Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

पाकच्या गोळीबारात ८ नागरिक ठार, तर २२ जण घायाळ !

पाकचा गोळीबार हे एक छुपे युद्धच आहे, हे भारत सरकारला कधी कळणार आणि त्याला तशाच पद्धतीने उत्तर कधी दिले जाणार ? सैनिक आणि नागरिक ठार होऊ देणारे सरकार जनतेला कधीतरी आपले वाटेल का ? 
     श्रीनगर - काश्मीर सीमेवर पाककडून सातत्याने गोळीबार चालूच आहे. आता पाकने भारतीय सैन्याच्या चौक्यांव्यतिरिक्त रहिवाशी भागांना लक्ष्य केले आहे. १ नोव्हेंबरला करण्यात आलेल्या गोळीबारात ८ नागरिक ठार झाले, तर २२ जण घायाळ झाले आहेत. मरणार्‍यांमध्ये ३ महिला आहेत. काश्मीरच्या सांबा आणि राजौरी येथे हा गोळीबार करण्यात आला. यामुळे येथील नागरिकांना येथून हलवण्यात आले आहे. (भारताला आता इस्रायलप्रमाणेच राज्यकर्ते हवेत, हेच पाकविषयी बोटचेपी भूमिका घेणार्‍या सरकारच्या धोरणावरून वाटत आहे ! - संपादक) 

बांगलादेशमध्ये धर्मांधाकडून ५ वर्षीय हिंदु बालिकेवर पाशवी बलात्कार आणि अमानुष छळ !

बांगलादेशातील असुरक्षित हिंदू ! 
भारतातील हिंदूंचेच संरक्षण कोणतेही सरकार आणि मोठ्या हिंदुत्वनिष्ठ संघटना करत नाही, तेथे मुसलमानबहुल देशातील हिंदूंचे संरक्षण कोण करणार ? ही स्थिती पालटण्यासाठी हिंदूंनी संघटित होऊन हिंदु राष्ट्र स्थापन करण्याला पर्याय नाही ! 
     ढाका - बांगलादेशच्या पार्वतीपूर येथे सैफुल इस्लाम नावाच्या ४२ वर्षीय धर्मांधाने एका ५ वर्षीय हिंदु बालिकेवर पाशवी बलात्कार केला, तसेच या बलात्कारी धर्मांधाने त्या बालिकेचे गुप्तांग फाडून टाकले आणि तिच्या गुप्त भागावर सिगारेटचे चटके दिले. या जिहाद्याने या बालिकेला १८ घंटे खोलीत बंद करून ठेवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले, तसेच तिचा गाल, गळा, हात आणि पाय यांवर धारदार हत्याराने घाव घातले. तसेच तिच्या संपूर्ण अंगाचे चावे घेतले. ती मुलगी आता मरणार असे लक्षात आल्याने त्या धर्मांधाने त्या मुलीला जवळच्या एका शेतात फेकून दिले. (भारतात अल्पसंख्यांकांवर अत्याचाराची एखादी घटना घडली की, येथील बुद्धीवादी, पुरो(अधो)गामी भारतातील असहिष्णुतेविषयी जगभर ओरड मारतात; मात्र या बुद्धीवाद्यांना शेजारच्या राष्ट्रांमधील धर्मांधांची असहिष्णुता दिसत नाही ! - संपादक) 

भोपाळ येथील मध्यवर्ती कारागृहातून फरार झालेले सिमीचे ८ आतंकवादी चकमकीत ठार !

मध्यवर्ती कारागृहातून आतंकवादी फरार होतात, हे मध्यप्रदेशातील सरकारला 
लज्जास्पद होय ! तसेच आतंकवाद्यांना पोसल्यामुळे अशा घटना घडत असल्याने 
त्यांना न्यायालयाने फाशीचीच शिक्षा द्यायला हवी, अशी जनतेची मागणी राहील !
      भोपाळ - ३० ऑक्टोबरला रात्री येथील मध्यवर्ती कारागृहातील पहारेदाराची हत्या करून फरार झालेल्या सिमीच्या आठही आतंकवाद्यांना चकमकीत ठार मारण्यात आले आहे. भोपाळ शहराला लागून असलेल्या ईनखेडी गावात पोलिसांनी या आतंकवाद्यांना घेरले आणि ठार केले. चकमकीत ठार झालेल्या आतंकवाद्यांची नावे मुजीब शेख, माजिद, खालिद, खिलची, जाकीर, सलीम, महबूब आणि अमजद अशी आहेत. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी या घटनेची राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून (‘एन्आयए’कडून) चौकशी करण्याचा आदेश दिला आहे. भोपाळ मध्यवर्ती कारागृहाच्या बी ब्लॉकमध्ये या आतंकवाद्यांना ठेवण्यात आले होते. बराक तोडल्यानंतर त्यांनी प्रथम मुख्य पहारेदार रामाशंकर यांची गळा चिरून हत्या केली. त्यानंतर चादरीचा दोरीसारखा वापर करून या सर्वांनी कारागृहाच्या भिंतीवरून उडी मारली. फरार होण्याआधी त्यांनी चंदन नावाच्या एका पोलिसाचेही हात-पाय बांधून ठेवले. या प्रकरणी सरकारने कारागृहाच्या ४ अधिकार्‍यांना निलंबित केले आहे.

बांगलादेशमध्ये हिंदु मुलीचे अपहरण आणि बळजोरीने धर्मांतर !

बांगलादेशातील असुरक्षित हिंदू ! 
     ढाका - बांगलादेशमधील नरसिंग्डी जिल्ह्यातील मधाबब्दी गावात १० ऑक्टोबर या दिवशी क्षिप्रा राणी मोंडल या २२ वर्षीय हिंदु मुलीचे ३ धर्मांध युवकांनी अपहरण करून तिचे इस्लाम धर्मात बळजोरीने धर्मांतर केले. मुलीचा आणि आरोपींचा शोध लावण्यात पोलिसांना अपयश आले आहे. राजू अहमद, जमातउल्लाह आणि अबू बाकर अशी अपहरणकर्त्यांची नावे आहेत. 

मल्लप्पुरम् (केरळ) येथील न्यायालयाच्या आवारात स्फोट !

सत्ताधारी साम्यवाद्यांच्या राज्यात जिहादी आतंकवाद्यांना पूर्णपणे मोकळीक मिळत आहे ! केंद्र सरकारने केरळमधील हा आतंकवाद मोडून काढला पाहिजे ! स्फोटाच्या ठिकाणी लादेनचे छायाचित्र असलेली पत्रके सापडली ! 
     मलप्पुरम् (केरळ) - केरळमधील मलप्पुरम् येथे जिल्हा सत्र न्यायालयाच्या वाहनतळाच्या आवारात दुपारी १ वाजण्याच्या सुमारास वैद्यकीय अधिकार्‍याच्या गाडीत स्फोट झाला आहे. स्फोट झाला, त्या वेळी गाडीत कोणीही नव्हते. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही; मात्र ३ गाड्यांची हानी झाली आहे. स्फोट झालेल्या गाडीच्या मागच्या बाजूस जेवणाच्या डब्यात (टिफिनमध्ये) हा स्फोट घडवण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे. पोलिसांना घटनास्थळी बॅटरी, वायर, पेन ड्राईव्ह आणि पत्रके आढळली आहेत. यातील पत्रकांवर ओसामा बिन लादेनचे छायाचित्र आहे, तसेच या पत्रकात देशभरात मानवीहक्कांचे उल्लंघन होत असल्याचे म्हटले आहे. गोमांस बाळगल्याच्या संशयावरून हत्या झालेले दादरी (उत्तरप्रदेश) येथील महंमद अखलाक याचाही या पत्रकामध्ये उल्लेख करण्यात आला आहे. जूनमध्ये कोल्लम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातही अशाच स्वरूपाचा स्फोट झाला होता.

बांगलादेशमध्ये इस्लामविषयीच्या कथित आक्षेपार्ह फेसबूक पोस्टमुळे हिंदूंच्या १५ मंदिरांची तोडफोड !

  • बांगलादेशातील हिंदूंचे रक्षण मोठा भाऊ असणारा भारत कधी करणार ? बलुचिस्तानच्या नागरिकांची काळजी करणार्‍या सरकारने इस्लामी देशांतील हिंदूंचीही काळजी करावी !
  • जगभरात कोठेही इस्लामचा अनादर झाल्याची भावना निर्माण झाली की, लगेच कायदा हातात घेण्यात येतो, तरीही त्यांना कोणीही असहिष्णु म्हणत नाही कि त्यांना वैध मार्गाने आंदोलन करण्याचा सल्ला देत नाही; मात्र हिंदूंनी वैध मार्गानेही देवतांच्या विडंबनाचा विरोध केला, तरी त्यांना सनातनी म्हणून हिणवले जाते !
  • १५० हून अधिक हिंदू घायाळ 
  • २०० घरे आणि ८ दुकाने जाळली
     ढाका - फेसबूकवर इस्लामविषयी कथित आक्षेपार्ह पोस्ट सर्वत्र प्रसारित झाल्यावर धर्मांधांनी त्याचा राग हिंदूंवर काढला. 
      ३० ऑक्टोबरच्या रात्री नसरीननगर येथील ब्राह्मणबाडिया विभागात शेकडो धर्मांधांनी हिंदूंच्या वस्तीवर आक्रमण करून येथील १५ मंदिरांची तोडफोड केली. तसेच २०० घरे आणि ८ दुकाने लुटून जाळण्यात आली. यात १५० हून अधिक हिंदू घायाळ झाल्याचे हिंदूंनी सांगितलेे. घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी पोलिसांनी ५०० जणांच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट केला असून ९ जणांना अटक करण्यात आली आहे. या पोस्टप्रकरणी पोलिसांनी रसराज दास या २७ वर्षीय युवकाला अटक केली आहे. रसराज याने काबा येथील ‘अल मशीद अल हराम’ या मशिदीमध्ये हिंदु देवतेचे चित्र दाखवल्याचा त्याच्यावर आरोप आहे. दास याने या प्रकरणी क्षमा मागितली असून ‘कोणीतरी त्याच्या फेसबूक पानावर हे चित्र पोस्ट केले’, असा दावा त्याने केला आहे.

अलीगड (उत्तरप्रदेश) येथे गोवर्धन पूजेसाठी जाणार्‍या महिलांची धर्मांधांनी छेड काढल्यावर हिंसाचार !

  • धर्मांधांकडून पोलिसांवर गोळीबार ! 
  • ६ जण घायाळ 
उत्तरप्रदेशात समाजवादी पक्षाच्या सरकारच्या गेल्या ४ वर्षांच्या काळात हिंदूंची स्थिती दयनीय होऊ लागली आहे. देशातील सर्वाधिक दंगली येथे झाल्या आहेत. उत्तरप्रदेश दुसरे काश्मीर बनत चालले आहे. समाजवादी पक्षाला सत्तेत बसवल्याची शिक्षाच हिंदूंना आज भोगावी लागत आहे ! 
     अलीगड (उत्तरप्रदेश) - येथील बाबरी मंडी भागात दाऊजी मंदिरात गोवर्धन पूजेसाठी जात असलेल्या महिलांवर अश्‍लील शेरेबाजी केल्यानंतर त्याला करण्यात आलेल्या विरोधामुळे झालेल्या हिंसाचारात ३ महिलांसह एकूण ६ जण घायाळ झाले. या वेळी धर्मांध आणि पोलीस यांच्यात गोळीबाराच्या फैरी झाडण्यात आल्या, तर काही ठिकाणी दगडफेक करण्यात आली. पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या आणि रबरी गोळ्याही झाडल्या, तसेच लाठीमारही केला. जवळपास एक घंटा हा हिंसाचार चालू होता. ही घटना ३१ ऑक्टोबरला रात्री ८ नंतर घडली. सध्या येथे तणाव असून पोलीसदल तैनात करण्यात आले आहे.

हॉक एअरक्राफ्ट्सचे इंजिन घेण्याच्या कंत्राटामध्ये दलालाला मिळाली ८२ कोटी रुपयांची लाच !

काँग्रेसच्या काळापासून चालत असलेला संरक्षणखात्यातील भ्रष्टाचार अद्यापही थांबलेला नाही, असे म्हणावे लागत आहे ! ही स्थिती हिंदु राष्ट्रातच पालटली जाईल ! 
     नवी देहली - भारतीय वायूदलामध्ये वापरण्यात येणार्‍या हॉक एअरक्राफ्ट्सचे इंजिन पुरवण्याचे कंत्राट मिळवण्यासाठी ८२ कोटी रुपयांची लाच देण्यात आली, असे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. शस्त्रास्त्रांचे वितरक सुधीर चौधरी यांना ही लाच देण्यात आल्याचे यात म्हटले आहे. लंडनमध्ये रहात असलेले चौधरी यांच्यावर यापूर्वीही दलाली घेतल्याचा आरोप झाल्यामुळे भारत सरकारने त्यांचे नाव काळ्या सूचीत घातले आहे. (लाचखोरांवर वरवरची कारवाई करण्याऐवजी वेळीच कठोर कारवाई केली असती, तर त्यांनी पुन्हा असे कृत्य करण्याचे धाडस केले नसते ! - संपादक)

बांगलादेशमध्ये धर्मांधाकडून हिंदू महिलेवर बलात्कार !

बांगलादेशमध्ये असुरक्षित हिंदू !
       ढाका - बांगलादेशच्या बगेर्‍हाट जिल्ह्यातील मोलार्‍हाट येथ महंमद सोभान नावाच्या धर्मांधाने एका ३५ वर्षीय हिंदु महिलेवर घरात घुसून बलात्कार केला. सदर महिलेच्या पतीने विरोध करण्याचा प्रयत्न केला असता धर्मांधाने तलवारीने त्याच्यावर वार केला. तेव्हा पतीच्या रक्षणार्थ पुढे आलेल्या पत्नीला तो वार लागला आणि तिचा उजवा पाय कापला गेला. त्या महिलेला गंभीर स्थितीत रुग्णालयात दाखल करण्यात आले. याविषयी पोलिसात तक्रार केली असता पोलिसांनी चुकीच्या कलमाखाली तक्रार दाखल करून घेतली. हिंदु कुटुंबावरील या अत्याचाराविषयीचे वृत्त कळताच ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’चे कार्यकर्ते रविंद्रनाथ बराल आणि अमरेश गेन यांनी पीडित कुटुंबाला भेट देऊन त्यांच्याशी चर्चा केली. पीडित महिलेला तातडीने वैद्यकीय सेवा पुरवण्यात यावी, त्यांना आर्थिक आणि कायदेशीर साहाय्य पुरवण्यात यावे. तसेच आरोपीला तातडीने अटक करावी, अशी मागणी ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’ ने केली आहे.श्रीराम सेनेच्या खानापूर तालुक्यातील २९ कार्यकर्त्यांची निर्दोष सुटका !

निरपराध हिंदुत्वनिष्ठांना नाहक अटक करून त्यांच्यावर खोटे गुन्हे प्रविष्ट 
करणार्‍या पोलिसांवर कर्नाटकातील काँग्रेस सरकार कारवाई करणार का? या 
निर्दोष हिंदुत्वनिष्ठांना शासनाने हानीभरपाई दिली पाहिजे, अशी हिंदूंची मागणी आहे !
लोंढा आणि खानापूर येथे धर्मांधांनी घडवलेल्या दंगलीचे प्रकरण
      खानापूर (जिल्हा कर्नाटक) - २१ आणि २२ ऑक्टोबर २०१५ या दिवशी धर्मांधांनी घडवलेल्या दंगलीच्या प्रकरणातील ९ वेगवेगळ्या खटल्यांतून श्रीराम सेनेच्या खानापूर तालुक्यातील २९ कार्यकर्त्यांची येथील न्यायालयाकडून नुकतीच निर्दोष सुटका करण्यात आली. 
      २१ ऑक्टोबरच्या २०१५ या दिवशी खानापूर तालुक्यातील लोंढा येथे श्रीराम सेनेच्या वतीने धर्मजागरण सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत एका वक्त्याच्या भाषणाच्या वेळी सुमारे २०० धर्मांधांनी दगडफेक चालू केली होती. भाषणाच्या वेळी हातात तलवारी आणि काठ्या घेऊन सुमारे २०० धर्मांधांनी दगडफेक केली. या आक्रमणात २ धर्माभिमानी घायाळ झाले होते. या वेळी धर्मांधांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि अन्य राष्ट्रपुरुष यांचे चित्र असलेले फलक, तसेच श्रीराम सनेचे फलक फाडून त्यांची नासधूस केली होती. या प्रकरणी २२ ऑक्टोबर २०१५ या दिवशी खानापूर येथे श्रीराम सेनेच्या वतीने निषेध करण्यात आला होता. या वेळीही धर्मांधांनी दगडफेक केली होती. त्यात वाहनांचीही मोठ्या प्रमाणात हानी झाली होती.

मुसलमानच कारागृहातून कसे पळतात, हिंदू का पळत नाहीत ? - (मौलाना) दिग्विजय सिंह यांचा प्रश्‍न

     प्रत्येक वेळी जगभरातील आतंकवादी आक्रमणे मुसलमानच कसे करतात ?, आतंकवाद्यांना धर्म नसतो, तरीही पकडलेले सर्व आतंकवादी मुसलमान कसे असतात ?, हिंदु धर्मामध्ये वसुधैव कुटुम्बकम् (अर्थ : संपूर्ण पृथ्वी हेच कुटुंब आहे.) सांगितलेले असतांना मुसलमानांमध्ये मूर्तीपूजकांना काफीर का म्हटले जाते ?, त्यांना पराभूत करून त्यांच्या बायकांना गुलाम बनवण्यास का सांगितले जाते ? असे प्रश्‍न दिग्विजय सिंह यांना कधीच का पडत नाहीत ? 
     भोपाळ - ३० ऑक्टोबरला रात्री भोपाळ येथील मध्यवर्ती कारागृहातून पळालेल्या सिमीच्या ८ आतंकवाद्यांना पोलिसांनी चकमकीत ठार केल्यानंतर काँग्रेसी आतंकवादप्रेमींनी आता ऊर बडवत मातम (दुःख करणे) करायला प्रारंभ केला आहे. काँग्रेसचे सरचिटणीस (मौलाना) दिग्विजय सिंह यांनी या चकमकीवर ३१ ऑक्टोबरला प्रश्‍न उपस्थित केल्यावर १ नोव्हेंबरला पुन्हा एकदा प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. प्रत्येक वेळी कारागृहातून केवळ मुसलमान कैदीच कसे पळून जातात, हिंदू का पळत नाहीत?, असा प्रश्‍न सिंह यांनी उपस्थित केला आहे.

आतंकवादी कोठेही सापडले, तरी त्यांना गोळ्या घालून ठारच केले पाहिजे ! - भाजपचे खासदार साक्षी महाराज यांची मागणी

साक्षी महाराजांसारखी भूमिका देशातील प्रत्येक लोकप्रतिनिधी का मांडू 
शकत नाही कि त्यांना जनतेपेक्षा आतंकवाद्यांविषयी अधिक सहानुभूती आहे ?
     नवी देहली - भोपाळ येथे कारागृहातून पळून गेलेल्या आतंकवाद्यांना ठार केल्यावरून जे लोक प्रश्‍न उपस्थित करत आहेत, ते वास्तविक मुसलमानांच्या लांगूलचालनाचा प्रयत्न करत आहेत. मी पंतप्रधान मोदी यांना आग्रह करतो की, आतंकवादी कोठेही सापडला, तरी त्याला भर चौकात उभा करून गोळ्या घालून ठार केले पाहिजे. आतंकवाद्यांना कारागृहात ठेवून खाऊपिऊ घालण्याचे आता दिवस राहिलेले नाहीत, असे परखड मत भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी व्यक्त केले आहे.
      साक्षी महाराज पुढे म्हणाले की, ‘एकीकडे आतंकवाद्यांना धर्म नसतो’, असे म्हणतात आणि दुसरीकडे त्यांना ठार केले की, त्यांचा विलाप चालू होतो. मग ते दिग्विजय सिंह असो कि केजरीवाल असो, असे वाटते की हे सिमीसारख्या संघटनांचे जनकच आहेत.

पणजी शहरात रात्री उशिरापर्यंत नरकासुर प्रतिमांच्या शेजारी कर्कश संगीत वाजवणार्‍यांवर पोलिसांची कारवाई : ४० हून अधिक संगीत उपकरणे जप्त !

अपप्रकार रोखण्यासाठी कृती करणारी पणजी महानगरपालिका आणि पोलीस यांचे अभिनंदन !
      पणजी, १ नोव्हेंबर (वार्ता.) - नरकासुर प्रतिमांच्या बाजूला रात्री उशिरापर्यंत कानठळ्या बसवणारे कर्कश आवाजातील संगीत वाजवणार्‍यांवर पणजी पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी ४० पेक्षा अधिक संगीत उपकरणे कह्यात घेतली. दुसर्‍या दिवशी आयोजकांना समज देऊन ही उपकरणे परत देण्यात आली, असे वृत्त दैनिक गोमन्तकने प्रसिद्ध केले आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे रात्री अशा संगीत वाजवण्याच्या प्रकारावर काही अंशी नियंत्रण आले. गेली अनेक वर्षे असे अपप्रकार चालू असतांना पहिल्यांदाच अशा पद्धतीने पोलिसांनी कारवाई केली आहे. (गेली अनेक वर्षे सनातनने नरकचतुर्दशीच्या पूर्वसंध्येला होणार्‍या अपप्रकारांच्या विरोधात वैध मार्गाने आवाज उठवला; मात्र सरकारने या अपप्रकाराकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे अपप्रकारांमध्ये वाढ होऊन आता ते असह्य झाले आहेत. यातून पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणांवर ताण येत आहे. शासनाने केलेल्या या कारवाईला उशिरा सुचलेले शहाणपण म्हणावे लागेल ! - संपादक)

ठाणे, कल्याण आणि पुणे येथे फटाक्यांमुळे आग लागली !

फटाक्यांमुळे आग लागण्याचे प्रकार सर्रास 
घडत असून शासनाने जनहितार्थ फटाक्यांवर बंदी घालावी ! 
     ठाणे / पुणे - दिवाळीच्या फटाक्यांमुळे आग लागण्याच्या वेगवेगळ्या घटना ठाणे, कल्याण आणि पुणे परिसरामध्ये घडल्या आहेत. यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नसली, तरी मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. 
 ठाणे आणि कल्याण 
     ठाण्यातील यशोधन नगर येथील श्री आई माता मंदिर येथील एम्एस्ईडीसीच्या मोठ्या केबल असलेल्या परिसरात आग लागली. कल्याणमधील शिळफाटा परिसरातील लाकडाचे गोदाम आणि खडकपाडा परिसरातील संदीप हॉटेल शेजारच्या गॅरेज यांनाही आग लागली होती. दिवाळीच्या फटाक्यांमुळे हे अपघात घडल्याचे प्राथमिक अंदाज अग्नीशमन दल आणि महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाने व्यक्त केले आहेत. 

हिंदु धर्माची पताका सातासमुद्रापार नेणारे स्वामी विवेकानंद यांना समाजवादी ठरवू पहाणारे विचारवंत दत्तप्रसाद दाभोलकर म्हणतात, 'स्वामी विवेकानंद प्रखर समाजवादी विचारसरणीचे होते !'

     सातारा, १ नोव्हेंबर (वार्ता.) - 'विज्ञान आणि धर्म कार्यकारणभाव मानतो. त्यामध्ये चमत्काराला स्थान नाही. चमत्कार हे सत्यप्राप्तीच्या मार्गातील खरे अडथळे आहेत. अवकाशात फिरणारे गोळे माणसाचे जीवन पालटू शकत नाहीत. समाजवादाने गरीब आणि दलित यांनाही शिक्षण मिळून त्यांचा आर्थिक स्तर उंचावेल, असे सांगणारे स्वामी विवेकानंद हे प्रखर समाजवादी विचारसरणीचे होते', असे प्रतिपादन विचारवंत दत्तप्रसाद दाभोलकर यांनी केले. (स्वामी विवेकानंद यांनी सातासमुद्रापलीकडे सनातन हिंदु धर्माचे श्रेष्ठत्व पाश्‍चात्त्यांसमोर प्रभावीपणे आणि समर्थपणे मांडले. भावभक्तीच्या जोरावर जोरावर देश-विदेशात हिंदु धर्माचे तेज पसरवण्याचे कार्य स्वामी विवेकानंद यांनी केले, हे सत्य असतांना समाजाची अशी वैचारिक दिशाभूल करून दाभोलकर हे स्वामी विवेकानंद यांची ‘समाजवादी विवेकानंद’ अशी प्रतिमा बनवण्याचा प्रयत्न करत आहेत ! - संपादक) खटाव (जिल्हा सातारा) येथे अंबाबाई टेक परिसरात पत्रकार एम्.आर्. शिंदे यांच्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित ‘समाजवादी विवेकानंद’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. 

डॉ. झाकीर नाईक यांच्या संस्थेची नोंदणी रहित होण्याची शक्यता !

     नवी देहली - डॉ. झाकीर नाईक यांच्या ‘'इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन'’ या संस्थेची नोंदणी रहित केली जाण्याची माहिती समोर येत आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने परदेशातून मिळणार्‍या पैशांविषयी कारवाई चालू केली आहे. ज्या कामांसाठी या संस्थेला पैसे मिळत होते, ते काम या संस्थेकडून होत नव्हते, असे चौकशीतून समोर आले आहे. त्यामुळे या संस्थेची नोंदणी रहित होण्याची शक्यता आहे. (अंधश्रद्धा निर्मूलन समितीनेही अशाच पद्धतीने परदेशातून मिळालेल्या पैशाचा अहवाल सादर करतांना दिलेल्या माहितीत गडबड असल्याचे ताशेरे ओढण्यात आले आहेत. तिचीही चौकशी करून केंद्रीय गृहमंत्रालयाने तिची नोंदणी रहित करावी, अशीच धर्मप्रेमी हिंदूंची मागणी आहे ! - संपादक)

मंदिरे अनधिकृत ठरवून पाडण्याचा डाव; मात्र अनधिकृत मशीद आणि दर्गा यांवर कारवाई नाही !

नवी मुंबई महानगरपालिकेची मोगलाई !
 एक लढा देवासाठी या धोरणाने ग्रामस्थ आणि भाविक यांचा मंदिरांच्या रक्षणासाठी लढा ! 
 मंदिरांच्या रक्षणासाठी संघटित होणार्‍या ग्रामस्थांचे अभिनंदन !
     नवी मुंबई, १ नोव्हेंबर (वार्ता.) - नवी मुंबई महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने महानगरपालिका क्षेत्रातील २४ धार्मिक स्थळांना अनधिकृत ठरवून त्यांच्यावर कारवाईची नोटीस दिली आहे. महानगरपालिकेने अनधिकृत ठरवलेल्या बांधकामामध्ये एक मशीद आणि एका दर्गा यांचा समावेश आहे. असे असतांना अतिक्रमण विभागाने केवळ मंदिरांवरच कारवाई चालू केली आहे. आतापर्यंत येथील ३-४ मंदिरे पाडण्यात आली आहेत. दुसरीकडे अनधिकृत मशीद आणि दर्गा यांविरोधात मात्र कारवाई करण्यात आलेली नाही.

अंधेरी (मुंबई) येथे महिलेवरील सामूहिक बलात्काराप्रकरणी ७ जण अटकेत, एक पसार

असुरक्षित मुंबई!
     मुंबई - येथील अंधेरीतील शामनगर झोपडपट्टीमध्ये घर शोधण्यासाठी गेलेल्या एका २८ वर्षीय महिलेवर ८ जणांनी सामूहिक बलात्कार केला. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी ७ जणांना अटक केली असून एक जण पसार आहे. 
     झोपडपट्टीमधील एका टोळक्याने एका घरात महिलेच्या पतीला बांधून त्याच्यासमोरच तिच्यावर बलात्कार केला. हे सर्व आरोपी २० ते २५ वयोगटातील असून त्यांच्यातील एकाची पार्श्‍वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची आहे. पीडित महिलेवर सध्या रुग्णालयात उपचार चालू असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.
असुरक्षित 

सांगली येथील हुतात्मा सुभाष कोळी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार !

नागरिकांकडून ‘'पाकिस्तान मुर्दाबाद' ’च्या घोषणा 
     सांगली, १ नोव्हेंबर (वार्ता.) - पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात दुधगाव येथील सीमा सुरक्षा दलाचे जवान २९ ऑक्टोबरला हुतात्मा झाले होते. ३१ ऑक्टोबरला त्यांचे पार्थिव दुधगाव येथे आल्यावर गावातून अंतयात्रा काढून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. शासकीत इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा भाऊ उल्हास आणि त्यांचा मुलगा देवराज यांनी नितीन यांच्या पार्थिवास अग्नी दिला. या वेळी बीएस्एफ्चे जवान आणि जिल्हा पोलीस दलाच्या वतीने बंदुकीच्या हवेत तीन फैरी झाडून हुतात्मा नितीन कोळी यांना मानवंदना दिली. 

नागपूर येथे फटाक्यांची १० कोटींची उलाढाल !

     एवढ्या मोठ्या प्रमाणात फटाक्यांच्या माध्यमातून झालेली उलाढाल म्हणजे पैशांचा चुराडाच आहे. एकट्या नागपूर शहरात एवढी उलाढाल, तर देशभरातून झालेली उलाढाल किती असेल, याचा विचारच न केलेला बरा ! केंद्र शासनाने फटाक्यांवर बंदी आणल्यास हेच पैसे देशाचे कर्ज न्यून करण्यास उपयोगी येतील ! - संपादक 
     नागपूर - यंदाच्या दिवाळीत वाढलेली महागाई आणि पर्यावरणपूरक पद्धतीने दिवाळी साजरी करण्यामुळे फटाके व्यवसायाला १० टक्क्यांची विक्री घट झाली आहे. असे असले, तरी नागपूर शहरात फटाक्यांची १० कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. गेल्या वर्षी नागपूरच्या ठोक बाजारात अनुमाने १५ कोटी रुपयांची फटाके विक्री झाली होती. या वर्षी ती १० कोटी रुपयांवर आली आहे.

हिंदु गोवंश रक्षा समितीकडून वसुबारसनिमित्त गोपूजन

गोमातेचे पूजन करतांना हिंदु गोवंश रक्षा समितीचे कार्यकर्ते
     नालासोपारा, १ नोव्हेंबर (वार्ता.) - येथील सोपारा गाव, संमेळपाडा येथे हिंदु गोवंश रक्षा समितीकडून वसुबारस सोहळा झाला. या वेळी गोमातेचे शास्त्रानुसार पूजन करण्यात आले. गोमातेचे हिंदु धर्मातील अनन्यसाधारण महत्त्व आणि या दिवशी गोमातेचे पूजन यांविषयी हिंदु समाजात अज्ञान असल्याने हेतुपूर्वक सार्वजनिकरित्या असा सोहळा करण्यात आल्याचे मत कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. 

प्रजासत्ताक सामाजिक संस्थेने स्मशानभूमीत दिवाळी सण साजरा केला !

हिंदु राष्ट्रात अशा चुकीच्या गोष्टींना थारा नसेल ! 
     कोल्हापूर, १ नोव्हेंबर (वार्ता.) - येथील प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्थेच्या वतीने सामाजिक बांधिलकी म्हणून येथील स्मशानभूमीतील कर्मचार्‍यांसमवेत ३१ ऑक्टोबर या दिवशी दीपावली सण साजरा करण्यात आला. देशभरामध्ये दिवाळीचा सण सर्वजणच मोठ्या उत्साहात आणि आनंदाच्या वातावरणात साजरा करत आहेत; मात्र असे असले, तरीही प्रजासत्ताक संस्थेने असा अशास्त्रीय उपक्रम राबवल्यामुळे हा सर्वत्र चर्चेचा विषय झाला आहे. (हिंदूंना धर्मशिक्षण नसल्यामुळे समाजात अशा चुकीच्या प्रथा पडत आहेत. यासाठी समाजाला धर्मशिक्षण देऊन आणि लोकांना धर्माचरणी बनवल्यास अशा चुकीच्या गोष्टी घडणार नाहीत. यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना होणे आवश्यक आहे. - संपादक ) 

महाराष्ट्र राज्य कृषी क्षेत्रात प्रथम, तर औद्योगिक क्षेत्रात १० व्या स्थानी !

नीती आयोगाचा अहवाल 
     मुंबई - महाराष्ट्र राज्य हे सर्वाधिक शेती अनुकूल, तर शेतीपूरक योजनांच्या अंमलबजावणीतही राज्य अग्रेसर ठरले आहे. तसेच उद्योग क्षेत्रात आंध्र प्रदेश राज्य प्रथम स्थानावर असून महाराष्ट्र राज्य १० व्या क्रमांकावर आहे, असे नीती आयोगाच्या वार्षिक अहवालात प्रसिद्ध झाले आहे. 

देशाचे ऐक्य आणि सलोखा वृद्धींगत करण्यासाठी राज्यातील विद्यापिठांतही '‘एक भारत श्रेष्ठ भारत !'’ योजना

अशा कार्यक्रमांमुळे खरेच देशाचे ऐक्य, देशप्रेम आणि सलोखा वृद्धींगत होणार का ? 
     मुंबई - देशाचे ऐक्य, देशप्रेम आणि सलोखा वृद्धींगत करण्यासाठी राज्यातील विद्यापिठांतही 'एक भारत श्रेष्ठ भारत’' योजना राबवण्याविषयीच्या सूचना विद्यापीठ अनुदान आयोगाने एका परिपत्रकाद्वारे दिल्या आहेत. या योजनेंतर्गत आता विद्यापीठ आणि महाविद्यालये यांच्या प्रवेशद्वारावरच त्या योजनेच्या माहितीचे फलक लावण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत. 

राजकारण करून '‘सर्जिकल स्ट्राइक'’चे पुरावे मागणे म्हणजे हा सैनिकांचा अवमानच ! - आतंकवादविरोधी संघटनेचे प्रमुख एम्.एस्.बिट्टा यांचे परखड मत

     कोल्हापूर (वार्ता.) - भारतीय सैन्याच्या नावावर चालू असलेले राजकारण त्वरित बंद करा, असे आवाहन आतंकवादविरोधी संघटनेचे प्रमुख श्री. मनिंदिरजित सिंह तथा एम्.एस्. बिट्टा यांनी येथे नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत केले. ‘'कॉम्पॅशन २'४’ आणि ‘'कोल्हापूर वुई केअर'’ या स्वयंसेवी संस्थेने बिट्टा यांना निमंत्रित केले होते. या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. भारतीय सैनिकांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये ‘'सर्जिकल स्ट्राइक'’द्वारे आतंकवादी अड्डे उद्ध्वस्त केले; मात्र या लष्करी कारवाईचे पुरावे मागितले जात आहेत. केवळ राजकारण डोळ्यांसमोर ठेवून पुराव्याची मागणी होत असेल, तर यापेक्षा दुर्दैव कोणते ! हा सैनिकांचा अवमानच आहे, असे परखड मत श्री. बिट्टा यांनी मांडले. 

माहिती अधिकार याचिकेवरील सुनावणी न घेणार्‍या तत्कालीन अपंग कल्याण उपायुक्तांना शिस्तभंगाची नोटीस

माहिती देण्यास टाळाटाळ करणार्‍या माहिती अधिकार्‍याला आर्थिक दंड 
     पुणे - माहिती अधिकार याचिकेवरील सुनावणी न घेणार्‍या तत्कालीन अपंग कल्याण उपायुक्त विजया पवार यांना शिस्तभंगाची कारवाई का प्रस्तावित का करू नये, अशी विचारणा करणारी नोटीस राज्य माहिती आयोगाच्या पुणे खंडपिठाने पाठवली आहे. तसेच माहिती देण्यास टाळाटाळ करणार्‍या माहिती अधिकार्‍यास ३ सहस्र रुपयांचा दंड ठोठावला आहे. माहिती आयोगाने एकाच प्रकरणात २ अधिकार्‍यांवर कारवाई करण्यात येणार आहे. 

ध्वनीप्रदूषण उल्लंघनाविषयी नागरिकांनी पोलीस नियंत्रण कक्षास माहिती द्यावी ! - रवींद्र डोंगरे

ध्वनीप्रदूषण करणार्‍या मशिदींवरील अवैध भोंग्यांवर कारवाई होणार का ? 
     सांगली, १ नोव्हेंबर (वार्ता.) - ध्वनीप्रदूषण उल्लंघनाविषयी नागरिकांनी पोलीस नियंत्रण कक्ष यांना १०० अथवा व्हॉटस अ‍ॅप क्रमांक ७८७५७१४८८३ या क्रमांकावर माहिती द्यावी, असे आवाहन सुरक्षा शाखा सांगलीचे पोलीस निरीक्षक रवींद्र डोंगरे यांनी केले आहे. (सांगली महापालिका क्षेत्रात अनेक मशिदींवर ध्वनीक्षेपकाद्वारे सर्रास याचे उल्लंखन केलेले आढळते. हिंदूंच्या सणांच्या वेळी तात्काळ कारवाई करणारे पोलीस प्रशासन आता मशिदींवरील अवैध भोंग्यांद्वारे होणार्‍या ध्वनीप्रदूषणावर कारवाई करणार का ? - संपादक)

'बालभारती'’ ही संस्था छापखाना म्हणून चालवली जाणार !

     पुणे, १ नोव्हेंबर - महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळ म्हणजेच, ‘'बालभारती'’ ही संस्था आता एक ‘'छापखाना'’ म्हणून चालवली जाणार आहे. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र योजनेअंतर्गत राज्य शैक्षणिक संशोधन आणि परिषद ही विद्या प्राधिकरण म्हणून ओळखली जाणार आहे. प्राधिकरणाकडे अभ्यासक्रम संशोधनाचे दायित्व सोपवले जाणार असल्याने ‘'बालभारती'’ ही पाठ्यपुस्तकांची छपाई आणि वितरण यांच्यापुरतीच मर्यादित रहाणार आहे. राज्य सरकारने नुकत्याच काढलेल्या अधिकृत सरकारी निर्णयातून ही गोष्ट उघड झाली आहे. 

कोल्हापूर येथे उदबत्ती आणि तंबाखू गोडाऊनला आग !

सहस्रो रुपयांची हानी ! 
     कोल्हापूर, १ नोव्हेंबर (वार्ता.) - येथील लक्ष्मीपुरीमधील उदबत्ती आणि तंबाखू गोडाऊनला आग लागून या आगीत सहस्रो रुपयांची हानी झाली आहे. सुशांत इंगळे यांच्या मालकीची ही तीन मजली इमारत आहे. या इमारतीतच कापूर, कापूस यांसह उदबत्ती आणि तंबाखू यांचा साठा करण्यात आला आहे. १ नोव्हेंबर या दिवशी दुपारी १२ वाजता अचानक या गोडाऊनला आग लागली. अग्नीशमन दलाच्या जवानांनी लागलीच घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. ही आग शॉर्टसर्किटने लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

चेंबूर येथे दिव्यांग तरुणीवर बलात्कार करणार्‍या वासनांधाला अटक !

अशा वासनांधांना कठोर शासन केल्याविना हे प्रकार थांबणार नाहीत ! 
     मुंबई - चेंबूर येथे घरात एकटीच असलेल्या २१ वर्षीय दिव्यांग तरुणीवर बलात्कार करणार्‍या वासनांधाला पोलिसांनी अटक केली. हा प्रकार आरोपीच्या मुलीने पाहिला. तिने आईला याविषयी माहिती दिली. त्यानुसार आरोपीच्या पत्नीनेच पोलीस ठाण्यात पतीविरोधात तक्रार दिली. मुलीवर रुग्णालयात उपचार चालू आहेत.

हिंदु स्त्रियांनी स्वचारित्र्य आणि राष्ट्र यांच्या रक्षणार्थ सज्ज होणे आवश्यक !

     उत्तरप्रदेशच्या बरेली येथील ‘ऑल इंडिया इत्तेहादे मिल्लत कौन्सिल’चे अध्यक्ष मौलाना तौकीर रजा यांनी ‘हिंदु धर्मामध्ये एका महिलेला ५ पती असतात. तिला तिच्या मुलाचे वडील कोण आहेत, हेही माहिती नसते’, असे विधान तथाकथित सामाजिक एकता संमेलनात केले. मौलाना तौकीर रजा यांच्या या वक्तव्यावरून त्यांची हिंदुद्वेषी मानसिकता दिसून येते. त्यांनी केलेले वक्तव्य हे अत्यंत घृणास्पद आणि समस्त हिंदु स्त्रियांचे चारित्र्यहनन करणारे आहे.

सावरकरांचे द्रष्टेपण

         १९४२ साली परदेशी पेपरांनी त्या वेळी चाललेल्या पाकिस्तानच्या वादाविषयी विचारले. आपले डावे नेते पाकिस्तान फार काळ टिकणार नाही, असे मत मांडीत होते. त्यात नेहरू, जयप्रकाश नारायण वगैरे थोर नेत्यांचा समावेश होता. सावरकर म्हणाले, मुसलमान जिहाद पुकारून भारताचे प्रांत जिंकतील आणि पाकिस्तान समृद्ध करतील. त्यांची कीव येणारे भाबडे त्यांना आर्थिक मदत करणार नाहीत कशावरून ? आज आतंकवादी काय करीत आहेत? मुलायमसिंह पाकिस्तानला २ सहस्र कोटी रुपये द्या, असे बडबडले होते ना ? आज आपण काश्मिरात वा अफगाणिस्थानात हजारो कोटी रूपये ओततोच आहोत ना ? सावरकरांनी हे भाकीत सत्तर वर्षांपूर्वी केले होते. - दादुमिया (संदर्भ : स्वातंत्र्यवीर - दिवाळी विशेषांक २०१६)दत्ता नायकांची पुरोगामी उचकी !

      १६ ऑक्टोबर या दिवशी दैनिक लोकमतमधील ‘कोकणस्थ ब्राह्मणांच्या घार्‍या डोळ्यांचे रहस्य’ या शीर्षकाने प्रसिद्ध झालेल्या लेखात पुरो(अधो)गामी कोकणी लेखक दत्ता नायक यांनी अत्यंत हीन भाषेत ब्राह्मणांचा अवमान आणि ब्राह्मण स्त्रियांचे चारित्र्यहनन केले आहे. या लेखाचा दैनिक लोकमतचे पुरवणी संपादक श्री. मयुरेश वाटवे यांनी १९ ऑक्टोबरच्या अंकात केलेला प्रतिवाद वाचकांसाठी देत आहोत. या लेखात व्याकरणाच्या किरकोळ सुधारणा आणि सूत्रांना उपमथळे देण्याव्यतिरिक्त अन्य संकलन केलेले नाही, याची दैनिक सनातन प्रभातच्या वाचकांनी नोंद घ्यावी.

स्त्रियांना समानाधिकार मिळूनही त्यांच्यावरील अत्याचार आणि बलात्कार यांचे प्रमाण न्यून न होण्याची काही कारणे

      ‘आज स्त्रियांना समानाधिकार मिळाला. समानतेची वागणूक मिळावी; म्हणून अनेक दंडविधी (कायदे) झाले; परंतु स्त्रियांवरचे अत्याचार आणि बलात्कार थांबले नाहीत. स्त्रिया आणि मुली यांवर बलात्कार ओळखीच्या माध्यमातूनच होतात. याची काही कारणे पुढीलप्रमाणे आहेत.
१. मुलींना मिळणारे अवाजवी स्वातंत्र्य
२. मुलामुलींची अतिरेकी मैत्री
३. मुलींची संख्या अल्प झाल्याने अनेक मुलांचे विवाहच होत नाहीत. त्यामुळे ते असे चुकीचे मार्ग शोधतात.’
(संदर्भ : सदाचार आणि संस्कृती, एप्रिल २०१३)


      निधर्मी संकल्पनेचे अधिष्ठानच मूळ सनातन हिंदु धर्म आणि संस्कृती यांचे उद्ध्वस्तीकरण हे आहे ! - गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (साप्ताहिक सनातन चिंतन, ८.७.२०१०)

उच्च कोटीचे संत असूनही प.पू. डॉक्टर, सनातनचे संत आणि सनातन संस्था यांविषयी जिव्हाळा असणारे पुणे येथील प.पू. आबा उपाध्ये !

प.पू. आबा उपाध्ये
१. सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि 
सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्याविषयी वाटणारी आपुलकी
      मी प.पू. आबा उपाध्ये यांच्या घरी विजयादशमीच्या दुसर्‍या दिवशी गेले असता ते मला म्हणाले, सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना मी काल दसर्‍याच्या शुभेच्छा देण्यासाठी भ्रमणभाष केला होता. त्या वेळी सद्गुरु (सौ.) बिंदाताई यांनी आमची आठवण येत असल्याचे सांगून आम्हाला आश्रमात बोलावले आहे. त्यावर मी म्हणालो, मी डिसेंबरमध्ये येणारच आहे; पण दोन्ही सद्गुरु ज्या वेळी आश्रमात असतील, त्याच वेळी मी येईन. मी दोघींनाही भगिनी मानतो. या संदर्भात सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्याशी दसर्‍याच्या दुसर्‍या दिवशी संपर्क झाल्यावर मी त्यांना हे सांगितले. त्यावर त्या म्हणाल्या, बरं आबा. तुम्ही डिसेंबरमध्ये आश्रमात जाल, तेव्हा मला कळवा. मी जिथे असेन, तिथून आश्रमात येईन.

महर्षींनी सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांना वेळोवेळी कथन केलेली त्यांच्याविषयीची वैशिष्ट्यपूर्ण माहिती

महर्षींची शिकवण आणि कार्य !
महर्षींनी ‘सप्तर्षि जीवनाडीपट्टी क्रमांक ५’ मधून 
पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या ‘नाडीपट्टी कार्यासाठी 
देवाने मलाच का पाठवले ?’ या जिज्ञासेचा केलेला उलगडा !
      ‘माताजी, (काही वेळा सप्तर्षि पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांना ‘माताजी’ म्हणून संबोधतात. - संकलक) तुमच्या मनात ‘सनातन संस्थेमध्ये इतके साधक आहेत, तर या कार्यासाठी देवाने मलाच का पाठवले ? किंवा निवडले ?’ असा विचार आला. (प्रत्यक्षातही पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या मनात असा विचार आला होता आणि याचे कारण जाणण्याची जिज्ञासाही होती. त्यांच्या मनातील हा विचार महर्षींनी ओळखला. - संकलक) याचे कारण म्हणजे तुमच्यात ही क्षमता आहे, हे ईश्‍वराला ज्ञात आहे. जसे ३३ कोटी देवतांचे वेगवेगळे कार्य असते, तसेच सर्व साधक वेगवेगळे असून प्रत्येकाचे कार्य भिन्न भिन्न आहे. देवाने हे कार्य तुम्हाला दिले आहे.’ (संदर्भ : सप्तर्षि जीवनाडीपट्टीवाचन क्रमांक ५, खोली क्र. ११०, वेस्ट पार्क हॉटेल, पोर्ट ब्लेयर, अंदमान आयलंड (२६.४.२०१५, सकाळी ११.१६ वाजता))

अनेक गुणांचा समुच्चय असलेली आणि श्रीकृष्ण अन् प.पू. डॉक्टर यांच्याप्रती पुष्कळ भाव असलेली ६३ टक्के आध्यात्मिक पातळी असणारी आणि महर्लोेकातून जन्माला आलेली कु. श्रीया राजंदेकर (वय ५ वर्षे) !

उच्चलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे 
हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. श्रीया राजंदेकर ही एक दैवी बालिका आहे !
कु. श्रीया राजंदेकर
     (कु. श्रीया हिची वर्ष २०१४ मध्ये आध्यात्मिक पातळी ६१ टक्के होती. आता ६३ टक्के आहे. - संकलक) 
     पुणे येथील कु. श्रीया राजंदेकर हिच्याविषयी तिच्या आईने सांगितलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.
१. कु. श्रीयाची गुणवैशिष्ट्ये 
१ अ. शांत आणि मितभाषी : ‘कु. श्रीयाचा स्वभाव पुष्कळ शांत आणि मितभाषी आहे. कुणाच्या घरी गेल्यावर, तसेच सत्संग किंवा मार्गदर्शन यांसाठी गेल्यावर ती शांतपणे माझ्या जवळ कार्यक्रम संपेपर्यंत बसून असते. घरातसुद्धा ती शांतपणे तिच्या खेळण्यांशी खेळत असते. 
१ आ. इतरांचा विचार करण्याची वृत्ती : घरी आलेले पाहुणे, तिच्या मैत्रिणी आणि घरातील सर्वजण यांचा ती इतक्या लहान वयातही पुष्कळ विचार करते. कुणाला काय हवे किंवा कुणाला काय आवडते, हे तिला न सांगताच कळते. आलेल्या पाहुण्यांना पाणी देणे, रात्री झोपण्यासाठी सिद्धता (तयारी) करणे, हे सर्व ती स्वतःहून करते. मी रुग्णाईत असल्यास ती जेवायला जे काही असेल, ते आनंदाने जेवते. मला ‘हवे-नको’ ते पहाणे, औषध देणे इत्यादी सर्व ती प्रेमाने करते. 

साधका, चाल मोक्षप्राप्तीची वाट ॥

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...
परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले
सत्ययुगी झाले अवतार सहा ।
त्रेतायुगी अवतरला श्रीराम ।
द्वापरयुगी अवतरला श्रीकृष्ण ।
तसाच एक अवतार आहे कलियुगी ॥ १ ॥ 

दुष्प्रवृत्तीच्या लोकांनो, केला कितीही उदोउदो ।
तरी नाही येणार एकही दिवस तुमचा ।
दुष्प्रवृत्ती न टिकणार कुठल्याही युगी ।
कारण त्यास अवतार टाकणार मागे मागे ॥ २ ॥

घरी असतांनाही भगवंताचे अनुसंधान असणे, या संदर्भात आलेल्या अनुभूती

डॉ. (कु.) आरती तिवारी
१. घरी असतांना सतत तीन दिवस प.पू. डॉक्टर स्वप्नात येणे, 
त्यामुळे दिवस त्यांच्या अनुसंधानात आणि आनंदात जाणे 
     एप्रिल २०१६ मध्ये वैयक्तिक कामाकरता मला घरी जावे लागले. तेव्हा घरी असतांना भगवंतालाच माझ्या साधनेची काळजी आहे, याची अनुभूती आली. घरी पहिले तीन दिवस सतत प.पू. डॉक्टर स्वप्नात आले. पहिल्या दिवशी त्यांनी संभाजीनगरच्या सर्व साधकांना मार्गदर्शन केले. दुसर्‍या दिवशी ते माझ्याशी काहीतरी बोलले. तिसर्‍या दिवशी ते म्हणाले, आनंदी आहेस ना ? त्यासाठी हा खाऊ.’ तीनही दिवस ते पहाटे स्वप्नात आले. त्यामुळे दिवस त्याच आनंदात त्यांच्या अनुसंधानात कसा गेला, ते कळले नाही.

एका संतांनी रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमातून जावेसे वाटत नाही’, असे सांगणे आणि कलियुगात प.पू. डॉक्टर सर्व संतांना एकत्र करून हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे कार्य करत असल्याचे मनात येणे

     रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमात काही मास (महिने) राहिलेले एक संत ऑगस्ट २०१५ मध्ये म्हणाले, इथून जावेसे वाटत नाही. तेव्हा माझ्या मनात आले, या कलियुगात प.पू. डॉक्टरांना हिंदु राष्ट्र स्थापन करणे अवघड नाही, तरीही ते सर्व संतांना एकत्र करून हे कार्य करत आहेत. 
      गुरुदेवा, गोवर्धन पर्वताला गोप-गोपींनी लावलेल्या काठ्यांप्रमाणे आम्हाला तुमच्या छत्रछायेखाली साधना करून हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात सहभागी होता येऊ दे, अशी तुमच्या चरणी प्रार्थना ! 
- सौ. सारिका आय्या, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.८.२०१५)

कु. सर्वमंगला मेदी यांनी गुरुचरणी केलेली चित्ररूपी प्रार्थना

कु. सर्वमंगला मेदी
      हे गुरुदेवा, या घोर कलियुगात आम्हाला गुरुकृपायोगानुसार साधनेच्या माध्यमातून ईश्‍वराशी अनुसंधान ठेवण्यास शिकवून समाजातील विविध अनैतिक आणि अधर्माचरणी कृत्यांपासून आमचे रक्षण करणार्‍या हे कलियुगातील श्रीकृष्णा, आपल्या चरणी नरकचतुर्दशीनिमित्त अनंत कोटी कोटी नमस्कार !’ 
पुढील चित्रात दर्शवलेली विविध अधर्माचरणी कृत्ये 
विदेशी आचरणाचे आकर्षण
स्वातंत्र्याच्या नावावर स्वैराचार
देश आणि धर्म यांच्याप्रती उदासीनता
वडीलधार्‍यांचा मान न राखणे
सनातन संस्कृतीची उपेक्षा

कु. रेश्मा नाईक यांना वाढदिवसानिमित्त रामनाथी आश्रमातील साधकांनी दिलेले शुभेच्छापत्र !

कु. रेश्मा नाईक
      रामनाथी आश्रमातील कु. रेश्मा नाईक यांचा आज कार्तिक शुक्ल पक्ष तृतीया (२.११.२०१६) वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने साधकांनी मागील वर्षी दिलेले शुभेच्छापत्र येथे देत आहोत. 
कु. रेश्मा नाईक यांना वाढदिवसानिमित्त 
सनातन परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा !
जीवेत् शरदः शतम् ।
लाडकी आमची रेश्माताई ।
तळमळीने अविरत गुरुसेवा करी ।
म्हणूनच गुरुदेवांच्या विश्‍वासास पात्र ती होई ॥ १ ॥ 

पदोपदी साहाय्य ती करते ।
नियोजनकौशल्यही भारी ।
गुरुकृपाही अखंड तिजवर ।
घेऊन जाईल तिज मोक्षतीरी ॥ २ ॥
- रामनाथी आश्रमातील सर्व साधक 

साधकांनो, मायेतील निर्णय घेतांना तो विचारपूर्वक घ्या ! यात ‘आपल्या साधनेची हानी तर होणार नाही ना’, याकडे अधिक लक्ष द्या !.....कारण आपत्काळ चालू आहे !

१. प्रारब्धाधीन गोष्टींवर क्रियमाणाने मात करता येते, हे विसरू नका ! 
     ‘लग्न ठरले, नोकरी लागली किंवा काही कारणाने आश्रमातून घरी जावे लागले की, साधक सांगतात, ‘‘बघा ! ईश्‍वराची लीला कशी होती. ते माझ्या प्रारब्धातच होते’’; परंतु प्रारब्धावर क्रियमाणाने मात करता येते, हे मात्र येथे सोयीस्कररित्या विसरले जाते. आपत्काळाचा विचार करून योग्य निर्णय घेऊन साधना करणे, हे आता अधिक महत्त्वाचे आहे.
२. ‘लग्न करू नये, नोकरी करू नये’, असे नाही, 
तर हे करत असतांनाही साधनेला अधिक प्राधान्य देणे महत्त्वाचे 
      कुणीही लग्न करू नये, नोकरी करू नये, असे नाही, तर हे करत असतांनाही साधनेत रहाणे अधिक महत्त्वाचे आहे. बर्‍याचदा अनेकांच्या बाबतीत लग्न झाले की, मायेत गुंतणे चालू होते. यामुळे साधनेत हानी होते. लग्नानंतर मुले होणे, त्यांचे पालनपोषण करणे, यांसारख्या जीवनात घडणार्‍या प्रत्येक गोष्टीत मायेपेक्षा साधनेचा विचार अधिक महत्त्वाचा आहे.

सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळकाकू यांनी एका साधकाऐवजी दुसर्‍या साधकाला मंदिरात जाण्यास सांगितल्यावर त्यामागचा कार्यकारणभाव नंतर समजणे

      ‘एकदा आम्हाला महर्षींनी सांगितल्याप्रमाणे श्रीमरूंदेश्‍वर मंदिरात जायचे होते. तेव्हा सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळकाकू मला म्हणाल्या, ‘‘श्री. विनायकदादासमवेत श्री. स्नेहलदादा जाऊ दे.’’ त्या वेळी मला यामागचा कार्यकारणभाव कळला नाही. विनायकदादा आणि स्नेहलदादा मंदिरात गेल्यावर त्यांनी येथील पुजार्‍यांना भेटून अभिषेकाची माहिती घेतली. त्यानंतर विनायकदादा मंदिरातील श्री दक्षिणामूर्ती देवासमोर नारळ फोडत होते. त्यांनी ३ वेळा नारळ फोडण्याचा प्रयत्न केला; पण तरीही तो फुटत नव्हता. तेव्हा तेथील पुजारी म्हणाले, ‘‘आज बुधवार असल्याने श्री दक्षिणामूर्ती देवासमोर नारळ फोडायला नको. तो उद्या फोडा. आजचा नारळ श्री गणपति मंदिरासमोर फोडा.’’ स्नेहलदादांनी त्याप्रमाणे केले. नारळ फोडत असतांना स्नेहलदादांच्या हातातून तो निसटल्यासारखा झाला आणि फुटल्यानंतर त्यांच्या शरिराची एक बाजू पूर्ण हलकी होऊन त्यांच्या उत्साहात वाढ झाली. यावरून सद्गुरु काकूंनी माझ्याऐवजी स्नेहलदादाला मंदिरात जाण्यासाठी का सांगितले, ते मला समजले.’ - श्री. विनीत देसाई, चेन्नई, तमिळनाडू. (जुलै २०१६) नाडीपट्टीतील लिखाणाविषयी महर्षींनी सांगितलेली माहिती

        महर्षींनी उपवास करून देवाला आळवून आळवून सनातनच्या कार्याविषयी सहस्रो नाडीपट्ट्यांमध्ये आधीच लिखाण करून ठेवलेले असणे ः ‘महर्षि म्हणतात, ‘आम्ही तुमच्यासाठी कितीतरी लिहिलेले आहे. आम्ही खाऊन पिऊन आरामात बसून हे सर्व लिहिलेले नाही, तर उपवास करून देवाला आळवून आळवून आम्ही हे लिखाण केले आहे. (असे केल्यानेच नाडीपट्टीतील ही अक्षरे एखाद्या शब्दब्रह्मासारखी चैतन्य देणारी झालेली आहेत. या शब्दांतील नादशक्तीची सहस्रो साधकांनी अनुभूती घेतली आहे. - संकलक) भारतात सनातन धर्म राज्याची स्थापना करणारे तीन प्रधान गुरु (प.पू. डॉक्टर, कार्तिकपुत्री (सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ) आणि उत्तरापुत्री (सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ)यांच्याविषयी महर्षि बोलत आहेत. - संकलक) असणार आणि ते येऊन पुढे अध्यात्माचे मोठे कार्य करणार; म्हणून आम्ही त्यांच्यासाठी हे आधीच लिहिले आहे.’ (संदर्भ : नाडीवाचन क्रमांक १०१, कांचीपूरम्, तमिळनाडू, १७.१०.२०१६)’ - (सद्गुरु) सौ. अंजली गाडगीळ, तिरुवण्णामलई, तमिळनाडू. (२२.१०.२०१६, रात्री ८.०५) हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) स्थापनेच्या संदर्भात साधकाला एका धर्माभिमानी मित्राने शंका विचारल्यावर गुरूंवरील श्रद्धेमुळे देवाने सुचवलेले उदाहरण !

श्री. व्यंकटेश अय्यंगार
        वर्ष २०२३ मध्ये हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) स्थापन होण्याविषयी माझ्या एका धर्माभिमानी मित्राने शंका व्यक्त केली आणि मला त्याविषयी विचारले. त्या वेळी प.पू. गुरुदेवांनी अंतर्मनातून एक उदाहरण सुचले. मी १००० लोकांचे जेवण सिद्ध करण्यामध्ये व्यस्त आहे. मला तिथे भाजी चिरण्याची सेवा दिली आहे. मी श्रद्धेने सेवा करतांना ती चांगल्या प्रकारे करण्याचा प्रयत्न करत आहे. कोणाला साहाय्य हवे असेल, तर मी जाऊन साहाय्य करतो आणि त्यानंतर मला जी सेवा दिली आहे, तीच मी करतो. माझ्या मनात मध्येच १००० लोकांचे जेवण वेळेवर शिजते कि नाही ? तांदूळ चांगल्या प्रकारे धुतले कि नाही ? पाणी गरम करण्यासाठी ठेवले आहे कि नाही ? इत्यादी विचार येत नाहीत. मला थोडीही शंका येत नाही की, १००० लोक येतील का ? ते जेवतील का ? ते शिजवलेल्या जेवणाचा स्वाद अवश्य घेतीलच’, असे म्हणून मी त्याच्या प्रतिक्रियेचे निरीक्षण केले. त्यावर त्याने म्हटले, तू धन्य आहेस; कारण तुझी तुझ्या गुरूंवर पूर्ण श्रद्धा आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाने हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) स्थापन होणारच ! जेवढे शक्य होईल तेवढे योगदान आम्हीही देऊ. 
        खरंच धन्य आहोत आम्ही ! आम्हाला असे गुरुदेव प्राप्त झाले. प.पू. गुरुदेवांच्या कृपेनेच हे विचार प्राप्त झाले आहेत. त्यांच्या चरणकमली अर्पण करून कृतार्थ होऊन जातो.
- श्री. व्यंकटेश अय्यंगार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२.८.२०१६)

प्रेमाला उपमा नाही, हे देवा घरचे देणे !’, या ओळी सार्थ ठरवणार्‍या सौ. विद्या शानभाग !

१. स्वतः गडबडीत असतांना आठवणीने पू. सौरभदादांना विवाहासाठी 
बनवलेला महाप्रसाद नेऊन देण्यास सांगणे, ‘तो त्यांनी घेतला का ?’, याचा 
पाठपुरावा घेणे आणि पू. सौरभदादांनी प्रसाद आवडीने ग्रहण करून ढेकर देणे 
श्री. विनायक आणि सौ. विद्या शानभाग
‘      २४.१२.२०१५ या दिवशी चि.सौ.का. शिल्पा करी आणि श्री. विनायक शानभाग यांचा विवाह झाला. विवाहाच्या व्यस्ततेत असतांनाही आणि लग्नघटिका जवळ आलेली असतांनाही सकाळी ११ वाजता शिल्पाताईंनी मला ‘पू. सौरभदादांना विवाहासाठी बनवलेला महाप्रसाद नेऊन द्या’, असा निरोप पाठवला. मी पू. सौरभदादांना कु. शिल्पाताई यांचा निरोप सांगितला. त्या वेळी ते गालातल्या गालात हसले. (सकाळी ११.३० वाजता पू. सौरभदादा यांची महाप्रसादाची वेळ असते.) त्यामुळे मी स्वयंपाक घरात जाऊन पू. (कु.) रेखा काणकोणकरताईंना सांगितले. त्यांनी ‘‘गोड पोळ्या आहेत. त्या घेऊन जा’’, असे सांगितले. त्याप्रमाणे मी आम्हा दोघांसाठी चार गोड पोळ्या घेऊन गेलो. मी पू. सौरभदादांना गोड पोळ्या भरवल्या. त्यानंतर पू. सौरभदादांनी लगेच ढेकर दिला. मी त्यांना विचारले, ‘‘पोळ्या आवडल्या का ?’’ तेव्हा ते ‘हो’ म्हणाले. पू. सौरभदादा यांचा महाप्रसाद घेऊन झाल्यावर साधारण एक घंट्याने एक साधिका आली आणि म्हणाली, ‘‘पू. सौरभदादांनी विवाहासाठीचा महाप्रसाद घेतला का ?’, असे शिल्पाताईने विचारले आहे.’’ तेव्हा मी ‘हो’ म्हणून सांगितले.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
     ‘एखादे औषध लागू पडले नाही, तर आपण ते पालटतो. त्याप्रमाणे राष्ट्र आणि धर्म यांच्या संदर्भात लोकशाही पूर्णपणे अयशस्वी ठरल्याने आज हिंदु राष्ट्राच्या (सनातन धर्म राज्याच्या) स्थापनेला पर्याय नाही !’ 
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

म्हातारपणी जीवनाचा कंटाळा येण्याची कारणे

१. बहुतेकांना म्हातारपणचे शरिराचे विकार आणि मनाची अस्वस्थता यांमुळे जीवनाचा कंटाळा येतो आणि ते मृत्यूची वाट पहातात.
२. साधनेत प्रगती केलेल्या काही जणांना मृत्यूनंतरचे नवीन जग पहावेसे वाटते, जग कसे असेल’, याची जिज्ञासा असते. त्यामुळे तेही मृत्यूची वाट पहातात. 
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

व्यष्टी आणि समष्टी प्रारब्ध

प.पू. पांडे महाराज यांचे अनमोल विचारधन
प.पू. पांडे महाराज
‘     सर्व प्रारब्धाप्रमाणे घडत असते. आपण स्वतःच्या प्रारब्धानुसार वागतो, तो भाग करावा आणि ज्याच्याशी प्रारब्धानुसार आपला संबंध आहे, त्याचे तेवढेच कर्तव्य समजून करावे.
१. व्यष्टी
      लग्न झालेल्या स्त्रीला ताप आला, तर कर्तव्य म्हणून पतीने तिची सेवा साधना म्हणून करावी. काळजी अथवा चिंता करू नये.
२. समष्टी
      जेवढ्या जणांशी प्रारब्धानुसार आपला संबंध येतो, तेवढ्यांशी वागतांना साधना म्हणून कर्तव्यपूर्ती करावी. मनावर कशाचेही ओझे अथवा ताण घेऊ नये. आपला वेळ अधिकाधिक साधनेत घालवावा.’
- प.पू. परशराम पांडे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१३.१०.२०१४)

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

कर्तव्य 
आई-वडील आणि इतर वडीलधारी माणसे देवघरातील 
मूर्तीसारखी सांभाळा. कर्तव्यात कुठेच न्यूनता ठेवू नका. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)चर्च आणि भारतीय प्रसारमाध्यमे !

संपादकीय
       भारतात चर्च, पाद्री, ख्रिस्ती धर्म यांची प्रतिमा नेहमीच उंचावण्याचा पद्धतशीरपणे प्रयत्न केला जातो. ख्रिस्ती धर्म हा प्रेम आणि शांती यांचा संदेश देणारा धर्म, तर ख्रिस्ती पाद्री हे प्रेम आणि शांती यांचे पुजारी ! चर्च आणि पाद्री यांचा पाशवी, विकृत तोंडवळा नेहमी कसा झाकला जाईल, याचा आटोकाट प्रयत्न भारतीय प्रसारमाध्यमे करतांना दिसतात. मागील काही दिवसांत विविध देशांत ख्रिस्ती धर्मप्रसारक आणि पाद्री यांची कुकृत्ये विदेशी प्रसारमाध्यमांनी जगासमोर आणली.

चीनचे धाबे दणाणले !

संपादकीय
      लहानपणी आपण अनेक कथा वाचल्या असतील. त्यात अनेकदा अक्राळविक्राळ राक्षसाचा जीव एखादी बाटली किंवा पोपट यांच्यात बंदिस्त असल्याचा कथेत उल्लेख असतो. चीनही असाच एक अक्राळविक्राळ राक्षस आहे. वर्ष १९९२-९३ पर्यंत भारत आणि चीन यांची अर्थव्यवस्था सारखीच होती; मात्र त्यानंतर चीनने शीघ्रगतीने अर्थव्यवस्था सुधारली. चीनच्या विकासाचा वेग इतका जलद होता की, आज तो महासत्ता बनला असून अमेरिकेलाही वाकुल्या दाखवू लागला आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn