Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कोटी कोटी प्रणाम !

दिनविशेष

श्री विठ्ठलाच्या निस्सीम भक्त 
संत सखूबाई यांची आज पुण्यतिथी

देशातील कारागृहांमध्ये मुसलमान कैद्यांची संख्या सर्वाधिक ! - नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोची आकडेवारी

        नवी देहली - देशातील कारागृहांतील मुसलमान कैद्यांची संख्या सर्वाधिक असल्याची माहिती समोर आली आहे. देशातील एकूण लोकसंख्येत मुसलमान १४.२ टक्के असतांना गुन्हेगारीत मात्र त्यांची टक्केवारी सर्वाधिक असणे आश्‍चर्यकारक मानले जात आहे.
१. इंडियन एक्स्प्रेस या इंग्रजी दैनिकात प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार वर्ष २०१५ मध्ये महाराष्ट्र आणि तमिळनाडू या राज्यांतील मुसलमान कैद्यांची संख्या त्यांच्या येथील लोकसंख्येच्या एक तृतीयांश इतकी होती.
२. महाराष्ट्रात मुसलमानांची लोकसंख्या राज्याच्या लोकसंख्येच्या ११.५ टक्के आहे; मात्र राज्यातील कारागृहांत ३० टक्क्यांहून अधिक कैदी मुसलमान आहेत. वर्ष २०१४ मध्ये ही टक्केवारी २६ इतकी होती. एका वर्षात ती ४ टक्क्यांनी वाढली.
३. या व्यतिरिक्त राजस्थान, गुजरात आणि बंगाल राज्यांतील मुसलमान कैद्यांची संख्या त्यांच्या लोकसंख्येच्या टक्केवारीच्या तुलनेत दुप्पट झाली आहे.
४. वर्ष २०११ च्या जनगणनेनुसार बंगालमध्ये मुसलमानांची लोकसंख्या राज्याच्या लोकसंख्येच्या २७ टक्के होती, तर राज्याच्या कारागृहांतील कैद्यांमध्ये मुसलमान कैद्यांची संख्या एकंदर कैद्यांच्या ४७ टक्के इतकी आहे. यात बांगलादेशातील घुसखोर मुसलमानांचाही समावेश आहे.

धादांत खोटा लेख प्रसिद्ध करून सनातन संस्थेची अपकीर्ती केल्याच्या प्रकरणी कन्नड

दैनिक ‘वार्ताभारती’ला 
सनातनची कायदेशीर नोटीस !
        रामनाथी (गोवा), ५ नोव्हेंबर (वार्ता.) - सनातन संस्थेचा राष्ट्र आणि धर्म या क्षेत्रातील नावलौकिक माहीत असतांना मानहानी करण्याच्या हेतूने मंगळुरू (कर्नाटक) येथून प्रसिद्ध होणार्‍या कन्नड दैनिक ‘वार्ताभारती’च्या संपादकांनी ‘सनातन संस्थेवर बंदी आणण्यास अडचण काय?’ या मथळ्याखाली मानहानीकारक संपादकीय लेख दैनिक वार्ताभारतीच्या २५ ऑक्टोबर २०१६ दिवशीच्या अंकात पृष्ठ ६ वर प्रसिद्ध केला. त्यामुळे संस्थेची अपकीर्ती झाली आहे. या प्रकरणी संस्थेचे व्यवस्थापकीय विश्‍वस्त श्री. वीरेंद्र मराठे यांनी सनातन संस्थेचे मानद कायदेविषयक सल्लागार अधिवक्ता श्री. रामदास केसरकर यांच्याकरवी दैनिक ‘वार्ताभारती’चे संपादक, मुद्रक आणि प्रकाशक ए.एस्. पुथिगे आणि मालक द कम्युनिटी मिडिया ट्रस्ट यांना कायदेशीर नोटीस बजावून मानहानी भरपाईपोटी १० कोटी रुपयांची मागणी केली आहे.
        ‘हानीभरपाईची रक्कम नोटीस मिळाल्याच्या दिवसापासून १५ दिवसांच्या मुदतीत न दिल्यास फौजदारी कारवाईसह हानीभारपाईची रक्कम वसूल करण्यासाठी संस्थेला दिवाणी न्यायालयात दावा दाखल करणे भाग पडेल आणि तसे करावे लागल्यास दाव्याचा खर्च अन् होणार्‍या सर्व परिणामांस आपणास उत्तरदायी धरण्यात येईल’, अशी समज या नोटिशीतून देण्यात आली आहे. तसेच या कायदेशीर नोटिशीचा खर्च ५ सहस्र रुपये देण्याचे दायित्वही आपलेच असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

चीनवर सर्जिकल स्ट्राईक कधी ?

दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून 
उद्धव ठाकरे यांचा परखड प्रश्‍न
      मुंबई - चीनच्या घुसखोरीकडे गांभीर्याने पहाण्याची आवश्यकता आहे. लडाखपासून अरुणाचल-सिक्कीमपर्यंतच्या सीमा भागात चीनच्या कारवाया वर्षानुवर्षे चालू आहेत. त्यापासून चीनला कोण रोखणार ? सीमांच्या संरक्षणासाठी पाकवर केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राइक’सारखे आक्रमण लेह-लडाखमध्ये घुसलेल्या चीनवरही करण्याची आवश्यकता आहे, असे परखड मत शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’च्या अग्रलेखातून व्यक्त केले आहे.
अग्रलेखात पुढे म्हटले आहे की,
१. लडाखमध्ये चिनी सैन्याने सरळ सरळ घुसखोरी केली आहे. बुधवारी चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’चे जवान लडाखमध्ये फक्त घुसलेच नाही, तर मनरेगा योजनेच्या अंतर्गत तेथे जे सिंचन कालव्याचे काम चालू होते, ते रोखण्यात आले. ६० च्या आसपास चिनी सैनिक आमच्या हद्दीत घुसून आमची विकासकामे थांबवतात आणि बेडरपणे तेथेच थांबतात, याचा अर्थ काय घ्यायचा ?
२. फक्त पाकिस्तानला दम देऊन चालणार नाही, तर चीनने वेढलेल्या सीमांचे रक्षण करणेही संरक्षणमंत्र्यांचे काम आहे; पण पाकच्या विरोधात जाहीर सभांतून बोलले की हमखास टाळी पडते. या टाळीच्या राजकारणातून बाहेर पडून आता चीनच्या घुसखोरीकडे गांभीर्याने पहावे लागेल.

परदेशातून निधी घेणार्‍या देशातील ११ सहस्र ३९९ स्वयंसेवी संस्थांची नोंदणी रहित !

  • १२ वर्र्षे उशिरा संस्थेचे विवरणपत्र सादर करणार्‍या अंनिसवर केंद्र सरकार कधी कारवाई करणार ? 
  • परदेशातून निधी घेतांना फसवणूक केल्याचा आरोप असणार्‍या अंनिसवर ही कारवाई कधी होणार ?
       नवी देहली - केंद्रशासनाने विदेशी अर्थसाह्य घेणार्‍या ११ सहस्र ३९९ स्वयंसेवी संस्थांची नोंदणी रहित केली आहे. विदेशी अर्थसाह्य नियमन कायद्यानुसार (‘एफ्सीआर्ए’नुसार) आवश्यक असलेले नूतनीकरण न केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. ३० जूनला ज्यांची नूतनीकरणाची मुदत संपली होती, अशा संस्थांची नोंदणी १ नोव्हेंबरपासून रहित समजण्यात येणार असल्याचे केंद्रीय गृह मंत्रालयाने म्हटले आहे. या आधी २०१५ मध्ये गृहमंत्रालयाने अशीच कारवाई करून सलग ३ वर्षे वार्षिक विवरणपत्र न भरणार्‍या १० सहस्र स्वयंसेवी संस्थांची नोंदणी रहित केली होती.
       नव्या कायद्यानुसार नूतनीकरणाची मुदत सरकारने ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढवली होती. त्यासाठी ३० जूनपूर्वी अर्ज सादर करणे बंधनकारक केले होते. या वेळी सरकराने १ सहस्र ७३६ संस्थांचे नूतनीकरण अर्ज अपूर्ण कागदपत्रांच्या कारणास्तव फेटाळून लावले आहेत. एस्.एम्. जोशी सोशलिस्ट फाऊंडेशन, पुणे; लोकमत प्रतिष्ठान, नेहरू मेमोरियल अ‍ॅण्ड म्युझियम लायब्ररी, अलिगड मुस्लिम विद्यापीठ, डॉ. झाकीर नाईक एज्युकेशनल अ‍ॅण्ड कल्चरल सोसायटी, तहलका फाऊंडेशन यांसारख्या काही मान्यवर धार्मिक संस्थांचा समावेश आहे. त्यांना ८ नोव्हेंबरपर्यंत आपली बाजू मांडण्यास सांगण्यात आले आहे. नंतर त्यांची कोणतीही बाजू ऐकून घेतली जाणार नाही.

एका शहरातील सनातनच्या साधकाच्या घरी चोरी झाल्यावर तत्परतेने कृती करण्यास टाळाटाळ करणारे निष्क्रीय पोलीस !

जनतेने केलेल्या तक्रारीविषयी तत्परतेने कृती न करणारे 
पोलीस हवेच कशाला ? असे पोलीस असतील, तर गुन्हेगारी 
कधीतरी अल्प होईल का ? हिंदु राष्ट्रात जनतेच्या 
तक्रारींची तत्परतेने दखल घेणारे पोलीस असतील !
‘        एका शहरातील सनातनच्या एका साधकाच्या घरी झालेल्या चोरीत सोने, चांदी यांचे दागिने आणि रोख रक्कम, तसेच किराणा सामान घेऊन चोरांनी पलायन केले. साधक बाहेरगावी गेले असता हा प्रकार घडला.
‘       या प्रकरणी साधक पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले होते. त्या वेळी तेथील ठाणे अंमलदारांनी याविषयी पोलीस निरीक्षकांना भ्रमणभाषवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलीस निरीक्षकांकडून कोणतेही उत्तर मिळाले नाही. ठाणे अंमलदारांकडे श्‍वानपथक, ठसेतज्ञ, आदींचे संपर्क क्रमांकही नसल्याचे साधकाच्या निदर्शनास आले. यासंदर्भात पोलीस एकमेकांकडेच विचारणा करत होते. तेव्हा साधकाच्या एका नातेवाइकांनीच श्‍वानपथकाचा क्रमांक मिळवून दिला.

(म्हणे) बंगालमध्ये धार्मिक हिंसाचाराला थारा नाही ! - ममता बॅनर्जी

बंगालमधील हिंदूंवर प्रतिदिन धर्मांधांकडून आक्रमण 
होत असतांना हिंदूंच्या संरक्षणासाठी कोणतेही प्रयत्न न 
करणार्‍या ममता(बानो) यांचे हे विधान म्हणजे धूळफेकच होय !
        जम्बोनी (बंगाल) - बंगालमध्ये आम्ही लोकांबरोबर भेदभाव केला नाही. बंगालमध्ये धार्मिक हिंसाचाराला थारा नाही. ते सहनही केले जाणार नाहीत. केवळ बंगालमध्येच दुर्गापूजा आणि मोहरम एकत्र साजरे केले जाऊ शकतात, असे प्रतिपादन बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी येथे केले. (खोटे बोलणार्‍या ममता बॅनर्जी ! मुसलमानांचे लांगूलचालन करण्यासाठी ममता बॅनर्जी यांनी गेल्या वर्षी आणि यावर्षीही हिंदूंना नवरात्रीच्या वेळी दुर्गामूर्ती विसर्जनाला दुसर्‍या दिवशी मोहरम असल्याने प्रतिबंध केला होता. त्यांना मोहरमच्या वेळी मूर्ती विसर्जन करण्यावर बंदी घातली होती. - संपादक) येथे आयोजित एका सभेत त्या बोलत होत्या. देशामध्ये धार्मिक आणि राजनैतिक असहिष्णुतेचे वातावरण आहे, अशी भाजपवर टीकाही त्यांनी केली. (प्रत्यक्षात बंगालमध्येच धार्मिक आणि राजनैतिक असहिष्णुता आहे ! - संपादक)

विषारी धुक्यामुळे देहलीतील १ सहस्र ८०० शाळा बंद !

विज्ञानाने केलेली ‘प्रगती’ !
नवी देहली - देहलीमध्ये फटाके आणि वाहने यांच्या प्रदूषणानंतर पसरलेल्या विषारी धुक्यामुळे ५ नोव्हेंबरला सुमारे १ सहस्र ८०० शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. मुलांच्या आरोग्यासाठी धोकादायक वातावरण असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. हरियाणाच्या गुरुग्राममधल्या शाळांना ३ दिवसांची सुट्टी देण्यात आली आहे.

पाकने जम्मूजवळील सीमेवर रेंजर्संना हटवून सैन्याला तैनात केले !

   जम्मू - जम्मूला लागून असलेल्या १९० कि.मी. सीमेवर पाकने पाकिस्तानी रेंजर्सना हटवून तेथे मोठ्या संख्येने पाक सैन्याला तैनात केले आहे. भारताच्या सीमा सुरक्षा दला प्रमाणेच येथील रेंजर्स सीमेची सुरक्षा करत असतात. सर्जिकल स्ट्राईकनंतर पाक भारतीय चौक्यांवर मोठ्या प्रमाणात गोळीबार करत आहे. त्याला सीमा सुरक्षा दलाने चोख प्रत्युत्तर दिले आहे. काही दिवसांपूर्वी भारताने येथे १३ तोफा तैनात करून पाकवर तोफगोळे डागले होते. यात पाकच्या ४ चौक्या उद्ध्वस्त करण्यात आल्या. त्यात ४० सैनिक ठार झाल्याची शंका वर्तवण्यात आली आहे. या वेळी पाकने पांढरे निशाणही फडकवले होते. यामुळेच पाकने रेंजर्संना हटवून सैन्याला तैनात केल्याचे म्हटले जात आहे.

म्हैसूर (कर्नाटक) येथे भाजपच्या कार्यकर्त्याचा मृतदेह सापडला !

देशाची सत्ता हातात असतांना देशातील 
स्वत:च्या कार्यकर्त्यांचे रक्षण होत नाही, हे कसे ?
        म्हैसूर (कर्नाटक) - येथे रवि मागली या ३५ वर्षीय भाजपच्या कार्यकर्त्याचा मृतदेह सापडला आहे. त्यांची हत्या करण्यात आल्याचा संशय त्यांच्या कुटुंबियांनी व्यक्त केल्यावर पोलिसांनी हत्येचा गुन्हा प्रविष्ट केला आहे. रवि त्यांच्या दुचाकीवरून प्रियापाटना येथील घरी जात असतांना काही जणांनी त्यांना शेवटचे पाहिले होते. पोलिसांच्या प्राथमिक तपासात रवि यांचा कोणाशीही वाद नव्हता. पोलिसांनी अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याची शंका व्यक्त केली आहे.
        गेल्या काही आठवड्यांत कर्नाटकात भाजप आणि संघ यांच्या कार्यकर्त्यांच्या हत्येच्या घटना घडल्याने रवि यांचा मृत्यूही ‘हत्या’ असण्याचा संशय त्यांच्या कुटुंबियांकडून व्यक्त होत आहे.

आग्रा येथे भारतमातेच्या मूर्तीची तोडफोड !

समाजवादी पक्षाच्या राज्यात कायदा-सुव्यवस्थेचे तीन तेरा !
    आग्रा - येथील जिल्हा न्यायालयाजवळील दिवानी चौकात असणार्‍या भारतमातेच्या मूर्तीची रात्रीच्या वेळी अज्ञाताकडून तोडफोड करण्यात आल्याने ४ नोव्हेंबरला येथे तणाव निर्माण झाला होता. मूर्तीचा डावा हात तोडण्यात आला. या हातात राष्ट्रध्वज होता. गेल्या ५ दिवसांत मूर्तीची तोडफोड होण्याची ही दुसरी वेळ आहे. या घटनेनंतर हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी येथे रस्ताबंद आंदोलन केले.
    विश्‍व हिंदु परिषदचे आग्रा शाखेचे अध्यक्ष सुनील पराशर म्हणाले की, या शहरातील शांतता बिघडवण्याचे षड्यंत्र रचण्यात येत आहे. पोलिसांनी अशा समाजकंटकांना तात्काळ अटक करावी.

मुंबईत पत्रकारांना केलेल्या मारहाणीप्रकरणी टाटा समूहाकडून दिलगिरी व्यक्त

       मुंबई - येथील बॉम्बे हाऊससमोर पत्रकारांना करण्यात आलेल्या मारहाणीप्रकरणी टाटा समूहाकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे. यासंदर्भात त्यांनी म्हटले की, झालेली घटना खेदजनक आहे. संबंधित छायाचित्रकारांची मी क्षमा मागतो. भविष्यात अशी घटना घडणार नाही, याची आम्ही काळजी घेऊ. मीडिया प्रतिनिधींचे काम किती कठीण असते, याची आम्हाला जाणीव आहे. आपले संबंध यापुढेही चांगले रहातील, यासाठी आम्ही प्रयत्न करू. सध्या पोलीस या सर्व प्रकरणाची चौकशी करत आहेत.

बेळगाव येथे महापौर आणि उपमहापौर यांच्या दालनाला काळे फासले !

मराठीद्वेषी कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांची अशोभनीय वर्तवणूक !
    बेळगाव, ५ नोव्हेंबर (वार्ता.) - येथे मराठी भाषिकांची गळचेपी चालूच आहे. येथील कन्नड संघटनांनी महापौर सरिता पाटील आणि उपमहापौर संजय शिंदे यांच्या दालनाला अन् नामफलकाला काळे फासले. या प्रकरणी कन्नड संघटनांच्या ४ कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. महाराष्ट्र एकीकरण समितीचे आमदार श्री. संभाजी पाटील यांचे दालन आणि नामफलकालाही त्यांनी काळे फासले.
    बेळगाव येथे कर्नाटक दिन हा ‘काळा दिवस’ म्हणून साजरा करण्यासाठी एक फेरी काढण्यात आली. या फेरीत महापौर आणि उपमहापौर सहभागी झाल्याने वाद निर्माण झाला. ‘काळा दिवस’ फेरीत उपस्थित रहाणार्‍या महापौर सरिता पाटील आणि उपमहापौर संजय शिंदे यांना नगरविकास खात्याने नोटीसही बजावली आहे. या नोटीसमध्ये बेळगाव नगरपालिका बरखास्त करण्याची चेतावणी देण्यात आली आहे.

खामगाव (जिल्हा बुलढाणा) येथील स्वर्गीय निंबाजी कोकरे आदिवासी आश्रमशाळेची मान्यता रहित !

  • धर्मशिक्षणरहित मॅकालेप्रणीत शिक्षणपद्धतीचे दुष्परिणाम !
  • अल्पवयीन विद्यार्थिनींवर सामूहिक बलात्काराचे प्रकरण
बुलढाणा, ५ नोव्हेंबर - येथील स्वर्गीय निंबाजी कोकरे आदिवासी आश्रमशाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार झाल्याप्रकरणी आदिवासीमंत्री विष्णु सावरा यांनी विशेष चौकशी समिती स्थापन केली असून त्यांनी आश्रमशाळेची मान्यता रहित केली आहे. पोलिसांनी या प्रकरणात १७ आरोपींवर गुन्हे प्रविष्ट केले असून १५ आरोपींना अटक केली. त्यातील ११ आरोपींना न्यायालयाने ७ दिवस पोलीस कोठडी दिली आहे.
१. मंत्री सावरा यांनी सांगितले की, विशेष चौकशी समितीच्या माध्यमातून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल. समितीत भारतीय प्रशासकीय सेवेतील महिला अधिकार्‍यांचा समावेश असून समिती राज्यभरातील आश्रमशाळांचीही पाहणी करणार आहे. (केवळ पाहणी करून न थांबता संबंधितांना कठोर शिक्षा झाल्यासच अशा प्रकारांना आळा बसेल. - संपादक)

म्हापसा येथील सेंट झेवियर महाविद्यालयात पोर्तुगीज दिन साजरा !

  • देशप्रेमी नागरिकांनो, असे कार्यक्रम आयोजित करणार्‍या सेंट झेवियर महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाला याविषयी खडसवा ! या पोर्तुगीजधार्जिण्या महाविद्यालयाचे अनुदान आणि मान्यता रहित करण्याची मागणी का करू नये ?
  • पोर्तुगिजांनी गोमंतकियांवर केलेल्या अत्याचाराच्या व्रणांवर मीठ चोळण्याचा प्रकार !
        म्हापसा, ५ नोव्हेंबर (वार्ता.) - म्हापसा येथील सेंट झेवियर महाविद्यालयाने फुंदासाव ओरियंट आणि इन्स्टिट्यूट कामोयस यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालय आवारात नुकताच पोर्तुगीज दिन साजरा केला. (हिंदूंवर अनन्वित अत्याचार करण्यासाठी इन्क्विझिशन राबवणारा ख्रिस्ती धर्मगुरु झेवियर याचे नाव असलेल्या महाविद्यालयात पोर्तुगीज दिन साजरा केला गेला यात नवल नाही. - संपादक) या कार्यक्रमाला पोर्तुगालचे गोव्यातील राजदूत रुई कार्व्हालो बासेरा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तसेच फुंदासाव ऑरियंटच्या मारिया इनेस फिगेरा आणि इन्स्टिट्यूट कामोईश संस्थेच्या पोर्तुगीज विभागाचे केंद्रीय संचालक डेल्फिन कोरिया डासिल्वा उपस्थित होते.

अंगावर आल्यावर शिंगावर घेण्याची तयारी मराठी माणसांच्यात आहे - राजेश क्षीरसागर

कानडी अत्याचाराच्या विरोधात शिवसेना रस्त्यावर !
    कोल्हापूर, ५ नोव्हेंबर (वार्ता.) - कर्नाटक पोलिसांची ही क्रूरता खपवून घेणार नाही. मराठी माणसांवर अन्याय कराल, तर ‘जशास तसे’ उत्तर शिवसैनिक देतील. लोकांच्या संरक्षणासाठी असणारे पोलीस नसून कानडी सरकारी गुंड आहेत. त्यांना मराठी माणसाचा इतिहास माहीत नाही. अंगावर आल्यावर शिंगावर घेण्याची तयारी मराठी माणसांच्यात आहे. मराठी माणसांवर होणार्‍या प्रत्येेक घावाचा बदला घेतला जाईल, अशी चेतावणी आमदार श्री. राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापूर येथे दिली.
    बेळगावात मराठी युवकांना झालेल्या बेदम मारहाणीचा निषेध करीत शिवसेनेने कर्नाटकी पोलिसांच्या प्रतिमेचे दहन केले. दुपारी ५ वाजता निषेधाच्या घोषणा देत शिवसैनिकांनी छत्रपती शिवाजी चौक परिसर दणाणून सोडला.

ठोशास ठोसा, हीच शिवसेनेची भूमिका ! - संजय राऊत, खासदार, शिवसेना

  • कानडी दडपशाहीच्या विरोधात शिवसेनेचा घणाघात !
  • शिवसेनेच्या अशा भूमिकेमुळेच मराठीजनांना तिचा आधार वाटतो !
    मुंबई, ५ नोव्हेंबर - कर्नाटक सरकारच्या विरोधात लोकशाही मार्गाने पाळलेल्या ‘काळा दिन’मध्ये सहभागी झालेल्या मराठी भाषिकांच्या विरोधात कानडी पोलिसांनी केलेल्या मारहाणीच्या विरोधात आम्ही संयम राखून आहोत; परंतु अत्याचार आणि अन्याय चालू राहिल्यास संयम सुटतो. मराठी माणसांनी ठरवले, तर इथेही बरेच काही होऊ शकते. असा अन्याय आम्ही फार काळ सहन करणार नाही. ‘ठोशास ठोसा’, अशीच भूमिका शिवसेनेची आहे. हे प्रकरण न्यायालायात आहे, तेव्हा आधी तिथे निकाल लागू द्या, अशी भूमिका शिवसेनेचे खासदार श्री. संजय राऊत यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीशी बोलतांना मांडली.

पिंपरी-चिंचवड परिसरात डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत वाढ

        पिंपरी-चिंचवड - येथील परिसरात सध्या डेंग्यूचा फैलाव झाला असून रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. महानगरपालिकेकडून धूरफवारणीत टाळाटाळ केली जात असल्याचेही समोर येत आहे. (महानगरपालिकेची कुचकामी यंत्रणा ! - संपादक)

बीआर्टीच्या डिजिटल फलकावर इंग्रजी भाषेतील स्वारगेटचा भाषांतरित उल्लेख स्वर्ग !

पुणे महानगर परिवहन महामंडळाकडे पाट्या तपासणारे नाहीत का ?
    पुणे, ५ नोव्हेंबर - पुणे महानगर परिवहन महामंडळ मर्यादितच्या (पीएम्पीएल्) संगमवाडी ते विश्रांतवाडी या मार्गावरील केंद्रीय विद्यालयाजवळ लावलेल्या ‘डिजिटल’ फलकावर इंग्रजी भाषेतील ठिकाणाच्या नावांचे मराठीत भाषांतर करतांना चुका झाल्या आहेत. ‘स्वारगेट’चा उल्लेख ‘स्वर्ग’, तर इंग्रजी भाषेतील ‘कोथरूड डेपोट’चे भाषांतर ‘कोथरूड डेपोत’ असा करण्यात आला आहे. (स्वतःचे हसे करून घेणारी ‘पीएम्पीएल्’ ! शासनाच्या सर्वच ठिकाणच्या भाषांतरीत मराठी पाट्यांवरील चुका सुधारयला हव्यात. - संपादक) अनेक प्रवाशांनी ‘स्वारगेट’ या शब्दाचे चुकीचे भाषांतर पाहून बीआर्टीची सेवा ‘पुण्यापासून स्वर्गापर्यंत’, अशी मिश्किल टिप्पणी केली आणि त्याची ‘पोस्ट’ करून त्याची सामाजिक संकेतस्थळांवरून खिल्ली उडवली.

कळवा (ठाणे) येथे बांगलादेशी गुन्हेगाराला अटक !

  • बांगलादेशींसाठी नंदनवन झालेला भारत !
  • बांगलादेशींची घुसखोरी रोखू न शकणारे सरकारया घुसखोरांपासून जनतेचे रक्षण कसे करणार ?
ठाणे - बांगलादेशात बॉम्बस्फोट करून फरारी झालेल्या आणि तेथे गुन्हा प्रविष्ट असलेल्या बशीरमुल्ला शुकुरमुल्ला शेख या बांगलादेशी नागरिकाला ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखने ४ नोव्हेंबरला कळव्यातून अटक केली. त्याने बॉम्बस्फोट करुन पत्नीची हत्या केली होती. बांगलादेशमध्ये आतंकवादी संघटनांकडून त्याने बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण घेतले होते. त्यामुळे त्याचा भारतात घातपाती कारवाया करण्याचा डाव होता का, याचा तपास गुन्हे शाखा करत आहे. शेख हा नवी मुंबईतील घणसोलीमध्ये रहातो.

स्वच्छता अभियानांतर्गत हागणदारीमुक्ततेत महाराष्ट्र देशातील ३२ राज्यांत १६ व्या क्रमांकावर !

    मुंबई - स्वच्छता अभियानांतर्गत पहिल्या ५८ हागणदारीमुक्त जिल्ह्यांत राज्यातील ५ जिल्ह्यांचा समावेश आहे. असे असले, तरी देशातील ३२ राज्यांत महाराष्ट्राचा क्रमांक १६ वा आहे. (स्वातंत्र्याच्या ६९ वर्षानंतरही देश आणि राज्य या दोन्ही ठिकाणी शौचालयाची समस्या शेष असणे, हे सर्वपक्षीय सरकारे आणि प्रशासन यांचे अपयशच म्हणावे लागेल. - संपादक) त्यामुळे स्वच्छता अभियानचे उद्दिष्ट गाठण्यासाठी राज्यापुढे मोठे आव्हान आहे.
    हागणदारीमुक्त मोहिमेत देशात नव्याने २ कोटी ६० लक्ष ५४ सहस्र ४४२ शौचालये बांधण्यात आली आहेत. देशातील १ लक्ष १३ सहस्र ११८ गावे हागणदारीमुक्त असून यात ५८ जिल्ह्यांचा समावेश आहे. राज्यातील सिंधुदुर्ग, कोल्हापूर, ठाणे, सांगली आणि सातारा या ५ जिल्ह्यांचा यात समावेश आहे.

मुंबईमध्ये फटाक्यांमुळे ४२ ठिकाणी आगी !

    मुंबई, ५ नोव्हेंबर (वार्ता.) - दिवाळीच्या कालावधीत फटाक्यांमुळे शहरात ४२ ठिकाणी आग लागली. आगीत मोठ्या प्रमाणात आर्थिक हानी झाली. (दुष्परिणाम लक्षात घेऊन आतातरी शासन फटाक्यांवर बंदी घालेल का ? - संपादक) सुदैवाने यात कोणतीही मनुष्यहानी झालेली नाही.

तोडफोड करणार्‍या संभाजी ब्रिगेडचे ३ कार्यकर्ते पोलिसांच्या कह्यात

‘ए दिल है मुश्किल’ या 
हिंदी चित्रपटाच्या विरोधाचे प्रकरण
     कल्याण - ‘ए दिल है मुश्किल’ या हिंदी चित्रपटाच्या निषेधार्थ येथील ‘एस्एम् - ५’ या चित्रपटगृहाच्या कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी संभाजी ब्रिगेडच्या ३ कार्यकर्त्यांना पोलिसांनी कह्यात घेतले आहे, तर १२ कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे.

पुण्यात एकतर्फी प्रेमातून तरुणाचे महिलेवर प्राणघातक आक्रमण !

   पुणे - येथील फुले आणि हार विक्री करणार्‍या महिलेच्या मुलीवरील एकतर्फी प्रेमासाठी अक्षय धनवे या तरुणाने मुलीच्या घरी जाऊन तिच्या आईच्या गळ्यावर ब्लेडने दोनदा वार केले आणि तो पसार झाला. महिलेवर रुग्णालयात उपचार चालू आहेत. धनवे याच्या विरुद्ध पोलिसांकडे तक्रार नोंदवण्यात आली असून त्याला अटक करण्यात आली आहे. धनवे याने एकतर्फी प्रेमापोटी हे कृत्य केल्याचे पोलिसांकडे मान्य केले आहे.


ईश्‍वरी राज्याची स्थापना, हिंदु राष्ट्र आणि सनातन धर्म राज्य या भिन्न शब्दप्रयोगांचे सार धर्मराज्याची स्थापना, हेच असणे

        परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी प्रारंभी ‘ईश्‍वरी राज्याची स्थापना’ करण्याविषयीचे सूत्र सांगितले. काही वर्षांनी योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी ईश्‍वरी राज्याची स्थापना सध्याच्या कालचक्रातच नसल्याचे सांगितले; पण ‘हिंदु राष्ट्र’ येईल, असे सांगितले. त्यानंतर प.पू. डॉक्टरांनी ‘हिंदु राष्ट्र’ हे संबोधन वापरण्यास आरंभ केला. आता महर्षींनी हिंदु राष्ट्राऐवजी ‘सनातन धर्म राज्य’ हा शब्दप्रयोग करण्यास सांगितला. काही काळाने तसाही पालट होईल. नावात पालट होत असला, तरी या शब्दप्रयोगामागील सार धर्म राज्याची स्थापना, हेच आहे. प्रभु रामचंद्र एकवचनी होते. त्यांनी जनतेला दिलेल्या वचनाचे ते पालन करीत होते. त्यानुसार परात्पर गुरु डॉ. आठवले ठरलेल्या ध्येयाने समष्टीला पुढे नेत आहेत, हे सगळ्यांनी लक्षात घेतले पाहिजे.’ 
- श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१९.६.२०१६)

सनातनच्या २०१७ च्या तमिळ भाषेतील पंचांगाचे प्रकाशन !

डावीकडून श्री. एच्. राजा, श्रीमती उमा आनंदन् आणि सौ. उमा रविचंद्रन्
चेन्नई - ५ नोव्हेंबर या दिवशी तमिळ भाषेतील २०१७ वर्षाचे सनातन पंचांगाचे भाजपचे राष्ट्रीय सचिव आणि तमिळनाडूमधील कृतिशील अन् प्रखर हिंदुत्वनिष्ठ श्री. एच्. राजा यांंच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले. प्रकाशन समारंभ श्री. राजा यांच्या निवासस्थानी सनईच्या मंगल वाद्यात झाला. या वेळी सनातन पंचांगाचे हळद, कुंकू, अक्षता आणि पुष्प अर्पण करून पूजन करण्यात आले. चेन्नई येथील धर्माभिमानी श्रीमती उमा आनंदन् यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या सौ. उमा रविचंद्रन् या वेळी उपस्थित होत्या.

सनातनच्या निरपराध साधकांवरील हा अन्याय लक्षात ठेवा !

       कोणताही गुन्हा केला नसतांना श्री. समीर गायकवाड यांना मागील १ वर्ष ४८ दिवसांपासून, तर डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना ४ महिने २७ दिवसांंपासून कारागृहात डांबण्यात आले आहे.
       केवळ हिंदुत्वाची मानहानी करण्यासाठी सनातनच्या निरपराध साधकांना कारागृहात डांबणार्‍यांना हिंदु राष्ट्रात दामदुप्पटीने शिक्षा देण्यात येईल !

(म्हणे) ‘सनातन संस्थेवर बंदी घालण्यात कोणता अडथळा आहे ?’

सनातनला आतंकवादी संघटना ठरवण्याचा अश्‍लाघ्य प्रयत्न !
कर्नाटकातील ‘वार्ताभारती’ या धर्मांधांच्या दैनिकातून सनातनद्वेषाची गरळओक !
    कर्नाटकातील वार्ताभारती या धर्मांध चालवत असलेल्या दैनिकातून सनातन संस्थेवर सरकार बंदी का घालत नाही ? असा प्रश्‍न उपस्थित करून सनातनवर खोटे, बिनबुडाचे आरोप करण्यात आले आहेत. या दैनिकाचे संपादक आणि प्रकाशक अब्दुसालम पुथिगे असून वृत्तसंपादक बी.एम्. बशीर हे आहेत. सनातनवरील आरोप आणि त्याचे खंडन येथे देत आहोत.

भ्रष्टाचाराला दूर सारून लोकांची कामे वेळेत पूर्ण करा, असे सांगावे लागणे, हेच हास्यास्पद आहे. अधिकार्‍यांना स्वत:चे कर्तव्य का शिकवले नाही ?

       ‘पारदर्शकतेला प्रोत्साहन देण्यासाठी निरीक्षण हे एक साधन आहे. विविध पातळीवरून भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करणे, हे आपले कर्तव्य आहे. भ्रष्टाचाराला दूर सारून लोकांची कामे वेळेत पूर्ण करा, असे आवाहन गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी शासकीय अधिकार्‍यांना केले. दक्षता संचालनालयाने सचिवालयात आयोजित केलेल्या दक्षता जागृती सप्ताहाचे उद्घाटन केल्यानंतर हे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. या वेळी विविध सरकारी खात्यांतील प्रमुख, विभागीय अधिकारी आणि दक्षता अधिकारी उपस्थित होते.’

बांगलादेशातील हिंदू : भयानक अत्याचार आणि छळ यांचे बळी !

      नवी देहली - आपण नेहमी पाकिस्तान आणि आपल्या देशातील तथाकथित बुद्धीवाद्यांना ‘भारतात मुसलमानांची स्थिती खूप वाईट आहे’, असे म्हणत असल्याचे ऐकले असेल; पण कोणीही पाकिस्तान आणि बांगलादेश या देशांतील हिंदूंवर कोणत्या प्रकारचे अत्याचार होत आहेत, याविषयी बोलत नाही. पाकिस्तान आणि बांगलादेशातील हिंदूंची लोकसंख्या झपाट्याने का अल्प होत आहे, हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमणे का होत आहेत यांवर बुद्धीवादी चर्चा करत नाहीत. दिवाळीच्या दिवशी जेव्हा संपूर्ण भारत सण साजरा करत होता आणि देशातील हिंदू ‘संपूर्ण जगभरात सुख आणि शांती येवो’, अशी प्रार्थना करत होते त्याच वेळी बांगलादेशातील १५ मंदिरांमध्ये तोडफोड करण्यात आली. ही घटना बांगलादेशाची राजधानी ढाका येथून १०० किलोमीटर अंतरावरील ब्राह्मणबाडिया या जिल्ह्यात घडली. या जिल्ह्यात १५ मंदिरे आणि साधारणतः १०० घरांची तोडफोड करण्यात आली.

राष्ट्र अन् धर्म कार्य करणार्‍या सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या कार्याला पराकोटीचा विरोध करणारे एका हिंदुत्वनिष्ठ संघटनेचे पदाधिकारी !

१. हिंदूसंघटन मेळाव्यासाठी विनामूल्य सभागृह मिळवण्यासाठी सभागृह 
पदाधिकार्‍यास विचारणा केल्यावर त्यांनी सभागृह विनामूल्य देण्याची सिद्धता दर्शवणे
     काही दिवसांपुर्वी एका शहरात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदूसंघटन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यासाठी सनातनच्या एका अधिवक्ता साधकाने संपर्कात असलेल्या आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या सभागृहातील कार्यकारणीत पदाधिकारी असलेल्या सभासदाला सभागृह धर्मकार्यासाठी विनामूल्य मिळण्याविषयी विचारणा केली. संबंधित पदाधिकार्‍याने हिंदूसंघटन मेळाव्याच्या संदर्भात विषय ऐकून घेऊन मेळाव्यासाठी सभागृह विनामूल्य देण्याची सिद्धता दर्शवली आणि सभागृह नोंदणीच्या अर्जावर स्वाक्षरीही घेतली.

अ‍ॅन्ड्रॉईड सनातन पंचांग २०१६ ला ऑक्टोबर २०१६ पर्यंत मिळालेला भरघोस प्रतिसाद !

- श्री. महेश ननावरे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

आज मुलुंड येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

आंदोलनातील मागण्या
१. वर्ल्डेक्स इंडिया एक्झिबिशन अँड प्रमोशन लि. या आस्थापनाच्या वतीने मुंबई येथे १५ ते १७ नोव्हेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या चिनी उत्पादनांचे प्रदर्शन तात्काळ रहित करण्यात यावे.
२. पाकिस्तानी कलाकार असलेले चित्रपट दाखवण्यास बंदी करण्यात यावी.
वेळ : सायंकाळ ५ ते ७
स्थळ : मुलुंड रेल्वेस्थानकाच्या बाहेर, मुलुंड, मुंबई.
समस्त राष्ट्र आणि धर्म प्रेमी नागरिकांनी या 
आंदोलनांमध्ये सहभागी होऊन धर्मकर्तव्य बजावावे !

मोठ्या हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या कार्यकर्त्यांनो, तुमच्या संघटनेने या संदर्भात काय केले, हे तुमच्या नेत्यांना विचारा !

१. मंदिरांशी संबंधित 
१ अ. मंदिरांचे सरकारीकरण (अधिग्रहण) 
१. हिंदू नसलेल्यांच्या एकाही प्रार्थनास्थळाचे सरकारीकरण न करता केवळ हिंदूंच्या ४ लक्षहून अधिक देवळांचे सरकारीकरण का ?
२. हिंदूंच्या देवळांत भक्तांनी अर्पण केलेले लाखो कोटी रुपयांची अहिंदूंसाठी उधळपट्टी 
१ आ. शासन अधिग्रहित मंदिरातील भ्रष्टाचार 
१. देवळांत भक्तांनी केलेल्या अर्पणाची (धन, सोने इत्यादी) लूट 
२. देवळांची भूमी, वास्तू इत्यादी हडपणे
३. देवळांतील प्रसाद, यात्रानियोजन, कर्मचारीवृंद आदींच्या संदर्भातील कंत्राटे
१ इ. शासन अधिग्रहित मंदिरांतील मूर्तींची विटंबना
१. देवळांतील प्राचीन मूर्तींचे अशास्त्रीय विलेपन
२. देवळांतील मूर्तींच्या पूजाविधींच्या संदर्भातील ढवळाढवळ (अभिषेक बंद करणे, महिला पुजारी नेमणे इत्यादी)

फलटणमध्ये अन्य धर्मियांकडून हिंदूंची होणारी छळणूक !

     ‘फलटण तालुक्यामध्ये अन्य धर्मियांकडून हिंदु धर्मियांना त्रास देण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यांचा हिंदु धर्मियांविषयीचा द्वेषही वाढल्याचे दिसून येत आहेे. याची काही उदाहरणे येथे देत आहे. 
१. हिंदूंची लूटमार आणि खंडणी वसूल करणे
१ अ. ग्रामीण भागातील ग्रामस्थांची लूटमार करणे : ग्रामीण भागातील नागरिक आठवड्याच्या बाजारासाठी आणि शेतकरी शेतीमाल विकण्यासाठी फलटणमध्ये येत असतात. तेव्हा अन्य धर्मीय शेतकर्‍यांकडून आणि इतरांकडून तो शेतीमाल धमकावून काढून घेतात आणि स्वतः विकतात, तसेच ते सण उत्सवांसाठी आणलेले पूजेचे साहित्यही त्यांच्याकडून धमकावून काढून घेतात आणि ते स्वतः विकतात.
१ आ. व्यापारी आणि प्रतिष्ठित नागरिक यांच्याकडून खंडणी वसूल करणे : हे अन्य धर्मीय भांडणे करून मारामार्‍या करतात आणि जमाव जमवून दहशत निर्माण करतात. त्यांचे जातबांधवही त्यांना या चुकीच्या गोष्टींसाठी साहाय्य करतात. त्यामुळेे येथे हिंदूंमध्ये दहशत निर्माण करणे, खंडणी, चोर्‍या आणि लूटमार असे प्रकार घडत असतात.

कुठे देशासाठी ‘लेखणी मोडा आणि बंदुका हातात घ्या’ म्हणणारे स्वातंत्र्यवीर सावरकरांसारखे साहित्यिक आणि कुठे देशातील एका राज्यातील नागरिकांवर झालेल्या अत्याचारांविषयी एक शब्दही न बोलणारे आताचे तथाकथित साहित्यिक !

      ‘कोथरूड व्यासपीठ आणि साहित्य वेध प्रतिष्ठान, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मैत्र पर्व’ चित्र, चरित्र आणि व्यंगचित्र प्रदर्शन यांविषयीचा कार्यक्रम येथील अंबर हॉल मध्ये २६ ऑक्टोबर २०१६ या दिवशी आयोजित केला होता. या वेळी उद्घाटक म्हणून सिम्बॉयसिस विद्यापिठाचे कुलगुरु डॉ. शां.ब. मुजुमदार, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अखिल मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस, कोहिनूर ग्रूपचे अध्यक्ष श्री. कृष्णकुमार गोयल, कार्यक्रमाचे आयोजक शिवसेनेचे श्री. श्याम देशपांडे आणि युथ फॉर पनून कश्मीरचे राष्ट्रीय संयोजक श्री. राहुल कौल यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते. यात श्रीपाल सबनीस ‘पनून कश्मीर’विषयी असलेल्या व्याख्यानाच्या संदर्भात स्वतःच्या भाषणात या विषयावर एकही वाक्य बोलले नाहीत. त्यांनी जाणून बुजून उल्लेख टाळला.’ अमेरिकन संस्कृतीने भारतियांना अंतर्बाह्य व्यापणे

    ‘ आमचे लेखन, भाषण, चिंतन, स्वप्न, शिंका, भावना असे सगळे ‘अमेरिकन’ झाले आहे. अमेरिकन संस्कृतीने आमच्या देशाला अंतर्बाह्य व्यापून टाकले आहे.
   ‘हिरोशिमा’वर आमचे कवी काव्य करतात ! हिटलरच्या क्रौर्याला आणि त्याच्या संहाराला लाजवणारे हत्याकांड अन् फाळणीचे प्रसंग घडले. किती काव्ये झालीत ? किती नाटके झालीत ?
      ‘व्हिएतनाम’ आणि ‘हिरोशिमा’ आम्हाला जर्जर करते; परंतु भारताच्या फाळणीचे ते भयानक प्रसंग मात्र.....!!’
(‘मासिक ‘घनगर्जित’, सप्टेंबर २०१२)

स्मशानात दिवाळी साजरी करणे अशा विकृत मनोविकृतीचे पोलीस त्यांचे काम कसे करत असतील, याची कल्पनाही करवत नाही !

       ‘मनमाड (नाशिक) येथील शहर पोलीस ठाण्याच्या कर्मचार्‍यांनी २९ ऑक्टोबर २०१६ या दिवशी स्मशानात दिवाळी साजरी केली. स्मशानात काम करणार्‍या कर्मचार्‍यांना दिवाळीचा आनंद उपभोगता यावा, अमावास्या आणि स्मशान यांविषयीच्या अंधश्रद्धा दूर व्हाव्यात, यांसाठी ही संकल्पना राबवल्याचे मनमाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पुंडलिक सपकाळे यांनी सांगितले.’

हिंदूंना पूजनीय असलेल्या भगवान विष्णूच्या दशावतारांपैकी वामन अवताराचा शिरच्छेद करत असतांना मोठ्या हिंदुत्वनिष्ठ संघटना काही करत कसे नाही ?

      ‘गेल्या काही वर्षांपासून बलीप्रतिपदेला ‘बळीराजा महोत्सव समिती’च्या वतीने ‘बळीराजा महोत्सव’ हा कार्यक्रम केला जातो. याच्या अंतर्गत हिंदु देवता भगवान श्रीविष्णूचा अवतार असलेल्या वामनाचे विविध मान्यवरांच्या हस्ते मस्तकभेद करण्याचा कार्यक्रम करण्यात येतो. तरी ‘बळीराजा महोत्सव समिती’कडून श्री विष्णु अवतार वामन यांच्या होणार्‍या विटंबनेस प्रतिबंध करावा, अशा मागणीचे निवेदन समस्त हिंदुप्रेमी संघटनांच्या वतीने कोल्हापूरच्या जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. अनिल देशमुख यांना २६ ऑक्टोबर २०१६ या दिवशी देण्यात आले.’
     काश्मिरी धर्मबांधवांचे काश्मीर खोर्‍यात पुनर्वसन होणे, हा त्यांचा जन्मजात, घटनात्मक, नैसर्गिक, धार्मिक आणि राष्ट्रीय अधिकार आहे.’ 
- श्री. अभय वर्तक, राष्ट्रीय प्रवक्ता, सनातन संस्था.

पनून कश्मीरची आवश्यकता !

     ‘काश्मीरच्या परिस्थितीला ‘जेनोसाईड’ म्हणजे एखाद्या समाजाला मुळासकट नष्ट करण्याची प्रक्रिया कारणीभूत आहे. हिटलरने जर्मनीमध्ये जशी ज्यू लोकांना नष्ट करण्यासाठी ‘जेनोसाईड’ प्रक्रिया वापरली, तीच प्रक्रिया काश्मिरी हिंदूंविषयी घडत आहे. ही प्रक्रिया रोखणे आणि भारताला पाकिस्तान होण्यापासून वाचवणे, याचे पहिले पाऊल म्हणजे ‘पनून कश्मीर’ (आपले काश्मीर) आहे.’ - डॉ. अजय च्रोंगू, अध्यक्ष, पनून कश्मीर.
     आज ‘घराघरांत अफझल जन्माला येईल’, अशी घोषणा होते. आम्हीही ‘प्रत्येक घरातून नाही, तर प्रत्येक गावातून एक छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येतील’, अशी प्रयत्नांची शिकस्त केली पाहिजे.’ - पू. बाबा अल्पहारी महाराज, संस्थापक, सनातन जागृती मंच.
    ‘स्वातंत्र्यवीर सावरकर आणि सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी हिंदूंना त्यांच्या अत्याचारांविरुद्ध वैध मार्गाने लढण्यासाठी प्रेरणा दिली. तीच प्रेरणा घेऊन काश्मिरी हिंदु बांधवांवरील अत्याचारांविरुद्ध लढण्याचे व्रत घेऊया.’- श्री. मुरली मनोहर शर्मा, संयोजक, भारत रक्षा मंच.
      ‘भारत स्वतंत्र असूनही जम्मू-काश्मीरमध्ये तिरंगा फडकवता येत नाही, हे हिंदूंचे दुर्दैव आहे.’ - अधिवक्ता विष्णु शंकर जैन, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदू फ्रंट फॉर जस्टीस.जिहादी आतंकवादाचे देशभरातील जाळे !

      ‘काश्मीरमधील हिंदूंचे हत्याकांड करून त्यांना विस्थापित होण्यास भाग पाडून, हिंदु महिलांवर अत्याचार करून, तसेच मंदिरे जमीनदोस्त करून धर्मांधांनी जिहादी आतंकवादाची चाचणी घेतली. जिहादी आतंकवादाची काश्मीरमधील चाचणी यशस्वी झाल्याने देशभरात काश्मीरसारखे ५० सहस्र छोटे भाग निर्माण झाले आहेत आणि त्या ठिकाणी जिहादी आतंकवादाचे प्रयोग होत आहेत.’ 
- श्री. प्रमोद मुतालिक, राष्ट्रीय अध्यक्ष, श्रीराम सेना.
      राजकीय पक्ष ‘पाकिस्तानला ‘आतंकवादी राष्ट्र’ म्हणून घोषित करा’, अशी जगभरातील देशांकडे मागणी करत आहेत; पण दुर्दैवाने भारतातील एकाही राजकीय पक्षाने त्यांच्या अधिवेशनामध्ये ‘पाकिस्तान हे आतंकवादी राष्ट्र आहे’, असा ठराव केलेला नाही. - डॉ. अजय च्रोंगू, अध्यक्ष, पनून कश्मीर.

न्यायमूर्तींनी केवळ असंतोष व्यक्त न करता उत्तरदायींना कडक शिक्षा करणे, अपेक्षित आहे !

      ‘गोवा येथे सहाशेहून अधिक जणांची ५ कोटीहून अधिक रुपयांना फसवणूक केल्याच्या संदर्भात कामाक्षी फोरेक्स प्रकरणी फसवणूक झालेल्यांपैकी ९ जणांनी खंडपिठात याचिका दाखल केली होती. ‘पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाकडून या प्रकरणात योग्य पद्धतीने आणि योग्य गतीने चौकशी होत नाही’, असा दावा याचिकादारांच्या अधिवक्त्यांकडून करण्यात आला होता. यावर न्यायमूर्ती नूतन सरदेसाई यांनी राज्य पोलिसांच्या अन्वेषणाच्या पद्धतीवर असंतोष व्यक्त करत याचिकाकर्त्यांची मागणी मान्य केली आणि हे प्रकरण केंद्रीय अन्वेषण विभागाकडे सोपवण्याचा आदेश दिला.

जनता दारिद्र्यात जगत असतांना तिचे प्रतिनिधी लक्षाधिश बनणार !

      ‘देशाचे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या वेतनात तिप्पट वाढ करण्याचा प्रस्ताव केंद्रीय गृहमंत्रालयाने बनवला आहे. सध्या राष्ट्रपतींचे वेतन प्रतिमास दीड लाख, तर उपराष्ट्रपतींचे वेतन सवा लाख रुपये इतके आहे. तसेच राज्यपालांचे १ लाख १० सहस्र इतके आहे. आता राष्ट्रपतींचे वेतन ५ लाख आणि उपराष्ट्रपतींचे साडेतीन लाख रुपये करण्याचा प्रस्ताव आहे. सध्या सचिवांना अडीच लाख रुपये वेतन मिळत आहे.’

Post title प.पू. डॉक्टरांच्या संकल्पातून साकारल्या जाणार्‍या ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’साठी सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ भगीरथ प्रयत्नांनी जतन करत असलेला अमूल्य वस्तूंचा ठेवा !

सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ
महर्षींची शिकवण आणि कार्य !
१. महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय
आणि त्याची नितांत आवश्यकता
१ अ. काळासमवेत परकियांच्या आणि मोगलांच्या आक्रमणामध्येे जगप्रसिद्ध विश्‍वविद्यालये अन् त्यातील अमूल्य ठेवा नामशेष होणे : ‘भारतात पूर्वी नालंदा, तक्षशीला आणि विक्रमशीला ही जगप्रसिद्ध विश्‍वविद्यालये होती. त्या काळी संपूर्ण विश्‍वातून लोक विद्येचे माहेरघर असलेल्या भारतात शिक्षणासाठी येत असत. या माध्यमातून समाजाला अनेक विद्यावंत आणि ज्ञानवंत लोक लाभले; पण काळासमवेत परकियांच्या आणि मोगलांच्या आक्रमणामध्ये ही सर्व विश्‍वविद्यालये अन् यातील अमूल्य ठेवा नामशेष करण्यात आला. आज या कलियुगात प.पू. डॉक्टरांच्या ईश्‍वरी संकल्पाने वर्ष २०१८ पर्यंत ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ची स्थापना या पृथ्वीवर होणार आहे.
१ आ. ‘आजचे शिक्षण हे स्वार्थ साधणे शिकवत असून परमार्थ साधणे शिकवत नाही’, या गंभीर स्थितीची जाणीव आधीच झाल्याने प.पू. डॉक्टरांनी ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ची स्थापना करण्याचा संकल्प करणे : या विश्‍वविद्यालयाचा प्रमुख उद्देश विद्यावान आणि ज्ञानी विद्यार्थी निर्माण करणे, असा नसून ‘ईश्‍वरभक्त निर्माण करणे’ असा आहे. आपण पहातो की, सध्या कार्यरत असणार्‍या शिक्षणसंस्था केवळ व्यावहारिक शिक्षण देणार्‍या आहेत. ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ हा अध्यात्माचा मूलभूत सिद्धांत शिक्षणालाही तेवढाच लागू आहे. सध्या त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून सर्वांना सारासार एकाच पठडीत, म्हणजे मायेत पुढे जाण्याचे शिक्षण दिले जाते. शिक्षण म्हणजे ‘चांगली नोकरी आणि भरपूर वेतन देणारे शिक्षण’, असे समीकरण झाले आहे. या माध्यमातून केवळ कागदी पदव्यांच्या बदल्यात लोकेषणेची खरेदी केली जाते. येथे संस्कृतीरक्षण, धर्मशिक्षण, राष्ट्ररक्षण हे विषय फार दूरचे आहेत. आपल्या संस्कृतीचे जतन करणारे गावागावातले खरे कलाकार, मूर्तीकार, संगीताचे उपासक इत्यादी सर्वच आज लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. आजचे शिक्षण हे स्वार्थ साधणे शिकवते, परमार्थ साधणे शिकवत नाही; म्हणूनच या गंभीर स्थितीची जाणीव अगोदरच झाल्याने प.पू. डॉक्टरांनी ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ची स्थापना करण्याचा संकल्प केला आहे.
१ इ. अध्यात्म विश्‍वविद्यालयात सनातन धर्मराज्य चालवण्यासाठी आदर्श विद्यार्थी घडवले जातील ! : खरा विद्यार्थी हा प्रथम एक साधक आणि शिष्य असणे आवश्यक आहे

स्त्रियांच्या मासिक धर्माच्या संदर्भात स्पंदनांचा अभ्यास करण्यासाठी ‘यू.टी.एस्. (युनीव्हर्सल थर्मो स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने केलेली वैज्ञानिक चाचणी !

      ‘पूर्वीच्या काळी मासिक धर्माच्या वेळी मुली आणि स्त्रिया आवश्यक ते आचारधर्म पाळत, उदा. देव-धर्माशी संबंधित ठिकाणी वावर टाळणे, वर्षभराच्या साठवणीतील वस्तूंना स्पर्श न करणे, विश्रांती घेणे इत्यादी. सध्याच्या मुली आणि स्त्रिया यांनी आधुनिकतेच्या आहारी जाऊन मासिक धर्माच्या वेळी न्यूनतम पाळावयाचे आचारही सोडून दिलेले आढळतात. ‘मासिक धर्माचा संबंधित स्त्री आणि वातावरण यांवर काय परिणाम होतो ?’, याचा वैज्ञानिक दृष्टीकोनातून अभ्यास करण्यासाठी ‘यू.टी.एस्. (युनीव्हर्सल थर्मो स्कॅनर)’ या उपकरणाच्या साहाय्याने चाचणी घेण्यात आली. या चाचणीची निरीक्षणे आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे.

पोलिसांनी साधना करण्याचे महत्त्व !

       ‘काही दिवसांपूर्वी पोलीस मुख्य कार्यालयात काही सेवेनिमित्त माझे सलग ४ - ५ दिवस जाणे झाले. त्या वेळी तेथील पोलीस कर्मचार्‍यांकडे पाहिले असता ५ ते ८ टक्के पोलीस सोडल्यास उर्वरित सर्व पोलिसांवर काळ्या शक्तीचे आवरण असल्याचे जाणवले. बर्‍याच जणांकडे पाहून त्रासदायक जाणवले. आलेल्या आवरणामुळे अनेकांचे तोंडवळे स्पष्ट दिसत नव्हते; तर ‘काही जणांना तीव्र आध्यात्मिक त्रास आहे’, असेे लक्षात आले. ही नोकरी प्रामाणिकपणे करणारेही काही जण आहेत; पण ते कोणतीच साधना करत नाहीत. ते पाहून ‘पोलिसांनी साधना करणे किती आवश्यक आहे’, असा विचार मनात आला. यामागील कारणे पुढीलप्रमाणे आहेत. 

तिसर्‍या महायुद्धात होणारी हानी आणि त्यापासून वाचण्यासाठी करावयाची सिद्धता

कु. मधुरा भोसले
       सध्याची जागतिक परिस्थिती आणि देशादेशांतील संबंधांचा अभ्यास करून राजकीय विश्‍लेषक आणि तज्ञ मंडळींनी ‘तिसरे महायुद्ध’ होण्याची भीती व्यक्त केली आहे. या पार्श्‍वभूमीवर महायुद्ध झाल्यास त्याने होणारी संभावित हानी आणि त्यांपासून वाचण्यासाठी करावयाची सिद्धता यांचा वेध घेणारा हा लेख ! 
१. मुसलमान राष्ट्रांमध्ये उद्भवलेल्या 
लढाईचे रूपांतर तिसर्‍या महायुद्धात होणार असणे 
     ‘मुसलमान राष्ट्रांमध्ये उद्भवलेल्या लढाईचे रूपांतर तिसर्‍या महायुद्धात होऊ शकते. मुसलमान राष्ट्रांच्या दोन गटांमध्ये चालू झालेल्या लढाईत विविध मित्र राष्ट्रांचा सहभाग वाढत जाऊन संपूर्ण जगातील राष्ट्रांचे ‘मित्र आणि शत्रू’ अशा दोन स्तरांवर विभागणी होऊन लढाईला महायुद्धाचे स्वरूप प्राप्त होऊ शकते. त्यामुळे कोणतेही राष्ट्र तिसर्‍या महायुद्धाच्या परिणामांपासून अलिप्त राहू शकणार नाही. तिसरे महायुद्ध झाल्यास त्याची झळ संपूर्ण जगाला पोचणार आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे द्रष्टेपण

श्री. विनायक शानभाग
परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या
अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...
वर्ष २००८ मध्ये ‘सनातन साधक-पुरोहित पाठशाळे’ची स्थापना करून, पुढील ७ वर्षे त्यांना वेदांचे शिक्षण देत त्यांच्याकडून साधना करवून घेऊन वर्ष २०१५ मध्ये महर्षींच्या आज्ञेनुसार त्यांना यज्ञ-याग करण्यास सिद्ध करणे
      ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतील आणि सनातनच्या धर्मकार्यातील अडथळे दूर व्हावेत अन् येणार्‍या भीषण आपत्काळात साधकांचे रक्षण व्हावे, यांसाठी गेल्या अनेक मासांपासून सप्तर्षि आणि भृगु महर्षि एकामागून एक यज्ञ-याग आणि होम करायला सांगत आहेत. कधी कधी महर्षि यागांविषयी अगदी एकच दिवस अगोदर सांगतात. हे सर्व करायचे झाले, तर आपल्याला तसे वेदब्राह्मण हवेत. याग करण्यासाठी सर्व साहित्य हवे आणि हे वेदब्राह्मण आपल्याकडे सतत उपलब्ध हवेत. येथेच परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचे द्रष्टेपण लक्षात येते.
     एप्रिल २००८ मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने ‘सनातन साधक-पुरोहित पाठशाळे’ची स्थापना झाली. त्या वेळी पाठशाळेच्या स्थापनेच्या फलकावर ‘साधक-पुरोहित सिद्ध करणारी पाठशाळा’, असे लिहिले होते. या वेदपाठशाळेत सिद्ध झालेले साधक-पुरोहित आज गुरुदेवांच्या कृपेखाली एका मागून एक यज्ञ-याग करत आहेत. वर्ष २०१५ मध्ये सनातन संस्थेचा आणि महर्षींचा अगदी जवळून संपर्क आला. वर्ष २००८ ते २०१५ या कालावधीत पाठशाळेत वेदमूर्तींकडून साधकांना वेदांचे शिक्षण मिळाले आणि देवाने संतांच्या मार्गदर्शनाखाली त्या साधकांची साधना करवून घेतली.

महर्षींनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीचे तंतोतंत आज्ञापालन करून त्यांचा प्रत्येक संदेश समष्टीला तळमळीने पोचवणार्‍या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ !

१. दौर्‍यावर असल्यामुळे प्रतिदिनच्या नियोजनात सतत पालट होणे आणि
वर्तमानात राहून महर्षींचे आज्ञापालन करणे, हे सर्वच पुष्कळ अद्भुत असणे
     ‘गेल्या दीड वर्षापासून चालू असलेल्या सप्तर्षि जीवनाडी वाचनामध्ये महर्षींनी सांगितल्याप्रमाणे सद्गुरु (सौ.) गाडगीळकाकू दैवी प्रवासाच्या सेवेत आहेत. यामध्ये सतत करावे लागणारे भ्रमण, प्रवास, विविध देवस्थानांना जाणे, साधकांच्या रक्षणासाठी महर्षींनी सांगितलेले उपाय करणे, असे चालू आहे. पू. डॉ. ॐ उलगनाथन् हे सप्तर्षि जीवनाडीचे वाचन करतात. बहुतांश वेळा प.पू. डॉक्टरांच्या आरोग्यासाठी आणि आपत्काळात साधकांचे रक्षण होण्यासाठी महर्षि उपाय सांगतात. यामध्येे नामजप, यज्ञ, पूजाविधी, मंदिरांत दर्शनाला जाणे, दक्षिणा देणे, अशा अनेक गोष्टी असतात. ठराविक काळात ठराविक अन्नपदार्थ न खाणे, असे अनेक उपाय आणि दैवी प्रवासाच्या वेळी आलेल्या अनुभूती, अशा पुष्कळ गोष्टी असतात. दौर्‍यावर असल्यामुळे प्रतिदिनच्या नियोजनात सतत पालट होत असतात. सतत वर्तमानात राहून महर्षींचे आज्ञापालन करावे लागते. हे सर्वच पुष्कळ अद्भुत आहे.
२. शारीरिक त्रासाची पर्वा न करता महर्षींच्या कृपेने आलेल्या अनुभूती, जप, उपाय हे सर्व
समष्टीला लवकर मिळावे, यासाठी पहाटे उठून टंकलेखन करणे आणि हे ‘आताच केले
नाही तर अमूल्य इतिहासाची नोंदच होणार नाही’, असे सद्गुरु गाडगीळ काकूंनी सांगणे
     सततच्या प्रवासामुळे आणि दिवस-रात्र सेवेमुळे सद्गुरु काकूंचे शरीर दुखत असते. एकाच स्थितीत अर्ध्या ते एक घंट्यापेक्षा अधिक वेळ त्या बसू शकत नाहीत. असे असूनही नाडीवाचनात महर्षींनी समष्टीसाठी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीचे त्या तंतोतंत आज्ञापालन करतात. कधी रात्री २ ते ३ घंटे झोपून पहाटे ३.३० ते ४ वाजता त्या उठतात. सर्व घडामोडी टंकलेखन करून दैनिकात देण्यासाठी पाठवतात.

कन्यागत पर्वाच्या कालावधीत झालेल्या ग्रंथप्रदर्शनाच्या सेवेत समाजातील व्यक्तींनी केलेले साहाय्य पाहून देवाचे कार्य देवच करत असल्याची साधकांना आलेली अनुभूती !

श्री. घनश्याम गावडे
१. ग्रंथप्रदर्शनासाठी लागणारे मंडपाचे साहित्य 
देऊन ते प्रदर्शनाच्या ठिकाणी पोचवण्यासाठी विनामूल्य 
वाहनही उपलब्ध करून देणारे आणि धर्मप्रसाराच्या सेवेची 
संधी मिळाल्याविषयी कृतज्ञताभाव असणारे श्री. दिलीपभाई पटेल ! 
     ‘कन्यागत पर्वाच्या निमित्ताने लावण्यात येणार्‍या ग्रंथप्रदर्शनासाठी आम्हाला मंडपासाठी काही साहित्य हवे होते. त्यासाठी आम्ही श्री. दिलीपभाई पटेल यांना संपर्क केला. त्या वेळी आम्हाला लागणार्‍या साहित्याच्या संदर्भात चर्चा झाली. श्री. पटेल यांनी आम्हाला पत्रे, पाईप, होर्डिंग लावण्यासाठी चौकटी आणि अन्य साहित्य दिले. हे साहित्य अन्य ठिकाणी होते. ते आणण्यासाठी विनामूल्य वाहनही दिले. ‘तुम्ही आम्हाला पुष्कळ सहकार्य केले’, असे श्री. पटेल यांना सांगितल्यावर म्हणाले, ‘‘तुम्ही ही सेवा करण्याची मला संधी दिली, याविषयी मी कृतज्ञ आहे. मी भाग्यवानही आहे. यापुढेही काही साहित्य लागल्यास मला सांगा. आवश्यकता भासल्यास मंडपाची सेवा करतांनाही मी येईन.’’ या प्रसंगातून ‘देवाने समाजातील लोकांना धर्मप्रसाराच्या कार्यासाठी सिद्ध ठेवलेले आहे’, असे जाणवले.

स्वतंत्र भारताची सत्तर वर्षांनंतरची दुःस्थिती आणि हिंदु राष्ट्र्राची अपरिहार्यता !

सौ. तारा शेट्टी
१. स्वातंत्र्यासाठी भारतियांनी ब्रिटिशांच्या विरुद्ध लढा देणे; 
आता मात्र आपल्याच लोकांचा विरोध करण्याची वेळ आली असणे
      ‘नुकताच भारताचा ७० वा स्वातंत्र्यदिन देशभरात साजरा करण्यात आला. त्या वेळी ‘खर्‍या अर्थाने आपला देश स्वतंत्र झाला आहे का ?’, ‘आपण खरंच स्वतंत्र आहोत का ?’, असे प्रश्‍न माझ्या मनात निर्माण झाले. आधी भारतीय जनतेला ब्रिटिशांनी दास्यत्वात (गुलामगिरीत) ठेवले. आता आपले राजकारणी जनतेला दास्यत्वात ठेवत आहेत. स्वातंत्र्यासाठी भारतियांनी ब्रिटिशांच्या विरुद्ध लढा दिला; परंतु आज आपल्याला आपल्याच लोकांचा विरोध करण्याची वेळ आली आहे. देशात उघडपणे भ्रष्टाचार आणि गुंडगिरी चालू आहे; परंतु कुणीही त्याविरुद्ध चकार शब्दही काढत नाही. उलट आहे त्या परिस्थितीचा स्वीकार करून जनता स्वतःला दास्यत्वात ठेवून दिवस कंठत आहे.

शुद्ध निर्मळ मन । तेच होई गुरुचरणी अर्पण ॥

  
सौ. ज्योती दाते
   ‘रामनाथी आश्रमातील साधनावृद्धी शिबिरात भावजागृतीचा प्रयोग केल्यानंतर देवाने मला पुढील कविता सुचवली.’
शुद्ध निर्मळ मन ।
तेच होई गुरुचरणी अर्पण ॥
त्यासाठी करावा एकच पण ।
करावे दोष अन् अहं निर्मूलन ॥ १ ॥

षडरिपू हे प्रगतीतील अडथळे ।
जिवास मागे नेती ते सगळे ॥
त्यासाठी संघर्ष करावा ।
दिवसागणिक प्रयत्न वाढवावा ॥ २ ॥

शुद्ध जिवाचे होई शिवाशी मिलन ।
त्यासाठी जावे गुरुचरणी शरण ॥ ३ ॥
श्रीकृष्णचरणी अर्पण,
- सौ. ज्योती दाते, पुणे (२९.६.२०१६)

आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी करावयाची सिद्धता

      ‘भारतामध्ये येणार्‍या आपत्काळाला तोंड देण्यासाठी प्रशासनावर अवलंबून न रहाता नागरिकांनी स्वतःच्या स्तरावर सिद्धता करायला हवी; कारण येथील प्रशासनाचा कारभार किती गलथान पद्धतीने चालतो, हे आपण संपत्काळात अनुभवत आहोत. येणार्‍या काळात नैसर्गिक आपत्तींना सामोरे जाणे, युद्धजन्य परिस्थितीला तोंड द्यावे लागणे आणि दंगली, जाळपोळ यांसारख्या मानवी आपत्ती कोसळणे, यांना भारतातील हिंदूंना मोठ्या प्रमाणावर तोंड द्यावे लागणार आहे. त्यासाठी सामान्य व्यक्तींप्रमाणे साधकांनीही पुढील सिद्धता करायला हवी.

निवृतीमार्गाने साधना करू इच्छिणार्‍या साधकांच्या मनात विवाहाविषयी येणारे विचार, त्यावर योग्य दृष्टीकोन आणि विचारांवर मात करण्यासाठी करायचे उपाय !

     ‘अविवाहित साधकांच्या मनात विशिष्ट वयानंतर विवाह करण्याचे विचार येत असतात. विशेषतः मित्र-मैत्रिणींचे, जवळच्या नातेवाइकांचे किंवा अन्य साधकांचे विवाह झालेले पाहून अथवा ऐकून हे विचार काही वेळा प्रबळ होतात. त्यात अनैसर्गिक असे काहीच नाही. अन्य साधकांशी या विषयावर बोलल्यावर ‘लग्न कर’ आणि ‘करू नको’, अशा दोन्ही बाजूंनी विविध दृष्टीकोन दिले जातात. त्यामुळे साधकांच्या मनात गोंधळ निर्माण होतो. हे सर्व ऐकून बुद्धीला ‘विवाह करायला नको’, असे वाटत असते; पण मनाला ‘विवाह करायला हवा’, असे वाटत असते. काही वर्षांपूर्वी माझ्या मनाच्या झालेल्या अशा प्रकारच्या संघर्षातून देवाने मला सोडवले. ज्या साधकांच्या मनाचा लग्नाविषयी संघर्ष होत असेल; पण निवृत्ती मार्गाने साधना करण्याची इच्छा असेल, ते साधक या संघर्षातून बाहेर पडण्यासाठी पुढीलप्रमाणे प्रयत्न करू शकतात.
    
  ‘या विषयावर मला लिहिता येणार नाही, इतका सुंदर मार्गदर्शनात्मक लेख कु. भाविनी कपाडिया हिने लिहिला आहे. विवाह न करता साधना करू इच्छिणार्‍यांनी त्यातील सूत्रे कृतीत आणली, तर त्यांना विवाह टाळून साधनेत जलद प्रगती करता येईल. या अप्रतिम लेखाबद्दल भाविनीचे कोणत्या शब्दांत कौतुक करावे, हेच मला कळत नाही. त्याचबरोबर भाविनीला विवाहबंधनात न अडकवता साधना करण्यास पूर्ण साहाय्य करणार्‍या तिच्या आई-वडिलांनीही सर्व आई-वडिलांपुढे एक आदर्श ठेवला आहे. त्यांचेही कौतुक करावे तेवढे थोडे !’ - (परात्पर गुरु) डॉ. आठवले
१. स्वतःच्या विवाहाविषयी सर्वसाधारणपणे येणारे विचार आणि त्या
विचारांवर मात करण्यासाठी मनाला द्यायचा दृष्टीकोन
१ अ. विचार : काही साधकांच्या विवाहाला संत मान्यता का देतात ?
दृष्टीकोन : व्यक्तीचा जन्म, मृत्यू आणि विवाह होणे किंवा न होणे, हे १०० टक्के व्यक्तीच्या प्रारब्धावर अवलंबून आहे; पण व्यक्तीला त्याच्या प्रारब्धात काय लिहून ठेवले आहे, हे कळत नाही.

समष्टीची आई बनून हिंदु राष्ट्राचा संसार करण्याचे ध्येय बाळगणारी आदर्श साधिका कु. मृण्मयी गांधी (वय २२ वर्षे) !

      ‘एके दिवशी माझ्या मनात स्वतःविषयी पुढील विचार आले.
१. कन्यादान : ज्या दिवशी आई-बाबांनी मला प.पू. डॉक्टरांकडे सोपवले, त्याच दिवशी माझे कन्यादान झाले.
२. सूत्रबंधन : प.पू. डॉक्टरांनीच मला कृष्णाकडे (ध्येयाकडे) जायला सांगून त्याच्याशी सूत्रबंधन केले. (या साधिकेचा गुरुंप्रती उत्कट भाव असल्याने तिला असे वाटत आहे. - संकलक)
३. कंकण : स्वतः कृष्णानेच माझ्या हाताला भावभक्तीचे कंकण बांधले.
४. वरमाळा : ज्या दिवशी मी संत होईन, त्या दिवशी स्वयं कृष्णच माझ्या गळ्यात पुष्पमाळा घालील.
५. सप्तपदी : षड्रिपूंना पार करून सातवे पाऊल मी पूर्णपणे कृष्णाकडे टाकीन, तीच खरी सप्तपदी असेल.
६. मंगळसूत्रातील काळे मणी : मंगळसूत्रातील काळे मणी म्हणजे विविध आध्यात्मिक गुण, तर दोन वाट्या म्हणजे जीव आणि शिव. ज्या वेळी ईश्‍वराचे सर्व गुण या जिवात येतील, त्या वेळी तो शिवाशी एकरूप होईल.
     (प्रत्यक्षात श्रीकृष्णाला मी पतीच्या रूपात पाहू शकत नाही; कारण मला ते अनुभवता येत नाही; पण ‘कृष्णाच्या चरणांची प्राप्ती हेच ध्येय असल्याने असे विचार आले असावेत’, असे मला वाटले.)
७. संसार आणि आई : अशा प्रकारे संसार करायचा आहे, तो हिंदु राष्ट्राचा, तर आई व्हायचे आहे, ती सार्‍या समष्टीची !’
- कु. मृण्मयी गांधी (वय २२ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.५.२०१६)

भावी महायुद्धकाळात डॉक्टर, औषधे आदी उपलब्ध नसतांना अन् नेहमीसाठीही उपयुक्त ग्रंथ मालिका !

      संत-महात्मे, ज्योतिषी आदींच्या सांगण्यानुसार आगामी काळ हा भीषण आपत्काळ असून या काळात समाजाला अनेक आपत्तींना तोंड द्यावे लागणार आहे. आपत्काळात दळणवळण तुटल्यामुळे रुग्णाला रुग्णालयात नेणे, डॉक्टर वा वैद्य यांच्याशी संपर्क साधणे आणि पेठेत (बाजारात) औषधे मिळणेही कठीण होते. आपत्काळात ओढवणार्‍या विकारांना (आजारांना) तोंड देेण्याच्या पूर्वसिद्धतेचा एक भाग म्हणून सनातन ‘भावी आपत्काळातील संजीवनी’ ही ग्रंथमालिका सिद्ध (तयार) करत आहे. या मालिकेतील १२ ग्रंथ आतापर्यंत प्रकाशित झाले आहेत. या ग्रंथांचा अभ्यास आतापासूनच केला, तर प्रत्यक्ष आपत्काळात विकारांना सामोरे जाण्यासाठी लागणारा आत्मविश्‍वास निर्माण होण्यास साहाय्य होईल. यासाठी हे सर्व ग्रंथ वाचकांनी अवश्य संग्रही ठेवावेत !

स्वतःच्या स्वार्थापोटी युवा पिढीला अमली पदार्थांचा रतीब देऊन मृत्यूच्या खाईत लोटणार्‍यांना विरोध करा !

श्री. व्यंकटेश अय्यंगार
१. पोलिओ निर्मूलनासाठी मातांना उद्युक्त करून 
भारताला अग्रक्रमांकावर आणण्याचे श्रेय काही अभिनेत्यांना असणे
      ‘मार्च २०१४ मध्ये पोलिओच्या निर्मूलनात भारत अग्रक्रमांकावर आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO, World Health Organisation) घोषित केले होते. देशासाठी हे निश्‍चितच अभिमानास्पद आहे. याचे थोडे श्रेय काही अभिनेत्यांनाही देऊ शकतो. त्यांनी ‘दोन थेंब जीवनाचे’ अशा आशयाचे विज्ञापन (जाहिरात) दूरदर्शन, भित्तीपत्रके (पोर्स्टस), फलक (बॅनर्स) आदींच्या माध्यमातून केले होते आणि देशातील लक्षावधी बाळांच्या मातांना प्रेरणा देऊन त्यांच्या बालकांना पोलिओची लस द्यायला उद्युक्त केले.

स्वतःच्या मुलीच्या सुरक्षेची काळजी वाटल्यावर सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांचे बोल आठवणे आणि मनातील काळजीचा विचार गुरुदेवांच्या चरणी अर्पण केल्यावर मुलीभोवती संरक्षककवच असल्याचे दिसणे

१. मुलींवरील अत्याचाराच्या बातम्या वाचल्यानंतर स्वतःच्या मुलीची काळजी वाटणे आणि सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांचे बोल आठवून मानसरित्या प.पू. गुरुदेवांच्या खोलीत जाऊन मनातील विचार त्यांच्या चरणी अर्पण करणे : ‘सप्टेंबर २०१६ च्या पहिल्या आठवड्यात एकाच दिवशी २ ते १४ वयोगटातील मुलींवर अत्याचार झाल्याच्या ३ बातम्या वर्तमानपत्रात वाचल्या. मी आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करत असल्याने घरी असणार्‍या माझ्या मुलीविषयी काळजीचे विचार मनात आले. या विचारांकडे दुर्लक्ष करून मी सेवा करू लागलो; मात्र काही वेळाने या विचारामुळेे मनाची घालमेल होऊ लागल्याने मी ध्यानमंदिरात गेलो. तेथे प्रार्थना करत असतांना सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांचे साधारण वर्षापूर्वीचे बोल आठवले. त्या म्हणाल्या होत्या, ‘‘दादा, तुम्ही पूर्णवेळ साधना करत असतांना मुलीची काळजी देव घेणारच आहे. तिला मानसरित्या गुरुदेवांच्या खोलीत नेऊन त्यांच्या चरणी अर्पण करून निःशंक मनाने साधना करा.’’ त्यानंतर मी मानसरित्या गुरुदेवांच्या खोलीत जाऊन त्यांच्या चरणी मनातील काळजीचा विचार अर्पण केला.
२. मुलीभोवती ४ - ५ फुटांचे लालसर रंगाचे संरक्षककवच दिसणे आणि प्रत्येक साधिकेचे अनुचित प्रसंगात रक्षण होण्यासाठी ईश्‍वरी कवच कार्यरत असल्याचे जाणवून भावजागृती होणे : त्यानंतर माझ्या मुलीभोवती ४ - ५ फुटांचे फिकट लालसर रंगाचे संरक्षककवच दिसले

परात्पर गुरु डॉ. आठवले संकलित करत असलेल्या ग्रंथांच्या निर्मिती-कार्यात सहभागी व्हा !

१. परात्पर गुरु डॉ. आठवले संकलित करत असलेल्या ‘
अध्यात्म’ या विषयावरील ग्रंथांच्या निर्मितीचे 
कार्य लवकरात लवकर करण्याची आवश्यकता !
          सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले संकलित करत असलेल्या धर्म, अध्यात्म, साधना, ईश्‍वरप्राप्तीसाठी कला, आध्यात्मिक संशोधन यांसारख्या विविधांगी विषयांवरील मराठी भाषेतील सुमारे ४५०० ग्रंथ लवकरात लवकर अंतिम करणे आणि त्यांचे विविध भाषांत भाषांतर करणे भावी काळाच्या दृष्टीकोनातून अत्यावश्यक झाले आहे. याची कारणे पुढे दिली आहेत.
१ अ. दूरचित्रवाहिन्यांसाठी धर्मशिक्षणाचे कार्यक्रम सिद्ध करणे : विविध दूरचित्रवाहिन्यांसाठी या ग्रंथांतील ज्ञानावर आधारित धर्मशिक्षणाचे कार्यक्रम सिद्ध करता येणार आहेत.
१ आ. आगामी भीषण काळापूर्वी करावयाची सिद्धता : तिसर्‍या महायुद्धाला काही वर्षांतच आरंभ होणार असल्यामुळे या ग्रंथांच्या संगणकीय धारिका लवकरात लवकर सिद्ध करायच्या आहेत.
१ इ. अखिल मानवजातीला पुढील सहस्रो वर्षे मार्गदर्शक ठरणे : हे ग्रंथ अखिल मानवजातीला पुढील सहस्रो वर्षे मार्गदर्शक ठरणार आहेत. या संदर्भातील ग्रंथांची वैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
१. कलियुगात पुढील शेकडो वर्षे आधुनिक विज्ञानाची भाषा प्रचलित रहाणार आहे. यासाठी हे ग्रंथ तुलनात्मक सारणी, टक्केवारी अशा वैज्ञानिक परिभाषेत लिहिले आहेत.

आपल्या बालकांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण आध्यात्मिक गुण असल्याचे लक्षात आल्यास त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करून त्याच्या जन्माचे कल्याण करा ! अशा बालकांची लक्षात आलेली वैशिष्ट्ये कळवा !

साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती
     ‘आताच्या घोर कलियुगात आणि तीव्र आपत्काळात पृथ्वीवरील वातावरण अधिक शुद्ध करण्यासाठी, तसेच साधना करणार्‍यांना अधिक सात्त्विकता अन् चैतन्य यांचा लाभ मिळण्यासाठी ईश्‍वर काही उन्नत जिवांना जन्माला घालत आहे. हे जीव उच्च स्वर्ग, महर् आणि जन अशा उच्च लोकांतून पृथ्वीवर जन्माला आले आहेत आणि अजूनही येत आहेत. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी ही बालके आपले अमूल्य योगदान देत आहेत आणि पुढेही देणार आहेत. ही बालके सर्वसामान्य बालकांपेक्षा निराळी असून त्यांच्यातील वैशिष्ट्यपूर्ण आध्यात्मिक गुणांमुळे ‘ही बालके दैवी(सात्त्विक) आहेत’, हे लक्षात येते.
     अशी बालके ओळखणे सहज शक्य व्हावे, यासाठी अशा सात्त्विक बालकांत सर्वसाधारणतः आढळणारी गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
१. ही बालके दिसायला सुंदर आणि तेजोमय असतात.
२. ही बालके आपल्या हसण्या-बोलण्यातून सर्वांना लगेच आकर्षित करतात.
३. ही बालके आचारधर्माचे पालन करणारी असतात

सर्वत्रच्या कार्यकर्त्यांसाठी महत्त्वाची सूचना

अपघाताचा दिवसेंदिवस उंचावणारा 
आलेख लक्षात घेऊन वाहनांच्या संदर्भातील 
सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करा !
१. अनेकदा जाणीव करून 
देऊनही वाहनांच्या संदर्भातील नियमांचे 
उल्लंघन करणारे दायित्वशून्य कार्यकर्ते !
       आतापर्यंत अनेकदा हिंदु जनजागृती समितीच्या राष्ट्रीय सत्संगात वाहनांच्या संदर्भातील नियम पाळण्याविषयी चुका घेण्यात आल्या आहेत. आपत्काळ दिवसेंदिवस समीप येत असल्याने वाहनांचे अपघात होण्याचे प्रमाणही वाढले आहे. असे असतांनाही काही कार्यकर्त्यांकडून वाहन परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) आणि अन्य कागदपत्रे समवेत न बाळगणे, दुचाकी चालवतांना शिरस्त्राण (हेल्मेट) न घालणे, तर चारचाकी चालवतांना सीटबेल्ट न वापरणे, भ्रमणभाषवर बोलत, तसेच अतिवेगाने वाहन चालवणे, वाहतुकीच्या नियमांचे पालन न करणे आदी गंभीर चुका वारंवार होत आहेत. अशा प्रकारे नियमांचे उल्लंघन केल्याने आतापर्यंत काही जणांना दंडही भरावा लागला आहे.
२. नियमांचे पालन करून योग्य क्रियमाण 
वापरा आणि स्वतःच्या साधनेची हानी टाळा !
       काही कार्यकर्त्यांना ‘मी साधना करतो; म्हणून देव मला वाचवेल. मी नियमांचे उल्लंघन केले, तरी चालेल’, असे वाटते. ‘असा अयोग्य विचार ठेवून चुकीचे क्रियमाण वापरल्यास त्याचे फळ भोगावे लागणारच आहे’, हे लक्षात घ्यावे. जलद आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी प्रत्येक क्षणी साधकत्वाला धरून आदर्श वर्तन करणे (योग्य क्रियमाण वापरणे) आवश्यक आहे.

फलक प्रसिद्धीकरता

हिंदुद्रोही ममता बॅनर्जी 
यांचा निंदनीय खोटारडेपणा !
        बंगालमध्ये आम्ही लोकांबरोबर भेदभाव केला नाही. येथे धार्मिक हिंसाचाराला थारा नाही. ते सहनही केले जाणार नाहीत. केवळ बंगालमध्येच दुर्गापूजा आणि मोहरम एकत्र साजरे केले जाऊ शकतात, असे प्रतिपादन बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केले आहे.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Bangalme Dharmik Hinsachar ko koi sthan nahi. Use sahan nahi kiya jayega.
Mamta Banerjee Phir Malda me 1 lakh jihadiyo ne kiya danga kya ahinsa thi ?
जागो ! : बंगाल में धार्मिक हिंसाचार को स्थान नहीं. उसे सहन नहीं किया जाएगा.
ममता बैनर्जी फिर मालदा में १ लाख जिहादियों ने किया दंगा क्या अहिंसा थी ?
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥

या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
न्यायव्यवस्थेच्या 
संदर्भात हास्यास्पद लोकशाही !
‘        एका बाजूला पाणी वाचवण्यासाठी शासन कोट्यवधी रुपये खर्च करून लोकजागृती करते; पण कोट्यवधी प्रलंबित खटले आणि न्यायाधिशांची अपुरी संख्या असतांनाही सहस्रो पानांची आरोपपत्रे, तारखांवर तारखा घेण्याची अनिष्ट पद्धत यांत न्याययंत्रणेचा बहुमूल्य वेळ वाया जात असतांना शासन काही करत नाही.’
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज 
सनातनचे श्रद्धास्थान
       हे असे आहे का ? ते तसे आहे का ? हे असेही नाही, तसेही नाही. ते कशात नाही ? मग ते असेही आहे आणि तसेही आहे.
भावार्थ :
‘हे असे आहे का ?’ मधील ‘हे’ मायेविषयी आहे. ‘ते तसे आहे का ?’ मधील ‘ते’ ब्रह्मासंबंधी आहे. ‘हे असेही नाही, तसेही नाही’, म्हणजे म्हटले तर ‘ही’ म्हणजे माया, ‘असेही नाही’ म्हणजे दिसते तशी नसून ब्रह्म आहे आणि ‘तशीही नाही’ म्हणजे ब्रह्म म्हटले तर ब्रह्मस्वरूपातही नाही. ‘ते कशात नाही ?’ म्हणजे ब्रह्म सर्वत्र आहे, मायेतही आहे. ‘मग ते असेही आहे आणि तसेही आहे’ म्हणजे माया व ब्रह्म दोन्ही एकच आहेत.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन ‘संत भक्तराज महाराज यांची शिकवण.’)  

बोधचित्र


योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

मनाची एकाग्रता 
‘मनाची एकाग्रता’ ही अशी शक्ती आहे की, जी प्रत्येक गोष्टीत यश प्राप्त करून देते. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

प्रसारमाध्यमांनी दायित्व जाणावे !

संपादकीय
     आम्ही काहीही दाखवू ! आम्हाला विचारणारे कोण आहे ?’, अशी बेताल वृत्ती असणार्‍या आणि नेहमी स्वयंघोषित न्यायाधिशाच्या भूमिकेत वावरणार्‍या ‘एन्डीटीव्ही’ला केंद्र सरकारने झटका देत एक दिवसासाठी वाहिनी बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. काँग्रेसच्या कार्यकाळात १९९० च्या दशकानंतर दूरचित्रवाहिनी क्षेत्र हळूहळू खाजगी वाहिन्यांसाठीही मोकळे झाले. प्रारंभी काही काळ मर्यादेत रहाणार्‍या दूरचित्रवाहिन्यांनी नंतर सर्वच मर्यादा ओलांडण्यास प्रारंभ केला. अनेक वाहिन्यांनी ‘शोध पत्रकारिते’च्या नावाखाली ‘टीआर्पी’साठी अतिरंजित आणि कपोलकल्पित माहिती प्रेक्षकांच्या माथी मारण्यास प्रारंभ केला. हिंदुत्ववादी संघटना आणि संत यांची अपकीर्ती करण्याची एकही संधी या वाहिन्या सोडत नाहीत.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn