Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कोटी कोटी प्रणाम !

धन्वंतरि जयंती 
धनत्रयोदशी 
यमदीपदान

काश्मीरमध्ये अशांतता निर्माण करण्यासाठी पाककडून पैसे घेणार्‍या चौघांना अटक !

काश्मीरमधील दंगलखोर आंदोलनकर्त्यांचे समर्थन करणार्‍यांना चपराक ! आता ते याविषयी तोंड उघडतील का ? पोलिसांनी अशा समर्थकांनाही कारागृहात डांबले पाहिजे ! 
     श्रीनगर - काश्मीरमध्ये हिंसाचार घडवून अशांतता निर्माण करण्यासाठी पाककडून पैसे घेतल्याच्या प्रकरणी ४ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. यातील दोघे तहरीक-ए-जेहाद-ए-इस्लामी या आतंकवादी संघटनेचे सदस्य आहेत. ते नुकतेच पाकमध्ये गेले होते. पाक दौर्‍याच्या वेळी या दोघांना प्रत्येकी ५० सहस्र रुपये देण्यात आले होते. आणि अशांतता कायम ठेवल्यास आणखी पैसे देण्याचे आश्‍वासन देण्यात आले होते.

पाकव्याप्त काश्मीरमध्ये नागरिकांचे पुन्हा एकदा स्वातंत्र्यासाठी आंदोलन !

पाकव्याप्त काश्मीर भारताचा भाग असल्याने आता भारतानेही तो पाकच्या कह्यातून स्वतंत्र करण्यासाठी कृती केली पाहिजे ! 
     मुझफ्फराबाद (पाकव्याप्त काश्मीर) - पाकच्या कह्यातील काश्मीरमधील नागरिकांनी पुन्हा एकदा स्वातंत्र्यासाठी आंदोलन केले. त्यांनी त्यांच्यावर अत्याचार करणार्‍या पाक सैन्याला येथून हटवण्याची मागणी केली; मात्र पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार केला. यापूर्वी येथील कोटली भागात ३० सप्टेंबर, १ आणि २ ऑक्टोबरला आंदोलन करण्यात आले होते. आंदोलनकर्त्यांपैकी एकाने सांगितले की, 'आम्हाला स्वातंत्र्य हवे आहे. पाकने त्याच्या सैन्याला येथून हटवले पाहिजे; आम्ही त्यांना सहन करू शकत नाही'. आंदोलनकर्ते म्हणाले की, 'पाकिस्तान स्वतःला सावरू शकत नाही. पंतप्रधान नवाज शरीफ जगातील कोणत्याही देशात गेले, तरी सैन्यदल प्रमुख राहिल शरीफ त्यांच्यावर लक्ष ठेवून असतात'.

पुरावे नसतील, तर सनातनवर कारवाई होणार नाही ! - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

     मुंबई - उच्च न्यायालयाने सनातन संस्थेविषयी केंद्र आणि राज्य शासन यांच्यामध्ये झालेल्या पत्रव्यवहारासंदर्भात माहिती मागवली आहे. या पार्श्‍वभूमीवर एकीकडे हिंदुद्वेषी पुरो(अधो)गामी आणि कथित धर्मनिरपेक्षतावाद्यांना जेथे सनातनवर अन्याय्य बंदी घालण्याचा पोटशूळ उठला आहे, तेथे दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सनातनच्या विरोधात पुरावे नसतील, तर कारवाई होणार नाही ! जय महाराष्ट्र या मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केले.

भारताला पाक होण्यापासून रोखण्याचे पहिले पाऊल म्हणजे पनून कश्मीर ! - डॉ. अजय च्रोंगू, पनून कश्मीर

     पुणे, २७ ऑक्टोबर (वार्ता.) - काश्मीरच्या परिस्थितीला जेनोसाईड म्हणजे एखाद्या समाजाला मुळासकट नष्ट करण्याची प्रक्रिया कारणीभूत आहे. हिटलरने जर्मनीमध्ये जशी ज्यू लोकांना नष्ट करण्यासाठी 'जेनोसाईड' प्रक्रिया वापरली, तीच प्रक्रिया काश्मिरी हिंदूंविषयी घडत आहे. ही प्रक्रिया रोखणे आणि भारताला पाकिस्तान होण्यापासून रोखणे, याचे पहिले पाऊल म्हणजे 'पनून कश्मीर' (आपले काश्मीर) आहे, असे प्रतिपादन पनून कश्मीरचे अध्यक्ष डॉ. अजय च्रोंगू यांनी केले. कोथरूड व्यासपीठ आणि साहित्य वेध प्रतिष्ठान, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने 'मैत्र पर्व' चित्र, चरित्र आणि व्यंगचित्र प्रदर्शन यांविषयीचा कार्यक्रम येथील अंबर हॉल येथेे २६ ऑक्टोबर या दिवशी आयोजित केला होता. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी उद्घाटक म्हणून सिम्बायोसिस विद्यापिठाचे कुलगुरु डॉ. शां.ब. मुजुमदार, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अखिल मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस, कोहिनूर ग्रुपचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, कार्यक्रमाचे आयोजक शिवसेनेचे श्याम देशपांडे आणि युथ फॉर पनून कश्मीरचे राष्ट्रीय संयोजक श्री. राहुल कौल यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते. 

डॉ. झाकीर नाईक आणि त्यांची संस्था धोकादायक ! - केंद्रीय गृहमंत्रालय

     नवी देहली - डॉ. झाकीर नाईक आणि त्यांची संस्था इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन धोकादायक आहे. त्यांची ही संस्था अनधिकृत आहे, असा अहवाल केंद्रीय गृहमंत्रालयाने बनवला आहे. लवकरच या दोघांवरही कारवाई होण्याची शक्यता आहे, असे वृत्त एका इंग्रजी वृत्तवाहिनीने दिले आहे. डॉ. झाकीर यांची विधाने आक्षेपार्ह आणि स्फोटक आहेत. त्यांनी आतंकवादी ओसामा बीन लादेन याचेही कौतुक केले आहे. तसेच दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करून द्वेष पसरवण्याचेही काम या विधानांतून केले जात आहे. त्यातूनच मुसलमान तरुण आतंकवादी कृत्यासाठी प्रेरित होत आहेत, असे या अहवालात म्हटल्याचे या वृत्तात म्हटले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपमध्ये पुन्हा युती !

     मुंबई - स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपमध्ये पुन्हा युती झाली आहे. यासंदर्भात शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत शिक्कामोर्तब करण्यात आले. आम्ही निवडणूक जिंकणारच, असे युतीकडून सांगितले जात आहे. एकमेकांवरील टीकेचा विषय संपल्याचेही राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

देहलीतील पाक उच्चायुक्तालयातील कर्मचार्‍याला हेरगिरी प्रकरणी अटक !

भारतातील पाकप्रेमींना चपराक !
 आता ते या गुप्तहेराचीही बाजू घेणार आहेत का ? 
     नवी देहली - गोपनीय माहिती पुरवल्याच्या प्रकरणी पाक उच्चायुक्तालयातील कर्मचारी महंम्मद अख्तर याला देहली पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात मौलाना रमजान आणि सुभाष जंगीर या दोन भारतीय नागरिकांनाही अटक करण्यात आली आहे. हे दोघेही राजस्थानमधील आहेत. या प्रकरणी भारतातील पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बसीत यांनाही समन्स बजावण्यात आले आहे. 

संशयित म्हणून अटक केलेल्या सनातनच्या साधकांना काहीही करून न्याय मिळू न देणे, ही आहे पोलिसांची अजब कार्यपद्धत !

      कॉ. गोविंद पानसरे हत्येच्या प्रकरणी सनातनचे साधक श्री. समीर गायकवाड यांना संशयित म्हणून अटक करून १३ महिने होऊनही पोलीस न्यायालयात काही ना काही कारण सांगून आरोप निश्‍चितीविषयीची सुनावणी पुढे ढकलत आहेत. डिसेंबर २०१५ मध्ये आरोपपत्र प्रविष्ट करूनही पोलीस केस चालवण्यास स्वतःच टाळाटाळ करत आहेत. यासाठी कधी स्कॉटलंड यार्डकडे पाठवलेल्या गोळ्यांचा अहवाल आला नसल्याचे, तर या प्रकरणात डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना अटक केल्याचे कारण पुढे केले जात आहे. काहीही करून संशयित आरोपींना न्याय मिळू द्यायचा नाही, अशीच पोलिसांची अजब कार्यपद्धत आहे का, असा प्रश्‍न निर्माण होतो.

समीर गायकवाड यांच्यावरील आरोपनिश्‍चिती उच्च न्यायालयाने २ डिसेंबरपर्यंत पुढे ढकलली !

कॉ. पानसरे हत्या प्रकरण 
     मुंबई, २७ ऑक्टोबर (वार्ता.) - कॉ. पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणी संशयित म्हणून अटकेत असलेले सनातनचे साधक श्री. समीर गायकवाड याच्या विरोधात कोल्हापूरमधील सत्र न्यायालयात चालू असलेल्या खटल्यात आरोप निश्‍चित केले जाऊ नयेत, यासाठी राज्यशासनाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती. यावर उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे यांच्यासमोर २७ ऑक्टोबरला सुनावणी झाली. या वेळी न्यायालयाने दोन्ही बाजूंचे युक्तीवाद ऐकल्यानंतर पुढील सुनावणी २ डिसेंबर या दिवशी ठेवत आरोपनिश्‍चितीवरील स्थगिती कायम ठेवली. 

सनातन प्रभात वृत्तपत्र चालवणे आमचे व्रत आहे, अर्थाजनाचे माध्यम नाही ! - पू. डॉ. चारुदत्त पिंगळे

डावीकडून श्रीमती कुमकुम, श्रीमती मिनाक्षी, बिझनेस स्टॅण्डर्डचे 
श्री. ऋषभ, पू. डॉ. चारुदत्त पिंगळे, नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडियाचे 
अध्यक्ष श्री. बलदेव शर्मा आणि देव संस्कृती विश्‍वविद्यालयाचे 
श्री. सुखनंदनख सिंह 
        हरिद्वार (उत्तराखंड), २७ ऑक्टोबर (वार्ता.) - सनातन प्रभात नियतकालिकाचे एक दायित्व दर्शवणारे वाक्य आहे की, व्यक्तीला जे पाहिजे ते आम्ही देणार नाही, त्याला जे आवश्यक ते आम्ही देऊ. सिगरेट, दारू, तसचे अश्‍लीलता पसरवणारी विज्ञापने आम्ही देत नाही. आमचे दायित्व आहे, समाज प्रबोधन, समाज उन्नती आणि राष्ट्राभिमानी समाज मनाची निर्मिती करणे. वृत्तपत्र चालवणे आमचे व्रत आहे, ते आमचे उत्पन्नाचे साधन नाही. त्यागाची भावना असलेल्या पत्रकार, संपादकांच्या योगदानातून सनातन प्रभातच्या ४ आवृत्त्या प्रसिद्ध होतात. एकही वार्ताहर, संपादक पगारी नाही.

नरकासुर स्पर्धांऐवजी श्रीकृष्ण पूजनाला प्रोत्साहन देण्याचा मगो पक्षाचा निर्णय !

श्री. सुदिन ढवळीकर
     पणजी - गोव्यात नरकचतुर्दशीच्या पूर्वसंधेला नरकासुर प्रतिमांची स्पर्धा भरवण्याचे स्तोम माजले आहे. दुर्दैवाने सर्व पक्षांचे नेते अशा स्पर्धांना पाठिंबा देत आहेत. याला छेद देऊन मगो पक्षाने लोकहिताच्या दृष्टीने आणि भारतीय संस्कृतीच्या रक्षणाच्या हेतूने नरकासुराऐवजी श्रीकृष्णाचे पूजन करण्यासाठी राज्यात प्रत्येक मतदारसंघ आणि तालुक्यात उपक्रम राबवण्याचे ठरवले आहे. याविषयी पक्षाचे नेते नारायण सावंत यांनी पणजी येथे पक्ष कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. श्री. नारायण सावंत म्हणाले, "रात्री उशिरापर्यंत युवक धांगडधिंगाणा घालत असतात. रात्री जागरण झाल्यामुळे युवक दीपावलीच्या दिवशी दुपारी २ पर्यंत झोपलेले असतात. त्यामुळे सकाळची दिवाळी हे युवक साजरे करू शकत नाही. नरकासुर प्रतिमा बनवण्यासाठी रात्रीच्या रात्री घराबाहेर असलेल्या युवकांवर पालकांचे नियंत्रण रहात नाही. त्यामुळे ते व्यसनाकडे वळतात, असे होऊ नये, यासाठी मगो पक्षाने प्रत्येक मतदारसंघात आणि तालुक्यात एकत्र जमण्याचे आणि या ठिकाणी भजन करायचे, गीता वाचन आदी सात्त्विक कार्यक्रम करायचे ठरवले आहे". नरकासुर स्पर्धेला असलेला सनातनचा विरोध आणि मगो पक्षाचा हा उपक्रम कदाचित योगायोग असू शकतो; मात्र ही मगो पक्षाची स्वतंत्र भूमिका आहे, असे श्री. नारायण सावंत यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देतांना स्पष्ट केले. 

मडकई (गोवा) मतदारसंघातील सर्व सहाही पंचायतींचा नरकासुर प्रतिमा स्पर्धेला विरोध !

श्रीकृष्णाला महत्त्व देऊन दिवाळी साजरी करण्याचे आवाहन 
इतर पंचायतींनी यातून आदर्श घ्यावा आणि गैरप्रकारांना वाव न देता प्रतिकात्मक नरकासुरदहन करून दिवाळीचा आनंद लुटावा !
     फोंडा, २७ ऑक्टोबर (वार्ता.) - मडकई मतदारसंघातील सहाही पंचायतींनी नरकासुर स्पर्धेला विरोध दर्शवला आहे. दीपावली उत्सव हा पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात येणे आवश्यक असून याचा प्रचार होणे आवश्यक असल्याचे या पंचायतींचे म्हणणे आहे. मडकई पंचायतीतील सहाही पंचायतींच्या सरपंचांनी आणि पंचसदस्यांनी बांदोडा पंचायत सभागृहात एक पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. श्रीकृष्णाला महत्त्व देण्याच्या उद्देशाने आणि पारंपरिकरित्या दिवाळी साजरी करण्यासाठी बांदोडा येथील भाऊसाहेब बांदोडकर मैदानात दिवाळीच्या दिवशी सायंकाळी ६.३० ते ९ वाजेपर्यंत एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे या वेळी सांगण्यात आले. या पत्रकार परिषदेला कवळे पंचायतीचे सरपंच राजेश कवळेकर; बांदोडा पंचायतीचे सरपंच नयन नायक, उपसरपंच संतोष फडते, पंचसदस्य रामचंद्र नाईक, राजेश नाईक; वाडी-तळावली पंचायतीचे सरपंच दिलेश गावकर; आगापूर-दुर्भाट पंचायतीचे सरपंच गणपत नाईक; मडकई पंचायतीचे सरपंच योगेश गावडे, पंचसदस्य शैलेंद्र पणजीकर, भारत नाईक, कुंडईचे उपसरपंच रामू नाईक आणि इतर पंचसदस्य, तसेच जिल्हा पंचायत सदस्य चित्रा फडते यांची उपस्थिती होती. 

प्रत्येक मतदारसंघातील दोन ते अडीच सहस्र नि:स्वार्थी कार्यकर्ते हीच आमची शक्ती ! - सुभाष देसाई, भारतीय भाषा सुरक्षा मंच

       वास्को, २७ ऑक्टोबर (वार्ता.) - भारतीय भाषा सुरक्षा मंचकडे प्रत्येक मतदारसंघात दोन ते अडीच सहस्र निस्वार्थी भावनेने कार्य करणारे कार्यकर्ते आहेत. हीच मातृभाषाप्रेमी भारतीय भाषा सुरक्षा मंच आणि गोवा सुरक्षा मंच पक्ष यांची शक्ती आहे. एवढे कार्यकर्ते गोव्यात अन्य कुठल्याही राजकीय पक्षाकडे नाहीत. भाजपकडे आता केवळ भाडोत्री कार्यकर्ते शिल्लक राहिलेले आहेत, असे भारतीय भाषा सुरक्षा मंचचे केंद्रीय समितीचे खजिनदार सुभाष देसाई वास्को येथे सभेत म्हणाले.

लांजा (जि. रत्नागिरी) येथील ए-वन ट्रेडर्स फॅन्सी फटाके विक्रेत्यांची आदर्श कृती !

दुकानासमोर मेड इन चायनाचे फटाके मिळत नाहीत, अशा आशयाचा फलक 
लावून ग्राहकांना ते खरेदी न करण्याचे आवाहन करणारे महेश भाटवडेकर !
श्री. महेश भाटवडेकर यांच्यासारखे राष्ट्राभिमानी आता सर्वत्र हवेत !
ए-वन ट्रेडर्स या फटाक्यांच्या दुकानात 
ग्राहकांना विनंती आणि आवाहन 
करण्यासाठी लावण्यात आलेला फलक
     लांजा, २७ ऑक्टोबर (वार्ता.) - येथील ए-वन ट्रेडर्स फॅन्सी फटाक्यांचे दुकान असलेले श्री. महेश भाटवडेकर यांनी त्यांच्या दुकानाबाहेर फटाक्यांच्या संदर्भात सर्व ग्राहकांना विनंती आणि आवाहन करणारा फलक लावला आहे. या फलकावर निषेध ! निषेध !! निषेध !!! सर्व ग्राहकांना विनंती आहे ... आमच्याकडे शत्रूराष्ट्राला मदत करणार्‍या राष्ट्राचे (Made in China) फटाके मिळत नाहीत आणि तुम्हीही ते खरेदी करू नयेत, असे लिखाण केले आहे.
     हिंदु जनजागृती समितीही चिनी फटाक्यांच्या विरोधात मोहीम राबवत आहे. याच उद्देशाने समितीचे डॉ. समीर घोरपडे हे फटाक्यांच्या संदर्भात निवेदन देण्यासाठी श्री. महेश भाटवडेकर यांच्याकडे गेले असता श्री. भाटवडेकर यांनी त्यांनी या संदर्भात केलेली वरील कृती सांगितली. श्री. भाटवडेकर म्हणाले, समितीने हे निवेदन दिले, हे बरे झाले. त्यामुळे आम्ही केलेली कृती योग्य असल्याची पोच मिळाली.

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या साडेबारा कोटी रुपयांच्या निविदेमध्ये घोटाळा - गोवा फॉर्वर्ड

      पणजी, २७ ऑक्टोबर (वार्ता.) - ४७ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन आणि समारोप समारंभ, तसेच सजावट यांसंबंधी काढण्यात आलेल्या साडेबारा कोटी रुपयांच्या निविदेमध्ये घोटाळा झाला आहे. या घोटाळ्याला अनुसरून गोवा लोकायुक्ताकडे तक्रार करण्यात येणार असल्याची माहिती गोवा फॉर्वर्ड पक्षाचे दुर्गादास कामत यांनी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.बस्तर (छत्तीसगड) येथे पोलिसांनी नक्षलवाद समर्थकांचे पुतळे जाळले !

पोलिसांवर अशी आंदोलने करून पुतळे जाळण्याची वेळ येते, हे दुर्दैवी !
       रायपूर (छत्तीसगढ) - २७ ऑक्टोबरला छत्तीसगढच्या बस्तर शहरात पोलिसांनी निदर्शने करत नक्षलवाद्यांचे समर्थन करणारे राजकारणी आणि काही समाजकंटक यांचे पुतळे जाळले. (राजकारणीच नक्षलवादाला समर्थन करत असतील, तर नक्षलवाद संपुष्टात येईल का ? नक्षलवाद संपवायचा असेल, तर त्याला समर्थन करणार्‍यांना आधी कारागृहात डांबणे आवश्यक ! - संपादक) वर्ष २०११ मध्ये ताडमेटला गावामध्ये १६० घरांना जाळण्यात आल्याच्या घटनेत केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआयने) पोलिसांना उत्तरदायी ठरवले आहे. त्याविरोधात पोलीस निदर्शने करत होते. राज्यातील जगदलपूर, दंतेवाडा, बिजापूर, कोंडगांव, सुकमा आणि नारायणपूर येथील पोलीस गणवेश घालून या निदर्शनात सहभागी झाले होते. या प्रकरणी ७ विशेष पोलीस अधिकार्‍यांच्या विरोधात आरोपपत्र प्रविष्ट करण्यात आले आहे. पोलिसांनी सांगितले की, प्रतिदिन आम्ही कठीण परिस्थितीशी लढत असतो; परंतु नक्षलवाद्यांचे समर्थक आमच्यावर प्रतिदिन आरोप करत असतात. या पोलिसांमध्ये अधिक पोलीस पूर्वी नक्षलवादी होते आणि नंतर ते पोलीस खात्यात नोकरीला लागले.चिनी बनावटीच्या उत्पादनांवर बहिष्कार घालण्याची बजरंग दलाची मागणी

भारतियांनो, चिनी वस्तू जरी स्वस्त असल्या, तरी राष्ट्रीय अस्मिता 
ही अत्यंत महत्त्वाची आहे ! जो देश भारताच्या मुळावर उठला आहे, त्याच्या वस्तू 
खरेदी करणे, हे चुकीचे नव्हे का ? हे लक्षात घेऊन सर्व चिनी वस्तूंवर बहिष्कार घाला !
चिनी आकाशकंदिल
      बेंगळुरू - चीनने पाकिस्तानशी हातमिळवणी केली आहे. त्यामुळे चिनी बनावटीच्या उत्पादनांवर बहिष्कार घालण्यात यावा, अशी मागणी बजरंग दलाचे राष्ट्रीय प्रवक्ता राजेश पांडे यांनी येथे केली. बजरंग दलाच्या विभागीय शिबिराचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. भारतियांच्या या कृतीमुळे आतंकवादाचे समर्थन करणारे वठणीवर येतील, असे श्री. पांडे यांनी सांगितले. दादरी हत्याकांडानंतर देशातील पुरोगाम्यांनी असहिष्णुतेविषयी आवाज उठवला होता; मात्र सहस्रावधी हिंदूंना काश्मीरमधून जेव्हा हाकलून लावले जात होते, तेव्हा ही बुद्धीवादी मंडळी कुठे होती, असा प्रश्‍न श्री. पांडे यांनी या वेळी उपस्थित केला. जेव्हा हिंदूंवर आक्रमण होते, तेव्हा हे पुरोगामी गप्प बसतात, असा आरोप श्री. पांडे यांनी केला.

आंध्रप्रदेशातील शिवसेनेकडून चिनी वस्तूंंवर बहिष्कार घालण्याचे आवाहन !

पत्रकार परिषदेला संबोधित करतांना श्री. टी.एन्. मुरारी
        भाग्यनगर - आंध्रप्रदेशातील शिवसेनेचे राज्य प्रमुख श्री. टी.एन्. मुरारी यांनी राज्यातील जनतेला चिनी वस्तूंंवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले आहे. एका पत्रकार परिषदेद्वारे त्यांनी हे आवाहन केले आहे.

देवतांची विटंबना करणार्‍या आणि चिनी बनावटीच्या फटाक्यांची विक्री थांबवा !

फोंडा (गोवा) येथे निदर्शनाद्वारे हिंदु संघटनांची मागणी
फलक घेऊन निदर्शने करतांना राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी हिंदू
     फोंडा (गोवा), २७ ऑक्टोबर (वार्ता.) - प्रदूषणकारी आणि हिंदूंच्या देवता अन् राष्ट्रपुरुष यांची विटंबना करणार्‍या फटाक्यांची निर्मिती आणि विक्री थांबवावी, तसेच अवैधपणे विक्री होत असलेल्या चिनी बनावटीच्या फटाक्यांवर बंदी घालावी. नागरिकांनी या फटाक्यांचा वापरही टाळावा, असे आवाहन हिंदु जनजागृती समिती आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी २६ ऑक्टोबर या दिवशी फोंडा शहरात निदर्शनाद्वारे केले.

अमेरिकेत चर्चमध्ये महिला ख्रिस्ती धर्मप्रसारकाकडून युवकाची हत्या !

अत्याचाराचे केंद्र बनलेले चर्च !
      न्यूयॉर्क - युटिका शहरातील एका चर्चमध्ये २ बंधूंना बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीमुळे एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा गंभीररित्या घायाळ झाला. (भारतीय प्रसारमाध्यमे असली वृत्ते का छापत नाहीत ? एखाद्या हिंदु संतांच्या आश्रमात किंवा मंदिरात अशी घटना घडली असती, तर प्रसारमाध्यमांनी दिवसभर ब्रेकिंग न्यूज म्हणून हे वृत्त वारंवार प्रसारित केले असते. यातून प्रसारमाध्यमांचा हिंदुद्वेष दिसून येतो ! - संपादक) या मनुष्यवधाविषयी चर्चच्या पाद्य्राकडून क्षमायाचना करण्यात आली आहे. या प्रकरणी वर्ड ऑफ लाईफ ख्रिस्ती चर्चच्या महिला धर्मप्रसारक टिफानी आयर्विन, त्यांचा भाऊ जोजेफ आयर्विन, आई, पुत्र आणि चर्चचे सदस्य लिंडा मरे अन् डॅविड मरे यांना न्यायालयाने दोषी ठरवले आहे.

आग्रा येथे फटाक्यांद्वारे देवता आणि राष्ट्रपुरुष यांचा होणारा अवमान रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीकडून प्रशासनाला निवेदन !

      आग्रा - येथे हिंदु जनजागृती समितीकडून शहर साहाय्यक दंडाधिकारी धर्मेंद्र सिंह यांना दीपावली निमित्त हिंदूंच्या देवता आणि राष्ट्रपुरुष यांची चित्र असणार्‍या फटाक्यांमुळे होणार त्यांचा अवमान रोखण्यासाठी आणि प्रदूषण रोखण्यासाठी निवेदन देण्यात आले. या वेळी समितीचे सर्वश्री अजय अग्रवाल, संजीव आणि शुभम उपस्थित होते.

अवैध मशिदींवरील बंदीच्या विरोधात रोम शहरात मुसलमानांची विराट निदर्शने !

मुसलमान जगाच्या पाठीवर कुठेही असोत, त्यांच्यातील 
धर्मांधता तसूभरही अल्प होत नाही, याचे हे उदाहरण होय ! 
      रोम (इटली) - इटलीतील मुसलमान तरुणांचे जिहादीकरण करणार्‍या अवैध मशिदींना प्रशासनाने टाळे ठोकल्यावरून सहस्रो मुसलमानांनी रोम शहरातील प्राचीन रोमनकालीन स्टेडीयम कोलोसियमच्या समोर अल्लाहू अकबरचे नारे देत निदर्शने केली. (जिहादला प्रोत्साहन देणार्‍या मशिदींवर कारवाई करण्याची मागणी करण्याऐवजी धर्मांध मुसलमान त्यांच्यावर कारवाई केली; म्हणून विरोध करतात, हे संतापजनक ! असे मुसलमान जगाच्या पाठीवर कुठेही असले, तरी ते सामाजात अशांतताच माजवणार, हे लक्षात घ्या ! - संपादक)

जर्मनीतील ख्रिस्ती आणि याजिदी यांच्या निर्वासित छावण्यांमध्ये जिहाद्यांकडून शेकडो शरणार्थींवर लैंगिक अत्याचार !

      बर्लिन (जर्मनी) - जर्मनीतील निर्वासित छावण्यांमध्ये सुमारे ७४३ ख्रिस्ती आणि १० यजिदी शरणार्थीं हे जिहादी कारवायांचे बळी ठरले आहेत. छावण्यांतील धर्मांध शरणार्थी आमच्यावर हिंसक आक्रमणे करतात. तसेच आमच्यावर लैंगिक अत्याचार करतात, असा आरोप ख्रिस्ती शरणार्थींनी केला आहे. या आक्रमणापासून अल्पसंख्यांक ख्रिस्त्यांना सुरक्षा पुरवण्यासाठी शासनाने प्रयत्न करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. गेल्या १ वर्षात जर्मनीमध्ये १० लक्ष शरणार्थींनी आश्रय घेतला आहे. यांपैकी बहुसंख्य मुसलमान असून ते अल्पसंख्यांक ख्रिस्ती आणि याजिदी शरणार्थींवर अत्याचार करतात. त्यांना जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. त्यामुळे ख्रिस्ती शरणार्थींचे छावण्यामधील जगणे कठीण झाले आहे, असे अहवालात म्हटले आहे.


अमेरिकेच्या राजदूतांच्या दौर्‍याला चीनचा आक्षेप !

       बीजिंग - भारतातील अमेरिकेचे राजदूत रिचर्ड वर्मा २२ ऑक्टोबरला अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्या निमंत्रणावरून अरुणाचल प्रदेशमधील तवांग शहराच्या दौर्‍यावर गेले होते. यावर चीनने टीका करतांना चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता लू कांग यांनी म्हटले की, हा वादग्रस्त भाग आहे. भारत आणि चीन मिळून हा वाद सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. कोणत्याही तिसर्‍या देशाच्या हस्तक्षेपामुळे हा वाद आणखी जटील होईल. चीनचे प्रवक्ता लू म्हणाले की, आम्ही अमेरिकेच्या राजदूतांच्या अधिकृत दौर्‍याची दखल घेतली आहे. आम्ही या दौर्‍याला तीव्र विरोध करत आहोत. चीन अरुणाचल प्रदेशला त्याचा भाग समजतो आणि त्याला दक्षिण तिबेट असे संबोधतो.

सनातनचा एक ग्रंथ म्हणजे १०० चांगल्या मित्रांच्या समान ! - भाजपचे माजी आमदार श्री. अप्पासाहेब पट्टणशेट्टी

डावीकडून साधिका श्रीमती गंगा वठार, 
श्री. अप्पासाहेब पट्टणशेट्टी, साधक 
श्री. सुरेंद्र चाळके आणि श्री. विठ्ठल कटकधोंड
      विजयपूर (कर्नाटक) - येथील श्री सिद्धेश्‍वर देवस्थानसमोर सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले होते. २२ ऑक्टोबरला विजयपूरचे भाजपचे माजी आमदार श्री. अप्पासाहेब पट्टणशेट्टी आणि विजयपूरचे भाजपचे जिल्हाध्यक्ष श्री. विठ्ठल कटकधोंड यांनी ग्रंथप्रदर्शनाला भेट दिली. श्री. पट्टणशेट्टी म्हणाले की, आध्यात्माद्वारे जीवनातील तणावाचे निवारण करणारे ग्रंथच उत्तम साधन आहे. हे ग्रंथ मनुष्यातील असणारे अज्ञान दूर करून दिव्य ज्ञानाचा प्रकाश देणारे आहेत. सनातनचा एक ग्रंथ म्हणजे १०० चांगल्या मित्रांच्या समान आहे. हे एक सामाजिक सुधारणेचे चांगले कार्य आहे. सनातनचे ग्रंथ प्रदर्शन यशस्वी होवो.

इटलीला भूकंपाचा धक्का !

   रोम - इटलीची राजधानी रोम आणि मध्यवर्ती क्षेत्र यांना भूकंपाचा धक्का बसला. पहिल्या धक्क्यानंतर २ घंट्यांनी दुसरा धक्का बसला. यामुळे नागरिक घरातून बाहेर रस्त्यावर आले. पहिल्या धक्क्याची तीव्रता रिश्टर स्केलवर ५.४, तर दुसर्‍याची ५.९ इतकी होती. यात विस्सो शहरातील २ नागरिक घायाळ झाले. २ महिन्यांपूर्वी इटलीत झालेल्या भूकंपामुळेे अनेक गावे नष्ट झाली होती. यात ३०० हून अधिक नागरिक ठार झाले होते. 
महर्षींनी प्रलयकालाविषयी सतर्क करणे
   १९.३.२०१६ या दिवशी झालेल्या नाडीवाचन क्रमांक ६७मध्ये महर्षि म्हणतात, हे पूर्ण वर्ष प्रलयकालाचे आणि आपत्तीजनक असणारे आहे. (इटलीची राजधानी रोम आणि मध्यवर्ती क्षेत्र यांना भूकंपाचा धक्क बसला. या घटनेवरून प्रलयकालाविषयी महर्षींनी केलेले भाष्य किती तंतोतंत आहे, हे लक्षात येते ! - संपादक) 

अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासाठी ३६०० कोटी रुपयांना संमती !

    मुंबई, २७ ऑक्टोबर (वार्ता.) - समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासाठी ३ सहस्र ६०० कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी २६ ऑक्टोबर या दिवशी संमती दिली आहे. आचारसंहितेतही निवडणूक आयोगाच्या अनुमतीने निधी संमत केला जाईल, अशी माहिती शिवस्मारक समितीचे अध्यक्ष श्री. विनायक मेटे यांनी दिली. निवडणूक आयोगाकडून अनुमती मिळाल्यास निविदा प्रक्रिया पूर्ण करून पंतप्रधान श्री. नरेंद मोदी यांच्या हस्ते शिवस्मारकाचे उद्घाटन करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
    शिवस्मारक प्रकल्पासाठी लागणारा निधी राज्य शासनाकडून उपलब्ध केला जाणार असून यातील काही प्रमाणात निधी केंद्र शासनाकडून मिळणार आहे. या प्रकल्पाचे काम दोन टप्प्यांत होणार आहे. वर्ष २०१९ पर्यंत पहिला टप्पा पूर्ण होईल.

उसाला एकरकमी आणि विनाकपात ३ सहस्र २०० रुपयांची पहिली उचल द्या ! - राजू शेट्टी

   जयसिंगपूर, २७ ऑक्टोबर - गेल्या वर्षीची साखर देशभरात शिल्लक नाही. त्यामुळे या वर्षी उत्पादित होणार्‍या साखरेला चांगला भाव मिळणार आहे. त्यातच शासनाने परदेशारातून आयात होणार्‍या साखरेवर ४० प्रतिशत आयात कर बसवला आहे. त्यामुळे राज्यातील साखर कारखानदारांनी यंदाच्या गाळप होणार्‍या उसाला ३ सहस्र २०० रुपयांची उचल द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी जयसिंगपूर येथील ऊस परिषदेत केली.
या वेळी ते म्हणाले....
१. यापूर्वी ऊसदरप्रश्‍नी इंदापूर, कराड, बारामती येथे आंदोलने करावी लागली. सध्याच्या शासनाने आमच्या भावना समजून घेऊन प्रतिसाद दिल्याने आम्हाला आंदोलनापेक्षा चर्चेतून प्रश्‍न सोडवावेसे वाटले.

कोल्हापूर विभाग माहिती खात्याच्या उपसंचालकपदी सतीश लळीत !

श्री. सतीश लळीत यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतांना संप्रदा बीडकर
   सांगली, २७ ऑक्टोबर (वार्ता.) - माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या कोल्हापूर विभागाच्या उपसंचालक (माहिती) पदाचा कार्यभार सतीश लळीत यांनी २५ ऑक्टोबर या दिवशी स्वीकारला. या वेळी सांगली जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर यांनी त्यांचे स्वागत केले. श्री. लळीत यांनी यापूर्वी मुख्यमंत्र्यांचे मुख्य जनसंपर्क अधिकारी म्हणून काम केले आहे. आजच्या काळात सामाजिक संकेतस्थळ हे अत्यंत महत्त्वाचे आणि लोकप्रिय संपर्क माध्यम आहे. शासनाच्या विविध योजना, उपक्रम, लोकाभिमुख निर्णय यांची माहिती तात्काळ जनतेपर्यंत पोचण्यासाठी त्या माध्यमाचा प्रभावी वापर करण्यासाठी प्रयत्न करू, असा मनोदय श्री. लळीत यांनी या वेळी व्यक्त केला.

अ‍ॅट्रॉसिटीचा कायदा ब्राह्मणांनाही लागू करा ! - रवीकिरण साने

   पिंपरी (पुणे), २७ ऑक्टोबर - अ‍ॅट्रॉसिटीचा कायदा ब्राह्मणांनाही लागू करावा. तसेच तो सर्वच जाती आणि धर्म यांच्यासाठी लागू केल्यास कोणीच कोणाला जातीवरून बोलणार नाही, असे प्रतिपादन अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे प्रवक्ते रवीकिरण साने यांनी केले. चिंचवडमधील दर्शन हॉलमध्ये अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने एका विशेष मेळाव्याचे आयोजन केले होते. त्या वेळी ते बोलत होते. या मेळाव्यात ब्राह्मण समाजानेही मोर्चा काढण्याची आवश्यकता व्यक्त केली. या मेळाव्याला ज्येष्ठ साहित्यिक
ह. मो. मराठे, महासंघाचे महासचिव मुकुंद कुलकर्णी आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

निजामपुरा (भिवंडी) पोलीस निरीक्षकांना लाच घेतांना अटक !

     ठाणे - पोलीस ठाण्यात प्रविष्ट झालेल्या गुन्ह्यात आरोपीला अटक न करण्यासाठी आणि 'ब' समरी बनवण्यासाठी १ लक्ष रुपयांची लाच घेणार्‍या भिवंडी येथील निजामपुरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब बेदरे यांना अटक करण्यात आली आहे. (अशा लाचखोरांचे नुसते निलंबन नको, तर त्यांच्यावर कठोर कारवाई करून त्यांची सर्व संपत्ती कह्यात घ्यायला हवी ! - संपादक) तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.

नागपूर येथील कार्यक्रमात गायिका अंजली भरती यांच्याकडून हिंदु देवतांचे विडंबन !

  • धर्माभिमान्यांनी तक्रार प्रविष्ट केल्यानंतर पोलिसांकडून गुन्हा प्रविष्ट !
  • असे धर्माभिमानी हिंदू सर्वत्र हवेत !
     बडनेरा, २७ ऑक्टोबर (वार्ता.) - नागपूर येथील कार्यक्रमात गायिका अंजली भरती यांनी हिंदु धर्माविषयी आक्षेपार्ह विधान केल्याने संतप्त झालेल्या धर्माभिमानी हिंदूंनी हिंदु धर्म आणि देवता यांच्या विरोधात बोलणार्‍या गायिका भरती आणि आयोजक यांच्या विरोधात बडनेरा पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी भरती आणि आयोजक यांच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट केला आहे. (हिंदु धर्म आणि देवता यांचे विडंबन करणार्‍या गायिका अंजली भरती यांच्या विरोधात तत्परतेने तक्रार करणार्‍या धर्माभिमान्यांचे अभिनंदन ! अशी कृती सर्वत्र केल्यास हिंदु धर्म आणि देवता यांचे विडंबन रोखण्यास वेळ लागणार नाही. - संपादक)

हिंदु धर्मजागृती सभा यशस्वी करण्यासाठी शहर आणि ग्रामीण भागात बैठका घेऊन जोरदार प्रसार करण्याचा हिंदुत्वनिष्ठांचा निर्धार !

कोल्हापूर येथे हिंदु धर्मजागृती सभेच्या निमित्ताने हिंदुत्वनिष्ठांची बैठक 
बैठकीत उपस्थित हिंदुत्वनिष्ठ 
     कोल्हापूर, २७ ऑक्टोबर (वार्ता.) - येथील पद्माराजे गर्ल्स हायस्कूल येथे ११ नोव्हेंबर या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्‍वभूमीवर सभेच्या प्रसाराची दिशा ठरवण्यासाठी २५ ऑक्टोबर या दिवशी येथील शाहूपुरी, कुंभार गल्लीमधील श्री पंचमुखी गणेश मंदिर विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला २५ हून अधिक हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी आणि धर्माभिमानी उपस्थित होते. या वेळी हिंदु धर्मजागृती सभा यशस्वी करण्यासाठी शहर आणि ग्रामीण भागात बैठक घेऊन जोरदार प्रसार करण्याचा निर्धार हिंदुत्वनिष्ठांनी बैठकीत केला. या बैठकीत अनेक रणरागिणींनी धर्मसभेच्या प्रसारकार्यात अधिकाधिक वेळ देणार असल्याचे सांगितले.

भाऊबीजेला मुंबई परिसरात बेस्ट च्या १३३ अधिक फेर्‍या सोडण्यात येणार

    मुंबई, २७ ऑक्टोबर (वार्ता.) - मंगळवार, १ नोव्हेंबर या दिवशी भाऊबीजेनिमित्त प्रवाशांच्या सोयीसाठी मुंबई शहर, पूर्व-पश्‍चिम उपनगरे, मीरारोड, भाईंदर, मॅरेथॉन चौक (ठाणे), कोपरी (ठाणे), कॅडबरी जंक्शन (ठाणे), रेतीबंदर-कळवा यांसह वाशी, नवी मुंबई, कोपरखैरणे, नेरूळ, ऐरोली, घणसोली गाव, सीबीडी बेलापूर आदी विविध मार्गांवर बसगाड्यांच्या १३३ अधिक फेर्‍या सोडण्यात येणार आहेत, अशी माहिती बेस्टकडून एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे. दिवाळीनिमित्त बेस्टकडून २१ ऑक्टोबरपासून वीर कोतवाल, उद्यान प्लाझा, दादर, वांद्रे, महात्मा फुले मार्केट, काळबादेवी, ए.पी.एम्.सी. मार्केट, वाशी इत्यादी ठिकाणी बसगाड्यांच्या २० अधिक फेर्‍या सोडण्यात येत आहेत.

धर्म आणि जात यांच्या आधारे मते मागण्यात भ्रष्टाचार कसा ? - सर्वोच्च न्यायालय

जर भारतात धर्म आणि जात यांच्या आधारे मते मागणे 
गुन्हा होऊ शकत नाही, तर या देशाला 'निधर्मी व्यवस्था' म्हणण्यात काय अर्थ आहे ? 
     नवी देहली - धर्म किंवा जात ही दोन सूत्रे नेहमी भारतीय राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिली आहेत. असे असतांना धर्म आणि जातीपातीच्या आधारावर एखाद्या राजकीय पक्षाने किंवा पक्षाच्या उमेदवाराने मतदारांकडे मते मागितली, तर तो भ्रष्टाचार कसा ठरेल, असा प्रश्‍न सर्वोच्च न्यायालयानेच उपस्थित केला आहे. सरन्यायाधीश टी.एस्. ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालील ७ सदस्यांच्या पिठापुढे सध्या हिंदुत्वाच्या सूत्रावरून युक्तीवाद चालू आहे. त्या वेळी न्यायालयाने वरील प्रश्‍न उपस्थित केला. 

ध्वनीप्रदूषण झाल्यास पोलिसांवर अवमानाची कारवाई करण्यात येणार ! - मुंबई उच्च न्यायालय

ध्वनीप्रदूषणप्रकरणी न्यायालयाने पोलीस प्रशासनावर कारवाई करावी, ही जनतेची अपेक्षा ! 
     मुंबई - उत्सवांच्या काळात ध्वनीप्रदूषण करणार्‍यांवर कारवाई करण्याविषयी पोलीस असमाधानकारक कामगिरी करत आहेत. ध्वनीप्रदूषणासंबंधी राज्याच्या मुख्य सचिवांनी नियमांची अंमलबजावणी आणि पाहणी करून त्याचा अहवाल सादर करावा, असे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती अमजद सय्यद यांच्या खंडपिठाने सांगितले. तसेच ध्वनीप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन करणार्‍या वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांवर न्यायालयाचा अवमान केल्याची कारवाई करणार, असे सांगून न्यायालयाने बोरिवली आणि उल्हासनगर येथील साहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या विरोधात २६ ऑक्टोबर या दिवशी अवमानाची नोटीसही बजावली. (मशिदींच्या भोंग्याद्वारे होणार्‍या ध्वनीप्रदूषण थांबवण्याविषयी काहीही कृती न करणार्‍या पोलिसांवरही न्यायालयाने कारवाई करावी, ही अपेक्षा ! - संपादक) 

पाकिस्तानी कलाकारांचे चित्रपट प्रदर्शित न करण्यासाठी कराड येथे चित्रपटगृहांना निवेदन

चित्रपटगृहाचे मालक श्री. शेवाळे (मध्यभागी) यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ
     कराड (जिल्हा सातारा), २७ ऑक्टोबर (वार्ता.) - पाकिस्तानातील कलाकारांच्या चित्रपटांवर प्रतिबंध घालून ते प्रदर्शित न करून देशभक्तीचा संघटित आविष्कार दाखवण्याविषयीचे निवेदन नुकतेच कराड येथील चित्रपटगृहांना हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी दिले. उरी येथील आक्रमणानंतर संपूर्ण भारतात पाकिस्तानच्या विरोधात जनभावना तीव्र आहेत; परंतु भारतातीलच काही नतद्रष्ट चित्रपट निर्माते पाकिस्तानी कलाकारांना घेऊन गल्लाभरू चित्रपटांची निर्मिती करत आहेत. पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करण्यास अनुमती देणे म्हणजे भारतीय जवानांच्या बलिदानावर आणि त्यांच्या कुटुंबियांच्या जखमांवर मीठ चोळणे; नव्हे हा उघडउघड राष्ट्रद्रोह करणे आहे. तरी असे चित्रपट प्रदर्शित करू नये, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. 

अंधश्रद्धा निर्मूलनाचे जनक असल्याचे फुकटचे श्रेय दाभोलकरांना घ्यायचे होते ! - पू. सुनील चिंचोलकर

     सातारा, २७ ऑक्टोबर (वार्ता.) - महाराष्ट्रातील कोणत्याही संतांनी अंधश्रद्धेला खतपाणी घातले नाही. संत तुकाराम महाराज, संत रामदास स्वामी यांनी त्यांच्या लिखाणातून अंधश्रद्धेवर प्रहार केले आहेत. संत कबीर, विवेकानंद, नानक यांनीही अंधश्रद्धेला नाकारून बुद्धीप्रामाण्याचा पुरस्कार केला. डॉ. दाभोलकर यांनी मात्र अंधश्रद्धा निर्मूलनाचे कथित कार्य करत असतांना संतांचे संदर्भ कधीच सांगितले नाहीत; कारण ते जर सांगितले असते, तर लोकांनी संतसाहित्य वाचले असते. त्यामुळे दाभोलकरांची बुवाबाजी बंद पडली असती. दाभोलकरांना स्वतःलाच महाराज व्हायचे होते. अंधश्रद्धा निर्मूलन स्वतःच शोधून काढले असल्याचे श्रेय त्यांना हवे होते. आपणच अंधश्रद्धा निर्मूलनाचे जनक असल्याचे फुकटचे श्रेय दाभोलकरांना घ्यायचे होते. जर लोकांनी खरेच डोळस श्रद्ध व्हावे, असे दाभोलकरांना वाटत होते, तर त्यांनी संतांचे संदर्भ का सांगितले नाहीत ?, असा परखड प्रश्‍न उपस्थित करत ज्येष्ठ समर्थभक्त पू. सुनीलजी चिंचोलकर यांनी अंधश्रद्धेच्या नावाखाली लोकांच्या धार्मिक श्रद्धा उखडू पहाणार्‍या अंनिसच्या दाभोलकर यांच्या कार्याचा बुरखा फाडला. येथील समर्थसदन येथे आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानमालेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. 

कोल्हापूर येथे चित्रपटगृह मालकांनी ऐ दिल है मुश्किल हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित करू नये ! - पतित पावन संघटनेची निदर्शनाद्वारे मागणी

पाकिस्तान आणि चीन देशांच्या ध्वजांची होळी ! 
 पोलीस निरीक्षक श्री. अनिल देशमुख यांना निवेदन देतांना धर्माभिमानी
     
पाकिस्तान आणि चीन देशांच्या ध्वजांची होळी करतांना धर्माभिमानी
     कोल्हापूर, २७ ऑक्टोबर (वार्ता.) - करण जोहर दिग्दर्शित ऐ दिल है मुश्किल हा चित्रपट २८ ऑक्टोबर या दिवशी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. येथील कोणत्याही चित्रपटगृहात हा चित्रपट प्रदर्शित करू नये आणि चिनी मालाची नागरिकांनी खरेदी थांबवावी, या मागण्यांसाठी पतित पावन संघटनेच्या वतीने येथील छत्रपती शिवाजी चौक येथे २६ ऑक्टोबर या दिवशी सकाळी ११.३० वाजता निदर्शने करण्यात आली. या वेळी धर्माभिमान्यांनी पाकिस्तान आणि चीन या देशांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून या दोन्ही देशांच्या ध्वजांची होळी केली. (राष्ट्रप्रेमापोटी पाकिस्तानी कलाकारांच्या चित्रपटाला विरोध करणार्‍या सर्व धर्माभिमान्यांचे अभिनंदन ! यातून बोध घेऊन अशी कृती सर्व ठिकाणी असलेल्या धर्माभिमान्यांनी केल्यास देशात पाकिस्तान कलाकारांचे चित्रपट प्रदर्शित व्हायचे कायमचे बंद होतील. - संपादक) 'ए दिल है मुश्किल' हा चित्रपट प्रदर्शित न करण्याविषयीचे निवेदन पतित पावन संघटनेच्या वतीने येथील चित्रपटगृह मालक आणि जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. अनिल देशमुख यांना २६ ऑक्टोबर या दिवशी देण्यात आले. 

चिनी उत्पादनांना विरोध करणे, हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य ! - नवीन सुर्वे, चुनाभट्टी सुधार समिती

चुनाभट्टी (मुंबई) येथील राष्ट्रीय हिंदू आंदोलनात चिनी उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन 
     मुंबई, २७ ऑक्टोबर (वार्ता.) - चीनची उत्पादने खरेदी करणे म्हणजे पाकिस्तानच्या आतंकवादी कारवायांना पाठिंबा देणार्‍या शत्रूराष्ट्राला एकप्रकारे साहाय्य करण्यासारखे आहे. हिंदु जनजागृती समिती राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या माध्यमातून चिनी उत्पादनांच्या विरोधात आवाज उठवत आहे. हिंदु जनजागृती समिती राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या माध्यमातून चिनी उत्पादनांना विरोध करत आहे. चिनी उत्पादनांना विरोध करणे, हे कुणा एका संघटनेचे दायित्व नाही, तर राष्ट्रावरील या संकटाला विरोध करणे, हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन चुनाभट्टी सुधार समितीचे श्री. नवीन सुर्वे यांनी केले. २३ ऑक्टोबर या दिवशी चुनाभट्टी येथे घेण्यात आलेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनात ते बोलत होते. या आंदोलनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्‍व हिंदू परिषद, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, हिंदु जनजागृती समिती आदी संघटना सहभागी झाल्या होत्या. आझाद गल्ली येथील धर्माभिमानी युवक यांसह ३० राष्ट्र आणि धर्म प्रेमी या आंदोलनात सहभागी झाले होते. 

रत्नागिरीतील कुरचुंब येथे गांगेेश्‍वर मंदिराच्या घुमटांवरील कळसांची चोरी

हिंदूंची असुरक्षित मंदिरे !
       लांजा - तालुक्यातील कुरचुंब गावचे ग्रामदैवत गांगेश्‍वर मंदिराच्या घुमटावरील कळस आणि अन्य साहित्य यांची चोरी झाल्याचे लक्षात आले असून चोरट्याविरुद्ध लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. गांगेश्‍वर मंदिरातील पावणाईदेवी, नवलादेवी, धनीनदेवी, ब्राह्मणेश्‍वर देवी, इटलादेवी, भराडीनदेवी आदींसह या देवळामध्ये पाषाणाच्या आठ घुमट्या आहेत. या घुमट्यांवर पितळेचे कळस बनवण्यात आले होते. याशिवाय मंदिरातील पितळेच्या पाच समया, भिंतीवरील पंखा, तांब्याची कळशी, दोन पितळेची मोठी पातेली, दोन हॅलोजन दिवे आदी साहित्य होते. २३ आक्टोबरच्या सकाळी संजय पांडुरंग गुरव हे देवांची पूजा करण्यास आले होते. त्या वेळी वरील सर्व साहित्य जागेवर होते; मात्र २४ ऑक्टोबरच्या सकाळी ९ वाजता पूजा करण्यासाठी गुरव गेले असता देवाच्या घुमट्यांवरील कळस चोरले गेल्याचे लक्षात आले. त्यानंतर गुरव यांनी अन्य साहित्य सुरक्षित आहे का ?, हे पाहिले असता तेही चोरीस गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. मंदिरात चोरी झाल्याने पुजारी संजय गुरव यांनी कुरचुंबचे पोलीसपाटील द्वारकानाथ माने यांच्याशी संपर्क साधला आणि चोरी झाल्याची माहिती दिली.

कोल्हापूर येथील सनातनच्या साधिका सौ. विद्या कदम यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार प्रदान !

सौ. विद्या कदम यांचे अभिनंदन !
भगवान श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळेच पुरस्कार मिळाला !
पुरस्कार मिळाल्याविषयी सौ. विद्या कदम म्हणाल्या की, देशाच्या विकासासाठी आणि सुसंस्कारित पिढी घडवण्यासाठी शिक्षकांचा महत्त्वाचा वाटा असतो. त्याचे दायित्व रोटरी क्लबने दिले आहे. भगवान श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळेच मला हा पुरस्कार मिळाला आहे. 
----------------------
सौ. विद्या कदम
कोल्हापूर, २७ ऑक्टोबर (वार्ता.) - येथील कसबा बावडा येथे रहाणार्‍या सनातनच्या साधिका आणि वडगणे (जिल्हा कोल्हापूर) येथील विद्या मंदिर शाळेतील शिक्षिका सौ. विद्या बाबासाहेब कदम यांना २१ ऑक्टोबर या दिवशी आदर्श शिक्षिका पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. शिवाजी विद्यापिठातील टेक्नॉलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. बागी यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार देण्यात आला. रोटरी क्लब औद्योगिक वसाहत शिरोली यांच्या वतीने नेशन बिल्डर अ‍ॅवार्ड या कार्यक्रमाचे आयोजन नागाळा पार्क येथील रोटरी क्लब येथे करण्यात आले होते. त्या वेळी सौ. कदम यांना हा पुरस्कार देण्यात आला.

हिंदु जनजागृती समितीच्या देहली येथील प्रसारकार्याचा १ ते २५ सप्टेंबर २०१६ या कालावधीतील आढावा

१. गणेशोत्सवानिमित्त प्रवचने, ग्रंथप्रदर्शन 
आणि धर्मशिक्षण फलक यांच्या माध्यमातून प्रसार
१ अ. लाजपत नगर येथे धर्मशिक्षण फलक आणि ग्रंथ यांच्या प्रदर्शनाचे आयोजन : श्री गणेश मंडळ, दक्षिण देहलीच्या वतीने लाजपत नगर येथे १० दिवस श्री गणेशोत्सव साजरा केला गेला. यात ९.९.२०१६ या दिवशी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता. कार्यक्रमामध्ये फलक प्रदर्शनाच्या माध्यमातून धर्मशिक्षणाचा विषय लोकांपर्यंत पोेचवला, तसेच राष्ट्र आणि धर्म यांविषयी ज्ञान देणार्‍या सनातनच्या दुर्मिळ ग्रंथसंपदेचा लाभ भाविकांनी घेतला. हळदी-कुंकवाचा समारंभ झाल्यानंतर समितीचे श्री. विनय पानवळकर यांनी श्री गणपतीविषयी शास्त्रोक्त माहिती सांगितली.

केरळ राज्याचा ऑक्टोबर २०१६ या मासातील दुसर्‍या आठवड्याचा हिंदु जनजागृती समितीच्या प्रसारकार्याचा आढावा !

१. केरळमध्ये पितृपक्ष केला जात नाही. येथील लोकांना त्याविषयी काहीच माहिती नाही. केरळमध्ये गुरुपौर्णिमेनंतर येणार्‍या अमावास्येला सर्वजण श्राद्ध करतात. या वर्षी नवीन चालू झालेल्या एका धर्मशिक्षण वर्गात पितृपक्ष आणि त्या काळात श्राद्ध करण्याचे महत्त्व याविषयी सांगितल्यावर वर्गात येणार्‍या २ महिलांनी श्राद्ध केल्याचे सांगितले. तसेच त्यांनी दत्ताचा नामजपही केला.
२. एर्नाकुलम् येथील एका धर्माभिमान्यांनी धर्मशिक्षणाचे १० फ्लेक्स फलक प्रायोजित करून ते राजराजेश्‍वरी मंदिरात विजयादशमीच्या आदल्या दिवशी लावले. हे फलक वाचून एका व्यक्तीने दुसर्‍या एका मंदिरात लावण्यासाठी फ्लेक्स फलक मागितले.
३. विजयादशमीच्या निमित्ताने एर्नाकुलम् जिल्ह्यात ४ मंदिरांमध्ये ग्रंथप्रदर्शने लावण्यात आली. त्यांतील एका मंदिरात धर्माभिमान्यांनी ग्रंथप्रदर्शन लावण्यास अनुमती घेतली, तर २ मंदिरांमध्ये धर्माभिमान्यांनी ग्रंथ प्रदर्शनाची सेवा केली. 
४. एक अधिवक्ता प्रतिवर्षी दिवाळीनिमित्त अनेकांना शुभेच्छापत्र पाठवतात. या वर्षी त्यांनी शुभेच्छापत्रकात लिहिण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचा काही मजकूर मागवला आहे.
- कु. अदिती सुखटणकर, हिंदु जनजागृती समिती, केरळ (१४.१०.२०१६)


सार्वजनिक बांधकाम विभागावर कारवाई केव्हा ?

      महाड येथील सावित्री पुलाच्या दुर्घटनेनंतर राज्यातील शिवकालीन आणि ब्रिटीशकालीन पुलांची पडताळणी करण्यात आली. त्यानंतर संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड-कन्नड राज्य महामार्ग क्र. ५१ वरील मोढावाडी जवळच्या नाल्यावरील ४० वर्षे जुना पूल ५ सप्टेंबर या दिवशी कोसळला. पूल कोसळण्याच्या या घटनांमुळे जीवितहानीही झाली. सदर घटनेनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने खडबडून जागे होत राज्यातील पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय घेतला. विभागाचे हे परीक्षण पूर्ण झाल्यानंतर राज्यातील पुलांचे भयावह चित्र समोर आले. त्यानुसार राज्यातील २ सहस्र १०० पूल हे वाहतुकीसाठी धोकादायक आहेत. त्यातील १०० पुलांची तातडीने दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे. पुलांची ही स्थिती लक्षात घेऊन कामाची पुढील दिशा ठरवण्यासाठी स्वतंत्र विभाग स्थापन करण्यात येणार असल्याचेही सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
     एकविसाव्या शतकातील भारतीय न्यायातील सर्वांत मोठी चूक म्हणजे ७९ वर्षीय पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांना न्यायालयाकडून जामीनासाठी मिळणारा सातत्याने नकार ! ही केस खोटी आहे. 
- सुप्रसिद्ध न्यायविद् डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी (ऋषी प्रसाद, ऑक्टोबर २०१६)

सुशिक्षित बेरोजगारांची सेना निर्माण करणारी सध्याची शिक्षणपद्धती !

    शिक्षण सम्राटांनी त्यांच्या धंदेवाईक शिक्षण संस्थांमधून कुचकामी शिक्षण देऊन समाजाच्या हाती ज्ञानाऐवजी निरर्थक पदव्यांची भंडारे दिली आहेत. अशिक्षित बेरोजगारांच्या जागी आता सुशिक्षित बेरोजगारांची सेना आम्ही सिद्ध केली. 
- श्री. अभय भंडारी, विटा, सांगली (साप्ताहिक वज्रधारी, वर्ष ७ वे, अंक २५, २५ जुलै ते ३१ जुलै २०१३)

तुम्ही सर्वधर्मसमानता मानता का ? मग या प्रश्‍नांची उत्तरे शोधा !

१. सरकारी खर्चाने अरेबिक भाषेची उन्नती केली जाते; पण संस्कृतची नाही. अरेबिक भाषा संस्कृतपेक्षा जास्त राष्ट्रीय आहे का?
२. आसाममधील आय.एम्.टी.डी. कायद्याने बांगलादेशी मुसलमानांना हिंदुस्थानात येऊन रहावयाचे आणि भारतीय नागरिक होण्याचे अधिकार दिले आहेत; परंतु भारतीय नागरिक जम्मू-काश्मीरमध्ये कायमचे राहू शकत नाहीत, असा दुजाभाव का?
- पी. देवमुथ्थु, संपादक, हिन्दू व्हॉईस

विश्‍वकल्याणासाठी भारताचे रक्षण आवश्यक !

     विश्‍वाचे कल्याण आणि लाभ यांच्यासाठी भारताचे रक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे; कारण केवळ भारतच विश्‍वाला शांती आणि न्याय व्यवस्था देऊ शकतो. 
- मदर, अरविंद आश्रम (हिन्दू चिंतन)


फाईव्ह स्टार हॉटेलआवश्यक होण्याचे खरे कारण !

       तो काळ फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये उतरण्याचा नव्हता. त्या वेळी घरातील आदरातिथ्य स्वीकारले जाई. आज ते नको असते; कारण हॉटेलमध्ये लेन-देन चालते. ती घरात कशी बरे चालणार ? बाई-बाटलीवाल्यांना तर नाहीच नाही ! - दादूमिया (संदर्भ : मासिक धर्मभास्कर, वर्षारंभ विशेषांक, मे २०१५)

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Pak Adhikrut Kashmirke nagrikoka Atyachari Pak senake virodhme evam Pakse swatantra honeke liye andolan! - Bharat sarkar In nagrikoke hitme kadam uthaye
जागो ! : पाक अधिकृत कश्मीर के नागरिकों का अत्याचारी पाक सेना के विरोध में एवं पाक से स्वतंत्र होने के लिए आंदोलन. - भारत सरकार इन नागरिकों के हित में कदम उठाए !
फलक प्रसिद्धीकरता

पाकव्याप्त काश्मीरला स्वतंत्र करण्यासाठी भारताने पावले उचलावीत !
   पाकच्या कह्यातील काश्मीरमधील नागरिकांनी पुन्हा एकदा स्वातंत्र्यासाठी आंदोलन उभारले आहे. त्यांनी त्यांच्यावर अत्याचार करणार्‍या पाक सैन्याला तेथून हटवण्याची मागणी केली आहे. पाक स्वतःलाच सावरू शकत नाही, अशी संतप्त नागरिकांची प्रतिक्रिया आहे.

निरपेक्ष, अनासक्त आणि सेवाभाव असलेले रायगड जिल्ह्यातील नागोठणे येथील पू. अनंत (तात्या) पाटील (वय ८७ वर्षे) !

पू. अनंत पाटील
       वर्ष २०१६ च्या गुरुपौर्णिमेला रायगड जिल्ह्यातील नागोठणे येथे रहाणारे श्री. अनंत (तात्या) पाटील यांना संतपद प्राप्त झाल्याचे घोषित करण्यात आले. ते ८७ वर्षांचे आहेत. ते वर्ष १९९४ पासून सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करत आहेत. सध्या ते समष्टीसाठी नामजप करतात. ते आदर्श कुटुंबप्रमुख आहेत. त्यांनी संसारात राहून साधना केली. पू. तात्यांना कुणाविषयी कधीही प्रतिक्रिया किंवा अपेक्षा नसतात. त्यामुळे ते कधीच निराश आणि नकारात्मक नसतात. ते या वयातही उत्साही असतात. साधकांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
१. व्यवस्थितपणा 
      पू. तात्यांनी त्यांची दैनिक सनातन प्रभातच्या अहवालाची वही मला दिली. ती इतकी नीटनेटकी होती की, मला कधी कुठलीच अडचण आली नाही. - श्री. आनंद उपाध्ये, नागोठणे, जि. रायगड.

भोळ्या भावाने श्री गुरूंचे मन जिंकणारे सनातनचे ५१ वे संतरत्न पू. जयराम जोशी यांचा प.पू. डॉक्टरांवरील अतूट श्रद्धेच्या बळावर शीघ्र गतीने झालेला साधनेचा प्रवास !

पू. जयराम जोशीआजोबा
      सनातनचे संत पू. जयराम जोशी यांनी भोळा भाव आणि प.पू. डॉक्टरांवरील अतूट श्रद्धा या बळावर शीघ्रातीशीघ्र गतीने आध्यात्मिक उन्नती केली. वर्ष २०१० पर्यंत ते गृहस्थाश्रमातील कर्तव्ये पूर्ण करत होते आणि पत्नीचे अकस्मात् निधन झाल्यामुळे ते रामनाथी आश्रमात रहाण्यास आले. सात्त्विक, सेवाभावी वृत्ती अन् आज्ञापालन या गुणांद्वारे त्यांनी केवळ ८ - ९ मासांत (वर्ष २०११ मध्ये) ६१ टक्के आध्यात्मिक पातळी प्राप्त केली. भोळ्या भावाने श्री गुरूंचे मन जिंकणार्‍या पू. आबांनी वर्ष २०१५ च्या गुरुपौर्णिमेला संतपदही प्राप्त केले आणि सनातनच्या संतांच्या मांदियाळीत ५१ वे संतरत्न म्हणून ते सन्मानित झाले. 
     पुढे दिलेला साधक ते संत हा त्यांचा साधनाप्रवास कु. प्रियांका लोटलीकर यांनी उलगडला आहे. यातून पू. जोशीआबांच्या अनेक गुणांचा परिचय होतो, तसेच कठीण प्रसंगी ईश्‍वरावरील निष्ठा कशी अतूट असली पाहिजे, हेही शिकायला मिळते.
      काल आपण पू. आजोबांच्या आयुष्यातील काही प्रसंग पाहिले आज आपण त्यांच्या साधनेतील अनुभूती पाहूया.

घरी आणलेले श्रीफळ पांढरे होण्यासंदर्भात आलेल्या अनुभूती !

१. अनुमाने एक मासापूर्वी घरी आणलेले श्रीफळ पांढरे होत असल्याचे जाणवणे : अनुमाने एप्रिल २०१६ च्या शेवटच्या आठवड्यात मी २ - ३ श्रीफळ आणले होते. मी त्यातील २ श्रीफळ वापरले; परंतु काही कारणाने एक श्रीफळ न वापरता तसेच राहिले. या कालावधीत माझे २ - ३ वेळा या श्रीफळाकडे लक्ष गेले. तेव्हा ते पांढरे होत असल्याचे जाणवले. त्या वेळी हे काहीतरी वेगळे आहे, असा विचार येऊन मी ते न वापरता तसेच ठेवले.
२. पंधरा दिवसांपासून श्रीफळाचा पांढरेपणा वाढला असून त्याला चकाकी येणे : मागील पंधरा दिवसांपासून त्याचा पांढरेपणा वाढला असून त्याला चकाकी आली आहे. श्रीफळ पांढरे होण्याला शेंडीपासून आरंभ होऊन आता त्याची एकेक बाजू पांढरी होत आहे.

पू. (सौ.) सुशीला मोदी (सासूबाई) यांच्या संतत्वाचा लाभ करून स्वतःमध्ये पालट करण्यासाठी प्रयत्न करणार्‍या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. राखी मोदी !

सौ. राखी मोदी
        जोधपूर येथील सनातनच्या साधिका पू. (सौ.) सुशीला मोदी (भाभी) यंदाच्या (वर्ष २०१६ च्या) गुरुपौर्णिमा महोत्सवामध्ये संतपदी विराजमान झाल्याचे घोषित झाले. या महोत्सवाच्या सेवेच्या निमित्ताने आम्हाला त्यांच्या घरी रहाण्याचा योग आला. गेल्या वर्षीच्या गुरुपौर्णिमेलाही आम्ही जोधपूरलाच होतो; पण गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या गुरुपौर्णिमेत त्यांची धाकटी सून सौ. राखी मोदी यांच्यात आंतरिक पालट झाल्याचे जाणवले. पू. सुशीलाभाभी यांच्याविषयीच्या भावामुळे त्यांच्यात हा पालट झाल्याचे जाणवले. त्यांच्यात झालेल्या पालटाविषयीची काही सूत्रे येथे देत आहे. 
१. गुरुसेवेतील सहभाग वाढणे 
      गेल्या वर्षी गुरुपौर्णिमेच्या बैठकीत त्यांचा सहभाग अत्यंत अल्प होता. त्या बैठकीत असल्या, तरी त्यांच्या मनात दुसरेच विचार चालू आहेत, असे जाणवायचे. त्या वेळी त्यांना सांगूनही त्या स्वतःच्या स्थितीत पालट करण्याच्या मनस्थितीत नव्हत्या. या वेळी मात्र बैठकीत त्यांचा उत्साह आणि सहभागही अधिक होता. गेल्या वेळी केवळ स्वतःला दिलेली सेवा परिपूर्ण करायची, असा त्यांचा संकुचित विचार होता; परंतु या वेळी स्वतःची सेवा करण्यासह आणखी दायित्व स्वीकारण्यासही त्यांची सिद्धता होती.

वाढदिवसाच्या निमित्ताने साधकाने गुरुचरणी केलेले आत्मनिवेदन

श्री. संदीप जगताप
माझे परमप्रिय प.पू. डॉक्टर, 
     मनात आलेले विचार आपल्या चरणी अर्पण करूया, या विचाराने ते केवळ शब्द उरले नाहीत, तर शब्दसुमनांजली झाले आणि आपल्या कोमल चरणी अर्पण होण्यास आतूर झाले. तीच शब्दसुमनांजली निवेदनरूपाने आपल्या चरणी अर्पण करण्याचा आपणच करवून घेतलेला एक प्रयत्न ! 
१. प्रत्येक कृतीतून प.पू. गुरुमाऊलीची कृपा साध्य 
करण्यासाठी केलेली प्रार्थना !
     प.पू. गुरुमाऊली, माझा जन्म हा केवळ आपल्या चरणी येण्यासाठी झाला आहे. 
प्रत्येक क्षण आपणास अनुभवण्यासाठी, 
प्रत्येक श्‍वास आपले चैतन्य ग्रहण करण्यासाठी,
प्रत्येक कटाक्ष आपले तेजस्वी आणि मनमोहक रूप मनात साठवण्यासाठी, 
प्रत्येक विचार आपल्या चिंतनासाठी आणि
प्रत्येक पाऊल आपल्या चरणांच्या दिशेने टाकण्यासाठी आहे, 
ही जाणीव वृद्धींगत होऊ दे !

रामनाथी आश्रमात येण्यापूर्वीची साधकाची मनःस्थिती आणि आश्रमात आल्यावर त्याला आलेल्या अनुभूती

१. साधनेचे प्रयत्न अल्प असल्याने अधिवेशनाला जाण्याचे रहित होईल, असे विचार मनात येणे

      गुरुमाऊली, मी काय सांगणार आणि लिहिणार ? माझ्यात स्वभावदोष आणि अहं असतांनाही ५ व्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाला माझे येण्याचे ठरले. तेव्हा माझे साधनेचे प्रयत्न चांगले होत नसल्याने माझ्या मनाची स्थिती चांगली नव्हती. त्यामुळे माझे जाणे रहित करतील, असे मला शेवटच्या क्षणापर्यंत वाटत होते. 
२. आश्रमात आल्यावर मनातील अयोग्य विचारांकडे लक्ष देऊन ते पालटण्यासाठी प्रयत्न करणे
       गुरुदेवा, रामनाथीला आल्यावर तुमच्या कृपेमुळे मी स्वतःच्या मनाकडे लक्ष देण्याचा प्रयत्न केला. माझे मन पुष्कळ दूषित आहे हो ! प्रत्येक साधकाविषयी मला प्रतिक्रिया येत होत्या. तेव्हा त्यांच्यामध्ये तुमचे रूप पहायला मी विसरलो. भाव ठेवणे आणि नामजप करणे होत नसल्याने मी त्यासाठी प्रयत्न केले आणि साधकांशी मनमोकळेपणाने बोलण्याचाही प्रयत्न केला.

स्वत:च्या आणि अन्य बालसाधकांच्या चुका प्रामाणिकपणे सांगणारी ५३ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली अन् उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली इंदूर, तेलंगणा येथील कु. झाँसी राघवपूरम् (६ वर्षे) !

उच्चलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र 
चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. झाँसी राघवपूरम् ही एक दैवी बालिका आहे !
कु. झाँसी राघवपूरम्
      धनत्रयोदशी (२८.१०.२०१६) या दिवशी कु. झाँसी राघवपूरम् हिचा तिथीनुसार वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिची आई आणि वडील यांना तिची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये देत आहोत.
कु. झाँसी राघवपूरम् हिला वाढदिवसानिमित्त 
सनातन परिवाराच्या वतीने शुभाशीर्वाद !
१. गुणवैशिष्ट्ये 
१ अ. जिज्ञासा : झाँसीमध्ये जिज्ञासा आहे. मनात शंका आल्यावर ती त्याविषयी विचारून घेते. प्रत्येक कृती विचारून करण्याचा प्रयत्न करते.

इतरांना साहाय्य करणारी आणि प.पू. डॉक्टरांप्रती भाव असणारी ६३ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली अन् महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली कळवा, ठाणे येथील चि. मैथिली स्वप्नील नाटे (वय ३ वर्षे) !

उच्चलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र 
चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. मैथिली स्वप्नील नाटे ही एक दैवी बालिका आहे !
चि. मैथिली नाटे
     (चि. मैथिली हिची वर्ष २०१४ मध्ये ६१ टक्के आध्यात्मिक पातळी होती. - संकलक)
    धनत्रयोदशी (२८.१०.२०१६) या दिवशी चि. मैथिली नाटे हिचा तिथीनुसार वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिची आई आणि आजोबा यांना तिची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये देत आहोत.
चि. मैथिली नाटे हिला वाढदिवसानिमित्त 
सनातन परिवाराच्या वतीने शुभाशीर्वाद !
१. देवाची ओढ 
१ अ. खेळायचे सोडून देवपूजा करणे : मैथिलीचे बाबा देवपूजा करत असतांना ती दूध पीत असल्यास किंवा खेळत असल्यास ते सोडून ती पूजेची भांडी घासणे, देवपूजा करणे यासाठी साहाय्य करण्यास येते. ती हे सर्व आनंदाने करते. - सौ. ऋतुजा स्वप्नील नाटे (मैथिलीची आई)

व्यक्तीच्या जीवनातील गुरूंचे महत्त्व !

     राजा नृग हा सरडा बनला. राजा अज हा बुद्धिमान होता; पण तो मृत्यूनंतर साप झाला. तसेच अमेरिकेचे माजी राष्ट्रपती अब्राहम लिंकन हे मानवतावादी होते, मला त्यांच्याविषयी प्रेमही आहे. त्यांची प्रसिद्धी करणार्‍या संस्था मला तेथे घेऊन गेल्या आणि मी तेथे गेलोसुद्धा; पण ते बिचारे अजूनही व्हाइट हाऊसमध्ये लिंगदेह बनून फिरत आहेत; कारण त्यांचे जीवन हे गुरुविना होते. - पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू (ऋषिप्रसाद, फेब्रुवारी २०१५)

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
देवाकडे ऐहिक सुख मागू नये
मुलाने विष मागितले, तरी आई आणि डॉक्टर त्याला विष देत नाहीत. तसेच देवही ऐहिक सुख देत नाही; कारण त्याला ठाऊक असते की, हे त्याला पेलवणार नाही. म्हणून देवाकडे भीक (ऐहिक सुख) मागण्यात अर्थ नाही.
भावार्थ : देव, म्हणजे गुरु, हे देवापासून दूर नेणारे ऐहिक सुख देत नाहीत. देवापासून दूर जाणे हे साधकाच्या दृष्टीने मरणच होय; म्हणून ऐहिक सुख हे विषासमान मानले आहे.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
पोलीस आणि न्याययंत्रणा यांवर कोट्यवधी रुपये उधळणारे सर्वपक्षीय शासनकर्ते त्याची फलनिष्पत्ती काय, हे जनतेला कळू देत नाहीत, हे लक्षात घ्या !
 - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

गुरुचरणी अनुसंधान !

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...
परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले
हे कृष्णा (गुरुदेवा) । 
निसर्गात तू, आश्रमात तू । 
अंत:करणातील लाटाही तू । 
हृदयी माझ्या असतोस तू ॥ १ ॥ 

पेशीपेशींत तुझाच निवास । 
माझा श्‍वास हा तुझाच श्‍वास । 
आता काय उरले तुला देण्यास । 
माझ्या समवेत आहे तुझाच प्रवास ॥ २ ॥

घेऊनी ये परत तुझ्या सहवासात । 
शरीर जरी थकले, तरी मनाला दे उभारी । 
जे होणार ते होऊ दे तुझ्या समोरी । 
आपल्या चरणी कोटी कोटी वंदन ॥ ३ ॥ 

- चरणसेविका, एक साधिका, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.१०.२०१६)
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

बुद्धीवाद संपल्यावर ईश्‍वरी शक्तीच्या उत्क्रांतीचा उगम होणे 
बुद्धीवादाच्या मर्यादा जेथे संपतात, तेथेच ईश्‍वरी शक्तीच्या 
उत्क्रांतीचा उगम होतो. इथेच मनुष्य आध्यात्मिक विचार करू लागतो.
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

फितुरांचे जाळे !

संपादकीय
     भारतातील पाकचे उच्चायुक्तालय हे भारतविरोधी कारवायांचा अड्डा आहे, याचा आणखी एक पुरावा समोर आला आहे. तेथील अधिकारी महंमद अख्तर याची भारतविरोधी कारवाया करत असल्याच्या प्रकरणात चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्याला भारत सोडण्याचा आदेश देण्यात आला. सीमा सुरक्षा दलाच्या हालचालींविषयी गोपनीय माहिती तो पाकची गुप्तचर संघटना आय.एस्.आय.ला पाठवत होता. मागील वर्षीही पाक उच्चायुक्तालयातील भारतविरोधी कारवाया करणार्‍या अधिकारी-कर्मचार्‍यांचे रॅकेट भारतीय अन्वेषण यंत्रणेने उघडकीस आणले होते.

इस्रायलची पॅलेस्टाईनला चेतावणी !

संपादकीय
      पॅलेस्टाईनने जर इस्रायलच्या विरोधात युद्ध केले, तर ते युद्ध त्यांच्यासाठी शेवटचे युद्ध ठरेल, अशी चेतावणी इस्रायलने दिली आहे. इवलासा दिसणारा हा इस्रायल देश, पण जिद्द केवढी ? केवढे हे धाडस आणि काय ही महत्त्वाकांक्षा ! धैर्याने पुरेपूर भरलेल्या शब्दांतून दिलेली ही चेतावणी वाचकाचाही क्षात्रभाव जागृत करते. पॅलेस्टाईन आणि इस्रायल या दोन देशांतील संघर्ष कित्येक वर्षांपासून चालू आहे. इस्रायलने व्यापलेल्या प्रदेशावर पॅलेस्टाईन स्वतःचा अधिकार सांगत असतो आणि त्या सूत्रावरूनच त्यांचे कित्येक वर्षांपासूनचे मतभेद आणि संघर्ष चालू आहेत. दुसर्‍या महायुद्धानंतर मित्रराष्ट्रांनी जगभर विखुरलेल्या ज्यू लोकांना त्यांचे राष्ट्र उभारण्यासाठी दिलेली जागा म्हणजे इस्रायल.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn