Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

आज नरकचतुर्दशी

दीपावलीच्या निमित्ताने नरकासुररूपी अधर्मी विकृतींवर 
विजय मिळवून हिंदु राष्ट्राची स्थापना होण्यासाठी 
धर्मसंस्थापक भगवान श्रीकृष्णाची उपासना करूया !

भारताने प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात पाकचे १५ सैनिक ठार !

       नवी देहली - काश्मीरमधील शक्करगड भागातील सीमेवर पाकने केलेल्या गोळीबाराला सीमा सुरक्षा दलाने प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात पाकचे किमान १५ सैनिक ठार झाले आहेत. तेथील काही तळही उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. पाक सैन्याने शस्त्रसंधी कराराचे उल्लंघन करत रात्रभर भारतीय चौक्यांवर गोळीबार केला. त्याद्वारे त्यांचा आतंकवाद्यांना भारतीय सीमेत घुसवण्याचा प्रयत्न होता. यामुळे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली. या गोळीबारात भारताचाही एक सैनिक हुतात्मा झाला. २७ ऑक्टोबरला केलेल्या गोळीबारातही भारताचा एक सैनिक हुतात्मा झाला होता, तर १३ नागरिक घायाळ झाले होते. २१ ऑक्टोबरला भारताने पाकचे ७ सैनिक आणि एक आतंकवादी यांना ठार केले होते.
       पाकने जम्मू-काश्मीर सीमेवर नौशेरा, सुंदरबनी आणि पल्लनवाला सेक्टरमध्ये गोळीबार चालू केला. गेल्या १२ घंट्यांत पाकने सहाव्यांदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. भारतीय सैन्यासह सामान्य नागरिकांनाही त्याने लक्ष्य केले.

शिर्डी येथे श्री साईबाबा संस्थानच्या मंदिरातील सोने चोरणार्‍या कर्मचार्‍यास ३ वर्षे कारावास आणि आर्थिक दंड

  • हिंदूंनो, मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम जाणा ! अशा चोरट्या कर्मचार्‍यांपेक्षा सेवेकरी भक्त मिळण्यासाठी अशी मंदिरे भक्तांच्या कह्यात देण्यासाठी शासनाकडे आग्रह धरा ! 
  • धर्मशिक्षणाच्या अभावामुळे जन्महिंदूंकडून होणारे अक्षम्य अपराध !
        शिर्डी, २८ ऑक्टोबर - येथील श्री साईबाबा संस्थानच्या मंदिरातील देणगीत मिळालेले सोन्या-चांदीचे दागिने चोरणार्‍या दिनकर हनुमंत डोखे या कर्मचार्‍यास न्यायालयाने ३ वर्षे कारावास आणि १ सहस्र रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे.
        ८ जुलै २०१४ या दिवशी मंदिर परिसरात श्री साईचरणी आलेल्या दानाची मोजणी चालू असतांना दिनकर डोखे यांनी काही सोने चोरले होते. हा प्रकार क्लोज सर्कीट टीव्हीमध्ये चित्रीत झाला होता. त्यानंतर मोजणी करणार्‍या कर्मचार्‍यांची संस्थानच्या सुरक्षारक्षकांनी पडताळणी केली असता डोखे यांच्याकडे १ ग्रॅम सोन्याचे नाणे, ३ ग्रॅमचे अन्य दागिने आणि ३६ ग्रॅम चांदीचे दागिने असा सुमारे १२ सहस्र रुपयांचा ऐवज आढळून आला. या प्रकरणी श्री साईबाबा संस्थानने शिर्डी पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार प्रविष्ट केली होती आणि डोखे यांना निलंबित केले होते.

परराज्यातील लॉटरीची अवैधपणे विक्री करणार्‍या ६ आस्थापनांनी महाराष्ट्र्र सरकारचा ९३३ कोटी रुपयांचा महसूल बुडवला

एवढा कररूपी पैसा बुडवेपर्यंत महसूल खाते काय 
करत होते ? जनतेला भिकेस लावणार्‍या लॉटरीवर केंद्र 
आणि राज्य सरकार यांनी बंदी घालावी, अशी जनतेची अपेक्षा !
        मुंबई - परराज्यातील ऑनलाईन लॉटरीची अवैधपणे विक्री करणार्‍या ६ लॉटरी आस्थापनांनी महाराष्ट्र सरकारचा वर्ष २००७ ते २००९ या कालावधीत ९३३ कोटी रुपयांहून अधिक महसूल बुडवल्याचे समोर आले आहे. यासंबंधीचे वृत्त मिड-डे इंग्रजी वृत्तपत्राने दिले असून त्याला अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दुजोरा दिला आहे. त्या आस्थापनांच्या लॉटरी विक्रीला राज्यात बंदी घालण्यात आली असून अद्यापपर्यंत कराची वसुली झालेली नाही. (इतक्या वर्षांत कर वसुली न करणार्‍या महसूल विभागातील संबंधितांची चौकशी करून कठोर कारवाई करायला हवी. - संपादक)
        त्या आस्थापनांनी अवैधरितीने अरुणाचल प्रदेश, सिक्कीम आणि मिझोरम आदी राज्यातील ऑनलाईन लॉटरीची राज्यात विक्री केली; पण त्याचा कर राज्य सरकारकडे जमा केला नाही. (कायद्याचा धाक न राहिल्याचे लक्षण ! - संपादक) त्या ६ आस्थापनांपैकी स्वागत एजन्सीने ७६ कोटी २२ लक्ष, समर्पण ट्रेडिंगने १३४ कोटी ४३ लक्ष, कॅम्पलॉट गेमिंग सोल्यूशनने ३८ कोटी, ज्यूपिटर गेमिंग ३२३ कोटी १४ लक्ष, एस्एल् मार्केटिंगने १३३ कोटी १० लक्ष आणि श्‍वेता एन्टरप्रायझेसने २२८ कोटी ३० लक्ष रुपयांचा महसूल बुडवला आहे. या प्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाने फसवणुकीचा गुन्हा प्रविष्ट केला आहे.

केरळमधील ३० युवक अफगाणिस्तानमधील इसिसच्या शिबिरातून आतंकवादी प्रशिक्षण घेऊन राज्यात परतले !

भारतातील इसिसचा गड झालेला केरळ ! हिंदूंनी 
साम्यवादी पक्षाला सत्तेत आणल्यामुळे त्यांना आतंकवादाच्या 
सावटाखाली जीवन जगण्याची मिळालेली ही शिक्षाच होय ! राज्यातील 
सत्ताधारी कम्युनिस्ट पक्ष आतंकवाद्यांच्या विरोधात कृती करण्याची 
शक्यता अल्प असल्याने केंद्र सरकारने त्यासाठी पुढाकार घ्यावा ! 
        कोची - केरळ राज्यात इसिसचा छुपा अड्डा अनेक दिवसांपासून अस्तित्वात आहे. राज्यातील २१ मुसलमान तरुण बेपत्ता झाले होते. त्यांचा शोध घेतांना राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या (एन्.आय.ए.च्या) लक्षात आले की, राज्यातील ३० हून अधिक मुसलमान युवक अफगाणिस्तान येथील इसिसच्या शिबिरात प्रशिक्षण घेऊन राज्यात परत आले आहेत आणि येथील इसिसचे छुपे अड्डे चालवत आहेत.
१. राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या तपासात असेही आढळून आले आहे की, केरळमधील जे सुशिक्षित मुसलमान आखाती देशात नोकरीसाठी गेले आहेत, त्यांचा इसिसच्या आतंकवादी यंत्रणेशी जवळचा संपर्क आहे. तसेच केरळमधील अनेक अनिवासी भारतीय मुसलमान व्यावसायिक हे इसिसच्या कारवायांना अर्थपुरवठा करतात.
२. केरळ हे धर्मनिरपेक्ष राज्य आहे, ही कल्पना अत्यंत चुकीची आहे. तेथे आतंकवाद मोठ्या प्रमाणात फोफावत आहे. अनेक मुसलमान संघटना आणि धार्मिक संघटना या आतंकवाद्यांना त्यांच्या कारवायांसाठी सुविधा अन् साहाय्य पुरवत आहेत, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यानेे सांगितले.

राजस्थानमधून आणखी एका पाकिस्तानी गुप्तहेराला अटक !

पाकच्या गुप्तहेरांनी पोखरलेला भारत !
        नवी देहली - येथील पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकारी महंमद अख्तर यांना अटक करण्यात आल्यानंतर शोएब नावाच्या आणखी एका हेराला जोधपूर येथे अटक करण्यात आली आहे.
हेरगिरीसाठी पाककडून 
तरुणी आणि पैसा यांचा पुरवठा
        पाकची गुप्तचर संस्था आयएस्आयने हेरगिरीसाठी येथील नागरिकांना जाळ्यात फसवण्यासाठी भरपूर पैसा दिला, तसेच तरुणीही पुरवल्या. या हेरांना व्हॉट्सअ‍ॅप कॉलद्वारे संपर्क केला जात होता. पाकिस्तानी उच्चायुक्त कार्यालयात कार्यरत असणार्‍या महंमद अख्तर या अधिकार्‍याला अटक केल्यानंतर हे उघडकीस आले. अख्तर आधी लोकांची कौटुंबिक पार्श्‍वभूमी गोळा करायचा आणि मग त्यांना आपल्या जाळ्यात अडकवायचा. अख्तरबरोबर अटक करण्यात आलेले मौलाना रमझान आणि सुभाष जांगीर अख्तरला माहिती आणि कागदपत्रे पुरवण्याचे काम करत होते. मौलाना एका मशिदीत धर्म प्रसाराचे काम करत होता; तर सुभाषचे त्याच मशिदीजवळ एक छोटेसे किराणा दुकान आहे. जोधपूरमध्ये अटक केलेल्या शोएबच्या संपर्कात मौलाना होता.

बेंगळुरू येथील रा.स्व. संघाच्या कार्यकर्त्याच्या हत्येप्रकरणी ४ धर्मांधांना अटक !

हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या धर्मांधांकडून होत असतांना 
त्याविषयी पुरोगामी आणि निधर्मीवादी कधी तोंड 
उघडत नाहीत; मात्र एखाद्या धर्मांधाची कोणी हत्या 
केल्यास लगेच त्यांच्याकडून थयथयाट केला जातो !
          बेंगळुरू - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते रुद्रेश यांची १६ ऑक्टोबर या दिवशी हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी महंमद सादिक, महंमद मुजीबुल्ला, वासिम अहमद आणि इरफान पाशा या चौघा धर्मांधांना अटक केली आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त एन्.एस्. मेघारीख यांनी दिली.
          रुद्रेश हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संचलनात सहभागी होऊन परत येत असतांना ते त्यांंच्या ३ मित्रांशी बोलत रस्त्यावर उभे होते. वासिम याने रुद्रेश यांच्यावर कोयत्याने वार केले आणि तो सादिक याच्याबरोबर पळून गेला. या आक्रमणकर्त्यांना संरक्षण देण्यासाठी मुजीबुल्ला आणि इरफान शेजारी उभे होते. या धर्मांधांचा आतंकवादी संघटनांशी संबंध आहे का, हे पोलीस पडताळून पहात आहेत. या हत्येसाठी उत्तरदायी असणार्‍यांना पकडण्यासाठी पोलिसांनी ५ विशेष पथके बनवली होती, अशी माहिती मेघारीख यांनी दिली.

तेलंगणच्या निजामाबादमध्ये फटाक्यांच्या संदर्भात हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून जनजागृती !

निजामाबादच्या पालिका आयुक्तांना
निवेदन देतांना धर्माभिमानी
     निजामाबाद - येथील हिंदुत्वनिष्ठांनी फटाक्यांमुळे होणार्‍या दुष्परिणामांच्या संदर्भात येथे जनजागृती करण्यासाठी अभियान राबवले. या अंतर्गत प्रशासनाला निवेदने देण्यात आली. 
१. हिंदु जनजागृती समितीशी जोडले गेलेले धर्माभिमानी श्री. श्रीनिवास यांनी येथील हिंदुत्वनिष्ठ संघटनांना एकत्रित करून फटाक्यांमुळे होणारी हानी, चिनी फटाक्यांवर बहिष्कार घालणे या संदर्भात जनजागृतीसाठी एका बैठकीचे आयोजन केले होते. यात बजरंग दल, हिंदु वाहिनी, हिंदु युथ, हिंदु राष्ट्र उत्सव समिती, हिंदु जनजागृती समिती आदी संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. या वेळी जनजागृतीसाठी १० सहस्र हस्तपत्रकांचे वितरण करणे, प्रत्येक संघटनेकडून ५ फ्लेक्स फलक लावणे आणि स्थानिक दूरचित्रवाहिन्यांवरून प्रचार करण्याचे ठरवण्यात आले. बैठकीसाठी श्री. यादगिरी आणि अधिवक्ता शरत चंद्र यांनी साहाय्य केले.

पाकमध्ये रॉ चे हस्तक असल्याचा आरोप असणार्‍या तिघांची मुक्तता !

      नवी देहली - पाकच्या एका न्यायालयाने भारतीय गुप्तचर यंत्रणा ‘रिसर्च अ‍ॅन्ड अ‍ॅनालिसिस विंग’(रॉ)चे हेर असल्याच्या आरोपातून ३ व्यक्तींना पुराव्याअभावी मुक्त केले. ताहिर उपाख्य लांबा, जुनैद खान आणि इम्तियाज अशी या तिघांची नावे आहेत. त्यांना मागील वर्षी एप्रिलमध्ये कराची येथे अटक करण्यात आली होती. पोलिसांचा आरोप होता की ते मुत्ताहिदा कौमी मूवमेंट (एम्क्यूएम्) ला जोडलेले होते आणि त्यांना रॉ द्वारा प्रशिक्षित केले गेले होते.

चेन्नई येथे दीपावलीनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने सत्संग !

      चेन्नई - येथील अण्णानगरमध्ये दीपावलीनिमित्त आयोजित एका स्नेहसंमेलनात सनातन संस्थेच्या वतीने विशेष सत्संग घेण्यात आला. सनातन संस्थेच्या सौ. सुगंधी जयकुमार यांनी या सत्संगात दीपावलीचे महत्त्व, कार्तिक दीपम् आणि प्रार्थना यांचे महत्त्व विशद केले. सौ. सुगंधी जयकुमार यांचे जवळचे नातेवाईक या सत्संगाला उपस्थित होते. या सत्संगाला सुमारे १०० जण उपस्थित होते. सत्संगामधील मार्गदर्शन ऐकून आनंद वाटल्याचे उपस्थितांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी २ सहस्र ५०० पत्रकारांसोबत दिवाळी साजरी करणार !

      नवी देहली - पंतप्रधान नरेंद्र मोदी पत्रकारांसाठी दिवाळी मिलन समारंभाचे आयोजन करणार आहेत. हा समारंभ ३ नोव्हेंबरला भाजपच्या येथील मुख्यालयात होणार आहे. या समारंभाला सुमारे २ सहस्र ५०० पत्रकारांना बोलावण्यात येणार आहे. पंतप्रधान सर्वांना एकाच वेळी नाही, तर वेगवेगळ्या वेळी भेटणार आहेत. वर्ष २०१४ मध्ये झालेल्या एका कार्यक्रमात पत्रकारांनी सेल्फी घेण्याच्या मोहात खूप धक्काबुक्की केली होती.शिक्षणातील इंग्रजीची सक्ती टाळा ! - रा.स्व. संघाशी संबंधित न्यासाची केंद्र सरकारकडे मागणी

संघाने शासनाकडे मागणी करण्याऐवजी दबाव आणून मुलांना मातृभाषेतून शिक्षण 
देण्याचा निर्णय घेण्यास सरकारला भाग पाडावे, अशी भाषाभिमान्यांची मागणी आहे !
      नवी देहली - रा.स्व. संघाशी संलग्न असणार्‍या शिक्षा संस्कृती उत्थान न्यास या संघटनेकडून नव्या शैक्षणिक धोरणासाठी केंद्रीय मनुष्यबळ खात्याकडे काही सूचना पाठवण्यात आल्या होत्या. प्राथमिक ते माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांना मातृभाषेतूनच शिक्षण दिले पाहिजे. तसेच शालेय स्तरावर विद्यार्थ्यांना भारतीय भाषांना पर्याय म्हणून विदेशी भाषांचा पर्याय उपलब्ध करून देण्यात येऊ नये, असा प्रस्ताव संघाने केंद्रीय मनुष्यबळ खात्यापुढे ठेवला होता. यामध्ये भारतीय शिक्षणव्यवस्थेत कोणत्याही स्तरावर इंग्रजी भाषेची सक्ती केली जाऊ नये, असे म्हटले आहे.

पूर्वजांनी मिळवलेले यश आणि मूल्ये ही विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवली पाहिजेत ! - केंद्रीय मनुष्यबळ राज्यमंत्री महेंद्रनाथ पांडे

     नवी देहली - नालंदा विद्यापिठातील १० सहस्र विद्यार्थ्यांपैकी किमान २ सहस्र विद्यार्थ्यांनी सैनिकी प्रशिक्षण घेतले असते, तर ते बख्तियार खिलजी याचे आक्रमण परतवून लावू शकले असते. शिक्षणाच्या माध्यमातून देशाचा वारसा, पूर्वजांनी मिळवलेले यश आणि मूल्ये ही विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवली गेली पाहिजेत, असे प्रतिपादन केंद्रीय मनुष्यबळ खात्याचे राज्यमंत्री महेंद्रनाथ पांडे यांनी केले. ते केंद्रीय शिक्षण सल्लागार मंडळाच्या बैठकीत बोलत होते. पांडे पुढे म्हणाले की, वैज्ञानिक ज्ञान हे भारतीय भाषांमध्येही उपलब्ध आहे आणि संस्कृत ही भाषा सर्व भारतियांना एका स्तरावर आणणारा घटक आहे.

दिवाळीविषयी व्हॉट्सअ‍ॅपवर अश्‍लील संदेश पाठवणार्‍या डॉ. महंमद याकूब याला अटक !

      जयपूर - दिवाळीनिमित्त काही अश्‍लील संदेश व्हाट्सअ‍ॅपवर पाठवल्याच्या प्रकरणी राजस्थानमधील पोखरण येथे डॉ. महंमद याकूब या वैद्यकीय अधिकार्‍याला अटक करण्यात आली आहे. (अशा धर्मांधांवर तात्काळ खटला चालवून त्यांना कठोर शिक्षा दिली पाहिजे ! - संपादक) तो पोखरण येथे कम्युनिटी हेल्थ सेंटरमध्ये वरिष्ठ डॉक्टरच्या पदावर होता. याकूबच्या विरोधात हिंदुत्वनिष्ठ संघटना, तसेच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीही आंदोलन केले होते. अटकेनंतर याकूबला पदावरून हटवण्यात आले आहे. नेमका अश्‍लील संदेश काय आहे, हे वृत्तसंकेतस्थळांनी स्पष्ट केलेले नाही.

पाळीव कुत्र्याशी अनैसर्गिक कुकृत्य करून त्याची हत्या करणार्‍या अस्लम खान याला अटक !

वासनांधतेची आणि क्रुरतेची परिसीमा गाठलेल्यांना 
कितीही कठोर शिक्षा केली, तरी ती अल्पच होईल !
      भाग्यनगर - येथील शास्त्रीपुरम् भागातील अस्लम खान याला पाळीव कुत्र्याबरोबर अनैसर्गिक कुकृत्य करून त्याची हत्या केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली आहे. अस्लम देहलीत रहाणारा आहे. तो त्याच्या मित्रांना भेटण्यासाठी येथे आला होता.

(म्हणे) तीन वेळा तलाक म्हणणे आणि शरीयत यांमध्ये हस्तक्षेप सहन केला जाणार नाही ! - दारूल उलूम

देशातील कायदे पाळण्यास नकार देणार्‍यांना या देशात रहाण्याचा अधिकार आहे का ?
      नवी देहली - तीन वेळा तलाक म्हणण्याच्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकारने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राला मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डने विरोध केला आहे. या पत्राद्वारे सरकारने तीन वेळा तलाकला विरोध केला आहे. बोर्डच्या भूमिकेला देशातील सर्व मुसलामानांनी समर्थन करावे, असे आवाहन दारूल देवबंदने केले आहे. दारूल उलूमने सांगितले की, समान नागरी कायदा करणे आणि तीन तलाक प्रकरणात सरकारचा हस्तक्षेप सहन केला जाणार नाही. देशभर याच्याविरुद्ध स्वाक्षरी अभियान चालवण्यात येईल. अमेरिकेत मुलीवर ४ वर्षे बलात्कार करणार्‍या पित्याला दीड सहस्र वर्षांची शिक्षा !

       फ्रेस्नो (कॅलिफोर्निया, अमेरिका) - स्वतःच्याच किशोरवयीन मुलीवर ४ वर्षे सतत बलात्कार करणार्‍या अमेरिकेतील एका व्यक्तीला न्यायालयाने १ सहस्र ५०३ वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. (हास्यास्पद शिक्षा ! माणूस १०० वर्षांपेक्षा अधिक काळ जीवंत रहात नसतांना अशा प्रकारच्या शिक्षा ठोठावून काय उपयोग ? - संपादक) पीडित मुलीची ओळख उघड होऊ नये म्हणून आरोपी असलेल्या तिच्या वडिलांचे नाव बातमीत गुप्त ठेवण्यात आले आहे. २००९ ते २०१३ या काळात बलात्कार करण्यात येत होता. पीडित मुलीने न्यायालयाला सांगितले की, तिच्यावर केलेल्या अत्याचारांविषयी तिच्या वडिलांनी कधीही पश्‍चाताप व्यक्त केला नाही. अंतिम शिक्षा ठोठाविण्यापूर्वी आरोपीला गुन्हा स्वीकारण्याची २ वेळा संधी देण्यात आली होती. गुन्हा स्वीकारल्यास २२ वर्षांची शिक्षा होईल, असे त्याला सांगण्यात आले होते; मात्र त्याने ते मान्य केले नाही.

डोनाल्ड ट्रम्प यांची स्नुषा लारा यांनी मंदिरात जाऊन दिवाळी साजरी केली !

      ऐशनर्ग (अमेरिका) - निवडणुकीच्या अनुषंगाने अमेरिकेतील भारतीय समुदायापर्यंत पोेचण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलाच्या पत्नीने वर्जीनियातील एका मंदिरात जाऊन दिवाळी साजरी केली. त्यांनी मंदिरात प्रवेश करतांना त्यांची चपले बाहेर काढून ठेवली. राष्ट्र्रपतीपदाच्या २ प्रमुख उमेदवारांपैकी एकाच्या परिवारातील कोणी एक सदस्य हिंदूंच्या मंदिरामध्ये आल्याची ही पहिलीच वेळ आहे. ट्रम्प यांची स्नुषा लारा यांनी सांगितले की, सार्वत्रिक निवडणुकीत जर तिच्या सासर्‍यांना अमेरिकेचे राष्ट्रपती म्हणून निवडून आले, तर भारत आणि अमेरिका यांचे संबंध एका नव्या उंचीवर जाऊन पोेचतील. लारा यांनी सांगितले की, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनात भारत आणि भारतातील लोकांच्या प्रती खूप प्रेम आणि आत्मियता आहे. वस्तूत: हिंदु संस्कृती मला पसंत आहे आणि मी तिचा सन्मान करते. ट्रम्प यांची कन्या इवांका येथे येणार होती; मात्र निवडणुकीच्या प्रचारामुळे तिला शक्य झाले नाही.बर्म्युडा ट्रँगलचे रहस्य उलगडल्याचा संशोधकांचा दावा !

      न्यूयॉर्क - अटलांटिक महासागरात बार्बाडोस, फ्लोरिडा आणि प्युर्टो रिको यांच्या दरम्यान बर्म्युडा ट्रँगल हा पट्टा येतो. ५ सहस्र किलोमीटरच्या या पट्ट्यात गेल्या शंभर वर्षांत ७५ विमाने आणि १०० हून अधिक नौका बेपत्ता झाल्या असून यामध्ये एक सहस्र जणांचा अद्याप काहीच थांगपत्ता लागू शकलेला नाही. विशेष म्हणजे ही विमाने किंवा नौका यांचे अवशेषही कधी सापडू शकलेले नाहीत. आता या बर्म्युडा ट्रँगलचे रहस्य उलगडल्याचा दावा करण्यात आला आहे. अटलांटिक महासागरातील या पट्ट्यात षट्कोनी ढगांची निर्मिती होऊन एअरबॉम्ब बनतात. तसेच याबरोबरच १७० मैल प्रति घंटा वेगाने वाहणारे वारेही असतात. या फेर्‍यात अडकून नौका बुडू शकतात आणि विमानही समुद्रात पडण्याची दाट शक्यता असते, असा दावा संशोधकांनी केला आहे.
     डेलीमेल या संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार ढगांना भेदत वाहणारे वारे समुद्राच्या लाटांवर येऊन आदळतात. त्यामुळे या लाटा अवघ्या काही क्षणातच रौद्ररुप धारण करतात. या लाटांची उंची त्सुनामीमुळे येणार्‍या लाटांच्या उंचीपेक्षाही अधिक असते. त्यामुळे आकाशातून जाणारे विमान असो किंवा समुद्रातून जाणारी नौका हे या परिस्थितीत टिकाव धरू शकत नाही, असे रेंडी सर्व्हनी यांनी सांगितले.नथुराम गोडसे यांच्या पुस्तकाच्या तमिळ आवृतीचे प्रकाशन

डावीकडून श्री. राधाकृष्णन्, श्री. गोविंदराजू, 
श्री. नानाजी गोडसे आणि श्री. प्रमोद मुतालिक
      चेन्नई - नथुराम गोडसे यांच्या मे इट प्लीज युअर ऑनर या पुस्तकाच्या ‘यार महात्मा या तामिळ आवृत्तीचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले. मोहनदास करमचंद गांधी यांची हत्या करण्यामागचे कारण नथुराम गोडसे यांनी मे इट प्लीज युअर ऑनर या पुस्तकात लिहिले आहे. देव गोविंदराजू यांनी भाषांतर करून यार महात्मा हे पुस्तक प्रकाशित केले आहे. या पुस्तकाला नथुराम गोडसे यांचे पुतणे श्री. नानाजी गोडसे आणि श्रीराम सेनेचे प्रमुख श्री. प्रमोद मुतालिक यांचे आशीर्वाद लाभले आहेत. देव गोविंदराजू यांनी २३ ऑक्टोबर २०१६ या दिवशी श्री. नानाजी गोडसे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांना हे पुस्तक भेट दिले. श्री. नानाजी गोडसे यांनी देव गोविंदराजू यांनी पुस्तकाची तमिळ आवृत्ती प्रकाशित केल्याविषयी त्यांचे अभिनंदन केले. नथुराम गोडसे यांच्या पुस्तकाच्या आतापर्यंत हिंदी, मराठी, इंग्रजी आणि गुजराती या भाषांतील आवृत्या प्रसिद्ध झाल्या होत्या. हे पुस्तक प्रत्येक भारतीय व्यक्तीने वाचावे आणि हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी कार्य करावे, असे आवाहन श्री. नानाजी गोडसे यांनी या वेळी केले. हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी कार्यरत असलेल्या सनातन संस्थेविषयी त्यांनी या वेळी गौरवोद्गार काढले. तमिळनाडू शिवसेनेचे अध्यक्ष श्री. राधाकृष्णन् या वेळी उपस्थित होते.

रावणवधानंतर प्रभु श्रीरामचंद्रांना अयोध्येत पोचण्यास २१ दिवस कसे लागले, याविषयी संकेतस्थळांवर वायफळ चर्चा !

रामायण न वाचता त्याविषयी हिंदूंच्या मनात 
संभ्रम निर्माण करण्याचे हिंदुद्वेष्ट्यांचे षड्यंत्र !
      नवी देहली - सामाजिक संकेतस्थळांवर श्रीरामाच्या संदर्भात एक संदेश सध्या प्रसारित होत आहे. फेसबूकवर प्रसारित झालेल्या या संदेशात ‘श्रीरामाने रावणाला दसर्‍याच्या दिवशी मारल्यानंतर २१ दिवसांनी ते अयोध्येत पायी पोेचले होते. त्यामुळे दसर्‍यानंतर २१ दिवसांनी दिवाळी साजरी केली जाते’, अशा आशयाचा मजकूर प्रसारित करण्यात आला आहे. प्रभु श्रीरामचंद्र पुष्पक विमानाने अयोध्येला पोचले, असा रामायणात उल्लेख आहे. ‘पुष्पक हे अतिशय वेगवान होते. तरीही त्याला अयोध्येत पोचायला २१ दिवस कसे लागले ?’, असा हिंदूंच्या मनात संभ्रम निर्माण करून ‘रामायण हे काल्पनिक कसे आहे’, असा अपसमज पसरवण्याचा हिंदुद्रोह्यांकडून प्रयत्न करण्यात येत आहे.

राज्यातील कुपोषणप्रश्‍नी मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले

  • झोपी गेलेल्या सरकारला जागे करण्यासाठी आता आम्ही काय करावे ?
  • मुख्य सचिवांनी खुलासा करावा, अन्यथा अवमान कारवाईला सामोरे जावे !
        मुंबई - गेल्या ८ वर्षांपासून कुपोषणामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी अनेक आदेश देण्यात आले; परंतु ही समस्या आणि आदिवासींच्या विकासाविषयी कमालीची असंवेदनशीलता असलेल्या सरकारमुळे हे आदेश अजूनही कागदावरच आहेत. त्यांची जर अंमलबजावणी झाली असती, तर परिस्थिती पालटली असती. त्यामुळे झोपी गेलेल्या सरकारला जागे करण्यासाठी आता आम्ही काय करावे ?, असा हतबलता करणारा प्रश्‍न मुंबई उच्च न्यायालयाने २६ ऑक्टोबर या दिवशी केला. मुख्य सचिवांनी या सगळ्या प्रकरणात लक्ष घालून आवश्यक तो खुलासा करावा, अन्यथा अवमान कारवाईला सामोरे जावे लागेल, अशी चेतावणी न्यायमूर्ती विद्यासागर कानडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपिठाने दिली. मेळघाटासह राज्यातील ११ जिल्ह्यांमधील कुपोषणाविषयीच्या विविध याचिका करण्यात आलेल्या आहेत. त्यावरील सुनावणीच्या वेळी न्यायालयाने वरील चेतावणी दिली.

गोव्याच्या माजी मुख्यमंत्री शशिकलाताई काकोडकर यांचे निधन

शशिकला काकोडकर
        पणजी, २८ ऑक्टोबर (वार्ता.) - गोव्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री श्रीमती शशिकला काकोडकर यांचे २८ ऑक्टोबर २०१६ ला दुपारी येथील रहात्या घरी निधन झाले. त्या ८१ वर्षे वयाच्या होत्या. मुक्त गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांच्या त्या कन्या होत. गोमंतकीय त्यांना ताई म्हणून ओळखत असत. ७० च्या दशकात भाऊंच्या निधनानंतर महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाची सत्ता असतांना त्या मुख्यमंत्री बनल्या होत्या. वर्ष १९७३ ते १९७९ या कालावधीत त्या गोवा राज्याच्या मुख्यमंत्री होत्या. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या त्या काही वर्षे अध्यक्ष होत्या. कट्टर मराठीवादी आणि साहित्यप्रेमी, अशी त्यांची ओळख होती. वयाच्या ८० व्या वर्षीही त्या भारतीय भाषा सुरक्षा मंच या मातृभाषेतून शिक्षणासाठी लढा देणार्‍या संघटनेच्या निमंत्रक होत्या आणि त्या आंदोलनात सक्रीय सहभागीही व्हायच्या. २९ ऑक्टोबर या दिवशी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, मगो पक्षाचे नेते तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. सुदिन ढवळीकर, मगोचे अध्यक्ष तथा मंत्री श्री. दीपक ढवळीकर यांनी त्यांच्या निधनाविषयी दु:ख व्यक्त केले आहे.

ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय वंशाच्या बसचालकाची जिवंत जाळून हत्या !

       ब्रिस्बेन (ऑस्ट्रेलिया) - येथील भारतीय वंशाचे २९ वर्षीय बसचालक मनमीत अलीशर यांना जिवंत जाळण्यात आल्याची घटना येथे घडली. बसमध्ये झालेल्या एका वादानंतर ही घटना घडली. या प्रकरणी एका ४८ वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. त्याने मनमीत यांच्यावर ज्वलनशील पदार्थ फेकून आग लावली होती.

मसूद अझर आतंकवादीच ! - परवेज मुशर्रफ

पाकला घरचा अहेर ! आतातरी 
पाक मसूदवर कारवाई करील का ?
        इस्लामाबाद - पाकचे माजी पंतप्रधान परवेज मुशर्रफ यांनी जैश-ए-महंमदचा प्रमुख मसूद अझर आतंकवादी आहे, असे म्हटले आहे. पाकमध्ये झालेल्या अनेक स्फोटांमध्ये त्याचा सहभाग असल्याचेही मुशर्रफ यांनी म्हटले आहे. मसूद याला संयुक्त राष्ट्र संघ समितीच्या आतंकवाद्यांच्या सूचीत समाविष्ट करण्यासाठी पाक चीनला सांगत का नाही, यावर मात्र त्यांनी स्पष्ट उत्तर दिले नाही. एका दूरचित्रवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. मसूदशी काही संबंध नसतांना चीनने यामध्ये पडण्याची काही आवश्यकता नाही, असेही ते म्हणाले.

धाडस असेल, तर पाकने समोर येऊन लढावे ! - गृहमंत्री राजनाथ सिंह

भारताने केवळ शब्दांत आव्हान देण्यापेक्षा 
स्वतःचे सामर्थ्य दाखवत पाकमध्ये घुसावे आणि 
त्याला संपवावे, अशी जनतेचीही इच्छा आहे !
        ग्रेटर नोएडा (उत्तरप्रदेश) - पाकिस्तान घाबरट देश आहे. तो पाठीमागून वार करतो. भारतीय सैनिक त्यांच्या गोळीबाराला जशास तसे उत्तर देत आहे. पाक आतंकवादाद्वारे भारताच्या विरोधात कारवाया करत आहेत. पाक छुपे युद्ध करत आहे. मात्र खरे वीर असे छुपे युद्ध करत नाही, तर शर्टाची बटने उघडी करत डोळ्याला डोळे भिडवतात. पाकमध्ये दम आहे, तर समोर येऊन लढावे, असे आव्हान केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिले आहे. ते भारत-तिबेट सीमा पोलिसांच्या ५५ व्या स्थापना दिवसानिमित्तच्या कार्यक्रमात बोलत होते.

जनसुराज्य शक्ती महायुतीत सहावा घटक पक्ष म्हणून सहभागी !

मुंबई येथे मुख्यमंत्र्यांच्या 
उपस्थितीत विनय कोरे यांची घोषणा
        कोल्हापूर - महायुतीत सहावा घटक पक्ष म्हणून जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते श्री. विनय कोरे सहभागी होणार आहेत, अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नुकतीच दिली होती. त्यानुसार २६ ऑक्टोबर या दिवशी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबई येथे त्याची अधिकृत घोषणा झाली. या वेळी जनसुराज्य पक्षाने भाजपला पाठिंबा घोषित करून महायुतीत सहावा घटक पक्ष म्हणून सहभागी झाला. या वेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी श्री. विनय कोरे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
        जनसुराज्यमुळे कोल्हापूरसह सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत भाजपला बळ मिळणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ९ नगरपालिकांमध्ये भाजप अथवा भाजप पुरस्कृतच नगराध्यक्ष होईल, असा विश्‍वासही श्री. चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.

आजच्या युवकांमध्ये शौर्य निर्माण होणे आवश्यक ! - प्रशांत जुवेकर

जळगाव येथे स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबीर
       जळगाव - सध्या युवकांमधील शौर्य लोप पावले असल्याने ते कोणत्याही गोष्टीला विरोध करण्याचे धाडस करत नाहीत. ही परिस्थिती पालटण्यासाठी युवकांनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेऊन स्वतःतील शौर्य आणि वीरश्री जागृत करायला हवी. तसेच राष्ट्र आणि धर्म यांवरील आघात रोखण्यास सिद्ध व्हायला हवे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रशांत जुवेकर यांनी केले. येथे आयोजित स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिरात उपस्थितांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
       शिबिराचा उद्देश स्पष्ट करतांना श्री. श्रेयस पिसोळकर म्हणाले, महिलांवरील अत्याचार, बलात्कार या घटनांत वाढ झाल्याने तरुणींना स्वसंरक्षण प्रशिक्षणाची जास्त आवश्यकता आहे. यानंतर कराटे, लाठी-काठी, नानचाकू यांची प्रात्यक्षिके उपस्थितांकडून करवून घेण्यात आली. सतर्कता आणि सज्जता वाढवणारे खेळ खेळण्यात आले.

दप्तराच्या ओझ्याप्रकरणी नियम न पाळणार्‍या शाळांवर कडक कारवाई करा ! - मुंबई उच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश

न्यायालयाला असे आदेश का द्यावे 
लागतात ? शिक्षण विभाग काय करत आहे ?
       मुंबई - विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे न्यून करणे, हे दायित्व शाळांचे असून नियम न पाळणार्‍या शाळांवर शासनाने कडक कारवाई करावी, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने २६ ऑक्टोबर या दिवशी बजावले आहेत. सामाजिक कार्यकर्त्या स्वाती पाटील यांच्या याचिकेवर न्यायमूर्ती विद्यासागर कानडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपिठापुढे सुनावणी झाली. त्या वेळी न्यायालयाने हा आदेश दिला. राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या अध्यादेशाची अंमलबजावणी वेळीच का होत नाही, असा प्रश्‍नही न्यायालयाने उपस्थित केला.
१. शाळांना अचानक भेटी देऊन विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे न्यून झाले कि नाही, याची पाहणी केली जात असल्याची माहिती आणि आकडेवारी न्यायालयात राज्य शासनाच्या वतीने देण्यात आली. त्याच वेळी प्रत्येक शाळेला भेट देऊन पाहणी करणे अशक्य असल्याचेही शासनाच्या वतीने सांगण्यात आले.
२. याचिकाकर्त्यांच्या अधिवक्त्यांनी न्यायालयाला सांगितले की, दप्तराचे ओझे न्यून न करणार्‍या शाळांवर राज्य सरकारच्या वतीने काहीच कारवाई केली जात नाही. सरकारने अशा एकाही शाळेला साधी नोटीसही बजावलेली नसल्याचे सांगत सरकारची ही पाहणी अपुरी असल्याचा दावा केला. (सर्व यंत्रणा हाताशी असतांनाही शिक्षण विभाग कशा पाट्याटाकूपणे काम करत आहे, हेच दिसून येते. - संपादक)

राज्यातील ४ आयुर्वेद महाविद्यालयांत पुरेसे अध्यापक नाहीत !

हिंदु राष्ट्रात आयुर्वेदाला प्रोत्साहन देऊन ती 
प्रमुख चिकित्सा पद्धती म्हणून विकसित होईल !
        पुणे - राज्यातील ४ आयुर्वेद महाविद्यालयात पुरेसे अध्यापक नाहीत, तसेच संशोधनासाठी स्वयंपूर्ण प्रयोगशाळा नसल्याचेही उघडकीस आले आहे. शासनाने अनुदानित खाजगी आणि युनानी महाविद्यालयांतील निवृत्त कर्मचार्‍यांच्या सेवानिवृत्ती वेतन, मृत्यू आणि सेवानिवृत्ती उपदान आदी सर्व कामांचे दायित्व आयुष संचालनालयावर आहे. त्या अनुषंगाने आणि भारतीय चिकित्सा केंद्रीय परिषदेच्या मानकांची पूर्तता करण्यासाठी किमान ८८० नवीन पदांची आवश्यकता असल्याचे आयुष संचालक डॉ. कुलदीप कोहली यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाला सादर केलेल्या प्रस्तावात म्हटले आहे. तसेच आयुर्वेद संशोधनाला चालना देण्यासाठी आणि आयुर्वेदिक औषधांचे स्वामित्व हक्क (पेटंट) घेण्यासाठी स्वतंत्रपणे २ प्राध्यापकांची आवश्यकता आहे; परंतु पदव्युत्तर अभ्यासक्रम मोठ्या प्रमाणावर चालू करण्यात येऊनही त्या मानाने पदे भरण्यात आलेली नाहीत, असे आयुष संचालनालयातील वरिष्ठ अध्यापकांचे म्हणणे आहे.

पोलिसांच्या खाजगी वाहनांवर अवैधरित्या पोलीस दलाचे चिन्ह; मात्र कारवाई नाही !

असे पोलीस आणि प्रादेशिक परिवहन 
कार्यालय हे खरेच कायद्याचे रक्षक आहेत 
का ? अशांकडून कायद्याचे राज्य मिळेल का ?
        पुणे - पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्या खाजगी वाहनांवर पोलीस असे लिहिलेले असणे आणि पोलीस दलाचे चिन्ह लावण्याच्या वाढत्या तक्रारीमुळे गृह विभागाने ७ सप्टेंबर २०१५ या दिवशी परिपत्रक काढले होते. त्यानुसार पोलिसांच्या खाजगी वाहनांवर वरील पद्धतीने लिहिल्यास वा तसे लिहिणार्‍यावर कारवाईचे आदेश देण्यात आले; परंतु अशी वाहने सर्रास दिसत असूनही मागील वर्षभरात कारवाई करण्यात आली नाही, असे लोकहित फाऊंडेशनने मागवलेल्या माहितीच्या अधिकाराखाली मिळालेल्या माहितीत उघड झाले. गृह विभागाचे हे आदेश परिवहन आयुक्तालयाने सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांना दिले आहेत. (पोलीस प्रशासन आणि प्रादेशिक परिवहन कार्यालय अशा वाहनांवर केव्हा कारवाई करणार ? - संपादक)

पाकमधील भारतीय उच्चायुक्तालयातील अधिकार्‍याला देश सोडण्याचा आदेश !

सूडबुद्धीने वागणारा पाक ! 
भारतातील पाकप्रेमी आता काही बोलतील का ?
        इस्लामाबाद - भारतातील पाकच्या उच्चायुक्तालयातील अधिकार्‍याला हेरगिरीच्या प्रकरणी अटक करून त्याला देश सोडण्यास सांगण्यात आल्यावर पाकनेही तेथील भारतीय उच्चायुक्तालयातील अधिकारी सुरजित सिंह यांनाही पाक सोडून जाण्यास सांगितले आहे. विदेश सचिव एजाज अहमद चौधरी यांनी भारतीय उच्चायुक्त गौतम बम्बवाले यांना बोलावून हा आदेश दिला. अहमद यांनी आरोप केला की, सुरजीत सिंह राजनैतिक शिष्टाचाराचे उल्लंघन करून आक्षेपार्ह कृती करत होते, जे व्हीएन्ना कराराचे उल्लंघन आहे.

समुद्रमंथनातून उत्पन्न झालेली चौदा रत्ने आणि दीपावली !

कु. मधुरा भोसले
‘     दीपावलीच्या प्रत्येक दिनाचे विशेष महत्त्व आहे. दिवाळीतील काही दिवशी समुद्रमंथनातून उत्पन्न झालेल्या रत्नांचे पूजन केले जाते. सत्ययुगातील द्वितीय मन्वंतरात देवासुरांनी केलेल्या समुद्रमंथनासाठी श्रीविष्णूने कूर्म अवतार धारण केला होता. समुद्रमंथनातून उत्पन्न झालेल्या संपदेमधील देवत्व जाणून त्यांचे पूजन केले जाते. 
१. समुद्रमंथनातून उत्पन्न झालेल्या देवता आणि अनमोल संपदा
     समुद्रमंथनातून उत्पन्न झालेल्या चौदा रत्नांपैकी हलाहल विष आणि मदिरा ही तामसिक होती. उर्वरित सर्व संपदा सात्त्विक असल्यामुळे ती देवतांना प्राप्त झाली. यांपैकी काहींचे पूजन दिवाळीत किंवा अन्य समयी केले जाते.

भारतनिष्ठा हा सार्‍याच पक्षांचा मानबिंदू असायला हवा !

        भारत आणि भारतनिष्ठा हा सार्‍याच पक्षांनी परम पवित्र असा मानबिंदू मानावयास हवा होता. भारतमातेच्या रक्ताने रंगलेले हात कुठल्याही प्रलोभनासाठी कुणीही हातात घ्यावयास नको होते; पण प्रत्यक्षात मात्र काही विपरीत घडले. देशहितापेक्षा पुन्हा एकदा पक्षहित महत्त्वाचे मानले गेले. राष्ट्रीय स्वार्थापेक्षा वैयक्तिक स्वार्थ वरचढ झाले. सत्तापिपासेला पुन्हा एकदा सत्त्वाचा बळी दिला गेला. मुसलमानांच्या मनधरणीचा तोच जुना खेळ नव्या भयानकतेने रंगू लागला. अनेक पक्षोपपक्षात विभागली गेलेली बहुसंख्या संघटित अल्पसंख्यांकांची आराधना करू लागली. राष्ट्रीय प्रकोपाच्या नैसर्गिक अपेक्षेने दबलेले जातवेडे पुन्हा शिरजोर बनले. सत्तेचा तराजू ते तोलू लागले. जयापजयाचे पारडे ते फिरवू लागले. बहुसंख्येतील अनंत कलह आणि मतभेद यांचा लाभ ते घेऊ लागले. 
(साप्ताहिक राष्ट्रपर्व, ५.४.२०१० - संदर्भ : वाघनखे - पु.भा. भावे जन्मशताब्दी वर्ष २००९-२०१०)

देशभरात बेकारीचा महापूर !

      देशातील बेरोजगारीचे वास्तव दिवसेंदिवस भयावह होत चालले आहे. दोन वर्षांपूर्वीच्या तुलनेत या दोन वर्षांत देशभरात नोकर्‍यांची संख्या झपाट्याने घटत चालली आहे. अर्थक्षेत्रात कार्यरत विविध संस्थांच्या अहवालावरून हेच सिद्ध होत आहे. देहली येथील प्रहार या स्वयंसेवी संस्थेनेही देशातील अर्थव्यवस्था आणि रोजगार यावर प्रकाशित केलेल्या अहवालानुसार मागील चार वर्षांत प्रतिदिन देशात ५५० नोकर्‍या न्यून होत आहेत. वर्ष २०५० पर्यंत देशातून ७० लाख नोकर्‍या गायब होणार आहेत. वर्ष २०१३ मध्ये देशात ४ लाख १९ सहस्र नवीन नोकर्‍यांची निर्मिती झाली होती; मात्र वर्ष २०१५ मध्ये अवघ्या १ लाख ३५ सहस्र नोकर्‍यांची निर्मिती झाली. याचा अर्थ मोदी सरकारमधील दोन वर्षांच्या कार्यकाळात नवीन नोकर्‍यांच्या निर्मितीमध्ये लक्षणीय घट झाली.

आपत्काळ असल्याने दिवाळी साधेपणाने; पण आध्यात्मिकदृष्ट्या योग्य प्रकारे साजरी करा !

       सध्या आपत्काळ चालू आहे, तसेच गेल्या काही दिवसांत विविध भागांत हिंदूंवर मोठ्या प्रमाणात अत्याचार झाले. या हिंदूंप्रती आपली सहवेदना व्यक्त करण्यासाठी दिवाळी साधेपणाने साजरी करणे योग्य ठरते. दिवाळी साधेपणाने साजरी करतांना पुढील गोष्टी लक्षात घ्याव्यात. दिवाळीत पणत्या आणि आकाशकंदिल लावण्यामागे आध्यात्मिक कारण आहे. पणत्या आणि आकाशकंदिल लावल्याने देवतांचे तत्त्व आकृष्ट होण्यास साहाय्य होते. त्यामुळे साधकांनी दिवाळी साधेपणाने साजरी करतांना पणत्या आणि आकाशकंदिल लावून त्यापासून होणारा आध्यात्मिक लाभ मिळवावा. दिवाळीत गोडधोड खाऊ शकतो; मात्र त्यावर मर्यादा असाव्यात. फराळाचे खूप पदार्थ बनवण्यापेक्षा आवश्यक तेवढाच फराळ बनवावा. दिवाळीत फटाके लावणे, तसेच किमती कपडे, तसेच वस्तू खरदी करणे, यांसाठी अनावश्यक खर्च न करता, हे पैसे राष्ट्र अन् धर्म कार्यासाठी अर्पण करावेत.
     हिंदूंमध्ये केवळ अस्तित्व आणि जाणीव उरली आहे; पण जागृती नसल्याने हिंदु धर्मावर निरंतर आक्रमणे होत आहेत.
- श्री श्री गुरुनागभूषण शिवाचार्य महास्वामी, कर्नाटक प.पू. डॉक्टरांचे अवतारी कार्य आणि त्यांचे रूप याविषयी कु. विनंती मळीक यांनी प.पू. डॉक्टरांच्या चरणी अर्पण केलेले त्यांना मिळालेले चित्ररूप ज्ञान

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले 
यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त... 
प.पू. डॉक्टर,
        श्रीकृष्ण तुम्ही, श्रीविष्णु तुम्ही, लीलाधर तुम्ही ।
        हे शंभू नमन स्वीकार, वंदन स्वीकार ॥ १ ॥
भावार्थ : हे गुरुदेवा, तुम्हीच श्रीकृष्ण, श्रीविष्णु आणि श्रीलीलाधरही आहात; म्हणून हे शंभू, माझे नमन आणि वंदन स्वीकारावे.
        देवा, तूच आहेस सर्वांच्या भावभक्तीची शोभा ।
        हे श्रीधरा, तुझा सहवास चराचरात दीपक अमृत समान ॥ २ ॥
भावार्थ : देवा, तूच आहेस प्रत्येक साधकांच्या भावभक्तीची देवता. हे श्रीधरा, तुझे अस्तित्व जिथे असते ती समष्टी भक्तीने उज्ज्वल होते.
        हे मधुसूदना, समष्टी पदर मागिते निर्मळ मना प्रयत्ना उजेड मार्गा ।
        हे मुरलीधरा, धर्मसेवा तुझ्या रूपा समष्टी सहस्र धारा ॥ ३ ॥
भावार्थ : हे मधुसूदना, तुला प्रार्थना करत आहे की, समष्टीची मने निर्मळ बनवून त्यांना मोक्षाकडे जाता येऊ दे. हे मुरलीधरा, धर्मसंस्थापनेच्या कार्यात सेवा करणार्‍यांवर तुझ्या कृपेची दृष्टी सतत असू देत. 

नागपूर येथे सौ. सिंधु परांजपे, सौ. सुनिता खरे आणि श्री. जयंत बेंद्रे यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

सौ. सिंधु परांजपे यांचा सत्कार करतांना पू. नंदकुमार जाधव (डावीकडे)
सौ. सुनिता खरे यांचा सत्कार करतांना पू. नंदकुमार जाधव (डावीकडे)

अंगण गायीच्या शेणाने सारवून त्यावर रांगोळी काढल्याने वायूमंडलावर होणारा परिणाम अभ्यासण्यासाठी यू.टी.एस्. (युनीव्हर्सल थर्मो स्कॅनर) या उपकरणाद्वारे महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने केलेली वैज्ञानिक चाचणी !

      ‘रांगोळी ही ६४ कलांपैकी एक कला आहे. ही कला घरोघरी पोचली आहे. सणा-समारंभांत, देवळांत आणि घरोघरी रांगोळी काढली जाते. सौंदर्याचा साक्षात्कार आणि मांगल्याची सिद्धी हे रांगोळीचे दोन उद्देश आहेत. ज्या ठिकाणी सात्त्विक रांगोळी काढली जाते, त्या ठिकाणी आपोआपच मंगलदायी वातावरणाची निर्मिती होते. हिंदूंमध्ये अंगण गायीच्या शेणाने सारवून रांगोळी काढण्याची परंपरा आहे. अंगण गायीच्या शेणाने सारवणे आणि त्यावर रांगोळी काढणे, यांचा वैज्ञानिकदृष्ट्या तुलनात्मक अभ्यास करण्याच्या उद्देशाने ‘यू.टी.एस्. (युनीव्हर्सल थर्मो स्कॅनर)’ या उपकरणाच्या साहाय्याने चाचणी घेण्यात आली. या चाचणीची निरीक्षणे आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे.

सतत इतरांचा विचार करणारे आणि प.पू. डॉक्टरांप्रती भाव असणारे श्री. मंदार मांजरेकर !

श्री. मंदार मांजरेकर
        श्री. मंदार मांजरेकर हे माझ्या बहिणीचे यजमान आहेत. २९.१०.२०१६ या दिवशी त्यांचा तिथीनुसार वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि सनातनच्या आश्रमात आल्यानंतर त्यांना आलेल्या अनुभूती देत आहे.
श्री. मंदार मांजरेकर यांना वाढदिवसानिमित्त 
सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
१. श्री. मंदार मांजरेकर यांची गुणवैशिष्ट्ये
१ अ. इतरांना साहाय्य करणे : ‘साधक असो किंवा नातेवाईक भावोजी सर्वांना साहाय्य करतात. त्यांना कितीही त्रास झाला, तरी ते इतरांसाठी सतत कार्य करतात.
१ आ. सासूबाईंचे डोळ्याचे शस्त्रकर्म ठरल्यानंतर रुग्णालयातील सर्व व्यवस्था पहाणे, घरी सर्व सामान आणून ठेवणे आणि त्यामुळे काही अडचण न येणे : एकदा माझ्या आईचे डोळ्याचे शस्त्रकर्म तातडीने करायचे ठरले. तेव्हा भावोजी स्वतः आईला घेऊन सिंधुदुर्गात आले. त्यांनी रुग्णालयातील सर्व व्यवस्था पाहिली. शस्त्रकर्म झाल्यावर मी आणि आई १ आठवडा सिंधुदुर्गात असलेल्या आमच्या घरी रहाणार होतो. एरव्ही घर बंद असल्याने आणि घराच्या आसपास ५ किलोमीटरमध्ये बाजार (पेठ) किंवा अन्य दुकाने नसल्याने त्यांनी ८ दिवस पुरेल एवढे धान्य, भाज्या आणि खाऊ घरात आणून ठेवला. जेणेकरून नंतर आम्हाला काही अडचण यायला नको. प्रत्यक्षातही आम्हाला काहीच अडचण आली नाही.

सदैव हसतमुख आणि समष्टी सेवेची तीव्र तळमळ असणारे ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. जयंत बेंद्रे (वय ८० वर्षे) !

        ‘वर्ष २००४ मध्ये श्री. जयंत बेंद्रेकाकांनी दायित्व घेऊन सेवा करण्यास आरंभ केला. प्रथम त्यांनी गुरुपौर्णिमेच्या अर्पण पावती पुस्तकांच्या सेवेचे दायित्व घेतले. तेव्हापासून वर्ष २०१५ पर्यंत त्यांनी अखंडपणे समष्टी सेवा केली. वर्ष २०१६ मध्ये शस्त्रकर्म झाल्याने त्यांना बाहेर पडून सेवा करता येत नाही, तरी ते घरी बसून सेवा करण्याचा प्रयत्न करतात. त्यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.
१. सुंदर हस्ताक्षर
        ‘काकांचे अक्षर अतिशय सुंदर आहे. त्यांनी लिहिलेल्या वह्या पाहिल्यावर सनातनचे संत पू. नकातेकाका म्हणाले, ‘‘किती देखणे अक्षर आहे ! वही किती सुंदर लिहिलेली आहे !’’
२. इतरांना साहाय्य करणे
        ‘सत्संग किंवा कार्यक्रम झाल्यानंतर ते शक्य होईल तितक्या साधकांना स्वतःच्या गाडीतून बसच्या थांब्यापर्यंत, तर कधी कधी घरापर्यंतही पोचवत. दुचाकीवरून जातांना ते आपणहून सांगतात, ‘‘मी तुमच्या भागातून जात आहे. तुम्हाला पोचवीन.’’
३. कोणत्याही 
वेळेत सेवा करण्याची सिद्धता
        ‘एकदा रात्री १२.३० वाजता बाहेरगावाहून साधक येणार होते. तेव्हा काका म्हणाले, ‘‘मी साधकांना आणायला जाऊ शकतो; कारण मला रात्री लवकर झोप येत नाही’’ आणि खरोखरच ते आनंदाने त्यांना आणायला गेले. ते कधीही ‘मी थकलो’, असे म्हणत नाहीत.

अमरावती येथील साधिका सौ. अलकनंदा गणोरकर (वय ७६ वर्षे) यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

सौ. अलकनंदा गणोरकर यांचा
सत्कार करतांना सौ. विभा चौधरी (डावीकडे)
      अमरावती - येथील साधिका सौ. अलकनंदा गणोरकर (वय ७६ वर्षे) यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे नुकतेच घोषित करण्यात आले. या वेळी ६१ टक्के पातळीच्या सौ. विभा चौधरी यांनी श्रीकृष्णाची प्रतिमा देऊन त्यांचा सत्कार केला. या वेळी सौ. गणोरकर म्हणाल्या, मी काहीच केले नाही. प.पू. डॉक्टरांनी मला पुष्कळ काही दिले. मी सेवाही करत नाही, तरीही देवाने माझी प्रगती करवून घेतली. मध्यंतरी मी रुग्णालयात असतांना रात्रभर सद्गुरु (कु.) स्वाती खाडये माझ्या पलंगावर झोपलेल्या दिसल्या. प.पू. डॉक्टरांच्या अमृत महोत्सव सोहळ्यापासून अजूनही त्यांचाच तोंडवळा माझ्या डोळ्यांसमोर दिसतो. 
     सौ. गणोरकर यांची दोन मासांपूर्वी मेंदूची नस तुटल्याने शस्त्रकर्म करण्यात आले होते. ‘त्यातूनही केवळ प.पू. डॉक्टरांनीच वाचवले, असा त्यांचा भाव आहे. 

सेवेची तीव्र तळमळ असलेल्या आणि कृतज्ञताभावात रहाणार्‍या नागपूर येथील सौ. सुनीता सुहास खरे (वय ७६ वर्षे) !

१. सनातन संस्थेशी संपर्क 
१ अ. सनातन संस्थेविषयीची माहिती जाणून घेऊन सत्संगात यायला लगेच सिद्ध होणे : ‘नागपूर येथील छत्रपतीनगर येथे एक दिवस खरेकाका आणि काकू फाटकापाशी उभे असतांना त्यांना समोरच्या घरी ५ - ६ स्त्रिया बोलत असतांना दिसल्या. त्या दोघांनाही कुतूहल वाटले. थोडा वेळ वाट पाहून ते दोघेही घरात गेले. ‘त्या स्त्रिया आपल्याकडेही येतील, असे त्यांना मनापासून वाटत होते. खरोखरीच त्या स्त्रिया त्यांच्याकडे आल्या. त्यांनी खरेकाकूंना सनातन संस्थेची माहिती सांगितली आणि सत्संगाला येण्याचे निमंत्रण दिले. काकू सत्संगात यायला लगेच सिद्ध झाल्या.
१ आ. सत्संगात प्रथमच येऊनही त्यात सांगितलेली सर्व माहिती लिहून घेणे : काकू सत्संगाला येतांना कागद आणि लेखणी घेऊन आल्या. सत्संगात सांगत असलेली सर्व सूत्रे त्या लिहून घेत होत्या. काकू सत्संगामुळे प्रभावित झाल्या. सत्संग कु. आसावरी राजहंस (आताच्या सौ. नंदिनी चितळे) यांनी घेतला होता. सत्संगात सांगितलेली सर्व माहिती काकूंना प्रथमच कळली. घरी आल्यावर काकूंनी ती माहिती लगेच एका वहीत उतरवून ठेवली. आसावरीताईंनी सहसाधिकांना त्यांच्याकडे विशेष लक्ष द्यायला सांगितले. प्रत्येक वेळी सत्संगात सांगितलेले त्या लिहून घ्यायच्या.

प्रेमळ आणि स्वीकारण्याची वृत्ती असलेल्या नागपूर येथील सौ. सिंधु परांजपे (वय ६९ वर्षे) !

१. सनातन संस्थेशी संपर्क
     ‘माझे यजमान श्री. महेश परांजपे हे नोकरीनिमित्त संभाजीनगर येथे असतांना सनातन संस्थेच्या संपर्कात आले. प्रत्येक जिल्ह्यात संस्थेचे कार्य आहे’, असे कळल्यावर त्यांनी त्यांच्या आईला (सौ. सिंधु परांजपे यांना) सांगितले. आईंनी शोध घेतला असता त्यांच्या अगदी घराजवळच श्री. राजहंसकाका यांच्या घरी नागपूर येथील सेवाकेंद्र आहे’, असे कळले. त्यानंतर आईंनी स्वतःच्या घरी सत्संग घेण्यासाठी साधकांना विनंती केली. त्यानुसार घरी सत्संग चालू झाला. कुणीही साधक घरी आल्यावर त्यांना आनंद होतो. 
२. व्यवस्थितपणा
     त्यांचे काम अतिशय नीटनेटके आहे. पुष्कळ पसारा करून ठेवणे किंवा कोणतीही वस्तू कुठेही ठेवणे, असे त्यांचे सहसा होत नाही. या वयातही त्यांना ‘कोणती वस्तू कुठे ठेवली आहे ?, हे आठवते आणि ती वस्तू तिथेच सापडते. घरात कुठेही कचरा दिसल्यावर त्या लगेच तो काढतात. त्यांच्याकडे सात्त्विक उत्पादनांचा साठा आहे. तोही त्यांनी व्यवस्थित ठेवला आहे.

शांत आणि सहजतेने सर्वांकडे जाणारा ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला कोल्हापूर येथील चि. कृष्णराज शेटे (वय १ वर्ष) !

उच्चलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र 
चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. कृष्णराज शेटे हा एक दैवी बालक आहे !
चि. कृष्णराज शेटे
गरोदरपण 
१. प्रतिदिन सायंकाळी रामरक्षा म्हणतांना पोटात बाळाची हालचाल होत असे. 
२. देवतांचा नामजप करत असतांना तो शांतपणे ऐकायचा. 
३. तो गर्भात असतांना मला उलटी, मळमळ किंवा पोटदुखी हे त्रास अत्यल्प झाले. 
४. पोटात असतांना बाळाला पू. भाऊकाका (सनातनचे संत पू. सदाशिव परब) यांचा १ मास (महिना) सहवास लाभला. 
जन्म 
     कृष्णराजचा जन्म दीपावलीच्या मुहूर्तावर झाला. त्या वेळी घरी पू. शेंडेआजोबा (सनातनचे संत पू. सुदामराव शेंडे) यांचे वास्तव्य होते.

कोणत्याही प्रसंगात स्थिर रहाणारा ५६ टक्के आध्यात्मिक पातळीचा फोंडा, गोवा येथील कु. पार्थ श्रीरामप्रसाद कुष्टे (वय १७ वर्षे) !

कु. पार्थ श्रीरामप्रसाद कुष्टे हा पुढे हिंदु राष्ट्र चालवणार्‍या पिढीतील एक आहे !
कु. पार्थ कुष्टे
     (वर्ष २०१० मध्ये कु. पार्थ याची आध्यात्मिक पातळी ५३ टक्के असल्याचे घोषित करण्यात आले होते. - संकलक)
१. आवड-नावड नसणे 
      कु. पार्थला नवीन कपडे घालणे, विशिष्ट पदार्थ खाणे किंवा पेय पिणे, यांची आवड नाही. मी जे बनवते, ते तो आवडीने खातो. 
२. राष्ट्र आणि धर्म प्रेमी 
      त्याची मैत्री राष्ट्रप्रेमी आणि अध्यात्माची आवड असलेल्या मित्रांशीच आहे. त्याला महाराणा प्रताप, संकटमोचन हनुमान इत्यादी मालिका आवडतात. त्याचे आवडते नेते आहेत, नेताजी सुभाषचंद्र बोस.

अतिचिंतनाने होणारी हानी !

सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ
१. चुकांच्या अति चिंतनाने 
साधनेतील अमूल्य वेळ वाया जाणे
‘        काही साधकांना स्वतःकडून होणार्‍या चुकांचे अति चिंतन करण्याची सवय असते. यामुळे त्यांना चुकांचे मूळ तर मिळतच नाही, उलट त्यांच्या मनावरील ताण वाढतो. ‘कोणत्याही गोष्टीचे अति चिंतन करण्याची सवय’ हा एक दोषच आहे. बुद्धीचा तो एकप्रकारचा अडथळाच आहे.
२. भावजागृतीचे प्रयत्न करण्याचे महत्त्व
२ अ. चुका आपोआपच कमी होणे : अति चिंतन करण्याची सवय असणार्‍यांना स्वतःकडून बर्‍याच अपेक्षा असतात आणि त्या पूर्ण झाल्या नाहीत, तर त्यांच्या पदरी अपेक्षाभंगाचे दुःख येते. चुकांचे मूळ अति चिंतन करून सापडत नाही, तर त्यासाठी भावजागृतीचे प्रयत्न केल्यास होणार्‍या चुका आपोआपच न्यून (कमी) होतात; म्हणून कोणतीही गोष्ट अति नको.
२ आ. नकारात्मक स्पंदने नष्ट होणे : भावजागृतीच्या प्रयत्नांसारखी सकारात्मक गोष्टच आपल्यातील नकारात्मक स्पंदनांना नष्ट करू शकते. भावजागृतीच्या प्रयत्नांमुळे चुकांचे मूळ न समजताही नकारात्मकता आपोआपच निघून जाते. आयुष्यात नकारात्मक गोष्ट कशाला समजायला हवी ? सकारात्मक गोष्ट कळली की झाले.

त्रास असणार्‍या साधकांना आश्‍वस्त करणारे महर्षींचे बोल आम्ही तुमचे शरीर वज्रासारखे करू !

महर्षींची शिकवण आणि कार्य !
‘        नाडीवाचन क्रमांक १०२’मध्ये महर्षि म्हणतात, ‘काही साधकांना पुष्कळ त्रास होत आहेत. हे त्रास शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक अशा स्वरूपाचे आहेत; मात्र आम्हा महर्षींना एवढे माहीत आहे की, हे साधक प.पू. डॉक्टरांच्या छत्रछायेखाली असल्याने आम्ही त्यांचे शरीर टप्प्याटप्प्याने वज्रासारखे करत आहोत, म्हणजे पुढे त्यांना कोणत्याही प्रकारचे त्रास होणार नाहीत. तेव्हा चिंता नसावी.’ 
(संदर्भ : नाडीवाचन क्रमांक १०२, कांचीपूरम्, तमिळनाडू, १७.१०.२०१६)’ 
- (सद्गुरु) सौ. अंजली गाडगीळ, तिरुवण्णामलई, तमिळनाडू. (२२.१०.२०१६, दुपारी ४.१३)

गाण्यांची दिवाळी पहाट नको, आता हिंदु राष्ट्राची पहाट हवी !

        दिवाळी आणि सुरेल संगीताचे दिवाळी पहाट हे कार्यक्रम असे आता शहरांमध्ये समीकरणच झाले आहे. दिवाळीचे अभ्यंगस्नान झाल्यानंतर सुश्राव्य संगीत ऐकून दिवाळीचे दिवस अधिक आनंददायी करावेत, ही त्यामागची कल्पना. कल्पना गोंडस असली, तरी आताच्या काळात त्याची आवश्यकता आहे का, याचा विचार व्हायला हवा. धर्म आणि राष्ट्र यांची सद्यस्थिती पाहिली, तर आताच्या काळात मनोरंजनामध्ये रममाण होणे म्हणजे रोम जळत असतांना नीरोने फीडल वाजवत बसल्याप्रमाणे आहे. त्यामुळे आता राग आळवण्यापेक्षा वीरश्रीयुक्त पोवाड्यांचे आलंबन करा. मनोरंजनापेक्षा धर्म आणि राष्ट्र रक्षणार्थ नागरिक कृतीशील होतील या उद्देशाने जागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करा. दिवाळीच्या सुट्टीत मी, माझे कुटुंब, भेटीगाठी, मनोरंजन, विश्रांती आणि सहल यांच्यामध्ये अधिक न गुरफटता धर्म आणि राष्ट्र हितासाठी स्वकौशल्य अर्पण करा. मायेतील सुखापेक्षा धर्मकार्यातील आनंद चिरंतन आहे, हे लक्षात घेऊन आपला अधिकाधिक वेळ धर्मकार्यासाठी देऊन त्यातून मिळणारे समाधान अनुभवून पहा. आता गाण्यांची दिवाळी पहाट साजरी करण्यापेक्षा सर्वकल्याणकारी हिंदु राष्ट्राची पहाट लवकर उगवावी, यासाठी प्रयत्नरत आहे. भ्रष्टाचार, कमाचुकारपणा, स्वार्थीपणा यांच्या गर्तेतून राष्ट्राला बाहेर काढून भारताला पुन्हा गौरवशाली करण्यासाठी धर्म अन् राष्ट्र रक्षणाच्या तळमळीचा दीप सर्वांच्या अंतरी निर्माण करणे, हाच खरा दीपोत्सव आहे. चला, तर मग या दीपावलीच्या निमित्ताने हिंदु राष्ट्राच्या निर्मितीसाठी यथाशक्ती प्रयत्नरत रहाण्याचा संकल्प करूया !

देशद्रोही संघटना आणि राजकारण यांमुळे वाढलेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात हिंदूंनी संघटित व्हावे ! - प्रमोद मुतालिक, श्रीराम सेना

मांगूर (तालुका चिक्कोडी, जिल्हा बेळगाव) येथील हिंदु धर्मजागृती सभेला २ सहस्र ५०० जिज्ञासूंचा प्रतिसाद !
मार्गदर्शन करतांना श्री. प्रमोद मुतालिक आणि उपस्थित हिंदू
      मांगूर, २८ ऑक्टोबर (वार्ता.) - 'देशात सर्वधर्मसमभाव आहे. आपण हिंदू या हिंदुस्थानात सर्वांना प्रेमाने वागवत आलो. तरीही हिंदु महिलांवर अत्याचार होत आहेत. भ्रष्टाचार वाढतच आहे. याला कारणीभूत देशद्रोही संघटना आणि राजकारण आहे. हिंदु धर्म आणि महिला यांवर होणारे अत्याचार, देशातील भ्रष्टाचार थांबवण्यासाठी सर्व हिंदूंनी एकत्र येऊन देशद्रोहीरूपी कर्करोगावर वेळीच उपाय करणे आवश्यक आहे', असे आवाहन श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक यांनी केले. २४ ऑक्टोबर या दिवशी ते येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिर समोरील पटांगणात आयोजित केलेल्या हिंदु धर्मजागृती सभेत आणि श्रीराम सेना शाखेच्या उद्घाटनच्या प्रसंगी बोलत होते. या वेळी व्यासपिठावर श्रीराम सेनेचे श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे आणि अधिवक्ता रणजित घाटगे, श्रीराम सेनेचे बेळगाव जिल्हाध्यक्ष रमाकांत कोंडुसकर, हुपरी (जिल्हा कोल्हापूर) येथील श्री शिवचरित्र अभ्यासक नीळकंठ माने उपस्थित होते. 

शासनाने टिपू सुलतानाची जयंती साजरी करू नये !

प्रमोद मुतालिक यांची चेतावणी
 हिंदूंवर अनन्वित अत्याचार करणार्‍या आणि हिंदूंची मंदिरे उद्ध्वस्त करणार्‍या टिपू सुलतानचा कर्नाटकात उदो उदो होणे, ही काँग्रेसला सत्तेवर आणणार्‍या हिंदूंना शिक्षाच होय ! 
      अथणी (जिल्हा बेळगाव), २८ ऑक्टोबर (वार्ता.) - देशात समान नागरी कायदा अंमलात आणला पाहिजे. जगात दोन-दोन कायदे नाहीत, मग भारतातच का ? हिंदुद्रोही टिपू सुलतान जयंतीस आपला विरोध असून शासनाने ही जयंती साजरी करू नये, असे आवाहन श्रीराम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक यांनी केले. २७ ऑक्टोबर या दिवशी येथे आयोजित केलेल्या पत्रकार बैठकीत ते बोलत होते. (श्रीराम सेनेच्या पाठीशी राहून सर्व हिंदुत्वनिष्ठांनी टिपू सुलतानाची जयंती साजरी करण्याला विरोध दर्शवला पाहिजे ! - संपादक) 

किल्ला बनवत असतांना विजेचा धक्का लागून मुलाचा मृत्यू

     कल्याण, २८ ऑक्टोबर - दिवाळीनिमित्त किल्ला बनवत असतांना विजेचा धक्का लागून एका १२ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना कल्याणमध्ये घडली. अंकित लोणकर असे त्या मुलाचे नाव असून तो कल्याण पूर्वेकडील हनुमान नगर येथील राधेश्याम अपार्टमेंटमध्ये रहात होता. किल्ल्याला विद्युत रोषणाई करतांना ही दुर्घटना घडली.

हिंदूसंघटन होण्यासाठी प्रयत्न करण्याचा धर्माभिमान्यांचा निर्धार

 काश्मिरी हिंदूंच्या हक्कांसाठी झालेल्या हिंदु धर्मजागृती सभेनंतरची आढावा बैठक 
     पुणे, २८ ऑक्टोबर (वार्ता.) - काश्मिरी हिंदूंच्या हक्कांसाठी येथे २३ ऑक्टोबर या दिवशी हिंदु धर्मजागृती सभा घेण्यात आली होती. या सभेनंतर धर्म आणि राष्ट्र कार्य करण्यासाठी कृतीशील होऊ इच्छिणार्‍यांसाठी २७ ऑक्टोबर या दिवशी विठ्ठलवाडी येथील श्री विठ्ठल मंदिरात एका आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी उपस्थित धर्माभिमान्यांनी हिंदूसंघटन करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. कोथरूड येथेही श्री अमृतेश्‍वर मंदिरात आढावा बैठक पार पडली. या बैठकीला भाजपचे नगरसेवक श्री. प्रशांत बधे, शिवसेनेचे श्री. गजानन थरकुडे, बावधन येथील श्री. निखिल वेडेपाटील, भाजपचे मुळशी अध्यक्ष श्री. कैलाश उपाख्या अप्पा चौधे, ह.भ.प. पांडुरंग महाराज हिंगे आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी बावधन येथे दिवाळीनंतर हिंदुत्वनिष्ठांची एक बैठक, तसेच हिंदु धर्मजागृती सभा घेण्याचे ठरवण्यात आले.

पालघरमधून १५ किलो स्फोटकांचा साठा शासनाधीन !

किती वेळा अशी स्फोटके शासनाधीन करणार ? त्यापेक्षा स्फोटके पसरवणार्‍यांचे मूळ शोधून काढायला हवे ! 
      पालघर - येथील सातवलीमधून मुंबई आणि ठाणे येथील आतंकवादविरोधी पथकाने संयुक्त कारवाईत १५ किलो स्फोटकांचा साठा २७ ऑक्टोबर या दिवशी शासनाधीन केला आहे. या कारवाईत जिलेटिनच्या कांड्यांचा साठा हाती लागला आहे. एका गोदामात स्फोटकांचा साठा असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार केलेल्या कारवाईत गोदामाच्या जमिनीखाली लपवून ठेवण्यात आलेला साठा मिळाला. हा साठा नेमका कोणत्या कारणासाठी आणि कोठून आणला होता, याचा तपास सध्या आतंकवादविरोधी पथक करत आहे.

मुंबई पोलिसांकडून दिव्याच्या आकाशकंदिलावर बंदी !

हा निर्णय राज्यभर लागू करण्यासाठी मुंबई पोलिसांनी प्रयत्न करावेत, ही अपेक्षा ! 
     मुंबई, २८ ऑक्टोबर - दिवाळीच्या कालावधीत दिवा प्रज्वलित करून हवेत सोडण्यात येणार्‍या आकाशकंदिलावर मुंबई पोलिसांकडून बंदी घालण्यात आली आहे. त्या दिव्याचा वापर आतंकवादी कारवायांसाठी होऊ शकतो, तसेच तो दिवा कोणत्या वसाहतीत पडल्यास त्यातून आग लागून मोठी दुर्घटना घडू शकते. या कारणास्तव त्या आकाशकंदिलांवर बंदी घातली असून या आदेशाचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई केली जाईल, असे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी सांगितले. 

अनुदान लाटण्याच्या प्रकाराला आळा बसण्यासाठी विद्यार्थ्यांचीही 'बायोमेट्रिक' उपस्थिती घेणे सक्तीचे !

वरवरची उपाययोजना करणारा शालेय शिक्षण विभाग !
     मुंबई - राज्यभरातील सर्व शाळांमधील शिक्षक-कर्मचारी यांच्यासमवेत आता विद्यार्थ्यांनाही 'बायोमेट्रिक' प्रणालीद्वारे उपस्थिती लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. 'बायोमेट्रिक' हजेरीमुळे विद्यार्थ्यांची खोटी उपस्थिती लावून सरकारचे अनुदान लाटण्याच्या प्रकाराला आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. (असे अपप्रकार करणार्‍या शाळा आणि त्यांचे व्यवस्थापन यांना कठोर शिक्षा केल्यासच काही प्रमाणात आळा बसेल. - संपादक) ज्या शाळांमध्ये 'बायोमेट्रिक' प्रणालीची सोय केली जाणार नाही, अशा शाळांना शिक्षकांच्या वेतनापोटी मिळणार्‍या अनुदानापासून वंचित ठेवले जाणार आहे. त्यामुळे राज्यातील सर्व शाळांना विद्यार्थी आणि शिक्षक यांची उपस्थिती नोंदवण्यासाठी बायोमेट्रिक प्रणाली बसवणे बंधनकारक करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतलेल्या अधिकार्‍यांच्या बैठकीत घेतला आहे. 

फलक प्रसिद्धीकरता

सदैव थयथयाट करणारे 
हिंदुविरोधी धर्मनिरपेक्षतावादी आता गप्प !
        बेंगळुरू येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते रुद्रेश यांची १६ ऑक्टोबर या दिवशी हत्या झाली. या हत्येप्रकरणी पोलिसांनी महंमद सादिक, महंमद मुजीबुल्ला, वासिम अहमद आणि इरफान पाशा या चौघा धर्मांधांना अटक केली आहे.

नवरात्रोत्सवाच्या १० दिवसांनंतरही देवीच्या मूर्ती कृत्रिम कुंडात पडून !

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा नवरात्रोत्सवातील धर्मद्रोही कारभार !
     चिंचवड, २८ ऑक्टोबर (वार्ता.) - नवरात्रोत्सवानंतर १० दिवस उलटून गेले, तरी पिंपळे गुरव येथील कृत्रिम कुंडात देवीच्या मूर्ती तशाच असल्याचे २३ ऑक्टोबरपर्यंत आढळून आले होते. २८ ऑक्टोबर या दिवशी मात्र कृत्रिम कुंडात मूर्ती नसल्याचे आढळून आले. या मूर्ती दान दिल्याचे स्थानिक नागरिक सांगतात; पण याकडे ना महानगरपालिकेचे लक्ष होते, ना मूर्तीदान स्वीकारणार्‍यांचे ! नवरात्रीमध्ये भक्तीभावाने पूजलेल्या देवीच्या मूर्ती विसर्जनानंतर मात्र उघड्यावरच पडून राहिल्याने देवीची एकप्रकारे विटंबनाच झाली. (भाविकहो, आतातरी देवतेच्या मूर्तींचे दान देण्याच्या धर्मशास्त्रविरोधी संकल्पनांना भुलू नका. सर्व धार्मिक उपचार धर्मशास्त्राप्रमाणेच करा. - संपादक)

पनवेल न्यायालयाच्या वाहनतळाप्रश्‍नी राज्याच्या मुख्य सचिवांविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाची अवमान नोटीस

     मुंबई, २८ ऑक्टोबर - पनवेल न्यायालयाच्या वाहनतळाच्या प्रश्‍नी राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्याविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाने अवमान नोटीस बजावली आहे. त्यावर १६ डिसेंबरपूर्वी उत्तर देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांच्या खंडपिठाने २७ ऑक्टोबर या दिवशी दिले. न्यायालयांसाठी पायाभूत सुविधा पुरवणे, हे राज्य सरकारचे घटनात्मक कर्तव्य आहे, असा निर्णय न्यायमूर्ती अभय ओक यांच्या खंडपिठाने यापूर्वीच दिला आहे. त्या वेळी पनवेल येथील न्यायालयाच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण करणे, वाहनतळ उभारणे आणि रस्ता रूंद करणे यांविषयीही आदेश देण्यात आले होते. असे असतांना त्या आदेशातील वाहनतळाचा प्रश्‍न सुटत नसल्याने पनवेल न्यायालयातील वकील संघटनेचे अध्यक्ष अधिवक्ता प्रमोद ठाकूर यांनी अधिवक्ता राहुल ठाकूर यांच्यामार्फत जनहित याचिका प्रविष्ट केली. त्यावर झालेल्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाने ही नोटीस बजावली. 

पनवेलला महानगरपालिकेचा दर्जा देण्याचा राज्य सरकारचा निर्णय कायदेशीर !

मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय 
     मुंबई, २८ ऑक्टोबर - पनवेल नगरपालिकेला महानगरपालिकेचा दर्जा देण्याचा राज्य सरकारचा निर्णय कायदेशीर असल्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रणजीत मोरे आणि न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपिठाने दिला. पनवेल नगरपालिकेला महानगरपालिकेचा दर्जा देण्यास खारघरमधील रहिवाशांचा विरोध होता. तसेच आगामी निवडणुकीची सिद्धता अंतिम टप्प्यात असतांना राज्य सरकार अशा प्रकारची अधिसूचना घोषित करू शकत नाही, असा दावा राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने करण्यात आला होता. या दोन्ही याचिकांवर २७ ऑक्टोबर या दिवशी झालेल्या सुनावणीच्या वेळी खंडपिठाने वरील निर्णय दिला. खंडपिठाने सांगितले की, 'एखाद्या नगरपालिकेची संरचना पालटून तिला महानगरपालिकेचा दर्जा देण्याचा अधिकार राज्य शासनाला आहे. त्यासाठी आवश्यक पूर्ततेची अंमलबजावणीही शासनाने केली आहे. त्यामुळे पनवेलला महानगरपालिकेचा दर्जा मिळू शकतो'. याचिकादारांनी न्यायालयाला सांगितले की, 'पनवेलला महानगरपालिकेचा दर्जा मिळाल्यास विकासाला विलंब होऊ शकतो'. यावर राज्य सरकारच्या वतीने 'महानगरपालिका झाल्यावर विकासाला चालना मिळेल', असा दावा केला.

सीमाशुल्क विभागाकडून ३८ कोटी रुपयांचे चिनी फटाके नष्ट

यापेक्षा केंद्र सरकारने चिनी फटाक्यांच्या आयातीवरच बंदी घालणे आवश्यक !
     मुंबई - काश्मीरमधील उरी येथे आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणानंतर संपूर्ण देशात पाकिस्तानच्या विरोधात आणि त्याला साहाय्य करणार्‍या चीनच्या विरोधात संतप्त भावना निर्माण झाली आहे. यंदाच्या दिवाळीत चिनी उत्पादने घ्यायची नाहीत, असा ठाम निर्धार भारतियांनी केला आहे. त्याच पार्श्‍वभूमीवर सीमाशुल्क विभागाने चीनमधून अवैधरित्या आयात केलेेले ३८ कोटी ३२ लक्ष रुपयांचे फटाके न्हावा शेवा बंदरामध्ये नष्ट केले आहेत. (एवढ्यावरच न थांबता विभागाने असे फटाके आयात करणार्‍यांना कठोर शासन करून त्यांच्याकडून आर्थिक दंडही आकारायला हवा. - संपादक)

खेळण्यातील पिस्तुलासाठी वापरण्यात येणार्‍या गोळ्यांनी गंभीर इजा होण्याचा धोका

फटाक्यांच्या उत्पादनांवरच बंदीची मागणी पोलिसांनी सरकारकडे करायला हवी ! 
     संगमनेर - येथे दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर बाजारात आलेल्या खेळण्यातील पिस्तूल आणि त्याच्या गोळ्या यांमुळे गंभीर इजा होण्याचा धोका आहे. त्यामुळे त्या गोळ्यांच्या विक्रीवर मनाई करण्यात येणार असल्याची माहिती संगमनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे यांनी दिली. यामुळे येथील नागरिकांकडूनही त्या गोळ्यांवर बंदीची मागणी करण्यात येत आहे.

शीना बोरा हत्याकांडाच्या प्रकरणी माजी पोलीस आयुक्त मारिया यांची चौकशी

     मुंबई - बहुचर्चित शीना बोरा हत्याकांडाच्या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) २७ ऑक्टोबर या दिवशी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि गृहरक्षक दलाचे (होमगार्ड) विद्यमान महासंचालक राकेश मारिया यांच्यासह तिघा वरिष्ठ अधिकार्‍यांची चौकशी केली. मारियांसह मुंबईचे पोलीस सहआयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) देवेन भारती आणि परिमंडळ-९चे उपायुक्त सत्यनारायण चौधरी यांनाही चौकशीसाठी बोलावले होते.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Bengaluru sthit RSS karykarta Rudresh ki hatya ke aarop me Police ne 4 jihadiyo ko giraftar kiya. 
Secularwadi ab chup hai, yah pura desh dekh raha hai!
जागो ! : बेंगलुरू स्थित संघ कार्यकर्ता रुद्रेश की हत्या के आरोप में पुलिस ने ४ जिहादियों को गिरफ्तार किया.
सेक्यूलरवादी अब चुप हैं, यह पूरा देश देख रहा है !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
       रामायण, महाभारत किंवा छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र नुसते वाचण्यापेक्षा त्यांतील घटनांकडून स्फूर्ती घेऊन सनातन धर्माचे रक्षण करा ! 
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
      कितीही कल्पनातीत आनंदलहरी असल्या, तरी त्यांची शीतलताच त्यांचा दाब उसळेल.
भावार्थ :
आनंदलहरी कल्पनातीत आहेत; कारण साधारण व्यक्तीला आध्यात्मिक आनंदाची, आत्मानंदाची अनुभूती नसतेच, केवळ व्यावहारिक सुखाची असते. त्यांची शीतलताच त्यांचा दाब उसळेल म्हणजे आनंदाची अनुभूती घ्यावी, अशी प्रत्येक जिवाला नैसर्गिक ओढ असतेच, म्हणून आनंद मिळावा हा विचार कधी ना कधी उफाळून येतोच.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

अहंभाव-निर्मूलनाचे महत्त्व 
अहंभाव, म्हणजे मीपणा. हा अहंभाव सोडला, तर माणसांच्या 
समूहात तुम्ही आश्‍चर्यकारक एकांताचा अनुभव मिळवाल.
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

नरकासुर दहनाला प्रारंभ !

संपादकीय
      आज नरकचतुर्दशी ! भगवान श्रीकृष्णाने नरकासुर नावाच्या दैत्याचा आजच्या दिवशी वध केला. नरकासुराने १६ सहस्र महिलांचे अपहरण करून त्यांना कारागृहात ठेवले होते. भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध करून या महिलांची सुटका केली. या तिथीला जो कोणी अभ्यंगस्नान करील, त्याला नरकाची पीडा होणार नाही, असा वर भगवान श्रीकृष्णाने दिला आहे. महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांत या दिवशी कारिट नावाचे फळ नरकासुर असल्याचे मानत ते पायाच्या अंगठ्याने चिरडले जाते.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn