Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

दीपावली लक्ष्मीपूजन


हुतात्मा भारतीय सैनिकाच्या मृतदेहाची विटंबना !

 • सर्जिकल स्ट्राईकचा पाकवर कोणताही परिणाम झालेला नाही, हेच यातून उघड होते ! त्यामुळे आता अशी कारवाई करण्याऐवजी ठोस आणि निर्णायक कारवाई करा !
 • पाकच्या क्रूरतेचा चेहरा पुन्हा उघड !
 • पाकच्या कलाकारांना पायघड्या घालण्यासाठी आसुसलेले भारतातील पाकप्रेमी या घटनेवर तोंड उघडतील का ?
श्रीनगर - पाकने कारगिल युद्धात कॅप्टन सौरभा कालिया आणि अन्य ४ सैनिकांना क्रूरपणे ठार केले होते. त्यानंतर हेमराज या सैनिकाचा शिरच्छेद करून त्याचे शिर पळवून नेले होते. त्यानंतर पुन्हा एकदा पाकने अमानवी कृत्य केले आहे. २८ ऑक्टोबरच्या रात्री कुपवाडा जिल्ह्यातील मच्छली सेक्टरमधील गोळीबारात हुतात्मा झालेला भारतीय सैनिक मनदीप सिंह यांच्या मृतदेहाची पाकपुरस्कृत आतंकवाद्यांनी छिन्नविछिन्न अवस्था केल्याचे समोर आले आहे. सैन्याने या घटनेला निंदनीय म्हणत त्याला प्रत्युत्तर दिले जाईल, असे म्हटले आहे.

इचलकरंजी येथे हिंदूला तीन धर्मांधांकडून अमानुष मारहाण !

 • हिंदूंनो, धर्मांधांकडून मार सहन करण्यापेक्षा हिंदु राष्ट्राची स्थापना करा !
 • धर्मांधांवर गुन्हा प्रविष्ट करण्यास पोलिसांची टाळाटाळ !
 • पीडित हिंदूचे मुख्यमंत्र्यांना निवेदन !
         इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर), २९ ऑक्टोबर (वार्ता.) - येथील बाळनगर, षटकोण चौकातील एका हिंदूला धर्मांध सलीम अत्तार, इरफान आणि वहिदा यांनी त्यांच्या घरात घुसून अमानुष मारहाण केली. त्यात ते गंभीररित्या घायाळ झाले आहेत. याप्रकरणी तक्रार करण्यासाठी गेल्यानंतर शिवाजीनगर पोलिसांनी त्यांंना तेथून हाकलून लावले. (तक्रारही प्रविष्ट करून न घेणारे पोलीस धर्मांधांचे एकप्रकारे तुष्टीकरणच करत आहेत, असे म्हटल्यास वावगे काय ? हिंदूंनो, अशा पोलिसांची नावे सनातन प्रभातला कळवा ! अशा कर्तव्यचुकार पोलीस अधिकार्‍यांना निलंबित करून त्यांच्यावर शासनाने कठोर कारवाई केली पाहिजे ! असे अकार्यक्षम पोलीस हे पोलीस दलाला कलंकच आहेत ! - संपादक) त्यामुळे धर्मांधांपासून मला संरक्षण मिळावे आणि तक्रार प्रविष्ट करून घेण्यास टाळाटाळ करणार्‍या संबंधित पोलीस अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पीडित हिंदूने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या एका निवेदनाद्वारे केली आहे.

संभाजीनगरमध्ये फटाक्यांच्या दुकानाला लागलेल्या आगीत १८५ दुकाने जळून खाक

 • अशा पद्धतीच्या घटना वारंवार घडत असूनही शासनाने फटाक्यांवर बंदी न घालणे, हा समाजद्रोह नव्हे का ?
 • जीवितहानी नाही; मात्र ५० दुचाकी आणि चारचाकी वाहनांची हानी !
         संभाजीनगर, २९ ऑक्टोबर - येथील जिल्हा परिषद मैदानावरील फटाक्यांच्या दुकानांना २९ ऑक्टोबरला सकाळी भीषण आग लागली. त्यामध्ये फटाक्यांची १८५ दुकाने जळून खाक झाली आहेत. त्यामुळे मैदानाच्या परिसरात धुराचे साम्राज्य पसरले असून फटाक्यांच्या स्फोटाने संपूर्ण शहरच हादरून गेले. आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र ५० दुचाकी आणि चारचाकी वाहनांची मात्र हानी झाली आहे. ही आग शॉर्टसर्कीटमुळे लागली असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. गंभीर गोष्ट म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात फटाक्यांची दुकाने असूनही मैदानात अग्नीशमनदलाची एकही गाडी नव्हती. आग लागताच मैदानातील सर्व जण तातडीने बाहेर पडल्याने अनर्थ टळला.
         आम्ही हानीभरपाईच्या संदर्भात पालकमंत्र्यांशी चर्चा करू, अशी माहिती शिवसेनेचे खासदार श्री. चंद्रकांत खैरे यांनी दिली. (यावरूनच प्रशासनाचा निष्काळजीपणा दिसून येतो. या प्रकरणाची चौकशी करून शासनाने संबंधितांवर कठोर कारवाई करणे अपेक्षित आहे ! - संपादक) या प्रकरणी जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडेय यांनी आगीच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अप्पर जिल्हाधिकार्‍यांच्या नेतृत्वाखाली चौकशी समिती नियुक्त केली आहे.

महिला आणि बालकल्याण मंत्रालयाकडून अंगणवाड्यांसाठी क्षार संजीवनीची खरेदी करण्यास टाळाटाळ !

 • महिला आणि बालकल्याण मंत्रालयाकडून आदिवासी बालकांना दिली जाणारी वागणूक ही प्रतारणाच !
 • अतिसारामुळे आदिवासी बालमृत्यूंत वाढ
         मुंबई - राज्यातील १६ जिल्ह्यांतील आदिवासी पाडे, तांडे आणि वाडी येथे दूषित पाणी असल्याने कॉलरा किंवा अतिसाराचे प्रमाण वाढले आहे. सध्या अतिसारामुळे मोठ्या प्रमाणात आदिवासी बालकांचे मृत्यू होत असतांनाही महिला आणि बालकल्याण मंत्रालयाकडून अंगणवाड्यांसाठी क्षार संजीवनीची (ओआरएस्) खरेदी करण्यास गेल्या दीड वर्षापासून टाळाटाळ होत असल्याचे उघड झाले आहे. यातील गंभीर गोष्ट म्हणजे एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या आयुक्त विनिता सिंघल यांनी क्षार संजीवनीची खरेदी करण्यासाठी राज्याच्या प्रधान सचिवांना जुलैमध्ये लेखी पत्र पाठवले होते. असे असले, तरी अद्यापपर्यंत कोणतीही खरेदी करण्यात आलेली नाही. (गतीमान प्रशासन देण्याची वल्गना करणार्‍या शासनाने यामध्ये लक्ष घालून खरेदीची प्रक्रिया जलद करावी, ही अपेक्षा ! तसेच ही खरेदी उशिरा होण्यामागील कारणमीमांसा जाणून संबंधितांवर कारवाई करेल का ? - संपादक)

मुंबई आणि नवी मुंबई परिसरातील व्यापारी, फटाके विक्रेते, पोलीस अन् प्रशासकीय अधिकारी यांना निवेदन

फटाक्यांवरील चित्रांद्वारे होणारी हिंदु 
देवता आणि राष्ट्रपुरुष यांची विटंबना रोखावी ! 

नालासोपारा येथील पोलीस निरीक्षकांना निवेदन देतांना कार्यकर्ते

मुंबई जिल्हाधिकारी श्री. कुशवाहा यांना निवेदन देतांना कार्यकर्ते


        मुंबई, २९ ऑक्टोबर (वार्ता.) - फटाक्यांवरील चित्रांद्वारे होणारी हिंदु देवता आणि राष्ट्रपुरुष यांची विटंबना रोखावी अन् चिनी बनावटीच्या फटाक्यांवर बंदी घालावी यासाठी राष्ट्र आणि धर्म प्रेमी नागरिकाकंडून मुंबई अन् नवी मुंबई परिसरात ठिकठिकाणी व्यापारी, फटाके विक्रेते, पोलीस अन् प्रशासकीय अधिकारी यांना निवेदने देण्यात आली. निवेदन देतांना हिंदू गोवंश रक्षा समिती, सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती, मनसे यांसह विविध पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

मालगाव (जिल्हा सातारा) येथे वसुबारसनिमित्त गोपूजन आणि गोमातेची मिरवणूक !

बांधकाम व्यवसायिक श्री. अतुल मेहता
गोमातेचे पूजन करतांना, शेजारी डॉ. महेश कदम

         मालगाव (जिल्हा सातारा), २९ ऑक्टोबर (वार्ता.) - येथे गोवृक्ष चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे वसुबारस या शुभदिनी मोठ्या उत्साहात गोमातेची मिरवणूक काढण्यात आली. गोरज मुहूर्तावर टाळ-मृदुंगाच्या गजरात पार पडलेल्या या मिरवणुकीत ग्रामस्थ भक्तीभावाने सहभागी झाले. माता-भगिनींनी ठिकठिकाणी गोमातेचे पूजन करून ग्रोग्रास दिला.
         बांधकाम व्यवसायिक श्री. अतुल मेहता यांच्या हस्ते गोमातेचे पूजन करून मिरवणुकीस आरंभ झाला. गोमातेप्रती कृतज्ञता निर्माण व्हावी, गोवंशाचे संवर्धन व्हावे, या उद्देशाने मिरवणुकीचे आयोजन करण्यात आल्याचे डॉ. महेश कदम यांनी सांगितले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. विनायक कुलकर्णी आणि श्री. सुनील दळवी उपस्थित होते.
         हिंदु संस्कृतीचे जतन व्हावे आणि गोमातेचे रक्षण, तसेच पालन करण्याची प्रेरणा सर्वांना मिळावी, यासाठी गोवृक्ष चॅरिटेबल ट्रस्ट कार्यरत आहे. ट्रस्टच्या वतीने मालगाव येथे गोशाळा आणि सप्तपदी गोमाता मंदिराची उभारणी चालू आहे.

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी संघटितपणे प्रयत्न करण्याचा तमिळनाडूतील हिंदु संघटनांचा निर्धार !

बैठकीला उपस्थित हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी
     चेन्नई - हिंदु राष्ट्र स्थापनेचे लक्ष्य समोर ठेवून त्यासाठी संघटितपणे प्रयत्न करण्याच्या उद्देशाने तमिळनाडूतील २७ हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी चेन्नई येथे नुकतीच एक बैठक घेतली. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी संघटितपणे प्रयत्न करण्याचा निर्धार या वेळी करण्यात आला. 
     हिंदु जनजागृती समितीच्या सौ. उमा रविचंद्रन् यांनी प्रारंभी दीपप्रज्वलन केले. त्यानंतर जिहाद्यांकडून हत्या करण्यात आलेल्या हिंदु नेत्यांना श्रद्धांजली वहाण्यात आली. या वेळी सौ. उमा रविचंद्रन् यांनी सनातन धर्मराज्य म्हणजेच हिंदु राष्ट्र स्थापण्यामागची आवश्यकता विशद केली. हे दैवी कार्य असून त्यासाठी आपण पात्र होणे आवश्यक आहे. त्यासाठी आपल्यातील राग, मत्सर यांसारखे दोष आणि अहं नष्ट करणे आवश्यक आहे, असे सौ. रविचंद्रन् यांनी सांगितले.

केंद्र सरकार अयोध्येत भगवान श्रीरामाचे संग्रहालय उभारणार !

केंद्र सरकारने आता राममंदिर बांधण्यासाठीही प्रयत्न करावेत, अशीच हिंदूंची अपेक्षा आहे ! 
     नवी देहली/अयोध्या - केंद्र सरकारचे संस्कृती मंत्रालय अयोध्येत भगवान श्रीरामाचे संग्रहालय उभारणार आहे. उत्तरप्रदेश सरकारने येथे राम आणि रामायण संग्रहालय उभारण्यासाठी २५ एकर भूमीही अधिग्रहित केली आहे. ही भूमी रामजन्मभूमीपासून १० ते १५ कि.मी. अंतरावर आहे.

संपूर्ण पाकिस्तानच एक आतंकवादी देश आहे, त्याला जगाच्या नकाशावरून नष्ट करणे हाच येथील आतंकवादावरील एकमात्र उपाय आहे !

पाकच्या सिंधमधील ९३ मदरशांचे आतंकवादी संघटनांशी संबंध ! 
      कराची - पाकच्या सिंध प्रांतातील ९३ मदरशांचे आतंकवादी संघटनांशी संबंध असल्याचे वृत्त येथील दैनिकांत प्रसिद्ध झाले आहे; मात्र सरकार या मदरशांच्या विरोधात कोणतीही कारवाई करण्याच्या विचारात नसल्याचेही या वृत्तात म्हटले आहे. 
     पाकच्या गुप्तचर यंत्रणांकडे या मदरशांची आणि तेथील कारवायांची विश्‍वसनीय माहिती आहे. या संदर्भात नुकतीच सिंधचे मुख्यमंत्री मुराद अली शाह यांच्या नेतृत्वाखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यात त्यांनी पोलीस आणि सैन्य यांना या मदरशांवर कारवाई करण्याचा आदेश दिला.

देशातील मंदिरे उद्ध्वस्त करणार्‍यांना धडा शिकवण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे ! - प्रमोद मुतालिक यांचे आवाहन

एकसंबा येथे श्रीराम सेना कार्यकर्त्यांना मार्गदर्शन 
श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना श्री. प्रमोद मुतालिक
     एकसंबा (जिल्हा बेळगाव), २९ ऑक्टोबर (वार्ता.) - हिंदु राष्ट्र घडवण्याचा संकल्प वेगळा आहे. देशामध्ये हिंदूंची मंदिरे उद्ध्वस्त केली जात आहेत. असे करणार्‍यांना धडा शिकवण्यासाठी हिंदूंनी संघटित झाले पाहिजे. देशामध्ये भक्तीचा अतिवापर झाला आहे. त्यापेक्षा सक्तीचा वापर झाला असता, तर काश्मीर मिनी पाकिस्तान झाले नसते. काश्मीरप्रश्‍नी हिंदूंची भूमिका प्रखर नाही. त्यामुळे भारतातच काश्मीरमध्ये हिंदूंवर अधिक अत्याचार झाले. आज ५० सहस्र मुसलमानांनी लक्षावधी हिंदूंना काश्मीरमधून हाकलून दिले, तेच उद्या १ लक्ष होतील, तेव्हा अंतर्गत युद्धाला पुन्हा सामोरे जावे लागणार आहे, असे प्रतिपादन श्रीराम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक यांनी केले. एकसंबा येथील दत्त मंदिर येथे २६ ऑक्टोबर या दिवशी श्रीराम सेना शाखेमधील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.

कितीही विरोध झाला, तरीही सनातनरूपी सूर्याचे कार्य चालूच राहील !

   सूर्याची पूजा करणारे आणि त्याला नावे ठेवणारे दोन्ही प्रकारची माणसे असतात; परंतु सूर्य त्याचे कार्य अखंडपणे करतच असतो. त्याप्रमाणे सनातनला कितीही विरोध झाला, तरीही सनातनरूपी सूर्याचे कार्य चालूच राहील.- श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१९.६.२०१६)

उलट भारतानेच पाकबरोबर व्यापार थांबवायला हवा !

भारताबरोबरचा व्यापार थांबवण्याचा पाकचा प्रयत्न !
       नवी देहली - भारत आणि पाक यांच्यामधील तणावाचा परिणाम दोन्ही देशांमधील व्यापारावर होतांना दिसू लागला आहे. भारताबरोबरचा व्यापार थांबण्याचा विचार पाकिस्तान करत असल्याचे वृत्त पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनने दिले आहे. पाकच्या मुख्य औद्योगिक संघटनेने हा निर्णय घेतल्याचे या वृत्तात म्हटले आहे. 
        पाकिस्तान चेंबर ऑफ कॉमर्स आणि उद्योग संघटना यांच्या समुहाचे अध्यक्ष अब्दुल रौफ आलम म्हणाले की, उपखंडातील तणावाचे वातावरण पहाता पाकिस्तानी व्यापारी समूह कुठलाही निर्णय एकत्रितपणे घेऊ शकतात. तसेच सध्याची स्थिती पहाता भारतासोबतचा व्यापार चालू ठेवणे योग्य नाही.
      भारत आणि पाकयांच्यामध्ये होणारा व्यापार हा भारताच्या एकूण जागतिक व्यापाराच्या अर्ध्या टक्क्याहून अल्प आहे, असे असोचेमचे महासचिव डी.एस्. रावत यांनी म्हटले आहे.

पाकने काश्मीरवरील अवैध नियंत्रण सोडावे ! - भारत

      जीनिवा (स्वित्झर्लण्ड) - पाकने त्याच्या कह्यातील काश्मीरवरील अवैध नियंत्रण सोडावे, असे भारताने जीनिवा येथील आंतरसंसदीय युनियनच्या १३५ व्या बैठकीत पाकला सांगितले. भारताचे संसद सदस्य आर्.के. सिंह यांनी म्हटले की, संपूर्ण जम्मू-काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे. येथील नागरिक केंद्र आणि राज्य या दोन्ही स्तरांवरील लोकशाही प्रक्रियेत भाग घेत आहेत. 
     या वेळी पाकने काश्मीरमधील मानवाधिकारांच्या उल्लंघनचा प्रश्‍न उपस्थित केल्यावर सिंह म्हणाले की, काश्मीरच्या वर्तमानस्थितीला पाकपुरस्कृत आतंकवाद कारणीभूत आहे. पाकिस्तान आंतरराष्ट्रीय आतंकवादाचे केंद्र बनले आहे. आतंकवादाचा सामना करण्यासाठी मिळत असलेल्या रकमेचा उपयोग पाकिस्तान आंतरराष्ट्रीय स्तरावर आतंकवाद फैलावण्यासाठी करत आहे. पाक स्वत: पाकव्याप्त काश्मीर, खैबर पख्तून आणि बलुचिस्तान येथे मानवाधिकारांचे उघडपणे उल्लंंघन करत आहे. तेथील लोक केवळ आतंकवादच नाही, तर जातीय संघर्ष आणि आर्थिक शोषण यांचे बळी ठरले आहेत.

महाराष्ट्रानंतर आता नवी देहलीत मराठा समाजाचा (मूक) मोर्चा !

      मुंबई - राज्यभरात मराठा समाजाच्या वतीने (मूक) मोर्चाचे आयोजन करण्यात येत आहे. आता हा (मूक) मोर्चा २० नोव्हेंबरला नवी देहलीत काढण्यात येणार आहे. हा मोर्चा जंतरमंतर ते महाराष्ट्र्र सदनापर्यंत काढण्यात येणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चा आयोजन समितीने २८ ऑक्टोबर या दिवशी दिली. 
     कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी देण्यात यावी, अ‍ॅट्रॉसिटी कायदा रहित करण्यात यावा, मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, अशा विविध मागण्यांसाठी राज्यभरात मूक मोर्चाचे आयोजन करण्यात येत आहे. नवी देहलीतील मोर्च्यानंतर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन निवेदनही देण्यात येेणार आहे.

अ‍ॅट्रॉसिटी कायदा रहित न करता त्यात सुधारणा करणार ! - मुख्यमंत्री

        मुंबई, २९ ऑक्टोबर (वार्ता.) - मराठा आंदोलनामध्ये अनेक मागण्यांमध्ये असलेली अ‍ॅट्रॉसिटी कायदा रहित करण्याची होती; मात्र अ‍ॅट्रॉसिटी कायदा रहित केला जाणार नाही; मात्र या कायद्याचा अपवापर होऊ नये, यासाठी त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी शासन प्रयत्न करेल. यासाठी राज्यभरातून कायद्याचा अपवापर झाल्याविषयीची माहिती मागवण्यात येईल. वर्षा बंगल्यावर पत्रकारांच्या प्रश्‍नांना उत्तरे देतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. ते पुढे म्हणाले, विविध जातीधर्माचे लोक मोर्चा काढत असले, तरी समाजाची एकता धोक्यात येणार नाही; कारण हे मोर्चे कोणा जातीच्या विरोधात नाहीत.

पुण्यातही आकाशात सोडण्यात येणार्‍या दिव्यांवर बंदी

 • संपूर्ण देश आणि राज्य येथे बंदी घालण्यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्न का करत नाही ?
 • दिवे सोडणार्‍यांवर कारवाईची चेतावणी
        पुणे, २९ ऑक्टोबर (वार्ता.) - दिवाळीच्या वेळी आकाशात सोडण्यात येणार्‍या दिव्यांमुळे (फ्लाईंग लॅटर्न) आगी लागण्याच्या दुर्घटना घडतात. असे दिवे आकाशात सोडल्यावर ते घरांचे छत किंवा झाडे यांवर पडून आग लागण्याच्या घटना प्रतीवर्षी दिवाळीत घडतात. या पार्श्‍वभूमीवर पुणे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी आकाशात सोडण्यात येणार्‍या दिव्यांवर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. त्याचसमवेत असे दिवे सोडणार्‍यांवर कारवाई करण्यासमवेत त्या दिव्यांची विक्री करण्यासही मज्जाव केला आहे. हे आदेश शहरातील सर्व पोलीस ठाण्यांना दिले असून ते २६ नोव्हेंबपर्यंत लागू असणार आहेत. दिव्यांची विक्री, तसेच आकाशात दिवे सोडल्यास संबंधितांवर गुन्हे प्रविष्ट करण्यात येणार आहेत, अशी चेतावणी शुक्ला यांनी दिली आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध मद्याची वाहतूक करणारा टेम्पो पकडला !

३५ लक्ष रुपयांचे साहित्य शासनाधीन
       कोल्हापूर, २९ ऑक्टोबर (वार्ता.) - राज्य उत्पादन शुल्क विभागाने गडहिंग्लज कौलगे मार्गावर अवैध मद्याची वाहतूक करणार्‍या टेम्पोवर कारवाई केली आहे. या टेम्पोतून जवळजवळ ३५ लक्ष रुपयांच्या मद्यासह ४७ लक्ष रुपयांचे साहित्य शासनाधीन केले. एका टेम्पोमधून ७६५ बॉक्स भरून मद्याची वाहतूक होत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानंतर सापळा रचून कौलगे फाटा याठिकाणी टेम्पोवर धाड टाकण्यात आला. या वेळी चालकाकडे बांबूची वाहतूक करण्याचा परवाना मिळाला; मात्र प्रत्यक्षात गाडीमध्ये वरील साहित्य आढळून आले. या प्रकरणी फिरोज शेख आणि वसंत सावंत या दोघांना कह्यात घेण्यात आले आहे.

पाकच्या गुप्तहेराने इस्रोचीही गोपनीय माहिती मिळवल्याचे उघड !

पाकच्या गुप्तहेरांनी पोखरलेला भारत !
   नवी देहली - भारतातील पाक उच्चायुक्तालयातील अधिकारी मेहमूद अख्तर याला हेरगिरीच्या प्रकरणी अटक केल्यानंतर त्याच्या चौकशीतून मिळालेली माहिती समोर येत आहे. अख्तरने भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) मधूनही गोपनीय माहिती मिळवली होती आणि यासाठी त्याला इस्रोतील अधिकार्‍याने साहाय्यही केले. अख्तर याने त्याचे नाव पोलिसांना सांगितले आहे. (अशा देशद्रोही अधिकार्‍याला कठोरातील कठोर शिक्षा करायला हवी ! - संपादक)
    मेहमूद हा पाकच्या बलूच रेजिमेंटचा सैनिक आहे. पाकिस्तान उच्चायुक्तालयात आयएस्आयने नेमलेल्या ८ गुप्तहेरांची माहिती मेहमूदने पोलिसांना दिली आहे. संरक्षण क्षेत्राशी संबंधित असलेली गोपनीय माहिती मिळवून मुंबईवरील २६/११ सारखे आतंकवादी आक्रमण घडवून आणण्यासाठी अख्तर प्रयत्नरत होता, अशी माहिती त्याने दिली आहे.

समाजवादी पक्षाचे खासदार मुनव्वर सलीम यांचा खाजगी साहाय्यक हेरगिरीच्या प्रकरणी कह्यात !

   नवी देहली - समाजवादी पक्षाचे राज्यसभेचे खासदार मुनव्वर सलीम यांचा खाजगी साहाय्यक फरहत याला हेरगिरीच्या प्रकरणी पोलिसांनी कह्यात घेतले आहे. (देशद्रोहाच्या प्रकरणात एकाच पंथाच्या लोकांचा सहभाग असल्याचेच का दिसून येते ? - संपादक) त्याची चौकशी करण्यात येत आहे. येथील पाकच्या उच्चायुक्तालयातील अधिकारी मेहमूद अख्तर याला हेरगिरीच्या प्रकरणी अटक केल्यानंतर फरहत याचे नाव समोर आल्याने त्याची चौकशी करण्यात येत आहे. या प्रकरणी आतापर्यंत शोएब, रमजान आणि सुभाष जंगीर या तिघांना अटक करण्यात आली आहे.

देशी मद्याचे सैराट, झिंगाट असे दोन नवे ब्रँड महिनाभरात बाजारात

जनतेला मद्यपी बनवण्यासाठी प्रयत्नशील मद्य उत्पादक आणि प्रशासकीय अधिकारी !
    मुंबई - सैराट चित्रपट आणि त्यातील झिंग झिंग झिंगाट गाणे लोकप्रिय झाले असल्याने त्याचा लाभ करून घेण्यासाठी राज्यातील देशी मद्य उत्पादक नविन नावांखाली मद्याचे उत्पादन करणार आहेत. सैराट आणि झिंगाट या नावाची देशी मद्य येत्या महिन्याभरात बाजारात आणली जाणार आहेत. राज्यातील देशी दारूचा खप हा तीन हजार कोटी रुपयांचा असून नव्या नावांमुळे मद्य प्राशन करणार्‍यांना अधिकच झिंग चढणार आहे. गेल्याच महिन्यात राज्य उत्पादक शुल्क विभागाकडे वरील दोन नावांसाठी अर्ज करण्यात आला. याविषयी कोणाची हरकत नसल्याने ही दोन नावे अंतिम संमतीच्या प्रतीक्षेत असून आठवड्याभरात त्याला संमती मिळेल, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागातील एका अधिकार्‍याने दिली.

(म्हणे) मुख्यमंत्र्यांकडून डॉनसारखी सेटलमेंट !

स्वत:च्या कार्यकाळात पाक कलाकारांच्या विरोधात
कृती न करणार्‍या माजी मुख्यमंत्र्यांचा आरोप
     सांगली, २९ ऑक्टोबर (वार्ता.) - पाकिस्तानी कलाकारांवरून करण जोहरच्या ए दिल है मुश्किल चित्रपटाच्या निर्माण झालेल्या वादात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सेटलमेंट केली. दोन बांधकाम व्यावसायिक यांच्यातील वाद मिटवतांना एखादा डॉन ज्याप्रमाणे भूमिका पार पाडतो, तीच भूमिका मुख्यमंत्र्यांनी पार पाडली. त्यांनी वठवलेल्या भूमिकेमुळे राज्याची प्रतिष्ठा धुळीस मिळाली, अशी टीका राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था विभागात सांगली-सातारा मतदारसंघातून काँग्रेसच्या वतीने मोहनराव कदम यांनी आवेदन प्रविष्ट केले. त्या वेळी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

काश्मीरमध्ये पाकच्या गोळीबारात दुधगाव (सांगली) येथील सैनिक नितीन सुभाष कोळी हुतात्मा !

वारंवार जवानांचे बळी घेणार्‍या पाकपुरस्कृत आतंकवाद्यांचा
सरकार संपूर्णपणे नायनाट कधी करणार ?
   सांगली, २९ ऑक्टोबर (वार्ता.) - पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात येत आहे. २८ ऑक्टोबरच्या रात्री काश्मीरमध्ये झालेल्या गोळीबारात मिरज तालुक्यातील दुधगाव येथील सैनिक नितीन सुभाष कोळी हे घायाळ झाले होते. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; मात्र २९ ऑक्टोबरला त्यांचे निधन झाले. कोळी यांच्या समवेत शीख रेजिमेंटचे मनदीप सिंह हेही हुतात्मा झाले आहेत. दुधगाव ग्रामपंचायतीजवळ ग्रामस्थांनी दुपारी शोकसभा घेऊन श्रद्धांजली वाहिली. गावचा सुपुत्र हुतात्मा झाल्याने गावात दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला.
   त्यामुळे घरांवर लावण्यात आलेले आकाशदिवेही काढण्यात आले. कोळी यांचे पार्थिव ३० ऑक्टोबरला त्यांच्या मूळ गावी आणण्यात येणार आहे. त्यांच्या नातेवाइकांना राज्यशासनाने १५ लक्ष रुपयांचे साहाय्य घोषित केले आहे.

अवैधरित्या शस्त्रविक्रीचा व्यवसाय करणारे संजय साडविलकर यांना तात्काळ अटक करा !

 • नागाव (जिल्हा सांगली) येथील नागरिक संजय पाटील यांची तासगाव पोलीस ठाण्यात तक्रार
 • संजय साडविलकर यांच्या जबाबाच्या आधारे सनातनचे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना अटक करणारे पोलीस अवैध शस्त्रविक्रीच्या गुन्ह्याखाली साडविलकर यांना अटक करणार का ?
    तासगाव (जिल्हा सांगली), २९ ऑक्टोबर (वार्ता.) - संजय साडविलकर हे गुन्हेगार असून त्यांनी अवैधरित्या रिव्हॉल्व्हर आणि पिस्तुल बनवणे, हाताळणे, खरेदी-विक्री करणे, त्यांची दुरुस्ती करणे इत्यादी गुन्हे केलेले आहेत. असे गुन्हे केल्याचा कबुलीजबाब साडविलकर यांनी न्यायाधिशांसमोर दिला आहे. त्यामुळे या कबुलीजबाबाच्या आधारे संजय साडविलकर, त्यांचे सहकारी बापू इंदुलकर आणि संगनमत करून शस्त्र विकणारे सर्व गुन्हेगार यांच्यावर गुन्हे प्रविष्ट करून त्यांना अटक करावी, अशी तक्रार नागाव येथील राष्ट्रप्रेमी नागरिक श्री. संजय पाटील यांनी तासगाव पोलीस ठाण्यात दिली आहे.
   या वेळी पोलीस निरीक्षकांनी उपविभागीय पोलीस अधिकार्‍यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेऊ, असे सांगितले. अशाच प्रकारची तक्रार कवठे महांकाळ येथे सौ. आशाताई पोतदार यांनी कवठे महांकाळ पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.

वसुबारस या तिथीला पुण्यातील लष्कर भागातील कसायी मोहल्ल्यात दोन गायींची हत्या

 • केवळ गोवंश हत्याबंदी कायदा करून उपयोग नाही, तर शासनाने त्याची प्रभावी कार्यवाही करणे आवश्यक आहे !
 • संबंधितांना अटक करण्याची गोप्रेमींची मागणी
    पुणे, २९ ऑक्टोबर (वार्ता.) - वसुबारसेच्या दिवशी म्हणजे २६ ऑक्टोबर या दिवशी पुण्यातील लष्कर भागातील कसायी मोहल्ल्यामध्ये दोन गायींची हत्या करण्यात आली. पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर त्याच भागातून ४ गायींची सुटका करण्यात आली. गोपूजनाच्या दिवशीच हा अपप्रकार घडल्याने पोलिसांनी या प्रकरणी गोवंश विकणारा आणि खरेदी करणारा, त्यांची वाहतूक करणारा, वाहन देणारा आणि गोवंशियांची हत्या करणारा अशा सर्वांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी अखिल भारत कृषी गोसेवा संघ, पश्‍चिम महाराष्ट्र यांनी एका निवेदनाद्वारे पुणे शहर परिमंडळ २ चे पोलीस उपायुक्त प्रमोद ढहाणे यांच्याकडे केली आहे. या निवेदनात आतापर्यंत अनेक वेळा मागणी करूनही पोलिसांनी गोवंश हत्याबंदी कायद्याची कार्यवाही न केल्यास प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करू, अशी चेतावणीही दिली आहे. हे निवेदन ढहाणे यांना हिंदुत्वनिष्ठ आणि गोसेवा संघाचे अध्यक्ष श्री. मिलिंद एकबोटे, गोभक्त श्री. शिवशंकर स्वामी आणि अधिवक्ता श्री. प्रशांत यादव यांनी २७ ऑक्टोबर या दिवशी दिले.

काश्मीरचे सूत्र सरदार पटेलच सोडवू शकले असते ! - केंद्रीयमंत्री जितेंद्र सिंह

इतिहासानुसार हे सत्य आहे; मात्र आता इतिहासातून शिकून भाजप
सरकारने काश्मीरचे सूत्र सरदार पटेल यांच्या
धोरणानुसार सोडवावे, हीच जनतेची इच्छा आहे !
    नवी देहली - देशातील तब्बल ५६० संस्थानांच्या विलीनीकरणाचा प्रश्‍न गृहमंत्री या नात्याने सरदार पटेल यांनी हाताळला होता; मात्र, नेहरू यांना पटेल यांच्यापेक्षा जम्मू-काश्मीरची चांगली माहिती असल्याने त्यांनी या राज्याचा प्रश्‍न हाताळला. पुढे त्यांनी हा प्रश्‍न राष्ट्रसंघापुढे नेला. अन्य संस्थानांप्रमाणेच जम्मू- काश्मीरचे दायित्व जर पटेल यांच्याकडे सोपवले असते, तर चित्र वेगळे दिसले असते, अशी सार्वत्रिक भावना आहे, असे विधान पंतप्रधान कार्यालयाचा पदभार असलेले केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी केले आहे. येथील सरदार पटेल स्मृती व्याख्यानात ते बोलत होते.

भिवंडी येथे रसायने ठेवलेल्या मुद्रणालयात आग !

आगीच्या वाढत्या घटना रोखण्यासाठी
 प्रशासन ठोस उपाययोजना राबवेल का ?
      ठाणे - भिवंडी तालुक्यातील दापोडा गावाच्या हद्दीत इंडियन कॉर्पोरेशन कॉम्प्लेक्समधील एका मुद्रणालयात दुपारच्या वेळी भीषण आग लागली. लिओन लेबल प्रा. लि. या आस्थापनाच्या गोदामात मुद्रणालयाचे काम चालू होते. तेथे रसायनांचा साठा ठेवण्यात आला होता. त्यामुळेच आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आग विझवण्यासाठी घटनास्थळी अग्नीशमन दलाच्या ८ गाड्यांना पाचारण करण्यात आले. २ घंट्यानंतर आग आटोक्यात आली असून या आगीमुळे २ मजूर गोदामात अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

घाटकोपर येथे चिनी उत्पादनांना विरोध करण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी संघटनांचे आंदोलन !

   घाटकोपर, २९ ऑक्टोबर (वार्ता.) - पाकपुरस्कृत आतंकवादाचे समर्थन करून भारतीय संरक्षण व्यवस्थेवर दबाव आणणे आणि चिनी बनावटीची उत्पादने भारतात आणून भारतीय बाजारपेठ कह्यात घेणे, असा दुहेरी डाव चीन खेळत आहे. भारतीय बाजारपेठ कह्यात घेऊन भारताला आर्थिकदृष्ट्या कमकुवत करण्याचे चीनचे षड्यंत्र आहे. हे दुहेरी आक्रमण हाणून पाडण्यासाठी चिनी वस्तूंवर बहिष्कार घाला, असे आवाहन स्वदेशी जागरण मंच आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांनी जनआंदोलनाद्वारे केले.   

उत्तर महाराष्ट्र विद्यापिठाच्या कुलगुरुपदी डॉ. पी.पी. पाटील याची नियुक्ती

       जळगाव, २९ ऑक्टोबर (वार्ता.) - महाराष्ट्राचे राज्यपाल तथा कुलपती श्री. विद्यासागर राव यांनी नुकतीच उत्तर महाराष्ट्र विद्यापिठाच्या कुलगुरुपदी स्कूल ऑफ फिजीकल सायन्समध्ये प्राध्यापक असलेले प्राध्यापक डॉ. पी.पी. पाटील यांची निवड केली. या निवडीविषयी विद्यार्थी, प्राध्यापक यांच्याकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

संभाजीनगर येथे कोकेनची विक्री करण्यासाठी आलेल्या नायजेरियन तरुणाला अटक

व्यसनांच्या तावडीतून राज्याला मुक्त करण्यासाठी 
शासनाने अशांना कठोर शासन करणे आवश्यक !
        संभाजीनगर - कोकेन या मादक पदार्थाची विक्री करण्यासाठी पुण्यातून येथे आलेल्या केडियो ख्रिस्तोफर या नायजेरियन तरुणाला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून ४.७२ ग्रॅम कोकेन शासनाधीन करण्यात आले. आंतरराष्ट्रीय बाजारात या मादक पदार्थाची किंमत अनुमाने २५ सहस्र रुपये आहे. पोलिसांना पहाताच केडियो पळत सुटला. पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडले.

टी.बी. लुल्ला चॅरिटेबल फाऊंडेशनच्या वतीने चालक-वाहकांना दिवाळी संच भेट !

   सांगली, २९ ऑक्टोबर (वार्ता.) - टी.बी. लुल्ला चॅरिटेबल फाऊंडेशनच्या वतीने दिवाळीच्या पहिल्या दिवशी सांगली आगारात उपस्थित असणार्‍या १०० वाहक-चालक यांच्यासाठी सुगंधी साबण, तेल, अत्तर, उटणे असलेला संच देण्यात आला. स्वत:च्या कुटुंबियांसमवेत दिवाळी साजरी करतांना अखंड प्रवासात रहाणार्‍या एस्.टी.च्या चालक-वाहक यांच्यासाठी अभ्यंगस्नानाचे साहित्य देऊन त्यांची जाण ठेवणारे सामाजिक कार्यकर्ते श्री. किशोर लुल्ला हे आदर्श आहेत, असे गौरवोद्गार एस्.टी.आगारप्रमुख श्री. अमित माळी यांनी काढले. अशाच प्रकारचा उपक्रम तरंग बहुउद्देशीय संस्था, सत्यवेध फाऊंडेशन आणि लुल्ला चॅरिटेबल फाऊंडेशन यांच्या वतीने महापालिकेच्या प्रभाग क्रमांक २३, २४, ३३ आणि ३४ क्रमांकाच्या सफाई कामगारांना देण्यात आला. हे सर्व साहित्य मूकबधीर शाळेतील विद्यार्थ्यांकडून करवून घेण्यात आले होते.

इंफाळ (मणीपूर) मध्ये बॉम्बस्फोट !

       इंफाळ (मणीपूर) - येथे २९ ऑक्टोबरला सकाळी बॉम्बस्फोट झाला. यामुळे एका चारचाकी गाडीची हानी झाली; मात्र कोणतीही जीवितहानी झाली नाही. हा स्फोट कोणत्या आतंकवादी संघटनेने आणि कशासाठी केला, हे अद्याप समजू शकलेले नाही.

फटाक्यांद्वारे होणारी धर्महानी रोखण्यासाठी शिरवळ पोलिसांना निवेदन

पुणे येथील धर्मसभेतून प्रेरणा घेऊन शिरवळ (ता.खंडाळा) येथील धर्मप्रेमी कृतीप्रवण !
पोलीस उपनिरीक्षक सुनील पवार
(उजवीकडे) यांना निवेदन देतांना धर्मप्रेमी 
      शिरवळ (जिल्हा सातारा), २९ ऑक्टोबर (वार्ता.) - हिंदूंच्या धर्मभावना दुखावणार्‍या फटाक्यांवर बंदी आणून विक्रेत्यांनाही असे फटाके विकण्यास मज्जाव करावा, अशा मागणीचे निवेदन शिरवळ येथील धर्माभिमान्यांनी पोलीस उपनिरीक्षक सुनील पवार यांना दिले, तसेच फटाके विक्रेत्यांचेही प्रबोधन केले. 
    नुकतीच पुणे येथे हिंदु धर्मजागृती सभा पार पडली होती. या सभेनंतर राष्ट्र आणि धर्म रक्षणासाठी कृतीशील होऊ इच्छिणार्‍यांसाठी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर देवतांच्या फटाक्यांच्या विक्रीच्या विरोधात निवेदन देण्याचे ठरवण्यात आले.

उच्च न्यायालयाच्या आदेशाला ३ मास उलटूनही पुण्यातील मशिदींवरील अवैध भोंगे चालूच !

उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन न करणारे पोलीस प्रशासन ! 
हा पोलिसांचा अल्पसंख्यांकांच्या तुष्टीकरणाचाच प्रकार आहे, असे वाटल्यास चुकीचे काय ? 
अशा पोलिसांवर शासनाने न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कारवाई करायला हवी !
      पुणे - प्रार्थनास्थळे ही शांतता प्रभाग (झोन) असल्याने सर्व प्रार्थनास्थळांना ध्वनीप्रदूषणाचे नियम पाळावेच लागतील, असे नमूद करून मशिदींवरील अवैध भोंगे काढावेत, असे स्पष्ट आदेश मुंबई उच्च न्यायालयाने ऑगस्ट २०१६ मध्ये दिलेल्या निकालात दिले आहेत; परंतु या निकालानंतरही पुणे शहरातील मशिदींवरील अवैध भोंगे उतरवण्यासंदर्भात पोलिसांनी कोणतीही कारवाई केलेली नाही. नाना पेठ परिसरात १२, लष्कर छावणी परिषदेच्या हद्दीत १०, बंडगार्डन हद्दीत ५, खडक परिसरात २२ मशिदी आहेत. शहरात पहाटेपासून रात्रीपर्यंत किमान ५ वेळा तरी अजान दिली जाते. मशिदींवरील भोंग्यांच्या संख्येत वाढ होत असून त्याच्या कर्णकर्कश आवाजामुळे इतर रहिवाशांना प्रचंड मनःस्ताप सहन करावा लागत आहे. (फक्त हिंदूंच्या सणांच्याच वेळी तत्परता दाखवणारे प्रशासन मशिदीच्या भोंग्यांसंदर्भात कारवाई कधी करणार ? - संपादक)

वसई किल्ल्यावर मद्यपी आणि प्रेमीयुगुले यांच्याकडून इतिहासाला गालबोट

या प्रकरणी राज्य शासनाने तात्काळ लक्ष घालून उपाययोजना करावी, ही दुर्गप्रेमींची अपेक्षा !
     विरार, २९ ऑक्टोबर - वसई किल्ल्यावर मद्यपी आणि प्रेमी युगुले यांचा वाढता वावर, तसेच चित्रपट, लघुपटांचे चित्रीकरण यांमुळे किल्ल्याच्या इतिहासाला गालबोट लागत आहे. पुरातत्व विभागाच्या प्रशासनाकडूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. 
    वसई किल्ल्यात अनेक तरुणांची टोळकी खाजगी वाहनांतून मद्याच्या बाटल्या घेऊन येतात आणि धांगडधिंगा करतात. त्यात भर म्हणून झाडाझुडपांच्या आडोशाला प्रेमी युगुलही बसलेली असतात. अशा स्थितीमुळे किल्ल्याच्या परिसरात मद्याच्या बाटल्यांचा खच आणि प्लास्टिक पिशव्यांचा कचरा झाला आहे. त्यामुळे किल्ल्याच्या परिसराला अवकळा आली आहे. याचसमवेत छायाचित्रणाच्या नावाखाली येणारी मंडळी आणि प्रेमी युगुले हे किल्ल्याच्या अवशेषांवर रंगकाम करत आहेत. (इतिहासावर घाला घालणार्‍या तरुणाईला यापासून कोण रोखणार ? - संपादक) 
       या प्रकारांना आळा घालण्याविषयी सरकार, स्थानिक प्रशासन आणि पुरातत्व विभाग उदासीन आहेे, असा आरोप किल्ले वसई मोहिमेचे डॉ. श्रीदत्त राऊत यांनी केला. त्यामुळे पोलीस, प्रशासन आणि पुरातत्व विभाग यांनी कठोर उपाययोजना करून किल्ल्याचे पावित्र्य राखावे, अशी मागणी किल्ले वसई मोहिमेने केली आहे.

देवता आणि राष्ट्रपुरुष यांची चित्रे असलेल्या फटाक्यांची विक्री केल्यास कारवाई होणार !

ए.पी.एम्.सी. पोलीस ठाण्याची अभिनंदनीय कृती !
हिंदु जनजागृती समितीच्या निवेदनावर तात्काळ कार्यवाही 
      मुंबई, २९ ऑक्टोबर (वार्ता.) - ए.पी.एम्.सी. पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र गलांडे यांनी २१ ऑक्टोबर या दिवशी परिसरातील व्यापारी आणि फटाके विक्रेते यांची बैठक घेऊन देवता आणि राष्ट्रपुरुष यांची चित्रे असलेल्या फटाक्यांची विक्री करू नये, अशी सूचना सर्वांना दिली. देवता आणि राष्ट्रपुरुष यांची चित्रे असलेल्या फटाक्यांची विक्री केल्यास कारवाई करण्यात येईल, अशी चेतावणीही या वेळी देण्यात आली. (अशा प्रकारे जनतेच्या भावनांची कदर केल्यानेच समाजामध्ये पोलिसांविषयी विश्‍वासार्हता निर्माण होईल. - संपादक)

यवतमाळ येथे श्री लक्ष्मी, श्री हनुमान आणि श्रीकृष्ण यांची चित्रे असलेल्या फटाक्यांची सर्रास विक्री !

फटाक्यांच्या विक्रीला पायबंद घालण्यासाठी पोलीस आणि प्रशासन यांचा पाठपुरावा करा !
पोलीस आणि प्रशासन निष्क्रीय
      यवतमाळ - येथील फटाका बाजारात श्री लक्ष्मी, श्री हनुमान आणि श्रीकृष्ण यांची चित्रे असलेल्या फटाक्यांची सर्रास विक्री होत आहे. पोलीस आणि प्रशासन यांनी निवेदने स्वीकारतांना आश्‍वासने दिली होती; पण प्रत्यक्षात पुराव्यानिशी गेल्यावर पोलीस म्हणतात की, ही घटना आमच्या कक्षेत येत नाही. तुम्ही तहसीलदारांना सांगा. उपविभागीय अधिकारी म्हणतात, आमच्याकडे निवडणुकांचे दायित्व आहे. तुम्हाला तक्रार नोंदवावी लागेल. (असे कर्तव्यचुकार अधिकारी काय कामाचे ? - संपादक)

इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील १४ सहस्रांहून अधिक विद्यार्थ्यांचा मराठी शाळेत प्रवेश

      मुंबई - यंदाच्या शैक्षणिक वर्षात अनुमाने १४ सहस्र ६४७ विद्यार्थ्यांनी इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून नाव काढून मराठी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेतल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे. शाळांचा दर्जा सुमार असल्याने पालकांनी आपल्या पाल्यांच्या शाळांमध्ये पालट केला आहे. (सुमार दर्जा असणार्‍या इंग्रजी माध्यमाच्या शाळांवर शिक्षण विभाग कारवाई करणार का ? - संपादक) यामध्ये सर्वाधिक विद्यार्थी पुणेेे विभागातील आहेत. या वृत्ताला शिक्षण सचिव नंदुकमार यांनी दुजोरा दिला आहे.
     नंदकुमार यांनी सांगितले की, मराठी शाळांकडून विविध प्रयोग आणि शिक्षण यांचा दर्जा सुधारण्यासाठी केल्या जाणार्‍या प्रयत्नांचे हे यश आहे. (हा दर्जा टिकून रहाण्यासाठीच शिक्षण विभागाकडून प्रयत्न होणे आवश्यक आहे. - संपादक) इंग्रजी माध्यमातून मराठी माध्यमाच्या शाळेत विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा, यासाठी पालकांचे मेळावे घेण्यात येणार आहेत. (यामध्ये पालकांचा मातृभाषाभिमान कसा वाढेल, यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. - संपादक)

फलक प्रसिद्धीकरता

हुतात्मा सैनिकाच्या भावाच्या ज्या भावना आहेत, त्या सरकारच्या का नाहीत ?
    काश्मीरमध्ये भारत-पाक सीमेवर झालेल्या गोळीबारात हुतात्मा झालेले सैनिक मनदीप सिंह यांच्या मृतदेहाची आतंकवाद्यांनी विटंबना केली. यावर त्यांचा भाऊ संदीप म्हणाला, हत्येचा सूड हत्येनेच घेतला पाहिजे. एका शिरच्छेदासाठी १० शिरच्छेद केले पाहिजेत.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Pak ke sath hui golibarime shahid hue sainik Mandip Singhke bhaine kaha- ek sirke badle 10 sir katne chahiye. -
 Rashtrapremiyo ki yah tivra bhavna samjhe
जागो ! : पाक के साथ हुई गोलीबारी में शहीद हुए सैनिक मनदीप सिंह के भाई ने कहा - एक सिर के बदले १० सिर काटने चाहिए.
राष्ट्रप्रेमियों की यह तीव्र भावना समझे !

सनातनच्या निरपराध साधकांवरील हा अन्याय लक्षात ठेवा !

   कोणताही गुन्हा केला नसतांना श्री. समीर गायकवाड यांना मागील १ वर्ष ४१ दिवसांपासून, तर डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना ४ महिने २० दिवसांंपासून कारागृहात डांबण्यात आले आहे.
केवळ हिंदुत्वाची मानहानी करण्यासाठी सनातनच्या
निरपराध साधकांना कारागृहात डांबणार्‍यांना हिंदु राष्ट्रात दामदुप्पटीने शिक्षा देण्यात येईल !

हिंदूंनो, संभाव्य मुघल साम्राज्याचे षड्यंत्र रोखण्यासाठी संघटित व्हा !

श्री. व्यंकटेश अय्यंगार
१. धर्मांधांचे तुष्टीकरण आणि हिंदूंना विरोध यांमुळे 
भविष्यात भारतात पुन्हा एकदा मुघल साम्राज्य येण्याचा धोका !
     सध्या भारतात धर्मांधांचे तुष्टीकरण आणि हिंदूंना विरोध केला जात आहे. असदुद्दीन ओवैसी यांचा एम्आयएम् पक्ष धर्मांधांच्या हितासाठीच कार्यरत आहे आणि या पक्षाला अनेक ठिकाणी (महानगरपालिका इत्यादींच्या) निवडणुकांमध्येही चांगला प्रतिसाद मिळत आहे. इतर राज्यांमध्येही धर्मांध उमेदवार निवडणुका जिंकून संसदेत प्रवेश मिळवत आहेत. त्यामुळे वर्ष २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये धर्मांध सदस्यांची संख्या १७५ ते २०० झाली, तर भारतात पुन्हा एकदा मुघल साम्राज्य येईल.

महिलांनी अयोग्य वस्तू आणि कपडे वापरल्यामुळे संभवते मानदुखी, पाठदुखी आणि गुडघेदुखी !

      काही महिलांंना अल्प वयातच मानदुखी, पाठदुखी आणि गुडघेदुखी यांना तोंड द्यावे लागते. कार्यालयात अधिक वेळ काम करावे लागणे, अयोग्य दिनचर्या, अनियमित खाणे-पिणे इत्यादी गोष्टी याला कारणीभूत आहेत; परंतु ब्रिटनमधील संशोधकांचा असा दावा आहे की, या समस्यांसाठी स्त्रियांकडून वापरले जाणारे घट्ट कपडे हे एक महत्त्वाचे कारण होऊ शकते. या त्रासांवरील विशेषतज्ञ टीम हचफुल यांनी महिलांमध्ये वाढत्या समस्यांच्या अभ्यासानंतर त्यांनी महिलांना खालीलप्रमाणे अशा कपड्यांचा अल्प प्रमाणात वापर करण्याचा समुपदेश केला आहे.

त्वचेचे आरोग्य टिकवण्यासाठी साबणाचा वापर टाळा !

      स्नानाच्या वेळी साबण लावल्याने साबणातील कृत्रिम द्रव्यांमुळे त्वचा रूक्ष (कोरडी) बनते. तसे होऊ नये, यासाठी साबणाऐवजी उटणे लावावे. एका वेळी अंगाला लावण्यासाठी २ चमचे उटणे पुरेसे होते. उटण्याप्रमाणेच मुलतानी माती किंवा वारुळाची मातीही वापरता येते.
    स्नान करतांना साबण न लावणे हे आदर्श असले, तरी तेल लावून अंघोळ करतांना अंगाला लागलेले अतिरिक्त तेल काढण्यासाठी काही जणांना साबण लावणे सोईचे वाटते. अशा वेळी साबण लावल्यावर अंग जास्त रगडू नये. त्वचेवरील सर्व तेल साबणाने न काढता तेलाचा थोडासा ओशटपणा त्वचेवर राहू द्यावा. अंग पुसल्यानंतर त्वचेवर आवश्यक तेवढा तेलकटपणा रहातो, तेल कपड्यांना लागत नाही आणि या तेलकटपणाचा त्रास न होता त्वचा मऊ रहाण्यास लाभ होतो.
- वैद्य मेघराज माधव पराडकर, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा.

त्वचेच्या बुरशीजन्य गजकर्णासारख्या विकारांवर (फंगल इन्फेक्शनवर) सोपे उपाय

वैद्य मेघराज पराडकर
      जांघा, काखा, मांड्या आणि नितंब (कुल्ले) या भागांवर जेथे घामामुळे त्वचा ओली रहाते, तेथे काही वेळा खाज सुटून लहान लहान फोड येतात आणि ते पसरत जाऊन गोलसर चट्टे निर्माण होतात. या चट्ट्यांवर पुढील दोन्ही उपाय करावेत.
१. प्रतिदिन दिवसातून २ - ३ वेळा विकारग्रस्त त्वचा नुसत्या पाण्याने धुवून कोरड्या कापडाने पुसावी आणि तेथील चट्ट्यांवर स्वतःची लाळ लावावी. यामुळे ८ - १० दिवसांत हे चट्टे पूर्ण बरे होतात, असा अनुभव आहे. या दिवसांत पूर्ण शरिराला साबण लावू नये.
२. ॐ पां पार्वतीभ्यां नमः । आणि ॐ वां वागीश्‍वरीभ्यां नमः । या २ मंत्रजपांनी पाणी अभिमंत्रित करून हे पाणी प्राशन करावे आणि विकारग्रस्त त्वचेलाही लावावे. पाणी अभिमंत्रित करण्यासाठी तांब्याच्या किंवा काचेच्या भांड्यात थोडे पाणी घेऊन त्यात उजव्या हाताची पाचही बोटे बुडवून वरील मंत्र प्रत्येकी २१ वेळा म्हणावेत.
- वैद्य मेघराज माधव पराडकर, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (२१.१०.२०१६)

भर सभेत आचार्य अत्रे यांनी विठ्ठलाविषयी काढलेल्या अश्‍लाघ्य उद्गारांचा निषेध करून धार्मिक भावना दुखावल्याचे निर्भीडपणे सांगणारे श्री. वसंत वासुदेव गुर्जर !

       प्रसिद्ध लेखक, वक्ते आणि साहित्यिक आचार्य अत्रे यांची बेळगाव येथे सभा होती. सभेला गर्दी उसळली होती. अत्र्यांचे गर्दीवर प्रेम असायचे आणि गर्दीचे अत्र्यांवर ! अत्र्यांचे भाषण चालू झाले. लोक हशा-टाळ्यांच्या गजरात न्हाऊन निघत होते आणि अत्रे पंढरपूरच्या बडव्यांवर घसरले. त्यांना विनोद करायची लहर आली. बडवे या शब्दावर कोटी करतांना त्यांनी विठोबा आणि बडवे यांच्यासंबंधी अश्‍लाघ्य उद्गार काढले. हसणारे हसले; पण भर सभेत श्री. वसंत वासुदेव गुर्जर (दादा) उभे राहून म्हणाले, अत्रेसाहेब, आपण फार थोर आहात. मी एक यःकिश्‍चित श्रोता; पण विठोबाविषयी असे उद्गार काढल्यामुळे आमच्या धार्मिक भावना दुखावतात, असे मला वाटते. अत्रे वस्ताद ! ते म्हणाले, अहो, तुम्हाला विनोद कशाशी खातात, हे कळते का ? दादा आपल्या मताशी ठाम होते. मला विनोद कळतो; पण अशा वक्तव्याने धार्मिक भावना दुखावल्या जातात, असे मला पुन्हा नम्रपणे; पण आग्रहपूर्वक सांगावेसे वाटते, असे दादांनी भर सभेत आचार्य अत्र्यांना सुनावले. - प्रा. सुरेश जोशी (संदर्भ : आमचे दादा (ती. वसंत वासुदेव बोंद्रे-गुर्जर))

सनातनद्वेष्ट्यांनो, चुकीची विचारसरणी असलेला सनातनचा एकतरी ग्रंथ दाखवा !

        डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणी सनातनच्या साधकांना संशयित म्हणून अटक करण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे या साधकांनी गुन्हा केल्याचा एकही पुरावा अद्यापपर्यंत मिळालेला नाही; मात्र पुरो(अधो)गाम्यांकडून सातत्याने सनातनद्वेषापोटी अनेक आरोप केले जात आहेत. हे आरोप करतांना विरोधकांकडून सनातनच्या ग्रंथांचा दाखला दिला जातो. सनातनच्या ग्रंथांमध्ये प्रक्षोभक भाषा वापरली जाते आणि या ग्रंथांमधून चुकीचे विचार पसरवले जातात. त्यामुळे सनातनचे साधक गुन्हेगारी कृत्ये करतात, असा कांगावा करत या विरोधकांकडून सनातनवर बंदीची मागणी केली जात आहे. असा कांगावा करतांना त्यांच्याकडून सनातनच्या एखाद्या ग्रंथामधील एखादे वाक्य घेऊन त्याचा चुकीचा अर्थ काढला जातो आणि त्यावरून सनातनची विचारसरणी चुकीची अन् समाजासाठी घातक आहे, असे पसरवले जाते. विशेष म्हणजे सनातनच्या ग्रंथांमध्ये जे काही लिहिले आहे, ते सर्व शास्त्राला अनुसरूनच आहे, तसेच ग्रंथांमधील लिखाणाला वेगवेगळे संदर्भही दिलेले असतात. असे असतांनाही या ग्रंथांचा योग्यप्रकारे अभ्यास न करता ग्रंथांवर नाहक टीका केली जाते. यात महत्त्वाचे म्हणजे सनातनच्या ग्रंथांचा अभ्यास करायला आणि त्यातील भावार्थ समजून घ्यायलाही तितकीच आध्यात्मिक पात्रता असावी लागते, हे सनातनद्वेष्ट्यांना समजेल तो सुदिन ! समाजविघातक विचारांना पूर्ण स्वातंत्र्य असलेल्या जेएन्यू विद्यापिठाचे खरे स्वरूप !

१. भारतीय संस्कृतीला निरुपयोगी 
मानून धर्माला अफूची गोळी समजणारे 
जेएन्यू विद्यापिठातील प्राध्यापक आणि विद्यार्थी !
     गेल्या अनेक वर्षांपासून जेएन्यू विश्‍वविद्यालयावर साम्यवाद्यांचे वर्चस्व आहे. येथील प्राध्यापक आणि विद्यार्थी जे काही म्हणतात, तेच परम सत्य असते. हे लोक भारतीय संस्कृतीला निरुपद्रवी मानतात आणि त्यांचे असे म्हणणे आहे, भारतीय मार्क्सचे अनुयायी होतील आणि दास कॅपिटल हा त्यांचा धर्मग्रंथ होईल, तेव्हाच भारताचे कल्याण होऊ शकेल ! द्वंद्वात्मक भौतिकवादच परम सत्य आहे. जेव्हा याच दर्शनावर जग चालेल, तेव्हाच हे जग शोषण, पाखंड, अंधश्रद्धा आणि दारिद्य्र यांपासून मुक्त होईल. ईश्‍वराचे कोणतेही अस्तित्व नाही. धर्म ही अफूची गोळी आहे. आत्म्याचे अस्तित्व नाही. ना पुनर्जन्म मिळतो आणि ना कर्मफल मिळते.

प्रसिद्ध विनोदी साहित्यिक वि.आ. बुवा यांची काही मार्मिक वाक्ये !

१. तह म्हणजे काय ?, तर पुढील युद्धासाठी अधिकाधिक सिद्धता कशी काय करता येईल ?, याचा शांतपणे विचार करता यावा; म्हणून चालू युद्ध स्थगित करण्याचा केलेला करार.
२. फितूर म्हणजे काय ? तर एखादा माणूस आपल्या पक्षातून दुसर्‍या पक्षात जाणे आणि मतपरिवर्तन म्हणजे दुसर्‍या पक्षातला माणूस आपल्या पक्षात येणे !
३. वर्गणी म्हणजे प्रतिष्ठित भिक्षा होय !

सर्वांनी हिंदूंवर होणार्‍या अत्याचारांविरुद्ध आवाज उठवला पाहिजे. - श्री. मुरली मनोहर शर्मा, संयोजक, भारत रक्षा मंच.

     बाबरी पाडल्यावर राज्यकर्त्यांनी अश्रू ढाळले; पण काश्मीरमधील ४० मंदिरे पाडूनही सर्वपक्षीय राज्यकर्ते शांत राहिले. तसेच काश्मिरी हिंदूंवर झालेल्या अत्याचारांविरुद्धही सर्वच जण शांत राहिले. त्या वेळी हिंदूंनी सर्वधर्मसमभाव जोपासला आणि त्याच्या बदल्यात त्यांना त्यांच्याच बांधवांच्या हत्या बघाव्या लागल्या. आपण सर्वांनी ही मानसिकता पालटून हिंदूंवर होणार्‍या अत्याचारांविरुद्ध आवाज उठवला पाहिजे. - श्री. मुरली मनोहर शर्मा, संयोजक, भारत रक्षा मंच.
तुम्ही इंग्रजी यासाठी शिका की, त्यामुळे तुम्हाला लोक मूर्ख समजणार नाहीत आणि संस्कृत यासाठी शिका की, तुम्ही मूर्ख होऊ नये ! - राष्ट्रीय संस्कृत संस्थानाचे संचालक प्रा. रमाकांत पांडे यांचे गुरु
फाळणीच्या वेळी नेत्यांनी हिंदूंचा घात केला. नेत्यांनी केलेले हे पाप तेव्हाच संपेल, जेव्हा आपले राष्ट्र हिंदु राष्ट्र म्हणून घोषित होईल ! - पू. बाबा अल्पहारी महाराज, संस्थापक, सनातन जागृती मंच.
फाळणीच्या वेळी पाकिस्तानमध्ये २२ टक्के हिंदू होते आणि आता केवळ १ टक्का राहिले आहेत. दुसरीकडे भारतात ९० टक्के हिंदू आणि १० टक्के मुसलमान होते, तर आता ७६ टक्के हिंदू आणि मुसलमान २४ टक्के झाले आहेत. - गिरीराज सिंह, केंद्रीय राज्यमंत्री
देश इस्लाममय करण्याचे धर्मांधांचे ध्येय आहे; पण राज्यकर्त्यांना धर्मांधांची ही मानसिकता समजलेली नाही. सत्तेच्या लालसेपोटी सर्वपक्षीय राज्यकर्ते देशहित पहाण्यास विसरले आहेत. जोपर्यंत काश्मिरी हिंदूंचे काश्मीरमध्ये पुनर्वसन होणार नाही, तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. - श्री. प्रमोद मुतालिक, राष्ट्रीय अध्यक्ष, श्रीराम सेना.
      शारदापिठामुळे काश्मीर हे सहस्रो वर्षांपासून भारतातील विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जात असतांना काश्मीरची आतंकवाद्यांचे माहेरघर म्हणून ओळख व्हावी, हे दुर्दैवी आहे. - सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, सनातन संस्था.


     स्वातंत्र्यकाळात सरदार वल्लभभाई पटेल यांनी जे संघटनाचे कार्य केले, तसे हिंदु जनजागृती समिती आणि श्री. रमेश शिंदे हे वेगवेगळ्या हिंदु संघटनांना एकत्र करण्याचे कार्य करत आहेत. - अधिवक्ता विष्णु शंकर जैन, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदू फ्रंट फॉर जस्टीस.
     पनून कश्मीरने आतापर्यंत जेवढे कष्ट घेतले नसतील, तेवढे कष्ट हिंदु जनजागृती समिती एक भारत अभियान-कश्मीर की ओरसाठी घेत आहे. यासाठी मी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे आभार मानतो. 
- श्री. राहुल कौल, संयोजक, पनून कश्मीर.

काश्मीरमधील धोका !

      जम्मू येथील २० लक्षांहून अधिक हिंदू हे इस्लामी आतंकवादाचे बळी ठरले आहेत. सरकारकडूनही देशप्रेमींचा आवाज दाबणे आणि देशद्रोहींना प्रोत्साहन देणे, याविषयीचे षड्यंत्र रचले जात आहे. धार्मिक कारणामुळे विभाजन झालेला भारत हा जगाच्या पाठीवरील एकमेव देश आहे. जम्मू-काश्मीर राज्याला स्वतंत्र संविधान आहे. राज्याचा स्वतंत्र ध्वज आहे. त्यामुळे तेथे अजून थोडी जरी सूट दिली गेली, तर हा प्रदेश भारतापासून वेगळा होईल.
- डॉ. हरि ओम, समन्वयक, जम्मू फॉर इंडिया. देवतेचे तत्त्व आकृष्ट करणारे यंत्र, देवतेचे चित्र आणि रांगोळी यांचा वायूमंडलावर होणारा परिणाम अभ्यासण्यासाठी यू.टी.एस्. (युनीव्हर्सल थर्मो स्कॅनर) या उपकरणाद्वारे महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने केलेली वैज्ञानिक चाचणी !


      रांगोळी ही ६४ कलांपैकी एक कला आहे. ही कला घरोघरी पोचली आहे. सणा-समारंभांत, देवळांत आणि घरोघरी रांगोळी काढली जाते. सौंदर्याचा साक्षात्कार आणि मांगल्याची सिद्धी हे रांगोळीचे दोन उद्देश आहेत. ज्या ठिकाणी सात्त्विक रांगोळी काढली जाते, त्या ठिकाणी आपोआपच मंगलदायी वातावरणाची निर्मिती होते. हिंदु धर्मातील सर्व सण आणि विधी विविध देवतांशी संबंधित असतात. त्या त्या सणाच्या दिवशी आणि विधीच्या वेळी त्या त्या देवतेचे तत्त्व वातावरणात नेहमीपेक्षा अधिक प्रमाणात असते अन् विधीमुळे रांगोळीमध्ये आकृष्ट होते. प्रत्येक सणानुसार त्या-त्या देवतेचे तत्त्व रांगोळीतून अधिक प्रमाणात आकृष्ट होऊन त्याचा सर्वांना लाभ व्हावा, अशा उद्देशाने सनातनच्या साधकांनी संतांच्या मार्गदर्शनाखाली विविध देवतांची तत्त्वे आकृष्ट करणार्‍या अनेक सात्त्विक रांगोळ्या सिद्ध केल्या आहेत. या रांगोळ्यांमुळे देवतेचे तत्त्व आकृष्ट आणि प्रक्षेपित झाल्यामुळे तेथील वातावरण त्या तत्त्वाने भारित होऊन त्याचा सर्वांना लाभ होतो. या गोष्टीचा वैज्ञानिकदृष्ट्या तुलनात्मक अभ्यास करण्याच्या उद्देशाने यू.टी.एस्. (युनीव्हर्सल थर्मो स्कॅनर) या उपकरणाच्या साहाय्याने चाचणी घेण्यात आली. या चाचणीची निरीक्षणे आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे.

दिवाळीच्या निमित्ताने धर्माधिष्ठित आणि लोककल्याणकारी सनातन धर्म राज्याची स्थापना करण्याचा निर्धार करा !

कु. प्राजक्ता धोतमल
     संपूर्ण भारतवासियांचा आवडता सण असलेली दिवाळी म्हणजे मांगल्याचे, उत्साहाचे प्रतीक ! स्वत:मधील दोष-अहंरूपी वैगुण्याचे निर्दालन करून तमसो मा ज्योतिर्गमय, असे मार्गक्रमण करा, हा संदेश या सणाच्या निमित्ताने आपल्याला मिळतो. खरेच, आपण प्रत्येकाने जन्मोजन्मीच्या मायारूपी आवरणाच्या अंधारातून शाश्‍वत अशा तेजोमय भगवंताकडे जाणे आवश्यक आहे. ही आपल्या उपनिषदांची उच्च शिकवण आहे. हे सर्व व्यष्टी, म्हणजेच स्वत:शी संबंधित झाले. आपण ज्या समाजात वावरतो, त्या समाजातील स्थितीही या सिद्धांताला अनुसरून आहे 
     का ?, याचे चिंतन करून ती तशी होण्यासाठी प्रयत्न करणे, हेही आत्मावलोकनच आहे; कारण या समाजाचा, राष्ट्राचा आपण घटक आहोत. समाजाच्या स्थितीचे चिंतन केले असता दुर्दैवाने आज समाज आणि राष्ट्र यांची स्थिती विदारक असल्याचे लक्षात येते. धर्म हा राष्ट्राचा आत्मा असल्याने साहजिकच या स्थितीचे मूळ धर्माचरणाचा अभाव यात आहे. त्यामुळे या स्थितीवर उपाययोजना काढण्याच्या दृष्टीने सर्व राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी यांनी कृतीशील होणे आवश्यक आहे.

रशियात प्रथमच सेंट पीटर्सबर्ग येथे एस्.एस्.आर्.एफ्.च्या वतीने एक दिवसीय कार्यशाळा !

बसलेले डावीकडून : मशा, इना, आंद्रे आणि नटालिया; उभे राहिलेले
डावीकडून : इरिना, तत्याना आणि त्यांची १० वर्षांची मुलगी
अर्यज्ञ (अरिशा), समवेत इगोर, डिमा, उल्याना आणि नस्त्या

        ‘श्रीकृष्णाच्या कृपेने ९.१०.२०१६ या दिवशी एस्.एस्.आर्.एफ्.च्या वतीने सेंट पीटर्सबर्ग, रशिया येथे प्रथमच एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सिटी सेंटर येथील ‘सिल्वर लोटस योगा क्लब’ येथे सकाळी ११ ते सायंकाळी ७ या कालावधीत ही कार्यशाळा झाली.
१. कार्यशाळेत घेतलेले विषय
        या वेळी स्वभावदोष-निर्मूलनाचा प्रायोगिक भाग, सूक्ष्मातील प्रयोग, आध्यात्मिक उपाय, मीठ-पाण्याचे उपाय यांविषयी मार्गदर्शन करण्यात आले, तसेच ‘लिव्ह अ‍ॅन अवेअर लाईफ (जागृत जीवन जगा)’ हा व्हिडिओही दाखवण्यात आले. प्रत्येकाला स्वभावदोष-निर्मूलनाविषयीची हस्तपत्रके देण्यात आली.

आध्यात्मिक उपाय केल्याने दारूचे व्यसन विनासायास सुटणे आणि आनंद अन् निर्विचार स्थिती अनुभवता येणे

१. साधना करणे थांबवल्यावर आध्यात्मिक त्रासात वाढ होऊन दारू पिण्यास 
आरंभ करणे आणि आध्यात्मिक उपाय करू लागल्यावर दारूचे व्यसन विनासायास सुटणे 
      साधारण एक वर्षापासून मी साधना करणे थांबवले होते आणि माझा आध्यात्मिक त्रासही पुष्कळ वाढला होता. त्यामुळे मी दारू पिणे चालू केले होते. मी कामावर असतांनाही दारू पीत असे. वर्षभर मी प्रतिदिन १५ पेगपर्यंत दारू पीत असे. अकस्मात् माझ्या मनात आध्यात्मिक उपाय करण्याचे आणि स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाउंडेशन (एस्.एस्.आर्.एफ्.)च्या कुटुंबात परतण्याचे विचार आले. मी आध्यात्मिक उपाय करायला चालू केल्यावर दारू पिण्याची माझी इच्छाच पूर्णपणे नाहीशी झाली. व्यसन सुटतांना मला सौम्य स्वरूपात त्रास जाणवला. देवाच्या कृपेविना हे शक्य नाही; कारण अशा प्रकारे अकस्मात् व्यसन अल्प झाल्यावर एखाद्याचा मृत्यू होऊ शकतो. माझे दारूचे व्यसन सुटण्यासाठी मला काहीच प्रयत्न करावे लागले नाहीत.

देवद आश्रमातील प.पू. पांडे महाराज वास्तव्य करत असलेल्या खोलीत जाणवलेले चैतन्यदायी पालट

प.पू. पांडे महाराज
        रामनाथी आश्रमाप्रमाणे देवद आश्रमातील प.पू. पांडे महाराज यांच्या खोलीत झालेले चैतन्यदायी पालट वाचून संतांचा निर्जीव वस्तूंवरही कसा परिणाम होतो, हे लक्षात येते. सौ. गौरी आफळे यांच्यामुळे आपल्याला प.पू. पांडे महाराज यांच्या खोलीत झालेले चैतन्यदायी पालट कळले. यासाठी त्यांचे निरीक्षण कौतुकास्पद आहे.
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले
-----------------------
‘        मी सेवेनिमित्त देवद आश्रमातील प.पू. पांडे महाराज वास्तव्य करत असलेल्या खोलीत गेले होते. ते याच खोलीत सकाळी आणि सायंकाळी प्रत्येकी २ घंटे समष्टीसाठी नामजप करतात. मला जाणवलेले खोलीतील चैतन्यदायी पालट येथे देत आहे.
१. खोलीतील पालट
अ. ‘खोलीत प्रकाश जाणवतो.
आ. ‘खोलीचे आकारमान वाढले आहे’, असे वाटते. खोलीत साहित्य असूनही ती मोकळी वाटते.
इ. ‘खोलीची उंची वाढली आहे’, असे वाटते.

रामनाथी आश्रम परिसरात शुभसंकेत देणारे प्राणी आणि पक्षी यांचे साधकांना झालेले दर्शन अन् त्यामागील आध्यात्मिक विश्‍लेषण

गोमातेचे पूजन करतांना
सनातनच्या संत सद्गुरू (सौ.) बिंदा सिंगबाळ

        प्राण्यांच्या पंचज्ञानेंद्रियांची क्षमता मानवाच्या पंचज्ञानेंद्रियांपेक्षा अधिक असते, हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाले आहे. त्यामुळे प्राण्यांची सूक्ष्मातील कळण्याची क्षमताही मानवाच्या क्षमतेपेक्षा अधिक असते. एखाद्या तीर्थक्षेत्री ज्या देवतेचे तत्त्व अधिक असते, तेथे त्या देवतेशी संबंधित पशू-पक्षी अथवा वनस्पती आढळून येतात.
        काही जण अंधश्रद्धेच्या नावाखाली याकडे दुर्लक्ष करतात; परंतु त्यामागे वैज्ञानिक आणि आध्यात्मिक कारणेही असतात. दत्तक्षेत्री गाय अथवा कुत्रे आढळतात. शिवाच्या मंदिराजवळ आपोआप आलेला बेलाचा वृक्ष दिसतो. त्या तीर्थक्षेत्रातून प्रक्षेपित होणारे देवतेचे तत्त्व त्या जिवांसाठी पूरक असल्यामुळे ते जीव आपोआपच तेथे आकृष्ट होतात, हे यामागील कारण आहे.

कु. सर्वमंगला मेदी त्यांना सुचलेले भावजागृतीसाठी करावयाचे प्रयत्न आणि त्यांनी दिवाळीनिमित्त प.पू. गुरुमाऊलीला दिलेले शुभेच्छापत्र !

कु. सर्वमंगला मेदी
चित्रातील काही घटकांचा भावार्थ
३. पणतीत भावरुपी तेल घालणे : भावपूर्ण साधना करणे
६. पणती प्रज्वलित केल्यावर सर्वत्र प्रकाश पसरणे : व्यष्टी आणि समष्टी साधना चांगली होऊन गुरुकृपेमुळे आत्मज्योत प्रज्वलित होऊन चैतन्य आणि आनंद पसरणे
७. प्रकाशामुळे भगवंताचे दर्शन होणे : आत्मज्योतीच्या प्रकाशामुळे स्वभावदोष आणि अहं दूर झाल्याने भगवंताचे (प.पू. डॉक्टरांचे) दर्शन होणे
भावप्रयोग 
        या देहरूपी पणतीत गुणरूपी कापसाच्या व्यष्टी आणि समष्टी साधनारूपी वाती अन् भावरूपी तेल घालूया, म्हणजेच भावपूर्ण साधना करूया. गुरुकृपेने संत आणि साधक रूपी कयपंजीच्या माध्यमातून त्यांच्या आदर्शांच्या ज्योतीने आपल्या देहरूपी पणतीतील ज्योत प्रज्वलित करूया. ज्योतीने ज्योत उजळूया. प्रज्वलित पणतीच्या चैतन्य आणि आनंद रूपी प्रकाशाने आपल्यातील स्वभावदोष अन् अहंरूपी अंधःकार दूर करूया. पणतीच्या सर्वत्र पसरलेल्या प्रकाशामुळे आपल्याला श्रीगुरूंचे दर्शन होत आहे.
        आता आपण श्रीगुरूंच्या सुकोमल चरणी विनम्र होऊन संपूर्ण शरणागत भावाने प्रार्थना करूया, ‘हे गुरुदेवा, आत्मजोतही तुमचीच आणि साधनेत येणार्‍या विविध अडचणीरूपी वारेही तुमचेच ! अडचणीच्या वार्‍याने आत्मजोत फडफडू लागली, तरी तिला विझू न देता भक्तीच्या बळाने पुन्हा स्थिर करून अखंड तेवत ठेवण्याचे बळ आम्हाला द्या’, हीच आपल्या चरणी प्रार्थना !’
        अनंत कोटी ब्रह्मांडनायक श्री श्रीजयंत यांचे चरणी दीपावलीनिमित्त अनंत कोटी नमस्कार !’
- कु. सर्वमंगला मेदी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांना मिरज आश्रमातील बालसाधिका कु. ऐश्‍वर्या जोशी (वय १३ वर्षे) हिने दीपावलीनिमित्त पाठवलेले शुभेच्छा पत्र !

प.पू. डॉक्टरबाबा,
        आपण कसे आहात ? मला आपली खूप आठवण येते; पण आता तुमचे छायाचित्र खोलीत आहे ना ! त्यामुळे प्रत्यक्ष तुम्हालाच भेटल्यासारखे वाटते. ‘तुम्ही माझ्याकडे पाहून हसत आहात’, असे वाटते.
        परम पूज्य, दीपावलीचा माझ्याकडून, तसेच पू. आबा (पू. जोशीआजोबा), बाबा आणि आई यांच्याकडून तुम्हाला शिरसाष्टांग नमस्कार ! ‘आमची सर्वांची प्रगती करून घ्या’, हीच प्रार्थना !
        माझ्या मनाची शुद्धी होऊन माझे मन निर्मळ फुलासारखे बनावे आणि त्यात तुमच्या चरणकमलांचा वास असावा. माझ्याकडून हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या विशाल कार्यात खारीचा वाटा उचलला जावा, सर्व बालसाधकांची प्रगती होऊन ते हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यास सक्षम व्हावेत, हीच आपल्या कोमल चरणी कळकळीची प्रार्थना !
- आपली,
कु. ऐश्‍वर्या जोशी
शुभेच्छा पत्राच्या शेवटच्या पानावर 
प्रज्वलित पणतीच्या खाली लिहिलेल्या प्रार्थना ! 
१. ‘ज्ञानाच्या ज्योतीचा प्रकाश सर्वत्र पडू दे.
२. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतील अडथळे दूर होऊ देत.
३. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी सर्व साधकांना शक्ती मिळू दे, हीच प्रार्थना !’
- कु. ऐश्‍वर्या योगेश जोशी (वय १३ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२७.१०.२०१६)
     प.पू. डॉक्टरबाबांना दिवाळीनिमित्त कु. ऐश्‍वर्याकडून शिरसाष्टांग नमस्कार !
मन मंदिरा तेजाने उजळू देई ।
मन मंदिरा तेजाने उजळू देई ।
दीपावलीच्या रम्य प्रकाशाने ॥ १ ॥
साधनेच्या चैतन्यमयी उटण्याने ।
धुऊन जाऊ दे आवरण मनाचे ॥ २ ॥
स्वच्छ मन होऊ दे माझे ।
त्यात राहू दे वास गुरुचरणांचे ॥ ३ ॥

प.पू. डॉक्टरांची सर्वज्ञता आणि द्रष्टेपणा !

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले 
यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...
१. सनातन संस्थेची स्थापना आणि 
तिचे कार्य हे ईश्‍वरी नियोजन ! - प.पू. डॉक्टर
       ‘मे २००५ मध्ये माझ्या मनात प.पू. डॉक्टरांनी सनातन संस्थेची स्थापना केल्यामुळे मनोमन कृतज्ञता दाटून येत होती. त्या वेळी प.पू. डॉक्टरांनी निरोप देऊन सांगितले, ‘‘केवळ माझ्या मनात विचार आला आणि सनातन संस्थेची स्थापना झाली, असे नाही. कलियुगात कोणत्या वर्षी सनातन संस्था स्थापन होणार ? त्यात कोणकोणते साधक असणार ? ते कोणती सेवा करणार ? इत्यादी सर्वकाही आधीच सुनिश्‍चित झाले आहे. त्यामुळे तसे घडत आहे. सनातनची स्थापना कोण आणि कधी करणार ? अवतारी कार्य कोण करणार ? तसेच धर्मसंस्थापना होऊन धर्म राज्याचा आरंभ कधी होणार ?’ यांविषयी हिंदु धर्माच्या जुन्या ग्रंथांमध्ये देवाने ऋषींच्या माध्यमातून आधीच लिहून ठेवले आहे. या लिखाणाचे दाखले आपल्याला काही वर्षांनी मिळतील.’’ 
- कु. मधुरा भोसले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (८.१.२०१३)

अजी सोनियाचा दिनु, बरसे अमृताचा घनु !

आज आम्हा साधकांसाठी सोनियाचा दिवस 
आहे; कारण आजचा दिवस, म्हणजे महर्षींनी 
आमच्यासाठी १००वे नाडीवाचन करण्याचा दिवस ! 

महर्षींची शिकवण आणि कार्य !

      ‘आजचा दिवस सनातनच्या इतिहासात परम भाग्याचा आहे. महर्षींनी गेले दीड वर्ष आमच्यासाठी नाडीवाचन करून आमच्यावर जणू त्यांच्या अमृतकृपेचा वर्षाव केला आहे. आज आमच्यासाठी महर्षि १०० वे नाडीवाचन करणार आहेत. खरंच, सार्‍या विश्‍वात असे प्रथमच घडले आहे की, कुणासाठी असे सलग १०० वेळा नाडीवाचन झाले आहे. पुढेही नाडीवाचन होणारच आहे; परंतु महर्षींच्या कृपेची आपल्या मनात जाणीव रहावी; म्हणून ही सुवर्णनोंद करत आहे.
      ‘‘महर्षींनी आजपर्यंत केलेल्या नाडीवाचनरूपी शब्दब्रह्मातून आम्हाला काय काय दिले असेल ?’, याची गणतीच करता येणार नाही. ज्ञानामृताला मोल नाही, हेच खरे. महर्षींनी आजपर्यंत दिलेल्या शाब्दिक ब्रह्मातून किती साधकांचे प्राण वाचवले असतील, किती साधकांना अध्यात्मात पुढे नेले असेल आणि किती मोठ्या प्रमाणावर सनातन संस्थेचे कार्य सार्‍या विश्‍वभर पसरवले असेल, याची कल्पनाही करता येणार नाही. आजपर्यंत झालेल्या नाडीवाचनातून महर्षींनी आम्हाला पुष्कळ काही शिकवले, पुष्कळ परीक्षा घेतल्या आणि पुष्कळ प्रमाणात देवतांच्या दर्शनाच्या साक्षी दिल्या. आम्ही त्यांचे उतराई होऊच शकत नाही. समाजऋण, गुरुऋण, ऋषिऋण आणि देवऋण फेडता येत नाही; परंतु त्यांच्या चरणी मात्र अनन्यभावाने आम्ही शरण येऊ शकतो.

भृगु संहितावाचक डॉ. विशाल शर्मा यांनी महर्षींच्या आदेशावरून रामनाथी आश्रमात पाठवलेल्या भृगुसंहितेच्या आणि शिवसंहितेच्या पानाला सुगंध येण्यास प्रारंभ होणे

१. प.पू. डॉक्टरांनी महर्षींच्या आदेशावरून भृगुसंहितेच्या प्रासादिक पानाला प्रतिदिन डोके टेकवून नमस्कार केल्यावर सहा मासांनी (महिन्यांनी) त्याला पुष्कळ सुगंध येण्यास प्रारंभ होणे : ‘पंजाबमधील होशियारपूर येथील भृगु संहितावाचक डॉ. विशाल शर्मा यांनी महर्षींच्या आदेशावरून १९.१२.२०१५ या दिवशी भृगुसंहितेची दोन पाने रामनाथी आश्रमात पाठवण्यासाठी दिली आणि सांगितले, ‘‘ही पाने प्रासादिक आहेत. प.पू. डॉक्टरांनी पाने त्यांच्या खोलीतील देवघरात ठेवून प्रतिदिन ७ वेळा या पानाला माथा टेकवून नमस्कार करायचा आहे, तसेच प्रत्येक शुक्रवारी फुले वाहून त्यांची पूजा करायची आहे.’’ २२.४.२०१६ या दिवशी कुंभमेळ्यात उज्जैनला याच पत्रावर पुढचा फलादेश प्राप्त झाला. या पानाला सहा मासांनी (महिन्यांनी), म्हणजेच १५.१०.२०१६ या दिवशी सकाळी ११.१० पासून सुगंध येण्यास प्रारंभ झाल्याचे लक्षात आले. हा सुगंध घेता क्षणीच नाकात झिणझिण्या आल्याप्रमाणे होऊन मनाला उत्साह जाणवत होता.

रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरात नामजप करतांना आलेल्या अनुभूती

१. ध्यानमंदिरामध्ये नामजप करतांना मन एकाग्र होणे आणि नामजप झाल्यानंतर सुगंध येणे : ‘जुलै २०१५ मध्ये मी रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरामध्ये बसून नामजप करत होते. त्या दिवशी नामजप करतांना पुष्कळ आनंद वाटत होता. मन अगदी एकाग्र होऊन नामजप होत असल्याने नामजप करतांना ‘उठू नये’, असे वाटत होते. माझा एक घंटा नामजप झाल्यानंतर शेवटी दहा मिनिटे पुष्कळ सुगंध आला आणि मनाला पुष्कळ चांगले वाटले.
२. डोळे मिटून नामजप करतांना महादेवाची पिंड आणि त्यावर पुष्कळ मोठा पिवळ्या रंगाचा नाग दिसणे : दुसर्‍या दिवशीही नामजपाला बसल्यावर भावपूर्ण नामजप होत होता आणि मन पुष्कळ आनंदी होते. त्या दिवशी ‘मी किती नामजप करू आणि किती नको ?’, असे मला वाटत होते. मन आनंदात डुंबत चालले होते. मी जेव्हा डोळे मिटून नामजप करत होते, तेव्हा मला महादेवाची पिंड आणि त्यावर पुष्कळ मोठा पिवळ्या रंगाचा नाग दिसत होता. ते पाहून मला पुष्कळ चांगले वाटत होते.
       हे भगवान श्रीकृष्णा, तुझ्या कृपेमुळेच मला या अनुभूती येऊ शकल्या, त्यासाठी मी तुझ्या चरणी कोटी-कोटी कृतज्ञ आहे.’
- कु. कृष्णाई खंडागळे, बार्शी, सोलापूर. (१२.८.२०१५)

पृथ्वीवरील पुरस्कारापेक्षा साधना करून देवाचा मोक्षरूपी शाश्‍वत पुरस्कार प्राप्त होणे महत्त्वाचे !

सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ
        ‘या वर्षीच्या ‘रिओ ऑलिम्पिक’ खेळामध्ये भाग्यनगरच्या पी.व्ही. सिंधूने रौप्यपदक मिळवले; म्हणून तिच्यावर सगळीकडूनच पारितोषिकांचा वर्षाव झाला. ‘तेलंगण सरकारने तिला ५ कोटी दिले, तर आंध्र सरकारकडून तिला ३ कोटी मिळाले’, अशा वार्ता कानावर आल्या. तिचे कौतुक तर आहेच; परंतु याही पुढे जाऊन असा विचार करावासा वाटतो की, जीवनात शाश्‍वत पुरस्कार मिळवणे अधिक महत्त्वाचे आहे. खेळाडूंना खेळात प्राविण्य दाखवल्यामुळे काही कोटी मिळत असले, तरी साधकांना साधनेमुळे अनंत कोटी ब्रह्मांडनायक असणारा देवच प्राप्त होतो. देव देत असलेला शाश्‍वत पुरस्कार म्हणजे ‘मोक्ष’ ! शेवटी नरजन्माला येऊन याच पुरस्कारासाठी जीवनभर साधना करणे आवश्यक आहे. हे कळले, तरच नरजन्माचे सार्थक होते. पृथ्वीवरील अशाश्‍वत पुरस्कारापेक्षा देवाचा शाश्‍वत पुरस्कार प्राप्त होणे अधिक महत्त्वाचे आहे !’ 
- (सद्गुरु) सौ. अंजली गाडगीळ, चेन्नई, तमिळनाडू. (२२.८.२०१६, रात्री ८.१०)

आपत्काळात, तसेच नेहमीसाठीही उपयुक्त ठरणारी सनातनची ग्रंथमालिका : भावी आपत्काळातील संजीवनी !

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे स्वसंमोहन उपचारांवरील अभ्यासपूर्ण ग्रंथ
      संत-महात्मे, ज्योतिषी आदींच्या सांगण्यानुसार आगामी काळ हा भीषण आपत्काळ असून या काळात समाजाला अनेक आपत्तींना तोंड द्यावे लागणार आहे. आपत्काळात दळणवळण तुटल्यामुळे रुग्णाला रुग्णालयात नेणे, डॉक्टर वा वैद्य यांच्याशी संपर्क साधणे आणि पेठेत (बाजारात) औषधे मिळणेही कठीण होते. आपत्काळात ओढवणार्‍या विकारांना (आजारांना) तोंड देेण्याच्या पूर्वसिद्धतेचा एक भाग म्हणून सनातन भावी आपत्काळातील संजीवनी ही ग्रंथमालिका सिद्ध (तयार) करत आहे. या मालिकेतील १२ ग्रंथ आतापर्यंत प्रकाशित झाले आहेत. या ग्रंथांचा अभ्यास आतापासूनच केला, तर प्रत्यक्ष आपत्काळात विकारांना सामोरे जाण्यासाठी लागणारा आत्मविश्‍वास निर्माण होण्यास साहाय्य होईल. यासाठी हे सर्व ग्रंथ वाचकांनी अवश्य संग्रही ठेवावेत !

हिंदूंमध्ये जागृती करण्याची आवश्यकता !

        एक राष्ट्र चांगले असणे, म्हणजे तेथील प्रजा त्याग आणि सेवा करणारी असणे, तसेच तेथील नागरिक ज्ञानी आणि देशभक्ती करणारे असणे महत्त्वाचे आहे. अशी स्थिती येण्यासाठी हिंदूंमध्ये जागृती करणे महत्त्वाचे आहे ! 
- पू. श्री श्री श्री विजयानंद सरस्वती स्वामीजी, धारवाड, कर्नाटक. (१०.१२.२००८)

सनातनच्या ‘भावी आपत्काळातील संजीवनी या ग्रंथमालिकेतील ग्रंथांचे गुजराती, तमिळ, तेलुगु, मल्ल्याळम्, बंगाली आणि ओडिया या भाषांत भाषांतर करण्यासाठी साहाय्य करण्याची विनंती !

१. आपत्काळात ओढवणार्‍या आपत्तींना / विकारांना 
तोंड देेण्याची पूर्वसिद्धता करण्याची आवश्यकता
        संत-महात्मे, ज्योतिषी आदींच्या सांगण्यानुसार आगामी काळ हा भीषण आपत्काळ असून या काळात समाजाला अनेक आपत्तींना तोंड द्यावे लागणार आहे. आपत्काळात स्वतःसह कुटुंबियांच्याही आरोग्याचे रक्षण करणे, हे मोठे आव्हानच असते. आपत्काळात दळणवळण तुटल्यामुळे रुग्णाला रुग्णालयात नेणे, डॉक्टर वा वैद्य यांच्याशी संपर्क साधणे आणि पेठेत (बाजारात) औषधे मिळणेही कठीण होते. आपत्काळात ओढवणार्‍या विकारांना तोंड देेण्याच्या पूर्वसिद्धतेचा एक भाग म्हणून सनातन संस्था ‘भावी आपत्काळातील संजीवनी’ ही ग्रंथमालिका सिद्ध (तयार) करत आहे.
२. मराठी भाषेत 
प्रकाशित झालेल्या ग्रंथांची नावे
        या मालिकेतील पुढील ११ ग्रंथ आतापर्यंत प्रकाशित झाले आहेत.
अ. अग्नीशमन प्रशिक्षण
आ. बिंदूदाबन (२ ग्रंथ)

साधकांना सूचना

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
प्रारंभ - आश्‍विन कृष्ण पक्ष चतुर्दशी (२९.१०.२०१६) रात्री ८.४० वाजता
समाप्ती - आश्‍विन अमावास्या (३०.१०.२०१६) रात्री ११.०८ वाजता
आज अमावास्या आहे.

साधकांसाठी सूचना आणि वाचक, हितचिंतक अन् राष्ट्रप्रेमी हिंदु यांना विनंती !

भ्रमणभाषसाठी सात्त्विक संकेतध्वनी (रिंगटोन) निवडा !
   काही साधकांच्या भ्रमणभाषचा संकेतध्वनी (रिंगटोन) पाश्‍चात्त्य संगीत किंवा सिनेगीत यांवर आधारित असल्याचे लक्षात आले आहे, तसेच काही साधक भ्रमणभाषमध्ये टॉकिंग अलार्म अ‍ॅपमधील गजर म्हणजे बोलण्याच्या आवाजातील गजर लावतात. असा रिंगटोन किंवा गजर कर्कश आवाजातील आणि त्रासदायक स्पंदने निर्माण करणारा असल्याने त्यातूून वातावरणात रज-तम लहरी पसरतात आणि त्याचे परिणाम मनावर होतात.
   नामजप, भजने किंवा आरती यांच्या चालींवरील सात्त्विक संकेतध्वनीतून वातावरणात सात्त्विक लहरी पसरण्यास आणि ऐकणार्‍याचा भाव जागृत होण्यास साहाय्य होते. त्यामुळे साधकांनी भ्रमणभाषचा संकेतध्वनी किंवा गजर सात्त्विक स्वरूपाचा ठेवावा.

साधकांनो, सनातनची माहिती काढण्यासाठी येणार्‍या अशा व्यक्तींपासून सावधान !

   अन्वेषण यंत्रणा वेगवेगळ्या माध्यमातून सनातनचे आश्रम आणि सेवाकेंद्रे येथे जाऊन, तसेच साधकांना संपर्क करून माहिती काढण्याचा प्रयत्न करत आहेत. काही महिन्यांपूर्वी राजस्थानमध्ये रहात असल्याचे सांगणारी एक व्यक्ती स्वत:चा मुलगा हरवल्याचे निमित्त करून दुसर्‍या राज्यातील सनातनच्या आश्रमात पोचली. त्या वेळी ती व्यक्ती मुलाची माहिती काढण्याच्या निमित्ताने संस्थेची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत होती. असेच प्रसंग विविध राज्यांतील साधकांसोबत, तसेच आश्रम, सेवाकेंद्र यांमध्ये घडत आहेत. त्यामुळे साधकांनी अशा संशयास्पद व्यक्तींपासून सावध रहावे.
        हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आहे आणि राष्ट्रीयत्व हेच भारतीयत्व ! 
- श्री. विनोदकुमार सर्वोदय, गाजियाबाद, उत्तर प्रदेश.

हिंदूंनो, दक्षिणेतील धर्माचरणी हिंदूंचा आदर्श घ्या !

       ‘देवघर हा हिंदूंच्या घरातील एक अविभाज्य भाग आहे; मात्र सध्याच्या ‘फ्लॅट’ (सदनिका) संस्कृतीतून देवघर गायब झाले आहे. त्यामुळे सदनिकेमध्ये देवघर असणे आधुनिक हिंदूंसाठी अडगळीचे वाटू लागले आहे. दक्षिणेतील हिंदूंनी मात्र वैज्ञानिक प्रगती करतांना धर्माचरण सोडलेले नाही. दक्षिणेत कितीही छोटे घर किंवा सदनिका असेल, तर त्यात देवघरासाठी जागा राखून ठेवलेली असते.’ 
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

प्रत्येक व्यक्तीने सुखरूप पैलतिराला लागावे आणि शांतीपूर्ण अन् आनंदमय जीवन जगावे, यांसाठी साहाय्य करणारे ऋषि आणि त्याची सनातनच्या साधकांना येणारी अनुभूती

१. साहाय्य करणारे ऋषि
       ‘सध्या या पृथ्वीवर रहात असलेल्या १ लक्ष ४४ सहस्र ऋषींचा गट सप्तर्षींच्या मार्गदर्शनाखाली मानवजातीच्या कल्याणासाठी कार्यरत आहे. याव्यतिरिक्त या जगात आणि वरच्या उच्च जगात असे इतर अनेक ऋषि आहेत, जे मानवजातीला परिवर्तनासाठी साहाय्य करत आहेत. सर्व युगांसाठी आवश्यक असलेले आध्यात्मिक ते लौकिक, असे सर्व प्रकारचे ज्ञान त्यांना सहजसाध्य आहे.
       ‘आपण मानवजातीच्या कालपथातील अत्यंत निर्णायक टप्प्यापाशी आहोत. निर्णायक अशासाठी की, ही वेळ मोठ्या पालटांची आहे. अशा वेळी ऋषि या पालटांमधून पार पडण्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करण्याची अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावतात. या परीक्षेच्या काळात प्रत्येक व्यक्तीने सुखरूप पैलतिराला लागावे आणि शांतीपूर्ण अन् आनंदमय जीवन जगावे, यासाठी प्रत्येकाला साहाय्य करण्याची ते वाट पहात आहेत. सांप्रत परिस्थितीत आपले जग क्लेश आणि विध्वंस यांपासून मुक्त होईल, ही शक्यता फार दूरची वाटते.’
(संदर्भ : ‘उच्च स्तरीय संवाद आणि इतर सत्ये’)

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
दुसर्‍याला उमजू न देणे, स्वतःचे स्वतःला न उमजणे,
स्वतःचे दुसर्‍याला उमजू न देणे, ही अवस्था आल्यास
तो जीव ईश्‍वराच्या अगदी निकट आला आहे, असे समजावे.
भावार्थ : दुसर्‍याला उमजू न देणे म्हणजे आपल्यातील शक्ती दुसर्‍याला समजणार नाही, असे वागणे. स्वतःचे स्वतःला न उमजणे म्हणजे अद्वैतात गेल्यावर स्वतःचे स्वतःला उमजण्यासारखे काही उरत नाही; कारण तो स्वतःला विसरूनच गेलेला असतो. स्वतःचे दुसर्‍याला उमजू न देणे म्हणजे आपण स्वतः ब्रह्मस्थितीत आहोत, हे प्रकृतीतील दुसर्‍याला उमजून येत नाही. ही ईश्‍वराची, ब्रह्माची लक्षणे असल्याने तशा स्थितीत जो असेल, तो साहजिकच ईश्‍वराच्या निकट आलेला असतो.


साधकांना सूचना

    ३० ऑक्टोबरला दीपावली लक्ष्मीपूजन असल्यामुळे हा दिवस बी.एस्.एन्.एल्. या आस्थापनाने ब्लॅकआऊट डे म्हणून घोषित केला आहे. या दिवशी भ्रमणभाषवरून लघुसंदेश पाठवणे, तसेच संपर्क करणे (कॉल करणे) यांसाठी विशिष्ट दरात पैसे आकारले जाणार आहेत. त्यामुळे साधकांनी या दिवशी लघुसंदेश पाठवू नयेत, तसेच आवश्यकतेप्रमाणे संपर्क (कॉल) करावा.

एखाद्या क्षेत्राचे शिक्षण घेत असतांना त्या क्षेत्राशी संबंधित कायद्याचे ज्ञान देणे आवश्यक !

परात्पर गुरु डॉ. आठवले
शिक्षणातील कोणतेही क्षेत्र, उदा. वैद्यकीय, अभियांत्रिकी, शैक्षणिक असले, तरी त्या त्या क्षेत्राशी संबंधित ज्ञान दिले जाते; मात्र त्या क्षेत्राशी संबंधित कायद्याचे शिक्षण दिले जात नाही. एखादा वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेत असेल, तर त्याला पुढे वैद्यकीय व्यवसाय करतांना कायदेशीरदृष्ट्या त्यात काही त्रुटी राहू नये, यासाठी वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित कायदेशीर ज्ञानही दिले जायला हवे. त्यामुळे पुढे कोणी त्या क्षेत्राशी कायदेविषयक प्रश्‍न विचारले, तर त्याची योग्य ती उत्तरे आपण देतो, तसेच संबंधित व्यवसायही कायदेशीरदृष्ट्या योग्यप्रकारे करणेही शक्य होते; मात्र सध्याच्या शिक्षणपद्धतीत एखाद्या क्षेत्राशी संबंधित कायदेविषयक ज्ञान देण्याची अशी कोणतीही सुविधा नाही. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला त्याच्या क्षेत्राशी संबंधित कायदेविषयक अज्ञानामुळे अडचण निर्माण होऊ शकते किंवा त्याच्याकडून एखादी चूक होऊ शकते.

भारत विनाशाच्या ज्वालामुखीच्या पाठीवर बसला आहे !

      या क्रांतीकारकांना कल्पनाही नव्हती की, स्वातंत्र्यानंतर एक दिवस असाही येईल की, या देशाचे राज्यकर्ते देशातील जनतेचे रक्त पितील आणि भारतवासियांचा शोक अन् आक्रोश यांनी भारत देशाचे आकाश थरथर कापेल. आज आपली भूमी आणि आकाश कोठे आहे ? आता ही भूमी आणि आकाश लुटारू अन् भांडवलदार यांचे आहे. राजकारण हा एक व्यवसाय झाला आहे. येथे घराणेशाहीचा झेंडा फडकत आहे. घराणेशाही लोकशाहीला ठेचून काढत आहे. देशभक्त, निष्काम कर्मयोगी, जनतेचे सेवक, प्रामाणिक आणि निष्ठावान इत्यादी लोकांना राजकारणात कोणतेही महत्त्व नाही. (आर्य नीति, १०.११.२००९)

संस्काराने राष्ट्र तेजस्वी होणे

      पिढ्यान्पिढ्या जेव्हा चांगले संस्कार होत असतात, तेव्हा ती आत्मशक्ती जागृत रहाते आणि चांगले नियोजन करून जीवन सुखदायी आणि समृद्ध करते. मध्येच जर संस्कार बंद पडले, तर ते पुन्हा प्रस्थापित करण्यास वेळ लागतो. तेथपर्यंत राक्षसीवृत्ती बोकाळून विघटनकारी कृत्ये सुरू होतात. त्याचे परिणाम समाजाला आणि राष्ट्राला भोगावे लागतात. आज भारताचे असेच झाले आहे. सुसंस्कार नाहीसे झाले आहेत आणि विघटनकारी कृत्ये बोकाळली आहेत. भौतिक वाद पुढे येत आहे. तेव्हा नवीन पिढीवर परत सुसंस्कार करणे आवश्यक आहे. - प.पू. परशराम माधव पांडे

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

मंत्रजपाचे महत्त्व 
समजा, मनाची एकाग्रता साधली नाही, तरी पावित्र्याने 
कर्तव्य म्हणून मंत्रजप केल्यावर मन आपोआप स्थिर होत जाईल. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

सीमाभागातील नागरिकांची सुरक्षा !

संपादकीय
     काश्मीरमधील शक्करगड सीमेवर पाकच्या सैनिकांनी गोळीबार चालू केला. या गोळीबाराचा आधार घेऊन भारतात अतिरेक्यांना घुसवण्याचे त्यांचे नियोजन होते. पाकच्या सैनिकांची ही नेहमीची हुशारी या वेळी यशस्वी होऊ शकली नाही; कारण भारतीय सैनिकांनी प्रत्युत्तर म्हणून केलेल्या गोळीबारात पाकचे १५ सैनिक ठार झाले. भारतीय सैनिकांनी दिलेले प्रत्युत्तर हेच सूत्र येथे महत्त्वाचे आहे. पाकने केलेला गोळीबार किंवा केलेले शस्त्रसंधीचे उल्लंघन मोजण्यात इतकी वर्षे गेली.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn