Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

बांगलादेशमधील हिंदूंवरील आक्रमणानंतर ६ हिंदु परिवारांचे देशातून पलायन !

  • पाकिस्तान, बांगलादेश असो कि भारत, सर्वत्रच हिंदूंना कोणी वाली नसल्याने त्यांना त्यांच्याच देशातून पलायन करावे लागत आहे ! अशी घटना धर्मांधांच्या संदर्भात झाली असती, तर एकजात सर्व निधर्मी त्यांच्या साहाय्यासाठी धावून गेले असते ! हिंदूंनो, ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करा !
    ढाका - येथून १०० कि.मी. अंतरावर असणार्‍या ब्राह्मणबाडिया जिल्ह्यातील नासिरनगर येथे ३१ ऑक्टोबरला ३ सहस्र धर्मांधांनी हिंदूंवर आक्रमण करून १५ मंदिरांची तोडफोड केली होती, तर २०० घरांना आग लावण्यात आली. यात दीडशेहून अधिक हिंदू घायाळ झाले होते. या घटनेमुळे घाबरलेल्या ६ हिंदु परिवारांनी देश सोडून पलायन केले आहे. तसेच काही परिवारांनी गाव सोडून अन्यत्र स्थलांतर केले आहे. ते परत गावात येण्यास घाबरत आहेत. ढाका ट्रिब्यून या दैनिकाने हे वृत्त प्रसिद्ध केले आहे. (ढाका ट्रिब्यूनने ज्या प्रमाणात हिंदूंवरील आक्रमणाच्या संदर्भात घटनास्थळी माहिती घेऊन वृत्त प्रसिद्ध केले आहे, तसे भारतात हिंदूंवर होणार्‍या आक्रमणाच्या संदर्भात एकतरी प्रसारमाध्यम वृत्त प्रसिद्ध करते का ? - संपादक)

सनातनच्या विरोधात खोटे आणि एकतर्फी वृत्त दिल्याच्या प्रकरणी एबीपी माझाचे पत्रकार गणेश ठाकूर यांना रामनाथ गोएंका पुरस्कार प्रदान !

  • पीतपत्रकारांना खिरापतीसारखे पुरस्कार वाटणार्‍यांच्या पुरस्कारांचा दर्जा किती खालचा असतो हे यावरून लक्षात येते !
  • सनातनच्या विरोधात कथित शोध पत्रकारिता करा आणि पुरस्कार घ्या अशी योजनाच चालू झाली आहे, असेच यातून लक्षात येते ! अशी पत्रकारिता समाजाला दिशा काय देणार ?
  • आतापर्यंत प्रसारमाध्यमे सनातनच्या विरोधात खोट्या बातम्या प्रसिद्ध करून सनातनची अपकीर्ती करत होती आणि आता अशी अपकीर्ती करणार्‍यांना पुरस्कार देण्याचा नवा पायंडाही त्यांनी याद्वारे घातला आहे !
  नवी देहली - पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्य करणार्‍यांना इंडियन एक्सप्रेस ग्रुपचे संस्थापक रामनाथ गोएंका यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ प्रतिवर्षी पुरस्कार देण्यात येतो. एबीपी माझा या मराठी वृत्तवाहिनीचे पत्रकार गणेश ठाकूर यांना यावर्षी रामनाथ गोएंका पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत देहलीत झालेल्या एका सोहळ्यात हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.

टिपू सुलतान स्वतःच्या हितांसाठी लढला असल्याने त्याची जयंती कशासाठी साजरी करता ? - कर्नाटक उच्च न्यायालयाचा काँग्रेस सरकारला प्रश्‍न

    नवी देहली - टिपू सुलतान स्वातंत्र्यसैनिक नव्हता. तो एक राजा होता. तो स्वतःच्या हितांसाठी लढला होता, मग त्याची जयंती का साजरी करण्यात येत आहे, असा प्रश्‍न कर्नाटक उच्च न्यायालयाने राज्यातील काँग्रेस सरकारला केला आहे. काँग्रेस सरकारकडून येत्या १० नोव्हेंबरला टिपू सुलतानची जयंती साजरी करण्यात येणार आहे. गेल्या वर्षीही ती साजरी करण्यात आली होती. तेव्हाही याला विरोध झाला होता आणि आताही त्याला विरोध करण्यात येत आहे. याच अनुषंगाने राज्यातील कुर्ग येथील के.पी. मंजुनाथ या शेतकर्‍याने न्यायालयात जयंती साजरी करण्यावर प्रतिबंध घालण्यासाठी याचिका दाखल केली आहे. त्यावर २ नोव्हेंबरला झालेल्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाने वरील प्रश्‍न विचारला.

इंदिरा गांधी यांनी संविधानात पालट करून गोव्याला केंद्रशासित राज्याचा दर्जा दिल्याने गोव्याची संस्कृती अबाधित राहिली ! - लुईझिन फालेरो, काँग्रेस, गोवा

याचप्रमाणे भाजपच्या मोदी शासनाने संविधानात पालट करून 
भारताला हिंदु राष्ट्र घोषित करून भारतीय संस्कृती अबाधित ठेवावी !
      पणजी, ३ नोव्हेंबर (वार्ता.) - महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने गोव्याला महाराष्ट्रात विलीन करण्यासाठी जोर लावला होता; मात्र काँग्रेसच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी तातडीने संविधानात पालट करून गोव्याला केंद्रशासित राज्याचा दर्जा दिला. संविधान पालटून त्यांनी जनमत कौल घेतला. त्यामुळे गोव्याची संस्कृती अबाधित राहिली, असे काँग्रेसचे गोवा प्रदेशाध्यक्ष लुईझिन फालेरो म्हणाले. (असे आहे, तर संविधानात पालट करून भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्यास काहीच हरकत नाही. हिंदुत्वनिष्ठांनी हिंदु राष्ट्राची मागणी केल्यावर ती असंविधानिक आहे, अशी ओरड काँग्रेसवाले का करतात ? त्यामुळे हिंदूंनी निवडून दिलेल्या शासनाने भारतातील बहुतांश हिंदूंची संस्कृती अबाधित ठेवण्यासाठी भारताला शीघ्रतेने हिंदु राष्ट्र घोषित करावे ! - संपादक)

(म्हणे) तीन वेळा तलाक म्हणण्याची प्रथा शरीयतनुसार असल्याने पंतप्रधान मोदी यांना यामध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही !

गोवा काँग्रेस अल्पसंख्यांक आयोगाचे उर्फान मुल्ला यांचा मूलतत्त्ववाद !
अल्पसंख्यांकांची ही असली थेरं बंद करण्यासाठीच देशात सर्वत्र 
समान नागरी कायदा आवश्यक आहे. समानतेचा ढोल बडवणारे तथाकथित 
पुरोगामी या संदर्भात काहीच बोलत नाहीत. त्यांची समानता केवळ हिंदूंसाठीच आहे का ?
     पणजी, ३ नोव्हेंबर (वार्ता.) - तीन वेळा तलाक म्हणण्याची प्रथा ही शरीयतपासून आलेली आहे आणि यामध्ये पंतप्रधान मोदी यांना हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही, असे मत गोवा काँग्रेस अल्पसंख्यांक आयोगाचे उर्फान मुल्ला यांनी येथे घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत व्यक्त केले. (हिंदू कधी त्यांच्या शास्त्रशुद्ध धर्मपरंपरांमध्ये शासनाने हस्तक्षेप करू नये, असे ठणकावून सांगतात का ? - संपादक)

मराठी संस्कृती टिकवण्यासाठी हे ईश्‍वरी कार्य म्हणून सार्वकालिक कार्य करणारे कार्यकर्ते एकत्र येणे आवश्यक ! - प्रा. अनिल सामंत, अध्यक्ष, मराठी अकादमी

       काणकोण, ३ नोव्हेंबर (वार्ता.) - मराठी संस्कृती म्हणजे भारतीय संस्कृती ! मराठी भाषा टिकून रहाणे आवश्यक आहे, तसेच मराठी शाळांना पुनर्प्रतिष्ठा प्राप्त होणे आवश्यक आहे. मराठी संस्कृतीचे संवर्धन आणि संरक्षण करण्याच्या उद्देशाने संघटनात्मक आणि तळमळीने कार्य करणारे कार्यकर्ते यांचे संघटन करणे आवश्यक आहे. मराठी संस्कृती टिकवण्यासाठी हे ईश्‍वरी कार्य म्हणून सार्वकालिक कार्य करणारे कार्यकर्ते एकत्र यायला हवेत. हाच मराठी अकादमीचा उद्देश आहे, असे प्रतिपादन प्रा. अनिल सामंत यांनी पैंगीण येथील श्री श्रद्धानंद प्राथमिक शाळेत मराठीप्रेमींना मार्गदर्शन करतांना केले.

घटनास्थळी मिळालेल्या पेनड्राईव्हमध्ये पंतप्रधान मोदी, केंद्रीयमंत्री आणि भाजपचे नेते यांची छायाचित्रे !

मल्लपुरम् (केरळ) येथील बॉम्बस्फोटाचे प्रकरण
    मल्लप्पुरम् (केरळ) - १ नोव्हेंबर या दिवशी येथील न्यायालयाच्या वाहनतळामध्ये अल्प क्षमतेच्या बॉम्बचा स्फोट झाला होता. या वेळी पोलिसांना येथे एक पेनड्राईव्ह सापडला होता. या पेनड्राईव्हमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीयमंत्री आणि भाजपचे नेते यांची छायाचित्रे असल्याचे समोर आले आहे. देशातील अन्य ठिकाणीही अशा प्रकारे बॉम्बस्फोट करण्यात येणार होते, असे यातून स्पष्ट झाले आहे, अशी माहिती पोलीस महानिरीक्षक अजित कुमार यांनी सांगितली.

चर्चसारखी सजावट केल्याच्या कारणावरून पब चालकावर गुन्हा प्रविष्ट

किती हिंदू स्वधर्माविषयी असे जागरूक असतात ?
    मुंबई - चर्चसारखी सजावट केल्यामुळे ख्रिस्ती धर्मियांच्या भावना दुखावल्याप्रकरणी गोरेगावमधील सोशल्स या पबच्या रियाझ अमलानी या मुसलमान मालकाच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा प्रविष्ट केला आहे. (विविध ठिकाणी विविध माध्यमांतून हिंदु देवतांची विटंबना होत असतांना हिंदू निष्क्रीयच रहातात. हिंदूंमध्ये असा धर्माभिमान कधी निर्माण होणार ? - संपादक)
    या पबमध्ये ख्रिस्ती धर्मातील संतांची चित्रे लावून त्याखाली विनोदी नाव देण्यात आले होते, तसेच पबमधील बाकड्यांवरही बायबलमधील सुविचार लिहिण्यात आले होते.

गोव्यात गुन्हा सिद्ध झालेल्या एकूण कैद्यांपैकी निम्मे कैदी बलात्काराच्या गुन्ह्यातील !

कॅसिनो, अमली पदार्थ व्यवसाय, वेश्याव्यवसाय वाढीस लागल्याने देवभूमी 
गोव्याची भोगभूमी बनल्याचे द्योतक ! शाळेत साधना करवून न घेतल्याचा हा परिणाम आहे !
     पणजी, ३ नोव्हेंबर (वार्ता.) - गोव्यातील कैद्यांमधील गुन्हा सिद्ध झालेले निम्मे कैदी बलात्काराच्या गुन्ह्यात सहभागी आहेत, अशी माहिती नॅशनल क्राईम रिकाडर्स ब्यूरो यांनी नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या वर्ष २०१५ च्या एका अहवालात दिली आहे. 
    या अहवालात दिलेल्या माहितीनुसार गोव्यात गुन्हा सिद्ध झालेल्या १५२ कैद्यांपैकी ७१ कैद्यांवर बलात्काराचा गुन्हा, ३३ जणांवर हत्येचा प्रयत्न करणे, २३ जणांवर चोरीचा, २१ जणांवर अमली पदार्थ प्रकरणी सहभागी असल्याचा, तर ४ जणांवर जुगारांसंबंधी गुन्हा केल्याचे सिद्ध झाले आहे. गोव्यात २६३ कैद्यांच्या विरोधात गुन्हा सिद्ध व्हायचा आहे आणि यामधील ६७ जणांवर खुनाचा, ३० जणांवर बलात्कार केल्याचा, ४८ जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा, ५ जणांवर हत्येचा प्रयत्न केल्याचा, १४ जणांवर पळवून नेण्याचा, १० जणांवर दरोडा घातल्याचा, ३४ जणांवर चोरीचा, ५ जणांवर अमली पदार्थ प्रकरणात सहभागी असल्याचा आरोप आहे. गुन्हा सिद्ध झालेल्या १५२ मधील ११, तर गुन्हा सिद्ध व्हायचा आहे अशा २६३ मधील १९ कैदी या महिला आहेत. कैद्यांचे पुनर्वसन आणि कल्याणासाठी गोवा शासनाचे कारागृह प्रशासन प्रयत्नशील आहे. या अंतर्गत कारागृह प्रशासनाने कैद्यांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी विविध औषधी झाडे लावण्यासाठी हिमालया ड्रग कंपनीशी करार केलेला आहे. कोलवाळ येथील कारागृहात झाडांना पाणी घालण्यासंबंधीचा एक प्रकल्पही राबवण्याचे ठरवले आहे.

महिलांनी संस्कृतीचे महत्त्व समजून घेऊन घर संस्कृतीप्रधान करण्याच्या दृष्टीने कार्य करावे ! - अभिनेत्री मोनिका पटेल

प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्‍वरीय विश्‍वविद्यालय काणकोणच्या 
वतीने गोवा राज्यस्तरीय महिला संस्कृती संरक्षण संमेलन !
      काणकोण (गोवा) - आद्य सनातन संस्कृतीत महिलांना प्रथम स्थान होते. म्हणूनच देवतांची नावे घेतांना आपण श्री लक्ष्मीनारायण, गौरीशंकर, सियाराम अशी स्त्री शक्तीला प्राधान्य देऊन घेतो; मात्र आज वर्तमानपत्रे उघडताच आपल्याला स्त्रियांवरील अत्याचार, बलात्कार आदी घटना वाचायला मिळतात. ही स्थिती पालटण्यासाठी महिलांनी संस्कृतीचे महत्त्व समजून घेऊन घर संस्कृतीप्रधान करण्याच्या दृष्टीने कार्य करायला पाहिजे, असे प्रतिपादन मुंबई येथील अभिनेत्री सौ. मोनिका पटेल यांनी केले. येथील नगरपालिका सभागृहात प्रजापिता ब्रह्माकुमारी विश्‍वविद्यालय काणकोण शाखेकडून राज्यस्तरीय महिला संस्कृती संरक्षक संमेलन आयोजित करण्यात आले होते. आद्य सनातन संस्कृतीपासून भरकटलेल्या समाजाला पुनर्प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी, महिला संस्कृती संरक्षक बनण्यासाठी महिलांमध्ये जागृती होण्याच्या दृष्टीने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होतेे. या संमेलनाचे उद्घाटन अभिनेत्री सौ. पटेल यांच्या हस्ते झाले.


हिंदूंच्या धार्मिक स्थळाला सहलीचे ठिकाण बनवू नका !

शबरीमला मंदिरात गेलेल्या केरळच्या मुसलमान मंत्र्याला भाजप नेत्याने फटकारले !
     थिवरुनंपुरम्, ३ नोव्हेंबर - केरळ येथील भाजपचे वरिष्ठ नेते व्ही. मुरलीधरन् यांनी राज्याचे मुसलमान मंत्री के.टी. जलील यांना शबरीमला मंदिरात गेल्यामुळे विरोध केला. जलील ३० ऑक्टोबरला शबरीमला मंदिरात गेले होते. तेथे जाणारे ते पहिले मुसलमान मंत्री आहेत. 
    श्री. मुरलीधरन् म्हणाले, हिंदूंच्या धार्मिक स्थळाचा वापर राजकारणासाठी केला जाऊ नये. जलील हे पूर्वी सिमी या आतंकवादी संघटनेचे सदस्य होते. ते एकदम निधर्मी बनले असतील यांवर माझा विश्‍वास नाही. माझ्या माहितीनुसार जलील यांचे मंदिरात कोणतेही काम नव्हते. छायाचित्र काढण्यासाठी मंदिराला सहलीचे ठिकाण बनवणे योग्य नाही. जलील यांना भगवान अयप्पा यांचे भक्त बनून मंदिरात जायचे असल्यास त्यांनी जावे; मात्र राजकारण करू नये. जलील राज्याचे अल्पसंख्यांक कल्याण आणि हज यात्रा या खात्याचे मंत्री आहेत. ते अन्य एक मंत्री कडकांपल्ली सुरंद्रन् यांच्या समवेत शबरीमला मंदिरात होणार असलेल्या एका उत्सवाच्या सिद्धतेची पाहणी करण्यास गेले होते. जलील यांनी मंदिरासमवेतचे स्वतःचे छायाचित्र सामाजिक संकेतस्थळावर अपलोड केले होते.भारतीय कार्यक्रम दाखवल्यामुळे पाकमध्ये अमेरिकी वाहिनीवर बंदी !

भारतातील पाकप्रेमी आता गप्प का ?
     इस्लामाबाद - हिंदीमध्ये डब केलेल्या कार्टून मालिका पाकमध्ये दाखवल्यामुळे पाकिस्तान प्रसारमाध्यम नियामक प्राधिकरणाने अमेरिकी वाहिनी निकलोडियनचा परवाना रहित केला आहे. भारताबरोबरील संबंधात तणाव निर्माण झाल्यामुळे पाकने काही दिवसांपूर्वी भारतीय वाहिन्या आणि रेडिओ यांवर पूर्णपणे बंदी घातली होती.

अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्रम्प यांना किंचित आघाडी !

      वॉशिंग्टन - अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांच्यापेक्षा एका टक्क्याने आघाडी घेतली आहे. एबीसी न्यूज आणि वॉशिंग्टन पोस्ट या प्रसारमाध्यमांनी निवडणूकपूर्व केलेल्या जनमत चाचण्यांमध्ये ट्रम्प यांना ४६, तर हिलरी यांना ४५ टक्के मतदारांनी पसंती दर्शवली आहे. हिलरी यांच्या वादग्रस्त ईमेल प्रकरणाची एफ्बीआयने पुन्हा चौकशी चालू केल्याने त्यांना फटका बसल्याचे मानले जात आहे. यापूर्वी हिलरी या ट्रम्प यांच्यापेक्षा काही टक्क्यांनी आघाडीवर होत्या. बराक ओबामा यांच्या अध्यक्षपदाच्या पहिल्या कार्यकाळात हिलरी या अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री होत्या. या काळात त्यांनी एका खासगी इमेल सर्व्हरच्या माध्यमातून विविध ठिकाणी सहस्रो इमेल पाठवल्याचे यापूर्वीच उघड झाले आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून असा खाजगी सर्व्हर वापरणे अयोग्य असल्याने हिलरी यांच्यावर तेव्हा टीका झाली होती. यानंतर हिलरी यांनी क्षमा मागितली होती.जर्मनीमध्ये इसिसच्या समर्थक महिलेकडून अल्लाहू अकबरच्या घोषणा देत पोलिसांवर चाकूद्वारे आक्रमण !

      बर्लिन - येथील एका मुसलमान महिलेने अल्लाहू अकबर अशा घोषणा देत एका पोलिसावर आक्रमण करण्याची घटना घडल्याचे समोर आले आहे. ही महिला इसिसची समर्थक आहे. ती तिच्या पाचव्या मजल्यावर सदनिकेतून कपडे आणि साहित्य बाहेर फेकत होती. ही माहिती मिळाल्यावर पोलीस तिच्या सदनिकेचे दार तोडून आत घुसले. त्या वेळी तिने पोलिसांवर चाकूने आक्रमण केले. पोलिसांच्या प्रवक्त्याने म्हटले की, या महिलेविषयी आम्हाला माहिती होती. ५३ वर्षीय महिलेने १६ वर्षांपूर्वी इस्लाम स्वीकारला होता. तिच्या घरातून पोलिसांना इसिसविषयक लेख आणि अन्य साहित्य सापडले.

ख्रिस्त्यांच्या पार्थिवाला दहन करण्यास पोपची काही अटींसह अनुमती

हिंदु धर्मानुसार मृतदेह दहन करण्याची पद्धत अमेरिकी ख्रिस्तींना स्वीकारावीशी 
वाटते, हे भारतातील तथाकथित पुरोगाम्यांनी लक्षात घ्यावे आणि अमेरिकी ख्रिस्ती हिंदु 
धर्म स्वीकारण्यापूर्वीच हिंदु धर्माची महानता समजून घेऊन त्याचा विरोध करणे सोडून द्यावे ! 
      रोम - कॅथलिक पंथातील ख्रिस्त्यांच्या पार्थिवाला दफनऐवजी दहन करण्यास पोपने काही अटीसह अनुमती दिली आहे. दहनानंतर रक्षा समुद्रात विसर्जित करू नये अथवा एखाद्या भांड्यात घरी जतन करून ठेऊ नये, रक्षा चर्चच्या दफनभूमीत ठेवावी, कुटुंबियांमध्ये वाटून घेऊ नये, त्यापासून दागिने बनवू नयेत, इत्यादी अटी घालण्यात आल्या आहेत. दहनानंतर पार्थिवाचे पंचमहाभूतात विलीनीकरण होते आणि पुनर्जन्म होतो, ही संकल्पना ख्रिस्ती लोकांत पसरू नये, याची काळजी पोप घेत आहेत. 
     अमेरिकेत दहनाची संकल्पना पुढे येत आहे. जवळपास येथील अर्ध्या ख्रिस्ती नागरिकांनी दहनाची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे पोपला वरील निर्णय घेणे भाग पडले. अमेरिकेतील ख्रिस्ती धर्मियांत निसर्ग पूजा; सत्याचा शोध निसर्गातूनच लागतो, धर्मातून नाही; अशा संकल्पना दृढ होत आहे तसेच नास्तिकतेचे स्तोमही माजत आहे. या सर्वांना कसे तोंड देता येईल त्याविषयी चर्च चिंतीत आहे. ख्रिस्त्यांना धर्मात राखून ठेवण्यासाठी धर्माविरुद्ध निर्णय घेणे चर्चला बाध्य झाले आहे.कल्याण-डोंबिवली महानगरपालिका पुरवत असलेल्या पाण्यातून नळाद्वारे साप बाहेर पडला

नागरिकांच्या आरोग्याशी खेळणारे महानगरपालिका प्रशासन !
    कल्याण - येथील महानगरपालिकेकडून करण्यात येणार्‍या पाण्यातून साप बाहेर पडल्याची घटना नुकतीच घडली. दुपारी नळाचे पाणी भरण्यासाठी लावलेल्या बादलीतील पाण्यात साप वळवळत असल्याचे आढळून आले. (यात संबंधित असणार्‍या उत्तरदायी अधिकार्‍यांवर कठोर कारवाईच व्हायला हवी ! - संपादक) या घटनेमुळे पालिकेकडून पुरवल्या जाणार्‍या पाण्याच्या शुद्धतेबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.
   या घटनेची माहिती मिळताच पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचार्‍यांनी पाइपलाइनची तपासणी केली. पालिकेकडून पुरवठा होणारे पाणी मोठ्या पाणी साठवण्याच्या टाकीत साठवले जाते.

मुख्यमंत्र्यांनी त्यागपत्र द्यावे - नवाब मलिक

बलात्कार रोखू न शकणे हे सर्वपक्षीय राज्यकर्ते आणि लोकशाही यांचे अपयश ! 
बुलढाणा जिल्ह्यातील आश्रमशाळेतील अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराचे प्रकरण 
     मुंबई, ३ नोव्हेंबर (वार्ता.) - बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील पाळा येथील स्व. निनाभाऊ कोकरे प्राथमिक आणि माध्यमिक आश्रमशाळेतील अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराचे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला. प्रारंभी या प्रकरणात पोलिसांनी तक्रार प्रविष्ट करून घेतली नव्हती. राजकीय दबावामुळेच पोलिसांनी तक्रार प्रविष्ट करून घेतली. या शाळेतील १०-१२ मुलींवर अत्याचार झाल्याचे समोर येत आहे. शासनाच्या निष्क्रियतेमुळेच असे प्रकार घडत आहेत. या प्रकरणाचे नैतिक दायित्व स्वीकारून मुख्यमंत्र्यांनी पदाचे त्यागपत्र द्यावे. यासह महिला आणि बाल विकासमंत्री पंकजा मुंडे अन् आदिवासीमंत्री विष्णु सावरा यांची पदावरून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता नवाब मलिक यांनी केली. ३ नोव्हेंबर या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. (समाजातील वाढती अनैतिकता रोखण्यासाठी समाजाला धर्मशिक्षण देणे, हाच एकमात्र उपाय आहे. - संपादक)

हवालदाराला दगड मारणार्‍या दोघांना अटक

पोलिसांचा धाक नसल्याचे दर्शवणारी घटना !
     पुणे - येथील कर्वेनगर भागात दुचाकीतील पेट्रोल चोरत असतांना हटकल्याने हवालदाराला शिवीगाळ करून त्याच्यावर दगड मारणारे सोमनाथ गायकवाड (वय २८ वर्षेे) आणि गौतम गायकवाड (वय २६ वर्षे) यांना पोलिसांनी अटक केली. दोन्ही आरोपींनी हवालदाराच्या पाठीत दगड मारला होता.

किल्लारीला (जिल्हा लातूर) भूकंपाचे धक्के !

    लातूर - औसा तालुक्यातील किल्लारी परिसरात आणि लोहारा येथे २ नोव्हेंबरला दुपारी २.४० वाजता भूकंपाचा सौम्य धक्का बसला. लातूरच्या भूकंप मापन केंद्रात याची नोंद झाली. या वेळी कोणतीही हानी झाली नाही. किल्लारी येथे दक्षिणेकडून उत्तरेकडे गडगडत जाणारा आवाज जाणवला. पत्रे, छत, भांडी हादरल्याने लोक रस्त्यावर धावले.
    १९९३ मध्ये येथे झालेल्या भूकंपात ७ सहस्र ९२८ जणांचा मृत्यू झाला होता. या वेळी सहस्रो धक्क्यांनी भूकंपमापक यंत्र बंद पडले होते. लातूरच्या या केंद्रात गेल्या २३ वर्षांंत ७३ वेळा भूकंप होऊनही अद्याप येथे भूकंपाची पूर्वसूचना देणारी यंत्रणा उभारण्यात आलेली नाही. येथे आजही सातत्याने भूकंपाचेलहान-मोठे धक्के बसतात. त्यामुळे अनेक जण आजही पक्क्या घरांमध्ये झोपत नाहीत.
महर्षींनी प्रलयकालाविषयी सतर्क करणे
    १९.३.२०१६ या दिवशी झालेल्या नाडीवाचन क्रमांक ६७मध्ये महर्षि म्हणतात, हे पूर्ण वर्ष प्रलयकालाचे आणि आपत्तीजनक असणारे आहे. (किल्लारी येथे भूकंपाचे धक्के बसले. या घटनांवरून प्रलयकालाविषयी महर्षींनी केलेले भाष्य किती तंतोतंत आहे, हे लक्षात येते ! - संपादक)

फटाक्याची ठिणगी ड्रेसवर पडून ८ वर्षीय मुलीचा मृत्यू !

पालकांनो, जिवावर बेतणार्‍या फटाक्यांपासून मुलांना दूर ठेवा !
   नवी मुंबई - फटाका उडवतांना ड्रेसवर ठिणगी पडून ड्रेस पेटल्याने येथील ८ वर्षीय अंकिता चौधरी हिचा मृत्यू झाला आहे. ड्रेसने पेट घेतल्यावर घायाळ अंकिताला पालकांनी रुग्णालयात नेले; पण ६ घंट्यांच्या उपचारांनंतरही तिचा मृत्यू झाला. दिवाळीच्या काळात नॅशनल बर्न्स सेंटरमध्ये भाजल्याच्या २६ घटनांची नोंद करण्यात आली आहे.

मित्रांकडून महाविद्यालयीन विद्यार्थ्याची हत्या विध्वंसकतेकडे वाटचाल करणारी आजची तरुणाई !

   नाशिक - आधीच्या भांडणाची कुरापत काढून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मित्र मयूर देवरे (वय १९ वर्षे) याचे अपहरण करून त्याची हत्या केली. (तरुणांकडून केल्या जाणार्‍या वाढत्या हत्या हे देशासाठी चिंताजनक ! - संपादक)
या प्रकरणी पाच संशयितांवर अपहरण आणि हत्येचा गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. संशयितांमध्ये एका पोलिसाच्या मुलाचाही समावेश आहे.
१. मित्रांनी बोलावल्यानुसार मयूर एका ठिकाणी पोचला. तेथे मित्रांनी आधीचे भांडण उकरून काढत त्याच्याशी वाद घातला. त्याला बळजोरीने दुचाकीवर बसवले आणि त्याला एका परिसरात नेले.

सातारा जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगर पंचायती यांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नोटिसा !

   सातारा, ३ नोव्हेंबर (वार्ता.) - जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगर पंचायती यांचे मुख्याधिकारी यांना पर्यावरणाचा सद्य:स्थितीतील अहवाल सादर न केल्याच्या कारणावरून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. याविषयी तातडीने खुलासा करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. (सातारा येथे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि समविचारी संघटना यांच्या वतीने गणेशोत्सवाच्या काळात प्रतिवर्षी पर्यावरण प्रदूषणाचे कारण पुढे करत श्री गणेशमूर्तीदान मोहीम आणि कृत्रिम तलाव हे धर्मद्रोही उपक्रम राबवण्यात येतात; मात्र सर्वत्र होत असलेले हे प्रदूषण प्रशासनाला दिसत कसे नाही ? - संपादक) हिंदु जनजागृती समितीने गणेशोत्सवाच्या काळात जिल्हाधिकारी आणि मुख्याधिकारी यांना निवेदने देऊन सातारा नगरपालिका सांडपाणी प्रक्रिया आणि नागरी घनकचरा व्यवस्थापन यांकडे अक्षम्य दुर्लक्ष करत असल्याचे निदर्शनास आणून दिले होते.
   यावर लवकरच आम्ही योग्य ती पावले उचलू, असे आश्‍वासन जिल्हाधिकार्‍यांनी दिले होते; मात्र दोन महिने झाल्यावरही जिल्हाधिकार्‍यांनी याकडे लक्ष दिले नाही. त्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी बोलावलेल्या बैठकीला काही नगरपालिकांचे मुख्याधिकारी उपस्थित राहिले नव्हते. मुख्याधिकार्‍यांनी अहवाल सादर न केल्याविषयी जिल्हाधिकार्‍यांनी त्यांना परत नोटिसा दिल्या.

आत्महत्या करणारा माजी सैनिक काँग्रेसचा कार्यकर्ता ! - केंद्रीय राज्यमंत्री व्ही.के. सिंह यांचा दावा

     नवी देहली - समान श्रेणी समान निवृत्तीवेतनच्या ('वन रँक वन पेन्शन'च्या) मागणीसाठी येथील जंतरमंतर येथे आंदोलन करतांना आत्महत्या करणारे माजी सैनिक रामकिशन ग्रेवाल हे काँग्रेसचे कार्यकर्ते होते. त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर सरपंचपदाची निवडणूकही लढवली होती, असा दावा केंद्रीय राज्यमंत्री आणि माजी सैन्यदल प्रमुख व्ही.के. सिंह यांनी केला आहे. रामकिशन यांचा बँकेबरोबर वाद होता, त्याचा सरकारशी काहीच संबंध नाही, असेही ते म्हणालेत. ग्रेवाल यांनी आत्महत्येसाठी 'सल्फा टॅबलेट्स' घेतल्या होत्या. त्यांना या गोळ्या कशा मिळाल्या, असा प्रश्‍नही सिंह यांनी उपस्थित केला आहे.

शेतकर्‍यांवर ओढवलेल्या परिस्थितीला मुख्यमंत्रीच उत्तरदायी ! - सुप्रिया सुळे

     पुणे, ३ नोव्हेंबर (वार्ता.) - २ वर्षांमध्ये शेतकरी आणि समाजातील इतर घटक यांच्यावर जी परिस्थिती उद्भवली, त्याला मुख्यमंत्रीच उत्तरदायी आहेत. राज्य सरकारच्या द्विवर्षपूर्तीनिमित्त कृषी क्षेत्रात महाराष्ट्र अव्वल असल्याचे सांगितले जात असले, तरी स्थानिक शेतकर्‍यांची परिस्थिती वेगळीच आहे. कांदा, टोमॅटो आणि झेंडू या पिकांना काडीमोलाचा भाव राहिलेला असताना कृषी क्षेत्र अव्वल स्थानी कसे असेल, असा प्रश्‍न उपस्थित करत खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य शासनावर टीका केली. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या कारकिर्दीला ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेची माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. आघाडी सरकारच्या काळातही द्राक्षे आणि कांदा यांचा भाव पडला होता, यासंदर्भात एका पत्रकाराने विचारले असता, त्या वेळी आम्ही शेतकर्‍यांच्या साहाय्यासाठी 'पॅकेज' उपलब्ध करून दिले होते, असे सांगून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.

साहाय्यक पोलीस निरीक्षकाला मारहाण करणार्‍या ३ भावांना अटक !

मारहाणीत खांदे निखळले पोलिसांना होणार्‍या
 मारहाणीच्या घटना म्हणजे कायदा-सुव्यवस्था संपल्याचे द्योतक ! 
     ठाणे - तीन सख्ख्या भावांनी मिळून येथील साहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन घोळकर यांना पुष्कळ मारहाण केली. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना ६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मारहाणीत घायाळ झालेल्या साहाय्यक पोलीस निरीक्षकांवर रुग्णालयात उपचार चालू आहेत. मारहाणीत त्यांचे दोन्ही खांदे निखळले असून त्यांच्या बरगड्या, छाती आणि तोंड येथेही जखमा झाल्या आहेत. तसेच त्यांना मोठ्या प्रमाणात मुका मार लागला आहे. (जेथे पोलीसच सुरक्षित नाहीत, तेथे सामान्यांच्या सुरक्षेचा विचारच न केलेला बरा ! - संपादक) 

(म्हणे) 'ज्यात ५-१० पोलीस मरत नाहीत, तिला चकमक कसे म्हणणार ?'

राणा मुनव्वर यांचे संतापजनक विधान 
     वाराणसी - 'ज्या चकमकीत ५-१० पोलीस कर्मचारी आणि १५-२० जण मरत नाहीत, तिला चकमक कसे म्हणणार ?', असा प्रश्‍न वाराणसीतील एका कार्यक्रमात राणा मुनव्वर यांनी भोपाळ येथील सिमीच्या आतंकवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीवर उपस्थित केला. राणा पुढे म्हणाले की, आज काल लोकांच्या मागणीनुसार चकमकी होतात. लोकांच्या इच्छेनुसार फाशी दिली जाते. एखाद्याच्या खिशात उर्दू भाषेतील पत्र मिळाल्यास त्याला आतंकवादी ठरवले जाते. हे सर्व राजकीय नेत्यांना खूश करण्यासाठी केले जाते.

देशभरातील पेट्रोलपंप चालकांकडून पेट्रोल-डिझेल खरेदी बंद आंदोलन !

   मुंबई - देशातील तेल आस्थापनांच्या मनमानी कारभाराला विरोध करत २ दिवस देशभरातील पेट्रोलपंप चालकांकडून पेट्रोल-डिझेल खरेदी बंद करण्यात येणार आहे. इंडियन पेट्रोल डिलर्स कॉन्फेडरेशनच्या आदेशानुसार हे राष्ट्रव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनामुळे येत्या दोन दिवसांत पेट्रोलची टंचाई जाणवण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
   १९ ऑक्टोबरपासून या आंदोलनाला प्रारंभ झाला होता; मात्र आस्थापनांसह शासनानेही दुर्लक्ष केल्याने पेट्रोल-डिझेल खरेदी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती फामपेडाचे अध्यक्ष उदय लोध यांनी दिली.

मुंबई येथे अल्पवयीन गतीमंद मुलीवर सामूहिक बलात्कार करणार्‍या ५ जणांना अटक

आज छत्रपती शिवाजी महाराज असते, तर त्यांनी अशा वासनांधांचा कडेलोटच केला असता !
    मुंबई - येथील दिंडोशी परिसरात अल्पवयीन गतीमंद मुलीवर सामूहिक बलात्कार झाला. यातून पीडित मुलगी गर्भवती राहिली. या प्रकरणी दिंडोशी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.
    पाच जणांनी तिला फिरायला नेत असल्याचे सांगून निर्जनस्थळी नेले. तेथे तिच्यावर बलात्कार केला. २१ ऑक्टोबरला तिचे अपहरण करून मालाडच्या आक्सा बिच परिसरात तिला डांबून ठेवले आणि ७ दिवस तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. मुलगी बेपत्ता झाल्याने कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी तिचा शोध घेतल्यावर ही घटना समोर आली.

महिला चालकाने २ वाहतूक पोलिसांना उडवले

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील घटना 
     मुंबई - मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भरधाव वेगाने आलेल्या गाडीतील महिला चालकाने दोन वाहतूक पोलिसांना उडवले. यात पोलीस गंभीररित्या घायाळ झाले असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत. याप्रकरणी महिलेला कह्यात घेण्यात आले आहे.

पाकमधील भारतीय उच्चायुक्तालयातील ८ कर्मचार्‍यांवर हेरगिरीचा आरोप

सूडवृत्तीच्या पाकिस्तान समवेतचे सर्व संबंध तोडण्यातच शहाणपणा आहे ! 
     इस्लामाबाद - पाकमधील भारतीय उच्चायुक्तालयातील ८ अधिकार्‍यांवर हेरगिरीचा आरोप पाककडून करण्यात आला आहे. त्यामुळे भारताकडून लवकरच या अधिकार्‍यांना परत बोलावले जाण्याची शक्यता आहे. पाककडून या ८ अधिकार्‍यांची माहिती सार्वजनिक करण्यात आली आहे. त्यामुळे या अधिकार्‍यांच्या जिवाला धोका आहे, असे भारत सरकारकडून सांगण्यात आले आहे. भारताकडून झालेल्या पाकच्या अधिकार्‍यांवरील कारवाईमुळे पाककडूनही भारतीय अधिकार्‍यांच्या विरोधात कारवाई होण्याची शक्यता होती. दुसरीकडे पाककडून त्याच्या ६ अधिकार्‍यांना भारतातील उच्चायुक्तालयातून मायदेशी बोलावून घेण्यात आले आहे.

संभाजीनगर येथे माजी सैनिकांसह शेतकर्‍यांकडून पाकविरोधात निदर्शने

पाकिस्तानने केलेल्या गोळीबाराचे प्रकरण 
शेतकर्‍यांना निदर्शने करावी लागणे, हे देशाचे दुर्दैव ! 
     संभाजीनगर - सीमेवर पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात भारतीय सैनिक धारातीर्थी होत असल्याने येथे माजी सैनिकांसह शेतकर्‍यांनी क्रांतीचौकात पाकविरोधात निदर्शने केली. या वेळी संतप्त शेतकर्‍यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची प्रतिमा आणि पाकिस्तानचा ध्वजही जाळला. या वेळी हुतात्मा झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. संतप्त शेतकर्‍यांनी पाकिस्तानविरोधात दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.

क्षुल्लक कारणावरून अल्पवयीन मुलाला मारहाण करणार्‍या धर्मांधाला अटक

अशा उद्दाम धर्मांधांवर पोलिसांनी कठोर कारवाईच करायला हवी !
१८ जणांच्या विरोधात दहशत माजवल्याचा गुन्हा प्रविष्ट
पिंपरी - चालतांना धक्का लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून अल्पवयीन मुलाला मारहाण करणार्‍या रजीक रज्जाक शेख (वय २१ वर्षे) याला पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी मुलाने तक्रार दिल्यावर रजीकने जमाव जमवून मुलाचे नातेवाईक आणि घटनास्थळी असलेले पोलीस कर्मचारी यांना मारहाण केली होती. (धर्मांधांची अरेरावी जाणा ! - संपादक) अन्य १८ जणांवर दहशत माजवल्याचा गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. आबीद उर्फ मजहर रेहमान शेख, थॉमस, अजय जयराज पिल्ले, अल्ताफ फिरोज खान, इरफान मेहमुद शहा, बटाटा, सूर्यवंशी, अनिकेत, इम्तियाज, हैदर आणि त्यांचे अन्य सात ते आठ साथीदार यांच्यावर गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. शेख याने तक्रार करणार्‍या मुलाच्या चुलत भावाच्या डोक्यात कोयत्याने वार करून त्याला गंभीर घायाळ केले.

पालघरमध्ये सापडलेली स्फोटके आर्डीएक्सच !

    मुंबई - पालघरच्या सातवली गावात आतंकवादविरोधी पथकाने ऐन दिवाळीच्या तोंडावर जप्त केलेली १५ ते २० किलो स्फोटके ही आर्डीएक्स असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे साहजिकच पुन्हा एकदा मुंबई रक्तरंजित करण्याची योजना आखली गेली होती का, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. २७ ऑक्टोबरला मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील सातवलीमध्ये एका झोपडीत जिलेटीनच्या कांड्या आणि ज्वलनशील पदार्थ सापडले होते. पालघरचा बराचसा भाग हा समुद्राला जोडलेला असल्यानं हा परिसर संवेदनशील समजला जातो.

स्थानिक स्वराज संस्थेत मतदान केल्यास हॉटेलिंगमध्ये २५ टक्क्यांपर्यंत सवलत !

नागरिकांना अशी आमिषे दाखवून मत मिळवण्यापेक्षा आदर्श राज्यकर्त्यांचे हिंदु राष्ट्र आणा !
मुंबई - स्थानिकस्वराज संस्थेत मतदान केल्यास हॉटेलिंगमध्ये २५ टक्क्यांपर्यंतची सवलत मिळणार आहे. नागरिकांनी अधिकाधिक प्रमाणात मतदान करावे, यासाठी शासनाने हा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्राच्या पर्यटन विभागाने ही सवलत दिली आहे. त्यासाठी मतदानाची खूण आणि आवश्यक गोष्टींची पूर्तता करावी लागणार आहे.

केवळ 'सर्जिकल स्ट्राईक' नको, तर युद्धच करा ! - राजेश आवटे

नांगनूर (जिल्हा बेळगाव) येथे हुतात्म्यांना श्रद्धांजली ! 
नांगनूर येथे प्रतिमापूजन करून हुतात्मा नितीन कोळी यांना श्रद्धांजली वाहतांना श्रीराम सेनेचे कार्यकर्ते
     निपाणी (जिल्हा बेळगाव), ३ नोव्हेंबर (वार्ता.) - पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन होत आहे. अनेक सैनिकांना यामुळे हौताम्य पत्करावे लागले आहे. भारताने 'सर्जिकल स्ट्राईक' करून पाकला धडा शिकवला आहे; मात्र एवढ्यावरच न थांबता सरळ युद्धच करून पाकिस्तानचे अस्तित्व मिटवून टाकावे, असे मत निपाणी येथील समाजसेवक श्री. राजेश आवटे यांनी व्यक्त केले. नांगनूर येथील छत्रपती संभाजीराजे चौक येथे श्रीराम सेनेच्या वतीने १ नोव्हेंबर या दिवशी हुतात्मा सैनिक नितीन कोळी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी श्रीराम सेना शाखाप्रमुख सर्वश्री अमोल गुरव, कार्यकर्ते विजय पोवार, निवास पोवार, अभिनंदन भोसले, प्रशांत क्षीरसागर, सागर श्रीखंडे आदी उपस्थित होते. 

आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर धर्मांधाकडून बलात्कार !

वासनांध धर्मांध ! 
     मुंबई - घराबाहेर खेळणार्‍या चार वर्षांच्या मुलीला खाऊचे आमिष दाखवत तिच्यावर बलात्कार करणार्‍या साजिद खान (वय २६ वर्षे) या धर्मांधाला पोलिसांनी अटक केली. मुलीने आई-वडिलांना याविषयी सांगितल्यावर रहिवाशांनी साजिदला चोप देत पोलिसांच्या कह्यात दिले.

संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून चित्रपटगृहाच्या कार्यालयाची तोडफोड

'ऐ दिल है मुश्किल' या चित्रपटाच्या विरोधाचे प्रकरण 
     कल्याण - येथील 'एस्एम् ५' या चित्रपटगृहाच्या नोंदणी कार्यालयाच्या संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली आहे. 'ऐ दिल है मुश्किल' या चित्रपटाच्या विरोधात त्यांनी हे कृत्य केले. चित्रपटाच्या फलकाला कार्यकर्त्यांनी काळे फासले. 
     संभाजी ब्रिगेड ठाणे जिल्हाध्यक्ष चेतन पवार यांनी दिवाळीपूर्वीच या मल्टिप्लेेक्सच्या बाहेर निदर्शने करत दिवाळीनंतर चित्रपटाच्या विरोधात आक्रमकपणे आंदोलन करण्याची चेतावणी दिली होती. त्यानुसार त्यांनी तोडफोड केली. 'पाकिस्तानी कलाकारांना आमचा ठाम विरोध असून नागरिकांनीही हा चित्रपट बघायला जाऊ नये', असे आवाहन संभाजी ब्रिगेडचे ठाणे जिल्हाध्यक्ष चेतन पवार यांनी केले होते. याप्रकरणी आंदोलकांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्याची कारवाई चालू होती.

सांगली-सातारा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी आठ उमेदवार छाननीत पात्र

     सांगली, ३ नोव्हेंबर (वार्ता.) - सांगली-सातारा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक २०१६ साठी आठ उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे दाखल केली होती. छाननीअंती आठही नामनिर्देशनपत्रे वैध ठरली आहेत. या आठमध्ये काँग्रेसचे मोहनराव कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे शेखर गोरे, भाजपचे युवराज गायकवाड यांचा प्रमुख समावेश आहे. ५ नोव्हेंबर या दिवशी आवेदन माघारी घेण्याचा अंतिम दिवस असून त्या दिवशी चित्र स्पष्ट होणार आहे. सध्या ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आहे.

कोल्हापूर येथे पोलिसांच्या १ सहस्र ४०० घरांसाठी २९ कोटी रुपयांची तरतूद ! - पालकमंत्री चंद्रकांत पाटील

     कोल्हापूर, ३ नोव्हेंबर (वार्ता.) - राज्यात पोलिसांना २९ सहस्र नव्या घरांची उभारणी करण्यात येणार आहे. येथील पोलिसांच्या १ सहस्र ४०० घरे बांधण्यासाठी २९ कोटी रुपयांची तरतूद केली आहे, अशी माहिती पालकमंत्री श्री. चंद्रकांत पाटील यांनी २ नोव्हेंबर या दिवशी येथे दिली. पाटील यांनी पोलीस मुख्यालयात भेट देऊन तेथील वसाहतींची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. या वेळी त्यांनी पोलीस वसाहतीतील प्रत्येक कुटुंबाला भेटवस्तू देऊन दिवाळीचा आनंद वृद्धींगत केला. (पोलिसांच्या वसाहतीची समस्या गेल्या अनेक वर्षांपासून आहे. सध्या उपलब्ध असलेल्या पोलिसांच्या निवासस्थानीही सुविधांची वानवा असल्याने पोलिसांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यासाठी शासनाने पोलिसांची घरे लवकर बांधून द्यावीत, हीच भाजप शासनाकडे अपेक्षा आहे. - संपादक) 

पोलिसांच्या संदर्भातील कटू अनुभव !

अवैधरित्या शस्त्रविक्री केल्याच्या प्रकरणी संजय साडविलकर
आणि त्यांचे सहकारी यांच्या विरोधात चौथी तक्रार प्रविष्ट !
  • संजय साडविलकर यांच्या जबाबाच्या आधारे सनातनचे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना अटक करणारे पोलीस अवैध शस्त्रविक्रीच्या गुन्ह्याखाली साडविलकर यांच्या विरोधात सातत्याने प्रविष्ट होणार्‍या तक्रारींची दखल घेऊन त्यांना अटक करत नाहीत. यावरून पोलिसांनी गुन्हेगारांशी हातमिळवणी केली आहे का, अशी शंका निर्माण होते. अशा पोलिसांवर शासन कारवाई करणार का ?
सांगली, ३ नोव्हेंबर (वार्ता.) - संजय साडविलकर यांनी अवैधरित्या रिव्हॉल्व्हर आणि पिस्तुल बनवणे, हाताळणे, खरेदी-विक्री करणे, त्याची दुरुस्ती करणे इत्यादी गुन्हे केले आहेत. साडविलकर यांनी असे गुन्हे केल्याचा न्यायाधिशांसमोर कबुलीजबाब दिला आहे. त्यामुळे या कबुलीजबाबाच्या आधारे संजय साडविलकर, त्यांचे सहकारी बापू इंदुलकर आणि संगनमत करून अवैधरित्या शस्त्रविक्री करणारे सर्व यांच्यावर गुन्हे प्रविष्ट करून त्यांना अटक करावी, अशी तक्रार राष्ट्रप्रेमी नागरिक श्री. अरुण भिकाजी यादव यांनी ३ नोव्हेंबर या दिवशी सांगली शहर पोलीस ठाण्यात केली आहे.

बिल्डरच्या खुनाची सुपारी घेणार्‍या मनीष नागोरी याला अटक !

     इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर), ३ नोव्हेंबर (वार्ता.) - २ मासांपूर्वी नवी मुंबई येथील बांधकाम व्यावसायिकाच्या खुनाची सुपारी घेणारा मुख्य सूत्रधार आणि आंतरराज्य पिस्तुल तस्कर मनीष नागोरी हा २ नोव्हेंबर या दिवशी शहापूर पोलीस ठाण्यात स्वतःहून उपस्थित झाला. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या प्रकरणातील संशयित स्वप्नील फातले याला पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे. 

एटीकेटीच्या परीक्षेनंतर १४ दिवसांतच एम्एस्सी गणिताची सत्र परीक्षा !

विद्यार्थ्यांची पर्वा न करणारे शिक्षण क्षेत्र ! 
     मुंबई- मुंबई विद्यापिठात गणित विषयाच्या पदव्युत्तर पदवीच्या (एम्एस्सीच्या) अभ्यासक्रमाच्या दुसर्‍या वर्षाला असलेल्या विद्यार्थ्यांची 'एटीकेटी' परीक्षा संपून आठवडा संपताच येत्या ९ नोव्हेंबरपासून विद्यार्थ्यांना तिसर्‍या सत्राच्या परीक्षेला सामोरे जावे लागत आहे. (हिंदु राष्ट्रात विद्यार्थ्यांवर परीक्षांचा ताण देणारी नव्हे, तर त्यांना खर्‍या अर्थाने घडवणारी आदर्श शिक्षणप्रणाली असेल ! - संपादक) 

मुलांसमवेत झालेल्या क्षुल्लक वादामुळे शालेय विद्यार्थ्याने घर सोडले !

क्षुल्लक वादातून आततायी कृती करण्याची संस्कृतीच 
कॉन्व्हेंट शाळेतून निपजत आहे, हे यावरून लक्षात येते ! 
     पुणे - मुलांसमवेत किल्ला बनवतांना झालेल्या क्षुल्लक वादामुळे संतप्त झालेल्या एका शालेय विद्यार्थ्याने (वय १५ वर्षे) घर सोडले. याप्रकरणी त्याच्या वडिलांनी पोलिसांत अज्ञाताविरुद्ध अपहरणाची तक्रार नोंदवली असून गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. हा विद्यार्थी येरवडा येथील डॉन बॉस्को शाळेत इयत्ता नववीत शिकत होता.

राजकारणातील माफिया अथवा गुन्हेगारी पार्श्‍वभूमीचे लोकप्रतिनिधी (?) !

      लोकांनी लोकांच्या कल्याणासाठी चालवलेले राज्य, अशी लोकशाहीची व्याख्या केली जाते. परंतु गुंडप्रवृत्तीचे लोकप्रतिनिधी आणि त्यांना निवडून देणारी जनता लोकशाहीच्या या व्याख्येला निरर्थक ठरवते. लोकशाहीचा हा पोरखेळ राष्ट्राच्या मुळावर उठला आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती वाटू नये ! त्यामुळे जनहो, या परिस्थितीवर लोककल्याणकारी हिंदु राष्ट्र अर्थात् सनातन धर्म राज्य हाच एकमेव उपाय आहे, हे जाणा ! - संपादक
१. गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असणार्‍यांना 
मंत्रीपद बहाल करणारी निरर्थक लोकशाही !
      गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असणारा लोकप्रतिनिधी असता कामा नये. अशा लोकप्रतिनिधींना अपात्र ठरवावे, असा अर्ज मनोज नरुला नामक नागरिकाने सर्वोच्च न्यायालयात केला होता. त्याचा अर्ज ९ वर्षांनंतर न्यायालयाने फेटाळून लावला; पण मंत्रीमंडळात गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असणार्‍यांना स्थान देऊ नये, अशा सूचना सर्वोच्च न्यायालयाने पंतप्रधानांना आणि देशातील राज्याच्या मुख्यमंत्र्यांना केली. या सूचनेला देशभर प्रसिद्धी मिळाली; पण त्याची कार्यवाही करण्यासाठी पंतप्रधानांनी किंवा देशातील कोणत्याही राज्याच्या मुख्यमंत्र्याने पाऊल उचलले नाही. कोणत्याही संशयित व्यक्तीस न्यायाधीश बनवले जात नाही, मग गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असणार्‍या व्यक्तीला किंवा गंभीर स्वरूपाचे आरोप असणार्‍या लोकप्रतिनिधीला मंत्री का बनवावे ?, असा प्रश्‍न सर्वोच्च न्यायालयानेच विचारला आहे.

सनातन संस्थेच्या वतीने राबवण्यात आलेल्या नवरात्र मोहिमेचा सोलापूर, कोल्हापूर, सांगली आणि पुणे या जिल्ह्यांचा आढावा

    काल पश्‍चिम महाराष्ट्रातील सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांचा सनातन संस्थेच्या प्रसारकार्याचा आढावा आपण पाहिला. आज सांगली आणि पुणे जिल्ह्यांचा आढावा देत आहोत.
३. सांगली जिल्हा 
३ अ. दुर्गादौडीचे स्वागत : श्रीशिवप्रतिष्ठानच्या वतीने काढण्यात येणार्‍या दुर्गादौडीचे मिरज येथील श्री अंबाबाई मंदिर आणि सांगली येथील श्री अंबामाता मंदिर, येथे रणरागिणी शाखेच्या वतीने स्वागत करण्यात आले. रणरागिणी शाखेच्या काही महिलांनी औक्षण करून घोषणा देत या दौडीचे स्वागत केले.
३ आ. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने जिल्ह्यात दैनिक सनातन प्रभातचे अनेक वर्गणीदार वाढले.
- सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, प्रसारसेविका (२१.१०.२०१६)

झारखंड राज्याचा ऑक्टोबर २०१६ या मासातील तिसर्‍या सप्ताहाचा हिंदु जनजागृती समितीच्या प्रसारकार्याचा आढावा !

१. मारवाडी महिला समितीच्या वतीने आयोजित केलेल्या 
आनंद मेळाव्यात साधनेची आवश्यकता या विषयावर मार्गदर्शन 
     धनबाद येथील मारवाडी महिला समितीच्या वतीने आयोजित केलेल्या आनंद मेळाव्यात झारखंड येथील हिंदु जनजागृती समिती प्रणित रणरागिणी शाखेच्या कु. निशाली सिंह यांनी साधनेची आवश्यकता या विषयावर मार्गदर्शन केले. याचा लाभ ११० जिज्ञासूंनी घेतला. या मेळाव्यात सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शनही लावण्यात आले होते.
२. किड्स केअर सेंटर येथे एकाग्रता कशी वाढवावी ? या विषयावर मार्गदर्शन
     धनबाद येथील किड्स केअर सेंटर येथे हिंदु जनजागृती समितीचे पूर्व आणि पूर्वोत्तर भारताचे समन्वयक श्री. चित्तरंजन सुराल यांनी एकाग्रता कशी वाढवावी ? या विषयावर मार्गदर्शन केले. या मार्गदर्शनाला अनेक विद्यार्थी आणि त्यांचे पालक उपस्थित होते.
- कु. मधुलिका शर्मा, समन्वयक, हिंदु जनजागृती समिती, झारखंड.

धर्माचरणानेच स्त्रीचा सन्मान !

   नुकताच स्त्रीशक्तीचा जागर करणारा नवरात्रोत्सव पार पडला. दिवाळीतील लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तिचा वास अखंड आपल्याकडे रहावा; म्हणून आपण तिची मनोभावे पूजाही केली. स्त्रीशक्ती ही आदिमाया आहे. तिची अशी पूजा हे हिंदु धर्माचे एक मूलभूत वैशिष्ट्य असून तिचीच आज घोर विटंबना होतांना दिसत आहे. प्रतिदिन एकतरी वृत्त बलात्कार वा विनयभंग झाल्याचे वृत्तपत्रात असते. १३ वर्षांच्या एका अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार करून तिला गर्भवती करणार्‍या वासनांध शिक्षकाची बातमी असो, पाथर्डी येथील हत्याकांड असो अथवा अन्य कोणत्याही स्त्रीवरील पाशवी अत्याचाराच्या ज्ञात-अज्ञात घटना असो, अशी वृत्ते वाचायला एकतर मन धजावत नाही किंवा वाचलेच, तर संतापाची एक सणसणीत तिरीप डोक्यात गेल्याशिवाय रहात नाही. आज तोकड्या कपड्यांमध्ये स्त्रीने वावरण्याच्या फॅशनला अतिशय लज्जास्पद अशी प्रतिष्ठा प्राप्त होत आहे. याहूनही अधिक शोकांतिका म्हणजे किशोरवयीन मुलींचे आदर्श हे झाशीची राणी, जिजामाता न रहाता अभिनेत्री झाल्या आहेत.

पवित्र आर्य संस्कृतीची अवहेलना रोखणे आणि तिचे स्वतः आचरण करून अशांत जगालाही दुःख दूर होण्यासाठी आर्य संस्कृतीचा मार्ग दाखवणे, हे भारतियांचे कर्तव्यच !

      भारतीय लोक आज आपल्या घरची महान संस्कृती आणि तिचे पावन सिद्धांत यांच्यापासून अनभिज्ञ राहून परमुखापेक्षी (परकीय संस्कृतीच्या मागे लागणे) बनत आहेत. आपल्या पवित्र आर्य संस्कृतीची अवहेलना करून केवळ अर्थ (धन) आणि अधिकार यांच्या मागे लागून, उन्मत्त होऊन ते सनातन धर्माच्या विनाशातच आपले कल्याण आहे, असे समजत आहेत. त्यामुळे ते पुढील आयुष्यात पाप आणि दुःख यांच्या दलदलीत फसत आहेत. त्यांनी शीघ्र सावध व्हावे ! येथील निवासींचे तर हे परमकर्तव्य आहे. 
    पाश्‍चात्त्य संस्कृतीच्या मागे लागणार्‍या लोकांनी आपल्या आर्य संस्कृतीला समजून घेऊन ती आचरणात आणण्याचा प्रयत्न करावा. भारताची अध्यात्मप्रधान संस्कृती हीच भारत देशाला स्वतःचा अभिमान वाटावा, अशी आहे. या अध्यात्म संस्कृतीला जाणून ती या अशांत जगाला दिल्यानेच जगाचे दुःख दूर होईल आणि ज्या योगे भारत आपल्या कर्तव्याचे पालन करू शकतो. 
- हनुमान प्रसाद पोद्दार

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा दूरदर्शीपणा

      जेव्हा देशाची फाळणी झाली तेव्हा स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकरांचे अखंड हिंदुस्थानचे स्वप्न भंगले. मात्र त्यांनी त्यासंबंधी अत्यंत दु:खाने केलेले भाकीत खरे ठारले. शस्त्रबळ वाढवा प्रसंगी ब्रिटीश सैन्यात शिरूनही युद्ध शास्त्र शिकून घ्या, अशी शिकवण सावरकरांनी लेखणीने अन् वाणीने सतत दिली. त्या वेळी त्यांच्यावर टीका झाली. रिक्रुटवीर म्हणून त्यांची कुचेष्टा करण्यात आली; पण वर्ष १९६२ मध्ये चीनचे सत्य आणि क्रूर स्वरूप जेव्हा प्रकट झाले, तेव्हा अनेकांना सावरकरांच्या द्रष्टेपणाची ओळख पटू लागली. सैन्यसामग्री वाढविण्याची घोषणा तेव्हाच्या संरक्षणमंत्र्यांना करावी लागली. केंद्र सरकारलाही ती पटू लागली. वर्ष १९६५ मध्ये भारतीय सैन्याने जेव्हा पाकिस्तानवर एकामागून एक विजय मिळवले, तेव्हा रुग्णशय्येवर असलेल्या या पुरुषश्रेष्ठाच्या डोळ्यांत आनंदाश्रू उभे राहीले. (साभार : सावरकर इतिहास दैनंदिनी) 
- दादुमिया (संदर्भ : स्वातंत्र्यवीर - दिवाळी विशेषांक २०१६)

मदरशांवरील आर्थिक खैरात बंद व्हावी !

   आघाडी सरकारने चालू केलेल्या झाकीर हुसेन मदरसा अनुदान योजनेंतर्गत मुसलमान समाजातील अनेकांनी कागदोपत्री मदरसे दाखवून कोट्यवधी रुपयांचे सरकारी अनुदान लाटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या गंभीर प्रकारामुळे राज्य सरकारने मराठवाड्यातील मदरशांची चौकशी करण्याचे आदेश देत मदरशांची तपासणी झाल्याविना अनुदान देण्यात येणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. या जोडीलाच आतापर्यंत मदरशांवर झालेली आर्थिक खैरात आणि त्याचा उपयोग या संदर्भातही सरकारने श्‍वेतपत्रिका काढावी.
   सर्वसामान्यतः गरीब घरातील मुसलमान मुले मदरशांमध्ये प्रवेश घेतात. ६ वर्षे ते १४ वर्षे या संस्कारक्षम वयात मदरशांमध्ये शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांच्या मनावर धार्मिक कट्टरतावाद रुजवला जातो. गणित, विज्ञान, समाजशास्त्र, संगणक यांसारख्या विषयांचा मागमूसही नसणारे असे विद्यार्थी जेव्हा मदरशांमधील शिक्षण घेऊन बाहेर पडतात, तेव्हा बाहेरच्या जगात टिकाव धरण्यात ते पूर्णतः अपात्र ठरतात. त्यामुळे ते पुन्हा स्वतःच नवीन मदरसा चालू करतात किंवा एखाद्या मशिदीमध्ये मौलवी बनून रहातात. अशांमुळेच मदरशांचे पीक फोफावते आणि त्यातून सरकारी अनुदान मिळत असल्याने कागदोपत्री मदरशांची संख्याही वाढते. मदरशांमधून धार्मिक कट्टरतावाद आणि हिंदुद्वेष यांचे विष विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण केले गेल्याने त्यातून धार्मिक आणि सामाजिक समस्यांमध्ये भर पडत रहाते, ते वेगळेच !

धर्मपालन करणे हे पुण्यकर्म, तर धर्मद्रोह करणे म्हणजे पापकर्म !

१. धर्म अफूची गोळी नव्हे, तर अमृताची वाटी !
- जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज 
२. धर्मपालन न करणे, अधर्म, धर्मद्रोह आणि पापकर्म
अ. धर्मपालन न करणे म्हणजे अधर्माने वागणे होय.
आ. अधर्माने वागणे म्हणजे धर्मद्रोह करणे होय. 
इ. धर्मद्रोह करणे म्हणजे ईश्‍वरनिर्मित नीतीनियमांचा अर्थात् कायद्यांचा भंग करणे होय.
ई. कायद्याचा भंग करणे म्हणजे योग्य त्या शिक्षेला पात्र ठरणे होय.
उ. अधर्मालाच अध्यात्मात पापकर्म म्हणतात.
     अगदी सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास, धर्मपालन करणे म्हणजे पुण्यकर्म आणि धर्मद्रोह करणे म्हणजे पापकर्म होय.
- संदर्भ : (मासिक धर्मक्षेत्र, नाणीजधाम, नोव्हेंबर २०१५)

रामनाथी आश्रमाच्या वैकुंठात भगवान श्रीविष्णूच्या अस्तित्वाची अनुभूती येणे आणि सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना पाहिल्यावर देवी आश्रमात वावरून साधकांची काळजी घेत असल्याचे अनुभवणे

सद्गुरु (सौ.) बिंदा
सिंगबाळ
१. वैकुंठ म्हणजे काय याची अनुभूती पृथ्वीवर 
रामनाथी आश्रमाच्या माध्यमातून साधकांनी अनुभवणे 
     सनातनच्या साधकांचे सौभाग्य आठवावे तितके न्यून आहे. याचे कारण म्हणजे वैकुंठ म्हणजे काय ?, याची अनुभूती पृथ्वीवर रामनाथी आश्रमाच्या माध्यमातून साधकांना अनुभवायला मिळते. प.पू. गुरुदेवांच्या माध्यमातून साधकांना भगवान श्रीविष्णूचा अवतार अनुभवायला मिळतो. त्यामुळे सनातनच्या साधकांचे सद्भाग्य आठवावे, तेवढे न्यून आहे. 
२. प.पू. गुरुदेवांनी त्यांच्या रूपात श्रीविष्णूची, रामनाथी आश्रमाच्या रूपात वैकुंठाची आणि सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या रूपात देवीची अनुभूती 
देऊन रामनाथी आश्रमात देवलोकाची अनुभूती दिल्याचे जाणवणे 
श्री. हर्षवर्धन शेट्टी
गुरुदेवांनी त्यांच्या रूपात श्रीविष्णूच्या दर्शनाची आणि रामनाथी आश्रम वैकुंठ असल्याची अनुभूती दिली आहे. या सर्व सद्भाग्याच्या अनुभूतींमध्ये सद्गुरु बिंदाताईंना पहाता साक्षात् देवी ताईंच्या माध्यमातून साधकांची काळजी घेत असल्याचे मला अनुभवायला मिळाले. हे केवळ एक क्षणभरच नव्हे, तर त्यांना पाहिल्यावर सदैव असे वाटते. साधकांचे शिबीर रामनाथी आश्रमात असतांना सर्व संत साधकांना मार्गदर्शन करत होते. त्या वेळी तेथे सद्गुरु बिंदाताई बसल्या होत्या. त्या वेळी ऋषी-मुनींमध्ये साक्षात् देवी बसली आहे आणि ती साधकांना मार्गदर्शन करत आहे, असे सातत्याने जाणवले. त्यामुळे रामनाथी येथे देवलोकाची अनुभूती अनुभवण्याचे सद्भाग्य लाभले.

महर्षींनी सांगितल्याप्रमाणे केरळमध्ये केलेला पाण्यावरील प्रवास आणि त्यामागील कार्यकारणभाव

महर्षींची शिकवण आणि कार्य !
१. आपत्काळात निसर्गातील देवाकडून साधकांना 
सतर्कतेचा आशीर्वाद मिळवण्याच्या दृष्टीने महर्षींनी 
बोटीने न्यूनतम तीन घंटे प्रवास करण्यास सांगणे 
      ९.१०.२०१६ या दिवशी, म्हणजेच नवरात्रीच्या आठव्या दिवशी पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या पत्नी ॐ पवित्रा यांचा वाढदिवस होता. या दिवशी आम्ही केरळला कुमरकुम या बॅक वॉटर असलेल्या स्थानी होतो. या दिवशी महर्षींनी आम्हाला या बॅक वॉटरमधून बोटीने न्यूनतम तीन घंटेतरी प्रवास करण्यास सांगितला होता. याचे कारण सांगतांना महर्षि म्हणाले, पाण्यात मासा हा असा प्राणी आहे की, तो सर्व प्राणीवर्गात अत्यंत सतर्क म्हणून ओळखला जातो. या पाण्यावर बोटीने प्रवास करून हे कार्तिकपुत्री, तुला निसर्गातील देवाकडून साधकांसाठी सतर्कतेचा आशीर्वाद मिळवायचा आहे. पुढे युद्ध चालू होईल. तेव्हा साधकांमध्ये सतर्कता हा गुण येण्यासाठी हा आशीर्वाद आपल्याला प्राप्त करून घ्यायचा आहे. पुढे राष्ट्रालाही पाकिस्तानविरुद्ध लढतांना ही सतर्कताच उपयोगी पडणार आहे. आम्ही तुला उगीचच कुठेही प्रवास करण्यास सांगत नाही. त्यामागे काहीतरी कारण हे असतेच. तसेच हे आहे.

माझी सद्गुरु माऊली - सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ !

श्री. विनायक शानभाग
१. पू. (सौ.) गाडगीळकाकूंच्या सांगण्यानुसार सेवा करण्यासंदर्भात एका
संतांनी फेब्रुवारी २०१५ मध्ये आणि सप्तर्षींनी अनेक वेळा जीवनाडीत सांगणे
१ अ. गाडगीळकाकूंच्या सांगण्यानुसार सेवा कर, म्हणजे साधनेत पुढे
जाशील, असा प.पू. डॉक्टरांनी फेब्रुवारी २०१५ मध्ये आशीर्वाद देणे
     २६.१.२०१५ या दिवसापासून मला प.पू. डॉक्टरांच्या कृपेने पू. (सौ.) अंजली गाडगीळकाकू यांच्या समवेत राहून सेवा करण्याची संधी मिळाली. फेब्रुवारी २०१५ मध्ये एक संत मला म्हणाले, तुला आता वेगळे उपाय करण्याची आवश्यकता नाही. गाडगीळकाकूंच्या सहवासात आपोआप उपाय होतील. त्या सांगतील तसे कर, म्हणजे साधनेत पुढे पुढे जाशील. तेव्हा काकू सद्गुरु झाल्या नव्हत्या आणि सनातनचा सप्तर्षि जीवनाडीपट्टीशी संपर्कही आला नव्हता.
१ आ. पू. (सौ.) गाडगीळकाकूंनी रामनाथी आश्रमाशी संबंधित सेवा कराल, असे सांगणे
आणि काही दिवसांतच सप्तर्षींच्या संपर्कात येऊन पू. काकूंच्या बोलण्याची प्रचीती येणे
     एप्रिल २०१५ मध्ये कन्याकुमारी येथे हिंदू अधिवेशन होते. मी सेवेसाठी तेथे जाऊ का ?, असे पू. (सौ.) गाडगीळकाकूंना विचारल्यावर त्या सहज म्हणाल्या, दादा, आता तुमची प्रसारातील सेवा न्यून होऊन तुम्ही कायम रामनाथी आश्रमाशी संबंधित सेवा कराल. त्यानंतर काही दिवसांतच आम्ही सर्व जण सप्तर्षींच्या संपर्कात आलो आणि काकूंनी सांगितलेल्या वाक्याची मला प्रचीती आली.
१ इ. कार्तिकपुत्रीच (सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ) आई असून गुरूंनी आणि आम्ही
तुला तिच्याकडे सोपवले आहे, असे सप्तर्षींनी अनेक वेळा जीवनाडीत सांगणे
     त्यानंतर सप्तर्षींनी अनेक वेळा जीवनाडीत सांगितले, भगवान शंकराच्या मोठ्या मुलाचे नाव असलेल्याला (मला) आम्ही सांगू इच्छितो की, कार्तिकपुत्रीच (सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ) तुझी आई आहे. तीच तुझ्यासाठी सर्वस्व आहे.

साधकांची भावजागृती होण्यासाठी भावसत्संगात करवून घेतलेले विविध भावप्रयोग

कु. माधुरी दुसे
     ऑक्टोबर आणि नोव्हेंबर २०१५ या मासांत आम्हाला भावसत्संगाचा लाभ मिळाला. सर्व साधकांची भावजागृती होण्यासाठी माधुरी दुसेताईने आम्हा सर्व साधकांकडून भावजागृतीचे प्रयोग करवून घेतले. त्याची उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत.
१. मानसरित्या प.पू. गुरुदेवांच्या खोलीत जाणे 
२. आपल्यातील गुणरूपी फुले गुरुचरणी अर्पण करणे 
३. प.पू. गुरुदेवांचे चरण धुण्यासाठी सोन्याच्या ताटात सप्तनद्यांचे पाणी घेऊन चरण धूत आहोत, असा भाव ठेवणे
४. प.पू. गुरुदेवांना वारा घालण्यासाठी साक्षात् गरुडदेवताच येत असतांना आपण वारा घालायला न्यून पडणार आहोत, असे वाटून प.पू. गुरुदेवांना केवळ आपले मन अर्पण करणे, हेच अपेक्षित आहे, असा भाव ठेवणे

सनातनचे आश्रम आणि प्रसारसेवा यांमधील साधकांसाठी आयोजित केलेल्या भावसत्संगात श्रीश्री जयंत बाळाजी आठवले, जय गुरुदेव हा जयघोष केल्यावर जाणवलेली सूत्रे

सौ. वृंदा वीरेंद्र मराठे
     ५.१०.२०१६ या दिवशी सनातनचे सर्व आश्रम, तसेच प्रसारसेवा यांमधील साधकांसाठी भावसत्संगाचे आयोजन केले होते. त्या प्रसंगी काही वेळ श्रीश्री जयंत बाळाजी आठवले, जय गुरुदेव हा जयघोष करण्यात आला. त्या वेळी मला जाणवलेली सूत्रे पुढे देत आहे.
१. माझे मन एकाग्र झाले आणि मला आज्ञाचक्रावर गार संवेदना जाणवू लागल्या. नंतर त्या संवेदना वाढत गेल्या अन् कृतज्ञतेने जयघोष होऊ लागला. 
२. मला सभागृहात अनेक साधक बसले आहेत, याची जाणीव न रहाता केवळ लांब अंतरावर प.पू. डॉक्टर लहान रूपात उभे आहेत, असे सूक्ष्मातून दिसले. 
३. नंतर प.पू. डॉक्टर विराट रूप धारण करून माझ्याजवळ येत आहेत, असे जाणवले.

नृसिंहवाडी येथील कन्यागत महापर्वाच्या सेवेसाठी गेल्यावर आलेल्या अनुभूती आणि सहसाधक अन् सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे

सौ. सुलभा कुलकर्णी
१. आलेल्या अनुभूती
१ अ. शरीर साथ देत नसूनही आणि पावसामुळे अनेक अडचणी येत असूनही नृसिंहवाडी येथे कन्यागत पर्वाच्या सेवेसाठी जाण्याची संधी प.पू. डॉक्टरांच्या कृपेने मिळणे : १० ते १८.८.२०१६ या कालावधीत नृसिंहवाडी येथे सेवेसाठी गेले होते. पूर्वी सर्व प्रकारच्या सेवा केल्यामुळे तृप्त होते; मात्र अलीकडे वाढत्या वयानुसार आणि गुडघेदुखीमुळे शरीर साथ देत नसल्यामुळे समष्टी सेवा करू शकत नव्हते. ही खंत माझ्या मनात होती. देव भरभरून देतो; पण मी त्याच्यासाठी काहीच करू शकत नाही, असे मला नेहमी वाटत असे. त्या वेळी सांगली जिल्हासेविका कु. प्रतिभा तावरे यांचा भ्रमणभाष आला, काकू, तुम्ही कन्यागत पर्वासाठी यायचे आहे. तत्क्षणी माझे डोळे पाणावले आणि काहीही विचार न करता मी हो म्हटले. मी कन्यागत महापर्वासाठी सेवेला जाईन, असे मला स्वप्नातही वाटले नव्हते. त्यानंतर पाऊस पडत असल्याने निवास व्यवस्थेमध्ये अडचणी येत होत्या. सारखी दोलायमान स्थिती होती. मी केवळ प.पू. डॉक्टरांना प्रार्थना करत होते, माझी देहबुद्धी नष्ट होऊ दे आणि सेवेची संधी मिळू दे. शेवटी जाण्याचा दिवस निश्‍चित झाला आणि ही संधी प.पू. डॉक्टरांच्या कृपेने मिळाली.

पांडव पंचमीमागील अध्यात्मशास्त्र

उद्या (५ नोव्हेंबर या दिवशी) असलेल्या पांडव पंचमीच्या निमित्ताने...
      पांडव पंचमी म्हणजे पांडवांचा विजय दिवस. श्रीकृष्णाच्या मार्गदर्शनाखाली युद्ध करून अल्प संख्याबळ असूनही बलाढ्य अशा कौरवसेनेचा नायनाट करणार्‍या पांडवांनी जगासमोर मोठा आदर्श उभा केला. त्यांच्यासारखे गुण आपल्यात यावेत, यासाठी हा दिवस साजरा केला जातो. या सणाचे महत्त्व आणि साजरा करण्याची पद्धत यांविषयीची माहिती या लेखातून जाणून घेऊया.
१. पांडव पंचमीचे महत्त्व
      पांडवांनी ईश्‍वराच्या (श्रीकृष्णाच्या) आदेशानुसार कौरवांवर विजय मिळवला, तो दिवस म्हणजे पांडव पंचमी. ज्याप्रमाणे ऋषीपंचमी साजरी करतात, त्याप्रमाणे भारतीय संस्कृतीत पांडव पंचमी साजरी करतात. पांडव पंचमी म्हणजे पांडवांची मनोभावे पूजा करून त्यांच्यात असलेले आदर्श गुण ग्रहण करणे.

भ्रमणभाषसंच, तसेच पैशाचे पाकीट चोरीला गेल्यावरही स्थिर राहून पुढील उपाययोजना करता आल्याने स्वभावदोष अन् अहं-निर्मूलन प्रक्रियेचे महत्त्व लक्षात येणे अन् प.पू. पांडे महाराजांनी सांगितलेला मंत्रजप करून चोरीला गेलेल्या वस्तू परत मिळाल्याने त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त होणे

श्री. शिवाजी वटकर
     २.३.२०१६ या दिवशी मी पत्नीसह मुंबईतील घाटकोपर येथे डोळ्यांच्या चिकीत्सालयात गेलो होतो. मी पत्नीसह जातांना शक्यतो बसने प्रवास करण्याचे टाळून रिक्शा किंवा चारचाकी वाहनाने प्रवास करतो; मात्र त्या दिवशी घाटकोपरहून मानखूर्दला घरी बसने जाऊया, असे पत्नीने अकस्मात् सांगितले. दुपारी १ वाजता बसमध्ये पुष्कळ गर्दी होती. मी तिकीट काढून पाकीट विजारीच्या(पँट) खिशात ठेवले. माझा भ्रमणभाषही विजारीच्या खिशात होता. एरव्ही मी वस्तू नेहमी पिशवीत ठेवतो; मात्र त्या दिवशी मी दोन्ही वस्तू खिशात ठेवल्या होत्या.
१. पनवेल रेल्वेस्थानकावर उतरल्यावर भ्रमणभाषसंच, 
तसेच पैसे, ओळखपत्र आणि डेबिट कार्ड ठेवलेले पाकीट चोरीला गेल्याचे लक्षात येणे 
      मला चेंबूर येथे मधेच उतरावे लागले. तेथून मी लोकलने पनवेल रेल्वेस्थानकावर आल्यावर मला भ्रमणभाषसंच गहाळ झाल्याचे लक्षात आले. मी भ्रमणभाष घाटकोपर येथील दवाखान्यात राहिला का ?, याची खात्री केली. तेथे भ्रमणभाष मिळाला नाही; म्हणून तो चोरीला गेला असावा, असे मला वाटले. मी भ्रमणभाष क्रमांक बंद करण्यासाठी पनवेल येथील मोबाईल गॅलरीत गेलो. त्या वेळी ओळखपत्र दाखवण्यासाठी पिशवीत शोधाशोध केली. तेव्हा थोडे पैसे, ओळखपत्रे आणि अधिकोषाचे डेबिट कार्ड्स असलेले पाकीटही चोरीला गेले आहे, हे लक्षात आले. बसमध्ये चोरट्यांनी पाळत ठेवून आणि सापळा रचून चोरी केल्याचे मला जाणवले.

परात्पर गुरूंच्या सर्वज्ञ या गुणाचा काही अंश त्यांच्या मुलांमध्ये, म्हणजे साधकांत असल्यामुळे ईश्‍वराकडून अनेक साधकांना विविध विषयांवर ज्ञान मिळत असणे

       सनातनच्या अनेक साधकांना ईश्‍वराकडून ज्ञान मिळते. साधकांना मिळणार्‍या ज्ञानाचे स्वरूप भिन्न असते. काही साधकांचे सेवा चांगली होण्याच्या दृष्टीने चिंतन होते, काहींना राष्ट्र आणि धर्म यांविषयी लेख सुचतात, काही साधकांना कविता सुचतात, काहींना वैशिष्ट्यपूर्ण कलाकृती करता येतात, तर काहींना पूर्वसूचना मिळून भविष्यात घडणार्‍या घटनांचे ज्ञान होते. असे घडण्याची २ कारणे आहेत. पहिले म्हणजे साधकांची साधना योग्य दिशेने चालू असणे आणि दुसरे म्हणजे आई-वडिलांचे काही गुण मुलात उतरतात. त्याप्रमाणे परात्पर गुरूंच्या सर्वज्ञ या गुणाचा काही अंश त्यांच्या मुलांमध्ये म्हणजे साधकांत उतरणे स्वाभाविकच आहे. - श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.६.२०१५)

गंभीर अपघात झाल्यावरही स्थिर रहाण्याचा आदर्श निर्माण करणारेे फोंडा (गोवा) येथील साधक श्री. नितीन सहकारी !

१. दसरा सण असूनही मन उद्विग्न होणे आणि त्याचे कारण 
श्री. नितीन सहकारी यांच्यावर ओढवलेला वेदनादायक प्रसंग वाचल्यावर लक्षात येणे 
श्री. नितीन सहकारी
     दसरा सण म्हणजे आनंदाचा सण ! दसरा सण मोठा, नाही आनंदा तोटा ।, असे असतांनाही माझे मन उद्विग्न होते. माझे माझ्या व्यवसायात नीट लक्ष लागत नव्हते. मनाची नुसती तडफड होत होती. प्रतिदिन येणारी इतर दैनिके मी वाचली; पण पिशवीत ठेवलेले दैनिक सनातन प्रभात मला मिळाले नाही. तेव्हा दुपारी जेवायला घरी गेल्यावर प्रथम मी तो अंक शोधला. त्यात सनातन संस्थेचे साधक श्री. नितीन सहकारी यांच्यावर ओढवलेला वेदनादायक प्रसंग वाचण्यात आला. (त्यांचा बोटीवर असतांना भीषण अपघात झाला होता.) तो वाचून माझ्या मनात विचार आला, हे आमच्या शिरोड्याचे आहेत. त्यांनीच मला साधनेत आणले. त्या दिवशी सकाळपासून मन उद्विग्न असण्यामागील कारण त्या वेळी माझ्या लक्षात आले.

साधकांनो, कर्नाटक राज्यातील साधकांचा आदर्श समोर ठेवून गुरूंना अपेक्षित अशी सेवा करा आणि त्यांची कृपा संपादन करा !

कु. सर्वमंगला मेदी
१. सद्गुरु (सौ.) बिंदाताई यांनी घालून दिलेल्या मार्गावर चालत (साधन करत) श्री. रमानंदअण्णांनी श्री गुरुचरणी कृतज्ञतादीप प्रज्वलित केला आहे. हा कृतज्ञतादीप तेवत ठेवून ते कर्नाटक राज्याला आदर्श बनवत आहेत. त्यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून भारताच्या अन्य सर्व राज्यांतील उत्तरदायी साधकांनो, गुरुचरणी शरण जाऊन त्यांना अपेक्षित अशी सेवा करूया आणि त्यांची कृपा संपादन करूया. 
२. सद्गुरु (सौ.) बिंदाताई यांनी दाखवून दिलेल्या स्वतःतील गुणवैशिष्ट्यरूपी दीपांनी कर्नाटकातील साधक श्री गुरुचरणांना ओवाळत आहेत.
३. चौदा वर्षांचा वनवास संपवून श्रीराम अयोध्येला परत आले, तेव्हा अयोध्यावासियांनी सर्वत्र दिवे लावून स्वागतोत्सव साजरा केला. तेव्हापासून दीपावलीचा प्रारंभ झाला.

सात्त्विक वातावरण आणि सात्त्विक गोष्टी यांची आवड असणारा, शांत स्वभावाचा अन् ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला पुणे येथील चि. श्रीवर्धन पंकज घोलप (वय १ वर्ष) !

उच्चलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु 
राष्ट्र चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. श्रीवर्धन पंकज घोलप एक दैवी बालक आहे !
चि. श्रीवर्धन घोलप 
     पुणे येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा चि. श्रीवर्धन पंकज घोलप याच्याविषयी त्याच्या आईला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे देत आहोत.
१. गर्भधारणेपूर्वी 
१ अ. सूक्ष्मातून गर्भाधान संस्कार करतांना सुवासिनींऐवजी ५ देवी ओटी भरत आहेत, असा भाव ठेवणे आणि प्रार्थना केल्यावर प्रकाशाचा एक गोळा पोटात गेल्याचे जाणवणे अन् तेव्हापासून नामजप चांगला होणे : सनातनचा सोळा संस्कार हा ग्रंथ वाचतांना आपल्याला जे अपत्य होईल, त्याच्यावर चांगले संस्कार व्हावेत, असे मला वाटत होते; परंतु काही अडचणींमुळे ते शक्य झाले नाही. मी स्थुलापेक्षा सूक्ष्म श्रेष्ठ या तत्त्वानुसार सनातनच्या सोळा संस्कार या ग्रंथातील सर्व संस्कार सूक्ष्मातून भावपूर्ण करायचे ठरवले. गर्भाधान संस्कारातील ओटी भरणे या संस्कारात कुलदेवी श्री भवानीमाता आणि शक्तीची चार रूपे माझी ओटी फळांनी भरून मला आशीर्वाद देत आहेत, असा मी भाव ठेवला आणि प्रार्थना केली, शिवाजीप्रमाणे देव, देश आणि धर्म यांचे रक्षण करणारा तेजस्वी जीव माझ्या गर्भात जन्माला येऊ दे. त्यानंतर प्रकाशाचा एक गोळा माझ्या पोटात जात आहे, असे मला जाणवले आणि मी कृतज्ञता व्यक्त केली. तेव्हापासून बाळंतपणापर्यंत माझे मन प्रसन्न होते आणि माझा श्रीकृष्णाचा नामजप अंतर्मनातून सतत होत होता.

बोधचित्र


॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
मी कोणावर प्रेम करीत नाही. प्रेम मला खेचते.
मी प्रेमात फसेन म्हणून मी प्रेमात अडकलो.
भावार्थ : मी प्रेम कोणावर करीत नाही, यातील प्रेम शब्द हा व्यावहारिक, मायेतील प्रेमासंबंधी आहे. प्रेम मला खेचते, यातील प्रेम म्हणजे प्रीती, पारमार्थिक प्रेम. नामधारकाचे प्रेम मला खेचते, म्हणजे मला त्याच्याविषयी ओढ वाटते.
मी प्रेमात फसेन, यातील प्रेम हा शब्द व्यावहारिक प्रेमासंबंधी आहे. म्हणून मी प्रेमात अडकलो, यातील प्रेमात हा शब्द प्रीती म्हणजे पारमार्थिक प्रेम या अर्थाने वापरला आहे. थोडक्यात व्यावहारिक प्रेमात फसू नये, म्हणून मी पारमार्थिक प्रेमात अडकलो आहे.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

सनातन मूल्ये अंगी बाणवण्याची आवश्यकता असण्यामागील कारणे

      सनातन मूल्यांचा विसर पडल्यामुळेच व्यसनाधीनता, भ्रष्टाचार, आत्मकेंद्री वृत्ती, प्रसिद्धीची प्रचंड हाव, धनपरायणता आणि शुष्कवाद असे अनंत दुर्गुण उसळ्या मारत आहेत. - गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (संदर्भ : मासिक घनगर्जित, ऑगस्ट २०१६)

कृष्णनामात रंगून गेलेल्या कु. विनंती मळीक यांनी कृष्णाला केलेले भावपूर्ण आत्मनिवेदन !

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...
परात्पर गुरु डॉ. जयंत
आठवले
      कृष्णा, तुझ्या नामाच्या नादात तू कसे फसवले, काय रे सांगू तुला ? तू तुझ्या भक्तीचे वेड लावतोस, हे कुणाला कसे कळत नाही ? जाऊ दे रे ! मज्जा सांगते कृष्णनामाची, कृष्णनामात रंगून जाण्याची. हे ऐकून घे, माझ्यात तू रंगरंगून. तुझे ना नाम कृष्णा, भावभक्तीने आणि प्रेमाने घेतल्यास हे कोडे सोडवले जाते. 
     प.पू. डॉक्टर, कृष्णा, अजून एक गंमत सांगायची आहे बघ ! नामाचा रंग निळा वाटतो, तसेच आतून निळे वाटतात प.पू. डॉक्टर ! अजून ऐक महागंमत. तुझे पाय, हात, ओठ, नाक, नेत्र, हसरा तोंडवळा, तुझे हृदय, तुझे डोक्यावरील केस, तुझे वस्त्र, तुझ्या कपाळावरचा टिळा, तुझे बोल, तुझी चाल, तुझी बोटे, पाठ, उठणे, बसणे, हे सगळे कृष्णासारखे मन मोहित करते.
     कृष्णा, असू दे रे ! तुझ्या नादी लागलेेली, तुझ्या प्रेमाच्या जाळ्यात अडकलेली तुझीच कृष्णाली ! आता काही कारण सांगू नकोस. दिवसभर मन भक्तीत, कृष्णाच्या नामात, कृष्णपंगतीत एवढे का रे म्हणून रमून असते ? तुझ्या नामाकरता असलेली मी ! तुझे नामचिन्ह माझ्यात असे कसे उमटले ? हे ज्याने पाहिले, तो तुझ्या नामात एकरूप झाला. गंमत ही ऐकली प.पू. डॉक्टरांनी, हसती ते ध्यानी-मनी ।
- कु. विनंती मळीक, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.१०.२०१२)
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे प.पू. पांडे महाराज यांचे अनमोल विचारधन

प.पू. परशराम पांडे
     आपले मिळवणे आणि दुसर्‍याला देणे म्हणजे मिळवलेले प्रवाहित करणे होय. हीच समष्टी साधना होय. यामुळे तो व्यापक होतो. समष्टी हे व्यष्टीचे शुद्धीकरण आहे. - प.पू. परशराम पांडे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१२.१०.२०१४) 

एका गुरूंच्या शिकवणीचा अर्थ स्वतःच्या मनाप्रमाणे लावणारा एक शिष्य

       एका गुरूंच्या एका शिष्याशी त्यांच्या साधनेसंदर्भात चर्चा चालू असतांना त्यांनी पुढील विचार व्यक्त केले.
१. गुरूंनी संसारात राहून साधना करायला सांगितली आहे; म्हणून तशी करतो. 
२. योग्य वेळ आली की, गुरु संसारातून बाहेर खेचतील. तेव्हा संसारातून सुटका होणार.
सूत्रांचे साधनेच्या संदर्भातील विश्‍लेषण
१. संसारात राहून साधना करायची असते, हे खरे आहे; पण येथे संसार म्हणजे मायेतील छोटा संसार नव्हे, तर विश्‍वाचा संसार ! येथे गुरूंना एकांतात राहून ध्यान लावून बसणे अपेक्षित नाही, तशी व्यष्टी साधना नाही, तर समष्टी साधना अपेक्षित आहे.
२. आपण काही प्रयत्न न करता गुरु आपल्याला संसारातून बाहेर खेचतील, या विचारात राहिलो, तर गुरु कधीच बाहेर खेचत नाहीत. आपल्यात तळमळ असेल, म्हणजे आपण मायेचा त्याग करण्यासाठी एक पाऊल उचलले, तरच गुरु निश्‍चितच पुढील नऊ पावले टाकायला बळ देतात; कारण साधनेत शेवटी सर्वस्वाचा त्याग करावा लागतो.
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

सद्गुरूंवर दृढ श्रद्धा ठेवा !
परमेश्‍वराप्रमाणेच सद्गुरूंवर दृढ श्रद्धा असेल, तर सद्गुरूंच्या रूपात परमेश्‍वर दिसतो. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

पुरस्काराचे षड्यंत्र !

संपादकीय
     सध्या पुरस्कार सोहळे नावाची पाश्‍चात्त्य नवरूढी आधुनिक भारतीय सामाजिक जीवनसरणीचा एक भाग होत चालली आहे. विविध माध्यमांतून प्रसिद्धीसाठी आसुसलेल्या, वलयांकित आणि झटपट श्रीमंत होऊ पहाणार्‍या उद्योगांपासून चित्रपटांपर्यंत, पत्रकारितेपासून मालिकांपर्यंत आणि विज्ञानापासून साहित्यापर्यंत अनेकविध क्षेत्रांत होऊ घातलेले हे भपकेबाज पुरस्कार सोहळे आता त्या पुरस्काराच्या दर्जाविषयीच प्रश्‍नचिन्ह निर्माण करू लागले आहेत. हे सूत्र आता प्रकर्षाने लक्षात येण्याचे निमित्त झाला आहे तो नुकताच देहली येथे पंतप्रधांनाच्या हस्ते पार पडलेला रामनाथ गोएंका फाऊंडेशनचा पत्रकार पुरस्कार सोहळा. 
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn