ पासून हे गड संवर्धनाचे कार्य चालू केले. गडांची स्वच्छता करतांना काही ऐतिहासिक पुरावेही आम्हाला सापडले; मात्र त्यांचे जतन होणे आवश्यक आहे. पुरातत्व विभागाच्या अनुमतीने सध्या किल्लेे राजगड, तिकोना, रोहिडा आणि बहादूरगड अशा अनेक किल्ल्यांची २०० हून अधिक कार्यकर्त्यांद्वारे स्वच्छता आणि संवर्धन केले जात आहे.

बांगलादेशमधील हिंदूंना साहाय्य करणार ! - सुषमा स्वराज

जगात कोठेही हिंदूंवर आक्रमण झाले की, 
भारत सरकारकडून त्वरित प्रतिक्रिया व्यक्त 
होणे अपेक्षित आहे, तसे होत नाही हे हिंदूंचे दुर्दैव !
       नवी देहली - बांगलादेशातील हिंदूंवर होणार्‍या अत्याचारांवर भारताच्या पराराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी अखेर चिंता व्यक्त केली आहे. तसेच हिंदूंना साहाय्य करण्याचे आश्‍वासन दिले आहे. ट्वीटरवरील एका नागरिकाने याविषयी विचारलेल्या प्रश्‍नावर स्वराज यांनीही चिंता व्यक्त केली. (सुषमा स्वराज यांनी स्वतःहून याविषयी भारतातील हिंदूंना आणि बांगलादेशातील हिंदूंना आश्‍वस्त करण्यासाठी सार्वजनिक स्तरावर विधान करणे आवश्यक होते; मात्र निधर्मी राज्यव्यवस्थेच्या नावाखाली त्यांनी हे टाळले, असेच जनतेला वाटत आहे. शेवटी प्रश्‍न विचारल्यावर त्यांनी उत्तर दिले, यावरच हिंदूंनी समाधान मानायला हवे ! - संपादक)
       सुषमा स्वराज यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये लिहिले आहे की, बांगलादेशातील भारतीय उच्चायुक्तांना बांगलादेशाच्या पंतप्रधानांना संपर्क करून त्यांच्याकडे भारतीय शासनाला वाटत असलेली चिंता व्यक्त करण्यास सांगितले आहे. भारत सरकार बांगलादेशमध्ये रहाणार्‍या हिंदूंच्या सुरक्षेविषयी चिंतीत आहे.
       काही दिवसांपूर्वी बांगलादेशातील ब्राह्मणबाडिया जिल्ह्यातील नसीरनगरात हिंदूंच्या १५ मंदिरांची तोडफोड करण्यात आली होती. तसेच दीडशे घरे जाळण्यात आली होती. यात दीडशेहून अधिक हिंदू घायाळ झाले होते. या घटनेनंतर दहशतीखाली असणार्‍या काही हिंदु परिवारांनी येथून पलायन केले आहे.

टिपू सुलतान जयंतीला विरोध करणार्‍या ३१ हिंदुत्वनिष्ठ नेत्यांना १० लक्ष रुपयांचा बाँड भरण्याचा आदेश !

कर्नाटकातील टिपूचे वंशज 
असणार्‍या काँग्रेस सरकारची दडपशाही !
      पुत्तूर (कर्नाटक) - १० नोव्हेंबरला साजरी करण्यात येणार्‍या टिपू सुलतान जयंतीच्या पार्श्‍वभूमीवर पुत्तूरचे तहसीलदार अनंत शंकर यांनी ३१ हिंदुत्वनिष्ठ नेत्यांकडून १० लक्ष रुपयांचा बाँड भरून घेण्याचा आदेश दिला आहे. गेल्या वर्षी टिपू जयंती उत्सवाच्या वेळी दंगल उसळल्याने सार्वजनिक मालमत्तेची हानी झाली होती. या वेळी त्याची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी तहसीलदाराने हा आदेश काढला आहे. टिपू जयंतीला विरोध करणार्‍या नेत्यांची नावे तहसीलदारांनी मागवून घेतली आहेत. बाँड भरण्यास नकार देणार्‍या हिंदु नेत्यांना टिपू सुलतान जयंती साजरी होईपर्यंत कारागृहात पाठवले जाईल, असे तहसीलदारांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. तहसीलदार अनंत शंकर यांनी पत्रकारांशी बोलतांना खबरदारीचा उपाय म्हणून हा आदेश देण्यात आला आहे. तालुक्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी ही उपाययोजना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
      बाँड भरण्याविषयीच्या राज्य सरकारच्या आदेशाचा हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी निषेध केला आहे. हा आदेश मागे घेण्याची मागणीही हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी केली आहे.
      टिपू सुलतान जयंती विरोधी तालुक समितीचे प्रवक्ते शिवरंजन म्हणाले की, राज्य सरकारचा आदेश हिंदुविरोधी आहे. सरकारच्या कार्यक्रमात बाँडची मागणी करणे हे अर्थहीन आहे.

पतित पावन संघटनेच्या वतीने आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन !

वासुदेव बळवंत फडके यांच्या
पुतळ्याला पुष्पहार घालतांना कार्यकर्ते

       पुणे, ६ नोव्हेंबर - आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांची ४ नोव्हेंबर या दिवशी जयंती होती. त्यानिमित्ताने पतित पावन संघटना, पुणे शहर यांच्या वतीने येथील राज्य गुन्हे अन्वेषण विभाग कार्यालय येथे असलेल्या आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या स्मारकाची स्वच्छता करण्यात आली. पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी वासुदेव बळवंत फडके यांच्या नावाचा जयघोष केला आणि बलिदानाचे स्मरणही केले. या प्रसंगी संघटनेचे पुणे शहराचे सरचिटणीस सर्वश्री मनोज नायर यांच्यासह संघटनेचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

बांगलादेशात हिंदूंवर पुन्हा आक्रमण !

  • भारतात हिंदु राष्ट्राची स्थापना झाल्यानंतरच बांगलादेशासहित जगभरातील हिंदूंचे रक्षण होईल !
  • २ मंदिरांची तोडफोड, ६ घरांची जाळपोळ !
      ढाका - काही दिवसांपूर्वी ब्राह्मणबाडिया जिल्ह्यातील नसीरनगरात ३ सहस्र धर्मांधांकडून हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमण झाल्यानंतर पुन्हा एकदा ५ नोव्हेंबरला हिंदूंवर आक्रमण करण्यात आले. या वेळी २ मंदिरांची तोडफोड करण्यात आली, तसेच हिंदूंच्या ६ घरांना आग लावण्यात आली. येथील पोलीस आयुक्त रिजवान-उर-रहमान म्हणाले की, आक्रमणकर्त्यांना पकडण्यासाठी ठिकठिकाणी छापे घातले जात आहेत. आतापर्यंत ३० हून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे. ४ नोव्हेंबरला येथे सर्वधर्मियांनी एक मोर्चा काढला होता. त्याद्वारे त्यांनी हिंदूंवर झालेल्या आक्रमणाचा विरोध दर्शवला. तसेच आक्रमणकर्त्यांना अटक करण्याची मागणीही करण्यात आली.

जम्मू-काश्मीरमध्ये नियंत्रणरेषेवर वर्ष २००१ पासून ४ सहस्र ५०० सैनिक हुतात्मा !

युद्धबंदीच्या काळात सैनिक हुतात्मा 
होऊ देणारा जगातील एकमेव देश भारत !
       नवी देहली - जम्मू-काश्मीरमध्ये नियंत्रणरेषेवर पाकिस्तानने युद्धबंदीचे उल्लंघन केल्याने वर्ष २००१ पासून आतापर्यंत ४ सहस्र ५०० पेक्षा अधिक भारतीय सैनिक हुतात्मा झाले आहेत. बडोदास्थित पंकज दर्वे यांनी माहिती अधिकाराखाली केलेल्या एका अर्जाला उत्तर देतांना सैन्यदलाने ही माहिती दिली आहे.
       गेल्या १५ वर्षांत आतंकवादी आक्रमणांमध्ये १ सहस्र १७४ भारतीय सैनिक हुतात्मा झाले. वर्ष २००१ पासून आतापर्यंत ७ सहस्र ९०८ आतंकवादी आक्रमणे झाली आहेत. यामध्ये पठाणकोट आणि उरी आक्रमणांचा समावेश आहे, असे अधिकृत आकडेवारीवरून स्पष्ट होते.
       सप्टेंबर २०१६ मध्ये झालेल्या उरी आतंकवादी आक्रमणानंतर युद्धबंदीच्या उल्लंघनाविषयी अधिक चर्चा चालू झाली. कारगिल युद्धानंतर पाकने युद्धबंदीचे उल्लंघन करून नियंत्रणरेषेवर गोळीबार चालूच ठेवला. या आक्रमणात हुतात्मा झालेल्या भारतीय सैनिकांचा आकडा मोठा आहे. तसेच यातून सीमेवर भारतीय सैनिक हुतात्मा होतात, हे उघड झाले आहे; मात्र त्याविषयी जनतेला सर्व घटना कळवल्या जात नाहीत.

पीडीपी-भाजप सरकार दगडफेकीच्या प्रकरणांत नरमाईचे धोरण राबवणार !

अशाने आतंकवाद कधीतरी न्यून होईल का ?
       श्रीनगर - काश्मीरमध्ये गेल्या काही महिन्यांपासून दगडफेकीच्या प्रकरणात पोलिसांनी अनेक युवकांना अटक केली आहे; मात्र आता पीडीपी-भाजप सरकारच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी या युवकांच्या अटकेची नव्याने समीक्षा करण्याचे सुतोवाच केले आहे. त्याद्वारे त्यांच्या विरोधात नरमाईचे धोरण राबवण्यात येणार आहे.
       मेहबुबा यांनी प्रशासकीय अधिकारी आणि पोलीस अधिकारी यांच्या बैठकीत सांगितले की, प्रथमच अटक झालेल्या युवकांच्या पालकांना सांगून त्यांच्याकडून तो युवक भविष्यात पुन्हा दगडफेक करणार नाही, असे वचन घेतले जाईल. (हास्यास्पद उपाय योजणारे सरकार ! - संपादक) यापुढे अशांना अटक करण्यात येणार नाही. येथील स्थिती नियंत्रणात येण्यासाठी नागरिकांच्या प्रती सहानुभूती दाखवणे आवश्यक आहे. त्यांना आंदोलनाच्या काळात भोगाव्या लागलेल्या त्रासासाठी आधार दिला पाहिजे. पोलिसांना नागरिकांमध्ये विश्‍वास निर्माण करण्यासाठी योजना बनवण्याचा आदेशही त्यांनी दिला. (आतंकवाद्यांच्या संदर्भात मेहबुबा यांचे हृदय जसे द्रवते, तसे आतंकवादपीडितांची स्थिती पाहून का द्रवत नाही ? - संपादक)

नाशिक महानगरपालिकेकडून ८४ अनधिकृत धार्मिक स्थळांना नोटिसा !

महंत आणि राजकीय नेते 
यांचा धार्मिक स्थळे हटवण्यास विरोध
      नाशिक - येथील महापालिकेने शहरातील ८४ अनधिकृत धार्मिक स्थळांना नोटिसा बजावल्यानंतर ७ नोव्हेंबरपासून पोलीस अधिकार्‍यांसमवेत होणार्‍या बैठकीत या संदर्भातील कारवाईची रूपरेषा निश्‍चित केली जाईल. विश्‍वस्तांनी धार्मिक स्थळे स्वत:हून काढून घेण्याची सिद्धताही केली आहे, अशी माहिती आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी दिली. महंत आणि राजकीय नेते यांनी धार्मिक स्थळे हटवण्यास विरोध करून फेरसर्वेक्षणाची मागणी केली आहे.
१. सर्वेक्षणात शहरात वर्ष २००९ नंतरची ३१६ धार्मिक स्थळे अनधिकृत आढळून आली आहेत. त्यातील ८४ धार्मिक स्थळे रस्त्यांना अडथळा ठरणारी आहेत. त्यामुळे पहिल्या टप्प्यात ती हटवण्यासाठी महापालिकेने कार्यवाही आरंभली.
२. काही दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत साधूमहंत, प्रशासन, काही नगरसेवक, लोकप्रतिनिधी आणि हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते; परंतु त्यात ठोस तोडगा निघाला नव्हता. (आता होणार्‍या बैठकीत प्रशासनाने सर्वांच्याच धार्मिक भावनांचा विचार करून योग्य निर्णय घ्यावा ! - संपादक)

देहलीमध्ये वाढत्या प्रदूषणामुळे ५ दिवस औद्योगिक क्षेत्र बंद रहाणार !

प्रदूषणाच्या समस्येवर वेळीच उपाययोजना 
केली असती, तर ही वेळ आली नसती !
      नवी देहली - वाढत्या प्रदूषणामुळे देहलीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी ६ नोव्हेंबरला प्रशासकीय अधिकार्‍यांची तातडीची बैठक आयोजित केली होती. यात त्यांनी देहलीतील शाळा ३ दिवस, तर औद्योगिक क्षेत्र ५ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या व्यतिरिक्त देहलीतील प्रदूषणाच्या धुराला नियंत्रित करण्यासाठी कृत्रिम पावसाचा मारा करून तो थोपवण्याचा विचार सरकार करत आहे.
      पुढील १० दिवस शहरामध्ये जनरेटरच्या वापरावर प्रतिबंध घालण्यात आला आहे. नागरिकांनी घरातून बाहेर पडू नये, असे आवाहन केजरीवाल यांनी केले आहे. पाला-पाचोळा जाळण्यावरदेखील बंदी घालण्यात आली. आवश्यकता भासल्यास पुन्हा एकदा सम-विषम तारखेवर वाहतूक चालू केली जाणार असल्याची माहितीसुद्धा केजरीवाल यांनी दिली.
      देहलीमध्ये १० घंटे घालवणे म्हणजे ४० पेक्षा अधिक सिगारेट ओढण्यासारखी धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रदूषणाविषयी निष्क्रीय असलेल्या सरकारला जागे करण्यासाठी नागरिकांनी जंतरमंतर मैदानावर प्रदर्शन केले. (केजरीवाल यांनी मोदीद्वेष व्यक्त करण्यात वेळ घालवण्याऐवजी राज्यातील प्रदूषण दूर करण्याचा प्रयत्न केला असता, तर जनतेला आंदोलन करावे लागले नसते ! - संपादक)

केरळमध्ये सामूहिक बलात्कारास बळी पडलेल्या महिलेस पोलिसांनी तक्रार मागे घेण्यास भाग पाडले !

  • पोलिसांनी महिलेला विचारले, बलात्कार्‍यांपैकी कोणी तुला सगळ्यात अधिक आनंद दिला ?
  • केरळमधील साम्यवाद्यांच्या राज्यांतील पोलिसांचे संतापजनक वर्तन ! 
      थिरुवनंतपुरम् - पतीच्या मित्रांनी एका महिलेवर सामूहिक बलात्कार केला; मात्र पोलिसांनी अपमानित केल्यामुळे नाईलाजाने मला तक्रार मागे घ्यावी लागली आहे, असा आरोप या महिलेने केला आहे. या संदर्भात प्रसिद्ध डबिंग कलाकार भाग्यलक्ष्मी यांनी फेसबूक या सामाजिक संकेतस्थळावर एक पोस्ट अपलोड केली होती. त्यामध्ये ही माहिती दिली आहे. 
     यात म्हटले आहे की, एका पोलीस अधिकार्‍याने त्या महिलेस विचारले, त्यापैकी कोणी तुला सगळ्यात अधिक आनंद दिला ? या फेसबूक पोस्टवर अनेक लोकांनी प्रतिक्रिया दिल्या. त्यानंतर मुख्यमंत्री पिनारायी विजयन् यांच्या कार्यालयाने या घटनेची नोंद घेत पोलिसांवर कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले आहे. मुख्यमंत्री आणि केरळ राज्याचे पोलीस त्या महिलेची भेट घेणार आहेत.

बंगालमध्ये मोहरमची वर्गणी न दिल्याने धर्मांधांनी केलेल्या आक्रमणात घायाळ झालेल्या हिंदु युवकाचा मृत्यू !

तृणमूल काँग्रेसच्या राज्यात दुसरा बांगलादेश होण्याच्या मार्गावर असलेला बंगाल ! 
      कोलकाता - बीरभूम जिल्ह्यात असलेल्या माल्लापूर येथील रहिवासी इंद्रजीत दत्ता यांनी मोहरमची वर्गणी देण्यास नकार दिल्याने धर्मांधांनी १५ ऑक्टोबर या दिवशी त्यांच्यावर जीवघेणे आक्रमण केले होते. यात गंभीर घायाळ झालेले इंद्रजीत दत्ता यांच्यावर आधी माल्लापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात, नंतर बर्दवान येथील वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात आणि शेवटी बर्दवान येथील खाजगी सुसज्ज रुग्णालयात उपचार करूनही त्यांनी ३१ ऑक्टोबर या दिवशी अखेरचा श्‍वास घेतला. 
     बीरभूम जिल्ह्यातील खरसीनपूर येथील धर्मांध १५ ऑक्टोबर या दिवशी महामार्गावर ट्रक थांबवून मोहरमसाठी खंडणी गोळा करत होते. काही ट्रकचालकांशी त्यांचे भांडण झाल्यावर त्याचे दंगलीत रूपांतर झाले. त्यानंतर धर्मांधांनी हिंदूंची दुकाने लुटण्यास प्रारंभ केला आणि महामार्गावरील हिंदु प्रवाशांना मारहाण करणे चालू केले.

अर्णव गोस्वामींवर जितेंद्र आव्हाड यांच्याकडून मानहानीचा दावा

     मुंबई - टाइम्स नाऊ वृत्तवाहिनीचे संपादक अर्णव गोस्वामी यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी १०० कोटी रुपयांचा मानहानीचा दावा ठोकला आहे. 
     ६ ऑक्टोबरच्या रात्री ९ वाजता काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या खून की दलाली या कार्यक्रमात अर्णव यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर काही आरोप केले होते. टाइम्स नाऊच्या ब्यूरो चीफ मेघा प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश कौल, टाइम्स ग्लोबल ब्रॉडकास्टिंग कंपनी लिमिटेडचे अधिकारी सुनील लुल्ला आणि टाइम्स ग्लोबल ब्रॉडकास्टिंग कंपनी यांनाही त्यांच्या वतीने नोटीस पाठवण्यात आली आहे.
     अर्णव गोस्वामी त्यांच्या कार्यक्रमात असभ्य भाषा वापरत असल्याचा आरोप आव्हाड यांनी केला आहे. अर्णव गोस्वामी यांनी आव्हाड यांची माफी मागावी, अशी मागणीही नोटिशीत करण्यात आली आहे. अर्णव हे खोटारडे आहेत. ते कधीही समोरच्या व्यक्तीस बोलण्याची संधी देत नाहीत. ते नेहमी कार्यक्रमात आलेल्या पाहुण्यांचा अपमान करतात. मीच एकटा खरा आहे, बाकी सगळे खोटे बोलतात, असे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. गोवा राज्याचा कर बुडवणार्‍या संगीतरजन्या आयोजकांना पुणे येथे संगीतरजन्या भरवण्यास गोवा शासनाने आक्षेप घ्यावा ! - अधिवक्ता रोहित ब्रास डिसा

     पणजी, ६ नोव्हेंबर (वार्ता.) - सनबर्न आणि सुपरसोनिक या संगीतरजनीच्या आयोजकांनी कोट्यवधी रुपयांचा व्यावसायिक कर आणि पोलीस संरक्षणासाठीचा खर्च अद्याप दिलेला नाही. आता त्यांनी गोव्याऐवजी पुणे येथे संगीतरजनी आयोजित केली आहे. एका राज्याचा कर बुडवणार्‍यांना दुसर्‍या राज्यात व्यवसाय करता येत नाही. त्यामुळे या संगीतरजनी आयोजकांकडून जोपर्यंत थकबाकी येत नाही, तोपर्यंत या संगीतरजन्यांना अनुमती देऊ नये, अशी मागणी गोवा शासनाने महाराष्ट्र शासनाकडे करावी, असे अधिवक्ता रोहित ब्रास डिसा म्हणाले.

नरकासुराचे स्तोम न माजवता खर्‍या संस्कृतीची ओळख व्हावी, यासाठी प्रयत्न ! - सुदिन ढवळीकर, सा.बां. मंत्री, गोवा

मगो पक्षाचा बांदोडा (गोवा) येथील मैदानातील दीपावली उत्सव उत्साहात साजरा ! 
      फोंडा (गोवा), ६ नोव्हेंबर (वार्ता.) - मगो पक्षाने गोवा राज्यातील मडकई मतदारसंघात दीपावली उत्सव ५ नोव्हेंबर या दिवशी बांदोडा येथील स्व. भाऊसाहेब बांदोडकर मैदानात वैविध्यपूर्णरित्या साजरा केला. या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे उत्सवात श्रीकृष्णाचे पूजन, गोमातेचे पूजन, तुळशी वृंदावनाचे पूजन करण्यात आले. मैदानावर २ सहस्र पणत्या प्रज्वलीत करण्यात आल्या होत्या. २०० आकाशकंदिलही लावण्यात आले होते. तसेच श्रीकृष्णाला आवडणार्‍या आणि वेगवेगळ्या पद्धतीने बनवलेल्या पोह्यांचा आस्वाद अनुभवण्याची संधी लोकांसाठी उपलब्ध करण्यात आली होती.

वाराणसीत रस्त्यावर अवैधरित्या बसगाड्या उभ्या करणार्‍या चालकांवर कारवाई करण्याचा आदेश !

राष्ट्रप्रेमी अधिवक्ता कमलेशचंद्र त्रिपाठी यांच्या प्रयत्नांना यश !
      वाराणसी - येथील जौनपूर-वाराणसी मार्गावर अवैधरित्या बसगाड्या उभ्या करून तेथे एक प्रकारे बस थांबा बनवण्यात आला असल्याने येथील महत्त्वाच्या शासकीय कार्यालयांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. यासाठी बसचालकांवर कारवाई करण्यासाठी अधिवक्ता कमलेशचंद्र त्रिपाठी यांनी विशेष पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर केले होते. (अधिवक्ता त्रिपाठी यांच्यासारखे सतर्क नागरिक हीच देशाची शक्ती ! अशी मागणी का करावी लागते ? पोलिसांच्या हे का लक्षात येत नाही ? - संपादक) त्यानंतर अधीक्षकांनी स्थानिक पोलीस ठाण्यांना यावर कारवाई करण्याचा आदेश दिला आहे.


संतश्री आसाराम बापू यांची अपकीर्ती करणार्‍या दैनिकाला एम्स् रुग्णालयाची चपराक !

अन्य धर्मियांच्या धर्मगुरूंची लैंगिक शोषणाच्या संदर्भातील वृत्त दडपणारी 
भारतातील प्रसारमाध्यमे हिंदूंच्या संतांविषयी खोटी वृत्ते प्रसारित करून त्यांची अपकीर्ती करतात !
      नवी देहली - सप्टेंबर महिन्यात संतश्री आसाराम बापू यांना येथील एम्स् रुग्णालयात चिकित्सेसाठी भरती करण्यात आले होते. त्या वेळी एका दैनिकाने वृत्त प्रसिद्ध करतांना पू. बापू यांनी स्थानिक परिचारिकेशी बोलतांना आक्षेपार्ह विधान केल्याचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते; मात्र प्रत्यक्षात रुग्णालयातील प्रसारमाध्यम आणि शिष्टाचार विभागाच्या अध्यक्षा प्रा. नीरज भाटला आणि प्रवक्ता डॉ. अमित गुप्ता यांनी १७ ऑक्टोबरला लिखित स्वरूपात दिलेल्या माहितीनुसार अशा प्रकारची कोणतीही घटना किंवा विधान रुग्णालयातील परिचारिका अथवा कर्मचार्‍याच्या संदर्भात घडलेले नाही, असे म्हटले आहे. तसेच पोलिसांकडेही या संदर्भात कोणतीही तक्रार आलेली नाही. यामुळे संबंधित दैनिकाची पीतपत्रकारिता दिसून आली आहे. (प्रसारमाध्यमांकडून हिंदु संतांची कशी अपकीर्ती केली जाते हे या घटनेतून लक्षात येते ! अशा प्रसारमाध्यमांवर हिंदूंनी बहिष्कार घातला पाहिजे ! - संपादक)

महानदीचे पात्र नष्ट होण्यापासून रोखा ! - राष्ट्रीय हरित लवाद

      भुवनेश्‍वर (ओडिशा) - महानदीच्या पात्रामध्ये १४ नोव्हेंबरपासून होणार्‍या १० दिवसीय बलीयात्रेच्या उत्सवात नदीच्या पात्रामध्ये दुकाने उभारण्यास अनुमती देऊ नये, असा आदेश राष्ट्रीय हरित लवादाने ओडिशा सरकारला दिला आहे. नदीचे पठार सुरक्षित ठेवण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे लवादाने म्हटले आहे. राष्ट्रीय हरित लवादाच्या पूर्व प्रांताच्या खंडपिठाचे सदस्य न्यायमूर्ती एस्.पी. वांगडी आणि न्यायमूर्ती पी.सी. मिश्रा यांनी ओडिशा सरकारला लवादाच्या यापूर्वीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याच्या प्रकरणी फटकारले आहे. तसेच नव्या आदेशाद्वारे महानदीच्या पात्रातील अतिक्रमण थांबवण्यास आणि नदीच्या पात्रामध्ये कचरा फेकण्याचे थांबवण्यास सांगितले आहे. महानदी ही ओडिशा राज्याची सर्वांत मोठी नदी आहे. पर्यावरणवादी बिश्‍वजित मोहंती यांनी केलेल्या एका याचिकेवरील सुनावणीच्या वेळी लवादाने नदीच्या पात्रामध्ये दालनासाठी अनुमती देण्याचा आदेश राज्य सरकारला दिला आहे. (यासाठी पर्यावरवाद्याला का प्रयत्न करावे लागतात ? सरकारला स्वतःच हे का समजत नाही ? - संपादक)डॉ. झाकीर नाईक यांना केंद्रशासनाने पाठवलेल्या नोटिसीत आतंकवादाचा उल्लेख नाही !

      मुंबई - डॉ. झाकीर नाईक यांना केंद्रशासनाने दिलेल्या नोटिसीत आतंकवादाचा उल्लेख नाही आणि जी सूत्रे नोटिसीत उपस्थित केली आहेत त्याला उत्तर देण्यात येईल, असा दावा डॉ. झाकीर यांचे अधिवक्ता मुबीन सोलकर यांनी केला आहे. (जर डॉ. झाकीर नाईक यांच्यावर आतंकवादाचे आरोप नसतील, तर ते भारतातून पळून जाऊन विदेशात का लपले आहेत ? अटकेच्या भीतीने स्वत:च्या पित्याच्या अंत्यसंस्कारालाही ते उपस्थित राहिले नाहीत. - संपादक) अधिवक्ता सोलकर म्हणाले की, नोटिसीत उपस्थित केलेली सूत्रे काही नियमांचे उल्लंघन केल्याविषयीचे आहेत. या आधी केंद्रशासनाच्या गृहमंत्रालयाने डॉ. झाकीर यांच्या संस्थांना नोटीस देऊन त्यांना विदेश निधी नियंत्रण कायद्याखाली दिलेली अनुमती रहित का करू नये, असे विचारले होते. तसेच या शिक्षण संस्थांना पुर्वानुमतीशिवाय विदेशातून निधी स्वीकारू नये, अशा प्रकाराचीही नोटीस दिली आहे.

पोर्तुगालच्या राणीच्या गोवा आगमनावेळी सांताक्रूझ येथे उभारलेले चार खांब पुरातन स्थळ म्हणून घोषित करा ! - टोनी फर्नांडिस, स्थानिक पंचसदस्य

अत्याचारी पोर्तुगीजांच्या खाणाखुणा जपण्याची 
मागणी करणारे स्वाभिमानशून्य लोकप्रतिनिधी !
      पणजी, ६ नोव्हेंबर (वार्ता.) - पोर्तुगालच्या राणीचे गोव्यात आगमन झालेल्या वेळी सांताक्रूझ येथे उभारलेले चार खांब पुरातन स्थळ म्हणून घोषित करून त्याची देखभाल दुरुस्ती करावी, अशी मागणी सांताक्रूझ येथील पंचसदस्य टोनी फर्नांडिस यांनी केली आहे. (पोर्तुगीज राज्यकर्त्यांची खूण असलेले हे चार खांब जतन करण्याची नाही, तर तोडून टाकण्याची आवश्यकता आहे ! - संपादक)
     पंचसदस्य फर्नांडिस यांच्या मते पोर्तुगीज काळात पोर्तुगालच्या राणीचे गोव्यात आगमन झाले होते. तिच्या स्वागतासाठी सांताक्रूझ येथे उपरोल्लेखित चार खांब उभारण्यात आले होते. हे चार खांब हा गोव्याचा वारसा आहे. (हा गोव्याचा वारसा नाही, तर गोमंतकियांवरील अत्याचाराची खूण आहे. याचा ख्रिस्ती धर्माशी कोणताही संबंध नाही. - संपादक) आणि त्याचे जतन होणे आवश्यक आहे.भोपाळ येथील मध्यवर्ती कारागृहात २१ आतंकवाद्यांची दहशत !

  • सर्व यंत्रणा असतांना आतंकवाद्यांना दहशत निर्माण करू देणार्‍या पोलिसांना वेतन देऊन पोसायचे कशाला ? अशांना घरी पाठवून सक्षम अधिकार्‍यांची नियुक्ती केली पाहिजे !
  • कारागृहात दहशत निर्माण करणार्‍या आतंकवाद्यांवर तात्काळ खटला चालवून त्यांना कठोरातील कठोर शिक्षा देणेच योग्य !
आतंकवाद्यांवर गेल्या ७ वर्षांत शासनाचे ३३ कोटी रुपये व्यय !
     भोपाळ - येथील कारागृहातून पळालेले ८ आतंकवादी पोलिसांच्या गोळीबारात मारले गेले असले, तरी या कारागृहात अजूनही २१ आतंकवादी आहेत. ते येथे मनमानी करत आहेत. १ नोव्हेंबरला त्यांनी कारागृहाच्या तपासणीच्या वेळी गोंधळ घालत अधिकार्‍यांना शिवीगाळी केली, तसेच धमकीही दिली. याच आतंकवाद्यांवर मध्यप्रदेश सरकारचे गेल्या ७ वर्षांत ३३ कोटी रुपये व्यय झाले आहेत.

जगात प्रत्येक साडेचार दिवसांनी होते एका पत्रकाराची हत्या ! - युनेस्को

     पॅरिस (फ्रान्स) - जगभरात प्रत्येक साडेचार दिवसांनी एका पत्रकाराची हत्या होते, असे युनेस्कोच्या महासंचालकांनी प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे. गेल्या १० वर्षांमध्ये ८२७ पत्रकारांची कामावर असतांना हत्या झाल्याची माहिती प्रसिद्ध झाली आहे. सिरीया, लिबिया, इराक, येमेन यांसह अरब राष्ट्रे पत्रकारांसाठी सर्वांत वाईट क्षेत्र ठरले आहे. तसेच दक्षिण अमेरिकेतही पत्रकारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने खूप वाईट स्थिती आहे. २००६ ते २०१५ या १० वर्षांच्या कालावधीत झालेल्या एकूण ८२७ हत्यांपैकी ५९ टक्के हत्या गेल्या २ वर्षांमध्ये झाल्या आहेत. युरोप आणि उत्तर अमेरिका येथेही पत्रकारांच्या हत्या होण्याच्या घटना वाढलेल्या आहेत. गेल्या एका वर्षात या भागात ११ पत्रकारांच्या हत्या झाल्या. विदेशी पत्रकारांच्या तुलनेत स्थानिक पत्रकारांना अधिक धोका असतो, हे या अहवालातून स्पष्ट झाले आहे.

इस्लामचा अवमान करणार्‍या ब्रिटनच्या जिमनॅस्टीक खेळाडूवर २ महिन्यांची बंदी !

भारतात हिंदु धर्माचा, देवतांचा अवमान केल्याच्या प्रकरणी कधीतरी कारवाई होईल का ? 
     लंडन - ब्रिटनचा ऑलिम्पिक पदक विजेता जिमनॅस्टीक खेळाडू लुइस स्मिथ याच्यावर इस्लामची टिंगलटवाळी केल्याच्या प्रकरणी २ महिन्यांची बंदी घालण्यात आली आहे. गेल्या महिन्यात समोर आलेल्या एका व्हिडिओमध्ये तो नमाज पढण्याचा अभिनय करत असल्याचे आणि नंतर मोठ्याने अल्ला-हू-अकबर म्हणतांना दिसत होता. तसेच त्यात त्याचा सहकारी ल्यूक कार्सनही मागे दिसत होता. तो विचित्र कृती करत होता. स्मिथ याने या प्रकरणी क्षमा मागितली आहे.

कॅनडातील ओंटारियो राज्य ऑक्टोबर मास हिंदु वारसा मास म्हणून घोषित करणार !

कॅनडातील विधानसभेकडून भारत काही शिकेल का ? जे महत्त्व कॅनडातील 
राज्य सरकारला कळते, ते भारतातील राजकीय पक्षांना समजेल तो सुदिन !
      ओंटारियो (कॅनडा) - राज्यामध्ये ऑक्टोबर मास हा हिंदु वारसा मास म्हणून घोषित करण्यात येणार आहे. यासाठी येथील विधानसभेत एक विधेयक सादर करण्यात आले आहे. या राज्यात ७ लाखांपेक्षा अधिक भारतीय वंशाचे नागरिक रहातात. ओंटारियोच्या विधानसभेत विधेयक सादर करतांना प्रांतीय संसदचे सदस्य जो डिक्सन यांनी सांगितले की, ऑक्टोबर मासाला हिंदूंचा विशेष वारसा असणारा मास म्हणून घोषित करून ओंटारियो येथील हिंदूंनी सामाजिक, आर्थिक, धार्मिक, राजनैतिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात केलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाला मान्यता देण्यात येईल. 
    डिक्सन म्हणाले की, हिंदूंमध्ये आक्टोबर महिन्याला विशेष महत्त्व आहे. हिंदू ऑक्टोबर महिना किंवा त्याच्या आसपास महत्त्वपूर्ण सण साजरे करतात. यात नवरात्री आणि दिवाळी समाविष्ट आहे.

राज्य सरकारविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार ! - विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील

      मुंबई, ६ नोव्हेंबर - राज्य सरकारने खोटी आश्‍वासने देऊन जनता आणि सभागृह यांची फसवणूक केली आहे. राज्य सरकारने आतापर्यंत केवळ घोषणा केल्या आहेत. प्रत्यक्षात काहीच साहाय्य केलेले नाही. त्यामुळे अनेक आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबियांची फसवणूक झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला. त्यामुळे आम्ही सरकारविरोधात हक्कभंगाचा आणणार असल्याचे विखे-पाटील यांनी ५ नोव्हेंबर या दिवशी प्रसारमाध्यमांशी बोलतांना सांगितले. (आघाडी सरकारच्या काळातही जनतेला अनेक आश्‍वासने देत शेतकर्‍यांच्या कुटुंबियांची फसवणूक केली होती. त्याविषयी राधाकृष्ण विखे पाटील बोलतील का ? - संपादक)
      ते पुढे म्हणाले की, फडणवीस सरकारला सत्तेत येऊन २ वर्षे पूर्ण झाली. या कालावधीत शेतकर्‍यांच्या आत्महत्या, गुन्हेगारी आणि भ्रष्टाचार यांमध्ये प्रचंड वाढ झाली असून राज्याने फक्त त्या क्षेत्रातच आघाडी घेतली आहे. विकासामध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर असल्याचा युती सरकारचा दावा पूर्णपणे खोटा असून हे सरकार नव्हे, इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी असल्याची टीकाही त्यांनी केली.

राममंदिरासाठी श्री श्री रविशंकर मध्यस्थी करण्यास सिद्ध !

      भाग्यनगर - आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर यांनी राममंदिराच्या प्रकरणी समाधानकारक तोडगा काढण्यासाठी मध्यस्थी करण्यास सिद्धता दर्शवली आहे. राममंदिराचे सूत्र सोडून दिल्यास उत्तरप्रदेशमधील निवडणुकीमध्ये भाजप सरकार सत्तेत येऊ शकत नाही, असेही श्री श्री रविशंकर यांनी म्हटले आहे. त्यांच्या या विधानावर भाजपच्या कोणत्याही नेत्याकडून अद्याप प्रतिक्रिया आलेली नाही.
      भारत-पाक यांच्यातील तणावाच्या पार्श्‍वभूमीवर श्री श्री रविशंकर यांनी दोन्ही देशांतील लोकांनी एकत्र येण्याचे आवाहन केले. पाकच्या ४ शहरांत श्री श्री रविशंकर यांच्या आर्ट ऑफ लिव्हिंगची केंद्रे आहेत. यापूर्वी पाकमधील पुराच्या वेळी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात साहाय्य करण्यात आले होते. पाकमधील ३०० ते ४०० लोक प्रतिवर्षी बेंगळुरूमधील आर्ट ऑफ लिव्हिंगच्या केंद्रामध्ये येत असतात, अशी माहितीही त्यांनी दिली.

माणगाव (जिल्हा रायगड) येथे क्षुल्लक कारणावरून धर्मांधांकडून हिंदु तरुणाला मारहाण

हिंदूंनो, धर्मांधांच्या आक्रमणांपासून स्वतःचे रक्षण 
होण्यासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेण्याला पर्याय नाही !
       माणगाव (जिल्हा रायगड) - गोरेगाव येथील २१ वर्षीय हिंदु तरुण चारचाकी घेऊन जात असतांना रस्त्यात उभी असलेली एक रिक्शा काढण्यास सांगितल्याचे निमित्त करून संतप्त झालेले वसीम जलील परदेशी, जमीर जलील परदेशी, खातून बशीर परदेशी, सईदा जलील परदेशी आणि बशीर परदेशी यांनी हिंदु तरुणाला मारहाण केली. ही घटना ३ नोव्हेंबरला घडली. (हिंदुबहुल देशात हिंदू संघटित नसल्यामुळेच त्यांना धर्मांधांकडून अशी मारहाण सहन करावी लागते. हिंदूंकडे वक्र दृष्टीने पहाण्याचे कोणाचे धाडस होणार नाही, यासाठी हिंदुसंघटनाला पर्याय नाही ! - संपादक) हिंदु तरुणाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी धर्मांधांच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट केला. सईदा जलील परदेशी यांनी हिंदु तरुण आणि अन्य हिंदू यांच्यावर मारहाण केल्याचा आरोप करत तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी हिंदूंवरही गुन्हा प्रविष्ट केला. (हिंदूंवर नाहक गुन्हा प्रविष्ट करणारे पोलीस भारताचे कि पाकचे ? हिंदूंनो, अशा पोलिसांची त्यांच्या वरिष्ठांकडे तक्रार करा ! हिंदु राष्ट्रात असे पोलीस नसतील ! - संपादक)

वारकरी संगीतात अद्भुत शक्ती ! - डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज

      जळगाव - वारकरी संगीतात अद्भुत शक्ती आहे. रामकृष्ण हरी च्या स्वराने बुद्धी तेज होते, तर काकड आरतीने मज्जारज्जू उत्तेजित होतात. फुगडी फू म्हणण्याने छातीच्या नसा मोकळ्या होतात. वारकरी संप्रदायातूनच सर्व प्रकारचे योग साधले जातात, असे प्रतिपादन डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज यांनी केले. जळगावमध्ये आयोजित अखिल भारतीय वारकरी संगीत संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
या वेळी ते म्हणाले...
१. वारीत पायी चालतांना माऊलींच्या गजराच्या ब्रह्मध्वनीने वर्षभर पुरेल इतकी ऊर्जा मिळते. वारकरी संप्रदायाचे संगीत हे सात्त्विक असून त्याचे संस्कार तरुण पिढीवर रूजत आहेत.
२. मनाने स्वच्छ, निर्मळ व्हायचे असेल, तर वारकरी संप्रदायाचे अनुयायी होण्याविना पर्याय नाही.
३. आजची पिढी सैराट होत आहे. त्यांच्या तामस वृत्तीला वारकरी संप्रदायातूनच आळा घातला जाऊ शकतो.

विधान परिषदेच्या निवडणुकांसाठी पुण्यातून उभे असलेले उमेदवार कोट्यधीश !

  • कुठे जनतेच्या हितासाठी धनत्याग करणारे पूर्वीचे राजे, तर कुठे स्वार्थासाठी अमाप संपत्ती जमवणारे आताचे लोकप्रतिनिधी !
  • हिंदु राष्ट्रातील राज्यकर्ते संपत्तीपेक्षा केवळ जनतेचाच अधिक विचार करणारे असतील !
      पुणे - राज्यातील विधान परिषदेच्या काही जागांसाठी लवकरच निवडणूक होणार आहे. पुण्यातील जागांसाठी विविध राजकीय आणि अन्य उमेदवार निवडणुकीसाठी जाहीर झाले आहेत. निवडणुकीसाठी उभ्या असलेले अनेक उमेदवारांची मालमत्ता जाहीर झाली असून त्यातील बहुतांश जण कोट्यधीश आहेत. ही माहिती उमेदवारांनी विधान परिषदेच्या निवडणुकीच्या उमेदवारी अर्जासमवेत मालमत्ताविषयक दिलेल्या प्रतिज्ञापत्रात दिली आहे.
      या व्यतिरिक्त उमेदवारांपैकी काही जणांच्या पत्नीकडे लक्षावधी, तर कोट्यवधी रुपयांची संपत्ती आहे. तसेच सोने, हिरे, चांदी आणि अनेक आलिशान चारचाकी वाहनेही आहेत.

मुंबईतील आलिशान प्रकल्पात माजी मुख्यमंत्र्याने काळा पैसा गुंतवल्याचा संशय

विकासकाच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट 
      मुंबई - करीरोड येथील आलिशान प्रकल्पात खोटी कागदपत्रे सादर केल्याने हा प्रकल्प आधीच वादात सापडला आहे. या प्रकल्पात एक माजी मुख्यमंत्री आणि त्याच्या कुटुंबियांचा जवळपास ३०० कोटी रुपयांचा काळा पैसा गुंतल्याची चर्चा आहे. या प्रकरणाविषयी प्रकल्प विकासकाच्या विरोधात काळा पैसा प्रतिबंधक कायद्याद्वारे गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. तसेच या माजी मुख्यमंत्र्याची अंमलबजावणी संचलनालयाने चौकशी चालू केल्याची चर्चा आहे. या प्रकरणी संबंधित विकासकाविरुद्ध काळा पैसा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा प्रविष्ट करण्यात आल्याने आता संबंधित माजी मुख्यमंत्री आणि त्यांचे कुटुंबीयही अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

भारत सर्वांत सुरक्षित आणि धर्मनिरपेक्ष देश ! - तस्लीमा नसरीन

भारताला असहिष्णु देश ठरवणार्‍या 
तथाकथित बुद्धीवाद्यांना चपराक !
      काणकोण (गोवा) - भारत माझे घर आहे. मी वर्ष १९९६ पासून निर्वासित म्हणून येथे रहात आहे. माझे पुढील आयुष्य कंठण्यासाठी भारत हाच एकमेव पर्याय आहे; कारण भारत सर्वांत सुरक्षित आणि धर्मनिरपेक्ष देश आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध बांगलादेशी लेखिका तस्लीमा नसरीन यांनी येथे केले. येथे आयोजित करण्यात आलेल्या इंडिया आइडियाज कॉन्क्लेव २०१६ या परिषदेत त्या बोलत होत्या.

राज्यातील दोन पोलीस अधिकारी नेमके कुठे कार्यरत आहेत, याविषयी पोलीस खाते अनभिज्ञ !

पोलीस दलाचा भोंगळ कारभार !
       पुणे, ६ नोव्हेंबर - राज्यातील २ पोलीस अधिकारी अभिलेखावरून गायब झाल्याचे निदर्शनास आले आहे. पोलीस महासंचालक कार्यालयाकडून प्रकाश काशिनाथ गदादे आणि प्रदीप नामदेव वाघे या २ निरीक्षकांचा शोध घेण्यात येत असून सर्व पोलीस घटकांना अभिलेखावरून शोध घेऊन माहिती कळवण्याचे आदेश महासंचालक कार्यालयाकडून देण्यात आले आहेत. आस्थापन विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक राजकुमार व्हटकर यांनी काढलेल्या अतितात्काळ आदेशानुसार निरीक्षक गदादे आणि वाघे हे राज्याच्या पोलीस दलात सध्या कोठे कार्यरत आहेत, याची माहितीच खात्याला नाही. (स्वतःच्याच खात्यातील पोलिसांचा थांगपत्ता नसलेले पोलीस छुप्या आतंकवाद्यांना काय शोधून काढणार ? - संपादक)
      मुंबई - मुलुंड रेल्वेस्थानकाला लागून असणारे प्रसिद्ध गणेशमंदिर अनधिकृत असल्याचे उघड झाले आहे. या मंदिरातील अर्पण आर्पीएफ् (रेल्वे प्रोटेक्शन फोर्स) अधिकार्‍यांच्या खिशात जात असल्याचा आरोप होत आहे. बी.आर्. जोगदनकर यांनी माहितीच्या अधिकारात ही माहिती मिळवली आहे. आर्पीएफ्च्या आजी-माजी अधिकार्‍यांनी मिळून हे मंदिर बांधले होते.

(म्हणे) सुळे, आठवले आणि आंबेडकर यांच्या मुलांना आरक्षण नकोच आहे ! - सुप्रिया सुळे, खासदार, राष्ट्रवादी काँग्रेस

मग आर्थिक निकषांवर आधारीत आरक्षण हवे, असे स्पष्ट का सांगत नाही ?
     पुणे - अल्प भूधारक शेतकरी आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांना शिक्षणाची संधी मिळण्यासाठी आरक्षण दिले गेले पाहिजे. सुप्रिया सुळे, रामदास आठवले किंवा प्रकाश आंबेडकर यांच्या मुलांना आरक्षण नकोच आहे. यासाठीच लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणाच्या संदर्भात स्वतंत्र चर्चा ठेवण्याची मागणी केली आहे, अशी माहिती राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी ३ नोव्हेंबरला पत्रकार परिषदेत दिली.

राज्यातील अवैध धार्मिक स्थळे ३१ डिसेंबरपूर्वी पाडण्याचे आदेश

प्रत्येक वेळी अवैध असल्याच्या नावाखाली हिंदूंच्याच 
मंदिरांवर मोठ्या प्रमाणात कारवाईचा बडगा उगारणारे शासन आणि 
नगरविकास विभाग अल्पसंख्यांकांच्या धार्मिक स्थळांवरही कारवाई करणार का ? 
     मुंबई - मुंबई उच्च न्यायालयाने पूर्वीच दिलेल्या निर्देशांचे काटेकोर पालन करण्यासाठी ५ नोव्हेंबर या दिवशी राज्यातील सर्व अवैध धार्मिक स्थळे ३१ डिसेंबरपूर्वी पाडण्याचे आदेश नगरविकास विभागाने सर्व पालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना दिले आहेत. 
१. २९ नोव्हेंबर २००९ पूर्वीची अवैध धार्मिक स्थळे पाडण्याच्या संदर्भात वेगळे निकष लावण्यात आले आहेत. ही धार्मिक स्थळे सरकारच्या लेखी वर्ग बमध्ये येतात. ती १७ नोव्हेंबर २०१७ पूर्वी निष्कासित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या संदर्भात कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नसून त्या आदेशाचे दिलेल्या मुदतीत पालन न झाल्यास संबंधितांवर न्यायालयीन अवमानाचा खटला भरण्यात येणार आहे. पालिकांनी आधीच सिद्ध केलेल्या अवैध धार्मिक स्थळांच्या सूचीनुरूप ही कारवाई होणार आहे. 
२. या कामात कोणी अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्यावर फौजदारी कारवाई होणार आहे. तसेच अवैध धार्मिक स्थळे पुन्हा उभारली जाऊ नयेत, यासाठी राज्य सरकार यंत्रणा उभारणार आहे. अशा बांधकामांविषयी नावानिशी अथवा निनावी तक्रार आल्यासही त्याकडे लक्ष दिले जाणार आहे.

आरोपीने पीडित मुलीवर अन्य मुलीजवळच बलात्कार केला ! - डॉ. आशा मिरगे, सदस्या, महिला आयोग

अशा वासनांधांना कठोरात कठोर शिक्षा 
होण्यासाठी सरकार आणि पोलीस यांनी प्रयत्न करावेत !
आश्रमशाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनींवर सामूहिक बलात्काराचे प्रकरण
      बुलढाणा, ६ नोव्हेंबर - आरोपीने पीडित अल्पवयीन मुलीवर इतर सर्व मुली ज्या ठिकाणी झोपल्या होत्या, त्याच ठिकाणी बलात्कार केला. पीडित मुलीने ओरडण्याचा प्रयत्न केला; परंतु आरोपीने तिचे तोंड दाबून तिला गप्प केले, अशी माहिती महिला आयोगाच्या माजी सदस्या डॉ. आशा मिरगे यांनी एका वृत्तवाहिनीला दिली. खामगाव येथील आश्रमशाळा बलात्कार प्रकरणातील पीडित मुलीच्या वैद्यकीय पडताळणीच्या वेळी डॉ. मिरगे उपस्थित होत्या. 
डॉ. मिरगे पुढे म्हणाल्या की,
१. स्वत: आरोपीने आणखी ५ मुलींची नावे सांगितली असून त्यातील ३ जणींवर त्याने अत्याचार केले आहेत. अन्य दोघींनी शाळेत असे प्रकार होत असल्याचे ठाऊक होते. चांगल्या जेवणाचे आमिष दाखवून आरोपी इतुसिंग याच्याकडून मुलींवर बलात्कार केला जायचा.

देहलीमध्ये धर्मांध प्रियकर आणि त्याच्या ६ मित्रांकडून १५ वर्षीय युवतीवर सामूहिक बलात्कार !

अशा बलात्कार्‍यांना शरीयत कायद्यानुसार शिक्षा 
करण्याची मागणी कोणी केल्यास आश्‍चर्य वाटू नये !
      नवी देहली - येथील पहाडगंज भागामधील एका हॉटेलमध्ये एका १५ वर्षीय युवतीवर तिच्या रेहान नावाच्या प्रियकराने आणि त्याच्या ६ मित्रांनी बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. रेहान याचे गेल्या दीड वर्षापासून या युवतीशी संबंध होते.

राज्यातील ५२५ आदिवासी आश्रमशाळांमध्ये महिला अधीक्षकच नाहीत !

आदिवासी आश्रमशाळांचा भोंगळ कारभार !
      मुंबई - राज्यातील १ सहस्र ७५ आश्रमशाळांपैकी ५२५ आश्रमशाळांमधील महिला अधीक्षक पदे रिक्त आहेत. या आश्रमशाळांसाठी शासन वर्षाला १ सहस्र २०० कोटी रुपये व्यय करते. खाजगी संस्थांना आश्रमशाळांची मान्यता देतांना मुलींच्या सुरक्षेची कसलीही अट घातली जात नाही, अशी माहिती आदिवासी विकास विभागातून देण्यात आली. (आदिवासी विद्यार्थिनींच्या सुरक्षेविषयी उदासीन असलेले प्रशासन ! - संपादक)
     आदिवासी विभागही सुरक्षेच्या दृष्टीने लक्ष देत नाही. राज्य सरकारने ८ वर्षांपूर्वीच मुलींच्या सुरक्षेसाठी महिला अधीक्षकाच्या नियुक्तीचा निर्णय घेतला होता; मात्र त्याची अंमलबजावणी प्रलंबित आहे.कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या क्षेत्र अधिकार्‍याला दीड लाख रुपयांची लाच घेतांना दुसर्‍यांदा अटक !

भ्रष्टाचारग्रस्त भारत ! 
९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी
     कल्याण - कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे क्षेत्र अधिकारी गणेश सारंगधर बोराडे यांना दीड लाख रुपयांची लाच घेतांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दुसर्‍यांदा अटक केली. बोराडे यांनी एका इमारतीचा दाखला देण्यासाठी आणि दोन नगरसेवकांविरुद्ध नोटीस काढण्यासाठी तक्रारदाराकडे साडे सहालाख रुपयांची मागणी केली होती. या प्रकरणी तक्रारदाराने विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार अटकेची कारवाई करण्यात आली. न्यायालयाने त्यांना ९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.
      दोन वर्षांपूर्वी येथील एका व्यापार्‍याकडून दोन लाख रुपये स्वीकारल्याप्रकरणी बोराडे यांना अटक करण्यात आली होती. त्या वेळी प्रशासनाने त्यांना निलंबित केले होते. त्यानंतर काही कालावधीने त्यांना पुन्हा सेवेत घेण्यात आले. (२ वर्षांपूर्वीच अशा भ्रष्ट अधिकार्‍यावर कठोर कारवाई का केली गेेली नाही ? - संपादक)

फटाका व्यापार्‍यांवर गुन्हे प्रविष्ट न केल्यास उपोषणाला बसणार ! - शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांची चेतावणी

संभाजीनगर येथील फटाक्यांच्या दुकानाला आग लागल्याचे प्रकरण 
      संभाजीनगर - येथील फटाका बाजाराला आग लागलेल्या प्रकरणात संबंधित व्यापार्‍यांवर २४ घंट्यांत गुन्हा प्रविष्ट न झाल्यास पोलीस आयुक्तालयासमोर उपोषणाला बसू, अशी चेतावणी शिवसेनेचे आमदार श्री. संजय शिरसाट यांनी दिली. प्रशासन या व्यापार्‍यांना पाठीशी घालत असल्याचा आरोपही त्यांनी या वेळी केला. आमदार शिरसाट यांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या नावे निवेदन दिले असून त्यात त्यांनी संबंधित दोषींवर गुन्हे प्रविष्ट करण्याची मागणी केली आहे. (या प्रकरणी पोलीस आयुक्तांनी निष्पक्षपणे चौकशी करून संबंधितांवर कारवाई करणे अपेक्षित आहे. - संपादक)

पाकच्या गोळीबारात २ सैनिक हुतात्मा !

शांतताकाळात पाककडून भारताची नाहक होणारी
 मानवी हानी भारत सरकार शासन कशी भरून काढणार ?
      जम्मू - पाककडून शस्त्रसंधीचे वारंवार उल्लंघन होत आहे. पूंछ जिल्ह्यात कृष्णा घाटी भागात नियंत्रणरेषेजवळ पाकने पुन्हा गोळीबार चालू केला. या गोळीबारात २ सैनिक हुतात्मा झाले, तसेच एक नागरिक घायाळ झाला आहे.

पाक कलाकारांवरील बंदी योग्य ! - अभिनेते रझा मुराद

       संभाजीनगर, ६ नोव्हेंबर - भारताने नेहमीच मैत्रीचा हात पुढे करूनही पाकिस्तानने मैत्रीपूर्ण संबंध ठेवले नाहीत. त्यामुळे पाकिस्तानी कलाकारांवरील बंदी योग्य आहे, असे प्रतिपादन अभिनेते रझा मुराद यांनी केले. (जे एका मुसलमान कलाकाराला वाटते, ते केंद्र सरकार, पाकप्रेमी लोकप्रतिनिधी आणि कलाकार यांना का वाटत नाही ? - संपादक)

सिल्लोड (संभाजीनगर) येथे कोसळलेल्या पुलाच्या प्रकरणी ३ अभियंते निलंबित

     संभाजीनगर - येथील सिल्लोड-कन्नड रस्त्यावरील ४० वर्षे जुना पूल सप्टेंबर २०१६ मध्ये कोसळल्याप्रकरणी अव्वर सचिव कैलास बधान यांनी ३ दोषी अभियंत्यांना निलंबित केले आहे. उपविभागीय अभियंता एम्.जी. काडलीकर, शाखा अभियंता बी.एस्. शेजूळ, शाखा अभियंता एस्.एल्. देवरे अशी त्यांची नावे आहेत. जिल्हाधिकार्‍यांनी नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीने दिलेल्या अहवालानुसार कारवाई करण्यात आली.

राज्याच्या ग्रामीण भागातून देवतांच्या प्राचीन मूर्ती आणि विरगळ यांची तस्करी !

अमूल्य आणि ऐतिहासिक ठेव्याकडे सरकार लक्ष 
देणार कि त्यासाठी इतिहासप्रेमींनाच चळवळ उभारावी लागणार ?
      पुणे - राज्याच्या ग्रामीण भागातून देवतांच्या अनेक प्राचीन मूर्ती, वीरांची स्मृतीचिन्हे आणि विरगळ यांची सध्या चोरी होत आहे. हा वारसा दुर्लक्षित राहिल्याने त्यांची अवैध विक्री करून पैसे कमावले जातात. आंतरराष्ट्रीय काळ्या बाजाराशी संबंधित तस्करांच्या टोळ्या यामागे कार्यरत असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे. (पोलीस या टोळ्यांची पाळेमुळे शोधून ती उद्ध्वस्त का करत नाहीत ? - संपादक)
     या संदर्भात वारसा अभ्यासक सौ. सायली पलांडे-दातार यांनी सांगितले, मंदिराबाहेर अथवा नागरिकांच्या अंगणात असलेल्या मूर्तींची नोंद सरकारकडे नाही. प्रश्‍नोत्तरांचा मनःस्ताप नको; म्हणून मूर्ती चोरीला गेल्यावर गावकरी पोलिसांकडे तक्रार नोंदवत नाहीत. शहरात तुमच्या दारातील मूर्ती आम्हाला विकत देता का ?, अशी थेट मागणीही केली जाते. नागरिकांनी वंशपरंपरेनुसार आलेल्या ऐतिहासिक वस्तूंची सरकारकडे नोंदणी करणे बंधनकारक असूनही त्याविषयी लोक उदासीन आहेत.

सैनिकांविषयी सद्भावना आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, तसेच त्यांच्या कुटुंबियांसमवेत दिवाळी साजरी करण्यासाठी उपक्रमाचे आयोजन !

     पुणे - देशाच्या सीमेवर लढणार्‍या सर्वच सैनिकांविषयी सद्भावना आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, तसेच त्यांच्या कुटुंबियांसमवेत दिवाळी साजरी करण्यासाठी २ नोव्हेंबर या दिवशी उपक्रम राबवण्यात आला. माहिती सेवा समिती, लोणीकंद पोलीस ठाणे आणि मराठी पत्रकार परिषद यांच्या वाघोली प्रेस क्लबच्या वतीने परिसरातील बकोरी, मांजरा खुर्द, आव्हळवाडी येथे जाऊन सैनिकांच्या परिवाराला दिवाळीचा फराळ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. या वेळी सैनिकांच्या कुटुंबियांनी उपक्रमाचे स्वागत केले. 
     बकोरी गावातील वाल्मीकि वारघडे, शिवाजी वारघडे, प्रशांत वारघडे, नवनाथ टुले आणि मांजरी येथील संदीप ऊंद्रे, तसेच आव्हळवाडी येथील राहुल आव्हाळे, वैभव आव्हाळे, देवीदास आव्हाळे यांच्या घरी जाऊन दिवाळी साजरी करण्यात आली.

ठाणे येथील माजी सैनिक असलेल्या वडिलांकडून मुलीवर बलात्कार

नैतिकतेचे अधःपतन झाल्याचे दर्शवणारी घटना !
     ठाणे - माजी सैनिक असलेल्या वडिलांनीच स्वत:च्या मुलीला मद्य पाजून तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी खोपट परिसरातील वडिलांसह सावत्र आईला अटक करण्यात आली आहे. 
     पीडित मुलीचे वडील भारतीय सैन्यात चालक या पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. वडील तिला दुधातून मद्य द्यायचे. ते पिण्यासाठी बळजोरी करायचे. सावत्र आई मुलीला घरात कोंडून ठेवायची. १ मास वडिलांनी मुलीला भ्रमणभाष आणि भ्रमणसंगणक यांच्यावर अश्‍लील चित्रफीती दाखवून अत्याचार केले. मुलीनेच आरडाओरडा केल्यावर हा प्रकार उघडकीस आला.

कराड येथील गणपति मंदिरात चोरी !

हिंदुबहुल देशात 
हिंदूंची मंदिरे असुरक्षित !
       कराड (जिल्हा सातारा) - येथील कोळेवाडी परिसरातील प्रसिद्ध गणपति मंदिरातील दोन्ही दानपेट्यांतील अनुमाने २७ सहस्र रुपयांची रक्कम चोरांनी पळवून नेली. ५ नोव्हेंबरला पहाटे हा प्रकार पुजार्‍यांच्या निदर्शनास आला. चोरांनी क्लोज्ड सर्कीट टीव्ही (सीसीटीव्ही) कॅमेराही पळवून नेला.

जातीयवादाचा महाराष्ट्रातील उच्छाद !

जातीचे भयंकर राजकारण !
श्री. शरद पोंक्षे
        गेल्या ५ ते ७ वर्षांत जात या शब्दाने हिंदुस्थानात विशेषकरून महाराष्ट्रात उच्छाद मांडला आहे. जरा काही झाले की, जात आडवी येते. मागे बेस्टसारख्या शासकीय उपक्रमाच्या महाव्यवस्थापक पदावर खोब्रागडे नावाचे गृहस्थ बसले. त्यांनी डेपोत जाऊन जाहीरपणे जातीयवाद मांडला. त्यांच्या काळात बेस्टमधे ओपन कॅटेगिरी असलेल्या कामगारांची पुरती वाट लावली गेली; पण त्या विरोधात एक अवाक्षरही प्रसारमाध्यमांनी छापले नाही. मी स्वतः जात मानत नाही. फक्त मनुष्यजात मला मान्य आहे; पण ज्या पद्धतीने हे जातीचे राजकारण पसरत चालले आहे, हे फार भयंकर आहे. मध्यंतरी कुठेतरी पवारसाहेबांनी कारण नसतांना जात मध्ये आणली आणि तरीही हे पुरोगामी ? सेक्युलर ? आश्‍चर्य आहे ?

हिंदु जनजागृती समितीच्या ऑक्टोबर २०१६ मधील पहिल्या आणि दुसर्‍या सप्ताहातील प्रसारकार्याचा रत्नागिरी जिल्ह्याचा आढावा !

१. नवरात्रोत्सव मोहीम
१ अ. आदर्श नवरात्रोत्सव साजरा करण्यासाठी निवेदने देणे : जिल्ह्यात प्रशासनाला ४, पोलिसांना ६, तर २९ नवरात्रोत्सव मंडळे आणि ७ देवस्थाने यांना आदर्श नवरात्रोत्सव साजरा करण्याबद्दलची निवेदने देण्यात आली. 
१ आ. विविध माध्यमांतून केलेले प्रबोधन
१ आ १. व्हॉटस् अ‍ॅप : व्हॉटस् अ‍ॅपच्या माध्यमातून २ सहस्र हिंदूंपर्यंत नवरात्रोत्सवाची शास्त्रीय माहिती पोेचवण्यात आली. 
१ आ २. ध्वनी-चित्रचकती : ३ शहरांत आदर्श नवरात्रोत्सव आणि शास्त्र या संदर्भातील ध्वनी-चित्रचकतीचे प्रसारण करण्यात आले. त्याचा ९३ सहस्रांहून अधिक दर्शकांनी लाभ घेतला.

दुर्जनांचे उदात्तीकरण करणार्‍या प्रवृत्तींचा निषेध नोंदवा !

   विजयादशमीच्या कालावधीत सामाजिक संकेतस्थळांवर एक पोस्ट व्हायरल (मोठ्या प्रमाणावर प्रसारित) झाली होती. त्यामध्ये रावण हा हल्लीच्या अत्याचारी दुर्जनांपेक्षा कसा चांगला होता, हे लिहिले होते. आजकाल दुर्जनांचे उदात्तीकरण करण्याची विद्रोही प्रवृत्ती मोठ्या प्रमाणात बळावली आहे. त्याचेच हे उदाहरण आहे. जिथे जिथे शक्य आहे, तिथे त्यांना वैचारिक विरोध करत राहिला पाहिजे. रावण प्रजेचा छळ करत होता. त्याने कुकर्मे केली; म्हणूनच प्रभु श्रीरामांनी त्याचा वध केला. सामाजिक संकेतस्थळांवरील सदर संदेशात रावण किती ज्ञानी, परस्त्रीचा आदर करणारा, शिवभक्त, लंकाधीश अशी अनेक गुणविशेषणे त्याच्यावर उधळण्यात आली होती. दुर्जनांमधील कमीतकमी वाईट कोण, हे शोधून त्याचे कौतुक करणे, हे कितपत योग्य आहे ! दुर्जन हा अल्प किंवा अधिक दुर्जन असा नसतो, तर तो अत्याचारीच असतो.

देशांतर्गत सर्जिकल स्ट्राईकची आवश्यकता !

      देशाच्या सीमेवर जसे सर्जिकल स्ट्राईक करण्यात येऊन आतंकवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. त्याचप्रमाणे भारतातील आतंकवाद्यांसाठीही सर्जिकल स्ट्राईक करणे आवश्यक आहे. आतंकवाद्यांना सर्व प्रकारची माहिती पुरविणारे औरंगाबादी हस्तक भारतातील महत्त्वाची कार्यालये, आस्थापने, शासकीय आस्थापने, विद्यापीठ, सैनिक खाते, जहाज आस्थापन आणि मंत्रालय येथील इतर महत्त्वपूर्ण ठिकाणांतून गुप्त कार्यवाही करून महत्त्वाची माहिती, नकाशे, भूभाग, इतिहास, डाटा पाकड्यांपर्यंत पाठवण्याचे काम करत आहेत. याचे अनेक पुरावे सरकारला मिळाले आहेत. जनतेलाही याविषयी ठाऊक आहे. वृत्तपत्रांतून हे सर्व प्रसिद्धही होते. याकडे भारत सरकारने गांभीर्याने लक्ष देणे महत्त्वाचे आहे.
      सरकारी खात्यात असणारे असे हस्तक शोधून काढणे आवश्यक आहे. त्यासाठी इंटर्नल सर्जिकल स्ट्राईकची आवश्यकता असून तशी मोहीमच पंतप्रधानांनी राबवावी. अशी जनतेची मागणी आहे. भारतात राहून भारताशी गद्दारी करणार्‍यांना कंठस्नान हीच खरी शिक्षा देऊन भारताच्या तिरंग्याची शान भारत सरकारने वाढवावी ! 
- प्रा. श्रीकांत भट, अकोला

राष्ट्र विखंडनाचे कूटनैतिक षड्यंत्र

      सोव्हिएत रशियाची गुप्तहेर एजंसी केजीबी चे माजी प्रचार एजंट आणि विशेषज्ञ यूरी एक्जेन्ड्रोव्हिच बेज्मेनोव्ह यांनी राष्ट्राच्या विखंडणाच्या षड्यंत्रासंदर्भात खळबळजनक खुलासे केले होते. भारताला ते तंतोतंत लागू होतात. ऋषि प्रसाद या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या या षड्यंत्राची माहिती आमच्या वाचकांसाठी साभार प्रकाशित करत आहोत. 
१. देशाची सैद्धांतिक विचारधाराच नष्ट करणे
     एखाद्या देशाच्या सैद्धांतिक विचारधारेचे नष्टीकरण ही उघड उघड अशी एक योजना आहे की, जिच्याद्वारे कोणत्याही देशाचा, जातीचा, धर्माच्या सिद्धान्ताचा, विचारधारेचा अथवा व्यवस्थेचा नाश करून दुसर्‍या देशांची विचारधारा आणि व्यवस्था स्थापित केली जाते.

दूधातील भेसळ रोखण्यासाठी संतांना याचिका प्रविष्ट करावी लागणे लज्जास्पद !

      देशाच्या सर्वच भागांमध्ये भेसळयुक्त दुधाची सर्रास विक्री करण्यात येत आहे. यामुळे लोकांचे आरोग्य धोक्यात आले असून, ही अतिशय गंभीर बाब आहे, अशा शब्दात चिंता व्यक्त करतांना, भेसळयुक्त दुधाची विक्री रोखण्यासाठी राज्यांनी तातडीने पावले उचलायलाच हवीत, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. उत्तराखंडमधील स्वामी अच्युतानंदतीर्थ यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांच्या एका गटाने ही याचिका प्रविष्ट केली आहे. युरीया, साबण, रिफाइंड तेल, कॉस्टीक सोडा आणि पांढर्‍या रंगाचा वापर करून दुधाची निर्मिती करण्यात येत आहे. या दुधाचा पुरवठा देशातील सर्वच राज्यांमध्ये करण्यात येत आहे. हे दूध आरोग्यास अतिशय अपायकारक असून, कर्करोगासारख्या विविध रोगांना त्यामुळे आमंत्रण मिळत आहे, याकडे याचिकाकर्त्यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले आहे. (साप्ताहिक वीरवाणी, वर्ष ३७, अंक ८, ५ जुलै २०१३)पोलीस आणि सरकार काही करत नसल्याने नागरिकांनाच कृती करावी लागते. आता अशा नागरिकांवर पोलीस तत्परतेने कृती करतील !

     गया (बिहार) येथील मोचरिम गावात एका कार्यक्रमात पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देणार्‍या १६ धर्मांधांपैकी तिघांना नागरिकांनी पकडून चोपल्याची घटना नुकतीच घडली. त्यांना रात्रभर बांधून ठेवण्यात आले होते. घोषणा देणारे धर्मांध ग्लेज ट्रेडिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेडशी संबंधित होते. पोलीस त्यांचे आतंकवाद्यांशी संबंध आहेत का, याची चौकशी करत आहेत.

आता निवडणुका जवळ आल्या म्हणून साड्या वाटल्या का ? मुख्यमंत्र्यांनी स्वत:चे छायाचित्र असलेल्या साड्या वाटणे म्हणजे निवडणुकीच्या प्रचाराचे फिरते फलक होय !

      भाऊबिजेच्या निमित्ताने मतदारसंघातील महिलांना साड्या वाटल्याच्या प्रकरणी पत्रकारांनी विचारले असता गोव्याचे मुख्यमंत्री पार्सेकर म्हणाले, मी भाऊबिजेच्या निमित्ताने माझ्या मतदारसंघातील बहिणींना साड्यांचे वितरण केले आहे. माझे छायाचित्र असलेल्या साड्या मी उघडपणे महिलांना दिल्या आहेत. यात कोणतीही लपवाछपवी केलेली नाही.


आध्यात्मिकतेचा वारसा असेपर्यंत जगातील कोणत्याही शक्तीला भारताचा विनाश करणे अशक्य !

      भारताचा आत्मा म्हणजे धर्म आहे. आध्यात्मिकता आहे म्हणूनच भारताचे पुनरुत्थानसुद्धा धर्माद्वारेच होईल. भारताचे प्राण धर्मातच सामावले आहेत. हिंंदु लोक जोपर्यंत आपल्या पूर्वजांचा महान वारसा विसरत नाहीत, तोपर्यंत या जगातील कोणतीही शक्ती त्यांचा विनाश करू शकत नाही. जोपर्यंत शरीरातील रक्त शुद्ध आणि शक्तीसंपन्न आहे, तोपर्यंत त्या देहात कुठल्याही रोगाचे जंतू जिवंत राहू शकत नाहीत. आपले जीवनरक्त म्हणजे आध्यात्मिकता होय. जर ते आपल्या अंगातून स्पष्टपणे, जोरदार, शुद्ध आणि बलसंपन्न असे वहात असेल, तर सर्वकाही सुरळीत होईल. जर ते रक्त शुद्ध असेल, तर राजकीय, सामाजिक आणि अन्य भौतिक दोष अगदी या भूमीची गरिबीसुद्धा सर्व काही सुधारले जाईल. 
- श्री. राजाभाऊ जोशी (मासिक लोकजागर, दिवाळी विशेषांक २००८)

सर्वधर्मसमभावचा खरा अर्थ काय ?

      सर्वधर्मसमभाव याचा अर्थ आपल्या धर्माविषयी उदासीनता बाळगणे, असा होत नाही. मध्यप्रदेशमधील भोजशाळेत, म्हणजे सरस्वती मंदिरात मुसलमान समाजाला प्रत्येक शुक्रवारी नमाज पढण्यासाठी अनुमती दिली गेली; मात्र हिंदूंच्या गणपतीच्या मिरवणुकीला मशिदीसमोरून जाण्यास अनुमती दिली जात नाही. 
- श्री. दुर्गेश परुळकर (संदर्भ : मासिक धर्मभास्कर, सप्टेंबर २०१३)

भारतीय शास्त्र आणि पाश्‍चात्य सिद्धांत !

      न्या. वुड्रॉफच्या म्हणण्यानुसार, सुशिक्षित समाज पाश्‍चात्त्यांचा मानसपुत्र झाला आहे. वस्तुत: आपल्या समस्यांचे स्वरूप काय आहे ? हे आपणच आपल्या शास्त्रीय दृष्टीने समजून घेतले पाहिजे. एखाद्या भांड्यातून पडलेल्या दाण्यांप्रमाणे पाश्‍चात्त्य सिद्धांत विखरत जातात. भारतीय शास्त्रे मात्र वृक्षाप्रमाणे असतात. त्यांची वाढ एकसंध असते. 
- डॉ. पानसे (त्रैमासिक प्रज्ञालोक, डिसेंबर १९८४)

होशियारपूर, पंजाब येथील भृगूवाचक डॉ. विशाल शर्मा यांचा सनातन संस्थेला आशीर्वाद !

भृगु महर्षि महर्षीमधील
भृगु मीच आहे ! - भगवद्गीता
     सप्तर्षींच्या आशीर्वादासमवेतच आता भृगू महर्षींचाही आशीर्वाद सनातन संस्थेला प्राप्त होणे आणि महर्षींमधील महर्षि जे भृगु तो म्हणजे मीच असल्याचे श्रीकृष्णाने गीतेमध्ये सांगणे
१. महर्षींच्या कृपेने डॉ. विशाल शर्मा
यांना अंकविद्येचे ज्ञान प्राप्त होणे
     भृगु महर्षींच्या कृपाशीर्वादाने त्यांना अंकविद्या प्राप्त आहे. १० आकड्यांपैकी कोणताही एक अंक ते आपल्याला ठरवण्यास सांगतात. आपण निवडलेल्या अंकावरून लगेचच ते आपले नाव, आपण कुठून आलो आहोत, या भृगु दरबारात येण्याचा तुमचा उद्देश काय आहे, हे अगदी बरोबर सांगतात; कारण भृगु महर्षींनी त्यांना शिकवलेल्या अंकविद्येतून त्यांना ही माहिती मिळते.
     यातूनच कळते की, अध्यात्मशास्त्र किती प्रगल्भ आहे आणि भारतात अजूनही असे अंकविद्या जाणणारे लोक आहेत.
१ अ. दहा भूमींएवढे शेत नांगरण्यासाठी जेवढी शक्ती लागते, तेवढी शक्ती एका अंकावरची माहिती काढण्यासाठी लागते, असे डॉ. विशाल शर्मा यांनी सांगणे : अंकविद्येबद्दल सांगतांना डॉ. विशाल शर्मा म्हणाले, दहा भूमींएवढे शेत नांगरण्यासाठी जेवढी शक्ती लागते, तेवढी शक्ती एका अंकावरची माहिती काढण्यासाठी लागते. अंकविद्येवरून ज्या वेळी ते काही सांगतात, तेव्हा खरंच, त्यांना पुष्कळच घाम येतो आणि त्यांना दमल्यासारखे होते.
संहितावाचन करतांना डॉ. विशाल शर्मा
२. भृगु महर्षींच्या आज्ञेनुसार विश्‍वविद्यालयाचे नामकरण
महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय असे होणे
     ४.८.२०१५ या दिवशी भृगुसंहितेतून आलेल्या फलादेशामध्ये भृगु महर्षींनी अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे नामकरण महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय असे करण्यास सांगितले आणि तसे आपण केलेही. या वेळी ज्या भुर्जपत्रावर हा फलादेश आला, त्या पानावर आपोआपच विभूतीही आली. ही विभूती तुम्हाला आशीर्वाद म्हणून महर्षींनी भृगुलोकातून पाठवली असल्याचे, डॉ. विशाल शर्मा यांनी सांगितले.
३. भृगु महर्षींच्या कृपेमुळे शिवसंहितेचे एक पान आशीर्वाद म्हणून सनातन संस्थेला प्राप्त होणे
     या वेळी भृगु महर्षींच्या आदेशाने डॉ. विशाल शर्मा यांच्याकडे असलेल्या शिवसंहितेचे एक पान त्यांनी सनातन संस्थेला आशीर्वाद म्हणून दिले

उज्जैन येथे झालेल्या सिंहस्थपर्वात संतांच्या मार्गदर्शनाखाली सेवा करतांना आपत्काळातही प.पू. डॉक्टरांच्या कृपेची विविध प्रसंगांतून आलेली अनुभूती !

१. दोन दिवस अकस्मात् आलेल्या पावसामुळे साधकांनी संघटितपणे ग्रंथ इत्यादी साहित्य
वाचवण्यासाठी प्रयत्न करणे आणि सेवा अल्प होत असल्याची परिस्थिती स्वीकारली जाणे
     मी ज्या दिवशी उज्जैनला कुंभमेळ्याच्या ठिकाणी आले आणि दुपारी सेवा चालू केली, त्याच दिवशी म्हणजे ५.५.२०१६ ला दुपारी ४ वाजता अकस्मात पुष्कळ मोठा पाऊस झाला. साधकांनी या स्थितीत स्थिर राहून संघटितपणे ग्रंथ इत्यादी साहित्य वाचवण्यासाठी प्रयत्न केले. त्या दिवशी पू. स्वातीताईंनी (पू. (कु.) स्वाती खाडये यांनी) कुंभमेळ्यातील अन्य संप्रदायांचे संत, महाराज आणि हितचिंतक यांच्याकडे साधकांची रहाण्याची व्यवस्था केली. सेवा सुरळीतपणे चालू होण्यास दोन दिवस लागले. त्यानंतर ९.५.२०१६ या दिवशी सेवेसाठी सनातनच्या कक्षात एका साधिकेसमवेत गेले, दुपारी थोडी सेवा झाली आणि पुन्हा मुसळधार पाऊस झाला. मला दुसर्‍या वेळीही सेवेला आल्यावर अगदी थोडीच सेवा करता आली. या दोन्ही वेळी परिस्थिती स्वीकारण्यास देवाने शिकवले.
२. पावसाच्या कालावधीत प.पू. डॉक्टरांच्या कृपेमुळे वेदभारती माताजींच्या आश्रमात
रहाण्याची सोय होणे आणि तेथे अतिथी देवो भव या वचनाचा प्रत्यय येणे
     पावसाच्या कालावधीत एका वेदभारती माताजींच्या आश्रमात रात्री रहाण्याची आमची सोय झाली. तेथे आम्ही रात्री १० च्या सुमारास १५ साधक गेलो, तरी त्यांनी आनंदाने आमचे स्वागत केले. सर्वांना झोपण्यासाठी गाद्यांची सोय केली. सकाळी चहाची सोय करून आम्हाला अल्पाहार घेऊन जाण्यासाठी आग्रह केला. आम्ही त्यांना अल्पाहार सेवेला साहाय्य करण्यासाठी गेल्यावर ईश्‍वराने आम्हाला तुमची सेवा करण्याची संधी दिली आहे, असे सांगून त्यांनी अतिथी देवो भव याचा त्यांच्या वागणुकीतून प्रत्ययच दिला. तेव्हा प.पू. डॉक्टरांसारखे महान गुरु मिळाल्याने आम्ही किती भाग्यवान आहोत, असे वाटले.

हे शास्त्र केवळ गुरूंसाठी लिहिले नसून सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ आणि सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्यासाठीही लिहिले आहे, असे सांगून महर्षींनी सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे केलेले गुणवर्णन !

महर्षींची शिकवण आणि कार्य !
१. पू. (सौ.) बिंदा या आभरणनायकी देवाचे सौंदर्य दाखवणारी देवी आहेत !
     महर्षि म्हणत आहेत, हे शास्त्र केवळ गुरूंसाठी लिहिले, असे नाही. हे कार्तिक पुत्री, हे तुझ्यासाठीही लिहिले आहे. तुझ्या गुरूंसमवेत आणखी एक साधिका आहे, तिच्यासाठीसुद्धा हे शास्त्र लिहिले आहे. तिचे नाव एवढे सुंदर आहे की, तिच्या नावामधून फुलांचा सुगंध येतो. ती आभरणनायकी देवाचे सौंदर्य दाखवणारी देवी आहे. त्या देवीविषयी मी तुला थोडे सांगतो. तिचा जन्म उत्तरा नक्षत्रात झाला आहे. वृंदावनात कृष्णासमवेत गोपी होत्या. फुलांचा सुगंध जसा फुलांसमवेतच असतो, तसे त्या कृष्णासमवेतच असायच्या. त्यांच्यातील एक नाव येथे आहे. त्यांचे नक्षत्र उत्तराफाल्गुनी असून राशी कन्या आहे. त्यांचा जन्म मंगळवारी झाला असून त्यांची जन्मवेळ आणि गुरूंच्या जन्माची वेळ सारखीच आहे. पृथ्वीच्या भ्रमणगतीनुसार फारतर एक-दोन मिनिटांचा फरक पडू शकतो; पण वेळ साधारण सारखीच आहे.
सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ
सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ
२. पू. (सौ.) बिंदाताई यांचा महालय 
(सर्वपित्री) अमावास्येच्या दिवशी जन्म झाल्यामागचे महर्षींनी सांगितलेले कारण
     महर्षि पुढे म्हणतात, आम्ही तिला महालय अमावास्येच्या दिवशी जन्म दिला आहे. आम्ही तिला अशा वेळी जन्म का दिला ? याचे कारण म्हणजे अनेक जणांना मृत्यूनंतर गती मिळत नाही. त्या अनेक जिवांना शांती मिळण्यासाठी आम्ही तिला महालय अमावास्येच्या दिवशी असा जन्म दिेला आहे. हे नक्षत्र आणि महालय मासातील शेवटचा शनिवार याला महत्त्व आहे. शास्त्रामधे विष्णूसाठी तो महत्त्वाचा दिवस आहे !

जगभर सनातन संस्थेची आणि गुरूंची कीर्ती होणार !

     महर्षि पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांना म्हणतात, गेल्या काही दिवसांपासून तुम्ही शास्त्रासमवेत आहात. येथे शास्त्र ऐकत असता; पण तेथे आश्रमात, सनातन संस्थेच्या स्तरावर आणि पृथ्वीच्या स्तरावर काय काय घडत असते ! असेच पुढे पुढे होत जाणार आहे. जगभर सनातन संस्थेची आणि गुरूंची कीर्ती होणार आहे. तुम्ही येथेच बराच काळ शास्त्रासमवेत असणार आहात ! आपण उत्तुंगाकडे चालत असणार !
(संदर्भ : सप्तर्षि जीवनाडीपट्टीवाचन क्रमांक ५२, हॉटेल कोहिनूर, खोली क्रमांक ११२, इरोड, तमिळनाडू. (२१.१२.२०१५, दुपारी ३ वाजून २४ मिनिटे))

संतसहवासाचा लाभ करून घेण्याची तळमळ असलेला चि. नंदन कुदरवळ्ळी (वय ४ वर्षे) !

  
चि. नंदन कुदरवळ्ळी
   २३.७.२०१६ या दिवशी मला आणि नंदनला सद्गुरु (सौ.) गाडगीळकाकूंची गाडी आश्रमातील धान्य-विभागाच्या बाहेर उभी दिसली. ती गाडी बघून नंदन पू. काकूंची गाडी, पू. काकू आल्या, असे आनंदाने उड्या मारत होता. आम्ही पू. गाडगीळकाकूंना भेटायला त्यांच्या खोलीत गेलो.
     पू. काकूंना पाहून नंदनला पुष्कळ आनंद झाला. पू. काकूंना भेटून आम्ही बाहेर आल्यावर नंदनने मला विचारले, आई, मी पू. काकूंच्या सहवासाचा लाभ करून घेतला का ? नंतर आम्ही आमच्या खोलीत आलो. त्या वेळी माझे नंदनशी झालेले संभाषण पुढीलप्रमाणे आहे.
मी : तू पू. गाडगीळकाकूंच्या खोलीत त्यांना भेटायला धावत का गेलास ?
नंदन : मला आनंद झाला. पू. काकू किती दिवसांनी आल्या. आम्ही बरेच दिवस भेटलो नाही; म्हणून धावत गेलो.
मी : तुला पू. काकू प्रतिदिन भेटतात ना ?
नंदन : पू. काकू इतके दिवस आश्रमापासून दूर होत्या; म्हणून मी धावत गेलो.
मी : त्यांना भेटल्यावर तुला काय वाटले ?
नंदन : आनंद झाला. पू. काकूंमध्ये मला श्रीकृष्ण दिसला. (असे सांगतांना नंदनने कृष्ण त्यांच्या हृदयात दिसल्याचे हात करून दाखवले.)
मी : काकू, तुझ्याशी प्रेमाने बोलत होत्या, तेव्हा तुला काय वाटले ?
नंदन : मलाही पू. काकूंवर प्रेम करूया, असे वाटले.
मी : पू. काकू येणार आहेत,

प्रधान गुण आणि भक्तीयोग यांनुसार पूरक साधना

पू. डॉ. वसंत आठवले
पू.डॉ. वसंत आठवले (अप्पाकाका) यांच्या कार्तिक शुक्ल पक्ष सप्तमी
(७ नोव्हेंबर २०१६) या दिवशी असलेल्या
 तृतीय पुण्यतिथीच्या निमित्ताने...
तमप्रधान
     अशी व्यक्ती आळशी असून ती नामस्मरण करण्यास कंटाळा करते. अशा व्यक्तीला अवतारांच्या गोष्टी, गुरुचरित्र, शिवलीलामृत इत्यादी मोठ्याने वाचण्यास सांगावे. तिला समजेल अशा सोप्या गोष्टी किंवा भाग वाचण्यास सांगावे, तसेच प्रतिदिन एक सहस्र वेळा नामजप किंवा एकदा विष्णुसहस्रनाम लिहिण्यास सांगावे.
रजप्रधान
      अशी व्यक्ती नामावर मन एकाग्र करू शकत नाही. तिने विष्णुसहस्रनाम, गणेशसहस्रनाम किंवा पुरुषसूक्त इत्यादी मोठ्याने वाचावे किंवा श्रीमद्भगवदगीतेतील एखादा अध्याय वाचावा.
सत्त्वप्रधान
     अशा व्यक्तीची एखाद्या ठिकाणी लक्ष केंद्रित करण्याची क्षमता असते; म्हणून तिने एखादे नाम किंवा गुरुमंत्र यांचा जप करावा. सात्त्विक व्यक्तीमध्ये कधीकधी रज-तम गुण उफाळून येतात, त्या वेळी नामस्मरण करणे कठीण जाते. अशा वेळी नाम किंवा गुरुमंत्र मोठ्याने म्हणावा किंवा विष्णुसहस्रनाम म्हणावे.

महर्षींचे जीवनाडीपट्टीवाचन ऐकतांना सौ. मनीषा गायकवाड यांना आलेल्या अनुभूती

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...
१. महर्षींचा जीवनाडीपट्टीवाचन सोहळा पहातांना विष्णुलोकात असल्याचे
जाणवणे आणि गुरुदेवांमुळे हे अनमोल क्षण अनुभवायला
मिळाल्यामुळे त्यांच्याविषयी कृतज्ञता वाटून सतत भावजागृती होणे
      ३०.५.२०१६ या दिवशी दुपारी १२ ते ४.३० या वेळेत झालेला जीवनाडीवाचन सोहळा पहात आणि ऐकत असतांना मी कुठल्या तरी वेगळ्या विश्‍वात, म्हणजेच विष्णुलोकात आहे आणि गुरुदेवांमुळे आपल्याला हे अनमोल क्षण अनुभवायला मिळत आहेत, असे वाटत होते. त्यामुळे सतत भावजागृती होत होती.
२. नाडीवाचन ऐकतांना मुलांना पितृदोष आहे यासाठी काही उपाय असेल का ?, असा विचार
आल्यावर थोड्याच वेळात महर्षींनी नाडीवाचन ऐकणार्‍यांना पितृदोष असतील, तर ते
नाहिसे होतील, असे सांगितल्याचे ऐकल्यावर शब्दातीत कृतज्ञता वाटून पुष्कळ रडू येणे
      नाडीवाचन ऐकतांना मनात आले, माझ्या मुलांना पितृदोष आहे. यासाठी काही उपाय असेल का ? थोड्याच वेळात महर्षींनी पू. ॐ उलगाथन् यांच्या माध्यमातून सांगितले, हे नाडीवाचन ऐकणार्‍यांना काही पितृदोष असतील, तर ते नाहिसे होतील. हे ऐकले आणि मला पुष्कळ रडू आले. देवा, आमच्यासाठी किती करतोस ?

आमची गुरुपरंपरा !

सौ. माधवी घाटे
श्रीमत्परमहंस चंद्रशेखरानंद यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने...
प.पू. गुरुदेव यांच्या चरणी,
कृतानेक शिरसाष्टांग नमस्कार.
परात्पर गुरूंची परंपरा लाभल्याने आनंद होऊन कृतज्ञता व्यक्त होणे
     देवा, मी बुद्धीहीन आहे, हे आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही; कारण मी काय, कशी आणि कुठे होते ?, हे मी जीवदशेत आल्यापासून या क्षणापर्यंत आपण जाणता. अशा या बुद्धीहीन जिवावर आपण केलेल्या कृपावर्षावामुळे त्यालाही काही सुचवावेसे आपणास वाटले, त्यासाठी कोटी कोटी कृतज्ञता !
     गुरुदेव, प.पू. भक्तराज महाराज यांचे चरित्र वाचतांना त्यातील आपले काव्य वाचले आणि हे श्रीकृष्णा, तुझ्या आणि प.पू. गुरुदेवांच्या कृपेने स्फुरलेले काही शब्द तुझ्याच चरणी अर्पण करत आहे.
     पूर्वी प.पू. गोंदवलेकर महाराजांचे चरित्र वाचले. त्यात त्यांनी असे सांगितले आहे की, त्यांच्या गुरुपरंपरेतील प्रत्येक जण परमोच्च पदाला पोचले होते. त्या वेळी माझ्या मनात असा विचार आला होता, महाराज, तुम्ही किती भाग्यवान होतात ! अशी गुरुपरंपरा आपणास लाभली. आता या घोर कलियुगात असे संत कुठे लाभणार ? सर्वत्र भोंदू संतांचाच भरणा आहे. कुणाला लुबाडण्यासाठी, स्वतःला मान मिळावा यासाठी प्रत्येक तथाकथित संतांची झालेली अवस्था बघून मी गर्भगळितच झाले होते.
     भगवंता, माझी तळमळ तुझ्यापर्यंत पोचली. श्रीगणेश आणि श्रीकृष्ण यांच्या अन् तुझ्या कृपेने त्यांनी माझ्यासारख्या निर्बुद्ध आणि अज्ञानी जिवाची गाठ सनातन संस्थेच्या माध्यमातून परात्पर गुरूंशी घालून दिली. आपल्यासारखे परात्पर गुरु साक्षात् लाभले. कोटी कोटी कृतज्ञता ! देवा, आपल्या कृपेने आम्हालाही हे म्हणण्याची सुसंधी आपण दिलीत, आमची गुरुपरंपराही परात्पर गुरूंचीच आहे.

लहानपणापासून साधनेची आणि अभ्यासाची आवड असणारी ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली मस्कत (ओमान) येथील कु. मुक्ता प्रसाद पेंढारकर (वय ५ वर्षे) !

उच्चलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र 
चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. मुक्ता प्रसाद पेंढारकर एक दैवी बालक आहे !
चि. मुक्ता पेंढारकर
     जुलै २०१५ पासून वर्षभरात चि. मुक्ता पेंढारकर हिची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये आणि स्वभावदोष पुढे देत आहे. 
१. लवकर उठणे 
     मुक्ताला शाळेत जाण्यासाठी सकाळी अनुमाने ६.३० वाजता उठावे लागते, तरी ती कधीच लवकर उठण्याचा आळस करत नाही किंवा रडतही नाही.
२. अभ्यासाची आवड असणे 
     मुक्ताला अभ्यास करायला सांगितल्यावर ती कधीच नाही, असे म्हणत नाही. 
३. घरकामांत साहाय्य करणे
    मुक्ता लहान असूनही तिच्या आईला घरकामात कांदे सोलणे, भाजी निवडणे, कपडे घड्या करून ठेवणे, कपडे वाळत घालायला साहाय्य करणे, कचरा उचलणे इत्यादी साहाय्य करते.

प्रार्थना करतांना मनात सनातन पंचायतनचा विचार येऊन त्यात प.पू. डॉक्टर, गणपति, श्रीकृष्ण, सद्गुरु (सौ.) अंजलीताई आणि सद्गुरु (सौ.) बिंदाताई दिसणे अन् त्यानंतर मनाला प्रसन्न आणि शांत वाटणे

श्रीमती रजनी नगरकर
     ३१.१०.२०१६ (बलीप्रतिपदा) या दिवशी मी पहाटे नामजप करण्यासाठी ध्यानमंदिरात बसले होते. प्रार्थना करतांना माझ्या मनात रामपंचायतनाचा विचार आला. रामपंचायतनात श्रीराम मध्यभागी असतात. मग आपले सनातन पंचायतन कसे असेल ?, असा विचार मनात येताच मध्यभागी प.पू. डॉक्टर, त्यांच्या उजव्या बाजूला गणपति आणि त्याच्या शेजारी सद्गुरु (सौ.) अंजलीताई निळ्या साडीत दिसल्या. प.पू. डॉक्टरांच्या डाव्या बाजूला भगवान श्रीकृष्ण आणि त्याच्या शेजारी सद्गुरु (सौ.) बिंदाताई पिवळ्या साडीत दिसल्या. या दोन्ही सद्गुरु म्हणजे सनातनच्या रिद्धि-सिद्धिच आहेत, असे मला वाटले.
     हे चित्र दिसताच मनाला प्रसन्न आणि शांत वाटले. देवा, या पंचायतनात प.पू. डॉक्टर पुष्कळ तेजस्वी आणि शांत वाटत होते. देवा, या पवित्र दिनी तू मला हे दृश्य दाखवून माझ्यावर उपाय केलेस; म्हणून मी तुम्हा सर्वांच्या प्रती अत्यंत कृतज्ञ आहे. त्याच दिवशी दैनिक सनातन प्रभातमध्ये महर्षींनी प.पू. डॉक्टर, सद्गुरु (सौ.) अंजलीताई आणि सद्गुरु (सौ.) बिंदाताई यांच्याबद्दल काढलेले पुढील उद्गार छापले होते, या तिघांविना धर्मस्थापना होऊ शकत नाही. त्यामुळे त्रिमूर्तीप्रमाणेच हे ३ गुरु आहेत. या तिघांचा उल्लेख आम्ही तीन गुरु असा करत आहोत.

पू. अप्पाकाकांच्या जिवंतपणी आणि देहत्यागानंतरही त्यांच्या प्रेमभावाची साधिकेला आलेली प्रचीती !

कु. सुषमा पेडणेकर
     प्रारंभी सेवेनिमित्त माझा पू. अप्पाकाकांशी संपर्क होत असे. त्या वेळी दैनिक सनातन प्रभातमध्ये एखाद्या साधकाचा आध्यात्मिक स्तर ६१ टक्के झाल्याचे छापून आल्यावर पू. अप्पाकाका मला विचारायचे, तुम्ही तुमचा नंबर कधी लावणार ? त्या वेळी मी त्यांना म्हणायचे, काका, ठाऊक नाही. प.पू. डॉक्टर सांगणार तेव्हा; पण मी अजून पुष्कळ न्यून पडते. अजून प.पू. डॉक्टरांना अपेक्षित असे पुष्कळ प्रयत्न करायचे आहेत.
     २६.२.२०१६ या दिवशी (२६.२.२०१६ या दिवशी कु. सुषमा पेडणेकर यांनी ६१ टक्के पातळी गाठल्याबद्दल उद्घोषित करण्यात आले.) संध्याकाळी मी घरी जातांना बसमधून आकाशाकडे पहात होते. त्या वेळी आकाशात मला पू. अप्पाकाकांचा हसणारा तोंडवळा दिसला. (पू. अप्पाकाकांचा देहत्याग झाला आहे.) ते मला म्हणाले, तुम्ही तुमचा नंबर लावला तर ! मी त्यांना म्हटले, ही प.पू. माऊलीची कृपा आहे. त्यांनीच माझा नंबर लावला. त्यानंतर आम्ही दोघेही हसायला लागलो. यातून मला शिकायला मिळाले, संतांचा देहत्याग झाला असला, तरी ते साधकांच्या आनंदात सहभागी होऊन त्यांना आनंद देतात.

पंचम हिंदू अधिवेशनाच्या वेळी डॉ. (सौ.) कस्तुरी भोसले यांना आलेल्या अनुभूती

डॉ. (सौ.) कस्तुरी भोसले
१. पंचम हिंदू अधिवेशनाच्या सेवेत रुग्णाईत असल्यामुळे सहभागी होऊ शकत
नसल्याने हे हिंदू अधिवेशन निर्विघ्नपणे पार पडू दे, अशी ईश्‍वराप्रती प्रार्थना होणे
     ११ ते १८.६.२०१६ या कालावधीत सनातनचा रामनाथी आश्रम पंचम हिंदू अधिवेशनाच्या भावतरंगात रंगून गेला होता. संपूर्ण भारतभरातील हिंदु धर्माभिमानी आणि कर्महिंदू यांचे आश्रमात आगमन होणार आहे, या आनंदात आश्रमातील प्रत्येक साधकाचा यामध्ये प्रत्यक्ष - अप्रत्यक्षपणे सहभाग वाढला होता. मी रुग्णाईत असल्यामुळे शारीरिकदृष्ट्या काही करू शकत नव्हते; पण हे हिंदू अधिवेशन निर्विघ्नपणे पार पडू दे, अशी ईश्‍वराप्रती सारखी प्रार्थना करत होते.
२. पूजा करतांना प.पू. श्री अनंतानंद साईश यांचे दर्शन का झाले नाही ? असा प्रश्‍न मनात
येणे आणि त्यांनी श्री चंद्रशेखरानंद यांच्यासह स्वप्नात येऊन पंचम हिंदू अधिवेशनाला
कृपाशीर्वाद दिल्याचे दिसणे अन् अंतःकरण कृतज्ञतेने भरून येणे
     १८.६.२०१६ या दिवशी मी आमच्या खोलीत उपायांसाठी लावलेल्या प.पू. श्री अनंतानंद साईश यांच्या छायाचित्राची प्रतिदिनप्रमाणे पूजा करत होते. तेव्हा मी मनात म्हणाले, बडे बाबा, मला तुमचे दर्शन अजूनपर्यंत का झाले नाही ? नंतर दिवसभर सेवा आणि नामजप यांंमध्ये मी हे विसरूनही गेले. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी (१९.६.२०१६ या दिवशी) पहाटे ४.३० वाजता मला स्वप्नात प.पू. श्री अनंतानंद साईश आपल्या अंगावरील शाल सावरत एका सभागृहात येत असलेले दिसले. मी त्या सभागृहात बसले होते आणि त्यांना पहाताच मी मनात म्हटले, अरे, हे तर प.पू. श्री अनंतानंद साईश ! मी त्यांना मनोमन भावपूर्ण वंदन केले. त्यांच्या पाठोपाठ श्री चंद्रशेखरानंदही येतांना दिसले. तेव्हा माझ्या आनंदाला पारावार राहिला नाही.

सौ. शौर्या मेहता यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली, त्या वेळी कु. दीपाली पवार यांनी त्यांना दिलेले शुभेच्छापत्र !

सौ. शौर्या मेहता
       सौ. शौर्या मेहता यांनी वर्ष २०१४ मध्ये ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली, त्या वेळी कु. दीपाली पवार यांनी त्यांना शुभेच्छापत्र दिले होते. ते येथे प्रसिद्ध करत आहोत. (सौ. शौर्या यांची सध्याची आध्यात्मिक पातळी ६६ टक्के आहे.) सौ. शौर्या मेहता यांचा कार्तिक शुक्ल पक्ष षष्ठीला (६.११.२०१६ ला) वाढदिवस झाला.
अन्य शुभेच्छापत्रांतील लिखाण
शौर्या हे नाव सार्थ करणे
       कुटुंबाची, नातेवाइकांची सर्व कर्तव्ये पार पाडून, त्रासाशी लढून, प्रतिदिन येऊन-जाऊन आश्रमात सेवा करून ६१ प्रतिशत आध्यात्मिक पातळी गाठून सौ. शौर्याताईंनी विवाहित, अविवाहित, संसारात राहून साधना करणार्‍या आणि आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करणार्‍या सर्व साधकांसमोर आदर्श निर्माण केला आहे. ताईंनी त्यांचे शौर्या हे नाव सार्थ केले आहे.
सौ. शौर्याताईंना आताच्या प्रगतीविषयी 
अभिनंदन आणि पुढील प्रगतीसाठी हार्दिक शुभेच्छा !
महर्लोकी सौ. शौर्याताईचेे 
स्वागत ! : महार्लोकातील जीव
       सौ. शौर्याताई महर्लोकात आली; म्हणून सर्व जीव आनंदात आहेत.
       श्रीकृष्णाच्या मागे धावण्यामुळे कृष्णाने शौर्याताईला महर्लोकी स्थान दिले.
- कु. दीपाली पवार, सनातन आश्रम, रामनाथी गोवा. (१३.१.२०१४)

साधिकेला तिच्यातील उत्कट भावामुळे वेगवेगळ्या वेळी देवता आणि संत यांचे दर्शन होणे

१. श्रीदेव बोडगेश्‍वराचे दर्शन होणे : १०.७.२०१६ या दिवशी म्हापसा, गोवा येथील श्री बोडगेश्‍वर देवाचे दर्शन झाले. प्रत्यक्षात देव बोडगेश्‍वर माझ्यापुढे उभा आहे, असे मला वाटले. माझ्याकडून पूर्ण शरणागत भावाने त्याला नमस्कार केला गेला.
२. श्री गणेशाच्या दोन मूर्तींचे दर्शन होणे : २३.७.२०१६ या दिवशी घरात अधांतरी असलेल्या श्री गणेशाच्या दोन मूर्तींचे दर्शन झाले. एक लाल रंगाची, तर दुसरी निळसर पांढर्‍या रंगाची होती. श्रीक्षेत्र गोकर्ण या तीर्थस्थळी श्री गणेशाची जशी मूर्ती आहे, त्याप्रमाणे मूर्ती दिसली.
३. नामजप करतांना प.पू. डॉक्टरांच्या छायाचित्रात त्यांचे आणि प.पू. दादाजी वैशंपायन यांचे आलटून-पालटून दर्शन होणे : २२.७.२०१६ या दिवशी सकाळी ६.१५ वाजता मी देवासमोर बसून नामजप करत होते. बहुतेक वेळा डोळे बंद करूनच माझा नामजप चांगला होतो; पण आज प.पू. डॉक्टरांच्या छायाचित्राकडे पहात नामजप करण्याचा विचार श्रीकृष्णाने मला दिला. त्याप्रमाणे नामजप करत असतांनाच हे गुरुराया, तुम्हीच माझ्यावर आध्यात्मिक उपाय करा, अशी प.पू. डॉक्टरांना भावपूर्ण प्रार्थना केली. प्रार्थना केल्यावर मला पुष्कळ जांभया आल्या. काही वेळाने प.पू. डॉक्टरांच्या छायाचित्रात प.पू. दादाजी वैशंपायन यांचे दर्शन झाले.

संतपदावर आरूढ होण्यापूर्वीपासूनच मायेतून अलिप्त असणारे पू. अप्पाकाका !

     सुमारे १५ ते २० वर्षांपूर्वी एकदा डॉ. वसंत आठवले यांचे कुटुंबीय, माझे कुटुंबीय आणि परिवारातील अन्य सदस्य एक बस करून सहलीला गेलो होतो. त्या वेळी बसमध्ये गाणी गाणे, विनोद सांगणे, गप्पा, असा गदारोळ चालू होता. मध्येच मी बसमध्ये उभा राहिलो आणि पाहिले, तर डॉ. वसंत आठवले हे त्या सर्वांमध्ये असूनही पूर्ण अलिप्त होते, जणूकाही ते एकाच वेळी २ वेगळ्या विश्‍वांत होते.
- श्री. अमरेश देशपांडे, गोवा (१५.८.२०१५)
(श्री. अमरेश देशपांडे हे श्रीमती विजया वसंत आठवले यांच्या माहेरकडचे नातेवाईक आहेत. ते रामनाथी आश्रमाला भेट देण्यासाठी आले असतांना त्यांनी वरील आठवण सांगितली होती. - सौ. नंदिनी सामंत)
      आज देशाचे पंतप्रधान बुलेटप्रूफ जॅकेट घालून लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करतात. देवळांत मेटल डिटेक्टर बसवावा लागतो. स्वतःच्याच घरात हिंदूंना असुरक्षित वाटते. ही दुर्भाग्यपूर्ण स्थिती अशीच राहिल्यास हिंदु समाज नष्ट होईल. अशा दुर्बल समाजास या जगात सोडाच, पण संपूर्ण ब्रह्मांडातही रहाण्यास सुरक्षित जागा सापडणार नाही !
- पू. आचार्य धर्मेंद्रजी महाराज

फलक प्रसिद्धीकरता

कर्नाटकातील टिपूचे वंशज 
असणार्‍या काँग्रेस सरकारची दडपशाही !
      कर्नाटक सरकारकडून साजर्‍या करण्यात येणार्‍या टिपू सुलतान जयंतीचा विरोध करणार्‍या ३१ हिंदुत्वनिष्ठ नेत्यांकडून १० लक्ष रुपयांचा बाँड भरून घेण्यात येणार आहे. गेल्या वर्षी दंगल उसळून झालेल्या हानीच्या पार्श्‍वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Tipu Jayantipar shanti rakhne hetu Karnatak Sarkar 31 Hindu Netaose 10 lakh rupayoka bond bharvakar legi.
Talibani fatwa jari karnewali Congress Sarkar
जागो ! : टीपू जयंती पर शांति रखने हेतु कर्नाटक सरकार ३१ हिन्दू नेताआें से १० लाख रुपयों का बाँड भरवाकर लेगी.
तालिबानी फतवा जारी करनेवाली कांग्रेस सरकार !
      हिंदूंनी हिंदुत्व हा आपला प्राण कुडीतून बाहेर काढून ठेवला आणि ते जिवंतपणाच्या हालचाली करू लागले; परिणामी हिंदूंचा सांगाडा झाला आहे.
- श्री. अरविंद विठ्ठल कुळकर्णी, ज्येष्ठ पत्रकार, मुंबई.
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥

या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे
      नित्य-नैमित्तिककर्मे न करणारा समाजद्रोही आहे, पर्यायाने राष्ट्र आणि मानवता यांचाही द्रोही आहे ! 
- गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

बोधचित्र

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
       अभिव्यक्ती स्वातंत्र्य, स्वैराचार हे एक वेळ प्राण्यांचे वैशिष्ट्य असू शकते, माणसाचे नव्हे. धर्मबंधनात रहाणे, धर्मशास्त्रांचे अनुकरण, असे करणाऱ्यांनाच माणूस म्हणता येते. 
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले
      हिंदु धर्माचे महत्त्व न समजणारे जन्महिंदूच सर्वधर्मसमभाव पुरस्कृत करतात !
- परात्पर गुरु डॉ. आठवले (४.४.२०१०)

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
घरघर नसणे
      एकदा घर सुटले की तो दारोदार होतो, दारोदार झाला की घरोघर होतो आणि घरोघर झाला म्हणजे तो सर्वत्र असतो; म्हणून त्याला घरघर नाही.
भावार्थ :
एकदा घर सुटले येथे घर हा शब्द माया या अर्थाने वापरला आहे. दारोदार होतो ... सर्वत्र असतो येथे सर्वव्यापी ब्रह्म किंवा ईश्‍वर या अर्थाचे वर्णन आहे. म्हणून त्याला घरघर नाही म्हणजे त्याला मृत्यूची घरघर नाही. तो अमर झालेला असतो.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण)

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

प्रत्येक कृती परमेश्‍वरी कार्य म्हणून करा !
जे काम कराल, ते श्रद्धेने, सचोटीने, शुद्ध मनाने आणि 
परमेश्‍वरी कार्य म्हणून करा, म्हणजे ईश्‍वर आपल्यापासून फार दूर नाही. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

कालाय् तस्मै नमः !

संपादकीय
     कर्नाटक राज्य सरकार क्रूरकर्मा टिपू सुलतानची जयंती येत्या १० नोव्हेंबर या दिवशी साजरी करणार आहे. कर्नाटकमधील काँग्रेसी राजवटीच्या विरोधात त्यामुळे राज्यात असंतोष निर्माण झाला आहे. टिपू सुलतान ही व्यक्ती या सत्कारासाठी लायक नाही, असेच राज्यातील जनतेला विशेषतः हिंदूंना उदाहरणांसह सांगायचे आहे. कर्नाटकच्या उच्च न्यायालयानेही सरकारले याविषयी फटकारले आहे. टिपू सुलतान स्वतःच्या हितासाठी लढलेला असतांना त्याची जयंती कशासाठी साजरी करता ?, असा प्रश्‍न न्यायालयाने विचारला आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn