Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

दिनविशेष

भाऊबीज
यमद्वितीया

बिहार सरकारकडून घटस्फोटित मुसलमान महिलांसाठी योजना !

मुसलमानांच्या लांगूलचालनासाठी निधर्मीपणाच्या 
नावाखाली त्यांना सोयीसुविधा देणारे राज्यकर्ते 
धर्मांधच होत ! असे राज्यकर्ते लोकशाही निरर्थक ठरवतात !
        पाटलीपुत्र - बिहारमधील नितीश कुमार सरकारने घटस्फाटित मुसलमान महिलांसाठी मुसलमान महिला परित्यक्त्या योजना आणली आहे. या योजनेंतर्गत मुसलमान महिलांना १० सहस्र रुपयांचे आर्थिक साहाय्य दिले जाते. या योजनेला भाजपने विरोध केला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार मोदी यांनी विचारले आहे की, सरकारचा व्यवहार मुसलमान आणि हिंदु महिलांमध्ये भेदभाव करणारा का आहे ? महिला कोणत्याही जाती-धर्माची असली, तरी तिच्या समस्या सारख्याच असतात. त्यामुळे असा भेद करू नये. अशा प्रकारची योजना हिंदु महिलांसाठीही असली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. १२ सहस्रांपेक्षा अधिक घटस्फोटित मुसलमान महिलांना सरकारने १५ कोटी रुपयांहून अधिक रक्कम वितरित केली आहे.
        सुशीलकुमार मोदी पुढे म्हणाले की, १० सहस्र रुपयांची रक्मम वाढवून २५ सहस्र करण्याची आवश्यकता आहे.
        नीतीश कुमार यांनी मुसलमान महिलांच्या तीन वेळा तलाक म्हणण्याच्या प्रकरणी तो त्यांचा अंतर्गत प्रश्‍न असल्याचे म्हणत कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यास नकार दिला होता. त्यावर मोदी यांनी म्हटले की, नितीश कुमार यांनी मतपेढीच्या राजकारणातून बाहेर पडून मुसलमान महिलांसाठी लढले पाहिजे.

बांगलादेशमध्ये धर्मांधाकडून हिंदु महिलेवर बलात्कार !

बांगलादेशमध्ये असुरक्षित हिंदु !
         ढाका - बांगलादेशच्या बगेर्‍हाट जिल्ह्यातील मोलार्‍हाट येथ महंमद सोभान नावाच्या धर्मांधाने एका ३५ वर्षीय हिंदु महिलेवर घरात घुसून बलात्कार केला. सदर महिलेच्या पतीने विरोध करण्याचा प्रयत्न केला असता धर्मांधाने तलवारीने त्याच्यावर वार केला. तेव्हा पतीच्या रक्षणार्थ पुढे आलेल्या पत्नीला तो वार लागला आणि तिचा उजवा पाय कापला गेला. त्या महिलेला गंभीर स्थितीत रुग्णालयात दाखल करण्यात आले. याविषयी पोलिसात तक्रार केली असता पोलिसांनी चुकीच्या कलमाखाली तक्रार दाखल करून घेतली.
         हिंदु कुटुंबावरील या अत्याचाराविषयीचे वृत्त कळताच बांगलादेश मायनॉरिटी वॉचचे कार्यकर्ते रविंद्रनाथ बराल आणि अमरेश गेन यांनी पीडित कुटुंबाला भेट देऊन त्यांच्याशी चर्चा केली. पीडित महिलेला तातडीने वैद्यकीय सेवा पुरवण्यात यावी, त्यांना आर्थिक आणि कायदेशीर साहाय्य पुरवण्यात यावे. तसेच आरोपीला तातडीने अटक करावी, अशी मागणी बांगलादेश मायनॉरिटी वॉच ने केली आहे.

न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रसंघाच्या मुख्यालयावरही दिवाळीची रोषणाई !

       न्यूयॉर्क - संयुक्त राष्ट्रसंघाच्या न्यूयॉर्क येथील मुख्यालयावर प्रथमच दिवाळीनिमित्त रोषणाई करण्यात आली आहे. भारताने त्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाला धन्यवाद दिले आहेत. या मुख्यालयावर निळ्या रंगाची आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. त्यावर दिवा आणि हॅपी दिवाली असा संदेश देण्यात आला आहे. याआधी वर्ष २०१४ मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाने दिवाळीच्या दिवशी कामकाज पूर्णवेळ बंद ठेवून दिवाळी साजरी करण्यात आली होती.

केरळमध्ये गेल्या ६ महिन्यांत बलात्काराची ९१० प्रकरणे !

देशात साक्षरतेमध्ये प्रथम क्रमांकावर असणार्‍या राज्यातील 
गुन्ह्याचे प्रमाण पहाता केवळ सुशिक्षित होणे पुरेसे नाही, 
 तर नीतीमान असणेही तितकेच आवश्यक आहे, हे लक्षात येईल !
        थिरूवनंपुरम् - केरळमध्ये गेल्या सहा महिन्यांत बलात्काराची ९१० प्रकरणे समोर आली आहेत. राज्य पोलिसांच्या आकडेवारीनुसार जुलैपर्यंत महिलांच्या संदर्भात ७ सहस्र ९०९ गुन्हे घडले. यात बलात्कारचे ९१०, छेडछाडीचे २ सहस्र ३३२ आणि अन्य प्रकारचे गुन्हे होते. गेल्या वर्षी बलात्काराची १ सहस्र २६३ प्रकरणे समोर आली होती. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा के.सी. रोसाककुट्टी यांनी याविषयी चिंता व्यक्त केली आहे.

वाहतुकीचे नियम तोडणार्‍यांवर तात्काळ कारवाईसाठी नवीन संगणकीय प्रणाली शोधण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

असा आदेश द्यावा लागणे, ही वाहतूक पोलिसांची 
अकार्यक्षमता नव्हे का ? पुण्यातील वाहतुकीला शिस्त 
लागण्यासाठी पुणे पोलीस काही उपाययोजना करणार का ?
        मुंबई - वाहतुकीचे नियम तोडणार्‍यांवर तात्काळ कारवाईसाठी अत्याधुनिक तंत्राचा वापर करून नवीन संगणकीय प्रणाली (सॉफ्टवेअर) शोधावी. त्याची माहिती प्रतिज्ञापत्रावर सादर करण्याचेे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य शासनाला दिले आहेत. पुणे येथे वाहतुकीचे नियम सर्रासपणे तोडले जातात, रस्त्यावर कोठेही वाहने उभी केली जातात. त्यामुळे वाहतुकीचे नियम पाळण्याची सक्ती सर्वांना करावी आणि त्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करणारी जनहित याचिका किशोर मनसुखानी यांनी केली आहे. त्यावर झालेल्या सुनावणीच्या वेळी न्यायमूर्ती विद्यासागर कानडे आणि न्यायमूर्ती स्वप्ना जोशी यांच्या खंडपिठाने वरील आदेश दिले आहेत.
१. याचिकाकर्त्यांनी सुनावणीच्या वेळी विनंती केली की, विदेशात वाहन क्रमांकाच्या पाटीमध्ये एक चिप बसवलेली असते. एखादा चालक वाहतुकीचे नियम तोडून अथवा अपघात करून पसार झाला, तरी त्याला शोधून कारवाई करणे शक्य होते. ही अत्याधुनिक पद्धत आपल्याकडेही चालू करावी.
२. त्यावर मुख्य सरकारी अधिवक्ता अभिनंदन वग्याणी यांनी न्यायालयाला माहिती देतांना सांगितले की, तूर्तास तरी ही पद्धत आपल्याकडे अंमलात आणणे शक्य नसून त्यासाठी आखणी करावी लागेल. नेटवर्कचे जाळे पसरावे लागेल. मुंबईत एखाद्याने वाहतुकीचा नियम तोडला अथवा अपघात झाला, तर त्याची तक्रार व्हॉटस् अ‍ॅप या सामाजिक प्रणालीवर करता येते आणि त्यानुसार कारवाई केली जाते. त्याविषयीची माहिती दूरचित्रवाहिनी आणि अन्य सामाजिक संकेतस्थळे यांवर दिली जाते. मुंबईप्रमाणे आम्ही पुण्यातही अशी व्हॉटस् अ‍ॅप प्रणाली सिद्ध करू.

पानशेत पूरग्रस्तांच्या समस्या कायमच ! - पानशेत पूरग्रस्त समिती

५५ वर्षानंतरही पूरग्रस्तांच्या समस्या न 
सोडवल्या जाणे, हे सर्वपक्षीय सरकारे आणि 
लोकशाही व्यवस्था यांचे अपयश नव्हे का ?
        पुणे - वर्ष १९६१ मध्ये पानशेत धरण फुटले होते. त्या वेळच्या पानशेत पूरग्रस्तांच्या समस्या आजही कायम असून मधल्या काळात झालेली बैठक म्हणजे, निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर केलेली दिशाभूल होती. राज्य सरकारचे पुनर्वसन, महसूल आणि वित्त हे विभाग टोलटोलवी करत आहेत, असा आरोप पानशेत पूरग्रस्त समितीचे अध्यक्ष मंगेश खराटे यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये केला आहे.
        खराटे पुढे म्हणाले की, पूरग्रस्तांना दिलेले गाळे, गेल्या काही वर्षांत त्याच्या भोवताली त्यांनी केलेले बांधकाम, या गाळ्यांचे आवश्यकतेप्रमाणे केलेले हस्तांतर हे सगळे अधिकृत करणे हा राज्य सरकारचा विषय आहे. तसेच गाळ्यांवर केलेले बांधकाम अधिकृत करणे, हे पालिकेच्या अखत्यारीतील असून त्यावरील निर्णय वर्ष २0१४ मध्येच झाले आहेत; पण प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी झालेली नाही. पुनर्वसन विभागानेच त्या संबधीच्या धारिकांवर निर्णय घ्यावा, असे वित्त आणि महसूल खात्याने असा अभिप्राय दिला असतांनाही विलंब लावला जात आहे.

राज्यातील माहिती आयुक्तांची निम्म्याहून अधिक पदे रिकामी, ४२ सहस्र माहिती प्रकरणे प्रलंबित !

कूर्मगतीचा कारभार ! प्रलंबित 
प्रकरणांचा निपटारा जलदगतीने करण्यासाठी 
राज्य शासनाने तत्परतेने पावले उचलावीत !
       मुंबई - राज्यातील माहिती आयुक्तांची निम्म्याहून अधिक पदे रिकामी असल्याने प्रकरणे ४२ सहस्र माहिती प्रकरणे प्रलंबित असल्याची माहिती माजी केंद्रीय माहिती आयुक्त आणि माहिती अधिकार कार्यकर्ते शैलेश गांधी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून कळवली आहे. ही पदे लवकर भरावीत, अशी विनंती मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांनीही मुख्यमंत्र्यांना केली आहे.
       गायकवाड यांनी पाठवलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, नाशिक, संभाजीनगर आणि अमरावती येथील माहिती आयुक्तांची पदे नुकतीच रिक्त झाली आहेत. याखेरीज माहिती आयुक्तांच्या खंडपिठांपुढे प्रतिमास साधारणपणे ४०० नवीन याचिका प्रविष्ट होत आहेत. माहिती आयुक्तांची पदे रिकामी राहिल्यास त्याचा आयोगाच्या कामावर विपरित परिणाम होऊन प्रलंबित प्रकरणांमध्ये वाढ होईल. परिणामी लोकांना वेळेवर न्याय मिळणार नाही.
फेब्रुवारीपर्यंत पदे भरली 
जातील ! - मुख्यमंत्री कार्यालय
       शैलेश गांधी यांनी पाठवलेल्या पत्राची मुख्यमंत्री कार्यालयाने तात्काळ नोंद घेतली असून माहिती आयुक्तांची रिक्त पदे भरण्याचे आश्‍वासन दिले आहे. गांधी यांच्या पत्राला काही तासांतच उत्तर देतांना मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सहसचिव प्रवीण परदेशी यांनी लिहिले की, मुख्यमंत्र्यांनी या विषयात लक्ष घातले असून माहिती आयुक्तांची रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया चालू आहे. येत्या फेब्रुवारीपर्यंत ही पदे भरली जाऊन त्यांची नेमणूक होईल.

बुरखा घालून खेळण्याच्या सक्तीमुळे भारतीय नेमबाज हिना सिद्धू हिची इराणमधील आशियाई एअरगन नेमबाजी स्पर्धेतून माघार !

महिलांच्या समानतेसाठी प्रसिद्धीलोलूप 
आंदोलने करणार्‍या तृप्ती देसाई आणि त्यांच्या 
संघटना अशा सक्तीच्या विरोधात का बोलत नाहीत ?
        मुंबई - इराणमध्ये होणार्‍या आशियाई एअरगन नेमबाजी स्पर्धेतून भारताची नेमबाज हिना सिद्धू हिने माघार घेतली आहे. महिला खेळाडूंना बुरखा घालून खेळण्याच्या सक्तीमुळे तिने माघार घेतली आहे. (बुरख्याच्या सक्तीला विरोध करणार्‍या हिना सिद्धू हिचे अभिनंदन ! सर्व महिला खेळाडूंनी हिनाचा आदर्श ठेवला पाहिजे, तर सरकारने अशा सक्तीला विरोध दर्शवला पाहिजे ! - संपादक) ही स्पर्धा डिसेंबरमध्ये होणार आहे. या स्पर्धेत हिनाकडून पदकांची अपेक्षा केली जात होती. २०१३ मधील विश्‍वकरंडक स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून ती रिओ ऑलिंपिकसाठी पात्र ठरली होती.
        हिना म्हणाली की, मला काही क्रांती करायची नाही; पण बुरखा घालून खेळणे भाग पाडणे हे खिलाडूवृत्तीच्या विरोधात आहे. अशा अडथळ्यामुळे कामगिरीवर परिणाम होऊ शकतो, असे माझे वैयक्तित मत आहे आणि त्यामुळेच मी या स्पर्धेतून माघार घेत आहे. क्रीडाक्षेत्रात वेगवेगळ्या संस्कृतींचे, वेगवेगळ्या देशांचे, वेगवेगळ्या धर्मांचे खेळाडू एकत्र येऊन खेळत आहेत आणि त्या वेळी केवळ खेळ हेच त्यांचे ध्येय असते, असेही हिनाने म्हटले आहे.

मंदिरांचे पुजारी आणि कर्मचारी यांचे राहणीमान सुधारण्यासाठी पावले उचलणार ! - तेलंगण राज्य धर्मादाय मंत्री

        भाग्यनगर - मंदिरांचे पुजारी आणि कर्मचारी यांचे राहणीमान सुधारण्यासाठी शासन पावले उचलणार आहे, असे तेलंगण राज्याचे धर्मादाय खात्याचे मंत्री ए. इंद्रकरण रेड्डी यांनी येथे सांगितले. मंदिरांचे पुजारी आणि कर्मचारी यांचे वेतन वाढविण्याविषयी त्रीसदस्यीय समितीने सादर केलेल्या अहवालावर मंत्रीमंडळ पथकाकडून अभ्यास करून निर्णय घेतला जाईल, असे रेड्डी यांनी सचिवालयामध्ये झालेल्या मंत्रीमंडळ उपसमितीच्या बैठकीत सांगितले. या बैठकीत राज्याचे गृहमंत्री एन्. नरसिंह रेड्डी, पंचायतराज मंत्री जुपल्ली कृष्ण राव आणि पशुसंवर्धन मंत्री तलसानी श्रीनिवास यादव उपस्थित होते.
        मंत्रीमंडळ पथकाने सर्व मंदिरांकडून जमा-खर्चाचा तपशील मागितला आहे. मंदिरांच्या उत्पनाच्या तुलनेत ३० टक्क्यांपेक्षा अल्प खर्च करणारी मंदिरे आणि ३० टक्क्यांपेक्षा अधिक खर्च करणारी मंदिरे यांविषयी सविस्तर माहिती पुरवण्याचा आदेश अधिकार्‍यांना दिला आहे. तसेच पुजारी आणि इतर कर्मचारी यांच्या वेतनाविषयीचा तपशील मागितला आहे. राज्यातील प्रत्येक मंदिराच्या मालकीची भूमी आणि इतर मालमत्ता यांविषयी सविस्तर माहिती पुरवण्याचा आदेश अधिकार्‍यांना देण्यात आला आहे. नव्याने नोंद करण्यात आलेल्या मंदिरांमध्ये धूप-दीप-नैवेद्य योजना राबवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

जगन्नाथ मंदिरांत मांसाहार बनवण्यात येत असल्याचा उल्लेख असणारा लेख नियतकालिकात प्रसिद्ध केल्याच्या प्रकरणी एअर इंडियाची क्षमायाचना !

या प्रकरणी एअर 
इंडियाने प्रायश्‍चित घेतले पाहिजे !
       नवी देहली - एअर इंडियाने शुभ यात्रा या त्याच्या अधिकृत नियतकालिकात ओडिशा येथील प्रसिद्ध जगन्नाथ पुरी मंदिरात मांसाहार बनवण्यात येत असल्याचा उल्लेख असणारा लेख प्रसिद्ध केला होता. या प्रकरणी एअर इंडियाने क्षमायाचना केली आहे. तसेच या नियतकालिकाच्या सर्व प्रती परत मागवण्यात आल्या आहेत. डिव्होशन कॅन बी डेलीशियस या शीर्षकांतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेल्या लेखात म्हटले होते की, जगन्नाथ पुरी मंदिरात मांसाहारी पदार्थ बनवले जातात. या लेखाच्या विरोधात अनेक संघटनांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. त्यानंतर एअर इंडियाने क्षमायाचना केली आहेे.

संभाजीनगर येथील फटाक्यांच्या दुकानाला लागलेल्या आगीच्या घटनेची सनातन प्रभातच्या वार्ताहराने टिपलेली क्षणचित्रे

१. पूर्ण मैदानावर एकही अग्नीशामक दलाची गाडी नसणे - संभाजीनगर येथे १८६ फटाक्यांच्या कक्षांना अनुमती देण्यात आली होती. त्यापैकी १४० कक्ष चालूही झाले होते. या दुर्घटनेच्या पूर्वी फायर ऑडिटही केले होते; मात्र तेव्हा मोकळ्या मैदानाच्या मध्ये एखादी तरी अग्नीशामक दलाची गाडी ठेवावी, असे वाटले नाही. यामुळेच एका दुकानाची आग शेवटी १८६ व्या दुकानापर्यंत गेली, असे उपस्थित सर्वांनी सांगितले.
२. दोन दुकानांतील अंतर ४ फूट हवे, असे असतांना सर्व दुकाने एकमेकांना चिटकून होती. त्यामुळे लवंगी फटाक्याच्या लडीप्रमाणे सर्व बाजारपेठ जळून गेली. अधिक दुकाने असल्याने कोणाचा आर्थिक लाभ झाला, हे पडताळून पहायला हवे. तसेच विनाअनुमती बरेच फटाक्यांचे कक्ष होते. त्यांचे कोणाशी आर्थिक हितसबंध होते, हे पहाण्यासारखे आहे.
३. मैदानाच्या आजूबाजूचे कापडी आणि प्लास्टिकचे फलक (बॅनर) जळणे आणि रॉकेट, अग्नीबाण आणि इतर नवे फटाके कुठेही उडाल्यामुळे सर्वांची पळतांना तारांबळ उडाली. पहिल्या दुकानाला जेव्हा आग लागली, तेव्हा ती विझवण्यासाठी दोन-चार जण कार्बन डायऑक्साईडचे छोटे सिलेंडर घेऊन आग शमवण्याचा प्रयत्न करत होते; मात्र भडका मोठा असल्यामुळेे सर्वांनीच पळ काढला.
४. बर्‍याच वर्षांपासून येथील मैदानाच्या मागील भागात स्वातंत्र्यसैनिक वसाहतीत रहाणार्‍या नागरिकांनी या बाजारपेठेस विरोध दर्शवला होता; मात्र विरोधास केराची टोपली दाखवण्यात आली.

माय मराठीच्या संचालकाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा प्रविष्ट

खाजगी दूरचित्रवाहिन्यांचे विकृत स्वरूप !
        मुंबई - माइंडसेट ट्रेनिंगच्या नावाखाली एका २१ वर्षीय तरुणीचे नग्न चित्रीकरण आणि छायाचित्रे काढून ते सामाजिक संकेतस्थळांवर ठेवण्याची (अपलोड) धमकी देत बलात्कार केल्याचा गुन्हा माय मराठी या दूरचित्रवाहिनीच्या संचालकाविरुद्ध नोंदवण्यात आला आहे. (अशांना पोलिसांनी तात्काळ अटक करून कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. स्त्रियांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटना हे कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाल्याचेच लक्षण होय ! - संपादक)
१. ही तरुणी मूळची रत्नागिरी येथील रहिवासी असून नालासोपारा येथे तिच्या नातेवाइकांकडे रहाते. माय मराठी दूरचित्रवाहिनीमध्ये प्रमुख वार्ताहरची जागा रिकामी असल्याचे समजताच ती मुलाखतीसाठी तेथे गेली.
२. मुलाखतीच्या वेळी प्रतिमास ३० सहस्र वेतन, चाकरी पाहून वंदे मातरम् प्रतिष्ठानच्या वतीने एक मर्सिडीज आणि एक सदनिका देण्यात येईल, असे आमिष माय मराठी दूरचित्रवाहिनीचे संचालक आणि वंदे मातरम् प्रतिष्ठानचे प्रवक्ते आभास पाटील यांनी दाखवले.
३. त्यानंतर ती तरुणी १ डिसेंबरपासून कामावर रुजू झाली आणि माइंडसेट ट्रेनिंगच्या नावाखाली त्या तरुणीवर ६ मास अत्याचार केले, असा आरोप तिने केला आहे. पाटील यांच्या वाढत्या अत्याचाराला तिने कंटाळून २५ जुलै या दिवशी तिने नोकरी सोडली; परंतु तरीही पाटील तिला मानसिक त्रास देत होता. अखेर तरुणीने तिच्या मैत्रिणीला झालेला प्रकार सांगून गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.

फुटीरतावाद्यांकडून साडेतीन महिने काश्मीरमधील शाळा बंद; मात्र सय्यद अली गिलानी यांची नात शिकत असलेली शाळा चालू !

फुटीरतावाद्यांचा ढोंगी चेहरा उघड !
     श्रीनगर - आतंकवादी बुरहान वानी याला सैन्यदलाने ठार केल्यानंतर काश्मीरमध्ये हिंसाचार चालू आहे. यामुळे गेल्या साडेतीन महिन्यांपासून सर्व खाजगी आणि सरकारी शाळा बंद आहेत; परंतु यामध्ये फुटीरतावादी हुर्रियत कॉन्फरन्सचे नेते सय्यद अली शाह गिलानी यांची नात ज्या श्रीनगरस्थित देहली पब्लिक स्कूलमध्ये शिकते ते मात्र चालू ठेवण्यात आले आहे. या शाळेने नियमबाह्यरित्या परीक्षाही घेतली आहे. 
     नातीच्या वडिलांचे नाव नईम जफर गिलानी आहे. ते गिलानी यांचे मोठे मुलगे आहेत. नईम वडिलांच्या कोणत्याही पक्षाचे सदस्य नाहीत आणि त्यांच्यापासून वेगळे रहातात. नईम यांनी सांगितले की, जर त्यांच्या मुलीने परीक्षा दिली नसती, तर तिचा अभ्यास वाया गेला असता आणि ती मार्चमध्ये होणारी वार्षिक परीक्षा देऊ शकली नसती.

लष्कर-ए-तोयबाकडून शाळांपाठोपाठ आता बँका लक्ष्य !

काश्मीरमध्ये पीडीपी-भाजपचे राज्य कि आतंकवाद्यांचे ?
बँका बंद करा अन्यथा आक्रमण करू !
      श्रीनगर - काश्मीर खोर्‍यात शाळांपाठोपाठ आता बँकांना लक्ष्य करण्यात येत आहे. आतंकवादी संघटना लष्कर-ए-तोयबाने बँकांना परिणाम भोगण्याची धमकी दिली आहे. दक्षिण काश्मीरमध्ये ठिकठिकाणी भित्तीपत्रके लावण्यात आली आहेत. जर बँका बंद केल्या नाहीत, तर बँकांच्या व्यवस्थापकांसह बँकांना परिणाम भोगावे लागतील, असे यात लिहिले आहे.
     नुकतेच कुलगामच्या एका बँकेच्या शाखेतून अज्ञात बंदुकधार्‍याने २ लाख रुपये लुटले. या घटनेच्या २ दिवस अगोदर मध्य काश्मीरमधून एक एटीएम् मशीन पळवून नेण्यात आली. काश्मीरमध्ये पसरलेल्या अशांततेच्या पार्श्‍वभूमीवर खोर्‍यातील अधिकतर बँकांना टाळे लावण्यात आलेले आहे. कामकाज सर्वसाधारणपणे पूर्णपणे बंद आहे. अशा स्थितीतही श्रीनगरमध्ये काही बँका सकाळी ७ ते ११ या कालावधीत काम करत आहेत.

देश एकसंध रहाण्यासाठी आटोकाट प्रयत्न करणे आवश्यक असतांना देशात विषमतेचे बी पेरू पहाणारे उत्तरप्रदेशचे मंत्री आझम खान म्हणतात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अल्लाहु अकबरचीही घोषणा द्यावी !

आझम खान हे उत्तरप्रदेशचे मंत्री आहेत, एका धर्माचे 
नाही, तरीही त्यांनी कधी हिंदु, शीख आणि अन्य धर्मियांच्या 
धार्मिक घोषणा दिल्या आहेत का ? किती मुसलमान मंत्री अन्य 
धर्मियांच्या धार्मिक घोषणा देतात, हेही खान यांनी सांगायला हवे !
         लक्ष्मणपुरी - पंतप्रधान कोणा एका जातीचा किंवा धर्माचा नाही, तर पूर्ण देशाचा असतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ जय श्री रामाचाच नव्हे, तर नारा-ए-तकबीर अल्लाहू अकबर, वाहे गुरू का खालसा वाहे गुरु की फतेह या घोषणाही दिल्या पाहिजेत, असे विधान उत्तरप्रदेशातील समाजवादी पक्षाचे मंत्री आझम खान यांनी येथे केले. दसर्‍याच्या दिवशी पंतप्रधान मोदी यांनी रामलीलेच्या कार्यक्रमात जय श्रीरामच्या घोषणा दिल्या होत्या. त्यावरून खान यांनी वरील विधान केले.

चर्चच्या शाळेतील शिक्षकाला अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अटक !

        कोची (केरळ) - येथून ५० किलोमीटर अंतरावर असलेल्या कोठामंगलम् येथील सिरीयन जाकोबाईट चर्चला संलग्न असलेल्या रविवारच्या शाळेत मुलांना शिकवत असलेले ५६ वर्षीय शिक्षक सुरेश यांना १६ वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली आहे. गेल्या एक वर्षापासून ते अत्याचार करत होते. पीडित मुलगा सुरेश यांच्या घराशेजारीच रहात होता. तोसुद्धा सुरेश यांच्या शाळेत शिकत होता. सुरेशवर अजून ३ प्रकरणांत असेच आरोप करण्यात आले आहेत. सुरेश यांच्यावर भारतीय दंड विधान कलम ३७७ आणि पोस्को कायद्याखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे.

भारत-पाक युद्धात लढलेल्या सैनिकाला एक मासात जमीन देण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश

राज्य शासनाचा गलथान कारभार
       मुंबई - भारत-पाक युद्धात कामगिरी बजावलेल्या सैनिकाला एक मासात भूखंड देण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच दिला. युद्धात कर्तव्य बजावलेल्या राज्यातील सैनिकांना जमीन देण्याचा निर्णय वर्ष १९७१ मध्ये घेण्यात आला. त्यानुसार जखमी सैनिक किंवा हुतात्मा झालेल्या सैनिकांच्या वारसांना शेतजमीन आणि निवासी जमीन देण्यात येते. या सरकारी निर्णयानुसार हिंदुराव इंगळे यांनी राज्य सरकारकडे १० वर्षांपूर्वी जमिनीची मागणी केली होती; परंतु त्यांच्या अर्जाची नोंदही सरकारने घेतली नाही. (असा होता आघाडी सरकारचा कारभार ! प्रशासकीय लालफितीच्या कारभाराचा नुमना ! - संपादक) त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती. त्या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती मंजुळा चेल्लूर आणि न्यायमूर्ती एम. एस. सोनक यांच्या खंडपिठापुढे नुकतीच सुनावणी झाली. त्या वेळी खंडपिठाने वरील आदेश दिले.

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेतून रशिया बाहेर !

     नवी देहली - रशियाला संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेतून बाहेर काढण्यात आले आहे. संयुक्त राष्ट्र महासभेने जिनिव्हास्थित संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेच्या १४ सदस्यांच्या निवडणुकीसाठी मतदान घेतले होते. १९३ सदस्यीय महासभेने मानवाधिकार परिषदेसाठी गुप्त मतदानाद्वारे १४ राष्ट्रांची निवड केली होती. यात रशियाला स्थान मिळाले नाही. हा निर्णय ऐतिहासिक असून जवळपास ८७ मानवाधिकार संघटनांनी रशियाच्या सदस्यत्वाला विरोध केला होता, अशी माहिती न्यू यॉर्क स्थित ह्युमन राइट्स वॉच या संघटनेचे उपसंचालक अक्षय कुमार यांनी दिली. निवडण्यात आलेल्या १४ राष्ट्रांची ३ वर्षांसाठी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेचे सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. सीरियाच्या एलेप्पो शहरात होत असलेल्या युद्ध अपराधांसाठी रशियाला जबाबदार धरण्यात आले आहे.
      भारत ४७ सदस्यीय मानवाधिकार समितीचा सदस्य आहे आणि त्याचा कार्यकाल वर्ष २०१७ मध्ये संपुष्टात येणार आहे.

इसिस आणि बोको हराम यांच्यानंतर नक्षलवादी सर्वाधिक क्रूर ! - छत्तीसगड सरकारचा दावा

क्रूर नक्षलवादावर उपाय काढू न शकणारी 
आतापर्यंतची सरकारे हिंदु राष्ट्र अपरिहार्य करतात !
      नवी देहली - इसिस आणि बोको हराम यांच्यानंतर माओवादी जगात सर्वाधिक क्रूर आहेत, असा दावा छत्तीसगड सरकारने सर्वोच्च न्यायालयात केला. . पुढील काळात नक्षलवाद्यांशी कोणतीही चर्चा केली जाऊ शकत नाही; कारण सरकार आणि नक्षलवादी यांचा एकमेकांवर विश्‍वास अल्प आहे, असे स्वतः सरकारने म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि राज्ये यांना नक्षलवादाला नष्ट करण्यासाठीचे नियोजन सादर करण्यास सांगितले होते. तसेच त्यांच्याशी चर्चा करण्यावरही विचार करण्यास सांगितले होते. त्यावर छत्तीसगड सरकारने वरील दावा केला. न्यायालयाने कोलंबियामधील गेल्या ५० वर्षांपासून चालू असलेली हिंसा चर्चेद्वारे रोखण्याचा यशस्वी प्रयत्न केला होता, त्या आधारे वरील सल्ला दिला होता. 
      राज्याचे अतिरिक्त महाधिवक्ता तुषार मेहता म्हणाले की, काही लोकांना नक्षलवाद समाप्त होऊ नये, असे वाटत असल्याने ही समस्या सुटण्यास अडचण होत आहे. (नक्षलवाद समाप्त होऊ नये, असे वाटणार्‍यांना शोधून त्यांना कठोर शिक्षा करण्यासाठी शासनानेच कृती करणे अपेक्षित आहे ! - संपादक)

आंध्रप्रदेशमध्ये ३ मंदिरांच्या विकास आराखड्यांना मुख्यमंत्र्यांकडून संमती

      विजयवाडा (आंध्रप्रदेश) - आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री एन्. चंद्राबाबू नायडू यांनी राज्यातील ३ मंदिरांच्या विकास आराखड्यांना संमती दिली आहे. यामध्ये विजयवाडा येथील श्री कनकदुर्गा मंदिर, श्री सेलम मंदिर आणि श्री कालहस्ती मंदिर यांचा समावेश आहे. श्री कालहस्ती मंदिराच्या विकासाचा आढावा घेतांना मुख्यमंत्र्यांनी वायुलिंगेश्‍वर स्वामी मंदिरात भक्तांना दर्शन घेणे सोयीचे व्हावे, यासाठी मंदिर परिसराचे रूंदीकरण करण्याचा आदेश धर्मादाय खात्याच्या अधिकार्‍यांना दिला. मंदिराच्या परिसरात सांस्कृतिक केंद्र उभारण्यात यावे, तसेच स्वर्णमुखी परिसराचे सौंदर्यीकरण करण्यात यावे, असे मुख्यमंत्र्यांनी अधिकार्‍यांना सांगितले. 
     श्री सेलम मंदिर तिरुमला मंदिराच्या धर्तीवर विकसित करण्याची सरकारची योजना आहे. त्यासाठी मंदिराच्या परिसरातील ३ सहस्र २५० कुटुंबांचे स्थलांतर करण्यात येणार असून त्यांना आधुनिक घरे बांधून देण्यात येणार आहेत, असे मुख्यमंत्री नायडू यांनी सांगितले. त्रिलिंग यात्रा आणि अष्टशक्ती यात्रा याविषयीचे माहितीपत्रक मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले. दगडफेकीसाठी काश्मीरमधील मुलांना अशिक्षित ठेवण्याचा फुटीरतावाद्यांचा प्रयत्न ! - मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती

मुख्यमंत्र्यांनी हे केवळ सांगणे अपेक्षित नाही, 
तर फुटीरतावद्यांच्या विरोधात कृती करणे अपेक्षित आहे !
      उधमपूर (जम्मू-काश्मीर) - नवी पिढी दगडफेक करण्यासाठी अशिक्षित रहावी आणि तोफगोळ्यांचे बळी म्हणून त्यांचा वापर करता यावा, यासाठी फुटीरतावादी खोर्‍यात शाळा चालवू देत नाहीत, असा आरोप जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी केला आहे. फुटीरतावादी गरीब कुटुंबांतील मुलांना हेरून त्यांना लष्करी तळ, पोलीस ठाणे आणि केंद्रीय राखीव पोलीसदलाचे तळ येथे आक्रमण करण्यासाठी उत्तेजन देत आहेत आणि त्यांचा ढालीसारखा वापर करत आहेत. त्याच वेळी स्वत:च्या मुलांना मात्र सुरक्षित ठेवत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.

काश्मीरमध्ये आतंकवाद्यांकडून शाळेच्या इमारती उद्ध्वस्त करण्याची मोहीम !

काश्मीरमधील दंगलखोरांचे समर्थन करणारे शाळांवरील आक्रमणाविषयी गप्प का ?
      श्रीनगर - काश्मीरमधील शाळा पूर्णपणे बंद रहाव्यात यासाठी आतंकवाद्यांकडून शाळेच्या इमारती उद्ध्वस्त केल्या जात आहेत. गेल्या ३ महिन्यांत एकूण १७ सरकारी आणि ३ खासगी शाळा पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आल्या. आतंकवादी बुरहान वानी याला ठार केल्यापासून काश्मीर खोर्‍यातील शाळा बंद आहेत. येथील २० लाख विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यापासून रोखले जात आहे. शाळा पुन्हा चालू करण्याचा प्रयत्न करणारे जम्मू-काश्मीरचे शिक्षण मंत्री अख्तर यांना लष्कर-ए-तोयबाने धमकी दिली होती की, जर त्यांनी माघार घेतली नाही, तर त्यांच्या विरोधात आम्हाला कारवाई करावी लागेल.पाकचे क्रिकेटपटू आनंद व्यक्त करण्यासाठी भर मैदानात पुश-अप्स ऐवजी प्रार्थना करणार !

भारताचे क्रिकेटपटू प्रार्थना करतात का ?
       इस्लामाबाद - पाकच्या सत्ताधारी पक्षातील सदस्यांनी पाकिस्तानच्या क्रिकेट संघातील खेळाडूंना आनंद व्यक्त करण्यासाठी भर मैदानातच पुश-अप्स काढण्याला विरोध केला आहे. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट मंडळाने खेळाडूंना असे करण्यावर बंदी घातली आहे. पाकिस्तान मुस्लिम लीगच्या राणा अफझल खान यांच्या मते खेळाडूंनी आनंद म्हणून मैदानात पुश-अप्स (व्यायामाचा एक प्रकार) काढण्यापेक्षा प्रार्थना म्हणायला हव्यात. पाकच्या खेळाडूंनी इंग्लंड दौर्‍यावर पुश-अप्स काढल्या होत्या. खान म्हणाले की, क्रिकेट हा सभ्य गृहस्थांचा खेळ आहे. पुश-अप्समधून खेळाची शक्ती दिसत नाही. उलट अशा गोष्टी केल्याने पाकची नकारात्मक प्रतिमा निर्माण होते. ती थांबायला हवी. देशाची सकारात्मक छबी विश्‍वासमोर यायला हवी. त्यासाठी प्रयत्न व्हायला हवे.

दलाई लामा यांच्या अरुणाचल प्रदेश भेटीला विरोधच ! - चीन

      बीजिंग - तिबेटचे प्रमुख धर्मगुरु दलाई लामा यांच्या अरुणाचल प्रदेश भेटीमुळे भारताबरोबरच्या द्विपक्षीय संबंधात तणाव निर्माण होईल, असे मत चीनने व्यक्त केले आहे. तसेच त्यांच्या भेटीमुळे शांततेवर परिणाम होणार असून सीमा भागातही अशांतता निर्माण होणार असल्याने त्याला आमचा विरोधच आहे, असे चीनचे परराष्ट्र व्यवहार मंत्री लु कांग यांनी म्हटले आहे. अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी दलाई लामा यांना आमंत्रित केल्यानंतर भारताने लामा यांना अरुणाचल प्रदेशमध्ये जाण्यास अनुमती दिली आहे. 
      चीनने अरुणाचल प्रदेश हा दक्षिण तिबेटचा भाग असल्याचा दावा करत भारताच्या नेत्यांच्या आणि विदेशी अधिकार्‍यांच्या दौर्‍याविषयीही यापूर्वी नाराजी व्यक्त केली होती. 
     या वेळी दलाई लामा यांनी अरुणाचल प्रदेशला यापूर्वी भेट दिली आहे, याची पत्रकारांनी कांग यांना आठवण करून दिली. यावर कांग म्हणाले की, एकदा तुम्ही चूक केलीत म्हणजे ती कायम करायलाच हवी असे नाही.स्त्री-पुरुष समानतेमध्ये भारत १०८ वरून ८७ व्या स्थानी !

स्त्री-पुरुष यांच्यात समानता नसतांनाही ती निर्माण करणे आणि 
त्याआधारे एखाद्या देशाचा स्तर घोषित करणे हा प्रकार निरर्थकच होय !
       जीनिव्हा - येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमकडून स्त्री-पुरुष समानतेविषयी घोषित करण्यात आलेल्या सूचीमध्ये भारत ८७ व्या स्थानी आला आहे. गेल्या वर्षीच्या अहवालात भारत १०८ व्या स्थानी होता. स्त्रियांच्या शिक्षणाच्या क्षेत्रात गेल्या वर्षभरात भारताने चांगली प्रगती केल्याने भारताचे स्थान वर सरकले आहे; परंतु भारताला आणखी मोठा पल्ला गाठायचा आहे, असे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने म्हटले आहे. 
       आर्थिक, शैक्षणिक, आरोग्य आणि राजकीय प्रतिनिधित्व या ४ क्षेत्रांतील स्त्री-पुरुषांच्या प्रमाणाच्या आधारे ही सूची बनवण्यात येते. या सूचीत आइसलॅण्डने प्रथम क्रमांक पटकावला आहे. भारतीय राजकारणात महिलांचे प्रमाण वाढत असून याविषयीच्या सूचीमध्ये जगातील पहिल्या १० देशांमध्ये भारताचा समावेश झाला आहे. (उद्या स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने भ्रष्टाचार आणि अनैतिक कृत्य करू लागल्यास त्यातही समानताविषयक क्रमांक देण्यात येणार का ? - संपादक)

८४ अनधिकृत धार्मिक स्थळांवर लवकरच कारवाई !

नाशिक येथे अनधिकृत 
धार्मिक स्थळांना नोटीस
       नाशिक - न्यायालयीन आदेशानुसार महापालिका क्षेत्रात २००९ नंतरची अनधिकृत धार्मिक स्थळे तातडीने हटवण्यासंदर्भात लवकरच कारवाई चालू करण्यात येणार असून त्याअंतर्गत प्रथम टप्प्यात कारवाई करण्यात येणार्‍या ८४ अनधिकृत धार्मिक स्थळांना नोटीस देण्यात आली आहे.
१. अनुमतीविना सार्वजनिक रस्त्यांवर वाहतुकीला अडथळा होईल अशा ठिकाणी धार्मिक स्थळांची उभारणी झाली आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने २००९ नंतरची अनधिकृत धार्मिक स्थळे हटवण्यासंदर्भात आदेश दिले; मात्र त्यातही चालढकल होत असल्याचे लक्षात घेऊन न्यायालयाने ताशेरे ओढले होते. त्यामुळे २००९ नंतरच्या सार्वजनिक रस्त्यांवरील अनधिकृत धार्मिक स्थळे हटवण्याची कारवाई लवकरच चालू करण्यात येणार आहे.
२. प्रथम टप्प्यामध्ये पालिकेच्या सहाही विभागीय कार्यालय क्षेत्रांत असलेल्या अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाईची नोटीस चिकटविण्यात आली आहे. त्यात नाशिक पूर्व १४, नाशिक पश्‍चिम १७, सातपूर, १०, मध्य नाशिक ४, पंचवटी २५, नाशिक रोड १४ याप्रमाणे एकूण ८४ धार्मिक स्थळांचा समावेश आहे. संबंधितांनी आपापली अनधिकृत धार्मिक स्थळे हटवून सहकार्य करण्याचे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

उत्तरप्रदेशातील नवजात बालकाच्या कपाळावर त्रिशूळ, ॐ सारखी चिन्हे !

अंनिसला याविषयी काय म्हणायचे आहे ?
      नवी दिल्ली - उत्तरप्रदेशातील रामगडमधील एका नवजात मुलाच्या कपाळावर त्रिशूळासारखी आकृती निर्माण झालेली आहे. केवळ कपाळावरच नव्हे, तर त्याचे दंड आणि छातीवरही प्रतिदिन त्रिशूळ, ॐ, त्रिनेत्र यांसारख्या आकृत्या निर्माण होऊन नाहीशा होतात. १० ऑगस्टला जन्मलेले हे बाळ लोकांच्या कुतूहलाचा विषय बनले आहे. अरूण कंवर यांचा हा मुलगा आहे. मुलगा निरोगी असला, तरी हा काय प्रकार असावा हे स्थानिक डॉक्टरांना समजलेले नाही. काहींच्या मते ब्लड कॅपलरीज डिफेक्टमुळे हिमांजोयोमा नावाच्या विकाराचा हा परिणाम असावा. या मुलाचे कुटुंबिय मात्र कोणत्याही चिंतेत नसून त्यांच्या घरात उत्साहाचे वातावरण आहे.

(म्हणे) समान नागरी कायद्याला ईशान्येकडील जनतेचाही विरोध ! - असदुद्दीन ओवैसी

देशहितासाठी आवश्यक असणार्‍या गोष्टीला धर्मांधांनी कितीही 
विरोध केला, तरी सरकारने तो विरोध मोडून काढत निर्णय घेणे आवश्यक आहे ! 
      भाग्यनगर - समान नागरी कायदा हा केवळ मुसलमानांचा प्रश्‍न नाही, तर ईशान्येकडील विशेषत: नागालॅण्ड आणि मिझोराम येथील जनतेचाही त्याला विरोध आहे, असे एम्आयएम्चे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटले आहे. भारतातील नागरिकांना याविषयी काळजी वाटते; कारण या प्रश्‍नाचा संबंध अनेकतत्त्ववाद आणि वैविध्यतेशी संबंधित असून भाजपला ते संपुष्टात आणायचे आहे, असा आरोप ओवैसी यांनी केला.

गुजरातचे ५५४ मच्छीमार पाकच्या कारागृहात बंद !

भारतीय मच्छीमारांच्या सुटकेसाठी केंद्र स
रकार काय प्रयत्न करत आहे, हे त्यांनी जनतेला सांगावे ! 
      कर्णावती - गुजरातचे ५५४ मच्छीमार आणि ९०० हून अधिक नौका पाकच्या कह्यात आहेत. त्यांच्या सुटकेसाठी भारताचे एक शिष्टमंडळ पाकमध्ये जाणार होते; मात्र सध्याच्या तणावाच्या स्थितीमुळे ते लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. पाक सरकारने वर्ष २०१६ मध्ये २२ नौका आणि ४७२ मच्छीमारांना मुक्त करण्याचा निर्णय घेतला होता; मात्र सर्जिकल स्ट्राईकमुळे ते रहित झाले. गुजरातच्या जामनगर, द्धारका, पोरबंदर आणि सौराष्ट्र येथील हे मच्छीमार आहेत. नॅशनल फिश वर्क्स फोरमचे सचिव मनीष लोढा म्हणाले की, यामुळे मत्स्योद्योगाची कोट्यवधी रुपयांची हानी होत आहे.

अशा धर्मांधांवर शासनाने तात्काळ खटला चालवून कठोरातील कठोर शिक्षा केली पाहिजे !

मठाच्या पिठावर बसून छायाचित्र काढणार्‍या महंमद आरिफ याला अटक !
      दावणगिरी (कर्नाटक) - दावणगिरी जिल्ह्यातील जगलूर येथे महंमद आरिफ या व्यक्तीला येथील श्री कनाकुप्पी गवी मठाच्या पिठावर बसून छायाचित्र काढून ते सामाजिक संकेतस्थळावर अपलोड केल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्याने धार्मिक भावना दुखावल्याने त्याच्या विरोधात तक्रार करण्यात आली होती. भाविकांनी सामाजिक संकेतस्थळावर हे छायाचित्र पाहिजल्यावर त्याला पकडून चोप दिला आणि पोलिसांच्या कह्यात दिले.आसाममध्ये इमामाला फसवणुकीच्या प्रकरणी पोलीस कोठडी !

हिंदूंच्या संतांच्या विरोधात वृत्त देणारी प्रसारमाध्यमे 
मुसलमान आणि खिस्ती यांच्या धर्मगुरूंच्या विरोधातील वृत्ते दडपतात !
      गौहत्ती - आसाममध्ये एका मशिदीच्या इमामाने त्याच्या एका कर्जदार शत्रूला अडचणीत आणण्यासाठी त्याच्या नावे भाजपच्या आमदाराला धमकीचे संदेश पाठवले होते. या फसवणुकीच्या प्रकरणी पोलिसांनी इमामाला अटक केली आहे.
     दक्षिण आसाममधील करीमगंज जिल्ह्यातील खिलोरबंद मशिदीचे इमाम अब्दुस शाहीद यांनी कर्जदाराला दिलेले ५० सहस्र रुपये परत मिळवण्याचा प्रयत्न चालवला होता. त्यामुळे त्यांनी त्या कर्जदार शत्रूच्या नावे पठारकंडीचे भाजपचे आमदार कृष्णेंदु पॉल यांना भ्रमणभाषवरून संदेश पाठवून बांगलादेशची जेएम्बी ही जिहादी संघटना आणि पाकिस्तानची आयएस्आय यांच्याशी संबंध असल्याचे सांगितले. अब्दुस शाहीद यांनी मला जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच माझ्याकडून ५० लक्ष रुपयांची मागणी केली. प्रत्येक संदेशात खाली त्यांच्या शत्रूचे नाव लिहिले, असे आमदार कृष्णेंदु पॉल यांनी सांगितले. हिलरी क्लिंटन यांना प्रचारासाठी अमेरिकेतील भारतियांकडून ६७ कोटी रुपये !

      वॉशिंग्टन - अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत डेमोक्रेटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांचा विजय व्हावा; म्हणून त्यांना येथील भारतीय वंशाचे नागरिक साहाय्य करत आहेत. तेथील भारतियांना हिलरी यांच्या प्रचार मोहिमेला ६७ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. यापूर्वी काही भारतियांना रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनाही असाच निधी देऊ केला होता.भारताप्रमाणे अमेरिकेची प्रगती का होत नाही ? - डोनाल्ड ट्रम्प यांचा बराक ओबामा यांना प्रश्‍न

      वॉशिंग्टन - ओबामा पहिले राष्ट्राध्यक्ष आहेत ज्यांच्या कार्यकाळात देशाचा आर्थिक विकासदर ३ टक्क्यांंहून अधिक झालाच नाही. देश मोठा असल्याने जलदगतीने विकास करू शकत नाही, असे मला सांगण्यात आले आहे; पण भारतही मोठा देश असून ८ टक्के विकास दर घेऊन वाटचाल करत आहेत. जर भारत ८ टक्के विकासदर घेऊन प्रगती करू शकतो, तर मग अमेरिका का करू शकत नाही, असा प्रश्‍न अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदाचे रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांना विचारला आहे. मॅनचेस्टमधील न्यू हॅम्पशायर येथील प्रचारसभेत त्यांनी हा प्रश्‍न विचारला. प्रचारसभा चालू होण्याच्या काही घंट्यांपूर्वीच अर्थव्यवस्थेशी संबंधित आकडेवारी घोषित करण्यात आली होती. आकड्यांनुसार अमेरिकेचा तिमाहीत २.९ टक्के विकासदर असल्याचे सांगण्यात आले होते. चीनही ६ ते ८ टक्के विकासदराने प्रगती करत आहे, असेही ट्रम्प यांनी सांगितले.

पाकिस्तानी कलाकारांवर कायमची बंदी हवी ! - गजेंद्र चौहान

        पुणे, ३१ ऑक्टोबर - भारतात चित्रपटात काम करण्यासाठी सहस्रो इच्छुक भारतीय कलाकार असतांना पाकिस्तानी कलाकारांना चित्रपटात घेण्याची आवश्यकता काय ? पाकिस्तानी कलाकारांना चित्रपटात घेण्यामागे निर्मात्यांचा आर्थिक लाभाचा दृष्टीकोनही असू शकतो. त्यांना चित्रपटाची प्रसिद्धी करण्यासाठी एक देश मिळतो. आपल्याच घरात घुसून आपल्याच लोकांना मारणार्‍या लोकांना तुम्ही चहा-नाश्ता विचारणार का ? असा परखड प्रश्‍न उपस्थित करत भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेचे अध्यक्ष (एफ्टीआयआय) अध्यक्ष श्री. गजेंद्र चौहान यांनी पाकिस्तानी कलाकारांवर कायमची बंदी घालण्यात यावी, असे मत व्यक्त केले.
        संस्थेतील विद्यार्थ्यांनी श्री. चौहान यांच्या नियुक्तीच्या वेळी तीव्र विरोध दर्शवला होता. या संदर्भात श्री. चौहान म्हणाले, मोदी सरकारला विरोध करण्यासाठीच माझ्या नियुक्तीवर आक्षेप घेण्यात आले. मला कितीही विरोध झाला, तरी सरकारने दिलेले दायित्व पूर्ण करीन.

स्वयंप्रेरणेने निघणारे महाराष्ट्रातील मराठा समाजाचे मोर्चे !

वैद्या (कु.) माया पाटील
       कोपर्डी (जिल्हा नगर, महाराष्ट्र) येथील एका अल्पवयीन मुलीवर झालेला अमानवी बलात्कार, शेतकर्‍यांच्या आत्महत्या, उरी (जम्मू-काश्मीर) येथे आतंकवादी आक्रमणामध्ये बळी गेलेले सैनिक, तसेच मराठा समाजातील गुणवत्ता असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणवत्तेनुसार मिळत नसलेला दर्जा या समस्यांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी संपूर्ण मराठा समाज एकत्रित होऊन रस्त्यावर उतरत आहे. या मोर्च्याची अनेक वैशिष्ट्ये आहेत. आज सामान्य माणूस संघटित झाल्यावर तो काय करू शकतो ?, याचे हे ज्वलंत उदाहरण आहे. सुशिक्षित समाज जागृत झाल्यावर त्याची शक्ती कशी कार्य करते आणि सुशिक्षित समाज रस्त्यावर कशा पद्धतीने उतरतो, याची झलक या दृष्टीने मराठा समाजाच्या मोर्च्यांकडे पाहिल्यावर येते. या मोर्च्यामध्ये सामील होता आल्याने मोर्च्याचे उत्कृष्ट नियोजन, समाजाचा उत्स्फूर्त प्रतिसाद, शिस्तबद्धता, प्रशासनाचे सहकार्य, अशा अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. सूज्ञ समाजाने संघटितरित्या उचललेले हे पाऊल आदर्शच म्हणावे लागेल. या मोर्च्याच्या निमित्ताने जाणवलेली सूत्रे येथे देत आहोत.

मनमाड (जिल्हा नाशिक) शहर पोलिसांनी स्मशानात साजरी केली दिवाळी

धर्मशिक्षणाच्या अभावी आणि अहंभावापोटी 
तथाकथित बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी केलेली अयोग्य 
कृती ! हिंदु राष्ट्रात धर्माचरण करणारे पोलीस असतील !
        मनमाड, ३१ ऑक्टोबर - येथील शहर पोलीस ठाण्याच्या कर्मचार्‍यांनी २९ ऑक्टोबर या दिवशी स्मशानात दिवाळी साजरी केली. स्मशानात काम करणार्‍या कर्मचार्‍यांना दिवाळीचा आनंद उपभोगता यावा, अमावास्या आणि स्मशान यांविषयीच्या अंधश्रद्धा दूर व्हाव्यात, यांसाठी ही संकल्पना राबवल्याचे मनमाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पुंडलिक सपकाळे यांनी सांगितले. या वेळी पोलीस कर्मचार्‍यांनी स्मशानात स्वच्छता करून पणत्या प्रज्वलित केल्या.

टपाल कार्यालयांतून विकल्या जाणार्‍या गंगाजलाला महाराष्ट्रात उत्तम प्रतिसाद !

       मुंबई - टपाल खात्याने जुलै मासापासून टपाल कार्यालयातून गंगाजलाची विक्री करण्यास प्रारंभ केला होता. या विक्रीला महाराष्ट्रात उत्तम प्रतिसाद मिळत आहे, असे टपाल खात्याच्या महाराष्ट्र आणि गोवा परिमंडळाच्या अधिकार्‍यांनी सांगितले. टपाल कार्यालयामध्ये गंगोत्री आणि ऋषिकेश येथून गंगाजल आणले जाते. हे जल २०० आणि ५०० मिलीलिटरच्या बाटल्यांतून विकले जाते. त्यांपैकी ऋषिकेश येथून आणलेल्या गंगाजलाला अधिक मागणी आहे. गंगोत्री येथील गंगाजल हे स्थान लांब असल्याने थोडे महाग आहे. महाराष्ट्रात १० जुलै ते १५ सप्टेंबर या कालावधीत गंगाजलाच्या २०० आणि ५०० मिलीलिटरच्या अनुक्रमे १ सहस्र ९४३ आणि १ सहस्र ८५५ बाटल्या विकल्या गेल्या. गंगाजल हे महाराष्ट्र आणि गोवा परिमंडळातील सर्व टपाल कार्यालयांत उपलब्ध आहे, असे अधिकार्‍यांनी सांगितले.

राज्य परिवहन महामंडळाची सहा प्रादेशिक कार्यालये दिवाळीनंतर बंद होणार !

       धुळे - महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची मुंबई, पुणे, नाशिक, संभाजीनगर, नागपूर, अमरावती ही सहा प्रादेशिक कार्यालये दिवाळीनंतर बंद होणार आहेत, अशी माहिती एसटी महामंडळाच्या सूत्रांनी दिली.
       नोव्हेंबर २०१६ च्या दुसर्‍या आठवड्यात याची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. ही कार्यालये बंद होणार असल्याने एस्टीची दोन कोटींपेक्षा अधिक बचत होणार आहे. त्यामुळे ६ प्रादेशिक व्यवस्थापक, ६ प्रादेशिक अभियांत्रिकी, ६ सांख्यिकी अधिकारी, ६ सुरक्षा आणि दक्षता अधिकारी या अधिकारी वर्गासाठी असलेली १२ वाहने यांवर होणारा व्यय टळणार आहे.
       ही सहा प्रादेशिक कार्यालये बंद झाल्यानंतर एस्टीच्या विभागीय कार्यालयाचा आता थेट मध्यवर्ती कार्यालयाशी संपर्क होणार आहे. त्यामुळे प्रशासन अधिक गतीमान होण्यास साहाय्य होईल.

धरणांमधील गाळामुळे पाणीसाठ्यात घट

        अमरावती, ३१ ऑक्टोबर - गाळ साचल्याने गेल्या तीस वर्षांत राज्यातील ६१ धरणांमधील पाणीसाठा ८.५ टक्क्यांनी न्यून झाल्याचे महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेच्या (मेरी) सर्वेक्षणातून निदर्शनास आले आहे. गाळ साठून प्रत्येक वर्षी सिंचन क्षमतेत सरासरी ०.२५ घट होत असल्याचेही निदर्शनास आले आहे. गाळामुळे धरणातील उपयुक्त पाणीसाठा न्यून होत जातो.

सनबर्न आणि सुपरसॉनिक महोत्सव यंदा पुण्यात !

       पुणे, ३१ ऑक्टोबर - गोव्यात मागील ३ वर्षे होणारा सुपरसॉनिक संगीत महोत्सव यंदा पुणे येथे १० फेब्रुवारी २०१७ ला आयोजित करण्यात येणार असल्याचे आयोजक व्हायकॉम-१८ ने घोषित केले होते. या जोडीला गोव्यातील कांदोळी येथे होणारा सनबर्न संगीत महोत्सवही पुण्यात २८ ते ३१ डिसेंबर २०१६ ला आयोजित करण्यात आला आहे. (पाश्‍चात्त्य विकृतीला चालना देणारे महोत्सव आयोजित करण्यापेक्षा सरकारने भारतीय संस्कृती आणि कला यांच्याशी नाळ जोडणारे कार्यक्रम आयोजित करून त्यांना प्रोत्साहन द्यावे, ही अपेक्षा ! - संपादक)
       गोवा पर्यटन खात्याने यंदाच्या वर्षापासून दोन संगीत महोत्सवाच्या आयोजनास मनाई केली आहे. १५ डिसेंबर ते १५ जानेवारी या कालावधीत गोवा येथे पर्यटकांची मोठी गर्दी होत असल्याने एकाच संगीत महोत्सवाला अनुमती देण्याचे धोरण पर्यटन खात्याने अवलंबले होते. याच जोडीला २० सहस्रांपेक्षा अधिक लोकांची उपस्थिती असलेल्या महोत्सवाचे परवाना शुल्क ५ कोटी रुपये केल्याने आयोजकांनी हे महोत्सव गोवा सोडून अन्यत्र घेण्याचे ठरवल्याचे सांगितले जाते.

ऑस्ट्रेलियातील रेड बबल आस्थापनाकडून हिंदूंच्या देवतांची चित्रे लेगिंन्सवर छापून विडंबन !

हिंदूंनी अशा 
आस्थापनांवर बहिष्कार घालावा !
         मेलबोर्न - रेड बबल या ऑस्ट्रेलियातील प्रतिदिन वापरातील साहित्याची ऑनलाईन विक्री करणार्‍या आस्थापनाने लेगिंन्सवर (मुलींची तंग विजार) ब्रह्मा, श्रीविष्णु, शिव, श्रीकृष्ण, गणेश, दुर्गादेवी, लक्ष्मीदेवी, स्कंध, सरस्वतीदेवी, हनुमान, काली, शेषनारायण इत्यादी देवतांची चित्रे छापून विडंबन केले आहे. त्यामुळे विदेशातील हिंदु धर्मियांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. अमेरिकेतील धार्मिक नेते श्री. राजन झेद यांनी नेवाडा येथून एक पत्रक प्रसिद्ध करून रेडबबल आस्थापनाकडे लेगिंगवरून देवतांची चित्रे हटवण्याची मागणी केली आहे. रेडबबल आस्थापनाच्या संकेतस्थळाला १९२ देशांतील ४२ लक्ष ग्राहक भेट देतात.
धर्माभिमानी या संपर्कावर निषेध नोंदवत आहेत.
press@redbubble.com

नागपंचमीसाठी शिराळकरांचा बहिष्कार

शिराळा नगरपंचायतीसाठी एकही आवेदन नाही
       बत्तीस शिराळा (जिल्हा सांगली), ३१ ऑक्टोबर (वार्ता.) - शिराळा नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शेवटच्या दिवशी एकही आवेदन दाखल झाले नाही. जिवंत नागाची पूजा करण्यास अनुमती मिळत नाही, तोपर्यंत शिराळकरांनी सर्व प्रकारच्या निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात मुख्याधिकारी श्री. अशोक कुंभार म्हणाले, एकही आवेदन दाखल न झाल्याचा अहवाल आम्ही निवडणूक आयोगाकडे पाठवला आहे. आयोगाच्या निर्देशनानुसार पुढील कार्यवाही केली जाईल.
       गेले सहा दिवस आवेदन स्वीकारण्याची प्रक्रिया चालू होती; मात्र शेवटच्या दिवसापर्यंत एकही आवेदन प्रविष्ट झाले नाही. शिराळा येथील नागरिकांनी घेतलेला हा निर्णय क्रांतीकारी असून राज्यभर या निर्णयाची चर्चा चालू आहे. या संदर्भात प्रशासन आणि शासन आता काय निर्णय घेणार, याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.

सातारा येथे नगराध्यक्ष पदासाठी १३ अर्ज प्रविष्ट

नगरसेवक पदासाठी २२७ जणांचे अर्ज
         सातारा, ३१ ऑक्टोबर (वार्ता.) - शहरासह संपूर्ण जिल्ह्यात नगपालिका निवडणूकांची सिद्धता चालू झाली आहे. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सर्वच इच्छुक उमेदवारांनी शक्तीप्रदर्शन करत आपापले उमेदवारी अर्ज भरले. यामध्ये नगर विकास आघाडीच्या श्री. सौ. वेदांतिकाराजे भोसले आणि सातारा विकास आघाडीच्या सौ. माधवी कदम या नगराध्यक्ष पदाच्या प्रमुख दावेदार मानल्या जात आहेत. भाजप आणि मित्रपक्षांनी सौ. सुवर्णादेवी पाटील यांच्या रूपाने सातारावासियांना सक्षम पर्याय दिला आहे. यंदाच्या पालिका निवडणुकीची चर्चा अधिक प्रमाणात वाढत आहे. येथे नगराध्यक्ष पदासाठी १३ अर्ज, तर नगरसेवक पदासाठी २२७ अर्ज प्रविष्ट करण्यात आले आहेत.
         भारतातली पहिली नगरपालिका असलेल्या रहिमतपूर, तसेच फलटण, वाई, म्हसवड, पाचगणी, कराड, महाबळेश्‍वर येथील पालिकेतून उमेदवारी अर्ज भरण्यात आले आहेत.

राज्यात कायदा-सुव्यवस्था नसल्याचे द्योतक !

क्षुल्लक कारणावरून 
तरुणांकडून पेट्रोल पंपाची तोडफोड !
       मनमाड - मनमाड-येवला रस्त्यावर अनकवाडे येथील फौजी ढाबा आणि पेट्रोलपंप येथे जेवणाच्या कारणावरून सात तरुणांच्या टोळक्याने पेट्रोलपंपावर मध्यरात्री तोडफोड केली. या प्रकरणी पोलिसांनी सात जणांना कह्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध गुन्हा प्रविष्ट केला आहे. पोलिसांनी रात्री दहानंतर रस्त्यावरील ढाबे, उपहारगृह चालू ठेवण्यास मज्जाव केला होता. असे असतांनाही ढाबा मध्यरात्रीपर्यंत चालू होता.
       तरुण येथे जेवायला आले असतांना मद्य न मिळाल्याने त्यांनी तेथील व्यवस्थापकाशी वाद घातला. शिवीगाळ केली. नंतर काही वेळाने पुन्हा ढाब्यावर येऊन लाठीकाठी आणि तलवार घेऊन मोडतोड केली. क्लोज्ड टीव्ही सर्किट कॅमेर्‍याच्या चित्रीकरणानुसार पोलिसांनी ७ जणांना कह्यात घेतले. न्यायालयात उपस्थित केल्यावर त्यांना २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

शिवसेनेच्या वतीने १ नोव्हेंबर या दिवशी मूक सायकलफेरी

       बेळगाव, ३१ ऑक्टोबर (वार्ता.) - सीमाप्रश्‍नाला बळकटी देण्यासाठी १ नोव्हेंबर या दिवशी म.ए. समिती आयोजित मूक सायकलफेरीला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचा निर्धार सीमावासियांनी व्यक्त केला आहे. काळ्या दिनी सीमावासियांचा आवाज बुलंद करण्यासाठी कोल्हापूरचे शिवसेनेचे आमदार श्री. राजेश क्षीरसागर, सांगली जिह्यातील खानापूरचे आमदार श्री. अनिल बाबर आणि शिरोळचे आमदार श्री. उल्हासदादा पाटील हे मोर्च्यात सहभागी होणार आहेत, अशी माहिती शिवसेनेच्या वतीने देण्यात आली आहे. सीमावासियांवर करण्यात आलेल्या अन्यायाच्या विरोधात १९५६ पासून प्रतिवर्षी १ नोव्हेंबर या दिवशी हरताळ पाळणे आणि मूक सायकलफेरी काढण्यात येते.

विकास निधी देण्यास ग्रामविकास विभागाची टाळाटाळ !

  • प्रशासनाचा भोंगळ कारभार !
  • ५० कोटी रुपयांची आर्थिक हानी
       पनवेल - १०० कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल असलेल्या पनवेल नगरपरिषदेचा विस्तार राज्य सरकारने महानगरपालिकेत केल्यानंतर पालिकेला विविध स्वराज्य संस्थांनी साहाय्य करणे अपेक्षित होते; परंतु समन्वयाच्या अभावामुळे पालिका क्षेत्रातील २९ गावांचा कारभार करणार्‍या ग्रामपंचायतींचा विकास निधी देण्यास ग्रामविकास विभाग टाळाटाळ करत आहे. त्यामुळे अनुमाने ५० कोटी रुपयांना पालिकेला मुकावे लागणार आहे.
       अपेक्षित निधी न मिळाल्यास पालिकेत सध्या चालू असलेली कामे रखडतील, तसेच ग्रामपंचायतींत काम करणार्‍या कर्मचार्‍यांच्या वेतनाचा प्रश्‍न भविष्यात निर्माण होईल, अशी स्थिती आहे.

पोलीस आणि प्रशासन यांना निवेदन दिल्यानंतरही सांगली आणि तासगाव येथे लक्ष्मी तोटे यांची विक्री !

पोलीस आणि प्रशासन निष्क्रीय !
        सांगली, ३१ ऑक्टोबर (वार्ता.) - देवता आणि राष्ट्रपुरुष यांची चित्रे असलेले फटाके विक्री होऊ नये यांसाठी प्रतिबंध होण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने जिल्ह्यात प्रशासन आणि पोलीस यांना निवेदने देण्यात आली होती. असे असतांना सांगली शहर आणि तासगाव शहर येथे लक्ष्मी तोटे यांची विक्री होतांना आढळून आली. या संदर्भात विक्रेत्यांचे प्रबोधन केल्यावरही त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

तुरुंगाविषयीची माहिती देण्यासाठी जेल टुरिझम चालू करणार !

जेल टुरिझमच्या जोडीला कारागृहातील 
गैरकारभार दूर होण्यासाठीही प्रयत्न करावेत !
       मुंबई - पर्यटकांना कारागृहाविषयीची माहिती व्हावी, यासाठी राज्यात जेल टुरिझम चालू करण्याचा विचार गृह विभागाने केला आहे.
१. या प्रकल्पातंर्गत राज्यातील प्रमुख कारागृहांचा काही भाग पर्यटकांसाठी खुला करण्यात येणार आहे. देशातील आणि राज्यातील अनेक कारागृह अनेक ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार आहेत.
२. राज्यात एकूण ३० कारागृहे आहेत. त्यापैकी अनेक कारागृहांच्या भिंती स्वातंत्र्यसैनिकांच्या आठवणींच्या मूक साक्षीदार आहेत. त्यामुळे कारागृहाच्या भिंतीआड दडलेला इतिहास पुन्हा उलगडता येणार आहे.
३. पर्यटकांना कैद्यांचा दिनक्रम समजावून सांगण्यात येईल. या वेळी कैद्यांनी बनवलेल्या वस्तूही प्रदर्शन आणि विक्रीसाठी ठेवण्यात येतील.

सागरी मार्गाला हेरिटेज समितीचा हिरवा कंदिल

        मुंबई - मुंबईतील मरीन ड्राईव्हपासून कांदिवलीपर्यंत होणार्‍या सागरी मार्गाला हेेरिटेज समितीने अनुमती दिली आहे. दक्षिण मुंबईपासून कांदिवलीपर्यंतच्या या मार्गात मरीन ड्राईव्ह आणि वांद्रे या ठिकाणी काही पालटही सुचवण्यात आले आहेत. आता या प्रकल्पाच्या भूतांत्रिक सर्वेक्षणाच्या कामाला प्रारंभ करण्यात आला आहे.

पुणे जिल्ह्यातील एका वर्तमानपत्राच्या संपादकांना संपर्क केल्यावर आलेले चांगले अनुभव

        पुणे जिल्ह्यातील एका वर्तमानपत्राच्या निवासी संपादकांना दसर्‍याच्या शुभेच्छा देण्यासाठी संपर्क केला असता त्यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया देत आहे.
१. सनातन संस्था ही राष्ट्र्र आणि धर्म यांच्या संघटनाच्या उद्देशाने कार्य करते, हे अतिशय चांगले आहे. एक व्यक्ती म्हणून मलाही पुष्कळ काही करावेसे वाटते; परंतु पत्रकारितेचे क्षेत्र पुष्कळ बिघडल्याने काही करता येत नाही. प्रतिदिन सर्वत्र खून, मारामार्‍या, दरोडे, तसेच घाणेरडे राजकारण यांसारख्या घडामोडींमुळे मन आणि बुद्धी यांवर ताण असतो. शांततेची आवश्यकता असूनही ती घेता येत नाही.
२. हिंदु राष्ट्र व्हायलाच हवे, या विचाराशी मी सहमत आहे; कारण आजही या देशात बहुसंख्येने हिंदू आहेत. पृथ्वीवर हिंदु धर्म अनादी काळापासून असूनही अद्याप भारत हे हिंदु राष्ट्र नाही, ही शोकांतिका आहे. पुढे जाऊन यासंदर्भात जशी जागृती होईल, तशी जनताच याला न्याय देईल.
३. काश्मिरी हिंदूंसाठीच्या हिंदु धर्मजागृती सभेविषयी सांगितल्यावर ते म्हणाले, आज अशा सभा होणे अतिशय महत्त्वाचे आहे. यासाठी सर्वच ठिकाणाहून प्रयत्न झाले पाहिजेत. काश्मिरी पंडितांच्या पुनर्वसनासंदर्भातील सूत्रही त्यांना पुष्कळ भावले. त्याविषयी सहकार्य करण्याचे आश्‍वासन देऊन त्यांनी पुणे आवृत्तीच्या कार्यालयातील एका व्यक्तीचा संपर्कही दिला.

हिंदु जनजागृती समितीच्या रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसारकार्याचा सप्टेंबर २०१६ मधील आढावा

१. स्थानिक हिंदुत्वनिष्ठांनी गणेशोत्सवाच्या 
कालावधीत धर्मप्रसाराच्या कार्यात घेतलेला सहभाग 
१ अ. बाजारपेठेत ॐ गं गणपतये नमः । हा नामजप लावणे आणि गणपति लघुग्रंथ घेऊन त्यांचे वितरण करणे : गणेशोत्सवाच्या कालावधीत मनसेचे नगरसेवक श्री. सचिन गायकवाड यांनी बाजारपेठेत ॐ गं गणपतये नमः । या नामजपाची सनातनची ऑडिओ क्लिप मागून घेऊन नामजप लावला. श्री. गायकवाड यांनी २० गणपति लघुग्रंथ घेऊन त्यांचे वितरण केले, तसेच त्यांनी असे कार्यक्रम ठेवायला केव्हाही सांगा. माझे सहकार्य नेहमीच असेल, असे सांगितले.
१ आ. प्रवचनाचे आयोजन : दापोली तालुक्यातील गिम्हवणे येथील धर्मशिक्षणवर्गातील धर्माभिमानी श्री. श्रीकांत मंडपे यांनी स्वतः वाडीत फिरून लोकांना एकत्र केले आणि वाडीत प्रवचनाचे आयोजन केले. या वेळी हिंदु जनजागृती समितीप्रणीत रणरागिणी शाखेच्या अधिवक्त्या (सौ.) अपर्णा कुलकर्णी यांनी पितृपक्ष या विषयावर प्रवचन केले. याचा ८५ जणांनी लाभ घेतला.

राष्ट्रहितैषी दिवाळी विशेषांक - स्वातंत्र्यवीर !

स्वातंत्र्यवीर या
विशेषांकाचे मुखपृष्ठ
      क्रांतीसूर्य स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जाज्ज्वल्य आणि द्रष्टे विचार समाजापर्यंत पोचावेत या हेतूने प्रसिद्ध होणार्‍या स्वातंत्र्यवीर या दिवाळी अंकाला १ तप पूर्ण झाले आहे. स्वातंत्र्यवीरचा यंदाचा १३ व्या वर्षीचा अंक त्याच्या परंपरेप्रमाणेच एका ध्येयनिष्ठेला वाहिलेला आणि वाचकांच्या मनात देशभक्तीची ज्योत प्रज्ज्वलित करणारा आहे.
    क्रांतीकारकांचे मुकुटमणी असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचा योगाभ्यास, त्यांचे सामाजिक कार्य, त्यांचा दरारा, त्यांचे मृत्यूपत्र, त्यांची अस्पृश्यता निर्दालनाची चळवळ, त्यांची वचने आदी तसेच श्री. दुर्गेश परुळकर यांचा स्वातंत्र्यवीरांचे आत्मार्पण हे या महान व्यक्तित्त्वाचे अनेकविध पैलू उलगडणारे लेख केवळ सावरकरप्रेमीच नव्हे, तर प्रत्येक हिंदुत्वनिष्ठ, तसेच प्रत्येक राष्ट्रप्रेमी भारतियाला भावतील असे आहेत. खुद्द सावरकारांचे आत्मार्पण या विषयावरील विचार, तसेच सावरकरांच्या झालेल्या उपेक्षेविषयीचा प्रा. गिरीश बक्षी यांचा आणि आजही सावरकरांना अनुयायी नाहीत, याविषयीचा श्री. शिरीष दामले यांचा असे विचार करण्यास प्रवृत्त करणारे लेखही यात समाविष्ट आहेत. संघावर बोलू काही हा संघकार्याची आणि कार्यपद्धतीची माहिती देणारा श्री. स.ग. जोशी यांचा लेखही यात आहे.

शेजारील राज्यही आपले न वाटणारे राज्यकर्ते लोकशाही निरर्थक ठरवतात !

श्री. संदीप जगताप
      सध्या महादई जलतंटा प्रकरण चर्चेत असून गोवा आणि कर्नाटक राज्यांत हा वाद मुख्यत्वे पाण्यावरून चालू आहे. आपल्या राज्याला अधिकाधिक पाणी मिळावे, यासाठी दोन्ही राज्ये प्रयत्नरत आहेत. यासाठी हिंसक आंदोलन करणे, नदीवर अवैध बांध घालणे इत्यादी मार्ग वापरून एक प्रकारे राष्ट्रीय संपत्तीची हानीच केली जात आहे.
     शेजारी असणार्‍या राष्ट्रांमध्येसुद्धा अशा प्रकारचे नदीच्या पाण्यावरून वाद होण्याचे प्रमाण अल्प आहे. एकाच देशातील दोन संघराज्यांमध्ये असे वाद होणे, हे निंदनीय आहे. त्या राज्यातील राज्यकर्ते केवळ स्वतःच्या राज्यापुरता विचार करतात. ते राष्ट्रहिताचा विचार करत नाहीत, हेच यातून सिद्ध होते. ६९ वर्षांनंतरसुद्धा अशी स्थिती असणे, हे लोकशाही व्यवस्थेचे अपयश असून यावर हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) हाच पर्याय आहे. 
- श्री. संदीप जगताप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. 
आली दिवाळी, उचलूया संधी हिंदु धर्मप्रसाराची ।

श्रीमती रजनी नगरकर
आली दिवाळी, करूया सिद्धता मनापासून ।
करूया स्वच्छता मनाची, अर्पूया तन-मन श्रीगुरूंना ॥ १ ॥ 

आली दिवाळी, करू सिद्धता सडा संमार्जनाची ।
करू स्वच्छता अंगणाची, झाडूया कर्तेपणासी ॥ २ ॥

आली दिवाळी, करू सिद्धता ती रंगावलीची । 
रेखूया ठिपके रंगावलीचे, आठवूया टप्पे ते साधनेचे ॥ ३ ॥

आली दिवाळी, करू सिद्धता आकाशदीपाची ।
उचलूया संधी सोन्याची, ती हिंदु धर्माच्या प्रसाराची ॥ ४ ॥
     या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. - संपादक

६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या मूळच्या सोलापूर येथील श्रीमती रुक्मिणी घोडकेआजी (वय ७४ वर्षे) यांना सुचलेल्या भावपूर्ण कविता !

श्रीमती रुक्मिणी
घोडकेआजी
     पूर्वी मिरज आश्रमात रहाणार्‍या श्रीमती रुक्मिणी घोडकेआजी यांना २२.४.२०१३ या दिवशी पहिल्यांदा एक कविता सुचली. त्यानंतर त्यांना अनेक कविता उत्स्फूर्तपणे सुचू लागल्या. (त्या वेळी त्यांची आध्यात्मिक पातळी ६२ टक्के होती आणि सध्या ६७ टक्के आहे.)
हे श्रीकृष्णा, हिंदु राष्ट्र स्थापन करूनी मोक्षमार्ग दाखवी ।
हे श्रीकृष्णा, साधकाचे हृदयमंदिर उघडून ममत्व जडवी ।
अहं आणि स्वभावदोष घालवून गुरुदेवांना साठवी ॥ १ ॥

गुरुदेवांच्या आठवणींनी साधकांना नटवून अनिष्ट शक्तींना हटवी ।
संतपदापर्यंत पोचण्यासाठी आमुची भावभक्ती वाढवी ॥ २ ॥

प्राणशक्तीवहन उपायपद्धतीने उपाय शोधून उपायांची फलनिष्पत्ती वाढवा !

पू. संदीप आळशी
     एकदा उपायांच्या वेळी मी दोन-तीन दिवसांपासून करत असलेला ॐ हा नामजप करत होतो. बराच वेळ नामजप करूनही उपायांचा परिणाम होत नव्हता. तेव्हा मी प्राणशक्तीवहन उपायपद्धतीने उपाय शोधून श्री अग्निदेवाचा नामजप करायला लागलो. हा नामजप करायला आरंभ केल्याच्या पुढच्याच क्षणाला उपायांचा परिणाम जाणवायला लागला. 
    प.पू. डॉक्टरांनी प्राणशक्तीवहन उपायपद्धत ही सोपी उपायपद्धत शोधून साधकांवर केवढी कृपा केली आहे, याविषयी कृतज्ञता वाटली.
       सध्या आपत्काळाची तीव्रता वाढत असल्याने अनेक साधकांना उपाय करावे लागत आहेत. बरेच साधक उपायांच्या वेळी प्राणशक्तीवहन उपायपद्धतीने मुद्रा, न्यास आणि नामजप शोधून उपाय करत नाहीत. विशिष्ट त्रासासाठी सांगितलेले विशिष्ट नामजप किंवा काळानुसार सांगितलेला श्रीकृष्णाचा नामजप हे योग्यच आहेत; तरीही त्रासानुसार प्राणशक्तीवहन उपायपद्धतीने उपाय शोधून ते करण्याचे महत्त्व पुढीलप्रमाणे आहे.

भगवंत भाव-भक्तीचा भुकेला !

श्रीकृष्ण हाच सखा । 
श्रीकृष्ण हाच मेवा ॥ १ ॥

श्रीकृष्ण हाच प्रत्येक विचार ।
श्रीकृष्ण हाच प्रत्येक आचार ॥ २ ॥

मग येई श्रीकृष्ण, प.पू. डॉक्टरांच्या रूपे ।
पाहूनी त्यांना, मजला आनंद होतसे ॥ ३ ॥

श्रीकृष्णाला आपलेसे करण्याची ओढ लागलेल्या एका साधिकेने श्रीकृष्णभेटीसाठी होणारी मनातील तगमग व्यक्त करण्यासाठी परात्पर गुरु डॉक्टरांना लिहिलेले भावस्पर्शी पत्र !

कु. शांभवी केळकर
प्रती,
    प.पू. डॉक्टर यांसी,
१. मनात स्वभावदोष अन् अहं यांच्या जाड पडद्यामुळे 
श्रीकृष्णाचे माझ्यावर प्रेम नाही आणि मी त्याची लाडकी नाही, 
असे विचार मनात येणे अन् तसे देवाशी बोलतांना त्यावर उपाय सुचणे 
      २६.१०.२०१३ या दिवशी मी आणि ललिता (कु. ललिता वाघ) बोलत होतो. मी तिला माझे मन आणि साधना यांची स्थिती सांगत होते. आता श्रीकृष्णाची पुष्कळ आठवण येते आणि त्याच्याविना जगूच शकत नाही, असे वाटते. तसेच त्याच्याविना मन अस्वस्थ होते; परंतु त्याला अपेक्षित असे मला वागता येत नाही. आम्हा दोघांमध्ये माझे स्वभावदोष अन् अहं यांचा जाड पडदा आहे, असे वाटते. त्यामुळे त्याच्याकडे मला जाता येत नाही आणि माझ्या मनाची पुष्कळ तगमग होते. मला सतत माझ्यासमवेत तो असावा, असे वाटते; पण तसे होत नाही. त्याचे माझ्यावरती प्रेम नाही आणि मी त्याची लाडकी नाही, असे सतत मला मनातून वाटत असते. असे बोलता बोलता देवाने यावर उपाय सुचवला.

असे अनुभवले पू. सदाशिव परब (भाऊकाकांचे) यांचे समष्टीरूप !

पू. सदाशिव परब
    मी आश्रमात नवीन आले त्या वेळी पू. भाऊकाका आश्रमातच सेवा करत असत. मी त्यांना नेहमी पहात होते; पण मला त्यांच्याशी बोलता येत नव्हते. पू. भाऊकाका प्रत्येक कृती भावपूर्ण करतात. त्या वेळी आरंभी मला त्यांचे व्यष्टी रूपच दिसले. मला त्यांच्यातील परिपूर्णता, व्यवस्थितपणा आणि तळमळ अशा विविध गुणांचे दर्शन झाले. त्यांच्या दुसर्‍या रूपाचे, समष्टीरूपाचे वेगवेगळ्या प्रसंगातून आता दर्शन घडत आहे. 
१. साधकांमधे व्यापकत्व येण्यासाठी दायित्व घेणे 
    श्री. खोतकाका गावी गेल्याने कोल्हापूरहून नवीन छपाई करून आलेल्या ग्रंथांची मोजणी करण्यासाठी दायित्व घेणारे कोणी नव्हते. त्या वेळी पू. भाऊकाका स्वतःहून म्हणाले, आम्ही सर्व जण मिळून करतो. त्यांच्या या बोलण्यातून मला ते सर्व साधकांना व्यापक करणार आहेत, असे वाटले.

सनातनच्या आश्रमावर मोठ्या प्रमाणात होणार्‍या वाईट शक्तींच्या आक्रमणापासून साक्षात् श्रीविष्णूचे वाहन गरुड आणि तुम्हाला वेळोवेळी मिळणारा वरुणाशीर्वाद तुमचे रक्षण करत आहे, असे महर्षींनी सांगणे

महर्षींची शिकवण आणि कार्य !
     महर्षि म्हणतात, अशी कोणतीही वाईट शक्ती नाही की, जी गुरूंच्या आश्रमाच्या बाहेर आक्रमण करण्यासाठी वाट पहात नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात आश्रमावर वाईट शक्तींचे आक्रमण चालू आहे. हे सर्व आम्ही (महर्षि) पहात आहोत. आम्ही टप्प्याटप्प्याने हे दूर करणारच आहोत. वरुणाशीर्वाद आणि गरुडाचे आश्रमाभोवती हिंडणे, या दोन गोष्टींमुळे वाईट शक्ती तुमच्या आश्रमात येऊ शकत नाहीत. साक्षात् गरुड आश्रमाच्या मुख्य द्वाराकडे लक्ष ठेवून आहे आणि द्वारपालासारखा तो रक्षण करत आहे. सर्व बाजूंनी फिरून गरुड आश्रमाची टेहळणी करत आहे. (खरोखरंच बर्‍याच वेळा साधकांना गरुड आश्रमाभोवती घिरट्या घालतांना दिसतो. - संकलक) काही वेळा वरुणाच्या रूपातही आश्रमाचे
सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ
आम्ही (महर्षि) रक्षण करत आहोत आणि वरुणराजाच्या रूपाने ती ती ऊर्जा आश्रमाला देत आहोत. (बर्‍याच वेळा कोणताही यज्ञयाग झाला की, पूर्णाहूतीच्या वेळी आश्रमाच्या ठिकाणी पाऊस पडतोच. अशी आम्हाला बर्‍याच वेळा अनुभूती आली आहे. - संकलक) (संदर्भ : नाडीवाचन क्रमांक १०१, कांचीपूरम्, तमिळनाडू, १७.१०.२०१६) - (सद्गुरु) सौ. अंजली गाडगीळ, तिरुवण्णामलई, तमिळनाडू. (२२.१०.२०१६, सायं. ७.५५)
    वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषीमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.

शारीरिक त्रासांकडे दुर्लक्ष करून सेवेला प्राधान्य देणार्‍या ६१ टक्के आध्यात्मिक स्तर असणार्‍या सांगली येथील सौ. विद्या जाखोटीया !

सौ. विद्या जाखोटीया
      सौ. विद्या जाखोटीया या सांगली येथे प्रसाराची सेवा करतात. नुकतीच त्यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे घोषित केले. सेवेच्या अनुषंगाने त्यांच्याशी संपर्क आल्यावर सांगली जिल्ह्यातील साधकांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत. 
१. शारीरिक त्रास असूनही मन नेहमी उत्साही असणे
     कन्यागत महापर्वाच्या सेवेच्या वेळी जाखोटीयाभाभींशी माझा जवळून परिचय झाला. भाभींना शारीरिक त्रास असूनही त्यांचे मन नेहमी उत्साही असते. त्या सतत आनंदी असतात आणि सकारात्मक रहाण्याचा प्रयत्न करतात. 
२. तीव्र शारीरिक त्रास असतांनाही ईश्‍वरपूर 
केंद्राचे दायित्व पहाणे आणि तेथील सेवांचे योग्य पद्धतीने नियोजन करणे
     भाभींना दुचाकीवर किंवा बसमध्ये गर्दी असतांना प्रवास करणे अवघड जाते. त्या ईश्‍वरपूर केंद्राचे दायित्व पहात होत्या, तेव्हा १ ते दीड घंटा प्रवास करून ईश्‍वरपूरला जायच्या आणि रात्री परत यायच्या. तीव्र शारीरिक त्रास असतांनाही त्या तेथील सेवांचे योग्य पद्धतीने आणि तळमळीने नियोजन करत असत. - सौ. कल्पना थोरात

ध्यानमंदिरातील लादीमध्ये चमक दिसून तिच्यात विष्णुतत्त्व आहे, असे जाणवणे

सौ. सौम्या कुदरवळ्ळी
      मी नामजप करण्यासाठी ध्यानमंदिरात गेले होते. खाली बसण्यासाठी बैठक घालत असतांना एक लादी चमकत होती. तिच्यावर वेगवेगळे रंग दिसत होते. तेच रंग दुसर्‍या लादीवरही दिसत आहेत का ? हे पाहिल्यावर तेथील एकाच लादीवर चमक दिसत होती. त्या चमकणार्‍या लादीकडे पाहिल्यावर तेथे विष्णुतत्त्व आहे, असे वाटून आनंद जाणवला. पूर्ण आश्रमात त्या लादीप्रमाणे दैवी पालट होणार आहेत, असे आतून जाणवत होते. - सौ. सौम्या कुदरवळ्ळी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१६.८.२०१६)

रामनाथी आश्रमात राहून स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया करतांना स्वमनाचा झालेला अभ्यास अन् भाववृद्धी प्रयत्नांचा आधार घेऊन प्रक्रिया राबवल्याने त्यातून मिळू लागलेला आनंद !

कु. रश्मी परमेश्‍वरन्
       रामनाथी आश्रमात स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रियेसाठी येण्यापूर्वी माझ्या साधनेची स्थिती अत्यंत गंभीर होती. मनात सतत इतरांकडून अपेक्षा असायची. सहसाधकांविषयी पूर्वग्रहामुळे चुकीचे निष्कर्ष काढले जाणे आणि त्यांच्याविषयी प्रतिक्रिया येणे, असे व्हायचे. मी आध्यात्मिक उपाय नियमितपणे करत नसल्यामुळे अनिष्ट शक्तींचे त्रासही वाढले होते. सहसाधकांनी साहाय्याच्या दृष्टीने चूक सांगितली, तरी मला राग यायचा. ते माझ्यावर आरोप करत आहेत, असे मला वाटायचे. मी स्वतःच्या चुका न स्वीकारता त्यांच्याच चुका सांगायचे. या स्थितीतून बाहेर येण्याची इच्छा होती; पण प्रयत्न न्यून पडत होते. व्यष्टी साधनेचे प्रयत्नही अनियमित आणि अल्प असल्यामुळे अंतर्मुखता नव्हती. अशा स्थितीत असतांना सप्टेंबर २०१५ च्या पहिल्या आठवड्यात रामनाथी येथील आश्रमात स्वभावदोष अन् अहं निर्मूलन प्रक्रियेसाठी येण्याचा निरोप मिळाला. त्यामुळे देवाविषयी पुष्कळ कृतज्ञता वाटली.

एकमेकांना साधनेचे दृष्टिकोन देऊन साधना करण्यास प्रोत्साहन देणार्‍या कु. सायली आणि श्री. संकेत डिंगरे या भावा-बहिणीचे आध्यात्मिक नाते !

आज भाऊबीज आहे त्यानिमित्ताने 
        साधना करणार्‍या जिवाच्या आयुष्यात साधना हीच महत्त्वाची असते. त्यामुळे जीवनातील कोणत्याही प्रसंगाकडे तो आध्यात्मिक दृष्टीकोनातून पहातो. त्याच्या दृष्टीने सर्व नाती आध्यात्मिक झालेली असतात. रामनाथी आश्रमातील पूर्णवेळ साधना करणारी कु. सायली डिंगरे हिचा भाऊ श्री. संकेत डिंगरे नोकरीनिमित्त पुणे येथे रहाण्यास गेला आहे. त्यानिमित्त सायली हिने त्याला पाठवलेले पत्र आणि त्याला श्री. संकेत यांनी दिलेले उत्तर पुढे देत आहोत. दोघेही साधक असल्याने त्यांनी एकमेकांना साधनेचे दृष्टीकोन देऊन साधना करण्यास प्रोत्साहन दिले आहे.  
कु. सायली डिंगरे हिने 
तिच्या भावाला पाठवलेली कविता
कु. सायली डिंगरे
अंतरीचा भगवंत पहा तुझी आतुरतेने वाट पाहे ।
सततचा अभ्यास करचा ओरडा बंद झाला ।
चुकल्या-चुकल्यासारखे वाटत असेल ना तुला ।
जीवनातील एका पर्वाचा शेवट असा अकस्मात्च झाला ।
म्हैसूरनंतर आता पुण्याला एकटा राहू लागला ।
नोकरीच्या एका संधीने तू अगदीच मोठा झाला ॥ १ ॥
अभ्यासाची निश्‍चिंतता अन् कंपनीची प्रशस्तता ।
वरवर अगदी लोभस वातावरण जरी वाटले ।
पाय भूमीवर अन् लक्ष गुरुचरणांवर ठेवावे ।
येथेच घ्यावे लागतील तुला अनेक धडे ।
स्वतःस सांगावे, अद्याप बरेच गाठायचे राहिले ॥ २ ॥

मुंग्यांकडून शिकायला मिळालेले गुण

कु. युवराज्ञी शिंदे
       आपल्या ध्येयाच्या दिशेने जातांना मुंगीला कुठलेही प्रलोभन विचलित करत नाही. ती आपली एकमार्गी ध्येयाकडेच वाटचाल करत असते. तिची वाट अडवली की, क्षणभरही विलंब न करता तेवढ्याच गतीने ती बाजूने मार्ग काढते. मुंग्यांमध्ये चिकाटीही प्रचंड असते. त्यांच्या सैन्यबळाचे कौतुक करावे तितके अल्प आहे. - कु. युवराज्ञी शिंदे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२९.८.२०१६)
कोणतीही परिस्थिती आनंदाने स्वीकारणारा ५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला पुणे येथील कु. जय सटाणेकर (वय १२ वर्षे)!

कु. जय सटाणेकर
   ५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला पुणे येथील कु. जय सटाणेकर याच्या आई-वडिलांना त्याची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे देत आहोत.
१. गर्भारपण
     आईला प.पू. भक्तराज महाराज यांच्या आश्रमात जाऊन रहावेसे वाटणे, सात्त्विक गोष्टी आवडणे अन् मन सकारात्मक असणे : जयच्या गर्भारपणात मला कांदळीला प.पू. भक्तराज महाराज यांच्या (प.पू. बाबांच्या) आश्रमात जाऊन रहावे, असे वाटायचे. त्याच काळात मी प.पू. बाबांचे संपूर्ण चरित्र वाचले. मला केवळ सात्त्विक पदार्थ खावेसे वाटायचे आणि सात्त्विक वेशभूषा (उदा. साडी नेसणे) आवडायची. माझा नामजप पुष्कळ शांतपणे, एका लयीत आणि भावपूर्ण व्हायचा. माझे मन नेहमी सकारात्मक अन् आनंदी असायचे.

श्रीमती रुक्मिणी घोडकेआजींनी व्यक्त केलेली कृतज्ञता आणि प्रार्थना

     प.पू. डॉक्टर आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता व्यक्त करते. अशीच सद्बुद्धी दे आणि सेवा करवून घे. तुझ्या चरणी लीन रहाता येऊ दे, अशी कोटी कोटी प्रार्थना. 
- श्रीमती रुक्मिणी घोडकेआजी (२८.४.२०१३)

साधकांना सूचना

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
दोन दिवसांपूर्वी अमावास्या झाली.

फलक प्रसिद्धीकरता

तथाकथित धर्मनिरपेक्षतावादी 
याविषयी तोंड उघडतील का ?
        इराणमध्ये होणार्‍या आशियाई एअरगन या नेमबाजी स्पर्धेतून भारताची नेमबाज हिना सिद्धू हिने माघार घेतली आहे. महिला खेळाडूंना बुरखा घालून खेळण्याच्या सक्तीमुळे तिने हा निर्णंय घेतला. वर्ष २०१३ मध्ये झालेल्या विश्‍वकरंडक स्पर्धेत तिने सुवर्णपदक मिळवले होते.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Iranme honewali Nishanebazi pratiyogitame Burkha anivarya honese Bharatiya khiladi Heena Siddhu sahabhagi nahi hogi.
Ispar Secularwadiyoka muh band kyu
जागो ! : इरान में होनेवाली निशानेबाजी प्रतियोगिता में बुरखा अनिवार्य होने से भारतीय खिलाडी हीना सिद्धू सहभागी नहीं होगी.
इस पर सेक्यूलरवादियों का मुंह बंद क्यूं ?
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. 
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे जीवनाचे सार्थक करणारे आमुचे गुरु आहेत महान ।

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...
परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले
प.पू. गुरुदेवांच्या प्रेमाची नदी काठोकाठ भरून जाते अशी ।
वात्सल्यभावाची घागर भरली दुधाने जशी ॥ १ ॥

दुसर्‍यांचा विचार सतत असे त्यांच्या निर्मळ मनी ।
सक्षम साधक बनवण्याची तळमळ त्यांनाच भारी ॥ २ ॥

प.पू. गुरुदेवांचा परिवार आहे समुद्राएवढा ।
लहान-मोठा, गरीब-श्रीमंत या भेदाला नाही थारा ॥ ३ ॥

अहं-स्वभावदोष घालवण्या प्रयत्न करून घेतले ।
अंतर्मनात नामजपाचे संस्कार केले ।
जीवनाचे सार्थक केले, असे आमचे गुरु महान ॥ ४ ॥

- श्रीमती रुक्मिणी घोडकेआजी (३.५.२०१३)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
        आता एकेका अशिलाची बाजू मांडणारे नव्हे, तर राष्ट्र आणि धर्म यांची बाजू मांडणारे राष्ट्रप्रेमी अन् धर्मप्रेमी वकील हवेत ! 
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
जीवात्मा आणि शिवात्मा म्हणजे काय ?
बाबा : मी कशासाठी जन्माला आलो आहे आणि मला काय करायचे आहे, याचे ज्ञान जिवाला झाले, तर त्या आत्म्याला जीवात्मा म्हणतात. कोणीतरी माझ्याकडून कार्य करवून घेत आहे, याचे ज्ञान झाले की, त्या आत्म्याला शिवात्मा म्हणतात. शिवात्मा शोधणे, म्हणजे खरे ज्ञान. शिवात्मा कार्यकारणभावापुरता जन्माला येतो, तर जीव प्रारब्धभोगामुळे जन्माला येतो.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

विचारपूर्वक कृती करणे आवश्यक !
कोणतीही कृती करण्यापूर्वी थोडा वेळ थांबून ती खरोखरंच 
हितावह आहे का ? याचा विचार करण्याची स्वतःला सवय लावावी. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

पाकिस्तानला आता कायमचा धडा शिकवा !

संपादकीय
      गेल्या आठवड्यातच पाकपुरस्कृत आतंकवाद्यांनी एका भारतीय सैनिकाचा बळी घेतला त्याचे घाव अद्याप ताजे असतांना ऐन दिवाळीत परत एकदा पाकने केलेल्या गोळीबाराने २८ ऑक्टोबरला सीमा सुरक्षा दलाच्या दोन सैनिकांचा बळी घेतला. उरी येथील आक्रमणानंतर भलेही आपण सर्जिकल स्टाईककेले असेल; मात्र त्यानंतरही भारतीय सैनिकांच्या मृत्यूची मालिका कुठेही खंडित होतांना दिसत नाही.

फटाक्यांवर बंदीच हवी !

संपादकीय
      संभाजीनगर येथे फटाका बाजाराला लागलेल्या आगीतून सुमारे १० कोटी रुपयांची आर्थिक हानी झाल्यानंतर प्रशासनाला जाग आली आहे. ३० ऑक्टोबरला अग्नीशमन प्रमुख शिवाजी झनझन यांना निलंबित करण्यात आले आहे. गेल्या २६ वर्षांपासून शहराच्या मध्यवर्ती भागात असणार्‍या जिल्हा पषिदेच्या या मैदानात फटाक्याचा बाजार भरतो. फटाका विक्रेता संघटनेने मनपा आणि पोलीस यांच्याकडून ना हरकत प्रमाणपत्र घेतले होते. त्यानुसार मैदानात अग्नीशमन दलाचे दोन बंब ठेवणे अत्यावश्यक होते. प्रत्यक्षात तेथे एकही बंब नव्हता. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी व्यापार्‍यांच्या गाड्या आणि माल जळल्याने मोठी आर्थिक हानी झाली आहे. वस्तूत: फटाके फोडणे, ही विदेशी प्रथा असून हिंदु धर्मात फटाके फोडण्याला कुठलाही धर्मशास्त्रीय आधार नाही. फटाक्यांमुळे मोठ्या प्रमाणावर वायू आणि ध्वनी यांचे प्रदूषण होऊन समाजाचे आरोग्य आणि पर्यावरण धोक्यात येत आहे. त्यामुळे आता एका घटनेतून तरी धडा घेऊन शासकीय स्तरावर फटाक्यांवर बंदी आणण्यासाठी प्रयत्न होणे अपेक्षित आहे !
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn