Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

आपला शत्रू ठरवण्याची वेळ आली आहे !

 • भाजप सरकारने असे आवाहन करण्यापेक्षा स्वत: कृती करून जनतेला मार्गदर्शन करणे अपेक्षित आहे !
 • आसाममधील भाजपच्या मंत्र्याचे स्थलांतरितांवरून नागरिकांना आवाहन !
गुवाहाटी (आसाम) - आपला शत्रू कोण आहे, हे ठरवण्याची वेळ आली आहे. स्थलांतरित एक-दीड लाख कि ५५ लाख लोक, यांपैकी आपले शत्रू कोण आहेत ? आसामी जनतेसाठी हे निर्णायक वळण येऊन ठेपले आहे. आपल्या हातातून ११ जिल्हे गेले आहेत. हे असेच चालू राहिले, तर २०२१ च्या जनगणनेत आणखी ६ जिल्हे आपल्या हातातून जातील, त्यानंतर २०३१ मध्ये आपण आणखी जिल्हे गमावून बसू, असे भीतीयुक्त आवाहन आसाममधील भाजपचे मंत्री हेमंतविश्‍व सर्मा यांनी आसामधील जनतेला केले आहे. आसाममधील नागरी सुधारणा विधेयकाविषयी बोलतांना त्यांनी हे आवाहन केले आहे. स्थलांतरितांची आकडेवारी हिंदू आणि मुसलमान यांना अनुसरून होती का, याविषयी अधिक बोलण्यास हेमंतविश्‍व सर्मा यांनी नकार दिला; मात्र आसाममध्ये हिंदू आणि मुसलमान स्थलांतरितांमध्ये भेद करणे हे भाजपचे अधिकृत धोरण आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

गोवंश हत्या बंदी कायद्यामुळे अन्य पशू मांसविक्री व्यवसायात वाढ - पशूसंवर्धन अधिकारी डॉ. सुभाष म्हस्के

राज्यात लागू झालेल्या गोवंश हत्या बंदी कायद्याचा परिणाम !
    रत्नागिरी, २ नोव्हेंबर - महाराष्ट्र राज्यात गोवंश हत्या बंदी कायदा लागू झाल्यानंतर जिह्यात अन्य पशू मांसविक्री व्यवसायात २० टक्क्यांची वाढ झाल्याची माहिती येथील जिल्हा परिषदेचे पशूसंवर्धन अधिकारी डॉ. सुभाष म्हस्के यांनी दिली.

पाककडून सातत्याने होत असलेल्या गोळीबारांच्या संदर्भात पंतप्रधानांनी घेतली बैठक !

बैठकांतून काही ठोस पावले उचलली जाऊन देशाचे सैनिक
आणि नागरिक सुरक्षित रहावेत, अशीच जनतेची अपेक्षा आहे !
    नवी देहली - सीमेवर शस्त्रसंधी कराराचे उल्लंघन करत पाककडून होत असलेल्या गोळीबारात भारतीय सैनिक आणि नागरिक ठार होत आहेत. या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ नोव्हेंबरला एक बैठक आयोजित केली होती. यात केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, राष्ट्र्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल आणि सरंक्षण मंत्री मनोहर पर्रिकर उपस्थित होते. आतंकवाद्यांकडून होणार्‍या घुसखोरीचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी अधिक प्रभावी उपाय योजना करणे आणि पाककडून होणार्‍या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देण्याच्या संदर्भात बैठकीत चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

काश्मिरी मुसलमान युवकांमध्ये इसिससारखी कट्टरता निर्माण करण्याची आय.एस्.आय.ची योजना !

     नवी देहली, २ नोव्हेंबर - गुप्तचर विभागाने गृहमंत्रालयाकडे एक महत्त्वाचा अहवाल सादर केला आहे. या अहवालानुसार पाकची गुप्तचर यंत्रणा आय.एस्.आय. ही इसिसच्या कट्टर विचारधारेप्रमाणे काश्मिरी युवकांमध्ये कट्टरता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.
१. आय.एस्.आय.ने यासाठी एक मोठी योजना बनवली आहे. यामध्ये काश्मीरमधील इयत्ता ९ वी ते १२ वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना लक्ष्य करण्याचा विशेष प्रयत्न आहे. या युवकांनी आतंकवादी घटनांमध्ये सामील व्हावे, तसेच दगडफेक करावी, यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे.
२. आय.एस्.आय. ही फुटीरतावादी नेत्यांची नवी फळी सिद्ध करत आहे. जुन्या फुटीरतावादी नेत्यांवर खर्च करण्यात येत असलेल्या रकमेत कपात करण्यात येणार आहे. या रकमेतील मोठा भाग नव्या फुटीरतावादी नेत्यांवर खर्च करण्याची योजना आहे.

काश्मिरी पंडितांव्यतिरिक्त काश्मीरवर तोडगा काढणे अशक्य ! - केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह

काश्मिरी हिंदूंच्या पुनर्वसनासाठी ठोस कोणतीही गोष्ट न
करता केवळ तोंडाच्या वाफा दवडणारे केंद्रीय मंत्री !
जम्मू - काश्मीरसंदर्भात काश्मिरी पंडितांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. त्यांच्या सहभागाव्यतिरिक्त कोणताही तोडगा काढता येणार नाही, असे केंद्रीय मंत्री राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी म्हटले आहे.

देहलीतील पाक उच्चायुक्तालयात आणखी १६ गुप्तहेर !

 • पाक उच्चायुक्तालय कि हेरगिरीयुक्तालय ? अशा उच्चायुक्तालयाला भारताने टाळे ठोकले पाहिजे !
 • पाकप्रेमी भारतीय यावर काहीही बोलणार नाहीत !
इस्लामाबाद - देहलीतील पाक उच्चायुक्तालयातील आणखी १६ कर्मचारी पाकची गुप्तचर संस्था आयएस्आयसाठी हेरगिरी करत असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी काही दिवसांपूर्वी अटक करून देशातून हाकलून लावण्यात आलेला पाक उच्चायुक्तालयातील कर्मचारी मेहमूद अख्तर याच्या चौकशीतून ही माहिती उघडकीस आली आहे. मेहमूद अख्तर याने पाक उच्चायुक्तालयातून बनावट आधारकार्ड बनवून आयएस्आयसाठी हेरगिरी केल्याचे उघड झाले आहे. उच्चायुक्तालयातील आणखी ४ अधिकार्‍यांची चौकशी होण्याची शक्यता असल्याने पाकने त्यांना मायदेशी बोलावण्याच्या हालचाली चालू केल्या आहेत.

सिमीच्या ठार करण्यात आलेल्या आतंकवाद्यांच्या अंत्ययात्रांना साडेतीन सहस्र मुसलमानांचा सहभाग !

 • आतंकवाद्यांच्या अंत्ययात्रेस उपस्थित रहाणार्‍यांच्या देशभक्तीविषयी कोणी प्रश्‍न उपस्थित केला, तर त्यात चुकीचे काय ? आतंकवाद्यांच्या अंत्ययात्रेस उपस्थित रहाणारे कधी देशासाठी हुतात्मा होणार्‍या सैनिकांच्या अंत्ययात्रेत सहभागी होतात का ?
 • कारागृहातून पळून जाण्यास अंत्ययात्रेत सहभागी झालेल्यांनीच साहाय्य केले असण्याचा संशय कोणी व्यक्त केल्यास ते चुकीचे कसे ठरेल ?
   उज्जैन/खांडवा/इंदूर - भोपाळ येथील मध्यवर्ती कारागृहातून पळून गेलेल्या ८ आतंकवाद्यांना पोलिसांनी ठार केले होते. त्यातील ६ आतंकवादी मध्यप्रदेशातील मालवा प्रांतातील आहेत. त्यापैकी ५ खांडवा आणि १ महिदपूर येथील आहे. १ नोव्हेंबरला त्यांची अंत्ययात्रा काढली असतात खांडवा येथे दीड सहस्र मुसलमान सहभागी झाल्याचे उघड झाले. या वेळी येथे दगडफेकीची घटनाही घडली. महिदपूर येथे २ सहस्र मुसलमान सहभागी झाले होते. तसेच येथील काही भागात बंदही पुकारण्यात आला होता.

कुत्रे मारा आणि सोने जिंका ! - विद्यार्थी संघटनेची घोषणा

भटक्या कुत्र्यांपासून जनतेचे रक्षण करू न शकणारे 
साम्यवादी सरकार आतंकवादी आणि पाकिस्तान यांच्या आक्रमणांपासून जनेतेचे 
रक्षण कसे करणार ? यामुळे आता जनतेलाच स्वरक्षणासाठी पाऊल उचलावे लागत आहे !
केरळमध्ये भटक्या कुत्र्यांच्या त्रासाचा परिणाम !
      थिरुवनंतपुरम् - केरळ राज्यात ४ महिन्यांत कुत्र्यांच्या आक्रमणामध्ये सुमारे ७०० नागरिक घायाळ झाले आहेत. (एवढ्या मोठ्या संख्येने जनतेवर आक्रमण होत असतांना त्यावर कोणतीही उपाययोजना न काढणारे केरळमधील कम्युनिस्ट सरकार राज्य करण्याच्या लायकीचे आहे का ? - संपादक) त्यामुळे राज्यातील सेंट थॉमस महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी सर्वाधिक कुत्रे मारणार्‍या पंचायती किंवा महानगरपालिका यांमधील अधिकारी यांना भेटवस्तू देण्याची योजना आखली आहे. १० डिसेंबरपर्यंत सर्वाधिक कुत्र्यांना ठार करणार्‍या अधिकार्‍यांना या संघटनेने सोन्याचे नाणे देण्याची घोषणा केली आहे. यापूर्वीही या संघटनेने कुत्र्यांना मारण्यासाठी विनामूल्य बंदुका वाटल्यामुळेही मोठा वाद निर्माण झाला होता.
     ‘आमचा उद्देश केवळ नागरिकांचे संरक्षण करणे हाच आहे’, असे संघटनेचे महासचिव जेम्स पमबायकल यांनी सांगितले. संघटनेच्या सदस्यांनी दिलेल्या देणगीतून ही नाणी खरेदी केली जाणार आहेत. जे अधिकारी सोन्याच्या नाण्यासाठी अर्ज करतील, त्यांना प्रत्येक दिवसाचा अहवाल सादर करावा लागणार आहे.

हिजाब नाकारणार्‍या भारतीय नेमबाज हिना सिद्धू यांना इराणच्या नागरिकांचे समर्थन !

      नवी देहली - भारताची महिला नेमबाज हिना सिद्धू यांनी हिजाब घालून खेळणे अनिवार्य असल्याचे समजताच इराणमधील आशियाई एअरगन नेमबाजी स्पर्धेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला. हिनाच्या या कृतीला इराणच्या नागरिकांचे समर्थन मिळत आहे. हिनाच्या या कृतीची इराणच्या सोशल मीडियावर कौतुक होत आहे. हिजाबच्या पक्षपाती कायद्यावर देखील टीका होत आहे. अनेक जण हिनाचे आभार मानत आहेत. फेसबूक पानावर हिनाचे कौतुक होत असून या पानावर तिचे हिजाब न घातलेले छायाचित्र प्रकाशित केले आहे. शेजारीच भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे हसन रुहानी यांच्याशी झालेल्या भेटीच्या वेळेचे छायाचित्र आहे. त्यात सुषमा स्वराज स्वराज डोक्यापासून पायापर्यंत झाकलेल्या आहेत. 
       या पानावर लिहिण्यात आले, ‘आम्ही इराणी नागरिक नसलेल्या अनेकांना इराणमध्ये आमंत्रित करतो; पण कुठल्याही परिस्थितीत हिजाब घालणे ही आमची संस्कृती नाही. महिलांविरुद्ध पक्षपात करणारा हा नियम आहे. सर्व महिलांना याविरुद्ध आवाज उठविण्याचे स्वातंत्र्य आहे.’ 
      फिरोज माहवी यांनी लिहिले, ‘परमेश्‍वराने या मुलीला आणखी शक्ती द्यावी. हे परमेश्‍वरा, गेल्या ३७ वर्षांपासून थोपण्यात आलेल्या हिजाब सक्तीविरुद्ध आवाज उठवणार्‍या सर्वच मुलींना तशी शक्ती दे.’ संघ स्वयंसेवक रुद्रेशचे मारेकरी ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ आणि ‘सोशल डेमोक्रॅटीक पार्टी ऑफ इंडिया’ यांचे कार्यकर्ते !

 • खोट्या गुन्ह्याखाली सनातनच्या निरपराध साधकांना अटक केल्यावरून सनातनवर बंदीची मागणी करणारे पुरो(अधो)गामी हे जिहादी संघटनांवर बंदी घालण्याची मागणी का करत नाहीत ? कि त्या संघटना त्यांना गांधीवादी वाटतात ?
 • पुरोगामी आणि निधर्मीवादी संघटना हिंदुत्वनिष्ठ संघटनांवर बंदी घालण्याची मागणी करतात, आता हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी जिहादी संघटनांवर बंदी घालण्यासाठी केंद्र सरकारवर दबाव निर्माण केला पाहिजे !
      बेंगळुरू - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते रुद्रेश यांच्या १६ ऑक्टोबर या दिवशी झालेल्या हत्येप्रकरणी पोलिसांनी अटक केलेले आरोपी महंमद सादिक, महंमद मुजीबुल्ला, वासिम अहमद आणि इरफान पाशा हे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया आणि सोशल डेमोक्रॅटीक पार्टी ऑफ इंडिया या जिहादी आतंकवादी संघटनांचे कार्यकर्ते असल्याचे पोलिसांना आढळून आले आहेत. पोलीस रुद्रेश हत्या प्रकरणात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया, कर्नाटक फोरम फॉर डिग्निटी आणि सोशल डेमोक्रॅटीक पार्टी ऑफ इंडिया या संघटनांच्या पदाधिकार्‍यांची चौकशी करणार आहेत. या संघटनांना केरळ आणि सागर तटावरील कर्नाटक भागातून काही हिंदुत्वनिष्ठ नेत्यांवर आक्रमण करण्यासाठी निधीचा पुरवठा करण्यात येतो. अशा नेत्यांची नावे पोलिसांना ठाऊक असूनही त्यांनी ती घोषित करण्यास नकार दिला.

३० दिवस उलटूनही राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे संकेतस्थळ बंदच

अशा कूर्मगतीने देश जलद प्रगती करेल का ?
पुणे - राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या (एनजीटी) संकेतस्थळावर ३ ऑक्टोबर या दिवशी ‘हॅकर्स’ने आक्रमण केले होते. त्या वेळी हे संकेतस्थळ उघडल्यानंतर पाकिस्तानचे राष्ट्रगीत वाजत होते. त्यानंतर सदर संकेतस्थळ पूर्णपणे बंद करण्यात आले. हे संकेतस्थळ २ नोव्हेंबर या दिवशी ३० दिवस उलटून गेले, तरी शासनाकडून चालू करण्यात आलेले नाही. संकेतस्थळ केव्हा चालू होणार, याविषयी कार्यालयातील कर्मचार्‍यांनी असमर्थता दर्शवली. संकेतस्थळ बंद असल्यामुळे नागरिकांना न्यायाधिकरणाचे कामकाज आणि खटल्यांचे निर्णय यांच्या माहितीसाठी कार्यालयात हेलपाटे मारण्याविना गत्यंतर नाही, अशी स्थिती आहे. तसेच २१ व्या शतकात देश महासत्ता वल्गना करणार्‍या आणि ‘डिजिटल इंडिया’ करू पहाणार्‍या सरकारकडून इतक्या दिवसांत दुसरे संकेतस्थळ चालू न होण्याविषयीही नागरिकांमध्ये आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

चैतन्य जप प्रकल्पाच्या वतीने ५ आणि ६ नोव्हेंबर या दिवशी मिरज येथे १७ वे राज्यस्तरीय शिबीर !

     मिरज, २ नोव्हेंबर (वार्ता.) - श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या कृपाशीर्वादाने चैतन्य जप प्रकल्पाचे १७ वे राज्यस्तराय शिबीर ५ आणि ६ नोव्हेंबर या दिवशी पटवर्धन हॉल येथे होत आहे. सदर कार्यक्रमाचे नियोजन मिरज येथील अंबाबाई मंदिर उपासना केंद्र, विठ्ठल उपासना केंद्र, समर्थ शिष्या वेण्णास्वामी मठ, दासबोध अभ्यास मंडळ, सुधर्म केटरर्स, महाबळ नामस्मरण मंडळ आणि विश्रामबाग-सांगली केंद्र यांच्या सहकार्याने केले आहे. याचे उद्घाटन ५ नोव्हेंबर या दिवशी सकाळी १०.३० वाजता नृसिंहवाडी येथील श्री गोकुलेंद्र सरस्वती यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे. तरी या आध्यात्मिक सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन स्थानिक शिबीरप्रमुख डॉ. श्रीकांत कुलकर्णी यांनी केले आहे.

अंधेरी येथील प्रादेशिक परिवहन विभागाच्या प्रस्तावित चाचणी भूखंडावर ४०० झोपड्या !

सरकारी जागेवर झोपड्या उभ्या रहाणे, हे कायद्याचा धाक
संपल्याचे आणि प्रशासनाच्या निष्क्रीयतेचे लक्षण !
    मुंबई, २ नोव्हेंबर - अंधेरी येथील प्रादेशिक परिवहन विभागाच्या नियोजित चाचणी मार्गाच्या भूखंडावर (टेस्टिंग ट्रॅक) ४०० झोपड्या उभ्या राहिल्या आहेत. त्या झोपड्या पाडण्याऐवजी अधिकृत करण्यासाठी राज्याच्या गृहनिर्माण मंत्र्याची बैठक झाली. एकीकडे मुंबई उच्च न्यायालयाने चाचणी मार्गाच्या निर्मितीविषयी येत्या ६ मासांत कृती करा, असे आदेश दिलेले असतांनाच मोकळ्या केलेल्या भूखंडाचे संरक्षण करण्यात परिवहन विभाग अपयशी ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. आता या झोपड्या पाडून टाकण्यासाठी अंधेरी प्रादेशिक परिवहन विभागाकडून पोलीस तक्रार केली जाणार आहे.
१. अंधेरी पश्‍चिमेकडील परिवहन विभागाच्या, तसेच काही प्रमाणात खाजगी भूखंडावर अण्णानगर आणि कासमनगर झोपडपट्टी होती. ती विकसित करण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन योजना विभागाने (झोपु) मे. चमणकर इंटरप्रायझेस या विकासकाची नियुक्ती केली; परंतु यासाठी परिवहन विभागाकडून ‘ना हरकत प्रमाणपत्र’ आवश्यक होते. ते घेण्याऐवजी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी काही अटी घालून चमणकर इंटरप्रायझेसला काम करण्यास सांगितले. तसा प्रस्ताव मंत्रिमंडळ पायाभूत समितीपुढे संमत झाला.

भारतात इसिसकडून आक्रमण होण्याच्या शक्यतेने सतर्क रहा ! - अमेरिकेची भारतात जाणार्‍या अमेरिकी नागरिकांना चेतावणी

 • भारत सरकार कधी देशातील नागरिकांची काळजी घेण्यासाठी अशी चेतावणी देते का ?
 • देशातील नागरिकांची काळजी घेऊ न शकणारे सरकार परदेशातील भारतियांची कशी काळजी घेणार ? आणि अशी संवेदनशीलता नसल्यानेच देशातील नागरिक आतंकवाद, नक्षलवाद, जिहाद्यांची आक्रमणे यांत ठार होतात !
    नवी देहली - अमेरिकेच्या दुतावासाने भारतात पर्यटनासाठी येणार्‍या अमेरिकी नागरिकांसाठी एक सूचनापत्रक प्रसारित केले आहे. यामध्ये भारतात पाश्‍चिमात्य देशांमधून आलेल्या पर्यटकांना जिहादी आतंकवादी लक्ष्य करू शकतात, अशी चेतावणी दिली आहे.
    धार्मिक स्थळ, बाजारपेठ आणि उत्सव चालू असलेली ठिकाणे येथे परदेशी पर्यटक मोठ्या प्रमाणात जातात. तेथे त्यांच्यावर आक्रमण केले जाऊ शकते. त्यामुळे अधिक सतर्क रहावे, असे निर्देश या पत्रकात देण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी नागरिकांनी सप्टेंबरमध्ये काढलेले पत्रक पहावे, असेही या पत्रकात म्हटले आहे.

सिमीचे आतंकवादी रहात असलेल्या बराकीमध्ये काजू, बदाम, भांडी आणि शेगडी सापडली !

आतंकवाद्यांना पोसणारे मध्यप्रदेशातील शासनाचे कारागृहातील पोलीस !
    भोपाळ - येथील मध्यवर्ती कारागृहातून पळून गेल्यानंतर पोलिसांच्या चकमकीत ठार झालेले सिमीचे ८ आतंकवादी ज्या बराकीत रहात होते, तेथे काजू, बदाम, मनुका, खजूर यांसह स्वयंपाक बनवायची शेगडी आणि काही भांडी पोलिसांच्या तपासणीत सापडली आहेत. येथील मटके फोडून ते त्यामध्ये पदार्थ शिजवत होते. पोलीस या वस्तू येथे कशा पोचल्या याचा शोध घेत आहेत. (वराती मागून घोडे नाचवणारे मध्यप्रदेशातील पोलीस ! वरील साहित्य पोलिसांच्या भ्रष्टाचाराव्यतिरिक्त आतमध्ये पोचणे केवळ अशक्य आहे. देशातील बहुतेक सर्वच कारागृहांमध्ये हीच स्थिती आहे. यातून देशातील लोकशाहीची निरर्थकता लक्षात येते. ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्राची (सनातन धर्म राज्याची) आवश्यकता आहे ! - संपादक)

गेल्या २ वर्षांत कारागृहातून १८५ कैद्यांचे पलायन !

भारतातील कारागृहांची दयनीय स्थिती !
    भोपाळ - मध्यप्रदेशातील मध्यवर्ती कारागृहातून सिमीच्या ८ आतंकवाद्यांनी पलायन केल्यानंतर देशातील कारागृहातील सुरक्षेचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गेल्या २ वर्षांत देशातील कारागृहातून १८५ कैद्यांनी पलायन केल्याची माहिती समोर आली आहे. नॅशनल क्राईम ब्युरोच्या नोंदीनुसार वर्ष २०१४ मध्ये १६ प्रकरणांत ९६, तर वर्ष २०१५ मध्ये २६ प्रकरणांत ८९ कैदी कारागृहातून पळून गेले होते. तसेच वर्ष २०१४ मध्ये २५१, तर वर्ष २०१५ मध्ये १६१ कैदी पोलिसांच्या कह्यातून पळून केले होते.

आजारी दाऊद इब्राहिम याची भारतात परतण्याची इच्छा !

      नवी देहली - आंतरराष्ट्रीय आतंकवादी दाऊद इब्राहिम याने येत्या डिसेंबरमध्ये भारतात परतण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यासाठी त्याने भारताचे साहाय्य मागितले आहे, असे वृत्त एका इंग्रजी दैनिकाने प्रसिद्ध केले आहे. या वृत्तानुसार दाऊद गंभीररित्या आजारी आहे. आजारी दाऊदला अकाली मृत्यूची भीती भेडसावत आहे. त्यामुळे किमान आपल्या मृतदेहाचे दफन भारतात व्हावे, असे दाऊदने म्हटले आहे. दाऊदच्या या इच्छेला पाकची गुप्तचर संस्था ‘आयएस्आय’ आणि पाकचे सैन्यदल यांचा विरोध आहे. दाऊद भारतात परतल्यास आपली सर्व गोपनीय माहिती तो उघड करील, अशी भीती पाकला वाटते. संयुक्त राष्ट्रांनी दाऊद इब्राहिमला आंतरराष्ट्रीय आतंकवादी घोषित केल्यानंतर पाकिस्तानवर त्याला अटक करण्याविषयी दबाव वाढला आहे. १९९३ च्या मुंबईतील साखळी बाँबस्फोटांनंतर दाऊद दुबईला पळून गेला होता. त्यानंतर त्याने पाकमध्ये आश्रय घेतला होता. दाऊदच्या विरोधात भारतात खंडणी गोळा करणे, आतंकवादी कारवाया घडवून आणणे, कट रचणे, सामूहिक हत्या घडवून आणणे यांविषयी अनेक खटले प्रलंबित आहेत.मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी संघटितपणे मंदिर समित्यांचे प्रबोधन करणार

म्हापसा येथे धर्माभिमानी हिंदूंच्या बैठकीत निर्णय
बैठकीत समोरील बाजूला डावीकडून सौ. शुभा सावंत, 
श्री. जयेश थळी आणि बैठकीत विचार 
मांडतांना एक हिंदुत्वनिष्ठ
     म्हापसा, २ नोव्हेंबर (वार्ता.) - मंदिरांमधील पावित्र्य राखण्यासाठी चळवळ राबवण्याचे म्हापसा येथील हिदु धर्माभिमान्यांनी नुकत्याच घेतलेल्या एका बैठकीत ठरवले. त्याचसमवेत युवकांचे संघटन करण्याचा निर्णय हिंदु धर्माभिमान्यांकडून घेण्यात आला. 
    म्हापसा येथे झालेल्या ‘एक भारत अभियान - कश्मीर की ओर’ या सभेनंतर कृतीप्रवण झालेल्या हिंदूंनी संघटितपणे कार्य करण्याचे ठरवले आहे. या दृष्टीने तृतीय आढावा बैठक नुकतीच झाली. मंदिरांचे पावित्र्य राखण्याच्या संदर्भात बार्देश तालुक्यातील देवस्थान समित्यांना भेटून प्रबोधन करण्याचे या वेळी ठरले. मंदिरात येणार्‍या पर्यटकांना नियमावली घालून देण्याचे आवाहन सर्व मंदिर समिती सदस्यांना करण्यात येणार आहे. या बैठकीत अनेकांनी त्यांचे विचार व्यक्त केले. बैठकीला उपस्थित धर्माभिमानी श्री. उदय मुंज यांनी या दृष्टीने पुढाकार घेऊन कृती करणार असल्याचे सांगितले.  श्री. जयेश थळी यांनी बैठकीचा उद्देश स्पष्ट केला. या वेळी सौ. शुभा सावंत उपस्थित होत्या.

इंग्लंडमध्ये मशिदीत अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपावरून इमामाला कारावास !

हिंदूंच्या संतांविषयीच्या कथित लैंगिक शोषणाच्या वृत्तांना 
वारेमाप प्रसिद्धी देणारी प्रसारमाध्यमे अशा वृत्तांना मात्र दडपतात !
      लंडन - इंग्लंडच्या पश्‍चिम मिडलॅण्डमधील क्रॅडली हिथ येथील क्वीन्स क्रॉस मशिदीचा इमाम हाफिज रहमान (वय ५८ वर्षे) याला मशिदीत कुराण शिकवण्याच्या नावाखाली बोलावून २ अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपावरून न्यायालयाने दोषी ठरवले आहे. रहमान याला कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
       हाफिज रहमान हा अनेक वर्षांपासून मशिदीत कार्यरत होता. वर्ष १९८६ ते ऑगस्ट १९८७ च्या कालावधीत तो काही मुसलमान मुलींना मशिदीत कुराण शिकवण्याच्या नावाखाली बोलावत असे. त्यापैकी एक मुलगी केवळ ६ वर्षांची होती. ती कुराण वाचत असतांनाच रहमान तिच्याबरोबर लैंगिक चाळे करत असे; मात्र मुलीने भयापोटी ही गोष्ट कुणाला सांगितली नाही. वर्ष २०१२ मध्ये तिने या लैंगिक अत्याचारांची माहिती पोलिसांना सांगितल्यावर पोलिसांनी रहमानला अटक केली आणि त्याच्यावर न्यायालयात खटला भरला. रहमानने २ अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याचे आरोप न्यायालयात सिद्ध झाले आणि त्याला कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. रहमान याला ७ मुले असून १० नातवंडे आहेत.

कुमटा (कर्नाटक) येथील ‘श्रीमंजुनाथ दूरचित्रवाहिनी’च्या माध्यमातून सनातनचा दिवाळीच्या वेळी धर्मप्रसार !

वाहिनीवरून मार्गदर्शन करतांना श्री. विनायक
शानभाग (डावीकडे) आणि श्री. रवि गावडी
    कुमटा (कर्नाटक) - येथील ‘श्रीमंजुनाथ दूरचित्रवाहिनी’चे मालक श्री. रवि गावडी गेल्या काही महिन्यांपासून सनातन धर्मशिक्षणा विषयीच्या ध्वनीचित्र-चकत्या त्यांच्या वाहिनीच्या माध्यमातून प्रसारित करत आहेत. कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्यातील ४ लाख लोकांपर्यंत श्रीमंजुनाथ दूरचित्रवाहिनी पोचते. या वेळी दिवाळीला ‘धर्मशास्त्रानुसार दिवाळी कशी साजरी करावी’ तसेच ‘सांप्रत काळात धर्मशिक्षणाचे महत्त्व’ या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी श्रीमंजुनाथ वाहिनीने सनातन संस्थेला आवाहन केले होते. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सनातन संस्थेचे साधक श्री. विनायक शानभाग यांनी ‘धर्मशास्त्रानुसार दिवाळी कशी साजरी करावी’ याविषयावर, तर सनातन संस्थेच्या साधिका सौ. विद्या विनायक शानभाग यांनी पाडव्याच्या दिवशी ‘सांप्रत काळात धर्मशिक्षणाचे महत्त्व’या विषयावर मार्गदर्शन केले.

डोनाल्ड ट्रम्प यांना निवडणुकीत रशियाकडून साहाय्य ! - डेमोक्रॅटिक पक्षाचा आरोप

      वॉशिंग्टन - अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांना रशियाकडून साहाय्य मिळत असल्याचा आरोप डेमोक्रेटिक पक्षाने केला आहे. डेमोक्रेटिक पक्षाचे खासदार रीड यांनी म्हटले की, एफ्बीआयच्या एका गुप्तहेराने ट्रम्प आणि रशिया यांच्यात संबंध असल्याची माहिती यापूर्वीच दिली आहे. दुसरीकडे ट्रम्प यांनी यापूर्वीच घोषित केले आहे की, जर ते राष्ट्राध्यक्ष झाले, तर ते शपथ ग्रहण करण्यापूर्वी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतीन यांची भेट घेणार आहेत.मुसलमान आणि हिलरी क्लिंटन यांच्या समर्थकांना शस्त्र विकणार नाही ! - अमेरिकेतील शस्त्रविक्रेत्याचे विज्ञापन

जिहादी आतंकवादाचा विरोध करणारा अमेरिकेतील शस्त्रविक्रेता ! अशी भूमिका स्वतः 
अमेरिका कधी घेणार ? जिहादी आतंकवाद्यांना पोसणार्‍या अमेरिकेकडून असे होईल तो सुदिन !
      न्यूयॉर्क - मुसलमान आणि राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांच्या समर्थकांना शस्त्रविक्री केली जाणार नाही, असे विज्ञापन एका शस्त्रविक्रेत्याने केले आहे. पेनिसिल्वानियामधील जॅक्सन सेंटर भागात अल्ट्रा फायरआर्म्स नावाचे दुकान चालवणार्‍या पॉल चांडलर या शस्त्रविक्रेत्याने हे विज्ञापन प्रसिद्ध केले आहे. आम्ही आतंकवाद्यांना शस्त्रे विकणे सुरक्षित समजत नाही, असे यात म्हटले आहे. या विक्रेत्याने अशा आशयाचा फलकच स्वतःच्या दुकानासमोर लावला आहे. तसेच स्थानिक वृत्तपत्रातील विज्ञापनामध्येही असेच प्रसिद्ध केले आहे.
      आमच्या दुकानात शस्त्र खरेदीसाठी येणार्‍या मुसलमान ग्राहकांना आम्ही माघारी पाठवतो, तसेच हिलरी यांच्या समर्थकांनाही अशाच प्रकारे माघारी पाठवले जाते, असे पॉल चांडलर याने म्हटले आहे.तपासाची माहिती देण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याने पुढील सुनावणीला उपस्थित रहावे ! - मुंबई उच्च न्यायालयाचे ताशेरे

 आध्यात्मिक गुरु ओशो यांच्या मृत्यूपत्राचा तपास 
पुणे पोलिसांकडून धीम्या गतीने केला जात असल्याचे प्रकरण 
उच्च न्यायालयाचे ताशेरे हे पुणे पोलिसांच्या कूर्मगती कारभाराचे निदर्शक ! 
     मुंबई - आध्यात्मिक गुरु ओशो यांच्या मृत्यूपत्राचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण यंत्रणेकडे देण्याचा विचार आम्ही करत नाही किंवा तसे संकेतही देत नाही. पुणे पोलीस या प्रकरणाचा तपास धीम्या गतीने करत आहेत. तपासाची माहिती देण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याने पुढील सुनावणीला उपस्थित रहावे, असे स्पष्ट आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. आध्यात्मिक गुरु ओशो यांच्या मृत्यूपत्रावर त्यांची खोटी स्वाक्षरी असून त्याविषयीची तक्रार पुणे पोलिसांकडे करण्यात आली आहे. पुणे पोलीस याचा तपास योग्य पद्धतीने करत नाहीत. त्यामुळे तो तपास अन्वेषण यंत्रणेकडे सोपवावा, अशी मागणी करणारी फौजदारी याचिका आध्यात्मिक गुरु ओशो यांचे अनुयायी योगेश ठक्कर यांनी अधिवक्ता प्रदीप हवनुर यांच्या माध्यमातून केली आहे. त्यावर न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्या खंडपिठासमोर सुनावणी झाली. त्या वेळी न्यायालयाने हे आदेश दिले. 

देहलीतील जंतरमंतर येथे ओआर्ओपी साठी सैनिकाची आत्महत्या !

नवी देहली - ‘वन रँक वन पेन्शन’(ओआर्ओपी)च्या प्रकरणी येथील जंतर-मंतरवर आंदोलन करत असलेल्या रामकिशन ग्रेवाल या माजी सैनिकाने विष पिऊन आत्महत्या केली.
    केंद्र सरकारकडून लागू करण्यात आलेल्या ओआर्ओपी (समान श्रेणी समान निवृत्तीवेतन) योजनेच्या प्रकरणी रामकिशन ग्रेवाल समाधानी नव्हते. ते १ नोव्हेंबरपासून काही सहकार्‍यांबरोबर येथे आंदोलन करत होते. रामकिशन यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहिली होती. यामध्ये त्यांनी लिहिले होते की, मी माझा देश, मातृभूमी आणि सैनिक यांच्यासाठी बलीदान देत आहे. या आत्महत्येवरून काँग्रेसचे खासदार राहुल गांधी, देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.

संजय साडविलकर यांच्यावर गुन्हा प्रविष्ट करून तात्काळ अटक करा ! - पलूस (जिल्हा सांगली) पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट

 • अवैधरित्या शस्त्रविक्री करणारे संजय साडविलकर यांच्या विरोधात तिसरी तक्रार प्रविष्ट
 • संजय साडविलकर यांच्या जबाबाच्या आधारे सनातनचे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना अटक करणारे पोलीस अवैध शस्त्रविक्रीच्या गुन्ह्याखाली साडविलकर यांच्या विरोधात सातत्याने प्रविष्ट होणार्‍या तक्रारींची नोंद घेऊन त्यांना तात्काळ अटक करणार का ?
    पलूस (जिल्हा सांगली), २ नोव्हेंबर (वार्ता.) - संजय साडविलकर हे गुन्हेगार असून त्यांनी अवैधरित्या रिव्हॉल्व्हर आणि पिस्तुल बनवणे, हाताळणे, खरेदी-विक्री करणे, त्याची दुरुस्ती करणे इत्यादी गुन्हे केलेले आहेत. साडविलकर यांनी असे गुन्हे केल्याचा न्यायाधिशांसमोर कबुलीजबाब दिला आहे. त्यामुळे या कबुलीजबाबाच्या आधारे संजय साडविलकर यांना, तसेच त्यांचे सहकारी बापू इंदुलकर आणि संगनमत करून विकणारे सर्व यांच्यावर गुन्हे प्रविष्ट करून त्यांना अटक करावी, अशी तक्रार पलूस येथील राष्ट्रप्रेमी नागरिक श्री. संतोष संपत पाटील यांनी पलूस पोलीस ठाण्यात केली आहे.

राष्ट्राचा उत्कर्ष साधणार्‍या आणि छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित असलेल्या हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कार्यरत होऊया !

वरळी (मुंबई) येथील ‘स्टार बॉईज ग्रुप च्या कार्यक्रमात
सनातनचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांचे आवाहन 
मध्यभागी मार्गदर्शन करतांना श्री. अभय वर्तक, त्यांच्या डाव्या बाजूला
हिंदू राष्ट्रसेनेचे मुंबई अध्यक्ष श्री. नागेश मढवी आणि समवेत पदाधिकारी
   मुंबई, २ नोव्हेंबर (वार्ता.) - स्वातंत्र्यानंतर आपण लोकशाही स्वीकारली; मात्र लोकशाहीने आपल्याला काय दिले, यावर चिंतन होणे आवश्यक आहे. लोकशाहीत निवडून येण्यासाठी भ्रष्टाचाराचा मार्ग अवलंबला जात आहे. आतंकवाद, गुंडगिरी, महिलांवर अत्याचार वाढले आहेत. लोकशाही पूर्णत: अपयशी ठरली आहे. हिंदु राष्ट्राची स्थापना हाच राष्ट्राच्या उत्कर्षाचा एकमात्र उपाय आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांना अपेक्षित असलेल्या हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी सर्वांनी कार्यरत होऊया, असे आवाहन सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांनी केले. स्टार बॉईज गु्रप च्या वतीने आयोजित एका कार्यक्रमात धर्मविषयी मार्गदर्शन करण्यासाठी श्री. वर्तक यांना निमंत्रित करण्यात आले होते. (सांस्कृतिक कार्यक्रमाच्या व्यासपिठाचा धर्मप्रसारासाठी उपयोग करणार्‍या स्टार बॉईज ग्रुप चा आदर्श समस्त हिंदु बांधवांनी घ्यावा ! - संपादक) या वेळी हिंदू राष्ट्रसेनेचे मुंबई अध्यक्ष श्री. नागेश मढवी, स्टार बॉईज ग्रुपचे सर्वश्री भूषण कांबळे, रूपेश महाडिक, रोहन पाटील यांसह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमाला सहस्रोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

देशातील सर्वांत मोठ्या कारवाईतून ३ सहस्र कोटी रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त !

पकडण्यात आलेला साठा इतका आहे, तर न पकडण्यात 
आलेला साठा किती असू शकतो याची कल्पना करता येत नाही ! 
     उदयपूर (राजस्थान) - महसूल गुप्तवार्ता महासंचालनालयाकडून २३.५ मेट्रिक टन इतका मँड्रेक्स या अमली पदार्थाचा साठा जप्त करण्यात आला आहे. राजस्थानमधील उदयपूरमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे. अमली पदार्थ जप्तीची ही कारवाई जगातील सर्वांत मोठी कारवाई असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. बाजारभावानुसार जप्त करण्यात आलेल्या मँड्रेक्सची किंमत ३ सहस्र कोटी रुपये इतकी आहे. मँड्रेक्स या अंमली पदार्थाचा वापर मेजवान्यांमध्ये केला जातो. मँड्रेक्स या पदार्थावर कायदेशीर बंदी आहे. या प्रकरणी सुभाष दुधानी याला अटक केली आहे. सौदी अरेबिया, दुबई आणि दक्षिण आफ्रिकेसह आफ्रिका खंडातील इतर काही देशांमध्ये हे अमली पदार्थ पाठवले जाणार होते.

महाराष्ट्रात मुलींचा जन्मदर १ सहस्र मुलांमागे केवळ ९०७

तथाकथित पुरोगामित्वाचा डंका बडवणारे 
आणि महिलांच्या समानतेसाठी लढणारे आता कुठे आहेत ? 
     नागपूर, २ नोव्हेंबर - केंद्र शासनाकडून ‘'बेटी बचाओ, बेटी पढाओ'’, ही मोहीम काही वर्षांपासून राबवण्यात येत आहे. राज्य शासनाकडूनही मोहिमेच्या यशस्वितेसाठी विविध विज्ञापने देऊन मुलींचा जन्मदर वाढवण्याचा प्रयत्न होत आहे. राज्य शासनाने अनेक उपाययोजना करून यासंदर्भात जनजागृती केली. असे असले, तरी राज्यात १ सहस्र मुलांच्या मागे केवळ ९०७ मुली असा जन्मदर असून वर्षागणिक मुलींच्या जन्मदरात घट होत आहे, असेे सामाजिक कार्यकर्ते अभय कोलारकर यांना माहिती अधिकारात मिळालेल्या आकडेवारीत स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ‘'बेटी बचाओ, बेटी पढाओ'’, या मोहिमेत राज्यात अनेक संस्था, संघटना, नागरिक सहभागी होऊनही कितपत यश मिळाले, हा प्रश्‍न उपस्थित होत आहे. 

पुण्यामध्ये फटाक्यांचा आवाज न्यून झाला असला, तरी हवेच्या प्रदूषणात मात्र वाढच !

फटाक्यांमुळे प्रदूषणात वाढ होत असल्याचे लक्षात येऊनही सरकार त्यावर बंदी का घालत नाही ?
    पुणे, २ नोव्हेंबर - कानठळ्या बसवणार्‍या फटाक्यांचा आवाज न्यून झाला असला, तरी अतिसूक्ष्म कणांमुळे होणार्‍या कणीय प्रदूषणात वाढ झाल्याचे दिसून आले. पाडव्याच्या दिवशी या अतिसूक्ष्म कणीय प्रदूषणाने धोक्याची पातळी ओलांडली होती, असे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रॉलॉजीच्या (आयआयटीएम) सफर या प्रदूषण मापन यंत्रणेचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. गुफरान बेग, नेहा पारखी आणि वृंदा आनंद यांनी सिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे. हा अहवाल संस्थेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
अहवालात म्हटले आहे की,...
१. यंदा फटाक्यांची विक्री जवळपास ५० टक्क्यांनी घटल्याचे फटाका व्यापारी सांगत आहेत. असे असले, तरी यंदाच्या दिवाळीत हवेतील कणीय प्रदूषणातील ‘पीएम २.५ अर्थात २.५ मायक्रॉनपेक्षा अल्प व्यासाच्या कणीय प्रदूषणाची पातळी पाडव्याच्या दिवशी ३३७ मायक्रोग्रॅम पर क्यूबिक मीटर झाली. हवेची ही पातळी अत्यंत वाईट गुणवत्ता आणि हेल्थ अलर्टची परिस्थिती दर्शवते. गेल्या वर्षी पाडव्याला हीच प्रदूषण पातळी २०५ मायक्रोग्रॅम पर क्यूबिक मीटर इतकी होती.

खेड (जिल्हा सातारा) येथे मानवता प्रतिष्ठानच्या वतीने चिनी वस्तूंचे दहन !

चीन आणि पाकिस्तान यांच्या निषेधाच्या घोषणांनी परिसर दणाणला
   सातारा, २ नोव्हेंबर (वार्ता.) - कोरेगाव तालुक्यातील खेड (नांदगिरी) येथील मानवता प्रतिष्ठानच्या वतीने प्रदूषणमुक्त दीपावली साजरी करण्यात आली. या वेळी प्रतिष्ठानच्या वतीने सुंदर किल्ला स्पर्धा, फटाके विरहीत दीपावली आदी उपक्रम राबवण्यात आले. याचसह भारताचे भावी आधारस्तंभ असणारे आजचे बालगोपाल यांच्यामध्ये राष्ट्रप्रेम निर्माण व्हावे, यासाठी बाजारपेठेत असणारे चिनी बनावटीचे फटाके, आकाशकंदिल आदी वस्तूंचे दहन करण्यात आले.

नांदेड येथे अज्ञात व्यक्तीकडून एका पोलीस कर्मचार्‍यास जीवे मारण्याचा प्रयत्न !

राज्यात पोलिसांवरील वाढती आक्रमणे म्हणजे पोलिसांचा धाक संपल्याचे लक्षण ! 
     नांदेड, २ नोव्हेंबर - येथील बिग बाजार समोरील चौकात रामराव किशनराव केंद्रे या पोलीस कर्मचार्‍यांना एकाने जीवे मारण्याचा प्रयत्न केला. रामराव केंद्रे हे ३१ ऑक्टोबरच्या रात्री ११ वाजता बिग बाजार विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयासमोर नाकाबंदीचे कर्तव्य बजावत होते. तेथे अज्ञात ३ जण आपापसांत भांडत होते. केंद्रे यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला; पण त्यातील एकाने केंद्रे यांचा डावा हात आणि डोके या भागांवर तलवारीने वार करत त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. (यावरून राज्यातील कायदा-सुव्यवस्था किती रसातळाला गेली आहे, हेच दिसून येते. - संपादक) केंद्रे यांनी दिलेल्या तक्रारीवरून नांदेड ग्रामीण पोलिसांनी त्या अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट केला आहे.

वाहतुकीचे नियम ठाऊक नाहीत आणि वाहन अनुज्ञप्ती (परवाना) हवी, अशी पुणेकरांची स्थिती !

विद्येचे माहेरघर म्हणवणार्‍या पुणे शहराला ही गोष्ट लज्जास्पदच ! 
     पुणे - वाहतूक नियम ठाऊक नाहीत; परंतु वाहन चालवण्याची अनुज्ञप्ती (परवाना) हवी आहे, अशी स्थिती सध्या प्रादेशिक परिवहन कार्यालयात अनुज्ञप्ती काढण्यासाठी येणार्‍या नागरिकांची दिसून येते; कारण गेल्या १० मासांमध्ये ३ सहस्र ३४२ नागरिक शिकाऊ वाहन अनुज्ञप्तीसाठी (लर्निंग लायसन्स) घेतलेल्या परीक्षेत अनुत्तीर्ण झाले आहेत. 

निवासी इमारतीत फटाक्यांचा साठा ठेवल्याप्रकरणी मुंबई पोलिसांकडून ५४ फटाके विक्रेत्यांना नोटिसा

नागरिकांची सुरक्षा आणि कायदा-सुव्यवस्था धाब्यावर बसवणारे फटाके विक्रेते ! 
     मुंबई, २ नोव्हेंबर - निवासी इमारतीत फटाक्यांचा साठा ठेवल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी ५४ फटाके विक्रेत्यांना नोटिसा बजावल्या आहेत. फटाक्यांची साठवणूक करणार्‍यांकडून सुरक्षेची काळजी घेतली जात आहे का, याची राज्यातील महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांनी काटेकोरपणे पाहणी करावी, तसेच नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई करावी, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार मुंबई पोलिसांनी लालबाग, परळ, शीव आणि मशीद बंदर या भागातील फटाके विक्रेत्यांना नोटिसा दिल्या. (न्यायालयाच्या निर्देशानंतर कृती करणारे पोलीस ! - संपादक) या पार्श्‍वभूमीवर मुंबई-ठाणे फटाके विक्रेते असोसिएशनची बैठक पार पडली असून पोलिसांच्या कारवाईविषयी मुंबई पोलीस आयुक्त यांची भेट घेऊन आपली भूमिका मांडणार आहे.

देशभरातील उच्च न्यायालयांतील न्यायाधिशांच्या ४३ टक्के जागा रिकाम्या !

देशभरातील न्यायालयांमध्ये ३ कोटीहून अधिक खटले प्रलंबित 
असतांना न्यायाधिशांच्या जागा रिकाम्या ठेवणारी व्यवस्था जनताद्रोहीच होय ! 
     नवी देहली - देशातील २४ उच्च न्यायालयांमध्ये न्यायाधिशांच्या ४३ टक्के जागा रिकाम्या आहेत. देशातील सर्व उच्च न्यायलयांमध्ये न्यायाधिशांची १०७९ पदे असतांना ४६४ पदांवर न्यायाधीशच नाहीत. राज्यानुसार पाहिले, तर आंध्रप्रदेशमध्ये ६३ टक्के जागा रिकाम्या आहेत. ४६४ मधील ३५५ जागा केवळ १० उच्च न्यायलयांमध्येच आहेत. यातील अलाहाबाद उच्च न्यायालयात ८३ जागा रिकाम्या आहेत. कर्नाटकात ३६, तर पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयात ३९ जागा रिकाम्या आहेत.

नवी मुंबई येथील ख्रिस्ती धर्मप्रसाराच्या कार्यक्रमाचे नाव मात्र संस्कृतमध्ये !

हिंदूंना आकृष्ट करण्याचा ख्रिस्त्यांचा छुपा डाव 
     मुंबई, २ नोव्हेंबर (वार्ता.) - नुकताच नवी मुंबई येथील पटनी मैदानावर ख्रिस्त्यांचा धर्मप्रसाराचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे नाव ‘'कृपाभिषेकम्’', असे संस्कृत भाषेत ठेवण्यात आले होते. त्याखाली ‘'बायबल कर्न्व्हशन २०१६'’, असे लिहिण्यात आले होते. या परिसरात ठिकठिकाणी कार्यक्रमाचे फलक लावण्यात आले होते. ख्रिस्ती धर्मप्रसारासाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे नाव मात्र संस्कृत भाषेत ठेवण्यात आले होते. यातून हिंदूंना आपल्या धर्माकडे आकर्षित करण्यासाठी ख्रिस्त्यांकडून ही कूटनीती वापरण्यात येत असल्याचे मत काही हिंदुत्वनिष्ठांनी व्यक्त केले. 

अभ्यासक्रम पूर्ण न होताच मुंबई विद्यापिठाकडून पदव्युत्तर विज्ञान शाखेची परीक्षा !

मुंबई विद्यापिठाचा अजब आणि हलगर्जी कारभार ! 
     मुंबई - मुंबई विद्यापिठाकडून पदव्युत्तर विज्ञान शाखेचा प्रथम सत्राचा कालावधी पूर्ण होण्याआधीच परीक्षेचा दिनांक जाहीर करण्यात आला आहे. प्रवेश प्रक्रियेनंतर महाविद्यालयात अभ्यासक्रम शिकवून झालेला नसतांनाच परीक्षा माथी मारली जात आहे, अशी तक्रार पदव्युत्तर विज्ञान शाखेच्या (एम्. एस्स्सी) पहिल्या वर्षाच्या शेकडो विद्यार्थ्यांनी केली आहे. (या प्रकरणी विद्यापिठाच्या कुलगुरूंनी परीक्षा विभागातील संबंधितांवर कारवाई करावी आणि नियमाप्रमाणे परीक्षा घ्यावी ! - संपादक) विद्यापिठाच्या संलग्न महाविद्यालयांच्या अनेक प्राचार्यांनी विद्यापीठ प्रशासनाला पत्र लिहून विद्यार्थ्यांना परीक्षा देणे गैरसोयीचे ठरत असल्याची पत्रे दिली आहेत. तसेच या पत्रांसमवेत ही परीक्षा पुढे ढकलण्यासाठी विद्यार्थ्यांनी निवेदनेही दिली आहेत. (विद्यार्थ्यांना निवेदने द्यावी लागणे, हे दुर्दैव ! - संपादक) 

मुंबई-नवी मुंबई परिसरात दुकानदार, शाळा, पोलीस आणि प्रशासन यांना निवेदन

हिंदु जनजागृती समितीची फटाकेविरोधी प्रबोधन मोहीम ! 
     मुंबई, २ नोव्हेंबर (वार्ता.) - देवता आणि राष्ट्रपुरुष यांची चित्रे असलेल्या फटाक्यांवर कायमस्वरूपी बंदी आणावी, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मुंबई अन् नवी मुंबई परिसरातील ११४ दुकानदारांना निवेदन देण्यात आले. ५ शाळांमध्ये प्रबोधन करण्यात आले. तसेच ३३ पोलीस ठाणे आणि ३ प्रशासकीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

फटाके फोडण्यास विरोध करणार्‍या वृद्धाचा तरुणाच्या मारहाणीत मृत्यू

स्वार्थापोटी हिंसक कृत्य करण्यास धजावणारी आजची युवा पिढी ! 
     सोलापूर - फटाके फोडण्यास विरोध केल्याने एका तरुणाने केलेल्या मारहाणीत ८० वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी राहुल जमादार (वय २० वर्षे) याला अटक केली आहे. दिवाळीनिमित्त राहुल फटाके फोडत असतांना वृद्धाने त्याला रोखले. त्यामुळे दोघांमध्ये वाद होऊन राहुलने त्यांना मारहाण केली. त्यात त्यांचा मृत्यू झाला.

नवी मुंबई महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरुद्धचा अविश्‍वास ठराव राज्य सरकारने फेटाळला

    मुंबई - नवी मुंबई महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरुद्धचा अविश्‍वास ठराव राज्य सरकारने फेटाळला आहे. तसेच नवी मुंबई प्रशासनला बाजू मांडण्यासाठी शासनाने ३० दिवसांचा वेळ दिला आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या अविश्‍वास ठरावावर कायदेशीर प्रक्रिया होईल, असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. त्यानंतर अविश्‍वास ठराव फेटाळण्यात आला आहे. याप्रकरणी नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनावणे यांनी ‘मुख्यमंत्र्यांनी विश्‍वासघात केला आहे’, असे म्हटले.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या जिल्हा सरचिटणीसाला अटक आणि पोलीस कोठडी !

वासनांध पदाधिकार्‍यांचा भरणा असलेली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ! 
सातारा येथे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केल्याचे प्रकरण 
     सातारा, २ नोव्हेंबर (वार्ता.) - साहित्य देण्यासाठी घरी आलेल्या ६ वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सातारा जिल्हा सरचिटणीस मधूकर आठवले (वय ५८ वर्षे) यांना शाहूपुरी पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्यांना १ दिवसाची पोलीस कोठडी ठोठावली आहे.

श्री साईबाबांच्या चरणी भक्ताकडून १८ लक्ष रुपये किंमतीचे सिंहासन अर्पण !

     शिर्डी - श्री साईबाबांच्या चरणी बडोदा (गुजरात) येथील एका भक्ताने १८ लक्ष रुपये किंमतीचे चांदीचे सिंहासन अर्पण केले आहे. भक्ताने स्वतःची इच्छा पूर्ण झाल्यामुळे श्री साईबाबांच्या चरणी ३० किलो १९० ग्रॅम वजनाचे सिंहासन अर्पण केले आहे, असे श्री साईबाबा संस्थानच्या अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले. (याविषयी अंनिसवाले काही बोलतील का ? - संपादक) हे सिंहासन श्री साईबाबांच्या चावडी मंदिरात ठेवण्यात आले असून त्यावर श्री साईबाबांची मूर्ती ठेवली आहे.

७० गुन्हे केलेल्या आरोपीला जळगाव पोलिसांनी केली अटक

आरोपी इतक्या मोठ्या प्रमाणात गुन्हे करेपर्यंत पोलीस काय करत होते ? 
     जळगाव - अनेक ठिकाणी घरफोड्या, अधिकोशांची लूट करणारा आरोपी सचिन इथापे याला पोलिसांनी पकडले. आरोपीने पळून जाण्याच्या प्रयत्नात पोलिसांवर गोळीबार केला. यानंतर पोलिसांनीही त्याला गोळी मारली. आरोपीने ७० हून अधिक गुन्हे केले असून तो नाव पालटून चाळीसगाव येथे रहात होता.

फलक प्रसिद्धीकरता

आतंकवाद्यांचे समर्थन हा राष्ट्रद्रोहच !
    मध्यप्रदेशातील तुरुंगातून पळालेल्या सिमीच्या ८ जिहादी आतंकवाद्यांना ३१ ऑक्टोबरला पोलिसांनी चकमकीत ठार केले होते. मध्यप्रदेशातील मालवा प्रांतात झालेल्या त्यांच्या दफनविधीच्या वेळी ३ सहस्र ५०० लोक उपस्थित होते. चकमकीचा निषेध करत त्यांनी दगडफेक केली.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Muthbhedme mare gaye SIMI atankiyoke janaje me 3500 log jute. Muthbhedke nished hetu unhone pathrav bhi kiya.
Secular Jagat inhe Rashtrapremi hi kahega
जागो ! : मुठभेड में मारे गए सीमी आतंकियों के जनाजे में ३५०० लोग जुटे. मुठभेड के निषेध हेतु उन्होंने पथराव भी किया.
सेक्युलर जगत इन्हें राष्ट्रप्रेमी ही कहेगा.

भारलेले वातावरण : विलायती कापडाची होळी नि बहिष्कार !

स्वदेशी वस्त्रांविषयी अशी आपुलकी आणि विदेशी 
वस्त्रांविषयी चीड आज किती राजकारण्यांमध्ये आहे ?
        या होळीचा आवाज देशभर उमटला. पुढे जागोजागी अशा होळ्या पेटू लागल्या. - व्याख्यान-प्रवचनकार, सच्चिदानंद शेवडे, पुणे.
       ‘१४ ऑक्टोबर. वंगभंग अस्तित्वात यायला दोन दिवस होते. विलायती कापडाची देवघेव पूर्णपणे नष्ट झाली. जो ती करेल त्यांच्यावर बहिष्कार टाकायचे ठरवण्यात आले. त्या पंधरवड्यात एकट्या कोलकत्यातच १६७ लहान-मोठ्या सभा झाल्या. सगळीकडे मिळून सहा लाखांवर श्रोते होते.
      या सर्व आंदोलने आणि उद्रेकाची धास्ती लॉर्ड कर्झनने घेतली. त्याने ऑक्टोबर अखेरीस जम्मूला भेट दिली. त्या वेळी आज्ञाच काढली ‘छावणी आणि मिरवणुकीपासून २००० फूटांच्या परिघात एकही बंगाली अथवा मराठी माणूस येता कामा नये. त्याचप्रमाणे २०० फूट परिघात पंजाबी आणि अन्य स्थानिक नकोत.

स्वैराचार आणि अनैतिकता यांना पूर्णत: निष्प्रभ करण्याचे सामर्थ्य केवळ अध्यात्मात असणे !

१. विज्ञानाने मानवजातीला बंदुका, 
तोफा नजराणे दिले; परंतु नीतीमत्ता न 
शिकवल्याने मनावर नैतिक संस्कार न होणे 
     ‘मानवजातीला बंदुका, तोफा हे नजराणे विज्ञानाने दिलेले आहेत ना ? विज्ञानामुळे झालेल्या लाभांचे योग्य अवधान ठेवून विचारावेसे वाटते, ‘उपरोक्त नजराणे हे मानवजातीचे कोणत्या प्रकारचे कल्याण करीत आहेत ?’ शालेय विद्यार्थी हातात पिस्तुल घेऊन काही कारण नसतांना आपल्या शालेय बंधुभगिनींचे धडाधड मुडदे पाडत आहेत. वैज्ञानिक शोधांच्या आधारे चोर्‍या, घरफोडी, दरोडे, लूटमार असले प्रकार सर्रास होत आहेत. विज्ञान मानवाला नीतीमत्ता शिकवत नाही, तसेच त्याच्या मनावर नैतिक संस्कार करीत नाही. त्यामुळे वैज्ञानिक शोधांचा दुरुपयोग होत आहे.

पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्या विरोधातील खटला, हा हिंदु संतांना जाणीवपूर्वक अपकीर्त करण्याचा डाव !

पूज्यपाद आसारामजी बापू
१. खटल्याविषयी पूज्य बापूजी आणि 
प्रवक्त्या श्रीमती नीलम दुबे यांची प्रतिक्रिया
१ अ. षड्यंत्रकर्त्यांचे हात पुष्कळ मोठे आहेत ! - पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू ‘पत्रकारांशी झालेल्या वार्तालापात पूज्यपाद संतश्री बापूजी म्हणाले की, ‘‘तो (कृपाल सिंह) तर १२ मासांपूर्वी (महिन्यांपूर्वी) साक्ष देऊन गेला. जे आक्रमणे करवून घेतात, त्यांचे अन्वेषण केले जावे. सत्य उजेडात येईल. माझी बाहेर निघण्याची वेळ येते, तेव्हा ते असे (साक्षीदारांच्या हत्या) घडवून आणतात. मी का असे करणार ? ज्यांनी मला येथे पाठवले आहे, तेच असे करवतात. त्यांचे हात लांब आहेत, मोठे षड्यंत्र आहे. देव सर्वांचे कल्याण करो.’’

पालट परीक्षापद्धतीत नको, तर शिक्षणपद्धतीत हवा !

     विद्यार्थ्यांना परिक्षांचा ताण नको, त्यांना मुक्तपणे शिक्षण घेता यावे या उद्देशांच्या नावाखाली काही वर्षांपूर्वी विद्यार्थ्यांना इयत्ता आठवीपर्यंत उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाची लाभ-हानी यासंदर्भात बर्‍याच चर्चा झडल्या होत्या. अखेर निर्णय विद्यार्थीभिमुख (?) असल्याचे सरकारमधील तज्ञांचे मत पडल्याने या निर्णयाची अंमलबजावणी चालू झाली. आता यामध्ये थोडासा पालट करून विद्यार्थ्यांची ढकलमपट्टी इयत्ता चौथीपर्यंतच करण्याचे सरकारच्या विचाराधीन असल्याची चर्चा आहे. अर्थात् असा निर्णय झाला, तरी तो प्रत्यक्षात येईपर्यंत अजून २ वर्षे जातील.

घरातील लादीची स्वच्छता (फरशीची साफसफाई)

१. तेलकट पदार्थ पडल्यास 
     ‘लादीवर तेलकट पदार्थ पडला असेल, तर तो सर्वप्रथम कोरड्या कापडाने टिपून घ्या, म्हणजे लादीवर पडलेले तेल किंवा तूप अन्यत्र पसरणार नाही. त्यानंतर छोट्याशा भांड्यात थोडेसे पाणी घेऊन त्यात ‘डिटर्जण्ट पावडर’ टाका. हे पाणी उकळवा. त्यानंतर त्यात कापड भिजवून त्याने लादी पुसा. सर्व तेलकट आणि तूपकट डाग सहज निघून जातील. त्यानंतर स्वच्छ पाण्याने पुन्हा एकदा लादी पुसा. लादी पूर्वीसारखी स्वच्छ आणि चकाकू लागेल.
२. चहाच्या डागावर उपाय 
२ अ. एका भांड्यात पाणी घ्या. त्यात थोडे मीठ टाका आणि त्या पाण्याने लादी पुसा. डाग निघून जातील आणि लादी स्वच्छ होईल.
२ आ. डाग सुकला असता काय कराल ? : स्वयंपाक खोलीतल्या लादीवर अनेकदा डाग आढळतात. भाजी चिरतांना भाजीचा रस लादीवर पडतो आणि तो डाग तसाच राहून जातो. तो डाग सुकल्यानंतर पाण्याने पुसला, तरीही निघत नाही. अशा वेळी ज्या भागावर डाग असेल, त्या भागावर थोडेसे स्पिरीट टाका आणि कापसाच्या बोळ्याने पुसा. डाग गेल्यावर तेवढा भाग पुन्हा पाण्याने पुसून घ्या.

सनातन संस्थेच्या वतीने राबवण्यात आलेल्या नवरात्र मोहिमेचा सोलापूर, कोल्हापूर, सांगली आणि पुणे या जिल्ह्यांचा आढावा

१. सोलापूर जिल्हा
१ अ. संपर्क : ‘सोलापूर जिल्ह्यात एकूण ४८ नवरात्र मंडळांना संपर्क केले.
१ आ. फ्लेक्स फलक आणि कापडी फलक यांद्वारे प्रबोधन
१. जिल्ह्यात धर्मशिक्षणाची माहिती देणारे ४६ फ्लेक्स फलक लावण्यात आले. ७ मंडळांनी २४ फ्लेक्स फलक स्वतः विकत घेऊन लावले. 
२. तुळजापूर येथे श्री भवानीदेवीच्या मंदिराच्या मार्गात आणि गावात प्रबोधनपर कापडी फलक लावून भाविकांचे स्वागत करण्यात आले.
३. सोलापूर येथे शिवप्रतिष्ठानच्या वतीने निघालेल्या दुर्गादौडीचे हिंदु जनजागृती समिती प्रणित ‘रणरागिणी’ शाखेच्या वतीने पारंपरिक पोशाखात ध्वजपूजन आणि औक्षण करून स्वागत केले. या वेळी कार्यकर्त्यांनी रणरागिणी शाखेचा फ्लेक्स फलक हातात घेतला होता.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर या कालावधीत देहली येथे झालेले प्रसारकार्य

१. नवरात्र मोहीम
१ अ. जिल्हाधिकार्‍यांना निवेदन : नोएडाच्या जिल्हाधिकार्‍यांना हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी नवरात्रीच्या काळात होणार्‍या अपप्रकारांविरुद्ध निवेदन दिले. या वेळी जिल्हाधिकार्‍यांनी समितीच्या या कार्याचे कौतुक केले. नवरात्रीच्या काळात होणार्‍या अपप्रकारांच्या विरोधात एका नवरात्रोत्सव मंडळाला निवेदन देण्यात आले.’
२. हिंदूसंघटन मेळावा 
     ‘देहली येथील लाजपतनगर येथे ‘श्री लक्ष्मी-नारायण सनातन धर्म मंदिरा’च्या सभागृहात २.१०.२०१६ या दिवशी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत हिंदूसंघटन मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात राष्ट्र आणि धर्म यांविषयीचे फ्लेक्स, ग्रंथ अन् सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते.
- सौ. तृप्ती जोशी (ऑक्टोबर २०१६)

सनातन संस्थेच्या वतीने २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर या कालावधीत देहली येथे झालेले अध्यात्मप्रसाराचे कार्य

१. समाजात श्राद्धाचे महत्त्व सांगण्यासाठी प्रवचनांचे आयोजन 
     ‘समाजातील श्राद्धाविषयीचे चुकीचे समज दूर व्हावेत आणि हिंदूंना श्राद्धाची अध्यात्मशास्त्रीय दृष्टीकोनातून माहिती व्हावी, यासाठी नोएडा येथील साधकांनी ११ ठिकाणी प्रवचने घेतली. या प्रवचनांचा अनेक जिज्ञासूंनी लाभ घेतला. यांमध्ये शाळेतील शिक्षक, मंदिरात येणारे भाविक आणि इतर यांचा समावेश होता. या प्रवचनांच्या माध्यमातून श्राद्धाविषयीचे शास्त्र सांगितले. यांमध्ये श्राद्धाविषयी जिज्ञासूंना असणार्‍या अनेक शंकांचेही निरसन करण्यात आले.
१ अ. क्षणचित्रे 
१. नोएडा येथील साधिका कु. किरण महतो हिने कोंडली निवासी संकुल पार्क येथे प्रवचनापूर्वी १० मिनिटे आलेल्या लोकांना श्राद्धाविषयीच्या प्रवचनाविषयी माहिती दिली. त्यामुळे तेथे पुष्कळ लोक जमले. त्यांपैकी काही लोकांनी या प्रवचनाच्या माध्यमातून चांगली माहिती मिळाली असल्याचे सांगितले.
२. नोएडा, उत्तर प्रदेश येथील एका शाळेत तेथील शिक्षकांसाठी श्राद्धाविषयीच्या प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रवचनामुळे या शाळेचे मुख्याध्यापक अतिशय प्रभावित झाले. त्यांनी साधकांना ७८ शाळांची सूची दिली, ज्यांमध्ये प्रवचनांचे आयोजन करता येऊ शकेल.

सनातन धर्म बुडवणे कोणाच्या हातचे नाही ! - स्वातंत्र्यवीर सावरकर

      सनातन धर्माविषयी वर्ष १९३० मधील एका लेखात स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात, ‘‘जुनी सर्व कर्मकांडे पालटली, तरी सनातन धर्म बुडणे शक्य नाही. सनातन धर्म बुडवणे मूठभर सुधारकांच्याच नव्हे, तर मनुष्यजातीच्याही हातचे नाही. जेव्हा आपण धर्म शब्दास ‘सनातन’ हे विशेषण लावतो, तेव्हा त्याचा अर्थ ईश्‍वर, जीव आणि जगत् यांच्या स्वरूपाविषयी अन् संबंधांविषयी विवरण करणारे शास्त्र आणि त्यांचे सिद्धांत अन् तत्त्वज्ञान असा असतो. आदिशक्तीचे स्वरूप, जगताचे आदिकारण आणि आदिनियम हे सनातन, शाश्‍वत आणि त्रिकालाबाधित आहेत. भगवद्गीतेत किंवा उपनिषदांत याविषयीचे जे सिद्धांत प्रकट केले आहेत, ते सनातन आहेत. ते पालटणे ही मनुष्यशक्तीच्या बाहेरची गोष्ट आहे. ते सिद्धांत आहेत आणि तसेच कायम रहाणार.’’

सनातनचे सर्व आश्रम आणि प्रसारसेवा यांमधील साधकांना भावविश्‍वात नेणारे रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील भावसत्संग !

श्री. यज्ञेश सावंत
‘       भाव तेथे देव’ ही उक्ती आपण ऐकलेली आहे. भाव स्वतःमध्ये निर्माण करणे कठीण आहे. दुसर्‍यामध्ये तो निर्माण करणे त्याहून कठीण आहे; तरीही ही किमया रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमात घेतल्या जाणार्‍या भावसत्संगात साध्य होते, याची अनुभूती आली. या भावसत्संगाचे वर्णन करणारा हा लेख. 
१. भावजागृतीचा प्रयोग 
      ‘गुरुमाऊली परात्पर गुरु डॉ. आठवले आपल्याला भेटण्यासाठी येणार आहेत’, हे ऐकल्यावर सर्व साधक पुष्कळ उत्सुकतेने आणि कृतज्ञताभावाने गुरुमाऊलीच्या येण्याची वाट पहात आहेत. ‘आता गुरुमाऊलींचे दर्शन होणार; म्हणून साधक त्यांच्या वाटेकडे डोळे लावून बसले आहेत. त्यांची कृपाप्राप्त व्हावी; म्हणून प्रार्थना करत आहेत आणि एवढ्यात निरोप मिळतो की, ते आता काही कारणामुळे येऊ शकणार नाहीत. हे कळल्याबरोबर साधकांना थोडे वाईट वाटले आहे.

पू. जयराम जोशी आणि पू. पद्माकर होनप यांचे वयस्कर साधकांना मौल्यवान अन् प्रेमळ मार्गदर्शन

पू. जयराम जोशी
पू. पद्माकर होनप
‘     १.११.२०१६ या दिवशी संध्याकाळी ६ ते ७ या कालावधीत पू. जोशीआजोबा आणि पू. होनपकाका यांनी वयस्कर साधकांना मार्गदर्शन केले आणि त्यांच्या प्रश्‍नांची उत्तरे दिली. या सत्संगाचा ३० साधकांनी लाभ घेतला.
१. पू. होनपकाका यांनी 
केलेले मार्गदर्शन 
अ. साधकांनी मनाविरुद्ध वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. 
आ. सतत ईश्‍वराच्या अनुसंधानात राहिले पाहिजे. 
इ. भाव वाढवण्यासाठी भावजागृतीचे प्रयत्न करावेत. कृष्णाच्या लीला आठवल्याने भावजागृती होते.
ई. सेवा करतांना नामजप करावा. त्या वेळी मनात विचार येत असतील, तर ते लिहून काढावेत. विचार येण्यामागील मूळ कारण शोधल्यास त्यातून आपले दोष लक्षात येतील. त्यावर स्वयंसूचना घ्याव्यात. स्वयंसूचना बनवण्यात अडचण असेल, तर इतरांचे साहाय्य घ्यावे.

गुरुदेवांचे महत्त्व, त्यांची कृपा होण्यासाठी करायच्या प्रयत्नांतील अडचणी आणि त्यांना सतत अनुभवता येण्यासाठी केलेली प्रार्थना यांविषयी साधकाने केलेले आत्मनिवेदन

श्री. कृष्ण आय्या
१. हिंदु राष्ट्र स्थापण्यासाठी भूतलावर अवतीर्ण 
झालेला श्रीहरि सर्वसामान्य जिवांचा उद्धारही करणार 
असल्याने साधक, निर्जीव वस्तू, झाडे आणि पशू-पक्षी 
त्याच्या दर्शनासाठी आतूर होऊन त्याची कृपा अनुभवत असणे
‘       हे प्रभो, आपण श्रीराम आणि श्रीकृष्ण होऊन जसे भूतलावर अवतरला, त्याचप्रमाणे आता हिंदु राष्ट्र स्थापण्यासाठी अवतीर्ण झाला आहात. श्रीहरीने या भूतलावर अवतार घेण्यामागे दैवी कार्यकारणभाव असतो. हा कार्यकारणभाव आम्हा साधकांना कळणे महाकठीणच आहे. मी जाणतो की, आपण हिंदु राष्ट्र स्थापन करणार असून सर्वसामान्य जिवांचा उद्धारही करणार आहात; म्हणूनच एवढे साधक आपल्या चरणी शरण येऊन आपल्या आश्रयाखाली साधना करत आहेत. हे भगवंता, निर्जीव वस्तू, झाडे आणि पशू-पक्षीही आपल्या दर्शनासाठी आतूर झाले असून आपली कृपा अनुभवत आहेत.

‘कर्नाटकातील साधकांप्रमाणे अन्य राज्यांतील साधकांनी प्रयत्न केल्यास लवकरच सनातन धर्म राज्याची स्थापना होईल’, असे सूचित करणारी कु. सर्वमंगला मेदी यांनी रेखाटलेली भावचित्रे !

कु. सर्वमंगला मेदी

ऋषिपंचमीच्या दिवशी प.पू. डॉक्टरांची आरती करतांना मिरज आश्रमातील साधकांना आलेल्या अनुभूती

     ‘६.९.२०१६ या दिवशी ऋषिपंचमीनिमित्त महर्षींनी प.पू. डॉक्टरांची आरती करायला सांगितली होती. त्या दिवशी मिरज आश्रमात पू. जयराम जोशीआबांना एका संतांनी दिलेले प.पू. गुरुदेवांचे छायाचित्र ध्यानमंदिरात ठेवले आणि त्याची आरती करण्यात केली. त्या दिवशी मिरज आश्रमातील साधकांना आलेल्या अनुभूती येथे देत आहोत.
१. ऋषिपंचमीच्या दिवशी आश्रमात दिवसभर महर्षींचे अस्तित्व जाणवणे 
     ‘ऋषिपंचमीच्या दिवशी महर्षींची आठवण येऊन ‘आपण आज त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करायला हवी’, असा विचार आला. त्यांचे अस्तित्व आश्रमात दिवसभर जाणवत होते. त्याच दिवशी गुरुमाऊलीची आरती करण्याचा निरोप आला आणि सर्वांच्या आनंदात अधिकच वाढ झाली.’ - कु. वैदेही पिंगळे, सनातन आश्रम, मिरज.

पाडव्याच्या शुभदिनी मिरज (सांगली) येथील श्री. रमेश वांडरे यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

श्री. रमेश वांडरे (डावीकडे) यांचा श्रीकृष्णाची
प्रतिमा देऊन सत्कार करतांना कु. वैदेही पिंगळे
कुटुंबियांना आधार देणारे आणि विविध 
गुणांचा समुच्चय असलेले श्री. रमेश वांडरे !
     मिरज, १ नोव्हेंबर (वार्ता.) - दिवाळी पाडव्याच्या आनंद द्विगुणित करत श्रीकृष्णाने मिरज केंद्राला आध्यात्मिक आनंद साजरा करण्याची पर्वणी उपलब्ध करून दिली. मिरज येथील फुलांच्या हारांचा व्यवसाय करणारे श्री. रमेश आण्णाप्पा वांडरे (वय ४४ वर्षे) यांनी पाडव्याच्या दिवशी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे ६५ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या साधिका कु. वैदेही पिंगळे (वय २१ वर्षे) यांनी घोषित केले. कु. वैदेही पिंगळे यांच्या हस्ते श्रीकृष्णाची प्रतिमा भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. श्री. रमेश यांचा मुलगा कु. अजिंक्य हा सनातन संस्थेच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात पूर्णवेळ सेवा करतो. या वेळी त्यांची पत्नी सौ. कांता, मुलगी कु. ऐश्‍वर्या, तसेच मिरज केंद्रातील साधक उपस्थित होते.

गुरूंनी धर्मप्रसारासाठी दिलेल्या वस्तूविषयी अत्युच्च भाव असलेले श्री. शशिकांत टोणपे !

श्री. शशिकांत टोणपे
     ‘दादा (श्री. शशिकांत गजेंद्र टोणपे) सनातन संस्थेच्या संपर्कात आल्यानंतरच्या दिवाळीला त्याने घरी सनातन संस्थेचा आकाशकंदील लावला होता. तेव्हा मी त्याला म्हटले, ‘‘हा अजिबातच सजावट नसलेला आकाशकंदील आहे. यावर केवळ हिंदूंचे लिहिलेले आहे. लोक काय म्हणतील ?’’ तेव्हा तो म्हणाला, ‘‘भविष्यात घरोघरी हेच आकाशकंदील लावले जातील. आता शेजारच्यांचे नक्षीदार आणि रंगीबेरंगी आकाशकंदील पाहू नको. पुढे तेही हाच आकाशकंदील लावतील.’’ खरंच आता असे चित्र दिसू लागले आहे.’
- कु. सुप्रिया गजेंद्र टोणपे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. 
देवाच्या अनुसंधानात २४ घंटे रहाता येण्यासाठी आत्मनिवेदन करणारी ५५ टक्के आध्यात्मिक पातळीची आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली कु. मानसी प्रभु (वय १५ वर्षे)!

उच्चलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु 
राष्ट्र चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. मानसी प्रभु ही एक दैवी बालक आहे !
कु. मानसी प्रभु 
कु. मानसी प्रभु हिला वाढदिवसानिमित्त 
सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
१. साधिकेने देवाला तिची प्रगती करवून घेण्याविषयी सांगितल्यावर त्याने स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनासाठीचे औषध दिले असल्याचे सांगणे 
     ‘एकदा माझे देवाशी पुढीलप्रमाणे बोलणे झाले.
मी : देवा, तू आमच्यासाठी किती करतोस. मी काहीच करत नाही. देवा, मी अजून पहिल्याच टप्प्यात आहे. मला आता पुढे पुढे जायचे आहे. मी आता तुझ्या दारी आध्यात्मिक रुग्ण म्हणून उभी आहे. मला कर्तेपणा घेणे, बहिर्मुखता, स्वीकारण्याची वृत्ती नसणे, इतरांचा विचार न करणे आणि नकारात्मकता या रोगांसाठी (दोषांसाठी) औषध हवे आहे.

शारीरिक सेवेनंतर पाय दुखत असतांना नामजपाला बसल्यावर बाळकृष्णाने हात धरून धावत एका संतांच्या खोलीत घेऊन जाणे आणि त्यांच्या चरणांवर नतमस्तक झाल्यावर आलेला सर्व थकवा निघून जाऊन पुष्कळ बरे वाटणे

सौ. चारूलता नखाते
‘      शारीरिक सेवा झाल्यानंतर पाय पुष्कळ दुखत असतांना नामजपाला बसल्यावर मला पुढील दृश्य दिसते, ‘बाळकृष्णाने माझा हात धरला आहे. तो मला धावतच प.पू. डॉक्टरांच्या खोलीच्या दिशेने नेत आहे. (प्रत्यक्षात माझा एक पाय अधू असल्याने मला धावता येत नाही.) खोलीत गेल्यावर प.पू. डॉक्टरांकडे पहात असतांना समवेत असलेला बाळकृष्ण अंतर्धान पावतो. त्याच वेळी प.पू. डॉक्टर गोड स्मित करतात. त्यानंतर मी त्यांच्या चरणांवर नतमस्तक होते.’ हे दृश्य दिसल्यावर मला आलेला सर्व थकवा निघून जातो आणि मला पुष्कळ बरे वाटते. अशी अनुभूती देेेवाच्या कृपेने अनेकदा घेता आली.’ 
- सौ. चारूलता नखाते, ठाणे (३०.१०.२०१६)

साधकाच्या दृष्टीने घड्याळाचा अर्थ

१. अस्थिर (चंचल) मनाचे प्रतीक म्हणजे मिनिट काटा.
२. या मनरूपी घड्याळाला सतत उत्साहित (चार्ज) ठेवणारा गुरुकृपायोगानुसार साधनारूपी ‘सेल’ हवा.
३. प्रत्येक तासरूपी अंक म्हणजे वेगवेगळ्या रूपामध्ये उभा असलेला आणि दर्शन देण्यास वाट पहाणारा भगवंत.
४. नामरूपी चैतन्याचे वलय २४ घंटे कार्यरत होईल, त्या वेळी खर्‍या अर्थाने दिवस आनंदी होईल.
- कु. चित्रा महामुनी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (७.४.२०१६)

॥ हरि ॐ तत्सत् ॥

सनातनचे श्रद्धास्थान
संत भक्तराज महाराज
आश्रमाविषयीचा दृष्टीकोन आश्रम माझा नाही; पण मी आश्रमाचा आहे.
भावार्थ : आश्रम माझा नाही म्हणजे आश्रमावर माझे स्वामित्व (मालकी) किंवा अधिकार (हक्क) नाही; कारण तो गुरूंचा आहे. मी आश्रमाचा आहे म्हणजे मी गुरूंच्या आश्रमाचा असल्याने आश्रमाची, आश्रमात आलेल्यांची काळजी घेणार आणि सेवा करणार. या दृष्टीकोनामुळेच आश्रमातील कामे करूनही आश्रमाविषयी प्रेम निर्माण होत नाही, तर प्रीती निर्माण होते.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन ‘संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
   ‘जनतेला राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी न बनवता भारतात लोकशाही पद्धत राबवणार्‍या शासनकर्त्यांमुळे देश पराकोटीच्या अधोगतीला गेला आहे.’ - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

बोधचित्र


साधकांची क्षमता लक्षात घेऊन त्यांना सेवा आणि व्यष्टी साधनेचे प्रयत्न यांविषयी सांगावे !

     ‘प्रत्येक साधकाची क्षमता अल्प-अधिक असते. त्या क्षमतेचा अभ्यास करूनच उत्तरदायी साधकांनी सेवा आणि व्यष्टी साधनेचे प्रयत्न यांविषयी साधकांना सांगायला हवे. साधकाची क्षमता लक्षात न घेता अल्प क्षमतेच्या साधकांना त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त सूत्रे सांगितल्यास ताण येऊन ते नकारात्मक स्थितीत जातात. क्षमता लक्षात न घेता साधकांना सूत्रे सांगितल्यास साधक दुरावले जातात. ‘आनंदप्राप्ती’ हा सेवेचा मूळ उद्देश आहे’, हे लक्षात ठेवावे. 
     वरील सूत्र लक्षात घेऊन क्षमता अधिक असलेल्या साधकांना सेवेविषयीची सर्व सूत्रे एकाच वेळी सांगावीत. ज्यांची क्षमता अल्प आहे, अशा साधकांना एकाच वेळी सर्व सूत्रे न सांगता ती टप्प्याटप्प्याने सांगावीत.’
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

गुरुराया, अखंड प्रार्थना तव चरणासी ।

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...
परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले
‘     प्रत्येक गोष्ट भगवंताच्याच हातात आहे, तर ‘आपल्या मनात त्याची सतत आठवण रहावी’, हेसुद्धा केवळ त्याची कृपा असल्यासच घडू शकते. ही गोष्ट माझ्या लक्षात आल्यावर देवानेच मला पुढील काव्यपंक्ती सुचवल्या.
गुरुराया, 
मनी असू द्यावी अखंड आपली आठवण ।
चित्ती असू द्यावी कृतज्ञता-पुष्पांची साठवण ॥ १ ॥

चित्तामधील पुसले जावे भूतकाळातील चुकांचे व्रण ।
चारही देहांची शुद्धी करून पवित्र करावे अंतःकरण ॥ २ ॥
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. 
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

कुळाचाराचे पालन करा !
ईश्‍वरावर श्रद्धा ठेवा. घरातील वातावरण आधुनिक असले, 
तरी देवघर असावे. कुळधर्म-कुळाचार यांचे पालन करा. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

राष्ट्र आणि विश्‍व यांच्या उत्कर्षाकरिता समर्पित व्हा !

गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी 
      ‘साड्या, सोफासेट, टी.व्ही., गाडी यातच गुदमरून एक दिवस जीवनयात्रा संपवायची नाही. समाज आणि धर्म यांचे काही कर्तव्य आणि ऋण आहे. प्रत्येकानेच ते बजावले पाहिजे. उपेक्षिले तर सर्वनाश अटळ आहे. धर्माकरिता समर्पित झाले पाहिजे. सर्वस्व वाहिले पाहिजे. त्यातच त्याचा, तसेच राष्ट्र आणि विश्‍व यांचाही उत्कर्ष आहे. कल्याण आहे आणि मुक्तीही ! धर्माकरिता बाजी लावण्याचा आजचा प्रसंग आहे. धर्माकरिता जीवन वेचण्याचा हा काळ आहे.’ 
- गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी


भगदाडे असणारी कारागृहे !

संपादकीय
       भारत देश ही एक धर्मशाळा झाली आहे, अशी प्रतिक्रिया सामान्य जनतेकडून नेहमीच व्यक्त केली जाते. या देशात कोणीही कधी अवैधपणे येऊ शकतो आणि या देशातून अवैधपणे बाहेरही जाऊ शकतो. भारतातील घुसखोरीच्या संदर्भात आणि भारतात गुन्हे करून परदेशात पळून जाण्याच्या संदर्भात विशेष करून अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जाते; मात्र आता कारागृहांच्या संदर्भातपण अशीच काहीशी प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागली आहे. त्यातही ३१ ऑक्टोबरला मध्यप्रदेशाची राजधानी असलेल्या भोपाळमधील मध्यवर्ती कारागृहातून सिमी या बंदी घालण्यात आलेल्या इस्लामी आतंकवादी संघटनेचे ८ आतंकवादी पळून गेल्याच्या घटनेवरून त्याला अधिक बळकटी मिळत आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn